Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

वैकुंठ पंढरी भीमरेचे तिरी ।
प्रत्यक्ष श्रीहरि उभा तेथे ॥

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. तुळशीदास महाराज पुण्यतिथी, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग

सनातनला एक आणि डॉ. झाकीर नाईकला वेगळा न्याय का ?

श्री. उद्धव ठाकरे
दैनिक सामनाच्या संपादकीयमधून
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा घणाघात !
धर्मांधांच्या विरोधात आणि हिंदुत्वाच्या बाजूने फक्त
शिवसेनाच इतक्या उघडपणे बोलू शकते. अन्य पक्ष आणि
लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प बसतात !
मुंबई, ११ जुलै - मुंबईसह देशभरात इस्लामिक संमेलने घेऊन झाकीर नाईक माथेफिरू धर्मांधतेचे विष पेरत होता. त्याची तक्रार याआधी शिवसेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांनी करूनही कारवाई झाली नाही. सनातन या संस्थेविषयी एक न्याय आणि झाकीरच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला वेगळा न्याय, हा प्रकार कायद्याचा मुखवटा फाडणारा आहे, असे घणाघाती प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या संपादकीयमधून केले आहे.

भारतीय सैन्याने ठार केलेला आतंकवादी बुरहान याला पाकिस्तान क्रिकेट मंडळाची श्रद्धांजली !

पाकबरोबर क्रिकेट सामने खेळून मैत्री निर्माण करण्याच्या
भोळसट आशेवरील पाकप्रेमी भारतियांना चपराक !

खेळात राजकारण आणि धर्म आणू नये, असे म्हणणारे
भारतातील पाकप्रेमी आता कुठल्या बिळात लपले आहेत ?
   नवी देहली - भारताच्या सैन्य दलाने ८ जुलैला काश्मीरमध्ये ठार केलेल्या बुरहान वाणी या हिजबुल मुजाहिदिनच्या आतंकवाद्यास पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ९ जुलै या दिवशी श्रद्धांजली वाहत बुरहान वाणी हुतात्मा झाला. अल्ला त्याची कुर्बानी स्वीकार करो या शब्दांत श्रद्धांजली वाहिली. (केंद्रसरकार आता पाकच्या क्रिकेट संघाबरोबर खेळण्यास भारतीय संघाला प्रतिबंध करील का ? कि नेहमीचीच गांधीगिरी दाखवणार ? - संपादक)

प्रादेशिक परिवहन विभागाच्या पडताळणी मोहिमेत १४० वाहने दोषी, तर ३० वाहने शासनाधीन

पुण्यामध्ये विद्यार्थी 
वाहतुकीची धोकादायक स्थिती !
        पुणे, ११ जुलै - सध्या पुण्यातील अनेक शाळांमध्ये जुन्या रंगरंगोटी करून आणलेल्या गाड्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात. मारुती व्हॅनसारख्या वाहनांतून अवैधरीत्या विद्यार्थ्यांना कोंबून बसवले जाते. या पार्श्‍वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या पडताळणी मोहिमेत विद्यार्थी वाहतुकीची धोकादायक स्थिती अनेक गोष्टींतून उघड झाली. (विभागाने ही मोहीम शाळा चालू होण्यापूर्वीच राबवायला हवी, जेणेकरून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित होईल. - संपादक) मोहिमेतील १२ पथकांकडून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीतील ३३८ वाहने पडताळण्यात आली. त्यांतील १४० वाहने दोषी, तर ३० वाहने शासनाधीन करण्यात आली आहेत. शासनाधीन करण्यात आलेल्या वाहनांमध्ये प्रामुख्याने अनुज्ञप्ती (परवाना) नसलेल्या, योग्यता प्रमाणपत्र संपलेले असणार्‍या आणि मारुती व्हॅनसारखी वाहने यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी
वाढल्याने निर्माण झालेली पूरजन्य स्थिती
  • कोयना धरणातील पाणीसाठा ६ अब्ज घनफूटने (टीएम्सी)ने वाढला 
  • सांगलीत कृष्णा नदीची पातळी २१ फुटांवर 
  • नंदुरबार जिल्ह्यातील पाचोराबारी येथे ढगफुटी, रेल्वे ट्रॅकची हानी 
  • नाशिकमध्ये ९ घंट्यांमध्ये ९९१ मिलीमीटर पाऊस  
  • पुण्यातील धरण क्षेत्रात पाऊस चालूच
         पुणे, ११ जुलै - राज्यभरात सर्वदूर पावसाने थैमान घातले असून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. ११ जुलै या दिवशी विविध ठिकाणी पावसाने विक्रमी नोंद केली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ६ अब्ज घनफूटने (टीएमसी) वाढला, तर सांगलीत संततधारेमुळे कृष्णा नदीची पाण्याची पातळी २१ फुटांवर गेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पाचोराबारी येथे ढगफुटी झाली असून तेथील रेल्वे ट्रॅक भूमीत खचला आहे. त्यामुळे पश्‍चिम रेल्वेचे मार्गही पालटण्यात आले आहेत. नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला असून ९ घंट्यांमध्ये ९९१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच पुण्यातील सर्वच धरणक्षेत्रांत पाऊस चालूच असून खडकवासला धरणाचा पाणीसाठा १ अब्ज घनफूटने (टीएमसी) वाढला आहे. ठाण्यामध्येही मुसळधार पाऊस चालू असून मुंबई उपनगरांसह नवी मुंबईतही पाऊस चालू होता.

दंगलखोर धर्मांधांनी अनंतनाग येथे न्यायालय जाळले, तर पुलवामामध्ये २ काश्मिरी हिंदूंची घरे जाळली !

   ११ जुलैला दंगलखोर धर्मांधांनी अनंतनाग येथे न्यायालयाला आग लावली. ती विघझवण्यासाठी सुरक्षादलांकडून प्रयत्न केले जात होते. दुसर्‍या घटनेत पुलवामा येथे धर्मांध दंगलखोरांनी ११ जुलैच्या रात्री हिंदूंच्या २ घरांना आग लावली. ही दोन्ही घरे बंद होती. वर्ष २००८ नंतर हिंदूंची घरे जाळण्याची ही पहिली घटना आहे.

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांच्या समर्थकांचे मशिदींवरील भोंग्यावरून जिहाद करण्याचे आवाहन !

  • भारतविरोधी आणि पाकचे समर्थन करणारी घोषणाबाजी ! 
  • काश्मीरमधील मशिदींतून करण्यात येणारे आवाहन देशातील प्रत्येक मशिदीतून होऊ लागल्यावर काय होईल, याची जाणीव निधर्मीवाद्यांना आहे का ?
  • पीडीपी-भाजपचे सरकार या देशद्रोह्यांवर कारवाई करणार कि यांना शिरकुर्मा आणि बिर्याणी खाऊ घालणार ?
   श्रीनगर - जिहादी आतंकवादी बुरहान वाणी याला सैनिकांनी ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये देशद्रोह्यांनी चालू केलेला हिंसाचार तिसर्‍या दिवशी प्रचंड बंदोबस्तामुळे दाबण्यात आला असला, तरी येथील मशिदींवरील भोंग्यांवरून पाकिस्तानच्या समर्थनार्थ आणि भारताच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. तसेच सुरक्षादलांशी दोन हात करण्याचे आणि भारतविरोधी जिहादमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याद्वारे मशिदींमधून हिंसाचारासाठी चिथावणी दिली जात आहे. जिहादच्या मार्गाने काश्मीरला भारतापासून स्वातंत्र्य मिळेल, अशी चिथावणी देणार्‍या ध्वनीफिती ऐकवल्या जात आहेत. (काश्मीर खोर्‍यातील मशिदींमधून भारतविरोधी नारे देण्याची ही पहिलीच वेळ नाही.

१८ सहस्र ३०२ सहकारी संस्थांपैकी ४ सहस्र २४७ संस्थांकडूनच लेखापरीक्षणाचा अहवाल सादर

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 
सहकारी संस्थांची लेखापरीक्षणात अक्षम्य कुचराई
        पुणे, ११ जुलै - पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ३९९ सेवक सहकारी पतसंस्था, ७९५ नागरी सहकारी पतसंस्था आणि १५ सहस्त्र ५४५ गृहरचना सहकारी संस्था अशा एकूण १६ सहस्र ७३९ सहकारी संस्था आहेत. निबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील आर्थिक वर्षांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील १८ सहस्र ३०२ सहकारी संस्थांपैकी केवळ ४ सहस्र २४७ संस्थांनीच लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केला आहे. अहवाल न देणार्‍यांमध्ये गृहरचना सहकारी संस्था सर्वाधिक असून त्यांची संख्या १५ सहस्रच्या पुढे आहे. (सहकार खात्याने अशा संस्थांची नोंदणी रहित करून त्यांच्या व्यवहारांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कठोर आर्थिक दंडाची कारवाईही करावी. - संपादक) यामुळे आता लेखापरीक्षण अहवाल न देणार्‍या संस्थांवरही नोंदणी रहित करण्याची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक धरणीधर पाटील आणि जिल्हा विशेष लेखापाल राम शिर्के यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्यासह अन्य संशयित फरार घोषित !

  • घोटाळ्यांचे वारंवार आरोप होणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर जनतेने बंदीची मागणी केल्यास चुकीचे काय ? घोटाळेबाजांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
  • बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी आरोपपत्र प्रविष्ट
        बीड, ११ जुलै - बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात अखेर जिल्हा न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. बँकेतील अनेक आजी-माजी संचालकांना अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे घातले होते; परंतु कोणीही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे आरोपपत्रातील काही आरोपींना फरार (पसार) म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गेवराई येथील आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्यासह ९३ जणांचा समावेश आहे. (घोटाळेबाजांना पोसणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष ! या प्रकरणी दोन्ही पक्ष त्यांचे त्यागपत्र घेऊन पक्षातून निलंबित करतील कि आपले दायित्व झटकतील ? - संपादक) विशेष अन्वेषण पथकाने ११ जुलै या दिवशी प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात बँकेच्या आजी-माजी संचालकांची नावे आहेत. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कोट्यवधी रुपयांचे विनातारण कर्ज संमत करणे, तसेच कागदपत्राची खातरजमा न करता कर्ज वाटप करणे, असे आरोप आहेत.
विशेष अन्वेषण पथकाकडून 
राजकीय नेत्यांच्या घरांची झडती
        बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी १०५ जणांना नोटिसा देऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती. न्यायालयाने पोलिसांच्या अन्वेषणावर ताशेरे ओढले असल्याने दोषारोप करतांना कोणतीही चूक होऊ नये; म्हणून काही मोठ्या राजकीय नेत्यांच्या घरांची झडती घेतल्याचे वृत्त आहे.

इसिसमध्ये भरती होण्यासाठी गेलेल्या केरळमधील १५ तरुणांपैकी ५ जण धर्मांतरित !

      थिरुवनंतपुरम् - केरळ राज्यातील कासारगोड जिल्ह्यात असलेल्या पडांना आणि थ्रीक्कारीपूर या गावांतील १५ मुसलमान तरुण घर सोडून इसिसच्या सैन्यात भरती होण्यासाठी गेले असल्याची शंका आहे. त्यातील ५ जण हिंदू आणि ख्रिस्ती असून त्यांनी वर्षभरापूर्वी धर्मांतर केल्याचे आढळून आले आहे.
१. एकूण १५ बेपत्ता असलेल्यांपैकी ५ विवाहित जोडपी आहेत. त्यातील २ जोडपी आधी हिंदू आणि ख्रिस्ती धर्मीय होती. 
२. निमिषा (आताची फातिमा) थिरुवनंतपुरम् येथील हिंदू कुटुंबातील असून कासारगोड जिल्ह्यातील दंत वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

अटक होण्याच्या भीतीने डॉ. झाकीर नाईक यांनी भारतात येण्याचे टाळले !

डॉ. झाकीर आता कधीही भारतात येणार नाहीत आणि भारत त्यांच्यावर कधीही कारवाई करू शकणार नाही ! म.फि. हुसेन यांच्या संदर्भात जे झाले, तसेच डॉ. झाकीर यांच्या संदर्भातही झाल्यास आश्‍चर्य ते काय !
    मुंबई - इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांनी ११ जुलैला भारतात येण्याचे टाळले आहे. सध्या ते सौदी अरबमध्ये आहेत. ते मदिनामधूनच पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार होते; मात्र तेही रहित झाले आहे. सध्या २-३ आठवडे दक्षिण आफ्रीकेत प्रसाराला जाणार असल्याने ते आता येण्याची शक्यता अल्प आहे.

सनातनचे साधक समीर गायकवाड यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

   मुंबई, ११ जुलै (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या अटकेत असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बदर यांनी एकूणच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, प्रकरण गंभीर आहे, असे कारण देत ११ जुलै या दिवशी फेटाळून लावला. कोल्हापूर येथील न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यावर २९ मार्च या दिवशी मुंबई येथील उच्च न्यायालयात हा अर्ज करण्यात आला होता. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात गेल्या दहा मासांपासून श्री. समीर गायकवाड हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

(म्हणे) आतंकवाद्यांना धर्म नसतो ! - केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन्

प्रत्येक जिहादी आतंकवादी धर्मासाठी जिहाद करतो, असे
स्वतः सांगत असतांना अशी विधाने करून ढोंगी राजकारणी कोणाला मूर्ख बनवत आहेत ?
    थिरुवनंतपुरम् - केरळ राज्यात कासारगोड जिल्ह्यातील १७ आणि पलक्कड जिल्ह्यातील ४ मुसलमान बेपत्ता असून ते इसिसच्या सैन्यात भरती झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील मार्क्सवादी पक्षाचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन् यांनी विधानसभेत निवेदन करतांना आतंकवाद्यांना धर्म नसतो. केवळ काही मुसलमान इसिसच्या सैन्यात भरती झाले म्हणून संपूर्ण इस्लाम धर्माला धारेवर धरू नये. समाजातील बहुसंख्य लोक आतंकवादाच्या विरोधात आहेत, असे म्हटले आहे. (मुख्यमंत्री ज्या मार्क्सवादी पक्षाचे आहेत त्याच पक्षाने केवळ केरळमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशात हिंसाचार माजवला. अनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या केल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पिनारायी विजयन् यांनी जिहादी आतंकवाद्यांची तळी उचलून धरली त्यात आश्‍चर्य ते काय ? - संपादक)

नेपाळमध्ये कोवळ्या बालकांचे धर्मांतर करणार्‍या बालसंगोपन केंद्रांवर कारवाई करणार ! - नेपाळचे उपपंतप्रधान मैनाली यांची चेतावणी

निधर्मी राष्ट्र बनल्यापासून नेपाळमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रकारांना ऊत !
      काठमांडू - नेपाळमध्ये बालसंगोपन केंद्रांच्या नावाने गरीब, अनाथ, असाहाय्य, तसेच कोवळ्या हिंदु बालकांच्या धर्मांतराचे प्रकार वाढले आहेत. अशाप्रकारे बालकांचे कुटिलतापूर्वक धर्मांतर करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी चेतावणी नेपाळचे उपपंतप्रधान, तसेच महिला, बाल आणि समाज कल्याण मंत्री सी.पी. मैनाली यांनी एका कार्यक्रमाच्या वेळी दिली. नेपाळ पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग आणि नेपाळ केंद्रीय बाल कल्याण मंडळ यांच्या वतीने काठमांडू येथे आयोजित कार्यक्रमात उपपंतप्रधान मैनाली बोलत होते.

डॉ. झाकीर नाईक अलीगड मुस्लीम विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते !

डॉ. झाकीर नाईक यांच्यासारख्या लोकांची ज्या विद्यापिठातील मोठ्या पदांवर नियुक्ती 
होते तेथील विद्यार्थी जिहादमध्ये सहभागी झाल्यास नवल ते काय ?
      अलीगड - ढाका येथे जिहादी आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना प्रेरणा देणारे वादग्रस्त डॉ. झाकीर नाईक अलीगड मुस्लीम विद्यापिठामध्ये सर्व प्रमुख निर्णय घेणारी संस्था व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य पदावर निवडून आले होते. वर्ष २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना मुसलमान संस्कृती आणि शिकवण यांचे प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले होते. त्यांची सदस्यता ११ जूनला संपली आहे.
     या परिषदेला विद्यापिठातील सर्वोच्च संस्था समजण्यात येते. या परिषदेची बैठक वर्षातून एकदा ऑक्टोबर मासात होते. सर्व महत्त्वपूर्ण निर्णय यात घेण्यात येतात. विद्यापिठाचे उपकुलगुरु जनरल जमीरुद्दीन शाह म्हणाले, मी कधीच डॉ. नाईक यांना भेटलो नाही, तसेच त्यांच्या गोष्टींवरही मी विश्‍वास ठेवत नाही. ते शिकलेले असल्यामुळे लोकांनी त्यांचे नाव प्रस्तावित केले होते. विद्यापीठ शिक्षक संघटनेचे सचिव मुस्तफा जैदी म्हणाले, डॉ. झाकीर नाईक यांना कोर्टाचे सदस्य बनवले गेले; मात्र अनेक जण यासाठी सहमत नव्हते.

सनातनवरील बंदीविषयीच्या याचिकेवर याचिकाकर्त्याच्या अधिवक्त्याकडून मुदतवाढीची मागणी

  मुंबई - सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील विजय रोकडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ११ जुलैला झालेल्या सुनावणीच्या वेळी विजय रोकडे यांच्या अधिवक्त्यांनी न्यायधीश खेमकर आणि न्यायाधीश कुलकर्णी यांच्या खंडपिठाकडे मुदत वाढवून मागितली आहे. या वेळी केंद्रशासनाच्या अधिवक्त्यांनी राज्यशासनाकडून सनातनवरील बंदीविषयी कोणतीही माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही, असे न्यायालयात सांगितले.

मंगळुरू येथील मंदिरात वस्त्रसंहिता सक्तीची करण्यात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेस यश !

रणरागिणी शाखेचे अभिनंदन !
   मंगळुरू - मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी मंदिरात येतांना महिलांना वस्त्रसंहिता सक्तीची करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने येथे चालू केलेल्या मोहिमेतील पहिल्याच प्रयत्नाला प्रशंसनीय यश प्राप्त झाले आहे.
   मंगळुरू येथील ग्रामदेवता महातोभारा श्री मंगलादेवीच्या मंदिराचे मुख्य विश्‍वस्त श्री. रामनाथ हेगडे यांना रणरागिणी शाखेने एक निवेदन देऊन त्याद्वारे मंदिरात येतांना महिलांना वस्त्रसंहिता सक्तीची करण्याची विनंती केली होती. श्री. हेगडे यांनी ही गोष्ट मंदिराच्या व्यवस्थापन समितीसमोर विचारार्थ मांडण्याचे आश्‍वासन दिले होते. या समितीने त्यांच्या ८ जुलै या दिवशी झालेल्या बैठकीत रणरागिणी शाखेने दिलेल्या निवेदनावर सकारात्मक भूमिका घेऊन सर्व भाविकांसाठी वस्त्रसंहिता सक्तीची करण्याची सूचना मंदिराच्या फलकावर लावली. या देवीच्या नावावरूनच मंगळुरू शहराचे नाव ठेवण्यात आले आहे.

समाजकंटकांच्या त्रासामुळे बसस्थानकातील स्नानगृह गेल्या सहा मासांपासून बंद

पंढरपूर येथे महिला स्नानगृहाच्या खिडकीतून 
छायाचित्र काढले जाण्याचे धक्कादायक प्रकार !
       पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ११ जुलै - पंढरपूर बसस्थानकाच्या सुलभ शौचालय संकुलातील महिलांच्या स्नानगृहाच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीतून काही समाजकंटक तरुण सारखे डोकावायचे, तर काही तरुण भ्रमणभाष घेऊन छायाचित्र काढणे आणि चित्रीकरण करणे यांसारखे प्रकार करत असल्याचे समोर आले आहे. स्नानगृहात स्नान करताना एका प्रवासी महिलेला याचा अनुभव आल्यावर ती जोराने किंचाळली. प्रचंड घाबरल्याने तिचा रक्तदाब अल्प झाला आणि ती तेथेच कोसळली. त्यानंतरही अनेकदा तक्रारी करूनही या समाजकंटक तरुणांचा त्रास अल्प झाला नाही. त्यामुळे महिलांचे स्नानगृह गेल्या सहा मासांपासून बंदच करुन टाकले आहे, अशी धक्कादायक माहिती शौचालय संकुलाचे व्यवस्थापक राजुकमार सिंग आणि येथील महिला कर्मचारी मंगल परमार यांनी दिली असल्याचे वृत्त स्थानिक दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.
       पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरीत येतात. वारीच्या काळात मठ, निवासीगृह मिळत नसल्याने बसस्थानकावरील सुलभ शौचालय आणि स्नानगृहात भाविक स्नान करतात; मात्र हे स्नानगृह महिलांसाठी सुरक्षित राहिले नाही अशी माहिती समोर आली आहे. शौचालय सेवा महिला आणि मुलांना विनामूल्य असलेली सेवा केवळ फलकावरच असल्याची स्थिती आहे. पुरुषांसाठी दोन रुपये असतांना तेथील कर्मचारी पाच रुपये सक्तीने वसूल करतात. (पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्री असे प्रकार होणे अपेक्षित नाहीत. बसस्थानक प्रशासन, पोलीस, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या विषयात लक्ष घालून त्वरित कृती करून भाविकांना न्याय देणे अपेक्षित आहे ! - संपादक)

हिंदु धर्मप्रसाराचे काम करणार्‍या सनातन संस्थेवर अन्याय होऊ देऊ नका ! - हरिदास पडळकर, शिवसेना

आमदार श्री. सुधीर गाडगीळ (डावीकडे) यांच्याशी
चर्चा करतांना श्री. दत्तात्रय रेठरेकर आणि श्री. हरिदास पडळकर
         सांगली, ११ जुलै (वार्ता.) - सनातन संस्था हिंदु धर्मप्रसाराचे पुष्कळ चांगले काम करत आहे. अशा संस्था असणे हे हिंदु धर्मासाठी भूषणावह आहे. हिंदु धर्मावर वृथा आरोप करणार्‍या तथाकथित पुरोगामी लोकांना सनातन संस्थेने नेहमीच न्यायलयीन, तसेच वैध मार्गाने विरोध केला आहे. अशा संस्थेच्या साधकांना नाहक अटक करणे, तसेच त्यांना त्रास देणे या गोष्टी शासनाकडून होणे अपेक्षित नाहीत. तरी या संदर्भात भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावे आणि हिंदु धर्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेवर अन्याय होऊ देऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख श्री. हरिदास पडळकर यांनी केली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर आणि श्री. हरिदास पडळकर यांनी सनातन संस्थेवर होत असलेल्या आरोपांविषयी सांगली विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांची भेट घेतली, त्या वेळी श्री. पडळकर यांनी ही मागणी केली. या वेळी श्री. गाडगीळ यांनी या विषयाच्या संदर्भात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले.

झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांच्या नातेवाईकांना धार्मिक ठिकाणी फिरवण्यासाठी साहाय्यक निबंधकांनी दिले निर्देश !

      रांची (झारखंड) - झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वीरेंदर सिंह यांच्या नातेवाईकांना राज्यातील विविध धार्मिक ठिकाणी फिरवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या साहाय्यक निबंधकांनी राज्यातील आठही जिल्हा उपायुक्त, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा न्यायाधीश यांना पत्र पाठवून निर्देश दिले आहेत. 
        १२ जुलै ते १५ जुलै या काळात न्या. सिंह यांच्या ९ नातेवाईकांचे राज्यातील रामगड, हजारीबाग, चतरा, गिरिडीह, देवघर, दुमका, धनबाद आणि बोकारो जिल्ह्यातील विविध धार्मिक ठिकाणी पूजापाठ करण्यासाठी जाण्याचे प्रस्तावित होते. या नातेवाईकांच्या सुविधांसाठी उच्च न्यायालयाचे संयुक्त निबंधक संजीव कुमार दास यांनी निर्देश दिले; मात्र यामध्ये निदेॅश देणार्‍याचे नाव देण्यात आले नाही. दास यांचे शासकीय पत्र लोकांनी सामाजिक संकेतस्थळावर सार्वजनिक केले आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. के. गांगुली यांनी बीबीसीला सांगितले की, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांच्या नातेवाईकांसाठी शिष्टाचारची सुविधा मागू शकत नाहीत.

झाकीर नाईक यांची भाषणे चिथावणीखोर असल्याचा अन्वेषण यंत्रणांचा निष्कर्ष !

      नवी देहली - डॉ. झाकीर नाईक यांची वक्तव्ये ही चिथावणीखोर आणि आतंकवादाला खतपाणी देणारी आहेत, या निष्कर्षाप्रत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रया (एन्आयए) आणि गुप्तचर विभाग आले आहेत. एन्आयएने इस्लामिक रिसर्च फाउंडेशनची आणि त्यांना मिळणार्‍या आर्थिक स्रोतांची माहिती मिळवण्यासाठी अन्वेषण चालू केले आहे.

पाकिस्तानी हिंदूंच्या अस्थींचे गंगा नदीमध्ये विसर्जन होणार !

     हरिद्वार - पाकिस्तानातील मृत हिंदूंच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित करण्यात येणार आहेत. पाकच्या कराची शहरातील प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात या अस्थी एकत्र करून ठेवण्यात आल्या आहेत. मंदिराचे महंत रामनाथ मिश्र यांनी सांगितले की, २४ सप्टेंबरला हरिद्वारच्या कनखल घाटावर या अस्थी विसर्जित करण्यात येतील.जौनपूर (उत्तरप्रदेश) जिल्हा कारागृहातील युवती गर्भवती असल्याचे निष्पन्न !

उत्तरप्रदेशात शासन आहे कि दु:शासन ! 
     जौनपूर - येथील जिल्हा कारागृहामध्ये हत्येच्या प्रकरणात ८ मासांपासून अटकेत असलेली एक युवती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून त्यांच्याकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. (यास उत्तरदायी असणार्‍यांवर त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे ! - संपादक)
     या कारागृहामध्ये अनुमाने ८० महिला बंदी आहेत. हत्येच्या प्रकरणात सदर युवतीला वर्ष २०१५ मध्ये या ठिकाणी आणण्यात आले होते. येथील महिला कैद्यांची प्रत्येक आठवड्यात वैद्यकीय तपासणी करण्यात येते; मात्र मागील काही मासांपासून संबंधित युवती तिची वैद्यकीय तपासणी करण्यापासून सातत्याने स्वत:ला वाचवत होती.

माझी २ मुले डॉ. झाकीर नाईक यांच्या संपर्कात होती ! - बेपत्ता मुलांचे वडील

केरळमधील २० जण बेपत्ता असल्याचे प्रकरण !
   थिरूवनंतपुरम् (केरळ) - केरळमधील २० लोक बेपत्ता आहेत. ते सर्व जिहादी आतंकवादी संघटना इसिसमध्ये सहभागी झाले असल्याचा संशय आहे. यांपैकी दोन मुले डॉ. झाकीर नाईक यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. (डॉ. झाकीर नाईक यांचा इस्लामी तत्त्वज्ञानाच्या आडून लोकांचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्याचा डाव असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने डॉ. झाकीर नाईक यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ! - संपादक)

आतंकवादी बुरहान वाणीच्या श्रद्धांजली कार्यक्रमात आतंकवादी हाफिज सईइदची उपस्थिती !

पाकिस्तान हाफिज सईदवर कोणतीही कारवाई 
करत नाही आणि भारतही पाकमध्ये घुसून ती 
करणार नाही, असे आणखी किती दिवस चालणार ?
       मुझफ्फराबाद - आतंकवादी बुरहान वाणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पाक व्याप्त काश्मीरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुझफ्फराबादमधील हिजबुलच्या तळावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी हिजबुलचा प्रमुख सय्यद सलाऊद्दीन आणि मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार अन् जमात-उल-दावाचा प्रमुख हाफिज सईद उपस्थित होते. पाकिस्तानने या संधीचा लाभ उठवला पाहिजे, असे हाफिज सईद याने म्हटले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विनामीटर पाण्याचा वापर !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 
प्रशासनाचा कायदाद्रोही कारभार !
        पिंपरी (पुणे), ११ जुलै - कायद्यानुसार बंधनकारक असूनही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची कोणतीही इमारत आणि कार्यालय यांच्यामध्ये पाण्याचे मीटर बसवलेले नाहीत, तसेच त्या पाण्याचे देयकही भरण्यात येत नाही, असा आरोप अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार असोसिएशनचे अध्यक्ष रामदास जंगम यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. (ही गोष्ट पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या लक्षात का आली नाही ? पालिकेतच जर अवैधरित्या पाणी वापरले जात असेल, तर त्यांना इतरत्र कारवाया करण्याचा काय अधिकार ? - संपादक)
        जंगम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सर्वच शौचालये आणि स्वच्छतागृहे, तसेच पालिकेच्या बांधकामांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी वापरण्यात येत आहे. (हे दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे. पालिकेकडून पाण्याचा होणारा अपव्यय हा समाजद्रोहच ! - संपादक) यापूर्वीही त्यांनी अवैधरित्या पाणी वापराविषयी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला असूनही त्याचा हिशोब त्यांना उपलब्ध झालेला नाही.

मराठीतून कागदपत्रे देण्याच्या आदेशाची पायमल्ली !

मराठीद्वेषी कर्नाटक शासन !
       बेळगाव, ११ जुलै (वार्ता.) - सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांना विविध शासकीय कागदपत्रे आणि माहिती मराठी भाषेतून द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे; मात्र सीमाभागात या आदेशाची उघडपणे पायमल्ली होत आहे. याचा त्रास येथील मराठी भाषिक नागरिकांना होत असून शासनाच्या विविध सेवा मिळवतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याद्वारे नूतन शिधापत्रिकांचे वितरण नुकतेच चालू करण्यात आले आहे. याविषयी संबंधित नागरिकांना भ्रमणभाषद्वारे संदेश पाठवण्यात येत आहे. तुमच्या आधारकार्ड (अर्ज संख्या) अर्जाची छाननी करण्यात आली असून तुमची शिधापत्रिका अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयातून घेऊन जावी, असा संदेश पाठवण्यात येत आहे. हा संदेश इंग्रजी लिपीत असून भाषा मात्र कन्नड वापरण्यात आली आहे. खात्याच्या या अजब भाषा प्रकारामुळे शिधापत्रिकेसाठी अर्ज केलेल्या मराठी भाषिकांची द्विधा मनस्थिती होत आहे. यासाठी अन्न आणि नागरीपुरवठा खात्याने संदेश पाठवतांना सर्व सामान्यांना समजेल अशा भाषेतून पाठवावा, आणि सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांना मराठीतून संदेश पाठवावा, अशी मागणी मराठी भाषिकांतून होत आहे.

बंगालमध्ये आतंकवाद्यांचे नवीन शस्त्र चेंडूबॉम्बची निर्मिती !

शासन आतंकवाद्यांच्या चेंडूबॉम्बला तोंड देण्यास समर्थ आहे का ? 
उद्या चेंडूबॉम्ब जागोजागी फुटल्यास आश्‍चर्य नाही !
    कोलकाता - लहान मुले खेळण्यासाठी प्लास्टिकचे चेंडू वापरतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे; मात्र बांगलादेशातील आतंकवाद्यांनी या चेंडूंचा वापर बॉम्ब बनवून त्यांचे स्फोट घडवून आणण्यासाठी चालवला आहे. अशा एका चेंडूबॉम्बचे निर्मिती मूल्य ४०० ते ५०० रुपये असून तो १ सहस्र रुपयांच्या किमतीत सहज उपलब्ध होतो, असे निदर्शनास आले आहे.
       ढाक्यात नुकत्याच झालेल्या आतंकवादी घटनेनंतर भारत-बांगलादेश सीमेवरील राज्यांत या बॉम्बचा वापर होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आधी असे बॉम्ब बंगाल राज्यात निवडणूककाळात दहशत पसरवण्यासाठी वापरण्यात येत असत; मात्र आता त्यांचा वापर प्रत्येक ठिकाणी करण्यात येत आहे.

गंगा आरतीप्रमाणे आता चंद्रभागा नदीची प्रतिदिन आरती होणार

       पंढरपूर, ११ जुलै - विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने आषाढी वारीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या नमामी चंद्रभागा या उपक्रमाचे स्वागत म्हणून पवित्र चंद्रभागा नदीच्या आरतीचा शुभारंभ सोहळा आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच १४ जुलै या दिवशी चंद्रभागेच्या पुंडलिक घाटावर सायंकाळी ७.१५ वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती माईर्स एम्आयटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी दिली. (स्तुत्य उपक्रम ! याचसमवेत नमामी चंद्रभागा हा उपक्रम तात्काळ चालू होण्यासाठीही सरकारवर दबाव आणावा ! - संपादक)
       डॉ. कराड म्हणाले की, चंद्रभागा नदीच्या आरतीसमवेत संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण श्री पांडुरंगाची आरतीही पुंडलिक घाटावर प्रतिदिन सायंकाळी नित्यनियमाने होणार आहे. या आरतीच्या शुभारंभ सोहळ्यास शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत, तसेच या शुभारंभ सोहळ्यास ह.भ.प. तनपुरे महाराज, आमदार भारत भालके, पंढरपूर शहराचे नगराध्यक्ष सौ. साधनाताई भोसले आणि वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

संभाजीनगर महानगरपालिकेत सुरक्षारक्षक नियुक्तीचा घोटाळा उघडकीस !

भ्रष्टाचाराची कुरणे 
बनलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था !
        संभाजीनगर, ११ जुलै - संभाजीनगर महानगरपालिकेत वर्ष २०११-१२ आणि वर्ष २०१३-१४ या कालावधीत सुरक्षारक्षक नियुक्तीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. (इतक्या उशिरा हा घोटाळा झाल्याचे लक्षात का आले ? पालिकेचे लेखापरीक्षण त्या त्या वेळी होत नाही का ? एवढ्या उशिरा चौकशी केल्याने संशयितांना पुरावे नष्ट करण्यास पुरेसा अवधी उपलब्ध करून दिल्यासारखेच आहे. - संपादक) त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी मुख्य लेखापरीक्षकांद्वारे करण्यात येणार आहे.
        पालिकेमध्ये ६० सुरक्षारक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती न करता त्यांच्या नावे आणि खोट्या स्वाक्षर्‍या करून ३० लक्ष रुपये लंपास करण्यात आले आहेत. या घोटाळ्यामध्ये तत्कालीन कामगार अधिकार्‍यांसमवेत काही वरिष्ठ अधिकारी गुंतले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी मुख्य लेखापरीक्षकांना घोटाळ्याची चौकशी करून कारवाईच्या शिफारसींसह अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. (अहवाल हा निवळ फार्स न ठरता त्यानुसार संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. - संपादक)

ममता (बानो) बॅनर्जी यांच्या बंगालमध्ये इसिसचे वाढते कार्य !

बंगालमधील शासनाने मुसलमानांच्या लांगूलचालनापोटी त्यांच्या कारवायांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच 
एवढी भीषण परिस्थिती उद्भवली आहे. हिंदूंनो, इसिसच्या वाढत्या संकटाशी सामना करण्याची 
तुमच्यात शक्ती आहे का ?
* बंगालमधील २० गावांतून इसिसची १४७ भित्तीपत्रके जप्त
* इसिसची भडकावू भाषणे बंगाली भाषेत उपलब्ध
* उच्चशिक्षित मुसलमान तरुणांना कट्टर जिहादी प्रशिक्षण देण्याची योजना

      कोलकाता - इसिसचा भारतातील म्होरक्या अबू अल-मुसा अल-बंगाली उपाख्य मुसा याला कोलकाता येथील उच्चशिक्षित मुसलमान तरुणांना कट्टर जिहादी प्रशिक्षण देऊन इसिसमध्ये भरती करण्याचे दायित्व देण्यात आले होते, अशी माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली आहे. मुसा कामाक स्ट्रीटवरील एका संगणक संस्थेत नोकरी करत असतांना त्याने तेथील संगणकांचा वापर करून भारतातील गोपनीय माहिती सांकेतिक भाषेत देशाच्या इतर भागात आणि देशाबाहेर माहिती पाठवली असण्याची शक्यता पोलीस पडताळून पहात आहेत.

जेएन्यूतील देशद्रोहाचा आरोपी उमर खालिदकडून जिहादी आतंकवाद्याचे समर्थन !

अशा देशद्रोह्यांवरील खटला लवकरात लवकर चालवून त्यांना कठोर शिक्षा का केली जात नाही ?
साम्यवादी क्रांतीकारी अर्नेस्तोचे ग्वेरा याच्याशी केली तुलना !
     नवी देहली - काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून ठार करण्यात आलेला हिजबुल मुजाहिदीनचा जिहादी आतंकवादी बुरहान वानी याचे देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील (जेएन्यूतील) देशद्रोहाच्या आरोपांतर्गत जामिनावर सुटलेला विद्यार्थी उमर खालिद याने समर्थन केले आहे. उमरने त्याच्या फेसबूक पानावर बुरहान याची साम्यवादी विचारसरणीच्या अर्नेस्तो चे ग्वेरा या क्रांतीकारकाशी तुलना केली आहे. याद्वारे त्याने बुरहानला हुतात्मा ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. (हिंदु जनजागृती समितीच्या फेसबूक पानावर जाणीवपूर्वक बंदी घालणार्‍या गृह मंत्रालयाला उमर याचा देशद्रोह दिसत नाही का ? - संपादक) उमर याच्यावर जिहादी आतंकवादी महंमद अफझल याच्या समर्थनार्थ घोषणा देण्याचा आरोप आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात शिरले पाणी !

नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात शिरलेले पाणी
नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर
पाण्याखाली गेल्यामुळे उत्सवमूर्ती हालवतांना पुजारी
        सततच्या पावसाने नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री दत्त मंदिर सोमवारी पाण्याखाली गेले. औदुंबर येथेही पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून येथील दत्त मंदिराला कृष्णा नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे. सायंकाळपर्यंत हे मंदिरही पाण्याच्या खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाचा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन या दोघांनीही आपत्कालीन यंत्रणेचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. महापालिका क्षेत्रातही गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
       श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात सोमवारी सकाळी १० वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. या वेळी सहस्रो भाविकांनी श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दुपारी १ वाजेपर्यंत स्नानाचा लाभ घेतला.

जर जिहाद इतका पवित्र आहे, तर फुटीरतावाद्यांची मुले बंदुका हातात घेऊन आतंकवादी का होत नाहीत ? - हॉलंडमधील मानवाधिकार कार्यकर्ते जुनैद कुरेशी यांचा प्रश्‍न

असा प्रश्‍न भारतातील एकही मुसलमान आणि त्यांच्या संघटना आणि राजकीय पक्ष का विचारत नाही ?
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे संस्थापक सदस्य हाशिम कुरेशी यांचा मुलगा जुनैद कुरेशी यांनी बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारावर टीका केली आहे. ते म्हणाले की, काश्मीरमधील तरुणांनी या फुटीरतावाद्यांना विचारले पाहिजे, जर जिहाद इतका पवित्र आहे, तर त्यांची मुले स्वतः बंदुका हातात घेऊन आतंकवादी का होत नाहीत ? कुरेशी सध्या हॉलंडमध्ये राहून मानवाधिकाराचे कार्य करत आहेत.

(म्हणे) अमेरिकेवर सूड उगवू !

आतंकवादी त्यांच्यावरील आक्रमणाचा सूड उगवण्याचा प्रयत्न करतात; मात्र भारतावर अनेक 
वर्षे आतंकवादी आक्रमण करूनही भारत त्याचा सूड उगवत नाही !
ओसामा बिन लादेन याच्या मुलाची धमकी !
     बैरूत - ओसामा बिन लादेन याला २ मे २०११ ला अमेरिकेच्या सैन्याने त्याच्या घरात घुसून ठार केले होते. या हत्येचा सूड उगवण्याची धमकी लादेनचा मुलगा हमजा याने अमेरिकेला दिली आहे. त्याने सामाजिक संकेतस्थळावर २१ मिनिटांची आम्ही सर्व ओसामा या नावाची ऑडिओ टेप ठेवली आहे. हमजाचा हा व्हिडिओ म्हणजे अल-कायदाला पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न आहे, असे म्हटले जात आहे. ओसामाच्या मृत्यूनंतर संघटनेची आतंकवाद्यांवरील पकड सैल होत चालली आहे.

डॉ. झाकीर नाईक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा ! - विहिंप

हे सांगावे का लागते ? केंद्रातील सरकारला ते कळत नाही का ? 
     नवी देहली - डॉ. झाकीर नाईक यांच्यावर देशद्रोहाच्या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याची मागणी विश्‍व हिंदु परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांनी केली आहे. मुसलमान धर्मियांतील काही समुदायांवर झाकीर यांचा प्रभाव पडत आहे आणि ते आतंकवादाकडे झुकत आहेत, असे जैन म्हणाले. 
    जैन म्हणाले की, ओसामा बिन लादेन याचे त्यांनी समर्थन केले होते. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. 
झाकीर नाईक यांचे ट्विटरवरून मुसलमानांना आवाहन !
     माझ्या विरोधात मिडिया ट्रायल चालू असून मला सहकार्य करा, असे आवाहन डॉ. झाकीर नाईक यांनी ट्विटरवरून मुसलमानांना केले आहे.

काश्मीरमधील धर्मांधांकडून डॉ. झाकीर नाईक यांच्या समर्थनार्थ सामाजिक संकेतस्थळांवरून प्रसार !

केंद्रसरकारने अशा समर्थकांवरही कारवाई करायला हवी ! 
     श्रीनगर - काश्मीरमधून डॉ. झाकीर नाईक यांच्या समर्थनार्थ सामाजिक संकेतस्थळावरून प्रसार करण्यात येत आहे. देशामध्ये हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना त्याने मुसलमानांना लक्ष्य केले नाही, असे होऊ शकत नाही. आज लोक डॉ. झाकीर नाईक यांना विरोध करत आहेत, उद्या आमच्या नमाज पठण करण्यावरही आक्षेप घेतील. आम्ही असे कधीपर्यंत शांत रहाणार ?, असे काश्मीर येथे रस्त्यावर उतरून आणि सामाजिक संकेतस्थळांवरून डॉ. झाकीर यांचे समर्थन करणार्‍या लोकांचे म्हणणे आहे.

पीडितेने बलात्कारास नकार दिल्यावरही आरोपीला शिक्षा ! - जर्मनीत नवा कायदा

बलात्काराला मूकसंमती देणारेही कायद्याच्या कचाट्यात
     बर्लिन - एखाद्या महिलेवर बलात्कार झाल्यावर तो सिद्ध करण्यासाठी त्या पीडित महिलेला बलात्कारास विरोध केला आणि त्यामुळे शरीरावर जखमा झाल्या, असे न्यायालयात दाखवणे अनिवार्य असते. त्यामुळे बलात्काराच्या अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष ठरत होते. आता जर्मनीत होऊ घातलेल्या एका कायद्यानुसार महिलेने बलात्कार्‍यास केवळ नकार दिला, तरी गुन्हा सिद्ध होऊन त्याला शिक्षा होऊ शकते.
     गेल्या नववर्ष दिनी जर्मनीत आश्रय घेतलेल्या मुसलमान आश्रितांनी कोलोन शहरातील अनेक महिलांवर बलात्कार केले; मात्र त्यांपैकी बहुतेक महिलांनी शारीरिक दुखापत होईल, या भयाने प्रतिकार केला नाही. त्यामुळे बलात्काराचे गुन्हे सिद्ध होणे अवघड झाले, तसेच अनेक आरोपींना अटक होऊ शकली नाही आणि काही आरोपी न्यायालयातून निर्दोष मुक्त झाले. यावर उपाय म्हणून जर्मनीत नवीन कायदा करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर बलात्काराच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी विरोध केला नाही, तर त्यांनाही नवीन कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर परराष्ट्रातून आलेल्या नागरिकांना देशाच्या बाहेर निष्कासित करण्याचे प्रावधानही नवीन कायद्यात करण्यात आले आहे.

राममंदिरासाठी पुढाकार घेणारे राजीव गांधी पहिले पंतप्रधान !

राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही ! 
विश्‍व हिंदु परिषदेचे महासचिव सुरेंद्र जैन यांचे प्रतिपादन
     कर्णावती (अहमदाबाद) - माजी पंतप्रधान राजीव गांधी अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या बाजूने होते. ते पहिले पंतप्रधान होते, ज्यांनी राममंदिराकरता पुढाकार घेतला होता, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे महासचिव सुरेंद्र जैन यांनी केले. ते परिषदेच्या एका बैठकीकरता येथे आले होते. या वेळी त्यांना मोदीशासन हिंदुत्वाचा कार्यक्रम पूर्ण करू शकेल का ? असा प्रश्‍न विचारण्यात आला असता ते म्हणाले, राजीव गांधी यांनी अयोध्येत रामराज्य आणण्याचे बोलून दाखवले होते, तसेच त्यांनी हिंदुत्वाशी संबंधित इतर सूत्रांवरही चर्चा केली होती (गेल्या अनेक वर्षांपासून राममंदिर हे निवडणुका जिंकून देणारे सूत्र झाले आहे. राजकारण्यांनी राममंदिराच्या उभारणीपेक्षा या प्रश्‍नाचे राजकारण करण्यातच अधिक रस घेतला आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्रातच राममंदिर साकार होऊ शकते, असे हिंदूंना वाटू लागले आहे ! - संपादक)

पुणे येथे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १४० वर !

       पुणे, ११ जुलै - येथे एडिस इजिप्ती या जातीच्या डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आता १४० वर गेली आहे. आरोग्य खात्याने केलेल्या पाहणीनुसार इमारतींची छोटी उद्याने, गच्चीवर ठेवलेल्या वस्तू, कुंड्या, तसेच शीतकपाट आणि वातानुकूलित यंत्र यांमध्ये साचलेल्या पाण्यात या डासांची अंडी सापडली आहेत. त्या डासांचे प्रमाण नियंत्रित आणण्यासाठी पाणीसाठा पडताळणी मोहीम आरोग्य खात्याने चालू केली आहे. पालिकेने सर्व कार्यालये, शाळा, दवाखाने आणि अन्य सरकारी आस्थापनांच्या परिसरात औषधाची फवारणीही चालू केली आहे. संशयित अथवा डेंग्यूचा रुग्ण सापडलेल्या घरात आणि परिसरातील चारशे घरांमध्ये धूरफवारणी करण्यात येत आहे.

पाथर्डी येथे मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळणार्‍या भाजपच्या ८ कार्यकर्त्यांवर गुन्हे प्रविष्ट !

        नगर, ११ जुलै (वार्ता.) - मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करीत ग्रामविकास मंत्री सौ. पंकजा मुंडे यांचे जलसंधारण खाते श्री. राम शिंदे यांच्याकडे सोपवले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे १० जुलै या दिवशी दहन केले होते. या प्रकरणी पाथर्डी येथील पोलिसांनी सर्व ८ समर्थकांच्या विरोधात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा प्रविष्ट केला आहे. यामध्ये भाजपचे माजी युवक शहराध्यक्ष मुकुंद गर्जे, भाजपचे सोनोशी गावचे सरपंच गोकुळ दौंड, भाजपचे पंचायत समितीचे माजी सभापती संपत कीर्तने यांसह ८ जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

क्रांतीकारकांचे वकीलपत्र विनाशुल्क घेणारे देशबंधू चित्तरंजन दास !

बोधकथा
बालकांसाठी परिपाठ !
     १९०८ मध्ये खुदीराम बोस यांनी इंग्रजांवर फेकलेल्या हिंदुस्थानातील पहिल्या ध्वमच्या (बॉम्बच्या) अभियोगात (खटल्यात) योगी अरविंदांनाही गोवण्यात आले. त्यांच्या सुटकेसाठी गोळा केलेला निधी संपल्यावर नेमलेली नामवंत अधिवक्ता (वकील) मंडळी पुढे काम करण्यास टाळाटाळ करू लागली. योगी अरविंदांच्या भगिनीने पैसा मिळाला, तर माझ्या निर्दोष भावाला अधिवक्ता देता येईल आणि तो वाचेल, असे निवेदन प्रसिद्ध करून राष्ट्रापुढे हात पसरले. चित्तरंजन पुढे झाले. योगी अरविंदांचा अभियोग त्यांनी नि:शुल्क लढवला. त्यात त्यांची आर्थिक स्थिती खालावली. घोडागाडी विकावी लागली. चित्तरंजन यांनी सतत ८ दिवस बचावाचा युक्तीवाद केला. योगी अरविंद निर्दोष सुटले. तेव्हापासून देशबंधू चित्तरंजन दास सर्व देशभक्तांचे आधारस्तंभ बनले !
      मुलांनो, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात अधिवक्ता, डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी आदी समाजघटकांनीही सक्रीय भाग घेतला. आजही या समाजघटकांनी यथाशक्ती योगदान दिले, तर राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती सुधारेल !
(अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ बोधकथा)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) कुठे उत्तर आयुष्यात (वय झाल्यावर) सार्वभौम राज्याचा त्याग करून एकांतात साधना करणारे पूर्वीचे राजे, तर कुठे वयाची ७० - ७५ वर्षे उलटूनही सत्तेला चिकटून रहाणारे सध्याचे शासनकर्ते !

     पूर्वीचे राजे ऋषीच, म्हणजे राजर्षि होते. ते राजे उत्तर आयुष्यात (वय झाल्यावर) वानप्रस्थी व्हायचे. ते वनात जायचे आणि वनात रहायचे. त्या काळी अखंड सार्वभौम राज्य सोडून एकांतात, गंगातिरावर असंख्य राजे साधना करत असत. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जानेवारी २०१५)     हिंदूंनी स्वतःकडे आणि अन्य धर्मांकडे त्यांनी दिलेल्या डोळ्यांनी नव्हे, तर आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पहायला शिकायला हवे ! - कै. राम स्वरूप गर्ग
      भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची गरज आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल !

पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांनी गुजरात येथील साधकांना केलेले मार्गदर्शन, त्या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. (कु.) अनुराधा वाडेकर
      प.पू. गुरुदेवांच्या कृपेने गुजरात येथे मला पू. (कु.) अनुराधाताई वाडेकर यांचा सत्संग ६ दिवस लाभला. संतांच्या सहवासात आनंदाची अनुभूती घेता आली. माझ्यावर पुष्कळ आध्यात्मिक उपाय झाले. माझ्यासाठीच प.पू. गुरुदेवांनी हे सगळे घडवून आणले, असे वाटले. पू. (कु.) अनुराधाताई यांनी गुजरात येथील साधकांना विविध विषयांवर केेलेले मार्गदर्शन, त्या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
    संतसहवासात मनातील विचारांचे प्रमाण उणावणे, उत्साह वाढणे, व्यष्टी साधना गांभीर्याने करायला हवी, हा मनाचा निश्‍चय होणे, स्वतःतील उणिवांची जाणीव होणे, स्वतःमध्ये पालट व्हायला हवा, असे वाटणे, हे पालट लक्षात आले. पू. ताईंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्याप्रमाणेच गुरूंच्या समष्टी रूपाची सेवा करता यायला हवी, असे वाटले. प.पू. गुरुदेवांनी त्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकवल्या. केवळ मानसिक आणि बौद्धिक स्तरावर विचार न करता आध्यात्मिक स्तरावर कसा विचार करायला हवा ?, हे शिकायला मिळाले. मी आध्यात्मिक स्तरावर विचार करण्यास आणि मार्गदर्शन घेण्यास किती न्यून पडतो, हे गुरुदेवांनी लक्षात आणून दिले. साधक जे जे प्रश्‍न विचारत होते, त्यातून माझेच मन देवासमोर व्यक्त होत होते. तेव्हा माझ्या स्वभावदोषांवरही उपाययोजना मिळत होती. मनाची संकुचित वृत्ती नष्ट होण्यास आणि बुद्धीचा अडथळा दूर होण्यास साहाय्य होत होते.

भावपूर्ण सेवा करून संतांचे मन जिंकणारे वेदमूर्ती चि. केतन शहाणे आणि हसतमुख अन् आनंदी असणार्‍या चि.सौ.कां. मधुरा गद्रे !

चि. केतन शहाणे
चि.सौ.कां. मधुरा गद्रे
       १२.७.२०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे आणि सनातन साधक-पुरोहित पाठशाळेचे अध्यापक वेदमूर्ती चि. केतन शहाणे आणि संरचनेची सेवा करणार्‍या चि.सौ.कां. मधुरा गद्रे विवाहबद्ध होत आहेत. त्यानिमित्त पाठशाळेतील विद्यार्थी साधकांना वेदमूर्ती चि. केतन शहाणे यांची, तर सहसाधकांना चि.सौ.कां. मधुरा गद्रे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
वेदमूर्ती चि. केतन शहाणे आणि चि.सौ.कां. मधुरा गद्रे यांना विवाहाप्रीत्यर्थ 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

सनातनचे विकलांग संत पू. सौरभ जोशी यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
        १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

साधकांनो, पू. भगवंतकुमार मेनराय आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांंच्या ध्यानाच्या वेळी नामजपाला बसून स्वतःच्या आध्यात्मिक उपायांची परिणामकारकता वाढवा !

पू. (श्री.) भगवंतराय मेनराय आणि
पू. (सौ.) सूरजकांता मेनराय
१. साधकांनी संतांच्या नामजपामध्ये 
असलेल्या सामर्थ्याचा लाभ करून घ्यावा ! 
    रामनाथी आश्रमात वास्तव्याला असणारे सनातनचे संत पू. (श्री.) भगवंतराय मेनराय आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय प्रतिदिन ७ घंटे ध्यानाला बसतात. या ध्यानाच्या वेळी साधकांनी इतरत्र कुठेही बसून नामजप केला, तरी त्यांना एरव्हीच्या नामजपाच्या तुलनेत अधिक प्रमाणात लाभ होतो.
     पू. (श्री.) मेनराय आणि पू. (सौ.) मेनराय यांच्या ध्यानाच्या वेळी साधक नामजपाला बसले, तर त्यांनी उपायांच्या घंट्यांच्या अर्धा वेळच नामजप केल्यास तो पुरेसा होणार आहे, उदा. एखाद्या साधकाला प्रतिदिन ४ घंटे नामजप करण्यास सांगितला असेल, तर पू. (श्री.) मेनराय आणि पू. (सौ.) मेनराय यांच्या ध्यानाला बसण्याच्या वेळी नामजपाला बसल्यास त्याला २ घंट्यांतच ४ घंटे नामजप केल्याचा लाभ होणार आहे.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

स्वतःकडून झालेल्या चुकांचा परिणाम अन्य व्यक्तींवर न होण्यासाठी काय कराल ? 
प.पू. परशराम पांडे
१. तोंडवळा प्रसन्न ठेवणे 
     आपला उदासीन तोंडवळा दुसर्‍याला दिसून तोही उदास होऊ नये; म्हणून आपण आपला तोंडवळा प्रसन्न ठेवला पाहिजे. त्यामुळे आपलाही निरुत्साह जाऊन उत्साह वाढेल. आपल्याला सकारात्मक विचार सुचतील आणि झालेल्या चुकांवर योग्य ते मार्गदर्शक विचार वाढतील. यासाठी मधूनमधून प्रार्थना केल्यास ईश्‍वराकडून चैतन्य मिळून आत्मबळ वाढेल. यासाठी नेहमी भगवंताच्या अनुसंधानात राहून सेवा केल्यास निरुत्साह येणार नाही आणि त्यामुळे आपल्याकडून चुकाही होणार नाहीत.
२. चुकांचे मूळ शोधणे 
      आपल्या हातून होणार्‍या चुकांचे मूळ कारण शोधले पाहिजे. त्यासाठी प्रार्थना करून चिंतन केल्यास मूळ कारण सापडते. हे मूळ कारण नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यावर दोषांच्या तीव्रतेनुसार स्वयंसूचनांची ५ ते १० अभ्याससत्रे प्रतिदिन करावीत.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.५.२०१५)


महर्षींनी प.पू डॉक्टरांच्या नावाचा जयघोष करायला सांगितल्याच्या दिवशी सकाळी एका साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परमपूज्य गुरुदेवांच्या चरणी प्रणाम.
१. गुरुकृपेची शक्ती मिळू दे, अशी श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर प.पू. गुरुदेवांच्या हृदयात श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री महालक्ष्मीदेवीच्या हृदयात प.पू. गुरुदेव दिसून देवाने विष्णुरुपी गुरुतत्त्व आणि श्री लक्ष्मीतत्त्व एकरूप झाले आहे, असे सांगणे : ६.३.२०१६ या दिवशी सकाळी ११.४५ वाजता माझ्याकडून श्रीकृष्णाला हे भगवान श्रीकृष्णा, माझ्या प.पू. गुरुदेवांच्या गुरुकृपेची शक्ती मला (माझे नांव घेऊन) मिळू दे. माझ्या गुरुदेवांची स्पंदने मला ग्रहण करता येऊ दे आणि त्यांचा लाभही मला मिळू दे, अशी प्रार्थना झाली. यानंतर माझे मन आणि देह हलके झाल्याचे मला जाणवले आणि मला प.पू. गुरुदेव दिसू लागले. प.पू. गुरुदेवांच्या हृदयात श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री महालक्ष्मीदेवीच्या हृदयात प.पू. गुरुदेव दिसू लागले. त्या वेळी देवाने विष्णुरूपी गुरुतत्त्व आणि श्री लक्ष्मीतत्त्व एकरूप झाले आहे, असे सांगितले. त्यानंतर ते तत्त्व घराच्या चौकटीपासून बाहेर संपूर्ण वातावरणात पसरले आहे, असे जाणवले. त्या वेळी चैतन्य आणि आनंद जाणवत होता.

लहान वयातच धर्माचरण करणारी आणि शिकण्याची वृत्ती असणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पाळधी, जळगाव येथील कु. मनस्वी नीलेश पाटील (वय १० वर्षे) !

कु. मनस्वी पाटील
       कु. मनस्वीचा वाढदिवस १०.७.२०१६ या दिवशी होता. तिच्या विषयी तिच्या आईला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि अन्य सूत्रे लेखात दिली आहेत. तिला सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा !
१. जन्म ते १ वर्ष
१ अ. दत्त असा उच्चार करणे : मनस्वी पाच मासांची (महिन्यांची) असतांना आम्ही तिच्याकरता दत्ताचा नामजप करत होतो, तेव्हा तिच्या मुखातूनही जोरात दत्त असा उच्चार निघाला.
१ आ. प्रार्थना करणे : मनस्वी १० मासांची (महिन्यांची) असतांना सकाळी उठल्याक्षणी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना करायची. आताही रुग्णाईत असतांना ती सांगितल्याप्रमाणे प्रार्थना करते आणि तिचा त्रास उणावल्याचे जाणवते.
२. गुणवैशिष्ट्ये
२ अ. नीटनेटकेपणा : ती घराची स्वच्छता, भांडी घासणे, कपडे धुणे, यांसारख्या कृती नीटनेटकेपणाने करते. घर झाडण्यापूर्वी सर्व वस्तू जागेवर ठेवते. मी घरी नसतांना कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवते. झोपतांनाही अंथरूण चांगले स्वच्छ करूनच झोपते. शाळेत किंवा सेवेच्या ठिकाणी एखादी वस्तू हवी असल्यास ती वस्तू आदल्या दिवशीच पिशवीत ठेवून देते.

प्रार्थना करतांना सौ. केतकी पेडणेकर यांना आलेल्या अनुभूती

१. प्रार्थना करतांना महासागरात शेषनागावर श्रीविष्णु विराजमान झाल्याचे आणि त्यालाच प्रार्थना करत असल्याचे दिसून भावजागृती होणे : आम्ही सर्व साधक प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी प्रार्थना करतो. श्रीकृष्ण, श्रीमत् नारायण आणि प.पू. डॉक्टर यांना वंदन करून प्रार्थना केल्यावर श्रीविष्णु महासागरात शेषनागावर विराजमान झालेले दिसायचे आणि मी त्यालाच प्रार्थना करत आहे, असे मला दिसायचे आणि माझी भावजागृती व्हायची. यामुळे मला चांगले वाटायचे.
२. काही दिवसांनी श्रीविष्णु दिसेनासे होणे, देवाला विचारल्यावर देवाने साधिकेजवळच असल्याचे सांगणे, सर्वत्र पाहिल्यावर प.पू. गुरुदेवांच्या आसंदीवर श्रीविष्णु दिसणे आणि साधिकेला अखंड भावाच्या स्थितीत रहाता येणे : काही दिवसांनी प्रार्थना केल्यावर मला श्रीविष्णु दिसेनासे झाले. मी देवाला विचारले, हे श्रीमत्नारायणा, तू कुठे आहेस ? मला का दिसत नाहीस ? देवा, माझे काय चुकले ? मी साधनेत पुष्कळ न्यून पडते, तरीही तू मला दर्शन दे ना रे देवा. माझी परीक्षा बघतोस का ? तेव्हा देव म्हणाला, मी तुझ्या जवळच आहे. तुझेच माझ्याकडे लक्ष नाही. तेव्हा मी आश्रमात सगळीकडे दृष्टी फिरवली, तर प.पू. डॉक्टरांंच्या आसंदीवर श्रीविष्णु विराजमान झालेले दिसले. तेव्हापासून मी प्रार्थना करतांना मला श्रीविष्णु आश्रमातच दिसतात. त्यामुळे दिवसभरातील सर्व प्रार्थना करतांना त्यांचे रूप डोळ्यांसमोर असते आणि मी श्रीविष्णुलोकात रहाते, याची २४ घंटे मला जाणीव होते. त्यामुळे मला अखंड भावाच्या स्थितीत रहायला मिळते.
        देवा, तुझ्याच कृपेमुळे मला वरील अनुभूती आली, त्यासाठी कोटी कोटी कृतज्ञता !
- सौ. केतकी पेडणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

शारीरिक त्रास आणि अडचण असूनही गुरुदेवांच्या अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्यातील नाडीवाचनाच्या कार्यक्रमासाठी जाता येऊन कसलाही त्रास न होणे आणि भावजागृती होऊन सोहळ्यातील चैतन्य अन् आनंद अनुभवता येणे

      माझ्या यजमानांची नुकतीच बायपास सर्जरी झाली होती. त्यामुळे गुरुदेवांच्या अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्यातील होणार्‍या सप्तर्षि जीवनाडीवाचनाच्या कार्यक्रमाला मला जायला मिळेल कि नाही ?, याविषयी मला शंका वाटत होती; परंतु माझ्या मुली आणि नातवंडे यांनी त्यांना सांभाळण्याचे दायित्व घेतले. त्यामुळे मला प.पू. गुरुदेवांच्या अमृत महोत्सव सोहळ्याला जाता आले. तेथे गेल्यावर माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. कार्यक्रम किती वेळ आहे, हे ठाऊक नाही. मला पाठ आणि कंबर दुखीचा त्रास आहे. त्यामुळे मी पूर्ण वेळ बसू शकेन का ? मध्येच उठून घरी जावे लागेल का ? त्यामुळे मी प्रार्थना करूनच बसले. सकाळी ११.१५ ते ४.३० पर्यंत जवळजवळ ५ घंटे मी कार्यक्रमासाठी बसले; परंतु मला कसलाही त्रास झाला नाही. हे सर्व गुरुमाऊलीच्या कृपेमुळेच झाले, हे माझ्या लक्षात आले. नाडीवाचन चालू असतांना मी गुरुमाऊलींचे चरण घट्ट धरून ठेवले होते आणि सतत प्रार्थना करत होते. तेव्हा मला पुष्कळ आनंद मिळून माझी भावजागृतीही होत होती. मला पूर्ण कार्यक्रम पहायला मिळून त्यातील चैतन्य ग्रहण करण्याची संधी मिळाली; म्हणून गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता !
- सौ. निलीमा बेंद्रे, नागपूर

ना झाली अशी गुरुमाई या संपूर्ण कालचक्रामधे ।

मी समष्टीचा अपराधी । मी गुरूंचा अपराधी (टीप) ॥ १ ॥
मी अपराधांचा पर्वत । मी अपराधांचा सागर ॥ २ ॥
तरीही गुरुमाऊली घेई कुशीत । स्वस्वरूपे अन् समष्टीरूपे ॥ ३ ॥
काय वर्णावे वात्सल्य । या गुरुमाऊलीचे ॥ ४ ॥
ना झाली अशी गुरुमाई । या संपूर्ण कालचक्रामधे ॥ ५ ॥
टीप : गुरूंनी सांगितलेल्या अनेक गोष्टींचे पालन न झाल्याने साधकाला आपण अपराधी आहोत, असे वाटते.
- एक साधक (९.६.२०१६)

गुन्हेगारांना शिक्षा झाल्यावर त्यांना साहाय्य केले; म्हणून संबंधित अधिवक्त्यांनाही कडक शिक्षा करा !

        भाग्यनगर (हैद्राबाद) येथे अटक करण्यात आलेल्या इसिसच्या ५ आतंकवाद्यांना एम्आयएम् न्यायालयीन साहाय्य करणार आहे, असे या पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. आमच्या पक्षाचे आतंकवादाला समर्थन नाही; मात्र राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) एखाद्याला अटक केली; म्हणून तो दोषी ठरत नाही. ते काम न्यायालयाचे आहे. न्यायालयाला योग्य निर्णय घेऊ द्यावा, असे ओवैसी म्हणाले.

असे निवेदन का द्यावे लागते ? पोलीस आणि सरकारी वकील यांच्या हे लक्षात कसे येत नाही ?

       डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात यापूर्वी संशयित म्हणून अटक केलेले आरोपी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्या विरुद्ध न्यायालयात प्रविष्ट केलेला खटला बंद करण्यात यावा, तसेच पोलिसांनी हा खटला बंद करण्याच्या संदर्भातील अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करावा, असा विनंतीअर्ज आरोपींचे अधिवक्ता बी.ए. अलुर यांनी ४ जुलै या दिवशी न्यायालयात प्रविष्ट केला. या संदर्भात अन्वेषण अधिकारी आणि शासकीय अधिवक्ता यांनी त्यांचे म्हणणे सादर करावे, असा आदेश न्यायाधीश व्ही.बी. गुळवे-पाटील यांनी दिला.

फलक प्रसिद्धीकरता

१९९० च्या काश्मिरी हिंदूंच्या 
वंशविच्छेदाच्या इतिहासाची पृनरावृत्ती ?
        काश्मीर खोर्‍यात असलेल्या मशिदींवरील भोंग्यांवरून पाकिस्तानचे समर्थन करणारी घोषणाबाजी करण्यात येत आहे. तसेच भारतविरोधी जिहादमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुसरीकडे ११ जुलैला धर्मांधांनी पुलवामा येथील २ हिंदूंच्या घरांना आग लावली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Kashmirki masjide Bharatke virodhme Jihad karne ka avahan kar rahi hain.
Bharatko Hindu Rashtra banana hi is vipada ka ekmatra upay !
जागो !
कश्मीर की मस्जिदें भारत के विरोध में जिहाद करने का आवाहन कर रही हैं.
भारत को हिन्दू राष्ट्र बनाना ही इस विपदा का एकमात्र उपाय !
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम
       कोणतीही गोष्ट जगात दिसली पाहिजे, उदा. प्रेम हे जगात दिसले पाहिजे, दाखविले पाहिजे, मग त्यात वास्तविकता असो वा नसो.
भावार्थ : जग आणि प्रेम हे प्रकृतीतील आहे. प्रेम कृतीतून दाखविता आले पाहिजे, नाहीतर दुसर्‍याला ते कळणार नाही. एकदा एका शिष्याकडे गेले असता, बाबांनी तेथे हातात माळ घेऊन जप केला. मग त्याच्या घरातील त्रासदायक स्पंदने नाहीशी झाली. वास्तविक बाबांच्या केवळ अस्तित्वानेच तसे झाले असते; पण अस्तित्वाचा परिणाम लोकांना दिसत नाही, तर हातात माळ धरून केलेला जप दिसतो, म्हणून बाबांनी तसे केले. या प्रसंगाच्या आधी जवळजवळ वीस वर्षे बाबांनी हातात माळ घेऊन जप केल्याचे कुणी पाहिले नव्हते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
पोलीस आणि न्याययंत्रणा यांवर कोट्यवधी रुपये उधळणारे आतापर्यंतचे शासनकर्ते त्यांची
फलनिष्पत्ती काय, हे जनतेला कळू देत नाहीत, हे लक्षात घ्या ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवलेगुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक

मायेतील ब्रह्माची जाणीव करून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य होय ! - संत भक्तराज महाराज

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने त्यांना 
सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

डॉ. झाकीर नाईक यांना अटक होणार ?

संपादकीय
      सध्या डॉ. झाकीर नाईक यांनी भारतात येण्याचा त्यांचा निर्णय रहीत केला असून ते सौदी अरबमध्ये थांबणार आहेत, असे वृत्त पुढे येत आहे. याचा अर्थ तूर्तास त्यांनी चालवलेले हिंदुद्वेषाचे आणि जिहादी निर्माण करण्याचे दुकान तेजीतच चालू रहाणार. डॉ. झाकीर नाईक मोकाट आहेत, याला उत्तरदायी कोण ? डॉ. झाकीर नाईक यांची कुकर्मे आताच प्रकाशात आलीत, असे नाही. गेली कित्येक वर्षे त्यांचे जिहादी प्रेम सर्वश्रुत आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी ओसामा बिन लादेन याचे जाहीर समर्थन केले होते. त्यानंतर त्यांनी प्रत्येक मुसलमानाला आतंकवादी बनण्याचे आवाहन केले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn