Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भगव्या आतंकवादाची कल्पना पी. चिदंबरम् यांचीच ! - माजी राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार एस्.डी. प्रधान

अशा माजी मंत्र्यांना आताच्या सरकारने कारवाई करून कारागृहात 
डांबले पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
     नवी देहली - रा.स्व. संघाला गोवून राजकीय लाभासाठी समोर आणली गेलेली देशातील भगव्या आतंकवादाची कल्पना तत्कालीन काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री पी. चिदंबरम् यांची होती, अशी गोपनीय माहिती संयुक्त गुप्तचर समितीचे माजी प्रमुख आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार एस्.डी. प्रधान यांनी दिलेल्या एका मुलाखतीत उघड झाली आहे. काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या भडकाऊ भाषणांमुळे साध्वी प्रज्ञासिंह आणि असिमानंद यांच्यासारखे लोक भगव्या आतंकवादाच्या षड्यंत्राचे बळी ठरले, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले.
एस्.डी. प्रधान यांनी केलेले खुलासे !
१. पाकच्या रावळपिंडीत ओसामा बिन लादेन लपला असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती आणि ती अमेरिकेला भारतानेच दिली.
२. समझौता एक्स्प्रेस आणि अन्य काही बॉम्बस्फोटांची पूर्वसूचना आधीच मिळाली होती. याची कागदपत्रे उपलब्ध आहेत; मात्र या माहितीकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि या स्फोटाचे अन्वेषण वेगळ्याच दिशेने करण्यात आले. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अन्वेषण हाती घेतल्यावर सर्वच पालटेल. त्याचप्रमाणे इशरत जहां प्रकरणाच्या अन्वेषणाचेही झाले. इशरत जहांचे नाव लष्कर-ए-तोयबाच्या संकेतस्थळावर होते. ऑगस्ट २००९ मध्ये असलेल्या धारिका काही उद्देशाने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पालटण्यात आल्या.

हिंदुत्वावरून रान उठवणार्‍यांनी पाकिस्तानात प्रतिदिन मरणार्‍या हिंदूंचा आक्रोश जरा ऐकावा !

दैनिक सामनातील संपादकीयद्वारे उद्धव ठाकरे यांचा निधर्मीवाद्यांना टोला
     मुंबई - भारतात मुसलमान हा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, लोकसभेचा सभापती, क्रिकेट टीमचा कप्तान होतो. राज्यात आणि केंद्रातील मंत्रीपदेही मुसलमानांच्या चरणी अर्पण करून आपले निधर्मीपण सिद्ध करून दाखवण्याची जणू चढाओढच लागलेली असते. या चढाओढीत कधी काळी हिंदुत्वावरून रान उठवणारे आता सामील झाले आहेत. त्यांनी पाकिस्तानात प्रतिदिन मरणार्‍या हिंदूंचा आक्रोश जरा ऐकावा म्हणजे चांगले, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनातील हिंदूंचा आक्रोश ऐका ! या संपादकीयद्वारे निधर्मीवाद्यांना दिला आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे... 
  १. भारतातील एखाद्या भागात मुसलमानांना नुसते खरचटले, तरी पाकिस्तानचे राज्यकर्ते थयथयाट करतात. त्यांना आझम खानसारखे पुढारी साथ देतात. भारतातील अल्पसंख्यांक समुदायाचे म्हणजे मुसलमानांचे जीवन असुरक्षित असल्याची बांग आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर मारली जाते; पण गेल्या काही मासांंपासून पाकिस्तानात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदु समाजावर निर्घृण आक्रमणे चालू असून ती दिवसेंदिवस वाढतच आहेत.

(म्हणे) बुरहान लपल्याची माहिती असती, तर त्याला मारलेच नसते ! - मेहबुबा मुफ्ती

आतंकवाद्याला पोसणारे राज्यकर्ते असणारा देश कधीतरी आतंकवाद नष्ट करू शकेल का ?
     श्रीनगर - कोकेरनाग येथील एका घरात ३ आतंकवादी लपून बसल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. त्याआधारे सैन्याने तेथे कारवाई केली; पण बुरहान त्या घरात आहे, हे सैन्याला आणि पोलिसांनाही ठाऊक नव्हते. त्याची माहिती असती, तर त्याला ठार केले नसते. त्याला एक संधी दिली गेली असती. सैन्यानेच आपल्याला नंतर तशी माहिती दिली, असा दावा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. पीडीपीच्या १७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. तसेच बुरहानवरून आंदोलन करतांना ठार झालेल्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असेही मेहबुबा म्हणाल्या. (दंगलखोरांच्या प्रती सहानुभूती ठेवणार्‍या मेहबुबा यांच्या विरोधात केंद्रसरकार काही कृती करील का ? - संपादक)
     मेहबुबा पुढे म्हणाल्या की, महंमद अफझलला फाशी देण्यापूर्वी येथे आधीच सुरक्षा करण्यात आली होती. त्यामुळे तेव्हा हिंसाचार झाला नव्हता. बुरहान ठार झाल्याचे आम्हाला माहिती नव्हते अन्यथा आम्हीही सुरक्षेसाठी उपाययोजना केली असती.
    जम्मू-काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मेहबुबा यांनी केले.

(म्हणे) गोरक्षकांवर बंदी आणावी !

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींच्या उलट्या बोंबा !
      मुंबई - गायीला गोमाता म्हणता, मग तिला वार्‍यावर का सोडता ? कित्येक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन गायी मरतात. गोवंडीत अशाच फिरणार्‍या २०० गायींकडे का लक्ष देत नाही ? पशूवधगृहांकडे जाणार्‍या गायींना अडवता, त्यांच्या वाहनचालकांना मारहाण करता. अशा गोरक्षकांवर बंदी आणायला हवी. त्यांना असे करण्याचा अधिकार कोणी दिला, अशी गोद्रोही विधाने समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली. इसिसच्या विरोधात मंत्रालयातील पत्रकार भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होेते.
     आझमी पुढे म्हणाले, आमचा इसिसला विरोध आहे. जे इसिसमध्ये सहभागी होतील, त्यांना नरकात जागा मिळेल. मी सर्व मौलानांना विनंती करणार आहे की, प्रत्येक मशिदीत इसिसला विरोध करा. पोलीस चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहेत. इस्लामला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र चालू आहे. (पोलीस काय करतात आणि त्यातून काय निष्पन्न होते, हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे आझमी यांनी काही न बोलणे योग्य ! - संपादक)
देव असल्याने स्वर्ग-नरक या संकल्पना मानतो ! - अबू आझमी
     एका पत्रकाराने आझमी यांना विचारले, तुम्ही स्वर्ग-नरक या संकल्पना मानता का ? जे दिसत नाही, तिला अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार अंधश्रद्धा मानली जाते. त्यावर ते म्हणाले, मी स्वर्ग-नरक या संकल्पना मानतो; कारण देव आहे. त्याच्यामुळेच हे जग चालले आहे.

शिवसेना सनातन संस्थेच्या पाठीशी असून सनातनवर बंदी येऊ देणार नाही ! - रणजित आयरेकर, शिवसेना

कोल्हापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन ! 

आंदोलनात उपस्थित धर्माभिमानी

       कोल्हापूर, २९ जुलै (वार्ता.) - शिवसेनेचे आता स्पष्टच केलेले आहे की, सनातन संस्थेवर बंदी येऊ देणार नाही. शिवसेना सनातन संस्थेच्या पाठीशी राहील. सनातनवर जे बेछूट आरोप केले जात आहेत, ते राष्ट्रीय पातळीवरील षड्यंत्र आहे. पौराणिक काळात वाल्याचा वाल्मिकी झाला; मात्र सध्याचे शासन वाल्मिकीचा वाल्या करत आहेत. संपूर्ण देशात धार्मिक शिक्षण देणारी सनातन संस्था एकमेव आहे. खरोखरच कॉ. पानसरे, दाभोलकर यांना मारले असते, तर शस्त्र मिळाले असते, तसे अद्याप काही मिळाललेे नाही. त्यामुळे शासन दिशाभूल करत आहे; मात्र त्यास जनता बळी पडणार नाही. एकीकडे हिंदूंच्या विरोधात गरळओळ करणार्‍या औवेसी बंधूवर कारवाई होत नाही; मात्र हिंदूंसाठी झटणार्‍या सनातन संस्थेवर कारवाई होते, असे मत शिवसेनेचे युवासेना जिल्हासमन्वयक श्री. रणजित आयरेकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने कोल्हापूर येथील शिवाजी चौक येथे २९ जुलै या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

सनातन संस्थेसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांवर होणारा अन्याय न थांबवल्यास सर्व हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील !

सोलापूर येथील राष्ट्रीय हिंदू 
आंदोलनात हिंदुत्ववाद्यांची चेतावणी 

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी धर्मबांधव

        सोलापूर, २९ जुलै (वार्ता.) - सनातन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश आणि कार्य, तसेच संस्थेवरील कथित आरोपांविषयी संस्थेची भूमिका समजून घेण्याअगोदर संस्थेवर बंदीचा निर्णय घेणे हा सनातनवर मोठा अन्याय होईल. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) कोणत्याही दबावास बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्र्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याविषयी ठोस भूमिका घ्यावी, या मागणीसाठी २९ जुलै २०१६ या दिवशी सोलापूर येथे जिल्हा परिषद गेटजवळ सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अजित रेळेकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी खालील सूत्रे निवेदनात स्पष्ट करण्यात आली.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे धाडस कुणीही करू नये ! - अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर, सोलापूर

    
श्रीमती अपर्णा रामतीर्थकर
सनातन संस्थेवर बंदी आणणार, या नुसत्या विचारांनी तथाकथित समाजवादी, हिंदूंचा बुद्धीभेद करणार्‍या विचारवंतांची कीव करावीशी वाटते. सनातन संस्थेेने हिंदू जागा करण्याचे ठरवले, सत्य हिंदूंसमोर आणले, धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगितले. लव्ह जिहाद, मंदिरांत होणार्‍या चोर्‍या, धर्मांतर, संत-महंतांचा केला जाणारा छळ यांविषयी सामान्य गृहिणींना समजले, ते केवळ सनातनमुळेच ! सनातनने आम्हाला धर्मावर प्रेम करायला शिकवले. धर्माची विटंबना थांबवून धर्मासाठी जगायला शिकवले.
     माझ्यासारखी गृहिणी सनातन प्रभातमधील बातम्या वाचून अस्वस्थ व्हायची. त्यातूनच धर्मकार्य करण्याची अंत:स्फूर्ती निर्माण झाली. अनेक वेळा नातेसंबंधांवर बोलणारी मी तळमळीने धर्माविषयी बोलू लागले. सनातनने व्यक्तींना नव्हे, तर त्यांच्यातील धर्मविरोधी कारवायांना विरोध केला. माणूस निर्माण करणारी संस्था माणसांच्या विरोधात कशी असेल ? संस्थेतील साधकांवर नाहक खोटे-नाटे आरोप करून त्यांना अडकवणे, त्यांची चौकशी करणे, हाच धर्मद्रोह आहे. सनातनमुळे आता आमची तरुण मुले-मुली धर्म समजावून घेऊ लागली आहेत. सनातन संस्थेवर बंदी आणून हिंदूंचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. सनातनवर बंदी आणण्याचे धाडस कोणीही करू नये. अध्यात्माच्या पायावर उभ्या असलेल्या सनातन संस्थेकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये.

गेल्या ६ वर्षांत बांगलादेशातील ९१ सहस्र मुसलमानांचे ख्रिस्त्यांकडून धर्मांतर !

मुसलमानबहुल राष्ट्रातही धर्मांतराचे कार्य अव्याहतपणे 
चालू ठेवणार्‍या ख्रिस्त्यांसारखे धर्मप्रेम किती हिंदूंमध्ये आहे ?
       ढाका - ख्रिश्‍चन टाइम्स च्या संकेतस्थळाने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार मुसलमानबहुल बांगलादेशमध्ये केवळ १ टक्का लोक ख्रिस्ती आहेत; मात्र तेथील ख्रिस्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या ६ वर्षांमध्ये देशभरातील सुमारे ९१ सहस्र मुसलमानांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे.
       बार्टन जॉर्ज यांनी वर्ष १९७५ मध्ये लिहिलेल्या रिलिजन्स ऑफ द वर्ल्ड या पुस्तकातील माहितीनुसार त्या वेळी बांगलादेशमध्ये ६ लक्ष ख्रिस्ती रहात होते. बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ख्रिस्तींची संख्या त्या वेळी ०.४ टक्के होती. अल्पसंख्यांक ख्रिस्तींना इस्लामी आतंकवादांच्या अत्याचारांना सामोरे जावे लागले. या मासाच्या आरंभी म्हणजेच १ जुलैच्या रात्री राजधानी ढाक्यामध्ये केलेल्या आक्रमणाच्या वेळी जिहादी आतंकवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या लोकांकडून कुराणातील आयात म्हणवून घेतल्याची घटना घडली होती. ज्यांना आयाती म्हणता आल्या नाहीत, त्यांना ठार करण्यात आले. सदर आक्रमणात एकूण २९ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांची बैठक

पंढरपुरातील संत, महंत, हिंदुत्ववादी 
संघटना एकवटल्या, आज धरणे आंदोलन
       पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २९ जुलै (वार्ता.) - प्रक्षाळ पूजा प्रतिवर्षी विशिष्ट तिथीला केली जाते. या वर्षी मंदिर समितीने रविवारी करावयाची पूजा परंपरा मोडून सोमवारी केली. मंदिर समितीच्या गोशाळेतील गैरकारभारामुळे अनेक गायींचा गेल्या दोन महिन्यांत मृत्यू झाला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील अनेक पारंपारीक पुजाविधींमध्ये मनमानीपणे पालट केला आहे. नामदेव पायरी, तसेच प्रवेशद्वार याठिकाणी सुरक्षा रक्षक बुट, चप्पल घालून जातात. या अन् अशा अनेक अपप्रकारांच्या विरोधात संत, महंत, हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या असून पंढरपूरातील टांगा स्टॅण्डजवळ शिवाजी चौक येथे शनिवार, ३० जुलै या दिवशी सकाळी ११.३० या वेळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

बालेवाडी (पुणे) येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीचे छत (स्लॅब) कोसळून ९ कामगारांचा मृत्यू

        पुणे, २९ जुलै - येथील बालेवाडी भागामध्ये पार्क एक्स्प्रेस या प्रकल्पातील बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरील छत (स्लॅब) कोसळून ९ कामगारांचा २९ जुलै या दिवशी मृत्यू झाला. (बांधकाम चालू असलेल्या छताची ही स्थिती असेल, तर पूर्ण इमारतीची गुणवत्ता कशी असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) छताखाली काम करत असलेले कामगार ढिगार्‍याखाली सापडले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही कामगार थेट इमारतीवरून खाली फेकले गेले. या घटनेत घायाळ झालेल्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे. हे काम प्राईड पर्पल बिल्डरकडून करण्यात येत असल्याचे समजते. घटनास्थळी पोलीस आणि महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनीही भेट दिली. ते म्हणाले, इमारत बांधणार्‍यांकडे आवश्यक अनुज्ञप्ती होती का आणि बांधकामाच्या वेळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या का, याचाही तपास करण्यात येईल. (केवळ तपास करण्यापेक्षा संबंधितांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! - संपादक)

हिमाचल प्रदेशमधील श्री रघुनाथ मंदिरावर तेथील काँग्रेसच्या सरकारचा ताबा !

  • मंदिरे ही सात्त्विकतेचा स्रोत असल्याने त्यांचे पावित्र्यरक्षण हे धर्मकर्तव्यच होत ! 
  • सर्वच क्षेत्रांचे खासगीकरण होत असतांना केवळ मंदिरांचे सरकारीकरण का ?
भाजपच्या आमदाराकडून कायदेशीर कारवाईची चेतावणी !
        शिमला - हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या मंत्रीमंडळाने एका अधिसूचनेद्वारे कुल्लु येथील ऐतिहासिक श्री रघुनाथ मंदिराचा ताबा राज्यसरकारकडे सुपूर्द केला आहे. (हिंदूंमध्ये असलेल्या संघटनाच्या अभावाचेच हे फलित आहे ! हिंदूंनो, मशिदी अथवा चर्चचा ताबा घेण्यासाठी कधी कोणते सरकार अशी अधिसूचना काढत नाही, हे लक्षात घ्या ! - संपादक) त्यामुळे कुल्लूचे आमदार तथा श्री रघुनाथ मंदिराचे विश्‍वस्त श्री. महेश्‍वर सिंह यांनी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे. श्री रघुनाथ मंदिर ही आमच्या राजघराण्याची मालमत्ता आहे. माझ्या पूर्वजांकडून ती मला मिळाली आहे. शासन त्यावर ताबा कसा काय घेऊ शकते ?, असा प्रश्‍न सिंह यांनी उपस्थित केला आहे. श्री. महेश्‍वर सिंह हे कुल्लूच्या राजाचे वंशज आहेत. सध्या आमदार असलेले सिंह हे भाजपकडून ३ वेळा खासदार म्हणून निवडूनही आले होते.

कारखान्यांकडून गेल्या १० वर्षांपासून पोलीस, महसूल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना हप्ते ! - ग्रामस्थांचा आरोप

भ्रष्टाचाराने पोखरलेला शासकीय विभाग !
राज्यशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार का ?
धाराशिव येथे कारखान्यांतील हाडांच्या भुकटीचे प्रकरण
     धाराशिव - येथील पिंपरी, चिलवडी परिसरात गोवंश आणि अन्य जनावरे यांच्या हाडांपासून भुकटी (पावडर) अन् तेल सिद्ध करणार्‍या ३ कारखान्यांवर २७ जुलै या दिवशी जिल्हा प्रशासनाने कारवाई केली. त्या कारखान्यातून प्रतिदिन ७० टन चरबी मुंबईला नेली जात असल्याचे उघड झाले आहे. हे विष वर्षानुवर्षे डालडा, चीज आणि बटर यांतून उघडपणे विकले जात होते. त्यात गोमांसाचाही समावेश असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. हे कारखाने चालू रहावेत; म्हणून गेल्या १० वर्षांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि महसूल प्रशासन यांना मोठा हप्ता दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. (इतकी वर्षे ग्रामस्थांनी याविरोधात काहीच पावले का उचलली नाहीत ? - संपादक)
     कारखान्यांवर महसूल प्रशासनाने कारवाई केल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने सगळे कारखाने पाडले आहेत. मुंबईकरांना एवढी वर्षे विष खाऊ घालणार्‍या या कारखान्यांना इतकी वर्षे कोणी सांभाळले, असा गंभीर प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

काश्मीर हिंसाचारात २ सहस्र २२८ पोलीस आणि १ सहस्र १०० हून अधिक केंद्रीय राखीव दलाचे सैनिक घायाळ !

काश्मीरमधील हिंसाचारात सहस्रो पोलीस आणि सैनिक यांना घायाळ होऊ देणारा भारत 
शत्रूने आक्रमण केल्यावर त्याचा सामना कसा करणार आहे ?
बुरहान वानीच्या समर्थनार्थ देशद्रोह्यांनी केलेल्या हिंसाचाराचे प्रकरण
घायाळ पोलीस आणि सैनिक यांच्याकडे माध्यमांचे दुर्लक्ष
      श्रीनगर - सैन्याकडून आतंकवादी बुरहान वानीला ठार मारण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचारात अनेक काश्मिरी घायाळ झाल्याचे सांगण्यात येते; मात्र त्यांच्या दगडफेकीत जम्मू-काश्मीरचे पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाचे सैनिकही घायाळ झाले आहेत, याकडे दुर्लक्ष केले गेले. राजकारण आणि मोठ्या प्रमाणात होणारा आंदोलकांचा विरोध यांमुळे सैनिकांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यातही अडचणी येत आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत २ सहस्र २५९ आंदोलक घायाळ झाले आहेत; मात्र त्याबरोबरच २ सहस्र २२८ पोलीस आणि १ सहस्र १०० हून अधिक केंद्रीय राखीव दलाचे सैनिक घायाळ झाले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १२ सैनिक आणि ८ पोलीस अजूनही गंभीर घायाळ असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

अरविंद केजरीवाल मला ठार मारतील !

आपचे आमदार असिम अहमद खान म्हणतात
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सनातनवर आरोप 
करणारे आपचे नेते आशिष खेतान यावर तोंड उघडतील का ?
     नवी देहली - देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या काही कार्यकर्त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली आहे, असा आरोप आपचे आमदार असिम अहमद खान यांनी केला आहे. ९-१० मासांपासून अशा धमक्या येत असल्याचेही खान यांनी म्हटले आहे. याविषयी २ मे या दिवशी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, तसे उपराज्यपाल यांना पत्र पाठवल्याचेही खान म्हणाले.

केरळ राज्यात धर्मांधाने मंदिराकडे जाणारी वाटच बंद करून टाकली !

साम्यवाद्यांच्या राज्यातील हिंदूंची दयनीय स्थिती !
      मलप्पुरम् (केरळ) - जिल्ह्यातील तिरूर तालुक्यात असलेल्या कल्पकांचेरी येथील १ सहस्र वर्षे प्राचीन शंकर नारायण मंदिराची बहुतांश भूमी एका धर्मांधाने हडप करून मंदिराचा रस्ताही बंद करून हिंदूंच्या धार्मिक अधिकारावर आक्रमण केले आहे.
१. हमस्कुट्टी नावाचा मुसलमान या मंदिराच्या जवळ रहात होता. मंदिराच्या ३४ सेंट भूमीपैकी ३० सेंट भूमी त्याने अवैधरित्या बळकावली. या जागेवर कुंपण घालून मंदिराचा रहदारी रस्ताही बंद करून टाकला. त्याला स्थानिक धर्मांधांचीही साथ मिळाली.
२. ही बातमी हिंदू भूमी संरक्षण वेदी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेला कळताच संघटनेचे उपाध्यक्ष श्री. रत्नाकरन् यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली. हमस्कुट्टला याला मुस्लीम लीग आणि अन्य जिहादी संघटनांचाही पाठिंबा आहे, असे श्री. रत्नाकरन् यांच्या लक्षात आले.

म्हैसुरू राजघराण्याचेे सुवर्ण सिंहासन सरकारने कह्यात घेण्याच्या संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

सुवर्ण सिंहासन आणि सोन्याचा हौद यांसाठी सरकारकडून म्हैसुरूच्या
राजघराण्याला लक्षावधी रुपयांचा महसूल देऊन जनतेच्या पैशांची उधळपट्टी !
     नवी देहली - म्हैसुरू राजघराण्याचे सुवर्ण सिंहासन आणि सोन्याचा हौद (हत्तीवर बसण्यासाठी बनवण्यात आलेले सोन्याचे सिंहासन) सरकारने कह्यात घेण्याच्या संदर्भातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सिद्धता दर्शवली आहे. याविषयीची सुनावणी त्वरित घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता श्री. विष्णु जैन यांनी केली होती. यावर न्यायालयाने या याचिकेवर २६ ऑगस्ट या दिवशी सुनावणी करण्याचे मान्य केले आहे.
१. या संदर्भात निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. नंजराजा यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. यात म्हैसुरू येथील सोन्याचे सिंहासन आणि हौद सरकारी संपत्ती असल्याने ते कह्यात घ्यावे, तसेच सरकारकडून म्हैसुरूच्या राणीला देण्यात येत असलेला लक्षावधी रूपयांचा महसूलही बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

कामचुकार सरकारी कर्मचार्‍यांना वार्षिक वेतनवाढ न देण्याचा केंद्रशासनाचा निर्णय

उशिरा सुचलेले शहाणपण !
     नवी देहली - केंद्रशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी अधिसूचना लागू केली आहे; मात्र त्याच वेळी कामचुकारपणा करणार्‍या कर्मचार्‍यांना वार्षिक वेतनवाढ न देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. सेवेच्या १०, २० आणि ३० वर्षांच्या टप्प्यांवर एम्एसीपीच्या निकषानुसार कर्मचार्‍याच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याची योजना कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सेवेच्या पहिल्या २० वर्षांत एम्एसीपी किंवा पदोन्नतीचे निकष प्राप्त न करणार्‍या कर्मचार्‍याची वेतनवाढ रोखून धरण्यात येणार आहे. तसेच कर्मचार्‍याला पदोन्नती आणि वेतनवाढीसाठी अतीउत्तम हा शेरा मिळवणे आवश्यक ठरणार आहे. सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती आणि वेतनवाढ होतच असतात , असा समज कर्मचार्‍यांमध्ये निर्माण झाल्याचे सातव्या वेतन आयोगाने सरकारला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले होते.

(म्हणे) कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास बांधील नाही ! - ब्रिटन

     नवी देहली - कोहिनूर हिरा भारताला परत करण्याला कोणताही कायदेशीर आधार नसून तो परत करण्यास आम्ही बांधील नाही, असे प्रतिपादन ब्रिटनने केले आहे. उपलब्ध माहितीनुसार केंद्रशासन १५ ऑगस्टपूर्वी सर्वोच्च न्यायालयात कोहिनूरसंबंधी शपथपत्र दाखल करणार आहे.
     ब्रिटिशांना कोहिनूर हिरा भारताने भेट म्हणून दिला असल्याने तो परत आणू शकत नाही, असे केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. शिखांबरोबर झालेल्या युद्धांत ब्रिटिशांनी पंजाब कह्यात घेतल्यानंतर पंजाबचे तत्कालीन शासक महाराजा रणजीत सिंग यांनी कोहिनूर हिरा ईस्ट इंडिया कंपनीला भेटीदाखल दिला होता. (याविषयी केंद्रशासनाकडे काही पुरावा आहे का ? कोहिनूर हिरा हा देशवासियांच्या अस्मितेचा प्रश्‍न असून केंद्रशासनाने यासंदर्भात विचारपूर्वक भूमिका घेणे आवश्यक आहे ! - संपादक) पुढे १८५० मध्ये पंजाबचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांना तो भेट म्हणून दिला.

बहुजन समाज पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता रहित करा ! - अधिवक्ता हरिशंकर जैन यांची निवडणूक आयोगाकडे याचिका

अधिवक्ता हरिशंकर जैन
     नवी देहली - बहुजन समाज पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता देण्यात आली आहे; मात्र यासाठीच्या निकषांची हा पक्ष पूर्तता करत नसल्याने त्याची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता रहित करावी, अशी मागणी करणारी याचिका ज्येष्ठ अधिवक्ता हरिशंकर जैन यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
     राष्ट्रीय पक्षाची मान्यता असणार्‍या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत किमान ४ राज्यांमध्ये मिळून ६ टक्के मते मिळणे आवश्यक आहे. तसेच कमीतकमी ४ जागांवर त्यांचा उमेदवार विजयी झालेला असला पाहिजे. शिवाय लोकसभेच्या एकूण जागांच्या २ टक्के जागा जिंकणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त ४ राज्यांमध्ये त्याला राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली असली पाहिजे. या अटींची बसप पूर्तता करत नसल्याचे श्री. जैन यांनी याचिकेत म्हटले आहे.

भारतातील इसिसचा गट २५ देशांतील आतंकवाद्यांच्या संपर्कात होता !

     भारतातील इसिसचे आतंकवादी जगभरातील आतंकवाद्यांच्या संपर्कात रहातात आणि गुप्तचर यंत्रणांना कळत नाही ! तसेच केंद्रीय गृहमंत्री म्हणतात की, भारतातील मुसलमान इसिसमध्ये सहभागी होणार नाहीत !
      नवी देहली - भारतात सध्या अस्तित्वात असलेला इसिसचा गट सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून जगभरातील २५ देशांतील इसिसच्या आतंकवाद्यांशी संपर्कात होता, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने न्यायालयात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात दिली आहे. यात सर्बिया, नेदरलँड, हंगेरी, ब्रिटन, इजिप्त, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवेत, कतार, सुदान, केनिया, नायजेरिया, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, मॉरीशस, बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया, हाँगकाँग, फिलिपींस, जपान, ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे.

पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील २ शिक्षकांकडून २५ विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन

मेकॉलेप्रणित शिक्षणाचे (कु)फलित ! चारित्र्यसंपन्न शिक्षक
 मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आवश्यक !
     पुणे - येथील कात्रज भागातील महानगरपालिकेच्या एका शाळेतील २ शिक्षकांनी २५ विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन केल्याची माहिती उघडकीस आली आहे. (असे शिक्षक हे पालिका आणि शिक्षणक्षेत्र यांना कलंकच आहेत. असे वासनांध शिक्षक चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्रप्रेमी पिढी घडवतील का ? अशांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. - संपादक) पुणे पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षाकडून विविध शाळांमध्ये लैंगिक शोषणाविषयी जनजागृती केली जात आहे. त्याअंतर्गत कात्रज भागातील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनींशी चर्चा केली असता ही गोष्ट उघड झाली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने नोंद घेतली असून अद्याप गुन्हा प्रविष्ट केलेला नाही. (या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून त्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करायला हवा. - संपादक)      महिला साहाय्य कक्षातील पोलीस अधिकार्‍यांनी कात्रज भागातील शाळेला भेट दिल्यावर २५ विद्यार्थिनींनी दोन शिक्षकांविषयी तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने नोंद घेत त्या २ शिक्षकांना २७ जुलै या दिवशी सायंकाळी पोलीस आयुक्तालयात बोलवून चौकशी केली. त्या वेळी २५ पैकी ४ विद्यार्थिनींनी त्या शिक्षकांच्या विरोधात तक्रार देण्यास सिद्ध झाल्या आहेत.

उत्तराखंड शासन संजीवनी बुटीचा शोध घेणार !

रामायण थोतांड असल्याचे म्हणणार्‍यांना यावर काय म्हणायचे आहे ?
  • संजीवनीसाठी समितीची स्थापना  
  • २५ कोटी रुपयांचा व्यय होण्याची शक्यता
     नवी देहली - रावणाच्या विरोधात लढतांना शस्त्र लागून लक्ष्मण बेशुद्ध होऊन पडला होता. तेव्हा त्याच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यांनी हनुमंताला द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी बुटी आणायला पाठवले होते; परंतु नेमकी वनस्पती न समजल्याने हनुमंताने संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला होता आणि त्याद्वारे लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यात आले होते. आता या संजीवनी बुटीचा शोध घेण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे. याकरता २५ कोटी रुपयांचा व्यय केला जाणार आहे. हिमालयातील या वनस्पतीचा शोध घेण्यासाठी उत्तराखंड सरकारने एक समिती नेमली असून या समितीतील अधिकार्‍यांना द्रोणागिरी पर्वतावर जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुढच्या मासापासून ही समिती कामाला प्रारंभ करणार आहे.

अखंड महाराष्ट्राच्या सूत्रांवरून विधानसभा आणि विधान परिषदेत आमदार आक्रमक !

  • परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि आमदार रामचंद्र अवसरे यांचा एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार !
  • विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज १ ऑगस्टपर्यंत स्थगित !
  • पावसाळी अधिवेशन २०१६
      मुंबई, २९ जुलै (विशेष प्रतिनिधी) -
लोकसभेत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी वेगळ्या विदर्भाविषयीचा अशासकीय प्रस्ताव मांडला आहे. हा विषय विधानसभा आणि विधान परिषदेत आल्यानंतर विरोधकांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीला तीव्र विरोध दर्शवला, तर भाजपच्या आमदारांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या. वेगळा विदर्भ आणि अखंड महाराष्ट्राच्या सूत्रावरून दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तीव्र गोंधळ निर्माण झाल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज १ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आले. या वेळी परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते आणि भाजपचे भंडार्‍याचे आमदार रामचंद्र अवसरे यांसह भाजपच्या आमदारांमध्ये जुंपली. विधानसभेत भाजप आमदारांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्यानंतर श्री. दिवाकर रावते त्यांच्या अंगावर धावून गेले. या वेळी जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन आणि भाजप आमदार श्री. राम कदम यांनी त्यांना अडवले.

मंदिरात प्रवेश मिळत नसल्याच्या कारणावरून तमिळनाडू येथील दलित कुटुंबांनी घेतला धर्मांतर करण्याचा निर्णय !

असे प्रकार कायमचे रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हाच एकमेव पर्याय आहे !
     चेन्नई - मंदिरात प्रवेश मिळत नसल्याच्या कारणावरून तमिळनाडूतील २५० दलित कुटुंबांनी हिंदु धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. आम्हाला आमचे अधिकार मिळवून देण्यात प्रशासनही अपयशी ठरले आहे, असे या कुटुंबांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले आहे.
१. तमिळनाडूमध्ये पझंगकल्लीमेडू हे समुद्रकिनार्‍यावर वसलेले गाव असून यात ४०० कुटुंबे रहातात. यांतील १८० कुटुंबे दलित आहेत.
२. येथील मंदिरात ५ दिवस चालणार्‍या उत्सवात एक दिवस सर्व विधी करायला मिळावेत, अशी या कुटुंबांची इच्छा होती; मात्र याला नकार दिल्याने त्यांना अनुमती मिळाली नाही.

आपचे आमदार करतारसिंग तन्वर यांची आयकर विभागाकडून चौकशी !

     नवी देहली - आम आदमी पक्षाचे छत्तरपूर मतदारसंघाचे आमदार करतारसिंग तन्वर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारून त्यांची चौकशी केली.
१. आयकर विभागाने शहरात एकूण ११ ठिकाणी छापे मारले. १०० हून अधिक अधिकारी या तपासासाठी कार्यरत आहेत.
२. करतारसिंग यांच्या २० कंपन्या असून आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांचे कार्यालय आणि फार्महाऊस येथे जाऊन झडती घेतली.
३. पंतप्रधान मोदी यांनीच आयकर विभागाला आमची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असा आरोप आपचे नेते दिलीप पांडे यांनी केला आहे.

देहलीत महंमद जुनैद नावाच्या व्यक्तीने ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला

अशा वासनांधांना शरीयतनुसार हातपाय तोडण्याची
शिक्षा करावी, असे कोणी म्हणत असेल, तर ते चुकीचे कसे ?
     नवी देहली - येथील शाहबाद डेयरी विभागात रहाणार्‍या २८ वर्षीय महंमद जुनैद या वासनांधाने शेजारी रहाणार्‍या ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. मुलीच्या आईने आरडाओरडा केल्यावर स्थानिक लोकांनी जुनैद याला पकडून चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.

तंजावर हिंदु युथ जागृत फोरमकडून गरीब हिंदु युवकांना शैक्षणिक निधी देण्याची मागणी

     चेन्नई - तंजावर हिंदु युथ जागृत फोरमकडून नुकतीच येथील रेल्वेस्थानकाच्या जवळ निदर्शने करण्यात आली. केंद्रशासन आणि राज्यशासन यांनी गरीब हिंदु युवकांना शैक्षणिक निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच त्यांना आरक्षणही द्यावे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. यामध्ये शिवसेना, विवेकानंद पेरवाई आणि हिंदु इलेग्नार इझुची पेरवाई या संघटना सहभागी झाल्या होत्या.

बळजोरीने धर्मांतर करणारे पाद्री आणि त्यांचे मित्र यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चोपले !

     रीवा (मध्यप्रदेश) - येथे बळजोरीने धर्मपरिवर्तन केल्याच्या प्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाद्री रामलाल कोरी आणि त्यांचे मित्र नंदलाल कोरी मऊगंज यांना खांबाला बांधून चोपले. घटनास्थळी पोलीस आल्यावर त्यांनी पाद्री आणि त्यांच्या मित्रांना सोडवून रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी पाद्री आणि त्यांच्या मित्रासोबत १३ कार्यकर्त्यांना अटक केली.

तमिळनाडूत इंग्रजी विषय कठीण जात असल्याच्या कारणावरून १६ वर्षांच्या विद्यार्थिनीची आत्महत्या !

इंग्रजी भाषेचे स्तोम माजवल्याचा दुष्परिणाम !
     तिरूवण्णामलाई - येथे दहावीत शिकणार्‍या १६ वर्षांच्या एका विद्यार्थिनीने इंग्रजी भाषा शिकणे कठीण जात असल्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. भवानी असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती थावसी कुलम या गावात रहात होती.
     किलनाथूर येथील महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या भवानीला चाचणी परीक्षेत इंग्रजी विषयात अल्प गुण मिळाले होते. यामुळे निराश झालेल्या भवानीने घरात कुणीही नसतांना अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. इंग्रजीच्या भीतीमुळे शाळेत जावेसे वाटत नाही, अशा शब्दांत तिने यापूर्वी भावंडांकडे मन मोकळे केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

राज्यातील अवैध धंद्यामुळेच अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ ! - अण्णा हजारे

व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी ग्रामसंरक्षण दल स्थापन करण्याची मागणी !
अण्णा हजारे यांची मुख्यमंत्र्यांशी विधानभवनात भेट !
     मुंबई - २७ जुलै या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. नगर जिल्ह्यातील कोपर्डीसारख्या घटनांतून महिलांवर अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तसेच इतर गुन्ह्यांतही वाढ होत आहे. त्यामागील मूळ कारण म्हणजे व्यसनाधिनता आहे. व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी गावांमध्ये ग्रामसंरक्षण दल स्थापन करा. या संदर्भात विधीमंडळात कायदा करावा, अशी सूचना ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी केली.
     या वेळी श्री. हजारे यांनी ग्रामसंरक्षक दल स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ग्रामसंरक्षण दलाला अधिकार देऊन गावातील अवैध धंदे रोखण्यासाठी नियुक्ती करा. जर ३ वेळा एका व्यक्तीवर प्राथमिक माहिती अहवाल प्रविष्ट झाले, तर अशा व्यक्तीला ३ वर्षे तडीपार, ३ वर्षांपर्यंत कारागृहाची शिक्षा देण्याचा कायदा करावा. लोकांच्या हातात सत्ता देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण करा, अशी मागणीही श्री. हजारे यांनी केली. गावागावातील नशाबंदी आणि जुगार तसेच सट्टा बंदीसाठी कायद्यात योग्य तो पालट करावा लागेल. त्यासाठी राज्यशासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही ! - अखिल भारतीय षट्दर्शन आखाडा परिषदेचे प्रवक्ता महंत डॉ. बिंदुमहाराज

सनातन संस्थेवरील संभावित बंदीच्या मागणीच्या विरोधात संतांचे अभिप्राय
    
महंत डॉ. बिंदुमहाराज
नाशिक - सनातन संस्था ही अतिरेकी संस्था नसून ती धर्मप्रसाराचे कार्य करणारी संस्था आहे. त्यामुळे तिच्यावर बंदीची मागणी करणे चुकीचे आहे. सध्या देशात धर्मांधांच्या कित्येक संघटना अशा आहेत की, ज्या देशविघातक कार्य करत आहेत. त्यांच्यावर बंदीची मागणी का केली जात नाही ? सनातन संस्थेवर जे बंदीची मागणी करत आहेत, ते राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही आहेत, असे मार्गदर्शक प्रतिपादन अखिल भारतीय षट्दर्शन आखाडा परिषदेचे प्रवक्ता महंत डॉ. बिंदुमहाराज यांनी केले. महंत डॉ. बिंदुमहाराज यांची त्र्यंबकेश्‍वर येथील त्यांच्या आश्रमात सनातन प्रभातचे प्रतिनिधी श्री. शैलेश पोटे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी यांनी भेट घेतली. त्या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
     ते पुढे म्हणाले की, संविधानाने आपल्याला आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार दिला असल्याने आपण प्रसार करू शकतो. आजवर सनातनने असे कोणतेही देशविघातक कार्य केलेले नाही की, ज्यामुळे आपण त्यांच्यावर बंदी घालू शकतो. बंदी घालायची असेल, तर एम्आयएम्वर घाला. सनातन संस्थेचे कार्य हे राष्ट्र आणि धर्म यांसाठी चांगले आणि हिताचे आहे. सध्याचे सर्व राजकारणी आणि पुढारी हे मुसलमानांचे लांगूलचालन करत आहेत. हिंदूंचा एकही नेता नाही की, जो हिंदूंची बाजू मांडतो; पण साधुसंत आणि आम्ही सर्वजण सनातन संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी पेण (जिल्हा रायगड) येथे निवेदन

वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. अशोक
जगदाळे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

       पेण २९ जुलै (वार्ता.) - हिंदु जनजागृती समिती गेली १४ वर्षांपासून राष्ट्रध्वजाच्या अवमानाच्या विरोधात राष्ट्र कर्तव्य म्हणून प्रबोधन करत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याविषयीचे निवेदन पेणच्या तहसीलदार श्रीमती वंदना मकु आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. अशोक जगदाळे यांना देण्यात आले.

समाजवादी पक्ष असो किंवा काँग्रेस, सर्वांनी मुसलमानांचे शोषण केले ! - असदुद्दीन ओवैसी

     नवी देहली - समाजवादी पक्ष असो किंवा काँग्रेस अथवा भाजप सर्वांनी मुसलमानांचे शोषण केले. त्यांचा केवळ मतपेढीसारखा उपयोग केला गेला, अशी टीका एम्आयएम्चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केली. ओवैसी पुढे म्हणाले की, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव मला घाबरतात. उत्तरप्रदेशमध्ये सर्व पक्षांच्या सभा होतात; मात्र माझी सभा ते होऊ देत नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि भाजप या दोघांना मी पराजित करणार आहे. मी त्यांची झोप उडवणार आहे, अशी दर्पोक्तीही ओवैसी यांनी केली.

राजस्थान विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीता आणि रामायण यांचा समावेश !

     जयपूर - राजस्थान विद्यापिठाशी संलग्न असलेल्या वाणिज्य आणि व्यवस्थापन या शाखांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीता आणि रामायण यांचा समावेश करण्यात येणार आहे. (राजस्थान विद्यापिठाचा अभिनंदनीय निर्णय ! - संपादक) तसेच दर्शनशास्त्राच्या अभ्यासक्रमात विदेशी लेखक रॉबर्ट ओवेन आणि जेम्स बर्नहॅम यांच्या जागी मोहनदास गांधी आणि स्वामी विवेकानंद यांची विचारसरणी पुस्तकांतून मांडण्यात येत आहेत.
     राजस्थान विद्यापिठाच्या पाठ्यपुस्तक संशोधन मंडळाचे अध्यक्ष नवीन माथुर यासंदर्भात म्हणाले, कुरुक्षेत्राच्या रणांगणात भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून अर्जुनाला उपदेश केला. हा उपदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यातून कष्ट करण्याची सिद्धता, दायित्वाची जाणीव, नेतृत्व असे अनेक गुण शिकायला मिळतात. यशापयश, आशा-निराशेच्या वेळी बुद्धी स्थिर ठेवण्याचे मार्गदर्शन मिळते. (भगवद्गीतेचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यास विरोध करणारे यातून बोध घेतील का ? - संपादक)

पुरोगामी अथवा अन्य कोणाच्याही दबावामुळे सनातन संस्थेवर बंदी घालू शकत नाही ! - आनंद आखाड्याचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज

    
स्वामी सागरानंद सरस्वती महाराज
नाशिक - सनातन संस्था ही धर्मप्रसाराचे कार्य करत आहे. येणार्‍या पिढीला आपल्या जीवनाविषयी मार्ग दाखवण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. त्यामुळे पुरोगामी अथवा अन्य कोणाच्याही दबावामुळे संस्थेवर बंदी घालू शकत नाही. त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. या संस्थेला समाजातील खूप लोक मान देतात. जर अशा संस्थेवर अन्याय झाला, तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे उद्गार आनंद आखाड्याचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांनी काढले. त्र्यंबकेश्‍वर येथील स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या आश्रमात सनातन संस्थेचे श्री. शैलेश पोटे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी यांनी भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

पुरोहित संघ सनातन संस्थेच्या पाठीशी आहे ! - पुरोहित संघ, त्र्यंबकेश्‍वर अध्यक्ष श्री. प्रशांत गायधने

     त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) - राज्यात आणि केंद्रात ज्या विचारांचे सरकार आहे, त्या विचारांचा प्रसारच सनातन संस्था करत आहे. कलम ३७०, राम मंदिर, समान नागरी कायदा हे विषय तातडीने मार्गी लागण्याची या सरकारकडून अपेक्षा आहे. डॉ. झाकीर नाईक यासारख्यांवर कारवाई होत नाही, त्यावर कोणी बोलत नाही आणि धर्माचा प्रसार करणार्‍या सनातन संस्थेवर बंदीची मागणी सरकार कशी काय करू शकते ? सनातन संस्थेवर बंदी आली, तर सरकारपद नष्ट होईल. पुरोहित संघ सनातन संस्थेच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन पुरोहित संघ, त्र्यंबकेश्‍वरचे अध्यक्ष श्री. प्रशांत गायधने यांनी केले.

फलक प्रसिद्धीकरता

धर्मनिरपेक्षतेचा आव आणणार्‍या काँग्रेसींचा हिंदुद्वेष !
     राजकीय लाभासाठी समोर आणली गेलेली देशातील भगव्या आतंकवादाची कल्पना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांची होती, अशी माहिती संयुक्त गुप्तचर समितीचे माजी प्रमुख आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार एस्.डी. प्रधान यांनी दिली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Congresske tatkaleen grihmantri Chidambaramne rajkiya labh hetu Bhagve atankwadki kalpana samne lai.
Kya sarkar Hinduvirodhi Congressko path padhayegi?
जागो !
     कांग्रेस के तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम् ने राजकीय लाभ हेतु भगवे आतंकवाद की कल्पना सामने लाई.
क्या सरकार हिन्दूविरोधी कांग्रेस को पाठ पढाएगी ?

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयातून एका आरोपीचे पलायन

      पुणे, २९ जुलै - येथील शिवाजीनगर न्यायालयातून चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपी संतोष ढेरे हा गर्दीचा अपलाभ घेत २८ जुलै या दिवशी पसार झाला आहे. ढेरे याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याच्या समवेत असलेले पोलीस कर्मचारी बी.डी. वाघ हे हे रिमांड वॉरण्ट घेत असतांना ढेरे हा पसार झाला. (या वेळी न्यायालयाच्या आवारात असलेले इतर पोलीस काय करत होते ? या प्रकरणाची चौकशी करून सुरक्षेची योग्य ती उपाययोजना करायला हवी. - संपादक) या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

कारगिल युद्धात १५ गोळ्या लागूनही टायगर हिलवरील शत्रूंचे बंकर उद्ध्वस्त करणारे जिगरबाज सैनिक ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव !

      प्राणापेक्षाही परमप्रिय असलेल्या भारतमातेच्या संरक्षणासाठी गेली ७ दशके भारतीय सैनिक जीवाचे रान करत आले आहेत. असंख्य सैनिकांनी स्वत:च्या प्राणांची बाजी लावून देशाची अखंडता टिकवली आहे. यातच एक नाव आहे ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव ! त्या वेळी त्यांचे वय अवघे १९ वर्षे ! नुकत्याच पार पडलेल्या कारगिल विजयदिनानिमित्त माजी सैन्यदलप्रमुख तथा विद्यमान केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी योगेंद्र सिंह यादव यांच्या पराक्रमाविषयी सामाजिक संकेतस्थळावर माहिती दिली. ती येथे देत आहोत.
      कारगिल युद्धाच्या वेळी योगेंद्र सिंह यादव आणि त्यांच्या चमूवर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या टायगर हिलवरील ३ बंकर्स कह्यात घेण्याचे दायित्व सोपवण्यात आले होते. ३ जुलै १९९९ च्या अंधार्‍या रात्री टायगर हिल मोहीम चालू झाली; परंतु टायगर हिल जिंकणे सहज सोपे नव्हते. सैनिकांनी ज्या मार्गाने चढण्याचा निर्णय घेतला तो मार्ग एवढा जीवघेणा होता की, या मार्गाने भारतीय सैनिक येऊ शकतात, याची कल्पनाही पाक करू शकला नाही.

भारतीय सैनिकांच्या जीवाचे मूल्य इतके स्वस्त आहे का ?

      गेले काही दिवस काश्मीरमध्ये धर्मांधांकडून धुमाकूळ चालू आहे. त्यात २७ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर ३ सहस्रांहून अधिक नागरिक आणि अनेक सुरक्षा दलाचे जवान घायाळ झाले. काश्मीर खोर्‍यातील १० जिल्हे संचारबंदीखाली होते. त्या सर्व भागात धर्मांधांकडून सुरक्षा दलाच्या सैनिकांवर पुष्कळ आक्रमणे चालू आहेत. हातात बंदुका असलेले सैनिक जमावाकडून मार खात असल्याचे इतके भीषण चित्र जगातील कुठल्याच देशात पहायला मिळत नाही. तरीही या स्थितीचा दोष सुरक्षा यंत्रणांवरच ढकलला जातो, हे दुर्दैव !

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑगस्टपर्यंत वाढ

डॉ. दाभोलकर हत्येचे प्रकरण
       पुणे, २९ जुलै - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची न्यायालयीन कोठडी २९ जुलै या दिवशी संपल्याकारणाने या प्रकरणाची पुढील सुनावणी झाली. या वेळी येथील केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.पी. गुळवे-पाटील यांनी डॉ. तावडे यांना १० ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. या वेळी डॉ. तावडे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित करण्यात आले होते. डॉ. तावडे यांच्या बाजूने अधिवक्ता नीता धावडे यांनी कामकाज पाहिले.

वादग्रस्त आदर्श इमारत लष्कराच्या कह्यात !

कूर्मगतीची न्याययंत्रणा !
       मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वादग्रस्त आदर्श इमारत लष्कराने कह्यात घेतली. ३१ मजल्यांची ही इमारत उभारतांना जमीन अधिग्रहणापासून अनुमती देण्यापर्यंत सगळीकडे नियम आणि कायदा यांचे उल्लंघन झाल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला होता.
       आदर्श घोटाळ्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पदत्याग करावा लागला, तर १२ हून अधिक आयएएस् अधिकार्‍यांना अटकही झाली होती. त्यामुळे इमारत पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले; मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रहित करत इमारत केंद्र सरकारला कह्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार कारवाई झाली.

दिघी आणि भोर (जिल्हा पुणे) येथे हिंदूसंघटन मेळावे !

     हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने हिंदूसंघटन व्हावे, या उद्देशाने ३१ जुलै या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता दिघी आणि भोर (जिल्हा पुणे) या दोन ठिकाणी हिंदूसंघटन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.
स्थळ : १. राघव मंगल कार्यालय, मित्र सहकारनगर, दिघी आळंदी रस्ता, दिघी.
२. गंगोत्री सभागृह, भोर.
अधिकाधिक हिंदूंनी या संघटन मेळाव्यांना उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवानिमित्त भित्तीपत्रके उपलब्ध !

     गणेशोत्सवानिमित्त ए २ या आकारातील पुढील विषयांवरील भित्तीपत्रके बनवण्यात आली आहेत.
१. श्री गणेशमूर्तीचे विडंबन रोखा !
२. गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात न करता वहात्या पाण्यात करा !
३. श्री गणेशपूजेमागील शास्त्र
४. श्री गणेशाची कृपा अशी संपादा !
     या भित्तीपत्रकांंच्या कलाकृती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भित्तीपत्रकांसाठी प्रायोजक मिळवून ती सार्वजनिक वाचनालये, गणेशोत्सव मंडळे, श्री गणेश मंदिरे, गणेशोत्सवातील प्रदर्शने, तसेच अन्य सुयोग्य ठिकाणी लावावीत.

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सेवेतील साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेली अनुभूती

१. साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे 
 १ अ. श्री. दिलीप माणगावकर, गोवा
१ अ १. सर्व सेवा माझ्याच आहेत, असा भाव ठेवून सेवा करणे : दिलीपदादांकडे काही सेवांचा समन्वय पहाण्याची सेवा होती. त्याअंतर्गत दायित्व असलेल्या साधकासमवेत बसून लिखित नियोजन करवून घेणे, नियोजन करण्यात साहाय्य करणे, अशा सेवा होत्या. ती सेवा कृतीच्या स्तरावर अधिकाधिक चांगली होण्यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. केंद्रातील सेवाही व्यवस्थित चालू रहाव्यात, यासाठी दादा प्रयत्न करत होते. त्याचसमवेत उत्तरदायी साधकाने अन्य एखादी सेवा करण्यास सांगितली, तर तीही आनंदाने स्वीकारून ती सेवा ते भावपूर्ण करत होते.

आज अंधेरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूसंघटन मेळावा !

वेळ : सायंकाळी ६.३०
स्थळ : विघ्नेश्‍वर सोसायटी सभागृह, पहिला मजला, धर्मवीर छत्रपती संभाजी 
महाराज नगर, सहार रोड, HDIL जवळ, विजयनगर संकुलाच्या समोर, अंधेरी (प.)
संपर्क : ९९२०२ ०८९५८
एक हिंदु म्हणून या हिंदूसंघटन मेळाव्यास उपस्थित रहा !

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

       एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या चिन्हांमुळे पालटणारे वाक्यचे अर्थ सांगणारे हे सदर !

मागील वर्षीच्या तुलनेत धर्माभिमानी आणि साधक, तसेच स्वतःची साधना यांसंदर्भात जाणवलेला पालट

१. पंचम अधिवेशनासाठी आलेले धर्माभिमानी आणि साधक यांच्या तोंडवळ्यावर उत्साह अन् आनंद जाणवत होता.
२. धर्माभिमान्यांची हिंदु राष्ट्र लवकर येण्यासाठीची तळमळ वाढली असल्याचे जाणवणे :
या वर्षी धर्माभिमान्यांची हिंदु राष्ट्र लवकर येण्यासाठीची तळमळ वाढली आहे, असे वाटले. ईश्‍वर ते लवकरच पूर्ण करील, यात काही शंका नाही.
३. सर्व सेवा सहजपणे आणि अल्प वेळेत होत असल्याचे जाणवणे : गेल्या ४ वर्षांपासून मी अधिवेशनाच्या सेवा केल्या आहेत; परंतु या वर्षी (वर्ष २०१६ मध्ये) केलेल्या सेवा या सहजपणे आणि अल्प वेळेत होत आहेत, असे बर्‍याच वेळा लक्षात आले. तेव्हा प्रत्यक्ष ईश्‍वरच या सेवा करवून घेत आहे, असे जाणवले.

अशी मागणी करावी लागते, हे सर्व राजकीय पक्षांना लज्जास्पद !

     गोव्यात हिंदु देवस्थानांना लागू असलेला पोर्तुगीजकालीन कायदा त्वरित रहित करून हिंदु उपासना आणि मूर्ती संरक्षण कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी २२ जुलै २०१६ या दिवशी श्री नवदुर्गा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील आमदार, मंत्री आदींना निवेदने देण्यात आली.

कॅसिनोने जनतेला जुगारी बनवले. त्यामुळे झालेली जनतेची हानी रुपयांमध्ये मोजता येणार का ?

     कॅसिनो व्यवसायातून वर्षाकाठी २०० कोटी रुपये शासकीय तिजोरीत जमा होत आहेत. ज्या काळी राज्यावर मोठे आर्थिक संकट आले, त्या वेळी कॅसिनोंनी अर्थव्यवस्थेला सावरले. त्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद करणे योग्य नाही. - मुख्यमंत्री, लक्ष्मीकांत पार्सेकर
हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !
हिंदी : www.hindujagruti.org/hindi/
मराठी : www.hindujagruti.org/marathi/

पुष्कर (राजस्थान) येथे पिढ्यान्पिढ्या जतन केला जात आहे श्रीकृष्णाच्या युगातील दुर्लभ शंख !

डॉ. हरेन्द्र कुमार शर्मा यांच्याकडे असलेला
श्रीकृष्णाच्या काळातील हाच तो प्राचीन शंख

      सनातन धर्मामध्ये शंखाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदु संस्कृतीमध्ये श्रीकृष्णाच्या पांचजन्य शंखाला विशेष महत्त्व आहे. अशाच प्रकारचा एक प्राचीन शंख येथील डॉ. हरेन्द्र कुमार शर्मा यांच्याकडे असल्याचे आढळून आले आहे. शर्मा यांच्या मते त्यांच्या जवळील शंख भगवान श्रीकृष्णाच्या काळातील असून तो ५ सहस्र वर्ष जुना आहे. तो पिढ्यान्पिढ्या जतन केला जात आहे. डॉ. शर्मा स्वत:ला महान ऋषी गर्ग यांचे वंशज असल्याचे सांगतात.
      डॉ. शर्मा यांच्या जवळील शंख गोमुखी आणि दक्षिणावर्ती असल्यामुळे तो अतिशय बहुमूल्य आणि दुर्लभ आहे. या शंखाची ८ वर्षांपूर्वी आग्रा येथील पुरातत्त्व आणि बहुमूल्य कलाकृती नोंदणी कार्यालयात प्राचीन वस्तू म्हणून नोंद करण्यात आली आहे. डॉ. शर्मा यांच्याकडे या शंखाच्या व्यतिरिक्त १५१ अतीप्राचीन ग्रंथ, तसेच भगवान श्रीकृष्णाशी संबंधित ६३ वस्तू उपलब्ध आहेत. यात श्रीमद् भागवद्गीता, रामायण, महाभारत, पद्मपुराण आणि शिवपुराण यांच्या पांडुलिपी यांचाही समावेश आहे. डॉ. शर्मा यांना त्यांच्या जवळील या दुर्लभ वस्तू राज्य किंवा केंद्रसरकारकडे सुपूर्द करायच्या आहेत.

काश्मीरमधील सायबर आक्रमणाचे आव्हान !

कु. प्राजक्ता धोतमल
       गेली अनेक दशके गुंतागुंतीची समस्या बनलेल्या काश्मीरमध्ये सध्या देशद्रोह्यांनी हैदोस घातला आहे. बुरहान वानी या आतंकवाद्याच्या मृत्यूनंतर सहस्त्रोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून त्याच्या समर्थकांनी अक्षरश: उच्छाद मांडला. यामुळे हिंदूंची अमरनाथ यात्रा काही काळापुरती स्थगित करण्यात आली. धर्मांधांच्या दबावामुळे काश्मीरमधून विस्थापित झालेल्या ३०० हिंदूंचे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने महत्प्रयासाने नुकतेच पुनर्वसन करण्यात आले होते; मात्र तेथील हिंसाचाराची परिस्थिती जैसे थे असल्याचे पाहून त्या हिंदूंनी तेथून पुन्हा पलायन केले. काश्मीरमधील हिंसाचार ही काही नवीन समस्या नाही. ही गोष्ट तेथे नित्याचीच झाली आहे. असे असले, तरी या वेळी सामाजिक संकेतस्थळांद्वारे (सायबरद्वारे) वायुवेगाने फोफावली जाणारी धर्मांधता, हिंदूंसमोर प्रसारमाध्यमांची यासंदर्भातील असहिष्णु भूमिका आदी समस्या मात्र नव्याने उभ्या ठाकल्या आहेत. तत्कालीन काँग्रेस सरकारने काश्मिरी हिंदूंची घोर उपेक्षा केली. त्याचा दुर्दैवी इतिहास हा तर एक वेगळ्या लेखाचा विषय होईल. तथापि भाजप सत्तेत आल्यानंतरही तेथील परिस्थितीत काहीही पालट झाल्याचे दिसत नाही.

पाकिस्तानी मुसलमानांचा उद्देश भारतावर जय मिळवणे, हाच आहे. युद्ध करून त्यांना ते साध्य न झाल्याने हसके लिया पाकिस्तान, घुसके लेंगे हिंदुस्तान असे म्हणत हा जिहादी प्रकार त्यांनी चालवला आहे. - श्री. प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना.


लोकमान्य टिळक यांना गुरुवंदना ! - प्रा. गजानन नेरकर

     स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या क्रांतीमय जडणघडणीच्या पूर्वार्धात युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळकांना आपले स्फूर्तीस्थान आणि गुरुस्थान मानत असत. पुणे येथे वर्ष १९०५ मध्ये घडवून आणलेल्या विदेशी कापड्यांच्या होळीच्या घटनेमध्ये लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्रस्थानी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्रीय अध्यक्षस्थान भूषवलेल्या अखिल भारत हिंदु महासभा पक्षाने गतवर्षी स्थापनेची शताब्दीपूर्ती केली. त्याचप्रमाणे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेलाही यंदा १०० वर्षे पूर्ण झाली.
     वरील दिव्य घटनांचे औचित्य साधून यंदा १ ऑगस्ट २०१६ या दिवशी लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने हिंदुसभेने लोकमान्य टिळक भक्तांचा मेळावा आयोजित केला आहे. स्वातंत्र्यवीरांच्या महागुरूंना (लोकमान्यांना) वंदन करणे या हेतूने गेली अनेक दशके हा कार्यक्रम आयोजित केला जातो. लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर यांच्यातील जन्मोजन्मीचे आणि पिढ्यान्पिढ्यांचे ऋणानुबंध त्यांच्या पुण्यस्मृतींच्या रूपात उजळवण्यासाठी हिंदु महासभा मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडते.

चंद्रपूर येथील सनातनच्या साधिका श्रीमती उर्मिला लक्ष्मण बुलदेव यांचे निधन

     ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चंद्रपूर येथील सनातनच्या साधिका श्रीमती उर्मिला लक्ष्मण बुलदेव (वय ८९ वर्षे) यांचे २८ जुलै या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, २ मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्या अनेक वषार्र्ंपासून रुग्णाईत होत्या. फेब्रुवारी २०१६ पासून त्या समष्टीसाठी नामजप करत होत्या. प.पू. परशराम पांडे महाराज यांच्या त्या सख्खी चुलत बहीण होत्या, तर सनातनच्या फोेंडा, गोवा येथील साधिका सौ. जानकी पाध्ये यांच्या त्या आजी होत्या. सनातन परिवार बुलदेव आणि पाध्ये कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ सद्गुरुपदावर आरूढ झाल्याच्या सोहळ्याविषयी मिळालेली पूर्वसूचना आणि आलेल्या अनुभूती

श्री. सोहम् सिंगबाळ
    २४.७.२०१६ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सद्गुरुपदावर आरूढ झाल्या. या सोहळ्याविषयी श्री. सोहम् सिंगबाळ यांना मिळालेली पूर्वसूचना आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. पूर्वसूचना
    वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेला मी संत झालेल्या साधकांची सारणी वाचत होतो. तेव्हा पुढील वर्षी गुरुपौर्णिमेला हा सोहळा होऊ शकतो, असा विचार माझ्या मनात आला; पण मी कसे लिहू आणि काय लिहायचे ?, असा संभ्रम वाटून मी काहीच लिहून दिले नाही.
२. सद्गुरु गाडगीळकाकूंप्रमाणे आधी श्रीकृष्णाला लिहायला सांगितल्यावर स्वतःला सूत्रे सुचू लागणे
     वर्ष २०१६ च्या गुरुपौर्णिमेच्या २ - ३ दिवस आधी मी याविषयी लिहायला बसलो. प्रथम थोडा वेळ विचार केल्यावर सूत्रे नीट सुचली नाहीत. तेव्हा आठवले, सद्गुरु गाडगीळकाकू आधी श्रीकृष्णाला लिहायला सांगतात आणि नंतर स्वतः लिहितात. त्याप्रमाणे मी केले आणि नंतर काही सूत्रे सुचली.

संतद्वयी सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे गुरुपौर्णिमेला घोषित होणार, असे वाटणे

   काही दिवसांपासून मला सद्गुरु बिंदाताई आणि सद्गुरु अंजलीताई सद्गुरुपदापर्यंत पोचल्या आहेत, असे वाटत होते. गुरुपौर्णिमेला (१९.७.२०१६ या दिवशी) ते घोषित करतील का, असा विचार मनात येत होता. प्रत्यक्षात २४.७.२०१६ या दिवशी ते घोषित करण्यात आले.
- सौ. ज्योती ढवळीकर, बांदिवडे, फोंडा, गोवा. (२४.७.२०१६)

चीनला कळते, ते भारतातील एकाही राजकीय पक्षाला का कळत नाही ? त्याचे राष्ट्रावर मुळीच प्रेम नाही, हे यातून सिद्ध होते !

     चीनमध्ये मशिदींचे बांधकाम करण्यास बंदी आहे.
(संदर्भ : पॅट्रीयट्स फोरम्)

अधिवेशनाच्या काळात चालकाची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. परशुराम गोरल
       अधिवेशनाच्या कालावधीत मला साधकांना रामनाथी येथील सनातन आश्रम ते अधिवेशनस्थळ येथे ने-आण करण्याची चालकाची सेवा मिळाली होती. ही सेवा करतांना मला संत, साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
१. सतत इतरांचा 
विचार करणारे पू. पिंगळेकाका !
       २२.६.२०१६ या दिवशी सकाळी एका साधकासह पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळेकाका आणि पू. नंदकुमार जाधवकाका यांना आश्रमातून अधिवेशनस्थळी सोडायला जायचे होते. बाहेर पाऊस पडत असल्याने मी समवेत दोन छत्र्या घेतल्या होत्या. अधिवेशनस्थळी चारचाकी थांबल्यानंतर मी उतरून पाऊस लागू नये; म्हणून एक छत्री उघडून प्रथम पू. पिंगळेकाकांच्या डोक्यावर धरली. तेव्हा पू. पिंगळेकाका मला म्हणाले, प्रथम पू. जाधवकाकांच्या डोक्यावर छत्री धर. तोपर्यंत दुसरा साधक छत्री घेऊन उतरला होता. या प्रसंगातून पू. पिंगळेकाकांमध्ये असलेले इतरांचा विचार करणे आणि संतांप्रतीचा आदरभाव हे गुण लक्षात आले.

पत्नीला साधनेसाठी साहाय्य करणारे आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव असणारे बेंगळुरू येथील श्री. अजय पाटील !

श्री. अजय पाटील
        बेंगळुरू(कर्नाटक) येथे नोकरीनिमित्त रहाणारे श्री. अजय पाटील यांचा आषाढ कृष्ण पक्ष एकादशी (३०.७.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. सुप्रिया यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
श्री. अजय पाटील यांना सनातन परिवाराच्या 
वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
१. साधे राहणीमान
        विवाहाच्या वेळी म्हणजेच वर्ष २००५ मध्ये श्री. अजय विदेशात नोकरीला होते. त्या वेळी त्यांच्या वागण्यात त्याविषयीचा कुठेही गर्व नव्हता. त्यांचे राहणीमान साधे असून त्यांना कधीही फॅशन करायला आवडत नाही.
२. काटकसरी
        त्यांना अनावश्यक व्यय करणे आवडत नाही. ते कपडे अन् वस्तू यांवर कधीही अनाठायी पैसे व्यय करत नाहीत.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सद्गुरुपद प्राप्त होण्याविषयी मिळालेली पूर्वसूचना

श्री. निलेश सिंगबाळ
    एक मासापूर्वी (महिन्यापूर्वी) सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सद्गुरुपदी विराजमान होतील, असा विचार मनात येणे : जून १०१६ मध्ये मी पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आणि शिबीर असल्याने गोव्याला आलो होतो. तेव्हा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सद्गुरुपदी विराजमान होतील, असा विचार माझ्या मनात काही वेळा आला होता, तसेच गुरुपौर्णिमेला त्यांचे सद्गुरुपद घोषित होईल, असेही मला वाटले होते.
- श्री. निलेश सिंगबाळ, (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे पती) वाराणसी (२९.७.२०१६)

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आगमने मना लागे चाहूल ।

कु. रजनी कुर्‍हे
२३.७.२०१६ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे रामनाथी आश्रमात आगमन झाल्याचे कळले आणि मनात आपोआपच पुढील कवितेच्या ओळी स्फुरल्या.
काळही वाट पहात आहे,
या क्षणाची ।
कधी येणार हो सुमधूर घटीका आनंदाची ॥ १ ॥
रामनाथी वैकुंठाचा कंठ दाटूनी स्वरला ।

अवचित काही घडणार कृष्ण-गोकुळी आता ॥ २ ॥
मात्र कळेना, काय करावे ? ।

आता सांगावे कि काही क्षण थांबावे ॥ ३ ॥
काळही वाट पहातो आहे या सुवर्णक्षणाची ।
अनेक संत सद्गुरुपदावरी आरुढ होण्याची ॥ ४ ॥ 

- कु. रजनी कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी,गोवा. (२४.७.२०१६)

प.पू. पांडे महाराज यांच्या आवाजातील दत्तमाला मंत्र ऐकतांना एस्.एस्.आर्.एफ्.चा कु. मारिओ सबाटो (वय १९ वर्षे) याला आलेल्या अनुभूती

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात 
२६ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत चालू 
असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने... 
प.पू. पांडे महाराज
         मला झालेली विषबाधा दूर होणे, त्रासदायक शक्ती आणि पूर्वजांचे त्रास न्यून होणे, यांवर उपाय म्हणून एस्.एस्.आर्.एफ्.ने केलेल्या मार्गदर्शनानुसार मी प.पू. पांडे महाराज यांच्या आवाजात असलेला दत्तमाला मंत्र ऐकतो. हा मंत्रजप ऐकतांना मला आलेल्या अनुभूती आणि दिसलेले दृश्य पुढे देत आहे.
१. प.पू. पांडे महाराजांच्या तोंडातून शक्तीशाली आणि तेजस्वी चैतन्याचे किरण बाहेर पडत असून वाईट शक्तींना ती निष्प्रभ बनवत असल्याचे दिसणे : प.पू. पांडे महाराज मंत्रजपाच्या माध्यमातून अत्यंत शक्तीशाली वाईट शक्तींचा त्रास दूर करत होते. वाईट शक्ती त्यांच्यावर आणि माझ्यावर काळी शक्ती प्रक्षेपित करत होत्या. प.पू. पांडे महाराज बसून या पवित्र मंत्रांचा जप करत होते. त्या वेळी त्यांच्या तोंडातून शक्तीशाली आणि तेजस्वी चैतन्याचे किरण बाहेर पडत असून वाईट शक्तींना ते निष्प्रभ बनवत होते. वाईट शक्ती माझ्या शरिरावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न करत होत्या; परंतु प.पू. पांडे महाराज सूक्ष्मातील या आक्रमणापासून माझे रक्षण करत होते.

सिंहासनी बसले श्रीमत् नारायण रामनाथीत ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
श्रीमती उषा बडगुजर

सिंहासनी बसले श्रीविष्णु भगवान ।
सोडवणार आम्हा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून ॥ १ ॥

सिंहासनी बसले प्रभु श्री रामचंद्र ।
श्रीरामरूपी दगड तरंगला समुद्रात ॥ २ ॥

सिंहासनी बसले श्रीकृष्ण भगवान ।
सवंगड्यांसह खेळले बालरूपात गोकुळात ॥ ३ ॥

सिंहासनी बसले श्रीमत् नारायण रामनाथीत ।
सर्व विश्‍वाचे सार त्यांच्या चरणात ॥ ४ ॥

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना दिलेले शुभाशीर्वाद !

प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये
२४.७.२०१४ या दिवशी सनातनच्या संत सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानिमित्ताने पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये आणि त्यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी त्यांचे पत्रातून केलेले कौतुक अन् दिलेले शुभाशीर्वाद येथे प्रसिद्ध करत आहोत.
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
॥ श्री ॥
२६.७.२०१६
वेळ : दुपारी २.२० मिनिटे
अंजलीताई आणि बिंदाताई, तुमचे त्रिवार अभिनंदन !
अंजलीताई आणि बिंदाताई, आपण सद्गुरुपदावर विराजमान झाला आहात. हे ऐकून आम्हा सर्व कुटुंबियांना अतिशय आनंद वाटला. हे होणारच होते, याची आम्हाला निश्‍चिती होती आणि तसे ते झालेच ! तुम्हाला मिळालेला हा सन्मान नव्हे, पुरस्कार, ही परमेश्‍वराची देणगी आहे. तेव्हा तुम्हा दोघींना आमच्या कुटुंबियांचे कोटी कोटी साष्टांग दंडवत आणि कोटी कोटी साष्टांग नमस्कार !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. विशाखा नार्वेकर यांना आलेली अनुभूती !

        १०.३.२०१५ या दिवशी मी कार्यालयातून घरी आल्यावर मीठ पाण्याचे उपाय करण्यास आरंभ केला. त्या वेळी मला सतत १५ मिनिटे जांभया येत होत्या. त्यानंतर मी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर बसून नामजप करू लागले. त्या वेळी मला पुष्कळ चैतन्य मिळत असून श्रीकृष्ण माझ्याशी बोलत आहे, असे जाणवले.
        २६.४.२०१४ या दिवशी मी प्रथमच सत्संगात सहभागी झाले होते. त्या दिवशी मला जी अनुभूती आली होती, तशीच अनुभूती मला मी डोळे बंद केल्यावर आली. त्या वेळी मला एका प्रशस्त मार्गावर तेजस्वी पिवळा प्रकाश पसरलेला दिसला. श्रीकृष्ण माझे बोट पकडून मला त्या मार्गावरून घेऊन जात आहे, असे दिसले.
        या वेळी मला डॉ. (सौ.) रश्मी नल्लादारू दिसल्या. माझा हात पकडून त्या मला पिवळ्या प्रकाश पसरलेल्या मार्गावरून घेऊन जात होत्या. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माझे संपूर्ण शरीर कंप पावत होते. मला अवर्णनीय आनंद होत होता. मी डोळे उघडल्यावर श्रीकृष्ण माझ्याकडे पाहून स्मित करत आहे, असे जाणवले. ही अनुभूती दिल्याबद्दल मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञ आहे.
- सौ. विशाखा नार्वेकर, एशिया पॅसिफिक (२१.३.२०१५)

श्री. टिमोथी बॉनर, अमेरिका यांना दैवी कणांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. एस्.एस्.आर्.एफ्.च्या सत्संगाला उपस्थित रहाण्याचा निर्णय घेतल्यावर हाता-पायांवर दैवी कण आढळणे आणि या घोर आपत्काळातही सत्संग मिळणे, ही ईश्‍वरी कृपाच असल्याचे जाणवणे : ऑगस्ट २०१४ मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या फेसबूकच्या सेवेसंदर्भात एक सत्संग होता. त्या सत्संगाला माझ्यासहित आणखी दोघेच उपस्थित रहाणार असल्याने सत्संगाला जाऊ नये, असे मला वाटत होते, तरीही मी सत्संगाला उपस्थित रहाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळी माझ्या हाताच्या तळव्यांवर मला दैवी कण आढळले. काही वेळाने माझ्या पायांवरही मला दैवी कण आढळून आले. त्या कणांकडे पहातांना मला आनंद जाणवत होता. त्यानंतर मात्र या घोर आपत्काळातही एस्.एस्.आर्.एफ्. चे सत्संग मिळणे, ही ईश्‍वरी कृपाच आहे, असे मला जाणवले.
२. दैवी कण सततच समवेत असल्यामुळे अशक्य वाटणार्‍या गोष्टीही शक्य होणे आणि दैवी कणांकडे पहातांना स्वतः साधना करत नसून प्रत्यक्ष ईश्‍वर ती करवून घेत आहे, असे जाणवणे : आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर तेे दैवी कण लुप्त झालेच नाहीत. त्या दिवसापासून दैवी कण सतत माझ्या समवेत आहेत. जेव्हा मला जीवन तणावपूर्ण वा कठीण वाटते, तेव्हा तेव्हा या दैवी कणांनी मला साधना चालू ठेवण्यास शक्ती दिली आहे. या कणांकडे पहातांना मी स्वतः साधना करत नसून प्रत्यक्ष ईश्‍वर माझ्याकडून ती करवून घेत आहे, असे मला वाटते. दैवी कण आढळून आल्यापासून मला अशक्य वाटणार्‍या गोष्टीही माझ्याकडून घडत आहेत.
- श्री. टिमोथी बॉनर, अमेरिका (२४.१०.२०१४)

अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पाचवे !

अधिवेशन पाचवे....
राष्ट्र-धर्म कार्याची मशाल पेटवणारे ।
देशप्रेमाचे बीज पेरणारे ॥
संघटित शक्तीचा अविष्कार असणारे ।
धर्मश्रद्धा बळकट करणारे ॥
धर्मतेज जागृत करणारे ।
ब्राह्मतेजाची ग्वाही देणारे ॥
पांचजन्याप्रमाणे ब्रह्मांडात निनादणारे ।
श्रीकृष्ण समवेत आहे, याची ग्वाही देणारे ॥
कार्याचा लेखा-जोखा घेणारे ।
व्यष्टी-समष्टी साधना साध्य करून देणारे ॥
आध्यात्मिक प्रगतीची आनंदवार्ता देणारे ।
पांडवांप्रमाणे भक्ती शिकवणारे ॥

सनातन प्रभात नियतकालिके सर्व वाचकांना मिळत असल्याची निश्‍चिती करण्याची सेवा ३१.८.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

जिल्हासेवक आणि लेखासेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
    बाहेरचे वितरक, नियतकालिकांचे वितरण करणारे संस्थेचे कार्यकर्ते यांच्याकडून होणार्‍या अक्षम्य चुका किंवा पोस्टाच्या अडचणी यांमुळे काही वाचकांना नियतकालिक नियमितपणे मिळण्यात विविध अडचणी येत असल्याचे समजले आहे. बर्‍याच वाचकांनी वर्गणीचे पैसे वेळेत भरूनही त्यांना लगेचच नियतकालिक चालू केले जात नाही अथवा त्यांना वेळोवेळी अंक न देता एकत्रित दिले जातात, आदी अडचणी येत असल्याचे लक्षात आले आहे.
   या अडचणींवर उपाययोजना काढण्याच्या दृष्टीने सर्व वाचकांना सनातन प्रभातची नियतकालिके मिळतात का, याची निश्‍चिती ३१.८.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करायची आहे. त्याविषयीच्या महत्त्वाच्या सूचना पुढे देत आहे.
१. साधक पुढील तीन प्रकारे वाचकांना अंक मिळत असल्याची निश्‍चिती करू शकतात !
   साधकांनी वाचकांना भ्रमणभाषद्वारे संपर्क करून नियतकालिक मिळते का, याची विचारणा करावी. आपल्याकडे त्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्यास प्रत्यक्ष भेटून अंक मिळत असल्याची निश्‍चिती करावी. एखाद्या वाचकाच्या संदर्भात वरील दोन्हीही कृती करणे शक्य नसेल, तर त्यांना पोस्टकार्ड पाठवून निश्‍चिती करावी. निश्‍चिती करतांना जेथे शक्य असेल, तेथे वाचकाची स्वाक्षरी घ्यावी; परंतु जेथे तसे शक्य नसेल, तेथे ज्या साधकाने वाचकाकडून निश्‍चिती करून घेतली आहे, त्या साधकाने आपले नाव वर्गणीदार सूचीवर लिहावे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हास्यास्पद साम्यवाद !
     जनतेचे शिक्षण, आरोग्य, आवडी-निवडी यांतही साम्यवादी साम्यवाद आणू शकत नाहीत, असे असतांना ते राष्ट्रात साम्यवाद काय आणणार ?
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
संस्कृती म्हणजे विद्वत्तापूर्ण चर्चा नसून कायम स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे 
आणि इतरांच्या दु:खाची जाणीव ठेवणे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


बोधचित्र

विठ्ठल मंदिर भक्तांकडे सोपवा !

संपादकीय 
        प्रत्येक मराठी माणसाच्या मनात पंढरीच्या पांडुरंगाविषयी विशेष स्थान आहे. आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जाऊन विठूरायाच्या चरणांवर डोके ठेवावे, अशी इच्छा महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदु भाविकाच्या मनात असते. भक्तीचे माहेरघर असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाच्या मंदिराचे सरकारीकरण झाले आणि चित्रच पालटले. या मंदिरात पूजा कोणी करायची ? प्रसाद कोणी करायचा ? परंपरा कुठल्या पाळायच्या ? हा निर्णय देवस्थान समिती घेऊ लागल्याने मंदिरात भक्तीभावाने केल्या जाणार्‍या या कृती यांत्रिकपणे होऊ लागल्या. मंदिर समितीचा हिंदुद्रोही कारभार भाजपचे पंढरपूर शहर चिटणीस श्री. संजय वाईकर यांनी पुन्हा चव्हाट्यावर आणल्याने तेथील हिंदुद्रोही कारभारावर पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. देवस्थान समितीने मंदिरात होणार्‍या प्रक्षाळपूजेची तिथीच पालटून टाकली आहे.

राजधानीत लॅण्ड जिहाद !

संपादकीय
       राजधानी देहलीतील मयूर विहार रेल्वेस्थानकाचा परिसर हा तसा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. याच परिसरात हरित लवादाच्या मालकीची २५ एकर जमीन आहे. ही जमीन मुसलमानांच्या कब्रस्तानाची भूमी आहे, असे सांगत धर्मांधांनी ती बळकावण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. प्रशासनाने वेळीच यात हस्तक्षेप केला नाही, तर ही भूमी धर्मांधांच्या घशात जाणार आहे. भारतात लॅण्ड जिहादचा प्रकार काही नवीन नाही. भारतात ठिकठिकाणी हे घडत आहे. शासकीय किंवा हिंदूंच्या भूमीवर स्वतःचा हक्क सांगायचा. त्या ठिकाणी अधिकाधिक धर्मांधांना जमा करायचे, नंतर मुसलमानांची एखादी संघटना किंवा व्यक्ती हिच्या नावे ती भूमी आहे; म्हणून फलक लावायचा आणि तेथे इमारत उभारायची असा पद्धतशीरपणे कट रचला जातो. बंगाल, आसाम, केरळ या राज्यांमध्ये हे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn