Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याला पर्याय नाही ! - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

     मुंबई - शिवसेनेने सतत हिंदुत्वाची कास धरली. आम्ही हिंदुत्वासाठी आक्रमणे सहन करायची, संकटे अंगावर घ्यायची आणि इतरांनी मात्र मजा मारायची. हे किती काळ चालणार ? सरकार पालटले; पण सर्वसामान्यांचे आयुष्य पालटले का ? त्यासाठी काय करणार आहात ? आपल्या देशाला एक काहीतरी मार्ग आता स्वीकारावाच लागेल. तो जर का स्वीकारायचा असेल, तर या देशाला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्याव्यतिरिक्त दुसरा तरी पर्याय नाही. हे निधर्मीवादाचे चोचले आता खूप झाले. निधर्मीवादातून हिंदूंवरच अन्याय झालेला आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी परखडपणे हिंदु राष्ट्राची मागणी केली. श्री. ठाकरे यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत दैनिक सामनामधून २४ जुलैपासून क्रमशः प्रसिद्ध होत आहे. त्यात श्री. ठाकरे यांनी वरील प्रतिपादन केले आहे.
श्री. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतील मांडलेली काही सूत्रे
१. सध्या देशामध्ये धुक्यासारखे वातावरण आहे. नक्की काय चालले आहे, तेच कळत नाही. नक्की कोण काय करत आहे, तेच कळत नाही आणि कारभार कोण करत आहे तेही कळत नाही.
२. इथेही पाकड्यांना अंगावर घेणारी शिवसेनाच आहे. पाकिस्तानचे कलाकार आले, क्रिकेटपटू आले, कुणी पुढारी आले की, आजही फक्त शिवसेनाच त्यांना विरोध करते. पाकिस्तान हा काही एकट्या शिवसेनेचाच शत्रू नाही.

आम्ही सनातनच्या पाठीशी ठामपणे उभे राहू ! - मंत्र्यांचा निर्वाळा

प्रा. राम शिंदे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना
डावीकडून श्री. शिवाजी वटकर आणि श्री. अभय वर्तक

डॉ. दीपक सावंत (डावीकडे) यांना निवेदन देतांना
उजवीकडून श्री. अभय वर्तक आणि श्री. शिवाजी वटकर

श्री. विजय शिवतारे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना
डावीकडून श्री. शिवाजी वटकर आणि श्री. अभय वर्तक

श्री. भरतशेठ गोगावले (वर्तुळात) यांना निवेदन देतांना डावीकडून
सर्वश्री सतीश सोनार, शिवाजी वटकर आणि उजवीकडे अरविंद पानसरे

  • सनातन संस्थेच्या शिष्टमंडळाकडून शिवसेना आणि भाजप या पक्षांतील विविध मंत्र्यांच्या भेटी !
  • दाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेवरील अन्याय्य कारवाईच्या विरोधाचे प्रकरण
        मुंबई, २४ जुलै (वार्ता.) - कोणताही ठोस पुरावा नसतांना केवळ षड्यंत्राद्वारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या निरपराध साधकांना अटक करण्यात आली आहे. यात हिंदुद्रोही प्रसिद्धीमाध्यमांना हाताशी धरून खोट्या बातम्यांद्वारे समाजात सनातनची मानहानी केली जात आहे. त्यातून पुढे सनातनवर बंदी आणण्याचे षड्यंत्रही काही हिंदुद्रोही आणि पुरोगामी यांनी आखलेले आहे. अशा वेळी कठीण प्रसंगात आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे आश्‍वासन राज्यातील शिवसेना आणि भाजप पक्षांतील विविध मंत्र्यांनी सनातन संस्थेच्या शिष्टमंडळाला दिले.

८०० जणांना धर्मांतराद्वारे केले मुसलमान !

सनातन संस्थेच्या निरपराध साधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणारे सरकार
आणि त्यांचे पालन करणारे पोलीस या दोघांच्या कृत्यांच्या वेळी झोपले होते का ?

घरवापसीवरून हिंदुत्वनिष्ठांवर टीका करणारे ढोंगी निधर्मीवादी आता तोंड उघडणार नाहीत !
डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनशी संबंधित असणार्‍या दोघांचे दुष्कर्म !

      मुंबई - इसिसशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आलेले रिझवान खान आणि आर्शीद कुरेशी या दोघांनी देशातील किमान ८०० नागरिकांचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवल्याचे आतंकवादविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. यांमध्ये मुंबईतील बहुसंख्य नागरिकांचा समावेश आहे. हे दोघेही डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेशी संबंधित आहेत. खान याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या काही कागदपत्रांमधून ही गोष्ट उघडकीस आली. आपण विवाह संस्था (मॅरेज ब्युरो) चालवत असून यातील कुठलेही धर्मांतर बळजबरीने घडवण्यात आलेले नाही, असे त्याने म्हटले आहे. मात्र पोलिसांच्या मते हे दोघेही मोठ्या स्तरावर धर्मांतर घडवण्याच्या प्रयत्नांत आहेत. या दोघांनी प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कारागृहातील कैदी यांना कायदेशीर आणि आर्थिक साहाय्य देऊन त्यांचे धर्मांतर केले होते.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू !

जळगाव येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषदेद्वारे चेतावणी
सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे आभार !
    
जळगाव - सनातन संस्था ही हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करणारी संघटना आहे. सनातन संस्थेला धर्मकार्यामध्ये मिळणारे यश निरीश्‍वरवादी आणि धर्मद्रोही संघटना यांना खुपत आहे. यासाठी ते सनातन संस्थेवर बंदी आणण्याचे षड्यंत्र आखत आहेत; पण सनातनची बाजू धर्माची असल्याने आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना सनातनच्या पाठीशी आहोत. सनातनवर बंदी आणण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी चेतावणी येथील हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.
     या पत्रकार परिषदेला अधिवक्ता निरंजन चौधरी, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी, मी मराठी प्रतिष्ठानचे श्री. कपिल ठाकूर, स्वराज्य निर्माण सेनेचे श्री. महेश सपकाळे उपस्थित होते. अधिवक्ता निरंजन चौधरी यांनी सनातन संस्थेला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले.

परभणी आणि संभाजीनगर येथून इसिसचे ५ जण कह्यात

भारतात पसरलेले इसिसचे जाळे नष्ट करण्यासाठी 
शासनाने कठोर पावले उचलावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे !
     संभाजीनगर - काही दिवसांपूर्वी आतंकवादविरोधी पथकाने इसिस या आतंकवादी संघटनेच्या नसीरबिन याफी चाऊस या आतंकवाद्याला परभणीतून अटक केली होती. नासेरबीन चाऊस याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. त्या माहितीच्या आधारे आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून २३ जुलै या दिवशी परभणीतून ३ आणि संभाजीनगर येथून २ जणांना कह्यात घेतले आहे. त्या ५ जणांची नावे मात्र समजू शकलेली नाहीत. ही माहिती पथकाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिली असून त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

मराठवाड्यातील मुसलमान युवकांना आतंकवादासाठी प्रवृत्त केले जात आहे ! - अतुलचंद्र कुलकर्णी,

आतंकवादविरोधी पथक प्रमुख नुसती माहिती देणे 
नव्हे, तर परिणामकारक कृती करणे अपेक्षित आहे !
     लातूर - मराठवाड्यातील मुसलमान तरुणांना मोठ्या प्रमाणात आतंकवादी होण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे. लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खुल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. मराठवाड्यातून सुमारे १०० तरुण बेपत्ता झाले आहेत का, त्यांचा आतंकवादाशी काही संबंध आहे का ? याची माहिती घेण्याचे काम चालू आहे, असेही कुलकर्णी यांनी या वेळी सांगितले.
कुलकर्णी पुढे म्हणाले की,
१. ज्या आतंकवाद्याचा आता आम्ही अभ्यास करत आहोत, त्याच्या संगणकात १३ सहस्र छायाचित्रे आहेत. या छायाचित्रांचा अभ्यास चालू आहे.
२. गेल्या २ मासांत महाराष्ट्रातील ४ मुसलमान युवकांना आतंकवादी विचारांपासून यशस्वीपणे परावृत्त केले.
३. जी १०० मुले इसिसमध्ये भरती होण्यासाठी परदेशी निघाली होती, त्यांचे समुपदेशन करून त्यांना परत आणले आहे. त्यांच्यावर खटला दाखल केलेला नाही. (सनातनच्या निरपराध साधकांना आतंकवादी आणि गुन्हेगार ठरवण्याचा आटापिटा करणारे पोलीस आतंकवादी होण्यासाठी सिरिया आणि इराक या देशांत जाणार्‍या धर्मांधांचे मात्र समुपदेशन करतात ! - संपादक)
४. त्या त्या धर्मातील लोकांनी या मुलांचे कट्टरवादाकडे जाणे थांबवायला हवे.

(म्हणे) सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संस्थांची सखोल चौकशी करावी !

  • तिन्ही हत्या प्रकरणांत अन्वेषण यंत्रणांनी सनातन संस्था किंवा हिंदु जनजागृती समिती यांना गुन्हेगार म्हणून घोषित केलेले नसतांनाही अंनिसच्या मागणीतून त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच सिद्ध होते !
  • अमळनेर येथील अंनिसची प्रांताधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे हिंदुद्वेषी मागणी
       अमळनेर (जळगाव) - डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्यांमध्ये संशयित असलेली सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संस्थांची सखोल चौकशी करावी. सनातन आणि संबंधित संस्थांवर बंदी घालावी, तसेच या संस्थांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे. अशा संस्थांशी कोणतेही राजकीय पक्ष, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, संस्था यांनी संबंध ठेवू नये, अशा आशयाचे निवेदन अंनिसच्या वतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार डी.एम्. वानखेडे यांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या नावे देण्यात आले.

आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांना तात्काळ अटक करा ! - अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

संभाजीनगर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन ! 
       संभाजीनगर, २४ जुलै (वार्ता.) - डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवलेले नसतांना तथाकथित पुरोगामी संघटना, नास्तिकवादी संघटना आणि काही राजकीय पक्ष हे संस्थेवर जाणीवपूर्वक खोटे आरोप करत आहेत. त्यांच्याकडून सनातनवर केली जाणारी बंदीची मागणी अत्यंत चुकीची आणि अन्याय्य आहे. याउलट डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांतून प्रेरित होऊन काही धर्मांध आतंकवादी सिद्ध झाले आणि त्यांनी बांगलादेशात आक्रमण केले आहे. अशा वेळी राष्ट्रहित लक्षात घेऊन आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांना तात्काळ अटक करायला हवी. त्यांना अटक केल्यास देशातील आतंकवाद संपू शकतो, असे प्रतिपादन हिंदु विधिज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी केले. येथील गुरु गोविंदसिंह पुरा (उस्मानपुरा) भागातील गोपाळ सांस्कृतिक सभागृहासमोर २२ जुलै या दिवशी सायंकाळी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

जळगाव येथील मान्यवरांनी सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार आणि दिलेला पाठिंबा

सनातन संस्थेला अपकीर्त करणे आणि संस्थेला अतिरेकी ठरवून बंदीची मागणी
 करणे अन्यायकारक ! - श्री. प्रकाश केशव दलाल, चोपडा जिल्हाध्यक्ष, विश्‍व हिंदु परिषद
     सनातन संस्था ही आर्य सनातन हिंदु धर्माचे रक्षण करणारी संस्था आहे. पौराणिक परंपरा जोपासून हिंदूंना धर्मशिक्षण देणारी आणि संस्कारित तरुण निर्माण करणारी संस्था आहे. आध्यात्मिक साधनेद्वारे स्वतःची उन्नती कशी करावी, हे शिकवणारी संस्था आहे. तरुणांची आध्यात्मिक प्रगती घडवून आणून त्यांना संस्कारित करणारी संस्था आहे. व्यसनापासून परावृत्त करणारी संस्था आहे. वैयक्तिक आणि सामाजिक उन्नयन करणारी संस्था आहे. हिंदु जनजागृती समिती समस्त हिंदूंना जातपात विसरून ऐक्याचा संदेश देणारी संघटना आहे. वैचारिक पातळीवर काम करणारी समाजात सौहाद्र निर्माण करणारी संस्था आहे. अशी संस्था विचारांची लढाई करते. एखाद्या विचाराचा आतंकवादाने सामना करणारी संस्था आहे, असे मला वाटत नाही.
     सध्या अनेक निधर्मी लोक सनातनला अपकीर्त करण्यासाठी करण्यासाठी खोटेनाटे आरोप करत आहेत. दोषी असतील, तर जरूर शिक्षा द्या; परंतु फारसा पुरावा नसतांना उगीचच न्यायालयीन दिरंगाई करणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीवरील दोषारोप सिद्ध न होता संस्थेला अपकीर्त करणे आणि संस्थेला अतिरेकी ठरवून बंदीची मागणी करणे अन्यायकारक आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे. त्यामुळे बंदीचा प्रस्ताव ठेवू नये आणि विधानसभेतही तो संमत करू करू नये.

काश्मिरी हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये वसवण्यासाठी कर्नूल (आंध्रप्रदेश) येथे झालेल्या सभेच्या माध्यमातून हिंदूसंघटनाचा आविष्कार !

व्यासपिठावर उपस्थित १. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश
 शिंदे, २. यूथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल, ३. शिवसेनेचे
 तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्यप्रमुख श्री. टी.एन्. मुरारी, ४. श्रीराम सेनेचे 
संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ नेते

सविस्तर वृत्तांत उद्या वाचा

बलात्काराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पॉर्न संकेतस्थळावर बंदी आणा ! - राष्ट्रसंत प.पू. भैय्यूजी महाराज

  • संतांना अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून कारवाई का करत नाही ?
  • कोपर्डी (जिल्हा नगर) येथील बलात्काराचे प्रकरण
        नगर, २४ जुलै - पॉर्न संकेतस्थळामुळे समाज बिघडत चालला आहे. युवावर्गामध्ये विकृतीचे प्रमाण वाढत असून त्यांना समुपदेशनाची आवश्यकता आहे. बलात्कारासह लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशात पॉर्न संकेतस्थळांवर पूर्णतः बंदी आणली पाहिजे. त्यासाठी कायद्यांमध्ये आवश्यक ते पालट करणेही आवश्यक आहे, अशी मागणी इंदूरचे राष्ट्रसंत प.पू. भैय्यूजी महाराज यांनी नगर जिल्ह्यातील कोपर्डी या गावी वार्ताहरांशी बोलतांना केली. राष्ट्र्रसंत प.पू. भैय्यूजी महाराज आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २२ जुलैला सायंकाळी कोपर्डी येथे बलात्कारपीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी अशा अप्रिय घटनांमध्ये समाविष्ट असणार्‍यांविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाईची आवश्यकता प्रतिपादित केली. या वेळी हिवरे बाजारचे पोपटराव पवार, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.

भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशनने आयोजित फेरीस मोठा प्रतिसाद !

फेरीसाठी जमलेले राष्ट्रप्रेमी आणि शालेय विद्यार्थी

     कोल्हापूर, २४ जुलै (वार्ता.) - काश्मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार द्या, आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करा, तसेच देशातील सर्व जनता भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे, हा संदेश देण्यासाठी वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशन यांच्या वतीने २३ जुलै या दिवशी कोल्हापूर शहरात फेरी काढण्यात आली. या फेरीस नागरिक, विविध संघटना, विद्यार्थी यांचा मोठा प्रतिसाद लाभला. ही फेरी सकाळी १० वाजता प्रायव्हेट हायस्कूल येथून चालू झाली. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन बिंदू चौक येथे समारोप झाला.

मलेशियामध्ये इसिसच्या १४ आतंकवाद्यांना अटक

जगातील सर्व देश एकत्र येऊन 
इसिसच्या विरोधात आघाडी कधी उघडणार ?
       कुआलालंपूर - इसिसशी संबंधित असणार्‍या १४ जणांना मलेशिया पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. सिनागोर, पेराक, केदाह, पैनांग आणि सबाह या शहरांत १४ ते २० जुलै या कालावधीत छापे टाकून यांना अटक करण्यात आली. पोलीस महानिरीक्षक खलिद अबू बकर यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्यांपैकी १२ जण एकाच गटाचे असून मलेशियात आक्रमण करण्यासाठी ते महंमद वांडी आणि महंमद जेडी यांच्या सूचनांनुसार कारवाया करत होते. त्यातील एकाने बॉम्ब कसा बनवायचा याविषयीची माहिती अन्य आतंकवाद्यांकडून घेतल्याची स्वीकृती दिली आहे. इसिसच्या एका जुन्या ४९ वर्षीय सदस्याला अटक करण्यात आली आहे. तो सिक आणि केदाह येथे गोपनीय चर्चा करून युवकांची इसिसमध्ये भरती करत होता.

सामाजिक आरोग्य चांगले रहाण्यासाठी यम-नियमांचे पालन करणे आवश्यक ! - डॉ. ह.वि. सरदेसाई

     पुणे - शारीरिक-मानसिक आरोग्याप्रमाणे सामाजिक आरोग्यही चांगले रहाणे आवश्यक असते. सध्याच्या समाजाची स्थिती अशक्त झाली आहे. ती चांगली रहाण्यासाठी यम-नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. ह.वि. सरदेसाई यांनी केले. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने या वर्षीचा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार डॉ. ह.वि. सरदेसाई यांना देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
     ते पुढे म्हणाले की, जेव्हा नियमांच्या पालनासाठी कायदा करावा लागतो, तेव्हा तेथे नीतीचा अभाव असतो; परंतु नीतीची तत्त्वेही कोणीतरी माणसाच्या जीवनात पेरावी लागतात. (त्यासाठीच जनतेला धर्मशिक्षण आणि सुसंस्कार यांची पुंजी मिळणे आवश्यक आहे. - संपादक) आपल्याप्रमाणे इतरांचा विचार केल्यानेही सामाजिक आरोग्य चांगले रहाते प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, श्री. रमेश राठीवडेकर, सौ. रसिका राठीवडेकर आणि प्राचार्य भोसले यांच्या स्नुषा सौ. भोसले, भाई वैद्य आदी या वेळी उपस्थित होते.

पुणे येथे खोट्या नोटा अधिकोषात भरणारा धर्मांध गजाआड

धर्मांध गुन्हेगारीत पुढे !
     पुणे - येथील सिंहगड रस्त्यावर असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेत खोट्या नोटांचा भरणा करणारा शहाजमल नूरशाद शेख याला अधिकोष कर्मचार्‍यांनी पकडले. या प्रकरणी शेख याच्या विरोधात अधिकोषाच्या शाखा वरिष्ठ व्यवस्थापक अदिती येरणडे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शेख याने खोट्या नोटा कोठून आणल्या, याचा तपास करण्यात येत आहे.

श्रीसाईचरणी गुरुपौर्णिमा उत्सवकाळात ३ कोटी ५५ लक्ष रुपयांचे दान

भक्तांनी अर्पण केलेल्या निधीचा विनियोग संस्थानने योग्य प्रकारे करावा, ही अपेक्षा !
     शिर्डी - श्रीसाईचरणी गुरुपौर्णिमेच्या उत्सव काळात देश-विदेशातील साईभक्तांनी ३ कोटी ५५ लक्ष ४१ सहस्र रुपयांचे दान केले आहे. १८ ते २१ जुलै हे ४ दिवस चालू असलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या काळात लक्षावधी साईभक्तांनी साईबाबांचे दर्शन घेतले. त्या वेळी दक्षिणापेटीत रोख २ कोटी ६१ लक्ष ४६ सहस्र, देणगी कक्षावर ८३ लक्ष ४६ सहस्र रुपये, ९ लक्ष रुपयांचे ३२५ ग्रॅम सोने, ४ किलो ४९३ ग्रॅम चांदी आणि विदेशातून १ लक्ष ४९ सहस्र रुपये भाविकांनी अर्पण केले आहेत. तसेच प्रसादाच्या लाडू विक्रीतून संस्थानला २१ लक्ष रुपये मिळाले आहेत.

सनातन संस्थेचा बळी देण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करू ! - अंकुश गोडसे, अध्यक्ष गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्था, सांगली

सनातन संस्थेवरील 
संभाव्य बंदीच्या संदर्भात प्रतिक्रिया
        मी सनातन संस्थेचा साधक नाही, तरीसुद्धा एक भारतीय नागरिक या नात्याने मला असे वाटते की, भारत सरकारने सनातन संस्थेवर बंदी आणण्यापेक्षा थोडे उत्तरेकडे लक्ष द्यावे. संपूर्ण काश्मीर हिरवा गार पडला आहे, तसेच भारतविरोधी-हिंदूविरोधी घोषणांनी दणाणून जात आहे. आज कितीतरी भारतीय सैनिक पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून मारले जात आहेत. अशात भारत शासनाने आपला वेळ आणि शक्ती हिंदूंना धर्मशिक्षण देणार्‍या, दैवी कार्य करणार्‍या मूलभूत भारतीय सनातन हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍या सनातन संस्थेचा बळी देण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करू !

(म्हणे) गायींचे सर्वेक्षण करून भगवे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही !

जिहादी आतंकवाद सहन करणार नाही, असे ममता बॅनर्जी कधी म्हणतात का ?
तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता (बानो) बॅनर्जी यांची दर्पोक्ती 
     कोलकाता - प्रत्येक घरात किती गायी आहेत, याचे सर्वेक्षण करण्याचे निमित्त करून बंगाल राज्याचे भगवे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न हिंदु जागरण मंच आणि गोरक्षादल करत आहे. त्यामागे काही राजकीय पक्षांचाही हात आहे. हे प्रयत्न मी खपवून घेणार नाही, अशी दर्पोक्ती तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता (बानो) बॅनर्जी यांनी केली आहे. येथे आयोजित एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

पोकेमॉन गो खेळावर दक्षता घेण्याची विधान परिषदेत मागणी !

अशा निरर्थक आणि जीवघेण्या पाश्‍चात्त्य खेळांवर बंदीच हवी !
    मुंबई, २४ जुलै (विशेष प्रतिनिधी) - भ्रमणभाषवर पोकेमॉन गो हा ऑनलाईन खेळ खेळतांना भान हरपल्यामुळे अनेक जणांनी त्यांचा जीव धोक्यात घातल्याची आणि काही जणांचे जीव गेल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य पहाता पोकेमॉन गो या खेळावर दक्षता घेण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात याव्यात, अशी मागणी नीलम गोर्‍हे यांनी औचित्याचा सूत्राच्या माध्यमातून २२ जुलै या दिवशी विधान परिषदेत केली.

चंद्रपूर येथे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

   
निवेदन स्वीकारतांना उपजिल्हाधिकारी
     चंद्रपूर येथे उपजिल्हाधिकारी अजय रामटेके यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सनातनचे साधक आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. झाकीर नाईक यांच्याविरुद्ध सुन्नी फेडरेशनने ३ वर्षांपूर्वीच प्रविष्ट केलेल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही !

तक्रारीची दखल न घेणार्‍या संबंधित पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे !
      चेन्नई - सुन्नी फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख शौकत शर्माह यांनी चेन्नई पोलीस आयुक्तांकडे वर्ष २०१३ मध्ये डॉ. झाकीर नाईक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती; मात्र पोलिसांनी त्या तक्रारीची काहीच दखल न घेतल्याने शौकत शर्माह आता न्यायालयाचे द्वार ठोठावणार आहेत.
शौकत शर्माह त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, 
१. ज्या पीस टीव्हीच्या माध्यमातून डॉ. झाकीर इस्लामी कट्टरवाद पसरवत आहेत त्या वाहिनीच्या स्थापनेमागे डॉ. इसरार अहमद यांचा सिंहाचा वाट आहे. 
२. डॉ. इसरार अहमद हे पाकिस्तानातील तंझीम-इ-इस्लाम या कट्टर जिहादी संघटनेचे संस्थापक आहेत.

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन आणि निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

    
निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना कार्यकर्ते
     वर्धा - येथे २२ जुलै या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन झाले. या वेळी कैराना (उत्तरप्रदेश) येथील धर्मांधांच्या अत्याचारांमुळे विस्थापित हिंदु कुटुंबियांचे तात्काळ पुनर्वसन करा आणि त्यांना पोलीस संरक्षण द्या, तसेच सनातनच्या विरोधात नियमबाह्य आंदोलने करून सामाजिक तणाव निर्माण करणार्‍या संघटना आणि नेते यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वैभव नावडकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

केरळमध्ये धर्मांधाकडून ८ विवाह रचून सर्व महिलांची आर्थिक फसवणूक आणि पलायन

धर्मांधांकडून महिलांवर अन्याय होतो, तेव्हा तथाकथित स्त्रीवादी संघटना कुठे जातात ? 
त्यांना केवळ प्रसिद्धीमध्येच रस असतो, असे कोणी म्हटल्यास चूक काय ?
     मदुराई (केरळ) - काजीर बाशा याने पुदूर येथील २८ वर्षीय बानू नावाच्या घटस्फोटीत मुसलमान महिलेशी विवाह करून एका मासात तिचे ३ लक्ष ५० सहस्र लक्ष रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याची तक्रार पिडिते मदुराई शहर पोलिस ठाण्यात नोंदवली. या तक्रारीनंतर बाशा याने यापूर्वीही अशाच प्रकारे चेन्नई आणि दिंडीगुल येथील ७ महिलांशी विवाह करून त्यांच्याकडूनही पैसे आणि दागिने घेऊन त्यांना फसवल्याचे उघडकीस आले आहे.

देशात दंगलींमध्ये महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर !

नुसती आकडेवारी गोळा करण्याऐवजी देशात दंगली करणार्‍या 
धर्मांधांवर कठोर कारवाई करणारे गृहमंत्रालय हवे !
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालातील आकडेवारी !
     नवी देहली - केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार उत्तरप्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जातीय आणि धार्मिक दंगली झाल्या आहेत. वर्ष २०१५ मध्ये उत्तरप्रदेशात १५५ दंगलींमध्ये २२ जणांचा मृत्यू आणि ४१९ जण घायाळ झाले, तर महाराष्ट्र्रामध्ये १०५ दंगलींमध्ये १४ जणांचा मृत्यू आणि ३२३ जण घायाळ झाले. भाजपचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी देशातील दंगलींविषयी लोकसभेत विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी ही आकडेवारी दिली. 
    यावर्षी मे २०१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार उत्तरप्रदेशात दंगलीच्या ६१ घटना घडल्या, तर राज्यात ४० घटनांची नोंद झाली. उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये दंगलींचे प्रमाण अधिक आहे. तुलनेने आसाम, ओडिशा, आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू ही राज्ये शांत आहेत. एकेकाळी संवेदनशील असलेल्या पंजाबमध्ये गेल्या ३ वर्षांत एकही दंगल झालेली नाही.

आक्रमण करतांना नक्षलवाद्यांकडून हॉलिवूडच्या चित्रपटांतील युद्ध करण्याच्या पद्धतींचा वापर !

काँग्रेसने नक्षलवाद्यांचा बीमोड केला नाही. त्यामुळे या समस्येने आता उग्र रूप धारण केले आहे. 
केंद्रातील आताच्या सरकारने त्यांचा बीमोड करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, 
अशीच जनतेची इच्छा आहे !
    पाटलीपुत्र (बिहार) - काही दिवसांपूर्वी बिहारच्या औरंगाबाद-गया या सीमेवर नक्षलवाद्यांनी अचानक केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा तुकडीवर आक्रमण केले. यामध्ये दहा सैनिक हुतात्मा झाले. या वेळी नक्षलवाद्यांनी विदेशी शस्त्रांसह रॉकेट लॉन्चरचाही वापर केला होता. प्रतिवर्षी वाढत चाललेल्या आक्रमणांच्या संदर्भात सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना काढलेली नाही. त्यामुळे गनिमी काव्याने केलेल्या या आक्रमणांमध्ये अनेक लोकांचा जीव जातो.

फलक प्रसिद्धीकरता

शिवसेनेप्रमाणे सर्व हिंदु संघटनांनी हिंदु राष्ट्राचा पुरस्कार करायला हवा !
     आपल्या देशाला एक काहीतरी मार्ग आता स्वीकारावाच लागेल आणि हा मार्ग म्हणजे, या देशाला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्याव्यतिरिक्त दुसरातरी पर्याय नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Bharatko Hindu Rashtra ghoshit karna hi ekmatra paryay ! - Uddhav Thackeray, Shivsena
     Hinduo, Is karyake liye sab bhed chhod sangthit ho jaye !
जागो !
भारत को हिन्दू राष्ट्र घोषित करना ही एकमात्र पर्याय ! उद्धव ठाकरे, शिवसेना
     हिन्दुओ, इस कार्य के लिए सब भेद छोड संगठित हो जाएं !

कर्नाटक आणि गुजरात राज्यांमध्ये भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !

     रामनाथी - सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती तसेच अन्य आध्यात्मिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक राज्यातील कुणिगल, चिक्कमंगळुरू, शिवमोग्गा, भटकळ, उडुपी, मंगळुरू, हुब्बळ्ळी, गदग, बादामी आदी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावरील केंद्रांमध्ये तसेच गुजरातमधील वापी, उमरगाव, नवसारी आणि सुरत या ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात प्रथम प.पू भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन आणि आरती करून गुरुपूजन करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. त्यानंतर सनातनचे साधक, हिंदु धर्माभिमानी, धर्माभिमानी अधिवक्ते यांनी उपस्थित जिज्ञासूंना राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांनी सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात संघटित लढा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या विषयावर प्रेरक मार्गदर्शन केले, तर समितीच्या रणरागिणी शाखेच्या वक्त्यांनी स्वसंरक्षणविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींनी दाखवलेले स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले.
क्षणचित्र : प्रोजेक्टरवर सप्तर्षि जीवनाडी यांनी केलेले राष्ट्र आणि धर्म विषयक मार्गदर्शन तसेच सनातनवर बंदीचा वार : पुन: एकवार हे लघुपट दाखवण्यात आले.

इंदूर (निझामाबाद, तेलंगण) येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन !

     इंदूर - येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर २० जुलैला आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे कैराना (उत्तरप्रदेश) येथील विस्थापित हिंदूंचे पुन्हा तेथेच पुनर्वसन करण्याची मागणी आणि सनातन संस्थेवरील बंदी घालण्याच्या मागणीचा विरोध करण्यात आला. या आंदोलनात शिवसेना, तेलंगना डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, लष्करे हिंदू, श्रीराम युवा सेना. तेलंगण विद्यार्थी परिषद, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.एलमक्करा (केरळ) येथे रामायण मासम्मध्ये हिंदु जनजागृती समितीकडून प्रवचन

     कोची (केरळ) - केरळमध्ये सध्या चालू असलेल्या रामायण मासम्च्या निमित्ताने ठिकठिकाणी प्रतिदिन (१मास) रामायणाचे वाचन होते. अशाच एका ठिकाणी एर्नाकुलम् जिल्ह्यातील एलमक्करा येथे एका निवासस्थानी हिंदु जनजागृति समितीच्या वतीने कु. अदिती सुखटणकर यांनी समाज, राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची बिकट स्थिती आणि त्याचे मूळ कारण म्हणजे अधर्म याविषयी माहिती दिली.
     या वेळी कु. सुखटणकर म्हणाल्या, आज भारतीय हे पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करतात, धर्म मानत नाहीत आणि पैशाच्या पाठी असल्यामुळेच आपल्या राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती खालवत आहे. त्यामुळेच धर्मांतर, लव जिहाद अशा समस्या वाढल्या आहेत. हे रोखण्यासाठी सर्व हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे आणि धर्माचरण करणे अत्यावश्यक आहे. या प्रवचनाचा लाभ ७० जिज्ञासूंनी घेतला.

मुसलमानांचे युरोपमध्ये स्थायिक होणे धोकादायक असल्याचे युरोपीय लोकांचे मत !

मुसलमानांमुळे समाजाला धोका आहे, असे परखडपणे सांगणार्‍या युरोपीय 
नेत्यांकडून भारतातील तथाकथित निधर्मीवादी काही शिकतील का ?
    न्यूयॉर्क - नेदरलॅन्ड या युरोपीय देशाचे राजकारणी गीर्ट विल्डर्स यांचा लोकांचा इस्लामवर विश्‍वास : एक गंभीर धोका या मथळ्याखाली एक लेख ब्रेटबर्ट डॉट कॉम या संकेतस्थळावर प्रकाशित झाला आहे. ते म्हणतात, हंगरी या युरोपीय देशाने प्रसिद्ध केलेल्या एका जनमत अहवालानुसार ७० टक्के युरोपीय नागरिकांना मुसलमानांचे देशांतर करून युरोपमध्ये स्थायिक होणे धोकादायक वाटते. पश्‍चिम युरोपमध्ये इस्लामची जलदगतीने वाढ होत आहे. अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार फ्रान्समध्ये मुसलमानांची लोकसंख्या ७.५ टक्के, नेदरलॅन्डमध्ये ६ टक्के, जर्मनीमध्ये ५.८ टक्के, ऑस्ट्रियामध्ये ५.४ टक्के, इंग्लंडमध्ये ४.८ टक्के, तर स्वीडनमध्ये ४.६ टक्के एवढी आहे. खरा आकडा यापेक्षाही अधिक आहे. वर्ष २०१५ मध्ये १० लाखांहून अधिक मुसलमान हे शरणार्थींच्या रूपात युरोपमधील विविध देशांमध्ये स्थायिक होण्यापूर्वीची ही आकडेवारी आहे.

भारताकडून ३ चिनी पत्रकारांची हकालपट्टी

      नवी देहली - शिन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेसाठी भारतामध्ये काम करणार्‍या ३ वरिष्ठ चिनी पत्रकारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. देहलीतील शिन्हुआचे शाखाप्रमुख (ब्युरो चीफ) वु किआंग आणि मुंबईमधील लु तांग आणि शे योंगगांग यांना शासनाने ३१ जुलैपर्यंत देश सोडण्याची चेतावणी दिली आहे. हे तीन पत्रकार वेगवेगळी फसवी नावे घेऊन देशातील प्रवेशावर निर्बंध असलेल्या विविध संवेदनशील ठिकाणांस भेट देत असल्याचे गुप्तचर खात्याने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

स्त्रियांच्या ऋतुकालातील विटाळामुळे होणार्‍या दुष्परिणामांविषयी धर्मशास्त्रातील सूत्रे जाणून न घेता स्त्री-पुरुष समानतेचा डांगोरा पिटणारे पुरोगामी आणि तृप्ती देसाई यांचा स्टंट !

प.पू. पांडे महाराज
      सध्या भारतीय घटनेतील स्त्री-पुरुष समानतेच्या सूत्राचा आधार घेऊन तृप्ती देसाईं यांच्यासारख्या तथाकथित पुरोगामी महिला या धर्माचरणाचा गंधही नसलेल्या हिंदू पोलिसांच्या साहाय्याने बलपूर्वक देवळांच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचे नाट्य करत आहेत. याविषयी धर्मशास्त्रातील सूत्रांचा आधार घेऊन प.पू. परशराम पांडे महाराज यांनी केलेले मार्गदर्शन पुढे देत आहोत.
१. भगवंताने स्त्री आणि पुरुष यांच्यातील प्राकृतिक भेदानुसार केलेले 
नियोजन जाणून तसे वागण्यातच मानवाचे हित असणे
     भगवंताने मूलतः स्त्री आणि पुरुष यांच्यात भेद केला आहे. त्याप्रमाणे त्यांचे नियोजन केले आहे. हेे नियोजन जाणून घेऊन त्याप्रमाणे वागल्यासच मानवाचे हित असते. हे न जाणता केवळ हट्टीपणाने वागल्याने होणार्‍या दुष्परिणामाला सामोरे जावे लागते. एवढेच नव्हे, तर हिंदु धर्मशास्त्रानुसार अशा पापाचरणामुळे मृत्यूनंतर यमयातनाही भोगाव्या लागू शकतात.

गरुड पुराणात स्त्रियांचा ऋतुकाळ याविषयी दिलेली सूत्रे

     स्त्रियांचा ऋतुकाळ ४ दिवसांचा असतो. त्यातील प्रथम ३ दिवस स्त्री अशुद्ध असते. या काळातील स्त्रीला धर्मशास्त्रात पहिल्या दिवशी हीन स्त्री, दुसर्‍या दिवशी ब्रह्महत्या करणारी आणि तिसर्‍या दिवशी रजका अशी विशेषणे दिली आहेत. (ही विशेषणे स्त्रीला न्यून किंवा हीन लेखण्यासाठी नसून तिची त्या कालावधीतील तशा प्रकारची शारीरिक स्थिती लक्षात यावी, यासाठी आहेत. ऋतुकाळात स्त्रीमधील रज-तमाच्या प्रभावामुळे तिच्या देहातील अशुद्धीची स्थिती किती गंभीर असते, हे लक्षात येण्यासाठी ही विशेषणे आहेत.) (संदर्भ : गरुडपुराण, अध्याय १९, श्‍लोक ७-८)

लेखक पीटर मॅगलॉगिलीन यांच्याकडून इझी मीट पुस्तकाद्वारे युरोपमधील लव्ह जिहादच्या विरोधात जागृती !

      लव्ह जिहाद या धर्मांधांच्या राक्षसाने केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण युरोपमध्ये धुमाकूळ घातला आहे. या प्रकारात पाकिस्तानहून आलेल्या विस्थापितांचा फार मोठा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. याविरुद्ध जागृती करण्यासाठी मॅकलोलीन नावाच्या लेखकाने इझी मीट हे पुस्तक लिहून या प्रश्‍नाविषयी सविस्तर ऊहापोह केला आहे. लव्ह जिहादला इंग्लंडमध्ये सेक्स ग्रूमिंग म्हटले जाते, तर नेदरलंडमध्ये अशा धर्मांध युवकांना लव्हर बॉईज् म्हणून ओळखले जाते.
युरोपमधील लव्ह जिहादचे स्वरूप !
     सेक्स ग्रूमिंग या प्रकारात धर्मांध युवक शाळेत शिकणार्‍या १० ते १४ वर्षे वयाच्या मुलींचा पाठलाग करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. त्यांच्याशी गोड बोलून आणि त्यांना मौल्यवान भेटवस्तू देतात. काही दिवसांनंतर याच मुलींची ओळख त्यांच्या मित्रांशी करून दिली जाते. हा सर्व प्रकार खरेदी-विक्री स्वरूपात होतो.

संवेदनशील शहरे, असंवेदनशील यंत्रणा

     जगावर इस्लामिक सत्ता स्थापन करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन इसिसचे आतंकवादी रक्तरंजित इतिहास घडवत आहेत. इसिसकडून घडवण्यात येणार्‍या नरसंहारात सहभागी होऊ इच्छिणार्‍या भारतातील धर्मांधांची संख्याही कमी नाही. नुकतेच पुण्यातील कोंढवा भागातील कौसरबाग परिसरातून इसिसशी संपर्कात असल्याच्या संशयावरून ५ युवकांना आतंकवादविरोधी पथकाने कह्यात घेतले. याआधीही पुण्यातील एक महाविद्यालयीन युवती इसिसकडे आकर्षित झाली होती. पुढे म्हणे ती समुपदेशनानंतर (?) योग्य वळणावर आली. केवळ पुणेच नाही, तर कल्याण, बेंगळुरू यांसारख्या शहरांतून, तसेच केरळ राज्यांतून अनेक धर्मांध गायब झाल्याच्या, तसेच काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे फडकवल्याची वृत्ते वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असतात. पुण्यात ज्या भागातून इसिसच्या समर्थकांना पोलिसांनी कह्यात घेतले, त्याच परिसरात गेल्या वर्षी एम्आयएम्चे नेते असदुद्दिन ओवैसी यांची सभा झाली होती. एखाद्या संवेदनशील परिसरात अशी सभा होणे आणि पुढे त्याच भागात इसिसचे समर्थक निर्माण होणे, याला काय म्हणायचे ?

डॉ. झाकीर नाईक यांची पीस (शांती) वाहिनी म्हणजे स्मशान शांतीची वाहिनी !

     बांगलादेशात डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस टीव्हीच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे. भारतात यापूर्वीपासूनच बंदी आहे; मात्र त्याची कार्यवाही होत नसल्याने देशात केबल चालकांकडून ती दाखवण्यात येते आणि ती उघडपणे पाहिली जाते.

गांधीहत्या आणि राहुल !

श्री. भाऊ तोरसेकर
१. सर्वोच्च न्यायालयानेच राहुल गांधी यांचे कान उपटले !
     अरुणाचल प्रदेशमधील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धडा शिकवला, लोकशाही शिकवली, अशी मुक्ताफळे राहुल गांधी यांनी उधळली होती; पण त्यातला खरा धडा त्यांच्यासह त्यांच्याच मातोश्रींसाठी होता, हे त्यांच्या पाठिराख्यांच्याही लक्षात आलेले नाही. किंबहुना त्यामुळेच काँग्रेस अशा दुर्दशेला पोहोचली आहे; पण दुर्दशेलाच प्रगती समजून चालणार्‍यांना कोण शिकवणार ? राहुल यांचे ते शब्द हवेत विरून गेले नाहीत, इतक्यात सर्वोच्च न्यायालयानेच त्यांचे कान उपटले आहेत. गांधींचे मारेकरी असा एक सरसकट आरोप रा.स्व. संघावर होत असतो.

समिती स्थापन करायची होती, तर इतके महिने का केली नाही ?

     गोवा राज्यातील १३० इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना देण्यात येत असलेले अनुदान आणि त्यांची आर्थिक बाजू यांसंबंधी अभ्यास करून राज्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी शिक्षणतज्ञ भास्कर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यीय समिती स्थापन करू.
- मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, गोवा
     ही समिती तोडगा काढणार आहे कि भाषाप्रेमींचा रोष थंड करण्यासाठी वेळकाढूपणा करण्याचा तो एक स्टंट आहे, असा प्रश्‍न काही भाषाप्रेमींचा आहे !

आश्रमातील शिलाईच्या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

शिवणकामाचे कौशल्य असणारे साधक, वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना गुरुसेवेची अमूल्य संधी !
     सनातनच्या विविध आश्रमांमध्ये पडदे, नेटलॉन, पायपुसणी, गोधड्या, आसंद्यांसाठी (खुर्च्यांसाठी) कव्हर आदी शिवण्याची सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या समवेतच आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या साधकांसाठी सात्त्विक पद्धतीचे पोशाख शिवू इच्छिणार्‍या साधकांचीही आवश्यकता आहे.
     वरील सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांनी रामनाथी आश्रमात सौ. क्षमा राणे यांच्याशी ०८४५१००६२५८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. इच्छुक असणारे आश्रमात राहून या सेवा करू शकतात किंवा काही कालावधीसाठी आश्रमात राहून नंतर घरी जाऊन सेवा चालू ठेवू शकतात.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

तक्रार करीपर्यंत पोलीस थांबतात कशाला ? स्वत:हून तपास का करत नाहीत ?

     डॉ. झाकीर नाईक यांच्या चिथावणीखोर आणि धर्मांधांना जिहादसाठी प्रवृत्त करणार्‍या भाषणांच्या विरोधात कोणीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे मुंबई पोलीस कारवाईसाठी कायदेतज्ञांचे साहाय्य घेत आहेत.
डॉ. झाकीर नाईक यांनी आतापर्यंत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यातील लाईव्ह हिंदुस्थान डॉट कॉम आणि महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम या संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या निवडक विधानांपैकी 
प्रतिदिन एक विधान येथे देत आहोत.
समलिंगींना ठार मारले पाहिजे, असे कुराण सांगते.
     हिंदूंनो, आपल्यासमोर गांधी, नेहरू आणि सर्वपक्षीय राजकारणी यांचा आदर्श नको, तर धर्म अन् राष्ट्र यांसाठी त्याग केलेले छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंद सिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी धर्माभिमान्यांचा आदर्श हवा !

देवतेची मूर्ती संगमरवरापेक्षा पाषाणी किंवा दगडी का असावी, याचे महर्षींनी नाडीवाचनातून विशद केलेले महत्त्व आणि अभिषेकाचा भाविकांना होणारा लाभ

महर्षींची शिकवण आणि कार्य !
      १५.७.२०१६ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या नाडीवाचन क्रमांक ८८मध्ये मूर्तीशास्त्राविषयी महर्षींनी उपस्थित केलेले एक सूत्र पुढीलप्रमाणे आहे - 
१. संगमरवरी मूर्तीपेक्षा पाषाणी मूर्ती असावी; कारण ही मूर्ती 
संगमरवरी मूर्तीपेक्षा अधिक प्रमाणात अभिषेकाचे द्रव्य शोषून 
घेऊ शकते, असे महर्षींनी सांगणे 
     महर्षि म्हणतात, उत्तरप्रदेशात अनेक मंदिरांत संगमरवरी मूर्ती आहेत. या मूर्ती अभिषेकातील द्रव्य आत शोषून घेऊ शकत नाहीत. परिणामी येथे अभिषेकामुळे जागृत होणारे मूर्तीतील देवत्व दक्षिण भारतातील मूर्तींना केलेल्या अभिषेकाच्या तुलनेत अल्प असते. मूर्तीवर अभिषेक होणे अत्यंत आवश्यक असते. अभिषेकातील द्रव्यांमुळे मूर्तीतील देवतेच्या तत्त्वाचा भाविकांना लाभ होण्यास साहाय्य होते. दक्षिणेतील मूर्ती पाषाणी असल्याने अभिषेकाचे द्रव्य आतपर्यंत शोषले जाते. परिणामी या मूर्ती अधिक जागृत असतात. या मूर्तींवर अभिषेकाच्या माध्यमातून कित्येक वर्षांचे संस्कार झालेले आहेत. त्यातूनही भाविकांना चैतन्य मिळते. अभिषेक होत असतांना तेथे काही संत-महात्मेही उपस्थित असतात. त्यांचाही भक्तांना आशीर्वाद मिळण्यास साहाय्य होते. या मूर्तीसमोर कित्येक भक्तांनी उपासनाही केलेली असल्याने मंदिराच्या सात्त्विकतेमध्ये आणखी वाढ होते.

प.पू. गुरुदेव अन् प.पू. दास महाराज यांच्या कृपेमुळे अनेक वर्षांपासून होणारे त्रास उणावून सकारात्मक पालट अनुभवणारे श्री. संतोष गरूड आणि त्यांचे कुटुंबीय !

श्री. संतोष गरूड
       संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाकडे मुक्ती, धन किंवा संपत्ती यांपैकी काहीही न मागता केवळ संत संग देई सदा, असे मागणे मागितले होते. ज्ञानेश्‍वर माऊलींनीही संतांचे संगती मनोमार्ग गती, असे म्हटले आहे. या पंक्तींची अनुभूती प.पू. गुरुदेवांनी आम्हाला (गरूड कुटुंबाला) दिली. व्यक्तीचे मन हेच त्याची उन्नती किंवा अधोगती यांचे कारण बनते; म्हणूनच रामदास स्वामींनी मनाच्या श्‍लोकांच्या माध्यमातून मनाला बोध केला आहे. मनाचा विकास होण्यासाठी संतांचा सत्संग महत्त्वाचा असतो. असाच सत्संग प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई (प.पू. दास महाराजांच्या धर्मपत्नी सौ. लक्ष्मी) या संतांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवांनी आम्हाला अचानक उपलब्ध करून दिला. त्यामुळे आमच्या कुटुंबात कसे आमूलाग्र पालट होत गेले, ते या लेखात मांडले आहेत. ते सर्व प.पू. गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो. 
- श्री. संतोष आनंदा गरूड, पर्वरी, गोवा.
१. श्री. संतोष गरूड आणि त्यांचे कुटुंबीय यांना 
होत असलेले त्रास आणि त्यावर केलेल्या उपाययोजना
सौ. समृद्धी गरूड
१ अ. तीन पिढ्यांपासून कुटुंबातील सदस्यांमध्ये काही समान दोष असणे आणि साधनेत असूनही त्यांवर मात न करू शकणे : तीन पिढ्यांपासून आमच्या कुटुंबात सदस्यांचे एकमेकांशी न पटणे, एकमेकांच्या वागण्याविषयी प्रतिक्रिया येणे, संभाषणाचा आरंभ नेहमी रागाने करणे, स्वतःच्या चुकीसाठी दुसर्‍यावर दोषारोप करणे, पूर्वग्रहदूषितपणाने वागणे, यांसारखे समान स्वभावदोष होते. या दोषांच्या परिणामस्वरूप पती-पत्नीचे न पटणे, घरात आल्यावर अशांत आणि अस्वस्थ वाटणे, चिडचिडेपणा उफाळून येणे, भांडणे होणे, तीव्र प्रतिक्रियांमुळे वाद विकोपाला जाणे, यांसारखे प्रकार सातत्याने व्हायचे. घरात थांबूच नये, असे वाटण्यासारखी स्थिती कधीकधी व्हायची. कुटुंबातील ५ जण पूर्णवेळ साधक असून दोघेजण नैमित्तिक सेवेत राहून साधना करतात; पण आमचे साधनेचे आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलनाचे प्रयत्न अल्प असल्याने आम्ही या दोषांवर मात करू शकलो नाही.

साधकांनो, अनावश्यक विचारांत वेळ घालवण्यापेक्षा साधनेच्या प्रयत्नांत सातत्य ठेवून आनंद मिळवा !

कु. तृप्ती गावडे
       सध्या आपत्काळाची तीव्रता वाढल्याने साधना करणे पुष्कळ महत्वाचे आहे. काही साधकांच्या मनाची शक्ती अनावश्यक विचारांमध्ये अधिक व्यय होते, असे लक्षात आले आहे. देवाने साधनेसाठी दिलेला अमूल्य दिवस अशा विचारांमध्ये वाया जातो. त्यापेक्षा साधकांनी साधनेचे प्रयत्न मनापासून आणि सातत्याने केल्यास त्यांच्याकडून देवाला अपेक्षित अशी कृती होऊन त्यांना आनंदप्राप्तीही होऊ शकते.
१. साधकांच्या मनामध्ये येणारे अनावश्यक विचार 
अ. काही साधकांना रामनाथी आश्रमात राहूनच सेवा करावी, असे वाटत असते. 
आ. काही जणांना वाटते, आपली घरी प्रक्रिया आणि प्रयत्न होत नाहीत. रामनाथीला गेल्यावर ते होतात. 
इ. काही साधकांचे एकमेकांशी पटत नाही.

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सेवेसाठी कर्नाटक राज्यातून आलेल्या साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !


श्री. कुशल गुरव
     १९ ते २५.६.२०१६ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे पार पडलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी गोवा येथील रामनाथी आश्रमात कर्नाटकामधून सेवेसाठी साधक आले होते. या साधकांच्या तोंडवळ्यावर सेवाभाव दिसून येत होता. अधिवेशनाच्या सेवेनिमित्त आपल्या सर्वांना जेथे भूतलावरचे वैकुंठच मानले जाते आणि साक्षात् भगवंताचा जेथे वास आहे, तेथे सेवा करण्याची संधी मिळाल्याविषयी ते सतत कृतज्ञताभावात रहायचे. ते सेवेतून पुष्कळ आनंदघेत होते. या साधकांमध्ये सेवेतील परिपूर्णता, शिकण्याची वृत्ती, कृतज्ञता आणि शरणागती हे गुण दिसून आले. या साधकांकडून शिकायला मिळालेली सामायिक सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथेे देत आहे.

केवळ साधकांचा नव्हे, तर प्रत्येक जिवाचा विचार करणारे प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
        सुमारे १४ - १५ वर्षांपूर्वी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाचे बांधकाम चालू असतांना प.पू. डॉक्टरांकडून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळत होत्या. प.पू. डॉक्टर केवळ साधकांचाच नाही, तर प्रत्येक जिवाचा पुष्कळ विचार करतात. या संदर्भातील काही उदाहरणे जवळून पहायला मिळाली. ती थोडक्यात येथे देत आहे.
१. प.पू. डॉक्टरांनी ठेकेदारांना मूल्य अल्प करायला लावून त्यांची हानी करायला नको, असे सांगणे : रामनाथी आश्रमाचे बांधकाम चालू करतांना वेगवेगळ्या कामांसाठी ठेकेदारांकडून व्ययाचे (खर्चाचे) अंदाजपत्रक (कोटेशन) घेण्यात आले होते. अल्प व्ययाचे अंदाजपत्रक दिलेल्या ठेकेदाराने आणखी अल्प दरात काम करून द्यावे, अशी मी अपेक्षा ठेवून होतो आणि तशी ठेकेदारांकडे बोलणीही चालू केली होती. ही गोष्ट प.पू. डॉक्टरांना समजल्यावर त्यांनी आम्हाला सांगितले, आपल्याला परवडत नसेल, तर आपण दुसरा ठेकेदार पाहू; पण आणखी मूल्य अल्प (बारगेन) करायला लावून आपण त्या ठेकेदाराची हानी करायला नको.

सनातनच्या सर्वव्यापी कार्याचा आत्मा असलेल्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सर्वत्र भ्रमंती करून संतांच्या कृपेला पात्र झालेल्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ सद्गुरुपदी विराजमान !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
सविस्तर वृत्त उद्या वाचा

हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे भव्य आंदोलन

विषय : साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू, श्री. धनंजय देसाई यांची अन्याय्यकारक अटक आणि सनातन संस्थेवरील संभाव्य बंदी यांना विरोध करणे, तसेच विदेशी शक्ती, हिंदुद्रोही माध्यमे आणि तथाकथित पुरोगाम्यांचे यासंदर्भातील दबावतंत्र हाणून पाडणे
दिनांक : २८ जुलै २०१६ वेळ : दुपारी २
स्थळ : आझाद मैदान, मुंबई
संपर्क : ९५५२४ ०२९९९
       समस्त हिंदू धर्माभिमानी, संप्रदाय, हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी संघटना आदी सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन हिंदु धर्मावरील होणार्‍या अन्यायाच्या विरोधात संघटित व्हावे !

शिंकतांना आणि खोकतांना तोंडासमोर रुमाल धरा !

साधकांना सूचना !
     सर्दी अथवा खोकला झाला असल्यास शिंकतांना आणि खोकतांना तोंडासमोर रुमाल धरला नसल्यास त्याचे जंतू हवेत पसरतात. त्यामुळे इतरांना त्याचे संक्रमण (इन्फेक्शन) होऊ शकते. सर्वांनी शिंकतांना आणि खोकतांना तोंडावर रुमाल धरावा. जांभई देतांनाही वरील काळजी घ्यावी. 
    आयुर्वेदामध्ये खोकणे, ढेकर देणे, शिंकणे, हसणे आणि जांभई देणे या कृती करतांना तोंडावर हात किंवा रुमाल धरावा, असे सांगितले आहे. यामागे तोंडातील दूषित वायूचा (आधुनिक शास्त्रानुसार यात जंतू असू शकतात.) इतरांना त्रास होऊ नये, तसेच रोग पसरू नये, हा उद्देश आहे. - वैद्य मेघराज पराडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जिवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हास्यास्पद साम्यवाद !
     जनतेचे शिक्षण, आरोग्य, आवडी-निवडी यांतही साम्यवादी साम्यवाद आणू शकत नाहीत, असे असतांना ते राष्ट्रात साम्यवाद काय आणणार ?
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावरील श्रद्धा !
परमेश्‍वरावरील श्रद्धा म्हणते, हे कार्य देवच करू शकतो. त्यापेक्षा अधिक प्रमाणातील श्रद्धा म्हणते, देव हे करीलच !; पण परमेश्‍वरावरील परमश्रद्धा म्हणते, हे काम झालेच आहे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


कॅसिनोचे राजकारण !

     गोवा हे छोटे राज्य आहे. येथील जनतेला भेडसावणारे प्रश्‍नही तुलनेने थोडेच आहेत. समस्यांची संख्या थोडीच असली, तरी गोमंतक ही देवभूमी असल्यामुळे येथे निर्माण होणार्‍या समस्या थेट सांस्कृतिक जीवनाला छेद देणार्‍या ठरतात. त्यात हे पर्यटन राज्य असल्यामुळे अधिकच अडचण निर्माण झाली आहे. भाषाप्रश्‍न, माध्यमप्रश्‍न, कॅसिनोप्रश्‍न आदी प्रश्‍न निवडणूक आणि राजकारण यांचे प्रश्‍न होऊन बसल्यामुळे त्यांचे घोंगडे गेल्या अनेक वर्षांपासून भिजत आहे. जो पक्ष सत्तास्थानी येतो, त्याला विरोधक विरोध करतात. दोघांच्याही भूमिका राजकीय असल्यामुळे आणि मुळात कुणाला येथील प्रश्‍न सोडवायचेच नसल्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झडूनही प्रश्‍न सुटत नाही. आज गोमंतकातील कॅसिनो प्रश्‍नाचेही असेच झाले आहे. पणजी येथील मांडवी नदीत सध्या पाच कॅसिनो जहाजे आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn