Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश

हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य)-स्थापनेचे
कार्य संतांच्या मार्गदर्शनाखाली करा !
     हिंदु धर्मातील गुरुपरंपरा ही देशातील संतपरंपरेने दिलेली अमूल्य देणगी आहे. संत हे साक्षात् ईश्‍वराचे सगुण रूप असतात. संतांमुळे समाज साधनेकडे वळतो, तसेच समाजातील सत्त्वगुणही वाढीस लागतो. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूंसह आध्यात्मिक मार्गदर्शन करणार्‍या संतांप्रतीही कृतज्ञता व्यक्त केली जाते. धर्म विरुद्ध अधर्म हा लढा प्रत्येक युगात लढला जातो. सध्याही त्याचे दृश्य रूप देशात सर्वत्र दिसत आहे. जेथे धर्म असतो, तेथे जय असतो, हे गीतेतील वचन असल्याने आगामी काळात प्रत्येकाने धर्माच्या बाजूने उभे रहाणे आणि त्यासाठी कार्य करणे आवश्यक ठरणार आहे. सामान्य हिंदूंना धर्माची बाजू कोणती आहे, हे कळत नाही. अशांनी खर्‍या संतांचे मार्गदर्शन घेणे आणि त्यानुसार कृती करणे अपेक्षित आहे.

आजचे दिनविशेष

हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ www.Hindujagruti.org चा आज वर्धापनदिन
वीर शिवा काशिद बलीदानदिन

गुरुपौर्णिमेनिमित्त कल्याण, ठाणे येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा संदेश

मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी अध्यात्माची कास धरा !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती
महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
    हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठच आहे. कोणत्याही कठीण क्षणाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य हिंदु धर्मच देतो. मानवी जीवनात अध्यात्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अध्यात्म हा यशस्वी आणि आनंदी जीवनाचा पायाच मानावा लागेल. जो हा पाया सशक्त बनवतो, त्याचे पुढील जीवन यशस्वीपणे पार पडते. मानवी जीवनात चढ-उतार, संकटे, सुख-दुःख इत्यादी भरलेले असते; परंतु या वाटचालीत अडकून न रहाता आंतरिक तळमळीने पुढे-पुढे वाटचाल करण्याची शक्ती अध्यात्मच आपल्याला देत असते; म्हणून साधकाने नेहमी अध्यात्माची कास धरावी, म्हणजे मानवी जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल, तसेच जीवनात कितीही संकटे आली, तरी साधकाने नेहमी सुविचारांनीच ती न्यून करावी. हा आदर्श ठेवण्यासाठी सर्व साधकांना शुभेच्छा !
शुभम् भवतु ।
- योगतज्ञ दादाजी वैशंपायन, कल्याण, ठाणे.

कृतज्ञ, कृतज्ञ, कृतज्ञ गुरुदेव !

    ग्रहमंडळात लुकलुकणारे अनेक तारे आहेत; मात्र सार्‍या सृष्टीला प्रकाशमान करणारा, अंधःकाराचे तम नष्ट करून चराचर सृष्टीत चैतन्य भरणारा सूर्य मात्र एकच आहे. युगानुयुगे तो अथक, अविश्रांतपणे सर्वांच्या जीवनात प्रकाश भरण्याचे कार्य निरपेक्षपणे करत आहे. तो रविराज ज्याप्रमाणे एकमेवाद्वितीय आहे, ज्याच्याविना सृष्टी शून्य आहे, त्याचप्रमाणे श्रीगुरूंच्या छत्रछायेविना साधकाचे जीवन शून्य आहे. श्रीगुरु आपल्यासाठी काय आणि किती करतात, हे साधकाला उमगणे अशक्य आहे; कारण जन्मजन्मांतरी तेच तर आपल्याला सांभाळत आहेत ! प.पू. डॉक्टर, आमच्यासारख्या सामान्य जिवांना समजेल, अशा भाषेत अध्यात्म सांगून आपणच आमच्याकडून अध्यात्माचे धडे गिरवून घेतलेत. आमच्या जीवनातील खाचखळग्यांवर साधनेने मात करायला शिकवून दुःखातही आनंदी रहायला शिकवलेत. प.पू. डॉक्टर आपल्या कृपेमुळेच आमची अगदी लहानशी सेवाही ईश्‍वरचरणी रूजू झाली. खरे तर ती सेवा करायला शिकवणारे आणि करवून घेणारेही आपणच आहात. याची अनुभूती आम्ही क्षणोक्षणी आपल्याच कृपेने घेत असतो.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भाद्रा, राजस्थान येथील श्रद्धेय प्रवर श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांनी लिहिलेले संस्कृतमधील काव्य !

श्री त्र्यंबकेश्‍वर
चैतन्यजी महाराज
    अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशनचे श्रद्धेय प्रवर श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांची वर्ष २०१६ मध्ये उज्जैनमध्ये झालेल्या सिंहस्थपर्वामध्ये उपस्थिती लाभली होती. त्या वेळी सनातनच्या साधकांनी त्यांची भेट घेतली असता त्यांनी सनातनच्या कार्याचे आणि साधकांचे कौतुक केलेे. श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांची कधीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली नाही; मात्र त्यांना साधकांची गुणवैशिष्ट्ये लक्षात आल्यानंतर त्यांना असे वाटले की, या साधकांमध्ये एवढी गुणवैशिष्ट्ये आहेत, तर त्यांच्या गुरूंमध्ये किती गुणवैशिष्ट्ये असतील, या उत्सुकतेपोटी त्यांनी प.पू. डॉक्टरांची गुणवैशिष्ट्ये जाणून घेतली आणि त्यांच्यावर पुढील काव्य केले. तसेच हे काव्य त्यांनी त्यांच्या फेसबूक खात्यावर प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रासह ठेवले.

काश्मीरमधून ३०० हिंदूंचे पलायन !

साडेचार लाख हिंदूंचे पुन्हा काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्याचे हिंदूंचे स्वप्न भंगले !
      श्रीनगर - जिहादी आतंकवादी बुरहान वाणी याला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराला १० दिवस झाले आहेत. येथील १० जिल्ह्यांत अजूनही संचारबंदी कायम आहे. या हिंसाचारात ४३ जण ठार झाले आहेत. या तणावपूर्ण स्थितीमुळे येथील ३०० काश्मिरी हिंदूंनी (पंडितांनी) येथून पुन्हा जम्मूमध्ये स्थलांतर केले आहे. या हिंदूंना आताच्या हिंसाचारात पाकिस्तान झिंदाबाद म्हणण्यासाठी मारहाण करण्यात आली होती.

कोल्हापूर पोलीस सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा ताबा घेण्याची शक्यता !

कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरण !
    कोल्हापूर, १८ जुलै (वार्ता.) - १० जून या दिवशी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात सनातन संस्थेचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली आहे. या प्रकरणी डॉ. तावडे हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून ते पुणे येथील येरवडा कारागृहात आहेत. कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणात चौकशी करणार्‍या विशेष पोलीस पथकास कॉ. पानसरे खून प्रकरणात डॉ. तावडे यांचीही चौकशी करायची आहे. त्यामुळे या आठवड्यात कोल्हापूर पोलीस डॉ. तावडे यांचा ताबा घेण्याची शक्यता आहे. कोल्हापूर पोलीस डॉ. तावडे यांचा ताबा घेऊन ते कोल्हापूर येथील न्यायालयात त्यांना उपस्थित करतील आणि पोलीस कोठडीची मागणी करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिव-पार्वती यांच्याप्रती कृतज्ञता !

      शिव-पार्वती यांच्यातील संवाद श्रवण करून महर्षींनी तो नाडीपट्ट्यांमध्ये लिहून ठेवला; म्हणून प.पू. डॉक्टरांचे अवतारत्व आणि अवतारी कार्य यांची ओळख साधकांना, तसेच सार्‍या जगाला झाली. यासाठी आम्ही साधक महर्षींप्रमाणेच शिव-पार्वती यांच्याप्रतीही कोटी कोटी कृतज्ञ आहोत. - (पू.) श्री. संदीप आळशी 

     परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मी अवतार आहेे किंवा अवतारी कार्याला आरंभ केला आहे, असे म्हटले नाही. महर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे आणि साधक अन् सनातन प्रभातचे संपादक मंडळ यांच्या महर्षींप्रतीच्या भावामुळे हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत. - संपादक

साधकांचे रक्षण करण्याविषयी महर्षींनी काढलेले उद्गार

१. महर्षींनी साधकांचे रक्षण करणार असल्याचे सांगणे
     आता कितीही तांत्रिक, मांत्रिक आणि करणी करणारे येऊ देत. आता तुम्ही या शास्त्राकडे आला आहात. त्यामुळे तुम्हाला काही होणार नाही, असे महर्षींनी सांगितले. (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक ६५, १०.३.२०१६)
२. प.पू. डॉक्टरांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणार !
      महर्षी म्हणतात, गुरूंच्या नावाविषयी आम्हाला पुष्कळ प्रेम वाटते. आम्हाला ते अत्यंत जवळचे आहेत. त्यांच्या मनात ज्या काही इच्छा आहेत, त्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण करणार. (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक ६५, १०.३.२०१६)
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (१२.३.२०१६, सायं. ५.१३)

श्रीगुरूंचे महात्म्य सांगणार्‍या महर्षींच्या चरणी कृतज्ञता !

     प.पू. डॉ. आठवले हे स्वयं विष्णूचा अवतार आहेत, हे महर्षींनी १०.५.२०१५ या दिवशी घोषित केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी, साधकांच्या साधनेतील, तसेच धर्मप्रसारातील अडथळे दूर होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, तसेच श्रीगुरूंची साधकांना खर्‍या अर्थाने ओळख करून देणारे महर्षि साधकांना त्यामुळेच परमवंदनीय आहेत. गुरुदेवांचे महात्म्य वर्णन करणार्‍या आणि यासाठी मार्गदर्शन करणार्‍या महर्षींच्या चरणी सनातन परिवार अनंतकोटी कृतज्ञ आहे ! - पू. (सौ.) अंजली गाडगीळ

साधकांना साधनेचे महत्त्व सांगून त्यांना सनातन धर्म राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन करण्यासाठी सक्षम बनवणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

प.पू. परशराम पांडे
॥ गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
१. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे विष्णूचे अवतार आहेत, असे सप्तर्षींनी सांगूनही साधकांना ते खरोखरच भगवंत आहेत का ?, असा प्रश्‍न पडण्यामागील कारणे : परात्पर गुरु डॉ. आठवले हे आज आम्हा सर्वांना प्रत्यक्ष गुरुच नव्हे, तर जगद्गुरु रूपात लाभले आहेत. हे आमचे महद्भाग्य आहे. १०.५.२०१५ या दिवशी सप्तर्षींनी जीवनाडीद्वारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे विष्णूचे अवतार आहेत, असे सांगितले, तरी आमच्यासारख्या अज्ञानी जिवांना आवरणामुळे ते खरोखरच भगवंत आहेत का ?, असा प्रश्‍न पडतो. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
अ. आमच्या मनात भगवंताची वेगळी प्रतिमा साठवलेली असते.
आ. भगवंत मायेच्या पलीकडे आहे. त्याला माया स्पर्श करत नाही.
२. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे विष्णूचे 
अवतार आहेत, हे साधकांना अनुभवास येत आहे !
       आता मात्र भगवंत प्रत्यक्ष सगुण स्वरूपात अवतरला आहे. त्यांचे गुण, आपण बघतो. ते भगवंताच्या गुणांशी जुळतात. त्यांच्या मध्ये साधकांना भगवान श्रीकृष्ण आणि प्रभु रामचंद्र यांच्याप्रमाणे ईश्‍वरीतत्त्व असल्याचे अनुभवास येत आहे.

साधकांनो, गुरुचरण सोडून कुठेही जाऊ नका !

     महर्षि म्हणतात, देवावर आमची पूर्ण श्रद्धा आहे. देवाने आम्हाला जे सांगितले, तेच आम्ही या नाडीशास्त्रात लिहिले. देवाने आम्हाला सांगितले की, साधकांना कैलासात, वैकुंठात दर्शन घ्यायला यायची आवश्यकता नाही. त्यासाठी आम्ही परम गुरुजींनाच (प.पू. डॉक्टरांनाच) अवताराच्या रूपात पृथ्वीवर पाठवले आहे. त्यांच्या दर्शनानेच साधकांना देवाचा आशीर्वाद मिळणार आहे. त्यामुळे साधकांनो, गुरुचरण सोडून कुठेही जाऊ नका. (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक ६५,१०.३.२०१६)

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात महर्षींचेे उद्गार

१. परम गुरुजींनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांमुळे हिंदु राष्ट्र येणारच आहे !
     राजा भगीरथाने ज्या प्रकारे भगीरथ प्रयत्न करून गंगेला भूतलावर आणले, तसेच परम गुरुजींनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांमुळे हिंदु राष्ट्र येणारच आहे. (नाडीवाचन क्र. ७५, चंडीगड (११.५.२०१६))
२. परम गुरुजींच्या इच्छेप्रमाणे पृथ्वीवर आध्यात्मिक राज्य यावे, यासाठी देवता करत असलेले साहाय्य !
     महर्षि म्हणतात, परम गुरुजींच्या (प.पू. डॉक्टरांच्या) इच्छेप्रमाणे पृथ्वीवर आध्यात्मिक राज्य यावे, यासाठी गणपति, हनुमान आणि कार्तिकेय आता झटून प्रयत्न करत आहेत.
(संदर्भ : नाडीवाचन क्रमांक ७०,स्थळ : मंगळुरू, कर्नाटक. २१.३.२०१६)
३. प.पू. डॉक्टरांना पहाण्यासाठीच हिंदु राष्ट्र येत आहे, असे महर्षींनी सांगणे
     याविषयी एकदा पू. डॉ. ॐ उलगनाथन् म्हणाले होते, महर्षी सांगतात की, प.पू. डॉक्टरांना पहाण्यासाठीच हिंदु राष्ट्र येत आहे.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णमलै, तमिळनाडू. (२४.११.२०१५, दुपारी २.०७)

लक्षावधी वर्षांपूर्वी महर्षींनी जीवनाडीपट्टीत वर्णिलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महात्म्य !

लक्षावधी वर्षांपूर्वी महर्षींनी जीवनाडीपट्टीत वर्णिलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महात्म्य !
१. प.पू. डॉक्टरांना आता सर्वत्र प्रसिद्धी मिळण्यास प्रारंभ होणार !,
याविषयी महर्षींनी दिलेले देवलोकातील संवादाचे एक उदाहरण
  देवलोकात पार्वती शिवाला विचारते - हे देवा, या पृथ्वीवर अनेक सिद्ध, संत आणि महात्मे आहेत. या सर्वांना सोडून तुम्ही परम गुरुजींविषयी इतके बोलण्याचे, लिहिण्याचे कारण काय ? यावर शिव पार्वतीला सांगतात - हे देवी, इतर सर्व महान असले, तरी सध्या ते पृथ्वीवर सर्वत्र त्यांच्याच नावाचे अवडंबर माजवण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु परम गुरुजी एकमेव असे आहेत की, ज्यांचे असे नाही. त्यांना स्वतःच्या नावापेक्षा देवाचे नाव सर्वत्र व्हायला हवे, असे वाटते आणि म्हणूनच आम्हालाही वाटते की, आता परम गुरुजींचे नाव सर्वत्र व्हावे. (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक ६५, १०.३.२०१६)

सनातनच्या रामनाथी आश्रमाला दिलेल्या हृद्य भेटीचे पुणे येथील प.पू. आबा उपाध्ये यांनी केलेले भावस्पर्शी वर्णन !

दैनिक सनातन प्रभातची माहिती घेतांना १. पू. (सौ.) मंगला उपाध्ये
२. प.पू. आबा उपाध्ये डावीकडून मागे उभे असलेले ३. सनातन प्रभातचे समूह
संपादक श्री. शशिकांत राणे आणि माहिती सांगतांना सौ. मनीषा पानसरे अन् अन्य
१. प.पू. आबा उपाध्ये यांनी मनःपटलावर 
साकारला प.पू. डॉक्टरांचा अमृत महोत्सव सोहळा ! 
प.पू. आबा उपाध्ये
       प.पू. डॉ. जयंतराव बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सवाचा सोहळा मी माझ्या मनातच उभा केला आणि त्याचे वर्णन करून घरातील मंडळींना सांगितले. तेव्हा माझ्या पत्नीसमवेत सार्‍यांनी एकत्रितपणे सांगितले, अतिशय सुंदर, अतिशय छान ! मला वाटले, मनाने टिपलेल्या दृश्यापेेक्षाही सोहळा कितीतरी पटीने अधिक चांगला झाला असेल आणि तसेच झाले; कारण मी तो सोहळा संगणकावर पाहिला. आम्ही १.६.२०१६ या दिवशी निघणार होतो. त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो. जातांना शैलेशच्या गाडीत आम्ही बसलो होतो. त्याचे विमान का होत नाही ?, असा बालीश विचार त्या वेळी माझ्या मनात आला.

महर्षींची दिव्यवाणी म्हणजेच जीवनाडीपट्टी म्हणजे काय ?

     अखिल मानवजातीविषयी शिव-पार्वती यांच्यात झालेला संवाद सप्तर्षींनी ऐकला. त्यांनी तो मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक जिवांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लिहून ठेवला. हेच ते नाडीभविष्य ! नाडीभविष्य ताडपत्रीच्या काही पट्टयांवर लिहिलेले असते. त्यातील जीवनाडी सजीव आहे. तिचा श्‍वासोच्छ्वास होत आहे. वाचतांना त्यातील अक्षरे आपोआप पालटतात. नाडी वाचतांना साक्षात् शिव-पार्वती नाडीवर नर्तन करतात, असे तमिळनाडू येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले. महर्षींनी लाखो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या नाडीभविष्याचे वाचन करण्याचे कौशल्य आज अत्यल्प जणांकडेच उपलब्ध आहे. आज जीवनाडी वाचू शकणारे विश्‍वातील पू. डॉ. ॐ उलगनाथन् हेच एकमेव आहेत. तमिळमध्ये नाडी या शब्दाचा अर्थ शोध घेणे थोडक्यात स्वचा शोध घेणे, असा होतो.


संतसंदेश

ईश्‍वरी अधिष्ठान आणि गुरूंचा संकल्प यांमुळे 
हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) वर्ष २०२३ मध्ये येणार, 
हे निश्‍चित ! - (पू.) के. उमेश शेणै, सनातन आश्रम, देवद, पनवेल. 
        कित्येक जन्मांच्या पुण्यफळामुळे आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्याची संधी मिळाली आहे. मानवजन्म अतीदुर्लभ, त्यातून सद्गुरूंचे मार्गदर्शन मिळण्यासाठी तर कित्येक जन्म-जन्मांतरीचे पुण्य असावे लागते. कोटी कोटी लोकांमध्ये आपण किती भाग्यवान आहोत !
        आपत्काळ आपल्या दाराशी येऊन ठेपला आहे, असे सातत्याने संत आपल्याला सांगत आहेत. आता सप्तर्षी नाडीपट्टीच्या वाचनातूनही याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. येणारा काळ अत्यंत दुष्कर आहे. त्याची सर्व लक्षणे आज जगभरात घडणार्‍या घटनांमधून दिसून येत आहेत. भारतात तर हिंदु धर्म संपवण्यासाठी निधर्मी, धर्मांध, धर्मद्रोही, तसेच हिंदुद्वेषी वाहिन्या आणि नियतकालिके आदी सर्व अल्प पडतात म्हणून कि काय, सरकारसुद्धा कंबर कसून उभे आहे. कोणतेही सरकार आले, तरी अल्पसंख्यांकांचे एकगठ्ठा मतांसाठी तुष्टीकरण करते. जाती, जमाती, संप्रदाय आणि पक्ष यांमध्ये हिंदू विभागले गेल्याने त्याचा लाभ अन्य धर्मीय उठवत आहेत; म्हणूनच आता हिंदूंनी सर्व मतभेद विसरून आपण एक हिंदू आहोत, हे ओळखून एकसंघ व्हायला हवे. आज सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदूंचे संघटन करत आहे. यामुळे विचलित झालेले हिंदुद्वेषी खोटे आरोप करून, कोणतेही पुरावे नसतांना सनातनच्या विरोधात षड्यंत्र रचत आहेत. एवढा अपप्रचार करूनही श्रीगुरुकृपेने जनतेच्या मनातील सनातनविषयीचे प्रेम, विश्‍वास आणि सहकार्य यांत जराही फरक पडलेला नाही. हिंदुद्वेष्ट्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी शेवटी विजय सत्याचाच आहे.
गुरूंची महती सांगणारे सनातनचे ग्रंथ !
१. गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र
२. गुरूंचे वागणे, कार्य आणि गुरुपरंपरा
३. गुरूंचे शिष्यांना शिकवणे आणि गुरु-शिष्य संबंध 
----------------------------------
आदर्श शिष्य बनण्यासाठी मार्गदर्शक सनातनचा ग्रंथ
शिष्य 
----------------------------------
साधना योग्य दिशेने होण्यासाठी उपयुक्त ठरणारा ग्रंथ !
गुरुकृपायोगानुसार साधना (भाग १)

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होत असलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा !
१९ जुलै या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन केले आहे. या महोत्सवात सहभागी व्हा !
गुरुपौर्णिमा महोत्सवाचे ठिकाण :
स्थानिक संपर्क : (स्थानिक गुरुपौर्णिमा महोत्सवाचे स्थळ आणि संपर्क क्रमांक लिहावा.)


साधकांना सूचना, तसेच सनातन प्रभात नियतकालिकांचे वर्गणीदार आणि विज्ञापनदाते यांना विनंती !

गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक !

१. साधकाने श्रीश्रीजयंत यांच्या चरणी पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्वकाही शक्य होणार आहे.
२. अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे. त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते.
३. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही.
४. गुरूंची अवहेलना/निंदा केल्यामुळे घडणार्‍या पापाचे क्षालन जगन्नियंताही करू शकत नाही.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Hinduopar ho rahe aghatoka ekmatra upay hai- Hindu Rashtraki sthapna.
Aaj Gurupurnimake mangal parvpar is Dharmakarya hetu shakti milneki prarthana kare
जागो !
हिन्दुआें पर हो रहे आघातों का एकमात्र उपाय है - हिन्दू राष्ट्र की स्थापना
आज गुरुपूर्णिमा के मंगल पर्व पर इस धर्मकार्य हेतु शक्ति मिलने की प्रार्थना करें !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संस्था यांच्या वतीने भारतात होणार्‍या गुरुपौर्णिमा आणि हिंदूसंघटन मेळावे

गुरुपौर्णिमेनिमित्त संतसंदेश

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साध्य होण्यासाठी प्रतिदिन
स्वतः धर्माचरण करा !
- पू. सत्यवान कदम, मुल्की, कर्नाटक. 
     ईश्‍वरी नियोजनानुसार आपल्याला महान अशा हिंदु धर्मात जन्म मिळाला आहे आणि प.पू. गुरुदेवांसारखे गुरु लाभले आहेत. हे आपले सर्वांचे परमभाग्य आहे. प.पू. गुरुदेवांनी आपल्याला व्यष्टी आणि समष्टी साधना सांगितली आहे. व्यष्टी साधना केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होणार आहे, तर समष्टी साधनेने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेस हातभार लागणार आहे. स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंभाव घालवण्यासाठी आपण तळमळीने प्रयत्न करायला हवेत. ईश्‍वराच्या अधिष्ठानासाठी नामजप आणि प्रार्थना वाढवायला हवी. हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय साध्य होण्यासाठी प्रतिदिन स्वतः धर्माचरण करून समाजातील इतरांनाही त्याविषयी अवगत करायला हवे. राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती असलेले आपले कर्तव्य नेहमीच बजावले पाहिजे. असे केल्यास आपले व्यष्टी आणि समष्टी साधनेतील ध्येय साध्य होईल अन् जीवनाचे सार्थक होईल. प.पू. गुरुदेवांनी आम्हाला व्यष्टी आणि समष्टी साधनेचे ध्येय साध्य करण्यासाठी शक्ती अन् बुद्धी द्यावी, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो !

गुरुपौर्णिमेनिमित्त संतसंदेश

देवाने जे दिले, त्यात समाधान मानून साधनेकडे अधिक लक्ष द्या ! - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
      भारत ही पुण्यभूमी आहे. अनेक साधू-संतांनी येथे जन्म घेतला. हे समजून घ्या आणि अधिकाधिक साधना करा ! मानापमान मानू नका. परस्परांना सहकार्य करा. ईश्‍वराची आराधना करा. विज्ञान कितीही पुढे गेले, तरी ईश्‍वरी शक्तीपुढे ते थिटेच पडते. देवाने जे दिले, त्यात समाधान माना आणि नामस्मरणावर अधिक भर द्या !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी आरंभ केलेले व्यापक कार्य आणि त्या कार्याचा होत असलेला विस्तार

       परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य विश्‍वव्यापी आहे. साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करून त्यांना मोक्षाची वाट दाखवण्याबरोबरच हिंदुत्वाच्या कार्यातही त्यांनी गरुडझेप घेतली आहे. धर्म, अध्यात्म, राष्ट्ररक्षण आदी क्षेत्रात रूंदावत असलेल्या कार्यकक्षांसमवेतच आध्यात्मिक संशोधन, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाची अभिनव पद्धत ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची निराळी वैशिष्ट्ये आहेत. सध्याची बिघडलेली समाजव्यवस्था सुस्थापित करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे व्यापक ध्येय ठेवण्याबरोबरच दैवी बालके ओळखून हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी सक्षम नागरिक आतापासूनच घडवणे आदी कार्यवैशिष्ट्ये त्यांचे द्रष्टेपण दर्शवतात !
गुरुज्ञान नाही ज्यासी । तरणोपाय नाही त्याशी ।
तो नावडे ऋषीकेशी । व्यर्थ जन्मासी तो आला ॥
- ज्ञानदेवगाथा, अभंग ६९८, ओवी १
अर्थ : ज्याला श्री गुरूंपासून ज्ञानप्राप्ती झालेली नाही, त्याला तरून जाण्यासाठी कुठलाच उपाय नसतो. तो श्रीहरीलाही आवडत नसल्याने त्याचा जन्मच व्यर्थ गेल्यासारखा आहे.

   ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, असे संत ज्ञानदेवांनी म्हटले आहे. ज्ञान देतात, ते गुरु ! शिळेपासून शिल्प बनू शकते; पण त्यासाठी शिल्पकार लागतो. त्याचप्रमाणे साधक आणि शिष्य ईश्‍वराला प्राप्त करू शकतात; पण त्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. गुरूंनी आपल्या बोधामृताने साधक आणि शिष्य यांचे अज्ञान दूर केल्यावरच त्यांना ईश्‍वरप्राप्ती होते.

गुरुकृपायोगानुसार साधना

१. आचारपालन : वेशभूषा, अलंकारधारण, आहार आदी सर्व कृती शास्त्रानुसार करण्यावर भर !
२. धर्माचरण : धर्मशिक्षण घेऊन धार्मिक कृती धर्मशास्त्रानुसार करणे !
३. अष्टांग-साधना : नामजप, सत्संग, सेवा, त्याग, प्रीती (निरपेक्ष प्रेम), तसेच स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन आणि भावजागृतीचे प्रयत्न !
४. धर्मप्रसार : समाजाला धर्मशिक्षण देणे !
५. धर्मरक्षण : वैध (सनदशीर) मार्गाने धर्महानी रोखणे !
(अधिक जाणून घेण्यासाठी वाचा सनातनची ग्रंथमालिका : गुरुकृपायोगानुसार साधना)

मम हृदयी कोण हे भासे !

परमपूज्य सांगती भजा श्रीकृष्णाला ।
परि साधक अंतरी आठवती परमपूज्यांना ॥ 

श्रीकृष्णाच्या लीला साधका मोहविती ।
परि साधक मुखी परमपूज्यांची महती गाती ॥ 

दुःखात साधक श्रीकृष्णाचा धावा करिती ।
परि अंती परमपूज्य हे नाव मुखी येती ॥ 

युगानुयुगे श्रीकृष्णाचे नाव अमर राही ।
साधकांच्या हृदयी परमपूज्य हे नाव कोरलेले राही ॥ 

प.पू. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना आहे, आपल्या कृपेमुळेच आमची साधना चालू आहे. केवळ याच जन्मात नव्हे, तर जन्मोजन्मी आम्हाला आपल्या चरणांशी स्थान देऊन आमचा उद्धार करा.
- (पू.) श्री. संदीप आळशी (१५.४.२०१६)

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः... या श्‍लोकाची सनातनच्या साधकांना येत असलेली प्रत्यक्ष प्रचीती, हे साधकांचे महत्भाग्य !

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः।
गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
अर्थ : गुरु स्वतःच ब्रह्मा, श्रीविष्णु आणि महेश आहेत. तेच परब्रह्म आहेत. अशा श्रीगुरूंना मी नमस्कार करतो.
    प.पू. भक्तराज महाराजांनीही त्रैलोक्याचे योगिराज हे अवतरले भूवरी । देखिले रूप हे हृदयांतरी । यांसारख्या अनेक भजनपंक्तींमधून श्रीगुरूंना देवतांच्या रूपात वर्णिले आहे. साधनेत आल्यापासून मला असे वाटायचे की, साधकांचा गुरूंविषयी अनन्य भाव निर्माण होण्यासाठी गुरूंना साक्षात् ब्रह्मा-विष्णु-महेश यांसमान मानले आहे. गुरु त्रिदेवांसमान आहेत, असा भाव असणे आणि गुरु प्रत्यक्ष तसे असणे, यांमध्ये अंतर (भेद) आहे.
    प.पू. डॉक्टर हे श्रीविष्णूचे अवतारच आहेत, असे महर्षींनी सांगितले आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः... या श्‍लोकाची सनातनच्या साधकांना येत असलेली प्रत्यक्ष प्रचीती, हे साधकांचे केवढे महत्भाग्य ! केवळ सनातनच्या साधकांचेच नाही, तर अखिल मानवजातीचेच हे महत्भाग्य आहे.
सर्वांना चांगली साधना आणि तळमळीने राष्ट्र अन् धर्म यांचे कार्य करून प.पू. डॉक्टरांची कृपा संपादन करून या अमृतपर्वणीचा लाभ करून घेता यावा, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !
- (पू.) श्री. संदीप आळशी (३०.५.२०१६)
समर्थ रामदासस्वामींनी वर्णिलेली गुरूंची महती
शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णे सुवर्ण करिता न ये ।
म्हणोनी उपमा न साहे । सद्गुरूसी परिसाची ॥
- दासबोध (दशक १, समास ४, ओवी १६)
अर्थ : परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते; पण ते सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाला सोने बनवू शकत नाही; मात्र गुरु हे शिष्याला गुरुपद प्राप्त करून देतात; म्हणून परिसाची उपमा गुरूंना लागू पडत नाही.

स्वामी विद्यानंद यांनी सांगितलेले भविष्य १९.११.२०१५ या दिवशी खरे ठरणे

१. पुढे तुम्हाला राष्ट्राच्या आध्यात्मिक 
सिंहासनावर बसायचे आहे, 
असे महर्षींनी प.पू. डॉक्टरांना सांगणे !
        आम्हाला परम गुरुजी आणि त्यांचे भक्त यांना आध्यात्मिक सिंहासनावर बसायचे आहे. गुरूंना सांगा, ते सिंहासन त्यांची वाट पहात आहे. त्यांना कुणीही थांबवू शकत नाही, असे महर्षींनी १९.११.२०१५ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या नाडीवाचनात (नाडीवाचन क्रमांक ४६ मध्ये) सांगितले. हे ऐकल्यावर मला प.पू. डॉक्टरांनी सांगितलेल्या पुढील अनुभूतीची आठवण झाली.
२. २००३ या वर्षी प.पू. डॉक्टरांनाही ध्यानात एक 
रिकामे सिंहासन दिसणे आणि त्यांना तुला पुढे या 
सिंहासनावर बसायचे आहे, असे स्वामी विद्यानंद यांनी सांगणे
        एकदा स्वामी विद्यानंद यांनी माझे ध्यान लावले आणि ध्यानात काय दिसते, ते वर्णन करून सांगा, असे मला सांगितले. मी सांगितले, ॐ हे चिन्ह वर लावलेले एक रिकामे सिंहासन दिसत आहे. त्यावर ते मला म्हणाले, त्या सिंहासनावर पुढे तुला बसायचे आहे. हा २००३ या वर्षी प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या संदर्भात सांगितलेला प्रसंग मला आठवला. महर्षींनीही प.पू. डॉक्टरांना नेमके हेच सांगितले.
        तो काळ आता जवळ येत चालला असल्याने महर्षींनी या घटनेचे आपल्याला पुनः स्मरण करून दिल्याचे जाणवले आणि महर्षींच्या या वाक्याने भावजागृती झाली. 
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णमलै, तमिळनाडू. (२४.११.२०१५)
     सद्गुरूंनी शिष्याला आपला म्हटले की, त्या शिष्याचे सर्व दायित्व ते घेतात. दायित्व म्हणजे त्याने पापे केली, दुर्वर्तन केले, तरी सद्गुरु त्याला सोडत नाहीत. प्राण पणाला लावून त्याला सुधारल्याविना ते रहात नाहीत. आपला शिष्य जोपर्यंत मोकळा होत नाही, तोपर्यंत सद्गुरूंची सुटका नसते. (संदर्भ : अज्ञात)

महर्षींनी वर्ष २०१६ मध्ये होणार्‍या गुरुपौर्णिमा उत्सवाविषयी भाष्य करणे, तसेच या नाडीवाचनात गुरूंचा महिमाही वर्णन करणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षि म्हणतात -
१. सिंहस्थपर्वानंतर येणार्‍या गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व असणे
     सिंहस्थपर्व झाल्यावर येणार्‍या गुरुपौर्णिमेला जास्त महत्त्व असते. मागच्या १२ वर्षांचे फळ या एका गुरुपौर्णिमेत मिळते. ज्यांना गुरु म्हणून संबोधले जाते, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आताची येणारी गुरुपौर्णिमा ही उज्जैनच्या सिंहस्थपर्वानंतर येत आहे आणि म्हणून हिला अधिक महत्त्व आहे.
२. गुरुपौर्णिमेची कथा सांगतांना महर्षि म्हणतात -

गुरुपौर्णिमेनिमित्त संतसंदेश

हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) लवकर येऊ दे ! - पू. श्रीमती राधा प्रभुआजी, मंगळुरू, कर्नाटक. 
  सर्वत्रचा गुरुपौर्णिमा महोत्सव निर्विघ्नपणे पार पडू दे. सनातनची कीर्ती विश्‍वभर पसरू दे आणि हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) लवकर येऊ दे.
- ---------------------------

    मनुष्याला स्थिरता आणि धैर्य मिळण्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे !
- प.पू. परूळेकर महाराज, श्रीरामनगरी, वराड, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः।
गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
    मनुष्याच्या जीवनप्रवासात गुरूंचे स्थान अढळ आहे. आपली प्रथम गुरु आई ! गुरु विना जगी थोर काही नाही. परिसाच्या स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने होते, तसेच गुरूंच्या सान्निध्यात शिष्याचा उद्धार होऊन तो भवसागरात स्वत:ची जीवनरूपी नौका तारू शकतो. बाल्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत मनुष्याला जीवनात वेगवेगळ्या गुरूंची भेट होते. गुरु मनुष्याच्या जीवनाला आकार देऊन, त्यास जीवनातील परमानंद मिळवून देतात. वादळात भरकटलेल्या नावेला किनार्‍यावर आणण्यासाठी ज्याप्रमाणे उत्तम नावाड्याची आवश्यकता असते, त्याप्रमाणे या कलियुगात भरकटलेल्या मनुष्याला स्थिरता आणि धैर्य मिळवण्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे.

गुरुचरणांप्रती पदोपदी कृतज्ञता व्यक्त करणे, ही खरी गुरुदक्षिणा !

पू. संदीप आळशी
१. एकदा केरळ येथील सनातनच्या साधिका श्रीमती कैमल यांची आणि माझी वाटेत भेट झाली. आम्ही एकमेकांना नमस्कार केला आणि निघून गेलो. त्या काही क्षणांच्या भेटीनेही त्यांची भावजागृती झाली, असे मला नंतर समजले. आमची विशेष ओळख नसतांना आणि केवळ काही क्षण भेटलो असतांनाही त्यांचा भाव जागृत का झाला ? साधकांचा प.पू. डॉक्टरांप्रती अपार भाव आहे आणि गुरुतत्त्व सूक्ष्मातून प्रत्येक साधकामध्ये वास करत असते. माझ्यात असलेल्या गुरुतत्त्वामुळेच श्रीमती कैमल यांचा भाव जागृत झाला, असे मला जाणवले. 
गुरुच आपल्या हृदयात वास करून आपला सांभाळ करतात, चालोनिया हाती धरोनिया, यानुसार आपल्याला साधनापथावरून पुढे पुढे नेतात आणि आपल्या कल्याणासाठीच सर्व करतात. असे असतांना आपण कसला अभिमान धरू शकतो ?
२. वेदधर्म नावाचे एक गुरु होते. एके दिवशी त्यांनी त्यांच्या सर्व शिष्यांना बोलावून म्हटले, माझे एक पूर्वजन्मी केलेले पापकर्म आहे. या पापाची निष्कृती होण्यासाठी मी काशीला जाणार आहे. तुम्ही मला काशीला घेऊन चला. मी ते पाप माझ्या देहाने भोगीन, त्या वेळी तुम्ही माझा सांभाळ करावा. तेव्हा दीपक नावाचा एक शिष्य गुरूंना म्हणाला, स्वामी, मला आज्ञा करावी. मी सर्वशक्तीनिशी आपली सेवा करीन. दीपकचे वचन ऐकून गुरु म्हणाले, त्या पापामुळे मी कुष्ठाने अंग झडलेला, आंधळा-पांगळा असा होईन. मला एकवीस वर्षे फार सांभाळावे लागेल. त्यावर दीपक हो, असे म्हणाला.

प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात जानेवारी २०१६ मध्ये झालेले पालट

प.पू. भक्तराज महाराज यांचे मूळ छायाचित्र (मे २०१०)
पालट झालेले छायाचित्र (जानेवारी २०१६)
तोंडवळा पांढरट पिवळा होणे 
आणि प्रभावळ गडद अन् गुलाबी होणेे
       तोंडवळा पांढरट पिवळा आणि जरासा अस्पष्ट होणे, हे निर्गुण तत्त्वाकडे होणारी वाटचाल दर्शवते. तेजतत्त्वाबरोबरच आपतत्त्व वाढल्याने छायाचित्रातील पिवळा रंग उल्हसित करणारा अथवा चैतन्यदायी जाणवतो. आसुरी शक्तींची साधकांवर होणारी आक्रमणे परतवून लावण्यासाठी निर्गुण तत्त्व वाढले आहे. प्रभावळ गडद अन् गुलाबी होणे, हे धर्मप्रसारासाठी आवश्यक असणारी कार्यकारी शक्ती प्रकट झाल्याचे निर्देशक आहे.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, सनातन संस्था. (१४.१.२०१६)

गुरुपौर्णिमेनिमित्त संतसंदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले हे सनातन संस्थेच्या 
माध्यमातून विश्‍वगुरूंचे कार्य करत आहेत ! - प.पू. घडशी 
महाराज, श्री नवनाथ श्रद्धास्थान, मुळदे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. 
       सनातन संस्था विश्‍वगुरूंचे कार्य करत आहे. आज चहुबाजूंनी समाज, देश आणि धर्म संकटात सापडले आहेत. अधर्म पराकोटीला पोचला आहे. पाश्‍चात्त्य जीवनशैलीच्या वाढत्या प्रभावामुळे हिंदू धर्माचरणापासून दूर जातांना दिसत आहेत. त्याचा परिणाम म्हणून आज सर्वत्र नीतीमूल्यांचा र्‍हास होतांना दिसत आहे. आपला हा अमूल्य असा धर्म जर टिकवायचा असेल, तर परत एकदा धर्मसंस्थापना होणे आवश्यक आहे. अर्थात् हे पवित्र कार्य करण्याचे दायित्व भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतच स्वतःकडे स्वीकारले आहे. आज सनातन संस्था आणि तिचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य पहाता भगवान श्रीकृष्णाने परत एकदा धर्मसंस्थापनेसाठी पृथ्वीवर जन्म घेतला आहे, अशी अनुभूती येते. भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु होता, तसे परात्पर गुरु डॉ. आठवले हे सनातन संस्थेच्या माध्यमातून विश्‍वगुरूंचे कार्य करत आहेत.

विविध नाड्यांत प.पू. डॉक्टर विष्णूचे अवतार आहेत, अशा येणार्‍या उल्लेखाचा भावार्थ

   माझा गुरुमंत्र श्रीरामाचा आहे. सध्याच्या आपत्काळातील माझी उपास्यदेवता श्रीकृष्ण आहे. दोघेही श्रीविष्णूचे अवतार आहेत. जो ज्या देवतेची उपासना करतो, त्या देवतेचे तत्त्व त्याच्यात येते. त्या तत्त्वाला अनुसरून विविध नाड्यांत प.पू. डॉक्टर विष्णूचे अवतार आहेत, असा उल्लेख येतो. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनो, श्रीश्रीजयंत आठवले यांची महती जाणून त्यांची कृपा संपादन करण्यासाठी अंतःकरणापासून प्रयत्न करा !

गुुरुपौर्णिमेनिमित्त महर्षींनी साधकांना दिलेला संदेश !
॥ नारायणस्मृति ॥
      साधकांनो, मंत्र म्हणजे गुरूंचा अविभाज्य घटक आहे. मी या मंत्राचे अंगभूत महत्त्व विशद करणार आहे. मंत्र, गुरु आणि ईश्‍वर हे एकच आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ईश्‍वर आणि मंत्र गुरूंचे अविभाज्य घटक आहेत. साधकाने मोठ्यांची गुणवैशिष्ट्ये शिकून ती स्वतःमध्ये आणावीत, आध्यात्मिक गुरूंची सातत्याने सेवा करावी आणि गुरूंचे कृपाशीर्वाद मिळवावेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात बहुमोल योगदान देणारे सनातन आणि अन्य आध्यात्मिक संस्थांचे संत !

- (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
 
 
गुरुपौर्णिमेनिमित्त साधक, वाचक, 
विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांना हार्दिक शुभेच्छा !

सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि 
वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ 
आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३ १५३१७

प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभा म्हणजे चैतन्याचा अतिशय वेगाने वहाणारा प्रवाह !

कु. राजश्री सखदेव 
१. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांची पार्श्‍वभूमी
     वर्ष १९९८ ते २००० या कालावधीत प.पू. डॉक्टरांनी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत साधना या विषयावर जाहीर सभा घेतल्या. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभा म्हणजे चैतन्याचा अतिशय वेगाने वहाणारा प्रवाह असे. वर्ष १९९८-९९ मध्ये सनातनला फारसे कोणी ओळखत नव्हते. साधकसंख्या अगदीच अल्प होती. सेवा करणारे सर्व साधक नवीन होते. त्यामुळे कोणाही साधकाला सेवेचा कोणत्याच प्रकारचा अनुभव नव्हता, तरी प्रत्येक साधक अतिशय उत्साहाने सेवा करत होता. सेवेत अडथळेही पुष्कळ येत होते. त्यांतील काही अडथळे वाईट शक्तींमुळे होते, हे आता लक्षात येते. येणार्‍या अडथळ्यांवर साधक कसोशीने मात करण्याचा प्रयत्न करीत.
     सभेचे मैदान आखल्यानंतर कनात लावण्यासाठी स्पाईक मारण्यापूर्वी, सभेचे व्यासपीठ उभे करण्यापूर्वी प.पू. डॉक्टर सभास्थानी येेऊन सर्व पहात. त्यात काही दुरुस्त करणे आवश्यक असेल, तर ते करायला सांगत. सभा सुरू होण्यापूर्वी काही वेळ येऊन झालेली तयारी आणि प्रदर्शन पहात अन् त्यानंतर ठरलेल्या वेळेला सभा चालू करत.
     आता मागे वळून या जाहीर सभांकडे पाहिल्यावर पुढील सूत्रे लक्षात येतात.

उत्साह आणि आनंदाचा झरा असलेल्या अन् साधकांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करून त्यांची माऊली झालेल्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ !

निरपेक्ष प्रीतीचे मूर्तीमंत रूप पू. (सौ.) अंजली गाडगीळ !
कु. माधवी पोतदार
१. सहज, उत्साही आणि आनंदावस्थेत रहाणे
    पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांची मुलगी सायली हिच्या विवाहाच्या दिवशी पहाटेपासून पू. (सौ.) गाडगीळकाकूंना सलग पाच वेळा जुलाब झाले, तरी त्यांना त्रास होत असल्याचे जाणवत नव्हते. त्या परिस्थितीतही त्या स्थिर, सहज आणि आनंदी होत्या. पू. काकूंच्या सेवेत असतांना त्यांच्या मनाची स्थिती एकसारखीच असल्याचे माझ्या लक्षात आले. सकाळी १० वाजता काकू उत्साही, आनंदी आणि चैतन्यमय स्थितीत असतात, तशाच दुपारी, सायंकाळी अन् मध्यरात्री बारा-एक वाजताही असतात. कोणत्याही वेळी त्यांना काही विचारले, तर त्या आनंदाने भगवंताच्या अनुसंधानात राहून बोलतात. कोणत्याही परिस्थितीत कसलाही थकवा त्यांच्या मुखावर जाणवत नाही. सतत वर्तमान आणि आनंदावस्था जाणवते. पू. डॉ. गाडगीळकाका आणि काकू पहाटे ४ वाजता उठतात आणि रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत अखंड सेवारत असतात. ते रात्री केवळ २ - ३ घंटेच झोपतात. त्या स्वतः सतत प्रत्येक क्षणी वर्तमानात आणि आनंदात रहातात अन् सहसाधकांनाही वर्तमानात, आनंदात रहाण्यासाठी साहाय्य करतात.

नेतृत्व, तत्त्वनिष्ठा आणि प्रीती अशा विविध गुणांचा संगम असणार्‍या पू. (कु.) रेखा काणकोणकर यांच्याप्रती सौ. शालिनी मराठे यांनी अर्पण केलेली भावपुष्पांजली !

भोळ्या भावाचे मूर्तीमंत रूप पू. (कु.) रेखा काणकोणकर !
सौ. शालिनी मराठे
     रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णा कक्षाची फलनिष्पत्ती सर्वाधिक आहे. (तेथे रामराज्य आहे.) या कक्षाचे दायित्व सौ. सुप्रिया माथूर आणि पू. (कु.) रेखा काणकोणकर या पहातात. रामनवमीला (१५.४.२०१६) पू. रेखाताईचे संतत्व घोषित झाले आणि मन आनंदित होऊन डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या, त्या थांबेचनात. पाळेसारख्या आमच्या छोट्या खेडेगावातील कु. रेखाताई तळमळीने साधना करून संतपदाला पोहोचली, तेव्हा श्रीगुरुकृपेने तिच्यासमवेत आमचा अन् गावाचाही उद्धार झाला आहे, असे मला वाटले. देवाने दिलेली ही शब्दफुले पू. रेखाताईच्या चरणी कृतज्ञतेने वहात आहे.

     कु. रेखा काणकोणकर यांच्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे त्या संतपदाला पोचल्या आहेत. हे जरी खरे असले, तरी रेखाची वैशिष्ट्ये कोणती ?, हे कोणाच्याच लक्षात आले नाही. सौ. शालिनी मराठे यांनी हे कोडे अतिशय सुंदर शब्दांत उलगडून दाखवले आहे. त्यामुळे मला आनंद झाला.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
१. साधनाप्रवासास आरंभ
    दैनिक सनातन प्रभातची गोवा-सिंधुदुर्ग आवृत्ती चालू झाली, तेव्हा पाळे केंद्रातून १० साधक पूर्णवेळ होण्याच्या इच्छेने गोव्यातील दोनापावला येथे सेवेसाठी येऊ लागले. पू. रेखा काणकोणकर ही त्यांच्यापैकीच एक आहे.
बीज न पेरावें खडकीं ।
ओल नाहीं ज्याचे बुडखीं ॥ - संत तुकाराम महाराज
अर्थ : खडकाळ भूमीत, तसेच ओलावा टिकवून धरू शकत नसलेल्या भूमीत बीज पेरू नये. यानुसार ज्याच्यात भाव किंवा मुमुक्षुत्व आहे, अशा शिष्याकडेच गुरु लक्ष देतात.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - आषाढ पौर्णिमा (१९.७.२०१६) पहाटे ४.४० वाजता
समाप्ती - आषाढ कृष्ण पक्ष प्रतिपदा (२०.७.२०१६) पहाटे ४.२७ वाजता
आज पौर्णिमा आहे.


पूर्वीच्या काळी शिक्षकांना गुरु वा आचार्य असे संबोधत. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरु जसे शिष्यांना ब्रह्मज्ञान देतात, तसे शिक्षक मुलांना विद्यारूपी अमूल्य धन देतात; म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकदिन गुरुपौर्णिमेला साजरा करा. तसे केल्यास भारतीय संस्कृतीचे जतन होईल.


आज्ञापालनात सातत्य ठेवल्यास गुरुकृपेला पात्र होता येणे

    सातत्याने गुर्वाज्ञापालन करून सेवाभावाने साधना केल्यास कर्मयोग, ध्यानयोग आणि भक्तीयोग साधला जाऊन गुरुकृपेला पात्र होता येते. अशा प्रकारे साधनेच्या पहिल्या दोन टप्प्यांत संत अथवा गुरु यांच्या छायाचित्राचे महत्त्व असते. - (पू.) सौ. अंजली गाडगीळ

अक्षय पुण्यस्थान असलेला सनातनचा रामनाथी आश्रम !

देवतांच्या अस्तित्वाची अनुभूती देणारा आणि संतांच्या
चरणस्पर्शाने पावन झालेला सनातनचा रामनाथी आश्रम

सौ. नीलम दातेकर
१. चारी धाम, सर्व पुण्यक्षेत्रे आणि सर्व लोक यांतील
चैतन्य, शांती अन् समाधान असलेला सनातनचा रामनाथी आश्रम !
      चारी धाम, सर्व पुण्यक्षेत्रे, तसेच सप्तलोक, गणेशलोक आणि ब्रह्मलोक, कैलाशधाम अन् वैकुंठधाम इत्यादी सर्व लोक यांतील चैतन्य, शांती, समाधान कुठे एकवटलेले असेल, तर ते केवळ एकाच क्षेत्री आणि ते स्थान म्हणजे महाविष्णूचे निजधाम असलेले परमपवित्र असा रामनाथी आश्रम ! या अक्षय वास्तूची आठवण केली, तरी अक्षय पुण्य आणि चैतन्य लाभेल, असा हा वैकुंठधाम असलेला रामनाथी आश्रम !
२. महाविष्णूचा अवतार असणारे परात्पर गुरु डॉ. जयंत
आठवले यांच्या परम पवित्र, मंगल आणि चैतन्यदायी अशा या
पुण्यक्षेत्री वास्तव्य करायला मिळणे, हे साधकांचे अहोभाग्यच !
      महाविष्णूचे अवतार असणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या परम पवित्र, परम मंगल आणि चैतन्यदायी अशा रामनाथी आश्रमक्षेत्री वास्तव्य करायला मिळत आहे, हे आम्हा साधकांचे अहोभाग्यच आहे. (परात्पर गुरु डॉ. आठवले महाविष्णूचा अवतार आहेत, असा साधिकेचा वैयक्तिक भाव आहे. - संपादक) प्रत्यक्ष भगवंताच्या सान्निध्यामुळे पावन झालेल्या रामनाथी आश्रमात सर्व देवता, ऋषि-मुनी, संत यांचेे वास्तव्य आहे. अशा या पुण्यक्षेत्र आश्रमाचे वर्णन काय करावे ? त्याचे वर्णन करण्यास प्रत्यक्ष महाशेषांच्या सहस्रो जिव्हाही अपुर्‍या पडतील.

साधकांना सूचना, तसेच सनातन प्रभात नियतकालिकांचे वर्गणीदार आणि विज्ञापनदाते यांना विनंती !

      धर्माभिमानी हिंदू आणि जिज्ञासू यांना सनातन प्रभात नियतकालिकांच्या नूतन संकेतस्थळावरून नियतकालिकांचे (दैनिक वगळून अन्य) वर्गणीदार होता येणार आहे, तसेच वर्गणीदार त्यांच्या नियतकालिकाचे संकेतस्थळाद्वारे नूतनीकरणही करू शकतात.
       तसेच संकेतस्थळाद्वारे विज्ञापनदाते सनातन प्रभातच्या कोणत्याही नियतकालिकाला (दैनिकाच्या ४ आवृत्त्यांसहित) विज्ञापनेही देऊ शकतात. विज्ञापनदात्यांनी संकेतस्थळावर उपलब्ध असलेला ऑनलाइन फॉर्म भरल्यास संबंधित साधक पुढील कार्यवाहीसाठी विज्ञापनदात्याला संपर्क करतील.
संकेतस्थळाची मार्गिका (लिंक) पुढीलप्रमाणे www.sanatanprabhat.org/subscribe

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान 
मायेचे आकर्षण
सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते.
लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते.
भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

शिष्याने नेहमी सद्गुरूंशी एकनिष्ठ रहावे !
      भाग्याने सद्गुरु लाभल्यास शिष्याने एकनिष्ठ रहावे, म्हणजे त्याच्याही नकळत त्याचा आध्यात्मिक विकास होत जाईल.


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

संपादकीय

गुरुपौर्णिमा महोत्सव !
      गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात. शिष्याच्या जीवनातील अती मोलाचा दिवस आणि साधकांसाठी तर उत्साहाची पर्वणी ! गुरु-शिष्य परंपरा भारतात चालू झाली, त्यामुळे गुरुपौर्णिमेचा उत्सव भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पूर्वी गुरुकुलाच्या माध्यमातून शिक्षण मिळत असे. विद्यार्थी गुरूंच्या घरी राहून विद्यासंपादन करत होते. जीवनाचे सत्यज्ञान त्यांना गुरूंकडून प्राप्त होत होते. त्यातून त्यांचे जीवन फलदायी होत होते. त्या वेळचा समाज म्हणजे आदर्श जीवनशैलीचे प्रतीक होते. भ्रष्टाचार नाही कि अराजक नाही कि अत्याचार नाहीत. भारतातील हे सात्त्विक वातावरण ब्रिटिशांना परवडणारे नव्हते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn