Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज हयग्रीव जयंती
आज नारळी पौर्णिमा

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या ५० व्या संत पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचा आज वाढदिवस

एर्नाकुलम् (केरळ) येथील मंदिरात लव्ह जिहादचा प्रयत्न !

लव्ह जिहाद काय आहे, हे माहीत नसणारे केंद्रीय 
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही घटना जाणून घ्यावी !
     एर्नाकुलम् (केरळ) - येथील मंदिरात महाप्रसादाच्या वेळी काही मुसलमान युवक येत असल्याने तेथे लव्ह जिहादचा धोका निर्माण झाला आहे.
     या मंदिरामध्ये प्रतिदिन दुपारी महाप्रसाद असतो. मंदिरात महाप्रसाद ग्रहण करण्याच्या निमित्ताने येणारी मुसलमान मुले हिंदु मुलींशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतात. नुकतीच या मंदिरात अशा प्रकारची एक घटना घडली. मंदिरात महाप्रसाद घेण्याच्या निमित्ताने आलेला मुसलमान युवक (अंदाजे २२ वर्षीय) हिंदु मुलीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत होता. मंदिर व्यवस्थापनाच्या सदस्यांना संशय आल्याने त्यांनी त्या मुलाला नाव आणि गाव विचारले. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर देवस्थानच्या सदस्यांनी त्या युवकाला तेथून निघून जाण्यास सांगितले. एका हिंदु युवकासमवेत ४ मुसलमान युवक मंदिरात आले होते. यातील एक मुसलमान युवक हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता.

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरामध्ये १८६ कोटी रुपयांच्या सोन्याचा अपहार !

मंदिर सरकारीकरणाचा परिणाम ! कुठे श्रद्धेने मंदिराला दान देणारे
 भक्त, तर कुठे मंदिराच्या धनाची लूट करणारे आधुनिक गझनी ! 
अशा लुटारूंचा शोध घेऊन त्यांच्याकडून व्याजासह धन वसूल करा !
     नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या माजी कॅग प्रमुख विनोद राय समितीने केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील संपत्तीचे लेखापरीक्षण करून अहवाल सादर केला. या अहवालात मंदिराच्या व्यवस्थापनाने केलेले आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचार आणि अपहार यांच्या गंभीर घटनांवर प्रकाश टाकतांना मंदिरातील १८६ कोटी रुपयांच्या सोन्याचा अपहार झाल्याचे उघड केले आहे.
१. वर्ष २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विनोद राय समितीला श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील संपत्तीचे लेखापरीक्षण करण्यास सांगितले होते. त्यानुसार या समितीने तिचा एक सहस्र पानांचा आणि २ भागांत असलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सदर केला.
२. या अहवालानुसार सुवर्णशुद्धीच्या नावाखाली २६३ सोन्याची भांडी वाया गेली. तसेच १८६ कोटी रुपये किमतीची ७६९ सोन्याची भांडी सापडत नाहीत, म्हणजेच त्यांचा अपहार झाला.
३. सोन्याच्या शुद्धीकरणासाठी वापरण्यात आलेल्या परिमाणामध्ये पालट केल्याने २.५ कोटी रुपयांच्या सोन्याची हानी झाली.
४. शुद्धीकरण झाल्यावर उर्वरित सोने परत न आणल्याने ५९ लक्ष रुपयाची हानी झाली.

पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या शरणार्थींना २ सहस्र कोटी रुपयांची साहाय्यता देणार !

पाक आणि बांगलादेश या देशांतून आलेल्या 
हिंदूंच्या साहाय्यासाठीही सरकारने पैसे खर्च करावेत !
     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख केला होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने तेथून भारतात आलेल्या शरणार्थींच्या साहाय्यासाठी २ सहस्र कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळासमोर ठेवला आहे. तसेच पाकव्याक्त काश्मीरमधील अत्याचारग्रस्त नागरिकांसाठीही आम्ही साहाय्य करणार आहोत, असे सरकारकडून म्हटले जात आहे.
     हे साहाय्य ३६ सहस्र परिवारांना मिळणार आहे. हे परिवार वर्ष १९४७, १९६५ आणि १९७१ च्या यद्धानंतर पाकव्याप्त काश्मीरमधून पलायन करून भारतात आले आहेत.

पाकिस्तानात आणि नरकात जाणे सारखेच ! - संरक्षणमंत्री पर्रीकर

       नवी देहली - पाकिस्तानात आणि नरकात जाणे सारखेच आहे, असे विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. हरियाणातील रेवाडीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पर्रीकर पुढे म्हणाले की, आतंकवादाचे दुष्परिणाम पाकिस्तान स्वत: भोगत आहे. लढण्याची शक्ती राहिली नाही; म्हणून कुरापती काढण्याचा विचार पाकिस्तान करतो. स्वत: हुतात्मा होण्याऐवजी शत्रूला नष्ट करा, असा सल्लाही त्यांनी भारतीय सैनिकांना दिला.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा झालेल्या हिंसाचारात ५ जण ठार

      श्रीनगर - १६ ऑगस्टला जम्मू-काश्मीरमध्ये नव्याने झालेल्या हिंसाचारात ५ जण ठार झाले, तर १५ हून अधिक जण घायाळ झाले आहेत. त्यामुळे ३९ दिवस चालू असलेल्या या हिंसाचारात मृतांची संख्या ६० हून अधिक झाली आहे.

शरीया समर्थकांना अमेरिकेत घुसू देणार नाही ! - डोनाल्ड ट्रम्प

     वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी एका प्रचारसभेत म्हटले की, आमच्या राज्यघटनेवर ज्यांचा विश्‍वास नाही अथवा जे धर्मांधतेचे आणि द्वेषाचे समर्थन करतात; त्यांना आमच्या देशात येण्याची अनुमती देण्यात येऊ नये. अमेरिकी कायद्यांऐवजी शरीया कायदा लागू व्हावा, असे वाटणार्‍यांचीही हकालपट्टी केली पाहिजे.
     ट्रम्प पुढे म्हणाले की, आतंकवाद्यांना समर्थन देणार्‍यांसह आपल्या देशातील सिद्धांतांच्या विरोधात विचार मांडत असतील, अशांनाही शोधून बाहेर काढले पाहिजे. जे अमेरिकी मूल्यांना समजून त्याचा सन्मान करत असतील आणि या देशात गुण्यागोविंदाने रहातील, त्यांनाच देशात प्रवेश द्यायला हवा.

हिंदूंंनो, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध व्हा ! - पू. शहाजीबुवा रामदासी

सातारा येथे सामूहिक वन्दे मातरम्चा कार्यक्रम 
मार्गदर्शन करतांना
पू. शहाजीबुवा रामदासी
       सातारा, १६ ऑगस्ट (वार्ता.) - भारतावर इंग्रजांचे राज्य असतांना केलेले कायदे अजूनही अस्तित्वात आहेत. त्यामुळे देशाची स्थिती फारच बिकट झाली आहे. भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार यांनी परिसीमा गाठली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध झाले पाहिजे, असे प्रतिपादन समर्थभक्त पू. शहाजीबुवा रामदासी यांनी केले. येथील गोलबागेसमोर शहरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक वन्दे मातरम्च्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक उपस्थित होत्या. या वेळी काश्मिरी पंडितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन सौ. महाडिक यांनी केले.

शालेय पाठ्यपुस्तकांतून दडपलेला इतिहास केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण जगासमोर मांडण्याचा समितीचा प्रयत्न कौतुकास्पद ! - पू. शहाजीबुवा रामदासी

पू. शहाजीबुवा रामदासी यांना प्रदर्शनाविषयी
माहिती सांगतांना श्री. हेमंत सोनवणे (डावीकडून पहिले)

        सातारा, १६ ऑगस्ट (वार्ता.) - आज स्वयंघोषित इतिहासकारांचे पेव फुटले आहेत. ब्रिगेडी इतिहासकारांना तर इतिहासरत्न ही पदवी दिली पाहिजे. खरा इतिहास सांगण्यापेक्षा अल्पसंख्यांकांच्या भावना जपून खोटा इतिहास शाळेत शिकवणे हेच त्यांना संयुुक्तिक वाटते; मात्र शालेय पाठ्यपुस्तकातून दडपलेला इतिहास केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण जगासमोर मांडण्याचा हिंदु जनजागृती समितीचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार समर्थभक्त पू. शहाजीबुवा रामदासी यांनी केले.

देशविरोधी घोषणाबाजीमुळे बेंगळुरू येथील अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट !

     बेंगळुरू (कर्नाटक) - येथील अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया संस्थेने आयोजित केलेल्या ब्रोकन फॅमिलीज् (विस्थापित कुटुंब) कार्यशाळेच्या वेळी काही जणांनी देशविरोधी घोषणा दिल्या. (अशा देशद्रोह्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! - संपादक) या घटनेचा निषेध करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. येथील युनायटेड थियॉलॉजिकल महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ही घटना घडली. या प्रकरणी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
     संस्थेने आयोजित केलेल्या चर्चेमध्ये काश्मीरमधील काही विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्यामध्ये आणि काश्मिरी हिंदूंचे नेते आर्.के. मट्टू यांच्यात वादविवाद झाले. मट्टू यांनी भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ एक विधान केले. भारतीय सैन्य काश्मीरसह ईशान्य भारत आणि इतरही ठिकाणी तैनात आहे. जगातील शिस्तबद्ध सैन्यांपैकी एक भारतीय सैन्य असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे मट्टू यांनी म्हटल्यावर त्याविरोधात काश्मीरमधील विद्यार्थ्यांनी भूमिका मांडली. त्यावरून वादविवाद चालू झाला. काश्मीरच्या मुक्ततेच्या बाजूने असणार्‍या एका गटाने देशविरोधी घोषणा दिल्या. पोलिसांच्या उपस्थितीतच हा सगळा प्रकार झाला.

नेहरूंपासून ते आतापर्यंतच्या केंद्रीय नेतृत्वाच्या चुका हेच काश्मीर समस्येचे मूळ ! - मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती

     श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील जनतेला कोणताही दोष देता येणार नाही. येथील राज्यकर्ते आणि केंद्रातील नेतृत्व येथील जनतेच्या मनात विश्‍वास निर्माण करू शकले नाही, यातच या समस्येचे मूळ आहे. नेहरूंपासून ते आतापर्यंतच्या देशाच्या नेतृत्वाने ज्या चुका केल्या, त्यामुळेच काश्मीरची ही अवस्था झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी टीका केली. त्या श्रीनगर येथे स्वातंत्र्यदिन सोहळ्यात बोलत होत्या. 
     मेहबुबा म्हणाल्या, काही देश लोकशाही मार्गाने आपली लढाई लढत होते, तोपर्यंत त्यांना सर्वांचेच पाठबळ मिळत होते; मात्र बंदूक, ग्रेनेड, पेट्रोलबॉम्ब, आतंकवाद यांचा शिरकाव होताच, या देशांचा पूर्ण विस्कोट झाला आहे. काश्मीरमध्ये पूर्वी लोक सुरक्षादलांना घाबरायचे; पण आता लोकांना दगडफेक करणार्‍यांची भीती वाटू लागली आहे. काही लोक मुलांना पुढे करून आक्रमणे करत आहेत, अशा समाजकंटकांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात १ सैनिक ठार, तर ५ घायाळ !

आतंकवादाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन साजरा करणारा जगातील एकमेव देश भारत !
     श्रीनगर - देशभरात ७० वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असतांना जिहादी आतंकवाद्यांनी श्रीनगरमधील नौहट्टा येथे केंद्रीय राखीव पोलीसदलाच्या तळावर आक्रमण केले. त्या वेळी झालेल्या चकमकीत कमांडर प्रमोद कुमार हुतात्मा झाले, तर ६ सैनिक घायाळ झाले. या वेळी २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. १५ ऑगस्टला सायंकाळी उशिरापर्यंत ही चकमक चालू होती. 
आसाममध्ये ४ बॉम्बस्फोटांत ४ सैनिक घायाळ 
      गुवाहाटी - आसामच्या तिनसुकीया जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी ४ शक्तीशाली बॉम्बस्फोट करण्यात आले. यात केंद्रीय राखीव पोलीसदलाचे ४ सैनिक घायाळ झाले. उल्फा इंडिपेंडंट या आतंकवादी संघटनेकडून हे स्फोट करण्यात आले.

डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळांमध्ये मिळते धोकादायक शिक्षण ! - पोलीस अहवालातील माहिती

बांगलादेशातील ढाका येथील आतंकवादी आक्रमणातील आतंकवाद्यांवर
 डॉ. झाकीर नाईक यांचा प्रभाव असल्याचे समोर आल्यावर त्यांची 
चौकशी करणार्‍या पोलिसांनी त्याकडे इतके दिवस दुर्लक्ष का केले ?
     मुंबई - वादग्रस्त डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक इंटरनॅशनल स्कूल मधील मुलांना धोकादायक शिक्षण देण्यात येत असल्याचे पोलिसांच्या एका अहवालातून समोर आले आहे. यात पोलिसांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
     या अहवालानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात देण्यात आलेली माहिती दुसर्‍या धर्मियांचा द्वेष करण्यास शिकवते, तसेच त्यांचे धर्मांतर करण्यासही प्रोत्साहन देते. या शाळेेच्या संकेतस्थळाचा आराखडा स्वत: डॉ. झाकीर यांनी सिद्ध केला होता. ढाका येथे आतंकवादी आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांवर डॉ. झाकीर यांचा प्रभाव असल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्यशासनाने डॉ. झाकीर यांच्याशी संबंधित संस्था आणि सदस्य यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

फ्रान्सच्या कोर्सिका बेटावर बुर्किनीबंदी !

     बस्तिया - फ्रान्समधील कोर्सिका बेटावर बुर्किनी (पोहण्यासाठी वापरण्यात येणारा संपूर्ण शरीर झाकण्याचा पोशाख) परिधान करण्यावर तेथील महापौरांनी बंदी घातली आहे. या पोशाखावरून १३ ऑगस्टला झालेल्या हिंसाचारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी फ्रान्सच्या कान्समधील रिवीरा रिसॉर्ट आणि व्हिलेन्यूवे-लौबेटमध्ये तेथील समुद्रकिनार्‍यांवर बुर्किनी परिधान करण्यास बंदी आणण्यात आली आहे. या बंदीला विरोधही करण्यात येत आहे.
     कोर्सिकाच्या सिस्को गावात स्थानिक रहिवासी आणि उत्तर अमेरिकी वंशाच्या नागरिकांमध्ये १३ ऑगस्टला हाणामारी झाली होती. या वादाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही; परंतु पर्यटकांनी बुर्किनी परिधान केलेल्या महिलांची छायाचित्र काढल्याने वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे. यात ५ जण घायाळ झाले होते, तर ३ गाड्या जाळण्यात आल्या होत्या.

हिंदु सिंहानो, श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने ध्येयनिष्ठेने मार्गक्रमण करा ! - प्रा. रामेश्‍वर मिश्र

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील वक्ता, प्रवक्ता 
यांच्यासाठीच्या मार्गदर्शन कार्यशाळेची सांगता ! 
स्वातंत्र्यदिन काळात झालेल्या कार्यशाळेत अखंड भारताच्या पुनरुत्थानाच्या वटवृक्षासाठीचे बीजारोपण ! 
सनातनच्या भोजनापूर्वीचे आचार, भोजनाच्या वेळचे आणि नंतरचे आचार, प्राणशक्ती (चेतना)
वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील  उपाय या इंग्रजी ग्रंथांचे प्रकाशन करतांना
श्री. शिवनारायण सेन,  प्रा. रामेश्‍वर मिश्र  आणि प्रा. कुसुमलता केडिया 
      रामनाथी - सध्या हिंदु धर्म संकटात आहे. संकटे ही देवाने केलेली आपल्यावरची एक प्रकारे कृपाच आहे. हिंदु धर्माचे शत्रू उन्मत्त हत्तीप्रमाणे बलवान भासत असले, तरी आपण हिंदु सिंह आहोत. सर्व संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य हिंदूंमध्ये आहे. आपण आपली शक्ती जागवून भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने निमित्तमात्र बनून ध्येयनिष्ठेने मार्गक्रमण करून ध्येय गाठायला हवे, असे मार्गदर्शन हिंदु विद्या केंद्र, वाराणसीचे प्रा. रामेश्‍वर मिश्र यांनी केले. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील वक्ता, प्रवक्ता यांच्यासाठीच्या मार्गदर्शन कार्यशाळेचा १५ ऑगस्ट या दिवशी समारोप झाला. या कार्यशाळेच्या समारोप कार्यकमात मिश्र बोलत होते. या वेळी मध्यप्रदेश येथील धर्मपाल शोध पिठाच्या संचालिका प्रा. कुसुमलता केडिया, बंगाल येथील राष्ट्र-धर्म प्रचार सभेचे सचिव श्री. शिवनारायण सेन उपस्थित होते. योगायोगाने भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या काळात झालेल्या या ३ दिवसांच्या कार्यशाळेत एकेकाळी संपूर्ण आशिया खंडात असलेल्या अखंड भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाच्या वटवृक्षासाठीचे बीजारोपण कार्यशाळेत सहभागी राष्ट्रप्रेमी युवकांच्या मन:पटलावर करण्यात आले.

कॉलेजियम पद्धतीवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रसरकारला फटकारले !

     नवी देहली - उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि मुख्य न्यायमूर्तीं यांची नियुक्ती आणि बदली यांंच्या निर्णयांच्या कार्यवाहीविषयी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रसरकारला फटकारले.
    मागील काही दिवसांपासून कॉलेजियम पद्धतीच्या निर्णयांची कार्यवाही करण्यात केंद्रसरकारकडून विलंब होत आहे. या संदर्भात अविश्‍वास का आहे ? असा प्रश्‍न विचारतांना सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना सरकारकडून सूचना मागवण्याचा आदेशही दिला आहे. कॉलेजियम पद्धतीद्वारे उच्च न्यायालयाच्या ७५ न्यायमूर्तींची नियुक्ती आणि बदल्या करण्याचा आदेश देण्यात आला होता; मात्र सरकारकडून अद्यापही त्याला संमती देण्यात आलेली नाही. ही प्रक्रिया नेमकी कुठे अडकून पडली आहे, हे समजत नाही, असे न्यायालयाने सुनावणीच्या वेळी म्हटले आहे. अशा प्रकारचा अविश्‍वास का दाखवला जात आहे ? आम्हाला हे सगळे नको आहे, अशा शब्दांत न्यायालयाने केंद्रसरकारला फटकारले. यावर मुकुल रोहतगी यांनी मी हे सूत्र वरिष्ठ पातळीपर्यंत नेईन आणि न्यायालयात उत्तर देईन, असे आश्‍वासन न्यायालयास दिले.गोव्यातील गोवा इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटचेचे संकेतस्थळ पाकमधून पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी हॅक !

काश्मीरमधील आणि भारतातील मुसलमानांची हत्या बंद करण्याची सूचना
     पणजी - देशातील सर्वोत्तम महाविद्यालयांच्या सूचीत असलेले गोवा इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटचे (जीआयएम्) संकेतस्थळ १४ ऑगस्ट म्हणजे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी तेथील झैन हॅक्सोर यांनी हॅक करून त्यामध्ये काश्मीरमधील आणि भारतातील मुसलमानांची हत्या बंद करा, अशी सूचना दिली. तसेच त्या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा दाखवण्यात आला होता; मात्र काही वेळातच हे संकेतस्थळ पूर्ववत् करण्यात आले. 
     १४ ऑगस्ट या दिवशी जीआयएम्चे संकेतस्थळ उघडण्यात आल्यावर ते पाकिस्तानच्या व्यक्तीने हॅक केल्याचे दिसत होते. त्यावर त्याने संदेश आणि हिंदी भाषेत देशभक्तीपर गीत वाजवले होते. हॅकरने स्वत:ची खूण म्हणून पाकिस्तान सायबर हल्लेखोर झैन हॅक्सोर गट, असा उल्लेख केला होता. हल्लीच काश्मीरमधील आतंकवादी संघटना हिझबुल मुजाहिदीन यांचा २१ वर्षीय आतंकवादी बुरहान वानी याला सुरक्षा रक्षकांनी ठार केले होते. या अनुषंगाने हॅकरने जीआयएम्च्या संकेतस्थळावर संदेश दिला असण्याची शक्यता आहे.शार्ली हेब्दो साप्ताहिकाकडून पुन्हा मुसलमानांवर व्यंगचित्र !

आक्रमण करण्याच्या धमक्या !
     लंडन - फ्रान्समधील शार्ली हेब्दो या साप्ताहिकाने पुन्हा एकदा मुसलमानांच्या विरोधात व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. या व्यंगचित्रात मुसलमानांना नग्न दाखवण्यात आले आहे. यामुळे या साप्ताहिकाला पुन्हा धमक्या दिल्या जात आहेत. यापूर्वी महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्यामुळे त्यांच्या कार्यालयावर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमणही केले होते. यात १२ जण ठार झाले होते. फ्रान्सच्या समुद्रकिनार्‍यावर बुरखा घालण्यास बंदी आहे. साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलेल्या व्यंगचित्रात एक दाढी वाढलेला मुसलमान पुरुष आणि हिजाब परिधान केलेली मुसलमान महिला समुद्रकिनारी नग्नावस्थेत धावत आहेत, असे दाखवण्यात आले आहे. व्यंगचित्राच्या खाली द रिफॉर्म ऑफ इस्लाम : मुस्लिम्स लुसेन अप (इस्लाममध्ये सुधारणा : मुसलमानांनी (त्यांच्यातील रितींना) सूट दिली), असे लिहिण्यात आले आहे. हे व्यंगचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर साप्ताहिकाच्या फेसबूक पेजवर धमक्या येऊ लागल्या आहेत. एका धमकीमध्ये लवकरच एक आक्रमण केले जाईल, असेही म्हटले आहे.

अमेरिकेत हिजाब घातलेल्या मुसलमान महिलांवर एका महिलेचे आक्रमण !

ट्रम्प इस्लामविरोधी भावना भडकवत असल्याचा पीडित महिलेचा आरोप
     शिकागो - अमेरिकेतील शिकागो येथे हिजाब घातलेली मुसलमान महिला आणि तिची मुलगी यांच्यावर एका महिलेने आक्रमण केल्याची घटना वेस्ट रॉजर्स पार्कमध्ये घडली आहे. या दोघींना इसिस असे संबोधून ही महिला त्यांच्यावर थुंकली. तसेच अन्य एका महिलेनेही त्यांचा अवमान करणारी टीका केली. शिकागो पोलीस हा प्रकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.
     सिहाम झाहदाम या आक्रमण झालेल्या महिलेने आरोप केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच अमेरिकेत इस्लामविरोधी भावना भडकत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे सुखांचा त्याग केल्याविना हिंदु राष्ट्र आणणे अशक्य ! - ह.भ.प. रामायणाचार्य रामकृष्ण महाराज सानप, सत्यगांवकर

देवगाव (नाशिक) येथे हिंदूसंघटन मेळावा

डावीकडून श्रीमती वैशाली कातकाडे, ह.भ.प. रामायणाचार्य
रामकृष्ण महाराज सानप, सत्यगांवकर, श्री. प्रशांत जुवेकर

        नाशिक, १६ ऑगस्ट (वार्ता.) - आयुष्यामध्ये आपण स्वत:साठीच जगतो; मात्र छत्रपती शिवाजी महाराज किंवा मावळे यांच्याप्रमाणे सुखांचा त्याग केल्याविना हिंदु राष्ट्र आणणे शक्य नाही. जेवढे महत्त्व तुकोबांची गाथा, ज्ञानेश्‍वरी यांना आहे, तेवढेच महत्त्व छत्रपतींच्या चरित्राला द्यायला हवे. त्यांच्या चरित्राचेही पारायण व्हायला हवे. भारत हे हिंदु राष्ट्रच होते; परंतु राज्यकर्त्यांमुळे आज ती ओळख पुसली गेली आहे. आता हिंदूंनी हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी राज्यकर्त्यांकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन हिंदूसंघटन मेळाव्याचे प्रमुख वक्ते ह.भ.प. रामायणाचार्य रामकृष्ण महाराज सानप, सत्यगांवकर यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील देवगांव येथे १४ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते.

हिंदूंवरील संकटे दूर करण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक ! - सौ. मोहिनी मांढरे, सनातन संस्था

धसई, शहापूर येथील हिंदु धर्मजागृती सभा 

व्यासपिठावर उपस्थित डावीकडून सौ. सुनीता
पाटील, सौ. मोहिनी मांढरे आणि श्री. सुमित सागवेकर

        शहापूर, १६ ऑगस्ट (वार्ता.) - श्रावणमासात सर्वच हिंदू एकत्र येऊन सण आनंदाने साजरे करतात; पण परधर्मीय हिंदूंच्याच सणांच्या दिवशी दंगली घडून तो आनंद हिरावून घेतात. हिंदूंचे सण आल्यावरच कायदा-सुव्यवस्था जागृत होते. इंंग्रज देश सोडून गेले असले, तरी मेकॉले शिक्षणपद्धतीमुळे ते आजही आपल्यावर राज्य करत आहेत. परकीय आणि पाश्‍चात्त्य यांचे संकट दूर करण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे यांनी धसई, शहापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांना केले.

सनातन संस्था चुकीचे मार्गदर्शन करत नसल्याने तिच्यावर बंदी नको !

होळे (आजोती) ता. पंढरपूर येथील मुख्याध्यापक 
अर्जुन शेरकर यांची शासनाला पत्राद्वारे विनंती ! 

मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना मार्गदर्शन
करतांना श्री. आप्पासाहेब सांगोलकर (उभे असलेले)

       पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १६ ऑगस्ट (वार्ता.) - सनातन संस्था कोणासही चुकीचे मार्गदर्शन करत नाही. त्यामुळे तिच्यावर बंदी घालू नये, अशी विनंती होळे (आजोती) ता. पंढरपूर येथील मातोश्री रुक्मिणी गंगाराम होळकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अर्जुन शेरकर यांनी शासनाकडे पत्राद्वारे केली आहे. सनातन संस्थेचे साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांनी त्यांची विद्यालयात भेट घेतली. त्या वेळी त्यांनी वरील आशयाचे पत्र शासनाकडे पाठवण्यासाठी दिले.
       या वेळी १५ ऑगस्टनिमित्त प्रकाशित झालेल्या दैनिक सनातन प्रभातच्या क्रांतीगाथा विशेषांकाच्या ४०० प्रतींचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.

त्र्यंबकेश्‍वर न्यासाकडून माहिती मिळण्यासाठी महंत डॉ. बिंदूजी महाराज यांनी चालू केलेले उपोषण मागे !

माहितीच्या अधिकारात मागिवली होती माहिती !
        नाशिक - येथील महंत डॉ. बिंदूजी महाराज यांनी सरकारीकरण झालेल्या त्र्यंबकेश्‍वर देवस्थान न्यासाकडे माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत विविध स्वरूपाची माहिती मागवली होती. ही मिळत नसल्याने त्यांनी १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण आरंभले होते; मात्र १६ ऑगस्ट या दिवशी त्र्यंबकेश्‍वर न्यासाच्या लेखी आश्‍वासनानंतर त्यांनी अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले आहे.
        त्र्यंबकेश्‍वर न्यासाच्या अध्यक्षपदी जिल्हा न्यायाधिशांची नेमणूक केलेली असते. माहितीच्या अधिकाराच्या कायद्याखाली दोन वेळा अपील देऊनही त्यावर सुनावणी झालेली नव्हती. माहिती मागवून सहा महिने होऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, त्यामुळे जनतेचा अवमान होत आहे, असे महंत डॉ. बिंदूजी महाराज यांनी म्हटले होतेे.

(म्हणे) शिक्षण मसुद्यात केवळ हिंदु राष्ट्र उभारणीसाठी सोयीच्या सूत्रांचा समावेश !

हिंदु राष्ट्राची कावीळ झालेल्या रझिया पटेल यांचे द्वेषमूलक वक्तव्य
     पुणे, १६ ऑगस्ट (वार्ता.) - नवीन शैक्षणिक मसुद्याच्या प्रस्तावनेपासूनच वैदिक संस्कृती आणि भारताचा तेजस्वी भूतकाळ हे शब्द जाणीवपूर्वक विखुरण्यात आले आहेत. (सत्य सांगण्यात चूक ते काय ? काँग्रेसने स्वतःच्या सोयीसाठी हे सत्य दडपले, हे रझिया पटेल का सांगत नाहीत ? - संपादक) भारतात केवळ वैदिक संस्कृतीच अस्तित्वात होती आणि वैदिक संस्कृतीनंतर थेट स्वातंत्र्य चळवळ झाली, असे दाखवण्यात आले आहे. मोहेंजोदडो, हडप्पा, द्रविड, अरब, मिशनरी आणि बुद्ध यांनी शिक्षणक्षेत्रात केलेल्या कार्याचा भाग हा गिळंकृत केलेला असून तो शासनाला पचू देता कामा नये. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये ज्यांना शिक्षण नाकारले गेले होते, अशांपर्यंत शिक्षण पोचवण्याचे काम मिशनर्‍यांनी केले, त्याचाही अहवालात उल्लेख नाही.

सर्वत्रच्या बी.एस्.एन्.एल्. लॅण्डलाईन धारकांनी आस्थापनाने दिलेल्या सुविधांचा लाभ करून घ्यावा !

     भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बी.एस्.एन्.एल्. या शासकीय दूरभाष आणि भ्रमणभाष आस्थापनाने भारतभरातील सर्व लॅण्डलाईन धारकांना पुढील सुविधा दिल्या आहेत. संबंधितांनी त्याचा लाभ घ्यावा.
१. बी.एस्.एन्.एल्. लॅण्डलाईन धारक प्रतिरात्री ९ ते सकाळी ७ या वेळेत कोणत्याही नेटवर्कच्या मोबाईलवर अथवा लॅण्डलाईनवर एस्.टी.डी. आणि लोकल कॉल्स् विनामूल्य करू शकतात.
२. प्रति रविवारी दिवसभर भारतातील कोणत्याही नेटवर्कच्या मोबाईलवर अथवा लॅण्डलाईनवर एस्.टी.डी. आणि लोकल कॉल्स् विनामूल्य करू शकतो. १५.८.२०१६ या दिवसापासून ही सुविधा कार्यान्वित झाली आहे.
     आंतरराष्ट्रीय संपर्क करण्यासाठी वरील सुविधा लागू होत नाहीत.

हिंदु धर्मातील सण, व्रते यांमागील शास्त्र समजावून घेऊन कृती केल्यास धर्माचरणाचा आनंद मिळेल ! - सौ. अनुराधा निकम

कन्यागत पर्वाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने 
नृसिंहवाडी परिसरात विविध माध्यमातून धर्मप्रसार !
  
सौ. अनुराधा निकम यांच्या प्रवचनास उपस्थित महिला
   शिरढोण-कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) - हिंदु धर्मात साजर्‍या करण्यात येणार्‍या प्रत्येक सण, व्रते यांमागे अध्यात्मशास्त्र आहे. महिलांच्या आभूषणांमुळे धर्माचरणासमवेत आपले रक्षणही होते. त्यामुळे प्रत्येक सण, व्रते यांमागील शास्त्र समजून घेऊन कृती केल्यास धर्माचरणाचा आनंद मिळेल, असे प्रतिपादन पुणे येथील ज्ञानेश प्रायमरी स्कूलच्या संचालिका सौ. अनुराधा निकम यांनी केले. त्या १४ ऑगस्ट या दिवशी कल्लेश्‍वर देवालय येथे आयोजित प्रवचनात बोलत होत्या. याचा लाभ ५० हून अधिक भाविकांनी घेतला.

सामाजिक संकेतस्थळावर नरेंद्र मोदी यांची तीन मुसलमानांकडून अपकीर्ती !

मुसलमानांचा उद्दामपणा !
        हुपरी (जिल्हा कोल्हापूर), १६ ऑगस्ट (वार्ता.) - पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची अपकीर्ती करणारे छायाचित्र सामाजिक संकेतस्थळावर टाकल्याचे १२ ऑगस्टच्या रात्री उघडकीस आले. व्हॉटस् अ‍ॅपवर हे छायाचित्र टाकून समाजविघातक कृत्य करणारे ग्रुप अ‍ॅडमिनसह मुबारक, जावेद आणि आरिफ या ३ धर्मांधांना पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले आहे.
        छायाचित्र पाहून संतप्त झालेले पक्ष आणि संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नरेंद्र मोदी विचार मंचचे जिल्हा प्रमुख श्री. संदीप शेटे यांनी या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अवमान होत असेल, तर शाहरूख खान अमेरिकेत जातातच कशाला ? - शिवसेना

       मुंबई - शाहरूख खानला मागील आठवड्यात अमेरिकेच्या लॉस एंजलिस विमानतळावर इमिग्रेशन विभागाच्या अधिकार्‍यांकडून कह्यात घेण्यात आले होते. या वेळी शाहरूख खानची अनेक घंटे चौकशी करण्यात आली. त्याचा असा वारंवार अपमान झाला आहे आणि तरीही हे सहिष्णु मंडळ अमेरिकेच्या थपडा खाण्यासाठी पुन:पुन्हा त्यांच्या दरवाजात जात आहे. त्याचा जर असा अपमान होत असेल, तो त्या देशात जातोच कशाला, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
       या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, प्रखर स्वाभिमानी बाणा दाखवून शाहरूख महाशय हिंदुस्थानात परतले असते, तर अमेरिकेचेच थोबाड फुटले असते आणि महासत्तेच्या तकलादू सहिष्णुतेचे बिंग फुटले असते; पण आमच्या बॉलीवूडकरांना स्वदेशावर सिनेमा काढायचे असतात आणि युरोप, अमेरिकेत जाऊन या अशा थपडा खायच्या असतात.

राष्ट्रीय समस्यांविषयी जागृती आणि राष्ट्रीय एकात्मतेची निर्मिती यांसाठी पनवेल येथे भव्य हिंदू सुरक्षा फेरीचे आयोजन

     पनवेल - विश्‍व हिंदू परिषदेच्या अखंड भारत संकल्पदिनानिमित्त बजरंग दलाच्या नेतृत्वाने येथे १४ ऑगस्ट या दिवशी भव्य हिंदू सुरक्षा फेरीचेे आयोजन करण्यात आले होते. देश, धर्म, संस्कृती रक्षण, गोरक्षण, धर्मांतर आणि आतंकवाद या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि तरुणांमध्ये देशप्रेम जागवून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी फेरीचे आयोजन केले होते. ही फेरी पनवेलमधील विविध भागांमध्ये नेण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात येत होत्या. या फेरीत विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोरक्षा दल, हिंदु जनजागृती समिती यांचे ४०० धर्माभिमानी सहभागी झाले होते. फेरीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रणजीत सांगळे यांनी अखंड हिंदुस्थान हा राजकीय स्वार्थासाठी कसा विभागला गेला, याची सविस्तर माहिती दिली.
क्षणचित्र - बजरंग दलाचे श्री. प्रल्हाद शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांवर केलेल्या वक्तवाविषयी असंतोष व्यक्त केला. या वेळी श्री. सांगळे यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यापर्यंत हा असंतोष पोचवून त्यांचा शब्द मागे घेण्याचे आश्‍वासन दिले.

धर्मप्रसाराचे कार्य तळागाळापर्यंत पोचवणे आवश्यक ! - पू. ईश्‍वरबुवा रामदासी

   
      नृसिंहवाडी - ज्या ठिकाणी हिंदु धर्मप्रसारक पोचत नाही, अशा दुर्गम ठिकाणी ख्रिस्ती धर्मप्रसारक जाऊन धर्मप्रसाराचे कार्य करतात. त्यांच्याप्रमाणे हिंदु धर्मप्रसारकांनी आपले कार्य तळागाळापर्यंत पोचवणे आवश्यक आहे. सनातन संस्थेचे कार्य आज दखलपात्र झाल्यानेच काही राज्यकर्त्यांकडून त्याला विरोध होत आहे; मात्र या कार्याला ईश्‍वरी आशीर्वाद असल्याने हे कार्य वाढतच जाणार आहे, असे प्रतिपादन भाळवणी येथील पू. ईश्‍वरबुवा रामदासी उपाख्य दादा महाराज यांनी केले. पू. ईश्‍वरबुवा रामदासी यांनी १४ ऑगस्ट या दिवशी कन्यागत महापर्वाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनास सदिच्छा भेट दिली. त्या वेळी तेे बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण पोळ यांनी हार घालून, तसेच ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती.

मुंबईत, तसेच ठाणे आणि पनवेल रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा चालू !

     मुंबई - वांद्रे, भायखळा, खार, चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनस, ठाणे आणि पनवेल या रेल्वेस्थानकांवर आता मोफत वायफाय सेवा पुरवण्यात येणार आहे. देशातील ४०० निवडक स्थानकांवर २०१८ पर्यंत ही सेवा पुरवण्यात येणार असल्याचे या रेल्वे अर्थसंकल्पात घोषित करण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी चालू झाली आहे. येत्या आठवडाभरात मुंबईतील आणखी सात स्थानकांवर मोफत वायफाय सेवा चालू होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्वातंत्र्यदिनी दिनी ट्विट करून ही माहिती दिली.

छगन भुजबळ यांचा नाशिकमधील आलिशान बंगला जप्त !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या घोटाळ्यांची न 
संपणारी मालिका ! भ्रष्ट नेत्यांचा भरणा असलेल्या 
राष्ट्रवादी काँग्रेसवर जनतेने बंदीची मागणी का करू नये ?
       नाशिक - पैशांच्या अफरातफरीच्या आणि घोटाळ्यांच्या आरोपावरून सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा नाशिकमधील आलिशान बंगला अखेर जप्त करण्यात आला आहे. भुजबळ फार्मची साडेतीन एकर जागा वडिलोपार्जित आहे, तर उर्वरित जागा विकत घेऊन त्यावर त्यांनी आलिशान राजवाडा उभा केला आहे. हे बांधकाम बेहिशोबी पैशांतून बांधल्याचा ईडीचा (अंमलबजावणी संचालनालयाचा) आरोप आहे. काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएम्एल्ए) भुजबळ आणि त्यांचे कुटुंब यांच्यावर ईडीने कारवाई चालू केली आहे. मागील आठवड्यात ४३३ कोटी रुपयांच्या २२ मालमत्तांवर ईडीने टाच आणली होती. त्यात भुजबळ फार्मचाही समावेश आहे. त्यांपैकी ९० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यात आली आहे. त्यात मुंबई, नाशिक आणि नगर येथील मालमत्तांचा समावेश आहे.

फलक प्रसिद्धीकरता

लव्ह जिहाद आता हिंदूंच्या मंदिरांपर्यंत !
     केरळ राज्याच्या एर्नाकुलम् येथील एका मंदिरात महाप्रसादाच्या वेळी काही धर्मांध युवक मंदिरात येत असून तेथील हिंदु मुलींशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लव्ह जिहादचा धोका निर्माण झाला आहे. याचे एक प्रकरणही समोर आले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Ernakulam (Keral) ke ek mandirme kuch dharmandh yuvak kar rahe hain Love Jihad ka prayas. - Hinduo, Apni beheno evam Dharm ki raksha hetu savdhan ho jayo
जागो !
: एरनाकुलम् (केरल) के एक मंदिर में कुछ धर्मांध युवक कर रहे हैं लव जिहाद का प्रयास. - हिन्दुओ, अपनी बहनों एवं धर्म की रक्षा हेतु सावधान हो जाओ !

देवस्थानचा ५० टक्के निधी सरकारला देण्यावरून शिर्डीवासियांचा उद्रेक : वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेला निधी हा धर्मकार्यासाठीच वापरला जावा, अशी सश्रद्ध हिंदूंची मागणी 
आहे. रुग्णसेवेसाठी निधी उपलब्ध करून देणे, हे शासनाचे कर्तव्य आहे ! देवस्थानांच्या निधीचा 
शासन योग्य विनियोग करत नसेल, तर शासनकर्त्यांना जनक्षोभाला सामोरे जावे 
लागल्यास आश्‍चर्य वाटायला नको !
     शिर्डी, १६ ऑगस्ट - राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच श्री साई संस्थानसह राज्यातील अन्य देवस्थानांचा ५० टक्के निधी सरकारने आरोग्याच्या सुविधेसाठी घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्या मागणीच्या विरोधात शिर्डीवासियांमध्ये उद्रेक झाला असून १३ ऑगस्ट या दिवशी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले, तसेच श्री साईंच्या झोळीतून १ रुपयाही घेऊ देणार नाही. त्याचप्रमाणे निधीविषयी जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत विश्‍वस्त मंडळाला शिर्डीत पायही ठेवू देणार नाही, अशी चेतावणीच ग्रामस्थांनी दिली आहे. 
१. गेल्या वर्षभरात २०० कोटी रुपयांचा डल्ला सरकारने देवनिधीवर मारला आहे. शिर्डीतील विकासकामे खोळंबली असून त्याला राज्य सरकारच उत्तरदायी असल्याचा आरोप करण्यात आला.
२. मंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देणारे श्री साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या निषेधाच्याही घोषणा या वेळी देण्यात आल्या.

तृप्ती देसाई, तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे कि स्वैराचार, हे प्रथम ठरवा !

देवगड येथील साप्ताहिक देवदुर्ग, यातील संपादकीय लेख आमच्या वाचकांसाठी देत आहोत.
१. मागील काही दिवस महिलांचे हक्क, समानता, विशेषतः 
मंदिर प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने यांसाठी गाजणे
    मागील काही दिवस महिलांचे हक्क, समानता, विशेषतः मंदिर प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने, न्यायालयीन दाद, धडक मोर्चा यांसाठी गाजले असल्याचे सर्व वाहिन्या आणि तथाकथित समाजसुधारक यांचे म्हणणे आहे. महिलांना स्वातंत्र्य मिळावे, यात कोणाचेही दुमत नाही. पुरुषजातीचे, तर नाहीच नाही. त्यांना माहिती आहे की, आपण स्त्रीविना पूर्णपणे अपूर्ण आहोत. त्यामुळे या आंदोलनामुळे कोणत्याही पुरुषाचा अहंकार दुखावला, ना अपमान झाला.

इंदापूर (जिल्हा पुणे) येथे पथकर मागणार्‍या कर्मचार्‍याला पोलीस निरीक्षकाकडून मारहाण

पोलिसाची गुंडगिरी !
       इंदापूर - येथील पथकर नाक्यावर एका पोलीस निरीक्षकाच्या खाजगी गाडीसाठी तेथे असलेल्या कर्मचार्‍याने पथकर मागितला. या वेळी संतप्त पोलीस निरीक्षकाने कर्मचार्‍यावर बंदूक रोखून त्याला पुष्कळ मारहाण केली. (कायदा-सुव्यवस्था गुंडाळून गुंडाप्रमाणे वर्तणूक करणार्‍या पोलिसांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी ! - संपादक) पोलीस निरीक्षकासमवेत असलेल्या अन्य लोकांनीही कर्मचार्‍याला मारहाण केली. ही घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील इंदापूर जवळच्या सरडेवाडी पथकर नाका येथे १४ ऑगस्ट या दिवशी घडली. या प्रकरणी कर्मचार्‍याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.

१८ ऑगस्ट या दिवशीचे छायाकल्प चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही !

     श्रावण पौर्णिमा म्हणजे गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६ या दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम पाळू नयेत.
ग्रहण दिसणारे प्रदेश आणि वेळ - उत्तर आणि दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, ऑस्ट्रेलिया, तसेच रशियाचा अतीपूर्वेकडील भाग
ग्रहण आरंभ : १४.५४ मि.
ग्रहण मध्य : १५.१३ मि.
ग्रहण समाप्ती : १५.३० मि.
(संदर्भ : दाते पंचाग)
- ज्योतिष फलविशारद (सौ.) प्राजक्ता जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
हिंदु धर्मातील संस्कार आणि परंपरा यांविषयी मार्गदर्शन करणारा सनातनचा ग्रंथ !
सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र
या ग्रंथात वाचा...
  •  सण धर्मशास्त्रानुसारच का साजरे करावेत ?
  •  वर्षा, शरद आणि हेमंत या ऋतूंत सणवार जास्त का असतात ?
  •  श्रावण पौर्णिमेला समुद्राचे पूजन का करतात ?
  •  रक्षाबंधनाचा इतिहास आणि महत्त्व काय ?
  •  दसरा, दीपावली आदी सणांचे महत्त्व काय ?
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुलाच्या संदर्भात दिसून आलेला प्रशासनाचा गलथानपणा !

कु. कल्याणी गांगण
     मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेल्याचे वृत्त वाचल्यावर मनात पुढील विचार आले.
१. अधिकार्‍याने सावित्री पूलाची खरच पाहणी 
केली होती का ?, अशी शंका येणे 
     ब्रिटिशांनी त्यांच्या काळात बांधलेल्या पुलाची क्षमता संपत आल्याचे पत्र शासनाला काही वर्षे आधीच पाठवले होते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी शासनाला वस्तुस्थितीची जाणीव करून देऊनही शासनाने त्या पुलाकडे पूर्ण दुर्लक्ष करून नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला, असेच म्हणावे लागेल. एक वेळ शासनाकडे नोंदी नाहीत किंवा त्या पाहिल्या नाहीत, या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, तरी प्रत्यक्षात मे २०१६ मध्ये पुलाची पाहणी करून पूल सुस्थितीत आहे, असा अहवाल सादर झाला होता.त्या अधिकार्‍याने खरेच तो पूल प्रत्यक्ष जाऊन पाहिला होता कि डोळे मिटून तो पूल चांगला आहे, असा अहवाल सादर केला होता ? अधिकार्‍याने पुलाची सद्य:स्थिती सरकारला सांगितली नाही, असेच म्हणावे लागेल. सरकारनेही ब्रिटिशांनी पाठवलेल्या पत्राला कचरापेटी दाखवली.

कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण सार्थ करणारे जन्महिंदू !


सौ. शालिनी मराठे
      ईश्‍वराने धर्मसंस्थापनेसाठी सनातन संस्थेची स्थापना केली आहे. कद्रूच्या दास्यातून आपल्या मातेची सुटका करण्यासाठी देवांशी झुंजून ज्याने अमृत आणले, त्या वैनतेयाप्रमाणे (गरुडाप्रमाणे) आम्ही सनातनचे साधक भगवान श्रीविष्णूचे दास आहोत. (संदर्भ : गाऊ त्यांना आरती, कवी बा.भ. बोरकर) पृथ्वीवर सनातन धर्म राज्य आणणे, हे आमचे आद्यकर्तव्य अन् साधना आहे. हे कर्म करत असतांना आमचे जे काय व्हायचे असेल (सनातन संस्थेवर बंदी येणे किंवा न येणे) ते ईश्‍वरेच्छेनेच होईल. त्यात आमचे कल्याणच आहे, असा आमचा भाव आहे. देवा, सनातनवर बंदीचे सावट असूनही तू आम्हाला स्थिर आणि आनंदात ठेवले आहेस. या तुझ्या कृपेसाठी आम्हा साधकांची तुझ्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवा ! - पू. संभाजी भिडेगुरुजी

पू. संभाजी भिडेगुरुजी
      दापोली (रत्नागिरी) - आज मातृभाषा, भूमी, धर्म, मंदिरे, गोमाता, स्त्री, संस्कृती यांवर आक्रमणे होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही अशीच आक्रमणे होत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून ही सर्व आक्रमणे मोडून काढली. आपण शिवजयंती साजरी करतो; मात्र हिंदूंवर होणार्‍या आघातांकडे दुर्लक्ष करतो. छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे होते, असे म्हणणार्‍या भाडोत्र्यांचा आज सुळसुळाट झाला आहे. सर्वधर्मसमभाव हा नपुंसक विचार आहे. धर्माचे अधिष्ठान ठेवून देव, देश, धर्म यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर कार्य केले. देशाचे तुकडे धर्माच्या आधारावर झाले असतांनाही आपण देशाचे हिंदुस्थान हे नाव का स्वीकारले नाही? हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवायला हवा, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी केले.

शहाणपण देगा देवा !

     जसा कष्टाळूपणा हा जपानी नागरिकांचा गुण आहे, तसा पाट्याटाकूपणा आणि दायित्वशून्यता हा काही भारतियांचा अवगुण आहे. हे अवगुण विविध स्तरांवर अनुभवायला येतात; पण दुर्दैव म्हणजे ही असुविधाजनक स्थिती पालटण्यासाठी विशेष प्रयत्न होतांना आढळून येत नाहीत.

मुंबई आणि नवी मुंबई जोडणार्‍या जुन्या पुलास तडे गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद !

       मुंबई - मुंबई आणि नवी मुंबईस जोडणार्‍या वाशी खाडीवरील जुन्या पुलास तडे गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
       सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने पुलाची पाहणी केली. अवजड वाहन गेल्याने पुलावरील रस्त्यास मोठी भेग पडली आहे. तरीदेखील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. तीन मासांपूर्वी या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. त्यानंतर लगेच पूल नादुरुस्त झाल्याविषयी आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - श्रावण शुक्ल पक्ष चतुर्दशी (१७.८.२०१६) दुपारी ४.२७ वाजता
समाप्ती - श्रावण पौर्णिमा (१८.८.२०१६) सकाळी ११.५३ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.

भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य- भारतियांचे निसर्गाशी असलेले स्नेहसंबंध !

कु. मधुरा भोसले
      संपूर्ण मानवजातीला निसर्गाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आले आहे. भारतीय वृक्ष, लता, वेली, पशु आणि पक्षी यांचे पूजन करतात. त्याविषयी पाश्‍चात्त्य विचारवंतांना वाटते, निसर्गाचे प्रचंड सामर्थ्य पाहून भारतीय पापभीरू वृत्तीने त्यांचे पूजन करतात. भारतियांनी निसर्गाचे सामर्थ्य पुढील ३ स्तरांवर मान्य केले आहे.
१. निसर्गातही देवतेचे दर्शन झाल्याने कृतज्ञताभावाने 
निसर्गाचे पूजन करणे
     भारतीय लोकांत असणार्‍या भोळ्या भावामुळे त्यांना निसर्गातही देवतेचे दर्शन झाले. त्यामुळे भारतीय निसर्गरूपी देवतेच्या चरणी आदरभावाने नतमस्तक झाले आहेत आणि निसर्गाचे माहात्म्य स्वीकारून कृतज्ञताभावाने निसर्गाचे पूजन करत आहेत.

वस्तू आणि सेवा कर अर्थात् जीएस्टी म्हणजे काय ?

      जीएस्टीवरून सध्या सर्वत्र चर्चा चालू आहेत; परंतु जनतेच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पाडणार्‍या या कायद्याविषयी जनतेमध्ये उत्सुकता आहे. या कायद्यामुळे आपल्याला सरकारकडे भराव्या लागणार्‍या करामध्ये नेमका काय फरक पडेल, हे पुढील लेखाद्वारे समजू शकेल.
१. जीएस्टीच्या प्रवासावर दृष्टीक्षेप !
      वर्ष २००६ मध्ये प्रथमच उल्लेख करण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर अर्थात् जीएस्टी (गुड्स अ‍ॅण्ड सर्विसेस टॅक्स) हा विषय समोर आला होता. तथापि विविध कारणास्तव गेल्या १० वर्षांमध्ये त्यास कायद्याच्या रूपात मूर्त स्वरूप प्राप्त होऊ शकले नव्हते. ऑगस्ट २०१६ मात्र या विधेयकासाठी मैलाचा दगड ठरला. राज्यसभेने त्यास दिलेल्या स्वीकृतीमुळे आणि लोकसभेनेही त्याचे समर्थन केल्याने पुढील वर्षी १ एप्रिलपासून तो लागू होण्याच्या शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात असलेल्या या विधेयकाला आता देशातील २९ पैकी अर्ध्या राज्यांनी अर्थात् १५ राज्यांनी स्वीकृती देणे आवश्यक आहे. राजकीय जाणकारांनुसार, हे काही अवघड कार्य नाही. नुकतेच या विधेयकास अनुमोदन देऊन आसाम राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर २२ ऑगस्टला छत्तीसगड शासन विधानसभेचे विशेष सत्र बोलावून सदर विधेयकावर चर्चा घडवून आणणार आहे. १५ राज्यांनी यावर स्वीकृती दिल्यावर राष्ट्रपती सदर विधेयकावर स्वाक्षरी करतील. ही प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होऊन यावर दुसर्‍यांदा चर्चा होईल. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जीएस्टीचे नियम बनवले जातील. हे सर्व सुरळित पार पडले, तर १ एप्रिल २०१७ ला जीएस्टी देशभर लागू होईल.

सरकारकडून असे नकारात्मक उत्तर अपेक्षित नाही !

     गोव्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सोपोकर वसुलीची समस्या आहे. सर्व नगरपालिकांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी मगोचे आमदार लवू मामलेदार यांनी विधानसभेत केली. सर्व नगरपालिकांच्या घोटाळ्यांची चौकशी करणे शक्य नाही. नगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटणे आवश्यक आहे, असे उत्तर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिले

गुप्तचर विभागाची कार्यक्षमता !

      कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या चांदीच्या रथामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी सीआयडीचे विशेष अन्वेषण पथक नेमले; मात्र सीआयडीची चौकशी चालू होऊन सव्वा वर्ष उलटले, तरी श्री महालक्ष्मीदेवीच्या रथात शेकडो किलो चांदीचा घोटाळा करणारे कारागीर संजय साडविलकर आणि देवस्थानचे पदाधिकारी यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. दोषींवर गुन्हे देखील प्रविष्ट झालेले नाहीत.
     राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे. - समर्थ रामदास स्वामी (छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु) (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. सरकारी खर्चाने अरबी भाषेची उन्नती केली जाते; पण संस्कृतची नाही. अरबी भाषा संस्कृतपेक्षा जास्त राष्ट्रीय आहे का ?
२. आसाममधील आय.एम्.टी.डी. कायद्याने बांगलादेशी मुसलमानांना हिंदुस्थानात येऊन रहावयाचे आणि भारतीय नागरिक होण्याचे अधिकार दिले आहेत; परंतु भारतीय नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये कायमचे राहू शकत नाहीत, असा दुजाभाव का ?
३. इस्लाम हा जर शांतताप्रिय धर्म आहे, तर कुराण आणि बंदुकांचा वापर या दोन्ही गोष्टी शिक्षण संस्थांमध्ये का शिकवतात ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस


स्वातंत्र्यदिनानिमित्त काढलेल्या फेरीच्या वेळी काही युवकांकडून सनातन आश्रमासमोरून सनातन बॉम्ब असे ओरडत जाण्याचा अश्‍लाघ्य प्रकार

सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि 
आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे २६४ वा दिवस ! 
     स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्टला गोव्यात ठिकठिकाणी फेर्‍या काढण्यात आल्या आणि भारतमाता की जय, वन्दे मातरम् अशा घोषणाही देण्यात आल्या. हातात तिरंगा झेंडा घेऊन दुचाकी आणि चारचाकी यांवरून काढलेल्या फेर्‍यांच्या वेळी युवकांनी आपण देशप्रेमी असल्याचे दाखवतांनाच काही अतीउत्साही तरुण मात्र या फेरीच्या नावाखाली मौजमजा करतांना दिसत होते. अशीच एक फेरी येथील सनातन आश्रमासमोरून जात असतांना त्यातील काही सनातनद्वेषी युवक सनातन बॉम्ब असेही ओरडत गेले. 
शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक करणे 
या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !
     ज्यांना ध्येयाविषयी दृढ आस्था आहे, असे मूठभर संकल्पनिष्ठ लोक इतिहासाचा प्रवाह पालटू शकतात. - दीपक सिंह (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

प्रीतीचे मूर्तीमंत प्रतीक असणार्‍या आणि साधकांना आधार देणार्‍या पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. माई) !

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक
     प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. माई) यांचा नारळी पौर्णिमा (१७.८.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. माई) यांना सनातन परिवाराकडून 
वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! 
१. प्रेमभाव 
१ अ. आजारपणात साधिकेची काळजी घेणे
१ अ १. साधिकेला औषधे घेण्याची वेळोवेळी आठवण करून देणे आणि प्रकृतीकडे लक्ष द्यायला सांगणे : गौतमारण्यात जाण्यापूर्वी मला कांजिण्या आल्या होत्या. त्यामुळे मला अशक्तपणा जाणवत होता; म्हणून मी चिकित्सालयात जाऊन आले. तिथून आल्यावर त्यांनी आधुनिक वैद्य काय म्हणाले ?, हे विचारून घेतले, तसेच औषधे घेण्यासाठी त्या वेळोवेळी मला स्मरण करून द्यायच्या. त्या म्हणायच्या, एक-दोन सेवा राहिल्या, तरी चालतील. तू तुझ्या प्रकृतीकडे लक्ष दे. मी तुम्हाला साहाय्य करू शकत नाही, असे मी त्यांना म्हणायचे, तेव्हा त्या मला म्हणायच्या, तुला जेवढे जमते, तेवढे तू करतेच ना ? त्या नेहमी मला अशाच समजून घेतात.

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांनी व्यक्त केलेली नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी कृतज्ञता !

      अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्रीमत् नारायण अवतार परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आम्हाला गुरुस्थानी लाभले आहेत. वर्ष २००० मध्ये त्यांची आमच्यावर कृपा झाली आणि आमच्या जीवनात त्यांचे आगमन झाले. तेव्हापासून क्षणोक्षणी ते आम्हा वृद्ध दांपत्याची सर्वतोपरी काळजी घेत आहेत. या लेखात त्यांच्याविषयी कृतज्ञतापूर्वक लिखाण शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मला सामर्थ्य प्रदान करावे, हीच त्यांच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.
१. प.पू. दास महाराज समाजकल्याणासाठी विविध ठिकाणी पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ करत असणे 
      प.पू. दास महाराज आणि मी पानवळ-बांदा येथील जंगलात एकांतात झोपडीत राहून तिथेच असलेल्या श्रीरामाच्या मंदिरात श्रीरामाची उपासना करत होतो. महाराजांना भगवान श्रीधर स्वामींचा अनुग्रह झाल्यामुळे त्यांची उपासना अव्याहतपणे चालू होती. ते गुरुआज्ञेने समाजकल्याणासाठी ठिकठिकाणी पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ करत असत.

पुणे येथील दाते कुटुंबियांनी प.पू. डॉक्टरांच्या सहवासात अनुभवलेली त्यांची अनमोल प्रीती आणि संस्मरणीय स्मृतींची आनंददायी शिदोरी !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
         वर्ष १९९५ पासून पुण्यातील पू. दातेआजी, त्यांचे दोन्ही सुपुत्र आणि कुटुंबीय यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाचा लाभ ते त्यांच्या घरी राहिल्यामुळे मिळाला. प.पू. डॉक्टरांच्या अनमोल सत्संगात त्यांना पदोपदी शिकायला मिळाले, तसेच अनेक अनुभूतीही आल्या. कौटुंबिक अडचणीच्या वेळी साहाय्य करणार्‍या गुरुमाऊलीची दाते कुटुंबियांनी बहुमूल्य प्रीती अनुभवली. सहजसोप्या पद्धतीने कृतीतून शिकवणार्‍या आणि सतत आनंदावस्थेत ठेवणार्‍या परात्पर गुरूंच्या सौ. ज्योती दाते, त्यांचे दीर श्री. निरंजन दाते आणि कुटुंबीय यांनी जपलेल्या अविस्मरणीय स्मृतींचा उर्वरित भाग त्यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त येथे देत आहोत.

उपजतच सात्त्विकतेची ओढ आणि देवाची आवड असलेला, शांत वृत्तीचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिंचवड, पुणे येथील चि. यज्ञेश गिरीश गुडी (वय १ वर्ष) !

       चि. यज्ञेश गिरीष गुडी याचा श्रावण शुक्ल पक्ष दशमी (१३.८.२०१६) या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्याच्या आई-वडिलांना आणि नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. जन्मापूर्वी 
चि. यज्ञेश गुडी
१ अ. बाळ झाल्यावर साधना होणार नाही, असा नकारात्मक विचार येणे आणि नाडी भविष्यात मूल होणार असल्याचे समजल्यावर मन सकारात्मक होणे : आपल्याला बाळ झाले, तर त्याच्यात अडकल्यामुळे माझी साधना होणार नाही; म्हणून बाळ नको, असा विचार माझ्या मनात सतत येत होता. त्याच काळात यजमानांचे नाडीभविष्य पाहिले. नाडीभविष्यात आम्हाला मूल होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर माझे मुलासंदर्भातील विचार सकारात्मक होऊ लागले.
१ आ. मूल होणे, हे देवाचेच नियोजन असून तोच मनाची सिद्धता करून घेत असल्याचे जाणवणे : नाडीभविष्य ऐकल्यावर मूल होणे हे देवाचेच नियोजन आहे आणि तोच सर्व प्रकारे काळजी घेत आहे, असे वाटून पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि देवाने माझी मानसिक सिद्धता करून घेतली. त्या वेळी माझी देवाला प्रार्थना झाली, हे श्रीकृष्णा, आम्हाला होणारे बाळ हे आमचे नसून तुझेच आहे. तुझा एक अंश आमच्या पोटी जन्म घेत आहे. त्याचा तूच सांभाळ करून घे. सेवा म्हणून आमच्याकडून सगळ्या कृती करून घे.

नियतकालिकांचे वाचक होण्यास इच्छुक जिज्ञासूंच्या सोयीसाठी ऑनलाईन वर्गणीदार होण्याच्या नव्या योजनेचा आरंभ !

वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
१. सनातन प्रभातला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत असणे
     जनसामान्यांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमाची ज्योत प्रज्वलित व्हावी, या एकमेव उदात्त हेतूने नियतकालिक सनातन प्रभात कार्यरत आहे. मराठीसह कन्नड, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या भाषांत प्रसिद्ध होणार्‍या या नियतकालिकांना वाचकांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. अनेक जण वर्गणीदार होण्यास उत्सुक असल्याचे आढळले आहे; परंतु मनुष्यबळाच्या अभावी साधक त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाहीत.
२. ऑनलाईन वर्गणीदार होण्याच्या नव्या सुविधेचा सर्व जिज्ञासूंनी लाभ घ्यावा !
     अशा इच्छुकांना नियतकालिकांचे वर्गणीदार सुलभतेने आणि शीघ्रतेने होता यावे, यासाठी ऑनलाईन वर्गणीदार होण्याच्या नव्या योजनेला नुकताच आरंभ करण्यात आला आहे. या योजनेद्वारे दैनिक सनातन प्रभातच्या व्यतिरिक्त अन्य नियतकालिकांचे (साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक यांचे) वर्गणीदार होता येईल. www.sanatanprabhat.org/subscribe या मार्गिकेला भेट देऊन जिज्ञासू वरील योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळे राष्ट्र-धर्म कार्य करणार्‍या साधकांचा जिज्ञासूंना संपर्क करण्यातील वेळ तर वाचेलच; पण त्याचबरोबर जिज्ञासूंना स्वतःच्या सोयीनुसार ऑनलाईन वर्गणीदार अर्ज भरता येऊन त्यांना लवकरात लवकर अंक चालू करता येईल.

भद्राकाळानंतरच राखी बांधणे योग्य !

     ज्याप्रमाणे शनीची क्रूर दृष्टी हानी करते, तसेच शनीची बहीण भद्रा हिचा प्रभावही हानीकारक असतो. रावणाने भद्राकाळात शूर्पणखेकडून राखी बांधून घेतली आणि त्याच वर्षी त्याचा त्याच्या कुळासहित नाश झाला. भद्रेच्या कुदृष्टीमुळे कुळाची हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे भद्राकाळात राखी बांधून घेऊ नये. (संदर्भ : अज्ञात)
(या वर्षी रक्षाबंधन १८.८.२०१६ या दिवशी आहे. त्या दिवशी भद्राकाळ नाही. - सौ. प्राजक्ता जोशी)

धर्मप्रेमींना सनातन प्रभात वाचण्यास प्रवृत्त करून राष्ट्र आणि धर्म कार्यार्थ कृतीशील करा !

सर्वत्रच्या धर्मशिक्षणवर्ग सेवकांसाठी सूचना
१. धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींमध्ये सनातन प्रभातविषयी जागृती करा !
     धर्मशिक्षणवर्गात वर्गसेवकांनी सनातन प्रभातचे महत्त्व सांगणारा विषय मांडून धर्मप्रेमींना वाचक होण्यास प्रवृत्त करावे. आर्थिक स्थिती चांगली नसणार्‍या जिज्ञासूला वाचनासाठी अंक देण्याची विनंती वाचक असलेल्या धर्मप्रेमींना करावी. धर्मप्रेमींना त्यांचे नातेवाईक, स्नेही यांनाही वाचक बनवण्यास प्रवृत्त करायला सांगावे. वर्गणीदार होण्याची धर्मप्रेमींची इच्छा नसल्यास त्यांना अती आग्रह करू नये.
२. धर्मप्रेमींनी वाचक होण्याची इच्छा दर्शवल्यास पुढील सूत्रे लक्षात घ्या !
     दैनिक वितरणाची व्यवस्था असल्यास दैनिक चालू करण्यास प्राधान्य द्यावे. तसे शक्य नसल्यास साप्ताहिक, पाक्षिक अथवा मासिक सनातन प्रभात चालू करू शकतो. धर्मप्रेमींच्या भाषेचा विचार करूनच नियतकालिक चालू करणे अपेक्षित आहे. वितरणाची व्यवस्था नसल्यास धर्मप्रेमींना पोस्टाद्वारे अंक पाठवता येईल.
     वाचक होण्यास इच्छुक असलेले धर्मप्रेमी www.sanatanprabhat.org/subscribe या मार्गिकेला भेट देऊन ऑनलाईन वर्गणीदार होण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. ऑनलाईन वर्गणीदार अर्ज भरणे शक्य नसल्यास स्थानिक साधकांनी त्यांना संपर्क करावा. ही सुविधा दैनिक वगळून अन्य नियतकालिकांसाठी आहे.
     कार्यकर्त्यांनो, राष्ट्र-धर्म यांसह अध्यात्माविषयीही मार्गदर्शन करणारे हे नियतकालिक धर्मप्रेमींचे साधनापथावरील दिशादर्शक आहे, हे लक्षात घेऊन अंक वाचनासाठी त्यांना अवश्य प्रवृत्त करा !
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंनी दिलेले नाव
लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, तर बाकीची नावे सगुणातील असतात.
भावार्थ : लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, यातील निर्गुणातील म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या लक्षणांवरून किंवा संप्रदायाप्रमाणे गुरूंनी शिष्याचे नाव ठेवलेले असते. याउलट आई-वडील सगुणातील लक्षणांवरून किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार मुलाचे नाव ठेवतात. गुरु मिळाले असे म्हणू नये. गुरु दिले गेले, असे म्हटले पाहिजे. ज्याचा जो गुरु (नाम), तो त्याला आम्ही दिला. तोच तारील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
श्रद्धा म्हणजे काय ?, हे ज्ञात नसलेले, म्हणे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा आनंद 
      आनंद हा कोणताही प्रसंग, वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी निगडित नसावा. ज्या गोष्टीमुळे दुःख होते वा होईल, असा कोणताही आनंद नसावा. आपला आनंद आपल्यात मिळावा, हा विचार प्रत्येकाने सांभाळून ठेवावा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत शांती ढळणार नाही. तुझे आहे तुजपाशी या संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडित असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. हे प्रगत होऊ पहाणार्‍या साधकांना परत परत सांगू इच्छितो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)नीती आयोग नावाचा पांढरा हत्ती !

संपादकीय 
      भारतीय प्रशासनामध्ये अनेक असे विभाग आहेत की, ज्यांचे केवळ नावच कधीतरी सर्वसामान्यांनी ऐकलेले असते. हे विभाग प्रत्यक्षात काय काम करतात आणि त्यांचा प्रत्यक्ष लाभ काय, हे कधी विशेषकरून सामान्यांच्या समोरही येत नाही. अशांपैकीच भारत शासनाचा नीती आयोग असा एक विभाग आहे. सध्या हा विभाग विशेषकरून चर्चेत आहे; कारण या विभागात सध्या तज्ञ सल्लागारांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. यातील नेमणुका केल्या जाणार्‍यांचे मासिक वेतन हे किमान अडीच लक्ष रुपये असेल. नेमणुका होणारे हे तज्ञ पूर्णकालीन नाही, तर काही काळच या विभागासाठी देणार आहेत. या तज्ञांना मिळणारे वेतन हे पंतप्रधानांच्या सल्लागारापेक्षाही अधिक आहे. भारतात अगोदरच पुष्कळ मोठ्या प्रमाणात प्रशासनावर व्यय होतो. त्यात नुकत्याच लागू केलेल्या ७ व्या वेतन आयोगाचा बोजाही भारतावर आहे. त्यामुळे अशा प्रकारे केवळ सल्लागारांवर कोट्यवधी रुपये व्यय होणे, ही एक प्रकारे देशाच्या तिजोरीचीच लूट आहे. हा पैसा शेवटी जनतेचा असल्याने जनतेनेही प्रत्येक ठिकाणी शासनकर्त्यांना जाब विचारणे चालू केले पाहिजे, तर त्यांच्याकडून घडणार्‍या अवास्तव गोष्टींना आळा बसेल !

रिओ ऑलिम्पिक आणि भारतीय !

संपादकीय
     गेले अनेक दिवस सर्व प्रसिद्धीमाध्यमांत रिओ ऑलिम्पिकची चर्चा चालू आहे. ऑलिंपिकला जाण्यापूर्वी भारतियांनी सर्व स्तरांतून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. इतकेच काय, तर अगदी देशाच्या पंतप्रधानांनीही या सर्वांना विशेष शुभेच्छा दिल्या; मात्र १२५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशाला ऑलिम्पिक चालू झाल्यापासून एकही सुवर्णपदक मिळू नये, ही निश्‍चितच भारतीय नागरिक आणि शासनकर्ते यांच्यासाठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकीकडे फिजी, उजबेकीस्तान, कजाकिस्तान यांसारखे देश, जे भारतातील एका राज्याएवढे किंवा काही देश तर एका जिल्ह्याएवढेही नाहीत, ते पदकांची लयलूट करत आहेत. दुसरीकडे भारतीय खेळाडू बहुदा रिकाम्या हातानेच परत येणार, असे दिसत आहे. यंदाच्या ऑलिम्पिकसाठी आपण सर्वाधिक खेळाडू पाठवले आहेत आणि खेळाडूंवर पाण्यासारखे पैसे खर्च केले आहेत. असे असतांना आपले अनेक संघ आणि खेळाडू एक-दोन फेर्‍याही पुढे सरकू शकलेले नाहीत. त्यामुळे ऑलिम्पिकला जाऊन भारतीय खेळाडूंनी देशासाठी काय मिळवले, याचे उत्तर कोणाकडेही नाही. जिम्नॅस्टिकसारख्या खेळामंध्ये तर आपले कोणी नाव घ्यावे, अशी स्थिती नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn