Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


आजचे दिनविशेष

आज नागपंचमी

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे ४६ वे संत पू. डॉ. भगवनकुमार
मेनराय यांचा आज वाढदिवस

सनातनच्या धर्मकार्याच्या रौप्यमहोत्सवानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने सनातनच्या स्थापनेमागील उद्देश सफल होईल !
    वर्ष १९९१ मध्ये प.पू.भक्तराज महाराजांच्या आशीर्वादाने चालू झालेल्या सनातनच्या बीजरूपी कार्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अध्यात्माचा प्रसार करणे, हा सनातनच्या स्थापनेमागील उद्देश होता. आज धर्मशिक्षण देणारे सत्संग, ध्वनीचित्र-चकत्या, फलक प्रदर्शने आणि संकेतस्थळे यांद्वारे होत असलेला अध्यात्मप्रसार, अध्यात्माविषयीच्या २९० ग्रंथांची निर्मिती अन् त्यांचे १५ भाषांतील प्रकाशन, साधक-पुरोहित पाठशाळेद्वारे होत असलेली सात्त्विक पुरोहितांची निर्मिती, तसेच देश-विदेशांत १५ सहस्रांहून अधिक साधकांनी अध्यात्मातील सिद्धांत शिकून साधना करणे, हे या कार्याचे दृश्य स्वरूप आहे. हे सर्व कार्य आजपर्यंत संतांच्या आशीर्वादामुळेच होऊ शकले आहे. बाह्यांगाने दिसणारे हे कार्य आणि सूक्ष्मातून होत असलेले कार्य वेगवेगळे असते. सनातनचे कार्य मूलतः ज्ञानशक्तीचे असून त्याचे महत्त्व अधिक आहे. येत्या २५ वर्षांत सनातन (हिंदु) धर्माची जी जगभर प्रस्थापना होणार आहे, त्यात सनातनच्या ज्ञानशक्तीच्या कार्याचा बहुमोल वाटा असणार आहे.

सनातनच्या धर्मकार्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष !

    सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी मानवजातीच्या कल्याणार्थ आरंभलेल्या धर्मकार्याचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. गेल्या २५ वर्षांतील सनातनची गरुडझेप स्तंभित करणारी आहे. सनातनने सांगितलेल्या गुरुकृपायोग या साधनामार्गामुळे जुलै २०१६ पर्यंत सनातनचे ६८ साधक संत बनले, तर ९२७ साधकांची संतत्वाकडे वाटचाल चालू आहे. २५ वर्षांत (जुलै २०१६ पर्यंत) सनातनच्या २९३ ग्रंथांच्या १५ भाषांत ६६ लाख २१ सहस्रांहून अधिक प्रतींचे प्रकाशन, आध्यात्मिक संशोधन, दूरचित्रवाहिन्यांवरील सत्संगांद्वारे धर्मशिक्षण, सनातन प्रभातच्या ९ नियतकालिकांद्वारे धर्मजागरण... हे सारे अद्वितीय आहे !

सनातनच्या प्रेरणेतून चालू असलेले कार्य !

  • प्रखर हिंदुत्ववादी नियतकालिके सनातन प्रभात
  • हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती
  • हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा रणरागिणी
  • हिंदूंच्या हिताकरिता लढणारी हिंदु विधीज्ञ परिषद

सनातनच्या आश्रमांविषयी महर्षींनी काढलेले गौरवोद्गार

१. गुरूंच्या आश्रमाजवळ अधूनमधून गरुड आणि पुष्कळ पक्षी येत असतात. यावरून तुमचे गुरु दैवी असल्याचे लक्षात येते. (प्रत्यक्षातही आश्रमात मोर आणि विविध प्रकारचे पक्षी येतात. एरवी मानवाला घाबरणारी फुलपाखरे आश्रमातील साधकांच्या अंगावर पुष्कळ वेळ बसतात.- संकलक)
२. मी तुमच्या आश्रमाला मंत्र, शक्ती, कीर्ती असे सर्वकाही देऊन टाकले.
३. गुरूंचा आश्रम कुठेही असो, त्याचे आम्ही रक्षण करणार, हे आमचे वाक्य आहे.
४. इतर संस्थांचे बाकी सर्व आश्रम वेगळ्या कारणासाठी आहेत; पण पृथ्वीवर हिंदु धर्मासाठी कार्य करणारा हा एकमेव आश्रम आहे. अध्यात्माचा शंखनाद करणारा हा एकमेव आश्रम आहे. जेव्हा गुरूंनी पहिला आश्रम चालू केला, त्या वेळी केवळ १० जण होते. पुढे वाढले, तसेच अजून पुढे वाढतील. आश्रमात पुष्कळ लोक येणार. (वर्ष १९८९ ते १९९३ या कालावधीत प.पू. डॉक्टरांच्या पहिल्या शीव येथील आश्रमात १० - १२ साधक होते. आता आश्रमांतील साधकांची संख्या शेकडो आहे. - संकलक)
५. हे शास्त्र आता या आश्रमासाठी आहे. ३ सहस्र वर्षांपर्यंत या आश्रमाचे नाव पृथ्वीवर रहाणार आहे.

सत्यनिष्ठ कार्यामुळे लक्षावधी वर्षांपूर्वीच महर्षींनी नाडीपट्टीमध्ये गौरवलेली सनातन संस्था !

१. सत्यमेव जयति ।, हे वचन सार्थ ठरवणारी सनातन संस्था !
    हे सर्व पहाता महर्षीही सनातन संस्थेचे वर्णन करतांना म्हणतात, सत्याला धरून चालणारी केवळ ही एकमेव संस्था आहे. सत्यमेव जयति ।, असे वचन असल्याने शेवटी विजय हा प.पू. डॉक्टरांचाच आहे आणि योगायोग असा की, त्यांच्या नावातही जय आहे. (प.पू. डॉक्टरांचे नाव जयंत आहे. - संकलक)
२. ६.१२.२०१५ या दिवशी महर्षींनी १०० टक्क्यांपैकी ९९ टक्के नाही,
तर १००० पटींनी आपल्याला विजय मिळणार आहे, असा संदेश प.पू. डॉक्टरांना देण्यास सांगणे
   या विजयाचे वर्णन करतांना महर्षींनी सप्तर्षी जीवनाडीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून ६.१२.२०१५ या दिवशी निरोप पाठवला, परम गुरुजींना सांगा की, १०० टक्क्यांपैकी ९९ टक्के नाही, तर १००० पटींनी आपल्याला विजय मिळणार आहे. तेव्हा निश्‍चिंत असावे. काळजीचे काही कारण असेल, तर आम्हाला सांगावे. आम्ही ती काळजी त्वरित दूर करू. आम्ही त्यांची छाया बनून त्यांच्याबरोबरच आहोत. त्यांचा अवतार शरिरदेहातील आहे. त्यांचे शरीर थकल्याने ते दूर कुठे जाऊ शकत नाहीत; परंतु आम्हाला शरीर नसल्याने आम्ही मात्र त्यांच्या आज्ञेनुसार दूरदूर जाऊन कार्य करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे सार्‍या विश्‍वाचे गुरु आहेत ! - पू. डॉ. ॐ उलगनाथन्

सनातनच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने संतसंदेश
    माझे परमभाग्य आहे की, सनातनला २५ वर्षे पूर्ण झाल्याविषयी एक संदेश लिहिण्याची संधी मिळाली आहे. लाखो वर्षांपूर्वी शिव-पार्वतीमध्ये झालेल्या संवादात सनातन संस्थेला त्यांनी सनातन चैतन्य संस्था असे संबोधले आहे. ज्यांनी या संस्थेची स्थापना केली, अशा परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा उल्लेख सनातन चैतन्य गुरु असा केला आहे. माझे गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे सार्‍या विश्‍वाचे गुरु आहेत. त्यांनी स्थापन केलेला सनातन आश्रम हा दगड, माती, सिमेंटने उभी केलेली इमारत नव्हे; तर त्यांच्या ईश्‍वरी चैतन्याने ओतप्रोत झालेला चैतन्यमय आश्रम आहे. या आश्रमातील प्रत्येक दगड सनातनचे साधक आहेत. त्याचे खांब म्हणजे प.पू. गुरुदेव आहेत.

सनातनचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय निश्‍चित पूर्ण होणार ! - प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये, पुणे

प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये, पुणे
    आज सकाळीच सनातनच्या पत्रकार चि. शलाकाचा (प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे यांचा) भ्रमणभाष आला की, सनातनच्या कार्याला २५ वर्षे पूर्ण होत असल्याविषयी आपला आशीर्वादरूपी संदेश द्यावा. माझा अंकशास्त्रावर विश्‍वास आहे. शलाकाचा भ्रमणभाष आला, ती वेळ सकाळी ८ वाजून ४४ मिनिटे होती. त्यातील अंकांची बेरीज सात (८ + ४ + ४ = १६ = १ + ६ = ७) येत होती. सनातनच्या कार्याला २५ वर्षे पूर्ण झाली. २५ या आकड्यातील अंकांची बेरीज पुन्हा सातच (२ + ५ = ७) येते. सद्गुरु (सौ.) अंजलीताई आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांना जुलै महिन्यात सद्गुरुपदाचा पुरस्कार मिळाला. जुलै हासुद्धा सातवाच महिना आहे; म्हणजेच यशाचा सात हा अंक हात धुऊन सनातनच्या मागे लागला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, धर्माचे महत्त्व ओळखा !
    हिंदु धर्मातील जन्म ते मृत्यू यांच्या दरम्यान होणारे विवाह, वास्तूशांत वगैरे विधी, तसेच मृत्यूनंतर करण्यात येणारे श्राद्धादी विधी, पूजा, यज्ञयाग वगैरे उपासनापद्धती हे सर्व ईश्‍वरप्राप्तीसाठी पूरक आहेत. विज्ञानातील एकतरी प्रयोग ईश्‍वराची प्राप्ती करून देतो का ?
साधक आणि धर्माभिमानी यांनी राष्ट्र अन् धर्मासाठी संघटित होणे, म्हणजे क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांचा एकत्रित आविष्कारच होय !

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Dharm raksha hetu nirantar prayasrat Sanatan Sansthapar
nastiktawadiyo dwara niradhar dosharopan.  
- Sanatanka samarthan kar Hinduon ki ekta dikhaye !
जागो !
धर्म रक्षा हेतु निरंतर प्रयासरत सनातन संस्था पर 
नास्तिकतावादियों द्वारा निराधार दोषारोपण.
- सनातन का समर्थन कर हिन्दुआें की एकता दिखाएं !

अवघ्या २५ वर्षांतील सनातनच्या कार्याची गरूडझेप !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
पू. नंदकुमार जाधव
   किती वर्णावी गुरूंची थोरवी, याची अनुभूती आपल्यापैकी अनेकजण घेत असतील. सनातनचे सहस्रो साधकदेखील ही अनुभूती प्रतिदिन घेत आहेत, ती परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रेरणेने चालू असलेल्या साधनारूपी कार्यामुळे ! म्हणूनच गत २५ वर्षांत विस्तारलेल्या सनातनच्या कार्याच्या कक्षा आणि व्याप्ती यांविषयी समाजालाही अवगत करणे आवश्यक वाटते. परात्पर गुरूंच्या या विशाल कार्याचे रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने केलेले हे कृतज्ञतारूपी सिंहावलोकन ! ही आत्मस्तुती नसून ईश्‍वरी अधिष्ठानसह कार्य केल्यास सहजगरुड भरारी घेता येऊ शकते, याचे कथन आहे.

संकलक : सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि पू. नंदकुमार जाधव, प्रसारसेवक, सनातन संस्था

१. सनातनच्या धर्मकार्याचा प्रारंभ !
सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी त्यांचे इंदूरनिवासी सद्गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रेरणेने वर्ष १९९१ मध्ये सनातनच्या माध्यमातून धर्मकार्यास प्रारंभ केला. प.पू. भक्तराज महाराज, तसेच अनेक संत यांच्या कृपाशीर्वादामुळेे आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या समाजोद्धाराच्या अत्यंत्यिक तळमळीमुळे सनातनचे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या उद्देशाने चालू केलेले कार्य गत २५ वर्षांत जगभरात प्रचंड वेगाने वाढले. सनातनचे हे इवलेसे रोपटे आज विश्‍वभरातील हिंदूंसाठी आधारवड बनला आहे. २५ वर्षांत सनातनच्या कार्याने जणू गरूडझेपच घेतली !

सनातनने आरंभ केलेले राष्ट्रहितैषी उपक्रम

सद्गुरु (कु.) अनुराधा
वाडेकर
     स्वसंरक्षण प्रशिक्षण, प्रथमोपचार प्रशिक्षण, आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षणवर्ग आणि अग्नीशमन प्रशिक्षणवर्ग या राष्ट्रहितैषी उपक्रमांचा आरंभ सनातनने १० - १५ वर्षांपूर्वीच अत्यंत दूरदृष्टीने केला. त्याविषयी सनातनचे विविध ग्रंथही प्रकाशित झाले आहेत. आताही सनातनचे साधक अन्य संघटना राबवत असलेल्या विविध राष्ट्रहितैषी उपक्रमांत सहभागी होतात.
संकलक : सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, प्रसारसेवक, सनातन संस्था.
१. प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग
   एखाद्या व्यक्तीला अपघात झाल्यास वा तिला आकस्मिक त्रास चालू
प्रथमोपचार प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक 
झाल्यास किंवा तिच्यावर अन्य एखादी आपत्ती कोसळल्यास तिला सहकार्य करणे आणि तिच्या प्राणाचे रक्षण करणे, हे देशातील प्रत्येक नागरिकाचे अलिखित कर्तव्यच आहे. हा समाजऋण फेडण्याचा एक भागही आहे. या दृष्टीने संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात येतात. यांमध्ये पीडित व्यक्तींची प्राथमिक तपासणी कशी करावी, हे शिकवण्यात येऊन विविध प्रकारच्या इजा आणि त्रास यांची सविस्तर माहिती देण्यात येते, तसेच त्या त्या प्रकारात प्रथमोपचाराची कोणती उपचारपद्धत अवलंबावी, हे सनातनकृतीसह शिकवते. त्याविषयी प्रथमोपचार प्रशिक्षण नावाचा सनातनचा ग्रंथही नुकताच जुलै २०१६ मध्ये प्रकाशित झाला आहे.

आगामी भीषण आपत्काळात संजीवनी ठरणारी सनातनची ग्रंथमालिका !

     भावी काळात ओढवणार असणार्‍या महापूर, महायुद्ध आदी आपत्तींत डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणे कठीण जाईल. आपत्तींमध्ये रक्षण होऊन जगणे सुसह्य होण्यासाठी हे ग्रंथ अवश्य संग्रही ठेवा -
विकार-निर्मूलनासाठी उपयुक्त ग्रंथ : नामजप (२ भाग), रिकाम्या खोक्यांचे उपाय, आध्यात्मिक यंत्रे, प्राणशक्तीवहन उपाय, मंत्रोपचार, घरगुती आयुर्वेदीय उपचार, स्वरोदयशास्त्रानुसार उपाय आणि प्राणायाम, बिंदूदाबन (२ भाग), रिफ्लेक्सॉलॉजी आणि स्वसंमोहन उपचार (४ भाग).
अन्य ग्रंथ : अग्निहोत्र, प्रथमोपचार (३ भाग), अग्नीशमन प्रशिक्षण, आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षण आणि औषधी वनस्पतींची लागवड.
सनातनच्या ग्रंथांच्या अनुवादासाठी योगदान द्या !
         भूतलावर कोठेही उपलब्ध नसलेल्या ज्ञानाचा समावेश, वैज्ञानिक परिभाषा आणि कृतीशील मार्गदर्शन, ही सनातनच्या ग्रंथांची ठळक वैशिष्ट्ये आहेत. आचारधर्म, धार्मिक कृती, देवता, साधना, राष्ट्र-धर्मरक्षण आदी विषयांवर जुलै २०१६ पर्यंत २९३ ग्रंथांच्या १५ भाषांत ६६ लाख २१ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. या ग्रंथांचा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतून अन्य भाषांत अनुवाद करण्यासाठी साहाय्य करा !
          या ग्रंथसंपदेचा अनुवाद करणे, ही धर्मसेवाच आहे ! या कार्यात सहभागी होऊन ईश्‍वरी कृपा संपादा !
संपर्क : ९४०४९५६०७४

मी... सनातनचे ग्रंथविश्‍व... परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धर्मदूत !

         शिवाच्या जटेतून जशी गंगानदी पृथ्वीला पावन करण्यासाठी अवतरित झाली, तसे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून अखिल मानवजातीचा उद्धार करण्यासाठी सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानगंगा अवतरित झाली आहे ! अध्यात्मशास्त्र, साधना, आचारधर्म, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण, बालसंस्कार, आयुर्वेद, स्वभाषा, भावी आपत्काळात संजीवनी ठरणार्‍या बिंदूदाबनादी उपचारपद्धती आदी विषयांवरील २९३ ग्रंथांच्या १५ भाषांत ६६ लाख २१ सहस्र प्रती जुलै २०१६ पर्यंत प्रकाशित झाल्या आहेत. सनातनच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने सनातनच्या ग्रंथसंपदेचे अद्वितीयत्व दर्शवणारा हा लेख...
शब्दांकन : सनातनचे ११वे संत (पू.)
श्री. संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे प्रमुख संकलक
     परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये त्यांच्यातील दैवीपणाची प्रचीती देतात. याविषयीच्या अनुभूती साधक, हिंदुत्ववादी आणि संत यांनी घेतल्या आहेत.

सनातनच्या कार्याचे विविध पैलू

सनातनचे श्रद्धास्थान 
प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी वंदन ! 

गुरूंना वंदन करतांना शिष्य डॉ. आठवले यांचा भाव....
नेमले या चित्ता तुझ्या सेवे नाथा । नुरे कार्य आता आणिक ते ॥

सर्वांगीणदृष्ट्या आदर्श असलेल्या सनातनच्या आश्रमांची वैशिष्ट्ये !

आज अनेक संतांचे आश्रम शिष्यवर्गाला दिशादर्शन करत असले, तरी राष्ट्र अन् धर्म यांसाठीचे कार्य करणारे आश्रम दुर्लभ आहेत. दगड-विटांची केवळ वास्तू म्हणजे आश्रम नव्हे, तर साधनेचे परिपूर्ण धडे देणारे, ईश्‍वराच्या अस्तित्वाची ठायी ठायी अनुभूती देणारे आश्रम परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवले. रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच आहे. सनातनचे आश्रम सर्वदृष्ट्या आदर्श का आहेत, याचे गमक आज आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.

संकलक : सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. वास्तूरचनेचा सात्त्विकतेच्या दृष्टीने अभ्यास
आश्रमात संगणकाच्या पटलांची रचना करतांना, निवासी खोल्यांतील पलंगांची रचना ठरवतांना, भिंतींचे, कपाटांचे रंग ठरवतांना, तसेच अन्य प्रकारच्या फर्निचरचीही रचना करतांना सात्त्विकतेचा आणि रचनेमुळे निर्माण होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास केला जातो. कोणतेही कर्म करतांना डोळ्यांना चांगले दिसते का, यांसह त्याकडे पाहून मनाला काय वाटते, याचा अभ्यास करणे आता साधकांना सवयीचे झाले आहे.

२. झाडावरून फुले खुडण्याची आदर्श पद्धत
आश्रमातील ध्यानमंदिर आणि विविध कक्षांतील देवतांच्या प्रतिमांच्या पूजनासाठी लागवडीतून फुले आणली जातात. फुले खुडतांनाही रोपाच्या दर्शनी भागातील फुले तशीच ठेवली जातात; कारण ते त्या रोपाचे सौंदर्य असते. आतील भागातील फुले खुडली जातात. आश्रमातील देवतांच्या प्रतिमांची संख्या जितकी आहे, तेवढीच फुले आणली जातात.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनने विविध क्षेत्रांत केलेले आध्यात्मिक संशोधन

सद्गुरु (सौ.) अंजली
गाडगीळ
        वर्ष १९९० पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या वतीने आध्यात्मिक क्षेत्रात संशोधन केले जात आहे. वाईट शक्ती, वास्तूंत झालेले पालट, दैवी कण यांविषयीचे संदर्भ शेकडो ध्वनीचित्रचकत्यांमध्ये सनातनने उपलब्ध केले आहेत. आता सनातनच्या या संशोधनकार्याला महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचेही साहाय्य लाभत आहे. हे संशोधन आता महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहे. एखाद्या आध्यात्मिक संस्थेने धार्मिक अथवा आध्यात्मिक घटनांचे वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे अशा प्रकारे संशोधन करणे अद्वितीय आहे. सनातन येणार्‍या अनेक पिढ्यांसाठी हा अमूल्य ठेवा जतन करत आहे. त्यासाठी समाज सनातनचा सदैव ऋणी राहील.
संकलक : सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची विहंगम गतीने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी निर्मिलेला गुरुकृपायोग !

कै. पू. (डॉ.)
वसंत बाळाजी आठवले
१. गुरुकृपायोगाचा उगम
      कृपा हा शब्द कृप् या धातूपासून सिद्ध होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात. अध्यात्मात ईश्‍वरप्राप्तीसाठी, म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग, ध्यानयोग, हठयोग इत्यादी अनेक योगमार्ग, म्हणजेच साधनामार्ग उपलब्ध असतांना सर्व मार्गांपेक्षा शीघ्र गतीने साधकांची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या अनुभवावरून गुरुकृपायोग निर्माण केला. सर्वसामान्य लोकांमध्ये अन् बहुतांश साधकांमध्येही भक्तीमार्गात आवश्यक असलेले भगवंतावरील निःसीम प्रेम किंवा ज्ञानमार्गासाठी आवश्यक असलेले वैराग्यही नसते. अशा साधकांसाठी आणि सर्वांसाठीही कर्म, भक्ती अन् ज्ञान या योगांचा सुरेख संगम असलेला गुरुकृपायोग प.पू. डॉक्टरांनी विशद केला. यात कर्मयोगाला प्राधान्य दिले आहे आणि त्याला भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांची जोड दिली आहे.

सनातन अल्पावधीत व्यापक होण्यामागचे उघड गुपित : परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्री. भूषण केरकर
        कोणतीही संस्था मोठी होण्यामागे काही वैशिष्ट्ये असतात. बहुतांश वेळा ही वैशिष्ट्ये मानसिक आणि व्यावहारिक स्तरावरची असतात. सनातन संस्था अल्पावधीत विश्‍वव्यापी होण्यामागेही काही वैशिष्ट्ये आहेत; मात्र ही वैशिष्ट्ये आध्यात्मिक स्तरावरची आहेत. प्रीती (सर्वांप्रती निरपेक्ष प्रेम), निरपेक्षपणे सतत कार्यरत रहाणे, स्वत:च्या गुण-दोषांविषयी आत्मपरीक्षण करणे, कोणत्याही संकटांना न डगमगण्याइतकी ईश्‍वरावरील श्रद्धा आणि व्यापकता ही काही निवडक वैशिष्ट्ये आहेत. सनातनची विचारधारा पूर्णत: मानणार्‍या सहस्रो साधकांमध्ये ही वैशिष्ट्ये काही प्रमाणात तरी अनुभवता येतील. अध्यात्मात पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्त्व आहे. सनातनच्या साधकांमध्ये ही दैवी वैशिष्ट्ये आहेत, याचे कारण सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्याची शिकवण आरंभीपासून साधकांना दिली आहे. आज परात्पर गुरु डॉ. आठवले हे सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाले आहेत; मात्र त्यांनी २० ते २५ वर्षांपूर्वी दिलेली ही शिकवण उगमाकडून संगमाकडे वहाणार्‍या सरितेप्रमाणे अखंड झुळूझुळू वहात आहे. सनातन अवघ्या २५ वर्षांत विश्‍वव्यापी होण्यामागे हेच गुपित आहे. ही शिकवण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये कशी रुजवली, याचे मर्म शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न...

आध्यात्मिक संग्रहालयासाठी आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतनकार्य

नांदेड येथील माहूरगडावरील श्री रेणुकादेवीच्या
मंदिराची यु.टी.एस्. उपकरणाद्वारे प्रभावळ मोजतांना साधक

        परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक संग्रहालयाची निर्मिती केली जात आहे. या संग्रहालयासाठी भारतातील तीर्थक्षेत्रे, देवळे, संतांचे मठ, संतांची समाधीस्थाने, ऐतिहासिक स्थळे इत्यादी ठिकाणच्या अध्यात्मशास्त्रदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, माती, पाणी आदी, तसेच पंचमहाभूतांचा परिणाम दर्शवणार्‍या सहस्रावधी वस्तू, छायाचित्रे आणि १६ सहस्रांहून अधिक ध्वनीचित्रफिती यांचे आजपर्यंत जतन करण्यात आले आहे. अशा अनेकविध आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतन करून सनातन संस्था अध्यात्मविश्‍वाच्या इतिहासात एक नवा अध्यायच लिहीत आहेत.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परिचय

१. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन-उपचारतज्ञ
     प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी वैद्यकीय शिक्षणानंतर १९७१ ते १९७८ या काळात ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेऊन संमोहन-उपचारपद्धतीवर संशोधन केले. १९७८ मध्ये त्यांनी मुंबई येथे संमोहन-उपचारतज्ञ म्हणून व्यवसाय चालू केला. १९८२ मध्ये त्यांनी भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्था स्थापली. १९६७ ते १९८२ अशी १५ वर्षे त्यांनी ५०० हून अधिक डॉक्टरांना संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार यांचे सिद्धान्त आणि प्रात्यक्षिके यांविषयी अमूल्य मार्गदर्शन केलेे.
२. संमोहन-उपचारातील संशोधन
     परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अयोग्य कृतीची जाणीव आणि तीवर नियंत्रण, अयोग्य प्रतिक्रियांच्या जागी योग्य प्रतिक्रिया निर्माण करणे, प्रसंगाचा मनात सराव करणे आदी संमोहन-उपचारांच्या नाविन्यपूर्ण पद्धती निर्माण केल्या. त्यांनी इओसिनोफिलिया हा रोग मानसिक ताणामुळेही होऊ शकतो, हे संशोधन केले.

श्री. शिवाजी वटकर यांनी उलगडला जीवनाच्या वाटचालीतील सनातनचा सहभाग !

श्री. शिवाजी वटकर
प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रेरणेने आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने स्थापन झालेल्या सनातनच्या स्थापनेपासून माझा संस्थेशी जवळून आणि सक्रीय संबंध आला. २५ वर्षांपूर्वी लावलेल्या या सनातनरूपी कल्पवृक्षाच्या रोपट्याचा फळाफुलांनी बहरलेला वटवृक्ष पहाण्याचे भाग्य आज लाभले. सनातन म्हणजे नित्य नूतनः सनातनः ! याचा अर्थ आहे, 'जे कधीही जुने होऊ शकत नाही ते सनातन'. त्यानुसार सनातनच्या कार्याची वाटचाल होत आहे. सनातन संस्था ही लौकिक अर्थाने स्थापन झालेली असली, तरी ती ईश्‍वरनिर्मित आणि ईश्‍वरी कार्य करणारी एकमेवाद्वितीय संस्था आहे. संस्थेचा दैदिप्यमान इतिहास म्हणजे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी कार्याचा इतिहास आहे. सनातनच्या रौप्य महोत्सवानिमित्त सनातनमुळे माझ्यासारखी 'सामान्य व्यक्ती' 'साधक' कशी बनली, हा प्रवास लेखाद्वारे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

१. सनातनच्या कार्यात सहभागी झाल्यामुळे जगण्यातील आनंद मिळाला !
सर्वसाधारण व्यक्तीसारखे मला 'सनातन' म्हणजे काय, 'अध्यात्मप्रसार म्हणजे काय, हे ठाऊक नव्हते. बुद्धीप्रामाण्यवादी आणि तथाकथित पुरोगामी यांच्यामुळे सनातन या शब्दाविषयी अपसमजच अधिक होते. सनातनच्या कार्यात सहभागी झाल्यामुळे वैयक्तिक जीवनात पालट होऊन जगण्यातील आनंद मिळाला.

सनातनच्या ग्रंथ विश्‍वाची व्याप्ती !

१. प्रसिद्ध झालेले ग्रंथ किंवा ग्रंथमालिका
        प.पू. डॉक्टरांच्या व्यापक आणि दैवी ग्रंथलेखन कार्याची अंशतः ओळख व्हावी, यासाठी त्यांनी संकलित केलेल्या ग्रंथांची वर्गवारी (जुलै २०१६ पर्यंतची) पुढे दिली आहे.
अ. हिंदु धर्मातील नित्य आचारांचे पालन करण्यास शिकवणारी ग्रंथमालिका (२४ ग्रंथ) : दिनचर्या, केशभूषा, वेशभूषा, अलंकारधारण, आहार आणि निद्रा या विषयांवरील ग्रंथ
आ. धार्मिक कृती का आणि कशा कराव्यात, हे सांगणारी ग्रंथमालिका (१३ ग्रंथ) : देवघराची रचना, देवपूजा, देवळात दर्शन घेणे, आरती, नमस्कार, वाढदिवस, उद्घाटन, श्राद्धकर्म इत्यादी विषयांवरील ग्रंथ
इ. देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये, उपासना आदींविषयी मार्गदर्शक ग्रंथमालिका (३३ ग्रंथ) : श्री गणपति, शिव, श्रीविष्णु, श्रीराम, श्रीकृष्ण, दत्त, शक्ति आदींविषयी अध्यात्मशास्त्रीय ज्ञान देणारे ग्रंथ; तसेच स्तोत्रे, आरत्या इत्यादी विषयांवरील लघुग्रंथ
ई. धर्म आणि धर्माचरण यांविषयी व्यापक दृष्टीकोन देणारी ग्रंथमालिका (२२ ग्रंथ) : धर्म; धर्मग्रंथ; वर्णाश्रमव्यवस्था; सण, धार्मिक उत्सव आणि व्रते; सोळा संस्कार; कुंभमेळ्याचे महत्त्व आणि पावित्र्यरक्षण आदी ग्रंथ
      हे सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्वशक्तीमान गुरुदेवा, आमची काहीच पात्रता नसतांना तुम्ही आमच्यावर कृपेचा वरदहस्त ठेवल्यामुळेच आम्ही सर्व साधक अजूनही जिवंत आहोत ! यासाठी आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतो. गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममंगलम् । या वचनाची सदैव स्मृती (गुरुस्मरण) आमच्या हृदयात असू द्यावी ! हीच आपल्या चरणी शरणागतीने प्रार्थना आहे !
- श्री. श्रीकांत भट आणि अधिवक्त्या सौ. श्रुती भट, अकोला

ध्वनी-चकत्या (ऑडिओ सीडी) आणि ध्वनीचित्र-चकत्या (व्हीसीडी) यांची निर्मिती !

दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मसत्संग 
मालिकांच्या ध्वनीचित्र-चकत्या (व्हीसीडी)
       परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना (एकूण १६५ भाग) आणि धार्मिक कृतींमागील शास्त्र (एकूण २०२ भाग) या दूरचित्रवाहिन्यांवरील धर्मसत्संगांच्या मालिका बनवण्यात आल्या. या धर्मसत्संगांच्या मालिकांचे ३ राष्ट्रीय दूरचित्रवाहिन्यांवर, तर १०० हून अधिक स्थानिक दूरचित्रवाहिन्यांवर प्रक्षेपण करण्यात आले.
साधनेसाठी उपयुक्त ध्वनी-चकत्या (ऑडिओ सीडी)
       परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना, अध्यात्माविषयी शंकानिरसन, देवतांच्या नामजपाची योग्य पद्धत, आरती, क्षात्रगीते आदी विषयांवरील ध्वनी-चकत्यांचीही (ऑडिओ सीडी) निर्मिती करण्यात आली आहे.

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
आपल्या अंतरातील राष्ट्र-धर्म प्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारे 
नियतकालिक सनातन प्रभात अनेकानेक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्यासाठी 
श्री. दिनेश एम्.पी. यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रयत्न करा !
        कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथील श्री. दिनेश एम्.पी. हे एक व्यावसायिक आहेत. मागील ४ वर्षांपासून ते सनातन संस्थेच्या कार्यात कृतीशीलतेने सहभागी होत आहेत. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळून साप्ताहिक सनातन प्रभातचे १ सहस्र वाचक बनवण्याचे ध्येय काही दिवसांपूर्वी निश्‍चित केले आहे. त्यांच्याकडे येणार्‍या ग्राहकाला ते नियतकालिकाचे महत्त्व अभ्यासपूर्ण सांगून वाचक होण्याची विनंती करतात. अशा प्रकारे त्यांचे अखंड प्रयत्न चालू असून आतापर्यंत त्यांनी ३०० जणांना वाचक होण्यास उद्युक्त केले आहे. त्यांच्यातील तळमळीमुळे या ध्येयाची लवकरच पूर्तता होईल, यात शंका नाही !
        सर्वत्रचे साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि कृतीशील धर्माभिमानी यांनीही श्री. दिनेश एम्.पी यांच्याप्रमाणे अधिकाधिक जणांपर्यंत हे नियतकालिक पोचवण्यासाठी ध्येय ठेवून प्रयत्न करावेत. आपले नातेवाईक, स्नेही आणि परिचित यांनाही या नियतकालिकाचे वाचक होण्यासाठी प्रवृत्त करावे !

हिंदु धर्मशास्त्रातील अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून राष्ट्र-धर्म कार्यासाठी निष्काम आणि समर्पित वृत्तीने सेवा करणार्‍या सनातन आश्रमांतील शेकडो साधकांच्या अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करा !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असणारी अन् त्यासाठी प्रभावीपणे कार्य करणारी सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे. भारतात विविध ठिकाणी संस्थेचे आश्रम आहेत. तेथे अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांविषयी ज्ञान देणारे ग्रंथ, नियतकालिके, ध्वनीचित्र-चकती आदींच्या निर्मितीची सेवा अविरतपणे चालू असते. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे उद्दिष्ट समोर ठेवून निष्काम आणि समर्पित वृत्तीने अखंड सेवारत असलेलेे शेकडो साधक या आश्रमांत वास्तव्याला असतात. त्यांच्यासाठी अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करून आध्यात्मिक लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी सर्व धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांना उपलब्ध आहे.
 
शिष्याचे परमंगल (म्हणजे मोक्षप्राप्ती) केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते
(संदर्भ: सनातनचा ग्रंथ शिष्य)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
योगी आणि भक्त
अ. मेणबत्तीचा प्रकाश म्हणजे भक्ती आणि मोठा प्रकाश म्हणजे योग. योग्याचे तेजही सहन होत नाही आणि भक्तीच्या मिणमिणत्या प्रकाशामुळे तिचे मूल्य कळत नाही. योग्याचे तेज दिसते; पण भक्तीचे सामर्थ्य लपलेले असते.
आ. ज्याच्याकडे श्‍वासोच्छ्वासाचे अनुसंधान आहे, तो खरा योगी.
भावार्थ : ध्यानयोग्याचे ध्यान संपले की, त्याचे अनुसंधान खंडित होते. ज्याचा नामजप श्‍वासोच्छ्वासावर होत असतो, म्हणजे नामाच्या ठिकाणी केवळ श्‍वासाची जाणीव असते, त्याचे श्‍वासाप्रमाणेच अखंड अनुसंधान असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सन्मार्गावरून चालण्याचे महत्त्व ! 
सत्प्रवृत्ती अंगी बाणवणे आणि तशी इच्छा होणे हे चांगलेच; पण चित्तवृत्ती संपूर्णपणे 
सन्मार्गाला लागणे, हा मनुष्य जीवनातील सुवर्णक्षण होय ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

सनातन आणि सनातन प्रभात !

विशेष संपादकीय
    वर्ष १९९८ मध्ये निधर्मी वातावरणात हिंदुविरोध बळावला जाऊन जेव्हा हिंदुत्व झाकोळले होते, तेव्हा केवळ हिंदुत्वनिष्ठ विचारांचे नियतकालिक चालू करणे, ते नियमित यशस्वीपणे आणि ध्येयनिष्ठेने चालवणे, हे आव्हान होते. आता सर्वत्र हिंदुत्वाची मोठ्या प्रमाणात चर्चा होते, अनेक संघटनांच्या व्यासपिठावरून हिंदु राष्ट्राची मागणी केली जाते; मात्र वर्ष १९९८ मध्येच प्रस्थापित लोकशाहीचे अपयश समाजासमोर मांडून ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेचे म्हणजेच आदर्श
   राज्याचे ध्येय समाजासमोर ठेवणे, हे शिवधनुष्य पेलण्याइतके कठीण होते. ते शिवधनुष्य पेलले सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ! वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रसाराचे कार्य करतांना अनेक कटू-गोड प्रसंगांचा अनुभव आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे सध्याच्या काळात सनातन हिंदु धर्माची बाजू मांडणारे, धर्माच्या तत्त्वांना जागवणारे आणि समाजाला धर्माचरणाला उद्युक्त करणारे एकही नियतकालिक अस्तित्वात नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn