Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आम्ही हरिचे सवंगडे । जुने ठायीचे वेडे बागडे ।
हाती धरुनी कडे । पाठीसवे वागविलो ॥

डॉ. झाकीर नाईक यांचे हाफिज सईद याच्याशी संबंध असल्याचा गुप्तचर विभागाला संशय !

इतकी वर्षे गुप्तचर विभाग झोपला होता का ?
     नवी देहली / मुंबई - मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याच्याशी डॉ. झाकीर नाईक यांचे संबंध आहेत, असा संशय गुप्तचर विभागाने व्यक्त केला आहे. हाफिज सईद याची संघटना जमात-उल- दावाच्या जुन्या उर्दू संकेतस्थळावर झाकीर यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या संकेतस्थळाची मार्गिका (लिंक) आहे. त्याचप्रमाणे इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या संकेतस्थळावर जमात-उल- दावाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. २००८ च्या आक्रमणानंतर दावाकडून नवीन संकेतस्थळ चालू करण्यात आले आहे. (२००८ च्या आधीपासून ही लिंक असतांना गुप्तचर विभागाला ती कशी दिसली नाही कि त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते ? - संपादक)

विशेष न्यायालय स्थापन करून डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कठोर कारवाई करा ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर

आंदोलनात सहभागी डावीकडून श्री. अभय वर्तक, अधिवक्ता संजीव
पुनाळेकर, अधिवक्ता ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ
डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात मुंबई येथे हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांचे आंदोलन !
     मुंबई, ८ जुलै (वार्ता.) - झाकीर नाईक यांना सौदी अरेबियातून पैसा येत आहे. त्यातून लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, धर्मांतर चालत आहे. झाकीर नाईक हा दाऊदचा साथीदार आहे आणि पाकिस्तानचा समर्थक आहे. शासनाने यातून शिकायला हवे, की शांतीच्या वार्ता करून आतंकवाद थांबत नाही. आतंकवादाला नष्टच करावे लागते. शासनाने झाकीर नाईक यांच्या विरोधात कठोर कारवाई करायला हवी. त्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करून विशेष टीम सिद्ध करायला हवी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केली.

क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या समूहशिल्पाचे अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यास भाजपचा विरोध

चापेकर बंधूंविषयी... 
       प्लेगच्या साथीत जनतेवर अनन्वित अत्याचार करणारा इंग्रज अधिकारी रॅन्ड याच्या घोडागाडीत शिरून गोळ्या झाडत दामोदर हरी चापेकर यांनी त्याला यमसदनी धाडले, तर आयर्स्ट या अधिकार्‍याचा बाळकृष्ण हरी चापेकर यांनी वध केला. पुढे द्रविड बंधूंच्या चुगलीमुळे बाळकृष्ण आणि दामोदर यांना फाशी देण्यात आले. इंग्रजांकडून बक्षीस मिळण्याच्या आशेने द्रविड बंधूंनी केलेल्या चुगलीविषयी कळल्यावर धाकटे बंधू वासुदेवपंत संतप्त झाले आणि त्यांनी त्यांचे साथीदार महादेव रानडे यांच्या साहाय्याने द्रविडबंधूंना ठार केले. पुढे ८ मे १८९९ या दिवशी वासुदेवपंत चापेकर यांनाही फाशी देण्यात आली. रॅन्डच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे वय होते अवघे २७ वर्षे, तर बाळकृष्णपंतांचे २४ आणि वासुदेवपंतांचे १८ वर्षे ! अशा प्रकारे तरुण वयात एकाच कुटुंबातील तिघा बंधूंनी राष्ट्रकार्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ वर्ष १९७१ मध्ये चिंचवडच्या चौकात चापेकर बंधूंचे शिल्प उभारण्यात आले होते.
       चिंचवड, ८ जुलै - रस्ता रुंदीकरण आणि उड्डाणपूल बांधणे या कारणांवरून शहरातील मुख्य चौकातून हटवलेले क्रांतीवर चापेकर यांचे शिल्प सुमारे १० वर्षांनंतर शहरात पुन्हा बसवले जात आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ९ जुलै या दिवशी चापेकर बंधूंच्या समूहशिल्पाचा अनावरण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे योजले आहे; मात्र भाजपने अजित पवार यांच्या हस्ते समूहशिल्पाचे अनावरण करण्यास विरोध दर्शवला असून समाजासाठी योगदान दिलेल्या एखाद्या मान्यवर व्यक्तीच्या हस्ते शिल्पाचे अनावरण करावे, अशी मागणी केली आहे.

डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांची चौकशी करा ! - मुख्यमंत्र्यांचे मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी झाकीर नाईक यांच्या आतंकवादी
कृत्यांना पायबंद घालण्याची मागणी यापूर्वीच अनेक वेळा आंदोलनांद्वारे केली होती !
     मुंबई - चिथावणीखोर भाषणे करून मुसलमान तरुणांना आतंकवादाकडे आकर्षित करणारे डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बांगलादेशात झालेल्या आतंकवादी आक्रमणातील अतिरेक्याने डॉ. झाकीर नाईक यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे म्हटले होते. त्यानंतर आयबीनेही डॉ. झाकीर यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. हैद्राबादमधील इसिसचा प्रमुख इब्राहीम यजदा याने झाकीर नाईक यांच्या शिबिरामध्ये १० दिवस वास्तव्य केले होते.

डॉ. झाकीर यांनी हिंदूंच्या विरोधात लोकांना भडकवले होते ! - आर्ट ऑफ लिव्हिंग

      नवी देहली - श्री श्री रविशंकर हेही झाकीर नाईकसोबत एका कार्यक्रमात व्यासपिठावर उपस्थित होते, अशी टीका करणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना आर्ट ऑफ लिव्हिंगने प्रत्युत्तर दिले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगने म्हटले आहे की, वर्ष २००६ मध्ये काँग्रेसचे आमदार रोशन बेग यांनी एका कार्यक्रमात श्री श्री रविशंकर यांना पवित्र ग्रंथांच्या आधारे हिंदुत्व आणि इस्लाममध्ये ईश्‍वराचे स्वरूप या विषयावर बोलण्यासाठी बोलावले होते. या कार्यक्रमात डॉ. झाकीर नाईक यांनी हिंदुत्व आणि मूर्तीपूजा करणार्‍या अन्य धर्मियांची टर उडवली होती. यामुळे येथे वातावरण तापले होते. (या वेळी पोलीस झोपले होते का ? तेव्हाच डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कारवाई का झाली नाही ? - संपादक)

(म्हणे) राजनाथ सिंह हे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भेटतात त्याचे काय ?

झाकीर नाईक यांना शांतीदूत म्हणणारे, ओसामा बिन लादेन याला ओसामाजी
म्हणणारे काँग्रेसचे बोलके पोपट (मौलाना) दिग्विजय सिंह यांचा संदर्भहीन प्रश्‍न !
     नवी देहली - डॉ. झाकीर नाईक यांचे वर्ष २०१२ मध्ये एका कार्यक्रमात त्यांचा शांतीदूत असा उल्लेख करत कौतुक केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, झाकीर नाईक एकाच व्यासपिठावर असल्याने जर माझ्यावर टीका होत असेल, तर राजनाथ सिंहजी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भेटतात त्याचे काय ? प्रज्ञा ही बॉम्बस्फोटातील आरोपी आहे.

इसिस इस्लामविरोधी ! - इमाम मौलाना राशिद अली फरंगी महली

हिंदू किंवा यजिदी लोक ठार होत असतांना न बोलणारे मुसलमान
धर्मगुरु मदिना येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बोलू लागले आहेत !
      लक्ष्मणपुरी - येथील ऐशबाग ईदगाहचे इमाम मौलाना राशिद अली फरंगी महली यांनी इसिसला इस्लामविरोधी म्हटले आहे. या संघटनेशी जोडलेल्या लोकांना मुसलमान म्हणता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्राने या संदर्भातील षड्यंत्र उघड करावे, अशी मागणी केली आहे. मदिना येथे झालेल्या बॉम्बस्फोटावरून ते बोलत होते.
     येथे ईदनंतरच्या मार्गदर्शनात मौलाना महली म्हणाले की, ज्या लोकांमध्ये इस्लामविषयी थोड्या प्रमाणात जरी प्रेम असेल, तर ते रमझानसारख्या पवित्र महिन्यात अशा प्रकारची इस्लामविरोधी कृती करणार नाहीत.

नमामि चंद्रभागे प्रकल्पाचा आरंभ तात्काळ करावा ! - वैष्णवजनांची मागणी

जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज 
यांनी सांगितलेले चंद्रभागा नदीचे माहात्म्य
अवघीच तीर्थे घडली एकवेळा ।
चंद्रभागा डोळा देखियला ॥
पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी ।
तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी ॥
  • आध्यात्मिक महत्त्व असलेल्या चंद्रभागा नदीची इतकी दुरवस्था होईपर्यंत प्रशासन काय करत होते ? हे इतकी वर्षे का लक्षात आले नाही ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • चंद्रभागेमध्ये गटाराचे पाणी, तर नदीच्या वाळवंटात जिकडेतिकडे शेवाळ आणि चिंध्या
        पंढरपूर, ८ जुलै - शहरातील गटारांचे पाणी थेट चंद्रभागा नदीमध्ये जात असल्याने संतांनी गौरवलेल्या या नदीचे पावित्र्य नष्ट होत आहे. नदीचे पाणी अतिशय अस्वच्छ झाले असून नदीचे वाळवंट शेवाळ आणि (कपड्याच्या) चिंध्या यांनी व्यापल्याचे दयनीय चित्र सध्या दिसत आहे. सद्यस्थितीत चंद्रभागा नदीपात्राच्या ठिकाणी पुष्कळ अस्वच्छता असून तेथे दुर्गंध पसरला आहे. (शासनाने तीर्थक्षेत्री स्नानांच्या ठिकाणी गटाराचे पाणी सोडले जाणार नाही आणि अन्य ठिकाणी प्रक्रिया करूनच सांडपाणी नदीत सोडले जाईल, यासाठी तत्पर उपाययोजना करायला हवी ! - संपादक)

डॉ. दाभोलकर हत्येची निष्पक्ष चौकशी करा आणि राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवा !

सातारा येथे हिंदुत्ववाद्यांकडून प्रशासनाला निवेदन 
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संदीप
पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
       सातारा - डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने कोणत्याही दबावास बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवावा, या मागणीचे निवेदन येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री श्री. राजनाथ सिंह यांच्यानावे पोलिस अधीक्षक श्री. संदीप पाटील यांना देण्यात आले. (कठीण काळात सनातनला पाठिंबा देणार्‍या हिंदुत्ववाद्यांचे आभार !- संपादक) या वेळी वारकरी सांप्रदायाचे ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, हिंदु महासभा कार्यकारिणी सदस्य श्री. उमेश गांधी, विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, बजरंग दलाचे संयोजक श्री. मुकुंदराव पंडित, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सुधन्वा गोंधळेकर, योग वेदांत सेवा समितीचे श्री. लोखंडे, शिवसेनेचे श्री. शैलेंद्र सावंत आदी हिंदुत्ववादी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

एका दिवसांत दोन कोटी झाडे लावता, तर वर्षभरात एकही झाड का लावले नाही ? - उच्च न्यायालय

       मुंबई, ८ जुलै - मोहीम म्हणून एका दिवसांत दोन कोटी झाडे लावता आणि गेल्या अनेक वर्षांपासून निधी पडून असतांना एकही झाड का लावले नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने राज्य शासानाला खडसवले आहे.
       मनसर-खवासा चौपदरीकरणासाठी वृक्षतोड झाली. त्या बदल्यात १ लक्ष झाडे लावण्याचा आदेश न्यायालयाने ३० जुलै २०१५ ला दिला होता; मात्र वर्ष उलटूनही एकही झाड लावले नाही. (न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारे कायदाद्रोही वनखाते ! - संपादक) त्याविषयी वनखात्याला धारेवर धरून न्यायालयाने वनखाते वर्षभरापासून निद्रावस्थेत आहे काय ?, असा प्रश्‍न उपस्थित केला. वनखात्याचे प्रधान सचिव, प्रधान मुख्यसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक यांना १४ जुलैला या संदर्भात उपस्थित रहाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील मनसर-खवासा दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. त्या संदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती भूषण देशपांडे आणि न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी वनखाते आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण यांच्यात विसंवाद आहे. महामार्गाच्या चौपरीकरणासाठी झाडे तोडण्यात येणार असल्याने त्याऐवजी १ लक्ष झाडे लावण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यासाठी प्राधिकरणाने ७ कोटी ६८ लक्ष रुपयांचा निधी वनखात्याला दिला. वनखाते १ लक्ष झाडे उमरेड परिसरात लावणार होते; परंतु वर्षभरापासून एकही झाड लावण्यात आलेले नाही.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार हमिदुल रहमान यांच्या उपस्थितीत धर्मांधांचे हिंदूंवर आणि रथयात्रेवर आक्रमण !

     धर्मांधांना पाठीशी घालणार्‍या ममता(बानो) बॅनर्जी यांच्या राज्यातील असुरक्षित हिंदू ! केंद्रातील सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी काहीही करत नाही, हे त्यांच्या पाठीशी असणार्‍या हिंदूंना लज्जास्पद ! दादरी प्रकरणावरून हिंदूंच्या नावाने ऊर बडवणारे आता कुठे आहेत ?
बंगालची बांगलादेश होण्याच्या दिशेने मार्गावरील वाटचाल !

  • आक्रमणासाठी बॉम्बचा वापर
  • पोलीस निष्क्रीय    
धर्मांधांनी केलेली जाळपोळ
     कोलकाता - बंगाल राज्यातील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रामगंज गावात हिंदूंच्या रथयात्रेवर धर्मांधाच्या जमावाने आक्रमण केले. पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नसल्याने हिंदूंना कोणतेच संरक्षण न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रीय महामार्ग ३१ वरील वाहतूक रोखून धरली. दुसर्‍या दिवशी शेजारील चोपरा या मुसलमानबहुल गावांत धर्मांधांनी अल्पसंख्य हिंदूंवर बॉम्बद्वारे आक्रमण केले. या वेळी तृणमूल काँग्रेसचे आमदार हमिदुल रहमान हे उपस्थित होते. चोपरा ब्लॉकमध्ये ३२ टक्के हिंदू आहेत, तर शेजारील इस्लामपूर ब्लॉकमध्ये २५ टक्के हिंदू आहेत.

वेरूळ येथील श्री घृष्णेश्‍वराच्या शिवलिंगावर बेल आणि फूल सोडून अन्य वनस्पती वहाण्यास प्रशासनाकडून बंदी

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे शिवलिंगावर अन्य वनस्पती वहाण्याची हिंदूंकडून केली जाणारी अयोग्य कृती !
      वेरूळ, ८ जुलै - येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात शिवलिंगावर बेल आणि फूल सोडून इतर वनस्पतींची पाने वहाण्यास प्रशासनाने ६ जुलैपासून बंदी केली आहे. पोलीस प्रशासन आणि भारतीय पुरातत्व विभाग यांना याची कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे. अशुद्ध दूध आणि इतर झाडांची पाने यांच्या वापराविषयी संभाजीनगर येथील डॉ. भांबरे यांनी संभाजीनगरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती.
     त्या अनुषंगाने ५ जुलै या दिवशी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस तहसीलदार बालाजी शेवाळे, भारतीय पुरातत्व विभागाचे हेमंत हुकुरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड, श्री घृष्णेश्‍वर ट्रस्टचे अध्यक्ष दीपक शुक्ला गुरु, डॉ. भांबरे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सुरक्षा यंत्रणांनी बंगालमध्ये आतंकवादी आक्रमणाचे षड्यंत्र उधळले !

  • मुसलमानधार्जिण्या ममता बॅनर्जी यांच्यामुळे बंगाल झाले आतंकवाद्यांचा गड !
  • बर्धमानमध्ये ३ संशयित आतंकवाद्यांना अटक
       नवी देहली - बंगालच्या बर्धमानमध्ये इसिसच्या आक्रमणाचे मोठे षड्यंत्र सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावले आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागलेला इसिसशी संबंधित महंमद मसुउद्दीन उपाख्य मूसा याच्या माहितीवरून त्याच्या २ आतंकवादी सहकार्‍यांना अटक करण्यात आली. हे तिघे जण बर्धमानमध्ये मोठे आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते.
१. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार बर्धमानमध्ये अटक करण्यात आलेला मूसा इसिसच्या लोन वुल्फ (मुंडके धडावेगळे करणे) आक्रमणाचा एक तरबेज हत्यारा झाला होता.
२. मूसा आणि त्याचे दोन सहकारी शेख कालू अन् शेख अमीन यांनी लोकांचे गळे कापण्याचे षड्यंत्र रचले होते.
३. बर्धमान येथील मूसा दोन वर्षांपासून तमिळनाडूच्या तिरूपर शहरात रहात होता. तेथून ऑनलाईन संकेतस्थळांच्या माध्यमातून इसिसशी संबंध ठेवून होता.

अमेरिकेच्या डल्लासमध्ये कृष्णवर्णीय आंदोलनकर्त्यांनी केलेल्या गोळीबारात ४ श्‍वेतवर्णीय पोलीस ठार !

भारतात धार्मिक विद्वेष वाढत आहे, असा कांगावा
 करणार्‍या अमेरिकींना त्यांच्या देशातील वर्णद्वेष दिसत नाही का ?
       डल्लास - ८ जुलैला सकाळी अमेरिकेतील डल्लास येथे कृष्णवर्णीय आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने केलेल्या गोळीबारात ४ श्‍वेतवर्णीय पोलिसांचा मृत्यू झाला, तर ७ पोलीस घायाळ झाले आहेत. या आठवड्यात वेगवेगळ्या प्रकरणांत पोलिसांच्या गोळीबारात २ कृष्णवर्णीय ठार झाले होते. याचे चित्रीकरणही झाले होते. या हत्यांच्या विरोधात ही निदर्शने करण्यात येत होती. याप्रकरणी ३ संशयितांना कह्यात घेण्यात आले असून पुढील तपास चालू आहे.

मुसलमानांनी इस्लाम आणि घटनाविरोधी असलेल्या काश्मीरमधील दगडफेकीचा निषेध करावा ! - संघ

असे किती राजकीय पक्ष आणि नेते बोलतात ?
     श्रीनगर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या वतीने महिलांना देण्यात येणार्‍या स्वसंरक्षण प्रशिक्षणावर संशय घेण्यापेक्षा जम्मू-काश्मीरमधील मुसलमानांनी इस्लाम आणि घटनाविरोधी असलेल्या दगडफेकीच्या घटनांचा निषेध करावा, असे आवाहन संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी केले आहे. संघ शाखांमध्ये महिलांना खंजीर चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची छायाचित्रे आणि वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी वरील आवाहन केले.

केरळप्रमाणे कर्नाटक राज्यातही मंदिरात प्रवेश करतांना वस्त्रसंहिता सक्तीची करणे आवश्यक ! - सौ. प्रसन्न रवी, सामाजिक कार्यकर्त्या

देवस्थानात वस्त्रसंहिता लागू करण्याविषयी मंगळुरू (कर्नाटक) येथील नम्म टी.व्ही. 
या वाहिनीवर आयोजित चर्चासत्रात रणरागिणी शाखेचा सहभाग !
डावीकडून सौ. लक्ष्मी पै, सौ. प्रसन्ना रवी
     मंगळुरू - केरळप्रमाणे कर्नाटक राज्यातही वस्त्रसंहिता सक्तीची करणे आवश्यक आहे. सर्व देवस्थानांच्या कार्यकारी समित्यांनी मनावर घेतल्यास हे निश्‍चित साध्य होऊ शकते. त्यासाठी आम्ही निवेदनाद्वारे जागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रसन्न रवी यांनी नम्म टी.व्ही. या स्थानिक वाहिनीवर आयोजित जन ध्वनी या चर्चासत्रात केले. या कार्यक्रमात मंदिरांमध्ये प्रवेश करतांना वस्त्रसंहिता लागू करण्याविषयी म्हणजेच भारतीय पोशाख परिधान करण्याविषयी चर्चा करण्यात आली. थेट प्रसारित केलेल्या या कार्यक्रमात वस्त्रसंहिता लागू करण्याविषयी सहमत असल्याचे ६ प्रेक्षकांनी दूरभाष करून सांगितले. मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी सात्त्विक वस्त्रे परिधान करणे महत्त्वाचे आहे, असा अभिप्राय अनेकांनी व्यक्त केला.

यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणी दोन्ही शिक्षकांच्या पोलीस कोठडीत वाढ !

      यवतमाळ, ८ जुलै - यवतमाळ पब्लिक स्कूलमधील अल्पवयीन विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी ती शाळा चालवणार्‍या जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा आणि शाळेचे मुख्याध्यापक जेकब दास यांची न्यायालयीन कोठडीत पाठवणी करण्यात आली आहे. याच प्रकरणातील आरोपी शिक्षक यश बोरुंदिया आणि अमोल क्षीरसागर यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
      अनेक पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे आवेदन करून त्यांच्या पाल्यांचे दाखले देण्याची मागणी केली आहे. दाखल्यासाठी आवेदन करणार्‍यांमध्ये पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यवतमाळ पब्लिक स्कूलवर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची नियंत्रक म्हणून नियुक्ती झाली आहे. याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी आम्ही आवेदनांची तपासणी करून त्यांना शाळेचा दाखला देणार आहोत. यांपैकी कोणालाही अडवण्याची अधिकार आम्हाला नाही, असे त्यांनी सांगितले.

साई संस्थानकडून रुग्णालयाला निधी देण्यास न्यायालयाची स्थगिती

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणून 
मंदिरांच्या विश्‍वस्त मंडळात भक्तांची नेमणूक करा !
       शिर्डी - येथील साई संस्थानने सरकारी रुग्णालयांना सिटीस्कॅन आणि एक्स रे यंत्र खरेदी करण्यासाठी देणगी म्हणून ४३ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी संमत केला होता. हा निधी देण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या संदर्भात शिर्डी येथील विजय कोते आणि संदीप पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने याचिका दाखल केली होती. (भक्तांनी अर्पण केलेल्या निधीचा वापर हा धर्मकार्यासाठीच व्हायला हवा. रुग्णालयात सुविधा देणे हे शासनाचे दायित्व आहे, मंदिरांचे नव्हे ! - संपादक)
       शिर्डी संस्थानचा कारभार उच्च न्यायालय नियुक्त त्रिसदस्यीय समिती पहात असली, तरी ही समिती सरकार सांगेल त्याला कोट्यवधी रुपये देणगी म्हणून देते. प्रत्येक जिल्हा सरकारी रुग्णालयालात सिटीस्कॅन आणि एक्स रे यंत्रे खरेदी करण्यासाठी निधी देण्याचा आदेश दिला होता; परंतु निधी देण्यापूर्वी उच्च नायालाची संमती लागते. ती मिळण्यापूर्वीच ग्रामस्थांनी त्यास विरोध केला.
       या संस्थानने आतापर्यंत रुग्णांसाठी ८७ कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे. तसेच वर्ष २०१३-१५ या कालावधीत सरकारने वैद्यकीय सुविधेसाठी दिलेल्या २०० कोटी रुपयांच्या निधीपैकी ७३ कोटी ६० लाख रुपये निधी विनावापर पडून आहे, या गोष्टी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

सनातन संस्था सातारा न्यासाच्या वतीने देवद (पनवेल) येथे वृक्षारोपण

       पनवेल - गेली काही वर्षे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे, तर पर्जन्यमान न्यून होत आहे. त्यामुळे आपल्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अमर्याद वृक्षतोडही त्यास कारणीभूत आहे. प्रत्येक व्यक्तीने प्रतिवर्षी एक झाड लावून त्याचे संगोपन केले, तर या समस्या दूर होतील असे मत देवद ग्रामपंचायतचे सदस्य श्री. निनाद गाडगीळ यांनी व्यक्त केले. सनातन संस्था सातारा या न्यासाच्या वतीने देवद गाव, पनवेल येथील सनातन संकुल येथे श्री. निनाद गाडगीळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सनातन संकुल येथील रहिवासी उपस्थित होते.
       सनातन आश्रमातील साधक श्री. शंकर नरूटे यांनी, तसेच संकुलातील रहिवासी श्री. प्रमोद बेंद्रे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. सर्वांनी लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा संकल्पही केला.

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात रमझानच्या शुभेच्छा देणारे अनधिकृत फलक

अनधिकृत होर्डिंग लावून शहराचे विद्रुपीकरण करणार्‍या 
लोकप्रतिनिधींवर महानगरपालिका काय कारवाई करणार ?
       नवी मुंबई, ८ जुलै (वार्ता.) - रमझान ईदच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी शुभेच्छा देणारी अनधिकृत होर्डिंग शहरात मोठ्या प्रमाणात लावून शहराचे विद्रुपीकरण केले आहे. या प्रकरणी अतिक्रमण विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणावर कारवाई करण्यात आली नाही किंवा शहराचे विद्रुपीपकरण केल्याच्या प्रकरणी कोणावरही गुन्हा प्रविष्ट करण्यात आलेला नाही. सुंदर नवी मुंबई ! स्वच्छ नवी मुंबई !ला हारताळ फासणार्‍या राजकारण्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
       मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंगमुळे शहरांचे विद्रुपीकरण होत असल्याने वर्ष २०१४ मध्ये सर्व महापालिकांना चांगलेच फटकारले होते. इतकेच नव्हे, तर न्यायालयाने या प्रकरणी वारंवार कारवाईचा आदेश दिला होता. कारवाई करण्यात चालढकलपणा होत असल्याने महापालिका आयुक्ततांना न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी न्यायालयात बोलावून होर्डिंग काढण्याची सक्त ताकीदही देण्यात आली होती.

डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस टीव्ही वाहिनीवर बंदी घाला !

शाही इमामांनी काश्मीरमधील विस्थापित हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये येण्यास विरोध करणार्‍या देशद्रोही मुसलमानांविषयीही बोलले पाहिजे ! गोहत्या बंदी असतांनाही ती करणार्‍या धर्मांध मुसलमानांच्या 
विरोधातही बोलले पाहिजे !
कोलकात्यातील टिपू सुलतान मशिदीच्या शाही इमामांची मागणी !
      कोलकाता - डॉ. झाकीर नाईक लोकांची दिशाभूल करत आहे. तो उलटसुलट बोलतो. तो स्वतःच्या लाभासाठी वाहिन्यांवरून इस्लामची व्याख्या करतो. मी बंगालमधील प्रमुख इमाम आहे; पण तुम्ही मला कितीवेळा टीव्हीवर पाहिले आहे ? डॉ. झाकीर याची चौकशी होऊन त्याच्या पीस टीव्ही वाहिनीवर बंदीच घातली पाहिजे, अशी मागणी शहरातील टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम सैय्यद महंमद नुरुर रहमान बरकती यांनी केली आहे. बरकती यांनी ढाका, बगदाद आणि मदीना येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणांचा निषेध केला.

शिवसेना उपविभाग प्रमुख दीपक भोईर यांना अटक !

बलात्कार प्रकरणी 
दबाव आणत असल्याचा आरोप
       कल्याण - अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी दबाव तंत्र आणत असल्याच्या आरोपावरून खडकपाडा पोलिसांनी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख दीपक भोईर यांना अटक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात वाडेघर येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली होती. एकूण सहा आरोपींपैकी एक जण त्यांचा नातेवाईक आहे. त्याच्या नावावरील खटला मागे घेण्यासाठी आणि पीडित मुलीच्या कुटुंबियांना धनादेष देऊन प्रकरण मिटवण्यासाठी, तसेच तो परिसर सोडून जाण्यासाठी दीपक भोईर दबाव आणत होते. पीडित मुलीच्या आईला काही इसमांनी घरातून उचलून नेले आणि मुलीने खोटी तक्रार दिल्याचे लिहिण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर त्यांची बलपूर्वक सही घेण्यात आली. हे पोलिसांना समजल्याने त्यांनी या प्रकरणी भोईर यांना अटक केली आहे. बलात्कार करणारे सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत.

२१ अधिकारी आणि ३ सहस्र पोलीस मागे असतांनाही मला पकडणे अशक्य आहे !

गुन्हेगारांना नियंत्रणात ठेवू न शकणार्‍या अकार्यक्षम पोलिसांमुळेच 
फरार झालेले गुन्हेगार त्यांना उघड आव्हान देण्यास धजावतात !
फरार झालेल्या गुन्हेगाराचे पोलिसांना फेसबूकवरून आव्हान !
     उदयपूर - राजस्थानमधील कुख्यात गुंड आनंदपाल सिंह हा फरार असून त्याने थेट पोलिसांनाच फेसबूकवरून आव्हान दिले आहे. सामाजिक संकेतस्थळावर त्याचा आनंदपाल यूथ ब्रिगेड या नावाचा एक गट आहे. यावरून तो पोलिसांना शरण जावे कि नाही, याविषयी सल्ला घेत आहे. या गटाच्या पानावर ८६ सहस्रांपेक्षा अधिक लोक चर्चा करत आहेत. या गटाविषयी पोलीस आणि सायबर सेल यांना काहीच कल्पना नसल्याचे समोर आले आहे. (असे पोलीस सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून जिहादी आतंकवादी जिहादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी करत असलेला प्रसार कसा रोखणार ? - संपादक)

(म्हणे) भारताशी संबंध बिघडण्याच्या मागे परदेशी प्रसारमाध्यमे ! - चीनचा कांगावा

भारतद्वेषी कारवायांवर बोट ठेवल्यावर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी चीनचा नवा डाव !
      नवी देहली - भारताशी असणारे संबंध बिघडण्यास परदेशी प्रसारमाध्यमे उत्तरदायी आहेत, असे चीनचे शासकीय वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्समध्ये म्हटले आहे. दैनिकात या संदर्भातील एक लेख प्रकाशित झाला आहे. गेल्या महिन्यात विशेष प्रयत्नानंतरही भारताला अणू पुरवठादार गटाचे (एन्एस्जीमध्ये) सदस्यत्व मिळाले नव्हते. त्यासाठी भारताने नाव न घेता चीनला दोषी ठरवले होते. त्यावरून या दैनिकाने हा लेख लिहिला आहे. (चीनची कुरापतखोर नीती, महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा आणि भारताद्वेष याची संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यातूनच सर्वच प्रसारमाध्यमे त्याला अनुसरून लिहितात. त्यांनी तसे लिहू नये किंवा पालटावे यासाठी चीनने स्वतःतील वरील अवगुणांना घालवायला हवे ! - संपादक)

(म्हणे) हिंदी महासागरात चिनी पाणबुड्यांनी ये-जा करणे वैध ! - चीनचा दावा

हिंदी महासागरात भारताचा अधिकार असतांना चीन तेथे कसा येऊ शकतो ?
     बीजिंग - चीनच्या पाणबुड्या काही सागरी क्षेत्रांना पार करतात ते आंतरराष्ट्रीय परंपरेच्या अंतर्गत करत असल्याने योग्य आहे, असा दावा चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता यांग यूजुन यांनी केला आहे. हिंदी महासागरात चीनच्या पाणबुड्या ये-जा करतात, यावर विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी वरील उत्तर दिले. तसेच ते म्हणाले की, भारतीय युद्ध नौका चीनच्या समुद्रात ये-जा करतात त्याला आम्ही अयोग्य मानत नाही. आम्ही कधीही दक्षिण चीन सागरात येणार्‍या भारतीय युद्ध नौकांना विरोध केलेला नाही. असा नौकांचा प्रवास त्या देशांतील संबंधांना साहाय्यभूत असला पाहिजे. त्या नौकांचे स्वागत झाले पाहिजे. (चीनचा साळसुदपणा ! चीनने दक्षिण चिनी सागरातील अन्य देशांच्या विशेषतः भारत आणि अमेरिका यांच्या युद्ध नौकाच्या वावराला विरोधच केला आहे. - संपादक)


गोंदिया जिल्ह्यातील पूल पहिल्याच पावसात वाहून गेला !

संबंधित राजकीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय 
अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याकडून या पुलाचा 
आणि नवीन पुलाचा खर्च वसूल करायला हवा !
       नागपूर - गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील इस्तारी गावाच्या सोयीसाठी हेरपार ते गुजुरबडगा या रस्त्यावरील गाढवी नदीच्या नाल्यावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मे मासात बांधून पूर्ण झालेल्या या पुलाला २२ लाखांचा खर्च आला. पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेला आहे. ग्रामपंचायतीने पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देवरी तालुक्यातील एका राजकीय पक्षाशी संबंधित कंत्राटदाराला दिले होते. बांधकामाच्या गुणवत्तेकडे कानाडोळा करण्यात आला, असा आरोप आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून पुलाचे बांधकाम करणार्‍या अभियंता आणि कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, तसेच पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावे अशी मागणी होऊ लागली आहे. कंत्राटदारावरील कारवाईसंदर्भात कोणी बोलत नसल्याने गावकर्‍यांत संताप आहे.

पारदर्शी आणि जनताभिमुख शासन देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या भाजप सरकारने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी !

नगर जिल्ह्यात महसूल आणि पोलीस प्रशासन यांच्याविषयी सर्वाधिक तक्रारी
     नगर, ८ जुलै - जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची सोडवणूक होण्यासाठी प्रत्येक मासाच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये सर्व विभागांच्या तक्रारी येत असल्या, तरी त्यामध्ये महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या तक्रारींचा सर्वाधिक भरणा असल्याचे चित्र आहे. नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ४ जुलै या दिवशी लोकशाही दिनाचे आयोजन केले होते. या वेळी जिल्ह्यातील नागरीकांनी एकूण ७६ तक्रारी प्रविष्ट केल्या. त्यात महसूल विभागाच्या सर्वाधिक १६, तर पोलीस प्रशासनाच्या ११ तक्रारी नागरीकांनी प्रविष्ट केल्या आहेत. (यावरून या दोन्ही विभागांतील कर्मचारीवर्ग जनतेशी कसा वागत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)

पाकिस्तानच्या हॅकर्सकडून विधी महाविद्यालयाचे संकेतस्थळ हॅक !

कुरापतखोर पाकिस्तान ! पाकला मुळासकट नष्ट केल्यानंतरच भारताला शांतता लाभेल !
     नवी देहली - पाकिस्तानी हॅकर्सनी नोएडा येथील आय.एम्.एस्. विधी महाविद्यालयाचे संकेतस्थळ हॅक केले आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार संकेतस्थळाच्या मुख्य पानावर पाकिस्तानच्या झेंड्यासह चीनशी साम्य असलेला झेंडा अपलोड केला आहे आणि हॅकड् बाय पाकिस्तानी हॅकर्स मिस्टर जी, हे वाक्य लिहिले आहे. महाविद्यालयाचे संकेतस्थळ हॅक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना संपर्क करून गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे. (पाक हॅकर्सकडून वारंवार भारतीय आस्थापनांची संकेतस्थळे हॅक होत असतांना त्यांना रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा काही पावले उचणार कि नाही ? - संपादक)केंद्रशासन इंग्रज वापरत असलेला आर्थिक वर्षाचा कालखंड पालटण्याच्या विचारात !

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर इंग्रजांच्या परंपरा पालटण्याचा विचार करणारे भारतीय ! इंग्रजांनी लादलेल्या 
सर्वच प्रथा-परंपरा पालटून भाजप शासनाने भारतीय संस्कृतीनुसारच सर्व व्यवहार करावेत, अशी 
हिंदूंची मागणी आहे !
      नवी देहली - १ एप्रिल ते ३१ मार्च ही इंग्रजांनी चालू केलेली आर्थिक वर्षाच्या कलाखंडाची परंपरा केंद्रसरकार पालटण्याचा विचार करत आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्रीय अर्थ विभागाने माजी मुख्य आर्थिक सल्लागार शंकर आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती सध्याचे आर्थिक वर्ष आणि विचाराधीन असलेले आर्थिक वर्ष याविषयीचा अभ्यास करून ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करणार आहे.

आतंकवादाचा अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंध ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

केवळ माहिती न देता शासन अमली पदार्थाच्या तस्करीचे जाळे उधळून लावेल अशी अपेक्षा आहे !
पंतप्रधान मोदी यांच्या आफ्रिका दौर्‍याला प्रारंभ 
     मापुटो (मोझांबिक) - जगाला आतंकवादापासून सर्वांत मोठा धोका असून याचा अमली पदार्थांच्या तस्करीसह अन्य गुन्ह्याशी परस्पर संबंध आहे. याला रोखण्यासाठी मोझांबिकशी करार करण्यात आला आहे. दोन्ही देश हिंदी महासागराने जोडलेले असून नव्याने समोर येणार्‍या सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रांमध्ये सहकार्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या पाच दिवसीय आफ्रिका दौर्‍याचा प्रारंभ मोझांबिकपासून झाला. 
     बांगलादेश आणि सौदी अरेबिया येथील आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर बोलतांना मोदी म्हणाले, भारतात डाळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याकरता मोझांबिकमधून डाळ खरेदी करण्याचा करार करण्यात आला. भारत हा मोझांबिकचा विश्‍वासू भरवशाचा सहकारी देश आहे. या देशाला एड्सशी लढण्यासाठी अन्य आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात येईल.शहरातील सर्व परिसरात अवैध धंदे बंद करावेत ! - पतित पावन संघटनेची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

एका हिंदुत्ववादी संघटनेला जे दिसते, ते पोलिसांना दिसत 
नाही का ? अवैध धंद्यांवर पोलीस स्वतःहून का कारवाई करत नाहीत ?
        कोल्हापूर, ८ जुलै (वार्ता.) - शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मटका, जुगार अशा प्रकारचे अवैध धंदे जोरात चालू आहेत. यामुळे चोर्‍या, घरफोड्या यांचे प्रकार वाढत असून परिसरातील शांतता नाहिशी होत चालली आहे. तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षक या नात्याने शहरातील अवैध धंदे बंद करावेत, या मागणीचे निवेदन पतित पावन संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना देण्यात आले.
        शहरात जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि करवीर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मटका, जुगार अड्डे चालू आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर मटका, रमी क्लब, तसेच लक्ष्मीपुरीच्या हद्दीत मटका जोरात चालू आहे. या अवैध धंद्यांकडे तरुण पिढी ओढली जात आहे. शहरातील सर्व अवैध धंदे बंद करावेत अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, अशी चेतावणी पतित पावन संघटनेच्या वतीने देण्यात आहे. या वेळी या संघटनेचे अध्यक्ष सर्वश्री सुनील पाटील, आकाश नवरुखे, स्वरूप पाटील, निवास पाटील, सतेज मांडवकर, सुदर्शन भोसले आदी उपस्थित होते.

महिलांना अश्‍लील लघुसंदेश पाठवणार्‍या महंमद खालीद याला अटक !

मुसलमानांची वासनांधता ! 
     नवी देहली - दीड सहस्त्र महिलांना अश्‍लील लघुसंदेश पाठवणार्‍या ३१ वर्षीय महंमद खालीद या वासनांधाला एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे. 
१. महंमद हा देहली येथे रहाणार्‍या या महिलेला २ भ्रमणभाष क्रमांकावरून अश्‍लील छायाचित्रे आणि लिखित लघुसंदेश पाठवत होता. 
२. यासंदर्भात महिलेने संबंधित क्रमांकावर भ्रमणभाष करून जाब विचारला असता त्याने स्वत:चे नाव न सांगता तिचे व्हॉट्स अपवरील छायाचित्र आणि भ्रमणभाष क्रमांक अश्‍लील संकेतस्थळांवर अपलोड करण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केली.

(म्हणे) केंद्र आणि राज्य शासन मुसलमान युवकांना खोट्या प्रकरणांत गोवण्याच्या प्रयत्नात !

वर्ष २०१४ मध्ये संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या २ मुसलमान युवकांचा थयथयाट !
     भाग्यनगर (हैद्राबाद) - वर्ष २०१४ मध्ये इस्लामिक स्टेटमध्ये (इसिसमध्ये) भरती होऊ पहाणार्‍या १४ मुसलमान युवकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना नंतर सोडून देण्यात आले. त्यांच्यापैकी २ युवकांनी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी आमचा छळ केला होता, तसेच आताही त्यांनी आम्हाला एका प्रकरणात साक्षीदार न झाल्यास खोटे गुन्हे प्रविष्ट करण्याची धमकी दिली आहे, असा आरोप केला. (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने याविषयी स्वतःची बाजू मांडणे आवश्यक ! - संपादक) केंद्रशासन आणि राज्यशासन मुसलमान युवकांना अटक करून त्यांना खोट्या प्रकरणांत गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आणि त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याचा थयथयाटही त्यांनी केला आहे. (आता प्रसारमाध्यमे मुसलमानांच्या म्हणण्याची शहानिशा न करता अशा वृत्तांना भरपूर प्रसिद्धी देतील. अन्वेषण यंत्रणांकडून हिंदुत्ववाद्यांचा जो छळ आरंभला आहे, त्यावर प्रकाश टाकण्यासाठी मात्र प्रसारमाध्यमे काहीही करत नाहीत ! - संपादक)

अलीगड मुस्लिम विद्यापीठ अल्पसंख्यांक संस्था नाही ! - केंद्रशासन

शासनावर आता मुसलमानविरोधी असल्याचा कांगावा केला जाईल !
केंद्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर
     नवी देहली - अलीगड मुस्लिम विद्यापीठ अल्पसंख्यांक संस्था नाही, या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मोदी शासनाने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही याचिका मागील काँग्रेस शासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. 
     महाधिवक्ता मुकुल रोहतगी म्हणाले, तात्कालीन काँग्रेस शासनाने दिलेले आव्हान परत घेण्यासंदर्भात केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. वर्ष १९६७ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत महाधिवक्ता रोहतगी म्हणाले, अलीगड मुस्लिम विद्यापीठ अल्पसंख्यांक संस्था नाही; कारण शासनाने याची स्थापना केली होती, मुसलमानांनी नाही.

कर्जत येथील एका मुलाचा नदीत बुडून मृत्यू

        कर्जत (जिल्हा रायगड) - कर्जत येथील श्री. तानाजी पिंगळे यांचा मुलगा सागर पिंगळे (वय २५) याचा ३ जुलैला येथील नदीत बुडून संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार श्री. पिंगळे यांनी येथील स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. सागर याचे मित्र सकाळी बोलवायला आले असता तो त्यांच्यासमवेत घरातून निघून गेला होता. त्यानंतर संध्याकाळी सागरच्या मित्रांनी सागर नदीत बुडाल्याचे अन्य एकांना सांगितले, तसेच पोलीस ठाण्यात जाऊन याविषयी माहिती दिली; परंतु तोपर्यंत त्याचे वडील श्री. पिंगळे यांना कोणतीही कल्पना दिली नाही. त्याच वेळी श्री. पिंगळे यांचे भाऊ श्री. रघुनाथ पिंगळे यांना या संदर्भात कळवण्यात आले. त्यामुळे श्री. पिंगळे यांना यात घातपात झाल्याचा संशय आहे.

पंढरपूरजवळ वारकर्‍यांच्या ट्रकला अपघात, १ ठार आणि ४८ घायाळ

      पंढरपूर, ८ जुलै - पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन पालखीकडे निघालेल्या वारकर्‍यांच्या ट्रकला जेऊर-करमाळा रस्त्यावर ८ जुलैला पहाटे अडीचच्या सुमाररास अपघात झाला. यात एका वारकर्‍याचा मृत्यू झाला असून ४८ वारकरी घायाळ झाले आहेत. मोतीराम गोविंद शिंदे असे मृत्यूमुखी पडलेल्या वारकर्‍याचे नाव आहे. अपघातग्रस्त वारकरी हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर आणि गंगापूर परिसरातील असून निवृत्ती महाराज यांच्या पालखीतील आहेत. ट्रक चालकाला झोप लागल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक पलटी झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

शेतकरी संघटनांत फूट पाडण्याचे षड्यंत्र ! - माजी आमदार संभाजीराव पवार

       सांगली, ८ जुलै (वार्ता.) - खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यावर काही लोक चिखलफेक करत चळवळ मोडीत काढण्याचा उद्योग करत आहेत. काही कारखानदारांच्या माध्यमातून हे षड्यंत्र रचले जात आहे. याला शेतकरी बधणार नसून जशास तसे उत्तर दिले जाणार आहे, असे मत माजी आमदार श्री. संभाजीराव पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
       श्री. पवार पुढे म्हणाले, चळवळीस मोठा इतिहास असतांना अचानक संघटनेच्या अंतर्गत मतभेद वाढू लागले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य शेतकरी संघटना यांच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज ऊस उत्पादक शेतकर्‍यांना चांगला दर मिळत आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एफ्आर्पीची रक्कम दिलेली आहे. हे चळवळीचे यश आहे. संघटनेचे हे यश पचनी पडत नसल्यानेच काही लोक संघटनेच्या पदाधिकार्‍यांत भांडणे लावत आहेत. त्याला शेतकरी बळी पडणार नाही.

गेल्या दहा वर्षांतील वृक्षारोपणाचे २७ टक्केच उपक्रम यशस्वी !

       पुणे, ८ जुलै - गेल्या दहा वर्षांत राज्यात झालेले वृक्षारोपणाचे २७ टक्केच उपक्रम यशस्वी झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या दहा वर्षांत सरकारने विविध योजनांद्वारे १३ सहस्र ७७७ चौरस किलोमीटर जागेत वृक्षारोपण केले; मात्र त्यांतील केवळ २७ टक्के जागेतील म्हणजे ३ सहस्र ७६३ चौरस किलोमीटर जागेतील वृक्ष जगले. (नुकत्याच झालेल्या पर्यावरणदिनी राज्याच्या वन विभागाने एकाच दिवशी दोन कोटी झाडे लावण्याचा उपक्रम राबवला. हा उपक्रम तरी शतप्रतिशत यशस्वी व्हावा, यासाठी वन विभागाच्या जोडीला सर्वसामान्यांनीही प्रयत्न करावेत आणि लावलेल्या रोपट्यांची काळजी घ्यावी. - संपादक)

इचलकरंजीत आठ सूतपेढ्यांवर छापे !

       इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ८ जुलै (वार्ता.) - शहरातील ८ व्यापायार्‍यांच्या सूतपेढीवर विक्रीकर विभागाने ७ जुलै या दिवशी छापे टाकले. ४५ जणांच्या पथकाने एकाच वेळी ही कारवाई केली. शहरात कोट्यवधींची सूत विक्रीची उलाढाल होत असते. परराज्यातून सूत शहरात येते. काही वेळा व्यापार्‍यांकडून राज्याचा महसूल बुडवला जातो, तसेच इचलकरंजीसह वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्र असणार्‍या मालेगावमध्ये देयके न करता सुताची विक्री मोठ्या प्रमाणात होते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून नफा कमावला जात आहे.

मंदिराच्या वर्धापनदिनाला गर्दी जमवण्यासाठी रज-तम प्रधान कार्यक्रमांचे आयोजन करणारे विश्‍वस्त !

यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते !
डॉ. संजय सामंत
      आम्ही जिल्ह्यातील एका गावात असणार्‍या एका मंदिराच्या वर्धापनदिनाला गेलो होतो. तो वर्धापनदिन तारखेनुसार होता. खरे तर तो तिथीप्रमाणे असायला हवा; परंतु लोकांना लक्षात ठेवायला सोपा जावा म्हणून इंग्रजी तारखेनुसार केला साजरा केला जात होता. हिंदु संस्कृतीनुसार तिथीला महत्त्व आहे, हेही त्या विश्‍वस्तांना ज्ञात नव्हते.
१. सोडतीचे आमीष दाखवून देवळात गर्दी जमवणारे विश्‍वस्त !
    कार्यक्रमात सोडत (लकी ड्रॉ) ठेवण्यात आली होती. या सोडतीत गावातील मान्यवरांनी (यामध्ये त्या मंदिराचे पुजारीही होते) विविध बक्षिसे प्रायोजित केली होती. कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये वारंवार बक्षिसांची सूची घोषित करून भाविकांनी या सोडतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत होते. या सर्व प्रकारामुळे भक्तीभावाने आलेल्या भाविकांचे लक्ष विचलित होत होते.

कॅपिटेशन फी नकोच !

     शैक्षणिक संस्थांकडून वसूल करण्यात येणारी कॅपिटेशन फी पूर्णत: अवैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाचा हा निर्वाळा पालकांसाठी दिलासा देणारा आहे. पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास सिद्ध असणार्‍या पालकांमुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण केव्हाच महाग झाले आहे. अशा प्रकारे अयोग्य गोष्टींना खतपाणी घालणारे श्रीमंत पालक हे गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात खो घालून त्यांची हानी करतात.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

एकही राज्यकर्ता हिंदूंच्या बाजूने नाही !

हिंदूंसाठी धोक्याची घंटा !
     एकही राज्यकर्ता हिंदूंच्या बाजूने नाही. सर्वजण विकासाची सूत्रे मांडत आहेत. धर्माच्या बाजूने कोणी नाही. अशी भयाण परिस्थिती आहे. हिंदूंमध्ये धर्माचरणाचा अभाव आहे. हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. 
- अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक

गुरुकृपा अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर करत रहाणे आवश्यक असते.

चांगली आकलनक्षमता आणि देवाची आवड असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. तनया चंद्रहास म्हसकर (वय ५ वर्षे) !

चि. तनया
     आषाढ शुक्ल पक्ष पंचमी (९.७.२०१६) या दिवशी पुणे येथील चि. तनया चंद्रहास म्हसकर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या नातेवाइकांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
चि. तनया हिला वाढदिवसानिमित्त सनातनच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. सौ. मानसी चंद्रहास म्हसकर 
(चि. तनयाची आई)
१ अ. विवाहापूर्वी दासबोध या ग्रंथाचे पारायण करणे आणि विवाहानंतर सासूबाईंकडून साधना अन् प्रत्येक सणाचे शास्त्रोक्त महत्त्व समजल्यामुळे त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे 
     मी वर्ष २००१ पासून श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या दासबोध या ग्रंथाचे पारायण करत आहे. माझ्या सासूबाई सौ. आसावरी मनोहर म्हसकर या सनातन संस्थेच्या साधिका आहेत. त्या प्रतिदिन मिरज आश्रमात येऊन जाऊन सेवा करतात. आमच्या विवाहानंतर सौ. आईंकडून मला साधना समजली. त्यांनी मला प्रत्येक सण आणि कुलधर्म-कुलाचार यांचे महत्त्व सांगितले. त्या मला अजूनही सनातनच्या नवीन प्रकाशित झालेल्या ग्रंथातील अनमोल ज्ञान सांगतात. त्या मला सुनेप्रमाणे न वागवता मुलीप्रमाणेच वागवतात. एवढ्या चांगल्या सासूबाई मिळाल्याविषयी मी श्रीसमर्थांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

पू. राजेंद्र शिंदे यांनी साधनेत ध्येय ठेवण्याविषयी केलेल्या मार्गदर्शनानंतर देवद आश्रमात सेवा करणार्‍या कु. सुवर्णा कुुंभार यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांच्यात झालेले पालट

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
        १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

समजूतदार आणि देवाची आवड असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली भोर, जि. पुणे येथील चि. कृष्णमयी विश्‍वजित चव्हाण (वय १ वर्ष) !

चि. कृष्णमयी
      चि. कृष्णमयी विश्‍वजित चव्हाण हिचा ९.७.२०१६ या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची वैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
चि. कृष्णमयी हिला वाढदिवसाप्रीत्यर्थ 
सनातन संस्थेच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. गर्भारपण 
१ अ. कृष्णमयीच्या वेळी दिवस गेल्यावर त्याच मासात आमचे कुलदेव आणि कुलदेवी यांच्या दर्शनाला जाण्याचे नियोजन झाले. 
१ आ. दुसर्‍या मासात एकदा नामजप करतांना प.पू. डॉक्टर लहान बाळ होऊन माझ्या मांडीवर झोपले आहेत, असे जाणवून माझी भावजागृती झाली.

अनेक गुणांचा समुच्चय असणारे चि. रूपेश रेडकर आणि देवाप्रती भाव असणार्‍या प्रांजळ चि.सौ.कां. ज्योती (अक्षता) रेणके !

चि. रूपेश रेडकर
चि.सौ.कां. ज्योती रेणके
     १०.७.२०१६ या दिवशी मूळचे पनवेल येथील आणि रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे चि. रूपेश रेडकर आणि मूळच्या गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील आणि रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या चि.सौ.कां. ज्योती (अक्षता) रेणके विवाहबद्ध होत आहेत. त्यानिमित्त चि. रूपेश आणि चि.सौ.कां . ज्योती (अक्षता) रेणके यांच्या सहसाधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
चि. रूपेश रेडकर आणि चि.सौ.कां ज्योती (अक्षता) रेणके यांना 
शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! 

२१.५.२०१४ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या तिथीनुसार झालेल्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त बालसाधकांनी केलेली प्रार्थना !

॥ श्रीकृष्ण ॥
वैशाख कृष्ण पक्ष षष्ठी/सप्तमी (२१.५.२०१४)
कृष्णाच्या सर्व बाळांकडून कृष्णाला गोड गोड खाऊ !
       कृष्णाला पुढील वर्ष चांगले, निरोगी, आनंदाचे जावो आणि कृष्ण अखंड आनंदी राहो, हीच कृष्णाला प्रार्थना !
सर्व बालसाधक,
सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

गुरुदेवा, प्रसाद मज द्यावा !

श्रीमती वसुधा कालीदास देशपांडे
गुरुदेवा, प्रसाद मज द्यावा ।
चरणी मज चिरंतन ठाव द्यावा ॥ धृ. ॥
मूर्ती तुझी असो नयनात सदा ।
गुंजारव महिमा कर्णात करावा ॥ १ ॥
मुखात भक्तीचा रस पाझरे सदा ।
श्‍वासही निमग्न राहो ॥ २ ॥
गुरुदेवा, मन चरणी दृढ राहो ।
तुजपासोनी विचार न ढळो ॥ ३ ॥
एकरूप होऊ दे तुजपाशी ।
चित्त वळो तुज चरणापाशी ॥ ४ ॥
गुरुदेवा, जन्मोजन्मीचे हे वस्त्र फेडू दे ।
निसंग होऊ दे अन् गळून पडो कर्मबंधन ते ॥ ५ ॥

राज्यकर्त्यांची क्रांतीकारकांविषयी घोर अनास्था !

       हुतात्मा दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव हे चापेकर बंधू आणि महादेव गोविंद रानडे या क्रांतीवीरांचे पूर्णाकृती पुतळे उभारून त्यांचे समूहशिल्प करण्याचा काही वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर बर्‍याच विलंबाने २५ ऑगस्ट २०१० मध्ये स्मारकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्या वेळी नेहमीप्रमाणे आश्‍वासने देणार्‍या लोकप्रतिनिधींनी स्मारकाचे काम वेगात पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले; मात्र स्मारकासाठीच्या चौथर्‍याचे भूमीपूजन व्हायला पुढची ४ वर्षे गेली.
       स्मारकासाठी प्रारंभी जे पुतळे सिद्ध केले होते त्यांची उंचीही पुष्कळ कमी होती. लांबून पाहिल्यास पुतळे दिसतच नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यात पालट करून ७ ते १२ फूटांपर्यंतची उंची असलेले सुधारित पुतळे करण्यात आले. (आरंभी केलेले पुतळे कुठे गेले ? त्याचा खर्च कोणाकडून वसूल करणार ? - संपादक) पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने काम रखडल्याचे कित्येक महिने सांगण्यात येत होते.

सनातनची यथेच्छ अपकीर्ती करणारे दैनिक लोकमत आणि वृत्तवाहिनी आय.बी.एन्. लोकमत या प्रकाराविषयी मूळ गिळून गप्प का ?

       मडगाव स्फोट प्रकरण, पुरोगाम्यांच्या हत्या आदी प्रकरणांवरून सनातनची यथेच्छ अपकीर्ती करणारे दैनिक लोकमत आणि आय.बी.एन्. लोकमत वृत्तवाहिनी हे जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या यवतमाळ पब्लिक स्कूलमधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाविषयी मूग गिळून गप्प का ? एरव्ही हिंदुत्ववाद्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्यांना नैतिकतेचे डोस पाजणारे वरील वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी यांचे या प्रकरणी मौन आश्‍चर्यकारक आहे, अशा प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त होत आहेत.

श्रेय लाटण्यासाठी स्मारकाचे घाईने उद्घाटन ?

       बराच काळ रखडलेले स्मारकाचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यात आले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण करण्याचे प्रयत्न चालू झाले. हा कार्यक्रम क्रांतीदिनी म्हणजे ९ ऑगस्ट या दिवशी करण्याचे योजले जात होते; पण या कामाचे श्रेय अन्यांना मिळू नये, यासाठी महापालिकेत सत्ता असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसने १० वर्षे रेंगाळलल्या स्मारकाचे अजित पवार यांच्या ९ जुलैच्या दौर्‍यातच घाईने उद्घाटन करण्याचा घाट घातला. त्यामुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ श्रेय लाटण्याच्या उद्देशानेच स्मारकाच्या अनावरणाचा सोहळा उरकण्याची घाई केली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात आज ठाणे येथे आंदोलन !

स्थळ : सॅटीस पुलाखाली, रेल्वे स्थानकाच्या जवळ, ठाणे प.
वेळ : सायं ५ ते ७
हिंदूंनो, या आंदोलनात 
बहुसंख्येने सहभागी व्हा !
संपर्क : ९३२४८६८९०६

गुरुकुल शिक्षणपद्धती

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
गुरुकुल शिक्षणपद्धतीचे महत्त्व आणि आवश्यकता या अंकात वाचा !
प्रसिद्धी दिनांक : १० जुलै २०१६
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ९ जुलै 
या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

फलक प्रसिद्धीकरता

बंगालच्या हिंदूंनी हिंदुद्वेष्ट्या तृणमूल 
काँग्रेसला निवडून दिल्याचा दुष्परिणाम !
       बंगाल राज्यातील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे आमदार हमिदुल रहमान यांच्या उपस्थितीत धर्मांधांनी बॉम्बद्वारे हिंदूंवर आक्रमण केले. त्यांनी हिंदूंची अनेक घरे जाळली आणि संपत्तीची लूट केली. त्यांनी केलेल्या गोळीबारात काही हिंदू घायाळही झाले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Bangalme Trinamool Congresske vidhayakke samaksh dharmandhoka Hinduopar bamdwara akraman.
Hinduodwara jitvaye Hindudrohi TMCke raajme aur kya hoga ?
जागो !
बंगाल में तृणमूल कांग्रेस के विधायक के समक्ष धर्मांधों का हिन्दुआें पर आक्रमण.
हिन्दुआें द्वारा जितवाए हिन्दूद्रोही टीएमसी के राज में और क्या होगा ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

खरे समजून घेणे 
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
 सुनो सोचो समझो । सुनो समझो सोचो ।
भावार्थ : सुनो म्हणजे ऐका, सोचो म्हणजे विचार करा आणि समझो म्हणजे समजून घ्या. पहिल्या ओळीत सुनो सोचो समझो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर मन आणि बुद्धी यांद्वारेे विचार करून काय ते समजून घ्या. यातील समजून घेणे मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून असल्याने ते मायेच्या संदर्भात आहे. अभिमन्यूला केवळ हीच ओळ ठाऊक होती, म्हणून तो चक्रव्यूहात अडकला. याउलट दुसर्‍या ओळीत सुनो समझो सोचो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर जिवाने ती गोष्ट समजून जाणे, त्याची अनुभूती घेणे आणि नंतर त्याविषयी विचार करणे. हे ब्रह्माच्या संदर्भात आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
    बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे प्राण्यांप्रमाणे स्वेच्छेने वागणारे, तर साधक म्हणजे परेच्छेने आणि ईश्‍वरेच्छेने वागणारे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवलेयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
परमेश्‍वराने देणगी दिलेल्या देहाचा उपयोग नेहमी सत्कर्मासाठी करावा. इतरांच्या 
त्रासाला आपला देह कारणीभूत होणार नाही, याची नेहमी काळजी घ्यावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


बोधचित्र

हे कसले नेते ?

संपादकीय
     पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्यांना दुहेरी नागरिकत्व देऊन त्यांना मतदानाचा अधिकार द्या, अशी हाक गोवा राज्यातील काँग्रेसच्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी दिली आहे. गोवा राज्यावर पोर्तुगीज तब्बल साडेचारशे वर्षे राज्य करून गेले. त्या गोष्टीला ५६ वर्षे होऊन गेली, तरी त्यांच्याविषयीचे काही गोमंतकीय मंडळीतील प्रेम उणावले नसल्याचे हे द्योतक आहे. देशविघातक विधाने करण्यात काँग्रेसचे नेते पुढे असतात, असे म्हणण्याचा जो प्रघात पडला आहे, त्याला व्हिक्टोरिया फर्नांडिस यांच्या वरील हाकेने पुष्टी मिळते. मतदानाचा अधिकार त्यांना आठवला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn