Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

गोस्वामी तुलसीदास पुण्यतिथी

चांदूरबाजार (अमरावती) येथे गोतस्करी करणार्‍या भरधाव ट्रकने तिघांना चिरडले !

 • बजरंग दलाकडून ट्रकला अडवण्याचा प्रयत्न ट्रकने १० वाहने उडवली !
 • २५ जण घायाळ
 • काही गायींचा मृत्यू
 • आज अमरावती बंदचे आवाहन !
 • केवळ गोवंश हत्याबंदी कायदा करून काही उपयोग नाही, तर त्या कायद्याची कठोर कार्यवाही जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत गोवंश हत्या थांबणार नाहीत !
 • गोवंशियांची होणारी वाहतूक गोप्रेमींना दिसते; मात्र पोलिसांना दिसत नाही ! यावरून एकतर पोलीस सक्षम नाहीत किंवा ते हप्ते घेऊन गोतस्करी होऊ देतात, असा आरोप जनतेने केल्यास चूक ते काय ?
    अमरावती, २१ जुलै - जिल्ह्यातील चांदूरबाजार येथे अवैधरित्या गायी घेऊन जाणार्‍या ट्रकला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रकचालकाने वेग वाढवून जातांना १० वाहने उडवली. त्यामध्ये लहान बालकासह ३ जण ठार झाले, तर २५ जण घायाळ झाले. तसेच त्या ट्रकमधील काही गायींचाही मृत्यू झाला. ही गंभीर घटना घडल्यानंतर अमरावती येथील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तत्परतेने रात्री ११ वाजताच जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली, तसेच घायाळ व्यक्तींची भेट घेतली. त्यानंतर २१ जुलै या दिवशी अमरावतीतील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना याविषयी निवेदन दिले.

(म्हणे) बुरहान वानीला का मारले ? - खासदार मुझफ्फर बेग, पीडीपी

जिहादी आतंकवाद्याची पाठराखण करणारे सत्ताधारी पक्षात
असल्यास काश्मीरमध्ये हिंसाचार होणार नाही, तर काय होणार ?
आतंकवाद्याचे असे समर्थन करणार्‍या पक्षांवर बंदी घालण्याची मागणी कोणीच
करणार नाही; मात्र निरपराध सनातन संस्थेला आतंकवादी ठरवण्यासाठी अहमहमिकाच लागलेली असते !
    नवी देहली - बुरहान वानी याला थेट ठार मारण्याची काय आवश्यकता होती ? वानी गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता, तर मग त्याला आधी अटक का केली नाही आणि त्याला मारलेच होते, तर त्याचा मृतदेह इतका वेळ पडून ठेवण्याची काय आवश्यकता होती ?, असे प्रश्‍न सत्ताधारी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे (पीडीपीचे) खासदार मुझफ्फर बेग यांनी भाजपला विचारले आहेत. सैन्याच्या या कृतीमुळेच काश्मीरमधील परिस्थिती इतकी चिघळली आहे, असा आरोप त्यांनी केला. सुरक्षादले आणि राज्यशासन यांमधील समन्वयाचा अभावही तणाव वाढण्यास कारणीभूत आहे. समन्वय असता, तर हे घडले नसते, असेही बेग म्हणाले. बुरहान वानीला ठार केल्यापासून गेले १५ दिवस काश्मीरमध्ये हिंसाचार चालू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

काश्मीरमधील हिंसाचारामागे पाकिस्तान ! - केंद्रीय गृहमंत्री

काश्मीरमधील प्रत्येक हिंसाचार आणि आतंकवादी आक्रमण पाकपुरस्कृत आहे,
हे देशातील लहान मुलांनाही गेल्या ३० वर्षांपासून माहीत आहेे;
मात्र ते कायमचे बंद करण्यासाठी गृहमंत्री पाकच्या विरोधात ठोस कृती कधी करणार ?
   नवी देहली - हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी बुरहान वानी याला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली. काश्मीरमधील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले. (गेल्या २ वर्षांत किती प्रयत्न केले आणि त्याचे फळ काय मिळाले, हे या हिंसाचारावरून देशातील जनतेला लक्षात आले आहे ! गेले १५ दिवस काश्मीर ठप्प आहे. अमरनाथ यात्रा ३ वेळा स्थगित करण्यात आली आहे, हेच सरकारचे प्रयत्न आहेत का ? - संपादक)    राजनाथ सिंह पुढे म्हणाले, काश्मीरमध्ये आज जी परिस्थिती आहे, ती तशी होण्यात आमच्या शेजारी देशाची भूमिका आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. भारताला अस्थिर करण्याचे पाकचे प्रयत्न आहेत. भारतात जो काही आतंकवाद आहे, तो पाकिस्तान पुरस्कृत आहे; पण भारतीय सैनिकांनी या आतंकवादाला चोख उत्तर दिले आहे. (सैनिक असल्यामुळे काश्मीर अद्याप भारतात आहे, नाहीतर भारतीय राज्यकर्त्यांनी तो केव्हाच पाकला दिले असते ! - संपादक) बुरहान वानी हा आतंकवादी होता यात तीळमात्र शंका नाही. सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून तो तरुणांना आतंकवादासाठी चिथावणी द्यायचा. गुप्तचर यंत्रणांना त्याच्याविषयी माहिती मिळताच त्याला संपवण्यात आले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आर्थिक घोटाळा आणि तिचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध यांची चौकशी करा !

देहलीतील जंतरमंतर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी !
देहली येथील जंतरमंतर येथे
आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ
    देहली - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तन न्यास यांमधील आर्थिक घोटाळे, तसेच त्यांचे नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांमुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आहे का, याची चौकशी करण्याची मागणी २० जुलैला येथील जंतरमंतर येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे करण्यात आली. तसेच डॉ. दाभोलकरांना विदेशातून येणार्‍या पैशांचे ते कोणत्या कामासाठी उपयोग करत होते, या पैशांचा वापर धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी केला जात होता का, याची शासनाने सखोल चौकशी करायला हवी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या आंदोलनात हिंदु स्वाभिमान, अखंड भारत मोर्चा, डासना पीठ, वैदिक उपासना पीठ, फेथ फाउंडेशन, सनातन संस्था, रणरागिनी शाखा, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य संघटना सहभागी झाल्या होत्या.

काश्मीरमध्ये दंगलखोर धर्मांधांनी पोलिसाचे डोळे फोडले !

जिहाद्यांचे हे क्रौर्य निधर्मीवाद्यांना दिसणार नाही;
कारण ते मुसलमानप्रेमाने आंधळे झाले आहेत !
   श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये दंगलखोर धर्मांधांनी एका पोलीस अधिकार्‍याचे डोळे फोडल्याची घटना घडली आहे. या पोलिसावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सुरक्षा अधिकारी शफाकत अहमद यांना १४ जुलै या दिवशी दंगलखोरांनी अमानुष मारहाण केली. अहमद हे खाली पडल्यानंतर दंगलखोरांनी त्यांच्या डोळ्यांवर आक्रमण करून ते फोडले. दंगलखोर सुरक्षारक्षकांना घेरून त्यांच्यावर आक्रमण करू लागले आहेत. तसेच त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे लूटत आहेत.

(म्हणे) (पुरोगाम्यांच्या) खुनातील संशयितांना आतंकवादी घोषित करा !

 • २५० हिंदुत्ववाद्यांच्या हत्या करणार्‍या साम्यवाद्यांना यांनी कधी आतंकवादी का म्हटले नाही ?
 • हिंदुद्वेषाने पछाडलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कांगावा !
        कोल्हापूर २१ जुलै - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या खूनप्रकरणातील संशयितांना अतिरेकी आणि दहशतवादी घोषित करून सनातन संस्थेच्या अनुयायांची माहिती पोलिसांनी संकलित करावी. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अटकेतील संशयित डॉ. तावडे यांचा ताबा घेऊन चौकशी करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन केली. (सनातन संस्थेवर अद्याप कोणत्याही प्रकरणात दोषारोप सिद्ध झालेला नाही, तसेच सनातन संस्थेला अद्याप कोणत्याही तपास यंत्रणेने दोषी ठरवलेले नाही. हिंदुद्वेषी साम्यवाद्यांचा हा पोलिसांवर दबाव आणण्याचाच प्रयत्न आहे. - संपादक) या वेळी भाकपच्या कार्यकर्त्यांनी नांगरे-पाटील यांना कॉ. पानसरेलिखित शिवाजी कोण होता, या पुस्तकाची प्रत भेट दिली. (शिवरायांच्या महाराष्ट्रात अशी इतिहासद्रोही पुस्तके पोलीस अधिकार्‍यांना भेट दिली जातात, याची शिवप्रेमी दखल घेतील काय ? - संपादक)

(म्हणे) दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांविषयी महाराष्ट्रातील खासदार केंद्रसरकारला जाब का विचारत नाहीत ?

गेल्या काही वर्षांत देशात शेकडो हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्या 
त्या वेळी हमीद दाभोलकर यांनी कधी असा प्रश्‍न विचारला का ?
हमीद दाभोलकर यांचा थयथयाट !
सनातनवर बंदीच्या मागणीसाठी अंनिसचे देहलीतील जंतरमंतर येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण 
     नवी देहली - डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येविषयी महाराष्ट्रातील खासदार केंद्र सरकारला जाब का विचारत नाहीत, असा प्रश्‍न अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी येथे केला. सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हमीद दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी २० जुलैला येथील जंतरमंतरवर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. त्या वेळी ते बोलत होते. 
(म्हणे) डॉ. झाकीर यांच्यावर तातडीने कारवाई होते, तर सनातनवर बंदी का नाही ?
    वादग्रस्त भाषणे केल्यामुळे डॉ. झाकीर नाईक यांच्यावर तातडीने कारवाई होते; तर मग कडव्या कारवाया करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी का घातली जात नाही ? असा प्रश्‍न डॉ. हमीद दाभोलकर यांनी या वेळी विचारला.

सनातन बंदीच्या सूत्राला पूर्ण शक्तीनिशी विरोध करणार ! - यज्ञपीठाधीश्‍वर धर्मसम्राट विद्यावाचस्पति श्री श्री १००८ श्री महंत स्वामी इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वतीजी महाराज

यज्ञपीठाधीश्‍वर धर्मसम्राट विद्यावाचस्पति श्री श्री १००८
श्री महंत स्वामी इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वतीजी महाराज (डावीकडे)
यांचा अभिप्राय घेतांना सनातनचे साधक श्री. प्रल्हाद सोनवणे

        पारोळा (जिल्हा जळगाव) - सनातन संस्थेच्या विरोधात जे षड्यंत्र रचले जात आहे, त्याचा आम्ही वैचारिक विरोध करतो. सनातन संस्थेला मी पुष्कळ जवळून ओळखतो. संस्थेचा कोणताही साधक कुठल्याही तर्‍हेची हिंसा करू शकत नाही, हे आम्ही पूर्ण विश्‍वासाने सांगतो. सरकारद्वारे सनातनवर बंदीसाठी जे प्रयत्न केले जात आहेत, त्याला आम्ही पूर्ण शक्तीने विरोध करतो, असे प्रतिपादन यज्ञपीठाधीश्‍वर धर्मसम्राट विद्यावाचस्पति श्री श्री १००८ श्री महंत स्वामी इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले.

चौकशीच्या नावाखाली कोणावरही अन्याय होता कामा नये ! - अधिवक्ता देवदास शिंदे

सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार्‍या अधिवक्त्यांचे आभार !
सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात पुणे अधिवक्ता मंचाच्या वतीने पत्रकार परिषद
अधिवक्ता देवदास शिंदे यांची पोलिसांकडून सखोल चौकशी

डावीकडून अधिवक्ता श्री. चंद्रकांत भोसले, बोलतांना अधिवक्ता
श्री. देवदास शिंदे, अधिवक्ता श्री. राजाभाऊ देशपांडे, अधिवक्ता श्री. सचिन पोटे
   पुणे, २१ जुलै (वार्ता.) - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे हाती नसतांना काही राजकीय पक्ष, तसेच तथाकथित पुरोगामी संघटना यांच्याकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. सनातनच्या विरोधात खोटे पुरावे, साक्षीदार उभे करून तिच्यावर बंदी घालण्याचे कारस्थान रचले जात आहे, असे स्पष्ट दिसते. एखाद्या संस्थेवर बंदी घालण्याच्या माध्यमातून विचारांची गळचेपी करून त्यांना गाडून टाकायचे, हे पुरोगामी म्हटल्या जाणार्‍या महाराष्ट्रात चालणार नाही.
    चौकशीच्या नावाखाली कोणावरही अन्याय होऊ नये, असे प्रतिपादन अधिवक्ता श्री. देवदास शिंदे यांनी येथे केले. सनातन संस्थेवरील अन्यायकारक बंदीच्या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी पुणे अधिवक्ता मंचाच्या वतीने उत्स्फूर्तपणे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी अधिवक्ता श्री. शिंदे बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार भवनात २१ जुलै या दिवशी झालेल्या या पत्रकार परिषदेला अधिवक्ता श्री. चंद्रकांत भोसले, अधिवक्ता श्री. राजाभाऊ देशपांडे आणि अधिवक्ता श्री. सचिन पोटे उपस्थित होते.

मंत्री आणि भाजपविषयी आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणे यांच्यावर दोन हक्कभंग सादर !

       मुंबई, २१ जुलै (वार्ता.) - १९ जुलै या दिवशी विधान परिषदेत नियम ९७ अन्वये कोपर्डी तालुक्यातील कर्जत गावात झालेल्या एका बलात्कार प्रकरणाच्या संवेदनशील विषयावर चर्चा चालू होती. त्या वेळी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी एका महिला अधिकारीविषयी एका मंत्र्यावर आक्षेपार्ह विधान करून भाजप हा गुंडांचा पक्ष असल्याची टीका केली होती. मूळ विषय बाजुला सारून राणे यांनी केलेल्या अवांतर विधानांमुळे सभागृहाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सदस्य प्रवीण दरेकर, सुजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांनी नारायण राणे यांच्या विरोधात हक्कभंग सभागृहात सादर केला. तसेच सभागृहाचे कामकाज चालविण्याविषयी सभापतींनी निर्देश दिले असतांनाही सभापतींना आव्हानात्मक भाषा वापरल्याप्रकरणीही नारायण राणे यांच्यावर दुसरा हक्कभंग वरील सदस्यांनी सादर केला आहे.

आतंकवाद्यांचे प्रेरणास्थान असणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांना अटक करण्याची मागणी !

फरीदाबाद (हरियाणा) आणि आग्रा (उत्तरप्रदेश) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
फरीदाबाद (हरियाणा) येथे आंदोलन
करतांना हिंदुत्वनिष्ठ
     फरीदाबाद - जिहादी आतंकवाद्यांचे प्रेरणास्थान असणारे डॉ. झाकीर नाईक यांना अटक करण्याची, तसेच त्यांच्या पीस टीव्हीचे प्रक्षेपण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी फरीदाबादच्या वल्लभगड आणि उत्तरप्रदेशच्या आग्रा येथे १८ जुलैला आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. 
    या व्यतिरिक्त अन्य काही मागण्याही या वेळी करण्यात आल्या. यात 
१. कैराना (जिल्हा शामली, उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांमुळे झालेल्या हिंदूंच्या पलायनावर केंद्रसरकारने योग्य कारवाई करावी आणि हिंदूंचे पुनर्वसन करावे.

सनातन संस्थेवर आरोप करणार्‍या पुरोगामी संघटनांची चौकशी करा ! - अधिवक्ता दिनेश नायक, उडुपी

उडुपी (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून सनातन संस्थेच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद
डावीकडून श्री. गुरुराज, पळ्ळी श्री लक्ष्मीनारायण हेगडे, 
सौ. अंबिका नायक, अधिवक्ता दिनेश नायक, 
श्री. चित्तरंजन हेगडे
    उडुपी (कर्नाटक) - सनातन संस्था एक आध्यात्मिक संस्था आहे. गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीसह समाज, राष्ट्र तसेच धर्माविषयी समाजात परिवर्तन करत आहे. एवढेच नव्हे, तर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली लक्षावधी लोकांनी आध्यात्मिक साधनेला प्रारंभ करून आपले जीवन आनंदी बनवले आहे. चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करून समाज समृद्ध व्हावा, या उद्देशाने चाललेले सनातनचे कार्य कौतुकास्पद आहे; परंतु अशा संस्थेला पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणात अडकवण्याचे प्रयत्न करणे, हा सनातनचा अवमान आहे. काही पुरोगामी संघटनांवरील पैशाच्या अव्यवहाराविषयी सनातनने प्रश्‍न उपस्थित केल्याने त्या संस्थांनी आरोपातून सुटण्यासाठी सनातनला लक्ष्य केले आहे. त्यासाठी सनातनवर आरोप करणार्‍या पुरोगामी संघटनांच्या आर्थिक व्यवहारांची सविस्तर चौकशी केली पाहिजे, अशी मागणी कर्नाटक क्षत्रीय महासभा संघाचे राज्यस्तरीय नेते अधिवक्ता श्री. दिनेश नायक यांनी १८ जुलै या दिवशी एका पत्रकार परिषदेत केली. या वेळी हिंदु महासभेच्या राज्याध्यक्षा सौ. अंबिका नायक, विश्‍व हिंदु परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. चित्तरंजन हेगडे, धर्माभिमानी पळ्ळी श्री. लक्ष्मीनारायण हेगडे आणि श्री. गुरुराज उपस्थित होते.

दुरुस्तीच्या नावाखाली प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त करण्याच्या तमिळनाडू सरकारच्या कृतीला उच्च न्यायालयाने फटकारले !

यासह संबंधितांवर कठोर कारवाईही करावी, अशी हिंदूंची मागणी आहे !
युनेस्कोचे साहाय्य घेण्याचा आदेश ! 
     चेन्नई - तमिळनाडू सरकारने प्राचीन मंदिरांच्या चालू केलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे अनेक प्राचीन मंदिरांची प्रचंड हानी झाली. ही गोष्ट लक्षात येताच चेन्नई उच्च न्यायालयाने स्वत:च याची दखल (सुओ मोटो) घेतली. न्यायालयाने राज्य सरकारला फटकारून अशी कामे बंद करण्याचे आदेश देऊन सध्या केवळ अत्यावश्यक तेवढीच दुरुस्ती हाती घेण्यास सांगितले. ही याचिका उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. संजय किशन कौल आणि न्या. आर्. महादेवन् यांच्या खंडपिठासमोर आली होती.
१. तमिळनाडूतील प्राचीन मंदिराचे प्रकरण ५ जुलै २०१५ या दिवशी उच्च न्यायालयाने स्वत:च दखल (सुओ मोटो) घेऊन सुनावणीस घेतले होते. त्यासाठी वरिष्ठ अधिवक्ता पी.एस्. रमन यांची न्यायालयाचे साहाय्य करण्यासाठी (अमिकस क्युरी) नियुक्ती केली होती. 
२. अधिवक्ता पी.एस्. रमन यांनी अनेक प्राचीन वारसा मिळालेल्या मंदिरांना भेटी दिल्या आणि त्यांच्या सूचना सादर केल्या.

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक गोवादूतचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांना सनातन संस्थेची कायदेशीर नोटीस

   पणजी, २१ जुलै (वार्ता.) - गोवा येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक गोवादूत या मराठी वृत्तपत्राने २३ जून २०१६ या दिवशीच्या अंकात रामनाथीतील सनातनच्या आश्रमावर सीबीआय छापा या मथळ्याखाली खोटे आणि मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध करून सनातन संस्थेची मानहानी केली. याप्रकारणी सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी सनातन संस्थेचे अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्या मार्फत ५ कोटी रुपये मानहानी भरपाई मागणीची कायदेशीर नोटीस दैनिक गोवादूतचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांना बजावली आहे.
   सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा समाजात धर्मप्रसार कार्याच्या संदर्भात असलेला नावलौकिक माहीत असतांना हेतुपुरस्सर मानहानी करण्याच्या हेतूने दैनिक गोवादूत या मराठी वृत्तपत्राने २३ जून २०१६ या दिवशीच्या अंकात पृष्ठ १ वर रामनाथीतील सनातनच्या आश्रमावर सीबीआय छापा या मथळ्याखाली खोटे आणि मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे संस्थेची मानहानी होऊन संस्थेची अपरिमित हानी झाली आहे. यासाठी श्री. वीरेंद्र मराठे यांनी अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्या मार्फत दैनिक गोवादूतचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांच्या विरोधात मानहानीपोटी ५ कोटी रुपये नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांच्या आत द्यावेत.

कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी एक मासात आरोपपत्र प्रविष्ट करणार ! - पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला

       नाशिक, २१ जुलै (वार्ता.) - कोपर्डी तालुक्यातील कर्जत येथील मुलीवर बलात्कार आणि खून प्रकरणी एक मासाच्या आत आरोपपत्र प्रविष्ट करून अन्वेषणामध्ये कोठेही हयगय होणार नाही, असे पुणे येथील पोलीस आयुक्त सौ. रश्मी शुक्ला यांनी कोपर्डी येथे भेट दिल्यानंतर सांगितले.
       विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर शासनाने कर्जत येथील प्रकरणात खास चौकशीसाठी नियुक्त केलेल्या पुणे येथील पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बंद खोलीमध्ये मुलीची आई, बहीण भाऊ तसेच, ग्रामस्थ यांच्यांसोबत चर्चा केली. नाशिक येथून खास लॅब मध्ये सर्व पुरावे गोळा करण्यात आले.

शासनाने सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करू नये !

भटकळ (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटना 
यांच्याकडून पत्रकार परिषदेत शासनाला चेतावणी 
पत्रकार परिषदेला संबोधित करतांना डावीकडून 
श्री. पुंडलीक पै, श्री. जयंत नायक आणि 
इतर धर्माभिमानी
      भटकळ, कर्नाटक - सनातन संस्था हिंदु समाजाला धर्मशिक्षणाविषयी मार्गदर्शन करणारी संस्था आहे. अशा सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करणार्‍या हिंदुद्रोह्यांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटना यांनी येथील नागमस्ती देवस्थानमध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला संबोधित करतांना श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. जयंत नायक म्हणाले, सनातन संस्था एक अध्यात्मप्रसार करणारी संस्था आहे. असे हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न केल्यास शासनाला हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

सनातन संस्थेवर बंदी आणणे सत्याला सोडून आहे ! - श्री काशी सिंहासनाधीश्‍वर शाखा सोत्रानुवर्ती श्री. ष.ब्र. सिद्धेश्‍वर शिवाचार्य, श्री संस्थान पंचग्रह हिरेमठ, नवलगुंद.

     सनातन संस्था सामाजिक हिताच्या दृष्टीने कार्य करत आहे. समाजात नैतिक मूल्यांचे संवर्धन, अध्यात्मशास्त्र यांविषयी सांगून जनतेला आध्यात्मिक जीवन कसे जगायचे, हे शिकवते. प्रारंभापासून आतापर्यंत संस्था हेच कार्य करत आहे. ती पुढे गेली पाहिजे, ती वृद्धींगत झाली पाहिजे. अशा संस्थेवर बंदी घालून समाजाची प्रगती थांबवणे, हे सत्याला सोडून आहे; म्हणून सनातन संस्थेवर कोणत्याही प्रकारे बंदी आणू नये, अशी गृहमंत्र्यांना माझी पत्राच्या माध्यमातून विनंती आहे. सनातन संस्था समाजासाठी नि:स्वार्थपणे परिश्रम करते. यासाठी आमचे सनातनला संपूर्ण सहकार्य आहे.

शासनाने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा विचार सोडून द्यावा ! - श्री वीरेंद्रस्वामी, नवलगुंद, कर्नाटक

जगद्गुरु अजात महालिंगस्वामी मठाचे श्री वीरेंद्रस्वामी 
(बसलेले) यांना निवेदन देतांना सनातन संस्थेच्या 
सौ. विदुला हळदीपूर आणि धर्माभिमानी श्री. मुरळी
      नवलगुंद (कर्नाटक) - सनातन संस्था ही एक धर्मजागृती करणारी संस्था आहे. ही संस्था आध्यात्मिक संदेश, नैतिक मूल्यांचे संवर्धन, जीवनपद्धत आदी जीवनावश्यक विचारांचा प्रसार करते. ही संस्था समाज आणि देश यांची तिच्या परीने सेवा करते. या संस्थेकडून याहून अधिक देशसेवा होणार आहेे; परंतु काही दिवसांपासून या संस्थेवर आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांमध्ये खोटेपणाच अधिक आहे. त्यामुळे शासनाने कुणाच्याही दबावाखाली येऊन सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा विचार सोडून दिला पाहिजे, असे वक्तव्य येथील जगद्गुरु अजात महालिंगस्वामी मठाचे श्री वीरेंद्रस्वामी यांनी केले.
क्षणचित्र : सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात नवलगुंद येथील सर्व मठधिपतींची बैठक घेऊ, असे श्री वीरेंद्रस्वामी यांनी सांगितले.

(म्हणे) गीतेचा आधार घेत जयंत आठवले द्वेष आणि हिंसा यांचा विखारी प्रचार करतात !

 • लोकभारती पक्षाचे सनातनद्वेषी आमदार कपिल पाटील यांची बौद्धिक दिवाळखोरी !
 • साप्ताहिक कोकण दिनांकच्या माध्यमातून लिहिलेल्या लेखात सनातनवर केले धादांत खोटे आरोप !
 • डॉ. झाकीर नाईक यांच्याविरोधात थेट लेख लिहिण्याचे धाडस नसल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु नेते यांना लक्ष्य करून त्यांची आणि झाकीर नाईक यांची तुलना करण्याचा केविलवाणा आणि भेकड प्रयत्न !
    गोवा - साप्ताहिक कोकण दिनांकच्या १८ जुलै २०१६ च्या अंकामध्ये प्रकाशित झालेल्या लेखातून आमदार कपिल पाटील यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अश्‍लाघ्य स्वरूपात अनादर केला आहे. झाकीर नाईकचं समर्थन कशासाठी ? या मथळ्याखाली छापलेल्या लेखात पाटील यांनी सनातन संस्थेवरही धादांत खोटे आणि निराधार आरोप केले आहेत. सदर लेखात पाटील म्हणतात की,
१. जयंत आठवले सनातन धर्म म्हणून जे सांगतात, त्यातील हिंदु शब्द काढून मुस्लिम शब्द टाकला की, त्याच वाक्याच्या पुढे डॉ. झाकीर नाईक हे नांव सहज लिहिता येईल. इतकं दोघांमध्ये साम्य आहे. डॉ. झाकीर नाईक कुराणाचा संदर्भ घेतात आणि जयंत आठवले गीतेचा आधार घेतात. (हिंदूंनो, संतांचा अवमान करणारे आमदार कपिल पाटील यांच्यासारख्या जन्महिंदूंची ही स्थिती धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच आहे, हे लक्षात घ्या ! अर्थात् अशा वक्तव्यातून त्यांच्या बुद्धीची कीव करावी, तेवढी थोडीच ! - संपादक)

...तर स्वरक्षणासाठी हत्यार उचला ! - नाना पाटेकर

स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व विशद 
करणारी नाना पाटेकर यांची संतप्त प्रतिक्रिया !
        पुणे, २१ जुलै - येथील एका पत्रकार परिषदेत अभिनेता श्री. नाना पाटेकर यांनी कोपर्डी (जिल्हा नगर) येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाविषयी प्रतिक्रिया देतांना तीव्र अप्रसन्नता व्यक्त करत अत्याचारी घटना घडतांना वेळप्रसंगी स्वरक्षणासाठी हत्यार उचलावे लागले, तरी मागे-पुढे पाहू नका, असे सडेतोड मत व्यक्त केले. (यावरून राज्यातील वातावरण महिलांसाठी किती असुरक्षित आहे, हेच दिसून येते. जे एका अभिनेत्याला जाणवते, ते देशातील एकाही राज्यकर्त्याला का जाणवत नाही ? ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच (सनातन धर्म राज्य) आवश्यक आहे. - संपादक)
        ते पुढे म्हणाले, स्वरक्षणासाठी असे पाऊल उचलणे कायदासंमत आहे. स्वतःवर अत्याचार होत असतांना स्वरक्षणासाठी मुलींनी प्रतिकार केला पाहिजे. तरुणांनीही अशा विकृतींना ठेचले पाहिजे. जिच्यावर अत्याचार होत आहे, ती आपली बहीण, वहिनी, आई आहे, असे समजून त्यांनी तिचे संरक्षण करायला हवे.

काश्मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार द्या आणि आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करा ! - वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशन

२३ जुलैला सकाळी १० वाजता 
भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ फेरीचे आयोजन
       कोल्हापूर - बुरहान वानी या कट्टर जिहादी आतंकवाद्याला आणि देशद्रोह्याला कंठस्नान घातल्याच्या दिवसापासून काश्मीरमधील हिंसाचार अद्यापही शमण्याचे नाव घेत नाही किंबहुना तो अधिकाधिक चिघळत कसा राहील, या दृष्टीने काश्मिरी धर्मांध प्रयत्नरत असल्याचेच दिसून येत आहे. गेल्या ८ दिवसांपासून तेथे संचारबंदी लागू असून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत २४ जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले असून अनुमाने १ सहस्र ५०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. याच समवेत या जिहादी आतंकवाद्यांकडून अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करणे, त्यांचे साहित्य लुटणे, महिलांवर अत्याचार करणे असे प्रकार घडत आहेत. एकीकडे काश्मीर येथे भारतीय सैन्य प्राणांची आहुती देऊन लढत आहे, तसेच गतवर्षी आलेल्या पुरात सैन्याने अनेक काश्मिरींचे प्राण वाचवले होते, हे कोठेही लक्षात न घेता तेथील धर्मांध आणि काही राजकीय पक्ष सैन्यावरच खोटे आरोप करत आहेत. केवळ सैन्यामुळेच आज काश्मीर भारताच्या कह्यात आहे. त्यामुळे अशा वेळी देशातील सर्वच जनतेने सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, त्याचसमवेत काश्मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार द्यावेत आणि आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशीही मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत. याच अनुषंगाने भारतीय सैन्याचे मनोधैर्य वाढावे म्हणून शनिवार, २३ जुलै या दिवशी सकाळी १० वाजता प्रायव्हेट हायस्कूल येथून भव्य फेरी काढण्यात येणार आहे. अशी माहिती १९ जुलै या दिवशी वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशनच्या वतीने करवीरनगर वाचन मंदिर हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सनदशीर मार्गाने कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर बंदीची मागणी होणे लज्जास्पद ! - ह.भ.प. सौरभ महाराज

आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
    जळगाव - हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण करणे, त्यांना हिंदूंच्या रक्षणासाठी, धर्मकार्यासाठी सिद्ध करण्यासाठी सनातन संस्था कार्यरत आहे. जो वाईट कृत्य करतो तो समाजात उघड माथ्याने फिरतो; पण जी सनातन संस्था सनदशीर मार्गाने सर्व करते तिच्यावर मात्र बंदीची मागणी होते, ही लज्जास्पद गोष्ट आहे. अंधश्रद्धा निर्मूलन संस्था ही अज्ञानी आणि निधर्मी आहे, हे तिच्या नावातून स्पष्ट होते. अशा संस्थेचा मी पूर्ण निषेध करतो. वारकरी संप्रदायाच्या वतीने आमचा सनातन संस्थेला पूर्ण पाठिंबा आहे, असे उद्गार ह.भ.प सौरभ महाराज यांनी काढले. जळगाव येथे महानगरपालिकेसमोर नुकत्याच आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये ते बोलत होते.
    जळगाव येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदु आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनाला १३० हून अधिक हिंदुत्ववादी उपस्थित होते. या वेळी चालणार नाही चालणार नाही सनातन संस्थेवर बंदी चालणार नाही, धिक्कार असो धिक्कार असो कैरानामध्ये हिंदूंवर अत्याचार करणार्‍या धर्मांधाचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाच्या माध्यमातून कैरानातून पलायन केलेल्या हिंदु कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली.

(म्हणे) राज्यात गुन्हेगारी घटली !

 • कोपर्डी येथे बलात्काराची भयंकर घटना घडूनही पोलीस महासंचालकांचे विधान अचंबित करणारे !
 • राज्यभर महिलांवर अत्याचार, वाळूतस्करी, चोरी आणि दरोडे यांच्या घटना घडत राज्याचे पोलीस महासंचालक यांचे अजब विधान !
       पुणे, २१ जुलै - महाराष्ट्रातील गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण (दोषसिद्धी) यंदाच्या वर्षी ३३.५ टक्क्यापर्यंत वाढले आहे. आजवर नोंदवलेल्या टक्केवारीत हे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाणही या वर्षी जानेवारी २०१६ पासूनची आकडेवारी पाहता न्यून झाल्याचे दिसून येते. गुन्हेगारी घटल्याची माहितीही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत दिली आहे, असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले. पोलिसांच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दीक्षित हे १९ जुलै या दिवशी आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना ही माहिती दिली.

हिंदु राष्ट्रासाठी कार्यरत होणे हेच गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होईल ! - पू. नंदकुमार जाधव

पू. नंदकुमार जाधव
       जळगाव - आज प्रत्येक व्यक्ती ही सकाळी उठल्यापासूनच भ्रष्टाचाराला तोंड देत असतो. शासन, आरोग्य, शिक्षण, पोलीस यांपैकी कोणत्याही क्षेत्रामध्ये सामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही. या प्रवृत्तींना संगठितपणे विरोध न केल्याने त्या बलवान बनल्या आहेत. यांविरुद्ध संगठितपणे कृती करणे आपले राष्ट्र आणि धर्म कर्तव्य आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे राज्यकर्ते असलेले हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. या हिंदु राष्ट्रासाठी कार्यरत होणे हेच गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होईल, म्हणून या समष्टी कार्यात सहभागी व्हा, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव यांनी यश लॉन, पिंप्राळा रोड, जळगाव येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

सर्व समस्यांच्या निराकरणासाठी भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे आवश्यक ! - पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

सोलापूर, अकलूज आणि बार्शी येथे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !
पू. (कु.) स्वातीताई उपस्थित
जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना
      सोलापूर - आज देशात हिंदू बहुसंख्यांक असतांनाही हिंदूंना कायदे आणि अल्पसंख्यांकांना फायदे अशी स्थिती आहे. हिंदूंच्या यात्रांवर कर लादला जातो, तर अल्पसंख्यांकांना अनुदान दिले जाते. हिंदूंच्या सणांना ध्वनीक्षेपकाची बंधने लादली जातात, मग भारत धर्मनिरपेक्ष आहे, तर देशात समान नागरी कायदा का नाही ? देशात भ्रष्टाचार, अनैतिकता आणि व्यभिचार यांसारख्या गोष्टींनी परिसीमा गाठली आहे. हिंदूंची मंदिरे सरकार कह्यात घेत आहे. तेथेही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. कायदा होऊनही मोठ्या प्रमाणात गोहत्या केली जात आहे. हे सर्व जर थांबवायचे असेल, तर हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांनी केले. सोलापूर येथील उपलप मंगल कार्यालयात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी २५० जिज्ञासू उपस्थित होते.

आतंकवादाचे मूळ कारण इस्लाम असून ते सांगण्याची सध्या कोणात हिंमत नाही - डॉ. श्रीरंग गोडबोले

   पुणे, २१ जुलै (वार्ता.) - सध्या संपूर्ण जगावर इस्लामचे आव्हान आहे. त्यामुळे येथून पुढे मानवी मूल्ये टिकतील कि नाही, याचा कस लागेल. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जगात सर्वांत बलाढ्य मानला जातो; परंतु आतंकवादाचे मूळ कारण इस्लाम आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही सांगू शकत नाही. तसे सांगण्याची सध्या कोणातही हिंमत नाही, असे प्रतिपादन हिंदुत्ववादी विचारवंत डॉ. श्रीरंग गोडबोले यांनी केले. १६ जुलै या दिवशी केसरी वाडा येथे ४ थ्या विश्‍व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांना डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्या हस्ते या वर्षीच्या साहस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
   ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इस्लामचा सत्य आणि स्पष्ट अभ्यास केला. त्यांनी झोपलेल्या हिंदूंना जागे आणि संघटित करण्याचे कार्य केले. सावरकरांनी केलेल्या अनेक विषयांपैकी एका विषयावर अभ्यास केला, तरी त्यांचे ऋण फेडले जाईल.

परभणी येथून अटक केलेल्या इसिसच्या अतिरेक्याने सिद्ध केला होता बॉम्ब ! - आतंकवादविरोधी पथकाची विशेष न्यायालयात माहिती

       संभाजीनगर, २१ जुलै - मागील आठवड्यात नांदेडच्या आतंकवादविरोधी पथकाने इसिसच्या नसीरबिन याफी चाऊस या अतिरेक्याला परभणीतून अटक केली होती. चाऊस ने बॉम्ब सिद्ध केला असल्याची माहिती आतंकवादविरोधी पथकाने २० जुलै या दिवशी येथील विशेष न्यायालयात दिली. चाऊस याची पोलीस कोठडी २० जुलै या दिवशी संपत असल्यामुळे त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. चाऊसला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

मी अणुबॉम्बद्वारे लक्षावधी लोकांना ठार करू शकते ! - ब्रिटनच्या नवीन महिला पंतप्रधान थेरेसा

       लंडन - आवश्यकता पडल्यास अणुबॉम्बद्वारे आक्रमण करून लक्षावधी लोकांना ठार करू शकते, असे प्रतिपादन ब्रिटनच्या नवनिर्वाचित महिला पंतप्रधान थेरासा यांनी एका प्रश्‍नावर उत्तर देतांना केले.

सनातनचा हिंसेवर विश्‍वास नाही ! - निवृत्त जिल्हा न्यायाधीश सुधाकर चपळगावकर

संभाजीनगर येथे गुरुपौर्णिमा 
कार्यक्रमस्थळी बोलतांना
श्री. सुधाकर चपळगावकर
    संभाजीनगर - पंढरपूर वारी, गणेश विसर्जन मिरवणूक, रामनवमी मिरवणूक, कुंभमेळा, जगन्नाथ यात्रा, केदारनाथ यात्रा असे सोहळे ज्यामध्ये लक्षावधींच्या संख्येने हिंदु एकत्र येतात, त्याला पर्यावरण, आरोग्य, धान्य नासाडी अशा कारणांवरून विरोध करणार्‍या पुरोगामी, विवेकवादी संस्थांचे गुप्त उद्देश बाहेर काढण्यासाठी सनातन संस्थेच्या पाठीशी फार मोठ्या संख्येने अधिवक्त्यांची फौज, हिंदु विधिज्ञ परिषद यांसारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून उभी राहिली आहे. सनातनचा हिंसेवर विश्‍वास नाही म्हणूनच एवढ्या प्रचंड संख्येने अधिवक्ते सनातनच्या पाठीशी आहेत. सनातनवर होणार्‍या अन्यायाचा विरोध कायदेशीर मार्गाने करण्यासाठी अधिवक्ते कटीबद्ध आहेत, असे आश्‍वासक उद्गार निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री. सुधाकर चपळगावकर यांनी काढले. संभाजीनगर येथे पणजी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम रामायणा कल्चरल हॉलमध्ये झाला.

सनातनला पाठिंबा दर्शवणार्‍या जालना, पैठण आणि संभाजीनगर येथील लोकप्रतिनिधींचे अभिनंदन !

शिवसेनेचे नवनिर्वाचित राज्यमंत्री श्री. अर्जुन खोतकर
आणि पैठण येथील आमदार श्री. संदीपान भूमरे यांचे
सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात निवेदन ! 
हिंदुत्ववाद्यांकडून निवेदन स्वीकारतांना अनुक्रमे डावीकडून
चौथे श्री. अर्जुन खोतकर आणि सहावे श्री. चंद्रकांत खैरे
   पैठण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. संदीपान भूमरे, तसेच जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे नवनिर्वाचित राज्यमंत्री श्री. अर्जुनराव खोतकर यांना सनातनवरील बंदीच्या विरोधात निवेदन दिले. राज्यमंत्री श्री. अर्जुनराव खोतकर म्हणाले, मीच याविषयी आधीही विधानभवनात बंदीच्या मागणीच्या विरोधात आवाज उचलला होता. या वेळीही मी निश्‍चितपणे तुमच्या समवेत आहे. आमदार श्री. भूमरे म्हणाले, हे उगीच आरोप करतात. मागील वेळीही सनातनला गोवण्यात आले; पण सर्व निष्फळ ठरले. तुम्ही चिंता करू नका. आम्ही बंदीच्या मागणीच्या विरोधात आवाज उठवू.

बहुसंख्य हिंदूंना दुय्यम स्थान मिळत आहे ! - अधिवक्ता प्रताप यादव

बेळगाव येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाला ९०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती 
प्रथमोपचार प्रशिक्षण - भाग ३ या सनातनच्या ग्रंथाचे प्रकाशन 
ग्रंथातील माहिती वाचून
दाखवतांना पू. गिंडे महाराज
       बेळगाव - आज देशात अल्पसंख्य संघटित असून, त्यांच्याकडून हिंदूंवर अन्याय होत आहेच. त्याचसमवेत त्यांच्या संघटनाच्या प्रभावामुळे राजकीय शक्तीही अन्यायग्रस्त हिंदूंची बाजू ऐकून घेत नाहीत. देशाच्या राज्यघटनेत बहुमताला स्थान असले, तरी बहुसंख्य हिंदूंना दुय्यम स्थान मिळत आहे. यामुळेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंना न्याय मिळवून देण्याकरिता कायद्याची योग्य ती माहिती आणि वापर आवश्यक आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मागे अधिवक्त्यांचे बळ असेल, तर कार्य करणे सोपे होते. हेच आज आम्हा हिंदु अधिवक्त्यांचे हिंदुत्वाच्या कार्यासाठीचे आवश्यक कर्तव्य आहे, असे अधिवक्ता प्रताप यादव यांनी येथे सांगितले. महावीर भवन, बेळगाव येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये आणि सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांचेही मार्गदर्शन झाले. या महोत्सवाला सनातनचे संत पू. शंकर गुंजेकर, तसेच बेळगाव येथील संत पू. वासुदेव पुरुषोत्तम गिंडे महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. पू. गिंडेमहाराज यांच्या हस्ते सनातनच्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

फलक प्रसिद्धीकरता

देशद्रोह्यांना पाठीशी घालणार्‍या पीडीपी या राजकीय पक्षावर बंदी घाला !
    बुरहान वानी याला थेट ठार मारण्याची काय आवश्यकता होती ? सैन्याच्या या कृतीमुळेच काश्मीरमधील परिस्थिती इतकी चिघळली आहे, असा आरोप पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे (पीडीपीचे) खासदार मुझफ्फर बेग यांनी भाजपवर केला आहे.

सनातनच्या धर्मप्रसाराला लाभलेले यश निधर्मी आणि नास्तिकतावादी दुष्प्रवृत्तींना खुपत असल्यानेच त्यांनी सनातनच्या बदनामीचे षड्यंत्र चालू केले आहे ! - जितेंद्र वाडेकर, विहिंप

विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर
महोत्सवात बोलतांना
     कराड (जिल्हा सातारा) - गुरु-शिष्य परंपरा हे हिंदु संस्कृतीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. भारतियांच्या विस्मरणात चाललेल्या या परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी सनातन संस्था कार्यरत आहे; मात्र सनातनच्या धर्मप्रसाराला लाभलेले यश काही निधर्मी आणि नास्तिकतावादी दुष्प्रवृत्तींना खुपत असल्यानेच त्यांनी सनातनच्या बदनामीचे षड्यंत्र चालू केले आहे, असे परखड मत सातारा येथील विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर यांनी व्यक्त केले. येथील अक्षता मंगल कार्यालयात सनातन संस्था सातारा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त ते बोलत होते.

नांदेड येथे गुरुपौर्णिमा महोत्सव

      नांदेड - येथे बजाज फंक्शन हॉल, छत्रपती चौक येथे गुरुपौर्णिमा पार पडली. कार्यक्रमात धर्मप्रेमी श्री. मिलिंद देशमुख यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी केला. श्री. मिलिंद देशमुख हे नांदेड उत्तर विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत. ते नेहमी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असतात. सामाजिक आणि धार्मिक कार्यात त्यांना मोठा सहभाग असतो. तसेच सनातनची साधिका कु. मानसी नितीन राठोड हिला इय्यता १० वीत सुयश मिळाळ्याविषयी सत्कार करण्यात आला. कु. मानसी हिची मातृभाषा गुजराथी असून तीला मराठी या विषयात ९० गुण मिळाले. तसेच दैनिक सनातन प्रभातचे वितरक श्री. शांताराम बेदरकर यांचा ही सत्कार करण्यात आला. श्री. शांताराम बेदरकर हे गेल्या ७ वर्षांपासून नियमितपणे दैनिक सनातन प्रभातचे वितरण करतात. अंक विरतण करत असतांना त्यांनी वाचकांशी चांगली जवळीक साधली आहे. कार्यक्रमाला ३५० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.सोलापूर येथील श्री गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला

मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) अपरिहार्य !
     सोलापूर, २१ जुलै - येथील हिप्परगामधील श्री मशरुम गणपती मंदिराचा २५ तोळे सोन्याचा कळस चोरीला गेला आहे. भाविकांच्या योगदानातून हा मिश्र धातूंचा कळस बांधला होता, त्याला २५ तोळे सोन्याचा मुलामा दिला होता. २० जुलै या दिवशी सकाळी पुजारी मंदिरात आल्यानंतर त्यांना कळस चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली आहे. १९ जुलै या दिवशी रात्री जोरदार पाऊस पडत असतांना अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्याचा अपलाभ घेत चोरांनी कळस चोरल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

संतांच्या मार्गदर्शनानुसार हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता ! - सुधन्वा गोंधळेकर, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

उपस्थितांना मार्गदर्शन करताना
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे
धारकरी श्री. सुधन्वा गोंधळेकर
      सातारा - कोणत्याही कार्याला गुरूंचा आणि ईश्‍वराचा आशीर्वाद असेल, तर ते कार्य निश्‍चितच सफल होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या महान कार्याच्या यशाचे गमक जाणून घ्यायचे असेल, तर आधी समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकोबारायांनी दिलेला धर्माचरणाचा उपदेश समजून घ्यावा लागेल. तरच शिवरायांच्या कार्याला धर्माचे अधिष्ठान असल्याने ते यशस्वी झाल्याचे आपल्या लक्षात येईल. सध्याच्या काळातसुद्धा राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन संतांच्या मार्गदर्शनानुसार सत्त्वगुणी लोकांचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघटित प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. सुधन्वा गोंधळेकर यांनी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात सहभागी हिंदु धर्माभिमानी
     यवतमाळ - यवतमाळ येथील दत्त चौक येथे दुपारी ४ ते सायं. ६ या वेळेत अत्यंत उत्साहात राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत धरणे आंदोलन पार पडले. या आंदोलनात ४० जण सहभागी झालेत. या आंदोलनात आतंकवाद पसरवणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कारवाई करण्याविषयी, पुरोगाम्यांच्या आवईवरून सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात आणि कैराना येथील पलायन करणार्‍या हिंदूंना संरक्षण देण्याविषयी आवाज उठवण्यात आला. यामध्ये वारकरी संप्रदायाचे ह.भ.प शिरभाते महाराज, हिंदू महासभेचे श्री. लक्षमणलाल खत्री, पतंजली योगपीठाचे श्री. रमेश राऊत, रामनवमी उत्सव समितीचे श्री. मनोज औदार्य, सनातन संस्थेचे श्री. रमाकांत दाभाडकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश खान्देल यांसह धर्मशिक्षण वर्गातील अनेक धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले, तर ५०० जणांनी निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्यात. 
क्षणचित्रे - १. साध्या वेशातील दोन पोलिसांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले. (पोलिसांनी हाच वेळ आतंकवाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला असता, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता. - संपादक)

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Senadwara Burhan Waniko marneke karanhi Kashmirki sthiti bigdi
- Muzzafar Beg, PDP Sansad Deshdrohiyonka samarthan karnewala PDP bhi deshdrohi hai !
जागो !
सेना द्वारा बुरहान वानी को मारने के कारण ही कश्मीर की स्थिति बिगडी 
- मुझफ्फर बेग, पीडीपी सांसद देशद्रोहियों का समर्थन करनेवाला पीडीपी भी देशद्रोही है !

दुचाकीस्वाराकडे शिरस्त्राण (हेल्मेट) नसल्यास पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही !

शिरस्त्राणसक्तीची 
दिवाकर रावते यांची घोषणा
        मुंबई, २१ जुलै (वार्ता.) - यापुढे दुचाकी चालवणार्‍यांकडे शिरस्त्राण नसेल, तर त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही, असे परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते यांनी २१ जुलै या दिवशी विधान परिषदेत घोषित केली. दुचाकी चालवणार्‍याकडे आणि त्याच्या मागे बसलेल्या प्रवाशाकडे शिरस्त्राण असले पाहिजे आणि ते त्यांनी घातलेले पाहिजे, तरच त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
        गेल्या मासात तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून शिरस्त्राण नसलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.

(म्हणे) संघ हे काँग्रेसचे अपत्य ! - व्ही. मातंग यांचे जातीयवादी वक्तव्य

       पुणे, २१ जुलै (वार्ता.) - काँग्रेस हे ब्रिटीशांचे अपत्य असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे काँग्रेसचे अपत्य आहे. या देशाला केवळ बामसेफच मुक्ती देऊ शकते, असे अज्ञानमूलक प्रतिपादन बहुजन मुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. मातंग यांनी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात केले. (हिंदूच्या ऐक्याची कधी नव्हे एवढी आवश्यकता निर्माण झाली असतांना जातीयद्वेषापोटी संघ आणि काँग्रेस यांना एक म्हणणे म्हणजे उच्चवर्णीय संबोधून बहुजन समाजाला त्यापासून वेगळे पाडू पहाणारे कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात, हे लक्षात येते. - संपादक) लोकशाही आणि ब्राह्मणशाही एकत्र राहू शकत नाही, आतंकवादाचा खरा चेहरा ब्राह्मणवाद आहे, तर निरपराध ५२ सहस्र मुसलमान कारागृहामध्ये का ?, आरक्षण लागू न करणे, हे शासनाचे षड्यंत्रच आहे आदी सूत्रांवर या वेळी द्वेषमूलक चर्चा करण्यात आली. (आज सर्वत्र इसिसच्या जिहादी आतंकवाद्यांनी जो हैदोस घातला आहे, त्याविषयी बामसेफवाले काहीच बोलत नाहीत. - संपादक)

माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील माजी पोलीस अधिकार्‍यांना जामीन

      पुणे, २१ जुलै - माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील आरोपी माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि साहायक पोलीस निरीक्षक नामदेव कवठाळे यांना २० जुलै या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. न्यायालयाने या वेळी त्या दोघांना १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला आहे. त्या दोघांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयात जुलै मासातच आरोपपत्र प्रविष्ट केले होते.

हिंदूंनो, संघटित होऊन अभेद्य अशी फळी उभारा !

      उत्तरप्रदेशातील कैरोना गावातील ३५० हिंदु कुटुंबे धर्मांधांच्या त्रासामुळे घरदार सोडून परागंदा झाली. बांगलादेश, पाकिस्तान या ठिकाणीही प्रतिदिन हिंदू नाहीसे होत आहेत किंवा धर्मपरिवर्तीत होत आहेत. २५ वर्षांपूर्वी काश्मीरच्या नंदनवनात महाभयंकर रक्तपात होत हिंदूंचा वंशसंहार झाला. आज पश्‍चिम बंगाल हा छोटा बांगलादेश म्हणून ओळखला जात आहे. केरळ, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश येथूनही हिंदु अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर आहेत.

हिंदूंनी हिंदूविरोधी घटकांच्या विरोधात बहिष्काराचे अस्त्र उगारावे !

      इतिहासातील सत्य घटनांची मोडतोड करून स्वतःच्या आर्थिक लाभासाठी अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, तसचे नाट्य क्षेत्रातील लेखक, निर्माते आदी हिंदूंच्या महापुरुषांना आणि स्त्रियांना त्यांच्या कलाकृतींतून चुकीचे रेखाटत असतात. यांच्या कलाकृती पाहून भावी पिढीलाही हाच आपला इतिहास असे वाटू लागते आणि या पिढीतील काही जण त्यातील व्यक्तीरेखांप्रमाणे चुकीच्या कृती करण्यास प्रवृत्त होतात. हल्लीचे ताजे उदाहरण म्हणजे सैराट चित्रपटानंतर घडलेल्या अल्पवयीन मुलांमुलींच्या पळून जाण्याच्या घटना आणि महाराष्ट्रातील कोपर्डी प्रकरण. पूर्वीच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील थोरातांची कमळा या नाटकापासून हल्लीच्या जोधा अकबर किंवा बाजीराव पेशवे यांसारख्या चित्रपटांतून त्यातील हिंदूंसाठी आदर्श ऐतिहासिक व्यक्तीरेखांना रोमेंटिक, व्यसनी आदी रेखाटण्यात आले. या गोष्टींना तथाकथित पुरोगामी आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले यांचा पाठिंबा असतो. या संदर्भात दैनिक तरुण भारत-सोलापूर आवृत्तीत १३ जुलै २०१६ या दिवशी दलालगिरीची हद्द या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या विशेष संपादकीय लेखाचा संपादित भाग आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

सौ. आराधना गाडी यांना रामनाथी आश्रमात असतांना आलेल्या विविध अनुभूती !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
१. प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवानिमित्तचे 
विधी आणि नाडीवाचन चालू असतांना 
१ अ. प.पू. डॉक्टरांचे पाद्यपूजन होत असतांना त्यांच्या जागी शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले साक्षात् भगवान विष्णु दिसणे अन् देवतांचे अस्तित्व जाणवणे : एका विधीत प.पू. डॉक्टरांचे पाद्यपूजन झाले. त्या वेळी मला त्यांच्या जागी शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले साक्षात् भगवान विष्णु दिसत होते. त्या वेळी मला देवतांचे अस्तित्व जाणवत होते. 
१ आ. पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकूंना बघताच आनंद होणे आणि त्यांनी स्पर्श केलेल्या हाताला अर्धा घंटा चंदनाचा सुगंध येणे : एके दिवशी सायंकाळी ७ वाजता पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे रामनाथी आश्रमात आगमन झाले. माझा साधनेचा आढावा असल्याने मी सभागृहात गेले होते. त्या वेळी पू. काकूंच्या स्वागताची सिद्धता चालू होती. मी सभागृहात जात असतांना अकस्मात् पू. काकूच माझ्या समोर उभ्या ठाकल्या. त्या वेळी माझा आनंद गगनात मावत नव्हता. माझ्या मनात पू. काकूंना भेटण्याची इच्छा होतीच. देवाच्या मनात असले, तर तो काहीही करू शकतो, हे मला पुन्हा जाणवले. त्या भेटीतील त्यांच्या स्पर्शाने माझ्या हाताला अर्धा घंटा चंदनाचा सुगंध येत होता.

भगवंताने सृष्टी आणि युगे निर्माण करण्याची प्रक्रिया आणि भगवंताच्या अवतारांनी जन्म घेतलेल्या भारताची वैशिष्ट्ये !

१. भगवंताचे नियोजन 
प.पू. पांडे महाराज
       ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आणि त्याने केलेल्या नियोजनाप्रमाणे ही सृष्टी चालू आहे. त्यामुळे भगवंताचे नियोजन जाणून घेऊन त्याच्या इच्छेप्रमाणे, म्हणजे ईश्‍वरेच्छेप्रमाणे वागणे, हेच खरे धर्मशिक्षण असल्याने आज काही सूत्रे आपल्यासमोर मांडत आहे.
१ अ. भगवंताला सृष्टी निर्मितीची इच्छा झाल्यावर त्याने नारायणतत्त्वाद्वारे संकर्षण (अहंकार) तत्त्वातून ब्रह्माद्वारे सृष्टीची निर्मिती करणे : भगवंताला सृष्टी निर्मितीची इच्छा झाल्यावर त्याने नारायणतत्त्वाद्वारे संकर्षण (अहंकार) तत्त्वातून ब्रह्माद्वारे सृष्टीची निर्मिती केली. ॐ या सगुण-निर्गुण तत्त्वातून त्याच्या अ, उ आणि म् या पदांतून सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण निर्माण झाले. त्यातील तमोगुणातून पंचमहाभूतांची निर्मिती झाली.
       नंतर सूक्ष्म अशा प्रथम सर्ग सृष्टीची निर्मिती झाली. त्यानंतर विसर्ग ही सगुण सृष्टी निर्माण झाली. सृष्टी निर्मितीच्या क्रमामध्ये ९ व्या क्रमांकावर मानव सृष्टी आणि १० व्या क्रमांकावर वैकारिक देवसर्ग (या सृष्टीत देवता, गंधर्व, अप्सरा, सिद्ध, चारण, विद्याधर, पितर, असुर, यक्ष-राक्षस, भूतप्रेत, पिशाच्च, किन्नर-किंपुरुष-अश्‍वमुख आदी भेदामुळे देवसृष्टी आठ प्रकारची आहे.) निर्माण झाले. याचे वर्णन महाभागवतात स्कंद ३, अध्याय १० मध्ये आले आहे.

प्रेमळ आणि प.पू. गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असलेल्या जोधपूर, राजस्थान येथील पू. (सौ.) सुशीला मोदी (वय ६५ वर्षे) !

पू. (सौ.) सुशीला मोदी
श्री. प्रणव मणेरीकर यांना पू. (सौ.) सुशीला मोदी 
यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. प्रेमभाव 
अ. आम्ही सुशीलाभाभींच्या घरी गेल्यावर त्या आम्हाला अतिशय प्रेमाने तुम्ही कसे आहात ?, असे विचारतात. आम्हाला वेळेवर जेवण देतात आणि आमची सर्व प्रकारे काळजी घेतात. 
आ. त्यांची प्रत्येक कृती प्रेमभावयुक्त असते.
२. झोकून देऊन तळमळीने सेवा करणे 
२ अ. उतारवयातही झोकून देऊन सेवा करणे : त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना सांगतात, तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. तुम्ही एवढी सेवा आणि धावपळ कशासाठी करता ?, तरीही त्या या वयातही झोकून देऊन सेवा करतात. माझ्याकडून ही सेवा कशी होईल ?, हा विचार त्यांच्या मनात कधीही येत नाही.

नेहमी कृतज्ञताभावात रहाणार्‍या रामनाथी आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधिका सौ. शालिनी मराठेकाकू (वय ६८ वर्षे) !

सौ. शालिनी मराठे
१. रामनाथी आश्रमातील पहिल्या भेटीतच 
वात्सल्यभावाने जवळीक साधणे
     मी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात ४.६.२००८ या दिवशी आलो. तेव्हा मूलतःच वात्सल्यभाव असणार्‍या सौ. शालिनी मराठेकाकूंशी माझी ग्रंथ विभागात ओळख झाली. त्या वेळी त्यांनी अनौपचारिकपणे बोलतांना कौतुकाने सांगितले, अरे ! काही वर्षांपूर्वी मी गणपतिपुळे येथील ग्रंथप्रदर्शन केंद्रावर सेवेला आले होते. तेव्हा आपण भेटलो होतो. तेव्हा तू कोतवड्याहून बसने सेवेला येत होतास.... 
     खरेतर माझ्या लहानपणी घडलेला तो प्रसंग मला एवढा इत्थंभूतपणे आठवतही नव्हता; पण त्यासंबंधी अन्य साधकांशी बोलतांना काकू ज्या कौतुकाने आणि कृतज्ञतेने बोलत होत्या, त्या शब्दांतूनच पहिल्या भेटीतच त्या मला अतिशय जवळच्या वाटल्या. जसे प्रत्येक आईला मुलाच्या लहान लहान गोष्टींचे कौतुक वाटते ना अगदी तसेच होते त्यांचे बोलणे !

कोरडवाहू शेतीत श्रीकृष्णाच्या कृपेने कूपनलिकेला पाणी लागल्याची आणि शेतात आध्यात्मिक उपाय करत असल्यामुळे तेथे श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवत असल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

१. कोरडवाहू भागात सरकारी खात्याकडून कूपनलिका खणल्यावर त्यांना पाणी लागले नसल्याचे ठाऊक असूनही भगवान श्रीकृष्णाला स्मरून कूपनलिका खोदायचीच, असे ठरवणे : आमची कोरडवाहू भागात शेती आहे. त्या भागात पाणी अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही कूपनलिका खोदायची, असा निर्णय घेतला; पण सभोवतीच्या सर्व लोकांनी इथे पाणी लागणार नाही, असे वारंवार सांगितले; कारण या आधी सरकारी खात्याकडून त्या भागात एकूण १२ कूपनलिका खणल्या होत्या; पण एकाही कूपनलिकेला पाणी लागले नव्हते, तरीही आम्ही भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांना स्मरून कूपनलिका करायचीच, असे ठरवले.
२. आध्यात्मिक उपाय करून कूपनलिका खोदायला चालू केल्यावर दीडशे फूट खोदूनही पाणी न लागणे : कूपनलिका खणण्याच्या दिवशी मी त्या ठिकाणी श्रीकृष्णाला प्रार्थना करून सनातन गोअर्क आणि विभूतीचे पाणी शिंपडले अन् उदबत्ती लावून प्रार्थना केली. दोन घंट्यांनी कूपनलिका खणण्याचेे काम चालू झाले. दीडशे फुटांपर्यंत खणूनही नुसतेच दगड आणि माती बाहेर येत होती. तेव्हा कूपनलिका खणणारे लोकही म्हणाले, इथे पाणी लागणार नाही.

मानस उपाय करतांना आलेल्या अनुभूती आणि झालेले परिणाम

१. अनुभूती
१ अ. सूक्ष्मातून रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात मानस उपाय करण्यासाठी गेल्यावर नामजप अगदी आतून सहजपणे आणि एकाग्रतेने होणे अन् हलके वाटणे : घरात पहाटे उठून मानस उपाय करण्यापूर्वी मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली आणि उपायांसाठी रामनाथी आश्रमात जात आहे, असा भाव ठेवला. मी आश्रमात गेल्यावर श्रीकृष्णाला उपायांसाठी कुठे जाऊ ?, असे विचारले. तेव्हा श्रीकृष्णाने मला ध्यानमंदिरात जाण्यास सांगितले. त्यानुसार मी ध्यानमंदिरात गेलो. तेथे पुन्हा श्रीकृष्णाला प्रार्थना करून नामजपाला आरंभ केल्यावर माझ्या मनातील सगळे विचार एकदमच उणावले आणि माझा नामजप एकाग्रतेने होऊ लागला. मग मी मला ध्यानमंदिरातील चैतन्य ग्रहण करता येऊ दे, अशी प्रार्थना केल्यावर माझा नामजप अगदी आतून सहजपणे होत आहे, तसेच मला माझे अस्तित्व जाणवून हलके वाटू लागले.

व्यावहारिक जीवनातील शिक्षण घेण्याच्या पद्धतीप्रमाणे देवाने साधनाही टप्याटप्याने शिकवल्याची साधकाने घेतलेली अनुभूती

श्री. राम होनप
       माझी आई मला लहानपणी तिच्यासमवेत एका देवळात कीर्तन ऐकण्यासाठी घेऊन जात असे. कीर्तनकार देवाविषयी विविध गोष्टी सांगत. मनुष्यासाठी देवदर्शन होणे महत्त्वाचे असून तेच आपले ध्येय आहे, हेच ते सांगत असलेल्या सर्व गोष्टींचे तात्पर्य असे. हे सूत्र माझ्या मनावर बिंबले गेले. कालांतराने कीर्तनकार देवदर्शन होण्यासाठी नामजपाचे महत्त्व याविषयी सांगू लागले. याचा परिणाम म्हणून मला देवदर्शनाची इच्छा निर्माण झाली आणि त्यासाठी मी नाम घेऊ लागलो.
       काही वर्षांनी मी सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. सत्संगात गेल्यावर मला आपले अंतिम ध्येय मोक्षप्राप्ती असून देवदर्शन हा त्यातील एक टप्पा आहे आणि मोक्षप्राप्तीसाठी तन, मन अन् धनाचा त्याग करणे आवश्यक आहे, हे समजले.
       या सूत्रावरून एक लक्षात आले की, प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळेत प्रवेश मिळतो आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. त्याप्रमाणे देवानेही मला टप्याटप्याने साधनेचा मार्ग दाखवला.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०१५)
       डॉ. झाकीर नाईक यांनी आतापर्यंत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यातील निवडक विधानांपैकी प्रतिदिन एक विधान येथे देत आहोत.
       मुसलमान राष्ट्रांत पत्नीला मारझोड करणे, हे वाईट नाही.

कृतज्ञता विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचे रंगीत
प्रसिद्धी दिनांक : २४ जुलै २०१६
पृष्ठ संख्या : १२, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ 
जुलैला दुपारी ३.३० पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हास्यास्पद साम्यवाद !
    अध्यात्मातील प्रारब्ध या शब्दाकडे आणि ईश्‍वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरु-शिष्य नात्याविषयी गुरूंचा दृष्टीकोन
मी कोणाचा गुरु नाही; पण शिष्य केल्याविना सोडणार नाही.
भावार्थ १ : मी कोणाचा गुरु नाही, यातील मी प्रकृतीतील मीविषयी आहे. शिष्य केल्याविना सोडणार नाही, म्हणजे पुरुषतत्त्वाचा किंवा बाबांच्या गुरूंचा, म्हणजे
प.पू. अनंतानंद साईश यांचा शिष्य केल्याविना सोडणार नाही किंवा असा नामजप चालू करून देईन की, सर्वजण नामाचे शिष्य होतील.
भावार्थ २ : गुरु म्हणजे शिव. शिवदशेत मनात विचार येत नाहीत; म्हणूनच मी गुरु आहे हा विचार मनात येऊ शकत नाही. जीवदशेत आल्यावर मी शिष्य आहे एवढाच विचार मनात येतो; म्हणूूनच माझ्या गुरूंकडे मी साधकांना घेऊन जाईन, त्यांना माझ्या गुरूंचे शिष्य करीन.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने त्यांना 
सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


बोधचित्र

तुकाराम मुंढे यांच्या चौकशीचे आदेश ?

       पूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी असणारे तुकाराम मुंढे हे आता नवी मुंबईचे आयुक्त आहेत. धडाडीचे निर्णय घेणारे म्हणून मुंढे यांची प्रसिद्धी आहे. स्वतःच्या मनाने निर्णय घेतांना ते लोकमत फारसे विचारात घेत नाहीत. पंढरपूरला गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करू नयेत, या शासनाच्या आदेशाची कार्यवाही करतांना मूर्तींची विल्हेेवाट लावण्याच्या संदर्भात त्यांनी सूतोवाच केले होते. ७०० वर्षे चालू असलेली चातुर्मासातील श्रीमद्भागवत प्रवचनाची श्री रुक्मिणी मंदिरातील परंपरा शासकीय मंदिर समितीने मागील वर्षी बंद केली. त्यासाठी प्रवचनकार मिळत नाहीत, असे कारण दिले. पंढरपूरच्या विठ्ठलाची शेकडो वर्षे चालणारी पंचोपचार पूजा बंद करून ती एकाच वेळी करण्याचा धर्मद्रोही निर्णय त्यांनी घेतला होता.

हत्यांचे वाढतेे गुन्हे !

संपादकीय 
     कर्जतमधील कोपर्डी येथील युवतीच्या हत्येचे प्रकरण विधानसभेत गाजत असतांनाच नवी मुंबई येथील नेरूळमध्ये १६ वर्षांच्या मुलाची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे त्याच्या पूर्ण कुटुंबाच्या देखत त्याला मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. ही एक प्रातिनिधिक घटना म्हणून लक्षात घेऊन या संदर्भात सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. दायित्वशून्य पोलीस, निष्क्रीय नागरिक, चित्रपटांचा समाजव्यवस्थेवर पगडा, सुसंस्कार आणि धाक यांविरहित चालणारी कुटुंबे आदी अनेक विदारक घटकांची स्थिती या घटनेच्या निमित्ताने पुढे आली आहे. गेल्या वर्षभरात आजोबांनी नातवांची हत्या करणे, भावाने बहिणीची, तसेच आई-वडिलांनी मुलांच्या आणि मुलांनी आई-वडिलांच्या अशा जवळच्या नातेवाइकांनी एकमेकांच्या हत्या करण्याची आकडेवारी सरासरी प्रतिदिन एक-दोन अशी आहेच.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn