Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आम्हा नामाचे चिंतन । राम कृष्ण नारायण ।
तुका म्हणे क्षण । खाता जेविता न विसंभो ॥

विनम्र अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेलिस उडीचे १०६ वे वर्ष

(म्हणे) आतंकवादाला प्रोत्साहन दिलेले नाही ! - डॉ. झाकीर नाईक यांचा साळसुदपणा

हिंदूंनो, सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे हिंदुद्वेषी पुरो(अधो)गामी हे आतंकवाद्यांचे प्रेरणास्थान असणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !
   मुंबई - मी आतंकवादाला प्रोत्साहन देतो, असे म्हणणे तथ्यहीन आहे. कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने मी आतंकवादाला प्रोत्साहन देतो, असे म्हटलेले नाही. गृहमंत्रालय माझ्या सर्व भाषणांची तपासणी करू शकते, असे डॉ. झाकीर नाईक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. प्रत्येक मुसलमानाने आतंकवादी व्हावे, असे मी सतत सांगत असतो. ज्याची दहशत असते तो आतंकवादी. एखाद्या चोराने पोलिसाला पाहिले असता त्याला दहशत वाटते. तेव्हा चोरासाठी पोलीस हा आतंकवादीच असतो. अशाच प्रकारे प्रत्येक मुसलमानाने चोरांसाठी आतंकवादी व्हावयास हवे, असे डॉ. झाकीर यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.
डॉ. झाकीर यांची प्रवचने आणि भाषण यांचा एन्आयए अभ्यास करत आहे.

डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस टीव्हीचे भारतात विनाअनुज्ञप्ती प्रक्षेपण !

केंद्रसरकारचे सूचना आणि प्रसारण मंत्रालय अन् सर्व राज्यांची सरकारे यांची निष्क्रीयता !
   नवी देहली - कथित इस्लामी विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस टीव्ही या वाहिनीला भारतात प्रक्षेपण करण्याची अनुज्ञप्ती (लायसन्स) नसतांनाही त्याचे देशभरात अवैधपणे प्रक्षेपण चालू आहे. केंद्रसरकारने त्यावर बंदी घातली असली, तरी ती कागदावरच असून प्रत्यक्षात ही वाहिनी उघडपणे पहाण्यात येते. काँग्रेसच्या राज्यात आणि आता गेल्या २ वर्षांतील भाजपच्या राज्यात याचे प्रक्षेपण दाखवणार्‍यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे झाकीर नाईक यांच्या जिहादी विचारसरणीचे सिंचन देशातील धर्मांधांमध्ये उघडपणे चालू आहे. यातून देशातील सूचना आणि प्रसारण मंत्रालयाची आणि देशातील सर्व राज्य सरकारांची निष्क्रीयताच समोर आली आहे.

बांगलादेशच्या मागणीवर भारत डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंदी घालण्याचा विचार करू शकतो ! - केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू

अन्य देशाने सांगितल्यावर बंदी घालण्यापेक्षा, भारत शासन स्वतःच का बंदी घालत नाही !
    नवी देहली - भारतासाठी बांगलादेशची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. जर बांगलादेश सरकारकडून मागणी आली, तर भारत इस्लामी विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंदी घालण्यावर गंभीरतेने विचार करील, असे विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले आहे.
१. बेकायदेशीर कारवायाविरोधी अधिनियमांच्या अंतर्गत डॉ. झाकीर यांच्यावर कारवाई करू शकतो. या नियमाचा उपयोग देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असणार्‍या संघटनांवर बंदी घालण्यासाठी केला जातो; परंतु अद्याप या कायद्याद्वारे कोणत्याही व्यक्तीवर कधीही बंदी घालण्यात आलेली नाही. जर नाईक यांच्याविरोधात पुरावे मिळाले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
२. ज्याद्वारे धार्मिक कट्टरतेला प्रोत्साहन देण्यात येते, त्या सर्व माध्यमांवर लक्ष ठेवण्याची योजना केंद्रीय गृहमंत्रालय बनवत आहे. (देशात विविध धर्माचे लोक रहात असतांना आणि प्रतिदिन देशात दंगली होत असतांना आतापर्यत अशी योजना का बनवण्यात आली नाही, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. - संपादक)

बांगलादेशात नमाजाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात ४ जण ठार !

   किशोरगंज - बांगलादेशात ढाका येथील होली आर्टिसन बेकरीत झालेल्या आक्रमणानंतर आता आतंकवाद्यांनी बांगलादेशातच आणखी आक्रमण करण्याची धमकी एका व्हिडिओद्वारे दिली होती. या धमकीच्या दुसर्‍याच दिवशी दुसरे आक्रमण करण्यात आले आहे. ७ जुलैला ईदच्या दिवशी किशोरगंजच्या शोलकिया ईदगाह मैदानात धार्मिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्य नमाजाच्या पठणाच्या वेळी आतंकवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात ४ ठार, तर १२ जण घायाळ झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये एका पोलीस शिपायाचा, तर घायाळांमध्ये ९ पोलिसांचा समावेश आहे.

श्रीलंकेकडून १६ भारतीय मच्छिमारांना अटक

यावर कायमस्वरूपी उपाययोजना काढण्याचे एकाही राज्यकर्त्याच्या लक्षात कसे येत नाही ?
   रामेश्‍वरम् (तमिळनाडू) - सागरी सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीलंकेच्या नौदलाने ७ जुलै या दिवशी कच्चाथेवू येथे १६ भारतीय मच्छिमारांना अटक केली. श्रीलंकेकडून भारतीय मच्छिमारांना अटक करण्याची या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. या प्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
    मच्छिमार संघटनेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ जुलैपासून आतापर्यंत श्रीलंकेकडून ४४ मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. नौदलाच्या सैनिकांनी भारतीय मच्छिमारांना घेराव घालत त्यांच्याकडील ५० जाळी आणि काही बोटीही कह्यात घेतल्या आहेत. मच्छिमारांना अटक केल्यानंतर त्यांना कंगेसनथुराई येथे नेण्यात आले आहे. (अशी कारवाई भारताने श्रीलंकेच्या मच्छिमारांवर केल्याचे ऐकिवात आहे का ? - संपादक)

रामजन्मभूमी प्रकरणी मुसलमान राष्ट्रांतील मुल्ला-मौलवींना बोलवणार ! - माजी खासदार रामविलास वेदांती

हिंदुस्थानातील प्रभु श्रीरामाच्या जन्मभूमीचा दाखला
अन्य राष्ट्रांतील मुसलमानांकडून कशासाठी हवा ?
   पुणे - रामजन्मभूमी-बाबरी मशीद हा वाद गेली अनेक वर्षे आहे. त्याची सोडवणूक करण्यासाठी इस्लामी राष्ट्रांतील मुल्ला-मौलवींना अयोध्येमध्ये एकत्रित करून चर्चा घडवून आणणार आहोत, असे रामजन्मभूमी शिलान्यासाचे अध्यक्ष आणि माजी खासदार रामविलास वेदांती यांनी सांगितले. (अन्य राष्ट्रांतील मुसलमानांचा काय संबंध ? उद्या त्यांनीही ही रामजन्मभूमी आहे, असे सांगितल्यावर पाकची फूस असलेले भारतातील मुसलमान ते ऐकणार आहेत का ? अयोध्येत रामजन्मभूमी आहे, याचा पुरावाच एकतर देण्याची आवश्यकता नाही. असे असूनही न्यायालयाने ती रामजन्मभूमी असल्याचा निकालही दिला आहे.

(म्हणे) डॉ. झाकीर नाईक शांतीदूत !

कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून
आतंकवाद्यांना प्रेरणा देणारे डॉ. झाकीर यांचा गौरव !
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना हिंदु आतंकवादी आणि डॉ. झाकीर नाईक
यांना शांतीदूत संबोधणारे दिग्विजय सिंह भारताचे कि पाकिस्तानचे !
   नवी देहली - वादग्रस्त डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस टीव्हीवरील एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी डॉ. झाकीर नाईक जगभरात शांतीचा संदेश पसरवत असल्याचा मला आनंद वाटतो, असे प्रमाणपत्र दिल्याचे एका ध्वनिचित्रफितीतून नुकतेच समोर आले आहे. त्यामुळे डॉ. सिंह यांचा मुसलमानधार्जिणेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

(म्हणे) मी स्मृती इराणी यांच्याविषयी काही बोललो नाही !

अधोगतीकडे वाटचाल करत असलेले भारतीय लोकराज्य !
संयुक्त जनता दलाचे नेते अली अन्वर यांचे घुमजाव
      नवी देहली - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर स्मृती इराणी यांचे मनुष्यबळ विकास खात्याचे मंत्रीपद काढून त्यांना वस्त्रोद्योग मंत्रीपद देण्यात आले. या संदर्भात भाष्य करतांना संयुक्त जनता दलाचे नेते अली अन्वर यांनी इराणी यांना उद्देशून छान ! त्यामुळे त्यांना शरीर झाकण्यास साहाय्य होईल, असे अवमानजनक वक्तव्य केले होते. यामुळे अन्वर यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत असल्यामुळे त्यांनी घुमजाव केले आहे. या वक्तव्याचे खापर त्यांनी वृत्तसंस्थांवर फोडले असून मी स्मृती इराणींच्या संदर्भात असे काहीही बोललोच नाही. प्रसार माध्यमांनीच माझे वक्तव्य पालटले. मला वाटते माध्यमांनी माझी दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी माझी नकारात्मक प्रतिमा निर्माण केली, असे म्हटले आहे. (आधी अवमानजनक वक्तव्य करायचे आणि गोष्ट अंगावर आली की, नेहमीप्रमाणे घुमजाव करायचे ! ही आहे आजच्या भारतीय राजकारण्यांची मानसिकता. अशा राजकाण्यांना जनतेने त्यांची जागा दाखवायला हवी ! - संपादक)

ध्वनिचित्रीकरण नष्ट करण्यास नकार दिल्याने पत्रकारावर अबु्रनुकसानीचा दावा प्रविष्ट करण्याची तेजप्रताप यादव यांची धमकी !

पत्रकारांना धमकी देणारे लोकप्रतिनिधी जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
     पाटलीपुत्र (पाटणा) - पत्रकाराने ध्वनिचित्रीकरण (व्हिडीओ रेकॉर्डिंग) नष्ट (डिलिट) करण्यास नकार दिल्याने बिहारचे आरोग्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची सदर पत्रकाराला धमकी दिली. राष्ट्रीय जनता दलाच्या २० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाच्या वेळी ही घटना घडली. त्यामुळे काही वेळ कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. या वेळी मंचावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव ही उपस्थित होते. कार्यक्रम चालू असतांना तेज प्रताप यादव त्यांच्या कॅमेर्‍यातून छायाचित्र काढत होते. हे एका पत्रकाराने पाहिल्यानंतर त्याने तेजप्रताप यादव यांचे भ्रमणभाषमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर तेजप्रताप यांच्या आदेशावरून दोघा जणांनी या पत्रकाराला हे ध्वनिचित्रीकरण नष्ट करण्यास सांगितले; मात्र मी काही चुकीचे केले नाही, असे सांगत ध्वनिचित्रीकरण नष्ट करण्यास पत्रकाराने नकार दिला. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी त्या पत्रकाराला व्यासपिठावर बोलवून पुन्हा ते ध्वनिचित्रीकरण नष्ट करण्याची विनंती केली. त्याने लालू प्रसाद यांनाही नकार दिल्यानंतर शेजारी बसलेल्या तेजप्रताप यादव यांनी पत्रकाराला अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, अशी धमकी दिली.डॉ. झाकीर नाईक हे धर्माचा चुकीचा प्रचार करत आहेत ! - अमीर खान

हे इतकी वर्षे का लक्षात आले नाही ?
    मुंबई - कोणताही धर्म हा आतंकवाद शिकवत नाही. आतंकवाद आणि धर्माचा संबंध लावला जाऊ नये. झाकीर धर्माचा चुकीचा प्रचार करत आहे. प्रेम हाच धर्माचा प्रमुख संदेश असतो. मुसलमान, हिंदु, शीख, ख्रिस्ती धर्मातील प्रत्येकजण त्याच्या धर्मासाठी काहीतरी करत असतो. जे लोक आतंकवाद पसरवतात आणि जे लोक आतंकवाद करतात त्यांना धर्माशी काही देणे-घेणे नसते. मग ते कोणत्याही धर्माचे असो, असे प्रतिपादन अभिनेता अमीर खान याने एका पत्रकार परिषदेते केले. (अमीर खान याने सर्व आतंकवादी एकाच धर्माचे का असतात, ते आतंकवादी का होतात, याचे उत्तरही दिले पाहिजे ! - संपादक)

इस्लाम जेथेही गेला, तेथे विध्वंस झाला ! - आशा शर्मा, नेत्या, राष्ट्रीय सेविका समिती

   नवी देहली - इस्लाम हा धर्म नसून राजकीय षड्यंत्र आहे. इस्लाम जेथेही गेला, तेथे विध्वंस सोबत घेऊन गेला आहे, हा इतिहास आपण नाकारू शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा राष्ट्रीय सेविका समितीच्या नेत्या आशा शर्मा यांनी देहली येथील आतंकवाद एक समस्या या कार्यक्रमात केले. या वेळी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन उपस्थित होत्या.
    प्रसिद्धी माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार शर्मा पुढे म्हणाल्या, आजही मुसलमानांची विचारसरणी तीच आहे. जेथे त्यांची लोकसंख्या १० टक्के असते, तेथे ते शांत असतात. १५ टक्के झाले, तर आपले म्हणणे सांगून गप्प करतील. त्यांची संख्या २५ टक्के झाली की इतरांनी त्यांची गोष्ट मान्य करावी, यासाठी प्रयत्न करतील आणि त्याहून अधिक वाढले, तर कोणाचेच ऐकणार नाहीत.

डॉ. झाकीर यांची भाषणे आक्षेपार्ह ! - केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू

      नवी देहली - केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांना आक्षेपार्ह म्हटले आहे. तसेच गृह मंत्रालय या भाषणांचे विश्‍लेषण करून कारवाई करू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या दुसर्‍या आक्रमणाचा नायडू यांनी निषेध केला. आतंकवाद्यांना कोणताही धर्म आणि क्षेत्र नसतो, असेही ते म्हणाले. (याविषयी जनतेला आता वास्तव कळून चुकले असतांना अशा विधानांमुळे तिची दिशाभूल होऊ शकते - संपादक) आतंकवादाच्या विरोधात संपूर्ण जगाने एकत्र आले पाहिजे, असे आवाहन नायडू यांनी केले. (अशी विधाने करून नव्हे, तर आतंकवाद्यांचे मूळ नष्ट करण्याचे धाडस दाखवल्यावरच आतंकवाद नष्ट होईल. - संपादक)

इसिसकडून यझिदी महिला आणि मुली यांची ऑनलाईन विक्री !

आतंरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना ही अमानवता दिसत नाही का ?
     खनके (इराक) - इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेकडून सध्या पश्‍चिम आशियामधील यझिदी समुदायाच्या महिला आणि लहान मुलींची सेक्स स्लेव्हज म्हणून सहस्रो डॉलर्सना ऑनलाईन विक्री केली जात आहे. याचे विज्ञापन व्हॉट्स-अ‍ॅप आणि इतर माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात येत आहे. उत्तर इराकमध्ये इसिसने ऑगस्ट २०१४ मध्ये केलेल्या आक्रमणांमध्ये सहस्रो याझिदी महिला आणि लहान मुले यांना कैद करण्यात आले होते. या संघटनेच्या कह्यात अद्यापही ३ सहस्र महिला आणि लहान मुली असून त्यांची माहिती विज्ञापनाच्या स्वरूपात देण्यात येत आहे. यात त्या महिला आणि मुलींची छायाचित्रे, तसेच त्या ज्या मुसलमान आतंकवाद्याच्या कह्यात आहेत, त्या आतंकवाद्याचे नाव दिले जात आहे. इसिसच्या कह्यातून सुटका झालेल्या नदिया मौराद या तरुणीने अमेरिकी काँग्रेस आणि युरोपीय संसदेसमोर बोलतांना याझिदींची अशा प्रकारे परवड होत असतांना मानवता कुठे आहे ?, असा प्रश्‍न विचारला होता.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाची पोलीस आणि सैन्य यांच्या खबर्‍यांना ठार करण्याची धमकी !

आतंकवादग्रस्त भारत !
* मशिदींबाहेर लावली भित्तीपत्रके 
* ठेकेदारांना सैन्यासह काम करण्यास मनाई 
       श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाकडून मशिदींच्या बाहेर पोलीस आणि सैन्य यांना माहिती पुरवणार्‍या खबर्‍यांना गोळीने ठार करण्याची धमकी देणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. उर्दू भाषेत लिहिण्यात आलेल्या या भित्तीपत्रकांमध्ये महिलांना सैन्य किंवा पोलीस प्रशिक्षण शिबिरांमध्ये न जाण्याची ताकीद देण्यात आली आहे. त्याचसमवेत ठेकेदारांनाही सैन्यासह काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. या भित्तीपत्रकांमध्ये एखाद्यावर थोडातरी संशय आला, तरी त्याला ठार करण्याची स्पष्ट चेतावणी देण्यात आली आहे.

मातृभाषाप्रेमी आमदार निवडून आणण्यासाठी थेट प्रचारात उतरण्याचा भाभासुमंचा निर्णय !

मातृभाषा रक्षक नोंदणी अभियानाद्वारे २ लक्ष नागरिकांना आंदोलनाशी थेट जोडण्याचे लक्ष्य !
     पणजी, ७ जुलै (वार्ता.) - संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर करून निवडणूक लढवण्याऐवजी (कुठल्याही पक्षातील किंवा अपक्ष) मातृभाषाप्रेमी आमदार निवडून येण्यासाठी निवडणुकीत सर्व शक्तीनिशी प्रचारकार्य करण्याची परिस्थितीनुरूप रणनीती भारतीय भाषा सुरक्षा मंचने (भाभासुमं) आखली आहे. यासाठी ४० पैकी ३८ मतदारसंघांतील २ लक्ष नागरिकांच्या दंडावर पट्टा बांधून त्यांना या आंदोलनाशी थेट जोडण्यासाठी मातृभाषा रक्षक नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती भाभासुमंचे राज्य समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी ६ जुलै या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, प्रा. सुभाष देसाई, शिक्षणतज्ञ पांडुरंग नाडकर्णी, पद्माकर केळकर, साहित्यिक पुंडलिक नायक, साहित्यिक अधिवक्ता उदय भेंब्रे, महेश म्हांब्रे, माजी सनदी अधिकारी अरविंद भाटीकर, फादर माऊझिन आताइद आदी भाभासुमंच्या केंद्रीय समिती सदस्यांची उपस्थिती होती.

(म्हणे) पाश्‍चात्त्य देश मुसलमान समाजामध्ये आतंकवादाला खतपाणी घालत आहेत ! - इराणचे प्रमुख आयतुल्ला खोमेनी

आतंकवाद्यांच्या मूळ बीजात आतंकवादाचे विचार असल्याने
त्यांना अन्य कोणी कशाला खतपाणी घालायला हवे ?
    तेहरान - दुर्दैवाने काही मुसलमान देशांमध्ये या वर्षीची ईद त्या आतंकवाद्यांमुळे दुःखात साजरी होत आहे जे खोट्या इस्लामला खरा इस्लाम संबोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना अमेरिका, ब्रिटन, इस्रायल सारख्या पाश्‍चात्त्य देशांच्या गुप्तचर संस्था पोसत आहेत, अशी टीका इराणचे प्रमुख आयतुल्ला खोमेनी यांनी केली आहे. आतंकवादाला जन्म देणारे आतंकवादाच्या अप्रत्यक्ष परिणामांपासून स्वतःला वाचवू शकत नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

वीज अटकाव यंत्रणा खरेदीमध्ये भ्रष्टाचार ! - विजय कुंभार, सामाजिक कार्यकर्ते

भ्रष्टाचाराने पोखरलेली यंत्रणा
     पुणे, ७ जुलै - राज्य सरकारचा सामाजिक न्याय विभाग आणि पुणे महानगरपालिकेचा शिक्षण विभाग यांनी केलेल्या वीज अटकाव यंत्रणा खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला असून ज्या शासकीय आदेशाद्वारे ही खरेदी केली गेली, तो आदेशच खोटा आहे, असेे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उघडकीला आणले आहे. ४० ते ५० सहस्र रुपयांना मिळणारी ही यंत्रणा साडेचार लक्ष रुपयांना खरेदी केली गेली असून या भ्रष्टाचारप्रकरणी संबंधितांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन श्री. कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
१. ९ मे २००८ या दिवशीच्या शासन आदेशानुसार शाळांच्या इमारतींवर बसवण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने ५ कोटी रुपयांची, तर पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने १ कोटी ८० लक्ष रुपयांची वीज अटकाव यंत्रणा २ वर्षांपूर्वी खरेदी केली.
२. या यंत्रणेची आवश्यकता नसतांना निविदा, तसेच शासनाचा दर करार नसतांना तो असल्याचे भासवून ही खरेदी केली गेली.

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या ठिकाणी लावण्याच्या प्रदर्शनातील फलकांची सूची आणि त्यांच्या कलाकृती उपलब्ध !

    गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी येणार्‍या जिज्ञासूंना सनातनच्या कार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने एकूण २५ फलक उपलब्ध करण्यात येत आहेत. या फलकांमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य, साधना, धर्मशिक्षण, सनातनची ग्रंथसंपदा, सनातन प्रभात, सनातनची उत्पादने, धर्मजागृती, हिंदु राष्ट्र आदींविषयी माहिती देण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमस्थळी उपलब्ध जागेनुसार आणि फलकांच्या सूचीतील प्राधान्यक्रमानुसार फलकप्रदर्शन लावता येईल.

पुणे महानगरपालिकेकडून संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्यात चालढकलपणा

माहिती अधिकार कायदा आणि राज्य शासनाचे परिपत्रक यांची पायमल्ली !
    पुणे, ७ जुलै - प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने स्वत:च्या संकेतस्थळावर प्रदर्शित करायची माहिती प्रतिवर्षी १ जानेवारी आणि १ जुलै या दिवशी अद्ययावत करावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २८ जानेवारी २०१६ या दिवशी दिले आहेत. असे असूनही त्या आदेशाप्रमाणे पुणे महानगरपालिकेकडून ही माहिती अद्ययावत केली जात नाही. (पालिकेकडून सरकारच्या आदेशालाच जर हरताळ फासला जात असेल, तर सर्वसामान्यांच्या तक्रार आवेदनाविषयी विचारच न केलेला बरा ! - संपादक) ही गोष्ट ३ मासांपूर्वीच आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती, अशी तक्रार सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्‍वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे. (यावरून पालिका आयुक्तांचा कारभार कसा चालतो, हेच दिसून येते. - संपादक) याविषयीचे पत्रही त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे. पालिकेच्या संकेतस्थळावरील अनेक विभागांची माहिती २ ते ४ वर्षे एवढी जुनी आहे. (आणि म्हणे स्मार्ट सिटी करणार ! - संपादक)

गेल्या ६ मासांत मराठवाड्यात ५६८ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आवश्यक !
    संभाजीनगर, ७ जुलै - मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे जानेवारी ते जून २०१६ या ६ मासांत ५६८ शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकी यांमुळे आत्महत्या केल्या आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ११५ आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी मासात ८९, फेब्रुवारीत ९५, मार्चमध्ये ८९, एप्रिलमध्ये १०२, मेमध्ये १०६, तर जूनमध्ये ८७ याप्रमाणे ५६८ आत्महत्या झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.

पिंपरी-चिंचवड येथे पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत !

   पिंपरी-चिंचवड - येथे सलग दोन दिवस संततधार पडलेल्या पावसामुळे आणि सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने मोरवाडी, शंकरवाडी, लालटोपीनगर इत्यादी भागांत रस्त्यांवरील खड्यांत पाणी साचले आहे. पवनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या भागातील रहिवाशांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने सर्व विभागांशी संबंधित प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेऊन एकमेकांशी समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु प्रत्यक्षात मात्र हे नियोजन केवळ कागदावरच राहिले असल्याचे दिसून येत आहे. (अशा अकार्यक्षम अधिकार्‍यांना पदच्च्युत करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे ! - संपादक)

छेड काढणार्‍यांचा बंदोबस्त करण्याचे पुणे पोलीस आयुक्तांचे पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना आदेश

असे आदेश द्यावे लागणे, याचा अर्थ पोलीस अधिकारी अन
कर्मचारी त्यांचे कर्तव्य पार पाडत नाहीत, असाच नव्हे का ?
    पुणे, ७ जुलै - शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरात थांबणार्‍या तरुणांकडून मुलींची छेड काढण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. शाळांच्या बाहेर थांबलेली टोळकी मुलींना त्रास देतात, मुलींचा पाठलाग करून त्यांची छेड काढतात, अशा तक्रारी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची नोंद घेत अशा घटना तातडीने रोखा आणि छेड काढणार्‍यांचा बंदोबस्त करा, असा आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना शुक्ला यांनी दिला आहे. (पोलीस आयुक्तांना असे आदेश का द्यावे लागतात ? सर्वच स्तराच्या पोलिसांचे हे कर्तव्य नव्हे का कि त्यांना कर्तव्याचा विसर पडला आहे ? - संपादक)

अंनिसचे कार्यकर्ते म्हणे वारीत सहभागी होणार !

  • संत सुधारणावादी म्हणजे पुरोगामी होते, असे सांगून समाजाची दिशाभूल करणार्‍या अंनिसच्या या नाटकांना भुलू नका !
  • ईश्‍वराला न मानणार्‍या अंनिसवाल्यांना अखेर दिखाऊपणासाठी का होईना भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणे भाग पडले ! नास्तिक अंनिसच्या विचारधारेचा हा घोर पराभवच ! 
  • संतांनी अंधश्रद्धेला विरोध केला म्हणून सांगणारे पुरोगामी संतांनी अनन्य भक्तीभावाने साधना केली, हे जाणीवपूर्वक लक्षात घेत नाहीत, हे लक्षात घ्या !
      पुणे, ७ जुलै - समाजप्रबोधन करण्याच्या नावाखाली अंनिसने ११ जुलै या दिवशी माळशिरस ते वेळापूर या टप्प्यात वारीमध्ये सहभागी व्हायचे ठरवले आहे. संतांनी त्यांच्या प्रबोधनातून अंधश्रद्धेला विरोध आणि मानवताकेंद्रीत धर्माचा पुरस्कार केल्याचे सांगत अंनिस आणि अन्य समविचारी संघटना, तसेच मुक्ता आणि हमीद दाभोलकर, श्यामसुंदर महाराज सोन्नर, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी, सुभाष वारे आदी वारीत सहभागी होणार आहेत. (संतमंडळींनी समाजाला धर्म आणि श्रद्धा काय आहे, हे शिकवून अंधश्रद्धेवर ताशेरे ओढले होते. देव न मानणारे तथाकथित पुरोगामी मात्र देव आणि धर्म मिथ्या आहे, असे सांगून स्वतःच अंधश्रद्धा पसरवत आहेत. नास्तिकवादी अंनिसवाल्यांना समाजाने झिडकारले असल्याने जनाधार मिळवण्याचा हा प्रसिद्धीच्या स्टंटबाजीअंतर्गतचा केविलवाणा प्रयत्न आहे. - संपादक)

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या तळावरून शस्त्रास्त्रे जप्त !

एवढा मोठा शस्त्रसाठा देशात आणला जातोच कसा, हे सैन्याने सांगायला हवे ! 
     पुंछ (जम्मू-काश्मीर) - येथील पुंछ-शोपियां मार्गावरील पीर की गली येथील जिहादी आतंकवाद्यांच्या तळावर सैनिकांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केले. यात ३ एके रायफल्स, ४ पिस्तुल, एके रायफल्सची ९७० काडतुसे, पिस्तूलाच्या २७० गोळ्या आणि ६ चिनी ग्रेनेड जप्त करण्यात आले. (काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांना स्थानिक धर्मांधांची फूस आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रसाठा वाहून नेण्यास आणि तो साठवण्यास आतंकवादी धजावतात ! - संपादक)

भारतीय सैनिकांकडून पाकच्या सैनिकांना ईदच्या शुभेच्छा !

भारतीय सैनिकांची गांधीगिरी !
     नवी देहली - भारत आणि पाकिस्तान यांची सीमा असलेल्या वाघा बॉर्डरवर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानात जाऊन त्याच्या सैनिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मिठाई देऊन सैनिकांचे तोंड गोड केले. (भारतीय सैनिक पाक सैनिकांचे तोंड गोड करतात, तर पाक सैनिक भारतीय सैनिकांचे शिर कापतात ! गेली कित्येक वर्षे भारतीय सैनिक अशी गांधीगिरी करत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम पाक सैनिकांवर झाला का ? मिठाया वाटून नव्हे, तर त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करूनच ते ताळ्यावर येतील, हे भारताला समजेल, तो सुदिन ! - संपादक) या वेळी भारतीय सीमा सुरक्षा दलाचे उपमहानिरीक्षक जे.एस्. ओबेरॉय आणि पाकिस्तानी रेंजरचे कमांडर बिलाल उपस्थित होते. (पाककडून वारंवार होणार्‍या आतंकवादी कारवायांमध्ये होरपळत असूनही त्यांना ईदच्या शुभेच्छा देणे ही भारतीय सैनिकांची सद्गुणविकृतीच म्हणावी लागेल ! असा नेभळटपणा सोडून पाकला जशास तसे प्रत्युत्तर द्यायला हवे. - संपादक)

चंद्रभागेतील वाळूचे खोल आणि जीवघेणे खड्डे बुजवण्याचे काम अंतिमतः चालू !

   पंढरपूर - वाळू माफियांनी येथील चंद्रभागा नदीच्या पात्रातील दगडी पूल ते भक्त पुंडलिक मंदिराच्या दरम्यान भरमसाट वाळूउपसा केल्याने चार ते आठ फूट उंचीचे आणि शंभर ते दोनशे फूट परिघाचे असंख्य खड्डे निर्माण झाले आहेत. वाळूमाफियांनी दगडी पूल ते भक्त पुंडलिक मंदिराच्या दरम्यान वाळवंटाची अक्षरश: चाळण केली आहे. यात्राकाळात उजनीतून सोडलेले पाणी खड्ड्यांमध्ये साठल्यानंतर स्नानासाठी आलेल्या वारकर्‍यांना पात्रातील पाण्याचा अंदाज येत नाही. अनेक वेळा या खड्ड्यांमध्ये बुडून भाविकांना प्राण गमवावे लागले आहेत. हे खड्डे बुजवण्याचे काम आता नुकतेच हाती घेतल्याचे दिसत आहे. वाळूठेक्यांच्या ठिकाणांवरून चाळून उरलेली जाड वाळू आणून हे खड्डे भरले जात आहेत. (अशा वाळू माफियांवर, तसेच हे अपप्रकार सर्रास चालू देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई झाल्यासच या समस्येवर कायमची उपाययोजना होईल. - संपादक)

लातूर येथे शिक्षिकेला अश्‍लील बोलल्याप्रकरणी संस्थाचालकाला शिक्षकांनी शाळेतच बदडले !

शिक्षणक्षेत्राला काळीमा फासणार्‍या संस्थाचालकांवर कठोर कारवाई करा !
    लातूर, ७ जुलै (वार्ता.) - येथील एका संस्थाचालकाने शाळेतच शिक्षिकेची छेड काढून तिच्याशी अश्‍लील संभाषण केले. त्यामुळे संतप्त झालेले इतर शिक्षक आणि शिक्षिकेसह पीडित शिक्षिकेच्या नातेवाइकांनी त्याला बेदम चोप दिला. हा प्रकार शहरातील संत नामदेव माध्यमिक विद्यालयात ५ जुलै या दिवशी घडला.
   लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका येथे शिवाजी परगे यांची शाळा आहे. परगे याची शाळेतील शिक्षिकेवर वाईट दृष्टी होती. त्यातूनच तो नेहमी त्यांची छेड काढायचा. ५ जुलै या दिवशी त्याने एका शिक्षिकेला पाहून अश्‍लील शेरेबाजी केली. पीडित शिक्षिकेने तात्काळ याविषयी आपल्या शाळेतील सहकारी शिक्षकांसह नातेवाइकांना माहिती दिली. त्यानंतर संतप्त झालेले तिचे नातेवाईक काहीच वेळात शाळेत आले. त्यांच्याच शाळेतील इतर शिक्षक आणि शिक्षिका यांनी मिळून संस्थाचालकास बेदम चोप दिला.

पोलिसाच्या घरातून गणवेशाची चोरी !

   नागपूर - मुलाच्या उपचारासाठी बाहेरगावी गेलेल्या हेमंत राऊत या पोलीस कर्मचार्‍याच्या घरातून सव्वा लाखाच्या मुद्देमालासमवेतच त्यांचा पोलिसाचा गणवेशसुद्धा चोरट्यांनी चोरून नेला आहे.

डोंगरी (मुंबई) येथील दाऊदसह अन्य कुख्यात गुन्हेगारांच्या परिसरातच डॉ. झाकीर नाईक यांचे वास्तव्य !

       मुंबई - येथील डोंगरी परिसरात डॉ. झाकीर नाईक याचा जन्म झाला आहे. येथेच वर्ष १९९१ मध्ये डॉ. झाकीर नाईक यांनी इस्लामिक रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली. त्यांची पत्नी फरहत नाईक यामध्ये महिलांसाठी काम करते. हा दक्षिण-मध्य मुंबईचा परिसर दाऊद, हाजी मस्तान, करीम लाला, छोटा शकील, अरुण गवळी आणि रमा नाईक आदी कुख्यात गुन्हेगारांचाही परिसर आहे. या परिसरातील या फाऊंडेशनला जगभरातून निधी येतो. हा निधी डेव्हलपमेंट क्रेडिट बँकेतील खात्यात जमा होतो. हे फाऊंडेशन गरीब मुसलमान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नोकर्‍या देते. झाकीर नाईक इस्लामवर भाषणे देण्यासमवेत कुराणच्या प्रतीही वाटतात.

पंढरपूर यात्रेसाठी सांगली-मिरजेतून जादा गाड्यांची सोय !

      सांगली, ७ जुलै (वार्ता.) - पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी सांगली-मिरज परिसरातून मोठ्या संख्येने भाविक जातात. यांसाठी राज्य परिवहन महामंडळ, तसेच रेल्वे प्रशासन यांच्या वतीने अधिक गाड्यांची सोय करण्यात आलेली आहे. रापमच्या सांगली विभागाने जिल्ह्यातून १८ अधिकच्या गाड्यांची सोय केली असून ५० पेक्षा अधिक प्रवाशांसाठी विशेष सवलतही देण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनानेही अधिकच्या तीन गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जेजुरी (जिल्हा पुणे) येथील मुलींच्या प्राथमिक शाळेसाठी धूळ खात पडलेली नवीन इमारत वापरण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश !

      जेजुरी (पुणे), ७ जुलै - येथील बंगाळी पटांगणामध्ये ५ वर्षांपूर्वी नगररचना खात्याने बांधून दिलेल्या मुलींच्या शाळेची नवी दुमजली इमारत अजुनपर्यंत एकदाही शाळेसाठी वापरण्यात आली नसल्याचे पंढरीच्या वारीत सहभागी होण्यासाठी आलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना जेजुरी येथे समजले. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थिनींना सर्व सुविधा देणे आवश्यक असल्याचे सांगून तावडे यांनी तातडीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आदेश दिले. (एवढ्यावरच न थांबता तिच्या न वापरण्यामुळे झालेल्या व्ययाचीही भरपाई चौकशी करून संबंधितांकडून वसूल करायला हवी. तसेच या आदेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, अशी विद्यार्थिनींची मागणी आहे. - संपादक)

गोवंशियांच्या चामड्याच्या तुटवड्यामुळे चेंडूच्या किमतीमध्ये दुपटीने वाढ !

गोवंशियांची हत्या करून गोद्रोह्यांचे खिसे भरणारे असे उद्योग हवेत कशाला ? असे उद्योग बंद 
करून त्याऐवजी गोपालन आणि त्यावर आधारित उद्योगांची निर्मिती राज्यकर्त्यांनी करणे आवश्यक !
धर्माभिमानी हिंदूंनो, क्रिकेट खेळावर बहिष्कार घाला !
       नवी देहली - क्रिकेट खेळातील चेंडूसाठी गोवंशाच्या म्हणजे गाय किंवा म्हैस यांच्या चामड्याचा वापर केला जातो. भारतात सध्या काही प्रमाणात गोहत्येवर निर्बंध घातल्यामुळे चामड्याची कमतरता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम चेंडूच्या निर्मितीवर आणि त्याच्या किमतीवर होऊन किंमत दुप्पट झाली आहे. 
१. उत्तरप्रदेशात गाय आणि बैल यांच्या हत्येवर कायदेशीर बंदी आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास कारागृह आणि १० सहस्र रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा आहे. जम्मू-कश्मीर, हरियाणा, झारखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये गोहत्या केल्यास १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये गोहत्या केल्यास दंड भरावा लागतो. बंगाल, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मेघालय, नागालॅण्ड, त्रिपुरा आणि सिक्किम आणि केरळ येथेही गोहत्येवर बंदी आहे. (इतके असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही आणि गोहत्या होतच रहातात ! - संपादक)

मलेशियातील मंदिरांची विटंबना होण्याच्या घटनांत वाढ !

       कुआलालंपूर - मलेशिया देशात प्राचीन संस्कृती दर्शवणारी अनेक मंदिरे आहेत. हा देश एकेकाळी अखंड हिंदु राष्ट्राचा भाग होता. कालांतराने मुसलमान आक्रमकांनी या देशाला तलवारीच्या जोरावर इस्लामी राष्ट्र केले. या देशात अद्यापही अनेक मंदिरे आहेत. गेल्या काही दिवसांत या मंदिरांची विटंबना होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामागे धर्मांधांचा हात असल्याचे आढळून येते.
१. २ जुलै या दिवशी पेनांग येथील देव श्री माथुराई वीरन मंदिरातील मूर्तीची तोडफोड करण्यात आली. अलीकडील काळातील ही तिसरी घटना आहे.

ब्रिटनने इराकविरोधी युद्धात उतरण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा !

चौकशी आयोगाचा तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्यावर ठपका !
अमेरिकेने निवळ सद्दाम हुसेन यांचा पाडाव करण्यासाठी इराकवर आक्रमण केले. तिच्या या 
कुकृत्याला ब्रिटनसारख्या देशाने पाठिंबा दिला. या युद्धामुळे इराकमधील स्थिती खालावली. 
इसिसच्या उत्पत्तीस एकप्रकारे हे युद्धच कारणीभूत ठरले. या आयोगाच्या अहवालावरून जगात 
अमेरिका आणि विकसित देश यांचीच दादागिरी चालते आणि स्वतःच्या स्वार्थासाठी 
ते जगाला वेठीस धरतात, हे स्पष्ट होते ! 
     लंडन - इराकचे राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांच्याविरोधात वर्ष २००३ मध्ये अमेरिकेच्या साथीने युद्धात सहभागी होण्याचा ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचा निर्णय चुकीचा आणि चुकीच्या गुप्तचर अहवालांवर आधारित होता, असा ठपका चौकशी आयोगाने ठेवला आहे. २००३ ते २००९ या कालावधीत झालेले इराक युद्ध आणि त्यानंतरची कारवाई यात १८० ब्रिटिश सैनिक मारले गेले. ७ वर्षांच्या चौकशीनंतर ६ जुलैला १२ खंडांचा हा अहवाल घोषित झाला. (भारतातच नव्हे, तर ब्रिटनमध्ये चौकशी आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी अनेक वर्षे लागतात ! - संपादक) २००९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी हा आयोग नेमला होता.

राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी नगर जिल्ह्यातील २ सहस्र ५०० झाडे तोडण्याच्या प्रक्रियेला आरंभ

आता कुठे आहेत पर्यावरणवादी ?
   नगर, ७ जुलै - जिल्ह्यातील पारनेर, नगर आणि पाथर्डी या तालुक्यांतून जाणार्‍या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी २ सहस्र ५०० झाडे तोडण्याच्या प्रक्रियेला आरंभ झाला आहे. ही झाडे तोडण्याची अनुमती प्रांताधिकार्‍यांनी दिली आहे. एका बाजूला पर्यावरण राखण्यासाठी शासन राज्यात एकाच दिवशी २ कोटी वृक्षांची लागवड करते आणि दुसर्‍या बाजूला झाडे तोडण्याची अनुमती देते, याविषयीची नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे.

शेवरे (जिल्हा सोलापूर) येथे वाळूतस्करांकडून तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न

शासन वाळूतस्करीला आळा कधी आणि कसा घालणार ?
      सोलापूर, ७ जुलै - अवैध वाळूउपसा करून निघालेला ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न करणारे माढ्याचे तहसीलदार सदाशिव पडदुणे यांच्या जीपवर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना ५ जुलै या दिवशी शेवरे येथे घडली आहे. शासकीय अधिकार्‍यांवर वाळूतस्करांकडून अशाच प्रकारे आक्रमण करण्याची एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. (याचा अर्थ सोलापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. - संपादक)

पुण्यात विनयभंग प्रकरणी ३ धर्मांध अफगाणी विद्यार्थ्यांना अटक

      पुणे, ७ जुलै - गेल्या वर्षभरापासून येथील एका महाविद्यालयातील तरुणीची छेड काढून तिला त्रास देणार्‍या सध्या पुण्यात रहाणार्‍या आणि मूळच्या अफगाणिस्तानच्या ३ विद्यार्थ्यांवर विनयभंगाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (पुण्यातील कायदा सुव्यवस्था मोडीत निघणे आणि अशा प्रकरणांत कठोर शिक्षा न होणे, यांमुळे विदेशी तरुण असे अपप्रकार करण्यास धजवतात. - संपादक)
    या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी अहमद सुलतान झहीर, महंमद शरीफ गफूर महमूद, शेर अफजाद अहमद नूरस्तानी यांना अटक केली आहे. (धर्मांध वासनांधतेच्या गुन्हेगारीत अग्रेसर ! - संपादक) न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

चित्रपटात काम करण्याचे आमिष दाखवून नवोदित कलाकारांची फसवणूक

      पुणे, ७ जुलै - सैराट चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर नवोदित कलाकारांना चित्रपटात घेण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक होत असल्याच्या घटना पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, सातारा येथे घडत असल्याचे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनीं सांगितले. (पोलीस प्रशासन आणि सरकार या घटनांना आळा कसा घालणार आहे ? - संपादक) नुकत्याच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावात घडलेल्या घटनेचा दाखला देऊन त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना महामंडळाच्या वतीने निवेदन दिले आहे.

वरकटणे (जिल्हा सोलापूर) येथे अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाकडून बलात्कार

      सोलापूर, ७ जुलै - येथील करमाळा तालुक्यातील वरकटणे गावातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १ जुलै या दिवशी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून श्रीरामपूर येथे पळवून नेऊन बलात्कार केला. (अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षाच करणे आवश्यक आहे. - संपादक) या अल्पवयीन आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे. अल्पवयीन आरोपी पसार झाला आहे. 
     अल्पवयीन मुलगी आणि अल्पवयीन आरोपी या दोघांनीही सैराट चित्रपट पाहून घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला असल्याचेही समजते. (चित्रपटांचे वाढते दुष्परिणाम ! हे दुष्परिणाम लक्षात घेता अशा चित्रपटांवर बंदी आणण्याची मागणी केल्यास चुकीचे काय ? - संपादक)


पुणे येथील महिलेस ब्लॅकमेल केल्याप्रकरणी हुपरी येथील २ पोलिसांची चौकशी !

      हुपरी (जिल्हा कोल्हापूर), ७ जुलै (वार्ता.) - पुणे येथील एका महिलेला ब्लॅकमेल केल्याविषयी हुपरी पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांची जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून चौकशी चालू झाली आहे. येथील २ चांदी व्यावसायिकही यामध्ये गुंतले आहेत. मांडवली चालू असतांना तेथील सीसीटीव्हीत याचे चित्रीकरण झाले. त्यानंतर या प्रकारावर हुपरी येथील काही चांदी उद्योजकांच्या मध्यस्थीने पडदा पाडला. काही दिवसानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे याविषयीचा एक तक्रार अर्ज आला. त्यानुसार ही माहिती पुन्हा उघड झाली. (जनतेचे रक्षक नव्हे, भक्षक पोलीस यंत्रणा ! - संपादक)

३० कोटी रुपयांचा कर चुकवल्याप्रकरणी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याला २१ मासांच्या कारावासाची शिक्षा !

भारतात कर चुकवणार्‍या सेलिब्रिटींना अशी तात्काळ शिक्षा होईल का ?
     अर्जेंटिना - वर्ष २००७, २००८ आणि २००९ मध्ये मिळालेले उत्पन्न दडवून ३० कोटी कर चुकवल्याच्या आरोपाखाली अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला स्पेनमधील न्यायालयाने ६ जुलै या दिवशी २१ मासांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे, तसेच त्याच्या वडिलांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मेस्सीने योग्य कर न भरल्याचा दावा शासकीय अधिवक्त्यांनी केला आहे. माझे वडील सर्व कारभार सांभाळत असल्यामुळे मी त्याकडे अधिक लक्ष देत नाही. माझे अधिवक्ता आणि सल्लागार या गोष्टी व्यवस्थित हाताळतील, अशी आशा आहे. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्‍वास आहे, असे मेस्सीने म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम लढतीमधील निराशाजनक कामगिरीनंतर मेस्सीने खेळातून निवृत्ती घेतल्याचे घोषित केले होते.युवकांची दिशाभूल करून त्यांना कट्टरतेकडे वळवणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करणार ! - सौदी अरेबियाच्या सुलतानाची चेतावणी

जिहादी कट्टरतेला पैसा पुरवणार्‍या सौदी अरेबियाच्या बोलण्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?
     रियाध - ४ जुलै या दिवशी सौदी अरेबियातील ३ शहरांमध्ये झालेल्या आत्मघाती आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर युवकांची दिशाभूल करून त्यांना कट्टरतेकडे वळवणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी सौदी अरेबियाच्या सुलतानाने दिली आहे. (जगातील बहुतांश आतंकवादी संघटनांना सौदी अरेबिया आर्थिक साहाय्य करते ! त्यामुळे सुलतान देत असलेली चेतावणी हा देखावा आहे ! - संपादक) संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार आयोगाच्या प्रमुखांनी म्हटले आहे की, मदीना येथील पैगंबर महंमद मशिदीवर झालेले आक्रमण हे इस्लामवरील आक्रमण आहे. या आक्रमणाला संपूर्ण जगभरातील मुसलमानांवरील आक्रमण समजले जावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
        सर्वांत पवित्र असणार्‍या मशिदीवर झालेल्या आक्रमणाविषयी मुसलमानांकडून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. कुठल्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही; मात्र यापूर्वी गत एका वर्षामध्ये सौदी अरेबियामध्ये शिया मुसलमानांच्या ठिकाणांवर आणि सौदी अरेबियामधील सुरक्षादलाच्या ठिकाणांवर आतंकवांद्यांनी आक्रमण केले होते.

(म्हणे) अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यास मी मोकळा !

वारंवार धमकीची भाषा करणारे भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर
      मुंबई - आंबेडकर भवन उद्ध्वस्त करण्यामागे दोन गटांमधील वाद आहे, असे जाहिररीत्या विधान करण्याचे धैर्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाखवावे, मग मुख्यमंत्री म्हणून माझा संघर्ष त्यांच्याशीच असेल. आगामी काळात वर्षा बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यास मीदेखील मोकळा असेन, अशी धमकी भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आंबडेकर भवन पाडणारेे रत्नाकार गायकवाड आणि त्यांचे साथीदार यांच्या अटकेच्या मागणीसाठी येत्या १५ जुलैला मुंबईत विराट मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

टिटवाळा येथे धर्माभिमानी युवकांच्या जागरूकतेमुळे गोमांस नेणारा टेम्पो पोलिसांच्या कह्यात

     कल्याण ७ जुलै (वार्ता.) - नगर येथून कल्याणच्या दिशेने एक टेम्पो गोमांस घेऊन येत असल्याची माहिती काही गोरक्षकांना मिळाली होती. त्याविषयी गोरक्षकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चालक फकीर महमद बाबुलाल शेख, क्लिनर वली महमद अकबर अली शेख यांना कह्यात घेतले आणि गुन्हा प्रविष्ट केला.

धर्मशिक्षणाअभावी एका शिल्पकाराने सिद्ध केली रोपट्यांना जन्म देणारी श्री गणेशमूर्ती !

     पुणे, ७ जुलै - गणेशोत्सवासाठी मातीचीच श्री गणेशमूर्ती वापरण्यात यावी आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरण्यात येऊ नयेत यासाठी अनेक वर्षे चळवळ चालू आहे. याविषयी येथील दत्ताद्री कोठूर या शिल्पकाराने विसर्जनानंतर श्री गणेशमूर्तीच्या मातीतून झाडाला जन्म देणारा ट्री गणेशा ही नवीन संकल्पना मंडळी आहे. सध्या सामाजिक संकेतस्थळांवर या मूर्तीचा विषय चर्चिला जात आहे. त्यानुसार असे आहे -
१. लाल माती आणि नैसर्गिक खते एकत्र करून त्यापासून श्री गणेशाची मूर्ती साकारण्यात येणार आहे. ही मूर्ती साकारतांना तिच्या पायामध्ये बिया ठेवण्यात येतील. त्यानंतर नैसर्गिक रंगात साकारलेली ही मूर्ती श्री गणेशोत्सवात पूजण्यासाठी सिद्ध होईल.

युरोपमध्ये शरण घेण्यास उत्सुक असणार्‍या गरीब शरणार्थ्यांची हत्या करून त्यांच्या अवयवांची तस्करी !

पैशांसाठी स्वतःच्या धर्मबांधवांना ठार मारण्याचे पाशवी कृत्य करणारे मुसलमान !
     रोम (इटली) - सिरियातील गृहयुद्धामुळे लाखो मुसलमान नागरिक युरोपकडे प्रयाण करत आहेत. अनेक शरणार्थी मेडिटरेनियन समुद्र ओलांडून युरोपमधील इटलीच्या भूमीवर पाय ठेवण्यासाठी अवैध मार्गांचा अवलंब करत आहेत. ज्या शरणार्थ्यांना प्रवासाचे पैसे देता येत नाहीत, त्यांना अवैध मार्गांचा अवलंब करून युरोपमध्ये पाठवले जाते. हा प्रवास घडवून आणणारे गट या लोकांना मानवी अवयवांची तस्करी करणार्‍या गटांना विकतात. तस्कर या शरणार्थ्यांची हत्या करून त्यांच्या अवयवांची तस्करी करतात, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

परग्रहवासीयांचा शोध घेण्यासाठी चीनने बनवली ५०० मीटर व्यासाची रेडिओ दुर्बीण !

     बीजिंग - चीनमधील पीपल्स डेली न्यूजपेपर या कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार चीनने अवकाश, आकाशगंगा आणि अंतराळातील परग्रहवासीय यांचा शोध घेण्यासाठी रेडिओ दुर्बीण बनवली आहे. 
        ही दुर्बीण गोलाकार असून तिचा व्यास ५०० मीटर आहे. ३० फुटबॉल मैदानाएवढी मोठी ही दुर्बीण आहे. दुर्बीण सिद्ध करण्यासाठी चीनमधील गुईझोऊ प्रांतातील मोठा डोंगर खोदण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १० सहस्र लोकांना विस्थापित करण्यात आले आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून तिचा उपयोग केला जाऊ शकतो.
      चीन अवकाश क्षेत्रात स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करू इच्छितो. याचाच भाग म्हणून त्याला अवकाशात स्वतःचे स्पेस स्टेशन उभे करायचे आहे, तर २०३६ पर्यंत चंद्रावर मानव पाठवायचा आहे.

इसिसकडून पळून जाणार्‍या आतंकवाद्यांची उकळत्या पाण्यात टाकून हत्या !

इसिसच्या या मनोवृत्तीचा जगभरातील मुसलमान कधी विरोध करणार कि त्यांना हे मान्य आहे ? 
     बगदाद - युद्ध सोडून पळून जाणार्‍या आतंकवाद्यांची इसिसकडून उकळत्या पाण्यात टाकून हत्या करण्यात आली आहे. इसिसच्या न्यायालयाकडून त्यांना ही शिक्षा देण्यात आली आहे. यापूर्वीही इसिसमधून पळून जाणार्‍या आतंकवाद्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तसेच त्यांनी पळून जाऊ नये, यासाठी त्यांचे हातपाय बांधण्यात आले होते.इसिसमध्ये जाण्यास रोखल्याच्या कारणावरून मुसलमान मुलांनी आईची हत्या केली !

जन्मदात्या आईचीही हत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या अशा क्रूर 
आतंकवादी संघटनेशी लढण्याची हिंदूंची सिद्धता आहे का?
     दुबई - इसिसमध्ये जाण्यापासून रोखल्यामुळे सौदी अरेबियातील खालिद आणि ओरैनी या जुळ्या भावांनी त्यांच्या आईची हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. (इस्लामला शांतीचा धर्म म्हणू नका, असे बांगलादेशातील लेखिका तसलीमा नसरीन म्हणाल्या ते दर्शवणारे वृत्त ! - संपादक) इसिसच्या विचारांनी प्रभावित होऊन इसिसमध्ये भरती होण्याचा निर्णय या दोघांनी घेतला होता. घरातून विरोध झाल्यानंतर या दोघांनी घरावर आक्रमण केले. यात त्यांचे वडिल आणि भाऊ गंभीररित्या घायाळ झाले असून आईचा मृत्यू झाला आहे. या दोघांना सीमेवरून पळून जातांना कह्यात घेण्यात आले.

सामाजिक संकेतस्थळावरून महिलांचा छळ झाल्यास ऑनलाइन तक्रार करण्याचे आवाहन !

     नवी देहली - ट्विटर किंवा अन्य सामाजिक संकेतस्थळांवरून एखाद्या महिलेवर आक्षेपार्ह टिपणी करून छळ केल्यास त्याच्या विरोधात थेट ऑनलाइन तक्रार करण्याचे आवाहन महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी केले आहे. मेनका गांधी यांनी यासाठी स्वत:चा इमेल पत्ताही दिला आहे.
     ऑनलाइन तक्रार केल्यास ही तक्रार तातडीने राष्ट्रीय महिला आयोगाकडे पाठवली जाईल तसेच ऑनलाइन अपकीर्त केल्याचा गुन्हा सायबर शाखेकडे नोंदवला जाईल.

फलक प्रसिद्धीकरता

डॉ. झाकीर नाईक यांच्यासह त्यांचा गौरव करणार्‍या काँग्रेसवरही बंदी घातली जाईल का ?
    बांगलादेशने मागणी केल्यास भारत इस्लामी विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंदी घालण्यावर गंभीरतेने विचार करील, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. झाकीर यांनाच काँग्रेसी नेते दिग्विजय सिंह यांनी शांतीदूत म्हटले होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Bangladeshne mang ki to Bharat Congressdwara prashansa prapt Rashtradrohi Dr. Zakir Naikpar pratibandh lagayega.
Phir Congresspar pratibandh kyon nahi?
जागो !
    बांग्लादेश ने मांग की तो भारत कांग्रेसद्वारा प्रशंसा प्राप्त राष्ट्रद्रोही डॉ. जाकिर नाईक पर प्रतिबंध लगाएगा.
फिर कांग्रेस पर प्रतिबंध क्यों नहीं ?

सबवर्जन : हस्तकांकरवी देश पोखरून काढण्याचे शत्रूचे पद्धतशीर कारस्थान !

       रावणाचे उदात्तीकरण या विरोधात मी फेसबूकवर २ पोस्ट्स टाकल्या होत्या. त्यानंतर एका गटात या विषयावर चर्चा चालू होती. एकंदरीतच श्रीरामाला आपल्या देशात विरोध कसा होऊ शकतो, हे त्या चर्चेतील सूत्र होते. त्या गटातील एकाने त्या वेळी सबवर्जन हा विषय काढला. सबवर्जन समवेत जोडून नाव आले ते युरी बेझमेनोव्ह उपाख्य टॉमस शुमन यांचे !
१. युरीची धोरणे आणि भारतात घडणार्‍या घटना यांतील साम्य !
     युरी बेझमेनोव्ह या माणसाविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि त्याविषयी उपलब्ध असलेल्या सर्व चित्रफिती शोधून काढून त्या पाहिल्या. युरीने जे काही मांडले आहे, ते पाहून डोके चक्रावून गेले. भारतात सध्या जे चालू आहे आणि यापूर्वी जे काही होऊन गेले आहे त्यामागे असलेली धोरणे युरीने ३० वर्षांपूर्वी दिलेल्या त्याच्या मुलाखतीमध्ये मांडली आहे. त्यामुळे त्याने सांगितलेल्या सुत्रांना फार महत्त्व आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे दूरदृष्टीचे सैनिकी धोरण !

स्वातंत्र्यवीर सावरकर
      स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेलीसच्या ऐतिहासिक उडीचे हे १०६ वे वर्ष ! देशाला जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी पदोपदी स्वत:च्या प्राणांची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे नररत्नच. सावरकरांनी भारताकडे सक्षम सैन्यधोरण असावे, यासाठी महत् प्रयत्न केले. आज सैन्यदलात असलेली मनुष्यबळाची न्यूनता पहाता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दूरदृष्टीची प्रचिती आल्यावाचून रहात नाही. त्यांच्या एकूणच दूरदृष्टी असलेल्या सैन्यधोरणाविषयी थोडेसे...
१. तात्याराव आणि सुभाषबाबू हेच आधुनिक काळातील भारतीय 
सशस्त्र सेनादलाचे प्रणेते होत !
      लहानपणी घरातील ज्येष्ठ व्यक्ती संस्कारक्षम कथा सांगत. त्यात एक उ:शाप मिळावा म्हणून वाट पाहणारा गंधर्व, हे पात्र नेहमी आपणांस भेटत असे. कथेतील त्या शापित गंधर्वाला शेवटी न्याय मिळत तर असे; परंतु भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एका तेज:पुंज गंधर्वाला आयुष्यात दुर्लक्षित जीवन कंठावे लागले. त्यास उचित सन्मान असा लाभलाच नाही. तरीही या महान नररत्नाने कधीही त्याचा ना खेद मानला किंवा ना खंत केली. सर्वस्वाचा त्याग करत इदं न मम। राष्ट्राय स्वाहा। या दधिची ऋषींच्या असीम व्रताचे पालन केले.

शिक्षणसंस्थांवर जागृत पालकांचा अंकुश !

     यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या यवतमाळ पब्लिक स्कूल या शाळेतील २ शिक्षकांकडून पहिलीतील मुलीवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने तेथील पालकवर्गात संतापाचे वातावरण असल्याचे प्रसारमाध्यमांतून महाराष्ट्राच्या समोर येत आहे. पालकांनी हे प्रकरण उचलून धरल्याने माध्यमांना याची नोंद घ्यावी लागली; मात्र दर्डा यांच्या मालकीचे दैनिक लोकमत आणि आय.बी.एन्. लोकमत ही वृत्तवाहिनी मूग गिळून गप्प का बसले ?

मायभूमीच्या रक्षणासाठी सागरालाही कवेत घेऊ पहाणार्‍या सावरकरांची जगप्रसिद्ध उडी !

बालकांसाठी परिपाठ !
बोधकथा
८ जुलै या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेलिस उडीच्या १०६ व्या वर्षांनिमित्त...
विश्‍वात केवळ आहेत । 
विख्यात बहाद्दूर दोन ।
जे गेले आईकरिता । 
सागरास पालांडून ।
हनुमानानंतर आहे । 
त्या विनायकाचा मान ॥
      - लोककवी मनमोहन
     स्वा. सावरकरांना ब्रिटिशांनी लंडनमध्ये अटक केली. पुढील अभियोग (खटला) हिंदुस्थानातील न्यायालयात चालवण्यासाठी त्यांना मोरिया या आगनौकेवर आरक्षकांच्या (पोलिसांच्या) पहार्‍यात चढवण्यात आले. प्रवासात नौका फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात थांबली.

डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात मुंबई येथे आंदोलन !

धिक्कार असो ! धिक्कार असो !! धिक्कार असो !!!
आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या डॉ. झाकीर नाईक याला तात्काळ अटक करा ! 
बंदी घातलेला देशविरोधी पीस टीव्ही दाखवणार्‍यांवर कारवाई करा ! 
     ढाका येथील आतंकवादी कृत्य करणार्‍या धर्मांध युवकांना डॉ. झाकीर नाईक यांचे प्रोत्साहन असल्याचे समोर आल्याने भारतासाठी हे अतिशय धोकादायक आहे.
    आधीच भारतातील अनेक मुसलमान युवक आणि युवती हे इसिस (इस्लामिक स्टेट) या आतंकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी जात आहेत. कदाचित त्यांना प्रोत्साहन देण्यामागेसुद्धा डॉ. झाकीर नाईक असू शकतात. त्यामुळे डॉ. नाईक आणि त्यांच्या संस्थेची पाळेमुळे खणून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.
या मागणीसाठी ...
जाहीर आंदोलन
शुक्रवार, दिनांक ८ जुलै २०१६ 
सायंकाळी ठीक ५ वाजता
कबुतरखाना, दादर रेल्वेस्थानकाबाहेर, दादर (प)
संपर्क : ९९२०२०८९५८
नागरिकांनो, या आंदोलनाला उपस्थित राहून आपले राष्ट्रकर्तव्य निभावा !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

भारतियांना भिकेला लावणारे आसुरी वृत्तीचे इंग्रज !

      गांधीवादी लेखक धर्मपाल म्हणतात की, इंग्रजांनी पुढील प्रमुख गैरमार्गांचा अवलंब करत भारताची मोठी हानी केली. त्यांनी येथील अमूल्य अशी नैसर्गिक आणि अन्य संपत्ती लुटून नेली. त्यामुळे सामान्य माणूस भिकेला लागला, तसेच त्यांनी अनेकांना कुमार्गाला लावले. या संदर्भात वॉरन हेस्टिंग याचा लेखी पुरावा देऊन त्यांनी पुढे सांगितले, आमची धोरणे आणि आम्ही केलेल्या कारवाया यांमुळे भारतात अंदाधुंदी माजली. त्यामुळे सैनिक आणि पोलीसही चोर अन् दरोडेखोर बनले ! इंग्रजांनी भारताला जाणूनबुजून कलंकित केले. 
- विश्‍वास पाटील (साप्ताहिक लोकजागर, २८.९.२०१२)

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. जर ख्रिस्ती आणि मुसलमान त्यांच्या शाळांमध्ये बायबल अन् कुराण शिकवू शकतात, तर हिंदूंच्या शाळांमधून भगवद्गीता, रामायण का शिकवले जात नाही ?
२. अब्दुल रेहमान अंतुले यांना प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचे विश्‍वस्त केले होते. एखादा हिंदु, मुलायमसिंह यादव वा लालूप्रसाद यादव मशिदीचे वा मदरशाचे विश्‍वस्त कधीतरी होऊ शकतील का ?
३. चित्र काढणे इस्लामला संमत नसेल तर एम्.एफ्. हुसेनविरुद्ध फतवा का नाही?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस
    स्वधर्म आणि स्वभाषा यांच्यामुळे मुसलमान जगभर दबाव आणू शकतात, तर स्वधर्म अन् स्वभाषा सोडल्यामुळे जगात काय भारतातही हिंदूंची किंमत शून्य झाली आहे !

सनातनचे संत पू. भाऊ परब आणि पू. महादेव नकाते यांच्याकडून श्रीमती सुनिता चितळे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
        १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

१३.३.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये पालटलेल्या नामजपाविषयी साधकांना सूचना वाचल्यावर झालेली विचारप्रक्रिया आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. पालटलेला नामजप वाचल्यावर पुष्कळ आनंद होणे : १३.३.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभात अगदी सकाळीच वाचायला मिळाला आणि मुख्य म्हणजे तो वाचण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. त्यात साधकांना सूचना या सदरात पालटलेला नामजप वाचल्यावर मला पुष्कळच आनंद झाला; कारण ११.३.२०१६ या दिवशी माझ्या मनात सतत विचार येत होते, मला होणार्‍या त्रासांवर मला मात करता येत नाही, तर त्यासाठी काही दुसरा कोणता नामजप करावा कि काय ? त्या दृष्टीने मी तशी विचारणाही केली होती; पण सध्या तोच जप करावा, असे सांगितल्यावर मी तोच नामजप चालू ठेवला होता.

भावजागृती होण्यासाठी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. स्वाती गायकवाड यांना भावसत्संगात आणि अन्य वेळी सुचलेले भावप्रयोग

कु. स्वाती गायकवाड
     गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेच्या टप्प्यांमधील भावजागृती हा एक साधनेचा महत्त्वाचा घटक आहे. भावाच्या स्तरावर स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी प्रयत्न केल्यास सातत्याने भावावस्था रहाते. त्यामुळे जलद आध्यात्मिक उन्नती होते, असे प.पू. डॉक्टर नेहमीच सांगतात. स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रियेसाठी आलेल्या साधकांसाठी भावसत्संग घेतांना आणि अन्य वेळीही विविध प्रसंगांत देवाने मला सुचवलेले भावजागृतीचे प्रयत्न पुढे देत आहे.
१. सत्संगात साक्षात् गुरुमाऊली येणार आहे, या भावाने सत्संगाची सिद्धता करणे आणि गुरुमाऊलीने लवकर यावे, यासाठी तिची आर्ततेने आळवणी करणे : सत्संगात साक्षात् गुरुमाऊली येणार आहे, या भावाने सर्व जण सिद्धता करत आहेत. गुरुमाऊलीला मनाचा आढावा द्यायचा आहे. गुरुमाऊलींना बसण्यासाठी आसंदी ठेवली आहे आणि सर्व जण आर्ततेने तिला आळवत आणि भावपूर्ण नाम घेत सिद्धता करत आहेत. आता सत्संगाची सिद्धता पूर्ण झाली आहे. सारेजण आळवत आहेत, हे गुरुमाऊली, आम्ही तुमच्या दर्शनासाठी व्याकुळ झालो आहोत. आमचे नेत्र तुम्हाला पहाण्यासाठी, कान तुमचा मधुर स्वर ऐकण्यासाठी, मुख तुमच्याशी बोलण्यासाठी, कर तुमच्या चरणस्पर्शासाठी आणि मन तुम्हाला अखंड अनुभवत तुमचे गोड रूप साठवून ठेवण्यासाठी आतुर झाले आहे. तरी हे सद्गुरुनाथा, तुम्ही लवकर या.

पू. (सौ.) सखदेवआजींना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

पू. (सौ.) आशालता सखदेव
१. प.पू. डॉक्टरांनी उपायांत सांगितलेला नामजप आणि खोलीत पू. आजी करत असलेला नामजप एकच असणे : ४.४.२०१६ या दिवशी सायंकाळी ६.१० मिनिटांनी पू. आजींना होत असलेल्या त्रासावर प.पू. डॉक्टरांना उपाय विचारले. त्यांनी महाशून्य हा नामजप करण्यास सांगितले. त्यानंतर मी खोलीत गेले, तर पू. आजी पलंगावर पहुडल्या होत्या आणि त्यांना झोप लागली आहे, असे मला वाटले. त्यामुळे मी त्यांच्या जवळ जाऊन त्या जाग्या आहेत का, हे पाहू लागले. त्या वेळी त्या मोठ्याने महाशून्य हा नामजप करत असल्याचे मला ऐकू आले. या नामजपातील महा हे शब्द मोठ्या आवाजात, तर शून्य हे शब्द हळू आवाजात ऐकू आले.
२. पू. आजींच्या प्रत्येक कृतीकडे प.पू. डॉक्टरांचे लक्ष असल्याची अनुभूती येणे : ५.४.२०१६ या दिवशी सकाळी झोपून उठल्यावर पू. आजींनी त्यांना रात्री पडलेले एक स्वप्न सांगितले. स्वप्नात त्या खोलीच्या शेजारी असलेल्या प्रसाधनगृहातून खोलीत आल्या आणि दरवाज्यात असलेल्या खुर्चीवर बसल्या. त्या वेळी त्यांना पुष्कळ दमल्यासारखे झाले होते. त्यांच्या पाठोपाठ प.पू. डॉक्टरही खोलीत आले आणि पू. आजींना म्हणाले, दमायला झालं ना ? त्यानंतर ते खोलीत असलेल्या खुर्चीवर बसले. पू. आजी झोपल्या, तरी प.पू. डॉक्टर खुर्चीवर बसून होते.

लहान वयातच आश्रमातील बालसाधकांची आई होऊन त्यांचे दायित्व समर्थपणे पार पाडणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. अमृता मुदगल (वय १४ वर्षे) !

कु. अमृता मुदगल
       रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारी कु. अमृता मुदगल हिचा आषाढ शुक्ल पक्ष चतुर्थी (८.७.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिची बहीण आणि अन्य एका साधिकेला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. अमृता मुदगल हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. कु. गौरी मुदगल (कु. अमृताची बहीण)
१ अ. सात्त्विक पोशाख आवडणे : पंजाबी पोशाखापेक्षा साडी सात्त्विक असल्याने कु. अमृताला साडी नेसायला अधिक आवडते. कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी ती आवर्जून साडी नेसते.
१ आ. समाधानी आणि आनंदी असणे : अमृताकडे कुठलीही वस्तू नसली, तरी ती समाधानी असते. ती हट्ट करत नाही. स्वतः सतत आनंदी असते आणि इतरांनाही आनंद देते.
१ इ. प्रेमभाव असणे : अमृतामध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. ती सर्व बालसाधकांना आईच्या मायेने सांभाळते. त्यांच्यावर प्रेम करते. त्यांचा बालसंस्कारवर्ग घेते. मोठ्यांंशीही ती प्रेमाने आणि आदराने बोलते.

कर्नाटकातील श्री. गुरुप्रसाद यांनी प.पू. डॉक्टर आणि सर्व संत यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

       प.पू. गुरुदेव आणि यशोदा माता यांच्याप्रमाणे तुम्हा सर्व संतांच्या मुखमंडलाच्या दर्शनानेच आमची साधना चालू आहे. प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे घडण्यासाठी मन लावून प्रयत्न करीन.
- श्री. गुरुप्रसाद, कर्नाटक (१.७.२०१६)

संतांचा आदर्श समोर ठेवा !

कु. आरती सुतार
१. पू. (सौ.) बिंदाताईंप्रमाणे व्यापक होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत : आपल्याला पू. (सौ.) बिंदाताईंसारखे व्हायचे आहे, हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी सर्व साधकांचे मन जिंकले. त्या सर्वांचे दायित्व बघतात. त्यांनी मुलावर संस्कार करून त्यालाही साधनेची गोडी लावली. त्या प्रत्येक साधकाची कशी काळजी घेतात ? सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने बोलतात, हे शिकले पाहिजे. आपल्याला पू. (सौ.) बिंदाताईंप्रमाणे व्यापक होता आले पाहिजे.
२. संतांचा आदर्श ठेवून प्रयत्न केले, तर उन्नती करणे सुलभ होणे : प्रत्येक साधकाच्या मनात आपल्याला देवाला अपेक्षित असे घडायचे आहे. आपल्याला पू. (सौ.) गाडगीळकाकू, पू. (सौ.) बिंदाताई, पू. (कु.) स्वातीताई, पू. (कु.) अनुराधाताई, पू. (डॉ.) पिंगळेकाका, पू. राजेंद्रदादा, पू. सत्यवानदादा यांच्यासारखे व्हायचे आहे, असा विचार असतो. आपल्यासाठी संत आदर्श असल्याने आणि त्यांच्याप्रती आपल्या मनात आदरभाव असल्याने आपल्याला त्यांच्यासारखे व्हावे, असे वाटते आणि ते योग्यही आहे. सनातनचे संत एकापेक्षा एक मोती आहेत; म्हणून आपण प्रयत्न करतांना संतांचा आदर्श ठेवून प्रयत्न केले, तर आपल्याला उन्नती करणे सुलभ होईल.
- सतत देवासाठी तळमळणारी,
कु. आरती नारायण सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.११.२०१५)

पू. (सौ.) सखदेवआजींना श्‍वास घेण्यास त्रास होत असतांना प.पू. डॉक्टरांनी सांगितलेले वैशिष्ट्यपूर्ण उपाय

१. ६.४.२०१६, दुपारी ३.४५
१ अ. नामजप : ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ ।
१ आ. मुद्रा आणि न्यास : तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे आणि या मुद्रेने दुसर्‍या हाताच्या कोपर्‍यापासून काखेपर्यंत हाताच्या पाठच्या बाजूने न्यास करणे (असा न्यास प्रथमच आला. - प.पू. डॉक्टर)
२. ६.४.२०१६, रात्री १०.४५
२ अ. नामजप : महाशून्य आणि ॐ ॐ श्री अग्निदेवाय नमः ॐ ॐ । एक-आड-एक पद्धतीने करणे
२ आ. मुद्रा : मधले बोट तळहाताला लावणे.
२ इ. न्यास : नाही.
३. ८.४.२०१६, सायं. ५.३५
३ अ. नामजप : ॐ आणि ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ । एक-आड-एक पद्धतीने करणे (या नामजपाने सगुण आणि निर्गुण दोन्ही तत्त्वे मिळतील. - प.पू. डॉक्टर)
३ आ. मुद्रा आणि न्यास : नमस्काराची मुद्रा करणे आणि अनाहतचक्रावर मनगटांनी न्यास करणे
- कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०१६)

अनंत अनंत कृतज्ञ पू. जाधवकाकांच्या चरणी ।

पू. नंदकुमार जाधव
जाधवकाका पूजनीय आहेत आम्हा सर्व साधकांना ।
नम्रता अन् गोडवा आहे पू. काकांच्या ठायी ॥
दवबिंदूसारखा हृदयातून भाव ओझरतो गुरुचरणी ।
प्रेमाचा झरा वहातो त्यांच्या नयनांतूनी ॥ १ ॥
भावाचा रस वहातो त्यांच्या मुखातूनी ।
भक्तीचा ओघ वहातो त्यांच्या शब्दाशब्दांतूनी ॥
प्रीतीचा झरा वहातो त्यांच्या हृदयातूनी ।
नारायणाचे चैतन्य मिळे त्यांच्या बोलण्यातूनी ॥ २ ॥
साधकांनी साधना करून प्रगती करावी ।
हीच तळमळ असे त्यांच्या मनी ॥
त्यांच्याद्वारे भेटतो आम्हा श्रीमत् नारायण ।
हाच भाव सदा राहो आम्हा साधकांच्या हृदयी ॥ ३ ॥
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नसलेले सर्वधर्मसमभावी हिंदु संत !
   केवळ हिंदु संतच सर्वधर्मसमभाव हा शब्द वापरतात. इतर कुठल्याही धर्मात किंवा पंथात हा शब्द वापरत नाहीत. प्रत्येक जण आमचाच धर्म किंवा पंथ सर्वश्रेष्ठ आहे, असे म्हणतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक

    जो शिष्याला वैराग्य देऊ शकतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण करू शकतो, तोच खरा सद्गुरु !
    शिष्याने कोणती साधना करावी ते गुरु जाणतात. त्याला नुसती साधना सांगून ते थांबत नाहीत, तर त्याच्याकडून साधना करवून घेतात. हेच गुरूंचे खरे शिकवणे असते.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला
उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
मानवी जन्म पूर्वपुण्याईनेच प्राप्त होतो; म्हणून जीवनात सुविचाराची साथ ठेवून जन्माचे सार्थक करावे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

निसर्गाकडून मानवाला शासन !

संपादकीय 
      उत्तराखंडमधील देवभूमी असलेल्या केदारनाथ येथे तीन वर्षांपूर्वी आलेल्या जलप्रलयात सहस्रो भाविकांचा बळी गेला. याचीच लघु पुनरावृत्ती काही दिवसांपूर्वी झाली आहे. उत्तराखंड राज्यात परत एकदा गेल्या काही दिवसांपासून होणार्‍या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग वाहून गेले असून याची पुनर्उभारणी कशी करायची, याचे मोठे आव्हान तेथील शासन आणि लष्कर यांच्यासमोर आहे. दरडी कोसळल्याने अनेक मार्गांवर पाच-पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा पहावयास मिळत आहेत. उत्तराखंड हे पर्वतराज्यांत सातत्याने होणारे उत्खनन, नदीचे प्रवाह बलपूर्वक वळवणे यांसह धरणे बांधण्यासाठी डोंगरांमध्ये घडवण्यात येणारे स्फोट यांमुळे काही पर्वतही आतून कमकुवत-खिळखिळे होत आहेत. त्यामुळे जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यावर अगोदरच कमकुवत झालेले हे डोंगर कोसळत आहेत. मानव वैज्ञानिक प्रगती साधून निसर्गावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र निसर्गही मानवाला आता हिसका दाखवत असून त्यातूनही मनुष्य शहाणा न झाल्यास होणारा विनाश केवळ पहात बसणे इतकेच त्याच्या हातात असेल !

गंगा नदीच्या आश्‍वासनांची पूर्ती कधी ?

संपादकीय
      भारतियांसाठी जन्म ते मृत्यू अशा प्रत्येक स्तरांवर अविभाज्य घटक असणारी आणि भारतियांसाठी परमपवित्र असणारी गंगा नदी अनेकविध प्रयत्न करूनही अद्यापही प्रदूषितच आहे. ही नदी केवळ प्रदूषितच नाही, तर मध्यंतरी तिच्यावर बांधण्यात येणार्‍या धरणांमुळे या नदीचा प्रवाहच लुप्त होतो कि काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. या नदीला प्रदूषणमुक्त करून ती प्रवाही करणे, हा भाजप शासनाचा निवडणूकपूर्व एक संकल्प होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn