Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे १९ वे संत 
पू. रमेश गडकरी यांचा आज वाढदिवस

पुरोगाम्यांनो, हिंदूंचा आवाज दाबाल, तर मोठी प्रतिक्रिया उमटेल ! - अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषद

सनातन संस्थेच्या समर्थनार्थ आयोजित हिंदूऐक्य 
मेळाव्याच्या माध्यमातून १५० हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा झंझावात ! 

अधिवक्ता श्री. पुनाळेकर यांचा सत्कार चालू
असतांना हिंदुत्वनिष्ठ उत्स्फूर्तपणे उभे राहिले तो क्षण !

 संतांची वंदनीय उपस्थिती !
  • पू. ईश्‍वरबुवा रामदासी उपाख्य दादा महाराज
  • सनातनच्या संत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
       कोल्हापूर, ५ ऑगस्ट (वार्ता.) - आजची सभा ही कौरव-पांडव यांच्या काळात युद्ध होण्यापूर्वी राजा द्रुपदाने बोलावलेल्या सभेप्रमाणे आहे. हे कुरुक्षेत्र आहे. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांनी धर्माच्या विरोधात मोठ्या प्रमाणात गरळ ओकली. समाजाची सेवा करणार्‍या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासारख्या सनातनच्या निष्पाप साधकाला अटक करण्यात आलेली आहे. हे पुरोगामी नसून भोगवादी आहेत. हे सामाजिक युद्धच आहे. डॉ. दाभोलकर यांच्या संघटनेचे अनेक भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले. यामुळेच सनातन संस्थेवर पुरोगामी संघटनांकडून आरोप करून तिच्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. पुरोगाम्यांनी सनातन संस्थेचा छळ थांबवला नाही, तर हिंदू आता शांत बसणार नाहीत. पुरोगाम्यांनो, हिंदूंचा आवाज दाबाल, तर प्रतिक्रिया मोठी होईल, हे लक्षात ठेवा, असे चेतावणीवजा प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी केले. कोल्हापूर येथे सनातन संस्थेच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या हिंदुऐक्य मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते.

तेल अविव शहरावर आक्रमण करणार्‍या फुटीरतावादी पॅलेस्टाइनच्या आक्रमणकर्त्यांची घरे इस्रायलकडून उद्ध्वस्त !

फुटीरतावाद चिरडण्याचा इस्रायली बाणा ! 
काश्मीरमधील फुटीरतावाद नष्ट करण्यासाठी 
भारत अशी कठोर पावले कधी उचलेल का ?
         तेल अविव (इस्रायल) - इस्रायलमधील मोठे शहर असलेल्या तेल अविववर २ पॅलेस्टिनी आक्रमणकर्त्यांनी जून मासात आक्रमण केले होते. याचा सूड उगवत इस्रायलने अवघ्या दीड मासाच्या आत म्हणजे ४ ऑगस्ट या दिवशी आक्रमणकर्त्यांची वेस्ट बँक येथील घरे उद्ध्वस्त करून टाकली. महंमद मखामराह आणि खालेद मखामराह अशी या आक्रमणकर्त्यांची नावे असून ते चुलक भाऊ आहेत. त्यांच्यावर न्यायालयात खटला चालू आहे.
         २ पॅलेस्टिनी बंदुकधार्‍यांनी तेल अविवमधील एका कॅफेमध्ये अंदाधुंद गोळीबार करत ४ इस्रायली नागरिकांची हत्या केली होती. या आक्रमणात १५ जण घायाळ झाले होते. त्यानंतर इस्रायलने आक्रमणकर्त्यांना प्रत्युत्तर दिले. एजन्सी फ्रान्स प्रेस (एएफ्पी) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार यट्टा येथील महंमद मखामराह याचे घर स्फोटाने उडवण्यात आले, तर त्याच्या जवळच असलेले खालेद मखामराह याचे घर जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई करण्यापूर्वी या दोघांच्या कुटुंबियांना त्यांचे साहित्य हलवण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. सरकारी आदेशांनुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सैन्याच्या महिला प्रवक्त्याने दिली आहे. आतंकवादी कारवायांना आळा घालण्यासाठी इस्रायलने हे पाऊल उचलल्याची माहितीही एएफ्पीने दिली.

भाजपशासित राजस्थानच्या हिंगोनिया गोशाळेतील ५०० गायींचा मृत्यू !

  • राजस्थानमध्ये गोमंत्रालय आणि गोमंत्री असतांनाही गोमातांवर अशी स्थिती येणे हे दुर्दैवी !
  • गाईंच्या मृत्यूस उत्तरदायी असलेल्यांवर भाजप शासन कठोर कारवाई करणार का ?
        जयपूर - येथील हिंगोनिया गोशाळेत झालेल्या दलदलीत फसून प्रतिदिन जिवंत गायी गाडल्या जात आहेत. गेल्या ३ दिवसांत येथे ५०० गायींनी प्राण सोडल्याचे वृत्त आहे.
१. या गोशाळेतून प्रतिदिन ६५ ट्रॉली शेण काढले जाते. गेल्या २ महिन्यांपासून येथून शेण उचलण्यात आलेले नाही.
२. या शेणाचा उग्रदर्प झाकण्यासाठी पालिकेने वरवरचे उपाय केले. पालिकेने शेण झाकण्यासाठी त्यावर माती टाकली, त्यानंतर आलेल्या पावसामुळे ही माती आणि शेण यांची दलदल येथे झाली आहे. या दलदलीत फसून गायींचा प्राण जात आहे.
३. प्रत्येक गोठ्यात ५ फुटांपर्यंत दलदल झाली. प्रतिदिन ४० गायी अतीदक्षता विभागामध्ये दाखल होत आहेत.

गुजरातमधील श्री सोमनाथ मंदिरात अहिंदूंना पूर्वअनुमती शिवाय प्रवेश बंद !

मंदिराचे पावित्र्य आणि 
सुरक्षा डोळ्यासमोर ठेऊन निर्णय
        कर्णावती (अहमदाबाद) - गुजरातमधील जगप्रसिद्ध श्री सोमनाथ मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाने अहिंदूंना पूर्वअनुमती शिवाय मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. धार्मिक स्थळाचे पावित्र्य आणि मंदिराची सुरक्षा यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे विश्‍वस्त मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. (मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या श्री सोमनाथ मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाचे अभिनंदन ! - संपादक) अहिंदूंना प्रवेश नसलेले हे पहिलेच मंदिर नसून देशभरातील अनेक मंदिरात तसा नियम आहे.
अहिंदूंना प्रवेश नसणारी 
भारतातील अन्य काही प्रसिद्ध मंदिरे !
१. केरळच्या गुरुवायूर शहरातील भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. केरळमधील हे मंदिर भारतातील भगवान श्रीकृष्णाच्या ५ प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.
२. पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदूंनाच मंदिरात प्रवेश मिळेल ! असा फलक लावण्यात आला आहे. हिंदु परंपरेनुसार श्री जगन्नाथ मंदिर हे एक पवित्र तीर्थक्षेत्र असून हिंदूंच्या चारधाम मंदिरांपैकी हे एक आहेे.

धर्मांधतेचे शिक्षण देणार्‍या फ्रान्समधील २० मशिदींना ताळे !

फ्रान्सपेक्षा कित्येक पटीने जिहादी आतंकवाद सोसलेला 
भारत फ्रान्सकडून काही शिकणार का की राष्ट्रविघातक 
लांगूलचालनाचे धोरण राबवण्यातच धन्यता मानणार ?
         नवी देहली - फ्रान्स सरकारने गेल्या डिसेंबरपासून आतापर्यंत देशातील २० मशिदी आणि प्रार्थना स्थळे बंद केली आहेत. येथून जिहादचा प्रसार केला जात होता, असे सरकारकडून सांगण्यात आले. फ्रान्सचे गृहमंत्री बर्नार्ड कैजेउन्वे यांनी ट्विट करून ही माहिती दिली. आणखीही काही मशिदींवर अशीच कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. फ्रान्सच्या या कृतीवरून बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्विट करून अन्य देश असा निर्णय कधी घेणार, असा प्रश्‍न विचारला आहे.
         तस्लिमा पुढे लिहितात, इस्लामी देश काय करणार आहेत ? त्यांना असा निर्णय घ्यायला नको का ?
         फ्रान्सच्या एका वृत्तवाहिनीच्या मते फ्रान्समध्ये २ सहस्र ५०० हून अधिक मशिदी आणि प्रार्थना सभागृहे आहेत. त्यातील १२० मशिदींवर संशय आहे.

कार्यक्रमाचे संयोजक श्री. सुनील घनवट यांना हिंदूऐक्य मेळाव्यात जाणवलेली सूत्रे

१. आजच्या कार्यक्रमातून सर्व हिंदुत्ववाद्यांमध्ये एक कुटुंबभावना निर्माण होण्यास साहाय्य झाले.
२. मेळावा संपल्यावरही अनेक जण बराच काळ थांबून एकमेकांशी चर्चा करत होते, तसेच प्रत्यक्ष हिंदुसंघटनाच्या कृतीच्या दृष्टीने नियोजन करत होते.
३. सनातनवर अन्याय होतो आणि आम्ही सनातनच्या समवेत आहोत, सनातनच्या पाठीशी आहोत या भूमिकेतून हिंदुत्वनिष्ठ मेळाव्याला आले होते; परंतु कार्यक्रम झाल्यावर सर्वांच्याच विचारात पालट होऊन सनातनसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे त्यांना वाटले.
४. अधिवक्ता श्री. पुनाळेकर यांचा समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून सत्कार होत असतांना सर्वांनी उभे राहून, तसेच जागेवर उभे राहून टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली, यातून सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या मनातील सनातन आणि अधिवक्ता श्री. पुनाळेकर यांच्याविषयी असलेला आदर लक्षात आला.

हिंदुत्वनिष्ठांनो, हिंदूंवरील अन्याय दूर होण्यासाठी बळकट संघटन निर्माण करा ! - सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

१. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारच्या निवडणुका लढवायच्या नाहीत किंवा कोणत्याही प्रकारच्या देवस्थान समितीमधील कोणत्याही प्रकारचे पदाचीही आवश्यकता नाही; मात्र मंदिर समिती यांच्यामध्ये असलेले विश्‍वस्त हे देव, देश आणि धर्म यांविषयी अज्ञानी असतील, तर हिंदूंना त्यांस सनदशीर मार्गाने विरोध करावा लागेल.
२. सध्या देशात अनेक कायदे आहेत; मात्र लोकांना त्याचा धाकच राहिलेला नाही. शिक्षणक्षेत्रातही मुलींची छेडछाड करणारे, तसेच सहकार सम्राट अन् त्यांचे पाठीराखे यांना शिक्षा होत नाही; पण आम्ही त्यांना विरोध करणार आहोत. त्यांना शिक्षा होईपर्यंत आमचा लढा चालूच राहील. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषेत सांगायचे झाले, तर आम्हाला होणारा विरोध मोडून काढून आम्ही हिंदु राष्ट्र स्थापन करूच !
३. सध्या ब्राह्मण्यवाद, मनुवाद अशा प्रकारचे काल्पनिक शत्रू लोकांसोर आणून लोकांची दिशाभूल केली जात आहे; मात्र समाजाचे खरे शत्रू कोण आहेत, हे उघड करण्याचे काम आम्ही करत आहोत.
४. आम्हाला वृत्तवाहिन्यांवर बोलू दिले जात नाही. जाणीवपूर्वक आमची अपकीर्ती केली जाते. या गोष्टी आम्हाला रोखायच्या आहेत. यासाठी हिंदूंचे संघटन आवश्यक आहे.

सनातनला शतप्रतिशत पाठिंबा घोषित करतांना कोल्हापूर येथे झालेल्या हिंदूऐक्य मेळाव्यातील हिंदुत्वनिष्ठांनी काढलेले उद्गार !

प्रत्येक हिंदूने घरात किमान स्वसंरक्षणासाठी 
कायदासंमत शस्त्र ठेवून ते प्रसंगी वापरण्याची वेळ 
आली आहे ! - सुधन्वा गोंधळेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
         सध्या देशद्रोही कृत्ये चालतात; पण हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांच्यावर कोणताही गुन्हा नसतांना आरोप केले जातात, अशी विदारक स्थिती आहे. येणार्‍या काळात पुरोगामी गणपति, दुर्गादेवी आणि शस्त्रास्त्रे यांचे पूजन करू नका, असे सांगण्यासही कमी करणार नाहीत. प्रत्येक हिंदूने घरात किमान स्वसंरक्षणासाठी कायदासंमत शस्त्र ठेवून प्रसंगी ते वापरण्याची वेळ आली आहे. 
-----------------------------------
देव, देश आणि धर्म यांना जर 
कोणी विरोध करत असेल, तर त्याला त्याच भाषेत 
उत्तर द्यावे लागेल ! - ह.भ.प. भगवान महाराज कोकरे
         हिंदुत्वावर कोणीही अन्याय केल्यास तो सहन करू नका. देव, देश आणि धर्म यांना जर कोणी विरोध करत असेल, तर त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल. स्वतःच्या धर्मावरील टीकेचे जो खंडन करतो, तो सनातनी. मग त्यात गैर काय ? आताचे पुरोगामी हे विदेशी पैशांद्वारे येथील संस्कृती नष्ट करू पहात आहेत. सनातनवर बंदी घालण्याची भाषा करणारे मागील सरकार गेले, आताचे सरकार जर तीच भाषा पुरोगाम्यांच्या दबावापोटी करत असेल, तर यापुढील काळात हिंदूंनाही मते देतांना विचार करावा लागेल.

धर्मकार्यात सदैव तुमच्या समवेत आहोत ! - पंडित मोडक

    सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात सनातनच्या साधकांनी वडकी (जिल्हा पुणे) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे संचालक पंडित मोडक यांची भेट घेतली. ते म्हणाले, सनातनला सहकार्य करण्याच्या संदर्भात मी सरपंचांशी बोललो.साधक स्वतःचे घरदार सांभाळून, नोकरी, व्यवसाय सांभाळून सनातनचे कार्य करतात. प्रसंगी ते अर्धी भाकरी खातात. वेळ पडलीच, तर पदरचे पैसे खर्च करून धर्मकार्य करतात. त्यासाठी त्यांचा अमूल्य वेळ न घालवता त्यांचे जे काही काम असेल ते त्वरित करून द्या. धर्मकार्यासाठी आम्ही सदैव तुमच्या समवेत आहोत. मध्यरात्री जरी दूरध्वनी केला, तरी आम्ही साहाय्याला येऊ. धर्मकार्यात कधीच पाठ दाखवणार नाही.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर अन्यायाची स्थिती येऊ देऊ नका ! - अभय वर्तक, सनातन संस्था

हिंदूऐक्य मेळाव्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद
    कोल्हापूर, ५ ऑगस्ट (वार्ता.) - सध्याचे शासन हिंदुत्वनिष्ठ विचाराचे आहे, हे जरी खरे असले, तरी हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर अन्याय होत आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर अन्यायाची स्थिती येऊ देऊ नका. पुरोगामी जर यापुढे सनातनवर आरोप करणार असतील, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. हे सांगण्यासाठी या हिंदूऐक्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये उपस्थित होते. 
पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना डावीकडून श्री. अभय वर्तक, अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि श्री. मनोज खाडये
* या वेळी श्री. अभय वर्तक पुढे म्हणाले....
१. सनातन संस्थेने पोलीस तपासाला कधीही विरोध केलेला नाही; मात्र तपासाच्या नावाखाली सनातनच्या साधकांची मिडिया ट्रायल चालू आहे, ती थांबली पाहिजे.

इराणमध्ये एकाच दिवशी २० सुन्नी पंथीय आतंकवाद्यांना फाशी !

भारतात जिहादी आतंकवाद्यांना 
शासन अशी शिक्षा कधी देणार ?
          तेहरान - शियाबहुल इराणने २० सुन्नीपंथीय आतंकवाद्यांना फाशी दिली. हे आतंकवादी अनेक हत्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या सूत्रावर दोषी आढळले होते. वर्ष २००९ ते २०११ या कालावधीत सुन्नीपंथियांवर महिला आणि मुले यांच्या हत्येचा आरोप होता. तो सिद्ध झाल्यामुळे ही कारवाई केल्याचे इराण सरकारचे म्हणणे आहे.
          इराणमध्ये तावाहिद आणि जिहाद नावाची संघटना अस्तित्वात आहे. अनेक आक्रमणांत या संघटनेचा हात आहे. तावहिद गटाचे सदस्य असलेल्या दोषींना ही शिक्षा झाल्याची माहिती सरकारी अधिवक्ता मोहंमद जावेद माँटाझेरी यांनी इराणी टीव्हीवरून दिली.इराणमध्ये गेल्या वर्षी ९७७ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती, असा दावा मानवी हक्क संघटनेने केला आहे. मृत्यूदंडाच्या शिक्षेची कार्यवाही करणारा इराण हा दुसरा देश आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी १ सहस्र जणांना मृत्यूदंड देण्यात आला होता. इराणनंतर पाकिस्तानने ३२६, तर सौदी अरबियाने १५८ जणांना फाशी दिली आहे.

... या वेळी करण्यात आले हिंदुत्वनिष्ठ मान्यवरांचे सत्कार !

अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांचा सत्कार
करतांना ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने (डावीकडे)

अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर (डावीकडे)
यांचा सत्कार करतांना श्री. व्यंकटेश शिंदे

श्री. सुनील घनवट (उजवीकडे)
यांचा सत्कार करतांना श्री. संजय पवार

अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन (डावीकडे)
यांचा सत्कार करतांना पू. ईश्‍वरबुवा रामदासी

चीनने मुसलमानांवर घातलेले निर्बंध

चीनला कळते, ते भारतातील एकाही 
राजकीय पक्षाला का कळत नाही ? त्याचे 
राष्ट्रावर मुळीच प्रेम नाही, हे यातून सिद्ध होते !
         इतर राष्ट्रांप्रमाणे गुन्हा सिद्ध होईपर्यंत आरोपीला निर्दोष समजणे, हे तत्त्व चीनला मान्य नाही. तेथे तुम्ही निर्दोषत्व सिद्ध करेपर्यंत तुम्हाला गुन्हेगार समजले जाते. (संदर्भ : पॅट्रीयट्स फोरम्)

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंना आवाहन

२३ ऑक्टोबर २०१६ या दिवशी शनिवारवाडा (पुणे) येथे होणार्‍या सभेत,
तर १९ जानेवारी २०१७ या दिवसापासून चालू होणार्‍या चला जम्मू काश्मीरला या मोहिमेत सहभागी व्हा !
    काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना अजूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे भारतभरातील २५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना १९ जानेवारी २०१७ या दिवशी चला जम्मू काश्मीरला ही मोहीम हाती घेणार आहेत. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी हिंदू सज्ज होत असून त्याचाच एक भाग म्हणून देशभरात १०० सभांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २३ ऑक्टोबर २०१६ या दिवशी शनिवारवाडा (पुणे) येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या सभेलाही अधिकाधिक हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.

जनतेच्या धर्मक्रांतीज्योतीतून पेटलेला वणवा हिंदु राष्ट्राची स्थापना करील ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

         आजच्या हिंदूऐक्य मेळाव्यातून उपस्थित धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प सोडला आहे. धर्माभिमान्यांमध्ये पेटलेली ज्योत आता प्रत्येक गावात पेटेल. येथून पुढे हिंदुत्ववाद्यांचा छळ सहन केला जाणार नाही. सनातन संस्थेचा छळ झाला; पण आम्ही त्याकडे संधी म्हणून पाहिले आणि त्या संकटाला सामोरे गेलो. पुरोगाम्यांनी आतापर्यंत सनातनला पुष्कळ डिवचले आहे; परंतु कर्मफल सिद्धांताप्रमाणे हेच त्यांच्यावरही उलटल्याविना रहाणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. पुरोगाम्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी वारंवार कोल्हापूरमध्ये एकत्र येतील. सनातनचे संशयित म्हणून अटक केलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि श्री. समीर गायकवाड यांच्या विरोधात अन्वेषण यंत्रणा अजूनपर्यंत एकही सबळ पुरावा देऊ शकलेल्या नाहीत. हिंदुंच्या पाठिंब्यावर निवडून आलेले सरकार असूनही हिंदुत्ववादी संघटनांचा छळ हा केवळ पुरोगाम्यांच्या दबावापोटीच होत आहे. अशा घटना या देशात होतात म्हणूनच आमची मागणी हिंदू राष्ट्राची आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
France ne 20 masjidopar lagaye pratibandh par Taslima Nasreen ne kaha,
Anya desh aisa nirnay kab lenge?
Kya sarkar tushtikaran chod ispar vichar karegi
जागो !
फ्रान्स ने २० मस्जिदों पर लगाए प्रतिबंध पर तस्लीमा नसरीन ने कहा,
अन्य देश ऐसा निर्णय कब लेंगे ?
    क्या सरकार तुष्टीकरण छोड इस पर विचार करेगी ?

फलक प्रसिद्धीकरता

जिहाद शिकवणार्‍या २० मशिदींना फ्रान्सने ठोकले टाळे !
    जिहादचा प्रसार केल्याच्या कारणावरून फ्रान्सने २० मशिदी आणि प्रार्थनास्थळे बंद केली आहेत. यावर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी अन्य देश असा निर्णय कधी घेणार ?, असा प्रश्‍न केला आहे.

आतंकवादग्रस्त भारताला यातून मुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्र अर्थात सनातन धर्म राज्यच हवे !

आसामच्या कोकराझारमध्ये 
झालेल्या आतंकवादी आक्रमणात १३ जण ठार !
         कोकराझार - कोकराझार जिल्ह्यातील बालाघाट तीनलो येथील बाजारात आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आणि बॉम्बस्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झाले आहेत. मृतांच्या आणि घायाळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सैन्याने एका आतंकवाद्याला ठार केल्याचे वृत्त आहे. या आक्रमणामागे नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड अर्थात एन्डीएफ्बी संघटनेच्या आतंकवाद्यांचा हात असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आक्रमण करणारे किती जण होते, हे स्पष्ट झालेले नाही. स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या संख्येने सैनिकांना येथे पाठवण्यात आले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, आम्ही घटनेवर लक्ष ठेवून आहोत. कोकराझार हे बोडोलॅण्डच्या आतंकवाद्यांचे मुख्य ठिकाण आहे. आम्ही तेथील नागरिकांच्या सुरक्षेकडे देत आहोत.

अश्‍लीलतेचा प्रसार करणार्‍या सनी लिऑन आणि तिच्या संकेतस्थळावर तातडीने कारवाई करा !

  • हिंदु जनजागृती समितीच्या तक्रारीचे विधानसभेत पडसाद
  • प्रा. देवयानी फरांदे यांनी औचित्याचा सूत्राद्वारे केली मागणी
         मुंबई, ५ ऑगस्ट - कॅनडातून प्रवासी पारपत्रावर भारतात आलेली, अश्‍लील चित्रपटांत काम करणारी कुप्रसिद्ध अभिनेत्री सनी लिऑन उर्फ रणजीतकौर वोहरा हिच्या विरोधात तसेच तिच्या अश्‍लीलता पसरवणार्‍या संकेतस्थळाच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या नाशिक मध्यच्या विधानसभा सदस्य प्रा. देवयानी फरांदे यांनी ४ ऑगस्ट या दिवशी औचित्याच्या सूत्राद्वारे विधानसभेत केली.
         याविषयी सौ. अंजली पालन यांनी १५ जून २०१५ या दिवशी डोबिंवली पूर्व (जिल्हा ठाणे) येथील रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांखाली तक्रार प्रविष्ट केली असून अजामीनपात्र गुन्हा प्रविष्ट झाला आहे; मात्र एक वर्ष पूर्ण झाले, तरी अद्यापही दोषींवर ठोस कारवाई झाली नाही. यामुळे कायद्याची पायमल्ली होऊन समाजात विकृतीचा आणि अश्‍लीलतेचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे, युवा वर्ग चुकीच्या मार्गाकडे वळत आहे. महिलांविषयी चुकीची भावना निर्माण होत आहे. यावर शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या सूत्राद्वारे करण्यात आली. (सौ. अंजली पालन या हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत रणरागिणी शाखेच्या सदस्या आहेत.)

मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत

        मुंबई - मुंबईत मध्य रेल्वेवरील शीव, कुर्ला, दादर, मशिद या रेल्वे स्थानकांमध्ये पाणी शिरले. शीव येथे रेल्वे रुळांवर ५ इंच उंचीपर्यंत पाणी होते. कुर्ल्यापासून मध्यरेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबईत पाणी साचल्यामुळे बेस्टच्या बसगाड्यांचे मार्ग पालटले आहेत. अंधेरीत सखल भागात गुडघाभर पाणी साचले असून बोरीवली ते अंधेरी या प्रवासाला दोन ते अडीच घंट्यांचा वेळ लागत आहे. एलफिन्स्टन पुलाकडे जाणार्‍या मार्गावर पाणी साचले आहे. वांद्रे पश्‍चिमेला आणि लिंकिंग रोडवर पाणी साचले. ठाण्याच्या कोपरी येथून मुंबईकडे जाणार्‍या रोड वर म्हणजेच ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली. अनेक कार्यालये आज लवकर सोडण्यात आली, तर शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली.

लोकप्रतिनिधींच्या कामकाजाचे मूल्यमापन करणारी यंत्रणा हवी !

       पुण्यातील परिवर्तन या सामाजिक संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या वर्ष २०१२ मधील निवडणुकीत विजयी झालेल्या १५२ नगरसेवकांचा गेल्या ४ वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडला. नगरसेवकांनी त्यांच्या हातात असलेल्या वॉर्डस्तरीय निधीचा कसा वापर केला, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांची किती उपस्थिती होती, या सभेत त्यांनी किती लेखी प्रश्‍न विचारले आणि नगरसेवकांवर कोणकोणते गुन्हे प्रविष्ट आहेत, या निकषांच्या आधारे हा अहवाल सिद्ध करण्यात आला होता. त्या अहवालातील सर्व माहिती संस्थेने पालिकेकडून माहितीच्या अधिकारांतर्गत घेतली आहे. त्यानुसार विविध पक्षांच्या १५२ पैकी ६१ नगरसेवकांवर वेगवेगळे गुन्हे प्रविष्ट आहेत, तर ८४ नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत एकही लेखी प्रश्‍न विचारला नाही. नगरसेवकांचे पितळ उघडे पाडणार्‍या या अहवालावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अर्थात्च गदारोळ झाला.

हिंदुत्वाचे कार्य तळमळीने करणार्‍या राष्ट्र-धर्म प्रेमी अधिवक्त्यांच्या भेटी घेण्यासाठी अधिवक्ता रामदास केसरकर यांनी केलेला उत्तर भारताचा प्रसारदौरा आणि त्यांना मिळालेला लक्षणीय प्रतिसाद !

अधिवक्ता
रामदास केसरकर
        मी फेब्रुवारी २०१६ मध्ये कर्नाटक राज्यातील बेंगळुरू आणि म्हैसूर येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्या संदर्भात दैनिक सनातन प्रभातमध्ये वृत्तांंत प्रसिद्ध करण्यात आला होता. या वृत्तांतासमवेत एक चौकटही प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या चौकटीचा आशय अधिवक्ता रामदास केसरकर देशभरातील राष्ट्र आणि धर्मप्रेमी अधिवक्त्यांच्या भेटी घेत असतात. त्यांचे अधिवक्त्यांच्या भेटीचे नियोजन करण्यासाठी आपल्या संपर्कात असलेल्या राष्ट्र आणि धर्मप्रेमी अधिवक्त्यांची नावे कळवा, असा होता. ती चौकट वाचून मार्च २०१६ च्या पहिल्या आठवड्यात पुणे येथील शक्ती उपासक आणि सनातन संस्थेचेे हितचिंतक श्री. अनिल बोकील यांनी मला भ्रमणभाषवर संपर्क केला आणि काही हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे संपर्क क्रमांक दिले. त्यांच्या तळमळीमुळे मला दौर्‍याचे नियोजन करण्याची आतून प्रेरणा झाली आणि विनाविलंब दौर्‍याचे नियोजनही झाले. या दौर्‍यात मला आनंद अनुभवता आला. मला भेटलेले हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते आणि त्यांनी राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यासाठी देऊ केलेले सहकार्य यांविषयी येथे कृतज्ञतापूर्वक माहिती देत आहे.

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

       एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या विरामचिन्हांमुळे पालटणारे वाक्याचे अर्थ सांगणारे हे सदर ! 

नाशिक येथील सिंहस्थपर्वाच्या वेळी आलेले कटू-गोड अनुभव आणि त्यातून धर्मशिक्षणाची लक्षात आलेली आवश्यकता !

         नाशिक येथे वर्ष २०१५ मध्ये झालेल्या सिंहस्थपर्वाची दु:स्थिती दर्शवणार्‍या लेखाचा पूर्वार्ध काल आपण पाहिला. आज या लेखाचा पुढील भाग पाहूया.
५. भिंती आणि फलक यांवर धर्मशिक्षणाचे लिखाण 
रंगवण्याची सेवा करतांना आलेले अनुभव आणि आलेल्या अनुभूती 
श्री. श्रेयस पिसोळकर
५ अ. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे 
धर्माविषयी उदासीन असलेले हिंदू !
५ अ १. एका व्यक्तीने तपोवनातील लक्ष्मण मंदिराऐवजी शूर्पणखेच्या मंदिराचा पत्ता विचारणे आणि यातून हिंदूंची दयनीय स्थिती लक्षात येणे : रंगकाम विभागात मी प्रथमच सेवा करत असल्याने ती सेवा शिकत होतो. त्यामुळे मला पुष्कळ आनंदही मिळत होता. आरंभी लक्ष्मण मंदिराजवळ सेवा करण्याची संधी मिळाली. श्री. रामानंददादा परब हेसुद्धा समवेत होते. त्यांच्याकडून बर्‍याच गोष्टी शिकता आल्या. तिथे सेवा करतांना कुंभमेळ्याला आलेले बरेच जण नवीन असल्याने पत्ता विचारायचे. एकदा एका व्यक्तीने विचारले, शूर्पणखेचे मंदिर कुठे आहे ? ते ऐकून मला प्रथम आश्‍चर्य वाटले. मग मी त्यांना समजावून सांगितले, या ठिकाणी लक्ष्मणाचे मंदिर आहे आणि येथेच शूर्पणखेचे नाक कापले. येथे लक्ष्मणाने तपश्‍चर्या केली; म्हणून याला तपोवन म्हणतात. मी त्या व्यक्तीला तेथील माहिती सांगितली. यातून एकूणच हिंदूंची स्थिती लक्षात आली.

मथुरा येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. विनय वर्मा यांच्याविषयी त्यांच्या आई-वडिलांना आलेल्या अनुभूती

श्री. विनय वर्मा
१. श्री. विनय वर्मा यांची 
सेवा करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. पायांना तेल लावतांना आध्यात्मिक उपाय होऊन नामजप एकाग्रतेने होणे : विनयच्या पायांना त्रास होत असल्याने मी काही दिवसांपासून त्याच्या पायांना तेलाने मर्दन (मालीश) करते. त्या वेळी मला पुष्कळ जांभया येऊन स्वतःवर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवते. तसेच त्याच्या पायांना तेल लावतांना नामजपही एकाग्रतेने होतो आणि ध्यान लागते.
- श्रीमती पुष्पा वर्मा (श्री. विनय वर्मा यांची आई), मथुरा
२. श्री. विनय वर्मा यांच्याकडे 
पाहिल्यावर आलेल्या अनुभूती
अ. पुष्कळ दिवसांपासून विनयची प्रकृती ठीक नाही, तरीही तो आनंदी असतो. त्याच्याशी बोलतांना त्याची प्रकृती एवढी खालावलेली आहे, असे कुणालाही वाटणार नाही.

साधिकेला मिळालेल्या पूर्वसूचना आणि आलेल्या अनुभूती !

कु. गौरी मुद्गल
१. २७.५.२०१६ या दिवशी मी ध्यानमंदिरात आरतीला गेले होते. मला आरती म्हणत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांचा दरबार दिसत होता. त्या दरबारात मला देवता उपस्थित असल्याचे दिसले. मला आरतीत वर्णन केल्याप्रमाणेच देवतांचे दर्शन होत होते.
२. २७.५.२०१६ या दिवशी मला रामनाथी आश्रमात आलेले पू. (डॉ.) उलगनाथन् खोली क्रमांक २०७ मधे रहातील, असे वाटत होते आणि २८.५.२०१६ या दिवशी पू. उलगनाथन् खोली क्रमांक २०७ मधेच रहायला आले असल्याचे समजले.
३. २९.५.२०१६ या दिवशी मला रात्री ७.४५ वाजता बैठक कक्षाच्या बाहेर सुगंध येत होता.
४. ८.६.२०१६ या दिवशी मला चॉकलेटी रंगाच्या चारचाकीतून चंदनाचा पुष्कळ सुगंध येत होता आणि संतही याच गाडीतून प्रवास करणार आहेत, असे वाटत होते आणि त्याच गाडीतून संत कलामंदिरात आले.

समंजस, प्रेमाने बोलून सर्वांची मने जिंकणारी आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. वेदश्री रामेश्‍वर भुकन (वय ३ वर्षे) !

कु. वेदश्री भुकन
     चि. वेदश्री रामेश्‍वर भुकन हिचा श्रावण शुक्ल पक्ष चतुर्थी (६.८.२०१६) या दिवशी तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि काका यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
चि. वेदश्री भुकन हिला वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !

१. हसतमुख आणि आनंदी
     वेदश्री सतत आनंदी असते आणि इतरांनीही सतत आनंदी रहावे, असे तिला वाटते. मला ती म्हणते, आई, आनंदी आनंद गडे..., हे गाणे म्हण. ती माझ्याकडून ते गाणे म्हणून घेते. तिच्याकडे पाहिल्यावर मनावरील ताण हलका होतो. आम्ही दोघे सेवेला बाहेर गेल्यावर ती घरीच थांबते आणि आम्ही घरी येईपर्यंत आमची वाट पहाते. (आम्हाला कधी कधी रात्री उशीरही होतो.) आम्ही घरी आल्यावर ती आनंदाने आमचे स्वागत करते.
२. प्रेमभाव
     वेदश्री घरातील प्रत्येकाची काळजी घेते, तसेच तिच्या मैत्रिणींचीही खेळतांना काळजी घेते. ती तिचा खाऊ इतरांना देते. तिची खेळणीही मैत्रिणींना खेळायला देते.
- सौ. उर्मिला रामेश्‍वर भुकन (वेदश्रीची आई)

एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेनिमित्त रामनाथी आश्रमात आलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका कु. अ‍ॅना ल्यु यांना आश्रमातील वाढत्या वायूतत्त्वाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

कु. अ‍ॅना ल्यु
        गोव्याच्या रामनाथी आश्रमात एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या साधकांची जानेवारी २०१६ मध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या कु. अ‍ॅना ल्यु यांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. संतांविषयी
१ अ. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या चरणांभोवती पांढरी प्रभावळ दिसणे : पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या चरणांकडेेे पहातांना त्यांच्या चरणांभोवती पांढरी प्रभावळ दिसली. त्यांच्या पायाच्या अंगठ्याच्या थोड्या वरच्या भागात एक मोठी ठिणगी दिसली. त्यांच्या हाताकडे पाहिल्यावर उदबत्तीतून बाहेर पडणार्‍या धुराप्रमाणे पांढर्‍या रंगाचा धूर बोटांच्या अग्रातून संथ गतीने येतांना दिसला.
२. रामनाथी आश्रमाविषयी
२ अ. बैठक कक्षातील भिंतीचे निरीक्षण करतांना भिंतीमध्ये जिवंतपणा जाणवून ती हलत असल्याचे जाणवणे आणि भिंतीचे त्रिमितीय बागेत रूपांतर होऊन पाना-फुलांचे आकार दिसणे : बैठक कक्षाच्या भिंतीचे निरीक्षण करतांना भिंतीमध्ये जिवंतपणा वाटून ती हलत आहे, तसेच भिंतीवर वेगवेगळ्या खुणा असून त्यांच्या आकारांत पालट होत आहे, असेेही जाणवले. काही वेळानंतर त्या भिंतीचे त्रिमितीय बागेत रूपांतर होऊन पाना-फुलांचे आकार तयार होतांना दिसू लागलेे. त्या फुलांचे रंग तेजस्वी होते आणि त्यांचे आकारही पालटत होते. याचबरोबर निळा, गुलाबी, पांढरा आणि हिरवा अशा विविध रंगांच्या छटांतही पालट होत असल्याचे लक्षात आले. ही बाग दैवी असल्याप्रमाणे वाटत होते.

कृतज्ञ आहे मी देवा, लाभले आम्हास असे संत पिता ।

जन्म झाला तुमचा केवळ साधनेसाठी ।
समर्थ अन् विष्णु अवतार देती आशीर्वाद त्यासाठी ॥ १ ॥
प्रतिकूलतेत प्रत्यक्ष महालक्ष्मीने दिल्या सर्व सिद्धी ।
गुरुकृपेने आठवतील त्या अटीतटीच्या प्रसंगी ॥ २ ॥
खडतर साधना करूनी प्राप्त केले तुम्ही संतपद ।
ईश्‍वरी कृपेने लाभो तुम्हा लवकरच सद्गुरुपद ॥ ३ ॥

संत आणि महर्षि यांची प.पू. डॉक्टरांवरील उपायांच्या संदर्भात वैशिष्ट्ये

     संत आणि महर्षी मला फारच थोडा वेळ लागणारे सोपे उपाय (३० टक्के) करायला सांगतात. बाकी सर्व (७० टक्के) तेच करतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुटुंबियांना प्रत्येक प्रसंगात साधनारत रहाण्याची प्रेरणा देणारे पू. रमेश गडकरीकाका !

पू. रमेश गडकरी
     श्रावण शुक्ल पक्ष चतुर्थी (६.८.२०१६) या दिवशी पू. रमेश गडकरी यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याकडून त्यांची मुलगी आणि पुतण्या यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.
साठाव्या वाढदिवसानिमित्त पू. रमेश गडकरी
यांच्या चरणी सर्व साधकांचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. प्रत्येक प्रसंगात साधनारत रहाण्याची प्रेरणा देणे
     पू. बाबा आम्हा कुटुंबियांना प्रत्येक प्रसंगात साधनारत रहाण्याची प्रेरणा देतात. दैनंदिन जीवनात येणारा प्रत्येक प्रश्‍न साधनेचा दृष्टीकोन घेऊन कसा सोडवायचा ?, हे मी पू. बाबांकडूनच शिकले.
२. यजमानांची नोकरी गेल्यावर ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाण्यासाठी साहाय्य करणे
     पू. बाबा स्वतः प्रतिकूल परिस्थितीत असतांनाही आम्हाला पत्र लिहून मार्गदर्शन करायचे आणि प्रत्येक पत्रात आमच्या साधनेची स्थिती विचारायचे. वर्ष २०१२ मध्ये माझ्या यजमानांच्या नोकरीत अडचण आली होती. त्या प्रसंगातही त्यांनी आम्हाला ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाण्यासाठी साहाय्य केले.

कोल्हापूर येथील हिंदूऐक्य मेळाव्यात वाईट शक्तींनी आणलेले विविध प्रकारचे अडथळे ईश्‍वराच्या कृपेमुळेच दूर होणे आणि मेळावा निर्विघ्नपणे पार पडणे

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
४ ऑगस्ट या दिवशी कोल्हापूर येथे झालेल्या हिंदूऐक्य मेळाव्यात खालील अनेक अडथळे आले.
१. कार्यक्रमाला निघालेल्या एका हिंदुत्ववाद्यांच्या पत्नीला रुग्णालयात प्रविष्ट करावे लागले. अन्य एका हिंदुत्वनिष्ठांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले.
२. संपूर्ण मेळाव्याचे चित्रीकरण करणारे साधक अचानक आजारी पडले, तसेच १५ हिंदुत्वनिष्ठ अचानक आजारी पडले.
३. मेळाव्यासाठी येण्यास निघालेल्या काही हिंदुत्वनिष्ठांना पाऊस आणि अन्य अडचणी यांमुळे अचानक परत जावे लागले.
४. काही साधक दुचाकी घेऊन मेळाव्याला येण्यासाठी निघाले असता काही कारण नसतांना त्यांच्या वाहनाला अपघात झाला.
५. मेळावा संपल्यावर रात्री परत जाणार्‍या एका साधिकेचा अपघात झाला आणि त्या घायाळ झाल्या.
६. मेळाव्यासाठी लागणार्‍या साहित्याची ने-आण करणारे वाहन काही कारण नसतांना बिघडले.

दम लागलेला असतांना ॐ नमः शिवाय । हा जप केल्याने दम्याचा त्रास न्यून होणे

         २८.४.२०१६ या दिवशी रात्री ११.४५ ला झोपलो असतांना पित्तामुळे छातीत जळजळ होऊ लागली. त्यामुळे मला खोकला येऊ लागला; म्हणून मी पित्तावरचे औषध घेतले. औषधामुळे पित्त शमले; मात्र खोकल्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा मी ॐ नमः शिवाय । हा जप आणि हाताच्या अंगठ्याचे टोक मध्यमेच्या टोकाशी जोडून मुद्रा केली. १० मिनिटांनी छातीतून येणारा आवाज न्यून होऊन मला थोडी झोप लागली. रात्री जेव्हा जेव्हा मला जाग येत होती, तेव्हा तेव्हा ॐ नमः शिवाय । हा जप आरंभ होत असल्याचे लक्षात येत होते. सकाळपर्यंत श्‍वास लागणे न्यून झाले होते.
         (सनातन संस्थेतर्फे प्रकाशित केलेला ग्रंथ आपत्काळातील संजीवनी - विविध रोगांवर नामजपाचे उपाय या ग्रंथात दम्यावर उपचार म्हणून ॐ नमः शिवाय । हा जप करण्यास सांगितला आहे. - संकलक)
- श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.४.२०१६)

प.पू. गुरुदेवा, आणखी किती करणार तुम्ही आमच्यासाठी ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
सनातनरूपी कवच देऊनी केला अमुचा स्वीकार ।
प.पू. डॉ., तुमच्या नावाचाच वाटतो नेहमी आधार ।
त्याचा नाही केला उपयोग साधनेसाठी ।
प.पू. डॉक्टर, आणखी किती करणार तुम्ही आमच्यासाठी ॥ १ ॥
दैनिकरूपी सत्संग प्रतिदिन येतो घरी ।
करता मार्गदर्शन निरनिराळे संदर्भ देऊनी ।
त्याचा नाही केला अभ्यास ज्ञान वाढवण्यासाठी ।
प.पू. गुरुदेवा, आणखी किती करणार तुम्ही आमच्यासाठी ॥ २ ॥

जीवाचे कल्याण करण्याची बुद्धी होण्यासाठी बुद्धीची उपयोगिता जाणा !

प.पू. पांडे महाराज
        मानवाची बुद्धी सक्षम आहे; परंतु ती त्याच्यातील रज-तमाने बद्ध आहे. मानवाने त्याच्या सुविधेसाठी मोठमोठी यंत्रणा निर्माण केली; परंतु त्याची उपयोगिता ही त्याच्या बुद्धीवर अवलंबून असल्याने त्याच्या रज-तमयुक्त बुद्धीने आज जगात सर्वत्र घाण झाली आहे.
१. साधनेद्वारे मेधाबुद्धी वाढवणे आणि 
त्यातून चैतन्य वाढवणे, हे जीवनाचे ध्येय असणे
        बुद्धीची उपयोगिता हा शब्द त्याच्या बुद्धीच्या सक्षमतेवर अवलंबून आहे; म्हणून साधनेद्वारे मेधाबुद्धी वाढवणे आणि त्यातून चैतन्य वाढवणे, हे जीवनाचे ध्येय असते. मानवात जेवढे अधिक चैतन्य निर्माण होईल, तेवढी त्याची समर्थता वाढते आणि बुद्धीची उपयोगिता योग्य होते.
२. मानवातील विकृतीमुळे 
त्याला दुष्ट कर्म करण्याची बुद्धी होणे
        महाभारतातील अश्‍वत्थामा दुष्ट बुद्धीचा होता. त्याने पांडवांचे सर्व पुत्र मारले. त्याने पांडवाचा वंश नष्ट करण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडले. आता जर याने आक्रमण असेच चालू ठेवले, तर सर्व विनाश होईल, प्रलय होईल; म्हणून कृष्ण त्याने सोडलेल्या ब्रह्मास्त्राच्या मध्ये येतो. महाभारतकाळात आताच्या अण्वस्त्रांपेक्षाही अधिक शक्ती होती. योग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धी सक्षम पाहिजे. अश्‍वत्थामा गुरुपुत्र होता; परंतु त्याच्या ठिकाणी विकृती होती. द्रोणाचार्यांमध्येही विकृती होती.

साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना जागतिक स्तरावरील समष्टी सेवेची सुवर्ण संधी !

विविध परकीय भाषा अवगत 
असल्यास भाषांतराच्या सेवेत सहभागी व्हा !
१. एस्.एस्.आर्.एफ्. या आध्यात्मिक संस्थेचे व्यापक स्तरावर चालू असलेले प्रसारकार्य ! : जगभरातील जिज्ञासूंना अध्यात्माविषयी मार्गदर्शन करून आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारी स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.) ही एक आध्यात्मिक संस्था आहे. www.spiritualresearchfoundation.org हे तिचे संकेतस्थळ आहे.
         हिंदी, इंग्रजी यांसह फारसी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, जर्मन, रशियन, स्लोव्हेनियन, चिनी, मलेशियन, क्रोएशियन, स्पॅनिश, हंगेरियन, सर्बियन, इंडोनेशियन, मॅसिडोनियन, बल्गेरियन अशा १८ भाषांतून या संस्थेचे प्रसारकार्य चालू आहे. एस्.एस्.आर्.एफ्.ने जर्मन भाषेतील अध्यात्माविषयीची ग्रंथसंपदा प्रकाशित केली आहे. स्पॅनिश, क्रोएशियन, सर्बियन आदी भाषांतील ग्रंथ प्रकाशित करण्याची सेवा चालू आहे.

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

        श्री. समीर गायकवाड यांना मागील १० महिने २१ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना १ महिना २७ दिवसांपासून कोणताही गुन्हा केला नसतांना कारागृहात डांबण्यात आले आहे.
        केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

हिंदूऐक्य मेळाव्यात सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा, रत्नागिरी आणि बेळगाव येथील १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् पक्ष यांचा उत्स्फूर्त सहभाग

पोलीस चौकशीच्या जाचामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची 
नावे प्रसिद्ध करता न येणारी लज्जास्पद लोकशाही !
संघटना : श्रीशिवप्रतिष्ठान, बजरंग दल, वारकरी संप्रदाय, अखिल गोवंश रक्षा समिती, शिववंदना प्रतिष्ठान, हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठान, प्रतापगड उत्सव समिती, राष्ट्रीय वारकरी सेना, विश्‍व हिंदु परिषद, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट, हिंदु विधीज्ञ परिषद, श्री योग वेदांत सेवा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती इत्यादी
पक्ष - शिवसेना, भाजप, युवा सेना
         हिंदूऐक्य मेळाव्यात १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाल्या होत्या; मात्र या सर्वांची नावे आम्ही प्रसिद्ध केली नाहीत. कारण नावे प्रसिद्ध केल्यानंतर या संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या हिंदुत्वनिष्ठांची अन्वेषण यंत्रणा नाहक चौकशी करून त्यांना त्रास देतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. अन्वेषण यंत्रणांच्या तपास करण्याच्या अन्यायकारक पद्धतीमुळे हिंदुत्वनिष्ठांच्या मनात निर्माण झालेल्या असुरक्षिततेचा या अन्वेषण यंत्रणा विचार करतील का ? - संपादक
         राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे. 
- समर्थ रामदास स्वामी (छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु) (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
    सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्वभावदोषांमुळे घडणार्‍या चुका 
        तुमच्यातील स्वभावदोष तुम्हाला सांगणारा तुमचा खरा मित्र आणि हितचिंतक असतो.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.  - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       हिंदु राष्ट्रात जात, धर्म इत्यादींनुसार आरक्षण नसेल, तर क्षमतेनुसारच नोकर्‍या दिल्याने प्रशासन सक्षम असेल. त्यामुळे जनतेचे सर्व प्रश्‍न वर्षानुवर्षे न रेंगाळता तात्काळ मार्गी लागतील. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

सर्वत्रची स्तब्धता !

       महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल २ ऑगस्टच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पुरामुळे कोसळला. अपघाताची वेळ विचारात घेता किती वाहने आणि किती प्रवासी यांना या अपघाताचा फटका बसला, हे ठरवणे अशक्यप्राय होऊन बसले. तरीही महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या दोन बसगाड्यांसह अंदाजे १५ वाहने आणि ४५ हून अधिक प्रवासी अपघातग्रस्त झाले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. वृत्तवाहिन्यांवरून जे दृश्य दाखवले जात होते, त्यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येत होती. प्रचंड प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सावित्री नदीला पूर आला. महाबळेश्‍वर आणि कशेडी घाट येथून येणारे पाणी सावित्री नदीला मिळत होते. एकूणच नदीतील पाण्याच्या प्रवाहाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले होते. प्रचंड वेगाने वहाणारे नदीतील पाणी केवळ पाहून एखाद्याचा थरकाप उडतो, त्या ठिकाणी अपघातग्रस्त वाहनांची आणि माणसांची काय अवस्था असू शकेल ? ४ ऑगस्टच्या सायंकाळी शोधकार्य थांबवण्यात येईपर्यंत १३ मृतदेह सापडले होते, ५ ऑगस्टच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत हा आकडा २० पर्यंत गेला; पण एकही वाहन हाती लागले नव्हते. हेलिकॉप्टर, राष्ट्रीय आपत्कालीन पथक, नौदल, तटरक्षक अशा साहाय्य यंत्रणा शोधमोहिमेत सामील होत्या. प्रसंग एकूणच गोंधळाचा होता. शोधकार्य एका ठिकाणी तर मृतदेह सापडत होते ते ठिकाण प्रत्यक्ष अपघाताच्या ठिकाणापासून दहा ते वीस कि.मी. दूरवर !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn