Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदूंच्या वाट्याला गेलात, तर तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ !

'आम्ही सारे सनातन ! आम्ही सारे सनातन !' या घोषणेने सभागृह दुमदुमले ! 
सनातनला पाठिंबा दर्शवणारी, पुरोगाम्यांच्या उरात धडकी भरवणारी १५० संघटनांची वज्रयुती ! 
हिंदूऐक्य मेळाव्याला उपस्थित असलेला हिंदुत्वनिष्ठांचा समुदाय
हिंदूऐक्य मेळाव्यात बोलतांना अधिवक्ता 
श्री. संजीव पुनाळेकर आणि अन्य मान्यवर
     कोल्हापूर, ४ ऑगस्ट (वार्ता.) - 'ऋषिमुनी आणि संत यांनी शास्त्रांद्वारे जो मार्ग दाखवला आहे, त्या हिंदु धर्माचे शिक्षण देणार्‍या सनातन संस्थेचे श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे या साधकांना केवळ नास्तिकवादी आणि पुरोगामी संघटना यांची मागणी आहे म्हणून अटक करण्यात आलेली आहे. गेल्या आठ मासांत समीर गायकवाड यांच्यावरील खटलाही चालू झालेला नाही, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासारख्या सत्शील साधकाला सर्व पुरोगाम्यांच्या हत्यांचा मास्टरमाईंड ठरवण्याचा घाट घातला जात आहे. त्याचप्रकारे पुरोगामी संघटनांकडून सनातन संस्थेवर आरोप केले जात आहेत आणि बंदीची मागणीही केली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर धर्मनिष्ठ सनातन संस्थेचा छळ न थांबल्यास आम्ही आता शांत बसणार नाही. हिंदूंच्या वाट्याला गेलात, तर तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ', अशी चेतावणी सनातनच्या समर्थनार्थ पश्‍चिम महाराष्ट्रातील १५० हून अधिक संघटनांनी हिंदूऐक्य मेळाव्यात दिली. 'सनातनच्या साधकांचा छळ न थांबल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटना संघर्षाची भूमिका घेतील आणि पुढची रणनीती ठरवतील', असा ठराव या वेळी करण्यात आला. या वेळी सर्वांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या 'आम्ही सारे सनातन ! आम्ही सारे सनातन !' या घोषणेने सभागृह दणाणून गेले ! 

हिंदूंना मी आवाहन करतो की, त्यांनी आतापासून देवाकडे केवळ स्वतःसाठीच न मागता राष्ट्र अन् धर्म रक्षणासाठीही मागण्याची सवय लावावी ! - ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे, डिचोली, गोवा.

बंगालमध्ये वायूदलाचे विमान कोसळले !

     नवी देहली - 'हॉक अ‍ॅडव्हान्सड जेट ट्रेनर' (एजेटी) हे भारतीय वायूदलाचे विमान ४ ऑगस्टला बंगालच्या कलैकुंडा येथे कोसळले. या विमानातील दोन्ही वैमानिक बचावले आहेत.

सुरत (गुजरात) येथे २०० धर्मांधांचे पोलीस ठाण्यावर आक्रमण !

काश्मीर असो कि गुजरात, धर्मांध हे पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्याचे धाडस करतात आणि पोलीस शेपूट घालतात ! 
     सुरत (गुजरात) - येथील लिंबायत पोलीस ठाण्यात २०० धर्मांधांनी आक्रमण केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. येथे 'लव्ह जिहाद'च्या प्रकरणातील एक व्हिडिओ प्रसारित झाला असून त्यात अल्पसंख्यांकांविषयी नकारात्मक विचार मांडण्यात आल्याने हा व्हिडिओ बनवणारे आणि ते प्रसारित करणारे यांच्यावर कारावाई करण्याच्या मागणीसाठी हे आक्रमण करण्यात आले. या वेळी पोलिसांनी धर्मांधांवर लाठीमार केला, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. हा व्हिडिओ 'व्हॉट्स अ‍ॅप'द्वारे प्रसारित झाला आहे. यात ३ जण दोन धर्मांधांना भाड्याचे घर खाली करून येथील परिसर सोडून जाण्यासाठी सांगत आहेत. हे दोन धर्मांध 'लव्ह जिहाद' प्रकरणातील आहेत, असा त्यांना सोडून जाण्यास सांगणार्‍यांचा दावा आहे.

सनातनवर बंदी घालण्यासाठी माझ्याकडे कोणतीही धारिका आलेली नव्हती ! - सुशीलकुमार शिंदे

ऊठसूट सनातनवर बंदीची मागणी करणार्‍या काँग्रेसींना घरचा अहेर ! 
     पुणे, ४ ऑगस्ट - 'सनातन संस्थेवर बंदी असावी कि नाही, हे राज्यसरकारने ठरवायला पाहिजे. सनातनवर बंदी घालण्यासाठी माझ्याकडे कोणतीही धारिका (फाईल) आली नव्हती', असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात तेे बोलत होते. 
     या वेळी पत्रकारसंघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे उपस्थित होते. शिंदे पुढे म्हणाले की, 'सध्या इसिसचा धोका सर्व जगालाच आहे. त्यामुळे आपणही त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवून सतर्क राहिले पाहिजे. मी गृहमंत्री असतांना इस्लामचे धर्मगुरु झाकीर नाईकविषयी आमच्याकडे कोणतीही माहिती आली नव्हती.'

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     श्री. समीर गायकवाड यांना मागील १० महिने २० दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना १ महिना २६ दिवसांपासून कोणताही गुन्हा केला नसतांना कारागृहात डांबण्यात आले आहे. 
केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

चीनने मुसलमानांवर घातलेले निर्बंध

चीनला कळते, ते भारतातील एकाही राजकीय पक्षाला का कळत नाही ? 
त्याचे राष्ट्रावर मुळीच प्रेम नाही, हे यातून सिद्ध होते !
     चीनमध्ये कोणत्याही मुसलमानाने आतंकवादी कारवायांत सहभाग घेणे, हत्या करणे अथवा बलात्कार करणे अशा प्रकारच गुन्हे केल्यास त्याला फासावर लटकावले जाते अथवा जन्मभर कारागृहात टाकले जाते. (संदर्भ : पॅट्रीयट्स फोरम्)

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या चांदीच्या रथात भ्रष्टाचार करणार्‍यांना तात्काळ अटक करा ! - शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांची मागणी

आमदार भरतशेठ गोगावले
     मुंबई, ४ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी) - देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी चांदीच्या रथामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार करणार्‍यांना त्वरित अटक करावी. देवस्थानातील अनेक घोटाळ्यांविषयी मागील वर्षी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मुख्ममंत्र्यांनी सभागृहातील सर्वपक्षीय आमदारांच्या भावना लक्षात घेत या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीआयडीचे विशेष अन्वेषण पथक नेमले; मात्र सीआयडीची चौकशी चालू होऊन सव्वा वर्ष उलटले, तरी श्री महालक्ष्मीदेवीच्या रथात शेकडो किलो चांदीचा घोटाळा करणारे कारागीर संजय साडविलकर आणि देवस्थानचे पदाधिकारी यांच्यावर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. दोषींवर गुन्हे देखील प्रविष्ट झालेले नाहीत. खरे तर देवस्थानमधील घोटाळा आणि श्री महालक्ष्मी देवीचा रथ हा अतिशय संवेदनशील आणि कोट्यवधी भक्तांचा श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे. आता तरी शासनाने देवस्थानात घोटाळा करणार्‍यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

बंदुकीच्या गोळ्यांचे कारण पुढे करून तुम्ही काहीच होऊ देत नाही ! - उच्च न्यायालय

न्यायालयाकडून ३ आठवड्यांची मुदत 
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाने अन्वेषण यंत्रणांना फटकारले ! 
     मुंबई, ४ ऑगस्ट - डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणातील बंदुकीच्या गोळ्यांचा फॉरेन्सिक अहवाल ३ आठवड्यांत स्कॉटलंड यार्डहून घेऊन या. गोळ्यांचे कारण देऊन तुम्ही काहीच होऊ देत नाही. असे चालणार नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला (सीबीआयला) फटकारले. ४ ऑगस्ट या दिवशी या खटल्याच्या झालेल्या सुनावणीच्या वेळी कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर या दोघांच्या हत्येला बराच काळ लोटूनही अद्याप अन्वेषण न झाल्याविषयी न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण करणारी विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) या दोघांनाही धारेवर धरले.

नदीपात्रात १३ मृतदेह सापडले, शोधकार्य अद्यापही चालूच

  • सावित्री नदीवरील पूल धोकादायक असल्याचे सुतोवाच आमदार भरत गोगावले यांनी गेल्या वर्षी केले होते !
  • सावित्री नदीवरील पूल कोसळल्याचे प्रकरण
  • शासनाचे दुर्लक्ष !
       मुंबई, ४ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी) - सावित्री नदीवरील पूल धोकादायक आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकतो, असे सुतोवाच महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार श्री. भरत गोगावले यांनी ३० जुलै २०१५ या दिवशी विधानसभेत केले होते. या दिवशी आमदार श्री. गोगावले यांनी सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन बांधल्या गेलेल्या पुलाविषयी प्रश्‍न उपस्थित केला होता. हा पूल पावसाळ्यात कोणत्याही क्षणी कोसळू शकतो आणि मोठी दुर्घटना घडू शकते, असे गोगावले यांनी या प्रश्‍नाच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर हा पूल तांत्रिकदृष्ट्या सक्षम असून त्यावरून वाहतूक सुरळीत असल्याचे लेखी उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी विधानसभेत दिले होते.

जबलपूर येथे हिंदु धर्मसेनेने ख्रिस्ती महिलेचा धर्मांतराचा डाव हाणून पाडला !

देशातील धर्मांतर थांबवण्यासाठी भारतातील हिंदुत्वनिष्ठ शासनाने 
धर्मांतरविरोधी कायदा करावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !
      जबलपूर (मध्यप्रदेश) - धर्मांतर करणार्‍या दोन ख्रिस्ती महिलांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हिंदु धर्मसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोरखपूर पोलिसांना धारेवर धरले, तसेच आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांना ंसंबधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन देणे भाग पडले. (धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, हे पोलिसांसाठी लज्जास्पद ! पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? - संपादक) 
      हिंदु धर्मसेनेचे अध्यक्ष श्री. योगेश अग्रवाल यांनी सांगितले, येथील जॉनसन शाळेजवळ एक ख्रिस्ती महिला काही महिला आणि लहान मुले यांना धर्मांतराठी चर्चमध्ये नेत असल्याचे समजले. तेथे त्यांना आर्थिक साहाय्य देण्यात येईल, तसेच त्यांच्या मुलांचे आजार बरे होतील, असे प्रलोभन दाखवण्यात आले होते. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते अशा प्रलोभनांना बळी पडून चर्चमध्ये जाण्यास आणि धर्मांतर करण्यास तयार होतात ! - संपादक) याची सूचना पोलिसांना मिळाल्यावर श्री. अग्रवाल सर्व लोकांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. (धर्मांतर रोखण्यासाठी तत्परतेने पावले उचलणारे श्री. अग्रवाल यांचे अभिनंदन ! - संपादक) त्यानंतर हिंदु धर्मसेनेने धर्मांतरात सहभागी असणार्‍या लोकांवर कारवाई करण्याची पोलिसांकडे मागणी करत आंदोलन केले, तसेच घोषणा दिल्या. यावर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन पोलिसांनी दिले.

देवद गाव ते नवीन पनवेल या पुलाचे बांधकाम तातडीने निर्धारित वेळेत पूर्ण करावे; अन्यथा जनआंदोलन करू !

देवद गाव ते नवीन पनवेल पूल समितीच्या वतीने
पनवेल येथील प्रांताधिकार्‍याकडे निवेदनाद्वारे मागणी 

प्रांताधिकार्‍यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

देवद येथील सध्याचा धोकादायक पूल

       पनवेल - देवद गाव आणि परिसरात १० सहस्रांहून अधिक लोकसंख्या आहे; मात्र येथील नागरिकांना वाहतुकीसाठी, तसेच नवीन पनवेल येथे जाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनसाठी बनवलेल्या एकेरी सर्व्हिस रस्त्याचा वापर करावा लागत आहे. तो रस्ता वाहतुकीसाठी अनधिकृत असून केवळ ३ मीटर रुंदीचा आहे. हा पूल धोकादायक असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. नुकत्याच महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेमुळे देवद येथील नागरिकही या पुलावरून जाण्यास भयभीत झाले आहे. त्यामुळे देवद गाव ते नवीन पनवेल या पुलाच्या बांधकामांच्या संदर्भात आवश्यक गोष्टींची पूर्तता करावी आणि तातडीने पुलाचे बांधकाम चालू करून निर्धारित वेळेत पूर्ण करावे. असे न झाल्यास नाईलाजाने स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे करतील, अशी चेतावणी असलेले निवेदन देवद गाव ते नवीन पनवेल पूल समितीच्या वतीने येथील प्रांताधिकारी श्री. भरत शितोळे यांना ३ ऑगस्ट या दिवशी देण्यात आले. या वेळी देवद येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. संदीप वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य श्री. निनाद गाडगीळ आणि श्री. विजय वाघमारे उपस्थित होते. महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर मार्गावरील पूल कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर देवद येथील पुलाच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले. अशाच आशयाचे निवेदन तहसीलदार कार्यालयात आणि स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यालयातही देण्यात आले.

बंगालमध्ये गोतस्करांनी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर केलेल्या आक्रमणात ८ सैनिक घायाळ !

सैनिकांवर आक्रमण करण्याचे धाडस गोतस्करांमध्ये होतेच कसे ?
      सिलीगुडी (बंगाल) - बांगलादेशच्या सीमेवरून गोतस्करी करणार्‍या तस्करांना रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर त्यांनी आक्रमण केल्याने यात ८ सैनिक घायाळ झाले. (सैनिकांना गोतस्करांवर कारवाई करण्याचे अधिकार का देण्यात येत नाहीत ? आधी काश्मीर आणि आता बंगालमध्ये समाजकंटकांकडून सैनिकांना लक्ष्य केले जात आहे ! केंद्रशासनाने यात लक्ष घालून सैनिकांना अधिक अधिकार देण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे ! - संपादक) सैनिकांनी तस्करांकडून ३४ गायी जप्त केल्या. ही घटना सिलीगुडीजवळील लियूसीपाखरी बाजाराच्या परिसारात घडली.

कर्ज मिळवण्यासाठी मुसलमानाने घेतली गोमांस न खाण्याची शपथ !

धर्मांधांच्या विश्‍वासघातकी वृत्तीचे अनेक दाखले इतिहासात नमूद आहेत. त्यामुळे कर्ज 
मिळवण्यासाठी गोमांस न खाण्याची शपथ मुसलमान किती दिवस पाळतात, हे पहावे लागेल !
      कोलकाता - गोकुळ मिशनच्या अंतर्गत गो-विकास प्रकोष्ठ या संस्थेचे आर्थिक साहाय्य प्राप्त करण्यासाठी येथील शेख शौकत यांनी यापुढे गोमांस खाणार नाही, अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे दूध डेअरी उघडण्यासाठी मिळणार्‍या ३ लाख ५० सहस्र रुपयांच्या आर्थिक साहाय्यासाठी ते पात्र ठरले आहेत. 
    भाजपच्या गो-विकास प्रकोष्ठने गाय मालकांना मुद्रा बँक योजनेच्या अंतर्गत आर्थिक साहाय्य देण्याचे आश्‍वासन दिले होते. ही संघटना बंगालमध्ये गोहत्या आणि गायींची तस्करी थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. गोरक्षणासाठी आवाहन केल्यावर लोकांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा निर्णय घेतला, असे गो-विकास प्रकोष्ठचे बंगालचे अध्यक्ष सुब्रतो गुप्ता यांनी सांगितले. या योजनेत सहभागी होणार्‍या लोकांसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. गायींची हत्या करणार नाही आणि मिळणार्‍या आर्थिक साहाय्याचा उपयोग केवळ गायीच्या संदर्भातील योजनेतच करणार, अशा अटींचा अंतर्भाव आहे. या योजनेच्या अंतर्गत दलित, आदिवासी आणि मुसलमान यांनाही जोडण्यात येत आहे. या योजनेचा प्रारंभ पश्‍चिम मिदनापूर येथून करण्यात आला आहे. आतापर्यंत १ सहस्र ९०३ आवेदन मिळाले असून त्यात ३६० मुसलमान आहेत. (आर्थिक योजनांविषयी जागरूक मुसलमान ! - संपादक)

शासनकर्त्यांच्या मनोवृत्तीमुळे निष्क्रीय झालेल्या शासकीय यंत्रणेचे दुष्परिणाम ! - प.पू. पांडे महाराज

रायगडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेविषयी संत आणि तज्ञ यांची मते 
प.पू. पांडे महाराज
     पाण्याची गती मोजणारे (व्हेलॉसिटी) यंत्र पुलाजवळ असते. त्यामुळे नदीच्या प्रवाहाचा वेग वाढल्यास त्याप्रमाणे सतर्कतेची सूचना खात्याकडून देता येऊ शकते. ब्रिटिशांनी या पुलाविषयी धोक्याची सूचना कळवली होती, असे समजलेे, तरी त्यावरून वाहतूक का चालू ठेवली ? तसेच पूल जर धोकादायक होता, तर त्या ठिकाणी चौकीची व्यवस्था का केली नाही ? इंडिकेटर वगैरे का लावले नाही ? पुलाच्या बांधकामात मोठी झाडे उगवल्यामुळे पूल धोकादायक होता. असे असून पुलावरून मोठमोठ्या वाहनांची वाहतूक चालू ठेवली, हे चुकीचे आहे. पाऊस असल्याने विशेष दक्षता घेणे, तसेच जुना पूल होता; म्हणून त्याची काळजी घेणे आवश्यक होते. सार्वजनिक बांधकाम खाते आणि जलसिंचन खाते (इरिगेशन) यांच्यामध्ये समन्वय असणे आवश्यक होते. प्रतिवर्षी स्ट्रक्चरल ऑडीट होणे आवश्यक आहे. ब्रिटिशांनी नोंदी ठेवून या संदर्भात तत्कालीन काँग्रेस शासनकर्त्यांना कळवले होते; परंतु निधर्मी शासनकर्त्यांच्या निष्क्रीयतेमुळे ही दुर्घटना झाली. खरेतर शासकीय यंत्रणा ६० वर्षांपासून काँग्रेसच्या अधिपत्याखाली कार्य करत होती. ती किती निष्क्रीय झाली आहे, हे यावरून दिसून येते. कार्य करणारी यंत्रणा मुळात सक्षम असल्यास असे प्रसंग उद्भवणार नाहीत. केवळ ५ वर्षांनंतर शासन पालटल्याने काही फरक पडत नाही; कारण शेवटी कार्य करणारी यंत्रणा ही कायम असते. यासाठी शासकीय यंत्रणा सक्षम ठेवणे हे राज्यकर्त्यांचे कार्य आहे. यापुढे सर्व पुलांविषयी दक्षता घेणे आवश्यक आहे.
 - प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. 
 (प.पू. पांडे महाराज राज्यशासनाच्या जलसिंचन विभागातून उपअभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत.) 

उत्तरप्रदेशमधील गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ

उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे जनताद्रोही शासन सत्तेवर 
असल्यामुळेच तेथे जंगलराज अस्तित्वात आहे !
      लक्ष्मणपुरी - उत्तरप्रदेशमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१६-१७ या वर्षातील गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०१४-१५ वर्षाच्या तुलनेत २०१६-१७ या वर्षातील गुन्ह्यांच्या आकडेवारीत १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने म्हटले आहे. वर्ष २०१४ मध्ये उत्तरप्रदेशात ३ सहस्र ४६७ अत्याचारांच्या घटनांची नोंद करण्यात आली होती, तर वर्ष २०१५ मध्ये ९ सहस्र ७५ एवढ्या अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.सूरत (गुजरात) येथे लव्ह जिहादमध्ये फसलेल्या तरुणीची आत्महत्या !

लव्ह जिहाद म्हणजे काय, हे ठाऊक नसणारे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह 
गुजरातच्या या घटनेची माहिती तेथे जाऊन घेतील का ?
      सूरत (गुजरात) - येथे महाविद्यालयात शिकणार्‍या दीपिका खत्री या २० वर्षीय तरुणीला मोइन हुसेन याने लव्ह जिहादद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केले. हुसेन याने त्यांच्यातील शारीरिक संबंधाचा व्हिडिओ बनवून तो मित्राला पाठवला. यामुळे होणार्‍या अपकीर्तीमुळे दीपिका हिने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. पोलिसांनी हुसेन आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. 
     हुसेन याने तो हिंदु असून त्याचे नाव रावण असल्याचे सांगून दीपिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. दीपिकाने घरातून पळून जाऊन त्याच्याशी लग्न केले होते.उत्तरप्रदेशमध्ये बलात्काराच्या व्हिडिओची ५० ते १५० रुपयांत विक्री !

अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालण्यास विरोध करणारे यावर काही बोलतील का ?
नैतिकतेचे अधःपतन झालेला उत्तरप्रदेश ! 
     लक्ष्मणपुरी - भ्रमणभाष संचाद्वारे (मोबाईलद्वारे) चित्रीकरण केलेल्या बलात्काराच्या व्हिडिओची उत्तरप्रदेशात उघडपणे विक्री केली जात आहे. अनेक दुकानांवर हा व्हिडिओ ५० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत विकला जात आहे. (समाजाला साधना न शिकवल्याचे हे फलित आहे ! - संपादक) 
१. बलात्काराचा व्हिडिओ किती विशेष आहे यावर त्या व्हिडिओची किंमत ठरवली जात आहे. हे सर्व व्हिडिओ ३० सेकंदापासून ५ मिनिटांपर्यंतचे आहेत. 
२. बलात्कारसारख्या व्हिडिओला ग्राहकांकडून मागणी वाढल्याने अनेक दुकानात यासारखे व्हिडिओ डाऊनलोड तसेच पेन ड्राईव्हमधून दिले जात आहे, अशी माहिती आग्रा येथील एका दुकानदाराने दिली.

पठाणकोट आक्रमणामागे पाकच ! - अमेरिकेकडून पुरावे सादर

पाकच्या विरोधात कितीही पुरावे दिले, तरी पाकवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही ! 
      नवी देहली - पठाणकोट आक्रमणातील जैश-ए-मोहंमद या आतंकवादी संघटनेचे आतंकवादी पाकमधील सूत्रधारांच्या संपर्कात होते, असे पुरावे अमेरिकेने दिले आहेत. या आक्रमणातील ४ आतंकवादी आणि पाकमधील त्यांचा प्रमुख काशिफ जान यांच्यातील चॅटिंग आणि संवाद असलेले १ सहस्र पानांचे दस्तावेज अमेरिकेकडून भारताला मिळाले आहेत. अमेरिकी अधिकार्‍यांनी अत्यंत विस्तृत तपशील पुरवल्याने भारताची बाजू भक्कम झाली आहे. द्विपक्षीय विधि साहाय्य कराराच्या आधारे हे दस्तावेज भारतीय अन्वेषण यंत्रणांना अमेरिकेकडून मिळाले आहेत. (पाकच्या विरोधात आतापर्यंत ढिगभर पुरावे मिळाले आहेत. त्याचा काय लाभ झाला ? पाकच्या विरोधात आता शासनाने कठोर पावले उचलावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे ! - संपादक)हिंदूंसारखी नपुंसक जात कोणतीही नाही !

हिंदूंची सद्यस्थिती आणि त्यांच्यावर होणारे अन्याय पाहून उद्विग्न 
झालेले केंद्रीय राज्यमंत्री गिरीराजसिंह यांचे विधान ! 
      नवी देहली - हिंदूंसारखी नपुंसक जात कोणतीही नाही. पुढील २० वर्षांत हिंदूंची अधोगती होणार आहे, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. (हिंदु धर्म आणि हिंदू यांच्यावर विविध माध्यमांतून आघात होत आहेत. असे असतांनाही हिंदू संघटित होऊन वैध मार्गाने त्याला विरोध करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर होणारे अन्याय थांबत नाहीत ! सिंह यांनी केलेले निरीक्षण जरी बरोबर असले, तरी हिंदूंमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी केंद्रशासनाने काही तरी करावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! - संपादक) कोबरापोस्ट डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये गिरीराजसिंह वरील विधान केले आहे. 
     यात ते पुढे म्हणतात, हिंदू असते तर (हिंदूंमधील हिंदुत्व जागृत असते तर) पाटण्यामध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यावर एकेकाला चोपण्यात आले असते. काही युवकांमध्ये अशी संवेदशीलता आहे. देशात असे केवळ २० टक्के संवेदनशील लोक आहेत.

चित्रफितीत फ्रान्सवरील आक्रमणाची चेतावणी !

फ्रान्समधील चर्चवरील आक्रमणातील आतंकवाद्यांची चित्रफीत प्रसिद्ध 
      पॅरिस - फ्रान्समधील नॉरमेंडीच्या सेंट-एटिने-ड्यू-रॉवेरीमधील एका चर्चवर आक्रमण करून एका पाद्रीच्या निर्घुण हत्येत सहभागी आतंकवादी १९ वर्षीय अब्देल मलिक पेटिटजीनची एक चित्रफित समोर आली आहे. इसिसशी संबंधित एका वृतसंस्थेकडून सार्वजनिक करण्यात आलेल्या या चित्रफितीमध्ये अब्देलने थेट राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद आणि पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांना संबोधून फ्रान्सला चेतावणी दिली आहे. या चित्रफितीत त्याच्यासह त्याचा सहकारी १९ वर्षीय अदेल करमिचेही दिसून येतो. ही चित्रफित चर्चवरील आक्रमणाच्या पूर्वी सिद्ध करण्यात आली होती. या दोन्ही आतंकवाद्यांनी २६ जुलैला नॉरमेंडीच्या सेंट-एटिने-ड्यू-रॉवेरीमधील एका चर्चवर आक्रमण करून ८६ वर्षाच्या पाद्री जेकस हामेल की वेदी याचा गळा कापून हत्या केली होती. त्यानंतर हे दोघेही पोलिसांच्या गोळीबारात ठार मारले गेले होते. दोन आठवड्यापूर्वीच आतंकवादी आक्रमणात ८४ लोक मृत्यूमुखी पडले होते.पाकिस्तानी आतंकवादी गटाकडून काश्मीरमधील मुसलमानांना साहाय्य !

       कराची - पाकमधील लश्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन या गटाने काश्मीरमधील मुसलमानांना मदतीचा साठा पाठवला होता. यामध्ये औषधांच्या साठ्याबरोबरच रुग्णवाहिका तसेच डॉक्टरांचा आणि कार्यकर्त्यांच्या ताफ्याचा समावेश होता. (भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये लुडबुड करून भारतव्याप्त काश्मीरमध्ये स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करू पहाणार्‍या पाकची धूर्त चाल भारत कधी ओळखणार ? अशा पाकला धडा शिकवण्यासाठी कणखर राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्र अर्थात् सनातन धर्म राज्यच हवे ! - संपादक) परंतु सदर गटाला भारत-पाक सीमेवर रोखण्यात आले. त्यामुळे हा गट भारत-पाक नियंत्रण रेषेवर तळ ठोकण्याचे नियोजन करत आहे, अशी माहिती पाकचे उपायुक्त मसूद-उर-रेहमान यांनी दिली आहे.कार्डिफ वस्तुसंग्रहालयाकडून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या दुर्गादेवीच्या मूर्तींचे प्रदर्शन

     लंडन - इंग्लंडच्या वेल्समधील कार्डिफ वस्तुसंग्रहालयाच्या वतीने विद्यार्थ्यांनी मातीपासून बनवलेल्या दुर्गादेवीच्या पूर्णाकृती मूर्तींचे प्रदर्शन ८ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत भरवण्यात येणार आहे. भारतातील पारंपरिक मूर्तीकारांच्या मार्गदर्शनाखाली कार्डिफ स्कूल ऑफ आर्टमधील विद्यार्थ्यांनी या मूर्ती बनवल्या आहेत. या मूर्तींची पुढे ऑक्टोबरमध्ये दक्षिण वेल्समध्ये साजर्‍या होणार्‍या ५ दिवसीय दुर्गापूजेच्या उत्सवाच्या वेळी विधिवत् पूजा करण्यात येणार आहे. या उत्सवानंतर या मूर्तींचे टाफ नदीमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. तसेच पुढच्या वर्षी नवीन मूर्ती बनवण्यात येणार आहे. 
      वेल्समध्ये गेल्या ४० वर्षांपासून दुर्गापूजा उत्सव साजरा करण्यात येतो. या उपक्रमाचे हिंदूंनी स्वागत केले असून जगभरातील इतर प्रसिद्ध वस्तुसंग्रहालयांनीही हिंदु धर्मातील वैभवशाली परंपरेचे जतन करावे, असे आवाहन केले आहे.

तैवान शासनाने मूळ निवासींची क्षमा मागितली !

      तैपेई (तैवान) - चिनी लोकांनी घुसखोरी करून मूळनिवासींवर केलेल्या अत्याचाराच्या प्रकरणी तैवान शासनाने मूळ निवासींची क्षमा मागितली आहे. चिनी वंशाच्या शासकांनी गेली ४०० वर्षे या निवासींवर अन्याय केला. याच मूळ निवासींच्या वंशाच्या असलेल्या तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी अध्यक्षीय प्रासादात आयोजित केलेल्या एका खास समारंभात या मूळ निवासी जमातींच्या नेत्यांपुढे भाषण करून त्यांना सोसाव्या लागलेल्या अन्याय आणि हालअपेष्टा यांविषयी दिलगिरी व्यक्त केली. तसेच त्यांनी शासनाच्या वतीने एक औपचारिक लेखी क्षमापत्रही सर्वांत वयोवृद्ध मूळ निवासी नेत्यापुढे नतमस्तक होत त्याच्याकडे सुपूर्द केला. मूळ निवासी समुदायांना अधिक स्वायत्तता देण्याचे, त्यांच्या हिरावून घेतलेल्या भूमी त्यांना परत करणे आणि त्यांच्या भाषा आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याचे वचनही त्साई यांनी दिले. तैवानच्या एकूण २ कोटी ३५ लाख लोकसंख्येत मूळ निवासींची संख्या केवळ २ टक्के आहे. तैवानच्या एकूण क्षेत्रफळापैकी दोन तृतीयांश भूमी मूळ निवासींची असूनही ती हडपून तेथे विकास केला गेला आहे.

बळजोरीने धर्मांतर करणे ही, हिंदूंची परंपरा नाही ! - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

      लंडन - बळजोरीने एखाद्याचे धर्मांतर करणे ही हिंदु धर्माची परंपरा नाही. धर्म हा वैयक्तिक अधिकार आहे. हिंदुत्व धर्म नाही तर परंपरा आहे. ही परंपरा एकमेकांना स्वीकारण्याची आणि एकमेकांचा आदर करण्याची शिकवण देते. तेव्हा कुणी कोणत्या धर्मावर विश्‍वास ठेवावा आणि कोणत्या धर्माचे पालन करावे हे प्रत्येकाला ठरवू द्या. आपण या अधिकारावर गदा आणू शकत नाही, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. येथील हिंदूंच्या हिंदु स्वयंसेवक संघ या संघटनेच्या सुवर्ण वर्धापनदिनाच्या निमित्ताने लंडन येथे आठवडाभराचे महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. या महाशिबिराच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. 
     सरसंघचालक पुढे म्हणाले की, हिंदू जगात कुठेही मानवी भावनेच्या बळावर एक समाज म्हणून नांदू शकतात. सामान्य हिंदूंनी हे सिद्ध केले आहे. त्यामुळेच हिंदू जगात सर्वत्र दिसतात.


देशात मद्यबंदी करण्याचा विचार नाही ! - केंद्र सरकार

आरोग्याच्या संदर्भात जनतेला वार्‍यावर सोडणे अयोग्य नाही का ?
      नवी देहली - देशात मद्यबंदी करण्याचा विचार नसल्याची माहिती केंद्रसरकारने ३ ऑगस्टला लोकसभेत दिली. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर एका लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात म्हणाले की, केंद्र सरकार राज्य सरकारांना त्यांच्या राज्यात मद्यबंदी करण्यासाठी साहाय्य करील; मात्र संपूर्ण देशात मद्यबंदी करणार नाही. अवैध मद्य पिऊन २०१२ मध्ये ७३१, २०१३ मध्ये ४९७, तर २०१४ मध्ये १ सहस्र ६९९ जणांचा मृत्यु झाल्याची माहिती त्यांनी दिली.देहलीतील रोहिणी न्यायालयाबाहेर अधिवक्त्यांकडून पोलिसाला मारहाण

     देहली - येथील रोहिणी न्यायालयाबाहेर अधिवक्त्यांचा पोलिसांबरोबर झालेल्या वादानंतर त्यांनी पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकारानंतर अधिवक्त्यांनी संप चालू केला आहे. 
      एक अधिवक्ते त्यांच्या परिवारासह न्यायालयात आले होते. प्रवेश करतांना पोलीस कोठडीच्या बाजूने जात असतांना पोलीस कमांडोने त्यांच्यावर आक्षेप घेतला. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यवसन दोघांत हाणामारी झाली. त्यानंतर अन्य अधिवक्त्यांनी मिळून पोलीस कमांडोला मारहाण केली.

अफगाणिस्तानमध्ये ६० वर्षांच्या मौलानाने ६ वर्षीय मुलीशी केला विवाह !

मुसलमानांना स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे, अशी शिकवण मिळत असल्यामुळेच असे प्रकार घडतात !
      काबूल - अफगाणिस्तानमधील महंमद करीम या ६० वर्षीय मौलानाने अवघ्या ६ वर्षीय मुलीबरोबर विवाह केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी करीम याला अटक केली असून ही मुलगी आपल्याला भेट म्हणून मिळाल्याचा दावा त्याने केला आहे. हेरात प्रांतातून या मुलीचे अपहरण करण्यात आले होते, असा दावा मुलीच्या पालकांनी केला आहे.इसिसने सिरीयामध्ये रशियाचे हेलिकॉप्टर पाडले !

      मॉस्को - १ ऑगस्टला इसिसने सिरीयातील इडलिब प्रांतात रशियाचे एक सैनिकी हेलिकॉप्टर क्षेपणास्त्राने पाडले. या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून पाच जण प्रवास करत होते, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. हे हेलिकॉप्टर अलेप्पो येथे गरजूंना मदत साहित्य पोचवून आले होते. त्यानंतर परतीच्या प्रवासात यास हेतूत: पाडण्यात आले, असे रशियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितल्याचा हवाला देऊन हे वृत्त रशियन न्यूज एजन्सीने दिले आहे.शासनाचे पर्याय मान्य न करणार्‍या शिक्षकांना शासन वेतन देणार नाही ! - शिक्षणमंत्री

        मुंबई, ४ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी) - शालेय शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंर्तगत मोठ्या संख्येने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि आश्रमशाळा यांतील शिक्षकांना सेवाशर्ती नियमावली आणि कायदा लागू आहे. या कायद्याप्रमाणे शासनाने इतर शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती केल्यास ते तेथे काम करण्यास सिद्ध नसतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अशा शिक्षक कर्मचार्‍यांना नो वर्क नो पे या तत्त्वानुसार वेतन देण्यात येणार नाही. शासनाचे पर्याय मान्य करून काम करणार्‍या शिक्षकांना वेतन देण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी ४ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देतांना दिली.

आपत्कालीन कक्षात प्रशिक्षित कर्मचार्‍यांची वानवा ?

        पुणे, ४ ऑगस्ट - शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवून सिंहगड रस्त्यावर नदीपात्रालगत असणार्‍या इमारतींमध्ये पाणी शिरले होते. या वेळी साहाय्यकार्यासाठी क्षेत्रिय कार्यालयामधून होडी मागवण्यात आली; पण अनेक कर्मचार्‍यांना ही होडी कशी चालवायची याचे प्रशिक्षणच नसल्याचे पहायला मिळाले. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांच्या साहाय्याने परिस्थिती नियंत्रणात आणली गेली असली, तरी महानगरपालिकेचा आपत्कालीन कक्ष नावापुरताच आहे का ? अशी स्थानिक नागरिकांकडून विचारणा होत होती. (आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षणच नसेल, तर आपत्कालीन कक्ष उभारून काय उपयोग ? - संपादक)

महाड दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करणार ! - मुख्यमंत्री

         मुंबई, ४ ऑगस्ट (वार्ता.) - मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ सावित्री नदीवर असलेला जुना महाड पुल रात्री पाण्याच्या प्रचंड वेगाने कोसळला. या वेळी पुलावरून जाणार्‍या २ एसटी बससह अनेक वाहने आणि जवळपास ३० जण वाहून गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या वाहनांचा अजून शोध लागला नाही. या दुर्घटनेचे ४ ऑगस्टला दुसर्‍या दिवशीही राज्य विधीमंडळात तीव्र पडसाद उमटले. या वेळी विरोधी पक्षांच्या वतीने मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणी केली.
         या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही घटना गंभीर आहे. यांसारखे राज्यात अनेक पूल आहेत. त्यांचेही प्राथमिक सर्वेक्षण करून त्यावर योग्य ती उपाययोजना केली जाईल. तसेच महाड येथील पडलेल्या पुलाच्या ठिकाणी दुसरा नवीन पूल बांधण्यात येणार आहे. आमदार राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह घटनेच्या ठिकाणापासून १०० कि.मी. अंतरावर सापडला त्यामुळे या घटनेची व्याप्ती मोठी आहे. तरी शासन २५ कि.मी. अंतरापर्यंतच शोध मोहीम करत आहे. ती व्याप्ती वाढवावी, तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि निष्काळजी अधिकार्‍यांवर कारवाई करावी.

सानपाडा (नवी मुंबई) येथे हिंदु देवतांची चित्रे असणार्‍या टाईल्स काढल्या !

  • धर्मरक्षणासाठी कृतीशील होणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील महिलांचे अभिनंदन !
  • हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी महिलांच्या प्रबोधनाचा परिणाम !
        सानपाडा - येथील सेक्टर ४ मधील शिव त्रिवेणी गॅलेरिया या इमारतीत जिन्यामधील कोपर्‍यांमध्ये हिंदु देवतांची चित्रे असणार्‍या फरशा धर्मशिक्षणवर्गातील महिलांच्या प्रबोधनानंतर काढून टाकण्यात आल्या. (आज धर्मशिक्षणाच्या अभावीच लोकांकडून जिन्यात देवतांच्या फरशा लावण्याची कृती होते. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणेच आवश्यक आहे. - संपादक) अधिवक्ता सौ. पूनम चव्हाण यांनी प्रबोधन करतांना विषय मांडला. त्यांच्या समवेत धर्मशिक्षणवर्गातील सौ. मनीषा खैरे, सौ. पूनम जाधव, सौ. कविता बोराडे याही सक्रीय सहभागी झाल्या होत्या. सौ. स्वाती सणस यांनी सर्वांना संघटित करण्यासाठी प्रयत्न केले.

चौथीच्या पुस्तकात अफझलखान वधाचे चित्र समाविष्ट न केल्यास शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्याची चेतावणी !

        कागल, ४ ऑगस्ट (वार्ता.) - धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सत्य इतिहास दडपण्याचे षडयंत्र चालू आहे. याचाच भाग म्हणून बालभारती म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास (भाग २) या पुस्तकातून अफझलखान भेटीचे चित्र समाविष्ट करण्यात आले आहे. तरी अफझलखान वधाचे चित्र अभ्याक्रमात तात्काळ समाविष्ट करण्यात यावे, अन्यथा शिवसेना तिच्या पद्धतीने आंदोलन करेल, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली कागल येथील तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांसह सुभाष गडकरी, शशिकांत जाधव, परशुराम जाधव, भिमराव पाटील, दीपक भोपळे, आनंदा पाटील, बाळासाहेब गडकरी, लक्ष्मण जाधव, सुशांत कालेकर आदी उपस्थित होते.

हिलरी क्लिंटन यांना इसिसच्या संस्थापक म्हणून पुरस्कार मिळावयास हवा ! - डोनल्ड ट्रम्प

        वॉशिंग्टन - अमेरिकेत आणि जगभरात काय घडते आहे, याकडे लक्ष द्या. इसिसचा प्रभाव आपण वाढू दिला आहे. तेव्हा हिलरी क्लिंटन यांना इसिसच्या संस्थापक म्हणून पुरस्कार मिळावयास हवा, अशी टीका अमेरिकी अध्यक्षपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
ट्रम्प म्हणाले की,
१. बराक ओबामा अमेरिकेचे आजपर्यंतचे सर्वांत वाईट अध्यक्ष आहेत. अमेरिकेच्या इतिहासात सर्वांत वाईट अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद होईल. त्यांचा कार्यकाळ म्हणजे एक आपत्तीच होती.
२. ओबामा यांनी पश्‍चिम आशिया आणि सिरीयामध्ये काय केले हे सर्वांनी पाहिले आहेच. आता त्यांना मी जिंकेन अशी चिंता वाटत आहे. मला अध्यक्षपदाच्या उमेदवारीचे नामांकनही मिळणार नाही, असे ते म्हणत होते. आता मी जिंकणार नाही, असे ते म्हणत आहेत.

दैनिक सनातन प्रभात : सनातन गौरव विशेषांक

सनातनच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने सनातनचे अद्वितीय
कार्य आणि वैशिष्ट्ये सांगणारा रंगीत विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : ७ ऑगस्ट २०१६
सनातनच्या सर्वव्यापी कार्याचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी आपली मागणी आजच नोंदवा !
संपर्क क्रमांक : ८४५१००६०३१, ९४०४९५६०८३

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूसंघटनाच्या आविष्कारातून सनातनला भक्कम पाठिंबा !
    पश्‍चिम महाराष्ट्रातील १५० हून अधिक संघटनांनी ४ ऑगस्टला कोल्हापूर येथे एका मेळाव्याद्वारे राष्ट्रप्रेमी आणि धर्मनिष्ठ सनातन संस्थेला आपला संपूर्ण पाठिंबा दर्शवला. सनातनचा छळ न थांबल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटना संघर्षाची भूमिका घेतील, असा ठरावही या वेळी करण्यात आला.

डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेवरील कारवाईत ३० कोटी रुपये आणि ४० किलो सोने शासनाधीन !

       पुणे - डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेवर प्राप्तीकर विभागाने केलेल्या कारवाईत ३० कोटी रुपये आणि ४० किलो सोने शासनाधीन करण्यात आले आहे. तसेच काही कागदपत्रे, बँकांची खाती आणि स्थावर मालमत्ताही कह्यात घेण्यात आली आहे. प्राप्तीकर विभागाने आतापर्यंत टाकलेल्या छाप्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.
       संत तुकारामनगर येथील दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेजारी या संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. जवळपास १०० घंटे देऊन प्राप्तीकर विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. (सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, शिक्षण संस्था ना लाभ ना तोटा या तत्त्वावर चालवणे अपेक्षित आहे. असे असतांनाही एका शिक्षणसंस्थेत इतक्या अधिक प्रमाणात मालमत्ता आढळते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन या संस्थेत झालेल्या सर्वच अपप्रकारांची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. तरच विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळेल ! - संपादक)

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Sanatan Sansthake sadhakoko diye ja rahe kashtke
virodhme Maharashtrake 150 Hindu sangathan ekatra.
Hindusangathan hi Hinduopar ho rahe aghatoka uttar !
जागो !
सनातन संस्था के साधकों को दिए जा रहे कष्ट के विरोध
में महाराष्ट्र के १५० हिन्दू संगठन एकत्र.
हिन्दूसंगठन ही हिन्दुआें पर हो रहे आघातों का उत्तर !

भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांच्या विरुद्ध दलितविरोधी वक्तव्याविषयी गुन्हा प्रविष्ट !

       भाग्यनगर - भाग्यनगर येथील भाजपचे आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांनी गुजरात येथील गोहत्येच्या प्रकरणी मारहाण झालेल्या दलितांविरुद्ध निवेदन केल्यावरून त्यांच्या विरुद्ध मंगलाहाट पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट करून घेतला आहे. श्री. राजासिंह यांनी त्यांच्या फेसबुक पानावर अपलोड केलेल्या व्हिडिओद्वारे त्यांनी म्हटले होते की, गोमांस खाणारे मग ते दलितही असोत, त्यांना धडा शिकवणे आवश्यकच होते. गोरक्षकांनी चांगले काम करून देशाची आणि समाजाची सेवा केली आहे. श्री. राजसिंह यांनी गोहत्या करणार्‍या सर्वांनाच चेतावणी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील पुलांची सद्यस्थिती तपासली जाणार !

        पुणे, ४ ऑगस्ट - महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर दक्षतेचा पर्याय म्हणून जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील सर्व पुलांची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागवली आहे. पुणे जिल्ह्यात ८ मोठे आणि ६८ छोटे पूल आहेत. पुलांच्या संदर्भातील माहिती प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पुलावरील वाहतूक वळवण्याविषयी निर्णय घेतला जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले. (यावरून प्रशासकीय कार्यपद्धतीत अनेक त्रुटी असल्याचे स्पष्ट होते. दुर्घटना झाल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा दुर्घटना होऊच नये, यासाठी उपाययोजना करणारे स्मार्ट प्रशासन नागरिकांना कधी मिळेल ? - संपादक)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रेय देणार्‍या अरोमा उपचारतज्ञ (डॉ.) सौ. मिनू रतन !

डॉ. (सौ.) मीनू रतन
१. पूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांकडून गुरुदेवांकडून (डॉ.) सौ. मिनूताईंच्या 
गुणांविषयी ऐकले असणे आणि आता त्याची प्रचीती येणे
     मी डॉ. (सौ.) मिनू रतन यांचे नाव सर्वप्रथम परात्पर गुरु डॉक्टरांकडून ऐकले होते. परात्पर गुरु जून १९९६ मध्ये मला म्हणाले होते, आता तूही अध्यात्माचा अभ्यास करून प्रवचने आदी घेण्यास आरंभ कर. डॉ. मिनू (सौ. मीनू रतन) किती चांगल्या प्रकारे सत्संग घेतात. मी सौ. मिनूताईंचे प्रवचन ऐकले नव्हते. आता वर्ष २०१६ मध्ये मी त्यांना अरोमा उपचारपद्धती हा विषय शिकवत असतांना त्यांचे बोलणे ऐकल्यावर मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या त्या वाक्याची प्रचीती आली. डॉ. (सौ.) मिनूताई अभ्यासपूर्ण बोलतात आणि त्या मांडत असलेल्या विषयावर त्यांचे चांगले प्रभुत्वही आहे, असे जाणवले.

सार्वजनिक उत्सव आदर्शरित्या साजरे करण्यासाठी करावयाचे प्रयत्न !

श्री. सुनील घनवट
        सार्वजनिक उत्सव आणि सण हे हिंदु धर्माचे अविभाज्य घटक आहेत. उत्सव म्हणजे आनंद देणारा सार्वजनिक समारंभ ! दैनंदिन जीवन आनंददायी करणे, हेच धार्मिक उत्सवांचे प्रयोजन असते. आज मात्र आपल्याला धार्मिक उत्सव साजरा करण्यातून आनंद मिळतो का ? नाही ना ! याचे एकमेव कारण म्हणजे हिंदूंच्या उत्सवांमध्ये शिरलेले अपप्रकार ! आपल्या सर्वांचे ध्येय रामराज्याची अनुभूती देणारे हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हे आहे. या भावी हिंदु राष्ट्रात आपण आपले उत्सव मद्यपान करून, जुगार खेळून किंवा खंडणी गोळा करून साजरे करणार का ? नाही ना ! म्हणूनच एक धर्मप्रेमी या नात्याने उत्सवांतील अपप्रकार रोखण्यासाठी आणि उत्सव आदर्शरित्या साजरे होण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे. आपण उत्सवांतील अपप्रकार रोखण्यासाठी काय करू शकतो, हे आता पाहूया. 

काश्मीरप्रश्‍नी संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप करणार नाही !

        संयुक्त राष्ट्र - पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीरप्रकरणी संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. त्यावर संयुक्त राष्ट्राने शरीफ यांना फटकारतांना स्पष्ट केले आहे की, काश्मीर भारत आणि पाक यांच्यातील द्विपक्षीय प्रश्‍न आहे. त्यात कोणताही तिसरा पक्ष हस्तक्षेप करणार नाही. संयुक्त राष्ट्रे काश्मीरच्या स्थितीवर लक्ष ठेवत नाही, असेही त्याने स्पष्ट केले आहे.

कुठे जनतेच्या हिताचा विचार करून मद्य, तंबाखू आदी हानीकारक पदार्थांवर निर्बंध घालणारे अन्य देश, तर कुठे या पदार्थांचा उघडपणे प्रचार होऊ देणारा भारत !

१. सिगारेट ओढल्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे मान्य करून संबंधित आस्थापनाला 
हानीभरपाई देण्यास भाग पाडणारी अमेरिकेची न्यायव्यवस्था !
      अमेरिकेची न्यायव्यवस्था किती चोख आहे !, हे पहाण्यासारखे आहे. श्रीमती पॅट्रेशिया ही ५३ वर्षीय फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासलेली एक महिला ! तिने १५ वर्षांपूर्वी मालब्रो सिगारेट आस्थापनाच्या एका विज्ञापनावर विसंबून मालब्रो सिगारेट ओढणे चालू केले. तिचे म्हणणे की, त्यांनीच तिला रोगी बनवले; म्हणून तिने मालब्रो सिगारेट आस्थापन आणि तिचे संचालक श्री. फिलीप मॉरिस यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा ठोकला. न्यायाधिशांनी सुनावणीनंतर पॅट्रेशियाचा दावा मान्य केला आणि तिला २०० कोटी रुपये हानीभरपाई दिली. विज्ञापनात खोटी आश्‍वासने दिल्याविषयी आस्थापन आणि संचालक यांना दोषी ठरवले.
        पॅट्रेशिया निर्णय ऐकून आनंदली. तिने या पैशांचा उपयोग धूम्रपानविरोधी विश्‍वस्त मंडळ स्थापण्यासाठी केला; कारण स्वतःला झालेला भयंकर रोग इतर कोणालाही होऊ नये, असे तिला वाटत होते.

नाशिक येथील सिंहस्थपर्वाच्या वेळी आलेले कटू-गोड अनुभव आणि त्यातून धर्मशिक्षणाची लक्षात आलेली आवश्यकता !

श्री. श्रेयस पिसोळकर
      नाशिक येथे वर्ष २०१५ मध्ये झालेल्या सिंहस्थपर्वाची दु:स्थिती दर्शवणार्‍या लेखाचा पूर्वार्ध काल आपण पाहिला. आता या लेखाचा पुढील भाग पाहूया.
सर्व साधकांनी अनुभवलेली संतांची प्रीती !
      पर्वणीची सेवा आम्ही सर्व साधक करू शकलो; कारण सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये), पू. जाधवकाका (पू. नंदकुमार जाधव) आणि पू. पिंगळेकाका (पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे) यांचा सेवेला जाण्यापूर्वी सत्संग मिळायचा. पू. ताई आणि पू. काका स्वतः सर्वांना तीर्थ आणि प्रसाद द्यायचे. त्यामुळे ते चैतन्य आम्हाला दोन दिवसांपर्यंत भारित ठेवायचे. संतांचे ते प्रेम पाहून बर्‍याच नवीन धर्माभिमान्यांचीही भावजागृती होत होती.

पुण्यातील भिडे पुलाला तडे

        पुणे, ४ ऑगस्ट - गेल्या ३ दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला होता. आज पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर या पुलाला तडे पडल्याचे दिसून आले. हे तडे केवळ डांबराला गेले असून पूल सुरक्षित आहे. तसे पत्र वाहतूक विभागाकडून मिळाले आहे, असे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. कळवा (ठाणे) येथील ब्रिटीशकालीन पूल सावधगिरी म्हणून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

माओवादाशी हवा सर्वंकष लढा !

निवृत्त ब्रिगेडिअर
हेमंत महाजन
     बिहारच्या गया जिल्ह्यातील जंगलात माओवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला असून यात ८ सैनिक हुतात्मा झाले. त्यानंतर शोधमोहिमेवर निघालेल्या कमांडो सैनिकांची माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत आणखी २ सैनिक धारातीर्थी पडले आणि काही सैनिक गंभीर घायाळ झाले, तर ६ माओवाद्यांना ठार करण्यात आले. गेल्या काही मासांपासून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणार्‍या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपासून देशद्रोही काश्मिरी तरूण पोलीस ठाण्यांवर आणि सुरक्षा दलांवर आक्रमणे करत आहेत. ही आक्रमकता एवढी वाढली आहे की, पोलिसांना उघडपणे जाळून मारण्यापर्यंत या देशद्रोही धर्मांधांची मजल गेली आहे. तरीही आपल्या राज्यसभेमध्ये काही सदस्यांना त्यांच्याशी वाटाघाटी करणे महत्त्वाचे वाटते, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल !

तिन्हीसांजेचा परवचा पुन्हा चालू करा !

      आमचा मन्या ना, अगदी स्मार्ट आहे. फक्त २ वर्षांचा आहे; पण पटापट दूरदर्शनच्या वाहिन्या पालटतो, भ्रमणध्वनी तर अगदी सराईतासारखा हाताळतो, अशा आशयाचे आई-वडिलांचे त्यांच्या मुलाविषयीचे बोल आपल्या आसपास अगदी सहज ऐकायला मिळतात. आपल्यालाही कौतुक वाटते की, खरंच, आजची पिढी किती हुशार आहे ! आपण या वयाचे असतांना आपल्याला हे सगळे काहीच येत नव्हतेे. आम्हाला येत होते ते निरागसपणे आजी आजोबांच्या कुशीत शिरून, मन लावून गोष्टी ऐकायच्या आणि तिन्हीसांजेचा परवचा म्हणायच्या.

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

     एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या विरामचिन्हांमुळे पालटणारे वाक्याचे अर्थ सांगणारे हे सदर !

हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी धर्मशिक्षणाचे महत्त्व !

        धर्मशिक्षणाने कृती, म्हणजे साधना होईल, साधनेने अनुभूती येतील, अनुभूतींनी श्रद्धा वाढेल, श्रद्धेने अभिमान वाढेल, अभिमानाने संघटन वाढेल, संघटनाने संरक्षण निर्माण होईल आणि त्यानेच हिंदुराष्ट्राचे निर्माण अन् पोषण होईल !
- डॉ. दुर्गेश सामंत.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे आधुनिक वाङ्मय राष्ट्र, धर्म आणि संस्कृती विघातक असणे अन् आंग्लछायेचा बुद्धीमान पंडितांवर विलक्षण परिणाम होणे !

      आधुनिक वाङ्मय राष्ट्र, धर्म आणि संस्कृती विघातक आहे. त्यात भारताची अस्मिता नाही. ते भाडोत्री आहे. तिथे उचलेगिरी आहे. अपौरुषेय वेदांना वेड्याची बडबड आणि दारुड्याचे बरळणे ठरवणार्‍या या आधुनिकांचे तर्कबुद्धी मारण्याचे प्रकार फार अमानुष आहेत. या पराभूत मनोवृत्तीचा प्रभाव आमच्या आंग्लछायेच्या बुद्धीमान पंडितांवर विलक्षण, व्यापक आणि खोल आहे. आम्ही विचार करणार कि नाही ? 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक घनगर्जित, फेब्रुवारी २०१३)       विज्ञाननिष्ठेच्या गोष्टी सांगणार्‍या बुद्धीखोरांना वेड्याच्या इस्पितळात पाठवा ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ७.१०.२०१०)

देवाशी अनुसंधान साधून रुग्णांवर उपचार करणार्‍या मुंबई येथील डॉ. (सौ.) मिनू रतन !

वैद्या (कु.) अपर्णा महांगडे
१. रोग होण्याची कारणे, सध्याच्या वैद्यांची उपचार करण्याची पद्धत 
आणि उपचार करतांना देवाशी अनुसंधान असण्याचे महत्त्व 
१ अ. रोग होण्याची कारणे
      या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्याला अल्प काळात अधिक लाभ कसा होईल ?, या शोधात असतेे. श्रीमंत लोक आहार-विहाराविषयी अती संवेदशील असतात, तर मध्यम आणि निम्न गटातील व्यक्ती अल्प संवेदनशील आढळतात. आपल्या आरोग्यशास्त्रात केवळ रोगांवर उपचार सांगितले नाहीत, तर रोग होऊ नयेत, यासाठी आहार-विहार आणि मन निरोगी रहाण्यासाठीही नियम सांगितले आहेत. प्रमेह (मधुमेह), उच्च रक्तदाब, मूत्रमार्गाचे विकार आणि स्त्रियांमधील पाळीच्या समस्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होतात. आपला आहार-विहार आणि मनाची स्थिती बिघडली की, हे रोग हळूवारपणे आपल्या शरीररूपी घरात प्रवेश करून तेथे कायमचा मुक्काम करतात.

पू. (सौ.) सुरजकांता मेनरॉय आणि पू. (श्री.) भगवंत मेनरॉय यांना डॉ. (सौ.) मिनू रतन यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

पू. (श्री.) भगवंत मेनरॉय
पू. (सौ.) सुरजकांता मेनरॉय
१. डॉ. (सौ.) मिनू रतन यांना विनासंकोचपणे मनातील सर्व सांगता येणे 
    डॉ. (सौ.) मिनू रतन ३.८.२०१६ या दिवशी आमच्या आजारांची चौकशी करण्यासाठी रामनाथी आश्रमातील आमच्या निवासकक्षात आल्या. त्या आल्यानंतर त्यांच्यातील स्पंदनांमुळे आमच्या दुःखांचे निवारण झाले आणि आता आम्ही पूर्णपणे ठीक होऊ, असे वाटू लागले. डॉ. पांडुरंग मराठेे आणि डॉ. (सौ.) मिनू रतन यांना कोणताही संकोच न ठेवता मनातील सर्वकाही सांगितले. त्या वेळी माझे (पू. (श्री.) भगवंत मेनरॉय यांचे) डोके शांत, स्थिर आणि थंड झाल्याचे जाणवत होते. त्या वेळी त्यांच्याप्रती आपोआप कृतज्ञता वाटू लागली आणि गुरुदेवांच्या चरणी आम्हा दोघांकडून प्रार्थना झाली, त्यांना गुरुदेवांचे आशीर्वाद मिळू देत.

ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाच्या जाणिवेची अनमोल भेट देणार्‍या परात्पर गुरूंप्रती डॉ. लिंडा बोरकर यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
१. प.पू. डॉक्टरांशी झालेली प्रथमभेट
        माझी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पहिली भेट १९९२ या वर्षी पणजी (गोवा) येथे एका प्रवचनाच्या वेळी झाली. त्यानंतर जेव्हा जेव्हा ते गोव्याला येत असत, तेव्हा मी त्यांना भेटायला जात असे. ते आपल्या मार्गदर्शनात नेहमी ईश्‍वरावर प्रेम करण्यास आणि ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय ठेवण्यास सांगत असत. त्यांना भेटायला येणार्‍या लोकांपैकी व्यवहारातील प्रश्‍न विचारणार्‍यांना ते कधीच प्रोत्साहन देत नसत. केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच तरुण वयातच मला निष्काम भक्तीचे महत्त्व कळून निष्काम भक्तीने ईश्‍वरप्राप्ती होऊ शकते, हे कळले.
२. प.पू. डॉक्टरांशी बोलतांना भावावस्था येऊनही 
तिचा अर्थ कळत नसल्याने ते अनैसर्गिक असल्याचे वाटणे
        प.पू. डॉक्टरांशी बोलतांना माझ्या डोळ्यांत अश्रू येत. माझा आवाज थरथरू लागे आणि माझ्या पोटात गोळा येई. त्या वेळी मला याविषयी पुष्कळ लाज वाटून असे होणे अनैसर्गिक आहे, असे वाटत असे. ही भावावस्था आहे, हे मला ठाऊक नव्हते.

डॉ. (सौ.) मीनू रतन अरोमा उपचार करतांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

सौ. प्राजक्ता जोशी
१. सप्तचक्रांची प्रभावळ समजून घेऊन होणारे शारीरिक त्रास सांगणे, 
मनाच्या स्थितीचे अचूक वर्णन करणे, त्यांच्या जागी परात्पर गुरु डॉक्टर 
दिसणे अन् त्यांचा आवाज ऐकू येणे आणि परात्पर गुरु 
डॉक्टरांप्रतीच्या कृतज्ञतेने डोळे पाणावणे
      २२.७.२०१६ या दिवशी सायंकाळी माझी डॉ. (सौ.) मिनू रतन यांच्याशी प्रथम भेट झाली. प्रथम भेटीत त्यांनी माझी केवळ सप्तचक्रांची प्रभावळ (ऑरा) समजून घेऊन मला होत असलेले सर्व शारीरिक त्रास मी न सांगताच सांगितले. त्या म्हणाल्या, सहस्रारचक्र आणि आज्ञाचक्र चांगले असून अन्य चक्रांमध्ये बिघाड असल्याचे दिसते. पू. सौरभदादांच्या जन्मापासून त्यांची सेवा करतांना मला आलेले सर्वच अनुभव आणि मनाची स्थिती मिनूताईंनी मोजक्या शब्दांत आणि अचूक वर्णन केली. मी काहीही न सांगता ताई सर्व सांगत असतांना मला त्यांच्या जागी परात्पर गुरु डॉक्टर दिसू लागले. मिनूताई बोलत असतांनाही परात्पर गुरु डॉक्टरांचा आवाज ऐकू येत होता. परात्पर गुरु डॉक्टर माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीसाठी किती करतात, या विचाराने आणि अनुभूतीने माझे डोळे पाणावले. त्या वेळी तेथे उपस्थित असणार्‍या आश्रमातील साधक वैद्यांचीही भावजागृती झाली. त्यानंतर सौ. मिनूताईंनी इतरांना बाहेर जायला सांगून त्या माझ्याशी बोलल्या.मला कोणत्याही प्रसंगात आनंदाश्रू किंवा दुःखाश्रू येत नाही, तरीही माझे डोळे कसे पाणावले ?, हे मी त्यांना कथन केले. तेव्हा त्यांनी त्याचे श्रेय परात्पर गुरु डॉक्टरांना दिले. त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती आणि साधकांप्रतीचा भाव पाहून मला आनंद झाला.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना श्रीकृष्णाच्या चित्रात जिवंतपणा आल्याविषयी आलेेल्या अनुभूती

         वर्ष २०१५ मध्ये स्वतःकडे असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून काय जाणवते, याविषयी साधकांना प्रयोग करण्यास सांगितले होते. प्रयोग केल्यानंतर एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. सौ. द्रगाना, युरोप (२७.८.२०१५)
१ अ. श्रीकृष्ण स्वतःकडे पहात असल्याचे वाटणे : घरी मोठ्या आकाराचे एक आणि मध्यम आकाराचे एक अशी श्रीकृष्णाची २ चित्रे आहेत. त्या दोन्ही चित्रांकडे कोणत्याही बाजूने पाहिले असता श्रीकृष्ण माझ्याकडेच पहात आहे, असे वाटते.
२. सौ. रिशिता गडोया, कॅनडा (२८.८.२०१५)
२ अ. श्रीकृष्णाच्या डोळ्यांतील बुबुळांची हळूवार हालचाल होत असून कुठल्याही दिशेने पाहिले, तरी तो माझ्याकडेच पहात असल्याचे जाणवणे : घरातील ध्यानमंदिरातील श्रीकृष्णाच्या चित्रासमोर बसल्यावर काही क्षणांत माझे मन पूर्णपणे एकाग्र झाले, तसेच मी श्‍वासावर लक्ष केंद्रित करू शकले. त्यानंतर डोळे उघडून मी श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिले असता तो माझ्याकडेच पहात असल्याचे मला जाणवले. मी उजव्या बाजूला गेल्यावर त्याचे डोळे उजवीकडे वळत असत आणि मी डाव्या बाजूला गेल्यावर त्याचे डोळे डाव्या बाजूकडे वळत असत. समोरून पाहिले असता त्याच्या डोळ्यांतील बुबुळांची हळूवार हालचाल होत असल्याचे जाणवले.

सूर्यप्रकाशात बसून उपाय करतांना सोनेरी कणांचा वर्षाव होतांना दिसणे आणि ईश्‍वरी कृपेमुळे आनंद अन् शांती अनुभवायला मिळत आहे, असे वाटणे

      १०.१.२०१६ या दिवशी मी तेजतत्त्वाचे उपाय होण्यासाठी सूर्यप्रकाशात बसून उपाय करत होते. तेव्हा सूर्यदेवतेच्या प्रती कृतज्ञता भाव ठेवून मी नामजप करू लागले. मी नामजप करत डोळे उघडून कौतुकाने सूर्यकिरण आणि निळे आकाश पहात होते. त्या वेळी मला अनेक सोनेरी कण माझ्याकडे येत असल्याचे दिसले. हेे काल्पनिक असावे, असे वाटल्याने मी डोळे बंद करून पुन्हा उघडले. तेव्हाही मला आकाशातून सर्व दिशांकडून कण खाली येतांना दिसले. ते चैतन्याचे कण आहेत, असे मला जाणवले. माझ्यावर ईश्‍वरी कृपेचा वर्षाव होऊन त्यामुळे मला आनंद आणि शांती अनुभवायला मिळत आहे, असे मला वाटले. सूर्यदेवतेशी अनुसंधान साधून त्याच्या तत्त्वाचे उपाय मिळाल्याबद्दल मी श्रीकृष्णाप्रती कृतज्ञता व्यक्त करते.
- सौ. सिल्विया विझकारा, बोलिव्हिया (२२.३.२०१६)

शांत, उत्साही आणि सेवाभावी असलेल्या अरोमा उपचारतज्ञ डॉ. (सौ.) मिनू रतन !

१. सेवाभाव
        डॉ. (सौ.) मिनू रतन या अरोमा उपचारपद्धती सेवाभावी वृत्तीने शिकवतात.
२. सुस्पष्ट बोलणे
        त्या अरोमा उपचारपद्धतविषयी प्रत्येक सूत्र सुस्पष्टपणे सांगतात.
३. उत्साही
        सलग ५ - ६ घंटे उभे राहून साधकांवर उपचार केल्यानंतरही त्या उत्साही असतात.
४. शांत
        काही तांत्रिक कारणांमुळे त्या साधकांवर करत असलेल्या उपचारांचे चित्रीकरण पुनःपुन्हा करावे लागत होते; पण डॉ. (सौ.) मिनू रतन या एकदाही गोंधळलेल्या दिसल्या नाहीत.

प्रेमभाव, मनमोकळेपणा आणि शिकण्याची वृत्ती असलेले एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक !

       २६ जुलै ते १ ऑगस्ट २०१६ या कालावधीत रामनाथी आश्रमात एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांची कार्यशाळा झाली. त्यानिमित्त आश्रमात आलेल्या विदेशी साधकांकडून श्रीमती रजनी नगरकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. वेळेचे पालन करणे
       ते साधक ठरलेली सेवा वेळेत करण्याचा प्रयत्न करतात, उदा. विभाग स्वच्छता. ते शिबिराच्या वेळांचे काटेकोरपणे पालन करतात.
२. प्रेमभाव
अ. हे साधक आश्रमात आलेल्या साधकांचे तोंड भरून स्वागत करतात.
आ. जातांना त्या साधकांची सिद्धता (डबा, पाणी, उपायांचे साहित्य, प्रसाद इत्यादी) तर करूनच देतात; पण एकमेकांचा भावपूर्ण निरोप घेतात.

सहज सब के मन के झरोंके खुलवानेवालीं मीनू ।

डॉ. (कु.) आरती तिवारी
प्रत्येक साधक में अपनी प्रीति से समा गईं मीनू (टीप १) ।
मानो जहां मैं नहीं है, वह हैं मीनू ॥ १ ॥
सहज सब के मन के झरोंके खुलवानेवालीं मीनू ।
गुरुदेव की कृपा से ज्ञान का सागर बहातीं मीनू ॥ २ ॥
हर पल कन्हैया से जुडी हैं मीनू ।
सहज कठिनाइयों की गुत्थी सुलझानेवालीं मीनू ॥ ३ ॥
गुरुदेव (टीप २) जो हैं वैश्‍विक ऊर्जा ।
इस बात का भान स्वयं कर, हमें करवानेवालीं मीनू ॥ ४ ॥
भाव-भक्ति, प्रीति, ममता-वात्सल्य, सहजता, ज्ञान ।
ऐसे अनेक रसों का आनंद करतीं-करवातीं मीनू ॥ ५ ॥

आश्रमात आल्यानंतर अतिशय खराब असलेले हस्ताक्षर विशेष प्रयत्न न करताही चांगले येेऊ लागणे

श्री. बोयान बाल्याक
       माझे हस्ताक्षर अतिशय खराब असल्याने मलाही ते वाचता येत नाही. मी चांगले अक्षर काढण्याचा प्रयत्न केला, तरीही मला ते कसेबसे वाचता येते. कार्यशाळेच्या निमित्ताने मी आश्रमात आल्यानंतर विशेष काहीच प्रयत्न न करताही अकस्मात् माझे हस्ताक्षर अधिक सुंदर होऊन ते वाचता येऊ लागले. हस्ताक्षर चांगले नसणे, यामागे माझा आध्यात्मिक त्रास हे मुख्य कारण असावे आणि आश्रमातील चैतन्यामुळे आता त्रास उणावल्याने अक्षर चांगले आले असावेे, असे मला वाटते.
- श्री. बोयान बाल्याक, क्रोएशिया, युरोप. (२६.७.२०१६)

साधकांसाठी सूचना आणि कृतीशील धर्माभिमान्यांना नम्र विनंती !

वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
जिज्ञासूंना साधनेसाठी योग्य दिशा देणारे आणि धर्माभिमान्यांना
राष्ट्र अन् धर्म यांवरील प्रेमाचे बाळकडू पाजणारे सनातन प्रभात घरोघरी पोचवून धर्मप्रसार करा !
   नियतकालिक सनातन प्रभात हे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या वैचारिक लढ्यातील महत्त्वाचे अस्त्र आहे. वाचकांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांप्रती प्रेम जागवण्यासाठी अन् त्यांना साधनेसाठी प्रतिदिन दिशा देण्यासाठी ते कटिबद्ध आहे. साधना आणि हिंदूंचे संघटित प्रयत्न यांमधून हिंदु राष्ट्ररूपी दिव्यस्वप्न वास्तवात उतरू शकते, हा दुर्दम्य आत्मविश्‍वास हिंदु धर्मनिष्ठांमध्ये रुजवण्यात या नियतकालिकाचा सिंहाचा वाटा आहे. आपत्काळाला तोंड देण्यासाठी साधनारूपी संजीवनी समाजापर्यंत पोेचवण्याची काळाची निकडही हे नियतकालिक पूर्ण करत आहे.
    या कार्याला अधिक गती येण्यासाठी ५ ते २०.८.२०१६ या कालावधीत सनातन प्रभात वाचकवृद्धी मोहीम राबवण्यात येत आहे. त्याद्वारे सनातन प्रभात अधिकाधिक हिंदूच्या घरी पोचवण्यासाठी साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांंनी संघटित प्रयत्न केल्यास धर्मप्रसारासह हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संकल्पनेला अधिक बळकटी मिळेल !
या मोहिमेसाठी दिशादर्शक असणारी काही महत्त्वाची सूत्रे पुढे देत आहे.

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती

सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी पुरोगामी आणि पोलीस
यांनी रचलेले षड्यंत्र उघड करणारा लघुपट पहा !
     डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्यानंतर पुरोगामी आणि धर्मद्रोही चहूबाजूंनी सनातनवर तुटून पडले आहेत. विविध दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून सनातन संस्थेची अपकीर्ती करण्यात येत आहे, तसेच सनातन संस्थेवर बंदीची मागणीही करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर एका धर्माभिमान्याने या धर्मद्रोह्यांचे आणि भ्रष्ट पोलिसांचे पितळ उघडे करणारा एक दृकश्राव्य (audio-visual) लघुपट बनवून यू-ट्यूब वर ठेवला आहे, तसेच या लघुपटाचे क्रमशः भाग करून व्हॉट्स अ‍ॅपद्वारे प्रसारित होत आहेत. साधक, वाचक, हितचिंतक यांनी हा लघुपट स्वतः पहावा आणि आपल्या संपर्कातील अन्य हिंदुत्वनिष्ठांनाही पाठवावा.
हा लघुपट पुढील लिंकवर उपलब्ध आहे.
: https://www.youtube.com/watch?v=28aKVvkd27g

साधकांना सूचना

शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ? हा सुधारित धर्मशिक्षण फलक उपलब्ध !
   सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या धर्मशिक्षण फलकांच्या मालिकेतील शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ? या फलकात काही सुधारणा केल्या आहेत.
१. हा धर्मशिक्षण फलक प्रायोजित / प्रदर्शित करण्यासाठी समाजातून मागणी आल्यास त्यांना सुधारित फलक छापून द्यावा. जिल्ह्यात संरक्षित केलेल्या जुन्या संगणकीय धारिकेवरून फलकाची छपाई करू नये. (जुनी संगणकीय धारिका डिलीट करावी.)
२. सध्या देवालय, वाचनालय आदी ठिकाणी प्रदर्शित केलेला फलक तसाच ठेवावा. या फलकावर केवळ सुधारित चित्राची प्रत काढून चिकटवावी. जिल्ह्याच्या साठ्यात असलेल्या फलकावरही केवळ सुधारित चित्र चिकटवावे.
सुधारित फलक आणि सुधारित चित्र यांच्या धारिका संगणकीय पत्त्यावर उपलब्ध आहेत. 
 
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.  - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या २९ व्या संत पू. (सौ.) निर्मला होनप यांची आज पुण्यतिथी 

धर्मदास नरेंद्रबुवा हाटे यांची आज पुण्यतिथी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
जनतेला राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी न बनवता भारतात लोकशाही पद्धत राबवणार्‍या शासनकर्त्यांमुळे देश पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जिवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मक रहा !
जगात यशाचीच पूजा केली जाते. मी यशस्वी होणारच, असे म्हणणारी आणि 
सकारात्मक वागणारी व्यक्तीच सर्वांना हवीहवीशी वाटते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

विज्ञापनांचा भूलभुलैया समाजविघातक !

संपादकीय
     विप्लव ठाकूर आणि रेणुका चौधरी या दोन काँग्रेसच्या महिला खासदारांनी नुकतेच त्वचा गोरी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या क्रीमच्या विज्ञापनांच्या (जाहिरातींच्या) संदर्भात सूत्र राज्यसभेच्या सभागृहात उपस्थित केले. अशी विज्ञापने महिलांमध्ये न्यूनगंड निर्माण करतात त्यामुळे अशा जाहिराती आणि उत्पादने यांवर बंदी आणली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. खासदार रेणुका चौधरी म्हणाल्या, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी रंग नव्हे, तर बुद्धीची आवश्यकता असते. ओबामा आणि त्यांची पत्नी हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. अशा विज्ञापनांमुळे महिलांचा सन्मान ठेवला जात नाही, असे अतिशय योग्य सूत्र त्यांनी उपस्थित केले. यापूर्वीही अनेक महिला खासदारांनी ७ दिवसांत त्वचा गोर्‍या करणार्‍या क्रीमच्या विरोधात आवाज उठवला होता. स्त्रियांनी गोरे दिसणे आवश्यक आहेे, याचा अर्थ महिलेकडे स्त्री म्हणून पाहिले जाते, असा अर्थ सूचित होतो. स्त्रीवादी संघटनांच्या हे कसे लक्षातही येत नाही ? आता तर पुरुषांसाठीही अशीच विज्ञापने असतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn