Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज संत विसोबा खेचर यांची पुण्यतिथी

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन !

पाकिस्तान परत जाच्या घोषणा !
     नवी देहली - पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात तेथील नागरिकांनी आंदोलन चालू केले आहे. येथील गिलगिट आणि बाल्टिस्थानमध्ये नागरिक रस्त्यावर उतरून स्वातंत्र्याच्या घोषणा देत आहेत. गिलगिटमध्ये यापूर्वीही सैन्याच्या विरोधात आंदोलने झाली आहेत.
     आंदोलन करणार्‍या लोकांचे म्हणणे आहे की, पाकसैन्याने ५०० युवकांना कह्यात घेतले आहे; कारण या युवकांनी सैन्याला गिलगिट सोडण्यास सांगितले होते. नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते बाबा जान यांच्या सुटकेची मागणी केली आहे. बाबा जान यांनी येथील पुरग्रस्तांसाठी आंदोलन केले होते. त्यामुळे पाकला ४५७ पूरग्रस्त परिवारांना हानीभरपाई द्यावी लागली होती. वर्ष २०११ मध्ये पाकने बाबा जान यांना आतंकवादविरोधी कायद्यान्वये अटक करून कारागृहात टाकले. त्यांना न्यायालयाने ४० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
     चीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये ३ सहस्र कि.मी. लांबीचा महामार्ग बनवत आहे. याद्वारे पश्‍चिम चीन आणि पाक यांना रस्ता, रेल्वे आणि पाईपलाईन यांद्वारे जोडण्यात येणार आहे. याचा प्रत्यक्ष लाभ पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांना होण्याऐवजी चिनी लोकांना होणार आहे. यासाठी लागणारी भूमी पाकव्याप्त लोकांकडून बलपूर्वक घेण्यात येत आहे. येथील नागरिक संतप्त आहेत; कारण चिनी लोकांनी येथे घुसखोरी करून त्यांचा रोजगार पळवला आहे.

(म्हणे) भारताने धडा शिकवण्याचा प्रयत्न करू नये ! - पाकचा थयथयाट

भारताने आता पाकला धडा शिकवावाच !
     इस्लामाबाद - भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगायला हवे होते की, ते पाकला कोणता धडा शिकवणार आहेत ? जर ते शांती आणि बंधूभाव यांचा धडा शिकवणार असतील, तर पाकचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत; मात्र जर भारत काश्मीरवर नियंत्रण मिळवण्याच्या सूत्रावरून धडा शिकवण्याचा प्रयत्न करत असेल, तर मी त्यांना सांगू इच्छितो की, पाक कोणाच्या अधीन राहू शकत नाही. काश्मीर पाकचे अविभाज्य अंग आहे. काश्मीरमधील लोकांवर होणार्‍या अत्याचारांविषयी पाक शांत राहू शकत नाही, अशी चेतावणी पाकचे गृहमंत्री निसार अली खान यांनी पत्रकार परिषदेत केली. १२ ऑगस्टला काश्मीरमधील हिंसाचारावर पंतप्रधान मोदी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत त्यांना पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले होते. या वेळी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला धडा शिकवण्याची चेतावणी दिली होती. त्यावर पाकने वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

सरोदवादक अमजद अली खान यांना ब्रिटनने व्हिसा नाकारला !

     देहली - प्रसिद्ध भारतीय सरोदवादक अमजद अली खान यांना ब्रिटनने व्हिसा नाकारला आहे. अमजद अली खान यांनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली.

चर्चचा त्याग करू इच्छिणार्‍या ननला चोर, वेडी ठरवून चर्चने छळ केला !

महिलांना समानतेचा अधिकार देण्यासाठी आंदोलने करणार्‍या तृप्ती 
देसाई यांच्यासारख्या महिला कधी अशा पीडित ननसाठी काही करतील का ?
     कोट्टायम (केरळ) - केरळ राज्यातील कोट्टायम जिल्ह्यात असलेल्या पाला गावातील मदर ऑफ कार्मेलशी संबंधित सायरो-मलबार चर्चमध्ये ४५ वर्षीय सिस्टर मेरी सेबेस्टियन या नन गेली २५ वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी वरिष्ठांच्या छळाला कंटाळून चर्च सोडून स्वतंत्र जीवन जगण्याची अनुमती मागितली असता त्यांच्यावर चोरी केल्याचा आणि मानसिक आजार असल्याचा चर्चकडून आरोप करण्यात आला. असे करून त्यांचे कायदेशीर वेतन नाकारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्‍या ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! याविषयी प्रसारमाध्यमे काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! - संपादक) १. सिस्टर मेरी सेबेस्टियन यांनी चर्चकडे नियमानुसार अर्ज करून ३ वर्षे स्वतंत्र जीवन जगण्याची आणि नंतर परत चर्चमध्ये येण्याची अनुमती मागितली; मात्र या प्रकाराने इतर ननही अशा प्रकारची अनुमती मागतील, या भीतीपोटी चर्चने सिस्टर मेरी सेबेस्टियन यांची अनुमती नाकारली. त्यावर सिस्टर मेरी सेबेस्टियन यांनी केरळ कॅथॉलिक चर्च रिफॉर्मेशन मुव्हमेंटच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे दाद मागितली. त्यांनी सिस्टर मेरी सेबेस्टियन यांना चर्चचा कायमचा त्याग करण्याची अनुमती घेण्यास सांगितले. त्यालाही सिस्टर मेरी सेबेस्टियन सिद्ध झाल्या; कारण त्या चर्चच्या वरिष्ठांच्या छळाला खूपच कंटाळल्या होत्या.

भारतातील विधानसभा आणि केंद्र येथील २१० मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल ! - असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सची माहिती

हिंदु राष्ट्रात गुन्हेगारांची जागा कारागृहात असेल, तर लोकप्रतिनिधी धर्माचरणी असतील !
     नवी देहली - भारतामध्ये विविध प्रदेशातील ७६ टक्के मंत्री कोट्यधीश आहेत, तर ३४ टक्के मंत्र्यांवर गुन्हे नोंद आहेत. राज्य विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ६२० पैकी ६०९ मंत्र्यांनी जमा केलेल्या घोषणापत्रांच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने ही माहिती दिली आहे.
१. ६०९ मंत्र्यांनी जमा केलेल्या घोषणापत्रांनुसार सुमारे ३४ टक्के म्हणजे २१० मंत्र्यांच्या विरोधात खटला चालू आहे आणि केंद्रातील ७८ पैकी २४ मंत्र्यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद असल्याची स्वीकृती दिली आहे.
२. राज्य विधानसभेतील ११३ मंत्र्यांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण तसेच महिलांच्या संदर्भातील अपराधांसारखे गंभीर आरोप आहेत. यांपैकी ३ मंत्री उत्तराखंड, ४ मंत्री देहली, ११ मंत्री बिहार, ९ मंत्री झारखंड, १८ मंत्री महाराष्ट्र आणि ९ मंत्री तेलंगण येथील आहेत.
३. विधानसभेच्या मंत्र्यांची एकूण संपत्ती सरासरी ८ कोटी ५९ लाख रुपये आहे, तर केंद्रातील मंत्र्यांची एकूण संपत्ती सरासरी १२ कोटी ९४ लाख रुपये आहे.
४. पंजाब, अरुणाचल प्रदेश आणि पुदुचेरी येथील सर्वच मंत्री कोट्यधीश आहेत आणि कर्नाटकचे ९७ टक्के मंत्री तसेच राजस्थान, मेघालय, छत्तीसगड आणि गोवा येथील ९२ टक्के मंत्री कोट्यधीश आहेत.

आंतरराष्ट्रीय सीमेवरून आतंकवाद्यांचे ७ गट ८ ठिकाणी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात ! - भारतीय गुप्तचर संस्था

पाकचे अस्तित्व असेपर्यंत जिहादी आतंकवाद्यांचेही अस्तित्व रहाणार आहे; 
म्हणून आतंकवाद संपवण्यासाठी प्रथम पाकला धडा शिकवणे आवश्यक आहे !
     नवी देहली - पाकपुरस्कृत आतंकवादी भारतात ८ ठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न करत आहेत. भारतीय गुप्तचर संस्थांना ही मिळाली असून या घुसखोरीच्या मागे आय.एस्.आय. ही माहिती पाकची गुप्तचर संस्था आहे. तसेच भारतीय सुरक्षा यंत्रणांनी लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटनांच्या आतंकवाद्यांचे बोलणे ध्वनीमुद्रित केले आहे. या संभाषणातून काश्मीरमध्ये मोठे आतंकवादी आक्रमण करण्याचा कटही उघडकीस आला आहे. आतंकवाद्यांनी सांकेतिक भाषेत संभाषण केले आहे. २६/११ च्या आक्रमणातील मुख्य सूत्रधार हाफिज सईद याचा मुलगा तल्हा सईद याचा उल्लेखही या संभाषणामध्ये आला आहे.
१. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर शाहबाज उपाख्य लतीफ त्याच्या ७ आतंकवाद्यांच्या गटासह तंगधार सेक्टर येथे घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी अंनिस पंतप्रधान मोदी यांना काळी निवेदने पाठवणार !

स्वत:ला अन्वेषण यंत्रणांपेक्षाही अधिक कळते, असे 
समजणारी आणि हास्यास्पद कृती करणारी अंनिस !
     पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्यांच्या प्रकरणी करण्यात येत असलेल्या तपासातील दिरंगाईचा निषेध करणे आणि या प्रकरणांचा तपास अधिक गतीने करण्यात यावा, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून २० ऑगस्ट या दिवशी स्थानिक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळ्या कागदावर निवेदने पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. धार्मिक विद्वेष पसरवणार्‍या झाकीर नाईक यांच्यावर कडक कारवाई करणारे सरकार त्याच पद्धतीने हिंसेचे समर्थन करणार्‍या सनातन आणि हिंदु जनजागृती समितीवर कारवाई का करीत नाही ?, असा प्रश्‍नही दाभोलकर यांनी या वेळी उपस्थित केला. (डॉ. झाकीर नाईक यांच्या विचारसरणीतून प्रभावित होऊन आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचे अनेक पुरावे तपास यंत्रणांना मिळाले आहेत. याउलट सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर कोणत्याही यंत्रणेने आरोप केलेला नाही. असे असतांना सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांना डॉ. झाकीर नाईक यांच्या रांगेत बसवून डॉ. हमीद दाभोलकर हे डॉ. झाकीर नाईक यांचे एकप्रकारे समर्थनच करत आहे ! - संपादक)

केजरीवाल यांच्या कार्यकाळात दारूंच्या दुकानांमध्ये वृद्धी !

जनतेला व्यसनाधीन बनवून राज्याची प्रगती करू पहाणारे
 राज्यकर्ते जनतेचे सुख कशात आहे, हे जाणतील का ?
दारूच्या दुकानांपासून मिळणारा महसूलही झाला दुप्पट !
     नवी देहली - जनतेला व्यसनमुक्त करण्याचे आश्‍वासन देणार्‍या आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर देहलीत दारूच्या दुकांनामध्ये वाढ झाली असून महसुलातही दुप्पट वाढ झाली असल्याचे स्वराज अभियान या संघटनेने उघड केले आहे.
     स्वराज अभियान संघटनेतील माहिती अधिकार कार्यकर्ते मुकेश गुप्ता यांनी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी देहलीत दारूचे किती दुकाने होती आणि त्यानंतर त्यात किती वाढ झाली या संदर्भातील माहिती प्रशासनाला विचारली होती.
     या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देतांना गुप्ता यांनी सांगितले, केजरीवाल सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात (१४ फेब्रुवारी २०१५ ते ४ जून २०१६) ५८ दारूच्या दुकानांना अनुज्ञप्ती (परवाने) देण्यात आली आहे. दारूच्या दुकानांपासून ८ अब्ज ३० कोटी ४८ लाख १३ सहस्र रुपयांचे महसूल प्राप्त होत होते. त्यानंतर केवळ सव्वा वर्षात सरकारने दारूच्या विक्रीत वाढ करून १५ अब्जाहून अधिक महसूल मिळवला आहे.

मशिदींवर भोंग्यांच्या नावाखाली सामान्य माणसाच्या झोपेचा अधिकार हिरावू शकत नाही ! - मुंबई उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाच्या मताचा आदर करून राज्य शासन आणि पोलीस 
प्रशासन कारवाई करणार का ? कि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार ?
     मुंबई - धर्माचरण करणे, हा नागरिकांचा वैयक्तिक अधिकार असला, तरी मशिदींवर भोंगे लावून अजान देणे, हा मूलभूत अधिकारच आहे, असे सांगत त्याद्वारे सामान्य माणसाच्या शांततापूर्ण झोपेचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ध्वनीप्रदूषणास आळा घालण्याची मागणी करणार्‍या विविध याचिका सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट आहेत. त्यावर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपिठाकडून निकालवाचन चालू आहे. त्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
सुनावणीच्या वेळी न्यायालयाने स्पष्ट केलेली सूत्रे
१. धर्मापेक्षा नागरिक आणि त्यांचे मूलभूत अधिकारच श्रेष्ठ आहेत. हे न्यायतत्त्व सर्वधर्मियांसाठी तेवढेच लागू आहे.
२. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत न्यायमूर्तींनी सांगितले की, ध्वनीक्षेपकाद्वारे प्रार्थना करावी, असे कुठलाच धर्म सांगत नाही. त्यामुळे धर्माचे आचरण करणे, हा वैयक्तिक अधिकार असला, तरी ध्वनीक्षेपकाद्वारे प्रार्थना करणे हा धर्माचा भाग होऊ शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे शांतताभंग करणे नव्हे.
३. मशिदींवरील भोंग्यांद्वारे दिल्या जाणार्‍या अजानविषयी कोलकाता उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत असेही स्पष्ट केले की, एखाद्याला एखादी गोष्ट ऐकायला आवडत नसेल, तर त्याच्यावर ती ऐकण्याची बळजोरी केली जाऊ शकत नाही.

रुग्णालयात भरती करण्यासाठी मागितलेली लाच देऊ न शकल्याने ९ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू !

सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या उत्तरप्रदेश राज्यातील शासकीय रुग्णालयातील असंवेदनशीलता !
     लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) - बहराइच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात इंजेक्शन देण्यासाठी २० रुपये, बेडवर चादर घालून झोपवण्यासाठी ३० रुपये आणि रुग्णालयात भरती करण्यासाठी १०० रुपयांची मागितलेली लाच तातडीने देऊ न शकल्याने एका ९ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मुलाचे पालक गरीब असल्याने इतके पैसे गोळा करून आणण्यास उशीर झाल्याने मुलाचा मृत्यू झाला; मात्र रुग्णालयातील डॉक्टरांचा दावा आहे की, त्यांनी मुलावर उपचार केले होते. याप्रकरणी या वेळी असलेल्या कर्मचार्‍यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

यज्ञ करणे हा दुष्काळावरील उपाय ! - वीरेंद्र सिंह, खासदार, भाजप

लोकसभेतील ५४४ खासदारांपैकी केवळ एका खासदाराला असे वाटते, हे सर्वपक्षीयांना लज्जास्पद !
     नवी देहली - यज्ञामध्ये वापरण्यात येणारे तूप आणि अन्न हे अनुक्रमे ऑक्सीजन आणि हायड्रोजनमध्ये रूपांतरित होते. ऑक्सीजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू एकत्र केल्याने पाणी निर्माण होते, हा वैज्ञानिक सिद्धांत आहे. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी यज्ञ करणे हा उपाय आहे, असे मत उत्तरप्रदेश मधील भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह यांनी लोकसभेत मांडले. लोकसभेत होत असलेल्या टिकाऊ विकासाच्या लक्ष्यांवरील चर्चेत सिंह बोलत होते.
     पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे देश विनाशाकडे जात आहे. आपल्या महान संस्कृतीचे आणि गौरवशाली परंपरेचे पालन केल्यानेच भारत विकासाच्या दृष्टीने पुढे जाऊ शकतो, असेही सिंह यांनी या वेळी सांगितले.

कन्यागत महापर्वात घातपात घडवून आणण्याची अज्ञातांकडून धमकी !

हिंदूंच्या उत्सवांकडे कोणी वक्रदृष्टीने पहाणार नाही, अशी स्थिती कधी निर्माण होणार ?
     नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) - बस्तवडे मंडल अधिकारी कार्यालयात मिळालेल्या चिठ्ठीद्वारे अज्ञातांकडून नृसिंहवाडीतील कन्यागत महापर्व सोहळ्यात घातपात करण्याची धमकी मिळाली आहे. हा केवळ खोडसाळपणा असल्याचा पोलिसांचा निष्कर्ष असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली.
     गेल्या २ दिवसांपासून कन्यागत महापर्वासाठी २ सहस्र ३२४ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील प्रतिदिन येथे भेट देत असून पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची देखील येथे उपस्थिती आहे. तसेच श्‍वानपथक, बॉम्बशोधक आणि नाश पथकही तैनात करण्यात आले आहे.

शासकीय विज्ञापनामध्ये पाकच्या लढाऊ विमानाचे छायाचित्र !

असे होऊ देणार जगातील एकमेव देश भारत ! 
या चुकीसाठी उत्तरदायींवर कठोर कारवाई केली पाहिजे !
     नवी देहली - इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार संस्कृती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ विज्ञापनामध्ये पाकच्या वायूदलाच्या जेट विमानाचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या चुकीवरून सरकारवर टीका झाल्यानंतर हे विज्ञापन हटवण्यात आले. १ मि. ४० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अ‍ॅनिमेशन केलेल्या भागात हे विमान दाखवण्यात आले आहे. त्याच्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवातांना दाखवले आहे.

एर्नाकुलम, केरळ येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्र्रध्वजाचा अवमान रोखा चळवळ
     कोची (केरळ) - प्लॅस्टिकचे ध्वज वापरणे, तोंडवळ्यावर राष्ट्रध्वज रंगवणे, राष्ट्रध्वजासारखे कपडे परिधान करणे इत्यादी अयोग्य कृतींमुळे राष्ट्रध्वजासह राष्ट्राचाही अवमान होतो. हा अवमान थांबवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सतर्क राहून प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि श्री बालाजी धर्मजागृती समिती यांच्या वतीने विविध शाळांमध्ये आयेजित केलेल्या प्रबोधनपर व्याख्यानांमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात आले. या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने एरनाकुलम् येथील श्री सरस्वती विद्यानिकेतन, एसीएस्. हायर सेकंडरी स्कूल, टेरेसा स्पिनेल्ली पब्लिक स्कूल आणि सी.के.सी.एल्.पी. स्कूल, पोन्नुरुन्नी या शाळांमधे प्रबोधन करण्यात आले. या प्रबोधनाचा लाभ ४ सहस्र विद्यार्थ्यांनी घेतला.
क्षणचित्र
     शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांना क्रांतीकारकांचे नावेही माहीत नसल्याचे लक्षात आले. (केरळमध्ये डावे अधिक काळ सत्तेत राहिले, तसेच काँग्रेसनेही सत्ता उपभोगली. त्याचाच हा परिणाम आहे ! काँग्रेसमुक्त भारताबरोबरच कम्युनिस्टमुक्त भारतची घोषणाही देणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते ! - संपादक)

आतापर्यंत देशभरातून इसिसच्या ५४ आतंकवाद्यांना अटक !

अटक करण्यात आलेल्यांचा खटला तात्काळ चालवून त्यांना कठोर शिक्षा करा !
     नवी देहली - देशभरातून इसिसच्या ५४ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी राज्यसभेत दिली. (केंद्रीय गृहमंत्री म्हणाले होते, भारतीय मुसलमान इसिसला महत्त्व देणार नाहीत. त्यांचे हे विधान जनतेची दिशाभूल करणारे होते, असे आता म्हणावे लागते ! - संपादक) यापैकी २९ आरोपींविरुद्ध राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल केले असल्याचे अहिर यांनी एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात सांगितले. अहिर म्हणाले की, उपलब्ध माहितीनुसार जम्मू-काश्मीर, देहली, उत्तरप्रदेश, झारखंड, बंगाल, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू येथील काही जण बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून ते इसिससारख्या आतंकवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याची शंका आहे.

भाजपने गोवंश विकास शाखा विसर्जित केली !

     नवी देहली - गोवंशाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी ६ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली गोवंश विकास शाखा भाजपने विसर्जित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांविषयी केलेल्या विधानानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. भाजपच्या केंद्र आणि राज्य स्तरावर ४० वेगवेगळ्या शाखा आहेत. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, राज्यस्तरावर १७ शाखांची घोषणा करण्यात आली आहे; मात्र यात गोवंशाच्या संदर्भातील शाखेचा उल्लेख नाही. या शाखा अन्य विषयांवरील आहेत.

आसाममध्ये कीर्तन चालू असतांना आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २ ठार !

आतंकवाद्यांना धर्म असतोे; म्हणून ते हिंदूंना लक्ष्य करतात !
     गौहत्ती (गुवाहाटी) - आसाम राज्यातील तिनसुकिया जिल्ह्यातील एका गावात ५-६ आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २ जण ठार, तर ७ जण घायाळ झाले. राजेश शहा आणि किशोरी शहा अशी मृतांची नावे आहेत. येथे कीर्तन चालू असतांना हा गोळीबार करण्यात आला. दुसर्‍या घटनेत कार्बी आंगलांग पोलीस ठाण्यावर १२ ऑगस्टच्या रात्री आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस ठार झाला, तर अन्य एक घायाळ झाला.

१३ मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्रीला १२ वर्षांची शिक्षा !

हिंदूंच्या संतांवरील कथित लैंगिक शोषणाच्या आरोपावरून त्यांची 
अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्ती किंवा मुसलमान 
धर्मगुरूंनी केलेल्या लैंगिक शोषणाची वृत्ते जाणीवपूर्वक दडपतात !
     लंडन - येथील न्यायालयाने ६६ वर्षीय पाद्री फिलिप टेंपल याला १३ मुला-मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी १२ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी या मुलांचे २७ वेळा लैंगिक शोषण केले होते. वर्ष १९७१ ते १९७७ या कालावधीत फिलिप ब्रिटनच्या लेम्बेथ आणि वान्सवर्थ येथील बाल संरक्षण गृहामध्ये काम करत होते. त्या कालावधीत त्यांनी या मुला-मुलींचे लैंगिक शोषण केले होते. या गुन्ह्यानंतरही त्यांना क्राइस्ट द किंग मॉनैस्ट्री चर्च मध्ये पाद्री बनवण्यात आले होते. पाद्री असतांना त्यांनी २ मुलांचे शोषण केले होते. शिक्षा ठोठावतांना न्यायालयाने असे वाटते की, मुलांचे लैंगिक शोषण करण्यासाठीच फिलिप पादरी बनले होते, असे म्हटले आहे.

भारतात इसिसला अर्थपुरवठा करणारा आतंकवादी अब्दुल्ला हादी याला कुवेतमध्ये अटक !

     कुवेत - भारतात इसिसच्या आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणारा आतंकवादी अब्दुल्ला हादी याला कुवेतमध्ये अटक करण्यात आली आहे. २०१३ मध्ये पाकमधून येथे आल्यापासून तो आतंकवाद्यांना समर्थन आणि अर्थपुरवठा करत आहे.
     अब्दुल्ला याने भारतात ४ आतंकवाद्यांना ६० सहस्र रुपये पाठवल्याचा आरोप आहे. या ४ आतंकवाद्यांमध्ये कल्याण येथील अरीब मजीद याचाही समावेश आहे. मजीद सिरियाला जाऊन परत आल्यावर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानेच दिलेल्या माहितीवरून अब्दुल्लाची माहिती कुवेत सरकारला देण्यात आली होती. या माहितीवरून त्याला अटक करण्यात आली. त्याने आपण पैसे पाठवल्याचेही चौकशीत स्वीकारले आहे.

अफगाणिस्तानमध्ये इसिसचे ३०० आतंकवादी ठार

अमेरिका अफगाणिस्तानमध्ये जाऊन शेकडो आतंकवाद्यांना ठार
 करते तर भारत स्वत:च्या देशातीलही आतंकवाद्यांना ठार मारत नाही !
     नवी देहली - अफगाणिस्तान आणि अमेरिका यांच्या सैन्याने संयुक्तपणे ऑपरेशन माऊंटन या मोहिमेच्या अंतर्गत कारवाई करून इसिसचे ३०० आतंकवादी ठार मारले आहेत, अशी माहिती या सैन्याच्या अधिकार्‍यांनी दिली.
     अमेरिकेचे जनरल जॉन निकोलसन सध्या भारत दौर्‍यावर आहेत. त्यांनी भारतीय सैन्याधिकार्‍यांची भेट घेतली. या वेळी ते म्हणाले की, अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नांगरहर प्रांतात इसिसने वर्चस्व वाढवले आहे. ते अल्प करण्यासाठी अमेरिकेने ही कारवाई केली आहे. या कारवाईसाठी अफगाणिस्तानच्या सैन्याने अमेरिकेला चांगले साहाय्य केले आहे.

बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन इस्लामिक स्टेटचे संस्थापक ! - डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा आरोप

डोनाल्ड ट्रम्प परत परत बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांना दोष देतात 
त्याप्रमाणे भारतातील जिहादी आतंकवादाला आणि खलिस्तानवादाला
 काँग्रेसने, गांधी-नेहरू परिवाराने खतपाणी घातले, असे म्हटल्यास चूक ते काय ?
   
  नवी देहली - इस्लामिक स्टेटचे संस्थापक बराक ओबामा असून सहसंस्थापक हिलरी क्लिंटन आहेत, असा आरोप रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका सभेत केला. या दोघांनी इराकमधील समस्येविषयी घेतलेल्या निर्णयामुळेच इस्लामिक स्टेटची निर्मिती झाली आणि ती मध्यपूर्वेतून जगभर पसरली आहे, असे डोनाल्ड म्हणाले.

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

     प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, तसेच राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जाऊ नयेत, या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना, तसेच राष्ट्राभिमानी नागरिक यांच्या वतीने देण्यात आले. याविषयीचा सविस्तर वृत्तांत येथे देत आहोत. 
धुळे  
जिल्हाधिकारी श्री. अण्णासाहेब मिसाळ यांना निवेदन देतांना
केर्ले (कोल्हापूर)
हनुमान हायस्कूलचे मुख्याध्यापक निवेदन स्वीकारतांना

मलकापूर
पोलीस निरीक्षक यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
मंगळवेढा
नायब तहसीलदारांना निवेदन देतांना मंगळवेढा येथील राष्ट्रप्रेमी
पुणे
उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन देतांना कार्यकर्ते
सिद्धेवाडी
मुख्याध्यापकांना निवेदन देतांना कार्यकर्ते
कोल्हापूर 
 राष्ट्राभिमान्यांकडून कोल्हापूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन !
    कोल्हापूर - प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नयेत, या मागणीचे निवेदन येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शंकर बर्गे यांना ५ ऑगस्टला देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सर्वश्री संभाजी भोकरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, श्री शिवप्रतिष्ठानचे राहुल नागटिळक, बजरंग दलाचे सुधाकर परमणी, वंदे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे अवधूत भाट्ये, युवा सेनेचे भाऊ चौगुले, हिंदु एकता आंदोलनाचे शिवाजीराव ससे, आशिष लोखंडे, शिवसेनेचे भुदरगड तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनराज घाडगे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेच्या साधिका यांसह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.
राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी ३ शाळांतील मुख्याध्यापकांना निवेदन सादर !
    केर्ले - येत्या १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नयेत, या राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या मोहिमेच्या अंतर्गत येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांनी येथील श्री हनुमान हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप गायकवाड, कुमार विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री. गोसावी आणि कला विद्यामंदिराचे मुख्याध्यापक यांना ८ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि श्री चंद्रकांत मारुति पाटील दादा कला क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक युवा मंच यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी रामभाऊ मेथे, रणधीर किल्लेदार, दीपक नलावडे, सागर कोळी, संदीप पाटील, विक्रम माने, अविनाश पोवार, आकाश भोसले, पंकज कालगे, विश्‍वजीत बुवा, विजय मोरे, ऋतवीन पोवार, अजित पाटील उपस्थित होते. या वेळी हनुमान हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप गायकवाड म्हणाले की, हा उपक्रम चांगला आहे. शाळेच्या लाभासाठी असे उपक्रम राबवणे आवश्यक आहे. आम्ही विद्यार्थ्यांना प्लास्टिकचे राष्ट्रध्वज न वापरण्याविषयी सांगतो.
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री आणि खरेदी करणार्‍यांवर
कारवाईचे पोलीस आणि प्रशासन यांचे आश्‍वासन
    मलकापूर - राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी समितीच्या वतीने येथील तहसीलदार श्री. चंद्रशेखर सानप आणि पोलीस निरीक्षक श्री. अनिल गाडे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. समितीच्या वतीने कोल्हापूर येथे प्रशासन, शाळा आणि महाविद्यालये अशा १४ ठिकाणी निवेदन देण्यात आले.
    तहसीलदार श्री. चंद्रशेखर सानप आणि पोलीस निरीक्षक श्री. अनिल गाडे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरणारे आणि खरेदी करणारे यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेच्या साधिका उपस्थित होत्या.
   शाहूवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ओवूळकर यांनी शाळेतील २५० विद्यार्थिनींना धर्मशिक्षण मिळण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता या विषयावर व्याख्यान घेण्याची मागणी केली.
पुणे
विविध प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन
     पुणे - पुणे जिल्हाधिकारी, पुणे पोलीस आयुक्त आणि पिंपरी-चिंचवड येथील पोलीस परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याविषयी निवेदन देण्यात आले.
     येथील पुणे पोलीस आयुक्तांच्या वतीने विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी ते म्हणाले की, यंदाच्या वर्षी राष्ट्र्रध्वजाचा मान राखण्यासाठी निश्‍चितपणे अंमलबजावणी करू. त्या संदर्भात सर्व पोलीस ठाण्यांना सूचनाही देणार आहोत. या वेळी निवेदन देतांना समितीचे सर्वश्री कृष्णाजी पाटील, शशांक सोनवणे उपस्थित होते. पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी पुरंदर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. दिलीप विठ्ठल गिरमे, पुरंदर तालुक्याचे युवा काँग्रेसचे श्री. सचिन जाधव, समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि अन्य राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.
पालघर
बोईसर येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून पालघर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
    पालघर - स्वातंत्र्याच्या काळात शिरीषकुमार याने छातीवर गोळी झेलली; मात्र हातातील राष्ट्रध्वज खाली पडू दिला नाही. स्वतंत्र भारतात मात्र कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वजाचे अशा प्रकारे होणारे विडंबन रोखण्यासाठी बोईसर येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून ११ ऑगस्ट या दिवशी पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना निवेदन देऊन राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आवाहन करण्यात आले. निवेदन देतांना श्री. नाईकगुरुजी, श्रीमती मालती सोनार उपस्थित होत्या.
धुळे
धुळे येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
उपजिल्हाधिकार्‍यांचा कृतीशील प्रतिसाद
    येथील जिल्हाधिकारी श्री. अण्णासाहेब मिसाळ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास राजपूत, भाजपचे श्री. प्रतीक गीते आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल उपस्थित होते. यानंतर उपजिल्हाधिकारी श्री. तुकाराम हुळवले यांनीही समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयी चित्रफीत पाहून उपक्रमाचे कौतुक केले, तसेच कृती समितीत हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्यात नियोजन करता येईल, असे सांगितले. केबल चालकांची बैठक घेऊन त्यांना ही चित्रफीत दाखवण्याचेही त्यांनी नियोजन केले.
रायगड
व्यापक स्तरावर प्रबोधन
     पनवेल - रायगड जिल्ह्यात ४० शाळा, २ महाविद्यालये आणि ३ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. १८ शाळांमधून विद्यार्थ्यांचेही राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक कार्यक्रमाची माहिती मुलांना सांगण्यासाठी या, असे सांगितले, तर उलवा (ता. उरण) येथील शाळेत विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. २ शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलांना राष्ट्र-धर्माचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने साप्ताहिक सनातन प्रभात चालू केले.
क्षणचित्र : या मोहिमेत रायगड जिल्ह्यातील ८ धर्माभिमान्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

देवनार येथील शाळेत क्रांतीदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांविषयी माहितीचे सचित्र प्रदर्शन !

धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !
    
फ्लेक्स प्रदर्शन पहातांना विद्यार्थी
     मुंबई - देवनार दत्ताराम गणपत पाटील इस्टेट, सायन ट्रोम्बे येथील मातोश्री विद्यामंदिर या शाळेत ९ ऑगस्ट या दिवशी क्रांतीदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे सचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते. इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रदर्शनातील क्रांतीकारकांची सर्व माहिती, जन्म-मृत्यू यांच्या नोंदीही त्यांनी करून घेतल्या. प्रदर्शन लावल्यविषयी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्ज्वला सांडभोर यांनी समितीचे आभार मानले.
     या वेळी समितीचे श्री. मयुरेश कोनेकर आणि सनातनच्या सौ. नयना भगत उपस्थित होत्या.

अकोला येथे साकारण्यात येणार्‍या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेल्या केकच्या रंगामध्ये पालट !

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी सतर्क असलेल्या
हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम !
   मुंबई, १३ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन केल्यानंतर अकोला येथे साकारण्यात येणार्‍या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेल्या २३५ फुटांच्या केकच्या रंगामध्ये पालट करणार असल्याचे आश्‍वासन समितीला देण्यात आले. ११ ऑगस्ट या दिवशी दैनिक लोकमतमध्ये प्रसारित केलेल्या वृत्तानुसार अकोला येथे नॅशनल इंट्रेग्रिटी मिशन, वंदेमातरम् संघ आणि हुशे ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टला हा विशाल केक साकारण्यात येणार होता. या केकवर राष्ट्रध्वजाचे चित्र दाखवण्यात आले होते.

पंतप्रधानांनी गोरक्षकांना समाजकंटक म्हटल्याविषयीचे वक्तव्य मागे घ्यावे ! - धर्माभिमान्यांची निवेदनाद्वारे मागणी

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शंकर बर्गे यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
    कोल्हापूर - पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांना समाजकंटक म्हटल्याविषयीचे वक्तव्य मागे घ्यावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्माभिमान्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शंकर बर्गे यांना १२ ऑगस्ट या दिवशी दिले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सर्वश्री संभाजी भोकरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, श्री शिवप्रतिष्ठानचे राहुल नागटिळक, आशिष लोखंडे, बजरंग दलाचे सुधाकर परमणी, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे अवधूत भाट्ये, युवा सेनेचे भाऊ चौगुले, हिंदु एकता आंदोलनाचे शिवाजीराव ससे, शिवसेनेचे भुदरगड तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनराज घाडगे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच सनातन संस्थेच्या साधिका यांसह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते. धर्माभिमान्यांनी श्री. शंकर बर्गे यांच्याशी पंतप्रधानांच्या वक्तव्यासंबंधी चर्चा केली. या वेळी श्री. बर्गे यांनीही धर्माभिमान्यांच्या भावना शासनाला कळवण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.

धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने हडपसर (पुणे) येथील शाळेत क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन !

     पुणे - छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप, थोरले बाजीराव पेशवे यांसारखे धर्मनिष्ठ राजे अन् असंख्य राष्ट्र्रप्रेमी क्रांतीकारक यांनी दिलेल्या क्रांतीलढ्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सुरक्षित जीवन जगू शकतो. त्याचे स्मरण ठेवून मुलांमधील राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, या जाणिवेतून ११ ऑगस्ट या दिवशी धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने हडपसर भागातील काळेपडळ येथील पालिकेच्या मारुतिराव काळे शाळा क्रमांक १७१ मध्ये क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले. त्याचा १८० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या वेळी विद्यार्थ्यांनी क्रांतीकारकांची माहिती जाणून घेतली आणि त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहलता भिसे आणि अन्य शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले. उपक्रमासाठी श्री. नारायण पाटील, श्री. बेंद्रे, सौ. माधुरी तडवळकर, सौ. छाया राऊत यांसह अन्य विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.

पंतप्रधानांनी गोरक्षकांच्या विरोधात केलेले विधान मागे घ्यावे ! - ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर

जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
    जळगाव -
जे हिंदूंच्या मतांवर निवडून येतात आणि सत्तेवर बसतात, तेच गोमातचे रक्षण करणार्‍यांच्या विरोधात वक्तव्ये करत असतील, तर धिक्कार असो त्यांचा ! छत्रपती शिवाजी महाराज १४ वर्षांचे असतांना त्यांनी कसायांच्या हातून गोमातेची सुटका केली आणि कसायांचे हात छाटले; मात्र आजचे राज्यकर्तेच गोरक्षण करणार्‍यंाना गुंड म्हणत असतील, तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून कोणता आदर्श घेतला ? हिंदूंच्या भावना दुखावणारी वक्तव्ये करू नका. तुम्ही केलेले विधान मागे घ्या, अशी मी विनंती करतो, असे प्रतिपादन ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी, तसेच जम्मू-काश्मीर येथे चालू असलेल्या हिंसाचाराला रोखण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार देण्यात यावेत, या मागण्यांसाठी येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. आंदोलनाला विविध हिंदुत्ववादी संघटनांचे ९० प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी हस्तफलक धरून निदर्शने करण्यात आली.
लोकहो, राष्ट्रध्वज आणि राष्ट्र्रगीत यांचा अवमान टाळा !
१. रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी पडलेले राष्ट्र्रध्वज उचला !
२. तोंडवळा अथवा कपडे यांवर राष्ट्रध्वज रंगवणार्‍यांचे प्रबोधन करा !
३. राष्ट्र्रगीताच्या वेळी सावधान स्थितीत शांतपणे उभे रहा !

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bhartiyo, Plastick ke Rashtradhvajka upyog na kare ! Raste par kahi Rashtradhvaj gira mile, to uthakar uska samman kare !
जागो ! : भारतियों, प्लास्टिक के राष्ट्रध्वज का उपयोग ना करे ! रास्ते पर कही राष्ट्रध्वज गिरा मिले, तो उठाकर उसका सम्मान करें !

पंतप्रधानांनी गोरक्षक आणि गोमाता यांची क्षमा मागावी ! - पुण्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना
   पुणे, १३ ऑगस्ट (वार्ता.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या विरोधात केलेले विधान मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी, अशा आशयाचे निवेदन येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजेंद्र मुठे यांना देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी सर्वश्री अनिकेत हराळे, अभिजीत औटी, हिंदु जनजागृती समितीचे प्रवीण नाईक, कृष्णाजी पाटील आणि सनातन संस्थेचे विनायक बागवडे उपस्थित होते.
   हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आंदोलन घेता यावे, यासाठी कार्यकर्ते पोलीस ठाण्यात अनुमती मागायला गेले. त्या वेळी पंतप्रधानाच्या विरोधात आंदोलन करता येणार नसल्याचे सांगून आंदोलनाला अनुमती नाकारण्यात आली. पंतप्रधान स्वत: लोकशाहीचे पुरस्कर्ते असतांना लोकशाही पद्धतीनेच आंदोलन करण्यास अनुमती नाकारल्याने कार्यकर्त्यांनी असंतोष व्यक्त केला.     आज प्रत्येक आई-वडील माझा मुलगा डॉक्टर, अभियंता वगैरे व्हावा, असे म्हणतात; पण कोणीही सत्पुरुष व्हावा, असे म्हणत नाहीत ! - प.पू. झुरळे महाराज, डोंबिवली

हिंदुत्वनिष्ठांनो, आपण करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म कार्याला ईश्‍वरी अधिष्ठान असणे किती आवश्यक आहे, याचे महत्त्व लक्षात घ्या !

श्री. आनंद जाखोटिया
१. सर्व अनुकूल स्थिती असतांना एक हिंदुत्वनिष्ठ आपला अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी का देत नाही ?, असा प्रश्‍न मनात येणे : एका शहरातील एका हिंदुत्वनिष्ठाला आम्ही भेटायला गेलो. ते एका संघटनेच्या पदावर असून त्या अंतर्गत ते वर्षातून दोन-तीन उपक्रम राबवतात. त्यांना हिंदूंची सद्य:स्थिती आणि हिंदुत्वाचे कार्य करण्याची आवश्यकता, यांची पूर्ण कल्पना आहे. त्या संघटनेत कार्य करणारा त्यांच्यासह १०-१५ जणांचा गट आहे. या गटातील सर्व जण चांगल्या पदावरून निवृत्त झाल्याने त्यांतील कोणालाच विशेष आर्थिक समस्या नाहीत. आम्ही ज्यांना भेटायला गेलो, त्यांच्या घरी तर पती-पत्नी दोघेच असल्याने त्यांना अन्य दायित्वही नाही. अशा सर्व अनुकूल स्थितीत ते आपला अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी का देत नाहीत ?, असा प्रश्‍न माझ्या मनात आला.

असे होऊ देणारा जगातील एकमेव देश म्हणजे भारत ! भारताची उरली-सुरली लज्जा संपवणारी लोकशाही नको, तर हिंदु राष्ट्र हवे !

     कोणत्याही भारतीय नागरिकाला देशात कुठेही जाण्याचा अधिकार आहे; परंतु हिमाचल प्रदेशमधील कसोल या गावात मात्र भारतीय पुरुषांना प्रवेशबंदी आहे. येथे मोठ्या प्रमाणात इस्रायली कुटुंबे रहात आहेत. येथे येणार्‍या पुरुष पर्यटकांकडून इस्रायली महिलांची छेड काढली जात असल्याने स्थानिक नागरिक, तसेच खासगी पर्यटन व्यवसायिक यांनी ही बंदी घातली आहे.

शासकीय चाकरीत असतांना शासकीय कामकाज आणि कर्मचारी यांविषयी आलेले कटू अनुभव अन् शिकायला मिळालेली सूत्रे

        ८ वर्षांपूर्वी मी एका सरकारी आस्थापनात चाकरी करत होते. प्रारंभी माझ्या मनात चाकरी करावी असे विचार होते; परंतु जेव्हा मी ती करू लागले, तेव्हा मात्र मला ती नकोशी वाटू लागली. मी आश्रमातील जीवन थोडेफार अनुभवले होते. त्यामुळे चाकरीतील हे जीवन मला नरकाप्रमाणे वाटू लागले. कधी कधी तेथील विचित्र माणसे, भ्रष्टाचार, दबाव, मानसिक खच्चीकरण करणे, खोटे बोलणे, अस्वच्छता, कामचुकारपणा, अधर्माचरण यांचा मला पुष्कळ कंटाळा येत असे. माझ्या पूर्वग्रहामुळे सरकारी चाकरी करायची नाही, असे मी ठरवले होते; परंतु प्रारब्धातच असल्याप्रमाणे चाकरी मिळाली. तेव्हा ही परिस्थिती देवाने काहीतरी शिकण्यासाठीच दिली आहे, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी देवाने तेथील कामकाजातून काही गोष्टी शिकवल्या. त्या मांडण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न !
१. शासकीय कार्यालयांची दुःस्थिती
१ अ. समाजऋण फेडण्याची उत्तम संधी मिळालेली असतांना केवळ लुटारूंप्रमाणे वागणारे शासकीय कर्मचारी !
उद्धवा अजब तुझे सरकार । लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार ।
        हे गाणे मी पूर्वी ऐकले होते. तसाच काहीसा अनुभव या सरकारी कामकाजाच्या संदर्भात येतो. राजा लहरी आणि प्रजाही आंधळी, असेच येथे अनुभवास येते. शासकीय कर्मचारी समाजाशी संबंधित असतात. त्यांना दिलेली चाकरी ही देवाने त्यांना समाजऋण फेडण्यासाठी दिलेली उत्तम संधी आहे. खरे तर, ही चाकरी प्रामाणिकपणे करून ते समाजाशी नाते जोडू शकतात. समाजसेवाही करू शकतात. आपल्याला फेडाव्या लागणार्‍या चार ऋणांपैकी समाजऋण फेडण्यासाठी हे एक चांगले माध्यम आहे; परंतु अलीकडे शासकीय कर्मचार्‍यांना समाजाकडून तुच्छतेची बोलणी ऐकावी लागतात. समाजाला लुटायला बसल्याप्रमाणे लुटारूंसारखी यांची अवस्था आहे. कितीही नियम केले, तरी त्यांच्यात पालट होत नाही. जोपर्यंत वृत्ती पालटत नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच रहाणार ! शासकीय कर्मचार्‍यांनो, भ्रष्टाचार करून पापाचे धनी होऊन नरकात जाण्यापेक्षा प्रामाणिकपणे चाकरी करून समाजऋण फेडा !
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
क्रांतीगाथा विशेषांक
प्रसिद्धी दिनांक
: १५ ऑगस्ट २०१६ पृष्ठ संख्या : ८, मूल्य : ४ रुपये
क्रांतीगाथा अंकात वाचाल...!
१. भारतमातेची शोकांतिका
२. कलियुगातील पुढार्‍याची प्रतिज्ञा !
३. राष्ट्रध्वज देऊ पहात असलेला संदेश
४. प.पू. पांडे महाराज यांचे राष्ट्राप्रतीचे जाज्वल्य विचार
     १५ ऑगस्टच्या क्रांतीगाथा या विशेषांकाची आणि १६ ऑगस्टच्या नियमित दैनिक सनातन प्रभातच्या अंकांची मागणी १४ ऑगस्टला दुपारी २ वाजेपर्यंत इआरपी प्रणालीत भरावी.
शहापूर येथे आज हिंदु धर्मजागृती सभा
स्थळ
: स्वातंत्रसैनिक किसनबाबा विद्यामंदिर, धसई, शहापूर
वेळ : दुपारी ४
संपर्क : ९३२४८६८९०६

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या मे २०१६ मधील प्रसारकार्याचा आढावा

१. संकेतस्थळाच्या 
संदर्भातील संख्यात्मक आढावा
१ अ. विविध माध्यमांतून 
संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या 
१ आ. संकेतस्थळाला मिळालेले मानांकन
१ आ १. गूगलने दिलेले मानांकन (टीप १) (मे २०१६ नुसार) : ३
टीप १ :
प्रत्येक संकेतस्थळाला गूगल १ ते १० यांपैकी क्रमांक देते. जेवढा क्रमांक जास्त, तेवढे मानांकन (पेज रँक) चांगले.

एवढी माहिती ज्ञात असूनही सरकार, एकाही राजकीय पक्ष किंवा बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी इतकी वर्षे अशी मागणी केली नाही, हे लक्षात घ्या ! त्यामुळे हिंदूंनो, आता तुम्हीच जागृत होऊन ही मागणी पूर्णत्वास जाईपर्यंत लढा द्या !

     इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांतून प्रेरणा घेत आतापर्यंत ५५ आतंकवादी सिद्ध झाले असल्याचे समोर आले आहे. यांपैकी काही धर्मांधांनी जगभरात आतंकवादी कारवाया केल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनशी संबंधितांनी भारतात आतापर्यंत ८०० हून अधिक जणांचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादाकडे वळवले असल्याची धक्कादायक माहितीही पोलीस अन्वेषणात समोर आली आहे.
     आतंकवादी कारवायांमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक शांतता बिघडवणार्‍या, तसेच धर्मांतरे घडवून धार्मिक तणाव निर्माण करणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांना तात्काळ अटक करावी, तसेच इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालावी. तसेच आतंकवाद रोखण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी २ ऑगस्ट या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात एका पत्रकार परिषदेद्वारे केली.

नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केल्यानंतर राजकीय स्तरावर पुष्कळ चढउतार झाल्याने तेथील जनतेने अनुभवलेली भयावह आपत्कालीन स्थिती !

       २०.९.२०१५ या दिवशी नवीन राज्यघटनेनुसार नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. नवीन राज्यघटना स्वीकारल्यानंतर राजकीय स्तरावर पुष्कळ चढउतार झाले आणि अजूनही होत आहेत. अन्नधान्य आणि औषधे यांपासून औद्योगिक साहित्यापर्यंत नेपाळ भारतावरच अवलंबून आहे. भारत आणि नेपाळ यांच्यामधे असलेल्या ५ सीमारेषा ५ मास बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे नेपाळमधील जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले.
१. नेपाळमध्ये पुढीलप्रमाणे 
जनजीवन विस्कळीत झाले 
कु. सानू थापा
 १ अ. घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे 
जनतेवर ओढवलेले कठिण प्रसंग
१ अ १. गॅस सिलिंडरच्या अभावी लोकांनी लाकडासाठी शोधलेला पर्याय आणि शासनाने लाकूड पुरवठा करण्यासाठी घेतलेला निर्णय : नेपाळमध्ये लोकांना ७ मास गॅस सिलिंडरच मिळत नव्हते. त्यामुळे तेथील लोकांनी भूकंपात कोसळलेल्या घरांतील लाकडांचा जळण म्हणून वापर करण्यास आरंभ केला. गॅसचा तुटवडा होऊन काही मास उलटल्यानंतर तेथील शासनाने पशुपतिनाथ येथील अंतीम संस्कारासाठी वापरले जाणारे लाकूड लोकांना जळण म्हणून उपलब्ध करून दिले. या लाकडांचे मूल्य २० रुपये प्रती किलो असे होते. यानंतर १ मासाच्या आत सर्वत्र जळाऊ लाकडाचा तुटवडा भासू लागला.

सनातनच्या रामनाथी आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) व्हिडिओ एडिटिंग आणि अ‍ॅनिमेशन यांसाठी पुढील संगणक अन् सॉफ्टवेअर यांची आवश्यकता !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     अखिल मानवजातीला ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवणे आणि आध्यात्मिक संशोधन करणे, ही महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये ! मानवाला आध्यात्मिक विषयांचे अमूल्य ज्ञान मिळावे आणि साधनेसाठी त्या ज्ञानाचा लाभ करून घेऊन त्याने आध्यात्मिक प्रगती साध्य करावी, या व्यापक उद्देशाने विश्‍वविद्यालयाकडून व्यापक स्तरावरील संशोधन कार्य चालू आहे.
     संशोधनाच्या अंतर्गत नानाविध विषयांवरील चित्रीकरण करण्यात येते. त्या चित्रीकरणाचे दृक्श्राव्य संकलन (व्हिडिओ एडिटिंग) करण्याची सेवा सध्या चालू आहे. बुद्धीअगम्य घटनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने या सेवेसाठी उपलब्ध असणारी उपकरणे अपुरे पडत आहेत. तुटपुंज्या उपकरणांमुळे या संशोधन कार्याची गती खुंटू नये, यासाठी व्हिडिओ एडिटिंग आणि अ‍ॅनिमेशन करण्याच्या क्षमतेचे पुढील संगणक अन् सॉफ्टवेअर यांची तातडीने आवश्यकता आहे.
   
  जे वाचक, हितचिंतक आणि अर्पणदाते वरील साहित्य विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. योगेश शिंदे यांच्याशी ०८४५१००६१३० या क्रमांकावर किंवा yogesh.sanatan@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

मृत्यूची भीती नको !

   
श्री. सुधाकर चपळगांवकर
  मौत का दिन मुअय्यन है (अय्यन हा शब्द ऐन म्हणजे निश्‍चित वेळ याला समानार्थी आहे.) ही एका प्रसिद्ध कवीने लिहिलेली पंक्ती आहे. मृत्यूचा दिवस जर निश्‍चित आहे, तर मन अस्वस्थ का ?, असा प्रश्‍न कवीला पडला आहे. मृत्यू म्हणजे शेवट नसून तो आपल्या जन्मापासून ते मुक्तीपर्यंतचा एक टप्पा मानला जातो. मृत्यूची भीती न बाळगता मृत्यूनंतर काय ?, याचा विचार करून आपल्याला अपेक्षित प्रवासासाठी या जन्मी तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे, असा या प्रश्‍नाचा अर्थ काढायला हवा. भारतीय तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक जण आपले प्रारब्ध घेऊन जन्माला येतो. त्यात आयुष्यभरातील चांगल्या आणि वाईट कर्मांची भर घालतो. मृत्यूच्या वेळी या सर्वांचा एकत्रित विचार होऊन त्याची पुढील वाटचाल ठरते; म्हणून मृत्यूची भीती न बाळगता सोबतच्या संचितात किती सकारात्मक भर घालता येईल, तेवढाच विचार दृष्टीसमोर ठेवल्यास मृत्यूचे भय वाटण्याचे कारणच रहाणार नाही.
- श्री. सुधाकर चपळगांवकर, निवृत्त जिल्हा न्यायाधीश, संभाजीनगर.

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मंदिरांच्या संरक्षणाविषयी शासन उदासीन !

       रामनाथी, गोवा येथे १९ जून ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात विविध राज्यांतील हिंदूंची असुरक्षितता या सत्रात भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय महासचिव श्री. अनिल धीर यांनी सांगितलेले त्यांचे अनुभव येथे देत आहोत.
१. ओडिशातील कोणार्क येथील 
सूर्यमंदिराचा केवळ २५ टक्केच भाग शिल्लक असणे !
       हिंदूंची मंदिरे किंवा हिंदूंच्या कोणत्याही गोष्टींविषयी आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही पुरातत्व अवशेषांचे संरक्षण करणारी संस्था काहीच करत नाही. ताजमहालला जागतिक दर्जाचे पुरातत्व संरक्षण मिळते. याउलट मी तुम्हाला ओडिशातील कोणार्क येथील सूर्यमंदिराचे उदाहरण देतो. तुम्ही जे सूर्यमंदिर पहाता, ते केवळ ३५ टक्केच आहे. त्याचा ६५ टक्के भाग कोसळला आहे. प्रत्येक वर्षी कोणार्कच्या सूर्यमंदिरात पाणी भरते. आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे कार्यालय त्या ठिकाणी आहे. कोट्यवधी रुपये त्यांना संमत होतात; पण मंदिराची अशी स्थिती आहे.

लोकशाहीतील सध्याची प्रक्रिया अपराध्यांना शिक्षा करत नाही; म्हणून ती पालटणे, हे खरे उत्तर आहे. हेही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात कसे येत नाही ?

     भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी शासन गंभीर आहे; मात्र लोकशाहीत कायदेशीर प्रक्रियेतून आम्हाला भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करावी लागते. आपल्या लोकशाहीत कितीही अट्टल गुन्हेगार असला, तरी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता शिक्षा केली जाऊ शकत नाही.
- लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा

सनातन संस्थेविषयी पोलिसांनी लोकांच्या मनात निर्माण केलेली दहशत !

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्‍या 
सनातनविषयी जनतेच्या मनात दहशत निर्माण करणारे आणि सनातनच्या समष्टी 
कार्याची हानी करणारे पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
     एका शहरातील एका संस्थेच्या वतीने सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सनातन संस्था आतंकवादी आहे का ? या विषयावर चर्चासत्र ठेवण्यात येणार होते. यात वक्ते म्हणून एक निवृत्त न्यायाधीश, एक मोठे राजकीय नेते आणि सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचे भाषण ठेवण्यात आले होते. हा कार्यक्रम शहरातील एका शाळेच्या सभागृहात होणार होता. या शाळेच्या विश्‍वस्तांना सनातन संस्थेविषयी कार्यक्रम होणार असल्याचे कळताच त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना सांगितले, सनातन संस्थेविषयी कार्यक्रम ठेवला, तर आमच्या मागे नसत्या पोलीस चौकशा लागतील. तरी कृपया आपण कार्यक्रमाचा विषय पालटा अन्यथा दुसरे सभागृह पहा. विश्‍वस्तांच्या या भूमिकेमुळे त्या संस्थेला सदर कार्यक्रमाचा विषय पालटावा लागला. कार्यक्रमाच्या आयोजकांना दूरभाष करून सनातन संस्थेकडे क्षमा मागावी लागली. पोलिसांनी सनातनविषयी लोकांच्या मनात जी दहशत निर्माण केली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी सनातनच्या समष्टी कार्याची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचे लक्षात येत आहे.
- श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय आणि एस्.एस्.आर्.एफ्. यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अमेरिकेतील पहिल्या तीन दिवसीय कार्यशाळेचा अहवाल !

      १० ते १२ जून २०१६ या कालावधीत अमेरिकेतील माऊंट लॉरेल, न्यू जर्सी येथे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय आणि एस्.एस्.आर्.एफ्. यांनी आयोजित केलेली पहिली तीन दिवसीय अध्यात्म कार्यशाळा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने यशस्वीपणे पार पडली. या कार्यशाळेचा लाभ १४ जिज्ञासूंनी घेतला. या कार्यशाळेत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, आध्यात्मिक उपाय, गुुरुकृपायोगांतर्गत साधनेचे ८ टप्पे यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आध्यात्मिक पैलूंवर आधारित संशोधन, तसेच चांगल्या आणि वाईट शक्तींमुळे झालेले पालट यांची काही चलत्चित्रे दाखवण्यात आली. एस्.एस्.आर्.एफ्. निर्मित आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
१. वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
अ. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रापासून सर्व जिज्ञासू मोकळेपणाने मनातील विचार मांडत होते, तसेच त्यांच्यात संघटितपणा आणि जवळीकता असल्याचे जाणवले.
आ. उपस्थितांमधील शिकण्याची वृत्ती आणि प्रत्येक सत्राच्या आधी १० मिनिटे केलेला नामजप यांमुळे प्रत्येक सत्रात पुष्कळ आनंद जाणवत होता.

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !
     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १० महिने २९ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना २ महिने ५ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
     राज्यघटनेत आतापर्यंत (केवळ ६९ वर्षांत) १०० वेळा सुधारणा झाल्या आहेत; परंतु २ अब्ज वषेर्र् प्राचीन असणार्‍या वेदांमध्ये आतापर्यंत एकदाही सुधारणा झालेली नाही, तरीही वेदांपेक्षा भारतीय राज्यघटनेला मोठे समजले जाते ! - प्रा. रामेश्‍वरप्रसाद मिश्र, गांधी विद्या संस्था, वाराणसी

गोव्यातील ४० आमदारांपैकी केवळ एकाला असे वाटणे, हे लोकशाहीला लज्जास्पद !

     लाच घेतांना पकडले जाणार्‍यांचे हात तोडणे अपेक्षित आहे ! - नरेश सावळ, अपक्ष आमदार, गोवा

युरोपमधील एका रुग्णालयातील आधुनिक वैद्या आणि कर्मचारी यांचे अनुभवलेले योग्य आणि अयोग्य वर्तन !

      २८.१०.२०१४ या दिवशी पायलोनीडल सिस्ट (माकडहाडाच्या ठिकाणी आलेली गाठ) काढून टाकण्याचे शस्त्रकर्म करण्यासाठी मी युरोपमधील एका खाजगी रुग्णालयात भरती झालो होतो. रुग्णालयातील वास्तव्यात तेथील कर्मचार्‍यांची योग्य आणि अयोग्य वर्तणूक मला पहायला मिळाली. हे कर्मचारी रुग्णांना तणावाखाली ठेवून पापाचरण करत असल्याचे मला जाणवलेे. यावरून चांगल्या वैद्यकीय सुविधेेसाठी धर्मशिक्षण हाच एकमेव पर्याय आहे, असे माझ्या लक्षात आले.
श्री. देयान ग्लेश्‍चिच
१. वैद्यकीय कर्मचार्‍यांची शस्त्रकर्मपूर्व 
पडताळणी आणि शस्त्रकर्माच्या वेळी असलेली वर्तणूक
१ अ. रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या अरेरावी वागण्याने रुग्ण हताश होणे : माझ्या शस्त्रकर्मपूर्व पडताळणीच्या वेळी आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांची वर्तणूक वेगवेगळी होती. काही आधुनिक वैद्य आणि काही परिचारिका हे पुष्कळ प्रेमाने अन् नम्रपणे वागत होते. ते सभ्य, शांत, काळजी घेणारे आणि मित्रत्वाने वागणारे होते, तरीही अर्ध्याहून अधिक कर्मचार्‍यांची धारणा ते स्वतः कोणी तरी श्रेष्ठ आहेत, अशी होती. ते माझ्याशी आणि इतर काही रुग्णांशी पुष्कळ अरेरावीने बोलत होते. रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या या अयोग्य वर्तनामुळे रुग्ण पुष्कळ हताश झाले होते.

रामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

        १९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. त्यांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आणि साधकत्ववृद्धी शिबीर या काळात आलेल्या अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे !

श्री. अपूर्व प्रसन्न ढगे
१. आश्रमात सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळणे आणि साधकांकडून पुष्कळ प्रेम अन् संतांचे आशीर्वाद मिळणे : १२.६.२०१६ ते ५.७.२०१६ या काळात मला रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवेची अनमोल आणि अमूल्य संधी मिळाली. प्रत्येक साधकाकडून मला विविध गोष्टी शिकायला मिळाल्या, तसेच त्यांच्याकडून पुष्कळ प्रेम, संतांचे आशीर्वाद आणि प्रसादही मिळाला. मला संतांसाठी जेवण बनवण्याची संधीही मिळाली. सर्वांसाठी स्वयंपाक बनवून मला पुष्कळ आनंद मिळाला.
२. उपाहारगृहामध्ये आणि रामनाथी आश्रमात जेवण बनवणे
 ३. पूर्णवेळ साधक होण्याच्या 
संदर्भातील स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्‍वरेच्छा !
३ अ. स्वेच्छा : माझ्या मनात पूर्णवेळ साधक होण्याचा विचार गेल्या वर्षापासून पुष्कळ तीव्रतेने येत आहे. उपाहारगृहात काम करण्यापेक्षा आश्रमातच सेवा करावी, असे मला वाटते. मला पूर्णवेळ साधक व्हायचेे आहे, असे वाटणे, ही झाली स्वेच्छा.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वक्ता, प्रवक्ता यांच्यासाठीच्या मार्गदर्शन शिबिराला प्रारंभ !

दीपप्रज्वलनाद्वारे शिबिराला प्रारंभ करतांना अर्थशास्त्रतज्ञ प्रा. कुसुमलता 
केडिया (मध्यभागी), डावीकडून सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस, हिंदु धर्म,
 संस्कृती आणि इतिहास यांचे गाढे अभ्यासक प्रा. रामेश्‍वर मिश्र आणि हिंदु 
जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे (उजवीकडे)
(सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत. - संपादक)

भावी महायुद्धकाळात डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध नसतांना अन् नेहमीसाठीही उपयुक्त ग्रंथ मालिका !

       संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १२ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !
सनातनची ग्रंथसंपदा आता 
SanatanShop.com वर उपलब्ध !
संपर्क : ९३२२३१५३१७

कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण न करता येणारे सरकार आतंकवाद्यांपासून रक्षण करू शकेल का ?

       गोवा राज्यात कुत्र्यांकडून प्रतिदिन ६२ नागरिकांचा चावा घेतला जातो. एप्रिल २०१५ ते एप्रिल २०१६ या एक वर्षाच्या कालावधीत राज्यातील २२ सहस्र ८१३ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद राज्य आरोग्य खात्याकडे आहे. प्रत्येक मासाला (महिन्याला) ५० ते ८० जणांना रेबिजविरोधी लस दिली जात आहे. एकूण ९६१ जणांना मागील वर्षी रेबिजविरोधी लस देण्यात आली आहे.

साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांनी आपल्या बहिणीला वाचक बनवण्याची इच्छा दर्शवल्यास लक्षात घ्यावयाची सूत्रे

     दैनिक वितरणाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी दैनिक चालू करण्यास प्राधान्य द्यावे. तसे शक्य नसल्यास साप्ताहिक, पाक्षिक अथवा मासिक सनातन प्रभात चालू करू शकतो. नियतकालिक वितरणाची व्यवस्था नसल्यास हितचिंतकांना पोस्टाद्वारे अंक पाठवता येईल. नियतकालिक चालू करतांना त्यांच्या भाषेचा विचार करणे अपेक्षित आहे. 
     सनातन प्रभातच्या नूतन संकेतस्थळावरून वाचक बनण्यास इच्छुक असलेले जिज्ञासू वर्गणीदार होऊ शकतात, तर वाचक त्यांच्या अंकाचे नूतनीकरण करू शकतात. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करावे. ऑनलाईन वर्गणीदार अर्ज भरणे शक्य नसल्यास स्थानिक साधकांनी त्यांना संपर्क करावा. ही सुविधा दैनिक वगळून अन्य नियतकालिकांसाठी आहे.

राखीपौर्णिमेला बहिणीला अशाश्‍वत भेट देण्याऐवजी चिरंतन तत्त्वाचा प्रसार करणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक बनवा आणि ज्ञानामृत असलेली अनोखी ओवाळणी द्या !

राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंंदु बांधवांना आवाहन ! 
वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने... 
१. राखीपौर्णिमेचे महत्त्व ! 
      श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! या वर्षी १८.८.२०१६ या दिवशी राखीपौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भावाने आपले रक्षण करावे, यासाठी बहीण या दिवशी भावाला ओवाळते आणि राखी बांधते. भाऊ बहिणीला पैसे अथवा तिला उपयोगी पडेल, अशी वस्तू ओवाळणी म्हणून देतो. 

शासकीय कार्यालयाप्रमाणे उत्तर देऊन हिंदुत्वनिष्ठ संघटनेला साहाय्य करण्याचे टाळणारी राष्ट्रव्यापी हिंदुत्वनिष्ठ संघटना !

      एका छोट्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने काही अडचणींविषयी राष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनेकडे साहाय्याची मागणी केली. त्यावर त्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी हा विषय एका राज्याचा आहे. त्यामुळे तो तुम्ही त्या राज्याकडे मांडा, असे सांगितले. विशेष म्हणजे त्या संघटनेचे मुख्यालय त्या राज्यातच येत असूनही त्यांना त्या राज्याचा विषय आपला वाटला नाही. राष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्‍या या संघटनेला राष्ट्रात सर्व घटक येतात, याचे भान राहिले नाही. तसेच या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी विदेशातील असुरक्षित हिंदूंसाठी काही केल्याचे ऐकिवात नाही.

साधकांसाठी सूचना - हाता-पायांना दोरा बांधण्याची पद्धत

      ७३ क्रमांकाच्या नाडीवाचनाच्या वेळी महर्षींनी विचारले, 'सनातनचे साधक हाता-पायांत लाल दोरा बांधतात, हे आम्हाला ठाऊक आहेे. त्याचे कारण काय ?' त्या वेळी मी म्हणाले, "अनिष्ट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी साधक हा दोरा बांधतात आणि प्रत्येक अमावास्या अन् पौर्णिमा या दिवशी पालटतात". तेव्हा महर्षींनी सांगितले, '३३ हा देवीचा आकडा आहे. 
१. साधकांनी त्या लाल दोर्‍याला ३३ गाठी मारून नंतरच पायाला बांधावा. 
२. स्त्रियांनी डाव्या पायाला आणि पुरुषांनी उजव्या पायाला दोरा बांधावा. 
३. लहान मुलांच्या पायाला दोरा बांधतांना २४ गाठी माराव्यात आणि गायत्री मंत्राचा जप करावा. 
अशा प्रकारे दोरा बांधल्याने सर्व साधकांना दुर्गादेवीचा आशीर्वाद मिळेल. 
(संदर्भ : सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्रमांक ७३, शिर्डी (२.५.२०१६)) 
 - (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

कधी चर्च किंवा मशीद यांची तोडफोड झाल्याची एकही बातमी नसते, हे लक्षात घ्या !

      मेक्सिकोतील हिदाल्गो येथील हिंदूंच्या एका मंदिराची काही धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. धर्मांधांनी मंदिराच्या इमारतीची तोडफोड केली, तसेच मंदिरातील मूर्ती आणि साहित्य इकडे-तिकडे फेकून दिले.

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !
     सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
     समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल (HGV) असे परवाने असणे आवश्यक आहे.
     जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर वरित संपर्क साधावा.

आध्यात्मिक उपाय म्हणून हाताला (किंवा पायाला) बांधायचा धागा कुठून आणला किंवा तो कुणी दिला ? यानुसार तो हाताला (किंवा पायाला) बांधण्याचा कालावधी - (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (५.८.२०१६, सायं. ५.२१)

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या 'अध्यात्म' या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
     सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४५०० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत. 
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत. 
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता : तिसर्‍या महायुद्धाला काही वर्षांतच आरंभ होणार असल्यामुळे या ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत. 
१ इ. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणे : हे ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहेत. 

स्त्रियांसाठी समान अधिकार मागणारे यासंदर्भात काही कृती करतील का ?

      श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी मुलींनो, दुचाकी चालवाल, तर दुचाकीसह जिवंत जाळू, अशी धमकी देणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्‍या देशद्रोह्यांकडून ती लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

देशातील असुरक्षिततेचे कारण म्हणजे हल्लीचे रावण !

      रामराज्यात सगळीकडे सुरक्षितता, समृद्धी, न्यायव्यवस्था होती. या रामराज्यातील एक मोठा रावण संपला असेल; पण असे अनेक छोटे-छोटे रावण अद्याप आहेत. या छोट्या रावणांचा नाश होणे आवश्यक आहे. 
- गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !

     सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे.    
  जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेले सूत्र आणि त्यावरून एका साधिकेला शिकण्याच्या दृष्टीने श्रीकृष्णाने सुचवलेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
कु. लीना कुलकर्णी
     ७.६.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांची विविध नाड्या आणि संहिता यांत ऋषींनी मायेतील प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे कारण या विषयावरील माहिती प्रसिद्ध झाली होती. ही माहिती आणि ती वाचल्यावर श्रीकृष्णाने मला शिकण्याच्या दृष्टीने सुचवलेली सूत्रे पुढे देत आहे. 
१. प.पू. डॉक्टरांनी दिलेले कारण
विविध नाड्या आणि संहिता यांत ऋषींनी मायेतील प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे कारण : विविध नाड्या आणि संहिता यांत विविध ऋषींनी सांगितलेली माहिती असते. नाडी आणि संहिता यांचे वाचन करणार्‍यांकडे येणारे बहुतेक सर्वच सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्‍न विचारतात आणि त्यांना ऋषींकडून उत्तरही मिळते. त्या संदर्भात मला वाटायचे, 'ऋषी एवढे ज्ञानी असूनही सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्‍नांची उत्तरे का देतात ?, असा प्रश्‍न माझ्या मनात येण्याचे कारण म्हणजे, मी कुणाला कधीच मायेतील प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत'. 

स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याचे दुष्परिणाम जाणून न घेता त्याविषयी अट्टाहास करणारे स्त्रीमुक्तीवाले !

        स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य हा स्त्रीमुक्तीचा अनिवार्य पैलू आहे, असे आजचे आधुनिक स्त्रीमुक्ती चळवळीचे सर्व जण सांगतात आणि आग्रहाने प्रतिपादतात. स्त्रियांची मागणी असो वा नसो, हे दिले नाही, तर समाज कर्तव्याला मुकतो, असे हे स्त्रीमुक्तीवाले मूर्खपणे आवर्जून सांगतात.
        स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य कायम राखून कुटुंबव्यवस्था टिकू शकते का ? अग्नी आणि पाणी दोन्ही एकत्र सुखरूप राहू शकतात का ? इतकेही त्यांना कळू नये ?
        युरोप आणि अमेरिकेत कुटुंबव्यवस्थेची कशी दाणादाण उडाली आहे ! तो समाज कसा उद्ध्वस्त झाला आहे ! तिथे अनौरस मुलांची संख्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे आणि प्रतिदिनी वृद्धींगत होत आहे.
        कामसुखार्थ इतरांचा शोध घेणारी स्त्री कुटुंबाशी प्रामाणिक राहू शकते का ? या स्त्रीमुक्तीवाल्यांना हे सर्व दिसत नाही, असे नसेलच !
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक घनगर्जित)

वर्ष २००५ मधील अहवालावर आता बंदीची शिफारस !

उत्तरदायींवर कठोर कारवाई करा !
       डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर बंदी घातली जाण्याची शक्यता असल्याचे कायदा मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. झाकीर नाईक यांच्या विरोधात वर्ष २००५ आणि २०१२ मध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रथमदर्शी अहवालाच्या आधारावर मंत्रालयाने सरकारकडे बंदी घालण्याची शिफारस केली आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
संतांना चौकटीत बसवू नका
     संतांविषयीच्या तुमच्या कल्पनेच्या चौकटीत त्यांना बसवायचा प्रयत्न करू नका. संतांचे बाह्य वागणे हे त्यांचा प्रकृतीचा धर्म, परप्रारब्ध इत्यादींवर अवलंबून असते; म्हणून ते निरनिराळे असते. अंतरात मात्र सर्व जण शिवदशेत असतात, म्हणजे तत्त्वाशी एकरूप झालेले असतात.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

कारकून निर्माण करणारी शिक्षणपद्धत पालटून धर्माधिष्ठित शिक्षणपद्धत अवलंबणे आवश्यक !
    
परात्पर गुरु डॉ. आठवले
आजकालची ढासळती शिक्षणव्यवस्था हा एक चिंतेचा विषय बनला आहे. इंग्रजांनी हिंदूंचा तेजोभंग करण्यासाठी हेतूपुरस्सर गुरुकुल शिक्षणपद्धत बंद केली आणि मॅकोलेप्रणित शिक्षणपद्धत चालू केली. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर राज्यकर्त्यांनी हीच शिक्षणपद्धत पुढे चालू ठेवली. सध्या मुलांना शिकवण्यात येणारे भूमिती, बीजगणित, भूगोल या विषयांचा त्यांना पुढील आयुष्यात काहीच लाभ होत नाही. त्याचे परिणाम म्हणजे आजची शिक्षणपद्धत कारकून निर्माण करते. दुसरी बाब म्हणजे आजच्या मुलांना शाळेत साधना शिकवली जात नाही. त्यामुळे मुलांमध्ये नीतीहीनता, व्यसनाधीनता आणि हिंसक वृत्ती वाढत आहे. म्हणजे सुशिक्षित म्हणजे पदव्युत्तर शिक्षण झालेली व्यक्ती सुसंस्कारित आणि नीतीमान असेल, याची खात्री नसते.
     पूर्वी मुले १२ वर्षे गुरुगृही राहून शिक्षण घेत असत. त्या वेळी भविष्यात उदरनिर्वाहासाठी त्यांना आवश्यक ते शिक्षण दिले जात असे. त्याबरोबरच त्यांना साधनाही शिकवली जात असल्यामुळे ते नीतीवान आणि धर्मशील होते. अशा शिक्षणपद्धतीमुळे राष्ट्र केवळ संपन्न होते असे नाही, तर सदाचारामुळे आनंदीही बनते. अशा विचारसरणीच्या आचरणामुळे आध्यात्मिक समाधान आणि आनंदी असणार्‍या राष्ट्रांच्या सूचीत भूतान प्रथम क्रमांकावर आहे, तर एकेकाळी विश्‍वगुरु असलेला भारत सुखी देशांच्या यादीत रसातळाला गेला आहे. हिंदु राष्ट्रात धर्माधिष्ठित शिक्षणपद्धतीमुळे भारत जगात सर्वाधिक आनंदी देश असेल ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सर्वकाही परमेश्‍वराच्या इच्छेने होते !
     या पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्र अन् मानव यांचा जन्म आणि त्यांचे प्राप्तकार्य हे परमेश्‍वरी इच्छेनेच नियंत्रित आहेत, हा विश्‍वास असला की, कुणाचाही द्वेष वाटत नाही.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

...मौन सुटले का ?

     काश्मीरप्रश्‍नी या देशातील प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिक आमच्या हिंदु राष्ट्रवादी पंतप्रधानांकडून ज्या सडेतोड वक्तव्याची अपेक्षा प्रतिदिन करत आहे, ते आज २ वर्षांनंतर त्यांनी प्रथमच केले आहे. स्वातंत्र्यापासून कायमच धगधगत असलेल्या काश्मीरविषयी अंतिमतः (काश्मीरच काय परंतु) पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे, असे घोषित करून पंतप्रधान मोदी यांनी पाकला दमात घेत राष्ट्रप्रेमी भारतियांच्या आशा पुनश्‍च पल्लवित केल्या आहेत. एका वृत्त संकेतस्थळावर वाचकाने पंतप्रधानांनी आता तत्पर कृती करावी, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया या संदर्भातील वृत्ताखाली नोंदवली आहे. यावरून सर्वसामान्य भारतियाच्या मनात काय आहे, हे सहज लक्षात येईल. खेद वाटतोे तो हा की, आशियाई मानवाधिकार आयोगाने एका मुसलमान नागरिकाला पोलीस त्रास देत असल्याच्या संदर्भात पाकव्याप्त काश्मीरमधील स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटल्यानंतर पंतप्रधानांचे वरील वक्तव्य आले आहेे. हेच मौन ७-८ जुलैला जेव्हा काश्मिरी हिंदूंच्या घरांवर स्थानिक आतंकवाद्यांनी दगडफेक केली किंवा काश्मिरी हिंदूंना धमकवणारी पत्रके सर्वत्र लागली, तेव्हा सुटले असते, तर काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना दिलासा मिळाला असता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn