Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

 
नाम घेता वाया गेला ।
ऐसा कोणी ऐकियेला ॥

काश्मीरमध्ये धर्मांधांकडून हिंसाचार चालूच !

पीडीपी-भाजप सरकारच्या काळात अमरनाथ यात्रेकरू महिलांवर
बलात्कार होणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! काँग्रेसच्या काळातही अशी स्थिती नव्हती ती आता झाली आहे !
हिंसाचार करणार्‍या देशद्रोह्यांना सरकार लाल चौकात फाशीची शिक्षा देणार का ?
 • हिंसाचारात १८ ठार, २०० हून अधिक घायाळ
 • दंगलखोरांकडून हातबाँम्बचा वापर
 • धर्मांधांकडून महिला यात्रेकरूंवर बलात्कार
 • सुरक्षा दलाच्या सैनिकांवर दगडफेक
 • ३ पोलीस बेपत्ता, ९६ सैनिक घायाळ
 • श्रीनगरसह १० जिल्ह्यांमध्ये संचारबंदी
     श्रीनगर - सुरक्षा दलाकडून हिजबूल मुजाहिदीनचा आतंकवादी बुरहान मुझफ्फर वानी आणि अन्य २ आतंकवाद्यांना ८ जुलैला सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले. त्यानंतर सुरक्षा दलाच्या कारवाईच्या विरोधात फुटीरतावादी देशद्रोही धर्मांध नेत्यांकडून काश्मीरमध्ये हिंसाचार माजवण्यात आला. या हिंसाचारात आतापर्यंत १८ ठार झाले असून २०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. या वेळी धर्मांधांनी पोलीस ठाण्यावर, तसेच भाजपच्या कार्यालयांवर आक्रमण केले. या परिस्थितीत जम्मूच्या छावणीतून जाणारी अमरनाथ यात्रा दुसर्‍या दिवशी उशीरा चालू करण्यात आली आहे. यात वेगवेगळ्या भागात अनुमाने ५ सहस्र यात्रेकरू अडकले होते. याचा अपलाभ घेत धर्मांधांकडून या यात्रेकरूंना मारहाण केली, तसेच महिलांवर बलात्कार केले. प्रशासनाने पुलवामा, अनंतनाग आणि श्रीनगरसह १० जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. दक्षिण काश्मीरमध्ये हिंसाचार वाढल्यानंतर भ्रमणभाष, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
धर्मांधांकडून अमरनाथ यात्रेकरूंची लूट, महिलांवर बलात्कार
       स्थानिक धर्मांधांनी रात्री यात्रेकरूंना लुटले. त्यांच्या जवळील किमती वस्तू पळवून नेल्या, तसेच पैसेही हिसकावून घेतले. याची माहिती यात्रेकरूंनी वृत्तपत्रांच्या कार्यालयात दूरभाषवरून दिली. यात्रेकरूंनी सांगितले की, ८ जुलैच्या रात्री श्रीनगर मार्गावरील काजीगुंद-अनंतनाग भागात काही स्थानिक लोकांनी मारहाण केली, बस आणि चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या, तसेच महिला यात्रेकरूंवर बलात्कार केले.
३ पोलीस बेपत्ता, सैनिकांवर दगडफेक, ९६ सैनिक घायाळ
      या हिंसाचारात सुरक्षा दलाच्या सैनिकांवर धर्मांध जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत काही यात्रेकरू घायाळ झाले आहेत.
     जमावाने ४ पोलीस चौक्या आणि सुरक्षा दलाची वाहने यांना आगी लावल्या, तसेच सैनिकांची शस्त्रास्त्रे खेचून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांच्या बंकर वाहनाला झेलम नदीत ढकलल्यामुळे चालक पोलीस ठार झाला. पोलीस अधिकार्‍यानुसार त्राल भागातील एका घटनेत एका पोलिसाच्या दोन्ही पायांवर आतंकवाद्यांनी गोळीबार केला. ९ जुलैच्या चकमकीनंतर ३ पोलीस बेपत्ता असून, ९६ सैनिक घायाळ झाले आहेत. सर्व फुटीरतावादी नेत्यांना त्यांच्या घरी स्थानबद्ध करण्यात आले आहे किंवा कह्यात घेण्यात आले आहे.
कृतीची वेळ असतांना केवळ बैठका घेणारे गृहमंत्री काय कामाचे ?
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची बैठक
     केंद्रीय गृहमंत्रालयाने काश्मीरच्या स्थितीवर एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. यात गृहसचिव, संयुक्त सचिव (काश्मीर विभाग) आयबीप्रमुख आणि गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले.

बांगलादेशमधून १० आतंकवादी भारतात घुसण्याच्या सिद्धतेत !

     नवी देहली - बांगलादेशातून १० आतंकवादी भारतात घुसण्याच्या सिद्धतेत आहेत, अशी माहिती बांगलादेशने भारताला या आतंकवाद्यांच्या नावांच्या सूचीसह दिली आहे. हे आतंकवादी १ जुलैला ढाकामध्ये झालेल्या आक्रमणात सहभागी असल्याची शक्यता आहे.
बंगालच्या मुसलमानबहुल मालदा जिल्ह्यात घुसू शकतात आतंकवादी !
      बांगलादेशातील आतंकवादी बांगलादेशातील सीमेवर असणार्‍या बंगालमधील मुसलमानबहुल मालदा जिल्ह्यात घुसू शकतात, या शक्यतेने येथील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. या जिल्ह्याची १७२ कि.मी. लांबीची सीमा बांगलादेशाला लागून आहे. येथे तारांचे कुंपण घालण्यात आलेले नाही. ४० कि.मी. सीमा केवळ नदी आणि तलाव यांनी व्यापली आहे. रात्रीच्या वेळी आतंकवादी या भागातून घुसखोरी करू शकतात. या जिल्ह्यात सध्या अमली पदार्थ, बनावट नोटा, शस्त्रांची तस्करी केली जाते. (ही तस्करी रोखू न शकणारे सुरक्षादल आणि सरकार आतंकवाद्यांना कसे रोखणार ? - संपादक)

२०० आतंकवादी भारतात घुसण्याच्या सिद्धतेत !

अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाल्यास देशातून एकालाही हज यात्रेला जाऊ
देणार नाही, अशी चेतावणी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती !
अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्याची शक्यता !
      श्रीनगर - सीमेवरून २०० जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये घुसण्याच्या सिद्धतेत आहे. अमरनाथ यात्रेवर आणि अन्यत्र मोठे आक्रमण करण्याच्या सिद्धतेत ते आहेत. या आतंकवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिजबुल मुजाहिदीन आणि जमात-उद-दावाचे सदस्य आहेत. आतंकवाद्यांची सीमा आणि आतल्या भागात आक्रमणाची योजना आहे. त्याद्वारे ते पर्यटनावर आघात करून राज्याची अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या माहितीमुळे सुरक्ष यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यांनी सर्व महत्त्वपूर्ण विद्यापिठांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस !

कोल्हापूर, नाशिक, 
जुन्नर, चंद्रपूर येथे पूरस्थिती 
 • नाशिक येथील गोदावरीला पूर
 • कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर
 • पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे ढगफुटी, मांडवीला महापूर
 • गडचिरोलीत पर्लकोटा नदीच्या पुरामुळे २०० गावांचा संपर्क तुटला
        पुणे, १० जुलै - मुंबई, कोकण, पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असा राज्यातील सर्वत्र ठिकाणी पावसाचा जोर कायम होता. एकूणच सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणांतील जलसाठाही वाढत चालला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील ओतूर येथे ढगफुटी झाली आहे. त्यामुळे मांडवी नदीला महापूर आहे. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे २०० गावांचा संपर्क तुटला आहे.
पुण्यातील ओतूर येथे ढगफुटी
        पुण्यातील जुन्नर तालुक्यातील ओतुर गावात ढगफुटी झाल्याने गुरव ठीके या भागातील भूमी वाहून गेली आहे. येथील मांडवी नदीला महापूर आल्याने या परिसरातील बंगले, शेती, जनावरांचे गोठे, घरे पाण्याखाली गेली आहेत. जुन्नरच्या पश्‍चिम आदिवासी भागात मुसळधार पाऊस पडत असून जवळपास १० गावांचा संपर्क तुटला आहे. कुकडेश्‍वर येथील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे घाटघरकडे कुकडेश्‍वर मार्गे जाणारी राज्य परिवहन मंडळाची बससेवाही बंद झाली आहे.

अन्वेषणातील आपची ढवळाढवळ म्हणजे सीबीआयच्या विश्‍वासार्हतेवरच शंका ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

डॉ. दाभोलकर हत्येची निष्पक्ष चौकशी करा आणि राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवा !
पुणे येथील राष्ट्रीय हिंदु आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची मागणी
      पुणे, १० जुलै (वार्ता.) - डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) अन्वेषण कार्यात आपच्या नेत्याने ढवळाढवळ करणे म्हणजे सीबीआयच्या विश्‍वासार्हतेवरच शंका उभी रहाते. सनातनची अपकीर्ती करण्यासाठी आपच्या नेत्यांचा वापर करण्यात आला. हिंदुत्वाचे कार्य नष्ट करण्यासाठी अंनिसने केलेले अनेक गैरव्यवहार सनातनने समोर आणले असल्यानेच अंनिस सनातनवर बंदीची मागणी करत आहे. खरे खुनी पोलिसांना मिळत नाहीत; म्हणून निर्दोष साधकांना अटक करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे. अटक केलेल्यांच्या विरोधात पुरावे मिळत नसल्याने खोटे साक्षीदार उभे केले जात असले, तरी साधकांच्या पाठीशी भगवंत आहे, असे प्रखर वक्तव्य सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी ९ जुलै या दिवशी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले.

स्वस्तिक हे चिन्ह ११ सहस्र वर्षे प्राचीन ! - संशोधकांचा निष्कर्ष

२ सहस्र आणि १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पंथियांनी हिंदु धर्माची प्राचीनता लक्षात घ्यावी !
     खरगपूर (बंगाल) - स्वस्तिक हे चिन्ह किमान ११ सहस्र वर्षे जुने आहे. हे चिन्ह आर्य संस्कृतीच्या आणि सिंधू संस्कृतीच्याही आधीपासून अस्तित्वात होते. पाश्‍चात्त्य आणि मध्यपूर्वेतील राष्ट्रांच्या संस्कृतींमध्येही त्याचा प्रसार झाला आहे, असा निष्कर्ष खरगपूरमधील आयआयटीमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनाअंती काढण्यात आला. 
     सामान्यतः आर्य संस्कृतीतील मानला जाणारा ऋग्वेद हा आर्यकाळाच्या कित्येक वर्षे पूर्वी म्हणजे हडप्पा संस्कृतीच्याही पूर्वी श्रुतींच्या स्वरूपात अस्तित्वात होता आणि त्यानंतर सिंधू संस्कृतीतून पुढे आला, असे स्वस्तिकाचा माग काढतांना शास्त्रज्ञांना आढळले. या अभ्यासाचे प्रमुख संशोधक जॉय सेन म्हणाले, आम्हाला हडप्पा संस्कृतीच्या पूर्वीच्या काळातही मुद्रांच्या स्वरूपातील सुस्पष्ट भौगोलिक स्वस्तिकाचे अस्तित्व आढळले. याच काळात वेदांमध्येही स्वस्तिकाचा उल्लेेख आढळतो. या गोष्टी पहाता भारतीय संस्कृती ही युरोपीय इतिहासकारांनी लिहिलेल्या पुस्तकांतील आजवरच्या उल्लेखापेक्षा अधिक जुनी असल्याचे स्पष्ट होते.

समाजाला अध्यात्माकडे वळवणार्‍या सनातनवर बंदी नको ! - प्रमोद मुतालिक

डावीकडून श्री. दयानंद राव, बोलतांना श्री. प्रमोद मुतालिक आणि अधिवक्ता चेतन मणेरीकर
हुबळ्ळी (कर्नाटक) येथे पत्रकार परिषद
      हुबळ्ळी (कर्नाटक) - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेल्या २० वर्षांपासून अध्यात्माची शिकवण देत आहेत. या संघटनांना सामाजिक प्रसारमाध्यमांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे कार्य जगातील १५० देशांत पसरले आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठांचे सरकार असूनही सनातनवर बंदी घालण्याचे त्यांनी चालवलेले प्रयत्न निंदनीय आहेत, अशी टीका श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथे केली. सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी येथे ९ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

लुटमार करणारे कार्यकर्ते पक्षाला अपकीर्त करत आहेत; मात्र पक्ष चालवायचा असल्याने मी दुर्लक्ष करत आहे ! - मुलायमसिंह यादव

सत्तेसाठी जनतेची लुटमार होऊ देणार्‍या अशा राजकीय पक्षांना जनता तरी का निवडून देते ? 
जनतेच्या लायकीप्रमाणेच त्यांना राज्यकर्ते मिळतात म्हणतात ते याचसाठी ! 
सर्वपक्षांची हीच स्थिती असल्याने देशातील लोकशाही निरर्थक ठरली आहे !
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - पक्षातील काही कार्यकर्ते पैसे कमवण्यासाठी लुटमार करू लागले आहेत. मला त्यांची माहिती आहे. त्यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे; मात्र पक्ष चालवायचा असल्याने, तसेच सरकार टिकवायचे असल्याने मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे विधान समाजवादी पक्षाचे संस्थापक तथा अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांविषयी केले आहे. ते पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. मुलायमसिंह यांच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य म्हणाले, आम्ही करत असलेला आरोप मुलायमसिंह यांनी स्वीकारला आहे. समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक राहिलेली नाही.हरिद्वार येथे मुसलमान तरुणाने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवले !

लव्ह जिहादची माहिती नाही, असे म्हणणारे केंद्रीय गृहमंत्री 
राजनाथसिंह या घटनेची माहिती घेतील का ?
      हरिद्वार - येथील ज्वालापूरमध्ये आफाक या मुसलमान तरुणाने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याची आणि तिचे धर्मांतर केल्याची घटना घडली. यानंतर हिंदूंनी येथील पोलीस ठाण्याला घेराव घालून विरोध केला. पीडित तरुणीला शोधून आणण्याची मागणी हिंदूंनी पोलिसांकडे केली. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना हे स्वत:चे कर्तव्य वाटत नाही का ? - संपादक) या प्रकरणी मुसलमान युवक आणि त्याच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यासह प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप !

       मुंबई, १० जुलै (वार्ता.) - विदर्भातील भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांनी ८ जुलै या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली; मात्र फुंडकर यांच्यावर राज्य सहकारी बॅँकेतील घोटाळ्यासह प्रतिज्ञापत्रात माहिती दडवल्याचे आरोप आहेत. असे असले तरी मंत्रिमंडळात जातीय समीकरणाचा समतोल राखण्यासाठीच त्यांची वर्णी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्यावरील आरोपांकडे दुर्लक्ष करून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
       राज्य सहकारी बँकेतील सुमारे १ सहस्र ६०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार राज्य शासनाने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून चौकशीचे आदेश दिले होते. त्यातून मोठा घोटाळा उघडकीस आला. प्राथमिक चौकशीत तत्कालीन संचालक मंडळ दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून सहकार विभागाने सहकार कायद्याच्या कलम ८८ अन्वये दोषी संचालकांवर हानीचे दायित्व निश्‍चित केले. या प्रकरणात तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील यांसह आजी, माजी ७६ संचालकांना दोषी ठरवण्यात आले. त्यात संचालक म्हणून भाऊसाहेब फुंडकर यांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोषींवर आर्थिक दायित्व निश्‍चित करण्यात आले. या घोटाळ्याची चौकशी सध्याही चालू आहे. असे असतांनाही भाऊसाहेब फुंडकर यांना कॅबिनेट मंत्री बनवून युती शासनानेही आघाडी शासनाप्रमाणे भ्रष्ट नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा कित्ता गिरवला.

डॉ. झाकीर नाईक यांच्या अटकेच्या हिंदुत्वनिष्ठांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम आज भोगावे लागत आहेत ! - डॉ. उपेंद्र डहाके, कल्याण शहर उपाध्यक्ष, भाजप

राष्ट्रीय हिंदु आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ
राष्ट्रद्रोही डॉ. झाकीर नाईक यांना अटक आणि पीस टी.व्ही.वर कारवाई करा !
ठाणे येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची मागणी !
     ठाणे, १० जुलै (वार्ता.) - हिंदूंच्या देवतांविषयी वादग्रस्त विधाने केल्याने अनेक गुन्हे इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्यावर आहेत. आतंकवादी कारवायांचा पुरस्कार केल्यामुळे इंग्लंड, मलेशिया आणि कॅनडा या देशांनी डॉ. झाकीर नाईक यांना प्रवेश बंदी केली आहे. ढाका येथेही निष्पाप नागरिकांना मारणार्‍या आतंकवाद्यांनी डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणातून प्रेरित झाल्याचे सांगितले. त्यांच्या अनधिकृतरित्या चालू असलेल्या पीस टी.व्ही.वर कारवाई करा, अशी मागणी होत आहे. गेल्या ४ वर्षांपासून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेली डॉ. झाकीर नाईक यांच्या अटकेच्या मागणीची शासनाने जर वेळीच नोंद घेतली असती, तर आज ही वेळ आली नसती, अशी खंत कल्याणचे भाजप शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी ठाणे येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात व्यक्त केली.

दंतेवाडा (छत्तीसगड) येथील भैरवबाबा मंदिरातून मूर्तींची चोरी !

हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
      दंतेवाडा - येथील भैरवबाबा मंदिर आणि अन्य मंदिरांतून श्री भैरव देव (नटराज) यांच्या पुरातन मूर्तींची चोरी झाली आहे. चोरट्यांनी दानपेटीला हात लावलेला नसल्याचे आढळून आले. या मूर्ती १०व्या शतकातील असल्याचे सांगितले जात आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपय मूल्य आहे. या देवतांवर तांत्रिकांची श्रद्धा असल्याने तांत्रिकांच्या एखाद्या आंतरराष्ट्रीय टोळीने ही चोरी केल्याचे संशय व्यक्त केला जात आहे.

चीनमध्ये मक्का येथील इमारतीची प्रतिकृती उभारण्यास सौदी अरेबियाचा विरोध !

मुसलमानांचे धर्मप्रेम !
      रियाध (सौदी अरेबिया) - चीनमध्ये सौदी अरेबियातील मक्का येथील इमारतीची प्रतिकृती उभारण्यात येत असून त्यास सौदी अरेबियाने विरोध दर्शवला आहे. 
१. सौदी अरेबियाचे राष्ट्राध्यक्ष सलमान बिन अब्दुल अजीज यांनी या इमारतीचे बांधकाम मागे न घेतल्यास अमेरिकेवर वर्ष २००१ मध्ये झालेल्या आक्रमणाप्रमाणे चीनवरही आक्रमण करू, तसेच चीनला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली आहे.
२. चीन याच वर्षी या इमारतीचे बांधकाम पूर्ण करणार असून मध्य चीनमधील ननचांग शहराजवळ या प्रतिकृतीची उभारणी होणार आहे.
३. चीनचे म्हणणे आहे की, या इमारतीची निर्मिती ही मुसलमान समाजासाठी आनंदवार्ता असेल. चीनचे पर्यटनमंत्री हू यान चाओ यांनी या इमारतीच्या निर्मितीचे दायित्व घेतले आहे. यावर सुमारे २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यय (खर्च) होणार आहे.
४. यापूर्वीही चीनमध्ये पॅरीसमधील आयफेल टॉवर, लंडनमधील टॉवर ब्रिज आणि अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा यांच्या प्रतिकृतीची निर्मिती करण्यात आली होती.

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्यास प्रत्येक शनिवारी बंदी !

धर्मपरंपरेप्रमाणे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश 
करण्यास प्रतिदिनच बंदी करावी, ही शनिभक्तांची अपेक्षा 
आहे ! धर्मपरंपरांचे रक्षण होण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
       सोनई (जिल्हा नगर), १० जुलै - स्त्री-पुरुष समानतेच्या सूत्रावरून श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलने झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे श्री शनिशिंगणापूर देवस्थानने श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांसह सर्वांना जाण्याची अनुमती दिली; परंतु सध्या श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता प्रत्येक शनिवारी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर दर्शनबंदी करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.
       गेल्या २ मासांपासून ही दर्शन व्यवस्था चालू झाली; मात्र श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर होणार्‍या प्रचंड गर्दीमुळे दर्शनासाठी मोठा गोंधळ आणि होणारी रेटारेटी यांमुळे भाविकांचा अपघात घडण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन देवस्थानने भाविकांच्या सुरक्षेसाठी गर्दीच्या काळात आणि प्रत्येक शनिवारी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांसह सर्वांनाच बंदी केली आहे.

कन्यागतच्या पहिल्या स्नानासाठी १० लक्ष भाविक अपेक्षित !

     नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर), १० जुलै (वार्ता.) - श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे ११ ऑगस्टपासून चालू होणार्‍या कन्यागत सोहळ्याची प्रशासन आणि मंदिर समिती यांच्या वतीने जय्यत सिद्धता चालू आहे. घाटांची उभारणी, घाटांवरील विद्युतीकरण, रस्ते, वाहनतळ यांसह अन्य विकासकामे जलदगतीने चालू आहेत. पहिल्या स्नानासाठी सुमारे १० लक्ष भाविक उपस्थित रहातील, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. कन्यागत महापर्वासाठी शासनाने १२१ कोटी ६७ लक्ष रुपयांचा निधी संमत केला आहे. पहिल्या टप्प्यात ६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
       कन्यागत महापर्व काळाचा मुख्य सोहळा शुक्लतीर्थ घाटावर होत असून याकरिता १०४ मीटर लांबीच्या घाटाची आकर्षक बांधणी करण्यात येत आहे. घाट उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या घाटावर एकाच वेळी ५० सहस्र भाविकांना स्नान करता येणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अशी १३ एकर परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराजवळील वाहनतळाच्या व्यवस्थेमुळे भाविकांना अल्प वेळेत स्नानासाठी घाटावर जाता येईल. १२ ऑगस्ट या दिवशी सूर्योदयाच्या वेळी श्रींच्या उत्सवमूर्तीचे स्नान होईल. गंगापूजनाचा विधी होईल. या वेळी तोफेची सलामी दिली जाईल. यानंतर सर्व घाटांवर भाविकांच्या स्नानास प्रारंभ होईल. यानंतर १७ सप्टेंबर २०१७ पर्यंत वर्षभर विविध पर्वणीवर स्नान होणार आहे.

त्र्यंबोली यात्रेत डॉल्बी यंत्रणेवर बंदी !

मशिदींवर प्रतिदिन पाच वेळा अवैधरित्या वाजणार्‍या 
भोंग्यांवरही अशीच बंदी आणावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
       कोल्हापूर, १० जुलै (वार्ता.) - शहरात डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिसांनी पाऊल उचलले आहे. शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी ८ जुलै या दिवशी याविषयी डॉल्बीमालक आणि चालक यांची बैठक घेतली. त्र्यंबोली यात्रा चालू असून या काळातही अनेक तालमींकडून डॉल्बीचा वापर केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉल्बीमालकांना सूचना करण्यात आल्या. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ही बैठक पार पडली. डॉल्बी लावल्यास मंडळाच्या पदाधिकार्‍यांसह डॉल्बीमालक, चालक, जनरेटर पुरवठा करणारे यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करू, असे राणे यांनी बैठकीत स्पष्ट केले. (न्यायालयाच्या आदेशानुसार नव्हे, तर अनेक वर्षांपासून अस्तित्त्वात असलेल्या कायद्याचा वापर करून डॉल्बी मालकांवर कारवाई करणारे पोलीस हवेत ! - संपादक)
       या वेळी उपअधीक्षक राणे म्हणाले, गतवर्षी शहरातील चारही पोलीस ठाण्यांच्या वतीने डॉल्बीचा वापर करणार्‍या मंडळांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी स्वत: तक्रारदार बनून मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, डॉल्बीमालक, चालक, जनरेटर मालक यांच्यावर गुन्हे प्रविष्ट केले आहेत. सर्व खटले सध्या न्यायप्रविष्ट आहेत. या वर्षीही त्र्यंबोली यात्रा आणि गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी साऊंड सिस्टीम (ध्वनीक्षेपक यंत्रणा) लावून ध्वनीप्रदूषण करणार्‍या मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयानेही याची गंभीर नोंद घेतली असून न्यायालयाच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल.

(म्हणे) चिथावणीखोर भाषण करणार्‍या सर्वांवरच कारवाई व्हायला हवी, मग ते झाकीर नाईक असोत किंवा जयंत आठवले !

 • महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात धर्मद्रोही निखिल वागळे आणि अन्वर राजन यांचा सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना हिंदुद्वेषी डॉ. झाकीर नाईक यांच्या पंक्तीत बसवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !
 • हिंदूंनो, तुमच्या संतांची अपकीर्ती कदापि सहन करू नका आणि संघटित होऊन हिंदुद्वेष्टे अन्वर राजन यांच्यावर कारवाई करण्यास शासनाला भाग पाडा !
हिंदुद्वेषी आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांचे हिरवे फुत्कार !

     मुंबई - चिथावणीखोर भाषण करणार्‍या सर्वांवरच कारवाई व्हायला हवी, मग ते झाकीर नाईक असोत किंवा जयंत आठवले, असे हिरवे फुत्कार हिंदुद्वेषी अन्वर राजन यांनी महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीवर ७ जुलै या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंदी घालावी का? या विषयावरील चर्चासत्रात काढले.

मराठी शाळा बचाव समितीच्या माध्यमातून मराठी शाळांसाठी आंदोलन छेडणार !

बेळगाव येथील मराठीप्रेमींच्या बैठकीत निर्णय
        बेळगाव, १० जुलै (वार्ता.) - मराठी शाळांना कर्नाटक शासन सापत्नभावाची वागणूक देत आहे. त्यामुळे मराठी शाळांना पुन्हा एकदा पाठबळ देण्यासाठी संघटित लढा देण्याचा निर्णय येथील मराठीप्रेमींच्या बैठीकीत घेण्यात आला आहे. मराठी शाळा बचाव समितीच्या माध्यमातून शहर आणि तालुके यांमधील मराठी शाळांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात जोरदार आवाज उठवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ९ जुलै या दिवशी येथील जत्तीमठ येथे मराठी शाळा बचाव समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष श्री. भाऊ गडकरी होते.
        श्री. गडकरी या वेळी म्हणाले की, सध्या सीमाभागातील मराठी शाळा अडचणीत आल्या आहेत. मराठी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर अन्याय होत आहे. याविषयी मराठी माणसानेच पुढे येण्याची आवश्यकता असून मराठी शाळा वाचवण्यासाठी व्यापक अभियान राबविल्याशिवाय शिक्षण खात्याला जाग येणार नाही. ही आणीबाणीची वेळ आहे. मराठी आणि कन्नडला वेगवेगळा न्याय दिला जात आहे. यासाठी वेळोवेळी उपक्रम हाती घेण्यात येतील. तालुका पंचायत सदस्य श्री. सुनील अष्टेकर म्हणाले की, मराठी शाळांसाठी कोणीच पुढे येत नाही. त्यामुळे भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी एकत्र येणे ही काळाची आवश्यकता बनली आहे. मराठी भाषिकांना भाषिक अल्पसंख्यांक म्हणून सर्व हक्क मिळाले पाहिजेत. त्यासाठी एकत्रित लढा हातात घेऊया.

भोजशाळेत श्री सरस्वतीदेवीची मूर्ती पुनर्प्रस्थापित करावी ! - स्वामी भारती महाराज यांची पंतप्रधान मोदी यांना विनंती

हिंदूंच्या संतांना पंतप्रधानांकडे अशी मागणी करावी लागते, हे हिंदूंना लज्जास्पद !
     इंदोर (मध्यप्रदेश) - वर्ष २००३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असतांना मध्यप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी भोजशाळेतील श्री सरस्वतीदेवीची मूर्ती इंग्लंडहून परत आणून ती धार येथील भोजशाळेत पुनर्प्रस्थापित करण्याचे आश्‍वासन दिले होते. ते आता पूर्ण करावे, अशी विनंती केरळ येथील क्षेत्र भूमी संरक्षण वेदीचे अध्यक्ष स्वामी भारती महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे.

अपप्रकारात अडकणार्‍या पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करणार ! - पोलीस अधीक्षक

भ्रष्ट पोलीस कर्मचार्‍यांमुळे 
पोलीस दलाची अब्रू चव्हाट्यावर !
        कोल्हापूर, १० जुलै (वार्ता.) - पोलीस दलातील लाचखोर वृत्ती मोडून काढण्यासाठी यापुढे कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अपप्रकारात अडकणार्‍या पोलिसांना निलंबित करण्याऐवजी त्यांना बडतर्फ करण्याचे धोरण राबवले जाणार आहे. झिरो पोलीस ही संकल्पना रहित केली जाणार असून अशा पोलिसांना हाकलून लावले जाईल. पोलिसांच्या जुन्या सवयी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकारांंना दिली.
        काही पोलिसांची लाचखोरी, लुटमारी, खंडणी, दहशत यामुळे पोलीस दलाची अपर्कीती होत आहे. अवैध कारभार करणारे पोलीस हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच आहेत; मात्र त्यांच्या कृत्यांमुळे संपूर्ण पोलीस दलाची अपर्कीती होत आहे. त्यामुळे अशी घाण काढून टाकली जाईल, असेही ते म्हणाले.

इसिसने रशियाचे विमान पाडल्याने २ वैमानिकांचा मृत्यू !

       दमास्क (सिरिया) - इसिसच्या आतंकवाद्यांनी गोळीबार करून रशियाचे एक हेलिकॉप्टर पाडल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने दिली आहे. यात २ वैमानिकही ठार झाले आहेत. या हेलिकॉप्टरमधील दारूगोळा संपल्यामुळे आतंकवाद्यांना आक्रमण करता आले. हेलिकॉप्टर पडल्यावर आतंकवाद्यांनी अल्ला महान आहे, असे म्हटल्याचे या संदर्भातील व्हिडिओमध्ये दिसत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. गेल्या वर्षीपासून रशियाचे सैन्य सिरियाच्या समर्थनार्थ येथे इसिसशी लढत आहे.

भोजपूर (बिहार) येथे पैगंबरांच्या संदर्भात फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे धर्मांधांकडून हिंसाचार !

स्वतःच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यावर मुसलमान तक्रार किंवा निवेदने देत नाही, तर थेट कायदा 
हातात घेऊन हिंसाचार घडवतात आणि त्या विरोधात एकही निधर्मीवादी तोंड उघडत नाही !
     भोजपूर (बिहार) - येथे ८ जुलै या दिवशी फेसबूकवर पैगंबर यांच्याविषयीचे आक्षेपार्ह चित्र शेअर केल्याच्या आरोपावरून धर्मांधांनी हिंसाचार केला. चित्र शेअर करणार्‍या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. धर्माधांनी अनेक दुकाने जाळली आणि दगडफेकही केली. यात काही पोलीस अधिकारी घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी दंगलखोर धर्मांधांवर गोळीबार केला.मध्यप्रदेशातील भोपाळसह २५ जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती !

      भोपाळ - मध्यप्रदेशात गेल्या ३ दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोपाळसह २५ जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती आहे. पावसामुळे विविध दुर्घटनांत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. दीड लाख लोकांना पावसाचा फटका बसला आहे. ४००० जणांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे. नर्मदेच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. देवासमध्ये नर्मदा नदी धोक्याच्या पातळीपेक्षा ५ फूट उंचीवरून वहात आहे. अनेक भागांत अन्नपदार्थांचा तुटवडा जाणवत आहे. सैन्याच्या २ पथकांमार्फत येथे बचावकार्य करण्यात येत आहे.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७ मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र येथे गेल्या ३ दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

केरळमधून गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेले १५ मुसलमान युवक इसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय !

आतंकवाद्यांना धर्म असतो !
       थिरूवनंतपुरम् - केरळच्या कासारगोड आणि पलक्कड येथील १५ सुशिक्षित मुसलमान तरुण गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता आहेत. हे तरुण सिरियामध्ये जाऊन इसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली; मात्र त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांत याविषयी अजून तक्रार केलेली नाही. यातील काही तरुण आधुनिक वैद्य आणि अभियंते आहेत.

बांगलादेशमधील पीडित हिंदूंना साहाय्य करण्यास विश्‍व हिंदु परिषदेचा पुढाकार !

पाणी नाकापर्यंत पोचल्यावर अभियान राबवणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटना !
बांगलादेशमधील सर्व ६४ जिल्ह्यांत हिंदू जनजागरण मोहीम राबवणार !
       बांगलादेशात रवींद्र घोष यांची बांगलादेश मायनॉरिटी वॉच संघटना गेली कित्येक वर्षे हिंदूंवरील आघातांच्या विरोधात लढा देत आहे. तेथील हिंदूंची दुर्दशा त्यांनी भारतात येऊनही मांडली आहे; परंतु या संदर्भात कारवाई सोडाच; पण त्यांना अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी भारत सरकारनेच यावर्षी व्हिसा नाकारला, ही दुर्दैवी घटना आहे.
       नवी देहली - बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्य आणि विखुरलेले असल्याने तेथील धर्मांधांच्या अत्याचारास सहज बळी पडत आहेत. गेल्या काही मासांत हिंदूंवरील धर्मांधांच्या आक्रमणांत वाढ झाली असून अनेक हिंदूंच्या हत्या झाल्या आहेत. विश्‍व हिंदु परिषदेने बांगलादेशमधील सर्व ६४ जिल्ह्यांत मिशन बांगलादेश अभियान चालू करण्याचे ठरवले असून त्याद्वारे हिंदूंच्या मनातील भीती दूर करण्याचे आणि त्यांची दशा जगासमोर मांडण्याचे प्रयत्न विश्‍व हिंदु परिषद करणार आहे.

ध्वनीप्रदूषणाचे नियम सर्वच धार्मिक स्थळांना लागू ! - मुंबई उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

 • मंदिर प्रवेशप्रकरणी तात्काळ कार्यवाही करणारे राज्य सरकार मशिदींवरील भोंग्यांसंबंधीच्या या निर्णयाची तत्परतेने कार्यवाही करणार का ?
 • हे न्यायालयाला सांगावे लागते, हे सरकारसाठी लज्जास्पद आहे !
       मुंबई, १० जुलै - ध्वनीप्रदूषण नियंत्रणाचे नियम विशिष्ट धर्मापुरते मर्यादित नाहीत, तर ते सगळ्याच धार्मिक स्थळांना लागू असल्याचे उच्च न्यायालयाने ८ जुलै या दिवशी पुन्हा एकदा स्पष्ट केले. मशिदींवरील अवैध भोंग्यांविषयीच्या याचिकेवरील युक्तीवादाच्या वेळेस न्यायालयाने हे स्पष्ट केले. याचसमवेत राज्यातील शांतता क्षेत्रात एकीकडे ध्वनीप्रदूषणाला पूर्णपणे बंदी असतांना ज्या इमारतींमुळे शांतता क्षेत्र जाहीर करण्यात आलेले आहे, त्यातील ध्वनीप्रदूषणाविषयीची कायदेशीर तरतूद स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
       बांधकामांच्या ठिकाणी होणारे ध्वनीप्रदूषण, धार्मिक स्थळी ध्वनीक्षेपक लावल्याने होणारे प्रदूषण, उत्सवांतील ध्वनीप्रदूषण, वाहनांचे ध्वनीप्रदूषण, शांतता क्षेत्राचे ध्वनीप्रदूषण नियम आदी विविध प्रकारच्या ध्वनीप्रदूषणांविषयी करण्यात आलेल्या याचिकांवर सध्या अंतिम सुनावणी चालू आहे. या सुनावणीच्या वेळेस शांतता क्षेत्राच्या नियमांतील विसंगती आवाज फाऊंडेशनच्या वतीने अधिवक्ता दरायस खंबाटा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. विकास आराखडा बनवतांना ध्वनीमापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेने ते केले आहे का, अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली आहे. त्यावर या संदर्भातील न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले जाईल, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
(संदर्भ - लोकसत्ता)

श्री एकवीरादेवीच्या कार्ला गडाच्या पायर्‍यांचा भराव ढासळला

       पुणे, १० जुलै - येथील लोणावळ्याच्या जवळील श्री एकवीरादेवीच्या गडावर जाणार्‍या मार्गाच्या काही पायर्‍यांचा भराव ८ जुलै या दिवशी रात्री ढासळल्याने काही मोठे दगड खाली असलेल्या दुकानाजवळ येऊन पडले. मागील १५ दिवसांपासून श्री एकवीरादेवीच्या गडावर सातत्याने दरडी पडत आहेत. वारंवार दगड पडत असल्याने, तसेच भराव खचत असल्याने गडावर धोका वाढला आहे. मागील वर्षी २१ जून २०१५ च्या रात्री मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात दगड पडून मंदिर कार्यालयाची हानी झाली आहे. येथील सुरक्षा भिंतही पडली होती, त्या वेळीही पायर्‍या खचल्या होत्या. (पुरातत्व विभाग आणि तालुका प्रशासन यावर उपाययोजना करणार का ? - संपादक)

आसाममध्ये ५ बांगलादेशी आतंकवाद्यांची घुसखोरी !

       गुवाहाटी - आसाममध्ये मेघालयाच्या मार्गाने ५ बांगलादेशी आतंकवादी घुसल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. हे आतंकवादी गुवाहटीमध्ये मोठे आक्रमण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे येथील विमानतळ, मंदिरे, मॉल आदी ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बांगलादेश सीमेजवळील धुबडी, करीमगंज आणि कछार येथे अतीसतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

स्त्रियांनो, स्वत:तील शक्तीस्वरूप ओळखून राष्ट्ररक्षणासाठी सज्ज व्हा !

    काश्मीर येथील कुपवाडा जिल्ह्यात देशाचे रक्षण करतांना आतंकवाद्याच्या आक्रमणात कर्नल संतोष महाडिक धारातिर्थी पडले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या वीरपत्नी श्रीमती स्वाती महाडिक यांनी हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवासमोर मी आणि माझी मुले सैन्यातच भरती होऊन देशसेवा करणार, अशी प्रतिज्ञा केली होती. ती प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरवत श्रीमती महाडिक या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची खडतर परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि पुढील प्रशिक्षणासाठी दाखलही झाल्या. या प्रशिक्षणानंतर त्या सैन्याच्या २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अधिकारी म्हणून सहभागी होणार आहेत.

नवनिर्वाचित मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून वारकर्‍यांची क्षमायाचना

       पंढरपूर, १० जुलै - पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वारकर्‍यांना ताटकळत रहावे लागल्याने नव्यानेच मंत्रीपदाची शपथ घेणारे सुभाष देशमुख यांना वारकर्‍यांची असुविधा झाल्याविषयी क्षमा मागितली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर १० जुलै या दिवशी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यासाठी प्रशासनाकडून दर्शनाची रांग ३० मिनिटे थांबवण्यात आली. त्यामुळे ४ घंट्यांहून अधिक काळ दर्शनाच्या रांगेत ताटकळलेल्या भाविकांना आणखी ३० मिनिटे थांबावे लागले. या सर्व प्रकारामुळे अनेक वारकरी आणि भाविक संतापलेे होते.

ऋषींनी सहस्रो वर्षांपूर्वी लक्षावधी लोकांचे भविष्य लिहून ठेवल्याचे महत्त्व आणि राज्यकर्त्यांची उदासीनता

श्री. राम होनप
     जगप्रसिद्ध ७ आश्‍चर्यांविषयी विचार केला, तर त्या मानवनिर्मित रचना असून त्यात इजिप्तमधील पिरॅमिड, चीनची भिंत, तेजोमहल (ताजमहाल) इत्यादींचा समावेश आहे. या रचनांचा बुद्धीने अभ्यास करता येतो, म्हणजे या रचनेची निर्मिती कोणी केली ? कधी केली ? कशी केली ? इत्यादी माहिती मिळते. एखाद्या गोष्टीचा बुद्धीने उलगडा करता येत नसेल, तर मनुष्य काय आश्‍चर्य आहे ?, असे म्हणतो; परंतु जगातील ७ आश्‍चर्यांची काही ना काही वैशिष्ट्ये असली, तरीही यात खरेच आश्‍चर्य मानण्यासारखे काय आहे ?, याचेच आश्‍चर्य वाटते.
     याउलट ऋषींनी सहस्त्रो वर्षांपूर्वी काही लक्ष लोकांचे भविष्य ताडपत्रींवर लिहून ठेवले आहे. त्यातील ठळक वैशिष्ट्य, म्हणजे त्यात मनुष्याच्या भूतकाळात घडलेल्या चांगल्या-वाईट घटना, सध्याचे चालू वय, संपूर्ण नाव, रास, त्याला असलेला आजार, भविष्यकाळातील घटना, तसेच पुढील जन्म या विषयीची अचूक आणि परिपूर्ण माहिती दिली आहे. या लिखाणातील सत्यता आतापर्यंत लाखोंनी अनुभवली आहे. असे कसे घडू शकते ?, या विषयी साहजिकच मनुष्य आश्‍चर्य व्यक्त करतो. भारतात अशी अनेक आश्‍चर्ये आहेत; परंतु आतापर्यंतच्या अधर्मी राज्यकर्त्यांनी अशा गोष्टींना कधीच महत्त्व दिले नसल्याने जगाला या गोष्टींविषयी ज्ञान नाही. हिंदु राष्ट्रात अशा आश्‍चर्यांची नवीन सूची बनवली जाईल आणि त्यांचे श्रेष्ठत्व जग आपोआपच मान्य करील. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.५.२०१५) 

देवतांच्या मूर्तींच्या विटंबनेविषयी चीड असणारे स्वामी विवेकानंद !

बोधकथा
बालकांसाठी परिपाठ !
     स्वामीजी त्यांच्या शिष्यांसह काश्मीरला गेले होते. तेथे क्षीर भवानीच्या मंदिराचे भग्न अवशेष त्यांनी पाहिले. अत्यंत विषण्ण होऊन स्वामीजींनी स्वत:च्या मनाला विचारले, जेव्हा हे मंदिर भ्रष्ट आणि भग्न केले जात होते, तेव्हा लोकांनी प्राणपणाने प्रतिकार कसा केला नाही ? जर मी तेथे असतो, तर मी अशी निंद्य घटना होऊ दिली नसती. देवीमातेच्या रक्षणार्थ मी माझ्या प्राणाची आहुती दिली असती ! या प्रसंगातून स्वामीजींचे देवी भगवतीवरचे प्रेम दिसून येते !!
    मुलांनो, देवळे ही ईश्‍वरी चैतन्याचा पुरवठा करणारी स्थाने आहेत. त्यांचे पावित्र्य राखा, तसेच ती भ्रष्ट होऊ देऊ नका !

सनातनवरील संभाव्य बंदीला मान्यवरांचा विरोध

सनातनच्या पाठीशी खंबीरपणे 
उभे रहाणार्‍या वारकर्‍यांचे आभार !
       डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या प्रकरणी कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने सनातन संस्थेला दोषी ठरवलेले नाही. तरी काही हिंदुद्रोही राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी संघटना यांच्याकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची अन्याय्य मागणी करत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर विविध वारकरी संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटना यांनी सनातनच्या पाठीशी ठाम उभे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी ठामपणे उभा 
आहे ! - ह.भ.प. भानुदास महाराज ढवळीकर, माजी अध्यक्ष,
श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज
       सनातन संस्था ही व्यापक स्वरूपात कार्य करत आहे. त्यांचे साधक आम्हाला बर्‍याच कार्यकाळापासून भेटत आहेत, तसेच आम्हीही त्यांना बर्‍याच कालावधीपासून भेटत आहोत. वारकरी संप्रदायाच्या विचारधारेला धरूनच सनातन संस्थेचे कार्य आहे. सनातन संस्था बंद करू नये किंवा त्यांच्यावर असे संकट आणू नये. सनातन संस्था धर्म आणि अध्यात्म प्रसाराचे उत्तम कार्य करत आहे. शासनाने सनातन संस्थेवर बंदी घालू नये; कारण संस्था अतिशय चांगले कार्य करत आहे. वारकरी संप्रदाय सनातन संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना नाहक अडकवून छळणे योग्य नाही. या बाबींचा शासनाने योग्य तो विचार करावा.
सनातनला नाहक अडकवण्याचा प्रयत्न केला 
जाणे, हे अत्यंत अयोग्य ! - ह.भ.प. किसन महाराज साखरे
       सनातन संस्थेचे कार्य आम्ही फार पूर्वीपासून पहात आहोत. सनातनचे कार्य अतिशय चांगले आहे. प.पू. डॉ. आठवले यांनी चालू केलेले कार्य आता व्यापक स्वरूपात पोहोचले आहे. सनातन संस्थेला आमचा पाठिंबा आहे. सध्याच्या प्रकरणात सनातनला अडकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, हे अत्यंत अयोग्य आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) यावे, ही श्रीकृष्णाचीच इच्छा !

      देहधारी कृष्ण आता नाही, तर धर्मसंस्थापना, म्हणजे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) निर्मितीचे कार्य कसे होणार ?, असे काही जणांना वाटते. श्रीकृष्ण काही संत आणि महान गुरु यांच्या रूपात अस्तित्वात आहे. द्वापरयुगात श्रीकृष्णाने अपवादप्रसंगी युद्धात शस्त्र न वापरताही धर्मसंस्थापना केली. आता तो अस्तित्वरूपाने कार्य करत असून आपल्याला ते मायेच्या पडद्यामुळे कळत नाही. हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) यावे, ही तर श्रीकृष्णाचीच इच्छा आहे. त्याचे सुदर्शनचक्र काळरूपाने फिरत आहे. याचा प्रत्यय हळूहळू सगळ्यांना येऊ लागेल. जनहो, श्रीकृष्णाच्या कार्यात सहभागी होऊन याचा अनुभव घ्या ! - श्री. राम होनप (२३.१.२०१६)

संत आणि ज्ञानप्राप्ती

२. मोजक्या संतांनाच ज्ञानप्राप्ती होण्यामागील कारण
प्रश्‍न : सत्त्वगुण ज्ञानस्वरूप असतो; परंतु मोजक्या संतांनाच ज्ञानप्राप्ती झालेली आढळते, असे का ? 
उत्तर : प्रत्येक संतांचे कार्य ठरलेले असते. ज्ञानप्राप्ती ही दैवी देणगी असून ज्ञान प्रगट होणे न होणे, हे केवळ गुरूंच्या किंवा ईश्‍वराच्या हातात असते, अन्यथा ते ज्ञानकण संतांच्या ठायी अप्रगट अवस्थेत वास करतात. 
३. ज्ञान आणि कार्य यांचा संबंध : जेव्हा ज्ञान पूर्ण प्रगट होते, तेव्हा आद्यशंकराचार्यांप्रमाणे कार्य घडते.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१.२०१६)

सर्वधर्मसमभावचा खरा अर्थ काय ?

     सर्वधर्मसमभाव याचा अर्थ आपल्या धर्माविषयी उदासीनता बाळगणे, असा होत नाही. मध्यप्रदेशमधील भोजशाळेत, म्हणजे सरस्वती मंदिरात मुसलमान समाजाला प्रत्येक शुक्रवारी नमाज पढण्यासाठी अनुमती दिली गेली; मात्र हिंदूंच्या गणपतीच्या मिरवणुकीला मशिदीसमोरून जाण्यास अनुमती दिली जात नाही. - श्री. दुर्गेश परुळकर (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१३)

गुरुपौर्णिमेला ८ दिवस शिल्लक

देवाने हृदयात सगळे भाव दिले; पण समाधान फक्त गुरुच देतो ! - संत भक्तराज महाराज

जीवनातील विविध कष्ट झेलतांना साधनेचे महत्त्व कळल्यावर मुलींना साधनेसाठी प्रेरित करणारे श्री. संजय धोतमल आणि सौ. संगीता धोतमल यांची त्यांच्या मुलींना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये !

श्री. संजय धोतमल आणि सौ. संगीता धोतमल
        कोरेगाव, सातारा येथील सनातनचे साधक श्री. संजय धोतमल आणि सौ. संगीता धोतमल यांच्या विवाहाला आज ११ जुलै २०१६ ला २५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या त्यांच्या कन्या कु. प्राजक्ता आणि कु. प्रेरिता धोतमल यांनी लिहून दिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
श्री. संजय धोतमल आणि सौ. संगीता धोतमल यांना लग्नाच्या 
२५ व्या वाढदिवसाप्रीत्यर्थ सनानत परिवाराकडून शुभेच्छा !

अन्य संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील भेद !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
       संतांची तुलना करू नये, असा एक सर्वसाधारण नियम अध्यात्मात वाटचाल करणार्‍यांना लागू असतो. याचे कारणही सबळ आहे; कारण आपल्याला संतांची खोली मोजता येणे अवघड असते. आपले जे काही अध्ययन असते, ते वरवरचे असते. त्यामुळे साधकाने तसे करता कामा नये, तरीही येथे काही सूत्रे मांडावीशी वाटली, ती कुणा संतांना न्यूनपणा देण्यासाठी नव्हे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निराळेपण काय आहे ?, हे सुलभतेने अभ्यासता यावे यासाठी ! त्यासाठीच हा लेखप्रपंच आहे.
१. स्वतः वेशभूषेत न अडकणे 
आणि साधकांनाही त्यात न अडकवणे
       अन्य संप्रदाय किंवा संत यांच्याकडे वेशभूषेच्या संदर्भात काही नियमावली असते. काही ठिकाणी भगवे वस्त्र धारण करणे आवश्यक असते, काही ठिकाणी धोतर अनिवार्य असते. प.पू. डॉक्टर मात्र कुठल्याही वेशभूषेत अडकले नाहीत आणि त्यांनी साधकांनाही अडकवले नाही. हिंदु संस्कृतीनुसार वेशभूषा करावी, अशी त्यांनी शिकवण दिली; मात्र त्याचा आग्रह धरला नाही. सहजावस्थेतसुद्धा अध्यात्म जगता येते, हे त्यांनी दाखवून दिले.

वर्ष २०१७ पासून सनातनने स्त्रीसंघटनाला महत्त्व देणे आवश्यक असल्याची कारणे

१. कलियुगातील हा काळ स्त्रीसंघटनासाठी अनुकूल आहे !
     सनातनने वर्ष २०१७ पासून स्त्रीसंघटनाला प्राधान्य द्यावे; कारण हा काळ त्या कार्यासाठी अनुकूल आहे. कलियुगात स्त्रियांची ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती पुरुषांपेक्षा अल्प असली, तरी त्यांची इच्छाशक्ती पुरुषांपेक्षा अधिक आहे. या स्त्रिया व्यक्तीगत साधना चांगली करून समष्टी कार्यही जोमाने करतील. 
२. स्त्रीसंघटनाचे कार्य केल्याने त्याचा विजयासाठी (हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी) लाभ होणार आहे ! 
     स्त्रीमूलं शक्तिः पुरुषस्य मूलं बलम् ।
     स्त्रीसङ्घटनकरणेन लाभो (भविष्यति) विजयाय ॥ 
अर्थ : स्त्रीचे मूळ शक्तीत, तर पुरुषाचे मूळ बळात आहे. स्त्रीसंघटनाचे कार्य केल्याने त्याचा विजयासाठी (हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी) लाभ होणार आहे. 
प्रश्‍न : स्त्रीचे मूळ शक्तीत, तर पुरुषाचे मूळ बळात आहे. यांमध्ये शक्ती आणि बळ यांत भेद काय ?
उत्तर : शक्तीने शरिराला बळ प्राप्त होते. शरिराचे बळ संपले की, शक्ती अल्प होते; पण शक्ती संपली, तर मृत्यू येतो.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.७.२०१६)


अत्यंत कठीण परिस्थितीतही देवावर श्रद्धा ठेवून स्थिर रहाणार्‍या आणि उतारवयातही स्वावलंबी असणार्‍या रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी (वय ९३ वर्षे) !

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
         १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.
         पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी (वय ९३ वर्षे) यांच्या जीवनाचा खडतर प्रवास, त्यांच्यावर आलेले कठीण प्रसंग आणि त्यांनी त्या प्रसंगांवर देवाच्या कृपेने कशी मात केली, यांविषयी त्यांच्या सूनबाई सौ. कविता शहाणे यांना जाणवलेली सूत्रे आणि पू. आजींची वैशिष्ट्ये येथे देत आहोत.

रत्नागिरी येथील सौ. कविता शहाणे यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

सौ. कविता शहाणे
१. शारीरिक त्रास न्यून होण्यासाठी वैद्यांनी दिलेली औषधे घेण्यास प्रारंभ केल्यावर त्याचा अपेक्षित परिणाम दिसून न येणे : अंगाला प्रचंड खाज येणे आणि संपूर्ण शरिरावर लाल पुरळ उठणे, असा त्रास मला वर्ष २००१ पासून होत होता. नामजप आणि सर्वांसाठीचेही उपाय नियमित केल्याने त्रासाचे प्रमाण न्यून-अधिक होत असे. संपूर्ण अंगाला खाज येणे, छातीत प्रचंड जळजळणे, चालतांना पाय जड होणे, उजवा हात, खांदा अन् डोक्याची उजवी बाजू पुष्कळ दुखणे, गिळतांना त्रास होणे, डोकेदुखी, शरिराला सूज येणे, शरीर, तसेच हात-पाय आणि तोंडवळा लाल होणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे, काही वेळा भूक न लागणे, भूक लागल्यावर जेवल्यास पोट फुगणे, चक्कर येणे, रात्री झोप न लागणे, अंगदुखी आणि थकवा येऊन ग्लानी येणे, असे त्रास होत असत. हे त्रास न्यून होण्यासाठी वैद्यांचा समुपदेश घेऊन त्यांची औषधे घेण्यास आरंभ केला. त्यांनी वैद्यकीय चाचण्या केल्या; पण अहवाल सर्वसाधारण होते. वैद्यांनी दिलेली औषधे घेतली; पण त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येत नव्हता. औषधोपचार योग्य असल्याचे वैद्यांनी दोन वेळा सांगितले.

साधकांनो, साधनेत अडथळा ठरणारा दिवसभरात घडलेला अप्रिय प्रसंग शोधून त्यावर तत्कालीन सूचना घ्या आणि साधनेचा अमूल्य वेळ वाचवा !

पू. अशोक पात्रीकर
      सर्वसाधारण साधकांचा अनुभव असतो की, दिवसातील काही काळापर्यंत नामजप, लिखाण, सत्र, सेवा, इतरांशी बोलणे, असे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न चांगले चालू असतात अन् अकस्मात् हळूहळू त्या प्रयत्नांत शिथिलता यायला लागते. त्याचे कारण तेव्हा कळत नाही. त्यानंतरच्या कालावधीत दिवसभर कोणतेच प्रयत्न करावेसे वाटत नाहीत. दुसर्‍या दिवशीही असेच होते आणि असे काही दिवस होत गेले की, नंतर नकारात्मक विचारांत वाढ होत जाते.
१. दिवसभरात केव्हातरी मनाविरुद्ध घडलेल्या प्रसंगामुळे मन निराश होणे आणि त्याचा परिणाम साधनेतील प्रयत्नांवर होणे : अशा वेळी आपल्या मनाचा अभ्यास करावा. दिवसभरात प्रत्येक गोष्ट जर आपल्या मनाप्रमाणे घडत असेल, तर तोपर्यंत सर्व प्रयत्न चांगले होत असतात, असे लक्षात येते; पण एखादा प्रसंग मनाविरुद्ध घडला की, त्याचा परिणाम नंतरच्या सर्व प्रयत्नांवर होतो आणि मन निराश होते. बर्‍याचदा हा प्रसंग क्षुल्लकही असू शकतो. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे असू शकतात.
अ. सकाळी तातडीच्या सेवेसाठी लवकर जायचे असते आणि अंघोळीला जायच्या वेळी स्नानगृह रिकामे नसते.

विकार-निर्मूलन आणि साधनेतील अडथळे यांवर उपयुक्त : सर्वबाधानाशक यंत्र !

१. यंत्राची उपयुक्तता
       सातत्याने आजारी पडून किंवा दुखापत होऊन साधनेत अडथळे येणे, आध्यात्मिक त्रास होणे किंवा सेवा करतांना सेवेशी संबंधित उपकरण, वाहन इत्यादी बंद पडणे किंवा अन्य काही अडचणी येणे, यांवर हे यंत्र उपयुक्त आहे.
२. यंत्र काढण्यासंबंधी सूचना
       यंत्र काढण्यासाठी ६० टक्के वा त्याहून अधिक पातळीचा किंवा भाव असलेला; पण वाईट शक्तीचा त्रास नसलेला साधक उपलब्ध असल्यास त्याच्याकडून हे यंत्र काढून घ्यावे. हे शक्य नसल्यास स्वतः काढावे.
३. यंत्र काढण्याची पद्धत
अ. यंत्र काढण्यापूर्वी हात-पाय धुवावेत.
आ. यंत्राचा हेतू सफल होण्यासाठी उपास्यदेवतेला प्रार्थना करावी.

भावसुमने !

भावाच्या परडीत, कृतज्ञतापूर्वक ।
प्राजक्ताची सुमने बनवूनी, तुझ्या चरणी वाहिली जाऊ दे ॥ १ ॥
भावपूर्ण नामजपाच्या तुळशीमाळा बनवूनी ।
तुझ्या गळ्यात घालता येऊ दे ॥ २ ॥
निर्मळ मनाने (षड्रिपूविरहित) तुझ्या चरणाशी ।
रांगोळी रेखाटली जाऊ दे ॥ ३ ॥
त्यागरूपी मोती बनवूनी तुझ्या चरणी ।
मला अर्पण करता येऊ दे ॥ ४ ॥
तुझ्याप्रती तळमळ भक्तीभाव वाढवूनी ।
पैंजण बनवूनी तुझ्या चरणांवर घालता येऊ दे ॥ ५ ॥

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने 
प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध ! 
        स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे.
१. राष्ट्रप्रतिकांचा अवमान ही राष्ट्रहानी ! आणि क्रांतीकारकांचा मूलमंत्र - वन्दे मातरम् । ही ए ५ आकारातील पाठपोट दोन हस्तपत्रके. (क्रांतीकारकांचा मूलमंत्र - वन्दे मातरम् हे पत्रक छापायचे कि नाही, हे जिल्ह्यातील उत्तरदायी कार्यकर्ते जिल्ह्यातील आवश्यकतेनुसार ठरवू शकतात.)
२. ए-२ आकारातील भित्तीपत्रक (कलाकृती सोबत दिली आहे)

साधकांना सूचना !

लग्नपत्रिकेत वधू-वरांच्या नावांच्या खाली 
नातेवाइकांची नावे लिहितांना ती याप्रमाणे लिहा !
       लग्नपत्रिकेत वधू-वर यांच्या नावांच्या खाली त्यांच्या नातेवाइकांची नावे लिहिलेली असतात. त्यामध्ये काही वेळा स्त्रियांची नावे आधी आणि पुरुषांची नावे नंतर लिहिलेली असतात, उदा.
सौ. स्नेहा श्रीहरि जोशी                      श्री. श्रीहरि सीताराम जोशी
सौ. सुमेधा सुनील जोशी                     श्री. सुनील सीताराम जोशी
       अशा प्रकारे नावे लिहिण्याऐवजी पुरुषांची नावे आधी आणि स्त्रियांची नावे नंतर लिहावीत, उदा.
श्री. श्रीहरि सीताराम जोशी                  सौ. स्नेहा श्रीहरि जोशी
श्री. सुनील सीताराम जोशी                  सौ. सुमेधा सुनील जोशी

फलक प्रसिद्धीकरता

देशद्रोह्यांना 
श्रीनगरच्या लाल चौकात फाशी द्या !
       आतंकवादी बुरहान मुझफ्फर वाणीला ठार करण्याच्या कारणावरून देशद्रोही धर्मांधांनी काश्मीरमध्ये हिंसाचार केला. त्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण आणि लूटमार केली, यात्रेकरू महिलांवर बलात्कार केले. सैनिकांवर झालेल्या दगडफेकीत ९६ सैनिक घायाळ झाले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Kashmirme deshdrohiyodwara Amarnath yatriyopar akraman, mahilayopar balatkar aur sainikopar pathrav kiya gaya.
Aise dharmandhoko faasi deneki mang karo
जागो ! : कश्मीर में देशद्रोहियों द्वारा अमरनाथ यात्रियों पर आक्रमण, महिलाआें पर बलात्कार और सैनिकों पर पथराव किया गया.
ऐसे धर्मांधों को फांसी देने की मांग करो !


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
तीर्थयात्रा
पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा 
आपल्याला परत येण्याची इच्छा होते; म्हणून 
म्हणतात, इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।
भावार्थ : इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं । म्हणजे पंढरपूरला जाणार, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्‍वराच्या भेटीपेक्षा भेट होणार यात जास्त आनंद आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

खरी वास्तुशुद्धी !

१. सर्वसाधारण व्यक्ती : यांना आपण रहातो ती वास्तू, असे वाटते आणि तिच्यासाठी आवश्यक असल्यास ते वास्तुशुद्धी विधी करतात.
२. व्यष्टी साधना करणारे : यांना शरीर, मन आणि बुद्धी ही आत्म्याची वास्तू वाटते आणि ते त्यांच्या शुद्धीसाठी प्रयत्न करतात.
३. समष्टी साधना करणारे : यांना राष्ट्र ही वास्तू वाटते आणि ते तिच्या शुद्धीसाठी प्रयत्न करतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     राजकारणी शब्दाचा अर्थ आहे मुत्सद्दी; पण कलियुगातील हल्लीचे राजकारणी राष्ट्र किंवा धर्म यांच्यासाठी मुत्सद्देगिरी न करता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी करतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

बाह्यरूपापेक्षा आत्म्याचे रूप महत्त्वाचे ! 
नुसते बाह्यरूपच देखणे असून काय उपयोग ? आत्माही तेवढाच देखणा हवा ! दिव्याची काच घासून पुसून ठेवली; पण त्यात ज्योतच नसेल, तर त्याचा काय उपयोग ? 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

धगधगते काश्मीर

संपादकीय
      जम्मू-काश्मीर हे भारताचे नंदनवन म्हणून एकेकाळी प्रसिद्ध होते. तेथील निसर्गसौंदर्यावर मोहीत होऊन अनेक पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र म्हणून काश्मीर दिमाखाने मिरवत होते; मात्र ते सौंदर्य झाकोळले जाईल, अशी स्थिती गेल्या दोन दशकांत निर्माण झाली आहे. जिहादी आतंकवादाने काश्मीर रक्तरंजित झाला आहे. तेथील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे, हे अवघा देश पहात आहे. नित्यनेमाने सेना दलांवर होणारी दगडफेक, भारतविरोधी घोषणा, आतंकवाद्यांना प्रोत्साहन आदी घटनांमुळे काश्मीर भारतात आहे कि शत्रूराष्ट्र पाकमध्ये, असा प्रश्‍न न रहावून पडतो. हिजबुल मुजाहिदीनचा जहाल आतंकवादी बुरहान वानी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये बंद पाळला गेला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn