Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

मॅडम भिकाईजी रुस्तुम कामा यांचा आज स्मृतीदिन

भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये पाकने ढवळाढवळ करू नये ! - सुषमा स्वराज

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांत पाकला असे कित्येक वेळा ठणकावले आणि युद्धात पराभूत केले, 
तरी पाकचे शेपूट वाकडेच आहे. शत्रूराष्ट्राकडून असा अपमान का सहन करायचा ?
     नवी देहली - पाकने भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात ढवळाढवळ करू नये. आतंकवादाला प्रोत्साहन देणे आणि त्याचे उदात्तीकरण करणे भारताला मान्य नाही, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत एका लिखित प्रश्‍नाच्या उत्तरात पाकला ठणकावले.
     स्वराज पुढे म्हणाल्या की, आतंकवादी बुरहान वानीच्या मृत्यूनंतर पाकच्या अधिकार्‍यांनी पाकमधील काही प्रमुख देशांच्या राजदूतांकडे या संदर्भात चर्चा केली. यात चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन, अमेरिका, युरोपीय संघ, इस्लामिक संघटना आणि एशियाई देशांचा समावेश होता. तसेच पाकने काश्मीरमधील हिंसाचारावर भारताने मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचाही आरोप केला. पाकने लक्षात ठेवले पाहिजे की, जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे. भारताने पाकच्या दुष्प्रचारावर अन्य देशांशी चर्चा केली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसमोर काश्मीरमधील हिंसाचारावर संयम राखत कारवाई केल्याची माहिती दिली आहे. येथील हिंसाचारामुळे सुरक्षादलाचे ३ सहस्र ७८० कर्मचारी घायाळ झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील लोक भारतीय नागरिक आहेत आणि सरकारला त्यांच्याविषयीच्या दायित्वाची जाणीव आहे, असेही स्वराज यांनी स्पष्ट केले.

पाकव्याप्त काश्मीरमधील स्थिती चिंताजनक ! - मानवाधिकार आयोग

भारतातील काश्मीरमध्ये सैनिकांकडून अत्याचार 
करण्यात येत असल्याची कोल्हेकुई करणार्‍या पाकला चपराक !
     नवी देहली - आशियाई मानवाधिकार आयोगाने पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्थान येथील नागरिकांवर होणार्‍या अत्याचारांविषयी चिंता व्यक्त केली आहे. येथील ग्रामीण आणि शहरी भागांत पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत.
     तेथील पोलिसांवर लोकांकडून बळजोरीने पैसे उकळल्याचाही आरोप आहे. तेथील स्थानिक दैनिकांमध्ये पोलिसांनी पैसे उकळल्याच्या घटनांचे वृत्त प्रसिद्ध झाले आहेत. आयोगाने म्हटले की, बाबा जान नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याला गेल्या २ वर्षांपासून पोलीस त्रास देत आहेत. येथे पोलिसांकडून लोकांवर करण्यात येणारे अत्याचार आता सामान्य घटना झाल्या असल्याने कोणीही याविषयी तक्रार करत नाही. पोलीस ठाणे गुन्हेगारांचे अड्डे झाले आहेत. येथे पोलीस ठाणे झाल्यापासून येथील शांती भंग पावली आहे. आयोगाने अत्याचार करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बुरहान वानी हा हुतात्मा होता, हे भाजपला मान्य आहे का ? - शिवसेना

     मुंबई - बुरहान वानी हा हुतात्मा होता, त्याच्या महान आणि पवित्र व्यक्तिमत्वामुळे लोकांनी त्याला प्रेम दिले, हे काश्मीरमधील पार्टनर आमदाराने तोडलेले चाँदतारे भाजपला मान्य आहेत का, हे एकदा देशाला कळू द्या, असा थेट प्रश्‍न शिवसेनेने दैनिक सामनाच्या संपादकीयमधून केला आहे. बुरहान वानी याला जे लोक हुतात्मा मानत आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून कठोर कारवाई करण्याचे धैर्य सरकारमध्ये आहे का ?, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
सामनाच्या संपादकीयमध्ये पुढे म्हटले आहे की, १. हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी बुरहान वानी हा धर्मात्मा होता, अशी मुक्ताफळे पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचे आमदार मुश्ताक अहमद शाह यांनी उधळली होती.
२. भाजपचे काश्मिरातील पार्टनर हे अतिरेक्यांना हिरो आणि हुतात्मा ठरवत आहेत. देशद्रोही म्हणून आमच्या सैनिकांनी अल्लासदनी पाठवले तो आता पवित्र आत्मा ठरवला जात आहे. बुरहान वानी हा पवित्र आत्मा असेल, तर मग कश्मीर खोर्‍यात शहीद होणार्‍या जवानांच्या आत्म्यांना काय म्हणावे बरे ?
३. बुरहान वानीने भारताविरुद्ध बंडच पुकारले होते आणि त्याला पाकचे पाठबळ होते. त्या बुरहानची तुलना क्रांतीकारक, हुतात्मा, पवित्र आत्म्याशी पीडीपीवाले करतात, हे भयंकर आहे. अफझलला हुतात्मा ठरवणार्‍यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार ?

कन्यागत महापर्वाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या भव्य ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

   
नृसिंहवाडीच्या सरपंच सौ. अरुंधती जगदाळे (डावीकडे) यांचा सत्कार करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
  श्रीक्षेत्र नृसिंहवाडी - तुम्ही या जागेचे स्वरूपच पालटून टाकले. येथील वातावरणात चैतन्य जाणवते. हे कार्य समाजासाठी आवश्यक आहे. सनातन संस्थेचे कार्य इतके चांगले आहे, हे अजून अनेकांना ठाऊकही नाही. सनातन संस्था धर्मप्रसार यांसमवेत राष्ट्र-धर्म यांसाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अरुंधती जगदाळे यांनी काढले. येथील कमानीशेजारी असलेल्या श्री दत्तविद्यामंदिरात लावण्यात आलेले सनातन संस्थेचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
     या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. अभिजित जगदाळे (सरपंच सौ. जगदाळे यांचे पती), श्री दत्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. मुकुंद पुजारी (सावकार), तसेच सांगली येथील हिंदु धर्माभिमानी अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन या वेळी उपस्थित होते. या प्रसंगी सनातनच्या संत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती.

भ्रमणभाषसंचाला शेण लावल्याने व्यक्तीचे किरणोत्सर्गापासून रक्षण होते !

देशी गायीचे दूधच नाही, तर शेण आणि मूत्रही मनुष्याला लाभदायक 
आहे, हे लक्षात घेऊन देशी गायीचे संगोपन करा ! 
अखिल भारतीय गोसेवा संस्थेचे प्रमुख शंकर लाल यांचा दावा
    आग्रा (उत्तरप्रदेश) - गायीचे ताजे शेण भ्रमणभाषसंचाला लावल्यामुळे व्यक्तीचे हानीकारक किरणोत्सर्गापासून रक्षण होते, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित अखिल भारतीय गोसेवा या संस्थेचे प्रमुख शंकर लाल यांनी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राशी बोलतांना केला. 
        या वेळी ७६ वर्षीय लाल म्हणाले, गाय आपली माता असून तिचे शेण आणि मूत्र अमृतासमान आहे, तसेच सर्व आजारांपासून मनुष्याचे रक्षण करण्याची क्षमता त्यात आहे. 
       जर गायीच्या शेणामुळे कर्करोग बरा होऊ शकतो, तर ते सूक्ष्मलहरींपासूनही आपल्याला वाचवू शकते. गायीच्या शेणाचा आपण अजून कशा प्रकारे वापर करता ?, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, मी गोमूत्र आणि शेण यांचे अंशात्मक सेवन करतो. त्यामुळे या वयातीही मी स्वस्थ आहे. आम्ही सर्व गंभीर आजारांमध्येही गायीच्या शेणाचा वापर करतो. एवढेच नव्हे, तर प्रसूती सामान्यपणे होण्यासाठी गर्भवती महिलांनाही शेण आणि गोमूत्र यांची पेस्ट खायला देतो; परंतु हे शेण देशी गायींचे असावेे, जर्सी किंवा कोणत्याही विदेशी गायींचे नाही.कन्यागत महापर्वकाल सोहळ्यास उत्साहात प्रारंभ !

दत्तात्रेयांच्या नामघोषात श्रींच्या पालखीचे शुक्लतीर्थाकडे प्रस्थान !
     श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) - श्री गुरुदेव दत्त ।, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा नामघोषात टाळ, मृदुंग, झांज, घंटा, गजर आणि ब्रह्मवृंदाच्या एका सुरात म्हटलेली पदे, आरत्यांचा निनाद अन् भाविकांचा अपूर्व उत्साह यांत कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यास ११ ऑगस्ट या दिवशी प्रारंभ झाला. या वेळी श्री नृसिंहसरस्वती, म्हणजेच श्रींच्या पालखीचे शुक्लतीर्थाकडे दुपारी २ वाजता प्रस्थान झाले. या वेळी करवीरपिठाचे पीठाधीश्‍वर विद्यानृसिंह भारती, तसेच गाणगापूर येथील श्री वल्लभानंद महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. श्री दत्त मंदिराच्या आवारात पालकमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रींच्या पालखीला पुष्पार्पण करण्यात आले.
     कन्यागत महापर्वकाळातील पालखी सोहळ्यामध्ये सहस्रोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. या वेळी श्री गुरुदेव दत्त नामघोषाच्या निनादाने आसमंत दुमदुमून निघाला. पालखी आकर्षक फुलांनी सजवण्यात आली होती. नैवद्य, धूप, दीप, आरती होऊन श्रींच्या पालखी सोहळ्यास ब्रह्मवृंद, ग्रामस्थ, दत्तभक्त यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. श्रींची पालखी प.पू. नारायण स्वामी मंदिरातून निघून प.पू. रामचंद्र योगी, श्री स्वामी महाराज यांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून श्रींच्या पालखीचे प्रस्थान शुक्लतीर्थ घाटाकडे झाले. पालखीच्या मार्गावर वाडीच्या ग्रामस्थांनी सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. पालखीच्या पूर्ण मार्गावर मंडप घालण्यात आला आहे.

केरळमधील विद्यालयाच्या उपप्राचार्याने हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयीचे व्याख्यान घेण्यापासून केला मज्जाव !

असे दिशाहीन आणि विचारांची सुस्पष्टता नसणारे उपप्राचार्य विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे काय देणार ?
केरळमधील हिंदूंची दैनावस्था !
     कोची (केरळ), ११ ऑगस्ट (वार्ता.) - राष्ट्रध्वजाचा मान राखा या हिंदु जनजागृती समितीच्या मोहिमेच्या अंतर्गत येथील कदावंथारा येथील केंद्रीय विद्यालयात समितीचे एक कार्यकर्ता गेले होते. या वेळी कार्यकर्त्याने विद्यालयाच्या उपप्राचार्यांची भेट घेऊन त्यांना मोहिमेची माहिती दिली, तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये या विषयी माहिती देणारे समितीचे भित्तीपत्रक (पोस्टर) विद्यालयात लावण्याची विनंती केली. यावर उपप्राचार्यांनी सदर भित्तीपत्रकावर हिंदु जनजागृती समिती असे नाव लिहिले असल्याने ते लावण्यास नकार दिला. यावर ते म्हणाले, आमच्या विद्यालयात सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेतात.

बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात अमेरिकेच्या खासदार तुलसी गबार्ड यांचा एकहाती लढा !

जे अमेरिकेतील एका हिंदु राजकारण्याला कळते, ते भारतातील राजकारण्यांना 
कळत नाही का ? हे भारतीय राजकारण्यांसाठी लज्जास्पद होय !
     नवी देहली - बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात अमेरिकेतील खासदार तुलसी गबार्ड यांनी मोहीम उभारली आहे. (बांगलादेशील हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी कृती करणार्‍या तुलसी गबार्ड यांचे अभिनंदन ! - संपादक) 
१. तेथील जिहाद्यांकडून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्याच्या दृष्टीने जुलै २०१५ मध्ये अमेरिकी काँग्रेसमध्ये एक ठराव संमत करण्याचा गबार्ड यांनी प्रयत्न केला होता. 
२. त्यानंतर बांगलादेशी हिंदूंना पाठिंबा दर्शवणे आणि बांगलादेशी शासनावर हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी दबाव आणणे या उद्देशाने गबार्ड यांनी एक स्वाक्षरी मोहीमही राबवली आहे.

रा.स्व. संघप्रणीत राष्ट्रीय मुस्लिम मंच स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये राष्ट्रध्वज फडकवणार !

एखाद्या संघटनेने मदरशांत जाऊन राष्ट्रध्वज फडकावण्यापेक्षा 
मदरशांनी स्वतःहून राष्ट्रध्वज फडकावला पाहिजे ! 
      नवी देहली - १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मदरशांमध्ये जाऊन झेंडावंदन करण्याचा निर्णय राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित राष्ट्रीय मुस्लिम मंचाने घेतला आहे. (देशातील मुसलमनांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आतापर्यंत बरेच प्रयत्न झाले; मात्र त्याची फलनिष्पत्ती काही मिळाली नाही. त्यामुळे संघाच्या या उपक्रमामुळे काही साध्य होणार का ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात आल्यास त्यात चूक ते काय ? सध्या हिंदूंवर विविध माध्यमांतून अत्याचार होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर संघाने हिंदूंच्या हितासाठी उपक्रम हाती घेतल्यास त्याचा हिंदूंना खर्‍या अर्थाने लाभ होईल आणि हिंदूसंघटनही वाढेल, असे हिंदूंना वाटते ! - संपादक) देशातील विविध भागात ध्वजवंदनाचा हा कार्यक्रम करण्यात येणार आहे.

विश्‍व हिंदु परिषदेसारख्या संघटना राममंदिर बांधणार नाहीत ! - महंत ज्ञानदास महाराज

        लक्ष्मणपुरी - आम्हाला रक्ताचे पाट वाहून राममंदिर नको आहे. जेव्हा भगवान श्रीरामांना वाटेल, तेव्हाच अयोध्येत राममंदिर होईल. विश्‍व हिंदु परिषदेसारख्या संघटना राममंदिर बांधणार नाहीत. राममंदिराच्या नावाखाली ते त्यांचे दुकान चालवत आहेत. याविषयावरून राजकीय लाभ उठवला जात आहे. राममंदिराचे सूत्र न्यायालयाबाहेर सोडवण्यासाठी याचिकाकर्ते हासिम अन्सारी सहमत होते; मात्र काही संघटनांनी ते होऊ दिले नाही, अशी टीका अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास महाराज यांनी केली आहे. ते अखिलेश यादव यांच्या सन्मान सभेत बोलत होते.

खरे गोरक्षक शोधण्यासाठी हरियाणा पोलिसांचे पथक !

असे पथक स्थापन करण्यापेक्षा गोतस्करी आणि गोहत्या होणार नाही, यासाठी पोलिसांनी 
अधिक प्रयत्न केल्यास गोरक्षणासाठी इतरांना काहीच करावे लागणार नाही ! 
     गुरुग्राम (हरियाणा) - समाजकंटक गोरक्षकांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधान केल्यानंतर भाजपशासित हरियाणा शासनाने खरे गोररक्षक शोधून काढण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याची नेमणूक केली आहे. 
      हरियाणा राज्य भाजपचे प्रवक्ता रमण मलिक म्हणाले की, आता पोलीसच खरे गोरक्षक कोण आणि गोरक्षणाच्या नावाखाली गैरकृत्ये करणारे कोण यांचा शोध घेतील. गायींची तस्करी किंवा कत्तल होऊ नये, हे आपले दायित्व आहे.

हरियाणामध्ये पोलिसांशी उडालेल्या चकमकीत १ गोतस्कर ठार, तर ३ पोलीस घायाळ !

      महराणगड (हरियाणा) - हरियाणाच्या महराणगड जिल्ह्यात ९ ऑगस्टच्या रात्री पोलीस आणि गोतस्कर यांच्यात झालेल्या चकमकीत एक तस्कर ठार, तर ३ पोलीस घायाळ झाले आहेत. 
     गोतस्कर गायींना घेऊन जात आहे, अशी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याच्या गाडीचा पाठलाग चालू केला. जेव्हा पोलीस गाडीजवळ पोचले तेव्हा गोतस्कराने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक तस्कर ठार झाला, तर उर्वरित तिघे पळून गेले.

... त्या दिवशी आमच्या घरातून एकाच वेळी आई-वडिलांच्या तिरड्या बाहेर पडल्या !

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील विस्थापित काश्मिरी हिंदू
 सौ. अर्चना काक यांनी व्यक्त केलेले हृदयद्रावक मनोगत
   
सौ. अर्चना काक
  भुवनेश्‍वर (ओडिशा) - येथे ९ ऑगस्ट या दिवशी एक भारत अभियान - कश्मीरकी ओर या अंतर्गत भारत रक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती आणि पनून कश्मीर यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या जाहीर सभेत विस्थापित काश्मिरी हिंदू सौ. अर्चना काक यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे प्रसिद्ध करत आहोत. त्यांचे मनोगत ऐकतांना संपूर्ण सभागृह सुन्न झाले होते आणि मनोगत संपल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
     आज काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाची सभा आहे, हे भित्तीपत्रकावर वाचले, तेव्हा मला रहावले नाही आणि मी या कार्यक्रमाला आले. मी बोलतांना कदाचित् मला रडू आवरणार नाही. त्या वेळी मला समजून घ्या.
    माझे वडील जम्मू-काश्मीरच्या पोलीस खात्यात प्रामाणिक आणि देशभक्त अधिकारी म्हणून ओळखले जायचे. त्यांना वारंवार धर्मांध जिहादी मुसलमानांच्या धमक्या येऊनही ते त्याला कधी घाबरले नाहीत. त्यांनी निरंतर पोलीससेवेतून देशसेवा चालू ठेवली. हाच त्यांचा अपराध होता; म्हणूनच काय, एके दिवशी दुपारच्या वेळी काही पोलीस अधिकारी तिरंग्यामध्ये गुंडाळलेले त्यांचे शव घेऊन आमच्या घरी आले. मी त्या वेळी ७ वर्षांची होते, तर माझा भाऊ ५ वर्षांचा होता. आम्हाला काय घडले आहे, हे कळले नव्हते; पण तो दिवस आजही आठवतो. माझी अत्यंत धार्मिक वृत्ती असलेली आई हे दृश्य पाहूच शकली नाही. त्या पतिव्रता स्त्रीला हा धक्का सहन झाला नाही आणि तिने जागीच प्राण सोडले. त्या दिवशी आमच्या घरातून एकाच वेळी आई-वडिलांच्या तिरड्या बाहेर पडल्या. आम्ही एका क्षणात निराधार झालो. आमचे बालपण कोमेजले.

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे १०० रुपयांची लाच न देणार्‍या दोघा जणांची पोलिसांकडून हत्या !

 • जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षक बनलेले पोलीस ! अशा पोलिसांना कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे !
 • सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या राज्यातील अराजक !
      इटावा (उत्तरप्रदेश) - मैनपुरीतील कोसमा भागात १०० रुपयांची लाच दिली नाही म्हणून पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दोघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ५ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. हे दोघे पोलीस रस्त्यावरील वाहनांची तपासणी करत असतांना ट्रॅक्टर-ट्रॉलीतून वीट नेणारे पंकज यादव आणि दिलीप यादव यांच्याकडे पोलिसांनी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यात पंकज आणि दिलीपचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाईक आणि लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनात एक पोलीस घायाळ झाला.वैष्णोदेवी मंदिराजवळ भूस्खलन, ३ भाविकांचा मृत्यू

     जम्मू - वैष्णोदेवी मंदिराजवळ नुकत्याच झालेल्या भूस्खलनामध्ये ३ भाविकांचा मृत्यू झाला, तर ७ जण घायाळ झाले. वैष्णोदेवी मंदिरापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्धकुमारी गुहेजवळ ही घटना घडली. फ्रान्समध्ये बुरखीनी दिन साजरा करणार, नागरिकांमध्ये संतापाची लाट !

     मर्सेले (फ्रान्स) - मर्सेलेमध्ये मुसलमान महिलांसाठी बुरखीनी दिन साजरा करण्याच्या सुत्रावरून फ्रान्समध्ये संतापाची लाट उसळली आहे. बुरखीनी दिन साजरा करणे म्हणजे धर्मांधतेला खतपाणी घालणे होय, असे फ्रान्सचे धार्मिक नेते मॅरीन ले पेन यांचे सल्लागार फ्लोरियन फिलिपॉट यांनी सांगितले.
        फ्रान्समधील स्माईल १३ या अरबींच्या महिला संघटनेने मर्सेलेमधील स्पीडवॉटर पार्क येथे बुरखीनी दिनचे आयोजन केले आहे. यावर सर्व स्तरांतून टीका केली जात आहे. सिनेटर मायकल अमिएल यांनी बुरखीनी दिनवर बंदी घालण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. फ्रान्समध्ये बुरख्याचा वापर महिलांच्या गुलामगिरीचे राजकीय साधन म्हणून केला जात आहे. त्यामुळे फ्रान्सच्या धर्मनिरपेक्ष समाजासाठी ते एक आव्हान ठरले आहे, असे विधान फ्रान्सचे पंतप्रधान मान्युएल वॉल्स यांनी जुलै मासात केले होते.

शरियत कायदा लागू असलेल्या देशांमध्ये हिंसाचाराचे प्रमाण अधिक !

शरियत कायद्याचे दुष्परिणाम जाणा !
      क्वालालंपूर (मलेशिया) - शरियत कायदा लागू असलेल्या देशांमध्ये हिंसाचाराच्या घटनांचे प्रमाण अधिक असते, असे प्रतिपादन एम्सीएचे मलेशियातील फेडरल टेरिटरीसच्या प्रचार आयोगाचे अध्यक्ष लाऊ चीन कॉक यांनी येथे केले. ते पुढे म्हणाले, शरियत कायदा लागू असलेल्या अफगाणिस्तान, इराक, सौदी अरेबिया, सिरीया, पाकिस्तान आदी देशांमध्ये बॉम्बस्फोट, दंगली, गोळीबार, आत्मघातकी आक्रमणे या नित्याच्याच घटना झाल्या आहेत. लोकांनाही आता त्याचे आश्‍चर्य वाटत नाही.
      इराक आणि सिरीया येथे इसीसच्या आतंकवाद्यांच्या अधिपत्याखालील भागात आतंकवाद्यांची सशस्त्र पथके रस्त्यावरून संचलन करतात. या प्रांतांमध्ये आतंकवाद्यांकडून शरियत कायद्याचे राज्य स्थापन करण्यासाठी लोकांमध्ये भय निर्माण केले जाते. त्यासाठी लोकांच्या सामूहिक हत्याही केल्या जातात. शरियत कायदा असलेल्या देशांमध्ये महिलांवर बलात्कार करणे, त्यांना मारहाण करणे, यांसारखे अत्याचार मोठ्या प्रमाणात केले जातात.देशात दूध प्रक्रिया केंद्रांपेक्षा पशूवधगृहांची संख्या अधिक !

 • हिंदूंच्या देशात त्यांच्या धार्मिक भावनांचा विचार केला जात नाही, याचा ढळढळीत पुरावा ! 
 • या दु:स्थितीवर हिंदु हिताचे हिंदु राष्ट्र अर्थात् सनातन धर्म राज्य हाच पर्याय !
      नवी देहली - भारतातील बहुसंख्य लोक शाकाहारी आहेत, तरीही या देशात दूध प्रक्रिया केंद्र आणि दूध उत्पादन केंद्र यांच्या एकत्रित संख्येपेक्षा पशूवधगृहांची संख्या अधिक आहे. भारतात १ सहस्र ६२३ नोंदणीकृत पशूवधगृहे आहेत, तर नोंदणीकृत दूध प्रक्रिया केंद्रांची संख्या मात्र केवळ २१३ आहे आणि दूध उत्पादन केंद्र ७९३ आहेत. कृषी मंत्रालयाच्या पशूसंवर्धन खात्याकडून माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या उत्तरात ही धक्कादायक आकडेवारी उघड झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ३१६ पशूवधगृहे आहेत. त्यानंतर उत्तरप्रदेशचा क्रमांक लागत असून तेथे २८५ पशूवधगृहे आहेत, तर तामिळनाडूमध्ये १३० पशूवधगृहे आहेत.

कर्नाटकातील माजी आमदाराकडून वैद्यकीय खर्च मिळवण्यासाठी शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न !

अशा घोटाळेबाज लोकप्रतिनिधींमुळे देश अधोगतीला जात आहे ! 
       बेंगळुरू - लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कुटुंबियांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी सरकारकडून खर्च दिला जातो. त्यानुसार कर्नाटक राज्यातील एका ८० वर्षीय माजी आमदाराने त्यांचा ९ वर्षाचा मुलगा कर्करोगाने मृत झाल्याचे सांगत त्याच्यावर करण्यात आलेला वैद्यकीय खर्च मिळावा, अशी मागणी केली होती; मात्र प्रशासनाने केलेल्या चौकशीत या आमदाराचा खोटेपणा उघड झाला. 
       माजी आमदाराने केलेल्या अर्जानंतर प्रशासनाला शंका आली की, या माजी आमदाराला ७१ व्या वर्षी मुलगा झालाच कसा ? मंत्रालयातील अधिकार्‍यांनी चौकशी केल्यावर त्यांच्या मुलाचा जन्मदाखला आढळून आला नाही. त्यामुळे ही फसवणूक उघड झाली. या संदर्भात सभापती के.बी. कोळीवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लोकप्रतिनिधीकडून वैद्यकीय खर्चाच्या नावे वसूल करण्यात येत असलेल्या खोट्या देयकाविषयी योग्य निर्णय घेण्यास बजावले आहे. त्याचबरोबर संबंधित कायद्यात पालट करून सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

बिहारच्या पश्‍चिम चंपारणमध्ये एका साधूची हत्या !

जंगलराज झालेला बिहार ! 
      चंपारण (बिहार) - बिहारच्या पश्‍चिम चंपारण जिल्ह्यातील हरिपूर येथे बालक दास उपाख्य भगन दास या ४० वर्षीय साधूची कर्‍हाडीचा वार करून हत्या करण्यात आली. ते गावापासून दूर एका झोपडीत रहात होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार रात्री उशिरा ही हत्या करण्यात आली. हत्येच्या कारण समजू शकलेले नसले तरी अनैतिक संबंधामुळे हत्या झाल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत.

चिनी उदबत्त्यांवर बंदी घाला ! - लोकसभा खासदारांची मागणी

चीन किंवा व्हियतनाम या देशांमधून अगरबत्ती सारखी उत्पादने 
आयात होऊ देऊ शकणारा देश महासत्ता होईल का ?
     नवी देहली - चीन आणि व्हिएतनाम या देशांमधून आयात होणार्‍या सिट्रोनेला आणि लेमन ग्रास या उदबत्त्यांमध्ये घातक रसायनांचे मिश्रण असल्याचा आरोप करत लोकसभेतील खासदारांनी या उदबत्त्यांवर त्वरित बंदी घालण्याची मागणी नुकतीच सभागृहात केली. सध्या सणांचा काळ असल्यामुळे या काळात या देशांमधून पूजेशी संबंधित अन्य साहित्याची आयात होईल. त्यामुळे सावधानता बाळगणे आवश्यक आहे, 
असेही खासदार म्हणाले. 
     शिवसेनेचे खासदार श्री. अरविंद सामंत यांनी लोकसभेत शून्य प्रहरमध्ये चीन आणि व्हिएतनाम यांच्या उदबत्त्यांचे सूत्र उपस्थित केले. ते म्हणाले, या देशांच्या उदबत्त्यांमध्ये घातक रसायनांचा वापर होत असल्यामुळे त्या अतिशय सुगंधित असतात.
     त्यात एलेथ्रिन आणि शिसे या रसायनांचा उपयोग करण्यात येतो. या उदबत्त्या आरोग्यासाठी हानीकारक असतांनाही केवळ स्वस्त असल्यामुळे लोक त्या खरेदी करतात. यासह त्यांच्या अन्य सामुग्रीतही रसायनांचा वापर करण्यात येत आहे.


हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशातील आग्रा आणि गाझियाबाद, तसेच हरियाणातील फरीदाबाद येथे राष्ट्रध्वजाचा आदर राखा चळवळ !

आग्रा प्रशासनाकडून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकण्यावर बंदी !
आग्रा येथील पालीवाल पार्कमध्ये प्रबोधनात्मक
फलक घेऊन उभे असलेले कार्यकर्ते
      आग्रा - हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे राष्ट्रध्वजाचा आदर राखा या अंतर्गत १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत चळवळ राबवण्यात येत आहे. याचा पोलीस, प्रशासन, वर्तमानपत्रे आणि राष्ट्रप्रेमी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आग्य्राच्या जिल्ह्याधिकारी कार्यालयाने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकण्यावर बंदी घालणारा आदेश देण्यात आला.

अमेरिकेने केलेल्या टीकेनंतरही मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या देशद्रोहाच्या शिक्षेच्या कार्यवाहीवर चीन ठाम !

राष्ट्रहिताच्या दृष्टीने केलेल्या कार्यवाहीवर ठाम रहात अमेरिकेलाही 
न जुमानणार्‍या चीनकडून भारतीय राज्यकर्ते बोध घेतील का ?
     बीजिंग - राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून चीनमधील फेंगसई या कायदा आस्थापनाशी संबंधित एक अधिवक्ता आणि ३ कार्यकर्ते यांना चीनच्या न्यायालयाने साडेसात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चीनच्या प्रशासनाने राजकारणाने प्रेरित होऊन मानवाधिकार संघटनेचे सदस्य असलेल्या या चौघांना शिक्षा केली, अशी टीका अमेरिकेने केली आहे. याला चीनने आक्षेप घेतला आहे. 
       चीनच्या विदेश विभागच्या महिला प्रवक्त्या हुआ चुनभयग यांनी अमेरिकेने केलेली टीका आधारहीन असल्याचे सांगत चीनच्या न्यायालयाच्या निर्णयाचा अमेरिकेने आदर करावा, असे म्हटले आहे. चीनमध्ये स्थिरता आणि राष्ट्रीय सुरक्षा राखण्यासाठी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कडक धोरणे अवलंबली आहेत. त्यानुसार तेथील प्रशासनाने फेंगसई या आस्थापनाशी संबंधित अनेक लोकांना जुलै २०१६ मध्ये महिन्यात अटक केली होती. त्यानंतर चौघांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. (कुठे गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा करणारा चीन, तर कुठे वर्षानुवर्षे खटले प्रलंबित ठेवणारा भारत ! - संपादक) चीनसाठी घातक असलेल्या लोकांचे खटले लढवले, तसेच विदेशी शक्तींशी हातमिळवणी करून आंदोलने केली, असा आरोप चीनने या आस्थापनावर केला आहे; मात्र अमेरिकेच्या विदेश विभागाच्या प्रवक्त्यांनी अटक केलेल्या ४ कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे.

गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे एक भारत अभियान-कश्मीर की ओरच्या चळवळीला आशीर्वाद !

११ राज्यांतील हिंदु संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतले शंकराचार्यांचे मार्गदर्शन !
    
हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन करतांना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती
      जगन्नाथपुरी (ओडिशा) - गेली २६ वर्षे विस्थापित असलेल्या काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मिळून एक भारत अभियान - चलो कश्मीर की ओरची घोषणा केली. या चळवळीसाठी आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेण्यासाठी ११ राज्यांतील विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच पुरी येथील गोवर्धन पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्‍चलानंद सरस्वती महाराज यांची भेट घेतली. या वेळी शंकराचार्यांनी काश्मिरी हिंदूंच्या हक्कांसाठी चालू केलेल्या या अभियानाला आशीर्वाद दिले.
जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी या वेळी केलेले मार्गदर्शन
१. मी फार पूर्वीपासून काश्मीरमध्ये चालू असलेल्या घटनांविषयी माहिती घेत आहे आणि मार्गदर्शनही करत आहे.
२. अगोदर माझ्याकडे येणार्‍या नेत्यांत प्रामाणिकपणा दिसत होता; मात्र नंतर त्यांचा उद्देश वैयक्तिक लाभ करून घेण्याचा दिसल्याने ती चळवळ सोडून द्यावी लागली.
३. असे असले, तरी मी काश्मीर हा विषय मात्र सोडलेला नाही. त्यामुळे तुमची चळवळ योग्य नेतृत्व करणार्‍यांच्या माध्यमातून पुढे न्या. त्यात वैयक्तिक स्वार्थ असता कामा नये.

हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रत्येक हिंदूंची मने जुळायला हवीत ! - अधिवक्ता अनंत देशपांडे

वणी (जिल्हा यवतमाळ) येथील हिंदूसंघटन मेळावा 

डावीकडून सौ. भक्ती चौधरी, दीपप्रज्वलन करतांना
अधिवक्ता अनंत देशपांडे आणि श्री. श्रीकांत पिसोळकर

       वणी (जिल्हा यवतमाळ) - स्वातंत्र्यानंतर सर्व शासनकर्त्यांनी हिंदूंचा अवमान करून हिंदूंना एकमेकांपासून तोडण्याचेच कार्य केले. गांधी-नेहरू यांच्यासह काँग्रेसने हिंदु धर्माची सर्वांत मोठी हानी केली आहे. अन्य धर्मियांना त्यांच्या धर्माचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार्‍या काँग्रेसने हिंदूंना मात्र धर्मशिक्षण मिळू दिले नाही. पर्यायाने या देशातील हिंदूंना एकमेकांपासून तोडण्याचेच काम केले आहे. या कठीण परिस्थितीत हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रत्येक हिंदूंची मने जुळायला हवीत आणि त्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले अथक प्रयत्न करत आहे, मी त्यांना वंदन करतो, अशा शब्दांत अधिवक्ता श्री. अनंत देशपांडे यांनी उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन केले. येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते.

वैद्यकीय शिक्षणखात्याचे मंत्री गिरीश महाजन यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

देवस्थानांनी तिजोरीतील ५० टक्के रक्कम रुग्णसेवेसाठी द्यावी ! भाविकांनी मंदिरांमध्ये श्रद्धेने अर्पण केलेल्या निधीचा विनियोग हा 
धर्मकार्यासाठी झाला पाहिजे. रुग्णसेवेसाठी होणारा खर्च सरकारने करणे अपेक्षित आहे !
     मुंबई - महाराष्ट्रात शिर्डी येथील श्री साई संस्थान, मुंबईतील सिद्धिविनायक, मराठवाड्यातील श्री तुळजाभवानी मंदिर, पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मी मंदिर अशी श्रीमंत देवस्थाने आहेत. या मंदिरांत प्रतीवर्षी भाविक अर्पण करत असलेली रक्कम कित्येक कोटी रुपये असते. रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा असल्याने वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयांतील गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रातील देवस्थानांना मिळणार्‍या देणगीतील ५० टक्के निधी राखून ठेवावा, अशी मागणी वैद्यकीय शिक्षणखात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या एका पत्रात केली आहे. त्यापुढे देवाच्या चरणी वाहिलेला निधी उपचारांवर व्यय होणे योग्य ठरेल, असेही मत व्यक्त केले आहे.

पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान संरक्षक कृती समितीची स्थापना !

पावित्र्यरक्षण, धर्मपरंपरांचे पालन, भ्रष्टाचारमुक्त 
देवस्थान यांसह पंचसूत्रींसाठी कृती समिती आक्रमक ! 

बैठकीला उपस्थित वारकरी संप्रदाय
आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी

        पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ११ ऑगस्ट (वार्ता.) - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन न होणे, गोशाळेतील गायींचा प्लास्टिक खाऊन मृत्यू होणे, तसेच प्रक्षाळपूजेसारख्या मुख्य धार्मिक विधींच्या तिथी पालटून प्रक्षाळपूजा करणे, असे मनमानी कारभार शासकीय प्रशासकांकडून होत आहेत. या समस्या थांबवण्यासाठी, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पावित्र्यरक्षण, धर्मपरंपरांचे पालन, धर्मशास्त्रानुसार तिथींचे पालन, भ्रष्टाचारविरहित प्रशासन, गोशाळेतील गोमातेचे रक्षण आणि संगोपन करणे यांसाठी येथे वारकरी संप्रदाय, हिंदुत्ववादी संघटना यांच्यासमवेत ८ ऑगस्ट या दिवशी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत वरील पंचसूत्री कार्यक्रम राबवण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान संरक्षक कृती समितीची स्थापना करण्यात आली.

प्रतिमास संघटित होऊन कृतीशील होण्याचा हिंदुत्ववाद्यांचा निर्धार !

हडपसर (पुणे) येथे हिंदूसंघटन 
मेळाव्यानंतर आयोजित आढावा बैठक 

आढावा बैठकीला उपस्थित धर्माभिमानी

        पुणे, ११ ऑगस्ट (वार्ता.) - प्रतिमास राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे संघटित होऊन कृतीशील होण्याचा निर्धार हडपसर येथील धर्माभिमान्यांनी ९ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत केला. हिंदु जनजागृती समितीने ६ ऑगस्ट या दिवशी घेतलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यानंतर कृतीशील होऊ इच्छिणार्‍या धर्माभिमान्यांसाठी श्री दुर्गामाता मंदिर, तरवडे वस्ती येथे ही बैठक आयोजित केली होती. या वेळी समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना सध्या होणारी धर्महानी आणि धर्मशिक्षणाचे महत्त्व याविषयी अवगत केले. या बैठकीला ६० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर उपस्थितांना या वेळी धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती विसर्जन या विषयावरील ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.

स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता ! - सौ. नंदा खंडागळे, रणरागिणी

नागपूर येथे हिंदूसंघटन मेळावा 

डावीकडून दीपप्रज्वलन करतांना सौ. नंदा खंडागळे,
अधिवक्त्या सौ. वैशाली परांजपे आणि श्री. श्रीकांत पिसोळकर

       नागपूर - आज स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. यामुळे स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासमवेत स्वतःची शारीरिक क्षमता वाढवणेही महत्त्वाचे आहे. प्रशिक्षण घेतल्यानेच स्त्रियांमध्ये अत्याचाराला प्रतिकार करण्याची मानसिकता निर्माण होईल, असे प्रतिपादन १० ऑगस्ट या दिवशी येथे झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात रणरागिणी शाखेच्या सौ. नंदा खंडागळे यांनी केले. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या सौ. वैशाली परांजपे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
       या वेळी गुरुपौर्णिमेनिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश श्री. श्रीकांत क्षीरसागर यांनी आणि महर्षींचा संदेश श्री. अतुल अर्वेन्ला यांनी वाचून दाखवला.

प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जनजागृती समित्या सज्ज !

      मुंबई - गृह विभागाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर आणि अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुका स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असल्याचे मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांंनी कळवले आहे.
     राष्ट्रीय कार्यक्रम, महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा सामने पार पडल्यानंतर खराब झालेले, तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तहसील कार्यालयात किंवा जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपुर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्थेसह अन्य संघटनांनाही देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली. (पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यापेक्षा राष्ट्रध्वजाचा असा अवमान होऊच नये यासाठी प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांच्या विक्रीवर बंदी घातल्यास ते अधिक योग्य होईल ! - संपादक)

केरळमधील पद्मनाभ मंदिरातील मौल्यवान हिरे आणि दागिने गहाळ !

हिंदूंच्या मंदिरांच्या 
सुरक्षेची दयनीय अवस्था !
        थिरूवनंतपुरम् - येथील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या खजिन्यातून मौल्यवान हिरे आणि दागिने गायब झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या अन्वेषणासाठी देवस्थान समितीने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. पद्मनाभस्वामींची संपत्ती ज्या ठिकाणी साठवून ठेवण्यात येते त्याला श्रीकोवील असे म्हटले जाते. श्रीकोवीलभोवती २४ घंटे कडक पहारा असतो. देवस्थान समितीने एक विशेष निवेदन प्रसिद्धीस दिले आहे, यात म्हटले आहे की, पेरियान्बी यांच्याकडे श्रीकोवीलच्या संरक्षणाची सूत्रे होती. त्यांच्या निवृत्तीनंतर ती नांबी वासुदेवन् नारायण यांच्याकडे आली. मागील वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी पदभार स्वीकारला होता. मागील ५ महिन्यांचा देवस्थानच्या संपत्तीशी संबंधित अहवाल अजून सादर झाला नसल्याचे देवस्थान समितीने म्हटले आहे. तसेच मंदिराच्या खजिन्यातील अनेक दागिने गहाळ झाल्याचे समितीने म्हटले आहे.
        पद्मनाभस्वामी मंदिराच्या दागिन्यांचे मूल्य एक लाख कोटी रुपये एवढे आहे. या मंदिरामध्ये आणखी एक खोली असून २०० वर्षांपासून ती उघडण्यात आलेली नाही. या खोलीमध्येही मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचे सांगितले जाते. धार्मिक कारणांमुळे या खोलीचे दार उघडण्यात आलेले नाही.

पुण्यामध्ये अवैधरित्या पिस्तुल बाळगणार्‍या गुंडांचा वावर वाढला !

 • पोलिसांकडून ७० पिस्तुले आणि १३८ काडतुसे शासनाधीन
 • असुरक्षित पुणे !
        पुणे, ११ ऑगस्ट - पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या ६ मासांत केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये गुंडांकडून ७० पिस्तुले आणि १३८ काडतुसे शासनाधीन केली आहेत. उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश येथून देशी बनावटीची पिस्तुले विक्रीसाठी पुण्यात येत असून शहरात खरेदी-विक्रीचा मोठा व्यवहार होत असल्याची माहिती समोर आहे. (उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश येथे कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात नसल्याचे द्योतक ! - संपादक) पोलिसांनी गेल्या वर्षभरात विविध टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली असली, तरी त्या टोळीतील साथीदार प्रतिस्पर्धी टोळीकडून जिवाला धोका असल्याने अवैधरित्या पिस्तुल बाळगणार्‍या गुंडांचा वावर वाढला आहे. (गुंडांची पाळेमुळे खोदून ती नष्ट करणे आणि नागरिकांना सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी पोलीस प्रशासन आणि गृह विभाग यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. - संपादक)

नगरमध्ये भाजप नेत्याला व्यक्तीने मारहाण करून लुटले

जेथे लोकप्रतिनिधीच सुरक्षित नाहीत, तेथे 
सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा विचारच न केलेला बरा !
       नगर, ११ ऑगस्ट - येथील अकोले तालुक्याचे भाजप नेते शिवाजीराजे धुमाळ यांना ११ ऑगस्ट या दिवशी वैद्य नावाच्या व्यक्तीने मारहाण करून त्यांच्या गाडीतील ५ लक्ष रुपयेही पळवले. (नगर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे ! - संपादक) या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. धुमाळ यांना मारहाण झाली असल्याची माहिती मिळताच त्यांचा समर्थक पोलीस ठाण्यात जमले. मारहाणीच्या निषेधार्थ अकोले बंदचीही हाक दिली आहे. (भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी अन्य सनदशीर मार्गांचा अवलंब करणे आवश्यक आहे. - संपादक)

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे एका अल्पवयीन मुलीवर धर्मांधांकडून अत्याचार

     श्रीरामपूर - येथील प्रभाग २ मधील एका १५ वर्षीय मुलीवर धमकी देऊन गफूर पठाण आणि शाहरूख पठाण या दोघांनी अत्याचार केले. या प्रकरणी शहर पोलिसांनी त्या दोघांवर गुन्हा प्रविष्ट केला असून त्यांना अजून अटक केलेली नाही. (दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांत वाढ होत असतांना निष्क्रीय रहाणारे पोलीस ! महिलांच्या सुरक्षेकडे कानाडोळा करून धर्मांधांपुढे कचखाऊ भूमिका घेणार्‍या पोलीसांवरच कारवाई का करू नये ? - संपादक)
     पीडित मुलगी येथील गुलशन मशीद परिसरातील असून पोथी वाचण्यासाठी जात असतांना तिला बलपूर्वक दुचाकीवरून एका खोलीत नेण्यात येत होते. हा अपप्रकार गेल्या काही मासांपासून चालू होता. या मुलीने घरच्यांना हे सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या घरच्यांनी तक्रार दिली होती.

डॉ. झाकीर नाईक यांना विदेशातून मिळाले ६० कोटी रुपये !

 • ढाका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात डॉ. झाकीर यांचे नाव पुढे आले नसते, तर पोलिसांनी हा तपास केला असता का ?
 • पोलीस तपासातून माहिती उघड
         मुंबई - इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्या बँक खात्यामध्ये गेल्या ३ वर्षांत विविध देशांतून ६० कोटी रुपये आल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. नाईक यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या ५ निरनिराळ्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे.
         पोलीस सूत्रांनुसार त्यांनी डॉ. झाकीर यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास केला आहे. त्यांना या पैशाचे स्त्रोत मिळाले आहेत; परंतु हे पैसे कशासाठी पाठवण्यात आले आहेत, हे समजले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, त्यांनी आयकर विभागाकडून या आस्थापनांची माहिती मागितली आहे. या आस्थापनांना आर्थिक साहाय्य मिळण्याचे स्त्रोत काय ? या पैशाचा धर्मांतरासाठी वापर होत होता का ? याविषयी संपूर्ण माहिती मिळाल्यावर डॉ. झाकीर यांच्या कुटुंबातील सदस्यांची पोलीस चौकशी करणार आहेत.

आज पंढरपूर येथे ह.भ.प. वै. हनुमंत महाराज वीर यांचा २५ वा पुण्यातिथी सोहळा !

        पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ११ ऑगस्ट (वार्ता.) - वै.ब्र. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांचे कृपापात्र शिष्य वै. ह.भ.प. हनुमंत महाराज वीर यांचा २५ वा पुण्यतिथी सोहळा १२ ऑगस्ट २०१६ या दिवशी पार पडणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत धर्मभूषण ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री यांचे कीर्तन आणि उपस्थितांसाठी महाप्रसाद असणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून ग्रंथदान, तसेच मुमुक्षू विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तकांचे वाटप आणि गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील लोकांना अन्नदान केले जाणार आहे. हा कार्यक्रम देवगड संस्थान नामदेव महाराज मंदिराजवळ, पंढरपूर येथे पार पडणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.न. रामकृष्ण हनुमंत महाराज, वीर वै. हनुमंत महाराज वीर प्रतिष्ठान, पंढरपूर यांनी केले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या मंदिरांच्या सुरक्षेची दयनीय अवस्था !
     केरळच्या थिरूवनंतपुरम् येथील जगप्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या खजिन्यातून मौल्यवान हिरे आणि दागिने गायब झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या अन्वेषणासाठी देवस्थान समितीने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Keralke Padmanabh Swami Mandirke khajanese bahumulya heere aur gehne gayab. Prakaran Sarvoccha nyayalayme !
     Hinduonke mandiroko sankatse koun ubarega ?
जागो !
: केरल के पद्मनाभ स्वामी मंदिर के खजाने से बहुमूल्य हीरे और गहने गायब. प्रकरण सर्वोच्च न्यायालय में !
     हिन्दुआें के मंदिरों को संकट से कौन उबारेगा ?

जफर हुसैन आतंकवादी असल्याचे पुरावे आहेत ! - महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक

भारताची आतंकवादापासून मुक्तता 
करण्यासाठी राष्ट्रप्रेमी राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्रच हवे !
       नागपूर - जिहादच्या संदर्भातही पुस्तके बाळगणे म्हणजे आतंकवाद होऊ शकत नाही. माझ्यावर प्रविष्ट करण्यात आलेले सगळे आरोप खोटे असून माझा आतंकवादाशी काहीही संबंध नाही, असा युक्तीवाद जफर हुसैन या आरोपीने जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर केला. या वेळी त्याने जामिनासाठी मागणी करणारा अर्जही सादर केला; मात्र याच वेळी जफर हा आतंकवादीच असून तसे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत, असे महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात प्रविष्ट केले आहे. या प्रकरणी २० ऑगस्टला पुन्हा युक्तीवाद करण्यात येईल.

समृद्ध जीवनच्या संचालिका लीना मोतेवार यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक

 • घोटाळेबाजांना कठोरात कठोर शासन केल्याविना अशा घटनांना आळा बसणार नाही !
 • समृद्ध जीवन घोटाळा प्रकरण
        पुणे, ११ ऑगस्ट - समृद्ध जीवन या चिटफंडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले महेश मोतेवार यांची सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभाग चौकशी करत आहे. त्या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी मोतेवार यांची पत्नी आणि संचालिका लीना मोतेवार यांना १० ऑगस्ट या दिवशी अटक केली आहे. लीना मोतेवार यांचाही गैरव्यवहारात सहभाग असल्याने त्यांना अटक केल्याचे सूत्रांकडून समजते.

पाथर्डी (जिल्हा नगर) येथे महिला वाहकाला विद्यार्थ्यांकडून मारहाण

        नगर, ११ ऑगस्ट - एकाच मासिक भाडे देयकावर (पास) महाराष्ट्र्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने प्रवास करणार्‍या २ विद्यार्थ्यांना महिला वाहक राणी तुपे यांनी पकडले. संतप्त विद्यार्थ्यांनी तुपे यांना माणिकदौंडी बस स्थानकावर शिवीगाळ करून मारहाण केली. या वेळी तुपे यांच्या बांगड्या फुटून त्या घायाळ झाल्या. (महिलांनो, आतातरी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची अपरिहार्यता जाणा ! प्रशासनाने महिलांना सक्षम करण्यासाठी तत्परतेेने पावले उचलायला हवीत ! - संपादक)

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड हे नाव तरी छत्रपतींना आवडले असते का ?

     महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास - २ या पुस्तकात अफझलखानवध या चित्राच्या जागी अफझलखानाच्या भेटीचे चित्र छापले आहे. हिंदू-मुसलमान ऐक्यासाठी या चित्रात पालट करू नयेत, अशी मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांचा हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याचा जून २०१६ मधील आढावा !

१. मुंबई जिल्हा
१ अ. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त 
समितीच्या वतीने प्रवचने 
१. कांजूरमार्ग येथे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कांजूरमार्ग येथील नव महाराष्ट्र व्यायाम शाळेच्या सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी संभाजी महाराजांचा इतिहास कथन केला. तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या अपरिहार्यतेसंबंधी उपस्थितांचे प्रबोधन केले. या वेळी सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना आरोग्याच्या आधारावर जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

       नवी देहली - आरोग्याच्या आधारावर अंतरिम जामीन देण्यासाठी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी प्रविष्ट केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. देहलीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक बनवून त्यांच्याकडून पू. बापूजी यांच्या १० दिवसांच्या आरोग्याच्या स्थितीचा अहवाल द्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. या अहवालानंतर न्यायालय पुन्हा सुनावणी करणार आहे.

भ्रष्टाचार होत नाही, असे एकतरी क्षेत्र भारतात आहे का ?

     पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंदिर समितीच्या २ सुरक्षा कर्मचार्‍यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी ही कारवाई केली असून संबंधितांच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत.

मुसलमानांनी माध्यान्ह भोजनाप्रमाणे हिंदूंशी निगडित इतर गोष्टीही बंद कराव्या !

कु. प्रियांका स्वामी
      ९ ऑगस्ट २०१६ च्या दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचले की, उज्जैन (मध्यप्रदेश) येथील इस्कॉन या आध्यात्मिक संस्थेने मदरशांना देऊ केलेले माध्यान्ह भोजन ५६ मदरशांनी नाकारले. हे एकप्रकारे बरेच झाले, असे म्हणावे लागेल. त्यामुळे तेवढा भुर्दंड तरी वाचला. अशी भूमिका सर्वत्रच्या मदरशांनी घेतली, तर आश्‍चर्य वाटू नये. मूलत: मदरशांना माध्यान्ह भोजन देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी हे अन्न ते नाकारू शकतील, हे लक्षात घ्यायला हवे होते. जे लोक योगातील ॐ, भारतमाता, गोमाता आदींना मानत नाहीत, त्यांना आध्यात्मिक संघटनांकडून अन्न विनामूल्य देणे, हा हिंदूंचा घोर अपमान आहे.
जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री ठार झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना कधी भेटतात का ?
     जिहादी आतंकवादी बुरहान वानीला सैनिकांनी ठार केल्याच्या निषेधार्थ काश्मीरमध्ये धर्मांध दंगलखोरांकडून प्रचंड हिंसाचार माजवण्यात आला. या हिंसाचारात ठार झालेल्या काही दंगलखोरांच्या नातेवाइकांचे सांत्वन जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी त्यांची भेट घेऊन केले.

जम्मू-काश्मीरमधील समस्येवर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय !

श्री. कुशल गुरव
१. अखंड भारताची फाळणीनंतर काश्मिरी हिंदूंचा विनाशकाळ चालू 
होऊनही त्यासंबंधी प्रसिद्धीमाध्यमांनी देशात जागृती न करणे !
     काश्मीर भारताचा कि पाकिस्तानचा ?, या प्रश्‍नावरून पुष्कळ दिवसांपासून भारतात बरेच राजकारण होत आहे आणि देश-विदेशांतही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत. खरे पाहिले, तर इतिहास साक्ष देणारा आहे. देशाची फाळणी झाली, त्या दिवसापासून प्रामुख्याने काश्मिरी हिंदूंचा विनाशकाळ चालू झाला. तेथे बहुसंख्य असलेले काश्मिरी हिंदू आता अल्पसंख्यांक झाले आणि अल्पसंख्यांक म्हणून मानल्या जाणार्‍यांची संख्या काश्मीरमध्ये मात्र पुष्कळ वेगाने वाढली. यामागे बरीच कारणे आहेत. त्यातीलच एक कारण म्हणजे अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी राजकारण्यांनी केलेले त्यांचे लांगूलचालन !
      राजकारण्यांनी हस्तक्षेप केला आणि अल्पसंख्यांकांना संतुष्ट करण्यासाठी हिंदूंचा उपहास केला, तरीही कोणतेच प्रसिद्धीमाध्यम या संदर्भात वार्ता का देत नाही ? किंवा सामाजिक संकेतस्थळांवर पोस्ट का टाकत नाही ?

पालकांनो, वेळीच सावध होऊन मुलांना धर्मशिक्षण द्या !

      राजस्थानमधील रावल कुटुंबामधील संदीप नावाच्या युवकाने आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्या चिथावणीखोर भाषणाने प्रभावित होऊन इस्लाम धर्म स्वीकारला. एवढ्यावरच न थांबता त्याने त्याची पत्नी, आई आणि वडील यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बळजोरी केली. त्यांनी त्याला नकार दिल्यावर त्या सर्वांना सोडून तो घरातून ४५ सहस्र रुपये घेऊन पसार झाला. ही घटना गंभीर आहे किंवा त्या परिवारापुरती मर्यादित आहे, असे म्हणून सोडून देता येणार नाही. सध्या समाजात असे का होते, याचा अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे; कारण आज हे संकट रावल कुटुंबावर आहे, उद्या आपल्या घरात कशावरून येणार नाही ? असे संदीप आपल्या घरात निर्माण झाल्यावरच आपण जागे होणार आहोत का ?

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !

     पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा करणार्‍या पुजार्‍यांची बैठक घेऊन श्री विठ्ठलाचे नित्योपचार, पोषाख आणि परंपरा यांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी केल्या होत्या, तसेच कोणत्याही प्रकारची चूक झाली, तर विनासूचना तात्काळ निलंबित करण्यात येईल, असेही पुजार्‍यांना सांगण्यात आले होते.

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

      एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या विरामचिन्हांमुळे पालटणारे वाक्याचे अर्थ सांगणारे हे सदर !

     आज हिंदु धर्म नष्ट होऊन सर्वत्र भोगसंस्कृती येईल कि काय, ही माझी शंका हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या कार्यामुळे मिटली आहे ! - ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे, डिचोली, गोवा.

हिंदु धर्मावरील संकटे, हे हिंदु धर्मगुरूंनी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचे फलित !

      हिंदूंवर धर्माचे संस्कार करण्याचे दायित्व धर्मगुरु आणि रामानंदाचार्य यांचे असते. ते कधीही आपला मठ अन् आश्रम सोडून जनतेत आले नाहीत. त्यामुळे हिंदूंना धर्म म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय ?, याविषयी ज्ञानच मिळाले नाही. त्यामुळे हिंदु धर्मावरील सर्व संकटांना धर्मगुरुच उत्तरदायी आहेत ! - जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १० महिने २७ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना २ महिने ३ दिवसांपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
    केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांच्याकडून पू. शेंडेआजोबा यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे
१. स्वभावदोषांवर मात करण्यासाठी साहाय्य करणे 
      सद्गुरु राजेंद्रदादांचा सहवास मला ५ वर्षे लाभला. माझ्यात स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण पुष्कळ होते, उदा. अनावश्यक बोलणे, अपेक्षा करणे, प्रतिमा जपणे, काळजी करणे आणि मायेतील विचार करणे. यांवर मात करण्यासाठी सद्गुरु दादांनी मला साहाय्य केल्याने त्यांच्या प्रेमानेच त्या स्वभावदोषांचे प्रमाण अल्प झाले.
२. सत्संगात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न न केल्यावर 
२ - ३ सत्संगांना न बसण्याची शिक्षाही करणे 
      सत्संगात व्यष्टी साधनेसाठी सद्गुरु दादांनी मला काही प्रयत्न करायला सांगितले होते. ते प्रयत्न मी केले नव्हते. याची मला जाणीव व्हावी, यासाठी त्यांनी मला २ - ३ सत्संगांना न बसण्यास सांगितले. माझ्यात पालट व्हावा, यासाठी त्यांनी हे सर्व प्रेमाने केले होते.

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांच्याकडून साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे

१. सहनशीलता आणि तळमळ
१ अ. साडे तीन वर्षे सद्गुरु राजेंद्रदादांनी झोपून सत्संग घेणे, तरी होणार्‍या त्रासाविषयी काही न बोलणे, साधकाने झोपून काही वेळ बोलून पाहिल्यावर त्याला तसे करणे पुष्कळ कठीण असल्याचे लक्षात येणे आणि यावरून सद्गुरु दादांचा सहनशीलता हा गुण शिकायला मिळणे : सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांना देवद आश्रमात येऊन ४ वर्षे झाली. आरंभी त्यांना पुष्कळ शारीरिक त्रास होत होते आणि त्यांची स्थितीही नाजूक होती. त्याही स्थितीत ते सत्संग, बैठका पलंगावर झोपूनच घेत होते. देवद आश्रमातील आणि भारतभरातील जिल्ह्यांचे शुद्धीकरण सत्संगही ते पलंगावर पडून, मध्येच थोडा वेळ बसून आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन, असे घेत होते. एक दिवस त्यांच्या खोलीत सत्संगाची जोडणी करतांना ते मला म्हणाले, झोपून बोलणे किती कठीण आहे ! मग मीही एकदा झोपून बोलण्याचा प्रयत्न केला, तर माझ्या पोटावर पुष्कळ ताण आला आणि काही वाक्येच बोलून मी उठून बसलो. मला थोडा वेळ बोलून एवढा त्रास जाणवला, तर सद्गुरु दादा तीन-साडेतीन वर्षे कुठल्याही त्रासाविषयी न बोलता झोपून बोलत आहेत ! हे किती कठीण आहे ?, हे माझ्या लक्षात आले आणि सद्गुरु दादांकडून मला सहनशीलता शिकायला मिळाली.

राखीपौर्णिमेला बहिणीला अशाश्‍वत भेट देण्याऐवजी चिरंतन तत्त्वाचा प्रसार करणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक बनवा आणि ज्ञानामृत असलेली अनोखी ओवाळणी द्या !

 • राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंंदु बांधवांना आवाहन !
 • वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
१. राखीपौर्णिमेचे महत्त्व !
       श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! या वर्षी १८.८.२०१६ या दिवशी राखीपौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भावाने आपले रक्षण करावे, यासाठी बहीण या दिवशी भावाला ओवाळते आणि राखी बांधते. भाऊ बहिणीला पैसे अथवा तिला उपयोगी पडेल, अशी वस्तू ओवाळणी म्हणून देतो.

पू. (सौ.) सुशीला मोदी यांच्याकडून रामनाथी आश्रमातील हिंदी-विभागातील साधिकांना शिकायला मिळालेली सूत्रे

पू. (सौ.) सुशीला मोदी
      पू. सुशीला मोदी (भाभी) संत झाल्याचे घोषित होण्यापूर्वी जून २०१६ मध्ये पंचम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सेवेसाठी रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी त्यांचा सेवेनिमित्त हिंदी-विभागात सेवा करणार्‍या साधिकांशी संपर्क आला. त्या साधिकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१. बालकभाव 
      सुशीलाभाभींच्या बोलण्यात बालकभाव जाणवला.
२. प्रेमभाव 
      भाभींनी विभागातील साधकांसाठी पुष्कळ चॉकलेट आणली होती.

सतत देवाशी अनुसंधान ठेवणार्‍या आणि इतरांना साधनेत पुढे जाण्यासाठी प्रेमाने साहाय्य करणार्‍या सनातनच्या ६० व्या संत पू. रेखाताई काणकोणकर !

पू. (कु.) रेखा
काणकोणकर
१. निर्मळ मन 
     पू. रेखाताईंचे मन अगदी लहान बाळाप्रमाणे निर्मळ आहे. त्या सर्वांशीच जुळवून घेतात आणि इतरांशी समरस होऊन बोलतात.
२. वेळेचे पालन करणे 
      पू. ताई नियमित आणि नियोजित वेळेत सेवेला येतात. त्या विभागातून उशिरा गेल्या; म्हणून त्यांना यायला उशीर झाला, असे कधीच होत नाही.
३. सेवाभाव 
     पू. ताई दिवस-रात्र अखंड सेवा करतात; पण त्या कधीच मी दमले, असे म्हणत नाहीत. वेळ प्रसंगी त्या कितीही दमल्या, तरी ते त्यांच्या तोंडवळ्यावर दिसतही नाही.

कोणत्याही प्रसंगात स्थिर असणारे आणि जिज्ञासूंना जोडून ठेवणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे जळगाव येथील श्री. दत्तात्रेय वाघुळदेकाका !

श्री. दत्तात्रेय वाघुळदे
      श्रावण शुक्ल पक्ष नवमी (१२.८.२०१६) या दिवशी जळगाव येथील श्री. दत्तात्रेय वाघुळदेकाका यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जळगाव येथील साधकाला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
श्री. दत्तात्रेय वाघुळदेकाका यांना 
वाढदिवसानिमित्त सनातन 
परिवाराच्या वतीने नमस्कार !
१. स्थिरता
      काका प्रत्येक प्रसंगात स्थिरच असतात. काकांना कौटुंबिक समस्या असूनही केवळ देवावर श्रद्धा ठेवून स्थिरतेने त्यांनी त्या समस्यांना तोंड दिले. काकांच्या पत्नी सौ. किरण वाघुळदेकाकू यांना स्वरनलिकेचा कर्करोग झाला होता. त्या वेळी शस्त्रकर्माविना पर्याय नव्हता. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी सांगितले, शस्त्रकर्म करतांना व्यक्ती दगावू शकते किंवा आवाज कायमचा जाऊ शकतो. तेव्हा काकांना जराही ताण आला नाही. यावर उपाय म्हणून त्यांनी संतांचे मार्गदर्शन घेऊन शस्त्रकर्मासाठी सिद्धता दर्शवली.

आत्मज्योती संपूर्ण देहात भ्रमण करीत आहे, असा भाव ठेवल्यावर आलेली अनुभूती आणि त्याविषयी झालेली विचारप्रक्रिया

अधिवक्ता योगेश जलतारे
      ३१.३.२०१६ या दिवशी एका साधकाला आध्यात्मिक त्रास होत होता. त्या वेळी त्याला प्रयोग म्हणून सप्तचक्रांवर लक्ष केंद्रित करून बघ, असे सांगून मी पुढे गेलो. थोड्या वेळाने त्या साधकाने तसे केल्यावर त्याला बरे वाटल्याचे मला सांगितले. त्या वेळी त्या साधकाशी बोलतांना तोंडून सहज वाक्य निघाले, आपल्याला होणारे जे काही सुख-दुःख आहे, ते आपल्या देहाला (म्हणजे स्थूलदेह, कारणदेह, महाकारणदेह यांना) आहे. आत्म्याचे बरे आहे ना, तो सदा आनंदी असतो ! त्यानंतर ते वाक्य माझ्या मनात बराच वेळ घोळत राहिले. शेवटचा विचार होता, आत्मा ज्योतीस्वरूप आहे. तो स्थिर आणि अविचल आहे.

मिळालेल्या ज्ञानात परिपूर्णता येण्यासाठी संत जसे काही पालट सांगतात, तसे पूर्वीच्या जन्मांतही ज्ञानाविषयी गुरु मार्गदर्शन करत असावे, असे स्वप्नात दिसलेल्या दृश्यातून लक्षात येणे

       एके दिवशी मला पहाटे एक स्वप्न पडले. त्यात मला एका गावात एक महाराज आहेत आणि ते तुकाराम महाराजांप्रमाणे भावपूर्ण ओव्या लिहितात, असे समजले. मला त्यांना भेटण्याची इच्छा असल्याने मी त्या महाराजांच्या घरी गेलो. त्यांचा पोशाख म्हणजे गळ्यात उपरणे, डोक्यावर पांढरी पगडी आणि पांढरा सदरा असा होता. त्यांना बघून मला हे महाराज नसून मोठे संत आहेत, असे वाटले. मी त्या महाराजांना स्वतः रचलेली एक ओवी दाखवली. त्यांनी ती ओवी शेणावर सारवलेल्या भिंतीवर लिहिली. त्यांनी ओवीतील दुसर्‍या वाक्यातील शेवटच्या शब्दांत पालट केला. त्यानंतर मला त्या ओवीत चैैतन्य आले आहे, असे जाणवले. ते वाचून मला देवाची पुष्कळ आठवण येऊन माझी भावजागृती झाली आणि मला योग्य मार्ग दाखवला; म्हणून मी त्या महाराजांचे चरण घट्ट पकडले आहेत, असे दिसले.
       मी सकाळी उठल्यावर मला वरील स्वप्न आठवले आणि मला मिळालेल्या ज्ञानात परिपूर्णता येण्यासाठी संत जसे काही पालट सांगतात, तसे पूर्वीच्या जन्मांतही मला ज्ञानाविषयी गुरु मार्गदर्शन करत असावे, असा विचार मनात आला.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

असे आमुचे परात्पर गुरु ।

धन्य ती माता, धन्य ते पिता । धन्य ते गुरु ।
त्यांच्या चरणी लीन होती । अमुचे परात्पर गुरु ॥ १ ॥
सर्वांना सन्मार्गा लावूनी । नाम देऊनी मोक्षाला नेती ।
कर्तेपणा स्वतः न घेता । कृष्णचरणी अर्पण करिती ॥ २ ॥
सर्वकाही स्वतः करूनी । मीपणाचा लवलेशही न ठेवती ।
सर्व गुरुचरणी अर्पण करती । सर्वस्व त्यागण्याचा आदर्श ठेवती ॥ ३ ॥
पात्रता नसता सर्वांना चरणाशी घेती । हसतमुखे योग्य मार्ग दाखवूनी ।
स्वतः साधना करवूनी घेती । अन् अनुभूती देऊनी प्रेरणा देती ॥ ४ ॥
सर्वच आपण करूनी घेती । सर्व श्रेय साधकास देती ।
साधकांचे कौतुक करूनी । अंतरी साधना करवून घडवती ॥ ५ ॥
अशा थोर गुरूंच्या चरणी कोटी कोटी नमन !
- सौ. नीलिमा सामंत, पिंगुळी, ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१.६.२०१६)

साक्षात् भगवंत म्हणजे प.पू. डॉक्टर ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
येणारा क्षण म्हणजे प.पू. डॉक्टर ।
गेलेला क्षण म्हणजे प.पू. डॉक्टर ॥ १ ॥
येणारा श्‍वास म्हणजे प.पू. डॉक्टर ।
गेलेला श्‍वास म्हणजे प.पू. डॉक्टर ॥ २ ॥
येणारा काळ म्हणजे प.पू. डॉक्टर ।
गेलेला काळ म्हणजे प.पू. डॉक्टर ॥ ३ ॥
येणारी व्यक्ती म्हणजे प.पू. डॉक्टर ।
घडणारा प्रसंग म्हणजे प.पू. डॉक्टर ॥ ४ ॥

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

 • हिंदु राष्ट्र स्थापनेतील दीपस्तंभ असलेल्या नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक होण्यासाठी आप्तस्वकियांना प्रवृत्त करा !
 • वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
        पत्रकारिता म्हणजे समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी समर्पित वृत्तीने केलेली तपश्‍चर्या आहे, असा संदेश लोकमान्य टिळकांनी त्यांच्या पत्रकारितेतून दिला. आज समाजातील राष्ट्रनिष्ठा अन् धर्माभिमान ओहोटीला लागलेले असतांना लोकमान्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार पत्रकारिता करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दुर्दैवाने आजची पत्रकारिता अर्थार्जनासाठी केली जाते. अशी स्थिती असतांनाही गेल्या १८ वर्षांपासून नियतकालिक सनातन प्रभात राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अव्याहत कार्य करत आहे.

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !
       सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
       समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल (HGV) असे परवाने असणे आवश्यक आहे.
       जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर वरित संपर्क साधावा.

साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांनी आपल्या बहिणीला वाचक बनवण्याची इच्छा दर्शवल्यास लक्षात घ्यावयाची सूत्रे

      दैनिक वितरणाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी दैनिक चालू करण्यास प्राधान्य द्यावे. तसे शक्य नसल्यास साप्ताहिक, पाक्षिक अथवा मासिक सनातन प्रभात चालू करू शकतो. नियतकालिक वितरणाची व्यवस्था नसल्यास हितचिंतकांना पोस्टाद्वारे अंक पाठवता येईल. नियतकालिक चालू करतांना त्यांच्या भाषेचा विचार करणे अपेक्षित आहे.
      सनातन प्रभातच्या नूतन संकेतस्थळावरून वाचक बनण्यास इच्छुक असलेले जिज्ञासू वर्गणीदार होऊ शकतात, तर वाचक त्यांच्या अंकाचे नूतनीकरण करू शकतात. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करावे. ऑनलाईन वर्गणीदार अर्ज भरणे शक्य नसल्यास स्थानिक साधकांनी त्यांना संपर्क करावा. ही सुविधा दैनिक वगळून अन्य नियतकालिकांसाठी आहे.

आश्रमातील शिलाईच्या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

शिवणकामाचे कौशल्य असणारे साधक, वाचक, 
हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना गुरुसेवेची अमूल्य संधी !
        सनातनच्या विविध आश्रमांमध्ये पडदे, नेटलॉन, पायपोस, गोधड्या, आसंद्यांसाठी (खुर्च्यांसाठी) कव्हर आदी शिवण्याची सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या समवेतच आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या साधकांसाठी सात्त्विक पद्धतीचे पोशाख शिवू इच्छिणार्‍या साधकांचीही आवश्यकता आहे.
        वरील सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांनी रामनाथी आश्रमात सौ. क्षमा राणे यांच्याशी ०८४५१००६२५८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. इच्छुक असणारे आश्रमात राहून या सेवा करू शकतात किंवा काही कालावधीसाठी आश्रमात राहून नंतर घरी जाऊन सेवा चालू ठेवू शकतात. 
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.७.२०१६)

क्रांतीगाथा विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
प्रसिद्धी दिनांक : १५ ऑगस्ट २०१६ 
पृष्ठ संख्या :
मूल्य : ४ रुपये
क्रांतीगाथा अंकात वाचाल...!
१. भारतमातेची शोकांतिका
२. कलियुगातील पुढार्‍याची प्रतिज्ञा !
३. राष्ट्रध्वज देऊ पहात असलेला संदेश
४. प.पू. पांडे महाराज यांचे राष्ट्राप्रतीचे जाज्वल्य विचार
       १५ ऑगस्टच्या क्रांतीगाथा या विशेषांकाची आणि १६ ऑगस्टच्या नियमित दैनिक सनातन प्रभातच्या अंकांची मागणी १३ ऑगस्टला दुपारी २ वाजेपर्यंत इआरपी प्रणालीत भरावी.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
वेळ न मिळणे
जे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता व जे 
गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका.
भावार्थ : जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता म्हणजे पैसा गोळा करता आणि जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. याउलट कसे करायचे ते शिका म्हणजे वेळेचा जास्तीतजास्त वापर साधना करण्यासाठी करा.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मला सर्व कळते, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आवश्यक तेवढेच बोलणे योग्य
परमेश्‍वराने आपल्याला दोन कान आणि एक जीभ दिली आहे. 
ती यासाठी की, जेवढे ऐकाल, त्याच्या निम्मेच बोला. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

विस्थापित काश्मिरींना आशेचा किरण !

संपादकीय 
       विस्थापित काश्मिरी हिंदूंचे सूत्र आता चांगलेच ऐरणीवर आले आहे. हे विस्थापित काश्मिरी हिंदू त्यांनी भोगलेल्या भोगांविषयी जनतेसमोर येऊन बोलत आहेत. मागील २५ वर्षे त्यांनी ज्या नरकयातना भोगल्या, त्यांविषयी ते भारतवासियांना अवगत करू लागले आहेत. केंद्रातील भाजपचे शासन न्याय मिळवून देर्ईल, त्यांची मातृभूमी मिळवून देईल, त्यांची काश्मीरमधील घरे मिळवून देईल, असा आशेचा किरण त्यांना दिसू लागला आहे. त्यांच्या साहाय्यासाठी देशभरातील विविध हिंदु संघटना एकत्र आल्या आहेत. परवाच ओडिशा येथे हिंदुत्वनिष्ठांची एक जाहीर सभा पार पडली.

हे मौन निरर्थक नाही !

संपादकीय
      हिंदूंचे सण आणि उत्सव चालू झाले आहेत. वीस दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सार्वजनिक उत्सव निर्विघ्नपणे आणि उत्साहात पार पडले, तरच त्यातून मनाला समाधान अन् आनंद मिळतो. हिंदूंचे उत्सव आले म्हणजे धर्मांध आणि आतंकवादी यांच्या धमक्या यायला लागतात. हे कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी दिली जाते. वगैरे... वगैरे ! म्हणजे हिंदूंना त्यांचे सण-उत्सव साजरे करण्यातून मिळणारा आनंद मिळू नये, अशीच मानसिकता ! बाह्य शक्तींमुळे होणारे हे आघात एका बाजूला, तर धर्मशिक्षणाच्या अभावी होणारी अंतर्गत हानी दुसर्‍या बाजूला. सण-उत्सव साजरे करण्यामागील उद्देश आणि त्यांपासून होणारे लाभ यांविषयी प्रत्येक जण सजग असला, तरच असे सण-उत्सव साजरे करण्यात गांभीर्य दिसेल. सण-उत्सव साजरे करण्याची पूर्वसिद्धता ते सण-उत्सवांची सांगता या कालावधीत जे अनुचित प्रकार घडतात, ते टाळण्यासाठी सनातन संस्थेने भित्तीपत्रके लावून जागृती करण्याचा प्रयत्न केला. गणेशोत्सव साजरा करतांना काय असावे आणि काय नसावे, यांविषयी सदर भित्तीपत्रकांत उल्लेख होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn