Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

भृगुविशाळऋषि जयंती

शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण सक्तीचे करणार ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

साधना, नैतिकता आणि आचारधर्म बालपणापासून शिकवल्यास
मुलांमधील सात्त्विकता वाढेल आणि वाईट कृत्ये करण्याचे विचार त्यांच्या मनात येणार नाहीत !
 
    कोपर्डी (जिल्हा नगर) - कोपर्डीची घटना सरकारने गांभीर्याने घेतली असून, राज्यातील शाळांमध्ये यापुढे मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आणि मुलांना संस्काराचे धडे सक्तीचे करण्याचा विचार आहे. अत्याचार आणि खून ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आरोपींना फाशी होईपर्यंत मी स्वत: पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ जुलैला येथे दिली.
कोपर्डी येथे बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या मुलीच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्या वेळी ते गावकर्‍यांशीही बोललेे. त्यांच्या या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळूनही मोठा जनसमुदाय येथे उपस्थित होता. या वेळी पीडितेच्या आईने माझी छकुली गेली, आता दुसर्‍या तरी वाचवा, अशी आर्त साद घातली. त्यावर श्री. फडणवीस म्हणाले, महिन्याच्या आत आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर होईल.

बलात्कार्‍यांचे हात-पाय तोडा ! - राज ठाकरे

   नगर, २५ जुलै - कोपर्डीसारख्या घटना रोखण्यासाठी सीरिया देशात जसे कडक कायदे आहेत, तसे कायदे आपल्याकडे करण्याची आवश्यकता आहे. पीडितांना शस्त्र अनुज्ञप्ती (परवाने) दिल्यामुळे प्रश्‍न सुटणार नाही. त्यासाठी राज्यात कायद्याचा धाक असला पाहिजे. निष्पाप आणि चिमुरड्या मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्यात शरीयासारखे कडक कायदे करायला हवेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख श्री. राज ठाकरे यांनी केले. (केवळ कायदे करून काय उपयोग ? त्यांच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता आहे; मात्र भारतात दुर्दैवाने ती होतांना दिसत नाही. कायद्यांच्या प्रभावी वापरासाठी भाजप शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे ! - संपादक) राज ठाकरे यांनी २५ जुलै या दिवशी कोपर्डी गावामध्ये जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर ते बोलत होते.

समर्पित भावाने समष्टी साधना करून विहंगम गतीने प्रगती करणार्‍या सनातनच्या संत पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ सद्गुरुपदी विराजमान !

सापडलो एकामेका, जन्मोजन्मी नोहे सुटका या भजनपंक्तीप्रमाणे
एकमेकींना पूरक कार्य करणार्‍या अन् आध्यात्मिक मैत्रिणी
असलेल्या संतद्वयींनी केला एकमेकांचा सन्मान !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना पू. (सौ.) अंजली गाडगीळ

पू. (सौ.) अंजली गाडगीळ (डावीकडे) यांचा सन्मान करतांना पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ

काश्मीर येथे धर्मांधांनी लावलेले काळे झेंडे सैन्याने काढले !

     श्रीनगर - बुरहान वानी या जिहादी आतंकवाद्याला ठार केल्याच्या निषेधार्थ धर्मांधांनी काश्मीर येथे लावलेले काळे झेंडे, तसेच पाकचे झेंडे भारतीय सुरक्षा दलांनी २० जुलै या दिवशी काढले. (झेंडेे हटवण्यात सैन्य बळ फुकट घालवण्यापेक्षा झेंडे लावणार्‍यांवर वचक बसवण्यासाठी हे बळ वापरणे आवश्यक ! - संपादक) बुरहान वानी मारला गेल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी १९ जुलैला काळा दिवस पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काश्मीर येथे काळे झेंडे लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.नालंदा येथे अनवारुल हक याने पाकचा झेंडा फडकवला, राष्ट्रप्रेमींमध्ये असंतोष !

यावरून देशविरोधी कारवाया कोण करते, हे लक्षात येते !
     बिहार - नालंदा येथील बिहारशरीफ नगरातील जामा मशिदीजवळील एका घराच्या छतावर २० जुलै या दिवशी पाकचा झेंडा फडकवल्याची घटना घडली. यानंतर राष्ट्रप्रेमींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. २१ जुलै या दिवशी पोलिसांनी छतावरून हा झेंडा उतरवला, तसेच घरमालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला. या घटनेनंतर अनवारुल हक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
काश्मीरमध्ये फडकणार्‍या पाकच्या झेंड्याविषयी भाजप गप्प ! - लालूप्रसाद यादव
     या घटनेविषयी लालूप्रसाद यादव म्हणाले की, काश्मीरमध्ये प्रतिदिन पाकचे झेंडे फडकवले जातात; मात्र त्यांच्याविरोधात कारवाई होत नाही. तेथे भाजपचे आणि केंद्रातही भाजपचे सरकार आहे. तरीही ते गप्प आहेत. (काश्मीरमध्ये फडकणार्‍या पाकच्या झेंड्यांविषयी भाजप काही करत नाही म्हणून स्वत:च्या राज्यात पाकचे झेंडे फडकवले तरी चालतील, ही वृत्ती राष्ट्रघातकीच नव्हे का ? - संपादक)

काश्मिरी हिंदूंच्या हक्कासाठी कर्नूल (आंध्रप्रदेश) येथे हिंदूसंघटनाचा आविष्कार !

काश्मिरी हिंदूंचे आठवे विस्थापन आणि संपूर्ण भारताच्या
इस्लामीकरणाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा उद्घोष ! 
सभेला संबोधित करतांना १. श्री. प्रमोद मुतालिक, सोबत
२. श्री. रमेश शिंदे, ३. टी.एन्. मुरारी आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ नेते
सनातनचा इंग्रजी भाषेतील ‘करेक्ट मेथड ऑफ कुकिंग अ मील’ (अन्न बनवण्याची योग्य पद्धत) या ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून शिवसेनेचे कर्नूल जिल्हा सरचिटणीस श्री. लक्ष्मीनारायण शर्मा, शिवसेनेचे श्री. अर्जुन यादव, श्री. रमेश शिंदे (हिंदु जनजागृती समिती) , श्री. राहुल कौल (यूथ फॉर पनून कश्मीर), श्री. टी.एन्. मुरारी (शिवसेना), श्री. प्रमोद मुतालिक (श्रीराम सेना), शिवसेना इंदूरचे जिल्हाध्यक्ष श्री. पी. गोपी, शिवसेनेचे कर्नूल जिल्हाध्यक्ष श्री. प्रताप रेड्डी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन

    कर्नूल (आंध्रप्रदेश) - भारतभरात उभारण्यात आलेल्या सहस्रो मशिदींना अनधिकृतरित्या पैसा पुरवला जातो. त्यासाठी शेकडो मंदिरांना पाडण्यात येते. अशा मशिदी आणि मदरसे यांच्या माध्यमातून धर्मांध मुसलमान संघटनांचे कार्य फोफावत चालले आहे. परिणामी समाजात कट्टरतावाद आणि जिहादी मानसिकता यांचा तीव्र गतीने प्रसार होत आहे. काश्मीरमधील हिंसाचार, अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि हिंदूंचा होत असलेला वंशविच्छेद हा या सगळ्याचा परिपाक आहे, असे कणखर प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. पनून कश्मीरसह भारतभरातील १६० हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी एक भारत अभियान - कश्मीर की ओर नावाची मोहीम चालू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कर्नूल येथे २४ जुलै या दिवशी एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्री. प्रमोद मुतालिक प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या राष्ट्रव्यापी मोहिमेच्या अंतर्गत ही चौथी सभा होती.

(म्हणे) भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील ! - चीनची धमकी

३ चिनी पत्रकारांच्या व्हिसाच्या मुदतवाढीला नकार दिल्याने चीन संतप्त
घुसखोरी करणार्‍या चीनला भारताने कधी अशी धमकी दिल्याचे ऐकिवात आहे का ?
    बीजिंग - भारतातील चीनच्या ३ पत्रकारांच्या व्हिसाच्या मुदतवाढीला नकार दिल्यावरून चीन संतप्त झाला आहे. चीनचे सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीय लेखात म्हटले आहे की, अणू पुरवठादार देशांच्या गटातील भारताच्या समावेशाला चीनने विरोध केल्यामुळे भारताने हे पाऊल उचलले असेल, तर भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
    भारताच्या या शूद्र कृतीचा भारत-चीन संबंधांवर विपरीत परिणाम होईल. भारताच्या या कृतीला आपणही प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. चिनी व्हिसा मिळवणे, ही सोपी गोष्ट नाही, याची जाणीव काही भारतियांना झाली पाहिजे, अशी धमकीही या लेखातून देण्यात आली आहे.

आतंकवादविरोधी पथकाच्या पत्रानंतरही जायकवाडी धरणाच्या सुरक्षेसाठी उपाय योजले नाहीत !

गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या निष्काळजीपणाचा कळस !
   पैठण, २५ जुलै - आतंकवाद्यांच्या यादीत घातपात करण्याच्या दृष्टीने येथील जायकवाडी धरणाचा समावेश आहे. त्यामुळे संभाजीनगर येथील आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख जी. श्रीधर यांनी विविध सूचना संकलित करून त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश पत्र २ वेळा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळास दिले होते; परंतु ६ मास उलटूनही महामंडळाने यंत्रणा उभारण्यासाठी मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत सुरक्षेची पावले उचललेली नाहीत. (आतंकवादविरोधी पथकाच्या पत्राला केराची टोपली दाखवणारे महामंडळ प्रशासन ! अशा अकार्यक्षम आणि गांभीर्यशून्य महामंडळ प्रशासनावर राज्य शासनाने तात्काळ कारवाई करून सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात ! - संपादक)

सैराटचा आदर्श न घेता शिक्षणासाठी सैराट व्हा ! - विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

उशिरा जागे झालेले लोकप्रतिनिधी !
   पुणे, २५ जुलै - विद्यार्थ्यांनी सैराट चित्रपटाचा आदर्श न घेता हात गमवूनही पायाने पेपर लिहून उत्तीर्ण झालेल्या आणि परीक्षेच्या काळात रक्ताच्या कर्करोगाशी लढत असतांनाही ८१ टक्के गुण मिळवणार्‍या २ विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यायला हवा. विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी सैराट व्हायला हवे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. (केवळ अशी विधाने करण्यापेक्षा सैराटसारखे चित्रपट येऊ नयेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत ! - संपादक) राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार अनिल भोसले यांनी आयोजित केलेल्या कर्तृत्व प्रेरणा पुरस्कार सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते.

सनातन संस्थेला पाठिंबा आहेच ! - आमदार गौतम चाबुकस्वार

आमदार चाबुकस्वार (मध्यभागी) यांना निवेदन देतांना
उजवीकडे श्री. पराग गोखले आणि डावीकडे श्री. नागेश जोशी
   पिंपरी, २५ जुलै (वार्ता.) - शिवसेनेने सनातन संस्थेला उघड पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमचा तुम्हाला पाठिंबा आहेच. सनातन बंदीच्या संदर्भातील विषयाच्या संदर्भात मी तुम्ही दिलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून विषय मांडीन. त्यामुळे कधीही साहाय्य लागले, तरी सांगा; मी अवश्य साहाय्याला येईन, असे आश्‍वासक मत आमदार गौतम चाबुकस्वार यांनी व्यक्त केले. पुरोगाम्यांच्या दबावामुळे सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि श्री. नागेश जोशी यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

ईश्‍वरी अधिष्ठान आणि गुरूंच्या आशीर्वादाने धर्मरक्षणासाठी कृतीशील होण्याचा धर्माभिमानी हिंदूंचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवंडी आणि खारघर (नवी मुंबई) येथे हिंदूसंघटन मेळावे !
श्री कैलाश जाधव
     मुंबई - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवंडी (प.) येथील गणेश मैदान सभागृह, देवनार म्युनिसिपल कॉलनी येथे आणि खारघर (नवी मुंबई) येथील सेक्टर १२ मधील श्री सिद्धी विवाह सभागृहात हिंदूसंघटन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे २०० आणि २६० हिंदूंची उपस्थिती लाभली. ईश्‍वरी अधिष्ठान आणि गुरूंच्या आशीर्वादाने नियमित साधना करून धर्मरक्षणासाठी कृतीशील होण्याचा निर्धार या वेळी उपस्थित धर्माभिमानी हिंदूंनी केला.
    विविध हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय, सार्वजनिक मंडळे आणि धर्माभिमानी हिंदु बांधवांचा मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी हिंदुत्वनिष्ठ अतिथींनी राष्ट्र आणि धर्म, तर हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांनी सामाजिक दुष्प्रवृत्तींचा संघटित प्रतिकार आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य, तसेच हिंदु जनजागृती समिती प्रणीत रणरागिणी शाखेच्या प्रतिनिधींनी स्वरक्षा ही काळाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले.

सैराट चित्रपट काढून चूक झाली का ? - दिग्दर्शक नागराज मंजुळे

    पुणे, २५ जुलै - सैराट चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. त्याला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या अत्याचाराच्या घटना जणू सैराटमुळेच घडत आहेत, असा शोध काही लोक लावत आहेत. (यात चुकीचे काय ? समाजातील नागरिक चित्रपटाविषयी मांडत असलेले वास्तव नागराज मंजुळे स्वीकारतील तो सुदिनच म्हणावा लागेल ! - संपादक) ही दुर्दैवाची गोष्ट असून मला त्याच्या माध्यमातून जे मांडायचे आहे ते न बघता चित्रपटाच्या बाकीच्या गोष्टींवर चर्चा केली जाते. यामुळे सैराट काढून चूक झाली का, असा प्रश्‍न दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उपस्थित केला.

पुणे महानगरपालिकेतील १५२ पैकी ६१ नगरसेवकांवर गुन्हे प्रविष्ट

  पुणे, २५ जुलै - पुणे महानगरपालिकेच्या वर्ष २०१२ मधील निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांच्या गेल्या ४ वर्षांतील कामगिरीच्या प्रसिद्ध झालेल्या लेखाजोखानुसार विविध पक्षांच्या १५२ पैकी ६१ नगरसेवकांवर गुन्हे प्रविष्ट आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १५ नगरसेवकांवर सर्वाधिक गुन्हे प्रविष्ट आहेत. (गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या नगरसेवकांपेक्षा स्वच्छ, पारदर्शी आणि राष्ट्राभिमानी नगरसेवक मिळण्यासाठी येत्या निवडणुकीत प्रयत्न करा ! - संपादक) ८४ नगरसेवकांनी मुख्य सभेसाठी एकही लेखी प्रश्‍न विचारलेला नाही. (याचा अर्थ रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाणी, घनकचरा या समस्या संपल्या का ? - संपादक)

इसिसची सोलापूरमधील पाळेमुळे शोधण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाची शोधमोहीम

अशा शोधमोहिमा राबवण्यापेक्षा राज्यातील संशयित ठिकाणी कोम्बिंग 
ऑपरेशन करून आतंकवाद्यांची पाळेमुळे नष्ट करा !
    सोलापूर, २५ जुलै - सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील मराठवाडा, आंध्रप्रदेशमधील भाग्यनगर आणि तेलंगणा राज्यांत इसिसचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात इसिसची पाळेमुळे रुजली आहेत का, याची शोधमोहीम आतंकवादविरोधी पथकाकडून घेण्यात आली आहे. पथकाच्या या कारवाईविषयी सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालयात आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी वरिष्ठांसमवेत घेतली.

जोधपूर येथे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे दर्शन करून भक्तांनी साजरी केली गुरुपौर्णिमा !

  • राजस्थान सरकारच्या पोलिसांची मोगलाई !
  • भक्तांवर लाठीमार करून त्यांना न्यायालय परिसरातून दूर नेऊन सोडले ! 
     जोधपूर - २३ जुलैला येथील न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे दर्शन घेऊन त्यांच्या सहस्रो भक्तांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. या वेळी पू. बापूजी यांनी भक्तांना आशीर्वाद दिले. पू. बापूजी यांच्या दर्शनासाठी देशभरातून आलेले भक्त न्यायालयाच्या परिसरात दर्शनासाठी उभे असतांना पोलिसांनी त्यांना लाठीमार करून पिटाळून लावले, तसेच त्यांना गाडीत बसवून या परिसरापासून काही किलोमीटर दूर जेथून येण्यासाठी वाहन मिळणे अवघड असते अशा ठिकाणी नेऊन सोडले.

फलक प्रसिद्धीकरता

स्वसंरक्षण प्रशिक्षणासह मुलींना धर्मशिक्षणही द्या !
    महाराष्ट्रातील शाळांमध्ये यापुढे मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आणि मुलांना संस्काराचे धडे सक्तीचे करण्याचा विचार आहे, असे आश्‍वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी येथे बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबाला भेट दिली असता दिले.

सनातन संस्थेच्या शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांना भेटीद्वारे निवेदने

आदिवासी विकासमंत्री श्री. विष्णू सावरा (डावीकडे) यांना निवेदन
देतांना सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि अन्य
निवेदन स्वीकारतांना पशूसंवर्धन आणि दुग्धविकास
राज्यमंत्री श्री. अर्जुन खोतकर (उजवीकडे)

बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या पुस्तकातून अफझलखान गळाभेटीचे चित्र वगळण्याची शेकापचे आमदार जयंत पाटील यांची आग्रही मागणी !

विधान परिषद सभापतींनी बालभारतीच्या विषयावर चर्चा करण्याची अनुमती नाकारली !
     मुंबई, २५ जुलै (विशेष प्रतिनिधी) - बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या मराठी आणि इंग्रजीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केल्याचे चित्र दाखवण्याऐवजी त्यांच्या गळाभेटीचे चित्र दाखवून इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी आणि चुकीचे चित्र वगळण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेत २५ जुलै या दिवशी शेकापचे आमदार श्री. जयंत पाटील यांनी केली; मात्र नियम २८९ अन्वये या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची अनुमती सभापती रामराजे निंबाळकर यांनी नाकारली. त्यामुळे या विषयावर विरोधी सदस्यांना चर्चा करता आली नाही.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Maharashtra ke pathshalao me ladkion ke liye swaraksha prashikshan anivarya karne ka ka vichar hai - Devendra Fadanvis
kya yah vichar kendrasarkar bhi karegi ?
जागो !
महाराष्ट्र के पाठशालाआ में लडकिआ के लिए स्वरक्षा प्रशिक्षण अनिवार्य करने का विचार - देवेंद्र फडणवीस
क्या यह विचार केंद्रशासन भी करेंगी ?

न्यायालयाच्या आवारात आरोपींवर संतप्त महिलांकडून आक्रमण !

कोपर्डी हत्याकांडातील आरोपींच्या विरोधात वाढता जनक्षोभ !
     नगर, २५ जुलै - येथील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारे आरोपी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आल्याने २५ जुलै या दिवशी त्यांना जिल्हा न्यायालयात आणले होते. त्या वेळी काही महिलांनी आरोपींना न्यायालयाच्या आवारात चपलांचा चोप दिला. (महिलांवरील अत्याचाराच्या घटना न थांबल्यास हा प्रक्षोभ क्रांतीची दिशा पकडेल, हे निश्‍चित ! - संपादक)

लो. टिळकांनी दिलेल्या स्वराज्याचे आपल्याला सुराज्य घडवायचे आहे ! - मुख्यमंत्री

कार्यक्रम चालू असतांना आंबेडकर भवन पाडल्याच्या संदर्भात एका तरुणाने केला निषेध
      पुणे, २५ जुलै (वार्ता.) - लोकमान्य टिळकांनी आपल्याला स्वराज्य दिले आणि आता आपल्याला सुराज्य घडवायचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकमान्य टिळकांची १६० वी जयंती आणि स्वराज्याच्या सिंहगर्जनेचे शताब्दी वर्ष याचे औचित्त्य साधून लोकमान्य टिळक मंच आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ३ पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २३ जुलै या दिवशी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रम चालू असतांना एका तरुणाने बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा देत पत्रके व्यासपीठावर टाकली आणि दादर येथील आंबेडकर भवन पाडल्याच्या वादासंदर्भात निषेध व्यक्त केला. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. (याला पोलिसांची सुरक्षाव्यवस्था म्हणायचे का ? - संपादक)

एस्.एस्.आर्.एफ्.च्या विदेशातील साधकांच्या कार्यशाळेला आजपासून प्रारंभ !

     रामनाथी - स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) विदेशातील साधकांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेला २६ जुलैपासून आरंभ होत आहे. ही कार्यशाळा सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आयोजित करण्यात आली असून १ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या कार्यशाळेत आशिया खंडातील भारत, इंडोनेशिया, नेपाळ, श्रीलंका; उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा, अमेरिका; युरोप खंडातील क्रोएशिया, जर्मनी, हंगेरी आदी १३ देशांतील २५ साधक सहभागी होणार आहेत. 
     समष्टी साधना कशी करावी, हे या कार्यशाळेत प्रामुख्याने शिकवण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्याची साधना कशी करावी, स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांच्याविषयी चिंतन करून ते कसे घालवावेत, अध्यात्मप्रसार कसा करावा, यांविषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

संघटनेसाठी धन मिळवण्यासाठीचे प्रयत्न, तसेच त्यासंदर्भात घ्यायची दक्षता

श्री. रमेश शिंदे
     कोणतीही संघटना दीर्घकाळ चालवण्यासाठी, तिच्या विस्तारासाठी, तसेच कार्यवृद्धीसाठी धन अत्यंत महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही हिंदवी स्वराज्यासाठी निधीचे नियोजन करावे लागले होते. त्यामुळे आपल्याला जर हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवायचे असेल, तर आपण या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल ? यासाठीच आज आपण संघटनेसाठी निधीसंकलन कसे करावे, हा विषय पाहूया.
१. विषयाचे महत्त्व
     हिंदूसंघटनाच्या कार्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या संघटना, त्यांचे प्रमुख आणि कार्यकर्ते यांची भेट झाल्यानंतर लक्षात येते की, काही संघटनांकडे चांगले कार्यकर्ते असतात, तसेच त्यांना समाजातूनही चांगला प्रतिसाद असतो; मात्र पुरेशा निधीच्या अभावी त्यांना कार्य वाढवता येत नाही. त्याचप्रमाणे काही संघटनांकडे निधी असला, तरी त्यांना त्याचा विनियोग चांगल्या प्रकारे करण्याची माहिती नसल्याने त्याचा अपव्यय होत असतो. काही ठिकाणी संघटनेच्या निधीच्या वापरावरून कार्यकर्त्यांत संघर्ष झाल्याने संघटनाच फुटून संपण्याच्या स्थितीत येते. या सर्व दृष्टीने या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार सर्वांनी प्रयत्न करावेत.

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी होणे, हा अविस्मरणीय अनुभव !

श्री. पसु शेषाद्री राघवन्
      मला हिंदु जनजागृती समितीने गोवा येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी होण्याची संधी मिळाली. हिंदु मक्कल कच्छीचे श्री. अर्जुन संपथ यांच्यासह आम्ही १२ जण होतो. यात आमच्या समवेत भारतभरातील आणि भारताबाहेरील नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी राष्ट्रांतून २०० संघटनांचे ४५० हून अधिक प्रमुख प्रतिनिधी आले होते. ११.६.२०१५ या दिवशी सकाळी ९.३० वाजता अधिवेशनाचा आरंभ होऊन १७.६.२०१५ या दिवशी अधिवेशनाची सांगता झाली. प्रतिदिन सकाळी ९.३० ते रात्री ९.३० पर्यंत अविरतपणे कार्यक्रम चालू होते. विविध प्रतिनिधींकडून त्यांच्या कार्याच्या यशोगाथा ऐकणे, हा सर्वांसाठी एक विलक्षण अनुभव होता.

उमर खालिदचे बुरहान वानीला समर्थन !

     जेएन्यूतील वादामुळे प्रकाशात आलेल्या उमर खालिदने फेसबूकवर हिजबुल मुजाहिद्दीनचा आतंकवादी बुरहान वानीच्या समर्थनार्थ पोस्ट करून जेएन्यूत त्याचा रिसर्च(शोध) नक्की कशावर चालू आहे, हे दाखवून दिले आहे ! अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा अपवापर नव्हे का ? या विद्यापिठात घडणार्‍या या विद्यार्थ्यांचा देशाला जराही उपयोग नाही, असे कुणाला वाटल्यास नवल काय ? ज्या आतंकवाद्याने काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करून उच्छाद मांडला होता आणि ज्याचावर १० लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते, अशा आतंकवाद्याचे समर्थन करणारी पोस्ट करणार्‍या खालिदवर कायदेशीर कारवाई का केली नाही ? त्याच्यावर कारवाई केली तर देशातील विद्यार्थ्यांचे वातावरण पुन्हा चिघळेल, अशी भीती केंद्रसरकारला वाटते का ? यासाठी आतंकवाद्यांचे समर्थन खपवून घ्यायचे का ? आतंकवाद्यांचे समर्थन कदापि सहन केले जाणार नाही, असा संदेश देशात पोचणे अपेक्षित होते; पण तसे काही झाले नाही. त्याच्यावर कडक कारवाई करण्याची संधी केंद्राने गमावणे संतापजनक आहे.

चीनमध्ये इस्लामवर घालण्यात आलेले कडक निर्बंध !

     चीनमध्ये बौद्ध, ख्रिस्ती, तसेच काही संप्रदायांचे अनुयायी यांना स्वत:च्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा असली, तरी तेथील घटनेनुसार विविध धर्मांच्या करण्यात येणार्‍या प्रसारावर मात्र कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे होणार्‍या राजकीय परिणामांची चिंता चीनमधील राजकीय पक्ष कधीच करत नाहीत, हे विशेष.
१. चीनच्या मते इस्लाम हा सर्वांत धोकादायक धर्म असून मुसलमान जेथे त्यांच्याच धर्मातील बांधवांचीही निर्घृण हत्या करण्यास सिद्ध असतात, तेथे इतर धर्मियांची काय तमा ?, अशी तेथील शासन आणि नागरिक यांची धारणा आहे.
२. जगातील इतर राष्ट्रांनी कितीही नाकारले, तरी चिनी नागरिक मात्र इस्लाम हा अत्यंत असहिष्णु धर्म आहे, असे मानतात. विस्थापित मुसलमानांना जो देश सामावून घेतो, त्या देशात हिंसाचाराला ऊत येतो, असे तेथील नागरिकांचा दावा आहे.

तरुणांनो, कबालीचे उदात्तीकरण टाळा !

वैद्या (कु.) माया पाटील
      २३ जुलैला अभिनेता रजनीकांत यांचा कबाली हा हिंदी भाषेतील चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या निर्मितीचा व्यय (खर्च) १६० कोटी रुपये आहे, तर या चित्रपटाने आतापर्यंत २५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आणि प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ज्या काही घटना भारतामध्ये आणि भारताबाहेर घडल्या त्या अचंबित करणार्‍या आहेत. सध्या देशातील समस्यांचा विचार केल्यास भ्रष्टाचार, महागाई, दुष्काळ, पूरसदृश स्थिती, आतंकवादी आक्रमणे, काश्मीरमधील हिंदूंवर होणारे अत्याचार, बलात्कार या आणि यांसारख्या असंख्य समस्या सामान्य माणसाला जगणे कठीण करत आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर कबाली चित्रपट आणि रजनीकांत यांच्या प्रेमाखातर तरुणाईने केलेली कृती डोके सुन्न करणारी आहे. ही अतिशयोक्ती तरुणाईला कोणत्या दिशेने घेऊन चालली आहे, हे काळच ठरवेल. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कोणत्या घटना घडल्या ते पाहूया.

ईश्‍वर असल्याची साक्ष देणारे चित्तूर (आंध्रप्रदेश) येथील कनिपकम् विनायक मंदिर !

     आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले कनिपकम् विनायक मंदिर हे स्वयंभू गणेशमूर्ती आणि अनेक आख्यायिका यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. चोल वंशाच्या राजाने ११व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. विजयनगरच्या राजाने वर्ष १३३६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
      ईश्‍वर आहे, याची साक्ष देणारी रोचक कथा या मंदिराविषयी सांगितली जाते. या गावात ३ भाऊ रहात होते. त्यातील एक आंधळा, एक बहिरा आणि एक मुका होता. त्यांचा उदरनिर्वाह छोट्याशा शेतीच्या तुकड्यावर होत होता. एकदा त्यांच्या शेतातील विहिरीतील पाणी आटले. तेव्हा विहीर आणखी खणावी म्हणून एक भाऊ विहिरीत उतरला. तेथे खणतांना त्याच्या पहारीचा घाव एका दगडी मूर्तीवर बसला आणि मूर्तीतून रक्त येऊ लागले. पहाता पहाता रक्त पाण्यात मिसळल्याने या विहिरीचे पाणी लाल झाले. त्याचवेळी या तिन्ही भावांचे अपंगत्व दूर झाले. त्यानंतर गावकर्‍यांनी या गणेशमूर्तीला पाण्याबाहेर काढून तिची पूजा केली. तेव्हापासून ही विहीर कधीच आटली नाही. येथे सापडलेल्या गणेशमूर्तीचा आकार दिवसेंदवस पालटतो आहे. या मंदिरात येऊन विहिरीकडे तोंड करून श्री गणेशाची शपथ घेऊन वादांचा निवाडा केला जातो. म्हणजे श्री गणेशाची शपथ घेईल, त्याचा पक्ष खरा मानला जातो. येथे अट्टल गुन्हेगारही विहिरीतील पाण्यात स्नान केल्यानंतर गुन्ह्याची स्वीकृती देतात आणि पाप मुक्त होतात. या गावात न्यायाची ही पद्धत खात्रीशीर मानली जाते.
(संदर्भ : माझा पेपर संकेतस्थळ)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे भव्य आंदोलन

विषय : साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू, श्री. धनंजय देसाई यांची अन्याय्यकारक अटक आणि सनातन संस्थेवरील संभाव्य बंदी यांना विरोध करणे, तसेच विदेशी शक्ती, हिंदुद्रोही माध्यमे आणि तथाकथित पुरोगाम्यांचे या संदर्भातील दबावतंत्र हाणून पाडणे 
दिनांक : २८ जुलै २०१६ वेळ : दुपारी २
स्थळ : आझाद मैदान, मुंबई 
संपर्क : ९५५२४ ०२९९९
समस्त हिंदू धर्माभिमानी, संप्रदाय, हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी संघटना आदी सर्वांनी मोठ्या संख्येने 
या आंदोलनात सहभागी होऊन हिंदु धर्मावरील होणार्‍या अन्यायाच्या विरोधात संघटित व्हावे !

सनातनचे समष्टी दायित्व सांभाळणार्‍या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि संतांचे मन जिंकण्याचे शिवधनुष्य लीलया पेलणार्‍या अन् सूक्ष्मातील कार्य सांभाळणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ सद्गुरुपदी विराजमान !

सन्मान सोहळ्यानंतर भावावस्था अनुभवतांना 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
संतपदप्राप्तीनंतर अवघ्या तीनच वर्षांत ८१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सद्गुरुपदी आरुढ !
       सनातन आश्रम, रामनाथी (गोवा), २५ जुलै (वार्ता.) - भगवंताची दोन सगुण रूपे ! एक अविरत धर्मप्रसार करतात, तर एक आश्रमात राहून साधकांना घडवतात ! एक भारतभर भ्रमण करून संतांना जोडतात, तर एक स्वतःच्या मार्गदर्शनाद्वारे साक्षात् संतच घडवतात ! उत्साह, आनंद, पारदर्शकता, अहोरात्र सेवारत रहाण्याची तळमळ, श्रीगुरूंचे कार्य विश्‍वभर नेण्याची धडपड, संतद्वयी आहेत अजोड ! त्यांच्या केवळ स्मरणानेही निराशा दूर पळते, श्रवणाने भावजागृती होते आणि केवळ अस्तित्वानेही कार्य होते. साधक, हिंदुत्वनिष्ठ अन् समाज यांनाही त्यांचा संतसंग अनुभवावासा वाटतो. श्रीगुरु अन् साक्षात् महर्षीही ज्यांचे अखंड कौतुक करतात. भगवान श्रीविष्णूच्या मुकुटातील सोनेरी रत्न असलेल्या सनातनच्या संतद्वयी पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ २४ जुलैला ८१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सद्गुरुपदी विराजमान झाल्या. साक्षात् भूवैकुंठ म्हणून महर्षींनी गौरवलेल्या, पू. (सौ.) बिंदारूपी वृंदाने अथक परिश्रम घेऊन ज्याला वृंदावनच बनवले आहे. अशा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एका दैवी सोहळ्यात ही घोषणा झाली अन् साधकांच्या भावाश्रूंचा बांध फुटला. सनईच्या सुरात अन् साधकांच्या भावसागरात हा अद्वितीय सोहळा संपन्न झाला. दोन देवीच असलेल्या त्या संतद्वयीच्या उपस्थितीमुळे साधकांना हा अनमोल सोहळा पहायला मिळाला अन् खरोखरच डोळ्यांचे पारणे फिटल्याची अनुभूती आली.

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांची अनोखी आध्यात्मिक मैत्री !

         गुरुकार्य तळमळीने पुढे नेण्यासह साधकांचीही उन्नती होण्यासाठी धडपडणार्‍या या आध्यात्मिक मैत्रिणी तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा असेच एकमेकींना सांगत नाहीत ना ?
         एकाच दिवशी सद्गुरुपद प्राप्त केलेल्या या दोघींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एकाच वर्षात, म्हणजे वर्ष २०१० मध्ये ६० प्रतिशतचा टप्पा पार केला. त्यानंतर अवघ्या ३ च वर्षांत, म्हणजे वर्ष २०१३ मध्ये दोघीही संतपदी आरूढ झाल्या आणि २०१६ मध्ये, म्हणजे पुढील ३ वर्षांत त्या एकाच दिवशी सद्गुरुपदावरही विराजमान झाल्या. दोघींची प्रकृती, तसेच सेवा भिन्न भिन्न आहेत, तरी एकसमान गतीने आध्यात्मिक उन्नतीची शिखरे पादाक्रांत करणार्‍या या दोघींची आध्यात्मिक मैत्री मात्र विलक्षणच म्हणावी लागेल. या आध्यात्मिक मैत्रीने सर्वांसमोरच एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांची ही मैत्री अशीच अखंड टिकून राहो आणि पुढील उन्नतीही अशीच शीघ्र गतीने होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

रामनाथी आश्रमात संपन्न झालेल्या भावसोहळ्याचे छायाचित्रात्मक दर्शन

मागच्या रांगेत उभे असलेले डावीकडून जावई श्री. सिद्धेश
करंदीकर अन् कन्या सौ. सायली करंदीकर यांच्यासह
पू. डॉ. मुकुल गाडगीळ अन् पू. (सौ.) अंजली गाडगीळ

पुत्र श्री. सोहम् सिंगबाळ यांच्यासह पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ

संतांच्या स्वागतासाठी जमलेला साधकांचा मेळा

      सोहळ्यात पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या साधनाप्रवासाविषयीची ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली. त्यांची पूर्वीची छायाचित्रे अन् त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण पाहून साधकही त्याच भावविश्‍वात रमले.

महर्षींना आवडेेल अशी सेवा करणार्‍या आणि प.पू. डॉक्टरांनी ज्यांच्या सेवेचे कौतुक केले अशा पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांच्याकडून साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. विनायक शानभाग
१. पू. ॐ उलगनाथन् यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या कुटुबियांना पू. गाडगीळकाकूंच्या पाया पडायला सांगणे आणि पू. काकूंनीही त्यांना नमस्कार करणे : जून २०१६ मध्ये तिरुपतीला असतांना पू. ॐ उलगनाथन् यांचा वाढदिवस होता. त्या वेळी पू. काकूंनी त्यांना भेटवस्त्र आणि गुरुदेवांचा प्रसाद देऊन नमस्कार केला. त्या वेळी पू. ॐ उलगनाथन् यांनी त्यांच्या पत्नी सौ. ॐ पवित्रा आणि समवेत असलेले ४ - ५ नाडीभक्त यांना पू. काकूंच्या पाया पडायला सांगितले. त्या सर्वांनी पू. उलगनाथन् यांचे आज्ञापालन केले आणि लगेच पू. काकूंनीही त्या सर्वांना नमस्कार केला.
२. ऋषि-मुनींचे आज्ञापालन करणे कठीण असूनही पू. काकू ते करत असणे : पू. ॐ उलगनाथन् यांनी गेल्या १५ महिन्यांत ८७ वेळा सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन केले आहे. त्यामध्ये प.पू. गुरुदेवांच्या (प.पू. डॉक्टरांच्या) वतीने पू. गाडगीळकाकू समोर असतात आणि महर्षि त्यांना वेगवेगळे आदेश देतात. खरेतर ऋषि-मुनींचे आज्ञापालन करणे पुष्कळ कठीण असते.

ज्ञान, भक्ती आणि भाव यांसह प्रसंगी हठयोगाचीही साधना करून साक्षात् महर्षींची कृपा संपादन करणार्‍या पू.(सौ.) अंजली गाडगीळ !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जन्म कार्तिक महिन्यात झाला आहे. महर्षि नाडीवाचनात त्यांचा उल्लेख कौतुकाने कार्तिकपुत्री असा करतात. ज्ञान, भक्ती आणि हठयोग यांद्वारे संतांची कृपा संपादन करणार्‍या पू.(सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी महर्षि म्हणतात, हे कार्तिकपुत्री, तुझ्याकडून आमच्यासंदर्भात आजपर्यंत एकही चूक झालेली नाही. तू आतापर्यंत केलेली आमची प्रत्येक सेवा परिपूर्णच झाली आहे.
२. नाडीवाचन करतांना तेथे महर्षींसाठी लाल रंगाचे आसन ठेवूया, असा विचार पू. काकूंच्या मनात आला. त्याप्रमाणे त्यांनी लाल रंगाचे आसन ठेवणे चालू केल्यानंतर महर्षि म्हणाले, आम्हाला जे अपेक्षित आहे, तेच तू करत आहेस. तू आमचा किती विचार करतेस. आम्हाला लाल रंग प्रिय आहे. आम्ही पूर्वी याच आसनावर बसायचो.

महर्षींनी शक्तीचे रूप असलेल्या आणि समष्टीच्या आधार असणार्‍या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
१. महर्षि पू. (सौ.) बिंदाताई यांची क्षणोक्षणी आठवण काढतात. त्या कशा आहेत ? त्या साधकांच्या माऊलीच आहेत. आम्ही त्यांना त्रिवार वंदन करतो !, असे महर्षि प्रत्येक नाडीवाचनात सांगतात.
२. महर्षि म्हणतात, ती वृंदावनातील वृंदा आहे. (महर्षि पू. (सौ.) बिंदाताई यांना कधी वृंदा म्हणून लडीवाळ हाक मारतात, तर कधी उत्तरापुत्री म्हणतात.) तिच्यामुळे रामनाथी आश्रम वृंदावन आहे. तिच्यामुळेच सर्व साधक गोपगोपी झाले आहेत. तर मग श्रीमत् नारायण का नाही येणार ?
३. पू. (सौ.) बिंदाताईंचे वर्णन करतांना महर्षि म्हणतात, बघा त्या उत्तरापुत्रीचा आवाज किती मधुर आहे. ती कशी चालते ! ते सर्व देवाच्या आभूषणांप्रमाणे आहे. उत्तरापुत्री हे देवाचे आभूषण आहे. ते शक्तीचे रूप आहे. त्यांच्या चैतन्याने कार्य व्यापक होत आहे.

पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील परस्पर पूरकतेविषयी महर्षींनी दिलेले निरनिराळे दाखले !

१. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जन्म सर्वांत महत्त्वाच्या कार्तिक पौर्णिमेला झाला, तर पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा जन्म सर्वांत श्रेष्ठ अशा भाद्रपद अमावास्येला झाला आहे.
२. पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा जन्म मंगळवारी झाला आहे, पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जन्म गुरुवारी झाला आहे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म दोघींच्या मध्ये म्हणजे बुधवारी झाला आहे.
३. महर्षि पितृतुल्य प्रेमाने म्हणतात, दोघीही आमच्या पुत्री आहेत.
४. प.पू. डॉक्टरांनी जे कार्य हाती घेतले आहे, ते कार्य पूर्ण करण्याची क्षमता या दोघींमध्येच आहे. त्यांच्यामध्ये गुरुकार्य पूर्ण करण्याची तळमळ आहे. त्यामुळे दोघी एकमेकांशी सातत्याने बोलतात, चर्चा करतात आणि मग प.पू. डॉक्टरांचे कार्य पूर्ण करतात.
५. जेव्हा देव अवतार घेतो, तेव्हा त्याच्यासमवेत देवी-देवताही येतात. त्याचा पूर्ण परिवार पृथ्वीवर येतो, तसेच भगवान श्रीविष्णूच्या अवतारासमवेत या दोन देवीही आल्या आहेत. 
६. भगवान श्रीविष्णूच्या हातात चक्र आहे, तर हृदयात श्रीवत्सलांच्छन (श्रीकृष्णाच्या गळ्यात असलेले भक्तांप्रतीच्या वात्सल्याचे पदक ) म्हणजे साक्षात् श्रीलक्ष्मीचा वास आहे ! पू. (सौ.) गाडगीळकाकू या त्या चक्रासारख्या आहेत. त्या सतत भ्रमण करत असतात. त्यांना विश्‍वभर गुरूंसाठी भ्रमण करायचे आहे उभयादेवी असलेल्या पू. (सौ.) बिंदाताई श्रीविष्णूच्या हृदयात असलेल्या श्री महालक्ष्मी आहेत.

पू. (सौ.) बिंदाताईंनी प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना करून त्यांचे मन जिंकले ! - नीलेश सिंगबाळ

      पू. (सौ.) बिंदा सद्गुरुपदी विराजमान झाल्याविषयी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो. पू. (सौ.) बिंदाताईंनी प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना करून त्यांचे मन जिंकले अन् अल्पावधीतच सद्गुरुपद प्राप्त केले. त्यांचा आदर्श समोर ठेवून आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन माझ्याकडूनही प्रयत्न होऊ देत, अशी प.पू. डॉक्टरांच्या चरणी संपूर्ण शरणागत भावाने प्रार्थना ! - श्री. नीलेश सिंगबाळ, देहली

एक मुलगी दोन कुळांचा उद्धार करते ही म्हण सार्थ करणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ अन् पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ !

       संतदांपत्य असलेले पू. डॉ. मुकुल गाडगीळ अन् पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह त्यांची कन्या सौ. सायली करंदीकर अन् जावई श्री. सिद्धेश करंदीकर हेही आश्रमात पूर्णवेळ साधना करतात. सौ. सायली हिने माता-पित्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ६० टक्के आध्यात्मिक पातळीही गाठली आहे.
       पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे पती श्री. नीलेश सिंगबाळ यांनीही ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, तर श्री. सोहम्ही आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे.
       यासह पू. (सौ.) अंजली गाडगीळ अन् पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ या संतद्वयीच्या सासरच्या, तसेच माहेरच्या नातेवाइकांनीही ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी प्राप्त केली आहे.
       खरे तर सासर आणि माहेर अशा दोन कुळांबरोबरच पू. (सौ.) गाडगीळकाकू अन् पू. (सौ.) बिंदाताई विश्‍वोद्धारक कार्य करत आहेत !

महर्षींनी पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

अ. आम्हाला जे आवडते, तेच तू करतेस आणि आमच्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होतेस, असे महर्षींनी सांगणे : आजपर्यंत आम्ही तुझी अनेक वेळा परीक्षा घेतली आहे; पण तू प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झालीस. श्रीमन्नारायण आणि सप्तर्षि यांना जे आवडते, तसेच तू केले आहेस.
आ. आम्ही आतापर्यंत सांगितलेले सर्व तू व्यवस्थित केलेस, यावरून गुरूंंकरता आमच्याकडे आलेली कार्तिकपुत्री तूच आहेस, हे सिद्ध होते, असे महर्षींनी सांगणे : आजपर्यंत आम्ही तुला जे जे सांगितले, ते ते तू सर्व व्यवस्थित केले आहेस. एकदाही तुझ्याकडून चूक झालेली नाही; म्हणून आम्हाला आनंद होतो. यावरून अवतारस्वरूप अशा तुझ्या गुरूंंकरता आमच्याकडे आलेली कार्तिकपुत्री तूच आहेस, हे परत परत सिद्ध झाले आहे.

पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सद्गुरुपदाची घोषणा करण्यापूर्वी ६१ टक्के पातळीच्या सौ. शालिनी मराठे यांना मिळालेली पूर्वसूचना

      भावसोहळ्याला आरंभ होण्यापूर्वी मला एक दृश्य दिसले. पिवळ्या रंगाचे आणि निळ्या रंगाचे परकर पोलके घातलेल्या दोन मुली एकमेकींशी फुगडी खेळत होत्या. गोल फिरतांना त्या एकमेकींशी इतक्या एकरूप झाल्या होत्या, की दोघींचे मिळून एकच वलय भासत होते. त्या वेळी मनात, आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या । हातात पाटल्या तोडीच्या या गीताच्या ओळी आल्या. हे दृश्य दिसण्यापूर्वी तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा, या गीताच्या ओळी आल्या. प्रत्यक्षातही भावसोहळ्यात पू. (सौ.) गाडगीळकाकू आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सद्गुरुपदाची घोषणा करण्यात आली. पू. (सौ.) बिंदाताईंनी पू. (सौ.) गाडगीळकाकूंचा पुष्पहार घालून सन्मान केला, तर पू. (सौ.) गाडगीळकाकूंनी पू. (सौ.) बिंदाताईंचा पुष्पहार घालून सन्मान केला. या वेळी पू. (सौ.) गाडगीळकाकूंनी निळ्या रंगाची, तर पू. (सौ.) बिंदाताईंनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या सर्वांवरून भावसोहळ्यापूर्वी दिसलेले दृश्य ही देवाने दिलेली पूर्वसूचनाच होती, हे लक्षात आले. - सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


पू. सौरभ जोशी यांना पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांची आध्यात्मिक पातळी ८० टक्के झाल्याची मिळालेली पूर्वसूचना !

    १३.१०.२०१५ या दिवशी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मी पू. सौरभदादांकडे सेवेला गेले होते. त्या वेळी सायंकाळी साधारण ५.३० वाजता पू. दादा आणि माझ्यात झालेले संभाषण पुढे देत आहे.
पू. सौरभदादा : ऐंशी ! 
मी : कुणाची झाली ऐंशी ? 
पू. सौरभदादा : काकू. 
मी : पू. गाडगीळकाकूंची का ? 
पू. सौरभदादा : हो.
मी : कुणी घोषित केलं ? 
पू. सौरभदादा : नाही.
मी : मग नाडीपट्टीत सांगितले का ? 
(यावरही पू. दादा पुष्कळ गोड हसले.)
       गुरुमाऊली, हे तुम्हीच अनुभवायला दिलेत, याबद्दल कोटी कोटी कृतज्ञता ! 
- कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१०.२०१५)


पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचा भाव, श्रद्धा अन् दृढ निर्धार दर्शवणारे काही प्रसंग !

अ. कधी शिवलिंगाला अभिषेक करण्याच्या आज्ञा महर्षींनी केल्यानंतर अभिषेक होईपर्यंत मांडी घालून त्या शिवलिंगासमोर बसतात. त्यांना पाहून महर्षीच थोड्या वेळाने पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना म्हणतात, माझ्या मुलीचे पाय दुखतात. तिला आता खुर्चीवर बसायला सांग.
आ. एकदा एका मंदिरात जाण्यासाठी २२ किमीचा मार्ग जंगलातून जाणारा होता. त्या वेळी तेथील वाहनचालकानेही विचारले की, तुम्ही खरेच तिथेपर्यंत जाणार ना ? त्या वेळी पू. काकू म्हणाल्या, महर्षींनी सांगितले आहे, तर ते आपले रक्षण करतीलच. आपण जाऊया. त्याप्रमाणे निघाल्यानंतर जातांना वाटेत गाडी अचानक बंद पडली. पू. काकूंनी केवळ नामजप केला अन् गाडी आपोआप चालू झाली. परत येतांनाही एका ठिकाणी गाडी ७० टक्के कलंडली होती. त्या प्रसंगातही गुरूंच्या कृपेने सर्व चांगलेच होणार आहे, या श्रद्धेने पू. काकू स्थिर होत्या. तेव्हाही गाडी पुन्हा आपोआप पूर्वस्थितीत येऊन पुढील प्रवास निर्विघ्नपणे पार पडला. (ही पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेली वैयक्तिक अनुभूती आहे. ती सरसकट सर्वांना येईलच असे नाही. - संपादक)

साधकांच्या स्थुलातील संघटनेसह त्यांच्या मनांचे संघटन होणेही आवश्यक असणे !

श्री. संदीप जगताप
       वेडात मराठी वीर दौडले सात ! अशी आपल्या जाज्वल्य इतिहासात नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. एवढ्या अल्प संख्याबळात या विरांनी एवढा मोठा पराक्रम केला, यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे, त्या सर्वांची मने जुळलेली होती. त्यामुळे ते एका ध्येयाने प्रेरित झाले आणि धर्मासाठी एवढे मोठे कार्य करू शकले.
     त्याचप्रमाणे एखाद्या जिल्ह्यात किंवा विभागात सेवा करणार्‍या साधकांच्या साधनेची फलनिष्पत्तीसुद्धा तेथील साधकांची मने एकमेकांशी किती प्रमाणात जुळली आहेत ?, यावर अवलंबून असते. एकमेकांकडून अनाठायी अपेक्षा करणे, पूर्वग्रह अशा दोषांमुळे एकमेकांची मने जुळण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात आणि फलनिष्पत्ती उणावते. त्यामुळे निरपेक्षपणे (अपेक्षाविरहित) आणि एकमेकांना साहाय्य करण्याच्या भूमिकेत रहाणारी मने असलेले साधकच साधनेच्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य पूर्णत्वास नेऊ शकतात आणि फलनिष्पत्ती वाढवू शकतात.
- श्री. संदीप जगताप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०१६)

साधकांनी व्यक्त केलेले मनोगत

आईच्या वात्सल्याने साधकांना आनंद आणि अंतर्मुखता 
प्रदान करणार्‍या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ ! - कु. प्रियांका जोशी
        ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका जोशी म्हणाल्या, आरंभी व्यवस्थापनाची सेवा करतांना निरोप देण्याच्या सेवेत माझा गोंधळ व्हायचा. पू. ताईंनी ही सेवा कशी करायची, ते मला टप्प्याटप्प्याने शिकवले. त्या आम्हाला भावनिक स्तरावर न हाताळता तत्त्वनिष्ठपणे आमच्यातील चुकांची जाणीव करून देतात. त्यांच्यामुळे देवाला आवडेल, अशी सेवा करण्याचा विचार मनावर बिंबतो. पू. ताई सतत भावावस्थेत, चैतन्यावस्थेत आणि आनंदावस्थेत असतात. मानवी देहाला जेवण, विश्रांती यांची आवश्यकता असते, तर मानवी मनाला कधीकधी ताण, निराशा येते. पू. ताईंनी या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून भगवंताचे अवतारी कार्य चालू आहे. पू. ताईंची प्रत्येकच कृती मधूर असते. सेवेसंदर्भात उत्तरादाखल आलेला त्यांचा एक लघुसंदेश हीदेखील चैतन्याची धाराच असते. त्यांच्या लघुसंदेशातून कधी आनंद, तर कधी अंतर्मुखता अनुभवता येते.
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ 
यांनी गुरुकार्याला सर्वस्व 
अर्पण केले आहे ! - श्री. नागेश गाडे
        ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी आश्रमातील साधक श्री. नागेश गाडे म्हणाले, रात्री १ - २ वाजता घरी गेल्यानंतरही त्या भ्रमणध्वनीवरून जागे असलेल्या साधकांना सेवा आणि साधना यांविषयी मार्गदर्शन करतात. सकाळी पुन्हा सेवेसाठी आश्रमात येतात. त्यांनी गुरुकार्याला सर्वस्व अर्पण केले आहे. कार्यासोबत साधकांच्या साधनेचा विचार करण्यातून त्यांची व्यापकता अनुभवता येते. सेवा परिपूर्ण करण्यासाठी त्या सातत्याने शिकण्याच्या स्थितीत असतात. प्रसारातील अडचणी सोडवण्यासाठी उपक्रमांत येणार्‍या अडचणींविषयी त्या विचारून घेतात. एखाद्या विषयाशी प्रत्यक्ष निगडित नसूनही कार्य अधिक चांगले करण्याच्या तळमळीमुळे त्यांना बारकावे सुचतात. आमच्या ते लक्षातही आलेले नसतात. त्यांच्या सत्संगात आध्यात्मिक उपाय होतात, तसेच त्रास जाणवत असल्यास किंवा ताण आला असल्यास तो निघून जातो. पू. ताईंकडून जे काही शिकायला मिळते, ते कृतीत आणण्याची तळमळ वाढावी, यासाठी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.
सातत्याने दैवी अनुभूतींची प्रचीती 
देणार्‍या पू. (सौ.) गाडगीळकाकू ! - श्री. विनीत देसाई 
      पू. (सौ.) गाडगीळकाकूंसोबत दैवी प्रवासात सेवा करणारे साधक श्री. विनीत देसाई यांनी साधनेत पदोपदी साहाय्य करणार्‍या सद्गुरु पू. (सौ.) गाडगीळकाकू यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतांना म्हटले, पू. काकूच आमच्यासाठी महर्षि आहेत. महर्षींप्रमाणे सातत्याने परीक्षा घेऊन त्या आम्हाला घडवतात. पूर्वी दूर्मिळ वस्तूंच्या संग्रहासाठी प्रवास करतांना एकदा पू. काकूंसोबत आम्ही नरसोबावाडीला निघालो होतो. अर्ध्या वाटेत गेल्यानंतर पू. काकू म्हणाल्या, नरसोबावाडीला नको; भुवनेश्‍वरी देवीला जाऊया. श्री भुवनेश्‍वरी देवीला गेल्यानंतर लक्षात आले की, भुवनेश्‍वरी देवीचे मंदिर त्याच दिवशी उघडे होते. दुसर्‍या दिवशी बंद असणार होते. अशा विविध प्रसंगांतून त्यांच्या देवत्वाचा प्रत्यय येतो. प्रवासात असतांना महर्षि आता ज्याप्रमाणे शुभसंकेतांविषयी सांगून ईश्‍वराचे लक्ष असल्याचे सूचित करतात; त्याप्रमाणे पू. काकूही पूर्वीपासूनच नदीत सर्प दिसल्यास किंवा अन्य शुभसंकेत दिसल्यास त्याविषयी आम्हाला सांगतात. मनाला भाव आणि प्रेम कुठे आहे ?, असा प्रश्‍न केला की, पू. काकू डोळ्यांसमोर येतात. सर्व गुरुच करतात, हा भाव त्यांच्या मुखमंडलावर असतो.

प्रत्येक कृती भावपूर्ण करणारी अन् प्रीतीचे मूर्तीमंत उदाहरण असलेली ! पू. (सौ.) आई ! - सौ. सायली करंदीकर

      ६० टक्के अध्यात्मिक पातळी असलेली पू. (सौ.) गाडगीळकाकूंची कन्या सौ. सायली करंदीकर यांनी उपस्थित साधकांना पू. काकूंमधील गुणविश्‍वाचे थोडक्यात; पण अचूकपणे दर्शन घडवले. सौ. सायली म्हणाल्या, एकदा टॉवेल दोरीवर वाळत घालण्याची कृती भावपूर्ण झाली नाही; म्हणून आईने ती कृती परत केली. ती कृती पुन्हा करणे, हेच माझे प्रायश्‍चित्त आहे, असे तिने सांगितले. आई मायेच्या बंधनाच्या पलीकडे गेली आहे. असे असले, तरी आम्ही जेव्हा नातेवाइकांकडे जातो; तेव्हा त्यांच्याशी ती प्रेमाने आणि आपुलकीने बोलते. तिचे कुणी कौतुक केले, तर ती स्थिर असते; पण तिच्यासमोर कुणी दुसर्‍या संतांचे किंवा साधकांचे कौतुक केले, तर त्यांच्याप्रतीच्या प्रीतीमुळे तिच्या डोळ्यांत पाणी येते. गुरूंवरील दृढ श्रद्धेने प्रत्येक सेवा अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण करण्यासाठी अविरत कष्ट घेणे, हे पू. आईचे वैशिष्ट्य ! - कु. सोहम् सिंगबाळ

     पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सर्वांत जवळून अनुभवलेला त्यांचा मुलगा कु. सोहम् सिंगबाळ याने मनोगत व्यक्त करतांना म्हटले,
१. आईला साधनेत येण्यापूर्वी पुष्कळ त्रास होता; परंतु त्या वेळीही त्यांच्यामध्ये तत्त्वनिष्ठता आणि नेतृत्व हे गुण प्रकर्षाने जाणवत. साधनेत आल्यानंतर त्यांच्या सेवेत कधीच खंड पडला नाही. एकदा दुचाकीवरून पडून त्यांचा अपघात झाला होता, त्या स्थितीतही वैद्यकीय उपचार घेऊन लगेच त्या सेवेसाठी गेल्या.
२. गुरुकार्य संपूर्ण विश्‍वात पोचवण्याचा ध्यास घेऊन प्रत्येक सेवा अधिकाधिक परिपूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्याकडे असलेले कार्याचे दायित्व उत्तरोत्तर वाढत गेले; मात्र त्यांना ताण आलेला मी कधी पाहिले नाही. प.पू. डॉक्टरांवरील दृढ श्रद्धेनेच त्यांना हे शक्य झाले.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

       पुणे येथील वास्तूविद्या वाचस्पती डॉ. नरेंद्र हरि सहस्रबुद्धे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वतःचे वास्तूविज्ञानाविषयीचे ग्रंथ अर्पण करतांना केलेला भावपूर्ण उल्लेख !
       परमपूज्य परमज्ञानी सनातन धर्म प्रतिपालक डॉ. जयंतरावजी आठवले यांच्या करकमली समर्पित !
- डॉ. नरेंद्र हरि सहस्रबुद्धे

प.पू. डॉक्टरांनी पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

अ. सूक्ष्म रूपात असलेल्या महर्षींच्या मनात काय आहे ?, हे जाणून तशी कृती चुकांविरहित करणार्‍या पू. गाडगीळकाकूंची सेवा कौतुकास्पद आहे ! : ऋषि-मुनींचे आज्ञापालन करणे पुष्कळ कठीण असते. पू. (सौ.) अंजली गाडगीळ जसे महर्षींचे आज्ञापालन करतात, तसे करणे मलाही जमले नसते. सूक्ष्म रूपात असलेल्या महर्षींच्या मनात काय आहे ?, हे जाणून तशी कृती चुकांविरहित करणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांची सेवा कौतुकास्पद आहे.
आ. पू. काकूंची सध्या हठयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या तीन मार्गांप्रमाणे साधना चालू आहे ! : महर्षींच्या आज्ञेप्रमाणे पू. (सौ.) अंजली गाडगीळ देवदर्शनासाठी जंगलात असलेल्या तीर्थक्षेत्री सध्या जात आहेत. अशा ठिकाणी जायची वाटही खडतर आहे. शरिराला विसरून त्या हा प्रवास करत आहेत. सध्या त्यांची हठयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या तीन मार्गांप्रमाणे साधना चालू आहे.

श्री गुरुचरणों में आत्म निवेदन ।

एक निवेदन श्री गुरुदेव की 
अमृत महोत्सव वर्षनिमित्त... 
सौ. मिनू रतन
श्री गुरु के चरण में शीश नमन है ।
श्री गुरु के हृदय में पावन दीप है ॥ १ ॥
श्री गुरुवर के आभाकुंज में पंखुरी बन
बिखर-बिखर जाऊं, यह तीव्र तपन है ।
आज इस पावन अवसर पर
श्री गुरु के चरणों में शीश नमन है ॥ २ ॥
श्री गुरु प्रेम-पुंज हैं,
वे एकमात्र मित्र, सखा, आत्मदीप्ति हैं ।
यही लालसा है जीवन की
कि उनकी प्रेम-आभा में प्रज्वलित हो दीप्तिमान हो जाऊं,
न रक्त रहे न राख... यह आत्म निवेदन है, श्री गुरुचरणों में ॥ ३ ॥
- सौ. मिनू रतन, मुंबई (३०.५.२०१६)

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांची पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली वैशिष्ट्ये

१. अस्तित्वाने कार्य होत असणे 
पू. डॉ. मुकुल गाडगीळ
       पू. (सौ.) अंजली यांचे आता अस्तित्वाने कार्य होत आहे. महर्षींनी त्यांची प.पू. डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून दैवी दौर्‍यासाठी निवड केली आहे. त्यामध्ये स्थानमहात्म्य असलेल्या देवळांचे दर्शन घेऊन त्या त्या ठिकाणच्या देवतांचा सनातन धर्म राज्यासाठी आशीर्वाद घेणे, सनातन धर्म राज्याच्या स्थापनेच्या कार्यातील अडचणी दूर होण्यासाठी याग करणे, तसेच भारतात ठिकठिकाणी जाऊन तेथील देवतांना तेथील साधकांच्या रक्षणासाठी प्रार्थना करणे, असे कार्य महर्षि पू. (सौ.) अंजली यांच्याकडून करवून घेत आहेत. पू. (सौ.) अंजली यांची आध्यात्मिक क्षमता आहे; म्हणूनच महर्षींनी त्यांची निवड केली आहे.
२. तोंडवळ्यातून तेज प्रक्षेपित होत असणे
       गेले दीड वर्ष पू. (सौ.) अंजली महर्षि सांगतील, त्याप्रमाणे भारतात फिरत आहेत. महर्षि सांगतील त्याप्रमाणे त्यांना आज इथे, तर उद्या तिथे जावे लागते. या काळात अधिकतर त्या तमिळनाडूत होत्या. तेथे उष्णता अधिक असते. काही कालावधीसाठी त्या उत्तर भारतात सिमला, मनाली, लेह-लडाख येथेही होत्या. तेथे पुष्कळ थंडी असते. एवढा अखंड प्रवास करूनही आणि हवेच्या तापमानातील तफावत सहन करूनही पू. (सौ.) अंजली यांच्या तोंडवळ्यावरील तेज अल्प झाले नाही, तर ते आणखी वाढलेच आहे. त्यांच्या त्वचेतून प्रकाश बाहेर पडतो, असे जाणवते.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
   भावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार व सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
साम्यवाद्यांची सर्वांत हास्यास्पद गोष्ट अशी की, त्यांच्यातही
राज्यकर्ते, प्रशासन आणि जनता असा भेद असतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरी संपत्ती !
वेळ म्हणजे खरी संपत्ती ! ती एकदा गेली की, परत येत नाही; म्हणूनच प्रत्येक 
क्षणाचा उपयोग करा. कधीही वेळ वाया घालवू नका ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

स्वसंरक्षणाच्या सूत्रावरून सनातनला आतंकवादी ठरवणार्‍यांनो, जरा लाज वाटू द्या !

विशेष संपादकीय
      कोपर्डी (जिल्हा नगर) येथे बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटून सांत्वन केले. जाता जाता राज्यातील शाळांमध्ये मुलींना सक्तीचे स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि मुलांना संस्काराचे धडे देण्याचा विचार आहे, असे सांगितले. केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशात स्त्रिया असुरक्षित असतांना उशिराने का होईना, मुख्यमंत्र्यांना मुलींना स्वसंरक्षण देण्याचे महत्त्व लक्षात आले, हेही नसे थोडके. त्यामुळे त्यांनी केलेल्या या विधानाचे सनातन स्वागतच करील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे विधान केल्यानंतर स्त्रीवादी, पुरोगामी, ब्रिगेडी संघटना आणि राजकीय पक्षही गप्प आहेत. या गप्प रहाण्याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या मताशी ते सहमत आहेत, असाच होतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn