Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

फ्रान्समध्ये आतंकवाद्याने ट्रकखाली चिरडल्याने ८४ जण ठार, तर १०० हून अधिक घायाळ !

  • लोकहो, अशा क्रूर आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेट म्हणजे इस्लामी राष्ट्र हवे आहे कि वसुधैव कुटुम्बकम् (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) या भावनेने रहाणार्‍या हिंदूचे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) हवे, हे ठरवा !
  • इसिसचे पुन्हा एकदा क्रूर कृत्य !
    नीस (फ्रान्स) - येथे १४ जुलैच्या रात्री फ्रान्सचा राष्ट्रीय दिन साजरा होत असतांना फ्रेंच रिवेरा रिसॉर्टमध्ये प्रचंड गर्दीच्या ठिकाणी ३१ वर्षीय आतंकवाद्याने अचानक ट्रक घुसवून शेकडो जणांना चिरडले. यात ८४ जण ठार झाले, तर १०० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रतीघंटे ७० कि.मी.च्या वेगाने जवळपास २ कि.मी.पर्यंत हा ट्रक नेण्यात आला. ट्रकमधून गर्दीच्या दिशेने गोळ्या झाडण्याचा आवाज येत असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, बंदुका असल्याची माहिती एका स्थानिक अधिकार्‍याने दिली. या आतंकवाद्याला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. राष्ट्रपती ओलांद यांनी याला दुजोरा दिला असून आतंकवादी फ्रान्सचा नागरिक असून तो ट्युनिशियन वंशाचा असल्याचे सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले. नीसमधील सर्व भारतीय सुखरूप असल्याची माहिती तेथील दूतावासाने दिली आहे.

(म्हणे) मी शांतीदूत ! - डॉ. झाकीर नाईक

आता शांतीदूताची नवीन व्याख्या करायला हवी !
युद्धाच्या वेळी आत्मघाती आक्रमण करण्याचे केले समर्थन !
    मदिना (सौदी अरेबिया) - आतंकवादाला प्रेरणा मिळेल असे कोणतेही वक्तव्य मी कधीही केलेले नाही. गेल्या २५ वर्षांपासून मी जाहीर व्याख्याने देत असून मी कधीही आतंकवादाला प्रोत्साहन दिलेले नाही. जगातील प्रत्येक आतंकवादी आक्रमणाचा मी नेहमीच निषेध केला आहे. त्यावर मी एक घंटा बोलायला सिद्ध आहे. माझ्या भाषणांमधून मी मांडलेल्या मतांचा विपर्यास केला जात आहे. मी शांतीचा संदेश देणारा एक शांतीदूत आहे, असा दावा डॉ. झाकीर नाईक यांनी केला आहे. इस्लामी वाहिनी चालवत असल्यामुळेच मला लक्ष्य केले जात आहे, असा उलटा आरोप डॉ. झाकीर यांनी केला. डॉ. झाकीर यांनी १५ जुलैला सौदी अरेबियातील मदिना येथून स्काइपप्रणालीद्वारे पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी वरील दावा केला. डॉ. झाकीर यांची ही पत्रकार परिषद यापूर्वी ३ वेळा रहित करण्यात आली होती. डॉ. झाकीर यांनी इस्लामी प्रार्थना करून पत्रकार परिषदेला प्रारंभ केला. प्रारंभीच त्यांनी फ्रान्समध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा निषेध करून आपण आतंकवादविरोधी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.

१९ जुलैला पाक काश्मीरच्या सूत्रावरून काळा दिवस पाळणार !

भारतीय शासन आतातरी शांतीची कबुतरे थांबवणार का ?
   नवी देहली - काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात पाक १९ जुलैला काळा दिवस पाळणार आहे. तसेच या विषयावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलावण्यात येणार आहे. पाक सरकारच्या मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले की, पाक काश्मिरींच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या न्यायोचित लढाईसाठी नैतिक राजकीय आणि कुटनीतीद्वारे समर्थन देत राहील.

राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निवेदने सादर

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात, तसेच झाकीर 
नाईक यांना तात्काळ अटक करण्याविषयी फलटण येथे निवेदन 

तहसीलदारांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

       फलटण (जिल्हा सातारा), १५ जुलै (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात, तसेच झाकीर नाईक यांना तात्काळ अटक करा या दोन्ही मागण्यांचे निवेदन फलटणचे तहसीलदार श्री. विजय पाटील यांना देण्यात आले. राष्ट्रप्रेमी सनातनचा छळ थांबवण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी आग्रही मागणी भाजप, शिवसेना आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी तहसीलदारांकडे केली. राष्ट्रद्रोही झाकीर नाईक यांच्या विरोधातील निवेदनही या वेळी देण्यात आले. या वेळी तहसीलदारांनी दोन्हीही निवेदने त्वरित शासनाकडे पाठवतो, असे सांगितले.

भारताने मदरशांंवर लक्ष ठेवावे ! - इराकच्या भारतातील राजदूतांचा सल्ला

भारतातील मदरशांवर लक्ष ठेवा, असे दुसर्‍या देशांना का सांगवे लागते ?
    नवी देहली - जिहादी आतंकवादी संघटना इसिसने भारतात स्लिपर सेल्स चालू केल्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताने मदरशांमध्ये कोणत्या प्रकारचा इस्लाम शिकवला जातो, यावर लक्ष ठेवले पाहिजे, असा सल्ला इराकचे भारतातील राजदूत फक्री हसन अल इसा यांनी दिला आहे. इसिसच्या कारवायांमध्ये इराक होरपळून निघाले आहे. याची किंमत स्वत: इसा यांनीही मोजली असून त्यांच्या कुटुंबातील ४ जण या आतंकवादी आक्रमणांत ठार झाले आहेत. त्यामुळे इसा यांचा सल्ला शासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, असे मत संरक्षणतज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

(म्हणे) पीस टीव्हीवर बंदी, तर सुदर्शन टीव्हीवर बंदी का नाही ?

आतंकवाद्यांची तळी उचलणारे (मौलाना) दिग्विजय सिंह यांचा थयथयाट ! 
आतंकवादाचा उघड पुरस्कार करणार्‍यांवर शासनाने
कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

यावर काँग्रेसने तिची भूमिका घोषित केली नाही, तर
राष्ट्रभक्त नागरिक काँग्रेसलाही आतंकवाद्यांचे समर्थक म्हणतील !
    पुणे, १५ जुलै - डॉ. झाकीर नाईक हे कोणत्याही आतंकवादाचे समर्थन करत नाहीत. ते इस्लाम शांतीसाठीच असल्याचे सांगतात. नाईक यांच्या पीस टीव्हीवर भारतात बंदी घातली जात असेल, तर सुदर्शन टीव्हीवर बंदी का नाही, असा हिंदुद्वेषी प्रश्‍न काँग्रेसचेे सरचिटणीस खासदार (मौलाना) दिग्विजय सिंह यांनी केला आहे. (पीस टीव्हीवरून चिथावणीखोर वक्तव्याने अनेक धर्मांध हे आतंकवादी म्हणून सिद्ध होत आहेत. सुदर्शन टीव्हीच्या माध्यमातून असे आतंकवादी सिद्ध झाल्यांचे एकतरी उदाहरण ऐकिवात आहे का ? सुदर्शन टीव्हीवर सातत्याने राष्ट्र आणि धर्म प्रेम जागृत करणारी वृत्ते आणि अन्य कार्यक्रम सादर केले जातात, यासाठी (मौलाना) दिग्विजय सिंह यांना पोटशूळ उठतो का ? - संपादक)
दिग्विजयसिंह पुढे म्हणाले,
१. पंतप्रधान मोदी हे संवेदनाहीन असून भाजपला काश्मीर प्रश्‍न समजलाच नाही.
२. डॉ. नाईक यांचे भाषण मी ऐकले आहे.
स्वामी असिमानंद यांच्यावर गुन्हा प्रविष्ट आहे, त्यांना केंद्र सरकार देणगी देते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसारामबापूच्या पाया पडतात, ते आसारामबापू कारागृहात आहेत. (संतांची तुलना आतंकवाद्यांना प्रेरणा देणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्याशी करणार्‍या दिग्विजय सिंह यांच्या बुद्धीची कीव करावी, तेवढी थोडीच ! - संपादक)

ठाणे येथे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांना सनातन संस्थेच्या वतीने निवेदन

डावीकडून माननीय आमदार श्री. सुभाष भोईर, निवेदन
देतांना श्री. अजय संभूस आणि धर्माभिमानी श्री. विशाल भगत

       ठाणे, १५ जुलै (वार्ता.) - डोंबिवली ग्रामीण विभागाचे आमदार श्री. सुभाष भोईर यांना सनातनवरील अन्यायाच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणातून संस्थेच्या निष्पाप साधकांना गुंतवणे रोखून चौकशीच्या नावाखाली चालू असलेला छळ थांबवण्यासाठी आणि सनातनवर बंदीची मागणी केली जात आहे, त्यावर रोख यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शिवसेनेचे आमदार उल्हासदादा पाटील यांना निवेदन

आमदार पाटील (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु धर्माभिमानी
       जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर), १५ जुलै (वार्ता.) - सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात शिरोळ मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. उल्हासदादा पाटील यांना निवेदन देण्यात आले. कुरुंदवाड येथील हिंदु धर्माभिमानी सर्वश्री सुनील साळुंखे, अनुप आलासे, विनायक चव्हाण, तसेच समितीचे सर्वश्री अण्णासो वरेकर, संजय घाटगे, विपुल भोपळे आणि डॉ. उमेश लंबे उपस्थित होते.

परभणीतील धर्मांधाला पोलीस कोठडी इसिसच्या संपर्कात असल्याचा संशय

   परभणी - येथील नासीरबीन चाऊस याला इसिसशी संबंध असल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. नासीरबीन याच्या भावाने अन्वेषण यंत्रणांनी केलेली ही कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे.

डॉ. झाकीर नाईक हे विखारी धर्मोपदेशक !

       आजकाल डॉ. झाकीर नाईक हे मुसलमान तरुणांना आतंकवादी कारवाया करण्यास उद्युक्त करणारे एक विखारी धर्मोपदेशक म्हणून प्रसिद्धी माध्यमात झळकत आहेत. त्यांच्या धर्मांतराचे प्रत्येक कार्यक्रम बारकाईने बघितल्यास असे लक्षात येईल की, काही लोकांना पैसे देऊन व्यासपिठावर बोलावले जाते आणि त्यांच्याकडून कबुल है अशी पोपटपंची वदवून घेतली जाते. केरळ राज्यात डॉ. झाकीर नाईक यांची लोकप्रियता शिखरावर आहे. म्हणूनच केरळमध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) सारख्या आतंकवादी संघटनांमध्ये भाग घेणार्‍यांची संख्या वाढत आहे, असे म्हणायला वाव आहे. ख्रिस्ती मिशनरीसुद्धा हिंदूंना त्यांच्या जाळ्यात ओढण्यासाठी डॉ. झाकीर नाईकसारख्या मार्गाचा अवलंब करतात. हिंदूंचे धर्मांतर करणे, या एकाच उद्देशाने इतर धर्मीय एकवटले आहेत. त्यामुळे देशाची शांतता आणि एकसंघता धोक्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझी विनंती आहे की, त्यांनी हिंदूंचे धर्मांतरापासून संरक्षण या नावाचा कायदा पारित करावा.
- जी.एस्.के. मेनन, केरळ

सनातनवर बंदी येणार नाही ! - अतुल भातखळकर, आमदार, भाजप

डावीकडून निवेदन स्वीकारतांना आमदार श्री. अतुल भातखळकर
आणि निवेदन देतांना सर्वश्री दत्तात्रेय बेंद्रे, प्रसाद काळे, सिमित सरमळकर

       मुंबई, १५ जुलै (वार्ता.) - संघाने गांधीहत्या केली असा अजूनही जनमानसात समज आहे; मात्र प्रत्यक्षात संघाने हत्या केली का ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही गांधी हत्येचा आरोप होता. अहो तुम्ही काही केलेच नाही, तर बंदी येणार कशी ? तुम्ही काळजी करू नका. सनातनवर बंदी येणार नाही, असा ठाम विश्‍वास कांदिवली विधानसभाक्षेत्राचे भाजपचे आमदार श्री. अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. सनातन संस्थेवरील बंदीच्या सावटाविषयी १३ जुलै या दिवशी हिंदुत्ववादी आणि सनातनचे साधक यांनी कांदिवली येथील भाजपच्या कार्यालयात आमदार श्री. भातखळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले. निवेदन देतांना गोरक्ष समितीचे श्री. प्रसाद काळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सिमित सरमळकर, सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रेय बेंद्रे उपस्थित होते.

गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांचे अपहरण करून निर्घृण हत्या, ५ जण अटकेत

चिटफंट प्रकरणी 
फसवणूक केल्याचा संशय !
        पिंपरी, १५ जुलै - येथील अंगावर पुष्कळ सोन्याचे दागिने घालणारे गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांच्या घरात १४ जुलैच्या रात्री १२ वाजता ५ जणांनी घुसून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्याही केली. फुगे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले, तसेच दगड घालून डोक्याचा चेंदामेंदा करून आक्रमणकर्ते पसार झाले. ८ दिवसांपूर्वी फुगे यांचे आक्रमणकर्त्यांशी पैशांवरून भांडण झाले होते.
        फुगे हे खाजगी सावकारीचा व्यवसाय करत असत. भोसरी येथे वक्रतुंड चिटफंडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करून, तसेच व्याजाने पैसे देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हेही प्रविष्ट आहेत. फुगे यांना काही मासांपूर्वी पोलिसांनी स्थानांतरणाची (तडीपारी) नोटीसही बजावली होती.
        या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून त्यामध्ये फुगे यांच्या पुतण्याचाही समावेश आहे. दत्ता फुगे यांच्या पत्नी सीमा फुगे खोटे जातप्रमाणपत्र सादर केलेल्या माजी नगरसेविका आहेत.

संभाजी ब्रिगेडचा मुख्यमंत्र्यांना घेराव !

मुख्यमंत्र्याचे सुरक्षारक्षक, स्वीय 
सहाय्यक आणि पोलीस यांनाही धक्काबुक्की
        पंढरपूर - राज्यभर मद्यबंदी करावी, कामे न केल्यामुळे पडून राहिलेला तीर्थक्षेत्र विकास निधीतील निधी, तसेच नगरपालिकेने त्यांच्या निधीतून केलेली अतिशय निकृष्ट कामे यांकडे लक्ष द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घातला. या वेळी पोलीस कार्यकर्त्यांना हुसकावत असतांना कार्यकर्त्यांनी पोलिसांसह मुख्यमंत्र्याचे सुरक्षारक्षक, स्वीय सहाय्यक यांनाही धक्काबुक्की केली. (या प्रकरणी पोलीस प्रशासन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर कोणती कारवाई करणार आहे ? - संपादक) ही घटना पंढरपूरच्या शासकीय विश्रमागृहात १४ जुलैच्या रात्री घडली.
        विश्रामगृह परिसरात पर्यावरण दिंडीचा समारोप कार्यक्रम आटोपल्यावर मुख्यमंत्र्यासह अन्य मंत्रीगण विश्रांतीगृह कक्षात गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलण्यासाठी बाहेर येतांना ते संभाजी ब्रिगेडचे निवेदन घेण्यासाठी बाहेर आले. त्या वेळी ही घटना घडली. त्यामुळे मुख्यमंत्री गाडीत बसून पंतनगर येथे सपत्नीक रवाना झाले.

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक लोकमतचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांना कायदेशीर नोटीस

    रामनाथी, १५ जुलै (वार्ता.) - पणजी, गोवा येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक लोकमत या मराठी वृत्तपत्राने ३ जून २०१६ दिवशीच्या अंकात सनातनचे काय करायचे ? या मथळ्याखाली मानहानीकारक संपादकीय प्रकाशीत करून सनातन संस्थेची मानहानी केली. या प्रकरणी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्यामार्फत १० कोटी रुपये मानहानी भरपाईची कायदेशीर नोटीस लोकमत वृत्तपत्र समूहाचे संपादक, मालक आणि प्रकाशक यांना बजावली आहे.
   सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा समाजात असलेला नावलौकिक माहिती असतांना मानहानी करण्याच्या हेतूने दैनिक लोकमतचे संपादक श्री. राजू नायक यांनी सनातनचे काय करायचे ? या मथळ्याखाली मानहानीकारक संपादकीय लिहून ते दैनिक लोकमतच्या गोवा आवृत्तीच्या ३ जून २०१६ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध केले.

सनातनचे कार्य चांगले असून तुमचा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवू ! - आमदार शिवाजीराव नाईक, भाजप

आमदार शिवाजीराव नाईक (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु धर्माभिमानी
   सांगली, १५ जुलै (वार्ता.) - सनातनचे कार्य चांगले असून या कार्याचा आम्हाला परिचय आहे. तुमचा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोेचवू, असे आश्‍वासन भाजपचे शिराळा येथील आमदार श्री. शिवाजीराव नाईक यांनी दिले. सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या संदर्भात सनातन संस्थेचे श्री. राजाराम मोरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष कुंभार आणि हिंदु धर्माभिमानी श्री. अशोक मस्कर यांनी शिराळा येथे आमदार श्री. शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

सनातन संस्थेच्या साधकांचा सेवाभाव वाखाणण्याजोगा ! - खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना


खासदार राजू शेट्टी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु धर्माभिमानी
    जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) - येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार श्री. राजू शेट्टी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी कुरुंदवाड येथील हिंदु धर्माभिमानी सर्वश्री सुनील साळुंखे, अनुप आलासे, विनायक चव्हाण, तसेच हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अण्णासो वरेकर, संजय घाटगे, विपुल भोपळे आणि डॉ. उमेश लंबे उपस्थित होते. या वेळी खासदार श्री. राजू शेट्टी म्हणाले, सनातन संस्थेच्या साधकांचा सेवाभाव वाखणण्याजोगा आहे. मला तुमच्या संस्थेचे कार्य ठाऊक आहे. या प्रकरणात मला जे करणे शक्य होईल, ते मी करतो.

राज्यातील २३ गडकोट खाजगी कडीकुलूपांमध्ये बंदिस्त

भाजप सरकारने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून गडकोट संरक्षित स्मारक करावे, ही अपेक्षा !
गडकोटांचे राज्य संरक्षित स्मारक करण्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
    पुणे, १५ जुलै - संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, अशा शब्दांत आज्ञापत्रातून शिवनिती व्यक्त झाली. सध्या गडकोटांतून मिळणार्‍या लक्ष्मीला महत्त्व देऊन राज्यातले यशवंतगड, गोवागड, गोपाळगड, वसंतगड, पांडवगड, भिवंडीतील कांबेकोटा असे २३ किल्ले खाजगी कडीकुलूपांमध्ये बंदिस्त झाले आहेत. या गडांना राज्य संरक्षित स्मारक करण्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती एवढा एकच अडसर आहे. हे गड राज्य संरक्षित स्मारक केव्हा होणार, या प्रश्‍नाचे उत्तर राज्य सरकार आणि पुरातत्व विभाग या दोहोंकडेही नाही. (गडकोट आणि पुरातन वास्तू यांचे योग्य संवर्धन होण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आवश्यक आहे. - संपादक)

गंभीर दुखापत झालेल्या घायाळांना विमानाने देहलीत आणणार !

काश्मीरच्या हिंसाचारातील 
घायाळांसाठी केंद्रशासन सरसावले !
         ठार झालेल्या आतंकवाद्याच्या समर्थनार्थ सैन्यावर दगडफेक केली, पोलिसांची वाहने जाळली, हिंदूंची घरे लुटली, अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करून महिलांची अब्रू लुटली, अशा देशद्रोह्यांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची फौज पाठवली आणि आता या देशद्रोह्यांना उपचारासाठी देहलीला विमानाने आणण्यात येणार आहे, यावरून जम्मू-काश्मीरचे सरकार कुणाच्यातरी दबावाखाली आहे, अशी शंका व्यक्त करण्यास जनतेला वाव आहे.
         नवी देहली - काश्मीरमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीच्या वेळी छर्‍याच्या गोळ्यांमुळे गंभीर दुखापत झालेल्या स्थानिक धर्मांधांना उच्च वैद्यकीय उपचार देण्यासाठी विमानाने देहलीत आणण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी उसळलेल्या दंगलीतील जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून छर्‍यांच्या बंदुकांचा वापर करण्यात आला होता. या छर्‍यांमुळे अनेकांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
         आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुकतेच देहली येथील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक श्रीनगरमध्ये दाखल झाले होते. या पथकामध्ये डोळ्यांच्या डॉक्टरांचा बहुतांश समावेश होता. या घायाळांची तपासणी करून ज्यांना विशेष उपचारांची आवश्यकता आहे, त्यांना देहलीला आणण्यात येईल. या घायाळांवर विनामुल्य उपचार करण्यात येतील.

पुणे जिल्ह्यातील दहा गावे अतिधोकादायक गटांत !

    पुणे - दोन वर्षांपूर्वी झालेल्या माळीण दुर्घटनेनंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने केलेल्या १५० धोकादायक गावांच्या सर्वेक्षणांती येथील दहा गावांचा आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिधोकादायक गटात समावेश केला आहे.
    या महाविद्यालयाने राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीकडे सादर केलेल्या अहवालामध्ये या गावांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. या अहवालानुसार शासनाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे.

आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आचारसंहिता हवी ! - पृथ्वीराज चव्हाण

हे सर्वाधिक काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसने आता सांगणे लज्जास्पद !
    पुणे, १५ जुलै - पानशेत धरण फुटून झालेल्या पूरस्थितीला ५५ वर्षे उलटली, तरी पूरग्रस्तांना अद्यापही हक्कांसाठी लढावे लागत आहे. अद्याप त्यांचे आणि कोयना भूकंपग्रस्त यांचेही संपूर्ण पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे पूरग्रस्त, प्रकल्पग्रस्त किंवा कोणत्याही आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आचारसंहिता ठरवायला हवी, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. (देशात आणि राज्यात काँग्रेसने सत्ता उपभोगलेली असतांना आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आचारसंहिता सिद्ध न होणे, हे काँग्रेसला लज्जास्पद आहे. ती अजूनपर्यंत न होण्यामागील कारणे काँग्रेसवाले सांगतील का ? - संपादक) पानशेत पूरग्रस्त समितीचे मंगेश खराटेलिखित कहाणी पानशेत पूरग्रस्तांची या पुस्तकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

हिंदराफ मक्कल सक्थी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेकडून डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंदी घालण्याची मलेशियाच्या पंतप्रधानांकडे मागणी !

      क्वाआलालंपूर (मलेशिया) - बांगलादेशमध्ये झालेल्या आतंकवादी घटनेस उत्तरदायी असलेल्या जिहादी आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्यावर मलेशिया देशात कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मलेशियातील हिंदराफ मक्कल सक्थी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने मलेशिया सरकारला पत्र लिहून केली आहे.
     संघटनेचे प्रमुख पी. वायथामूर्ती यांनी मलेशियाच्या पंतप्रधानांना लिहिलेल्या या पत्रात पुढे म्हटले आहे की, मलेशिया हा मुसलमानबहुल देश आहे. तेथील धर्मांधांना देशात असलेल्या इतर धर्मियांना देशाबाहेर घालवायचे आहे. त्यासाठी ते डॉ. झाकीर नाईक यांना वारंवार देशात आमंत्रित करून सभा संमेलने घेतात. तेरेन्गाणु (याचे प्राचीन हिंदु नाव त्रीन्गाणु असे होते) प्रांताच्या सुलतानाने तर डॉ. झाकीर यांना प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी एक बेट विकत देण्याचा प्रस्तावही विचारार्थ घेतला आहे. 
     डॉ. झाकीर यांच्याविरुद्ध बांगलादेश आणि भारत या देशांत चौकशीही चालू आहे. तरी मलेशियातील धार्मिक वातावरण शांततामय राखण्यासाठी डॉ. झाकीर यांना मलेशिया देशात येण्यावर बंदी घालण्यात यावी.सनातन संस्था कोल्हापूर न्यासाच्या वतीने वृक्षारोपण !


  पुणे, १५ जुलै - गोर्‍हे बुद्रुक येथे १० जुलै या दिवशी सामाजिक वनीकरणाचा उपक्रम राबवण्यात आला. गोर्‍हे गावचे सरपंच श्री. सचिन पासलकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. खिरीड आणि श्री. संदेश तिपुळे यांच्या हस्ते गावात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी भेंडीवृक्ष आणि चिंच अशा २२ वृक्षांची लागवड करण्यात आली. या वेळी संस्थेचे श्री. विनायक बागवडे आणि श्री. राजेंद्र कुटे आदी उपस्थित होते.

नगर जिल्हा बँकेच्या उक्कलगाव (जिल्हा नगर) येथील शाखेत चोरी

  • नगर जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासन यांचे अस्तित्व आहे का ?
  • जिल्ह्यामध्ये याच अधिकोषाच्या आतापर्यंत २८ शाखा फोडल्या !
       नगर, १५ जुलै - येथील श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील नगर जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतील तिजोरी चोरट्यांनी गॅसकटरच्या साहाय्याने तोडून ८ लक्ष ३८ सहस्र २५६ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १३ जुलैच्या रात्री घडली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत याच अधिकोषाच्या २८ शाखा फोडण्यात आल्या आहेत. (यावरून जिल्ह्यातील पोलीस प्रशासन आणि अधिकोष प्रशासन यांचा हलगर्जीपणाच दिसून येतो. इतक्या वेळा अधिकोष लुटण्याची घटना होण्यामध्ये काही आर्थिक हितसंबंध असण्याची शक्यता वाटल्यास चुकीचे काय ? अशा अधिकोषात सर्वसामान्य नागरिकांचे पैसे खरोखरंच सुरक्षित असतील का ? - संपादक) अधिकोषाच्या गलथान कारभारामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे.

आज केसरी वाडा (पुणे) येथे साहस पुरस्कार वितरण कार्यक्रम

        पुुणे, १५ जुलै (वार्ता.) - ८ जुलै १९१० या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समुद्रात मारलेली उडी त्रिखंडात गाजली. राष्ट्ररक्षणासाठी मार्सेलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या या अतुलनीय शौर्याचा जागर व्हावा या उद्देशाने सावरकर स्मृती प्रतिष्ठान आणि पुणे नगर हिंदू सभा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रासाठी साहस करणार्‍या वीरांना साहस पुरस्कार देऊन गौरवले जाते. यंदाचा साहस पुरस्कार वितरण कार्यक्रम १६ जुलै या दिवशी लोकमान्य सभागृह (केसरी वाडा) येथे सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. चौथ्या विश्‍व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.श्री. शेषराव मोरे यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून हिंदुत्ववादी विचारवंत डॉ. श्रीरंग गोडबोले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अधिकाधिक जणांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जीव आणि परमेश्‍वर यांना जोडणारा दुवा म्हणजे सद्गुरु ! - प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती

    पुणे, १५ जुलै (वार्ता.) - खर्‍या श्रद्धेमुळेच व्यक्ती परमेश्‍वराशी जोडली जाते. वेलीवरील फळाला जसे देठाच्या माध्यमातून पोषण मिळत असते, त्याचप्रमाणे गुरु हे जीवाला ईश्‍वराचे चैतन्य पुरवत असतात. जीव आणि परमेश्‍वर यांना जोडणारा दुवा म्हणजे सद्गुरु असतो, असे गुरूंचे महत्त्व विषद करणारे मार्गदर्शन प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. स्वच्छंदानंद गायत्री परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कै. राजस साठे यांच्या स्मरणिकेच्या उद्घाटन प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.

डॉ. झाकीर नाईक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा ! - विहिंप

हे सांगायला का लागते ? केंद्रातील सरकारला ते कळत नाही का ?
      नवी देहली - डॉ. झाकीर नाईक यांच्यावर देशद्रोहाच्या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याची मागणी विश्‍व हिंदु परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांनी केली आहे. मुसलमान धर्मियांतील काही समुदायांवर झाकीर यांचा प्रभाव पडत आहे आणि ते आतंकवादाकडे झुकत आहेत, असे जैन म्हणाले. 
     जैन पुढे म्हणाले की, ओसामा बिन लादेन याचे त्यांनी समर्थन केले होते. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. 
झाकीर नाईक यांचे ट्विटरवरून मुसलमानांना आवाहन !
     माझ्या विरोधात मिडिया ट्रायल चालू असून मला सहकार्य करा, असे आवाहन डॉ. झाकीर नाईक यांनी ट्विटरवरून मुसलमानांना केले आहे.

बांगलादेशकडून पीस नावाच्या शाळांची चौकशी

बांगलादेशने केवळ पीस नावावरून तेथील अनेक शाळांची चौकशी चालू केली. भारतात मात्र 
अनेक मदरशांमधून आतंकवादी कारवाया होत असल्याचे सत्य समोर येऊनही सरकारने कधी 
त्यांची चौकशी केली आहे का ?
     ढाका - बांगलादेशने पीस नाव असलेल्या शाळांची चौकशी चालू केली आहे. शासनाला या शाळांचा डॉ. झाकीर नाईक यांच्या वादग्रस्त पीस टीव्हीशी संबंध असल्याचा संशय आहे. या शाळा डॉ. नाईक यांच्या विचारांचे अनुसरण करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
      बीडीन्यूज २४ डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार बांगलादेशाची राजधानी ढाका आणि अन्य भागांमध्ये चालत असलेल्या शाळांनी कथितपणे डॉ. नाईक यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या नावांना पीस जोडले. शासन आता या तथाकथित पीस शाळांच्या उपक्रमांची चौकशी करत आहे. एका अधिकार्‍याच्या मते बांगलादेशमध्ये २८ शाळांच्या नावांमध्ये पीस आहे. बांगलादेशच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीवरून मंत्रालयाने पीस नावांच्या २० शाळांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.सनातनचे साधक श्री. अमेय अजित कोटगी यांचे सुयश

श्री. अमेय कोटगी
    रामनाथी, गोवा (वार्ता.) - कोल्हापूर येथील सनातनचे साधक श्री. अमेय अजित कोटगी यांनी आयुर्वेदाचार्य पदवी परीक्षेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. ते शिरोडा, गोवा येथील गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्रामध्ये अध्ययन करत आहेत. गोवा विद्यापिठाने घेतलेल्या या परिक्षेत त्यांनी ५८ टक्के गुण प्राप्त केले आहेत. याविषयी त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

बिहारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणांतील संशयित आतंकवाद्यांनी वाचली होती डॉ. झाकीर नाईक यांची पुस्तके !

सुरक्षा यंत्रणांकडे एवढे पुरावे असतांना डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कारवाई का केली जात नाही ?
सुरक्षायंत्रणांच्या चौकशीतून उघड
      पाटलीपुत्र (पटणा) - आक्षेपार्ह भाषणांच्या माध्यमातून मुसलमान तरुणांचा बुद्धीभेद (ब्रेनवॉश) करून त्यांना आतंकवादी कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देणारे डॉ. झाकीर नाईक यांचे मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी बिहारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणांशी संबंध असल्याचे सुरक्षायंत्रणांनी केलेल्या चौकशीत समोर आले आहे.
     सुरक्षायंत्रणांच्या एका अधिकार्‍याने इंडिया टुडेशी बोलतांना सांगितले की, डॉ. नाईक यांची पुस्तके, छायाचित्रे आणि भित्तीपत्रके जप्त केली आहेत. एका अहवालानुसार इंडियन मुजाहिदीनच्या अनुमाने १४ आतंकवाद्यांना वर्ष २०१० ते २०१४ या काळात दरभंगातून अटक करण्यात आली होती. यात सौदी अरेबियामध्ये रहात असलेला फैसल महमूदचाही समावेश होता. दरभंगा प्रकरणाचे संचालन दार-उल्-किताब सुन्ना वाचनालयातून होत होते. यात डॉ. नाईक यांचे लेख, पुस्तके आणि काही संबंधित साहित्य जप्त करण्यात आले होते. या वाचनालयात जिहादी आतंकवादी संघटना इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक यासीन भटकळ नियमित येत असे. मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील सभेच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आतंकवाद्यांकडूनही डॉ. झाकीर नाईक यांची पुस्तके आणि छायाचित्रे जप्त करण्यात आली होती.

दैनिक सनातन प्रभातचे रंगीत विशेषांक

गुरुमाहात्म्य विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : १७ जुलै २०१६
पृष्ठ संख्या : १२, मूल्य : ५ रुपये
गुरुमाहात्म्य विशेषांकाची वाढीव मागणी
वितरकांनी १६ जुलैला दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !
---------------------
गुरुपौर्णिमा विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : १९ जुलै २०१६
पृष्ठ संख्या : १६, मूल्य : ५ रुपये
गुरुपौर्णिमा विशेषांकाची वाढीव मागणी
१७ जुलैला दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

डॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेला विदेशातून १५ कोटी रुपयांच्या देणग्या !

एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉ. झाकीर नाईक यांना पैसा मिळेपर्यंत आणि त्याचा वापर जिहादसाठी 
होत असतांना भारतीय अन्वेषण यंत्रणा काय करत होत्या कि तत्कालीन काँग्रेस सरकारने कारवाई 
करण्यास विरोध केला होता, हे जनतेला समजले पाहिजे ! 
     नवी देहली - डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला विदेशातून पैसा पुरवला जात असल्याचे गृहमंत्रालयाच्या अन्वेषणातून समोर आले आहे. डॉ. नाईक यांच्या संस्थेला वर्ष २०१२ पर्यंत ब्रिटन, सौदी अरेबिया आणि मध्य पूर्व देशांतून १५ कोटी रुपये पुरवण्यात आले होते. ढाका आक्रमणानंतर केंद्रशासनाने डॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. 
      डॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेला पुरवण्यात येणार्‍या पैशांचा वापर राजकीय कामांसाठी, तसेच तरुणांना आतंकवादाकडे आकर्षित करण्यासाठी केला जात आहे. असे करणे हे एफ्सीआर्एच्या तरतुदींचे उल्लंघन आहे, ज्याच्या अंतर्गत डॉ. नाईक यांच्या संस्थेची नोंदणी आहे. हे सिद्ध झाल्यास या संस्थेवर कारवाई करण्यात येईल.

भारतीय सैन्यदल ही देशातील आदर्श संस्था ! - मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे

    पुणे, १५ जुलै - देशातील तरुणांना अंतःप्रेरणेने जीवनात वाटचाल करण्यासाठी भारतीय सैन्य दलाशिवाय दुसरा मार्ग नाही. येथे कोणतेही आरक्षण नसून सारेच समान पातळीवर आहेत. त्यामुळे आज भारतीय सैन्यदल ही देशातील आदर्श संस्था आहे, असे मत पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित येथील कार्यक्रमात मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
   हा पुरस्कार शिवशाहिरांच्या हस्ते मिळणे, हे स्वतःचे भाग्य असल्याचे सांगत श्री. पित्रे पुढे म्हणाले, सैन्याचे नेतृत्व करणारा हा, त्या सैन्याच्या ऊर्जेचा मुख्य स्त्रोत असतो. मी भारतीय सैन्याचा एक साधा शिपाई आहे. भारतीय सैन्य दलातील सैन्यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारला आहे.

एक हिंदु मुलगी ठरली लव्ह जिहादचा बळी !

मुसलमान पतीसह इसिसमध्ये सहभागी झाल्याची शक्यता ! 
  थिरूवनंतपुरम् (केरळ) - येथील श्रीमती बिंदु कुमार यांचा मुलगा एन्एस्जी कमांडो बनून देशसेवा करत असतांना मुलगी निमिषा मात्र तिच्या मुसलमान पतीसह आतंकवादी संघटना इसिसमध्ये सहभागी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निमिषाने लग्नानंतर धर्मांतर करून मुसलमान धर्म स्वीकारला होता. त्यामुळे हिंदू मुलींशी विवाह करून त्यांना मुसलमान करायचे आणि नंतर त्यांचा आतंकवादी कारवायांमध्ये वापर करून घेण्याचे षड्यंत्र या प्रकरणातून पुन्हा एकदा उघड झाले आहे. 
     केरळमधून इसिसमध्ये सहभागी होण्यास गेलेल्या २० लोकांमध्ये श्रीमती कुमार यांची मुलगीही आहे. यासंदर्भात श्रीमती कुमार यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या हिंदूंवर काश्मीरमधील धर्मांध दंगलखोरांकडून आक्रमण !

यात्रेकरूंच्या सुरक्षेची हमी देणारे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह 
आक्रमणकर्त्यांवर तात्काळ कठोर कारवाई करतील का ?
जोधपूर येथील यात्रेकरूंनी सांगितलेला भयावह अनुभव !
     जोधपूर - येथून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या हिंदूंवर काश्मीरमधील धर्मांध दंगलखोरांकडून आक्रमणे होत असून हिंदूंना सुखरूपपणे माघारी परतणे कठीण झाले आहे. यात्रेसाठी गेलेल्या जोधपूर येथील २ हिंदु युवकांनी याविषयी अनुभव सांगताना म्हटले की,
१. यात्रेहून परत येतांना रस्त्यात आमचे वाहन अडवण्यात आले. पुढे रस्ता बंद आहे, असे सांगून दंगलखोरांनी वाहनाच्या चालकाला मारहाण करण्यास प्रारंभ केला, तसेच पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत वाहनावर दगडफेक केली. (आक्रमणकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या, यावरूनच हे कृत्य देशद्रोह्यांचे असल्याचे लक्षात येते. या देशात हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी वारंवार होणार्‍या आक्रमणांना कायमचा प्रतिबंध घालण्यासाठी केंद्रसरकार काही करणार आहे का ? - संपादक) चालकाने वाहन मागे घेताच दंगलखोर वाहनाला आग लावण्याविषयी ओरडू लागले. 
२. त्यानंतर माघारी परतून पुढे जात असतांना अन्य दंगलखोरांनी पुन्हा त्यांचे वाहन अडवलेे. दोन्ही बाजूंनी पेच निर्माण झाल्यामुळे चालकाने मार्गाच्या मध्यावर वाहन थांबवले. दंगलखोरांच्या अरेरावीमुळे आणि आक्रमणामुळे अशी कित्येक वाहने मध्येच अडकली होती. सर्व वाहनांच्या काचा दंगलखोरांनी फोडल्या होत्या.
३. प्रवाशांनी सैनिकांना साहाय्य करण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी, आम्हाला वरून प्रतिकार करण्याचे आदेश आले नसल्याने आम्ही काही करू शकत नाही, असे सांगितले. (शत्रूला सामोरे जाण्यासाठी सैन्याला आवश्यक ते अधिकारही न देणारे सरकार जनतेचे रक्षण कसे करणार ? - संपादक)
४. काही वेळाने पोलिसांनी घटनास्थळी येऊन अडकलेल्या वाहनांना बाहेर पडण्यास साहाय्य केले. त्यानंतर यात्रेकरू रेल्वेने जोधपूरला पोचले.
गुजरातच्या यात्रेकरूंना मारहाण करत म्हटले, दूरभाष करून बोलवा तुमच्या मोदींना !
    या वेळी एका वाहनातील प्रवाशांनी ते गुजरात येथून आल्याचे सांगितल्यावर दंगलखोरांनी पंतप्रधान मोदींविषयी अरेरावीची भाषा वापरली. ते म्हणाले, दूरभाष करून बोलवा तुमच्या मोदींना !

फलक प्रसिद्धीकरता

तुष्टीकरणाला बाजूला ठेवून सरकार राष्ट्ररक्षणास प्राधान्य देईल का ?
    जिहादी संघटना इस्लामिक स्टेटने भारतात स्लिपर सेल्स चालू केल्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताने मदरशांमध्ये कोणत्या प्रकारचा इस्लाम शिकवला जातो, यावर लक्ष ठेवले पाहिजे, असा सल्ला इराकच्या भारतातील राजदूताने भारताला दिला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
ISISki sleeper cells Bharatme karyanvit, madarsopar dhyan rakhna avashyak - Bharatsthit Iraqi Rajdut
Dusre ye sunaye, ye sarkarki nishkriyataka pratik!
जागो !
इसिस की स्लीपर सेल्स भारत में कार्यान्वित, मदरसों पर ध्यान रखना आवश्यक ! - भारतस्थित इराकी राजदूत
दूसरे ये सुनाएं, यह सरकार की निष्क्रियता का प्रतीक !

देशात साम्यवादी आतंकवादाचा उदय ! - श्री. सूर्यकांत केळकर, राष्ट्रीय संयोजक, भारत रक्षा मंच

श्री. सूर्यकांत केळकर
      देशात एका नव्या आतंकवादाचे स्वरूप उदयास आले आहे आणि ते म्हणजे साम्यवादी (कम्युनिस्ट) आतंकवाद ! या लोकांनी देशाच्या इतिहासाला विकृत करण्याचे षड्यंत्र रचले. त्यांनी आम्ही आर्य असून बाहेरचे असल्याचे सांगितले आणि वनवासींना आदीवासी नाव देऊन त्यांना येथील मूळ निवासी असल्याचे सांगितले, असे प्रतिपादन भारत रक्षा मंचाचे राष्ट्रीय संयोजक श्री. सूर्यकांत केळकर यांनी केले.
    भारत रक्षा मंचाच्या वतीने नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलतांना श्री. केळकर पुढे म्हणाले, सत्य हे आहे की, मुघल सैन्य आपल्यावर चाल करून आले, तेव्हा लूट आणि महिलांचे अपहरण ही सामान्य गोष्ट होती. त्यांच्या भयाने गावचे गाव रिकामे होत होते. लोक जीव वाचवण्यासाठी भीतीने जंगलांमध्ये पळून जात. हेच वनवासींचे सत्य आहे. आर्यांना गौरवर्ण असल्याचे सांगितले जाते; परंतु आपले श्रीकृष्ण आणि श्रीराम तर श्याम वर्णाचे होते. आर्य जात नाही, तर विशेषण आहे, भारतीय वांङमयामध्ये सभ्य आणि शिष्ट लोकांना आर्य म्हटले आहे.

हरियाणाच्या शालेय अभ्यासक्रमात स्वा. सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी !

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धडे केवळ हरियाणा राज्यातीलच नाही, तर सर्वच भारतीय 
मुलांनी शिकल्यास देश महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही ! 
      चंदीगड - मुलांना नैतिक शिक्षण मिळण्याच्या हेतूने हरियाणा शासनाने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये पालट करण्याचे ठरवले आहे. या अंतर्गत राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवनचरित्र विषयक धडे समाविष्ट करण्यात येणार आहेत.
     यापूर्वी हरियाणा शासनाने भगवद्गीतेला पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्याचा विचार केला होता; मात्र तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी पक्षांनी यास विरोध केल्यावर शासनाने अन्य पंथियांच्या ग्रंथांनाही पाठ्यपुस्तकांमध्ये जोडले होते. या संदर्भात माहिती देतांना राज्याचे शिक्षणमंत्री रामविलास वर्मा यांनी सांगितले, विभिन्न धर्मांच्या ग्रंथांच्या व्यतिरिक्त स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी अभ्यास केल्यामुळे मुलांमध्ये नैतिक शिक्षणाचा विकास होईल आणि ते राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती व्यापक स्वरूपात विचार करू लागतील.

मदिनामध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणामागे हाफिज सईद : युरोपीय संसदेचे उपाध्यक्ष रिझार्ड झारनेक यांचे मत

     ब्रुसेल्स (बेल्जियम) - मदिनामध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणामागे लष्कर-ए-तोयबा आणि हाफिज सईदची स्वयंसेवी संस्था फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन असल्याची शक्यता युरोपीय संसदेचे उपाध्यक्ष रिझार्ड झारनेक यांनी त्यांच्या वेक अप कॉल टू अ‍ॅन्टी-टेररिझम् अय्यतोल्लाज् या लेखात व्यक्त केली आहे. 
     जिहादी आतंकवादी संघटना इसिसने मध्यपूर्व देशांमध्ये आतंकवादी कारवाया करणे चालू केल्यापासून पाकच्या लष्कर-ए-तोयबा आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन यांनी देखील त्यांच्या कार्याचा आवाका वाढवण्यास प्रारंभ केला आहे. त्यांच्या कारवाया भारताशी संबंधित असल्याचा समज असल्याने त्याकडे प्रथम दुर्लक्ष केले जात होते; मात्र मदिना येथे झालेल्या आक्रमणामुळे, हा समज चुकीचा असल्याचे झारनेक यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे. 
      फलाह-ए-इन्सानियत समाजकार्य करण्याच्या नावाखाली तरुणांना धर्मांध बनवत आहे. लष्कर-ए-तोयबा आणि फलाह-ए-इन्सानियत यांसारख्या संघटना ज्यांचा शरिया कायद्यावर विश्‍वास आहे, ते आतंकवाद्यांची भरती करण्यासाठी अधिक काम करत आहेत. हा एक धोका असून याच्याशी लढा दिला पाहिजे, असेही रिझार्ड झारनेक यांनी त्यांच्या लेखाद्वारे म्हटले आहे.

पुणे-सातारा महामार्ग खड्डे आणि अपघात ग्रस्त !

  • रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आस्थापनाचा उदासीन कारभार !
  • ३०० प्रवाशांचा मृत्यू
        भोर (जिल्हा पुणे) - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आस्थापनाच्या उदासीन कारभारामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम नियोजनानुसार होत नसून सध्या पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. महामार्गाचे उकरलेले रस्ते, अतिक्रमणामुळे झालेला पसारा, तुंबलेले ओढे-नाले, नदीवरील अर्धवट पूल, उड्डाणपूल, तसेच ठिकठिकाणी एकेरी सेवा रस्ता असल्याने तेथे प्रतिदिन अपघात होतात. आतापर्यंत जवळपास ३०० प्रवाशांना अपघातामुळे जिवाला मुकावे लागले आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

अवैधरित्या हुक्का यंत्र बाळगल्याप्रकरणी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या भावावर दुसर्‍यांदा गुन्हा प्रविष्ट

       पुणे, १५ जुलै - अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याने येथील कोरेगाव पार्कमधील त्याच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या १८ हुक्का यंत्रे ठेवल्याचे पोलिसांनी १३ जुलै या दिवशी टाकलेल्या धाडीत समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात १४ जुलै या दिवशी गुन्हा प्रविष्ट केला. त्याच्या हॉटेलवर कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे. (प्रथमच कठोर कारवाई केली असती, तर ही वेळच आली नसती. हे पोलिसांच्या कसे लक्षात येत नाही ? - संपादक)

सोपे आयुर्वेदीय उपचार

१. ताप
       पुढील काढा ताप येणार्‍या साधकांनी ७ दिवस दिवसातून ३ वेळा (सकाळी ६ ते १०, दुपारी १२ ते २ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळांत) प्रत्येकी १०० मि.लि. (१ वाटी) प्रमाणात घ्यावा. २५ जणांसाठी दिवसभरात लागणार्‍या काढ्यातील औषधांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
१ किलो आले, पावणे दोन किलो कडूनिंबाची पाने आणि १५० ग्रॅम काळी मिरी हे सर्व ठेचून १५ लिटर पाण्यामध्ये घालावेत. हे मिश्रण अर्धे (७.५ लिटर) होईपर्यंत उकळावे. काढा गरम असतांनाच घ्यावा. काढा घेतांना यात प्रत्येकाने १ चमचा मध घालून घ्यावा.
(काढा बनवून चहाच्या किटलीत ओतावा. साधकांनी प्रत्येकी पाऊण चहाचा पेला काढा घ्यावा. साधकसंख्येनुसार काढ्यातील औषधांचे प्रमाण न्यून-अधिक करावे.)
२. बद्धकोष्ठता
(शौचाला न होणे किंवा मलाचे खडे होणे)
    एका ताटलीत २ चमचे एरंडतेल घ्यावे. एका अख्ख्या सोललेल्या केळ्याला सर्व बाजूंनी हे तेल लावून ते केळे खावे. दिवसातून २ वेळा (सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळांत) एरंडाच्या तेलात एकेक केळे बुडवून खावे आणि यावर कपभर गरम पाणी प्यावे. असे ३ दिवस करावे.
- सिद्धाचार्य पुण्यमूर्ति, तंजावूर, तमिळनाडू. (२४.६.२०१६)

झाकीर नाईक आगे बढो... !

श्री. भाऊ तोरसेकर
     मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांच्या http://jagatapahara.blogspot.in/ या ब्लॉगवर काश्मीरमधील हिंसाचाराच्या प्रकरणी पुढील लेख प्रसिद्ध झाला आहे. हा लेख उपहासात्मक शैलित असून पुरोगाम्यांचे बिंग फोडणारा आहे. आमच्या वाचकांसाठी तो येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. सनातनच्या मागे हात धुवून लागणार्‍यांचे काश्मीरमधील 
हिंसाचाराच्या प्रकरणी मौन खटकणारे !
     मालेगाव स्फोट किंवा तत्सम काही घडले, मग सनातनच्या मागे हात धुवून लागणार्‍यांचे मौन सध्या अनेकांना खटकते आहे. त्याला एकच कारण आहे ते म्हणजे असे ज्यांना खटकते ते बुद्धीमंत नाहीत. बुद्धीजीवी वर्गातून तुम्ही आलेले असलात, की तुम्हाला असले प्रश्‍न पडत नसतात. सत्याला पारखे झाले, की बुद्धीजीवी तयार होत असतो.

क्लिष्ट वैज्ञानिक आणि आनंददायी आध्यात्मिक सिद्धांत !

      खड्डे नसलेला, दुतर्फा हिरवीगार झाडे असलेला प्रशस्त महामार्ग सोडून दगडधोंडे, काटेकुटे यांनी भरलेला खड्डेमय अरुंद रस्त्यावरचा प्रवास कुणीही सुबुद्ध व्यक्ती करण्याचे मनात आणणार नाही. व्यावहारिक जीवनात आपण वरील साहजिक विचार करून वागत असलो, तरी स्वतःच्या जीवनाच्या संदर्भात मात्र आपण अगदी विरुद्ध वागत असतो आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपला प्रवास अयोग्य मार्गाने चालू आहे, याची जाणीवही बहुतांश जणांना आयुष्य संपेपर्यंत होत नाही. त्यामुळेच मायानगरीत जन्म झाल्यापासून आपला जन्म कशासाठी झाला आहे ?, मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे ?, याचा विचार न करता मृत्यू येईपर्यंत आपण जगत रहातो. त्यामुळेच शिक्षण, नोकरी, संसार यातच आपले आयुष्य संपून जाते. एकमेकांची तुलना, स्पर्धा, हेवेदावे या डोहातच गटांगळ्या खाण्यात बराचसा वेळ निघून जातो.

आतंकवाद्यांना धर्म असतो !

       आतंकवाद्यांना धर्म नसतो, या घासून गुळगुळीत झालेल्या वाक्यावर आम्ही विश्‍वास ठेवतो; पण मग प्रश्‍न इतकाच आहे की, मारलेल्या अतिरेक्याच्या शवयात्रेला गर्दी करून शिवयात्रा (अमरनाथ यात्रा) रोखणार्‍यांचा धर्म कोणता ? अतिरेक्याला हुतात्मा न म्हटल्यामुळे निष्पाप यात्रेकरूला बडवणार्‍या लोकांचा धर्म कोणता ? अमरनाथ यात्रेतील लंगर जाळणार्‍या लोकांचा धर्म कोणता ? भारत आणि सैन्याविरुद्ध जिहाद पुकारा, असे सांगणार्‍या धर्मगुरूंचा धर्म कोणता ? 
        आणखीनही बरेच प्रश्‍न विचारता येतील......!!
- डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     देशभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, त्यागाची निष्ठा यांच्या प्रसूतीवेदना हिंदुस्थानला जोपर्यंत जाणवणार नाहीत, तोपर्यंत आपण स्वातंत्र्यविश्‍वाच्या त्रिखंडात टिकणार नाही. आजचा सुशिक्षित समाज अशाच क्षुद्र विचारांचा झाला आहे. 
- पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान
     जोपर्यंत माझे घर जळत नाही, तोपर्यंत मी उठणार नाही, ही मानसिकता हिंदूंनी त्यागायला हवी ! - ह.भ.प. शिवणीकर महाराज, पंढरपूर, जिल्हा सोलापूर
     देशापुढील समस्यांकडे भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्या दृष्टीकोनातून न पहाता सनातन हिंदु धर्माच्या दृष्टीने पहायला हवे, तरच राष्ट्राचा उद्धार होऊ शकेल !

अध्यात्म जगून स्वतःच्या आदर्श वागण्याने साधकांना घडवणारे संतरत्न पू. (सौ.) अंजली गाडगीळ !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. देवाने सुचवलेल्या सूत्रांप्रमाणे कृती करण्याचे पू. (सौ.) गाडगीळकाकूंनी सांगितलेले महत्त्व

१ अ. देवाने सुचवल्याप्रमाणे कृती केल्याने फलनिष्पत्ती वाढणे : मी रामनाथी आश्रमात असतांना एकदा विभूतीच्या मोठ्या बरण्या एका जागेहून दुसर्‍या जागी ठेवायच्या होत्या. त्या ठेवत असतांना देवाने आश्रमातील हातगाडी वापरण्याचा विचार दिला; पण त्याकडे दुर्लक्ष करून मी तशीच सेवा करू लागले. तेवढ्यात पू. गाडगीळकाकूंनी मला हातगाडीचा वापर करण्यास सांगितले.

एकदा खोक्यातील साहित्याची सूची करतांना माझ्या मनात विचार आला, 'कार्बन कागद घेऊन दोन प्रती करूया का ?'; पण मी त्या विचाराकडे दुर्लक्ष करून केवळ एकच प्रत केली. नंतर पू. (सौ.) काकूंनी मला 'कार्बन कागद घेतला असता, तर दोन प्रती मिळाल्या असत्या', असे सांगितले.

हे दोन प्रसंग घडल्यावर मी पू. (सौ.) काकूंना सांगितले, तुम्ही जे करायला सांगितले, तसा विचार माझ्या मनात आधी येऊन गेला होता; पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा पू. काकू म्हणाल्या, "सेवा करतांना ती अधिकाधिक चांगली होण्यासाठी देव जसे सुचवतो, तशी कृती लगेच केल्याने आपली सेवेतील फलनिष्पत्ती वाढते आणि प्रगती होते."

सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करून गुरुपौर्णिमा २०१६ पर्यंत ६० टक्के आणि त्याहून अधिक पातळी प्राप्त करणार्‍या साधकांची, तसेच संतांची साधनेतील वाटचाल

     आस्थापने आणि संस्था त्यांचा आर्थिक, तसेच कार्याविषयीचा वार्षिक आढावा सादर करतात. त्याप्रमाणे सनातन संस्था आणि तिने सांगितलेल्या साधनेनुसार मार्गक्रमण करणार्‍या हिंदु जनजागृती समिती, तसेच एस्.एस्.आर्.एफ्. या अन्य संघटना यांच्या आध्यात्मिक कार्याचा हा वार्षिक आढावाच आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण आढावा आत्मोन्नतीदर्शक असून अन्य साधकांना त्याद्वारे प्रेरणा मिळून त्यांचीही साधनेतील वाटचाल जलद गतीने व्हावी, या उद्देशाने तो सादर केला जात आहे.
    साधना करणार्‍यांसाठी गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।, म्हणजे शिष्याचे परममंगल, म्हणजे मोक्षप्राप्ती ही केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते. गुरुकृपा संपादन करणे, ही आध्यात्मिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. सनातनचे आणि सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या अन्य संघटनांचे साधक गुरुकृपायोगानुसार साधनेचा अंगीकार करतात. त्यांचे भाग्य म्हणजे त्यांना साधनेसाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (प.पू. डॉक्टर) यांचे सनातन प्रभात नियतकालिके, ग्रंथ आदींच्या माध्यमातून मार्गदर्शन लाभते आणि स्वतःची साधनेची वाटचाल कुठपर्यंत आली, हेही गुरुपौर्णिमेच्या वेळी कळते. त्यामुळे त्यांना गुरूंप्रती कृतज्ञता वाटते आणि ते या दिवसाची चातकासारखी वाट पहातात.

आध्यात्मिक पातळीनुसार उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या जिवांची जाणवणारी सूक्ष्मातील स्पंदने

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
        १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

प्राण असेपर्यंत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या देहाची काळजी घेणार ! - सिद्धाचार्य श्री. पुण्यमूर्ती

तंजावूर (तमिळनाडू) येथील सिद्धाचार्य श्री. पुण्यमूर्ती यांचा सनातनच्या 
संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार
सिद्धाचार्य श्री. पुण्यमूर्ती यांचा सत्कार करतांना
पू. (सौ.) अंजली गाडगीळ. सोबत श्री. पुण्यमूर्ती
यांच्या पत्नी सौ. प्रेमा आणि पुत्र श्री. रामानुजम्,
तसेच सनातनचे साधक श्री. विनायक शानभाग.
       तंजावूर (तमिळनाडू) - येथील सिद्धाचार्य श्री. पुण्यमूर्ती यांचा सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. प्रेमा आणि पुत्र श्री. रामानुजम् उपस्थित होते, तसेच सिद्धाचार्य श्री. पुण्यमूर्ती यांच्याकडून वैद्योपचार शिकायला आलेले सनातनचे साधक वैद्य मेघराज पराडकर हेही उपस्थित होते. प्राण असेपर्यंत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या देहाची काळजी घेणार, असे भावपूर्ण उद्गार सिद्धाचार्य श्री. पुण्यमूर्ती यांनी या वेळी काढले.
     सिद्धाचार्य श्री. पुण्यमूर्ती हे तंजावूर येथील त्यांच्या घरी प्रतिदिन सकाळी ६ ते १० या वेळेत, तसेच सायंकाळी ४ ते ७ या वेळेत रुग्णांवर सिद्ध उपचारपद्धतीनुसार उपचार करतात. त्यातील बहुतेक जण असाध्य व्याधीने ग्रासलेले असतात आणि शेवटचा उपाय म्हणून सिद्धाचार्य श्री. पुण्यमूर्ती यांच्याकडे उपचारासाठी येतात. गेल्या काही दिवसांपासून ते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, सनातनचे काही संत आणि साधक यांच्यासाठी उपचार सांगत आहेत.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या एस्.एस्.आर्.एफ्. च्या कार्यशाळेत सहभागी झालेले साधक

      रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ८.७.२०१६ ते १२.७.२०१६ या कालावधित महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत सहभागी झालेल्या साधकांची साधना आणि आश्रमात आल्यानंतर त्यांच्यात झालेले पालट पुढे देत आहोत.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्यातील आनंद घ्यायला शिकवणारे अन् प्रेमभावाने चुका सांगणारे पू. राजेंद्र शिंदे !

पू. राजेंद्र शिंदे
१. पू. राजेंद्र शिंदे यांनी घेतलेला पहिला व्यष्टी आढावा म्हणजे जणूकाही भावसत्संगच वाटून त्यांच्याकडून साधनेचा श्रीगणेशा गिरवत आहोत, असे जाणवणे : पू. राजेंद्र शिंदे आम्हा काही वयस्कर साधकांचा व्यष्टी आढावा घेतात. आरंभी पू. दादांनी आम्हाला आमच्या अडचणी आणि प्रश्‍न मोकळेपणाने लिहून द्यायला सांगितलेे. त्यानुसार एक-एक प्रश्‍न सोडवतांना त्यांनी चर्चेत आम्हालाही सहभागी करून घेतले आणि त्यावरील उपाय सांगितले. आमच्या चुका इतक्या प्रेमाने लक्षात आणून दिल्या की, आम्हाला तो भावसत्संगच वाटत होता. आम्ही ६० वर्षे वयाच्या पुढचे साधक पू. दादांच्या पुढ्यात ४ - ५ वर्षांची बालके असल्यासारखे बसून साधनेचा श्रीगणेशा गिरवत आहोत, असे जाणवले. त्यांनी माझ्या स्वयंसूचना २ - ३ वेळा पालटायला सांगितल्या. प्रत्येक वेळी न कंटाळता, न रागवता आमच्या चुकीच्या स्वयंसूचना दुरुस्तही करून दिल्या. दोन सूचना चांगल्या लिहिल्या. तेव्हा लगेच कौतुक करून तिसरी पुन्हा लिहा, असे सांगितले. त्या वेळी आनंदाने लहान मुलांसारख्या उड्या माराव्या, असे वाटले. पहिल्या आढाव्यानंतर विभागात परतल्यावर सहसाधिकेने सांगितले, तुमचा तोंडवळा केवढा पालटला आहे. तुम्ही पुष्कळ आनंदी दिसत आहात.

प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व क्षणोक्षणी अनुभवल्याने साधकाला मिळालेला कृष्णानंद !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
       काल प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व क्षणोक्षणी अनुभवण्यासाठी श्री. दीपक आगावणे यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज आपण त्या लेखाचा पुढील भाग पाहूया. यात गुरुमाऊलीला अपेक्षित अशी साधना होण्यासाठी त्यांनी केलेला निश्‍चय आणि कृती येथे दिल्या आहेत.
४. गुरुमाऊलीला अपेक्षित अशी साधना 
होत नसल्याची खंत वाटल्याने साधकाने 
तळमळीने साधना करण्याचा केलेला निश्‍चय ! 
श्री. दीपक आगवणे
४ अ. प.पू. डॉक्टरांनी साधकावर सतत सुखाचा, प्रेमाचा आणि चैतन्यानंदाचा वर्षाव करणे : माझी परात्पर गुरुमाऊली, तुमची दैवी लीला पुष्कळ अद्भुत आहे. शेषनागसुद्धा सहस्रो मुखांनी तुमच्या दैवी लिलांचे गुणगान करतांना थकून जाईल. तो असमर्थ आहे, तर मी एका मुखाने तुमचे गुणगान कसे वर्णू ? प.पू. डॉक्टर, तुम्ही माझ्यावर सुखाचा, प्रेमाचा आणि चैतन्यानंदाचा सतत वर्षाव करत आहात. तुमच्या कोमल चरणांशी एकरूप होण्यासाठी आतुरलेला हा जीव अपराधीपणाच्या जाणिवेने नतमस्तक होऊन आणि सर्वसमर्पणभावाने शरण येऊन तुमच्या कोमल चरणांशी कृतज्ञता व्यक्त करत आहे.

केवळ जिज्ञासा म्हणून भुतांचा अभ्यास नको, तर याबरोबरच संशोधन करणार्‍याची साधनाही हवी, नाहीतर या वाईट शक्ती कधीही आपल्या जिवास हानी पोहोचवू शकतात आणि त्याचे प्रत्यक्ष उदाहरण !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
      भुतांविषयी संशोधन करणार्‍या एका मोठ्या संस्थेच्या तरूण संस्थापकाचे नुकतेच निधन झाल्याची बातमी वाचनात आली. त्यांचा मृत्यू मोठा चमत्कारिक होता. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी हा तरुण त्याच्या पत्नीला कुणीतरी काळी शक्ती मला तिच्याकडे खेचत आहे, असे सांगत होता. या तरुणाने जवळजवळ ६ सहस्र बाधित घरांचे संशोधन केले होते. पोलिसांनी सदर तरूणाने अती ताण घेऊन आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला; परंतु त्याच्या कुटुंबियांनीही मात्र ही शक्यता फेटाळून लावत तो असा आत्महत्या करणार नाही. त्याच्या मृत्यूचे गूढच आहे, असे सांगितले.
     एका मोठ्या संस्थेच्या संस्थापकाचे हल्लीच निधन झाल्याची बातमी वाचल्यावर त्या संदर्भात मी जे लिहिणार होतो, अक्षरशः तेच पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी लिहिले आहे. - परात्पर गुरु डॉ. आठवले

६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले ठाणे येथील प्रा. शिवकुमार ओझा यांची गुणवैशिष्ट्ये

प्रा. शिवकुमार ओझा
१. स्वावलंबी
      जो स्वतःची कामे स्वतः करतो, तोच श्रेष्ठ असतो आणि यशस्वी होतो, असे ठाणे येथील प्रा. शिवकुमार ओझा यांनी बोलतांना सांगितले. ते ८२ वर्षांचे असून ही जेवणाचे ताट स्वतः घेणे, काही हवे असल्यास स्वतः घेणे आदी सर्व कामे करतात.
२. उतारवयातही धर्मप्रसाराची आत्यंतिक तळमळ असणे
     ठाणे येथील प्रा. शिवकुमार ओझा हे ८२ वर्षांचे असूनही रेल्वेने प्रवास करून येत होते. त्या वेळी त्यांच्या हातात पुष्कळ जड पिशवी होती. ते स्वतःच्या साहित्याची पिशवी भूमीवर ओढत आणत होते. त्यांना विचारल्यावर लक्षात आले की, हिंदू अधिवेशनात धर्माभिमान्यांना वाटण्यासाठी त्यांनी ग्रंथ आणले आहेत. या वयात चालणेही अशक्य असतांना ते धर्मासाठी इतक्या दूर येऊन तळमळीने कार्यरत आहेत.
- डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, मुंबई. (२४.६.२०१६)

कु. श्रावणी पेठकर (वय १४ वर्षे) हिला आलेली अनुभूती आणि स्फुरलेली कविता

कु. श्रावणी पेठकर
१. स्वप्नामध्ये श्रीकृष्णाच्या संपूर्ण रूपाचे प्रथमच दर्शन होणे, त्याच्याकडून केशरी आणि पिवळ्या रंगांचे प्रकाशकिरण येतांना दिसणे अन् त्याच्या विराट रूपाकडे पहातांना त्याचेे तेज सहन न होणे : जुलै २०१४ मध्ये पहिल्यांदाच स्वप्नामध्ये मला माझी आई आणि मी एकत्रित असल्याचे दिसले. नंतर लगेच श्रीकृष्ण माझ्या डोळ्यांसमोर आला. आकाशात श्रीकृष्ण दिसत होता. त्याच्या आजूबाजूला ग्रह आणि तारे होते अन् पृथ्वी लखलख चमकत होती. श्रीकृष्णाकडून केशरी आणि पिवळ्या रंगांचे प्रकाशकिरण येतांना दिसले. जेव्हा मी श्रीकृष्णाकडे पाहिले, तेव्हा त्याचेे तेज मला सहन होत नव्हते. माझे डोळे दिपत होते. आतापर्यंतच्या स्वप्नांमध्ये मला श्रीकृष्णाचे मुखापासून गळ्यापर्यंत इतकेच रूप दिसायचे. या स्वप्नात मला त्याचे संपूर्ण रूप दिसले. त्यानंतर त्याने मला त्याचे विराट रूप दाखवले . ते मला सहन न झाल्याने मी पटकन डोळे उघडले. जेव्हा मला स्वप्नातून जाग आली, तेव्हा मला घाम आला होता.
श्री. राम होनप
       परमेश्‍वराची आपल्यावर केवळ दृष्टी नको, तर कृपादृष्टी हवी आणि त्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. दृष्टी म्हणजे जे घडते, ते केवळ पहाणे, यालाच साक्षीभाव म्हणतात. कृपादृष्टी म्हणजे भगवंताने मनुष्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साहाय्य करणे.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

महर्षींच्या आज्ञेनुसार श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव हा नामजप करण्यापूर्वी प्रार्थना करतांना उत्स्फूर्तपणे हिंदु राष्ट्र संस्थापक प.पू. श्रीजयंत बाळाजी आठवले, असे शब्द उच्चारले जाणे

       महर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे सांगितले होते, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या आरंभदिनी सर्व साधकांनी प्रार्थना करून श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव असा नामजप १०८ वेळा करावा. त्यानुसार मी त्या दिवशी नामजप करण्यापूर्वी मनात प्रार्थना केली. तेव्हा माझ्या अंतर्मनातून उत्स्फूर्तपणे हिंदु राष्ट्र संस्थापक प.पू. श्रीजयंत बाळाजी आठवले, असे शब्द उच्चारले गेले आणि मला पुष्कळ आनंद जाणवला. - अधिवक्त्या (सौ.) श्रुति भट, अकोला

गुरुराया, येऊ कसा तवचरणी !

श्री. दीपक छत्रे
गुरुराया, येऊ कसा तव चरणी ।
षड्रिपू छळती निशिदिनी ॥ धृ. ॥
शरण जावे तुजला, इतुकेच जमते मला ।
जाणतोस या पतिताला, परि वदतो काही न राखूनी ॥ १ ॥
सकलां ज्ञान तू दिधले, या मूढा ते न उमगले ।
सुखासीन जगणे झाले, आज्ञापालन नच घडूनी ॥ २ ॥
मीपणाने मज ग्रासियले, गांभीर्य तेही हरपले ।
आळसास सोबती केले, वासना न जाई पळोनी ॥ ३ ॥
तव कृपेने हरघडी सावरलो, पश्‍चात्तापे क्षणभर रडलो ।
पुनरपी चुकतच गेेलो, येती स्वभावदोेष उफाळूनी ॥ ४ ॥
साधनेस मज बळ द्यावे, ध्येय दुजे काही नुरावे ।
कृष्णमय जीवन होऊनी, तवचरणी विलीन व्हावे ॥ ५ ॥
- श्री. दीपक रामचंद्र छत्रे, फोंडा, गोवा. (२०.११.२०१४)

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
    सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
   समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल (HMV) असे परवाने असणे आवश्यक आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
   स्वातंत्र्यानंतर ६९ वर्षे झाली, तरी अजूनही इंग्रजी भाषेची गुलामगिरी नष्ट करावी, असे शासनकर्त्यांना वाटत नाही. हिंदु राष्ट्रात तामसिक इंग्रजी भाषेचे समूळ उच्चाटन केले जाईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक

शिष्याने कोणती साधना करावी ते गुरु जाणतात.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं ।
    भावार्थ : आनेवालेको कहना नहीं मधे कहना हे विचारणे या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला तू जन्माला का आलास ? असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस ? हे स्वतःला विचारल्याविना राहू नये. या प्रश्‍नाने तरी तो स्वतःच्या खर्‍या रूपाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्वभावदोषांमुळे घडणार्‍या चुका 
तुमच्यातील स्वभावदोष तुम्हाला सांगणारा तुमचा खरा मित्र आणि हितचिंतक असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

पर्यायाच्या शोधात !

संपादकीय 
      अमरनाथ यात्रा सध्या स्थगित आहे. आतंकवाद्यांच्या हिंसाचारामुळे यात्रेकरू यात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. श्रीनगरच्या सैन्याच्या एका छावणीत साधारण दहा सहस्र यात्रेकरू मागील चार दिवसांपासून रहात आहेत. आतंकवादी वाटेत दगडफेक करतात, त्यामुळे बाहेर पडणे कठीण काम होऊन पडले आहे. जम्मू-काश्मीर राज्यातील ही समस्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे. आतंकवादी बुरहान वानी भारतीय सैनिकांकडून मारला गेला आणि काश्मिरी युवकांनी सैनिकांवर दगडफेक करणे चालू केले. आतंकवाद्यांच्या समर्थकांनी हे दुष्कृत्य चालवले आहे.

जनता निर्भय कशी बनेल ?

संपादकीय
      इसिस या आंतरराष्ट्रीय जिहादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून परभणी येथील ४ जणांना चौकशीसाठी कह्यात घेतले गेले. आंध्रप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने ही कारवाई केली, असे सांगण्यात येत आहे. आरंभी आंध्रप्रदेशमध्येच असे २० संशयित पकडले गेले. त्या कारवाईतूनच आंध्रप्रदेश पोलिसांना अधिक माहिती मिळाली असावी आणि त्यातून परभणीतील ही कारवाई यशस्वी झाली असावी, असे म्हणता येते. परभणीमध्ये चार संशयित पकडले जाण्यापूर्वी आणखी कुठून-कुठून असे संशयित पकडले गेल्याची वृत्ते प्रसिद्ध झालेली आहेत; त्यामुळे देशभर असे किती संशयित पसरले असावेत, याविषयी एक प्रश्‍न मनात उभा रहातो. इसिसने सिरियामध्ये डोके वर काढल्याच्या क्षणापासून भारतीय नेते म्हणत आहेत की, इसिसला भारतात पोहोचणे शक्य होणार नाही किंवा भारतीय तरुण इसिसच्या प्रभावाखाली जाणार नाहीत. आज ती परिस्थिती नाही. किंबहुना तसा आत्मविश्‍वास बाळगणे धोक्याचेच आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn