Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न ! - सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

वीर शिवा काशीद यांचे १३ वे वंशज आनंदराव काशीद यांची विशेष उपस्थिती 
भरपावसात २५० हून अधिक हिंदु धर्माभिमान्यांनी जागवले बाजीप्रभूंचे बलीदान ! 
फेरीच्या समारोपप्रसंगी बोलतांना डावीकडून सर्वश्री पंडितराव विभूते,
सुनील घनवट, मनोज खाड्ये आणि गोलामध्ये आनंदराव काशीद
   मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), २० जुलै (वार्ता.) - देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशात आक्रमक औरंगजेब याच्या नावाने जिल्हा आहे; पण धर्मासाठी बलीदान देणार्‍या छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जिल्हा नाही. आजही हिंदूंचा अनन्वित छळ करणारे अकबर, हुमायू, तसेच अनेक आक्रमक यांची नावे शहरांना, मार्गांना जशीच्या तशी आहेत. हाच प्रकार इतिहासाच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीतही चालू आहे. आजच्या निधर्मी शिक्षण विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा कोथळा काढलेले छायाचित्र काढून टाकून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या भेटीचे छायाचित्र समाविष्ट केले आहे. त्यामुळे दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न आपण सर्वांनी रोखला पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक
श्री. सुनील घनवट यांनी केले. मलकापूर येथे बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पालखी मिरवणुकीनंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

संजीव पुनाळेकर यांनी याचिका दाखल केली नसती, तर सरकारने स्वतःहून ही कारवाई केली नसती !

खाजगी संस्थांकडून ३८ चौ. किलोमीटर भूमी महाराष्ट्र शासनाने परत घेतली !
शासकीय भूमीच्या गैरवापर प्रकरणी अधिवक्ता पुनाळेकर
यांच्या याचिकेवर न्यायालयाच्या आदेशाने कारवाई !
    मुंबई - शासकीय भूमी भाड्याने देतेवेळी घातलेल्या अटींचे पालन न केलेल्या काही खाजगी संस्थांकडून महाराष्ट्र शासनाने ३८ चौ. किलोमीटर भूमी परत घेतल्याचे शासकीय अधिवक्त्याने १९ जुलैला मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ १ सहस्र ५१३ चौ. किलोमीटर शासकीय भूमी खाजगी संस्थांना भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे, असे शासनाच्या वतीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. शासनाकडून भाड्याने देण्यात आलेल्या भूमीविषयी काही खाजगी संस्थांकडून गैरवापर झाल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला होता. शासकीय भूमी वापरणार्‍या काही खाजगी संस्थांकडून शासनाने घातलेल्या अटींचे पालन केले जात नाही, असे या याचिकेमध्ये म्हटले होते.
    न्या. अभय ओक आणि न्या. अमजद सईद यांच्या खंडपिठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली होती. न्यायालयाने एका आदेशाद्वारे शासनाला दोषी खाजगी संस्थांवर कारवाई करण्यास सांगितले होते. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या वतीने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.

सनातनच्या विविध गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये झालेल्या कार्यक्रमांत साधकांच्या संतपदाची, तसेच सद्गुरुपदाची घोषणा !

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील श्री. अनंत (तात्या) पाटील ६१ व्या,
कपिलेश्‍वरी (गोवा) येथील सौ. सुमन नाईक ६२ व्या आणि
जोधपूर (राजस्थान) येथील सौ. सुशीला मोदी ६३ व्या संतपदी विराजमान !
सनातनचे संत पू. राजेंद्र शिंदे सद्गुरुपदी विराजमान ! 
पू. अनंत (तात्या) पाटील (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना पू. रमेश गडकरी
 
पू. (सौ.) सुमन नाईक (डावीकडे) यांचा सन्मान करतांना पू. (सौ.) मालिनी देसाई
पू. (सौ.) सुशीला मोदी (डावीकडे) यांचा सन्मान करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
पू. राजेंद्र शिंदे (डावीकडे) यांचा सन्मान करतांना प.पू. परशराम पांडे महाराज

२१ जुलैला आतंकवादाच्या विरोधात सानपाडावासीय एकवटणार !

     २१ जुलै या दिवशी सकाळी ९ वाजता येथील शहिद बाबू गेनू मैदानावर संपूर्ण सानपाड्यातील रहिवाशी आतंकवादाचा निषेध करण्यासाठी एकवटणार आहेत. यामध्ये समस्त राष्ट्र्रप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल सानपाडा रहिवासी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

देशद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कारवाई व्हावी !

अखिल सानपाडा रहिवासी महासंघाची मागणी
आतंकवादाच्या विरोधात २१ जुलै या दिवशी आंदोलन ! 
      मुंबई, २० जुलै (वार्ता.) - आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी, यासाठी अखिल सानपाडा रहिवाशी महासंघाच्या वतीने १८ जुलै या दिवशी सानपाडा रेल्वेस्थानकाजवळ आंदोलन करण्यात आले. या वेळी डॉ. झाकीर नाईक यांचा देशद्रोही कृत्यांचा निषेध करत संतप्त नागरिकांनी त्याच्या प्रतिमेला चपलांनी मारले. आंदोलनात अखिल सानपाडा रहिवाशी महासंघाचे सचिव श्री. घनश्याम पाटे, सल्लागार सर्वश्री मिलिंद सूर्यराव, संतोष पाचलग, अजय पवार, विसाजी लोके, समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी, सनातन संस्थेच्या सौ. कमल गिरमकर यांसह बहुसंख्य राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

खरे मंगल कार्यालय, सांगली येथे गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी ५०० जिज्ञासूंची उपस्थिती

     सांगली - येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाचा कार्यक्रम खरे मंगल कार्यालय, विश्रामबाग या ठिकाणी सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत पार पाडला. या सोहळ्यामध्ये ५०० जिज्ञासूंची उपस्थिती होती. स्वसंरक्षण विषय कु. प्रतिभा तावरे यांनी मांडला, तर हिंदु राष्ट्र हा विषय सौ. मधुरा तोफखाने यांनी मांडला. या वेळी सातारा येथील पू. विजय महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. या वेळी ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज, माजी आमदार आणि मनसेचे नेते श्री. नितीन शिंदे, श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री सचिन पवार, श्रीकृष्ण माळी, शिवसेनेचे व्यापारी सेनेचे श्री. तात्या कराडे, भाजपचे श्री. अजिंक्य हंबर, हिंदु धर्माभिमानी श्री. सतीश तोडकर, गोंधळी समाजाचे श्री. नितीन भोरावत, भाजपच्या सौ. आशाताई पोतदार उपस्थित होत्या.

धर्माला ग्लानी आल्यावर गुरु-शिष्य परंपराच धर्म प्रस्थापित करते ! - अभय वर्तक, राष्ट्र्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भांडुप येथे 
आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवाला ४८२ धर्माभिमानी उपस्थित !
     मुंबई, २० जुलै (वार्ता.) - आज जगात अधर्माचा अंधःकार वाढत असून भारत या अंधकारात लोटला जाता आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रत्येकाने अन्यायाच्या विरोधात कृती केली पाहिजे. ज्याप्रकारे गुरु-शिष्य परंपरा समाजाला साधनेकडे नेते. त्याप्रमाणे जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा गुरु-शिष्य परंपराच धर्म प्रस्थापित करते, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. १९ जुलै या दिवशी भांडुप जैनम बँक्वेट सभागृहात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था आयोजित संयुक्त गुरुपोर्णिमा महोत्सवात ते बोलत होते.

आळंदी (जिल्हा पुणे) येथील पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू आश्रमात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी !

उपस्थित भक्तगण
      आळंदी, २० जुलै - गुरुपौर्णिमेनिमित्त केळगाव येथील संत श्री आसारामजी बापू आश्रमात शेकडो भक्तांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. पूज्य बापूजींचे संक्षिप्त जीवन चरित्र असलेल्या श्री आसारामायणचा पाठ, गुरुपादुका पूजन, भजन आणि कीर्तन करण्यात आले. गेल्या ३ वर्षांपासून पूज्यपाद संतश्री आसारामबापूजी एका खोट्या आरोपाखाली जोधपूर येथील कारागृहात असतांनाही भक्तांच्या श्रद्धेत काहीही फरक पडलेला नाही. या उत्सवाला २ सहस्र भक्त उपस्थित होते. या वेळी भक्तांनी पूज्य बापूजींवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध संताप व्यक्त केला, तसेच त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली.

सनातन प्रभात हे राष्ट्रजागरण करणारे वृत्तपत्र ! - प.पू. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज

प.पू. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांना
श्रीफळ अर्पण करतांना श्री. पराग गोखले 
     दहिवली (जिल्हा पुणे), २० जुलै - सनातन प्रभात हे राष्ट्रजागरण करणारे वृत्तपत्र आहे. सनातन संस्था आणि दैनिक सनातन प्रभात यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे साधनारत राहून हिंदु धर्मरक्षणाचे कार्य हातून होत आहे, असे मार्गदर्शन प.पू. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांनी केले. दहिवली (पुणे) येथील स्वामी करपात्री फौंडेशन आणि अखिल भारतवर्षीय धर्मसंघ संस्कार शाला या आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त प.पू. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांची १९ जुलै या दिवशी भेट घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी प.पू. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांचा दैनिक सनातन प्रभातचा गुरुपौर्णिमा विशेषांक, श्रीफळ आणि भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

देशावरील संकटांना नष्ट करण्यासाठी सनातन संस्था सांगत असलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेविना पर्याय नाही ! - डॉ. उपेंद्र डहाके, भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष

पेण आणि अमरावती येथील गुरुपौर्णिमा महोत्सव 
डॉ. उपेंद्र डहाके
     पेण - गुरु-शिष्य परंपरेमुळे धर्म-संस्कृती आणि परंपरा आजपर्यंत टिकून आहे; पण लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणप्रणालीमुळे ती नष्ट होत गेली. याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागत आहेत. या परंपरेच्या रक्षणासाठी समाजाला मार्गदर्शन करणार्‍या सनातन संस्थेवर पुरोगाम्यांकडून चिखलफेक केली जात आहे, तसेच संस्थेवर बंदी आणण्याचे षड्यंत्रही रचले जात आहे. देशावर सध्या आतंकवादी आक्रमणाचेही सावट आहे. देशावरील संकटांना नष्ट करण्यासाठी सनातन संस्था सांगत असलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेविना पर्याय नाही, असे प्रतिपादन भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी येथील रामेश्‍वर मंदिर सभागृहात झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. अर्पिता पाठक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
     डॉ. डहाके यांच्या हस्ते १८ वर्षे दैनिक सनातन प्रभातचे वितरण करणारे श्री. कृष्णा जनाजे पाटील, तसेच इयत्ता दहावीमध्ये ८० प्रतिशत गुण मिळवणारा कु. सर्वज्ञ गणेश ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. 
    या वेळी पेण येथील नगरसेवक श्री. निवृत्ती पाटील, ह.भ.प. दिगंबर महाराज राऊत आणि गोरक्षक श्री. मंगल पाटील हेही उपस्थित होते.

सनातनला विरोध झाल्यास हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन विरोध करतील ! - अभिषेक दीक्षित, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

     अमरावती - आम्ही प्राण जाईपर्यंत सनातनच्या पाठीशी आहोत. सनातनला विरोध होणार असेल, तर आम्ही हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन विरोध करू. सनातन संस्था, श्री. धनंजय देसाई, पू. भिडेगुरुजी यांचा विनाकारण छळ होत आहे; पण मुल्ला-मौलवींचा असा छळ होतांना दिसत नाही. केवळ हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांवरच संकट ओढवले आहे. ही स्थिती पालटण्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित यांनी केले. 
     या वेळी नागपूर येथील श्री. दिलीप पागनीस (वय ६२ वर्षे) आणि सौ. मंगला पागनीस (वय ५९ वर्षे) यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानिमित्त ६१ टक्के पातळीच्या सौ. विभा चौधरी यांनी श्रीकृष्णाचे चित्र देऊन सत्कार केला. (याविषयीची छायाचित्रे पृष्ठ ८ वर प्रसिद्ध केली आहेत.)
     याच कार्यक्रमात धर्माभिमानी सर्वश्री महेश लडके, दीपक कावळे, अक्षय पाथरे यांचे सत्कार करण्यात आले.

फलक प्रसिद्धीकरता

दादरी हत्याकांडावरून ऊर बडवणारे निधर्मी आता गप्प का ?
   जिहादी आतंकवादाच्या भयाने काश्मीर खोर्‍यातून ६०० हिंदूंनी पलायन केल्याचे धक्कादायक वृत्त प्रकाशित झाले आहे. हे हिंदू केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी असून या सर्वांना पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत काश्मीर खोर्‍यात नोकरी देण्यात आली होती. ते आता जम्मू येथे आले आहेत.

नाशिक येथील गुरुपौर्णिमा महोत्सव

     नाशिक - येथील गुरुपौर्णिमा सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीचे वक्ते श्री. शशिधर जोशी यांनी, तर रणरागिणी शाखेच्या श्रीमती वैशाली कातकाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वक्त्यांच्या सत्कारासमवेत काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाला ३०० जण उपस्थित होते.

कोणत्याही हिंदुत्ववाद्यावर राष्ट्र-धर्म कार्य करतांना खटला झाल्यास विनामूल्य लढवेन ! - अधिवक्ता समीर पटवर्धन

      कोल्हापूर - सनातन संस्थेच्या अपकीर्तीचे षडयंत्र रचले जात आहे आणि सनातनच्या साधकांचा छळ चालू आहे. या सर्वांचा सांगोपांग विचार केल्यास एक अधिवक्ता म्हणून मी धर्म-अधर्म यांच्या लढयात सनातन संस्थेच्या बाजूने आहे. मी अभिवचन देतो की, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात कोणत्याही हिंदुत्ववाद्यावर खटले झाल्यास ते विनामूल्य लढेन. माहिती अधिकाराचा वापर कसा करावा, कायदेविषयक कार्यशाळा यांसाठी मी साहाय्य करेन, असे मार्गदर्शन सांगली येथील धर्मप्रेमी अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी येथील गुरुपौर्णिमेत केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jihadi atank aur algavvadiyonke bhayse Kashmir ghatise 600 Hinduone palayan kiya. 
- Dadri hatyakandpar bawal karnewale dhongi manavtavadi ab kaha gaye?
जागो ! : जिहादी आतंक और अलगाववादियों के भय से कश्मीर घाटी से ६०० हिन्दुआ ने पलायन किया.
 - दादरी हत्याकांड पर बवाल करनेवाले ढोंगी मानवतावादी अब कहा गएं ?

मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, अमरावती, पुणे आणि कोल्हापूर येथे साजरा झाला भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा सोहळा !

हिंदु राष्ट्र आपल्याला संघर्ष करून हक्काने मिळवले पाहिजे ! - अधिवक्ता विवेक भावे, कल्याण
     डोंबिवली, २० जुलै (वार्ता.) - हिंदू विभागलेले असल्याने ते एकतेचे बळ दाखवू शकत नाहीत. त्यामुळेच हिंदु संतांवर अन्याय आणि अत्याचार होतो. संघे शक्तीः कलौयुगे । या रामदासस्वामींच्या वचनाप्रमाणे जर आपण एकत्र आलो, तर जय आपलाच आहे. हिंदु राष्ट्र्र आपल्याला संघर्ष करून हक्काने मिळवलेच पाहिजे. यासाठी प्रत्येकाने आपासातील मतभेद विसरून धर्मासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करायला हवा. त्याच समवेत दुष्ट आणि दुर्जन प्रव्रृत्तीच्या लोकांविरुद्ध न्यायालयीन लढा देण्यासही सिद्ध व्हायला हवे, असे मार्गदर्शन अधिवक्ता विवेक भावे यांनी येथील गुरुपौर्णिमा सोहळ्यात केले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी मार्गदर्शन केले.

सरकारी कर्मचार्‍यांची फलनिष्पत्ती मोजणार का ?

       केंद्रसरकारने ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी संमत केल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या वेतनात पुष्कळ प्रमाणात वाढ झाली आहे. या वेतनवाढीमुळे तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचे किमान मासिक वेतन १८ सहस्र रुपये इतके होईल, तर सर्वोच्च अधिकार्‍यांचे कमाल वेतन २ लक्ष ५० सहस्र रुपये इतके होईल. ही वाढ काही वर्गातील चाकरमान्यांसाठी १०० टक्क्यांइतकीही असेल. वेतनवाढीमुळे केंद्रसरकारवर १ लक्ष २ सहस्र १०० कोटी रुपये इतका अतिरिक्त बोजा पडेल. ही रक्कम आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ०.७५ टक्के इतकी आहे. सध्याच्या स्पर्धेच्या काळात इतकी मोठी वेतनवाढ देणे, हे केवळ सरकारलाच परवडू शकते. कोणाचेही वेतन वाढत असेल, तर त्याविषयी आनंदच आहे; पण त्या वेतनवाढीपोटी आपल्याला (सरकारला) त्याची फलनिष्पत्ती मिळायला हवी, हेही तितकेच खरे.

सनातनच्या साधिका सौ. मनीषा गाडगीळ (वय ५५ वर्षे) आणि श्री. सुबोध नवलकर (वय ७७ वर्षे) यांनी गाठला ६१ टक्के आध्यात्मिक स्तर !

गुरुपौर्णिमादिनी सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात रंगला भावसोहळा !
    पनवेल - देवद (पनवेल) येथील सनातन संकुलात रहाणार्‍या सौ. मनीषा गाडगीळ (वय ५५ वर्षे) आणि सनातनच्या देवद आश्रमात रहाणारे श्री. सुबोध नवलकर (वय ७७ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केल्याचे आश्रमात गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेल्या भावसोहळ्यात ६९ टक्के पातळीच्या सौ. अश्‍विनी पवार यांनी घोषित केले.
   सौ. मनीषा गाडगीळ यांनी त्यांच्या आई आणि सनातनच्या पहिल्या संत पू. विमल फडकेआजी यांची त्या रुग्णाईत असतांना अनेक वर्षे मनोभावे सेवा केली. घरातील अडचणींना तोंड देत साधना करत असतांना नेहमी सकारात्मक रहाणे, सातत्याने गुरूंना आळवणे, गुरूंवरील दृढ श्रद्धा यांमुळे सौ. गाडगीळ यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केला. या वेळी मनोगत व्यक्त करतांना सौ. गाडगीळ म्हणाल्या, मी काहीच केले नाही. घरातील सेवा करतांना आणि अडचणी आल्यावर गुरु आहेत, ते साहाय्य करणार, असाच भाव असतो.

पुणे येथे संत आणि हिंदुत्ववादी यांच्या उद्बोधक मार्गदर्शनाने साजरी झाली गुरुपौर्णिमा !

      पुणे, २० जुलै (वार्ता.) - येथील सिंहगड रस्ता, कोथरूड, पुणे गावठाण आणि सांगवी येथे १९ जुलै या दिवशी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला. या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा लाभ १ सहस्र ५०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. चारही ठिकाणच्या गुरुपौर्णिमांचा वृत्तांत येथे देत आहोत. 
सिंहगड रस्ता 
राष्ट्राय स्वाहाः । असे जीवन जगणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालणार का ? 
- समर्थभक्त पू. सुनीलजी चिंचोलकर
     इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांना हार पत्करावी लागली. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, संघावर बंदी घालण्यासारखी चूक करणार नाही. तेच वाक्य काँग्रेस वा भाजप सरकारने सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंबंधी लक्षात ठेवावे. सनातनवर बंदी घालणे म्हणजे स्वतःच्या विनाशाचा मार्ग खोदून काढण्यासारखे आहे. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून सनातनच्या निष्पाप साधकांना अटक करून संस्थेच्या विरोधात मुद्दामहून वातावरण निर्माण केले जात आहे. सनातनच्या कोणत्याही सभा आणि कार्यक्रम यांमधून देशद्रोही घोषणा दिल्या जात नाहीत वा सनातनच्या आश्रमांमधून कोणतेही देशविघातक कार्य केले जात नाही. उलट सनातनचे साधक हे जीव धोक्यात घालून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य करत आहेत. असे राष्ट्ररक्षणाचे कार्य करणार्‍या आणि राष्ट्राय स्वाहाः । असे जीवन जगणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालणार का, असे प्रतिपादन समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी केले.

कठीण प्रसंगातही स्थिर रहाणारे नागोठणे (जिल्हा रायगड) येथील श्री. अनंत (तात्या) पाटील (वय ८३) यांनी गाठले संतपद !

    पनवेल - नागोठणे (जिल्हा रायगड) येथील ८३ वर्षांचे श्री. अनंत (तात्या) पाटील गुरुपौर्णिमेच्या दिवशी संतपदी विराजमान झाले, ही शुभवार्ता पेण येथील एका अनौपचारिक कार्यक्रमात घोषित करण्यात आली. सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांच्या शुभहस्ते श्री. अनंत (तात्या) पाटील यांचा सन्मान करण्यात आला. पू. पाटीलतात्या सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील ६१ वे व्यष्टी संतरत्न ठरले आहेत.
    पेण येथील श्री रामेश्‍वर मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्यात पू. रमेश गडकरी यांनी पू. तात्या पाटील यांच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी काढलेले गौरवोद्गार या वेळी वाचून दाखवले. त्या वेळी उपस्थित साधकांची भावजागृती झाली. पू. गडकरीकाकांनी पू. तात्यांचा आध्यात्मिक स्तर घोषित केल्यावर उभय संतांनी एकमेकांना आलिंगन दिले. हा भावसोहळा पाहून उपस्थित साधकांच्या डोळ्यांमध्ये भावाश्रू तरळले.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे मूठभरच हिंदुत्वनिष्ठ हिंदु राष्ट्र स्थापन करतील ! - सुनील घनवट

भरपावसात पावनखिंड 
येथे घेतली हिंदु राष्ट्राची शपथ ! 

बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करतांना हिंदुत्ववादी

        पावनखिंड येथे हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली. या वेळी बोलतांना श्री. सुनील घनवट म्हणाले, स्वातंत्र्य हे आपल्याला कोणी भेट म्हणून दिलेले नाही किंवा झोळीत टाकलेले नाही, त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्रही कोणी भेट देणार नाही, तर ते लढूनच मिळवावे लागेल. शूर वीर मावळे, क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या बलिदानामुळेच आपण स्वत:ची ओळख हिंदु म्हणून करून देत आहोत. येणार्‍या पिढीने जर आपल्याला विचारले तुम्ही आमच्यासाठी काय केले, तर आपल्याकडे काय उत्तर असेल, याचा विचार आजच करावा लागेल. आपले आदर्श चित्रपट सृष्टीतील खानावळ ठेवण्याऐजवी भगतसिंग, सुखदेव, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद हे असले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे मूठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केले, त्याचप्रमाणे आपल्यासमवेत येणार्‍या मूठभर लोकांना घेऊनच हिंदु राष्ट्र स्थापन करावे लागेल.

साधकांवर पितृवत प्रीती करणारे सनातनचे ६ वे संत पू. राजेंद्र शिंदे सद्गुरुपदी विराजमान !

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी साधकांना मिळाली शुभवार्ता !
    पनवेल - साधकांवर पितृवत प्रीती करणारे सनातनचे ६ वे संत पू. राजेंद्र शिंदे यांना सद्गुरुपदी विराजमान करून भगवंताने सनातनच्या साधकांना गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी अनमोल भेट दिली. नेतृत्व, नियोजनकौशल्य, तत्परता, समयसूचकता, सतर्कता, प्रीती, आर्त शरणागती, क्षात्रवृत्ती आदी गुणसमुच्चयाने युक्त असलेले पू. राजेंद्रदादा यांनी सद्गुरुपद प्राप्त केल्याचे सनातनच्या देवद आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ६९ प्रतिशत आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. अश्‍विनी पवार यांनी घोषित केले. या सुवार्तेमुळे पू. राजेंद्रदादा यांचे संत ते सद्गुरु या प्रवासाचे साक्षीदार असलेल्या देवद आश्रमातील साधकांचे नेत्र पाणावले !
... अशी झाली घोषणा !
    पू. राजेंद्रदादा यांना समोर येऊन व्यासपिठावरील आसंदीवर बसण्याची विनंती करण्यात आली, तेव्हा पू. राजेंद्रदादा यांची भावजागृती झाली ! प.पू. पांडे महाराज यांच्या करकमलांनी पू. राजेंद्रदादा यांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्या क्षणी पू. दादांनी सद्गदीत होऊन प.पू. पांडे महाराजांचे चरणकमल धरले ! उपस्थित सनातनचे संतगण आणि साधक भावविभोर होऊन हा सन्मानसोहळा पहात असतांना त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते ! या वेळी प.पू. पांडे महाराजांनी पू. राजेंद्रदादांना हार आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.
आज हिंदू समाज सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिकूल आहे. या सर्वांमध्ये मोठा दोष कोणता ? तर आपल्याला आपला शत्रू कोण आहे ?, हे कळत नाही. - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान

सौ. अश्‍विनी पवार यांचे चैतन्याच्या लहरी परावर्तीत करणारे हृदयस्पर्शी सूत्रसंचालन !

   देवद आश्रमात गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेल्या संपूर्ण भावसोहळ्याचे सूत्रसंचालन करतांना ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्‍विनी पवार यांच्याकडून चैतन्याच्या शीतल लहरी प्रक्षेपित होत आहेत आणि भावचैतन्याची ती शीतल धारा साधकांच्या हृदयसिंहासनावर पडल्याने त्यातून भावकणांचे तुषार उडून सर्वत्र पसरत आहेत, असे जाणवत होते आणि त्यामुळे त्यांच्या सूत्रसंचालनातील शब्दन् शब्द साधकांच्या हृदयापर्यंत पोचून साधकांची भाववृद्धी होण्यास साहाय्य झाले.
भावसोहळ्यातील क्षणमोती !
१. या सोहळ्यात दोन साधकांनी उत्स्फूर्तपणे सूचलेल्या काव्यरचना म्हणून दाखवल्या !
२. काही साधकांना पू. राजेंद्र शिंदे सद्गुरुपदी विराजमान होणार, तसेच श्री. सुबोध नवलकर आणि सौ. मनीषा गाडगीळ यांंचा आध्यात्मिक स्तर घोषित होणार, अशा पूर्वसूचना मिळाल्या होत्या, त्यामुळे या सोहळ्यात त्यांची नावे घोषित झाल्यावर त्या साधकांच्या तोंडवळ्यावर वेगळा आनंद तरळला !
३. कार्यक्रमाच्या शेवटी देवद आश्रमातील साधकांची प्रगती जलद व्हावी, यासाठी पू. राजेंद्र शिंदे यांनी प्रार्थना केली.
४. या वेळी पाऊस पडल्याने कार्यक्रमाला वरूणदेवतेनेही आशीर्वादरूपी शुभसंकेत दिल्याचे जाणवले !
   ज्या देशात विद्वानांना त्रास दिला जातो, तो देश तुटलेली नौका जशी पाण्यात नष्ट होते, त्याचप्रमाणे नष्ट होतो. - अथर्ववेद (मासिक अभय भारत, १५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०१०)

जीवनातील प्रत्येक कृतीला अध्यात्माची जोड देऊन अष्टांग साधना करणारे, मुलांवर लहान वयातच साधनेचे संस्कार होण्यासाठी प्रयत्न करणारे आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले सातारा येथील श्री. शाम मेणकर !

श्री. शाम मेणकर
      सातारा येथील श्री. श्याम मेणकर यांची मुलगी कु. गौरी हिला त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
     स्वतः साधना करत मुलांना साधनेसाठी प्रोत्साहन कसे द्यायचे, याचा आदर्श श्री. शाम मेणकर यांनी सर्वांपुढे ठेवला आहे. सर्व आई-वडील श्री. शाम मेणकर यांच्याप्रमाणे मुलांवर संस्कार करू लागले, तर रामराज्य, म्हणजे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) दूर नाही. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. मुलांना लहान वयातच अध्यात्माची गोडी 
लागण्यासाठी त्यांच्यावर संस्कार करणे
१ अ. लहानपणापासून साधनेचे संस्कार होण्यासाठी मुलांकडून वेगवेगळ्या आध्यात्मिक कृती करवून घेणे आणि पोषक वातावरणही निर्माण करणे : मी लहान असतांना माझे वडील मला प्रतिदिन सायंकाळी देवाजवळ दिवा लावून सद्गुरूंची आरती करायला, गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन एक पान वाचायला आणि कुलदेवी अन् दत्त यांचे नामजप करायला सांगत. मी रात्री लवकर झोपत असल्यामुळे ते आईला हिने आरती-नामजप केला का ?, असे विचारत असत. मी अभ्यास केला का ?, हे ते कधीच विचारायचे नाहीत. ते नेहमी साधनेला प्राधान्य देत असत. आम्ही लहान असतांनाच त्यांनी घरातील दूरचित्रवाणी संच माळ्यावर ठेवून दिला होता. तसेच साधकांचा सहवास मिळून सतत सत्मध्ये रहाता यावे, यासाठी त्यांनी साधकांच्या शेजारी घर घेतले होते.

माया आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम साधून झपाट्याने प्रगती करणार्‍या सौ. सुशीला मोदी संतपदी विराजमान !

जोधपूर (राजस्थान) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रकटले सनातनचे ६३ वे समष्टी संतरत्न ! 
     जोधपूर, २० जुलै (वार्ता.) - गुरुपौर्णिमेच्या या शुभदिनी, कशी अर्पण करू मी कृतज्ञता । तुझ्यातच एकरूप करून घ्यावे, हीच प्रार्थना ।
    गुरुपौर्णिमा, म्हणजे गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! शिष्याने आपल्यासारखे व्हावे, हा गुरूंचा संकल्प तळमळीने साधना करून प्रत्यक्षात आणणार्‍या जोधपूर येथील सौ. सुशीला मोदी या शुभदिनी संतपदी विराजमान झाल्या. माया आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम साधून झपाट्याने आध्यात्मिक उन्नती करणार्‍या पू. (सौ.) सुशीला मोदी (वय ६५ वर्षे) यांना सनातनच्या ६३ व्या समष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले. येथील लायन्स क्लब वेस्टच्या सभागृहात झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हे गुपित उघड केले आणि सर्वांचा आनंद द्विगुणित केला. या वेळी जयपूर येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. सीतादेवी नोगीया यांनी पुष्पहार अर्पण करून, तर पू. डॉ. पिंगळे यांनी भेटवस्तू देऊन पू. (सौ.) सुशीला मोदी यांचा सन्मान केला.

गुरुपौर्णिमेच्या भावसोहळ्यांतील अविस्मरणीय क्षणांची साठवण !

संतपद घोषित केल्यानंतर
भावावस्थेत गेलेले पू. अनंत (तात्या) पाटील

संत सन्मानानंतर गळाभेट घेतांना
पू. रमेश गडकरी आणि अनंत (तात्या) पाटील

सद्गुरुपद घोषित केल्यावर
कृतज्ञता भावस्थितीतील पू. राजेंद्र शिंदे

सद्गुरुपद घोषित झाल्यानंतर आनंदाने
आलिंगन देतांना प.पू. पांडे महाराज आणि पू. राजेंद्र शिंदे


देवद आश्रमात ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर प्राप्त केलेले डावीकडून
श्री. सुबोध नवलकर, मध्यभागी सद्गुरुपदी विराजमान झालेले
पू. राजेंद्र शिंदे, त्यांच्या शेजारी ६१ प्रतिशत स्तर प्राप्त केलेल्या सौ. मनीषा
गाडगीळ आणि उच्च लोकातून जन्माला आलेली कु. पूजा काळुंगे (वय १६ वर्षे )

          सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात ३० ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवांतील घडलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण क्षणांचा हा छायाचित्रात्मक वृत्तांत प्रसिद्ध करत आहोत !

सातत्याने देवाच्या अनुसंधानात राहून आनंदी असणार्‍या आणि इतरांशी सहजतेने जवळीक साधणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा गाडगीळ !

       सनातन संकुल, देवद, पनवेल येथे रहाणार्‍या आणि संकलन विभागात सेवा करणार्‍या, तसेच प.पू. फडकेआजी यांच्या कन्या सौ. मनीषा गाडगीळ यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. प्रतिकूल 
परिस्थितीतही आनंदी असणे
       आयुष्यात कितीही कठीण प्रसंग किंवा अनंत अडचणी आल्या, तरी आई नेहमी हसतमुख आणि आनंदी असते. तिच्या मनाची स्थिती कधीच ढासळत नाही. ती स्वतः सकारात्मक असते आणि आम्हालाही त्या प्रसंगात सकारात्मक दृष्टीकोन देते. कोणताही प्रसंग आला, तरी त्यात प.पू. डॉक्टरांना या प्रसंगात माझ्याकडून काय अपेक्षित आहे, याचा विचार करते आणि प्रार्थना करून तशी कृती करण्याचाही प्रयत्न करते. केवळ आईमुळे कठीण प्रसंगांतही आमच्या घरातील वातावरण आतापर्यंत कधीच तणावपूर्ण किंवा निराशाग्रस्त झालेले नाही. त्या प्रसंगांतही आम्हाला तिच्यामुळेच आनंद अनुभवता येतो.

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी कपिलेश्‍वरी (फोंडा) येथील पू. (सौ.) सुमन नाईक सनातनच्या संतांच्या मंदियाळीतील ६२ वे संतपुष्प !

सौ. लता दीपक ढवळीकर, सौ. शालिनी मराठे आणि कु. कन्हैया श्रीवास्तव 
६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !
     सनातन आश्रम, रामनाथी (वार्ता.) - कठीण प्रसंगांतही ईश्‍वरावर असलेली दृढ श्रद्धा, श्रीगुरूंप्रती अपार कृतज्ञताभाव, साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी निरपेक्षतेने प्रयत्न करणे आदी अनेक गुणवैशिष्ट्यांनी संपन्न असलेल्या कपिलेश्‍वरी, फोंडा येथील साधिका सौ. सुमन नाईक (वय ६७ वर्षे) या सनातनच्या ६२ व्या समष्टी संत झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या रामनाथी आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या कार्यक्रमात सर्वांना मिळाली. सनातनच्या साधिका सौ. ज्योती ढवळीकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचनही केले.

संतपद की और अग्रसर हो रहीं श्रीमती सुशीला भाभी ।

          जोधपूर, राजस्थान येथील सनातनच्या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. सुशीला मोदी (आताच्या पू. सुशीला मोदी) यांच्यावर श्रीकृष्णाने सुचवलेले काव्य पुढे देत आहे. 
एक समय था भक्ति का,
जब मीरा ने श्याम को, उसके नाम से बांधा ।
आज के समय में भाभी ने, 
समष्टि मीरा बनकर इसी कृष्ण को, अखंड सेवा से बांधा ॥ १ ॥

ज्यों ज्यों समझी साधना, पहले उसे जीवन में उतारा ।
जो समझा, जो पाया, वो दूसरों को बांटा ॥ २ ॥

सेवेची तळमळ असलेले देवद आश्रमात सेवा करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सुबोध नवलकर (वय ७७ वर्षे) !

       देवद आश्रमात सेवा करणारे श्री. सुबोध नवलकर (वय ७७ वर्षे) गेली १० वर्षे पूर्णवेळ साधना करत आहेत. त्यांच्या पत्नी सौ. स्मिता नवलकर या विज्ञापनाच्या सेवेसाठी विविध राज्यांत जात असतात. श्री. नवलकरकाकांच्या उजव्या डोळ्याचा पडदा फाटलेला आहे. त्यांना पूर्वी डाव्या डोळ्याने थोडे दिसत होते; परंतु आता त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे न्यून झाली आहे. असे असले, तरी त्यांची सेवा करण्याची तळमळ आणि इतरांशी आपलेपणाने बोलण्याची पद्धत यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
१. परिपूर्ण सेवा करणे
१ अ. सेवेची पूर्वतयारी करणे : मी आणि श्री. नवलकरकाका दोघेही भोजनकक्षात सेवा करायला बसतो. मला टंकलेखनाची सेवा नसतांना मी त्यांच्यासमवेत सेवा करते. ते सनातन-निर्मित कापराच्या डबीत पत्रके घालण्याची सेवा करतात. ते ज्या पटलावर सेवा करतात, त्यावर कधी चहा सांडलेला असतो किंवा खाऊचे कण पडलेले असतात, तर कधी साधकांनी घेतलेला चहाचा पेला, अल्पाहाराची ताटली असते, तरीही ते शांतपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता नियमित पटल स्वच्छ पुसून घेतात आणि पेला, ताटली उचलून भांडी घासण्याच्या जागी नेऊन ठेवतात.

सातत्याने भावावस्थेत रहाणार्‍या तुळजापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. पुनाबाई अरुण होरडे यांना आलेल्या अनुभूती

१. निराशेचे विचार येत असतांना स्वप्नात एका व्यक्तीने हे योग्य नाही, असे सांगणे आणि 
प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र पाहिल्यावर स्वप्नात दिसलेली व्यक्ती हीच असल्याचे जाणवणे 
सौ. पुनाबाई होरडे
      एकदा माझ्या मनात निराशेचे विचार येत होते. ६.६.२००६ या रात्री १.३० वाजता मला स्वप्न पडले. त्यात मला पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची पँट परिधान केलेली एक व्यक्ती दिसली. ती मला म्हणाली, बाळ, हे योग्य नाही. त्यानंतर स्थानिक साधक सत्संग घ्यायला आले. त्यांच्यासमोर असलेले प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र बघितल्यावर मला स्वप्नात हेच दिसले होते, याची जाणीव झाली. 
२. नामजप चालू केल्यावर तंबाखूचे व्यसन सुटणे 
     मला तंबाखूचे व्यसन होते. सत्संगात सांगितल्यानुसार मी नामजप चालू केला. मी नामजप चालू केल्यावर तीन आठवड्यांत देवाच्या कृपेने हे व्यसन सुटले.

नांदेड येथील श्री. सुरेंद्रपाल बरारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त

      नांदेड - येथील श्री. सुरेंद्रपाल बरारा यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी गाठली. त्यांचा सत्कार नांदेड येथील ६१ प्रतिशत स्तर प्राप्त केलेले श्री. प्रकाश पांडे यांच्या हस्ते करण्यात आला. आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर श्री. बरारा यांच्या डोळ्यांत भावाश्रू आले. आपले मनोगत व्यक्त करतांना श्री. बरारा म्हणाले की, प.पू. डॉक्टरांच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन अंतर्मनातून साधना चालू झाली. घरात पत्नी साधना करत असल्यामुळे घरातील वातावरण साधनेमुळे संस्कारमय झाले. त्यातून मला प्रेरणा मिळत गेली. शिकण्याची वृत्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती आणि मित्र परिवार यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाकडूनच नवनवीन शिकता आले आणि आचरणात आणता आले. मी एक सर्वसाधारण व्यक्ती आहे. मला एक चांगला माणूस व्हायचे होते आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला ही अमूल्य भेट दिली, मी त्याची अपेक्षा पण केली नव्हती. त्यांच्या कृपेनेच हे होऊ शकले. त्यांच्या पत्नी सौ. अनिता बरारा यांचासुद्धा दोन वर्षांपूर्वीच ६१ प्रतिशत स्तर झाला आहे. या वेळी सौ. बरारा यांनी सांगितले की, श्री. बरारा इतरांना तोंडवळ्यावर कधीच काही जाणवू देत नव्हते, पण त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू यायचे.

धाराशिव येथील साधिका सौ. पुनाबाई होरडे झाल्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

     धाराशिव - येथे गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये यांनी उपस्थित साधकांना सौ. पुनाबाई होरडे यांनी ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर प्राप्त करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्तता झाल्याची आनंदवार्ता दिली. ही आनंदाची वार्ता ऐकून सर्व साधक भावविभोर झाले. पू. (कु.) स्वातीताईंनी संस्थेच्या वतीने प्रकाशित श्रीकृष्णाचे चित्र असलेली प्रतिमा देऊन सौ. पुनाबाईंचा या वेळी सत्कार केला.
       या वेळी सौ. पुनाबाई आणि उपस्थित साधक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. अध्यात्मात शिक्षणाची आवश्यकता नाही. कमी शिकलेल्या असूनही भाव-भक्तीच्या जोरावर गुरुदेवांचे मन सौ. पुनाबाईंनी जिंकले, असे पू. (कु.) स्वातीताईंनी सांगितले.
       मी केवळ परात्परगुरु प.पू. डॉक्टरांना आठवते, असे मनोगत व्यक्त करतांना सौ. पुनाबाई यांनी सांगितले.

गुरुपौर्णिमा म्हणजे भक्तीरसांचे मीलन ।

श्री. अविनाश जाधव
गुरुपौर्णिमा म्हणजे...
श्री गुरुचरणांचे स्मरण ।
श्री गुरुचरणांचे दर्शन ॥ १ ॥

श्री गुरुचरणांचे पूजन ।
श्री गुरूंच्या कृपेचे स्मरण ॥ २ ॥

गुरुमहतीचे पुनरुच्चारण ।
गुरुतत्त्वाचे पृथ्वीतलावर प्रक्षेपण ॥ ३ ॥

परमात्म्याशी मीलन ।
चैतन्याची उधळण ॥ ४ ॥

ज्ञान आणि विषय यांचा परस्परांशी असलेला संबंध !

      ज्ञानाला प्रकट होण्यासाठी विषय लागतो. विषयामुळे अनेक पैलूंचे ज्ञान होते. ईश्‍वराच्या ज्ञानभांडारातून ज्ञान हवे असल्यास त्यासाठी विशिष्ट विषयाची आवश्यकता असते, उदा. सूर्य हा विषय असल्यास ईश्‍वराकडून सूर्याविषयी माहिती मिळते. या विषयामुळे सूर्याच्या कार्याचे ज्ञान होते. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०१५)

नातवाचा वाढदिवस तिथीनुसार साजरा करणार्‍या पैंगीण (गोवा) येथील जिल्हा पंचायत सदस्या डॉ. (सौ.) पुष्पा कालिदास अय्या !

        पैंगीण (गोवा) येथील जिल्हा पंचायत सदस्या डॉ. (सौ.) पुष्पा कालिदास अय्या यांनी त्यांचा नातू कु. अनुराग बैजू अय्या याचा पहिला वाढदिवस तिथीनुसार ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वादशी या दिवशी साजरा केला. (सर्वच लोकप्रतिनिधींनी हा आदर्श घ्यावा ! - संपादक) वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेल्या सर्वांना रोपाचे वाटप करण्यात आले. याविषयी डॉ. (सौ.) अय्या म्हणाल्या, हिंदु धर्मशास्त्र श्रेष्ठ असून त्यानुसार वाढदिवस साजरा केल्याने त्या व्यक्तीला त्याचा लाभ होतो. माझ्या मुलाचाही वाढदिवस मी पूर्वीपासून तिथीनुसार साजरा करायचे आणि आता नातवाचाही वाढदिवस तिथीनुसारच साजरा केला जातो.

साधकाच्या भावामुळे त्याला सुचलेले प.पू. डॉक्टरांच्या संपूर्ण नावाचे व्यापक अर्थ

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. प.पू. डॉक्टर आठवले 
(नावातच सर्व विश्‍व सामावले आहे.)
प.पू. डॉक्टर - विश्‍वाशी एकरूपता
जयंत - हिंदु राष्ट्राची स्थापना
आठवले - अध्यात्म
२. प.पू. डॉक्टर आठवले (श्रीकृष्णाप्रमाणे 
युगानुयुगे चिरंतन पूजनीय रहाणारे)
प - परमेश्‍वर, परमात्मा
पू - पूजनीय, पूर्णत्वाला नेणारे
       डॉ. झाकीर नाईक यांनी आतापर्यंत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यातील निवडक विधानांपैकी प्रतिदिन एक विधान येथे देत आहोत.
       इस्लाम हा सर्व धर्मांपेक्षा महान धर्म आहे. इस्लामी देशांमध्ये बिगर-इस्लामी धर्माच्या नागरिकांना त्यांचे धार्मिक स्थळ बनवण्याची अनुमती देता कामा नये.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.
       ज्यांना ध्येयाविषयी दृढ आस्था आहे, असे मूठभर संकल्पनिष्ठ लोक इतिहासाचा प्रवाह पालटू शकतात.
- दीपक सिंह (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
    सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
   समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल असे परवाने असणे आवश्यक आहे.
   जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
       साधना जमत नाही; म्हणून मी परत व्यवहारात जातो, असा विचार करण्याऐवजी मला आज ना उद्या साधना करणे जमेल, असा सकारात्मक विचार केल्यास कधीतरी प्रगती होईल; मात्र व्यवहारात गेल्यास जन्मोजन्म फुकट जातील.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
(गोव्यातील) मराठी भाषा प्रेमिकांनो, केवळ मराठी भाषेसाठी न लढता हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करा ! हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर मराठी भाषेसह गोवंश रक्षा, राममंदिर बांधणे, गंगाप्रदूषण रोखणे इत्यादी सर्व प्रश्‍न सुटतील. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कर्माचे महत्त्व कर्माविना तुम्हाला
गती नाही; कारण कर्मालाच गती आहे.
  भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत... सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने त्यांना 
सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


काश्मिरी हिंदूंचे दैन्य !

संपादकीय
       दोन वर्षांपूर्वी केंद्रातील सत्ता परिवर्तन झाल्यावर राष्ट्रप्रेमी हिंदूंना आणि विशेषतः काश्मीरमधून पलायन केलेल्या हिंदूंना सर्वाधिक आनंद झाला. त्यानंतर काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात आलेल्या पीडीपी-भाजप सरकारमुळेही या हिंदूंच्या मनात आशेचा किरण दिसू लागला. गेली २५ वर्षे साडेचार लाख काश्मिरी पंडित त्यांच्या मूळ भूमीपासून दूर आहेत. काँग्रेसच्या काळात त्यांना आपल्याच देशात विस्थापित व्हावे लागले होते. काँग्रेस सत्तेत रहाता पुन्हा काश्मीरमध्ये परतण्यास मिळेल, ही त्यांची इच्छाच नष्ट झाली होती. त्यातही काँग्रेसने वर्ष २०१० मध्ये पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत १ सहस्र ६५४ विस्थापित हिंदूंना नोकरी देऊन त्यांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन केले. गेली ६ वर्षे ते येथे रहात होते; मात्र त्यात मोकळेपणा नव्हता. संपूर्ण असुरक्षिततेमध्येच त्यांनी ही वर्षे घालवली.

बंगालच्या मालदामधील हिंदू !

संपादकीय
      बंगाल राज्याचा मालदा हा जिल्हा धर्मांधांच्या हिंसाचारासाठी कुप्रसिद्ध आहे, हे आता सांगायला नको. हिंदूंवर अत्याचार करणे, पोलिसांवर आक्रमण करणे, पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांना मारपीट करणे, पोलिसांची शस्त्रे पळवून नेणे अशी अत्यंत आक्षेपार्ह कृत्ये येथील धर्मांध करत असतात. परवाच त्यांनी एका ३३ वर्षीय महिलेला विवस्त्र करून मारहाण केली. या महिलेची गाय शेजार्‍याच्या शेतात घुसल्याने गायीला अमानुष मारहाण करण्यात येत होती. तिला सोडवण्यासाठी ही महिला गेली असता तिला मारहाण करण्यात आली. मर्यादा नसलेले हे त्यांचे अमानुष कृत्य आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn