Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांचा आज वाढदिवस

दिनविशेष

आज आषाढी (देवशयनी) एकादशी
अवघे गरजे पंढरपूर ।
चालला नामाचा गजर ॥
टाळ घोष कानी येती ।
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ॥
पांडुरंगी जाहले हो ।
चंद्रभागा नीर ॥

सनातनवर बंदी नको !

वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी !
श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्यात दिंडी समाजाच्या वतीने एकमुखाने ठराव ! 
दिंडीच्या बैठकीत ठराव मांडताना ह.भ.प. माधव महाराज
शिवणीकर (उभे असलेले) आणि उपस्थित दिंडीप्रमुख
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १४ जुलै (वार्ता.) वारकरी संप्रदायातील एखाद्या वारकर्‍याने चोरी केली अथवा दरोडा टाकला, तर संपूर्ण वारकरी संप्रदायावर बंदी आणणार का ? सनातनच्या प्रकरणात जर कोणी दोषी असतील, तर त्यांच्यावर निश्‍चित कारवाई करा; मात्र सनातनवर बंदी घालणे हे अन्यायकारक होईल. वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी राहील, असे आश्‍वस्त करणारे मत श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे विद्यमान तिसरे मठाधिपती तथा अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज कदम यांनी व्यक्त केले. याविषयी ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर यांनी ठराव मांडला होता. या ठरावास सर्वांनी एकमुखाने संमती दिली.

सनातनवर बंदी घातल्यास हिंदु धर्माची मोठी हानी होईल ! - ह.भ.प. भगवान महाराज कोकरे

पंढरपुरात निवडक अभंग निरूपणच्या ३० व्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न ! 
   डावीकडून ह.भ.प. बाबूराव महाराज वाघ, ह.भ.प. चंद्रशेखर महाराज
देगलूरकर, ह.भ.प. बाळ महाराज हरिदास, ह.भ.प. अनिलकाका बडवे
    पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १४ जुलै (वार्ता.) - सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रचार प्रसार करणारी एकमेव संस्था आहे. या संस्थेवर बंदी घातल्यास हिंदु धर्माची मोठी हानी होणार असून सनातन संस्थेवर बंदी म्हणजे हिंदु धर्मावर बंदी घालण्यासारखे आहे. वारकरी संप्रदाय आणि सनातन संस्था यांनी एकत्रित कार्य केले आहे. सनातन धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य ही संस्था करत आहे. सध्याच्या शासनाला वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटना यांनी अथक प्रयत्न करून सत्तेवर आणले आहे.
    वेळ पडलीच, तर सनातनसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्यास वारकरी संप्रदाय सर्वांत पुढे असेल. अशा धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी संघटनेवरील बंदी खपवून घेतली जाणार नाही, अशी चेतावणी ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी येथील सोहळ्यात दिली.

कर्नाटकच्या मंत्रीमंडळाने प्रस्तावित अंधश्रद्धाविरोधी विधेयक पुनर्विचारासाठी उपसमितीकडे परत पाठवले !

   बेंगळुरू - कर्नाटकातील काँग्रेस सरकारने प्रस्तावित केलेल्या अंधश्रद्धाविरोधी विधेयकाला नुकत्याच पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनुमती मिळू शकली नाही. तसेच या कायद्याला विरोधी पक्षाच्या सदस्यासह सत्तारूढ काँग्रेस पक्षाच्या सदस्यांचाही विरोध असल्याने हे विधेयक मंत्रीमंडळ उपसमितीकडे पुनर्विचारासाठी पाठवण्यात आले आहे. महसूल मंत्री कागोडू थीमप्पा या उपसमितीचे अध्यक्ष आहेत. हा प्रस्तावित कायदा महाराष्ट्र सरकारने पारित केलेल्या कायद्यावर आधारित आहे. या कायदाला हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विरोध केला आहे.
१. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी २०१३ मध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यापासून अंधश्रद्धा विरोधी कायदा विधिमंडळात पारित करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार या विधेयकाचा तपशील सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व राष्ट्र्रीय कायदा संस्थेकडे सोपवण्यात आले होते; मात्र त्यातील अनेक वादग्रस्त प्रावधानांवर मंत्र्यांचे एकमत होऊ शकले नाही.

पुरोगाम्यांच्या दबावाला महाराष्ट्र शासनाने बळी पडून सनातन संस्थेवर बंदी आणू नये ! - ह.भ.प. ज्ञानेश्‍वर विष्णु महाराज कोल्हापूरकर

मध्यभागी ह.भ.प. ज्ञानेश्‍वर विष्णु महाराज कोल्हापूरकर भक्तांना मार्गदर्शन करतांना

बैठकीत पाठिंबा देतांना वर्तुळात ह.भ.प. ज्ञानेश्‍वर विष्णु महाराज कोल्हापूरकर यांसह अन्य प्रमुख

  • कुर्डुवाडी मुक्कामी बैठकीत एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे पाठिंबा !
  • ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर (आपेगांव संस्थान) सनातनच्या पाठीशी !
        पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १४ जुलैै (वार्ता.) - सनातन संस्थेचे कार्य गेली कित्येक वर्षे वारकरी संप्रदायाने जवळून पाहिले आहे. सनातन संस्था समाजाला धार्मिक शिक्षण देऊन सुसंस्कृत बनवण्याचे कार्य करत आहे. महाराष्ट्र शासनाने पुरोगाम्यांच्या दबावाला बळी पडून सनातन संस्थेवर बंदी आणणे म्हणजे देश आणि धर्म यांच्या पायावर स्वत:हून दगड मारण्यासारखे आहे. हिंदु संस्कृतीचे शिक्षण देणारी ही भारतातील अग्रगण्य संस्था आहे. सनातन संस्थेला ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर (आपेगांव संस्थान) यांचा संपूर्ण पाठिंबा आहे. समाजामधील काही विघ्नसंतोषी आणि समाजविद्वेषक संघटना समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सनातन संस्थेवर खोटे आरोप करून समाजातील वातावरण आंदोलने करून गढूळ करत आहेत. त्यांच्यावरही शासनाने कार्यवाही करावी आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता सनातन संस्थेवर बंदी आणू नये, अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर (आपेगांव) यांच्या दिंडीचे कुर्डुवाडी मुक्कामी पालखी सोहळ्याच्या वेळी एका बैठकीनंतर काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे ह.भ.प. ज्ञानेश्‍वर विष्णु महाराज कोल्हापूरकर (दादा) यांनी वरील मागणी केली. वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी आहे, असे आश्‍वस्त मतही ह.भ.प. ज्ञानेश्‍वर विष्णु महाराज कोल्हापूरकर यांनी या वेळी व्यक्त केले.

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात पुणे येथे मंत्री आणि आमदार यांना निवेदने !

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री श्री. गिरीष बापट
(उजवीकडे) यांना निवेदन देतांना सनातनचे साधक श्री. प्रवीण नाईक
आमदार माधुरी मिसाळ (उजवीकडे)यांना निवेदन देतांना सनातनचे साधक
आमदार श्री. योगेश टिळेकर (उजवीकडे)यांना निवेदन देतांना सनातनचे साधक
        पुणे, १४ जुलै (वार्ता.) - पुरोगाम्यांच्या दबावापोटी, तसेच हिंदुद्वेषी शक्तींच्या अपप्रचारामुळे सनातन संस्थेवर गेल्या काही वर्षांपासून बंदीची टांगती तलवार आहे. सनातनचे कार्य धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ आणि पारदर्शक असतांना केवळ हिंदुद्वेषापोटी सनातन संस्थेला लक्ष्य केले जात आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातनचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक झाल्यानंतर न्याययंत्रणेनेही कोणती टिपणी केली नसतांना पुरोगामी बांडगुळे सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आमदारांची भेट घेऊन त्यांना सनातनची न्याय बाजू सांगणारे निवेदन देत आहेत. पुण्यातही पुण्याचे पालकमंत्री, तसेच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री श्री. गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ आणि आमदार योगेश टिळेकर यांना निवेदने देण्यात आली. या वेळी तिघांनीही विधीमंडळात विषय मांडण्याचे आश्‍वासन दिले.

निर्दोष हिंदूंच्या सुटकेकरिता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू ! - प्रशांत ठाकुर, आमदार, भाजप

सनातनचा छळ 
थांबवण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी ! 
डावीकडून श्री. नरेंद्र सुर्वे, सौ. अभया उपाध्ये, श्री. ठाकुर अजयसिंह सेंगर,
निवेदन स्वीकारतांना श्री. प्रशांत ठाकुर आणि त्यांच्या बाजूला श्री. गुरुनाथ मुंबईकर
        पनवेल - निर्दोष हिंदूंच्या सुटकेकरिता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू आणि हिंदुविरोधी शक्तीचा बिमोड करू, असे आश्‍वासन पनवेल येथील भाजपचे आमदार श्री. प्रशांत ठाकुर यांनी दिले. दाभोलकर आणि पानसरे हत्यांच्या प्रकरणात सनातन संस्थेच्या निष्पाप साधकांना गुंतवणे थांबवावे, तसेच चौकशीच्या नावाखाली चालू असलेला छळ थांबवावा आणि सनातनवर बंदी घालण्याच्या मागणीला येत्या पावसाळी अधिवेशनात विरोध करावा, यासाठी आमदार श्री. प्रशांत ठाकुर यांंना पनवेल येथील हिंदुत्ववाद्यांनी निवेदन दिले. त्या वेळी ते बोलत होते.

सनातनचे कार्य खूप चांगले ! - आमदार सौ. मनीषा चौधरी, भाजप

सनातनला साहाय्य करण्याविषयी 
भाजपच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनाही केली विनंती ! 

डावीकडून श्री. वैभव राऊत, श्री. दत्तात्रेय बेंद्रे, निवेदन
स्वीकारतांना आमदार सौ. मनीषा चौधरी आणि डावीकडे श्री. प्रसाद काळे

        मुंबई, १४ जुलै (वार्ता.) - सनातनचे कार्य मला माहीत आहे. डहाणू येथे सनातनचे कार्य आरंभ करण्यासाठी मी सहकार्य केले आहे. सनातनचे कार्य खूप चांगले आहे, अशा शब्दांत दहिसर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार सौ. मनीषा चौधरी यांनी सनातनच्या कार्याची स्तुती केली. १२ जुलै या दिवशी हिंदुत्ववादी आणि सनातन संस्था यांच्या वतीने आमदार सौ. मनीषा चौधरी यांची बोरीवली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना सनातनवरील बंदीचे षड्यंत्र हाणून पाडावे, यासाठी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी त्यांनी वरील प्रतिपादन केले. या वेळी हिंदु गोवंश रक्षा समितीचे समन्वयक श्री. वैभव राऊत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद काळे, सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रेय बेंद्रे उपस्थित होते.

पावसाळी अधिवेशनात आम्ही सनातनच्या बाजूने आवाज उठवू ! - आमदार राम कदम, भाजप

   माहिती देतांना सौ. शर्मिला बांगर, निवेदन स्वीकारतांना
आमदार राम कदम मध्यभागी आणि बाजूला सतीश सोनार
लोकप्रतिनिधींकडून सनातनच्या राष्ट्र आणि धर्म कार्याचे कौतुक !
मुंबई, १४ जुलै (वार्ता.) - मी पूर्णत: सनातनचे कार्य जाणतो. सनातन संस्थेचे कार्य राष्ट्र-धर्माचे आहे. माझ्यासारख्या छोट्या माणसाची अपकीर्ती होते, तर सनातन संस्था किती मोठी आहे. आम्ही अधिवेशनात सनातनच्या बाजूने नक्कीच आवाज उठवू, असे आश्‍वासन भाजपचे आमदार श्री. राम कदम यांनी दिले. १३ जुलै या दिवशी सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात आवाज उठवण्याकरता सनातन संस्थेचे साधक श्री. सतीश सोनार आणि सौ. शर्मिला बांगर यांनी भाजपचे आमदार श्री. राम कदम यांची भेट घेऊन त्यांना याविषयीचे निवेदन दिले. या वेळी आमदार श्री. कदम यांनी वरील आश्‍वासन दिले.

परभणी येथील इसिसचे ४ युवक पोलिसांच्या कह्यात !

    इसिसने पोखरलेला भारत ! आतातरी आतंकवादविरोधी पथक धर्मांधांच्या वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवणार का ? सनातनच्या निरपराध साधकांच्या मागे चौकशीचा नाहक ससेमिरा लावणार्‍या अन्वेषण यंत्रणांनी त्यांची शक्ती अशा जिहादी आतंकवाद्यांना शोधण्यासाठी वापरली, तर देश लवकर आतंकवादमुक्त होईल ! 
    परभणी, १४ जुलै - इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून आंध्रप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने येथील ४ जणांना चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. त्यामधील एकाचे नाव नसीरबिन याफी चाऊस असे आहे. भाग्यनगर येथे काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केलेल्या संशयिताच्या चौकशीच्या वेळी मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक सण्डे टाइम्सचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांना हानीभरपाईच्या मागणीची कायदेशीर नोटीस

    रामनाथी (गोवा), १४ जुलै (वार्ता.) - पणजी, गोवा येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक सण्डे टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राने त्यांच्या १९ जून २०१६ दिवशीच्या अंकात Retd cop denies connections to Dabholkar murder plotter या मथळ्याखाली मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध करून सनातन संस्थेची मानहानी केल्याच्या प्रकरणी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्यामार्फत १० कोटी रुपये हानीभरपाईची मागणी करणारी कायदेशीर नोटीस सण्डे टाइम्स चे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांना बजावली आहे. या नोटिशीत म्हटले आहे की, सनातन संस्था धर्मप्रसार करणारी असून संस्थेचा समाजातील नावलौकिक माहीत असतांना तिची मानहानी करण्याच्या हेतूने दैनिक सण्डेे टाईम्स चे संपादक श्री. के.आर्. श्रीनिवास, मालक बेनेट कोलोमन अ‍ॅण्ड कंपनी लि., प्रकाशक श्री. सोनू कुमार आणि मुद्रक एलीगंट ऑफसेट प्रिन्टर्स यांनी दैनिक सण्डे टाईम्सच्या गोवा आवृत्तीच्या १९ जून २०१६ या दिवशीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून सनातन संस्थेला अपकीर्त केले आहे.

काश्मीरमधील हिंदू पुन्हा पलायनच्या स्थितीत !

   नवी देहली - काश्मीर खोर्‍यातील हिंसाचारामुळे तेथील शिल्लक काश्मिरी हिंदू पलायन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे विस्थापित हिंदूंना पुन्हा काश्मीर खोर्‍यात आणण्याचा प्रयत्न होत असतांना तेथील शिल्लक हिंदूंचेच पलायन होण्याची स्थिती चिंताजनक आहे, असे म्हटले जात आहे. अखिल भारतीय काश्मिरी पंडित समुदायाचे उपाध्यक्ष एम्.एल्. भल्ला यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन याविषयी चिंता व्यक्त केली. यापाठोपाठ पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीही गृहमंत्र्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.

अमरनाथ यात्रेकरूंवरील आक्रमणामुळे यात्रा पुन्हा स्थगित !

अमरनाथ यात्रा भारतात आहे कि पाकमध्ये ?
    अनंतनाग (जम्मू-काश्मीर) - गेल्या आठवड्यात जिहादी आतंकवादी बुरहान वाणीला ठार केल्यावर काश्मीरमध्ये दंगलखोर धर्मांधांकडून हिंसाचार झाला. त्यात अमरनाथ यात्रेकरूंवरही आक्रमण झाले. त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांंना लुटण्यात आले, महिलांवर अत्याचार झाले. यामुळे यात्रा स्थगित करण्यात आली होती. यानंतर केंद्रसरकारने बैठका घेऊन कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले; मात्र केंद्रशासनाची ती गर्जना पोकळ ठरली. अमरनाथ यात्रेकरूंवर पुन्हा १३ जुलैला आक्रमण झाले. या आक्रमणामुळे चालू झालेली यात्रा पुन्हा स्थगित करण्यात आली आहे. येथील रामबानमध्ये हे आक्रमण करण्यात आले. यात्रेकरूंच्या गाड्या फोडण्यात आल्या. त्यांचे सामानही फेकण्यात आले.

ह.भ.प. भगवान महाराज कदम मठाचे मठाधिपति अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज कदम यांचा सन्मान !

तिसरे विद्यमान मठाधिपती तथा अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज कदम
यांचा संस्थानच्या वतीने ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगांवकर यांच्या हस्ते सन्मान करतांना
  • अखंड विणा पहारा करण्याच्या मठाच्या परंपरेला १०० वर्षे पूर्ण !
  • वाखरी तळावर श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्याची बैठक पार पडली !
        पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १४ जुलै (वार्ता.) - अखंड विणा पहारा उभा करण्याच्या मठाच्या परंपरेला १०० वर्षे पूर्ण झाली. याविषयी श्री संत सोपानकाका पालखी सोहळाच्या वतीने वाखरी तळावर सर्व दिंड्यांच्या प्रमुखांची निरोप सभारंभाची बैठक पार पडली. या वेळी तिसरे विद्यमान मठाधिपती तथा अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज कदम यांचा संस्थानच्या वतीने ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगांवकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी न्यासाचे प्रमुख ह.भ.प. गोपाळ महाराज गोसावी, सोहळा प्रमुख श्रीकांत गोपाळ गोसावी, उपाध्यक्ष ह.भ.प. दशरथ तात्या जगताप, ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. धनाजी चोरगे महाराज, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट, समितीचे श्री. राजन बुणगे यांसह जवळपास ८० दिंड्यांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.

हिंदवी स्वराज्यासाठी बलीदान देणार्‍या बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांचे स्मरण करण्यासाठी २० जुलैला पावनखिंड मोहीम !

    कोल्हापूर - हिंदवी स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे मावळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे होते. त्यांच्या बळावरच त्यांनी हिंदु राष्ट्राची कल्पना साकार केली. सिद्धी जोहोरच्या गराड्यातून निसटून जाणार्‍या शिवछत्रपतींसाठी शिवरायांच्या वेशात नरवीर शिवा काशीद मृत्यूला सामोरे गेले, तर शेवटचा श्‍वास असेपर्यंत बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवून ती पावन केली. या सर्वांचा त्याग, पराक्रम, बलीदान जागवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रतिवर्षी विविध हिंदुत्ववादी संघटना अन् समस्त धर्माभिमानी यांच्या समवेत पावनखिंड मोहीम राबवते. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्राणार्पण करणार्‍या छत्रपतींच्या वीर मावळ्यांचा आदर्श घेण्यासाठी यंदा ही मोहीम बुधवार, २० जुलै या दिवशी मलकापूर आणि पावनखिंड येथे होत आहे. तरी या मोहिमेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे यांनी केले आहे.

पीएम्पीएम्च्या इमारतीच्या महिला स्वच्छतागृहात छायाचित्रक बसवणार्‍या कर्मचार्‍यांना तीव्र आंदोलनानंतर अटक

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशी घटना होणे, हे लज्जास्पद !
    पुणे, १४ जुलै - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या इमारतीतील (पीएम्पीएम्) महिला स्वच्छतागृहात भ्रमणभाषवरील छायाचित्रक बसवल्याचे एका महिला कर्मचार्‍याने ११ जुलै या दिवशी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतरही प्रशासनाने त्याची गांभीर्याने नोंद घेतली नसल्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी या संदर्भात १२ जुलै या दिवशी तीव्र आंदोलन केले. (स्वतःच्या पक्षाची सत्ता पालिकेत असतांना असे आंदोलन करावे लागणे, हेच लज्जास्पद ! महामंडळाच्या महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन सर्वसामान्य महिलांच्या तक्रारीला कचर्‍याची टोपलीच दाखवत असणार ! - संपादक) त्यानंतर २ संशयित कर्मचार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. (अशा वासनांध कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई झाली, तरच इतरांना वचक बसेल आणि असे प्रकार भविष्यात टाळले जातील ! - संपादक)

संयुक्त राष्ट्र संघात बुरहान वाणीचे सूत्र उपस्थित करणार्‍या पाकला भारताने खडसावले !

   न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांनी ठार केलेल्या बुरहान वाणी या आतंकवाद्याचे सूत्र उपस्थित करणार्‍या पाकला भारताने खडसावले. आतंकवाद हे पाकिस्तानचे राष्ट्रीय धोरण बनले असून आतंकवाद्यांची तळी उचलणे, हा त्यांच्या कारभाराचा भाग झाला आहे. भारतविरोधी आतंकवाद्यांना हुतात्मा ठरवून तुम्हाला संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क समितीचे सदस्यत्व मिळणार नाही. मानवतेविषयी बोलण्याआधी तुमचा इतिहास तपासा, अशा शब्दांत भारताचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकला खडसावले.

औंध (पुणे) येथील जिल्हा (सामान्य) रुग्णालयातील प्राणवायू यंत्रणेचा वापर दुरुस्तीविना ३ वर्षांपासून प्रलंबित !

स्मार्ट होऊ पहाणार्‍या पुण्यातील जिल्हा (सामान्य) रुग्णालयाचा कूर्मगती कारभार !
   पिंपरी, १४ जुलै - तत्पर वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या दृष्टीने औंध येथील जिल्हा (सामान्य) रुग्णालयातील अतीदक्षता विभागात सार्वजनिक विभागामार्फत लक्षावधी रुपये व्यय करून सेंट्रलाइज ऑक्सिजन सप्लाय सिस्टिम ३ वर्षांपूर्वी बसवण्यात आली. सद्यस्थितीत ही यंत्रणा केवळ अर्भक अतीदक्षता विभागात चालू असून अन्य विभागात ती यंत्रणा बसवल्यापासून बंदच आहे. त्यामुळे अन्य विभागातील रुग्णांना यंत्रणा उपलब्ध असूनही सिलिंडरद्वारेच प्राणवायूचा (ऑक्सिजन) पुरवठा केला जातो.

भारती विद्यापिठामध्ये कीर्तन अभ्यासक्रमास प्रारंभ !

भारती विद्यापिठाचा स्तुत्य उपक्रम !
   पुणे, १४ जुलै - येथील भारती अभिमत विद्यापिठाने कीर्तनाचा अभ्यासक्रम चालू केला आहे. विद्यापिठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स च्या वतीने कीर्तन प्रमाणपत्र आणि कीर्तन पदविका हे अभ्यासक्रम चालू केले आहेत. (हे अभ्यासक्रम म्हणजे फक्त उपजीविकेचे साधन म्हणून न रहाता त्यातून विद्यार्थ्यांमध्ये देवाविषयी भक्ती कशी वाढेल, यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे. - संपादक)
    या अभ्यासक्रमाद्वारे वारकरी सांप्रदायिक कीर्तन आणि नारदीय कीर्तन या कीर्तनाच्या मुख्य प्रकारांचे धडे विद्यार्थांना देण्यात येणार आहेत. कीर्तन शिक्षणाचे धडे पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांनाही घेता यावे, यासाठी प्रत्येक शनिवार आणि रविवार या दिवशी अभ्यासक्रमाच्या वर्गांचे आयोजन केले आहे.

हप्ता न देणार्‍या फेरीवाल्याला गुंडांकडून मारहाण

राज्यातील वाढते अराजक रोखण्यासाठी प्रशासन काही उपाययोजना करणार का ?
    कल्याण - येथील स्कायवॉकवर बसणार्‍या फेरीवाल्याने हप्ता देण्यास नकार दिल्याने फेरीवाले आणि हप्तेखोर गुंड यांच्यात हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पापाभाई रफिक, आवेश बाबू मुर्गी, आलार, मोईन, पप्पू जमील शेख आणि असलम शेख अशी त्या गुंडांची नावे आहेत. या प्रकरणी मारहाण झालेल्या फेरीवाल्याने तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून पोलीस गुंडांचा शोध घेत आहेत.
    नेहमीची वर्दळ आणि वाहतूक कोंडी या समस्या सोडवण्यासाठी स्कायवॉक उभारण्यात आले; मात्र लक्षावधी रुपयांचा हप्ता शासकीय अधिकारी, पोलीस आणि परिसरातील गुंड यांना दिल्याविना तेथे फेरीवाल्यांना बसताच येत नाही. हप्ते न देणार्‍यांना मारहाण केली जाते.

अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्यासह अंनिसवाले टिळा न लावताच वारीत सहभागी !

प्रबोधनाच्या नावाखाली वारकर्‍यांसह वारीत 
सहभागी होण्याचा नास्तिकतावादी अंनिसचा ढोंगीपणा !
        पुणे, १४ जुलै - समाजप्रबोधन करण्याच्या नावाखाली अंनिसचे कार्यकर्ते ११ जुलै या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस ते वेळापूर या टप्प्यात वारीमध्ये सहभागी झाले. संतांनी त्यांच्या प्रबोधनातून अंधश्रद्धेला विरोध आणि मानवताकेंद्रित धर्माचा पुरस्कार केल्याचे सांगत अंनिस आणि अन्य समविचारी संघटना, तसेच डॉ. हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर, श्यामसुंदर महाराज सोन्नर, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी, सुभाष वारे आदी वारीत सहभागी झाले. असे असले, तरी यांपैकी अनेकांनी कपाळावर साधा टिळाही लावला नव्हता. (संतमंडळींनी समाजाला धर्म आणि श्रद्धा काय आहे, हे शिकवून अंधश्रद्धेवर ताशेरे ओढले होते. देव न मानणारे तथाकथित पुरोगामी मात्र देव आणि धर्म मिथ्या आहे, असे सांगून स्वतःच अंधश्रद्धा पसरवत आहेत. नास्तिकवादी अंनिसवाल्यांना समाजाने झिडकारले असल्याने जनाधार मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ? - संपादक)
अनायासे अंनिसवाले वारीत सहभागी होतच 
आहेत, तर त्यांनी खालील प्रश्‍नाचे उत्तर द्यावे !
        ज्या ईश्‍वराच्या दर्शनाच्या ओढीने कुणालाही निमंत्रण न देता वैष्णवांचा मेळा प्रतिवर्षी लाखोंच्या संख्येने वारीमध्ये सहभागी होतो, त्या ईश्‍वराचे अस्तित्व अंनिसला मान्य आहे का ?

भुईकोट किल्ल्यातील पंचधातूंची तोफ चोरीस

पुरातन वस्तूंच्या जतनासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) अपरिहार्य !
    औसा (जिल्हा लातूर), १४ जुलै - येथील भुईकोट किल्ल्यातील पंचधातूची ३.५ फूट लांब, ८.८ इंच व्यास आणि ५० किलो वजनाची तोफ ९ जुलैच्या रात्री चोरीस गेली. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात १० जुलै या दिवशी गुन्हा प्रविष्ट केला आहे. ही तोफ पंचधातूची असूनही तिची किंमत औसा पोलिसांनी १० सहस्र रुपये असल्याची नोंद केली आहे़. (पोलिसांना ऐतिहासिक वस्तूंचे मोल केव्हा कळणार ? - संपादक)
   या किल्ल्याची गेल्या ३ वर्षांपासून डागडुजी करण्यात येत आहे. ९ जुलैच्या रात्री उशिरा किल्ल्याच्या दिंडी दरवाज्याचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तोफ चोरली. पुरातत्व विभागाने या किल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची स्थिती बिकट होत चालली आहे. (पुरातत्व विभागाचीच ढासळलेली स्थिती दुरुस्त करणे आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. - संपादक)

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहाणार्‍या युवकाने युवतीला भोसकले !

उदात्त हिंदु संस्कृतीला झिडकारून पाश्‍चात्त्य संस्कृती आचरण्याचा परिणाम !
   नोएडा - हिंदु संस्कृतीपासून लांब जाऊन पाश्‍चात्त्य संस्कृतीशी जवळीक साधल्यामुळे त्याचे समाजात घडणारे परिणाम पुनः पुन्हा पुढे येऊ लागले आहेत. एक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात असलेल्या युवकाने त्याच्या सहकारी मैत्रिणीला क्रूरपणे ३२ वेळा भोसकल्याची घटना सरफाबाद येथील सेक्टर ७३ येथे घडली आहे.
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्यायामशाळा प्रशिक्षक असलेला वरुण गोयल हा २७ वर्षीय युवक एका युवतीसह रहात आहे. एक वर्ष एकत्र राहिल्यानंतर संबंधित युवतीने त्याच्याकडे विवाह करण्याची मागणी चालू केली होती; परंतु वरुण विवाह करण्यास नकार देत होता.

पुण्यात धर्मांधांकडून २ कोटी ५० लक्ष रुपयांचे हेरॉईन शासनाधीन; तीन धर्मांधांना अटक

अमली पदार्थांचा वाढता विळखा !
    पुणे, १४ जुलै - येथील संगमवाडी भागात हेरॉईनची वाहतूक करणार्‍या ३ धर्मांधांना पोलिसांनी १२ जुलै या दिवशी अटक केली असून त्यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. सीमाब कय्युब शेख, अबेदा अझीज मांडेकर आणि असीफ अब्दुल सय्यद अशी या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही नगर येथे हेरॉईन विक्रीसाठी नेणार होते. (पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी करून मुख्य सूत्रधारापर्यंत पोचून कठोर कारवाई करत आंतरराष्ट्रीय टोळी उद्ध्वस्त करावी, ही अपेक्षा ! - संपादक)

वारकरी पाईक संघाचा सनातन संस्थेला पाठिंबा !

वासकर फडावर बैठकीत उपस्थित महाराज

हिंदु धर्म विरोधकांच्या दबावाला बळी पडून सनातन संस्थेवर बंदी आणू नये ! - वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष ह.भ.प. राणा महाराज वासकर

      पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १४ जुलै (वार्ता.) सनातन संस्था, वारकरी पाईक संघ आणि वारकरी संप्रदाय यांनी वारकर्‍यांच्या समस्या, मंदिरातील भ्रष्टाचार, मंदिरातील गायींची कसायांना विक्री, पांडुरंगाच्या मंदिरातील परंपरात पूजा बंद केल्याविषयी, वारकर्‍यांना सोयीसुविधा मिळवण्यासारखी अनेक आंदोलन एकत्र केली आहेत. सनातनचे कार्य हे परंपरा आणि संस्कृती रक्षणाचे आहे हे आम्ही जवळून जाणतो. सनातन संस्था हिंदूंना धर्माविषयी जागृत करण्याचे कार्य करत आहे. दुष्कर्म कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने केले असले, तरी ते अयोग्यच आहे. सध्या पुरोगाम्यांच्या हत्यांच्या संदर्भात सनातनच्या साधकांना संशयित म्हणून अटक झाली आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालय जो निर्णय देईल, तो वारकरी संप्रदायाला मान्य आहे; मात्र पुरोगाम्यांच्या तसेच हिंदु धर्मविरोधक विविध ठिकाणी आंदोलन करून, मोर्चे काढून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या दबावाला बळी पडून सनातन संस्थेवर बंदी आणू नये. असे स्पष्ट मत वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी व्यक्त केले. संतशिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याच्या वेळी भंडीशेगाव येथील पालखी तळावर झालेल्या बैठकीत वासकर महाराजांनी वरील मागणी केली आणि सनातनला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, याविषयी शासनाला आम्ही कळवू, असे आश्‍वस्त करणारे मत राणा महाराज वासकर यांनी व्यक्त केले. या वेळी ह.भ.प. भानुदास महाराज ढवळीकर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष बापू महाराज रावकर यांसह अन्य महाराज या वेळी उपस्थित होते.

सनातन संस्थेच्या मागणीविषयी आम्ही लक्ष घालू ! - आमदार अधिवक्ता आशिष शेलार

        मुंबई, १४ जुलै (वार्ता.) - सनातन संस्थेवर बंदी येणार नाही, अशा प्रकारची सुस्पष्ट बातमी वृत्तपत्रात आली आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही सनातन संस्थेच्या मागणीविषयी लक्ष घालू, असे आश्‍वासन भाजपचे आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी दिले. १२ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे आणि सनातनच्या सौ. शर्मिला बांगर यांनी वांद्रे येथील कार्यालयात आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांची भेट घेऊन सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात आवाज उठवण्याविषयीचे निवेदन दिले. या वेळी आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी वरील आश्‍वासन दिले.

सनातनवरील दोषारोप अयोग्य - ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे (शास्त्री), धर्माचार्य संपर्क प्रमुख, पश्‍चिम महाराष्ट्र

      महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी संघटनांवर काही कारण नसतांना पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण पथक दोषारोप करत आहे, ते योग्य नाही. प्रज्ञासिंह ठाकुर निर्दोष असतांना न्यायालय जामीन फेटाळते, ते बरोबर नाही. सनातन संस्थेचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर दाभोलकर हत्या प्रकरणी दोषारोप केले जात आहेत. प्रत्यक्षात ते आरोप सिद्ध झालेले नसतांना त्यांना कारागृहात ठेवले आहे.दैनिक सनातन प्रभातचे रंगीत विशेषांक

 गुरुमाहात्म्य विशेषांक 
प्रसिद्धी दिनांक : १७ जुलै २०१६
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
गुरुमाहात्म्य विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी
१६ जुलैला दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी ! 

----------------------------------
 गुरुपौर्णिमा विशेषांक 
प्रसिद्धी दिनांक : १९ जुलै २०१६
पृष्ठ संख्या : १६, मूल्य : ५ रुपये
गुरुपौर्णिमा विशेषांकाची वाढीव मागणी १७ जुलैला दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !


फलक प्रसिद्धीकरता

देशाला आतंकवादापासून वाचवण्यासाठी श्री विठ्ठलाला प्रार्थना करा !
    अराजकसदृश काश्मीरमध्ये चालू असलेल्या अमरनाथ यात्रेवर आतंकवादाचे संकट आहे. इसिसने संपूर्ण देश पोखरला आहे. देशद्रोह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आज असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त देशाच्या रक्षणासाठी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करा !

साम्यवादी क्युबामध्येही इस्लामची वाढ !

      हवान्ना (क्युबा) - साम्यवादी असलेल्या क्युबा देशातही इस्लामने पाय रोवले आहेत. वर्ष १९५० च्या दशकात क्युबामध्ये मुसलमानांची संख्या अत्यल्प असल्याने मुसलमान नमाजासाठी एखाद्याच्या घरात एकत्र येत; मात्र आज तेथे मुसलमानांची संख्या १० सहस्र झाली आहे. काही मुसलमान अन्य देशांमधून तेथे स्थलांतरित झाले आहेत. जिहादी आतंकवादाविषयी अनभिज्ञ असलेल्या क्युबातील लोकांमध्ये इस्लामचा प्रसार केल्यामुळे ते धर्मांतरित झाले आहेत, अशी माहिती ताम्पा बे सारासॉता या अमेरिकेच्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तामध्ये प्रसिद्ध झाली आहे.

हडपसर परिसरात (पुणे) अज्ञातांनी ३५ हून अधिक दुचाकींच्या आसनांचे आच्छादन (सीट कव्हर) फाडले

पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ !
        पुणे, १४ जुलै - येथील हडपसर परिसरातील निर्मलनगर टाउनशिपमध्ये काही अज्ञातांनी १२ जुलैच्या रात्री ३५ हून अधिक दुचाकींच्या आसनांचे आच्छादन (सीट कव्हर) फाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील अनेक भागांमध्ये दुचाकी जाळण्याचे प्रकार उघकीस आले होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Amarnath yatrapar sankat, ISISka badhta prabhav adise deshki suraksha chintajanak.
Ashadhi Ekadashipar aaj Bhagwanse RashtraRaksha hetu prarthana kare
जागो ! : अमरनाथ यात्रा पर संकट, इसिस का बढता प्रभाव आदि से देश की सुरक्षा चिंताजनक.
आषाढी एकादशी पर आज भगवान से राष्ट्ररक्षा हेतु प्रार्थना करें !

पाऊले चालती पंढरीची वाट...

आज असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त...
१. पंढरपूरच्या वारीचा प्रारंभ 
    संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी या ग्रंथाची निर्मिती करून समाजात भागवत धर्माची स्थापना केली आणि समाजात भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नामदिंडीची, अर्थात् पंढरीच्या वारीची प्रथा चालू केली.

सनातनवर बंदी घालणे पूर्णपणे अयोग्य ! - वारकरी संप्रदाय

सनातनच्या साधकांचे खच्चीकरण करणे अयोग्य ! - ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख, अमरावती 
सनातन संस्था समाजामध्ये धर्मप्रेम जागृत करून, समाजामध्ये खर्‍या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन करून, सात्त्विक श्रद्धा वाढवून समाजाला एकत्रित करण्याचे काम करते. वारकरी संप्रदायासमवेत या संस्थेने कार्य केले आहे. संस्थेचे साधक आणि आम्ही एकत्रित कार्य करतो. पुरोगामी लोकांचे म्हणणे आहे की, या संस्थेवर बंदी आणावी. संस्थेच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत. तरीसुद्धा चांगल्या साधकांना त्रास दिला जात आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा विश्‍वास आहे; परंतु पुरावे नसतांना विनाकारण सनातनच्या चांगल्या साधकांना त्रास देणे, त्यांचे खच्चीकरण करणे अयोग्य आहे. वारकरी संप्रदाय सनातन संस्थेच्या पाठी ठामपणे उभा आहे. गुन्हा केला असेल, तर जरूर शिक्षा द्या. सरकारने याचा विचार करावा. संस्थेचे साधक धर्माचे कार्य करत आहेत. त्यांना त्रास व्हायला नको. पुढेही असे व्हायला नको, असे समाजाला वाटते. आपल्या धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य सर्व धर्माला आहे.

हिंदु धर्मप्रचारक सनातन संस्थेवर बंदी आणणे चुकीचे ! - धर्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते, मुक्ताबाई मठ, पंढरपूर.

ह.भ.प. निवृत्ती महाराज
       महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना वक्ते महाराज यांनी सनातनवर बंदी आणू नये या संदर्भात निवेदन देणार आहेत. त्यातील काही भाग सारांशरूपाने येथे देत आहोत.
निवेदनात म्हटले आहे की -
१. हिंदु धर्माच्या विरोधात असणार्‍या सर्व संस्था या हिंदु धर्माचा संहार कसा करता येईल, याचा रात्रंदिवस अभ्यास करीत आहेत. राम देव नव्हता, कृष्ण देव नव्हता, पंढरपूरचा विठोबा देव नाही, हिंदूंचा कुलाचार कुलधर्म ही सर्व अंधश्रद्धा आहे, हिंदूंचे ४८ संस्कार अंधश्रद्धा आहे, असे ते म्हणत आहेत. मडगावला (सर्व जाती नष्ट करण्यासाठी) जात पंचायतीची सभा नरेंद्र दाभोलकर यांनी घेतली. वर्णाश्रम, धर्म हे सर्व ब्राह्मणांनी पोटासाठी निर्माण केले. हे सर्व सोडून सर्व हिंदूंचे परिवर्तन करण्याकरिता नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांनी सर्व महाराष्ट्रभर घोडदौड केली. कोणालाही स्वत:चा धर्म प्रिय असतो. नास्तिक पाखंड्याशिवाय धर्मपरिवर्तन हे कोणालाच आवडत नाही. संपूर्ण भारत ७५ टक्के हिंदु असून प्रत्येक व्यक्ती स्वधर्माभिमानी आहे. फक्त सनातनच हिंदु धर्मनिष्ठ आहे, अशी जर पुरोगाम्याची समजूत असेल, तर संपूर्ण चुकीची आहे. भारतात या महाराष्ट्रात ७५ टक्के लोक हिंदुत्ववादी आहेत. बहुतांश राजकारणी, मिडियावाले आणि पत्रकार सोडले, तर सर्वच हिंदुत्ववादी आहेत.

सनातनवर बंदीचा विचार कराल तर समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि वारकरी संप्रदाय तीव्र आंदोलन करेल ! - ह.भ.प. कोकरे महाराज यांची चेतावणी

भारतीय संस्कृतीचे पालन करणारी 
प्रत्येक संस्था सनातनच्या पाठीशी ! 
ह.भ.प. कोकरे महाराज
        सनातनवर बंदी आणण्याकरिता पुरोगाम्यांनी आणि हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र रचणार्‍या संस्था, संघटना यांनी समाजवादाचा पुरोगामी बुरखा परिधान करून हिंदु धर्मामध्ये देव, देश आणि धर्म यांविषयी लोकांच्या मनात जागृती निर्माण करून अनादी काळापासून वैदिक सनातन भारतीय संस्कृती जोपासण्याचे ईश्‍वरी कार्य करणारी सनातन संस्था यांच्यावर बंदी आणण्याच्या संदर्भात प्रसारमाध्यमे आणि कथित पुरोगामित्व समाजात रुजवणार्‍या काही मंडळी यांच्याकडून ऐकायला मिळते. या देशामध्ये आदिअनादी काळापासून वैदिक संस्कृती आजपर्यंत चालत आलेली आहे आणि ती पुढे टिकवण्याकरिता प्रात:स्मरणीय परात्पर गुरु श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या रूपात परमेश्‍वराने या भारत देशामध्ये सनातन संस्था नावाचा उघडलेला धर्मदरबार आहे. त्यामध्ये प्रत्यक्षात साधकांची संख्या जरी काहीशी अल्प असली, तरी भारतीय संस्कृतीचे पालन करणारी प्रत्येक संस्था आणि संघटना सनातनच्या पाठीशी आहे.

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या संदर्भात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा वारकरी संप्रदायासमवेत खांद्याला खांदा लावून दिलेला लढा !

नागपूर विधीमंडळाबाहेर आंदोलन करतांना वारकर्‍यांसमवेत सनातनचे साधक
आझाद मैदानात वारकरी संप्रदाय आणि सनातन यांच्या आंदोलनात मार्गदर्शन करतांना
पू. (कु.) अनुराधा वाडेकर आणि व्यासपिठावर वर्तुळात धर्माचार्य ह.भ.प. वक्ते महाराज
       हिंदु धर्म, संत, राष्ट्रपुरुष यांच्यावर विविध माध्यमांतून जे आघात होत आहेत. त्या आघातांच्या विरोधात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी वारकर्‍यांसमवेत खांद्याला खांदा लावून लढा दिला आहे. हिंदु धर्मावर आघात करणारे जादूटोणा कायद्याच्या विरोधातील आंदोलन, वारकर्‍यांना सुविधा मिळण्यासाठी केलेले आंदोलन, पंढरपूर-कोल्हापूर-तुळजापूर येथील मंदिर समित्यांचा भ्रष्टाचार आणि अनियमितता बाहेर काढण्यासाठी केलेले आंदोलन, विडंबनात्मक नाटक थरारली वीट याच्या विरोधात केलेले आंदोलन अशा अनेक घटनांत केलेल्या आंदोलनाची नोंद शासनालाही घ्यावी लागली आणि समाजातही मोठ्या प्रमाणात जागृती झाली. त्यातील काही निवडक उदाहरणे देत आहे.

वयाच्या ८७ व्या वर्षीही समष्टीसाठी झिजणारे पुणे येथील थोर संतरत्न प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी !

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या तीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
     ईश्‍वरी प्रेरणेने समाजाला ज्योतिषाविषयी मार्गदर्शन करणारे ज्योतिषाचे अभ्यासक प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी हे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मकार्यात साहाय्य करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आध्यात्मिक स्तरावर कार्यरत आहेत. 
१. वयाच्या ८७ व्या वर्षी अखंड ७ घंटे उभे राहून देवतांची पूजा करणारे आणि 
हिंदु राष्ट्र यावे, यासाठी प्रार्थना करणारे प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी !
     वयाच्या ८७ व्या वर्षीही प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजींचा उत्साह तरुणांना लाजवील, असाच आहे. ते साधकांच्या कल्याणासाठी आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात कोणतेच विघ्न येऊ नये; म्हणून अखंड उपासनारत आहेत. ते प्रतिदिन नित्यनियमाने अखंड ७ घंटे उभे राहून देवाची पूजा करून आपल्यासाठी प्रार्थना करत आहेत. - (पू.) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२०.६.२०१४)

अमेरिकेच्या तंत्रज्ञानाने देशी गायींची संख्या वाढवणे, हे गोमांस भक्षकांसह अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचे नवे माध्यम !

पू. अशोक पात्रीकर
१. देशी गायींची संख्या वाढवण्याच्या नव्या प्रकल्पाविषयी 
केंद्रसरकार अमेरिकेशी करत असलेली बोलणी, हे 
अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचे नवीन माध्यम असणे
     देशी गायींची संख्या आणि गायींच्या दुधाचे उत्पादन वाढून गोपालन अधिक लाभदायी व्हावे, यासाठी केंद्रसरकार अमेरिकेतील ए.बी.एस्. जीनस आणि सेक्सिंग टेक्नॉलॉजीज या आस्थापनांशी बोलणी करत असल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. ती वाचून केंद्रसरकारने गोमांस भक्षण करणारे विशेषतः अन्य पंथियांच्या लांगूलचालनाचे नवीन माध्यम शोधून काढले आहे, असे लक्षात आले.

डॉ. झाकीर नाईक यांच्याकडे दुर्लक्ष करणे का महागात पडेल ?

    डॉ. झाकीर नाईक अशा मुसलमान धर्मगुरूंधील एक आहेत, ज्यांचा प्रभाव नवीन पिढीतील मुसलमान युवकांवर स्पष्टपणे दिसून येतो. वर्ष १९६५ मध्ये मुंबई येथे जन्मलेले डॉ. झाकीर नाईक स्वत: एम्बीबीएस् डॉक्टर असल्याचे सांगतात. प्रत्येक प्रश्‍नाच्या उत्तरामध्ये धार्मिक पुस्तकांचा संदर्भ देत वैधता प्रदान करून दिशाभूल करण्याच्या कौशल्यामुळे त्यांना इतर धर्मगुरूंपेक्षा वेगळे स्थान आहे.
    डॉ. झाकीर नाईक त्यांच्या वक्तव्यांमुळे वादग्रस्त राहिले आहेत. अलीकडे बांगलादेशातील ढाका येथे ज्या धर्मांध युवकांनी जिहादी आक्रमण केले होते, ते नाईक यांच्या विचारसरणीने प्रभावित असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनीही राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्यांच्या भाषणांचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
      नित्य-नैमित्तिक कर्मे न करणारा समाजद्रोही आहे, पर्यायाने राष्ट्र आणि मानवता यांचाही द्रोही आहे ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

सुशिक्षित बेरोजगारांची सेना निर्माण करणारी सध्याची शिक्षणपद्धती !

     शिक्षण सम्राटांनी त्यांच्या धंदेवाईक शिक्षण संस्थांमधून कुचकामी शिक्षण देऊन समाजाच्या हाती ज्ञानाऐवजी निरर्थक पदव्यांची भंडारे दिली आहेत. अशिक्षित बेरोजगारांच्या जागी आता सुशिक्षित बेरोजगारांची सेना आम्ही सिद्ध केली. 
- श्री. अभय भंडारी, विटा, सांगली (साप्ताहिक वज्रधारी, वर्ष ७ वे, अंक २५, २५ जुलै ते ३१ जुलै २०१३)

प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व क्षणोक्षणी अनुभवल्याने साधकाला मिळालेला कृष्णानंद !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
हे भगवंता, श्रीकृष्णा, 
     तू मला तुझ्या दैवी आनंदाची अनुभूती प्रदान करत असतोस. या अनुभूतींचे लिखाण करण्यास मी असमर्थ आहे. हे भगवंता, या ब्रह्मांडातील कुठलेही कार्य तुझ्या अगाध कृपेविना पूर्ण होऊच शकत नाही. मला तुझ्या कोमल चरणांच्या अनुसंधानात ठेवून तुझ्या अद्भुत अनुभूतींचे लिखाण माझ्याकडून भावपूर्ण करवून घे, हीच तुझ्या चरणी सर्वसमर्पण भावाने प्रार्थना करतो.
१. साधकाने प.पू. डॉक्टरांच्या सूक्ष्मातून केलेल्या 
पाद्यपूजेचा घेतलेला आनंद !
१ अ. सूक्ष्मातून पाद्यपूजा करणे : सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांच्या कोमल चरणांचे मी सुवासिक तेलाने मर्दन करतो आणि पंचामृताने स्वच्छ धुतो. त्यांनीच शुद्ध केलेले माझे मन, बुद्धी, देह आणि चित्त रूपी पुष्पे त्यांच्या चरणांवर अर्पण करतो. या देहातील प्राणज्योत प.पू. डॉक्टरांच्या चरणांतून उत्पन्न झाली आहे आणि त्यांच्या कोमल चरणांमध्ये विलीन होण्यासाठी तळमळत आहे. या प्राणज्योतीने मी गुरुमाऊलीला ओवाळतो. मी प्रतिदिन प.पू. डॉक्टरांनी आतून सुचवल्याप्रमाणे कधी साधकांसमवेत, तर कधी नातेवाइकांसमवेत पाद्यपूजा करतो आणि दिव्य आनंदाची अनुभूती घेतो.

हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक आणि युवा साधक !

       वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना होईल, असे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, तसेच इतर संत यांनी सांगितले आहे. सनातन धर्म राज्य, म्हणजे विश्‍वकल्याणासाठी सात्त्विक लोकांनी चालवलेले राष्ट्र ! ते रामराज्यासारखे असेल ! असे राज्य चालवायला पात्र व्यक्ती लागतील. ईश्‍वराने सनातनला सामान्यांपेक्षा उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या, म्हणजे गेल्या जन्मीची साधना असलेल्या शेकडो बालसाधकांची ओळख करून दिली आहे. आतापर्यंत उच्च स्वर्ग आणि महर् या लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या ६२५ पेक्षाही अधिक बाल अन् युवा वयाच्या साधकांना सनातनने ओळखले आहे. 
         आनंदाची गोष्ट म्हणजे या वर्षी अनेक बालसाधकांची आध्यात्मिक पातळी वाढली आहे. २०१५ - २०१६ या वर्षभरात सनातनने २५० जणांचे दैवीपण ओळखले. वेळोवेळी त्यांची वैशिष्ट्ये सनातन प्रभातमधून प्रसिद्ध होतात या सर्वांची नावे बालसाधकांच्या सूचीत समाविष्ट केली असून त्या त्या आवृत्तीनुसार ती प्रसिद्ध केली जाणार आहेत.

मुलगी रुग्णाईत असतांना आलेल्या अनुभूती आणि पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या संकल्पाची आलेली प्रचीती !

गुरुपौर्णिमा मास २०१६
       १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत

सात्त्विक वृत्तीचा आणि धर्मपालन करणारा ५३ टक्के आध्यात्मिक स्तर असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रायगड येथील कु. अमर दिलीप बागुल (वय ११ वर्षे) !

पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
कु. अमर बागुल
       तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. - (प.पू.) डॉ. आठवले 
१. सात्त्विक वृत्ती
१ अ. सात्त्विक वस्तूंचीच खरेदी करणे : एकदा आम्ही पनवेलला खरेदीसाठी एका मॉलमध्ये गेलो होतो. तेथील बर्‍याच वस्तू असात्त्विक होत्या; पण अमरने पतंजलीच्या सात्त्विक आणि स्वदेशी वस्तू स्वतः निवडून घेतल्या. यावरून त्याला सात्त्विक गोष्टींची आवड आहे, हे माझ्या लक्षात आले.

साधनेच्या पुढच्या स्थितीला जाण्याची लागली जिवा तळमळ ।

ज्ञानेश्‍वरांनी योगसामर्थ्ये प्रत्यक्ष भिंत चालवली ।
प.पू. डॉक्टरांनी आपल्या कृपाकटाक्षे संतरत्ने घडवली ॥
माझ्या गुरुमाउलीची काय वर्णावी थोरवी ।
ते आहेत प्रत्यक्ष भगवंत साक्षात्कारी ॥ १ ॥

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
    सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
    समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल (HMV) असे परवाने असणे आवश्यक आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
   नोकरी करायची असेल, तर कोणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
भांडे स्वच्छ हवे
    तुम्हाला भिक्षा हवी आहे. तुम्ही म्हणता मी दाता आहे, तर तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा. भांड्यात आधीचे काही खरकटे रहाता कामा नये. नाहीतर तुम्हालाच भिक्षा न्यून (कमी) मिळेल. भिक्षापात्र रिकामे हवे.
   भावार्थ : तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा, याचा अर्थ आपण शुद्ध, निर्मळ अंतःकरणाने बाबांकडे (गुरूंकडे) गेले पाहिजे. भांड्यात आधीचे काही खरकटे राहता कामा नये म्हणजे आपल्यात कुठलाही विषय, वासना किंवा कामना असता कामा नये.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्वभावदोषांमुळे घडणार्‍या चुका 
मानवी आयुष्यात कालक्रमणा करतांना चुका घडतातच; पण प्रत्येक चुकीपासून आपण 
काहीतरी शिकलो, तर पुढील आयुष्य यशस्वी होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

कायदाद्रोही राजकीय पक्ष !

संपादकीय 
      महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १९१ राजकीय पक्षांची मान्यता रहित केली आणि अनेक हिंदुत्वनिष्ठांना आनंद झाला. कारण यात कुख्यात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन अर्थात् एम्आयएम्चा समावेश आहे. मुळात मान्यता रहित झालेल्या एम्आयएम्सारख्या धर्मांध पक्षांना निवडणूक लढवण्यासच बंदी घालण्याची आवश्यकता आहे. १५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना संपवतील, असे विधान करणारा आमदार असणारा पक्ष या देशात निवडणूक लढवतो, हे भारतातील लोकशाहीला कलंकच आहे. सातत्याने जिहादी आतंकवाद्यांची बाजू घेणार्‍या या पक्षावर बंदी घालण्याची मागणी सर्वत्रच्या हिंदूंनी केली पाहिजे.

काँग्रेसवर बंदीच हवी !

संपादकीय 
      मोहनदास गांधी यांनी वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसला विसर्जित करण्यात यावे, असा विचार मांडला होता. काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्यप्राप्तीच्या कार्यासाठी झाली होती आणि तो साध्य झाल्यामुळेच आता तिला विसर्जित करण्यात यावे, अशी त्यामागची भावना होती; मात्र सत्तेची चव आता चाखायला मिळणार या स्वार्थापोटी नेहरू आणि त्यांच्या कंपूने ही मागणी स्वीकारली नाही. नेहमी गांधींचा आणि गांधीवादाचा जप करणार्‍या काँग्रेसची ही वस्तूस्थिती तेव्हा होती आणि ती आताही आहे. वर्ष २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गांधींची ही इच्छा पूर्ण करण्याचे जनतेला आवाहन केले आणि जनतेने गांधींची ही इच्छा पूर्ण करण्याच्या एक टप्पा म्हणून काँग्रेसला सत्ताच्युत करून भाजपला केंद्रात सत्तेवर बसवले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn