Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातनची कोर्ट ट्रायल नव्हे, तर मिडिया ट्रायल चालू ! - अभय वर्तक, सनातन संस्था

सनातनवरील अन्यायाच्या विरोधात पुणे आणि अन्य ठिकाणी आज भव्य निषेध मोर्चा !
 
डावीकडून सर्वश्री आनंद दवे, अभय वर्तक आणि पराग गोखले
    पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणात सनातनच्या निष्पाप साधकांना अटक करण्यात आली. पुरोगाम्यांच्या दबावापोटी सनातनच्या साधकांना नाहक अडकवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात येत आहे. पानसरे हत्या प्रकरणात अटकेत असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावरील खटला चालू करावा, अशी मागणी करूनही तो खटला चालूच केला जात नाही. सनातनला आरोपीच्या पिंजर्‍यात नाहक उभे केले जात आहे. आज सनातनची कोर्ट ट्रायल नाही, तर मिडिया ट्रायल चालू आहे. सनातन संस्थेवरील अन्यायाच्या विरोधात २० ऑगस्ट या दिवशी भव्य निषेध मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. या मोर्च्याची माहिती देण्यासाठी १९ ऑगस्ट या दिवशी येथील हॉटेल साहिलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. आनंद दवे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले उपस्थित होते.

पाकव्याप्त काश्मीर कधी मुक्त करणार ? - भारताचा पाकला प्रश्‍न

भारताच्या सांगण्यावरून पाक कधीही पाकव्याप्त काश्मीर 
सोडणार नाही, तर तो युद्ध करूनच जिंकावा लागणार आहे !
     नवी देहली - पाकने गेल्या आठवड्यात काश्मीर विषयावर चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिले होतेे. त्यावर भारताचे परराष्ट्र सचिव एस्. जयशंकर यांनी पाकला ५ सूत्रांवर चर्चा करण्याचे उत्तर पाठवले आहे. यात पाकव्याप्त काश्मीर पाक कधी मुक्त करून देणार, यावर भर देण्यात आला आहे.
     परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी सांगितले की, ज्या ५ सूत्रांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, त्यात जम्मू-काश्मीरमध्ये पाककडून होणारी आतंकवादी आक्रमणे थांबवणे, काश्मीरमध्ये हिंसाचार करण्यासाठी प्रोत्साहन न देणे, पाकमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर घोषित करणार्‍या आतंकवाद्यांवर कारवाई करणे, पाकमध्ये चालणारी आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे बंद करणे आणि भारतातून पळून पाकमध्ये गेलेल्या आतंकवाद्यांवर कारवाई करणे, अशी सूत्रे आहेत.

केरळमध्ये सणांच्या वेळेस ऑनलाईन मद्य उपलब्ध होणार !

केरळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारची योजना
केरळ सरकारने मद्याच्याच नशेत हा निर्णय घेतला
असावा, असे जनतेला वाटल्यास आश्‍चर्य वाटू नये !
     कोझीकोडे (केरळ) - देशातील काही राज्यांत दारूबंदी आहे, तर काही राज्यांत बंदीची मागणी होत आहे, अशा वेळेस केरळमध्ये सणांच्या वेळी ऑनलाईन मद्यविक्री करण्यात येणार आहे. यासाठी केरळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने अनुमती दिली आहे.
     केरळ सरकारच्या अखत्यारित असलेल्या सहकार महासंघाने ओणमच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. सणाच्या दिवशी लोकांना रांगा लावाव्या लागू नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे महासंघाचे अध्यक्ष एम्. मेहबूब यांनी सांगितले. (इस्लाममध्ये मद्य पिणे वर्ज्य असतांना मेहबूब अशा प्रकारचा निर्णय घेऊन इस्लामद्रोह तर करत आहेतच, तसेच ओणमसारख्या हिंदूंच्या सणांच्या वेळी ही योजना राबवून हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत ! - संपादक)

आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि ठार करू ! - डोनाल्ड ट्रम्प यांची आतंकवाद्यांना चेतावणी

भारतातील एकातरी राज्यकर्त्याने असे कधी म्हटले होते का ?
     वॉशिंग्टन - आमच्या नागरिकांना मारण्याचा प्रयत्न करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांना माझी चेतावणी आहे की, आम्ही तुमचा शोध घेऊ आणि तुम्हाला ठार करू. आम्ही यात विजयी होऊ, असे प्रतिपादन अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठीचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ते एका प्रचारसभेत बोलत होते. ट्रम्प पुढे म्हणाले की, आतंकवादाच्या प्रकरणी आम्ही राष्ट्र निर्माणाचे कार्य संपवून इसिस आणि इस्लामी आतंकवाद यांना नष्ट करण्यावर लक्ष केंद्रीत करू.

(म्हणे) माझा मुलगा चुकीचे करत असता, तर लोकांनी त्याला समर्थन दिले नसते ! - बुरहान वानीच्या वडिलांचा कांगावा

चोर, दरोडेखोर, आतंकवादी, देशद्रोही यांचे आईवडील आणि समर्थक 
कधीतरी त्यांच्या मुलांना आणि नेत्यांना चुकीचे ठरवतील का ? 
      श्रीनगर - भारतीय सैन्याने ठार केलेला हिजबुल मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटनेचा कमांडर बुरहान वानी याच्या वडिलांनी त्याच्या आतंकवादी कृत्याचे एक प्रकारे समर्थन करणारे विधान केले आहे. बीबीसी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुजफ्फर वानी यांनी म्हटले की, माझा मुलगा चुकीचे वागत असता, तर लोकांनी रस्त्यावर येऊन त्याला समर्थन दिले नसते. (हिंदुद्वेषी असणारी वृत्तसंस्था बीबीसी ! बीबीसीने कधी काश्मीरमधील परागंदा झालेल्या हिंदूंची किंवा काश्मीरमधील देशद्रोह्यांच्या दगडफेकीत घायाळ होणार्‍या सैनिकांची मुलाखत घेतली आहे का ? - संपादक)

जिहादी आतंकवादी हाफीज सईद याची इस्लाममधून हकालपट्टी करण्याचा बरेली (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानांचा फतवा !

     बरेलीच्या मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण करणार्‍या भारतातील धर्मांधांच्या विरोधातही फतवा काढावा, काश्मीरमधून हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणार्‍यांच्या विरोधातही फतवा काढावा, घुसखोर बांगलादेशींच्या विरोधातही फतवा काढावा, अशी येथील जनतेची इच्छा आहे !      बरेली (उत्तरप्रदेश) - पाकमधील आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार हाफीज सईद याच्या विरोधात इस्लाममधील बरेलवी धर्मगुरूंनी फतवा काढला आहे. त्याद्वारे सईद याची इस्लाममधून हकालपट्टी झाल्याचे मानण्यात येत आहे. बरेली येथे झालेल्या इस्लामिक परिषदेत मुफ्ती महंमद सलीम बरेलवी यांनी हा फतवा काढला. सईद याला पाठिंबा देणे किंवा मुसलमान म्हणणे अवैध असल्याचेही बरेलवी यांनी म्हटले आहे.
     पाकिस्तानचे निर्माते जिना यांच्या अपूर्ण राहिलेल्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी पाक सैन्य काश्मीरमध्ये पाठवण्यात यावे, अशी मागणी सईद याने पाकिस्तानी सैन्यदलप्रमुख राहील शरीफ यांच्याकडे केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हा फतवा जारी करण्यात आला आहे.

जैसलमेरमध्ये हेरगिरी करणारा पाकिस्तानी हिंदु नंदलाल महाराज याला अटक !

भारतातील काही हिंदू देशद्रोह करतात, तेथे 
पाकमधील हिंदूंनी भारतात हेरगिरी केली यात आश्‍चर्य ते काय !
     जैसलमेर (राजस्थान) - येथील पोलिसांनी नंदलाल महाराज या पाक नागरिकाला भारतात पाकसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. त्याने आतापर्यंत बॉम्बस्फोटांसाठी पाकमधून भारतात ३५ किलो आर्डीएक्स् आणल्याचे उघड झाले आहे. त्याच्या अटकेनंतर त्याचे ६-७ सहकारी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्याच्या अटकेने सीमा सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. सीमेवरून एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्डीएक्स भारतात येत असतांना सीमा सुरक्षा दल काय करत होते, असे म्हटले जात आहे.
     गुप्तचर विभाग, रॉ आणि राजस्थानच्या गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी नंदलाल याच्यावर पाळत ठेवली होती. नंदलाल याच्याकडून एक दैनंदिनी जप्त करण्यात आली आहे. त्यात त्याने केलेल्या हेरगिरीची माहिती लिहिण्यात आलेली आहे. पाकची गुप्तचर संस्था आयएस्आय त्याला अर्थपुरवठा करत होती, याचीही माहिती या दैनंदिनीत लिहिलेली आहे. आयएस्आय १० ते ७० सहस्र रुपयांपर्यंत त्याला पैसे देत होती.

मंदिराच्या उत्सवात सहभाग नाकारल्याने दलितांची इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी !

इस्लाममध्ये धर्मांतर करणे म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखे नव्हे का ?
     चेन्नई - तमिळनाडूतील करुर जिल्ह्यात असलेल्या मालायकोविलूरया गावातील मंदिराच्या उत्सवात दलितांना सहभाग नाकारल्याने इस्लाम धर्म स्वीकारण्याची तसेच जाळून घेण्याची धमकी दिली आहे. (हिंदु धर्मात जातीव्यवस्था नाही. जातीव्यवस्था मानवनिर्मित आहे. हिंदु समाजाला धर्मशिक्षण दिले, तरच हे थांबेल ! इस्लाममध्ये प्रवेश करणार्‍या दलितांनी शिया, सुन्नी, अहमदीया आदी मुसलमानांमधील जातीव्यवस्था समजून घ्यावी ! मुसलमानांमध्ये जातींवरून रक्तपात होतो. दलितांनी याचा अभ्यास केल्यास ते त्यांचा निर्णय नक्की पालटतील ! - संपादक)

भाजपच्या कार्यकर्त्याने अनुभवला अंदमानमधील रुग्णालयांमध्ये चालणारा ख्रिस्ती धर्माचा प्रचार !

रुग्णांना भेटून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतांना ख्रिस्ती
      पोर्ट ब्लेअर - अंदमानच्या पोर्ट ब्लेअर शहरातील जी.बी. पंत रुग्णालयामध्ये उपचार घेणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी ३ ख्रिस्ती महिला गरीब हिंदु रुग्णांची भेट घेऊन त्यांचे नाव आणि पत्ता लिहून घेत होत्या आणि त्यांना येशू ख्रिस्ताला प्रार्थना करण्यास सांगत होत्या. तसेच त्या महिलाही रुग्णांसाठी येशूला प्रार्थना करत होत्या. त्यानंतर त्या खचलेल्या रुग्णांना भेटकार्ड देऊन चर्चला भेट देण्याची विनंती करत होत्या, अशी माहिती भाजपचे कार्यकर्ते मोहन हलदर यांनी दिली आहे.

आगामी विधानसभांच्या निवडणुकांमुळे डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता नाही !

केंद्रशासनाने याविषयीची भूमिका स्पष्ट करावी, अशी राष्ट्रप्रेमींची इच्छा आहे ! 
      मुंबई - उत्तरप्रदेश, पंजाब आणि गोवा राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकांमुळे डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कारवाई करण्याविषयी केंद्रसरकारच फारसे उत्सुक नसल्याने ही कारवाई तूर्तास बारगळण्याची शक्यता असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. (डॉ. झाकीर यांच्याविषयी भारत शासनाकडे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. असे असतांनाही त्यांच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. या उलट बांगलादेशात मात्र डॉ. झाकीर यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी आहे ! - संपादक)
     डॉ. झाकीर यांचे इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून धर्मप्रचाराच्या नावाखाली जिहादी आतंकवादी संघटनांशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाईची सिद्धता चालू केली. याविषयी पोलिसांनी एक अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाशी चर्चा करून डॉ. झाकीर यांच्यावर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली; मात्र तशी कारवाई होण्याची शक्यता सध्या दिसत नाही.

काश्मीरमध्ये देशविरोधी मुसलमानांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना हाकलले !

काँग्रेसी नेत्यांनी काश्मीरमध्ये जे पेरले, तेच आता त्यांच्यावर उलटले आहे !
     श्रीनगर - काश्मीरमध्ये गेला दीड महिना चालू असलेल्या हिंसाचारात घायाळ झालेल्या दंगलखोरांची विचारपूस करण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीयमंत्री मणिशंकर अय्यर गेले होते. (काँग्रेसच्या राज्यात साडेचार लाख हिंदूंना काश्मीरमधून पलायन करावे लागले, सहस्रो हिंदूंवर अत्याचार झाले, तेव्हा मणिशंकर अय्यर किंवा अन्य काँग्रेसी नेते कधी त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले होते का ? - संपादक) तेव्हा रुग्णालयातील मुसलमान स्वयंसेवक, कर्मचारी आणि घायाळ दंगलखोर यांनी विरोध करून त्यांना हाकलून लावले. खुन्यांशी हात मिळवण्याची आमची इच्छा नाही, असे विरोध करणार्‍यांनी सांगितले. अय्यर हे रुग्णालयात पोहोचताच गो इंडिया गो बॅक अशी देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. श्रीनगर येथील महाराजा हरिसिंह रुग्णालयात ही घटना घडली. अय्यर एका शिष्टमंडळासमवेत येथे गेले होते. त्यात सामाजिक कार्यकर्त्या शबनम हाशमी, एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) कपिल काक, पत्रकार प्रेमशंकर झा आदी मान्यवर आणि काँग्रेस कार्यकर्ते यांचा सहभाग होता.

हिंदु विवाह विधेयक अखेर पाकच्या संसदेत !

      इस्लामाबाद - पाक संसद सदस्य श्री. रमेश लाल यांनी हिंदु विवाह विधेयक पाकच्या संसदेत नुकतेच मांडले. या विधेयकाला अनुमती देण्यासाठी संसदीय समितीने सुमारे १० महिने घेतले. त्यानंतर त्याविषयीचा अहवाल संसदेसमोर ठेवण्यास आणखी ६ महिने घेतले. सरकारने आता हे विधेयक पुढील अधिवेशनात सभागृहात चर्चेला घ्यावे, असे श्री. लाल यांनी म्हटले आहे. हा कायदा झाल्यास विवाहित हिंदु महिलांच्या अपहरणाचे प्रकार थांबतील, असे म्हटले जात आहे.

खजुराहो येथील १८ व्या शतकातील मंदिर खुले करणार

       भोपाळ (मध्यप्रदेश) - खजुराहो येथील १८ व्या शतकातील प्रतापेश्‍वर मंदिर पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. ही ऐतिहासिक वास्तू सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय पुरातत्व खाते हे मंदिर कह्यात घेणार आहे. वर्ष १९५६ मध्ये हे मंदिर बंद करण्यात आले होते. राज्य पुरातत्व खाते या मंदिराची काळजी घेऊ शकले नाही. त्यामुळे हे मंदिर बंद करण्यात आले होते, अशी माहिती एका पुरातत्व खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. प्रतापेश्‍वर मंदिर ज्या संकुलामध्ये आहे, त्याच संकुलामध्ये श्री विश्‍वनाथ मंदिर, देवी मंडप, लक्ष्मण मंदिर, कंदारिया महादेव मंदिर आणि देवी जगदंबी ही मंदिरे आहेत. 
    राजा प्रताप सिंह यांनी त्यांचे स्मारक म्हणून प्रतापेश्‍वर मंदिर बांधले होते. प्रतापेश्‍वर मंदिर हे हिंदु सांस्कृतिक वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या पुढे राजपुताना घुमट आहे, मध्यभागी पागोडा पद्धतीचे छप्पर आहे तर मागे वैशिष्ट्यपूर्ण कळस आहे. या मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे, असे खजुराहोमधील ज्येष्ठ पर्यटक मार्गदर्शक सुदेश तामराकर यांनी सांगितले.

१४ सेकंदांहून अधिक काळ महिलेकडे पाहिल्यास गुन्हा प्रविष्ट होऊ शकतो !

समाजाला धर्मशिक्षण दिल्यास त्यांच्यात नैतिकता निर्माण होईल आणि समाज महिलांचा आदर करेल !
केरळचे महसूल आयुक्त ऋषीराज सिंह यांचे विधान 
      कोची (केरळ) - कोणत्याही महिलेकडे १४ सेकंदांहून अधिक वेळ एकसारखे पाहिल्यास गुन्हा प्रविष्ट होऊ शकतो, असे विधान महसूल आयुक्त ऋषीराज सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात केले. राज्यात अशा प्रकारचा एकही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असेही त्यांनी सांगितले.
    केरळमध्ये महिलांशी संबंधित वाढत्या गुन्हेगारीविषयी बोलतांना महसूल आयुक्त सिंह विद्यार्थीनींना म्हणाले, जर एखादी व्यक्ती चुकीच्या हेतूने तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमच्यावर अभद्र टिपण्या करत असेल, तर तुम्ही गप्प न बसता त्याला प्रखर विरोध केला पाहिजे. महिलांनी त्यांच्या विरोधात होणार्‍या गुन्ह्यांच्या संदर्भात कठोरपणे पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले. देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट झाल्यानंतर ऍम्नेस्टी इंटरनॅशनलची देशातील कार्यालये बंद !

     नवी देहली - बेंगळुरू येथे देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट झाल्यानंतर ऍम्नेस्टी इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेने भारतातील कार्यालये तात्पुरती बंद केल्याचे घोषित केले आहे. तसेच या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आले आहेत. बेंगळुरू येथे काश्मीरमधील भारतीय सैन्याची दडपशाही या विषयावर ऍम्नेस्टीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी झाली होती. (भारतीय सैन्याच्या विरोधात अशा प्रकारे कार्यक्रम घेण्याचे धाडस होतेच कसे ? कर्नाटकातील काँग्रेसच्या राज्यात अशी अनुमती कशी दिली जाते ? बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सैन्याकडून होत असलेल्या दडपशाहीवर ऍम्नेस्टीने कधी पाकमध्ये जाऊन कार्यक्रम आयोजित केला आहे का ? - संपादक) त्यावरून ऍम्नेस्टीविरोधात तक्रार प्रविष्ठ करण्यात आली आहे आणि विविध राजकीय संघटनांनी निदर्शनेही केली आहेत.

पाकमध्ये लव्ह जिहाद !

हिंदु मुलींचे बलपूर्वक विवाह लावून करण्यात येते धर्मांतर !
      नवी देहली - पाकिस्तानच्या २० कोटी लोकसंख्येत केवळ १० टक्के मुसलमानेतर अल्पसंख्यांक आहेत. यात अधिकांश हिंदू आहेत. पाकमध्ये ११ ऑगस्ट या दिवशी अल्पसंख्यांक दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी पाकच्या प्रत्येक शहरात हिंदू जनता रस्त्यावर उतरली आणि स्वत:वर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला. या मागील कारण होते, मागील काही दिवसांपासून हिंदूंवरील आक्रमणात झालेली वाढ ! कराचीमध्ये सतीश या तरुणाची हत्या होणे आणि एका हिंदु डॉक्टरला गोेळी मारण्यात येणे या घटनांमुळे हिंदू बंड करण्यासाठी बाध्य झाले आहेत.

बिहारच्या राजेंद्रनगरमध्ये छेड काढणार्‍या पोलिसाच्या विरोधात विद्यार्थिनीची पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार

विद्यार्थीनींची छेड काढणारे पोलीस रक्षक कि भक्षक ? 
      पाटलीपुत्र (पाटणा) - राजेंद्रनगर येथे मुलांबरोबरच काही पोलीसही शाळेत जाणार्‍या मुलींची छेड काढत असल्याची तक्रार स्थानिक रवींद्र कन्या शाळेतील एका विद्यार्थिनीने पोलीस महानिरीक्षक शालीन यांच्याकडे केली. शालीन यांनी विद्यार्थिनीकडून छेडछाडीच्या विषयी विस्तृत माहिती घेतली असून तपास चालू आहे. घरून शाळा आणि शिकवणी वर्गांमध्ये जातांना प्रतिदिन टवाळखोरांची टिंगल सहन करणार्‍या विद्यार्थिनींच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी शालीन यांनी या शाळेला भेट दिली होती.

अमेरिकेतील एका विद्यापिठात प्रथमच हिंदूंसाठी पूर्णवेळ हिंदु संचालकाची नियुक्ती

      वॉशिंग्टन - अमेरिकेतील एका प्रमुख विद्यापिठाने त्याच्या संस्थेमध्ये हिंदूंसाठी प्रथमच पूर्णवेळ संचालक म्हणून ब्रह्मचारी व्रजविहारी शरण यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती मिशन अ‍ॅण्ड को जॉजर्र्टाऊनचे उपाध्यक्ष रे हावर्ड ग्रे यांनी केली. या विद्यापिठात अनुमाने ४०० हिंदु विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. शरण न्यू साऊथ हॉलमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी कुलगुरु म्हणूनही कार्य पहाणार आहेत. ग्रे म्हणाले, वर्ष १७८९ मधेे स्थापन झालेले प्राचीन कॅथॉलिक आणि जीशूएट विद्यापीठ जॉर्जटाऊन सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी खुले राहिले आहे. शरण श्री गोलोक धाम आश्रम (वृंदावन आणि नवी देहली) येथे मुख्य पुजारी आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासकडून विनामूल्य योगवर्गाच्या आयोजनाचे हिंदूंकडून स्वागत !

      नेवाडा (अमेरिका) - युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या ब्लँटन म्युजियम ऑफ आर्टने विनामूल्य योगवर्ग चालू केले आहेत. विश्‍वविद्यालयाच्या या निर्णयाचे हिंदूंनी स्वागत केले आहे. योग ही हिंदु धर्माने जगाला दिलेली देणगी आहे, असे हिंदूंनी म्हटले आहे. (जगात सर्वत्र योग आत्मसात केला जात असतांना निधर्मी भारतात मात्र त्याला विरोध होत आहे ! - संपादक)

काश्मीरमधील ३०० युवकांची सैन्यात भरती !

हे युवक भारताच्याच विरोधात लढण्यास सिद्ध होऊ नयेत, अशी जनतेची अपेक्षा !
     जम्मू - काश्मीरमधील ३०० युवक भारतीय सैन्यात भरती झाले आहेत. येथील बाना सिंह परेड मैदानात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल एन्,एन्. वोहरा यांच्या उपस्थितीत या युवकांना भरती करून घेण्यात आले. या वेळी राज्यपाल म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या लोकांनी कठीण काळात नेहमीच वीरतेचे दर्शन घडवले आहे. वर्ष १९४७ मध्ये पाकच्या आक्रमणाच्या वेळी लोकांनी भारतीय सैनिकांना सहकार्य केले होते.

कुपवाडा येथे सीमा सुरक्षा दलाच्या तळावरील आक्रमणात ३ सैनिकांसह ४ जण घायाळ !

     कुपवाडा - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात १९ ऑगस्टला जिहादी आतंकवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या तळावर केलेल्या आक्रमणात ३ सैनिक आणि एक नागरिक घायाळ झाले आहेत. आतंकवाद्यांसमवेतची चकमक सायंकाळी उशिरापर्यंत चालू होती.

(म्हणे) सनातन संस्था आणि हिंदु जनजागरण समिती यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही ?

हिंदुद्वेषापोटी सरकारवर दबाव आणणारी अंनिस !
   मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट या दिवशी ३ वर्षे पूर्ण होऊनही त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. पानसरे आणि कलबुर्गी यांचे मारेकरीही फरार आहेत. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासातील दिरंगाई क्लेशदायक आहे. हिंसेचे समर्थन करणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागरण समिती यांवर सरकार कारवाई का करत नाही, अशी गरळओक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे. (हिंदु जनजागृती समितीचे नावही नीट उच्चारू न शकणारे अंनिसचे अविनाश पाटील आरोप करतात, हे हास्यास्पद ! सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी कधीही हिंसेचे समर्थन केलेले नाही; उलट वैध मार्गाने प्रत्येक कृती करण्याचेच या दोन्ही संघटना सातत्याने आवाहन करत असतात; म्हणून सनातन आणि समिती यांच्या राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणाच्या कार्याला समाजातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. असे असतांना वारंवार धादांत खोटे आरोप करणार्‍या अंनिसवाल्यांना जनता चांगलीच ओळखून आहे ! - संपादक)

टेमघर धरणाच्या ठेकेदारांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करणार ! - जलसंपदामंत्री गिरीश महाजन

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काळ्या कारकिर्दीतील आणखी एक भ्रष्टाचाराचा नमुना !
     मुंबई, १९ ऑगस्ट - टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. धरणाचे बांधकाम करणार्‍या श्रीनिवास आणि प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शन या बांधकाम व्यावसायिकांचे नाव काळ्या सूचीत टाकण्यात येणार आहे. तसेच या ठेकेदारांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका पत्रकार परिषदेत १८ ऑगस्ट या दिवशी दिली.
   पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या टेमघर धरणाची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अधिकार्‍यांसह काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती. धरणाला १५ वर्षेही पूर्ण झालेली नसतांना त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे, रायगड आणि नागपूर येथील रक्षाबंधनाचा कार्यक्रम !

१. राज्यमंत्री श्री. रवींद्र चव्हाण
२. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. सूर्यवंशी
    
 
३. भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस श्री. नंदू परब
  
४. भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार
५. पिंपळेश्‍वर मंदिराचे अध्यक्ष श्री. प्रकाश म्हात्रे यांना
 राखी बांधतांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या
     ठाणे - येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने मा. राज्यमंत्री श्री. रवींद्र चव्हाण, भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप माळी आणि भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस श्री. नंदू परब यांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अमृता संभूस यांनी राखी बांधली. श्री. नंदू परब यांनी स्वतःच्या अंतर्गत येणार्‍या गावांमध्ये केल्या जाणार्‍या समितीच्या कार्याला साहाय्य करणार असल्याचे सांगितले.

एटीएम् फोडण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला !

   इचलकरंजी - येथील जय सांगली नाका परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम् मध्यरात्री फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. आवाजामुळे नागरिक जागे झाल्याने चोरट्याने तेथून पळ काढला. चोराने आणलेले लोखंडी गज, कटावणी आदी साहित्य घटनास्थळीच पडले होते. चोरट्याने एटीएम् यंत्राचा समोरील भाग उचकटण्याचा प्रयत्न केला होता. (असुरक्षित इचलकरंजी ! - संपादक)

गोवंश सोडवण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक !

  • केवळ गोवंशहत्या बंदी कायदा करून उपयोग नाही, तर त्याची कठोर कार्यवाही जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत गोवंशियांचे रक्षण होणार नाही, हेच यावरून लक्षात येते !
  • यावरून धर्मांधांना पोलिसांचा कोणताही धाक वाटत नाही, हेच यावरून लक्षात येते ! निरपराध हिंदूंवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस धर्मांधांकडून मात्र असा मार खातात. असे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?
    संभाजीनगर, १९ ऑगस्ट - येथील सिल्लेखान्यात १८ ऑगस्टला पहाटे ४ वाजता गोवंशियांंची सोडवणूक करण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांनी दगडफेक केली. (यावरूनच धर्मांधांची पूर्वसिद्धता आणि त्यांचे दंगल घडवून आणण्याचे पूर्वनियोजन दिसून येते ! - संपादक) या वेळी पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी कारवाई करत ५१ गोवंशियांची सुटका केली. पोलिसांनी मौलाना मजीद अब्दुल करीम, जाफर छोटे कुरेशी, नदीम अब्बास कुरेशी आणि अनीस हनीफ कुरेशी या धर्मांधांवर गुन्हे प्रविष्ट केले आहेत. शहरातील सिल्लेखाना भागात जनावरांची हत्या केली जात असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या.

पुणे येथे धर्माभिमान्यांच्या प्रबोधनानंतर आस्थापनाने श्री गणेशाचे विडंबन करणारा फलक काढला

   पुणे, १९ ऑगस्ट (वार्ता.) - येथील भोसरी परिसरात लावण्यात आलेल्या क्रिस्टल सिटी या बांधकाम करणार्‍या आस्थापनाच्या फलकावर श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र छापण्यात आले होते. बजरंग दलाचे श्री. यशवंत कर्डिले यांंनी संबंधित आस्थापनाच्या संकेतस्थळावरून प्रतिनिधींचा क्रमांक घेऊन त्यांना संपर्क केला. या फलकातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याविषयी प्रबोधन केले. त्यानंतर संबंधित आस्थापनाने विडंबनात्मक विज्ञापनाचे फलक उतरवले. (श्री गणेशाचे विडंबन रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणार्‍या श्री. यशवंत कर्डिले यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी हिंदु सर्वत्र हवेत ! - संपादक)

बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त दुचाकी वाहनफेरी !

    पुणे, १९ ऑगस्ट (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने दुचाकी वाहनफेरी काढण्यात आली. १८ ऑगस्ट या दिवशी पर्वतीच्या पायथ्यापासून शनिवारवाड्यापर्यंत काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीचा शुभारंभ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शनिवारवाडा येथे बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी पेशवे यांचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा, मस्तानी यांचे वंशज उमरबहादूर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्याध्यक्ष विश्‍वजीत देशपांडे, लक्ष्मीकांत धडफळे, अनिरुद्ध पेटकर, आनंद दवे, अविनाश कुलकर्णी, सौ. अंजली कुलकर्णी आदी उपस्थित होते.
क्षणचित्र
     चित्रपट कलावंत मनीष कुलकर्णी बाजीरावांच्या वेशभूषेत फेरीत सहभागी झाले होते.

सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची अवैध मद्यविक्रेत्यावर धाड !

सर्वत्र सर्रास चालू असलेली अवैध मद्यविक्री हे पोलीस
प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीचे द्योतक !
    सिंदखेडराजा - अनेकवेळा सांगूनही कारवाई होत नसल्याने शेवटी सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी एका गावात स्वत:च धाड टाकली. अवैध दारू व्यवहार चव्हाट्यावर आणला. (न ऐकणार्‍या प्रशासनावर काय कारवाई करणार, हेही लोकप्रतिनिधींनी स्पष्ट करावे ! - संपादक)
    सिंदखेडराजा तालुक्यात अनेक गावांत प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध देशी, हातभट्टी आणि परदेशी मद्याची विक्री होते. आमदार डॉ. खेडेकर हे मतदारसंघाचा दौरा करीत असतांनाच त्यांना राहेरी बु. ते वदर्डी मार्गावरील पांगरी उगले फाट्यानजीक एका शेतात जाळीचे छत टाकून दारूविक्री चालू असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी स्वत:च दुकानात जाऊन मद्याची मागणी केली. आमदारांच्या या धाडीने पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांच्या तक्रारीवरून अवैध मद्यविक्रीचे ठिकाण सापडले, तर ठाणेदारांना उत्तरदायी धरण्यात येऊन त्यांची तक्रार गृहमंत्र्यांकडे केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

जनतारा हायस्कूलचे संस्थापक राजेंद्र नांद्रेकर यांची प्रदर्शनास भेट !

    
डावीकडे श्री. राजेंद्र नांद्रेकर यांना 
प्रदर्शनाची माहिती देतांना श्री. अजित धुळाज
     जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) - येथील कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील डॉ. मोदी रुग्णालयाजवळील जनतारा हायस्कूलचे संस्थापक श्री. राजेंद्र नरसाप्पा नांद्रेकर यांनी सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनास सदिच्छा भेट दिली. प्रदर्शन पाहून त्यांनी प्रदर्शन उत्कृष्ट असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी त्यांच्यासमवेत सनातनचे जयसिंगूपर येथील साधक श्री. आनंदलाल बलदवा उपस्थित होते.
सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनासंदर्भात अधिक घडामोडी अशा...
१. सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनास उपसरपंच पृथ्वीराजसिंह यादव, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत जगदाळे, उदय संकपाळ, शिरोळ येथील पंचायत समितीचे माजी सदस्य आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते सदाशिव आंबी आदी मान्यवरांनी भेट देऊन प्रदशर्नाची माहिती जाणून घेतली.
२. शिरोळ दत्त सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पाटील यांनी ग्रंथपाल श्री. गिरीश कुलकर्णी यांना प्रदर्शनातील सनातनचे ग्रंथ पाहून ते कारखान्यातील ग्रंथालयामध्ये घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे श्री. कुलकर्णी यांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन २ सहस्र ५०० रुपयांचे ग्रंथ खरेदी केले.

वांगी (जिल्हा बीड) येथील देवस्थानच्या महाप्रसादातून १ सहस्र भाविकांना विषबाधा !

   वांगी (जिल्हा बीड) - येथील निर्मलनाथ देवस्थानच्या महाप्रसादातून १ सहस्र भाविकांना विषबाधा झाल्याची घटना १८ ऑगस्ट या दिवशी घडली. ५०० जणांना रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे. देवस्थानात हरिनाम सप्ताहाच्या सांगतेनंतर भाविकांना हा महाप्रसाद देण्यात आला होता.

आतंकवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी घरातून पळून गेलेल्या मुलाला पोलिसांनी शोधले !

असे देशप्रेम प्रत्येक घरातील युवकांमध्ये निर्माण झाले,
तर हा देश पालटण्यास वेळ लागणार नाही !
    मुंबई - आतंकवाद्यांविरुद्ध लढण्यास गेलेल्या १४ वर्षांच्या निर्मल वाघ याला पोलिसांनी अखेर कुटुंबियांकडे सोपवले. वसई येथे रहाणारा निर्मल १० ऑगस्टला घर सोडून गेला होता. पोलिसांनी सूरत येथून त्याला शोधून काढले. त्या वेळी जम्मू्-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी भारतीय लष्कराला साहाय्य करण्यासाठी घरातून पळून गेल्याचे निर्मलने सांगितले.
    काश्मीरमध्ये वाढलेल्या आतंकवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर निर्मलने काश्मीरमध्ये जाण्याचा हट्ट धरला होता. यावरून त्याचे मित्र त्याला चिडवतही होते. (युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची वानवा असल्याचेच हे द्योतक आहे ! - संपादक) दहावीतील निर्मलने १० ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजता मुंबई सेंट्रल येथून अमृतसरला जाणारी गोल्डन टेम्पल ही गाडी पकडली. रात्री एक वाजता सुरत रेल्वे स्थानकावर तिकीट तपासनिकाने त्याला तिकीट नसल्याने गाडीतून उतरवले. निर्मलच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. अखेर एका पाणीपुरी विक्रेत्याच्या झोपडीत निर्मल सापडला.

महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची शक्यता (?)

   पुणे - महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे संकेत आहेत. मुंबई, पुणे यांसह राज्यातील १० प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीत मराठीच्या सूत्रावर लढणार्‍या पक्षांना शह देण्यासाठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रीमंडळाची मोहोर उमटणे बाकी आहे. अन्य भाषांना ज्या निकषाने हा दर्जा मिळाला, ते सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केलेले आहेत.
१. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न चालू आहेत. तत्कालीन आघाडी सरकारने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने पाठवलेला अहवाल मान्य करून साहित्य अकादमीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे.
२. उडीया भाषेला अभिजात दर्जा दिल्यावर त्याला आक्षेप घेणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल आहे. ही याचिका निकाली निघेपर्यंत अन्य भाषेच्या अभिजात दर्जाविषयीचा प्रस्ताव स्वीकारायचा नाही, असा निर्णय केंद्राने घेतला आहे.

पिंपरी (पुणे) येथे संशयित धर्मांध आरोपीकडून पोलीस कर्मचार्‍यावर आक्रमण

कायदा-सुव्यवस्था संपली असल्याचे दर्शवणार्‍या पोलिसांवरील वाढत्या आक्रमणाच्या घटना !
    पिंपरी, १९ ऑगस्ट - घरफोडी आणि चोरीच्या प्रकरणात कह्यात घेतलेला संशयित धर्मांध बुग्गी उपाख्य मोमीन सलीम शेख याने स्वत:वर आणि पोलीस कर्मचारी प्रीतम वाघ यांच्यावर पळून जाण्याच्या उद्देशाने आक्रमण केले. संशयित आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार चालू आहेत.
सोलापूर येथे धर्मांध रिक्शाचालकाने परिवहन विभागाची गाडी फोडली !
सोलापूर, १९ ऑगस्ट - येथील रिक्शाचालक धर्मांध सैपन शेख याची गाडी नादुरुस्त असल्याने पोलिसांनी कारवाई अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लावली. रिक्शा आणायला गेल्यावर त्याने आतील विद्युतघट चोरीला गेल्याचे सांगत आरडाओरडा चालू केला. संतप्त होऊन परिवहन विभागाच्या बाहेर लावलेली पोलिसांची गाडी फोडली. या प्रकरणी पोलिसांनी शेख याला कह्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे.

भाव कसा असावा, हे सांगण्यासाठी सनातनच्या साधिकेचे उदाहरण देणारे पुणे येथील समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर !

   पुणे येथील समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर गेली २६ वर्षे रामकृष्ण मठात व्याख्यानाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रबोधनाचे कार्य करत आहेत. या वर्षी ते करत असलेल्या ज्ञानेश्‍वरीवरील निरुपणाच्या वेळी भगवंताप्रती भाव कसा असतो, हे सांगण्यासाठी त्यांनी दैनिक सनातन प्रभात मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका कवितेचे उदाहरण दिले.
    सांगली येथील सनातनच्या साधिका कु. कविता कुलकर्णी यांची येणारा क्षण म्हणजे प.पू. डॉक्टर, जाणारा क्षण म्हणजे प.पू. डॉक्टर, येणारा श्‍वास म्हणजे प.पू. डॉक्टर, गेलेला श्‍वास म्हणजे प.पू. डॉक्टर, येणारा काळ म्हणजे प.पू. डॉक्टर, गेलेला काळ म्हणजे प.पू. डॉक्टर ... ही कविता त्यांनी या वेळी वाचून दाखवली. एका कार्यक्रमानिमित्त पू. सुनील चिंचोलकर यांच्याशी भ्रमणभाषवर बोलणे झाले असतांना त्यांनी हा प्रसंग सांगितला. त्या वेळी ईश्‍वराप्रती उत्कट भाव असणारे धन्य ते साधक आणि त्यांना घडवणारी धन्य ती परात्पर गुरुमाऊली असा विचार येऊन कृतज्ञता व्यक्त झाली. तसेच पू. सुनील चिंचोलकर यांच्यातील शिकण्याची वृत्तीही या प्रसंगातून अनुभवता आली.
    - प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे

दूरचित्रवाहिन्यांवर संतनिंदेचा धंदा ! - पू. सुनील चिंचोलकर

महामानवाची मुक्तीगाथा या पुस्तकाचे प्रकाशन करतांना डावीकडून
स्वामी श्रीकांतानंद महाराज, पू. सुनील चिंचोलकर, सौ. हर्षदा जोशी
पुणे, १९ ऑगस्ट (वार्ता.) - आत्मज्ञान झालेले सर्व संत ही भगवंताचीच रूपे आहेत. संतांकडे पहाण्याची दृष्टी शरणागत हवी. सध्याची प्रसारमाध्यमे मात्र संतविरोधी असून न्यायाधिशाची भूमिका बजावत आहेत. दूरचित्रवाहिनीवर संतनिंदेचा धंदाच चालतो, असे परखड मत व्यक्त करत समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी संतांना विनाकारण अपकीर्त करणार्‍या प्रसारमाध्यमांवर तोफ डागली. येथील रामकृष्ण मठात ज्ञानेश्‍वरीवर चालू असलेल्या व्याख्यानमालेत १७ ऑगस्ट या दिवशी ते बोलत होते. श्रावणमासात चालणार्‍या या व्याख्यानमालेचे यंदाचे २६ वे वर्ष असून ज्ञानेश्‍वरी, दासबोध, तसेच मनाचे श्‍लोक आदी विषयांवर आतापर्यंत उद्बोधन करण्यात आले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

भारताला अशा कणखर मानसिकतेच्या राजकारण्यांची आवश्यकता !
      जिहादी आतंकवाद्यांना माझी चेतावणी आहे की, आम्ही तुमचा शोध घेऊ आणि तुम्हाला ठार करू. आम्ही यात विजयी होऊ, असे प्रतिपादन अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठीचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Donald Trump ne jihadiyoko chetavni di, Hum aapko chunchun kar mar dalenge aur vijayi honge ! - Hamare rajnetaome aisi kathor mansikta kab nirman hogi ?
जागो !
: डोनाल्ड ट्रम्प ने जिहादियों को चेतावनी दी, हम आपको चुन-चुनकर मार डालेंगे और विजयी होंगे ! - हमारे राजनेताआें में ऐसी कठोर मानसिकता कब निर्माण होगी ?

चंद्रपूर येथील कु. परेश लिमजे याला राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत कास्य पदक !

कु. परेश लिमजे
विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवणार्‍या कु. परेश लिमजे याचे अभिनंदन !
     चंद्रपूर - स्टुडन्ट्स ऑलिम्पिक असोशियनच्या वतीने हरिद्वार येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत सनातनचा कु. परेश शेखर लिमजे (वय १३ वर्षे) याने कास्यपदक पटकावले आहे. परेश हा चंद्रपूर येथील इंदिरा गांधी गार्डन स्कूलचा विद्यार्थी असून त्याने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले आहे.
    त्याने सोलापूर येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत कराटे आणि कुंगफू मध्ये सुवर्णपदक पटकावले होते. विविध जिल्हास्तरीय स्पर्धांत ५ सुवर्णपदके, राज्यस्तरीय स्पर्धेत ११ सुवर्णपदके, राष्ट्रीय स्तरावर ५ सुवर्ण, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत २ सुवर्णपदके आणि अनेक कास्य पदके मिळवली आहेत. आतापर्यंत मिळालेल्या यशाचे श्रेय त्याने श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिले आहे. यापुढे त्याची निवड मलेशिया आणि जपान येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेसाठी झालेली आहे.

काश्मीरमधील देशद्रोही फुटीरतावाद्यांच्या उच्छादाचे भीषण वास्तव !

काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांवर दगडफेक करणारे 
धर्मांध देशद्रोही. अशा हिंसक जमावाला 
पांगवण्यासाठीच सैनिक पॅलेट गनचा वापर 
करतात !  (संकेतस्थळावरील छायाचित्र)
   गेल्या काही मासांपासून काश्मीर खोर्‍यातील देशद्रोही फुटीरतावाद्यांकडून प्रचंड हिंसाचार केला जात आहे. याविषयी उपमिता वाजपेयी यांनी प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचे वार्तांकन केले. त्या वेळी त्यांना जाणवलेली सूत्रे आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
१. दगडफेक करण्यापासून रोखणार्‍या 
वयोवृद्धांच्या थोबाडीत मारणारे देशद्रोही फुटीरतावादी तरूण !
       काश्मीरमध्ये संचारबंदीला ४० दिवसांहून अधिक कालावधी लोटला आहे. यात ६५ जण मारले गेले आहेत. संचारबंदीत एक दिवसही शिथिलता नाही. कदाचित् देशातील ही सर्वांत मोठी संचारबंदी असावी. वर्ष २०१० मध्येही ४ मास हिंसाचार चालला. तेव्हा अधूनमधून संचारबंदी शिथिल होत होती; मात्र या वेळी असे होतांना दिसत नाही. याच कारणांचा शोध घेण्यासाठी आतंकवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या डाऊन टाऊन नावाच्या भागामध्ये मी १२ घंटे घालवले.

सायबर सुरक्षा !

   सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात सायबर प्रकल्प राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्यातील १ सहस्र पोलिसांना प्रशिक्षित करण्यात येणार असून या माध्यमातून राज्यात भक्कम असा सायबर फोर्स सिद्ध करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये १५ ऑगस्ट या दिवशी ४२ ठिकाणी सायबर लॅब चालू करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

१४ ऑगस्टला जागे होणारे केंद्रीय गृहमंत्रालय ! व्यापार्‍यांनी गेली कित्येक वर्षे धन कमावले त्याचे काय करणार ?

       ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व शासकीय कार्यालयांना प्लास्टिकचे झेंडे न वापरण्याची सूचना केली. भारतीय ध्वजसंहिता २००२ आणि राष्ट्रीय प्रतिकांच्या अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार ही सूचना करण्यात आली आहे.

इस्लाममध्ये सुधारणा घडवून आणण्याची भाषा करायची कि इस्लामशी चांगले संबंध जोडायचे ?

      इस्लाममधील नागरिकांच्या वतीने शासनच निर्णय घेऊ लागते आणि शासनाचे त्याविषयीचे निर्णय जेव्हा चुकतात, तेव्हा इस्लामला दोष न देता शासनालाच उत्तरदायी ठरवले पाहिजे. आतंकवाद हा मशिदीमध्ये किंवा मुसलमान समाजामध्ये उदयाला आलेला नाही, तर सामाजिक संकेतस्थळ, तुरुंग किंवा गुप्त संघटन यांद्वारे आतंकवाद निर्माण झाला आहे, असे फ्रेंच मानवाधिकार कार्यकर्ता यासर लोआटी यांनी लिहिले आहे. (काही मदरशांमधून मुसलमानांना जिहादी आतंकवादाचे शिक्षण दिले जात असल्याचे पुरावे सापडले आहेत ! - संपादक)

केरळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा जुलै २०१६ मधील आढावा

१. हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद 
      एर्नाकुलम् आणि जवळच्या त्रिश्शूर जिल्ह्यांतील धर्माभिमान्यांसाठी एर्नाकुलम् येथे एक बैठक घेण्यात आली. त्यात त्यांना साधनेचे जीवनातील महत्त्व सांगण्यात आले. या बैठकीला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांनी समितीच्या धर्मप्रसार आणि राष्ट्ररक्षण या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली. या बैठकीतील एक क्रियाशील धर्माभिमानी श्री. पी.टी. राजू यांनी अजून काही धर्माभिमान्यांना एकत्र केले. समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना साधनेचे महत्त्व सांगितले. वैपिन या ठिकाणीही झालेल्या बैठकीतही धर्माभिमानी सहभागी झाले होते. त्यांनाही साधनेचे आणि नामजपाचे महत्त्व सांगण्यात आले.

पंचम (वर्ष २०१६) अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या संदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

१. धर्माभिमान्यांची साधना चालू असणे
     या अधिवेशनात सहभागी झालेले धर्माभिमानी हे साधना करणारे आणि भगवंताच्या अस्तित्वाची अनुभूती घेणारे होते. त्यांच्या बोलण्यात सातत्याने तसा उल्लेख येत होता.
२. अधिवेशन चैतन्याच्या स्तरावर होत असल्याचे जाणवणे
    अधिवेशनात पुष्कळ उत्साह होता. ते चैतन्याच्या स्तरावर होत होते. आपण सतत ईश्‍वराच्या सान्निध्यात रहात आहोत, याची जाणीव होत होती.
३. हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) येणार आहे, अशी दृढ श्रद्धा हिंदुत्वनिष्ठांमध्ये निर्माण झाली असणे
     काल माहात्म्यानुसार आता श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या कृपेने हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) येणार आहे, अशी दृढ श्रद्धा देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे, हे लक्षात आले.
४. धर्माभिमानी आणि साधक हे वेगवेगळे वाटत नव्हते, तर ते सर्व एकच आहेत, असे अनुभवास आले.
- श्री. विनोद रसाळ, सोलापूर (१.७.२०१६)

भाजपच नाही, तर बहुतेक सर्वच राजकीय पक्ष हिरव्या रंगाच्या आधारावर उभे आहेत ! एवढेच नव्हे, तर भारताचा तिरंगा राष्ट्रध्वजही !

     भारतातील सर्वच राजकीय पक्षांच्या झेंड्यांमध्ये हिरवा रंग समाविष्ट करण्यात आला आहे, याला भाजपही अपवाद नाही. भारताच्या राष्ट्रध्वजामध्येही हिरवा रंग आहेच.

निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधींवर स्वाक्षरीचा परिणाम होणार नाही. आता प्रभावी उपाय योजले पाहिजेत !

     महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांचे मानधन आणि निवृत्तीवेतन वाढवण्याचा निर्णय झाला. या निर्णयाच्या विरोधात सुजाण नागरिक संघ, सावंतवाडीच्या वतीने येथील श्रीराम वाचन मंदिरानजिक १४ आणि १५ ऑगस्ट या दिवशी स्वाक्षरी चळवळ राबवण्यात आली.

हिंदूंनी सत्य इतिहास लक्षात ठेवून वाटचाल केली पाहिजे ! - प्रा. कुसुमलता केडिया, संचालिका, धर्मपाल शोधपीठ, भोपाळ

      अफगाणिस्तान, तुर्कस्तान, कजाकिस्तान, उजबेकिस्तान, तसेच अरब आणि अन्य मुसलमान राष्ट्रे सहस्रो वर्षांपूर्वी सनातन वैदिक संस्कृती असलेली राष्ट्रे होती. वर्ष १९२२ पर्यंत जगाच्या नकाशात इराण, इराक, कुवैत, सिरीया, सौदी अरेबिया ही राष्टे्र नव्हती. पहिल्या महायुद्धानंतर ती उदयास आलेली आहेत. तोपर्यंत या सर्व भूभागांतून भारतात महसूल जमा होत असे. अरबी राष्ट्रांसह चीन आणि रशिया हा सर्व भाग अनुवंशिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या हिंदूंचा प्रदेश आहे. आता हिंदु धर्मियांच्या उत्कर्षाचा काळ पुन्हा आला आहे. त्यामुळे हिंदूंनी हा सत्य इतिहास लक्षात ठेवून वाटचाल केली पाहिजे.
भांडुप येथे हिंदु जनजागृती
समितीच्या वतीने हिंदूसंघटन मेळावा !

वार आणि दिनांक : रविवार, २१ ऑगस्ट २०१६
वेळ : सायंकाळी ५.३०
स्थळ : पराग विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज 
तलावाजवळ, जंगल-मंगल मार्ग, भांडुप (प.), मुंबई.
भ्रमणभाष : ९९२०२०८९५८
समस्त हिंदु बांधवांनी या हिंदूसंघटन
मेळाव्यास उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावावे !
कळंबोली (नवी मुंबई) येथे समस्त राष्ट्रप्रेमी आणि 
हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने आंदोलन !

आंदोलनातील मागण्या
१. काश्मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी भारतीय सैन्याला सर्वाधिकार देऊन आतंकवादी अन् त्यांचे समर्थक यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी !
२. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांना समाजकंटक म्हटल्याविषयीचे वक्तव्य मागे घ्यावे !
दिनांक : २१ ऑगस्ट, वार : रविवार, वेळ : सायंकाळी ५ वाजता
स्थळ : पोलीस निवारा, करवले हॉटेल चौक, सिडको गार्डनजवळ, कळंबोली
समस्त राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकांनी
या आंदोलनात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावावे !

श्रीकृष्णाची ओढ असणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कोथरूड, पुणे येथील चि. इंद्राणी तावरे (वय १ वर्ष) !

      ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. इंद्राणी तावरे (वय १ वर्ष) हिची तिच्या आई-वडिलांना आणि आजीला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत !
१. गरोदरपणात आईला आलेल्या अनुभूती
१ अ. गरोदरपणी पोटावर बर्‍याचदा दैवी कण दिसणे आणि प्रवासात पोटावर हात ठेवून नामजप केल्यावर कपड्यांवर दैवी कण मिळणे : गरोदरपणी माझ्या पोटावर बर्‍याचदा दैवी कण दिसायचे. मी नोकरीहून परत येत असतांना बसमध्ये बसल्यावर पोटावर हात ठेवून नामजप करत असे. एकदा नामजप करत घरी आले, तेव्हा मला माझ्या कपड्यांवर असंख्य दैवी कण असल्याचे दिसले.

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या देहत्यागासंदर्भात साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना आणि आलेल्या अनुभूती !

अनुभूती
कै. पू. (सौ.) आशालता सखदेव
      सायंकाळी ५.१० वाजण्याच्या सुमारास संगणकीय सेवा करतांना आपोआप श्री गुरुदेव दत्त हा नामजप सलग आणि शांतपणे चालू होणे 
     १७.८.२०१६ या दिवशी सायंकाळी ५.१० वाजण्याच्या सुमारास संगणकीय सेवा करतांना माझा श्री गुरुदेव दत्त हा नामजप आपोआप, सलग आणि शांतपणे चालू झाला. माझा सहसा सेवा करतांना नामजप होत नाही, तर तो अगदी लक्षपूर्वक करावा लागतो. त्यामुळे मी देवाला विचारले, आज कसा हा नामजप सलग आणि शांतपणे चालू झाला रे ? त्यावर देवाकडून काही उत्तर मिळाले नाही; पण नामजप शांतपणे चालूच होता.

नियतकालिकांचे वाचक होण्यास इच्छुक जिज्ञासूंच्या सोयीसाठी ऑनलाईन वर्गणीदार होण्याच्या नव्या योजनेचा आरंभ !

वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
१. सनातन प्रभातला वाचकांचा
उदंड प्रतिसाद लाभत असणे
     जनसामान्यांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमाची ज्योत प्रज्वलित व्हावी, या एकमेव उदात्त हेतूने नियतकालिक सनातन प्रभात कार्यरत आहे. मराठीसह कन्नड, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या भाषांत प्रसिद्ध होणार्‍या या नियतकालिकांना वाचकांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. अनेक जण वर्गणीदार होण्यास उत्सुक असल्याचे आढळले आहे; परंतु मनुष्यबळाच्या अभावी साधक त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाहीत.
२. ऑनलाईन वर्गणीदार होण्याच्या नव्या सुविधेचा सर्व जिज्ञासूंनी लाभ घ्यावा !
     अशा इच्छुकांना नियतकालिकांचे वर्गणीदार सुलभतेने आणि शीघ्रतेने होता यावे, यासाठी ऑनलाईन वर्गणीदार होण्याच्या नव्या योजनेला नुकताच आरंभ करण्यात आला आहे. या योजनेद्वारे दैनिक सनातन प्रभातच्या व्यतिरिक्त अन्य नियतकालिकांचे (साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक यांचे) वर्गणीदार होता येईल. www.sanatanprabhat.org/subscribe या मार्गिकेला भेट देऊन जिज्ञासू वरील योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळे राष्ट्र-धर्म कार्य करणार्‍या साधकांचा जिज्ञासूंना संपर्क करण्यातील वेळ तर वाचेलच; पण त्याचबरोबर जिज्ञासूंना स्वतःच्या सोयीनुसार ऑनलाईन वर्गणीदार अर्ज भरता येऊन त्यांना लवकरात लवकर अंक चालू करता येईल.

पू. (सौ.) आशालता सखदेवआजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती

श्रीमती आदिती देवल
१. पू. आजींचा तोंडवळा तान्ह्या बाळासारखा निरागस आणि लोभस 
वाटणे अन् त्यांचे सर्व अंग तेजस्वी पिवळ्या रंगाचे दिसणे 
     १७.८.२०१६ या दिवशी पू. सखदेवआजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना मनाला केवळ शांतता जाणवत होती. माझ्या मनात कोणत्याही भाव-भावनांचे विचार येत नव्हते. त्यांच्याजवळ गेल्यावर त्यांचे हात-पाय, तोंडवळा सर्व तेजस्वी पिवळ्या रंगाचे दिसत होते. मला त्यांचा तोंडवळा एखाद्या तान्ह्या बाळासारखा निरागस आणि लोभस वाटला. 
२. त्या शांतपणे वरच्या लोकांत चालल्या आहेत आणि त्यांना इथली (पृथ्वीवरील) थोडीही आसक्ती राहिली नाही, असे जाणवले.

जिवाचा स्वर्गलोकाकडे जाण्याचा आणि पुन्हा पृथ्वीवर जन्माला येऊन आध्यात्मिक उन्नती करण्याचा प्रवास

 
चित्राचा भावार्थ
 
कु. लक्ष्मी राऊळ
चित्रामध्ये पाठीमागे दिसणारी बदके मागील जन्मातील पुण्यानुसार आणि गुरुकृपेस पात्र झालेल्या जिवांना स्वर्गलोकात घेऊन जात आहेत. अशा उच्च स्वर्गलोकात स्थान प्राप्त केलेल्या जिवांना श्रीकृष्ण पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी आणत आहे. हे जीवही अतिशय आतुर होऊन श्रीकृष्णासमवेत पृथ्वीवर येत आहेत. ते आनंदी दिसत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी तेथे फुलांचा सडा पडला असून दैवी कणांचा वर्षावही होत आहे.
हेच जीव पुढे आध्यात्मिक उन्नती करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊन महर्लोकात किंवा त्यापुढील लोकांत स्थान प्राप्त करतील. - कु. लक्ष्मी चंद्रकांत राऊळ (वय १७ वर्षे), सिंधुदुर्ग (१.१.२०१५ वेळ दुपारी १२.१५)

जेवतांना पाळायचे आचार, याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी केलेले मार्गदर्शन

प.पू. पांडे महाराज
१. भोजनापूर्वी चित्राहुती का देतात ? 
      अन्नापासून मन बनते. मनामुळे संकल्प आणि विकल्प येतात. त्याप्रमाणे कर्म घडते. कर्मापासून चांगल्या किंवा वाईट कृती घडतात. वाईट कर्म आणि चुका घडल्यामुळे पाप घडते. पापामुळे दुःख होते. मृत्यूनंतर आपल्याला यमयातना भोगाव्या लागतात. त्या भोगाव्या लागू नयेत आणि आपण केलेल्या कर्माची फलश्रुती चित्रगुप्त ग्रथित करत असतो. आपल्या मृत्यूनंतर तो यमाकडे हे सर्व ग्रथित करतो. त्यानुसार यम त्याला योग्य न्यायनिवाडा देऊन शिक्षा देतो. या यमयातना चुकवण्यासाठी, याची सतत स्मृती रहावी, यासाठी भोजन (अन्न) ग्रहण करण्यापूर्वी चित्राहुती देण्यात येते.

२४ ऑगस्टला असणार्‍या श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने....

सौ. शालिनी मराठे
सांग ना श्रीहरि, सांग ना ।
सांग ना श्रीहरि ।
एकदा तरी माझ्या घरी
तू येशील का ॥ १ ॥

पळसाच्या द्रोणात,
मातीच्या मडक्यात ।
दही, दूध अन् लोणी
खाशील का ॥ २ ॥
 
गोवर्धनी, वृंदावनी अन् मधुबनी ।
एकदा तरी मला नेशील का ॥ ३ ॥
यशोदामैय्या, तुझी सखी राधा नि सवंगडी पेंद्या ।
सांग ना मजला भेटतील का ॥ ४ ॥

निजानंदी, आत्मानंदी नि कृष्णानंदी ।
मन माझे देवा, भिजेल का ॥ ५ ॥
गुरुकृपेने, तुझ्या प्रीतीने नि हरिलीलेने ।
अद्वैती मज नेशील का ।
सांग ना श्रीहरि, नेशील का ॥ ६ ॥
- सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, गोवा. (२४.७.२०१६) 

अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिरात आलेल्या अनुभूती

१. श्रीकृष्णाकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याने सर्व जण न्हाऊन निघत आहेत, असे जाणवणे
     साधनावृद्धी शिबिराचा उद्घाटन सोहळा चालू असतांना वरुण देवता प्रसन्न होऊन मोठा पाऊस आला. त्या वेळी श्रीकृष्ण व्यासपिठावर आहे आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असून सर्व साधक अन् धर्माभिमानी चैतन्याने न्हाऊन निघत आहेत, असे वाटून श्रीकृष्णाप्रती माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.
२. पू. पिंगळेकाकांचे मार्गदर्शन चालू असतांना ते अंतर्मनात पोचत आहे, असे अनुभवण्यास मिळाले.
- श्री. विनोद रसाळ, सोलापूर (१.७.२०१६)

स्वतःतील स्वभावदोष आणि अहं आेंजळीत घेऊन ते प.पू. डॉक्टरांच्या चरणी अर्पण करण्याच्या भावप्रयोगात आलेल्या अनुभूती !

श्री. अभिजीत कुलकर्णी
१ अ. मनाने प.पू. डॉक्टरांच्या कक्षात जाऊन स्वतःतील स्वभावदोष
आणि अहं त्यांच्या चरणी अर्पण करायला जातांना त्यांचे
काट्यांत रूपांतर झाल्याने ते अर्पण करता न येणे
     मागील ३ - ४ मासांपासून मी भावजागृतीचा एक प्रयोग नियमित करत आहे. आरंभी ३ - ४ दिवस असे व्हायचे की, मनाने मी प.पू. गुरुमाऊलीच्या कक्षात जाऊन त्यांच्यासमोर लीन होऊन बसत असे. त्या वेळी कसा आहेस ? भाववृद्धीचे प्रयत्न कसे चालू आहेत ?, असे प्रश्‍न सूक्ष्मातून प.पू. डॉक्टर मला विचारत असत. मग मी माझ्या आेंजळीत माझे स्वभावदोष आणि अहं घेऊन ते प.पू. डॉक्टरांच्या चरणी अर्पण करण्यासाठी त्यांच्या चरणांपाशी जात असे. मी ती आेंजळ त्यांच्या चरणांवर रिती करणार, त्याच वेळी त्या दोष आणि अहं यांचेे रूपांतर काट्यांमध्ये होत असे. हे सर्व काटे मी गुरुमाऊलीच्या कोमल चरणांवर कसे अर्पण करणार ?, या विचाराने तो भावप्रयोग तेथेच संपत असे. यामुळे माझे मन अस्वस्थ व्हायचे आणि माझ्यातील दोष आणि अहंं यांविषयी माझ्या मनात चीड निर्माण व्हायची.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अमरावती येथील सौ. जयश्री चौधरी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या आरंभदिनानिमित्त
दैनिक सनातन प्रभातच्या विशेषांकासाठी विज्ञापनांची संरचना करतांना ती सेवा
अपेक्षेपेक्षा अल्प वेळेत पूर्ण होणे आणि श्रीकृष्णच सेवा करवून
घेत आहेत, असे जाणवून कृतज्ञता व्यक्त होणे
    परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीच्या विशेषांकासाठी विज्ञापनांची संरचना करण्याची सेवा मिळण्याच्या १ - २ दिवस आधीच मी ८ - १० दिवसांचा सलग प्रवास करून आले होते. त्यामुळे सेवेसाठी माझे शरीर आणि मन यांची सिद्धता नव्हती, तरीही मी त्या विशेषांकाच्या विज्ञापनांची सेवा करण्यासाठी बसायचे. तेव्हा ती विज्ञापने कुठलाही विचार न करता अगदी सहज आणि अपेक्षेपेक्षा अगदीच अल्प वेळेत पूर्ण होत होती. त्या वेळी श्रीकृष्णच ती आपल्याकडून करवून घेत आहे, असे जाणवले आणि मला सेवेसाठी माध्यम बनवून या अमूूल्य अंकाच्या सेवेत सहभागी होण्याची संधी देत असल्याविषयी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली. 
सौ. जयश्री चौधरी

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या आदल्या
दिवशी आणि अमृत महोत्सवाच्या दिवशी देवघरातील दिवा अधिक वेळ प्रज्वलीत रहाणे
    देवघरात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे आहेत. प.पू. गुरुदेवांच्या अमृत महोत्सवाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी देवघरात तेलाचा दिवा लावला होता. तो दुसर्‍या दिवशी, म्हणजे अमृत महोत्सवाच्या दिवशी सकाळी ७ - ८ वाजेपर्यंत तेवत होता आणि सकाळी पूजेच्या वेळी लावलेला दिवा त्या रात्री उशिरापर्यंत तेवत होता. त्याच्या आधी तेच तेल आणि तशीच वात असूनही दिवा दोन घंट्यांपेक्षा (तासांपेक्षा) अधिक वेळ तेवत नाही. केवळ त्याच दिवशी तो एवढा वेळ प्रज्वलीत होता.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.

शिवणकामाचे कौशल्य असणारे साधक, वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना गुरुसेवेची अमूल्य संधी !

आश्रमातील शिलाईच्या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !
     सनातनच्या विविध आश्रमांमध्ये पडदे, नेटलॉन, पायपोस, गोधड्या, आसंद्यांसाठी (खुर्च्यांसाठी) कव्हर आदी शिवण्याची सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या समवेतच आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या साधकांसाठी सात्त्विक पद्धतीचे पोशाख शिवू इच्छिणार्‍या साधकांचीही आवश्यकता आहे.
    वरील सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांनी रामनाथी आश्रमात सौ. क्षमा राणे यांच्याशी ०८४५१००६२५८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. इच्छुक असणारे आश्रमात राहून या सेवा करू शकतात किंवा काही कालावधीसाठी आश्रमात राहून नंतर घरी जाऊन सेवा चालू ठेवू शकतात.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम
कोणतीही गोष्ट जगात दिसली पाहिजे, उदा. प्रेम हे जगात दिसले 
पाहिजे, दाखवले पाहिजे, मग त्यात वास्तविकता असो वा नसो.
भावार्थ : जग आणि प्रेम हे प्रकृतीतील आहे. प्रेम कृतीतून दाखवता आले पाहिजे, नाहीतर दुसर्‍याला ते कळणार नाही. एकदा एका शिष्याकडे गेले असता, बाबांनी तेथे हातात माळ घेऊन जप केला. मग त्याच्या घरातील त्रासदायक स्पंदने नाहीशी झाली. वास्तविक बाबांच्या केवळ अस्तित्वानेच तसे झाले असते; पण अस्तित्वाचा परिणाम लोकांना दिसत नाही, तर हातात माळ धरून केलेला जप दिसतो, म्हणून बाबांनी तसे केले. या प्रसंगाच्या आधी जवळजवळ वीस वर्षे बाबांनी हातात माळ घेऊन जप केल्याचे कुणी पाहिले नव्हते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्याचे कारण
     हिंदु शब्दाची व्याख्या आहे, हीनान् गुणान् दूषयति इति हिंदुः ।, हीनान् गुणान् म्हणजे हीन, कनिष्ठ अशा रज आणि तम गुणांचा दूषयति म्हणजेच नाश करणारा. या व्याख्येनुसार पाहिले, तर हिंदूंपैकी फक्त १० टक्केच हिंदू खरे हिंदू आहेत. बाकीचे ९० टक्के केवळ जन्महिंदू आहेत. त्यामुळे हिंदूंची स्थिती जगातच नव्हे, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आत्मप्रौढी नको ! 
स्वतःच्या प्रगतीचा विचार करावा; पण अहंकाराची जोपासना करू नये. 
आत्मप्रौढीपेक्षा अधिक कोणता वेडेपणा नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ 
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ । ।
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

संवेदनशीलता !

संपादकीय 
      देशाचे रक्षण करतांना हुतात्मा झालेल्या सैनिकांचे स्मारक देशात नाही. देशाची फाळणी झाल्यावर उद्भवलेले टोळीवाल्यांचे युद्ध, वर्ष १९६२ चे चीनबरोबरचे युद्ध, वर्ष १९६५ आणि वर्ष १९७१ मधील पाकबरोबरचे युद्ध, ऑपरेशन विजय, श्रीलंकेत पाठवलेली शांतीसेना, राष्ट्रसंघ सेना, पाकसीमेवरील गोळीबार आणि देशात होणारी घुसखोरी अशा प्रसंगी आजपर्यंत २५ सहस्र भारतीय सैनिक मृत्यू पावले आहेत. देशासाठी लढतांना सैनिक जेव्हा मृत्युमुखी पडतो, तेव्हा देशाची सैन्यसंख्या एकाने घटते, त्याचबरोबर एका कुटुंबाचा आधार तुटलेला असतो. वृद्ध माता-पिता, भावंडे, पत्नी, लहान मुले या सर्वांवर दुःखाची छाया पसरते. अर्थात् या सर्वांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि प्रसंगाला सामोरे जाण्याची सिद्धता हृदय हेलावून टाकणारी असते. आपल्या व्यक्तीने देशासाठी दिलेल्या बलीदानाविषयी त्यांच्या चेहर्‍यावर अभिमान चमकत असतो आणि नव्या पिढीलाही देशकार्यासाठी पाठवण्याचा निर्धार झालेला असतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn