Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गोहत्या करणार्‍यांना धडा शिकवणारच ! - राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप, भाग्यनगर

   
राजासिंह ठाकूर
  नवी देहली - काही दिवसांपूर्वी गुजरातच्या उना येथे गोरक्षकांकडून गोहत्या करणार्‍या दलितांना चोप देण्यात आला होता. त्यावरून हिंदुद्वेषी राजकारण्यांकडून टीका होत आहे. त्यावर भाग्यनगर येथील भाजपचे आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ अपलोड करून गोरक्षकांचे समर्थन केले आहे. गोहत्या करणार्‍यांना असाच धडा शिकवला पाहिजे. उनामधील दलित हे धर्मांतरित ख्रिस्ती असल्याचेही ठाकूर यांनी म्हटले आहे.
     श्री, ठाकूर यांनी यात म्हटले आहे की, मतांसाठी भीक मागणार्‍या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांना मी विचारू इच्छिते की, त्या दलितांचे नाव अपकीर्त का करत आहेत ? अनेक दलित परिवार गोरक्षणांचे कार्य करत आहेत. माझे अनेक सहकारी दलित आहेत. दलितांना विचारू इच्छितो की, गोहत्या करणे आणि गोमांस खाणे आवश्यक आहे का ? काही दलितांमुळे गोभक्तांचे नाव अपकीर्त केले जात आहे.

इंदूर (तेलंगण) येथे भव्य सभेद्वारे हिंदूंच्या मनात जागवले धर्मबंधुत्व !

काश्मिरी हिंदूंना त्यांचे न्याय्य अधिकार मिळवून देण्यासाठी 
भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रयत्नांना गती !
सभेचे दीपप्रज्वलन करतांना हिंदुत्वनिष्ठ : डावीकडून शिवसेनेचे 
श्री. अर्जुन यादव, शिवसेनेचे कर्नूल जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश रेड्डी,
 अधिवक्ता श्री. विष्णुशंकर जैन, श्री. रमेश शिंदे, अधिवक्ता श्री. गंगाधर गौड,
 श्री. टी.एन्. मुरारी, श्री. तपन घोष, गुरु सत्ता संघटनेचे श्री. रुद्र वर्मा,
 श्री. मुरली मनोहर शर्मा, श्री. अनिल धीर आणि श्री. गोपी किशन गौड 
   इंदूर (तेलंगण) - वर्ष १९९० मध्ये विस्थापित झालेल्या साडेचार लाख काश्मिरी पंडितांना त्यांचे न्यायोचित अधिकार पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी तेलंगण राज्याच्या इंदूर (निजामाबाद) येथे ३१ जुलै या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने एका भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या साधूला जनार्दन गार्डनमध्ये झालेल्या सभेला देशाच्या अनेक राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी काश्मिरी पंडितांच्या अधिकारांसाठी एकाच वेळी संघटित आवाज उठवण्यात आला. सभेच्या वेळी मोठा पाऊस येऊनसुद्धा ९००हून अधिक धर्माभिमानी हिंदु सभेला उपस्थित होते.
अधिक वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

सनातन संस्थेवर बंदी घालणे अयोग्य ! - हिंदु धर्माभिमानी

सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या निषेधार्थ कारवार 
(कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पत्रकार परिषद 
डावीकडून सर्वश्री. संतोष महालसेकर, रवी राव,
बी.जी. मोहन, दिनानाथ सारंग आणि
सोमनाथ साळगांवकर 
      कारवार (कर्नाटक) - काही हिंदु विरोधकांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीच्या विरोधात कारवार येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील भद्र हॉटेलमध्ये नुकत्याच एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. बी.जी. मोहन, सिद्धीविनायक मंदिराचे विश्‍वस्त श्री. उल्लास मुंज, जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदायचे श्री. संतोष महालसेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. रवी राव, श्री. रामदास कुडतरकर, श्री. प्रशांत पेडणेकर, सौ. धनलक्ष्मी हळदणकर आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या परिषदेत सर्व हिंदुत्वनिष्ठांनी सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीचा तीव्र शब्दांत निषेध केला.

हिंदु संस्कृतीच्या प्रसारासाठी सनातन संस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे ! - श्री प्रकाशानंदजी महाराज, श्री रामकृष्ण विवेकानंद आश्रम, राणेबेन्नूरु, कर्नाटक

सनातनला संतांचे आशीर्वाद !
श्री प्रकाशानंदजी महाराज (बसलेले) यांना कन्नड
साप्ताहिक सनातन प्रभात भेट देतांना सनातनच्या
सौ. विदुला हळदीपूर आणि पतंजली योग
समितीचे कार्यकर्ते
     राणेबेन्नूरु (कर्नाटक) - हिंदु संस्कृतीचा प्रसार करणे आणि राष्ट्रभक्तीविषयी जनजागृती करणे, यांसाठी सनातन संस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. गेल्या १५ वर्षांपासून संस्थेच्या या कार्याचे आम्ही जवळून अवलोकन केले आहे. या संस्थेकडून धर्म आणि संस्कृती यांचे कार्य पुढे होत राहो अणि त्यात त्यांना यश लाभो, ही शुभेच्छा ! भगवंताची कृपा सर्वांवर असू दे, अशी प्रार्थना करतो, असे आशीर्वचन राणेबेन्नूरु येथील श्री रामकृष्ण विवेकानंद आश्रमाचे श्री प्रकाशानंदजी महाराज यांनी सनातन संस्थेला दिले. काही हिंदु विरोधकांकडून सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर संस्थेचे साधक आणि पतंजली योग समितीचे कार्यकर्ते यांनी महाराजांची भेट घेतली होती. त्या वेळी ते बोलत होते.

सनातन संस्थेवर बंदी घालणे, हे मानवतेचे लक्षण नाही ! - डॉ. आनंद कुलकर्णी, अध्यक्ष, हिंदुस्थान मरुनामकरन् संस्था

विजयपूर (कर्नाटक) येथे सनातन संस्थेच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद 
पत्रकार परिषदेला संबोधित करतांना डावीकडून डॉ.
आनंद कुलकर्णी, श्री. संतोष विश्‍वकर्मा, श्री. आनंद
कुलकर्णी, अधिवक्ता श्री. तुळशीराम सूर्यवंशी,
श्री. किरण काळे
    विजयपूर - भारतावर प्रतिदिन आक्रमण करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांवर प्रथम बंदी घातली पाहिजे. ते सोडून भारतीय संस्कृती जोपासणार्‍या सनातन संस्थवर बंदी घालणे, हे मानवतेचे लक्षण नाही, असे प्रतिपादन हिंदुस्थान मरुनामकरन् या संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.
       हिंदुद्वेष्ट्यांकडून वारंवार सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत असल्याच्या विरोधात येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी प्रसिद्ध अधिवक्ता श्री. तुळशीराम सूर्यवंशी म्हणाले, सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे. ती समाजात धर्मप्रसाराच्या आधारे समाजातील अयोग्य आचरण थांबवून उत्तम समाजाची निर्मिती करण्याचे कार्य करत आहे. त्यामुळे अशा संघटनेवर बंदी आणणे चुकीचे आहे. छत्रपती फाऊंडेशनचे संस्थापक श्री. किरण काळे म्हणाले, सनातन संस्था ही सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या मातृस्थानी आहे. ती सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना धर्माचरणाविषयी मार्गदर्शन करते. तेव्हा कोणत्याही कारणामुळे या संस्थेवर बंदी घालण्यात येऊ नये. तसे झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. या परिषदेला श्रीराम सेनेचे संचालक श्री. आनंद कुलकर्णी, विश्‍व हिंदु युवा सेनेचे अध्यक्ष श्री. संतोष विश्‍वकर्मा आदी धर्माभिमानी उपस्थित होते.

नेपाळच्या राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष शब्द हटवला जाणार !

     काठमांडू - नेपाळमधील सर्वपक्षांनी नवीन राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्याला संमती दिली आहे. नेपाळमध्ये लवकरच नवीन राज्यघटना घोषित होणार आहे. नेपाळमधील यूनीफाइड कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल-माओवादी (यूसीपीएन्-एम्) या पक्षाने काही वर्षांच्या संघर्षानंतर २००७ मध्ये धर्मनिरपेक्ष शब्द राज्यघटनेत जोडला होता.
     राज्यघटना समितीने म्हटल्यानुसार अधिकतर लोकांना धर्मनिरपेक्ष शब्दाच्या ठिकाणी हिंदु अथवा धार्मिक स्वातंत्र्य असा शब्द जोडला जावा, असे वाटते. यूसीपीएन्-माओवादी पक्षाचे अध्यक्ष पुष्प कमल दहल उपाख्य प्रचंड यांनी म्हटले आहे की, धर्मनिरपेक्ष शब्द राज्यघटनेला सुयोग्य नाही; म्हणून त्याच्या जागी आम्ही दुसरा शब्द जोडत आहोत. या शब्दामुळे लोकांना त्रास झाला आहे. या शब्दाने लाखो लोकांना दुःख दिले आहे. आम्हाला लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे.

सनातन संस्थेने समाजात आध्यात्मिक चेतना जागृत केली आहे ! - श्री मल्लय्या स्वामी, सिद्धारूढ मठ, राणेबेन्नूरु, कर्नाटक

श्री मल्लय्या स्वामी यांना कन्नड साप्ताहिक सनातन
प्रभातचा अंक भेट देतांना सनातनच्या १. सौ. विदुला
हळदीपूर आणि साधक तसेच पतंजलीचे कार्यकर्ते
      राणेबेन्नूरु (कर्नाटक) - सनातन संस्थेचा परिचय आम्हाला अनेक वर्षांपासून आहे. माझा त्यांच्याशी अतिशय जवळचा संपर्क आहे. ही संस्था समाज, राष्ट्र आणि सनातन भारतीय संस्कृती यांसाठी मोठे कार्य करत आहे. लहान मुलांसाठी बालसंस्कारवर्ग घेऊन त्यांच्यात उत्तम संस्कार बिंबवण्यात संस्थेची प्रमुख भूमिका आहे. यासह संस्थेने समाजात आध्यात्मिक चेतना जागृत केली आहे. निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे समाजाची सेवा करणार्‍या सनातन संस्थेचे कार्य अत्युत्तम असून त्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. या संस्थेचे कार्य असेच निरंतर पुढे चालत राहो, ही शुभेच्छा, असे आशीर्वचन कर्नाटकच्या राणेबेन्नूरु येथील सिद्धारूढ मठाचे श्री मल्लय्या स्वामी यांनी सनातन संस्थेला दिले आहेत. काही हिंदु विरोधकांकडून सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर संस्थेचे साधक आणि पतंजली योग समितीचे कार्यकर्ते यांनी स्वामीजींची भेट घेतली होती. त्या वेळी स्वामीजी बोलत होते.

अखंड महाराष्ट्राच्या सूत्रावरून विधानसभा आणि विधान परिषद येथे विरोधकांचा गदारोळ !

 • स्वतंत्र विदर्भाची मागणी करतात; कारण त्यामुळे अनेक जणांना मंत्री होता येते !
 • अखंड महाराष्ट्रात विदर्भाचा विकास होत नाही, असे म्हणणे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !
 • कुठे स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे आमदार, तर कुठे हे विश्‍वची माझे घर । या वृत्तीचे संत !
 • दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !
        मुंबई, १ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी) - अखंड महाराष्ट्राच्या सूत्रावरून विधानसभा आणि विधान परिषद येथे विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला. विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्तेतील शिवसेनेचे आमदार हे सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणा देत होते. आमदारांनी दोन्ही सभागृहांतील अध्यक्ष आणि सभापती यांच्यासमोरील हौदात जाऊन विरोधकांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे तालिका सभापती जनार्दन चांदूरकर यांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले.

श्री ज्ञानदेव सेवा मंडळ, ठाणे यांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांचा सत्कार

श्री. अभय वर्तक (मध्यभागी) यांचा सत्कार
करतांना डावीकडून ह.भ.प. एकनाथ महाराज सद्गीर,
डॉ. जयकृष्ण शिंदे आणि माजी नगरसेवक ह.भ.प. श्री. सकपाळ

        ठाणे, १ ऑगस्ट (वार्ता.) - येथील श्री ज्ञानदेव सेवा मंडळ, ठाणे यांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा सत्कार करण्यात आला. श्री. वर्तक यांनी श्री ज्ञानदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची ३१ जुलै या दिवशी सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी हा सत्कार केला गेला. या वेळी पुरोगामी संघटना, काही सुपारीबाज पत्रकार आणि तपासयंत्रणांतील काही अधिकारी सनातन संस्थेची कशा पद्धतीने अपकीर्ती करत आहेत, याविषयी श्री. वर्तक यांनी उपस्थितांना सांगितले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पाठीमागे उभे रहा ! - श्री. दिवाकर भट, भारत स्वाभिमान संघटना, चिक्कमगळुरू

शिरसी (कर्नाटक) येथे हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन
व्यासपिठावर डावीकडून कु. स्फूर्ती बेनकनवारी,
श्री. दिवाकर भट, श्री. विवेक पै
     शिरसी (जि. उत्तर कन्नड, कर्नाटक) - संपूर्ण भारतात मी हिंदु आहे, असे छातीठोकपणे सांगणारी केवळ हिंदु जनजागृती समिती आहे. त्याचप्रमाणे देशात हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्य करणारीही केवळ सनातन संस्थाच आहे. अशा हिंदु समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थेच्या विरोधात कोणताही पुरावा किंवा गुन्हा दाखल नसतांना बंदी आणण्याची मागणी करणे, हा अन्याय आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पाठीमागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन चिक्कमगळुरू येथील भारत स्वाभिमान संघटनेचे प्रांतीय प्रभारी श्री. दिवाकर भट यांनी केले.

(म्हणे) परंपरेत श्री विठ्ठलाची प्रक्षाळपूजेची तिथीच निश्‍चित नाही !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी 
तथा प्रांताधिकारी संजय तेली यांचे अविवेकी उत्तर
     ज्या अर्थी वारकरी संप्रदायातील अधिकारी व्यक्ती प्रक्षाळपूजेची परंपरा खंडित झाली, असे म्हणतात, त्या अर्थी त्यांच्याकडे याविषयी पुरावे असणार. त्यामुळे प्रक्षाळपूजेची कोणतीही विशिष्ट तिथी निश्‍चित नाही, असे सांगण्यापूर्वी प्रांताधिकार्‍यांनी यासंदर्भात वारकरी संप्रदायातील संत, महंत आणि हिंदुत्ववादी यांच्याशी चर्चा केली होती का ?      पंढरपूर - आषाढी यात्रा संपल्यानंतर चांगला मुहूर्त पाहून प्रक्षाळपूजा करण्याची परंपरा आहे. त्याकरता कोणतीही विशिष्ट तिथी निश्‍चित करण्यात आलेली नाही. यापूर्वी अनेकदा तत्कालीन सेवाधार्‍यांनी सोयीनुसार मुहूर्त पाहून प्रक्षाळपूजा केल्याच्या नोंदी आहेत. (शास्त्रापेक्षा रूढी बलवत्तर, असे वचन असतांना आषाढी यात्रा संपल्यावर प्रक्षाळपूजा करण्याची रूढी का मोडली ? त्यामुळे हिंदु भाविक दुखावले गेले त्याचे काय ? - संपादक) त्यामुळे या वर्षी शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी भाविकांची पंढरीत असलेली मोठी गर्दी पाहून प्रक्षाळपूजा चांगल्या मुहूर्तावरच पारंपरिकपणे घेण्यात आलेली आहे. यामध्ये कोणत्याही परंपरेचे खंडण झालेले नाही, असे प्रतिपादन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी केले. या वर्षी आषाढी यात्रा संपल्यानंतर श्री विठ्ठलाची प्रक्षाळपूजा करण्याची परंपरा खंडित झाल्यामुळे वारकरी संप्रदाय आणि विविध हिंदुत्ववादी संघटना यांनी आंदोलन उभारले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तेली बोलत होते.

सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तीव्र विरोध करू ! - कुमटा येथील समस्त धर्माभिमानी हिंदू

कुमटा (कर्नाटक) येथे पत्रकार परिषद
पत्रकार परिषदेला उपस्थित धर्माभिमानी हिंदू
      उत्तर कन्नड (कर्नाटक) - सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही त्याला तीव्र विरोध करू, असा निर्धार कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्याच्या कुमटा येथील समस्त धर्माभिमानी हिंदूंनी पत्रकार परिषदेद्वारे केला. या वेळी भाजप जिल्हा युवा मोर्च्याचे अध्यक्ष श्री. सुरज नायक सोनी, भाजपचे नगरसेवक श्री. विश्‍वनाथ नाईक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संचालक श्री. हनुमंत शानभाग, विश्‍व हिंदु परिषदेचे डॉ. व्ही.जी. शेट्टी, विश्‍व हिंदु परिषदेचे तालुका अध्यक्ष श्री. कृष्णा कामत, श्री राधाकृष्ण पै, श्री. सतीश सेट आदी धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची त्यागपत्र देण्याची इच्छा !

     गांधीनगर- गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी त्यागपत्र देणार असल्याचे त्यांच्या फेसबूक अकाऊंटवर म्हटले आहे. या पदावरून आपल्याला मुक्त करावे, असे २ महिन्यांपूर्वीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना म्हटले होते, असे फेसबूक अकाऊंटवर त्यांनी लिहिले आहे.
     आनंदीबेन पटेल पुढे लिहितात की, मी वयाची पंचाहत्तरी लवकरच पार करणार आहे. त्यामुळे मी सर्वोच्च पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. युवा नेतृत्वाला यापुढे संधी मिळावी, मी पक्षात सामान्य कार्यकर्ती म्हणून कार्यरत राहीन.

जोधपूर (राजस्थान) येथे पार पडलेल्या अखिल भारतवर्षीय माहेश्‍वरी महासभेच्या बैठकीत सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार !

ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या
प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू
      जोधपूर - येथील कस्तूरी ऑर्चिड येथे अखिल भारतवर्षीय माहेश्‍वरी महासभेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार करण्यात आला. या ठिकाणी धर्म, अध्यात्म, देवता यांसारख्या विविध विषयांवरील सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याशिवाय देवळात दर्शन कसे घ्यावे ?, कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व, पाश्‍चात्त्य संस्कृती टाळून हिंदु संस्कृतीनुसार आचरण करा, आदी विषयांवरील फलकांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून आलेल्या ५०० हून अधिक जणांनी संस्थेच्या प्रदर्शनाला भेट दिली. अनेकांनी सनातनचे सर्वच ग्रंथ घेण्यासारखे आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर काहीजण पाक्षिक सनातन प्रभातचे वर्गणीदार झाले. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी श्री. संदीपजी काबरा यांचे सहकार्य लाभले.

शिवसेना आआमदार आणि खासदार यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने दिलेले निवेदन

शिवसेना आमदार अजय चौधरी
(उजवीकडे) यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

निवेदन स्वीकारताना
शिवसेना खासदार श्री. अरविंद सावंत (१)

निवेदन स्वीकारतांना शिवसेना
आमदार श्री. सुनील शिंदे (उजवीकडे)

       मुंबई - शिवसेनेचे वरळी येथील आमदार श्री. सुनील शिंदे, परळ येथील आमदार श्री. अजय चौधरी आणि दक्षिण मध्य मुंबई येथील खासदार श्री. अरविंद सावंत यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वांनीच त्यातील विषय पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे आश्‍वासन दिले. निवेदन देतांना सनातन संस्थेच्या सौ. शर्मिला बांगर, समितीचे श्री. प्रसाद मानकर उपस्थित होते.

जेट एअरवेज्च्या प्रगतीत दाऊदचा वाटा होता ! - एका पुस्तकातील गौप्यस्फोट

सरकार या प्रकरणाची चौकशी करणार का ?
      नवी देहली - जेट एअरवेज्चे अध्यक्ष नरेश गोयल आणि कुख्यात आतंकवादी दाउद इब्राहीम यांचे ख्रिस्ताब्द २००० मध्ये जवळचे संबंध होते, तसेच जेट एअरवेज्च्या प्रगतीत कुख्यात जिहादी आतंकवादी दाउद इब्राहिमचा वाटा होता, असा गौप्यस्फोट पत्रकार जोसू जोसेफ यांनी लिहिलेल्या अ फिस्ट ओड व्हल्चर्स - दी हिडन बिझिनेस ऑफ डेमॉक्रसी इन इंडिया या पुस्तकात करण्यात आला आहे. हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. यात गुंतलेले अधिकारी आणि राजकारणी यांची नावेही या पुस्तकात देण्यात आली आहेत. या पुस्तकात म्हटले आहे की,
१. ख्रिस्ताब्द २००२ मध्ये केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी अंजन घोष यांनी केंद्रीय गृहखात्याच्या तत्कालीन सहसचिव श्रीमती संगीता गैरोला यांना एक पत्र पाठवून त्यात नरेश गोयल आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील संबंधाविषयी माहिती दिली होती.
२. जेट एअरवेज्च्या भागभांडवलात दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांचे संबंध असलेल्या एका गुंड टोळीकडून बर्‍याच मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली गेली होती, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले होते.

केंद्रीय दक्षता आयोगाकडे ६ मासांत भ्रष्टाचाराच्या ४० सहस्र ५१७ तक्रारी !

देशात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत वाढ !
      नवी देहली - केंद्रीय दक्षता आयोगाकडे या वर्षी जूनपर्यंत भ्रष्टाचाराच्या ४० सहस्र ५१७ तक्रारी आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ८ सहस्र ३०० तक्रारी अधिक आहेत, अशी माहिती केंद्रीयमंत्री जीतेंद्र सिंह यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात नुकतीच दिली. गेल्या वर्षी जानेवारी ते जून याच कालावधीत आयोगाकडे ३२ सहस्र १४९ तक्रारी आल्या होत्या, तर वर्ष २०१४ च्या पहिल्या ६ मासांत आयोगाकडे भ्रष्टाचाराच्या ६४ सहस्र ४१० तक्रारी आल्या होत्या. याशिवाय वर्ष २०१३ च्या त्याच कालावधीत ३५ सहस्र ३३२ तक्रारी आल्या होत्या, अशीही माहिती सिंह यांनी दिली.डॉ. यज्ञेश्‍वर शास्त्री यांची सांची विद्यापिठाच्या उपकुलगुरुपदी नियुक्ती !

     भोपाळ - मध्यप्रदेशचे राज्यपाल तथा सांची विद्यापिठाचे कुलपती श्री. राम नरेश यादव यांनी प्राध्यापक डॉ. यज्ञेश्‍वर शास्त्री यांची सांची विद्यापिठाच्या उपकुलगुरुपदी नियुक्ती केली आहे, असे विद्यापिठाच्या एका अधिकार्‍याने सांगितले. डॉ. शास्त्री यांनी हिंदु धर्म, तसेच बौद्ध आणि जैन पंथ यांवर १४ ग्रंथ लिहिले आहेत. डॉ. शास्त्री यांचे १२० हून अधिक संशोधनात्मक लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत.

(म्हणे) इस्लामचा आतंकवादाशी संबंध नाही !

पोप फ्रान्सिस यांची गांधीगिरी !
     व्हॅटिकन सिटी - आतंकवादाची तुलना इस्लामशी करता येऊ शकत नाही. जर मी इस्लामी हिंसेची चिंता करत असेन, तर मला ख्रिस्ती हिंसेवरही बोलावे लागेल. जवळपास प्रत्येक धर्मात कट्टर विचारसरणीचा छोटासा गट असतो. तो आमच्या धर्मातही आहे. मला प्रत्येक दिवशी इटलीतील हिंसा दिसते. कोणी आपल्या प्रेयसीला मारले, तर कोणी सासूला, असे विधान ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी युरोपला दोष देत म्हटले की, तो त्यांच्या तरुणांना कट्टरवादाकडे ढकलत आहे.
    नुकतेच इसिसच्या आतंकवाद्यांनी फ्रान्समधील एका चर्चवर केलेल्या आक्रमणात पाद्रीचा गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेवर पोप यांनी वरील विधान केले.

मीडिया आणि अकॅडमी यांनी दडपलेला भारताचा खरा इतिहास तरुण पिढीसमोर आणण्याची आवश्यकता ! - प्रा. कुसुमलता केडिया

नवी देहलीत युरोप : एक भारतीय दृष्टी या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा
डावीकडून श्री. रविशंकर, प्रा. रामेश्‍वर मिश्र,
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि प्रा. कुसुमलता केडिया
     नवी देहली - स्वातंत्र्यानंतर मीडिया आणि अ‍ॅकडमी यांद्वारे भारताचा चुकीचा इतिहास भारतियांना शिकवला गेला आहे. भारतियांच्या मनात ठसवण्यात आलेला हा चुकीचा इतिहास खोडून काढण्यासाठी भारतियांनी युरोपच्या इतिहासाचा भारताच्या दृष्टीने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. या अभ्यासातून भारत हा एक विकसनशील देश आहे किंवा सापांसमवेत खेळणार्‍यांचा देश आहे, हे स्वतःविषयीचे भ्रम दूर होतील, असे प्रतिपादन भोपाळच्या धर्मपाल शोधपिठाच्या संचालिका प्रा. कुसुमलता केडिया यांनी केले. युरोप-एक भारतीय दृष्टी, या विषयावर आधारित २ दिवसीय कार्यशाळेत बोलत होत्या.

चीनच्या टेहळणी विमानांकडून भारतीय सीमेत घुसखोरी !

चीनच्या टेहळणी विमानांना रोखू न शकणारे भारतीय सैन्य चीनच्या आक्रमणाला कसे तोंड देणार ?
     नवी देहली - चिनी सैन्याने उत्तराखंडमधील बारहोटी भागात घुसखोरी करण्याआधी सिंथेटिक अपार्चर रडार (एस्एआर्) बसवलेल्या अतीउंचीवरून उडणार्‍या विमानातून टेहळणी केली होती. एस्एआर्च्या साहाय्याने मोठ्या भूभागावरील सुस्पष्ट छायाचित्रे मिळतात. टूपोलोव्ह टू १५३ एम् या चिनी विमानांनी या वर्षात २-३ वेळा उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांतील काही भागांची टेहळणी केली आहे. ही टेहळणी मागील ३ महिन्यांत झाली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. हे विमान ४० सहस्र फूट उंचीवरून उडते; मात्र रडारवर सापडू नये म्हणून ते ६० सहस्र फूट उंचीपर्यंत जाऊन छायाचित्रे घेऊ शकते. तसेच या उंचीवरून ते संपर्कही साधू शकते.

मेक्सिकोमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिराची तोडफोड : हिंदूंकडून निषेध !

हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
     नेवाडा (अमेरिका) - मेक्सिकोच्या हिदाल्गो येथील हिंदूंच्या एका मंदिराची काही धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. धर्मांधांनी मंदिराच्या इमारतीची तोडफोड केली, तसेच मंदिरातील मूर्ती आणि इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले.
     मेक्सिकोतील शॅपिंगो विद्यापिठाचे प्राध्यापक लुईस पेरेज ल्यूगो म्हणाले, हे आक्रमण काही धर्मांध जेहोवा विटनेसेस (येशू ख्रिस्ताला ईश्‍वराने निर्माण केले असून अन्य सर्व जीवसृष्टीही येशूने निर्माण केली असल्याचे मानणारे ख्रिस्ती) यांनी केले आहे. तथापि प्राध्यापक लुईस पेरेज ल्यूगो यांचा हा आरोप मेक्सिकोतील ख्रिस्ती समाजाच्या प्रवक्त्याने फेटाळून लावला आहे. अमेरिकेतील हिंदूंनी मंदिरावरील आक्रमणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आणि राज्यपाल यांनी या प्रकरणी लक्ष घालून हल्लेखोरांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे.राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस !

 • लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील नद्या दुथडी भरून वाहण्यास प्रारंभ
 • मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारा विहार तलाव पाण्याने पूर्ण भरला
        पुणे, १ ऑगस्ट - राज्यातील मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्र यांसह बहुतांश भागांत पावसाने ३० जुलैपासून पुनरागमन केले आहे. विदर्भात मुसळधार पाऊस चालू असल्याने अनेक भागांतील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दुष्काळग्रस्त असलेल्या मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पाऊस पडत आहे. त्यामुळे लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील पाणीटंचाई दूर झाली आहे. नगर आणि नाशिक या जिल्ह्यांच्या अनेक भागांत पाऊस पडत आहे, तर मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारा विहार तलाव पाण्याने पूर्ण भरून गेला असून पाणी ओसंडून वहात आहे.
        मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांचा काही भाग, तर संभाजीनगर, विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या भागांत मुसळधार पाऊस पडला आहे. कोकणातील सर्वच भागांत मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. ठाण्याच्या पूर्व भागातही पावसाचा जोर कायम आहे.

मातृभूमी, गोमाता आणि महिला यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय ! - कु. प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र राज्य संघटक, रणरागिणी शाखा

तुळजापूर येथे हिंदूसंघटन मेळावा 

दीपप्रज्वलन करतांना कु. प्रतीक्षा कोरगावकर

         तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १ ऑगस्ट (वार्ता.) - राष्ट्राची सद्यस्थिती अतिशय विदारक असून मातृभूमी, गोमाता आणि महिला यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र्र हाच एकमेव पर्याय आहे, असे ठाम मत रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी मांडले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ जुलै या दिवशी तुळजापूरमधील काटी येथे पार पडलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात त्या बोलत होत्या.

(म्हणे) पॅलेट गनचा वापर थांबवा ! - माकप

हुतात्मा भारतीय सैनिकांविषयी नव्हे, तर आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍या
 दंगलखोर धर्मांधांविषयी प्रेम दाखवणार्‍या साम्यवाद्यांना कारागृहात का डांबू नये ?
     नवी देहली - आतंकवादी बुरहानी वानी याला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये उसळलेला हिंसाचार अद्याप आटोक्यात येत नाही. हिंसक जमावावर सुरक्षा दलांकडून होणार्‍या पॅलेट गनचा (छर्‍यांच्या बंदुकांचा) वापर थांबवा, तसेच पाकिस्तानशी चर्चा चालू करून काश्मीरविषयीच्या सध्याच्या परिस्थितीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू करावेत. कारण वाटाघाटी हाच या समस्येवरचा उपाय आहे, असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात आले आहे. (काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या संदर्भात पाकशी कशाला चर्चा करायची ? अशी मागणी करणारा पक्ष भारताचा कि पाकचा ? चीनमध्ये पाऊस पडल्यावर भारतात छत्री उघडणारा पक्ष कधीतरी देशाशी एकनिष्ठ असेल का ? - संपादक)

दुचाकी चालवाल, तर तिच्यासह जिवंत जाळू !

पीडीपी-भाजपच्या शासन काळातील काश्मीरची दयनीय स्थिती !
काश्मीरमध्ये तरुणींच्या विरोधात तालिबानी भित्तीपत्रके !
     श्रीनगर - श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी मुलींनो, दुचाकी चालवाल, तर दुचाकीसह जिवंत जाळू !, अशी धमकी देणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्‍या देशद्रोह्यांकडून ती लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फ्रीडम मूव्हमेंट ऑफ काश्मीर व्हॅली या नावाच्या संघटनेकडून ती लावण्यात आली आहे. या पत्रकांमध्ये वरील संघटनेने म्हटले आहे की, काश्मीर खोर्‍यातील बंधू आणि भगिनींनो, काश्मीर आपला असून याचा निर्णय आम्ही घेऊ. काश्मीरमध्ये सध्या चालू असलेल्या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा. काश्मीरविरुद्धची लढाई संपेपर्यंत दुकाने बंद ठेवावीत. काश्मीरमधील कोणा नागरिकांच्या घरांमध्ये खाण्याच्या वस्तू नाहीत, असे कोणी नाही; परंतु असे कोणी असल्यास आमच्याशी संपर्क साधावा, यासाठी आम्ही साहाय्य करू, असेही लिहिण्यात आले आहे.
१० वर्षांच्या मुलांकडून वृद्धांना मारहाण
     काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांकडून बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. या वेळी एखाद्या वृद्ध दुकानदाराने दुकान उघडण्याचा प्रयत्न केला, तर १० वर्षांचा मुलगाही त्यांना मारहाण करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच विवाहासाठी जाणार्‍या मुलींना अडवण्यात येऊन त्यांच्या कपड्यांविषयी प्रश्‍न निर्माण केला जात आहे.

आम्ही डॉ. झाकीर नाईक यांच्यामुळे आतंकवादासाठी प्रेरित झालो !

 • देशद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात ५५ जणांकडून ढळढळीत पुरावा हाती असतांना सरकार तत्परतेने कारवाई का करत नाही ?
 • अटकेत असलेल्या ५५ आतंकवाद्यांचे म्हणणे !
        मुंबई - आतंकवादाच्या विविध आरोपांखाली अटकेत असलेल्या ५५ जणांनी डॉ. झाकीर नाईक यांच्यामुळे प्रेरित झाल्याचे सांगितले आहे. हे सर्व आरोपी सिमी, लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन आणि इसिस या संघटनांसाठी काम करतांना पकडले गेले होते. यात ३ पोलिसांचाही समावेश आहे. (असे पोलीस असणारी पोलीस यंत्रणा कधीतरी आतंकवाद संपुष्टात आणू शकणार का ? - संपादक) ढाका आक्रमणातील आतंकवाद्यांनीही डॉ. झाकीर नाईक यांच्या संदर्भात असेच विधान केले होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई पोलीस, राज्य आतंकवादविरोधी पथक, तसेच अन्य केंद्रीय यंत्रणा यांनीही केलेल्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. (सनातन संस्थेच्या विरोधात बोलणार्‍या निधर्मीवाद्यांची तोंडे आता गप्प का ? - संपादक)

म्हणे, कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर आणि कॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा खरा मास्टरमाईंड कोल्हापुरात !

स्वतःला अन्वेषण यंत्रणांपेक्षा मोठ्या 
समजणार्‍या स्मिता पानसरे यांनी उधळली मुक्ताफळे !
       पलूूस (जिल्हा सांगली), १ ऑगस्ट (वार्ता.) - कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर आणि कॉ. कलबुर्गी यांच्या हत्या करणारे आणि त्यांचे मास्टरमाईंड (सूत्रधार) कोल्हापुरातच आहेत. याची सर्व माहितीही पोलीस यंत्रणेला मिळाली आहे; मात्र खर्‍या मास्टरमाईंडचा शोध घेण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती वापरली जात नाही. सध्याचे शासन या हत्याकांडाच्या मागे असलेल्या जातीयवादी संघटना आणि त्यांचे साधक यांना पाठीशी घालत आहे, असा आरोेप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य संघटक कॉ. स्मिता पानसरे यांनी पलूस येथे पत्रकार परिषदेत केला.
       कॉ. स्मिता पानसरे पुढे म्हणाल्या, डॉ. तावडे यांच्या पत्नीने त्यांच्याच घरात कॉ. पानसरे यांच्या हत्येचा कट शिजल्याची स्वीकृती दिली आहे, तर यापूर्वी साक्षीदार संजय साडवीलकर याने या हत्येत सहभागी असलेल्या साधकांची इत्थंभूत माहिती संबंधित पोलीस अधिकार्‍यांना दिली होती. लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा आणि या प्रकरणात सापडलेल्या लोकांना बाजूला काढण्याचा शासनाचा डाव आहे. या प्रकरणातील खर्‍या आरोपींना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत कायदेशीर लढाई तर लढूच; पण आता रस्त्यावर उतरूनही लढाई करू. (अशी भाषा करणार्‍या स्मिता पानसरे यांचा अन्वेषण यंत्रणांवर विश्‍वास नाही, असे समजायचे का ? कि त्यांच्या मनाप्रमाणे पोलीस अन्वेषण करत नाहीत; म्हणून केलेला कांगावा समजायचा ? - संपादक)

(म्हणे) राजनाथ सिंह यांना पाकमध्ये येऊ देऊ नका ! - आतंकवादी हाफिज सईद

        इस्लामाबाद - भारताचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पाकिस्तानमध्ये येऊ देऊ नये, असे आवाहन जिहादी आतंकवादी हाफिज सईद याने पाक सरकारला केले आहे. सार्क परिषदेसाठी राजनाथ सिंह ३ ऑगस्टला पाकच्या दौर्‍यावर जाणार आहेत. काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर त्याने हे वक्तव्य केले आहे. काश्मीरमधील निष्पाप नागरिकांची हत्या होण्यासाठी राजनाथ सिंह उत्तरदायी आहेत. ते इस्लामाबादला आले, तर देशभर आंदोलन करण्यात येईल.

चीनने अण्वस्त्र प्रसारबंदी कायद्याचे उल्लंघन करून पाकला दिल्या अणुभट्टया !

मुठभर आतंकवाद्यांवर नियंत्रण मिळवू न शकणारा 
भारत चीनला दरडावण्याचेही धाडस करू शकत नाही !
        नवी देहली - २०१० मधील अण्वस्त्र प्रसारबंदी कायद्याच्या (न्युक्लिअर नॉनप्रोलिफरेशन ट्रिटी (एनपीटी) समिक्षा परिषदेमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रस्तावाचे उल्लंघन करत चीनने पाकिस्तानला अणुभट्ट्या दिल्या आहेत. अण्वस्त्र प्रसारबंदीची जागतिक संस्था असलेल्या आर्म्स कंट्रोल असोसिएशनने (एसीएने) तिच्या एका अहवालात चीनने या कराराचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.

जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेत निवेदन सादर !

हिंदु जनजागृती समितीची 
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा चळवळ
       सांगली, १ ऑगस्ट (वार्ता.) - प्लास्टीकच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा, तसेच अन्य बाबींसाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्त, तसेच जिल्हापरिषदेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी महापालिकेत आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी झेंडा विक्रेत्यांना नोटीस काढणे, तसेच महापालिका शिक्षण मंडळाकडेही निवेदन पाठवत असल्याचे सांगितले.

मद्यबंदीसाठी आझाद मैदानात महिलांचे आंदोलन !

     ठाणे - यवतमाळ, बुलढाणा आणि नगर या जिल्ह्यांतील महिलांनी अस्तित्व संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात मद्यबंदी व्हावी, यासाठी नुकतेच आझाद मैदानात आंदोलन केले. आम्ही मागील ३ वर्षांपासून ही मागणी करत असून शासन आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, अशी खंत आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केली.
     मद्यबंदी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना स्वाक्षर्‍यांचे निवेदनही देण्यात आले आहे. मद्यबंदी न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी या वेळी महिलांनी दिली. मद्यबंदी न करणार्‍या शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. संघटनेच्या वतीने मद्यबंदीसाठी जिल्ह्यांमध्ये महिलांचे प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच विविध ठिकाणी मद्यबंदीसाठी आंदोलने करण्यात आली असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा सौ. प्रेमलता वाघ-सोनोने यांनी शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्यातील दिघी आणि भोर येथील हिंदूसंघटन मेळाव्यातून हिंदूंचा जागर !

दिघी (पुणे) येथील मेळावा
सनातन संस्थेवरील प्रस्तावित बंदी म्हणजे संपूर्ण हिंदु समाजावर संकट ! 
- हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड
ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड
     पुणे, १ ऑगस्ट (वार्ता.) - सध्या देशात भगव्या आतंकवादाच्या खोट्या नावाखाली हिंदूंची छळवणूक केली जात आहे. देशात जर भगवा आतंकवाद असता, तर देशात फक्त भगवेच राहिले असते. आज देशात हिंदुत्ववादी सरकार असूनही हिंदु संघटनांवर बंदीची भाषा वापरली जाते; पण शिखांच्या दंगलीप्रकरणी काँग्रेसवर बंदीची भाषा केली जात नाही. सनातन संस्थेवरील प्रस्तावित बंदी हे सनातनवरील संकट नसून संपूर्ण हिंदु समाजावरील संकट आहे. हिंदु समाज विखुरण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून ते फार काळ टिकणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्र्रीय युवा क्रांतिकारी प्रखर हिंदू प्रवक्ता हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड यांनी केले. दिघी येथील राघव मंगल कार्यालयात ३१ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी समितीचे श्री. पराग गोखले आणि रणरागिणी शाखेच्या कु. अश्‍विनी कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.

फलक प्रसिद्धीकरता

जगभरातील हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
     मलेशियात मंदिरांवरील वाढलेल्या आक्रमणांच्या घटनांनंतर आता मेक्सिको देशाच्या हिदाल्गो राज्यातील एका मंदिरावर काही धर्मांधांनी नुकतेच आक्रमण केले. यात मंदिरातील मूर्तीं उखडून फेकून देण्यात आल्या.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Malaysiake bad ab Mexicoke mandirpar dharmandhoka akraman, devtayoki murtia todi gayi.
Dharmapar ho rahe aghatopar ek hi upay- Prabhavi Hindusangathan
जागो !
    मलेशिया के बाद अब मेक्सिको के मंदिर पर धर्मांधों का आक्रमण, देवताआें की मूर्तियां तोडी गईं.
धर्म पर हो रहे आघातों पर एक ही उपाय - प्रभावी हिन्दूसंगठन !

सनातन हिंदु संस्कृती टिकवण्याचे दायित्व आपल्या सर्वांवर ! - रघुजीराजे आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हिंदूसंघटन मेळावा !
(डावीकडून) सर्वश्री विक्रम भावे,
योगेश ठाकूर, रघुजीराजे आंग्रेे
     रामनाथ (अलिबाग) - सनातन हिंदु संस्कृतीचा पाया पक्का असल्याने अनेक आक्रमणे होऊनही सनातन धर्म टिकून आहे. आजपर्यंत हिंदु धर्मावर विविध आक्रमणे झाली. धर्म टिकून रहाण्यासाठी पुढील पिढीला मार्गदर्शन करण्याचे दायित्व आपल्या सर्वांवर आहे. आज मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळे आपण मानसिक गुलामगिरीत अडकलो आहोत. त्यातून मुक्त होऊन स्वत्वाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज श्री. रघुजीराजे आंग्रे यांनी केलेे. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हिंदु जनजागृती समितीने ३१ जुलै या दिवशी येथे आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते. समितीचे श्री. योगेश ठाकूर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. 
राष्ट्र-धर्मकार्याच्या दिशेसाठी आढावा बैठक ! 
दिनांक : ३ ऑगस्ट २०१६
स्थळ : ब्राह्मण आळी, श्रीराम मंदिर, रामनाथ (अलिबाग) वेळ : सायंकाळी ६ 

राष्ट्रप्रेमी सनातनचा छळ थांबवावा !

नाशिक येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात मागणी
आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
   नाशिक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी राष्ट्रप्रेमी सनातनचा छळ थांबवण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, या मागणीसाठी ३० जुलै २०१६ या दिवशी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी ४ ते ५ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडेकर यांना निवेदन देण्यात आले.
दैनिक सनातन प्रभात 
सनातन गौरव विशेषांक

सनातनच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने सनातनचे 
अद्वितीय कार्य आणि वैशिष्ट्ये सांगणारा रंगीत विशेषांक
प्रसिद्धी दिनांक
: ७ ऑगस्ट २०१६
विशेषांकात प्रसिद्ध करण्यात येणारे लेख
 •  सनातनच्या २५ वर्षांच्या कार्याचे सिंहावलोकन
 •  सनातनचे प्रचंड वेगाने वाढणारे प्रसारकार्य
 •  सनातनच्या आश्रमांचे सुव्यवस्थापन
 •  संत, मान्यवर आणि हिंदुत्ववादी यांनी गौरवलेला सनातन परिवार
       ... यासह अन्य वैशिष्ट्यपूर्ण लिखाण !
सनातनच्या सर्व व्यापी कार्याचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी आपली मागणी आजच नोंदवा !
संपर्क क्रमांक : ८४५१००६०३१, ९४०४९५६०८३

देशभर गोवंश हत्याबंदी कायदा करायला हवा !

    गायींमध्ये ३३ कोटी देवतांचा वास असल्याने ती हिंदूंना पवित्र आहे. गायीमधील आध्यात्मिक गुण अन्य प्राण्यांत नाहीत. त्यामुळे हिंदू तिची देवता म्हणून पूजा करतात. आपला देश पूर्वी गोपूजकांचा देश म्हणून ओळखला जात असे. तेव्हा गायींमुळे भारतियांचे जीवन इतके समृद्ध होते की, येथे सोन्याचा धूर निघत होता; मात्र साक्षात् भगवान श्रीकृष्णाने पूजलेल्या गोमातेची स्थिती आताच्या कलियुगात अत्यंत विदारक झाली आहे. स्वातंत्र्याच्या वेळी ३४ कोटी असलेले गोधन आज केवळ साडेतीन कोटी राहिले असून गायीच्या १२८ पैकी केवळ १८ जाती उरल्या आहेत. गोवंशियांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
     हिंदूंनी हिंदुत्व हा आपला प्राण कुडीतून बाहेर काढून ठेवला आणि ते जिवंतपणाच्या हालचाली करू लागले; परिणामी हिंदूंचा सांगाडा झाला आहे. - श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
     स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्वाचे विचार आणि लोकमान्य टिळक यांचे सर्वसमृद्ध ज्ञान यांची हिंदूंना आवश्यकता आहे ! - कै. मिलिन्द गाडगीळ, ज्येष्ठ युद्धपत्रकार

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

     एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या विरामचिन्हांमुळे पालटणारे वाक्याचे अर्थ सांगणारे हे सदर !धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून 
घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

राष्ट्र्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही

    जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे. 
- समर्थ रामदास स्वामी (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

समर्पणभावाने सेवा करणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. (सौ.) मिनू रतन !

डॉ. (सौ.) मिनू रतन
     डॉ. रवि रतन आणि त्यांच्या धर्मपत्नी डॉ. (सौ.) मिनू रतन हे रामनाथी आश्रमात अरोमा थेरपी विषयासंदर्भात कार्यशाळा घेण्यासाठी आल्यानंतर अवघ्या ४ - ५ दिवसांत डॉ. (सौ.) मिनू रतन आश्रमातीलच एक झाल्याचे जाणवले. डॉ. (सौ.) मिनू रतन यांच्यातील सहजता, विनम्रता, वात्सल्यभाव, प्रीती, प.पू. गुरुदेवांप्रतीचा भाव, सेवेप्रतीचा समर्पणभाव, हसत खेळत शिकवणे आदी गुण मला भावले. 
१. सहजता 
     डॉ. (सौ.) मिनू रतन यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या कार्यशाळेत मी आणि अन्य काही जण सहभागी झालो नव्हतो. त्यांनी हे समजून घेऊन सर्व विषय थोडक्यात समजावून सांगितला. त्यामुळे मला पुढील विषय समजणे सोपे झाले. त्या कार्यशाळा झाल्यानंतर लगेचच आमच्यात मिसळून जातात. त्या कुठेही स्वतःचे वेगळेपण जपतांना दिसत नाही.

श्री नवनाथ संप्रदायातील महान योगी प.पू. सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज यांचे नगर येथील शिष्य पू. प्रा. अशोक नेवासकर यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

डावीकडून सौ. हेमलता नेवासकर, श्री. कृष्णा बाळासाहेब
केंगे, पू. प्रा. अशोक नेवासकर, सौ. अरुंधती केंगे आणि
सनातन प्रभात नियतकालिकांची माहिती देतांना
सनातनच्या डॉ. (सौ.) नंदिनी सामंत
     रामनाथी (गोवा) - श्री नवनाथ संप्रदायातील महान योगी प.पू. सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज यांचे नगर येथील शिष्य तथा जीवनगौरव या पुरस्काराने सन्मानित पू. प्रा. अशोक नेवासकर यांनी त्यांची धर्मपत्नी सौ. हेमलता नेवासकर यांच्यासह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी सनातनच्या साधिका डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांविषयक कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन याची माहिती दिली. या वेळी त्यांच्यासमवेत नगर येथील सनातनचे साधक श्री. कृष्णा बाळासाहेब केंगे आणि सौ. अरुंधती केंगे होते.

चीनने मुसलमानांवर घातलेले निर्बंध

चीनला कळते, ते भारतातील एकाही राजकीय पक्षाला का
 कळत नाही ? त्याचे राष्ट्रावर मुळीच प्रेम नाही, हे यातून सिद्ध होते !
     मुसलमान पुरुषांना दाढी ठेवण्यास बंदी आहे. दाढीमुळे समाजात भीती पसरते, असे तेथील सरकारला वाटते. (संदर्भ : पॅट्रीयट्स फोरम्)

जीवनात पदोपदी शिकवून आणि प्रीतीचा वर्षाव करून साधक म्हणून घडवणार्‍या गुरुमाऊलीच्या चरणी सौ. श्‍वेता क्लार्क यांनी अर्पण केलेली कृतज्ञतासुमने !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
         प.पू. गुरुदेवांचे वर्णन करणे आणि त्यांनी माझ्यासाठी अन् इतरांसाठीसुद्धा जे काही केले त्याविषयी शब्दांत सांगणे, म्हणजे माझ्यासारख्या क्षुद्र जिवाने साक्षात् श्रीविष्णूचे वर्णन करण्याप्रमाणे आहे. मला जे वाटते, ते सांगण्यासाठी शब्दांना पुष्कळ मर्यादा येतात. प.पू. गुरुदेवांंनी जे काही आमच्यासाठी केले आहे अन् करत आहेत, त्यासाठी मी त्यांना केवळ प्रार्थना करून सतत कृतज्ञता व्यक्त करू शकते. प.पू. गुरुदेवांमुळे याच जन्मात मोक्षप्राप्ती होण्याची मला शाश्‍वती आहे, असे मला वाटू लागले. पूर्वी अंधारमय असलेल्या माझ्या आयुष्यात ते प्रकाश बनून आले आणि त्यांनी मला त्यातून बाहेर काढले. अध्यात्म म्हणजे काय ? हे मला खर्‍या अर्थाने शिकवले.
१. लहानपणापासून शिवाची उपासना करणे, विराट रूपातील भगवान शिवाला ईश्‍वरप्राप्तीसाठी साहाय्य करण्याविषयी प्रार्थना केल्यावर त्याने स्मित करून आश्‍वस्त करणे आणि सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी शिवाचे ते रूप पुन्हा दिसणे : पूर्वी मी भगवान शिवाची उपासना करत होते. लहानपणापासून भगवान शिव माझे वडील असून तोच माझी काळजी घेत आहे, असे मला वाटत होते. मी एकटी असतांना गच्चीत जाऊन त्याला प्रार्थना करून त्याच्याशी बोलत असे. त्या वेळी त्याचे विराट रूप माझ्यापुढे येत असे आणि मी त्याला विचारत असे, याच जन्मात मला ईश्‍वरप्राप्ती करून घ्यायची आहे. मी तुझ्यापर्यंत येण्यासाठी तूच मला साहाय्य कर. मला या भौतिक जीवनाचा कंटाळा आला आहे. त्या वेळी तो स्मित करून जणू मला आश्‍वस्त करत असे. हे गुरुदेवा, मी आश्रमात येण्यासाठी निघतांना मला शिवाचे ते रूप पुन्हा दिसले.

रुग्णसेवा कशी करावी ?, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणार्‍या डॉ. (सौ.) मिनू रतन !

     डॉ. (सौ.) मिनू रतन यांनी शिबिरात रुग्णाच्या सप्तचक्रांची लोलक चिकित्सा पद्धतीने तपासणी कशी करावी ? त्यांच्यावर कोणते उपचार करणे आवश्यक आहेत ?, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्या वेळी त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहे.
१. रुग्णांची प्रेमाने विचारपूस करणे 
     डॉ. मिनू रतन रुग्णांची तपासणी करण्यापूर्वी त्यांना अतिशय प्रेमाने प्रश्‍न विचारून बोलते करत होत्या. त्यामुळे रुग्णांना होणारे त्रास ते मनमोकळेपणाने सांगून पूर्ण सहकार्य करत होते, असे जाणवले.
२. साधकांनी लवकर शिकावे, अशी तळमळ 
     डॉ. मिनू रतन यांनी शिबिरातील सहभागी साधकांना लोलक कसा हाताळावा, हे दाखवले. त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवल्यानंतर साधकांना लोलक सप्तचक्रांवर धरून तपासणी करायला सांगितले. तेव्हा साधकांनी उत्साहाने सिद्धता दाखवली आणि यशस्वीपणे लोलक हाताळला. यातून त्यांची साधकांनी लवकर सिद्ध व्हावे अशी तळमळ आहे, असे जाणवले.

सतत इतरांचा विचार करणार्‍या आणि कृतज्ञताभावाने सेवा करणार्‍या डॉ. (सौ.) मिनू रतन !

१. इतरांचा विचार करणे 
अ. डॉ. (सौ.) मिनूताई दिवसभर व्यस्त असतात. त्यातही त्या सतत इतरांचा विचार करतात. त्या साधकांना सोयीची असलेली वेळ पाहून त्या वेळेत उपचार करतात. त्या स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य देतात, उदा. आधी साधकांना बसायला सांगून मग स्वतः बसतात. जेवण वाढून घेतांना आधी साधकाला वाढून मग स्वतः वाढून घेतात
आ. एकदा त्या भोजनकक्षात महाप्रसाद ग्रहण करत असतांना त्यांना बालसाधिका देवांशी दिसली. त्यांनी लगेच तिच्या आईला देवांशीला कोणते त्रास होतात, ते विचारून घेऊन तिच्या कोणत्या चक्रांवर उपचार करायला हवेत, ते सांगितले.

आश्रमजीवनाची ओढ असलेल्या आणि व्यष्टी साधना गांभीर्याने करणार्‍या डॉ. (सौ.) मिनू रतन !

१. प्रेमभाव 
     एका साधिकेला आध्यात्मिक त्रास आहे. सौ. मिनूताई त्या साधिकेवर उपचार करत असतांना तिचा त्रास वाढला, तरी त्या स्थिर होत्या. त्यांनी आम्हा सर्वांना प्रार्थना करायला सांगितली. मिनूताईंनी साधिकेचा त्रास समजून घेऊन तिला प्रेमाने सांगितले, तुझा त्रास न्यून होणार आहे. त्यांनी असे सांगितल्यावर ती साधिका शांत झाली. पूर्ण उपचार झाल्यावर त्या साधिकेला चांगले वाटत होते. सौ. मिनूताईंनी उपचार संपल्यावर आमच्यापैकी एकीला त्या साधिकेला खोलीत घेऊन जायला सांगितले.

उपजतच साधकत्व आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव असलेल्या डॉ. (सौ.) मिनू रतन !

     मला डॉ. (सौ.) मिनू रतन घेत असलेल्या अरोमा थेरपीच्या अभ्यासवर्गाला बसण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले.
१. व्यवसाय साधना म्हणून करणे 
अ. डॉ. (सौ.) मिनू रतन या रुग्णांना तपासतांना त्यांना होणारा त्रास समजून घेऊन त्यावर उपचार करतात. केवळ औषधांनी हे त्रास दूर करणे शक्य नाही, तर त्याला नामजपाची जोड असणे आवश्यक आहे, तरच उपचार परिणामकारक होतात, अशी त्यांची श्रद्धा आहे. 
आ. त्यांना एका साधिकेने विचारले, तुम्ही दिवसभर रुग्णांवर उपचार करता. या उपचार पद्धतीच्या परिणामकारकतेसाठी काही वेळ स्वतः बसून ध्यानधारणा करता का ? तेव्हा त्या म्हणाल्या, मी उपचार करत असतांना प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप याकडे कटाक्षाने लक्ष देते. वेगळे असे काही करत नाही. देवच सर्वकाही करवून घेत असल्याने रुग्णावर करत असलेल्या प्रत्येक उपायाचे सत्र झाल्यावर मी आठवणीने कृतज्ञता व्यक्त करते.

आपत्काळात तेल आणि खडे न मिळाल्यास अ‍ॅरोमाथेरपीच्या उपचारांसाठी खड्यांऐवजी देवतांची चित्रे उपयोगात आणून प्रार्थना करू शकतो, असे देवाने सुचवणे

     अ‍ॅरोमाथेरपीत कुंडलिनीतील चक्रांची शुद्धी करतांना वेगवेगळ्या प्रकारचे खडे (स्टोन्स) चक्रांवर ठेवले जातात, तसेच प्रत्येक चक्रासाठी विशिष्ट पद्धतीचे तेल वापरले जाते. या उपचार पद्धतीच्या संदर्भात पू. संदीपदादांना सांगितल्यावर ते म्हणाले, येणार्‍या आपत्काळात तेल आणि खडे उपलब्ध होतील का ?, याचा विचार करायला हवा. 
       तेव्हा देवाने सुचवले, चक्रांच्या शुद्धीसाठी गोमूत्र, विभूती, तसेच प्रत्येक चक्रावर खड्यांऐवजी देवतांची चित्रे आणि आज्ञाचक्रावर प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र लावू शकतो. देवतांना चक्राच्या ठिकाणी जागृत होण्यासाठी (सिद्ध होण्यासाठी) प्रार्थना करू शकतो. 
- श्री. रामदास कोकाटे आणि एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०१६) 
सनातनच्या रामनाथी आश्रमात कार्यशाळेनिमित्त आलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कॅनडा येथील साधिका सौ. कॅरन रॉद्रीगेज यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

सौ. कॅरन रॉद्रीगेज
        स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशनच्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) विदेशी साधकांसाठी सनातनच्या रामनाथी आश्रमात २६.७.२०१६ ते १.८.२०१६ या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सौ. कॅरन रॉद्रीगेज यांना पुढील अनुभूती आल्या.
१. उद्घाटन प्रसंगी शंखनाद होत असतांना शंखातून स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे : कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या वेळी साधक-पुरोहित शंख वाजवत होते. तेव्हा त्या शंखातून वलयांप्रमाणे स्पंदने निघून ती सर्व साधकांच्या दिशेने जात आहेत, असे दिसले. ती स्पंदने त्यांच्या शरिरातील प्रत्येक पेशीत जाऊन तेथील वाईट शक्तींना नष्ट करत आहेत, असे जाणवलेे.
२. पू. प्रा. अशोक नेवासकर यांच्या दर्शनाने डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागणे : सायंकाळी पू. प्रा. अशोक नेवासकर (नगर येथील नाथ संप्रदायाचे गाढे अभ्यासक) आम्हा विदेशी साधकांना भेटण्यासाठी कार्यशाळेत आले. ते सभागृहात प्रवेश करताक्षणी आनंदाचे तरंग आत येतांना दिसून शांती अनुभवायला आली. ते आले, त्या वेळी मी श्री. दावरदादा यांच्याशी बोलत होते. त्यांना पाहून आम्ही दोघेही निःशब्द झालो आणि आमच्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले.
- सौ. कॅरन रॉद्रीगेज, कॅनडा (२६.७.२०१६)

स्वप्नात पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् हे साधक आणि आश्रम यांच्याभोवती तीर्थ शिंपडत असून त्यांच्यावर आकाशातून पुष्पवृष्टी होत आहे, असे दिसणे अन् जाग आल्यावर प्रसन्न वाटणे

        १६.७.२०१६ या दिवशी नेहमीप्रमाणे मी प.पू. पांडे महाराजांकडील सेवा पहाटे ४ ते सकाळी ८ या काळात करून पुन्हा झोपलो. मला अनुमाने सकाळी १० वाजता स्वप्न पडले. स्वप्नात मला मी आणि अन्य २ साधिका अन्नपूर्णा कक्षात सेवा करत आहोत. अकस्मात पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् हातात तीर्थाचे भांडे घेऊन तेथे आलेे आणि त्यांनी लगेच आश्रमाच्या सभोवती तीर्थ शिंपडण्यास आरंभ केला. आम्हाला उद्देशून ते म्हणाले, साधकांचे आणि आश्रमाचे रक्षण होण्यासाठी मी हे तीर्थ शिंपडत आहे. पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् तीर्थ शिंपडत असतांना त्यांच्यावर आकाशातून पुष्पवृष्टी होत होती. ते जसे अकस्मात् आले, तसेच ते संपूर्ण आश्रमाभोवती तीर्थ शिंपडून झाल्यावर अकस्मात् दिसेनासे झाले, असे दिसले. मला जाग आल्यावर ते स्वप्न होते, हे माझ्या लक्षात आले. झोपण्यापूर्वी माझ्या मनाची स्थिती नकारात्मक होती; परंतु जाग आल्यानंतर मनाला आतून पुष्कळ आनंद जाणवत होता आणि प्रसन्न वाटत होते.
- श्री. सचिन हाके, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.७.२०१६)

रामनाथी आश्रमात चालू असलेल्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेहून आलेल्या कु. टिना फल्लाह यांना प्रवासावेळी आणि आश्रमात नामजपाच्या वेळी आलेल्या अनुभूती

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात 
२६ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत झालेल्या 
एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने... 
कु. टिना फल्लाह
१. अमेरिकेहून निघतांना शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता जाणवणे, आध्यात्मिक उपायांनी ती न्यून न होणे अन् भारतात प्रवेश केल्याबरोबर अकस्मात् शांत वाटू लागणे : मी अमेरिकेहून विमानाने भारतात येत असतांना माझ्या मनात त्रासदायक विचार येत होते आणि एकंदरितच मानसिक अन् शारीरिक अस्वस्थताही जाणवत होती. त्याच्या निवारणासाठी मी काही आध्यात्मिक उपाय केले; पण काही लाभ झाला नाही. मनात अनावश्यक विचारांचे प्रमाण वाढल्यामुळे ते शांत होत नव्हतेे. काही वेळाने मी कोणताही उपाय न करताच अकस्मात् मला शांत वाटू लागले आणि मनातील विचारांचे प्रमाणही उणावले. मी डोळे उघडून वर पाहिले. तेव्हा तेथील पडद्यावर (मॉनिटरवर) आमच्या विमानाने भारतात प्रवेश केला असल्याचे दर्शवले होते. त्यामुळे माझा भाव जागृत होऊन शारीरिक अस्वस्थता नाहीशी झाली. माझ्यावर उपाय करून मला ही अनुभूती दिल्याविषयी मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

आश्रमातील एका खोलीच्या भिंतींना स्पर्श केल्यावर आलेल्या अनुभूती !

श्री. बोयान बी.
१. मी रामनाथी आश्रमातील एका खोलीच्या भिंतींना स्पर्श केल्यावर भिंती मला त्यांच्याकडे ओढून घेत असून मी त्यांच्यात सामावून जात आहे, असे जाणवले.
२. त्या वेळी मला उष्णता जाणवली.
३. माझ्या शरिरावर २० वर्षांपूर्वी आणि ५ वर्षांपूर्वी काही ठिकाणी जखमा झाल्या आहेत. मी भिंतींना स्पर्श केल्यावर त्या जागी मला वेदना जाणवल्या; मात्र त्यानंतर मला त्या ठिकाणी कधीही त्रास जाणवला नाही.
४. माझ्या आज्ञाचक्रावर पुष्कळ दाब जाणवत होता.
- श्री. बोयान बी., क्रोएशिया (२९.१२.२०१५)

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील पारिजातकाच्या झाडांच्या फुलांतील चैतन्यामुळे क्रोएशिया येथील सौ. रेवती बाल्याक यांना आलेल्या अनुभूती

सौ. रेवती बाल्याक
१. फुले आज्ञाचक्रस्थानी धरल्यावर नामजप पुष्कळ चांगला होऊन सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांचे चरण दिसणे, डोक्याचा भाग पिवळ्या चैतन्याने वेढला जाऊन मन आनंदी आणि उत्साही होणे : आज पू. सिरियाकदादांनी आम्हाला पारिजातकाच्या झाडाची फुले दिली. ती फुले मी माझ्या आज्ञाचक्रस्थानी धरल्यानंतर माझा नामजप पुष्कळ चांगला होऊ लागला आणि माझ्यासमोर (सूक्ष्मातून) प.पू. गुरुदेवांचे चरणकमल दिसू लागले. माझ्या डोक्याचा भाग पिवळ्या चैतन्याने वेढला गेला होता. त्यामुळे माझे मन आनंदी आणि उत्साही झाले.
२. सत्राला आरंभ झाल्यानंतर फूल अनाहत चक्रस्थानी धरल्यावर मनातील सर्व भीती नाहीशी होऊन शिकण्याची वृत्ती आणि उत्साह वाढणे : आश्रमात आल्यानंतर कार्यशाळेतील सत्रांमधे साधनेसंदर्भात होणार्‍या आढाव्याची मला भीती वाटत होती. कार्यशाळेच्या सत्राला आरंभ झाल्यानंतर ते फूल न्यास केल्याप्रमाणे अनाहत चक्रस्थानी ठेवावे, असे मला वाटले. मी तसे केल्यानंतर काही वेळाने माझ्या मनातील सर्व भीती नाहीशी झाली. माझी शिकण्याची वृत्ती आणि उत्साह वाढून मला सत्रांतील सूत्रांचे आकलन होऊ लागले, तसेच प.पू. डॉक्टरांप्रती कृतज्ञता वाटू लागली.
- सौ. रेवती बाल्याक, क्रोएशिया (२७.७.२०१६)

मुरबाड (कल्याण) येथील सौ. निर्मला तेलवणे (वय ७९ वर्षे) यांनी ६३ टक्के अन् श्री. राजाराम तेलवणे (वय ८४ वर्षे) यांनी गाठली ६५ टक्के आध्यात्मिक पातळी !

१. सौ. निर्मला राजाराम तेलवणे
१ अ. परेच्छेने वागणे : आजीने वयाच्या दहाव्या वर्षापासून ठाण्याला काका-काकूंकडे राहून शिक्षण घेतले. बाहेर राहिल्यामुळे परेच्छेने वागणे, मन मारून रहाणे, वडीलधार्‍यांचे ऐकणे हे गुण तिच्यामध्ये लहानपणापासूनच आले.
१ आ. समंजसपणा आणि स्वीकारण्याची वृत्ती : तिचे १५ व्या वर्षी लग्न झाले. सासरचे कुटुंब एकत्र असून ते मोठे होते. आजोबांना ७ भाऊ आणि आजोबा सर्वांत लहान होते. त्यामुळे सतत इतरांनी सांगितलेले ऐकावे लागे; पण तिने ते सर्व आनंदाने केले. गाई-म्हशी सांभाळणे, स्वयंपाक, विहिरीचे पाणी आणणे, शेण सारवणे, हे तिने आनंदाने केले.
१ इ. पती हाच परमेश्‍वर हा भाव : लग्न झाल्यापासून आजोबांनी जे सांगितले, ते ती ऐकायची. आजोबा स्वतःचा विचार न करता आपल्याजवळचे इतरांना देत; पण त्यालाही तिने विरोध केला नाही. तिने पती हाच परमेश्‍वर मानून त्यांची सेवा केली.
१ ई. सर्वगुणसंपन्नता आणि निपुणता : तिला गायनाचीही आवड आहे. दळण, कांडण, स्वयंपाक करणे अशी कामे करतांना ती भजने म्हणते. त्यामुळे ती दमत नाही. ती भजनांना स्वतः चाली लावते. एका शिक्षकांनी तिला सांगितले, तू शिकवणी लाव. मी तुला शिकवतो. तिने काका-काकूंकडे पैसे मागायला नकोत; म्हणून ती स्वतःच गाणे शिकली. आजीच्या आवाजात गोडवा आहे. आजी पेटीही शिकली. ती भजनी भंडळात भजने म्हणते, तसेच पेटी-झांजेची साथही देते. आषाढी आणि कार्तिकी पौर्णिमेमध्ये पहाटे देवळात जाऊन काकड आरती करते. स्वयंपाकातही ती निपुण आहे. तिच्यावर अन्नपूर्णादेवी प्रसन्न असल्याचे जाणवते. रांगोळी, शिवणकाम, चित्र काढणे यांतही ती निपुण आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - आषाढ कृष्ण पक्ष चतुर्दशी (१.८.२०१६) उ.रा. ३.१५ वाजता
समाप्ती - आषाढ अमावास्या (२.८.२०१६) उ.रा. २.१५ वाजता
आज अमावास्या आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
     मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हास्यास्पद साम्यवाद !
     आई-वडिलांचेही आपल्या सर्व मुलांवर सारखे प्रेम नसते. असे असतांना साम्यवाद शब्दाला काही अर्थ आहे का ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प.पू. गुरुदेवांना मर्दन करतांना आणि त्यांच्यावर अ‍ॅरोमा उपचार करतांना जाणवलेली सूत्रे

- श्री. रामदास कोकाटे आणि एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०१६)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

यशप्राप्ती
सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय कशाचीही प्राप्ती होत नाही. यश हे नेहमी प्रयत्नांनाच चिकटून रहाते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

स्मार्ट नव्हे सुरक्षित शहरे हवीत !

संपादकीय
     भारतात एकामागून एक बलात्कारांची प्रकरणे समोर येत असतांना, देशात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ?, असा प्रश्‍न सामान्य माणसाच्या मनात आल्यास आश्‍चर्य वाटायला नको. देहलीत एका सोळा वर्षीय मुलीच्या घरात घुसून नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला ठार मारून जाळण्यात आले. उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये रात्री चारचाकी वाहनातून जाणार्‍या एका कुटुंबाला गुंडांनी रोखले. त्यानंतर आई आणि तिची १३ वर्षीय मुलगी यांना गाडीतून बाहेर काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील कोपर्डी, भांबोरा आणि नांदगाव शिंगवे या गावातील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे राज्य हादरले आहे. या सर्व घटनांमध्ये एक सामायिक सूत्र आहे, ते म्हणजे पोलिसांची निष्क्रीयता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn