Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.प. टेंब्येस्वामी जयंती

सनातनवरील बंदीच्या विरोधात महाराष्ट्रातील हिंदू रस्त्यावर येतील ! - नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन

सांगली येथील आंदोलनात 
१२५ हून अधिक धर्माभिमानी सहभागी ! 
         सांगली, २१ ऑगस्ट (वार्ता.) - सनातन संस्थेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली निवडून आलेले शासन सनातन संस्थेवर बंदी घालणार नाही अथवा आम्ही घालू देणार नाही. जे शासन ओवैसी यांच्या एम्आयएम् संघटनेवर बंदी घालू शकले नाही, ते शासन देशप्रेमी सनातन संस्थेवर काय बंदी घालणार ? सनातन संस्थेवर बंदीचा विचारही करू नका. शासनाने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यास या बंदीच्या विरोधात महाराष्ट्रातील हिंदू रस्त्यावर येतील, अशी चेतावणी शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी दिली.

सनातनवरील बंदी पूर्ण ताकदीने झुगारून देऊ ! - डॉ. अनिल पाटील, उपतालुका प्रमुख, युवा सेना

कोल्हापूर येथे आंदोलन 

कोल्हापूर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन

       कोल्हापूर, २१ ऑगस्ट (वार्ता.) - सनातनवर बंदी घालू नका अन्यथा शिवसैनिक पेटून उठतील. कॉ. पानसरे यांना हुतात्मा समजून देशाच्या सीमेवर लढणार्‍या आणि देशासाठी प्राण देणार्‍या सैनिकांचा अवमान केला जात आहे. सनातनवरील बंदी पूर्ण ताकदीने झुगारून देऊ, असे प्रतिपादन युवा सेनेचे करवीर उपतालुका प्रमुख डॉ. अनिल पाटील यांनी केले.
       सनातन संस्थेवरील अन्याय्य कारवाईच्या विरोधात २० ऑगस्ट या दिवशी दुपारी ४ वाजता येथील शिवाजी चौकात समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या आंदोलनात ८० धर्माभिमानी सहभागी झाले होते. यामध्ये १० हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधातील वचनांचे फलक आणि भगवे झेंडे हाती घेतले होते.

डॉ. दाभोलकर यांना संत बनवण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषद

मोर्च्याच्या अखेरीस हिंदुत्वनिष्ठांना संबोधित करतांना अधिवक्ता पुनाळेकर

मुंबई येथील भव्य मोर्चा

 • सनातन संस्थेवरील अन्याय्य कारवाईच्या विरोधात मुंबई येथील भव्य निषेध मोर्च्यात हिंदुुत्वनिष्ठ संघटनांचा हुंकार !
 • मोर्च्यात गोरक्षक सतीशकुमार प्रधान यांच्या अटकेचा निषेध !
 • १८ संघटनांचे ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी आणि सनातनप्रेमी उपस्थित
       मुंबई, २१ ऑगस्ट (वार्ता.) - आमच्याकडे अंनिससारखा विदेशातून येणारा पैसा नाही, तर हिंदु धर्माभिमान्यांची शक्ती आहे. घोटाळेबाज डॉ. दाभोलकर यांना संत बनवण्याचा प्रयत्न सध्या चालू असून तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. तसेच घोटाळेबाज असलेल्या दाभोलकर कुटुंबियांना १ वर्षाच्या आत कारागृहात टाकू, अशी चेतावणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी दिली. त्याचसमवेत आतापर्यंत जेवढ्या निरपराध हिंदुत्ववाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांना आम्ही निर्दोष सोडवून आणू आणि येथेच शिवाजी पार्क मैदानावर त्यांची सभा घेऊ. निरपराध हिंदूंना अटक केल्यास हिंदु विधीज्ञ परिषद त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सोडवण्यास प्रयत्नरत राहील, अशी ग्वाही अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी दिली. सनातनच्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आयोजित केलेल्या मोर्च्याच्या अखेरीस झालेल्या सभेत ते मार्गदर्शन करत होते. या मोर्च्यात विविध १८ संघटनांचे ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

पंजाब गोरक्षक दलाचे प्रमुख सतीशकुमार प्रधान यांना अटक !

 • अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना सोडून गोरक्षकांवर कारवाई करणारे अकाली दल-भाजप सरकारचे भ्रष्ट आणि हिंदुद्वेषी पंजाब पोलीस !
 • शासनकर्त्यांकडून अत्याचार चालूच आहेत. यावरून हिंदूंना ६९ वर्षांनंतरही योग्य शासनकर्ता निवडता आला नाही, असेच म्हणावे लागेल ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
 • कसाई आणि गोतस्कर यांना नव्हे, तर गोरक्षकांना कारागृहात टाकले जाते, ही पोलिसांची मोगलाई नव्हे का ?
        पटियाला (पंजाब) - पंजाब गोरक्षक दलाचे प्रमुख श्री. सतीशकुमार प्रधान यांना २१ ऑगस्ट या दिवशी पटियाला पोलिसांनी अटक केली. (पंजाबमध्ये अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात चालू आहे. तेथील नागरिक या तस्करांवर कारवाई करण्याची मागणी करत असतांना निष्क्रीय रहाणारे भ्रष्ट पंजाब पोलीस गोरक्षकांवर मात्र तातडीने कारवाई करत आहेत. पंजाबमधील आगामी निवडणुकीत हिंदूंनी आणि गोरक्षकांनी याचा निषेध मतपेटीद्वारे व्यक्त केला पाहिजे ! - संपादक) सामाजिक संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या व्हिडीओमध्ये श्री. सतीशकुमार यांच्या संघटनेचे सदस्य काही गोतस्करांना मारहाण करतांना दिसत असल्याने त्यांच्यावर अपहरण आणि लोकांना त्रास देणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

सातारा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये समस्त हिंदुत्ववादी संघटनांचा सनातनला जाहीर पाठिंबा !

अंनिसच्या बालेकिल्ल्यात 
आम्ही सारे सनातनचा जयघोष ! 

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी धर्माभिमानी हिंदू

       सातारा, २१ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने येथील राजवाडा परीसरातील गोलबाग येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदुत्ववाद्यांनी आम्ही सारे सनातन-सनातन सनातनच्या घोषणा देऊन राजवाडा परिसर दणाणून सोडला.
       या वेळी वारकरी संप्रदाय, सनातन संस्था, हिंदु महासभा, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्ववादी संघटनांचे ७० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी शाहुपुरी पोलीस ठाणे, गोपनीय शाखा आणि केंद्रीय गुप्तचर विभाग यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोर्ट ब्लेअर येथील कॉन्व्हेंट शाळेत विद्यार्थ्यांच्या राख्या काढून टाकल्या !

 • केंद्र सरकारने हिंदूंच्या धार्मिक सणांना विरोध करणार्‍या शाळांवर कारवाई करण्याचा आदेश काढावा, अशी हिंदूंची मागणी आहे !
 • दादरी प्रकरणावरून हिंदूंना असहिष्णु ठरवणारे निधर्मीवादी कॉन्व्हेंट शाळांच्या धर्मांधतेविषयी कधीच बोलत नाहीत !
      पोर्ट ब्लेअर - अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअर शहरातील कारामेल कॉन्व्हेंट शाळेत रक्षाबंधन सणानिमित्त हिंदु विद्यार्थ्यांनी बांधलेल्या राख्या शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या आदेशाने काढून टाकण्यात आल्या. तसेच त्यांची दप्तरे तपासून त्यांना रक्षाबंधन निमित्ताने मिळालेल्या भेटवस्तूही जप्त करण्यात आल्या. त्यामुळे पालक संतप्त झाले असून त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला जाब विचारला आहे. (अमेरिका, ब्रिटन आदी देशांत हिंदूंचे सण साजरे केले जात असतांना भारतातील ख्रिस्ती शाळांची ही धर्मांधता सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडवत असल्याने अशा शाळांवर कठोर कारवाई सरकारने करावी ! - संपादक)

सनातन संस्थेला केंद्रस्थानी ठेवून अन्वेषण यंत्रणांचा तपास का चालू आहे ? - श्री. बापू ढगे, माजी नगरसेवक

सोलापूर येथे सनातनवरील 
अन्यायाच्या निषेधार्थ मोर्चा
         सोलापूर, २१ ऑगस्ट (वार्ता.) - पुरोगाम्यांच्या दबावापोटी सनातनच्या साधकांना नाहक अडकवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात येत आहे. कॉ. पानसरे हत्या प्रकरणात अटकेत असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावरील खटला चालू करावा, अशी मागणी करूनही तो खटला चालूच केला जात नाही. सनातनला नाहक आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात आहे. अन्वेषण यंत्रणांनी निष्पक्ष अन्वेषण करावे. पुरागाम्यांच्या दबावाला बळी पडू नये अन्यथा सर्व हिंदुत्ववादी संघटना तीव्र आंदोलन छेडतील, अशी चेतावणी या वेळी माजी नगरसेवक श्री. बापू ढगे यांनी दिली.
         पुरोगाम्यांच्या दबावापोटी डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेच्या निष्पाप साधकांना गोवण्यात आले असून सनातनचे हिंदुत्वरक्षणाचे कार्य पचनी पडत नसल्यामुळेच सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे. सनातनवर होत असलेल्या या अन्यायाच्या विरोधात २१ ऑगस्ट या दिवशी सोलापूर येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीन निषेध मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. सनातनचे संत पू. महादेव नकाते यांची वंदनीय उपस्थिती या आंदोलनाला लाभली.

छर्र्‍याच्या बंदुकांचा वापर न केल्यास बंदुकीच्या गोळ्या घालाव्या लागतील !

आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ हिंसाचार माजवणार्‍यांना वेळीच रोखले नाही, 
तर उद्या तेही आतंकवादी बनतील ! 
 • पॅलेट गनच्या वापराच्या विरोधात न्यायालयात याचिका
 • केंद्रीय राखीव पोलीस दलाचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर
      श्रीनगर - हिंसक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी छर्र्‍याच्या बंदुकांचा वापर न केल्यास अतिहिंसक परिस्थितीत जमावावर बंदुकीच्या गोळ्या चालवाव्या लागतील, असे केंद्रीय राखीव पोलीस दलाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

तुम्ही एकवेळ मला कुत्रा म्हणा; पण पाकिस्तानी म्हणू नका...

जगभरात आपल्याच धर्मियांवर अत्याचार करणारे मुसलमान !
पाकिस्तानच्या अत्याचारांमुळे देश सोडावा लागलेल्या मजदक दिलशान बलूच यांचा संताप 
      नवी देहली - पाकिस्तानकडून बलुचिस्तान आणि गिलगिट प्रांतातील नागरिकांवर होणार्‍या अत्याचारावर पुन्हा एकदा प्रकाश पडला. या अत्याचारांमुळे देश सोडावा लागलेले बलुची नेते मजदक दिलशान बलूच यांनी तुम्ही एकवेळ मला कुत्रा म्हणा; पण पाकिस्तानी म्हणू नका..., अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
     कॅनडाच्या पासपोर्टवर पाकिस्तान क्वेटा हे शहर आढळल्याने देहली विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्‍यांनी मजदक यांची चौकशी केली. इकॉनॉमिक टाइम्सशी बोलतांना मजदक यांनी पाकिस्तानकडून बलुचिस्तानमध्ये होणार्‍या अत्याचाराची माहिती दिली. पाकिस्तानमुळे संपूर्ण आयुष्य अडचणीत गेल्याचेही त्याने सांगितले. ते म्हणाले, पाकिस्तानी सैन्याकडून होणार्‍या अत्याचारांमुळे माझ्यासारख्या सहस्रो लोकांनी स्वतःची जन्मभूमी सोडली आणि जगभरातील विविध देशांमध्ये आसरा घेतला. पाकिस्तानी सैन्याने चित्रपट निर्माते असलेल्या माझ्या वडिलांचे अपहरण केले आणि आईवर अत्याचार केले. या अत्याचाराला कंटाळून वर्ष २००८ मध्ये आमचे कुटुंब कॅनडाला गेले. आता मजदक आणि त्यांची पत्नी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत.तेलंगण राज्य मुसलमानांना १२ टक्के आरक्षण देणार !

मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी त्यांना १२ टक्के आरक्षण देणारे 
मुसलमानधार्जिणे तेलंगण राष्ट्र समितीचे शासन !
      भाग्यनगर - तेलंगण राज्यात रोजगार आणि शिक्षण क्षेत्रांत मुसलमानांना १२ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आरक्षणाविषयी तमिळनाडू मॉडेल तेलंगण राज्यात राबवण्याचा विचार चालवला आहे. गेल्या २ वर्षांत राज्यसरकारने घेतलेले निर्णय कायद्याच्या कचाट्यात सापडले असतांना मुसलमानांना १२ टक्के आरक्षण देण्याचे प्रयत्न सरकारने चालवले आहेत. तसेच अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षणही ६ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर नेण्याचा विचार राज्यसरकारने चालवला आहे. राज्यात मुसलमान समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी माजी सनदी अधिकारी जी. सुधीर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच राज्यातील अनुसूचित जमातीचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी एस्. चेल्लप्पा यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले आहे. 
     २००४ मध्ये त्यावेळचे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस्. राजशेखर रेड्डी यांनी मुसलमानांना ५ टक्के आरक्षण घोषित केले होते; मात्र एकूण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याला आक्षेप घेतला होता.

गेल्या १० वर्षांत प्रथमच अमरनाथ यात्रेकरूंच्या संख्येत घट !

पीडीपी-भाजप सरकारच्या काळात हिंदूंच्या धार्मिक यात्रेची झालेली दूरवस्था !
     नवी देहली - काश्मीरमधील अमरनाथ यात्रा १८ ऑगस्टला पूर्ण झाली. गेला दीड महिना काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे प्रथमच अमरनाथ यात्रेकरूंच्या संख्येत घट झाली. यावर्षी एकूण २ लक्ष २० सहस्र ३९९ भाविकांनी दर्शन घेतले. गेल्या वर्षी ही संख्या ३ लक्ष ५२ सहस्र ७७१ इतकी होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत १ लक्ष ३१ सहस्र भाविकांची घट झाली आहे. २००४ पासून सरासरी ३ लक्ष भाविक दर्शनासाठी येत होते. या वर्षी ४७ व्या दिवशी केवळ १०४ भाविकच दर्शनासाठी आलेे. वर्ष २००८ मध्ये या यात्रेकरूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ती ५ लक्षापर्यंत पोचली होती. 
     अमरनाथ श्राइन बोर्डच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, हिजबूल मुजाहिद्दीनचा आतंकवादी बुरहान वानी याला सैनिकांनी ठार केल्यानंतर झालेल्या हिंसाचारामुळे ही घट झाली आहे. २ ऑगस्टच्या पूर्वी प्रतिदिन एक सहस्र भाविक येत होते, ही संख्या यात्रेच्या शेवटच्या आठवड्यात ५०० इतकी झाली होती.आतंकवादाला प्रोत्साहन देणारी अडीच लक्ष ट्विटर खाती बंद !

आतंकवादाच्या विरोधात ट्विटरसारखी सामाजिक संकेतस्थळे सतर्क 
राहून कृती करतात ! भारत शासन अशी कृती करेल का ?
     नवी देहली - मागील काही वर्षांपासून आतंकवादी त्यांचे जाळे वाढवण्यासाठी फेसबूकपासून ट्विटरपर्यंतच्या सामाजिक प्रसारमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे आतंकवादाला प्रोत्साहन देणारी अशी अडीच लक्ष संदिग्ध ट्विटर खाती ट्विटर आस्थापनाने बंद केली आहेत. 
१. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार ट्विटरच्या अधिकार्‍यांच्या मते, या सर्व खात्यांवर आतंकवादाला प्रोत्साहन देणारे मजकूर ट्विट करण्यात येत होते, तसेच भडक चित्रे, ध्वनीचित्रफिती आणि आतंकवादाशी संबंधित वृत्ते ठेवण्यात येत होती.

ऊर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर !

     नवी देहली - सध्याचे रिझर्व्ह बँकेचे उप गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची पदोन्नती होऊन त्यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपष्टात येणार आहे.

पॅरिस आणि ब्रुसेल्स यांवरील आक्रमणांसाठी आतंकवाद्यांकडून मुंबईवरील आक्रमणाचा अभ्यास !

      संयुक्त राष्ट्र - संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या एका अभ्यासानंतर असा दावा केला आहे की, इसिसने पॅरिस आणि ब्रुसेल्स यांवर केलेली आतंकवादी आक्रमणे ही मुंबईवरील आक्रमणाच्या धर्तीवरच होती. या आतंकवाद्यांनी मुंबईवरील आक्रमणाचा आणि या प्रकारच्या अन्य आक्रमणांचा अभ्यास केला होता. या माध्यमातून अधिकाधिक लोकांना लक्ष्य करण्याचाही त्यांचा हेतू होता. या आक्रमणांच्या विरुद्ध कारवाई करणे अवघड होऊन जावे, अशीच या आतंकवाद्यांची व्यूहरचना होती.
     पॅरिसमध्ये १३ नोव्हेंबर २०१५ या दिवशी एका क्रीडा संकुलात, रेस्टॉरंटमध्ये आणि एका सभागृहात आक्रमण करण्यात आले होते. मुंबईवरील आक्रमणासारखीच पद्धत येथे वापरण्यात आली होती. पॅरिसमध्ये १३० जणांचा मृत्यू झाला होता, तर मुंबईवरील आक्रमणात १६० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.


आंध्रप्रदेशमध्ये कृष्णा नदीच्या पुष्कर पर्वामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून धर्मप्रसार !

पुष्कर पर्वातील ग्रंथप्रदर्शन केंद्राचा
लाभ घेतांना जिज्ञासू
      विजयवाडा - १२ वर्षांतून एकदा येणारा कृष्णा नदीचा पुष्कर पर्वाला यावर्षी १२ ऑगस्ट या दिवशी आरंभ झाला असून तो २३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. कृष्णा नदी ज्या ज्या ठिकाणी वहाते, त्या ठिकाणी हे पर्व साजरे केले जाते. या पर्वकाळात कृष्णा नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. हा मेळा आंध्रप्रदेशात कृष्णेच्या तिरावर वसलेल्या विजयवाडा येथील पवित्र संगम घाटावर (कृष्णा आणि गोदावरी नदी यांचा संगम) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने या ठिकाणी भव्य ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीकेंद्र उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी अकादमी केहलीकडून हिंदु धर्मदिन साजरा !

निधर्मी भारतातील महाविद्यालयांमध्ये कधी असा कार्यक्रम होऊ शकतो का ?
      लंडन - हिंदु धर्मातील प्रथा आणि परंपरा जाणून घेण्याच्या उद्देशाने इंग्लंडच्या अटले येथील युनिव्हर्सिटी अकादमी केहली या माध्यमिक शाळेत नुकताच हिंदु धर्मदिन साजरा करण्यात आला. युनिव्हर्सिटी अकादमी केहलीमध्ये भारतीय पद्धतीच्या पोषाखात करण्यात आलेले दांडिया नृत्य हिंदु धर्मदिनाचे वैशिष्ट्य ठरले.
     या वेळी धर्मावर आधारित एक प्रश्‍नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. हिंदु धर्माविषयी माहिती करून घेण्याच्या उद्देशाने हिंदु धर्मावर आधारित प्रश्‍नोत्तराचे सत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी विविध अभिनयाच्या माध्यमातून हिंदु धर्म समजून घेण्याचा प्रयत्न झाला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना हिंदु श्रद्धा आणि संस्कृती यांविषयी बरेच शिकायला मिळाले, असे इंडिया लाईव्ह टुडेच्या प्रवक्त्यांनी सांगितले. 

जर्मनीमध्येही बुरखा वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी !

पाश्‍चात्त्य देशांचे अंधानुकरण करणारे पाश्‍चात्त्यांच्या या मागणीकडे लक्ष देतील का ?
     बर्लिन - युरोपमधील स्वित्झर्लण्ड आणि फ्रान्सप्रमाणे जर्मनीतही सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी आणण्याची मागणी होऊ लागली आहे. 
      जर्मनीचे गृहमंत्री थॉमस डि मजिएरे यांनीही बुरख्यावर बंदी घालण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे. एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चासत्रात ते म्हणाले की, तोंडवळा झाकण्याची प्रथा आमच्या देशात चालू शकत नाही. येथे आम्ही एकमेकांचा तोंडवळा दाखवणे पसंत करतो.

सनातन संस्थेला केंद्रस्थानी ठेवून अन्वेषण यंत्रणांचा तपास का चालू आहे ? - श्री. बापू ढगे, माजी नगरसेवक

सोलापूर येथे सनातनवरील अन्यायाच्या निषेधार्थ मोर्चा 

सोलापूर येथे निषेध मोर्च्यात सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ

 मोर्च्यातील वैशिष्ट्यपूर्ण घटना !
 • कबुतरखान्याजवळील मशिदीच्या येथून मोर्चा आला असता मोच्यार्र्तील घोषणा ऐकून मुसलमान मोर्चा पहाण्यासाठी बाहेर आले.
 • मोर्च्याच्या येथून जाणार्‍या गोविंदा पथकांनी थांबून मोर्च्यात देण्यात येत असलेल्या घोषणा देत मोर्च्याला पाठिंबा दिला.
 • मोर्च्याच्या वेळी सनातनला पाठिंबा दर्शवण्यासाठी चालवलेल्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये १ सहस्र ५०० हिंदूंनी स्वाक्षर्‍या करून पाठिंबा दिला.

मंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोषाखाची अटकळ, या विषयावर जनश्री वाहिनीवर चर्चासत्र

चर्चासत्रात बोलतांना सौ. सुमा मंजेश
(डावीकडे) आणि उजवीकडे सूत्रसंचालक

        बेंगळुरू - कर्नाटकमधील जनश्री या प्रसिद्ध कन्नड दूरचित्रवाहिनीवरून मंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोषाखाची अटकळ या विषयावर चर्चासत्र नुकतेच आयोजित करण्यात आले होते. बेंगळुरू येथील हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्यांनी सर्व मंदिरांना याविषयी निवेदन दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही चर्चा आयोजित करण्यात आली होती.

सैनिकांवर दगड फेकणारे सत्याग्रही नाहीत ! - जेटली

      जम्मू - काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर दगड फेकणारे सत्याग्रही नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काश्मीरमधील देशद्रोह्यांवर टीका केली. हिरानगर येथे तिरंगा यात्रेत ते बोलत होते. जेटली यांनी काश्मीर खोर्‍यातील अस्थिरतेला पाकिस्तानच उत्तरदायी असल्याचे सांगितले. (हे जगजाहीर आहे. पाकला रोखण्यासाठी आतापर्यंत काय केले आणि पुढे काय करणार आहात, ते सांगितले पाहिजे ! - संपादक) राज्यात जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता, तेव्हा नागरिकांच्या हिताचा विचारच केला गेला नाही. काश्मिरी जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असेल, असे जेटली म्हणाले.

पंजाब पोलिसांनी संपूर्ण हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या ! - राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप

श्री. राजासिंह ठाकूर
        भाग्यनगर (हैद्राबाद) - सतीशकुमार प्रधान यांच्या अटकेसंदर्भात भाग्यनगर (हैद्राबाद) येथील भाजपचे आमदार आणि श्रीराम युवा सेना या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष राजासिंह ठाकूर यांच्याशी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने चर्चा केली. या प्रकरणासंदर्भात राजासिंह म्हणाले, आज भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहेत. भारत जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रमाणात गोमांस निर्यात करणारा देश झाला आहे. पंजाब गोरक्षा दल त्यांच्या स्तरावर गोरक्षणाचे कार्य करत आहे. विविध शहरांमध्ये त्यांच्या शाखाही आहेत. पंजाब पोलिसांनी सतीश कुमार यांना अटक करून संपूर्ण हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जर गोमातेला राष्ट्रीय प्राणी घोषित करून कायद्याने तिला संरक्षण दिले असते, तर गोरक्षणाच्या संदर्भात आज अशी दुस्थिती दिसली नसती. कोणताही सनातनी हिंदु गोहत्या होतांना पाहू शकत नाही. मी सतीश कुमार प्रधान आणि सर्व गोरक्षक यांच्या पाठीशी आहे. प्रधान यांना माझा पाठिंबा आहे.

अमरावती येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

       अमरावती - येथे १५ ऑगस्ट या दिवशी पंचवटी चौकात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी अनेकांचे प्रबोधन करण्यात येऊन राष्ट्रध्वज सन्मानपेटीमध्ये ठेवण्यात आले. एका वाहतूक पोलिसाने प्रबोधनानंतर नाल्यात फेकलेला राष्ट्रध्वज परत घेतला आणि या कृत्यासाठी क्षमा मागितली. भगवा वादळ संघटनेचे श्री. अतुल खोंड यांनी केलेल्या प्रबोधनानंतर एका वाहनचालकाने वाहनावरील १५ राष्ट्रध्वज काढले. श्री. खोंड यांनी त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही मोहिमेत सहभागी केले होते. सिटी न्यूज वृत्तवाहिनीने मोहिमेला प्रसिद्धी दिली.

धडाडीचे गोरक्षक श्री. सतीश प्रधान यांच्या अटकेच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील गोसेवकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

गोरक्षकांना नाहक त्रास देण्याची किंमत शासनाला 
चुकवावी लागेल ! - पंडितकाका मोडक, संचालक, 
सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा, वडकी
        हिंदुत्वाच्या प्रेमापोटी लोकांनी पंतप्रधानांना बहुमताने निवडून दिले. मोदी यांनी गोरक्षकांना समाजकंटक संबोधून त्यांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे. गोरक्षकांवर गुन्हे प्रविष्ट करण्याऐवजी त्यांनी प्राणीसंरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. पोलिसांकडून गोरक्षणाचे कार्य होत नसल्याने गोरक्षकांना हे कार्य करावे लागते. महाराष्ट्रात गोरक्षणाच्या संदर्भात ९५ टक्क्यांहून अधिक प्रथमदर्शी अहवाल हे गोरक्षकांचे आहेत. पोलीस आपणहून कोणतीही अवैधरित्या गोवंशियांची वाहतूक करणारी गाडी पकडत नाहीत. मोदी सरकारने हिंदूंच्या भावनांचा विचार करावा. गोरक्षकांच्या दृष्टीने गाय हा जिवंत देव आहे. सतीश कुमारांसारख्या गोरक्षकांना अटक करून सरकारने वेडेपणा केला आहे. त्यांची किंमत सरकारला चुकवावी लागेल. हिंदुत्वाच्या भावनेने गोरक्षक पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत राहिले. मोदी शासन सत्तारूढ होण्यात गोरक्षकांचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात असंवेदनशील वक्तव्य करायलाच नको होते; कारण गोरक्षण करणारा कार्यकर्ता स्वतःचा जीव धोक्यात घालून धन अर्पण करून गोरक्षणाचे कार्य करत असतो.

जनतेला खड्डेमुक्त रस्ते कधी मिळणार ?

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे
   मुंबई-गोवा महामार्ग प्रतिवर्षी पावसाळ्यात पडणार्‍या खड्ड्यांमुळे चर्चेत असतो. हा महामार्ग मुंबईपासून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह गोवा आणि कर्नाटक या राज्यांतून केरळ राज्यातील एडापल्लीपर्यंत जाणारा देशातील ७ वा महामार्ग आहे. भेद इतकाच की, महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत केरळ, कर्नाटक आणि गोवा ही राज्ये या महामार्गाविषयी तुलनेत थोडी अधिक सजग आहेत, असे वाटते. मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे, तर नुकत्याच घडलेल्या महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेने मार्गाच्या एकंदरित सुरक्षेविषयी प्रश्‍नचिन्ह उभे झाले आहे. लवकरच गणेशोत्सवानिमित्त गणेशभक्त मोठ्या प्रमाणात याच मार्गावरून कोकणात येेणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर एकूणच महामार्गाच्या झालेल्या दुर्दशेमुळे होणारे अपघात आणि नागरिकांचे मृत्यू टाळण्यासाठी काही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार आहे का ? हा खरा प्रश्‍न आहे. 
संकलक : श्री. संजय जोशी, कुडाळ, सिंधुदुर्ग.

साम्यवाद्यांच्या पोकळ धमक्यांनी सनातन संस्था संपणार नाही ! - डॉ. उदय धुरी, मुंबई समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

       दाभोलकर हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या नागोरी, खंडेलवाल आणि सनातनचे श्री. समीर गायकवाड यांना २५ लक्ष रुपयांची लाच देऊ केली होती. हा अपप्रकार पोलीस खात्यातील चांगल्या पोलिसांनी बाहेर आणावा. अंनिस, काँग्रेस, साम्यवादी हे सनातनला गाडण्याचे स्वप्न पहात आहेत. हे पाखंडी साम्यवादी अभय वर्तक यांना गोळ्या घालण्याची भाषा करतात, यावरून त्यांचे अंत:करण विकृत आहे, हे दिसून येते. साम्यवाद्यांनी लक्षात ठेवावे की, सनातन चिरंतन असून साम्यवाद्यांच्या पोकळ धमक्यांनी सनातन संपणार नाही.
हिंदुत्ववाद्यांच्या प्रतिक्रिया
१. श्री. विनोद ठावरे, विश्‍व हिंदु परिषद : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितलेल्या धर्मकार्यात आपण सहभागी होऊया.
२. श्री. बळवंतराव दळवी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान : कोणत्याही परिस्थितीत आम्ही सनातनवर बंदी आणू देणार नाही. सनातन ही हिंदु धर्मासाठी कायदेशीर लढा देणारी संस्था आहे. आम्ही सर्व धारकरी सनातनच्या मागे ठामपणे उभे आहोत.

कोकणातील वाहतूक मार्गाच्या बदलामुळे वाढीव तिकिटाचा लक्षावधी गणेशभक्तांना भुर्दंड बसणार !

      मुंबई-गोवा महामार्गावर प्रतिदिन मोठ्या प्रमाणात वाहतूक असतेच. त्यातही गणेशोत्सवाच्या काळात त्यामध्ये अनेक पटीने वाढ होते. प्रतिवर्षी महामार्गावर खड्डे पडल्याने प्रवासाला विलंब होत असतोच; मात्र या वर्षी महाडमधील पूल दुर्घटना आणि मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुर्दशा, या पार्श्‍वभूमीवर येत्या गणेशोत्सवात एस्.टी. गाड्यांचा मार्ग पालटण्यात आला आहे. आता पनवेल मार्गाऐवजी सातारा-चिपळूणमार्गे गाड्या कोकणात येणार आहेत. त्यामुळे कोकणात पोहोचण्यास अधिक वेळ लागणार आहे. वाढीव तिकीटाचा अधिक भुर्दंड लक्षावधी गणेशभक्तांना सोसावा लागणार आहे. याला उत्तरदायी कोण, असा संतप्त प्रश्‍न कोकणवासीयांतून विचारला जात आहे.

गोरक्षकांवर कारवाई आणि कसायांना मोकळे रान, हा हिंदूंवर अन्याय ! - हिंदु जनजागृती समिती

पंजाब गोरक्षा दलाचे प्रमुख श्री. सतीशकुमार प्रधान 
यांच्या अटकेचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निषेध !
        हिंदूंसाठी पूजनीय असणार्‍या गोमातेची हत्या करणार्‍या कसायांना मोकळे रान आणि स्वतःच्या धार्मिक श्रद्धांचे रक्षण करणार्‍या गोरक्षकांवर अन्यायकारक कारवाई हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे. पंजाब गोरक्षा दलाचे प्रमुख श्री. सतिशकुमार प्रधान यांना झालेली अटक हा त्यातीलच एक प्रकार आहे. हिंदुबहुल भारतात हिंदूंच्या धर्मश्रद्धांचा हा अपमान आहे. त्यामुळे शासनाने या भूमिकेचा पुनर्विचार करावा आणि गोरक्षकांविषयीची आकसाची भूमिका सोडून द्यावी अन्यथा देशभरात गोरक्षकांच्या समर्थनार्थ जनआंदोलन उभे राहील, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. देशात हिंदुत्ववादी विचारांचे शासन आले असले, तरी अनधिकृत पशूवधगृहे, गोमातेची अवैध वाहतूक, गोहत्या, गोमांस निर्यात यांपैकी कशावरही बंदी नाही.

जिहादी विळख्यात सापडलेला पाक आणि बलुचिवासियांचे बंड !

१. ज्या बुद्धीवादी वर्गाने पाकिस्तानी जिहादी 
मानसिकतेला खतपाणी घातले, तीच 
मनोवृत्ती आता तिथल्या अभिजनांवर उलटली ! 
श्री. भाऊ तोरसेकर
        पाकिस्तानात आता तिथल्या जाणत्या वा अभिजनांना जिहादचे चटके जाणवू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी क्वेट्टा येथे झालेली भीषण बॉम्बस्फोटाची घटना त्याचीच ग्वाही देते; कारण या स्फोटात सर्वाधिक मारले गेले आहेत, ते अधिवक्ते आहेत. एका सन्मान्य अधिवक्त्यावर दोन दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडल्या. तो अधिवक्ता संघटनेचा पदाधिकारी होता. साहजिकच वकीलवर्गात त्यावरून संतापाची लाट येणार हे उघड होते. त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणले गेले आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला. पुढल्या घटना अपेक्षित होत्या. विनाविलंब तिथे वकिलांनी गर्दी केली आणि त्या गर्दीतच कोणीतरी भयंकर स्फोट घडवून पाऊणशे लोकांचा झटक्यात बळी घेतला. यामागे कोणाचा हात आहे, त्याचा शोध घेण्याच्या आधीच बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय गुप्तचर खात्यावर घातपाताचा आरोप करून टाकला. पाक सेनेच्या स्थानिक अधिकारी वर्गानेही त्याला दुजोरा देऊन टाकला. आता ही पाकिस्तानी शैली झालेली आहे. पाकिस्तानात कुठेही असंतोष वा हिंसक घटना घडली की, त्यासाठी भारतीय गुप्तचर संस्थेला उत्तरदायी धरणे ही जणू फॅशन झाली आहे. आरंभीच्या काळात त्याचा गवगवा पाकिस्तानी माध्यमे आणि पत्रकारही करत असत; मात्र त्याचे चटके बसू लागले, तेव्हा अनेकांना जाग येऊ लागली. भारताला हिणवण्याची संधी म्हणून ज्या बुद्धीवादी वर्गाने पाकिस्तानी जिहादी मानसिकतेला खतपाणी घातले, तीच मनोवृत्ती आता तिथल्या अभिजनांवर उलटू लागली. पाकमध्ये शेकड्यांनी लहानमोठे जिहादी गट तयार झाले असून, ते आपापल्या हेतूसाठी कोणालाही लक्ष्य करू लागले आहेत. त्या मानसिकतेचा भीषण आविष्कार म्हणजे क्वेट्टा येथील घटना म्हणता येईल; पण त्यातला भारतावर झालेला आरोप नुसता झटकून टाकता येणार नाही. त्यामागे किती तथ्य आहे, त्याकडेही बारकाईने बघावेच लागेल.

राष्ट्ररक्षणाचा वसा घराघरातून मिळायला हवा !

        सातारा जिल्ह्यातील अपशिंगे हे लहान गाव; पण या गावाने देशभक्तीचा मोठा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. विविध सामाजिक संकेतस्थळांवर (सोशल मीडिया) देशभक्तीच्या गप्पा मारणार्‍यांनी कृतीच्या स्तरावर देशभक्ती काय असते, हे अपशिंगेकरवासियांकडून शिकायला हवे. लष्करी सेवेतील योगदानामुळे या गावाला अपशिंगे मिलिटरी असेही म्हणतात; कारण या गावाचे देशसेवेतील योगदान हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. गावातील लोकांचे पूर्वज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते. तेव्हापासून ते आतापर्यंत या गावातील लोकांनी देशसेवेसाठी हौतात्म्य पत्करले आहे. गावातील प्रत्येक कुटुंबामधील एक व्यक्ती ही देशसेवेसाठी सीमेवर जाते. राजांच्या मावळ्यांकडून त्यांना मिळालेला राष्ट्ररक्षण कार्याचा वसा गावातील व्यक्ती खंबीरपणे पुढे नेत आहेत.
        पहिल्या महायुद्धापासून ते वर्ष १९७१ च्या पाकिस्तानविरोधी युद्धापर्यंत या गावातील अनेक सैनिक भारतासाठी हुतात्मा झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेसाठीही ग्रामस्थांनी सहभाग घेतल्याची नोंद आहे. नुकतेच सातारा जिल्ह्यातील कर्नल संतोष महाडिक यांना आतंकवाद्यांशी हौतात्म्य पत्करल्यावर त्यांच्या वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी स्वतःसह मुलांना देशसेवेसाठी झोकून देण्याची शपथ घेतली. प्रत्यक्षातही त्या लष्करी प्रशिक्षण घेण्यासाठी पुढे गेल्या आहेत. या सर्व उदाहरणांवरून लक्षात येईल की, त्यांना देशसेवेची प्रेरणा ही कोठून मिळाली, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांकडून. देशाची आजची स्थिती ही विदारक आणि भयावह असून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अपशिंगेकरवासियांप्रमाणे प्रत्येक घराने तसा वसा घ्यायला हवा आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
     ज्ञानाचे बीज धर्मात आहे. या ज्ञानरूपी वृक्षाला गीता, वेद, पुराणेरूपी फळे लागतात आणि त्यावर संतांनी रचलेले अभंग आणि श्‍लोकरूपी पुष्पे बहरलेली असतात. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०१६)       राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचा त्याग करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे.
- समर्थ रामदास स्वामी (छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु)

चीन, जर्मनी, रशिया यांच्यासह अरब राष्ट्र यांची संस्कृती भारतीय होती !

        अफगाणिस्तान, तुर्कस्तान, कजाकिस्तान, उजबेकिस्तान आदी देशांतील भूमीमध्ये उत्खननानंतर सहस्रो संस्कृत ग्रंथ सापडले. येथे ब्रह्मा, विष्णु, महेश यांसह सर्व देवता आणि गंगानदीची पूजा होत होती. जर्मनी आणि रशिया येथे मिळालेल्या मूर्ती या भारतीय संस्कृतीशी मिळत्याजुळत्या आहेत. चीन हा भरतवंशियांचा देश आहे. हिंदूंच्या रामायण आणि महाभारत या ग्रंथांमध्येही भारताचे चीन आणि अन्य देशांशी असलेल्या संबंधाचे विस्तृत वर्णन आहे.
- प्रा. कुसुमलता केडिया, संचालिका, धर्मपाल शोधपीठ, भोपाळ

प.पू. पांडे महाराज यांनी स्वयंपाकसेवेतील साधिकांना केलेले मार्गदर्शन

प.पू. परशराम पांडे
१. अन्नपदार्थ बनवतांना कसा अभ्यास करावा ?
अ. स्वयंपाक घरात अन्नपदार्थ बनवतांना अन्न पाचक कसे होईल, स्वादिष्ट कसे होईल आणि त्याचे लवकर पचन कसे होईल ?, या दृष्टीने अभ्यास करून पदार्थ बनवले पाहिजेत. 
आ. प्रत्येक पदार्थाचा शेवटपर्यंत उपयोग झाला पाहिजे : प्रत्येक पदार्थाचा शेवटपर्यंत उपयोग झाला पाहिजे. जसे भाजीचे देठ आणि पाने यांचाही उपयोग झाला पाहिजे. शेवटी आपण खाऊ शकणार नाही, असे देठ उरतात, ते कुणाची गाय असेल किंवा कुणाकडे ढोरं असतील, त्यांना द्यायला पाहिजे. त्यांना ते न्यायला सांगू शकतो. ते सर्व कचर्‍यात टाकले की, वाया जाते.

कठीण प्रसंगांवर गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर मात करणार्‍या सौ. गौरी आफळे !

श्री. वैभव आफळे
सौ. गौरी आफळे
      सौ. गौरी वैभव आफळे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतात. श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२२.८.२०१६) या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे पती श्री. वैभव आफळे यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवणारे पालट पुढे देत आहोत. 
सौ. गौरी आफळे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! 

स्वतः भावावस्थेत राहून इतरांकडून भावजागृतीचे प्रयत्न करवून घेणार्‍या पू. (सौ.) सुमन नाईक !

पू. (सौ.) सुमन नाईक
       पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या काळात सौ. सुमनमावशी (सौ. सुमन नाईक) या संतसेवेसाठी आमच्यासमवेत होत्या. सौ. सुमनमावशी यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. वयाने मोठ्या असूनही सौ. सुमनमावशी प्रत्येक गोष्ट विचारून करतात.
२. रामनाथीला सेवेसाठी येतांना सांगितलेल्या वेळेत त्या आवरून तयार असत.
३. शिकण्याची वृत्ती
     त्यांना सेवेतून शिकायला मिळालेली सूत्रे सांगून त्यांनी ती टंकलिखित करून द्यायला सांगितली.

पत्नीला साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे आणि प.पू. डॉक्टरांवर श्रद्धा असणारे पुणे येथील श्री. ऋषिकेश कुलकर्णी !

श्री. ऋषिकेश कुलकर्णी
सौ. रमणी कुलकर्णी
    श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२२.८.२०१६) या दिवशी पुणे येथील श्री. ऋषिकेश भारत कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
श्री. ऋषिकेश कुलकर्णी यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसाच्या 
हार्दिक शुभेच्छा !

दिखाऊ, बाह्य सौंदर्यापासून दूर असलेली, इतरांचा विचार करणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि महर्लोेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. नेहा प्रवीण कर्वे (वय १५ वर्षे) !

कु. नेहा कर्वे
       (कु. नेहा हिची २०१४ मध्ये आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती.)
१. गुणवैशिष्ट्ये 
१ अ. साधी रहाणी 
१ अ १. मैत्रिणी पाश्‍चात्त्य पद्धतीचा पोषाख वापरत असूनही नेहाला सात्त्विक पद्धतीने रहायला आवडणे : नेहाच्या शाळेतील आणि शिकवणी वर्गातील सर्व मुली प्रतिदिन पाश्‍चात्त्य पद्धतीचे कपडे परिधान करतात. त्याचप्रमाणे केस मोकळे सोडणे, कुंकू-टिकली न लावणे, नियमित सौंदर्य वर्धनालयात जाणे आदी कृती करतात; परंतु नेहा त्यांच्यासमवेत राहूनही पंजाबी पोषाखच वापरते. ती नियमितपणे कुंकू लावून बाहेर पडते. तिला पावडर लावायलाही मुळीच आवडत नाही. मैत्रिणींमध्ये नेहा अत्यंत साधी दिसते; पण तिच्या मनात याविषयी विचारही येत नाही.

आला अमृत महोत्सव परात्पर गुरुमाऊलीचा ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
सौ. माधवी घाटे
आला अमृतमहोत्सव परात्पर गुरुमाऊलीचा ।
भाग्यवान आम्ही बघणार सोहळा 
गुरुमाऊलीचा ॥ १ ॥ 

काय वर्णू कौतुक परात्पर गुरुमाऊलीचे ।
करती कौतुक देव, ऋषि अन् महर्षि 
माऊलीचे ॥ २ ॥ 

अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर दिले सूक्ष्मातून दर्शन गुरुमाऊलीने ।
                                             न अडकवले साधकांना स्वतःच्या स्थूल रूपात माऊलीने ॥ ४ ॥

भारत हीच आमुची भगिनी, हीच माता । भारत हीच आमुची भगिनी, हीच माता ।

सौ. वर्षा ठकार
शील तिचे रक्षण करण्या ।
कटीबद्ध आम्ही धर्मरक्षक आता ॥ १ ॥

सोडवून तुझ्या अधर्मी बेड्या ।
गाऊ धर्माची पवित्र गाथा ॥ २ ॥

रक्ताचा टिळा मस्तकी लावून ।
नमन करतो हे भगिनी तुजला ॥ ३ ॥

आणण्यास हिंदु राष्ट्र ।
सर्वस्व अर्पून देऊ झुंज ।
तव चरणांशी करूनी वंदन ।
हातात घेऊन नाम, संघशक्ती, गुरुवचन ॥ ४ ॥

मायेमुळेच आपण ब्रह्माला शोधण्यातील आनंद अनुभवू शकतो !

     चित्राचा भावार्थ : आपल्याला मायेतील ब्रह्म शोधायचे आहे. या चित्रात ढग म्हणजे माया, तर इंद्रधनुष्यामागे श्रीकृष्ण, म्हणजेच ब्रह्म लपला आहे. पावसाचे ढग हे काही क्षणांपुरतेच येतात आणि पाऊस पडून गेल्यावर पुन्हा आकाश निरभ्र होते. मायाही अशीच काही क्षणांपुरती सुख देणारी असते; परंतु हे पावसाळ्यातील ढगच नसतील, तर इंद्रधनुष्याचा आनंद आपल्याला अनुभवता येणार नाही, म्हणजेच मायाच नष्ट झाली, तर ब्रह्माला शोधण्यातील आनंद आपण अनुभवू शकणार नाही, असे या चित्रातून सुचवायचे आहे.

२४ ऑगस्टला असणार्‍या श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने....

हे मुरलीधरा कान्हा... ।
हे मुरलीधरा कान्हा, येण्या तुझ्या चरणी ।
अज्ञानी जीव हा, व्याकुळ झाला रे । 
तुझी राधा-मीरा होण्यासी, मी एकरूप तुझ्याशी रे । 
करशील ना मला तुझी दासी, त्यासाठी मी आतुरलेले रे ॥ 
- कु. चैताली बाळासाहेब पोटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०१४)

हे वर्ष सर्व साधकांच्या विजयाचे !

       ३०.५.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ८० मध्ये महर्षि म्हणतात, आजच्या दिवसापासून विजययोग आहे. हे वर्ष सर्व साधकांच्या विजयाचे वर्ष आहे. (२० आणि २१ ऑगस्ट २०१६ या दिवशी पुणे, मुंबई, सातारा, सोलापूर यांसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी सनातनला पाठिंबा दर्शवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ मोर्चे आणि आंदोलने यांच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात संघटित झाले. यातून साधकांची विजयाच्या दिशेने चाललेली वाटचाल लक्षात येते. यावरून महर्षींनी केलेले भाष्य तंतोतंत आहे, याची साक्ष पटते ! - संपादक)

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ६९ वर्षे झाली, तरी सुराज्य स्थापता आले नाही, हे सर्व राजकीय पक्षांना लांच्छनास्पद !

       स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या प्राणाच्या बलीदानामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. आता या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी सर्वाच्या संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. 
- केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक
       राग-द्वेष यांपासून विमुक्त असलेल्या ऋषिमुनींनी दिव्य दृष्टीने पुराण वेदांची रचना केली असल्याने ही शास्त्रे शाश्‍वत आहेत.
- शिवनारायण सेन, सचिव, राष्ट्र-धर्म प्रचार सभा, बंगाल

संख्याबळातही सनातनचाच विजय !

      पुणे येथे २० ऑगस्टला सकाळी अंनिसच्या वतीने काढलेल्या मोर्च्यात २०० पुरोगाम्यांनी सहभाग दर्शवला होता; मात्र त्याच वेळी सनातनच्या समर्थनार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी काढलेल्या पुण्यातील मोर्च्यात ३०० हून अधिक आणि मुंबईतील मोर्च्यात ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. दोन्ही मोर्च्यांमधील संख्याबळ पहाता पुरो(अधो)गाम्यांपेक्षा सनातनच पुढे राहिले.

फलक प्रसिद्धीकरता

गोमातेला पूजणार्‍या 
हिंदूंच्या देशात गोरक्षकांनाच अटक !
       गोरक्षणासाठी प्राणपणाने लढणार्‍या पंजाब गोरक्षा दलाचे प्रमुख श्री. सतीशकुमार प्रधान यांना २१ ऑगस्ट या दिवशी पटियाला पोलिसांनी अटक केली. त्यांच्या संघटनेचे सदस्य काही गो-तस्करांना मारहाण करतांनाचा एक व्हिडिओ समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
      Punjab Goraksha Dalke Satish Kumar Pradhanke virodhme gotaskaroki shikayat, policene bandi banaya
Gayko mata mananewale Hinduoka kya yah apman nahi ?
जागो !
      पंजाब गोरक्षा दल के सतीशकुमार प्रधान के विरोध में गोतस्करों की शिकायत, पुलिस ने बंदी बनाया.
गाय को माता माननेवाले हिन्दुआें का क्या यह अपमान नहीं ?

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

विचारपूर्वक 
कृती करणे आवश्यक !
       कोणतीही कृती करण्यापूर्वी थोडा वेळ थांबून ती खरोखरंच हितावह आहे का ? याचा विचार करण्याची स्वतःला सवय लावावी.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या भक्तीची गोडी निर्माण केली असती, तर कोणी दारू आणि सिगारेट यांच्या नशेला बळी पडला नसता !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको 
रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं ।
भावार्थ : आनेवालेको कहना नहीं मधे कहना हे विचारणे या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला तू जन्माला का आलास ? असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस ? हे स्वतःला विचारल्याविना राहू नये. या प्रश्‍नाने तरी तो स्वतःच्या खर्‍या रूपाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

वानी यांची अभद्र वाणी !

        शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी !, ही प्रचलित असलेली म्हण आपल्या सर्वांना ठाऊक आहे. माता-पिता हे सुसंस्कारित, नीतीवान असले, तर त्यांचे अपत्यही सुसंस्कारित आणि नीतीवान निपजते, हा या म्हणीचा अर्थ ! जर बीजच नासके आणि किडके असेल तर ? त्याचे फळही नासके, किडके म्हणजे थोडक्यात बुरहान वानी याच्यासारखे निपजते ! हे जिहादी कार्टे ज्यांनी जन्माला घातले, त्यांचे नाव मुझफ्फर वानी ! बुरहान हा त्यांच्यासाठी अल्लाचा बंदा आहे. जिहाद करणे, हे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे, असे मुझफ्फर वानी यांचे म्हणणे आहे. भविष्यात कधीतरी मुझफ्फर वानी पैगंबरवासी होतील. तेव्हा त्यांना म्हणे अल्लाने जर विचारले, माझ्यासाठी काय केले ?, तर त्याचे उत्तर देता यावे म्हणून त्यांनी बुरहानला अल्लाच्या मार्गावर जाऊ दिले. हे मुझफ्फर महाशय एका शाळेचे मुख्याध्यापक आहेत. आता अशा विचारसरणीच्या मुख्याध्यापकांच्या शाळेत बुरहानच निपजत असतील, हे वेगळे सांगायला नको. काश्मीरमधील आतंकवाद निपटण्याविषयी बरीच चर्चा होते. जोपर्यंत मुझफ्फर वानी यांच्यासारख्या मानसिकतेचे मुसलमान काश्मीरमध्ये आहेत, तोपर्यंत बुरहानसारखी पिलावळ जन्माला येतच रहाणार. सध्या बुरहान वानी याच्यापेक्षा सर्वांत मोठे आव्हान हे अशा जिहादी मानसिकतेच्या विरोधात लढणे हे आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn