Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

लष्कर-ए-इस्लाम संघटनेने हिंदूंना काश्मीर सोडण्याची धमकी देणारी भित्तीपत्रके लावली !

पीडीपी-भाजपच्या राज्यात काश्मीरमधील हिंदूंची दयनीय स्थिती !
    श्रीनगर - लष्कर-ए-इस्लाम या संघटनेने काश्मिरी हिंदूंना काश्मीर खोर्‍यातून निघून जावे अथवा मरण्यास सिद्ध व्हावे, अशा मजकुराची भित्तीपत्रके लावली आहेत. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला असून ते चौकशी करत आहेत. ही भित्तीपत्रके दक्षिण काश्मीरमधील हाल-पुलवामामध्ये लावण्यात आली आहेत. येथे ७-८ जुलैला विस्थापित काश्मिरी पंडित कर्मचार्‍यांच्या घरांवर देशद्रोह्यांनी दगडफेक केली होती. तसेच येथील हिंदूंच्या रिकाम्या घरांना आग लावली. या वेळी ६०० हिंदूंनी येथून पलायन केले होते.
     या भित्तीपत्रकांत पुढे म्हटले आहे की, काश्मीला इस्रायल बनवू पहाणार्‍या आणि काश्मिरी मुसलमानांची हत्या करण्याचा विचार करणार्‍या काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये कोणतीही जागा नाही. तुम्ही तुमची सुरक्षा दुप्पट-तिप्पट करून घ्या; तरीही तुम्ही मरण्यासाठी सिद्ध रहा.
     लष्कर-ए-इस्लामी ही जिहादी संघटना बरेलवी आणि शिया मुसलमानांनाही शत्रूू समजते. २००४ मध्ये ही संघटना पाकच्या खैबर भागात सक्रीय होती. मार्च २०१५ मध्ये तिने तहरीक-ए-तालिबानबरोबर हातमिळवणी केली. या संघटनेचे काश्मीरमधील नेतृत्व क्यूम नजार नावाचा आतंकी करत आहे.

परभणीतून इसिसचा आणखी एक धर्मांध अटकेत

पुरोगामी कधी इसिसची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी 
कोम्बिंग ऑपरेशनची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !
     परभणी - येथील मदिनानगरमधून इसिसचा संशयित आतंकवादी म्हणून शेख इकबाल शेख कबीर अहमद याला आतंकवादविरोधी पथकाने ७ ऑगस्टला अटक केली. काही दिवसांपूर्वी नासेरबिन चाऊस आणि मोहंमद शाहीद खान या दोघांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली होती. हे तिघेही मित्र आहेत. चाऊसने बॉम्ब सिद्ध केल्याचेही स्पष्ट झाले होते. महंमदकडून दीड किलोचा रिमोट कंट्रोल आयईडी बॉम्बही हस्तगत करण्यात आला होता.

शेगाव आणि शिर्डी येथील मंदिरांत बॉम्बस्फोट करण्याची इसिसची धमकी

प्रत्येक राष्ट्रीय सण आणि धार्मिक उत्सव यांवेळी हिंदूंवर असणारी आतंकवादाची टांगती 
तलवार दूर होण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेविना पर्याय नाही !
४ रेल्वेस्थानके आणि शेगावचे न्यायालयही उडवण्याची धमकी
      अमरावती - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर शेगाव आणि शिर्डी येथील मंदिरे, तसेच अमरावती, मलकापूर, भुसावळ अन् जळगाव येथील ४ प्रमुख रेल्वेस्थानके, तसेच शेगावचे न्यायालय बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी इसिसच्या भारतातील म्होरक्यांनी एका पत्राद्वारे दिली आहे. हिंदुस्थान मुर्दाबाद, पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा लिहिलेले हे पत्र जळगावच्या जिल्हाधिकार्‍यांना ५ ऑगस्ट या दिवशी मिळाले. या पार्श्‍वभूमीवर राज्य गुप्तवार्ता विभागाने राज्यात सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले आहेत. पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, विश्‍व हिंदु परिषदेचे प्रमुख डॉ. प्रवीण तोगाडिया यांनाही ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यासाठी संभाजीनगर, परभणी, अकोला, खामगाव येथील कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे एके-४७, बुलेटपू्रफ जॅकेट, तसेच जिवंत काडतुसे असल्याचे, तसेच अजमल कसाब हा चांगला माणूस असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

खर्‍या गोरक्षकांनी नकली गोरक्षांवर लक्ष ठेवावे ! - पंतप्रधान मोदी

राज्यघटनेत गोरक्षणाचा उल्लेख असल्याने आता 
सरकारनेच गोरक्षणाचे कार्य प्रभावीपणे हाती घ्यावे !
     नवी देहली - काही मूठभर लोक गोरक्षेच्या नावाखाली समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते भारताच्या एकतेमुळे त्रस्त आहेत. मी खर्‍या गोरक्षकांना आणि गोसेवकांना प्रार्थना करतो की, त्यांनी सतर्क राहून स्वतःचे चांगले काम या नकली लोकांनी खराब करू नये, यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी ७ ऑगस्ट या दिवशी केले. ते तेलंगणच्या मेडक येथील एन्टीपीसी थर्मल पावर प्रॉजेक्टच्या पहिल्या फेजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
     ६ ऑगस्टला त्यांनी गोरक्षकांविषयी केलेल्या टीकेनंतर हे विधान केले आहे. मोदी यांनी राज्य सरकारांनाही आवाहन केले की, अशा नकली गोरक्षकांना शोधून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी. गोसेवा करणे म्हणजे राष्ट्राची संपत्ती वाढवण्यासारखे आहे. शेतकरी, शेत आणि गाव यांना वाचवण्यासाठी गोरक्षकांपासून सावध व्हा. गोरक्षणाचे निर्देश राज्यघटनेत दिले आहेत.

६ ऑगस्टला देहलीत एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांविषयी केलेली विधाने
१. रात्री गुन्हेगारी कारवाया करणारे दिवसा गोरक्षकाचा मुखवटा ओढून घेतात. त्यांनी गोरक्षणाची दुकाने थाटली आहेत. हे सर्व पाहून संताप येतो.
२. राज्य सरकारांनी अशा गोरक्षकांचे अहवाल बनवावेत, त्यामध्ये ८० टक्के गोरक्षक हे समाजकंटक असल्याचे आढळतील.
३. गोसेवा करायची असेल, तर गायीला प्लास्टिक खाण्यापासून थांबवा; कारण कत्तलीपेक्षा प्लास्टिक खाऊन अधिक गायी मरतात. दुसर्‍यांना त्रास देऊन गायीची सेवा होत नाही.

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

मुंबई येथे महापौर 
आणि प्रशासन यांना निवेदन ! 

छायाचित्रात डावीकडून श्री. मिलिंद पोशे, डॉ. उदय
धुरी, निवेदन स्वीकारतांना महापौर सौ. स्नेहल आंबेकर

        मुंबई, ७ ऑगस्ट (वार्ता.) - महापौर सौ. स्नेहल आंबेकर आणि उपजिल्हाधिकारी श्री. चंद्रकांत थोरात यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेच्या अंतर्गत ३ ऑगस्ट या दिवशी निवेदन देण्यात आले. प्लास्टिकच्या ध्वजांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथे आजपासून पनून काश्मीरची २ दिवसीय परिषद !

ओडिशाचे राज्यपाल एस्.सी. जमीर यांच्याशी
चर्चा करतांना डावीकडून सर्वश्री रवी अगरवाल, मुरली
मनोहर शर्मा, अनिल धीर, रमेश शिंदे आणि प्रकाश मालोंडकर

        भुवनेश्‍वर - भारत रक्षा मंच आणि इतर १५ राष्ट्रप्रेमी अन् हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथे ८ आणि ९ ऑगस्ट या दिवशी एक भारत अभियान - कश्मीर की ओर या मोहिमेच्या अंतर्गत दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या अंतर्गत देशभरात घेण्यात येत असलेल्या परिषदांपैकी ही ७ वी जनजागृती परिषद आहे. या परिषदेला देशभरातील १६० राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा असून पनून काश्मीर ही संघटना गेली २५ वर्षे काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी लढा देत आहे. तिला क्रियाशील पाठिंबा देण्यासाठी सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतात ८९३ रुग्णांमागे केवळ एक डॉक्टर !

स्वातंत्र्यानंतर गेल्या ६८ वर्षांत भारताने केलेली प्रगती !
      नवी देहली - देशातील अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, उनानी आणि होमिओपॅथी या क्षेत्रांतील डॉक्टरांची संख्या पहाता प्रत्येक ८९३ रुग्णांमागे एक डॉक्टर अशी सरासरी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री फगन सिंह कुलस्ते यांनी नुकतीच लोकसभेत एका लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. देशात ९ लाख ५९ सहस्र अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांची, तर ६ लाख ७७ सहस्र आयुर्वेद, उनानी आणि होमिओपॅथी क्षेत्रातील डॉक्टरांची नोंद आहे. केवळ अ‍ॅलोपॅथीचा विचार केल्यास १ सहस्र ६८१ रुग्णांमागे एक डॉक्टर, अशी सरासरी आहे, अशी माहिती कुलस्ते यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातील अनेक अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांकडे वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नाही. या विषयी विचारलेल्या प्रश्‍नावर कुलास्ते यांनी इंडियन मेडिकल काऊन्सिल अ‍ॅक्ट, १९५६ या कायद्याचा दाखला देत राज्याच्या वैद्यकीय रजिस्टरवर नोंद असलेले डॉक्टरच केवळ वैद्यकीय व्यवसाय करू शकतात, असे उत्तर दिले. (मंत्र्यांनी मूळ प्रश्‍नाचे उत्तर देणे आणि ती समस्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना केली, हे नेमकेपणाने सांगणे अपेक्षित आहे ! - संपादक)(म्हणे) हिंदूंच्या देवतांना नैवेद्य म्हणून दिलेले भोजन खाणार नाही !

उज्जैन (मध्यप्रदेश) येथील ५६ मदरशांनी माध्यन्ह भोजन बंद केले !
 • मुसलमानांचा सर्वधर्मसमभाव !
 • हिंदु शेतकरी त्याच्या शेतात उगवलेले धान्यातील काही भाग प्रथम देवाला अर्पण करतो आणि नंतर बाजारात विकतो; मग असे अन्य मदरशातील लोकांना कसे चालते ?
 • हिंदूंनी अन्य धर्मियांनी बनवलेले माध्यन्ह भोजन नाकारले असते, तर एकजात सर्व ढोंगी निधर्मीवादींनी हिंदूंना धर्मांध, तालिबानी आदी विशेषण लावून विरोध केला असता !
 • नरेंद्र मोदी यांनी मुसलमानांची गोल टोपी घातली नाही; म्हणून त्यांच्यावर टीका करणारे आता तोंड उघडतील का ?
 • इफ्तारची पार्टी देणारे राजकीय पक्ष यावर तोंड उघडतील का ?
     उज्जैन (मध्यप्रदेश) - येथील ५६ मदरशांनी सरकारकडून देण्यात येणारे माध्यन्ह भोजन घेण्यास नकार दिला आहे. या मदरशांच्या प्रशासनाचे म्हणणे आहे की, आम्हाला हिंदूंनी बनवलेल्या भोजनावर आक्षेप नाही, तर विद्यार्थ्यांना भोजन देण्यापूर्वी ते हिंदूंच्या देवतांना नैवेद्य म्हणून दिले जाते. त्यामुळे असे पूजा-अर्चा करून दिलेले भोजन आम्ही स्वतःही खाणार नाही आणि विद्यार्थ्यांनाही देणार नाही.

हिंदु देवतांच्या चित्रांशी आक्षेपार्ह कृत्य करतांनाचे चित्र आणि ध्वनीफीत प्रसारित केल्यावरून बिहारच्या छपरा जिल्ह्यात दंगल

 • हिंदूंच्या धार्मिक भावनांची त्वरित नोंद न घेता त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडणारे प्रशासन या दंगलीला उत्तरदायी आहे !
 • आरोपींच्या विरोधात तक्रार करूनही २ दिवस पोलीस कारवाई नाही !
 • प्रार्थनास्थळांवर दगडफेक
        पाटलीपुत्र (पाटणा) - छपरा जिल्ह्यातील मकेरमध्ये एका युवकाने हिंदु देवी-देवतांच्या चित्रांशी आक्षेपार्ह कृत्य करतांनाचे चित्र आणि ध्वनीचित्रफीत भ्रमणध्वनीवर प्रसारित केली. त्यामुळे ५ आणि ६ ऑगस्टला परिसरात मोठ्या प्रमाणात दंगल भडकली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी पथसंचलन केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची चौकशी चालू आहे. सध्या वातावरण शांत असले, तरी परसा, सोनहो आणि भेल्दी या ठिकाणी तणाव कायम आहे.
१. छपरातील साहेबगंज भागात दोन गटांतील लोकांनी एकमेकांच्या प्रार्थनास्थळांवर दगडफेक केली, तसेच एका ठिकाणी पेट्रोल बॉम्ब फेकून आग लावण्यात आली.
२. दोन गटांत मारामारी होऊन अनेक जण घायाळ झाले. या कालावधीत लोकांनी मकेर गावातील आरोपीचे घर पेटवून दिले. आरोपीने घर बंद करून कुटुंबासह पलायन केले होते.

संभाजीनगरमधील पोलीस अधीक्षक कार्यालय होते इसिसच्या हस्तकांचे लक्ष्य !

 • आतंकवादी पोलीस अधीक्षक कार्यालयाची रेकी करतात, हे देशातील गुप्तचर यंत्रणांच्या लक्षात का येत नाही ?
 • आतंकवादविरोधी पथकाच्या तपासातून माहिती उघड
      संभाजीनगर, ७ ऑगस्ट - येथील पोलीस अधीक्षक कार्यालयावर आणि त्याच्या परिसरात आक्रमण करण्याचा इसिस च्या हस्तकांचा प्रयत्न होता, तसेच त्यांनी कार्यालयाच्या परिसराची आणि पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या शासकीय निवासस्थानाची रेकीही केली होती, अशी धक्कादायक माहिती आतंकवादविरोधी पथकाच्या तपासात समोर आली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही या माहितीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
      ५ ऑगस्ट या दिवशी आतंकवादविरोधी पथकाने नासेरबिन चाऊस आणि मोहंमद खान यांना समवेत घेऊन त्यांच्या घराची झडती घेतली. (हिंदुत्वनिष्ठांच्या घरांची झडती घेतांना तपासयंत्रणांकडून काही वेळा कोणतीही पूर्वकल्पना न देता झडती घेतली जाते; मात्र धर्मांधांच्या घरी झडती घेतांना त्यांना समवेत घेतले जाते, हा तपासयंत्रणांचा हिंदुद्वेष / दुजाभाव नव्हे का ? - संपादक) यात काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. नासेरबिन चाऊस याला काही दिवसांपूर्वी परभणी येथून इसिसच्या संपर्कात असल्याच्या, तसेच बॉम्ब बनवण्यासाठी साहाय्य केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रात घातपात घडवून आणण्याचे दायित्व याच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती आतंकवादविरोधी पथकाला मिळाली होती.

(म्हणे) गोवंश हत्याबंदी शेतकरीविरोधी ! - शेतकरी संघटना

छत्रपती शिवाजी महाराजांचे 
नाव घेणारे ब्रिगेडी गोवंश हत्याबंदी 
उठवण्यासाठी आंदोलने करतात !
        अमरावती - राज्य सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा केल्याने २५ लाख लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा कायदा रहित व्हावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे. संघटनेच्या वतीने ९ ऑगस्ट या दिवशी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
        विहिंप, बजरंग दल, शिवसेना यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांना गोवंश हत्याबंदीमुळे नवे कुरण मिळाले आहे. शेतकरी, कुरेशी, दलित यांच्यात त्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. राज्य शासनाने ही गोवंश हत्याबंदी, तसेच वन्यजीव संरक्षण असे कायदे करून शेतकर्‍यांची हानी केली, असे आपेट यांनी सांगितले. या वेळी दिनकर दाभाडे म्हणाले की, गोवंश हत्याबंदी हा शेतकरीविरोधी कायदा आहे. या कायद्यामुळे जनावरांचा व्यवसाय कोलमडला आहे. (गोवंश भाकड किंवा वृद्ध झाला म्हणून त्याची विक्री करणे, हे चुकीचेच आहे. अशा गोवंशापासून होणार्‍या विविध आर्थिक लाभांची शेतकर्‍याला कल्पना दिली, तर तो गोवंश विकणारच नाही. - संपादक)

जम्मू-काश्मीरमध्ये मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती आणि उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन !

आतंकवादी बुरहान वानीला अप्रत्यक्षपणे पाठीशी घातल्याचे प्रकरण !
      कठुआ (जम्मू-काश्मीर) - जम्मू-काश्मीर राज्याच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती आणि उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी जिहादी आतंकवादी बुरहान वानीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या दोघांच्या विरोधात शिवसेनेने कठुआ येथील राजबाघ परिसरात नुकतेच निषेध आंदोलन केले. या आंदोलनात शिवसेनेच्या प्रदेशाध्यक्षा डिंपी कोहली यांच्यासह २०० शिवसैनिक उपस्थित होते. (आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्‍यांच्याचा विषय असो अथवा देशाच्या मूळावर उठलेली कोणतीही समस्या असो, त्या विरोधात राजकीय पक्षांमध्ये केवळ शिवसेनाच तत्परतेने आंदोलन करते, हे लक्षात घ्या ! - संपादक) या वेळी शिवसैनिकांनी २ घंटे रस्ता बंद आंदोलनही केले. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी बुरहान वानी या जिहादी आतंकवाद्याचे अप्रत्यक्ष समर्थन करत म्हटले होते की, आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या वेळी सैनिकांना तेथे बुरहान वानी असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे तो मारला गेला, तर उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी म्हटले होते की, बुरहान वानीची चकमक हा एक अपघात होता.मध्यप्रदेशमधील वायुदल तळात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या सद्दाम हुसेन यास अटक !

अशांवर कठोर शिक्षा केली पाहिजे !
      भोपाळ - ग्वॉल्हेर येथील भारतीय वायुदलाच्या महाराजपूर वायुतळात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या सद्दाम हुसेन नावाच्या ३० वर्षीय धर्मांधास अटक करण्यात आली आहे. वायुदलाच्या अधिकार्‍यांनी त्या संशयिताला पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी सद्दाम हुसेन हा गाझियाबाद येथील रहिवासी असून कंत्राटी कामगार असल्याचे भासवून त्याने या तळामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावर्षांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये २ तरुणांनी महाराजपूर वायुदालाच्या तळात घुसण्याचा प्रयत्न केला होता.१४ वर्षांच्या अल्पवयीन गुन्हेगाराला कारागृहात पाठवणारा कायदा संमत !

अल्पवयिनांकडून होणारे गुन्हे रोखण्यासाठी इस्रायलची तत्परता !
     तेल अवीव (इस्रायल) - इस्रायलच्या संसदेने आतंकवाद आणि अन्य गुन्ह्यांच्या आरोपाखाली १४ वर्षांच्या अल्पवयीन गुन्हेगारांनाही कारागृहात पाठवणारा नवीन कायदा संमत केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे या नवीन कायद्यानुसार हत्या, हत्येचा प्रयत्न किंवा आतंकवादी प्रकरणांमध्ये दोषी आढळणार्‍या अल्पवयिनांनाही कारावासाची शिक्षा होऊ शकणार आहे. येथील समाजात अनेक प्रकरणांमध्ये १२ वर्षांची मुले आत्मघातकी आक्रमणांच्या प्रकरणांत दोषी आढळून आली होती. या पार्श्‍वभूमीवर तेथे कठोर कायद्याची आवश्यकता निर्माण झाली होती. लिकुड पक्षाचे नेते एम्.के. अनट बॅरको हा कायदा संमत करतांना म्हणाले, हत्या करणारा १२ किंवा १५ वर्षे वयाचा असला, तरी त्यालाही शिक्षा झाली पाहिजे.

हिमाचल प्रदेशातील कसोल गावात भारतीय पुरुष पर्यटकांना प्रवेशबंदी !

देशातील एका गावात भारतीय नागरिकांना प्रवेशबंदी असणे, 
हे घटनेच्या विरोधात असतांना प्रशासन गप्प का ?
येथील इस्रायली महिलांची छेड काढत असल्याचे कारण !
     नवी देहली - कोणत्याही भारतीय नागरिकाला देशात कुठेही जाण्याचा अधिकार आहे; परंतु हिमाचल प्रदेशमधील कसोल या गावात मात्र भारतीय पुरुषांना प्रवेशबंदी आहे. येथे मोठ्या प्रमाणात इस्रयली कुटुंब रहात असून येथे येणार्‍या पुरुष पर्यटकांकडून इस्रायली महिलांची छेड काढली जात असल्याने स्थानिक नागरिक, तसेच खासगी पर्यटन व्यवसायिक यांनी ही बंदी घातली आहे. हे गावच विदेशी गावाप्रमाणे झाले असून ते भारतातच आहे का, असा प्रश्‍न पडल्याविना रहात नाही.

पंजाबमध्ये रा.स्व. संघाचे ज्येष्ठ नेते आणि निवृत्त ब्रिगेडिअर जगदीश गंगेजा यांच्यावर खलिस्तानवाद्यांकडून गोळीबार !

पंजाबमधील खलिस्तानी आतंकवादाने पुन्हा उचल 
खाण्यापूर्वी शासनाने त्या विरोधात कृती केली पाहिजे !
     जालंधर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते ब्रिगेडिअर (सेवानिवृत्त) जगदीश गंगेजा यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या खलिस्तानवाद्यांनी ६ ऑगस्टच्या रात्री गोळीबार केला. यात घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना ३ गोळ्या लागल्या आहेत. गंगेजा हे पंजाब प्रांताचे सहसरसंघचालक आहेत. पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंह यांनी या आक्रमणाचा निषेध केला.

दुधात भेसळ करणार्‍यांना आजन्म कारावासाची शिक्षा द्या ! - सर्वोच्च न्यायालय

      नवी देहली - भेसळयुक्त दूध वाढत्या वयातील मुलांच्या शरीरिक प्रक्रियांवर परिणाम करत आहे. दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. दुधात भेसळ करणार्‍यांना देण्यात येणारी ६ मासांची शिक्षा आणि दंड पुरेसा नसून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा दिली, तरी हरकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
    सर्वोच्च न्यायालयातील मुख्य खंडपिठाचे न्या. टी.एस्. ठाकूर आणि न्या. आर्. भानुमती यांच्या खंडपिठासमोर या विषयीची सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले की, उत्तरप्रदेश, बंगाल आणि ओडिशा या राज्यांत दुधात भेसळ करणार्‍यांना आजन्म कारावासाची शिक्षा होण्यासाठी आधीच कायदे अस्तित्वात आहेत; मात्र हे कायदे आता देशभरात राबवण्याची आवश्यकता आहे. वर्ष २०११ च्या दूध भेसळीच्या अहवालाचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, अन्न सुरक्षा आणि एफ्एस्एस्एआय या संघटनेने विक्री केलेल्या ६८ टक्के दुधात भेसळ असल्याचे समोर आले होते.

फेसबूकवरील भारतविरोधी मजकुराचे समर्थन करणार्‍या काश्मिरी तरुणास अटक !

     नवी देहली - फेसबूकवर भारतविरोधी मजकुराला समर्थन देणार्‍या तौफीक अहमद या काश्मिरी तरुणास छत्तीसगड पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे. तौफीक अहमदने फेसबूकवर भारतविरोधी मजकुराचे नुसतेच समर्थन केले असे नाही, तर तो मजकूर इतरांनाही पाठवला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर बजरंग दलाचे भिलाई जिल्हाप्रमुख रतन यादव यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. (देशद्रोह्यांच्या विरोधात तत्परतेने पोलीस तक्रार करणार्‍या रतन यादव यांचे अभिनंदन ! जी घटना एका हिंदुत्वनिष्ठाला लक्षात येते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का लक्षात येत नाही ? - संपादक)

इटलीमध्ये बॉम्बस्फोटाचा कट रचणार्‍या अफताब फरूक या तरुणाची पाकमध्ये रवानगी !

आतंकवादाला धर्म नसतो म्हणणार्‍यांनो, आतंकवादाच्या घटनांत सापडणारे 
बहुतेक आरोपी हे एकाच धर्माचे असतात, हे लक्षात घ्या !
      रोम - इटलीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचणार्‍या अफताब फरूक नावाच्या तरुणाची पाकमध्ये रवानगी करण्यात आली. अफताब इटालियन युथ क्रिकेट टीमचे कर्णधारपद भूषवत होता. उत्तर इटलीमधील बेरगामो विमानतळ किंवा मिलन शहरातील दारूचे दुकान यांवर एके-४७ रायफल किंवा बॉम्ब यांद्वारे आक्रमण करण्याविषयी व्हायर टॅप या संदेशवहन यंत्रणेवरून बोलतांना फरूक याला पकडण्यात आले होते, अशी माहिती इटलीच्या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली आहे. 
      २६ वर्षीय अफताब फरूक इसिसचा समर्थक असून सिरीयामध्ये जाण्याची त्याची योजना होती, असे इटलीचे अंर्तगत व्यवहारमंत्री आंजेलिनो आल्फानो यांनी सांगितले. गेल्या १३ वर्षांपासून फरूक त्याच्या कुटुंबियांसह इटलीच्या मिलन शहराजवळील एका गावात रहात होता. गेल्या एक वर्षापासून त्याच्या वागण्यात पालट झाला होता. तो पत्नीला मारहाण करत होता आणि तिला बुरखा घालण्याची सक्ती करत होता, असे ला स्टाम्पा या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे.कोणताही धर्म आतंकवाद शिकवत नाही ! - कर्नाटकातील काँग्रेसचे मंत्री रोशन बेग

     मंगळुरु - कर्नाटकातील शहरविकास आणि हज यात्रेचे मंत्री रोशन बेग यांनी हज यात्रेला जाणार्‍या मुसलमान यात्रेकरूंना संबोधित करतांना म्हटले की, कोणताही धर्म आतंकवाद शिकवत नाही. (असे आहे तर, जगातील सर्व आतंकवादी मुसलमानच का असतात, या विषयी बेग यांनी वक्तव्य करून जगाचा अपसमज दूर करावा ! - संपादक) इस्लाम हा खर्‍या अर्थाने शांतीचा धर्म आहे, याची खात्री बाळगा. इस्लामच्या नावाखाली जगभरात होणार्‍या जिहादी आक्रमणांचा मी निषेध करतो. (गेल्या २ दशकांहून अधिक काळ भारतात जिहादी कारवाया चालू असतांना बेग यांनी आता निषेध करणे म्हणजे मगरीचे अश्रुच नव्हे का ? वर्ष १९९० मध्ये लाखो काश्मिरी हिंदूंना जिहाद्यांच्या भयामुळे स्वत:चे घर-दार सोडून पलायन करावे लागले, तेव्हा बेग गप्प का होते ? - संपादक) इस्लाम आणि आतंकवाद यांचा काहीही संबंध नसून इस्लाम हिंसा शिकवत नाही. इस्लाम निरपराध्यांच्या हत्येचा पुरस्कार करत नाही. हज यात्रेकरूंनी अल्लाहला प्रार्थना करावी की, इस्लामच्या नावाखाली आतंकवादी आक्रमणे करणार्‍यांना सुबुद्धी होऊ दे आणि आतंकवादी कारवाया करण्यापासून त्यांना परावृत्त कर.

चर्च नष्ट करू आणि ख्रिस्त्यांना ठार करू ! - जिहादी आतंकवादी संघटना बोको हरमच्या नव्या नेत्याची धमकी

     अबुजा (नायजेरिया) - येथील बोको हरम या जिहादी संघटनेच्या नव्या नेत्याने देशातील सर्व चर्च बॉम्बने उडवून देण्याची आणि सर्व ख्रिस्त्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. अनेक पाश्‍चात्त्य राष्ट्रे नायजेरियामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत असल्याचा आरोप या नेत्याने केला आहे. बोको हरम ही संघटना आतापर्यंत मशिदी आणि बाजारपेठा येथेच आक्रमण करत होती.ख्रिस्ती काफीर आहेत, त्यांनी त्यांचा धर्म सोडून द्यावा ! - इस्लामिक स्टेटच्या नियतकालिकातील फुत्कार

      लंडन - इस्लामिक स्टेटने (इसिसने) त्यांच्या दाबिक या नियतकालिकाच्या ताज्या अंकात प्रकाशित करण्यात आलेल्या ब्रेक द क्रॉस या लेखात येशू ख्रिस्तांना अल्लाचा गुलाम असल्याचे म्हटले आहे, तसेच ख्रिस्त्यांनी त्यांचा धर्म सोडून द्यावा, अशा शब्दांत धमकी देण्यात आली आहे.
       या लेखात इसिसने लिहिले आहे की, आम्ही तुमचा द्वेष करतो; याचे कारण तुम्ही काफीर आहात. तसेच तुम्ही अल्लावर विश्‍वास ठेवत नाही, इस्लाम आणि मुसलमान यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट करता. तुम्ही आमच्या भूमीवर आक्रमणही करता. जोपर्यंत एक इंच भूमीही आमच्या नियंत्रणाच्या बाहेर असेल, तोपर्यंत मुसलमानाला जिहाद करणे, हे त्याचे कर्तव्य असेल. नियतकालिकाच्या प्रारंभीच इसिसने नुकत्याच झालेल्या आक्रमणांचे दायित्व घेतले आहे. यात जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेतील ऑरलॅण्डो येथील आक्रमणांचा समावेश आहे. खलिफाच्या छुप्या सैनिकांनी ही आक्रमणे केली आहेत, असे यात म्हटले आहे.

कर्नाटकातील केएल्ई ध्वनी एफ्एम् ९०.४ रडिओवर नागपंचमीविषयी मार्गदर्शन !

हुबळी (कर्नाटक) येथे सनातन संस्थेचा उपक्रम 
डावीकडून निवेदिका सौ. विजयालक्ष्मी,
कु. नागमणी आचार आणि कु. स्फूर्ती बेनकनवारी
      हुबळी (कर्नाटक) - सनातन संस्थेच्या वतीने केएल्ई ध्वनी एफ्एम् ९०.४ या रेडिओ वाहिनीवर नागपंचमी या सणाविषयी मार्गदर्शन करण्यात आलेे. यात नागपंचमी सण साजरा करण्याची योग्य पद्धत कोणती, याविषयी सनातनच्या साधिका कु. स्फूर्ती बेनकनवारी आणि कु. नागमणी आचार यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रसारण ७ आणि ८ ऑगस्ट या दिवशी करण्यात आले.

...अन्यथा कराचीवर आमचा झेंडा फडकवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही - शंकर गायकर, क्षेत्रीय मंत्री विहिंप

      मुंबई - भारतीय सैन्याच्या सन्मानासाठी बजरंग दलाकडून फुटीरतावादी, साम्यवादी विचारसरणीच्या विरोधात आणि त्यांना पाठीशी घालणार्‍या प्रसार माध्यमांच्या विरोधात विश्‍व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या वतीने नुकतेच आझाद मैदान येथे आंदोलन घेण्यात आले. या वेळी विहिंपचे क्षेत्रीय मंत्री श्री. शंकर गायकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. 
      श्री. गायकर पुढे म्हणाले की, नेहरूंच्या चुकीच्या कृतीमुळे आज काश्मीरमध्ये ही स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंनी काश्मीर येथील सैनिकांवर हल्ले होत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या सैनिकांनी पाकपुरस्कृत काश्मीरमधील आतंकवाद्यांवर आणि तेथील राष्ट्रद्रोही मुसलमानांवर कारवाई केली तर काय चुकीचे केले ? पाकिस्तानने चीनचे साहाय्य घेऊन आमच्या वाटेला जाऊ नये अन्यथा कराचीवर आमचा झेंडा फडकवायला आम्ही मागे-पुढे पहाणार नाही, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला २५० हून अधिक बजरंग दल आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अमर जवान ज्योतीला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सोलापूर जिल्ह्यात स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यास राज्य क्रीडा विभाग उदासीन

शासकीय स्तरावर स्त्रियांच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे तीनतेरा !
     सोलापूर - सोलापूर महानगरपालिका महिला बालकल्याण समिती, महिला बाल विकास कार्यालय आणि स्वयंसिद्धा उपक्रम विभागीय स्तरावर करणारे राज्य क्रीडा विभाग यांच्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची शासकीय योजना आहे. असे असले, तरीही गेल्या वर्षापासून ती योजना प्रत्यक्षात कृतीत आणली गेलीच नाही. वरील समित्यांची स्त्रियांच्या प्रशिक्षणांतर्गत उपक्रम राबवण्यात कमालीची उदासीनता आहे. जिल्ह्यातील केवळ एका समितीच्या वतीने शाळकरी मुलींसाठी कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. युवती आणि महिला यांच्यासाठी कोणतेही उपक्रम आजमितीला चालू नाहीत. (स्त्रियांवरील अत्याचारांनी परिसीमा गाठलेली असतांना स्वसंरक्षणाविषयीची ही उदासीनता विनाश ओढवून घेणारी आहे ! या संदर्भात प्रत्यक्ष महिलांनीच आता गांभीर्य ओळखून पुढाकार घेणे आवश्यक आहे. - संपादक)

२ गावांचा संपर्क तुटला, तर १२ गावांचा वाहतुकीचा मार्ग पालटला

सततच्या पावसामुळे शहापुरातील पूल वाहून गेला
     ठाणे - येथील ढाढेरे नदीवरील पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे १२ गावांंना ४ किमीचा वळसा घालून बाहेर यावे लागत आहे. तसेच पुलापलीकडील ढाढेरे आणि शिसोरी या गावांचा संपर्कही तुटला आहे. शहापूर तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी याविषयीची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली असून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
     या पुलाची उंची अल्प असल्यामुळे प्रतिवर्षी थोड्या पावसातही पूल पाण्याखाली जातो. सततच्या पावसामुळे पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. १९९० या वर्षी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या पुलाची तातडीने डागडुजी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच नदीवर उंच पूल बांधण्याची मागणीही करण्यात येत आहे. पूल वाहून गेल्याने अनुमाने ७०० नागरिकांची असुविधा होत आहे. (नागरिकांना अशी मागणी करावी लागते, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! प्रतिवर्षी निर्माण होणार्‍या समस्येवर प्रशासन ठोस उपाययोजना का काढत नाही ? - संपादक)

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग चालू : शिराळ्यातील सहा पूल पाण्याखाली !

कृष्णा-वारणा 
नद्यांच्या काठी सतर्कतेची चेतावणी
       सांगली, ७ ऑगस्ट (वार्ता.) - कोयना धरण ८५ टी.एम्.सी.पेक्षा अधिक भरल्याने ७ ऑगस्ट या दिवसापासून दुपारी २ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला आहे. धरणाचे दोन दरवाजे तीन फुटांनी उचलून १५ सहस्र घनफूट प्रतिसेकंद पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पावसाळ्यामुळे अगोदरच दुथडी भरून वाहणार्‍या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शिराळ्यातील ६ पूल पाण्याखाली गेले आहेत. सांगली येथे आयर्विन पूल येथील पाण्याची पातळी ३५ फूट नोंदवली गेली. पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या काठी सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
       कोल्हापूर जिल्ह्यातही पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहेे. नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर आणि औदुंबर येथील दत्त मंदिर सध्या पूर्णत: पाण्याखाली गेले आहे. पंचगंगेकाठीही असलेल्या लोकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आलेली आहे.

धाराशिव येथे पोलीस उपनिरीक्षकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

महिलांच्या सुरक्षेऐवजी वासनांध बनलेले पोलीस !
       धाराशिव, ७ ऑगस्ट - बंदुकीचा धाक दाखवून येथील इयत्ता ११ वीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे पोलीस उपनिरीक्षक प्रेम बनसोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (अशा पोलिसांना पोलीस प्रशासनाने तात्काळ पदावरून दूर करून कठोर कारवाई करायला हवी. - संपादक) या प्रकरणी आपल्यावर गुन्हा प्रविष्ट होऊ नये, म्हणून बनसोडे याने पीडितेच्या कुटुंबियांनाही बंदुकीचा धाक दाखवल्याचे समजते. मूळचा धाराशिव येथील असलेला बनसोडे हा सध्या सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भ्रष्टाचाराची समयमर्यादेत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी ! - आमदार राजेश क्षीरसागर

भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे 
आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांचे अभिनंदन !
शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर !
     मुंबई - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भ्रष्टाचाराची समयमर्यादेत चौकशी पूर्ण करून दोषींवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी ५ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारे श्री महालक्ष्मी मंदिर, जोतिबा देवस्थान यांसह सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील ३ सहस्र ६७ देवस्थानांचा समावेश असणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या घोटाळ्याची राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाच्या वतीने चौकशी करण्यात येईल, असा आदेश ८ एप्रिल २०१५ या दिवशी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत लक्षवेधीवर दिला होता.
     आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी या निवेदनात म्हटले आहे की,
१. देवस्थान समितीच्या भूमी घोटाळ्यात प्रामुख्याने देवस्थानच्या २५ सहस्र एकर भूमीपैकी ८ सहस्र एकर भूमी दिसून येत नाही, तसेच वर्ष १९६९ पासून वर्ष २००४ या ३५ वर्षांचे लेखापरीक्षण झालेेले नाही.
२. श्री महालक्ष्मीदेवीच्या चांदीच्या रथातील शेकडो किलो चांदीच्या घोटाळ्याच्या संदर्भात, तसेच श्री महालक्ष्मी देवस्थान आणि केदारलिंग देवस्थान सोडून प्रत्येक देवस्थानचे दागदागिने किती, त्यांचे मूल्य किती, याविषयी समितीकडे कोणतीही नोंद नाही.

शिरस्त्राण (हेल्मेट) वापरत नसल्याचे वारंवार निदर्शनास आल्यास दंडाची कारवाई करण्यात येईल ! - परिवहन मंत्री श्री. दिवाकर रावते

     मुंबई - दुचाकीवरून प्रवास करतांना चालकाने आणि सहकार्‍याने शिरस्त्राण (हेल्मेट) वापरत नसल्याचे वारंवार निदर्शनास आल्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दंडाची कारवाई करणार असल्याचे परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते यांनी ५ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत सांगितले. (शिरस्त्राण वापरणे हे सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असताना त्यात सवलत देण्याचा निर्णय कशाला ? - संपादक) काही दिवसांपूर्वी शिरस्त्राण न वापरल्यास पेट्रोल देणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला होता. रावते यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय रहित केला असल्याचे घोषित केले. याविषयी ते पुढे म्हणाले की, शिरस्त्राण परिधान न करता एखादा वाहनचालक पेट्रोल भरण्यासाठी आल्यास त्याला पेट्रोल दिले जाईल; मात्र त्याच वेळी पेट्रोल देणारा कर्मचारी वाहनाचा क्रमांक नोंदवून ठेवेल आणि त्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना देईल. त्या चालकाची वारंवार नोंद झाल्यास वाहन चालकावर दंडाची कारवाई केली जाईल.

श्री गणेशाच्या चित्रामुळे अभियांत्रिकी पदविकेच्या विषयाची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना लाभ !

     मिरज - महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०१६ मध्ये लठ्ठे एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक सांगली मधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. सदर परीक्षेत प्रथम वर्ष (इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन) या पदविकेमधील कम्युनिकेशन स्किल्स (इंग्रजी) या विषयात कु. वृषाली धन्यकुमार आळते (रा. म्हैसाळ) हिला १०० पैकी १०० गुण मिळून राज्यात प्रथम आली, तसेच या वर्गातील १३ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक गुण मिळाले.
     इंग्रजी विषयाचा इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा निकाल १०० प्रतिशत आणि मेकॅनिकल विभागाचा निकाल ९४ प्रतिशत लागला आहे. सदरच्या वर्गातील बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी सनातननिर्मित श्री गणेशाचे चित्र भेट देण्यात आले होते. या चित्रामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत होण्यास विशेष लाभ झाला. अनेकांनी परीक्षेस जातांना हे चित्र सोबत नेल्याचे सांगितले. १५० विद्यार्थ्यांना श्री गणेशाची चित्रे भेट दिली होती, असे प्रा. काकासो घोडके (सर) यांनी सांगितले. (सदरची अनुभूती जरी अनेकांना आली, असली तरी ती वैयक्तिक स्वरूपाची आहे. ही अनुभूती इतरांना येईल असे नाही ! - संपादक)

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरु श्री स्वामी कचरनाथ दरबार येथे नवनाथांचा होम, महाप्रसाद आणि भजन

     मिरज - प्रतिवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरु बाबा श्री स्वामी कचरनाथ दरबार येथे नवनाथांचा होम, महाप्रसाद आणि भजन असा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात झाला. हा कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सौ. कांचन सदाशिव दाभाडे (माई) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतो. होम चालू असतांना सतत वरुणराजा बरसत होता. सोहळा झाल्यावर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ५०० हून अधिक भाविकांनी याचा लाभ घेतला. जगतकल्याण, धर्मप्रतिष्ठापना यांसाठी हा होम करण्यात आला.
     मिरज दरबारचालक श्री. संतोष सदाशिव दामाडे हे तबला विशारद असून ते रेकीमध्ये मास्टर हिलर यात निपुण असून ते कराटेचे शिकवणी वर्ग घेतात. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यक्रमांना त्यांची नियमित उपस्थिती असते. त्यांच्या घरी हिंदु जनजागृती समितीचा धर्मशिक्षण वर्ग चालू आहे.

भिवंडीत हनुमान टेकडी परिसरातील दुमजली इमारत कोसळली

     ठाणे - भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरातील विनोद डाईग कंपनीजवळ असलेली दुमजली धोकादायक इमारत कोसळली. सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ७ ते ८ जण इमारतीच्या मलब्यात अडकल्याचे सांगण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही इमारत महापालिकेकडून धोकादायक घोषित करण्यात आली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महापालिका यांच्याकडून मलबा बाजूला करण्याचे काम वेगाने चालू आहे. कोसळलेल्या इमारतीचा परिसर अत्यंत दाट वस्तीत असल्याने तेथे अग्निशमन दलाची वाहने पोचण्यास अडथळे निर्माण होत होते.

बजरंग दलाचे शहरप्रमुख महेश उरसाल यांनी फलटणच्या भाविक महिलेचे २ लक्ष रुपये किमतीचे दागिने प्रामाणिकपणे परत केले !

श्री. महेश उरसाल
असा प्रामाणिकपणा असलेले 
हिंदु संघटनांचे प्रतिनिधी सर्वत्र हवेत !
        कोल्हापूर, ७ ऑगस्ट (वार्ता.) - फलटण येथील कु. जया बबनराव शिंदे या त्यांच्या घरच्यांनसोबत कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. परत जातांना त्यांनी बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल यांच्या महाद्वार रस्त्यावरील दुकानातून महिला पर्सची खरेदी करून निघून गेल्या. त्या वेळी गडबडीत त्या त्यांच्याकडे असलेली अन्य एक पिशवी उरसाल यांच्या दुकानात विसरून गेल्या. त्या गेल्यावर श्री. महेश यांनी सदरची पिशवी उघडून पाहिली असता, त्यात दोन स्टीलच्या डब्यात २ लक्ष रुपयांचे सोन्याचे दागिने आढळून आले. त्यांनी ती पिशवी सुरक्षित ठेवून ती भाविक महिला परत येण्याची वाट पाहिली. थोड्या वेळाने कु. जया या चौकशीसाठी श्री. महेश यांच्याकडे आल्या. त्या वेळी शहानिशा करून श्री. महेश यांनी कु. जया यांना ती पिशवी परत केली.

लक्षावधी वर्षांपासून असलेली लोकांची श्रद्धा ही नास्तिकवाद्यांना वाटते म्हणून अंधश्रद्धा ठरू शकत नाही ! - सौ. स्मिता माईणकर, सनातन संस्था

सी केबल न्यूजवर आयोजित चर्चासत्र
       सांगली, ७ ऑगस्ट (वार्ता.) - लक्षावधी वर्षांपासून सहस्रो देवळे आहेत, तसेच लक्षावधी लोक देवळात जातात, याचा अंधश्रद्धा निर्मूलवाल्यांनी अभ्यास करायला हवा. केवळ अंनिसवाल्यांना वाटते म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. साधना केल्यावर शांती, समाधान मिळते. सध्या सर्वत्र अस्थिरता आहे, सर्वजण त्रासलेले आहेत. या लोकांना शांती पाहिजे. शांती लोकांना देवळात जाऊन मिळते, असे ठाम प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर यांनी केले. त्या सी केबल न्यूजवर आयोजित अंधश्रद्धा, भक्त आणि भक्ती कितपत योग्य, या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होत्या. या वेळी अंनिसचे डॉ. प्रदीप पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ. संजय लवटे, माजी नगरसेविका ज्योती आदाटे यांनीही सहभाग घेतला. सूत्रसंचालन शर्वरी पवार यांनी केले.

राहुरी तालुक्यात (नगर जिल्हा) गेल्या ७ मासांत ७ बलात्कार आणि १५ विनयभंगाच्या घटना

नगर जिल्ह्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना 
म्हणजे कायद्याचा बट्ट्याबोळ आणि पोलिसांचे अस्तित्व नसण्याचे लक्षण !
     नगर - जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातही महिलांची सुरक्षा हा चिंतेचा विषय बनला असून गेल्या ७ मासांत, म्हणजेच जानेवारी ते ४ ऑगस्ट २०१६ या कालावधीत ७ बलात्कार आणि १५ विनयभंग अशा गंभीर घटना घडल्या आहेत.
     राहुरी तालुक्यात ८२ ग्रामपंचायती आणि एकूण ९६ गावे असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी राहुरी पोलीस ठाणेच्या अंतर्गत सक्षम अधिकार्‍याची वानवा आहे. त्यामुळे तालुक्यात गुन्हेगारी बोकाळली आहे. (या प्रकरणी गृह विभाग आणि जिल्हा पोलीस प्रशासन लक्ष घालून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करेल का ? - संपादक) महत्त्वाचे म्हणजे विनयभंगातील काही आरोपीही वाळूतस्करी, अवैध वाहतूक आणि अन्य गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याचे दिसून येत आहे. त्यांना पोलिसांकडून वेळीच शिक्षा मिळत नसल्याने बलात्काराच्या घटनाही घडल्याचे वास्तव समोर येत आहे. (राज्यातील गुन्हेगारी न्यून होत असल्याचे सांगून स्वतःची पाठ थोपटून घेणारे पोलीस प्रशासन आतातरी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करेल का ? - संपादक) वाढत्या गुन्हेगारीची गंभीर नोंद घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी सर्व ग्रामस्थांकडून होत आहे.

मुलांना घेऊन स्मशानात भुताची सहल !

मुलांच्या जिवाशी खेळणारे धर्मद्रोही आणि अघोरी उपक्रम !
     कल्याण - मुलांच्या मनातून अंधश्रद्धा, अंधार, भूत-प्रेत यांची भीती घालवणे आणि बुवाबाजी करणार्‍यांचे पितळ उघडे पाडणे या उद्देशाने विद्यार्थी भारती संघटनेच्या वतीने १०० मुलांना घेऊन भुताची सहल हा उपक्रम राबवण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तरुण यात सहभागी झाले होते. या वेळी घेतल्या गेलेल्या खेळात मुलांना भीतीही दाखवण्यात आली. (या वेळी मुलांना खरोखर भीती वाटून शारीरिक किंवा मानसिक त्रास झाला असता, तर त्याचे दायित्व अंनिसने घेतले असते का ? - संपादक)
१. माधुरी कर्‍हाणे यांनी सांगितले की, भुताची सहल ही वर्षाच्या सर्वांत मोठ्या अमावास्येच्या रात्री थेट स्मशानात काढली जाते. पूर्ण रात्र स्मशानात थांबून भुतांना हाका मारणे, मुद्दाम मांसाहारी अन्न जेवणे असे कार्यक्रम केले जातात.
२. या वेळी श्रद्धा, अंधश्रद्धा आणि विश्‍वास यांवर चर्चा झाली. अंनिसच्या वतीने या वेळी वेगवेगवळे चमत्कार दाखवण्यात आले.
३. मुलांच्या मनातून अंधार आणि भूत यांची भीती घालवण्यासाठी खेळ घेतले गेले.
     दूरवर काही अंतरावर चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. बॅटरीच्या सहाय्याने तिथपर्यंत एकट्याने जाऊन चिठ्ठीत लिहिलेल्या गोष्टी पूर्ण करायच्या होत्या. वाटेत काही मुले घाबरवण्यासाठी लपून बसली होती.

मोरगाव येथील पू. बालविनायक महाराज लालसरे यांचे गणेशभक्तांसाठी मार्गदर्शन !

     अकोला - श्रीक्षेत्र मोरगाव, जिल्हा पुणे येथील श्रीगणेशजगद्गुरु पीठ श्रीयोगीन्द्रमठाचे पीठाधिपती श्रीगा. पू. बालविनायक महाराज लालसरे यांचे ८ ऑगस्ट या दिवशी श्रीगणेशोपासना या विषयावरील मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. श्री गणेश मंदिर संस्थान यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वच भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे.
स्थळ : स्वयंभू श्री गणेश मंदिर संस्थान, मांदार गणपती मंदिर, देवराव बाबांची चाळ, डी.एस्.पी. ऑफिस रोड, अकोला
वेळ : सकाळी १० संपर्क : ९४२११४१८७५

मुंबईतील ॐ गॅलरीकडून ॐ चे विडंबन !

हिंदूंनी केलेल्या निषेधानंतरही विडंबन चालूच !
     मुंबई - सांताक्रूझ येथील ॐ गॅलेरीने त्यांच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी भूमीवर मोठ्या आकारातील ॐ कोरला आहे. त्यामुळे ॐ चे विडंबन होत असल्याचे हिंदु धर्माभिमान्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हिंदु जनजागृती समितीला या विषयी सूचित केले. समितीने ५ मे २०१६ या दिवशी या गॅलेरीला पत्र पाठवून सदर कृतीचा निषेध केला.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विश्‍वनाथ कराड यांची नियुक्ती करावी ! - ह.भ.प. वा.ना. उत्पात

चंद्रभागेची आरती करतांना संत आणि मान्यवर
      पंढरपूर, ७ ऑगस्ट - श्रीक्षेत्र आळंदी येथील घाटांची आणि गरुडस्तंभ तसेच श्रीक्षेत्र देहू येथील महाद्वार यांची उभारणी करून डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी भागवत धर्माची सेवा केली आहे. देवस्थान परिसराचा विकास करण्याचा त्यांना अनुभव आहे. सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सातशे वर्षांची परंपरा संपुष्टात आणून त्यावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने मंदिर समितीची स्थापना करतांना कोणत्याही राजकारण्यांना त्यात स्थान देण्यापेक्षा कराड यांना मंदिर समितीचे अध्यक्ष करण्यात यावे, अशी मागणी ज्ञानेश्‍वरी आणि भगवद्गीतेचे गाढे अभ्यासक ह.भ.प. वा.ना. उत्पात यांनी केली. आषाढ कृष्ण एकादशीच्या औचित्यावर भक्त पुंडलिक घाटावर प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांच्या शुभहस्ते पवित्र चंद्रभागेची आरती करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पुणे येथील विश्‍व शांती केंद्र, माईर्स एम्आयटी, पुणे, भारत आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती यांच्या वतीने या आरतीचे आयोजन करण्यात आले होते.
     मुंबई - महाराष्ट्र्र स्वयं अर्थसहाय्यित शाळेच्या अधिनियमानुसार मागील तीन वर्षांमध्ये मराठी माध्यमांच्या २ सहस्र ४००, हिंदी माध्यमाच्या ६२, उर्दू माध्यमांच्या १६६, इंग्रजी माध्यमांच्या ४ सहस्र २१९ आणि इतर माध्यमांच्या ४ अशा एकूण ६ सहस्र ८५१ शाळा मंजूर करण्यात आल्या आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली. राज्यातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

अनधिकृत बांधकामाविषयीचे नवीन धोरण संपूर्ण राज्यासाठी लागू ! - मुख्यमंत्री

     मुंबई - अनधिकृत बांधकामाविषयीचे नवीन धोरण हे केवळ नवी मुंबई अथवा ठाणे या शहरांसाठी नसून संपूर्ण राज्यासाठी आहे, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ६ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत सांगितले. नवी मुंबई येथील दिघा परिसरातील ९६ इमारती अनधिकृत असल्याविषयीची, तसेच राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांविषयीची लक्षवेधी सूचना विधानसभेच्या सदस्यांनी मांडली होती.
     या संदर्भात मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामाविषयीचे नवीन धोरण सिद्ध करण्यात आले आहे. या धोरणामध्ये बांधकामाचे नियमन नवीन धोरणाच्या अंतर्गत झाले असले, तरी मूळ बांधकाम व्यावसायिकांचे बांधकाम अनधिकृत असल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. तसेच संबंधित अधिकारी दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील चित्रपट १५ वर्षे अज्ञातवासात !

पंतप्रधान कार्यालयाने देशभक्तांच्या चित्रपटाविषयी असलेली उदासीनता 
दूर करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी !
चित्रपटाविषयी पंतप्रधान कार्यालयाकडूनही कार्यवाही प्रलंबित 
      पुणे, ७ ऑगस्ट - केंद्रीय अनुदानातून सिद्ध होत असलेला लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील चित्रपट गेल्या १५ वर्षांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपट प्रदर्शनास राज्य सरकारने टाळाटाळ केली आहेच; पण पंतप्रधान कार्यालयाकडूनही चित्रपटाकडे दुर्लक्ष झाल्याचे उघड झाले आहे. येथील सजग नागरिक मंचाच्या वतीने सप्टेंबर २०१५ मध्ये पंतप्रधान कार्यालयाला त्या चित्रपटाच्या पाठपुराव्याच्या दृष्टीने पत्र पाठवले होते. त्यावर संबंधित विभागाकडून कार्यवाही केली जाईल, असे उत्तरही आले होते; परंतु प्रत्यक्षात कोणतीही हालचाल झालेली नाही, अशी माहिती मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि विष्णू कमलापूरकर यांनी दिली.

पोकेमॉनमुळे राष्ट्रीय संकट निर्माण होण्याची शक्यता ! - डॉ. संजय उपाध्ये

याविषयी पोकेमॉनप्रेमींना काय म्हणायचे आहे ? 
      पुणे, ७ ऑगस्ट (वार्ता.) - पोकेमॉन या भ्रमणभाषवरील खेळामुळे काम, क्रोध या षड्रिपूंची वृद्धी होऊन तरुणांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खालावू शकते. या व्हिडिओ खेळांमुळे चिडचीड होणे, दृष्टीचंचलता, मेंदूवर परिणाम यांसारखे त्रास वाढीस लागतात. हा खेळ सर्व्हरसमवेत जोडला गेल्यामुळे भारतातील खेळ खेळणार्‍या नागरिकांची माहिती शत्रूच्या हाती लागून सामाजिक, तसेच राष्ट्रीय संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे पालकांनी जागृत राहून पाल्यांना अशा घातक खेळांपासून दूर ठेवायला पाहिजे, असे मार्गदर्शन डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. विश्‍वशांती संघ आणि गांधींपेठ तालीम मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला २५० जण उपस्थित होते. 
      या वेळी पोकेमॉनवर बंदी आणावी, तसेच आगामी yz या मराठी चित्रपटाचे नाव पालटावे, या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी उपस्थितांना पत्रे वाटण्यात आली. मोक्षाचे विज्ञान म्हणजे धर्म ! - डॉ. प्रवीण तोगाडिया

      पुणे, ७ ऑगस्ट (वार्ता.) - एखाद्या व्यक्तीकडे पद, प्रतिष्ठा आणि ऐश्‍वर्य असले, तरी आनंद असेलच असे नाही. आनंद मिळवायचा असेल, तर धर्माचरण हा एकच पर्याय आहे. मोक्षाचे, तसेच प्रारब्ध पालटण्याचे विज्ञान म्हणजे धर्म. प्रत्येकाने धर्मावर दृढ श्रद्धा ठेवून धर्माचरण आणि धर्मरक्षण करायला हवे, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केले. ३० जुलै या दिवशी गुरुवार पेठेतील जैन मंदिर येथे त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. 
डॉ. तोगाडिया पुढे म्हणाले, 
१. काश्मीरमध्ये हिंदूंना वास्तव्य करण्याचा अधिकार नाकारला जात आहे. हिंदूंनी कुठे रहायचे आणि कुठे नाही, हे धर्मांधांनी का ठरवावे ? उर्वरित देशातील हिंदूंनीही मग धर्मांधांनी कुठे रहायचे आणि कुठे नाही, हे ठरवावे का ?
२. केवळ मंदिरांचेच नाही, तर देवीदेवता, संत-महात्मे, त्यांची आराधना करणारे हिंदू यांचे रक्षण करायला हवे. त्यासाठी जेथे संधी मिळेल, त्या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार पेरायला हवेत.

५ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन !

पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले !
      मुंबई, ७ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी) - १९ जुलै या दिवशी चालू झालेल्या पावसाळी अधिवेशनाचे ५ ऑगस्ट या दिवशी सूप वाजले. आता पुढील हिवाळी अधिवेशन सोमवार, ५ डिसेंबर या दिवशी नागपूर येथे होईल, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेत केली. चालू सत्रातील कामकाजाचा आढावा घेतांना श्री. बागडे यांनी एकूण १५ दिवस कामकाज झाले, असे सांगितले.
    एकूण १०५.४९ मिनिटे कामकाज झाले. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे १० मिनिटे आणि अन्य कारणांमुळे ७ घंटे ५४ मिनिटे, असे एकूण ८ घंटे ८ मिनिटे कामकाज वाया गेले. (वाया गेलेल्या वेळेत लक्षावधी रुपयांची हानी झाल्याने याचा सर्व खर्च याला उत्तरदायी असणार्‍या मंत्र्यांच्या वेतनातून वसूल करावा ! - संपादक) या सत्रात ११ सहस्र २८४ तारांकित प्रश्‍न प्राप्त झाले. त्यातील ६७६ प्रश्‍न स्वीकृत करण्यात आले असून प्रत्यक्षात सभागृहात ५६ प्रश्‍नांची तोंडी उत्तरे देण्यात आली. 
       २ सहस्र ६८५ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी १३९ स्वीकृत होऊन प्रत्यक्षात ५१ सूचनांवर चर्चा करण्यात आली. विधानसभेत १५ विधेयके, तर दोन्ही सभागृह मिळून ७ विधेयके संमत करण्यात आली. एकूण उपस्थिती ८३.५० टक्के होती, असेही श्री. बागडे यांनी सांगितले.

फलक प्रसिद्धीकरता

जिहाद्यांकडून हिंदूंना काश्मीर सोडण्याची पुन्हा एकदा धमकी !
     लष्कर-ए-इस्लाम या संघटनेने हिंदूंनी काश्मीर खोर्‍यातून निघून जावे अथवा मरण्यास सिद्ध व्हावे, अशा मजकुराची भित्तीपत्रके लावली आहेत. भित्तीपत्रकांत पुढे म्हटले आहे की, तुम्ही तुमची सुरक्षा दुप्पट-तिप्पट करून घ्या; तरीही तुम्ही मरण्यासाठी सिद्ध रहा !

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Kashmiri panditoko Lashkar-e-Islam sangathan ki dhamki - Kashmir chhodo athva marneke liye tayyar raho!
     Aur kitne din Hinduoko yatna sehte dekhna hoga?
जागो !
: कश्मिरी पंडितों को लष्कर-ए-इस्लाम संगठन की धमकी - कश्मीर छोडो अथवा मरने के लिए तैयार रहो ! - और कितने दिन हिन्दुआें को यातना सहते देखना होगा ?

बीड जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभाराची चौकशी होणार ! - पंकजा मुंडे

मंत्र्यांनी चौकशी ठराविक समयमर्यादेत पूर्ण करून कारवाई करणे अपेक्षित !
      मुंबई, ७ ऑगस्ट - बीड जिल्हा परिषदेत नियमबाह्य काम झाल्याचे लेखा परिक्षणावरून स्पष्ट झाले असल्याचे स्वीकारून या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा करतांनाच यामधील दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेतही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली. तसेच जिल्ह्यातील वातावरण खराब होऊ नये यासाठी विशेष तपास पथकाकडून अन्वेषण करण्याची मागणी फेटाळून लावली. ही चौकशी करण्यास ग्रामविकास विभाग सक्षम असल्याचेही श्रीमती मुंडे यांनी स्पष्ट केले.
     बीड जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभाराच्या संदर्भात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी मांडली होती. श्री. भातखळकर म्हणाले की, जिल्हा परिषदेमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून सरकारी पैशांचा अपहार करणे, सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही संमती न घेता जिल्हा मार्गावर जिल्हा परिषदेने मोठ्या प्रमाणामध्ये बनावट कामगार संस्थेच्या नावाने देयक सादर करणे आदी भ्रष्टाचाराविषयी लेखा परिक्षण अहवालात ताशेरे ओढले आहेत. तेव्हा जिल्हा परिषदेतील या अपव्यवहाराची विशेष तपास पथकाकडून चौकशी करा, अशी मागणी श्री. भातखळकर यांनी केली.

कुरकुंभ (जिल्हा पुणे) येथे पुणे सीमा शुल्क विभागाकडून २५ कोटी रुपयांचा अमली पदार्थ शासनाधीन

अमली पदार्थमुक्त राष्ट्र बनवण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आवश्यक !
विदेशी नागरिकांसह ४ जण पोलिसांच्या कह्यात
     दौंड (जिल्हा पुणे) - येथील कुरकुंभ तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमधील समर्थ लॅबोरेटरीज या आस्थापनावर सीमा शुल्क विभागाने धाड टाकून २५ कोटी रुपये किमतीचा १५९ किलो मेफेड्रोन हा अमली पदार्थ शासनाधीन केला. (अवैधरित्या अमली पदार्थ सापडण्याच्या घटना वाढत असून त्याचे समूळ पोलीस केव्हा नष्ट करणार ? - संपादक) या प्रकरणी एका विदेशी नागरिकासह ४ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले. काही दिवसांपूर्वीच चालू झालेल्या या आस्थापनातून बंदी असलेला मेफेड्रोन हायड्रोक्लाराईड हा पदार्थ सिद्ध करून अवैधरित्या लंडनला पाठवण्यात येत होता. हा अमली पदार्थ सिद्ध करण्याविषयी त्या आस्थापनाकडे अनुज्ञप्ती नव्हती.

आध्यात्मिक बळप्राप्तीद्वारे जीवन यशस्वी होण्यासाठी दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचन करा ! - जयप्रकाश सावंत

गडहिंग्लज येथे दैनिक सनातन प्रभातचा वाचक मेळावा भावपूर्ण वातावरणात संपन्न
वाचक मेळाव्यात मनोगत व्यक्त
करतांना श्री. देवेश रेडकर
         गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), ७ ऑगस्ट (वार्ता.) - दैनिक सनातन प्रभातच्या वाचनाने मनुष्याचे मन आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ होते. त्यामुळे आध्यात्मिक बळप्राप्तीद्वारे जीवन यशस्वी होण्यासाठी दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचन करा, असे मत दैनिक सनातन प्रभातचे संकेश्‍वर येथील वाचक श्री. जयप्रकाश सावंत यांनी व्यक्त केले. ते ४ ऑगस्ट या दिवशी लायन्स क्लब संचलित श्री अण्णासाहेब गळतगे रक्तपेढी येथे पार पडलेल्या वाचक मेळाव्यात बोलत होते.

ब्रिटीशकालीन पुलांचा धोका : शासन आतातरी जागे होणार का ?

खारेपाटण येथील सुख नदीवरील ब्रिटीशकालीन पूल
    महाडनजीक पुलाचे मे महिन्यातच परीक्षण करण्यात आले होते आणि तो पूल वाहतुकीसाठी सुस्थितीत असल्याचा अहवाल शासनाला देण्यात आला होता. पूल सुस्थितीत असतांना तो कोसळला कसा ? यावरून आता वादंग चालू झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुलांची सुस्थितीही चव्हाट्यावर आली आहे.
ब्रिटिशांना काळजी, तर भारत शासन सुस्त !
     मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेल्याने दोन एस्.टी. बसेस आणि काही वाहने बेपत्ता झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर या महामार्गावरील सर्वच ब्रिटीशकालीन पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वधर्माची कास धरा ! - प्रा. रामेश्‍वरप्रसाद मिश्र

नवी देहली येथील युरोप : एक भारतीय दृष्टी, या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप !
प्रा. रामेश्‍वरप्रसाद मिश्र
      नवी देहली - राज्यघटनेत आतापर्यंत १०० वेळा सुधारणा झाल्या आहेत; परंतु २ अब्ज वर्ष प्राचीन असणार्‍या वेदांमध्ये आतापर्यंत एकदाही सुधारणा झालेली नाही. तरीही वेदांपेक्षा भारतीय राज्यघटनेला मोठे समजले जाते. देशाच्या उत्थानासाठी आपल्याला ज्ञान परंपरेशी जोडायचे आहे. प्रचंड पुरुषार्थासाठी प्रचंड ज्ञान असणे आवश्यक आहे. गोमातेसाठी गोग्रास काढणे, गायत्री मंत्राचा जप करण्यानेही देश सेवा होते; कारण धर्माचरणाने देशाची परंपरा अबाधित ठेवली जाते. सनातन धर्माला शरण गेल्यासच समाजाचे उत्थान होऊ शकते. भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वधर्माची कास धरणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील गांधी विद्या संस्थेचे प्रा. रामेश्‍वरप्रसाद मिश्र यांनी केले.

संवेदनशून्यतेची परिसीमा !

     २ ऑगस्टला मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ रात्री ११.३० वाजता सावित्री नदीवरील पूल कोसळल्यामुळे २ बसगाड्यांसह काही वाहने पाण्यात वाहून गेली. त्यानंतर अद्यापही मृतदेहांचा शोध चालूच आहे.
    स्थानिक नागरिकांनी या पुलाच्या दु:स्थितीविषयी प्रशासनाला काही मासांपूर्वीच कळवले होते; मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सदर पूल धोकादायक असल्याचे, तसेच तो कालबाह्य झाल्याचे ब्रिटिशांनीही ३ वर्षांपूूर्वीच कळवले होते. त्या वेळी काँग्रेसची सत्ता होती. घोटाळे करून स्वत:चे हित साधण्यात मग्न असलेल्या काँग्रेसला सत्ताकाळात ब्रिटिशांच्या या सूचनेचा विसर पडला, तर आता विरोधकांवर हल्लाबोल करण्याच्या उतावळेपणात या घटनेला स्वत:ही उत्तरदायी आहोत, याचा विसर पडला. यामुळेच की काय त्यांनी घटना घडल्याच्या दुसर्‍याच दिवशी विधानसभेत राजकीय दुकान थाटून सत्ताधारी पक्षाला वेठीस धरले. दुसरीकडे सत्ताधारी पक्षानेही घटनेचा खुलासा केला. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांची ढाल पुढे केली. चालू वर्षाच्या मे मासात या पुलाची पाहणी झाली असून त्या वेळी पूल वापरण्याजोगा असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाने केला. आरोप आणि खुलासे यांच्या रणधुमाळीत खरा आरोपी दुर्लक्षिला जाऊ नये, तसेच घटनेच्या मुळाशी जाऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच जनतेची यासंदर्भात स्वाभाविक अपेक्षा राहील.

संकटाच्या तीव्रतेप्रमाणे महर्षींनी वेगवेगळे उपाय करण्यास सांगणे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
       सनातनवर कोणतेही संकट आले, तरी ते लगेचच महर्षींना सांगा आणि या संकटांवर उपाय कोणते ?, हेही विचारून घ्या, असे प.पू. डॉक्टर नेहमी सांगत असतात. महर्षींना तसे सांगितल्यावर महर्षि त्याप्रमाणे यज्ञयाग करण्यास सांगतात किंवा कधी कधी त्या त्या ठिकाणी जाऊन मंदिरांत दर्शन करण्यासही सांगतात. कधी देवतांना अभिषेक, कधी अन्नदानही करण्यास सांगतात, तर कधी बसून काही सहस्र जप करण्यास सांगितला जातो. 
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१५.७.२०१६, सकाळी ८.५४)

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

      एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या विरामचिन्हांमुळे पालटणारे वाक्याचे अर्थ सांगणारे हे सदर !सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १० महिने २३ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना १ महिना २९ दिवसांपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
     केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !
www.sanatan.org
वर वाचा आणि अध्यात्म अनुभवा !

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक 
करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे २५५ वा दिवस !
६.८.२०१६
     रात्री ११ वाजता एका दुचाकीवरून आश्रमासमोरील रस्त्यावरून दोघे जण सनातन बॉम्ब असे ओरडत गेले, तर त्याच वेळी एका चारचाकी वाहनातून जाणार्‍या व्यक्तींनी आश्रमासमोरील रस्त्यावर काचेची बाटली फोडली.

उतारवयातही नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ असलेले आणि प्रत्येक गोष्टीचे श्रेय गुरुदेवांना देणारे पू. भगवंतकुमार मेनराय !

पू. भगवंतकुमार मेनराय
      पू. भगवंतकुमार मेनराय यांचा श्रावण शुक्ल पक्ष पंचमी (नागपंचमी ७.८.२०१६) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
१. शिकण्याची वृत्ती 
      रामनाथी आश्रमात काही साधकांना अरोमाथेरेपी शिकवत आहेत. पू. मेनरायकाका त्याविषयी जिज्ञासेने प्रश्‍न विचारतात आणि मला ही थेरेपी शिकायची आहे, असे म्हणतात. ते हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांना मराठी बोलता येत नाही. बहुतांश साधक मराठी भाषिक असल्याने त्यांच्याशी बोलण्यासाठी ते मराठी शिकत आहेत.

हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यावर गुरुकृपेने सर्व साहाय्य वेळेत मिळून जीव वाचल्यामुळे साधकाने कृतज्ञताभावाने प.पू. डॉक्टरांना लिहिलेले पत्र !

श्री. योगेश जोशी
प.पू. डॉक्टरांच्या चरणी 
शिरसाष्टांग नमस्कार,
     घरी एकटे असतांना साधकाच्या छातीत तीव्र वेदना होऊन उलटी होणे : गुरुदेवा, ८.५.२०१६ या दिवशी दुपारी ३ वाजता मी जेवण करून घरी आलो. घरच्यांशी भ्रमणभाषवर बोलणे झाले. काही वेळ विश्रांती घेण्याचा विचार करत असतांनाच अकस्मात् माझ्या छातीमध्ये थोडेसे दुखू लागले. तेव्हा पोटातील वायूमुळे (गॅसेसमुळे) असेल; म्हणून मी सोडा घेतला; पण माझा त्रास वाढून मला एक उलटी झाली. त्यानंतर अस्वस्थता अधिक वाढली आणि छातीत तीव्र कळा येऊ लागल्या. त्या वेळी घरी कोणीच नव्हते.

महर्षींनी रामनाथी आश्रमात अश्‍वत्थ, वटवृक्ष, औदुंबर आणि कारंजा ही चार झाडे लावण्यास सांगणे आणि या वृक्षांचे महत्त्वही विशद करणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
    १५.७.२०१६ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या नाडीवाचन क्रमांक ८८ मध्ये महर्षि म्हणतात - परम गुरुजींच्या (प.पू. डॉक्टरांच्या) आश्रमात किमान अश्‍वत्थ, वटवृक्ष, औदुंबर आणि कारंजा हे चार वृक्ष तरी असलेच पाहिजेत; कारण यांच्यात श्रीविष्णुतत्त्व आहे. कारंजा वृक्षही महत्त्वाचा आहे; कारण यात श्रीविष्णु ध्यानस्थ रूपात आहे. अश्‍वत्थ वृक्षाच्या मुळात तर त्रिदेवच आहेत. वटवृक्ष जेवढा वर वाढलेला दिसतो, तेवढा तो खालीही वाढलेला असतो. वटवृक्षाच्या मुळांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची मुळे भूमीतून पसरून कुठे ना कुठेतरी असलेल्या औदुंबराच्या मुळाला मिळतात; कारण औदुंबराच्या मुळाशी दत्तचरण असतात. वटवृक्षातही स्वयं विष्णु असल्याने हे चार वृक्ष आश्रमात लवकर लावण्यास सांगावेत, अशी सूचनाही महर्षींनी या वेळी केली.

प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवानिमित्त सौ. विमल माळी यांना सुचलले काव्य !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
      १८.५.२०१६ या दिवशी मी संध्याकाळी दूरदर्शनवर श्रीमद्भागवत कथेतील संस्कृत गोपीगीत ऐकत होते. तेव्हा मी कृष्णाचे भावपूर्ण ध्यान करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मला प.पू. डॉक्टर सूक्ष्मातून माझ्यासमोर बसलेले दिसले. त्या गीतातील शब्द संस्कृत होते आणि मी ते २ - ३ वेळाच ऐकले होते. त्यामुळे ते मला कळत नसले, तरी हे गीत मी प.पू. डॉक्टरांसाठीच गात आहे, असे जाणवले. गीताची चाल भावपूर्ण असल्याने भावजागृती झाली. याच चालीवर प.पू. डॉक्टरांसाठी शब्द सुचायला हवे, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर रात्री १२ वाजता झोपतांना मी ती चाल गुणगुणत असतांना त्याच चालीवर प.पू. डॉक्टरांच्या कृपेने पुढील काव्य सुचले.
साधकांचा कल्पतरु !
भक्तजनांच्या माहेरा । समस्त जिवांचा सोयरा ।
त्राहीमां त्राहीमां (टीप १) ईश्‍वरा । जगद्गुरु जगद्गुरु ॥ १ ॥
सकल सृष्टीचा आधारु । साधकांचा कल्पतरु ।
तारावया भवसागरु । जगद्गुरु जगद्गुरु ॥ २ ॥

मुलाला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊनही प.पू. डॉक्टरांवरील अपार श्रद्धेमुळे त्यांच्यावर सर्व सोपवून स्थिर रहाणारे पू. जयराम जोशीआजोबा !

पू. जयराम जोशीआजोबा
१. मुलाच्या प्रकृतीविषयी कळल्यावर प.पू. डॉक्टरांच्या कृपेेचे प्रसंग 
आठवणे आणि तेच त्याला सांभाळणार आहेत, याची निश्‍चिती होणे
      ८.५.२०१६ या दिवशी सायंकाळी योगेशला रुग्णालयात दाखल केल्याचा मला पुण्याहून भ्रमणभाष आला. त्यानंतर पाच मिनिटे मी अस्थिर झालो; पण लगेच मी मनाला सांगितले, प.पू. डॉक्टर माझ्या समवेत आहेत. कितीही संकटे आली, तरी ते मला त्यातून बाहेर काढणारच आहेत. त्या वेळी आम्ही पुण्यात असतांना आलेल्या संकटांतून प.पू. डॉक्टरांनी कसे बाहेर काढले, हे आठवले आणि तेव्हापासून प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच आतापर्यंत सर्व सुरळीत चालले आहे आणि यापुढेही सुरळीतच होणार आहे, याची मनोमन निश्‍चिती झाली.

राखीपौर्णिमेला बहिणीला अशाश्‍वत भेट देण्याऐवजी चिरंतन तत्त्वाचा प्रसार करणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक बनवा आणि ज्ञानामृत असलेली अनोखी ओवाळणी द्या !

 • राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंंदु बांधवांना आवाहन !  
 • वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
१. राखीपौर्णिमेचे महत्त्व ! 
       श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! या वर्षी १८.८.२०१६ या दिवशी राखीपौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भावाने आपले रक्षण करावे, यासाठी बहीण या दिवशी भावाला ओवाळते आणि राखी बांधते. भाऊ बहिणीला पैसे अथवा तिला उपयोगी पडेल, अशी वस्तू ओवाळणी म्हणून देतो. 

प.पू. डॉक्टरांची कृपा संपादन करण्यासाठी त्यांनी साधना करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या गोेष्टींविषयी कृतज्ञ आणि शरणागत राहून अखंड साधनारत रहाणे आवश्यक !

प.पू. पांडे महाराज
       प.पू. पांडे महाराजांनी मला मी डोळस आहे का ?, असा प्रश्‍न विचारून अंतर्मुख केले. ते म्हणाले, आपण डोळ्यांनी सर्व गोष्टी पहातो; परंतु त्यातील मर्म शिकण्याकडे आपले लक्ष नसते. त्यांनी केलेले मार्गदर्शन सर्वांनाच उपयुक्त असल्याने पुढे देत आहे.
१. झाडे, पशु आणि पक्षी या योनीतील सर्व जीव परमेश्‍वराने दिलेल्या स्थितीत राहून त्यांच्या प्रारब्धानुसार यातना भोगत असूनही आनंदी असणे : झाडे उन्हा-तान्हात, तसेच थंडी-पावसात एके ठिकाणी उभी असतात. त्यांना मानवासारखे अन्न-पाणी मिळवण्यासाठी कुठेही जाता येत नाही. त्यांना ईश्‍वरेच्छेने जेव्हा आणि जितके पाणी मिळेल, तेवढ्यावरच समाधानी रहावे लागते. कधी कोणी दगड मारेल, फांदी तोडेल किंवा कुर्‍हाडीचे घाव घालेल, याचा काही नेम नसतो. हे सर्व प्रारब्ध किंवा पूर्वकर्माची फळे म्हणून त्या झाडालाही निमूटपणे सहन करावे लागते. त्याविषयी ते कोणाकडेही तक्रार करत नाही. या यातना यमयातनेसारख्याच कष्टदायक नाहीत का ? मानवाव्यतिरिक्त अन्य प्राणी, पशू आणि पक्षी यांचेही तसेच आहे. ते सर्व परमेश्‍वराने दिलेल्या योनीत राहून स्वतःचे प्रारब्ध आणि यातना भोगत आहेत. असे असतांनाही हे सर्व जण आनंदी आणि चैतन्यमय दिसतात, हे सर्व आपण पहातो.

बाबांच्या हृदयविकारासारख्या गंभीर आजारपणात प.पू. डॉक्टरांवर पूर्ण श्रद्धा ठेवणारी आणि स्थिर रहाणारी कु. ऐश्‍वर्या जोशी ! (वय ११ वर्षे)

कु. ऐश्‍वर्या जोशी
१. बाबांना बरे नसल्याने पुण्याला जायचे आहे, हे मामांनी सांगितल्यावर ताण 
न येता श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांना प्रार्थना लिहून तो कागद त्या 
दोघांच्या चित्रासमोर ठेवणेे 
      ८.५.२०१६ या दिवशी मी कल्याणला माझ्या मामाकडे होते. मला दुसर्‍या दिवशी रामनाथीला जायचे होते; म्हणून मी सिद्धता करत होते. अकस्मात् मामा मला म्हणाला, तुझ्या बाबांना बरे वाटत नाही. तू देवाला प्रार्थना कर. त्यांना भेटायला आपल्याला पुण्याला जायचे आहे. तेव्हा बाबांना मध्ये मध्ये बरे नसते. तसेच काहीतरी होत असेल, असे मला वाटले. त्यामुळे मी ताण न घेता प.पू. डॉक्टरबाबांना प्रार्थना केली, माझ्या बाबांना जो त्रास होत आहे, तो तुम्हीच दूर करून त्यांना शक्ती द्या. कृष्णाच्या मोरपिसाने त्यांच्या मनावरील आवरण आणि त्रास दूर करा. या प्रार्थना कागदावर लिहून मी तो कागद प.पू डॉक्टरांचे छायाचित्र आणि श्रीकृष्णाचे चित्र यांच्या समोर ठेवला.

आषाढ अमावास्या काळातील प.पू. डॉक्टरांच्या कुंडलीतील ग्रहमान आणि त्यामुळे होणारे अशुभ परिणाम यांविषयी ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनी केलेले ज्योतिषशास्त्रीय विवेचन !

सौ. प्राजक्ता जोशी
      प.पू. डॉक्टरांच्या जन्मपत्रिकेनुसार आषाढ अमावास्येच्या काळातील (२.८.२०१६ आषाढ/दर्श अमावास्या) ग्रहमान त्यांच्या आरोग्यासाठी त्रासदायक आहे, असेे जाणवते. त्यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती पुढे देत आहे.
१. प.पू. डॉक्टरांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती 
आणि त्यामुळे होणारे अशुभ परिणाम !
१ अ. कुंडलीत अष्टमांत बुध, गुरु, शुक्र, राहू एकत्र येत असून व्ययस्थानात रवि असल्याने यांचा परिणाम शारीरिक प्रकृतीवर होण्याची, तसेच प्राणशक्ती उणावणे, ग्लानी येणे आदी त्रास होण्याची शक्यता असणे : प.पू. डॉक्टरांच्या कुंडलीत जानेवारी २०१६ पासून अष्टमात (कुंडलीतील आठवे स्थान - यालाच मृत्यूस्थान असेही म्हणतात.) सिंह राशीत गुरु, राहू युती, म्हणजे चांडाळयोग आहे. २७.७.२०१६ या दिवशी बुध ग्रह आणि ३१.७.२०१६ या दिवशी शुक्र ग्रह अष्टमांत सिंह राशीत प्रवेश करतो. याचाच अर्थ प.पू. डॉक्टरांच्या कुंडलीत अष्टमांत बुध, गुरु, शुक्र, राहू एकत्र येत आहेत आणि यांच्या व्ययस्थानात रवि ग्रह आहे. या ग्रहांचा परिणाम त्यांच्या शारीरिक प्रकृतीवर होण्याची शक्यता आहे. या ग्रहमानामुळे प.पू. डॉक्टरांना तोल जाणे, प्राणशक्ती उणावणे, मळमळल्यासारखे वाटणे किंवा उलटी होणे, ग्लानी येणे, तोंडाला चव नसणे, सर्दी, ताप, अंग दुखणे यांसारखे आजार होण्याची शक्यता आहे. (हे सर्व आजार मला होत आहेत. - डॉ. आठवले )

ॐ हा जप आपोआप चालू होण्याविषयी साधकाला आलेली अनुभूती !

प्रा. श्रीकांत भट
१. महाविद्यालयात दुचाकीने जात असतांना गणपतीने माझ्या ॐकार या मूळ स्वरूपाचा नामजप तुला करायचा आहे, असे सांगितल्याचे जाणवणे : २८.१०.२०१५ या दिवशी सकाळी ८ वाजता मी घरून महाविद्यालयात जायला दुचाकीने निघालो. मी दुचाकीने महाविद्यालयात जात असतांना मला गणपतीने माझ्या ॐकार या मूळ स्वरूपाचा नामजप तुला करायचा आहे, असे सांगितल्याचे जाणवले. यानंतर माझा ॐचा जप आपोआप चालू झाला. मी वाहन चालवत असतांना हा जप तीव्रतेने आणि जलद गतीने होत होता, तर मी महाविद्यालयात पोचल्यावर माझा संथगतीने जप चालू झाला. ॐचा जप करत असतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता आणि चित्त स्थिरावल्यासारखे जाणवत होते.
२. दैनिक सनातन प्रभात वाचल्यावर त्यात साधकांनी ॐ हा जप करावा, असे सांगितले असल्याचे लक्षात येणे : माझा दुपारी १ वाजेपर्यंत हा जप का होत होता ?, हे मला समजलेच नाही. मी महाविद्यालयातून घरी आल्यावर दैनिक सनातन प्रभात वाचण्यासाठी घेतला. तेव्हा त्यात एका संतांनी ॐ चा जप २८.१०.२०१५ ते २.११.२०१५ पर्यंत करावा, असे सांगितल्याचे वाचनात आले.
- प्रा. श्रीकांत भट, अकोला (२९.१०.२०१५)

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना

राष्ट्र्रध्वजाचा मान राखा या विषयीचा 
प्रबोधनात्मक दृकश्राव्य लघुपट सर्वत्र 
प्रसारित करून ही चळवळ प्रभावीपणे राबवा !
       हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी राष्ट्र्रध्वजाचा मान राखा ही चळवळ राबवण्यात येते. या चळवळीसाठी ४.१५ मिनिटांचा राष्ट्र्रध्वज सन्मान आंदोलन हा मराठी भाषेतील, तसेच २ मिनिटे कालावधीचे हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम् भाषांतील प्रबोधनात्मक दृकश्राव्य (audio-visual) लघुपट सिद्ध करण्यात आले आहेत. हे लघुपट अद्ययावत करून जानेवारी मासांत सर्व जिल्ह्यांना पाठवण्यात आले होते. त्या वेळी काही जिल्ह्यांनी जुने लघुपट पुसून न टाकल्याने जुने आणि अद्ययावत असे दोन्ही लघुपट त्यांच्याकडे आहेत, तरी कार्यकर्त्यांनी आता २ जुने लघुपट पुसून सुधारित अद्ययावत लघुपट पुढील लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावेत.
       लघुपटासाठी भाषानिहाय संगणकीय मार्गिका (लिंक) पुढे देत आहे.
१. मराठी : https://goo.gl/D0NgkL
२. हिंदी : https://goo.gl/je1PV6
३. कन्नड : https://goo.gl/3pzQ23
४. तमिळ : https://goo.gl/nY5354
५. तेलुगु : https://goo.gl/zPYNgd
६. मल्ल्याळम् : https://goo.gl/nGl6Ak
       लघुपट मिळण्यात काही तांत्रिक वा तत्सम अडचण असल्यास सौ. विद्या शानभाग यांच्याशी ८४५१००६०८२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
अधिकाधिक जणांपर्यंत प्रबोधनात्मक 
लघुपट पोचवून राष्ट्ररक्षणाच्या कार्यात सहभागी व्हा !
१. या लघुपटांचे स्थानिक दूरचित्रवाहिनीद्वारे (केबल नेटवर्कद्वारे) प्रसारण करता येईल.
२. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, चित्रपटगृह इत्यादी ठिकाणीही हे लघुपट दाखवता येतील.
३. व्हॉट्सअ‍ॅप प्रणालीद्वारेही ते प्रसारित करू शकतो. त्यासाठी लहान आकारातील लघुपट वरील संगणकीय मार्गिकेवर ठेवण्यात आले आहेत.

सनातनच्या स्थापनेचे साक्षीदार असणार्‍या साधकांसाठी सूचना !

आताच्या पिढीला सनातनचा इतिहास 
समजण्यासाठी सनातनच्या कार्यारंभीचे अनुभव कळवा !
        सनातनचे कार्य उभे करण्यासाठी आरंभीच्या काही वर्षांत साधकांनी पुष्कळ कष्ट घेतले. काहींना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले, तर चांगले कार्य करत असल्याविषयी काही साधकांचे समाजातून कौतुकही झाले. आता समाजाला सनातनचे कार्य, साधक यांविषयी माहिती झाली आहे. कार्यारंभी जेव्हा समाजाला सनातन, साधना, तसेच गुरुकृपायोगानुसार साधना आदींविषयी माहिती नव्हती, तेव्हा प्रसार करणे, समाजाला सनातनच्या कार्याशी जोडणे आणि त्यांच्या मनात सनातनविषयी विश्‍वास निर्माण करणे, या सेवा करण्यासाठी अनेक साधकांनी कष्ट घेतले. साधकांचे ते कष्ट, कटू-गोड अनुभव आणि त्यातून त्यांना मिळालेली आध्यात्मिक शिकवण, हा सनातनचा इतिहास आहे. या इतिहासाचे साक्षीदार असणार्‍या, तसेच सनातनच्या कार्याची पायाभरणी करणार्‍या साधकांनी सनातनच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने त्यांचे अनुभव लिहून पाठवावे. आपण आपल्या इतिहासाचे जतन करूया. त्यातून पुढील पिढीलाही शिकता येईल. तसेच आता प्रसार करणे किती सुलभ झाले आहे, हे लक्षात येऊन ईश्‍वराप्रती कृतज्ञताही वृद्धींगत होईल.
        ज्या साधकांनी यापूर्वी असे लिखाण लिहून दिले आहे, त्यांनी पुन्हा ती सूत्रे लिहून देऊ नयेत.
अनुभव / अनुभूती पाठवण्यासाठी पत्ता : २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.
ई-मेल पत्ता - sankalak.goa@gmail.com
संपर्क क्रमांक : ९४०४९५६०७४

साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांनी आपल्या बहिणीला वाचक बनवण्याची इच्छा दर्शवल्यास लक्षात घ्यावयाची सूत्रे

        दैनिक वितरणाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी दैनिक चालू करण्यास प्राधान्य द्यावे. तसे शक्य नसल्यास साप्ताहिक, पाक्षिक अथवा मासिक सनातन प्रभात चालू करू शकतो. नियतकालिक वितरणाची व्यवस्था नसल्यास हितचिंतकांना पोस्टाद्वारे अंक पाठवता येईल. नियतकालिक चालू करतांना त्यांच्या भाषेचा विचार करणे अपेक्षित आहे.
        सनातन प्रभातच्या नूतन संकेतस्थळावरून वाचक बनण्यास इच्छुक असलेले जिज्ञासू वर्गणीदार होऊ शकतात, तर वाचक त्यांच्या अंकाचे नूतनीकरण करू शकतात. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करावे. ऑनलाईन वर्गणीदार अर्ज भरणे शक्य नसल्यास स्थानिक साधकांनी त्यांना संपर्क करावा. ही सुविधा दैनिक वगळून अन्य नियतकालिकांसाठी आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आनंद माझ्या मागे आहे. दुःख माझ्या पुढे आहे. माझ्या मागे जो
 आनंद आहे, तो तुमच्या मागे येईल, तेव्हा मी सुखी होईन. मी दुःखी आहे.
भावार्थ : आनंद माझ्या मागे आहे, याचा अर्थ याप्रमाणे आहे. सुषुम्ना नाडीतून शक्तीप्रवाह जाऊ लागला की, आनंदाची अनुभूती येते. ही सुषुम्ना नाडी पाठीच्या मणक्यातून, म्हणजे शरीराच्या मागच्या भागातून जात असल्याने आनंद माझ्या मागे आहे, असे म्हटले आहे. दुःख माझ्या पुढे आहे म्हणजे प्रकृतीमुळे निर्माण झालेले भोग समोर येतात, त्याचे दुःख होत असते. मी दुःखी आहे म्हणजे तुम्ही नामजप करून आनंदी होत नाही, याचे मला दुःख आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
जनता दारिद्य्रात जगत असतांना पैसे जाळणार्‍या आणि आरोग्यहानी करणार्‍या तमप्रधान फटाक्यांवर हिंदु राष्ट्रात बंदी असेल ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधक
साधक जेव्हा एखाद्या गोष्टीचा निर्धार करतो आणि निर्धाराला दृढतापूर्वक चिकटून राहतो, 
तेव्हा उद्दिष्टपूर्ती होणे लांब राहत नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

दुकाने : गोरक्षकांची कि गोभक्षकांची ?

संपादकीय 
      नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून वादग्रस्त विषयांवर बोलून विनाकारण वाद ओढवून घेत नाहीत. सत्तास्थापनेपासून आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांत त्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची असूनही त्यांनी सूचक मौन पाळले होते. त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती. टीकेनंतरही त्यांनी प्रत्युत्तर देण्याचे जाणीवपूर्वकच टाळले होते; परवा मात्र बोलता बोलता गोरक्षकांवर टीका करून नवाच वाद ओढवून घेतला. गोरक्षणाच्या नावावर दुकाने उघडून बसलेल्या या समाजकंटकांची कुंडलीच बाहेर काढा. तुम्ही खरोखरच गोरक्षक असाल, तर गायींना प्लास्टिकसारखे घातक पदार्थ खाऊ देऊ नका; कारण अर्ध्याहून अधिक गायी प्लास्टिक पोटात गेल्याने मृत्यू पावतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. दादरी (उत्तरप्रदेश) येथील अखलाख प्रकरण आणि गुजरातेत गोरक्षकांनी गोमातेची चामडी काढण्याच्या प्रकरणाला केलेला विरोध पाहून पंतप्रधान संतप्त झाले आहेत. रात्री अपराध करणारेच सकाळी गोरक्षक म्हणून समाजात हैदोस घालतात, असे त्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधानांचे म्हणणे गोरक्षणाच्या नावाखाली दिखाऊपणा करणार्‍या काही जणांच्या संदर्भात कदाचित् योग्य असेलही; पण काही जण तसे असतात; म्हणून सर्वच गोरक्षकांना असे अपकीर्त करणे योग्य नव्हे. एवढ्या विशाल संघटनातील दोघा-चौघांची वाट चुकली; म्हणून गोमातेसाठी रात्रं-दिवस स्वतःच्या जिवावर उदार होऊन कार्य करणार्‍या गोरक्षकांवर संशय घेणे, दुर्दैवी आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn