Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भाजपला वर्ष २०१९ च्या निवडणुकीत किंमत मोजावी लागेल ! - विहिंपची चेतावणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोरक्षकांविषयीच्या विधानाचे प्रकरण
     नवी देहली - गोरक्षकांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान गोरक्षकांसाठी अवमानकारक आहे. यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपला वर्ष २०१९ मधील निवडणुकीमध्ये या विधानाची किंमत मोजावी लागेल, अशी चेतावणी विश्‍व हिंदु परिषदेने दिली आहे. देशभरात गोहत्येवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही गुजरातमधील विहिंपच्या शाखेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
     विहिंपचे ब्रज भागाचे उपाध्यक्ष सुनील पराशर म्हणाले की, देशात प्रतिवर्षी एक लाख गायींची हत्या करणार्‍या कसायांना गुंड म्हटले जात नाही आणि गीता रामभैया यांसारख्या गोरक्षकांना गुंड म्हटले जात आहे. (रामभैया यांची कर्णावतीमध्ये काही वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती.) यामधून तुमच्या (भाजपच्या) भूमिकेत झालेला पालट दिसत आहेे. हा पालट हिंदूंना समजलेला नाही. गायी प्लास्टिक खातात, तर त्यावर भाजपच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी काय केले ? जर ८० टक्के गोरक्षक नकली आहेत, तर तुमच्या गुजरातमधील १० वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कायद्याच्या अंतर्गत किती लोकांना दंड केला ? गोरक्षणासाठी कायदा केला जात नाही.

दलितांवरील आक्रमणे थांबवा, हवे तर मला गोळ्या घाला ! - मोदी

काश्मीर, बंगाल आदी राज्यांत हिंदूंवर आक्रमणे होत आहेत, 
यासाठीही पंतप्रधानांनी बोलावे, अशीच निरपराध हिंदूंची अपेक्षा आहे !
असे भावनिक आवाहन करण्याऐवजी कोणावरही 
गोळ्या झाडल्या जाणार नाहीत, अशी उपाययोजना करा !
     भाग्यनगर - गेल्या काही दिवसांपासून देशात दलितांवरील आक्रमणांच्या घटना समोर आल्या आहेत. ही आक्रमणे थांबायला हवीत. दलितांवर होणारी आक्रमणे लज्जास्पद आहेत. गरीब आणि दलित यांचे संरक्षण करणे, हे आपले दायित्व आणि कर्तव्य आहे. त्यांच्यावरील आक्रमणे थांबवा. दलित बंधू आणि भगिनी यांना अशा प्रकारे त्रास देणे उचित आहे का ? आक्रमण करायचेच असेल, तर माझ्यावर करा. हवे तर मला गोळ्या घाला, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑगस्ट या दिवशी येथे केले. ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. आपण नेहमीच वसुधैव कुटुम्बकम् म्हणतो; पण जर आपण दलितांना त्यापासून वेगळे ठेवले, तर हे जग आपल्याला कधीच क्षमा करणार नाही, असेही मोदी म्हणाले.

काश्मिरी हिंदूंच्या रक्षणासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत ! - हिंदुत्वनिष्ठाची मागणी

भुवनेश्‍वर येथे एक भारत अभियान - कश्मिरकी ओर परिषदेस प्रारंभ
    
डावीकडून श्री. अनिल धीर, श्री. रमेश शिंदे, श्री. सूर्यकांत केळकर, 
डॉ. विमालेंदू मोहंती, डॉ. अजय च्रोंगू आणि श्री. विठ्ठल चौधरी
      भुवनेश्‍वर (ओडिशा) - भारत रक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती आणि पनून कश्मीर या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथे ८ आणि ९ ऑगस्ट या दिवशी एक भारत अभियान - कश्मिरकी ओर या मोहिमेच्याअंतर्गत दोन दिवसीय परिषदेस प्रारंभ झाला आहे. या परिषदेस श्रीराम सेना, शिवसेना, हिंदू मक्कल कत्छी (हिंदू जनता पक्ष), हिंदू संहति आणि १० राज्यांतील हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.
     पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू हे तीन सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असून त्यांनी परिषदेला संबोधित करतांना सांगितले, पनून कश्मीर ही संघटना गेली २५ वर्षे काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी लढा देत आहे. आतापर्यंतच्या सरकारांनी काश्मिरी हिंदूंच्या संरक्षणासाठी काहीच पावले उचलली नाहीत. भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सह-संयोजक श्री. मुरली मनोहर शर्मा म्हणाले की, या संयुक्त परिषदेच्या वतीने भारत शासनाकडे याविषयी तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात येईल अन्यथा काश्मीर आणि भारतही काही काळाने पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरिया, इराक या देशांसारखा इस्लामी राष्ट्र्राचाच एक भाग बनून राहील. काश्मीरमध्ये व्यापक होत चाललेला इस्लामी कट्टरतावाद संपूर्ण देशात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काश्मीरमध्ये २ सैनिक हुतात्मा, तर १ आतंकवादी ठार !

     श्रीनगर - कुपवाडा जिल्ह्यातील मचिल सेक्टरमध्ये जिहादी आतंकवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत २ सैनिक हुतात्मा झाले, तर एका आतंकवाद्याला ठार करण्यात आले आहे.

शिर्डी येथील मंदिराच्या सुरक्षेसाठी फोर्स वनची मागणी !

जनता आणि तिची श्रद्धास्थाने यांचे रक्षण होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
     शिर्डी - स्वातंत्र्यदिनी शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर उडवून देण्याच्या धमकीच्या पार्श्‍वभूमीवर मंदिराच्या सुरक्षेसाठी फोर्स वन सुरक्षा तैनात करण्याची मागणी शासनाकडे करण्याचा निर्णय मंदिराच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी दिली. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराचा परिसर आणि अन्य ठिकाणी तातडीने क्लोज सर्किट टीव्ही लावण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

पीपली लाईव्ह चित्रपटाचा सहदिग्दर्शक महमूद फारुकी यास ७ वर्षांचा कारावास !

विदेशी नागरिकांशी गैरवर्तणूक करणे म्हणजे जगात अतिथी देवो भव : 
साठी प्रसिद्ध असणार्‍या भारतीय संस्कृतीला काळीमा फासणे होय ! 
अमेरिकी महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरण 
      नवी देहली - एका अमेरिकी महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पीपली लाईव्ह या हिंदी चित्रपटाचा सहदिग्दर्शक महमूद फारुकी याला न्यायालयाने ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेसह ५० सहस्र रुपयांचा दंडही ठोठवला आहे. हा दंड न भरल्यास कारावासात ३ मासांची वाढ करण्यात येणार आहे.
     मार्च २०१५ मध्ये येथील न्यू फ्रेंडस कॉलनीमधील पोलीस ठाण्यात एका ३५ वर्षीय अमेरिकेच्या महिलेने महमूद फारूकीच्या विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. ही महिला कोलंबिया विद्यापिठाची विद्यार्थिनी होती. संशोधनासाठी ती भारतात आली होती.

उत्तरप्रदेशमधील एका शाळेत विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत आणि प्रार्थना यांच्याऐवजी अल्ला हु अकबर म्हणण्यास लावले !

शाळेत गीता शिकवण्याच्या निर्णयाला शिक्षणाचे भगवेकरण म्हणणार्‍या
पुरोगाम्यांना शाळेत अल्ला हु अकबर च्या घोषणा दिल्या,
तर चालतात का ? प्रसारमाध्यमे, पुरोगामी आदी मंडळी आता गप्प का ?
  • १५ दिवसांपासून शाळेत राष्ट्रगीत आणि प्रार्थना यांवर बंदी !
  • शाळेच्या मुख्याध्यापिकेसह एक शिक्षिका निलंबित !
      बांदा (उत्तरप्रदेश) - जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत आणि प्रार्थना यांऐवजी अल्ला हु अकबर म्हणण्यास लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापिकेसह एका शिक्षिकेला निलंबित केले आहे.
   मिळालेल्या माहितीनुसार बडोखर क्षेत्रातील जौरही येथील प्राथमिक शाळेत मागील १५ दिवसांपासून नियमितपणे म्हणण्यात येणारे राष्ट्रगीत आणि प्रार्थना यांवर बंदी घालण्यात आली होती. शाळेच्या या निर्णयाच्या विरोधात अधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर चौकशी करून जिल्हाधिकार्‍यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका साजिया परवीन यांच्यासह शैलेंद्री या शिक्षिकेला निलंबित केले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, मुख्याध्यापिका साझिया यांनी त्यांना राष्ट्रगीत आणि प्रार्थना म्हणण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे १५ दिवस शाळेत राष्ट्रगीत आणि प्रार्थना होऊ शकली नाही. याऐवजी त्या मुलांना अल्ला हू अकबर म्हणण्यास सांगत होत्या.

काश्मीरमध्ये हिंसाचार माजवणार्‍या देशद्रोही धर्मांधांवर थेट कारवाई करावी ! - राष्ट्राभिमानी हिंदू

देहली येथील जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन
   
जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्राभिमानी हिंदू
  देहली - काश्मीरला आतंकवादमुक्त करण्यासाठी केंद्रशासनाने हिंसाचार माजवणार्‍या देशद्रोही काश्मिरी धर्मांधांवर थेट कारवाई करावी आणि आतंकवादाच्या विरोधात सैन्याला सर्वाधिकार द्यावेत, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी येथील जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भाजप, वैदिक उपासना पीठ, युवा एकता मंच, रणरागिणी शाखा, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांसह माजी नौदल सैनिक आणि अनेक राष्ट्राभिमानी नागरिक उपस्थित होते.
आंदोलनातील मागण्या
१. आतंकवादाचे समर्थन करणार्‍या लोकप्रतिनिधींना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे.
२. सैन्यावर दगडफेक करणारे, आतंकवाद्यांचे समर्थन करणारे आणि देशविरोधी घोषणा देणारे यांच्यावर कठोर कारवाई करावी.
३. देशविरोधी घोषणा देणार्‍या मशिदींवरील भोंगे तात्काळ काढण्यात यावेत, तसेच त्या मशिदींवरही कारवाई करण्यात यावी.

सनातनला दडपण्याच्या प्रयत्नांतून सनातनचे कार्य आणखी वाढणार ! - अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

डावीकडून सौ. सुमा मंजेश, अधिवक्ता
श्री. अमृतेश एन्.पी. आणि श्री. मोहन गौडा
     हासन (कर्नाटक) - सनातनवर खोटे आरोप करून त्याचे राष्ट्ररक्षणाचे आणि धर्मजागृतीचे कार्य दडपण्याचा प्रयत्न विरोधकांकडून चालू आहे; मात्र त्यामुळे सनातनचे कार्य आणखीनच वाढणार आहे, असे उद्गार कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी. यांनी येथे काढले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकच्या हासन येथे आयोजित केलेल्या हिंदू संघटन मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा आणि रणरागिणी शाखेच्या सौ. सुमा मंजेश यांनीही संबोधित केले. मेळाव्याला २७५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

काश्मीरमधील आतंकवाद संपण्याऐवजी तो भारतभर पसरला ! - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

कटक (ओडिशा) येथे अधिवक्ता आणि धर्माभिमानी यांचे एकदिवसीय संमेलन 
संमेलनाला उपस्थित धर्माभिमानी हिंदू
     भुवनेश्‍वर - देशात राष्ट्र आणि धर्म यांविरोधी शक्तींचे प्राबल्य दिवसेंदिवस वाढत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये उच्च न्यायालयाने गोहत्येवर प्रतिबंध लावण्याचा आदेश दिल्यावर धर्मांधांनी त्या दिवशी काश्मीरमधील रस्त्यांवर ४८ सहस्र गायी कापून न्यायालयाचा आदेश आम्ही मानणार नाही, अशी राष्ट्रद्रोही चेतावणी दिली; मात्र याला न्यायालयाने स्वतःच्या आदेशाचा अवमान मानला नाही. धर्मांधांच्या आतंकवादामुळे काश्मीरमधून ४ लाख ५० सहस्र हिंदू आज स्वत:च्याच देशात विस्थापितांचे जीवन जगत आहेत. २६ वर्षांत ते पुन्हा काश्मीर खोर्‍यात परतू शकले नाहीत; मात्र काश्मीरमधील आतंकवाद सार्‍या भारतभर पसरला, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले.

सनातन संस्थेवर बंदी घातल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्याचा बेंगळुरू येथील अधिवक्त्यांचा निर्धार !

डावीकडून अधिवक्ता उमाशंकर, अधिवक्ता 
शशिकुमार, अधिवक्ता अमृतेश एन्.पी., 
अधिवक्ता पद्मनाभ होला (बोलताना), 
अधिवक्ता कृष्णास्वामी
    बेंगळुरू (कर्नाटक) - सनातन संस्था समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत आहे. अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्‍या या संघटनेवर बंदी घातली जाऊ नये. या बंदीला न्यायालयात आव्हान दिले जाईल आणि हा खटला विनामूल्य लढवला जाईल, असा निर्धार बेंगळुरू येथील अधिवक्त्यांनी पत्रकार परिषदेत केला. (कठीण काळात सनातनच्या पाठीशी उभ्या रहाणार्‍या सर्व अधिवक्त्यांचे आभार ! - संपादक) या वेळी व्यासपिठावर अधिवक्ता उमाशंकर, अधिवक्ता शशिकुमार, अधिवक्ता अमृतेश एन्.पी., अधिवक्ता पद्मनाभ होला आणि अधिवक्ता कृष्णास्वामी उपस्थित होते.

ग्रेटर नोएडामध्ये राम आणि रावण यांचे एकत्रित मंदिर बांधणार !

स्वातंत्र्यानंतर हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! मंदिरे कशासाठी उभारायची, 
हेही माहीत नसणारे हिंदू मंदिराचा लाभ कसा करून घेणार ?
      ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) - येथे रामासह लंकेच्या रावणाचेही एकत्र मंदिर उभारले जाणार आहे. येथील बिसरख धाममध्ये उभारण्यात आलेल्या या मंदिरात ११ ऑगस्टला या दोन्ही मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. राम आणि रावण यांचे एकच मंदिर असण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा मंदिर प्रशासनाने केला आहे. या मंदिराचे बांधकाम गेल्या ५ वर्षांपासून असल्याचे मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष अशोकानंदजी महाराज यांनी सांगितले.

अमेरिका अण्वस्त्रांचा वापर का करू शकत नाही ? - डोनल्ड ट्रम्प यांचा प्रश्‍न

      वॉशिंगटन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवार डोनल्ड ट्रम्प हे एका बैठकीच्या वेळी तेथील परराष्ट्र धोरणाच्या सल्लागारांना अमेरिका अण्वस्त्रांचा वापर का करू शकत नाही असे सतत विचारत होते, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तसेच ट्रम्प यांच्याकडून युरोपमध्ये किंवा इराक अन् सिरीयामध्ये इस्लामिक स्टेटच्या विरोधात याचा वापर होऊ शकतो का, अशीही विचारणा करण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. यामुळे ट्रम्प यांच्या हातात अमेरिकेची सत्ता गेल्यास त्यांच्याकडून अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

भ्रष्टाचार आणि गैरवर्तणूक या आरोपांखाली ९०० कर्मचारी बडतर्फ, तर १९ सहस्र कर्मचार्‍यांना वेतनकपातीच्या शिक्षा !

        नवी देहली - वर्ष २०१५ मध्ये भ्रष्टाचार आणि गैरवर्तणूक या आरोपांखाली ९०० शासकीय कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले, तर १९ सहस्र कर्मचार्‍यांना वेतनकपात यांसारख्या इतर शिक्षा देण्यात आल्या, असे केंद्रीय दक्षता आयोगाने संसदेमध्ये मांडलेल्या वार्षिक अहवालाद्वारे म्हटले आहे. यामध्ये भारतीय पोलीस सेवेतील एका अधिकार्‍याला बडतर्फ करण्यात आले, तर आयकर विभागातील एका आयुक्तांचे वेतन कापण्याचे आदेश देण्यात आले. तसेच देहली महानगरपालिकेच्या मुख्य नगर नियोजकाच्या निवृत्तीवेतनामध्ये ही कपात करण्यात आली. (स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये प्रामाणिकपणा निर्माण होऊ शकला नाही, हे लोकशाहीची निरर्थकता स्पष्ट करते. यातून जनहितकारी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) आवश्यकता स्पष्ट होते ! - संपादक)

गृहपाठ न केल्यामुळे शिक्षिकेकडून विद्यार्थिनीला पट्ट्याने मारहाण !

अशा पद्धतीने अत्याचार सहन करून इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण देण्यापेक्षा पाल्यांना मराठी शाळेत घाला !
      बेंगळुरू (कर्नाटक) - गृहपाठ न केल्याच्या कारणावरून येथील सेंट जोसेफ या शाळेत दुसरीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीला शिक्षिकेने पट्ट्याने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या शरिरावर मारहाणीचे व्रण असून या विरोधात तिच्या पालकांनी तक्रार केली आहे. मुलगी घरी गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे.

एका विवाहित धर्मांधाने हिंदु युवतीला पळवून नेल्याने फोंडा येथे तणाव !

हिंदूंनो, सनातन गेली काही वर्षे सांगत असलेला लव्ह जिहाद तो हाच ! आतातरी जागे व्हा !
  • वशीकरणाला बळी पडलेल्या हिंदु युवतीचा घरी येण्यास नकार ! 
  • कायद्याने हात बांधले असल्याने पोलिसांचे असहकार्य : पालक हतबल ! 
  • संतप्त हिंदूंचा दिवसभर पोलीस ठाण्याला गराडा !
      फोंडा, ८ ऑगस्ट (वार्ता.) - कुर्टी, फोंडा येथील एका प्रतिष्ठित हिंदु कुटुंबातील २९ वर्षीय युवती लव्ह जिहादला बळी पडली आहे. एका पन्नाशीच्या जवळ पोहोचलेल्या विवाहित, तसेच मुलांचा बाप असलेल्या धर्मांधाने पळवून नेऊन या मुलीशी निकाह केला आहे. तीन दिवसांपूर्वी हुब्बळीला पळून गेलेल्या या दोघांना परत आणण्यास फोंडा पोलिसांना यश आले असले, तरी धर्मांधाच्या वशीकरणाला बळी पडलेल्या या युवतीने पालकांसोबत येण्यास नकार दिला आहे. कायद्याने हात बांधले असल्याने पोलिसांनी सहकार्य करण्यास नकार दिल्यामुळे पालक हतबल बनले आहेत. एका हिंदु युवतीला पळवल्यामुळे आणि पोलिसांच्या असहकार्यामुळे संतप्त बनलेल्या हिंदूंनी दिवसभर पोलीस ठाण्याला गराडा घातला होता.

पंजाब गोरक्षा दलाच्या अध्यक्षांवर एफ्आयआर् प्रविष्ट !

पंतप्रधानांनी गोरक्षकांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे कारवाई !
     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ ऑगस्ट या दिवशी गोरक्षकांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर पंजाब सरकारने गोरक्षणासाठी प्राणपणाने लढणार्‍या पंजाब गोरक्षा दलाचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या विरोधात तत्परतेने एफ्आयआर् (प्रथमदर्शनी अहवाल) प्रविष्ट केला आहे. (अशीच तत्परता अवैध गोहत्या करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात पंजाब सरकारने कधीतरी दाखवली आहे का ? - संपादक) कुमार यांच्यावर गोहत्या करण्यासाठी ट्रकमधून गायी घेऊन जाणार्‍या चालकांना मारहाण करण्याचे आरोप आहेत.

अभिनेत्री सनी लिओनवर कोणती कारवाई झाली याची माहिती द्यावी

  • अश्‍लीलता पसरवणार्‍या अभिनेत्रीवर १ वर्षापूर्वी गुन्हा प्रविष्ट होऊनही कारवाई न होणे, ही काय लोकशाही आहे का ?
  • रणरागिणी शाखेच्या वतीने सहपोलीस आयुक्तांना १ वर्षानंतर पुन्हा स्मरणपत्र !
         ठाणे, ८ ऑगस्ट (वार्ता.) - तरुण पिढीला अनैतिकतेकडे घेऊन जाणार्‍या अभिनेत्री सनी लिओनवर कारवाई झाल्यास तरुण पिढीवर होणार्‍या कुसंस्कारांचा धोका टळेल. यासाठी सनी लिओनवर कोणती कारवाई झाली आणि काय शिक्षा करण्यात आली, या आशयाचे स्मरणपत्र हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने सहपोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांना देण्यात आले. या वेळी शाखेच्या सौ. सुनीता पाटील, तक्रारदार सौ. अंजली पालन, मातृवत्सल महिला मंडळाच्या श्रीमती सुलभा देशपांडे, अधिवक्त्या सौ. गौरी सावंत, शिवसेना महिला संघटक सौ. मनीषा शेलार, सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर आणि अधिवक्त्या सौ. किशोरी कुलकर्णी उपस्थित होत्या. (नैतिकता जोपासण्यासाठी संघटित होणार्‍या महिलांचे अभिनंदन ! - संपादक) या वेळी पोलिसांनी कारवाईचे आश्‍वासन दिले. (रणरागिणींनो, केवळ आश्‍वासने देणार्‍या पोलिसांचा वारंवार पाठपुरावा घ्या ! - संपादक) स्मरणपत्र दिल्यावर पोलीस उपआयुक्त आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल, ठाणे शहराचे श्री. संदीप भाजीभाकरे यांचीही भेट घेण्यात आली.

अमित कुरणेसह दोघांना अटक; पोलिसांकडून पीडित महिलेवरच खंडणीचा गुन्हा प्रविष्ट

बलात्कारपीडित विवाहितेने आत्महत्या केल्याचे प्रकरण
        मिरज, ८ ऑगस्ट (वार्ता.) - बलात्काराची तक्रार दिल्यानंतर कारवाई न करता मिरज शहर पोलिसांनी पीडितेवरच खंडणीचा गुन्हा प्रविष्ट केला. मोठा धक्का बसल्याने पीडित विवाहित महिलेने ६ ऑगस्ट या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी प्रथमत: टाळाटाळ करणार्‍या मिरज पोलिसांनी नागरिकांच्या रेट्यामुळे मिरज अर्बन बँकेचे मुख्य अध्यक्ष अण्णासाहेब कुरणे, त्यांची धर्मपत्नी सौ. सुनीता आणि मुख्य आरोपी अमित कुरणे यांना अटक केली आहे. त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१. पीडित महिलेचा वर्ष २०१० मध्ये विवाह झाला होता. काही दिवसांपूर्वी मिरजेतील अमित कुरणे याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिने मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणीच दाद दिली नाही. त्यामुळे ती मिरजेतील एका सामाजिक संघटनेच्या अध्यक्षाकडे गेली. या अध्यक्षांसह तिने २४ जून २०१६ या दिवशी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या वेळी पोलीस अधीक्षकांनी संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट करण्याचे आदेश दिले.

स्वागत कमानी, होर्डिंग यांद्वारे सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून व्यापक धर्मप्रसार !

ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांच्या प्रदर्शनाची कमान

धर्मशिक्षण देणारा फलक

नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर), ८ ऑगस्ट (वार्ता.) - नृसिंहवाडी येथे १२ ऑगस्टपासून चालू होणार्‍या कन्यागत महापर्वाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने व्यापक अध्यात्मप्रसार, धर्मप्रसार करण्यात येणार आहे. या महापर्वाची लोकांना माहिती होण्यासाठी विविध ठिकाणी फलक, स्वागतकमानी लावण्यात येत आहेत. अध्यात्मशास्त्राची माहिती देण्यासाठी सनातन संस्थेचा विशेष धर्मरथही नृसिंहवाडी येथे आला आहे. याचसमवेत अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीनेही पर्वाच्या निमित्ताने विशेष संशोधन करण्यात येणार आहे.

अल्प विद्यार्थीसंख्येमुळे संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेच्या ६ शाळा बंद

     संभाजीनगर - गाव तेथे शाळा ही योजना राबवणार्‍या संभाजीनगर जिल्हा परिषदेने विद्यार्थी संख्या अल्प असल्याने येथील वाड्या-वस्त्यांवरील ६ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा बंद होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. (शिक्षक आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांनी या प्रकरणी आत्मावलोकन करायला हवे. तसेच शाळांची गुणवत्ता वाढण्यासाठी काय प्रयत्न करणार, याचे चिंतन करणेही आवश्यक आहे. - संपादक) इंग्रजी शाळांचे जाळे ग्रामीण भागात पसरल्याने विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाठ फिरवत असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. (इंग्रजी भाषेचे वाढते स्तोम रोखणे आणि मराठी भाषेचे संवर्धन यांसाठी मराठी भाषा संवर्धन समिती आणि शिक्षण विभाग कोणते प्रयत्न करणार आहे ? - संपादक)

इंटरनेट सुविधा पुरवणार्‍या संगणकीय प्रणालीवर (सर्व्हरवर) अज्ञातांकडून आक्रमण

पुणे, मुंबई येथील माहिती-तंत्रज्ञान आस्थापने आणि वित्तीय संस्था यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न
     पुणे - राज्यातील अनेक भागांमध्ये इंटरनेटची गती न्यून झाल्याचे मध्यंतरी आढळून आले. या अनपेक्षित प्रकारामुळे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पुणे, मुंबई यांसारख्या शहरांमध्ये काही प्रमाणात हानी झाली. अचानक मंदावलेल्या इंटरनेट गतीचा सायबर पोलिसांनी अभ्यास केल्यावर इंटरनेट सुविधा पुरवणार्‍या संगणकीय प्रणालीवर (सर्व्हरवर) अज्ञातांकडून डिस्ट्रिब्युशन डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक (डॉस) हे तांत्रिक आक्रमण केल्याचे उघड झाले आहे. या माध्यमातून पुणे, मुंबई येथील माहिती-तंत्रज्ञान आस्थापने आणि वित्तीय संस्था यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याचेही सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे इंटरनेटची गती न्यून होऊन आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाला. या प्रकरणी पोलीस महानिरीक्षक (सायबर) यांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे. (नागरिकांना स्मार्ट करू पहाणारे सरकार आणि पोलीस प्रशासन सायबर आक्रमणांना कसे तोंड देणार आहे ? - संपादक)

(म्हणे) सनातनच्या पदाधिकार्‍यांवर खटले प्रविष्ट करा !

  • आतापर्यंत हिंदुद्वेष्ट्यांच्या दबावाखाली येऊन सनातनच्या निष्पाप साधकांना छळणार्‍या पोलिसांनी असे खटले प्रविष्ट केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
  • हिंदूसंघटनामुळे धास्तावलेल्या भाकपचा कांगावा !
       कोल्हापूर - कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने चिथावणीखोर भाषणे करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍या सनातन संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांवर खटला प्रविष्ट करा, अशी मागणी येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे देण्यात आले.
       सनातन संस्थेच्या वतीने नुकताच कोल्हापुरात घेण्यात आलेल्या हिंदुऐक्य मेळाव्यात १५० हून अधिक संघटना सनातनला पाठिंबा देण्यासाठी एकत्रित आल्या होत्या. या वेळी सनातन, हिंदु विधीज्ञ परिषद, तसेच हिंदु जनजागृती समिती यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे सनातनवरील संभाव्य बंदीविषयीचे विचार व्यक्त केले. या पार्श्‍वभूमीवर भाकपने वरील विधान केले आहे.

हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे १ ते १५ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ !

सरस्वती शिशु मंदिराचे विद्यार्थी
आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

        देहली - स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे १ ते १५ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ राबवण्यात येत आहे. या चळवळीला पोलीस, प्रशासन, वृत्तपत्रे तसेच राष्ट्रप्रेमी नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

धर्मप्रसार करणार्‍या सनातनला नाहक गोवणारी तपासयंत्रणा रावणापेक्षाही दुर्जन ! - अधिवक्ता प्रशांत यादव, पुणे महानगरपालिका विधी सल्लागार

हडपसर (पुणे) येथील हिंदूसंघटन मेळाव्यात राष्ट्र-धर्म रक्षणार्थ हिंदूची एकजूट !
अधिवक्ता प्रशांत यादव
      पुणे, ८ ऑगस्ट (वार्ता.) - रावण हा दुर्जनतेचे प्रतीक आहे; पण त्यालाही रामनामातील शक्तीचे अर्थात सज्जनशक्तीचे ज्ञान होते. धर्मशिक्षण देणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणू पहाणारी आजची तपासयंत्रणा रावणापेक्षाही दुर्जन आहे. तपास यंत्रणेकडे कोणताही पुरावा नाही. सज्जन शक्ती आणि दुर्जन शक्ती यांचा लढा रामायण काळापासून चालू आहे. रामायणातील रावण आज नाही; परंतु तपास यंत्रणेत काही रावण आहेत, ज्यांना सनातनच्या विश्‍वभर वाढत चाललेल्या कार्याची म्हणजे सनातनच्या सज्जन शक्तीची भीती वाटत असल्याने बंदीसाठी ते प्रयत्न करत आहेत. सनातनच्या साधकांवर कितीही मोठे आरोपपत्र प्रविष्ट केले, तरी आजतागायत एकही पुरावा तपासयंत्रणांच्या हाती लागलेला नाही. अन्वेषण यंत्रणांनी सनातनला बंदीची दाहकता दाखवण्याचा प्रयत्न करू नये. सनातन संस्था या अग्निदिव्यातून सोन्याप्रमाणे उजळेल आणि बंदीच्या दाहकतेतून सहस्रो नवीन साधक निर्माण होऊन ते समाजाला प्रेरित करतील, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे विधी सल्लागार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे धर्मसंयोजक अधिवक्ता प्रशांत यादव यांनी केले. हडपसर येथील विघ्नहर्ता गार्डन मंगल कार्यालय येथे ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजित देशमुख आणि हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. मोनिका गावडे उपस्थित होत्या.

हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या प्रदेशाध्यपदी प्रमोद संकपाळ !

     सांगली - येथील श्री. प्रमोद पंडित संकपाळ यांची हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष (ग्रामीण) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रदेश कार्याध्यक्ष श्री. नारायणराव कदम यांनी नियुक्तीचे पत्र नुकतेच प्रदान केले आहे. हिंदुत्वावर होणार्‍या आघातांच्या विरोधात मी कार्य करण्यासाठी कटीबद्ध आहे, असे श्री. संकपाळ यांनी दैनिक सनातन प्रभातशी बोलतांना सांगितले.

फलटण येथे तहसीलदारांना निवेदन !

     फलटण - स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या ध्वजाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फलटण येथील तहसीलदारांना ४ ऑगस्ट या दिवशी निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार श्री. नंदकुमार भोईटे यांनी तहसीलदारांच्या वतीने हे निवेदन स्वीकारले. फलटण येथे काही ठिकाणी प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री होत असून ती थांबवण्याची विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. श्री. भोईटे यांनी त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल तसेच कारवाई केल्याचे तुम्हाला कळवण्यातही येईल, असे आश्‍वासन या वेळी दिले.
     या वेळी हिंदु जनजागृती समितीचे आशिष कापसे, अमोल सस्ते, श्रीमती डोईफोडे, सौ. मनिषा बोबडे, शिवसेनेचे सर्वश्री सचिन बिडवे, विजय मायने, राष्ट्रप्रेमी रणजीत शेटे, अरूण ढेरे आदी उपस्थित होते.

खार (मुंबई) येथील महिला पत्रकारितेचा विनयभंग आणि तिला मारहाण करणार्‍या धर्मांधाला अटक

धर्मांधाच्या या कृत्याच्या निषेधार्थ 
पत्रकार संघटना संघटितपणे आवाज उठवणार का ?
          मुंबई, ८ ऑगस्ट (वार्ता.) - खार येथील दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या पत्रकार कु. भाग्यश्री ठाकूर यांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध रफिक शेख (वय ३५ वर्षे) याला अटक केली आहे. (उद्दाम धर्मांधांना कायदा-सुव्यव्थेचा काहीच धाक राहिला नसल्याचे लक्षात येते ! - संपादक)
१. कु. भाग्यश्री ठाकूर या पशुकल्याण संस्थेच्या सदस्याही आहेत. पाळीव कुत्र्यास २ ऑगस्ट या दिवशी त्या सकाळी बाहेर फिरायला घेऊन जात होत्या. कुत्र्याने शेजारी रहाणारे रफिक शेक यांच्या घरासमोर मलमूत्र विसर्जन केले.
२. याचा राग येऊन धर्मांध रफिक शेख याने कु. भाग्यश्री हिला सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला.
३. कु. भाग्यश्री यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला कह्यात घेऊन अधिक चौकशी आरंभली आहे.

बारामती येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ
  
निवेदन स्वीकारतांना नायब तहसीलदार श्री. ठोंबरे
  बारामती (जिल्हा पुणे) - १५ अ‍ॅागस्ट या दिवशी लहान मुले प्लास्टिक किंवा कागदी राष्ट्रध्वज खरेदी करतात. त्याचा वापर झाल्यावर ते कुठेही फेकले जातात. त्यामुळे राष्ट्र्रध्वजाचा अवमान होतो. अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील नायब तहसीलदार श्री. ठोंबरे यांना निवेदन देण्यात आले.
     या प्रसंगी समितीचे श्री. प्रकाश जाधव, श्री. दिनेश नायक, सौ. कल्याणकर, सौ. गौरी जोशी, सौ. संगीता बुरडे, सौ. सिंधु कुंभार उपस्थित होते.

जिहादी आतंकवादी बुरहान वानीच्या वडिलांकडून काश्मीरमध्ये आंदोलन !

केवळ जिहादी आतंकवाद्यांवरच नव्हे, तर त्याच्या 
संपूर्ण परिवारावरच कारवाई करण्याची आवश्यकता आहे !
        श्रीनगर - हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी याला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये गेले २५ दिवस देशद्रोही धर्मांधांकडून हिंसाचार चालू आहे. आता यात वानीचे वडीलही सहभागी झाले आहे. नुकतेच मुजफ्फर वानी यांनी पँपोर येथे सहस्र दंगलखोरांसह मोर्चा काढला होता. फुटीरतावाद्यांनी या वेळी आयोजित केलेल्या मोर्च्याऐवजी दंगलखोर वानी यांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वानी या वेळी एका वाहनातून तिथे आले होते. त्या वेळी त्यांच्यासोबत गाडीमध्ये सशस्त्र आतंकवादी बसले होते.
        मुझफ्फर वानी म्हणले की, मी काश्मीरसाठी माझ्या दोन मुलांचा त्याग केला. आता माझी मुलगीही त्यासाठी देत आहे. ती काश्मीर मुक्त करण्यासाठी आंदोलन करील. बुरहानचा मोठा भाऊ खालिद २०१० मध्ये त्राल येथे सैनिकांकडून चकमकीत ठार झाला होता.

राष्ट्रध्वज सन्मानविषयक जिल्हासमिती स्थापन करावी ! - नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीची मागणी

अप्पर जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील
(उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

        नंदुरबार - राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जाण्याविषयी व्यापक प्रबोधन करण्यासाठी जिल्हा समिती स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्याचे पालन व्हावे, तसेच शाळांमधून राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन करण्याला हिंदु जनजागृती समितीला अनुमती देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकार्‍यांंना देण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले. समितीचे हे निवेदन वाचून जिल्हाधिकारी श्री. कलशेट्टी यांनी जिल्हास्तरीय समिती लवकरच स्थापन करू आणि त्यावर हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधीला स्थान देऊ, असे आश्‍वासन दिले. तसेच समितीने राष्ट्रध्वजाविषयी चालवलेल्या प्रबोधनकार्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.
        निवेदन देतांना वृक्षमित्र श्री. विठ्ठल मगरे, सर्वश्री मोहन जैन, मुकेश राजपूत, चेतन राजपूत, जितेंद्र राजपूत, राजू चौधरी, भावना कदम, आकाश गावित, डॉ. नरेंद्र पाटील हे उपस्थित होते.

मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांत अर्ध्याहून अधिक जलसाठा

       मुंबई, ८ ऑगस्ट - मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये अर्ध्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे. राज्यातील १०१ मोठ्या प्रकल्पात सरासरी ६५ टक्के, २२८ मध्यम प्रकल्पात ५२ टक्के आणि २ सहस्र २७० लहान प्रकल्पात ४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट मासाच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रकल्पांत केवळ ४५ टक्के पाणीसाठा झाला होता.
       जलसाठ्यात कोकणाची स्थिती चांगली असून तेथील १६२ प्रकल्पांत सरासरी ८८ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. मराठवाड्यातील स्थिती मात्र चिंताजनक असून विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत २७ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत १७ टक्के, तर ७३२ लघु प्रकल्पांत सरासरी २४ टक्के इतकाच जलसाठा आहे.

फलक प्रसिद्धीकरता

आतापर्यंतच्या शासनांच्या नाकर्तेपणामुळे जिहाद्यांची प्रतिवर्षी येणारी धमकी !
     स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील शिर्डी आणि शेगाव येथील मंदिरे, तसेच अमरावती, मलकापूर, भुसावळ अन् जळगाव येथील ४ प्रमुख रेल्वेस्थानके आणि शेगावचे न्यायालय बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी इस्लामिक स्टेटने दिली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     15 August ko Maharashtrake Shirdi aur Shegavke mandiropar akraman karneki ISIS ki dhamki.
     Phir bhi Atankwadka koi Dharma nahi; Hindu yah kaise mane ?
जागो !
     १५ अगस्त को महाराष्ट्र के शिर्डी और शेगाव के मंदिरों पर आक्रमण करने की इस्लामिक स्टेट की धमकी. 
     फिर भी आतंकवाद का कोई धर्म नहीं; हिन्दू यह कैसे माने ?

स्वसंरक्षण प्रशिक्षणासह धर्मशिक्षणही सक्तीचे करा ! - अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर

अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर
     चिंचवड, ८ ऑगस्ट (वार्ता.) - आज विविध राज्यांतून हिंदु मुली मोठ्या प्रमाणात पळवल्या जात आहेत. महिलांवर प्रतिदिनच कुठे ना कुठे अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या दुःस्थितीला पुरुष आणि स्त्रिया दोघेही तितकेच उत्तरदायी आहेत. विशेषतः स्त्रियांना त्यांच्यातील मातृशक्तीचे आणि देवीच्या अंशाचे भान न राहिल्यानेच स्त्रिया धर्माचरणापासून दूर गेल्या आहेत. कोपर्डीसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यासमवेत घराघरातून धर्मशिक्षणही सक्तीने द्या, असे आवाहन अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. बजरंग दल पिंपरी-चिंचवड प्रखंड यांच्या वतीने मोरया यात्री निवास येथे एक पाऊल स्त्री संरक्षणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी मोरया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शकुंतला माटे, माजी महापौर सौ. अपर्णा डोके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रजागरण युवा मंचचे अधिवक्ता मोरेश्‍वर शेडगे यांनी केले. २५० हून अधिक नागरिक या वेळी उपस्थित होते.

राष्ट्रध्वजाचे विडंबन रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करणार !

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !
संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे यांचे आश्‍वासन !
निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन
देतांना राष्ट्रप्रेमी नागरिक
     संभाजीनगर, ८ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणारा राष्ट्रध्वजाचा मान राखा हा उपक्रम पुष्कळ चांगला आहे. शासनाकडून आलेल्या आदेशानुसार आम्ही जिल्ह्यात कृती समिती स्थापन करून राष्ट्रध्वजाचे विडंबन रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला रस्त्यात राष्ट्रध्वज आढळल्यास ते आम्ही एकत्र करून त्याची कायदेशीर विल्हेवाट लावणार आहोत, असे आश्‍वासन येथील निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेच्या अंतर्गत संभाजीनगरच्या जिल्हाधिकार्‍यांना ४ ऑगस्ट या दिवशी निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने निवेदन स्वीकारतांना ते बोलत होते. या वेळी समितीच्या सौ. सुवर्णा निकम, सनातन संस्थेचे श्री. शरद चावडा आणि अन्य राष्ट्रप्रेमी महिलाही उपस्थित होत्या.

प्लास्टीकचे ध्वज विक्री न होण्यासाठी दुकानदारांना तात्काळ पत्र पाठवू ! - पोलीस निरीक्षक

निवेदन स्वीकारतांना उजवीकडून नायब तहसीलदार
पी.आर्. पाटील आणि अन्य
     गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), ८ ऑगस्ट (वार्ता.) - येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार पी.आर्. पाटील, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री. औदुंबर पाटील, गटशिक्षण अधिकारी श्री. जी.बी. कमळकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना शहरप्रमुख श्री. सागर कुराडे, सर्वश्री मनोज पवार, काशिनाथ गडकरी, सुरेश संकपाळ यांसह हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. या वेळी पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी तुमचे कार्य चांगले आहे, असे सांगून प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजांची विक्री न होण्यासाठी दुकानदारांना तात्काळ पत्र पाठवत असल्याचे सांगितले. गटशिक्षण अधिकारी यांनी सर्व केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांना यांसाठी सूचना देतो, असे सांगितले.

बाळगंगा धरण घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लिन चीट नाही !

      ठाणे - बाळगंगा धरणाच्या कामाची किंमत शेकडो पटींनी वाढवून कोट्यवधींचा घोटाळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) १० जणांच्या विरोधात ३० सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. एफ्.ए. कन्स्ट्रक्शनचे भागिदार आणि जलसंपदा विभागाचे ७ अधिकारी यांची आरोपपत्रात नावे आहेत. तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांचे नाव आरोपपत्रात नसले, तरी त्यांना क्लिन चीट मिळालेली नसून त्यांच्याविषयी पुरावे आढळले, तर त्यांचे नाव या आरोपपत्रात समाविष्ट केले जाणार आहे.
      अजित पवार यांची बाळगंगा घोटाळ्यात नेमकी काय भूमिका होती, याची चौकशी चालू आहे. या घोटाळ्याप्रकरणी ११ जणांविरोधात लाचलुचपत विभागाने तक्रार प्रविष्ट केली होती.
      बाळगंगा धरणाचे कंत्राट मिळवतांना एफ्.ए.कन्स्ट्रक्शनचे ५ अधिकारी यांनी सरकारी अधिकार्‍यांसह मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. यामध्ये धरणाच्या बांधकामाचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आला आहे.

स्वातंत्र्यलढ्यातील असंतोषाचे जनक : लोकमान्य टिळक !

९ ऑगस्ट या दिवशी असणार्‍या क्रांतीदिनाच्या निमित्ताने...
लोकहो, सर्वपक्षीय राजकारणी क्रांतीकारकांना सोयीस्कररित्या 
विसरले असले, तरी तुम्ही असा कृतघ्नपणा करू नका !
१. रॅण्डच्या खुनाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केल्यावरून वर्ष १८९७ 
मध्ये टिळकांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा फर्मावण्यात येणे 
     रॅण्डसाहेबाचा खून झाला, त्याच वेळी शिवजयंती उत्सवाची सभा भरलेली होती. त्यात टिळक आणि इतर यांची भाषणे झाली. त्यात शिवाजीने केलेल्या अफझलखानाच्या वधासंबंधी माहिती सांगण्यात आली. या प्रश्‍नाविषयी शिवाजीच्या टीकाकारांना उत्तर देतांना टिळक म्हणाले, शिवाजीने जे केले ते योग्यच केले आणि पीनल कोडच्या संदर्भात शिवाजीचे मूल्यमापन करता येणार नाही, याचे वृत्त केसरीमध्ये प्रसिद्ध झाले. तेव्हा रॅण्डसाहेबांच्या खुनाचे समर्थन करण्याचा हा प्रयत्न आहे, असा सरकारने अर्थ काढला आणि त्यावरून टिळकांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालला आणि वर्ष १८९७ मध्ये त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा फर्मावण्यात आली.

अत्याचारी ब्रिटीश अधिकार्‍यांच्या खुनांच्या सत्राने उठून दिसलेली क्रांती !

१. ब्रिटीश अधिकार्‍यांनी चालवलेले अमानुष अत्याचार, हेच रॅण्ड 
आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांच्या हत्येचेे कारण !
      पुणे शहरातील प्लेगच्या साथीच्या वेळी ब्रिटीश सैनिकांनी भारतियांवर केलेल्या अमानुष अत्याचारांनी संतप्त झालेल्या चापेकर बंधूंनी २२ जून १८९७ या दिवशी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या षष्ठ्याब्दिसमारंभाच्या दिवशी पुणे शहरात रॅण्डसाहेब आणि लेफ्टनंट आयर्स्टसाहेब या प्लेग साथीच्या नियंत्रण अधिकार्‍यांवर गोळया झाडल्या. ज्युबिली नाईट मर्डर्स म्हणून त्या खुनांचा उल्लेख त्या वेळी ब्रिटिश अधिकारी करत असत. या उठावाचे तात्कालिक कारण म्हणजे, ब्रिटीश अधिकार्‍यांनी भारतियांवर चालवलेले अमानुष अत्याचार हेच होते. पुण्यातील सार्वजनिक हौदांवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या स्त्रियांच्या संतप्त आणि हृदयद्रावक किंकाळ्यांमुळे सूडभावनेने पेटून चापेकर बंधूंनी हे कृत्य केले, असे या संदर्भात सांगितले जाते.

खड्डेच खड्डे; पण उत्तरदायी कोण ?

      सध्या राज्यात पावसाने हाहाःकार उडवला आहे. तसाच हाहाःकार जणू राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांनीही उडवला आहे. सध्या पावसाचे पाणी रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वहाते आहे. यामुळे विशेषतः डांबरी रस्त्यांना तडे जात आहेत आणि भले मोठ्ठे खड्डेही पडत आहेत. काही भागात रस्त्यावरील डांबराचा थर मागे-पुढे सरकून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच शहरी भागातील नागरिकांना वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे ओढे आणि नाले यांवरील पुलांना जोडलेल्या रस्त्यांनाही तडे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे, तर अगदी नव्याने बांधणी केलेल्या डांबरी रस्त्यांचीही वाताहत झाली आहे. त्या रस्त्यांवरीलही डांबर वाहून गेले आणि जागोजागी खड्डे पडले आहेत.

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

      एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या विरामचिन्हांमुळे पालटणारे वाक्याचे अर्थ सांगणारे हे सदर !

     प्रवाहाच्या बरोबर वहाणारे मुडदे असतात. त्या प्रवाहात स्वतःची दिशा ठरवणारे जिवंत असतात ! - डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि साहित्यिक, डोंबिवली, ठाणे. (दैनिक सनातन प्रभात, आषाढ शुक्ल पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५११२ (१७.७.२०१०))

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १० महिने २४ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना २ महिन्यांपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
     केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

महर्षींनी आम्हाला लग्नसमारंभ, गृहप्रवेशाचा कार्यक्रम, कानटोचणीचा प्रसंग अशा ठिकाणी नेण्याचा उद्देश आणि त्यातून ते करत असलेले प.पू. डॉक्टरांच्या प्रसिद्धीचे कार्य !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
कानटोचणीच्या समारंभात सहभागी झालेल्या 
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ (उजवीकडून दुसर्‍या)
१. गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी महर्षींनी 
आम्हाला एका नाडीभक्ताच्या घरी नेणे 
आणि त्यामागचा उद्देश 
     महर्षींच्या आज्ञेप्रमाणे पू. डॉ. ॐ उलगनाथन् आम्हाला बर्‍याच कार्यक्रमांच्या ठिकाणी घेऊन जात असतात. बेंगळुरू येथे असलेल्या एका नाडीभक्ताच्या घरी वास्तुशांतीसाठी आम्हाला ते घेऊन गेले. यातून महर्षींनी सांगितले की, कार्तिकपुत्री (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) इतर संप्रदायांतील भक्तांच्या घरी गेल्याने प.पू. डॉक्टरांचे महत्त्व त्यांच्या लक्षात येऊन भविष्यकाळात हे लोकही आपल्याशी जोडले जातील. तुम्हाला या घरी गृहप्रवेशासाठी नेणे, हे केवळ निमित्त आहे. बाकी प्रसार तर आम्हीच करणार आहोत.

समाजाच्या उत्थानासाठी साधना या विषयांवरील प्रवचनांच्या ध्वनीफितींच्या निर्मितीच्या माध्यमातून यज्ञ करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
१. अध्यात्मप्रसाराचे कार्य वाढवण्यासाठी प्रारंभी प.पू. डॉक्टरांनी अध्यात्माविषयी अभ्यासवर्ग घेणे : वर्ष १९९० ते १९९६ या कालावधीत संस्थेच्या अध्यात्मप्रसाराचे कार्य म्हणून काही जिल्हे, तालुके आणि शहरे या ठिकाणी प.पू. डॉक्टर अभ्यासवर्ग घेत असत. अध्यात्माचे तात्त्विक विवेचन आणि वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती असा अभ्यासवर्गाचा विषय असे. या अभ्यासवर्गात स्वतःकडून आणि शीव गुरुकुलातील साधकांकडून झालेल्या चुका, प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, अभ्यासवर्गात येणार्‍या भाव असलेल्या साधकांच्या साधनेचा आढावा, कुणाचे नाम अल्प पडते ? ते वाढण्यासाठी काय करायला हवे ? सेवावृत्ती, प्रेमभाव वाढण्यासाठी काय करायला हवे ?, असे विविध विषय असत.

संधी मिळेल तेव्हा धर्मप्रसाराला प्राधान्य देणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् !

वृत्तवाहिन्यां समोर यज्ञयागाचे महत्त्व सांगतांना
पू. डॉ. ॐ उलगनाथन् (डावीकडून दुसरे)
     आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी महर्षींनी ईरोड, तमिळनाडू येथे महासुदर्शन याग केला. या महासुदर्शन यागाचे वृत्त संकलन करण्यासाठी तमिळनाडूतील काही दूरचित्रवाणी वाहिन्यांचे (चॅनेलचे) प्रतिनीधीही तेथे आले होते. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी या वृत्तवाहिन्यांना सामोरे जाऊन यज्ञयागाचे महत्त्व काय आहे ?, तसेच हिंदु धर्म समाजात रुजण्यासाठी काय करायला हवे ?, हे तळमळीने सांगितले. पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर अध्यात्मप्रसाराची एकही संधी सोडत नाहीत. यातूनच त्यांची हिंदु धर्माविषयीची प्रसाराची तळमळ दिसून येते.
      एका लग्नसमारंभात गेल्यानंतर तेथे संगीताचा एक कार्यक्रम ठेवला होता. तेथेही व्यासपिठावर चढून पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी संगीत कसे असायला हवे ?, हे सांगितले आणि देवाचे महत्त्वही लोकांना समजावून सांगितले.
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (६.८.२०१६, सकाळी ९.०६)

श्री. योगेश जोशी यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यावर देवाच्या कृपेने स्थिर रहाता येणे आणि त्यांना ईश्‍वराने केलेले साहाय्य !

सौ. भाग्यश्री योगेश जोशी
१. देवाने महत्त्वाच्या सेवा पूर्ण करण्याचा विचार 
देणे आणि त्या पूर्ण करवून घेणे 
     यजमानांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी १५ दिवस मला असे वाटत होते की, आपला पुढचा क्षण आपल्याला ठाऊक नाही. त्यामुळे आपण आपली दैनंदिन सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची घटना घडायच्या दोन दिवस आधी देवाने महत्त्वाच्या सेवा पूर्ण करवून घेतल्या. 
२. यजमानांना रुग्णालयात दाखल केल्याचे भ्रमणभाष येऊनही शांत 
राहून सेवा करणे आणि प.पू. त्यांना सांभाळत आहेत, असे वाटणे 
     ८.५.२०१६ या दिवशी सेवा करत असतांना यजमानांचे पुणे येथून मला भ्रमणभाष येत होेते; परंतु सेवेत व्यस्त असल्याने मी दुर्लक्ष केले. ही माझी चूक झाली. त्यानंतर योगेशना उलटी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे त्यांच्या मित्राने भ्रमणभाषवर मला सांगितले. त्या स्थितीतही मी माझी सेवा चालू ठेवली. थोड्या वेळाने त्यांच्या दुसर्‍या मित्रांचा भ्रमणभाष आला आणि त्यांनी तुम्ही लवकर निघता ना ?, असे विचारले. तरी भय न वाटता आपण जाण्यापेक्षा प.पू. डॉक्टर त्यांच्या समीप आहेत आणि तेच त्यांना सांभाळत आहेत, असे मनातून वाटत होते.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या क्रोएशिया येथील साधक श्री. दाव्होर होर्वात यांना आलेली अनुभूती

श्री. दाव्होर होर्वात
१. पू. प्रा. अशोक नेवासकर यांच्या आगमनाने सभागृहातील चैतन्य वाढून श्‍वास घेणे कठीण होणे आणि त्यांच्यातील प्रेम अन् विनम्रता यांमुळे हलके, तसेच उत्साही वाटणे : कार्यशाळा असलेल्या सभागृहात नगर येथील नाथ संप्रदायाचे गाढे अभ्यासक पू. प्रा. अशोक नेवासकर यांचे आगमन झाल्यानंतर तेथील चैतन्याचे प्रमाण एवढे वाढले की, मला श्‍वास घेणे कठीण होत होते. त्या संतांमध्ये पुष्कळ प्रेम आणि विनम्रता असल्याचे जाणवले. त्यामुळे माझ्यात आंतरिक पालट होऊन मला अधिक हलके आणि उत्साही वाटू लागले. त्यांच्या सहवासात आणखी थोडा वेळ रहावे, असे मला वाटत होते.
२. ध्यानमंदिरात उपाय करतांना तोंडात विचित्र चव येेणे, प.पू. भक्तराज महाराज यांना नमस्कार केल्यावर शरिरात पुष्कळ ऊर्जा जात असल्याचे जाणवणे आणि तीर्थ गोड लागणे : मी आश्रमातील ध्यानमंदिरात उपायांसाठी बसलो होतो. साधारण ४५ मिनिटे उपाय केल्यानंतर माझ्या तोंडात एखाद्या धातूची असावी, तशी विचित्र चव आली. ती चव ५ मिनिटांपर्यंत टिकून होती आणि नंतर ती नाहीशी झाली. त्यानंतर मी प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणकमली नतमस्तक झालो. तेव्हा मला डोक्यामधून हृदयापर्यंत पुष्कळ ऊर्जा जात असल्याचे जाणवले. त्यानंतर मी तेथील तीर्थ घेतले. तेव्हा त्यात मध किंवा साखर घातल्याप्रमाणे ते मला गोड लागले.
- श्री. दाव्होर होर्वात, क्रोएशिया, युरोप. (२६.७.२०१६)

ॐच्या नामपट्ट्या खोलीतील चारही भिंतींवर छतालगत लावल्यावर आलेल्या त्रासदायक अनुभूती

        २८.३.२०१५ या दिवशी खोलीतील छताला लावण्यासाठी ॐच्या ४ नामपट्ट्या दिल्या होत्या; म्हणून मी दुपारी खोलीच्या चारही भिंतींच्या छतालगत असलेल्या नामपट्ट्यांच्या दोर्‍यांना त्या लावल्या. त्यानंतर आम्हाला पुढील अनुभूती आल्या.
१. २८.३.२०१५ ला रात्री खोलीत भूमीवर ३ ठिकाणी डास मेल्याच्या खुणा दिसत होत्या आणि त्यांच्याभोवती बर्‍याच ठिकाणी बारीक-बारीक रक्ताचे डाग उमटलेले दिसत होते.
२. २९.३.२०१५ ला रात्री २.३० वाजता माझे पती श्री. रामचंद्र पांगुळ सेवेसाठी उठले, तर त्यांना खोलीतील देवघरातील श्रीकृष्णाचे चित्र आणि त्याच्यासमोर ठेवलेले उपनेत्र खाली पडलेले दिसले; पण देवघरातील देवाच्या चित्राखालचे वस्त्र, अन्य एक चित्र आणि देवघरातील इतर वस्तू जागच्या जागीच होत्या.
- सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.३.२०१५)

शिबिरात सांगितल्यानुसार भावपूर्ण स्वयंसूचना सत्र करतांना पुणे येथील सौ. ज्योती दाते यांना आलेली अनुभूती !

सौ. ज्योती दाते
       रामनाथी आश्रमात झालेल्या शिबिरात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, स्वयंसूचना सत्र शरण जाऊन आणि मनापासून करायला हवे. मी अशा प्रकारे सत्र करण्याचा प्रयत्न केल्यावर मला दिवसभर आनंद मिळून पुढील अनुभूती आली.
१. श्रीकृष्णाने (रामनाथी आश्रमातील खोलीत, म्हणजे) वैकुंठातील खोलीत बसून स्वयंसूचना सत्र करण्याचे भाग्य लाभले आहे, असे सांगणे : एकदा मी रामनाथी आश्रमातील एका खोलीत श्रीकृष्णाला समवेत घेऊन स्वयंसूचना सत्र केले. तेव्हा श्रीकृष्णाने मला सांगितले, तू पुष्कळ भाग्यवान आहेस. तुला वैकुंठातील या खोलीत बसून सत्र करण्याची संधी मिळाली. अखंड ब्रह्मांडात प्रतिदिन एकाच जिवाला ही संधी मिळत असते. 

बार-बार है एक ही प्रार्थना ।

सौ. नीलिमा सप्तर्षि
       श्रावण शुक्ल पक्ष षष्ठी (९.८.२०१६) या दिवशी ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नीलिमा सप्तर्षि यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी प.पू. डॉक्टरांना केलेली काव्यरूपी प्रार्थना पुढे देत आहोत.
सौ. नीलिमा सप्तर्षि यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
किया ८० वें वर्ष में पदार्पण,
गुरु चरणों में (स्वयं को) करती हूं अर्पण,
सदैव होता रहे उनका स्मरण,
उनका ही रहे प्रतिपल चिंतन,
प्रतिक्षण उनका होता रहे मनन ॥ १ ॥
संसार में अब कुछ रहा नहीं,
ईश्‍वर के सिवा अन्य विचार नहीं ॥ २ ॥

वाहनातून प्रवास करतांना वाटेत पुरामुळे निर्माण झालेली संकटे गुरुकृपेने दूर होणे आणि मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडता येणे

भीषण नैसर्गिक आपत्तीत सद्गुरु (कु.) स्वाती 
खाडये आणि साधक यांनी अनुभवलेली गुरुकृपा 
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
१. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूरकडे जातांना मार्गावरील पुरातील पाण्यात वाहन अडकणे आणि गुरुकृपेमुळेच त्यातून आमचे रक्षण होणे : ९ जुलै २०१६ या दिवशी मी आणि माझ्यासोबत अन्य दोन, असे आम्ही तिघे जण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स्कॉर्पिओ गाडीतून कोल्हापूरकडे जायला निघालो होतो. रात्रीचे १० वाजले होते आणि कोल्हापूर ३५ ते ४० किलोमीटर एवढ्या अंतरावर राहिले होते. पाऊस आणि जोराचा वारा चालू होता आणि रस्त्यावर पाणी साचले होते. गाडीची डिपर लाईट बंद पडली होती. त्यामुळे रस्त्यावर पाणी किती साचले आहे, याचा अंदाज येत नव्हता आणि खाली उतरूनही पाण्याचा अंदाज घेणे शक्य होत नव्हते. अशा स्थितीत पाण्यातून वाहन चालवतांना लक्षात आले की, आमच्या गाडीचा अर्ध्याहून अधिक भाग पाण्याखाली बुडाला होता आणि गाडी मागे वळवून घेणेही शक्य नव्हते. त्यामुळे आमच्या समोर मोठे संकटच उभे ठाकले होते. या वेळी आम्ही तिघांनी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करून जयघोष केला आणि त्या पाण्यातून गाडी बाहेर काढली. त्यानंतर पुढचा प्रवास करावा कि नको, असा प्रश्‍न पडला. त्याचक्षणी एक घर दिसले. त्या घरातील एका काकूंकडे पुढच्या मार्गाविषयी चौकशी केली असता काकू म्हणाल्या, पुढे जाऊ नका; कारण पुढे पाणी पुष्कळ आहे आणि एक ट्रकही पाण्यात बुडाला आहे. असाच पाऊस पडत राहिला, तर चार दिवस पाणी ओसरणार नाही. ती संपूर्ण रात्र जंगलात काढावी लागली. या संपूर्ण कालावधीत प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच आमचे रक्षण झाले. भीषण आपत्काळ काय असतो, याचा अक्षरशः आम्ही अनुभव घेतला. त्या संपूर्ण परिस्थितीत प.पू. गुरुदेवच सतत आमच्या बरोबर होते, याची अनुभूती आली. सकाळी आमच्या गाडीचे निरीक्षण केले असता गाडीत कुठेही पाणी शिरले नव्हते.

गणेशचतुर्थी, पितृपक्ष, नवरात्र, दिवाळी यांच्या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ, ध्वनीचकत्या, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना
    सप्टेंबर-ऑक्टोबर २०१६ या कालावधीत गणेशचतुर्थी, पितृपक्ष, नवरात्र, तसेच दिवाळी असणार आहे. त्या निमित्ताने ग्रंथ, ध्वनीचकत्या, सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी गुरुकृपेमुळे लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेल्या प्रसारसाहित्याचे अधिकाधिक वितरण करावे.
१. ग्रंथ
अ. दत्त (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)
आ. श्राद्ध (भाग १) महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन
इ. श्राद्ध (भाग २) श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र
ई. पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र
उ. पूजेपूर्वीची वैयक्तिक सिद्धता (शास्त्रासह) ऊ. देवपूजेपूर्वीची सिद्धता
ए. पूजासाहित्याचे महत्त्व
ऐ. सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र
ओ. धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र
अं. श्रीविष्णु (कार्य, वैशिष्ट्ये आणि उपासनेमागील शास्त्र)
क. देवालय दर्शन (भाग १)
(देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वी करायच्या कृती आणि त्यांमागील शास्त्र)

हिंदूंनो, कन्यागत महापर्वकालाच्या निमित्ताने सनातन संस्था आयोजित ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांचा लाभ घ्या !

     आनंदप्राप्तीसाठी धर्माचरणासह योग्य साधना करणे आवश्यक आहे. सनातनचे ग्रंथ धर्माचरण व साधना या संदर्भात मार्गदर्शन करतात. देवालय दर्शन, नामजप, श्राद्ध आदी विषयांवरील ग्रंथ, तसेच धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन पहाण्यासाठी अवश्य भेट द्या. -
दिनांक : १० ते २० ऑगस्ट २०१६ (सकाळी ९ ते रात्री १०)
स्थळ :
१. श्री विठ्ठल मंदिराशेजारी, नृसिंहवाडी
२. श्री दत्तविद्यामंदिर कमानीशेजारी, नृसिंहवाडी
३. श्री हनुमान मंदिराशेजारी, शिरोळ-वाडी रोड

राखीपौर्णिमेला बहिणीला अशाश्‍वत भेट देण्याऐवजी चिरंतन तत्त्वाचा प्रसार करणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक बनवा आणि ज्ञानामृत असलेली अनोखी ओवाळणी द्या !

वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !
१. राखीपौर्णिमेचे महत्त्व !
     श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! या वर्षी १८.८.२०१६ या दिवशी राखीपौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भावाने आपले रक्षण करावे, यासाठी बहीण या दिवशी भावाला ओवाळते आणि राखी बांधते. भाऊ बहिणीला पैसे अथवा तिला उपयोगी पडेल, अशी वस्तू ओवाळणी म्हणून देतो.
२. येणार्‍या काळाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आपल्या 
भगिनीला सक्षम बनवण्याकरता सनातन प्रभातचे वाचक बनवा !
     सद्यःस्थितीत सामाजिक परिस्थिती बिकट असल्याने स्त्रियांंना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांविषयी त्यांना अवगत करून सतर्क करणे, ही काळाची आवश्यकता आहे. हे समाजोपयोगी कार्य करण्यासाठी नियतकालिक सनातन प्रभात अविरत कार्य करत आहे. स्त्रियांंंमधील सतर्कता वाढवणारे, त्यांना स्व-संरक्षणासाठी उद्युक्त करणारे, तसेच अनुचित प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी साधनेचा आधार देणारे वाचनीय लेख या नियतकालिकात नियमित प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे मनोधैर्य त्यांच्यात निर्माण होत आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
व्यावहारिक प्रश्‍न आणि संत
     संत उत्स्फूर्तपणे बोलतात ते खरे. एखाद्याच्या प्रश्‍नाला लगेच उत्तर दिले तर ते खरे समजायचे, थोड्या वेळाने दिले तर ते खोटे असू शकते. एखाद्याने प्रश्‍न विचारल्यावर संत उत्तर देतात, ते बहुधा त्याला बरे वाटावे असे असते. (हे उत्तर बिंब- प्रतिबिंब या न्यायाने असते; म्हणजे त्याला जे उत्तर हवे असते (बिंब), त्याचे प्रतिबिंब संतांच्या मनात पडून ते त्याप्रमाणे सांगतात.) संतांना व्यवहारातील प्रश्‍नांविषयी, म्हणजे मायेविषयी, काहीही सांगायला आवडत नाही. संत अध्यात्मविषयक प्रश्‍नांची उत्तरे आवडीने सांगतात आणि ती कधीच चुकीची असत नाहीत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
आद्य शंकराचार्यांनी विरोधी पंडितांशी वाद-विवाद करून त्यांचा पराभव केला; मात्र हल्लीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना, धर्मद्रोह्यांना वाद-विवाद करून हरवता येत नाही; कारण त्यांचा धर्माचा काडीइतकाही अभ्यास नसल्याने ते वाद-विवाद करण्यास पुढे येत नाहीत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्वभावदोषांमुळे घडणार्‍या चुका 
तुमच्यातील स्वभावदोष तुम्हाला सांगणारा तुमचा खरा मित्र आणि हितचिंतक असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

राष्ट्रद्रोह्यांना कठोर शासन हवे !

संपादकीय 
       लवकरच १५ ऑगस्ट २०१६ ला आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करू ! दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्याच्या ६८ वर्षांनंतरही भारतात अशा अनेक नतद्रष्ट प्रवृत्ती आहेत की, ज्या देशाच्या स्वाभिमान ज्याच्यातून व्यक्त होतो, असे राष्ट्रगीत म्हणण्यासही नकार देण्यास मागेपुढे बघत नाहीत. देशातील काही मदरसे आणि कॉन्व्हेंट शाळा यांमध्ये राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिल्याची वृत्ते येत असतातच. तशीच एक घटना उत्तरप्रदेश येथे घडली आहे. उत्तरप्रदेशातील एम्.ए. कॉन्व्हेंट नावाच्या शाळेत गेल्या १२ वर्षांपासून राष्ट्रगीत गाण्यात आलेले नाही.

भारतद्वेष नसानसांत भिनलेला पाकिस्तान !

संपादकीय
      भारतीय राज्यकर्ते पाकिस्तानला कितीही चांगली वागणूक देत असले, अचानक जाऊन त्यांच्या गळाभेटी घेत असलेे, तरी पाकिस्तानच्या मनात मात्र भारतद्वेष नसानसांत भिनलेला असून पाक भारतीय राज्यकर्ते, पत्रकार यांचा अवमान करण्याचा एकही प्रसंग सोडत नाही. नुकतेच पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे सार्क देशांमधील गृहमंत्र्यांचे एकत्रित संमेलन पार पडले. या संमेलनात पाकिस्तानने भारतातील केंद्रीय गृहमंत्र्यांचे भाषण तर दाखवलेच नाही, त्याही पुढे जाऊन भारताचे गृहमंत्री पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमवेत चर्चा करतांना ते देहली येथे दूरभाष करण्यासाठी आठ वेळा शौचालयात गेले, अशी खोटी वृत्ते दाखवून त्यांचा घोर अवमानही केला. खरे तर राजनाथ सिंह यांनी शौचालयाचा उपयोग दोन वेळाच केला होता आणि बैठकीत अडचण नको म्हणून राजनाथ यांनी बैठकीत स्वत:जवळ भ्रमणभाषही ठेवला नव्हता. पाकिस्तानच्या प्रसिद्धीमाध्यमांमध्येही भारतद्वेष प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्यानेच त्यांनी अशी खोटी वृत्ते दाखवून भारतीय नेत्याची मानहानी केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn