Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।कोटी कोटी प्रणाम !

योगी अरविंद यांची आज जयंती (दिनांकानुसार)

जिहादी आतंकवाद्यांकडून बुढा अमरनाथ यात्रेवरील आक्रमणात १४ शिवभक्त घायाळ !

 • ही स्थिती देशात आणि राज्यात असणारे कोणतेही सरकार पालटू शकत नसल्याने आता हिंदु राष्ट्राची म्हणजेच सनातन धर्म राज्याची स्थापना करण्याला पर्याय नाही !
 • काँग्रेसच्या राज्यात झाले नाही, ते पीडीपी-भाजपच्या राज्यात झालेले आक्रमण !
    पुंछ - येथील बुढा अमरनाथ यात्रेवर १३ अ‍ॅगस्टला सायंकाळी जिहादी आतंकवाद्यांनी ग्रेनेड फेकून केलेल्या आक्रमणात १४ हून अधिक शिवभक्त घायाळ झाले. येथील दशनामी आखाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ हे ग्रेनेड फेकण्यात आले. घायाळांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जम्मू येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर येथे सुरक्षादलांकडून शोध मोहीम चालवण्यात येत आहे. बुढा अमरनाथ यात्रा विश्‍व हिंदु परिषदेककडून प्रतिवर्षी आयोजित केली जाते. या यात्रेत देशभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी होतात.
     घायाळांमध्ये उषा देवी, हजुरी लाल, अशोक कुमार, पंकज शर्मा, हिरदेश सिंह, रोहित कुमार, संदीप सिंह, विनाशा देवी, रमेश कुमार बाली आदी शिवभक्तांचा समावेश आहे.
     काही दिवसांपूर्वी येथे आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदूंना काश्मीर सोडण्याची धमकी देणारी भीत्तीपत्रके लावली होती.

हिंदु जनजागृती समितीमुळेच शासनाला राष्ट्रध्वजाविषयीचा अध्यादेश काढावा लागला ! - श्रीमती अंजली पवार, तहसीलदार

     ठाणे - हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांमुळे शासनाला राष्ट्रध्वजाविषयीचा अध्यादेश काढावा लागला. समितीचे कार्य चांगले आहे. समितीने सिद्ध केलेली राष्ट्रध्वजाचा मान राखा ही चलचित्रफीत आम्ही पुढेही दाखवू, असे प्रतिपादन तहसीलदार करमणूककर अधिकारी श्रीमती अंजली पवार यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा त्या बोलत होत्या. या वेळी त्यांना राष्ट्रध्वजाचा मान राखा ही ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली. राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती फरोग मुकादम यांना देण्यात आले.
     या वेळी समितीच्या सौ. सुनीता पाटील, तसेच धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी सौ. अंजली रायकर, सौ. सीमा कापडे आणि सनातन संस्थेचे श्री. कोंडिबा जाधव उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे, असे सांगून श्रीमती फरोग मुकादम यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून मुंबईतील ४८० शाळांमध्ये प्रबोधन !

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !
     मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून येणार्‍या प्रक्षेपणामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा मान राखा हे व्याख्यान, तसेच हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भातील ध्वनीचित्रफीत मुंबईतील महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये दाखवण्यात आली.
     मुंबईतील चार भाषांच्या (मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू) शाळांतील १ लाखांहून अधिक विद्यार्थांपर्यंत हा विषय पोचवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना क्रांतीकारकांची माहिती, तसेच स्वातंत्र्यदिन आदर्शरित्या कशाप्रकारे साजरा करावा ?, राष्ट्रधवजाचा मान कशा प्रकारे राखला पाहिजे ? याविषयीचे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कु. वर्षा जेवळे यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे आणि त्याच्या सहकार्‍यांचे या उपक्रमासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य लाभले. मुंबईच्या महापौर सौ. स्नेहल आंबेकर यांना जेव्हा समितीचे शिष्टमंडळ भेटले, त्या वेळी त्यांनी त्वरित संबंधित उपायुक्त श्री. रणजित ढाकणे, शिक्षण अधिकारी श्री. महेश पालकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांना सहकार्य करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे महापौरांनी स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, या आशयाचे आवाहनपत्रक काढले. वरळीच्या शिवसेना नगरसेविका आणि बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा सौ. हेमांगी वरळीकर यांचेही सहकार्य लाभले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वक्ता, प्रवक्ता यांच्यासाठीच्या मार्गदर्शन शिबिराला प्रारंभ !

 • प्रसिद्धीमाध्यमांतील हिंदूविरोधी प्रचाराच्या वैचारिक सूत्रांचा प्रतिवाद चातुर्याने करा ! 
 • मान्यवरांचे अमूल्य मार्गदर्शन
       रामनाथी, १४ ऑगस्ट (वार्ता.) - विदेशी शक्तींचे नियंत्रण असलेली प्रसिद्धीमाध्यमे हिंदु धर्माला हीन लेखण्यासाठी कार्यक्रमात हिंदु धर्माला दुय्यम लेखत असतात. बहुतांश वेळा धर्मांचा तौलनिक अभ्यास नसलेले प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी मूर्खपणाने, अज्ञानापोटी किंवा जाणीवपूर्वक हिंदु धर्माला हीन लेखत असतात. त्यांच्याशी शांतपणे आणि चातुर्याने कसा संवाद साधायचा ? आपल्या धर्माचे महत्त्व समाजाला कसे पटवून दिले पाहिजे ? प्रश्‍नांची उत्तरे चाणाक्षपणे कशी द्यायची ? प्रतिप्रश्‍न कसे उपस्थित करायचे आदी अमूल्य मार्गदर्शन हिंदु धर्म, संस्कृती आणि इतिहास यांचे गाढे अभ्यासक प्रा. रामेश्‍वर मिश्र आणि अर्थशास्त्रतज्ञ प्रा. कुसुमलता केडिया यांनी केले. धर्मपाल शोधपीठ, राजसूय आणि संतकृपा प्रतिष्ठान यांच्या वतीने सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात देशभरातील हिंदुत्वनिष्ठ प्रवक्ता आणि वक्ते यांच्यासाठी आयोजित ३ दिवसीय मार्गदर्शन शिबिराला १३ ऑगस्ट या दिवशी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला. शिबिराचे सूत्रसंचालन श्री. अभिजीत देशमुख यांनी केले.

सर्व शासकीय कार्यालयांनी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नये ! - केंद्रीय गृहमंत्रालयाची सूचना

हिंदु जनजागृती समितीच्या गेल्या १४ वर्षांच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळीचे यश !
     नवी देहली - ६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व शासकीय कार्यालयांना प्लास्टिकचे झेंडे न वापरण्याची सूचना केली आहे. भारतीय ध्वजसंहिता २००२ आणि राष्ट्रीय प्रतिकांच्या अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार ही सूचना करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने सर्व माध्यमांना याविषयी जनजागृती करण्याचे आवाहनही केले आहे.
     स्वातंत्र्यदिन हा भारताचा राष्ट्रीय सण असून या दिवशी तिरंगा फेकणे किंवा त्याची हेळसांड करणे कायद्याने गुन्हा आहे. तिरंग्याचा सन्मान केला पाहिजे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत सन्मानपूर्वक विल्हेवाट लावली पाहिजे. त्यामुळे प्लास्टिकपासून बनलेले झेंडे न वापरण्याविषयी माध्यमांनी जनजागृती करावी, असे आवाहनही गृह मंत्रालयाने केले आहे. प्रतिवर्षी प्लास्टिकचे लाखो झेंडे रस्त्यावर टाकले जातात. यामुळे राष्ट्रीय बोधचिन्हाचा अवमान होतो. यावर उपाय म्हणून गृह मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर मार्गदर्शन !

   
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. जैस्वाल
   ठाणे - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे येथील विविध शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरल्याने राष्ट्रध्वजाचा कशाप्रकारे अवमान होतो हे सांगून प्लास्टिकचे ध्वज न वापरण्याविषयी प्रबोधन करण्यात आले.

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या विरुद्धची तक्रार उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने फेटाळली !

आयुर्वेदीय गर्भसंस्कार पुस्तक कायद्याच्या चौकटीतच ! - न्यायालयाचा निर्वाळा
या प्रकरणी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांची अपकीर्ती करणारे त्यांची जाहीर क्षमा मागतील का ?
     पुणे - गर्भसंस्कार केल्याने मुलगा होईल, असा दावा आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकात कुठेही केलेला नाही. लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा या पुस्तकात भंग झालेला नाही. तसेच त्या पुस्तकातील संदर्भ हे प्राचीन परंपरा असलेल्या आयुर्वेदातील चरक आणि सुश्रुत यांच्या ग्रंथातून घेण्यात आलेले आहेत. त्या संदर्भांचा लिंगनिदानाशी काडीमात्रही संबंध नाही. त्यामुळे आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकातील लिखाणाच्या अनुषंगाने तांबे यांच्या विरोधात प्रविष्ट केलेली तक्रार मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती ए.व्ही. निरगुडे आणि न्यायमूर्ती व्ही.एल्. अचलिया यांनी फेटाळून लावली आहे. आपल्या पुस्तकातील प्रतिपादनाचा हेतू पुत्रप्राप्ती हा नसून सुदृढ अपत्यप्राप्ती हा आहे, असे तांबे यांच्या वतीने अधिवक्ता राजेंद्र रघुवंशी आणि अधिवक्ता ज्ञानेश्‍वर बागुल यांनी खंडपिठासमोर मांडले. या युक्तीवादानंतर संगमनेर येथील न्यायालयात प्रविष्ट असलेली तक्रार रहित करण्याचे आदेश खंडपिठाने दिले.
     ही तक्रार फेटाळतांना न्यायालयाने म्हटले आहे की, आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकातील हे लिखाण हा भारतीय वैद्यकशास्त्र, आयुर्वेद शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात, तसेच शिक्षणपद्धतीमध्ये समाविष्ट आहे. या पुस्तकातील विवेचन हे कायद्याचा भंग करणारे आहे, असे ओढून ताणूनही दाखवता येणार नाही.

इसिसशी संपर्क ठेवल्याचा आरोप असलेला इस्लामी उपदेशक पोलिसांच्या कह्यात !

     कन्नूर (केरळ) - जिहादी आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटशी (इसिसशी) संपर्क ठेवल्याच्या आरोपाखाली कन्नूरजवळ असलेल्या पनुरमध्ये एका इस्लामी उपदेशकाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर उपदेशकाचे नाव महंमद हनीफ असून त्याने केरळमधून गायब झालेल्या इसिसच्या २१ संदिग्ध आतंकवाद्यांपैकी ११ जणांचे मार्गदर्शन केले होते. कन्नूर येथे मुंबई पोलिसांचे एक पथकही आले असून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे.

लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या कार्टून पात्रांच्या रूपात

समाजाला धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता दर्शवणारे उदाहरण !
   
विडंबनात्मक राख्या
    पुणे - यंदा १८ ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त येथील बाजारपेठांमध्ये अनेकविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये बालकांना आकर्षित करण्यासाठी अनेक राख्या डोरेमॉन, सिनचॅन, बाहुबली, छोटा भीम, स्टोन राखी, डिस्को लाईट, जु जु वंडरबॉय, टेडी बेअर अशा कार्टून पात्रांच्या रूपात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बाजारात सध्या चिनी बनावटीच्या राख्याही आल्या असल्याचे समजते. (चीनची पुन्हा घुसखोरी ! - संपादक)
राखीच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन रोखा !
     आजकाल रक्षाबंधन या सणाला राखीवर किंवा देवतांची चित्रे असतात. राखीच्या वापरानंतर ती इतस्ततः पडल्यामुळे एकप्रकारे देवता आणि धर्मप्रतीक यांचे विडंबन होते. त्यामुळे पाप लागते. हे टाळण्यासाठी राखीचे पाण्यात विसर्जन करा !

श्रीमंत बाजीराव पेशवे आणि बालगणेश या रूपांतील अशास्त्रोक्त पद्धतीच्या गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध !

शास्त्रोक्त पद्धतीच्या गणेशमूर्तींतूनच गणेशतत्त्वाचा लाभ होतो, हे 
हिंदूंना कसे कळणार ? यासाठी धर्मशिक्षण देणारे हिंदु राष्ट्रच स्थापायला हवे !
   
  पुणे - यंदा गणेशोत्सवानिमित्त शहर आणि परिसरातील चौकाचौकांमध्ये श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारली आहेत. बालगणेश आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांमुळे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या वेषातील श्री गणेशमूर्ती बाजारात तेथे विक्रीसाठी आल्या आहेत. (गणेशाच्या मानवी रूपातील मूर्तींच्या मागणीला धर्मशिक्षणाचा अभावच कारणीभूत ! - संपादक) श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या वेशातील गणेशमूर्तींना विशेष मागणी असून त्या आणि बालगणेशाच्या मूर्ती यांसाठी नागरिकांनी आगाऊ पैसे दिले आहेत.
     श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या रूपातील श्री गणेशमूर्ती २ ते ६ फूट या आकारांमध्ये उपलब्ध आहेत. बालगणेशाच्या मूर्तीमध्ये उंदीर किंवा मोर यांच्यावर बसलेला गणपति, तसेच फुटबॉल खेळणारा गणपति असेही विविध प्रकार उपलब्ध आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदुबहुल भारतात हिंदूच असुरक्षित !
     काश्मीरच्या पुंछ येथील बूढा अमरनाथ यात्रेवर १३ ऑगस्टला जिहादी आतंकवाद्यांनी ग्रेनेड फेकून केलेल्या आक्रमणात १४ हून अधिक शिवभक्त घायाळ झाले. येथील दशनामी आखाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ हे ग्रेनेड फेकण्यात आले. घायाळांची प्रकृती चिंताजनक आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Kashmirke Poonch me Budha Amarnath yatrapar jihadiyoka grenade se akraman, 14 Shivbhakt ghayal. -  
Bahusankhyank Hinduonki is durdashake liye doshi koun ?
जागो ! : कश्मीर के पुंछ में बूढा अमरनाथ यात्रा पर जिहादियों का ग्रेनेड से आक्रमण, १४ शिवभक्त घायल.     बहुसंख्यक हिन्दुआें की इस दुर्दशा के लिए दोषी कौन ?

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या संघटनेच्या स्थापनेचा जाज्वल्य इतिहास !

    वर्ष १९०६ पासून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी (गदरच्या माध्यमातून), अमेरिका, हाँगकाँग, सिंगापूर, ब्रह्मदेश इत्यादी ठिकाणी अभिनव भारत या गुप्त संघटनेच्या शाखा कार्यरत झाल्या. अभिनव भारतची चळवळ दडपण्यासाठी नाशिकमध्ये वर्ष १९०९ मध्ये ब्रिटिशांनी बाबाराव सावरकरांना पकडले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून अंदमानात पाठवले. त्याचा सूड म्हणून वर्ष १९०९ मध्ये ब्रिटिशांची राजधानी लंडन येथे क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा याने कर्झन वायलीला भर समारंभात गोळ्या घालून ठार मारले, तर पुढील वर्षीच नाशिकमध्ये विजयानंद चित्रपटगृहामध्ये जिल्हाधिकारी (कलेक्टर) जॅक्सनला क्रांतीकारक अनंत कान्हेरे, देशपांडे आणि कर्वे यांनी पिस्तुलने गोळी झाडून ठार मारले.
    शेवटी ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक करून आणि अभिनव भारतच्या अनेक क्रांतीकारकांना पकडून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. त्यांना जबरदस्त शिक्षा ठोठावल्या आणि ही क्रांतीकारक चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला, तरीही सशस्त्र क्रांतीची ही चळवळ नष्ट झाली नाही.

क्रांतीविरांचे ऋण फेडून राष्ट्रधर्माचे पालन करण्यासह साधनेतील पूर्णत्वही साधा !

पू. संदीप आळशी
      हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतीविरांना आमचे वंदन आणि कोटी कोटी कृतज्ञता ! मातृभूमीलाच देवता मानून तिच्यासाठी कित्येक क्रांतीविरांनी ब्रिटिशांचा क्रूर कारावास भोगला, फासाच्या दोराला हसत हसत आलिंगन दिले, अंदमानच्या निर्दयी एकलकोंडीत मरणयातना सोशीत काया झिजवली... हे सारे त्यांनी हिंदुस्थानला सुजलाम् सुफलाम् पहाण्यासाठी आणि भावी पिढ्यांना स्वातंत्र्यसुख उपभोगता येण्यासाठीच केले होत; मात्र आज हिंदुस्थानची पावन भूमी भ्रष्टाचार्‍यांनी कलंकित; जिहादी आतंकवाद्यांच्या आघातांनी विदीर्ण; धर्मांध, जात्यंध अन् राष्ट्रद्रोही यांच्या विषारी डंखांनी घायाळ आणि तथाकथित पुरोगामी अन् नास्तिकतावादी यांच्यामुळे धर्मभ्रष्ट झाली आहे. अशा स्वराज्यासाठी क्रांतीविरांनी प्राणांचे बलिदान केले होते का ?
      हिंदुस्थानची ही दुःस्थिती पालटण्यासाठी प्रत्येक हिंदुस्थानीने प्रयत्न करणे, हीच क्रांतीविरांप्रती कृतज्ञता आणि देशाला मानवंदना ठरेल. हाच राष्ट्रधर्म आहे आणि ही समष्टी साधनाही आहे. क्रांतीविरांचे आपल्यावर जे ऋण आहे, ते फेडल्यावाचून कोणाचीही इहलोकीची साधना पूर्णत्वास जाणार नाही. यासाठी हिंदुस्थानी बंधूंनो, जागृत व्हा ! सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी प्रज्वलित केलेल्या राष्ट्रयज्ञातील समिधा बना, राष्ट्र अन् धर्म यांवरील सर्व समस्यांचे एकमेव उत्तर असलेल्या हिंदु राष्ट्र (सनातन धर्मराज्य) स्थापनेच्या कार्याला हातभार लावा आणि जीवनाचे सार्थक करून घ्या !
- (पू.) श्री. संदीप आळशी (९.८.२०१६)

हिंदूंनो, साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होणे, हे खरे स्वातंत्र्य असून ते मिळवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करा !

१. भारताचे स्वातंत्र्यानंतरचे पारतंत्र्य 
प.पू. परशराम पांडे
१ अ. स्वातंत्र्यापूर्वीपासून भारताची केलेली विभागणी : इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यापूर्वी भारताचा वायव्येकडील भाग पाकिस्तानला म्हणजेच मुसलमानांना दिला, तसेच पूर्वेकडील बंगालचा बांगलादेश करून भारतातील अन्य ठिकाणे, म्हणजे भाग्यनगर, गोवा आणि काश्मीर सोडून दिली; मात्र भारताचे स्वातंत्र्यानंतरचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या सहकार्याने आंदोलानाद्वारे भाग्यनगर आणि गोवा हा प्रदेश भारतात विलीन झाला. काश्मीरचे राजे हरिसिंह यांनी भारतात विलीन होण्यासाठी अनुमोदन दिल्यामुळे काश्मीरचा प्रदेश भारतात विलीन झाला. त्यापूर्वी पाकिस्तानने काश्मिरी मुसलमानांना फितवून काश्मीरचा प्रदेश बळकावला होता, जो प्रस्तावाच्या स्वरूपात यू.एन्.ओ.कडे अजूनही प्रलंबित आहे.
१ आ. स्वातंत्र्योत्तर काळात मुसलमानांचे हिंदूंवर होत असलेले अत्याचार : १५.८.१९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला; म्हणून १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन मानण्यात येते. भारतातील मुसलमानांनी पाकिस्तानात जावे आणि पाकिस्तानातील हिंदूंनी भारतात यावे, असे फाळणीच्या वेळी ठरले होते. त्याप्रमाणे पाकिस्तानातील हिंदू भारतात येतांना मुसलमानांनी रेल्वेत लक्षावधी हिंदूंची हत्या केली, तरी त्या संदर्भात भारतातील शासनाने कोणत्याच प्रकारचा विरोध किंवा त्यांच्यावर आक्रमण करून प्रतिकार केला नाही. पुढे पाकिस्तानात असलेल्या हिंदूंचीसुद्धा मोठ्या प्रमाणात हत्या केली. बर्‍याच जणांचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान केले. आज फारच थोडे हिंदू पाकिस्तानात आहेत. पाकिस्तानातील हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली, तरी या संदर्भात भारत सरकारने कोणत्याही प्रकारचा विरोध दर्शवला नाही. उलट रेल्वे, बस यांद्वारे पाकिस्तान आणि हिंदुस्थान यांमधील मार्ग मोकळा केला. त्यानंतर ४ वेळा पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. त्यात आपण जिंकूनही हरलो; कारण जिंकलेला प्रदेश परत केला; परंतु काश्मीरचा प्रश्‍न तसाच ठेवला.

हिंदु राष्ट्रातील धर्मध्वज

ध्वजाला प्रार्थना
यज्ञध्वज नमस्तुभ्यं धर्मध्वज नमोऽस्तु ते ।
तालध्वज नमस्तेऽस्तु नमस्ते गरुडध्वज ॥
                               वामनपुराण, अध्याय ८७, श्‍लोक ४
अर्थ : हे यज्ञध्वजा, हे धर्मध्वजा तुला नमस्कार असो. 
हे तालध्वजा, हे गरुडध्वजा, तुला नमस्कार असो.
     विश्‍वकल्याणासाठी सात्त्विक लोकांनी चालवलेले भावी हिंदु राष्ट्र धर्माधिष्ठित असेल. त्यामुळे हिंदु राष्ट्रात राष्ट्रध्वज नाही, तर धर्मध्वज असेल. याचे कारण म्हणजे राष्ट्रध्वजापेक्षा धर्मध्वज महत्त्वाचा. हिंदु राष्ट्र धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष साध्य करणे, या तत्त्वावर आधारलेले असेल. त्यासाठी धर्मध्वज प्रेरणा देईल. याउलट राष्ट्रध्वजामुळे केवळ राष्ट्राभिमान जागृत होऊ शकतो. धर्मध्वज धर्माधिष्ठित राज्याची प्रेरणा देत असल्याने धर्मध्वजाला प्रार्थना करतात; पण राष्ट्रध्वजाला कोणी प्रार्थना करत नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्रात धर्मध्वज हाच राष्ट्रध्वज असेल. या लेखात धर्मध्वजाची माहिती दिली आहे. त्यामुळे आपल्या धर्मध्वजाप्रती भाव निर्माण होईल.

भारतातील सुजाण नागरिकांनो, स्वतःचे कर्तव्य जाणून घ्या आणि देशाला वाचवा !

सौ. आनंदी पांगुळ
१. स्वतंत्र भारतातील नागरिकाला कर्तव्याची जाणीव होण्यासाठी कायद्यात कोणत्याही प्रकारची तरतूद नसणे : स्वतंत्र भारतातील नागरिकाला त्याच्या कर्तव्याची जाणीव रहाण्यासाठी कायद्यात कोणत्याही प्रकारची तरतूद असल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे स्वातंत्र्य असूनही आज भारतातील नागरिक पारतंत्र्यात राहिल्यासारखा जीवन जगत आहे. नागरिक त्यांच्या कर्तव्यापासून पराङ्मुख झाले आहेत. आतापर्यंत एकाही शासनकर्त्याने भारतातील नागरिकाला स्वतंत्र केले नाही. त्यामुळे येथे लोकशाहीचे राज्य आहे, असे म्हणणे हास्यास्पद ठरते.
२. नागरिकाला सामाजिकदृष्ट्या सुजाण बनवून समर्थ करणे, हे सरकारचे काम असूनही त्या अनुषंगाने शासनाने केवळ बोटावर मोजण्याइतक्याच तरतुदी करणे : जीवनात दैनंदिन घडणार्‍या कोणत्या प्रसंगी काय करावे ?, याविषयी शिक्षण देऊन नागरिकाला सामाजिकदृष्ट्या सुजाण बनवून समर्थ करणे, हे सरकारचे काम आहे. त्या अनुषंगाने शासनाने केवळ बोटावर मोजण्याइतक्याच तरतुदी केलेल्या दिसतात, उदा. पोलिसांचे साहाय्य पाहिजे असल्यास १०० क्रमांकावर दूरभाषवरून संपर्क करा, वैद्यकीय उपचारांना नेण्यासाठी अँब्युलन्स पाहिजे असल्यास १०२ क्रमांक दाबा, आग लागली असल्यास १०१ क्रमांक दाबा इत्यादी.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा भारतीय ध्वजाचा प्रवास

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा ध्वज
१९०५ भगिनी निवेदितांचा ध्वज
१९०६ - कोलकाता ध्वज

१९०७ - स्टुटगार्ट येथे मादाम कामा यांचा ध्वज १९१७ - होमरूल लीग चळवळीमध्ये
 डॉ. अ‍ॅनी बेझंट आणि लोकमान्य
 टिळक यांनी फडकवलेला ध्वज
१९२१ मध्ये गांधीजींनी मान्यता दिलेला तिरंगा
१९३१ - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संमत केलेला ध्वज 

आझाद हिंद सेनेचा ध्वज


स्वतंत्र भारताचा अधिकृत ध्वज
    भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारताचा इतिहास सर्वांना कळावा आणि राष्ट्रध्वजांतील वैविध्य लक्षात यावे, या उद्देशाने हे ध्वज येथे प्रसिद्ध करत आहोत.
(संदर्भ : साप्ताहिक विवेक, १९ ऑगस्ट २०१२)

भारतियांनो, स्वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करा !

     देश स्वतंत्र झाला तो दिवस होता श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार १५ ऑगस्ट असल्याचे म्हटले जाते. (भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट तिथीप्रमाणे श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरा करा !)
या वर्षी ही तिथी ३१ ऑगस्ट या दिवशी आहे.

ऐश्‍वर्य, वैभव, सुख-समृद्धी, ज्ञान, त्याग आणि वैराग्य अशा सद्गुणसंपन्न असलेल्या भारतमातेची शोकांतिका !

    
   
श्री. किसन काळोखे
माझी (भारतमातेची) पूर्वीची ओळख ज्ञान, त्याग, वैराग्य, ऐश्‍वर्य, सुख-समृद्धी, येथील संस्कृती अशा अनेक गोष्टींनी सोन्यासारखी उजाळून निघालेली आणि सर्व गुण, धन, वैभवसंपन्न असलेली ही भारतभूमी, देवता, साधूसंत, ऋषिमुनी यांच्या चरणस्पर्शाने अन् वास्तव्याने पावन झालेली आणि सर्व विश्‍वाला प्रिय असलेली अशी आहे.
     मुलांनो, मी प्रभु श्रीरामाचे क्षात्रतेज पाहिले आहे. कृष्णवेड्या गोप-गोपी पाहिल्या आहेत आणि उन्मत्त झालेल्या कालिया अन् कंसाचा वध करणार्‍या भगवान श्रीकृष्णालाही पाहिले आहे. या भूमीत शौर्याने तळपणारे अनेक वीर निपजले आहेत. या मातीच्या प्रत्येक कणात श्रीकृष्ण आहे. ही भूमी पवित्र आहे; पण आज याच भगवान श्रीकृष्णाच्या भूमीत काय चालू आहे, तर अत्याचार !
१. गुलामगिरी, फाळणी आणि भ्रष्टाचार !
१ अ. गुलामगिरी !
१ अ १. आतापर्यंतच्या शासनकर्त्यांची कुकर्मे
: किती भयंकर आहेत हे शब्द ! हे शब्दच नव्हे, तर ते एक सत्य आहे. विश्‍वाच्या गुरुपदी विराजमान होणारी मी, आज पूर्णपणे रसातळाला गेले आहे. आज मी गुलामगिरीच्या साखळदंडाने जखडले आहे. एवढेच नव्हे, तर धर्मांतर, अत्याचार अशा अनेक संकटांचा भस्मासूर माझ्या अंगा-खांद्यावर बांडगुळाप्रमाणे पोसला जात आहे. हा अत्याचार केवळ कंगाल आणि प्रामाणिक शेतकर्‍यांवरच होतो.

राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !

सनातनच्या बालसंस्कार मालिकेतील ग्रंथ
या ग्रंथात वाचा...
 • राष्ट्रप्रतिकांचा सन्मान कसा राखावा ?
 • राष्ट्रीय दिनी ध्वजवंदनासाठी का उपस्थित रहावे ?
 • राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा मान का राखावा ?
 • राष्ट्राभिमान वाढवण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात ?
 • स्वभाषाभिमानी होण्यासाठी काय करावे ?
संपर्क : गोवा - (०८३२) २३१५९१९, पनवेल - (०२१४३) २३३१२०
सनातनची ग्रंथसंपदा आता
SanatanShop.com वर उपलब्ध !

हिंदु राष्ट्र का हवे ?

हिंदु राष्ट्र : विश्‍वकल्याणार्थ 
कार्यरत सात्त्विक लोकांचे राज्य !
 • भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्रच !
 • निधर्मी लोकशाहीत भारताची झालेली अधोगती !
 • निधर्मी भारतीय लोकशाहीची निरर्थकता !
 • आदर्श राज्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापणे अनिवार्य !
 • जगभरात अपयशी ठरलेल्या विविध राज्यपद्धती !
 • हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी शारीरिक, वैचारिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरावर योगदान आवश्यक !

१५ ऑगस्टचे भीषण सत्य !

     १५ ऑगस्ट १९४७ या अमावस्येच्या मध्यरात्री मुसलमानप्रेरित दंगलींनी रक्ताळलेला आणि देशविभाजनाने ढगाळलेला स्वातंत्र्यसूर्य उगवला ! - अधिवक्ता यशवंत बा. फडणीस (प्रज्ञालोक, सप्टेंबर २०१३)

क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन !

     १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धास वर्ष २००७ मध्ये १५० वर्षे पूर्ण झाली. १० मे १८५७ या दिवशी या स्वातंत्र्यसमराची पहिली ठिणगी मीरत येथे पडली आणि पुढे या संग्रामाने देशव्यापी स्वरूप धारण केले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतीकारकांनी आपले आयुष्य खर्च केले अन् प्राणाची आहुती दिली.  
 
 
 - विकल्पवेध (१६ ते ३१ मे २००७)
     अलीकडेच दैनिक सामना आणि सनातन प्रभात सारखी वृत्तपत्रे विविध क्रांतिकारकांचा थोडक्यात परिचय प्रसिद्ध करत आहेत. या आणि अशा वृत्तपत्रांना धन्यवाद.
- श्री. श्रीकांत विठ्ठल ताम्हनकर (स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव, दिवाळी अंक २०१४)

स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे होऊनही देशाची विदारक स्थिती !

   
श्री. हर्षवर्धन शेट्टी
  १५ ऑगस्ट या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे पूर्ण होतील. या निमित्ताने देशाच्या स्थितीचा अभ्यास केल्यास आपला देश कुठे चालला आहे, याचे परीक्षण करणे आवश्यक आहे. खरे स्वातंत्र्य कुणाला मिळाले ? हाच मोठा प्रश्‍न आहे. या लोकराज्यात (लोकशाहीत) खालील व्यक्तींना स्वातंत्र्य मिळाल्याचे दुःखाने सांगावे लागत आहे.
१. खरे स्वातंत्र्य कुणाला मिळाले ?
१ अ. भ्रष्ट राजकारणी आणि अधिकारी : आज देशाची कोट्यवधी रुपयांची संपत्ती निर्भयपणे लुटण्याचे स्वातंत्र्य राजकारण्यांना मिळाल्याचे दिसते. अनेक घोटाळे उजेडात येऊनही आणि त्या घोटाळ्यांतून कोट्यवधी रुपयांचे अपहरण केल्याचे उघडकीस येऊनही कोणत्याही राजकारण्याला शिक्षा अथवा तुरुंगवास न होता ते निर्भयपणे फिरत आहेत. लोकराज्य आणि क्रांतीकारकांनी केलेले बलीदान यांमुळे मिळालेले स्वातंत्र्य लोकराज्यातून निवडून आलेल्या भ्रष्टाचारी राजकारण्यांना देशाची लूट करण्यासाठी मिळाल्यासारखे वाटते. लहान-लहान कामांसाठी लाच घेऊन सामान्य प्रजेचे रक्त शोषण्याचे स्वातंत्र्य शासकीय अधिकार्‍यांना मिळाल्याचे दिसते.
१ आ. अत्याचारी, गुंड आणि खुनी : अत्याचारी, गुंड आणि खुनी यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. आज लहान मुले, महिला यांवर होणारे अनन्वित अत्याचार पाहून अत्याचारी लोकांनाच स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटते. आज अनेक खून, दरोडे घालणार्‍या व्यक्तींना कोणतीही शिक्षा न होता लोकराज्यात आणखी अत्याचार, खून आणि दरोडे घालण्यासाठी स्वातंत्र्य मिळाले आहे.

प्रत्येक साधकात आणि आकाशात प.पू. डॉक्टरच दिसून सर्व जण श्रीगुरुमय, श्रीजयंतमय झाले आहेत, असे जाणवून भावजागृती होणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
       दोन मासांपूर्वी आश्रमातील प्रत्येक साधकात मला देवतेचे रूप दिसत होते. ते दिवसभर थोड्या थोड्या वेळाने दिसत होते. त्यानंतर सायंकाळी आरतीचा शंखनाद होताच सर्व साधकांमध्ये देव आहे आणि रामनाथी आश्रमात देवांचेच वास्तव्य आहे, असे वाटून माझी भावजागृती झाली.
डॉ. (कु.) आरती तिवारी

       १९.७.२०१६ या दिवशी सकाळपासून प्रार्थना करत असतांना मला मधेमधे साधकाच्या जागी गुरुकृपायोगाचे बोधचिन्ह आणि प.पू. डॉक्टर असे आलटून पालटून दिसत होते. त्या दिवशी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास प्रत्येक साधकात, सर्व माळ्यांवर, आकाशात प.पू. डॉक्टरच दिसत होते. त्यांचा वर्ण आकाशी होता. तेव्हा सर्व जण श्रीगुरुमय, श्रीजयंतमय झाले आहेत, असे जाणवून भावजागृती होत होती. 
- डॉ. (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.७.२०१६)

गडद रंग आणि फिकट रंग यांच्या संदर्भातील आध्यात्मिक प्रयोग

     पहिल्या रांगेतील चौकोनांमध्ये काही रंग आणि त्यांच्याच बाजूच्या ३ रांगांत त्याच रंगाची फिकट छटा असलेले चौकोन घेतले आहेत. रंग फिकट करतांना गडद रंग १०० टक्के असल्यास तो टप्प्याटप्प्याने म्हणजेच ७० टक्के, ३० टक्के, १० टक्के असा घेतला आहे.
प्रयोग
     प्रथम गडद रंगांच्या चौकोनांकडून सर्वांत फिकट रंगांच्या चौकोनांकडे दृष्टी फिरवा. नंतर त्या उलट म्हणजे फिकट रंगांच्या चौकोनांकडून गडद रंगांच्या चौकोनांकडे दृष्टी फिरवा. असे ४ - ५ वेळा करून काय वाटते, ते अनुभवा.
सर्व रंगांचे प्रमाण टक्यांमध्ये

गडद रंगांपेक्षा फिकट रंगांकडे पाहून अधिक चांगले वाटण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा

सौ. जान्हवी शिंदे
विश्‍लेषण
     या चौकोनांकडे पाहिल्याबरोबर गडद रंग आपले लक्ष वेधून घेतात. फिकट रंगांच्या तुलनेत गडद रंग जास्त आकर्षक वाटतात; परंतु सूक्ष्मातून प्रयोग केल्यास फिकट रंगांकडे पाहून अधिक चांगले वाटते, म्हणजे डोळ्यांना गडद रंग, तर मनाला फिकट रंग चांगले वाटतात. डोळ्यांना जे आकर्षक वाटते, त्यापेक्षा मनाला जे वाटते, ते अधिक योग्य असते.
१. फिकट रंग चांगले वाटण्याची कारणे
१ अ. दृष्टी गडद रंगांकडून फिकट रंगांकडे फिरवतांना स्थुलाकडून सूक्ष्मात जाण्याची आणि निर्गुणाची अनुभूती येणे : साधनेचा प्रवास नेहमीच जडत्वाकडून निर्गुणाकडे, म्हणजेच स्थुलाकडून सूक्ष्माकडे असतो. जितके सूक्ष्म तितके आनंददायी. वरील रंगांच्या चौकोनांच्या संचांचेही तसेच आहे. दृष्टी गडद रंगांकडून फिकट रंगांकडे फिरवतांना स्थुलाकडून सूक्ष्मात जाण्याची अनुभूती घेता येते. फिकट होत गेलेले रंग शेवटी पांढर्‍या रंगात विलीन होतात. तेथे मन स्थिरावते म्हणजेच मनाला निर्गुणाची अनुभूती येते.
१ आ. अनेक रंगांचे अस्तित्व न्यून होत जाऊन ते शेवटी पांढर्‍या रंगात विलीन होत असल्याने मनाला चांगले वाटणे : अनेकातून एकात जाणे, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. वरील प्रयोगात अनेक रंगांचे अस्तित्व न्यून होत जाऊन ते शेवटी एका रंगात, म्हणजे पांढर्‍या रंगात विलीन होतात. त्यामुळे मनाला चांगले वाटते.
     वरील प्रयोगामध्ये गडद रंगांच्या संचाकडून फिकट रंगांच्या संचाकडे जातांना जी अनुभूती येते, तशीच अनुभूती त्या संचातील कोणत्याही एका रंगाचा तसा प्रयोग केल्यास येते.

आपला राष्ट्रध्वज कोणता संदेश देतो ?

       प्रत्येक राष्ट्राचे मानचिन्ह म्हणजे त्या राष्ट्राचा राष्ट्रध्वज ! हा राष्ट्रध्वज त्या देशाच्या लोकांना काहीतरी संदेश देत असतो. आपला अशोक चक्रांकित तिरंगा भारतियांना कोणता संदेश देत आहे ?, ते पाहूया.
१. हिरवा रंग : समृद्धी
२. पांढरा रंग : पांढरा रंग हा क्षमा आणि शांती यांचा संदेश देतो.
३. केशरी रंग : त्याच्या माथ्यावरचा केशरी रंग हा त्याग आणि सेवाधर्म यांचा संदेश देणारा आहे; मात्र या केशरी रंगात दडलेला लाल रंग हा जागरुकता असण्याची जाणीव जागृत ठेवतो. प्रेम-सत्य-अहिंसा-सेवा-क्षमा हा आपला माणूसधर्म असला, तरीही अन्यायांविरुद्ध लढण्याचे तुझे सामर्थ्य तू गमावू नकोस. तुझ्या मनगटातील सिंहाचे बळ जपून ठेव, अशी ताकीद या केशरी रंगात दडलेला लाल रंग आपल्याला देत असतो.
४. अशोकचक्र : मोठ्या डौलात फडकणार्‍या ध्वजावर निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. निळा रंग हा आकाशाचा, म्हणजे या विश्‍वाच्या पोकळीचा रंग आहे. हा रंग सर्वांभूती समभाव शिकवतो. तुमचे जीवन गतीशील ठेवा. थांबला तो संपला, पुढे चला., असा संदेश हे अशोकचक्र देत आहे. अशा आपल्या उच्च तत्त्वांचा हा संदेश जगभर घेऊन जाणारा राजा अशोक हा जगज्जेता होता. (संदर्भ : अज्ञात)

जगातील दुसर्‍या क्रमांकाचे लोकप्रिय राष्ट्रगीत !

       राष्ट्रगीत वन्दे मातरम् हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे लोकप्रिय गीत आहे. वन्दे मातरम् गीताचे रचनाकार स्व. बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी १०० वर्षांपूर्वी केलेल्या भविष्यवाणीत प्रत्येक भारतवासी वेदमंत्राप्रमाणे हे गीत गाईल, असे म्हटले होते. गीताची लोकप्रियता आणि देशभक्ती कुणाच्याही विरोधाने अल्प होणार नाही. बंकीमचंद्र यांची भविष्यवाणी यथार्थ ठरली आहे.

कलियुगातील पुढार्‍याची प्रतिज्ञा !

भारत माझा देश आहे - राजकारणासाठी !
सारे भारतीय माझे बांधव आहेत - प्रचारासाठी !
माझ्या देशावर माझे प्रेम आहे - लुटण्यासाठी !
माझ्या देशातील विविधता आणि समृद्धी यांनी नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे - एकता तोडण्यासाठी !
त्या परंपरांचा पाईक होण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन - खुर्चीसाठी !
माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन - लाच घेण्यासाठी !
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन - मतांसाठी !
माझा देश आणि देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे - गाडी-माडीसाठी !
त्यांचे कल्याण आणि समृद्धी यांतच माझे सौख्य समावले आहे - पोट भरण्यासाठी !
(संदर्भ : अज्ञात)

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

 
हिंदी : www.hindujagruti.org/hindi/
मराठी : www.hindujagruti.org/marathi/

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा एकांत
       माणूस कुठेही गेला, तरी त्याला इतर कुठलेही नसेल; पण स्वतःच्या शरिराचे बंधन राहीलच; म्हणून शारीरिक आणि सांसारिक विचारांपासून मुक्त होणे, हाच खरा एकांत.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, 
स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो 
जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
     पोलीस आणि न्याययंत्रणा यांवर कोट्यवधी रुपये उधळणारे आतापर्यंतचे शासनकर्ते त्यांची फलनिष्पत्ती काय, हे जनतेला कळू देत नाहीत, हे लक्षात घ्या !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संपादकीय


स्वातंत्र्यदिन चिरायू होवो ! 
       ६९ वा भारतीय स्वातंत्र्यदिन आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांनी त्या वेळी इंग्रजांच्या कह्यातून देश मुक्त केला. त्या स्वातंत्र्यसैनिकांचे आदरपूर्वक स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. एका अर्थाने गेल्या ६८ वर्षांच्या प्रवासाचे आत्मावलोकन करण्याचा हा दिवस आहे. आजच्या दिनी सर्वत्र देशभक्तीमय वातावरण असते. भारतमातेची गीते सर्वत्र गायली जातात आणि प्रत्येक भारतियाचा उर देशाभिमानाने भरून येतो. ही देशभक्ती आणि हे स्वातंत्र्य टिकवण्याचे कार्य आपले आहे, याची जाणीव या निमित्ताने होत असते. त्या जाणीवेतूनच आज काही सूत्रे येथे विशद करणे अपरिहार्य आहे. आपले स्वातंत्र्य चिरायू होण्यासाठी या सूत्रांचा राष्ट्रीय स्तरावर ऊहापोह होणे आवश्यक आहे; म्हणूनच स्वातंत्र्याच्या या उत्सवात वास्तवाचे भान करून देत आहोत. त्यानेच हे स्वातंत्र्य टिकून रहाणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn