Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

चीनच्या सैनिकांची उत्तराखंडमधील भारतीय सीमेत घुसखोरी !

चीनची इतकी वर्षे चालू असलेली भारतीय 
सीमेतील घुसखोरी थांबत नाही म्हणजे केंद्रातील 
सत्तापालटाला चीन जुमानत नाही कि काय ?
       गोपेश्‍वर (उत्तराखंड) - चिनी सैनिकांनी उत्तराखंडला लागून असलेल्या सीमेवरून भारतीय परिसरात एक आठवड्यापूर्वी घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. येथील प्रशासनाचे पथक येथे निरीक्षणासाठी गेले असता ही घटना उजेडात आली. या पथकाला चीनच्या सैनिकांनी येथून पळवून लावले. संबंधित जिल्हाधिकार्‍यांनी मात्र अशी घटना झाल्याची माहिती फेटाळून लावली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, आम्ही या घटनेची माहिती घेत आहेत, त्यानंतर घुसखोरी होती कि नाही, हे पडताळून कारवाई करता येईल. (घटनेला ७ दिवस उलटून गेल्यावरही माहिती घेऊ म्हणणारे गृहराज्यमंत्री असणारा देश कधीतरी सुरक्षित राहू शकेल का ? - संपादक) 
१. जोशी मठ जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी योगेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाचे १९ सदस्यांचे पथक १९ जुलैला चीनच्या सीमेचे निरीक्षण करण्यासाठी सुमना क्षेत्रातील बाडाहोती येथील सैन्याच्या रिमखिम चौकीजवळ गेले होते; मात्र तेथे चीनचे सैनिक पाहून त्यांना धक्का बसला. 

अलीगडमधील (उत्तरप्रदेश) हिंदूंचे स्थलांतरासाठी न्यायदंडाधिकार्‍यांकडे अर्ज !

 • हिंदूंचे त्यांच्याच देशात पलायन होत असतांना मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे लक्षावधी कार्यकर्ते कुठे आहेत ?
 • दुसरे काश्मीर होऊ लागलेले उत्तरप्रदेश !
 • धर्मांधांकडून हिंदूंवर अत्याचार
       लक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेशातील अलीगड जिल्ह्यातील बाबरी मंडी या मुसलमानबहुल भागातून अनेक हिंदूंनी पलायन केले आहे, असे वृत्त यापूर्वीच प्रकाशित करण्यात आले होते. आता येथील आणखी १० कुटुंबांनी त्यांची संपत्ती विकून स्थलांतर करण्यासाठी न्यायदंडाधिकार्‍यांकडे अर्ज केल्याचे समोर आले आहे. धर्मांधांकडून हिंदु महिलांची छेड काढण्याचे; तसेच हिंदु कुटुंबांना हेतूपुरस्सर त्रास देण्याचे प्रकार वाढल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे या कुटुंबांचे म्हणणे आहे. अलीगडच्या महापौर शकुंतला भारती या कुटुंबांच्या प्रमुखांसोबत न्यायदंडाधिकार्‍यांकडे अर्ज देण्यासाठी गेल्या होत्या. यापूर्वी राज्यातील श्यामली जिल्ह्यातील कैराना येथे हिंदूंनी पलायन केल्याची घटना घडलेली आहे. या अर्जावर न्यायदंडाधिकारी अवधेश तिवारी म्हणाले, या कुटुंबांनी स्थलांतर करू नये, यासाठी जिल्हा प्रशासन सर्व आवश्यक कार्यवाही करील. तसेच छेडछाड करण्यात आलेल्या संबंधित हिंदु कुटुंबाला आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था पुरवली जाईल.

महाराष्ट्रातील यंदाचा गणेशोत्सव इसिसच्या आतंकवाद्यांचे लक्ष्य !

 • प्रत्येक सण-उत्सवांच्या वेळी हिंदूंवर असणारी आतंकवादाची टांगती तलवार दूर होण्यासाठी हिंदु राष्ट्राविना (सनातन धर्म राज्याविना) पर्याय नाही !
 • इसिसच्या अटक केलेल्या संशयिताकडून पोलिसांना माहिती
       संभाजीनगर, २७ जुलै - महाराष्ट्रातील गणेशोत्सव हे अतिरेक्यांचे लक्ष्य आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करण्याचा आदेश इसिसने भारतातातील हस्तकांना दिला आहे. नसीरबिन याफी चाऊस याने बनवलेल्या बॉम्बचा स्फोट गणेशोत्सवात करण्यात येणार होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (आतंकवाद्यांच्या संभाव्य भीषण आक्रमणांना भारतीय लष्कर आणि अन्वेषण यंत्रणा कशी सामोरी जाणार आहेत ? - संपादक) सध्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा आणि इतर चौकशी पथकेही मराठवाड्यात दाखल झाली आहेत.
१. नासेर आणि शाहीद यांनी मराठवाड्यात सिद्ध केलेल्या हस्तकांच्या जाळ्याची चौकशी आतंकवादविरोधी पथक करत आहे. त्यानुसार २६ जुलै या दिवशी अन्वेषण पथकांनी परभणीमध्ये काही जणांची चौकशी केली. भाग्यनगरमध्ये गेल्या मासात अटक केलेल्या इसिसच्या आतंकवाद्याचे नांदेडमध्येही संपर्क असल्याचे उघड झाले. त्यामुळे ही पथके नांदेडमध्येही कसून चौकशी करत आहेत.

मध्यप्रदेशात गोमांसाची तस्करी करणार्‍या सलमा आणि शमीम या महिलांना जमावाने चोपले !

 • देशात धर्मांधांकडून हिंदूंवर, तसेच दलितांवर होणार्‍या अत्याचारांच्या वेळी मायावती आणि अन्य पुरोगामी महिला लोकप्रतिनिधी कधी तोंड उघडत नाहीत !
 • हिंदुत्वनिष्ठांवर कारवाई करण्यासाठी मायावती यांचा राज्यसभेत थयथयाट !
       नवी देहली - मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये रेल्वेगाडीतून ३० किलो गोमांसची तस्करी केल्याच्या संशयावरून सलमा आणि शमीम या २ महिलांना जमावाने चोपल्याच्या घटनेचे पडसाद राज्यसभेत उमटले. येथे बहुजन समाज पक्षाच्या खासदार मायावती यांनी हा प्रश्‍न उपस्थित केल्यावर सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. महिलांना चोपणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली.
१. सलमा आणि शमीम यांच्याकडे रेल्वे फलाटावर ३० किलो मांस सापडल्याने त्यांच्या विरोधात कलम ४ आणि ५ अंतर्गत पशूहत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (जमावाने या दोघींना पकडले नसते, तर पोलिसांनी काहीही केले नसते ! अशा प्रकारे प्रतिदिन गोमांसाची तस्करी होत असतांना पोलीस काय करत असतात ? पोलीस आणि तस्कर यांच्यामध्ये अर्थपूर्ण संबंध आहेत का ? - संपादक)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त सनातनकडून सत्कार

श्री. उद्धव ठाकरे यांचा सत्कार करतांना श्री. अभय वर्तक

       मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी त्यांचा येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सत्कार केला. या वेळी त्यांना सनातनने प्रकाशित केलेले श्री गणपतीचे चित्र आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा हा सनातनचा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला.

इसिसच्या स्थानिक संशयितांकडून वर्ष २०१५ मध्ये पुण्यासह देशभरात ९ ठिकाणी बैठका

 • देशभरात इसिसच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात बैठका होतात आणि सुरक्षायंत्रणांना त्यांचा थांगपत्ताही लागत नाही, हे सुरक्षाव्यवस्थेचे अपयशच म्हणावे लागेल ! निरपराध सनातनच्या मागे वारंवार नाहक चौकशीचा ससेमिरा लावणार्‍या अन्वेषण यंत्रणांनी त्याची हीच शक्ती आंतकवाद्यांना शोधण्यासाठी वापरली असती, तर इसिससारख्या आतंकवादी संघटनांचे असे जाळे पसरले नसते !  
 • स्फोटकांचे प्रशिक्षण आणि शस्त्र खरेदी यांसाठी नक्षलवाद्यांशी संपर्क
      पुणे, २७ जुलै - संपूर्ण देशभरात आतंकवादी आक्रमणे घडवून आणण्यासाठी इसिस या आतंकवादी संघटनेच्या स्थानिक संशयितांनी ८ डिसेंबर २०१५ या दिवशी पुण्यासह देशात ९ ठिकाणी बैठका घेतल्याचे उघडकीस आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने इसिसच्या १६ संशयितांना नुकतीच अटक केली आहे. त्यांच्या तपासातून ही माहिती उघड झाली. (७ मासांनंतर इसिसच्या बैठकांविषयी माहिती मिळणे हे अतिशय गंभीर आहे ! देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात निष्काळजी असणार्‍या संबंधित अधिकार्‍यांचीच सखोल चौकशी करायला हवी ! - संपादक)

सरकारी वकील सौ. रोहिणी सालीयन यांना श्री. दिलीप अलोणी यांची कायदेशीर नोटीस

मालेगाव बॉम्बस्फोटांचे प्रकरण
       मुंबई - सरकारी वकील सौ. रोहिणी सालीयन यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुसलमान आरोपींविषयी एक भूमिका, तर हिंदु आरोपींविषयी वेगळी भूमिका घेतली. तसेच या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एन्आयए) बदनाम करण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांसमोर अनेक बिनबुडाचे आरोप केले. या सर्वांविषयी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ता श्री. दिलीप अलोणी यांनी त्यांचे अधिवक्ता श्री. सुभाष झा यांच्यावतीने सौ. सालीयन यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी एक संधी म्हणून नोटीस पाठवली आहे. अन्यथा त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलमध्ये एडव्होकेटस अ‍ॅक्ट १९६१ कलम ३५ नुसार आपली तक्रार नोंदवली जाईल आणि पुढील कार्यवाही सुद्धा होऊ शकेल, अशी चेतावणी देण्यात आली आहे.

मुजाहिर ब्लॉगवरून केरळच्या मुसलमान युवकांना इसिसमध्ये सहभागी होण्याचे आवाहन !

     थिरुवनंतपूरम् - केरळमधील इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) काही हस्तकांकडून मुजाहिर ब्लॉग चालवला जातो. या ब्लॉगवरून केरळच्या मुसलमान युवकांना इसिसमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जाते. वन इंडिया या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार इसिसमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व सांगणारे सुमारे ४० लेख मुजाहिर ब्लॉगवरून मल्याळम् भाषेत प्रसारित करण्यात आले आहेत. या लेखांमध्ये इसिसमध्ये सहभागी झालेल्या काही आतंकवाद्यांचे अनुभवही समाविष्ट करण्यात आले आहेत. इसिसमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या केरळच्या युवकांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे काम या ब्लॉगवरून केले जात आहे.

इस्लामच्या शांतीच्या संदेशाला आतंकवादी वेगळे वळण देऊ पहात आहेत ! - अरब लीग परिषद

इस्लामिक स्टेट, बोको हरम यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटनांच्या उपद्रवाची 
स्वत:च्या देशाला झळ बसू लागल्यावर जागे झालेले मुसलमान देश !
      मॉरिटेनिया - मॉरिटेनियाच्या नोआकोट येथे २२ देशांची असलेली अरब लीग परिषद २५ जुलै या दिवशी पार पडली. इस्लामच्या नावाने आतंकवाद पुकारण्याच्या प्रवृत्तीला या परिषदेत विरोध दर्शवण्यात आला. परिषदेला प्रारंभ करतांना इजिप्तचे पंतप्रधान शेरिफ इस्माईल म्हणाले, जगात आतंकवाद पसरवण्यासाठी आतंकवाद्यांकडून धार्मिक भाषा वापरली जात आहे. इस्लामच्या शांतीच्या संदेशाला आतंकवादी वेगळे वळण देऊ पहात आहेत. मॉरिटेनियाचे अध्यक्ष महंमद उल्द आब्देल अझीझ यांनी आतंकवाद्यांच्या आंधळ्या हिंसाचारावर टीका केली. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तंटा सोडवण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 
     अरब लीग परिषदेने वर्ष २०१५ मध्ये झालेल्या बैठकीत आतंकवादविरोधी पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र त्याची स्थापना अद्याप झालेली नाही. यावरही या परिषदेत चर्चा झाली. या परिषदेत कतार, कुवेत, येमेन, कोमोरोस, लेबेनॉन, लिबिया इत्यादी देश सहभागी झाले होते.

भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग नियुक्त करा ! - विरोधकांची मागणी

 • गोंधळावरून विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !
 • पावसाळी अधिवेशन २०१६
        मुंबई, २७ जुलै (वार्ता.) - चौकशी आयोग नेमून भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करा, अशी आग्रही मागणी करून विरोधकांनी आदल्या दिवशीप्रमाणे सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी २ वेळा ३० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. त्यानंतर कामकाजाला पुन्हा प्रारंभ झाल्यानंतर विरोधकांनी मोकळ्या जागेत जाऊन भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद झाला. दोघेही एकमेकांच्या विरोधात घोषणा देत होते. गोंधळ वाढल्याने सभापती निंबाळकर यांनी दिवसभरासाठी विधान परिषदेचे कामकाज स्थगित केले. (विरोधकांना जनतेच्या प्रश्‍नांशी काही देणे नसल्यानेच ते अशा प्रकारे सभागृहात गोंधळ घालतात, हे दिसून येते. - संपादक)

आदेश असतांनाही समीर गायकवाड यांना दुपारच्या वेळेत कारागृह परिसरात फिरण्यास अनुमती न देणार्‍या कारागृह प्रशासनास न्यायालय नोटीस बजावणार !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
       कोल्हापूर, २७ जुलै (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात बंदीस्त असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना प्रतिदिन दुपारी १२ ते ३ या वेळेत कारागृहाच्या आवारात फिरण्यास न्यायालयाने अनुमती दिलेली आहे. असे असतांना न्यायालयाचा आदेश डावलून कारागृह प्रशासनाकडून गेल्या आठवड्यापासून श्री. समीर यांना बाहेर फिरण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे, असे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर न्यायाधिशांनी या संदर्भात कारागृह प्रशासनास नोटीस बजावण्यात येईल, असे सांगितले. जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर ही सुनावणी चालू आहे. अधिवक्ता आनंद देशपांडे हेही अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांच्यासमवेत उपस्थित होते. (न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही कारागृह प्रशासन तो आदेश जुमानत नाही, यावरून कारागृह प्रशासन स्वत:च्या मर्जीप्रमाणे कृती करत असल्याचे दिसते. संशयित आरोपीस किमान सुविधाही उपलब्ध करून न दिल्याविषयी कारागृहास प्रशासनावर योग्य ती कारवाई अपेक्षित आहे ! - संपादक)

फ्रेंच मुसलमान तरुणाने इसिसला हरवण्याची शपथ घेतल्याने इस्लाम मलीन केल्याचा इसिसचा आरोप !

इस्लामिक स्टेटचा इस्लामी कट्टरवाद जाणा !
     मार्सेली (फ्रान्स) - फ्रेंच मुसलमान तरुणाने इस्लामिक स्टेटला (इसिसला) हरवण्याची शपथ घेऊन इस्लाम मलीन केला आहे, असा आरोप इसिसने केला आहे. फ्रान्सच्या मार्सेली शहरातील रहिवाशी हेन्नी महंमद या मुसलमान तरुणाने एक व्हिडिओ (ध्वनिचित्रफीत) संकेतस्थळावर प्रसारित केली असून इसिसने मार्सेली शहरावर आक्रमण केल्यास त्याला लगेच पराभूत करू, असे त्यामध्ये म्हटले आहे. सदर व्हिडिओ व्हायरल (मोठ्या प्रमाणात प्रसारित) झाला असून त्याला गेल्या ८ दिवसांत १४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. परिणामी जिहाद्यांमध्ये शाब्दिक युद्ध चालू झाले आहे.

बलात्कार करणार्‍या नराधमांना कठोर शासन करा !

अखिल भारतीय ब्राह्मण 
महासंघाची निषेध आंदोलनाद्वारे मागणी 

बलात्काराच्या घटनांचा निषेध नोंदवताना कार्यकर्ते

       पुणे, २७ जुलै (वार्ता.) - पंढरपूर येथे नुकतेच एका ब्राह्मण महिलेवर बलात्कार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. या घटनेत ४५ वर्षीय महिलेवर वासनांधांनी घरात घुसून तिच्या नवर्‍यासमोर बलात्कार केला. या प्रकरणी नराधमांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून महिलेला न्याय मिळवून द्यावा, या मागण्यांसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने २६ जुलै या दिवशी अलका चित्रपटगृह चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

टेंभुर्णी (जिल्हा परभणी) येथील कारखान्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लावल्याच्या कारणावरून १२० कामगारांना कामावरून काढले !

अशी घटना होण्यासाठी 
हा भारत आहे कि पाकिस्तान ?
       टेंभुर्णी, २७ जुलै - येथील औद्योगिक वसाहतीतील जिंदाल स्टील कंपनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लावल्याच्या कारणावरून १२० कामगारांना कामावरून काढण्यात आले आहे. त्यामुळे कामागारांनी आस्थापनाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. (छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लावण्यावरून महाराष्ट्रात आंदोलन करावे लागणे, हे लज्जास्पद ! - संपादक) टेंभुर्णी पोलिसांनी कारखान्याच्या प्रवेशदारासमोर बंदोबस्त ठेवला आहे.
       जिंदाल स्टील कंपनीमध्ये अनेक परप्रांतीय कामगार कामाला असून त्यांपैकी १२० कामगार स्थानिक आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लावून त्याची पूजा केली. त्यामुळे कारखान्याचे अधिकारी आणि कामगार यांच्यात वाद झाला. त्यानंतर पर्यवेक्षक (सुपरवायझर) जाधव यांनी संबंधित कामगारांना सांगितले, कारखान्यामध्ये काम नसल्याने तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नये. तसेच त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रारही केली.

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी अन्याय्य !

जालना येथील १५ हिंदुत्ववादी संघटनांची 
जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी 

निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे
(उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी

        जालना, २७ जुलै (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने सनातन संस्थेचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना संशयित म्हणून अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू असून न्यायालयानेही तपासयंत्रणांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढून असंतोष व्यक्त करत फटकारले आहे. कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने सनातन संस्थेला दोषी ठरवलेले नसतांना काही राजकीय पक्ष, पुरोगामी संघटना, तथाकथित नास्तिकवादी संघटना सनातनवर बंदी घालण्याची अन्याय्य मागणी करत आहेत. सनातन संस्थेवरील कथित आरोपांविषयी संस्थेची भूमिका समजून घेण्याअगोदरच बंदीचा निर्णय घेणे, हा सनातन आणि हिंदुत्व यांच्यावरील मोठा अन्याय होईल. त्यामुळे शासनाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी कोणत्याही दबावास बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याविषयी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी येथील १५ विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे केली. येथील निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी हे निवेदन स्वीकारले.

सनातनवर बंदी घालणे हे षड्यंत्र ! - पांडुरंग धोत्रे, बेळगाव सेवा संघटना

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या संदर्भात बेळगाव येथे लोकप्रतिनिधींना निवेदने 
सौ. सरिता पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना डॉ. (सौ.) नम्रता कुट्रे आणि श्री. सुधीर हेरेकर

श्री. संजय पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना डॉ. अंजेश कणगलेकर

श्री. अनिल बेनके (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
श्री. पांडुरंग धोत्रे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
    बेळगाव, २७ जुलै (वार्ता.) - सनातन संस्थेचे कार्य मला ठाऊक आहे. संस्थेवर बंदी घालणे, हे एक षड्यंत्र आहे. आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी आहोत, असे आश्‍वासन बेळगाव सेवा संघटनेचे अध्यक्ष श्री. पांडुरंग धोत्रे यांनी दिले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवत असल्याचे सांगितले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. अक्षय भंडारी, श्री. बापू सावंत, डॉ. (सौ.) नम्रता कुट्रे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर, श्री. विजय नंदगडकर, हिंदु धर्माभिमानी श्री. विनोद पाटील, कर्तव्य महिला मंडळाच्या अध्यक्षा, तसेच बेळगाव जिल्हा मानवाधिकारी समितीच्या उपाध्यक्षा सौ. अक्काताई सुतार, डॉ. अंजेश कणगलेकर उपस्थित होते. सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या संदर्भात बेळगाव येथे विविध लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली. त्या वेळी सर्वांनीच सनातन संस्थेचे कार्य चांगले असून आम्ही सनातनच्या पाठीशी आहोत, असे सांगितले.

सनातन संस्थेवर बंदी घातल्यास हिंदु धर्माची मोठी हानी होईल ! - जितेंद्र शिंपी, स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन, चोपडा

     सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात पंढरपूर येथील संत आणि जळगाव येथील मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत. 
स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन सनातन संस्थेच्या पाठीशी ! 
- जितेंद्र शिंपी, स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन, चोपडा
      सनातन संस्थेच्या कार्याचा अभ्यास न करता तिला जातीयवादी म्हणून हिणवणे, हा वैचारिक आतंकवाद आहे. याचा आम्ही स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशनच्या वतीने जाहीर निषेध करतो. सध्या राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍या संस्थेवर बंदीची चालू असलेली चर्चा निंदनीय आहे. सनातन संस्थेचे कार्य अत्यंत चांगले आहे. सनातन संस्थेवर बंदी घातल्यास हिंदु धर्माची मोठी हानी होईल. आम्ही स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य सनातन संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

परभणीतून १००, तर लातुरातून १३२ युवक बेपत्ता ! - शिवसेना आमदार राहुल पाटील

केवळ ८ युवकच बेपत्ता 
असल्याचे सांगत अबू आझमींचा थयथयाट
        मुंबई, २७ जुलै (वार्ता.) - शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी परभणीतून १०० युवक बेपत्ता असल्याचे सांगितले होते; मात्र ते खोटे असल्याचे सांगत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी परभणीत पोलीस अधीक्षकांच्या माहितीचा आधार देत केवळ ८ मुलेच बेपत्ता आहेत, त्यापैकी ३ मतिमंद आहेत, असे सांगितले. त्याच वेळी शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी आक्रमक होऊन आतंकवादविरोधी पथकाचा संदर्भ देत लातुरातून १३२ युवक बेपत्ता असल्याचे आणखी एक धक्कादायक वास्तव उघड केले. गदारोळ वाढत असल्याचे लक्षात येतात मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करत सर्व प्रकरणांचे गृहविभागाच्या माध्यमातून अन्वेषण केले जाईल, असे आश्‍वासन दिले. (केवळ आश्‍वासन न देता इतक्या मोठ्या प्रमाणात युवक बेपत्ता होत असल्याच्या प्रकरणाविषयी तत्परतेने पावले उचलावीत, ही अपेक्षा ! - संपादक)

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात सभागृहात आवाज उठवू ! - आमदार दीपक चव्हाण

मध्यभागी वर्तुळात श्री. दीपक चव्हाण हिंदुत्ववाद्यांकडून निवेदन स्वीकारतांना
    फलटण (जिल्हा सातारा), २७ जुलै (वार्ता.) - सनातन संस्थेचे राष्ट्र आणि धर्मजागृतीचे कार्य मला ठाऊक आहे. सनातनमुळेच मरगळलेल्या हिंदूंमध्ये धर्माविषयी जागृती होत आहे. सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात सभागृहात आवाज उठवीन, असे आश्‍वासक उद्गार फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार श्री. दीपक चव्हाण यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात त्यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीचे कार्यकर्ते, तसेच धर्मप्रेमी नारायण हंपे उपस्थित होते.

एका युवतीशी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवणार्‍या युवकाला तृप्ती देसाई यांच्याकडून मारहाण

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा कायदाद्रोही कारभार !
   पुणे, २७ जुलै - सामाजिक कार्यकर्त्या (?) तृप्ती देसाई यांनी एका युवतीशी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवणार्‍या श्रीकांत लोंढे या युवकाला २७ जुलै या दिवशी नगर रस्त्यावरील शिक्रापूर चौकात कायदा हातात घेत चपलेने पुष्कळ मारहाण केली. (याचा अर्थ तृप्ती देसाई यांचा कायदा सुव्यवस्था आणि पोलीस यांच्यावर विश्‍वास नाही, असेच म्हणावे लागेल. देसाई यांच्या अयोग्य कृतीतून त्या महिलांना कायद्याद्वारे समानतेचे राज्य देतील, असे वाटत नाही. - संपादक) तृप्ती देसाई यांना कायदा हातात घेऊन त्या तरुणाला मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला ? देसाई यांनी लोंढे याला पोलिसांच्या कह्यात का दिले नाही, अशा अनेक प्रश्‍नांची चर्चा नागरिकांमध्ये चालू होती. (या प्रकरणी पोलीस तृप्ती देसाई यांच्यावर कोणती कारवाई करणार ? - संपादक)

दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर नियमावली करणार ! - गिरीश बापट, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

पावसाळी अधिवेशन २०१६
    मुंबई, २७ जुलै (वार्ता.) - राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी अजामीनपात्र गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी राष्ट्र्रपतींकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तथापी हा कायदा केंद्र सरकारचा असला, तरी भेसळ करणार्‍यांंवर कठोर कारवाई करण्यासाठीची नियमावली राज्य शासन तयार करून भेसळीवर प्रतिबंध घालेल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली. पंढरपूर तालुक्यातील श्रीराम दूध संकलन केंद्रावर रसायनांचा साठा जप्त करण्याविषयी आमदार भारत भालके, डॉ. पतंगराव कदम आदींनी तारांकित प्रश्‍न विचारला होता.

पुण्यात सायबरसंबंधीच्या तक्रारींत ६ मासांत दुपटीने वाढ

सायबर विश्‍वातील वाढती गुन्हेगारी म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ !
      पुणे, २७ जुलै - येथील पोलीस आयुक्तालयात असलेल्या स्वतंत्र सायबर गुन्हे शाखेकडे गेल्या वर्षभरात ७०० तक्रार अर्ज आले होते, तर यंदाच्या वर्षी १५ जुलैपर्यंत ८४७ तक्रार अर्ज आले आहेत. याचाच अर्थ सायबरसंबंधीच्या तक्रारी गेल्या ६ मासांत दुप्पट वाढल्या असल्याचे सायबर गुन्हे शाखेने सांगितले आहे. (गुन्ह्यांचे प्रमाण न्यून झाले, असे म्हणणार्‍या पोलीस महासंचालकांना ही सणसणीत चपराकच म्हणावी लागेल ! अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आणि शासन सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती अन सुरक्षितता यांसाठीच्या गतीमान उपाययोजना कधी करणार ? - संपादक) या तक्रारीमध्ये नायजेरियन व्यक्तींकडून फसवणूक, विवाह नोंदणी संकेतस्थळांद्वारे होणारी फसवणूक, सामाजिक संकेतस्थळांवरून होणारी मानहानी, अधिकोषातून बोलत असल्याचे खोटे सांगून गोपनीय माहिती मिळवणे आणि पैसे उकळणे, नोकरीच्या आमिषाने फसवणूक अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे.

दादोजी कोंडदेवांव्यतिरिक्त अन्य कुणाचाही शिवरायांचे गुरु म्हणून उल्लेख नाही ! - पांडुरंग बलकवडे

      पुणे, २७ जुलै (वार्ता.) - जातीय द्वेष मनात ठेवून काही वर्षांपूर्वी दादोजी कोंडदेवांचा पुतळा लाल महालातून उखडण्यात आला. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु नव्हते, असा कांगावा करत ब्राह्मण समाजाच्या विरोधात जनमत कलुषित करण्यात आलेे; पण प्रत्यक्षात दादोजी कोंडदेवांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचाही गुरु म्हणून ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये उल्लेख सापडत नाही. प्रत्यक्ष शिवरायांनाही दादोजींप्रती पुष्कळ आदर होता, शहाजीराजांचाही त्यांच्यावर विश्‍वास होता. केवळ जातीद्वेषापोटीच महापुरुषांच्या इतिहासातून राष्ट्राला उज्ज्वल बनवण्याऐवजी राष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे यांनी केले.

पुणे शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना अद्याप पावसाळी अंगरख्याचे (रेनकोट) वाटप नाही !

महानगरपालिकेचा हा हलगर्जीपणा पुण्याला कधीतरी स्मार्ट बनवील का ?
विद्यार्थ्यांना गणवेश आणि पावसाळी अंगरखा १० दिवसांत देण्याचे महापौरांचे आदेश 
     पुणे, २७ जुलै - पुणे शिक्षण मंडळाकडून मे मासापासून पावसाळी अंगरखा (रेनकोट) खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली जात असली, तरी पावसाळ्याचे २ मास संपल्यानंतरही ही खरेदी पूर्ण झालेली नाही आणि विद्यार्थ्यांना अद्यापही ते मिळालेले नाहीत. शिक्षण मंडळाकडून शालेय साहित्याची खरेदी करतांना नेहमीच दिरंगाई आणि विलंब होत असल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या सदस्यांनी २५ जुलै या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्षण मंडळाच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्यानंतर गणवेश आणि पावसाळी अंगरखा १० दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात यावेत, अशी सूचना महापौर प्रशांत जगताप यांनी केली. (सूचना करण्यासमवेत या प्रकरणाची चौकशी करून महापौरांनी संबंधितांवर कारवाईही करायला हवी. - संपादक)

के.एम्.टी. कर्मचार्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा ! - आमदार राजेश क्षीरसागर

पावसाळी अधिवेशन २०१६
   मुंबई, २७ जुलै (विशेष प्रतिनिधी) - कोल्हापूर शहरातील के.एम्.टी. सेवा ही सर्वसामान्य नागरिकांचा आधार असून शहराची रक्तवाहिनी बनली आहे. के.एम्.टी. बसेस नागरिकांच्या जीवनातील अविभाज्य घटक असून त्यावर सर्वसामान्य नागरिक अवलंबून आहेत. नागरिकांना नि:स्वार्थी सुविधा पुरवणार्‍या के.एम्.टी. कर्मचार्‍यांच्या मागण्या आजतागायत प्रलंबित असून वारंवार पाठपुरावा करूनही आजपर्यंत या मागण्या जैसे थे स्थितीत आहेत. त्यामुळे २५ जुलैपासून के.एम्.टी. कर्मचार्‍यानी बेमुदत संप चालू केला आहे. के.एम्.टी.च्या कर्मचार्‍यांच्या समस्या दूर करण्याकरिता शासनाने त्वरित निर्णय घ्यावेत, अशी मागणी आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये केली. याविषयी के.एम्.टी. कर्मचार्‍यांनी श्री. क्षीरसागर यांना निवेदन दिले होते. त्यानुसार के.एम्.टी. कर्मचार्‍यांनी घोषित केलेल्या बेमुदत संपाकडे औचित्याच्या सूत्राद्वारे श्री. क्षीरसागर यांनी लक्ष वेधले.
    सभागृहामध्ये औचित्याचे सूत्र उपस्थित करतांना आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि विद्यार्थी प्रवाशी यांना ५० टक्के सवलत दिली जात आहे; मात्र के.एम्.टी.च्या कर्मचार्‍यांना आपल्या प्रश्‍नाविषयी वारंवार झगडावे लागते. के.एम्.टी. हे कोल्हापूर महानगरपालिकेचा घटक असतांनाही या कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही. शासनाने घोषित केलेले महागाई भत्ते ही वेळेवर पगारात न देता उशिराने दिले जातात आणि त्याचा फरकही सन १९९८ पासून दिलेला नाही. तसेच या वेळी श्री. क्षीरसागर यांनी अन्य समस्या सांगितल्या.

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर बसून आमरण उपोषण

    मुंबई, २७ जुलै (विशेष प्रतिनिधी) - कोल्हापूर शहराची हद्दवाढ त्वरित करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी २७ जुलैपासून शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी विधीमंडळाच्या पायरीवर बसून आमरण उपोषण चालू केले. महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनीही श्री. क्षीरसागर यांची भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवला. हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया असूनही राज्य शासनाने इतर शहरांची हद्दवाढ केली; मात्र कोल्हापूरच्या हद्दवाढीविषयी ४४ वर्षांपासून राज्य शासन उदासीन का आहे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. या वेळी श्री. क्षीरसागर यांनी हद्दवाढ मागणीचे आणि आमरण उपोषण असे लिहिलेला फलक हाती धरला होता. या वेळी त्यांनी हद्दवाढ होण्यासाठी घोषणाही दिल्या.

सनातन संस्थेच्या पाठीशी असल्याचे विविध मंत्र्यांचे सुतोवाच !

महसूल राज्यमंत्री श्री. संजय राठोड (उजवीकडे) यांना निवेदन 
देतांना श्री. अभय वर्तक आणि शेजारी श्री. शिवाजी वटकर 
रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री श्री. जयकुमार रावल (उजवीकडे) यांना 
निवेदन देतांना श्री. अभय वर्तक आणि शेजारी श्री. शिवाजी वटकर

त्र्यंबकेश्‍वराच्या मंदिरातील पार्वतीची पुरातन मूर्ती पालटण्यास पुरातत्व विभागाची अनुमती

   नाशिक - त्र्यंबकेश्‍वराच्या मंदिरातील पार्वतीची पुरातन मूर्ती जीर्ण आणि खंडित झाल्याने ती पालटून नव्या मूर्तीची पूजेसाठी प्राणप्रतिष्ठा करण्यास पुरातत्व विभागाने अनुमती दिली आहे. जगन्नाथपुरीच्या मूर्तीबदलानंतरची देशातली दुसरी, तर महाराष्ट्र्रातील ही पहिलीच वेळ आहे. नवी मूर्ती स्थापित करण्यासह जुन्या मूर्तीचेही संवर्धन करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना जुनी मूर्तीही दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे.

तीव्र इच्छाशक्ती आणि त्याला साधनेची जोड, हीच माझ्या जीवनातील यशाची गुरुकिल्ली ! - रवींद्र प्रभुदेसाई, संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी उद्योग समूह

मुलाखतीतील प्रश्‍नांना उत्तरे देतांना श्री. रवींद्र प्रभुदेसाई 
(उजवीकडे) आणि त्यांच्या बाजूला प्रसिद्ध मुलाखतकार 
संगीता अभ्यंकर
     राजापूर (रत्नागिरी) - तीव्र इच्छाशक्ती आणि त्याला असलेली साधनेची जोड, हीच माझ्या जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन पितांबरी उद्योग समूहाचे संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी येथे केले.
   मित्रमेळा संघटनेच्या वतीने २४ जुलै या दिवशी राजापूर नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात श्री. प्रभुदेसाई यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. पितांबरी उद्योग समूहाची २५ वर्षांची यशस्वी वाटचाल आणि श्री. रवींद्र प्रभुदेसाई या यशस्वी उद्योजकातील आगळ्या व्यक्तीमत्वाचा प्रवास प्रसिद्ध मुलाखतकार संगीता अभ्यंकर यांनी उलगडला. या मुलाखतीतील महत्त्वाची सूत्रे पुढीलप्रमाणे -

मालेगाव येथील मंदिरांच्या रक्षणासाठी विहिंपचे लाक्षणिक धरणे आंदोलन

     मालेगाव (जिल्हा नाशिक) - सर्वोच्च न्यायालयाच्या धार्मिक स्थळाविषयीच्या आदेशाचा आम्ही सन्मान करतो; मात्र मालेगाव येथील २२२ हिंदु धर्मीय स्थळांना व्यापक लोकमान्यता असून तेथे नित्य धार्मिक विधी होत असतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या व्यापक लोकमान्यतेच्या आधारावर या २२२ स्थळांना नियमित करण्याची मागणी करत आहोत, असे विश्‍व हिंदु परिषद मठमंदिर विभागाच्या वतीने मालेगाव येथील तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विहिंपच्या वतीने मालेगाव येथे मंदिर रक्षणार्थ एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी हे निवेदन शासनाला देण्यात आले.

डॉ. दाभोलकर हत्येची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी आणि डॉ. झाकीर नाईक यांच्यावरही कारवाई करावी !

संभाजीनगर जिल्हाधिकार्‍यांकडे हिंदुत्ववाद्यांची निवेदनाद्वारे मागणी 
     संभाजीनगर, २७ जुलै (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवावा, तसेच आतंकवादाला खतपाणी घालणारे डॉ. झाकीर नाईक आणि त्यांच्या पीस वाहिनीचे प्रक्षेपण करणार्‍यांवर कारवाई करावी, या मागण्यांचे निवेदन २५ जुलै या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी विश्‍वंभर गावंडे यांना देण्यात आले.
     या वेळी गावंडे म्हणाले, पीस दूरचित्रवाहिनी जिल्ह्यामध्ये कोठेही दाखवली जात नाही. मी आपल्या अन्य मागण्या शासनस्तरावर कळवतो. या प्रसंगी योग वेदांत सेवा समितीचे श्री. तांबोळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अशोक कुलकर्णी, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर आणि सनातन संस्थेच्या सौ. छाया देशपांडे उपस्थित होत्या.

आवारात घडलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारींकडे पुणे विद्यापिठाचे दुर्लक्ष !

देशभरात आणि राज्यात मुलींवरील अत्याचाराची प्रकरणे पुष्कळ मोठ्या प्रमाणात घडत असतांना 
अशा संवेदनशीलप्रश्‍नी उदासीन रहाणारे विद्यापीठ आणखी किती प्रकरणे होण्याची वाट पहात आहे ?
माजी अधिसभा अध्यक्षांचा आरोप
     पुणे, २७ जुलै - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या मुख्य आवारात वर्ष २०१३ ते २०१६ या कालावधीत घडलेल्या घटनांच्या संदर्भाने पुणे विद्यापिठाचे माजी अधिसभा अध्यक्ष डॉ. बागुल यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार लैंगिक छळाच्या तक्रारींविरोधात दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. 
    ते म्हणाले की, महिला आणि विद्यार्थिनी यांच्यावरील लैंगिक अत्याचारांच्या संदर्भात प्रतिबंधात्मक कारवाई होणे आवश्यक आहे; परंतु मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती विद्यापिठाला देता आली नाही. त्यादृष्टीने महाविद्यालयीन पातळीवर कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या गेल्या असल्या, तरी विद्यापिठांमधील विभाग आणि वसतीगृहे यांमध्येही अशा कार्यशाळा झालेल्या नाहीत. लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्यानुसार तक्रारींवर कारवाई करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या बैठकांमध्येही सातत्य नाही. (अशा उदासीन अधिकार्‍यांवर विद्यापीठ प्रशासन आणि उच्च शिक्षण विभाग कठोर कारवाई करणार का ? - संपादक)

पिंपरी (पुणे) आणि कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्थेवर प्राप्तीकर विभागाच्या धाडी

       पिंपरी/कोल्हापूर, २७ जुलै - पुण्यातील पिंपरी येथील डॉ. डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्थेवर २७ जुलै या दिवशी सकाळी ७.३० वाजता, तर कोल्हापूर येथील संस्थेवर सकाळी ८.३० वाजता प्राप्तीकर विभागाने धाड टाकली. पिंपरीतील डी. वाय. पाटील दंतवैद्यकीय, वैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र आणि अभियंता या महाविद्यालयांवर, तर कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयावर धाडी टाकल्या आहेत. या कार्यालयांबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असून सर्वांनाच आत जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्राप्तीकर विभागाचे अधिकारी कागदपत्रांचा कसून तपास करत आहेत. प्राप्तीकर विभागाच्या पुण्याच्या आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

केजरीवाल यांचा थयथयाट !

     मध्यंतरी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्रकुमार, उपसचिव तरुण शर्मा आणि अन्य ३ जणांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेने सरकारी ठेक्यांमध्ये झालेल्या ५० कोटी रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर केजरीवाल, त्यांच्या पक्षातील अन्य मंत्रीगण आणि कार्यकर्त्यांनी थयथयाट करून जनतेसमोर स्वतःचे हसे करून घेतले आहे. त्यानंतर देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अगदी पंतप्रधान मोदी यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढला. यावरून आप हा पक्ष ध्येयापासून भरकटला आहे, हे निश्‍चित !

चीनमध्ये मुसलमान महिलांना बुरखाबंदी !

चीनला कळते, ते भारतातील एकाही 
राजकीय पक्षाला का कळत नाही ? त्याचे 
राष्ट्रावर मुळीच प्रेम नाही, हे यातून सिद्ध होते !
      चीनमधील अनेक प्रांतांत मुसलमान महिलांना बुरखा घालण्यास बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन करणार्‍यांना देशाबाहेर हाकलण्यात येते.

फ्रान्समध्ये चर्चवरील आक्रमणामागेही इसिस !

       पॅरिस - २६ जुलैला फ्रान्सच्या नॉरमंडी येथील सेंट इतिन्न-दू-रॉव्रे या चर्चमध्ये २ बंदूकधारी व्यक्तींनी ७-८ नागिरकांना ओलीस ठेवले होते. या दोघांनी चर्चमधील पाद्रीची गळा कापून हत्या केली. या दोघांना पोलिसांकडून ठार करण्यात आले आहे. हे बंदूकधारी इसिसशी संबंधित होते. दोघांपैकी एकाकडे चाकू होता, अशी माहिती फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी दिली आहे.

सनातनवर बंदी घालणे चुकीचे ! - श्री श्री श्री त्रिदंडी व्रताधर नारायण रामानुज जीयार स्वामीजी, श्री जगन्नाथ मठ, भाग्यनगर.

     सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मी गेलेलो आहे. हे कार्य चांगले आहे. सनातनवर बंदी घालणे चुकीचे आहे. तुम्ही मला मध्यरात्रीही आवाज दिला, तरी मी तुमच्या साहाय्यासठी धावून येईल.

सनातनवरील प्रस्तावित बंदीच्या विरोधात निवेदने दिलेले पक्ष आणि संघटना

पक्ष - शिवसेना
आध्यात्मिक संस्था - महानुभाव दत्त मंदिर, हरी ओम साधक परिवार, जालना, श्रीराम सुंदरकांड सत्संग परिवार, श्री योग्य वेदांत सेवा समिती, जालना, युवा सेवा संघ, जालना
हिंदुत्ववादी संघटना - लहुजी शक्ती सेना, अखिल भारतीय मराठा महासंघ, हिंदू महासभा, अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी जिल्हाध्यक्ष, महाराणा ब्रिगेड, स्वामी विवेकानंद विचार मंच, अखिल भारतीय पेशवा संघटना, हिंदू राष्ट्र सेना, जालना, श्री भगवती पुरोहित बहुउद्देशीय सेवा संघ, जालना आणि हिंदु जनजागृती समिती
       (सनातनवरील प्रस्तावित बंदीला विरोध करणार्‍या सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे आभार ! अशा हिंदुत्ववादी संघटना याच हिंदु धर्माची शक्ती आहेत. - संपादक)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे थांबवले पाहिजे ! - आमदार राजासिंह ठाकूर, भाजप, भाग्यनगर, तेलंगण

राजासिंह ठाकूर
       सनातन संस्था राष्ट्रपुरुष आणि देशभक्त यांचे स्मरण करण्याचे कार्य करते. अशी संस्था आणि तिचे साधक यांच्यावर चुकीचे आरोप करण्यात येत आहेत. ते एक मोठे षड्यंत्र असून याचा आम्ही विरोध करतो. भारतात अशा अनेक संस्था आणि संकेतस्थळे आहेत, ज्या लव्ह जिहाद आणि धर्मांतर ही कृत्ये उघडपणे करतात. त्यांच्यावर बंदी का घातली जात नाही ? सनातनच्या संकेतस्थळावरून धर्मग्रंथ, संत, देशभक्त आणि हिंदु धर्म यांचे ज्ञान दिलेले असते. अशा संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करणे थांबवले पाहिजे. पंतप्रधानांना माझी विनंती आहे की, भारतात सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी तुम्हाला (पंतप्रधानांना) समर्थन दिले; कारण तुम्ही हिंदुत्ववादी विचारांचे आहात. त्यामुळे तुमचे प्रथम कर्तव्य आहे की, तुम्ही सनातनसारख्या हिंदु संघटनांचे रक्षण केले पाहिजे.

कुठे काही सहस्र लोक ठार झाल्यावर मुसलमान अतिरेकी संघटनांचा तीव्र निषेध करणारी अमेरिका आणि कुठे अतिरेक्यांच्या आक्रमणात लक्षावधी भारतीय ठार झाल्यावरही शांत असणारे संवेदनाशून्य भारतीय शासन !

     अमेरिकेच्या जागतिक व्यापार संघटनेच्या ११० मजली इमारतीवर मुसलमान अतिरेकी संघटनांनी विमानांची टक्कर मारून त्या उद्ध्वस्त केल्या. त्यांत २० सहस्र लोक ठार झाले. त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटॅगॉन या प्रचंड कार्यालयावरही हल्ला केला.
      अमेरिकेचे २० सहस्र लोक ठार झाले, याचा अमेरिका तीव्र निषेध व्यक्त करत आहे. याच अतिरेक्यांनी भारतातील सुमारे एक लक्ष लोकांची हत्या केली. तेव्हा त्याचा भारत शासनाला संताप येत नाही. या दोन राष्ट्रांच्या प्रवृत्तींतील हा भेद आहे. 
(सुराज्य पथ, १५.९.२००१)

भारतातील हिंदू कधी काही करतात का ? हिंदूंनी आता अमेरिकेतील हिंदूंकडून धर्माभिमान शिकावा !

   जर्मनीतील स्प्रेडशर्ट या आस्थापनाने अंतर्वस्त्रांवर श्रीगणेश, शिव आणि दुर्गा या हिंदु देवतांची चित्रे छापून ती संकेतस्थळावर विक्रीकरता ठेवली. हिंदु देवतांची विटंबना करणार्‍या या अंतर्वस्त्रांची विक्री स्प्रेडशर्टने त्यांच्या संकेतस्थळावरून थांबवावी आणि सदर अंतर्वस्त्रे तात्काळ मागे घ्यावीत, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर केल्याच्या प्रकरणी सदर आस्थापनाने हिंदूंची क्षमायाचना करावी, अशी मागणी अमेरिकेतील हिंदूंनी केली आहे.

जगभरातील भाषातज्ञ मातृभाषेतून शिक्षण घेण्याविषयी आग्रही असतांनाही त्याविषयी तज्ञांची समिती नेमून वेळ काढणारे शासन !

(म्हणे) शिक्षणाचे माध्यम कोणते असावे, याचा निर्णय तज्ञांनी घेतला पाहिजे !
    शिक्षणाचे माध्यम कोणते असावे, याचा निर्णय तज्ञांनी घेतला पाहिजे. हा निर्णय राजकीय नसावा, असे सरकारला वाटते म्हणून माध्यमप्रश्‍नी निर्णय घेण्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले. या समितीच्या अहवालावरून जनतेसाठी, शिक्षणासाठी आवश्यक तो निर्णय सरकार घेणार आहे; मात्र टोकाच्या भूमिकेला सरकारी निर्णयात स्थान नाही, असेही ते म्हणाले.

घराच्या शेजारी एक आश्रम चालू झाल्यानंतर घरातील लादी भूकंप झाल्याप्रमाणे हलत असल्याचे जाणवणे

पू. मिलुटीन पांक्रात्स
    सप्टेंबर २०१५ मध्ये आम्ही रहात असलेल्या सदनिकेच्या शेजारी एक आश्रम चालू झाला. त्यानंतर अधूनमधून आमच्या रहात्या सदनिकेतील लादी हलत असल्याचे आम्हाला जाणवत असेे. या हालचाली किंवा कंपने एखाद्या छोट्या भूकंपाप्रमाणे जाणवत असत. त्यामुळे अशा वेळी कुठे भूकंप झाला असल्याची वार्ता आहे का ?, याचा आम्ही शोध घेत होतो; परंतु असे काहीच नसायचे. ऑक्टोबर २०१५ मधे एकदा मध्यरात्रीच्या वेळी आम्ही उभयता झोपण्यासाठी पलंगावर पहुडलो होतो. त्या वेळी मला मोठा भूकंप होत असल्याप्रमाणे पलंग आणि आम्ही रहात असलेली पूर्ण इमारतच हलत असल्याचे जाणवले. मी याविषयी माझी पत्नी सौ. पावला हिला विचारले; परंतु तिला तसे काहीच जाणवत नव्हते. हे विनाशकारी झोके मला पुढील १० मिनिटांपर्यंत जाणवत होते. या अनुभूतीसाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! 
- (पू.) श्री. मिलुटीन पांक्रात्स, युरोप
    ((पू.) श्री. मिलुटीन पांक्रात्स संत असल्यामुळे त्यांची सूक्ष्मातील कळण्याची क्षमता इतरांपेक्षा अधिक असल्याने त्यांना भूगर्भातील स्पंदने जाणवली. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

पू. (श्रीमती) लोला वेझीलिच यांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २६ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत 
चालू असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने...
पू. श्रीमती लोला वेझीलिच
१. प्रवासात एका साधिकेने प.पू. भक्तराज महाराज 
यांच्या ग्रंथातील अनुभूती भावपूर्ण रितीने सांगणे
     २८.६.२०१६ या दिवशी अमेरिकेतील फ्लोरिडामधील ओकलॅण्ड पार्क येथील एका सभागृहात स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या वतीने पूर्वज या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. हे प्रवचन घेण्यासाठी आम्ही चारचाकीतून जातांना सौ. माया देगास्पे प.पू. भक्तराज महाराज यांच्या ग्रंथातील अनुभूती भावपूर्ण रितीने सांगत होत्या. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वहात होते.

हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द वापरात आणण्याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेले गुह्य ज्ञान !

प.पू. पांडे महाराज
   १६.६.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये महर्षींनी ८.६.२०१६ जीवनाडीपट्टी क्र. ८२ मध्ये हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द वापरावा, अशा आशयाची चौकट प्रसिद्ध झाली होती.
     चौकटीत पुढे असेही लिहिले होते, सनातन हा मूळ धर्म आहे. काळाच्या ओघात त्याचे हिंदु असे नाव प्रचलित झाले. सिंधू नदीच्या काठी रहातात, ते हिंदू, अशी हिंदु शब्दाची एक व्युत्पत्ती सांगितली जाते. याविषयी काही वर्षांपूर्वी बोलतांना परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, सध्या हिंदु धर्म असे नाव प्रचलित असले, तरी त्याचे मूळ नाव सनातन धर्म असे आहे. आपण सध्या प्रचलित आहे; म्हणून हिंदु धर्म असा उल्लेख करू; पण पुढे हिंदु राष्ट्रात सनातन धर्म असाच उल्लेख प्रचलित करू. आता महर्षींनी दिलेला संदेशही तशाच अर्थाचा आहे. महर्षींनी नाडीपट्टीत सहस्रो वर्षांपूर्वी भविष्य कथन स्वरूपात केलेले लिखाण आणि प.पू. डॉक्टरांनी व्यक्त केलेले वरील विचार यांतील साम्य पहाता त्यांचे त्रिकालज्ञानीत्व लक्षात येते. सनातन धर्म म्हणजे काय ? सनातन धर्म राज्य म्हणजे काय ?, याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी केलेले विवेचन पुढे देत आहोत.

जाणूनी श्रीगुरूंचे मन या भावाने सेवा करतांना ईश्‍वरी अनुसंधानात रहाणार्‍या आणि सहजभावाने सर्वांनाच आपलेसे करणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ (उजवीकडे) यांनी विविध प्रश्‍नांद्वारे
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचा साधनाप्रवास उलगडला

       हिंदु धर्माच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी अखंड कार्यरत असणार्‍या आणि साक्षात् महर्षींनी गौरवलेल्या सनातनच्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ २४ जुलै या दिवशी सद्गुरुपदी विराजमान झाल्या. या भावसोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दोघींनीही एकमेकींना प्रश्‍न विचारून त्याद्वारे प्रत्येकीचा साधनाप्रवास उलगडला. या संवादातून सनातनच्या संतांमधील दुर्लभ आणि अनमोल गुण अनुभवण्याची संधी सर्व साधकांना मिळाली. सनातनच्या सर्वच साधकांना या अनमोल संतरत्नांची गुणवैशिष्ट्ये कळावीत, यासाठी हा साधनाप्रवास लेखाद्वारे उलगडून दाखवला आहे. श्रीकृष्णाने अशा महान संतांच्या सान्निध्यात सनातनच्या साधकांना रहाण्याची संधी दिली, यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता !

असे लोकप्रतिनिधी देणारी लोकशाही नको !

    वडिलोपार्जित भूमीच्या विक्रीस हरकत घेणार्‍या सचिन घावटे या युवकास भ्रमणभाषवरून शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड (पुणे) येथील माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर ११ जुलै या दिवशी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी श्री. मॅथ्यू फोफी यांना आलेल्या अनुभूती

श्री. मॅथ्यू फोफी
१. प.पू. भक्तराज महाराज यांंचे छायाचित्र देवघरात ठेवल्यावर स्वतःवर 
आणि घरावर आध्यात्मिक उपाय करण्याची शक्ती त्या छायाचित्रात 
असल्याचे जाणवणे 
     नुकतेच मी प.पू. भक्तराज महाराज यांंचे एक छायाचित्र पूजा करण्यासाठी घेतले आहे. या आधी माझ्याकडे देवघर नव्हते. मी माझ्या संगणकाच्या पडद्यावर असलेले त्यांचे छायचित्र पहात असे. त्या वेळी मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील त्यांचे छायाचित्र प्रत्यक्ष पहात आहे, असा भाव ठेवत असे. मी आश्रमापासून फार दूर (विदेशात) असल्याने काही काळानंतर असे करणेे मला कठीण होऊ लागले. मी प.पू. भक्तराज महाराज यांंचे छायाचित्र घरी आणल्यानंतर मला बराच पालट जाणवत आहे. माझ्यावर, तसेच मी रहात असलेल्या घरावर आध्यात्मिक उपाय करण्याची शक्ती प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात आहे, असे मला जाणवले.

सेवा स्वतःच्या बुद्धीने किंवा अहंभावाने करणे आणि श्रीकृष्णाच्या अनुसंधानात राहून करणे, यांतील श्रीकृष्णाने लक्षात आणून दिलेला भेद

सौ. क्रिस्टन हार्डी
१. नवीन सेवेविषयी मनात असलेल्या शंका दायित्व असणार्‍या 
साधिकेला विचारून न घेतल्याने मनावर ताण येणे 
     श्रीकृष्णाच्या कृपेने डिसेंबर २०१५ मध्ये चालू असलेल्या कार्यशाळेचा अहवाल इतर विदेशी साधकांना पाठवण्यासाठी सिद्ध करण्याची सेवा मला मिळाली. मी ती सेवा प्रथमच करणार असल्याने ती मला समजावण्यात आली; परंतु त्याविषयी माझ्या मनात काही शंका होत्या. पूर्वी ती सेवा केलेल्या साधिकेला सर्व ठाऊक असून मला केवळ तिच्याकडून शिकायचे आहे, असा विचार मनात असल्याने मी मनातील शंका दायित्व असणार्‍या साधिकेला सांगितल्या नाहीत. असे असले, तरी काहीतरी चुकते, असे वाटल्याने माझ्या मनावर ताण आला होता.

तोंडले चिरतांना कापलेल्या भागावर ॐचा आकार दिसणे, त्या ॐकडे पाहून चांगले वाटून नामजप करण्याची आठवण होणे आणि नंतर काही वेळ शांत वाटणे

तोंडल्याच्या कापलेल्या भागावरील ॐ
     २४.८.२०१५ या दिवशी सायंकाळी मी माझी मुलगी कु. सान्वी (वय ५ वर्षे) हिला तिच्या चुका सांगून गुण कसे वाढवायचे ?, यासंदर्भात बोलत भाजी चिरत होते. मी चिरत असलेल्या तोंडल्याच्या कापलेल्या भागावर मला अकस्मात् ॐ दिसला. त्या ॐकडे पाहून मला चांगले वाटून नामजपाची आठवण झाली आणि मला शांत वाटत होते. नंतरही काही काळापर्यंत तो शांतपणा टिकून होता. घरातील इतर मंडळींनाही त्या ॐकडे पाहून चांगले वाटले. या अनुभूतीच्या माध्यमातून प.पू. डॉक्टरांनी मला नामजप करण्याची आठवण करून दिली असावी, असे वाटून माझी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. 
- सौ. वैशाली धवस (२४.८.२०१५)

साधनेतील अडथळ्यांना न घाबरता आणि परिणामांची अपेक्षा न करता सतत प्रयत्नरत रहाणे आवश्यक असल्याचे श्रीकृष्णाने साधिकेला सांगणे

सौ. वैशाली धवस
     मला आध्यात्मिक त्रास असल्यामुळे सत्सेवा करतांना अडचणी येतात. त्यामुळे मी एकदा श्रीकृष्णाला म्हणाले, माझ्या सेवेत एवढ्या अडचणी का येतात ?, हे कृपा करून मला सांग. त्या वेळी मला श्रीकृष्णाचे विराट रूप दिसले आणि त्याने मला पुढील मार्गदर्शन केले.
     सर्व साधकांना मी माझ्याकडे घेऊन जाणार आहे. सत्सेवा हे माझ्यापर्यंत पोेेचण्याचे एक माध्यम आहे. सर्व साधक नौकेत बसले असून मायेच्या या सागरातून तरून ते माझ्यापर्यंत पोेचणारच आहेत. ही नौका चालत रहाण्यासाठी प्रयत्न करणे, ही एक प्रकारची सत्सेवाच आहे. श्रीकृष्ण हेच तुमचे ध्येय ठेवल्यास तुम्ही निश्‍चितपणे माझ्यापर्यंत पोेचाल. सागर पार करतांना सतत माझ्या चिंतनात रहाणे (श्रीकृष्णाशी अनुसंधान साधणे), हाही साधनेचाच भाग आहे. असे केल्याने मायेतील विचार मनात येणार नाहीत.

श्रीकृष्णाचे चित्र रेखाटतांना नामजपाचा अवर्णनीय आनंद मिळाल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

सौ. वैशाली धवस यांनी भावपूर्ण
रेखाटलेले श्रीकृष्णाचे चित्र
      सर्वसाधारणपणे सकाळच्या वेळी माझा त्रास वाढलेला असल्याने सकाळी उठतांना मला पुष्कळ त्रास होतो; परंतु ५.१२.२०१५ या दिवशी मी नेहमीपेक्षा उशिरा उठले, तरी मला झोप पूर्ण झाल्याचे जाणवून प्रसन्न वाटत होते. नेहमीप्रमाणे सकाळच्या उपायांच्या वेळी मी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर बसून नामजपाला आरंभ केला. त्याचवेळी माझी मुलगी कु. सान्वी (वय साडेपाच वर्षे) हिने चित्र काढण्याचा हट्ट केला; म्हणून मी स्वतःसाठी आणि तिच्यासाठी आवश्यक कागद अन् पेन्सिल आणायला तिलाच सांगितले. 
     प्रारंभी माझा नामजप चांगला होत नसल्याने मी प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र आज्ञाचक्रावर ठेवून एकाग्रतेने नामजप करू लागले. त्या वेळी मला चित्र काढण्याची तीव्र इच्छा झाली. चित्र काढतांना माझा नामजप सहजतेने आणि एकाग्रतेने होईल, या विचाराने मी श्रीकृष्णाचे चित्र रेखाटण्यास आरंभ केला. मला चित्र, विशेषकरून तोंडवळा (डोळे, नाक इत्यादी) काढता येत नाही. चित्र रेखाटतांना माझे श्रीकृष्णाशी अनुसंधान साधले जाऊन नामजप चांगला होत होता. आपणच माझ्याकडून हे चित्र रेखाटून घ्यावे, अशी मी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना करताक्षणी प.पू. डॉक्टर मला चित्र रेखाटण्यास साहाय्य करत आहेत, असे जाणवले. नामजपासहित चित्र काढतांना मला पुष्कळ चांगले वाटत होते.

परम पूज्य या शब्दातील महान जादू

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. परम पूज्य म्हणजे
प : परमेश्‍वर असणारे परमपूज्य
र : रामराज्य येण्यासाठी झटणारे परमपूज्य
म : महान असे परमपूज्य
पू : पूजनीय असे परमपूज्य
ज्य : ज्यांना साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीत आनंद वाटतो, असे परमपूज्य !

भक्ती आणि सेवा

श्री. रमानंद गौडा
      भक्ती म्हणून सेवा केली, तर आपल्यामध्ये ईश्‍वराचे गुण येतात.
- श्री. रमानंद गौडा, कर्नाटक. (४.७.२०१६)

ईश्‍वराचा तृप्त करणे, हा गुण प.पू. डॉक्टरांच्या शब्दांतून व्यक्त होत असल्याने त्यांनी दिलेल्या उत्तराने जिज्ञासूची तृप्ती होऊन त्याचे मन समाधान पावत असणे

श्री. राम होनप
      प.पू. डॉक्टरांना अनेक हितचिंतक, हिंदुत्ववादी, साधक किंवा संत यांनी अनेक प्रश्‍न विचारले आहेत. प्रश्‍न कितीही कठीण आणि गुंतागुतीचा असला, तरीही त्याचे उत्तर प.पू. डॉक्टरांनी हो, किंवा नाही या शब्दांत किंवा दोन-चार वाक्यांत दिले आहे. प.पू. डॉक्टरांनी दिलेल्या उत्तरातील शब्दसंख्या मर्यादित असली, तरीही पोटभर जेवल्यानंतर मन तृप्त व्हावे, असा अनुभव जिज्ञासूला उत्तर मिळाल्यानंतर येतो. ईश्‍वराचा तृप्त करणे, हा गुण प.पू. डॉक्टरांच्या शब्दांतून व्यक्त होतो. त्यामुळे प.पू. डॉक्टरांनी दिलेल्या उत्तराने जिज्ञासूची तृप्ती होऊन त्याचे मन समाधान पावते.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सर्व जिल्हासेवक आणि समितीसेवक यांना सूचना

विविध कार्यक्रमांत आसंद्याची रचना 
करतांना पुढील बारकावे लक्षात घ्या !
       गुरुपौणिमा महोत्सव, हिंदूसंघटन मेळावे, हिंदु धर्मजागृती सभा आदी कार्यक्रम सभागृहात पार पडतात. त्या वेळी अधिकाधिक जणांची बैठकव्यवस्था व्हावी, यासाठी साधक आसंद्या (खुर्च्या) एकमेकांच्या अगदी जवळ जवळ मांडतात. त्यामुळे इतरांना आपल्या कोपराचा स्पर्श होऊ नये, यासाठी जिज्ञासूंना अवघडून बसावे लागते, तसेच खुर्च्यांच्या दोन रांगांत अंतर कमी असल्यास तेथून ये-जा करणेही अडचणीचे होते. तसे होऊ नये यासाठी पुढील सूत्रे विचारांत घेऊनच आसंद्यांची रचना करावी.
१. आसंद्या मांडतांना आडव्या ओळींमधील २ आसंद्यांमध्ये आसंदीवर हात ठेवण्यासाठी असलेल्या भागांमध्ये न्यूनतम ९ इंच, तर उभ्या ओळींमधील २ आसंद्यांमध्ये न्यूनतम १६ इंच एवढे अंतर ठेवावे.
२. मागच्या ओळींमध्ये आसंद्या एका मागे एक अशा न ठेवता पुढच्या ओळीतील २ आसंद्यांच्या मध्ये पाठच्या ओळीतील १ आसंदी अशा प्रकारे ठेवावे. जेणेकरून जिज्ञासूंना व्यासपीठ व्यवस्थित दिसू शकेल.
       कार्यक्रमाला उपस्थित रहाणार्‍या जिज्ञासूंच्या सोयीचा विचार करून वरील प्रकारे रचना केल्याने सभागृहातील आसंद्यांची संख्या अल्प झाली, तरी चालेल.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०१६)

महाराष्ट्रातील साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती

नियमितपणे प्रवास करावा लागत असल्यास बसचा वार्षिक 
पास काढून प्रवासभाड्यात मिळणार्‍या सवलतीचा लाभ घ्या !
       बर्‍याच साधकांना सेवेच्या निमित्ताने, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना वैयक्तिक कारणाने विविध ठिकाणी सतत प्रवास करावा लागतो. अशांना बसच्या प्रवासभाड्यात सवलत मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या योजनेविषयीची माहिती पुढे देत आहे.
       नियमितपणे प्रवास करावा लागत असल्यास बसचा वार्षिक पास काढावा. त्यासाठी २०० रुपये, तसेच पासपोर्ट आकाराची दोन रंगीत छायाचित्रे एस.टी. कार्यालयात जमा करावी लागतात. प्रतिवर्षी नव्याने पास काढणे आवश्यक आहे. पास काढण्यासाठी वयाचे बंधन नाही.
       पास काढल्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या राज्य आणि आंतरराज्य मार्गावरील बसेसच्या प्रवासभाड्यात वर्षभर १० टक्के सवलत मिळते. (१८ कि.मी. अथवा त्यापेक्षा न्यून (कमी) अंतरापर्यंतच्या प्रवासाला सवलत लागू होत नाही.)
       प्रवासात नेहमी पास स्वतःसह ठेवणे आवश्यक आहे. तो समवेत नसेल, तर प्रवासभाड्यात सवलत मिळणार नाही.
       ज्यांचे वय ६५ वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांनी वरील पास काढू नये. त्याऐवजी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार्‍या ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा.
      हिंदु जनजागृती समितीचे कार्य शासनापेक्षा चांगले आहे. या कार्याचे कोणतेही मोजमाप करता येत नाही. या कार्यासाठी मी हिंदु जनजागृती समितीचा आजन्म आभारी आहे ! 
- श्री. गौरीश केळकर, भटवाडी, शिरोडा, गोवा.

फलक प्रसिद्धीकरता

उत्तरप्रदेशची दुसर्‍या 
काश्मीरकडे होणारी वाटचाल थांबवा !
   उत्तरप्रदेशातील अलीगड जिल्ह्यातील बाबरी मंडी या मुसलमानबहुल भागातून अनेक हिंदूंनी यापूर्वी पलायन केल्यानंतरही आणखी १० कुटुंबांनी त्यांची संपत्ती विकून स्थलांतर करण्यासाठी न्यायदंडाधिकार्‍यांकडे अर्ज केले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
UPme Aligarhki Babri mandise fir 10 Hindu parivaronka palayan.
- Ham deshme aur kitne kashmir banne denge ?
जागो !
उत्तरप्रदेश में अलीगड की बाबरी मंडी से फीर १० हिन्दू परिवारों का पलायन.
- हम देश में और कितने कश्मीर बनने देंगे ?

हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने आज आझाद मैदान, मुंबई येथे भव्य आंदोलन

विषय : संत आणि हिंदुत्ववादी यांची अन्याय्यकारक अटक अन् सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीला विरोध करणे
वेळ : दुपारी २  
संपर्क : ९५५२४ ०२९९९
मुंबई, ठाणे, रायगड येथील साधकांनी आंदोलनाला 
उपस्थित रहावे. वाचक आणि हितचिंतक 
यांनी आंदोलनात सहभाग घ्यावा, ही विनंती !
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      भारताहून आकाराने मोठ्या असलेल्या रशिया, चीन, अमेरिका यांना एक राजधानी आहे; पण महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर या दोन ठिकाणी अधिवेशने होतात. जनता दरिद्री असतांना ही उधळपट्टी टाळावी, असे एकाही पक्षाला वाटत नाही !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
मानवाचे रूप अल्प काळाचे असते. रूपाला महत्त्व नसून व्यक्तीचे आचार, 
विचार आणि वागणे यालाच खरे महत्त्व असते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
    मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र

चीनच्या वाढत्या कुरापती !

संपादकीय 
      चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठी तो करत असलेली दादागिरी ही भूमी, पाणी आणि आकाश अशा तिन्ही स्तरांवर आढळते. काही दिवसांपूर्वी दक्षिण चिनी समुद्रात चीनने बेधडकपणे अवैधरित्या मानव-निर्मित बेटे बनवली आणि तेथे सैन्य तैनात करून शेजारी देशांवर दादागिरी गाजवण्यास आरंभ केला. चिनी समुद्रावर चीनने दावा सांगितल्यावर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले. न्यायालयाने चीनला या समुद्रावरील दाव्यावरून चांगलेच फटकारले; पण कोणाला जुमानेल तो चीन कसला ? न्यायालयाचा हा आदेश बेधडकपणे धाब्यावर बसवून चीनने त्याच्या पुढच्याच आठवड्यात त्याच समुद्रात सैनिकी कवायती केल्या. यावरून चीनची आक्रमकता दिसून येते. कुठल्याही परिस्थितीत आम्ही दक्षिण चिनी समुद्रावरील दावा सोडणार नाही, हेच चीनने जगाला दाखवून दिले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn