Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

आज नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृतीदिन
आज संस्कृतदिन
आज रक्षाबंधन

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या ३८ व्या संत पू. हेमलता दास यांचा आज वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

आज भृगु महर्षींचा अवतरणदिन

महर्षींमधील भृगु तो म्हणजे मीच
असल्याचे श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगणे
                                                               महर्षीणां भृगुरहं ।
                                                             - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्‍लोक २५
अर्थ : मी महर्षींमध्ये भृगू आहे.

संत, गुरु, सद्गुरु, सप्तर्षि आणि भृगु महर्षि यांच्या 
आशीर्वादामुळेच एक दिवस हिंदु राष्ट्राची स्थापना होणार !
     परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व साधकांना साधनेचे बाळकडू पाजल्यामुळे आता सर्व स्तरांतूनच संत, गुरु, सद्गुरु, सप्तर्षि आणि भृगु महर्षि यांचे आशीर्वाद सनातनच्या कार्याला प्राप्त होत आहेत आणि हे आशीर्वाद हीच खरी सनातनची शक्ती आहे. या शक्तीमुळेच एक दिवस हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, यात शंका नाही.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक. (१९.१२.२०१५, सायं. ७.२६)

शिर्डीतील विकासानंतरच सरकारला निधी देण्याविषयी विचार करू ! - साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम ! 
देवधनाचा वापर हा धर्मकार्यासाठीच व्हायला हवा, असे शास्त्र सांगते.
   
  शिर्डी - भाविकांना पायाभूत सुविधा देणे, हे श्री साई संस्थानचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे शिर्डीच्या स्थानिक विकासानंतरच राज्य सरकारला निधी देण्याविषयी विचार करू, असे प्रतिपादन श्री साई संस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश हावरे यांनी केले. (राज्याचा विकास करणे हे शासनाचे कर्तव्य आहे, त्यासाठी देवस्थानच्या निधीवर डोळा कशाला ? हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच असे विचार होत आहेत ! - संपादक) शिर्डीचे ग्रामस्थ आणि देवस्थानचे विश्‍वस्त यांची संयुक्त बैठक १६ ऑगस्ट या दिवशी झाली. त्या वेळी ते बोलत होते.
     राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच श्री साई संस्थानसह राज्यातील अन्य देवस्थानांचा ५० टक्के निधी सरकारने आरोग्याच्या सुविधेसाठी घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्या मागणीला विरोध म्हणून ग्रामस्थांनी महाजन यांच्या पुतळ्याचे दहनही केले होते. या पार्श्‍वभूमीवर शिर्डी संस्थानच्या अध्यक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी भूमिका घेतली होती. त्या दृष्टीने ही बैठक आयोजित केली होती.

भारताच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यावर अमरनाथ यात्रेकरूंवर धर्मांधांचे आक्रमण !

पीडीपी-भाजपच्या राज्यात हिंदु यात्रेकरू असुरक्षित !
     पुंछ - बुढा अमरनाथ यात्रेकरूंवर धर्मांधांनी आक्रमण केल्याची घटना १५ ऑगस्टला येथे घडली. ३ दिवसांपूर्वी येथील बसस्थानकाजवळ या यात्रेकरूंवर ग्रेनेड फेकण्यात आले होते. त्यात १५ जण घायाळ झाले होते.
     यात्रेकरूंनी येथील बाजारात भारत में रहना होगा, तो वन्दे मातरम् कहना होगा !, भारत में रहना होगा, तो राम राम कहना होगा ! अशा घोषणा दिल्या. त्यामुळे काही धर्मांधांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर या दोन गटांत हाणामारी झाली. या वेळी आलेल्या पोलिसांनाही धर्मांधांनी मारहाण केली. नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारू पिऊन १३ जणांचा मृत्यू !

बंदी असतांनाही दारू विकली जाणे हे प्रशासन आणि पोलीस यांचे अपयशच होय !
     पाटलीपुत्र - बिहार राज्यात दारूबंदी असूनही विषारी दारू प्याल्यामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना राज्यातील गोपालगंज जिल्ह्यात घडली आहे. प्रशासनाने मात्र त्यांचा दारूमुळे नव्हे, तर आजारामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. (स्वत:ची कातडी वाचवू पहाणारे प्रशासन ! - संपादक) विषारी दारू प्यायल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला आहे, असे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांनी म्हटले आहे. वैद्यकीय अहवाल हाती आल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल. घटनास्थळी पोलिसांनी छापा टाकून ५० दारूच्या बाटल्यांसह एकाला अटक केली आहे.

अमरावतीतील ख्रिस्ती शाळेत भारतमाता की जय म्हणण्यास विरोध करणार्‍या मुख्याध्यापकांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रयत्नांचे अभिनंदनीय यश !
हिंदूंनो, ख्रिस्त्यांच्या शाळांमध्ये राष्ट्रद्रोही वातावरण कसे असते, हे लक्षात घ्या ! अशा 
कॉन्व्हेंट शाळांमध्ये तुमच्या मुलांना घातल्यास ती कधीतरी आदर्श आणि देशप्रेमी बनू शकतील का ?
     अमरावती - येथील एडिफाय कॉन्व्हेन्ट या शाळेत मुख्याध्यापकांनी भारतमाता की जय म्हणण्यास घातलेल्या बंदीचा आदेश हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रयत्नांमुळे धुडकावण्यात आला. अलेक्झांडर असे या मुख्याध्यापकाचे नाव असून त्यांना त्यागपत्र देण्यास भाग पाडण्यात आले.
१. काही दिवसांपूर्वी या शाळेत राष्ट्रगीत म्हणण्यास मुख्याध्यापकांनी बंदी घातली होती. त्यानंतर भारतमाता की जय असे म्हणण्यासही बंदी घातली.
२. शर्मा नावाच्या एका शिक्षिकेने याचा विरोध केला आणि १० ऑगस्ट या दिवशी स्वत: भारतमाता की जय अशा घोषणा दिल्या. तेव्हा मुख्याध्यापकांनी त्यांना पुन्हा असे केल्यास शाळेतून काढून टाकू, अशी धमकी दिली. यापूर्वीही सीमा विल्यम या शिक्षिकेने त्यांना विरोध केला असता त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. शर्मा यांनी ही गोष्ट हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निदर्शनास आणून दिली. (देशद्रोही कृत्यांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या राष्ट्रनिष्ठ शिक्षिका शर्मा यांचे अभिनंदन ! असे देशप्रेमी शिक्षक सर्वत्र असतील, तर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान वृद्धिंगत होईल ! - संपादक)

दहीहंडी फोडतांना लहान मुलांचा समावेश नको, तसेच २० फुटांपेक्षा अधिक उंची नको !

सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम !
     मुंबई - दहीहंडी फोडतांना त्यात लहान मुलांचा समावेश करू नये, तसेच २० फुटांपेक्षा अधिक मोठा थर लावू नये, हा मुंबई उच्च न्यायालयाने वर्ष २०१४ मध्ये दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑगस्टला कायम ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी अंतरिम स्थगिती दिली होती; पण आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच खेळात घायाळ होणार्‍यांचे प्रमाणही वाढत असल्यामुळे उच्च न्यायालयाने या खेळावर अनेक बंधने घातली होती.
     या उत्सवाचे बाजारीकरण करण्यात सर्वांत आघाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता कसला उत्सव साजरा करायचा, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

मशिदींवरील अवैध भोंगे उतरवा ! - मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

हिंदूंच्या उत्सवाच्या वेळी कायद्याचा बडगा उगारणारे राज्य सरकार आणि
 पोलीस प्रशासन आता कारवाई करणार कि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार ?
     मुंबई - प्रार्थनास्थळे हा शांतता क्षेत्राचाच एक भाग आहेत. त्यामुळे सर्वच प्रार्थनास्थळांना ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन करावे लागेल. मशिदींवर अवैधपणे भोंगे लावणे, हा मूलभूत अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे मशिदींवरील अवैध भोंगे तातडीने उतरवा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सैय्यद यांनी राज्य सरकारला दिला. त्याचसमवेत हा आदेश आम्ही दिला आहे. त्याची प्रत मिळण्याची वाट पाहू नका, तर कारवाई करा अन्यथा कारवाईला सामोरे जाण्यास सिद्ध रहा, असेही न्यायालयाने बजावले.
     ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात विविध जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या. त्या याचिकांची एकत्रित सुनावणी होऊन खंडपिठाने १६ ऑगस्ट या दिवशी हा निकाल घोषित केला आहे. खंडपिठाने आपल्या निकालपत्रात रस्त्यावरील मंडप, रहिवासी आणि शांतता या क्षेत्रांतील आवाजाच्या मर्यादेविषयी ठळक निर्देश दिले.

भारत हा ब्रिटिशांची निर्मिती असल्याची श्रीलंकेच्या राज्यकर्त्यांची गरळओक

आजपर्यंत राष्ट्रावर झालेल्या आघातांच्या विरोधात भारतीय राजकारण्यांनी कधीही ठोस प्रत्युत्तर न 
दिल्याने ऊठसूट कोणीही भारताचा अवमान करतो. छोट्या राष्ट्रांकडूनही केला जाणारा अवमान 
निमूटपणे सहन करणारा जगातील एकमेव देश भारत !
भारताच्या श्रीलंकेतील राजदूतांकडून प्रखर विरोध !
     कोलंबो - भारत हा एकसंघ देश कधीच नव्हता. एकसंघ भारताची निर्मिती ब्रिटिशांनी केली, असे मत श्रीलंकेच्या राज्यकर्त्यांनी व्यक्त केले होते. (श्रीलंका हा एकेकाळी भारताचा अविभाज्य भाग होता, हे सोयीस्कररित्या विसरणारे श्रीलंकेचे धूर्त राज्यकर्ते ! - संपादक) भारताचे श्रीलंकेतील राजदूत वाय.के. सिन्हा यांनी हा दावा फेटाळून लावतांना भारत हे आधुनिक राज्य आहे; मात्र ते नवीन राष्ट्र नाही, असे स्पष्टपणे सांगितले. भारताच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्टला कोलंबो येथील इंडिया हाऊसमध्ये भारतीय आणि श्रीलंकेच्या नागरिकांना संबोधित करतांना सिन्हा यांनी वरील वक्तव्य केले.

भारत झिंदाबाद म्हणायचे नसेल, तर त्यांनी देश सोडून जावे ! - इंद्रेशकुमार, रा.स्व. संघ

याविषयी संघाने कृती करावी, अशी देशप्रेमींची अपेक्षा आहे !
      नागपूर, १७ ऑगस्ट - ज्यांना भारत झिंदाबाद म्हणणे आवडत नसेल, त्यांनी भारत सोडायला हवा. त्यांनी त्यांच्या मुलाबाळांसह त्यांना आवडणार्‍या देशात जावे. अशा अप्रामाणिक लोकांना भारतात जागा नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेशकुमार यांनी केले. रा.स्व. संघाच्या युवा आयाम संघटनेच्या वतीने संघ मुख्यालयाच्या परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अखंड भारत स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यालयाच्या परिसरात अखंड भारत स्मृतीदिन पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. 
     अखंड भारताची संकल्पना स्पष्ट करतांना इंद्रेशकुमार म्हणाले की, महाभारतात वर्णन केलेला भारत अखंड आहे. त्याचे अनेक तुकडे झाले. इंग्रजांनी भारताचे विभाजन करून स्वातंत्र्य दिले.

काश्मीरमध्ये सैनिकाने ५० मीटर उंचावर मोबाईल टॉवरवर लावलेला पाकचा राष्ट्रध्वज काढून भारताचा राष्ट्रध्वज लावला !

अशा सैनिकांमुळेच देश सुरक्षित आहे, अन्यथा भ्रष्ट राजकारण्यांनी 
तो केव्हाच पाकच्या घशात घातला असता ! 
      श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या त्राल येथील आतंकवादी बुरहान वानीच्या गावात ५० मीटर उंच मोबाइल टॉवरवर लावण्यात आलेला पाकचा झेंडा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा सैनिक सचिनकुमार याने काढून टाकला आणि तेथे भारताचा राष्ट्रध्वज लावला. १५ ऑगस्ट या दिवशी ही घटना घडली. सचिनकुमार बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करून टॉवरवर चढला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित झाला आहे. पाकचा झेंडा कोठेही फडकण्यास देऊ नये, अशा सूचना सैनिकांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पाकचा झेंडा येथे फडकतांना दिसल्यावर तो काढण्यात आला. या घटनेचे चित्रीकरण सचिन याच्या सहकार्‍यांनी ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने केले.रॅगिंगला पूर्णविराम मिळावा, म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग पालकांकडून सक्तीचे प्रतिज्ञापत्र घेणार

विद्यापीठ अनुदान आयोगाची हास्यास्पद उपाययोजना !
      मुंबई, १७ ऑगस्ट - विद्यापीठ आणि महाविद्यालये यांमध्ये होणार्‍या रॅगिंगला पूर्णविराम मिळावा; म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) कडक पावले उचलण्याचा एक भाग म्हणून पालकांकडून सक्तीचे प्रतिज्ञापत्र भरण्याची सूचना केली आहे. (अशा उपाययोजना करून रॅगिंग या विकृतीला आळा बसेल का ? रॅगिंगला आळा घालण्यासाठी कठोर शिक्षा आणि विकृत मानसिकता पालटण्यासाठी धर्मशिक्षण देणे, हाच उपाय आहे. त्यासाठी आयोग प्रयत्न करेल का ? - संपादक)
    आयोगाच्या http:/www.antiragging.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रतिज्ञापत्र भरावयाचे आहे. आतापर्यंत ४ लक्ष २४ सहस्र ८५१ जणांनी हे प्रतिज्ञापत्रक पूर्ण केले आहे. या प्रतिज्ञापत्रात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरायची असून त्यांच्या पालकांची माहितीही नमूद करण्याची सूचना केली आहे.

'शिक्षण संक्रमण'कडून लोकमान्य टिळकांची उपेक्षा !

     पुणे, १७ ऑगस्ट (वार्ता.) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या ऑगस्ट महिन्यातील 'शिक्षण संक्रमण' या मासिकात मंडळाला स्मरणीय महापुरुषांच्या सूचीत लोकमान्य टिळकांचा समावेश करण्याचा विसर पडला आहे. शिक्षण मंडळाने १ ऑगस्टला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असूनही त्यांचा येथे उल्लेख न करून त्यांची उपेक्षा केली आहे; तर हिंदूंचे धर्मांतर आणि रुग्णांचा छळ करणार्‍या मदर तेरेसा यांना मात्र मंडळाने विनम्र अभिवादन केले आहे. 

१५ ऑगस्टनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बार्शी येथे संपूर्ण 'वन्दे मातरम्' चे गायन !

 बार्शी (जिल्हा सोलापूर), १७ अ‍ॅागस्ट (वार्ता.) - येथे १५ ऑगस्टच्या निमित्ताने सायंकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहासमोर संपूर्ण 'वन्दे मातरम्' म्हणण्याचा कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आला. 
     या वेळी ग्रंंथप्रदर्शन लावण्यात आले होते. दैनिक सनातन प्रभातच्या 'क्रांतीगाथा विषेशांकां'चेही या वेळी वितरण करण्यात आले. हिंदुत्ववादी सर्वश्री अनिल जाधव, प्रमोद जगताप, राहुल परदेशी, तसेच समितीचे कार्यकर्ते, तसेच अन्य राष्ट्रप्रेमी उपस्थित होते. 

बारामुल्ला येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिक आणि १ पोलीस हुतात्मा !

सातत्याने आतंकवाद्यांच्या आक्रमणात सैनिकांना हुतात्मा होऊ देणारा भारत
 कधीतरी आतंकवाद्यांना मुळासकट नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे का ?
     जम्मू - १७ ऑगस्टच्या पहाटे काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील ख्वाजा बाग येथ सैन्याच्या ताफ्यावर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात २ सैनिक आणि १ पोलीस, असे ३ जण हुतात्मा झाले, तर ४ जण घायाळ झाले.

भारताने काश्मीरवरील विशेष चर्चेचे पाकचे आमंत्रण फेटाळले !

     नवी देहली - काश्मीरच्या समस्येवर विशेष चर्चा करण्याचे पाकने दिलेले आमंत्रण भारताने फेटाळून लावले आहे; मात्र त्याच वेळी विदेश सचिव स्तरावरील चर्चेचा स्वीकार केला आहे. या चर्चेत केवळ सीमेवरून होणार्‍या आतंकवादाचाच विषय घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. भारताचे विदेश सचिव एस्. जयशंकर या चर्चेसाठी पाकमध्ये जाणार आहेत.

पंजाबमध्ये कुराणाचा अवमान करणार्‍या मुसलमान युवकाला अटक !

     चंदीगड - दोन मासांपूर्वी पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील मेहला चौकातील एका मशिदीच्या छतावर कुराणाची फाटलेली पाने सापडली होती. याप्रकरणी पोलिसांनी महंमद इसरार या तरुणाला अटक केली आहे. तो मशिदीचा मौलवी मोहम्मद मुस्तफा याचा मेहुणा आहे. या षड्यंत्राच्या प्रकरणी यापूर्वीच आम आदमी पक्षाचे आमदार नरेश यादव यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. 

बिहारमधील भाजपच्या नेत्याची घरात गोळ्या झाडून हत्या

     पाटलीपुत्र - बिहारच्या दानापूर येथे भाजपचे नेते अशोक जैस्वाल यांची त्यांच्या घरात घुसून मारेकर्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. (बिहारमधील जंगलराज ! - संपादक)

सांगवी (पुणे) येथे अज्ञातांकडून २५ वाहनांची तोडफोड

पिंपरी-चिंचवड परिसरात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे ! 
     पुणे, १७ ऑगस्ट - येथील पिंपरी-चिंचवड शहराजवळच असलेल्या सांगवी येथील शितोळेनगर आणि प्रियदर्शनीनगर या भागात काही युवकांनी २५ हून अधिक वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी ४ संशयितांना कह्यात घेतले आहे. युवकांनी दगड आणि विटा यांचा मारा करत इमारतीच्या वाहनतळांमध्ये लावलेल्या वाहनांची तोडफोड केली

नाशिक येथे दुचाकी आणि चारचाकी यांची तोडफोड !

पहिल्याच घटनेत आरोपींना कडक शासन झाले असते, 
तर वाहन तोडफोडीचे लोण सर्वत्र पसरले नसते ! वारंवार होणारी 
वाहनांची तोडफोड थांबवू न शकणे, हे पोलीस प्रशासनाचे अपयशच नव्हे का ? 
     नाशिक - येथील सातपूर परिसरात मायको ते शिवनेरी चौकापर्यंत रस्त्यावर उभ्या असलेल्या १५ ते २० दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करून गुंडांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये गाड्यांची तोडफोड करणे आणि त्या जाळणे यांच्या घटना वारंवार घडत आहेत. 
     पुणे, पिंपरी, चिंचवड, सिन्नर फाटा, तसेच पंचवटीमध्ये दुचाकी आणि चारचाकी यांची तोडफोड करण्याचे प्रकार वारंवार घडतात. पोलिसांकडून कारवाई होऊनही वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार अल्प झालेले नाहीत.

वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर ५०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप !

     मुंबई - आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी शिवसेनेचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर ५०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील २५० गाळे हे खोतकरांचे नातेवाईक आणि निकटवर्तीय अशा ४० व्यक्तींच्या नावावर आहेत, असा आरोप प्रीती मेनन यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केला. खोतकरांनी नाथानी आणि बजाज कुटुंबाला वैयक्तिक लाभ मिळवून दिला. जालन्यात जो कुणी खोतकर यांच्या विरोधात आवाज उठवतो त्याचे मुडदे पाडले जातात. अर्जुन खोतकर यांच्या विरोधात अपक्ष दलित नगरसेविका संगीत खिल्लारे यांच्या खुनाचा, तर त्यांचे बंधू संजय खोतकर यांच्यावर रा.स्व. संघाचे कार्यकर्ते कैलास गौड यांच्या खुनाचा आरोप आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये वन्दे मातरम्च्या माध्यमातून मातृभूमीला वंदन करत हिंदुत्वाचा आविष्कार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण वन्दे मातरम् सामूहिक गायनाचा कार्यक्रम 
       पुणे, १७ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये १५ ऑगस्ट या दिवशी ठिकठिकाणी संपूर्ण वन्दे मातरम् सामूहिक गायनाचे कार्यक्रम घेण्यात आले. मातृभूमीचे वर्णन आणि वंदन करणार्‍या या राष्ट्रीय गीताचे केवळ एकच कडवे न म्हणता संपूर्ण गीत गायले जावे, अशी मागणी सर्वत्रच्या देशप्रेमी हिंदूंनी केली. त्यामुळे अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी वन्दे मातरम्च्या माध्यमातून मातृभूमीला वंदन करत हिंदुत्वाचा आविष्कार दिसून आला.

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांचा गेल्या वर्षी नियम मोडल्याप्रकरणी आकारलेला प्रत्येकी लाखाचा दंड रहित !

मुसलमानांना असे दंड आकारण्याचे धैर्य कुणात आहे का ? 
     मुंबई - गणेशोत्सवाच्या काळात विनापरवाना मंडपाची उभारणी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, मंडप तसेच रोषणाईसाठी नव्या रस्त्यांवर खड्डे खोदणे, तसेच नियमांची पायमल्ली करून नागरिकांना वेठीस धरणे असे करणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी एक लाख रुपयांचा दंड आकारला होता; मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या सूत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक होताच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दंडाची वसुली करण्यात येणार नाही, अशी भूमिका १६ ऑगस्ट या दिवशी घेतली. 

परभणीतील शासकीय गोदामांतील ४ कोटींहून अधिक रुपयांच्या धान्य घोटाळ्याप्रकरणी दोघांवर गुन्हा प्रविष्ट

भ्रष्टाचाराची बजबजपुरी झालेल्या शासकीय यंत्रणा ! 
     परभणी, १७ ऑगस्ट - येथील तिन्ही शासकीय गोदामांची अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या उपसंचालकांसह संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी १ ते ९ ऑगस्ट या कालावधीत धान्यसाठ्याची पडताळणी केली. शासनाच्या माध्यमातून पुरवठा केलेले आणि गोदामात शिल्लक असलेले धान्य यात १९ सहस्र १४१ क्विंटल धान्याची तफावत आढळून आली आहे. बाजारभावाप्रमाणे ही किंमत ४ कोटी ९७ लक्ष ६९ सहस्र ९२९ रुपये एवढी होते. पुरवठा विभागाच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी गोदामांची पडताळणी केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायद्यान्वये गोदामपाल अनिल नागोराव आंबेराव आणि मुकादम शेख महेबूब यांच्या विरुद्ध गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. (या प्रकरणाची मुळापर्यंत सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी. तसेच त्या संबंधितांकडून आर्थिक भरपाईही करून घ्यायला हवी. - संपादक)

जळगाव येथे श्री साईबाबा मंदिरात तिसर्‍यांदा चोरी !

अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनास्थळांमध्ये अशा
 प्रकारे चोर्‍या होत असल्याचे वृत्त कधी ऐकले आहे का ? 
     जळगाव, १७ ऑगस्ट - शहरातील बळीराम पेठेतील श्री साईबाबा मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील १५ सहस्र रुपयांची रोकड एका चोरट्याने चोरून नेली. ही घटना १५ ऑगस्टच्या रात्री १ वाजता घडली. क्लोज्ड सर्कीट टीव्ही कॅमेर्‍यात ही घटना रेकॉर्ड झाली आहे. या मंदिरात यापूर्वी २ वेळा चोरी झाली होती. ५ मे २०१६ या दिवशी मंदिरात चोरी झाल्यानंतर पोलिसांनी चोराला ८ घंट्यांमध्ये अटक केली होती.

हिंदु धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ! - सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

हिंगणगाव (तालुका परांडा) येथे हिंदु धर्मजागृती सभा

     धाराशिव, १७ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदु समाजाला धर्मशिक्षण दिले जात नसल्याने समाज आज पाश्‍चात्त्य संस्कृतीकडे झुकला आहे. जुन्या रूढी-परंपरा यांच्यापासून तो पुष्कळ दूर गेला आहे. अशा परिस्थितीत हिंदु धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी केले. हिंगणगाव (तालुका परांडा) येथील हनुमान मंदिरात १४ ऑगस्ट या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. 

नगर येथील हिंदूसंघटन मेळावा यशस्वी होण्यासाठी हिंदुत्ववाद्यांची एकजूट !

     नगर, १७ ऑगस्ट (वार्ता.) - येथील खाकिदास बाबा मठात पार पडलेल्या हिंदूसंघटन मेळाव्याच्या आयोजनाच्या बैठकीत विविध संघटनांचे हिंदुत्ववादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. १६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या बैठकीला छावा संघटनेचे नगर शहर जिल्हाध्यक्ष श्री. अशोकराव चव्हाण; तसेच महिला कार्यकर्त्या सुरेखा पाटील आणि रेखा जरे, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. विशाल रायमोकर, बजरंग दलाचे श्री. अनिल देवराव, श्री. सागर होनराव, श्री. महेश जाधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विनोद काशीद, श्री. नीलेश काळे, 'इस्कॉन'चे श्री. मदन कांबळे, स्वदेशी संघटनेचे (राजीव दीक्षितप्रणीत) श्री. ताथडे, निवृत्त पोलीस निरीक्षक श्री. अविनाश बुधवंत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांसह ३५ हून अधिक हिंदुत्ववाद्यांनी हा मेळावा यशस्वी होण्यासाठी एकजूट दर्शवली. येथील कोहिनूर मंगल कार्यालय, गुलमोहर रस्ता, सावेडी येथे शनिवार, २७ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ६ वाजता होणार्‍या हिंदूसंघटन मेळाव्याला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

देवनार (मुंबई) येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण वन्दे मातरम्चे गायन

    
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात उपस्थित राष्ट्राभिमानी
     मुंबई - देवनार गोवंडी येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गाला येणार्‍या बाळ मित्र क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. हर्षद खानविलकर यांनी म्हटलेल्या संपूर्ण वन्दे मातरम्मुळे हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम वैशिष्टपूर्ण ठरला. श्री. खानविलकर यांनी संस्कृतमधील संपूर्ण वन्दे मारतम् म्हणून उपस्थितांना त्याचा मराठीत अर्थही सांगितला. स्थानिक मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान टाळण्यासाठी ध्वजारोहणाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज सन्मान पेटी ठेवण्यात आली होती. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला ६० हून अधिक राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.

इस्लामिक स्टेटचे समर्थन करणारा ब्रिटनचा जिहादी अंजेम चौधरी याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होण्याची दाट शक्यता !

     इस्लामिक स्टेटचे समर्थन करणारे डॉ. झाकीर नाईक आणि इसिसच्या प्रत्यक्ष संपर्कात येणारे ५५ भारतीय तरुण यांच्यावर अशी कारवाई मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या राजकारण्यांच्या भारतात होईल, याची सूतराम शक्यता नाही ! यासाठी कणखर राजकारण्यांचे हिंदु राष्ट्र अर्थात् सनातन धर्म राज्यच हवे ! 
     लंडन - जिहादी आतंकवादाचे कट्टर समर्थक म्हणून ब्रिटनमध्ये कुप्रसिद्ध असलेल्या आणि इस्लामिक स्टेटचे समर्थन करणार्‍या अंजेम चौधरी यांना तेथील न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याची दाट शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. ४९ वर्षीय अंजेम चौधरी आणि महंमद मिजानुर रहमान या त्यांच्या सहकार्‍यावर ऑनलाइन व्याख्याने आणि संदेशांच्या माध्यमातून इसिसला समर्थन आणि प्रोत्साहन देण्याच्या कारणावरून दोघांवर सदर कारवाई करण्यात येणार आहे. 

अमली पदार्थ तस्करी करणार्‍या टोळीला भाग्यनगर येथे अटक

गोव्यात पाळेमुळे रोवल्यानंतर नायजेरियन अन्य
 राज्यात त्यांचे जाळे विणत आहेत, असे म्हणण्यास वाव आहे ! 
 गोव्यात रहाणार्‍या ३ नायजेरियातील नागरिकांचा टोळीत समावेश 
     पणजी, १७ ऑगस्ट (वार्ता.) - केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी भाग्यनगरमध्ये (हैद्राबाद) नायजेरिया देशातील नागरिकांच्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ टोळीला मोठ्या अमली पदार्थ साठ्यासह पकडले आहे. या टोळीतील ३ सदस्य गेले अनेक मास गोव्यात रहात होते, असे पोलिसांच्या लक्षात आले आहे. या टोळीकडून साडेतीन लक्ष रुपयांचे कोकेन, ब्राऊन शुगर आदी अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या टोळीकडून गोव्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ वितरणाचे जाळे विणण्यात आले होते. भाग्यनगर येथेही मोठे जाळे विणण्याचे काम ही टोळी करत होती. या टोळीच्या म्होरक्याकडून बरीच माहिती गोळा केली जात आहे.

प्लास्टिक खाण्यामुळे ४० टक्के गायी आजारी !

धर्मनिष्ठ शासनच खर्‍या अर्थाने गोरक्षण आणि गोसंवर्धन यांसाठी प्रयत्न करू शकते !
     मुंबई - महिला घरातील शिळे अन्न प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून ते रस्त्यावर किंवा कचर्‍याच्या ठिकाणी टाकतात. विविध स्तरांवरील प्लास्टिकचा कचरा असाच फेकला जातो. हेच प्लास्टिक खाण्यामुळे ४० टक्के गायींना आजार झाल्याचे समोर आले आहे. 

सनातनच्या साधिका प्रतिभा तावरे यांनी प्रबोधन करून प्लास्टिकच्या ध्वजाची विक्री रोखली !

राष्ट्रहानी रोखणार्‍या सनातनच्या साधिका हीच हिंदु धर्माची खरी शक्ती !
     जयसिंगपूर - येथे १५ ऑगस्टच्या निमित्ताने सिद्धेश्‍वर देवालय येथे श्रावणी सोमवारच्या निमित्ताने सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. त्या वेळी तेथे फिरत्या विक्रेत्याकडे प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, तसेच ध्वजासाख्या दिसणार्‍या टोप्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. सनातनच्या साधिका कु. प्रतिभा तावरे यांच्या लक्षात हे आल्यावर त्यांनी विक्रेत्याचे प्रबोधन केले. प्रबोधनानंतर विक्रेत्याने या वस्तूंची विक्री न करता त्या पिशवीत ठेवून दिल्या.

नंदुरबार येथे सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने प्रबोधनात्मक उपक्रम

  
मार्गदर्शनाचा लाभ घेतांना विद्यार्थी
   नंदुरबार - राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने येथील महिला महाविद्यालयात प्रबोधनात्मक उपक्रम घेण्यात आला. या वेळी डॉ. नरेंद्र पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी मुख्याध्यापक रुपेश चौधरी आणि शिक्षक उपस्थित होते.

सरनोबतवाडी येथे जीवनावश्यक सुविधा न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकणार ! - शिवसेनेची चेतावणी

सरनोबतवाडीच्या सरपंच श्रीमती सविता शिंदे
यांना निवेदन देतांना शिवसैनिक
       कोल्हापूर, १७ ऑगस्ट (वार्ता.) - सरनोबतवाडी येथील संपूर्ण गावात ८ ते १० दिवसांत पिण्याचे पाणी, तसेच सोनाई पार्क, उजळाई कॉलनी येथील रस्त्यावरील दिवे, रस्ते आणि गटारे या सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्यात याव्यात, अन्यथा सरनोबतवाडी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेनेच्या वतीने १० ऑगस्ट या दिवशी सरनोबतवाडीचे सरपंच श्रीमती सविता शिंदे आणि ग्रामविकास अधिकारी भरत सातपुते यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख सर्वश्री राजू यादव, युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगुले, कुलदीप आडसूळ, विश्‍वास माने, भूषण आडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

न्यायालयाच्या आदेशापेक्षा लांगूलचालन महत्त्वाचे ?
     मशिदींवर अवैधपणे भोंगे लावणे, हा मूलभूत अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे मशिदींवरील अवैध भोंगे तातडीने उतरवा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. सदर आदेश अनेक वेळा देऊनही सरकार कोणतीच कारवाई करत नाही.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Masjido se avaidh bhopu shighra nikalne ka Mumbai Uccha nyayalay ka sarkar ko adesh !
     Dharmanirpeksh Bharat me aise adesho ka palan kya sambhav hai ?
जागो !
: मस्जिदों से अवैध भोंपू शीघ्र निकालने का मुंबई उच्च न्यायालय का सरकार को आदेश ! - धर्मनिरपेक्ष भारत में ऐसे आदेशों का पालन क्या संभव है ?

यवतमाळ येथील शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी मार्गदर्शन

मार्गदर्शन ऐकतांना विद्यार्थी
       यवतमाळ - येथील हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत राबवण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेअंतर्गत काही शाळांमध्ये मार्गदर्शन, तसेच प्रश्‍नमंजुषा घेण्यात आली. या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समितीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण करण्यास सांगितले.

साखरवाडी (ता. फलटण) येथे राष्ट्र्रध्वजाचा मान राखण्यासाठी पोलीस निरीक्षक आणि सरपंच यांना निवेदन

धर्मसभेतील ठरावाप्रमाणे ढवळेवाडीतील धर्माभिमानी हिंदूंची कृती !
पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना धर्माभिमानी
      फलटण (जिल्हा सातारा) - राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी साखरवाडी (ता. फलटण) येथील पोलीस निरीक्षक भोसले आणि सरपंच श्री. विक्रमसिंह भोसले यांना राष्ट्राभिमान्यांनी निवेदन दिले. सरपंचांच्या वतीने तेथील कारकुनांनी निवेदन स्वीकारले. ढवळेवाडी येथे घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीत निवेदन देण्याचे ठरवण्यात आले होते. त्याप्रमाणे बैठकीतील सहभागी हिंदूंनी कृती केली. (राष्ट्र-धर्मासाठी कृतीशील होणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! - संपादक) या वेळी ढवळेवाडी येथील सर्वश्री प्रणजित माने, अभिजीत नेवसेे, स्वप्नील मदने, तुषार मोहिते, गणेश वाघमारे, सुमित नेवसे, पांडुरंग कदम, अजय माने, सचिन रणवरे, प्रदीप जाधव, अक्षय जाधव, अमन मुजावर, प्रथमेश चांगण, गणेश यळे यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संस्कृत ही धर्माप्रमाणे सनातन भाषा आहे !

जागतिक संस्कृतदिनाच्या निमित्ताने...
      संस्कृत भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रसरकारने ख्रिस्ताब्द १९५० मध्ये संस्कृत आयोग स्थापन केला होता. या आयोगाने केलेल्या शिफारसींवर तत्कालीन काँग्रेस सरकारने अंमलबजावणी केली असती, तर आज संस्कृतची स्थिती वेगळी दिसली असती. ती भारतातील एक प्रमुख, तसेच आपल्या धर्माप्रमाणेच सनातन भाषा झाली असती. संस्कृत भाषेची प्रथमपासून चालत आलेली हेळसांड श्री. राजेश सिंह यांनी द पायोनिअर या वृत्तपत्रात काही मासांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका लेखात नमूद केली आहे. आमच्या वाचकांसाठी ती येथे देत आहोत.

देवभाषा संस्कृतचे महात्म्य, सर्व भाषांतील सर्वोत्कृष्टता

१. भाषांतरासाठी संस्कृत सर्वश्रेष्ठ माध्यम असून जगातील कोणत्याही 
भाषेत तिचे भाषांतर केल्यास मूळ अर्थ पालटत नसणे
      या गुणांमुळे संस्कृत भाषेला भाषांतराचे सर्वश्रेष्ठ माध्यम मानले आहे. आपण कोणत्याही भाषेतील वाक्यांचे संस्कृतमध्ये सहजपणे भाषांतर करू शकतो आणि संस्कृतमधील लिखाणाचे भाषांतर कोणत्याही तिसर्‍या भाषेत करू शकतो. संस्कृत भाषेतील भाषांतर सर्वांत योग्य असेल, याची निश्‍चिती देता येईल; परंतु अन्य कोणत्याही भाषेतून दुसर्‍या भाषेत आणि तिच्यातून तिसर्‍या भाषेत सरळ भाषांतर केल्यानंतर अर्थ पालटणार नाही, याची आपण शाश्‍वती देऊ शकत नाही. संस्कृतमध्ये अनुवाद केल्यानंतर जगातील इतर कोणत्याही भाषेत भाषांतर केल्यावर त्याचा मूळ अर्थ पालटत नाही; परंतु अन्य भाषांतून थेट भाषांतर केवळ एकाच भाषेत केले जाऊ शकतेे.

भारतातील रुग्णालये रुग्णांची फसवणूक कशी करतात ?

      भारतातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची कशी फसवणूक केली जाते किंवा रुग्णांना कसे लुटले जाते याविषयी लंडनमध्ये वास्तव्य करणार्‍या माझ्या एका मैत्रिणीने तिच्या आईच्या उपचारासाठी गुरुग्राम (गुडगाव) येथे आली असता तिला आलेला प्रत्यक्ष अनुभव सांगितला.
१. भारतातील रुग्णालये रुग्णांना महाग औषधे विकत घेण्यास भाग पाडतात. या औषधांचे स्वस्त पर्याय उपलब्ध असतांना अधिक लाभ मिळवण्यासाठी महाग औषधे घेण्यास भाग पाडतात.
२. रुग्णाच्या खोलीच्या दर्जानुसार औषधांचा आणि रुग्णसेवेचा दर वाढवला जातो. 
       तिने पुढे सांगितले की, तिचे दोन मित्र, भारतीय डॉक्टर्स लंडनमध्ये नोकरी करत होते. त्यांनी परत भारतात येऊन वैद्यकीय व्यवसाय चालू केला. येथील व्यवसायात अनैतिकता पुष्कळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्याचे भागिदार आपण होऊ शकत नाही, असा विचार करून त्यांनी लंडनमध्ये परत जाणे पसंत केले.

अतीदक्षतेच्या चेतावण्या आणखी किती दिवस ?

      येत्या १५ ऑगस्टला भारताने स्वातंत्र्य मिळवून ६९ वर्षे पूर्ण झाली. अपेक्षेप्रमाणे यंदाच्या वर्षीही गुप्तचर यंत्रणांनी देशात आतंकवादी आक्रमणे अथवा घातपात होणार असल्याची शक्यता वर्तवत स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यांना अतीदक्षतेची चेतावणी दिली. तसे पाहिले, तर भारत आणि अतीदक्षतेच्या चेतावण्या हा विषय देशवासियांना आता नवीन राहिलेला नाही. राष्ट्रीय उत्सव असो अथवा हिंदूंचा धार्मिक उत्सव असो, त्यावर आतंकवादाचे सावट हे ठरलेले आहे. परभणी आणि संभाजीनगर येथे नुकत्याच पकडलेल्या इसिसच्या हस्तकांच्या चौकशीतही स्वातंत्र्यदिनी, तसेच गणेशोत्सवाच्या काळात घातपात करण्याचा इसिसचा डाव असल्याचे उघडकीस आले.

वाचकांत राष्ट्रप्रेम जागवणारे, त्यांना धर्मसंजीवनी देणारे अन् अध्यात्म मार्ग अनुसरणार्‍यांंना दिशादर्शन करणारे सर्वांगस्पर्शी सनातन प्रभात !

वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
     सत्य वार्तांकन करून राष्ट्र आणि धर्म यांविषयी समाजमनात जागृती करणारी वर्तमानपत्रे सध्या अभावानेच आढळतात. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचा वसा घेऊन आदर्श पत्रकारितेचे ब्रीद पाळणार्‍या सनातन प्रभातचे नाव अशा वृत्तपत्रांत अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एकांड्या शिलेदाराप्रमाणे राष्ट्र-धर्म कार्यासाठी प्रयत्न करणार्‍या सनातन प्रभातची वैशिष्ट्ये पाहूया.
१. राष्ट्रप्रेमी आणि धर्मनिष्ठ हिंदूंसाठी आशेचा किरण म्हणजे सनातन प्रभात !
     राष्ट्ररक्षणासाठी कटिबद्ध असणारे आणि हिंदु धर्माच्या पुनरुत्थानासाठी धडपडणारे अनेक हिंदू आज पहायला मिळतात. राष्ट्र आणि धर्म कार्याच्या संदर्भातील अमूल्य मार्गदर्शन त्यांना सनातन प्रभात नियतकालिकांच्या माध्यमातून लाभत आहे. पुढील मार्गदर्शनाच्या शोधात असणार्‍यांना ही नियतकालिके अंधःकारात प्रकाशाचा किरणच वाटतात. सनातनचे वैचारिक लिखाण राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकांच्या विचारांचेच प्रतिबिंब असल्याचे काही जण उत्स्फूर्तपणे सांगतात.

आकाशवाणीवर संस्कृत वार्तापत्र चालू होण्यामागील इतिहास !

पंडित वसंत गाडगीळ
      ३० जून १९४७ या दिवशी सकाळी ९ वाजता संस्कृत वार्तापत्र परंपरेला जन्म देणारे हे संस्कृत आवाहन सर्व विश्‍वाला सर्वप्रथम ऐकायला मिळाले. राष्ट्राध्यक्ष डॉ. राधाकृष्णन् यांच्या हस्ते झालेल्या शिवाजी विद्यापिठाच्या (कोल्हापूर) उद्घाटन समारंभासाठी त्या दिवशीच मी पुणे विद्यापिठाचे कुलगुरु म.म.प्रा.दत्तो वामन पोतदार यांच्यासह कोल्हापूरला गेलो होतो. श्री महालक्ष्मी मंदिरात प्रात: दर्शन घेऊन मंदिराबाहेर पुण्यातील पत्रकारांसह आमची मंदिर प्रदक्षिणा चालू होती. या प्रदक्षिणा परिक्रमेतच मी पत्रकार बंधूंना ५ मिनिटे थांबा म्हणून सांगितले आणि हातातील आकाशवाणी ट्रान्झिस्टर चालू करून प्रथम संस्कृत वार्तापत्र ऐकवले. इयम् आकाशवाणी ..... प्रवाचिका विजयश्री । ...... ॥ शारदा पत्रिकेच्या या विजयाबद्दल सर्वांना दुग्धमोदक (पेढे) देऊन हा क्षण साजरा केला.

उत्तरप्रदेशातील शहरी भागात मुसलमानांचे वर्चस्व

     वर्ष १९७१ ते २०११ या कालावधीत उत्तरप्रदेशमधील एकूण लोकसंख्या आणि शहरी भागातील मुसलमानांची लोकसंख्या यांविषयीचा अहवाल चेन्नईस्थित सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज् या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील धोरणात्मक अभ्यासासाठी त्यांनी वर्ष २०११ मधील जनगणनेचा अभ्यास केला असता पश्‍चिम उत्तरप्रदेश मधील २-३ भागांत मुसलमान बहुसंख्येने असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

१. अधिवेशनात सांगितल्यानुसार कृती करण्याची इच्छा असलेले 
आसाम येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. जगदिप पटवार !
     आसामहून आलेले हिंदुत्वनिष्ठ श्री. जगदिप पटवार यांची भेट झाली असता ते म्हणाले, मला प्रथमच या अधिवेशनातून पुष्कळ शिकायला मिळाले. मी आसाम येथे गेल्यावर हे सर्व कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करीन. मी घरातील सर्वांना साधना सांगितली आहे. मला अनेक अनुभूती आल्या आहेत. त्यांच्या बोलण्यातून पुष्कळ तळमळ जाणवली. 
२. प्रतिकूल परिस्थितीतही धर्माभिमानी करत असलेले प्रयत्न !
     अधिवेशनात २ दीदींची भेट झाली. त्यांनी त्या अधिवेशनासाठी कशा परिस्थितीतून आल्या ?, ते सांगितले. त्या दोघी गौहत्तीहून (गुवाहाटीहून) केवळ धर्मावरील प्रेमापायी गोवा येथे अधिवेशनासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांना एक दिवस उपहारगृहात (लॉजवर) रहावे लागले. यातून प्रतिकूल परिस्थितीतही धर्माभिमानी कसे प्रयत्न करत आहेत ?, हे शिकायला मिळाले.
- सौ. प्राची जुवेकर, वाराणसी सेवाकेंद्र (२२.६.२०१६)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे


देववाणी संस्कृतची वैशिष्ट्ये अन् संस्कृतला वाचवण्यासाठीचे उपाय

संस्कृत भाषा आणि संस्कृती यांविषयी मार्गदर्शन करणारा सनातनचा ग्रंथ !
* संस्कृत भाषेच्या निर्मितीचा इतिहास
* संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये आणि महत्त्व
* संस्कृतमुळे होणारे मानसिक अन् आध्यात्मिक लाभ
* संस्कृतला होणारा विरोध आणि त्यामागील कारणे
* संस्कृत भाषेची सद्यस्थिती 
* संस्कृतच्या रक्षणाचे उपाय व तिच्या उपासनेचे मार्ग
संपर्क : गोवा - ९४२१२४९२०६, सिंधुदुर्ग - ९४२३५८५८७०
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !सरकारकडून असे नकारात्मक उत्तर अपेक्षित नाही !

      गोव्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सोपोकर वसुलीची समस्या आहे. सर्व नगरपालिकांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी मगोचे आमदार लवू मामलेदार यांनी विधानसभेत केली. सर्व नगरपालिकांच्या घोटाळ्यांची चौकशी करणे शक्य नाही. नगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटणे आवश्यक आहे, असे उत्तर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिले
     हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांना धर्म, अध्यात्म अन् उपासना यांचे अधिष्ठान आहे ! - पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड

भृगुसंहिता आणि शिवसंहिता यांचे रामनाथी आश्रमात शुभागमन होण्यापूर्वी अन् झाल्यावर आलेल्या भावानुभूती

आज श्रावण पौर्णिमेला (१८.८.२०१६) भृगु महर्षींचा अवतरण दिवस आहे त्या निमित्ताने...
     ३१.७.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात पंजाबमधील भृगु संहितावाचक आणि शिव संहितावाचक डॉ. विशाल शर्मा अन् राजस्थानमधील भृगु संहितावाचक डॉ. सुनील चोपडा यांचे आगमन झाले. त्या वेळी आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. आगमनापूर्वी 
      भृगुसंहिता आणि शिवसंहिता यांचे स्वागत करण्यास निसर्गदेवतेसह रामनाथी आश्रमही उत्सुक झाला आहे, असे वाटणे : आश्रमात कोणत्याही नाडीपट्टीचे आगमन होण्यापूर्वी प्रत्येक वेळी निसर्गात काही वैशिष्ट्यपूर्ण पालट जाणवतात. तसे पालट भृगुसंहिता आणि शिवसंहिता यांचे आश्रमात होण्यापूर्वीही जाणवले.
सार्‍या वृक्षवेली जणू आनंदाने डोलून त्यांचे स्वागत करण्यासाठी उभ्या आहेत, असे वाटत होते. रामनाथी आश्रमही त्यांच्या आगमनासाठी आतूर झाला आहे आणि सर्वत्र आनंदाची स्पंदने प्रक्षेपित करत आहे, असे जाणवत होते. त्या वेळी वातावरणातील उत्साह आणि आनंद यांत पुष्कळ वाढ झाल्याचे लक्षात आलेे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे प्रत्येक प्राणीमात्राची काळजी वाहणारे आणि प्रत्येक प्राणीमात्रावर प्रेम करणारे आहेत !

भृगुसंहितेद्वारे डॉ. विशाल शर्मा यांच्या 
माध्यमातून महर्षींकडून परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या वैशिष्ट्यांचे कथन आणि कार्याला आशीर्वाद ! 

संहितावाचन करतांना डॉ. विशाल शर्मा आणि सोबत डॉ. सुनील चोपडा

         भृगुसंहिता आणि शिवसंहिता यांसह त्यांचे वाचन करणारे होशियारपूर, पंजाब येथील डॉ. विशाल शर्मा आणि भृगुसंहितेचे वाचन करणारे नाथद्वार, राजस्थान येथील डॉ. सुनील चोपडा यांचे ३१ जुलै २०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले. त्या दिवशी रात्री आणि १ ऑगस्ट २०१६ या दिवशी डॉ. विशाल शर्मा यांनी आश्रमात भृगुसंहितेचे वाचन केले. या वाचनाचा वृत्तांत येथे देत आहे. 

हमने लूट लिया गुरुजनों का प्यार, गुरुजनोंने हमारा दिल लूटा ।

हमारी जुड गई नाम के साथ तार ।
हमने लूट लिया गुरुजनों का प्यार, गुरुजनोंने हमारा दिल लूटा ॥ 
हमारा अच्छे गुरुजनों के साथ जुड गया नाता ।
हम भूल गये सारा संसार ॥ १ ॥ 

जिस प्रकार भी रखे रहना है ।
झूठे जगत से क्या लेना है ॥
हमें मिल गया सच्चा करतार (टीप) ।
गुरुजनों ने हमारा दिल लूटा ॥ २ ॥

साधकांची श्रद्धा अल्प पडल्याने महर्षींना प.पू. डॉक्टर अवतार असल्याचे स्मरण करून द्यावे लागणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
श्री. शंकर नरुटे
      गुरूंचा महिमा साधकांना सांगावा लागत नाही. साधक तो प्रतिक्षण अनुभवतच असतात. गुरुदेव परम अवतार आहेत, हे साधकांना ज्ञात आहे. अनेक संतही हेच सांगतात; मात्र साधकांची श्रद्धा अल्प पडते; म्हणून महर्षींना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महती सांगावी लागली. महर्षींनी सांगितल्यावर साधकांना स्वतःला आलेल्या अनुभूतींचे स्मरण झाले. हे गुरुदेवा, तुमच्याप्रती असलेल्या प्रीतीचा भाव आम्ही कसा टिकवून ठेवायचा ?, हे तुम्हीच आम्हाला शिकवा, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.
- श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जुलै २०१६)

सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या खोलीत डोळे मिटून बसल्यावर तेथे हवन चालू असून महर्षि बसले असल्याचे दोनदा दिसणे आणि तेथील यंत्रे महर्षींनीच दिलेली असल्याचे सद्गुरु बिंदाताईंनी सांगणे

श्रीमती शिरीन चाइना
       मला माझ्या वैयक्तिक विषयावर सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्याशी बोलायचे असल्याने मी २७.४.२०१६ या दिवशी त्यांच्या खोलीत गेले होते. त्या वेळी त्यांना कुणाचा तरी भ्रमणभाष आल्यामुळे त्या भ्रमणभाषवर बोलत होत्या. मी शांतपणे डोळे मिटून बसले असतांना मला त्यांच्या खोलीच्या मध्यभागी हवन चालू असून तिथे महर्षि बसले असल्याचे दोन वेळा दिसले. मी हे सद्गुरु बिंदाताईंना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, या खोलीत ठेवलेली दोन यंत्रे महर्षींनीच दिलेली आहेत. 
- श्रीमती शिरीन चाइना, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.४.२०१६)

श्री. विशाल शर्मा यांचा प.पू. डॉक्टरांप्रती असलेला उच्च कोटीचा भाव !

      ३१.७.२०१६ या दिवशी श्री. शर्मा आश्रमात आल्यावर त्यांच्यात प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव जाणवत होता. प.पू. डॉक्टरांविषयी बोलतांना त्यांना भावाश्रू अनावर होत होते. त्यांच्या शब्दा-शब्दांतून उत्कट भाव व्यक्त होत होता. प.पू. डॉक्टर आणि इतर साधक यांच्याशी बोलतांना ते सतत नमस्काराच्या मुद्रेत होते. 
भृगु आणि शिव संहितावाचक श्री. विशाल शर्मा यांनी वर्णिलेले प.पू. डॉक्टरांचे श्रेष्ठत्व ! 
     प.पू. डॉक्टर अतिशय सामर्थ्यवान आहेत. जेव्हा श्री गुरूंची साधकावर कृपादृष्टी असते, तेव्हा साधकाचे मनोरथ निःशंक पूर्ण होते ! 
- (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ (१७.८.२०१६)

अक्षरांच्या उच्चारांशी संबंधित सूक्ष्मातील काही प्रयोग

पृष्ठ २ वर दिलेल्या प्रयोगाचे उत्तर
वैद्य मेघराज पराडकर
प्रयोग १ चे उत्तर
    ॐ ह्रीम् नमः । या जपाच्या तुलनेत ॐ ह्रीन् नमः । या जपातून शांतीची स्पंदने येतात.
शास्त्र
      संस्कृत भाषेमध्ये प्रत्येक वर्णाचा उच्चार कसा करावा, यासंबंधी नियम सांगितले आहेत. सर्वसाधारणपणे अनुस्वाराचा उच्चार म् असा केला जातो, उदा. ह्रीं याचा उच्चार ह्रीम् असा होतो; परंतु अनुस्वारापुढे दुसरे अक्षर असल्यास अनुस्वाराचा उच्चार त्या दुसर्‍या अक्षरावरून ठरतो. उदा. ॐ ह्रीं नमः । यात अनुस्वाराच्या पुढे न आल्याने संस्कृत व्याकरणाच्या नियमांनुसार अनुस्वाराचा नकार होतो. त्यामुळे ॐ ह्रीन् नमः । असाच उच्चार करणे अधिक योग्य आहे. वरील प्रयोगातूनही हे सिद्ध होते. संस्कृत भाषेतील प्रत्येक वर्ण विशिष्ट अनुभूती देण्यास समर्थ आहे. यावरून संस्कृत भाषेचे महत्त्व लक्षात येते.

स्वप्नात रामनाथी आश्रमाच्या वर आकाशात ढगांमध्ये तीन ऋषी, श्रीविष्णु आणि शिव यांचे झालेले दर्शन अन् नंतर ढगांमधील वैशिष्ट्यपूर्ण पालट अभ्यासतांना लक्षात आलेली काही सूत्रे

१. दुपारी झोपल्यावर साधिकेला पडलेले स्वप्न 
कु. सोनाली बधाले
१ अ. आकाशात ढगांमध्ये एका तेजस्वी ऋषींचा चैतन्यदायी तोंडवळा दिसून ते चैतन्य डोळ्यांना सहन न होणे आणि निर्विचार स्थिती अनुभवणे : २२.५.२०१६ या दिवशी दुपारी मी झोपले असता मला एक स्वप्न पडले. त्यात मला पुढील दृश्य दिसले, आपण आश्रमात प्रवेश करतो, त्या ठिकाणी मी आणि कु. स्वाती गायकवाड बोलत होतो. त्या वेळी आकाशात ढगांमध्ये एका तेजस्वी ऋषींचा तोंडवळा दिसला. तो पुष्कळ चैतन्यदायी होता आणि त्यांची दृष्टी वरच्या दिशेने होती. त्यांच्या आज्ञाचक्रातून पुष्कळ पिवळा प्रकाश बाहेर पडतांना दिसत होता. तो डोळ्यांना सहन होत नसल्याने मी त्यांच्याकडे अधिक वेळ पाहू शकले नाही. त्यांना पहातांना मन निर्विचार आणि शांत होऊन मी वेगळीच अवस्था अनुभवत होते.
१ आ. तेजस्वी ऋषींच्या डाव्या-उजव्या बाजूला आणखी दोन ऋषी दिसून त्यांच्यामागे श्रीविष्णु आणि शिव दिसणे अन् तीन ऋषी म्हणजे प.पू. डॉक्टर, महर्षि आणि भृगुऋषि असावेत, असे वाटणे : त्या तेजस्वी ऋषींच्या डाव्या बाजूला एक ऋषि दिसले आणि त्यांच्यामागे श्रीविष्णूचे दर्शन झाले. त्यांच्या उजव्या बाजूला दुसरे ऋषि दिसले आणि त्यांच्या मागे प्रथम त्रिशूळ दिसले अन् पुन्हा पाहिल्यावर शिवाचे दर्शन झाले. हे दृश्य मी आणि स्वातीताई पहात होतो. तेवढ्यात तिथे पू. पात्रीकरकाका आले. आम्ही त्यांनाही आकाशातील दृश्य दाखवले. त्यानंतर ते ढग अदृश्य झाले. हे दृश्य पाहिल्यावर वाटले, ते तेजस्वी ऋषि म्हणजे प.पू. डॉक्टर आणि त्यांच्या बाजूला असलेलेे दोन ऋषी म्हणजे महर्षि अन् भृगुऋषि असावेत.

भृगुसंहितेचे वाचन करणारे डॉ. विशाल शर्मा यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि भृगुसंहितेच्या संदर्भात आलेली अनुभूती

श्री. सिद्धेश करंदीकर
      ३१.७.२०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात भृगुसंहितेचे वाचन करणारे डॉ. विशाल शर्मा यांचे आश्रमात आगमन झाले. त्या वेळी त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेली अनुभूती येथे देत आहे.
१. शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. दूरचा प्रवास करून आल्यानंतरही विश्रांती न घेता फलादेशाचे वाचन करण्यास येणे : ३१.७.२०१६ या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. विशाल शर्मा यांचे आश्रमात आगमन झाले. ते होशियारपूर, पंजाब येथून प्रवास करून आले होते, तरीही ते आल्यानंतर विश्रांती न घेता फलादेशाचे वाचन करण्यास आले.

भाद्रपद संक्रांतीच्या निमित्ताने भृगु महर्षि आणि सप्तर्षि यांनी दिलेला आशीर्वाद !

     १६.८.२०१६ या दिवशी भाद्रपद संक्रांत असल्याने महर्षींनी डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून पुढील संदेश दिला, सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि साधक यांच्यासाठी भाद्रपद संक्रांत शुभ अन् मंगलमय राहो. आश्रमात सुख-समृद्धी अबाधित राहू दे, असा माझा (भृगु महर्षि) आणि सप्तर्षि यांचा आशीर्वाद आहे ! - (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.८.२०१६) 
(तामिळनाडू पंचांगानुसार १६.८.२०१६ या दिवशी भाद्रपद संक्रांत होती. - सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद)

भृगुसंहितेच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

१. नामजप करतांना श्‍वेतवस्त्रधारी ऋषींचे दर्शन होणे आणि ते यजमानांवर उपचार करत असल्याचे जाणवणे : माझ्या यजमानांचा अपघात झाल्यावर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ते रुग्णालयात असतांना मी रुग्णालयाच्या जवळ असलेल्या निवासस्थानी नामजप करत असे. २६.४.२०१५ या दिवशी सकाळी प्रार्थना करून नामजपाला बसल्यावर श्‍वेतवस्त्रधारी ऋषींचे दर्शन झाले. हे ऋषी मंत्र म्हणत यजमानांवर मंत्राने भारित पाणी शिंपडून उपचार करतांना दिसले.
२. अनुभूतीचे टंकलेखन करतांना सप्तर्षींमध्ये भृगुऋषींचे नाव नाही, असा विचार करून त्यांचे नाव पुसून टाकणे आणि आश्रमात भृगुसंहितेचे आगमन झाल्यावर चुकीची जाणीव होणे : वरील अनुभूतीचे टंकलेखन करतांना अत्रि, अगस्ति या ऋषींसमवेत भृगुऋषींचे नावही अंतर्भूत होते; परंतु धारिका देतांना बुद्धीने विचार केल्यामुळे मी ते पुसून टाकले. सप्तर्षींमध्ये भृगुऋषींचे नाव नाही, म्हणजे मला जाणवलेले चुकीचे असणार, असा बुद्धीने विचार केला. नाव पुसून टाकतांना मी यजमानांना याविषयी सांगितले होते आणि जे जाणवले ते लिही, भले ते चूक असू दे कि योग्य, असे त्यांनी सांगूनही मी ते पुसले. २.११.२०१५ या दिवशी आश्रमात भृगुसंहितेचे आगमन झाल्यावर ही गोष्ट माझ्या लक्षात येऊन मला पुष्कळ अपराधी वाटू लागले. मला ही चूक दाखवून देण्यासाठी भृगुऋषींना आश्रमात यावे लागले. माझी ही चूक अक्षम्य आहे. देव परम दयाळू आहे; पण मीच कृतघ्न आहे. ईश्‍वराने जी अनुभूती दिली, त्याच्यात पालट करण्याचा अधिकार मला नाही. येथे माझा भाव अल्प होऊन अहं जागृत झाला. हे ऋषीवर्य, मी तुमची शतशः अपराधी आहे. मला क्षमा करा. 
- सौ. श्रुति सहकारी, फोंडा, गोवा (३.११.२०१५)

अक्षरांच्या उच्चारांशी संबंधित सूक्ष्मातील काही प्रयोग

प्रयोग १
     प्रथम २ मिनिटे ॐ ह्रीम् नमः । हा जप करून काय वाटते, ते अनुभवा. त्यानंतर ॐ ह्रीन् नमः । हा जप करून काय वाटते, ते अनुभवा.
प्रयोग २
     प्रथम २ मिनिटे ज्ञ हे अक्षर डोळ्यांसमोर आणून द्न्य असा उच्चार करून काय वाटते, ते अनुभवा. त्यानंतर तेच अक्षर (ज्ञ) डोळ्यांसमोर आणून ज्ञ (च, छ, ज, झ, ञ यांतील अर्धा ज आणि पूर्ण ञ) असा उच्चार करून काय वाटते, ते अनुभवा.

भृगुसंहितेचे आगमन होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना

नामजप करतांना सूक्ष्मातून आश्रमात सर्वत्र दीप लावलेले दिसणे आणि त्यानंतर २ दिवसांनी आश्रमात भृगुसंहितेचे आगमन होणे : ३१.१०.२०१५ या दिवशी सायंकाळी ६ वाजता खोली क्र. ३२४ मध्ये नामजप करत असतांना मला सूक्ष्मातून आश्रमात सर्वत्र दीप लावलेले दिसले. दिवाळीला तर अजून अवकाश आहे आणि हे दीप कसले ?, असा विचार माझ्या मनात आला. साधू-संत येती घरा तोची दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे २.११.२०१५ या दिवशी भृगुसंहितेचे आश्रमात आगमन झाले. तेव्हा खरोखरीच दिवाळीप्रमाणे वातावरण होते. त्यामुळे ही पूर्वसूचना असल्याचे लक्षात आले.
- सौ. श्रुति सहकारी

भृगु संहितेच्या पानांसंदर्भात पंडित डॉ. विशाल शर्मा यांनी सांगितलेली माहिती

डॉ. आठवले : भृगु संहितेच्या फाटलेल्या पानांना ती टिकावी म्हणून सेलोटेप का लावत नाहीत ?
पंडित डॉ. विशाल शर्मा : आम्ही सर्व महर्षि भृगु सांगतात, तसे करतो. त्यांनी सेलोटेप लावायला सांगितलेले नाही. एखादा मजकूर महत्त्वाचा असला आणि सेलोटेप न लावल्यामुळे पान फाटले, तर महर्षि पुन्हा दुसर्‍या पानावर तो मजकूर उमटवतात.
डॉ. आठवले : भृगु संहितेची ठराविकच पाने माझ्या खोलीत ठेवायला का दिली ? त्यांतील मजकूर माझ्याशी संबंधित आहे का ? त्यांत काय लिहिले आहे ?
पंडित डॉ. विशाल शर्मा : महर्षींनी सांगितलेली पाने आपल्याला भेट म्हणून दिली आहेत. त्यांत मजकूर काय आहे, हे मला ज्ञात नाही. त्यांत काय लिहिले आहे, याला महत्त्व नाही; कारण ती पाने म्हणजेच महर्षि भृगूंचे प्रत्यक्ष अस्तित्व ! त्यांत काय लिहिले आहे, हे सांगणे आवश्यक असल्यास महर्षि तसा संदेश देतील.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एका बहिणीची राखीनिमित्त भावासाठी प्रार्थना !

१८ ऑगस्टला राखीपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने ...

मैं तुम्हारी बहना, तुम मेरे भ्राता ।
आंखों का आंसू से नाता ॥ १ ॥
पुलकित हो, तुम्हें पुकारूं ।
दुःख में तुम्हारा साथ चाहूं ॥ २ ॥
गुरुरूप हुआ अब संसार सारा ।
यहां कोई न बहना, कोई न भ्राता ॥ ३ ॥
शीघ्र ही प्रगति करें हम बंधुवर (टीप) ।
यही प्रार्थना इस राखी पर ॥ ४ ॥
टीप १ - गुरुबंधु
- कु. निधि श्याम देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.८.२०१६)

सनातनच्या २० व्या संत पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांचा देहत्याग

     रामनाथी (गोवा) - सनातनच्या २० व्या संत पू. (सौ.) आशालता सखदेव (वय ८१ वर्षे) यांनी १७ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५.१० वाजता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला. त्यांनी वैशाख कृ. ५, कलियुग वर्ष ५११४ अर्थात १० मे २०१२ या दिवशी संतपद प्राप्त केले होते. त्यांच्या पश्‍चात पती श्री. शशिकांत सखदेव, मुलगा श्री. गुरुदत्त, सून सौ. हेमलता आणि कन्या कु. राजश्री असा परिवार आहे. कु. राजश्री यांनी पू. (सौ.) सखदेवआजी यांच्यासोबत आश्रमात राहून त्यांची शेवटपर्यंत भावपूर्ण सेवा केली. पू. (सौ.) सखदेवआजी यांच्यावर १८ ऑगस्ट या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सनातन परिवार सखदेव कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या देहत्यागाविषयीचे सविस्तर वृत्त 
आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती वाचा उद्याच्या अंकात

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - श्रावण शुक्ल पक्ष चतुर्दशी (१७.८.२०१६) दुपारी ४.२७ वाजता
समाप्ती - श्रावण पौर्णिमा (१८.८.२०१६) सकाळी ११.५३ वाजता
आज पौर्णिमा आहे.

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना
     सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
घरघर नसणे
एकदा घर सुटले की तो दारोदार होतो, दारोदार झाला की घरोघर होतो 
आणि घरोघर झाला म्हणजे तो सर्वत्र असतो; म्हणून त्याला घरघर नाही.
भावार्थ : एकदा घर सुटले येथे घर हा शब्द माया या अर्थाने वापरला आहे. दारोदार होतो ... सर्वत्र असतो येथे सर्वव्यापी ब्रह्म किंवा ईश्‍वर या अर्थाचे वर्णन आहे. म्हणून त्याला रघर नाही म्हणजे त्याला मृत्यूची घरघर नाही. तो अमर झालेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     आद्य शंकराचार्यांनी विरोधी पंडितांशी वाद-विवाद करून त्यांचा पराभव केला; मात्र हल्लीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि धर्मद्रोह्यांना वाद-विवाद करून हरवता येत नाही; कारण त्यांचा धर्माचा काडीइतकाही अभ्यास नसल्याने ते वाद-विवाद करण्यास पुढे येत नाहीत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मकतेतील शक्ती !
घडणार्‍या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीत आपले हितच आहे, याची जाणीव होते. नेहमी सकारात्मक बोलणारी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. नैराश्यपूर्ण विचारांची व्यक्ती समाजातील लोकांना नकोशी वाटते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पाकला धडा शिकवण्याची हीच वेळ !

संपादकीय
       दुसर्‍यांच्या घरांना आगी लावण्याचा उद्योग फार काळ करता येत नाही. त्याच आगीच्या ज्वाळांत एक दिवस स्वत:चेही घर भस्मसात् होते, हे पाकला बहुधा ठाऊक नसावे. भारतापासून वेगळे होऊन ६९ वर्षे उलटली; पण पाकच्या भारतविरोधी कुरघोड्या थांबायचे नाव घ्यायला तयार नाहीत. येनकेन प्रकारेण तो कधी काश्मीरमध्ये, तर कधी भारताच्या अन्य भागांत भारताला डिवचत आहे. कारगिलसह यापूर्वीच्या युद्धांत भारताकडून सपाटून मार खाऊनही पाकची खुमखुमी कायम आहे. भारताशी समोरासमोर लढाई करणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यामुळे आता कुरघोडीचे शस्त्र तो वापरत आहे. म्हणून भारताने पाकच्या कारवायांकडे एक युद्ध म्हणून पहायला हवे आणि त्यास त्याच पद्धतीने प्रत्युत्तरही द्यायला हवे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn