Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

क्रांतीकारक खुदीराम बोस बलीदानदिन

काश्मीर वाचले, तरच भारत वाचेल ! - श्री. प्रमोद मुतालिक

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथे एक भारत अभियान - कश्मीरकी ओर चळवळीच्या अंतर्गत जाहीर सभा
    
डावीकडून अधिवक्ता देवदास शिंदे, श्री. रमेश शिंदे, श्री. विमलेंदू मोहंती,
 श्री. टी.एन्. मुरारी, दीपप्रज्वलन करतांना श्री. प्रमोद मुतालिक आणि श्री. मुरली मनोहर शर्मा
      भुवनेश्‍वर (ओडिशा) - काश्मीर हे भारताचे प्रवेशद्वार आहे. आज पाकसमर्थित काश्मीरच्या आझादीची (मुक्ततेची) चळवळ चालू आहे. तेथील हिंदूंना २६ वर्षांपूर्वी हाकलून लावण्यात आले. आता काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. पाकिस्तान मुसलमानांना मिळाल्यानंतर त्यांनी लगेच हसके लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्थान अशी घोषणा दिली. त्यांनी भारताविरुद्ध ४ युद्ध लढली. लढूनही हिंदुस्थान मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर घुसके लेंगे हिंदुस्थानची रणनीती आखली आहे. त्यामुळे आज काश्मीर संकटात आहे. काश्मीरचे रक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी तेथे हिंदू असणे महत्त्वाचे आहे. काश्मीर वाचले, तरच भारत वाचेल, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. भुवनेश्‍वर येथे भारत रक्षा मंच आणि हिंदु जनजागृती समिती यांनी एक भारत अभियान - कश्मीरकी ओर चळवळीच्या अंतर्गत आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू यांच्यासह ११ राज्यांतील हिंदु संघटनांचे पदाधिकारी आणि २५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

काश्मीरमधील हिंसाचारात पाकचा हात !

     नवी देहली - आतंकवादी बुरहान वानी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारात पाकिस्तानी सैन्य आणि लष्कर-ए-तोयबा ही संघटना साहाय्य करत आहेत, अशी स्वीकृती सुरक्षा दलाने जिवंत पकडलेल्या बहादूर अली या पाकमधील आतंकवाद्याने दिली आहे. भारतात घुसखोरी करण्याआधी पाक सैन्याचे २ अधिकारी त्याला भेटले होते.

काश्मिरातील हिंदूंचे निर्दालन रोखण्याची हीच वेळ ! - उद्धव ठाकरे

     मुंबई - हिंदुस्थानचा सत्तरावा स्वातंत्र्यदिन आता तोंडावर आला आहे; मात्र या ७० वर्षांत ज्या मरणयातना काश्मिरी हिंदूंनी भोगल्या, तेच भोग आताही नशिबी येणार असतील, तर ते डोळे बंद करून पहाता येणार नाही. काश्मिरातील हिंदूंना असे वार्‍यावर सोडून चालणार नाही. देशातील समस्त हिंदूंच्या धमन्यांतील रक्त उसळायला हवे, अशी दमदाटीची भाषा काश्मिरातील हिंदु बांधवांना उद्देशून केली जात आहे. हिंदूंनो, कश्मीर सोडा, नाहीतर मरा अशी धमकी देणार्‍या जिहाद्यांना लाथा मारून पाकिस्तानात पिटाळून लावायला हवे. देशातील शंभर कोटी हिंदूंनी बांगड्या भरलेल्या नाहीत, हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. काश्मिरातील हिंदूंचे निर्दालन रोखण्यासाठी हे करावेच लागेल, असे रोखठोक प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून केले आहे.
या अग्रलेखात पुढे म्हटले आहे -  १. आता काश्मिरातील हिंदूंना ठार मारण्याची उघड उघड धमकी लष्कर-ए-इस्लाम या आतंकवादी संघटनेने दिली आहे. काश्मिरी हिंदूंनो, पंडितांनो, काश्मीरमधून चालते व्हा, नाहीतर मरण्यासाठी सिद्ध रहा, असे या संघटनेने हिंदु धर्मियांना बजावले आहे. लष्कर-ए-इस्लाम ही मूळ पाकिस्तानची आतंकतवादी संघटना असली, तरी तीन-चार वर्षांत या संघटनेने काश्मिरात चांगलेच बस्तान बसवले आहे. काश्मीरमध्ये एकही हिंदु अथवा काश्मिरी पंडित दिसता कामा नये, अशी प्रतिज्ञाच या संघटनेने केली आहे.

मदरशांच्या आधुनिकीकरणावर केंद्र सरकारकडून १ सहस्र कोटी रुपयांचा खर्च !

संस्कृत आणि वेदपाठशाळा यांसाठी केंद्रसरकार 
किती रुपये खर्च करत आहे, हेही त्यांनी घोषित करावे !
     नवी देहली - केंद्र सरकारने आतापर्यंत मदरसे आणि अन्य इस्लामी शिक्षण संस्था यांच्या आधुनिकीकरणावर एक सहस्र कोटी रुपयांहून अधिक पैसे खर्च केले. लोकसभेमध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.
१. सरकारने मदरशांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी वर्ष २००९-१० मध्ये स्कीम फॉर प्रोव्हायडिंग क्वालिटी एज्युकेशन इन मदरसाज् (एस्पीक्यूईएम्) ही योजना आरंभ केली होती. त्यावरील खर्च २०१५ मधे १०८ कोटी होता.
२. जावडेकर म्हणाले की, या योजनेअंतर्गत मदरशांमध्ये विज्ञान, गणित, हिंदी, इंग्रजी आदी विषय शिकवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ही रक्कम खर्च करण्यात आली.
३. उत्तरप्रदेशात ४८ सहस्रांहून अधिक मदरशांना गेल्या ७ वर्षांत आर्थिक साहाय्य देण्यात आले. देशातील सर्व राज्यांमध्ये उत्तरप्रदेश राज्यात मदरशांची ही संख्या सर्वांत अधिक आहे.

जयपूरमध्ये काँग्रेसकडून गोरक्षा यात्रा आणि महाआरती यांचे आयोजन !

जयपूर येथील गोशाळेतील मृत्यूमुखी पडलेल्या गायींसाठी काँग्रेसचे नक्राश्रू ! 
      जयपूर - राजस्थानातील हिंगोनिया गोशाळेत शासकीय व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे तेथील गायींची स्थिती दयनीय झाली आहे. अनेक गायी आजारी पडून मृत्यूमुखी पडल्या आहेत. अशी टीका करून काँग्रेस पक्षाने भाजप राज्य सरकारच्या विरोधात गोरक्षा यात्रा आणि महाआरती यांचे आयोजन केले होते. 
       राज्यशासनाने मोकाट फिरणार्‍या गायींना गोशाळेत ठेवून त्यांचे संगोपन करण्याची योजना आखली आहे. (काँग्रेसच्या राज्यात लक्षावधी गायी कसायांच्या दारात जात असत, हे काँग्रेस विसरलेली दिसते. राज्यशासनाने निदान गायींचे संगोपन करण्यास गोशाळेसारखी व्यवस्था केली आहे. तेथील व्यवस्थापन योग्य करणे हे शासनाचे कार्य आहे; मात्र राज्य आणि केंद्रातील सत्ता गमावल्यावर काँग्रेसला गायींबद्दल पुळका का आला आहे ? हे काँग्रेसचे नक्राश्रू आहेत हे न समजायला जनता खुळी नाही. - संपादक)

हिंगोलीतून अटक केलेला धर्मांध शिक्षक इसिसचा सूत्रधार (कमांडर) !

  • इसिसची पाळेमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत असतांना त्याचा गुप्तचर यंत्रणांना सुगावा न लागणे, हे गुप्तचर यंत्रणांचे अपयशच नव्हे का ? गुप्तचर यंत्रणा बळकट करण्यासाठी गृह विभाग कोणती उपाययोजना करणार आहे ?
  • आतंकवादविरोधी पथकाची विशेष न्यायालयात माहिती
         संभाजीनगर, १० ऑगस्ट - राज्यात रमजान आणि गणेशोत्सव या कालावधीत आतंकवादी आक्रमण करण्याची योजना आखणारा आणि नुकताच हिंगोली येथून अटक करण्यात आलेला जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील इंग्रजीचा शिक्षक मोहंमद रईसोद्दीन हा इसिसचा सूत्रधार (कमांडर) आहे. (असा शिक्षक विद्यार्थ्यांवर कोणत्या प्रकारचे संस्कार करत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) मराठवाड्यातील इसिसची विषवल्ली वाढवण्यात त्याचा सहभाग आहे, अशी माहिती आतंकवादविरोधी पथकाने ९ ऑगस्ट या दिवशी विशेष न्यायालयात दिली. रईसोद्दीन हा मराठवाड्यातील मुसलमान तरुणांचे ब्रेन वॉश करून इसिसचे जिहादी सिद्ध करण्यासाठी कार्यरत होता.

बंगालमधील सीमावर्ती भागात गोतस्करांकडून जुगारांच्या अड्ड्यांची निर्मिती !

गोतस्करांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी प्रशासन काही पावले उचलणार का ?
      मालदा (बंगाल) - भारत-बांगलादेश सीमावर्ती भागातील हबीबपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आग्रा हरिश्‍चंद्रपूर, तालतली, पान्नापूर, केदारीपाडा, टिकियापाडा, बामनगोला आदी अनेक गावांमध्ये भारतीय गोतस्करांकडून जुगाराचे अड्डे चालवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या अड्डयांवर सीमेपलीकडून बांगलादेशी गोतस्कर जुगार खेळण्यासाठी येतात. याप्रकरणी एका व्यक्तीने तक्रार केल्यानंतर येथील बामनगोला, हबीबपूरसह जिल्ह्यातील विविध स्थानांवर पोलिसांनी धाड टाकून जुगारींना अटक केली, तसेच त्यांच्याकडून मोठी रक्कम जप्त केली.

केरळमधील २ सहस्र मुसलमान युवक इसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय !

     मुंबई - धर्मपरिवर्तन आणि इसिससाठी नागरिकांचे मनपरिवर्तन केल्याप्रकरणी केरळ आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले आतंकवादी अर्शीद कुरेशी आणि रिझवान खान यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नागपाडा पोलीस ठाण्यातही कुरेशी आणि खानसह चौघांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. केरळमधील अब्दुल कादेर यांचा मुलगा अश्फाक याला इसिसमध्ये सहभागी करून घेतल्याचा संशय कादेर यांनी व्यक्त केला आहे. अन्य २ सहस्र तरुणांचे धर्मांतर करून त्यांना इसिसमध्ये सहभागी करून घेण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार गुन्हे शाखा, एटीएस्, सीआययूने तपास चालू केला आहे. धर्मांतरासाठी डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च अ‍ॅण्ड फाऊण्डेशनच्या कार्यालयाचा वापर होत होता.

बेल्जियममध्ये १५ वर्षांची शिक्षा झालेल्या जिहादी महिलेची ४ मासांत सुटका !

प्रशासकीय त्रुटीचा लाभ घेणारे धूर्त जिहादी !
      ब्रुसेल्स (बेल्जियम) - बेल्जियममध्ये १५ वर्षांची शिक्षा झालेल्या इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) हस्तक फातिमा अबेरकन या जिहादी महिलेची प्रशासकीय त्रुटीमुळे ४ मासांतच सुटका करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिची सुटका जरी करण्यात आली असली, तरी देशातील मोलेनबीक या मुसलमानबहुल जिल्ह्याला भेट न देणे आणि जिहादी संकेतस्थळे न पहाण्याच्या अटी तिच्यावर घालण्यात आल्या आहेत.
१. फातिमाला आतंकवादाच्या आरोपाखाली एप्रिलमध्ये बेल्जियमच्या कनिष्ठ न्यायालयाने १५ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. परंतु बेल्जियमच्या जिहादच्या जनक असे संबोधल्या जाणार्‍या ५५ वर्षीय अबेरकन हिची नोकरशाहांच्या चुकीमुळे ४ मासांत सुटका झाली.

हिरानंदानी रुग्णालयातील किडनी विक्रीचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस !

अवैध किडनी विक्रीच्या 
प्रकरणात १४ जणांना अटक
        मुंबई - येथील हिरानंदानी रुग्णालयातील अवैध किडनी विक्रीच्या प्रकरणात १४ जणांना अटक करण्यात आली आहे. यात रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. सुजीत चॅटर्जी, डॉ. अनुराग नाईक, मुकेश शेटे, मुकेश शाह, प्रकाश शेट्टी यांच्यासह वैद्यकीय संचालकांचाही समावेश आहे. त्यामुळे या रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपणाला स्थगिती देण्यात आली आहे. किडन्यांची अवैधरीत्या विक्री चालू असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबईमधील किडनी रॅकेट प्रकरणी करण्यात आलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. आतापर्यंत या रुग्णालयात १३० किडन्यांची अवैध विक्री झाल्याचे समजते.
१. खोट्या कागदगपत्रांच्या साहाय्याने खोट्या नातवाइकांची सूची रुग्णालयातील टोळी बनवायची आणि यानंतर खर्‍याखुर्‍या गरजू लोकांना २५ ते ३० लाख रुपयांच्या मोबदल्यात ही किडनी विकली जायची; मात्र प्रत्यक्षात किडनी देणार्‍या व्यक्तीला काही सहस्र रुपये देऊन गप्प केले जायचे.
२. काही दिवसांपूर्वी एका किडनी दात्याने एका सामाजिक संस्थेला समवेत घेऊन रुग्णालयात धाड टाकली. तेव्हा हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले.

भारतीय खासदारांकडे ७१० किलो सोने !

स्वतःचे सोने सरकारकडे जमा करण्यास सिद्ध नसलेले लोकप्रतिनिधी हिंदूंच्या मंदिरांचा 
पैसा आणि सोने सरकारकडे जमा करण्याची मागणी करतात, हे लक्षात घ्या !
केंद्रसरकारच्या सुवर्ण योजनेकडे खासदारांची पाठ !
     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१५ मधे चालू केलेल्या सुवर्ण योजनेकडे सामान्य नागरिकांसह खासदारांनीही पाठ फिरवली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार केवळ लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील खासदारांकडे ७१० किलो सोने आहे; मात्र कोणीही या योजनेच्या अंतर्गत सोन्याची गुंतवणूक केली नाही. 
        पंतप्रधानांच्या या योजनेच्या अंतर्गत किमान ३० ग्रॅम सोने बँकेत ठेवल्यावर त्यावर करमुक्त २.५ टक्के व्याज मिळण्याची हमी देण्यात आली आहे. या संदर्भात बोलतांना राज्यसभेचे खासदार अमर सिंह म्हणाले, माझ्या पत्नीकडे अनुमाने १३ किलो सोने आहे; पण ती अशा गोष्टीला कधी सिद्ध होणार नाही. मी आग्रह केला, तर आमच्यात वाद होतील.

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी एकही बैठक घेतली नाही ! - माहितीच्या अधिकारात उघड

देहलीत कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी ते महिलांची सुरक्षा 
करू शकणार नाही, हेही तितकेच सत्य आहे !
      नवी देहली - देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतापर्यंत राजधानीतील महिलांच्या सुरक्षेेविषयी एकही बैठक घेतली नाही, अशी माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. भाजपचे प्रवक्ते हरीष खुराना यांनी ही माहिती मिळवली आहे.
     १४ फेब्रुवारी २०१५ ते ९ जून २०१६ मध्ये केजरीवाल यांनी देहलीतील कायदा, सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षेविषयी चर्चा करण्यासाठी किती बैठकी आयोजित केल्या, याविषयी माहिती मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज प्रविष्ट केला होता. देहली सरकारने अशा कोणत्याच सूत्रावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली नसल्याचे समोर आले आहे. सध्या अरविंद केजरीवाल हे विपश्यनेसाठी विपश्यना केंद्रात आहेत.
      खुराना म्हणाले, माझ्या हातात सत्ता द्या. मी बदल घडवतो, असे अरविंद केजरीवाल ओरडून सांगत होते; पण आता देहलीत त्यांचेच सरकार आहे; पण देहलीच्या सुरक्षेविषयी आणि महिलाच्या सुरक्षेविषयी त्यांच्या मनात किती गांभीर्य आहे हे आता उघड झाले आहे. अशा कोणत्याच सूत्रावरून त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी देखील चर्चा केली नाही ना त्यांची भेट घेतली.

साम्यवाद्यांनी २५ लाख २० सहस्र लोकांची हत्या घडवून आणली ! - अधिवक्ता विवेक सिंह, कर्नाटक उच्च न्यायालय

बेंगळुरू (कर्नाटक) येथील हिंदूसंघटन मेळावा
डावीकडून कु. भव्या गौडा, श्री. रमेश शर्मा गुरुजी,
अधिवक्ता श्री. विवेक सिंह आणि श्री. मोहन गौडा
      बेंगळुरू (कर्नाटक) - साम्यवाद्यांचे धर्मावरील आक्रमण धर्मशक्तीमुळे रोखू शकलो. साम्यवादी तत्त्वप्रणालीमुळे हिंदु धर्माची फार मोठी हानी झाली आहे. साम्यवाद्यांनी आतापर्यंत २५ लाख २० सहस्र लोकांची हत्या घडवून आणली आहे, असे विधान कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. विवेक सिंह यांनी बेंगळुरू येथे आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात बोलतांना केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील द्वारका परिषद सभागृहामध्ये नुकताच हिंदूसंघटन मेळावा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

सनातनच्या‘प्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोधोंके कारण होनेवाले विकारोंपर उपचार’ या हिंदी ग्रंथाचे पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या हस्ते प्रकाशन

‘प्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोधोंके कारण होनेवाले विकारोंपर उपचार’ या
हिंदी ग्रंथाचे प्रकाशन  करतांना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद
सरस्वती. बाजूला हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया
    कटक (ओडिशा) - पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या हस्ते ८ ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेच्या ‘प्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोधोंके कारण होनेवाले विकारोंपर उपचार’ या हिंदी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ओडिशात चलो काश्मीर मोहिमेच्या अंतर्गत अनेक हिंदुत्वनिष्ठ एकत्रित आले होते. या हिंदुत्वनिष्ठांनी शंकराचार्यांची भेट घेतली. त्या वेळी प्रकाशनाचा हा कार्यक्रम पार पडला.

इसिसच्या आतंकवाद्याकडून बेल्जियमच्या २ पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण

भारतात अशा आक्रमणांना सामोरे जाण्यास पोलीस सिद्ध आहेत का ?
      ब्रुसेल्स - ६ ऑगस्टला बेल्जियम देशातील चार्लेलोई या शहरात एका इसिसच्या आतंकवाद्याने अल्लाहू अकबर या घोषणा देत २ पोलिसांवर पोलीस ठाण्याच्या बाहेरच चाकूने आक्रमण करून त्यांना घायाळ केले. पोलिसांनी प्रत्त्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आक्रमणकर्ता घायाळ झाला असून त्या घटनेचे उत्तरदायित्व इस्लामिक स्टेटने स्वीकारले आहे. 
     याच वर्षी २२ मार्च या दिवशी इसिसच्या जिहादी आक्रमणकर्त्यांनी ब्रुसेल्स विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून ३२ लोकांचा जीव घेतला होता. तसेच ३० जुलैला नुरुद्दीन नावाच्या धर्मांधाला आतंकवादी कारवाया करण्याचा प्रयत्न केल्यामुळे अटक करण्यात आली होती.

सिंहस्थ-कुंभपर्वाइतकीच पवित्र दैवी पर्वणी लाभलेल्या कन्यागत महापर्वास आजपासून पालखी मिरवणुकीने होणार प्रारंभ !

॥ हर हर गंगे ॥ हर हर कृष्णे ॥
     नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) - गुरु जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा कृष्णा नदीच्या किनारी नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाल साजरा केला जातो. गंगा भागिरथी कुंड सतत अकरा वर्षे कोरडे असते. त्यातून पाण्याचा एक थेंबही येत नाही; मात्र गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला की, अचानक गंगा कुंडातून जलस्रोत चालू होतो आणि तो सतत वर्षभर चालू असतो. गुरु कन्या राशीतून बाहेर पडला आणि त्याने तूळ राशीत प्रवेश केला की, पुन्हा गंगा कुंड कोरडे पडते. पुन्हा पुढची अकरा वर्षे ते पूर्णत: कोरडेच असते. बारा वर्षांनंतर गुरूने कन्या राशीत पुन्हा प्रवेश केला की, गंगा कुंडातून जलप्रवाह चालू होतो, यालाच कन्यागत महापर्वकाल म्हणतात. सिंहस्थ-कुंभपर्वाइतकीच पवित्र दैवी पर्वणी असलेल्या या कन्यागत महापर्वास गुरुवार, ११ ऑगस्टपासून पालखी मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे. येथे गुरुवारी पहाटे ५ वाजता श्री मंदिरात काकड आरती होईल, यानंतर सकाळी ८ ते ११ या वेळेत पंचामृत अभिषेक आणि इतर सेवा होतील. सकाळी ११.३० वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा, आरती, नैवेद्य होईल. त्यानंतर धूप, दीप होऊन प.पू. नारायणस्वामी मंदिरातून सवाद्य श्रींची उत्सवमूर्ती मुख्य मंदिरात आणण्यात येईल. प्रार्थना होऊन इंदुकोटी स्तोत्राने पालखीचा प्रारंभ दुपारी २ वाजता होईल. विविध मार्गांवरून जाऊन रात्री उशिरा शुक्लतीर्थ येथे श्रींची पालखी पोचेल.

९/११ च्या अमेरिकेवरील जिहादी आक्रमणात सौदी अरेबियाच्या राजपुत्राचा हात ?

     वॉशिंग्टन - जगातील सर्वांत मोठे जिहादी आक्रमण अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ या दिवशी झाले होते. प्रसिद्ध जुळ्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि इतर ठिकाणी विमाने कोसळवून केलेल्या आक्रमणात एकूण ३ सहस्र लोक ठार झाले होते, तर ६ सहस्र घायाळ झाले होते. या आक्रमणात सौदी अरेबियाच्या बंदर बिन सुलतान याचा हात असल्याचे वर्ष २००२ मधील गोपनीय कागदपत्रे उघड केल्यावर कळाले आहे. 
     या आक्रमणात अमेरिकेतील सौदी अरेबियाचे तात्कालीन राजदूत (वर्ष १९८३ ते २००५) बंदर बिन सुलतान आणि त्यांचा संबंध असलेल्या अस्पेन कोलाराडो या नावाच्या एका आस्थापनाने आक्रमणास उत्तरदायी असलेल्या अल्-कयदा या आतंकवादी संघटनेस साहाय्य केल्याचे आढळून आले. अबू झुबायदाह नावाची व्यक्ती या आस्थापनाशी संबंधित होती आणि त्याने अल्-कयदा संघटनेत प्रवेश घेण्यासाठी इतर मुसलमान युवकांना उद्युक्त केले होते. तिच्याकडून अमेरिकेच्या पोलिसांनी जी दूरध्वनी क्रमांकाची सूची हस्तगत केली, त्यावरून अबू याचा संपर्क बंदर बिन सुलतान यांच्याशी आला होता, असे दिसून येते. अमेरिकेच्या सीआयए आणि अन्य गुप्तहेर संघटनांनी केलेल्या चौकशीत जरी बंदर बिन सुलतान यांचा प्रत्यक्ष सहभाग स्पष्टपणे दिसून आला नसला, तरी त्यांच्यावर दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका आणि सौदी अरेबिया या देशांचे घनिष्ट संबंध लक्षात घेता या प्रकरणाची चौकशी राजकीय कारणामुळे बंद करण्यात आली आहे.

अमेरिकेत हिजाबसाठी एका मुसलमान महिलेने नोकरीवर पाणी सोडले !

असा धर्माभिमान किती हिंदु महिलांमध्ये आहे ? 
     वॉशिंग्टन - वर्जिनियाच्या फेअरफॅक्स काऊंटीमध्ये एका दंत चिकित्सालयात साहाय्यक म्हणून कामाला असणार्‍या नजफ खान या महिलेने नोकरीच्या ठिकाणी हिजाब (डोके आणि तोंड झाकायचा कापड) घालण्यास अनुमती नाकारली म्हणून नोकरीवर पाणी सोडले.
     फेअर ओक्स डेंटल केअर या दंत चिकित्सालयात नोकरी लागल्यावर नजफने प्रारंभीचे काही दिवस हिजाब घातला नाही. त्यानंतर नोकरी कायम झाली समजून एक दिवस ती हिजाब घालून चिकित्सालयात आली. त्या दिवशी डॉ. चेक जो यांनी तिला हिजाब काढायला सांगितला. 
     डॉ. जो यांनी तिला सांगितले, इस्लामी हिजाबमुळे रुग्णांना अडचण होऊ शकते, तसेच त्या व्यवसायापासून धर्माला लांब इच्छितात नजफने तिच्या धर्माशी तडजोड करण्यास नकार दिला. त्यामुळे तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

अमेरिकेच्या सिनेटर तुलसी गब्बार्ड बांगलादेशमधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध सक्रीय !

भारतातील किती लोकप्रतिनिधी बांगलादेशी हिंदूंविषयी आवाज उठवतात ? 
त्यांना निवडून देणार्‍या हिंदूंसाठी हे लज्जास्पद होय !
     वॉशिंग्टन - अमेरिकेच्या हवाई या प्रांतातून संसदेवर निवडून गेलेल्या सिनेटर तुलसी गब्बार्ड यांनी बांगलादेशमधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध लढा हाती घेतला असून त्यासाठी अमेरिकेच्या संसदेत हा प्रश्‍न मांडण्यासाठी स्वाक्षर्‍यांची मोहीम प्रारंभ केली आहे. (बांगलादेशातील हिंदू बांधवांसाठी सक्रीय होणार्‍या तुलसी गब्बार्ड यांचे अभिनंदन ! असे हिंदूंच हिंदु धर्माचे खरे रक्षणकर्ते होत ! - संपादक)
      तुलसी गब्बार्ड या वर्ष २०१३ पासूनच बांगलादेशमधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत. यासंबंधी अमेरिकेच्या सिनेटमध्ये या प्रश्‍नावर चर्चा घडवून एक ठराव पारित करून घेण्याच्या प्रयत्नात तुलसी गब्बार्ड आहेत. त्यासाठी आवश्यक अशी सह्यांची मोहीम त्यांनी प्रारंभ केली आहे. या ठरावामुळे बांगलादेश शासनावर दबाव येऊन ते शासन हिंदूंवरील अत्याचाराविरुद्ध पावले उचलण्यास बाध्य होईल, अशी अपेक्षा आहे.डॉ. झाकीर नाईक यांच्या २ संस्थांना विदेशातून मिळणार्‍या फंडाची शासनाकडून चौकशी !

      नवी देहली - डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन आणि इस्लामिक एज्युकेशनल ट्रस्ट या २ संस्थांना विदेशातून मिळणार्‍या पैशांची फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन अ‍ॅक्ट २०१० (एफ्.सी.आर्.ए.) या कायद्याअंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे, असे वृत्त इंग्रजी वृत्तपत्रानेे दिले आहे. गृहमंत्रालय या शिक्षण संस्थांकडून एफ्.सी.आर्.ए.च्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का ? याची चौकशी करत आहे. (वास्तविक या चौकशीला एवढा विलंब का लागत आहे ? ही चौकशी जलदरित्या होणे अपेक्षित आहे ! - संपादक) 
     डॉ. झाकीर नाईक यांनी या दोन संस्थांची नोंदणी शैक्षणिक संस्था म्हणून केली होती; मात्र या संस्थांना धार्मिक कार्य करण्यासाठीही विदेशातून पैसे मिळाले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कायदेशीर पैलूंचा विचार चालू आहे. प्रथम या शिक्षण संस्थेला धार्मिक कार्यासाठी पैसे मिळाल्याची आम्ही निश्‍चिती करू त्यानंतरच या संस्थांची एफ्.सी.आर्.ए.ची अनुज्ञप्ती रहित करता येईल, असे एका अधिकार्‍याने सांगितले आहे.

पुणे आकाशवाणी केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करणार !

ही मराठी भाषेची गळचेपी नव्हे का ?
मराठी भाषा आणि प्रादेशिक भाषा यांचे संवर्धन करण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !
संसदेतील मराठी भाषिक खासदार सात्त्विक मराठीवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतील का ?
     पुणे - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने पुणे आकाशवाणी केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्यात येणार आहे. दूरदर्शन वाहिन्यांच्या आजच्या काळात अजूनही पुण्यासह महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिक आकाशवाणीवरील सकाळी ७.१० वाजता लागणार्‍या बातम्या आवर्जून ऐकतात. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ९ ऑगस्टला प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशानुसार पुणे केंद्रातील उपमुख्य संचालकपद कोलकाता आकाशवाणी केंद्रात, तर वृत्तसंपादकपद श्रीनगर केंद्रात स्थलांतरित केले आहे. तसेच पुण्यातील वृत्त विभागामध्ये कोणतेही नवीन पद भरण्यात आलेले नाही वा आता तसे पदही राहिलेले नाही. (या प्रकरणी राज्यशासन आणि मराठी भाषा संवर्धन समिती काही प्रयत्न करणार का ? - संपादक) त्यामुळे वृत्त विभाग कोणाच्या दायित्वावर चालणार, असा प्रश्‍न निर्माण झाल्याने हा विभाग बंद करण्यात येणार आहे. (पुण्यासारख्या मराठीच्या माहेरघरी अशी स्थिती निर्माण होणे, हे लज्जास्पद आहे ! - संपादक) या निर्णयाच्या विरोधात मनसेच्या वतीने येथील आकाशवाणी केंद्राबाहेर निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. याचसमवेत पुण्यातील भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनीही या निर्णयाच्या विरोधात केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी पुण्यातील अनेक नागरिकांनी संगणकीय पत्रे पाठवून या निर्णयाला विरोध दर्शवला आहे, असे म्हटले आहे.

ईश्‍वराचे भक्त होण्यासाठी स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया करणे आवश्यक ! - पू. नंदकुमार जाधव

श्रावण मासानिमित्त
परभणी येथे ज्ञानेश्‍वरीवर प्रवचन 

भाविकांना मार्गदर्शन
करतांना पू. नंदकुमार जाधव

        सेलू (जिल्हा परभणी) - जीवनातील अनेक समस्यांचे कारण आपल्या अंतर्मनावर असलेले वाईट संस्कार म्हणजेच स्वभावदोष आणि अहं हेच आहे. दोष आणि अहं यांमुळे आपण स्वत:ला ईश्‍वरापासून वेगळे समजतो. त्यामुळे ईश्‍वराचे भक्त होण्यासाठी स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी केले. येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरातील सभागृहात सध्या श्रावण मासानिमित्त ज्ञानेश्‍वरीवर १ मास प्रवचन चालू आहे. त्या वेळी ज्ञानेश्‍वरीतील ९० व्या ओवीविषयी त्यांनी हे मार्गदर्शन केले. तसेच दोष आणि अहं यांमुळे घडणार्‍या प्रसंगांवर मात कशी करायची, हे त्यांनी उदाहरणासहित सांगितले. या वेळी मंदिराच्या वतीने पू. नंदकुमार जाधव यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे आवश्यक ! - अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

ढवळेवाडी (ता. फलटण, 
जिल्हा सातारा) येथे हिंदु धर्मजागृती सभा 

दीपप्रज्वलन करतांना
अधिवक्ता नीलेश सांगोलकर

       फलटण (जिल्हा सातारा), १० ऑगस्ट (वार्ता.) - वर्ष १९७६ मध्ये घटनेतील कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले; मात्र धर्मनिरपेक्ष देशात आज सर्वत्र भ्रष्टाचार, अनैतिकता, प्रतिदिन होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. हिंदूंवरील अत्याचारांतही वाढ होत असून हिंदूंचीच मंदिरे शासन कह्यात घेत आहे. हिंदू आणि अन्य धर्मीय यांच्यात दुजाभाव केला जातो. हिंदूंवरील अत्याचार वाढतच आहेत. हे रोखण्यासाठी देशाला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर यांनी केले. ढवळेवाडी (ता. फलटण) येथील श्रीराम मंदिरात ९ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छोट्या हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

वडखळ, पेण येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर मार्गदर्शन !

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम
    
विद्यार्थ्यांना फ्लेक्स फलकांची माहिती सांगतांना समितीचे श्री. मनीष माळी
      पेण (रायगड) - वडखळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. जगन्नाथ जांभळेगुरुजी यांनी जय किसान विद्यामंदिर या शाळेत राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी मुलांमध्ये राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्याविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले होते. मुख्याध्यापक श्री. मनोहर वाणी यांनी दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. ९०० विद्यार्थी आणि २४ शिक्षक यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.
हिंदु जनजागृती समितीने लावलेल्या प्रदर्शनातून गौरवशाली भारतीय संस्कृतीचा प्रत्यय !
     हिंदु जनजागृती समितीने लावलेले प्रदर्शन अतिशय सुंदर आणि उपयुक्त आहे. या प्रदर्शनातून गौरवशाली भारतीय संस्कृतीचा प्रत्यय येतो. प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे प्रबोधन झाले. त्यामुळे समितीला मनापासून धन्यवाद ! - सौ. प्रज्ञा महाजन
क्षणचित्र - बहुतांश विद्यार्थी फ्लेक्स फलकावरील लिखाण आपल्या वहीत लिहून घेत होते.

धर्मशास्त्र जाणून घेऊन सण साजरे करूया ! - सौ. नयना भगत

   
मार्गदर्शनाचा लाभ घेतांना उपस्थित महिला
  मुंबई - आपल्या सर्व सणांच्या मागे धर्मशास्त्र आहे. धर्मशास्त्र जाणून घेऊन कृती केली तर आपल्याला त्याचा अधिकाधिक आध्यात्मिक लाभ होईल. त्यामुळे धर्मशास्त्र जाणून घेऊन सण साजरे करूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले. देवनार येथील मातोश्री विद्यामंदिरात ६ ऑगस्ट या दिवशी माता पालक संघाच्या प्रथम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उपस्थित महिलांना नागपंचमीचे महत्त्व या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनातून सण आणि उत्सव यांमागील शास्त्र, चातुर्मासाचे महत्त्व, गुरुशिष्य परंपरा आदी विषयांवर त्यांनी माहिती दिली. मातोश्री विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. उज्ज्वला सांडभोर यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून शाळेच्या अध्यक्षा श्रीमती करुणाताई पाटील उपस्थित होत्या. ७० हून अधिक महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

राज्यातील महाविद्यालयीन स्तरावरील मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गळती ! - सर्वेक्षणातील वास्तव

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी 
प्रयत्न करणारे राज्यशासन आणि मराठी भाषा 
संवर्धन समिती तिच्या सद्यस्थितीकडे लक्ष देईल का ?
        पुणे, १० ऑगस्ट - मराठी भाषेमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अपयशामुळे राज्यात प्रतीवर्षी ७ ते १४ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. येथील महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे मराठीचे अध्यापन करणार्‍या डॉ. राजेंद्र थोरात यांनी राज्यातील महाविद्यालयीन स्तरावरील मराठीच्या स्थितीविषयी केलेल्या सर्वेक्षणातून मराठी भाषेच्या विद्यार्थी गळतीची ही माहिती समोर आली आहे.
        डॉ. थोरात यांनी गेल्या ५ वर्षांत वैयक्तिक संपर्क, सामाजिक संकेतस्थळे आणि अन्य संपर्कसाधने यांचा वापर करून राज्यभरातील मराठी भाषेचे महाविद्यालयीन पातळीवरचे विद्यार्थी, त्यांची संख्या, वर्ग, शिक्षक, संशोधन, भाषाविषयक उच्चशिक्षण आदी विविध सूत्रांवर युवा पिढीशी संवाद साधला. तसेच महाविद्यालयीन पातळीवर उपलब्ध आकडेवारीचीही पडताळणी केली. त्यातून प्रतीवर्षी मराठी भाषेचे सुमारे ७०० ते १ सहस्र ४०० विद्यार्थी न्यून होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील ओतूर आणि नारायणगाव येथील महाविद्यालयांमधील मराठी विभाग बंद पडले आहेत.

पंतप्रधानांनी गोरक्षकांची क्षमा मागावी ! - धनंजय जाधव, छावा संघटना

आंदोलनात सहभागी कार्यकर्ते

       पुणे, १० ऑगस्ट (वार्ता.) - ८० टक्के गोरक्षक समाजकंटक असतात, हे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य संतापजनक आहे. पंतप्रधान उल्लेेख करत असलेली गोरक्षणाची दुकानदारी महाराष्ट्रात नाही. या प्रकरणी पंतप्रधानांनी गोरक्षकांची क्षमा मागावी, अशी मागणी छावा संघटनेचे श्री. धनंजय जाधव यांनी निषेध आंदोलनाच्या वेळी केली. ७ ऑगस्ट या दिवशी पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पत्रकार भवनच्या समोर आंदोलन करण्यात आले. या वेळी छावा प्रमुख धनंजय जाधव, कार्याध्यक्ष गणेश सोनवणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

समाजकंटकांकडून सनातन संस्थेची प्रबोधनात्मक भित्तीपत्रके फाडण्याची अश्‍लाघ्य कृती !

१. फाडलेले भित्तीपत्रक

       नृसिंहवाडी, १० ऑगस्ट (वार्ता.) - सनातन संस्थेच्या वतीने भाविकांचे प्रबोधन होण्यासाठी नृसिंहवाडी परिसराच्या क्षेत्रात आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रबोधन करणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. या पत्रकांमुळे भाविकांना नेमके धर्मशास्त्र समजण्यास सोपे होत आहे, तसेच उत्सवातील अपप्रकार टाळून उत्सव आदर्शरीत्या कसा साजरा करावा, याचे मार्गदर्शन मिळत आहे. असे असतांना श्री महादबा पाटील मठ परिसरात ही पत्रके अज्ञात समाजकंटकांनी फाडलेली आढळून आली. (सनातन संस्था भित्तीपत्रकांच्या माध्यमातून संपूर्ण समाजाचे प्रबोधन करण्याचे प्रयत्न करते. असे असतांना या कृतीस कोणताही हातभार न लावता ती पत्रके फाडण्याची अश्‍लाघ्य कृती करणार्‍यांना धर्मभंजकच म्हणावे लागेल ! - संपादक)

व्हिएतनामकडून चीनच्या विरोधात मोबाईल रॉकेट लाँचर्स तैनात होणार !

चीनला जशास तसे उत्तर देण्याची मानसिकता ठेवणार्‍या
छोट्याशा व्हिएतनामकडून भारत काही शिकेल का ?
       हाँगकाँग - दक्षिण चिनी समुद्रातील व्हिएतनामच्या बेटांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी या बेटांवर व्हिएतनामतर्फे मोबाईल रॉकेट लाँचर्स तैनात करण्यात येणार आहेत. दक्षिण चिनी समुद्रातील चिनी सैन्य असलेल्या बेटांना येथून लक्ष्य करता येणे शक्य असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दक्षिण चिनी समुद्रातील स्पार्टले बेटसमूहांमधील व्हिएतनामच्या नियंत्रणामध्ये असलेल्या प्रदेशातील ५ सैनिकी तळांवर ही रॉकेट लाँचर्स तैनात करण्यात येणार आहेत.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज न वापरण्याच्या संदर्भात प्रबोधन करू ! - श्रीमती आंधळे, नायब तहसीलदार (गृह शाखा), नगर

    
  नगर - १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवसांच्या निमित्ताने होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांचेही प्रबोधन करतो. या संदर्भात पोलीस आणि प्रशासन यांनाही सांगू, असे प्रतिपादन नायब तहसीलदार (गृह शाखा) श्रीमती एम्.एस्. आंधळे यांनी केले. विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याच्या मागणीचे त्यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी त्यांनी हे प्रतिपादन केले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. परमेश्‍वर गायकवाड, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. सागर होनराव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष गवळी, श्री. पराग गावडे, सनातन संस्थेचे श्री. विनायक बत्तीन, श्री. तेजस भाले उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

छोट्याशा व्हिएतनामकडून भारत काही शिकेल का ?
     दक्षिण चिनी समुद्रातील व्हिएतनामच्या बेटांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी या बेटांवर व्हिएतनाम मोबाईल रॉकेट लाँचर्स तैनात करणार आहे. समुद्रातील चिनी सैन्य असलेल्या बेटांना येथून लक्ष्य करता येणे शक्य असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Chinka dabdaba kam karne hetu Vietnam dakshin Chin sagarme Mobile rocket launchers tainat karega. - Chinko takkar deneki aisi mansikta Bharat kab sikhega ?
जागो !
: चीन का दबदबा कम करने हेतु विएतनाम दक्षिण चीन सागर में मोबाईल रॉकेट लॉन्चर्स तैनात करेगा. चीन को टक्कर देने की ऐसी मानसिकता भारत कब सीखेगा ?

तमिळनाडूमध्ये दरोडेखोरांनी धावत्या रेल्वेगाडीतून ५ कोटी ७८ लक्ष रुपये लुटले !

देशातील 
आतापर्यंतचा सर्वांत मोठा दरोडा
        चेन्नई - तमिळनाडूमध्ये धावत्या सालेम-चेन्नई एक्स्प्रेसचे छत कापून दरोडेखोरांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ५ कोटी ७८ लक्ष रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा दरोडा असल्याचे समजते. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याविषयी रिझर्व्ह बँकेने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
        सालेम-चेन्नई एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ३४२ कोटी रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेली २२८ खोकी घेऊन सालेम येथून निघाली होती. ९ ऑगस्टच्या सकाळी ११ च्या सुमारास एक कामगार रेल्वेच्या बोगीत गेला असता गाडीच्या वरच्या छताला भोक असल्याचे त्याला दिसले. त्यानंतर गाडीतून रिझर्व्ह बँकेची २ खोकी बेपत्ता झाली असून ५ कोटी ७८ लक्ष रुपये लुटल्याचे लक्षात आले. रेल्वेत अगोदरपासून दडून बसलेल्या दरोडेखोरांनी हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर) येथे लाच घेणार्‍या २ पोलीस कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट !

       सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर) - येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील २ पोलीस कर्मचार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले. संदीपान भेरे आणि अशोक मोरे अशी या कर्मचार्‍यांची नावे असून शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
       सिल्लोड येथे काही मास पूर्व तक्रारदाराच्या घरासमोर झालेल्या अपघातात एक व्यक्ती घायाळ झाली होती. तक्रारदाराने तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्या व्यक्तीने तक्रारदाराविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात १ लक्ष ५० सहस्र रुपये चोरल्याचा आरोप केला होता. हा आरोप मागे घ्यावा यासाठी तक्रारदार पोलीस ठाण्यात गेला असता कर्मचार्‍यांनी त्याच्याकडे १५ सहस्र रुपयांची मागणी केली होती.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या गॅस शवदाहिनी खरेदीतील भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपचे तिरडी आंदोलन

व्यक्तीच्या मृत्यूनंतरही केला जाणारा भ्रष्टाचार 
म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखेच आहे !
       पिंपरी, १० ऑगस्ट - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून वाकड, दापोडी, पिंपळेनिलख, पिंपळे सौदागर आणि पिंपरी-वाघेरे या ठिकाणच्या स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसवण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी रुपये व्यय करण्यात येणार असून त्या माध्यमातून जनतेच्या पैशांची होणारी लूट थांबवण्याच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट या दिवशी भाजपच्या वतीने पालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि स्थायी समिती सभापती यांच्या दालनासमोर तिरडी आंदोलन करण्यात आले.
       आंदोलनाच्या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये वाद झाला. सभापती आसवानी यांनी बाहेर येऊन आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या प्रकरणाची १५ दिवसांत चौकशी करण्याचे तसेच तोपर्यंत पर्यावरण विभागाचे वादग्रस्त कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आश्‍वासन भाजपच्या आंदोलकांना दिले.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ ऑगस्टपर्यंत वाढ

       पुणे, १० ऑगस्ट - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची न्यायालयीन कोठडी १० ऑगस्ट या दिवशी संपल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी झाली. या वेळी येथील केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.पी. गुळवे-पाटील यांनी डॉ. तावडे यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. या वेळी डॉ. तावडे यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले नव्हते. या वेळी अन्वेषण विभागाच्या वतीने शासकीय अधिवक्ता उज्ज्वला पवार यांनी, तर डॉ. तावडे यांच्या बाजूने अधिवक्ता नीता धावडे यांनी कामकाज पाहिले.

इम्फाळमध्ये २ बॉम्बस्फोटांत एक जण घायाळ !

      नवी देहली - मणीपूरची राजधानी इम्फाळमध्ये १० ऑगस्टला सलग २ बॉम्बस्फोट झाले. येथील मणीपूर विद्यापिठाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि इम्फाळनजीक असलेल्या मोईरंग पुरेल गावातील सीमा सुरक्षा दलाच्या तळाजवळ बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. यात सात वर्षांचा मुलगा घायाळ झाला आहे. या स्फोटासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. (आतंकवादग्रस्त भारत ! - संपादक) सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर आक्रमण करण्यासाठीच हा स्फोट घडवून आणण्यात आला होता, अशी माहिती मिळते आहे.

देशासाठी सर्वस्वाचे बलीदान केलेला १९ वर्षीय वीर : खुदीराम बोस

क्रांतीकारक खुदीराम बोस यांच्या बलीदानदिनानिमित्त ... 
     खुदीराम बोस ! भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर भारतभूच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी हुतात्मा झाला.
१. खुदीराम बोसने सशस्त्र 
क्रांतीचा मार्ग पत्करणे !
    काळ होता १९०३ चा ! बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने निश्‍चित केले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला. देशासाठी काहीतरी करावे, असे सारखे वाटू लागल्याने मेदिनीपूर येथे थोडेफार शिक्षण झाल्यावर त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरुद्ध आंदोलने करणार्‍यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या.

ऑनलाईन गोंधळ आणि ऑफलाईन चलाखी !

     शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याची ओरड आपल्याकडे नेहमीच होत असते; पण ते कोणी गांभीर्याने घेत आहे, असे चित्र नाही. त्यात आता गेल्या काही वर्षांपासून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशातील तंत्रज्ञानसदृश त्रुटींची भर पडली आहे. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशावरून सध्या बराच खल चालू होता. चांगली टक्केवारी असूनही आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नसल्याची, अल्प टक्केवारीवाल्यांना चांगल्या महाविद्यालयाची लॉटरी लागत असल्याची आणि ही प्रक्रिया राबवणारी प्रक्रिया चुकीची असल्याची पालकांची मूळ तक्रार आहे. ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत प्रतिवर्षी प्रक्रियेविषयी ज्या त्रुटी लक्षात येतात त्यांत सुधारणा होऊन पुन्हा तशी चूक उद्भवू नये, हे लक्षात घेतले पाहिजे.

हिंदु धर्मात कट्टर विचारसरणीचा गट कधीच नव्हता, हे पोपना ज्ञात नाही का ?

     नुकतेच इसिसच्या आतंकवाद्यांनी फ्रान्समधील एका चर्चवर केलेल्या आक्रमणात तेथील पाद्रीचा गळा चिरून त्यांची हत्या केली. यासंदर्भात ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस पत्रकारांना म्हणाले, आतंकवादाची तुलना इस्लामशी करता येत नाही. इस्लामी हिंसेची चिंता करतांना ख्रिस्ती हिंसेवरही बोलावे लागेल. जवळपास प्रत्येक धर्मात कट्टर विचारसरणीचा एक छोटासा गट असतो.

केंद्रसरकार बैलांच्या झुंजीला पौराणिक संदर्भ देते, तसे चांगल्या गोष्टींसाठी का देत नाही ?

     केंद्रशासनाने तमिळनाडू, पंजाब आणि हरियाणा यांसह देशाच्या विविध भागांमध्ये चालणारा जल्लीकट्टू हा क्रीडा प्रकार, बैलांच्या झुंजी, बैलगाड्यांच्या शर्यती यांचे समर्थन करतांना श्रीकृष्ण आणि महाभारताचा संदर्भ दिला आहे. भगवान श्रीकृष्णाला राजकन्या नागनाजिती हिच्याशी विवाह करण्यासाठी ७ बैलांशी झुंज द्यावी लागली होती. बैलांच्या शर्यती, बैलगाड्यांच्या शर्यती किंवा जल्लीकट्टू आदी खेळ जैव विविधता जोपासण्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे केंद्रसरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

१२ वर्षांनंतर अनुभवास येणारा अद्भुत आणि पवित्र सोहळा : कन्यागत महापर्वकाल !

११ ऑगस्टपासून चालू होणार्‍या कन्यागत महापर्वकालाच्या निमित्ताने...
      सह्याद्री पर्वतावर सातारा जिल्ह्यात श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर हे ठिकाण आहे. येथे सात नद्यांचे उगमस्थान असून येथील आमलकीच्या आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळांमधून सात नद्यांचा उगम होतो. सध्या येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, गंगाभागीरथी आणि सरस्वती अशी सात कुंडे बांधण्यात आली आहेत. यातील कृष्णा, वेण्णा, कोयना आणि सावित्री या चार कुंडांतून निरंतर जलप्रवाह चालू असतो. सरस्वती नदी गुप्तरूपाने येथे वास करते, तर गायत्री कुंडातून ६० वर्षांतून एकदाच कपिलाषष्ठीच्या योगावर जलप्रवाह येतो. गुरु ग्रहाने कन्या राशीमध्ये प्रवेश केल्यावर गंगा भागीरथी कुंडातून जलस्रोत येतो आणि तो वर्षभर चालू रहातो. यालाच कन्यागत महापर्वकाल असे म्हणतात. यावर्षी ११ ऑगस्टपासून गुरु ग्रह कन्या राशीत प्रवेश करत असून कन्यागत महापर्वाला प्रारंभ होत आहे.

जखमा कायम अन् खुमखुमीही !

     अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर ६ आणि ९ ऑगस्ट या दिवशी अणूबॉम्ब टाकून प्रचंड विद्ध्वंस केला. त्या घटनेला ९ ऑगस्ट २०१६ या दिवशी ७१ वर्षे पूर्ण झाली. या घटनेस ७ दशके उलटल्यानंतरही त्याचे व्रण अद्यापही कायम आहेत. या घटनेविषयी थोडसे...
१. ...अन् एका क्षणात सजीव-निर्जीव सर्व खाक झाले !
     प्रतिवर्षी ६ आणि ९ ऑगस्ट हे दोन दिवस जगाच्या नेहमीच स्मरणात रहाणारे आहेत. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी या दिवशीच अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या जपानमधील २ प्रमुख शहरांवर अणूउत्पात घडवून आणला अन् दुसर्‍या महायुद्धाची समाप्ती झाली. अणुउत्पाताच्या क्षणानंतरच अणुऊर्जेचे रौद्र आणि महाविघातक रूप जगासमोर आले आणि त्याने माणूस अक्षरशः हादरून गेला.
      स्वातंत्र्यानंतर समाजात अनैतिकता, संस्कारहीनता आणि चारित्र्यहीनता आली असून गुंडगिरी, दहशतवाद आणि भ्रष्टाचार हे सर्व वाढत चालले आहे !
(लोकजागर)

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

      एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या विरामचिन्हांमुळे पालटणारे वाक्याचे अर्थ सांगणारे हे सदर !तंत्रशास्त्राला गोमांसभक्षण अभिप्रेत नाही !

आक्षेप : तंत्रशास्त्रात पंच मकाराची उपासना आहे. एका श्‍लोकात मांसभक्षणासंबंधी गोमांस सेवनाचा उल्लेख आहे. म्हणजे तंत्रशास्त्राला गोमांस भक्षण संमत आहे.
उत्तर : तंत्राला गोमांसभक्षण अभिप्रेत नाही. मांस पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. तन्मात्रा गंध आहे. कर्म आणि फलेच्छा बंधनात असलेल्या पशूभावाला विवेक या शस्त्राने तोडून टाकणे अन् मी आणि माझे निष्कल शिवात मिळविणे, याला गोमांस भक्षण म्हणतात.
      मी आणि माझे निष्कल शिवात विलीन सहजसाध्य करण्याकरता योग सांगितला आहे. टाळूच्या (जिव्हेच्या वरील भागात) मुळात (विवरात) जिव्हेने प्रवेश करणे, या क्रियेला गोमांसभक्षण म्हणतात. (संदर्भ : मासिक घनगर्जित, सप्टेंबर २०१२)

राखीपौर्णिमेला बहिणीला अशाश्‍वत भेट देण्याऐवजी चिरंतन तत्त्वाचा प्रसार करणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक बनवा आणि ज्ञानामृत असलेली अनोखी ओवाळणी द्या !

  • राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंंदु बांधवांना आवाहन !
  • वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
१. राखीपौर्णिमेचे महत्त्व !
       श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! या वर्षी १८.८.२०१६ या दिवशी राखीपौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भावाने आपले रक्षण करावे, यासाठी बहीण या दिवशी भावाला ओवाळते आणि राखी बांधते. भाऊ बहिणीला पैसे अथवा तिला उपयोगी पडेल, अशी वस्तू ओवाळणी म्हणून देतो.

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १० महिने २६ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना २ महिने २ दिवसांपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
     केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

महर्षींनी साधकांच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यासाठी आणि प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे, यांसाठी चेन्नई येथील तिरुवाणमियुर गावातील तिरुमरुंदीश्‍वर मंदिरात दर्शनाला जाण्यास सांगणे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
      महर्षींच्या आदेशाप्रमाणे आम्ही ४.८.२०१६ या दिवशी चेन्नई येथील तिरुवाणमियुर गावातील तिरुमरुंदीश्‍वर मंदिरात दर्शनाला गेलो होतो. हे शिवाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराचे स्थापत्य जवळजवळ २००० वर्षांपूर्वीचे आहे. येथे शिवाची प्रसिद्ध दक्षिणाभीमुख मूर्ती आहे. साधकांच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यासाठी, तसेच प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे, यांसाठी महर्षींनी आम्हाला या मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक करून तेथे प्रार्थना करण्यास सांगितले होते. आम्ही तसे केले. तेथे गेल्यानंतर या मंदिराच्या स्थानमहात्म्याविषयी तेथील पुजार्‍यांनी आम्हाला यथासांग माहिती दिली.

विविध संतांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्यक्ष कृती करून अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणारे प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. डहाणू येथील संत प.पू. अण्णा करंदीकर यांची माहिती मिळणे आणि त्यांना भेटल्यावर त्यांंच्याकडून मार्गदर्शन मिळेल, अशी प.पू. डॉक्टरांना खात्री वाटणे : डहाणू येथील एक संत प.पू. अण्णा करंदीकर आयुर्वेदीय चिकित्सालयात रुग्णांना पहाण्यासाठी प्रत्येक मासात (महिन्यात) ३ दिवस दादर येथे येत असत. प.पू. (डॉ.) आठवले त्या वेळी अध्यात्माचा प्रायोगिक तत्त्वाने अभ्यास करत होते. प.पू. डॉक्टरांना त्यांच्या एका मित्राने प.पू. अण्णा करंदीकर यांच्याविषयीची माहिती सांगितली. प.पू. अण्णांना भेटल्यावर त्यांच्याकडून अपेक्षित असे मार्गदर्शन मिळेल, अशी खात्री प.पू. (डॉ.) आठवले यांना झाली.

अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिरामध्ये शिकायला मिळालेली सूत्रे

१. सकारात्मक राहिल्याने चैतन्यात वाढ होणे 
       दिनांक २७.६.२०१६ पासून अखिल भारतीय साधनावृद्धी शिबीर आरंभ झाले. शिबिराला आरंभ होताच पाऊस पडू लागला आणि वीज अचानक जाऊन अंधार पडला. अशा वेळी सामान्यपणे कुणाच्याही मनात नकारात्मक विचार येतात; परंतु शिबिरात उपस्थित असलेल्या संतांनी त्याची सकारात्मक बाजू सांगितली. त्यामुळे वातावरणातील चैतन्य वाढले. यातून प्रत्येक प्रसंगात सकारात्मक कसे आणि का रहायचे ?, याचे महत्त्व लक्षात आले. हेही लक्षात आले की, जेथे लोक सकारात्मक असतात, तेथील चैतन्य वाढते.
२. प्रत्येक कृती ईश्‍वराचे अधिष्ठान ठेवून केल्यास तिची फलनिष्पत्ती वाढणे 
      प्रत्येक सेवा, मग ती छोटी असो किंवा मोठी, ईश्‍वराचे अधिष्ठान ठेवून केल्याने त्या सेवेची फलनिष्पत्ती वाढते. यावरूनच व्यष्टी साधना आणि आध्यात्मिक उपाय यांचे महत्त्व लक्षात आले.
३. घडलेल्या अयोग्य प्रसंगामध्ये अंतर्मुख होऊन मनातील विचारप्रक्रियेचे विश्‍लेषण करणे महत्त्वाचे ! 
    अहं आणि स्वभावदोष यांच्याशी निगडित घडलेल्या प्रसंगांवर लक्ष ठेवतांना अंतर्मुख होऊन प्रसंग घडत असतांना मनात झालेल्या विचारप्रक्रियेचे विश्‍लेषण करणे पुष्कळ महत्त्वाचे आहे, हे लक्षात आले.
- डॉ. नंदकिशोर, अयोध्या, उत्तरप्रदेश. (५.७.२०१६)


सनातनचे संत पू. संदीप आळशी यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन

पू. संदीप आळशी 
१. त्रास असणार्‍या साधकांना एकाच सेवेचा कंटाळा आल्यास 
त्याला नवनवीन सेवा देण्याचे नियोजन करा ! 
      काही वेळा साधकांना त्रासामुळे सेवेचा कंटाळा येतो. त्यामुळे ते करत असलेली सेवा त्यांना कंटाळवाणी वाटते आणि त्रासामुळे काहीच करावेसे वाटत नाही. अशा वेळी संबंधित साधकाकडून अमुक एक घंटेच सेवा व्हायला हवी, असा विचार करण्यापेक्षा सेवा आणि साधना यांतून त्याला आनंद कशा प्रकारे मिळेल ?, याचा विचार करावा. साधकाचा सध्याचा त्रास आणि स्थिती समजून घेऊन त्याचे मन रमेल, अशा सेवा त्याला देऊ शकतो. नाविन्याची ओढ प्रत्येकाला असल्याने नवनवीन शिकण्याची इच्छाही असते. हे लक्षात घेऊन अशा साधकाला आलटून-पालटून सेवा देऊ शकतो.

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता अंतरात्म्याकडे लक्ष देणे आवश्यक असणे

प.पू. पांडे महाराज
प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !
      आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा आपण आपल्यावरील आवरणाकडे लक्ष देत असतो; पण त्याच्यातील कार्य करणार्‍या भगवंताकडे आपले लक्ष नसते. आपण त्यांच्या दोषांशी एकरूप न होता त्यांच्या स्थितीत जाऊन त्यांना दोष घालवायला कसे साहाय्य करता येईल ?, याचा विचार करायला हवा. आपण त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता त्यांच्यातील अंतरात्म्याकडे लक्ष द्यायला हवे.
      - प.पू. पांडे महाराज (संग्राहक - डॉ. मंगलकुमार कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.५.२०१५))
आपणच आपल्या साधनेचे दायित्व घेऊन प्रयत्न केले पाहिजेत, याची जाणीव तळमळीने करून देणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर !

सौ. सुप्रिया माथूर
      मी रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया करण्यासाठी गेले होते. त्या वेळी आमचा आढावा घेणार्‍या सौ. सुप्रिया माथूर यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे देत आहे. 
१. मनात येणार्‍या विचारांना योग्य दिशा दिली, तर मन हलके होऊन आपण शिकण्याच्या स्थितीत रहातो, हे ताईच्या माध्यमातून मला शिकायला मिळाले. 
२. प.पू. गुरुमाऊलीच सुप्रियाताईच्या माध्यमातून मनाचे मंथन करून सुप्त अहं आणि दोषांचे पैलू दाखवून त्यातून बाहेर कसे पडायचे ?, हे शिकवत आहे, असे जाणवले.

श्री. सत्यकाम कणगलेकर यांना नामजप आपोआप पालटण्याच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. सत्यकाम कणगलेकर
१. नामजप करतांना ॐ निसर्गदेवो भव ।.. हा महर्षींनी सांगितलेला 
नामजप आपोआप थांबून ॐ श्री अग्निदेवाय नमः । हा नामजप 
आपोआप चालू होणे आणि तो थांबवून पुन्हा महर्षींनी सांगितलेला 
नामजप करणे चालू केल्यावर पुन्हा तसेच होणे 
      २०.४.२०१६ या दिवशी सकाळी ८.२९ वाजता मी उपाय करण्यासाठी खोली क्रमांक ३२४ मध्ये बसलो होतो. त्या वेळी मी महर्षींनी सांगितलेला ॐ निसर्गदेवो भवः । ॐ वेदम् प्रमाणम् । ..., हा जप करण्यास आरंभ केला. नामजपातील पहिल्या २ जपानंतरच माझा हा जप आपोआप थांबला आणि ॐ श्री अग्निदेवाय नमः । हा नामजप चालू झाला. ३ - ४ वेळा हा जप मनातल्या मनात झाल्यावर मला त्याची जाणीव झाली आणि मी त्या जपाला थांबवले अन् पुन्हा महर्षींनी सांगितलेला नामजप करण्यास आरंभ केला; मात्र या वेळीसुद्धा पहिल्याप्रमाणेच हा जप थांबून श्री अग्निदेवाचा नामजप चालू झाला. हा जप आपोआप चालू होण्यामागे काही कारण असावे, असे वाटून मी तो चालू ठेवला.

रामनाथी आश्रमात कार्यशाळेसाठी आलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या युरोप येथील सौ. रेवती बाल्याक यांना आलेली अनुभूती

सौ. रेवती बाल्याक
कपाळावर कुंकू लावल्यावर मनातील नकारात्मक आणि निराशेचे विचार नष्ट होऊन मन सकारात्मक होणे अन् हिंदु संस्कृतीतील धार्मिक कृतींमागील अध्यात्मशास्त्राचे महत्त्व लक्षात येणे : ३०.७.२०१६ या दिवशी मी सकाळी उठले. तेव्हा माझ्या मनात नकारात्मक आणि निराशेचे विचार होते. त्यामुळेे मला कुणाशीही बोलावेसे वाटत नव्हते. कार्यशाळेचे सकाळचे सत्र चालू होण्यापूर्वी पू. सिरियाक वाले यांनी प्रत्येक साधकाने (कपाळावर) आज्ञाचक्रस्थानी कुंकू लावून काय जाणवते ?, याची अनुभूती घ्यावी, असे सर्वांना सांगितलेे. त्यानुसार मी कपाळावर कुंकू लावल्यावर काही वेळातच माझ्या मनाची स्थिती पालटून मनातील नकारात्मक विचारांच्या ठिकाणी सकारात्मक विचार असल्याचे जाणवले. कार्यशाळेतील सत्रांमध्ये सांगितलेले सर्व सहजपणे मला समजत असल्याचे जाणवलेे. यावरून हिंदु संस्कृतीतील धार्मिक कृतींमागील अध्यात्मशास्त्राचे महत्त्व माझ्या लक्षात आले. प.पू. गुरुदेवांकडून आम्हाला मिळत असलेले मार्गदर्शन आणि संरक्षण यांसाठी आम्ही भाग्यवान आहोत, असे मला वाटले.
- सौ. रेवती बाल्याक, क्रोएशिया, युरोप. (३०.७.२०१६)

साधकांसाठी सूचना आणि कृतीशील धर्माभिमान्यांना नम्र विनंती !

  • जिज्ञासूंना साधनेसाठी योग्य दिशा देणारे आणि धर्माभिमान्यांना राष्ट्र अन् धर्म प्रेमाचे बाळकडू पाजणारे सनातन प्रभात घरोघरी पोचवून धर्मप्रसार करा !
  • वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
       नियतकालिक सनातन प्रभात हे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या वैचारिक लढ्यातील महत्त्वाचे अस्त्र आहे. वाचकांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम जागवण्यासाठी अन् त्यांना साधनेसाठी प्रतिदिन दिशा देण्यासाठी ते कटिबद्ध आहे. साधना आणि हिंदूंचे संघटित प्रयत्न यांमधून हिंदु राष्ट्ररूपी दिव्यस्वप्न वास्तवात उतरू शकते, हा दुर्दम्य आत्मविश्‍वास हिंदु धर्मनिष्ठांमध्ये रूजवण्यात या नियतकालिकाचा सिंहाचा वाटा आहे. आपत्काळाला तोंड देण्यासाठी साधनारूपी संजीवनी समाजापर्यंत पोेचवण्याची काळाची निकडही हे नियतकालिक पूर्ण करत आहे.
       या कार्याला अधिक गती येेण्यासाठी ५ ते २०.८.२०१६ या कालावधीत सनातन प्रभात वाचकवृद्धी मोहीम राबवण्यात येत आहे. त्याद्वारे सनातन प्रभात अधिकाधिक हिंदूंच्या घरी पोचवण्यासाठी साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांंनी संघटित प्रयत्न केल्यास धर्मप्रसारासह हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संकल्पनेला अधिक बळकटी मिळेल !

साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांनी आपल्या बहिणीला वाचक बनवण्याची इच्छा दर्शवल्यास लक्षात घ्यावयाची सूत्रे

       दैनिक वितरणाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी दैनिक चालू करण्यास प्राधान्य द्यावे. तसे शक्य नसल्यास साप्ताहिक, पाक्षिक अथवा मासिक सनातन प्रभात चालू करू शकतो. नियतकालिक वितरणाची व्यवस्था नसल्यास हितचिंतकांना पोस्टाद्वारे अंक पाठवता येईल. नियतकालिक चालू करतांना त्यांच्या भाषेचा विचार करणे अपेक्षित आहे.
       सनातन प्रभातच्या नूतन संकेतस्थळावरून वाचक बनण्यास इच्छुक असलेले जिज्ञासू वर्गणीदार होऊ शकतात, तर वाचक त्यांच्या अंकाचे नूतनीकरण करू शकतात. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करावे. ऑनलाईन वर्गणीदार अर्ज भरणे शक्य नसल्यास स्थानिक साधकांनी त्यांना संपर्क करावा. ही सुविधा दैनिक वगळून अन्य नियतकालिकांसाठी आहे.

क्रांतीगाथा विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
प्रसिद्धी दिनांक : १५ ऑगस्ट २०१६ 
पृष्ठ संख्या :
मूल्य : ४ रुपये
        १५ ऑगस्टच्या क्रांतीगाथा या विशेषांकाची आणि १६ ऑगस्टच्या नियमित दैनिक सनातन प्रभातच्या अंकांची मागणी १२ ऑगस्टला दुपारी २ वाजेपर्यंत इआरपी प्रणालीत भरावी.

हिंदूंनो, कन्यागत महापर्वकालाच्या निमित्ताने सनातन संस्था आयोजित ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांचा लाभ घ्या !

     आनंदप्राप्तीसाठी धर्माचरणासह योग्य साधना करणे आवश्यक आहे. सनातनचे ग्रंथ धर्माचरण व साधना या संदर्भात मार्गदर्शन करतात. देवालय दर्शन, नामजप, श्राद्ध आदी विषयांवरील ग्रंथ, तसेच धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन पहाण्यासाठी अवश्य भेट द्या. -
दिनांक : ११ ते २० ऑगस्ट २०१६ (सकाळी ९ ते रात्री १०)
स्थळ : १. श्री विठ्ठल मंदिराशेजारी, नृसिंहवाडी
२. श्री दत्तविद्यामंदिर कमानीशेजारी, नृसिंहवाडी
३. श्री हनुमान मंदिराशेजारी, शिरोळ-वाडी रोड
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन
१. तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने पहाता, त्याच भावनेने मी तुमच्याकडे पहातो.
२. आपल्याकरिता कुणी नाही, आपण सर्वांकरिता आहोत.
३. दरिद्रका मुंह नहीं देखता । गरीबका साथ नहीं देता । लखपतीके घर नहीं जाता । धनवानके घर रहता हूं ।
भावार्थ : दरिद्र, गरीब हे शब्द नाम न घेणार्‍याच्या संदर्भातील आहेत. लखपती हा मायेसंबंधातील, तर धनवान हा नाम घेणार्‍या साधकाला उद्देशून आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     नैतिकता आणि आचारधर्म बालपणापासून न शिकवणारे पालक अन् शासन यांच्यामुळे भारतात सर्वत्र अनाचार, राक्षसी वृत्ती प्रबळ झाल्या आहेत. या स्थितीमुळे बलात्कार, भ्रष्टाचार, विविध गुन्हे, देशद्रोह आणि धर्मद्रोह यांचे प्रमाण अपरिमित होऊन देश रसातळाला गेला आहे. त्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्‍वरप्राप्तीच्या तीन प्रमुख योगमार्गांची कलियुगातील उपयुक्तता

- परात्पर गुरु डॉक्टर आठवले 


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकीतून शिकणे महत्त्वाचे ! 
मानवी आयुष्यात कालक्रमणा करतांना चुका घडतातच; पण प्रत्येक चुकीपासून 
आपण काहीतरी शिकलो, तर पुढील आयुष्य यशस्वी होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)देवस्थानांचा पैसा !

संपादकीय
      नवव्या शतकात देशात प्रथम मुसलमान आक्रमणकर्त्यांचे आक्रमण झाले. भारत सुवर्णभूमी असल्याने आणि वाळवंटातील मुसलमान हे लुटारू असल्याने त्यांनी भारतावर आक्रमण केले. येथील संपत्ती लुटून मध्यपूर्वेतील वाळवंटात नेली. विशेष करून हिंदूंच्या मंदिरांतील प्रचंड संपत्ती लुटण्यात आली. महंमद गझनी याने तर अनेकदा गुजरातच्या सोमनाथ मंदिरावर आक्रमण करून लूट केली. आक्रमणकर्त्या मुसलमानांचे नेहमीच हिंदूंच्या मंदिरांतील पैशावर लक्ष होते. ही परंपरा आजही कायम आहे. आजही देशातील मंदिरांवर धर्मांधांकडून आक्रमणे केली जातात. मंदिरांत चोर्‍या होतात, यात पकडले गेलेले आरोपी अनेकदा धर्मांधच असतात. ही झाली धर्मांधांची मनोवृत्ती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn