Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

आज लोकमान्य टिळक जयंती
   आकाश कोसळले, तरी मी कोसळणार नाही. त्या कोसळलेल्या आभाळावर उभा राहून ध्येयाकडे वाटचाल करीन ! - लोकमान्य टिळक

सिडको प्रशासनाने हिंदूंच्या भावनांचा अंत पाहू नये ! - हिंदूंची चेतावणी

मुसलमानबहुल भागात मंदिराला संमती देण्याचे धाडस सिडकोने दाखवले असते का ?
सानपाडा (नवी मुंबई) येथील हिंदुबहुल वस्तीतील मशिदीच्या
भूखंडाचे आरक्षण १८ वर्षांपासून रहित करण्याच्या मागणीचे प्रकरण !

सानपाडावासियांचे चक्का जाम आंदोलन ! 
हिंदुबहुल भागातील मशिदीचे आरक्षण हटवण्यासाठी आंदोलन करणारे सानपाडावासीय
    नवी मुंबई, २२ जुलै (वार्ता.) - सानपाडा सेक्टर ८ येथील भूखंड क्रमांक १७ ए येथे हिंदुबहुल वस्तीमध्ये सिडको प्रशासनाने गेल्या १८ वर्षांपासून मशिदीसाठी दिलेल्या भूखंडाचे आरक्षण हटवावे. सिडको प्रशासनाकडून मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात येत आहे. सिडकोने हिंदूंच्या भावनांचा अंत पाहिल्यास त्याचा उद्रेक होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, अशी चेतावणी येथील हिंदु नागरिकांनी संघटित मोर्च्याद्वारे २१ जुलै या दिवशी दिली.
   मागील १८ वर्षे सानपाडावासीय सातत्याने सिडको प्रशासनाकडे वरील मागणी करत आहेत; मात्र सिडको प्रशासनाने याविषयी अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. (१८ वर्षे मागणी करून त्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन हवेच कशाला ? - संपादक) सिडको प्रशासनाचा भूखंड आरक्षणाचा चुकीचा निर्णय हिंदूंसाठी डोकेदुखी ठरला आहे. याविषयी सिडकोने न्यायालयात योग्य भूमिका मांडून मशिदीचे आरक्षण रहित करावे, अशी हिंदूंची मागणी आहे; मात्र अनेक वर्षे होऊनही सिडकोने याविषयी ठोस भूमिका मांडलेली नाही. केवळ प्रशासनामुळे हा विषय संवेदनशील झाला आहे, असा आरोप सानपाडावासियांकडून करण्यात येत आहे. सिडको प्रशासनाच्या या गलथान कारभाराच्या विरोधात सानपाडा-तुर्भे येथे संतप्त शेकडो नागरिकांनी रस्त्यावर येऊन चक्का जाम (चाक बंद) आंदोलन केले. आंदोलनानंतर बेलापूर येथील सिडकोभवनावर मोर्चा नेण्यात आला. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना मोर्च्याच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. (हिंदूंनो, केवळ निवेदन देऊन थांबू नका, तर योग्य ती कार्यवाही होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा घ्या ! - संपादक)

पारदर्शी कारभारासाठी जनतेने भाजपला निवडून दिले आहे ! - मुख्यमंत्री

भाजपच्या मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे 
सर्व आरोप मुख्यमंत्र्यांनी खोडून काढले !
      मुंबई, २२ जुलै (विशेष प्रतिनिधी) - पारदर्शी कारभारासाठी जनतेने भाजपला निवडून दिले आहे. लोकायुक्तांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चीट मिळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केले. कलंकित मंत्र्यांवरून विरोधकांनी भाजप नेत्यांवर आरोपांच्या फैर्‍या झाडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले.
      भाजपमधील काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या सूत्रावरून राज्यात रान पेटले आहे. पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी याच सूत्रावर अधिक जोर दिला आहे. विरोधकांनी भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. त्यावर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवेदनातून विरोधकांना चिमटे काढले. तसेच भ्रष्टाचाराच्या सूत्रावरून पेटलेले रान विझवण्याचा प्रयत्नही केला.

राममंदिर प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी प्रतिदिन व्हावी !

राममंदिर प्रकरणी संसदेतील इतर हिंदु खासदारांनीही डॉ. स्वामी यांना पाठिंबा द्यावा !
डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची राज्यसभेत मागणी
    नवी देहली - अयोध्येतील राममंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात चालू असलेली सुनावणी प्रतिदिन व्हावी आणि राम मंदिराचे बांधकाम त्वरित चालू करावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी राज्यसभेत केली. (अयोध्येतील राममंदिराचे सूत्र डॉ. स्वामीच का उचलून धरतात. इतर हिंदु खासदारांना अयोध्येत राममंदिर व्हावे, असे वाटत नाही का ? - संपादक)
   खासदार डॉ. स्वामी यांनी नुकतेच राज्यसभेत राममंदिराचे सूत्र उचलून धरले. या वेळी त्यांनी, शासनाने सर्वोच्च न्यायालयाला राममंदिराचा खटला त्वरित निकालात काढण्याची विनंती करावी, अशी मागणी केली. यापूर्वीही हेच सूत्र डॉ. स्वामी यांनी राज्यसभेत उचलून धरले होते.

अलीगडच्या बाबरी मंडी येथे धर्मांधांनी केलेल्या दंगलीनंतर अनेक हिंदु परिवारांचे पलायन !

काश्मीरप्रमाणेच काहीशी स्थिती उत्तरप्रदेशातील काही जिल्ह्यांत झाली आहे.
पुढे सरकार आताप्रमाणेच निष्क्रीय राहिले, तर अशी स्थिती बंगाल,
आसाम, केरळ आदी राज्यांत आणि नंतर पूर्ण भारतभरात होईल !
    अलीगड (उत्तरप्रदेश) - येथील बाबरी मंडी परिसरात महिलेची छेड काढल्यावरून झालेल्या दंगलीनंतर येथील अनेक हिंदु परिवारांनी घर-दुकान सोडून पलायन केले आहे. जातांना घरांवर विकणे आहे असे लिहिले आहे.
   या दंगलीत अनेक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपच्या महापौर शंकुतला भारती भाजप कार्यकर्त्यांसह बाबरी मंडी येथे पोहोचल्यावर घोषणाबाजी करण्यात आली. त्याला पोलिसांनी विरोध केला. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात वाद झाला. भाजपचा आरोप आहे की, पोलीस धर्मांधांना सोडून हिंदूंवरच कारवाई करत आहेत. भाजप हे सहन करणार नाही. (उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंची स्थिती वाईट आहे, याला उत्तरदायी असलेले तेथील समाजवादी पक्षाचे सरकार केंद्र सरकार विसर्जित का करत नाही ? - संपादक)

वारीहून परतल्यावर आम्ही पालिकेसमोर टाळ-मृदंग आणि वीणा घेऊन आंदोलन करणार ! - ह.भ.प. मारुति महाराज कोकाटे

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 
झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदी 
घोटाळ्याचा वारकरी संप्रदायाकडून जाहीर निषेध
      पिंपरी, २२ जुलै - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी केलेले कृत्य समाजाला कलंक लावणारे आहे. त्यामुळे सर्व वारकरी संप्रदायाचा अपमान झाला आहे. या घटनेचा आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने निषेध करतो. गलेलठ्ठ वेतन असणारे अधिकारी देवांच्या मूर्ती खरेदीतच भ्रष्टाचार करतात. ही गोष्ट वारकर्‍यांच्या दृष्टीने चीड आणणारी आहे. असे अधिकारी धर्म, पंथ, देवादिकांचाही मुलाहिजा ठेवत नाहीत, याला काय म्हणावे ? भागवत धर्माचा अपमान करणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी वारीहून परतल्यावर आम्ही महापालिकेसमोर टाळ-मृदंग, वीणा घेऊन आंदोलन करून पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांना खडसवणार आहोत, असे प्रतिपादन श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज कोकाटे यांनी केले.

(म्हणे) गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे कुरेशींवर अन्याय !

गोवंश हत्याबंदीच्या विरोधात शेतकरी 
संघटनेचे रघुनाथ पाटील यांची कोल्हेकुई !
        सोलापूर, २२ जुलै - गोवंश हत्याबंदी कायदा चुकीचा असून त्यामुळे कुरेशी समाजावर मोठा अन्याय झाला आहे. भाकड जनावरे सांभाळणे शेतकर्‍यांना अशक्य असल्याने त्यांची हत्या करण्यासाठी शासनाने अनुमती द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटना आणि कुरेशी समाज यांच्या वतीने २१ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात ते बोलत होते. (स्वदेशी चळवळीचे दिवंगत राजीव दीक्षित यांनी न्यायालयासमोर गोवंश हे गोधन कसे आहे याविषयी सर्व पुरावे आकडेवारीसह मांडले आहेत. हे या देशाच्या मुळावर उठलेल्या संघटनांना सांगणे म्हणजे अरण्यरुदनच ! - संपादक) या वेळी कुरेशी समाजातील मान्यवरांनी राज्य आणि केंद्र शासनावर टीका केली. आंदोलनामध्ये मराठा सेवासंघ, छावा, अखिल भारतीय मराठा महासंघ, संभ्राजी ब्रिगेड, रिपब्लिकन सेना, कुरेशी जमात, मुस्लिम विकास परिषद, आम आदमी पार्टी, ऑल इंडिया इमाम कौन्सिल आदी संघटनांचा सहभाग होता.

स्प्रेडशर्ट आस्थापनाने क्षमा मागावी ! - अमेरिकेतील हिंदूंची मागणी

जर्मनीतील स्प्रेडशर्ट या आस्थापनाकडून अंतर्वस्त्रांवर हिंदु देवतांची चित्रे छापण्याचा अश्‍लाघ्य प्रकार
     नेवाडा (अमेरिका) - जर्मनीतील स्प्रेडशर्ट या आस्थापनाने अंतर्वस्त्रांवर श्रीगणेश, शिव आणि दुर्गा या हिंदु देवतांची चित्रे छापल्याच्या प्रकरणी हिंदूंनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. हिंदु देवतांची विटंबना करणार्‍या या अंतर्वस्त्रांची विक्री स्प्रेडशर्टने त्यांच्या संकेतस्थळावरून थांबवावी आणि सदर अंतर्वस्त्रे तात्काळ मागे घ्यावीत. तसेच हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर केल्याच्या प्रकरणी सदर आस्थापनाने हिंदूंची क्षमायाचना करावी, अशी मागणी अमेरिकेतील हिंदूंनी केली आहे. (हिंदु देवी-देवतांच्या अनादरच्या विरोधात तात्काळ वैध मार्गाने कृती करणार्‍या अमेरिकेतील जागृत हिंदूंकडून भारतातील जन्महिंदू काही शिकतील का ? - संपादक) स्वत:च्या आर्थिक लाभासाठी इतरांच्या धार्मिक भावना दुखावणे योग्य नव्हे. श्रीगणेश, शिव, दुर्गा इत्यादी देवता हिंदूंसाठी पूजनीय आहेत. त्यांचे स्थान हे मंदिर किंवा देवघरात असते, याचे भान व्यापारी आस्थापनांनी ठेवायला हवे, असेही अमेरिकेतील हिंदूंनी म्हटले आहे. या प्रकरणी धर्माभिमानी हिंदू वैध मार्गाने स्प्रेडशर्टचा निषेध नोंदवत आहेत.मलेशियातील मंदिरांना सुरक्षा पुरवण्याची हिंदु संघटनांची मलेशियाच्या गृहमंत्र्यांकडे मागणी !

जिथे भारतातीलच हिंदूंची मंदिरे असुरक्षित आहेत, तिथे जगभरातील हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण कसे होणार ?
मलेशियामध्ये हिंदु मंदिरांवरील आक्रमणात वाढ झाल्याचे प्रकरण 
      कुआलालुंपूर - मलेशियामध्ये हिंदु मंदिरांवरील आक्रमणात वाढ झाली आहे. यामध्ये आतंकवादी संघटनांचा हात असल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर मलेशियातील हिंदु मंदिरांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी मलेशियातील स्वयंसेवी हिंदु संघटनांनी केली आहे. मलेशियाचे गृहमंत्री अहमद जहिद हमिदी आणि पोलीस महानिरीक्षक खलीद अबू बकर यांची भेट घेऊन मंदिरांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती रपट या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कायदेशीर सल्लागार एम्. मनोगरन् यांनी कुआलालुंपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. (मलेशियातील हिंदूंच्या मंदिरांवर वाढत असलेल्या आक्रमणांच्या विरोधात केंद्रसरकारने मलेशियाच्या सरकारला जाब विचारावा, अशी भारतातील हिंदूंची अपेक्षा आहे ! - संपादक) मलेशियातील हिंदु समुदायाकडे मंदिरांना सुरक्षा पुरवण्यासाठी निधी अपुरा पडतो. त्यामुळे यापुढेही मंदिरांवर आक्रमण होण्याची शक्यता आहे, असे मलेशियातील एका हिंदु संघटनेचे महासचिव जी. गुणराज यांनी सांगितले.
     मलेशियाच्या पेनांग राज्यामध्ये गेल्या २ मासांत हिंदूंच्या ४ मंदिरांवर आक्रमण करण्यात आले. तसेच केडाह आणि पेराक येथेही हिंदु मंदिरांवर आक्रमण करण्यात आले. हिंदु मंदिरांवरील या आक्रमणांची चौकशी करण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी रपटचे अध्यक्ष ए. राजरेटिनम् यांनी केली आहे.

कॅलिफोर्नियाच्या शाळांमध्ये प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासक्रमात वाढ !

      कॅलिफोर्निया (अमेरिका) - अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या शिक्षण मंडळाने नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. यामध्ये प्राचीन भारतीय इतिहास आणि हिंदु धर्म यांविषयीच्या अभ्यासक्रमात वाढ करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रमात इतिहास आणि समाजशास्त्र यांविषयीचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात आला आहे. काही शिक्षणतज्ञांनी प्राचीन भारत ऐवजी प्राचीन दक्षिण आशिया, असे नाव देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र अमेरिकेतील हिंदूंनी त्याला तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे शिक्षण मंडळाने भारताच्या बाजूनेच निवाडा दिला. (भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाला विरोध करणार्‍या अमेरिकेतील हिंदूंचे अभिनंदन ! किती भारतीय हिंदू भारतीय पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून होणार्‍या हिंदुद्वेषी आणि विकृत इतिहासाला विरोध करतात ? - संपादक)

गेल्या ४९ वर्षांत बांगलादेशमधून १ कोटी १० लाख हिंदू विस्थापित !

इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे पलायन होऊनही भारतातील एकाही राजकीय पक्षाने 
आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याविरोधात काहीच केले नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
      ढाका - गेल्या ४९ वर्षांत धार्मिक अत्याचार आणि भेदभाव यांना कंटाळून बांगलादेशमधून जवळजवळ १ कोटी १० लाख हिंदू विस्थापित झाले आहेत, अशी धक्कादायक माहिती बांगलादेशचे प्रख्यात अर्थतज्ञ डॉ. अबुल बरकत यांनी बांगलादेशची सातवी पंचवार्षिक योजना : २०१६-२०२० या विषयावर भाषण करतांना दिली. ते बांगलादेशच्या राजशाही विश्‍वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत बोलत होते. डॉ. अबुल बरकत यांनी दिलेले आकडे गृहित धरले, तर १९६४ ते २०१३ या कालावधीत प्रत्येक दिवशी ६३२ हिंदू धार्मिक अत्याचार आणि भेदभाव यांना कंटाळून बांगलादेशातून विस्थापित झाले.

चुकीच्या पद्धतीने राष्ट्रगीत म्हटल्याच्या प्रकरणी सनी लिओन यांच्या विरोधात गुन्हा दाखल

   नवी देहली - अश्‍लील चित्रपटातील अभिनेत्री सनी लिओन यांच्या विरोधात येथील न्यू अशोक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत उपस्थित असतांना सनी लिओन यांनी राष्ट्रगीत चुकीच्या पद्धतीने म्हटले. यामुळे त्यांच्या विरोधात उल्हास नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली.

इसिसचे समर्थन करणार्‍या एम्आयएम् पक्षाची मान्यता रहित करा ! - शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील

   मुंबई, २२ जुलै (विशेष प्रतिनिधी) - इसिस या आतंकवादी संघटनेचे समर्थन करणार्‍या आणि मराठवाड्यातील मुसलमान तरुणांना भडकवणार्‍या एम्आयएम् पक्षाची मान्यता रहित करण्यात यावी, अशी मागणी परभणी येथील शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी २२ जुलै या दिवशी विधानसभेत औचित्याच्या सूत्राद्वारे केली. (धर्मांध एम्आयएम् पक्षाच्या विरोधात आवाज उठवणारे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांचे अभिनंदन ! - संपादक)
या पत्रकात आमदार डॉ. राहुल पाटील यांनी म्हटले आहे की,
१. इसिसचा कट्टर समर्थक नासेरबीन चाउसला आतंकवादविरोधी पथकाने परभणी येथून १५ जुलैला अटक केली.
२. मराठवाड्यातील १०० पेक्षा अधिक मुसलमान युवक अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. ते सर्व तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी गेले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संभाजीनगर येथे ५१ पोलिसांवर शिरस्त्राण परिधान न केल्याप्रकरणी कारवाई

कायदाद्रोही पोलीस !
       संभाजीनगर, २२ जुलै - पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूक पोलीस विभागाला विनाशिरस्त्राण दुचाकी चालवणार्‍या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. (अशा पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश का द्यावे लागतात ? कायदा मोडणार्‍या पोलिसांवर कारवाई करणे, हे वाहतूक पोलीस विभागाला आपले कर्तव्य वाटत नाही का ? - संपादक) त्यानुसार शिरस्त्राण परिधान न करणारे ५१ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर २१ जुलै या दिवशी वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई केली. (असे कायदाद्रोही पोलीस समाजाला कायद्याचे पालन करण्यास कधीतरी शिकवतील का ? - संपादक) या प्रकरणी कारवाई केलेल्या पोलिसांची नावे पोलीस आयुक्तांना देण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. त्यामुळे पोलीस आयुक्त त्या पोलिसांवर काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबईतील विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणी विधानसभेचे कामकाज दोन वेळा स्थगित !

       मुंबई, २२ जुलै (विशेष प्रतिनिधी) - नवी मुंबईमधील कळंबोली परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला ११ वीत प्रवेश न मिळाल्याने तिने आत्महत्या केली. या विषयावरून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत शासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आले.
       शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांना पॉईंट ऑफ इन्फर्मेशन अंतर्गत हे सूत्र उपस्थित केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांसह विरोधी पक्षाचे आणि शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले. एकीकडे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी २१ जुलै या दिवशी सभागृहात अकरावी प्रवेशापासून कोणीही वंचित रहाणार नाही, असे निवेदनात स्पष्ट केले होते. तरीही विद्यार्थिनीने प्रवेश न मिळाल्याने आत्महत्या केली. शासनाकडून यावर स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यावरून सदस्य अध्यक्षांसमोरील हौदात येऊन घोषणाबाजी आणि गोंधळ करू लागले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा २५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.

कोथरूड (पुणे) येथे वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍या हस्तकाला अटक : मुख्य आरोपी पसार

       पुणे, २२ जुलै - येथील भुसारी कॉलनी येथील शिवालय संकुलातील सदनिकेमध्ये काही हस्तकांच्या माध्यमातून कल्याणी देशपांडे मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी २० जुलैच्या रात्री धाड टाकून रवि उपाख्य रत्नदीप तपसे याला अटक केली. त्याच्या कह्यातून ३ सज्ञान मुलींची सुटका करण्यात आली. या मुली उत्तर प्रदेश, मुंबई आणि कोलकाता येथील आहेत. पोलिसांनी त्यांना सुधारगृहात पाठवले आहे. या पूर्वी ३ गुन्हे प्रविष्ट झालेल्या कल्याणी देशपांडेवर पुन्हा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून ती पसार आहे. (पहिल्याच गुन्ह्याच्या वेळी कठोर शिक्षा केली असती, तर अन्य युवतींचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असते ! - संपादक)

(म्हणे) डॉ. झाकीर नाईक यांना लक्ष्य करून केंद्रशासनाकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा !

अनेक जिहादी कारवाया करणार्‍या कार्यकर्त्यांचा भरणा असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने हिंदुद्वेषी 
तथा आतंकवाद्यांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. झाकीर नाईक यांची पाठराखण केल्यास आश्‍चर्य ते काय ?
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या धर्मांध संघटनेचा कांगावा !
      मंगळुरू - डॉ. झाकीर नाईक यांना लक्ष्य करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत केंद्रशासन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहे, असा आरोप पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) या धर्मांध संघटनेचे कर्नाटक राज्य सचिव शफी बेळ्ळारी यांनी केला आहे. विविध मुसलमान संघटनांनी मंगळुरू येथील जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर आयोजित एका निषेध मोर्च्याला संबोधित करतांना त्यांनी हा आरोप केला. (राष्ट्रद्रोह्यांचे समर्थन करणार्‍या संघटनाही राष्ट्रद्रोहीच होत ! धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे पुरो(अधो)गामी राष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात मात्र मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या ! - संपादक)


भारताच्या सुरक्षेला अपायकारक ! - डी.सी. नाथ, माजी विशेष संचालक, गुप्तचर विभाग

इसिसचा बांगलादेशमधील शिरकाव 
     नवी देहली - गेल्या काही वर्षांमध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) या आतंकवादी संघटनेने बांगलादेशमध्ये तळागाळात शिरकाव केला आहे. त्यांनी नुकत्याच बांगलादेशमध्ये घडवलेल्या बॉम्बस्फोटांमुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भारताच्या सुरक्षेवर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी गुप्तचर विभागाचे माजी विशेष संचालक डी.सी. नाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
      बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना लक्ष्य करण्याचा, तर खलिदा बेगम यांच्याशी सलगी करण्याचा इसिसचा डाव आहे. या प्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला तपास करण्याचे आदेश देण्यात यावे, असेही डी.सी. नाथ यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

काश्मीरमधील हिंसाचाराच्या वणव्यात सामाजिक संकेतस्थळांवरील चिथावणीखोर संदेशांचा मोठा वाटा !

संकेतस्थळांवरून कोणी कितीही चिथावण्या दिल्या, तरी दंगलखोरांना 
रोखण्यासाठी सुरक्षा दलांना आदेश का दिला जात नाही ?
पाकमधून १० सहस्राहून अधिक पोस्ट करण्यात आल्याचे निष्पन्न
     नवी देहली - हिजबूल मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेचा कमांडर बुरहान वाणी याला भारतीय सैन्याने ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये भडकलेल्या हिंसाचाराच्या वणव्यामध्ये सामाजिक संकेतस्थळांवरील चिथावणीखोर संदेशांचा मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे. काश्मीरमधील हिंसाचाराच्या कालावधीत सामाजिक संकेतस्थळांवर बंदी घालण्यात आली होती. त्या वेळी सामाजिक संकेतस्थळांवरील प्रतिक्रियांच्या विविध पोस्ट तपासण्यात आल्या.

डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे जनसंपर्क अधिकारी अर्शीद कुरेशी यांना अटक !

    नवी मुंबई - डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे जनसंपर्क अधिकारी (पी.आर्.ओ.) अर्शीद कुरेशी यांना केरळ पोलीस आणि महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक यांनी २० जुलैला रात्री उशिरा संयुक्त कारवाई करून अटक केली. येथील सीवूड्समधील कुरेशी यांच्या फ्लॅटवर धाड टाकून त्यांना अटक केल्यावर न्यायालयाने ४ दिवसांची कोठडी दिली आहे. नंतर कुरेशी यांना केरळमध्ये नेण्यात येणार आहे. केरळमधील एबीन जॅकोब आणि त्याची बहीण मरिअम या दोघांवर तिचा पती बेस्टिन अन् अर्शीद कुरेशी यांनी इस्लाममध्ये धर्मांतरित होण्यासाठी आणि इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी बळजोरी केली होती. वर्ष २०१४ मध्ये एबीन हा मुंबईत येऊन कुरेशी यांना भेटला होता; परंतु कुरेशी यांनी बलपूर्वक धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्यावर तो केरळला परत गेला. केरळमधून २१ जणांसह त्याची बहीण मरिअम आणि तिचा पती बेस्टीन विन्सेट बेपत्ता आहे. मरिअम एका कॉल सेंटरमध्ये कामाला होती. गेल्याच वर्षी ती नवी मुंबईत स्थायिक झाली होती.

भारत सरकारने सांगितल्यास केव्हाही भारतात येईन ! - डॉ. झाकीर नाईक

सरकारने कशाला सांगायला हवे, स्वतःच का येत नाही ?
    जेद्दा (सौदी अरेबिया) - भारत सरकारला आवश्यकता भासल्यास केव्हाही भारतात परतण्याची सिद्धता आहे, असे विधान डॉ. झाकीर नाईक यांनी २२ जुलैला केले आहे. एका इंग्रजी दैनिकाला त्यांनी जेद्दातून दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील विधान केले आहे.
   डॉ. झाकीर म्हणाले की, भारतातील एकात्मता भंग करण्याचा प्रयत्न मी केल्याचे कोणी दाखवून दिल्यास किंवा कायद्याचे पालन केले नसल्याचे सिद्ध झाल्यास कारवाईला सामोरे जाण्याची सिद्धता आहे.
   ते पुढे म्हणाले की, इसिस संघटना इस्लामच्या विरोधात असून निष्पाप नागरिकांना मारण्याचे कृत्य म्हणजे मानवतेला काळिमा फासल्यासारखे असल्याचे कुराणमध्ये म्हटले आहे.

आदर्श इमारत सैन्याच्या कह्यात द्या ! - सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रसरकारला आदेश

  नवी देहली - मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटीची इमारत सैन्याच्या कह्यात द्यावी, असा आदेश २२ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने केंद्रसरकारला दिला आहे. इमारत रिकामी करून एक आठवड्यात सोसायटीच्या कह्यात देण्यात यावी, असे या आदेशात म्हटले आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने ही इमारत पाडण्याचा आदेश दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने गोवंडी (मुंबई) येथील हिंदूसंघटन मेळाव्याच्या प्रसाराला आरंभ

स्वयंभू हनुमान मंदिर, देवनार,
गोवंडी येथे प्रार्थना करतांना समस्त हिंदुत्ववादी

       गोवंडी - येथील समस्त हिंदुत्ववाद्यांनी हिंदूसंघटन मेळावा २४ जुलै या दिवशी गणेश मैदान सभागृह, स्वयंभू हनुमान मंदिराजवळ, देवनार म्युनिसिपल कॉलनी, गोवंडी (प.) येथे सायंकाळी ६ वाजता घेण्याचे नियोजन केले आहे. या कार्याला प्रेरणा मिळावी म्हणून प्रसाराचा प्रारंभ स्थानिक ग्रामदेवतेच्या पूजनाने झाला. या वेळी हिंदुत्ववादी सर्वश्री विजय सरगर, किशोर आवटी, विनोद जगताप, कैलास वाघमोडे, संदीप मांडवकर, राहुल पवार, विक्रम यादव आणि सुनील तावडे हे उपस्थित होते. सर्व हिंदुत्ववाद्यांनी चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द या विभागातील हिंदूंच्या प्रत्येक घराघरात या संघटन मेळाव्याचा प्रसार करण्याचा निर्धार केला.

सर्वोच्च न्यायालयाकडून काश्मीरमधून अन्य राज्यांत खटल्यांचे हस्तांतरण करण्याची तरतूद !

     नवी देहली - काश्मीरमधील खटले देशभरात कुठेही हस्तांतरित केले जाऊ शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधिशांच्या पिठाने नुकताच दिला. एखादी व्यक्ती दुसर्‍या राज्यात जाऊन खटला चालवण्यास असमर्थ असेल, तर खटला दुसर्‍या राज्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो. देशातील अन्य राज्यांत ही तरतूद आहे, तर काश्मीरलाही ती लागू होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी एखाद्या खटल्याला एका राज्यातून दुसर्‍या राज्यात स्थलांतरित करण्यासाठी ही तरतूद काश्मीरमध्ये लागू होत नव्हती. त्यामुळे काश्मीरमधून खटले अन्य राज्यात स्थलांतरित करता येत नव्हते. (काश्मीर भारतात आहे कि पाकमध्ये ? स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर अशी तरतूद लागू करण्यात येते, हे भारतियांना लज्जास्पद होय ! - संपादक)

मध्यप्रदेशमधील शाळेने विद्यार्थ्यांना वाटलेल्या वह्यांमध्ये भारताच्या नकाशातून काश्मीरचा भाग वगळला !

अशा शाळेत कधीतरी राष्ट्रभक्तीचे शिक्षण मिळेल का ?
      शहडोल (मध्यप्रदेश) - येथील ग्रीन बेल्स स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शाळेकडून वह्यांचे वाटप करण्यात आले असून त्यात काश्मीरचा भाग वगळून भारताचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेचे संचालक महंमद यांच्यासह ३ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. १८ जुलैला त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. (देशद्रोही कृत्ये करूनही जामिनावर लगेच मुक्तता होते. यामुळे देशद्रोह्यांचे धाडस वाढून वारंवार नकाशाचे विकृतीकरण होतेे, असे कोणाला वाटल्यास नवल ते काय ? राष्ट्रद्रोह्यांवर त्वरित कठोर कारवाई व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! - संपादक)

(म्हणे) भूत आणि प्रेत यांमुळे शेतकरी आत्महत्या करतात ! - भूपेंद्र सिंह, गृहमंत्री, मध्यप्रदेश

हा स्वत:चे दायित्व झटकण्याचा प्रकार नव्हे का ?
     भोपाळ (मध्यप्रदेश) - शेतकरी दुष्काळ आणि अल्प उत्पादन यांमुळे नव्हे, तर भूत आणि प्रेत यांमुळे आत्महत्या करत आहेत, असा दावा मध्यप्रदेशाचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी २० जुलैला विधानसभेत केला. मध्यप्रदेशात चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार शैलेंद्र पटेल यांनी उपस्थित केलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रश्‍नाचे उत्तर देतांना ते बोलत होते. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून विधानसभेत मोठा गदारोळ झाला. यावर भूपेंद्र सिंह म्हणाले, मध्यप्रदेशातील काही ग्रामीण भागात भूत उतरवले जाते; तथापि सभागृहातील गदारोळ न थांबल्यामुळे कामकाज स्थगित करण्यात आले.

गाय आनंदी असेल, तर तिचे दूध अधिक पौष्टिक असते ! - संशोधनातील निष्कर्ष

पाश्‍चात्त्य लोक गोमातेविषयी जिज्ञासेने संशोधन करतात, तर भारतात मात्र तिची हत्या होते ! 
हा प्रकार म्हणजे दिव्याखाली अंधार आहे !
     नवी देहली - गायीच्या दुधाच्या पौष्टिकतेच्या संदर्भात संशोधकांनी संशोधन केले असून त्यातून गाय आनंदी असेल, तर तिचे दूध अधिक पौष्टिक असते, असा निष्कर्ष समोर आला आहे.
       या संशोधनात गाय कोणत्या प्रजातीची असते, यावरही बरेच काही अवलंबून असते, असे लक्षात आले आहेे. संशोधनाच्या वेळी होलस्टाईन आणि जर्सी गायींमध्ये सरोटिन रसायनाचा प्रभाव वेगवेगळा दिसून आला. हे रसायन दुधातील कॅल्शियमचे प्रमाण कायम ठेवते. गाय जर आनंदी असेल, तर तिच्यात सरोटिनच्या रसायनाचे स्राव अधिक प्रमाणात होते. विस्कॉन्सिन मेडिसिन युनिव्हर्सिटीतील लारा हर्नाडेज यांनी दूध देणार्‍या गायींतील दूध आणि रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यात सरोटिन कोणती भूमिका पार पाडते, यावर संशोधन केले. पाडसाला जन्म देण्यापूर्वी होलस्टाईन आणि जर्सी गायींना सरोटिनपूरक खुराक दिला. त्यानंतर त्यांच्या शरिरातील रक्त आणि दुधातील कॅल्शियमच्या प्रमाणाचा अभ्यास केला.भारतीय वायूदलाचे विमान २९ प्रवाशांसह बेपत्ता

   नवी देहली - चेन्नईवरून पोर्ट ब्लेअरकडे निघालेले भारतीय वायूदलाचे एएन्-३२ हे विमान २२ जुलैला बेपत्ता झाले आहे. या विमानामध्ये २९ प्रवासी आहेत. बंगालच्या उपसागरादरम्यान या विमानाचा रडारशी संपर्क तुटला आहे. भारतीय वायूदल आणि तटरक्षकदल यांनी शोधमोहीम चालू केली आहे. रात्री उशिरापर्यंत या विमानाचा शोध लागला नव्हता.

(म्हणे) चूक केली असेल, तर क्षमा मागीन ! - भगवंत मान

संसदेवर आक्रमण करणार्‍या महंमद अफझलच्या फाशीला विरोध
करणार्‍या पक्षाच्या खासदाराकडून याहून वेगळे काय घडणार ?

संसदेतील प्रवेशमार्गाचा व्हिडिओ बनवून सुरक्षा धोक्यात आणणारे आपचे खासदार भगवंत मान
नवी देहली - मी जर चूक केली असेल, तर त्यासाठी क्षमा मागीन, असे आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनी संसदेतील प्रवेश मार्गाचे चित्रीकरण केल्याच्या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन त्यांना सांगितले आहे. या चित्रीकरणाच्या घटनेवरून वाद निर्माण झाल्याने संसदेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले. या संदर्भात सुमित्रा महाजन म्हणाल्या की, मान यांच्यावर कारवाई केली जाणार आहे; मात्र ती कशा प्रकारची असावी याविषयी सर्व पक्षांच्या प्रमुखांना विचारून ठरवण्यात येईल. (सुरक्षेच्या संदर्भात नियमांचे उल्लंघन करणार्‍याला कारागृहातच डांबायला हवे, हीच शिक्षा हवी, यात विचारण्यासारखे काय आहे ? - संपादक)

सनातन बंदीच्या विरुद्ध वारकरी संप्रदायाचा सनातन संस्थेला वाढता पाठिंबा !

सनातन संस्थेवर बंदीची मागणी अयोग्य आणि निषेधार्ह !
- ह.भ.प. सोपानकाका नामदेवबुवा टेंभूकर महाराज, श्रीक्षेत्र पंढरपूर
   सनातन ही संस्था हिंदु धर्म प्रसाराचे आणि प्रचाराचे कार्य निरपेक्षपणे, अव्याहत आणि अखंडपणे करीत आहे. सनातनच्या कार्याचा प्रभाव सर्वच ठिकाणी प्रभावीपणे दिसून येत आहे. सनातन संस्थेने आजपावेतो हिंदु धर्माविरुद्ध बोलणार्‍यांचा सनदशीर मार्गानेे आणि लेखणीद्वारे निषेध केलेला आहे. तसेच अनेक वेळा हिंदु देवदेवतांच्या विडंबनाविषयी, संताविषयी आणि संत वांड्मयाविषयी आक्षेपार्ह, निंदनीय लेखन करणार्‍या साहित्यिकाविषयी सनातनमधून आवाज उठवला आहे. सनातन ही संस्था वारकरी संप्रदायाला पूरक (पोषक) अशा पद्धतीने कार्य करीत आहे. हे जाणून वारकरी संप्रदायातील मान्यवर महाराज या सर्वांनीच सनातनला भक्कम पाठिंबा दिला आहे. याचे कारण सनातनचे हिंदु जागृतीचे कार्य प्रेरणादायी, प्रशंसनीय आणि अभिमानास्पद आहे. सनातनच्या कार्याची व्याप्ती पाहून काही पक्ष, संघटना सनातनविरूद्ध गरळ ओकून जातीय दंगली पेटवण्यासाठी प्रक्षोभक भाषणे करून समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. तेव्हा शासनाने पुरोगामी संघटना अथवा कोणत्याही पक्षाच्या वा संघटनेच्या प्रचाराला बळी पडून सनातनवर बंदी लादू नये. सनातनच्या साधकांच्या हातून गुन्हा घडलेला आहे कि नाही हे अजून सिद्ध झालेले नाही. गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय तो गुन्हेगार आहे, हे ठरवणे अशक्य आहे. त्यासाठी कायदेशीर न्याय संस्था आहेत. ते योग्य निर्णय देतील. त्यासाठी सनातन संस्थेला जबाबदार धरणे अन्यायकारक आहे. हे या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो.

भक्तांच्या उद्रेकाची वाट पाहू नका ! - करवीरनिवासिनी श्री अंबाबाई भक्त मंडळाचे पत्रक

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील 
देवीच्या मूर्तीवर नागचिन्ह घडवण्याचे प्रकरण
       कोल्हापूर, २२ जुलै - करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर मूर्तीच्या मस्तकावरील नागचिन्ह गायब झाले आहे. देवीच्या मूर्तीवरील नागचिन्ह त्वरित घडवून घ्यावे, या मागणीचे निवेदन अनेकदा प्रशासनाला सादर केले; पण जिल्हाधिकार्‍यांनी मूर्तीवर नाग घडवण्याविषयी समिती स्थापन करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार कोणतीच कारवाई केली नसल्याने देवीच्या अपूर्ण मूर्तीची पूजा केली जात आहे. प्रशासन भक्तांच्या उद्रेकाची वाट पहात आहे का, असा प्रश्‍न करवीरनिवासिनी श्री अंबाबाई भक्त मंडळाच्या वतीने कार्यवाह दिलीपराव पाटील आणि सहकार्यवाह वसंतराव मुळीक यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

पालिका प्रशासनाने १० दिवसांत रस्त्यांवरील १ सहस्र २०० खड्डे बुजवले

रस्त्यावर खड्डे फार नाहीत !, असा दावा 
करणार्‍या पुण्याच्या महापौरांना सणसणीत चपराक !
       पुणे, २२ जुलै - शहरातील रस्त्यांवर खड्डे फार नाहीत, असा दावा पुण्याचे महापौर प्रशांत जगताप आणि पालिका प्रशासन यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. पालिका प्रशासनाने १० दिवसांत प्रमुख ५० रस्त्यांसह अन्य भागांतील १ सहस्र २०० खड्डे बुजवल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी २१ जुलै या दिवशी दिली. (या प्रकरणी प्रशासन आणि महापौर जनतेची क्षमा मागतील का ? - संपादक) आगामी काळात रस्त्यांवर खड्डे पडू नयेत, यासाठी उपाययोजना केल्याचेही त्यांनी सांगितले.

(म्हणे) गोरक्षक कोणी निर्माण केले ?

  • देशात राजरोसपणे गोहत्या होत असतांना कसाई कोणी निर्माण केले ? असा प्रश्‍न कधी शरद यादव यांनी संसदेत विचारला आहे का ?
  • जदयुचे खासदार शरद यादव यांंनी संसदेत विचारला प्रश्‍न !
       नवी देहली - गुजरातमधील उना येथे गोरक्षकांकडून दलित कुटुंबातील सदस्यांना झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी राज्यसभेमध्ये चर्चा चालू असतांना गोरक्षक कोणी निर्माण केले ? शासन त्यांच्यावर बंदी का घालत नाही ? असा प्रश्‍न जनता दल युनायटेडचे (जदयुचे) खासदार शरद यादव यांनी २१ जुलैला केला.
       उना येथे सदर कुटुंब गायीचे चामडे काढत असतांना गोहत्या केल्याच्या संशयावरून काही गोरक्षकांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या कुटुंबातील ४ युवकांना मारहाण करण्यात आली होती. युवकांना सकाळपासून दुपारपर्यंत मारहाण करण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी पोलिसांना अनेक वेळा बोलावले; मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप सदर दलित कुटुंबाकडून करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर काही संघटनांनी गुजरातमध्ये हिंसक आंदोलन केले.

कल्याण येथे दत्त मंदिरातील दानपेटीतून ५ सहस्र रुपयांच्या रकमेची चोरी !

हिंदूंनो, अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळी अशा
चोरीच्या घटना झाल्याचे कधी ऐकले आहे का ?
    कल्याण - येथील रामबाग परिसरातील दत्त मंदिरातील दानपेटीतून ५ सहस्र रुपयांच्या रकमेची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली. मंदिराच्या दरवाजाला लावलेले कुलूप लोखंडी अवजाराने तोडून चोरी करण्यात आली आहे. चोरटे क्लोज्ड सर्किट टीव्ही कॅमेर्‍यात बंदिस्त झाल्याने त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी मंदिराचे व्यवस्थापक श्री. मारुती नांगरे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.

कांचीकामकोटी पीठाचे मठाधिपती जयेंद्र सरस्वती यांच्या मुक्ततेविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान !

तमिळनाडूच्या अद्रमुक 
सरकारचा हिंदुद्वेष चालूच !
       चेन्नई - कांचीकामकोटी पीठाचे मठाधिपती जयेंद्र सरस्वती आणि इतर ८ जणांची लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांना मारहाण केल्याच्या आरोपातून जिल्हा न्यायालयाने एप्रिल मासात निर्दोष मुक्तता केली होती; मात्र या निर्णयाच्या विरोधात तमिळनाडू सरकारने चेन्नई उच्च न्यायालयात आव्हान केल्याने न्यायालयाने कांचीकामकोटी पीठाचे मठाधिपती जयेंद्र सरस्वती आणि इतर ८ जणांना नोटीसा पाठवल्या आहेत.
       या आव्हानाची सुनावणी न्या. आर्. सुबय्या यांच्यासमोर चालू झाली असता त्यांनी आरोपींना नोटीसा पाठवण्याचा निर्णय घेतला. आव्हानासाठी दाखल केलेल्या याचिकेत राज्य सरकारने खालच्या न्यायालयाचा निर्णय अवैध होता आणि पुरावे असतांनाही चुकीचा दिला गेला, अशी भूमिका घेतली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी २ आठवड्यानंतर होणार आहे.

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात मंगळुरू (कर्नाटक) येथील पत्रकार परिषदेतून हिंदुत्वनिष्ठांची सरकारला चेतावणी !

सनातन संस्थेची न्याय्य बाजू घेणार्‍या सर्व हिंदुत्वनिष्ठांची संस्था आभारी आहे !
पत्रकार परिषदेला संबोधित करतांना मध्यभागी 
हिंदुत्वनिष्ठ नेते कुमार मलेमार 
आणि इतर मान्यवर
   मंगळुरु - सनातन संस्था समाजाच्या कल्याणासाठी कार्य करत आहे. ही संस्था जगभरातील लोकांना अध्यात्माविषयी मार्गदर्शन करत आहे. अध्यात्माचा प्रसार करणार्‍या अशा संस्थेवर बंदी घालण्यासाठी शासनाने पुढाकार घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी हिंदुत्ववादी नेते कुमार मलेमार यांनी १९ जुलै या दिवशी मंगळुरू येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

तेलंगण राज्यात मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी सरकारच्या विविध योजना घोषित !

  • प्रत्येक राजकीय पक्ष मुसलमानांना खुश करण्यासाठी प्रयत्न करतो, तरीही हिंदूच अशा पक्षांना मते देऊन सत्तेवर बसवतात !
  • निधर्मी भारतात धर्माच्या आधारे सोयीसुविधा देणारे राज्यकर्ते लोकशाही निरर्थक ठरवतात ! 
     भाग्यनगर - तेलंगण राज्य सरकारने मुसलमानांच्या लांगुलचालनाचे धोरण कायम ठेवत अनेक योजना जाहीर केल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री महमूद अली यांनी अल्पसंख्यांक कल्याण समितीची बैठक घेऊन या योजनांचा निर्णय घेतला आणि त्याची माहिती पत्रकारांना दिली.
१. राज्यातील अल्पसंख्यांक (मुसलमान) बेरोजगार युवकांना भाग्यनगर शहरात १ सहस्र तर इतर जिल्ह्यात प्रत्येकी ५०० ऑटोरिक्शांचे वाटप करण्यात येईल.
२. राज्यातील २५० उर्दू शाळांना प्रत्येकी ५० सहस्र रुपयांचा निधी सोयी आणि पायाभूत सुविधांच्या नावाखाली देण्यात येईल.

सनातन संस्थेवर बंदी घातल्यास हिंदु समाज ते सहन करणार नाही ! - जयराज सालियन

सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात बेळ्तंगडी येथे धर्मरक्षा समितीची पत्रकार परिषद
      बेळ्तंगडी (कर्नाटक) - सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न केंद्रशासनाने केला, तर हिंदु समाज ते सहन करणार नाही, हे लक्षात ठेवा, अशी चेतावणी धर्मरक्षा समितीचे बेळ्तंगडी तालुका संचालक जयराज सालियान यांनी सनातन संस्थेच्या समर्थनार्थ घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
    यावेळी धर्मरक्षा समितीचे कार्यकर्ते अधिवक्ता सुब्रह्मण्य कुमार अगर्त म्हणाले, सर्वधर्म समभावाच्या नावाखाली हिंदु संस्कृतीचा नाश करणेे आणि हिंदु संघटनांमध्ये फूट पाडण्याचे काम हाताच्या बोटांवर मोजता येतील, असे बुद्धीवादी करत आहेत. या षड्यंत्राविरुद्ध हिंदु समाजाने संघटितपणे सामना करण्याची वेळ आली आहे. या परिषदेला अधिवक्ता बी.के. उदयकुमार बंदारू, छत्रपती शिवाजी मित्र संघाचे कार्यदर्शी संतोष उजिरे, महम्मायी केसरी संघ दिडुपेचे संचालक प्रमोद दिडुपे उपस्थित होते.

हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्युब यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट

सनातन संस्थेच्या विरोधात गरळ ओकणार्‍या राणा अय्युब 
यांची समाजद्वेषी पत्रकारिता उघड करणारी घटना ! 
मोहनदास गांधी यांना संघाने मारल्याचे ट्विट केल्याचे प्रकरण ! 
     नवी देहली - पत्रकार राणा अय्युब यांनी विविध जातीत वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात देहली येथील भाजपच्या युवा शाखेचे राज्य सचिव अभिमन्यू त्यागी यांनी येथील मंदिर मार्ग सायबर सेल पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. (अशा समाजकंटक पत्रकारांच्या विरोधात तक्रार करणारे श्री. त्यागी यांचे अभिनंदन ! - संपादक) राणा अय्युब यांनी १९ जुलै २०१६ या दिवशी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोहनदास गांधी यांनी दलित आणि मुसलमान समाजाला समान हक्क मिळावेत, याचे समर्थन केले म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांची हत्या केली, असे म्हटले आहे. (न्यायालयाच्या निकलात कुठेही संघाचा उल्लेख नाही. असे असतांनाही असे मत व्यक्त करणे, हा कायदाद्रोह होय ! अशी मंडळी पत्रकारितेच्या नावाखाली समाजात असत्यच खपवत असतील, हे समाजाला वाटल्यास चूक ते काय ? - संपादक) सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच राहुल गांधी यांना संघाला गांधी यांच्या हत्येला उत्तरदायी असल्याचे म्हटल्याच्या कारणावरून क्षमा मागावी अथवा मानहानीच्या खटल्याला सामोरे जावे, असे म्हटले होते.

भारतीय सैन्याने सीमेवरील रणगाड्यांची नावे टिपू सुलतान आणि औरंगजेब ठेवली !

ज्यांनी हिंदूंची असंख्य मंदिरे लूटली, स्त्रियांची अब्रू लूटली आणि लक्षावधी हिंदूंना ठार करून येथील 
थोर संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्या क्रूर आक्रमकांचा भारतीय सैन्यासमोर आदर्श ठेवून 
संरक्षण विभाग काय साध्य करू पहात आहे ? 
     नवी देहली - वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारताने प्रथमच लद्दाखमधील भारत-चीन सीमेवर रणगाडे तैनात केले असून यांतील काही रणगाड्यांची नावे टिपू सुलतान, महाराणा प्रताप, औरंगजेब अशी ठेवण्यात आली आहेत. (आता भारतीय सैन्य आणि संरक्षण विभाग यांना खरा इतिहास शिकवण्याची वेळ आली आहे, असे म्हणायचे का ? - संपादक) आतापर्यंत असे १०० रणगाडे सीमेचे रक्षण करत असून यात अजून अनेक रणगाडे समाविष्ट करण्यात येत आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून समजली आहे. 
     चीनने भारताच्या सीमेवर सैन्याची संख्या वाढवली आहे. याची संरक्षण विभागाने दखल घेतली असून भारताने ७-८ मासांआधीच सीमेवरील सैन्यात वाढ करत रणगाडे तैनात केली आहेत;. मात्र हे रणगाडे सुस्थितीत ठेवण्यासाठी सैन्याला बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. लद्दाख सीमेवर हवा विरळ असते आणि तापमानही उणे ४५ अंशापर्यंत घसरते. अशा वातावरणात रणगाड्यांना कार्यरत ठेवण्यासाठी विशेष इंधन आणि वंगण तेल लुब्रीकंट वापरावे लागतात; मात्र या रणगाड्यांच्या तैनातीने भारताचा सीमेचे संरक्षण करण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

सोलापूर येथील गुरुपौर्णिमेत गुणवंत विद्यार्थी आणि धर्मप्रेमी यांचा सत्कार

  सोलापूर - येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात इयत्ता दहावीत सुयश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना सोडवणारे आणि साहाय्य करणारे श्री. योगेश तातुस्कर, १५ ऑगस्ट या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा घेण्याचे नियोजन करणारे आणि ग्रामपंचायत सदस्य गुरुसिद्ध पटणे यांच्या साहाय्याने बोरामणी गावात धर्मशिक्षणवर्गाला प्रारंभ झाल्यानिमित्त या सर्वांचाच पू. (कुु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बारामती, जिल्हा पुणे येथील दैनिक सनातन प्रभातचे वितरक श्री. दिनेश नाईक यांनी २ वर्षे सातत्याने केलेल्या वितरण सेवेसाठी त्यांचाही सत्कार करण्यात आला.

निपाणी येथील गुरुपौर्णिमा महोत्सव

   निपाणी, २२ जुलै (वार्ता.) - येथे झालेल्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अधिवक्ता चेतन मणेरीकर यांनीही उपस्थितांना सनातनवर होणारा अन्याय आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता, तसेच रणरागिणी शाखेच्या सौ. अलका पाटील यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण- काळाजी गरज या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा ४७५ जिज्ञासूंनी लाभ घेतला.
क्षणचित्र - कार्यक्रमाला निपाणी येथील समाधी मठाचे मठाधिपती प्राणलिंग स्वामीजी यांनी भेट दिली.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत कृतज्ञता विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २४ जुलै २०१६
पृष्ठ संख्या : १२, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ जुलैला दुपारी ३.३० पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

(म्हणे) भाजपला काश्मिरी जनतेशिवाय काश्मीर हवा ! - दिग्विजयसिंह

काश्मीरमधील देशद्रोही जनतेशिवाय काश्मीर कोणाला नको आहे ?
दिग्विजयसिंह यांच्यासारख्या काँग्रेसींनीच अशा देशद्रोह्यांवर
कारवाई न केल्याने ते आता डोईजड झाले आहेत, त्यामुळे
भारताला या देशद्रोह्यांसह काँग्रेसमुक्त करायलाच हवे !
       नवी देहली - भाजपला काश्मीरमधील जनतेशिवाय काश्मीर हवा, अशी टीका काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
       दिग्विजयसिंह म्हणाले की, काश्मीरच्या लोकांना सोबत घेतल्याशिवाय या समस्येवर उपाय काढणे शक्य नाही. (स्वातंत्र्यापासून सर्वाधिक वर्षे काँग्रेस सत्तेत असतांना उपाय का काढला नाही ? मुळात काश्मीरची समस्या ही काँग्रेसमुळेच निर्माण झाली आहे, हा इतिहास आहे. - संपादक) तसेच काश्मीरच्या समस्येविषयी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विचारसरणीत मुलभूत भेद आहे.

बनावट नियुक्तीपत्राच्या आधारे ४ युवकांनी घेतले सैन्याचे प्रशिक्षण !

सैन्य भरतीतील भोंगळ कारभार ! अशा प्रकारे आतंकवाद्यांनी सैन्यात प्रवेश केल्यास नवल नाही !
     बरेली (उत्तरप्रदेश) - हरियाणाच्या ४ युवकांनी भारतीय सैन्याच्या बनावट नियुक्तीपत्राच्या आधारे जाट रेजिमेंट सेंटरमध्ये प्रवेश करून १२ दिवस प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे सैन्यभरतीच्या प्रक्रियेतील त्रुटी उघड झाली असून गुप्तचर यंत्रणेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. 
     सूत्रांनुसार या युवकांच्या मागे कोणी सूत्रधार आहे का, याचा शोध सैन्याकडून घेण्यात येत आहे. काही मासांपूर्वी बरेलीच्या सैन्यस्थळांची गोपनीय माहिती गोळा करणारा आयएस्आय या पाकच्या गुप्तचर यंत्रणेचा हस्तक इजाजला अटक करण्यात आली होती. तो काही देशद्रोही लोकांच्या संगनमतामुळे सैन्याच्या स्थळांपर्यंत घुसखोरी करू शकला होता; मात्र हरियाणाचे नागरिक म्हणवणारे ४ युवक थेट भरती प्रक्रियेला भेदून जाट रेजिमेंट पर्यंत पोचण्यात यशस्वी झाले. या युवकांना देहली येथील सैन्यभरती कार्यालयातील एका अधिकार्‍याचा चालक असल्याचे सांगणार्‍या रेशमने बनावट नियुक्तीपत्र दिले होते. हे सत्य असेल, तर रेशमला भरती प्रक्रियेची पूर्ण माहिती होती. जर देहली भरती कार्यालयातून सूचना आली नसती, तर कदाचित हे युवक अजून काही दिवस प्रशिक्षण घेत रहिले असते.

पूजा साहित्यामुळे गंगा नदीचे प्रदूषण होत नाही !

निर्माल्यामुळे नदीचे प्रदूषण होत असल्याचा कांगावा करणार्‍यांना शासनाची चपराक !
जल संसाधन आणि गंगा संरक्षणमंत्री उमा भारती यांची स्पष्टोक्ती
     नवी देहली - नदीमध्ये टाकण्यात येणार्‍या पूजा सामुग्रीमुळे नव्हे, तर औद्यागिक कचरा आणि मल निःसारण यांमुळे नदीचे प्रदूषण होत असल्याचे जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षणमंत्री उमा भारती यांनी राज्यसभेत सांगितलेे, तसेच गंगा नदीला प्रदूषित करणार्‍या उद्योगांच्या विरुद्ध कठोर तरतूदी असणारा कायदा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (असे सांगण्याबरोबरच त्यांनी प्रदूषण करणार्‍यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे ! - संपादक)

मुसलमान चालकांना भारत माता की जय आणि पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देण्यास लावले !

काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंना पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यास भाग 
पाडणार्‍यांना पंजाबमधील शिवसैनिकांनी दिले जशास तसे उत्तर !
     लुधियाना - पंजाबमधील शिवसैनिकांनी जम्मू-कश्मीरमध्ये ये-जा करणार्‍या ट्रकना वाटेत रोखून मुसलमान ट्रकचालकांना भारत माता की जय आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यास लावले. ज्यांनी घोषणा देण्यास नकार दिला त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या हातून पाकचे झेंडे जाळण्यात आले. पोलिसांनी मात्र अशी घटना घडल्याची माहिती नसल्याचे म्हटले आहे. 
    शिवसैनिकांनी सांगितले की, काश्मीरमधील हिंसाचाराच्या वेळी अमरनाथ यात्रेकरूंना पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात आले.रा.स्व. संघाची क्षमा मागण्यास राहुल गांधी यांचा स्पष्टपणे नकार !

पडलो तरी नाक वर, या वृत्तीचे राहुल गांधी !
     नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविषयी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संघाची क्षमा मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. न्यायालयात ऐतिहासिक पुरावे सादर करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी मोहनदास गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना, एकतर संघाची क्षमा मागा नाहीतर खटल्याला तोंड द्या, असे फटकारले होते.

फलक प्रसिद्धीकरता

भारतभरात काश्मीरसारखी स्थिती होण्याआधी जागृत व्हा !
    उत्तरप्रदेशच्या अलीगड येथील बाबरी मंडी परिसरात झालेल्या दंगलीनंतर तेथील अनेक हिंदु परिवारांनी घर-दुकान सोडून पलायन केले आहे. त्यामुळे काश्मीरच्या वर्ष १९९० च्या काळ्या इतिहासाची पृनरावृत्ती आता भारतात विविध ठिकाणी होत असल्याची चर्चा आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
UPke Aligarhme dharmandhoke bhayse anek Hindu parivarone ghar-dukan chhod palayan kiya.
Hindusangthanke abhavke karan Kashmir jaisi sthiti ab UP me bhi
जागो !
उत्तरप्रदेश के अलीगढ में धर्मांधों के भय से अनेक हिन्दू परिवारों ने घर-दुकान छोड पलायन किया.
हिन्दू-संगठन के अभाव के कारण कश्मीर जैसी स्थिती अब उत्तरप्रदेश में भी !

जर्मनीमध्ये रेल्वेप्रवाशांवर आक्रमण करणारा अफगाणिस्तानी तरुण पोलिसांकडून ठार

भारतात आक्रमण करणार्‍या तरुणाला ठार मारले असते, तर तथाकथित मानवाधिकारवाल्यांनी 
पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली असती !
      बर्लिन (जर्मनी) - दक्षिण जर्मनीमध्ये एका १७ वर्षीय अफगाणिस्तानी तरुणाने रेल्वे प्रवाशांवर कुर्‍हाड आणि सुरा यांच्या साहाय्याने आक्रमण केले. यात ३ प्रवाशी गंभीर घायाळ झाले असून इतरांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. आक्रमणकर्ता पळून जात असतांना पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांच्या माहितीप्रमाणे स्थानिक वेळेनुसार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकावर रेल्वे पोचली असतांना हे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणाचे नेमके कारण कळू शकले नाही.

बेंगळुरूमध्ये नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांची पूजा केल्याने दुरुस्तीचे कार्य तातडीने पार पडले !

     बेंगळुरू - येथील एच्.एस्.आर्. ले-आऊट परिसरातील रहिवाशांनी त्यांच्या भागातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेत अनेक खेटे घातले; पण त्याचा काही परिणाम होत नाही हे बघून त्यांनी या खड्ड्यांची जाहीर पूजा आयोजित केली. (खड्ड्यांची पूजा करणे, हे धर्मशास्त्रदृष्ट्या चुकीचे आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ! - संपादक) या पूजेत केलेल्या प्रार्थनेला प्रसारमाध्यमे आणि सामाजिक संकेतस्थळे यांवर प्रसिद्धी देण्यात आली होती. यानंतर अवघ्या २४ घंट्यांत महापालिकेने हे खड्डे बुजवले. (यावरून नागरिकांनी टोकाची भूमिका घेतली, तरच प्रशासन जागे होणार, असे समजायचे का ? - संपादक)
     या घटनेतून स्फूर्ती घेऊन शहराच्या इतर भागातही असेच कार्यक्रम आयोजित करण्याचा नागरिकांचा विचार आहे. एका भागात रस्त्यावरून दुचाकीवर मुलीला शाळेत सोडण्यास चाललेली महिला खड्ड्यांमुळे दुचाकीला अपघात होऊन घायाळ झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनीही अशाच प्रकारे खड्ड्यांची पूजा आरंभ केली. तेथेही महापालिकेने खड्डे बुजवण्याचे कार्य त्वरित हाती घेतले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आतंकवाद्यांच्या सूचीत घातल्याविषयी गुगलला न्यायालयाकडून नोटीस !

     प्रयाग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जगातील १० प्रमुख गुन्हेगारांच्या सूचीमध्ये घातल्याच्या प्रकरणात न्यायालयाने गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतातील प्रमुख यांना नोटीस पाठवली आहे. सोबतच गुगल आणि त्याच्या उच्च अधिकार्‍यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.

भांडुप (मुंबई) येथील जयेश राणे यांचा दैनिक मुंबई मित्रच्या वतीने पत्रभूषण पुरस्कार देऊन गौरव

       मुंबई, २२ जुलै (वार्ता.) - भांडुप येथील श्री. जयेश राणे यांचा दैनिक मुंबई मित्र च्या वतीने कै. वीर लक्ष्मण अण्णाजी राणे पत्रभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सातत्याने पत्रलेखन करणार्‍या व्यक्तींचा दैनिक मुंबई मित्रच्या वतीने सत्कार करण्यात येतो. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, तुळशी वृंदावन असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मुंबई-ठाणे येथील ५२ पत्रलेखकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. जयेश राणे म्हणाले, ईश्‍वराच्या कृपेमुळे मला हा सन्मान प्राप्त झाला.

पुण्यस्मरण लोकमान्यांचे !

आज असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त...
     आपल्या थोर पूर्वजांना विसरून कोणतेही राष्ट्र उदयास येत नाही, असा ऐतिहासिक सिद्धांत आहे. या सिद्धांताचा विसर पडल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जण आपली गौरवशाली परंपरा विसरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर ही आपली गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेतील लोकमान्य टिळकांच्या २३ जुलै या दिवशी असणार्‍या जयंतीनिमित्त हे स्मरण...!

लोकमान्य टिळकांची निरहंकारिता आणि निःस्पृहता !

      जेव्हा लोकमान्य इंग्लंडहून स्वदेशी परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोहळा संपल्यानंतर ते आपल्या बग्गीत बसून परत जाऊ लागले. सोहळ्यात त्यांना घातलेले पुष्पहारही त्या बग्गीत ठेवण्यात आले. ते हार ती बग्गी हाकणार्‍या कोचवानाला देऊन लोकमान्य हसत म्हणाले, हे हार तुझ्या घोड्यांना घाल; कारण हे घोडे ही बग्गी ओढतात आणि त्याच पद्धतीने आम्ही देशाचा गाडा ओढतो. त्यांच्यात आणि आमच्यात काहीही भेद नाही. 
      त्यांची ही निरहंकारिता आणि निस्पृहता यांमुळेच त्यांना लोकमान्य ही उपाधी मिळाली आणि ते जनमनासाठी प्रेरणेचे स्रोत बनले. 
(संदर्भ : मासिक अखंड ज्योती, जानेवारी २००१)

मालिकांमधून पुरोगाम्यांचा विवेकी (?) टेंभा मिरवण्याचा हीन प्रयत्न !

  सध्या झी मराठी या वाहिनीवर पसंत आहे मुलगी ही मराठी मालिका चालू आहे. या मालिकेत नायक हा धर्म मानणारा; पण आधुनिक विचारांचा युवक आहे. त्याचे कुटुंबीय हे धर्म, धर्मशास्त्र, परंपरा, गुरु आणि ज्योतिषशास्त्र यांच्यावर श्रद्धा असलेले आहे. तो नायक शिक्षण घेत असतांनाच त्याचे मालिकेतील नायिकेशी प्रेम जडते. ही नायिका आणि तिचे कुटुंबीय हे पुरोगामी, नास्तिकवादी, धर्माचा कोणताही भाग न मानणारे आणि तथाकथित विवेकाचा (?) जागर करणारे असते. त्यामुळे सध्या तरी या मालिकेच्या माध्यमातून आस्तिक विरुद्ध नास्तिक असा वैचारिक प्रतिवाद चालू असून त्याद्वारे पुरोगाम्यांचा विवेकी (?) टेंभा मिरवण्याचा हीन प्रयत्न चालू आहे.
डॉ. झाकीर नाईक यांनी आतापर्यंत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यातील लाईव्ह हिंदुस्थान डॉट कॉम आणि महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम या संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या निवडक विधानांपैकी प्रतिदिन एक विधान येथे देत आहोत.
शरियत कायद्यानुसार विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍यांना दगडाने ठेचून मारणे योग्य आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

   भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     भगवंताने त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी सोडलेला दोर म्हणजे नाम, तर हा दोर चढण्यासाठी शक्ती पुरवतात ते गुरु ! 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
    भारतात सांस्कृतिक आधारावर राष्ट्राची कल्पना अतीप्राचीन आहे; परंतु राजनैतिक चेतनेची उणीव होती आणि आजही आहे. त्याचे दुष्परिणाम हिंदूंना वेळोवेळी भोगावे लागले आहेत. 
(अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

देवाचे एक गोड समष्टी रूप

सौ. अश्‍विनी पवार !
१. देवाच्या या समष्टी रूपाला पाहून मन प्रसन्न आणि आनंदी होणे 
     सौ. अश्‍विनीताईची प्रकृती ठीक नसतांना ती आश्रमात कुठे दिसली नाही, तर मला तिला भेटावे, असे पुष्कळ वाटते. तिच्याकडे जाऊया. ती कुठे दिसेल ?, अशी मला सतत ओढ लागते. मला ती प्रतिदिन एकदा तरी दिसावी, असे वाटते. देवाच्या या समष्टी रूपाला पाहून माझा सर्व थकवा नाहीसा होतो. माझे मन प्रसन्न आणि आनंदी होते. एकदा तिची प्रकृती ठीक नसतांना मला तिची आठवण येत होती. या जिवाचे मन आणि डोळे तिला देवद आश्रमात शोधत असतांना अकस्मात देव तिला माझ्यासमोर घेऊन आला. तिला पाहून या जिवाला फार आनंद झाला.

कु. सोनाली गायकवाड यांना साधनेतील चढ-उतारात ६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. अश्‍विनी पवार यांनी केलेले अनमोल साहाय्य

सौ. अश्‍विनी पवार
       मी पूर्णवेळ साधना करून लागल्यानंतर अनुमाने १ वर्षाने सौ. अश्‍विनी पवार (सौ. अश्‍विनीताई) देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात व्यवस्थापनाच्या सेवेसाठी आली. त्या वेळी मला व्यवस्थापन म्हणजे काय ? यामध्ये कोणत्या सेवा असतात ? हेही ठाऊक नव्हते; परंतु सौ. अश्‍विनीताईने मला अनेक लहान-मोठ्या सेवा शिकवल्या. अनेक वेळा मला जेव्हा नकारात्मक विचारांमुळे सेवा करू नये, असे वाटत असे, तेव्हा ताई आपण कसे घडणे, प.पू. डॉक्टरांना अपेक्षित आहे ?, ते सांगत असे आणि सेवेचे महत्त्व माझ्या मनावर बिंबवत असे. एकदा पू. अनुराधा वाडेकर म्हणाल्या होत्या, सौ. अश्‍विनी म्हणजे शिकण्याची खाण आहे. अशा सौ. अश्‍विनीताईकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.

सहजता, प्रीती आणि साधकांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ असलेल्या पू. (कु.) अनुराधा वाडेकर !

पू. (कु.) अनुराधा वाडेकर
       हे श्रीकृष्णा, पू. (कु.) अनुताईंच्या माध्यमातून तू मला साधनेत टिकवून ठेवले आहेस आणि पुढे पुढे नेत आहेस, त्याविषयी कृतज्ञता म्हणून मी अनुभवलेली तुझी कृपा मला शब्दात मांडता येऊ दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करते.
       सध्या मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांच्या प्रसारसेवेचे दायित्व पू. (कु.) अनुताई (पू. (कु.) अनुराधा वाडेकर) यांच्याकडे आहे. खरेतर त्यांच्या संकल्पानेच या जिल्ह्यांमधील सनातनचे प्रसारकार्य चालू आहे. आमची पात्रता नसतांना पू. ताई आम्हाला अखंड मार्गदर्शन करून साधनेत पुढे नेत आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही ईश्‍वराचे सगुण रूपच अनुभवतो; पण आम्ही त्यांच्याकडून शिकण्यात न्यून पडतो. असे असूनही पू. अनुताईंकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे मांडण्याचा मी प्रयत्न करते.
१. सहजता
१ अ. संत म्हणून कुठेच वेगळेपण न जपणे : पू. अनुताई आम्हा सर्व साधकांमध्ये वावरत असतांना त्यांच्या वागण्या-बोलण्यात सहजता असते. सेवाकेंद्रे, बैठका किंवा शिबीर यांमध्ये पू. ताई संत म्हणून कुठेच वेगळेपणा जपत नाहीत. बैठकांसाठी सतरंजी घालतांना साहाय्य करणे, उशिरा आलेल्या साधकांना पाणी देणे, या कृती त्या सहज करतात.

तत्त्वनिष्ठता आणि प्रेमभाव यांचा संगम असलेली साधकांची आध्यात्मिक आई सौ. अश्‍विनी पवार !

१. स्वतःच्या सेवेपेक्षा साधकांना प्राधान्य देणे
     एकदा मला माझ्या मनात येत असलेल्या विचारांमुळे आणि माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे पुष्कळ मानसिक त्रास होत होता. मी अश्‍विनीताईला भेटायला गेल्यावर तिला पहाताक्षणी मला पुष्कळ रडू येत होते. त्या वेळी तिने ती करत असलेली सेवा बाजूला ठेवून मला पुष्कळ प्रेमाने जवळ घेतले. तिने माझ्या पाठीवरून मायेने हात फिरवत माझे सर्व म्हणणे ऐकून घेतले.
२. साधकांना आधार देणे 
     मला साधकांविषयी नकारात्मक विचार येत होते. त्या वेळी तिने योग्य दृष्टीकोन देऊन साधकांना कसे समजून घ्यायचे ? साधकांच्या प्रकृतीचा अभ्यास कसा करायचा ?, याविषयी समजून सांगितले आणि मला पुष्कळ आधार दिला.

साधकांसाठी रात्रंदिवस झटणार्‍या परब्रह्मस्वरूपी प.पू. डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अशक्य असल्याचे सांगणारे पत्र !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
हे गुरुराया,
अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज,
योगीराज असे माझे प.पू. डॉक्टर,
तुमच्या चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी नमस्कार !
१. प.पू. डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्द अपुरे असल्याची जाणीव होणे
        हे गुरुदेवा, मी काय लिहू ? हे मला कळत नाही. मला काहीही येत नाही आणि सुचतही नाही. गुरुराया, तुम्ही जगन्नियंता परब्रह्म ! मी तुम्हाला काय देणार ? देवा, तुझ्याविषयी लिहायला माझ्याकडे शब्दच नाहीत रे ! कृतज्ञता किंवा कोणतीही शब्दरचना तुमचे वर्णन करण्यास असमर्थ आहे. भगवंता (प.पू. डॉक्टर), खरे सांगायचे, तर तुम्ही अनंतकोटी मधुरापेक्षाही शब्दातीत असे मधुर आहात. परमेश्‍वरा, मला तुम्हाला काय सांगायचे आहे, जी कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ती तुम्हीच समजून घ्या. देवा, मला तुला शब्दांत सांगता येत नाही. मी मोठ्या प्रमाणात ते केवळ अनुभवत आहे. त्यासाठी कोटी कोटी कृतज्ञता !

पू. संदीपदादांचा नामजपासंदर्भातील लेख वाचून प्रयोग करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

कु. मनीषा शिंदे
१. नामजप करतांना श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवून आनंद मिळणे 
     मी नामजप करतांना मला श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवत असे आणि मला नामजपातून आनंद मिळून श्रीकृष्णाला हे भगवंता, तू मला इथपर्यंत आणले आहेस आणि तूच मला येथून पुढे घेऊन चल, अशी आर्ततेने प्रार्थना होऊ लागली. त्यानंतर देवाने पू. संदीप आळशी आणि पू. उमेश शैणे यांचे लेख वाचायला हवेत, असे सुचवले. ते वाचल्यावर त्यानुसार भावजागृतीचे आणि कृतीच्या स्तरावरील प्रयत्न झाल्यावर श्रीकृष्णच पुढे जायला साहाय्य करत आहे, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांचे अस्तित्व अनुभवता यायला लागले.

रामनाथी आश्रमातील प्रसाधानगृहात दिव्य सुगंधाची अनुभूती येऊन मन नामजपात एकाग्र होणे

      २६.५.२०१६ या दिवशी मी रामनाथी आश्रमात असतांना मला प्रसाधनगृह स्वच्छतेची सेवा मिळाली. तेव्हा प्रसाधानगृहात दिव्य सुगंधाची अनुभूती आली. मी सुगंधाचा अभ्यास करणारा असलो, तरी या दैवी गंधाची कोणत्याही सुगंधाशी तुलना करू शकलो नाही. तो सुगंध घेतच रहावा, असे वाटून माझे मन नामजपात एकाग्र झाले. 
- श्री. चैतन्य तागडे, पुणे
अपघातात एक हात गमावल्यानंतरही आनंदाने परिस्थिती स्वीकारणार्‍या आणि सहजतेने सर्व कृती करून इतरांना प्रेरणा देणार्‍या ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी असलेल्या आधुनिक वैद्या सौ. सुमन सोनवणे !

सौ. सुमन सोनावणे
     मध्यंतरी झालेल्या एका अपघातात देवद आश्रमात रहाणारी साधिका आधुनिक वैद्या सौ. सुमन सोनवणे हिला उजव्या हाताचा पंजा गमवावा लागला. तिने ही परिस्थिती अगदी सहजपणे स्वीकारली. अशा स्थितीत ती तिच्या दैनंदिन सर्व कृती सहजतेने करते. काही कालावधीसाठी देवद आश्रमात सेवेसाठी गेलेल्या सौ. कांता वांडरे यांना तिच्या सहवासात शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत. 
१. हसतमुख 
    ताई सतत हसतमुख असते. तिच्या तोंडवळ्यावरील हास्याने ती इतरांना प्रेरणा देते.

घरात प्रतिदिन विविध रंगांचे दैवी कण दिसणे आणि त्या कणांमुळे सर्वांना उत्साह जाणवून साधनेला चालना मिळणे

श्री. देवांग गडोया
       जानेवारी २०१६ च्या आरंभापासून जवळजवळ प्रत्येक दिवशी आमच्या घरात केर काढल्यावर दैवी कण सापडतात. कधी कधी त्यांची संख्या अल्प असते, तर कधी ती एवढी असते की, ते एकत्रित करणे कठीण जाते. हे कण सोनेरी, चंदेरी, गुलाबी, लाल आणि निळा या रंगांचे असतात. यांतील सोनेरी आणि लाल रंगाच्या कणांची संख्या अधिक असते. या कणांच्या अस्तित्वामुळे आम्हा सर्वांना उत्साह जाणवतो आणि साधनेला चालना मिळते. कधी कधी आमच्या तोंडवळ्यावर आणि हातावरही दैवी कण सापडतात. ही अनुभूती दिल्याबद्दल श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता ! 
- श्री. देवांग गडोया, कॅनडा (१७.२.२०१६)
टीप : दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे फॉर्म्युले सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या फॉर्म्युल्याशी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना दैवी कण असे संबोधतात.

देवदेवता ऋषीमुनी, धन्य धन्य जाहले ।

सौ. शालिनी मराठे
गुरुवर सिंहासनी बैसले ॥ धृ. ॥
ब्राह्मतेजामध्ये । क्षात्रतेज मिसळले ॥
धर्मसंस्थापनेसाठी ।
श्रीहरि प्रकटले ॥ १ ॥
रूप साजिरे । अती गोजिरे ॥
श्रीश्रीजयंत । नामे अवतरले ॥ २ ॥
डोक्यास फेटा रक्तवर्णी । अंगावर शेला केशरीवर्णी ॥
जणू प्राचीला उदेला दिनमणी । तेज पुंजाळले ॥ ३ ॥
प्रसन्न मुखावर सुहास्य उमलले । नेत्रांमधूनी चैतन्य अवतरले ॥
दर्शन होता गुरुराजांचे । सारे साधकजन संतोषले ॥ ४ ॥
गळ्यात हार तुळशीचा । दुसरा सुंदर हार ॥
लाल गुलाबपुष्पांचा । लावण्य ओसंडले ॥ ५ ॥

गुरुपौर्णिमा करू साजरी भाव-भक्तीने ।

कशास सांगसी देवा, भेटीलागी जिवा लागलीसे आस ।
जिवा-शिवाची भेट घडवूनी, मुक्त करशी ना तू मायेचा फास ॥ १ ॥
ज्ञानजलाने भरलेस तू देवा, हे मानस सरोवर ।
त्या ज्ञानाने गेला देवा भाव आप-पर ॥ २ ॥
भक्तीची गंगा वाहू देत, भरलास मनःसागर ।
रात्रंदिन घडू दिलास देवा, तुझ्या नामाचा जागर ॥ ३ ॥
तुझी कृपा वाढवित होती, भक्ती क्षणाक्षणाने ।
तुझी प्रीती वाढवित होती, ज्ञान कणाकणाने ॥ ४ ॥
जीवनाचे सार्थक केलेस, ज्ञान-भक्ती-वैराग्य देऊनी ।
अमुचे हृदय भरून पावले, तुझ्या कृपाशीर्वादाने ॥ ५ ॥
काहीच न मागता, देवराणा देतो भरभरूनी ।
जीवन ते उजळले तुझ्या प्रीतीच्या चांदण्याने ॥ ६ ॥

साधकांना सूचना

गोकुळाष्टमीनिमित्त प्रबोधन करण्यासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !   
   गोकुळाष्टमीनिमित्त प्रबोधन करण्यासाठी ए-५ आकारातील पाठपोट हस्तपत्रक आणि २.२५ ३.५ फूट या आकारातील धर्मशिक्षण फलक नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहेत. या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचे सुयोग्य ठिकाणी वितरण करावे.
       गेलेलं धन मिळू शकेल. निघून गेलेली पत्नी घरी येईल, बळकावलेली जमीन परत मिळू शकेल; पण गेलेलं शरीर परत मिळायचं नाही. (म्हणून शरीर असेपर्यंत साधना करा !)
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

१. सनातन संस्थेत अनेक संत असूनही सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते.
२. विविध संत आणि संप्रदाय यांत एक प्रमुख असतात; म्हणून त्यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते आणि त्यांच्या विषयीची माहिती स्मरणिकेत किंवा पत्रकात असते. सनातनमध्ये अनेक साधक संत झाले असल्यामुळे त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सनातन प्रभात नियतकालिकांत प्रकाशित करण्यात येतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हास्यास्पद साम्यवाद !
   जिथे पृथ्वीवरची सर्व माणसेच नव्हे, तर झाडे, डोंगर, नद्या इत्यादी एकसारखे दिसत नाहीत, तेथे साम्यवाद हा शब्दच हास्यास्पद नाही का ?
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
शिष्याचा विश्‍वास
गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे.
भावार्थ : गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे, यातील गुरु हा शब्द बाह्य गुरूविषयी वापरलेला आहे. गुरूवर विश्‍वास असेल, तरच गुरु गुरु म्हणून कार्य करू शकतो. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे, यातील गुरु हा अंतर्यामी असलेला गुरु होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुठलेही कर्म मनःपूर्वक करणे हितकारक !
कर्म करतांना ते छोटे आहे का मोठे, हे पहाणे महत्त्वाचे नसून 
प्राप्त कर्म मनःपूर्वक करणे हितकारक आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

विद्यमान काश्मीर !

संपादकीय 
     काश्मीरमध्ये दंगलखोरांनी पोलिसाचे डोळे फोडले, या मथळ्याखाली नुकतेच वृत्त झळाळले. बुरहान वानी नावाचा आतंकवादी सैनिकांकडून ठार मारला गेल्यावर जम्मू-काश्मीर राज्यात धर्मांध दंगलखोरांनी मागील दोन आठवड्यांपासून हिंसाचार माजवला आहे. १४ जुलै या दिवशी त्यांनी शफाकत अहमद नावाच्या सुरक्षा अधिकार्‍याला अमानुष मारहाण केली आणि शफाकत अहमद भूमीवर पडल्यानंतर त्यांचे डोळे फोडले. देशाच्या सुरक्षा रक्षकांवरही हात उगारण्याचे यांचे धाडस काय दर्शवते ? त्यांना देशाचे कायदे मान्य नाहीत कि देशातील कायदा आणि सुव्यवस्थेशी त्यांना काही देणेघेणे नाही. उत्तरदायी नागरिक म्हणून जे कर्तव्य आहे, त्यापासून ही जमात फार दूर आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn