Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काश्मीरवरून अणूयुद्ध होणार नाही

पाकचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी म्हणतात
     इस्लामाबाद - काश्मीरच्या प्रश्‍नावरून भारत आणि पाक यांच्यात अणूयुद्ध होईल, असे मला वाटत नाही. अण्वस्त्रांची निर्मिती होऊ शकते, त्याचे प्रदर्शन होऊ शकते; मात्र त्याचा वापर करणे हा विनोद नाही, असे विधान पाकचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी केले आहे. सध्या काश्मीर प्रश्‍नावरून दोन्ही देशांत तणाव आहे; मात्र सर्व काही ठीक होईल, असेही ते म्हणाले.

हिंदु संत, नेते आणि संघटना यांच्यावरील अन्याय न थांबल्यास राज्यभर आंदोलन !

समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे आझाद मैदानात आंदोलन
८५० हून अधिक हिंदुत्ववाद्यांची शासनाला चेतावणी
   
आंदोलनाच्या वेळी उत्स्फूर्तपणे घोषणा देतांना हिंदुत्वनिष्ठांचा समुदाय
      मुंबई - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. धनंजय देसाई यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसतांना त्यांना अजूनही कारागृहात ठेवण्यात आले आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची अन्याय्य मागणी होत आहे. वरील सर्वांची कारागृहातून सुटका करण्यात यावी आणि सनातन संस्थेची अपकीर्ती थांबवून सनातनचे निष्पाप साधक श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची त्वरित सुटका करण्यात यावी, या मागण्यांसाठी येथील समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन आझाद मैदानात २८ जुलै या दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत आंदोलन केले. हिंदु संत, नेते आणि संघटना यांच्यावरील अन्याय्य कारवाई न थांबल्यास महाराष्ट्रात आंदोलनाची लाट उसळेल, अशी चेतावणी या आंदोलनाद्वारे संत आणि हिंदुत्ववादी यांनी शासनाला दिली. आंदोलनाला धर्मप्रेमी संघटना आणि हिंदुत्ववादी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, हर हर महादेव यांनी आझाद मैदानाचा परिसर दणाणून गेला. आंदोलनाला ८५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती लाभली.

पाकमध्ये एका हिंदूची गोळ्या झाडून हत्या !

कोणीही वाली नसलेले पाकमधील हिंदू !
कुराणाचा अवमान झाल्याच्या आरोपावरून धर्मांधांची दंगल !
      घोटकी (पाकिस्तान) - पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथील एका हिंदु व्यक्तीने कुराणाला कथितपणे अपवित्र केल्यावर उसळलेल्या दंगलीत दोन हिंदु तरुणांंवर गोळ्या झाडण्यात आल्या. यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीररित्या घायाळ झाल्याची घटना २७ जुलैला घडली. मयत हिंदूचे नाव दिवान सतीश कुमार (वय १७) असून घायाळ झालेल्याचे नाव अविनाश आहे. या घटनेनंतर स्थानिक हिंदूंनी प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
     अमर लाल नावाच्या व्यक्तीने कुराणाचा अवमान केल्याचा आरोप आहे. अमर याला अमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन आहे. अलीकडेच त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि तो मशिदीत रहात होता. त्याची मानसिक स्थिती चांगली नाही. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच ८४ दंगलखोरांनाही अटक करण्यात आली आहे.
     पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी प्रशासनाला कोणत्याही धर्माच्या लोकांची हानी होऊ नये, याकडे लक्ष पुरवण्याची विनंती केली आहे. तसेच पक्षातील हिंदु नेते रमेश लाल यांना पीडित परिवाराच्या घरी जाण्यास सांगितले आहे.

२०१४ मध्ये देशभरात ११४ पत्रकारांवर आक्रमणे !

     नवी देहली - २०१४ मध्येे देशभरात ११४ पत्रकारांवर आक्रमणे झाली. त्या प्रकरणांत ३२ जणांना अटक करण्यात आली. सर्वाधिक म्हणजे ६३ आक्रमणे उत्तरप्रदेशात झाली, अशी माहिती गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभेत दिली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील प्रक्षाळपूजेची तिथी पालटणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करा !

प्रक्षाळपूजेची तिथी पालटण्याचा धर्मद्रोह करणार्‍यांवर 
शासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी भाविकांची मागणी आहे !
पंढरपूर शहर भाजपचे सरचिटणीस संजय वाईकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर) - येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २४ जुलै २०१६ या दिवशी पूर्वा भाद्रपद नक्षत्रावर प्रक्षाळपूजा करण्याचे मंदिर समितीने घोषित केले होते. ही तिथी म्हणजे पंचांगशास्त्राानुसार ओटी भरण्याचा दिवस असून हा दिवस पंचांगशास्त्रात शुभ मानला जातो. या दिवसापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे बंद केलेले नित्योपचार नव्याने चालू करण्याचे समितीने घोषित केले होते; मात्र मंदिरातील मनमानी कारभाराचा फटका बसल्याने अधिकार्‍याने प्रक्षाळपूजेची तिथी स्वतःच्याच मनाने पालटून ती २४ जुलै ऐवजी २५ जुलै या दिवशी केली. त्यामुळे धार्मिक विधी, रुढी आणि परंपरा यांच्यात पालट केल्याच्या प्रकरणी अधिकार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे शहर सरचिटणीस श्री. संजय वाईकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (धर्महानी रोखण्यासाठी प्रयत्न करणारे श्री. संजय वाईकर यांचे अभिनंदन ! - संपादक) हे मंदिर महसूलखात्याच्या कह्यात गेल्यापासून मंदिराला तलाठी कार्यालयाचे स्वरूप आले आहे. मंदिरात मनमानी पद्धतीने कारभार केला जात आहे, तसेच देवाच्या दैनंदिन राजोपचारामध्ये अनेकवेळा हयगयही केली जाते. सोयीप्रमाणे मंदिरातील राजोपचार केले जातात, असेही आरोप श्री. वाईकर यांनी केले. (हिंदूंनो, मंदिरांतील वाढत्या धर्महानीला रोखण्यासाठी ही मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्यासाठी शासनाकडे आग्रह धरा ! - संपादक)

राजकीय स्वार्थासाठी सनातन संस्थेवर बंदी घालणे अन्यायकारकच ! - आदित्य देशमुख, हिंदू राष्ट्र सेना

कल्याण येथील पत्रकार परिषदेत सनातनच्या 
पाठीशी उभे असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांचे आश्‍वासन 

डावीकडून अधिवक्ता श्री. विवेक भावे, श्री. सुशील
तिवारी, श्री. आदित्य देशमुख आणि श्री. हरिश यादव

       कल्याण, २८ जुलै (वार्ता.) - सनातन संस्था आध्यात्मिक संशोधन करून वैज्ञानिक दृष्टीकोनातून हिंदु धर्माचे महत्त्व पटवून देणारी संस्था आहे. संस्था हिंदु धर्माची बाजू खंबीरपणे मांडत असल्यामुळेच आज पुरोगामी खोटे आरोप करून संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. सध्या अनेक राजकीय पक्षांतील घोटाळे उघड होत आहेत; पण त्यांच्यावर कधीच बंदीची मागणी केली जात नाही, उलट याच राजकीय संघटना स्वार्थासाठी आणि घोटाळे दाबून टाकण्यासाठी सनातन संस्थेवर खोटे आरोप करत आहेत. यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालणे पूर्ण अन्यायकारकच आहे, असे मत हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. आदित्य देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच सनातनवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात आम्ही सर्व राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना सनातन संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही आश्‍वासन हिंदुत्ववादी संघटनांनी कल्याण येथील पत्रकार परिषदेत दिला.

शाहजापूर (जिल्हा नगर) येथील आगेबाबा मंदिरातील समाधींवर हिरव्या चादरी काढून परंपरेप्रमाणे भगव्या चादरी घातल्या !

हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या प्रबोधनाचा परिणाम
       शाहजापूर (जिल्हा नगर), २८ जुलै (वार्ता.) - येथील पारनेर तालुक्यातील शाहजापूर गावातील आगेबाबा मंदिरातील समाधींवर काही दिवसांपासून विनाकारण हिरव्या चादरी घालण्यात येत होत्या. या संदर्भात हिंदुत्ववाद्यांनी गावकर्‍यांचे प्रबोधन केले. त्यानंतर समाधींवर जलाभिषेक करून वेदघोषात विधीवत पूजा-आरती करून भगवी वस्त्रे घालण्यात आली. १४ जुलै या दिवशी हा कार्यक्रम पार पडला. (कधी बलपूर्वक, तर कधी भोळ्या भाबड्यांना फसवून केले जाणारे भारताचे हिरवेकरण रोखणार्‍या जागृत धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! इतरांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कृतीशील व्हावे. - संपादक)
१. गावात काही वर्षांपूर्वी आलेले फकीर नंतर तेथेच स्थायिक झाले. गावातील म्हस्केबाबा आणि मांगिरबाबा हे त्यांचे शिष्य झाले. या तिघांच्या समाधी एकाच ठिकाणी नाथपंथाप्रमाणे असल्याचे आढळते.

सनातन संस्थेवर बंदी येऊच शकत नाही ! - आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजप, परांडा, जिल्हा सोलापूर

     बार्शी (जिल्हा सोलापूर) - सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात विधान परिषदेत मी विषय मांडणारच होतो. मी तुमचाच आहे. मी तुमचा नसतो, तर मी तुमच्या (सनातनच्या) कार्यक्रमांना आलोच नसतो. काळजी करू नका. सनातन संस्थेवर बंदी येऊच शकत नाही, असे आश्‍वासन परांडा येथील विधान परिषदेतील भाजपचे आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी दिले. सनातन संस्थेच्या वतीने त्यांना संभाव्य बंदीच्या विरोधात निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
     परांडा येथील ग्रामदैवत काळभैरवचे श्री. संजय महाराज पुजारी यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी सांगितले, मी मंदिर ट्रस्टच्या वतीने पत्र पाठवतोे आणि इतर मंदिर संस्थांनाही हा विषय सांगतो. करमाळ्याचे शिवसेनेचे आमदार श्री. नारायण पाटील यांनाही कुर्डूवाडी येथे निवेदन देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या साधकांसह हिंदुत्ववादी श्री. दादा तिटवे उपस्थित होते.

मुसलमानांनी अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ नये ! - उलेमांचा फतवा

मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या कीर्तीवर मात करणारे उलेमांचे धर्मशिक्षण
     रामनाथपुरम् (तमिळनाडू) - भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा रामेश्‍वरम् येथे पुतळा बसवण्यात येणार आहे. पुतळा बनवणे, हे इस्लामच्या विरोधात असल्याचे सांगत येथील उलेमांनी पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात मुसलमानांनी सहभागी होऊ नये, असा फतवा काढला आहे. रामनाथपुरम् जिल्हा जमातुला उलेमा काऊन्सिलने म्हटले आहे की, आम्ही कलाम यांचा सन्मान करतो; मात्र पुतळा बनवणे इस्लामला मान्य नाही.

पाण्याचे अवर्षण दूर व्हावे, यासाठी कळंब, जिल्हा धाराशिव येथे २६ जुलैपासून पर्जन्ययाग आणि सुवृष्टीकारक प्रवर्ग्य विधीला प्रारंभ !

पर्जन्ययाग करतांना अहिताग्नि सोमयाजी श्री. चैतन्य काळेगुरुजी
आणि यजमानपदी असलेल श्री. समीर देशपांडे आणि त्यांच्या
धर्मपत्नी सौ. दिपाली देशपांडे, तसेच पौरोहित्य करतांना ऋत्विज

  • यज्ञ-यागावर टीका करणार्‍यांंना याविषयी काय म्हणायचे आहे !
  • पर्जन्ययागाला प्रारंभ केल्यानंतर ५५ मिलीमीटर पावसाची नोंद
        धाराशिव - लातूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचे अवर्षण दूर व्हावे, तसेच लातूर आणि कळंब परिसरातील धरण क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस व्हावा, या हेतूने बेंगळुरू येथील प्राकृती फाऊंडेशन आणि कासारवाडी-बार्शी, जिल्हा सोलापूर येथील श्री योगीराज वेद विज्ञान आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कळंब येथे २६ जुलैपासून पर्जन्य याग आणि सुवृष्टी कारक प्रवर्ग्य विधीला प्रारंभ झाला. कळंब शहरातील ढोकी रोड येथील श्री साई मंगल कार्यालयात हा विधी होत असून ३० जुलैला विधीची सांगता होणार आहे. कळंब येथील श्री. समीर देशपांडे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. दिपाली देशपांडे यागाच्या यजमानपदी आहेत.

धाराशिव (उस्मानाबाद) येथील गोवंश आणि अन्य जनावरे यांच्या हाडांपासून भुकटी सिद्ध करणारे ३ कारखाने टाळेबंद

यावरून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी 
कार्यवाही करणे किती आवश्यक आहे, हेच दिसून येते !
       धाराशिव, २८ जुलै - येथील पिंपरी, चिलवडी परिसरात गोवंश आणि अन्य जनावरे यांच्या हाडांपासून भुकटी (पावडर) आणि तेल सिद्ध करणारे ६ कारखाने होते. त्याविषयी ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींमुळे उपविभागीय अधिकार्‍यांच्या आदेशानुसार कडेकोट पोलीस बंदोबस्तात ३ कारखाने तहसीलदार आणि मंडल अधिकारी यांच्या पथकाने २७ जुलै या दिवशी टाळेबंद केले. (अवैध कारखान्यांवर कारवाईसाठी सातत्याने पाठपुरावा करणार्‍या ग्रामस्थांचे अभिनंदन ! - संपादक) त्या कारखान्यांमध्ये काम करणारे सर्व परप्रांतीय कामगार या कारवाईच्या वेळी पसार झाले आहेत. कारखान्यांचे मालक हे मुंबई आणि भाग्यनगर येथील असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
१. गेल्या १० वर्षांहून अधिक काळ हे कारखाने कार्यरत असून त्या ठिकाणी गाय, बैल, म्हैस आदी जनावरांची हत्या करण्यात येत होती. त्यांचे मांस आणि हाडांची भुकटी ही तेल, तूप, चीज आणि अन्य पदार्थ यांच्यामध्ये वापरण्यासाठी मुंबई येथे पाठवण्यात येत होती. (प्राण्यांचे मांस आणि हाडे यांचा वापर हा खाद्य पदार्थांमध्ये करण्यात येत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही ? अशा खाद्य पदार्थांची नियमित पडताळणी करण्यात येत नाही का ? या प्रकरणाची समूळ चौकशी करून संबंधित सर्वांवर कठोर कारवाई व्हायला हवी. - संपादक)

नेपाळमधील पावसामुळे बिहारमध्ये पूर, तर काश्मीर आणि आसामला पुराचा तडाखा !

     नवी देहली - नेपाळमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारच्या १२ जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले. दुसरीकडे ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्याने आसामच्या २१ जिल्ह्यांतील १६ लाख लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत बिहारमध्ये १७, तर आसाममध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे; मात्र नेपाळमध्ये ६४ जणांचा मृत्यू झाला.
     याव्यतिरिक्त जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बंगाल येथील नद्यांनाही पूर येण्याची शक्यता आहे. जम्मूमध्ये २ मुलांचा मृत्यू झाला आहे. श्रीनगर येथे लोकांच्या घरात पाणी घुसले आहे. ठिकठिकाणी दरड कोसळल्याने अमरनाथ यात्रा मध्येच थांबवण्यात आली आहे, तर केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे जाणारे यात्रेकरू मध्येच अडकले आहेत. सीमेवरील भारतीय सैन्याच्या चौकी आणि बंकर पाण्याखाली गेले आहेत. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळसहित ५ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, बंगाल, बिहार आणि आसाममधील पूरस्थितीवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

सनातन संस्थेवरील अन्यायकारक बंदीच्या मागणीला अधिवक्त्यांचा एकमुखाने विरोध ! - अधिवक्ता नीलेश सांगोलकर

सोलापुरातील पत्रकार परिषदेत अधिवक्ता 
आणि हिंदुत्ववादी यांनी दिला सनातन संस्थेला पाठिंबा ! 

डावीकडून श्री. सत्यनारायण गुर्रम, अधिवक्ता अभय कुलकर्णी, अधिवक्ता संदीप
अपसिंगेकर, अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्ता प्रियांका लिगाडे, श्री. गंगाधर गवसणे

       सोलापूर, २८ जुलै (वार्ता.) - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेविरोधात कोणतेही ठोस पुरावे हाती नसतांना काही राजकीय पक्ष, पुरोगामी संघटना आणि तथाकथित सामाजिक संघटना यांच्याकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. सनातन संस्थेवरील अन्यायकारक बंदीच्या मागणीला अधिवक्त्यांचा एकमुखाने विरोध करत सनातन संस्थेला आमचा पाठिंबा असल्याचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी स्पष्ट केले. २८ जुलै या दिवशी सोलापूर येथील श्रमिक पत्रकार संघ येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अधिवक्ता संदीप अपसिंगेकर, अधिवक्ता अभय कुलकर्णी, अधिवक्ता प्रियांका लिगाडे, आजोबा गणपती मंदिराचे सदस्य श्री. गंगाधर गवसणे, पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान समितीचे सचिव श्री. सत्यनारायण गुर्रम आदि उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांच्यावर ड्रोनद्वारे आक्रमण करण्याचा आतंकवाद्यांचा कट !

मूठभर आतंकवादी आक्रमणांचे कट रचतात, तर
 अण्वस्त्रधारी भारत केवळ बचावाचे नियोजन करतो !
     नवी देहली - १५ ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत असतांना त्यांच्यावर ड्रोनद्वारे (चालकविरहित विमानाद्वारे) आक्रमण करण्याचा कट जिहादी आतंकवादी संघटनांनी रचल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. या आक्रमणापासून रक्षण होण्यासाठी हा परिसर बुलेट-प्रूफ ओवरहेड कॅनोपी या यंत्रणेद्वारे सुरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे.

हिंदु धर्माचा अवमान करणार्‍या मल्याळम् चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास सेन्सॉर बोर्डाचा नकार !

हिंदु धर्माचा अवमान टाळण्याचा सेन्सॉर बोर्डाचा अभिनंदनीय निर्णय !
     नवी देहली - न्यूयॉर्क येथील मल्याळम् चित्रपट निर्माते जयन चेरियन यांच्या का बॉडीस्केप्स या चित्रपटात हिंदु धर्माचा अवमान आणि अश्‍लीलता असल्यामुळे त्याला प्रमाणपत्र देण्यास केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) नकार दिला आहे. हा चित्रपट समलैंगिक व्यक्ती आणि महिला यांच्या संबंधांवर बनवण्यात आला आहे.
     सेन्सॉर बोर्डाने चेरियन यांना या संदर्भात पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, या चित्रपटाचा पूर्ण संदर्भच हिंदु धर्मासाठी अवमानकारक आहे. यात हिंदु धर्माची टिंगल करण्यात आली आहे. विशेषतः देवी-देवतांचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे, तर भगवान हनुमानाला समलैंगिकतेची पुस्तके घेऊन जातांना दाखवले आहे. त्यातील एका पुस्तकाचे शीर्षक आय अ‍ॅम गे (मी समलैंगिक आहे) असे आहे. चेरियन यांनी सेन्सॉर बोर्डाचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

संभाजीनगर येथील शस्त्रसाठाप्रकरणी आतंकवादी अबू जुंदालसह १२ जण दोषी

  • कूर्मगतीने चालणारी न्याययंत्रणा !
  • १० वर्षांनंतर झाला निर्णय
       मुंबई - संभाजीनगरमध्ये वर्ष २००६ मध्ये घडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणात लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी आणि २६/११ च्या मुंबई आक्रमणाचा सूत्रधार अबू जुंदालसह १२ आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने दोषी ठरवले आहे, तर १० जणांची निर्दोेष सुटका केली आहे. सर्व दोषींवरील मोक्का हटवण्यात आला आहे. २९ जुलै या दिवशी त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. २० वर्षांच्या इतिहासात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
१. महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने ८ मे २००६ या दिवशी टाटा सुमो आणि इंडिका कारचा पाठलाग करून संभाजीनगर येथील वेरुळमध्ये तीन संशयित अतिरेक्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून ३० किलो आर्.डी.एक्स., १० एके-४७ रायफल आणि ३ सहस्र २०० गोळ्या कह्यात घेतल्या होत्या; मात्र त्या वेळी इंडिकाचा चालक अबू जुंदाल पसार झाला.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा मूर्खपणा करू नये ! - ह.भ.प. भानुदास महाराज तुपे

        पुणे, २८ जुलै (वार्ता.) - सनातन संस्थेवर जे आरोप केले जात आहेत, ते चुकीचे आहेत. कुठलाही पुरावा हातात नसतांना आरोप करणे अयोग्य आहे. सनातन संस्था लोकांना पूजापाठ, ध्यानधारणा, नामस्मरण, चिंतन अशा चांगल्या गोष्टी शिकवते. सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा मूर्खपणा करू नये, असे प्रतिपादन वारकरी महामंडळाचे सदस्य ह.भ.प. भानुदास महाराज तुपे यांनी केले. सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, श्री. प्रशांत पाटील, सनातन संस्थेचे श्री. शंभू गवारे यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
ह.भ.प. तुपे महाराज पुढे म्हणाले की,
१. आपलेच लोक आपल्याला त्रास देत आहेत. सनातनवर बंदीची मागणी करणे म्हणजे चोराला पोळी आणि संन्याशाला सुळी देण्याचा प्रकार आहे.
२. नाशिकच्या कुंभमेळ्यात सनातनने अतिशय सुंदर प्रदर्शन लावले होते.

भगवा ध्वज आणि चौक हटवल्यास संघर्ष होईल ! - हिंदुत्वनिष्ठ आणि शिवसेना यांची बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे चेतावणी

भारतात भगवा ध्वज लावायचा नाही, तर पाकिस्तानचा ध्वज फडकवायचा का ? 
हिंदुबहुल देशात भगव्या ध्वजासाठी संघर्ष करावा लागणे, हे शासनाला लज्जास्पद !
चिपळूण, रत्नागिरी येथील कोंढे-करंबवणे फाट्यावरील भगवाध्वज आणि 
चौक हटवण्यासाठी बांधकाम विभाग आणि पोलीस यांच्याकडून दबाव !
याच भगव्या ध्वजाला आक्षेप घेतला जात आहे
      चिपळूण २८ जुलै (वार्ता) - येथील कोंढे-करंबवणे फाट्यावर चौक उभारून लावण्यात आलेला भगवा ध्वज कोणी उतरवण्याची भाषा करत असेल, तर आम्ही गप्प रहाणार नाही. भगवा ध्वज ही हिंदूंची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे ते प्रतीक आहे. चौक अनधिकृत ठरवणार्‍यांनी प्रथम महामार्गालगतची अन्य अनधिकृत बांधकामे हटवावीत. भगवा ध्वज आणि चौक हटवल्यास संघर्ष होईल, असे लेखी निवेदन खाडी मालदोली येथील ग्रामस्थ आणि शिवसैनिक यांनी बांधकाम विभागाला दिले.

पाकने काश्मीरचे स्वप्न पहाण्यापेक्षा कराचीची चिंता करावी ! - अल्ताफ हुसेन, मुत्तैहिदा कौमी मुव्हमेंट

      नवी देहली - पाकने काश्मीर मिळवण्याचे स्वप्न पहाण्यापेक्षा कराचीची चिंता करावी, अशी टीका पाकमधील निर्वासित मुत्तैहिदा कौमी मुव्हमेंट संघटनेचे नेते अल्ताफ हुसेन यांनी केली आहे. हुसेन यांच्या समर्थकांनी अमेरिकेत व्हाईट हाऊसच्या बाहेर निदर्शने करून न्याय देण्याची मागणी केली. या वेळी पाक सैन्याचे समर्थक आणि हुसेन यांचे समर्थक यांच्यात हाणामारी झाली. तत्पूर्वी हुसेन यांनी लंडन येथून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे समर्थकांना मार्गदर्शन केले.

फलक प्रसिद्धीकरता

कोणीही वाली नसलेले पाकमधील अल्पसंख्यांक हिंदू !
     पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे एका हिंदु व्यक्तीने कुराणाला कथितपणे अपवित्र केल्यावर उसळलेल्या दंगलीत २ हिंदु तरुणांंवर गोळ्या झाडण्यात आल्या. यात दिवान सतीश कुमार याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक हिंदूंनी प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

डॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेकडून धर्मांतरासाठी प्रत्येकी ५० सहस्र रुपयांचा खर्च !

  • आणखी किती पुरावे मिळाल्यानंतर डॉ. झाकीर नाईक यांना अटक करून त्यांच्या संस्थेवर बंदी घालण्यात येणार आहे ?
  • निरपराध सनातनवर बंदी घालण्याची मागणी करणारे निधर्मीवादी आणि पुरोगामी डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात का बोलत नाहीत ?
      मुंबई - डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेेशनचा जनसंपर्क अधिकारी अरशी कुरेशी याला नुकतीच अटक करण्यात आली. त्याच्याकडील कागदपत्रांद्वारे संस्थेने ८०० जणांचे धर्मांतर केल्याचे उघडकीस आले आहे. यातील प्रत्येक धर्मांतरासाठी संस्थेने ५० सहस्र रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. हे सर्व धर्मांतर अवैधरित्या करण्यात आले आहे. कुरेशीसह त्याचा सहकारी रिझवान खान यालाही अटक करण्यात आली आहे. 
     या दोघांच्या चौकशीतून माहिती मिळाली की, रिझवान हा एक मौलवी आहे. तो प्रथम लोकांना मानसिक स्तरावर धर्मांतरासाठी सिद्ध करत होता आणि त्यानंतर धर्मांतर केले जात होते. रिझवान इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनसह मुंबईतील माझगाव येथील अल-बिर्र फाऊंडेेशनसाठीही काम करत होता. या संस्थेत धर्मांतरासह विवाहही करून दिले जात होते. या संदर्भातील सर्व कागदपत्रे कुरेशीच्या डोंगरी येथील कार्यालयात बनवली जात होती.
    या संपूर्ण प्रक्रियेनंतर रिझवान इस्लामिक रिसर्च फाऊंडेेशनला खर्च सादर करत होता आणि मग कुरेशी संस्थेकडून रिझवान याला प्रत्येक धर्मांतरासाठी ५० सहस्र रुपये देत होता.

धर्मांधांच्या मारहाणीत ठार झालेल्या डॉ. नारंग यांच्या कुटुंबियांना युनायटेड हिंदू फ्रंटच्या शिष्टमंडळाची भेट !

      नवी देहली - येथील धर्मांधांच्या मारहाणीत ठार झालेल्या डॉ. नारंग यांच्या निवासस्थानी युनायटेड हिंदू फ्रंटच्या एका शिष्टमंडळाने २७ जुलैला भेट दिली. तसेच त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊन, सर्व हिंदु संघटना त्यांच्या पाठीशी आहेत, असे सांगितले. 
१. काही महिन्यांपूर्वी एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे डॉ. नारंग यांना काही धर्मांधांनी मारहाण केली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
२. या घटनेनंतर डॉ. नारंग यांच्या कुटुंबियांना देहलीतील आप सरकारकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक साहाय्य करण्यात आले नव्हते. दुसरीकडे आप सरकारने मात्र उत्तरप्रदेशातील दादरी येथे गोमांसप्रकरणी मरण पावलेल्या अखलाखच्या कुटुंबियांना ४५ लक्ष आणि हत्या झालेले राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी तंजील अहमद यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांचे साहाय्य केले होते. (निधर्मीवादाच्या नावाखाली मुसलमानांचे लांगूलचालन करणारा आम आदमी पक्ष लोकशाहीला कलंकच होय ! - संपादक)

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pakistanke Sindhme Quranke kathit apmanpar hui hinsame dharmandhone ki 1 Hinduki hatya. -  Pakke Hinduoki vyathapar secularwadiyoke saath sarkar bhi chup!
जागो !
: पाकिस्तान के सिंध में कुरान के कथित अपमान पर हुई हिंसा में धर्मांधों ने की १ हिन्दू की हत्या.
    पाक के हिन्दुआें की व्यथा पर सेक्युलरवादियों के साथ सरकार भी चुप !

सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा देणे हे कर्तव्य ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

फरीदाबाद (हरियाणा) येथील हिंदूसंघटन मेळावा !
डावीकडून कु. कृतिका खत्री, अधिवक्ता हरि शंकर जैन 
आणि मार्गदर्शन करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
      फरीदाबाद (हरियाणा) - आज प्रत्येक व्यक्तीला सकाळी उठल्यापासून प्रत्येक क्षेत्रातील भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागत आहे. प्रशासन, आरोग्य, शिक्षण, पोलीस यांपैकी कोठेही गेलात, तरी सामान्य लोकांना न्याय मिळत नाही, अशी स्थिती आहे. या प्रवृत्तीच्या विरोधात संघटितपणे लढा न दिल्याने त्या बलवान झाल्या आहेत. त्यामुळे या समस्यांच्या विरोधात लढा देणे हे आपले राष्ट्र आणि धर्म कर्तव्य आहे. सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात संघटितपणे लढा देता येईल; मात्र राष्ट्रीय आणि धार्मिक समस्या सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्र अर्थात सनातन धर्म राज्य स्थापित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदुु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. शारिका भवन (कश्मिरी मंदिर) येथे समितीद्वारे आयोजित हिंदुसंघटन मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचा प्रारंभ वैदिक उपासना पिठाच्या पू. तनुजा ठाकुर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून झाला. त्यानंतर सप्तर्षि जीवनाडीपट्टीमध्ये दिलेली राष्ट्र आणि धर्म संबंधी वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगण्यात आली.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात सर्व हिंदूंनी सहभागी व्हावे ! - ज्येष्ठ पत्रकार बी.आर्. हरन यांचे आवाहन

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीतर्फे हिंदूसंघटन मेळावा
सनातनच्या ग्रंथांचे प्रकाशन करतांना डावीकडून ज्येष्ठ 
पत्रकार श्री. बी.आर्. हरन आणि तमिळनाडू शिवसेनेचे 
महासचिव श्री. रविचंद्रन्
     चेन्नई - सनातनवर खोटे आरोप करणारे राजकारणी आणि प्रसारमाध्यमे यांचा ज्येष्ठ पत्रकार श्री. बी.आर्. हरन यांनी निषेध केला, तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आरंभलेल्या धर्मप्रसाच्या कार्यात सर्व धर्माभिमानी हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. हरन यांनी चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डी.जी. वैष्णव महाविद्यालय, अरुंबक्कम् येथे आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात केले. गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्त समितीच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन आले होते. या मेळाव्याला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी समितीचे श्री. जयकुमार यांनी स्वसंरक्षणाचे महत्त्व सांगतांना आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवण्याची आवश्यकता सांगितली.

मुलांना भारतात पाठवा !

असे वरवरचे उपाय करण्यापेक्षा पाकबरोबरचे सर्व संबंध का तोडून टाकण्यात येत नाहीत ?
पाकमधील भारतीय अधिकार्‍यांना केंद्रसरकारचा आदेश !
       नवी देहली - पाकमध्ये रहाणार्‍या भारतीय अधिकार्‍यांनी त्यांच्या मुलांचा स्थानिक शाळांमधील प्रवेश रहीत करावा आणि त्यांना भारतात पाठवावे अथवा ते शक्य नसल्यास त्यांच्यासह स्वत: परत यावे, असा आदेश भारत सरकारने दिला आहे. या अधिकार्‍यांची पत्नी अथवा पती मात्र त्यांच्यासोबत पाकिस्तानात राहू शकतात. इस्लामाबादमधील अमेरिकी शाळेमध्ये भारतीय अधिकार्‍यांची एकूण ५० मुले शिकत आहेत. भारताच्या या आदेशाप्रमाणेच पाकिस्तानही त्याच्या अधिकार्‍यांना असा आदेश देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काश्मीरच्या सूत्रावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाचाच परिणाम म्हणून भारत सरकारच्या या आदेशाकडे पाहिले जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूर हद्दवाढीच्या सूचनेला स्थगिती !

       मुंबई/कोल्हापूर, २८ जुलै (विशेष प्रतिनिधी) - कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या विरोधात कोल्हापूर येथील भाजपचे आमदार सर्वश्री अमल महाडिक, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि डॉ. सुजित मिणचेकर हे विधानभवनाच्या पायर्‍यावर बेमुदत उपोषणाला बसले. गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर शहर हद्दवाढीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. याच पार्श्‍वभूमीवर कोल्हापूरच्या आमदारांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन निषेध म्हणून विधानभवनाच्या परिसरात बेमुदत उपोषण करण्याविषयी निवेदन दिले. हद्दवाढीविषयी शासनाने अधिसूचना काढू नये, अशी त्यांनी विनंती केली. तेव्हा लोकांना विश्‍वासात घेतल्याविना हा निर्णय घेणार नाही, असे आश्‍वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीच्या अधिसूचनेला स्थगिती दिली.

हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द वापरात आणण्याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेले गुह्य ज्ञान !

प.पू. पांडे महाराज
    १६.६.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये महर्षींनी ८.६.२०१६ जीवनाडीपट्टी क्र. ८२ मध्ये हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द वापरावा, अशा आशयाची चौकट प्रसिद्ध झाली होती.
      चौकटीत पुढे असेही लिहिले होते, सनातन हा मूळ धर्म आहे. काळाच्या ओघात त्याचे हिंदु असे नाव प्रचलित झाले. सिंधू नदीच्या काठी रहातात, ते हिंदू, अशी हिंदु शब्दाची एक व्युत्पत्ती सांगितली जाते. याविषयी काही वर्षांपूर्वी बोलतांना परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, सध्या हिंदु धर्म असे नाव प्रचलित असले, तरी त्याचे मूळ नाव सनातन धर्म असे आहे. आपण सध्या प्रचलित आहे; म्हणून हिंदु धर्म असा उल्लेख करू; पण पुढे हिंदु राष्ट्रात सनातन धर्म असाच उल्लेख प्रचलित करू. आता महर्षींनी दिलेला संदेशही तशाच अर्थाचा आहे. महर्षींनी नाडीपट्टीत सहस्रो वर्षांपूर्वी भविष्य कथन स्वरूपात केलेले लिखाण आणि प.पू. डॉक्टरांनी व्यक्त केलेले वरील विचार यांतील साम्य पहाता त्यांचे त्रिकालज्ञानीत्व लक्षात येते. 
     सनातन धर्म म्हणजे काय ? सनातन धर्म राज्य म्हणजे काय ?, याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी केलेल्या विवेचनाचा पूर्वार्ध काल आपण पाहिला आज उत्तरार्ध पाहू.

कुकर्मी चित्रपटाच्या दिग्दर्शकांचा कांगावा !

      एखादा पदार्थ जहाल तिखट बनवला आणि खाणार्‍याने तो पदार्थ तिखट झाला आहे, असे सांगितल्यावर पदार्थ बनवणार्‍याने मी तर चमचाभर साखर घातली होती, खाणार्‍यांचे साखरेकडे लक्षच जात नाही, अशी बाजू मांडली, तर ती ज्याप्रमाणे हास्यास्पद ठरेल, तसेच सध्या काहीसे सैराट चित्रपटाविषयी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलेल्या वक्तव्याच्या बाबतीत झाले आहे.

निस्सीम सेवेने दत्तात्रयाचे दर्शन झालेले संत एकनाथ महाराज !

       संत एकनाथ महाराज यांचा जन्म संत भानुदास यांच्या कुळात देशस्थ ऋग्वेदी आश्‍वलायन ब्राह्मण कुटुंबात झाला. नाथांचे माता-पिता त्यांच्या बालपणीच निवर्तले. त्यामुळे नाथांचा सांभाळ त्यांच्या आजी-आजोबांनी केला. नाथांना बालपणापासूनच भगवद्भक्तीचे वेड होते. गुरुकृपेने भगवंताची भेट होते, हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी (आकाशवाणीच्या निर्देशानुसार) नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे दत्तभक्त जनार्दनस्वामी किल्लेदार म्हणून होते. नाथांनी त्यांना पाहिले आणि त्यांना सद्गुरु मानून त्यांची मनोभावे सेवा केली.

गोवंशाची अवैध वाहतूक !

श्री. सुधाकर चपळगांवकर
       मध्यंतरी गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक अनावर (संतप्त) जमावाने जाळून टाकल्याचे वृत्त वाचले. जमाव एवढा अनावर होण्याचे कारण वृत्तासोबतच्या काही छायाचित्रांवरून स्पष्ट दिसत होते. गोवंश अत्यंत क्रूर पद्धतीने आणि अक्षरशः कोंबून वाहतूक केल्यामुळे अनेक गायी वाटेतच मरण पावल्या होत्या, तर काही कायमच्या अपंग झाल्या होत्या. मातेसमान असलेल्या गायींची अशाप्रकारे वाहतूक आणि पर्यायाने झालेले मृत्यू अन् अपंगत्व पाहून कोणतेही भारतीय मन संतापाने पेटून उठणे साहाजिक आहे.
       ट्रक जाळल्याने मालकाची काहीही आर्थिक हानी होत नाही; कारण ट्रकचा संपूर्ण विमा उतरवलेला असतो. ही बाब जरी खरी असली, तरी गोवंशाची वाहतूक करण्यासाठी वाहतूकदाराने विशिष्ट काळजी घेतली पाहिजे, अशी कायद्यामध्ये/नियमांमध्ये तरतूद आहे. या तरतुदीचा भंग करून गोवंशाची वाहतूक केली आणि त्यातून होणार्‍या परिणामामुळे ट्रक जाळण्यात आला, तर साहजिकच कराराचा भंग झाल्याच्या कारणावरून विमा आस्थापनांकडून विमा रक्कम नाकारण्याचा बचाव येऊ शकतो. याची जाण गोवंशाची अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांच्या मालक/चालकाने ठेवली पाहिजे अन्यथा ट्रक जाईलच आणि हानीभरपाईही हाती पडणार नाही. अशी वेळ येण्याची शक्यता वाटते.
- श्री. सुधाकर चपळगांवकर, माजी जिल्हा न्यायाधीश, संभाजीनगर (२६.६.२०१६)

मंगलमय दीपपूजन साजरा करणार कि लाजिरवाणी गटारी ?

      अलीकडे आषाढ अमावास्या या दिवसाला गटारी अमावास्या असे चुकीचे संबोधून ती साजरी करण्याची कुप्रथा समाजात प्रचलित होत आहे. आषाढ अमावस्येच्या दुसर्‍या दिवसापासून श्रावण मास चालू होत असल्याने आणि हा पवित्र मास मानला जात असल्याने असंख्य जण त्या काळात मांसाहर वर्ज्य करतात. काही जणांना पुढे महिनाभर, तर काही जणांना चातुर्मास संपेपर्यंत मांसाहर करायला मिळणार नसल्यामुळे गटारी अमावास्येच्या दिवशी दारू आणि मांसाहर यांचे सेवन केले जाते. या कुप्रथेचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करण्यात येते. या चुकीच्या प्रथेच्या विरोधात जागृती करणारा पुढील संदेश सध्या व्हॉटस् अ‍ॅप, फेसबूक यांसारख्या सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित होत आहे. तो आमच्या वाचकांसाठी येथे आहे असा देत आहोत.

सर्वसामान्य जनता जीवनावश्यक सुविधांच्या अभावी विविध समस्यांना तोंड देत असतांना कर्मचार्‍यांवर पैशांची उधळपट्टी करणारे एक शासकीय विमान आस्थापन !

     एक विमान आस्थापन शासकीय असून ते भारतात सुप्रसिद्ध आहे. त्यामध्ये सहस्रो कर्मचारी कार्यरत आहेत. या आस्थापनाने सर्व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना अत्यल्प दरात विमानप्रवास करण्याची सुविधा दिली आहे. त्या अंतर्गत कर्मचार्‍यांच्या दर्जाप्रमाणे (ग्रेडप्रमाणे) निर्धारित केलेल्या संख्येनुसार तेवढ्या वेळा ते कुटुंबियांसह कोणत्याही ठिकाणी विमानाने प्रवास करू शकतात.
    ज्या कर्मचार्‍यांना अत्यावश्यक आहे, त्यांना आस्थापनाने सुविधा देणे समर्थनीय आहे. जे कर्मचारी सधन आहेत, स्वखर्चाने प्रवास करू शकतात, त्यांना नोकरीत असतांना आणि निवृत्तीनंतरही या शासकीय विमान आस्थापनाने दिलेली सवलत म्हणजे पैशांची उधळपट्टीच आहे.
     आज सर्वत्रची सर्वसामान्य जनता अन्न, पाणी, वीज आदी जीवनावश्यक सुविधांपासून वंचित आहे, अशा अनेक समस्या असतांना शासकीय आस्थापनाने तो पैसा राष्ट्रउभारणीसाठी उपयोगात आणणे अपेक्षित आहे !

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

      एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या चिन्हांमुळे पालटणारे वाक्यचे अर्थ सांगणारे हे सदर !

     आज प्रत्येक आई-वडील माझा मुलगा डॉक्टर, अभियंता वगैरे व्हावा, असे म्हणतात; पण कोणीही सत्पुरुष व्हावा, असे म्हणत नाहीत ! - प.पू. झुरळे महाराज, डोंबिवली
      घडून गेलेले सत्य दडपून ठेवण्याची भारतीय पुरातत्व खात्याची मानसिकता आहे. जे घडले आहे, ते लोकांना कळू द्यायचे नाही. स्वातंत्र्योत्तर काळानंतरही सत्य इतिहास लोकांपर्यंत आला नाही. त्यामुळे लोक सत्य इतिहासापासून वंचित राहिले ! 
- श्री. फ्रान्सुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार

मुसलमानांना सहजासहजी नागरिकत्व नाही !

चीनला कळते, ते भारतातील एकाही राजकीय पक्षाला का
 कळत नाही ? त्याचे राष्ट्रावर मुळीच प्रेम नाही, हे यातून सिद्ध होते !
     मुसलमानांना सहजासहजी चीनचे नागरिकत्व मिळत नाही. सर्व मुसलमानांवर आणि विदेशातून आलेल्या त्यांच्या नातेवाइकांवर तेथे बारीक लक्ष ठेवण्यात येते.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे - हर्ली यांना आलेल्या अनुभूती

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २६ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत 
चालू असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने...
पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली
१. यज्ञाच्या वेळी पुरोहित चंडीकवच म्हणतांना आलेली अनुभूती
१ अ. पुरोहितांनी चंडीकवचातील खड्गधारिणी हा शब्द उच्चारताच बंद डोळ्यांसमोर हातात खड्ग घेतलेली देवी प्रकट होणे : एप्रिल २०१६ मधे रामनाथी आश्रमात स्वागतकक्षाच्या बाहेर एक यज्ञ संपन्न झाला. तो यज्ञ पहाण्यासाठी मी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातील शिबिरार्थींच्या समवेत गेले होते. त्या वेळी साधक पुरोहित चंडीकवच म्हणत होते. देवीची विविध नावे घेऊन स्वाहा, असे म्हणत ते यज्ञामध्ये धान्याची आहुती देत होते. त्यांनी खड्गधारिणी (हातात खड्ग घेतलेली देवी) हा शब्द उच्चारताच मला माझ्या बंद डोळ्यांसमोर असे दृश्य दिसले - हातात खड्ग घेतलेली देवी माझ्यासमोर प्रकट झाली आणि खड्गाच्या एका घावात तिने माझ्या सूक्ष्म देहाचे दोन तुकडे केले, असे मला जाणवले.

संभाजीनगर येथील संत एकनाथ महाराजांचे १२ वे वंशज प.पू. गणेश गोसावी महाराज यांचा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

प.पू. गणेश गोसावी महाराज यांना ओवाळतांना सौ. कल्याणी शहाणे 
आणि वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी, त्यांच्या मागे (उजवीकडे) 
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि अन्य साधक
     सनातन आश्रम, रामनाथी, २८ जुलै (वार्ता.) - येथे संभाजीनगर येथील संत एकनाथांचे १२ वे वंशज प.पू. गणेश गोसावी महाराज (वय ८२ वर्षे) यांचा २६ जुलैला रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला चरणस्पर्श झाला. साक्षात् महर्षींनी भूलोकीचा वैकुंठ अशा शब्दांत गौरवलेल्या रामनाथी आश्रमात प.पू. गणेश गोसावी महाराज यांच्या रूपाने संत एकनाथ महाराजांचे चैतन्यच अवतरले. या वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. डॉ. मुकुल गाडगीळ हे उपस्थित होते. मंगलमय शंखनादासह वेदमंत्रांच्या घोषात प.पू. गणेश गोसावी महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली. सनातन साधक-पुरोहित पाठशाळेचे अध्यापक वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी आणि त्यांची धर्मपत्नी सौ. कल्याणी शहाणे यांनी त्यांची पाद्यपूजा केली. वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी यांनी पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला, तर सौ. कल्याणी शहाणे यांनी औक्षण केले. प.पू. गणेश गोसावी महाराज यांच्या स्वागतासाठी ठेवलेल्या फलकाच्या माध्यमातून आश्रमातील सर्व साधकांनी त्यांच्या चरणी शब्दरूपी शरणागत पुष्पांजली अर्पण केली. या वेळी उपस्थित सर्व संत आणि साधक यांचा भाव जागृत झाला.

दिवसरात्र सेवेचा ध्यास असलेले आणि तत्त्वनिष्ठ राहून साधकांना खर्‍या अर्थाने घडवणारे अद्वितीय संतरत्न पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ (डावीकडे) यांनी विविध प्रश्‍नांद्वारे
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा साधनाप्रवास उलगडला

        हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी अखंड कार्यरत असणार्‍या आणि साक्षात् महर्षींनी गौरवलेल्या सनातनच्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ २४ जुलै या दिवशी सद्गुरुपदी विराजमान झाल्या. या भावसोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दोघींनीही एकमेकींना प्रश्‍न विचारून त्याद्वारे प्रत्येकीचा साधनाप्रवास उलगडला. या संवादातून सनातनच्या संतांमधील दुर्लभ आणि अनमोल गुण अनुभवण्याची संधी सर्व साधकांना मिळाली. सनातनच्या सर्वच साधकांना या अनमोल संतरत्नांची गुणवैशिष्ट्ये कळावीत, यासाठी हा साधनाप्रवास लेखाद्वारे उलगडून दाखवला आहे. श्रीकृष्णाने अशा महान संतांच्या सान्निध्यात सनातनच्या साधकांना रहाण्याची संधी दिली, यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता !

प.पू. डॉक्टरांच्या विराट आणि निर्गुण रूपाची सौ. श्‍वेता क्लार्क यांना आलेली अनुभूती

सौ. श्‍वेता क्लार्क
१. प्रवास करतांना प.पू. डॉक्टरांविषयी विचार मनात येऊन भावजागृती 
होणे आणि प.पू. डॉॅक्टरांचे विराट रूप डोळ्यांसमोर दिसून 
त्यात सर्व ब्रह्मांडे समाविष्ट असल्याचे दिसणे 
      माझे हाँगकाँग, सिंगापूर आणि मलेशिया या देशांत प्रसारसेवेचे नियोजन झाले होते. क्वालालंपूर येथील एक प्रवचन झाल्यावर मी आणि एक साधिका (सुभाषिनीताई) आम्ही दोघी घरी परतत होतो. मी गाडीत बसताक्षणी माझा भाव जागृत झाला आणि साधारण एक घंट्याच्या या प्रवासात माझ्या मनात प.पू. डॉक्टरांविषयी विचार येऊ लागले. मला त्यांची पुष्कळ आठवण आल्याने मी त्यांच्याशी मानसरित्या बोलू लागले. थोड्याच वेळात मला एक दृश्य दिसले. त्यात प.पू. डॉक्टरांचे रूप मोठे मोठे होत गेले. अल्पावधीतच तेे एवढे मोठे झाले की, माझ्या दृष्टीक्षेपात मावेनासे झाले. प.पू. डॉक्टरांच्या या विराट रूपात अनेक ब्रह्मांडे समाविष्ट असल्याचे मला जाणवले. या विश्‍वातील सर्वच गोष्टी त्यांच्यामधे सामावलेल्या असून त्यांच्या बाहेर असे काहीही नव्हते. त्या वेळी माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

हा सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेचा आविष्कार होय !

आश्रमातील कार्य पाहून प.पू. गोसावी महाराज यांनी काढलेले उद्गार 
आश्रमातील ध्यानमंदिरात श्री भवानीमातेच्या मूर्तीचे 
दर्शन घेतांना सर्वांत डावीकडे प.पू. गोसावी महाराज 
अन् सर्वांत उजवीकडे डॉ. (सौ.) नंदिनी सामंत
     प.पू. गणेश गोसावी महाराज यांनी सनातनचा आश्रम अत्यंत उत्साहाने पाहिला. या वेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. सनातनच्या साधिका डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती करून दिली. 
      सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी प्रशंसोद्गार काढतांना प.पू. गोसावी महाराज म्हणाले, प.पू. डॉक्टर म्हणजे अवतारी पुरुषच आहेत. (एका नाडीवाचनात महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले हे विष्णूचा अवतार आहेत, असे म्हटले आहे. - संपादक) या सर्वांतून त्यांचे दिव्यत्व सिद्ध होते. हा सर्व त्यांच्या कृपेचा आविष्कार आहे. आश्रम पहातांना ते सारखे म्हणत होते, मी दमलेलो नाही, जेवढे आहे, तेवढे सगळे दाखवा. सूक्ष्म-जगताविषयी सनातनने केलेल्या संशोधनाचे प्रदर्शनही त्यांनी पुष्कळ जिज्ञासेने पाहिले.

आता वय झाले, नाहीतर मीही झोकून देऊन कार्य केले असते ! - प.पू. गणेश गोसावी महाराज

प.पू. गणेश गोसावी महाराज यांचा रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सन्मान
                         धन्य आज दिन संतदर्शनाचा । अनंत जन्मीचा शीण गेला ॥ १ ॥
                         मज वाटे त्यांसी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्यांचे ॥ २ ॥
                         एका जनार्दनी घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग जन्मो जन्मी ॥ ३ ॥ 
प.पू. गणेश गोसावी महाराज (उजवीकडे) यांचा 
सन्मान करतांना पू. डॉ. मुकुल गाडगीळ
      हा भावपूर्ण अभंग म्हणून प.पू. गणेश गोसावी महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याशी झालेल्या भेटीची भावना त्यांच्या ओघवत्या वाणीत व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी सनातनशी माझा उशिरा परिचय झाला. आज माझे वयही झाले आहे. नाही तर मीही झोकून देऊन कार्य केले असते, अशा शब्दांत धर्मकार्याविषयी तळमळ प्रकट केली.
     प.पू. गोसावी महाराज यांनी २६ जुलै या दिवशी त्यांच्या काही आप्तस्वकियांसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याशी चर्चा करतांना ते पुढे म्हणाले, सनातनचे कार्य अनेक वर्षांपासून चालू आहे. तीव्र तळमळीने कार्य करणारी अनेक माणसे तुम्ही निर्माण केली आहेत. तुमचे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना मी संत एकनाथ महाराजांना केली आहे. 
     तुमच्या भेटीमुळे मला माझ्या गुरूंची स्थिती अनुभवायला मिळाली, असे या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले प.पू. गोसावी महाराज यांना म्हणाले.

पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकूंच्या सेवेत असतांना साधिकांना जाणवलेली सूत्रे

१. देहबुद्धी अल्प असणे
       पू. काकूंना मालीश करण्याची सेवा करतांना त्यांची देहबुद्धी पुष्कळ अल्प असल्याचे जाणवते.
२. पू. काकूंमधील चैतन्यामुळे स्वतःवरील 
त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट झाल्याचे जाणवणे
       पू. काकूंना मालीश करण्याची सेवा करतांना त्यांच्या शरिराला स्पर्श केला की, पू. काकूंच्या चैतन्यमय देहातील चैतन्यामुळे माझ्यावरील त्रासदायक आवरण नष्ट होऊन माझा त्रास उणावल्याचे माझ्या लक्षात येते.
३. मालीश करतांना, त्यांच्याशी बोलतांना किंवा त्या समवेत असतांना मनामध्ये आनंदाचे अन् चैतन्याचे कारंजे उडत आहे, असे जाणवते.
४. मन निर्विचार होऊन आनंद मिळणे
       पू. काकूंना मालीश करतांना मन निर्विचार होऊन आनंद मिळतो, ध्यान लागते. देवाच्या अनुसंधानातून बाहेरच येऊ नये, अशी स्थिती होते.

प.पू. गुरुदेव सर्वस्व असल्याने साधिकेने त्यांच्या चरणी वाहिलेली कृतज्ञतारुपी भावपुष्पे !

सौ. रुची गोल्लामुडी
      काही आठवड्यांपासून मला दिवसभर प.पू. गुरुदेेवांचे अस्तित्व सतत जाणवत आहे. मी डोळे मिटल्यावर त्यांचे मुखकमल माझ्या दृष्टीसमोर येते. (मला आध्यात्मिक त्रास होत असतांना असे होत नाही.) त्या वेळी मला आतून शांत वाटून कुणीतरी सांत्वन करत आहे, असे जाणवते. माझे स्वभावदोष आणि अहं यांमुळे माझ्या मनात प्रतिक्रिया येतात; परंतु काही मिनिटांतच मी पुन्हा शांत होऊन माझ्याकडून झालेल्या चुका किंवा माझी कृती यांविषयी मी चिंतन करते. कधीकधी मला मी आणि माझ्या सभोवतालचा परिसर किंबहुना विश्‍व स्तब्ध झाले आहे, असे जाणवते.

एस्.एस्.आर्.एफ्.चे युरोप येथील साधक श्री. कार्ल यांना आलेली अनुभूती

श्री. कार्ल
      रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी ६ मास किंवा १ वर्षापर्यंत आश्रमात रहाण्याची इच्छा सहकार्‍यांना बोलून दाखवणे आणि प्रत्यक्षात तसाच निरोप मिळणे, त्या वेळी मनाची सिद्धता होण्यासाठीच ईश्‍वराने तो विचार आधीच दिल्याचे जाणवणे : २०१५ या वर्षी मी रामनाथी आश्रमात कार्यशाळेसाठी आलो होतो. कार्यशाळेच्या सातव्या दिवशी (१२.८.२०१५) मी सूक्ष्मातून प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांना मला माझ्या इच्छा आणि अपेक्षा तुमच्या चरणी अर्पण करायच्या आहेत, अशी प्रार्थना केली. तेव्हा (सूक्ष्मातून) श्रीकृष्ण म्हणाला, काळजी करू नकोस. मी त्याची सिद्धता केली आहे. 
      प्रत्यक्षातही मला त्यानंतर तू ६ मासांसाठी (महिन्यांसाठी) किंवा १ वर्षासाठी आश्रमात रहायला ये, असा निरोप मिळाला. त्या वेळी मला आठवले की, रामनाथी आश्रमात येण्याच्या २ आठवड्यांपूर्वी मी माझ्या सहकार्‍यांशी बोलतांना मला ६ मास किंवा १ वर्षापर्यंत आश्रमात रहाण्याची इच्छा आहे, असे म्हटले होते. तेव्हा माझ्या मनाची सिद्धता होण्यासाठीच ईश्‍वराने तो विचार मला आधीच दिला होता, असे मला वाटले. 
- श्री. कार्ल, युरोप (१२.८.२०१५)

कु. मेरी कियॉन यांना सूर्यनमस्कार घालतांना आलेली अनुभूती

कु. मेरी कियॉन
१. सूर्यनमस्कार घालतांना अखंड नामजप होऊन प्रत्येक 
कृती सूर्यदेवाच्या स्तुतीप्रीत्यर्थ होत असल्याचे दिसणे 
     १४.८.२०१४ या दिवशी सकाळी मी सूर्यनमस्कार घालत असतांना माझी प्रत्येक कृती सूर्यदेवाच्या स्तुतीप्रीत्यर्थ होत आहे, असेे मला वाटत होते. खाली वाकल्यावर देवा मी तुलाच नमस्कार करत आहे, असा विचार मनात येत होता. त्या वेळी माझा अखंड नामजप चालू होता. उभे राहिल्यावर खिडकीतून येणार्‍या सूर्यप्रकाशामध्ये मी पूर्णतः न्हाऊन निघत असल्याचे माझ्या लक्षात आले.
२. आरती म्हणतांना अचानक आरतीतील शब्दच आठवेनासे होणे 
      त्यानंतर सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात होणार्‍या सद्गुरु ज्योतसे ज्योत जगाओ ।, या आरतीविषयी माझ्या मनात विचार आला. मीही आरती म्हणत गुरुदेवांना आळवू लागले. नंतर अचानक मला आरतीतील शब्दच आठवेनासे झाले. तेव्हा मला आरतीतील शब्दांचा विसर पडला असून कृपया मला अंतर देऊ नका, अशी मी गुरुदेवांना प्रार्थना करू लागले.

आध्यात्मिक त्रासामुळे अधिक प्रमाणात खाल्ल्याने पोट फुगून अस्वस्थता जाणवणे, औषधोपचार करूनही काहीच परिणाम न होणे; मात्र आध्यात्मिक त्रासावर मार्गदर्शन करणार्‍या साधिकेला त्रासाविषयी सांगितल्यावर दुसर्‍याच दिवशी त्रास नाहीसा होणे

      काही वर्षांपूर्वी आध्यात्मिक त्रासामुळे माझे अकस्मात् खाण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले. मी कधी दिवसभरात सलग २ - ३ वेळा जेवत असे. त्यामुळे अन्नपचनाची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे माझे पोट फुगून मला अस्वस्थपणा जाणवत असे. याचा परिणाम माझे दैनंदिन जीवन आणि साधना यांवर झाला. मी या त्रासाच्या निवारणासाठी अनेक दिवस विविध प्रकारची औषधे आणि पचन होण्यासाठीच्या गोळ्या घेतल्या; पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

अकस्मात् संत एकनाथ महाराज यांंची आठवण होणे, त्यांचे १२ वे वंशज प.पू. गणेश गोसावी महाराज यांच्या आगमनाची वार्ता कळल्यावर त्याचे कारण उलगडणे आणि त्यांनी भेटीत पू. सौरभदादा योगीपुरुष आहेत, असेे सांगणे

      आज सकाळी ९.३० वाजता पू. सौरभदादांना स्नान घालून झाल्यावर त्यांचे अंग श्री. अजित महांगडे पुसत होते. पू. सौरभदादांचे हास्य आणि अजितदादांची सेवा पाहून मला संत एकनाथ महाराज यांची आठवण झाली. मी तसे श्री. अजितदादांना सांगितलेही. त्यानंतर दुपारी मला समजले की, संत एकनाथ महाराज यांचे १२ वे वंशज प.पू. गणेश गोसावी महाराज यांचे आश्रमात आगमन होणार आहे. त्या वेळी मला आज अकस्मात् संत एकनाथ महाराज यांंची आठवण का झाली ? यामागील कारण उलगडले. सायंकाळी प.पू. गणेश गोसावी महाराज पू. सौरभदादांना भेटण्यासाठी खोलीत आले होते. ते पू. सौरभदादांविषयी म्हणाले, यांची काळजी करण्याचे कारण नाही. हे योगीपुरुष आहेत. या वेळी पू. सौरभदादा आनंदात होते. 
- सौ. प्राजक्ता जोशी (पू. सौरभदादा यांच्या मातोश्री) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०१६)


सहनशीलता आणि सेवेची तळमळ यांमुळे वेदनादायी स्थितीतही हसतमुख अन् सेवारत रहाणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस !

श्री. चेतन राजहंस
        काही दिवसांपूर्वी श्री. चेतन राजहंस यांना मूतखड्यामुळे (किडनी स्टोनमुळे) तीव्र वेदना होत होत्या. याच कालावधीत आश्रमात प्रसाराच्या संदर्भातील महत्त्वाचे सत्संग आयोजित केले होते. एवढ्या वेदनादायी स्थितीतही ते या सत्संगांना उपस्थित रहात होते. त्यांना तीव्र वेदना होत आहेत, अशी जराही कल्पना त्यांच्या तोंडवळ्यावरून इतरांना आली नाही.
        आपत्काळात तीव्र शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रास झाले, तरी ईश्‍वराशी अनुसंधान ठेवून सेवारत राहिल्यास त्याही स्थितीत स्थिर कसे राहू शकतो, याचा आदर्श श्री. चेतन यांनी सर्व साधकांसमोर ठेवला आहे ! या गुणांमुळेच त्यांची जलद आध्यात्मिक प्रगती होत आहे.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०१६)

शांत, समंजस, सेवेची आवड असलेली अन् प.पू. डॉक्टरांना भेटण्याची ओढ लागलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. राधिका उत्तम पाटील (वय ११ वर्षे) !

कु. राधिका उत्तम पाटील
     कोलशेत, ठाणे येथील कु. राधिका उत्तम पाटील हिचा २९.७.२०१६ (आषाढ कृष्ण दशमी) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिची आई, आजी आणि दोन मावशा यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. राधिका उत्तम पाटील हिला सनातन 
परिवाराकडून वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. गरोदरपणी केलेली साधना
     मी गर्भवती असतांना प्रतिदिन भगवद्गीता, दासबोध आणि संतांची चरित्रे वाचली होती. मी त्या काळात पोटावर हात ठेवून नामजप करत असेे.
२. जन्मानंतर
२ अ. बालवयापासून देवाची आवड १. राधिकाला झोपवण्यासाठी अंगाईगीत किंवा खेळवण्यासाठी गीत म्हणावे लागले नाही. वैखरीतून सप्तदेवतांचा जप म्हटल्यास ती तो शांतपणे ऐकायची.
२. ती ७ मासांची असतांना विठ्ठल ! देवबाप्पा !, असे म्हटले की, प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राकडे बघायची.
३. आम्ही प्रतिदिन मारुतिस्तोत्र म्हणायचो. ते ऐकून राधिकाचेही मारुतिस्तोत्र पाठ झाले आणि साडेतीन वर्षांची असल्यापासूनच तीही स्तोत्र म्हणू लागली.
४. आम्ही तिला अक्षरओळख नसतांना एकदा नामस्मरण केल्यावर एक रेघ ओढायला शिकवले होते. त्याप्रमाणे ती नामजप करत असे. तिला लिहिता येऊ लागल्यावर ती प्रतिदिन १ पान दत्ताचा आणि श्रीकृष्णाचा जप लिहून काढू लागली.
- सौ. कविता उत्तम पाटील (राधिकाची आई), कोलशेत, ठाणे. (३०.९.२०१५)

गुरुदेव म्हणती, तो मी नव्हेच !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
सौ. अनघा जोशी
साधक म्हणती गुरुदेवा, साधनेत आनंद शिकलो आपल्यामुळे ।
परि गुरुदेव म्हणती, तो मी नव्हेच ॥ १ ॥
साधक म्हणती गुरुदेवा, आपणच आम्हा अनुभूती देता ।
परि गुरुदेव म्हणती, तो मी नव्हेच ॥ २ ॥
साधक म्हणती गुरुदेवा, हिंदु राष्ट्राची उभारणी आपणच करणार ।
परि गुरुदेव म्हणती । तो मी नव्हेच ॥ ३ ॥
साधक म्हणती गुरुदेवा, अमूल्य अध्यात्मशास्त्र आपण आम्हा दिले ।
परि गुरुदेव म्हणती, तो मी नव्हेच ॥ ४ ॥
साधक म्हणती गुरुदेवा, अनेक साधकांसी आपण संतपदी नेले ।
परि गुरुदेव म्हणती, तो मी नव्हेच ॥ ५ ॥

सेवा करणारी, चुकीसाठी प्रायश्‍चित्त घेणारी आणि संतांप्रती भाव असणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देवद (पनवेल) येथील कु. ईश्‍वरी विनोद बेंद्रे (वय ७ वर्षे) !

कु. ईश्‍वरी विनोद बेंद्रे
१. दिवसभरात करत असलेली साधना
१ अ. नामजप : कु. ईश्‍वरी नामजप करते आणि तो वहीतही लिहिते.
१ आ. आरतीला जाणे : ती सायंकाळी आजीसमवेत आश्रमात आरतीला जाते.
१ इ. सेवा : ईश्‍वरी आजीसमवेत आश्रमात भाजी निवडणे, पोळ्या टोपलीत रचून ठेवणे, कापराच्या डब्यांमध्ये कागद घालणे, अशा सेवा करते. घरी असतांना ती दैनिक सनातन प्रभात व्यवस्थित रचून ठेवणे, आसंदी आणि पटल पुसणे, कपड्यांच्या घड्या घालण्यासाठी आईला साहाय्य करणे, अशा सेवा करते.
१ ई. साधनेचा आढावा देणे आणि चुकांसाठी प्रायश्‍चित्त घेणे : ती तिची आत्या सौ. शर्मिला बांगर यांना दूरध्वनीवर आढावा देते. त्यामध्ये ती त्यांना चुका सांगून त्यांबद्दल क्षमायाचना करते आणि दोन पाने नामजप अधिक लिहिण्याचे प्रायश्‍चित्त घेते.
२. भाव
     संत दिसले की, ती त्यांना लगेच नमस्कार करते आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देते. ते आपलेच नातेवाईक आहेत, आपल्या घरातीलच आहेत, अशा प्रकारे ती त्यांच्याशी बोलते. गोपींचे ग्रंथ पाहून त्यांनी घातलेले दागिने, कपडे, गजरे आपल्यालाही हवेत, असे तिला वाटते. तिला गोपी व्हावेसे वाटते. बाबांसमवेत वाहनातून जातांना ती स्वतः जयघोष करून प्रार्थना म्हणते आणि स्वतःबरोबर सर्वांना म्हणायलाही सांगते.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे
विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
सनातन संस्थेचे बरेच साधक सर्व घटनांकडे साक्षीभावाने पहातात किंवा सर्व ईश्‍वरेच्छेने घडते, या दृष्टीने पहातात. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी आली, तरी त्यांना दुःख होणार नाही !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
उत्तम चरित्र म्हणजे कधीही दुराचाराचा विचारही मनात न आणणे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


इसिसचे आव्हान !

संपादकीय
       श्रावण मास लवकरच चालू होत आहे. हिंदूंचे विविध सण आणि व्रत-वैकल्ये यांनी भरगच्च असा हा मास. तो समाप्त झाल्यावर भाद्रपद मासाच्या पहिल्या आठवड्यात श्री गणेशाचा जगप्रसिद्ध गणेशोत्सव चालू होतो. प्रचंड धार्मिक भावनेने हिंदु परिवार गणेशोत्सव साजरा करतात. धर्मांध मात्र शेपटीवर पाय पडल्यागत अस्वस्थ होतात आणि सात्त्विक वातावरणात विष कालवण्याचे धंदे चालू करतात. हिंदूंनी मागील शंभर वर्षांपासून हे अनुभवले आहे. युगपुरुष लोकमान्य टिळक यांना हिंदूंच्या संघटनाची आवश्यकता धर्मांधांच्या अशा दुष्ट आचरणामुळेच भासली आणि त्यातूनच त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. सांगायचे तात्पर्य एवढेच की, हिंदूंच्या उत्सवांना होणारा धर्मांधांचा विरोध ही नवीन गोष्ट नसून या वर्षीचा गणेशोत्सव इसिस या जागतिक आतंकवादी संघटनेचे लक्ष्य आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn