Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

श्री सिद्धारूढस्वामी पुण्यतिथी, कर्नाटक

चारही हिंदूंची निर्दोष मुक्तता !

परभणी बॉम्बस्फोट प्रकरण
आरोपींना १३ वर्षांनी न्याय मिळाला. या कालावधीत
 त्यांनी सहन केलेल्या मनस्तापाची भरपाई कोण देणार ? 
 
खोटे आरोप करून हिंदूंना नाहक गुन्ह्यात गोवणार्‍यांना शिक्षा करा !
  •  काँग्रेसने हिंदूंना बाँम्बस्फोट प्रकरणात जाणीवपूर्वक गोवल्याचे या निर्णयामुळे सिद्ध होते !
  •  हिंदूंना भगवे आतंकवादी ठरवणारी वृत्ते प्रसिद्ध करणारी प्रसारमाध्यमे आता हिंदु आरोपींच्या निर्दोषत्वावर गप्प का ?
     परभणी - वर्ष २००३ मध्ये परभणी येथील मोहम्मदीया मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही हिंदु आरोपींची येथील मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या स्फोटात १ जण ठार, तर ३१ जण घायाळ झाले होते.
     आरोपींचे अधिवक्ता श्री. रुणवाल यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार
१. नांदेड येथील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी योगेश देशपांडे, संजय चौधरी आणि मारुती वाघ यांना २००६ मधे परभणी बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी आरोपी करण्यात आले होते. या तीनही आरोपींना न्यायालयाने जामीनावर मुक्त केले होते.
२. २००८ मधे मालेगाव स्फोटातील आरोपी राकेश धावडे यांनाही परभणी स्फोटाच्या प्रकरणी आरोपी करण्यात आले.

मशिदींवरचे भोंगे कुठे काढले ? - संजय राऊत, खासदार, शिवसेना

     मुंबई - उच्च न्यायालयाने आदेश देऊनही मशिदींवरचे भोंगे कुठेही काढले गेलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा दहीहंडीविषयीचा निर्णय रहित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी. दहीहंडी हा शौर्याचा खेळ आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
     श्री. राऊत पुढे म्हणाले की, मशिदींवरचे विनापरवाना भोंगे काढून टाकावेत, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत त्यांचा वापर करू नये, शांतता क्षेत्रात ते लावू नयेत, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत; पण मुसलमानांचा रोष नको, यासाठी राज्य सरकार आणि पोलीस यांच्याकडून त्याचे पालन केलेच जात नाही. या पार्श्‍वभूमीवर दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी ध्वनीवर्धकांचा वापर, रस्त्यांवरचे मंडप आणि अन्य सूत्रांवरून उच्च न्यायालय अन् सर्वोच्च न्यायालय यांनी काही आदेश दिले आहेत.

न्यायालयाकडून हिंदु धर्माच्या सणांमध्येच आडकाठी का आणली जाते ? - राज ठाकरे

     मुंबई - न्यायालयाने प्रत्येक ठिकाणी नाक खुपसू नये. तसे असेल, तर निवडणुका घेऊ नका, न्यायालयानेच देश चालवावा. स्टूलावर चढून आता दहीहंडी फोडायची का ? न्यायालयाकडून हिंदु धर्माच्या सणांमध्येच आडकाठी का आणली जाते, असा प्रश्‍न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
१. दहीहंडीत तीन-चार वर्षांच्या मुलांना घेऊन जाणे चूकच आहे. माझा आक्षेप थरांच्या मर्यादेवर आहे.
२. ध्वनीप्रदूषण, बाजारीकरण ही सूत्रे योग्यच; मात्र त्यावरील उपाय अयोग्य आहे.
३. आज दहीहंडीवर बंधन आणले आहे, उद्या गणेशोत्सव आणि नवरात्रावर आणतील.
४. हिंदु धर्माच्या सणावेळीच नियमावली का ? दहीहंडीच्या वेळीच ध्वनीप्रदूषण दिसते; पण मशिदीवरील ध्वनीवर्धक चालूच ठेवता.
५. दहीहंडी हा सण आहे. साहसी खेळाचा दर्जा देण्याचा प्रयत्न कशाला ?

गोरक्षकांत शिरलेल्या समाजकंटकांची सूची करण्यासह राजकारणातही असलेल्या समाजकंटकांची सूची बनवा !

हिंदू एक्झीस्टन्स या संकेतस्थळाचे संपादक श्री. उपानंद ब्रह्मचारी यांचे पंतप्रधानांना आवाहन
     कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गोरक्षक हे समाजकंटक आहेत, असे विधान केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदू एक्झीस्टन्स या संकेतस्थळाचे संपादक श्री. उपानंद ब्रह्मचारी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून, गोरक्षकांत शिरलेल्या समाजकंटकांची सूची करण्यासह राजकारणात असलेल्या समाजकंटकांचीही सूची बनवा, असे आवाहन केले आहे.
शासनाच्या भूमिकेमुळे गोहत्या करणार्‍यांना मोकळे रान मिळणार ! 
      शासनाच्या या भूमिकेमुळे एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणवणारे विविध पक्ष गोरक्षकांवरच कारवाई करणार, तर दुसरीकडे गोहत्या करणार्‍यांना मोकळे रान मिळणार आहे, असे श्री. ब्रह्मचारी यांनी निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान असे म्हणतात, पशूवधगृहांपेक्षा अधिक गायी प्लास्टिक पोटात गेल्याने मृत्यू पावतात. वास्तविक गायी रस्त्यावरील प्लास्टिक खातात, यातून गोमातांच्या चार्‍याचा प्रश्‍न आणि प्लास्टिकच्या कचर्‍याच्या व्यवस्थापनाचा प्रश्‍न समोर येतो. हे दोन्ही प्रश्‍न सोडवण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. शासन पशूवधगृहांना अनुमती देते, शासकीय अनुदान देते, गोमांस निर्यातीत जगभरात प्रथम स्थान मिळवते आणि गोरक्षकांना गुंड संबोधते हा दुर्दैवी विरोधाभास आहे.

देहली येथील शासकीय गोशाळांमध्ये मृत्युमुखी पडणार्‍या गोवंशाकडे आप सरकारचे दुर्लक्ष !

केवळ सत्ता हेच लक्ष्य असणार्‍या आपच्या राज्यकर्त्यांचे गोवंशाच्या मृत्यूकडे लक्ष जाईल, तो सुदिन !
       देहली - देहलीत महानगरपालिका आणि शासन यांच्या ५ गोशाळा आहेत. त्यामध्ये भटके आणि बेवारस गोवंश आणून ठेवले जातात. या गोशाळांमध्ये असलेल्या गोवंशाची स्थिती अत्यंत दयनीय असून त्यातील सहस्रो गोवंश मृत्यू पावत आहे.
१. दक्षिण देहली महानगरपालिकेतील गोशाळेत वर्ष २०१५-१६ मध्ये ३ सहस्र ३९८ गोवंश पाठवण्यात आले. याच कालावधीत तेथील ३ सहस्र ६८५ गोवंश मृत्युमुखी पडले.
२. वर्ष २०१४-१५ मध्ये हेच आकडे अनुक्रमे २ सहस्र ९७४ आणि २ सहस्र १४३ असे होते.

भारतात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे स्मारक नाही !

सैनिकांविषयी कृतघ्न असणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते !
     नवी देहली - भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य प्राप्त होऊन ६९ वर्षार्ंचा कालावधी लोटला. वर्ष १९४७ पासून भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे सुमारे २५ सहस्र सैनिक १९४७-४८, १९६२, १९६५, १९७१ मधे झालेल्या युद्धांत, ऑपरशेन विजय, श्रीलंकेतील शांतीसेना, राष्ट्रसंघ शांतीसेना, पाक सीमेवरील गोळीबार तसेच भारतात घुसखोरी करणार्‍या आतंकवाद्यांच्या चकमकीत हुतात्मा झाले आहेत. प्रजासत्ताकदिनी ज्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते, त्या देहलीतील इंडिया गेटवरील स्मारकावर जे सैनिक ब्रिटीश सैन्यात असतांना पहिले महायुद्ध आणि अफगाणिस्तानात झालेल्या युद्धात धारातीर्थी पडले, त्यांची नावे आहेत; मात्र जे सैनिक स्वतंत्र भारताच्या सुरक्षेसाठी हुतात्मा झाले, त्यांच्यासाठी बांधण्यात येणारे स्मारक कागदावरच आहे.
१. या स्मारकाचे बांधकाम करण्याचा ठराव केंद्रीय मंत्रीमंडळाने ७ ऑक्टोबर २०१५ या दिवशी झालेल्या बैठकीत संमत केला. सुमारे ५ कोटी रुपये व्यय करून बांधण्यात येणार्‍या स्मारकाचा आराखडा अद्याप अंतिम झालेला नाही अथवा त्यासाठी जागतिक निविदाही काढण्यात आलेल्या नाहीत. प्रत्येक वेळी संरक्षण खाते काम प्रगतीपथावर आहे असे उत्तर देते.

बिहारमध्ये गॅरेजमध्ये भरत आहेत महाविद्यालयांचे वर्ग !

देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाल्यावरही शिक्षणासारख्या मूलभूत गरजाही 
पूर्ण करू न शकलेला भारत हिंदु राष्ट्राची आवश्यता विषद करतो !
      पाटलीपुत्र (पाटणा) - बिहारच्या शालांत परीक्षांमध्ये गुणवत्ता सूचीचा घोटाळा अजूनही ताजा असतांनाच राज्यातील महाविद्यालयांचे वर्ग वाहनदुरुस्ती तळांच्या (गॅरेजच्या) ३-४ खोल्यांमध्ये भरत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ही महाविद्यालये बिहार शालांत परीक्षा मंडळाशी संलग्न आहेत. या घोटाळयामागे परीक्षा मंडळाचे माजी अध्यक्ष लंकेश्‍वर प्रसाद सिंह, त्यांची पत्नी आणि जनता दल (संयुक्त)च्या माजी आमदार उषा सिन्हा या उत्तरदायी आहेत. सध्या हे दोघेही कारावास भोगत आहेत. (सत्तेवर असलेल्या जनता दल (संयुक्त)मध्ये कशा लोकांचा भरणा आहे, हे यातून दिसून येते. असे नेते जनतेचे काय भले करणार ? - संपादक)

हिंदूंना चुकीचा इतिहास शिकवला जात आहे ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

मार्गदर्शनाचा लाभ घेतांना हिंदु धर्माभिमानी
     आग्रा - आज हिंदु समाज स्वतःच्या धर्माप्रती अज्ञानी आहे. त्यांना विकृत इतिहास शिकवला जात असून चुकीच्या संकल्पना थोपवल्या जात आहेत. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करायचे असेल, तर हिंदूंमधील क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, आणि इच्छाशक्ती यांना जागृत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील हिंदु धर्माभिमान्यांच्या बैठकीत केले. साधना, राष्ट्र, धर्म आणि हिंदूंचे प्रभावी संघटन या विषयावर बोलतांना पू. डॉ. पिंगळे म्हणाले, आपण धर्मकार्य साधना समजून केले, तर ईश्‍वराची अनुभूती घेऊ शकतो, तसेच आपल्या धर्माचा प्रसार करून इतर हिंदूंमध्येही धर्माभिमान जागृत करू शकतो. समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाला भेट देणारे राष्ट्रप्रेमी, राष्ट्रीय गोरक्षा दल, हिंदु सेना, हिंदु युवा वाहिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

उत्तरप्रदेशातील मंदिरांत चोर्‍या करणार्‍या उमर अली या चोराला अटक !

मंदिरांमध्ये चोरी करणारे धर्मांध असतात, हे येथे दिसून येते ! हिंदूंना असहिष्णु 
म्हणून हिणवणारे याविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
      झाशी (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशात मंदिरात चोर्‍या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी उमर अली या चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून मूर्ती, मुकुट आणि पैसे हस्तगत करण्यात आले आहेत. त्याने त्याच्या दोन सहकार्‍यांसह या चोर्‍या केल्या होत्या.

विहिंप देशभरात ५ सहस्र संमेलने आयोजित करणार !

पंतप्रधान मोदी यांच्या गोरक्षकांच्या संदर्भातील वक्तव्याचे प्रकरण
       नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या गोरक्षकांच्या संदर्भातील विधानाच्या विरोधात विश्‍व हिंदु परिषद संपूर्ण देशात ५ सहस्र संमेलने आयोजित करणार आहे. तसेच देहलीत गोरक्षणाच्या संदर्भात सभाही आयोजित करणार आहे. ही संमेलने गोकुळाष्टमीनंतर आयोजित करण्यात येणार आहेत.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार !

* उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! 
* दादरी प्रकरणी ऊर बडवणारे हिंदु मुलींवर होणार्‍या अत्याचारांवर तोंड उघडत नाहीत !
 
     बरेली (उत्तरप्रदेश) - येथे एका हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर काही दिवस सामूहिक बलात्कार करण्याची आणि तिला गोमांस खायला लावण्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बाबू हसन आणि त्याचा भाऊ तिल हसन यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मुलीला एका घरात लपवून ठेवले होते. शेजार्‍यांना याची शंका आल्यावर ही घटना उघडकीस आली. या दोघांनी मुलीला गुंगीचे इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केले.

गोतस्करीच्या प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

     उडुपी - कर्नाटकातील उडुपी येथे गायींची तस्करी केल्याच्या संशयावरून विश्‍व हिंदु परिषद आणि हिंदु जागरण वेदिके यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रवीण पुजारी या कार्यकर्त्याची हत्या केली आहे.

संगणक अभियंता सय्यद खलिद सैफुल्ला यांच्याकडून १५५ मुसलमान स्वातंत्र्यसैनिकांवर मोबाईल अ‍ॅप विकसित !

स्वातंत्र्यसैनिकांची धर्माधारित विभागणी करणारे धर्मांधच नव्हेत का ? हिंदूंना ऊठसूट 
जातीयवादी ठरवणारे पुरोगामी यावर काहीही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !
      मुंबई - येथील संगणक अभियंता सय्यद खलिद सैफुल्ला यांनी देशातील मुसलमान स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयी मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. प्रख्यात लेखक सय्यद नासीर अहमद यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित एकूण १५५ मुसलमान स्वातंत्र्यसैनिकांची माहिती या अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. 
     या स्वातंत्र्यसैनिकांचे वर्गीकरण करण्यात आले असून त्यामध्ये महिला, राज्यकर्ते, मौलवी, अधिवक्ता, पत्रकार, उद्योगपती, आझाद हिंद सेनेतील सैनिक, डॉक्टर, शिक्षणतज्ञ, कवी, नोकरशाह, न्यायाधीश आणि इतर व्यावसायिक असे गट करण्यात आले आहेत.

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाल्यास मूलतत्ववादी इस्लामच्या विरोधात आयोग स्थापणार ! - डोनाल्ड ट्रम्प

कुठे इस्लामी कट्टरतेच्या समर्थकांचे जाळे उद्ध्वस्त करण्याची मनिषा बाळगणारे बाणेदार 
अमेरिकी राजकारणी, तर कुठे इसिसच्या समर्थकांचे समुपदेशन करून त्यांना सोडून 
देणारे भारतीय राजकारणी !
इस्लामी कट्टरतेच्या समर्थकांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचे सूतोवाच !
     यंग्सटाऊन (ओहायो, अमेरिका) - ८ नोव्हेंबरला होणारी अमेरिकेची निवडणूक जिंकल्यास मूलतत्त्ववादी इस्लामच्या विरोधात आयोग स्थापन करण्यात येईल, तसेच देशांतर करून अमेरिकेत रहाण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकांची कसून तपासणी करण्यात येईल, असे आश्‍वासन अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. अमेरिकेतील ओहायो राज्यातील यंग्सटाऊन येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या आयोगाच्या माध्यमातून अमेरिकेतील इस्लामी कट्टरतेचे समर्थन करणारे जाळे उद्ध्वस्त करण्यात येणार असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

केरळ येथील मलबार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड्स दुकानाकडून पाकच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन !

अशा देशद्रोह्यांच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
      थिरूवनंतपुरम् - केरळ येथील मलबार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड्स या सोन्या-चांदीच्या दुकानाने हल्लीच संकेतस्थळाद्वारे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत सहभागी व्हा असे आवाहन केले होते. १४ ऑगस्टला झालेल्या पाकच्या या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वी मलबार गोल्ड अँड डायमंड्स या दुकानाच्या केरळच्या इतर भागात असलेल्या त्याच्या शाखांमध्ये आणि आखाती देशांमधील यांच्या दुकानांमध्ये याचा प्रचार केला गेला. या स्पर्धेत सहभागी व्हा आणि गिफ्ट व्हॉऊचर मिळवा असा प्रचार केला गेला. 
      कोझिकोड येथे हनुमान सेनेच्या कार्यकर्त्यांनी मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या दुकानासमारे निदर्शने केली. काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दुकानांमध्ये दूरध्वनीवरून संपर्क केला आणि स्पर्धेविषयी निषेध नोंदवला.भारताचे ५० टक्के तरुणही सांगू शकत नाहीत राष्ट्रध्वजातील रंग !

  • भारतियांनो, आपल्याला असे स्वातंत्र्य अपेक्षित आहे का ?
  • हा आहे गेल्या ६९ वर्षांमध्ये राजकारण्यांनी जनतेमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण न केल्याचा परिणाम !
४० टक्क्यांहून अल्प लोक योग्य प्रकारे राष्ट्रगीत म्हणू शकतात ! 
      मुंबई - देशाने १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला असतांना भारतातील एक मोठा वर्ग त्यांच्या देशाच्या राष्ट्रध्वजाचे रंगही सांगू शकत नसल्याचे वास्तव एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. पोद्दार इंस्टिट्यूट ऑफ एज्युुकेशन या संस्थेने नुकतेच १८ ते २३ वर्षीय तरुणांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार मुंबई येथील १० टक्के, बेंगळुरू येथील १२ टक्के, तर चेन्नई येथील केवळ ८ टक्के तरुणांनाच तिरंगा राष्ट्रध्वजाचे रंग माहीत आहेत, तसेच या शहरांतील ४० टक्क्यांहून अल्प लोकच योग्य प्रकारे राष्ट्रगीत म्हणू शकत असल्याचे यातून दिसून आले आहे.

कोलकात्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात चित्रपट गीतांवर नर्तकींसह नृत्य केले !

तृणमूल काँग्रेसची विकृती !
     कोलकाता - येथे तृणमूल काँग्रेसप्रणित कामगार संघटना इंडियन नॅशनल तृणमूल ट्रेड यूनियन काँग्रेस (आयएन्टीटीयूसी) हिने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी हिंदी आणि भोजपुरी चित्रपटातील गाण्यांवर नर्तकींसमवेत पक्षाच्या समर्थकांनी नृत्य केले. कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जा मंत्री सोवनदेब चट्टोपाध्याय उपस्थित होते. त्यांच्या जाण्यानंतर वरील घटना घडली. प्रथम ध्वनीक्षेपकावरून देशभक्तीपर गाणी लावण्यात आली होती. मंत्री गेल्यावर चित्रपटातील गाणी लावण्यात आली. या घटनेनंतर चट्टोपाध्याय म्हणाले की, पक्ष अशा कार्यक्रमांचे समर्थन करत नाही. या प्रकरणी संघटनेच्या नेत्याला निलंबित करण्यात आले आहे.स्वातंत्र्यदिनी दुचाकीवर पाकिस्तानचा झेंडा लावणार्‍या यमन अली या युवकाला संतापलेल्या लोकांनी चोपले !

अशा देशद्रोह्यांना कठोर शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! 
      गौहत्ती (आसाम) - स्वातंत्र्यदिनी येथे यमन अली हा १९ वर्षीय तरुण मोटारसायकलवर पाकचा झेंडा मिरवत असल्याचे पाहून देशप्रेमी नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. तसेच त्याची मोटारसायकल जाळून टाकली. यमन अलीचे पाकच्या आयएस्आय या गुप्तचर संस्थेशी संबंध आहेत का, याचादेखील पोलीस तपास करत आहेत. तसेच यमनने त्याचे वडील नसीरुद्दीन मियाँ यांनीदेखील पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याचे चौकशीत सांगितल्यावर पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे.बलुचिस्तानमधील जनतेला पाकपासून हवे आहे स्वातंत्र्य !

      नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करतांना पाकच्या बलुचिस्तानचे सूत्र उपस्थित केले. त्यामुळे बलुचिस्तानमधील नागरिकांनी आणि नेत्यांनी त्यांचे आभार मानले. बलुचिस्तानच्या नागरिकांना पाकपासून स्वातंत्र्य हवे आहे. यासाठी ते गेली ७० वर्षे लढा देत आहेत. 
१. बलुचिस्तान पाकिस्तानचा पश्‍चिम प्रांत आहे. बलुचिस्तान इराण आणि अफगाणिस्तान यांच्या सीमांशी जोडला गेलेला आहे. त्याची राजधानी क्वेटा आहे. येथील लोकांची प्रमुख भाषा बलूच अथवा बलुची या नावाने ओळखली जाते. 
२. बलुचिस्तानमधील लोकांची पाकच्या स्थापनेपासूनच स्वतंत्र राष्ट्र होण्याची मागणी राहिलेली आहे. त्यांना पाकमध्ये सहभागी व्हायचे नव्हते. त्यामुळे पाकने प्रथम वर्ष १९४८ ला सैन्य कारवाई करून त्यांचे आंदोलन चिरडून टाकले. त्यानंतर वर्ष १९५८-५९, १९६२-६३ आणि १९७३-७७ मध्ये अशा प्रकारे सैनिकी कारवाई करून त्यांचे आंदोलन चिरडले. वर्ष २००० मध्येही असाच संघर्ष झाला होता.

हिंदु मुलीच्या काकाने मुसलमान युवकाला गोळ्या झाडून ठार केले !

लव्ह जिहादचे प्रकरण
     मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) - येथील वहलाना गावात एका हिंदु तरुणीला लव्ह जिहादद्वारे प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करणार्‍या २१ वर्षीय नाजिम या मुसलमान तरुणाला मुलीच्या काकाने गोळ्या झाडून ठार केल्याची घटना घडली आहे. त्याला मुलीच्या घरातच ठार करण्यात आले. या प्रकरणी मुलीचे वडील आणि भाऊ यांना अटक करण्यात आली आहे, तर काका आणि अन्य एक भाऊ यांच्यावरही गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाला आहे.

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

     वर्धा - पंतप्रधानांनी गोरक्षकांना समाजकंटक म्हटल्याविषयीचे वक्तव्य मागे घ्यावे, काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून सैन्यावर आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वैभव नावडकर यांना निवेदन दिले.

भाजपशासित राज्यांतील गोशाळांची स्थिती दयनीय ! - आझम खान

आझम खान यांचे नक्राश्रू !
     नवी देहली - भाजपशासित राज्यांतील गोशाळांची स्थिती दयनीय आहे. चारा न मिळाल्यामुळे गोशाळेतील गायींचा मृत्यू होत आहे, अशी टीका उत्तरप्रदेशातील मंत्री आझम खान यांनी केली आहे.

काश्मीरमध्ये ६० आतंकवाद्यांची घुसखोरी !

     श्रीनगर - काश्मीरमध्ये गेला दीड महिना चालू असलेल्या हिंसाचाराचा अपलाभ घेत ६० आतंकवाद्यांनी घुसखोरी केली आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा आणि उरी सेक्टरमधून ही घुसखोरी करण्यात आली आहे. हे आतंकवादी मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये लपून बसले असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे हिजबूल मुजाहिद्दीनचे आतंकवादी त्राल परिसरातील तरुणांना प्रशिक्षण देत असून त्यांना आतंकवाद्यांच्या गटात भरती करून घेत आहेत. सैन्य या आतंकवाद्यांना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गोळीबारही केला जात आहे. आतापर्यंत ५ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे, असे गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍याने सांगितले आहे.

बारामती येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी ६०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

     बारामती (जिल्हा पुणे) - राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. प्राजक्ता सांगळूदकर यांनी येथील कै. भिवराव देशपांडे माध्यमिक शाळेमध्ये ६०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला.

संतश्री आसाराम बापू प्रेरित युवा सेवा संघाच्या वतीने देशभक्ती संकीर्तन यात्रेचे आयोजन !

     पुणे - येथील संतश्री आसाराम बापू प्रेरित युवा सेवा संघांच्या वतीने ७० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट या दिवशी भव्य देशभक्ती संकीर्तन यात्रा पार पडली. शनिवारवाडा येथून चालू झालेली ही यात्रा लक्ष्मी रस्त्याकडे मार्गस्थ होऊन श्री ओंकारेश्‍वर मंदिर येथे तिची सांगता झाली.
     या वेळी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू, तसेच हुतात्मा देशभक्त यांची चित्रे लावून रथ सुसज्ज करण्यात आला होता. तसेच रथाच्या मागून देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. यात्रेच्या कालावधीत भारतीय संस्कृतीचे महत्त्व आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात युवकांचे योगदान या विषयावरील माहितीपत्रके वितरित करण्यात आली. या यात्रेत योग वेदांत सेवा समिती, बाल संस्कार विभाग, महिला उत्थान मंडल, ऋषीप्रसाद विभाग सहभागी झाले होते.
     या वेळी युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री. विपुल खुरपे, जनशक्ती संघटनेचे श्री. संदीप परदेशी, ओजस्वी देश पत्रकारचे श्री. उत्कर्ष शर्मा यांसह अनेक कार्यकर्ते आणि भक्त सहभागी झाले होते.

(म्हणे) 'गर्भसंस्कार पुस्तकाविरोधात सरकारने उच्च न्यायालयात जावे !' - तक्रारदार गणेश बोर्‍हाडे आणि अधिवक्त्या वर्षा देशपांडे

हा शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न नव्हे का ? 
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या 'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' पुस्तकावरील याचिकेचे प्रकरण 
     नगर - 'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' या पुस्तकात बालाजी तांबे यांनी गर्भलिंगनिदान कायद्याचा भंग केलेला आहे. या प्रकरणी औरंगाबाद खंडपिठात शासनाची योग्य भूमिकाच मांडली गेलेली नाही. त्यामुळे शासनाने सर्वोच्च न्यायालयात जावे, अशी मागणी मूळ तक्रारदार गणेश बोर्‍हाडे आणि गर्भलिंग निदान विरोधातील देशपातळीवरील केंद्रीय समितीच्या सदस्या अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांनी केली आहे. (आज विदेशात भारतीय शास्त्रांचा मोठा प्रमाण्यावर अभ्यास होत असतांना भारतात मात्र त्याला विरोध होणे, हे दुर्दैव ! - संपादक) नुकतीच तांबे यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. 

सोलापुरात श्रीराम सेनेकडून अवैध पशूवधगृह बंद करण्याची मागणी !

     सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागातील शेतामध्ये आणि वनखात्याच्या जागेत अवैधरित्या पशूवधगृह चालू असून ते त्वरित बंद करावे, अशी मागणी श्रीराम सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. अवैध पशूवधगृहे बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली.
     जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रूरपणे रातोरात सहस्रो गोवंशियांची हत्या होत आहे. त्यामुळे गाव बाजारात होणार्‍या पशूखरेदी-विक्रीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे, पशूंना बळी देण्यास आणि अवैध खरेदी-विक्रीला आळा घालण्यात यावा आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्या. निवेदन देतांना श्रीराम सेनेचे गोरक्षाप्रमुख सुधीर बहिरवाडे, संयोजक सिद्धाराम नंदरगी, मृणाल कांबळे, सूरज साळुंखे, सिद्धाराम गुरदोळ्ळी, मोहन नुन्ना आदी उपस्थित होते.

रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला महिलांच्या कुस्तीमध्ये कास्यपदक !

एकमेव कास्यपदक मिळवणारा जगातील १२५ कोटी लोकसंख्येचा देश भारत !
     रिओ (ब्राझील) - येथे चालू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील महिलांच्या कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिक या भारतीय महिला खेळाडूने कास्य पदक जिंकले आहे. भारताला आतापर्यंत मिळालेले हे पहिलेच पदक आहे. या विजयानंतर साक्षी हिला पंतप्रधानांसह देशभरातून शुभेच्छा मिळाल्या आहेत. (अमेरिका, चीन, जपान, ब्रिटन आदी देश पदके पटकावण्यात भरारी मारत असतांना एकमेव आणि तेही कास्य या पदकावर स्वतःची पाठ थोपटून घेणार्‍या भारताला हे लज्जास्पदच होय. याला राज्यकर्तेच उत्तरदायी आहेत ! - संपादक)

(म्हणे) मोदी यांनी भारतव्याप्त काश्मीरसाठी चर्चा करावी !

काँग्रेसचे नेते (मौलाना) दिग्विजय सिंह यांचे पाकप्रेम !
     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानची अधिक काळजी आहे. त्या भागातील लोकांना ते धन्यवाद देत असतात; मात्र भारतातील काश्मिरींशी चर्चा करण्यास मोदी सिद्ध नाहीत. ((मौलाना) दिग्विजयसिंह यांनी कधी परागंदा काश्मिरी हिंदूंविषयी चर्चा करण्याच्या संदर्भात मागणी केली आहे का ? - संपादक) पाकव्याप्त काश्मीर असो; वा भारतव्याप्त काश्मीर असो; येथील जनतेमध्ये विश्‍वास निर्माण करावयाचा असल्यास ते चर्चेद्वारेच शक्य आहे, असे विधान काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी येथे केले. भारतव्याप्त काश्मीर या उल्लेखावर सिंह यांनी स्पष्टीकरण देतांना सांगितले की, काश्मीर हा भारताचाच भाग आहे. मला पाकव्याप्त काश्मीर, असे म्हणावयाचे होते. (लादेन याला ओसामाजी आणि हाफीज सईद याला सईद साहेब असे म्हणणार्‍या दिग्विजय सिंह यांच्याकडून भारतव्याप्त काश्मीर असा उल्लेख झाल्यास त्यात आश्‍चर्य ते काय ? - संपादक)

पुणे वाहतूक पोलिसांकडून गेल्या ६ मासांत २ सहस्र ३८६ मद्यपीचालकांवर कारवाई !

मद्यपी वाहनचालकांची वाढती संख्या हे कायद्याचे भय न राहिल्याचे द्योतक !
     पुणे - मद्यपी वाहनचालकांकडून होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून पूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला किंवा गटारी अमावस्येला धडक कारवाई केली जायची; मात्र मद्यपी वाहनचालकांकडून होणार्‍या अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याने पोलिसांकडून मद्यपींना पकडण्यासाठी वर्षभर मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत गेल्या ६ मासांत २ सहस्र ३८६ मद्यपी वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा मद्यपी वाहनचालकावर खटला प्रविष्ट करून त्याला गजाआड करण्यात येते. त्यांचे वाहन अनुज्ञप्ती (परवाना) कह्यात घेऊन तो रहित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात येतो. (अशा मद्यपींवर वचक बसवण्यासाठी त्या चालकांना कठोर शिक्षा आणि आर्थिक दंड केल्यासच त्याला काही प्रमाणात आळा बसेल. - संपादक)

वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथे अवैधरित्या गोवंशियांची वाहतूक करणार्‍या धर्मांधाला अटक

गोवंश हत्या बंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता दर्शवणारी घटना ! 
     वैजापूर, १८ ऑगस्ट - पशूवधगृहात हत्येसाठी ३ गायी आणि १ वासरू घेऊन जात असलेल्या एका वाहनाला भादली गावच्या ग्रामस्थांनी १७ ऑगस्ट या दिवशी अडवले आणि त्यातील गोवंशियांची सुटका केली. (गोवंशियांचे रक्षण करणार्‍या भादली ग्रामस्थांचे अभिनंदन ! - संपादक) या वेळी वाहनचालक फेरोज गुफरान कुरेशी याला ग्रामस्थांनी शिऊर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून कुरेशी याला अटक केली आहे. त्या गायींना स्थानिक गोशाळेत भरती करण्यात आले आहे.

ध्वजारोहण न केल्याने 'न्यू मिलेनियम' शाळेवर राष्ट्राभिमानी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा मोर्चा !

मुख्याध्यापकांवर कठोर कारवाईची मागणी ! 
     हातकणंगले (जिल्हा कोल्हापूर), १८ ऑगस्ट (वार्ता.) - हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील 'न्यू मिलेनियम पब्लिक' शाळेत १५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न केल्यामुळे संतप्त झालेले राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी शाळेवर मोर्चा काढला. या वेळी शाळा प्रशासनाला जाब विचारण्यात आला. या ठिकाणी वादावादी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मुख्याध्यापिका श्रीमती विजया मोहन यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांना देण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्च्याच्या पदाधिकार्‍यांनी शाळेच्या पदाधिकार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करावा, या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक पोवार यांना दिले. मुख्याध्यापिकांनी सर्व विद्यार्थ्यांसह सामूहिक राष्ट्रगीत म्हटल्यानंतर या वादावर पडदा पडला. 

लाल-पिवळा ध्वज हटवून तिरंगा ध्वज लावण्याची महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी !

जिल्हाधिकार्‍यांचे थातूरमातूर उत्तर ! 
     बेळगाव, १८ ऑगस्ट (वार्ता.) - राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा ध्वज वगळता इतर ध्वजांना मान्यता नसल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या सूचनेनुसार येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लावण्यात आलेला लाल-पिवळ्या रंगांतील ध्वज काढण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने १७ ऑगस्ट या दिवशी जिल्हाधिकारी एन्. जयराम यांना देण्यात आले; मात्र जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणी 'चौकशी करू, बघू' अशी थातूरमातूर उत्तरे दिली, तसेच 'केवळ वादाचे विषयच का उपस्थित करता ?' असा प्रतिप्रश्‍न करून मूळ प्रश्‍नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. 

विदेशी मद्यासाठी लागणारे २० सहस्र लिटर स्पिरीट जप्त !

     सोलापूर - टँकरमधून होणारी २० सहस्र लिटर स्पिरिटची अवैध वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई आणि सोलापूर येथील पथकाने संयुक्त कारवाई करून पकडली. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दोघांना अटक करून स्पिरीटसह २५ लक्ष रुपयांचा मुद्देमालही शासनाधीन केला. हे स्पिरीट विदेशी मद्य बनवण्यासाठी वापरले जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली. मॅथ्यू योहानन आणि गोपाल कृष्णन (केरळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बालेवाडी (पुणे) येथील इमारतीचे छत कोसळल्याप्रकरणी मुख्य बांधकाम व्यावसायिकाला अटक

     पुणे - येथील बालेवाडी भागातील पार्क एक्स्प्रेस इमारतीचे छत (स्लॅब) कोसळून ९ जण मृत्युमुखी पडल्याची घटना २९ जुलै या दिवशी घडली. या प्रकरणातील मुख्य बांधकाम व्यावसायिक महेंद्र कामत याला चतुःश्रुंगी पोलिसांनी १६ ऑगस्ट या दिवशी अटक केली आहे. या प्रकरणातील इतर ६ आरोपी अजूनही पसार आहेत. पोलिसांनी यापूर्वी ४ जणांना अटक केली होती.
श्रीनगर येथे संकेश्‍वर येथील सैनिक मृत्युमुखी !
       संकेश्‍वर (जिल्हा बेळगाव) - जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे १५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्यदिनी ध्वज उतरवतांना ध्वजस्तंभाजवळ असणार्‍या उच्च दाबाच्या वीजभारित तारांचा स्पर्श झाल्यामुळे येथील श्री. सागर कुंभार (वय २४) या सैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वातंत्र्यदिनी संकेश्‍वराच्या सुपुत्राला वीरमरण आल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्री. कुंभार हे राजस्थान रेजिमेंटल नॅशनल रायफल फोर्समध्ये कार्यरत होते.

(म्हणे) 'त्या मारेकर्‍यांना सांगायला हवे, जेवढ्या गोळ्या तुम्ही बनवाल, त्यापेक्षा जास्त छाती आमच्याकडे आहेत !'

अभिनेता जितेंद्र जोशी यांचे चिथावणीखोर आणि असहिष्णु वक्तव्य ! 
     पुणे, १८ ऑगस्ट - एकेकाळी आपण 'देव देव्हार्‍यात नाही', हे गाणे सहज गात म्हणू शकायचो; पण आजच्या या सहिष्णु-असहिष्णु लढ्याच्या काळात आपण खरेच 'देव देव्हार्‍यात नाही', असे बिनधास्तपणे म्हणू शकू का ? (असे बोलू शकतो, याचाच अर्थ ते म्हणूही शकतो, असाच नव्हे का ? - संपादक) सत्य मांडणार्‍यांची हत्या करणारे, ते करत आहेत, म्हणून आपण घाबरून त्यांच्यापुढे जायचेच नाही का ? तर याचे उत्तर 'हो जायचे' असे असायला हवे. आपण त्या मारेकर्‍यांना सांगायला हवे, 'जेवढ्या गोळ्या तुम्ही बनवाल, त्यापेक्षा जास्त छाती आमच्याकडे आहेत', असे प्रतिपादन अभिनेता जितेंद्र जोशी यांनी केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आटपाट यांच्या वतीने होणार्‍या पहिल्या विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी १७ ऑगस्ट या दिवशी ते बोलत होते.

कोल्हापूरमध्ये गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी न लावण्याविषयी पोलिसांना प्रतिज्ञापत्र दिले !

पोलीस मुसलमानांकडून अशी प्रतिज्ञापत्रे कधी लिहून घेणार ? 
     कोल्हापूर, १८ ऑगस्ट (वार्ता.) - गणेशोत्सवाच्या काळात आवाजाच्या मर्यादेचा भंग करणारी डॉल्बी यंत्रणा वापरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी यंत्रणा वापरणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र पोलिसांना दिले आहे. सर्वच पोलीस ठाण्यांनी बैठका घेऊन मंडळांची भूमिका घोषित केली आहे. त्यामुळे पोलिसांना शब्द देऊन ऐनवेळी डॉल्बी यंत्रणेचा वापर करणार्‍या मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करून डॉल्बी यंत्रणा जप्त करण्याची कारवाई पोलीस करणार आहेत.

सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनास बंदोबस्तातील पोलिसांसह २५ सहस्र भाविकांचा भरघोस प्रतिसाद !

कन्यागत महापर्वकाल 
सनातनच्या प्रदर्शनाला मिळालेला पोलिसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
     नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर), १८ ऑगस्ट (वार्ता.) - नृसिंहवाडी येथे ११ ऑगस्टपासून कन्यागत महापर्वकालास प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील श्री दत्त विद्या मंदिर विद्यालयामध्ये ग्रंथप्रदर्शन आणि सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने यांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनास २५ सहस्र जिज्ञासू आणि भाविक यांनी भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घेतला. 
काश्मिरी हिंदूंच्या व्यथेवर हिंदुद्वेष्टे काँग्रेसी गप्प !
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानची अधिक काळजी आहे. त्या भागांतील लोकांना ते धन्यवाद देत असतात; मात्र भारतातील काश्मिरींशी चर्चा करण्यास मोदी सिद्ध नाहीत, असे राष्ट्रद्रोही वक्तव्य काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
PM Modiko PoK aur Baluchistan ki apeksha (deshdrohi) Kashmiriyose charcha karni chahiye - Digvijay Singh
     Congresska yah tushtikaran deshke liye ghatak !
जागो !
पीएम् मोदी को पीओके और बलुचिस्तान की अपेक्षा (देशद्रोही) कश्मीरियों से चर्चा करनी चाहिए. - दिग्वीजय सिंह
     कांग्रेस का यह तुष्टीकरण देश के लिए घातक !

सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध जिल्ह्यांत हिंदुत्ववादी, प्रशासकीय अधिकारी, संपादक, तसेच धर्माभिमानी यांना रक्षाबंधन !

     हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येकाचेच योगदान असावे, तसेच महान भारतीय संस्कृतीची जोपासना व्हावी, या उद्देशाने सनातन संस्था तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सांगली, पंढरपूर, लातूर आदी जिल्ह्यांत विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच विविध प्रशासकीय अधिकारी यांना राखी बांधण्यात आली. बहुतांश सर्वांनीच समितीच्या कार्याची प्रशंसा करून "तुम्ही हाक माराल तेव्हा आम्ही या राष्ट्रकार्यासाठी सहकार्य करू", असे सांगितले.

भ्रष्ट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयीचा धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणे म्हणजे लांगूलचालनाचा कहर !

१. सी.बी.एस्.ई.च्या अभ्यासक्रमित पुस्तकात राहुल गांधींचे कौतुक असणे
     काही मासांपूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सी.बी.एस्.ई.च्या) पाचवीसाठी अनुरोध (शिफारस) केलेल्या पुस्तकात राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा पूजनीय, आकर्षक व्यक्तीमत्त्व आणि शक्तीशाली असा उल्लेख केला आहे. हा लांगूलचालनाचा कहरच म्हटला पाहिजे.
२. राहुल गांधींची खरी ओळख समोर आणणार्‍या काही घटना
 अ. भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची वक्तव्ये 
१. डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी एकदा म्हणाले होते, राहुल गांधींनी निवडणुकीला उभे रहाण्यापूर्वी भरायचे आवेदनपत्र एकट्याने बिनचूक भरून दाखवावे ! ज्या राहुल गांधींविषयी डॉ. स्वामी असे उद्गार काढतात, त्यांची पात्रता सामान्य जनतेला वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही.
२. आप की अदालत या कार्यक्रमात डॉ. स्वामी हे राहुल गांधींविषयी बोलतांना तो मूर्ख आहे, असे म्हणाले होते. यावर तुम्ही असे कसे म्हणू शकता ?, असे डॉ. स्वामींना विचारल्यावर ते म्हणाले, मी एक शिक्षक आहे. त्यामुळे मूर्ख मुलाला मी ओळखू शकतो !
२ आ. राष्ट्रीय काँग्रेसने भूमी, भूगर्भ आणि आकाश या तिन्ही स्तरांत भ्रष्टाचार करणे : राहुल गांधींच्या काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार केवळ सैनिकांसाठीची जागा हडप करून आदर्श घोटाळा यांपुरता मर्यादित नसून त्यात भूगर्भातील खाण घोटाळा (खाणी भूमीखाली असतात) आणि आकाशातील ऑगस्टा वेस्टलॅण्ड (आकाशात भ्रमण करणारे हेलीकॉप्टर) प्रकरण हेही समाविष्ट आहे !
२ इ. चोराच्या उलट्या बोंबा या प्रमाणे आरोप करणे : ऑगस्ट वेस्टलॅण्ड प्रकरणात राष्ट्रीय काँग्रेसमधील अन्य काही मंडळींवर आरोप झाल्यानंतर देहलीतील जंतरमंतर मैदानात राहुल गांधी म्हणाले, या देशातील जनतेवर नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे विचार लादले जात आहेत. आज आम्हाला लक्ष्य (टार्गेट) केले जाते; परंतु आम्ही घाबरणार नाही. असे म्हणणे म्हणजे चोराने आधी चोरी करायची आणि नंतर पकडले गेल्यावर, मला लक्ष्य केले, असे म्हणण्यासारखेच नव्हे का ?
२ ई. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांविषयी नाटकी कळवळा असणे : केंद्रात काँग्रेसची सत्ता असल्यापासून शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्या थांबवण्यासाठी काँग्रेस सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यावर राहुल गांधींनी शेतकर्‍यांना भेटण्यासाठी दौरे आरंभ केले आणि भाजप सरकार शेतकर्‍यांसाठी काहीही करत नाही, अशी गरळओक चालू केली. सत्ता मिळवण्याचे स्वार्थी ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन केलेली ती स्टंटबाजी आहे, हे सामान्य जनतेला चांगलेच ठाऊक आहे. ज्यांना पंचतारांकित सोयीसुविधांमध्ये रहाण्याची खाण्याची सवय आहे, त्यांना शेतकर्‍यांवरील अन्याय कसे कळणार ?
२ उ. पंतप्रधानांना विरोध करणे, हा एकमेव उपक्रम राबवणे ! : राहुल गांधींचा एकमेव उपक्रम म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणे, हा आहे. त्यांच्या अनेक वक्तव्यांवरून हे लक्षात येते. काँग्रेसला ना जनतेचा विकास साधायचा आहे, ना जनतेच्या हिताची विधेयके पारित करून जनहित साधायचे आहे. त्यांना केवळ काँग्रेसचे सरकार आणून पुन्हा सत्ता उपभोगायची आहे. 
२ ऊ. अमरनाथ यात्रेत सहभागी होणे, हे राहुल गांधींचे हिंदूंविषयी नाटकी प्रेम ! : राहुल गांधींना महान भारतीय संस्कृतीचा अभिमान नाही आणि हिंदु धर्माविषयी आस्थाही नाही; परंतु हिंदु संस्कृतीचा आदर असल्याचा आव आणत ते अमरनाथ यात्रेत काही अंतर चालत सहभागी झाले. ज्यांनी स्वतःच्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराच्या परिसीमा गाठून पिढ्यान्पिढ्या ऐषारामात घालवता येतील, इतकी संपत्ती लुटली, त्यांनी अमरनाथला जाऊन शिवपिंडीवर सहस्रो वेळा जरी डोके टेकले, तरी तो शिवशंकर त्यांना क्षमा करणार नाही.
३. सी.बी.एस्.ई.च्या पुस्तकातील राहुल गांधींचे उदात्तीकरण करणारा उल्लेख 
काढून टाकण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक
     अशा राहुल गांधींना अनेक उपाध्या देणार्‍या सी.बी.एस्.ई.च्या पुस्तकाच्या लेखकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. राहुल गांधींचे उदात्तीकरण करणारा उल्लेख काढून टाकण्यासाठी सामान्य जनतेने संघटितपणे आणि वैध मार्गाने प्रयत्न करावे.
४. स्वार्थी अन् सत्तालोलूप राहुल गांधींचा आदर्श नकोच !
        आमच्या समोर पाच पातशाह्यांना पराजित करून हिंदवी स्वराज्य स्थापणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या शूर राजांचा आणि राष्ट्र अन् धर्म प्रेम यांनी भारलेल्या महान क्रांतीकारकांचा जाज्वल्य इतिहास आहे. तेव्हा स्वार्थी अन् सत्तालोलूप राहुल गांधीचा तथाकथित आदर्श (?) आम्हाला कदापीही नको !
- श्री. लोमेश पाठक (वय २१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०१६)

संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन व्हावे !

      समानता, सर्वधर्मसमभाव असे शब्द तथाकथित निधर्म्यांच्या तोंडून आपण वारंवार ऐकत असतो. प्रत्यक्षात देशात सर्वत्र समानता आहे का, याकडे डोळसपणे पाहिल्यानंतर मात्र या शब्दांतील फोलपणा लक्षात येतो. सर्वधर्मसमभावाचा टेंभा मिरवणार्‍या निधर्मी राज्यकर्त्यांचे अल्पसंख्यांकधार्जिणे रूप विविध माध्यमांतून वारंवार समोर येतेे. तेव्हा देशात हिंदूंची उपेक्षा आणि अल्पसंख्यांकांसाठी सर्व सुविधा, अशी काहीशी सर्वधर्मसमभावाची व्याख्या झाल्याचे लक्षात येते.

ॐकारात दडलेल्या दोन शून्यांतून विश्‍वाची निर्मिती होणे

योगातून ॐ काढून टाकणारे राजकारणी हे समजून घेतील का ? 
श्री. राम होनप

      शून्यातून विश्‍वाची निर्मिती झाली आहे. ॐकारात दोन शून्य दडलेले आहेत. ॐकाराचे चार भागांत विभाजन केल्यास दोन गोल सिद्ध होतात.
१. ॐ या अक्षराचे चार भाग
२. दोन-दोन भाग जोडल्यावर 
३. चार भाग जोडून सिद्ध झालेले दोन गोल.
० + ० = ॐकार
शून्य महाशून्य
(ईश्‍वर) (परमेश्‍वर)
अ. ईश्‍वर आणि परमेश्‍वरी शक्ती यांचा संमिश्र आविष्कार म्हणजे ॐकार.
आ. ॐकारातील बिंदू हा शिवाचे निर्गुण स्थान दर्शवतो. ॐकाराचा उच्चार व्यवस्थित व्हावा, यासाठी बिंदूचे अस्तित्व आणि स्थान महत्त्वाचे आहे. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०१६) 
तंबाखू, दारू आदी व्यसनांपासून मुक्त झालेल्या सज्जनांनो, व्यसनी लोकांना व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी साहाय्य करा !

सौ. आनंदी पांगुळ
१. व्यसनग्रस्ततेविषयी जगाच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती
      जगातील अनुमाने ७०० कोटी लोकसंख्येपैकी महाराष्ट्रासारख्या संतभूमीतील २ कोटी लोकांना तंबाखूचे व्यसन आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे जडणार्‍या रोगांवरील उपचारांसाठी प्रतिवर्षी रुग्णांचे २ सहस्र कोटी रुपये व्यय (खर्च) होतात. असे व्यसन असणारे ६० टक्के तरुण २० ते ३८ वर्षे वयोगटातील आहेत, अशा आशयाचे वृत्त नुकतेच दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचनात आले. 
२. व्यसनाधीनतेमध्ये तरुणांसमवेत महिलाही आघाडीवर !
      देशाच्या भवितव्याचा विचार करता, देशाची स्थिती देशातील युवकांवर अवलंबून असते. असे असतांना आज जागतिक स्तरावर युवापिढी व्यसनाधीन बनल्याचे पहायला मिळते. व्यसनांच्या आहारी गेल्याने उद्ध्वस्त झालेले जीव आणि त्यांची कुटुंबे यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने सिंगापूर येथे घेण्यात आलेल्या प्रवचनांचा आढावा

१. दोन्ही प्रवचनांच्या निमित्ताने सिंगापूर येथील साधकांचा एक 
गट सक्रिय होऊन त्यातील सर्वांनी दायित्व घेऊन सेवा करणे
      २७.४.२०१६ या दिवशी सिंगापूर येथे पहिले प्रवचन करण्यात आले. या प्रवचनाचा विषय पर्सनॅलिटी डिफेक्ट रिमूव्हल (स्वभावदोष आणि अहं निर्मूलन) हा असून १४ जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला. २९.४.२०१६ या दिवशी सिंगापूर येथे दुसरे प्रवचन करण्यात आले. या प्रवचनाचा विषय सेव्हन पॉवरफुल स्पिरिच्युअल सेल्फ-हीलिंग टेक्निक्स् (स्वतःवर उपाय करण्याच्या ७ प्रभावी आध्यात्मिक उपायपद्धती) असा होता. २४ जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला. दोन्ही प्रवचनांच्या सेवेच्या निमित्ताने सिंगापूर येथील साधकांचा गट सक्रीय झाला आणि या सर्वांनी दायित्व घेऊन सेवा केली. यामुळे सर्वांना आनंद झाला.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून 
घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या !
www.hindujagruti.org

पंतप्रधानांपेक्षा गुरु श्रेष्ठ !

     पंतप्रधान होणे, ही मोठी गोष्ट आहे; पण चांगला गुरु होणे, ही पंतप्रधान होण्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे. पंतप्रधान केवळ वर्तमान घडवतो, तर गुरु हे भविष्य घडवतात, एक पिढी निर्माण करतात आणि राष्ट्राचे भविष्य ठरवतात. - श्री वेद प्रताप वैदिक (संदर्भ : गुरुकुलम्, १७.१०.२०१५)

ही आहे सरकारी कार्यक्षमता !

असे निर्णय काही महिन्यांत का घेता येत नाहीत ? 
     म्हादई नदीच्या पाणीवाटपाविषयी गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधील तंटा मिटवण्यासाठी सरकारने नोव्हेंबर २०१० मध्ये नेमलेल्या म्हादई लवादाचा कालावधी २१ ऑगस्ट २०१६ या दिवशी संपणार आहे. तो पुन्हा २१ ऑगस्ट २०१७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
     हिंदु धर्मासाठी भारताबाहेरून आर्थिक वा इतर कोणतीही मदत येणे शक्य नाही. हिंदु धर्माच्या दृष्टीने विचार केला, तर हिंदूंना स्वबळावर उभे रहाण्याशिवाय पर्याय नाही ! (लोकजागर)
     अन्यायाचा प्रतिकार करा आणि नंतर क्षमाशील बुद्धीने व्यवहार करा, असे महाभारतातून व्यास सांगतात. प्रतिकार न करता क्षमा कराल, तर तुम्ही तुमचे स्वातंत्र्य गमावून बसाल, असा संदेश महर्षींनी दिला आहे. - सुघोष

श्‍वास घेण्यास तीव्र त्रास होत असतांना झालेल्या निर्गुणातील युद्धाच्या वेळी पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी ठेवलेला भाव आणि त्यांची त्रासाकडे पहाण्याची दृष्टी !

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी संत घोषित झाल्यावर 
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नमस्कार करतांना 
डावीकडून कु. राजश्री सखदेव आणि 
पू. (सौ.) आशालता सखदेवआजी
१. त्रास होत असतांना उपायांत 
आलेल्या जपाचे स्वरूप 
     वाईट शक्तींच्या त्रासावर उपाय म्हणून निर्गुण स्तरावरील जप आल्यानंतर सहसा १ ते २ घंट्यांत जप पालटतो; पण पू. (सौ.) सखदेवआजींना होत असलेल्या त्रासासाठी २७.७.२०१६ या दिवशी दुपारी ४.१५ वाजल्यापासून २९.७.२०१६ या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत निर्गुणातील जप येत होते.
२. श्‍वास घेण्यास तीव्र त्रास होत असतांना 
पू. आजींनी ठेवलेला भाव 
      २९.७.२०१६ या दिवशी पू. आजींना श्‍वास घेण्यास तीव्र त्रास होत असतांना त्यांनी त्या झोपलेला पलंग म्हणजे प.पू. डॉक्टरांचे चरण आहेत आणि त्या प.पू. डॉक्टरांच्या चरणांशी बसलेल्या आहेत. त्यामुळे कोणताच त्रास होणार नाही, असा भाव ठेवला. त्यामुळे तीव्र त्रास होत असतांनाही त्या तो सहन करू शकल्या.

पू. (सौ.) सखदेवआजींवर बिंदूदाबनाचे उपचार करण्याची सेवा करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

१. डोक्यावर संवेदना 
जाणवणे आणि ध्यान लागणे 
        गेल्या ८ दिवसांपासून मला भगवंताच्या कृपेने पू. (सौ.) सखदेवआजींवर बिंदूदाबनाचे उपचार करण्याची सेवा मिळाली आहे. पू. (सौ.) आजींच्या प्रत्येक पायावरच्या एकूण ७ बिंदूंवर उपचार करायचे असतात. (शक्ती येण्यासाठी एका बिंदूवर, सायनसचा त्रास दूर होण्यासाठी तीन बिंदूंवर, पित्ताचा त्रास दूर होण्यासाठी दोन बिंदूंवर आणि कटी, गुडघा अन् घोटा यांत होत असलेल्या वेदना थांबण्यासाठी एका बिंदू) पहिल्या दिवसापासून मी पित्ताचे बिंदू वगळता अन्य बिंदूंवर उपचार करत असतांना माझ्या डोक्यावर संवेदना जाणवतात आणि पित्ताच्या बिंदूंवर उपचार करतांना ध्यान लागते. पहिल्या दिवशी मला झोप येत आहे कि काय ?, असे वाटले; म्हणून दुसर्‍या दिवशी मी बारकाईने निरीक्षण केले असता मला झोप येत नसून माझे ध्यान लागते, हे लक्षात आले.

पू. सखदेवआजी यांच्या देहत्यागासंदर्भात आलेल्या अनुभूती

१. संध्याकाळी पू. सखदेवआजींना पलंगावर उचलून बसवतांना त्यांचा देह हलका असल्याचे 
जाणवणे आणि रात्री झोपवतांना त्यांचा देह अवजड असल्याप्रमाणे जाणवणे 
     पू. सखदेवआजींनी देहत्याग करण्यापूर्वी २ दिवस, म्हणजे १५.८.२०१६ या दिवशी त्यांची प्रकृती पुष्कळ अस्वस्थ होती. त्यांना अंथरुणावर उचलून बसवावे लागत होते. संध्याकाळी त्यांना उचलून बसवता आले. संध्याकाळी त्यांना उचलले, तेव्हा त्यांचा देह कापसासारखा हलका लागला होता. त्यामुळे त्यांना सहजतेने उचलता आले होते. त्याच रात्री त्यांना उचलून झोपवायचे म्हणून मला बोलावले होते; मात्र त्यांना पुष्कळ वेदना होत होत्या आणि सारखा खोकला येत होता. त्यामुळे त्यांना झोपवता आले नाही. त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी त्यांचा देह पुष्कळ अवजड असल्यासारखे जाणवत होते. त्या वेळी त्यांनीही झोपवण्यास नकार दिला.

आपला प्रत्येक श्‍वास समष्टीसाठी देणार्‍या पू. (सौ.) सखदेवआजी !

      पू. (सौ.) सखदेवआजी संत होण्यापूर्वी साधारण २०१० या वर्षी अत्यवस्थ होत्या. त्यांना वारंवार डायलिसिसवर ठेवावे लागत होते. त्यानंतर आजतागायत त्यांचा जीवनप्रवास म्हणजे एक दैवी चमत्कारच ! वैद्यकीयदृष्ट्या त्यांच्या जगण्याची शाश्‍वती नसतांना साधनेच्या बळावर त्या नुसत्या जगल्याच नाही, तर त्यांनी आपल्या प्रत्येक श्‍वासाला समष्टीसाठी नामजप केला. यातूनच त्यांनी संतपद गाठले आणि पुढची उन्नतीही विहंगम गतीने केली. स्वतः मरणासन्न अवस्थेत असतांनासुद्धा पू. आजींना समष्टीचाच ध्यास होता. थोडा त्रास न्यून झाला की, त्या लगेच समष्टीसाठी नामजप चालू करीत. देवाने जणू काही त्यांना समष्टी कार्यासाठीच आयुष्य वाढवून दिले होते. धन्य त्या पू. आजी ! त्यांच्या चरणी आम्ही सर्व साधक नतमस्तक आहोत. 
- अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. प.पू. डॉक्टरांनी सांगितलेली पू. (सौ.) सखदेवआजींची अन्य वैशिष्ट्ये

१. पू. आजींची दृष्टी शून्यात आणि तोंडवळा आनंदी आहे.
२. पू. आजी तीव्र त्रास होत असतांना हसत बोलू शकतात. त्यामुळे त्यांना त्रास होत आहे, हे इतरांच्या लक्षात येत नाही.
३. पू. आजी दररोज मृत्यूशी झुंज देत आहेत. असे असतांनाही त्यांचा तोंडवळा आनंदी असतो.
- कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०१६)

पू. (सौ.) आशालता सखदेवआजींची वैशिष्ट्ये

१. सहनशक्ती अधिक असणे 
      पू. आजींना कोणताही त्रास असह्य झाला, तरच त्या सांगतात. एरव्ही अन्य कोणी मध्यम स्वरूपाचा त्रास होऊ लागल्यावर लगेच आधुनिक वैद्यांकडे जातात. यावरून आजींची सहनशक्ती जास्त आहे, हे लक्षात येते. 
२. रात्रभर जागरण होऊनही तोंडवळा आनंदी असणे 
      एकदा रात्रभर आजींना जागरण होऊनही त्यांचा तोंडवळा आनंदी होता. त्यांच्यासारखं असं दुसरं उदाहरण नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवलेआदिवासी भागातील शाळेत उपक्रम राबवतांना आलेले अनुभव

सौ. ज्योती कांबळे 
      आम्ही एका गावात फ्लेक्स प्रदर्शन लावण्याचे नियोजन करत होतो. आमच्या वसाहतीत रहाणार्‍या एका शिक्षिकेने मला सांगितले, मी ज्या शाळेत शिकवते, तेथे आदिवासी मुले येतात. त्यांना काही चांगली माहिती मिळावी, असे आम्हाला वाटते. ताई, तुम्ही आमच्या शाळेत सनातन संस्थेचे सर्व उपक्रम घेऊ शकता. ते ऐकून मलाही पुष्कळ आनंद झाला.
१. आदिवासी पाड्यातील शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त 
राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयी माहिती सांगणे 
१ अ. सोप्या भाषेत माहिती सांगून मुलांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे : एकदा आम्ही १५ ऑगस्टच्या आधी त्या शाळेत जाण्याचे नियोजन केले. आम्ही दोन साधिका रिक्शाने शहरापासून पुष्कळ आत असलेल्या त्या शाळेत पोचलो. आदिवासी पाड्यात असलेली जिल्हा परिषदेची ती शाळा पाहून आम्हाला पुष्कळ आनंद झाला. आम्ही स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा मान राखा हा विषय मुलांना समजेल, अशा सोप्या भाषेत मांडून मुलांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच भेटीत हे सहज शक्य नव्हते, याची आम्हाला जाणीव होती.

प.पू. डॉक्टरांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
१. सदर्‍यावर पडलेला कुंकवाचा डाग स्वच्छ करण्याच्या सेवेतून प.पू. डॉक्टरांनी परिपूर्ण कृती करण्याचे महत्त्व लक्षात आणून देणे : वर्ष २००१ मध्ये कर्नाटक मधील निपाणीजवळील चिकोडी या गावात प.पू. डॉक्टरांची जाहीर सभा होती. सभेच्या दुसर्‍या दिवशी प.पू. डॉक्टरांनी ते घालत असलेला सदरा माझ्याकडे देऊन सदर्‍यावर पडलेला कुंकवाचा डाग स्वच्छ करण्यास सांगितला. त्या वेळी मी त्यांना विचारले, ४ - ५ वेळा हा सदरा घातलेला आहे, तर तो धुवू का ? त्यावर त्यांनी दुसर्‍या दिवशी असलेल्या निपाणी येथील जाहीर सभेला सदरा घातल्यानंतर तो धुण्यास सांगितले. सदर्‍यावर पडलेला कुंकवाचा डाग मी हलक्या हाताने चोळून स्वच्छ केला. सदर्‍याला इस्त्री केली आणि घडी करून तो त्यांच्या खोलीत ठेवला. प.पू. डॉक्टरांनी नेमकी तीच घडी उघडून पाहिली आणि सदर्‍यावर असलेला कुंकवाचा पुसट डाग दाखवून तो स्वच्छ करण्यास सांगितले. त्यानंतर मी त्या डागाला थोडे साबण लावून डाग पूर्ण जाईपर्यंत चोळून स्वच्छ केला. त्यानंतर इस्त्री करून तो प.पू. डॉक्टरांच्या खोलीत नेऊन दिला. त्या वेळी सदरा उलगडून न पहाताच प.पू. डॉक्टर म्हणाले, आता डाग गेला ना ! कृती कोणतीही असो, ती परिपूर्ण करणेच महत्त्वाचे असते.

पू. सखदेवआजींच्या देहत्यागासंदर्भात साधिकेला मिळालेली पूर्वसूचना आणि आलेल्या अनुभूती

१. साधारणपणे २ - ३ आठवड्यांपूर्वी मला पहाटे स्वप्नात पू. आजींनी देहत्याग केल्याचे दिसले. 
२. पू. (सौ.) आजींनी देहत्याग केल्याचे ठाऊक नसतांनाही भावसत्संगाच्या 
आरंभी पू. सखदेवआजींना नमस्कार करणे 
      १७.८.२०१६ या दिवशी सायंकाळी ५.२५ वाजता डॉ. पांडुरंग मराठेकाका यांना पू. सखदेवआजींचे नाडीचे ठोके लागत नाहीत, असे कोणाकडून तरी मला समजले. त्यानंतर ५.३० वाजता मी भावसत्संगाला गेले. भावसत्संगाच्या आरंभी मी पू. सखदेवआजींना नमस्कार केला. मी असे का केले, हे मला कळले नाही; कारण यापूर्वीही पू. आजींची स्थिती अशा प्रकारे गंभीर झाल्याचे मी ऐकले होते.

पू. सखदेवआजी यांनी देहत्याग करण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना

पू. सखदेवआजींची शारीरिक स्थिती पाहून देव आता लवकरच त्यांची या त्रासातून मुक्तता करील, 
असे वाटणे आणि दुसर्‍या दिवशी पू. आजींनी देहत्याग केल्याचे कळणे
      १६.८.२०१६ या दिवशी दुपारी एका सेवेच्या निमित्ताने पू. (सौ.) सखदेवआजींच्या खोलीत गेले होते. त्या वेळी बर्‍याच दिवसांनी मी पू. आजींना पाहिले. आजी पुष्कळ अशक्त झाल्या होत्या. त्यांच्या हाता-पायांवर सूज होती. त्यांना खोकला झाला होता. त्यांना धड उठताही येत नव्हते आणि बसताही येत नव्हते. या स्थितीत खोकतांनाही त्यांना पुष्कळ त्रास होत होता. त्यांची स्थिती पाहून वाटले, संतांनाही देहाचे किती भोग सोसावे लागतात ! त्यांना त्रास होत असतांना पाहून देव आता लवकरच त्यांची या त्रासातून मुक्तता करील. पुष्कळ दिवसांपासून आजी सहन करत आहेत, असे मला वाटले. १७.८.२०१६ या दिवशी सायंकाळी पू. आजींनी देहत्याग केल्याचे कळल्यावर मला कालच मनात आलेल्या विचाराची आठवण झाली. 
- कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.८.२०१६)

पू. (सौ.) आशालता सखदेवआजींमध्ये श्रीकृष्णाचे रूप पहाणारा इंग्लंड येथील चि. नारायण लोटेय (वय ५ वर्षे) !

     इंग्लंडला जाण्यापूर्वी चि. नारायण लोटेयला त्याची आई पू. (सौ.) सखदेवआजींना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत घेऊन आली. त्या वेळी पू. सखदेवआजी आसंदीत बसल्या होत्या. खोलीत एका पटलावर श्रीकृष्ण आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे चित्र ठेवले आहे. चि. नारायण श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून श्रीकृष्ण, असे म्हणत होता. त्याला त्याच्या आईने पू. सखदेवआजी या कोण आहेत ?, असे विचारले. त्या वेळी नारायण त्यांच्याकडे पाहून श्रीकृष्ण असे पुनःपुन्हा म्हणत होता. 
- कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.७.२०१४)

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांची सेवा करतांना गुरूंची सेवा करत असल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

        पू. (सौ.) सखदेवआजी यांच्यावर बिंदूदाबन आणि न्यूरोथेरपीचे उपचार करण्याची सेवा मला मिळाली. त्या वेळी त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. जाणवलेली सूत्रे
१ अ. बिंदूदाबन करतांना दाब अल्प पडल्यास दाब अधिक दिला, तरी चालेल, असे पू. आजींनी सांगणे : पू. (सौ.) सखदेवआजींवर बिंदूदाबन करत असतांना माझे काही चुकले, तर त्या मला लगेच सांगतात. उपचार करतांना शरिरावरील विशिष्ट भागावर हाताने दाब द्यायचा असतो. त्या वेळी दाब अल्प पडला, तर पू. आजी दाब अधिक दिला, तरी चालेल, असे सांगतात.
१ आ. सहनशीलता : त्यांच्यावर उपचार करतांना पायांवर दाब दिला किंवा बिंदूदाबन करतांना जोरात दाब दिला, तरी जेवढे सहन करता येईल, तेवढे त्या सहन करतात. त्या वेळी त्यांच्या तोंडवळ्यावर काहीच पालट जाणवत नाही. त्या स्थिर असतात.
१ इ. त्रास होत असतांनाही उपचार करवून घेणे : पू. आजींची शारीरिक स्थिती नेहमी पालटत असते. शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही पू. आजी उपचार करून घेण्याचा कधीही कंटाळा करत नाहीत. त्या उपचारासाठी उठून बसण्याचा १०० टक्के प्रयत्न करतात. त्यांना अगदीच शक्य नसेल, तरच त्या आता उपचार करायला नको, असे सांगतात.

पू. (सौ.) सखदेवआजींच्या देहत्यागाच्या काळात आलेल्या अनुभूती

१. वातावरणात हलकेपणा आणि अधिक चैतन्य जाणवणे अन् पू. सखदेवआजींच्या देहत्यागाविषयी सूचना वाचल्यावर त्यामागील कारण लक्षात येणे : १७.८.२०१६ या सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत मी नामजप करत होतो. तेव्हा मला प.पू. डॉक्टरांची तीव्रतेने आठवण येऊन वेगळाच हलकेपणा आणि अधिक चैतन्य जाणवत होते. त्यानंतर सेवा करतांनाही तो हलकेपणा कायम होता. नंतर मी भोजनकक्षात पू. सखदेवआजींच्या देहत्यागाविषयी सूचना वाचली. तेव्हा माझा श्‍वास एका लयीत चालू झाला. तेव्हा मला सायंकाळी ५.३० वाजल्यापासून जाणवत असलेला हलकेपणा आणि चैतन्य यांमागील कारण उमगले.
२. पू. आजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना त्यांचा शीघ्र गतीने श्‍वासोच्छ्वास चालू असल्याचे जाणवणे : पू. आजींच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी खोलीत गेलो. तेव्हा मला पू. आजींचा श्‍वासोच्छ्वास शीघ्र गतीने चालू असल्याचे जाणवले. त्याच वेळी तेथे सेवेत असणार्‍या एका साधिकेने चैतन्यामुळे पू. आजींचा श्‍वासोच्छ्वास चालू असल्याचे जाणवत आहे, असे सांगितले. त्या वेळी माझ्याकडून ज्याप्रमाणे पू. आजी या गुरुतत्त्वाशी एकरूप झाल्या, त्याप्रमाणे मलाही गुरुतत्त्वाशी एकरूप होता येऊ दे, अशी प्रार्थना झाली.
- श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी गोवा.

प.पू. डॉ. आठवले यांनी पू. (सौ.) सखदेवआजी यांना साधनेत कसे घडवले, यासंदर्भातील प्रसंग

प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाच्या वेळी बसण्यास 
जागा नसतांना त्यांनी स्वतःच्या चरणांजवळ 
जागा आहे, असे सांगून तेथे बसण्यास सांगणे
        वर्ष २००० मध्ये प.पू. डॉक्टरांचे सांगली येथील साधक डॉ. प्रमोद घोले यांच्या घरी सांगली जिल्ह्यातील साधकांना मार्गदर्शन होते. मलाही त्या मार्गदर्शनाला बोलावले होते. मी क्रियाशील साधक नसल्याने मागे कुठेतरी बसावे, असे मला वाटत होते. मी डॉ. घोले यांच्या घरी पोचले, त्या वेळी त्या मोठ्या खोलीत बसण्यास कुठेच जागा नव्हती; म्हणून मी मागे दारातच उभी राहिले. तेवढ्यात प.पू. डॉक्टर येऊन त्यांच्यासाठी ठेवलेल्या आसंदीवर बसले. मी उभी असलेली पाहून त्यांनी मला पुढे येऊन बसण्यास सांगितले. पुढे बसण्यास जागा नव्हती, तरी ते सांगतात; म्हणून मी पुढे गेले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या चरणांजवळ बसण्यास जागा आहे, असे खुणेने दाखवून तेथे बसण्यास सांगितले. तेथे कसे बसायचे ?, असे मला वाटत होते; परंतु माझ्या मागून आणखी साधक येत असलेले पाहून मी प.पू. डॉक्टरांच्या चरणांशी बसले. त्या संपूर्ण मार्गदर्शनात प.पू. डॉक्टरांनी काय सांगितले, हे मला काहीच कळले नाही. माझे मन निर्विचार झाले होते.
- (पू.) सौ. आशालता सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मे २०१६)

सनातनच्या संत पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या पार्थिवावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

अंत्यविधीच्या वेळी तुळशी आणि फुले यांच्या
 हारांनी सजवलेले पू. (सौ.) सखदेवआजी यांचे पार्थीव
     रामनाथी (गोवा) - सनातनच्या २० व्या संत पू. (सौ.) आशालता सखदेव (वय ८१ वर्षे) यांच्या पार्थिवावर १८ ऑगस्ट या दिवशी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रारंभी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सखदेव कुटुंबियांसह परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. डॉ. मुकुल गाडगीळ, पू. बाबा (सदानंद) नाईक, पू. (कु.) रेखा काणकोणकर, पू. भगवंतकुमार मेनराय, पू. (सौ.) सूरजकांता मेनराय, पू. संदीप आळशी, पू. पृथ्वीराज हजारे, पू. अशोक पात्रीकर, एस्एस्आर्एफ्चे संत पू. सिरियाक वाले आणि सनातनचे साधक यांनी पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी १७ ऑगस्टला सायंकाळी ५.१० वाजता रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला होता.
१. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी शेवटच्या अंत्यसंस्काराच्या विधीला प्रारंभ झाला.
२. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या पार्थिवावर तुळशीचा हार अर्पण करून त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
३. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून पू. (सौ.) सखदेवआजी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत नारायण हा नामजप करत साधक सहभागी झाले होते.
४. अंत्ययात्रेच्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटलेले मंगलात झाले मंगल, नाथ गेले सदन सोडून हे भजन आश्रमात लावण्यात आले होते.

राष्ट्र-धर्म कार्यार्थ योगदान देण्यासाठी वाचकांना प्रेरित करणारे अन् साधनावृद्धीसाठी अचूक मार्गदर्शन करणारे एकमेवाद्वितीय सनातन प्रभात !

वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
१. वाचकांना राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी करून घेणारे व्यापक वृत्तपत्र !
१ अ. धन अर्पणाचे महत्त्व जाणून वाचकांनी धर्मकार्यासाठी आर्थिक साहाय्य करणे : बर्‍याच वाचकांना राष्ट्र आणि धर्म कार्यातील प्रत्यक्ष सेवांमध्ये सहभागी होण्याची इच्छा असते; पण वेळेअभावी ते सेवा करू शकत नाहीत. असे वाचक सनातन प्रभातमधील लेख आणि चौकटी वाचून धर्मकार्यासाठी आवश्यक साहित्य, उपकरणे आदींच्या खरेदीसाठी उत्स्फूर्तपणे आर्थिक साहाय्य करतात अथवा प्रायोजक बनतात. अनेक जण विशेषांकांसाठी विज्ञापने देतात अथवा विशेष औचित्य साधून धन अर्पण करतात.
१ आ. प्रत्यक्ष धर्मकार्यातही वाचकांचे योगदान ! : वाचक राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्यात सहभागी व्हावेत, हा सनातन प्रभातचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे राष्ट्र-धर्म कार्यार्थ राबवण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती देऊन त्यात हातभार लावण्याचे आवाहन या नियतकालिकातून करण्यात येते. असे लेख वाचून बरेच वाचक कार्यक्रमांसाठी अर्पण गोळा करणे, विज्ञापने मिळवून देणे, स्वतःचे सभागृह अथवा वास्तू वापरण्यास देणे, साधकांच्या भोजन-निवासाची व्यवस्था करणे आदी सेवा स्वतःहून करत आहेत. काही जण अंतर्प्रेरणेने वाचक मेळावे आयोजित करत आहेत, तर बरेच जण प्रसारसेवेत सहभागी होत आहेत.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल पौर्णिमा झाली.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
तीर्थयात्रा
पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा
 होते; म्हणून म्हणतात, इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।
भावार्थ : इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं । म्हणजे पंढरपूरला जाणार, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्‍वराच्या भेटीपेक्षा भेट होणार यात जास्त आनंद आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     हिंदूंची धर्मनिष्ठा बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी नष्ट केल्यामुळे धर्मनिष्ठ अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध बहुसंख्य हिंदूंना भारी झाले आहेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

अहंभाव-निर्मूलनाचे महत्त्व 
अहंभाव, म्हणजे मीपणा. हा अहंभाव सोडला, तर माणसांच्या समूहात तुम्ही 
आश्‍चर्यकारक एकांताचा अनुभव मिळवाल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

उच्च न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही कधी ?

संपादकीय 
     जवळपास वर्षापेक्षा अधिक कालावधी चाललेल्या प्रार्थनस्थळांवरील भोंग्यांच्या जनहित याचिकांवर १६ ऑगस्ट या दिवशी उच्च न्यायालयाने प्रार्थनास्थळे ही शांतता क्षेत्राचा (सायलेन्स झोन) एक भाग आहेत, त्यामुळे सर्वच प्रार्थनास्थळांना ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन करावे लागेल. आदेशाची प्रत मिळवण्यासाठी वाट पाहू नका, प्रत्यक्ष कारवाई करा, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्यासाठी सिद्ध रहा, असा आदेश दिला आहे. वास्तविक असा आदेश यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात दिलेलाच आहे; असे असतांना त्याची कोणतीच कार्यवाही प्रशासन करत नसल्याने याचिकाकर्त्यांना परत एकदा न्यायालयाचे द्वार ठोठावावे लागले होते. सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत अवैध आणि अतिक्रमित प्रार्थनास्थळे हटवण्याची मोहीम गेली काही वर्षे जोरात चालू आहे.

सैन्याला अत्यावश्यक सुविधा कधी मिळणार ?

संपादकीय
      शिक्षिण काश्मीरमध्ये बुरहान वानी या आतंकवाद्याच्या गावात राष्ट्रीय रायफल्सचा सैनिक पाकिस्तानचा लावण्यात आलेला झेंडा काढण्यासाठी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता भ्रमणभाषच्या मनोर्‍यावर चढला. काश्मीरची स्थिती अशी आहे की, आतंकवाद्यांकडून कधी कुठून गोळीबार होईल, कधी बॉम्ब टाकला जाईल, कधी मिसाईल सोडले जातील, हे सांगता येत नाही. अशी स्थिती असतांना केवळ देशप्रेमापोटी या सैनिकाने पाकिस्तानचा झेंडा खाली उतरवून तेथे भारताचा झेंडा फडकवला, तोही आतंकवाद्यांचा प्रभाव असलेल्या गावात. अन्य एका घटनेत जम्मू-काश्मीर येथील नौहट्टा येथे एका अधिकार्‍याला आतंकवाद्यांच्या विरोधात लढतांना बुलेटप्रूफ शिरस्त्राण नसल्याने प्राण गमवावा लागला. या अधिकार्‍याने दंगल आणि दगडफेक अवरोध शिरस्त्राण घातले होते; जे बंदुकीची गोळी अडवू शकत नाही. याचा अर्थ एकीकडे भारतीय सैनिक देशासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्यासाठी लागणार्‍या बुलेटप्रूफ शिरस्त्राणासारख्या किमान सुविधाही आपण त्यांना पुरवू शकत नाही, यापेक्षा लज्जास्पद काही असेल का ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn