Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज गोस्वामी तुलसीदास जयंती

तुळजापूर देवस्थान घोटाळ्याचे अन्वेषण असमाधानकारक : ८ आठवड्यांत अहवाल सादर करा ! - उच्च न्यायालय

काँग्रेसच्या शासनकाळातील तुळजापूर देवस्थान समितीचा भूमी आणि दानपेटी घोटाळा !
धाराशिव येथील पत्रकार परिषदेत श्री तुळजाभवानी संरक्षक कृती समितीची माहिती !
    
डावीकडून श्री. अर्जुन साळुंखे, महंत मावजीनाथ महाराज, 
अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, श्री. सुनील घनवट, श्री. राजन बुणगे
     धाराशिव - तुळजापूर देवस्थान भूमी आणि दानपेटी घोटाळ्याच्या प्रकरणी अन्वेषण यंत्रणांचे काम समाधानकारक नाही. या संदर्भात पुढे काय पावले उचलली, याचा अहवाल ८ आठवड्यांत गृह, महसूल आणि न्याय विभागाचे सचिव, तसेच धाराशिव येथील जिल्हाधिकारी यांनी सादर करावा, असे कडक ताशेरे उच्च न्यायालयाने अन्वेषण यंत्रणांवर ओढले आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ९ ऑगस्ट या दिवशी धाराशिव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
     या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, महंत मावजीनाथ महाराज, शिवबाराजे प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्री. अर्जुन साळुंखे आणि हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर समन्वयक श्री. राजन बुणगे उपस्थित होते.

मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतातून सर्वाधिक गोमांसाची निर्यात ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

     नवी देहली - गोरक्षणाच्या आश्‍वासनामुळेच मोदी पंतप्रधान म्हणून निवडून आले; मात्र त्यांच्याच काळात भारत गोमांसाची सर्वाधिक निर्यात करू लागला आहे. वास्तविक ते सत्तेवर आल्यावर गोहत्या बंद होऊन ही निर्यात बंद होण्याची आशा होती; मात्र भाजपच्या राज्यांतूनच गोमांस निर्यात होत आहे अन् त्यांना अनुदानही दिले जाते आहे, तर दुसरीकडे मोदी गोरक्षकांनाच समाजकंटक ठरवत आहेत, अशी टीका द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केली आहे.
     शंकराचार्य पुढे म्हणाले की, दोन-चार लोक जर चुकीचे काही करत असतील, तर ते नगण्य आहे. त्याच्यापेक्षा गोमांस निर्यात करून तुम्ही (मोदी) मोठा गुन्हा करत आहात. तुम्ही स्वतःकडे पहा. अशी विधाने करण्यापेक्षा तुम्ही गोहत्या रोखण्यासाठी काम करावे.
     मोदी यांना जर असे वाटत असेल की, विकासाच्या नावामुळे निवडून आलो आहे, तर त्यांनी त्यागपत्र देऊन केवळ विकासाच्या आधारे निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान शंकराचार्य यांनी दिले.

८० टक्के समाजकंटक गोरक्षक भाजप आणि रा.स्व. संघातले ! - स्वामी चक्रपाणी

     नवी देहली - जे खरे गोरक्षक आहेत, ते गोमातांना कधीही मरू देणार नाहीत. मला वाटते की, मोदी अनेक वर्षे संघात होते. भाजप आणि संघवाले राममंदिर, गोरक्षा या सूत्रांवर बोलतात; पण कृती करत नाहीत. निष्क्रीय असतात. त्यामुळे कदाचित् ८० टक्के समाजकंटक गोरक्षक भाजप आणि संघातील असू शकतात, ज्यांना मोदी ओळखत असतील. ते अनुभवाचे बोल असू शकतील, अशी प्रखर टीका अखिल भारतीय हिंदु महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली आहे. मोदी म्हणत असलेल्या ८० टक्के समाजकंटक गोरक्षकांचे त्यांनी पुरावे द्यावेत. त्यांनी कोणत्या अहवालाद्वारे हे विधान केले, ते १५ दिवसांत सादर करावेत अन्यथा क्षमा मागावी, असेही स्वामी चक्रपाणी म्हणाले.
स्वामी चक्रपाणी यांनी मांडलेली सूत्रे
     राजस्थानच्या जयपूर येथील हिंगोनिया गोशाळेला प्रतिमास अडीच कोटी रुपये मिळत होते. तरीही तेथील दुरवस्थेमुळे ५०० हून अधिक गायी मरण पावल्या. तेथे भाजपचे सरकार आहे. त्यावर मोदी यांनी बोलायला हवे होते; मात्र त्यांनी गोरक्षकांवर विधान केले, ते दुर्दैवी आहे. मोदी यांनी गुलाबी क्रांतीच्या (पिंक रिव्होल्यूशनच्या) नावाखाली मते मागितली होती. आम्ही गोरक्षण करून त्यासाठी केंद्रात कायदा आणू, असे म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात गोरक्षकांनाच गुन्हेगार ठरवण्यात आले.

शादियाबाद (उत्तरप्रदेश) येथील एका शाळेत राष्ट्रगीत म्हणण्यास बंदी !

राष्ट्रापेक्षा धर्माला अधिक महत्त्व देऊन राष्ट्रगीतावर बंदी असणार्‍या 
शाळेतून राष्ट्रविरोधी नागरिक बाहेर पडल्यास आश्‍चर्य ते काय ?
* मुख्याध्यापकासह ८ शिक्षकांनी शाळा सोडली 
*हिंदु युवा वाहिनीने शिक्षणमंत्र्याचा पुतळा जाळला
     प्रयाग (अलाहबाद) - शादियाबाद, बघाडा येथे एम्ए कॉन्वेंट शाळेच्या व्यवस्थापनाकडून स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रगीत तसेच अन्य देशभक्तीपर गीते म्हणण्यास अनुमती नाकारण्यात आली आहे. नर्सरी पासून आठवी पर्यंतचे शिक्षण देणारे हे खाजगी कॉन्वेंट १२ वर्षांपासून चालू असून आजतागायत या शाळेत कधीही राष्ट्रगीत म्हणण्यात आलेले नाही. 
     या विरोधात आवाज उठवणारे शाळेचे मुख्याध्यापक आणि ८ शिक्षक यांना विद्यालय व्यवस्थापनाने शाळा सोडण्यास भाग पाडले आहे. तर सदर प्रकरणी चौकशी केल्यावरच शाळेच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते, असे प्रशासनाने म्हटले आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री अहमद हसन यांचा पुतळा जाळून सदर घटनेविषयी निषेध व्यक्त केला आहे.

दलित आणि गोमाता यांचे संरक्षण करण्यात मोदी सरकार अपयशी ! - विहिंप

     नवी देहली - विश्‍व हिंदु परिषदचे केंद्रीय संयुक्त सरचिटणीस राजेंद्रसिंह पंकज यांनी आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आरोप केला आहे की, पंतप्रधान मोदी त्यांच्या अपयशाचे खापर गोरक्षकांवर फोडत आहेत. दलितांवरील अत्याचार रोखण्याचे काम सरकारचे आहे आणि गोरक्षणाचे कार्यही राज्यघटनेने सरकारला दिलेले आहे. जर सरकार दलितांचे रक्षण करण्यात असमर्थ आहे आणि गोरक्षणही करू शकत नसेल, तर याला सरकारचे अपयश नाही, तर कोणाचे अपयश म्हणायचे ? केंद्रसरकारकडून गोरक्षणाचा कायदा करण्यावरही मोदी सरकार मौन बाळगून आहे, असेही सिंह म्हणाले.
राजेंद्रसिंह पंकज यांनी मांडलेली सूत्रे
     पंतप्रधानांना वस्तूस्थितीचे ज्ञान नाही आणि त्यांच्या सरकारने गोरक्षणासाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. निवडणुकीच्या वेळी गुलाबी क्रांती (पिंक रिव्होल्यूशन) रोखण्याचे दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याच्या दिशेनेही काही केलेले नाही. पंतप्रधान बांगलादेश सीमेवरून होणारी गोतस्करी रोखण्यासाठी सीमा बंद करण्यावर मौन का बाळगून आहेत ? गेल्या अनेक वर्षांपासून कोणाच्या संरक्षणात गोमांसासाठी किती गोमातांना बांगलादेशात नेले जात आहे, याची आकडेवारी पंतप्रधान का देत नाहीत ? यात सरकार आणि प्रशासन यांची युती नाही का ?

गेल्या ४ वर्षांत देहलीमध्ये प्रतिदिन ४ महिलांवर बलात्कार झाले !

बलात्कार्‍यांची राजधानी झालेली देहली ! कोणतेही सरकार आले तरी महिलांवरील अत्याचार 
थांबत नाहीत, ही स्थिती हिंदु राष्ट्र अर्थात सनातन धर्म राज्य अपरिहार्य करते !
* महिलांवरील बलात्कारांत तिपटीने वाढ, तर विनयभंग आणि मारहाणीच्या घटना ७ पटीने वाढल्या !
* नागरिकांची नीतीमत्ता झपाट्याने घसरत असतांना देशाच्या आर्थिक विकासापेक्षा नागरिकांचा नैतिक विकास होणे, हे अधिक आवश्यक नाही का ?
     नवी देहली - वर्ष २०१२ ते २०१५ या काळात देहलीमध्ये प्रतिदिन सरासरी ४ महिलांवर बलात्कार आणि ९ महिलांचा विनयभंग होत होता, अशी माहिती देहली पोलिसांनी महिला अत्याचारांसंबंधी बनवलेल्या अहवालातून उघड झाली आहे. या अहवालानुसार वर्ष २०१२ ते २०१५ या ४ वर्षांच्या काळात बलात्काराच्या घटनांची संख्या तिपटीने वाढली. २०१२ मध्ये बलात्काराच्या ७०६ घटनांची नोंद झाली होती. हीच संख्या २०१५ मध्ये २१९९ इतकी झाली. वर्ष २००१ च्या तुलनेत ही संख्या १५ पटींनी वाढली आहे. महिलांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग अशा घटनांची संख्या २०१२ मध्ये ७२७ होती. २०१५ मध्ये ती वाढून ५ सहस्र ३६७ इतकी झाली आहे. या ४ वर्षांच्या काळात ६८१ महिला हुंडाबळी ठरल्या आहेत.

योगऋषी रामदेवबाबा यांच्यावर टीका केल्याच्या प्रकरणी दिग्विजय सिंह यांच्या विरोधात वॉरंट !

केवळ वॉरंट काढायला ४ वर्षे लागली, तर शिक्षा व्हायला किती वर्षे लागतील ?
ऑगस्ट २०१२ मध्ये प्रविष्ट केलेल्या खटल्यात ४ वर्षांनंतर वॉरंट !
      वैशाली (बिहार) - इंदूर येथील एका सभेत योगऋषी रामदेवबाबा यांच्यावर टीका केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात वैशाली येथील न्यायालयाने वॉरंट काढला आहे. (केवळ तोंड आहे म्हणून बोलणार्‍या नेत्यांना कारागृहात पाठवल्याशिवाय त्यांचे इतरांवर पोकळ दोषारोप करणे थांबणार नाही ! - संपादक) इंदूर येथील एका सभेत सिंह यांनी योगऋषी रामदेवबाबा यांच्यावर आरोप करतांना आचार्य बालकृष्ण यांना रामदेवबाबा यांच्या सर्व गुप्त व्यवहारांची माहिती आहे. त्यामुळे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेेपासून वाचण्यासाठी ते बालकृष्ण यांची हत्या करू शकतात, असे विधान केले होते. त्यामुळे वैशाली येथील बाबांचे भक्त अजित कुमार यांनी दिग्विजय सिंह यांच्या विरोधात ७ ऑगष्ट २०१२ या दिवशी स्थानिक न्यायालयात खटला प्रविष्ट केला होता. या प्रकरणी सुनावणी करतांना न्यायालयाने सिंह यांच्या विरोधात वॉरंट बजावला.

संभाजीनगर येथे मराठा समाजाच्या वतीने ५० सहस्र नागरिकांचा मूक मोर्चा

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी देण्याची मागणी
मूक मोर्चा काढणार्‍या जनतेने उद्या पुढचे पाऊल उचलण्यापूर्वी 
शासन गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई करणार का ?
     संभाजीनगर - कोपर्डी (जिल्हा नगर) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपींना तातडीने फासावर चढवा, या मागणीसाठी, तसेच कोपर्डीतील घटनेला एक मास उलटूनही अंतिम आरोपपत्र प्रविष्ट न झाल्याने सरकारला खडसवण्यासाठी येथील सर्व राजकीय पक्ष, मराठा संघटना आणि मराठा समाज यांच्या वतीने येथील क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला. यात ७ तालुक्यांतील ५० सहस्रांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. या वेळी अ‍ॅट्रॉसिटी कायदा रहित करण्याचीही मागणी करण्यात आली.
मोर्च्यात घोषणांतून नागरिकांनी व्यक्त केलेला संताप
१. कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा काय, तोडून टाका हात-पाय !
२. आमची पोरगी गेली जिवानिशी, आरोपींना द्या मरेपर्यंत फाशी !

कुंकू लावल्याने मी मुसलमान रहात नाही का ?

दूरचित्रवाणी मालिकेत कुंकू लावल्यावरून टीका करणार्‍या 
धर्मांधांना अभिनेत्री सना शेख हिचे चोख प्रत्युत्तर ! 
     मुंबई - दूरचित्रवाहिनीवरील मालिका कृष्णदासीमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री सना शेख हिच्यावर धर्मांधांकडून टीका होत आहे. या मालिकेत काम करतांना ती एका मराठी तरुणीची भूमिका करत असून ती कपाळावर कुंकू लावत आहे, यामुळे तिचा विरोध केला जात आहे. (स्त्रियांच्या अधिकारांसाठी लढण्याच्या नावाखाली हिंदु धर्माला आणि धर्मियांना प्रतिगामी ठरवून त्यांना हिणवणार्‍या पुरोगामी स्त्रिया आता एक चकारही काढणार नाहीत, हे लक्षात घ्या ! - संपादक) यावर सना शेख हिने फेसबूकद्वारे टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. कुंकू लावल्याने मी मुसलमान रहात नाही का ? कुंकू लावल्याने अल्ला मला शिक्षा देणार आहे का ?, असे प्रश्‍न तिने विचारले आहेत.

भारतात इसिसच्या आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणारा आतंकवादी अब्दुल्ला हादी याला कुवेतमध्ये अटक !

     कुवेत - भारतात इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणारा आतंकवादी अब्दुल्ला हादी याला कुवेतमध्ये अटक करण्यात आली आहे. वर्ष २०१३ मध्ये पाकमधून कुवेतमध्ये आल्यापासून तो आतंकवाद्यांना समर्थन आणि अर्थपुरवठा करत आहे. 
    अब्दुल्ला याच्यावर त्याने भारतात ४ आतंकवाद्यांना ६० सहस्र रुपये पाठवल्याचा आरोप आहे. या ४ आतंकवाद्यांमध्ये कल्याण येथील अरीब मजीद याचाही समावेश आहे. मजीद सिरीयाला जाऊन परत आल्यावर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानेच दिलेल्या माहितीवरून अब्दुल्लाची माहिती कुवेत सरकारला देण्यात आली होती. या माहितीवरून त्याला अटक करण्यात आली. त्याने आपण पैसे पाठवल्याचेही चौकशीत स्वीकारले आहे.

फ्रान्समध्ये संशयावरून मुसलमान जोडप्याला विमानातून उतरवले !

     शिकागो - विमानात अल्ला असे म्हटल्यावरून नाझिया आणि फैझल अली या पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकी मुसलमान जोडप्याला विमानातून उतरवण्याची घटना नुकतीच पॅरिसवरून अमेरिकेतील सिनसिनाटी येथे जाणार्‍या विमानात घडली. डेल्टा एअर फोर्सच्या विमानातील कर्मचार्‍यांना या जोडप्याविषयी शंका आल्याने त्यांनी त्या दोघांना विमानातून उतरण्यास सांगितले; मात्र त्यांची चौकशी केल्यानंतर काहीही निष्पन्न न झाल्याने डेल्टा एअर फोर्सने त्यांची क्षमा मागितली. धर्माच्या आधारे भेदभाव केल्यामुळे या आस्थापनाच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाकमध्ये एका हिंदु डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या !

पाकिस्तान असो कि अन्य कोणताही इस्लामी देश, तेथे हिंदू कायमच भयभीत स्थितीत जीवन जगत असून 
ते कमालीचे असुरक्षित आहेत. इस्लामी राष्ट्रांत हिंदूंच्या वारंवार हत्या होऊनही येथील सरकार गप्प का ?
      कराची - येथील प्रीतम लखवानी या ५६ वर्षीय हिंदु डॉक्टरची त्यांच्या चिकित्सलयाबाहेर अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या धर्मावरून केल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी येथील एका डॉक्टराचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. लखवानी यांचा मुलगा राकेश कुमारने सांगितले की, त्यांचे कोणाशीही व्यक्तीगत शत्रूत्व नव्हते आणि त्यांना कधी कोणाकडून धमकीही आली नव्हती. तरीही ही हत्या करण्यात आली.

अमेरिकेने केलेल्या टीकेनंतरही मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या देशद्रोहाच्या शिक्षेच्या कारवाईवर चीन ठाम !

राष्ट्रहिताच्या दृष्टीने केलेल्या कारवाईवर ठाम रहात अमेरिकेलाही 
न जुमानणार्‍या चीनकडून भारत काही बोध घेईल का ? 
     बीजिंग - राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून चीनमधील फेंगसई या कायदा आस्थापनाशी संबंधित एक अधिवक्ता आणि ३ कार्यकर्ते यांना चीनच्या न्यायालयाने साडेसात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. चीनच्या प्रशासनाने राजकारणाने प्रेरित होऊन मानवाधिकार संघटनेचे सदस्य असलेल्या या चौघांना शिक्षा केली, अशी टीका अमेरिकेने केली आहे. याला चीनने आक्षेप घेतला आहे.
    चीनच्या विदेश विभागाच्या महिला प्रवक्त्या हुआ चुनभयग यांनी अमेरिकेने केलेली टीका आधारहीन असल्याचे सांगत चीनच्या न्यायालयाच्या निर्णयाचा अमेरिकेने आदर करावा, असे म्हटलेे आहे. चीनमध्ये स्थिरता आणि राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्यासाठी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कडक धोरणे अवलंबली आहेत. त्यानुसार तेथील प्रशासनाने फेंगसई या आस्थापनाशी संबंधित अनेक लोकांना गेल्या महिन्यात अटक केली होती. त्यानंतर चौघांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (कुठे गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा करणारा चीन, तर कुठे वर्षानुवर्षे खटले प्रलंबित रहाणारा भारत ! - संपादक) चीनचा आरोप आहे की, सदर आस्थापनाने चीनसाठी घातक असलेल्या लोकांचे खटले लढवले तसेच विदेशी शक्तींशी हातमिळवणी करून आंदोलने केली आहेत; मात्र अमेरिकेच्या विदेश विभागाच्या प्रवक्त्यांनी अटक केलेल्या ४ कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे.

भीक मागणे आता गुन्हा ठरणार नाही !

गरीबांना भीक मागावीच लागणार नाही, अशी स्थिती सरकार निर्माण का करत नाही ?
केंद्रसरकारच्या आगामी विधेयकामध्ये तरतूद
     नवी देहली - केंद्रसरकारकडून एक नवीन विधेयक आणण्यात येणार आहे. या विधेयकात भीक मागणे हा गुन्हा ठरवण्यात येणार नाही. या आगामी विधेयकात भीक मागणार्‍यांना अटक करण्याऐवजी त्यांचे पुर्नवसन आणि समुपदेशन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
१. अनेक राज्ये बॉम्बे अ‍ॅक्ट या कायद्याच्या आधारे भीक मागणार्‍यांच्या विरोधात कारवाई करत आहेत. या कायद्यानुसार कोणत्याही वॉरंटशिवाय अटक करण्याची मुभा पोलिसांना आहे; परंतु नवीन कायदा झाल्यास भीक मागणार्‍यास कारागृहात टाकता येणार नाही.
२. केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या या विधेयकात भीक मागणे आणि टोळी बनवून भीक मागणे, यांमध्ये भेद करण्यात आला आहे.

काश्मीरमधील हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याची भाजपची रणनिती अयोग्य ! - भाजपचे खासदार आर्.के. सिंह

   नवी देहली - बुरहान वानीला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये भडकलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरण्यात येणारी रणनीती अयोग्य असल्याची टीका भाजपचे खासदार आणि माजी गृहसचिव आर्.के. सिंह यांनी लोकसभेत केली. 
    सिंह म्हणाले की, सरकारला समजले पाहिजे की, राज्यात फुटीरतावादी आणि आतंकवादी अल्प आहेत. तथापि बहुसंख्यांक नागरिकांना शांती, रोजगार आणि विकास हवा आहे. सिंह यांनी फुटीरतावाद्यांवर कठोरपणे कारवाई करून त्यांच्यावर खटले चालवावेत, अशीही मागणी केली. त्यांच्या या मागणीला भाजपच्या ६ खासदारांनी समर्थन दिले.भाजपला काँग्रेसमुक्त भारत नको ! - केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू

निवडणुकीत ज्या सूत्राचा प्रचार करून सत्ताप्राप्ती केली, आता त्या सूत्राच्या 
विरुद्ध विधान करणे म्हणजे जनतेची फसवणूक करण्यासारखेच होय !
      नवी देहली - केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांनी भाजपच्या काँग्रेसमुक्त भारत या धोरणाला तिलांजली देऊन भाजपला काँग्रेसमुक्त भारत नको, असे निवेदन संसदेच्या सभागृहात केले आहे. तथापि काँग्रेस पक्ष भाजपला नेहमी विरोधी पक्ष म्हणून हवा आहे; कारण त्याचा भाजपला पुष्कळ लाभ होतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
    संसदेत उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील राजकीय परिस्थितीवर चर्चा चालू होती. तेव्हा काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी आरोप केले की, भाजप काँग्रेसमुक्त भारत हे धोरण राबवत आहे. त्यामुळेच उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश येथील काँग्रेसचे शासन राज्यपालांचे साहाय्य घेऊन उलथवून टाकण्याचे प्रयत्न भाजपने केले. काँग्रेस हा १३१ वर्षे जुना पक्ष आहे. सध्या त्याचे लोकसभेत खासदार अल्प असले, तरी अशी परिस्थिती नेहमीच रहाणार नाही. त्यावर उत्तर देतांना व्यंकय्या नायडू म्हणाले की, असे आरोप करण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही. जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा या पक्षाने अनेक राज्यांतील विरोधी पक्षाची सरकारे विसर्जित करण्याचा धडाका लावला होता. आता काँग्रेसने भाजपला उपदेश करून नये.

हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने ग्रामीण सभेचे आयोजन

उस्थि (बंगाल) येथे धर्मप्रसाराला प्रारंभ 
मार्गदर्शन करतांना श्री. उपानंद ब्रह्मचारी, त्यांच्या
डाव्या बाजूला श्री. चित्तरंजन सुराल आणि
इतर हिंदुत्ववादी
       उस्थि (बंगाल) - हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील उस्थि येथे नुकतेच एका ग्रामीण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत राज्यात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या घटना, प्रशासन आणि पोलीस यांची दुटप्पी भूमिका इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि काळानुसार साधना यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कोची (केरळ) येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंबंधी हिंदु जनजागृती समितीकडून पत्रकार परिषद

डावीकडून ज्येष्ठ अधिवक्ता व्ही.एस्. राजन, हिंदु 
जनजागृती समितीचे श्री. नंदकुमार कैमल, 
कु. रश्मी परमेश्‍वरन् आणि कु. प्रणिता सुखटणकर
     कोची (केरळ) - स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशात अनेक ठिकाणी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकले जातात आणि हे ध्वज त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत किंवा दुसर्‍या दिवशी रस्त्यावर किंवा नाल्यात पडलेले आढळतात. राष्ट्रध्वजाचा हा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने एर्नाकुलम् प्रेस क्लबमध्ये ८ ऑगस्ट २०१६ यादिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. भारतभरात राष्ट्रध्वजाचा अवमान कशापद्धतीने होत आहे याविषयी समितीच्या कु. प्रणिता सुखटणकर यांनी माहिती दिली.

मध्यप्रदेशातील गोशाळेतील १ सहस्र २०० गायींचा मृत्यू !

भाजपशासित राज्यांतील गोमातांची दुरवस्था !
     ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) - राजस्थानच्या जयपूर येथील हिंगोनिया गोशाळेतील ५०० हून अधिक गायींच्या मृत्यूनंतर आता मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील महापालिकेच्या लालटिपारा गोशाळेत गेल्या ४ महिन्यांत १ सहस्र २०० हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गोशाळेत क्षमतेपेक्षा अधिक गायी आहेत. त्यामुळे त्यांना चारा पुरवण्यात अडचण येत आहे, औषधोपचारही देण्यात अडचण आहे, असे म्हटले जात आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या मते, पॉलिथीन खाणे आणि कुंकू चाटल्यामुळे मृत्यू होत आहे.
१. लालटिपारा गोशाळेत ३ सहस्र गायी आहेत. ही गोशाळा काही एकर जागेत आहे. त्यातील ७५ टक्के जागेत गायींसाठी गवत उगवले जाते, तर इतर जागेत गायींना ठेवण्यात येते.
२. गोशाळेत मोठ्या प्रमाणात चिखल आहे. त्यामुळे यात फसलेल्या गायीला बाहेर काढणे कठीण होते.
३. या गोशाळेत प्रतिदिन ९ गायींचा मृत्यू होत आहे. या गोशाळेवर प्रतिवर्षी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात येतो.
४. गायींना गोठ्यात इतके जवळ जवळ बांधण्यात आले आहे की, त्या हलूही शकत नाहीत. त्यामुळे एकाच जागेवर सतत उभे राहिल्यानेही त्यांचा मृत्यू होत आहे.

यमुना नदीतील प्रदूषणामुळे ताजमहलावर परिणाम होत असल्याने राष्ट्रीय हरित लवादाने अखिलेश सरकारला फटकारले !

      लक्ष्मणपुरी (लखनौ) - ताजमहल जगातील ७ आश्‍चर्यांपैकी एक आहे. तो पहाण्यासाठी जगभरातून पर्यटक भारतात येथे भेट देतात. त्यामुळे राज्यसरकारला ताजमहालमधून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो; मात्र ताजमहलला लागून असलेल्या यमुना नदीमध्ये नगरपालिकेकडूनच मोठ्या प्रमाणात कचरा टाकून प्रदूषण करण्यात येत असल्यामुळे ताजमहालला धोका निर्माण झाला आहे. या १७ व्या शतकातील इमारतीचे रक्षण करण्यात अयशस्वी ठरल्याविषयी राष्ट्रीय हरित लवादाने जगातील ७ आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालची मानहानी यापेक्षा अधिक कोणती असू शकते, अशा शब्दांत अखिलेश सरकारला फटकारले आहे. आग्रा येथील डी.के. जोशी यांनी याविषयी याचिका प्रविष्ट केली होती.

हिंदु धर्माविषयी बोलणार्‍या सर्वांना रा.स्व. संघाचे लेबल लावणे चुकीचे ! - अभिनेता नितीश भारद्वाज

      नवी देहली - माझ्या वाचनाच्या बळावर मी काही गोष्टी मांडतो. त्यांचा रा.स्व. संघाशी कोणताही संबंध नाही. कोणी जर हिंदु धर्माविषयी काही बोलले, तर तथाकथित उदारमतवादी, बुद्धीवादी आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून त्यांना रा.स्व. संघाचे लेबल लावले जाते. ते चुकीचे आहे. त्यामुळे देशात इतर दृष्टीकोन आणि विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उरले नसल्याचे चित्र निर्माण झाले आहेे, अशी खंत दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या महाभारत या मालिकेतील श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेता आणि माजी खासदार नितीश भारद्वाज यांनी बोलून दाखवली. भारद्वाज पुढे म्हणाले की, गेली कित्येक वर्षे कम्युनिस्ट, काँग्रेस समर्थक आणि इतिहासकार यांच्याकडून शालेय अभ्यासक्रमासाठीची पाठ्यपुस्तके लिहिली जात आहेत. विद्यार्थ्यांना नेहमी विविध विचार आणि दृष्टीकोन अभ्यासण्याची संधी दिली गेली पाहिजे. एखादा विचार सातत्याने इतरांच्या गळी उतरवू शकत नाही.(म्हणे) बेरोजगारीमुळे रस्त्यावर कावड यात्रेकरूंची वाढ !

जनता दलाचे (संयुक्त) नेते शरद यादव यांचे धर्मद्रोही विधान
     कानपूर - जर रोजगार असता, तर इतक्या मोठ्या संख्येने कावड यात्रेकरू रस्त्यावर दिसले नसते. भाजप सरकार नोकरी देण्याच्या आश्‍वासनामुळे सत्तेवर आले; मात्र ते हे आश्‍वासन पूर्ण करू शकले नाही, याचेच हे यात्रेकरू उदाहरण आहेत, अशी टीका संयुक्त जनता दलाचे नेते आणि खासदार शरद यादव यांनी केली. यादव यांच्या विधानावर काशी सुमेरू पीठाधीश्‍वर स्वामी नरेंद्र सरस्वती, आखाड़ा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी, आत्मानंद ब्रह्मचारी, हिंदु महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी आक्षेप घेत त्यांचा निषेध केला आहे. उत्तर भारतात श्रावण मासात शिव भक्त जलाभिषेक करण्यासाठी कावडमधून नदीतील पाणी घेऊन मंदिरात जलाभिषेक करतात.

केरळमध्ये राष्ट्रप्रेमींनी केलेल्या प्रबोधनानंतर राष्ट्रध्वजाचे विडंबन थांबवले !

माडाच्या झापाच्या काड्यांपासून बनवलेले झाडू उलटे ठेवून त्या 
काड्यांना बांधण्यात आलेले राष्ट्रध्वज.
    अलाप्पूझा (केरळ) - येथील एका दुकानात प्लास्टिकपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजांची विक्री करण्यात येत होती. या दुकानामध्ये राष्ट्रध्वज विडंबनात्मकरित्या प्रदर्शित करण्यात आले होते. माडाच्या झापाच्या काड्यांपासून बनवलेले झाडू उलटे ठेवून त्या काड्यांना राष्ट्रध्वज बांधण्यात आले होते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना काही राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या दृष्टीस पडली. त्यांनी दुकानदाराची भेट घेऊन त्यांना राष्ट्रध्वजाचे विडंबन थांबवण्याची विनंती केली. नंतर त्या दुकानदाराने झाडूच्या काड्यांना बांधलेले राष्ट्रध्वज काढले. 
     हे चित्र कुणाच्याही राष्ट्रभावना दुखावण्यासाठी नव्हे, तर राष्ट्रध्वजाचे झालेले विडंबन जनजागृतीच्या हेतूने दर्शवण्यासाठी प्रसिद्ध केले आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

वल्लभगड (हरियाणा) येथे हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी जनजागृती मोहीम !

राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी जनजागृती करतांना
हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
     वल्लभगड - हिंदु जनजागृती समितीकडून ७ आणि ८ ऑगस्टला येथील आंबेडकर चौकात राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. या वेळी कायकर्त्यांकडून प्रबोधनात्मक पत्रके वाटण्यात आली, तसेच १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतांना राष्ट्रध्वजाचा मान कसा राखावा, याचीही सविस्तर माहिती देण्यात आली.


श्रीनगरच्या एन्आयटीमध्ये आतंकवादी बुरहान वानीचे छायाचित्र लावले !

देशात सरकार अस्तित्वात आहे का ? असे कोणालाही वाटावे, अशी काश्मीरमधील स्थिती !
पीडीपी-भाजपच्या राज्यात बिगर काश्मिरी विद्यार्थी असुरक्षित !
     श्रीनगर - येथील एन्आयटी या शिक्षण संस्थेतील सूचनाफलकावर सैन्याकडून ठार करण्यात आलेला जिहादी आतंकवादी बुरहान वानीचे छायाचित्र लावल्याची घटना घडली. धर्मांधांनी या फलकावर चिथावणीखोर लिखाण केले होते. याशिवाय या शिक्षण संस्थेतून घरी परतणार्‍या एका बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांवर धर्मांधांनी दगडफेक करून आक्रमण केल्याचीही घटना घडली. यावरून काश्मीरमध्ये बुरहान वानीचे उदात्तीकरण चालूच असल्याचे स्पष्ट होते.


जिहादी आतंकवादी सलाहुद्दीन याची भारताला अणूयुद्धाची धमकी !

पाकमध्ये घुसून जिहादी आतंकवाद न चिरडल्यामुळे अशा प्रकारच्या 
धमक्या मिळत आहेत, हे भारताला लज्जास्पद आहे ! 
      इस्लामाबाद - राजकीय, नैतिक आणि पाक राज्यघटनेचे समर्थन यांच्या साहाय्याने काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी पाकिस्तान बांधील आहे. जर पाकच्या राज्यघटनेने समर्थन दिले, तर दोन्ही देशांमध्ये अणूयुद्ध होण्याची चांगली संधी आहे. काश्मीरच्या सूत्रावरून भारत-पाक यांच्यात चौथे युद्ध होईल, असा माझा अंदाज आहे. तसे झाल्यास काहीही झाले, तरी तडजोड करणार नाही, असा दावा हिजबूल मुजाहिदीनचा प्रमुख सलाहुद्दीन याने केला आहे. सलाहुद्दीन पुढे म्हणाला की, काश्मीरमधील जनतेने रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याचा निर्णय घेतला आहे. सशस्त्र जिहाद हाच एकमेव पर्याय आपल्याकडे आहे, या निष्कर्षावर काश्मिरी जनता पोचली आहे.डॉ. झाकीर नाईक यांची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन ही धर्मांतर करणार्‍या संघटनांची शिखर संस्था ! - अन्वेषण यंत्रणांचा दावा

        सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी वर्ष २०१२ मध्येच झाकीर नाईक यांच्या विरोधात तीव्र आंदोलने करून त्यांना अटक करण्याची मागणी केली होती; मात्र तत्कालीन काँग्रेस शासनाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आता भाजप शासन तरी डॉ. झाकीर नाईक यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करणार का ?
        मुंबई -
डॉ. झाकीर नाईक यांचे इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआर्एफ्) राज्यातील धर्मांतर घडवणार्‍या संघटनांची शिखर संघटना झाल्याचा दावा अन्वेषण यंत्रणांनी केला आहे. आतंकवाद्यांना चिथावणी देणारे डॉ. नाईक आयआर्एफ् सदस्यांच्या साहाय्याने धर्मांतर घडवण्यास प्रोत्साहन देत असल्याचेही अन्वेषणात पुढे आले आहे.
१. या संस्थेला जगभरातून होणार्‍या अर्थपुरवठ्याचा अन्वेषण यंत्रणा शोध घेत आहेत.
२. राज्यात १० संस्था वेगवेगळ्या नावांनी बिगर मुसलमानांचे धर्मांतर करतात. त्या आयआर्एफ्शी संबंधित आहेत.
३. अन्य धर्मियांना मुसलमान करण्यासाठी लागणारा खर्च आयआर्एफ्कडून भागवला जातो.
४. धर्मांतरानंतर चांगले आयुष्य देण्याच्या आमिषासमवेतच सुंदर तरुणींशी विवाह, नोकरी, पैसे अशा प्रलोभनांद्वारे अनेक तरुणांचे धर्मांतर करण्यात आले.

पंढरपूर येथील प.पू. बालयोगी महाराज यांचा देहत्याग

प.पू. बालयोगी महाराज

        पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ९ ऑगस्ट (वार्ता.) - येथील प.पू. बालयोगी महाराज (दंडी स्वामी नारायणानंद सरस्वती) यांनी पुणे येथे ९ ऑगस्ट २०१६ या दिवशी दुपारी ४.३० वाजता देहत्याग केला. लहान वयातच ते परमार्थाच्या शोधात घरातून बाहेर पडले. त्यामुळे त्यांना बालयोगी हे नाव पडले. १० ऑगस्ट या दिवशी पंढरपूर येथील दत्त घाटावरील बालयोगी महाराज मठात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सनातन, हिंदु जनजागृती 
समिती आणि प.पू. बालयोगी महाराज
        धर्मद्रोही अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला प.पू. बालयोगी महाराजांनीही कडाडून विरोध केला. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला महाराजांचा नेहमीच पाठिंबा आणि आशीर्वाद होते. ते नेहमीच साधकांची आस्थेने चौकशी करत. समितीच्या वतीने आयोजित केलेल्या वारकरी अधिवेशनात त्यांचा कृतीशील सहभाग होता.

पंतप्रधान मोदी यांनी क्षमा मागावी अथवा भगवान श्रीकृष्णाचा कोप ओढवून घ्यावा ! - सतीशकुमार प्रधान, पंजाब गोरक्षक दल, पंजाब

श्री. सतीशकुमार प्रधान
     चंडीगड - पंतप्रधान मोदी यांंनी गोरक्षकांना समाजकंटक म्हणून घोडचूक केली आहे. त्यांना भगवान श्रीकृष्णाचा कोप सहन करावा लागेल. श्रीकृष्णही गायींचे पालन करत होते. मोदी यांनी कसायांना खूश करण्याचा निश्‍चय केला आहे, अशी प्रतिक्रिया पंजाब गोरक्षक दलाचे प्रमुख सतीश कुमार प्रधान यांनी दिली आहे. तसेच भाजप आणि पंतप्रधान यांच्याविरोधात आंदोलन करण्याचीही चेतावणी त्यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ८० टक्के गोरक्षक समाजकंटक असतात, असे म्हटल्यानंतर सतीश कुमार आणि त्यांच्या २१ सहकार्‍यांवर पंजाब पोलिसांनी खंडणी वसूल करणे, गायींच्या कथित तस्करांना बळजोरीने डांबून ठेवणे अशा स्वरूपाचा गुन्हा प्रविष्ट केला आहे. त्यानंतर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.
     सतीशकुमार यांनी नुकतेच सहारनपूर येथून इम्तियाज आणि बबलू नावाच्या दोन मुसलमान तस्करांना गायींची तस्करी करतांना पकडले. त्यांच्याकडे ५० सहस्र रुपये खंडणी मागितली. अखेर ३० सहस्र रुपये घेऊन त्यांची वाहने सोडली, असे प्रविष्ट करण्यात आलेल्या प्रथम माहिती अहवालात म्हटले आहे. सतीशकुमार यांना अटक होण्याची शक्यता असून त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पीडित लोकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हिंदुहिताचे उपक्रम राबवून धर्मद्रोहाला चाप लावणार !

पिंपरी येथील हिंदुत्ववाद्यांचा निर्धार 

बैठकीला उपस्थित हिंदुत्ववादी

      पिंपरी, ९ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या विविध हिंदुत्ववादी संघटनांचे एकत्रिकरण व्हावे, हिंदुहिताच्या कार्याला गती मिळावी, तसेच हिंदूंचे भक्कम संघटन उभे रहावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी येथील हनुमान मंदिरात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्येकी १५ दिवसांनी एकत्र येण्याचा, हिंदुहिताचे विविध उपक्रम राबवून सध्या फोफावलेल्या धर्मद्रोही आणि राष्ट्रविघातक वृत्तीला चाप लावण्याचा निर्धार केला. सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात २१ ऑगस्ट या दिवशी हिंदु ऐक्य मेळावा घेण्याचेही बैठकीत उत्स्फूर्तपणे ठरवण्यात आले. शिवसेना, भाजप, योग वेदांत समिती, श्री संप्रदाय, अखिल शिवजयंती महोत्सव समिती, शिववंदना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी संघटनांचे २५ हून अधिक प्रतिनिधी बैठकीसाठी उपस्थित होते.

कन्यागत महापर्वाच्या पूर्वसंध्येला श्रीकृष्णाकडून सांगली जिल्ह्याला पंचरत्नांची भेट !

५ साधकांनी गाठली 
६१ टक्के आध्यात्मिक पातळी 

डावीकडून सौ. उमा लेले, सौ. कुमुदिनी टांकसाळे,
सौ. द्वारका जाधव, सौ. स्मिता कानडे, श्री. अण्णासाहेब
वरेकर आणि बसलेल्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

      मिरज, ९ ऑगस्ट (वार्ता.) - १२ ऑगस्टपासून नृसिंहवाडी येथे कन्यागत पर्वकाल चालू होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर श्रीकृष्णाने सांगली जिल्ह्याला पाच रत्नांची अनमोल भेट दिली. जयसिंगपूर येथील श्री. अण्णासाहेब वरेकरकाका आणि मिरज येथील सौ. स्मिता कानडे, सौ. उमा लेले, सौ. द्वारका महादेव जाधव, सौ. कुमुदिनी टांकसाळे हे सर्व साधक ६१ टक्के अध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे ६५ प्रतिशत आध्यात्मिक पातळीच्या कु. वैदेही पिंगळे यांनी घोषित केले. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला. सनातन संस्थेच्या ब्राह्मणपुरी येथील आश्रमात भावपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. आध्यात्मिक स्तर घोषित केल्यावर प्रत्येक साधकालाच भावाश्रू अनावर झाले. आध्यात्मिक स्तर घोषित करण्यात आलेल्या प्रत्येक साधकाला तीव्र शारीरिक त्रास असूनही प्रत्येकाने चिकाटीने त्यावर मात केली, हे विशेष आहे. या प्रसंगी सनातनचे पू. उमेश शैणे उपस्थित होते.

(म्हणे) वैदिक परंपरा विरुद्ध संत परंपरा, अशी चिकित्सा हवी !

समाजात फूट पाडू पहाणारे जात्यंध अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांची वैचारिक दिवाळखोरी !
     पुणे - भविष्यातील समाजव्यवस्था कशी हवी ? वैदिक परंपरा विरुद्ध संत परंपरा, या सर्वांची चिकित्सा व्हायला हवी. त्यातून आपल्याला कोणती व्यवस्था हवी, हे समाज आणि तरुण पिढी यांना सांगायला हवे, असे जातीयद्वेषी वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले. (वैदिक आणि संत परंपरा भिन्न समजणार्‍या आंबेडकर यांची ही बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल ! संतांना विशिष्ट समाजाचे प्रतिनिधी मानून त्यांची परंपरा हवे म्हणणारे हे जाणत नाहीत की, आजपर्यंत सर्वच संतांनी विश्‍व कल्याणासाठी नेहमीच वैदिक परंपरा जपण्याचाच उपदेश केला आहे. - संपादक)
आंबेडकर पुढे म्हणाले की,
१. मंडल आयोगामुळे ओबीसींच्या सामाजिक जाणिवा जागा झाल्या; मात्र राजकीय जाणिवा अद्याप जागृत झाल्या नाहीत. (आज कधी नव्हे, एवढी हिंदूऐक्याची आवश्यकता असतांना केवळ एका समाजाचा विचार करून समाजात फूट पाडू पहाणारे देश एकसंघ काय ठेवणार ? - संपादक)
२. देश वाचवण्यासाठी संघाचे नेतृत्व लायक आहे कि नाही, हे ठरवणे हा मूलभूत प्रश्‍न आहे. भविष्यात देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि देशाच्या उभारणीविषयी प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला उत्तर देण्याची, तसेच संघाला राजकीय पर्याय देण्याची आवश्यकता आहे. (स्वतःच्या पक्षाकडे कोणतेही टीचभर नेतृत्व देण्याची क्षमता नसतांना देशाच्या नेतृत्वाविषयी बोलण्याचा आंबेडकर यांना काय अधिकार ? - संपादक)

सनातन संस्थेला विविध संघटनांचा भरभक्कम पाठिंबा !

धर्मकार्य करणार्‍या सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीला हिंदुत्ववादी अन् राष्ट्रप्रेमी यांचा प्रखर विरोध
     पुणे - पुरोगाम्यांच्या दबावापोटी सनातन संस्थेवर बंदीची टांगती तलवार आहे. पुरोगामी संघटनाही त्यांची धर्मद्रोही आणि समाजविघातक कृत्ये उघडकीला येऊ नयेत; म्हणून सनातन संस्थेला फासावर चढवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असले, तरी सनातन संस्थेला समाजातून हिंदुत्ववादी, व्यावसायिक, राष्ट्रप्रेमी यांच्यासह विविध संघटनांचा भरभक्कम पाठिंबा मिळत असून त्यांनी सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीला प्रखर विरोध दर्शवला आहे. केवळ शाब्दिक समर्थन नव्हे, तर सनातनवरील बंदीच्या विरोधात पत्रेही गृहमंत्र्यांना पाठवण्यात आली आहेत.
     उरळी देवाची ग्रामपंचायतीचे सरपंच सर्वश्री उल्हास शेवाळे, उरळी देवाची फाटा येथील पंचायत समिती सदस्य आणि हिंदवी प्रतिष्ठाानचे अध्यक्ष श्री. संतोष भाडळे, अवतारी हांडेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य श्री. विकास हांडे, गोर्हे बुद्रुकचे सरपंच श्री. सचिन पासलकर, फुरसुंगीच्या पंचायत समिती अध्यक्ष सौ. रोहिणी राऊत, तसेच वडगाव काशिंबे, साकोरे, एकलहरे, पेठ, नारोडी, भावडी, खडकवाडी गावाचे सरपंच आणि घोडेगावचे उपसरपंच यांनी सनातनच्या कार्याचे कौतुक करून सक्रीय पाठिंबा घोषित केला.

मशिदीत जमल्यानंतरच बॉम्बस्फोटाची कारस्थाने रचण्यात येत होती !

  • धर्मांधांच्या प्रार्थनास्थळांचे देशद्रोही वास्तव जाणून केंद्र सरकार त्यावर बंदी आणणार का कि आणखी आतंकवादी सिद्ध होण्यासाठी त्यांना अनुदान देत रहाणार ?
  • आतंकवादविरोधी पथकाची विशेष न्यायालयात माहिती
  • धर्मांधाच्या घरातच बनवला आयईडी बॉम्ब
       संभाजीनगर, ९ ऑगस्ट - राज्यात रमजान आणि गणेशोत्सव या कालावधीत बॉम्बस्फोट करण्यासाठी बनवण्यात आलेला आयईडी बॉम्ब परभणीतून अटक केलेला इसिसचा संशयित आतंकवादी इकबाल अहमद कादर याच्या गुलजार कॉलनीतील घरी बनवण्यात आला, तसेच मशिदीत जमल्यानंतरच बॉम्बस्फोटाची कारस्थाने रचण्यात येत होती, अशी माहिती आतंकवादविरोधी पथकाने संभाजीनगरमधील विशेष न्यायालयात ८ ऑगस्ट या दिवशी दिली. (फ्रान्सवर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर कट्टरवादी इमामांची हकालपट्टी करण्याची सिद्धता करणार्‍या फ्रान्सकडून भारत शिकेल काय ? - संपादक) त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम्.ए. हुसेन यांनी इकबाल अहमद कादरला १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

शरीर आणि मन प्रतिकारक्षम बनवण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! - मोनिका गावडे

व्याख्यानाला उपस्थित हिंदू

         खंडाळा (जिल्हा सातारा), ९ ऑगस्ट (वार्ता.) - स्वसंरक्षण म्हणजे स्वतःचे रक्षण करणे होय. सध्या समाजात गुंड, बलात्कारी आणि धर्मांध यांसारख्या दुष्प्रवृत्ती समाजावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानेच त्या सामर्थ्यवान बनल्या आहेत. आपल्यासह समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर त्यासाठी आपण आपले शरीर आणि मन सातत्याने प्रतिकारक्षम ठेवायला हवे. त्यासाठी सर्वांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकून सिद्ध होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या पुणे जिल्हा समन्वयक कु. मोनिका गावडे यांनी केले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी येथील भैरवनाथ मंदिरात हिंदु संघटन आणि महिला सक्षमीकरण या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. स्वतःच्या अस्तित्वासाठी कुटुंब, घर, वसाहत, गाव, समाज, राष्ट्र आणि धर्म यांचीही आवश्यकता असते. या सर्वांचे रक्षण झाले, तरच खर्‍या अर्थाने स्वरक्षण होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात साडेसहा वर्षांत १९७ पोलिसांच्या आत्महत्या !

मनोबल खचलेले पोलीस असणारे खाते जनतेचे संरक्षण कसे करणार ? साधनेचे 
बळ असेल, तरच पोलीस मानसिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम बनतील, 
हे शासनाने जाणावे आणि सर्वांना बालपणापासूनच साधना शिकवावी !
     मुंबई - गेल्या साडेसहा वर्षांमध्ये १९७ पोलिसांनी आत्महत्या केल्या आहेत. यात अधिकार्‍यांची संख्या ३५ आहे. गेल्या सहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते जून २०१६ अखेरपर्यंत दोन अधिकार्‍यांसह ८ जणांनी सेवेत असतांना आयुष्य संपवले आहे. ७ ऑगस्टला पहाटे बोरीवली-चर्चगेट लोकलगाडीत महिलांच्या डब्यात बंदोबस्ताला असलेले हवालदार शिवाजी गायकवाड यांनी मालाड आणि गोरेगाव स्थानकाच्या दरम्यान बंदुकीतून गोळी झाडत आत्महत्या केली.

करमाळा येथे वाळू तस्करांकडून शासकीय कर्मचार्‍यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ

     करमाळा - येथे वाळू तस्करांनी शासकीय कर्मचार्‍यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून वाळूसह ट्रक पळवून नेला. जेऊर-कोंढेज या रस्त्यावर तलाठी राजेंद्र पांडेकर यांनी अन्य शासकीय कर्मचार्‍यांसह वाळूची चोरी करणार्‍या तस्करांना पकडले होते. या प्रकरणी तस्कारांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

सनातन संस्थेवर बंदी घालणे चुकीचे ! - अभय पाटील, माजी आमदार, भाजप

   
श्री. अभय पाटील (डावीकडे) यांच्याकडून समर्थनाचे पत्र 
घेतांना डावीकडून श्री. विजय नंदगडकर आणि श्री. सुधीर हेरेकर
  बेळगाव - सनातन संस्था समाजात चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. संस्थेवर बंदी घालणे हे चुकीचे आहे. मी माननीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवीन, असे भाजपचे बेळगावचे माजी आमदार श्री. अभय पाटील यांनी सनातनवर येऊ घातलेल्या बंदीच्या प्रस्तावाविषयी चर्चा करतांना सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर आणि श्री. विजय नंदगडकर यांनी त्यांची भेट घेतली. श्री. अभय पाटील यांनी त्यांच्या वतीने सनातनला समर्थन देणारे पत्रही दिले आणि काहीही साहाय्य लागल्यास अवश्य सांगा, असे सांगितले.

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सहकार मंत्री श्री. सुभाष देशमुख यांचा सत्कार !

    तुळजापूर (जिल्हा धाराशिव) - सोलापूर येथील आमदार सुभाष देशमुख यांची महाराष्ट्राचे सहकार पणन आणि वस्त्र उद्योग कॅबीनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच ते श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री भवानीदेवीच्या मंदिरात श्री. विलास पुजारी आणि श्री. अमित कदम यांनी पुष्पहार आणि गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

राष्ट्रीय आणि धार्मिक समस्या सोडवण्यासाठी देशातील स्वार्थी लोकांची लोकशाही व्यवस्था हटवणे क्रमप्राप्त ! - प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

धुळे येथे हिंदूसंघटन मेळावा 
मेळाव्याला उपस्थित धर्माभिमानी
     धुळे (वार्ता.) - १९४७ मध्ये भारतावर १ रुपयाचेही कर्ज नव्हते. वर्ष २०१५ च्या आकडेवारीनुसार प्रत्येक नागरिकावर २३ सहस्र २८५, म्हणजे देशावर २९ सहस्र १०६ अब्ज रुपयांचे कर्ज आहे. आज देशात ३०० हून अधिक जिल्हे संवेदनशील आहेत. देशात प्रत्येक १४ मिनिटांनी १ बलात्कार होतो. धर्मनिरपेक्षतेमुळे देशासमोर असंख्य धामिर्र्क समस्या निर्माण झाल्या आहेत.

मोदी यांनी दलितांसह काश्मिरी हिंदूंचे नाव घेतले असते, तर आनंद झाला असता ! - संजय राऊत

        नवी देहली - पंतप्रधान मोदी यांनी दलित यांच्यासह जर काश्मिरी हिंदूंचेही नाव घेतले असते आणि म्हटले असते की, काश्मिरी पंडितांना गोळी मारू नका, दलितांना गोळी मारू नका, तर शिवसेनेला आनंद झाला असता. पंतप्रधानांच्या स्वतःच्या भावना आहेत; मात्र त्यांच्या तोंडी गोळी मारासारखी भाषा शोभत नाही. त्यांनी कृतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यांच्या विधानामुळे देशाला दुःख झाले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दलितांविषयीच्या विधानावर एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
१. ८० टक्के जे समाजकंटक गोरक्षक आणि त्यांच्या संस्था आहेत त्यांची सूची पंतप्रधानांनी लोकांसमोर आणली पाहिजे.
२. आम्हाला वाटत होते की, गोरक्षक हे विश्‍व हिंदु परिषदेचे, बजरंग दलाचे, संघाचे, साधू-संतांचे आहेत; मात्र पंतप्रधान म्हणतात ते समाजकंटक आहेत. असे असेल तर हे गंभीर सूत्र आहे.

फलक प्रसिद्धीकरता

गोमातेच्या संरक्षणासाठी झटणारे सरकार हवे !
     राजस्थाननंतर आता मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर येथील एका सरकारी गोशाळेत गेल्या ४ मासांत १ सहस्र २०० हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामागे गोशाळेत क्षमतेपेक्षा अधिक गायी, तसेच चारा आणि औषधे पुरवण्यात अडचण असल्याच्या कारणांची चर्चा आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Gwaliorki sarkari goshalame 4 mahinome 1200 gayonki mrityu. Chara aur davaiki kami jaise karno ki charcha. - Gomataki raksha hetu Hindu Rashtra avashyak !
जागो !
: ग्वालियर की सरकारी गोशाला में ४ महिनों में १२०० गायों की मृत्यु. चारा और दवाई की कमी जैसे कारणों की चर्चा. - गोमाता की रक्षा हेतु हिन्दू राष्ट्र आवश्यक !

देशातील सर्वच समस्यांवरील कायमस्वरूपी उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! - कु. प्रियांका लोणे

लायगाव (जिल्हा संभाजीनगर) येथे हिंदूसंघटन मेळावा 
कु. प्रियांका लोणे
      संभाजीनगर, ९ ऑगस्ट (वार्ता.) - सध्या देशामध्ये प्रशासन, आरोग्य, शिक्षण, पोलीस अशा कोणत्याही यंत्रणेत सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. त्यातून सामाजिक दुष्प्रवृत्तीच वाढतेे. या प्रवृत्तींच्या विरोधात संघटितपणे प्रतिकार करता येईल; पण राष्ट्रीय आणि धार्मिक समस्या सोडवण्यासाठी देशातील स्वार्थी लोकशाही व्यवस्था हटवणे क्रमप्राप्त आहे. यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे राज्यकर्ते असणारे हिंदु राष्ट्र्र स्थापन करावे लागेल. इसिसचे आतंकवादी वैजापूर आणि परभणी येथे सापडत आहेत. आतंकवाद नष्ट करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श घ्यायला हवा ! देशातील सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी केले. येथील लायगाव गावातील श्री मारुति मंदिर येथे ७ ऑगस्ट या दिवशी गावातील धर्माभिमानी युवक आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात त्या बोलत होत्या.

पुरोगाम्यांचे सनातन संस्थेला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र ! - उपेंद्र डहाके, भाजप, कल्याण शहर उपाध्यक्ष

सारडे (ता. उरण), रायगड येथे हिंदूसंघटन मेळावा
डावीकडून सौ. नंदिनी सुर्वे, श्री. नरेंद्र सुर्वे
आणि डॉ. उपेंद्र डहाके 
     सारडे (ता. उरण), ९ ऑगस्ट (वार्ता.) - सुपारीबाज पत्रकार आणि प्रसिद्धीमाध्यमे यांच्यासह तथाकथित पुरोगामी सनातन संस्थेला अपकीर्त करतात. एकदा का निर्दोषत्व सिद्ध झाले की, ते गायब होतात. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांवर विश्‍वास ठेवायचा कि नाही, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडत आहे. देशद्रोही आणि धर्मद्रोही यांच्यावर कारवाई केली जात नाही; पण निरपराध साधक आणि संत यांवर मात्र अन्याय केला जातो. हे सर्व थांबवायचे असेल, तर आपले पद, पक्ष बाजूला ठेवून एक हिंदु म्हणून धर्मकार्यासाठी वेळ देऊन संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे परखड विचार भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी व्यक्त केले. रायगड जिल्ह्यातील सारडे (ता. उरण) येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला १५० हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती लाभली.
     या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे, तसेच रणरागिणी शाखेच्या सौ. नंदिनी सुर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात सारडे गावचे सरपंच श्री. संदीप पाटील हेही उपस्थित होते.

इरोम शर्मिला यांनी उपोषण सोडले !

         इम्फाळ (मणीपूर) - सैन्याच्या विशेषाधिकाराच्या विरोधात मागील १६ वर्षांपासून चालू असलेले उपोषण इरोम शर्मिला यांनी ९ ऑगस्ट या दिवशी उपोषण सोडले. निवडणूक लढवून सत्तेचा भाग बनून विशेषाधिकाराच्या विरोधात कायदा बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराची भूमी आणि दानपेटी यांत भ्रष्टाचार करणार्‍यांना दंडीत करा !

हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांचे मंदिरातील 
भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याचे पुढचे पाऊल !
अधिवक्ता श्री. वीरेंद्र
इचलकरंजीकर
     पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील भ्रष्टाचार, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील अपप्रकार यांच्यानंतर आता तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा आम्ही केलेला अभ्यास येथे देत आहोत.
१. देवस्थानचा कारभार हल्लीपर्यंत हैद्राबादच्या 
निजामाच्या नियमावलीनुसार !
     काहींना प्रश्‍न पडेल की, तुळजापूर देवस्थान सरकारी कधी होते ? अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की, तुळजापूर हे हैद्राबादच्या निजामाच्या राजवटीत होते. आधीची भांडणे निजामाकडे गेल्यामुळे निजामाने देवस्थानची नियमावली केली होती. त्याला कवायत असे म्हणतात. अगदी अलीकडे शासनाने वेगळा नियम काढून अधिकृतरित्या कह्यात घेईपर्यंतही देवस्थानचा कारभार निजामाच्याच कह्यात होता; म्हणजे त्या अर्थाने देवी निजामाच्याच अधिपत्याखाली हल्लीपर्यंत होती आणि त्याचे कोणालाही सोयरसूतक नव्हते. या कवायतीनुसार चाललेल्या कारभारात देवस्थानच्या विश्‍वस्तांमध्ये जिल्हाधिकारी (जो अध्यक्ष आहे), आमदार, तुळजापूरचे नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी, असे सदस्य आहेत. हे विश्‍वस्त शासकीयच आहेत. यात भक्त कुठेच नाहीत. हे दुर्भाग्य आता अधिकृतरित्या शासन पुढे चालवते आहे; कारण शासनाने अधिकृतरित्या हे देवस्थान कह्यात घेतले आहे.

विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे हवेतच !

     सीबीएस्ईच्या १ ली ते १२ वी इयत्तेपर्यंतच्या अभ्यासक्रमात नैतिक शास्त्र हा अनिवार्य विषय करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. समाजात प्रत्येक चांगली गोष्ट लागू करण्यासाठी जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालय आदेश देऊ शकत नाही, असेही न्यायालयाने सांगितले आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे पाल्यांवर संस्कार करणारी घरातील जेष्ठ मंडळी (आजी-आजोबा) आधुनिक पालकांना अडचणीची वाटू लागल्याने पाल्यांची वैचारिक स्तरावर पुष्कळ हानी होत आहे. आई, बाबा कामावर आणि पाल्य सोशल मिडियावर, असे दृश्य सध्या पहायला मिळत आहे. धावत्या वैज्ञानिक युगात पाल्याच्या शिक्षणावर मुक्त हस्ते व्यय (खर्च) करणे जेवढे महत्त्वाचे समजले जाते, तेवढेच त्याच्यावर संस्कार करण्यासही महत्त्व दिले पाहिजे. शिक्षणाने पदवी मिळेल आणि नंतर नोकरी; पण संस्कारांची पदवी कुठेही मिळत नाही. सुसंस्कारांचे जीवनात किती अनमोल स्थान आहे, याचे महत्त्व विद्यार्थ्यांवर सातत्याने बिंबवले गेले पाहिजे. त्याचा लाभ विद्यार्थ्याला पदोपदी होईल. चांगल्या गोष्टींची निर्मिती होण्यासाठी नेहमीच थोडा वेळ द्यावा लागतो. विद्यार्थी-पालक, विद्यार्थी-शिक्षक आणि शिक्षक-पालक यांच्यात प्रांजळ संवाद होत राहिला पाहिजे. सकारात्मक संवादातूनच विचारांची देवाण-घेवाण होत राहिल्याने विद्यार्थ्यास उत्तम विद्यार्थी आणि पर्यायाने उत्तम नागरिक बनवण्यासाठी काय करता येईल, यावर विचारमंथन होते.
     राष्ट्ररूपी मठ निर्माण व्हावा, हा आमचा संकल्प आहे. प्रत्येक घरच जर मठ झाला, तर प्रत्येक व्यक्ती सद्गुणी वृत्तीने कार्य करून आध्यात्मिक आणि सामाजिक विकास करील. (धर्मादित्य टाइम्स, ऑगस्ट २०१०)
इंग्रजांशी आम्ही राजकीयदृष्ट्या लढलो; परंतु सांस्कृतिकदृष्ट्या त्यांच्यापुढे पूर्णतः शरणागती पत्करली !

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

     एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या विरामचिन्हांमुळे पालटणारे वाक्याचे अर्थ सांगणारे हे सदर !सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १० महिने २५ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना २ महिने १ दिवसांपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
     केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

भुवनेश्‍वर येथे हिंदुत्वनिष्ठांची विशाल सभा !

        काश्मीरच्या दु:स्थितीत परिवर्तन करणे, काश्मिरी आतंकवादाला भारतीय राष्ट्रवादाने प्रत्युत्तर देणे आणि काश्मिरी हिंदूंचे अधिकार पुन: मिळवून देणे, या उद्देशांसाठी ९ ऑगस्टच्या सायंकाळी ओडिशाच्या भुवनेश्‍वर येथे भारतभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एक विशाल सभा पार पडली.
या विषयीचा सविस्तर
वृत्तांत उद्या
वाचा !

२४.७.२०१६ या दिवशी सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ या सद्गुरुपदी विराजमान झाल्यावर कु. मधुरा भोसले यांनी त्यांच्या चरणी सविनय अर्पण केलेले शुभेच्छापत्र !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
यांच्या चरणी सविनय अर्पण ! 
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
आनंद गगनात मावेना ।
बोलण्यासाठी शब्द सुचेना ॥

व्यवस्थापनाची घडी बसवली ।
प्रेमाने आम्हाला शिस्त लावली ॥

संतपदावरून विहंग झेप घेतली ।
सद्गुरुपदी स्थिर जाहली । 
श्रीविष्णूची लक्ष्मी शोभली ॥ १ ॥
हिंदूंनो, ख्रिस्ती व इस्लाम या पंथांच्या धार्मिक वसाहतवादापासून सावध रहा !

स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रिया

सौ. सुप्रिया माथुर
१. सेवेविषयीची सूत्रे 
अ. जेव्हा आपण स्वतःला श्रेष्ठ समजतो, तेव्हा सेवेत कोणी काही सुचवल्यावर आपल्याला प्रतिक्रिया येतात आणि आपण ते मनापासून स्वीकारत नाही. हाही आपला सूक्ष्म अहं असून तो आपल्या लक्षात येत नाही.
आ. एका साधकाने एक प्रसंग सांगितला. एकदा त्याला स्वयंपाकघरात नैवेद्य बनवण्याची सेवा मिळाली. तेव्हा आपल्यामध्ये भाव असल्यामुळेच आपल्याला ही सेवा मिळाली आहे, असा अहं त्याच्या मनात निर्माण झाला. 
     हा आपल्या मनाचा खेळ आहे. आपण स्वतःविषयी मनात ग्रह करून घेतो. सेवेकडे पहाण्याचा आपला हा दृष्टीकोनच चुकीचा आहे. आपल्याला मिळणार्‍या प्रत्येक सेवेतून ईश्‍वराला आपल्याला काहीतरी शिकवायचे असते.

सद्गुरुपदी विराजमान जाहल्या कृष्णप्रिया पू. बिंदाताई । अनन्य भावे साधक वदती, सांग दयाघना, होऊ कशी मी उतराई ॥

     २४.७.२०१६ या दिवशी पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ सद्गुरुपदी विराजमान झाल्या. ते गोड गुपित उघड झाल्यावर भारतभरातील साधकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कुणी त्यांना प्रत्यक्ष भेटून, कुणी भ्रमणभाषवर संपर्क करून, तर कुणी लघुसंदेशाद्वारे या सद्गुरुमाऊलींप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची भाववैशिष्ट्ये वर्णन करणारे आणि 
त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे हे काही कृष्णसंदेश...
१. श्रीमत् नारायणाची छाया म्हणजे सद्गुरु सौ. बिंदाताई ! : सद्गुरु बिंदाताई, तुमची पुष्कळ आठवण येत आहे. डोळ्यांसमोर तुम्हीच उभ्या आहात. आनंदाने मन भरून वहात आहे.
     समष्टीच्या कल्याणार्थ श्रीमत् नारायणाची सावली आहात तुम्ही ।
     आठवणीने ऊर येतो भरूनी । मन अखंड रहावे आपल्या चरणी ॥
- सौ. संगीता घोंगाणे, दादर सेवाकेंद्र, मुंबई. (२६.७.२०१६)

मथुरा येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. विनय वर्मा यांच्याविषयी त्यांच्या आई-वडिलांना आलेल्या अनुभूती, तसेच त्यांना संतपद प्राप्त होण्यासंबंधी मिळालेला स्वप्नदृष्टांत

श्री. विनय वर्मा
१. श्री. विनय वर्मा यांची 
सेवा करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. पायांना तेल लावतांना आध्यात्मिक उपाय होऊन नामजप एकाग्रतेने होणे : विनयच्या पायांना त्रास होत असल्याने मी काही दिवसांपासून त्याच्या पायांना तेलाने मर्दन (मालीश) करते. त्या वेळी मला पुष्कळ जांभया येऊन स्वतःवर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवते. तसेच त्याच्या पायांना तेल लावतांना नामजपही एकाग्रतेने होतो आणि ध्यान लागते. 
- सौ. पुष्पा वर्मा (श्री. विनय वर्मा यांची आई), मथुरा
१ आ. संतसेवा करत असल्यासारखे वाटणे : विनयची सेवा करतांना आणि त्याच्याशी बोलतांना मला शीतलता आणि आनंद जाणवतो, तसेच पुष्कळ शांत वाटते. त्या वेळी माझ्या मनात विचार येतात, त्याची प्रत्येक गोष्ट ऐकावी, त्याची अधिकाधिक सेवा करावी, त्याच्यासाठी आणखी काय काय करू शकतो ? प.पू. गुरुदेवांनी आम्हाला संतसेवा दिली आहे आणि त्याच्या माध्यमातून आमच्या जीवनाचे सार्थक झाले आहे.
        त्याचप्रमाणे पुष्कळ मासांपासून मला तो संतपदाला पोचला आहे, ही गोष्ट प.पू. डॉक्टर आम्हाला कधी सांगतील, असे वाटते.

पू. राजेंद्र शिंदे यांच्या ध्वनीफितीत सांगितल्याप्रमाणे मानसशुद्धी केल्यामुळे एस्.एस्,आर्.एफ्.च्या साधिका सौ. अंजना साईदीपक यांना मनाच्या स्थितीत जाणवलेला आमूलाग्र पालट !

सौ. अंजना साईदीपक
१. मुलाचा तीव्र राग येणे
          गेल्या १ वर्षापासून माझा मुलगा चि. आयुष याला सांभाळतांना मला तीव्र राग येत असे, त्या वेळी माझे विचार आणि वर्तन पुढीलप्रमाणे असे.
अ. मी घरातील वस्तू फेकून तोडून टाकत असे.
आ. कधी कधी काही प्रसंगात प्रत्यक्षात मला राग आलेला नसे; परंतु मी पुष्कळ चिडून आक्रमकपणे वागत आहे, अशी दृश्ये मला दिसत असत अथवा तसे विचार येत असत. ही दृश्ये दिसल्यावर माझे स्वतःवरील नियंत्रण सुटत असे आणि मी दृश्यात दिसल्याप्रमाणे अथवा विचार केल्याप्रमाणे वागत असे.
इ. मी त्याच्यावर मोठ्याने ओरडत असे.
२. रागावर नियंत्रण 
ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न
          मी माझ्या रागाला नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वयंसूचना घेणे, प्रार्थना करणे, यांसारखे पुष्कळ प्रयत्न केले. प्रसूतीपश्‍चात येणार्‍या नैराश्यावर (पोस्ट पार्टम डिप्रेशनवर) मी ८ मास औषधेही घेतली; परंतु काही काळाने या औषधांचा प्रभाव न्यून झाला. दिवसेंदिवस माझ्या मनाची स्थिती बिघडतच होती.

मुलाच्या लग्नात प्रत्यक्ष बोलणे न होताही प.पू. डॉक्टरांना केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांना अपेक्षित झाल्याचे अनुभवणे

श्री. तुकाराम लोंढे
१. मुलाच्या लग्नात मुलीकडचे पुष्कळ खर्च करणार, याकडे साक्षीभावाने पहायचे, असे ठरवणे : मे २०१६ मध्ये माझा मुलगा श्री. विष्णु याचे लग्न आंबेजोगाई येथे करण्याचे ठरवले होते. त्या वेळी मुलीकडचे लग्नात पुष्कळ खर्च करणार होते. तेव्हा मी त्यांना सांगितले, अनावश्यक खर्च करू नका. ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते; कारण त्यांना त्यांची प्रतिष्ठा महत्त्वाची होती. त्यांनी लग्नात डी.जे. आणि आर्केस्ट्रा लावण्याचे नियोजनही केले होते. त्यामुळे लग्नातील वातावरण रज-तम होणार, असे मला वाटत होते. त्या वेळी मी काही करू शकत नव्हतो; पण असे होऊ नये यासाठी मी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केली आणि होईल त्याकडे साक्षीभावाने पहाण्याचे ठरवले.
२. मी पाहुण्यांना किंवा श्री. बाळासाहेब केंद्रे यांना काहीही न सांगता गुरुकृपेनेच हे सर्व घडले; म्हणून प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे : त्यानंतर आमचे हितचिंतक श्री. बाळासाहेब केंद्रे हे मुलीच्या वडिलांकडे चौकशीला गेले होते. तेव्हा त्यांनी मुलीच्या वडिलांना सांगितले, ते सनातनचे साधक असून देवाचे कार्य करणारे आहेत. त्यामुळे लग्नात डी.जे. आणि आर्केस्ट्रा लावू नका. तेव्हा त्यांनी सांगितले, सर्व ठरलेले असल्यामुळे आता ते रहित करता येणार नाही. आम्ही केवळ भावगीते आणि भक्तीगीते लावू. त्याप्रमाणे लग्नाच्या वेळी सात्त्विक गाणी आणि भक्तीगीते लावण्यात आली. तेव्हा असा कार्यक्रम प्रथमच झाला, असे तेथील सर्व लोकांनी सांगितले. मी पाहुण्यांना किंवा श्री. बाळासाहेब केंद्रे यांना काहीही न सांगता गुरुकृपेनेच हे सर्व घडले. त्यामुळे हे सर्व करवून घेणार्‍या प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
- श्री. तुकाराम लोंढे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.७.२०१६)

प.पू. डॉक्टर म्हणजे साक्षात् प्रभु श्रीरामचंद्र आहेत, असा भाव ठेवून त्यांना भावपूर्ण शुभेच्छा देणारे बालसाधक कु. वेद पाटील (वय १२ वर्षे) आणि कु. गुरुदास घोडके (वय १० वर्षे) !

         प.पू. डॉक्टरबाबांना आमचा साष्टांग दंडवत ! प.पू. डॉक्टरबाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
         प.पू. डॉक्टरबाबा, आमच्या एवढ्या गंभीर चुका होऊनही तुम्ही आम्हाला जवळ केले आहे. प.पू. डॉक्टरबाबा, आम्हाला तुमची पुष्कळ आठवण येते. आम्हाला पूर्णवेळ साधना करायची आहे. तुम्ही हो, असे सांगितले, तर आम्ही पूर्णवेळ साधना करू.
प.पू. डॉक्टरबाबा, आम्हाला वाटते, ते खरे आहे.
प.पू. डॉक्टरबाबा म्हणजे राम ।
परमपिता परमेश्‍वर श्रीराम ।
जय राम जय जय राम ।
चैतन्याचा सुवास राम ।
श्रीराम जयराम जय जय राम ।
श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचंद्रचरणौ शरणम् प्रपद्ये ।
- कु. वेद पाटील (वय १२ वर्षे), सानपाडा, नवी मुंबई आणि कु. गुरुदास घोडके (वय १० वर्षे), बार्शी, सोलापूर (२९.५.२०१६)

प.पू. डॉक्टरांच्या नावाच्या आद्याक्षरांचा सुचलेला अर्थ

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
श्री - श्रीकृष्ण असे ते
ज - जगदीश्‍वर असती ते
यं - युगायुगात अवतार घेणारे ते
त - तारणहार भक्तांचे ते
बा - बाळ गोपाळ ते
ळा - हळहळ जिवाची ओळखणारे ते
जी - जीवात्माला शिवात्माशी जोडणारे ते
आ - आख्या ब्रह्मांडाचे पालन करती ते

स्वतःच्या वाढदिवसानिमित्त साधिकेची प.पू. डॉक्टरांना प्रार्थना !

सौ. अनुपमा जोशी
देवा, ६५ व्या वर्षात केले पदार्पण ।
स्वतःला गुरुचरणी केले अर्पण ।
देवा, तुझेच राहो सदैव मनात चिंतन ।
प्रत्येक क्षणी, प्रत्येक कृती यात राहो तुझे स्मरण ।
संपला संसार कधीच ।
आता थोडे बंध आहेत तेही असो तुझ्या चरणी अर्पण ।
ईश्‍वरा, माझ्याकडून तुला अपेक्षित अशी साधना होत नाही ।
ही खंत सतत राहो अन् वाढो तुझ्या चरणांची ओढ ।
देवा, केवळ एकच इच्छा तुझ्या चरणी ।
पुष्कळ दोषांनी बरबटलेले तन आणि मन स्वच्छ होऊन तुझ्यातच लीन होऊ दे ।
- सौ. अनुपमा जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.८.२०१६)

साधकांनो, तातडीच्या सेवांमुळे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प झाल्यास ताण न घेता मिळालेली सेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण करा !

        गुरुपौर्णिमा, हिंदु धर्मजागृती सभा, हिंदू अधिवेशन आदी कार्यक्रमांच्या वेळी साधकांना अधिक सेवा असतात आणि त्या त्वरित पूर्ण करणे अपरिहार्य असते. त्यामुळे या काळात काही साधकांकडून सत्र, सारणी लिखाण आदी व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नाहीत. परिणामी त्यांना ताण येतो अथवा नकारात्मक विचारांमुळे निराशा येते. याचा सेवेवर विपरीत परिणाम होतो आणि चुका होऊन सेवेची फलनिष्पत्ती अल्प होते.
        साधकांनी महत्त्वाच्या आणि तातडीच्या सेवांच्या वेळी शक्य तेवढे व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून मिळालेली सेवा परिपूर्ण अन् भावपूर्ण करण्याकडे अधिक लक्ष द्यावे. एरव्ही वर्षभर व्यष्टी साधनेचे प्रयत्न मनापासून आणि तळमळीने कसे होतील, असे पहावे.
        साधकांनो, आनंदप्राप्ती करणे, हा साधनेचा मूळ उद्देश आहे, हे लक्षात घेऊन निराशा अथवा ताण येत असल्यास त्या स्थितीत रहाण्याऐवजी उत्तरदायी साधकांशी बोलून तत्परतेने मात करा !
- (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.८.२०१६)

नियतकालिकांचे वाचक होण्यास इच्छुक जिज्ञासूंच्या सोयीसाठी ऑनलाईन वर्गणीदार होण्याच्या नव्या योजनेचा आरंभ !

वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने... 
१. सनातन प्रभातला 
वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत असणे
        जनसामान्यांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमाची ज्योत प्रज्वलित व्हावी, या एकमेव उदात्त हेतूने नियतकालिक सनातन प्रभात कार्यरत आहे. मराठीसह कन्नड, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या भाषांत प्रसिद्ध होणार्‍या या नियतकालिकांना वाचकांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. अनेक जण वर्गणीदार होण्यास उत्सुक असल्याचे आढळले आहे; परंतु मनुष्यबळाच्या अभावी साधक त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाहीत.
२. ऑनलाईन वर्गणीदार होण्याच्या 
नव्या सुविधेचा सर्व जिज्ञासूंनी लाभ घ्यावा !
        अशा इच्छुकांना नियतकालिकांचे वर्गणीदार सुलभतेने आणि शीघ्रतेने होता यावे, यासाठी ऑनलाईन वर्गणीदार होण्याच्या नव्या योजनेला नुकताच आरंभ करण्यात आला आहे. या योजनेद्वारे दैनिक सनातन प्रभातच्या व्यतिरिक्त अन्य नियतकालिकांचे (साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक यांचे) वर्गणीदार होता येईल. www.sanatanprabhat.org/subscribe या मार्गिकेला भेट देऊन जिज्ञासू वरील योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळे राष्ट्र-धर्म कार्य करणार्‍या साधकांचा जिज्ञासूंना संपर्क करण्यातील वेळ तर वाचेलच; पण त्याचबरोबर जिज्ञासूंना स्वतःच्या सोयीनुसार ऑनलाईन वर्गणीदार अर्ज भरता येऊन त्यांना लवकरात लवकर अंक चालू करता येईल.

राखीपौर्णिमेला बहिणीला अशाश्‍वत भेट देण्याऐवजी चिरंतन तत्त्वाचा प्रसार करणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक बनवा आणि ज्ञानामृत असलेली अनोखी ओवाळणी द्या !

वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !
१. राखीपौर्णिमेचे महत्त्व !
     श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! या वर्षी १८.८.२०१६ या दिवशी राखीपौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भावाने आपले रक्षण करावे, यासाठी बहीण या दिवशी भावाला ओवाळते आणि राखी बांधते. भाऊ बहिणीला पैसे अथवा तिला उपयोगी पडेल, अशी वस्तू ओवाळणी म्हणून देतो.
२. येणार्‍या काळाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आपल्या 
भगिनीला सक्षम बनवण्याकरता सनातन प्रभातचे वाचक बनवा !
     सद्यःस्थितीत सामाजिक परिस्थिती बिकट असल्याने स्त्रियांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांविषयी त्यांना अवगत करून सतर्क करणे, ही काळाची आवश्यकता आहे. हे समाजोपयोगी कार्य करण्यासाठी नियतकालिक सनातन प्रभात अविरत कार्य करत आहे. स्त्रियांंंमधील सतर्कता वाढवणारे, त्यांना स्व-संरक्षणासाठी उद्युक्त करणारे, तसेच अनुचित प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी साधनेचा आधार देणारे वाचनीय लेख या नियतकालिकात नियमित प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे मनोधैर्य त्यांच्यात निर्माण होत आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

        कृष्णाला तुळस आवडते, अशा तर्‍हेची वाक्ये भक्तीयोगात असतात. काही जणांना वाटते, देवांना आवड-निवड कशी ? प्रत्यक्षात अशा वाक्याचा अर्थ असतो, तुळशीत श्रीकृष्णतत्त्व अधिक प्रमाणात असते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
माया आणि परमेश्‍वर
अ. परमेश्‍वराची माया समजून घेऊन आहे तिथेच समाधानाने रहावे.
भावार्थ
: माया समजून घेऊन म्हणजे मायेतील ब्रह्म समजून घेऊन. ते झाले की समाधान, आनंदच आहे.
आ. परमेश्‍वर पहाण्यापेक्षा परमेश्‍वराच्या रचनेची जाणीव करून घेणे, हेच खरे ज्ञान.
भावार्थ
: परमेश्‍वराची रचना म्हणजे माया. तिची खरी जाणीव, ओळख करून घेणे, म्हणजेच मायेतील ब्रह्म ओळखणे. हेच खरे ज्ञान.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
पाश्‍चात्त्य संस्कृती स्वेच्छेला प्रोत्साहन देणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि दुःखाला निमंत्रण देते, तर हिंदु संस्कृती स्वेच्छा नष्ट करून सत्-चित्-आनंदावस्था कशी प्राप्त करायची, हे शिकवते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन 
आध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपोआप 
बदलत जातो आणि शाश्‍वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

एक फसलेले उपोषण !

संपादकीय 
     मणीपूरमधील तथाकथित मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी १६ वर्षे चालू असलेले उपोषण थांबवले. या सोळा वर्षांच्या कालावधीत मानवाधिकारवाल्यांनी शर्मिला यांना देवतेच्या स्वरूपात रेखाटले. काहींनी तर त्यांना गांधी, अण्णा हजारे यांच्या पंक्तीत नेऊन बसवले. वर्ष २००० मध्ये आसाम रायफल्सने केलेल्या गोळीबारात १० नागरिक ठार झाले. त्यानंतर शर्मिला यांनी उपोषणाला प्रारंभ केला. मणीपूरमध्ये सैन्याला देण्यात आलेले विशेषाधिकार परत घेण्यात यावेत, यासाठी शर्मिला यांनी अपयशी झुंज (?) दिली. वास्तविक १६ वर्षे आमरण उपोषण करून व्यक्ती जीवंत कशी राहू शकते ?, असा बाळबोध प्रश्‍न प्रत्येक सामान्य माणसाला पडतो. नळीद्वारे द्रव्यजन पदार्थ देऊन प्रशासनाने त्यांना जिवंत ठेवले आहे. त्यामुळे शर्मिला यांच्या उपोषणाला उपोषण तरी कसे म्हणायचे, असा प्रश्‍न आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn