Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कराड येथील मुख्याधिकार्‍यांनी गणेशमंडळांवर लादलेल्या निर्बंधांच्या विरोधात गणेशभक्तांचा भव्य मोर्चा

  • श्री गणेशाच्या आगमनापूर्वी गणेशभक्तांना असा मोर्चा काढावा लागणे याहून दुसरे दुर्दैव कुठले ?
  • गणेशोत्सव आनंदात साजरा करता यावा, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !
      कराड - येथील मुख्याधिकार्‍यांनी गणेशमंडळांवर लादलेल्या निर्बंधांच्या विरोधात कराड येथील गणेशभक्तांनी प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. मोर्च्याचे नेतृत्व हिंदु एकता आंदोलनाचे पश्‍चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि कराड नगरसेवक श्री. विनायक पावसकर यांनी केले. मुख्याधिकार्‍यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पुढे करत गणेशमंडळांनी वाहतुकीसाठी रस्त्यावर जागा सोडावी, असे सांगत गणेशमंडळांना नोटिसा बजावल्या आहेत. त्या अनुषंगाने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुरोगामी कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्याकडून जेएन्यूमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार !

जेएनयूमध्ये साम्यवादी विद्यार्थी संघटनेचे 
कार्यकर्ते शारीरिक संबंध ठेवतात, या भाजपच्या 
नेत्याच्या आरोपाला या घटनेतून पुष्टीच 
मिळते ! या घटनेवर पुरोगामी तोंड उघडतील का ?
        नवी देहली - देहलीतील जवाहरलाल नेहरु विद्यापिठात (जेएन्यूमध्ये) इंडिया स्टुडंट्स असोसिएशन या साम्यवाद्यांच्या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता अनमोल रतन याने या विद्यापिठातील एका विद्यार्थिनीवर तिला पेयातून गुंगीचे औषध पाजून बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. ही तरुणी जेएन्यूमध्ये पीएच्डीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
        पीडित तरुणी म्हणाली, मला सैराट चित्रपट पहायचा होता. त्यासाठी सामाजिक संकेतस्थळावर मी अनेकांकडे या चित्रपटाविषयी चौकशी केली. अनमोलने आपल्याकडे हा चित्रपट आहे, हवा असेल तर वसतीगृहातील खोलीत येऊन घेऊन जा, असे सांगितलेे. त्यानंतर त्याने पेन ड्राईव्हमधून चित्रपटाची कॉपी घेऊन जाण्यास सांगितले. त्याच्यासमवेत वसतीगृहातील खोलीत गेल्यावर त्याने पेयातून गुंगीचे औषध दिले आणि बलात्कार केला. अनमोलला या घटनेनंतर विद्यार्थी संघटनेतून काढून टाकण्यात आले आहे.

गोरक्षकांनी न भीता कार्य चालू ठेवावे, आमच्या २५ अधिवक्त्यांच्या संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे ! - अधिवक्ता राजू गुप्ता, उच्च न्यायालय, मुंबई

गोरक्षण आणि काश्मीरमधील सैन्याला 
सर्वाधिकार मिळावेत, या मागण्यांसाठी कळंबोली येथे 
समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन 
         नवी मुंबई, २२ ऑगस्ट (वार्ता.) - गोहत्या बंदी कायद्याचा काहीच उपयोग नाही. पोलीस आणि प्रशासन यांच्या संगनमताने आजही गोतस्करी आणि गोहत्या होतात. पोलीस पैसे घेऊन कसायांना निर्दोष सोडतात. गोरक्षकांवर खोटे खटले प्रविष्ट केले जातात. असे कितीतरी खटले आम्ही आज चालवत आहोत. मोदी यांच्या विधानाने गोरक्षकांवर कुर्‍हाडच कोसळली आहे. आमची २५ अधिवक्त्यांची संघटना गोरक्षकांना सर्व कायदेशीर सहकार्य करत आहे. पुढेही गोरक्षकांनी न भीता हे कार्य चालू ठेवावे. आमचा सर्व अधिवक्त्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल, अशी ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता राजू गुप्ता यांनी दिली. कळंबोली येथील आंदोलनात उपस्थित हिंदुत्ववाद्यांना मार्गदर्शन करतांना अधिवक्ता राजू गुप्ता बोलत होते.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील संत प.पू. पांडे महाराज यांच्या पत्नी सौ. आशा पांडेआजी यांचे निधन

सौ. आशा पांडेआजी
       देवद, २२ ऑगस्ट (वार्ता.) - येथील सनातनच्या आश्रमातील संत प.पू. परशराम पांडे महाराज यांच्या पत्नी सौ. आशा पांडेआजी यांचे २२ ऑगस्ट २०१६ ला सकाळी ९.३० वाजता महात्मा गांधी मिशन रुग्णालयामध्ये निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती. दोन दिवसांपासून त्यांचा दम्याचा आजार बळावला होता. २२ ऑगस्टला सायंकाळी पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र श्री. अमोल पांडे यांनी त्यांना अग्नी दिला. या वेळी प.पू. पांडे महाराज आणि त्यांचे आप्तजन, तसेच सनातनचे साधक उपस्थित होते.
       सौ. पांडेआजी यांच्या पश्‍चात् पती प.पू. पांडे महाराज, पुत्र श्री. अमोल पांडे, स्नुषा सौ. देवयानी पांडे आणि दोन नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार प.पू. पांडे महाराज यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

(म्हणे) आम्ही केवळ गोरक्षणासाठी मत मागितले नाही ! - हंसराज अहिर, केंद्रीय गृहराज्यमंत्री, भाजप

         पणजी, २२ ऑगस्ट (वार्ता.) - केवळ गोरक्षण याच विषयावर आम्ही निवडून आलेलो नाही. आम्ही केवळ गोरक्षणासाठी मत मागितले, हे खरे नाही. गायीला आम्ही गोमाता मानतो. जिथे शक्य आहे तिथे आम्ही गोहत्या बंदी कायदा आणला आहे, असे मत केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केले. ते गोवा भेटीवर आले होते.
         पंजाब गोरक्षा दलाचे अध्यक्ष प्रधान यांच्यावर कारवाई केल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने भाजप शासनावर टीका केली आहे. भाजपने गोरक्षणासाठी मत मागितले होते. याविषयी काय म्हणायचे आहे ?, असा प्रश्‍न एका पत्रकाराने विचारल्यावर हे उत्तर गृहराज्यमंत्र्यांनी दिले. मंत्री अहिर म्हणाले, आम्ही महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा आणला आहे. काही गोरक्षकांकडून गोसेवा होते; मात्र काही गोरक्षक कायदेबाह्य गोष्टी करत आहेत. अशांवर त्या राज्यातील शासन कायद्यानुसार कारवाई करते. गोहत्या करणार्‍यांवर अवश्य कारवाई झाली पाहिजे; मात्र त्यासाठी कायदा आहे. गोरक्षकांनी कायदा हातात घेऊ नये. गोमांसाची निर्यात ही पूर्वीपासून होत आहे. आमच्या काळात ती वाढलेली नाही.

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथे गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यासाठी प्रशासन आणि शासन यांना निवेदने

कल्याण

ठाणे महापौर

ठाणे आमदार

        ठाणे - कृत्रिम हौदाऐवजी धर्मशास्त्राप्रमाणे वाहत्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात यावे, यासंदर्भातील निवेदन ठाणे येथील आमदार श्री. संजय केळकर आणि महापौर श्री. संजय मोरे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कल्याण-डोंबिवलीचे महापौर श्री. राजेंद्र देवळेकर यांनाही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

पंढरपूर येथील संत पू. विनायक (भानुदास) केशव विप्र महाराज यांचा देहत्याग !

पू. विनायक विप्र
          पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २२ ऑगस्ट (वार्ता.) - पंढरपूर येथील विप्र दत्त मंदिराचे सेवेकरी पू. विनायक (भानुदास) केशव विप्र महाराज (वय ८८ वर्षे) यांनी रविवार, २१ ऑगस्ट २०१६ ला उत्तररात्री ३ वाजता मुंबईतील खारघर येथील त्यांच्या मुलाच्या निवासस्थानी देहत्याग केला. त्यांच्या पश्‍चात् पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सोमवार, २२ ऑगस्टला दुपारी १ वाजता त्यांच्यावर खारघर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सनातन परिवार पू. विप्र महाराज कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
पू. विप्र महाराज यांचा परिचय
          पू. विप्र महाराज यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील अंजनवनी हे आहे. वर्ष १९५१ मध्ये पू. विप्र महाराज यांची प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक झाली. तेव्हा त्यांनी शालांत परीक्षा (मॅट्रीक) उत्तीर्ण केली होती. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी घरी अभ्यास करून एम्.ए. (संस्कृत) पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले. वर्ष १९८४ ते १९८८ या कालावधीत ते श्रीवर्धन (जिल्हा रायगड) येथे गटशिक्षणाधिकारी होते.

बौद्धांच्या अत्याचारांमुळे भूतानमधून ५३ सहस्र हिंदूंनी घेतला अमेरिकेत आश्रय !

भूतानमधील अत्याचारग्रस्त हिंदूंनी भारताकडे न येता अमेरिकेत आश्रय घेतला, याचा अर्थ भारतात 
हिंदूंसाठी अनुकूल वातावरण नाही, असे म्हणायचे का ? या अन्यायग्रस्त हिंदूंना भारत सरकार काय 
साहाय्य करणार आहे ?
      वॉशिंग्टन - १९९० च्या दशकात भूतानमध्ये वन नेशन, वन पीपल आंदोलन राबवण्यात आले. या आंदोलनात बौद्धांनी केलेल्या अत्याचारांमुळे येथील ५० सहस्रांहून अधिक हिंदूंनी भूतान सोडून अमेरिकेत आश्रय घेतला होता. एका सर्वेक्षणानुसार अद्यापही ५३ सहस्रांहून अधिक हिंदु शरणार्थी अमेरिकेत रहात आहेत.
१. पीईडब्लू रिसर्चच्या अनुसार वर्ष २००५ पासून या वर्षीच्या ऑगस्ट पर्यंत ५३ सहस्र ६६२ हिंदूंनी अमेरिकेत आश्रम घेतला. यात केवळ भूतानमधील ५३ सहस्र १५ विस्थापितांचा समावेश होता.
२. अमेरिकेत भूतानशिवाय श्रीलंकेतून ३८३, नेपाळमधून १४४, म्यानमारमधून ९५, भारतातून ११, पाकमधून ६, व्हिएतनाममधून ५, बांगलादेशातून २ आणि कंबोडियामधून एक हिंदू यांनी आश्रम घेतला.
३. वर्ष २०१६ मध्ये २८ सहस्र ९५७ मुसलमान अमेरिकेत स्थायिक झाले, तर याच कालावधीत २७ सहस्र ५५६ ख्रिश्‍चन स्थायिक झाले.
४. बौद्ध देश असलेल्या भूतानमध्ये हिंदूंच्या विरोधात वर्ष १९९० पासूनच अत्याचारांना प्रारंभ झाला होता. शेवटी तेथील सहस्रो हिंदूंनी स्वदेश सोडून अमेरिकेचा आश्रय घेतला.


भारताला गांधींनी नाही, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले ! - बीबीसी

निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनीही आपल्या पुस्तकातून दिला दुजोरा !
      नवी देहली - बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) या इंग्लंडच्या वृत्तवाहिनीच्या मते भारताला गांधींनी नाही, तर नेताजी बोस यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले. बीबीसीचा हा खुलासा अशा वेळी आला, जेव्हा भारताने स्वातंत्र्यानंतर ७० व्या वर्षात पदार्पण केले आहे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधित २०० धारिका केंद्रशासनाने सार्वजनिक केल्या आहेत. (काँग्रेसने जनतेमध्ये गांधींमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, असा खोटा आणि स्वार्थी प्रचार करून क्रांतीकारक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बलीदानाचे मूल्य शून्य केले. अशा राष्ट्रद्रोही काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी आता जनतेने मतपेटीद्वारे त्यांना धडा शिकवावा ! - संपादक)

हिंदुत्ववाद्यांच्या सुटकेसाठी अमरावती शहरात व्यापक आंदोलनाची आवश्यकता ! - श्री. नितीन व्यास, भगवा सेना

अमरावती येथे हिंदु ऐक्य मेळाव्याचे आयोजन 

मेळाव्याला उपस्थित धर्माभिमानी

         अमरावती, २२ ऑगस्ट - ३१ ऑगस्टला पूज्यपाद संतश्री आसारामजी बापूंना अटक होऊन ३ वर्षे पूर्ण होत असून अजून त्यांची सुटका झालेली नाही. तसेच साध्वी प्रज्ञासिंग, धनंजय देसाई आणि सनातनचे साधक यांचीही सुटका होत नसल्याने अमरावती शहरात व्यापक आंदोलन व्हायला हवे. तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपण सर्वांनी प्रभु श्रीरामाचे हनुमंत व्हायला हवे, असे प्रतिपादन भगवा सेनेचे श्री. नितीन व्यास यांनी केले. अमरावती येथे २१ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु ऐक्य मेळाव्यात ते बोलत होते.

उत्तरप्रदेशात भाजपच्या भित्तीपत्रकांवर नेहरूंना स्थान, तर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वर्ज्य !

गांधींएवढ्याच नेहरूंनी घोडचुका करून देशाला विनाशाच्या 
खाईत लोटले असतांना त्यांचा उदोउदो कशाला ?
     बाराबंकी (उत्तरप्रदेश) - नुकत्याच पार पडलेल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपकडून येथे काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेतील भित्तीपत्रकांवर जवाहरलाल नेहरू यांना मुख्य स्थान देण्यात आले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे आता मोहनदास गांधींनंतर नेहरू भाजपसाठी आदर्श नेते झाले आहेत का ?, असा प्रश्‍न विचारला जात आहे. या भित्तीपत्रकांमध्ये लाल बहाद्दूर शास्त्री यांनाही स्थान देण्यात आले आहे. तथापि भाजप ज्यांना आदर्श मानतो त्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना मात्र या भित्तीपत्रकांतून वगळण्यात आले आहे. भाजपकडे एकही आदर्श नेता नसल्यामुळे त्यांना काँग्रेसच्या नेत्यांशिवाय पर्याय नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे.(म्हणे) काश्मीर भारताचा अंतर्गत प्रश्‍न नाही ! - इस्लामिक सहकार्य संघटना

इस्लामी राष्ट्रांचे पाकप्रेम ! भारताने सर्व इस्लामी देशांना कठोर शब्दांत 
काश्मीरच्या प्रकरणी नाक न खुपसण्याची चेतावणी दिली पाहिजे !
५७ इस्लामी देशांच्या संघटनेचे काश्मीरप्रकरणी पाकला समर्थन !
      नवी देहली - इस्लामिक सहकार्य संघटना या ५७ इस्लामी देशांच्या संघटनेचे सरचिटणीस इयाद अमीन मदनी यांनी म्हटले आहे की, काश्मीरमधील मानवाधिकारांचे उल्लंघ हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न नाही. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी पाकचे परराष्ट्रासंदर्भातील नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अजीजही उपस्थित होते. ओआयसी ही इस्लामी देशांची सर्वांत मोठी संघटना आहे. काश्मीरमधील हिंसाचारावरून पाक गेल्या काही दिवसांपासून इस्लामी देशांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगानेच या संघटनेने पाकला समर्थन दिले आहे.
     मदनी पुढे म्हणाले की, काश्मीरमधील परिस्थिती उत्तरोत्तर बिघडत चालली आहे. यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष दिले पाहिजे. काश्मीर समस्या राजकीय स्तरावर सोडवली पाहिजे. काश्मीरमधील स्थिती सार्वमत घेण्याच्या दिशेने जात आहे. ओआयसी याप्रकरणी एक विशेष सल्लागार आणि संपर्क गट बनणार आहे. हा गट अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य सभेत काश्मीरचे सूत्र उपस्थित करील.सौदी अरेबियात भारतीय महिलांची होत आहे विक्री !

स्त्रियांच्या अधिकारांच्या नावावर हिंदूंच्या विरोधात गरळओक करणार्‍या संघटना आता गप्प का ?
     नवी देहली - भारतातून अनेक भारतीय लोकांना मोठ्या पगाराच्या नोकर्‍यांचे प्रलोभन देऊन अरब देशांमध्ये पाठवण्यात येते; मात्र तेथील वास्तव निराळेच असल्याचे समोर आले आहे. तेथे भारतीय महिलांची दुकानातील वस्तूंप्रमाणे विक्री होत असून सौदी अरेबियामध्ये ४ लाख, तर बहरीन, कुवेत आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये २ लाख रुपयांपर्यंत महिलांना विकले जात आहे.
      मागील काही वर्षांपासून भारतातून विशेषत: आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्यांतून महिला-पुरुष मोठ्या प्रमाणात रोजगाराकरता सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, कतार, संयुक्त अरब अमिरात इत्यादी अरब देशांमध्ये जात आहेत. या देशांमध्ये सध्या अनुमाने ६० लाख भारतीय काम करत आहेत. अरब देशांमध्ये होणार्‍या भारतीय महिलांच्या विक्रीच्या संदर्भात आंध्रप्रदेशचे मंत्री पी. रघुनाथ रेड्डी यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात भारत सरकारने अरब देशांतील पीडित महिलांना आवश्यक कागदपत्रे आणि सुविधा पुरवून भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली आहे.मुसलमान आयपीएस् अधिकार्‍यांमध्ये घट, तर आयएएस् अधिकार्‍यांमध्ये वाढ !

      नवी देहली - जानेवारी २०१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस्) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस्) यांतील अधिकार्‍यांमध्ये मुसलमानांची संख्या ३ टक्के आहे. जानेवारी २०१६ पर्यंत ३.१९ टक्के म्हणजे एकूण ३ सहस्र ७५४ आयपीएस् अधिकार्‍यांपैकी १२० मुसलमान अधिकारी आहेत. वर्ष २००६ मध्ये ही संख्या ४ टक्के म्हणजे ३ सहस्र २०९ मध्ये १२८ अधिकारी होते. म्हणजचे यात काही प्रमाणात घट झाली आहे. आयएएस् अधिकार्‍यांमध्ये मुसलमानांची संख्या थोडी वाढलेली आहे. देशातील एकूण ४ सहस्र ९२६ आयएएस् अधिकार्‍यांपैकी १६४ मुसलमान अधिकारी आहेत. वर्ष २००६ मध्ये ही संख्या ९६ इतकी होती.

गुगलने भारताचा वादग्रस्त नकाशा पालटला !

      नवी देहली - गुगलने त्याच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दाखवणे चालू केले आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्यास १०० कोटी रुपये दंड ठोठावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गुगलने हा पालट केला आहे.
    गुगलने वादग्रस्त नाकाशांच्या संदर्भात डोमेनमध्ये पालट केला. त्यानुसार भारतात गूगलवर नकाशा पाहिल्यास पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसेल, तर पाकिस्तान्यांना तो पाकमध्ये दिसणार आहे. अरुणाचल प्रदेशावरून भारत आणि चीन या देशांमध्ये फार पूर्वीपासून वाद आहे. (मुळात देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या अशा सूत्रांवर आजपर्यंतच्या सर्वपक्षीय राजकारण्यांनी कठोर भूमिका न घेतल्यानेच अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यकर्त्यांच्या या नाकर्तेपणामुळेच देशाच्या सीमांचे प्रश्‍न अनुत्तरित राहिले. हिंदु राष्ट्रात अर्थात् सनातन धर्म राज्यात या सर्व प्रश्‍नांवर कायमस्वरूपी उपाययोजना काढण्यात येईल ! - संपादक) हा वादही गूगलने त्याच्या पद्धतीने सोडवला आहे. आता चिन्यांना गूगलच्या नकाशात अरुणाचलचा वादग्रस्त भाग त्यांच्या समवेत, तर भारतियांना भारताच्या हद्दीत पहायला मिळेल. गुगलच्या चुकीच्या नकाशा दाखवण्यावर भारतीयही नाराज होते.

भारतीय सैन्याकडून म्यानमारची सीमा पार करून कारवाई !

      नवी देहली - नागालॅण्ड येथील म्यानमारची सीमा पार करून भारतीय सैनिकांनी आतंकवादी संघटना एन्एस्सीएन् (खापलांग)च्या तळावर आक्रमण केले. अशा प्रकारची कारवाई यापूर्वी काही वेळा करण्यात आली आहे. गेल्या जून मासातही अशी कारवाई करण्यात आली होती; मात्र याची माहिती सार्वजनिक केली जात नाही, असे गृहमंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या कारवाईच्या वेळी भारताचे ६ कमांडो ठार झाले, असा दावा एन्एस्सीएन् (खापलांग) संघटनेने केला आहे; मात्र भारताने तो फेटाळून लावला आहे.

कोची, केरळ येथे रामायण मासम् कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्तीचा सत्कार !

       कोची (केरळ) - केरळमध्ये हिंदूंकडून रामायण मासम् (रामायण मास) मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने विविध जिल्ह्यांमध्ये सलग ३० दिवस रामायणाच्या पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने एलमक्करा येथे आयोजित रामायण पारायणातील ३ दिवस हिंदु जनजागृती समितीकडून धर्माचरण, नामजपाचे महत्त्व, देवालय दर्शन या विषयांवर प्रवचने करण्यात आली. त्यानिमित्ताने १४ ऑगस्ट या दिवशी झालेल्या विश्‍व हिंदु परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात अभिनेत्री कु. जानकी कृष्णन् यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या कु. अदिती सुखटणकर यांचा सत्कार करण्यात आला.

ट्विटरवर जुलै २०१६ मध्ये प्रतिदिन इस्लामच्या विरोधात ७ सहस्र ट्विट्स !

      लंडन - इंग्लंडच्या डेमोस आस्थापनाच्या सेंटर फॉर दी अनालिसिस ऑफ सोशल मीडिया या केंद्राने नुकतेच सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार जुलै २०१६ मध्ये फ्रान्समधील नीस शहरात झालेल्या जिहादी आक्रमणानंतर ट्विटर या सामाजिक संकेतस्थळावर इंग्रजी भाषेत प्रत्येक दिवशी इस्लाम विरोधात ७ सहस्र ट्विट्स करण्यात आल्या. एप्रिल मासात अशाच ट्विट्सची संख्या २ सहस्र ५०० होती.

काश्मीरमधील कलम ३७० रहित करा ! - हिंदु सेवा परिषद

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेचा भव्य मशाल मोर्चा ! 
     जबलपूर (मध्यप्रदेश) - काश्मीरमधून कलम ३७० कलम रहित करावे आणि देशात समान नागरी कायदा लागू करावा, यासाठी हिंदु सेवा परिषदेच्या वतीने येथे नुकतीच एक भव्य मशाल यात्रा काढण्यात आली. हिंदु सेवा परिषदेचे अध्यक्ष श्री. अतुल जैस्वानी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्थानिक हनुमान मंदिरापासून या मशाल यात्रेचा प्रारंभ होऊन आधारतल येथील बिरसा मुंडा चौकात यात्रेचा समारोप करण्यात आला. या वेळी मोर्च्याला संबोधित करतांना परिषदेचे प्रसार प्रमुख म्हणाले, काश्मीरमुळे देशात अशांत वातावरण बनले आहे. काश्मीरमध्येही अन्य राज्यांप्रमाणेच कायदे असावेत.

पुडुचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी मंदिर-उत्सवात रथ ओढण्यात सहभागी

      पुडुचेरी - अनेक वर्षांपासून चालत आलेल्या प्रथेला मान देऊन पुडुचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी या वीरमपट्टीनम् गावातील प्रख्यात सेन्गाझुनीर अम्मा मंदिरातील उत्सवात रथ ओढण्यात सहभागी झाल्या. हा उत्सव प्रत्येक वर्षी तमिळ पंचांगानुसार आडी मासाच्या (जुलै-ऑगस्ट) पाचव्या शुक्रवारी साजरा करण्यात येतो. पुडुचेरीत फ्रान्सची वसाहत होती, तेव्हापासून या प्रथेला प्रारंभ झाला. यावर्षी उपराज्यपाल किरण बेदी यांच्यासह मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी आणि त्यांचे सहकारी मंत्रीही सहभागी झाले होते.

संताच्या आशीर्वादानेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! - डॉ. उपेंद्र डहाके, भाजप, कल्याण शहर उपाध्यक्ष

भांडुप येथील हिंदु जनजागृती 
समितीच्या हिंदूसंघटन मेळाव्यात 
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग 

डावीकडून सौ. नयना भगत, दीपप्रज्वलन
करतांना डॉ. उपेंद्र डहाके, बाजूला श्री. सुमित सागवेकर

         भांडुप, २२ ऑगस्ट (वार्ता.) - देशात आजही मोगलाई चालू आहे. मुघलांचे अत्याचार दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या पाठीशी त्यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी होते. शिवरायांच्या मुखात कुलदेवीचे नामस्मरण होते. त्यामुळेच त्यांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे धर्मकर्तव्य म्हणून राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी स्वत:चे तन, मन आणि धन अर्पण करायला हवे. संतांच्या आशीर्वादानेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असा ठाम विश्‍वास भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी व्यक्त केला. २१ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पराग विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर उपस्थित होते. मेळाव्याला बजरंज दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू राष्ट्र्रसेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शौर्य प्रतिष्ठान, श्री संप्रदाय आणि योग वेदांत सेवा समिती या संघटना अन् शिवसेना, भाजप या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांसह १६५ धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.

(म्हणे) गायीला माता म्हणण्याचा आदेश द्यायचा अधिकार यांना कोणी दिला ?

शरद पवार यांचे हिंदुद्वेषी वक्तव्य !
        पुणे - गायीला माता न म्हणणार्‍यांनी देश सोडून जावे, असे देशातील एका मुख्यमंत्र्याकडून ऐकायला मिळाले. गायीचा आदर आम्ही सर्वच जण करतो; पण आमच्या आईच्या जागी गायीला माता म्हणण्याचा आदेश द्यायचा अधिकार यांना कोणी दिला ? देश यांच्या मालकीचा आहे का, असा प्रश्‍न माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २१ ऑगस्ट या दिवशी केला. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. भाई वैद्य यांना त्रिदल या संस्थेच्या वतीने पवार यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला. या वेळी अध्यक्षपदावरून पवार बोलत होते.
        डॉ. भाई वैद्य या वेळी म्हणाले की, इसिसच्या रूपाने धर्मवादाचा धोका जगभर धुमाकूळ घालत आहे. भारतातही धर्माधिष्ठित राजकारणाची भूमिका मांडणारे लोक आहेत. जगभर भयानक विषमता निर्माण झाली आहे. या आव्हानांचा सामना तरुणांना करावा लागणार आहे. आर्थिक वितरण आणि जात निर्मूलनाचे कामही तरुणांना करायचे आहे. (इसिस आणि भारतातील धर्मनिष्ठांची तुलना करणे हास्यास्पद ! आज जगभरातील विचारवंत हिंदु धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतात येत आहेत; मात्र भारतातील तथाकथित विचारवंत मात्र धर्मनिष्ठांची तुलना इसिसशी करतात, हे दुर्दैवी ! - संपादक)

न्यायालयाच्या कक्षेत राहून मशिदीवरील भोग्यांच्या विरोधात तक्रार करता येईल - संतोष पाचलग

नवी मुंबई येथील हिंदू ब्रेन्स 
संघटनेचा व्याख्यानाच्या माध्यमातून 
हिंदूंच्या तेजोमय इतिहासाचा प्रसार ! 

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. संतोष पाचलग

         कोपरखैरणे, २२ ऑगस्ट - पक्ष, संघटना आणि संप्रदाय यांच्या भिंती ओलांडून एक हिंदु आणि देशाचा उत्तरदायी नागरिक म्हणून आचरण करावे. मशिदींवरील भोंग्यांद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाविषयी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाच्या कक्षेत राहून मशिदींवरील भोग्यांच्या विरोधात तक्रार करता येईल, असे प्रतिपादन प्रखर हिंदुत्ववादी श्री. संतोष पाचलग यांनी केले. येथील ज्ञानविकास संस्थेच्या शाळेत हिंदू ब्रेन्स या संघटनेच्या वतीने २१ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या गटचर्चा आणि व्याख्यानाच्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या व्याख्यानाला ४५ जिज्ञासू आणि धर्माभिमानी उपस्थित होते.

भारतीय लष्करात कराचीपर्यंत मजल मारण्याचे सामर्थ्य ! - केंद्रीय मंत्री उमा भारती

लष्कराचे हे सामर्थ्य जगाला ज्ञात असून त्याचा 
अवलंब करण्याविषयी उमा भारती यांनी सरकारला सांगावे !
        नागपूर, २२ ऑगस्ट - भारतीय लष्कराला मर्यादा आहेत. अन्यथा त्यांच्यात लाहोर आणि कराचीपर्यंत मजल मारण्याचे सामर्थ्य आहे. ते पाकिस्तानात शिरून तेथे तिरंगा फडकवू शकतात. आपणच सैन्य आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाला मर्यादा घालून दिल्या आहेत, असे मत केंद्रीय जलसंपदा आणि गंगानदी विकास खात्याच्या मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले. १८ ऑगस्ट या दिवशी त्यांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या तळाला भेट देऊन तेथील सैनिकांना राख्या बांधल्या. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
        काश्मीरमधील सध्याच्या हिंसक कारवायांविषयी बोलतांना त्या म्हणाल्या की, काश्मीरमध्ये सैनिक महिलांची छेड काढत असल्याचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. भारतीय लष्कराने कायमच महिलांचा आदर केला आहे. तेथील भरकटलेले युवक हे सैन्य आणि सुरक्षा दलाच्या सैनिकांवर दगडफेक करतात. याप्रसंगीही सैनिकांनी संयम बाळगला आहे. त्याचा अपलाभ घेणे योग्य नाही. या कार्यक्रमानंतर उमा भारती यांनी संघ मुख्यालयालाही भेट दिली.

देशात समान नागरी कायदा लागू करणे, हाच सर्वसमावेशक उपाय !

सरसंघचालकांच्या 
वक्तव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया !
       मुंबई - इतर धर्मीय लोक अनेक मुलांना जन्म देतात, तर हिंदूंना कोणी रोखले आहे ?, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच केले. त्यावर मोहन भागवत यांनी जुनाच बुरसटलेला विचार मांडला असून हे विधान सुसंस्कृत आणि पुरोगामी हिंदु समाजाला पचनी पडणारे नाही. भागवतांच्या या विधानामुळं सरसंघचालक तुम्ही सुद्धा ?, असा प्रश्‍न एखाद्याच्या मनात आला, तर त्याला काय उत्तर आहे ? हे विचार म्हणजे हिंदुत्वाला लागलेली जळमटे आहेत, अशी टीका शिवसेनेने दैनिक सामना या मुखपत्रातून केली आहे.
या लेखात पुढे म्हटले आहे,
१. असे विचार व्यक्त करण्यापेक्षा समान नागरी कायदा आणि सर्वांना सक्तीच्या कुटुंब नियोजनाचा आग्रह सरसंघचालक का धरत नाहीत ? साध्वी प्राची, साक्षी महाराज, प्रवीण तोगाडिया यांनीही हिंदूंनी पोरांची लटांबरे वाढवून मुसलमानांना शह द्यावा, असा विचार यापूर्वी मांडला आहे. सरसंघचालकांनी त्याचीच री ओढू नये, कारण ते सरसंघचालक आहेत.

३ लाख रुपयांहून अधिक व्यवहाराच्या रोख रकमेच्या देवाण-घेवाणीवर बंदी येणार !

        नवी देहली - भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार्‍या काळ्या धनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता ३ लाख रुपयांवरील व्यवहाराच्या रोख रकमेच्या देवाण-घेवाणीवर प्रतिबंध येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष अन्वेषण पथकाने न्यायालयाकडे अशी शिफारस केली आहे. त्यावर न्यायालय वरील निर्णय घेण्याची शक्यता आहे. हा कायदा झाल्यावर त्याचे उल्लंघन करणार्‍यांना शिक्षा करण्याचीही शिफारस करण्यात आलेली आहे. ३ लाखांवरील व्यवहार धनादेश, ड्राफ्ट, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे करता येईल. यापूर्वी १५ लाख रुपयांच्या रोख व्यवहारावर बंदी घालण्याच्या विचारावर उद्योगक्षेत्राकडून विरोध करण्यात आला होता.

युवा सेनेच्या विरोधानंतर कॉन्व्हेंट शाळेने रक्षाबंधनाच्या दिवशी असलेली तोंडी परीक्षा रहित केली

       मुंबई, २२ ऑगस्ट (प्रतिनिधी) - रक्षाबंधनादिवशी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा ठेवणार्‍या प्रभादेवी येथील गर्ल्स कॉन्व्हेंट स्कूल च्या विरोधात युवा सेनेने शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर शाळेने परीक्षा रहित केली.
       राज्यातील अनेक कॉन्व्हेंट शाळा आणि महाविद्यालये हिंदू सणांच्या दिवशी जाणीवपूर्वक चालू ठेवतात. पालकांनी गर्ल्स कॉन्व्हेंट स्कूल च्या शाळा चालू ठेवण्याच्या निर्णयाविषयी युवा सेनेकडे तक्रार केली होती. (हिंदूंच्या सणांदिवशी जाणीवपूर्वक शाळा चालू ठेवणार्‍या कॉन्व्हेंट शाळांचा हिंदुद्वेष ! बहुसंख्य असूनही हिंदूंवर होणारा हा अन्याय रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) च हवे ! - संपादक)

काश्मीरमध्ये हिंसाचारात ठार झालेले लोक आमचेच होते ! - पंतप्रधान मोदी

       नवी देहली - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विरोधी पक्षांच्या नेत्याच्या एका शिष्टमंडळासह पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या वेळी मोदी यांनी काश्मीरमधील हिंसाचारात ठार झालेल्यांप्रती दुःख व्यक्त करत म्हटले की, यात मरण पावलेली माणसे आमचीच होती. या समस्येवर राज्यघटनेच्या अंतर्गत उपाय काढण्याविषयीही त्यांनी मत व्यक्त केले. अब्दुल्ला यांनी यापूर्वी राष्ट्रपतींचीही भेट घेतली होती. काश्मीरमधील हिंसाचारात आतापर्यंत ७० जण ठार झाले आहेत. यात बहुतेक दंगलखोर आहेत. या वेळी सुरक्षादलांकडून वापरण्यात येणार्‍या पॅलेट गनचा वापर करण्यावर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली.

संख्या वाढवण्यास हिंदूंना कोणी रोखले आहे ? - सरसंघचालक मोहन भागवत यांचा प्रश्‍न

         नवी देहली - तुम्ही लोक म्हणत आहात की त्यांची (मुसलमानांची) संख्या वाढत आहे; मात्र हिंदूंना कोणी रोखले आहे ?, असे विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. ते देहली विद्यापीठ आणि महाविद्यालय यांतील शिक्षकांच्या संमेलनात बोलत होते. या वेळी शिक्षकांनी आरक्षण व्यवस्था संपवण्याविषयी प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, व्यवस्था पालटण्यासाठी स्वत:मध्ये पालट घडवणे आवश्यक आहे.

टेमघर धरणातून दिवसाला ५ कोटी १८ लाख ४० सहस्र पाण्याची गळती !

वाढती गळती रोखण्यासाठी आणि त्याद्वारे 
होणार्‍या भीषण परिणामांना आळा घालण्यासाठी 
प्रशासनाने तत्परतेने पावले उचलावीत !
         पुणे - सध्या टेमघर धरणातून जवळपास ६०० लिटर प्रतिसेकंद पाण्याची गळती होत आहे. एका दिवसाचे ८६ सहस्र ४०० सेकंद म्हणजे दिवसाला ५ कोटी १८ लाख ४० सहस्र आणि एका मासाचा हिशोब मांडल्यास १५५ कोटी ५२ लाख लिटर पाण्याची गळती होत आहे. पुण्यात प्रतिव्यक्ती प्रतिदिन १४० लिटर पाणी दिले जाते. त्यामुळे दिवसाला ३ लाख ७० सहस्र २८५ लोकांना पुरेल एवढे पाणी वाया जात आहे. त्यामुळे ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी माहिती सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी दिली.

मोदी यांचे आभार मानणार्‍या ३ बलुची नेत्यांवर पाकमध्ये गुन्हा प्रविष्ट !

पाकची दडपशाही !
         नवी देहली - १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बलुचिस्तानचे सूत्र उपस्थित केल्यामुळे त्यांचे आभार मानणार्‍या ३ बलुची नेत्यांवर पाकने गुन्हा प्रविष्ट केला आहे. त्यांच्यावर प्रत्येकी ५ गुन्हे प्रविष्ट केले आहेत. यात विद्यार्थी नेते बनुक करीमा बलूच, हरबियार मर्री आणि ब्रहमदग बुगती यांचा समावेश आहे.

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

        नाशिक, २२ ऑगस्ट (वार्ता.) - पंतप्रधानांनी गोरक्षकांचे चुकीचे मूल्यमापन केले. संपूर्ण भारतात गोहत्या रोखण्यासाठी स्वत:चे शासन असावे, अशा हेतूने भारतियांनी त्यांना मते दिली; मात्र त्यांनीच गोरक्षकांचा अवमान केला. या माध्यमातून त्यांनी गोपालक असणार्‍या श्रीकृष्णाचाही एकप्रकारे अवमान केला आहे. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी येथील सर्व हिंदू आणि गोरक्षक राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून संघटित झाले.
        या वेळी पंतप्रधानांनी त्यांचे वक्तव्य मागे घेण्यासमवेतच जम्मू-काश्मीर येथे चालू असलेल्या हिंसाचाराला रोखण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार द्यावेत, तसेच आतंकवादी अन् त्यांचे समर्थक यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. या आंदोलनात विविध संघटनांचे ३० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. वरील मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर यांना देण्यात आले.

दहेगाव (जिल्हा संभाजीनगर) येथील ग्रामसभेत महिला उपसरपंचाचा विनयभंग

महिलांच्या 
सन्मानासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक !
        संभाजीनगर, २२ ऑगस्ट - येथील वैजापूर तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायतीच्या १७ ऑगस्ट या दिवशी झालेल्या ग्रामसभेत महिला उपसरपंचाचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विद्यमान सरपंचांचे पती बाबासाहेब गंगाधर वाघ, बाबासाहेब मच्छिंद्र उगले आणि गणेश नारायण उगले यांच्या विरोधात वैजापूर पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे.
        ग्रामसभा चालू होताच सरपंच अंबिका वाघ यांचे पती बाबासाहेब वाघ यांनी उपसरपंचाना उद्देशून तू ग्रामपंचायतीमध्ये बैठकीला येत नाही, साहाय्य करत नाही, असे आरोप केले. उपसरपंच महिलेने त्यांना तुमचा याच्याशी काय संबंध ? तुम्ही सरपंच आहात काय ?, असे प्रत्युत्तर दिले. बाबासाहेब उगले यांनी तू राजीनामा दे, असे म्हणत वाईट हेतूने हात धरून त्यांना ओढले. या वेळी बाबासाहेब वाघ यांनी उगले यांना साहाय्य केले आणि उपसरपंच महिलेला शिवीगाळही केली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी झालेले रक्षाबंधन !

फलटण
       येथील मा. श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद सदस्य, तसेच तहसीलदार श्री. विजय जाधव, फलटण पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी श्री. रमेश चोपडे यांना राखी बांधण्यात आली.
कोल्हापूर
       जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा संस्थेचे संस्थापक राजू मेवेकरी, अधिवक्ता सतीश कुनकेकर यांना सनातन-निर्मित राखी बांधण्यात आली.
       नाशिक येथे उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर यांनाही राखी बांधण्यात आली.

अतिरिक्त शुल्क आकारणार्‍या एम्आयटी महाविद्यालयाच्या विरोधात अभाविपचे उपोषण

        पुणे, २२ ऑगस्ट - एम्आयटी महाविद्यालयातील एका अनुसूचित जातीतील विद्यार्थिनीला शुल्कात सवलत न देता तिच्याकडून खुल्या वर्गासाठीचे शुल्क मागण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाविद्यालयाच्या विरोधात उपोषण चालू केले आहे. या विद्यार्थिनीकडून बळजोरीने २५ सहस्र रुपये घेण्यात आले, तसेच तिला परीक्षेतूनही मध्येच उठवण्यात आले. महाविद्यालयाचे मंगेश कराड यांनी मानसिक त्रास देऊन तिच्या पालकांना शिवीगाळ केल्याचा आणि अभाविपच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्याचा आदेश दिल्याचा आरोप अभाविपने केला आहे.
प्रार्थना 
हे जगतपिता जगदीश्‍वर, अपने में ये गुण लाऊं ।
भारत के हित में जन्मूं, भारत के हित मर जाऊं ॥
गीत 
राष्ट्रभक्त जागो रे, देशभक्त जागो रे ।
राष्ट्रभक्त हो, तो राष्ट्रभक्ति की मिसाल (प्रमाण) दो ।
शत्रु के घुसपैठियों को, देश से निकाल दो । 
राष्ट्रभक्त जागो रे, देशभक्त जागो रे ॥ धृ.॥

ख्रिस्ती पंथात स्त्रियांना हीन दर्जाची वागणूक मिळणे !

        काही शतकांपूर्वी युरोपमध्ये पत्नीपेक्षा वेश्येला श्रेष्ठ समजले जात होते. ख्रिस्ती पंथात स्त्री पापी गणल्याने अगदी १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत युरोपमध्ये स्त्रियांचे दोन तुकडे करण्याचे, त्यांच्या बोटांमध्ये खिळे ठोकण्याचे, त्यांना पाण्यात किंवा तेलात उकळण्याचे वेगवेगळे दर चर्चच्या बाहेर लावलेले असायचे. मुसलमान धर्मात स्त्रीला केवळ भोगवस्तू समजले जाते. - प्रा. कुसुमलता केडिया, संचालिका, धर्मपाल शोधपीठ, भोपाळ      भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची गरज आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल ! 
- श्री. अरविंदराव हर्षे, निवृत्त प्राचार्य, पुणे
     पुरोगामी हे या देशात नवीन परंपरा निर्माण करू पहात आहेत. सध्याचे पुरोगामी हे त्यांच्या व्याख्येला कलंक असून ते भौतिकवादी आहेत. आज पुरोगामी ही शिवी झाली आहे ! - अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषद शेवटच्या क्षणापर्यंत संत-पतीला (प.पू. पांडे महाराज यांना) साथ देणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या ती. (सौ.) आशा पांडेआजींच्या चरणी अर्पिलेली भावपूर्ण शब्दसुमनांजली !

कै.ती.(सौ.) आशा परशराम पांडे
       ३०.७.२०१६ या दिवशी ती. (सौ.) आशा परशराम पांडे (वय ८६ वर्षे) यांचा वाढदिवस झाला. दोन मासांपासून त्यांची गुणवैशिष्ट्ये लिहून देण्याचा विचार माझ्या मनात रेंगाळत होता; पण माझ्यातील आळस या दोषामुळे ते राहून गेले. यासाठी मी भगवंताची आणि ती. (सौ.) आजींची क्षमा मागते. आज त्या आपल्यात राहिल्या नाहीत; पण त्यांना श्रद्धांजली म्हणून हे लिखाण त्यांना अर्पण करते.
१. प.पू. पांडे महाराजांच्या आध्यात्मिक 
यशात आजींचा अप्रत्यक्ष सहयोग !
       कोणत्याही यशस्वी व्यक्तीमागे एका स्त्रीचा हात असतो, अशा आशयाची एक म्हण प्रसिद्ध आहे. मी प.पू. परशराम पांडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ती. (सौ.) आशा पांडे यांना मागील अडीच-तीन वर्षांपासून जवळून अनुभवत असल्याने ही म्हण त्यांच्या संदर्भातही १०० टक्के सत्य आहे, हे अनुभवले आहे. प.पू. पांडे महाराजांच्या आध्यात्मिक यशासाठी आजींचा अप्रत्यक्षपणे सहयोग होता. त्यांनी आजीवन प.पू. महाराजांना कधीच कोणत्याही गोष्टीत विरोध केला नाही. आजही त्या देवद आश्रमात केवळ प.पू. महाराज यांच्या इच्छेने रहात होत्या.

ती. (सौ.) आशा पांडेआजी यांच्या मृत्यूविषयी देवद आश्रमातील साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना !

१. उद्या आजी आपल्यात 
नसतील, असा विचार येणे
        आजी खरे तर रविवारी घरी जाणार होत्या. मला कालपासून वाटत होते, आजी घरी गेल्या, तर त्या परत येणार नाहीत. रात्री माझ्या मनात विचार येत होता, उद्या त्या आपल्यात नसतील !
- कु. सविता भणगे
२. दोन दिवसांपासून आजींचे 
देहावसान होईल, असा विचार मनात येणे
        माझ्या मनात २ दिवसांपासून सारखा विचार येत होता, आजींचे देहावसान होईल. मी सकाळी ९ वाजता झोपलो असतांना आजी माझ्या स्वप्नात येऊन म्हणाल्या, मला प.पू. महाराजांना बघायचे आहे. भेटायचे आहे. मला वाटले, आजी असे का म्हणत आहेत ? तेवढ्यात सौ. अश्‍विनी पवार यांचा निरोप आला, आजी वारल्या. - श्री. सचिन हाके

प.पू. डॉक्टरांप्रती अपार भाव असलेल्या पू. (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांची गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेली भावस्पर्शी भेट !

पू. कुवेलकरआजीं
१. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पू. बाबा (सदानंद) नाईक यांच्यासमवेत 
पू. कुवेलकरआजींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाणे
     १९.७.२०१६ या दिवशी गुरुपौर्णिमा होती. मी आणि पू. बाबा (सदानंद) नाईक पू. कुवेलकरआजींना भेटायला गेलो होतो. त्या वेळी पू. आजी बाहेरच उभ्या होत्या. त्यांनी आम्हाला घरात बोलावले आणि बसायला सांगितले. घरात केवळ त्यांचा धाकटा मुलगा होता. पू. बाबा (सदानंद) नाईक त्यांना दोन वर्षांनंतर भेटत होते आणि मी प्रथमच भेटत होतो. तेव्हा पू. आजींनी आम्हाला ओळखले नसल्याचे सांगितले. त्यांना पू. बाबांनी आम्ही रामनाथी आश्रमातून आलो आहोत, असे त्यांना सांगितले. त्या वेळी त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यानंतर त्यांनी पू. बाबांना ओळखले आणि मी माझी ओळख सांगितली.

पू. (सौ.) सुशिला मोदी, सोजतरोड (जिल्हा जोधपूर), राजस्थान यांचा साधनाप्रवास !

पू. (सौ.) सुशिला मोदी
१. आधीची साधना 
      मी आरंभीपासूनच नामजप, स्तोत्रपठण, ग्रंथांचे वाचन, व्रत-वैकल्ये, उपवास इत्यादी साधना करत होते. 
२. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला आरंभ 
    सनातन संस्थेचे साधक आमच्या गावात आणि घरी आले. त्या वेळी मला संस्थेविषयी कळले. त्यांनी मला साधनेत मार्गदर्शन करू, असे सांगितले. तेव्हा मी त्यांना सांगितले, तुम्ही मला ध्यान लावायला सांगाल, तर माझे लागत नाही. मी पोथी आणि ग्रंथ यांचे पुष्कळ वाचन केले आहे. आता माझे त्यातही मन लागत नाही. तुम्ही मला आता काय करायला सांगणार ? त्या वेळी त्यांनी मला केवळ कुलदेवतेचा आणि श्री गुरुदेव दत्त । हे नामजप करायला सांगितले. नंतर तुम्हाला सत्संगाविषयी सांगू, असे ते म्हणाले. अशा प्रकारे माझी साधना चालू झाली.

कपड्यांची स्पंदने ओळखून धुतलेले आणि न धुतलेले कपडे अचूक ओळखणार्‍या साधिकेला पाहून विज्ञानाहून अध्यात्म श्रेष्ठ असल्याचे लक्षात येणे

     ८.७.२०१६ या दिवशी मी माझ्या पिशवीतील धुवायचे कपडे वेगळे काढत होते. पिशवीतून कपडे काढतांना कुठले कपडे धुवायचे आहेत आणि कुठले धुवायचे नाहीत, हेे मी बघत होते. त्या वेळी तेथे ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. पोन्नामअक्का बसल्या होत्या आणि मी कपडे काढत असतांना त्या मला सांगायच्या, हे कपडे धुतलेले नाहीत आणि हे कपडे धुतलेले आहेत. असे त्यांनी ६ - ७ वेळा बरोबर सांगितले. तेव्हा मी त्यांना विचारले, हे तुम्हाला कसे कळले ? तेव्हा त्यांनी सांगितले, तू काढलेले कपडे धुतलेले नसतील, तर त्यांतून काळ्या रंगाचे, धुरासारखे काहीतरी बाहेर पडतांना सूक्ष्मातून जाणवले आणि ज्या कपड्यांतून तसे बाहेर पडतांना दिसत नाही, ते धुतलेले आहेत.

गुरुदेवांची आळवणी !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
कु. कनकमहालक्ष्मी देवकर
कसे रे आळवू माझ्या गुरुराया ।
अंतरी वसे तू मम हृदया ॥ १ ॥

कर्ता-करविता तूच रे ।
बुद्धी दास असू रे ॥ २ ॥

तव स्मरणात आहे तरी काय रे गुरुराया ।
विसर पडे या क्षणिक सर्वांचा ॥ ३ ॥

 आहे कसली रे जादू गुरुराया । 
                                             दिसे केवळ आणि केवळ तूच रे ॥ ४ ॥
- कु. कनकमहालक्ष्मी देवकर (वय २० वर्षे), भाग्यनगर, तेलंगण. (२८.५.२०१४)

प्रेमभाव, सेवाभाव आणि कृतज्ञताभाव असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारी कु. गौरी मुदगल (वय १६ वर्षे) !

कु. गौरी मुदगल
      श्रावण कृष्ण पक्ष षष्ठी (२३.८.२०१६) या दिवशी रामनाथी आश्रमातील कला विभागात सेवा करणार्‍या कु. गौरी मुदगल हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची धाकटी बहीण कु. अमृता मुदगल हिला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि पालट येथे देत आहोत.
   (वर्ष २०११ मध्ये कु. गौरी हिची ५० टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे घोषित केले होते. - संकलक) 
कु. गौरी मुदगल हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

शक्ती आणि बळ यांमधील भेद

श्री. राम होनप
१. शक्ती : कार्य करण्यासाठी लागणारी अप्रकट ऊर्जा म्हणजे शक्ती. 
२. बळ : ऊर्जेचा वापर करण्यासाठी लागणारी क्षमता म्हणजे बळ. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.९.२०१५)
बुद्धीच्या स्तरावर विचार करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांमध्ये संतांमधील चैतन्याने झालेला पालट !

श्री. आनंद जाखोटिया
      एका शहरातील एका हिंदुत्वनिष्ठांकडे मी एका संतांना घेऊन गेलो. आधी त्या हिंदुत्वनिष्ठांचे विचार बुद्धीच्या स्तरावर चिकित्सा करणारे होते; पण यंदा गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांना या कार्यात आपणही काहीतरी केले पाहिजे, असे वाटू लागल्याचे जाणवले. त्याची प्रचीतीही आली. आम्ही त्यांच्या घरी संतांना घेऊन गेल्यावर त्या व्यक्तीने संतांना वाकून नमस्कार केला. नंतर आत बसल्यावर ते संतांना म्हणाले, माझ्या योग्यतेची काहीही सेवा असल्यास सांगा. संतांमधील चैतन्यामुळेच ते ऐकण्याच्या स्थितीत आले. - श्री. आनंद जाखोटिया, नवी देहली (३०.७.२०१६)

मंत्रजप आणि नामजप यांची परिणामकारकता वाढवा !

पू. संदीप आळशी
      सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने अनेकांना आध्यात्मिक उपाय म्हणून मंत्रजप आणि नामजप करावे लागत आहेत. 
१. मंत्र मोठ्याने म्हणण्यापेक्षा मनात म्हटल्याने अधिक आध्यात्मिक उपाय होणे आणि मंत्र अधिक भावपूर्ण म्हटले जाणे : मला असणार्‍या विकारांच्या निर्मूलनासाठी मी नियमित मंत्रपठण करतो. सर्वसाधारणपणे मंत्र मोठ्याने म्हणायचे असतात, असे मी समजत होतो; त्यामुळे आरंभी मी मोठ्याने मंत्रपठण करायचो. मंत्रपठण करतांना मला जांभया येत असत. माझ्यावर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे ते निर्देशक असे. सनातनचे वेदमूर्ती केतनगुरुजी यांनी सांगितले, शास्त्रानुसार मंत्र मनात म्हणणे योग्य आहे. त्यानुसार मी मंत्रपठण मनात करू लागलो. मंत्रपठण मनात करतांना माझ्यावर आध्यात्मिक उपाय होण्याचे प्रमाण वाढल्याचे मला जाणवले. शास्त्रात सांगितल्यानुसार कृती केल्याने अधिक फळ मिळते, याची मला प्रचीती आली. मंत्रपठण मनात करतांना ते अधिक भावपूर्ण होते, हेही लक्षात आले. (स्तोत्र मोठ्याने म्हणणे योग्य आहे. 
- सनातनचे वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी)

स्वतःत पालट करण्याची तळमळ असलेली आणि प.पू. डॉक्टरांप्रती अपार भाव असलेली कु. गौरी मुदगल !

१. गौरी तिच्या सहवासातील साधकांना आनंद देते. ती साधकांंच्या चांगल्या गोष्टींचे आणि गुणांचे सहजपणे 
कौतुक करते. 
२. गौरी साधकांना काही साहाय्य हवे असल्यास लगेच करते. 
३. प्रेमभाव : ती सर्वांची प्रेमाने काळजी घेते. ती रुग्णाईत साधकांना जेवण-अल्पाहार वेळेत देणे, त्यांना काही हवे-नको ते बघणे, हे सर्व आपुलकीने करते.
४. तिच्या वयाच्या मानाने तिच्यात पुष्कळ समजूतदारपणा आहे.

रामनाथी आश्रमात झालेल्या शिबिरात शिकायला मिळालेली सूत्रे

      मला शिबिरात निरीक्षणक्षमता वाढवणे आणि आढावा देतांना कसा दृष्टीकोन हवा ?, याविषयी पुढील सूत्रे शिकायला मिळाली. 
१. निरीक्षणक्षमता वाढवण्याविषयी
अ. आपली वृत्ती बहिर्मुख असेल, तर आपल्यासमवेत असलेल्या सहसाधकांचीही साधनेत हानी होते. 
आ. आपण निरीक्षणक्षमता वाढवली, तर गुरुकार्याची आणि साधकांची साधनेत होणारी हानी टाळता येऊ शकते. 
इ. आपली वृत्ती अंतर्मुख असली, तर आपले निरीक्षण योग्य प्रकारे होऊ शकते. प्रत्येक लहान किंवा मोठ्या प्रसंगात आपल्या मनाच्या स्थितीचा अभ्यास कसा करायचा ?, हे शिकायला मिळाले.
२. आढावा देण्याच्या सेवेविषयी
अ. आपण सेवेचा आढावा वेळेत दिला नाही, तर कार्याची आणि साधनेची कशी हानी होते ?, हे मला समजले. 
आ. साधना करत असतांना आपण काय चांगले केले ?, हा विचार करण्यापेक्षा मी कुठे न्यून पडलो ?, याचा अभ्यास करून चुका सांगितल्या, तर त्याचा आपल्याला लाभ होईल. 
      हाच भाग माझी प्रगती होण्यासाठी मला साहाय्य करणार आहे, हेही माझ्या लक्षात आले.
- श्री. शशिधर जोशी, नाशिक, महाराष्ट्र (२.७.२०१६)

गावातील धर्माभिमान्यांना त्रास होत असल्यास धर्मशिक्षणवर्ग घेण्यात अडथळे येणे आणि चिकाटीने वर्ग घेत राहिल्याने त्रास उणावून वर्ग चांगला चालणे

१. धर्मशिक्षणवर्ग चालू करतांना त्रास होणे आणि तो ६ मासांनंतर बंद होणे
      मी २ वर्षांपूर्वी फलटण शहरापासून २० कि.मी. अंतरावरील हिंगणगाव येथे धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याच्या उद्देशाने गेले होते. ते गाव डोंगरामध्ये आहे. जातांना मला पुष्कळ भीती वाटत होती. प्रार्थना केल्यावर मला होणारा त्रास काही अंशी उणावला आणि मी कशीतरी घरी पोचले. त्यानंतरही अधून-मधून मला त्रास व्हायचा. तेथील धर्मशिक्षणवगर्र् ६ मास चालला आणि नंतर बंद झाला. 
२. दोन वर्षांनी संपर्क करून धर्मशिक्षण वर्गात सांगितल्यानुसार साधना केल्याने २ रुग्णांना बरे 
वाटल्याने वर्ग पुन्हा चालू करा, असे धर्माभिम्यान्यांनी सांगणे
    २ वर्षांनी तेथील एका धर्माभिमान्यांचा मला भ्रमणभाष आला. ते म्हणाले, येथे २ रुग्ण होते. ते अगदी वेडे होण्याच्या स्थितीत होते. त्यांना तुम्ही सांगितलेली साधना सांगितली आणि त्यांनी ती केल्यावर ते ठीक झाले. आम्हाला पुन्हा धर्मशिक्षणवर्ग चालू करायचा आहे. आम्हाला पूर्ण साधना कळावी; म्हणून तुम्ही परत वर्ग चालू करा. तेव्हापासून आपण तेथे २ मासांतून एकदा धर्मशिक्षणवर्ग घेत आहोत.

रामनाथी आश्रमात शिबिराला येण्यापूर्वी आणि आल्यावर आलेल्या अनुभूती

सौ. अलका व्हनमारे
१. हाताला फोड येऊन ठणका वाढणे, वैद्यकीय उपचारादींनी तो न्यून न 
होणे आणि प.पू. डॉक्टरांना शरणागतीने प्रार्थना केल्यावर फोड 
फुटल्याने शिबिराला जाता येणे
     मला २१.६.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमातील शिबिराला येण्यासाठी सोलापूरहून निघायचे होते. त्याआधी १५ दिवसांपासून माझ्या उजव्या हातावर वरच्या बाजूला एक फोड आला होता. आरंभी तो पुष्कळ लहान होता; पण नंतर पुष्कळ मोठा झाला आणि त्याच्या वेदनाही वाढल्या. त्यासाठी आधुनिक वैद्यांनी दिलेली औषधे घेतली; मात्र वेदनांची तीव्रता न्यून होत नव्हती. मी हातात काहीही धरू शकत नव्हते, एवढा हात सुजला. १९ जून आला, तरी फोड फुटेना; म्हणून मला पुष्कळ रडू आले आणि एक दिवसानंतर लांबचा प्रवास करायचा आहे, या विचाराने मला प.पू. गुरुदेवांची आठवण येऊ लागली.

श्रीकृष्णाची मानस पाद्यपूजा करतांना तोंडवळ्यावर आनंद आणि डोळ्यात भाव असणारी साधिका

कृष्णा, तूच जगताचा पालनहार, तुझ्यासम कोणीच नसे ।

प्रेमात न्हाऊया, चैतन्यात वाहूया ।
कृष्णा, तुझ्याशी एकरूप होऊनी मोक्षाला जाऊया ।
वाट पहाती सर्व गोप-गोपी येण्यास तुझ्याच चरणांशी ॥ १ ॥

रंगूनी या तुझ्याच नामात कान्हा ।
असे वेड लागले मज तुझ्या प्राप्तीचेे रे कान्हा ।
तुजविण जगणे हे झाले कठीण रे कान्हा ॥ २ ॥

शरण मी आले तुजला, कान्हा रे कान्हा !

कु. चैताली बाळासाहेब पोटे
हे श्रीकृष्णा, शरण मी आले तुजला, कान्हा रे कान्हा ॥ धृ. ॥
तुझ्या प्रेमाची ओढ लागली ।
माझ्या मना कान्हा रे कान्हा ॥ १ ॥

तुजसाठी करीन हे मनाचे फूल ।
अर्पिण्या तव चरणा
कान्हा रे कान्हा ॥ २ ॥

तुझी प्राप्ती हा एकची ध्यास
मनी धरिला कान्हा रे कान्हा ॥ ३ ॥

तुझ्या प्रेमाची ओढ लागली 
माझ्या मना कान्हा रे कान्हा ॥ ४ ॥
- कु. चैताली बाळासाहेब पोटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०१४)

रामनाथी आश्रमातील साधिका कु. दीपाली पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका साधिकेने केलेली कविता

आहेस तू सखी सर्वांची ।
परि धडपड करी कृष्णसखी होण्याची ॥ १ ॥

तुझ्यात दिला कृष्णाने प्रेमाचा झरा ।
तोच पसरू दे सुगंध वारा ॥ २ ॥

नामातच दडले सर्वस्व सारे ।
तेच अर्पूनी हो कृष्णाची आज रे ॥ ३ ॥

दीपाली = दीप + आवली (रांग) दीपाप्रमाणे तू प्रकाशमान हो, हीच कृष्णचरणी प्रार्थना ! 
- सौ. सारिका आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (फाल्गुन कृष्ण पक्ष त्रयोदशी (५.४.२०१६))

२४ ऑगस्टला असणार्‍या श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने....

वैद्या (कु.) अपर्णा महांगडे
     स्वभावदोष आणि अहं यांमुळे श्रीकृष्णापासून दूर जात असल्याची जाणीव झाल्यावर एका साधिकेने केलेली काव्यरूपी प्रार्थना !
     अपेक्षा, पूर्वग्रह, प्रतिमा
     जपणे अन् संकुचित वृत्ती ।
     तव चरणापासून क्षणोक्षणी
     नेतात मज दूर ॥ १ ॥

     असती प्रिय तुज अनेक साधक ।
     माझे मन त्यांचा का द्वेष करी ॥ २ ॥

सात्त्विक गोष्टींची आवड असणारा आणि सेवा एकाग्रतेने करणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा नवीन पनवेल, रायगड येथील कु. वेदांत राऊत (वय ७ वर्षे) !

कु. वेदांत राऊत
१. घरकामात साहाय्य करणे
      घरातील पुष्कळ कामे शिल्लक राहिल्यास आणि माझी (आईची) शाळेत जाण्याची वेळ होत असेल, तर तो मला साहाय्य करतो. त्याचप्रमाणे आदित्यलाही (त्याच्या धाकट्या भावालाही) मला साहाय्य करण्यास सांगतो. 
२. कोणतीही गोष्ट सांगितल्यावर ती पूर्ण करणे
      कोणतीही गोष्ट सांगितल्यावर ती पूर्ण केल्याविना कु. वेदांतला चैन पडत नाही, उदा. शाळेचा अभ्यास, कविता पाठांतर, नामजप किंवा शाळेतून दिलेला एखादा प्रकल्प. एकदा शाळेतून एक मोठी कविता पाठ करून येण्यास सांगितले होते. तो दिवसभर थकला होता आणि त्याला झोपही येत होती. त्याने डोळ्यांवर पाणी मारून झोप घालवली आणि कविता पाठ करून तो रात्री उशिरा झोपला.

अंतर्मुख झाल्याने दोष लक्षात येत असणे अन् या विचारप्रक्रियेमुळे चुका मनापासून स्वीकारण्यासाठी साहाय्य होणे

      एकदा विभागाची सामूहिक स्वच्छता असतांना मला काच स्वच्छ करण्याची सेवा मिळाली. मी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी प.पू. गुरुदेवांना हे गुरुदेवा, ही काच म्हणजे स्थूलरूपाने माझे मनच आहे. तिच्यावर कोणताही डाग (दोष) राहू नये, अशा प्रकारे तिला स्वच्छ करण्याची क्षमता तुम्हीच मला द्या, अशी प्रार्थना केली. ही सेवा करतांना मन आनंदी होते. काच पुसून झाल्यावरही मला काचेवर डाग दिसत होते. जेव्हा बाहेरील प्रकाश काचेवर पडत होता, तेव्हाच मला ते डाग दिसत होते. काचेच्या कोपर्‍यातही असेच डाग होते. तेव्हा मनात माझ्यातील दोषांवरही जेव्हा कोणी प्रकाश टाकतो, तेव्हाच मला ते दोष लक्षात येतात. मनाच्या कोपर्‍यात असलेले दोष लक्षपूर्वक पाहिल्याने, अंतर्मुख झाल्याने किंवा एखाद्याने सांगितले, तरच लक्षात येतात. अन्यथा मी मनरूपी काच स्वच्छ असल्याच्या भ्रमातच रहातो आणि त्यामुळे मग ब्रह्मापासून दूर जातो, असा विचार आला. या विचारप्रक्रियेमुळे मला माझ्या चुका मनापासून स्वीकारण्यासाठी साहाय्य मिळाले.
तुमच्या चरणांचा दास, - श्री. वेकंटेश अय्यंगार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२५.२.२०१६)

पूज्य मेनराय काका की हम चरण वंदना करते हैं ।

पू. डॉ. भगवंतकुमार मेनराय
बारह ज्योतिर्लिंगों की जिन्होंने उपासना की है ।
ऐसे पूज्य मेनराय काका की हम चरण वंदना करते हैं ॥ १ ॥

शिवजी ने भेजा उन्हें सनातन में । 
परम पूज्य ने बसा लिया अपने हृदय में ॥ २ ॥

गुरुदेव के प्रतिनिधि बनकर उपाय करते हैं । 
सभी साधक आगमन की प्रतिक्षा में रहते हैं ॥ ३ ॥

जन्मदिन के अवसर पर, ईश्‍वर से प्रार्थना है ।
गुरुदेव की कृपा से, आगे की प्रगती होती रहे ॥ ४ ॥ 
(पू. डॉ. भगवंतकुमार मेनरायकाका यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली कविता) 
- श्रीमती निलीमा सप्तर्षि, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.७.२०१६)धडाडीचे गोरक्षक श्री. सतीश प्रधान यांच्या अटकेच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथील गोसेवकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

गोमातेच्या रक्षणासाठी कोणतीही तडजोड करणार 
नाही ! - सचिन पवार, गोल्ला समाज, राष्ट्रीय अध्यक्ष
        आताचे शासन केवळ मतांचे राजकारण करून गोरक्षकांना त्रास देत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. वास्तविक आताच्या सत्ताधार्‍यांकडून गायींच्या रक्षणासाठी काहीतरी होईल, या मोठ्या अपेक्षेने गोरक्षक पहात होते; मात्र आताचे सत्ताधारी त्याच्या उलट वागत आहेत. कत्तलीसाठी ज्या गायी गाड्यांमध्ये कोंबल्या जात आहेत. त्यामुळे त्यांचे मृत्यू होत आहेत. त्या घायाळ होत आहेत. ज्या गायींची रस्त्यावर हत्या होत आहे, असे प्रकार शासनाला दिसत नाहीत, तर जे गोरक्षक प्र्राणांची बाजी लावून गायींचे रक्षण करत आहेत, त्यांच्यावर मात्र तात्काळ कारवाई होत आहे. गोरक्षणासाठी आम्ही यापूर्वीही प्राणांची बाजी लावलेली आहे आणि यापुढेही लावू. गोमातेच्या रक्षणासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. गायीचे काम करणार्‍यांच्या विरुद्ध कृती करणार्‍यांना गोपालक भगवान श्रीकृष्णच योग्य ती शिक्षा देईल !

पनवेल येथे श्री कपिकुल सिद्धपीठम् पिठाधिश्‍वरी १००८ श्री महंत तपोमूर्ती संन्यासिनी परमहंस सद्गुरु श्री वेणाभारती महाराज यांच्या अमृतदिव्य वाणीतील श्रीमद्भागवत !

कालावधी : १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०१६
स्थळ : तथास्तु सभागृह, नीलसमृद्धी सोसायटी, पनवेल.
वेळ : सायंकाळी ५.३० ते ७.३०
संपर्क : ९८५०५९११६६

फलक प्रसिद्धीकरता

महिला सशक्तीकरणाची 
पोकळ वल्गना करणारे साम्यवादी !
        देहलीतील जेएन्यूमध्ये इंडिया स्टुडंटस् असोसिएशन या साम्यवाद्यांच्या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता अनमोल रतन याने विद्यापिठात पीएच्डी शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार केला. तिला पेयातून गुंगीचे औषध पाजण्यात आले होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : JNUme AISA is samyavadi sangathanke karyakartane PhD ki ek vidyarthinipar balatkar kiya. 
Stri sashaktikaran ka burkha odhe samyavadiyonka asli chehra !
जागो ! : जेएन्यू में एआयएस्ए इस साम्यवादी संगठन के कार्यकर्ता ने पीएच्डी की एक विद्यार्थिनी पर बलात्कार किया. 
स्त्री सशक्तीकरण का बुरखा ओढे साम्यवादियों का असली चहरा !

       आज प्रत्येक आई-वडील माझा मुलगा डॉक्टर, अभियंता वगैरे व्हावा, असे म्हणतात; पण कोणीही सत्पुरुष व्हावा, असे म्हणत नाहीत ! - प.पू. झुरळे महाराज, डोंबिवली

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       शालेय शिक्षणात जीवनात सर्वात उपयुक्त असा विषय, म्हणजे साधना शिकवत नाहीत, तर इतर सर्व विषय शिकवतात. त्यामुळे समाजात सर्वत्र दुराचार पसरला आहे. याउलट हिंदु राष्ट्रात धर्मशिक्षण असल्यामुळे एकही गुन्हेगार नसेल ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू 
नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवा !
परमेश्‍वराप्रमाणेच सद्गुरूंवर दृढ श्रद्धा असेल, तर सद्गुरूंच्या रूपात परमेश्‍वर दिसतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बलुचिस्तान दुसरा बांगलादेश !

संपादकीय
      भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान यांचे सूत्र उपस्थित केले आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली. काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी बुरहान वानी याला सैन्याने ठार केल्यावर उसळलेला हिंसाचार अद्यापही चालू आहे. या हिंसाचारामागे पाकची फूस आहे, हे जगजाहीर झाले आहे. लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी या हिंसाचाराचे नेतृत्व करत आहेत, हे स्वतः या संघटनेचा संस्थापक हाफिज सईद यानेच जाहीरपणे सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn