Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

    
     हे भगवान श्रीकृष्णा, प.पू. डॉक्टर, धर्मसंस्थापनेचे हे महान कार्य आपण आरंभले आहे. कलियुगातील ही महाभव्य उलथापालथ याची देही याची डोळा केवळ पहाण्याचेच नव्हे, तर या कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे आणि त्या माध्यमातून आमचा उद्धार होण्याचे भाग्य तुम्ही आमच्या पदरात टाकले आहे ! आमच्या आध्यात्मिक उन्नतीच्या माध्यमातून राष्ट्राची सर्वांगीण उन्नती होऊन ते धर्मनिष्ठांचे हिंदु राष्ट्र कसे सिद्ध होणार आहे, हे आम्हाला तुम्ही हळूहळू अनुभवण्यास देत आहात ! हे सर्वज्ञानी, सर्वव्यापी भगवंता, तूच कर्ता करविता असलेल्या या हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आम्हाला सहभागी करून तुझ्या चरणांपर्यंत पोहोचण्याची संधी देत असल्याविषयी आम्ही अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. कृतज्ञता !

चैतन्यदायी सनातन प्रभातची निर्मिती केल्याविषयी कोटी कोटी कृतज्ञता !

   
     हे गुरुदेवा, सनातन प्रभातसारखे नियतकालिक तुम्ही निर्माण केलेत, ते प्रतिदिन आमच्यापर्यंत तुमचा सत्संग मिळून आम्हाला सर्वांगाने घडवण्यासाठीच ! साधनेचे मार्गदर्शन करून गुर्वेच्छा आमच्यापर्यंत पोहोचवणारा हा सनातन प्रभातरूपी चैतन्यदायी धर्मग्रंथ आमच्यावर आणि समाजातील व्यक्तींवर आध्यात्मिक उपाय करून आमचे संरक्षककवच बनला आहे. सनातन प्रभातच्या माध्यमातून हिंदूंवरील अन्यायाची जाणीव निर्माण करून हिंदु राष्ट्र स्थापनेचा जयघोष करत राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी संघटित होण्याची प्रेरणा तुम्ही अखिल हिंदूंना देत आहात. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज प्रक्षेपित करून धर्मसंस्थापनेच्या कार्यातील सिंहाचा वाटा उचलणारे एकमेवाद्वितीय सनातन प्रभात साधक आणि हिंदूंसाठी आधुनिक काळातील भगवद्गीताच बनले आहे ! हे गुरुदेवा, यासाठी कोटी कोटी कृतज्ञ आहोत !

नरकाच्या वाटेवरून परत आणणार्‍या गुरूंविषयी कृतज्ञतेशिवाय दुसरा कोणता भाव असणार ?

     समजा मला तुम्ही गुरु मानले, मग तुम्ही जरी मला सोडले, तरी मी तुम्हाला कधीच टाकून देणार नाही. हे आश्‍वासन सर्वांपुरते आहे. वाघाच्या जबड्यात सापडलेले श्‍वापद ज्याप्रमाणे सोडले जात नाही, त्याचप्रमाणे ज्याच्यावर गुरूने कृपा केली, तो मोक्षाला जाईपर्यंत गुरु त्याला केव्हाही सोडून देत नाहीत. शिष्य जर नरकात जात असेल, तर भगवान (म्हणजे मी रमण) तुमच्या पाठोपाठ जाऊन तुम्हाला घेऊन परत येतील. गुरु आतही आहे आणि बाहेरही आहे. तुम्ही अंतर्मुुख व्हावे अशी परिस्थिती गुरु निर्माण करतो. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करीत असतो. मी मौनानेच उपदेश देतो तुम्ही मला अनन्य व्हा, म्हणजे मी तुमच्या मनाचा मनोनाशापर्यंत ताबा घेतो. तुम्ही स्वस्त रहा. भगवान (रमण) योग्य काय असेल ते करतील. - रमण महर्षी

सनातनची नाहक अपकीर्ती करणार्‍या ४ वृत्तपत्रांना सनातन संस्थेकडून कायदेशीर नोटीस !


     सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा समाजात धर्मप्रसार कार्याच्या संदर्भात असलेला नावलौकिक माहीत असतांनाही काही वृत्तपत्रांनी हेतुपुरस्सर (हेतूत:) मानहानी करण्याच्या हेतूने सनातन संस्थेची अपर्कीती करणारे वृत्त/लेख प्रसिद्ध केले. त्यामुळे संस्थेची अपरिमित हानी झाली आहे. यासाठी सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी सनातनचे अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्यामार्फत खालील वृत्तपत्रांचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांना १४ जुलै ते १७ जुलै २०१६ या कालावधीत मानहानी भरपाई मागणीची कायदेशीर नोटीस बजावली आहे.

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी कर्नुल (आंध्रप्रदेश) येथे आज जाहीर सभा

     मुंबई - वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवादाचे पहिले बळी काश्मिरी हिंदू ठरले. या आतंकवाद्यांनी हत्या, बलात्कार, धमक्या यांच्या बळावर काश्मीर खोर्‍यातून ४ लक्ष ५० सहस्र हिंदूंना हाकलून लावले. त्यामुळे गेली २६ वर्षे काश्मिरी हिंदू विस्थापितांचे दुर्दैवी जीवन जगत आहेत. या काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काश्मीर खोर्‍यातच पनून कश्मीर (आपले काश्मीर) या स्वायत्त भागाची निर्मिती करण्यासाठी विस्थापित काश्मिरी हिंदूंकडून २७ डिसेंबर २०१६ या दिवशी चलो जम्मू अभियान राबवण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर २४ जुलैला दुपारी ४ वाजता आंध्रप्रदेशातील कर्नुल येथील ललिता कलासमिती (टी.जी.व्ही. कलाक्षेत्रम्) सी. कॅम्प सेंटर, टी.टी.डी. कल्याण मंडपम्च्या समोर एका भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शिवसेनेचे तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्यप्रमुख श्री. टी.एन्. मुरारी, श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, यूथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे उपस्थित रहाणार आहेत.
आता नको पोकळ आश्‍वासन, त्वरित करा काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन !
विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या न्याय्य मागण्या !
१. काश्मिरी हिंदूंचे विस्थापन ही काही नैसर्गिक आपत्ती नव्हे, तर तो आतंकवादाचा दुष्परिणाम आहे. त्यामुळे केवळ अर्थसाहाय्य नको, तर पनून काश्मीर (कलम ३७० लागू नसलेला स्वतंत्र केंद्रशासित भाग) हवा आहे.
२. काश्मिरी हिंदूंना देशांतर्गत विस्थापितांचा दर्जा देऊन वर्ष १९९० मधील जिहाद्यांचे आक्रमण केवळ काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदासाठी होते, हे मान्य करावे.

दूरसंचार आस्थापनांच्या ब्लॅक आऊट डेचा हिंदूंनाच फटका !

  • हिंदुबहुल भारतात दूरसंचार आस्थापनांकडून हिंदूंना सापत्न वागणूक देणे संतापजनक होय ! हिंदूंनी अशा आस्थापनांवर बहिष्कार घालून त्यांना हिंदु ऐक्याची चुणूक दाखवावी !
  • अल्पसंख्यांकांच्या सणांना अल्प दर आकारणी, प्रसंगी आकर्षक सवलतींची खैरातही !
  • दूरसंचार आस्थापनांच्या भेदभावामुळे हिंदूंमधून संताप !
       मुंबई - देशातील सरकारी आणि खाजगी दूरसंचार आस्थापनांकडून विशिष्ट दिवशी घोषित करण्यात येणार्‍या ब्लॅक आऊट डे (विशिष्ट दिवशी भ्रमणभाष करणे आणि लघुसंदेश पाठवणे यांवर करण्यात येणारी अतिरिक्त दरआकारणी) चा सर्वाधिक फटका हिंदूंनाच बसत असल्याचे उघड झाले आहे. याउलट अल्पसंख्यांकांच्या सणांच्या दिवशी मात्र तुलनेने अल्प दर आकारणी करण्यासह प्रसंगी त्यांच्यावर आकर्षक सवलतींचीही खैरात करण्यात येते. या भेदभावामुळे हिंदूंमधून संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात भारतीय दूरसंचार नियामक मंडळ (टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात् ट्राय) यात हस्तक्षेप का करत नाही ?, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तथापि ट्रायच्या अधिकृत संकेतस्थळावरच सर्व दूरसंचार आस्थापनांच्या ब्लॅक आऊट डेजची सूची प्रसारित करण्यात आली असल्याने दर आकारणीतील या विषमतेविषयी ट्राय अनभिज्ञ आहे असे म्हणता येणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.

कांदिवली (मुंबई) येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांचा मोर्च्याद्वारे सैन्यदलाला पाठिंबा

आतंकवादी बुरहान वानीला ठार मारल्यामुळे भारतीय जवान
 आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी दगडफेक केल्याचे प्रकरण !

              मोर्च्यात सहभागी झालेले राष्ट्रप्रेमी नागरिक
     मुंबई - हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी बुरहान वानी याला ठार मारल्यावर काश्मीरमधील धर्मांधांकडून भारतीय सैन्यदलावर दगडफेक करण्यात आली. सैन्यदलाचे मनोबल खच्ची करण्याच्या या प्रकाराच्या विरोधात १७ जुलै या दिवशी कांदिवली लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोर्चा काढून सैन्यदल आणि पोलीस यांना पाठिंबा दर्शवला. लोखंडवाला सर्कल येथून काढण्यात आलेल्या या मोर्च्यात पनून कश्मीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांच्या कार्यकर्त्यांसह बहुसंख्य राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने सैन्यदलाला पाठिंबा द्यायला हवा ! - सी.के. रैना, पनून कश्मीर
     काश्मीरमध्ये सैन्याविषयी केला जाणारा अपप्रचार थांबवला पाहिजे. प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने घराबाहेर पडून सैन्यदलाला पाठिंबा द्यायला हवा.

कल्याण येथून इसिसशी संबंधित धर्मांधाला अटक !

     मुंबई - कल्याणमधून २३ जुलैला सकाळी इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून रिझवान खान या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक (एटीएस्) आणि केरळ पोलीस यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. रिझवानवर मुसलमान युवकांना इसिसमध्ये जाण्यासाठी साहाय्य केल्याचा आरोप आहे. केरळमधून नुकतेच काही युवक इसिसमध्ये गेल्याचे समोर आले होते. त्यामुळे केरळ पोलिसांकडून देशभरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

इसिसचे लक्ष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते !

     मुंबई - मुंबईतील मालवणी येथून इसिसमध्ये भरती होण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करणार्‍या ४ मुसलमान युवकांच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आरोपपत्र दाखल केले आहे. यात म्हटले आहे की, या आतंकवाद्यांच्या केलेल्या चौकशीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही नेत्यांना लक्ष्य करण्यात येणार होते. या तरुणांचा प्रयत्न एकट्याने मोठे आक्रमण करण्याचा कट होता. हे ४ जण घरातून बेपत्ता झाले होते. नंतर पोलिसांनी त्यांना शोधून अटक केली होती.
१. अटक केलेल्यापैकी रिजवान याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध मिळण्यासाठी प्रयत्न करणार होते.
२. २२ जुलैला महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी दावा केला होता की, मराठवाड्यातील १०० मुसलमान तरुण बेपत्ता आहेत. ते इसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या तरुणांकडून संघ नेत्यांना किंवा अन्य ठिकाणी आक्रमण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फलक प्रसिद्धीकरता

इसिसचा आतंकवाद आता हिंदुत्वाच्या मुळावर !
     मुंबई येथून इसिसमध्ये भरती होण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करणार्‍या ४ धर्मांध युवकांच्या चौकशीत इसिस संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही नेत्यांना लक्ष्य करणार होती, अशी माहिती समोर आली आहे. इसिसचे अनेक संशयित आतंकवादी देशात विविध ठिकाणांहून पकडण्यात आले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Mumbaise pakde gaye ISISke 4 atanki RSSke netaopar akraman karnewale the.
     Atankwadka Dharma nahi hota, to atankiyonka Hindutvako virodh kyun ?
जागो !
: मुंबई से पकडे गए इसिस के ४ आतंकवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के नेताआें पर आक्रमण करनेवाले थे ।
     आतंकवाद का धर्म नहीं होता, तो आतंकवादियों का हिन्दुत्व को विरोध क्यों ?

हिंदु जनजागृती समिती आयोजित आज हिंदूसंघटन मेळावे

हिंदूसंघटन मेळाव्याची रूपरेषा
  • व्याख्यान : सामाजिक समस्यांचा संघटित प्रतिकार आणि हिंदु राष्ट्र-स्थापना
  • हिंदुुत्वनिष्ठ वक्त्यांचे मार्गदर्शन
  • स्वसंरक्षण प्रशिक्षणाविषयी प्रात्यक्षिके
गोवंडी
स्थळ : गणेश मैदान सभागृह, श्री स्वयंभू हनुमान मंदिराजवळ, देवनार म्युनिसिपल कॉलनी, गोवंडी (प.) 
वेळ : सायं. ६
खारघर
स्थळ : श्री सिद्धी मॅरेज सभागृह, उत्कर्ष बिल्डींग, फ्लॉट नं. ए-१३, सेक्टर-१२, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ, खारघर, नवी मुंबई. 
वेळ : सायं ५.३० संपर्क : ९९२०२०८९५८
एक हिंदु म्हणून या हिंदुसंघटन मेळाव्यास उपस्थित रहा !

प्रार्थनेने मनाची धारणा, तर कृतज्ञतेने बुद्धीची धारणा सत्त्वगुणी बनणे

   मनाला केवळ एखाद्या घटनेचे कारण समजते; कारण मनाला केवळ भाव-भावनांच्या स्तरावर विचारस्वरूप प्रतिक्रिया नोंदवण्याची सवय असते. बुद्धी ही मनापेक्षा स्थिर असल्याने ती सत्त्वगुणाच्या जोरावर घटनेतील कारणावर उपाय सांगू शकते; कारण बुद्धीला प्रतिक्रिया नोंदवण्यापेक्षा चिंतन किंवा एखाद्या गोष्टीचे आकलन करण्याची सवय असते; म्हणून बुद्धी सत्त्वगुणी बनवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक असते. प्रार्थनेने मनाची धारणा, तर कृतज्ञतेने बुद्धीची धारणा सत्त्वगुणी बनते; म्हणून आध्यात्मिक प्रवासात प्रार्थना आणि कृतज्ञता यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ

कृतज्ञताभावात राहिल्याने होणारे लाभ

१. देवावरील श्रद्धा वाढते.
२. मनाविरुद्ध घडणार्‍या प्रसंगामध्ये मनाची स्थिरता वाढते.
३. साधकांविषयी प्रतिक्रिया अल्प होऊन पूर्वग्रहही निर्माण होत नाही आणि शिकून पुढे जाता येते.
४. त्रास, प्रारब्ध, दोष आणि अहं यांमुळे निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारता येते अन् अहंविरुद्ध लढण्याची शक्ती मिळते.
५. कृतज्ञताभावात राहिल्याने साधनेच्या प्रयत्नांमध्ये सातत्य येते आणि चिकाटी वाढून प्रयत्नांना गती मिळते.
६. देव देत असलेल्या प्रत्येक क्षणातून आनंद घेता येतो.
७. रज-तम असूनही दिवसेंदिवस वाढत जाणारे चैतन्य ग्रहण करता येते.
- कु. पूजा जाधव, जळगाव

प्रत्येक साधकाला मोक्षाला नेणार्‍या प.पू. डॉक्टरांच्या चरणी नतमस्तक होऊन अखंड कृतज्ञता व्यक्त होणे आवश्यकच !

   प.पू. डॉक्टरांच्या साधना या ध्वनीफीतीतील गुरूंचे महत्त्व सांगतांना प.पू. डॉक्टरांनी दिलेल्या शेरपाचे उदाहरण एकदा आठवले आणि भावजागृती झाली. एखादा कडा चढतांना जर वर शेर्पा असेल, तर तो पर्वत चढणार्‍याच्या कमरेला असलेल्या दोरीच्या आधराने त्याला वर चढायला साहाय्य करतो. तसेच साधनेत जर मोक्षाला नेणारे गुरु असतील, तर ते साधकाला प्रत्येक क्षणाला आधार देत असतात. प्रत्येक साधकाला मोक्षाला नेणारे गुरु प.पू. डॉक्टरच आहेत. त्यांचे अनंत ऋण आपल्यावर आहेत, याची जाणीव प्रत्येक क्षणाला ठेवून आपण त्यांच्या चरणी अखंड कृतज्ञतेच्या भावाने नतमस्तक व्हायला हवे.
   हे श्रीकृष्णा, प.पू. डॉक्टरांच्या चरणांवर आम्हाला कृतज्ञतेच्या भावात रहायला शिकव, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !
- पू. अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

चराचरातील सर्वांविषयी कृतज्ञताभाव हवा !

     मार्ग इच्छित स्थळी नेतो आणि वाटेत सावली देणार्‍या तरूखाली आपण बसून काही काळ सुखावतो; म्हणून तरूलाही कृतज्ञतेचे चार शब्द बोलून पुढे जायचे ! एखादी कोकिळा मंजूळ गाऊन मन उल्हसित करते, तेव्हा तिचे आभार मानायचे असतात. एखादी शिला (दगड असला तरी) १० मिनिटे बसल्याने पायाचा शीण हरवते. त्या शीलेचेही आभार मानायचे ! २-४ रानफुले हळूच मान वर करून पहातात आणि आपल्यावर उपाय करतात. त्यांच्याशी चार शब्द बोलायचे ! एखादा मैलाचा दगड सांगतो, ८० मैल अंतर संपले, तेव्हा आम्ही त्याच्याशी कृतज्ञतेने बोलतो आणि म्हणतो, आभारी आहोत तुझे. आता काय केवळ २० मैल राहिले, हे तुझ्यामुळेच कळले बरे ! तू नसतास, तर कसं कळावं आम्हाला. अशी रस्त्यावरची प्रत्येक गोष्ट शिकवत असते ?
- पुष्पांजली, बेळगाव (३.६.२०११))

कृतज्ञतेचे महत्त्व

   कृतज्ञतेमुळे अहं न्यून होतो आणि भाव वाढतो. यामुळे साधकाने साधनेप्रती, तसेच साधनेत येणार्‍या अडचणींप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याने घडणार्‍या प्रत्येक घटनेकडे पहाण्याचा त्याचा दृष्टीकोन सकारात्मक बनतो. तो प्रत्येक अडचणीवर मात करण्यास शिकतो. कृतज्ञतेच्या भावामुळे ईश्‍वर त्याला प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढण्यास शिकवतो. अशा प्रकारे कृतज्ञतेमुळे साधनेतील अडथळे दूर होतात. 
- कु. मधुरा भोसले

पाऊस पडतांना त्याच्या थेंबांकडे पाहून आनंद जाणवण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा

पावसामुळे धरणीवर पडणारे असंख्य थेंब
आनंद देणारा पावसाचा एक थेंब
 
कु. प्रियांका लोटलीकर
ढगांतून जमिनीवर बरसती धुंद पाऊसधारा ।
भिजे चिंब आसमंत सारा ।
व्याकुळ मनांना हर्षिल टपटप थेंबांचं येणं ।
भूमाता गाईल मग पावसाचं गाणं ॥
   देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये ऋतूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ऋतूंपैकी वर्षाऋतू हा भूतलावरील सर्व प्राणीमात्रांना सुखावणारा असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा क्षण म्हणजे पहिला पाऊस ! पाऊस पडल्यामुळे जो आनंद आणि आल्हाद आपल्याला होतो, तो काही वेगळाच असतो; पण आपण याचा कधी विचार केला आहे का की, या पावसाकडे पाहून आपल्या मनाला एक वेगळा आनंद का मिळतो ? या संदर्भात लक्षात आलेली काही आध्यात्मिक कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. पृथ्वी, आप आणि वायु या तत्त्वांच्या संयोगामुळे पाऊस पडतांना त्यांच्या थेंबांकडे पाहून आनंद जाणवणे : पावसाचे थेंब भूमीवर पडतात, त्या वेळी पृथ्वीतत्त्वाचा आपतत्त्वाशी संयोग होतो. असे थेंब ज्या वेळी भूमीवर आदळून पुन्हा उसळतात, त्या वेळी उसळण्याच्या या प्रक्रियेमध्ये वायुतत्त्व कार्यरत होते. त्यामुळे पृथ्वी, आप आणि वायु तत्त्व कार्यरत असल्यामुळे हे दृश्य पहातांना मनाला आनंद मिळतो.

साधनेत साहाय्य करणार्‍या प्रत्येक निर्जीव माध्यमांप्रतीही कृतज्ञता व्यक्त करण्याच्या स्थितीत रहा !

    साधना परिपूर्ण होण्यास आणि साधनेत प्रगती होण्यास सजीव आणि निर्जीव माध्यमेही कारणीभूत असतात. प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञ रहाण्याचे जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व प्रत्येक वस्तूप्रती रहाण्याचे आहे.
    साधकांनो, ज्या माध्यमांतून तुम्ही साधनेत आलात आणि आज साधनेत टिकून आहात, त्या प्रत्येकाविषयी तुमच्या मनात शरणागतीचा भाव निर्माण झाला पाहिजे. अनेक साधक नामपट्ट्या, ग्रंथ, कापडीफलक, देवतांची सात्त्विक चित्रे, प.पू. डॉक्टर किंवा प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे, सत्संग आणि प्रवचने अशा विविध माध्यमांतून साधनेत आलेले आहेत. ही माध्यमे स्थुलातून निर्जीव असली, तरी ती सूक्ष्म-रूपाने पवित्र आणि सात्त्विक असल्याने त्यांच्या लहरी सातत्याने कार्यरत असतात. तुमच्या भावापोटी अशा माध्यमांद्वारेही तुम्हाला ईश्‍वरी तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होईल, उदा. भक्त प्रल्हादाच्या भावापोटी ईश्‍वराला खांबात प्रकट व्हावे लागले. तसेच तुम्हीही प्रत्येक माध्यमात ई रूप पहा. त्यामुळे शरणागतीचा भाव निर्माण होऊन तुमचे अंतरंग भक्तीने परिपूर्ण होईल.

भावापेक्षा कृतज्ञता महत्त्वाची !

    ईश्‍वराप्रती असलेल्या भावापेक्षा कृतज्ञतेला जास्त महत्त्व आहे; कारण ईश्‍वराप्रती असलेल्या भावात अहं असू शकतो; पण ईश्‍वराप्रती असलेल्या कृतज्ञतेत भावही असतो. अहंसुद्धा अल्प असतो. - (पू.) सौ. अंजली गाडगीळ

विस्थापित काश्मिरी हिंदूंकडून १९ जानेवारी २०१७ या दिवशी चलो कश्मीर मोहिमेचे आयोजन !

श्री. राहुल कौल
मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात जाहीर सभांचे आयोजन !
नवी देहली - केंद्रशासनाने विस्थापित काश्मिरी हिंदूंविषयी त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी विस्थापित काश्मिरी हिंदूंकडून १९ जानेवारी २०१७ या दिवशी चलो कश्मीर ही मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती काश्मिरी हिंदूंच्या न्याय्य अधिकारांसाठी लढणार्‍या यूथ फॉर पनून कश्मीर या संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल यांनी त्यांच्या एका लेखात दिली आहे. हा लेख सध्या सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
   या लेखात श्री. कौल यांनी पुढे म्हटले आहे, चलो कश्मीर या मोहिमेचा आरंभ १ मे २०१६ या दिवशी बेंगळुरू येथे झाला. त्यानंतर बंगालमधील कलिमपोंग येथे १५ मे या दिवशी जाहीर सभा घेण्यात आली. पनून कश्मीर, यूथ फॉर पनून कश्मीर आणि कश्मिरा वाहिनी या संघटनांच्या सर्व कार्यकर्त्यांनी ही मोहीम पुढे नेण्यासाठी कंबर कसायला हवी. काश्मिरी हिंदूंनी स्वत:चा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी आता कटिबद्ध झाले पाहिजे.
चलो कश्मीर मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित सभांचे नियोजन पुढीलप्रमाणे !
    चलो कश्मीर या मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या समस्यांविषयी जागृती करण्यासाठी देशभरात एकूण ८० जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील काही मुख्य सभांचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.
दयाघना, भगवंता, कृपासागरा ही रूपे सर्वत्र तुझी ।
दयेच्या सागरा, करून घे रे आध्यात्मिक उन्नती माझी ।
   श्रीकृष्ण हा परिपूर्ण आणि तिन्ही लोकांचा भगवंत आहे. सर्व सृष्टी त्यानेच निर्माण केली आहे. तो प्रत्येकाला त्याचा एकेक गुण देतो; कारण एकच गुण कितीतरी जणांना शिकवू शकतो. प्रत्येक व्यक्तीमधील गुण इतरांना शिकवू शकतो. सर्व जण एकमेकांमधील गुण जाणून घेऊन प्रयत्न करतात. श्रीकृष्णाचे अस्तित्व चराचरात असते. त्याचे वेगवेगळे गुण आपल्यात आल्यावर आपल्याला श्रीकृष्णाशी एकरूप होता येते. आपल्यातील सर्व गुण वाढत जाऊन आपण श्रीकृष्णाशी एकरूप होतो.
- कु. तृप्ती गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

हे गुरुदेवा, तुम्हीच शिकवले !

हे गुरुदेवा, जीवनाच्या खाचखळग्यातून चालतांना
न ठेचकाळता चालायला तुम्ही शिकवले ।
कोठून आलो व कोठे जाणार
याचा शोध घ्यायला तुम्ही शिकवले ।
जन्माला येऊन काय करायचे, हे तुम्ही शिकवले
जीवन कसे जगावे, हे तुम्ही शिकवले ।
- सौ. विद्या कदम, कोल्हापूर

हे गुरुमाऊली, तूच आमची माता, पिता आणि सखा आहेस. तूच आमचे सर्वस्व आहेस. गेले अन्येक जन्म तू आमची काळजी घेत आहेस. आम्ही तुझ्याशी एकरूप व्हावे, ही ओढ आमच्यापेक्षा तुलाच अधिक आहे. तू आमच्यावर प्रीतीरूपी अखंड कृपेचा वर्षाव करून आम्हाला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवत आहेस. यासाठी कृतज्ञता आणि कृतज्ञता !...

     

प.पू. डॉक्टर, कृतज्ञतेत साधनेचे सर्व काही पैलू अंतर्भूत असल्याने प्रत्येक श्‍वासासह तुम्हीच आम्हाला कृतज्ञता व्यक्त करण्याची जाणीव क्षणोक्षणी करवून द्या !


अहं वाढणे आणि न्यून होणे यांचे व्यस्त प्रमाण

     अहं मणामणाने वाढतो आणि कणाकणाने न्यून होतो. मणभर प्रयत्न केल्यावर कणभर अहं न्यून होतो. कणभर कौतुक केल्यावर अहं मणभर वाढतो. - (पू.) अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०१६)

कृतज्ञतेचा भाव कसा निर्माण होतो ?

१. ज्ञानप्राप्तीची तळमळ वाढल्यावर जिवाच्या जिज्ञासेचे श्रद्धेत रूपांतर होते, म्हणजेच ज्ञान मिळण्याविषयी ईश्‍वराप्रती कृतज्ञतेचा भाव निर्माण होतो.
२. कार्यात भावाचे सातत्य येऊन त्याचे अव्यक्त भावात रूपांतर झाल्याने कृतज्ञतेचा भाव निर्माण होतो. - एक विद्वान ((पू.) सौ. अंजली गाडगीळ या एक विद्वान या टोपण नावाने लिखाण करतात. (१६.२.२००६))

गुरुदेवा, विश्‍ववंद्य अवधूत त्रिविक्रम कल्याणमूर्ती तुम्हीच ना ?

कु. देवेन पाटील
विश्‍ववंद्य अवधूत त्रिविक्रम कल्याणमूर्ती तुम्हीच ना ।
सकल विश्‍वाचे पालनकर्ता लक्ष्मीप्रिय तुम्हीच ना ॥ १ ॥
मनुला दर्शन दिधले मत्स्यरूपात तुम्हीच ना ।
मेरू पर्वता घेतले पाठी ते कूर्मरूपही तुम्हीच ना ॥ २ ॥
बळीराजाचे कल्याण करणारे बटू वामन ही तुम्हीच ना ।
गोमंतक निर्मिणारे देवी रेणुकापुत्र ही तुम्हीच ना ॥ ३ ॥ 
चौदा वर्षे वनवास भोगला ते मर्यादा पुरुषोत्तम तुम्हीच ना ।
पूर्णावतार हो गोप-गोपींचे गोपाळपण तुम्हीच ना ॥ ४ ॥
पुंडलिकावर प्रसन्न होऊनी विठ्ठल दर्शन दिधले तुम्हीच ना ।
व्यष्टी - समष्टी साधनेची ओळख करून देणारे तुम्हीच ना ॥ ५ ॥

साधकांनो, बाळाचे अचूक भविष्य जाणून घेण्यासाठी आधुनिक वैद्यांकडे त्याच्या अचूक जन्मवेळेची, म्हणजे बाळाचे डोके सर्वप्रथम बाहेर दिसू लागते, त्या वेळेची जन्मवेळ म्हणून मागणी करा !

     जन्मपत्रिकेवरून अचूक भविष्य काढण्यासाठी अचूक जन्मवेळेची आवश्यकता असते. बुद्धीच्या पलीकडचे जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्र उपयोगी ठरते. बहुतांश वेळा नवजात बालकांची निश्‍चित जन्मवेळ पालकांना ठाऊक नसते. यासाठी बाळाचा जन्म होण्यापूर्वीच पालकांनी किंवा नातलगांनी बाळाच्या अचूक जन्मवेळेची मागणी आधुनिक वैद्यांंकडे करावी. बाळाच्या जन्मवेळेत पालट झाला की, जन्मकुंडलीतही पालट होतो. अचूक जन्मवेळेनुसार पत्रिका अभ्यासल्यास भविष्यकाळातील घटनांचा बोधही अचूक होण्यास साहाय्य होते.
     मनाचा लय करून घेऊन गुरु साधकाला शिष्यपद देतात. गुरु बुद्धीचा लय करून घेऊन संतपद बहाल करतात. शेवटी अहंचा लय करून घेऊन गुरुपदाचा अधिकारी करतात. नंतर चित्तालाच माध्यम बनवून त्यालाच चैतन्यमय करून सद्गुरुपदाचा अधिकारी बनवतात !

ज्ञानाद्वारे शिष्याकडून साधना करवून घेऊन त्याचा उद्धार करणार्‍या गुरूंची महती !

प.पू. पांडे महाराज
        प.पू. पांडे महाराज यांच्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी सादर समर्पण !
१. गुरु या संज्ञेची व्युत्पत्ती आणि अर्थ
अ. श्री गुरुगीतेत गुरु या शब्दाच्या पुढील अर्थी बर्‍याच व्युत्पत्ती सांगितल्या आहेत.
        गुकारस्त्वन्धकारश्‍च रुकारस्तेज उच्यते ।
        अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः ॥ - गुरुगीता, श्‍लोक २९
अर्थ : गुरु शब्दातील गु हे अक्षर म्हणजे अंधार (अज्ञान) आणि रु हे अक्षर म्हणजे प्रकाश (ज्ञान) होय, असे म्हटले जाते. गुरु हेच अज्ञान नाहीसे करणारे ब्रह्म होय, यांत मुळीच संशय नाही.
आ. आगमसारमध्ये गुरु या शब्दातील तीन वर्णांचा अर्थ पुढीलप्रमाणे सांगितला आहे,
        गकारः सिद्धिदः प्रोक्तो रेफः पापस्य हारकः ।
        उकारो विष्णुरव्यक्तस्त्रितयात्मा गुरुः परः ॥
अर्थ : गुरु या शब्दात ग, र आणि उ हे तीन वर्ण आहेत. त्यांपैकी गकार सिद्धी देणारा, रकार हा पापहारक आणि उकार हा अव्यक्त विष्णु आहे. गुरु हा वरील तिन्ही गोष्टींचा समावेशक असा श्रेष्ठ आहे.

प.पू. भक्तराज महाराजांची चैतन्यदायिनी भजने !

   हे गुरुदेवा, आपले परात्पर गुरु इंदूरनिवासी प.पू. भक्तराज महाराज यांच्या स्वरांतील भजने तुम्ही ध्वनीमुद्रित करून ठेवलीत आणि कधीही न संपणारा चैतन्याचा चिरंतन ठेवा आम्हाला दिलात ! आमची भावभक्ती, तळमळ, श्रद्धा वाढवणारी, आम्हाला अध्यात्माचे चिंतनात्मक ज्ञान देऊन आमचा विवेक जागृत करणारी, नैराश्य दूर करून मन आनंदी आणि उत्साही करणारी, तसेच संतांनी लिहिलेली, म्हटलेली असल्याने काळ्या शक्तीचे आवरण अन् वाईट शक्तींच्या त्रासापासून रक्षण करणारी प.पू. भक्तराज महाराजांची (प.पू. बाबांची) भजने दिवस-रात्र आमच्या कानात गुंजत असतात; जणू ती आमचा प्राणच झाली आहेत. त्यांच्या चालू असण्यामुळेच जणू साधक कार्यरत आहेत ! प.पू. भक्तराज महाराज सनातन संस्थेचे प्रेरणास्थान कसे आहेत, हे लक्षात येण्यासाठी एवढे उदाहरण पुरेसे आहे. प.पू. डॉक्टर, आम्ही अनंत कोटी कृतज्ञ आहोत.

शारीरिक त्रास होत असतांनाही लेखाची सेवा संपल्यानंतर विश्रांतीच्या वेळेत वैजयंती माळा बनवण्याची सेवा करणारे पू. सत्यवान कदम !

पू. सत्यवान कदम
     मंगळुरू सेवाकेंद्रात पू. सत्यवानदादा पूर्ण कर्नाटक राज्याच्या लेखाविषयक सेवा करतात. लेखाची सर्व सेवा संपल्यानंतर विश्रांतीच्या वेळेत ते वैजयंती माळा बनवण्याची सेवा करतात. प्रत्यक्षात पू. सत्यवानदादा यांना बसायला पुष्कळ त्रास होत असूनही ते सेवा करतात. तेव्हा ते प.पू. गुरुदेवांच्या विचारांशी एकरूप आहेत, असे जाणवले, तसेच एवढा त्रास होत असूनही ते सेवा करतात, याचे त्यांना कधीच कौतुक वाटत नाही. ते निरपेक्ष रहातात. त्यांनी जपमाळ करायला शिकतांना केलेली दोर्‍याची गुंडाळी मी संतांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ठेवली आहे. ती एका डबीत घालून पाठवत आहे. इतक्या आदर्श संतांच्या मार्गदर्शनाखाली साधकांना साधनेत हात धरून पुढे घेऊन जाणार्‍या गुरुदेवांचे (प.पू. डॉक्टरांचे) वर्णन शब्दांतून करू शकत नाही. केवळ व्यक्त करू शकते, तर ती कृतज्ञता ! - कु. सर्वमंगला मेदी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

स्वतः कृतज्ञताभावात राहून इतरांनाही प्रेरणा देऊन त्या भावात रहायला शिकवणारे सनातनचे संत पू. पात्रीकरकाका !

पू. अशोक पात्रीकर
कु. सर्वमंगला मेदी
१. आश्रमातील महाप्रसादात चविष्ट पदार्थ असल्याचे पाहून पू. पात्रीकरकाकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेने पाणी येणे आणि त्यानंतर प्रत्येक वेळी जेवणात विशेष पदार्थ असला की, पू. पात्रीकरकाकांच्या कृतज्ञतेच्या भावाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांची आठवण होणे : एके दिवशी रामनाथी आश्रमात दुपारच्या महाप्रसादात पुरी-भाजी आणि खीर असे सर्व चविष्ट पदार्थ होते. त्या दिवशी भोजन करतांना मी पू. पात्रीकरकाकांच्या शेजारी महाप्रसादाला बसले होते. पानातील सर्व पदार्थांकडे पाहून ते म्हणाले, आपल्या घरीसुद्धा एवढे पदार्थ आणि तेही वेळेत, आपल्याला खायला मिळत नाहीत; पण इथे गुरुदेव वेळेत सर्व पक्वान्ने देत आहेत. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून पाणी आले. तेव्हापासून आश्रमात असे काही विशेष पदार्थ भोजनात असले की, मला पू. काकांचे कृतज्ञतेने भरलेले भावाश्रूंचे डोळे आठवतात आणि माझाही कृतज्ञताभाव जागृत होतो.

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शुभांगी पिंपळे यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

सौ. शुभांगी पिंपळे
अनंत हस्ते कमलावराने, देेता किती घेशील दो कराने ।, या
ओळीचा देवाने कृतज्ञतेच्या जाणिवेतून शिकवलेला दृश्यात्मक भावार्थ
     १२.१.२०१५ या दिवशी नामजप करतांना मला मी मधे उभी आहे आणि माझ्याभोवती आतापर्यंत भेटलेले सर्व संत गोलाकारात उंच उभे राहून वरून मला हात देत आहेत, असे दिसले. (आपण खाली असतांना उंचावर चढता येण्यासाठी आपल्यापेक्षा उंचावर असलेली व्यक्ती आपल्याला वर घेण्यासाठी हात पुढे करते, तसे) सर्व हातांचा रंग समान होता. त्या हातांमध्ये वात्सल्य होते आणि सर्व संत माझ्याकडे अतिशय प्रेमाने, वात्सल्याने पाहून हसत होते. त्यांच्याकडे पाहून मला कृतज्ञतेने भरून आले आणि देवाने मला आतापर्यंत किती दिले, अजूनही देत आहे; पण मी किती न्यून पडत आहे, याची जाणीव होत होती. त्या वेळी मला अचानक २००३ साली एका सत्संगात प.पू. डॉक्टरांनी मार्गदर्शन करतांना देव सनातनला करत असलेल्या साहाय्याविषयी अनंत हस्ते कमलावराने, देेता किती घेशील दो कराने । असे म्हटले होते, ते वाक्य आठवले. त्या वेळी त्या वाक्याचे मी मन आणि बुद्धी यांच्या स्तरांवर आध्यात्मिकदृष्ट्या चिंतन केले होते; पण त्या वाक्याचा दृश्यात्मक भावार्थ आता जाणिवेतून अनुभवायला येत आहे. प.पू. डॉक्टरांच्या या एका वाक्यात किती कृतज्ञता, किती ऋण, किती असमर्थता, किती शरणागती साठली आहे, हे शिकवल्याप्रती कृतज्ञ आहे देवा ! (१२.१.२०१५) 
प्रभु, तुमच्या चरणी ।
मस्तक माझे झुकले ।
प्रभु, तुमच्या चरणी ।
मस्तक माझे झुकले ॥ १ ॥
सनातन धर्म स्थापित होण्यासाठी ।
देह माझा झिजेल ॥ २ ॥
तुमचे रूप हृदयात साठवून ।
तुमच्या स्मरणातच हा प्राण जाईल ॥ ३ ॥
तुमची,
- कु. मधुरा चतुर्भूज, पुणे

स्वयंपाकाच्या वेळी त्रास होत असतांना सूक्ष्मातील प.पू. डॉक्टरांनी स्वयंपाक झालेला असून तेथे केवळ थांबण्यास सांगणे आणि प्रत्यक्षातही तशी अनुभूती येणे

कु. मनीषा शिंदे
     पितृपंधरवड्याच्या कालावधीत माझ्याकडे पथ्याचा स्वयंपाक करण्याची सेवा होती. मला पुष्कळ त्रास होत होता. आता सेवा करायला जमणार कि नाही ?, असे वाटू लागले. त्या वेळी मी प.पू. पांडे महाराज (प.पू. बाबा) यांच्या खोलीत सूक्ष्मातून गेले. त्या वेळी मला प.पू. बाबा दिसत नव्हते. प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण दिसले, तरीही मी प.पू. बाबांनाच शोधू लागले. ते कुठेच दिसत नव्हते. त्या वेळी सूक्ष्मातील प.पू. डॉक्टर आणि माझ्यात पुढील संभाषण झालेे.
प.पू. डॉक्टर : कुणाला बघतेस ?
मी : प.पू. बाबांना.
प.पू. डॉक्टर : बाबा आणि मी एकच आहोत. बरं. सांग कशासाठी आलीस ?

गुरुदेव, अखिल ब्रह्मांडाचे नायक तुम्हीच आहात ।

डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे
     २५.५.२०१६ या दिवशी सकाळी मी प.पू. गुरुदेवांचे स्मरण करत होते. त्यांचे लोभस आणि चैतन्यदायी रूप डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी गुरुदेव कोण आहेत ?, याविषयी पुढील काव्य स्फुरले.
गुरुदेव आपण अनादि अनंत आहात ।
निर्गुण निराकार आहात ॥ १ ॥
ज्ञानाचा पर्वत आहात ।
प्रीतीचा अथांग सागर आहात ॥ २ ॥
तुम्हीच ब्रह्मा, विष्णु आणि महेश आहात ।
राम आणि कृष्णही तुम्हीच आहात ॥ ३ ॥

नम्र, गुरुकार्याशी एकरूप झालेले आणि असह्य वेदना होत असतांनाही स्थिर राहून श्रीगुरुस्मरणात मग्न असणारे पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळेकाका !

१. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे घडत आहे, असे पू. पिंगळेकाकांनी सांगितल्यावर महर्षींनी सांगितलेल्या अमूल्य सूत्रांचे आज्ञापालन कटाक्षाने करायला हवे, याची जाणीव होऊन साधना तळमळीने करण्याचे विचार मनात येणे : पू. पिंगळेकाका जून मासाच्या पहिल्या आठवड्यात मिरज आश्रमात आले होते. त्यांना पाहून महर्षि, तसेच संत यांच्या कृपेने उज्जैन येथील सिंहस्थ पर्वात झालेल्या भीषण वादळातही साधकांचे रक्षण झाल्याचे आठवून कृतज्ञता वाटली. मी पू. काकांना सांगितले, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी वादळी पावसाची तीव्रता अधिक होती. त्या वेळी ते म्हणाले, आपल्याला महर्षींनी सांगितलेच आहे ना, तसेच घडत आहे. याचीच प्रचीती देव देत आहे. पू. काकांचे बोलणे ऐकल्यावर आपण महर्षींनी सांगितलेल्या अमूल्य सूत्रांचे आज्ञापालन किती कटाक्षाने करायला हवे, याची जाणीव होऊन साधना तळमळीने करण्याचे विचार मनात आले.

विविध आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन साधकांना मानसिक आणि बौद्धिक स्तरावरून आध्यात्मिक स्तरावर नेणारे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
१. प्रसिद्धीसेवेच्या संदर्भात पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेले मार्गदर्शन
१ अ. प.पू. डॉक्टरांनी समाजातील अयोग्य घटनांच्या वृत्तांवर योग्य दृष्टीकोन द्यायला सनातन प्रभात या नियतकालिकांच्या माध्यमातून शिकवले ! : समाजात घडणार्‍या अयोग्य घटनांवर राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीकोनातून योग्य दृष्टीकोन काय असावा ?, हे प.पू. डॉक्टरांनी मराठी दैनिक अन् साप्ताहिक, तसेच अन्य भाषांतील मासिक सनातन प्रभातमधील वृत्तांना टिपण्या देत साधकांना शिकवले. त्यांनी त्यासाठी नियतकालिकांत येणार्‍या वृत्तांच्या खालील टिपण्या प्रथम न वाचता वृत्त वाचून आपल्या मनात काय विचार येतो ?, याचा अभ्यास करण्यास सांगितले. त्यानंतर टिपण्या वाचून आपला विचार योग्य होता कि अयोग्य ?, हे अभ्यासायला शिकवले.

प.पू. डॉक्टर हे आध्यात्मिक मित्र म्हणून लाभल्याविषयी साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

प.पू. डॉक्टर,
शिरसाष्टांग नमस्कार.
        मी बरेच दिवसांत आपल्याला पत्र लिहिले नाही; म्हणून आता लिहित आहे.
१. प.पू. डॉक्टरांचे अनंत 
उपकार असल्याने तेच खरे मित्र असणे
        मी दैनिक सनातन प्रभातमधील आध्यात्मिक मैत्रीविषयीची चौकट वाचली. माझ्या आयुष्यात ज्याच्यावर माझा पूर्ण विश्‍वास आहेे, असा एकच मित्र आहे. प.पू. डॉक्टर, तुम्हीच माझे मित्र आहात. तुम्हीच मला प्रत्येक संकटातून वाचवले आहे. मला होत असलेल्या तीव्र त्रासात माझ्यावर उपाय केले. तुम्ही प्रसंगी माझ्यासाठी प्रार्थनाही केली. तुम्ही करत असलेले उपकार शब्दांत मांडणे अशक्यच आहे.
२. प.पू. डॉक्टरांचे ऋण फिटण्यासाठी 
त्यांना अपेक्षित अशी साधना होण्यासाठी प्रार्थना !
        मला या जन्मात मोक्ष मिळाला, तरच तुमचे हे ऋण फिटू शकेल; म्हणून तुम्हीच माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना करून घ्या. आपली मैत्री अशीच उमलू दे. गुरुंपेक्षा चांगला मित्र या जगात असूच शकत नाही. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सूक्ष्मातून सांगितली. त्यावर तुम्ही ग्रंथ, दैनिक आणि साधक इत्यादी माध्यमातून जे मार्गदर्शन केले, ते अमूल्य होते. मी ते कृतीत आणायचा प्रयत्न करत आहे.

अमृत महोत्सवाच्या दिवशी आणि नाडीवाचनाच्या वेळी कर्नाटक राज्यातील साधकांना आलेल्या अनुभूती !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. शिमोगा
१ अ. अमृत महोत्सवाच्या दिवशी प.पू. गुरुदेवांची आरती करतांना त्यांच्या आज्ञाचक्रावर ॐ दिसला. 
- सौ. शांता, सागर
१ आ. मी श्रीश्री जयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव ! हा जप करत असतांना चक्रधारी श्रीकृष्णच माझ्याकडे येत आहे, असे मला जाणवले. - श्रीमती शांता आचार, सागर
१ इ. नाडीवाचनाच्या वेळी मला प.पू. डॉक्टरांच्या आज्ञाचक्रावर ज्योत दिसली आणि तेथून चैतन्य प्रक्षेपित होत आहे, असे जाणवत होते. - सौ. अनिता, सागर

गुरुदेव, मी अनंत अनंत कोटी कृतज्ञ आहे ।

   ८.७.२०१४ या दिवशी सकाळी ११.१५ ते दुपारी १२ या वेळेत मी नामजप करत होते. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी मला पुढील कृतज्ञतासुमने सुचवली आणि ती दृश्य स्वरूपात माझ्या डोळ्यांसमोरही दिसली.

प.पू. गुरुदेव, मी आपल्या चरणी ।
अनंत अनंत कोटी कृतज्ञ आहे ॥ धृ. ।

मला मनुष्यजन्म दिल्याबद्दल ।
या मनुष्यजन्माचे सार्थक होण्यासाठी ।
नामाचे महत्त्व सांगून सत्संग मिळवून दिल्याबद्दल ॥ १ ॥

या सत्संगामध्ये सेवेचे महत्त्व सांगून ।
सत्सेवा करवून घेतल्याबद्दल ॥
केवळ सेवाच न शिकवता ।
ती नामासहित अन् भावपूर्ण करायला शिकवल्याबद्दल ॥ २ ॥

पू. संदीपदादा यांच्या भेटीत शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन !

पू. संदीप आळशी
१. या जन्मात आता प.पू. डॉक्टर हे गुरु म्हणून लाभले, असे नाही, तर मागील अनेक जन्मांच्या पुण्याईमुळेच या जन्मात आपल्याला त्यांच्यासारखे गुरु लाभले आहेत.
२. आमचा मुलगा कु. विश्‍व याचा व्रतबंध सोहळा रामनाथी आश्रमात झाला. या संदर्भात पू. दादा म्हणाले, आश्रमात व्रतबंध सोहळा होणे, ही एक अद्भुत घटना आहे.
३. कु. विश्‍वने पू. दादांना भिक्षा म्हणून ज्ञान द्या, असा आशीर्वाद मागितला. त्या वेळी पू. दादांनी सांगितले, ज्ञान आपल्यातच असते. ते साधनेनेे जागृत करायचे असते.
४. लिखाणाला नामजपाचे मंडल घालण्याचे महत्त्व : आपण केलेल्या लिखाणाला नामजपाचे मंडल घातल्यामुळे लिखाणात आलेली आपली स्पंदने नष्ट होऊन लिखाण आणि आपण यांच्यावर उपाय होतात.

गोपियुष : ईश्‍वराने सुदृढ मानवी शरिरासाठी दिलेली अनमोल देणगी !

गोपियुष म्हणजे अमृततुल्यच !
    गोपियुष म्हणजे गाय व्यायल्यानंतर पहिल्या ४८ ते ७२ घंट्यांत दिलेले प्रथम दूध (चीक) होय. गोपियुष आणि बाळाला आईकडून मिळणारे पियुष यात बर्‍याच अंशी साम्य असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. उलटपक्षी गोपियुषमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आणि शरीर सुदृढतेसाठी लागणारी ९० हून अधिक पोषकतत्त्वे आहेत. गोपियुष हे ईश्‍वराने सुदृढ मानवी शरिरासाठी दिलेली अनमोल देणगी आहे. आयुर्वेदामध्ये याला अमृततुल्य संबोधले आहे. गेल्या दशकाहून अधिक कालावधीपूर्वी विद्यापीठे आणि मेडिकल रिसर्च सेंटरद्वारे झालेल्या विविध वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाले की, गोपियुषमध्ये मानवी शरिरासाठी लागणारे आण्विक संयोजन आणि विकास घटकांचा समावेश असून शरिरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्याची प्रचंड क्षमताही आहे.

वाढो कृतज्ञता अंतरीची, ओढ लागो तव चरणांसी ।

कु. धनश्री टोंगे
भगवंत चराचरांतून पाहे ।
परि मज नकळे रूप तयाचे ॥
तळमळ त्यास मम उद्धरण्याची ।
परि मज नसे जाण अंतरी त्याची ॥ १ ॥
गुरुरूपे देव आला ।
प्रेमाचा कृपाकटाक्ष त्याने टाकला ॥
सखीरूपे देव आला ।
अंतरीचा भाव जागृत केला ॥ २ ॥
कधी ताई होऊनी रागावले ।
कधी आई होऊनी मिठीत घेतले ॥
माझे हित चिंतून चालणे, बोलणे अन् वागणे ।
यांतील चुका सांगितल्या ॥ ३ ॥

प.पू. पांडे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आत्मतत्त्व बघण्यासाठी प्रयत्न केल्यावर आनंद वाटणे

      एकदा मी देवद आश्रमात सेवा करत असतांना प.पू. पांडे महाराज त्यांच्या खोलीबाहेर आले होते. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून आमच्यावर उपाय केले. त्यांनी आम्हाला भाऊ, बहीण, मैत्रीण, व्यक्तीचे नाव, तोंडवळा यांच्याकडे वैशिष्ट्य म्हणून न बघता त्यांच्या आत्मतत्त्वाकडे बघायला सांगितले. नंतर त्यांनी आमचा आढावा घेतला. त्याप्रमाणे मी प्रयत्न केले. त्यानंतर सौ. आनंदी पांगुळ सूत्र स्पष्ट करून सांगत असतांना प.पू. पांडे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आत्मतत्त्व मार्गदर्शन करत आहे, असे मला वाटले. तेव्हा मला क्षणभर आनंद होऊन मनाला चांगले वाटले.
- कु. ऋता अनिल दांडेकर, नगर (२१.५.२०१५)

प्रथमोपचार प्रशिक्षण

आगामी महायुद्धकाळात, तसेच नेहमीसाठीही
उपयुक्त सनातनची नूतन ग्रंथमालिका प्रकाशित !
भाग १ : रुग्णतपासणी, गंभीर स्थितीतील रुग्णाचे जीवितरक्षण आणि मर्माघातादी विकारांवर प्रथमोपचार
भाग २ : रक्तस्राव, जखम, अस्थीभंग, स्नायूंच्या दुखापती आदींवर प्रथमोपचार
भाग ३ : गुदमरणे, भाजणे, विजेचा धक्का बसणे, प्राणीदंश, विषबाधा आदींवर प्रथमोपचार

     लहान-मोठा अपघात, भूकंप, पूर, बॉम्बस्फोट, युद्ध अशा आपत्ती कधी सांगून येत नाहीत. पाण्यात बुडाल्याने बेशुद्ध होणे, हृदयविकाराचा आकस्मिक झटका येणे अशा काही प्रसंगी तर वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंतचा कालावधी पुष्कळच महत्त्वाचा असतो. काही मिनिटांच्या या कालावधीत मिळालेल्या योग्य प्रथमोपचारामुळे रुग्ण मृत्यूच्या दारातून परत येऊ शकतोे. तसेच कापणे, भाजणे, हाड मोडणे, विजेचा धक्का बसणे, कुत्रा चावणे, सर्पदंश इत्यादी आपत्ती तर कौटुंबिक जीवनात केव्हाही उद्भवू शकतात. अशा विविध प्रसंगी वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत रुग्णावर कोणते उपचार करावेत, याचे विवेचन १४० हून अधिक आकृत्यांच्या साहाय्याने करणारा ग्रंथ ! 
 
सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !
     सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
वितरकाचा संपर्क : ९३२२३ १५३१७ 

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे.
     जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म या 
विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
     सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४००० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता : तिसर्‍या महायुद्धाला काही वर्षांतच आरंभ होणार असल्यामुळे या ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.
१ इ. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणे : हे ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहेत. या संदर्भातील ग्रंथांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. कलियुगात पुढील शेकडो वर्षे आधुनिक विज्ञानाची भाषा प्रचलित रहाणार आहे. यासाठी हे ग्रंथ तुलनात्मक सारणी, टक्केवारी अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिले आहेत.

पं. शारंगदेव यांच्या संगीत-रत्नाकर(हिंदी भाषेतील) या ग्रंथाची तातडीने आवश्यकता !

साधकांना सूचना, तसेच वाचक, हितचिंतक यांना विनंती
     महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या अंतर्गत संगीत विषयावरील विविध ग्रंथांच्या संकलनाची सेवा चालू आहे. यासाठी पं. शारंगदेव यांच्या संगीत-रत्नाकर(हिंदी भाषेतील) या ग्रंथाची तातडीने आवश्यकता आहे. हा ग्रंथ कुणाकडे उपलब्ध असल्यास अथवा हा ग्रंथ कुठे उपलब्ध होऊ शकतो, याबाबत काही माहिती असल्यास त्याविषयी कु. तेजल पात्रीकर यांना ७५८८५४५४७४ या भ्रमणभाषवर कळवावे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
वाटाड्या
देव वाटाड्या आहे. मार्गात ठेच लागते; कारण मार्गात खाचखळगे असतात.
 आपण वाटाड्यावर संतापतो, तरी तो सांगतो, पुढे मार्ग चांगला आहे.
भावार्थ : येथे वाटाड्या म्हणजे मोक्षाचा मार्ग दाखविणारे गुरु. ठेच लागते म्हणजे त्रास होतो, आध्यात्मिक प्रगती खुंटते. मार्गात खाचखळगे असतात म्हणजे साधनेत अडचणी असतात. पुढे मार्ग चांगला आहे म्हणजे आध्यात्मिक प्रगती चांगली होणार आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

कृतज्ञता
     केवळ सातत्याच्या भक्तीभावाचे मोल मागणार्‍या आणि परमानंदापर्यंत हवे ते देऊ शकणार्‍या सहवासाचे महत्त्व शब्दांत थोडेसे व्यक्त करणेही अशक्य आहे. अशा संतांच्या चरणी कृतज्ञता आणि शरणागत भावाने प्रार्थनाच करणे इष्ट ठरेल !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ईश्‍वर सर्वत्र आहे !
     जी गोष्ट उघडपणे करणे अयोग्य वाटते, ती लपून करण्याचा प्रयत्न करणेही अयोग्यच; कारण एखादी अहितकारक गोष्टच उघडपणे करायची टाळली जाते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥

(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

विकासाच्या मार्गातील अडथळे !

     देहली राज्यात सत्ता असलेला आम आदमी पक्ष (आप) मागील काही दिवसांपासून त्याच्या आमदारांवरील विविध प्रकारच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. असाधारण गोष्टी करण्यात आमदार न्यून पडले म्हणून कि काय आता त्यांचे खासदार भगवंत मान यांनी संसदेतील प्रवेशमार्गाचा व्हिडिओ बनवल्याने ते वादात सापडले आहेत. संसदेच्या सुरक्षेविषयी त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या दायित्वाकडे दुर्लक्ष केले. संसदेच्या परिसराचे चित्रीकरण करण्यास सुरक्षा नियमांनुसार प्रतिबंध आहे. मान यांनी त्यांच्या घरापासून संसदेच्या इमारतीपर्यंतचा मार्ग आणि संसदेतील विविध प्रवेशमार्ग यांचे चित्रीकरण केले आणि सामाजिक संकेतस्थळावर शेअर केले. त्यांचे हे चित्रीकरण ८८ सहस्र लोकांनी पाहिल्याचा प्राथमिक कयास आहे. त्यांच्या या कृतीच्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई होणार, हे निश्‍चित झाल्यावर ते सावध झाले आणि त्यांनी लोकसभा अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांची भेट घेतली आणि चूक केली असेल, तर क्षमा मागीन असे त्यांना सांगितले. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn