Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे २२ वे संत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा आज वाढदिवस

डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घाला ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

मुंबई येथे पत्रकार परिषदेद्वारे मागणी
    
डावीकडून श्री. बळवंतराव दळवी, श्री. अभय वर्तक, डॉ. उदय धुरी, 
अधिवक्ता संजीव पुनाळेकर, ह.भ.प. बापू महाराज रावकर, श्री. भालचंद्र गायकवाड
     मुंबई - इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांतून प्रेरणा घेत आतापर्यंत ५५ आतंकवादी प्रेरित झाले असल्याचे समोर आले आहे. यापैकी काही धर्मांधांनी जगभरात आतंकवादी कारवाया केल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. तसेच झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनशी संबंधित कार्यकर्त्यांनी भारतात आतापर्यंत ८०० हून अधिक जणांचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादाकडे वळवले असल्याची धक्कादायक माहितीही पोलीस अन्वेषणात समोर आली आहे. आतंकवादी कारवायांमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक शांतता बिघडवणार्‍या, तसेच धर्मांतरे घडवून धार्मिक तणाव निर्माण करणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांना तात्काळ अटक करावी, तसेच इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालावी. तसेच आतंकवाद रोखण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी २ ऑगस्ट या दिवशी मुंबई मराठी पत्रकारसंघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

सनातनवरील बंदीची मागणी, हे एक षड्यंत्र !

राजस्थान हायकोर्ट अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशन, जोधपूरकडून केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र
     जोधपूर - सनातन संस्था राजस्थानच्या शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांत ऋषीपरंपरा अन् साधना यांचे संस्कार देण्याचे अमूल्य कार्य करत आहे. सनातनच्या आध्यात्मिक शिक्षणामुळे युवकांसह जनतेची चेतना जागृत होत आहे. एकंदरच सनातन संस्थेचे समाज आणि राष्ट्र विकासात अभूतपूर्व योगदान आहे. काही राष्ट्रविरोधी आणि नास्तिक विचारांच्या संघटना संस्थेवर बंदी आणण्याची मागणी शासनाकडे करत आहेत. हे एक षड्यंत्र असून आमच्या असोसिएशनच्या सर्व अधिवक्त्यांच्या वतीने गृहमंत्र्यांना विनंती आहे की, कृपया सनातन संस्थेच्या कार्यावर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध आणू नयेत, असे पत्र राजस्थान हायकोर्ट अ‍ॅड्व्होकेट्स असोसिएशन, जोधपूरचे अध्यक्ष अधिवक्ता रणजित जोशी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवले आहे. (समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेच्या पाठीशी उभे रहाणारे राजस्थान हायकोर्ट अ‍ॅड्व्होकेट्स असोसिएशन, जोधपूरचे अध्यक्ष अधिवक्ता रणजित जोशी आणि अन्य सर्व सदस्यांची सनातन संस्था आभारी आहे. - संपादक)

डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांमुळे प्रभावित होऊन राजस्थानमधील हिंदूने इस्लाम धर्म स्वीकारला !

सरकार आणि पोलीस यांना डॉ. झाकीर नाईक देशद्रोही असल्याचे 
आणखी किती पुरावे मिळाल्यावर ते त्यांना अटक करणार आहेत ?
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते अन्य धर्मांमध्ये धर्मातरित होतात !
ही स्थिती पालटण्यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणारे हिंदु राष्ट्रच हवे !
     मुंबई - डॉ. झाकीर नाईक यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे प्रभावित होऊन राजस्थानमधील एका हिंदु युवकाने धर्मांतर केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. संदीप रावल असे त्याचे नाव असून तो राजस्थानमधील लाटाडा येथील मूळचा रहिवासी आहे.
१. संदीप रावल याच्या वडिलांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे. वर्ष २००५ मध्ये त्यांनी संदीपला बेंगळुरू येथे मित्राकडे इलेक्ट्रॉनिक्सचे काम शिकण्यासाठी पाठवले. त्या कालावधीत धर्मांध इमरान खान या झाकीर नाईकच्या सहकार्‍यासमवेत संदीपची मैत्री झाली.
२. बेंगळुरू येथील एस्पी रोडवर इमरानचे दुकान होते. त्याने डॉ. झाकीर नाईक यांच्या ध्वनीचित्रफीती दाखवून संदीपला इस्लामच्या जाळ्यात ओढले. (हिंदूंनो, धर्मांधांचे धर्मांतराचे कारस्थान जाणा ! - संपादक) त्यामुळे विवाहानंतर संदीपने पत्नीलाही धर्मांतर करण्याचा आग्रह केला.
३. इस्लाम स्वीकारल्यानंतर त्याने अब्दुल रहमान नाव वापरण्यास प्रारंभ केला. संदीपने धर्मांतर केल्याचे घरी समजताच त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. (हिंदूंनो, ही वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी आपल्या मुलांना वेळीच धर्मशिक्षण द्या ! - संपादक)

पंढरपूर देवस्थान समिती लवकरात लवकर स्थापन करणार ! - नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

पावसाळी अधिवेशन २०१६
मंदिरातील प्रथा-परंपरांचे पालन होण्यासाठी देवस्थान समितीवर भक्तांचीच नेमणूक झाली पाहिजे !
     मुंबई - श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी आणि परंपरा पाळल्या जाव्यात, यासाठी पंढरपूर देवस्थान समिती लवकरात लवकर स्थापन केली जाईल, असे आश्‍वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी २ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत दिले. पंढरपूर देवस्थान समिती स्थापन करण्यासाठी न्यायालयीन अडचणी असल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तरीही विधी आणि न्याय विभागाकडून मत मागवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूर येथील वारकरी, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी भाजपचे आमदार श्री. प्रशांत परिचारक आणि शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांना यासंदर्भात निवेदन दिले होते.
१. पंढरपूर येथे प्रतिवर्षी लक्षावधी भाविक येतात. त्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी ५ कोटी रुपयांचे यात्रा अनुदान देण्याची घोषणा करण्याविषयाची लक्षवेधी सूचना आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सभागृहात मांडली.
२. या सूचनेवर उत्तर देतांना डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, भाविकांची रहाण्याची सोय ६५ एकर भूमीत करण्यात येत आहे. भजन, कीर्तन, प्रक्षाळपूजा करण्यासाठी स्थानिकांचा समितीमध्ये समावेश व्हावा, यादृष्टीने बैठक घेण्यात येईल.

इंदूर (तेलंगण) येथील भव्य सभेत मान्यवरांनी तेजस्वी विचारांद्वारे हिंदूंमध्ये चेतवले स्फुल्लिंग !

काश्मिरी हिंदूंना त्यांचे न्याय्य अधिकार मिळवून देण्यासाठी 
भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रयत्नांना गती !
सभेला संबोधित करतांना टी.एन्. मुरारी,
तसेच व्यासपिठावर उपस्थित मान्यवर
     इंदूर (तेलंगण) - केंद्रसरकारने विस्थापित काश्मिरी हिंदूंविषयी त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी विस्थापित काश्मिरी हिंदूंकडून १९ जानेवारी २०१७ या दिवशी चलो कश्मीर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतभरातील १६० हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने एक भारत अभियान - कश्मीर की ओर या राष्ट्रव्यापी जागृतीपर मोहिमेस आरंभ करण्यात आला आहे. या अंतर्गत हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी भारतभरात ८० सभा घेण्यात येणार आहे. त्यांतील इंदूर येथे झालेली सभा पाचवी होती. सभेच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस येऊनसुद्धा ९०० धर्माभिमानी हिंदू या सभेला उपस्थित होते. या सभेत मान्यवरांनी पुढील विचार व्यक्त केले.

महाराष्ट्रात विविध भागांत पावसाचे थैमान !

 • नाशिक येथे गोदावरी नदीला पूर; नदीकाठच्या ९२ गावांतील शाळांना सुट्टी
 • त्र्यंबकेश्‍वर मंदिरही पाण्याखाली
      अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।       स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति
अर्थ :
धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.
      नाशिक - महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमधील गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे येथील दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी वाढले आहे. या पुरामुळे नदीकाठच्या ९२ गावांतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
१. मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणे पुष्कळ भरली आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिकमधील महापुराची खूण मानलेल्या नारोशंकराच्या घंटेपर्यंत पाणी पोहोचले आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन् यांनीही आपत्कालीन स्थितीचा आढावा घेऊन सेना अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. सेनेचे ३०० सैनिक साहाय्यासाठी सिद्ध आहेत.

संसदेत मी सनातनची बाजू मांडीन ! - खासदार अनिल देसाई, शिवसेना

खासदार श्री. अनिल देसाई (मध्यभागी) यांना श्रीकृष्णाचे
चित्र भेट देतांना श्री. केदार चित्रे (डावीकडे) आणि वैद्य उदय धुरी

       मुंबई, २ ऑगस्ट (वार्ता.) - भारतात हिंदु राष्ट्र येणारच. संसदेत मी सनातनची बाजू मांडेन, असे आश्‍वासन शिवसेनेचे खासदार श्री. अनिल देसाई यांनी दिले. सनातनचे हितचिंतक श्री. केदार चित्रे आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा प्रवक्ता वैद्य उदय धुरी यांनी १ ऑगस्ट या दिवशी शिवसेनेचे खासदार श्री. अनिल देसाई यांची भेट घेऊन त्यांना सनातन संस्थेवरील बंदीचे षड्यंत्र हाणून पाडावे, यासाठी निवेदन दिले. या वेळी श्री. केदार चित्रे यांच्या वतीने खासदार श्री. अनिल देसाई यांना सनातन-निर्मित भगवान श्रीकृष्णाचे चित्र भेट देण्यात आले. या वेळी खासदार श्री. देसाई यांनी श्रीकृष्णाचे चित्र खूपच सुंदर असल्याच आवर्जून म्हटले.

हिमाचल प्रदेशमधील श्री रघुनाथ मंदिर कह्यात घेण्याच्या काँग्रेस सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

     शिमला - हिमाचल प्रदेशमधील कुल्लु येथील १७ व्या शतकातील ऐतिहासिक श्री रघुनाथ मंदिर कह्यात घेण्याच्या काँग्रेस सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. राज्य सरकारला ११ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचा आदेश दिला आहे. हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या मंत्रीमंडळाने एका अधिसूचनेद्वारे या मंदिराचा ताबा राज्यशासनाकडे सुपूर्द केला होता. कुल्लुचे आमदार तथा श्री रघुनाथ मंदिराचे मुख्य विश्‍वस्त श्री. महेश्‍वर सिंह यांनी मंत्रीमंडळाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
श्री रघुनाथ मंदिर हे आपल्या राजघराण्याची मालमत्ता असल्याचा दावा त्यांनी याचिकेमध्ये केला होता. न्या. तर्लोक चौहान आणि न्या. सी.बी. बरोवालिया यांच्या खंडपिठाने मंदिर कह्यात घेण्याच्या सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती दिली. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी मंदिर कह्यात घेण्याच्या मंत्रीमंडळाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

इसिसमध्ये भरती झालेली मरियम डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी !

डॉ. झाकीर यांच्या विरोधात किती पुरावे मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे ?
      कोची (केरळ) - धर्मांतर करून इसिसमध्ये भरती झालेली ख्रिस्ती धर्मीय मरीन उपाख्य मरियम या विद्यार्थिनीने जिहादी आतंकवादाचे प्राथमिक प्रशिक्षण कोची येथील पीस इंटरनॅशनल स्कूल या संस्थेत घेतल्याचे उघड झाले आहे. ही संस्था डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेशी संलग्न आहे.
        मरीन ही बेंगळुरू येथे एका कॉलसेंटरमध्ये काम करत होती. तिने धर्मांतर करून बेन्सन उपाख्य याह्या या मूळ ख्रिस्ती मात्र नंतर इस्लाममध्ये धर्मांतरित झालेल्या तरुणाशी विवाह केला. तिला पीस इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास याह्या यानेच बाध्य केले. नंतर मरियम परवूर येथील याच शाळेच्या शाखेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. तिथेच तिच्यात जिहादी आतंकवादाचे बीज पेरले गेले.

भारतातील मुसलमान युवकांना जिहादी आतंकवादापासून परावृत्त करण्यासाठी भारत मलेशियाचे साहाय्य घेणार !

इस्लामी शिक्षणाच्या नावाखाली अनेक मदरशांमधून जिहादचे शिक्षण देण्यात येत असल्याचे यापूर्वी 
उघड झाले आहे. त्यांच्यावर बंदी घालण्याऐवजी त्या शिक्षणाच्या आधुनिकीकरणाविषयी जाणून 
घेणे आत्मघातच नव्हे का ?
मलेशियाकडून इस्लामी शिक्षणाच्या आधुनिकीकरणाविषयी जाणून घेणार
     नवी देहली - भारतातील मुसलमान युवकांना जिहादी आतंकवादापासून परावृत्त करण्यासाठी भारत मलेशियाचे साहाय्य घेणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भारत शासन इस्लामी शिक्षणाच्या आधुनिकीकरणाविषयी मलेशियाचे अनुभव जाणून घेणार आहे. सदर वृत्त इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.
       या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात मलेशियाचे उपपंतप्रधान अहमद झहीद अमिदी भारताच्या भेटीवर आले होते. या वेळी त्यांच्याकडे वरील मागणी करण्यात आली. या प्रसंगी झालेल्या एका बैठकीत मलेशियाने इस्लामी शिक्षणाच्या आधुनिकीकरणाविषयी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी भारताचे एक शिष्टमंडळ मलेशियाला पाठवण्यात येणार असल्याचे ठरले. या शिष्टमंडळामध्ये देशाच्या सुरक्षायंत्रणा, मनुष्यबळ विकास मंत्रालय, अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय आणि मुसलमान संघटना यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात येणार आहे. धार्मिक शिक्षणामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मलेशियाने एक अंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करावे, अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. या परिषदेमुळे मलेशियाचे अनुभव इतर देशांना लाभदायक ठरतील, असाही सूर या बैठकीत उमटला.

हिंदु जनजागृती समितीकडून वाराणसी येथे प्रशासनाला निवेदन सादर !

प्रशासनाला हे सांगावे का लागते ? ते स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा चळवळ !
पोलिसांना निवेदन देतांना धर्माभिमानी हिंदू
   वाराणसी - स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अप्पर आयुक्त सहदेव आणि अप्पर जिल्हाधिकारी इन्द्रेश्‍वर शर्मा यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी योग्य पावले उचलली जातील, असे आश्‍वासन समितीला दिले.
     या वेळी भारत विकास परिषदचे अध्यक्ष डॉ. अजयकुमार जयस्वाल, सनातन संस्थेचे श्री. दशरथ मसुरकर, हृषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री नीलेश सिंगबाळ, राजन केसरी, सुभाष यादव, निलय पाठक, नीरज सेठ, देवेशकुमार सिंह, धीरज सेठ, मुन्नु जयस्वाल आदी राष्ट्रप्रेमी उपस्थित होते. निवेदन देण्याविषयी बार असोशिएशनचे अधिवक्ता अरुणकुमार मौर्या, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता विजय सेठ, अधिवक्ता त्रिभुवननाथ प्रजापति, अधिवक्ता ज्ञानप्रकाश यादव, अधिवक्ता सतीशकुमार मौर्या यांनी पुढाकार घेतला. या वेळी क्षेत्राधिकारी राजेंद्र सिंह यांच्यामार्फत वरिष्ठ पोलीस अधीक्षक आकाश कुलहरिया यांनाही निवेदन देण्यात आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा निर्धार केला असल्याने ते होईलच ! - पू. स्वामी सर्वानंद सरस्वती

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली 
देहलीच्या वसंतकुंज येथील पू. स्वामी सर्वानंद सरस्वती यांची भेट !
पू. चारुदत्त पिंगळे (डावीकडे) आणि
पू. स्वामी सर्वानंद सरस्वती
     देहली - हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. चारुदत्त पिंगळे यांनी येथील वसंतकुंजमध्ये रहाणारे पू. स्वामी सर्वानंद सरस्वती यांची भेट घेतली आणि समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. या वेळी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी स्वामीजींना सनातनच्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येण्याचे निमंत्रण दिले. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात स्वामीजी म्हणाले, त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा निर्धार केला असल्याचे ते होईलच.

नोकरीच्या ठिकाणी चारित्र्याच्या प्रमाणपत्रामध्ये गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवल्यास कारवाई ! - सर्वोच्च न्यायालय

     नवी देहली - नोकरीच्या ठिकाणी सादर करण्यात येणार्‍या चारित्र्याच्या प्रमाणपत्रामध्ये गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवणार्‍या कर्मचार्‍याला बडतर्फ करण्यात येऊ शकते, असे निर्देश न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्या. अरुण मिश्रा आणि पी.सी. पंत यांच्या खंडपिठाने दिले. या निर्देशांत न्यायालयाने सांगितले की, 
१. मोठ्या पदांच्या नोकरीसाठी कठोर नियम अवलंबण्यात आले पाहिजे; मात्र हेच नियम लहान नोकर्‍यांची स्थिती पाहून अमलात आणू शकतो.
२. अनेक वेळा तरुण धरणे आंदोलनांमध्ये सहभागी होतात किंवा त्यांच्याकडून राजकीय घोषणा देण्यात येतात. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. अशा प्रकरणांमध्ये त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे.
३. चारित्र्याच्या प्रमाणपत्रात काही गोष्टींची मागणी करण्यात आलेली नसते; मात्र नंतर अशा गोष्टी पुढे येतात, तेव्हा अशा प्रकरणात कर्मचार्‍यावर कारवाई करता येणार नाही. 
४. ज्या व्यक्तीचा हत्यांसारख्या प्रकरणात पूर्वी सहभाग होता आणि त्यानंतर त्याचे निदोषत्व सिद्ध झाले, तरीही अशा व्यक्तींना पोलीस खात्यात नोकरी देता कामा नये.

फेअरनेस क्रीमच्या विज्ञापनांवर बंदी घालण्याची सर्वपक्षीय खासदारांची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? संबंधित सरकारी यंत्रणांना हे लक्षात का येत 
नाही कि लक्षात येऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते ?
    नवी देहली - चेहर्‍याचा रंग उजवळण्याचा दावा करणार्‍या सर्वच फेअरनेस क्रीमच्या विज्ञापनांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सर्व पक्षाच्या सदस्यांनी राज्यसभेत नुकतीच केली.
१. काँग्रेसच्या सदस्या ठाकूर म्हणाल्या, सर्व प्रकारच्या फेसक्रीमच्या (फेअर अ‍ॅण्ड लव्हली, पॉण्ड्स फेसक्रीम आदी) उत्पादनांची विज्ञापने महिलांसाठी मानहानीकारक आहेत. ही आस्थापने रंग उजळवण्याचा दावा करत असून या दाव्याची कधीही शहानिशा झालेली नाही. या विज्ञापनांमुळे महिलांमध्ये न्यूनगंड निर्माण होत आहे. तसेच खोटे दावेही दाखल केले जात आहेत. शासनाने याची दखल घ्यायला हवी.

आरोपी महंमद आलमगीरला फाशीची शिक्षा !

११ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्यायच नव्हे का ?
वर्ष २००५चे श्रमजीवी एक्सप्रेस स्फोट प्रकरण
      जौनपूर - जिल्ह्यातील श्रमजीवी एक्सप्रेस रेल्वेमध्ये वर्ष २००५ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणातील आरोपी महंमद आलमगीर याला येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. यासह रेल्वे कायद्याच्या कलम १५१ अन्वये त्याला आजीवन कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. या वेळी न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. स्फोटाच्या घटनेच्या ११ वर्षांनंतर हा निर्णय दिला. २८ जुलै २००५ या दिवशी सायंकाळी ५ वाजता हरपालगंज रेल्वे स्थानकाच्या हरिहरपूर रेल्वे क्रॉसिंवर पाटण्याहून देहलीकडे जाणार्‍या श्रमजीवी एक्सप्रेस या रेल्वे गाडीच्या सामान्य डब्यात बॉम्बस्फोट झाला. यात १२ प्रवासी ठार, १८ जण घायाळ झाले होते. या प्रकरणात एकूण ७ आरोपी होते. यातील १ आरोपी शरीफ उपाख्य कंचन फरार असून डॉ. सईदचा मृत्यू झाला आहे.

हिंदूंनी उपासनेची भिंत बळकट करावी ! - राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे

लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त 
टिळकभक्तांच्या मेळाव्याचे आयोजन 

डावीकडून दिनेश भोगले, गोविंद
गांधी, चारुदत्त आफळे, अनुप केणी, संतोष औटी

      पुणे, २ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदूंनी सेवाकार्य, संरक्षणकार्य यांप्रमाणे उपासनेतही अग्रेसर व्हायला हवे. ऐन यशाच्या तोंडावर राष्ट्रीय नेत्यांवर काळाचा घाव पडण्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या ५० व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतात, तर औरंगजेब ९० वर्षे जगतो. सध्या हिंदुत्ववादी नेत्यांना अटक करून हिंदुत्वाची हानी केली जात आहे. ती होऊ नये, यासाठी हिंदूंनी उपासनेची भिंत बळकट केली पाहिजे, असे मार्गदर्शन राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश हिंदु महासभेच्या वतीने लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट या दिवशी येथील उद्यानप्रसाद कार्यालयात टिळकभक्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.

मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याने माझ्या कामाचे मूल्यमापन जनता करेल !

 • स्वतंत्र विदर्भाची मागणी करतात; कारण त्यामुळे अनेक जणांना मंत्री होता येते !
 • अखंड महाराष्ट्रात विदर्भाचा विकास होत नाही, असे म्हणणे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !
 • कुठे स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे आमदार, तर कुठे हे विश्‍वची माझे घर । या वृत्तीचे संत ! 
 • त्यागपत्र देण्याची मागणी फेटाळत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले
      मुंबई, २ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी) - माझे त्यागपत्र मागायचा तुम्हाला अधिकार नाही. मी तुमच्या मेहरबानीवर सत्तेत आलेलो नाही, अखंड महाराष्ट्र्राच्या जनतेने आम्हाला निवडून दिले. मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याने माझ्या कामाचे मूल्यमापन राज्याची जनता करेल, असे प्रतिपादन वेगळ्या विदर्भ राज्याच्या सूत्रावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देतांना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत केले. जाओ पहले प्रफुल्ल पटेल को पूछ के आओ, असे म्हणत मी त्यागपत्र देणार नाही, असे त्यांनी राष्ट्र्रवादी काँग्रेसला ठणकावून सांगितले. गेल्या २ दिवसांपासून विधीमंडळात स्वतंत्र विदर्भाच्या सूत्रावरून भाजपला लक्ष्य करणार्‍या विरोधकांन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसवले; पण मुख्यमंत्री बोलत असतांनाही विरोधकांना गोंधळ चालूच होता.

वाराणसीत रोड शो केल्यानंतर अचानक ताप आल्यामुळे सोनिया गांधी श्री काशी विश्‍वनाथ मंदिरात दर्शनासाठी न जाताच माघारी परतल्या !

     वाराणसी - येथे २ ऑगस्टला सकाळी रोड शो केल्याने सोनिया गांधी यांना अचानक ताप आला. त्यामुळे त्यांनी सायंकाळी नियोजित सभेला मार्गदर्शन न करताच माघारी जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काँग्रेसचे नेते अजय राय यांनी दिली. अचानक ताप आल्यामुळे त्यांना श्री काशी विश्‍वनाथ मंदिरात जाण्याचा नियोजित कार्यक्रमही रहित करावा लागला आणि त्यांना माघारी परतावे लागले. वर्ष २००४ नंतर त्या पहिल्यांदाच वाराणसीला आल्या होत्या.
     वाराणसी येथील श्री काशी-विश्‍वनाथ मंदिरात केवळ हिंदूंनाच प्रवेश आहे. सोनिया गांधी स्वतःला ख्रिस्ती समजतात. असे असतांनाही त्या मंदिरात जाणार होत्या; मात्र अचानक आलेल्या आजारपणामुळे त्या जाऊ शकल्या नाहीत, म्हणजे एका अर्थाने देवानेच त्यांना मंदिरात येण्यापासून रोखले. हिंदूंनो, धर्महानीच्या अशा घटनांमध्ये देवाला असे करायला लावू नका, तर अशांना मंदिरात प्रवेश करण्यापासून तुम्हीच वैध मार्गाने रोखा ! - संपादक

केंद्रसरकारने धर्मांतरविरोधी कायदा करावा ! - विश्‍व हिंदु परिषदेची मागणी

विहिंपला यासाठी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून कायदा का करत नाही ? 
डॉ. झाकीर नाईक यांचे धर्मांतराचे कृत्य उघड !
    नवी देहली - इस्लामच्या प्रचाराच्या नावाखाली जिहादी आतंकवादी निर्माण करण्याचे आणि धर्मांतराचे डॉ. झाकीर नाईक यांचे प्रयत्न उघड झाले आहेत. याद्वारे धर्मांतराचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र समोर आले आहे. त्यामुळे आता केंद्रसरकारने धर्मांतरविरोधी कायदा बनवावा, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केली. डॉ. जैन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, इस्लामी देशांतून भारतात धर्मांतरासाठी मौलवींना पैसे पाठवण्यात येतात, हे यातून उघड होत आहे. याद्वारेच लव्ह जिहाद सत्य आहे, हेही समोर आले आहे. झाकीरची माणसे ५० सहस्र रुपये खर्च करून लोकांचे धर्मांतर करत होते, अशी स्वीकृती या प्रकरणातील आरोपीनेच दिली आहे. देशातील निधर्मीवादी मात्र हिंदूंनाच विरोध करण्यासाठी शक्ती पणाला लावत होते. त्यामुळे त्यांनी आता हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे.

केवळ डॉ. झाकीर नाईकच नव्हे, तर अन्य १४ इस्लामी विचारवंतही इसिसच्या आतंकवाद्यांचे प्रेरणास्थान !

इस्लामी विचारवंत असे कुठले प्रबोधन करतात की ज्यामुळे ते आतंकवाद्यांचे प्रेरणास्थान 
बनतात, याची चौकशी करून सरकार ते जनतेसमोर आणणार का ?
     नवी देहली - इसिसमधील आतंकवादी हे डॉ. झाकीर नाईक यांच्या व्यतिरिक्त १४ अन्य इस्लामी विचारवंतांकडूनही प्रेरित झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने न्यायालयात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे. या १४ जणांची सूची यात देण्यात आली आहे. इसिसचे हे आतंकवादी या विचारवंतांचे भडकावू आणि आक्षेपार्ह व्हिडिओ पहात असतात. हे विचारवंत कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया येथे रहाणारे आहेत. यात कॅनडामधील माजिद महमूद, अमेरिकेमधील यासिर कादी, यूसुफ एस्तेस, हमजा यूसुफ आणि अहमद मूसा; ब्रिटनमधील अंजिम चौधरी, हमजा आंद्रियास, इमरान मंसूर, मिजानुर रहमान आणि अबू वालिद; झिम्बाब्वेमधील मुफ्ती मेंक आणि ऑस्ट्रेलियामधील मूसा सेरंटोनियो, शेख फैज महंमद आणि उमर अल बन्ना यांचा समावेश आहे.

इसिसशी संबंधित युवकाचा एम्आयएम्शी संबंध ?

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा चौकशी करणार
      नवी देहली - इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आशिक अहमद या १९ वर्षीय युवकाने त्याचा एम्आयएम् या पक्षाशी संबंध असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्आयए) त्याविषयी चौकशी करणार आहे. अहमद हा अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असून इसिसशी संबंध असल्याच्या कारणावरून त्यास मार्च २०१६ मध्ये हुगळी येथून अटक करण्यात आली होती. त्याने एम्आयएम्चे सदस्यत्व मिळवण्यासाठी त्या पक्षाचे बंगालचे नेते हसीकुल इस्लाम यांची भेट घेतल्याचीही माहिती त्याने दिली. अलीकडे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने इसिसकडून प्रायोजित केलेल्या जूनूद-अलखलीफा-फिल-हिंदची स्थापना करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली काही धर्मांध युवकांना अटक केली होती. त्या युवकांपैकीच आशिक अहमद हा एक युवक आहे. याप्रकरणी बोलतांना एम्आयएम्चे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी बंगालमध्ये त्यांनी अधिकृतपणे कोणालाही नियुक्त केले नसल्याचे म्हटले आहे.

वर्ष २०१५ मध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे देशभरात १० सहस्र ७२७ जणांचा मृत्यू !

निकृष्ट रस्ते बनवल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडतात ! 
ही समस्या सुटण्यासाठी प्रथम भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करा !
महाराष्ट्र सर्वांत पुढे !
     नवी देहली - रस्त्यांवरील खड्डे, गतीरोधक, बांधकाम चालू असलेल्या किंवा दुरुस्ती चालू असलेल्या रस्त्यांच्या संदर्भात न घेतलेली खबरदारी यांमुळे वर्ष २०१५ मध्ये देशभरात १० सहस्र ७२७ जणांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. खड्ड्यांमुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात अधिक वाढ झाली आहे. वर्ष २०१४ मध्ये खड्ड्यांमुळे १२४ जणांचा मृत्यू झाला होता. ही संख्या २०१५ मध्ये ८१२ वर पोहोचली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

उत्तरप्रदेशच्या ६ माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले रिकामे करण्याचा आदेश !

पद गेल्यावरही अनेक वर्षे सरकारी बंगल्यात रहाणार्‍या माजी मुख्यमंत्र्यांना आणि 
त्यांना राहू देणार्‍या प्रशासनातील अधिकार्‍यांना कारागृहातच डांबायला हवे !
     नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासस्थाने २ मासांच्या आत रिकामे करण्याचा आदेश दिला आहे. उत्तरप्रदेशातील ६ माजी मुख्यमंत्री गेली अनेक वर्षे या सरकारी बंगल्यांमध्ये रहात आहेत. यात मुलायमसिंह यादव, मायावती, कल्याणसिंह, राजनाथसिंह, राम नरेश यादव आणि एन्.डी. तिवारी यांचा समावेश आहे. (या काळात या बंगल्यांवर झालेला सर्व प्रकारचा व्यय (खर्च) संबंधितांकडून वसूल करा ! - संपादक)

इसिसकडून सिरीयातील २४ नागरिकांना फाशी !

      बैरुत - उत्तर सिरीयातील बूयीर गाव कह्यात घेऊन इसिसने २४ निर्दोष नागरिकांना फासावर चढवले आहे. ही माहिती सिरीयातील मानवी हक्क कार्यकर्त्यांनी दिली. इसिसने उत्तर सिरीयातील कुर्दीश सैन्य आणि अरब संघ यांच्या नियंत्रणाखालील भागावर आक्रमण करून तो स्वतःच्या कह्यात घेतला आहे.

सिरीयातील यादवीमुळे अर्ध्याअधिक जनतेचे पलायन, २ लाख ८० सहस्र मृत्यू !

      दमिश्क - सिरीयामध्ये चालू असलेल्या यादवीमुळे देशातील अर्ध्याअधिक जनतेने विदेशात पलायन केले आहे, तर आतापर्यंत २ लाख ८० सहस्र नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दोषी अबू जुंदालसह ७ जणांना मरेपर्यंत जन्मठेप !

वर्ष २००६ मधील संभाजीनगर येथील शस्त्रसाठा प्रकरण
तब्बल १० वर्षांनी कूर्मगतीने निकाल लागणारी न्याययंत्रणा !
     मुंबई - संभाजीनगर येथील वर्ष २००६ च्या शस्त्रसाठा प्रकरणी दोषी अबू जुंदालसह बिलाल अहमद अब्दुल रजाक, सय्यद आकिफ सय्यद जफरुद्दीन, अफरोज खान शाहिद खान पठाण, फैजल अताउर रेहमान शेख, मोहम्मद असलम, मोहम्मद अमीर शकील अहमद शेख या सात जणांना मरेपर्यंत जन्मठेप ठोठावण्यात आली आहे, तर डॉ. मोहम्मद शरीफ शब्बीर अहमद आणि मोहम्मद मुजफ्फर मोहम्मद तनवीर या दोघांना १४ वर्षांची जन्मठेप आणि मुस्ताक अहमद मोहम्मद इशाक शेख, जावेद अहमद अब्दुल मजीद अन्सारी, अफझल खान नबी खान या तिघांना आठ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायालयाने हा निर्णय दिला. ज्या तिघांना ८ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे, त्यांनी आधीच १० वर्षे शिक्षा भोगल्याने त्यांची आता सुटका करण्यात येईल.
     या प्रकरणात न्यायालयाने २२ दोषींपैकी ११ जणांना दोषी ठरवले होते. त्यात २६/११ च्या मुंबई आक्रमणाचा सूत्रधार अबू जुंदालचा समावेश होता. दोषींवरील मोक्का हटवण्यात आला आहे.

इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी काबूलला जाणार्‍या मुसलमान महिलेला विमानतळावर अटक !

 • महिलांना समान अधिकार असण्याची मागणी करणार्‍या महिला संघटना महिला जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात काही करतील का ? 
 • कि तो महिलांचा समान अधिकार असल्याचे म्हणतील ?
        नवी देहली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बिहारच्या यास्मीन महंमद या २८ वर्षीय महिलेला तिच्या ५ वर्षाच्या मुलासह अटक करण्यात आली आहे. ती इसिसमध्ये भरती होण्यासाठी काबूल येथे जात होती. यास्मीन पाटलीपुत्र येथून देहलीला आली होती. केरळमधून गेल्या महिन्यात गायब होऊन इसिसमध्ये भरती झालेल्या २१ तरुणांच्या गटात सहभागी होण्याची तिची योजना होती. यास्मीन हिचा घटस्फोट झालेला आहे.
        यास्मीन वर्ष २०१३-१४ मधे डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस इंटरनॅशनल स्कूलच्या केरळच्या कोट्टाकलम आणि कोल्लम येथील शाळेत काम करत होती. यास्मीनचा संबंध कासारगोडच्या अब्दुल राशीदशी असल्याची माहिती मिळाली आहे. राशीदमुळेच केरळमधील २१ मुसलमान तरुण इसिसमध्ये भरती झाले होते. यास्मीनला राशीदनेच अफगाणिस्तानमध्ये बोलावले होते. तो यास्मीनला स्वतःची पहिली पत्नी असल्याचे सांगतो. यास्मीनचा जन्म आखाती देशातील असून ती तेथेच वाढली आहे. तिचे आईवडील आखाती देशांतच रहातात.

प्रवेश प्रक्रियेत कोट्यवधी रुपये घेतल्याच्या संशयावरून कर्मचार्‍यांची चौकशी

१०० घंट्यांनंतर पिंपरी (जिल्हा पुणे) येथील डी.वाय. पाटील
 शैक्षणिक संस्थेवरील प्राप्तिकर विभागाचे छापासत्र पूर्ण !
     पिंपरी - येथील डी.वाय. पाटील दंतवैद्यकीय, वैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र आणि अभियंता या महाविद्यालयांच्या कागदपत्रांची पडताळणी ३१ जुलै या दिवशी, १०० घंट्यांनंतर पूर्ण झाली.
१. डॉ. डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्थेवर २७ जुलै या दिवशी सकाळी ७.३० वाजता प्राप्तिकर विभागाकडून छापा टाकण्यात आला होता. तसेच संस्थेचे प्रमुख डॉ. पी.डी. पाटील यांच्या पुण्यातील घरावरही छापा टाकण्यात आला होता.
२. या संस्थेच्या पिंपरी कार्यालयातील नोंदणी सचिव यांच्यासह, प्रमुख ३ अधिकारी आणि कर्मचार्‍यांची कसून चौकशी करण्यात आली होती.
३. चौकशीच्या वेळी, प्रवेशासंबंधीची सर्व कागदपत्रे प्राप्तिकर विभागाने शासनाधीन केली आहेत. प्रवेशाच्या वेळी व्यवस्थापनाने कोट्यवधी रुपये घेतले असल्याचा प्राप्तिकर विभागाचा संशय आहे.
४. अधिकार्‍यांनी प्रवेश देतांना काय प्रक्रिया राबवली जाते या संदर्भात प्रत्येकाची स्वतंत्रपणे चौकशी केली होती.

आमदारांना हवे १ लक्ष रुपयांचे वेतन !

देश आर्थिक संकटात असतांना लोकप्रतिनिधींनी जनतेपुढे त्यागाचा आदर्श ठेवणे अपेक्षित !
     मुंबई - सर्वत्र सातव्या वेतन आयोगाची चर्चा चालू असतांनाच आता आमदारांनाही वेतनवाढ हवी आहे. आमदारांना १ लक्ष रुपये वेतन हवे आहे. तशी मागणीच त्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांकडे केली आहे. आमदारांच्या या मागणीचा विचार करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. (राज्यावर कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा भार असतांना स्वतःचे वेतन अल्प करण्याऐवजी वेतनात वाढ करण्याची मागणी करणारे लोकप्रतिनिधी राज्याचे कर्ज कधीतरी फेडू शकतील का ?- संपादक)      आमदारांचे वेतन आणि त्यांच्या स्वीय सचिवांचे वेतन वाढवण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गेल्या आठवड्यात विधान भवनात बैठक बोलावली होती. त्यात आमदारांचे वेतन १५ सहस्र ते २५ सहस्र रुपयांपर्यंत वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. आमदारांचा पगार २५ सहस्रांनी वाढवण्यावर या बैठकीत अनुकूलताही दर्शवण्यात आली. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर ३७ लक्ष ५० सहस्र रुपयांचा ताण पडणार आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांना १ लक्ष ९० सहस्र ते २ लक्ष रुपये मासाला वेतन मिळते.

तस्करांची नव्हे, तर गोरक्षकांचीच पोलिसांकडून कानउघाडणी केली जाते ! - अमन जोहरी, गोरक्षा समिती, तळोदा

नंदुरबार येथील एकदिवसीय हिंदु अधिवेशन 
डावीकडून श्री. प्रशांत जुवेकर,
पू. नंदकुमार जाधव आणि अधिवक्ता कुलकर्णी
    नंदुरबार - तळोदा-अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात सीमेवरून सातत्याने मोठ्या प्रमाणात गोवंशियांची तस्करी केली जाते. तस्करी करणारी वाहने आम्ही पकडून देतो; मात्र पोलिसांकडून आमचीच कानउघाडणी केली जाते. आमच्यावर गुन्हेही प्रविष्ट झाले आहेत. एवढेच नाही, तर काही वेळा गुंडांची आक्रमणेही झेलावी लागली आहेत. असे असतांना संख्येने अल्प असूनही आम्ही शेकडो गोवंशियांना जीवदान मिळवून दिले आहे. हे कार्य पुढेही प्रभावीपणे करणार आहोत, असे प्रतिपादन तळोदा येथील गोरक्षा समितीचे श्री. अमन जोहरी यांनी केले. येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे एकदिवसीय अधिवेशन ३१ जुलै या दिवशी पार पडले. या वेळी ते बोलत होते.

घरातून पळून आलेल्या युवतीवर धर्मांधाचा फसवून बलात्कार !

 • आता जालन्यातही लव्ह जिहाद !
 • लव्ह जिहादच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सरकार कृतीशील पावले कधी उचलणार ? धर्मांधांच्या भूलथापांपासून वाचण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याला पर्याय नाही !
       जालना - घरात वाद झाल्याने नांदेड येथून पळून जात असलेल्या युवतीवर फसवून बलात्कार करणारा धर्मांध सय्यद साजिद सिद्दीकी याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
       रेल्वे चुकल्याने पीडित युवती रात्री ११.३० वाजता भेदरलेल्या अवस्थेत प्रतीक्षालयात रडत होती. धर्मांध सय्यदने या वेळी तिला खोटा धीर दिला. (तरुणींनो, धर्मांधांचा कावेबाजपणा जाणा ! - संपादक) येथे धोका असल्याचे सांगत त्याने तिला स्थानकाबाहेरील परिसरातील एका वसतीगृहात नेऊन तिच्यावर बलात्कार केला, तसेच लग्नाचे आमिष दाखवत तिला संभाजीनगर येथे तीन दिवस फिरवले. पोलिसांनी संशय आल्याने त्यांनी या दोघांना कह्यात घेतले. चौकशीअंती बलात्कार केल्याचे उघड झाले.

अखंड महाराष्ट्राच्या सूत्रावर विधीमंडळात गदारोळ; ठराव मांडण्यावर शिवसेनेसह विरोधक आग्रही !

       मुंबई, २ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी) - अखंड महाराष्ट्राच्या सूत्रावर शिवसेनेसह विरोधी पक्ष २ ऑगस्टला आग्रही राहिले. शासनाने सभागृहात अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडावा, अशी एकच मागणी लावून धरली. यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज ४ वेळा स्थगित करावे लागले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या निवेदनानंतरही सभागृहात गोंधळ चालूच राहिला. अखेर १.४० वाजता कामकाज १ घंट्यासाठी स्थगित करण्यात आले.
       सकाळी सभागृहाचे कामकाज चालू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, शासनाने अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव आणावा. आम्हाला चर्चा नको, मुख्यमंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपचे आमदार निवडून आले आहेत. ज्या भाजपच्या आमदारांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या ते वेगळ्या विदर्भाच्या सूत्रावर निवडून आले नव्हते. या आमदारांनी त्यागपत्रे द्यावीत, अशी मागणी श्री. पाटील यांनी केली. शिवसेनेचे आमदारही अखंड महाराष्ट्रासाठी भगव्या टोप्या घालून आणि खासदार नाना पटोले शेखचिल्ली असल्याचे व्यंगचित्र दर्शवणारा फलक घेऊन सभागृहात आले होते.

शिक्षेची भीती दाखवून ५० सहस्र रुपयांची मागणी करणारा सोलापूरचा पोलीस अधिकारी निलंबित

कायद्याच्या रक्षकांचे खरे स्वरूप !
     सोलापूर - जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी २०१५ या वर्षी गुन्हा घडला होता. त्याचे अन्वेषण करण्याचे दायित्व साहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने यांच्याकडे दिले होते; मात्र सोनोने यांनी गुन्ह्यातील आरोपी गणेश फराटे यांचा भाऊ सुभाष यांना या गुन्ह्यात गणेशला मोठी शिक्षा होणार आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी ५० सहस्र रुपयांची मागणी केली होती, तसेच तपासकामी मुलीच्या वडीलांकडून पैसे घेऊन वरिष्ठांची अनुमती न घेता भोपाळला तपासाला गेले. यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन झाली म्हणून कुंदन सोनोने यांना पोलीस आयुक्त रविंद्र सेनगांवकर यांनी निलंबित केले.

जम्मू-काश्मीरच्या शिक्षणमंत्र्यांच्या घरावर पेट्रोलबॉम्ब फेकला !

     जम्मू - जम्मू आणि काश्मीरचे शिक्षणमंत्री नईम अख्तर यांच्या घरावर दंगलखोर धर्मांधांनी पेट्रोलबॉम्ब फेकून आक्रमण केले. या वेळी ते घरी नव्हते. (जेथे मंत्री सुरक्षित नाहीत, तेथे नागरिक कसे सुरक्षित रहाणार ? - संपादक)

धर्मावरील आघातांना रोखण्यासाठी धर्माभिमानी अधिवक्त्यांची आवश्यकता ! - अधिवक्ता जयेश तिखे

भिवंडी आणि कल्याण येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात हिंदुत्वाचा हुंकार !
अधिवक्ता जयेश तिखे
      ठाणे, २ ऑगस्ट (वार्ता.) - आज बरेच अधिवक्ते पैशांच्या मागे लागले आहेत. ते हिंदूंना साहाय्य करत नाहीत. सध्याची धर्माची बिकट स्थिती पहाता आपल्यालाच न्यायालयीन लढा द्यावा लागणार आहे. त्यासाठी धर्माभिमानी अधिवक्त्यांची आवश्यकता असून युवकांनी त्यादृष्टीने कायद्यांचा अभ्यास करायला हवा. गोरक्षण हे धर्माने आपल्याला दिलेले दायित्व आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता श्री. जयेश तिखे यांनी केले. ३१ जुलै या दिवशी भिवंडी येथील गणपति मंदिर सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता पाटील, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर उपस्थित होते. महर्षींच्या संदेशाने संघटन मेळाव्याचा प्रारंभ झाला. या वेळी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, वारकरी संप्रदाय या संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

कार्यालयीन वेळेत सैराट चित्रपट पाहण्यासाठी ६ महिला कर्मचार्‍यांवर कारवाई !

स्वत:वरील सामाजिक दायित्वाचे भान नसलेले कर्मचारी !
     पुणे - येथील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील ६ महिला कर्मचारी २ मासांपूर्वी कार्यालयीन वेळेत एकाच वेळी सैराट चित्रपट पाहण्यास गेल्या होत्या. यामुळे कार्यालयात कामकाज करण्यास कोणीच नव्हते. या ६ महिलांवर विनावेतन आणि शिस्तभंग करणे, यानुसार कारवाई करण्यात आली.
     या महिला कर्मचार्‍यांना सूचनापत्र पाठवून याविषयी खुलासा मागवला होता. प्रशासकीय अधिकारी कमल घोटकर यांनी केलेल्या चौकशीनुसार उपसंचालकांकडे अहवाल सादर करण्यात आला; परंतु हा अहवाल असमाधानकारक आणि बचावात्मक असल्याने उपसंचालकांनी केलेल्या फेरअहवालाच्या मागणी केली. फेरअहवालानुसार या ६ महिला कर्मचारी दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (म्हणे) सरकारच्या प्रसिद्धीच्या मोहापायी काश्मीरमध्ये हिंसाचार !

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात काश्मीरमध्ये हिंसाचार होत असतांना त्याविषयी काहीही 
न करणारे सुशीलकुमार शिंदे यांना भाजप शासनावर टीका करण्याचा काय अधिकार ! 
     पुणे, २ ऑगस्ट - सरकारच्या प्रसिद्धीच्या मोहापायी काश्मीरमध्ये हिंसाचार वाढल्याचा आरोप काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने १ ऑगस्ट या दिवशी आयोजित वार्तालापामध्ये ते बोलत होते.
१. उत्तरप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये दलितांवरील आक्रमणाच्या घटना वाढल्या आहेत. हे सरकार स्वैराचारी आहे. 
२. देशाच्या एका भागात चीन घुसखोरी करत आहे. पाकिस्तानने एका जवानाचे शिर पाठवले, तर आम्ही १० शिर आणू, असे म्हणणारे मोदी हे शत्रूचे शिर का आणत नाहीत ? केवळ आपल्याच जनावांची शिरे कापली जात आहेत ? 
३. काश्मीरमधील माध्यमांशी संवाद साधणे आवश्यक आहे. काश्मीर आपला भाग असल्याची जाणीव तेथील नागरिकांमध्ये असावी, त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. (याविषयी सत्ताकाळात असतांना शिंदे यांनी काय केले, ते सांगावे ! - संपादक)
४. वेगळा विदर्भ नकोच. विदर्भ, मराठवाडा, कोकण हा मागासलेला भाग आहे, त्यांना समान विकासाची संधी द्यावी.

केर्ले (ता. पन्हाळा) येथील हिंदूसंघटन मेळाव्यासाठी २०० हून अधिक हिंदू धर्माभिमान्यांची उपस्थिती

व्यासपिठावर डावीकडून सर्वश्री संभाजी भोकरे,
अमोल कुलकर्णी आणि किरण दुसे
   कोल्हापूर, २ ऑगस्ट (वार्ता.) - काश्मीर येथे सद्यस्थिती बिकट आहे. प्रतिदिन तिथे आंतकवादी कारवाया होत आहेत. तेथे हिंदू संकटात आहेत. सनातन संस्था समाजाला धर्मशिक्षण देत असल्याने आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी आहोत, तसेच उपस्थितांनीही सनातन संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. सध्या बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकातून अयोग्य इतिहास शिकवला जात असून अफझलखानवधाचे चित्र वगळून छत्रपती शिवाजी महाराज-अफझलखान भेट असे चुकीचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे यांनी केले. ते केर्ले (ता.पन्हाळा) येथील श्री हनुमान मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ जुलै या दिवशी झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यासाठी २०० हून अधिक हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

डॉ. झाकीर नाईक यांच्यावर आतातरी कठोर कारवाई होईल का ?
     विविध आरोपांखाली अटकेत असलेल्या ५५ जिहादी आतंकवाद्यांनी डॉ. झाकीर नाईक यांच्यामुळे प्रेरित झाल्याचे म्हटले आहे. सदर आतंकवादी सिमी, लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन, इस्लामिक स्टेटसारख्या संघटनांसाठी काम करतांना पकडले गेले होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     55 atanki Dr. Zakir Naik ke vicharose prerit huye the. ISIS, IM jaise sangathanoke liye ve kaam karte the. - Kya ab sarkar Zakir Naikpar shikanja kasegi
जागो !
: ५५ आतंकी डॉ. जाकिर नाईक के विचारों से प्रेरित हुएं थे. इस्लामिक स्टेट, आयएम् जैसे संगठनों के लिए वे काम करते थे. - क्या अब सरकार जाकिर नाईक पर शिकंजा कसेगी ?

नृसिंहवाडी येथील श्री. ज्ञानेश्‍वर वैद्य यांचा दैनिक सनातन प्रभातप्रती असलेला भाव !

श्री. ज्ञानेश्‍वर वैद्य
    नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु धर्माभिमानी आणि श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी श्री. ज्ञानेश्‍वर वैद्य हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी निघालेल्या माऊलींच्या यात्रेसाठी प्रथमच आळंदी येथे गेले होते. सोमवती अमावास्येच्या दिवशी माऊलींची पालखी जेजुरी येथून निघाली. त्या वेळी वारकर्‍यांना भजी देणारा एक विक्रेताही वारीसमवेत होता. हा विक्रेता ज्या कागदात लोकांना तळलेली भजी देत आहे, तो कागद दैनिक सनातन प्रभातचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या वेळी काही कागद खाली चुरगाळून टाकले होते. हे समजताच श्री. वैद्य तात्काळ विक्रेत्याजवळ गेले. श्री. वैद्य यांनी विक्रेत्यास खाली पडलेले दैनिक सनातन प्रभातचे कागद दाखवून त्यातील देवता-संत यांची चित्रे दाखवली, तसेच असे कागद फाडून रस्त्यावर टाकल्याने, तसेच अयोग्य कृतींसाठी वापरल्याने त्यांची विटंबना कशी होते, हे लक्षात आणून दिले.

टिळकांचा राष्ट्र्रवाद आजही उपयुक्त ! - शरद पवार

       पुणे, २ ऑगस्ट (वार्ता.) - स्वातंत्र्यपूर्व काळात संस्कृती आणि भाषा यांप्रमाणे विभागल्या गेलेल्या भारताला अखंड भारत करण्याचे अपूर्व कार्य लोकमान्य टिळकांनी केले. त्यांनी राष्ट्रवादाची संकल्पना जनमानसात रुजवली. स्वतंत्र भारत कसा असावा, यासाठी केसरीतून देशाला दिशा दिली. शेती आणि औद्योगिक विकास यांचा समन्वय साधत आर्थिक राष्ट्रवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला. टिळकांचा राष्ट्रवाद आजही उपयुक्त आहे, असे विचार माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचे टिळक सन्मान पारितोषिक टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते शरद पवार यांना देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. (केवळ शाब्दिक स्तुतीसुमने न उधळता लोकमान्य टिळक यांचा राष्ट्रवाद सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी आचरणात आणला असता, तर आज देश प्रगतीपथावर असता ! - संपादक)

वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहात रॅगिंग करणार्‍या ७ विद्यार्थ्यांना अटक !

रॅगिंग या विकृतीवर समूळ उपाययोजना करून विद्यार्थ्यांना भयमुक्त 
शिक्षण देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल का ?
     वैजापूर, २ ऑगस्ट - येथील दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयाच्या सोनीबाई पाटील वसतिगृहात ३५ विद्यार्थ्यांवर रॅगिंग करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी वसतिगृहाचे अधीक्षक प्रशांत कर्डीले यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून रॅगिंग करणार्‍या ७ विद्यार्थ्यांना कह्यात घेतले आहे. (रॅगिंगच्या घटनांबाबत कठोर कायदे आणि शिक्षा केल्याशिवाय त्या प्रवृत्तीला आळा बसणार नाही. - संपादक)
     महाविद्यालयीन परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तुम्ही वर्गातील मुलींना का बोलता ? शिक्षकांना का बोलता ? शिक्षकांपेक्षा अधिक मानसन्मान आम्हाला द्या, असे म्हणत त्या विद्यार्थ्यांना चापट्या मारल्या. वसतिगृहाचे अधीक्षक प्रशांत कर्डीले हे आपल्या सहकार्‍यांसह रात्री पहारा करत असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यापूर्वीही ५ मासांपूर्वी त्याच वसतिगृहात झालेल्या रॅगिंगच्या एका घटनेत एका विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला होता. (त्याच वेळी वसतिगृह आणि महाविद्यालय प्रशासन यांनी त्या विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा केली असती, तर ही वेळ आलीच नसती. - संपादक)


तीनही आरोपींची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यास न्यायालयाची अनुमती

कोपर्डी (जिल्हा नगर) 
येथील अत्याचाराचे प्रकरण
        नगर, २ ऑगस्ट - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील तीनही आरोपींची ब्रेन मॅपिंग (मानसशास्त्रीय चाचणी) करण्यास येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एच्.एम्. देशपांडे यांनी अनुमती दिली आहे. त्या आरोपींची ही चाचणी मुंबई येथे ५ आणि ६ ऑगस्ट या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या प्रयोगशाळेत घेण्यात येणार आहे. यामध्ये आरोपींच्या ब्रेन मॅपिंग चाचणीसह अन्य ४ चाचण्याही होणार आहेत.

कन्हैया कुमार याला विधान परिषदेत प्रवेश नाकारला !

       मुंबई, २ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्र विधीमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी जेएन्यू विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला सुरक्षा रक्षकांनी रोखले. त्याला विधानभवनात जाण्यास प्रवेश पत्र मिळाले होते. कन्हैया कुमार याने शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा संदर्भ देऊन प्रवेश पत्र मिळवले होते; मात्र विधान परिषदेत सुरक्षा रक्षकांनी त्याला प्रवेश दिला नाही. विधान परिषदेत सध्या वेगळा विदर्भाच्या सूत्रावरून चर्चा चालू आहे. या चर्चेसाठी कन्हैया उपस्थित रहाणार होता. त्यासाठी दुपारी १२ ते १ अशी वेळ त्याला देण्यात आली होती.

हक्काची धारणा; पण कर्तव्याशी प्रतारणा !

      हक्क आणि कर्तव्य या नाण्याच्या २ बाजू असतात. मागील काही दिवसांपासून घडणार्‍या घटना पहाता सरकारी कर्मचार्‍यांनी मात्र यासंदर्भात वन वे स्वीकारलेला दिसतो. हक्क आणि मागण्या यांसाठी जोर धरलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना स्वत:च्या कर्तव्यांचा विसर पडला आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्याचे असे की, काही दिवसांपूर्वी मुंबईत बीईएस्टी(बेस्ट) या विद्युत आस्थापनेतील अभियंता कर्मचार्‍यांनी अन्य कर्मचार्‍यांप्रमाणे आम्हालाही आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळावी, अशी मागणी केली. ऐन पावसाळ्यात त्यांनी संप पुकारला. बीईएस्टीचा विद्युत विभाग हा तातडीने सेवा पुरवणारा विभाग आहे. कुठेही कधीही अडचण आल्यास तात्काळ धावून जाणे, हे या विभागाचे काम आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
 - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नावाचा उल्लेख योग्य प्रकारे करा !

      सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते जाहीर सभेतील भाषण किंवा व्याख्याने यांच्या आरंभी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करतात. अशा वेळी काही साधकांकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नावाचा उल्लेख अयोग्य प्रकारे केला जातो. साधकांकडून केल्या जाणार्‍या अयोग्य उल्लेखाची उदाहरणे आणि साधकांनी यापुढे करावयाचा योग्य उल्लेख पुढे दिला आहे. 
१. अयोग्य उल्लेख (अधोरेखित केले आहेत.)

अ. परात्पर गुरु प.पू. डॉ. जयंत आठवले
आ. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
इ. श्री श्रीजयंत बाळाजी आठवले : असा उल्लेख हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर करू शकतील.
२. योग्य उल्लेख 
      परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले दैनिक सनातन प्रभात
सनातन गौरव विशेषांक
सनातनच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने सनातनचे 
अद्वितीय कार्य आणि वैशिष्ट्ये सांगणारा रंगीत विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : ७ ऑगस्ट २०१६
विशेषांकात प्रसिद्ध करण्यात येणारे लेख
 •  सनातनच्या २५ वर्षांच्या कार्याचे सिंहावलोकन
 •  सनातनचे प्रचंड वेगाने वाढणारे प्रसारकार्य
 •  सनातनच्या आश्रमांचे सुव्यवस्थापन
 •  संत, मान्यवर आणि हिंदुत्ववादी यांनी गौरवलेला सनातन परिवार
        ... यासह अन्य वैशिष्ट्यपूर्ण लिखाण !
सनातनच्या सर्व व्यापी कार्याचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी आपली मागणी आजच नोंदवा !
संपर्क क्रमांक : ८४५१००६०३१, ९४०४९५६०८३
     नित्य-नैमित्तिक कर्मे न करणारा समाजद्रोही आहे, पर्यायाने राष्ट्र आणि मानवता यांचाही द्रोही आहे ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
      आपण हिंदू एकत्र येतो; पण एक होत नाही. आतातरी एक होऊ या ! - श्री. आनंद मयेकर, अध्यक्ष, ब्रह्मानंद तरुणाई
     आज जगात हिंदुस्थान हे एकमेव राष्ट्र आहे, जेथे हिंदूंना तुम्ही हिंदु आहात, असे सांगावे लागत आहे. हिंदूंना तुम्ही हिंदुस्थानात रहाता, असे सांगावे लागत आहे. भारतमातेच्या दोन्ही डोळ्यांत आज अश्रू आहेत ! - ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे, डिचोली, गोवा.

६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रमानंद गौडा आणि मंगळुरू सेवाकेंद्रातील साधक यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. रमानंद गौडा
   मागील वर्षी मी मंगळुरू येथे सेवेसाठी काही मास (महिने) होते. त्या वेळी तेथील साधक श्री. रमानंद गौडा आणि इतर साधक यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.
१. श्री. रमानंद गौडा यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. साधकांना सेवेमध्ये प्रोत्साहन देणे 
     श्री. रमानंदअण्णा विज्ञापन सेवेच्या संदर्भात सर्वांची बैठक घेतात. त्यामध्ये साधक त्यांचे ध्येय सांगतात. त्यावर ते तुमची क्षमता तर पुष्कळ आहे. तुम्ही अजून मोठेे ध्येय ठेवू शकता, असे बोलून त्यांना क्षमता वाढण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देतात.

५४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. स्नेहल शिवानंद स्वामी (वय १८ वर्षे), उचगांव, कोल्हापूर हिने व्यक्त केलेली कवितारूपी गुरुचरणी कृतज्ञता !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
कृतज्ञता व्यक्त करते देवा, तुझ्या चरणी ।
जन्म दिलास तू पृथ्वीवरती ॥ १ ॥
कृतज्ञता व्यक्त करते देवा, तुझ्या चरणी ।
गुरु दिलेस प.पू. डॉक्टरांसारखे ॥ २ ॥
कृतज्ञता व्यक्त करते देवा, तुझ्या चरणी ।
साधक दिलेस प्रेमळ असे ॥ ३ ॥
कृतज्ञता व्यक्त करते देवा, तुझ्या चरणी ।
महर्षींसारखे गुरु दिलेस ॥ ४ ॥
- कु. स्नेहल शिवानंद स्वामी (वय १८ वर्षे), उचगांव, कोल्हापूर (२६.३.२०१६)

इंद्रधनुष्य पहातांना श्री. दुर्गेेेश सामंत यांना उलगडलेले मायेचे कोडे आणि सुचलेले काव्य

श्री. दुर्गेश सामंत
१. इंद्रधनुष्य पहातांना मन हरखून जाणे आणि प्रत्यक्षात ते विलोभनीय अन् सुंदर असे नसून तो भ्रम असल्याचे लक्षात येणे, त्या वेळी मायासुद्धा अशीच असून पहाणार्‍यामुळे ती अस्तित्वात आल्याचे जाणवणे आणि त्या पहाणार्‍याचे कौतुक वाटणे : ११.९.२०१४ या दिवशी मी तिसर्‍या माळ्यावर झोपाळ्यावर बसून पायाचा व्यायाम करत बसलो होतो. बाहेर वातावरणात उन-पावसाचा खेळ चालू झाला होता. ते पाहून आता इंद्रधनुष्य येणार, असे मला वाटले. पहाता पहाता इंद्रधनुष्य खरंच अवतरले. ते सुंदर दृश्य पहातांना माझे मन हरखून गेले. येणार्‍या-जाणार्‍याने ते पहावे, यासाठी मी ते त्यांना दाखवू लागलो. एका-दोघांना ते पहाण्यात फारसा रस नव्हता. दोन-तीन जणांना ते दाखवून झाल्यानंतर लक्षात आले, अरे हा तर भ्रम आहे ! तिथे ढगात प्रत्यक्ष असे काहीच नसते. तेव्हा लगेचच माझ्या मनात विचार आला, मायाही अशीच असते, विलोभनीय आणि सुंदर ! प्रत्यक्षात मात्र ती नसते. त्या वेळी लक्षात आले, पहाणार्‍यामुळेच माया अस्तित्वात आली.
    ते दृश्य आणि हा भावार्थ माझ्या मनात साठून राहिला. मला त्या पहाणार्‍याचे कौतुक वाटले. उर्वरित सायंकाळी माझे मन बर्‍यापैकी प्रसन्न होते.

प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे लाभलेला सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. सौरभ जोशी या दोन संतांचा अवर्णनीय भावसत्संग !

सद्गुरु राजेंद्र शिंदे
      देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असणारे पू. राजेंद्रदादा १९.७.२०१६ या दिवशी (गुरुपौर्णिमेच्या दिवशी) सद्गुरुपदावर आरूढ झाले. हे समजल्यावर वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पू. सौरभदादा आणि पू. राजेंद्रदादा यांचा भ्रमणभाषवरील भावसत्संग अनुभवण्याचा योग प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे लाभला होता, त्याची आठवण झाली.
      या भावसत्संगात पू. राजेंद्रदादा संत असूनही संतांच्या चरणी असलेला त्यांचा भाव, नम्रता आणि लीनता हे गुण गुरुदेवांनी लक्षात आणून दिले. संतांप्रती असलेल्या अनन्य शरणागत भावामुळेच पू. राजेंद्रदादा यांनी पू. सौरभदादा यांना त्या वेळी विचारले होते, मी पुढे जाण्यासाठी अजून काय करू ? या भावसत्संगाचा लाभ मला पू. सौरभदादा यांची सेवा करतांना झाला. मी प.पू. गुरुदेव, पू. राजेंद्रदादा आणि पू. सौरभदादा यांच्या चरणी शब्दबद्ध केलेला सत्संग कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.

श्रद्धेने, साधना म्हणून आणि भगवंताची सेवा समजून व्यवसाय करणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या मुंबई येथील डॉ. (सौ.) मिनू रतन !

डॉ. (सौ.) मिनू रतन
१. नम्रता 
     सौ. मिनू रतन यांचा अरोमाथेरेपीचा पुष्कळ अभ्यास आणि अनेक वर्षांचा अनुभव असूनही त्यांच्यात बोलण्यात नम्रता जाणवते. 
२. आत्मविश्‍वास 
     त्या प्रत्येक कृती आत्मविश्‍वासाने करतात. त्यांच्यातील हा आत्मविश्‍वास म्हणजे त्यांची देवावरील दृढ श्रद्धा जाणवते. 
३. रुग्णांना प्रेमाने जिंकणे 
     आपल्याकडे आलेल्या रुग्णाला प्रेम देऊन कसे ठीक करता येईल, असा त्यांचा प्रयत्न असतो; मात्र रुग्ण बरा झाल्यावर याचे सर्व श्रेय त्या देवाला देतात.

रुग्ण लवकर बरे व्हावेत, अशी तळमळ आणि प.पू. डॉक्टरांप्रती अपार भाव असलेल्या डॉ. (सौ.) मिनू रतन !

१. रुग्ण लवकर बरे व्हावेत, याची तळमळ : डॉ. (सौ.) मिनू रतन कुठल्याही रुग्णावर उपचार करतांना त्या रुग्णाला लवकर बरे कसे वाटेल ?, असा विचार शेवटपर्यंत करतात. 
२. दिवसभर साधकांवर उपचार करूनही त्यांच्या तोंडवळ्यावर आनंद आणि उत्साह जाणवतो.
३. साधक परिपूर्ण व्हावेत, याची तळमळ : त्यांना जे ज्ञान आहे, ते सर्व साधकांना देऊन त्या त्यांना परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात. 
४. त्याग : त्या त्यांचे स्वतःचे चिकित्सालय बंद ठेवून गुरुसेवेसाठी १५ दिवस आश्रमात आल्या आहेत.
५. सत्मध्ये रहाण्याची तळमळ : मुंबईसारख्या रज-तमाच्या ठिकाणी असलेले त्यांचे चिकित्सालय सांभाळून त्या सत्मध्ये रहण्याचा प्रयत्न करतात.

डॉ. (सौ.) मिनू रतन यांच्या अ‍ॅरोमाथेरपीच्या अभ्यासवर्गात आलेल्या अनुभूती आणि त्यांनी सांगितलेले उपाय केल्यावर जाणवलेले पालट

आधुनिक वैद्या
(कु.) आरती तिवारी
१. डॉ. (सौ.) मिनू रतन यांनी तपासणी करून कोणत्या चक्राशी संबंधित 
कोणते त्रास होतात ?, हे सांगणे आणि तेच त्रास होत असणे 
     २१.७.२०१६ या दिवशी डॉ. (सौ.) मिनू रतन यांचा अ‍ॅरोमाथेरपीच्या वर्गात अभ्यासासाठी माझी लोलकाच्या साहाय्याने तपासणी केली. त्यांनी मला कोणत्या चक्राशी संबंधित कोणते त्रास होतात ?, हे सांगितले. त्यांनी सांगितलेलेच त्रास मला होत आहेत. 
२. संतांवर उपचार होत असतांना स्वतःलाही तेच त्रास असल्याने 
स्वतःवर उपाय होत आहेत, असे जाणवणे 
     त्यानंतर डॉ. (सौ.) मिनू रतन यांनी एका संतांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांना होत असलेले पोट आणि झोप यांच्याशी संबंधित त्रास मलाही होत आहेत. संतांवर उपचार होत असतांना मला माझ्यावरही उपाय होत आहेत, असे जाणवले.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ सद्गुरुपदी विराजमान होण्याविषयी मिळालेल्या पूर्वसूचना आणि सद्गुरुपद बहाल केलेल्या दिनाचे ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण !

१. पू. सौरभदादांना आणि साधिकेला 
सद्गुरुपद प्राप्तीच्या संदर्भात मिळालेल्या पूर्वसूचना ! 
सौ. प्राजक्ता जोशी
१ अ. पू. सौरभदादांनी आनंदाने ऐंशी, ऐंशी असे म्हणणे : गेल्या २० दिवसांपासून पू. सौरभदादा सतत आनंदाने ऐंशी, ऐंशी.. असे म्हणत होते. सेवेत असणार्‍या काही साधकांनीही हे ऐकले आहे.
१ आ. खाऊ पाठवायला सांगणे : पंधरा दिवसांपूर्वी पू. सौरभदादांनी पू. (सौ.) अंजली गाडगीळ, महर्षि आणि त्यांच्यासोबत असणार्‍या साधकांना खाऊ पाठवायला सांगितला होता.
१ इ. साधिकेच्या मनात विचार येऊन पू. (सौ.) काकूंचे सूक्ष्मातून दर्शन होणे : पू. सौरभदादांकडे पाहून मनात विचार आला, पू. (सौ.) गाडगीळकाकू आता लवकरच सद्गुरुपद प्राप्त करतील ! त्यानंतर पू. काकू गळ्यात हार घातलेल्या रूपात दिसल्या.
१ ई. साधिका पू. (सौ.) गाडगीळकाकूंशी भ्रमणभाषवर बोलतांना पू. सौरभदादांनी या काकू, ऋषी, ऐंशी, असे आनंदाने उच्चारणे : एका सेवेनिमित्त गुरुपौर्णिमेच्या आदल्या, म्हणजे १८.७.२०१६ या दिवशी मी पू. (सौ.) गाडगीळकाकूंशी भ्रमणभाषवर बोलत असतांना पू. सौरभदादाही त्यांच्याशी आनंदाने बोलू लागलेे. पू. सौरभदादा पू. काकूंना, नमस्कार, या काकू, ऋषी, ऐंशी, श्री, खाऊ, असे म्हणाले. पू. सौरभदादांचे स्पष्ट उच्चार ऐकून त्या वेळी पू. काकूंनाही अतिशय आनंद झाला.

विषयावर प्रभुत्व असलेल्या आणि नम्रतेने बोलणार्‍या डॉ. (सौ.) मिनू रतन !

१. नम्रता : डॉ. (सौ.) मिनू रतन या सर्वांशी नम्रतेने बोलतात. त्यांच्याशी बोलतांना परकेपणा जाणवत नाही. त्यांच्याशी बोलतांना त्यांच्याशी आधीपासून ओळख असल्यासारखे वाटते.
२. तन्मयतेने शिकवणे : डॉ. (सौ.) मिनू रतन इतक्या तन्मयतेने शिकवतात की, वेळ कसा गेला हे समजत नाही. त्या शिकवत असलेल्या वर्गात सर्व जण मोकळेपणाने बोलतात.
३. विषयावरील प्रभुत्व : डॉ. (सौ.) मिनू रतन शिकवत असलेला विषय नवोदितांना समजायला क्लिष्ट असला, तरी त्या तो इतक्या सोप्या भाषेत सांगतात की, समोरच्या व्यक्तीला तो विषय लगेच समजतो. यातून त्यांचे विषयावरील प्रभुत्व लक्षात येते. त्या विषय समजावून सांगतांना आवश्यक तिथे एखादी छोटीसी गोष्ट, व्यवहारातील एखादे चपखल उदाहरण सहजतेने सांगतात. त्यातून ऐकणार्‍या व्यक्तीला विषय चांगला स्पष्ट होतो. 
- डॉ. दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, गोवा. (२२.७.२०१६)

पूर्णस्वरूप श्रीकृष्णाशी एकरूप होण्यासाठी सातत्याने करत असलेले प्रयत्न म्हणजेच साधना ! - प.पू. पांडे महाराज

प.पू. पांडे महाराज
        या विश्‍वात श्रीकृष्णाविना दुसरे काहीच नाही; म्हणून तो अनन्य आहे. अशा शाश्‍वत तत्त्वाशी एकरूप होऊन त्याच्या पूर्ण तत्त्वाशी संलग्न होणे, म्हणजे साधना. तो आणि मी, माझा जीव आणि ते शिवस्वरूप एक होण्यासाठी सतत त्याचे चिंतन करावे. जीवनातील प्रत्येक कर्म त्याच्या अनुसंधानात राहून करावे. प्रत्येक कार्य आणि कृती त्याची भावपूर्ण सेवा करत आहे, हा भाव ठेवून करावेे. इतकेच नव्हे, तर ते केलेले कार्यही त्याला अर्पण करावे. प्रत्येक वस्तूमध्ये त्याचेच अस्तित्व आहे. तोच त्या स्वरूपातून माझी सेवाच करत आहे, हे जेव्हा दिसून येते, तेव्हा आपला भाव जागृत होतो.
        आपला उद्धार होण्यासाठी तोच किती प्रयत्न करत आहे, हे सतत जागृत राहून पाहिल्यास त्याच्या सतत चिंतनात आणि सान्निध्यात रहाण्यात आनंदच येईल. अशा प्रकारे सतत आनंदात राहून त्याच्या मीलनाच्या ओढीने केले गेलेले प्रयत्न म्हणजेच आपली खरी साधना ! पूर्ण स्वरूप श्रीकृष्णाशी एकरूप होण्यासाठी सातत्याने करत असलेले प्रयत्न म्हणजेच साधना !
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.१.२०१६)

साधकांना सूचना

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात 
होणार्‍या आंदोलनांची वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या 
आणि न करणार्‍या प्रसारमाध्यमांची माहिती कळवा !
        सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, वारकरी, पुरोहित संघ, तसेच राजकीय पक्ष हे पत्रकार परिषद, आंदोलने, मोर्चा यांच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत आणि सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात आहेत. ही वृत्ते प्रसिद्ध करणार्‍या आणि न करणार्‍या वृत्तपत्रांची माहिती दैनिकाच्या नजीकच्या कार्यालयात खालील पत्त्यावर कळवावी.
दैनिक कार्यालयाचा पत्ता : सनातन आश्रम, १०७, सनातन संकुल, देवद, पोस्ट ओ.एन्.जी.सी., तालुका - पनवेल, जिल्हा - रायगड, पिन - ४१०२२१
संपर्क क्रमांक : ९४०४९५६०८७
इ-मेल : panveldainik@gmail.com

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे.     
     जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा. 
धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना
     सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल अमावास्या झाली.

अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी राज्यातील प्रत्येक विभागाला शासनाकडून सूचना !

अल्पसंख्यांकांसाठी नंदनवन ठरलेला आणि बहुसंख्य हिंदूंच्या 
न्याय्य हक्कांची सातत्याने गळचेपी होणारा भारत !
     मुंबई - अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा, यासाठी शासनाने प्रत्येक विभागाला निश्‍चित आराखडा तयार करण्याची सूचना दिली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व विभागांना या सूचना देण्यात आल्या. विभागांशी समन्वय साधण्याचे दायित्व शासनाने अल्पसंख्यांक विकास विभागाकडे सोपवले आहे. (आतापर्यंत विविध सुविधा देऊनही अल्पसंख्यांकांनी त्याचा वापर केवळ जिहादसाठीच केला. गुन्हेगारीत बहुसंख्य असणारे अल्पसंख्यांक या सुविधांचा सुविनियोग करतील, याची निश्‍चिती शासन देईल का ? - संपादक)

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
कितीही कल्पनातीत आनंदलहरी असल्या, 
तरी त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल.
भावार्थ : आनंदलहरी कल्पनातीत आहेत; कारण साधारण व्यक्तीला आध्यात्मिक आनंदाची, आत्मानंदाची अनुभूती नसतेच, केवळ व्यावहारिक सुखाची असते. त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल म्हणजे आनंदाची अनुभूती घ्यावी, अशी प्रत्येक जिवाला नैसर्गिक ओढ असतेच, म्हणून आनंद मिळावा हा विचार कधी ना कधी उफाळून येतोच.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नसलेले सर्वधर्मसमभावी हिंदु संत !
     केवळ हिंदु संतच सर्वधर्मसमभाव हा शब्द वापरतात. इतर कुठल्याही धर्मात किंवा पंथात हा शब्द वापरत नाहीत. प्रत्येक जण आमचाच धर्म किंवा पंथ सर्वश्रेष्ठ आहे, असे म्हणतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ? 
कालक्रमणा करतांना मनुष्याकडून चुका घडतातच; पण प्रत्येक चुकीपासून 
आपण काहीतरी शिकलो, तरच पुढील आयुष्य यशस्वी होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

महाराष्ट्रातील आमदारांना वेतनवाढीचे डोहाळे !

संपादकीय 
      महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्वपक्षीय आमदारांना वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. या संदर्भात गेल्या आठवड्यात विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे यांनी बैठक घेतली आहे. वर्ष २०१० नंतर आमदारांच्या वेतनात वाढ झालेली नाही. सध्या आमदारांना महिना ७५ सहस्र रुपये वेतन मिळते; मात्र तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या मतदारसंघात फिरतांना ही रक्कम अल्प पडते, असे मत मंत्री श्री. गिरीष बापट यांनी मांडले. कर्मचार्‍यांना जर सातवा वेतन आयोग लागू होतो, तर लोकप्रतिनिधींनाही वाढ का नाही ?, असे कारण सर्वपक्षीय आमदारांनी पुढे केले आहे. गेले अनेक वर्षांपासून आपला देश आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. अशा स्थितीत खरे तर विचार केल्यास आहे ते वेतनच अधिक आहे; मात्र याच्याशी आमदाररूपी लोकप्रतिनिधींना देणेघेणे नाही. एकीकडे देशातील लक्षावधी जनतेला दोन वेळचे खाणेही मिळत नाही, दोन-दोन पदव्या घेतलेले युवक ५ ते १० सहस्र रुपयांपर्यंत पगार घेऊन राबत आहेत आणि दुसरीकडे आमदारांना ७५ सहस्र रुपयेही पुरत नाही, हे अनाकलनीय आहे. आमदारांना मिळणारे वेतन हा शेवटी देशाचा पैसा असून तो देशहितासाठीच वापरला गेला पाहिजे. त्यामुळे गुड गर्व्हनन्सची ग्वाही देणार्‍या शासनाने अशा अयोग्य गोष्टींकहे होणार्‍या उधळपट्टीकडे चाप लावावा, हे अपेक्षित आहे !

वाढते रस्ते अपघात आणि सर्वपक्षीय निष्क्रीय राज्यकर्ते !

संपादकीय
     भारत हा देश खड्ड्यांचा देश म्हणून ओळखला जातो की काय, अशी सध्याची स्थिती आहे. वर्ष २०१५ मध्ये केवळ रस्त्यातील खड्डे यांमुळे १० सहस्र ७२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात हा आकडा सगळ्यांत अधिक असून एकट्या महाराष्ट्रात ८१२ लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने नुकत्याच घोषित केलेल्या अहवालानुसार एकीकडे केंद्र आणि राज्य शासन नवीन रस्ते अन् उड्डाणपूल बांधण्यासाठी निधी वाढवत आहे, तर दुसरीकडे पूर्वीचे रस्ते अधिकच खराब होणे, अशा स्थितीकडे जात आहे. खराब रस्त्यांमुळे प्रत्येक ३.६ मिनिटाला एका माणसाचा मृत्यू होतो, तर प्रतिदिन हाच आकडा ४०० होतो. अशा मृत्यूंमध्ये उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र आघाडीवर आहे. वर्ष २०१५ मध्ये १ लक्ष ४६ सहस्र लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून रस्ते सुरक्षिततेसाठी राज्यांकडून तयार करण्यात आलेल्या विशेष गटांनी आम्ही रस्ता अपघातात मृत्यू अल्प करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि वेगवेगळ्या उपायोजना करत आहोत, असे उत्तर दिले आहे; मात्र राज्यांकडून काय प्रयत्न होतात, हे जगजाहीरच आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn