Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या ४१ व्या संत पू. प्रमिला प्रभुदेसाई यांचा आज वाढदिवस

सनातनचे कार्य योग्य असल्यानेच वारकर्‍यांचा खंबीर पाठिंबा ! - ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र वारकरी महामंडळ

वारकरी संत अधिवेशनात सहभागी संत, वारकरी आणि मान्यवर
पंढरपूर येथे वारकरी संत अधिवेशन
कठीण काळातही सनातनच्या पाठीशी उभे रहाणारा वारकरी
संप्रदाय आणि संत यांच्या चरणी सनातन संस्था कृतज्ञ आहे !
   पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १७ जुलै (वार्ता.) - केवळ आरोप झाला म्हणून कुणी गुन्हेगार आहे, असे म्हणता येणार नाही. मडगाव स्फोटप्रकरणी सनातनच्या ६ साधकांना अटक केली होती; मात्र ते सर्व या खटल्यातून निर्दोष मुक्त झाले. हे कोणत्याही माध्यमांनी समोर आणले नाही. सनातन संस्था धर्माचे योग्य आणि चांगले कार्य करत आहे; म्हणूनच आमचा सनातनला पाठिंबा आहे. संस्थेचे प्रवक्ता वृत्तवाहिन्यांवर परखडपणे विषय मांडतात, हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी काढले. आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर येथील एकनाथ भवन येथे १७ जुलै या दिवशी पार पडलेल्या वारकरी संत अधिवेशनात ते बोलत होते. या अधिवेशनात वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांनी सनातनवर बंदी आणू नये या ठरावसह अन्य ठराव हर हर महादेवच्या जयघोषाने एकमुखाने संमत केले. या संमेलनात सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत या सनातनच्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ह.भ.प. मुरलीधर महाराज धूत यांनी म्हटलेल्या पसायदानाने अधिवेशनाची सांगता झाली.

केरळमधील सलाफी विचारसरणीच्या धर्मांध युवकांचे श्रीलंका हे नवीन आकर्षण !

      कोझिकोडे (केरळ) - केरळमधील धर्मांध सलाफी विचारसरणीचे युवक आता इस्लामच्या अभ्यासासाठी श्रीलंकेमध्ये जात असल्याचे समोर आले आहे. याआधी येमेन हे केरळमधील सलाफींचे आकर्षण केंद्र होते. 
      ३ वर्षांपूर्वी मलप्पुरम् जिल्ह्यातील निलांबूर येथून किमान १२ मुसलमान तरुण येमेनच्या दम्माज येथील दारुल हदीस येथे गेले होते. हे ठिकाण इस्लामचे प्रकाशगृह असल्याची सलाफींची धारणा आहे. परंतु त्यानंतर येमेनमधील सरकार आणि तेथील हौथी बंडखोर यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार दारुल हदीसमधील सर्व विदेशी विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्यात आली.

सनातनवरील बंदी विरोधात मुख्यमंत्र्यांकडे विषय मांडू !

रोजगार हमी आणि पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल 
आणि भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांचे आश्‍वासन ! 
(वाहनामध्ये) महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री श्री. जयकुमार
रावल यांना निवेदन देतांना डॉ. नरेंद्र पाटील आणि श्रीमती भावना कदम.
उजवीकडून दुसर्‍या श्रीमती भावना कदम, त्यांच्या शेजारी
डॉ. नरेंद्र पाटील आणि निवेदन स्वीकारतांना आमदार उदेसिंग पाडवी
       नंदुरबार - सनातन संस्था आध्यात्मिक आणि राष्ट्र जागरणाचे कार्य करणारी चांगली संस्था असल्याचे आम्ही जाणून आहोत. सनातनचे राष्ट्र आणि धर्म कार्य सर्वांत चांगले आहे. आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी असून सनातनवर बंदी येऊ नये; म्हणून मुख्यमंत्र्यांकडे अवश्य विषय मांडू, असे आश्‍वासन महाराष्ट्राचे रोजगार हमी आणि पर्यटन (कॅबिनेट) मंत्री तथा दोंडाईचा (जिल्हा धुळे) येथील आमदार श्री. जयकुमार रावल यांनी सनातनच्या साधकांना दिले, तर तळोदा (जि. नंदुरबार) येथील भाजपचे आमदार श्री. उदेसिंह पाडवी म्हणाले, सनातनच्या कार्याविषयी आम्हाला आदर आहे. शासनाकडे आम्ही बंदीच्या विरोधात विषय मांडू.
       श्री. जयकुमार रावल आणि श्री. उदेसिंह पाडवी यांची १५ जुलैला नंदुरबार येथील हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील आणि सनातनच्या साधिका श्रीमती भावना कदम यांनी भेट घेऊन बंदीच्या विरोधातील विषयाचे निवेदन दिले. त्या वेळी या दोन्ही लोकप्रतिनिधींनी उपरोक्त आश्‍वासन दिले.

सनातनवर बंदीची मागणी करणार्‍या पुरोगामी संघटना झाकीर नाईक यांच्या विरोधात अवाक्षरही काढत नाहीत ! - अभय वर्तक, सनातन संस्था

श्री गुरुबाबासाहेब आजरेकर फडात 
सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या संदर्भात सभा 
श्री गुरुबाबासाहेब आजरेकर मठावर विषय मांडतांना सनातन संस्थेचे प्रवक्ते
श्री. अभय वर्तक आणि व्यासपिठावर बसलेले ह.भ.प. गुरु तुकाराम एकनाथ काळे महाराज
        पंढरपूर - अजून कोणतीही अन्वेषण यंत्रणा अथवा कोणतीही न्याय यंत्रणा यांनी सनातन संस्थेला दोषी ठरवलेले नसतांना केवळ हिंदुद्वेषापोटी पुरोगामी संघटना सनातनवर बंदीची मागणी करत आहेत. सनातवर बंदीची मागणी करणार्‍या या संघटना अनेक आतंकवाद्यांना उत्तेजन देणार्‍या आणि हिंदु धर्मावर अश्‍लाघ्य टीका करणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात अवाक्षर काढत नाहीत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी व्यक्त केले. श्री गुरुबाबासाहेब आजरेकर फडात ह.भ.प. गुरु तुकाराम एकनाथ काळे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी २०० हून अधिक वारकरी सांप्रदायिक उपस्थित होते.

सनातन संस्थेचे उपक्रम चारित्र्यसंपन्न पिढी घडवणारे !

भाजपचे आमदार श्री. सरदार तारासिंह यांचे 
सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र ! 

(बसलेले) आमदार तारासिंह यांना निवेदन देतांना सौ. आशा गंगाधरे आणि श्री. सतीश सोनार

        मुंबई, १७ जुलै (वार्ता.) - सनातन संस्था ही मागील १७ वर्षे व्यक्तीची पारमार्थिक उन्नती व्हावी, तसेच समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मविषयक प्रबोधन या उदात्त हेतूंनी कार्यरत आहे. समाजाचे अध्यात्म आणि धर्म यांविषयीचे अपसमज दूर व्हावेत अन् समाज नीतीमान व्हावा, यासाठी सनातन संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहे. सनातन संस्थेचे उपक्रम चारित्र्यसंपन्न पिढी घडवणारे आहेत, असे प्रशंसोद्गार भाजपचे आमदार तारासिंह यांनी काढले. सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात आमदार श्री. तारासिंह यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अशा प्रकारे सनातन संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली आहे. सनातन संस्थेवरील बंदीविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार आणि सनातनच्या साधिका सौ. आशा गंगाधरे यांनी आमदार श्री. तारासिंह यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी वरील माहिती दिली.

आपल्याला हिंदु राष्ट्राचे साक्षीदार नको, तर कृती करून भागीदार व्हायचे आहे ! - मनोज खाडये

पावनखिंड मोहीम आयोजन बैठक 
        मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), १७ जुलै (वार्ता.) - सध्या राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात वाढत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही अशीच स्थिती होती. त्या वेळी मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत संघटित होऊन लढा दिला. स्वराज्यासाठी प्रेरणास्रोत असलेल्या गट-कोटांची स्थिती सध्या वाईट आहे. या गट-कोटांच्या माध्यमातून शिकण्याऐवजी आजचे तरुण मद्यपान, तसेच मौजमजा-पर्यटन म्हणून गडांवर जात आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी पावनखिंड मोहिमेचे आयोजन केले आहे. आपल्याला हिंदू राष्ट्राचे साक्षीदार नको, तर कृती करून भागीदार व्हायचे आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी व्यक्त केले. मलकापूर येथील राममंदिर २० जुलै या दिवशी होत असलेल्या पावनखिंड मोहिमेच्या आयोजनाच्या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

काश्मीरमध्ये दगडफेकीसाठी दंगलखोर धर्मांधांना मिळतात ५०० रुपये !

      श्रीनगर - काश्मीरमधील हिंसाचारामागे पाकिस्तान आणि फुटीरतावादी यांचा हात असल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील एका व्हिडिओमधून ही माहिती उघड झाली आहे. (अशी कितीही माहिती मिळाली, तरी भारत सरकार पाक आणि फुटीरतावादी यांच्यावर काहीही कारवाई करणार नाही, हेच सत्य आहे ! - संपादक)
     हुर्रीयत कॉन्फरन्सच्या जहाल गटाचे नेते सईद अली शहा गिलानी यांचे हस्तक दगडफेक करण्यासाठी प्रतिदिन ५०० रुपये या दराने पैसे देतात, असे यामध्ये सहभाग असलेला आरोपी सांगत आहे, असे सदर व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. एकाला ५०० रुपये मिळतात आणि आमच्या गटात २५-३० मुले आहेत, असा दावाही आरोपीने व्हिडीओमध्ये केला आहे. या हिंसाचारासाठी पाकची गुप्तचर संस्था आयएस्आयने ६० कोटी रुपये खर्च केल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे.काश्मीरमध्ये प्रसारमाध्यमांवर ३ दिवसांची बंदी !

      श्रीनगर - जम्मू-काश्मीर राज्याच्या प्रशासनाने काश्मीर खोर्‍यातील प्रसारमाध्यमांवर ३ दिवसांसाठी बंदी घातली आहे. प्रशासनाने एका स्थानिक दैनिकाच्या कार्यालयावर १५ जुलैच्या रात्री छापा मारून दैनिकाच्या प्रती जप्त केल्या. तसेच उर्दू आणि इंग्रजी वर्तमानपत्रांच्या छापखान्याला टाळे ठोकले. याव्यतिरिक्त कामगारांनाही कह्यात घेण्यात आले. काश्मीर रीडर, तामिल-ए-इरशाद, काश्मीर टाइम्स, काश्मीर ऑब्जर्व्ह, द काश्मीर मॉनेटर, काश्मीर एज आणि ब्रायटर काश्मीर या वृत्तपत्रांचे प्रकाशन काश्मीरमधील केटी या ठिकाणावरून केले जात होते. या छाप्याच्या विरोधात पत्रकारांनी आंदोलन केले. वर्ष १९९० नंतर प्रथमच अशा प्रकारची बंदी घालण्यात आली आहे.

इंडिया टुडेवरील योगऋषी रामदेवबाबा यांच्या छायाचित्रावरून त्यांचा सामाजिक संकेतस्थळांवरून अवमान !

संतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात सरकारने कारवाई करायला हवी ! 
     हिसार (हरियाणा) - इंडिया टुडे या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर योगऋषी रामदेवबाबा यांचे योगासन करतांनाचे एक छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे. त्यात पॉवर योगी असा त्यांचा अवमानकारक उल्लेख करण्यात आला आहे. त्या छायाचित्राद्वारे सामाजिक संकेतस्थळांवरूनही त्यांचा अवमान केला जात आहे. काही जणांनी याचा विरोधही केला आहे. (हिंदूंमध्ये असलेल्या स्वधर्मासंदर्भातील अनास्थाच अशा घटनांना कारणीभूत आहे. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांचे प्रभावी हिंदूसंघटन करणे, ही काळाची आवश्यकता आहे, हे जाणा ! - संपादक)

काही प्रसारमाध्यमांचे आतंकवाद्यांना समर्थन ! - रॉच्या माजी अधिकार्‍याचा दावा

अशा प्रसारमाध्यमांवर कायमची बंदी घालून त्यांच्या मालकांना कारागृहात डांबले पाहिजे !
     नवी देहली - काही प्रसारमाध्यमे आतंकवाद्यांचे समर्थन करत आहेत. असे केवळ भारतातच होऊ शकते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अशा वाहिन्यांवर काही दिवसांसाठी बंदी घातली पाहिजे, ज्या आतंकवाद्यांना हिरो बनवत आहेत किंवा फुटीरतावाद्यांना साहाय्य करत आहेत. बंदी घातल्यास त्यांना धडा मिळेल, असे परखड मत रॉ या गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी अमर भूषण यांनी एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

केरळच्या डाव्या आघाडी सरकारकडूनही महिला प्रवेशबंदीचे समर्थन !

शबरीमला मंदिर महिला प्रवेशाचे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण
     नवी देहली - केरळच्या शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नुकतेच सुनावणीसाठी आले असता केरळच्या डाव्या आघाडी सरकारनेही आधीच्या काँग्रेस शासनाने घेतलेल्या धोरणाप्रमाणे प्राचीन काळापासून चालू असलेल्या रूढीचे म्हणजेच १० ते ५० वर्षे वयामधील महिला प्रवेशबंदीचे समर्थन केले. (आता कथित स्त्री समानतेचा पुरस्कार करणारे पुरोगामी गप्प का ? - संपादक) विशेष म्हणजे वर्ष २००८ मध्ये केरळ राज्यात डाव्या आघाडीचे शासन असतांना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करून शबरीमला मंदिरात महिला प्रवेशबंदीला स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली विरोध केला होता; मात्र त्यानंतर आलेल्या काँग्रेसप्रणीत शासनाने हे शपथपत्र मागे घेऊन प्राचीन रूढी आणि परंपरा यांना शासन विरोध करणार नाही, अशा आशयाचे शपथपत्र दाखल केले होते.
     ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठासमोर सुनावणीस आली असता न्यायमूर्तींनी शासनाच्या अधिवक्त्यांना विचारले की, केरळ राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यामुळे शासनाच्या भूमिकेत काही पालट झाला आहे का ? यावर वरिष्ठ अधिवक्ता व्ही. गिरी यांनी सध्यातरी शासनाने त्याची भूमिका पालटलेली नाही, असे सांगितले.

त्यांना इस्लामी आतंकवादी म्हणू नका, ते अल्लाचे शिपाई आहेत ! - तस्लिमा नसरीन

     नवी देहली - फ्रान्सच्या नीस येथे आक्रमण करणार्‍यांना इस्लामी आतंकवादी म्हणू नका, ते अल्लाचे शिपाई आहेत, अशी टीका बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी उपरोधिकपणे केली आहे. फ्रान्स येथील नृशंस आक्रमणानंतर ट्वीट करतांना तस्लिमा म्हणाल्या, या आतंकवाद्यांनी फ्रान्समध्ये ८० लोकांना ठार मारले, ते असे कृत्य पुन्हा करतील. त्यांना प्रत्येक ठिकाणी अल्लाचा कायदा स्थापन करायचा आहे. नीस येथे १४ जुलैच्या रात्री फ्रान्सचा राष्ट्रीय दिन साजरा होत असतांना फ्रेंच रिवेरा रिसॉर्टमध्ये प्रचंड गर्दीच्या ठिकाणी ३१ वर्षीय आतंकवाद्याने अचानक ट्रक घुसवून शेकडो जणांना चिरडले. यात ८४ जण ठार झाले होते.

मुसलमानबहुल मलेशियात हिंदूंच्या आणखी २ मंदिरांची विटंबना !

जे भारतात काही वर्षांपूर्वी चालू 
होते, तेच आता मलेशियातही होत आहे !
       कुआलालंपूर - मलेशिया देशातील महांग आणि सेलामा येथील २ मंदिरांची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केल्याचे उघडकीस आले आहे. ही दोन्ही मंदिरे एकमेकांपासून ४ किलोमीटर अंतरावर आहेत. त्यावरून दोन्ही घटनांत एकाच गटाचा हात असावा असे दिसून येते.
       येथील दि स्टार ऑनलाईन या संकेतस्थळावर आलेल्या वृत्तानुसार मंदिराच्या पुजार्‍यास मुथूमारीयाम्मा देवीच्या महांग येथल मंदिरातील मूर्ती मूळ जागेवरून उचलून तोडण्यात आल्याचे दिसून आले. तसेच टोंग हर्स्ट इस्टेट, सेलामा येथील सुबा श्री शक्ती कानागावाल्ली मंदिराचे मुख्य द्वार उचकटून तोडण्यात आले आणि तेथील २ मूर्ती फोडण्यात आल्याचे याच दिवशी दुपारी लक्षात आले. या दोन्ही मंदिरांतील मूर्तींच्या खाली ठेवलेले देवतांचे दागिनेही चोरीस गेल्याचे आढळून आले. कुळीम येथील पोलीस उप-प्रमुख बरुदिन वारीसो यांनी माहिती दिली की, या दोन्ही प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. पेनांग राज्यात गेल्या २ मासांत अनेक मंदिरांची विटंबना झाली आहे. जॉर्ज टाऊनमधील जालन तेंगकू कुदिन येथील श्री मुनिश्‍वर मंदिरातील ३ मूर्ती तोडण्यात आल्या. एप्रिल मासात इपोह येथील मंदिरातही असाच प्रकार घडला.

(म्हणे) मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे भ्रष्टाचाराचा विस्तार !

घोटाळेबाज काँग्रेसचे विरोधी 
पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका
      मुंबई, १७ जुलै (प्रतिनिधी) - राज्यातील भाजप-शिवसेना युती शासनाच्या अंतर्गत असणार्‍या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि घोटाळा यांचे आरोप होत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे भ्रष्टाचाराचा विस्तार आहे. सत्तेतील भ्रष्ट मंत्र्यांना बडतर्फ केले पाहिजे. राज्यात वाढत चालणारे बलात्काराचे प्रकार, सावकाराकडून शेतकर्‍यांचा होणारा छळ आणि शेती प्रश्‍नावर युती शासनाची अनास्था, डाळ वितरणात झालेला भ्रष्टाचार, सैराटाप्रमाणे सैरभैर झालेल्या शासनाचा अनागोंदी कारभार आदी कारणांमुळे विरोधी पक्ष आणि नेते यांच्या वतीने या सर्व गोष्टींचा निषेध करून आम्ही चहापानावर बहिष्कार घातलेला आहे, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी १७ जुलै या दिवशी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. (यापूर्वी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असतांना भ्रष्ट आणि महाघोटाळे करणारे मंत्री होते. त्यांच्यावर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. आपल्या तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे असे करण्याऐवजी स्वतःच्या पक्षातील दोषी लोकप्रतिनिधींवर पक्षाने का कारवाई केली नाही, याचा खुलासा राधाकृष्ण विखे-पाटील करतील का ? - संपादक) सत्ताधिकार्‍यांनी बोलावलेल्या चहापानावर या वेळी विरोधकांनी बहिष्कार घातला.

स्वत:स अनुकूल अशा निर्णयांसाठी तत्कालीन काँग्रेस सरकारचा रिझर्व्ह बँकेवर होता दबाव !

डॉ. सुब्बाराव यांच्या आरोपावरून काँग्रेस सरकारने देशावर कसे राज्य केले असेल, हे लक्षात येते !
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांचा आरोप 
     मुंबई - तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार त्यास अनुकूल असे निर्णय घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर दबाव टाकत होते, असा आरोप रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी केला आहे. सुब्बाराव त्यांच्या हू मूव्हड् माय इंटरेस्ट रेट या पुस्तकाद्वारे पुढे म्हणतात की, वाढत्या महागाईमुळे व्याजदरात वृद्धी करण्याची आवश्यकता असतांना माजी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि पी. चिदंबरम् यांनी गुंतवणूक वाढवण्यासाठी व्याजदर अल्प करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारे माझ्यावर दबाव आणला होता. (पक्षाच्या लाभापोटी देशाचे हित न पहाणारे राष्ट्रद्रोहीच होत ! अशांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! - संपादक)

डॉ. झाकीर यांच्या समर्थनार्थ पीएफ्आयने काढलेल्या मोर्च्याला अभाविपचा विरोध !

डॉ. झाकीर नाईक यांचे समर्थन करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया 
(पीएफ्आय) या जिहादी संघटनेवर बंदी घातली पाहिजे !
     बरहरवा (बिहार) - येथे १६ जुलै या दिवशी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) या जिहादी संघटनेच्या २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी डॉ. झाकीर नाईक यांच्या समर्थनार्थ आणि असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात चालू असणार्‍या कथित मीडिया ट्रायलच्या विरोधात मोर्चा काढला. त्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविपच्या) कार्यकर्त्यांनी विरोध केला. (देशद्रोह्यांना विरोध करणार्‍या अभाविपचे अभिनंदन ! - संपादक) यामुळे येथे तणाव निर्माण झाला; मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने स्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी पीएफ्आयच्या कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आणि नंतर जातमुचलक्यावर त्यांना सोडण्यात आले. हा मोर्चा विनाअनुमती काढण्यात आला होता आणि याची माहिती पोलिसांना देण्यात आली नव्हती. (विनाअनुमती आणि कोणतीही माहिती न देता २०० धर्मांध मोर्चा काढतात आणि पोलिसांना याची माहिती मिळू शकत नाही, हे धोकादायक आहे. अशा जिहाद्यांनी उद्या सशस्त्र आक्रमण केले, तर पोलीस काय करणार ? सनातनवर लक्ष ठेवणारे आणि सनातनच्या शेकडो साधकांची कसून चौकशी करणारे पोलीस जिहादी संघटनेकडे मात्र दुर्लक्ष करतात ! - संपादक)

धर्मासाठी क्रिकेटही सोडण्यास सिद्ध आहे ! - ब्रिटीश क्रिकेटपटू मोईन अली

किती हिंदु क्रिकेटपटू आतापर्यंत असे बोलले आणि पुढे बोलतील ?
     लंडन - धर्मासाठी क्रिकेटही सोडण्यास सिद्ध आहे, असे मत इंग्लंडचे अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अली यांनी व्यक्त केले आहे. इस्लाम धर्म, मुसलमान आणि ब्रिटीश आशियाई लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचे दायित्व माझ्यावर आहे. मी इस्लाम धर्मात जन्मलो, याचा मला आनंद होतो. क्रिकेट मला प्रिय आहे; परंतु त्यापेक्षाही मला माझा धर्म अधिक प्रिय आहे, असेही ते म्हणाले.

चीन म्हणतो, अमेरिका आणि जपान कागदी वाघ, षंढ !

      बीजिंग - दक्षिण चीन समुद्रातील बेटांवरील हक्क सोडण्याच्या आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयावरून अमेरिका आणि जपान यांनी चीनच्या विरोधात भूमिका घेतल्यावर चीनने त्यांच्यावर कागदी वाघ आणि षंढ अशा शब्दांत टीका केली आहे. दक्षिण चीन समुद्रात चीन हक्क सांगत असलेल्या बेटांजवळ अमेरिकी युद्धनौकांनी सराव केल्यास चीनच्या सैन्याने प्रतिआक्रमण करण्याच्या सिद्धतेत रहावे, असे ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्राच्या अग्रलेखात म्हटले आहे.
     ग्लोबल टाइम्स हे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र आहे. ऐतिहासिक हक्कांच्या आधारे दक्षिण चीन समुद्रातील बेटांवर हक्क सांगत असलेले चीनचे दावे या लवादाने रहित ठरवले होते. त्याच समुद्रावर फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई, तैवान या देशांचेही दावे आहेत.

वारकरी संप्रदायाकडून सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा सत्कार

श्री. आप्पासाहेब सांगोलकर (उजवीकडे) यांचा
सत्कार करतांना ह.भ.प. राम महाराज कदम (डावीकडे)

श्री. अभय वर्तक (डावीकडे) यांचा सत्कार करतांना
ह.भ.प. गुरु तुकाराम एकनाथ काळे महाराज (उजवीकडे)

        आषाढी दिंडीच्या निमित्ताने सनातन संस्थेवर होत असलेल्या आरोपांविषयी माहिती देतांना सनातन संस्थेचे साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी विविध दिंड्या, पालखी, मठ, संप्रदाय यांच्या भेटी घेतल्या. या वेळी अनेकांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक करून सनातनचे साधक यांचा सन्मान केला. त्यातील काही प्रातिनिधीक सत्कार येथे देत आहोत.
१. पुणे येथील वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळ नीरवांगी मुक्कामी असतांना त्यांच्या दिंडीसमोर श्री. सुनील घनवट यांनी विषय मांडला. या वेळी हिंदु जनजागृती समिती संस्कार आणि प्रबोधन यांचे कार्य करत असल्याविषयी दिंडीच्या वतीने श्री. सुनील घनवट यांचा सत्कार करण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणांत निर्दोष सनातन संस्थेचा चौकशीच्या
नावाखाली होणारा छळ थांबवण्याची आणि सनातनवर बंदी न आणण्याची मागणी !
   पंढरपूर, १७ जुलै (वार्ता.) - पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणांत निर्दोष सनातन संस्थेचा चौकशीच्या नावाखाली होणारा छळ थांबवावा आणि सनातनवर बंदी आणू नये, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांना भेटून दिले. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री पंढरपूर येथे असतांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुणगे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. नीलेश सांगोलकर, रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे आणि सनातन संस्थेचेे श्री. आप्पासाहेब सांगोलकर हे उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना संशयित म्हणून अटक केली आहे. या प्रकरणाचे अन्वेषण उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू असून न्यायालयाने २३ जून या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी अन्वेषण यंत्रणांवर तीव्र शब्दांत ताशेरे मारून अप्रसन्नताही व्यक्त केली आहे.

शाळेत ख्रिस्ती महिला प्राचार्याचे हिंदु देवतेच्या रूपात चित्र लावल्याने त्यांना बडतर्फ करण्याची मागणी

विदेशातील हिंदूंप्रमाणे भारतातील हिंदूंना स्वधर्माचा अभिमान का नाही ?
     लंडन - इंग्लंडमधील क्वीन्स माध्यमिक शाळेत ख्रिस्ती महिला प्राचार्याचे हिंदु देवतेच्या रूपात चित्र लावल्याने शाळेच्या आजी आणि माजी कर्मचार्‍यांनी प्राचार्य रशेल व्हाईट यांना बडतर्फ करावे, या मागणीसाठी शाळेसमोर निदर्शने केली. 
     शाळेत उत्कृष्ट काम केल्याविषयी शाळेच्या व्यवस्थापनाने रशेल व्हाईट यांचा सत्कार करून त्यांचे हिंदु देवतेच्या रूपातील मोठे तैलचित्र शाळेच्या दर्शनीय भागात लावले होते. त्यामुळे स्थानिक हिंदू आणि शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त करून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप प्राचार्यांवर केला होता. त्यामुळे हे चित्र त्वरित काढण्यात आले होते. त्यानंतर शाळेचे साहाय्यक प्राचार्य डेव्हिड पोसनर यांच्या उपस्थितीत शाळेच्या आजी आणि माजी कर्मचार्‍यांनी शाळेच्या प्रांगणात निदर्शने करून रशेल व्हाईट यांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली. व्हाईट यांची शाळेच्या शिक्षकांशी आणि कर्मचार्‍यांशी वागणूक चांगली नाही, असाही आरोप या वेळी करण्यात आला.भारतमाता की जय म्हणण्यास अडचण असणार्‍यांनी भारत अम्मी की जय म्हणावे ! - शिया धर्मगुरु मौलाना कल्बे सादिक

      लक्ष्मणपुरी (लखनऊ) - ज्यांना भारत माता की जय म्हणण्यास आक्षेप आहे, त्यांनी भारत अम्मी की जय म्हणावे, असा सल्ला शिया धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांनी दिला आहे.(मौलाना कल्बे सादिक यांचा सल्ला सुन्नी मानतील का ? - संपादक) येथील इरा मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
    ते पुढे म्हणाले की, निरपराध्यांची हत्या घडवणारे पिसाळलेले कुत्रे आहेत. जे हिंसेचा आधार घेतात ते स्वत:ही संपून जातात. फक्त शिक्षण आणि शिक्षणच मुसलमान समाजाची जगातील सध्याची परिस्थिती पालटू शकते. (उच्चशिक्षित मुसलमान तरुणही जिहादी आतंकवादी झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळे शिक्षणामुळेच परिस्थिती पालटेल, असे नसून त्यांना शिकवण्यात येणारी जिहादी विचारसरणी थांबवली, तरच हे पालटू शकते ! - संपादक)

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुबळ्ळी (कर्नाटक) येथे केएल्ई ध्वनी बीव्हीबी एफ्.एम्. ९०.४ वर गुरुपौर्णिमा महोत्सवाचा प्रसार !

एफ्. एम्. रेडिओवर माहिती सादर करतांना
हिंदु जनजागृती समितीच्या कु. स्फूर्ती
बेनकनवारी (उजवीकडे)
      हुबळ्ळी (कर्नाटक) - गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने येथील केएल्ई ध्वनी बीव्हीबी एफ्.एम्. ९०.४ या आकाशवाणी (रेडिओ) वाहिनीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माहिती सादर करण्यात आली. या वेळी समितीच्या कार्यकर्त्या कु. स्फूर्ती बेनकनवारी यांनी गुरु आणि गुरुपौर्णिमा महोत्सव या विषयावर बोलतांना गुरूंची महती सांगितली, तसेच निष्काम सेवेमुळे साधकाला कसा लाभ होतो, याचेही महत्त्व विशद केले.
       १९ जुलैला होणार्‍या गुरुपौर्णिमेचा जिज्ञासूंनी लाभ घ्यावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
आमीर खान यांनी केलेल्या कोणताही धर्म आतंकवाद शिकवत नसून एखाद्या धर्माचा चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जातो, या वक्तव्यावर हिंदूंनी संकेतस्थळावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया !

     अभिनेता आमीर खान यांनी ७ जुलै या दिवशी ईदनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कोणताही धर्म आतंकवाद शिकवत नसून एखाद्या धर्माचा चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जातो. आतंकवाद आणि धर्म यांचा संबंध लावला जाऊ नये, असे वक्तव्य केले होते. आमीर खान यांच्या या वक्तव्यावर अनेक हिंदूंनी ई सकाळ या संकेतस्थळावर सडेतोड प्रतिक्रिया नुकत्याच व्यक्त केल्या. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया येथे देत आहोत.

पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदु धर्माचे योग्य वर्णन करण्याची कॅलिफोर्नियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरांची मागणी

आता अमेरिकेतही शिक्षणाचे भगवेकरण करण्यात 
येत आहे, असे तथाकथित धर्मनिरपेक्षवादी म्हणतील !
        वॉशिंग्टन - अमेरिकेतील भारतवंशीय तरुण आणि हिंदु-अमेरिकी विद्यार्थी यांना हिंदु धर्माविषयी योग्य माहिती व्हावी, यासाठी अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियाचे लेफ्टनंट गव्हर्नर गाविन न्यूसॉम आणि ४० वरिष्ठ शिक्षणतज्ञ यांच्या एका समुहाने तेथील शाळांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदु धर्माचे योग्य आणि यथोचित वर्णन करण्याची मागणी केली आहे. यात कॅलिफोर्नियाच्या स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशनला लिहिलेल्या पत्रात त्यांनी मूळ भारतवंशीय युवक आणि हिंदु-अमेरिकी विद्यार्थी यांना त्यांचा इतिहास योग्य अन् चांगल्या प्रकारे शिकवण्यासाठी विचार करण्याविषयी सूचना केली. (अमेरिकेतील शिक्षणतज्ञांना हिंदु धर्माविषयी आस्था आहे, तशी आस्था भारतातील शिक्षणतज्ञांना का नाही ? अमेरिकेतील शिक्षणतज्ञांप्रमाणे भारतातील शिक्षणतज्ञांनीही पुढे येऊन हिंदूंचा खरा इतिहास शिकवण्यासाठी शासनावर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे ! - संपादक)

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांना कायदेशीर नोटीस

   रामनाथी, १७ जुलै (वार्ता.) - पुणे येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने २० जून २०१६ या दिवशीच्या अंकात फॉर धिस कल्ट, क्रिटिक्स आर् डिमोन्स या मथळ्याखाली मानहानीकारक लेख प्रसिद्ध करून सनातन संस्थेची मानहानी केली. या प्रकरणी सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्या मार्फत १० कोटी रुपये मानहानी भरपाई मागणीची कायदेशीर नोटीस दैनिक टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांना बजावली आहे.
   सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या समाजातील वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा समाजात असलेला नावलौकिक माहीत असतांना मानहानी करण्याच्या हेतूने दैनिक टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीच्या २० जून २०१६ या दिवशीच्या अंकात लेख प्रसिद्ध केला. त्यामुळे संस्थेची अपरिमित हानी झाली आहे.

राऊरकेला (ओडिशा) येथे धर्मांध विद्यार्थ्याकडून फेसबूकवरून श्रीरामाचा अवमान

सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी धर्मांधांचे अतीलांगूलचालन केल्यामुळेच त्यांना
कायद्याचे भय राहिलेले नाही ! त्यामुळेच ते हिंदूंवर आक्रमण करण्यास धजावतात !
  • प्रत्युत्तर देणार्‍या हिंदु विद्यार्थ्याला मारहाण 
  • मुसलमानबहुल भागात कावड यात्रेवरही आक्रमण
  • पोलिसांकडून हिंदु विद्यार्थ्यालाच अटक
   राऊरकेला (ओडिशा) - येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते राजेश तिवारी यांचा महाविद्यालयात शिकणारा मुलगा अंकित तिवारी याने फेसबूकवर श्रीरामाविषयी केलेल्या पोस्टवर त्याचा सहकारी विद्यार्थी महंमद सुभान याने अवमानकारक प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावर अंकितने प्रत्युत्तर दिल्यावर सुभान याने १५ धर्मांधांना आणून अंकित याला महाविद्यालयातच मारहाण केली. तसेच पोलिसांनी सुभान आणि धर्मांधांना अटक करण्याऐवजी अंकित यालाच अटक करण्याची घटना १३ जुलैला घडली. (चोर सोडून संन्याशाला फाशी देणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? - संपादक) या संदर्भात हिंदूंनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी धर्मांधांनी येथील कावड यात्रेला लक्ष्य करून ती रोखली आणि त्याचा मार्ग पालटण्यास पोलिसांना भाग पाडले. (राज्यातील बिजू जनता दल शासन काय करत आहे ? ओडिशात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात नसल्याचे हे उदाहरण होय ! - संपादक)

सनातनवर बंदी येणे शक्य नाही ! - गिरीश महाजन, जलसंपदामंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री

श्री. गिरीश महाजन (उजवीकडे) यांना निवेदन देतांना सनातनचे संत
पू. नंदकुमार जाधव, सोबत साधिका सौ. मीनाक्षी पाटील आणि सौ. स्मिता पाटील
    जळगाव - सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या मागणीच्या विरोधात येथील भाजपचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ते म्हणाले, सनातनवर बंदी येणे शक्य नाही. सनातनवर बंदी येऊ नये, यासाठी आम्ही त्या प्रक्रियेत सहभागी आहोत. या वेळी सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव, सौ. मीनाक्षी पाटील, सौ. स्मिता पाटील, हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे आणि रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर उपस्थित होत्या.

नारायणगुरु महाराज संस्थान यांच्या वतीने सनातन संस्थेच्या कार्याला पाठिंबा !

नारायणगुरु महाराज संस्थान माहुली धांडे 
पालखी सोहळ्यात सनातन संस्थेच्या वतीने प्रबोधन !
       पंढरपूर - येथील चंद्रभागेच्या तीरावर कासारघाट नगरेश्‍वर मंदिरात नारायण गुरु महाराज संस्थानचा पालखी सोहळा संपन्न होत आहे. हा सोहळ्यात सनातन संस्थेला विषय मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू रावकर महाराज यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. श्री. अभय वर्तक यांनी सनातन संस्थेवर कशाप्रकारे वृथा आरोप होत असून एका अध्यात्मप्रसार करणार्‍या संस्थेला कशाप्रकारे त्रास दिला जात आहे, ते सांगितले. या वेळी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या संदर्भात नारायणगुरु महाराज संस्थान माहुली धांडे पालखी सोहळ्याच्या वतीने ह.भ.प. सुधाकर जोशी यांनी सनातन संस्थेला पाठिंबा घोषित केला. या वेळी ५० हून अधिक वारकरी बांधव आणि भगिनी उपस्थित होते.

नाशिक येथे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भव्य प्रसारफेरीचे आयोजन !

       नाशिक - येथील नाशिकरोड भागात १९ जुलै या दिवशी होणार असलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भव्य आणि शिस्तबद्ध प्रसारफेरी भावपूर्ण वातावरणात काढण्यात आली. या वेळी नागरिकांना गुरुपौर्णिमा सोहळ्याला सहकुटुंंब उपस्थित रहाण्याचे उद्घोषणेद्वारे निमंत्रण देण्यात आले. फेरीत साधकांनी हातात कापडी पिवळ्या रंगाचे फलक धरलेले होते. फेरीत ७० हून अधिक साधक उपस्थित होते. प्रसारफेरीच्या मार्गातील नागरिकांनी फेरी चांगली असल्याचे सांगितले.
क्षणचित्रे
१. फेरी चालू होण्यापूर्वी पाऊस पडत होता; मात्र फेरी चालू झाल्यावर पाऊस थांबला.
२. फेरी चालू झाल्यावर तेथे बसलेल्या ७ ते ८ गायी उठून स्वतःहून फेरीजवळ आल्या.

सोलापूर येथे वाहतूक नियंत्रणामध्ये कुचराई करणार्‍या १४ पोलिसांना नोटिसा

कर्तव्यचुकार वाहतूक पोलीस !
    सोलापूर - शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून करण्यात आलेल्या वाहतूक पाहणीच्या वेळी चौकांमध्ये शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी हे कर्तव्याचे ठिकाण सोडून अन्यत्र थांबलेले आणि अनुपस्थित असलेले दिसून आले होते. (कर्तव्य योग्यरीत्या न बजावणारे दायित्वशून्य पोलीस गुन्हे काय थांबवणार ? - संपादक) त्यामुळे पोलीस उपायुक्तांनी १४ पोलिसांना प्रत्येकी ५ सहस्र रुपये दंडाच्या नोटिसा दिल्या आहेत.

संभाजीनगर महानगरपालिकेतील सुरक्षारक्षक घोटाळ्याची धारिका गायब

भ्रष्टाचार्‍यांना पुरावे नष्ट करण्याची संधी देणार्‍या महापालिका प्रशासनाला
घोटाळ्याची चौकशी निष्पक्षपातीपणे होऊच द्यायची नाही, असे वाटल्यास चूक ते काय ?
   संभाजीनगर - येथील महानगरपालिकेत वर्ष २०१२-१३ ते वर्ष २०१५-१६ या ३ वर्षांच्या कालावधीत सुरक्षारक्षक नियुक्तीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी मुख्य लेखापरीक्षकांद्वारे करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या घोटाळ्याची धारिका अचानक गायब झाली आहे. (महत्त्वाच्या धारिका अशा निष्काळजीपणे का ठेवल्या ? - संपादक) त्यामुळे चौकशी करणार कशी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे चौकशी करण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिले आहेत.
    पालिकेमध्ये ६० सुरक्षारक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती न करता त्यांच्या नावे आणि खोट्या स्वाक्षर्‍या करून ३० लक्ष रुपये उचलण्यात आले आहेत. या घोटाळ्यामध्ये तत्कालीन कामगार अधिकार्‍यांसमवेत काही वरिष्ठ अधिकारी गुंतले असण्याची शक्यता आहे. (अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यामध्ये साटेलोटे असल्याचा संशय आल्यास वावगे काय ? - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

संतांचा वारंवार अवमान होणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !
    इंडिया टुडे या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर योगऋषी रामदेवबाबा यांचे अवमानकारक छायाचित्र आणि मजकूर प्रकाशित करण्यात आला आहे. या चित्रावरून सामाजिक संकेतस्थळांवरही त्यांच्यावर अश्‍लाघ्य रूपात वक्तव्ये केली जात आहेत.

मोरटक्का (मध्यप्रदेश) येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन

       मोरटक्का (मध्यप्रदेश) - श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदूर न्यासाच्या वतीने श्री सद्गुरु सेवा सदन मोरटक्का आश्रम येथे १८ जुलै आणि १९ जुलै या दिवसांत गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ जुलै या दिवशी सकाळी ८ वाजता श्री व्यास पूजन आणि श्री सत्यनारायण पूजनाने महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर प.पू. श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे पूजन आणि दर्शन सोहळा होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : India Today ne Yogrishi Ramdev Babaka avmankarak chitra chapa. Social mediapar bhi unke virodhme vaktavya. - 
Santoka aisa avman kab tak sahan karna padega ?
जागो ! : इंडिया टुडे ने योगऋषि रामदेव बाबा का अवमानकारक चित्र छापा. सोशल मीडिया पर भी उनके विरोध में वक्तव्य. - 
संतों का ऐसा अवमान कब तक सहन करना पडेगा ?

शेतकर्‍यांना दिलासा कधी मिळणार ?

कु. प्राजक्ता धोतमल
      देशातील शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या हा कृषीप्रधान (?) भारतासाठी आव्हानात्मक प्रश्‍न निर्माण झाला आहे. वैफल्यातून आणि भविष्याच्या चिंतेच्या न पेलवणार्‍या ओझ्यातून होणार्‍या या आत्महत्यांचे प्रमाण घटावे, यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी शेतकर्‍यांनी फळे आणि भाज्या यांची थेट विक्री करावी, असे आवाहन केले. याशिवाय घाऊक व्यापारी आणि दलाल यांना शेतकर्‍यांकडून मिळणारी ६ टक्क्यांची अडत घेण्यास मनाई केली. शासनाने हा प्रस्ताव ठेवताच व्यापारी वर्गातून त्यास तीव्र विरोध झाला. अनेकांनी आडमुठेपणाचे धोरण अवलंबले. या प्रस्तावाच्या विरोधात व्यापार्‍यांनी संप पुकारला, तसेच त्यांच्या काही अटी ठेऊन त्या पूर्ण होण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. कधी नव्हे ते शेतकर्‍यांना थोडा तरी दिलासा देणारा आशेचा किरण मिळत होता; पण त्यालाही वादाचे स्वरूप आल्याने शेतकर्‍यांना दिलासा कधी मिळणार ? हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला.

पंढरीची वारी म्हणजे भक्ती आणि शिस्त !

     पंढरपूरच्या वारीचा खळखळता उत्साह आषाढी एकादशी दिवशी म्हणजेच १५ जुलै या दिवशी अधिकच द्विगुणित झाला. प्रसारमाध्यमांतून वारीचा वृतांत समजत असल्याने अनेकांना घरबसल्या वारीचा अनुभव घेता आला. विठूनामाचा गजर आणि टाळ मृदुंगाच्या सुमधुर आवाजाने अवघा महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून दुमदुमला आहे. अवघ्या महाराष्ट्रासाठी वारीचे दिवस म्हणजे आनंदाचे डोही आनंदाचे रंग असा अभूतपूर्व क्षण असतो. महाराष्ट्राची ही परंपरा कोणत्याही शासकीय आधाराविना शिस्तीने आणि नेमाने शेकडो वर्षे चालू आहे. त्यात अजिबात खंड पडलेला नाही.

सनातन संस्थेची अपकीर्ती रोखण्यासाठी सरसावला वारकरी संप्रदाय !

नास्तिकवाद्यांच्या दबावाला 
बळी पडून शासन जर बंदी घालण्याचा विचार 
करत असेल, तर त्याला आमचा विरोध 
राहील ! - स्वामी गोविंददेवगिरीजी
महाराज उपाख्य आचार्य किशोरजी व्यास
         सनातन संस्थेला मी जवळून अनेक वर्षे पहात आहे. अखिल विश्‍वात सनातन धर्माची पताका फडकण्याचे कार्य सनातन संस्था करत आहेत. या संस्थेचे कार्य मी जवळून पाहिले आहे. मी यांच्या आश्रमातही जाऊन आलो आहे. सनातन संस्थेचे साधक हे हिंदु धर्माचा प्रचार-प्रसार यांचे कार्य करत आहेत. ते अतुलनीय आहे. असे असतांना मूठभर नास्तिकवाद्यांच्या दबावाला बळी पडून शासन जर बंदी घालण्याचा विचार करत असेल, तर त्याला आमचा विरोध राहील. अजून कोणत्याही प्रकरणात दोषारोप सिद्ध झालेले नसतांना समाजात सनातन संस्था आणि तिचे साधक यांची जी अपकीर्ती केली जात आहे. ती निंदनीय आहे. संपूर्ण भारतभराचा, संपूर्ण समाजाचा आपल्या संविधानावर विश्‍वास आहे. न्यायालयीन मार्गाने जे काही होईल ते सर्वांनाच मान्य असेल ! यदा कदाचित यात कोणी दोषी आढळला, तर त्याला शिक्षा व्हावी याविषयी दुमत नाही; परंतु मिडिया ट्रायल करून अकारण सनातन संस्थेची अपकीर्ती करू नये. समस्त वारकरी संप्रदाय, राष्ट्रप्रेमी संघटना यांनी या काळात सनातनच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे मत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात निदर्शनास आणून देण्यात आलेली काही सूत्रे

        महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आषाढी एकादशीला पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनास गेले असता हिंदु जनजागृती आणि राष्ट्रीय वारकरी सेना यांच्या शिष्टमंडळांनी त्यांना निवेदन दिले. त्या निवेदनांतर्गत काही गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत -
१. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी डॉ. तावडे यांना १० जून या दिवशी अटक करण्यात आली. ही अटक होण्याच्या १० दिवस अगोदर आपचे आशिष खेतांना यांनी सनातनच्या देवद आश्रमात पोलीस पोहोचण्यापूर्वीच डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा हात आहे, असे ट्विट केले. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने कोणतीही कारवाई करण्यापूर्वी ही माहिती आशिष खेतान यांच्याकडे कशी पोहोचली ? यावरून सनातन संस्थेला अडकवण्यासाठी रचलेले हे एक सुनियोजित षड्यंत्र चालू आहे, हे लक्षात येते.

देवाचे अस्तित्व सर्वत्र असणे !

बोधकथा
बालकांसाठी परिपाठ !
      देव सर्वत्र आहे, ही अनुभूती घेतलेला शिष्य गुरूंच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे : एका महात्म्याचे दोन शिष्य होते. दोघेही शिकलेले कथाकार होते. जेव्हा महात्म्याचा मृत्यू जवळ आला, तेव्हा वारस कोणाला करावे ? कुणाला गादी द्यावी, हा विचार महात्म्याला पडला. मग त्याने दोन फळे घेतली. त्या शिष्यांना एक-एक फळ दिले आणि सांगितले, ही फळे अशा जागी जाऊन खा की, तिथे तुम्हाला पहाणारा कुणीच नसेल. 
     एका शिष्याने खोली बंद केली आणि फळ खाल्ले. दुसरा शिष्य फळ घेऊन अनेक ठिकाणी गेला; पण कुणी नाही, असे स्थानच त्याला सापडले नाही; कारण देव सर्वत्र आहे. त्या शिष्याने केवळ शब्दज्ञान न घेता ज्ञान आत्मसात केले होते. अर्थातच गुरूंनी त्याला उत्तराधिकारी केले. 
(अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ बोधकथा)

देशाच्या विकासापेक्षा नागरिकांचे चारित्र्य निर्माण करणे आवश्यक !

      जेव्हा चीनमधील प्राचीन राज्यकर्त्यांना आक्रमकांपासून रक्षण होऊन शांततेत जगण्याची इच्छा अनावर झाली, तेव्हा त्यांनी चीनची भव्य भिंत (ग्रेट वॉल) बांधली. या भिंतीवर चढणे आक्रमकांना शक्य न झाल्याने अनेक वर्षे चीनमध्ये शांतता नांदली; मात्र त्यानंतर चीनवर १०० वर्षांत ३ आक्रमणे झाली. त्यासाठी आक्रमकांना भिंत चढण्याची आवश्यकताच भासली नाही. त्यांनी भिंतीच्या रक्षणासाठी नेमलेल्या सुरक्षा सैनिकांना लाच देऊन मार्ग मोकळा करून घेतला. यावरून चीनने भिंत बांधली; मात्र तिचे संरक्षण करणार्‍या सैनिकांचे चारित्र्य मात्र चीन बांधू शकला नाही. यावरून देशाच्या विकासाचे स्वप्न बघण्याआधी देशातील नागरिकांचे चारित्र्य कसे चांगले करता येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरते, असा धडा घेता येईल.
       एका पौर्वात्य इतिहासकाराने एखाद्या देशाची संस्कृती नष्ट करण्याचे ३ मार्ग सांगितले आहेत.

डॉ. झाकीर नाईक यांनी आतापर्यंत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यातील निवडक विधानांपैकी प्रतिदिन एक विधान येथे देत आहोत.

      कुराण मुसलमान पुरुषांना त्यांच्या समवेत महिलांना ठेवण्यास अनुमती देते. इसिसमध्ये सध्या महिलांशी होत असलेल्या व्यवहारावरून आपल्याला याची कल्पना येते.सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

भारतीय नागरिकांनो, जपानच्या नागरिकांकडून शिका !

     जपानमधील होजी तकाअशी या ७१ वर्षांच्या प्रेक्षकाने त्यांच्या देशातील दूरचित्रवाणीवरील राष्ट्रीय प्रसारणावर नाराजी व्यक्त करीत या वाहिनीकडून होत असलेल्या इंग्रजीच्या अतीवापराच्या विरोधात खटला दाखल केला आहे. एवढेच नव्हे, तर त्याने त्याच्या काही समर्थकांसह जपानमधील वाढत्या इंग्रजीच्या वापराच्या विरोधातही निदर्शने केली.
(साप्ताहिक वीरवाणी, वर्ष ३७, अंक ८, ५ जुलै २०१३)
   राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे.
- समर्थ रामदास स्वामी (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

साधकांनो, साधनेत अडथळा ठरणार्‍या देहबुद्धीवर मात करण्यासाठी गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया तळमळीने राबवा ! - पू. (सौ.) लक्ष्मी नाईक, पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग

गुरुपौर्णिमा मास २०१६
पू. (सौ.) लक्ष्मी नाईक
      मी देह आहे अशी दृढ भावना असणे; म्हणजे देहबुद्धी होय. मी आत्मा आहे, अशी दृढ भावना होणे; म्हणजे आत्मबुद्धी होय. देहबुद्धीच्या जोराने जीव आकुंचित होऊन दृश्याच्या नादी लागतो. आत्मबुद्धीच्या प्रभावाने जीव विशाल होऊन ब्रह्मस्वरूपाशी समरस होऊन जातो. आत्मबुद्धी उत्पन्न होण्यात देहबुद्धीचा मीपणा मोठा अडथळा आहे. यालाच सोप्या भाषेत अहंभाव म्हटले जाते. याचे निर्मूलन केल्याशिवाय परब्रह्मस्वरूप गुरुंची कृपा होणे शक्य नाही. यासाठी साधकांनी सारासार विचार करून देहबुद्धी सोडून द्यायला हवी. सारासार विचार, आत्मानात्मक विवेकबुद्धी हे सगळे शब्द समानार्थी आहेत. यांचा नेमका अर्थ समजणे आवश्यक आहे. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीमत् नारायणस्वरूप असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि माझे पती प.पू. दास महाराज यांच्या चरणी वंदन करून हा अर्थ साधकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करून गुरुपौर्णिमा २०१६ पर्यंत ६० टक्के आणि त्याहून अधिक पातळी प्राप्त करणार्‍या साधकांची, तसेच संतांची साधनेतील वाटचाल

     आस्थापने आणि संस्था त्यांचा आर्थिक अन् कार्याविषयीचा वार्षिक आढावा सादर करतात. त्याप्रमाणे सनातन संस्था आणि तिने सांगितलेल्या साधनेनुसार मार्गक्रमण करणार्‍या हिंदु जनजागृती समिती, तसेच एस्.एस्.आर्.एफ्. या अन्य संघटना यांच्या आध्यात्मिक कार्याचा हा वार्षिक आढावाच आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण आढावा आत्मोन्नतीदर्शक असून अन्य साधकांना त्याद्वारे प्रेरणा मिळून त्यांचीही साधनेतील वाटचाल जलद गतीने व्हावी, या उद्देशाने तो सादर केला जात आहे. 
     प्रती वर्षीप्रमाणे याही वर्षी साधकांना अन्य काही संप्रदायांतील भक्त, सेवाभावी वृत्तीचे व्यावसायिक, तळमळीने कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ, तसेच धर्माभिमानी अधिवक्ते अशा काही जणांनीही आध्यात्मिक उन्नती करून ६१ प्रतिशत पातळी किंवा संतपद गाठले आहे, असे लक्षात आले. सनातनने या सर्वांची आध्यात्मिक उन्नती झाल्याचे घोषित करून त्यांना गौरवले. यातील काही जणांची नावेही खालील सूचीमध्ये समाविष्ट केली आहेत.

पू. सौरभदादांची सेवा भावपूर्ण करणारे, गेल्या वर्षभरात चांगले पालट जाणवत असलेले आणि तोंडवळा आनंदी दिसत असलेले श्री. संजय जोशी !

श्री. संजय जोशी
सौ. प्राजक्ता जोशी
     श्री. संजय जोशी यांचा ४७ वा वाढदिवस आषाढ शुक्ल पक्ष चतुर्दशी (१८.७.२०१६) या दिवशी आहे. श्री. जोशी १४.६.२०१५ पासून त्यांचे पुत्र पू. सौरभदादांच्या सेवेसाठी रामनाथी आश्रमात आहेत. रामनाथी आश्रमातील चैतन्य, संत अन् साधक यांचा सत्संग आणि पू. सौरभदादांची सेवा यांमुळे त्यांच्यात अनेक चांगले पालट जाणवत आहेत. ते येथे देत आहे.
वाढदिवसानिमित्त श्री. संजय जोशी यांना 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

माझा देव चढीला हृदयसिंहासनावरी ।

परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
पितांबर अंगावरी, 
लाल शेला खांद्यावरी ।
फेटा डोईवरी, 
कुंकुम तिलक शोभे भाळी ।
तेज चढले नेत्रांवरी, 
ओठ फुलले (टीप) तोंडल्यापरी ।
माझा देव बसला 
पितृराज्याच्या सिंहासनावरी ॥ १ ॥
    आषाढ शुक्ल पक्ष त्रयोदशी (१७.७.२०१६) या दिवशी ५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील कु. शिवाजी दीपक चौधरी (वय ६ वर्षे) याचा वाढदिवस झाला. त्याच्याविषयीचे लिखाण लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार !

१. अनेक वारकरी, संत-प्रवचनकार, महाराज, दिंडी प्रमुख हे सनातनविषयी बोलतांना म्हणाले, तुम्ही अतिशय चिकाटीने प्रामाणिकपणे कार्य करत आहात. एवढ्या कठीण काळात तुम्ही हे कार्य करत आहात, अनेकांच्या भेटी घेत आहात, हे कौतुकास्पद आहे. हा प्रामाणिकपणा पाहूनच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
२. ह.भ.प. ज्ञानेश्‍वर विष्णु महाराज कोल्हापूरकर म्हणाले, मी स्वत: या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सनातन संस्थेवर बंदी घालू नये म्हणून मागणी करेन. अपेगाव संस्थान येथे बोलावून पत्रकार परिषद घेऊन जाहीर भूमिका मांडणार आहे.

महाराष्ट्रात अधिवेशन कधी घ्यायचे याचे सामान्यज्ञानही नसलेले सर्वपक्षीय राज्यकर्ते !

       महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन मुंबईत घेतात, तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेतात. प्रत्यक्षात मुंबईत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने तेथे पावसाळ्यात अधिवेशन घेणे अयोग्य आहे, तर हिवाळ्यात नागपूर येथे मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने तेथे हिवाळी अधिवेशन घेणे अयोग्य आहे; मात्र या दोन्ही गोष्टींचे सामान्यज्ञानही राज्यकर्त्यांकडे नसल्याने ते अयोग्य वेळी अयोग्य जिल्ह्यात अधिवेशन घेत आहेत. ज्या राज्यकर्त्यांना कोणत्या ऋतूत कोणत्या जिल्ह्यात अधिवेशन घ्यायचे याचे सामान्यज्ञानही नाही, ते सामान्य जनतेचे प्रश्‍न काय सोडवणार ?
       असे राज्यकर्ते आणि निरर्थक लोकशाही यावर हिंदु राष्ट्रच कायमस्वरूपी पर्याय आहे !

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - आषाढ पौर्णिमा (१९.७.२०१६) पहाटे ४.४० वाजता
समाप्ती - आषाढ कृष्ण पक्ष प्रतिपदा (२०.७.२०१६) पहाटे ४.२७ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.

साधकांना सूचना

सनातनवर होणारे खोटे आरोप आणि त्यांमागील वस्तूस्थिती
स्पष्ट करणारी दृकश्राव्य मुलाखत उपलब्ध !
    पोलीस यंत्रणा पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणात सनातनच्या साधकांना नाहक गुंतवून सध्या सनातन संस्थेवर विविध खोटे आरोप करीत आहेत. त्या माध्यमातून पुरोगामी आणि धर्मद्रोही विविध दूरचित्रवाहिन्यांवर सनातनची नाहक अपकीर्ती करीत आहेत. गोवा येथील एका पत्रकाराने सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्याशी या आरोपांविषयी संवाद साधला. मराठी भाषेतून झालेली ही मुलाखत पुढील लिंकवर ठेवण्यात आली आहे. साधकांनी ही मुलाखत डाऊनलोड करून स्थानिक दूरचित्रवाहिन्यांद्वारे प्रसारित करावी. डाऊनलोड करण्यात काही अडचण असल्यास कु. गायत्री जाधव यांच्याशी ८४५१००६०८२ या क्रमांकावर संपर्क करावा.
लिंक : http://bit.ly/29ClWdD

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
   सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
   समाजापर्यंत शीघ्रतेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल असे परवाने असणे आवश्यक आहे.

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
    सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
     - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या ठिकाणी लावावयाच्या प्रदर्शनासाठी सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या संदर्भातील फलक उपलब्ध !

   गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी येणार्‍या जिज्ञासूंना सनातनच्या कार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने लावावयाच्या प्रदर्शनातील फलकांची सूची आणि फलक यापूर्वीच उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त गुरुपौर्णिमा महोत्सवातील व्याख्यानाला अनुसरून शिक्षण, आरोग्य आदी सामाजिक समस्यांच्या संदर्भातील ६ ४ फूट आकारातील ४ फलक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमस्थळी पूर्वी कळवलेले फलक प्राधान्याने लावावेत परंतु जागा उपलब्ध असल्यास हे नवीन फलकही लावावेत.

उद्या गुरुपौर्णिमा

गुरूंविषयी आपली खात्री जितकी दृढ तितकी प्रचीती खात्रीपूर्वक मिळते ! - संत भक्तराज महाराज

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
   भारताहून आकाराने मोठ्या असलेल्या रशिया, चीन, अमेरिका यांना एक राजधानी आहे; पण महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर या दोन ठिकाणी अधिवेशने होतात. जनता दरिद्री असतांना ही उधळपट्टी टाळावी, असे एकाही पक्षाला वाटत नाही !- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
खरा शिष्य
रंगाच्या जशा अनेक छटा असतात, 
तशाच शिष्यत्वाच्याही अनेक पायर्‍या असतात.
१. मला कोणी शिव्या दिल्या, मारले, माझी कुणी हत्या (खून) केली, तरी त्याच्यावर तुम्ही दया केलीत, तर मी समजेन की, माझ्या गुरूने तुम्हाला सिद्ध (तयार) केले.
भावार्थ : शिव्या देणे, मारणे, हत्या करणे इत्यादी सर्व प्रकृतीतील आहे. हे समजून ते करणार्‍याविषयी राग न येणे, एवढेच नव्हे, तर करुणाकर भगवंताप्रमाणे त्याच्यावर दया करणे, हे शिष्याच्या खर्‍या प्रगतीचे लक्षण होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
मनात निर्माण होणार्‍या इच्छा कशा पूर्ण होतील ?, याचा सतत विचार करून त्या पूर्ण करण्यापेक्षा 
इच्छा मर्यादित केल्या, तर मानसिक शांतीचा लाभ होईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

फ्रान्समधील क्रौर्य !

संपादकीय
     १४ जुलैच्या रात्री फ्रान्सच्या नींस या शहरात इस्लामी आतंकवादाचा आणखी एक क्रूर चेहरा समोर आला. येथे फ्रान्सचा राष्ट्रीयदिन साजरा होत असतांना महंमद लाहोएज बुलेल या आतंकवाद्याने मोठ्या संख्येने उपस्थित फ्रान्स नागरिकांवर ताशी ७० कि.मी.च्या वेगाने ट्रक घुसवून त्यांना चिरडले. यात ८४ जण ठार, तर १०० हून अधिक जण घायाळ झाले. या घटनेने संपूर्ण जग स्तब्ध झाले. फ्रान्समध्ये गेल्या दीड-दोन वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेले हे तिसरे आक्रमण होते; मात्र हे आक्रमण अत्यंत क्रूर होते. या आक्रमणाचे दायित्व इसिसने घेतले आहे. इसिसने आतापर्यंत केलेले क्रौर्य पहाता त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणी असे क्रौर्य दाखवील, असेतरी वाटत नव्हते त्यामुळे तेच खरे ठरले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn