Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे बलीदानदिन 
-----------------------
क्रांतीकारक बटुकेश्‍वर दत्त स्मृतीदिन 

भारतभरात ५१ गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये श्रीगुरूंना भावपुष्पांजली अर्पण !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य
समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !
    पनवेल - मना माझिया गुरु थोर वाटे । जयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ॥ या अपार कृतज्ञतेच्या भावाश्रूंची सुमनांजली श्रीगुरूंच्या कमलचरणांवर वाहत साधकजन, हिंदु धर्माभिमानी आणि सनातनचे हितचिंतक यांनी आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण भारतभरात ५१ गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आले होते.
   कपिलेश्‍वरी, फोंडा (गोवा) येथील सौ. सुमन नाईक (वय ६७ वर्षे), नागोठणे (जिल्हा रायगड) येथील श्री. अनंत (तात्या) पाटील (वय ८३ वर्षे) आणि जोधपूर (राजस्थान) येथील सौ. सुशिला मोदी यांनी संतपदी, तर देवद, पनवेल येथील सनातन आश्रमातील ६ वे संत पू. राजेंद्र शिंदे यांना सद्गुरुपदी विराजमान करून भगवंताने साधकांना आणखी एक अनमोल भेट दिली. देशभरात ६८ साधकांनी ६० आणि अधिक टक्के पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले.

केवळ दाभोलकर कुटुंबाची भलावण करण्यासाठी सनातनला लक्ष्य केले जात आहे ! - अधिवक्ता देवदास शिंदे

पिंपरी (पुणे) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
         पिंपरी, १९ जुलै (वार्ता.) - डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक झाली. केवळ एकांगी तपास करून ही कारवाई करण्यात आली. केवळ दाभोलकर कुटुंबाची भलावण करण्यासाठी सनातन संस्थेला लक्ष्य केले जात आहे. हिंदूंना हक्क आणि अधिकार यांच्यासाठी लढू द्यायचे नाही. ते त्यांना विसरायला लावून समाजाला वेगळ्याच मार्गाने चालवण्याचे हे षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठानचे सचिव आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता देवदास शिंदे यांनी केले. येथे १७ जुलै या दिवशी करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या वेळी ५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. सनातनला नेस्तनाबूत करण्याच्या उद्देशाने आज पोलिसांचे कार्य चालू आहे. जर सर्व यंत्रणा निरपराध सनातनच्या मागे लावली, तर खरे गुन्हेगार कसे सापडणार, असा प्रश्‍नही अधिवक्ता देवदास शिंदे यांनी उपस्थित केला.

पंतप्रधानांकडून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !

देशभरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
    नवी देहली - १९ जुलैला संपूर्ण देशात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्थांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुरुपौर्णिमेसाठी देशवासियांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.


मोरटक्का (मध्यप्रदेश) येथे श्री सद्गुरु अनंतानंद साईश ट्रस्ट आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा !

   मोरटक्का (मध्यप्रदेश) - येथे श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदूर न्यासाच्या वतीने श्री सद्गुरु सेवा सदन मोरटक्का आश्रम येथे १८ आणि १९ जुलै या दिवसांत गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथून जवळ असणार्‍या मेहताखेडी येथे श्री सद्गुरु अनंतानंद साईश यांचे वास्तव्य होते. त्या ठिकाणी १८ जुलैला सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज आणि सनातनचे स्फूर्तीस्थान प.पू. रामानंद महाराज यांची पालखी नेण्यात आली होती. १९ जुलै या दिवशी सकाळी ८ वाजता श्री व्यासपूजन आणि श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री सद्गुरु अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे पूजन अन् दर्शन सोहळा झाला.
   या सोहळ्याला एक सहस्राहून अधिक भक्त आणि भाविक सहभागी झाले होते, अशी माहिती न्यासाचे श्री. अनिल जोग यांनी दिली.

सर्वच आमदारांचा सनातन संस्थेला उत्स्फूर्त पाठिंबा

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या 
मागणीच्या विरोधात महाराष्ट्रातील आमदारांना निवेदन 
मुंबई 

डाव्या बाजूला निवेदन स्वीकारतांना आमदार अधिवक्ता पराग अळवणी

उरण 

आमदार श्री. मनोहर शेठ भोईर यांना निवेदन स्वीकारतांना (उजवीकडे)

वर्धा 

आमदार श्री. पंकज भोयर यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी

जालना

हिंदुत्ववाद्यांकडून निवेदन स्वीकारतांना अनुक्रमे डावीकडून
चौथे श्री. अर्जुन खोतकर आणि सहावे श्री. चंद्रकांत खैरे

चीनमधील पुरामध्ये २५० जणांचा मृत्यू !

दीड लाख कोटी रुपयांची हानी
        बीजिंग - चीनमध्ये २३ जूनपासून चालू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. २६ प्रांतांतील १ सहस्र शहरे जलमय झाली आहेत. आतापर्यंत पावसामुळे २५० जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० जण बेपत्ता आहेत. यात दीड लाख कोटी रुपयांची हानी झाली आहे. चीनच्या इतिहासात अशी हानी होण्याची ही दुसरी घटना आहे. १९९८ मध्ये चीनची अशी हानी झाली होती.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
        १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (चीनमध्ये २३ जूनपासून चालू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सनातनचे ६८ साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

कर्नाटक राज्यातील ५८ साधकांनी गाठला ६० आणि त्याहून अधिक आध्यात्मिक स्तर !
    सनातनच्या ६८ साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे १९ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर विविध ठिकाणच्या गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये घोषित करण्यात आले. यामध्ये सनातनच्या रामनाथी आश्रमातील २, देवद आश्रमातील २, तसेच महाराष्ट्रात प्रसारातील ५, गोव्यातील १, तर कर्नाटकात ५८ साधकांनी ६० आणि त्याहून अधिक आध्यात्मिक स्तर प्राप्त केला आहे. यामध्ये रामनाथी आश्रमातील बालसाधक कु. कन्हैया श्रीवास्तव (वय १२ वर्षे), सौ. शालिनी मराठे (वय ६८ वर्षे), तर देवद येथील आश्रमातील श्री. सुबोध नवलकर (वय ७७ वर्षे) आणि सनातन संकुल येथे रहाणार्‍या सौ. मनीषा गाडगीळ (वय ५५ वर्षे ) यांचा समावेश आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

काश्मीरमधून आणखी ३०० हिंदूंचे पलायन !

पीडीपी-भाजप सरकारचे अपयश !
दादरीवरून, घरवापसीवरून ऊर बडवणारे निधर्मीवादी यावर तोंड का उघडत नाहीत ?
   जम्मू - काश्मीरमधून ३०० हिंदूंनी पलायन केल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आणखी ३०० हिंदूंनी पलायन केल्याचे समोर आले आहे. हे सर्व हिंदू काश्मीर खोरे सोडून जम्मूमध्ये आले आहेत. हे सर्व ६०० हिंदू राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत. राज्य सरकारच्या अधिकार्‍यांनी काश्मीर सोडून गेलेल्या कर्मचार्‍यांची संख्या सांगण्यास नकार दिला. तरीही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ सहस्र ६७३ पैकी वरील ६०० हिंदू कर्मचार्‍यांनी काश्मीर सोडले आहे. या सर्वांना पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत येथे नोकरी देण्यात आली होती. (सरकारला काश्मीरमधील हिंदूंना मरू द्यायचे आहे म्हणून त्यांना योग्य सुरक्षा न पुरवताच तेथे नोकरी दिली, असेच म्हणावे लागेल ! - संपादक) गेल्या १० दिवसांपासून चालू असलेल्या हिंसाचारामुळे या हिंदूंनी पलायन केले आहे. काश्मीरच्या शरणार्थी शिबिरात ते रहात होते. जम्मूमध्ये पसरलेले कर्मचारी साहाय्य केंद्राच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. त्यांना जम्मूमध्येही नोकरी दिली जावी, अशी ते मागणी करत आहेत.

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांना कायदेशीर नोटीस

   रामनाथी, १९ जुलै (वार्ता.) - पुणे येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने २१ जून २०१६ या दिवशीच्या अंकात सनातन मे पॉज अ थ्रीट लाईक तालीबान, आयएस्आयएस्, दाभोळकर्स सन या मथळ्याखाली मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध करून सनातन संस्थेची मानहानी केली. याप्रकरणी सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्या मार्फत १० कोटी रुपये मानहानी भरपाई मागणीची कायदेशीर नोटीस दैनिक टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांना बजावली आहे. सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या समाजातील वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा समाजात असलेला नावलौकिक माहीत आहे.

इसिसकडून हरिद्वार येथील अर्धकुंभावर आक्रमण केले जाणार होते !

जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो !
    नवी देहली - इसिसच्या अटक करण्यात आलेल्या ५ आतंकवाद्यांनी काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या हरिद्वार येथील अर्धकुंभामध्ये आक्रमण करण्याचा कट रचला होता, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे. या आतंकवाद्यांना सिरियामध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांच्या प्रमुखाने काडेपेटीच्या काड्यांपासून स्फोटके कशी बनवायची याचे प्रशिक्षणही त्यांना दिले होते.

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या ४ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या ! - सदस्यांची मागणी

विरोधकांचा सभात्याग !
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्‍या सैराट 
मराठी चित्रपटावर बंदी घाला ! - आमदार मनीषा चौधरी
       मुंबई, १९ जुलै (वार्ता.) - १३ जुलै या दिवशी नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या प्रकरणाचा १९ जुलै या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी सदस्य यांनी निषेध करून मुलीची हत्या करणार्‍या ४ नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि पुन्हा असे गुन्हे न घडण्यासाठी कायद्यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद करावी, अशी एकमताने मागणी केली. तसेच सैराटसारखे चित्रपट पाहून समाजात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे सैराट या मराठी चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी भाजपच्या आमदार सौ. मनीषा चौधरी यांनी विधानसभेत केली. विधानसभेत नियम १०१ अन्वये अल्पकालीन चर्चेमध्ये नगर जिल्ह्यातील या घटनेच्या विषयावर ४ घंटे विधानसभेत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने आणि या घटनेत शासनाने दिरंगाई केल्याचे कारण पुढे करून राधाकृष्ण विखे-पाटील यांसह विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.

कोपर्डी प्रकरणावरून विधानसभा आणि विधान परिषद यांमध्ये तीव्र पडसाद !

        मुंबई, १९ जुलै (विशेष प्रतिनिधी) - कोपर्डी (नगर) येथील घटना गंभीर असून मानवतेला काळीमा फासणारी आहे. त्यावर तातडीने चर्चा करून गुन्हेगारांना कठोर शिक्षेची तरतूद करावी, या मागणीसाठी विरोधक विधीमंडळात आक्रमक झाले होते. त्यावर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करूनही विधानसभेत विरोधकांचे समाधान झाले नाही. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नगरमधील घटना, भ्रष्ट मंत्री आदी सूत्रांवर विरोधकांनी शासनाला घेरले. विधानसभेचे कामकाज चालू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सर्व कामकाज बाजूला ठेवून तातडीने चर्चा करावी, अशी मागणी केली. यावर सर्व विरोधी पक्षांचे सदस्य आग्रही राहिले. अध्यक्षांसमोरील हौदात येऊन शासनविरोधी घोषणाबाजी केली.

विदेशात एस्एस्आर्एफ्च्या वतीने २१ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे गुरुपूजन करतांना डावीकडून सौ. रूची गोल्लामुडी आणि श्री. वाम्सी कृष्णा गोल्लामुडी
   मुंबई - विदेशात स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने २१ ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. आशिया खंडातील इंडोनेशिया, सिंगापूर, श्रीलंका, मॉरीशस या देशांत; उत्तर अमेरिका खंडातील अमेरिका, कॅनडा; दक्षिण अमेरिका खंडातील बोलिव्हिया; युरोप खंडातील ऑस्ट्रीया, क्रोएशिया, ब्रिटन, तसेच अन्य देशांत हा उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी काही ठिकाणी सत्संगाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी भावजागृतीचे प्रयत्न, त्यामुळे आलेल्या अनुभूती, साधकांमध्ये वर्षभरात झालेले पालट यांविषयी विवेचन करण्यात आले.
मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे गुरुपूजनाच्या ठिकाणी दैवी कण आढळले !
    मेलबर्न येथील एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. अनिल आणि सौ. शोभना शेट यांच्या निवासस्थानी एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. वाम्सी कृष्णा आणि सौ. रूची गौल्लामुडी यांनी गुरुपूजन केले. या वेळी १२ साधक आणि २ बालसाधक सोहळ्याला उपस्थित होते.

देवस्थान समिती घोटाळा यांसह अनुमाने ८२ तारांकित प्रश्‍न, लक्षवेधी, अशासकीय ठराव, औचित्याच्या सूत्र यांद्वारे शासनाचे लक्ष वेधणार - आमदार राजेश क्षीरसागर

      कोल्हापूर, १९ जुलै (वार्ता.) - महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनास १८ जुलैपासून पासून प्रारंभ झाला आहे. या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने पंचगंगा प्रदूषण, शहरातील वाहतुकीची समस्या, शहरात चालू असलेल्या रिलायन्स केबलच्या कामातील गफलत, शहराची हद्दवाढ, पंचगंगा प्रदूषण, रेडझोन क्षेत्रातील अवैध्य बांधकामामुळे ओढवलेली पूरपरिस्थिती, अवैध बॉक्साईट उत्खनन, रखडलेली थेट जलवाहिनी योजना, शहरातील वाहतुकीची समस्या, देवस्थान समिती घोटाळा सी.पी.आर् रुग्णालयामध्ये अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून विभाग सुसज्ज करण्याविषयी रंकाळा तलावाचे सुशोभीकरण करणे, छत्रपती शाहू स्मारकाचे काम, पासपोर्ट कार्यालय, विमानतळ विस्तारीकरण आदी सुमारे ८२ तारांकित प्रश्‍न, १० लक्षवेधी, २ अर्धातास सूचना अधिवेशनामध्ये उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

महिलांवरील अत्याचार रोखण्याच्या उपाययोजना काढण्यासाठी महिला समिती सिद्ध करणार ! - मुख्यमंत्री

कोपर्डी घटनेप्रकरणी गुन्हेगारांना
फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार ! 
      मुंबई, १९ जुलै (विशेष प्रतिनिधी) - कोपर्डी येथील घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची शासनाकडून मागणी करण्यात येईल. तसेच या प्रकरणात विशेष शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनीही या संपूर्ण प्रकरणात लक्ष देऊन खटला लढवण्यास सिद्धता दर्शवली आहे. राज्यातील महिलांवर विविध प्रकरणात अत्याचारांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचारांचा अभ्यास करून ते अल्प करण्यासाठी उपाययोजना सिद्ध करणार आहे. त्यासाठी महिला आमदारांची समिती सिद्ध करून त्याद्वारे समितीने सुचवलेल्या उपाययोजना सिद्ध केल्या जातील. अवैध मद्यविक्री करणार्‍यांना आतापर्यंत ३ वर्षांची शिक्षा केली जात होती. या शिक्षेत वाढ करून ही शिक्षा १० वर्षांपर्यंत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी १८ जुलै या दिवशी विधानसभेत दिली केली. कोपर्डी येथील घटनेवर सत्ताधारी आणि विरोधक यांनी चर्चा केल्यानंतर त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.

सनातनचे संत वापरत असलेल्या चारचाकी वाहनाची काच कोणत्याही भौतिक कारणाशिवाय फुटली !

साधकांनो, येणार्‍या आपत्काळाची तीव्रता लक्षात घ्या आणि आध्यात्मिक उपाय गांभीर्याने करा !
आपत्काळाची वाढती तीव्रता दर्शवणारी घटना !
काच फुटल्याचे छायाचित्र
गाडीत पडलेल्या खिडकीच्या फुटलेल्या काचा (गोलात)
रामनाथी, गोवा - सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये या प्रसारसेवेसाठी वापरत असलेल्या स्कॉर्पियो वाहनाच्या एका दरवाजाची काच ५ जुलै २०१६ या दिवशी अचानक फुटली. साधक या वाहनातून रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातून दुसर्‍या एका गावात जात असतांना मिलिटरी गेट परिसरात चालकाच्या मागच्या दरवाजाची काच फुटली. त्या वेळी मोठा आवाज झाला; परंतु काच कशामुळे फुटली, हे समजले नाही, तसेच तेथे कोणती वस्तूही मिळाली नाही. सदर घटनेच्या वेळी चालकासह ४ साधक गाडीत होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. या वेळी पू. (कु.) स्वाती खाडये स्वत: वाहनामध्ये नव्हत्या.

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेल्या, संतपद प्राप्त केलेल्या आणि सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या भारतभरातील साधकांची एकूण संख्या

   पुढील तक्त्यावरून लक्षात येईल की, कर्नाटकातील साधकांची साधनेत किती घोडदौड चालू आहे ! त्यांनी सर्वत्रच्या साधकांपुढे एक आदर्श ठेवला आहे. कर्नाटकातील साधकांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणार्‍या श्री. रमानंद गौडा आणि इतर साधकांचे कौतुक करावे तेवढे थोडे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 


विरोधकांनी जाहीर क्षमा मागावी ! - मुख्यमंत्री

राम शिंदे यांच्यासोबत असणारी 
व्यक्ती आरोपी नव्हे, तर पक्षाचा कार्यकर्ता !
        मुंबई, १९ जुलै (प्रतिनिधी) - राम शिंदे यांच्यासमवेत छायाचित्रात असणारी व्यक्ती ही आरोपी नाही, तर तो पक्षाचा कार्यकर्ता आहे. या प्रकरणातील आरोपी आणि त्या व्यक्ती याचे छायाचित्र यामध्ये कोणतेही साधर्म्य नाही. केवळ नावातील सारखेपणामुळे विरोधकांनी शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी आरोप करण्याआधी माहिती घेणे आवश्यक होते. या प्रकरणाशी राम शिंदे यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे विरोधकांनी राम शिंदे यांची जाहीर क्षमा मागावी, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांना ठणकावले.

बिहारमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात १० पोलीस ठार !

       औरंगाबाद (बिहार) - बिहारच्या गया आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआर्पीएफ्चे) १० पोलीस ठार झाले, तर ४ घायाळ झाले आहेत. (काँग्रेसच्या सत्ताकाळात नक्षलवादी पोलिसांना ठार करत होते, तेच पुढे चालू ! - संपादक) हे सर्व पोलीस सीआर्पीएफ्च्या कोब्रा बटालियनचे होते. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ३ नक्षलवादीही मारले गेल्याचे वृत्त आहे. घायाळ पोलिसांना वाईट हवामानामुळे सुमारे १० घंटे वैद्यकीय साहाय्यताच मिळाली नाही. डुमरी नाला परिसरातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेल्या सनातनच्या ग्रंथ प्रकाशनाची सूची


कोल्हापूर येथील महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने प्राध्यापकाचे तरुणीशी असभ्य वर्तन

असे प्राध्यापक हे शिक्षण क्षेत्राला काळिमा आहेत. अशांना कठोर 
शिक्षा करून धर्माचरणाचे धडे द्यायला हवेत !
      कोल्हापूर, १९ जुलै - येथील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून असभ्य वर्तन करणार्‍या प्राध्यापकाला युवतीच्या संतप्त पालक आणि नातेवाईक यांनी पुष्कळ मारहाण केली. (नैतिकता रसातळाला गेलेल्या अशा शिक्षकांकडून सुजाण नागरिक घडवतील, अशी अपेक्षाच नको ! - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

भारतीय राज्यकर्त्यांना सत्य आणि जनतेची सुरक्षा यांपेक्षा राजकारण महत्त्वाचे !
    फ्रान्समध्ये ट्रकद्वारे झालेल्या जिहादी आक्रमणानंतर फ्रान्स इस्लामी आतंकवादाच्या सावटाखाली असल्याचे वक्तव्य फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांनी केले. परंतु आतंकवादाने पोखरलेल्या भारताचे राज्यकर्ते सत्य स्वीकारत नाहीत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Francepar Islami atankwadka sankat mandara raha hai- Franceke rashtrapati Francois Hollande - 
Yah satya kehneka sahas Bharatiya rajkartayonme kab ayega ?
जागो ! : फ्रांस पर इस्लामी आतंकवाद का संकट मंडरा रहा है - फ्रांस के राष्ट्रपति फ्रांस्वा ओलांद
यह सत्य कहने का साहस भारतीय राजकर्ताआें में कब आएगा ?

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन २०१६ च्या प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचा आढावा

दैनिक जनसंग्राम, वर्धा (मराठी), २०.६.२०१६
दैनिक मलायला मनोरमा, केरळ (मल्ल्याळम्), २०.६.२०१६

बाजीप्रभु देशपांडे : दुर्दम्य स्वराज्यनिष्ठेचा आदर्श

बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या बलीदानदिनानिमित्त...
     मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजीप्रभु देशपांडे यांच्या सारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. स्वराज्याविषयीचा अभिमान आजही आपल्या रोमरोमात भिनवणार्‍या बाजीप्रभूंचा पराक्रम त्यांच्या राष्ट्र आणि धर्मनिष्ठेचे दर्शन घडवते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरक्षेसाठी आत्मबलिदान दिलेल्या अशा बाजीप्रभु आणि त्यांचे बंधू फुलाजीप्रभु देशपांडे या पराक्रमी लढवय्यांच्या बलीदानदिनानिमित्त सदर लेख प्रकाशित करत आहोत.

सनातन संस्थेवर बंदी आणल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करू !

नंदुरबार येथील हिंदुत्ववाद्यांची 
पत्रकार परिषदेद्वारे चेतावणी
       खोटे पुरावे आणि खोटे साक्षीदार उभे करून सनातन संस्थेच्या साधकांना चौकशीत गुंतवणे चालू असून हे तातडीने थांबवावे. सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेवर बंदी आणल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करू, अशी चेतावणी येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. १८ जुलै या दिवशी येथील जय बजरंग व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष शेखर मराठे आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
या वेळी त्यांनी सांगितले...
१. सनातन संस्था ही विस्मरणात गेलेल्या हिंदु संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी कार्य करणारी संस्था आहे; परंतु सनातन संस्थेला या कार्यात येणारे यश निधर्मी आणि नास्तिकवादी दुष्प्रवृत्ती यांना खुपत असल्याने अपकीर्तीचे षड्यंत्र रचले जात आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे. - समर्थ रामदास स्वामी (छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु)

सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचनाचा कार्यक्रम पहातांना भोर, जि. पुणे येथील साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
      प.पू. डॉक्टरांच्या वाढदिवसानिमित्त सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या वाचनाचा झालेला कार्यक्रम साधकांना दाखवण्यात आला. त्या वेळी भोर, जि. पुणे येथील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत. 
अ. नाडीवाचनात डोळे आणि कान यांवर हात ठेवून अनुभूती घ्यायला सांगितल्यावर 
१. प्रथम शंखनाद ऐकू आला आणि नंतर पांढरा प्रकाश दिसला. - श्री. विठ्ठल जाधव
२. समुद्राच्या लाटांचा आवाज आला. नंतर समुद्रात शेषनागावर आसनस्थ श्रीविष्णूचे दर्शन झाले. 
- सौ. सायली कंक

साधकांना साधनेचे महत्त्व सांगून त्यांना हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापन करण्यासाठी सक्षम बनवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

प.पू. परशराम पांडे
     महर्षींनी सांगितल्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले हे विष्णूचे अवतार आहेत, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निराळेपण आणि सनातन संस्थेची निर्मिती याविषयीची सूत्रे १९ जुलै या दिवशी पाहिली आज आपण पुढील सूत्रे पाहूया. 
५. सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे अवतारी जगद्गुरु असलेले प.पू. डॉक्टर 
५ अ. रज-तमाने अंधःकारमय झालेल्या बिकट परिस्थितीतून पार होण्यासाठी भगवंताने प.पू. डॉक्टरांना धरतीवर अवतार घेऊन पाठवलेले असणे : हे गुरुवर्या, कलियुगाच्या कालमहिम्याप्रमाणे आजची परिस्थिती ही त्रेतायुग आणि द्वापारयुग यांपेक्षा रज-तमाने अधिक अंधःकारमय झाली आहे. इतकी बिकट झाली आहे की, तिला पार करणे, हे आता अवतारी पुरुषाविना शक्य नाही. यासाठी हे भगवंता, तुला या धरतीवर अवतार घेऊन पाठवले आहे.

पू. डॉ. भगवंतकुमार मेनराय यांचा साधकांना संदेश !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वास्थ्य लाभण्यासाठी साधकांनी स्वतःची साधना वाढवायला हवी ! 
पू. डॉ. भगवंतकुमार मेनराय
     परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वास्थ्य लाभावे यासाठी विविध संत अनेक अनुष्ठाने करत आहेत. त्याच्या परिणामस्वरूप गुरुदेवांना काही प्रमाणात लाभही होत आहे, तरीही साधकांनी गुरुदेवांचे स्वास्थ्य का बिघडते ?, याचा विचार करायला हवा. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वतःचे असे काही आजारपण नाही. जे काही आहे, ते समष्टीचे आहे. म्हणजे काय ? तर साधकांना होणारे त्रास, राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात त्यांना स्वतः भोगावे लागतात. परिणामस्वरूप त्यांचे आरोग्य बिघडते. साधकांनी जर स्वतःची साधना वाढवली, म्हणजेच अखंड नामजप केला, तर साधक स्वतःला होणार्‍या आध्यात्मिक त्रासांवर काही प्रमाणात मात करू शकतील. त्यामुळे साधकांचा त्रास दूर होण्यासाठी गुरुदेवांना व्यय करावी लागणारी शक्ती वाचेल. ती शक्ती त्यांना हिंदु राष्ट्राच्या उभारणीसाठी वापरता येईल, तसेच साधकांची साधना वाढल्याने राष्ट्र आणि धर्म यांच्या परिस्थितीतही सुधारणा होईल. मुले मोठी होऊन पैसे मिळवू लागली की, वडिलांचा भार हलका होतो. त्याप्रमाणे साधकांनी साधना वाढवल्यास प.पू. गुरुदेवांना होणारे त्रास न्यून होतील.

सनातनच्या पाठीशी असणार्‍या संतांची आशीर्वादपर वाणी आणि लोकांचे सद्भावनादर्शक उद्गार !

प.पू. आबा उपाध्ये
१. ब्रह्मदेवाचे ब्रह्मास्त्र, श्री विष्णूचे सुदर्शनचक्र आणि शिवाचे त्रिशूळही आपल्याकडे असल्याने सनातनवर बंदी येणार नाही, असे प.पू. आबांनी सांगणे : गुरुपौर्णिमेच्या चार-पाच दिवस आधी पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांचा भ्रमणभाष आला होता. त्या वेळी त्यांनी म्हटले, सनातनवर बंदी येणार नाही; कारण आपल्याकडे तर साक्षात् त्रिदेव आहेत. ब्रह्मदेवाचे ब्रह्मास्त्र, श्रीविष्णूचे सुदर्शनचक्र आणि शिवाचे त्रिशूळही आपल्याकडे असल्याने आपल्याला कसली आली आहे भीती ? 
      त्यांचे हे उद्गार संकटकाळात साधकांना पुष्कळ मोठा आधार देऊन गेले. मी त्यांना म्हटले, खरंच आबा, आपल्यासारख्या संतांचा आशीर्वाद पाठीशी असतांना आम्हाला काहीही होणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.

दोष आणि अहं यांमुळे होणारी जिवाची हानी आणि शरणागती अन् अनुसंधान यांमुळे प्राप्त होणारी देवाची कृपा याची साधिकेने घेतलेली अनुभूती !

कु. कनकमहालक्ष्मी देवकर
       १२.४.२०१६ या दिवशी मला पुष्कळ सेवा असल्याने मी आदल्या रात्री सेवांचे नियोजन केले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी मी नियोजनानुसार सेवा करण्याचा प्रयत्न करत होते; पण प्रत्यक्षात तसे होत नव्हते. प्रत्येक सेवा पूर्ण व्हायला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने मनाची स्थिती थोडी नकारात्मक होत होती. माझ्या स्वतःकडून अपेक्षा वाढल्या होत्या. रात्रीपर्यंत सेवाही पूर्ण झाल्या नाहीत. माझ्यातील कर्तेपणा घेणे, अतिआत्मविश्‍वास, अपेक्षा अशा अहंच्या अनेक पैलूंमुळे माझी दिवसभर सेवा आणि साधना झाली नाही, असे लक्षात आले. मला याची फार खंत वाटू लागली.

श्रीकृष्णाच्या संदर्भातील खेळ खेळणारा ५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील कु. शिवाजी दीपक चौधरी (वय ६ वर्षे) !

कु. शिवाजी चौधरी
     आषाढ शुक्ल पक्ष त्रयोदशी (१७.७.२०१६) या दिवशी जळगाव येथील कु. शिवाजी दीपक चौधरी (वय ६ वर्षे) याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
कु. शिवाजी दीपक चौधरी याला सनातन परिवाराच्या 
वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद ! 
१. गर्भारपण 
१ अ. चित्रांचे उपाय लावले की, पोटातील बाळाने हालचाल करणे आणि मनात इतर विचार आल्यावर बाळाने हालचाल करून नामजपाची आठवण करून देणे : मी गरोदर असतांना मला आध्यात्मिक उपाय करायला आवडायचे. मी नियमित उपायांची चित्रे लावत असे. मी कापूर आणि अत्तर यांचे उपाय करायचे. मी रामरक्षा, गणपति अथर्वशीर्ष आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकत असे. मी चित्रांचे उपाय लावले असता पोटातील बाळ हळूच हलत असे. माझ्या मनात इतर विचार आले की, बाळ लगेच हालचाल करून मला नामजपाची आठवण करून देत असे.
     प.पू. डॉक्टरांच्या नेत्रांच्या छायाचित्रांचे आणि मीठ-पाण्याचे उपाय करतांना बाळ हालचाल करत नसे अन् उपाय संपले की, त्याची हालचाल होत असल्याचे मला जाणवायचे.

चुकीची खंत वाटून ती सुधारण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पू. (सौ.) सूरजकांता मेनराय आजी !

पू. (सौ.) सूरजकांता
मेनराय
१. चूक झाल्यावर पुष्कळ खंत वाटणे आणि ती लगेच 
सर्वांना सांगून चुकीसाठी स्वयंसूचना देणे 
      ७.७.२०१६ या दिवशी पू. (सौ.) मेनराय आजींकडून प्रसाधनगृहातील गिझरची कळ (बटन) चालू राहिली होती. या चुकीची त्यांना पुष्कळ खंत वाटली. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच खोलीतील सर्वांना सांगितले, माझ्याकडून एक गंभीर चूक झाली आहे. माझ्याकडून गिझरची कळ (बटन) चालू राहिली होती. माझ्यातील विसरणे या दोषामुळे ही चूक झाली आहे. त्यानंतर त्यांनी दुपारी विश्रांतीच्या वेळेत कोणाशीही न बोलता सतत मनाला स्वयंसूचना दिल्या.

स्वतःकडे कर्तेपणा न घेता इतरांचे कौतुक करून त्यांना श्रेय देणार्‍या सनातनच्या संत पू. राधा प्रभुआजी !

पू. राधा प्रभु
      १९ जुलै २०१६ या दिवशी गुरुपौर्णिमा झाली. या निमित्ताने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये येथे प्रकाशित करत आहोत.
१. पूर्ण वेळ साधना करण्यासाठी आश्रमात आल्यावर पू. राधा प्रभु यांनी 
प्रमुख साधकांनी माझ्यासमवेत सेवा करण्यासाठी पाठवले आहे, 
असे सर्व साधकांना कौतुकाने सांगणे 
     २०१५ या वर्षी मी पूर्णवेळ साधिका होऊन मंगळुरू येथील सेवाकेंद्रात गेले. त्या वेळी पू. प्रभुआजींना पुष्कळ आनंद झाला आणि त्या मला म्हणाल्या, प्रमुख साधकांनी मला पुढच्या टप्प्याची सेवा करण्यासाठी जायला सांगितले आहे; परंतु माझ्याकडे असलेली जपमाळा सिद्ध करण्याची सेवा कोण करणार ? असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी देवानेच, तर सर्वमंगलाला माझ्याकडे सेवा करण्यासाठी पाठवले आहे, असा विचार आला. हे त्या आनंदाने आणि कौतुकाने सर्व साधकांना सांगत होत्या.

साधना करत असतांना मनात येणार्‍या मायेतील विचारांसंदर्भात योग्य कि अयोग्य विचार

श्री. राम होनप
१. अयोग्य विचार 
      आपण सामान्य असल्याने साधना करतांना मायेतील विचार येणारच.
२. योग्य विचार 
      आपण ईश्‍वरप्राप्तीचे असामान्य ध्येय ठेवल्याने मायेतील विचारांचा त्याग करणेच महत्त्वाचे ! 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०१६)

देवा, मज वाटते मी गुरुचरणांसी जावे ।

श्रीमती रजनी नगरकर
मज वाटते, मी गुरुचरणांसी जावे । 
चरणांचे त्यांच्या 
मी फूल बनावे ॥ १ ॥

मज वाटते, सत्संग मज तो मिळावा । 
तो गुरुचरणीचा वाटे मम ठेवा ॥ २ ॥

मज वाटते, घ्यावे अविरत नाम । 
हेच आहे मनुष्य जन्माचे काम ॥ ३ ॥

आर्थिक क्षमता नसतांनाही गुरुपौर्णिमेनिमित्त १०१ रूपये अर्पण करणे आणि त्यानंतर अर्धा एकर भूमीत द्राक्षाचे अधिक पीक आल्याने सर्व कर्ज फिटणे अन् त्यामुळे अर्पणाचे महत्त्व समजणे

      १५ वर्षांपूर्वी माझे मित्र श्री. राजाराम बंडू ईर (पाटील) (रहाणार बोरगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली, वय वर्ष सध्याचे ७९, हे आमची शेती करत होते.) हे प्रतिवर्षाप्रमाणे जून मासात मिरज आश्रमात आले होते. मी त्यांना रोख पैसे देऊन शेतीसाठी खते आणि बियाणे घेण्यास सांगितले. मित्राची आर्थिक कुवत नाही, हे ठाऊक असूनही मी त्यांना गुरुपौर्णिमेसाठी १०१ रुपये अर्पण करायला सांगितले. त्यांनी मला सांगितले, आता तुम्ही माझ्या वतीने पैसे भरा. मी तुम्हाला धान्य विकून झाल्यावर पैसे देईन. त्याप्रमाणे मी त्यांच्या नावाने १०१ रुपये अर्पण केले.

सनातन संस्था वैदिक संस्कृतीचे पालन करणारी आदर्श संस्था ! - योगी अरविंद, ऋषिकेश

       सनातन संस्था ही धर्माप्रती आदरभाव निर्माण करणारी आणि धार्मिक मूल्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी संस्था आहे. वैदिक सनातन संस्कृतीची जपणूक करणार्‍या या संस्थेचे समाजात अत्यंत मानाचे स्थान आहे. संस्थेच्या कार्यास माझ्या शुभेच्छा ! गेल्या काही वर्षांत संस्थेच्या कार्यकर्त्यांना काही कारणासाठी अटक करण्यात आली आणि संस्थेची प्रसारमाध्यमांकडून अपकीर्ती झाली आहे, अशा प्रसंगात संस्थेने न्यायव्यवस्थेला संपूर्ण सहकार्य करून देशभक्तीचा परिचय करून दिला आहे. समाजानेही १-२ घटनांच्या (तथाकथित) आधारे संस्थेचे मूल्यमापन करू नये. सनातन संस्था सुंदर विचार रुजवणारी वैदिक संस्कृतीचे पालन करणारी आदर्श संस्था आहे. सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी पूर्णतः अयोग्य आहे. सनातन संस्थेच्या राष्ट्र आणि धर्म कार्याला माझ्या शुभेच्छा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक आणि धर्माभिमानी यांना विनंती

        सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता श्री. रामदास केसरकर हे २६ ते ३० जुलै २०१६ या कालावधीत विदर्भातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्त्यांना संपर्क करण्यासाठी जाणार आहेत. त्यांचा पूर्वनियोजित दौरा खालीलप्रमाणे आहे.
        उपरोक्त जिल्ह्यांमध्ये आपल्या परिचयाचे राष्ट्रप्रेमी अणि धर्मप्रेमी अधिवक्ते असल्यास त्यांची नावे आणि संपर्क क्रमांक अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांना भ्रमणभाष क्रमांक ८४५१००६०५९ अथवा इ-मेल पत्ता adv.kesarkar@gmail.com वर कळवल्यास त्या अधिवक्त्यांना श्री. केसरकर यांना संपर्क करणे सोयिस्कर होईल.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल पौर्णिमा झाली.

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

सनातनच्या साधकांसाठी सेवेची सुवर्णसंधी !
    सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
   समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल (HMV) असे परवाने असणे आवश्यक आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
सनातन संस्था सांगत असलेल्या गुरुकृपायोगाचे महत्त्व !
    पूर्वीच्या युगांत व्यक्ती सात्त्विक असल्याने प्रकृतीनुसार कोणत्याही साधनामार्गाने साधना करू शकत असे. कलियुगात व्यक्तीत स्वभावदोष खूप असल्याने ते दूर केल्याशिवाय साधना करणे अशक्य आहे. यासाठी सनातन संस्था सांगत असलेल्या गुरुकृपायोगात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनास प्राधान्य दिले आहे. त्यांचे निर्मूलन करत असल्यामुळे सनातनच्या साधकांची साधनेत जलद प्रगती होते ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिसने पायो उसने छिपायो । वो नर सच्चा, वोही गुरुका बच्चा ।
भावार्थ : पायो म्हणजे आत्मानुभूती झाली. छिपायो म्हणजे आत्मानुभूती झाल्याचे कोणाला सांगितले नाही. (अर्थात ती शब्दांत सांगताही येत नाही.) गुरुका बच्चा म्हणजे गुरूचा खरा शिष्य. एखाद्याकडे अनमोल हिरा असला, तर तो काही सर्वांना त्याविषयी सांगत नाही. तसेच अनमोल आत्मानुभूती आलेला त्याविषयी कोणाला काही सांगत नाही. अहंभाव नसल्यामुळेच त्याला ती अनुभूती आलेली असते व म्हणूनच तो तिच्याविषयी बोलत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

यशप्राप्ती
आयुष्यात यश, सुख आणि ईश यांची प्राप्ती होणे, या अतिशय कठीण गोष्टी आहेत, 
असे न मानता प्रयत्न करीत राहिले की, या गोष्टी प्राप्त होतात. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

आव्हान नक्षलवाद चिरडण्याचे !

संपादकीय
     गेल्या काही दशकांपासून देशात आतंकवादी आक्रमणांसह नक्षलवादी कारवायाही लक्षणीय प्रमाणात वाढल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, बंगाल, ओडिशा, आंध्रप्रदेश आदी राज्यांमध्ये नक्षलवाद्यांनी भू-सुरुंगाचा स्फोट घडवणे, रेल्वेरूळ उडवून देणे, प्रशासकीय कार्यालयांवर आक्रमणे करणे यांसारखी हिंसक आक्रमणे करून भारतीय सुरक्षेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांचे अपहरण करून आपल्याला हव्या असलेल्या मागण्या मान्य करून घेण्यापर्यंत नक्षलवाद्यांची मजल गेली आहे. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील मदनपूर या गावात १८ जुलै या दिवशी नक्षलवाद्यांनी भू-सुरुंगाचा स्फोट घडवून आणला. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियनचे १० सैनिक हुतात्मा झाले. नक्षलवाद्यांनी यापूर्वीही अशी आक्रमणे केली आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn