Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आनंदाचा कंद उभा पांडुरंग ।
गोपाळांचा संघ भोवती उभा ॥

सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुरावे देत नाही ! - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

मुंबई - महाराष्ट्र सरकार सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी पुरावे देत नाही, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्आयए) आणि केंद्रीय गृहमंत्रालय यांच्या अधिवक्त्याने ११ जुलै या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. येवला (जिल्हा नाशिक) येथील विजय रोकडे यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी अधिवक्त्याने हे न्यायालयात सांगितले. केंद्रीय गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे सल्लागार अधिवक्ता जी.आर्. शर्मा यांनी न्यायालयात युक्तीवाद करतांना सांगितले की, मे महिन्यामध्ये केंद्रसरकारने महाराष्ट्र राज्याच्या गृहखात्याकडे पुरावे मागितले होते; मात्र त्याविषयी काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

(म्हणे) काश्मीर जळत असतांना मोदी ढोल वाजवत आहेत ! - काँग्रेसचा कांगावा

देशावर बहुतांश काळ ज्यांनी राज्य केले त्या काँग्रेसमुळेच
आजच्या काश्मीरची ही स्थिती झाली आहे. अशा काँग्रेसला
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे का ?
    नवी देहली - जम्मू-काश्मीर जळत असतांना पंतप्रधान मोदी ढोल वाजवण्यात व्यग्र आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजावाला यांनी केली आहे. काश्मीरमध्ये २१ हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. सुरक्षा सैनिकांवर प्रतिदिन आक्रमणे होत आहेत. अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. ही परिस्थिती हाताळण्यात पीडीपी-भाजप युतीचे शासन अपयशी ठरले आहे, असेही सुरजावाला ट्विट करतांना म्हणाले.   

समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचे झाकीर नाईक यांना समर्थन, तर सनातनवर बंदीची मागणी !

  • गुन्हेगार, भ्रष्टाचारी, दंगलखोर, खुनी आदी आरोप असणार्‍यांचा भरणा असणार्‍या समाजवादी पार्टीवर बंदी का आणू नये, याचे उत्तर आझमी देतील का ?
  • मुंबईतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी अटक झालेले, दाऊद इब्राहिमच्या मेजवानीला उपस्थित रहाणारे अबू आझमी झाकीर नाईक यांचे समर्थन करून सनातनवर बंदीची मागणी करतात यात आश्‍चर्य ते काय !
    मुंबई - डॉ. झाकीर नाईक हे शांततेत आणि घटनेच्या तरतुदीनुसार धर्मप्रसार करून इतर धर्मियांचे इस्लाम धर्मात धर्मांतर करत असल्याने ज्यांच्या पोटात दुखत होते, त्यांनीच डॉ. झाकीर नाईक यांची अपकीर्ती चालवली आहे. सनातन संस्थेने धर्मनिरपेक्ष व्यक्तींच्या मनात आतंक पसरवल्याने त्या संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अबू आझमी यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून काश्मीरविषयी केवळ बैठक !

अशा बैठका घेऊन काय साध्य होणार ? त्यापेक्षा दंगलखोरांना
कायमची अद्दल घडेल, अशी कृती करण्याचा प्रयत्न का होत नाही ?
    नवी देहली - आफ्रिकेच्या दौर्‍यावरून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अन्य काही उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. काश्मीरमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळे राजनाथ सिंह यांनी त्यांचा नियोजित अमेरिका दौरा रहित केला आहे.
   या बैठकीनंतर केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधानांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही निष्पाप लोकांना हानी पोचवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. काश्मीरमधल्या पीडीपी-भाजप शासनालाही पंतप्रधानांनी साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

पंजाबमध्ये ३ पाकिस्तानी घुसखोर ठार !

  चंडीगड - पंजाबच्या अजनाला सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाने ३ पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले. ते येथील शाहपूर चौकीच्या जवळून भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते.

केरळमध्ये भाजप आणि माकप यांच्या नेत्यांची हत्या !

पुरोगामी डाव्यांची सत्ता असणार्‍या केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
   थिरुअनंतपुरम (केरळ) - केरळमध्ये माकप आणि भाजप या पक्षांच्या दोन स्थानिक नेत्यांची हत्या झाल्याचे वृत्त आहे. ११ जुलैला सकाळी पय्यानूर शहरात सी.व्ही. धनराज (वय ३६ वर्षे) नावाच्या माकपच्या कार्यकर्त्याची हत्या झाली.
१. धनराज त्याच्या निवासस्थानाच्या दिशेने जात होते. त्या वेळी तीन दुचाकींवरून गुंडांची एक टोळी त्यांचा पाठलाग करत होती. धनराज घराजवळ पोचल्यानंतर घरात प्रवेश करत असतांना टोळीने त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले.
२. माकपच्या एका स्थानिक नेत्याने या हत्येमागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर अवघ्या २ घंट्यांनी पय्यानूर येथीलच भाजपचे कार्यकर्ते सी.के. रामचंद्रन् (वय ४६ वर्षे) यांच्यावर प्राणघातक आक्रमण करून त्यांना ठार करण्यात आले.

डॉ. झाकीर यांच्या चिथावणीखोर भाषणांच्या पुराव्यासाठी पोलीस कायदेतज्ञांचे साहाय्य घेणार

   मुंबई - राष्ट्रद्रोही झाकीर नाईक यांच्या चिथावणीखोर आणि धर्मांधांना जिहादसाठी प्रवृत्त करणार्‍या भाषणांच्या विरोधात कोणीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे मुंबई पोलीस कारवाईसाठी कायदेतज्ञांचे साहाय्य घेत आहेत. डॉ. झाकीर नाईक हे जिहादसाठी प्रवृत्त करणारी विधाने करतात; मात्र या विधानांनंतर ते जिहादविषयी सारवासारव करणारी विधानेही करतात. पहिले विधान करतांना ते म्हणतात, सर्वच मुसलमान बांधवांनी जिहादी व्हायला हवे, आतंकवादी व्हायला हवे; मात्र पुढील विधान करतांना डॉ. नाईक म्हणतात, आतंकवादी म्हणजे ज्याची दहशत असते तो. चोरालाही पोलिसाची दहशत असते. म्हणजे चोरासाठी पोलीस आतंकवादीच. या अर्थाने आतंकवादी व्हा.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन न मिळाल्यास देहलीतील चौकात त्यांचे भक्त प्रतिदिन सामूहिक जप करतील ! - चंद्रप्रकाश कौशिक, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा

देहली येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन
   नवी देहली - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन मिळाला नाही, तर देहलीच्या चौकात युनायटेड हिंदु फ्रंट आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या नेतृत्वाखाली पूज्य बापूजींचे भक्त प्रतिदिन सामूहिक हरि ओमचा जप करतील, अशी घोषणा अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष
   श्री. चंद्रप्रकाश कौशिक यांनी केली. दारा सेना आणि भारत जागृती मोर्चा यांनी सनातन वैदिक हिंदु धर्म संस्कृतीच्या गुरुपरंपरेच्या रक्षणासाठी जंतरमंतर येथे संयुक्तपणे एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या वेळी ते बोलत होते.

सनातनवरील संभावित बंदीच्या विरोधात मुंबई आणि ठाणे येथे लोकप्रतिनिधींना निवेदन सादर

बंदरे आणि आरोग्य राज्यमंत्री तथा भाजपचे नेते 
रवींद्र चव्हाण यांना सनातनच्या वतीने निवेदन सादर 

राज्यमंत्री श्री. रवींद्र चव्हाण (मध्यभागी) यांना निवेदन
देतांना श्री. अजय संभूस. सोबत श्री. संदीप अग्निहोत्री (डावीकडे)

        ठाणे, १२ जुलै (वार्ता.) - सनातनवर होत असलेल्या अन्यायाच्या संदर्भात डोंबिवली येथील बंदरे आणि आरोग्य राज्यमंत्री तथा भाजपचे नेते श्री. रवींद्र चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. अन्वेषण यंत्रणांना खरे खुनी सापडत नसल्याने सनातनच्या साधकांना आणि सनातन संस्थेला गोवण्यासाठी खोटे पुरावे अन् साक्षीदार उभे करणे चालू आहे, ते थांबवावे. याच यंत्रणांच्या हवाल्याने वृत्तपत्रांतही खोटी वृत्ते छापून आणून सनातनची मानहानी चालू आहे ती बंद करण्यात यावी.
२. सनातन संस्था तपासकामी संपूर्ण सहकार्य करत असतांनाही चौकशीच्या नावाखाली सनातनच्या साधकांचा केला जाणारा छळ थांबवावा आणि सनातनवर बंदी घालण्याच्या मागणीला विरोध करावा, ही विनंती.

भाग्यनगर येथे इसिसच्या दोघा आतंकवाद्यांना अटक !


  भाग्यनगर - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) इसिसच्या दोघा आतंकवाद्यांना येथून अटक केली आहे. इसिसच्या भाग्यनगर गटाचा प्रमुख यासिर नियामतुल्ला आणि त्याचा साथीदार अताउल्ला रहमान अशी त्यांची नावे आहेत. रहमान या गटासाठी पैसे गोळा करत होता. काही दिवसांपूर्वी येथून इसिसच्या पाच आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून स्फोटके हस्तगत करण्यात आली होती.

काश्मीरचा हिंसाचार भारताचे अंतर्गत प्रकरण ! - अमेरिका

   नवी देहली - हिजबूल मुजाहिदीनचा आतंकवादी बुरहान मुझफ्फर वाणी चकमकीत ठार मारल्यानंतर भारताच्या कारवाईला चुकीचे ठरवणार्‍या पाकला अमेरिकेडून धक्का बसला आहे. या संदर्भात अमेरिकेने काश्मीरचा हिंसाचार भारताचे अंतर्गत प्रकरण असून सर्व पक्षांनी या परिस्थितीवर उपाय काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे म्हटले आहे. (अमेरिकेडून पाकला चपराक ! - संपादक)

शिक्षकांचा हिशेब न लागल्याने पुणे शिक्षण मंडळ सभेचे कामकाज थांबवले !

पुणे शिक्षण मंडळाच्या 
आणखी एका अनागोंदी कारभाराचा नमुना !
         पुणे, १२ जुलै - पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळात नेमके किती शिक्षक आहेत, त्यांची नियुक्ती कोणत्या शाळांमध्ये आहे, कोणत्या शाळांमध्ये किती शिक्षक न्यून आहेत किंवा एकूण विचार करता किती शिक्षक अधिक आहेत, यासंबंधीची कोणतीही माहिती २ घंटे चर्चा होऊनही मंडळ प्रशासनाकडून मिळू न शकल्यामुळे अखेर शिक्षण मंडळाची सभा ११ जुलै या दिवशी तहकूब करण्यात आली. (शिक्षण मंडळाच्या अशा कारभारामुळे शाळांमध्ये जर खोटे शिक्षक भरती होऊन अपलाभ घेत असतील, तर त्याला उत्तरदायी कोण ? शिक्षकांच्या संख्येवरून प्रशासनाचा कारभार किती हलगर्जीपणाचा असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) अचूक माहिती जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत सभा तहकूब राहील, असाही निर्णय या वेळी घेण्यात आला. याविषयीची विचारणा शिक्षण मंडळ सदस्य विनीता ताटके यांनी सभेत केली होती. या वेळी प्रशासनाकडून निवेदन देण्यात आले की, येत्या आठवड्यात शिक्षकांच्या नेमणुका नेमक्या पद्धतीने केल्या जातील. त्यामुळे शिक्षकसंख्येविषयी कोणतीच माहिती व्यवस्थित उपलब्ध देण्यात प्रशासन अकार्यक्षम ठरले. (यावरून शिक्षण मंडळाच्या नोंदी पडताळण्याचीच आवश्यकता किती आहे, हेच लक्षात येते. या प्रकरणी संबंधित कर्मचार्‍याकडून सभेचा व्यय वाया घालवल्याची रक्कम दंड म्हणून वसूल करायला हवी. - संपादक)

कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती कोल्हापूर-गगनबावडा, रत्नागिरी मार्ग बंद !

रस्त्यावर पाणी आल्यामुळे सांगली-कोल्हापूर रस्ता बंद करण्यात आला आहे.

         कोल्हापूर, १२ जुलै (वार्ता.) - सतत ३ दिवस चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने ११ जुलै या दिवशी धोक्याची पातळी गाठली आहे. या नदीने सायंकाळी ४३ फुटापर्यंत पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात सतत अतीवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ७० हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक मार्ग बंद झाले असून जिल्ह्यातील ८० हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. पन्हाळा, गगनबावडा तालुक्यांतील २० गावांचा पूर्ण संपर्क तुटला आहे.

शिवीगाळ आणि दमदाटी केल्याच्या प्रकरणी राष्ट्र्वादी काँग्रेसचे दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर गुन्हा प्रविष्ट

असे नेते असणार्‍या राष्ट्रवादी 
काँग्रेसवर जनतेने बंदीची मागणी का करू नयेे ?
        चाकण (जिल्हा पुणे), १२ जुलै - वडिलोपार्जित भूमीच्या विक्रीस हरकत घेणार्‍या सचिन घावटे या युवकास भ्रमणभाषवरून शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड (पुणे) येथील माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर ११ जुलै या दिवशी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या वेळी घावटे यांनी त्यांना मोहिते-पाटील यांनी दिलेल्या धमकीचे भ्रमणभाषवरील कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना दिले.
        सचिन घावटे याच्या आई-वडिलांनी आपल्याला भ्रमणभाषवरून सांगितले की, मुलगा मद्य पिऊन शिवीगाळ करत आहे. त्यामुळे सचिन याला भ्रमणभाषवरून समज दिली होती, असे स्पष्टीकरण मोहिते-पाटील यांनी या प्रकरणी दिले आहे.

हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आणि धरणे आंदोलन

आदिवासींचे पैसे हडपणारे भ्रष्टाचारी 
अभियंता नागापुरे यांच्यावर कारवाईची मागणी
        संगमनेर (जिल्हा नगर), १२ जुलै (वार्ता.) - येथील वादग्रस्त ठरलेले सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता ज.शि. नागापुरे यांनी मंत्रालयातील तत्कालीन सचिव आनंद कुलकर्णी यांच्याशी संधान साधून जिल्हा परिषदेत केवळ ४ मास कार्यरत असतांना आदिवासी भागात नियमबाह्य स्थानांतर करवून घेतले. श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, संगमनेर, अकोले - १, अकोले -२, राजूर या विभागांतील आदिवासी भागांमध्ये आदिवासी कामे न करता केवळ कागदोपत्री कामे झाल्याचे दाखवून त्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून पैसा जमवला. या प्रकरणाची सर्व स्तरांवरून चौकशी करून अशा भ्रष्ट अधिकार्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन (अण्णा) शितोळे यांनी केली. या मागणीसाठी ११ जुलै या दिवशी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आणि धरणे आंदोलन केले.

आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशनच्या माध्यमातून आजतागायत ७ सहस्र ५०० रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

श्री. राजेश क्षीरसागर
आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांची माहिती
मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ५० लक्ष रुपयांच्यावर निधी संमत !
   कोल्हापूर, १२ जुलै (वार्ता.) - कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतून शहरामध्ये विविध आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याकरिता सहस्रो रुग्ण येत असतात. त्यातील बहुतांश रुग्ण हे गरीब असतात. या रुग्णांना उपचाराअभावी परतावे लागू नये, त्यांना दिलासा मिळावा या सामाजिक भावनेतून आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशनच्या वतीने गेल्या ६ ते ७ वर्षांमध्ये ७ सहस्र ५०० रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच शस्त्रक्रिया झालेल्या ४० रुग्णांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ५० लक्ष रुपयांचा निधी संमत करून रुग्णांना आधार देण्याचे काम करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी ११ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

ऑल इंडिया सुन्नी उलेमा काऊन्सिलचे सरसंघचालक मोहन भागवत यांना ६ प्रश्‍न !

मुसलमानांकडून तुम्हाला कशा प्रकारचे राष्ट्रप्रेम अपेक्षित आहे ?
   कानपूर - ऑल इंडिया सुन्नी उलेमा काऊन्सिलने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. येथे ११ जुलैपासून चालू झालेल्या संघाच्या ६ दिवसीय बैठकीच्या स्थळी काऊन्सिलच्या पदाधिकार्‍यांनी जाऊन या संदर्भातील पत्र दिले आहे. तसेच यात डॉ. भागवत यांना ६ प्रश्‍नही विचारले आहेत.
सरसंघचालकांना विचारलेले प्रश्‍न
१. आपणाला आम्हा मुसलमानांकडून कशा प्रकारचे राष्ट्रप्रेम अपेक्षित आहे ?
२. धर्मांतराविषयी संघाचे विचार काय आहेत ?
३. आपण इस्लामविषयी किती जाणता आणि समझता ?
४. काय संघ देशाला हिंदु राष्ट्र बनवू इच्छितो ?
५. इस्लामकडून संघ काय अपेक्षा बागळतो ?
६. संघ भारताला हिंदु राष्ट्र मानतो, तर तो त्याला हिंदु धर्मग्रंथांच्या आधारे चालवू इच्छितो का ?

स्वामी गोविंदानंद यांना संभाजीनगर उच्च न्यायालयाकडून शिर्डीमध्ये प्रवेश करण्यास सशर्त अनुमती

स्वामी गोविंदानंद यांच्यावर शाई फेकली !
        संभाजीनगर, १२ जुलै - श्री साईबाबा यांच्या विरोधात वक्तव्य करणारे स्वामी गोविंदानंद यांना शिर्डीमध्ये पोलीस बंदोबस्तात प्रवेश करण्याची सशर्त अनुमती मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने ११ जुलै या दिवशी दिली. स्वामी गोविंदानंद यांना तुळजापूर येथे अवैधरित्या डांबून ठेवणे आणि नजरकैदेत ठेवणे या प्रकरणी अधिवक्ता सतीश तळेकर यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या वेळी याचिकाकर्त्यांकडून शिर्डीत सभा घेणार नाही, ४८ घंट्यांमध्ये शिर्डी सोडू, श्री साईबाबांच्या समाधीच्या ठिकाणी फिरकणार नाही आणि दूरचित्रवाहिन्यांशी बोलणार नाही, अशी हमी घेतली आहे.
        स्वामी गोविंदानंद हे शिर्डी येथे श्री साईबाबा यांच्यावरील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी आले होते. त्या वेळी उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी २८ जून, ३० जून आणि २ जुलै या दिवशी त्यांना शिर्डीत येण्यास बंदी केली होती. दंडी स्वामी गोविंदानंद हे शिर्डी येथे आले असता काही सार्ईभक्तांनी शाई फेकून त्यांचा अवमान केला. दंडी स्वामी गोविंदानंद हे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे शिष्य आहेत.

सनातन आश्रमासंबंधी दैनिक पुणे मिररने आक्षेपार्ह वृत्त दिल्याप्रकरणी अन्वेषण यंत्रणांनी अहवाल सादर करण्याविषयीचे आवेदन न्यायालयाने फेटाळले !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
         कोल्हापूर, १२ जुलै (वार्ता.) - रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाची झडती घेण्याच्या संदर्भातील पुणे मिरर या इंग्रजी दैनिकाने २२ जून या दिवशी आक्षेपार्ह वृत्त दिले होते. या संदर्भात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) यांनी अहवाल सादर करण्याविषयी अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी जिल्हा न्यायालयात २४ जून या दिवशी आवेदन (अर्ज) केले होते; मात्र सध्या कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचे कामकाज उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चालू असल्याने हे आवेदन जिल्हा न्यायालयास संमत करता येणार नाही, असे कारण देऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी हे आवेदन (अर्ज) १२ जुलै या दिवशी फेटाळले. जिल्हा न्यायालयात अर्ज फेटाळला, तरी मुंबई उच्च न्यायालयात याविषयी आवेदन देऊ शकतो, असेही न्यायालयाने सुचवले आहे.

मुसलमान धर्मगुरूंकडून डॉ. झाकीर नाईक यांना समर्थन !

मुसलमान धर्मगुरूंनी डॉ. झाकीर नाईक यांना समर्थन देणे यात, आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही; 
कारण यांपैकी अनेक जण देशापेक्षा धर्माचा आधी विचार करतात !
     नवी देहली - डॉ. झाकीर नाईक यांना बाजूला करणे हे एक षड्यंत्र आहे. एखाद्या व्यक्तीच्या सुमारे १ कोटी ४० लाख अनुयायांपैकी काहीजण आतंकवादी बनले, यासाठी त्यांना उत्तरदायी ठरवणे हा अन्याय आहे. तुम्हाला संशय असल्यास त्यांची चौकशी व्हायला हवी; मात्र प्रसिद्धीमाध्यमांकडून डॉ. झाकीर नाईक यांची अपकीर्ती योग्य नाही, असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना रशीद फिरंगी महली यांनी म्हटले आहे.

शैक्षणिक वर्षाचे ३ आठवडे उलटूनही नगरपरिषदेचे ६ वी, ७ वी आणि ८ वीचे काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित !

शिक्षण विभागाचा नियोजनशून्य सावळा गोंधळ !
   (पुस्तके इतक्या उशिरा का वितरित झाली, याची चौकशी होऊन शिक्षण विभागाने संबंधितांवर कारवाई करायला हवी. - संपादक)
नगर, १२ जुलै - शैक्षणिक वर्ष चालू होऊन ३ आठवडे उलटून गेले आहेत. जिल्हा परिषद शाळेतील सेमी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ६ वीच्या १ लक्ष १ सहस्र ६५५ विद्यार्थ्याना गणित आणि विज्ञान या २ विषयांची पुस्तके मिळाली नव्हती. या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी भाषेतील गणित, विज्ञान आणि हिंदीसह स्वाध्याय पुस्तिका बालभारतीच्या पुरवठादाराने ११ जुलै या दिवशी सायंकाळपर्यंत अखेर वितरीत केल्या.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच प्रत्येक वेळी जात काढतात ! - महादेव जानकर

   शिरोळ (जिल्हा कोल्हापूर), १२ जुलै - मी आणि राजू शेट्टी जातीयवादी नाही; मात्र राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणवून घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारच यांनाच जात काढण्याची सवय आहे. राजू शेट्टी यांची जात पवारांनीच काढली होती. जोपर्यंत जानकर आणि शेट्टी आहेत तोपर्यंत अजित पवार यांना परत सत्ता मिळणार नाही. अशा शब्दांत राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी शरद पवार यांच्यावर तोफ डागली.

पोलीस अधिकारी घाडगेळ यांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

पोलीस दलातील बड्या अधिकार्‍यांनी अडकवल्याचा आरोप !
   कल्याण - राष्ट्रवादीचे पदाधिकारी मदन दराडे यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांना पोलिसांनी अटक करून १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे; परंतु घाडगे यांनी भ्रष्ट पोलिसांनी षड्यंत्र रचून त्यांना अटक केल्याचा आरोप केला आहे. घाडगे यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग एका ड्रगप्रकरणी आरोपी निष्पन्न झाल्याने त्यांची मी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठांना तक्रार केली. त्याचा राग मनात धरून परमवीर सिंग यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस यांनी कट रचून मला खोट्या गुन्ह्यात अडकवून मानसिक आणि शारीरिक छळ चालू केल्याचा आरोप केला आहे.

इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर नगरपालिकेच्या कारभाराची चौकशी होणार !

   इचलकरंजी - सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच गेल्या ५ वर्षांतील येथील नगरपालिकेच्या कारभाराची चौकशी होणार आहे. २०१२ ते २०१६ या ५ वर्षांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश नगरविकास विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. याविषयीचे पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार कार्यवाही चालू करण्यात आली आहे. इचलकरंजी नगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. भाजपचे आमदार श्री. सुरेश हाळवणकर यांनी गेल्या ५ वर्षांतील इचलकरंजी नगरपालिकेचे लेखापरीक्षण करण्याची मागणी शासनाकडे केली होती.

डॉ. दाभोलकर हत्येची निष्पक्षपातीपणे चौकशी होण्याच्या संदर्भात पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

        पुणे, १२ जुलै (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्रप्रेमी सनातनचा छळ थांबवण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, या मागणीचे निवेदन ११ जुलै या दिवशी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सुधाकर संगनवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि श्री. विनायक बागवडे उपस्थित होते. याच मागण्यांसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ९ जुलै या दिवशी महाराणा प्रताप उद्यानासमोर राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले होते.

भारतात प्रतिवर्षी दीड लाखांहून अधिक स्त्रीभ्रूणहत्या : एशियन सेंटर फॉर ह्युमन राईट्सच्या अहवालातील वास्तव !

विज्ञान-तंत्रज्ञानाने गर्भलिंग निदान यंत्रे शोधून काढल्यामुळे स्त्रीभ्रूणहत्या होत आहे, 
तर या शोधावर आणि त्याच्या शिक्षणावर शासन आता बंदी घालणार का ?
      कोलकाता - भारतात प्रतिवर्षी दीड लाखांहून अधिक मुलींची गर्भातच हत्या होत असल्याचे वास्तव एशियन सेंटर फॉर ह्युमन राईट्स (एसीएच्आर्) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले आहे. या स्त्रीभ्रूणहत्येमुळे पुरुष आणि महिला यांच्यात असमतोल निर्माण झाल्यास भविष्यात मानवी तस्करी, महिलांवरील अत्याचार यांसारख्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. (गेल्या अनेक दशकांपासून देशात धर्मशिक्षण न देण्यात आल्यामुळे समाजात स्वार्थी वृत्ती वाढीस लागली आहे. परिणामी जीवहत्या हा विषय गौण ठरला आहे. ही स्थिती पालटण्यासाठी समाजाला धर्मशिक्षित करणे आवश्यक आहे ! - संपादक)

केंद्रशासनाचा गुप्तचर विभागाला संभाव्य न्यायाधिशांची पार्श्‍वभूमी तपासण्याचा आदेश !

     नवी देहली - न्यायाधिशांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या व्यक्तींची पार्श्‍वभूमी कसून तपासण्याचा आदेश केंद्रशासनाने गुप्तचर विभागाला दिला आहे. (असे आदेश द्यावे लागतात, यावरून जनतेने काय समजायचे ? - संपादक)

बोरिवली (मुंबई) येथील सेंट फ्रान्सिस शाळेकडून विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण अनिवार्य करून त्यासाठी शुल्क सक्ती !

पालकांनो, आपल्या पाल्यांना ख्रिस्त्यांच्या अशा
पैसे उकळणार्‍या शाळांत घालायचे का ते ठरवा !
   बोरिवली - येथील सेंट फ्रान्सिस शाळेने काही शालेय वस्तूंची खरेदी शाळेकडून करण्यास विद्यार्थ्यांना भाग पाडल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, असा आरोप पालकांनी केला आहे. तसेच शालेय घंट्यांमध्ये कराटे खेळाचे अनिवार्य प्रशिक्षण चालू करण्यात आले आहे. याविषयी पालक-शिक्षक संघटनेच्या सभेत निर्णय झाला, असे शाळेने परस्पर घोषित केले; मात्र तसे प्रत्यक्षात नव्हते. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाच्या विरोधात पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे दाद मागितली आहे. तसेच आंदोलनाच्या माध्यमांतून शाळेला धडा शिकवणार असल्याची चेतावणी पालकांनी दिली आहे.

शेरीनाल्याचे पाणी कृष्णा नदीत मिसळल्याने पाणी प्रदूषित

वारंवार उद्भवणार्‍या समस्यांविषयी ठोस उपाययोजना न करणारे निष्क्रीय महापालिका प्रशासन !
    सांगली, १२ जुलै (वार्ता.) - गेले दोन दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने शेरीनाल्याचे पाणी कृष्णा नदीत मिसळल्याने नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळा चालू झाल्यावर शहरातील सर्व नाले, गटारी यांचे पाणी शेरीनाल्यात मिसळते आणि हे पाणी एकत्रितरित्या नदीत मिसळते. महापालिकेची शेरीनाल्यासाठी असलेली धुळगाव योजना पूर्ण होण्यास अद्याप किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही. हे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेतच आहे. (वारंवार उद्भवणार्‍या समस्यांविषयी महापालिका प्रशासन उपाययोजना करण्यास असमर्थ असेल, तर प्रशासनाचा खर्चिक डोलारा हवा तरी कशाला ? तसेच दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यास त्याचे दायित्व कोण घेणार आहे ? - संपादक)

सरकारी नोकरावर खटला भरण्यासाठी शासनाच्या अनुमतीची आवश्यकता नाही ! - सर्वोच्च न्यायालय

     नवी देहली - एखादा सरकारी नोकर त्याचे अधिकृत कर्तव्य बजावत नसतांना त्याने केलेल्या कथित गुन्ह्यासाठी त्याच्यावर खटला भरण्याकरता शासनाच्या अनुमतीची आवश्यकता नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. शासनाने आपल्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या खटल्यासाठी संमती दिलेली नसल्यामुळे हा खटला पुढे चालू ठेवला जाऊ शकत नाही, असे सांगून पंजाबच्या २ वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. या संदर्भातील प्रस्थापित कायद्याच्या आधारे न्या. जे.एस्. खेहर आणि न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपिठाने ही याचिका फेटाळून लावली.

केंद्रसरकार भारतातील प्रसिद्ध १०० स्थळांची स्वच्छता करणार !

      नवी देहली - स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत ताजमहल, वैष्णोदेवी मंदिर आणि अजमेर शरीफ यांसहित १० प्रसिद्ध स्थळी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली आहे. तोमर म्हणाले, स्वच्छ भारत मोहिमेच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी महत्त्वाची १०० स्थळे निवडण्याची प्रक्रिया चालू आहे. यामध्ये धार्मिक स्थळांचा, तसेच पर्यटनस्थळांचा समावेश आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ९० ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.
सध्या निवडलेली १० स्थळे 
     वैष्णोदेवी मंदिर, ताजमहल, तिरुपती मंदिर, सुवर्ण मंदिर, अजमेर शरीफ, जगन्नाथ मंदिर, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मणिकर्णिका घाट, मीनाक्षी मंदिर आणि कामाख्या मंदिर (हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी लागणे दुर्दैवी ! मंदिरे आणि परिसर स्वच्छ नसतील, तर तेथील पावित्र्य टिकून राहील का ? - संपादक)


निपाणी (जिल्हा बेळगाव) येथील सनातनची साधिका श्रीदेवी मुंडे हीला वाणिज्य शाखेच्या पदवी परीक्षेत ९५.५७ टक्के !

कु. श्रीदेवी मुंडे
   निपाणी - येथील सनातनचे साधक श्री. सुरेश मुंडे यांची कन्या कु. श्रीदेवी हिला वाणिज्य शाखेच्या पदवी परीक्षेमध्ये मध्ये ९५.५७ टक्के, तर अ‍ॅग्रिगेटमध्ये ९३.४६ टक्के गुण मिळाले आहेत. इनकमटॅक्स विषयात कु. श्रीदेवी हिला १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. श्रीदेवी हीने सांगितले की, हे यश केवळ श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु श्री जयंत आठवले यांच्या आशीर्वादामुळे मिळाले आहे. प्रार्थना आणि कृतज्ञता, नामजप, आध्यात्मिक उपाय केल्याचा लाभ झाला. अनेक संकटे आली तरी गुरूंनी मला मार्ग दाखवला. मी आजारी (रुग्णाईत) असतांनासुद्धा श्रीकृष्ण आणि गुरूंनी मला त्यातून वाचवले, असे तिने म्हटले आहे.


गुरुपौर्णिमा विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १९ जुलै २०१६
पृष्ठ संख्या : १६, मूल्य : ५ रुपये
गुरुपौर्णिमा विशेषांकाची वाढीव मागणी
१७ जुलैला दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

दैनिक सनातन प्रभातचे रंगीत : गुरुमाहात्म्य विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १७ जुलै २०१६
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
गुरुमाहात्म्य विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी
१६ जुलैला दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

फलक प्रसिद्धीकरता

धर्मांधांना पाठीशी घालणारे समाजवादी पक्षाचे अबू आझमी !
   ओसामा बिन लादेनची बाजू घेणारे डॉ. झाकीर नाईक यांचे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी समर्थन केले आहे. डॉ. झाकीर शांततेत आणि घटनेच्या तरतुदीनुसार धर्मप्रसार करून इतर धर्मियांचे इस्लाम धर्मात धर्मांतर करतात, असे आझमी म्हणाले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jihadi Atankwadko protsahan denewale Dr. Zakir Naikko Samajwadi Partyke Abu Azmika samarthan. - Tushtikaranki rajniti karnewale aise log rashtradrohi hai
जागो ! : जिहादी आतंकवाद को प्रोत्साहन देनेवाले डॉ. जाकिर नाईक को समाजवादी पार्टी के नेता अबू आजमी का समर्थन. - तुष्टिकरण की राजनीति करनेवाले ऐसे लोग राष्ट्रद्रोही हैं !

भारतात जिहाद पसरवण्यासाठी इसिसकडून गझवा-ए-हिंद या नवीन संकल्पनेचा प्रसार !

जिहादी आतंकवादी नवनवीन प्रकाराद्वारे जिहादसाठी प्रयत्न करतात; 
तसा प्रयत्न त्यांचा बीमोड करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा का करत नाहीत ?
     नागपूर - भारतावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे युद्ध करण्यासाठी इसिसकडून गझवा-ए-हिंद (भारतावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे युद्ध) ही नवीन संकल्पना पसरवली जात आहे. याद्वारे पुढील लक्ष्यासाठी तरुणांचे सैन्य निर्माण केले जात आहे. आजूबाजूच्या मुसलमान तरुणांना आकर्षित करण्यासाठी पद्धतशीरपणे हे जाळे टाकण्यात आले आहे. यामध्ये उच्चशिक्षित तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी यू-ट्यूब, फेसबूक, ट्विटर आणि इतर सामाजिक संकेतस्थळे यांचा वापर केला आहे. लहान मुलांना आकर्षित करणारे टेडी बेअर आणि टी शर्ट यांचाही यासाठी वापर केला जात आहे. त्याशिवाय प्रत्येक स्टॉलवर तरुणांना भडकवणारी पुस्तके उपलब्ध आहेत. कधीकाळी स्पेन आणि भारत या देशांवर आपण राज्य केले आहे आणि आता आपल्याला येथे गुलामासारखे का रहावे लागत आहे ?, असा युक्तीवाद केला जातो आहे. भारतात डॉ. झाकीर नाईक ज्या पद्धतीने युवकांची दिशाभूल करतात, त्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये हे काम झायद हमीद करत आहे.

अंधश्रद्धेचे निर्मूलन कायद्याने नव्हे, तर केवळ धर्मशिक्षणामुळेच होऊ शकते ! - डॉ. महर्षी आनंद गुरुजी, संस्थापक, ब्रह्मर्षी आनंदसिद्धपिठम्

कर्नाटकात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात बेंगळुरू आणि उत्तर कन्नड येथे आंदोलन
आंदोलनाला संबोधित करतांना १. डॉ. महर्षी आनंद
गुरुजी आणि उत्स्फूर्तपणे घोषणा
देतांना हिंदु धर्माभिमानी
     बेंगळुरू - आता हिंदूंनी धर्माच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरायला हवे. अंधश्रद्धेच्या नावाखाली एखाद्याने धर्माला बाजूला करणे, हा मूर्खपणा आहे. केवळ ज्ञानानेच अंधश्रद्धेचे निर्मूलन होऊ शकते, कुठल्याही कायद्याने नाही. अनेक संतांनी हा कायदा पारित करण्यास संमती दिली आहे; मात्र त्यांनी ज्ञानाच्या आधारे लोकांना धर्मशिक्षण द्यायला हवे, कायद्याच्या आधारे नाही. हिंदु जनजागृती समिती या कायद्याच्या विरोधात महत्त्वाचा लढा देत आहे. हा लढा १-२ दिवसांचा नाही, तर यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्नरत रहायला हवे, असे प्रतिपादन ब्रह्मर्षी आनंदसिद्धपिठम्चे संस्थापक डॉ. महर्षी आनंद गुरुजी यांनी आंदोलनाला संबोधित करतांना केले.

आतंकवादाला प्रोत्साहन देणारे डॉ. झाकीर नाईक यांना त्वरित अटक करा ! - हिंदुत्ववाद्यांची मागणी

जंतरमंतर, देहली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
जंतरमंतर येथे राष्ट्रीय आंदोलन
करतांना हिंदु धर्माभिमानी
     देहली - इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन चे संस्थापक डॉ. झाकीर नाईक आतंकवादाला प्रोत्साहन देतात. एवढेच नव्हे, तर त्यांनी हिंदूंच्या देवदेवता यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने करून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. डॉ. झाकीर नाईक यांच्यावर आतंकवादी कारवाया करणे आणि आतंकवादी ओसामा बिन लादेन याचे लांगुलचालन करण्याच्या आरोपावरून त्यांच्यावर इंग्लंड, कॅनडा या देशांसह मलेशियासारख्या मुसलमान देशातही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आतंकवादाला प्रोत्साहन देणारे डॉ. झाकीर नाईक यांना अटक करावी, तसेच प्रतिबंधित पीस टीवीचे प्रक्षेपण करणार्‍यांवर कारवाई करावी, याकरता जंतरमंतर येथे १० जुलै या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

श्रद्धा आणि भक्ती यांचे उत्कट दर्शन घडवणारी जगन्नाथ रथयात्रा !

सध्या चालू असलेल्या जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्ताने...
     पुरी (ओडिशा) येथे ६ जुलैपासून जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ झाला आहे. ही यात्रा म्हणजे भगवान श्री जगन्नाथाच्या अर्थात् जगदोद्धारक भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी जणू महापर्वणीच ! केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील भाविकांची रीघ असलेली ही यात्रा श्रद्धा आणि भक्ती यांचे उत्कट दर्शन घडवते. पुढील लेखात आपण या यात्रेची काही वैशिष्ट्ये पाहुया.

शिक्षण गुणवत्तापूर्ण होण्यासाठी शिक्षणपद्धतीत पालट करणार ! - प्रकाश जावडेकर

       पुणे, १२ जुलै - ज्या शिक्षकांच्या डोळ्यांत जिवंत स्वप्ने आहेत, असेच शिक्षक चांगले विद्यार्थी घडवू शकतात. त्यांच्यामध्येही स्वप्नांची बीजे रोवू शकतात. शिक्षण संस्थांमध्ये पायाभूत आणि आधुनिक सुविधांसमवेत चांगले शिक्षकही आवश्यक असतात. अशा चांगल्या शिक्षकांमुळेच शिक्षणपद्धतीत सकारात्मक पालट घडून शिक्षण गुणवत्तापूर्ण होईल. त्यासाठी शिक्षणक्षेत्रात गुणवत्ता वाढवण्यासमवेतच उत्तरदायित्वावरही भर देणार आहे. शिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण देण्यासमवेत शिक्षणाच्या गुुणवत्तेत सुधारणा करणे, हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी शिक्षणपद्धतीत पालट करणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. (शिक्षणपद्धती पालटतांना सरकार गुरुकुल शिक्षण पद्धतीचाही विचार करेल का ? - संपादक) केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्रिपदी निवड झाल्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी त्यांची शाळा आणि महाविद्यालय यांतील शिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान केला. त्या वेळी ते बोलत होते.

पुरक पोषण आहाराच्या कामाचे तालुकानिहाय सर्वेक्षण करून कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश

चिक्की घोटाळा प्रकरण
       मुंबई - पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण विभागाचे पूरक पोषण आहाराचे ७५० कोटींच्या निविदा रहित करण्याचा औरंगाबाद खंडपिठानेे आदेश दिला आहे. महिला व बालकल्याण विभागावर औरंगाबाद खंडपिठाने ताशेरे ओढले आहेत. चिक्की घोटाळा प्रकरणी पुरक पोषण आहाराच्या कामाचे तालुकानिहाय सर्वेक्षण करून पुढील योग्य ती करवाई करा, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

मनुष्याला २३ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्य देणारी अमरनाथ यात्रा !

सध्या चालू असलेल्या अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने...
      धार्मिक मान्यतेनुसार अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने काशीमध्ये घेतलेल्या दर्शनापेक्षा १० पट, प्रयागपेक्षा १०० पट आणि नैमिषारण्यापेक्षा १ सहस्र पट अधिक पुण्य लाभते. म्हणूनच आजही कोट्यवधी हिंदू मोठ्या भक्तीभावाने अमरनाथ यात्रा करतात. अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाची, तसेच तेथील पार्वती पीठाची वैशिष्ट्ये सांगणारा हा लेख.

(म्हणे) मराठ्यांसह ब्राह्मणांनाही आरक्षण द्या !

आरक्षणाचे भूत 
मानगुटीवर बसलेलेे रामदास आठवले !
       मुंबई - मराठा, धनगर, जाट, पटेल आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाचे आपण समर्थक असून सर्व सामाजाचा विकास व्हावा, यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास ब्राह्मण समाजालाही आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने ११ जुलैला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्व जातींना आरक्षण द्यावे आणि ७५ टक्क्यांपर्यंत आरक्षण देऊ शकतो, असे ते या वेळी म्हणाले.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) 



एका अज्ञाताकडून पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाविषयी एका हिंदुत्वनिष्ठाकडे चौकशी !

   रामनाथी, गोवा येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात एका शहरातील येथील एक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. अधिवेशनातून शहरात परतल्यानंतर त्यांना अन्य शहरातील एका अज्ञात व्यक्तीचा भ्रमणभाष आला होता. संबंधित व्यक्तीने स्वत:चे नाव सांगून अन्य जिल्ह्यातील एका साधकाची ओळख सांगितली आणि तुम्ही अधिवेशनाला गेला होता का ? त्यात काय काय माहिती दिली ?, असे प्रश्‍न विचारले. या अज्ञात व्यक्तीने विचारलेल्या प्रश्‍नांवरून ती व्यक्ती पोलीस असावी, अशी शंका व्यक्त होत आहे.
   (गोवा येथे झालेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाविषयी दैनिक सनातन प्रभात, तसेच अन्य वर्तमानपत्रे यांतून लेख आणि अन्य वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली आहेत, तरीही पोलीस जाणीवपूर्वक हिंदुत्ववाद्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत ! - संपादक)
   स्वा. सावरकरांचे कोणतेही साहित्य वाचा त्यातून सुगंध येतो, मातृभूमीच्या मातीचा. तसे सनातन प्रभातचा कोणताही अंक वाचा त्यातून हुंकार येतो, राष्ट्रप्रेमाचा आणि हिंदु राष्ट्राचा !
- श्री. विद्याधरपंत नारगोलकर, महामंत्री, सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे

हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक आणि युवा साधक !

     वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना होईल, असे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, तसेच इतर संत यांनी सांगितले आहे. त्या वेळी कलियुगांतर्गत कलियुगातील छोटेसे कलियुग संपून छोट्याशा सत्ययुगाला आरंभ होईल. तेव्हा हिंदु राष्ट्राची, म्हणजेच सनातन धर्म राज्याची स्थापना होईल. सनातन धर्म राज्य म्हणजे विश्‍वकल्याणासाठी सात्त्विक लोकांनी चालवलेले राष्ट्र ! ते रामराज्यासारखे असेल ! असे राज्य चालवायला पात्र व्यक्ती लागतील.

सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर यांचा खडतर जीवनप्रवास आणि त्यांना आलेल्या अलौकिक अनुभूती

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
        १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.
        बेळगाव जिल्ह्यातील रामनगर हे गाव. या गावामध्ये दिसणारी साधी भोळी माणसे, त्यांचे साधे राहणीमान आणि त्यांच्या डोळ्यातील निरागस भाव हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. याच गावात रहातात सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकरमामा ! आज आपण त्यांच्या खडतर जीवनप्रवासातही त्यांनी कशा प्रकारे साधना केली, ते पहाणार आहोत. पू. मामांनी सहन केलेला हा खडतर जीवनप्रवास सर्वांसाठीच आदर्श आहे. त्यांचा हा जीवनप्रवास वाचून आपण आपली दुःखे विसरून जाऊ.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिबिरार्थींना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

      रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ८.७.२०१६ ते १२.७.२०१६ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत सहभागी झालेल्या साधकांना आश्रमात आल्यानंतर आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. श्री. हर्षित रस्तोगी
     श्री. हर्षित मूळ नेपाळचे असून सध्या ते भाग्यनगर येथे रहात आहेत. अलीकडेच त्यांनी स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला आहे. 
१ अ. आश्रमात आल्यावर प्रवासाचा शीण आणि अंगदुखी नाहीशी होणे :
स्वतःची अनुभूती सांगतांना श्री. हर्षित म्हणाले, रात्रभर काम करून आणि सकाळी लवकर आवरून कार्यशाळेसाठी येण्यास निघालो. अंगदुखी आणि दमट वातावरणातील आश्रमापर्यंतचा प्रवास यांमुळे मी हैराण झालो होतो. आश्रमात प्रवेश करताक्षणी आणि या अद्भुत विश्‍वात माझे स्वागत करण्यासाठी आलेल्या तेजस्वी लोकांचे हसरे तोंडवळे पहाताक्षणी माझा प्रवासाचा शीण आणि सर्व दुखणे नाहीसे झाले. आश्रमात आल्यावर सलग एक घंटा बसून नामजप करू शकलो.
१ आ. आश्रमात चांगली स्पंदने जाणवणे : सुटी घालवण्यासाठी घरी आल्यावर एखाद्या मुलाला जो आनंद होतो, तोच आनंद मला जाणवत होता. आश्रमात मला पुष्कळ चांगली स्पंदने जाणवली. आरंभी इतर साधकांशी माझी ओळख करून देण्यात येत होती; मात्र मी येथील स्पंदनांनी वेढलो गेल्याने मला काहीच ऐकू येत नव्हते. मला घरी आल्याप्रमाणे किंवा अंतिम मुक्कामाच्या ठिकाणी आल्याप्रमाणे जाणवत होते.
१ इ. आश्रमातील शुद्ध चैतन्यामुळे उपाय झाल्याने त्यांना होणारा त्रास आपोआप उणावला असून या अनुभूतीसाठी त्यांना कृतज्ञता वाटत आहे.

प.पू. डॉक्टरांनी सात्त्विक पोशाख कशाप्रकारे असावे, हे शिकवल्यावर आणि तसा पोशाख शिवल्यावर समाजातील लोकांना ते आवडत असल्याचे लक्षात येणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
       मला पू. गुंजेकरकाका यांच्यासाठी २ बंड्या शिवण्याची संधी मिळाली. मी त्या शिवत असतांना मी प.पू. डॉक्टरांसाठी बंड्या शिवत आहे, असे मला वाटत होते आणि पुष्कळ आनंद मिळत होता. त्या बंड्या पू. काकांना पाठवल्यावर त्यांचा बंड्या पुष्कळ छान शिवल्या असून मला त्या आवडल्या आहेत, असा निरोप आला.
       काही दिवसांनी मी घरी गेल्यावर पू. काकांची भेट झाली. त्या वेळी पू. काकांनी सांगितले, त्या बंड्या बर्‍याच जणांना आवडल्या. साधकांना तर आवडल्याच; परंतु समाजातील बर्‍याच लोकांनी विचारले, या बंड्या कोठून घेतल्यास ? छान शिवल्या आहेत. 
सौ. केतकी पेडणेकर
       त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी साधकांना सात्त्विक पोषाखाचे कापड कसे निवडायचे आणि ते कसे शिवायचे ?, हे शिकवल्यामुळे ते सर्वांना आवडत आहेत, हे लक्षात आले. (त्या बंड्यांना पाश्‍चात्त्य पद्धतीने कॉलर न लावता गळ्याला सात्त्विक पद्धतीने हातशिलाई केली होती.)
       प.पू. डॉक्टरांनी सात्त्विक पोशाख शिवायला शिकवल्याविषयी मी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.
- सौ. केतकी पेडणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
       सेवेमुळे (कार्य केल्याने) आध्यात्मिक उन्नती होत नाही, तर सेवेतील आनंद मिळाल्यामुळे उन्नती होते. 
- परात्पर गुरु डॉ. आठवले

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या बेळगाव येथील श्रीमती शकुंतला भंडारी (वय ८० वर्षे) यांच्या देहावसानानंतर जाणवलेली सूत्रे

श्रीमती शकुंतला भंडारी
     १.७.२०१६ या दिवशी बेळगाव येथील श्रीमती शकुंतला भंडारी यांचे देहावसान झाले. १३.७.२०१६ या दिवशी त्यांचा देहावसानानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या देहावसानाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत. 
     यंदाच्या गुरुपौर्णिमेला श्रीमती शकुंतला भंडारी यांची पातळी ६१ टक्के असून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत, असे जाहीर करून त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. त्यांनी आधीच देहत्याग केल्यामुळे साधकांची ती संधी गेली, तरी त्यांनी साधकांपुढे साधकत्वाचा जो आदर्श ठेवला आहे, तो साधकांना पुढेही मार्गदर्शन करील.
     आईबरोबरच श्री. अक्षय भंडारी यांचाही ६१ टक्के पातळी गाठल्याबद्दल सत्कार करण्यात येणार होता. त्याऐवजी आजच त्यांचे अभिनंदन करत आहे.
     १४ - १५ वर्षांपूर्वी पूर्वी मी प्रचाराला जायचो, तेव्हा बेळगावला भंडारी यांच्या घरीच रहायचो. त्यांच्या घरी मला घरच्यासारखे जे प्रेम मिळायचे, ते मला अजूनही आठवते. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

प्रेमळ, त्यागी आणि सेवेची तीव्र तळमळ असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले बेळगाव येथील श्री. अक्षय भंडारी (वय ५४ वर्षे)!

श्री. अक्षय भंडारी
१. शांत आणि प्रेमळ
     पहिल्यापासूनच श्री. अक्षय यांचा स्वभाव प्रेमळ, शांत, समजून कृती करणारा आणि अन्यायाविषयी चीड असणारा असा आहे. याचा मी अनेकदा अनुभव घेतला आहे.
२. अभ्यासू वृत्ती 
अ. श्री. अक्षय पुष्कळ हुशार असल्याने त्यांचा अभ्यासही अफाट आहे. याचा उपयोग जिज्ञासूंना होतो आणि ते साधनेला लागतात.
- सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 
आ. त्यांना कोणताही विषय विचारला, तर त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही, असे कधीच झाले नाही. - श्री. अंजेश कणगलेकर, बेळगाव

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
    सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
   समाजापर्यंत शीघ्रतेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल (HMV) असे परवाने असणे आवश्यक आहे.
   जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

सनातन संस्थेच्या साधकांना येणार्‍या अनुभूतींचे वैशिष्ट्य

       सनातन संस्थेतील साधक एकमेकांशी बोलतांना सकामातील, उदा. आजार बरा होणे, नोकरी लागणे, लग्न जमणे इत्यादी अनुभूती न सांगता आध्यात्मिक स्तरावरील, उदा. नामजपाची गुणवत्ता वाढणे, भावजागृती होणे, सूक्ष्मातून दर्शने होणे इत्यादी अनुभूती सांगतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देणारे संत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरु सर्वस्वाचा त्याग करण्याइतकी शिष्याची तयारी करून घेतात.
अधिक माहितीसाठी भेट द्या !

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
संतांचे विश्‍लेषण करू नये
संतांचा शोध घेऊन काही सापडत नाही; कारण तेथे केवळ शून्य असते.
भावार्थ : प्रकृतीतील गोष्टी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे शोध घेऊन सापडणे शक्य आहे; पण पुरुष, शिव किंवा ब्रह्मतत्त्व यांचा शोध घेता येत नाही; कारण ते पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे आहे. संत ब्रह्माशी एकरूप झालेले असल्याने त्यांचा शोध घेऊन काही सापडत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने 
त्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

नवा हिंसाचार, जुना सोपस्कार !

संपादकीय
     काश्मीरमधील हिंसाचार अद्यापही शमण्याचे नाव घेत नाही किंबहुना तो अधिकाधिक चिघळत कसा राहील, या दृष्टीने काश्मिरी धर्मांध प्रयत्नरत असल्याचे तेथील घटना सांगतात. बुरहान वानी या कट्टर जिहादी आतंकवाद्याला आणि देशद्रोह्याला कंठस्नान घातल्याच्या दिवसापासून हा हिंसाचार चालू आहे. 
    ४ दिवसांपासून तेथे लागू असलेल्या संचारबंदीवरून तेथील परिस्थितीची कल्पना यावी. या हिंसाचारात आतापर्यंत २४ जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले असून अनुमाने १ सहस्र ५०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. काश्मीरमध्ये आतंकवाद्यांचे जाहीरपणे उदात्तीकरण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ते सतत होतच असते. हृदयात शत्रूसाठी स्थान असणारे आणि त्यासाठी सैनिकांविरुद्ध उघड संघर्ष करणारे धर्मांध हे देशाचे शत्रूच आहेत, हे शासनाने मतांचे राजकारण बाजूला ठेवून लक्षात घ्यायला हवे आणि त्यांच्यावर तशी कारवाई करायला हवी.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn