Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी ठार झाल्यावर देशद्रोही मुसलमानांचा बंद !

जिहादी आतंकवाद्यांच्या समर्थकांना श्रीनगरच्या लाल चौकात जाहीररित्या फाशी का दिली जात नाही ?
अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
     श्रीनगर - हिजबूल मुजाहिदीनचा २२ वर्षीय आतंकवादी बुर्‍हान मुझफ्फर वाणी याला ८ जुलैला सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार करण्यात आलेे. बुर्‍हानसह दोन अन्य आतंकवादीही ठार झाले. त्यानंतर फुटीरतावादी देशद्रोही मुसलमान नेत्यांकडून काश्मीरमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. बुर्‍हान ठार झाल्याची माहिती मिळाल्यावर देशद्रोही धर्मांधांनी श्रीनगर-अनंतनाग महामार्ग ठप्प केला. या वेळी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दगडफेक करण्यात आली. अनेक ठिकाणी बुर्‍हानच्या अंतिम संस्काराचे नमाजपठण करण्यात आले. तसेच काही ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

डॉ. झाकीर नाईक यांच्याविषयी गुप्तचर विभागाने तत्कालीन काँग्रेस सरकारला ३ वेळा सतर्क केले होते !

निरापराध सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या तत्कालीन काँग्रेस
सरकारने डॉ. झाकीर यांच्यावर बंदी घातली नाही, त्यामुळे आता काँग्रेसवरच बंदी घातली पाहिजे !
     नवी देहली - डॉ. झाकीर नाईक यांच्या संदर्भात गुप्तचर विभागाने वर्ष २००९ ते २०१४ या कालावधीत ३ वेळा केंद्रीय गृहमंत्रालयाला सतर्क केले होते; परंतु त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. तसेच वर्ष २००७ च्या ग्लासगो येथील आक्रमणातील आतंकवादी सबील अहमद हा डॉ. झाकीर यांच्या भाषणांमुळे प्रेरित झाला होता, अशी माहितीही देण्यात आली होती. गुप्तचर विभाग वर्ष २००९ पासून डॉ. झाकीर यांच्यावर लक्ष ठेवून होता. त्याने डॉ. झाकीर यांच्या भाषणांना प्रक्षोभक ठरवून त्यावरून कारवाई करण्याची शिफारस केली होती; परंतु तत्कालीन काँग्रेस सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नाही. सध्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, डॉ. झाकीर यांच्या भाषणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा डॉ. झाकीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

राष्ट्रद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कारवाई करण्याच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या मागणीकडे शासनाचे ४ वर्षांपासून अक्षम्य दुर्लक्ष !

हिंदुत्वनिष्ठ सनातनवर बंदीची मागणी करणारे साम्यवादी, पुरोगामी, काँग्रेसी हे विखारी प्रचार 
करणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंदीची मागणी कधी करत नाहीत, हे लक्षात घ्या !
२०१२ मध्ये ठाणे येथे झालेले आंदोलन
      डॉ. झाकीर नाईक यांच्यावरील कारवाईच्या विलंबास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! तसेच हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांच्यासह त्यांचे उदात्तीकरण करणारे धर्मांध, साम्यवादी, पुरोगामी आणि काँग्रेसी यांच्यावरही कठोर कारवाई करा !
    हिंदूंच्या देवतांसह अन्य पंथांतील श्रद्धास्थाने यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केल्यामुळे इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्यावर भारतात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. आतंकवादी कारवायांचा, तसेच ओसामा बिन लादेनचा पुरस्कार केल्यामुळे इंग्लंड, मलेशिया आणि कॅनडा या देशांमध्ये डॉ. झाकीर नाईक यांना प्रवेशबंदी आहे. आतातर बांगलादेशातील ढाका येथे अनेक लोकांना मारणार्‍या आतंकवाद्यांना डॉ. झाकीर नाईक यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याची अतिशय गंभीर गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे डॉ. नाईक आणि त्याच्या संस्थेची पाळेमुळे खणून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

पीस टीव्हीवर बांगलादेशात बंदी !

     ढाका - बांगलादेशात डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस टीव्हीच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे. बांगलादेश शासनाने प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून या वाहिनीवर बंदी घातली आहे. भारतात यापूर्वीपासूनच बंदी आहे; मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने देशात केबल चालकांकडून ती दाखवण्यात येते आणि ती उघडपणे पाहिली जाते. या केबल चालकांवर अद्यापही कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे.

झाकीर नाईक यांच्या चिथावणीमुळेच कल्याणमधील चौघे मुसलमान युवक इसिसमध्ये भरती झाले !

तसे होते, तर आताच्या सरकारच्या राज्यात पुरावे असूनही
आतंकवाद्यांचे प्रेरणास्थान असणार्‍यांना अटक होत नाही !
      मुंबई - कल्याण येथील ४ मुसलमान युवक सिरियामध्ये जाऊन इसिसमध्ये सहभागी झाले आहेत. ते युवक डॉ. झाकीर नाईक यांच्या प्रक्षोभक भाषणांनीच प्रभावित झाल्याची माहिती समोर आली आहे. या चौघांपैकी एक अरीब मजीद हा भारतात परतला होता. त्याच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. झाकीर यांची भाषणे ऐकून इस्लाम या विषयातील माझी रुची वाढली, असे अरीब याने जबाबात म्हटले आहे. त्यानंतर त्याने जहाल इस्लाम धर्माविषयी वाचन केले आणि त्याचीच परिणती पुढे इसिसमध्ये सहभागी होण्यात झाली.
     २०१०-११ मध्ये दरभंगा येथून अटक करण्यात आलेल्या इंडियन मुजाहिदीनचे आतंकवादी येथील एका वाचनालयात जात होते. येथे डॉ. झाकीर यांच्या व्याख्यानाच्या प्रती होत्या. त्यानंतर त्या जप्त करण्यात आल्या. येथे आतंकवादी यासिन भटकळ रहात होता आणि तो आणि त्याचे साथीदार या वाचनालयात जात असत.

इयत्ता ४ थीच्या इंग्रजी माध्यमाच्या शिवछत्रपती पाठ्यपुस्तकातील ४ धडे वगळले !

पुस्तकात प्रकाशित केलेले भेटीचे चित्र
महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा इतिहासद्रोही निर्णय !
पुस्तकात अफझलखानवधाचे नव्हे, तर भेटीचे चित्र !
    मुंबई - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) च्या वतीने तयार करण्यात आलेल्या इयत्ता ४ थी च्या (परिसर अभ्यास भाग २, इंग्रजी माध्यम) अंतर्गत शिवछत्रपती पुस्तकातील ४ धडे वगळण्यात आले आहेत. शिवरायांचे सक्षम प्रशासन, शिवरायांची युद्धनीती, जनतेचा राजा शिवाजी आणि प्रेरणेचा जिवंत स्रोत अशी या धड्यांची नावे आहेत. याऐवजी किल्ले आणि नौदल यांचे व्यवस्थापन आणि कल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन हे धडे अंतर्भूत करण्यात आले आहेत.

हिजबुल मुजाहिदीनचा बुरहान होता डॉ. झाकीर नाईक यांचा चाहता !

आतंकवाद्यांना जिहादसाठी प्रेरणा देणार्‍या डॉ. झाकीर हुसेन यांना त्वरीत कारागृहात पाठवा !
     नवी देहली - नुकताच जम्मू-काश्मीर पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त कारवाईत मारला गेलेला हिजबुल मुजाहिदीनचा मोस्ट वॉन्टेड आतंकवादी बुरहान वानी डॉ. झाकीर नाईक यांचा चाहता असल्याचे समोर आले आहे. तो सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून युवकांना हिजबुलच्या जाळ्यात ओढण्याचे काम करत होता. त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षिस होते. त्याने ८ जुलै या दिवशी केलेल्या संकेतस्थळावरील शेवटच्या ट्विटमध्ये डॉ. नाईकचे समर्थन करण्याचे आवाहन केले होते. यात त्याने झाकीर नाईक यांना समर्थन द्या, नाहीतर अशी वेळ येईल, जेव्हा कुराण वाचण्यावरही बंदी आणली जाईल, असे म्हटले होते.

हिंदु जनजागृती समितीच्या फेसबूक पानाने ओलांडला १० लाख सदस्यसंख्येचा टप्पा !

      मुंबई - हिंदु जनजागृती समितीच्या हिंदू अधिवेशन या फेसबूक पानाच्या सदस्यसंख्येने ६ जुलै २०१६ या दिवशी १० लक्ष सदस्यसंख्येचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला. हे पान गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीचे कार्य करत आहे. या पानावर करण्यात येणार्‍या पोस्ट्समध्ये राष्ट्र, धर्म यांविषयीची वृत्ते, धर्मशास्त्र, सण, क्रांतीकारक अन् राष्ट्रपुरुष यांचा इतिहास या विषयांचा समावेश असतो.
समितीच्या फेसबूक पानाची मार्गिका
https://www.facebook.com/HinduAdhiveshan

सनातनच्या विरोधातील खटल्यांमध्ये जर सरकार हस्तक्षेप करणार असेल, तर हा न्यायालयाचा अवमान आहे ! - अभिनेता शरद पोंक्षे

अभिनेता शरद पोंक्षे
   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सनातनवर बंदीची मागणी केली; नुसती केली नाही, तर ती घालण्यासाठी सरकारवर दबावही आणत आहे, हे वाचून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वाक्य आठवले. ते म्हणायचे, मला मुसलमान, ईसाई यांची भीती वाटत नाही. मला हिंदूंची भीती वाटते. सावरकरांनी त्यांना केव्हाच ओळखले होते. भारत लोकशाही राष्ट्र आहे कि हुकुमशाही राष्ट्र, हे आधी स्पष्ट झाले पाहिजे आणि जर येथे लोकशाही असेल, तर मग त्यात न्यायालयांना विशेष महत्त्व येते. एकदा एखादे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असेल, तर त्यात दुसर्‍या कोणत्याही संघटनेने सरकारवर दबाव आणला, तर सरकारने त्यांना योग्य समज द्यायला हवी; पण तसे न होता सरकार जर त्या संघटनेच्या दबावाखाली येणार असेल, तर त्यांना सरकारमध्ये बसण्याचा नैतिक अधिकार असता कामा नये. बरं, अनेक वर्षे सनातनवर बंदीची मागणी केली जात आहे.

डॉ. झाकीर नाईक यांच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलन

      श्रीनगर (जम्मू-काश्मीर) - आतंकवादाला उत्तेजन देण्याचा आरोप असलेले डॉ. झाकीर नाईक यांच्या समर्थनार्थ काही मुसलमानांनी फलक हाती घेऊन येथे आंदोलन केले. ढाका येथील आतंकवादी आक्रमणातील आतंकवाद्यांनी डॉ. नाईक यांच्या भाषणांमधून त्यांना जिहादसाठी लढण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा डॉ. नाईक यांचा आतंकवादाशी संबंध आहे का ते तपासून पहात आहेत. भारतात शिवसेनेसह अनेक संघटनांनी डॉ. नाईक यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सध्या एन्आयएकडून त्यांची भाषणे तपासली जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. झाकीर नाईक यांच्या समर्थनार्थ श्रीनगरचे मुसलमान रस्त्यावर उतरले आहेत. (जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवणार्‍या धर्मांधांनी डॉ. झाकीर नाईक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणे आश्‍चर्य नाही ! - संपादक)

महाराष्ट्रात २ कोटी लोकांना तंबाखूचे व्यसन

चांगल्या गोष्टींसाठी कायदा केल्यावर त्याचे प्रतिवर्षी 
नूतनीकरण करण्यासारख्या तांत्रिक गोष्टी कशासाठी ? 
हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) असे कायदे नसतील !
       मुंबई - राज्यातील दोन कोटी जनतेला जर्दा, खैनी, मावा, खर्रा, मशेरी, पान तसेच पानमसाला आणि गुटखा यांचे व्यसन आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे जडणार्‍या रोगांवरील उपचारांसाठी प्रतिवर्षी रुग्णांचे २ सहस्र कोटी रुपये खर्च होतात. त्यामुळे तंबाखूची ही मगरमिठी सोडवण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीची कार्यवाही कठोरपणे करण्याची आवश्यकता आहे, असे मत कर्करोगतज्ञ व्यक्त करतात.
      देशात प्रथमच महाराष्ट्रात जुलै २०१२ मध्ये गुटखा आणि पानमसाला यांवर बंदी घालण्यात आली. या विरोधात गुटखा उत्पादकांनी न्यायालयात धाव घेतली; मात्र न्यायालयाने ही बंदी कायम ठेवली. या बंदीच्या आदेशाचे प्रतिवर्षी नूतनीकरण करावे लागते. गेल्या वर्षी काढलेल्या बंदी आदेशाची मुदत येत्या १० जुलैला संपुष्टात येत आहे. तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीच्या आदेशाचे प्रतिवर्षी नूतनीकरण करण्याची पद्धत बंद करून कायमस्वरूपी आदेश काढण्याच्या मागणीसाठी टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक आणि अन्य संस्था यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.
     गुटखा, मावा, पानमसाला खाणार्‍यांपैकी ६० टक्के तरुण २० ते ३८ वयोगटातील आहेत. तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंडाचा कर्करोग, हृदयविकार, श्‍वसनाचे आजार, स्ट्रोक असे आजार जडतात. त्यांवर उपचारांसाठी प्रतिवर्षी लोकांचे सरासरी दोन सहस्र कोटी रुपये व्यय होतात.
इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतामध्ये ७ लाख ३२ सहस्र गुरुकुले होती. ९७ टक्के लोक सुशिक्षित होते. त्या वेळी शिक्षणक्रमात १८ विषय होते. त्यात आयुर्वेद, योग, आरोग्य, गणित, स्थापत्य अशा अनेक प्रकारच्या विषयांचा समावेश होता.
- अनंत गाडगीळ (लोकजागर, ऑक्टोबर २००९)


गुरुकुल शिक्षणपद्धती

     आजवर आपण अनेकदा भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धतीविषयी ऐकले असेल. या शिक्षण पद्धतीत गुरूंच्या घरी जाऊन शिक्षण घेणे, एवढाच अर्थ आपणांस ठाऊक असतो. गुरुकुल म्हणजे नेमके काय, तेथील दिनचर्या, अध्यापन पद्धती काय असते, आदी माहिती होण्यासाठी उदाहरणादाखल एका गुरुकुल पद्धतीची माहिती येथे देत आहोत. गुरुकुल शिक्षणपद्धतीतच राम, कृष्ण घडले. त्यामुळे त्याची उपयोगिता अनन्यसाधारण अशीच आहे.

सर्वश्रेष्ठ राष्ट्र निर्माण करणारी वैदिक शिक्षणपद्धत !

     पूर्वीच्या काळी वैदिक शिक्षणपद्धत होती. त्यामुळे भारत सर्वश्रेष्ठ असे राष्ट्र होते. ते इतके समृद्ध होते की, त्या वेळी भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, असे म्हटले जाते. या वैदिक शिक्षण पद्धतीचा पाया आध्यात्मिक होता. तसेच हे वैदिक शिक्षण कालातीत आणि हितकारी असल्यामुळेच त्या शिक्षणप्रणालीतून सिद्ध झालेले विद्यार्थी राष्ट्राला उच्च स्थानावर नेऊन पोचवत होते. अशा श्रेष्ठपदाला पोचलेली गुरुसंस्था भारतात होती; म्हणूनच सहस्रावधी वर्षे उलटली, तरी तिचे स्थान धु्रवासारखे अढळच आहे. ही वैदिक शिक्षणपद्धत नेमकी कशी होती, याचा परामर्श घेणारा श्री. प्र.दी. कुलकर्णी यांचा लेख केसरी गर्जने या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला होता. तो आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

हिंदु जनजागृती समिती आणि अन्य संघटना यांनी डॉ. झाकीर नाईक यांना आतापर्यंत वैध मार्गाने केलेला विरोध !

१. पीस टी.व्ही.वर बंदीच्या मागणीसाठी अनेक वेळा निवेदने दिली ! 
      भारतात डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस टी.व्ही. या वाहिनीवर बंदी घालावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीने भारत शासनाला अनेक निवेदने पाठवली आहेत.
२. श्रीगणेशाचा आणि हिंदूंचा अवमान करणार्‍या डॉ. झाकीर नाईक 
यांच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांकडून पोलिसांत तक्रारी !
       वर्ष २०१२ मध्ये ऐन गणेशोत्सवात जर तुमचा देव स्वतःच्या मुलाला (श्री गणेशाला) ओळखू शकत नाही, तर तो मी संकटात आहे, हे कसे ओळखणार, असे हिंदुद्वेष्टे वक्तव्य डॉ. झाकीर नाईक यांनी केले होते. हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात फेसबूकद्वारे पसरले. डॉ. झाकीर यांनी कोट्यवधी हिंदूंच्या धर्मभावना दुखवल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने मुंबईत विविध गणेशोत्सव मंडळांसमवेत, पुणे येथे हिंदुत्ववाद्यांसमवेत आणि पनवेल येथे शिवसेना अन् भाजप यांच्या समवेत पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या.

रामराज्यात शिक्षण कसे होते ?

श्रीरामाने स्वतंत्र शक्षण देऊन घराघरात श्रीराम निर्माण केले होते. 
     रामराज्यात आर्थिक योजनेसोबत उच्च प्रतीचे राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले होते. त्या वेळचे लोक निर्लोभी, सत्यवादी, अलंपट, आस्तिक आणि कृतीशील होते. क्रियाशून्य नव्हते. त्याकाळी लोक स्वतंत्र होते. कारण, शिक्षण स्वतंत्र होते, शिक्षण राज्याश्रित आणि वित्ताश्रित नव्हते. शिक्षण आणि शिक्षण देणारे दोन्ही पराधीन (गुलाम) असतील, तर त्या शिक्षणातून काय निर्माण होणार ? जे पेरलेले असते तेच उगवते. त्यात भेद होणार नाही.
     जेथे शिक्षण राज्याश्रित किंवा वित्ताश्रित असेल, तेथे कधी काळी स्वतंत्र श्‍वासोच्छ्वास नसेल. तेथे राष्ट्रीय चारित्र्याचे पुनरुत्थान नसेल.
लोकांना विशिष्ट शिक्षण मिळाल्याने राष्ट्रीय चारित्र्य उभे राहिले ! : माणसाला केवळ कर्तव्यपरायणच नाही, तर लोभविवर्जितही बनवण्यात आले होते. आपण एकच कर्तव्याचा घोष करीत असतो; पण कर्तव्यपरायणता येत नाही. म्हणून श्रीरामाने लोकांना विशिष्ट शिक्षण देऊन राष्ट्रीय चारित्र्य उभे केले होते.
संदर्भ : व्यासविचार, नववा स्कंध

फलक प्रसिद्धीकरता

अशा देशद्रोही फुटीरतावाद्यांना सरकार फाशी देईल का ?
      हिजबूल मुजाहिदीनचा मोस्ट वाँटेड आतंकवादी बुर्‍हान मुझफ्फर वाणी याच्यासह २ आतंंकवाद्यांना ८ जुलैला सैनिकांसमवेत झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले. त्यानंतर फुटीरतावादी देशद्रोही मुसलमान नेत्यांकडून काश्मीरमध्ये बंद पुकारण्यात आला.


हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Burhan wani ke mare jane ke bad Kashmir me algaowadione band pukara.
Aise Deshdrohionko Pakistan Bhejo !
जागो !
आतंकवादी बुरहान वाणी के मारे जाने के बाद कश्मीर में अलगाववादीआें ने बंद पुकारा.
ऐसे देशद्रोहीआें को पाकिस्तान भेजो !

चला, आनंददायी धर्माधिष्ठित शिक्षणपद्धतीकडे वाटचाल करूया !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
शाळा चालू होऊन एक महिनाच होत आहे. तरीही शाळेच्या धकाधकीच्या वेळापत्रकामुळे मुले त्रस्त झालेली असतात. 'कधी एकदा शाळा सुटते', असे त्यांना सततच वाटत असते. परीक्षांच्या काळातही पाठ्यपुस्तकांतील सारखे तेच तेच परिच्छेद वाचून ती अतिशय कंटाळून जातात. 'परीक्षा संपल्या की, कुठेतरी मस्तपैकी जाऊन मजा करून यायला हवे.....' असे संवाद परीक्षेच्या काळात घरोघरी पालकांच्या आणि मुलांच्या तोंडून ऐकायला मिळतात. हेच तर आजकालच्या अभ्यासक्रमाचे, विज्ञानाचे मोठे अपयश आहे. दप्तराचे ओझे वाढले; पण ज्ञानात भर पडली नाही. शाळेत जाऊन, अभ्यास करून मुले आनंदित झाली आहेत, असे दृश्य पहायला मिळाले तर कुणाला आवडणार नाही ? सद्यस्थितीत ते शक्य आहे का ?

याउलट अध्यात्माचे आहे. जरा पूर्वीच्या गुरुकुलाचे दृश्य आठवून पहा.. !, लगेचच आपल्या तोंडवळ्यावर आनंद पसरतो; कारण पूर्वी गुरुकुलात हिंदुधर्मविषयक आचार आणि विचार पद्धतींना, हिंदु धर्मातील शास्त्रशुद्ध प्रमाणांना आत्यंतिक महत्त्व देऊन देवतांच्या, ऋषींच्या कृपेने अध्ययन आणि अध्यापन केले जात असल्याने ते वातावरणच चैतन्याने आनंदीत झालेले असायचे. आता हे सर्व काळाच्या ओघात नष्ट झाले आहे.
     आमची हिंदु मुले सत्यवचनी युधिष्ठिर आणि श्रीराम यांच्या चरित्रातून सत्याचा महिमा जाणतात. सत्य बोलायला शिकतात. अनृताचा (असत्याचा) तिरस्कार करतात. आम्हाला जॉर्ज वॉशिंग्टनची आवश्यकता काय ?
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १.१०.२००९)

इंग्रजी अंक, तसेच देवनागरी लिपीतील सर्वसाधारण अंक आणि सात्त्विक पद्धतीने लिहिलेला अंक यांचा वायूमंडलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी

सात्त्विक देवनागरी लिपीतील 
सात्त्विकतेचा अधिकाधिक लाभ व्हावा, 
यासाठी सात्त्विक लेखनपद्धतीचाच वापर करा !
        अंक लिहितांना अंकातील रेषांची जाडी, वळण आदींमध्ये पालट करून एकच अंक अनेक पद्धतींनी लिहिता येतो. अनेक पद्धतींपैकी कोणती लेखनपद्धत सर्वाधिक सात्त्विक आहे ?, हे संत (अध्यात्मातील जाणकार) सांगू शकतात.
        इंग्रजी अंक, तसेच देवनागरी लिपीतील सर्वसाधारण (प्रचलित) पद्धतीने लिहिलेला अंक यांच्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-चित्रकारांनी विकसित केलेल्या, म्हणजेच सात्त्विक पद्धतीने लिहिलेल्या अंकातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वायूमंडलावर काय परिणाम होतो ?, हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यासण्याच्या उद्देशाने तीनही पद्धतींनी लिहिलेल्या ५ या अंकाच्या छायाचित्राची पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

मुलांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक असणारी गुरुकुल शिक्षणपद्धती

पू. डॉ. वसंत आठवले
१. पूर्वीच्या काळी गुरुकुलात मुलांना प्रथम अध्यात्मशिक्षण आणि नंतर ६४ कलांपैकी २ - ३ कलांचे शिक्षण दिले जाणे : पूर्वी मुंज झाल्यावर मुलांना गुरुकुलात शिक्षण घेण्यासाठी पाठवत असत. गुरुकुलामध्ये प्रारंभी अध्यात्मशिक्षण देत आणि त्यानंतर मुलांची आवड किंवा योग्यता यांनुसार ६४ कलांपैकी २ - ३ कलांचे शिक्षण त्यांना दिले जायचे. कलेतील शिक्षण हे संसार आणि व्यवहार यांत उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडत असे. त्यातही आध्यात्मिक दृष्टीकोन कसा ठेवावा, हे गुरुकुलात शिकवले जायचे.
२. अहंभाव वाढण्याआधीच मुलांना अध्यात्माचे शिक्षण दिल्यास त्यांच्यावर सात्त्विक संस्कार होऊन आध्यात्मिक उन्नती होणे : मुलांमध्ये ६ वर्षांनंतर अहंचा विकास होतो. एकदा अहं वाढला की, संस्कार करणे जवळजवळ अशक्यप्राय होते; म्हणून अहंभाव वाढण्याआधीच त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांना अध्यात्माचे शिक्षण दिले जात असे. त्यामुळे त्यांच्यावर सात्त्विक संस्कार होत असत. लहानपणापासून साधनेेचे संस्कार झाल्याने त्यांच्यात साधनेची आवड निर्माण व्हायची आणि साधनेमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती होत असे. अहंभाव वाढवण्याआधीच साधनेत पुढे जाणे सोपे असते. तसेच गुरुकुलातील वातावरणही सात्त्विक असल्याने साधनेला पोषक असे.

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
गुरुपौर्णिमा मास २०१६

१९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.


१. पू. पिंगळेकाकांना सेवा परिपूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचा ध्यास !

पू. काका दुपारी १२ वाजेपर्यंत 'सनातनच्या वस्तूंचा अहवाल उत्तरदायी साधक भरतात का ?', याचा नियमितपणेे आढावा घेत. त्यामुळे ही सेवा प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न होत होता. सेवा वेळेत झाली नाही, तर त्या चुकीची जाणीव त्या उत्तरदायी सेवकामध्ये निर्माण होत होती. यावरून पू. काकांनाच सेवा परिपूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचा ध्यास आमच्यापेक्षा पुष्कळ आहे आणि आम्हाला तसे प्रयत्न वाढवायला हवेत, हे शिकता आले.

परात्पर गुरु प.पू. डॉक्टर आठवले यांच्या जागी काहीच न दिसणे, म्हणजे ते निराकार आणि निर्गुण असल्याची अनुभूती साधिकेला दोन निराळ्या प्रसंगात येणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

१. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी 'बोटांनी डोळे आणि कान बंद करून काय अनुभवायला येते ?', ते पहाण्यास सांगितल्यावर पू. (सौ.) अंजलीताई आणि पू. (सौ.) बिंदाताई यांच्या जागी प्रकाश दिसणे; मात्र प.पू. गुरुदेवांच्या जागी काहीच न दिसल्याने निराश होणे :
परात्पर गुरु श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षारंभी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी जीव नाडीपट्टीचे वाचन केले. त्या वेळी त्यांनी साधकांना 'बोटांनी डोळे आणि कान बंद करून काय अनुभवायला येते ?', ते पहाण्यास सांगितले होते. त्या वेळी मला पू. (सौ.) अंजलीताई आणि पू. (सौ.) बिंदाताई यांच्या जागी प्रकाश दिसत होता; मात्र प.पू. गुरुदेवांच्या जागी मला काहीच दिसले नाही; म्हणून 'पुन्हा प्रार्थना करून काय अनुभवायला येते ?' , ते पहाण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हाही मला काहीच न दिसल्याने मी निराश झाले. (माझ्या दिरांचे निधन झाल्यामुळे मी १२ - १३ दिवस घरी गेले होते आणि नुकतीच आश्रमात परत आले होते. माझ्यावर आवरण आल्यामुळे मला काही जाणवत नाही, असा विचार करून मी मनाला समजावण्याचा प्रयत्न केला.)

शिक्षणात अध्यात्मशास्त्र शिकवण्याला पर्याय नाही !

परात्पर गुरु डॉ. आठवले
'सध्या लोक किंवा शासन जे काही निर्णय घेते, ते केवळ बुद्धीचा किंवा विज्ञानाचा उपयोग करूनच घेते. त्यामुळे ते बहुतांशी चुकीचे असतात. याची दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. श्री भवानीदेवीच्या मूर्तीची झीज होत आहे; म्हणून मंदिराचे प्रशासक असलेल्या धाराशीवच्या जिल्हाधिकार्‍यांनी तिच्या अभिषेकावर बंदी घातली.

२. वर्ष १९६० मध्ये अशुद्धलेखन करणार्‍यांना सोपे जावे, यासाठी 'अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ' यांनी पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ मध्ये मान्यता देऊन संस्कृत शुद्धलेखनाप्रमाणे असलेले सर्व नियम मराठीच्या शुद्धलेखनात पालटले.

पहिल्या उदाहरणामध्ये भाविक मूर्तीवरील अभिषेकातून देवतेच्या मूर्तीतून मिळणार्‍या चैतन्यापासून वंचित झाले आणि दुसर्‍या उदाहरणामध्ये संस्कृतमधील नियम पालटल्याने संस्कृत भाषेतील चैतन्यापासून मराठी भाषिक वंचित झाले. या उदाहरणांमधून लक्षात येईल की, सरकारने, तसेच लोकांनी पूर्वापार चालत आलेल्या आणि ऋषीमुनींनी सांगितलेल्या अध्यात्मशास्त्राला लक्षात न घेतल्याने किंवा ते त्यांना ठाऊक नसल्याने आणि त्यांना अहंमुळे कोणाचे त्याविषयी मार्गदर्शन घ्यावेसे न वाटल्याने असे चुकीचे निर्णय घेऊन समष्टीचीच हानी केली. ही हानी सूक्ष्मातील आहे; पण ती पुष्कळ मोठी आहे.

गुरुपौर्णिमेला ०९ दिवस शिल्लक

     गुरु ज्याच्यावर कृपा करतात त्याचे तन, मन, धन, सुख, दु:ख, अहं इत्यादी सर्व हरण करतात.

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !
     सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे.
     जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
     धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !

आपत्काळात आणि साधनेच्या संदर्भात व्यायामाचे महत्त्व

      स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ हा अध्यात्मातील एक सिद्धांत असल्याने इतकी वर्षे मी साधकांना स्थूलदेहाचे व्यायाम करण्यास सांगत नसे. त्याऐवजी देहापेक्षा सूक्ष्म असलेले मन आणि बुद्धी यांना प्रथम सात्त्विक बनवण्याकडे आणि नंतर त्यांचा लय करण्यासाठी साधना करण्यास सांगत असे.
      आता हे लक्षात आले की, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी आणि साधनेसाठी स्थूलदेह (शरीर) सक्षम असणे आवश्यक आहे. यासाठी साधकांनी प्रतिदिन व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे वाईट शक्तींचे आवरण जाण्यासही साहाय्य होते. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । (संदर्भ : कुमारसम्भव, सर्ग ५, श्‍लोक ३३), म्हणजे धर्माचरण, म्हणजे साधना करण्यासाठी शरीर हे सर्वांत पहिले साधन आहे हे किती योग्य आहे, याची आता जाणीव झाली. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
॥ हरि ॐ तत्सत् ॥
गुरूंनी दिलेले नाव
     लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, तर बाकीची नावे सगुणातील असतात.
     भावार्थ : लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, यातील निर्गुणातील म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या लक्षणांवरून किंवा संप्रदायाप्रमाणे गुरूंनी शिष्याचे नाव ठेवलेले असते. याउलट आई-वडील सगुणातील लक्षणांवरून किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार मुलाचे नाव ठेवतात. गुरु मिळाले असे म्हणू नये. गुरु दिले गेले, असे म्हटले पाहिजे. ज्याचा जो गुरु (नाम), तो त्याला आम्ही दिला. तोच तारील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
साधनेने व्यष्टी प्रारब्धावर मात करता येते, तर समष्टी प्रारब्ध कालमहात्म्यानुसार पालटते !
      असे असल्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना यासारखे समष्टी कार्य करतांना अनुकूल काळ येण्याची वाट पहावी लागते. हिंदु राष्ट्राची स्थापना वर्ष २०२३ मध्ये होणार असल्यामुळे त्याच्यासाठीच्या कार्याचा आरंभ आतापासून करणे आवश्यक आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्नेही निर्धन असला तरी चालेल पण सदाचारी असावा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्‍वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

दर्डा कुटुंबियांच्या काळ्या साम्राज्याची सखोल चौकशी करा !

संपादकीय 
     यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीच्या यवतमाळ पब्लिक स्कूलच्या शाळेत विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण बाहेर आल्यावर शिक्षणाच्या नावाखाली सोज्वळतेचा बुरखा पांघरलेल्या दर्डा कुटुंबियांची एकेक कुकृत्ये बाहेर येण्यास प्रारंभ झाला आहे. दुसर्‍या प्रकरणात जवाहरलाल दर्डा आभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रयोगशाळा साहाय्यक असलेल्या कर्मचार्‍यावर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

...जेव्हा रक्षकच बनतात गुन्हेगार !

संपादकीय 
    गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांच्या संदर्भात विशेषत: महाराष्ट्र पोलिसांच्या संदर्भात घडलेल्या ज्या घटना समोर येत आहेत, त्या पाहून सद्रक्षणाय खलनिग्रहणाय अर्थात् सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी हे ब्रीदवाक्य पालटून सज्जनांना त्रास देण्यासाठी आणि दुष्टांच्या रक्षणासाठी असा पालट करावा इतकी दयनीय स्थिती असल्याचे चित्र समोर येत आहे. लोकराज्यात ज्यांच्यावर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे दायित्व आहे, असे पोलीसच सराईत आणि कुख्यात गुन्हेगारांनाही लाजवतील अशी अवैध आणि अनैतिक कृत्ये करण्यात आघाडीवर असल्याचे समोर येत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn