Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तत्कालीन काँग्रेस सरकारचे मंत्री के. रहमान खान यांच्याकडून डॉ. झाकीर नाईक यांची पाठराखण झाल्याचे उघड !

के. रहमान खान यांच्यासारखे मंत्री
जिहाद्यांना पाठीशी घालतात, हे लक्षात घ्या !

डॉ. झाकीर यांनी हिंदु जनजागृती समिती
आणि सुदर्शन टीव्ही यांच्याविरुद्ध तक्रार केली होती !
नवी देहली - जिहादी आतंकवादाला प्रोत्साहन देणारे डॉ. झाकीर नाईक यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारमधील केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री के. रहमान खान यांना ३ डिसेंबर २०१२ या दिवशी एक पत्र लिहून हिंदु जनजागृती समिती आणि सुदर्शन टीव्ही वाहिनी यांनी त्यांच्याविरुद्ध चालवलेल्या अवमान मोहिमेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती आणि त्यावरून रहमान खान यांनी डॉ. झाकीर यांची पाठराखण केल्याचे उघडकीस आले आहे.
के. रहमान खान यांचे हेच ते पत्र !

१. या पत्रासह समिती आणि सुदर्शन टीव्ही वाहिनीवर केलेल्या आरोपांपुष्ट्यर्थ डॉ. झाकीर नाईक यांनी दोन ध्वनीफितीही जोडल्या होत्या.
२. हे पत्र प्राप्त झाल्यावर केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री के. रहमान खान यांनी काँग्रेस सरकारमधील माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांना १५.२.२०१३ या दिवशी पत्र देऊन त्यासोबत डॉ. झाकीर नाईक यांचे पत्र आणि दोन ध्वनीफिती जोडल्या होत्या.

काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी ! - हिंदु जनजागृती समितीची मागणी

   मुंबई - ढाका येथील आतंकवादी आक्रमणानंतर डॉ. झाकीर नाईक यांच्याविषयी आज गदारोळ उठला आहे; मात्र हिंदु जनजागृती समितीने त्यांची विद्वेषपूर्ण भाषणे आणि सीडी (ध्वनीफिती) यांच्याविषयी वर्ष २०१२ मध्येच आंदोलने करून पोलीस तक्रारीही केल्या होत्या. यापैकी मुंबई, सोलापूर, सावंतवाडी आणि अकोला या ठिकाणी डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात एफ्आयआर् देखील नोंद झाले. तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याचे धाडस तत्कालीन काँग्रेस सरकारने दाखवले नाही; याउलट काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री के. रहमान खान यांनी १५ फेब्रुवारी २०१३ या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि सुदर्शन टीव्ही हे डॉ. झाकीर नाईक यांच्याविषयी खोटा प्रचार करत आहेत, अशी तक्रार करणारे पत्र तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांना पाठवल्याचे आता उघड झाले आहे.

सनातवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात जळगाव येथील आमदार सुरेश भोळे आणि आमदार किशोर पाटील यांना निवेदन

उजवीकडून श्री. दत्तात्रेय वाघुळदे, पू. नंदकुमार जाधव,
निवेदन स्वीकारतांना श्री. सुरेश भोळे आणि कु. प्रतीक्षा कोरगावकर
उजवीकडून सौ. रेखा जाधव, कु. रागेश्री देशपांडे पू. नंदकुमार जाधव
निवेदन स्वीकारतांना आमदार श्री. किशोर पाटील, तसेच कु. प्रतीक्षा कोरगावकर
        जळगाव - येथील भाजपचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांना सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या मागणीच्या विरोधात निवेदन देण्यात आले. त्या वेळी श्री. भोळे म्हणाले, सनातनचे साधक घरदार सोडून सर्वांचा त्याग करून अध्यात्मप्रसार करतात. तुमचे कार्य किती चांगले हे मला माहीत आहे. बंदी येऊ नये म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीन. या वेळी सनातनचे पू. नंदकुमार जाधव, श्री. दत्तात्रेय वाघुळदे, तसेच कु. प्रतीक्षा कोरगावकर उपस्थित होत्या.

अमरनाथ यात्रा चालू झाली नाही, तर मुसलमानांना हज यात्रेला जाऊ देणार नाही !

आंदोलन करतांना शिवसैनिक
  • हिंदूंवरील आघातांच्या विरोधात वारंवार आवाज उठवणार्‍या शिवसेनेचा हिंदूंना नेहमीच आधार वाटतो !
  • शिवसेनेची पुणे येथील आंदोलनात चेतावणी !
        पुणे, १३ जुलै (वार्ता.) - बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक हा प्रसंगी रस्त्यावर येऊन दोन हात करायला आणि जशास तसे उत्तर द्यायलाही सिद्ध आहे. जर अमरनाथ यात्रा चालू झाली नाही, तर येथून पुढे हज यात्रेला एकाही मुसलमानाला जाऊ देणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेच्या वतीने ११ जुलै या दिवशी पुणे येथील आंदोलनात देण्यात आली. शिवसेनेच्या वतीने शनिपार चौक येथे अमरनाथ यात्रेवरील बंदीच्या विरोधात आंदोलन घेऊन तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलनात अमरनाथ यात्रेवरील बंदी आणि यात्रेवरील आक्रमण यांचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या. अमरनाथ यात्रा सुलभतेने चालू व्हावी, याकरता आंदोलनस्थळी अमरनाथची प्रतिकृती म्हणून बर्फाचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्यात आली.

काश्मीरमधील दंगलखोर धर्मांधांनी पोलिसांच्या ७० स्वयंचलित रायफल्स पळवल्या !

  • स्वतःची शस्त्रे सुरक्षित ठेवू न शकणारी सुरक्षादले, जनतेचे रक्षण कसे करणार ?
  • काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! पीडीपी-भाजप सरकारचे अपयश !
    श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या वेळी दंगलखोर धर्मांधांनी सुरक्षादलाच्या ७० स्वयंचलित बंदुका पळवून नेल्याची माहिती समोर आली आहे. कुलगाम भागातील दामहाल हांजी पोरा येथील पोलीस ठाण्यावर झालेल्या आक्रमणाच्या वेळी धर्मांधांच्या जमावाने पोलिसांची शस्त्रे पळवून नेली.
    १२ जुलैला २ वेगवेगळया घटनांमध्ये सैनिकांकडून शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न झाला. त्रालमध्ये धर्मांधांनी पोलीस चौकीत तैनात असलेल्या ४ शिपायांवर आक्रमण करून त्यांच्या बंदुका पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोठ्या संघर्षानंतर स्वत:च्या रायफल्स वाचवल्या; परंतु धर्मांध मॅगझिन घेऊन पळाले.
संध्याकाळी शस्त्रात्रे मिळवण्याच्या उद्देशाने कारालपूरामध्ये पोलीस चौकीवर आक्रमण करण्यात आले. येथील पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १४ जण घायाळ झाले आहेत.
तत्पूर्वी ९ जुलैला ब्रिजबेहरा येथे पोलीस चौकीवर आक्रमण करून दंगलखोरांनी शस्त्रास्त्रांची लूट केली. या बंदुकांचा वापर सुरक्षा दलांच्या विरोधात केला जाण्याची शक्यता आहे.

राज्यात शिक्षकांची ५ सहस्रांहून अधिक पदे रिक्त

       पुणे, १३ जुलै - शिक्षण संचालकांनी जाहीर केलेल्या संच मान्यतेच्या माहितीनुसार राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची ५ सहस्र ५५६ पदे रिक्त आहेत आणि ४ सहस्र २२८ शिक्षक अतिरिक्त आहेत. सध्या रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले, तरी शिक्षकांची १ सहस्र ३२८ पदे रिक्त रहाणार आहेत. (या प्रकरणी शिक्षण विभागाने तात्काळ लक्ष घालून शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करावेत. - संपादक)
       आतापर्यंत दक्षिण मुंबई, पश्‍चिम मुंबई यांसह ३३ जिल्ह्यांची ऑनलाइन संच मान्यता पूर्ण करून ती शिक्षण संचालकांना सादर करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती आणि अतिरिक्त शिक्षकांची माहिती ऑनलाइन घोषित झाली आहे. राज्यातील रायगड, ठाणे, पुणे आणि हिंगोली जिल्ह्यांच्या संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रिक्त पदे आणि अतिरिक्त शिक्षकांची संख्या आणखी फुगण्याची चिन्हे आहेत. (यावरून शिक्षण विभागाचा कारभार किती भोंगळ पद्धतीने चालतो, हेच दिसून येते. - संपादक)

भाजपशासित मध्यप्रदेशातील कॉन्व्हेंट शाळेत भारत माता की जय म्हणण्यावर बंदी !

ख्रिस्त्यांना कुणी देशप्रेम 
शिकवले नाही, त्याचा परिणाम !
       भोपाळ - मध्यप्रदेशमधील शहडोल जिल्ह्यातील ख्रिस्ती मिशनर्‍यांद्वारे चालवण्यात येणार्‍या गुड शेफर्ड कॉन्व्हेंट शाळेत १ जुलैपासून भारत माता की जय म्हणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना गुड शेफर्ड कॉन्व्हेंट शाळेच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास सांगितले आहे. शाळेच्या प्रशासनाच्या या निर्णयानंतर पालकांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. यानंतर व्यवस्थापनाने या आदेशाला स्थगिती दिली आहे.
       शाळेचे व्यवस्थापन केरळमधील कार्मेल कॉन्व्हेंट नावाच्या संस्थेकडून केले जाते. त्यांचे मुख्यालय देहलीत आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा शिक्षणाधिकारी उमेश धुर्वे यांनी सांगितले की, अशा प्रकारे बंदी घालणे अयोग्य आहे. घटनेचा तपास केला जाईल आणि तक्रार योग्य असल्यास शाळेवर कडक कारवाईही केली जाईल.

एम्आयएम्सह १९१ पक्षांची मान्यता रहित !

अशा राजकीय पक्षांमुळेच लोकशाही निरर्थक ठरली आहे !
अशा कायदाबाह्य
पक्षांचे लोकप्रतिनिधी जनतेला लाभले, याला उत्तरदायी कोण ?
सध्या एम्आयएम् पक्षाचे आमदार जनतेचे प्रतिनिधीत्व करत आहेत,
त्यांचीही आमदारकी रहित करणार का ?
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची कारवाई
   मुंबई - नोटीस बजावूनही आयकर विवरणपत्र आणि लेखा परीक्षण यांची प्रत न देणार्‍या भाग्यनगरमधील ओवैसी बंधूंच्या ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एम्आयएम्)सह १९१ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रहित केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी १३ जुलै या दिवशी ही घोषणा केली. महाराष्ट्रात एम्आयएम् पक्षाचे दोन आमदार आहेत. एम्आयएम्चा मुंबई महापालिका निवडणूक लढवण्याचाही विचार होता. राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण ३५९ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यात १७ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश असून उर्वरित सर्व ३४२ अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत.

स्वामी गोविंदानंद यांना त्रिशूळ नेण्यास बंदी केल्याने त्यांनी विमानाऐवजी चारचाकीने केला प्रवास !

अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंवर असे निर्बंध लादणे विमान प्राधिकरणाला
शक्य झाले असते का ? हिंदू सहिष्णु असल्यामुळेच हिंदूंच्या
संतांना असा घोर अवमान सहन करावा लागत आहे !
   संभाजीनगर, १३ जुलै - श्री साईबाबा यांच्या विरोधात वक्तव्य करणारे स्वामी गोविंदानंद यांना १२ जुलैला रात्री संभाजीनगरच्या विमान प्राधिकरणाने विमानातून त्रिशूळ नेण्यास बंदी केली. या वेळी प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी स्वामी गोविंदानंद यांना ८ फूट उंचीचे त्रिशूळ विमानातून न नेता विमानाच्या मालवाहू भागातून (कार्गो) नेण्याची अनुमती दिली. या वेळी स्वामीजींनी त्रिशूळाला धार्मिक महत्त्व असून ते माझ्यासमवेतच राहील, असे सांगून मालवाहू भागातून नेण्यास नकार दिला. या घटनेमुळे स्वामीजींनी एअर इंडियाच्या विमानाने न जाता चारचाकी वाहनाने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. स्वामी गोविंदानंद हे पोलीस बंदोबस्तात शिर्डी येथे गेले होते. तेथून ते संभाजीनगरला परत आले आणि तेथून मुंबईला विमानाने जाणार होते.

बिहारमधील बॉम्बस्फोटात एक जण ठार !

बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
   सासाराम (बिहार) - येथील न्यायालयाबाहेर झालेल्या एका देशी बॉम्बच्या स्फोटात एक जण ठार, तर ३ जण घायाळ झाले. हा बॉम्ब येथे एका दुचाकीवर ठेवण्यात आला होता. मार्च महिन्यातही या न्यायालयाबाहेर असाच स्फोट झाला होता.

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक लोकमतचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांना कायदेशीर नोटीस

   रामनाथी, १३ जुलै (वार्ता.) - पणजी, गोवा येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक लोकमत या मराठी वृत्तपत्राने १९ जून २०१६ दिवशीच्या अंकात सनातनी... नव्हे ! विकृत ! या मथळ्याखाली मानहानीकारक लेख प्रकाशित करून सनातन संस्थेची मानहानी केली. या प्रकरणी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्यामार्फत १० कोटी रुपये मानहानीभरपाई मागणीची कायदेशीर नोटीस लोकमत वृत्तपत्रसमूहाचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रशासक यांना बजावली आहे.
    या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा समाजात असलेला नावलौकिक माहिती असतांना मानहानी करण्याच्या हेतूने दैनिक लोकमतचे संपादक श्री. राजू नायक यांनी सनातनी... नव्हे ! विकृत ! या मथळ्याखाली मानहानीकारक लेख लिहून तो दैनिक लोकमतच्या गोवा आवृत्तीच्या १९ जून २०१६ या दिवशीच्या अंकाच्या हॅलो रविवार पुरवणीत प्रसिद्धी केला. त्यामुळे संस्थेची अपरिमित हानी झाली आहे.

पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ८० गावांचा संपर्क तुटला !

  • १५ रस्त्यांवरील वाहतूक बंद !
  • जिल्ह्यात ९२६० मि.मी. पावसाची नोंद !
       कोल्हापूर, १३ जुलै (वार्ता.) - गेल्या ४ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार चालू असून १२ जुलै या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत राजाराम बंधार्‍याची पाण्याची पातळी ४४ फूट १० इंच इतकी झाली असून पावसामुळे नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे ८४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील १५ रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत एकूण ९ सहस्र २६०.१२ मि.मी. पाऊस झाला आहे. पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ८० गावांचा संपर्क तुटला आहे.
       एन्डीआर्एफ्च्या ४० जवानांची ६ पथके पुणे येथून कोल्हापूरकडे आली आहेत. पन्हाळा मार्गावर पुरात अडकलेल्या १२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेे. आंबेवाडीजवळ एका लग्नाच्या सभागृहात अडकलेल्या ५ महिला आणि ३ पुरुष यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. १२ जुलै या दिवशी रात्री ९ वाजता आंबेवाडीजवळ रेडे डोह फुटला. या डोहात दोन मुले पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत, तर २ मुलांना वाचवले आहे.

राज्यातील विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालूच, धरणांमधून पाण्याचा विसर्ग

  • नाशिकचा पूर ओसरला
  • खडकवासला धरणातून ९ सहस्र क्युसेक्सने विसर्ग
  • मराठवाड्यातील काही धरणे मात्र कोरडीठाक
       पुणे, १३ जुलै - गेल्या १२ दिवसांत राज्यभरात पावसाने सर्वदूर दमदार उपस्थिती लावल्याचे चित्र आहे. राज्यातील विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग चालू आहे. नाशिक येथील गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पुण्यातील खडकवासला धरण ९० टक्के भरले असल्यामुळे धरणातून ९ सहस्र क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग चालू आहे. नगर जिल्ह्यातील अकोले येथील ११ छोटी धरणे पूर्णपणे भरली आहेत. राज्यात सर्वत्र पाऊस होत असला, तरी मराठवाड्यातील काही धरणे मात्र कोरडीठाक आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आता पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
       पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या चारही धरणांच्या क्षेत्रात पाऊस चालूच असून धरणात पाणीसाठा ९० टक्के झाला आहे. धरणातील पाणी मुठा नदीतून ९ सहस्र ३०० क्युसेक इतके विसर्ग करण्यात आले आहे. पाऊस न थांबल्यास विसर्ग वाढवणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

डॉ. झाकीर नाईक यांचे शिर कापून आणणार्‍याला ५० लक्ष रुपयांचे बक्षिस देणार ! - साध्वी प्राची, विहिंप

    नवी देहली - जो कोणी सौदी अरेबियाला जाऊन डॉ. झाकीर नाईक यांचे शिर कापून आणील, त्याला ५० लक्ष रुपयांचे बक्षिस देण्यात येईल, अशी घोषणा विश्‍व हिंदु परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलतांना साध्वी म्हणाल्या, धर्मोपदेशकाच्या नावावर झाकीर नाईक हे आतंकवादाला खतपाणी घालत आहेत. त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन जर कुणी आतंकवादी बनत असेल, तर हे कसले धर्मोपदेशक आहेत ? झाकीर यांच्यासारख्या धर्मोपदेशकाची केंद्रशासनाने चौकशी केलीच पाहिजे.

साबरमती रेल्वेगाडी जाळण्यातील प्रमुख आरोपी इमरान बटुकला अटक

५९ जणांच्या हत्येतील आरोपीला शोधण्यास १४ 
वर्षे लागत असतील, तर त्याला शिक्षा कधी करणार ?
        कर्णावती (अहमदाबाद) - वर्ष २००२ मध्ये झालेल्या गोध्रा जळीतकांडातील मुख्य आरोपी इमरान बटुक याला महाराष्ट्राच्या मालेगावमधून अटक करण्यात आली आहे. याकरता आतंकवादविरोधी पथक आणि अहमदाबाद गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या पोलिसांकडून संयुक्तपणे मोहीम राबवण्यात आली.
        २७ फेब्रुवारी २००२ या दिवशी अयोध्येहून साबरमती रेल्वेगाडीने परतत असतांना करसेवकांच्या डब्यांना गोध्रा रेल्वे स्थानकावर आग लावण्यात आली. यात ५९ जणांचा जळून मृत्यू झाला होता. बटुक साबरमती रेल्वे जाळण्यातील प्रमुख आरोपी आहे. दोन मासांपूर्वी गुजरात पोलिसांनी या प्रकरणातील एक आरोपी फारुख भाणा याला अटक केली होती.

आतंकवाद्यांना पैसे पुरवणार्‍या ४ बांगलादेशींना सिंगापूरमध्ये शिक्षा !

सिंगापूरमधील बांगलादेशी आतंकवाद्यांना पैसे 
देतात हे उघड झाल्यावर आता भारतातीलही 
बांगलादेशी घुसखोर तसे करत आहेत का, यााचा शोध घ्या !
       सिंगापूर - आतंकवाद्यांना पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली सिंगापूर येथील न्यायालयाने बांगलादेशच्या ४ नागरिकांना २ ते ५ वर्षांची शिक्षा दिली आहे. इसिसच्या नावाने बांगलादेशमध्ये आतंकवादी आक्रमणे करण्यासाठी या चौघांनी ३ सहस्र रुपयांपासून ७० सहस्र रुपयांपर्यंत पैसे दिल्याचे उघड झाले आहे. आतंकवाद्यांना पैसे पुरवण्याची सिंगापूरमधील ही पहिलीच घटना आहे. सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक कामगार म्हणून काम करतात.

नंदुरबार येथे डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन

प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त
    नंदुरबार - राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांना त्वरित अटक करावी, त्यांच्या पीस टीव्हीचे प्रक्षेपण करणार्‍या केबलचालकांवर कारवाई करावी, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ जुलै या दिवशी येथे करण्यात आलेेल्या आंदोलनात हिंदुत्ववाद्यांनी केल्या. या वेळी झाकीर नाईक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारा आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला.
   बजरंग व्यायामशाळेचे संस्थापक अध्यक्ष शेखर मराठे म्हणाले, चौकशीच्या नावाखाली सनातन संस्थेच्या साधकांचा केला जाणारा छळ थांबवावा. सीबीआयने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची चौकशी करतांना कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करावी. या वेळी समितीच्या सौ. निवेदिता जोशी यांनीही त्यांचे विचार मांडले. हिंदुत्ववाद्यांच्या मागण्यांचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री राजनाथसिंह यांना पाठवण्यात आले असून त्याच्या प्रती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आल्या.

कारागृहातूनही पीडित युवती आणि तिची आई यांना धमक्या देणार्‍या धर्मांधाचा जामीन अर्ज फेटाळला

    नांदेड - येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून सध्या कारागृहात असतांनाही पीडित युवती आणि तिची आई यांना धमक्या देणार्‍या धर्मांध सय्यद अफरोज सय्यद मुर्तूजा (वय १९ वर्षे) या आरोपीचा जामीन अर्ज येथील जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधिशांनी फेटाळला. (कारागृहातूनही धमक्या देण्याचे आरोपीचे धैर्य कसे होते ? यासाठी त्याला साहाय्य करणार्‍या संबंधितांवरही कठोर कारवाई करायला हवी ! - संपादक)
    धर्मांध अफरोजने युवतीवर ५ जूनच्या सकाळी बलात्कार केला होता. यामुळे तिला अनेक जखमाही झाल्या. जामीन मिळण्यासाठी धर्मांध अफरोज आणि पीडित युवती यांचे प्रेमसंबंध असल्याचे त्याच्या बाजूने सांगण्यात आले. सध्या महिला आणि विशेषतः अल्पवयीन बालक, बालिका यांच्याविरुद्ध घडणार्‍या गुन्ह्यांना लक्ष करून अशा आरोपींना सोडणे अयोग्य असल्याचे मत नोंदवून न्यायाधीश जी.ओ. अग्रवाल यांनी सय्यद अफरोजचा जामीन अर्ज फेटाळला.

प्रत्येकी ३ घरांमागे १ मुसलमान स्त्री तलाकने पीडित ! - रूबिना पटेल

हिंदु स्त्रीला सन्मानाची वागणूक देणार्‍या हिंदु धर्माचे महत्त्व यावरून तरी जाणतील का ?
   नाशिक - सध्या प्रत्येकी ३ घरांमागे १ मुसलमान स्त्री तलाकने पीडित असल्याचे रूबिना पटेल यांनी सांगितले. येथे झालेल्या ९५ व्या वसंत व्याखानमालेत मुसलमान महिलांच्या प्रश्‍नांवर कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, तलाक देण्याची इस्लाममध्ये लिहून ठेवलेली पद्धत वेगळी असून आताच्या काळात तिचा विपर्यास केला जात आहे. स्त्रीला विचारून तलाक देणे असे लिहून ठेवलेले असतांना तिचा विचार न करता तलाक दिला जातो.

(म्हणे) रस्त्यावर फार खड्डे नाहीत !

पुण्यामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असतांना महापौरांचा दावा
    पुणे, १३ जुलै - पावसाच्या संततधारेने शहरातील रस्त्यांवर लहानमोठ्या खड्ड्यांच्या संख्येत पुष्कळ वाढ झाली आहे. दीड मासांपूर्वी उद्घाटन झालेल्या स्वारगेट येथील जेधे उड्डाणपुलावरही खड्डे पडू लागले आहेत. (यावरून पुलावरील रस्त्याची गुणवत्ता किती निकृष्ट आहे, हेच यावरून सिद्ध होते. शहरातील रस्त्यांना खड्डे कसे पडले, याची पालिकेने चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करायला हवी. - संपादक) गल्लीबोळांतील रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. यावर महापौर प्रशांत जगताप यांनी मात्र हे प्रमाण फार नसल्याचा दावा केला आहे.

मनसेकडून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचार्‍याला चोप

जे मनसेला जमते, ते महानगरपालिकेला का जमत नाही ?
फेरीवाल्यांकडून हप्ते वसूल केल्याचे प्रकरण
    कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करत असल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील प्रकाश म्हात्रे या कर्मचार्‍याला पुष्कळ चोप दिला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे प्रविष्ट केले आहेत. अजूनही कुणाला अटक करण्यात आलेली नाही. एका भाजी विक्रेत्या महिलेला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून तिच्याकडे पैशांची मागणी करत असल्यामुळे म्हात्रे याला चोप दिल्याचे मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार प्रकाश भोईर यांनी सांगितले. पीडित महिलेने त्यांच्याकडे तक्रार केली होती.
    येथील परिसरात पुष्कळ फेरीवाल्यांनी ठाण मांडला आहे. टपर्‍या आणि हातगाड्या यांवरही अवैध अन्नपदार्थांची विक्री होत आहे; मात्र महानगरपालिका त्याकडे कानाडोळा करते. (महानगरपालिकेने अशा सर्वच फेरीवाल्यांवर कारवाई करायला हवी ! - संपादक)

(म्हणे) लाकडी, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसचा नाग बनवून पूजा करा ! - जिल्हाधिकारी

शिराळा येथील नागपंचमीची बैठक
        पर्यावरणाची हानी होते म्हणून बकरी ईदला मातीची बकरी करून कापावी, असे आवाहन कधी प्रशासनाने केल्याचे ऐकीवात नाही. वटपौर्णिमा, गणेशोत्सव, नागपंचमी अशा हिंदूंच्याच सणांनाच नेहमी प्रशासन आणि न्यायालय यांना नियमांची कशी काय आठवण होते ? हिंदुबहुल देशात हिंदूंनी किती दिवस अन्याय सहन करायचा ? - संपादक
        सांगली, १३ जुलै (वार्ता.) - शिराळा येथील नागपंचमी कायद्यानुसारच साजरी झाली पाहिजे. या सणांसाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन झाले पाहिजे. उत्सवाला काळानुरूप संदर्भ द्या. त्यासाठी जिवंत नागांऐवजी लाकडी, तसेच प्लास्टर ऑफ परिरसचे नाग सिद्ध करून त्याची पूजा करा, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात नागपंचमी सणाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार श्री. शिवाजीराव नाईक, पोलीस अधीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे, विभागीय वन अधिकारी समाधान चव्हाण उपस्थित होते.

मुंबईत रस्ते घोटाळ्याच्या प्रकरणी कंत्राटदाराला अटक

जनतेच्या मूलभूत सुविधांमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांना 
कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर वचक बसेल !
       मुंबई - रस्ते घोटाळ्याच्या प्रकरणी रेलकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या आस्थापनाच्या दीपन शाह या कंत्राटदाराला अटक करण्यात आली आहे. कंत्राटदाराला करण्यात आलेली ही पहिलीच अटक आहे. यापूर्वी १० लेखापालांना अटक झाली आहे. या घोटाळ्याच्या प्रकरणी मुंबईच्या महापौर सौ. स्नेहल आंबेकर यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यातून मुंबईत रस्ते घोटाळा झाल्याचे उघड झाले होते.

उगे, गोवा येथे श्री सिद्धेश्‍वर देवाच्या मूर्तीवर क्रॉस घालण्याचे ख्रिस्त्याचे निंदनीय कृत्य !

* पोर्तुगालचा संघ फूटबॉलचा सामना जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी कुकृत्य केल्याची लुकास कार्व्हालोची स्वीकृती !
* अशा पोर्तुगालधार्जिण्या आणि हिंदुद्वेष्ट्या ख्रिस्त्यांना तात्काळ पोर्तुगालमध्ये हाकला ! 
श्री सिद्धेश्‍वर देवाच्या मूर्तीवर ख्रिस्त्यांचा क्रॉस
असलेली रोझरी माळ घातलेली बाजूच्या छायाचित्रात
दिसत आहे. रोझरी माळेतील क्रॉस मोठा करून
वर्तुळात दाखवला आहे.
      सांगे, (गोवा) १३ जुलै (वार्ता.) - उगे, सांगे येथील श्री सिद्धेश्‍वर देवाच्या मूर्तीवर ख्रिस्त्यांचा क्रॉस असलेली रोझरी माळ घालण्याचा निंदनीय प्रकार ११ जुलै या दिवशी घडला. यासंदर्भात पोलिसांनी लुकास कार्व्हालो (वय ४४ वर्षे) या व्यक्तीला अटक केली. त्याची चौकशी केली असता हे कुकृत्य केले असल्याचे त्याने मान्य केले. पोर्तुगाल देशाचा संघ युरोकप मालिकेतील फूटबॉल सामना जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हे कुकृत्य केल्याची स्वीकृती कार्व्हालो यांनी दिली.
महिला मंडळातील सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या सतर्कतेमुळे संशयितास त्वरित अटक 
करण्यात यश
     ११ जुलैला मंदिरातील भटजी सकाळी अभिषेक, पूजा आणि दुपारची आरती करून घरी गेल्यानंतर दुपारी २ ते ४ या वेळेत हे कुकृत्य करण्यात आले. हा प्रकार मंदिरात सायंकाळी महिला मंडळाच्या बैठकीसाठी आलेल्या महिलांना लक्षात आल्यावर त्यांनी ही बाब सर्व ग्रामस्थांना सांगितली. ही वार्ता सर्व गावात आणि आसपासच्या गावात पसरल्यानंतर सुमारे १ सहस्र ग्रामस्थ, मंदिराचे विश्‍वस्त, सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई, पंच अमेय नाईक, शिवसेनेचे नेते बाबूराव नाईक आदी मंदिर परिसरात जमले. ग्रामस्थांना संशयित लुकास कार्व्हालो यानेच हा प्रकार केल्याचा दाट संशय आला. हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी जाणीवपूर्वक ही रोझरी माळ मूर्तीवर घालण्यात आली आहे. यामुळे हिंदु भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत, अशी तक्रार श्री सिद्धेश्‍वर देवस्थानचे सचिव सुरेश भंडारी यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. सांगेचे पोलीस निरीक्षक उत्तर राऊत देसाई यांनी फौजफाट्यासह येऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर गावकर्‍यांच्या संशयावरून लुकास कार्व्हालो याला कह्यात घेण्यात आले.

नाशिक येथे वरुणराजासाठी नंदीचे मुख फिरवले आणि जोरदार पाऊस आला !

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी आणि अंनिस यांना चपराक !
   नाशिक, १३ जुलै - जिल्ह्यात पुष्कळ पाऊस व्हावा, यासाठी गोदाघाटावरील श्री बाणेश्‍वर महादेव मंदिराची पिंड पाण्यात ठेवलेली असतांनाच निर्वाणीचा उपाय म्हणून येथील श्री अर्धनारीनटेश्‍वर मंदिरातील नंदीचे मुखही दक्षिण दिशेला फिरवण्यात आले आहे. या मंदिरातील नंदीचे मुख फिरवल्यानंतर येथे प्रचंड पाऊस पडतो, अशी आख्यायिका असल्याने नंदी फिरवण्यात आला आहे आणि प्रत्यक्षातही आता नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. (यावरूनच हिंदु धर्माची महानता स्पष्ट होते. - संपादक) त्यामुळे आता गोदावरी नदीला पूर आला आहे.

गुरुपौर्णिमा विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १९ जुलै २०१६
पृष्ठ संख्या : १६, मूल्य : ५ रुपये
गुरुपौर्णिमा विशेषांकाची वाढीव मागणी
१७ जुलैला दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

पोर्तुगाल विरुद्ध फ्रान्स यांत अंतिम सामना चालू असतांना सोशल मिडियावर गोवा विरुद्ध पुडूचेरी असा खेळ चालला !

देशाभिमानशून्य फूटबॉल रसिक !
      नवी देहली - युरो चषकासाठी १० जुलै या दिवशी रात्री पोर्तुगाल विरुद्ध फ्रान्स या देशांमध्ये अंतिम फूटबॉल सामना चालू असतांना देशातील सोशल मिडियावर गोवा विरुद्ध पुडूचेरी असा खेळ चालला होता. फ्रान्स देशाने वर्ष १९६२ पर्यंत पुडूचेरीवर राज्य केले होते, तर पोर्तुगालने १९६१ पर्यंत सुमारे साडेचारशे वर्षे गोव्यावर राज्य केले होते आणि या देशांनी या ठिकाणी फूटबॉल खेळही आणला.

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथील मंदिरे पाडण्यास तथाकथित पुरोगाम्यांचे समर्थन !

     विजयवाडा (आंध्रप्रदेश) - विकासाच्या नावाखाली येथील अनेक प्राचीन मंदिरे पाडण्याचे प्रयत्न तेलगू देसम पक्षाच्या सरकारने चालू केले असल्याने हिंदूंमध्ये संतापाची लाट पसरली असून अनेक संत आणि हिंदु भाविक यांनी मोर्चे काढून निषेध व्यक्त केला आहे; मात्र शहरातील काही हिंदूविरोधी पुरोगामी आणि साम्यवादी मंडळींनी एक बैठक घेऊन विकासाच्या नावाखाली मंदिरे पाडण्याचे समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू केला आहे.
१. या बैठकीत अधिवक्ता शंकर राजेंद्र प्रसाद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा संदर्भ देऊन रस्त्यावर बांधण्यात येणारी मंदिरे हा देवांचा अवमान आहे, असे सांगितले. त्यामुळे या घटनेला राजकीय स्वरूप देऊ नये. (येथील विजयेश्‍वर स्वामी मंदिर हे अत्यंत प्राचीन असून ते भाविकांचे प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे. ते बांधण्यात आले तेव्हा त्या ठिकाणी रस्ता होता का ? हे अधिवक्ता महाशयांना माहीत नाही का ? विकासाच्या नावाखाली हिंदूंची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त करणारे सरकार इतर धर्मियांच्या श्रद्धास्थानांना हेच नियम का लागू करत नाही ? - संपादक)

धर्म परिवर्तनानंतरही अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने केले कुंभस्नान

    ठाणे - २ सहस्र कोटींच्या एफड्रीन प्रकरणातून वाचण्यासाठी मुसलमान धर्म स्वीकारलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी वर्ष २०१३ मध्ये अलाहाबाद येथील कुंभमेळ्यालाही उपस्थित होती, अशी माहिती तिचा पती विकी गोस्वामी यांची बहीण रिटा गोस्वामी हिने पोलिसांना दिली. अलाहाबाद येथील कुंभमेळ्यात तिने स्नानही केल्याचे रिटाने सांगितले. या प्रकरणात रिटाच्या झालेल्या चौकशीच्या वेळी तिने हे उघड केले. मुसलमान धर्म स्वीकारल्यावर ममताने स्वतःचे नाव आयशा हसन असे ठेवले आहे.

दैनिक सनातन प्रभातचे रंगीत : गुरुमाहात्म्य विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १७ जुलै २०१६
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
गुरुमाहात्म्य विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी
१६ जुलैला दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

इसिस आणि जेएम्बी बंगालमध्ये बेरोजगार मुसलमान युवकांना संघटनेत भरती करत आहेत !

जिहादी आतंकवाद्यांच्या या कार्याकडे बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारचे लक्ष आहे का ? 
कि मुसलमानांच्या मतांसाठी ते याकडे दुर्लक्ष करत आहेत ?
     कोलकाता - बंगालमध्ये इसिस आणि जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (जेएम्बी) बंगालमधील बेरोजगार मुसलमान युवकांना त्यांच्या संघटनेमध्ये भरती करत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 
     नुकत्याच अटक करण्यात आलेल्या २५ वर्षीय महंमद मुसीरूद्दीन याने राज्यातील वर्धमान, मुर्शिदाबाद आणि बीरभूम सहित बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांतील आतंकवाद्यांच्या अस्तित्वाची माहिती दिली. मुसीरूद्दीनही या बेरोजगार युवकांपैकीच एक आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, या संघटनांचे प्रमुख जिल्ह्यातील १६ ते ३० वयोगटातील बेरोजगार तरुणांवर लक्ष ठेवतात. त्यात महिलांचाही समावेश असतो. नंतर त्यांची भेट घेऊन त्यांचे ब्रेनवॉश करणे आरंभ करतात. नंतर त्यांना आर्थिक साहाय्य करून त्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी उद्युक्त करतात. त्यांना सांगितले जाते की, तुम्हाला सिरियात जाऊन युद्ध करण्याची आवश्यकता नाही, तर येथेच राहून तुम्ही जिहाद आरंभ करू शकता. 
     संघटनेचे हे प्रमुख फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य सामाजिक संकेतस्थळांद्वारे सिरिया, इराक आणि बांगलादेश येथील त्यांच्या नेत्यांशी संपर्क साधतात.

इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचे संस्थापक गौरव तिवारी यांचा गूढरित्या मृत्यू !

गौरव तिवारी यांच्या गूढ मृत्यूवर भारतातील संशोधक संशोधन करतील का ? 
     नवी देहली - प्रसिद्ध पॅरानॉर्मल संशोधक गौरव तिवारी यांचा देहलीमध्ये गूढरित्या मृत्यू झाला आहे. गौरव तिवारी हे २००९ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होते. अतिंद्रिय गोष्टींविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि लोकांची भयातून मुक्तता करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती. अतिंद्रिय घटना, भूत-पिशाच, परग्रहवासी या विषयांवर ते सातत्याने संशोधन करत होते. झपाटलेल्या ६ सहस्र ठिकाणांना त्यांनी भेट दिली होती. 
     ३२ वर्षांच्या गौरव यांचा याच वर्षी जानेवारीत विवाह झाला होता. ते आपले आई-वडील आणि पत्नीसमवेत राहत होते. अलीकडेच त्यांनी त्यांच्या पत्नीला एक दुष्ट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा त्यांना आपल्याकडे खेचत असून अनेक प्रयत्नांनंतरही त्या शक्तीला नियंत्रित करणे कठीण जात आहे, असे म्हटले होते.
    कामाच्या ताणामुळे त्यांना असे वाटत असावे, असा त्यांचा समज झाला. गौरव त्यांच्या घराच्या न्हाणीघरात असतांना तेथून मोठा आवाज आला. कुटुंबियांनी प्रयत्न करून दरवाजा उघडल्यावर गौरव बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या गळ्याभोवती एक काळसर रेषा उमटलेली दिसून आली.

देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ५७ सहस्र शाखा !

संघाने देशातील हिंदूंची दारूण स्थिती दूर करण्यासाठी प्रयत्न करावे ! 
     कानपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशात मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत देशभरात संघाच्या एकूण ५७ सहस्र शाखा उघडल्या गेल्या आहेत. आणि पुढील वर्षांत ही संख्या १ लाखाच्याही पुढे जाऊ शकते, अशी माहिती बिठूर येथे चालू असलेल्या संघाच्या चिंतन शिबिरात देण्यात आली. 
    या शिबिरात अखिल भारतीय प्रांत प्रचारकचे प्रमुख मनमोहन वैद्य म्हणाले, मागील ६ वर्षांत जनतेमध्ये संघाविषयी रस वाढला आहे. त्यामुळे वर्ष २०१२ पर्यंत देशभर एकूण १२ सहस्र शाखा उघडल्या गेल्या होत्या. त्यांची संख्या आता ५७ सहस्रांपर्यंत जाऊन पोहचली आहे. या चिंतन शिबिरामध्ये एकूण ४२ प्रांत प्रचारक सहभागी झाले होते.फलक प्रसिद्धीकरता

राष्ट्रद्रोह्यांना पाठीशी घालणार्‍या काँग्रेसवर बंदी घाला !
    जिहादी आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात काही वर्षांपूर्वी राष्ट्रप्रेमींनी मोहीम हाती घेतली होती. यापासून नाईक यांना संरक्षण मिळावे, अशी मागणी वर्ष २०१२ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारमधील केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री के. रहमान खान यांनी केली होती.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Atankwadke samarthak Dr. Zakir Naikko 2012me Congressi mantri Rehman Khanne suraksha deneki maang ki thi. -
 Congresske rashtradrohka yah ek aur udaharan!
जागो ! : आतंकवाद के समर्थक डॉ. जाकिर नाईक को २०१२ में कांग्रेसी मंत्री रहमान खान ने सुरक्षा देने की मांग की थी । - 
कांग्रेस के राष्ट्रद्रोह का यह एक और उदाहरण !

संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाकडून आतंकवादविरोधी युवकांचे पथक !

मुसलमानांना जिहादी आतंकवादी बनण्यापासून रोखण्याचा उपक्रम
     नवी देहली - इसिससारख्या आतंकवादी संघटनेला आव्हान देण्यासाठी रा.स्व. संघ प्रणीत मुस्लिम राष्ट्रीय मंचने आतंकवादविरोधी तरुणांचे पथक बनवले आहे. याद्वारे जिहाद्यांकडून तरुणांचे केले जाणारे ब्रेन वॉशिंग रोखले जाईल. हे पथक जेथे मुसलमान युवक इसिसकडे वळत असल्याची माहिती मिळेल, तेथे जाऊन कृती करील. या पथकात मुसलमानांपेक्षा नमो सेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचेच कार्यकर्ते अधिक असतील. मंचचे राष्ट्रीय संयोजक महंमद अफजल यांनी सांगितले की, इसिस भारतासाठी एक आव्हान आहे. दक्षिणेतील राज्यांतील मुसलमान याकडे आकृष्ट होत आहेत. आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत.


केरळ येथील धर्माभिमानी श्री. अभिजीत अशोकन् यांनी भारताच्या मानचित्राचा अवमान थांबवला !

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणारे श्री. अभिजीत अशोकन् यांचे अभिनंदन !
दीपेश रामचन्द्र प्रभु टीडी या नावावरून
चालवण्यात येणार्‍या फेसबूकच्या
पानावर भारताच्या नकाशाचे
केलेले विकृतीकरण
      कोची (केरळ) - केरळ येथील आलप्पुझा जिल्ह्यातील धर्माभिमानी श्री. अभिजीत अशोकन् (वय २१) यांना फेसबूकवर दीपेश रामचन्द्र प्रभु टीडी, तसेच अ‍ॅमॅझेन्स टेक या दोन नावावरून प्रसिद्ध केलेले पोस्टमध्ये भारताच्या मानचित्राचे (नकाशाचे) विकृतीकरण झाल्याचे लक्षात आले. त्याच्यावर त्यांनी लगेच संबंधित लोकांना जाणीव करून दिली. मानचित्राचे विकृतीकरण करणे हा राष्ट्र्रद्रोह आहे. या नंतर या दोघांनीही फेसबूक पानावरून ते मानचित्र काढून टाकले. श्री. अभिजीत यांनी तत्परतेने केलेल्या या कृतीमुळे त्यांना हा राष्ट्रद्रोह थांबवता आला. यापूर्वीही त्यांनी भारत स्काऊटच्या ऑप्रो पुस्तकातून भारताच्या मानचित्राचा अवमान थांबवण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना संपर्क केला होता आणि ते काढण्यासाठी पाठपुरावाही केला होता.
     हे चित्र प्रसिद्ध करण्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसून केवळ जनजागृतीसाठी ते प्रसिद्ध करत आहोत.

काश्मीरमध्ये धर्मांधांनी अमरनाथ यात्रेकरूंना पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यास भाग पाडले !

भाजप-पीडीपीच्या राज्यात हिंदूंची ही स्थिती हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) अपरिहार्य करते ! 
     श्रीनगर - काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या वेळी धर्मांधांनी उधमपूर येथे अमरनाथ यात्रेकरूंना पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. घोषणा न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. घोषणा दिल्यानंतर त्यांना मारहाण करून सोडण्यात आले. त्यांच्या वाहनांना आग लावण्यात आली.दक्षिण चिनी समुद्रावर चीनचा अधिकार नाही ! - आंतरराष्ट्रीय न्यायालय

     अ‍ॅमस्टरडॅम - दक्षिण चिनी समुद्रावर चीनचा कसलाही अधिकार नाही, असा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला आहे. असा निर्णय येणार असल्याचे पाहून चीनने आधीच या सुनावणीवर बहिष्कार टाकला होता. दक्षिण चिनी समुद्रातील पाण्यावर चीनचा अधिकार असल्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. 
     न्यायालयाने काय आदेश दिला याच्याशी आमचे फारसे देणेघेणे नाही. आमचे सार्वभौमत्व, सागरी सुरक्षितता आणि स्थैर्य या गोष्टी कशा पद्धतीने हाताळायच्या, हे आमच्या सैन्याला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. 
      काही दिवसांपासून दक्षिण चिनी समुद्रातील पाण्यावरून चीन आणि फिलिपिन्स यांच्यामध्ये वाद चालू आहे. सर्वच देशांनी या समुद्रातील चीनच्या हस्तक्षेपास तीव्र आक्षेप घेतला आहे. चीनने या सागरी भागामध्ये एक कृत्रिम बेटदेखील उभारले आहे. अमेरिकेनेदेखील यास तीव्र आक्षेप घेतला आहे. फिलिपिन्सने हा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेत चीनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. विशेष म्हणजे व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवाननेदेखील दक्षिण चिनी समुद्रावर अधिकार सांगितला आहे.


४ लाख मंदिरे सरकारच्या अधीन; परंतु एकही मशीद नाही ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

असे बोलण्याचे धाडस केवळ डॉ. स्वामी यांच्यामध्येच आहे; 
अन्य नेते केवळ मतांसाठी हिंदुत्वाचा विषय घेतात ! 
     कर्णावती - देशातील ४ लाख मंदिरांवर सरकारचे नियंत्रण आहे; परंतु एकही मशीद सरकारच्या नियंत्रणात नाही, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. ते गुजरातच्या अरावली जिल्ह्यातील एका मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी आले होते. डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, धर्मनिरपेक्ष देशातील मुसलमान समाज सहिष्णु नसल्याने सरकार किंवा प्रशासन एकाही मशिदीत हस्तक्षेप करू शकत नाही; मात्र मंदिरात सरकार हस्तक्षेप करते.

बँक कर्मचार्‍यांचा २९ जुलैला देशव्यापी संप !

       नवी देहली - सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँक कर्मचार्‍यांनी २९ जुलैला देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रशासनाने बँकिंग क्षेत्रात राबवलेल्या सुधारणा जनतेच्या हिताविरुद्ध असल्याचे म्हणत बँक कर्मचार्‍यांनी त्या सुधारणांना विरोध दर्शवण्यासाठी हा संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (युएफ्बीयू) या संपाचे नेतृत्व करणार आहे. याआधी कर्मचार्‍यांनी १२ आणि १३ जुलैला संप पुकारला होता; परंतु देहली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तो रहित करण्यात आला.

जगभर सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी एस्.एस्.आर्.एफ्. कार्यरत !

श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे १९ ते २५ जून या कालावधीत पार पडलेल्या पंचम अखिल भारतीय 
हिंदू अधिवेशनात एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. सिरियाक वाले यांनी केलेले अभिभाषण
पू. सिरियाक वाले

     स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊन्डेेशन (एस्.एस्.आर्.एफ्.) या आध्यात्मिक संस्थेचे प्रेरणास्थान असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो, तसेच येथे उपस्थित असलेल्या सर्व संतांच्या चरणी नम्रभावे अभिवादन करतो. हिंदु राष्ट्राची स्थापना या एकाच ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणार्‍या आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या हिंदुत्ववाद्यांना पाहून मला पुष्कळ आनंद होत आहे.

दाभोलकर प्रकरणाचा तपास निःपक्षपणे होणार का ?

खरे मारेकरी सापडणार कधी ?
     पनवेल येथील दैनिक कर्नाळाच्या ०५.०७.२०१६ या दिवशीच्या अंकात श्री. उन्मेश गुजराथी यांनी फ्रॉम द डेस्क ऑफ उन्मेश गुजराथी या स्तंभात दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासाच्या नि:पक्षपणाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारा लेख लिहिला आहे. हा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
     मागील महिन्याभरापासून डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासाचे अक्षरशः वाभाडे काढणे चालू होते. अखेर उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे (सीबीआयचे) अधिकारी, तसेच दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांंना चांगलेच झापले. तपासाच्या नावाने फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचे उद्योग बंद करा, असा दम दिला. त्याचबरोबर माध्यमांमध्येही तपासाच्या बातम्या बंद झाल्या. आता तरी सीबीआयचे अधिकारी या तपासाकडे प्रामाणिकपणे लक्ष देतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबियांंनी खर्‍या मारेर्‍यांना शिक्षा व्हावी, असा आग्रह धरावा. सनातन संस्था आणि पर्यायाने हिंदुत्ववादी विचारांची अपकीर्ती करण्याचे कारस्थान थांबवावे.

ढाका घातपाताच्या निमित्ताने !

श्री. भाऊ तोरसेकर
       डॉ. झाकीर नाईक हे वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे. हा माणूस सर्व धर्माच्या पवित्र ग्रंथांचा ज्ञानकोष असल्यासारखी प्रवचने करतो आणि ती ऐकून त्याचे श्रोते भारावून जातात, असा अनुभव आहे. म्हणजे असे, की त्याच्या समोर केवळ त्याचे अनुयायी किंवा मुस्लिम श्रद्धाळूच जमलेले नसतात. अनेकदा त्याने विविध धर्माच्या पंडितांना परिसंवादात बोलावून लिलया पराभूत केल्याचीही अनेक चित्रणे सामाजिक संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यात अनेक मुसलमानेतर शहाण्यांचीही उपस्थिती असल्याचे अगत्याने प्रदर्शित केलेले असते. हा अर्थात्च प्रचाराचा भाग आहे. त्यात महाभारत, भगवद्गीता किंवा कुराणासह बायबलच्याही अनेक श्‍लोकांचे उल्लेख डॉ. झाकीर नाईक करतात. इतक्या फटाफट हा विषय पुढे सरकत असतो की, त्यांनी उधृत केलेले श्‍लोक वा ओळी खरोखर त्या त्या धर्मग्रंथात आहेत किंवा नाही, याची छाननीही होत नाही. त्याची आवश्यकताही नसते.

पदपथ अतिक्रमणापासून मुक्त होणार का ?

      पुणे, मुंबई यांसारखी अन्य मोठी शहरे असो वा त्या ठिकाणची उपनगरे असो, या सर्वच ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना एक मोठी समस्या भेडसावते ती म्हणजे, सर्व रस्ते आणि पदपथ हे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. एकट्या पुणे शहराचा विचार केल्यास शहरात अनेक अतिक्रमणे झाली असून त्यांतील काही ठिकाणे ही संवेदनशील असल्याचे पुणे महानगरपालिकेने केलेल्या एका पाहणीत आढळून आले आहे. त्या भागात पोलिसांचा फौजफाटा घेऊनच अतिक्रमणांवर कारवाई करावी लागेल, अशी भयावह स्थिती आहे. याचसमवेत शहराच्या विविध भागांतील २९ रस्त्यांवर व्यावसायिक वापरासाठी दुकानांना बांधकामाची अनुज्ञप्ती देता येत नाही. असे असतांनाही तेथे दुकाने उभारण्यास प्रशासनाने अनुमती दिली आहे. पदपथ आणि रस्ते याठिकाणी अतिक्रमण होणे, हे त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लांच्छनास्पदच आहे.

धीरोदात्तपणे कठोर शिक्षा भोगणारा सुशील सेन !

बोधकथा
बालकांसाठी परिपाठ !
सुशील सेन !
      २६ ऑगस्ट १९०७. कोलकाता येथील न्यायालयात अरविंद घोष यांच्यावर अभियोग (खटला) चालू होता. बाहेर जमलेल्या समुदायानेे वन्दे मातरम्च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून सोडले. त्या देशभक्तांवर इंग्रज शिपाई अंदाधुंद लाठीमार करू लागले. १५ वर्षांच्या सुशील सेन याला ते पहावले नाही. त्याने एका धिप्पाड शिपायाला हातानेच तडाखा लगावला ! पुन्हा एकदा ! आणखी एक !! 
    बाकीच्या शिपायांनी सुशीलला घेरले आणि रक्तबंबाळ होईपर्यंत मारले. दुसर्‍या दिवशी न्यायालयाने सुशीलला १५ फटक्यांची कठोर शिक्षा दिली. धीरोदात्तपणे सुशीलने ती भोगली !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

हा निर्णय घ्यायला इतकी वर्षे का लागली ? अर्थात् कधीच निर्णय न घेता आतातरी निर्णय घेतला, हे महत्त्वाचे आहे !

    संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर न करता निवडणूक लढवण्याऐवजी (कुठल्याही पक्षातील किंवा अपक्ष) मातृभाषाप्रेमी आमदार निवडून येण्यासाठी निवडणुकीत सर्व शक्तीनिशी प्रचारकार्य करण्याची परिस्थितीनुरूप रणनीती भारतीय भाषा सुरक्षा मंचने (भाभासुमं) आखली आहे.
- प्रा. सुभाष वेलिंगकर, राज्य समन्वयक, भारतीय भाषा सुरक्षा मंच
     पाकिस्तानशी सर्व प्रकारचे राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, तसेच व्यावहारिक संबंध त्वरित तोडून टाका. पाकिस्तान, बांगलादेश यांना शेजारी राष्ट्र्र असे म्हणणे बंद करा ! त्यांना शत्रूराष्ट्रच म्हणा ! - आचार्य स्वामी धर्मेंद्रजी महाराज (मासिक सावरकर टाइम्स, जून २०१०)

उशिरा जागी झालेली एन्आयए !

    बांगलादेशातील ढाका येथे १ जुलै २०१६ला झालेल्या आतंकवादी आक्रमणातील निब्रास इस्लाम आणि रोहान इम्तियाझ या जिहाद्यांनी डॉ. झाकीर नाईक यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे स्पष्ट झाल्यावर आता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) डॉ. झाकीर यांच्या भाषणांची तपासणी चालू केली आहे.

श्री गुरुच साधकाच्या उन्नतीस पोषक अशी परिस्थिती निर्माण करतात आणि त्याच्याकडून कृती करवूनही घेतात !

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
        १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक आणि युवा साधक !

      वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना होईल, असे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, तसेच इतर संत यांनी सांगितले आहे. सनातन धर्म राज्य, म्हणजे विश्‍वकल्याणासाठी सात्त्विक लोकांनी चालवलेले राष्ट्र ! ते रामराज्यासारखे असेल ! असे राज्य चालवायला पात्र व्यक्ती लागतील. ईश्‍वराने सनातनला सामान्यांपेक्षा उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या, म्हणजे गेल्या जन्मीची साधना असलेल्या शेकडो बालसाधकांची ओळख करून दिली आहे. आतापर्यंत उच्च स्वर्ग आणि महर् या लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या ६२५ पेक्षाही अधिक बाल अन् युवा वयाच्या साधकांना सनातनने ओळखले आहे.

साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली होण्यासाठी प्रयत्नरत असलेले पू. भाऊकाका परब !

पू. भाऊ परब
       मी काही मासांपूर्वी देवद आश्रमात सेवा करत होतो. आश्रम म्हणजे जणू चैतन्याचा सतत वहाणारा झराच; कारण या आश्रमामध्ये सर्व ग्रंथसंपदा आणि पू. भाऊकाका परब, पू. नकातेकाका, पू. होनपकाका ही गुरुमाऊलींची रूपे दिवसभर कार्यरत असतात. त्यामुळे आम्हा साधकांची मने दिवसभर उल्हसित राहून सेवा करतांना मनावर कोणताही ताण येत नव्हता. तसेच श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज, प.पू. गुरुमाऊली आणि अनेक संत यांचे तेथे सतत अस्तित्व जाणवते. त्या वेळी पू. भाऊकाका यांच्या समवेत सेवा करतांना आणि त्यांच्या खोलीत रहात असतांना मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.
१. पू. भाऊकाका यांच्याबरोबर सेवा करतांना जाणवलेली सूत्रे
१ अ. प्रत्यक्ष प.पू. डॉक्टरच समवेत असून त्यांना अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करवून घेत आहेत, असे वाटणे : देवद आश्रमात सेवेस आल्यापासून सेवेतील सर्व बारकावे शिकायला मिळाले. कोणती सेवा कशा पद्धतीने आणि घाईगडबड न करता परिपूर्ण अन् अचूक कशी होईल हे तिथे पाहिले जाते. प्रत्येक जण प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. पू. भाऊकाका यांच्याबरोबर सेवा करतांना प्रत्यक्ष प.पू. डॉक्टर आपल्यासमवेत आहेत आणि त्यांना अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करवून घेत आहेत, असे मला वाटत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव वर्षारंभदिनी आलेल्या अनुभूती

१. अमृत महोत्सव वर्षारंभदिनी जणू आमच्या घरातच मोठा उत्सव आहे, असे वाटणे : अमृत महोत्सवाच्या दिवशी सकाळी लवकर उठून मी अंघोळ इत्यादी केले. नंतर दारासमोर रांगोळी काढली आणि दाराला तोरण बांधले. त्या दिवशी जणू आमच्या घरातच मोठा उत्सव आहे, असे वाटत होते.
२. दैनिक सनातन प्रभातने काढलेल्या विशेषांकाद्वारे घरात पुष्कळ चैतन्य आल्याचे जाणवणे आणि तो अंक भाव असलेल्या वाचकांना देतांना स्वतःला पुष्कळ कृतज्ञता अन् आनंद जाणवणे : सकाळी ७ वाजता श्री. अरविंद आराडकरदादा हे दैनिक सनातन प्रभातचा परात्पर गुरु डॉ. आठवले अमृत महोत्सव वर्षारंभदिन विशेषांक घेऊन आमच्या घरात आले. तेव्हा मला त्या विशेषांकाद्वारे घरात पुष्कळ चैतन्य आल्याचे जाणवले. घरातील सर्व जण उत्साही अन् आनंदी होते. आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवून पूजा केली. त्यानंतर अतिरिक्त अंकांच्या वितरणासाठी बाहेर पडतांना मला आजचा हा अंक योग्य व्यक्तीलाच दिला पाहिजे, असे वाटत होते. त्यानुसार मी त्या अनुषंगाने प्रार्थना करून भाव असलेल्या वाचकांना तो विशेषांक दिला. तेव्हा मला प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता अन् आनंद जाणवत होता.
- सौ. नविता नवनाथ भोसले, वास्को, गोवा.

केवळ स्पर्शाने लोखंडाचे सोने करणार्‍या परिसाप्रमाणे चैतन्याचा स्रोत असलेले प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
       केवळ स्पर्शाने लोखंडाचे सोने करणार्‍या परिसाप्रमाणे चैतन्याचा स्रोत असलेले प.पू. डॉक्टर ! आमची गुरुमाऊली ! मृत्यूनंतरही साधकांची काळजी घेणारी, सतत साधकांच्या प्रगतीचा विचार करून साधकांना जीवन्मुक्त करणारी, मानवजातीच्या कल्याणासाठी ग्रंथरूपाने अनमोल चैतन्याचे स्रोेत देणारी, संपूर्ण समाज आणि वातावरण यांतील रज-तमाचे आवरण दूर होण्यासाठी विविध सात्त्विक उत्पादने देणारी, विश्‍वातील साधकांना आणि हिंदुत्ववाद्यांना एकत्र आणणारी, प्रत्येक धर्माभिमान्याच्या मनात धर्माप्रती प्रेम निर्माण करून हिंदुतेज जागवणारी, संपूर्ण ब्रह्मांडाचे आणि प्राणीमात्रांचे कल्याण चिंतणारी, रामराज्य अनुभवण्यास देणारी, अशा आमच्या गुरुमाऊलीची थोरवी किती वर्णावी ? 
श्री. ज्ञानदेव पाटील
       अशी गुरुमाऊली आम्हाला दिल्यामुळे श्रीकृष्णाच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !
       श्रीकृष्णाच्या चरणी गोपींचा असलेला भाव आमच्यामध्ये निर्माण करण्यासाठी आम्हाला गोपी दिल्या (सतत गोपीभावात असणार्‍या साधिकांचे मार्गदर्शन लाभते.) आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रक्रियेत आम्हा जिवांना सामावून घेतले यांसाठीही अनंत कोटी कृतज्ञता !
- श्री. ज्ञानदेव पाटील, लोटे, जिल्हा रत्नागिरी. (१५.४.२०१६)

प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवानिमित्त नाडीवाचन चालू असतांना डोळ्यांतून भावाश्रू येऊन प.पू. डॉक्टरांप्रती आतून कृतज्ञता वाटणे आणि ही स्थिती एक घंटा टिकून रहाणे

       प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवानिमित्तचे विधी चालू असतांना त्यांचे सिंहासनावर आरूढ झालेले छायाचित्र पाहिल्यावर माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. मला प.पू. डॉक्टरांविषयी आतून कृतज्ञता वाटत होती.
       त्या दिवशी जीवनाडीपट्टी वाचनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मला आरंभी काहीच जाणवत नव्हते. नंतर मी नामजप करायला आरंभ केला. तेव्हा थोड्या वेळाने माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. माझ्या मनात प.पू. डॉक्टरांविषयी विचार येत होते. मी भावश्रूंना थांबवू शकत नव्हते. मला आतून प.पू. डॉक्टरांप्रती कृतज्ञता वाटत होती. माझी ही स्थिती एक घंटा टिकून होती.
- सौ. गायत्री अश्‍विन गांवकर, पणजी, गोवा.
दिंड्या पताकांची दाटी । झांज मृदंग वाजती ॥
तुझ्या नामाचा विठ्ठला । घोष चाले वाळवंटी ॥

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
    सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
   समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल (HMV) असे परवाने असणे आवश्यक आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
   वैद्यकीय, अर्थ, न्याय इत्यादी सर्वच क्षेत्रांत सर्व जण तज्ञांचे ऐकतात; पण त्याहून सूक्ष्म असणार्‍या अध्यात्माच्या क्षेत्रात मात्र बुद्धीप्रामाण्यवादी हिंदू स्वतःला अधिक शहाणे समजतात !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेला ५ दिवस शिल्लक

गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, तर आध्यात्मिक उन्नतीकडेच असते.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
   भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
जीवनाचा प्रवास करतांना ठामपणे मार्गक्रमण करून जीवनाला योग्य दिशा 
देऊन परिपूर्ण कर्म करणे, हे सर्वस्वी मनुष्याच्या स्वत:च्या हातात असते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

... ते वरिष्ठ नायालय !

संपादकीय
      पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन न मिळाल्यास त्यांचे भक्त देहलीच्या चौकात प्रतिदिन सामूहिक हरि ओमचा जप करतील, अशी चेतावणी अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक यांनी दिली आहे. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू मागील तीन वर्षांपासून कारागृहात आहेत. ते तेथे खितपत पडले आहेत, असे म्हटले म्हणून गैर नाही; कारण एवढा कालावधी निघूनही त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झालेले नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn