Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

१ सहस्र एकर शेतजमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या भ्रष्ट कारभाराचे नमुने 
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) चौकशीत बाहेर येण्यास आरंभ !
     कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची शाहूवाडी तालुक्यातील १ सहस्र एकर शेतजमीन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे पुणे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडीच्या) चौकशीत निष्पन्न झाले आहे. चौकशीमध्ये हा प्रकार पुढे येताच त्यासंबंधीचा लेखी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केल्याचे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. (या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश द्यावेत ! - संपादक) या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात समितीचे कर्मचारी शिवाजी साताप्पा साळवी यांनी तक्रार दिल्यानंतर संबंधित २ आस्थापनांसह अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट झाला आहे.
१. देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे यांच्यासह समितीच्या लेटरपॅडवर सदस्यांच्या खोट्या स्वाक्षर्‍या आणि शिक्के मारून मुंबईतील देव रिर्सोसेस इंडिया आणि एन्.एस्. कुंभार ट्रेडर्स अ‍ॅण्ड मिनरल्स, पेठवडगाव या आस्थापनांच्या नावे ही भूमी देण्याचा प्रयत्न झाला आहे.
२. हा प्रकार १६ ऑगस्ट २०१२ ते ३१ ऑगस्ट २०१५ या कालावधीत देवस्थान समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात झाल्याने समितीचे १८ सदस्य आणि कर्मचारी चौकशीच्या फेर्‍यांत अडकले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवसपुरामुळे बंगालमध्ये ४ जणांचा मृत्यू, तर आसाममध्ये ६ लाख लोकांना फटका !

      गुवाहाटी / कोलकाता - बंगालमध्ये अलीपुरद्वार, जलपाईगुडी आणि कूच बिहार या ३ जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामध्ये ४ जण ठार झाले, तर ५८ सहस्र लोक बाधित झाले आहेत. हे मृत्यू भिंत पडल्याने, पाण्यात बुडाल्याने आणि पाण्यातील साप चावल्याने झाले आहेत. 
     आसाममध्ये १४ जिल्ह्यांमधील ६ लाखांहून अधिक नागरिकांना या पूराचा फटका बसला आहे. पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी एन्डीआर्एफ्, एस्डीआर्एफ् आणि भारतीय सैन्य यांना तैनात करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यांच्यासाठी ८१ ठिकाणी साहाय्य छावण्या उभारण्यात आल्या आहेत. पुरामुळे काझीरंगा अभयारण्यातील वन्यजीवन मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. 
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (बंगाल आणि आसाममध्ये पुरस्थितीवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

हिंदु संत, नेते आणि संघटना यांच्यावरील अन्याय्य कारवाईच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे २८ जुलैला मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन !

डावीकडून प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. विशाल पटनी, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. आदित्य देशमुख, 
हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, भारतीय युवा शक्तीचे श्री. अंश देसाई
     मुंबई - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. धनंजय देसाई पुरावे नसतांनाही कारागृहात आहेत, तसेच सनातन संस्थेवर बंदीची अन्याय्य मागणी होत आहे, या विरोधात मुंबईतील समस्त राष्ट्र्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र आल्या आहेत. २८ जुलै या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात दुपारी २ वाजता भव्य निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी धर्माभिमानी हिंदूंनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्र्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी २६ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भारतीय युवा शक्तीचे मुख्य सल्लागार अधिवक्ता अंश देसाई, हिंदु राष्ट्र सेनेचे प्रवक्ता श्री. आदित्य देशमुख आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. विशाल पटनी उपस्थित होते.

केरळमध्ये लघुकथेच्या पुस्तकाच्या नावात अल्ला शब्द असल्यावरून धर्मांधांकडून मुसलमान लेखकावर आक्रमण !

साम्यवाद्यांच्या राज्यातील वाढती असहिष्णुता ! 
      पलक्कड (केरळ) - केरळमधील २६ वर्षीय मल्याळम् लेखक पी. जिमशर यांच्यावर जाफर आणि अन्य तिघांनी आक्रमण करून त्यांना गंभीररित्या घायाळ केले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिमशर यांच्या लघुकथांचा पहिला संग्रह येत्या ५ ऑगस्टला प्रकाशित होणार आहे. याचे नाव पदाचोन्टे चित्रप्रदर्शनम् (अल्लाचे चित्रप्रदर्शन) असे आहे. मल्याळम् भाषेत पदाचोन या शब्दाचा वापर अल्लासाठी केला जातो. या पुस्तकाच्या प्रकाशनची घोषणा झाल्यावर त्यांना धमकीचे दूरभाष आणि संदेश येऊ लागले होते. राज्यातील एक लेखक आणि इस्लामी विचारवंत मुजिद रहमान यांनी म्हटले की, ही घटना केरळमधील वाढत्या असहिष्णुतेचे ताजे उदाहरण आहे. (दादरीवरून असहिष्णुता वाढल्याचा ढोल पिटून पुरस्कार परत करणारे लेखक हे मुजिद रहमान यांच्याप्रमाणे बोलतील का ? - संपादक) बांगलादेशात पोलिसांच्या कारवाईत इसिसचे ९ आतंकवादी ठार !

     ढाका - शहरामध्ये पोलिसांनी एका इमारतीवर छापा टाकून केलेल्या कारवाईत ९ आतंकवाद्यांना ठार मारले आहे. हे आतंकवादी इसिसशी संबंधित होते. २ घंटे चाललेल्या या कारवाईच्या वेळी आतंकवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने बॉम्ब फेकले. या कारवाईनंतर परिसरात शोधमोहीम चालू करण्यात आली आहे.अफझलखान वधाचे चित्र पाठ्यपुस्तकात समाविष्ट न केल्यास तीव्र आंदोलन करणार !

इयत्ता ४ थीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि 
अफझलखान यांच्या आलिंगनाच्या वादग्रस्त चित्राचे प्रकरण
शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना यांची पत्रकार परिषदेद्वारे चेतावणी
   
डावीकडून श्री. राजेंद्र सावंत, श्री. बळवंत राव दळवी, डॉ. उदय धुरी, श्री. अभय वर्तक, श्री. प्रभाकर भोसले
      मुंबई - बालभारतीने म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता ४ थीच्या शिवछत्रपती (परिसर अभ्यास - भाग २) या पुस्तकात अफझलखान वधाच्या चित्राच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाला आलिंगन देण्यास जात आहेत, असे दिशाभूल करणारे चित्र प्रकाशित केले आहे. हे वादग्रस्त चित्र पालटून पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पराक्रमाच्या म्हणजेच अफजलखान वधाच्या चित्राचा समावेश करावा. येत्या ७ दिवसांत याविषयी काही कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना यांनी पत्रकार परिषदेत दिली. (अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी बहुसंख्यांकांचा जाज्ज्वल्य इतिहास दडपला जाणारा जगातील एकमेव देश भारत ! - संपादक)

(म्हणे) गणेश मंडळांनी मशिदीसमोर मिरवणूक आल्यावर ध्वनीक्षेपक बंद केल्यासच देशात एकता नांदेल !

हिंदूंच्या सणांच्या मिरवणुकांवरून धर्मांध नेते अशी उघडपणे धमकी देतात; मात्र हिंदु किती नेते
 हिंदूंचे सण आणि उत्सव निर्विघ्नपणे साजरे होण्यासाठी हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभे रहातात ?
पत्रकार परिषदेत आमदार अबू आझमींची गर्भित धमकी
     मुंबई - मी मुसलमानांना सांगेन की, गणेश मंडळांचा मान राखा; मात्र गणेश मंडळांनी मिरवणूक मशिदीसमोर आल्यानंतर ध्वनीक्षेपक बंद करायला हवा, तरच देशात एकता नांदेल, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एकप्रकारे धमकी दिली. (हिंदुबहुल भारतात हिंदूंना अशी धमकी मिळते, याहून दुसरे दुर्दैव कुठले ? - संपादक) विधानभवनातील पत्रकारसंघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आझमी बोलत होते.
     आतंकवादविरोधी पथकांच्या वतीने विविध ठिकाणी मुसलमान तरुणांना इसिसमध्ये सहभागी होण्याच्या शक्यतेवरून अटक केली जात आहे. या कारवाईच्या विरोधात निष्पाप मुसलमानांवर कारवाई करू नये, या मागणीसाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. (इसिसमध्ये सहभागी होणार्‍या मुसलमानांकडे त्यासंदर्भातील प्रक्षोभक साहित्यही सापडत असतांना त्याविषयी आझमी का बोलत नाहीत ? - संपादक)

कुपवाडामध्ये सैन्याच्या कारवाईत ४ घुसखोर आतंकवादी ठार !

      जम्मू - २६ जुलैला जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आतंकवाकडून घुसखोरीचा प्रयत्न होत असतांना सैन्याने केलेल्या कारवाईत ४ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तर एकाला जिवंत पकडण्यात आले. (पकडण्यात आलेल्या आतंकवाद्याला आता भारत आयुष्यभर पोसत रहाणार ! - संपादक) नौगम सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) ही कारवाई करण्यात आली. ठार झालेले चारही आतंकवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे चौकशीनंतर समोर आले आहे.अफगाणिस्तानातील अपहृत भारतीय महिलेची सुटका

     नवी देहली - दीड मासांपूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथून अपहरण करण्यात आलेली भारतीय महिला जुडीथ डिसोझा यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली. जुडीथ यांचे अपहरण कसे झाले आणि सुटका कशा पद्धतीने झाली, याची माहिती मात्र देण्यात आली नाही. ४० वर्षीय जुडीथ या कोलकाता येथील आहेत. आगा खान फाऊंडेशनमध्ये त्या तांत्रिक सल्लागार म्हणून काम करतात. जुडीथ यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती.

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कामगार राष्ट्रपतींहून अधिक वेतन मिळवतात !

* एका कामगाराचे प्रतिमाह वेतन ४ लाख ५० सहस्र रुपये !
* ३७० विभागीय कामगारांना कामावरून काढण्याचा केंद्राचा निर्णय !
      नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्रसरकारने प्रतिमास लाखो रुपये वेतन मिळवणार्‍या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफ्सीआयच्या) विभागीय कामगारांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासह देशातील एफ्सीआयची ६३ गोदामे आणि रेल्वे हेड्स यांमध्ये पुन्हा एकदा ठेका पद्धतीने कामगारांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

खानाचा कोथळा काढल्याचे चित्र पाठ्यपुस्तकात कधीही प्रकाशित करण्यात आले नव्हते ! - शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजप

सरकारने पुस्तकात खर्‍या इतिहासाचे चित्र समाविष्ट करावे, अशी शिवप्रेमींची अपेक्षा आहे !
     मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, अशा आशयाचे चित्र इयत्ता चौथीच्या इंग्रजी माध्यमाच्या इतिहासाच्या कोणत्याही आवृत्तीमध्ये प्रकाशित करण्यात आलेले नाही. पाठ्यपुस्तक मंडळाने वर्ष १९७० पासून आतापर्यंत प्रकाशित केलेल्या चौथीच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या भेटीचे चित्र दाखवण्यात आले ओह. केवळ सामाजिक संकेतस्थळांवर विश्‍वास ठेवून आणि खरा इतिहास न वाचता अशा पद्धतीचा चुकीचा प्रचार करण्यात येत आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २ धड्यांमध्ये पूर्वीच्या धड्यांमधून आवश्यक ती माहिती आणि अधिकची तपशीलवार माहिती विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने अन् आकर्षक मांडणी करून देण्यात आली आहे.
     पाठ्यपुस्तक मंडळाच्या वतीने एकूण ८ भाषांमध्ये पाठपुस्तकाची निर्मिती केली जाते. त्यानुसार मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, गुजराती, सिंधी आणि तेलगू या सर्व भाषांच्या सुधारित आवृत्त्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. (याविषयी विविध मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया लवकरच प्रसिद्ध करत आहोत. - संपादक)

जर्मनीतील पेगिडा ही कट्टर राष्ट्रनिष्ठ संघटना नवीन राजकीय पक्ष स्थापणार !

      बर्लिन - जर्मनीतील पेगिडा ही मुसलमान शरणार्थींच्या विरोधात चळवळ राबवणारी कट्टर राष्ट्रनिष्ठ संघटना नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. या नव्या राजकीय पक्षाचे नाव पॉप्यूलर पार्टी फॉर फ्रीडम अ‍ॅण्ड डायरेक्ट डेमोक्रसी असे आहे. जर्मन भाषेत या पक्षाला एफ्डीडीव्ही संबोधले जाणार आहे, अशी माहिती पेगिडा चळवळीचे प्रमुख ल्युट्झ बॅशमॅन यांनी दिली. तथापि आमचा पक्ष जर्मनीमध्ये कार्यरत असलेल्या एएफ्डी (ऑल्टरनेडीव्ह फॉर जर्मनी) या उजव्या विचारसरणीच्या पक्षाची मते मागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकेतील ३७ टक्के नागरिकांमध्ये इस्लामविषयी प्रतिकूल मत

अमेरिकेत मुसलमानांवरून राजकीय पक्षांत मतभेद !
      न्यूयॉर्क - इस्लामविषयी बर्‍याच अमेरिकी नागरिकांचे मत चांगले नाही. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे बरेच समर्थक इस्लामच्या विरोधात आहेत. रॉयटर्स या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ३७ टक्के अमेरिकी नागरिकांमध्ये इस्लामविषयी प्रतिकूल मत आहे. यामध्ये ट्रम्प यांचे ५८ टक्के समर्थक इस्लामविरोधी आहेत, तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचे २४ टक्के समर्थक इस्लामच्या विरोधात आहे. १४ जुलै या दिवशी फ्रान्सच्या नाईस शहरात झालेल्या आतकंवादी आक्रमणानंतर सदर सर्वेक्षणाचे आकडे घोषित करण्यात आले. या आक्रमणात ८० लोक ठार झाले होते, तर अनेक जण घायाळ झाले होते. या आक्रमणानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांनी फ्रान्स इस्लामी आतंकवादाच्या सावटाखाली आहे, असे वक्तव्यही केले होते.
      ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी होणार्‍या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इस्लामच्या मुद्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेत शरणार्थींच्या रूपात प्रवेश करणार्‍या मुसलमानांवर बंदी घालण्यात यावी, असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. इस्लाम आतंकवादाला खतपाणी घालतो, असे मत ट्रम्प यांच्या ७८ टक्के समर्थकांनी, तर क्लिंटन यांच्या ३६ टक्के समर्थकांनी व्यक्त केले आहे.

कॅलिफोर्नियास्थित ब्लिझार्ड एन्टरटेनमेंटच्या व्हिडिओ गेममधून श्री दुर्गादेवीचे चित्र हटवण्याची हिंदूंची मागणी !

हिंदू असंघटित असल्यानेच कुणीही त्यांच्या देवतांचे विडंबन करू धजावते. यास्तव हिंदूंनी संघटित व्हावे !
      न्यूयॉर्क - कॅलिफोर्नियाच्या सांता मोनिका येथील ब्लिझार्ड एन्टरटेनमेंटच्या ओव्हरवॉच नावाच्या व्हिडिओ गेममधून श्री दुर्गादेवीचे विडंबन करण्यात आले आहे. या विरोधात अमेरिकेतील हिंदूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या खेळामधून श्री दुर्गादेवीचे चित्र तातडीने हटवावे, अशी मागणी केली आहे. देवीच्या प्रतिमेचा व्यावसायिक लाभासाठी वापर करणे अयोग्य आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान झाला आहे. श्री दुर्गादेवीचे स्थान हे मंदिरात किंवा देवघरात असते. जगभरातील कोट्यवधी हिंदु श्री दुर्गादेवीची पूजा करतात. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दुर्गादेवीचे मनोरंजनासाठी वापर करणे अयोग्य आहे. ब्लिझार्ड एन्टरटेनमेंटने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करत हे चित्र तातडीने हटवावे, अशी मागणी हिंदूंनी केली आहे. या विडंबनाच्या विरोधात धर्माभिमानी हिंदू सनदशीर मार्गाने निषेध नोंदवत आहेत.(म्हणे) काश्मीर पाकमध्ये येण्याची वाट पहात आहे ! - नवाज शरीफ

काश्मीरमध्ये भारतीय सैन्य असल्यामुळे अद्याप काश्मीर भारतात आहे अन्यथा काँग्रेस 
आणि गांधी-नेहरू परिवाराने केव्हाच ते पाकच्या घशात घातले असते !
     मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) - पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पक्षाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीत ४१ पैकी ३० जागा जिंकल्या आहेत. यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शरीफ म्हणाले की, काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल, या दिवसाची मी वाट पहात आहे.
शरीफ यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही ! - भारत
      शरीफ यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना भारताच्या परराष्ट्र्रमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या, शरीफ यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही.
      पाकिस्तानने काश्मीरमध्ये आतंकवादाशिवाय काहीही केले नाही किंबहुना नवाज शरीफ हे ज्या बुरहान वानीला हुतात्मा घोषित करतात तो हिजबुलचा कमांडर होता, हे शरीफ यांना माहीत आहे का ?

इंदूर (तेलंगण) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंदिरात ग्रंथ वाचनालयाचे उद्घाटन

डावीकडून अधिवक्ता श्री. व्यंकटेश, नगरसेविका 
श्रीमती गंगामनी, महापौर श्रीमती अकुला सुजाता, 
डॉ. ए. विशाल, श्री. नरेंद्र गौड, अधिवक्ता उदय कृष्णा

सनातन संस्थेचा ग्रंथवाचनालयाचा स्टॅण्ड

गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीराम सेनेच्या वतीने हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन

     हुब्बळ्ळी - गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीराम सेनेच्या वतीने येथील विठ्ठल मंदिरात नुकतेच गुरुवंदना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित मोहन गुरुस्वामी गोकुल यांची पाद्यपूजा करण्यात आली. यानंतर त्यांच्या हस्ते १० भगवद्गीता वितरित करण्यात आल्या. याप्रसंगी गुरुपौर्णिमा, गुरु, शिष्य, हिंदु धर्म आणि धर्माचरण यांचे महत्त्व विषद करण्यात आले. या सोहळ्यास श्रीराम सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री. गौरीशंकर मोत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कलांगौडर, श्रीराम सेनेचे गदग जिल्हाध्यक्ष श्री. राजू खानापूर, तसेच अनेक भाविक उपस्थित होते.
क्षणचित्र : या वेळी जनजागृती म्हणून हिंदु मंदिरांची स्थिती, गोहत्या आणि देवतांचे होणारे विडंबन यांविषयी ध्वनिचित्रतबकडी (सीडी) दाखवण्यात आली.

सनातनच्या मार्गदर्शनामुळे समाजात धर्म आणि अध्यात्म यांविषयी असलेले अपसमज दूर होत आहेत ! - आनंद गौडा, सामाजिक कार्यकर्ते

कठीण काळात सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार्‍या धर्माभिमानी हिंदूंचे आभार !
पुत्तुरू (कर्नाटक) येथे सनातन संस्थेच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद !
डावीकडून के.एन्. कृष्णकुमार शर्मा' श्री. माधव
गौडा, 
श्री. आनंद गौडा, श्री. राजशेखर राय
      पुत्तुरू - सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे. ती घरोघरी प्रसार करून अध्यात्म आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन करते. आतापर्यंत आम्ही सनातन संस्थेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. सनातनच्या मार्गदर्शनामुळे समाजात धर्म आणि अध्यात्म यांविषयी असलेले अपसमज दूर होत आहेत. त्यामुळे अशा राष्ट्र आणि धर्मप्रेमी संघटनेवर बंदी घालण्याचा विचार करणे थांबवले पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते श्री. आनंद गौडा यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केले. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. राजशेखर राय, कोडींबाडी सहकारी संघाचे संयोजक श्री. माधव गौडा, धर्माभिमानी के.एन्. कृष्णकुमार शर्मा आदी उपस्थित होते.

गांधी हत्येमागे लॉर्ड माउंटबॅटन आणि नेहरू ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांसाठी सनातनवर धादांत खोटे 
आरोप करून बंदीची मागणी करणारे पुरो(अधो)गामी गांधी हत्येविषयीच्या या 
दाव्यावर काही बोलतील का आणि काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी करतील का ?
     नवी देहली - मोहनदास गांधी यांच्या हत्येच्या वेळी किती गोळ्या झाडण्यात आल्या याविषयी कोणाला काहीच माहिती नाही ? त्यांचे शवविच्छेदन का केले नाही, याचीही माहिती नाही आणि जेव्हा गांधी यांना गोळ्या लागल्या, तेव्हा त्यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आले नाही ? त्यांना बिर्ला हाऊसमध्येच का ठेवण्यात आले ? अशा प्रश्‍नांची सरबत्ती भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी २६ जुलैला राज्यसभेत केली. गांधी हत्येमागे लार्ड माऊंटबॅटन आणि नेहरू यांचा कट होता, असा दावाही त्यांनी या वेळी केला. या संदर्भात १५ ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती आणि तथ्य समोर ठेवीन, असेही डॉ. स्वामी यांनी या वेळी सांगितले.
     डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, जेव्हा काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत होती, तेव्हा आम्ही राष्ट्रपतींना पत्र लिहून म्हटले होते की, गांधींना ब्रिटिशांनी मारले आहे. काही माहितीच्या आधारे यामागे लॉर्ड माऊंटबॅटन आणि नेहरू होते, असे स्पष्ट होते.

खरातवाडी (जिल्हा सोलापूर) येथील श्री लक्ष्मी मंदिरातील सोन्याच्या मूर्तीच्या चोरीप्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यास पोलिसांची टाळाटाळ

हिंदूंनो, मंदिरांच्या रक्षणासाठी पोलीस काहीही करणार नाहीत, त्यासाठी 
हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करण्याला पर्याय नाही ! 
      पंढरपूर, २६ जुलै - तालुक्यातील खरातवाडी गावातील श्री लक्ष्मीदेवीच्या मंदिरातून ५ तोळे सोन्याची श्री लक्ष्मीची मूर्ती आणि १० ग्रॅम चांदीसह अनुमाने १ लक्ष ६० सहस्र रुपयांचा ऐवज चोरांनी चोरून नेला. ही घटना २४ जुलै या दिवशी उघडकीस आली. याविषयी देवीचे पुजारी दादा समर्थ खरात आणि हरिभाऊ खरात हे करकंब पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले; परंतु तेथे असलेल्या पोलिसांनी साहेब, सध्या नाहीत. तुम्ही उद्या या. साहेबांना सांगून तक्रार घ्यावी लागेल, असे सांगितल्याने पोलीस ठाण्यात अजूनपर्यंत गुन्हा प्रविष्ट झाला नाही. (अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनास्थळामध्ये अशी घटना घडली असती, तर पोलिसांनी असेच उत्तर दिले असते का ? - संपादक)

देहली येथे धर्मांधांकडून शासनाची २५ एकर भूमी लाटण्याचा प्रयत्न !

हरित प्राधिकरणाच्या फलकाखाली धर्मांधांनी
कब्रस्तानाची भूमी आहे, अशा आशयाचा
लावलेला फलक
* राष्ट्रीय हरित प्राधिकरणाची नोटीस 
* अखंड भारत मोर्चाकडून जनहित याचिका
     देहली - धर्मांधांकडून शहरातील मयूर विहार एक्स मेट्रो रेल्वे स्थानकाच्या जवळ बलपूर्वक बनावट थडगे आणि स्मशान यांची निर्मिती करून अनुमाने २५ एकर भूमी अवैधपणे कह्यात घेण्याचा प्रयत्न चालू आहे. (धर्मांध पद्धतशीरपणे शासनाची भूमी बळकावतात आणि नंतर त्या भूमीचा वापर समाजविघातक कारवायांसाठी करतात ! याविषयी अनेक पुरावे असतांनाही प्रशासन मात्र अशा प्रकरणांत सतर्कता बाळगत नाही, हे संतापजनक ! - संपादक) याप्रकरणी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने जामिया कब्रस्तान कमेटी, केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्रालय, डी.डी.ए. उत्तरप्रदेश सिंचन विभाग आणि जिल्हाधिकारी पूर्व देहली यांना नोटीस पाठवली असून त्यांना १९ ऑगस्टपर्यंत अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.

अफजलखानवधाचे चित्र वगळणे हे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सत्य इतिहास दडपण्याचे षड्यंत्र ! - सुनील घनवट

सात दिवसांच्या आत अफजलखानवधाचे चित्र 
आणि संबंधित इतिहास पाठ्यपुस्तकात अंतर्भूत
 न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी

इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात अफजलखान
 भेटीचे चित्र समाविष्ट करणार्‍यांचा
 अफजलखानवधाचे छायाचित्र भेट देऊन निषेध 
  
श्री. सुनील चव्हाण (वर्तुळात) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
      पुणे - बालभारतीने म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती परिसर अभ्यास (भाग २) या पुस्तकात अफजलखान वधाच्या चित्राच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाची गळाभेट घेण्यास जात असल्याच्या संदर्भातील दिशाभूल करणारे चित्र प्रकाशित केले आहे. गनिमी काव्याने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून छत्रपती शिवरायांनी पराक्रमाचा इतिहास घडवला; पण शालेय अभ्यासक्रमात अफजलखानवधाचे चित्र वगळण्यात आले. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सत्य इतिहास दडपण्याचेच हे षड्यंत्र आहे. येत्या ७ दिवसांत अभ्यासक्रम पालटून अफजलखानवधाचे चित्र आणि संबंधित इतिहास पाठ्यपुस्तकात अंतर्भूत करावे, तसेच दोषींवर कठोर कारवाई करून पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बरखास्त करावे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता श्री. सुनील घनवट यांच्यासह उपस्थित इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमी आंदोलक यांनी दिली. हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने २५ जुलै या दिवशी येथील बालभारतीच्या कार्यालयात शिक्षण सहसंचालक सुनील चव्हाण आणि इतिहास, नागरिकशास्त्र विषयांचे विशेष अधिकारी मोगल जाधव यांना निवेदन देण्यात आले. इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात अफजलखान भेटीचे चित्र समाविष्ट करणार्‍यांचा अफजलखान वधाचे छायाचित्र भेट देऊन निषेध करण्यात आला. हे निवेदन स्वीकारून त्वरित त्याचा अहवाल पुढे पाठवण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिले.

ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने झीच्या कार्यालयात निवेदन

शूर योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांची झी टॉकीजने अपकीर्ती केल्याचे प्रकरण ! 
      पुणे, २६ जुलै (वार्ता.) - नुकत्याच झी टॉकीज एका कार्यक्रमात शूर योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे विडंबन आणि अपकीर्ती करण्यात आली होती. याचा निषेध म्हणून ब्राह्मण जागृती संघाचे श्री. अंकीत काणे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील झीच्या कार्यालयात जाऊन निषेधाचे पत्र देण्यात आले. बाजीराव पेशवे यांच्या अपकीर्तीविषयी आपल्या दूरचित्रवाहिनीवर क्षमायाचना व्यक्त करा आणि यापुढे देशातील कुठल्याच महापुरुषाविषयी अशी अपकीर्ती होऊ देऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी शिक्षण मंडळाच्या माजी सभापती संगिता तिवारी उपस्थित होत्या. (आपल्या श्रद्धास्थानांचे विडंबन रोखण्यासाठी प्रयत्नशील ब्राह्मण जागृती संघाचे अभिनंदन ! प्रत्यकानेच देवता-राष्ट्रपुरुष यांच्यावर होणार्‍या विडंबनाविषयी केवळ बघ्याची भूमिका न घेता सनदशीर मार्गाने विरोध नोंदवला पाहिजे ! - संपादक)
सांगलीतून झीला निषेधाची पत्रे ! 
     सांगली - श्रीमंत बाजीराव पेशवे यांची अपकीर्ती केल्याविषयी सांगली ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री. केदार खाडिलकर यांनी निषेध केला असून सभेच्या वतीने झीला सांगलीतून अनेक पत्र पाठवली असल्याचे श्री. खाडिलकर यांनी सांगितले.

कॉ. पानसरे हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्र तावडे यांच्या कोठडीसाठी प्रयत्न

विशेष तपास पथकाची उच्च न्यायालयात माहिती
      मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्र तावडे यांची कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणीही चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या विशेष तपास पथकाच्या (एस्आयटीच्या) वतीने २५ जुलै या दिवशी उच्च न्यायालयात देण्यात आली.

समाजात प्रत्येक चांगल्या गोष्टी लागू करण्यासाठी न्यायालय आदेश देऊ शकत नाही ! - सर्वोच्च न्यायालय

समाजात सुव्यवस्था आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन प्रयत्न करत नाहीत आणि ते न्यायालयाच्या अखत्यारित नसल्यामुळे न्यायालयही हतबलता दर्शवते ! अशा वेळी सामान्य नागरिकाने 
काय करायचे ? यावरून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) अपरिहार्यता लक्षात येते ! 
     नवी देहली - समाजात प्रत्येक चांगली गोष्ट लागू करण्यासाठी जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालय आदेश देऊ शकत नाही. सीबीएस्ईच्या १ ली ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात नैतिक शास्त्राला अनिवार्य विषय बनवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाला एक सीमा आहे आणि त्यापुढे जाऊ शकत नाही. न्यायालयाने म्हटले की, अशा विषयांत निर्णय घेण्याचा अधिकार त्या लोकांना आहे जे सरकारमध्ये शिक्षण खात्याशी संबंधित आहेत. न्यायालयाचे काम राज्यघटना आणि कायदा यांसंदर्भातील प्रकरणे पहाण्याचे आहे; मात्र यात दुमत नाही की, नैतिक मूल्यांचे अधःपतन होत आहे. समाजात नैतिकता आवश्यक आहे; मात्र त्याला एक चौकट नाही. एक चांगल्या लोकशाहीप्रधान समाजासाठी नैतिक मूल्यांव्यतिरिक्त आणखीही काही गोष्टी आहेत.

राजस्थानमधील बीकानेर येथील संवित् साधनायन संस्थेचा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा !

     बीकानेर (राजस्थान) - पू. श्रीस्वामी संवित् सोमगिरिजी महाराज यांचे गुरु तथा अबू पर्वत (माऊंट अबू) येथील संवित् साधनायनचे संस्थापक परमहंस परिव्राजकाचाय श्रीस्वामी ईश्‍वरानंदगिरिजी महाराज यांच्या संन्यास संस्काराला ६० वषेर्र् पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्रीलालेश्‍वर महादेव मंदिराचे अधिष्ठाता श्रीस्वामी संवित् सोमगिरिजी महाराज यांच्यावतीने येथे हिरक जयंती गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. 
   या वेळी स्वामी नारायणगिरिजी, स्वामी राजनरहरिगिरजी, स्वामी नृसिंहदासजी, स्वामी संवित् भास्करगिरिजी, स्वामी भूमानन्द सरस्वतीजी, संवित् आशीष, स्वामी सुबोधगिरिजी, राजेश्‍वर गिरिजी आदी संत आणि राज्याचे मंत्री राजकुमार रिणवा, आमदार डॉ. गोपाल जोशी, माजी आमदार ओम जोशी, माजी महापौर भवानी शंकर शर्मा, महाराजा गंगासिंह विश्‍वविद्यालयाच्या कुलपति डॉ. चंद्रकला पाडिया आदी मान्यवर उपस्थित होते.होन्नाळी (कर्नाटक) येथे हिंदु असल्याचे भासवून धर्मांधाकडून हिंदु युवतीची फसवणूक : युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

हिंदु युवतींना फसवणे, हा धर्मांध युवकांचा नित्याचाच कार्यक्रम झाला आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच 
हिंदु युवती केवळ भ्रमणभाषवरील संभाषणाद्वारे शारीरिक संबंध ठेवण्यापर्यंत धर्मांधांच्या जाळ्यात 
फसतात आणि स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. हिंदु युवतींनो, धर्मांधांपासून रक्षण 
होण्यासाठी धर्मशिक्षण घेण्याबरोबरच स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे !
     होन्नाळी (कर्नाटक) - होन्नाळी तालुक्यातील गिड्डेहळ्ली गावातील एका हिंदु युवतीला इंडुवळ्ळी येथील महंमद गौस याने कोणतीही ओळख नसतांना भ्रमणभाषवरून मिस्ड कॉल केला. या क्रमांकावर सदर युवतीने संभाषण केले. त्या माध्यमातून त्याने स्वत:ला हिंदु असल्याचे भासवून युवतीशी ओळख वाढवली. तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला सोडून दिले. महंमदने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपी महंमदला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या अन्वेषणात महंमद याने हिंदु युवकाच्या नावाने सीमकार्ड खरेदी केल्याचे निष्पन्न झाले.

भांडुप (मुंबई) येथे धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने पावसाळ्यातील आजार आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? या विषयावर मार्गदर्शन

छायाचित्रात उपस्थितांना आरोग्यविषयक
मार्गदर्शन करतांना डॉ. प्राची दळवी
     मुंबई, २७ जुलै (वार्ता.) - भांडुप येथील जैनम बँक्वेट सभागृह येथे १९ जुलै या दिवशी दुपारी ३ ते ४ या वेळेत धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने पावसाळ्यातील आजार आणि पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. धर्मसेवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. प्राची दळवी यांनी उपस्थितांना पावसाळ्यात घ्यावयाचा आहार, आहारातील पथ्ये, वाताचे विकार, त्याविषयी घ्यावयाची काळजी यांविषयी सविस्तर माहिती दिली. या मार्गदर्शनाचा लाभ ७० जणांनी घेतला. 
     डॉ. दळवी यांनी उपस्थितांचे आरोग्यविषयक शंकानिरसन केले. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना डॉ. दळवी म्हणाल्या, धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाचे कार्य समाजपयोगी आहे. या उपक्रमाद्वारे मला समाजसेवेची संधी मिळाली. न्यासाच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील.

फलक प्रसिद्धीकरता

निष्पापांजवळील प्रक्षोभक साहित्याकडे आझमी यांची सोयीस्कर डोळेझाक !
     प्रक्षोभक साहित्य मिळाल्यामुळे अटक करण्यात आलेल्या इसिसच्या संशयित आतंकवाद्यांविषयी समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी म्हणाले, इसिसचे संशयित म्हणून अनेकांचे अटकसत्र चालू आहे. यात निष्पापांवर कारवाई करण्यात येऊ नये !

सबनीस हे स्वत:च्याच प्रेमात पडून बीभत्स आणि हिडीस स्वरूपाची टीका करत आहेत ! - माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे

डॉ. श्रीपाल सबनीस यांना घरचा अहेर !
      पुणे, २६ जुलै - कोणताही अभ्यास न करता बेधडक विधाने करणारे डॉ. श्रीपाल सबनीस हे स्वत:च्याच प्रेमात पडून बीभत्स आणि हिडीस स्वरूपाची टीका करू लागले आहेत. अशा साहित्यिकाला ज्ञानपीठ आणि नोबेल मिळू देत. त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत; पण यापुढे सबनीस यांच्यासमवेत मी व्यासपिठावर बसणार नाही, असे संतसाहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.

सनातन संस्थेचे कार्य कौतुकास्पद ! - प.पू. माधवानंद स्वामी गुरुवामनानंद स्वामी महाराज

महाराजांना माहिती सांगतांना
श्री. गजानन मुंज (डावीकडे)
      पुणे, २६ जुलै (वार्ता.) - सनातन संस्थेचे कार्य अतिशय चांगले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी त्यांचे कार्य पहातो. हिंदु धर्मियांना धर्मशिक्षण देणे, लहान मुलांना सुसंस्कारित करणे असे कार्य सनातन संस्था करत आहे. सनातन संस्थेचे राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य कौतुकास्पद आहे. देवतांचे विडंबन करणार्‍यांना, तसेच हिंदु धर्मावर चिखलफेक करणार्‍यांना संस्था सनदशीर मार्गाने निषेध करून धर्मरक्षणाचे कार्य करत आहे. अशा संस्थेवर बंदी घालू नये. माझा संस्थेच्या कार्याला आशीर्वाद आहे, असे आशीर्वचन चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडचे मठाधिपती प.पू. माधवानंद स्वामी गुरुवामनानंद स्वामी महाराज यांनी व्यक्त केले. सनातनवरील संभाव्य बंदीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजानन मुंज यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.


केरळमध्ये हिंदु तरुणीचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचा आईचा आरोप !

हिंदु मुली धर्माभिमानी असतील, तर त्या कधीही इतर पंथियांच्या वळचळणीला जाणार नाहीत. त्यामुळे 
त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! घरवापसीविषयी आकांडतांडव करणारे हिंदु मुलींच्या 
धर्मांतराविषयी गप्प का ?
     थिरुवनंतपुरम् (केरळ) - कोच्चीमध्ये अ‍ॅरोनॉटिकल इंजिनियरिंगची विद्यार्थीनी असणार्‍या अपर्णा विजयन् या तरुणीला बलपूर्वक मुसलमान बनवण्यात आल्याची तक्रार तिच्या आईने थिरुवनंतपुरम् येथील पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे. 
    अपर्णा तीन वर्षांपासून एर्नाकुलम्च्या जुएल् एज्युकेशनल ट्रस्टमध्ये शिकत आहे. तेथे एका वसतीगृहात रहात असतांना तिचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात येऊन तिचे शहानानाव ठेवण्यात आले, असा आरोप युवतीची आई मिनी विजयन् यांनी तक्रारीत केला आहे. मिनी विजयन् यांनी सांगितले, अपर्णा सध्या इस्लामचा प्रचार-प्रसार करणार्‍या सथ्य सारनी संस्थेजवळ रहाते. तिला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचे तिनेच मला सांगितले. केरळमधील अलीकडेच हिंदु तरुणी निमिषाचे धर्मांतर करून तिला फातिमा करण्याची घटना घडली होती.
अपर्णाचा हिंदु होण्यास नकार !
     तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अपर्णाला कह्यात घेऊन न्यायालयात उपस्थित केले; मात्र पुन्हा हिंदु होण्यास अपर्णाने नकार दिला. मी मैत्रिण सुमय्यासह आले असून तिच्यासोबतच परत जायचे आहे, असे तिने न्यायालयाला सांगितले.

स्टेण्टच्या किमती नियंत्रित ठेवणे होणार शक्य !

हृदयविकारावरील स्टेण्टचा समावेश अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय सूचीत !
      नवी देहली - हृदयविकारावरील उपचारामध्ये वापरण्यात येणार्‍या स्टेण्टचा समावेश अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय सूचीत अंतर्भूत करण्याचा अध्यादेश केंद्रसरकारने काढला आहे. यामुळे स्टेण्टच्या किमती नियंत्रित ठेवणे शक्य होणार आहे. हृदयाच्या वाहिन्या कमकुवत झाल्यावर त्यांच्या उपचारार्थ नळीसदृश स्टेण्ट वाहिन्यांमध्ये बसवण्यात येते. प्रामुख्याने अँजीओप्लास्टीच्या वेळी ते बसवण्यात येते.

जैन मुनी सौरभ सागर यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

राजस्थानमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा !
      जयपूर - अलवर जिल्ह्यातील तिजारा येथे जैन मुनी सौरभ सागर यांच्यावर १८ जुलैला प्राणघातक आक्रमण करण्यात आले. ते रहात असलेल्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता एका चोराने त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यांचे शिष्य येईपर्यंत चोर पळून गेले. मुनी सागर यांचे प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     ISISke sambhavit atankiyoke rupme nirdosh logonko bandi na banaya jaye- MLA Abu Azmi, Samajwadi Party - Nirdoshke pas bhadkau sahitya milnepar Azmi chup !
जागो !
     इस्लामिक स्टेट के संभावित आतंकियों के रूप में निर्दोष लोगों को बंदी न बनाया जाए - अबु आजमी, विधायक, समाजवादी पार्टी - निर्दोष के पास भडकाऊ साहित्य मिलने पर आजमी चुप !

मुंबईतील रस्ते पोकेमॉनला पकडण्यासाठी नाहीत !

पोकेमॉनच्या मागे धावणार्‍या तरुणाईला मुंबई पोलिसांनी सुनावले
       मुंबई - आयुष्य म्हणजे काही गेम नव्हे आणि रस्त्यावर खेळला जाणारा तर तो मुळीच नव्हे. मुंबईतील रस्ते पोकेमॉनला पकडण्यासाठी नाहीत, अशा शब्दांत मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून पोकेमॉनप्रेमींना सुनावले आहे. (पोकेमॉनच्या मागे धावण्याचे दुष्परिणाम तरुण पिढीला न कळणे हा पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाचाच परिपाक म्हणावा लागेल ! - संपादक) एका जीफ इमेजच्या (ग्राफिक इंटरफेस फॉरमॅट म्हणजेच दहा-पंधरा सेंकदांच्या व्हिडीओसारखा हलणारा फोटो) माध्यमातून हे सांगण्यात आले आहे. पोकेमॉनच्या खेळासाठी तरुणांनी स्वतःच्या आणि आजूबाजूच्यांच्या सुरक्षेशी तडजोड करू नये, असेही पोलिसांनी म्हटले आहे. पोकेमॉन गो या खेळाविषयी संदेश देतांना पोलिसांनी Pokemon cant go out on streets, causing distraction हा संदेश दिला आहे.

आरोप झालेल्या मंत्र्यांच्या चौकशीसाठी विरोधक आक्रमक, विधान परिषद दिवसभरासाठी स्थगित !

लक्षावधी रुपये खर्च करून चालवल्या जाणार्‍या अधिवेशनाचे कामकाज गोंधळामुळे 
स्थगित करावे लागणारे लोकप्रतिनिधी जनतेपुढे कुठला आदर्श ठेवत आहेत ?
      मुंबई, २६ जुलै (वार्ता.) - राज्य मंत्रिमंडळातील सर्व आरोपीत मंत्री निष्कलंक असल्याचा दावा शासनाकडून २५ जुलै या दिवशी विधान परिषदेत करण्यात आला; मात्र मंत्रिमंडळातील या सर्व आरोपीत मंत्र्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहाचे कामकाज प्रथम दोन वेळा, तर नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
    मागील आठवड्यात विरोधी पक्षांद्वारे एका प्रस्तावाद्वारे राज्य मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवर विविध स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. या प्रस्तावाला प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर शासनाकडून उत्तर देण्यात आले. या वेळी संबंधित मंत्र्यांनी आपापल्या उत्तरातून सर्व आरोपांचे जोरदार खंडन केले.

परराज्यातील लॉटरीच्या महसूल थकबाकीविषयी शासन गंभीर ! - सुधीर मुनगंटीवार

     मुंबई, २६ जुलै (विशेष प्रतिनिधी) - परराज्यातील ऑनलाईन लॉटरीच्या महसूल थकबाकीविषयी शासन गंभीर असून त्याविषयीच्या उपाययोजना चालू आहेत, असे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी २५ जुलै या दिवशी विधान परिषदेत केले. या संदर्भातील प्रश्‍न आमदार संजय दत्त यांनी तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून उपस्थित केला. त्याला मुनगंटीवार उत्तर देत होते.
     ते पुढे म्हणाले, राज्यातील जुगार, मटका, अवैध व्यापार बंद व्हावेत, या उद्देशाने लॉटरी चालू करण्यात आली. लॉटरीला यावर्षी ४ कोटी ५ लक्ष रुपयांचा लाभ झाला. आपल्या राज्यात परराज्यांच्या ऑनलाईन पद्धतीने चालू असलेल्या सर्व लॉटरी वैध आहेत. केंद्र शासनाच्या या नियमाप्रमाणेच त्या चालू आहेत. या लॉटरी धारकांकडून येणार्‍या महसूल थकबाकी संदर्भात अलीकडेच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाबरोबर बैठक झाली असून विभागाला याचा अन्वेषण करण्यासाठी दोन मासांचा कालावधी देण्यात आला आहे. अन्यथा हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात येईल.मुसलमानांना देशात येण्यास बंदी घालण्याची ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध निवेदिकेची मागणी !

कुठे दुसर्‍या देशात आतंकवादी आक्रमण झाल्यानंतर स्वत:च्या देशाच्या संरक्षणार्थ दूरगामी विचार 
करणारी ऑस्ट्रेलिया, तर कुठे आतापर्यंत अनेकदा आतंकवाद्यांच्या आक्रमणाला बळी पडूनही 
सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना न काढणारा भारत !
     मेलबर्न - फ्रान्समध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियातही मुसलमान प्रवाशांना येण्यास बंदी घातली पाहिजे, असे विधान ऑस्ट्रेलियातील विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणार्‍या प्रसिद्ध निवेदिका सोनिया क्रूगर यांनी केले आहे. 
१. सोनिया क्रूगर यांनी पुढे म्हटले की, आपण मुसलमानांना देशात रहाण्यासाठी जितकी मोकळीक देत आहोत, तितके आपल्यासाठी धोकादायक आहे. ऑस्ट्रेलियात जिहादी विचारसरणीच्या मुसलमानांची संख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी मुसलमानांना देशात येण्यास बंदी घातली पाहिजे. 
२. क्रूगर यांच्या या वक्तव्यांवरून ऑस्ट्रेलियातील स्तंभलेखक आणि स्वतंत्र विचारसरणीच्या पत्रकारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तसेच येथील एका दूरचित्रवाहिनीनेही त्यांचे समर्थन केले आहे. (भारतात असे वक्तव्य कोणी केले असते तर एव्हाना पुरोगाम्यांनी थयथयाट चालू केला असता ! - संपादक)


(म्हणे) दलितांनी हिंदु धर्माचा त्याग करावा ! - डॉ. प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर अन्य धर्मियांना त्यांचा धर्म त्यागण्याचे आवाहन करतील का ? जिहादी 
आतंकवादाने परिसीमा गाठली असतांना मुसलमानांना असे आवाहन ते करतील का ?
      राजकोट (गुजरात) - गुजरातमधील ऊना येथील दलित समाजातील तरुणांना मारहाण केल्याच्या प्रकरणी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या पीडित कुटुंबातील व्यक्तींना भेटल्यानंतर डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दलितांनी त्यांच्याकडील देव-देवतांना मंदिरात दान करून हिंदु धर्माचा त्याग करावा. जातीप्रथा ही मानसिक गुलामगिरी आहे. मानसिक स्वातंत्र्य हेच शारीरिक स्वातत्र्ंय मिळवण्याचा पहिला टप्पा आहे.कर्नाटकमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंग दिलेल्या श्रीगणेशमूर्तींवर बंदी !

कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा स्तुत्य निर्णय ! असा निर्णय देशातील सर्व राज्यांनी घ्यावा !
      बेंगळुरू (कर्नाटक) - कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंग दिलेल्या श्रीगणेशमूर्तींवर बंदी घातली आहे. त्याऐवजी मातीच्या श्रीगणेशमूर्ती बनवल्या जाणार आहेत. कर्नाटकमधील वॉटर अ‍ॅक्ट १९७४नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीच हा निर्णय झाला होता; परंतु त्याची कार्यवाही करता आली नव्हती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रीगणेशमूर्तींची विक्री करणार्‍या व्यापार्‍यांची अनुज्ञप्ती (लायसन्स) रहित केले जाणार आहे. यासाठी पोलिसांचे सहकार्य घेतले जाणार आहे. राज्याबाहेरून येणार्‍या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रीगणेशमूर्तींवरही बंदी घातली जाणार आहे.

समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सरकार कटीबद्ध ! - कायदामंत्री रविशंकर प्रसाद

      नवी देहली - देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी केंद्रशासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत केले. विश्‍वंभर प्रसाद यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला प्रसाद यांनी लिखित स्वरूपात उत्तर दिले.
     राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी म्हटले की, समान नागरी कायदा हा महत्त्वाचा कायदा आहे. त्यामुळे यासंदर्भातील सर्व गोष्टी व्यवस्थित तपासणे आणि सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्यामुळे हा कायदा विधी आयोगाकडे शिफारशींसाठी पाठवण्यात आला आहे. घटनेच्या नीती मार्गदर्शक तत्त्वाच्या कलम ४४ नुसार समान नागरी कायदा लागू करणे सरकारचे कर्तव्य आहे.बांगलादेशात ४ महिला आतंकवाद्यांना अटक !

जिहादी महिलांची समानता ! आता जिहादी पुरुषांप्रमाणे जिहादी 
महिला आतंकवाद्यांपासून सतर्क रहावे लागणार ! 
     ढाका - १ जुलैला येथील होली आर्टिसन बेकरीमध्ये करण्यात आलेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी बांगलादेश पोलिसांनी जमातुल मुजाहिद्दीन बांगलादेश या आतंकवादी संघटनेच्या ४ महिला आतंकवाद्यांना अटक केली आहे. सिराजगंज जिल्ह्यात छापा मारून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी येथून बॉम्बनिर्मिती साहित्य, ६ देशी बॉम्ब आणि जिहादी पुस्तके जप्त केली आहेत. प्रोटोम अलो या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार एका महिलेला आधीच अटक करण्यात आली होती. ती आक्रमणकर्त्यांपैकी एक असावी, असा संशय आहे.

पाकिस्तानशी संबंध ठेवणे अल् कायदा आणि तालिबान यांच्याशी लढण्यापेक्षाही अवघड ! - अफगाणिस्तान

पाकला आतंकवादी राष्ट्र घोषित करून त्याच्यावर संपूर्ण बहिष्कारासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत ! 
    काबुल - पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवणे हे अल् कायदा आणि तालिबान यांच्या विरोधात लढण्यापेक्षाही कठीण आव्हान आहे, अशी टीका अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी पाकवर केली. घनी म्हणाले, स्वत:च्या भूमीवर आतंकवाद सहन करणार नाही, असे पाकिस्तानकडून सांगितले जाते. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी पाकने राष्ट्रीय स्तरावर एक योजनाही आखली आहे; पण अफगाणिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणे करणार्‍या संघटनांवर मात्र पाक काहीच कारवाई करत नाही. या आतंकवाद्यांना पाकमध्ये आश्रय मिळतो, त्यांना इथेच प्रशिक्षणही दिले जाते. पाकमधील क्वेट्टा शहरात रहात असलेल्या तालिबानी आतंकवाद्यांचे पत्तेही मी देऊ शकतो. हक्कानी नेटवर्क, मुल्ला ओमर, मुल्ला मन्सूर या आतंकवाद्यांच्या विरोधात पाकने केलेल्या कारवाईचे एकतरी उदाहरण कुणी देऊ शकेल का ? मन्सूर तर पाकच्या पारपत्रावर इतर देशांमध्ये फिरतो. अफगाणिस्तानने आतंकवादी म्हणून घोषित केलेले अनेक जण इस्लामाबादमध्ये बैठका आयोजित करतात. यामुळे पाकबरोबर संबंध ठेवणे, हेच आमच्यासाठी मोठे आव्हान आहे.

आतंकवाद्यांना जशास तसे उत्तर देऊन अधिकार्‍यांना त्यांच्या तावडीतून सोडवणारा जिगरबाज रशिया !

रशियाकडून शिका !
      लेबेनॉनच्या अंतर्गत युद्धाच्या वेळी म्हणजे ३० सप्टेंबर १९८५ या दिवशी हिजबुल्लाह या आतंकवादी संघटनेने रशियाच्या ४ प्रशासकीय अधिकार्‍यांना बंदी बनवले होते. त्यांची सुटका करण्यासाठी आतंकवाद्यांनी रशियावर दबाव आणला.
      २ दिवसांतच आतंकवाद्यांनी एकाची हत्या केली. त्यानंतर रशियाच्या केजीबी या गुप्तचर संस्थेने हिजबुल्लाहच्या प्रमुखाच्या अतिशय जवळच्या नातेवाईकाला पकडले. त्याचे तुकडे केले आणि ते हिजबुल्लाहच्या प्रमुखाला पाठवून दिले. याशिवाय त्या तुकड्यांवर आम्हाला तुमच्या आप्तस्वकीयांची माहिती आहे. जर तुम्ही आमच्या अधिकार्‍यांना सोडले नाही, तर तुम्हाला तुमच्या सर्व नातेवाइकांचे असे तुकडे मिळतील, अशी गर्भित चेतावणीही लिहून पाठवली. त्यानंतर आतंकवाद्यांनी लगेचच रशियाच्या अधिकार्‍यांना सोडून दिले.

काश्मीरमध्ये वर्ष २००० मध्ये आतंकवाद्यांशी लढतांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या एका नौदल अधिकार्‍याची यशस्वी झुंज !

काश्मीरमध्ये प्राणपणाने लढणारे सैनिक, हेच राष्ट्राचे आशास्थान !
     नौदलातील तरुण अधिकारी कॅप्टन वरूण सिंह ! वर्ष २००० मध्ये श्रीनगरच्या वुलार सरोवरावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सरोवरातून एकाही जिहादी आतंकवाद्याची घुसखोरी होता कामा नये, हे त्यांच्या तुकडीचे कार्य होते. मे २००० मधील घटना. काश्मीरच्या बंदिपोरा जिल्ह्यात एका इमारतीमध्ये ३ आतंकवादी दडून बसले होते. या आतंकवाद्यांना ठार करण्याचे दायित्व सळसळणार्‍या तरूण रक्ताचे वरूण सिंह यांच्या नौदलाच्या तुकडीवर सोपवण्यात आले.
नायजेरियाच्या नागरिकांना त्यांच्या आर्थिक स्थितीची 
माहिती मिळवल्याशिवाय सरकार भारतात येऊ का देते ?
     पर्वरी (गोवा) पोलिसांनी सावळे, पिळर्ण येथे अमली पदार्थ (गांजा) विकणार्‍या नायजेरियाच्या २ नागरिकांना २ लक्ष रुपये किंमतीच्या अमली पदार्थांसह अटक केली.

पोकेमॉन गोला आवरा !

     इंटरनेटवरील खेळांच्या भाऊगर्दीत भारतात येऊ पहात असलेला आणखी एक खेळ म्हणजे पोकेमॉन गो ! त्यासाठी भ्रमणभाषमधील ग्लोबल पोझिशनींग सिस्टीम अर्थात् जीपीएस् यंत्रणा आणि इंटरनेटची जोडणी एवढे असले की झाले. स्वत:चे ठिकाण (लोकेशन) देऊन तेथून पोकेमॉन या काल्पनिक पात्राचा शोध घेत त्याच्या मार्गावर जायचे आणि त्याला कॅप्चर करायचे, असा हा खेळ आहे. इंटरनेटवरील खेळ असल्यामुळे तो तासन्तास आणि कितीही वेळ खेळू शकतो, हे ओघाने आलेच; मात्र त्याहून गंभीर भाग म्हणजे या खेळामुळे रात्री-अपरात्री कधीही घडू शकणारा प्रवास !
भारतात हिंदु धर्मांचे शिक्षण दिले जावे, असे एकाही राजकीय पक्षाला का वाटत नाही ?
     अमेरिकेतील भारतवंशीय तरुण आणि हिंदु-अमेरिकी विद्यार्थी यांना हिंदु धर्माविषयी योग्य माहिती व्हावी, यासाठी कॅलिफोर्नियाचे लेफ्टनंट गव्हर्नर गाविन न्यूसॉम आणि ४० वरिष्ठ शिक्षणतज्ञ यांच्या एका समूहाने तेथील शाळांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदु धर्माचे योग्य आणि यथोचित वर्णन करण्याची मागणी केली आहे.

हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे भव्य आंदोलन

विषय : साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू, श्री. धनंजय देसाई यांची अन्याय्यकारक अटक आणि सनातन संस्थेवरील संभाव्य बंदी यांना विरोध करणे, तसेच विदेशी शक्ती, हिंदुद्रोही माध्यमे आणि तथाकथित पुरोगाम्यांचे या संदर्भातील दबावतंत्र हाणून पाडणे 
दिनांक : २८ जुलै २०१६ 
वेळ : दुपारी २
स्थळ : आझाद मैदान, मुंबई 
संपर्क : ९५५२४ ०२९९९
समस्त हिंदू धर्माभिमानी, संप्रदाय, हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी संघटना आदी सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन हिंदु धर्मावरील होणार्‍या अन्यायाच्या विरोधात संघटित व्हावे !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)      कोणताही ख्रिस्ती असा नाही की, ज्याने बायबल वाचले नसेल. कोणताही मुसलमान असा नाही की, ज्याने कुराण वाचले नसेल आणि एकही हिंदु असा नाही की, ज्याने गीता वाचली असेल ! - चिन्मय मिशनच्या स्वामिनी विमलानंदजी, म्हापसा, गोवा.
     आज पापस्तानादी शत्रू पक्षांनी हिंदुस्थानात घुसवलेल्या पंचस्तंभीय घातपाती आणि भ्रष्टाचारी देशद्रोह्यांच्या प्लेगला नष्ट करण्यासाठी, तसेच पवित्र सिंधु नदीला मुक्त करण्यासाठी अखंड बलसंपन्न हिंदुस्थान निर्मिण्याकरता कृतीशील राहूया ! - प्रज्वलंत, (२२.६.२००२)

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

     आज हिंदु धर्म नष्ट होऊन सर्वत्र भोगसंस्कृती येईल कि काय, ही माझी शंका हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या कार्यामुळे मिटली आहे ! - ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे, डिचोली, गोवा.

गुरूंच्या अखंड कृपेचा वर्षाव झाल्यास साधनेत अशक्य असे काही उरत नाही ! - पू. सिरियाक वाले

एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेस प्रारंभ
दीपप्रज्वलन करतांना एस्.एस्.आर्.एफ्.चे 
संत पू. सिरियाक वाले 
      रामनाथी, २६ जुलै (वार्ता.) - साधनेत आध्यात्मिक प्रगतीचे ध्येय निश्‍चित करावे लागते. ध्येय गाठतांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागतो. त्यासाठी गुरुकृपा संपादन करणे आवश्यक आहे. साधकामध्ये तीव्र तळमळ असल्यास गुरूंच्या अखंड कृपेचा तुमच्यावर वर्षाव होतो. त्यानंतर साधनेत अशक्य असे काही उरत नाही, असे प्रतिपादन एस्.एस्.आर्.एफ्.चे फ्रान्स येथील संत पू. सिरियाक वाले यांनी केले. स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) विदेशातील साधकांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेला सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आजपासून प्रारंभ झाला. त्या वेळी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विदेशातील साधकांना मार्गदर्शन करतांना त्यांनी हे वक्तव्य केले. 
    ही कार्यशाळा १ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या कार्यशाळेत आशिया खंडातील भारत, इंडोनेशिया, नेपाळ, श्रीलंका; उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा, अमेरिका; युरोप खंडातील क्रोएशिया, जर्मनी, हंगेरी आदी १३ देशांतील २५ साधक सहभागी झाले आहेत.

सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या संतांची साधनेतील वाटचाल

      आतापर्यंत आपण ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी प्राप्त केलेले साधक, तसेच सनातनने ओळखलेले समाजातील संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याविषयी समजून घेतले. आज आपण सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या संतांची साधनेतील वाटचाल पहाणार आहोत.
* वाईट शक्तींचे आक्रमण आणि आजारपण यांमुळे या संतांची उन्नती झाली नाही
** यांनी वाईट शक्तींचा तीव्र त्रास असूनही उन्नती केली.
प.पू. डॉक्टरांना एकेका सेवेतून 
मुक्त करणारे सनातनचे संत आणि साधक !
      वर्ष २०१३ च्या गुरुपौर्णिमेपासून साधकांची पातळी किती टक्के आहे, हे मला पहावे लागत नाही. सनातनचे संत, उदा. पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. (कु.) अनुराधा वाडेकर, पू. (कु.) स्वाती खाडये, पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि पू. नंदकुमार जाधव, तसेच कर्नाटकातील ६७ टक्के पातळीचे श्री. रमानंद गौडा यांनी ते पहाण्यास आरंभ केला. अशा तर्‍हेने सक्षम साधक आणि संत तयार करून कृष्ण मला एकेका सेवेतून मुक्त करत आहे. यासाठी मी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
(गुरुपौर्णिमा २०१६ या दिवसापर्यंतच्या काळात जसे होईल, त्याप्रमाणे हे लिखाण १५.७.२०१६ या दिवशी केले आहे.)
सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे 
उच्चलोकांतील बालसाधक, ६० प्रतिशत आणि त्यापेक्षा 
अधिक आध्यात्मिक स्तर असलेले साधक अन् संत यांची संख्या 

प.पू. गुरुदेव अन् प.पू. दास महाराज यांच्या कृपेमुळे अनेक वर्षांपासून होणारे त्रास उणावून सकारात्मक पालट अनुभवणारे श्री. संतोष गरूड आणि त्यांचे कुटुंबीय !

श्री. संतोष गरूड
        संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाकडे मुक्ती, धन किंवा संपत्ती यांपैकी काहीही न मागता केवळ संत संग देई सदा, असे मागणे मागितले होते. ज्ञानेश्‍वर माऊलींनीही संतांचे संगती मनोमार्ग गती, असे म्हटले आहे. या पंक्तींची अनुभूती प.पू. गुरुदेवांनी आम्हाला (गरूड कुटुंबाला) दिली. व्यक्तीचे मन हेच त्याची उन्नती किंवा अधोगती यांचे कारण बनते; म्हणूनच रामदास स्वामींनी मनाच्या श्‍लोकांच्या माध्यमातून मनाला बोध केला आहे. मनाचा विकास होण्यासाठी संतांचा सत्संग महत्त्वाचा असतो. असाच सत्संग प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई (प.पू. दास महाराजांच्या धर्मपत्नी सौ. लक्ष्मी) या संतांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवांनी आम्हाला अचानक उपलब्ध करून दिला. त्यामुळे आमच्या कुटुंबात कसे आमूलाग्र पालट होत गेले, ते या लेखात मांडले आहेत. या लेखाचा पहिला भाग २५ जुलैला प्रसिद्ध झाला आहे.

महाविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवताराविषयी आलेली अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
श्रीविष्णूच्या अवतारांसमवेत प्रत्यक्ष बोलणे-चालणे आदी कृती करण्याची बालपणीची इच्छा श्रीविष्णूने सनातन संस्थेत आणून पूर्ण करणे : २९.२.१९९७ या दिवशी सनातन संस्थेचे साधक आमच्या घरी आल्यावर मला साधनेविषयी कळले. त्यापूर्वी १९९० या वर्षापासून गावातील स्वयंभू देवालयांमध्ये मी आई-वडिलांसमवेत नवरात्री, शिवरात्र, कार्तिकी पौर्णिमा आदी उत्सवांना जात असे. तेव्हा तत्कालीन नारदीय कीर्तनकार पुराणांतील भक्त प्रल्हाद, पांडव-भगवान श्रीकृष्ण आदींच्या जीवनावर आधारित कथा कीर्तनातून सांगत आणि देवाची भक्ती करण्याचे महत्त्व पटवून देत. तेव्हा माझ्या मनात विचार येत असत, आपणही मंदिरामध्ये रात्रभर देवाचा नामजप आदी साधना केल्यास देवदर्शन देईल. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण किंवा श्रीराम यांच्या काळातील अनुक्रमे पांडव, सुग्रीव, भरत आदी भक्त किती भाग्यवान होते ! त्यांना श्रीविष्णूच्या अवतारांसमवेत प्रत्यक्ष बोलणे-चालणे आदी कृती करायला मिळाल्या. आपल्याला असे भाग्य मिळाले, तर किती आनंदाची गोष्ट असेल !

तांदळाचा भात बनवतांना संस्कार महत्त्वाचा !

अन्नावरचा भारतीय संस्कार
वैद्य सुविनय दामले
      कुकरमधे भात बनवला, तर त्यात चिकटपणा तयार होतो. पाणी भातात मुरते. जिथे पाणी मुरते तिथे गडबड असतेच ना ! तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरमधे २५० सेंटीग्रेडला १५ ते २० मिनिट शिजवला, तर त्यातील जीवनसत्वे जीवंत रहातील ? एका बाजूने गॅस वाचेल, त्यापेक्षा अधिक रक्कम डॉक्टरांना कायमस्वरूपी द्यावी लागते ! अग्निसंस्कार चुकीचा झाला ना ! कसा ?
    आपली भात करण्याची पारंपरिक पद्धत काय आहे ? त्यातील तापमान अभ्यासूया. प्रथम तांदळाच्या १६ पट पाणी १०० सेंटीग्रेडला उकळवून घ्यावे. आधीच रोवळीमध्ये धुवून घेतलेले तांदुळ त्यात ओतावे. उकळत्या पाण्यात ८ ते १० मिनिटे तांदुळ शिजवावा. त्यानंतर एक शीत काढून तो आतपर्यंत शिजला आहे, हे पाहून अधिकचे पाणी काढण्यासाठी हा भात चाळणीवर ओतावा. शिजलेले पाणी, म्हणजचे पेज काढून टाकावी आणि भात पुन्हा पातेल्यात ओतून केवळ ५० ते ६० सेंटीग्रेडला १० मिनिटे झाकण टाकून ठेवावा. भात मस्त फुलतो. वेगळी केलेली पेज प्यायची हं. पोषक अंश (आजच्या भाषेत, कार्बोहायड्रेटस्) त्याच्यातच आहेत ना ! आता या पद्धतीच्या भातात, भात आणि पेज मिळून सगळी जीवनसत्वे शाबूत असतील ना ! अग्निचा संस्कार यथायोग्य झाल्याने आणि पाणी काढून टाकल्याने भात पचायला हलका आणि पेजही पचायला हलकी.

धर्माचरणाअभावी सात्त्विकता अत्यल्प झालेल्या समाजाचे प्रबोधन करतांना अनेक शब्दांचा वापर करावा लागणे आणि अखिल मानवजातीच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी धर्माधिष्ठित जीवनव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करणे अनिवार्य असणे


सौ. कमलिनी कुंडले
      १९.५.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमधील देवी, कृतज्ञते परत ये मज दर्शन देण्याला ही काव्यमय प्रार्थना वाचली आणि एका साधकांनाही वाचायला सांगितली. तेव्हा त्यांनी काही समजले नसल्याचे सांगितले. तेव्हा मला त्यांना केवळ ६ ओळींच्या प्रार्थनेचा भावार्थ सांगत असतांना कितीतरी शब्द वापरावे लागले. त्यावरून मला पुढील विचार सुचले.
१. भगवद्गीतेतील श्‍लोकांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी त्या 
नंतरच्या काळातील संतांना त्यापेक्षा अधिक श्‍लोक लिहावे लागणे 
     भगवद्गीतेतील श्‍लोकांचा अर्थ सांगण्यासाठी श्रीज्ञानेश्‍वरमाऊलींना त्यापेक्षा अधिक श्‍लोक असलेली भावार्थदीपिका, म्हणजे श्रीज्ञानेश्‍वरी लिहावी लागली. त्यांच्या पुढच्या पिढ्यांना तीही आकलन होईना; म्हणून संत सोनोपंत दांडेकर किंवा संत साखरे महाराज आदींना गीतेचे आजच्या मराठी भाषेत विवेचन करावे लागले. त्या ग्रंथातही मूळ श्रीज्ञानेश्‍वरी या ग्रंथापेक्षा कितीतरी अधिक शब्दांचा वापर करावा लागला.

लहान वयातही स्वभावदोष निर्मूलनासाठी तळमळीने प्रयत्न करणारा चि. मुकुल प्रभु (वय ५ वर्षे) !

चि. मुकुल प्रभु
      चि. मुकुल प्रभु याचा आषाढ कृष्ण पक्ष अष्टमी (२७.७.२०१६) या दिवशी पाचवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि नातेवाईक यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
चि. मुकुल प्रभु याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. प्रेमभाव
अ. मुकुल त्याची खेळणी अन्य बालसाधकांना देतो. - सौ. माधवी घाटे (मुकुलची आजी)
आ. मुकुल आजीला (सौ. माधवी घाटे यांना) काही त्रास होत असल्यास तिला लगेच आजी, तुला काय झाले ?, तुला औषध आणून देऊ का ?, मलम देऊ का ?, असे विचारतो. मुकुल आजीचे डोके दुखत असल्यास तिला कापूर लावून डोके चेपूनही देतो.
- कु. मानसी प्रभु (मुकुलची बहीण)

पंचम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात सेवा करतांना साधिकेने अनुभवलेले आनंददायी क्षण !

सौ. विमल चौधरी
१. अधिवेशनस्थळी प्रवेशद्वारावर श्री हनुमंतराय संजीवनी घेऊन बसले आहेत आणि आत येणार्‍या प्रत्येक साधकाला शक्ती देत आहेत, असे जाणवणे 
     मला नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात प्रसारसेवा करण्याची संधी मिळाली. प्रसारसेवा झाल्यावर आम्ही अधिवेशनस्थळी रामनाथ देवस्थान येथे आलो. त्या वेळी प्रवेशद्वारावर श्री हनुमंतराय संजीवनी घेऊन बसले आहेत आणि आत येणार्‍या प्रत्येक साधकाला ते शक्ती देत आहेत, असे मला जाणवत होते. मी हनुमंतरायाला प्रार्थना केली, तुम्ही जशी प्रभु श्रीरामाची दास्यभक्ती केली, तशी आम्हा सर्व साधकांकडून प.पू. गुरुमाऊलींची निःस्वार्थ दास्यभक्ती करवून घ्या.

गुरुदेव, होऊ कशी उतराई । कशी येऊ मी तुमच्या चरणी ।

       प.पू. दास महाराज आणि पू. माई घरी येऊन गेल्यानंतर मला पुढील कविता सुचली.
गुरुदेव किती ऋणी मी तुमची ।
उणी आहे साधना माझी ॥
होऊ कशी मी उतराई ।
कशी येऊ मी तुमच्या चरणी ॥ १ ॥
तुम्ही करवून घेतली साधना ।
शिकविले अध्यात्म आम्हा ॥
साधनेत चुका होतात । मन रमते भ्रामक कल्पनांत ॥ २ ॥
अहंकार अन् दोष यांचे निर्मूलन करण्या ।
दिली तुम्ही आम्हा प्रेरणा ॥
भावाने अहंचे निर्मूलन करण्या ।
शिकवलेत तुम्ही आम्हा ॥ ३ ॥

कोटी कोटी कृतज्ञता ! भाव सुमने गुरुचरणी आर्पितो ।

श्री. द.र. पटवर्धन
गुर्वाज्ञा (टीप १) म्हणूनी केली सनातन संस्थेची स्थापना ।
समाजामध्ये रुजवली गुरुकृपायोग साधना ॥ १ ॥
साधक-संत निर्मिले घोर अशा या कलियुगात ।
सहा दशकापेक्षा अधिक संत अन् सहस्रावधी साधक त्यात ॥ २ ॥
ईश्‍वरी राज्याचा (टीप २) संकल्प केला शिवधनुष्य जे आहे खरोखर ।
कलियुगांतर्गत सत्ययुग ते साकारणारे गुरु परात्पर ॥ ३ ॥
सुमारे ४० वर्षांपूर्वी पाहिले होते, घोषवाक्य रस्ता-भिंतीवर ।
सत्ययुग येणार, असे होते ते जे अनाकलनीय वाटे फार ॥ ४ ॥
कोण कधी ते लिहीत होते, कळले नाही अखेरपर्यंत ।
परंतु त्याचे रहस्य प्रचीती आहे हिंदु राष्ट्र निर्मितीत ॥ ५ ॥
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
राजकारणी पुढील निवडणुकीत जिंकण्यासाठी काय करायचे ?, याचा सतत विचार करतात, तर साधक रामराज्य, हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) कसे आणायचे, याचा सतत विचार करतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने त्यांना 
सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

देशाला इसिसचा वाढता विळखा !

संपादकीय
     भारतात इसिसचा प्रभाव वाढत नाही, असे कितीही कुणी छातीठोकपणे सांगत असले, तरी गेल्या काही मासांतील घटनांचा अभ्यास केल्यास इसिसने हळूहळू देशातील सर्व राज्यांत हात-पाय पसरण्यास प्रारंभ केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. जुलै मासात महाराष्ट्र, गुजरात, भाग्यनगर आणि कर्नाटक येथून इसिसशी संबंधित ८ धर्मांधांना कह्यात घेण्यात आले आहे, तर केरळ राज्यातून इसिसच्या संपर्कात असलेले २१ लोक बेपत्ता झाले आहेत. देशात सर्वत्र स्लिपर सेल बनवण्यात इसिस मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. आतापर्यंत केवळ युवकच यात सहभागी होत आहेत, असा समज होता; मात्र आता यात महिला आणि मुलेही सहभागी होत आहेत. देशाच्या सुरक्षिततेशी अत्यंत गंभीर असलेल्या या गोष्टी केंद्रशासनाने तितक्याच गांभीर्याने घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. असे न केल्यास उद्या भारतातही फ्रान्स, अफगाणिस्तान यांच्याप्रमाणे जिहादी कारवायांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn