Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. भक्तराज महाराज यांचा दिनांकानुसार आज जन्मोत्सव
पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।
तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ॥
आज विनायक चतुर्थी

(म्हणे) बांगलादेशातील आतंकवादी मला ओळखतात, यात आश्‍चर्य ते काय ? - डॉ. झाकीर नाईक यांचा प्रश्‍न

डॉ. झाकीर नाईक यांच्या या प्रश्‍नावरून त्यांची विचारसरणी
लक्षात येते ! अशा जिहाद्याला कारागृहातच डांबले पाहिजे !
    नवी देहली - माझे १ कोटी १४ लाख अनुयायी आहेत. तसेच पीस टीव्ही या माझ्या वाहिनीचे सुमारे २० कोटी प्रेक्षक आहेत. फेसबूकवर माझे सर्वाधिक अनुयायी बांगलादेशातील आहेत. त्यात नेते, उद्योगपती, विद्यार्थी यांच्यासह विविध वर्गांतील लोकांचा समावेश आहे. यातील ५० टक्के लोक माझे चाहते असू शकतात. त्यामुळे ढाका आक्रमणातील आतंकवादी मला ओळखतात यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही; पण ते मला ओळखतात म्हणजे त्यांच्या कृत्याला माझा पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ होत नाही, असे स्पष्टीकरण इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक आणि कथित विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांनी दिले आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्टीकरण केले आहे. या स्फोटाच्या प्रकरणातील आतंकवादी डॉ. झाकीर नाईक यांच्या विचारांनी प्रेरित होते, असे समोर आले आहे. त्यावरील प्रश्‍नावर डॉ. झाकीर नाईक यांनी वरील विधान केले.

डॉ. झाकीर नाईक यांना तात्काळ अटक करा आणि बंदी घातलेल्या देशविरोधी पीस टीव्ही दाखवणार्‍यांवर कारवाई करा ! - हिंदु जनजागृती समिती

   मुंबई - हिंदूंच्या देवतांसह अन्य पंथांतील श्रद्धास्थाने, तसेच महंमद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केल्यामुळे इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्यावर भारतात गुन्हे दाखल झालेले आहेत. आतंकवादी कारवायांचा, तसेच ओसामा बिन लादेनचा पुरस्कार केल्याचा ठपका ठेवत इंग्लंड, मलेशिया आणि कॅनडा या देशांमध्ये डॉ. झाकीर नाईक यांच्यावर प्रवेशबंदी केली आहे. त्यात बांगलादेशातील ढाका येथे निष्पाप्यांना मारणार्‍या आतंकवाद्यांना डॉ. नाईक यांच्याकडून प्रोत्साहन मिळाल्याचे समोर येत आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट असून डॉ. झाकीर नाईक यांची वादग्रस्त पार्श्‍वभूमी लक्षात घेता त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच त्यांना मिळणार्‍या आर्थिक स्रोताची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

एन्आयएकडून डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांची तपासणी

   नवी देहली - ढाका येथील आतंकवादी आक्रमणातील निब्रास इस्लाम आणि रोहान इम्तियाझ या जिहाद्यांनी डॉ. झाकीर नाईक यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे स्पष्ट झाल्यावर आता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) डॉ. झाकीर यांच्या भाषणांची तपासणी चालू केली आहे. ढाका येथील १ जुलैच्या आतंकवादी आक्रमणात २० जणांचा बळी गेला होता. झाकीर नाईक याने प्रत्येक मुसलमानाने आतंकवादी झाले पाहिजे, अशा प्रकारचे विधान केले होते. त्यावरून बांगलादेशातील आतंकवादी प्रेरित झाले होते.

बांगलादेशातीलच नव्हे, तर भाग्यनगर येथील इसिसचे आतंकवादीही डॉ. झाकीर नाईक यांच्या विचारांनी प्रेरित !

   नवी देहली - भाग्यनगर येथून नुकतेच अटक करण्यात आलेले इसिसचे आतंकवादीही डॉ. झाकीर नाईक यांच्या जिहादी विचारांनी प्रेरित झाले होते, असे महंमद इब्राहिम याझदानी या आतंकवाद्याच्या चौकशीतून समोर आले आहे. २९ वर्षीय याझदानी डॉ. झाकीर यांच्या भाषणांच्या कार्यक्रमासाठी भाग्यनगर येथून मुंबईत येत असे. २०१० मध्ये डॉ. झाकीर यांच्या कार्यक्रमात तो सेवेकरीही होता. डॉ. झाकीर यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या १० दिवसांच्या एका शिबिरालाही याझदानी सहभागी झाला होता.

डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंदी घाला ! - रझा अकादमीची मागणी

केवळ डॉ. झाकीर नाईक यांच्यावरच नव्हे, तर मुंबईत दंगल
माजवणार्‍या रझा अकादमीवरही कारवाई केली पाहिजे !
    मुंबईतील रझा अकादमीने डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. डॉ. झाकीर यांचे आतंकवाद्यांशी संबंध असू शकतात. त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून येतो ? त्यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला मिळणार्‍या निधीची चौकशी करावी, अशी मागणी अकादमीचे प्रमुख अमानुल्ला यांनी केली आहे.

अटकेत असलेल्या अबू सालेमने रेल्वेत प्रेयसीसोबत लग्न केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध !

        हिंदुत्ववाद्यांना कारागृहात अत्यावश्यक वैद्यकीय सुविधाही न देणारे पोलीस प्रशासन अबू सालेमचे लग्नही लावून देतात, हे लक्षात घ्या ! हेच आतंकवादी उद्या पोलिसांच्या जिवावर उठणार आहेत, हे पोलीस जाणतील का ?
        बनावट पासपोर्ट प्रकरणी सालेमच्या विरोधात लखनऊ आणि पटियाला न्यायालयात खटला चालू आहे. देहलीत एका व्यावसायिकाकडून ५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा आहे. बिल्डर प्रदीप जैनची हत्या केल्याप्रकरणी अबू सालेम सध्या तळोजा जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला कारागृहात सर्व सुखसोयी मिळत असल्याची तक्रार यापूर्वीही करण्यात आली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात असतांनाही काढण्यात आलेल्या या छायाचित्रांनी तळोजा कारागृह प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या एका कैद्याची ही शिक्षा आहे कि ऐश ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. २०१२ ते २०१५ या काळात ट्रेनमधल्या प्रवासाची ही छायाचित्रे मुंबई पोलीस आणि कारागृह प्रशासनाचे वाभाडे काढणारे ठरली आहेत.

        मुंबई - १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असलेला आणि कुख्यात गुन्हेगार अबू सालेम याचे प्रेयसी कौसारसोबतचे नवे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. २०१४ मध्ये अबू सालेमचे धावत्या ट्रेनमध्ये लग्न केल्याची चर्चा होती. त्या लग्नाचे पुरावे देणारी छायाचित्रे मिड डे या वृत्तपत्राने प्रसिद्ध केली. राज्यासह देशभरात ज्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा या गुन्हेगाराला सुनावणीसाठी मुंबई पोलिसांचे एस्कॉर्ट पथक देहली आणि लखनऊला रेल्वेने घेऊन जात असतांनाही छायाचित्रे काढण्यात आली आहेत. या छायाचित्रांमध्ये अबू सालेमसोबत असलेली तरुणी सय्यद बहार कौसर हीनेे अबूसोबत निकाह करण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती.
        केवळ नातेवाइकांना भेटण्याचीच नव्हे, तर त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर बोलण्याचीही मुभा याला देण्यात आली आहे, असे समजते. लखनऊ रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूममध्ये तो भ्रमणध्वनीवर बोलत आहे, असेही छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे.

काश्मीरमध्ये देशद्रोही मुसलमानांकडून ईदच्या नमाजानंतर पोलिसांवर दगडफेक !

दगडफेकीच्या प्रकरणी अटकेत असणार्‍यांना काश्मीरमधील
पीडीपी-भाजप सरकारकडून ईदनिमित्ताने सोडण्यात आल्यावर पुन्हा दगडफेक !
अशा देशद्रोह्यांना रोखण्यासाठी त्यांच्यावर गोळीबार
करण्याचे आदेश पोलिसांना का दिले जात नाहीत ?
   श्रीनगर (जम्मू-काश्मीर) - काश्मीर खोर्‍यातील अनंतनाग येथे ६ जुलैला देशद्रोही मुसलमानांनी ईदच्या नमाजानंतर पाकचे झेंडे घेत पोलिसांवर दगडफेक केली. यात ६ पोलीस घायाळ झाले. यात वरिष्ठ पोलीस अधिकारी मुबाशिर बुखारी यांचा समावेश आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सफाकदल भागात झालेल्या दगडफेकीत ४ वृत्तछायाचित्रकार घायाळ झाले. पोलिसांना या देशद्रोही मुसलमानांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

आशिष खेतान यांच्या विरोधात गुन्हा दाखल !

आपच्या घोषणापत्राची तुलना गुरुग्रंथसाहिबशी केल्याचे प्रकरण 
सनातन संस्था हिंदूंसाठी कलंक, असे म्हणणारे खेतान हे आपसाठी कलंकच ठरले !
   चंडीगड - पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता आशिष खेतान यांनी आपपक्षाच्या घोषणापत्राची तुलना गुरुग्रंथसाहिब या शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाशी केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवालाची नोंद करण्यात आली आहे.
    पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपतर्फे एका प्रचार फलकावर शिखांचे अमृतसर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या सुवर्णमंदिराच्या शेजारी झाडू दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर आम आदमी पक्षासाठी हे घोषणापत्र बायबल,गीता आणि गुरुग्रंथसाहिब आहे, असे विधानही खेतान यांनी केले होते. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्यावरून ऑल इंडिया शीख स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रमुख कर्नल सिंह पीर महंमद यांनी खेतान यांच्या विरोधात अमृतसर येथे तक्रार दाखल केली आहे.

येमेनच्या विमानतळाजवळ २ बॉम्बस्फोटांत ४ जण ठार !

   साना (येमेन) - येमेनच्या अदन आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ६ जुलैला झालेल्या २ बॉम्बस्फोटांमध्ये ४ जण ठार झाले आहेत. येथील सैनिकी तळाला लक्ष्य करून हे बॉम्बस्फोट करण्यात आले. या तळाच्या प्रवेशद्वाराबाहेरील चारचाकी गाड्यांमध्ये हे स्फोट घडवून आणण्यात आले. या स्फोटांचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने घेतलेले नाही.

ऑस्ट्रेलियातील खासदाराने मशिदींवर कडक लक्ष ठेवण्याचे केले सुतोवाच !

अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया येथे आतंकवाद्यांचा धर्म 
जाणून त्यांच्या विरोधात जनमत सक्रीय होत आहे, हे आतंकावाद्यांना 
धर्म नसतो हे पालुपद म्हणणारा भारत लक्षात घेईल का ?
        कॅनबेरा (ऑस्टे्रलिया) - ऑस्टे्रलियात नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये वन नेशन पार्टीच्या अध्यक्षा पॉलिन हॅन्सन विजयी झाल्या आहेत. विजय झाल्याचे घोषित झाल्यावर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत हॅन्सन म्हणाल्या, इस्लामचा अभ्यास करण्यासाठी शासकीय आयोगाची स्थापना करण्यात यावी. तसेच देशातील मशिदींवर कडक लक्ष ठेवण्यात यावे.
        आशिया खंडातून ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होणार्‍यांच्या विरोधातही त्यांनी मत मांडले. हॅन्सन यांच्या सदर वक्तव्यांचा देशाच्या वांशिक भेदभावविरोधी आयोगाचे आयुक्त टिम साउटफोम्मासेन यांनी निषेध केला आहे.
        ते म्हणाले की, अशी वक्तव्ये हिंसेला प्रोत्साहन देतात, याची उदाहरणे आपण पाहिली आहेत.

(म्हणे) देशात समान नागरी कायद्याची आवश्यकता; पण प्रारंभी त्याची सक्ती नको !

सर्वाधिक काळ सत्तेवर असूनही काही न करणार्‍या काँग्रेसचे रमाकांत खलप यांचा अजब सल्ला !
     पणजी - केंद्रशासनाने समान नागरी कायदा लागू करण्याविषयी विधी आयोगाकडे अहवाल मागितला आहे. या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करतांना माजी केंद्रीय कायदामंत्री तथा अधिवक्ता रमाकांत खलप यांनी देशात समान नागरी कायद्याचे स्वागतच आहे आणि हा कायदा होणे काळाची आवश्यकता आहे; मात्र प्रारंभीच्या काळात याची सक्ती केली जाऊ नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. (कायदा आणा; पण प्रारंभी सक्ती नको म्हणजे काय ? महाराष्ट्रातील जादूटोणाविरोधी कायद्याविषयी खलप यांनी कधी अशी सवलत देण्याविषयी भाष्य केल्याचे आठवत नाही. समान नागरी कायदा मुसलमानांविषयी असल्यामुळे एवढी सहानुभूती का ? - संपादक)

केंद्राकडून नागरिकत्व अधोरेखित करण्याचा निर्णय राज्यशासनाला बहाल; पण कोणत्याही एकाच देशाचे नागरिकत्व मिळणार !

गोव्यातील दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्‍न !
     पणजी - गोवा राज्यातील दुहेरी नागरिकत्वाच्या विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार केंद्राने राज्यशासनाला दिला आहे. देहली येथे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत केंद्रशासनाने उपरोल्लेखित प्रस्ताव स्वीकारला असून यासंबंधीची अधिसूचना पुढील काही दिवसांत काढण्यात येणार आहे. दुहेरी नागरिकत्व प्रकरणी उत्तर आणि दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी नियुक्त अधिकारिणी म्हणून काम पहाणार आहेत. देहली येथे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या विदेशी नागरी विभागाचे संयुक्त सचिव गोपाल कृष्ण द्विवेदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गोव्याचे अतिरिक्त गृह सचिव श्रीनेत कोठवाळे आणि एन्आर्आय खात्याचे संचालक संजीव गडकर यांचीही उपस्थिती होती.

(म्हणे) सनातनला आतंकवादी घोषित करून तिच्यावर बंदी घाला !


दलित महासंघाचे प्रा. मच्छिंद्र सकटे यांची मुक्ताफळे 
सनातनद्वेषाची कावीळ झालेला दलित महासंघ !
    कोल्हापूर, ६ जुलै (वार्ता.) - ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्या आणि अनेक बॉम्बस्फोट प्रकरणांत संशयाच्या केंद्रस्थानी असलेल्या सनातन संस्थेला आतंकवादी संघटना म्हणून घोषित करा, असा प्रमुख ठराव दलित महासंघाच्या येथे झालेल्या निर्धार परिषदेत करण्यात आला. (समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अहोरात्र झटणार्‍या सनातनला आतंकवादी संबोधणारे प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी असे वक्तव्य करून वैचारिक दिवाळखोरीच सिद्ध केली आहे. इसिस, लष्कर-ए-तोयबा, सिमी अशा अनेक आतंकवादी संघटना बॉम्बस्फोट घडवून आणत असतांना त्यांच्याविरोधात कधी ठराव केला आहे का ? - संपादक) या परिषदेत समविचारी शक्तीला संघटित करून तिला गतिमान करण्याचा ठराव करून दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी सनातन संस्था ही आतंकवादी संघटना असल्यामुळे शासनाने या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली.

देशाविरुद्ध घातक कारवायांना साहाय्य करणार्‍या असदुद्दीन ओवैसीला अटक करा !

इसिसच्या आतंकवाद्यांना साहाय्य करण्याच्या
 वक्तव्याविषयी एम्आयएम्चे अध्यक्ष असदुद्दीन 
औवेसी यांच्याविषयी जनतेत संतप्त प्रतिक्रिया
       पुणे - नुकतीच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) भाग्यनगर येथून काही युवकांना इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटक केली. त्यानंतर त्या संशयित युवकांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी एम्आयएम्चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी साहाय्य करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा सकाळच्या संकेतस्थळावर वाचकांनी खरपूस समाचार घेतला आहे. सनातन प्रभातच्या वाचकांसाठी त्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
१. आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांसमवेत सर्वांना अटक केली पाहिजे ! - रवी
२. हे कसले विचारांचे स्वातंत्र्य ? ही कसली लोकशाही ? जिथे देशाच्या विरोधात केलेले वक्तव्य आणि आतंकवाद्यांचे समर्थन एखादा तथाकथित अल्पसंख्यांक नेता करतोे आणि लोकशाहीचा एक स्तंभ म्हणजे इलेक्ट्रॉनिक मिडिया बघ्याची भूमिका घेतो, तर विचारवंत मूग गिळून बसतात ! - केतन सागर
३. राजकीय पक्षाने इसिसचे असे जाहीर समर्थन करणे, हे फक्त भारतातच घडू शकते ! - तुषार

शाळा म्हणजे कमाईचे जाळे ! - उच्च न्यायालयाचा तीव्र संताप

१ लाखावर शुल्क भरूनही 
विद्यार्थ्याला शाळेतून काढल्याचे प्रकरण
        मुंबई - हल्ली शाळा या एकप्रकारे पैसा कमाईचे जाळे (रॅकेट) बनल्या आहेत आणि त्या कायदा हातात घेत आहेत. शाळांकडून मनमानी केली जात आहे, हा गंभीर विषय आहे, असा संताप शाळेतून लाखो रुपये शुल्क घेऊन एका विद्यार्थ्याला काढण्यात आल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ५ जुलैला व्यक्त केला. याविषयी शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस देऊन ११ जुलैला त्यांचे म्हणणे मांडण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने या संदर्भातील पालकांची व्यथा ऐकल्यानंतर शिक्षणक्षेत्रातील सध्याच्या अपप्रकारांविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली.
        दक्षिण मुंबईतील मरिन लाइन्स येथील एच्व्हीबी ग्लोबल अ‍ॅकॅडमी स्कूलमध्ये शिकत असलेल्या १२ वर्षीय मुलाचे वडील संतोष मेहता यांनी या संदर्भात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे - शाळेने प्रारंभी सांगितलेले १ लाख ९५०० रुपये शुल्क भरले. नंतर शाळेने मुलाचा गणवेश आणि अन्य साहित्यांसाठी ५० सहस्र रुपये मागितले. त्याला आम्ही आक्षेप घेतल्याने शाळेच्या प्रशासनाने आम्हाला धमकावण्यास आरंभ केला. नंतर पत्नीला फसवून तिची कोर्‍या कागदावर सही घेतली. त्याआधारे शाळेने ट्रान्सफर सर्टिफिकेट आमच्या हातात ठेवून मुलाला शाळेतून काढून टाकले. मग आम्ही महाराष्ट्र बालहक्क आयोग आणि उपशिक्षण अधिकार्‍यांकडे दाद मागितली. उपशिक्षण अधिकार्‍यांनी मुलाला पुन्हा शाळेत घेण्याचे निर्देश या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुख्याध्यापकांना दिले होते; परंतु त्यानुसार मुलाला शाळेत पाठवले असता शाळेच्या सुरक्षारक्षकांनी त्याला अडवले आणि प्रवेश नाकारला.

देहलीतील मक्की मशिदीत सर्वधर्म इफ्तार पार्टीत गायत्री मंत्राचा जप !

     नवी देहली - येथील देहली गेट परिसरात असणार्‍या मक्की मशिदीत रमजानच्या काळात होत असलेल्या इफ्तार पार्टीत एका बाजूला कुराण शरीफमधील आयते म्हटल्या जातात, तर दुसरीकडे गायत्री मंत्राचा जप करण्यात येतो. या वेळी मौलवींबरोबरच महामंडलेश्‍वर अरुण गिरी महाराज, महंत कैलासनाथ हटयोगी, डॉ. उजैर अहमद काश्मी, गुलिंदरसिंह दास, गिरीश यांच्यासह शीख आणि ख्रिस्ती धर्मगुरूसुद्धा आपली उपस्थिती दर्शवून त्यांच्या श्रद्धास्थानांची प्रार्थना करतात. या वेळी मशिदीत जमलेले मुसलमान गायंत्री मंत्राचे उच्चारण करण्यात धर्मविरोध मानत नाहीत. तसेच या पार्टीचे आयोजक मोहंमद बिलाल शबगा हे स्वत: गायत्री मंत्र म्हणतात. 
     यंदाच्या वर्षी आयोजित इफ्तार पार्टीच्या वेळी शबगा म्हणाले की, हमारा नारा-मिशन भाईचारा या अंतर्गत गेल्या ३८ वर्षांपासून आम्ही या सर्वधर्म इफ्तार पार्टीचे आयोजन करत आहोत. त्यात विविध स्वयंसेवी संस्थाही सहभागी होतात. आणीबाणीच्या काळात माजी केंद्रीय मंत्री आरिफ बेग कारागृहात असतांना रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांच्या रोजाची व्यवस्था केली होती. तेव्हापासून सर्वधर्म रोजा इफ्तार पार्टीचे आम्ही आयोजन करत आहोत.

(म्हणे) भाभासुमंचा बहुजन समाजाला इंग्रजीपासून तोडण्याचा प्रयत्न !

जातीच्या आधारे मातृभाषाप्रेमी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारी कुटील फोर्स संघटना !
      मडगाव, ७ जुलै (वार्ता.) - गोव्यातील इंग्रजी शाळांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असलेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंचकडून (भाभासुमंकडून) केला जात असलेला विरोध हा बहुजन समाजाला इंग्रजीपासून तोडण्याचा प्रयत्न आहे, असा कांगावा इंग्रजी शाळांचे अनुदान कायम रहावे, यासाठी कार्यरत असलेल्या फोर्स संघटनेचे निमंत्रक सावियो लोपिस यांनी केला आहे. मडगाव येथे पत्रकार परिषद घेऊन लॉपिस यांनी शासनाने इंग्रजी शाळांना दिलेले अनुदान कायम ठेवण्यासाठी त्वरित कायदा करण्याची मागणी केली. 
     लोपिस म्हणाले, भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या पदाधिकार्‍यांची मुले ही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. त्याचसमवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थांच्या वतीने गुजरात आदी अन्य राज्यांत इंग्रजी माध्यमांतील शाळा चालवण्यात येत आहेत. भाभासुमंचा इंग्रजी भाषेला नव्हे, तर तिला मिळणार्‍या अनुदानाला विरोध आहे; कारण इंग्रजी भाषा तळागाळातील बहुजन समाजापर्यंत पोचू नये, यासाठी ते धडपडत आहेत. (मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे, या तज्ञांच्या मताबद्दल लोपीस अनभिज्ञ आहेत का ? कि स्वतःच्या स्वार्थासाठी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अर्थात् असा स्वार्थ ठेवून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेणार्‍या लोपिस यांच्यासारख्यांना सूज्ञ मातृभाषाप्रेमी जनता ओळखून आहे. - संपादक)

गोव्यातील ९० टक्के घरे अनधिकृत !

ही स्थिती आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे ! मुंडकारांची घरे गोवा मुक्तीनंतर ५५ 
वर्षांत अधिकृत का केली नाहीत ? कायदेशीर प्रक्रिया सोपी करण्यासाठी शासनाने प्रयत्न का केले नाहीत ?
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची धक्कादायक माहिती
     पणजी - कायदेशीर प्रक्रियेतील जटीलतेमुळे नागरिक अनधिकृतपणे घरे बांधत आहेत. राज्यातील ९० टक्के घरे अनधिकृत आहेत. ही बांधकामे पाडली जातील, या भीतीखाली ते जगत आहेत, अशी धक्कादायक माहिती गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
    पार्सेकर या वेळी म्हणाले, अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात आम्ही कायदा आणणार आहोत. अनेक अनधिकृत घरे मुंडकारांनी बांधलेली आहेत. जमीनमालकाच्या संमतीने बांधलेली ही घरे आम्ही अधिकृत करणार आहोत. यापुढे घरे बांधण्याच्यासंदर्भातील प्रक्रिया सोपी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित झाल्यास काँग्रेस सरकारचा विनाश निश्‍चित ! - प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना.

बेंगळुरू (कर्नाटक) येथे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात पत्रकार परिषद
डावीकडून सौ. अनुपमा रेड्डी, डॉ. महर्षी आनंद गुरुजी, श्री. प्रमोद मुतालिक,
अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर, अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी. आणि श्री. गुरुप्रसाद
    बेंगळुरू (कर्नाटक) - कर्नाटकात हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही लोक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा, यासाठी शासनावर दबाव आणत आहेत. सध्या असलेले अनेक कायदे सक्षम असून वेगळ्या कायद्याची आवश्यकता नाही. अंधश्रद्धेच्या संदर्भात शासनाने जनजागृती करण्याचे काम केले पाहिजे. शासनाने प्रस्तुत कायद्यात श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी स्पष्ट कल्पना दिलेली नाही. शासनाचा हा कायदा म्हणजे हिंदु देवस्थान, हिंदूंचे धर्माचरण, मठाधिपती यांच्यावर आघात करण्याचा प्रयत्न आहे. शासनाने हा कायदा पारित केल्यास त्याचा सर्वनाश होईल, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटक अनिष्ट, अमानवीय अंधश्रद्धा कायद्याच्या विरोधात ६ जुलै या दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले.

बंगालमध्ये शस्त्रास्त्रांसह इसिसचा संशयित एन्आयएच्या कह्यात !

भारतातील मुसलमान इसिसकडे वळणार 
नाहीत, असे दिवास्वप्न पहाणार्‍या केंद्रीय 
गृहमंत्र्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
      वर्धमान - येथील रेल्वे स्थानकावर विश्‍वभारती फास्ट पॅसेंजर मधून सीआयडी अधिकार्‍यांनी एका आतंकवाद्यास शस्त्रास्त्रांसह कह्यात घेतले. मोसिरूद्दीन उपाख्य मोसी असे या आतंकवाद्याचे नाव असून तो बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रहिवासी आहे.
      मोसिरुद्दीननेे इसिस आणि जमात-उल-मुजाहिदीन या आतंकवादी संघटनांशी सोशल मिडिया तसेच इ-मेल, भ्रमणध्वनी यांद्वारे संपर्कात असल्याची स्वीकृती दिली आहे. तसेच खगरागड बॉम्बस्फोटात अटक केलेला अमजद शेख याच्याशी संबंध असल्याचेही त्याने मान्य केले आहे. सीआयडी अधिकार्‍यांनी त्याच्याकडून तीक्ष्ण हत्यारे आणि एअरगन जप्त केली आहे. बराच काळ मोसिरुद्दीनवर एन्आयएने पाळत ठेवली होती. तो काही काळ तमिळनाडूतील त्रिपूर जिल्ह्यात रहात होता. तो कोलकात्यात काल परत येणार असल्याची माहिती एन्आयएला मिळाली होती.

काळ्या सूचीतील कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट नाही !

पालिका प्रशासनाचा 
निर्णय उच्च न्यायालयाकडून रहित
        मुंबई - निकृष्ट दर्जाचे रस्त्यांचे बांधकाम केल्याने काळ्या सूचीत नोंद केलेल्या कंत्राटदारांना पुन्हा नव्याने कंत्राट देण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा निर्णय उच्च न्यायालयाने ६ जुलै या दिवशी रहित केला; मात्र न्यायालयाने जे. कुमार इन्फ्रास्टक्चरला देण्यात आलेल्या मेट्रोचे कंत्राट त्यातून वगळले आहे.
        न्यायमूर्ती एस्.एस्. केमकर आणि एम्.एस्. कर्णिक यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली. जे. कुमार इन्फ्रास्टक्चर या आस्थापनाच्या कंत्राटदाराला पालिकेने काळ्या सूचीत टाकण्यापूर्वीच मेट्रोने कंत्राट देण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याकडे खंडपिठाने लक्ष वेधले. एकूणच न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पालिका प्रशासन सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

आषाढी यात्रेसाठी येणार्‍या वारकर्‍यांना पथकर द्यावा लागणार !

या संदर्भात शासनाने त्वरित लक्ष 
देऊन पथकर रहित होण्यासाठी प्रयत्न करावेत !
        सोलापूर, ६ जुलै - १५ जुलै या दिवशी असणार्‍या आषाढी यात्रेसाठी अनेक वारकरी पालख्यांसोबत पंढरपुरात येेतील. गत वर्षी शासनाने प्रमुख पालख्यांसमवेत येणार्‍या दिंडीतील वाहनांना पथकर भरावा लागणार नाही, असे घोषित केले होते; मात्र आषाढी तोंडावर आलेली असतांना या संदर्भातील कोणताच निर्णय शासनाने न घेतल्याने वारकरी-भाविक यांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
        पुण्यात आषाढी यात्रेच्या निमित्ताने झालेल्या नियोजनाच्या बैठकीत पुरवठामंत्री श्री. गिरीष बापट यांनी पथकर न लागण्याच्या संदर्भात पाठपुरावा करण्याची घोषणा केली होती. यावर बैठक होऊन घोषणा न झाल्यास त्याची अंमलबजावणी होणार काय, असे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि संतांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर येथे प्रतीवर्षी भरणार्‍या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी देशभरातून लक्षावधी भाविक येतात. यात सुमारे २५ प्रतिशत भाविक पालखी सोहळ्याद्वारे पंढरपुरात येतात. त्यामुळे या सोहळ्यासमवेत असणार्‍या वाहनांना पथकरमुक्ती देणे आवश्यकच आहे.

पोलिसांनो, इफ्तार पार्ट्या बंद करा ! - विजय साळवी, कल्याण-डोंबिवली महानगरप्रमुख, शिवसेना

शिवसेनेला जे लक्षात 
येते ते पोलिसांना लक्षात येत नाही का ?
       कल्याण, ६ जुलै (वार्ता.) - पोलीस सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धर्मांधासाठी जागोजागी इफ्त्तार पार्टीचे आयोजन करतात; पण कधी हिंदूंच्या दिवाळीला साधा शुभेच्छा फलकही लावत नाहीत. ही कुठली समानता ?, असा खडा सवाल धर्माभिमानी विजय साळवी यानी पोलीस आयुक्तांना विचारला आहे. त्या संदर्भात एक निवेदन श्री. विजय साळवी यांनी मुख्यमंत्री, ठाण्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे, पोलीस आयुक्त, कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांना देऊन त्या माध्यमातून इफ्तार मेजवान्या बंद कराव्यात, असे कळवले आहे.
       यात पुढे म्हटले आहे की, कल्याणमधून इसिसमध्ये काही तरुण गेले होते. भिवंडीत पोलिस चौकीच्या वादातून दोन पोलिसांना ठेचून मारण्यात आले. हिंदुस्थानात माजवलेल्या आतंकवादात सहस्रो सैनिक आणि पोलीस मारले जातात. आझाद मैदानात पोलीस आणि माध्यमे यांवर आक्रमण केले जाते. तरीही आपण धर्मांधांचे किती लाड करणार ? इफ्तार पार्टीवर विचार करावा. इफ्तार पार्टीने कोणता जातीय सलोखा निर्माण होणार आहे ?

सैन्यावर दगडफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जिहाद्यांची सुटका होणार !

भारतीय सैनिकांवर दगडफेक करणार्‍या युवकांना कठोर शिक्षा करण्याऐवजी त्यांची 
सुटका केल्यामुळे ते पुन्हा सैनिकांवर दगडफेक करणार नाहीत का ? 
काश्मीरमधील भाजप-पीडीपी शासनाचा आत्मघातकी निर्णय !
सैन्यावर दगडफेक करणारे दगडफेक आतंकवादी
    श्रीनगर - सैन्यावर दगडफेक केल्याप्रकरणी कारागृहांमध्ये अटकेत असलेल्या ६३४ दगडफेक आतंकवाद्यांची सुटका करण्याचा निर्णय काश्मीरमधील भाजप-पीडीपी शासनाने घेतला आहे. शासन या सर्वांच्या विरोधातील १०४ प्रकरणे परत घेणार असून त्यांची ईदच्या पूर्वी सुटका करणार आहे. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या मते यामुळे या युवकांना त्यांचे भविष्य सुधारण्याची संधी मिळणार आहे.
      मागील मासात मेहबूबा मुफ्ती यांनी शासन वर्ष २००८ पासून दगडफेक प्रकरणांची समीक्षा करत असून जे क्रूर गुन्ह्यांमध्ये सहभागी नाहीत, अशा आरोपींना सोडण्यात येईल, असे विधानसभेत घोषित केले होते. या प्रकरणांची समीक्षा करण्याचे दायित्व पोलीस महासंचालक, कारागृह महासंचालक आणि मुख्य सचिव (गृह) यांच्या समितीकडे सोपवण्यात आले होते.
हा सैनिकांचा अवमान ! - अशोक पंडित, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक
     मुफ्ती शासनाच्या या निर्णयाविषयी प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अशोक पंडित यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी हा आमच्या सैनिकांचा अवमान असून त्याचा परिणाम भोगावा लागेल, असे ट्विट केले आहे.

भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ !

     नवी देहली - आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयेला ओडिशातील पुरीमध्ये होणार्‍या भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला आरंभ झाला आहे. ही भारतातीलच नव्हे, तर जगभरातील महत्त्वपूर्ण यात्रा आहे. या यात्रेला देश-विदेशातील लक्षावधी लोक येतात. या यात्रेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी म्हटले आहे की, भगवान जगन्नाथाची कृपा आम्हा सर्वांवर नेहमीच राहो. भगवान जगन्नाथाचा आशीर्वाद गाव, गरीब, शेतकरी यांच्या विकासासाठी मिळो आणि देशाची प्रगती होवो.

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील पू. दिवाकर अनंत घैसास (पू. आप्पा घैसास) यांचा देहत्याग !

पू. दिवाकर घैसास
    डोंबिवली - येथील पू. दिवाकर अनंत घैसास उपाख्य पू. आप्पा यांनी ५ जुलैच्या रात्री दीड वाजता देहत्याग केला. ते ८९ वर्षांचे होते. दीडशेहून अधिक ग्रंथांचे लिखाण त्यांनी केले आहे. त्यामध्ये गद्य महाभारत, सार्थ तुकाराम गाथा, सार्थ दासबोध (मराठी आणि इंग्रजी), सार्थ ज्ञानेश्‍वरी (मराठी आणि इंग्रजी), सार्थ एकनाथी भागवत (मराठी आणि इंग्रजी) आदी अनेक आध्यात्मिक ग्रंथांचा समावेश आहे. मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर पू. घैसास यांचे त्यांचे प्रभुत्व होते. स्थानिक नागरिक त्यांना आदराने आधुनिक व्यास संबोधित असत.
    रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी या गावी २२ जून १९२७ या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. १० डिसेंबर १९९३ या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पू. दिवाकर घैसास यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन मी तुला समीपतामुक्ती देत आहे, असे सांगून धन्य केले होते.

पशुवधगृहाकडे जाणार्‍या ११४ गोवंशियांचे प्राण वाचले !

मंगळवेढा आणि सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे पोलीस
आणि गोरक्षक यांची संयुक्तरित्या मोठी कारवाई !
गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता दर्शवणारी घटना !
मंगळवेढा (जिल्हा सोलापूर), ६ जुलैै (वार्ता.) - मंगळवेढा आणि सांगोला येथे पोलीस आणि गोरक्षक यांच्या सतर्कतेमुळे पशुवधगृहाकडे जाणार्‍या ११४ गोवंशियांचे प्राण वाचले आहेत. सांगोल्यात रविवारी जनावरांचा मोठा बाजार असल्याने या बाजारातून मोठ्या प्रमाणात गोवंश सोलापूर तसेच विजापूरला पशुवधगृहाकडे नेला जातो; मात्र शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पोलीस आणि गोरक्षकांनी सर्तकता दाखवल्याने मंगळवेढ्यात ३ टेंम्पोतील ३७, तर सांगोल्यात जवळपास ८२ गोवंशियांचे प्राण वाचले.

सतीश शेट्टी हत्या प्रकरणी आंधळकर आणि कवठाळे यांच्यावर दोषारोपपत्र

    पुणे, ६ जुलै - माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची जानेवारी २०१० मध्ये हत्या झाली होती. त्या वेळी या गुन्ह्याचा तपास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत असलेले पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांच्याकडे होता. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने ४ जुलै या दिवशी तत्कालीन पोलीस निरीक्षक आंधळकर आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव कवठाळे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.

माहिती सेवा समितीद्वारे वडगाव बांडे (जिल्हा पुणे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ३०० रोपट्यांचे वाटप

बारामती (पुणे) येथे २५ टन विनामूल्य चारावाटप
विद्यार्थ्यांना रोपट्यांचे वाटप करतांना श्री. चंद्रकांत वारघडे
    पुणे, ६ जुलै - माहिती सेवा समितीद्वारे वडगाव बांडे (जिल्हा पुणे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ३०० वृक्षांच्या रोपट्यांचे वाटप, तर बारामती (पुणे) येथे २५ टन विनामूल्य चारावाटप करण्यात आले.
१. दुष्काळी भागामध्ये जनावरांसाठी चारा सिद्ध होण्यास आणखी २५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे माहिती सेवा समितीने ५ जुलै या दिवशी बारामती तालुक्यातील दुष्काळी भाग असलेल्या मुर्टी, मोरगाव आणि ढोले मळा येथील २५ शेतकर्‍यांना २५ टन विनामूल्य चारावाटप केले. विशेष म्हणजे हा चारा दौंड तालुक्यातील वाळकी या गावातील शेतकर्‍यांनी स्वतः तोडून स्वखर्चाने त्यांच्या गावी नेला. या चारावाटपाच्या वेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे, समितीचे सचिव प्रशांत महाराज भागवत, समितीचे दौंड तालुकाध्यक्ष बाबुराव पिंगळे यांसह समितीचे अनेक कार्यकर्ते आणि दुष्काळी भागातील शेतकरी उपस्थित होते.

रायगडमधील भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा !

बलात्कारासारख्या गुन्ह्याचे आरोप असलेले कार्यकर्ते निर्माण 
होत असलेल्या भाजपची ही वाटचाल काँग्रेसच्या वळणावर तर नव्हे ?
       पनवेल - भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा कार्यकारिणी सदस्य किशोर म्हात्रे यांच्याविरोधात रोहा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून म्हात्रे यांनी शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने नोंदवली आहे. आरोपी किशोर म्हात्रे याने संबंधित पीडित तरुणीशी प्रेमाचे नाटक करून २४ मार्चला रोहा येथून स्कॉर्पियो गाडीत दुपारी १२ च्या सुमारास बलपूर्वक बसवून पळवून नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. तसेच आरोपीने पीडित तरुणीला शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असेही तिने म्हटले आहे. माझे चारित्र्यहनन करण्यासाठी राजकीय विरोधकांनी रचलेला हा कट आहे, न्यायव्यवस्थेवर माझा विश्‍वास आहे. मी या प्रकरणाला धैर्याने सामोरे जाईन, अशी प्रतिक्रिया किशोर म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

हॉटेलमध्ये मद्यपान करण्यास मनाई केल्यावरून समाजवादी पक्षाच्या नेत्याचा गोळीबार !

समाजवादी पक्षाचा नेता आणि आतंकवादी यांत काय भेद ? सनातनच्या साधकाला संशयावरून 
अटक केल्यावर सनातनला आतंकवादी संघटना म्हणणारे या प्रकरणी गप्प का ?
      बलरामपूर (उत्तरप्रदेश) - जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये मद्यपान करण्यास मनाई केली; म्हणून समाजवादी पक्षाचे नेते आणि लोहिया वाहिनीचे शहराध्यक्ष विनोद गिरी आणि त्यांच्या समर्थकांनी गोळीबार केला. (जनतेने अशा पक्षाला निवडून देणे म्हणजे अराजकालाच निमंत्रण होय ! - संपादक) त्यामुळे हॉटेलमध्ये उपस्थित लोकांमध्ये गोंधळ उडाला; मात्र यात कोणीही घायाळ झाल्याची माहिती नाही. या प्रकरणी गिरी याच्यासह त्यांच्या ६ सहकार्‍यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.लांब दाढीमुळे शाळेत प्रवेश नाकारल्याविषयी मुसलमान विद्याथ्यार्र्ची जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार !

धर्माचरणाविषयी तडजोड न करणारे मुसलमान विद्यार्थी ! किती हिंदु 
विद्यार्थी धर्माचरणाविषयी असे आग्रही असतात ?
जिल्हाधिकार्‍यांकडून प्रकरणाची गंभीर नोंद
      वाराणसी - लांब दाढी ठेवल्यामुळे एका खाजगी शाळेने ११ व्या इयत्तेत प्रवेश नाकारला, असा आरोप मऊ येथील महंमद आरिफ या विद्यार्थ्यांने केला. या आरोपाची गंभीर नोंद घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. (एखाद्या हिंदु विद्यार्थ्याच्या धर्माचरणाच्या संदर्भात असा प्रसंग घडला असता, तर त्याची जिल्हाधिकार्‍यांनी एवढ्या तत्परतेने नोंद घेतली असती का ? - संपादक)
    आरिफ याने यावर्षी सीबीएस्ई बोर्डातून १० वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार येथील अमृत पब्लिक शाळेमध्ये ११व्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी त्याने अर्ज दिला, तेव्हा तेथील प्रशासनाने त्याला येथे दाढी चालणार नाही, असे सांगितले. त्यानंतर प्रवेश परिक्षेचा निकाल आला, तेव्हा तो अनुत्तीर्ण झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर लांब दाढीमुळे त्याला अनुत्तीर्ण करण्यात आल्याची शंका आल्यावर त्याने शाळेला चाचणी परिक्षेची प्रत दाखवण्याची मागणी केली; मात्र शाळा प्रशासनाने नियमांचे कारण देत प्रत देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने याची तक्रार जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे केली. सध्या व्यवस्थापनाला त्याची दुसर्‍यांदा चाचणी परीक्षा घेण्यास सांगण्यात आले आहे.

संत भक्तराज महाराज यांचे चरित्र (१ ते ५ भाग)

   संतांच्या बालपणापासून ते गुरुपदापर्यंतचा प्रवास, त्यांचे कार्य आदींविषयी अनेकांना औत्सुक्य असते आणि हे ज्ञान त्यांच्या साधनेसाठी आवश्यकही असते. याच उद्देशाने संत भक्तराज महाराज यांचे पंचखंडात्मक चरित्र सनातनने संकलित केले आहे.
  • संत भक्तराज महाराज यांचे बालपण ते शिष्यावस्था
  • संत भक्तराज महाराज यांचे गुरुरूप व सहजावस्था
  • संत भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य, इतर संत व देवता
  • संत भक्तराज महाराज यांचा अमृतमहोत्सव, देहत्याग आणि उत्तराधिकारी
  • संत भक्तराज महाराज यांची वैशिष्ट्ये व कार्य
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

बाणेर (जिल्हा पुणे) भागातील वीजपुरवठा ५५ घंटे खंडित

     पुणे, ६ जुलै - गेल्या ३ दिवसांपासून सतत चालू असलेल्या पावसात शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. बाणेर भागातील काही गृहरचना संस्थांमध्ये वीजपुरवठा सलग ५५ घंटे खंडित होता. वीज उपकरणांवर झाडे किंवा फांद्या तुटून पडणे, विजेच्या कडकडाटाने उपकरणांवर दाब येणे, फीडर पिलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरणे, भूमिगत वाहिन्यांमध्ये शिरलेले पाणी यांसारख्या समस्यांमुळे वीज खंडित झाली आहे. बाणेर, खराडी, कात्रज अशा अनेक भागांत वीज गेल्याच्या तक्रारी नागरिक करत होते.

सांगली विधानसभा क्षेत्रात दोन विद्युत उपकेंद्रे उभारणार ! - आमदार सुधीर गाडगीळ

    सांगली, ६ जुलै (वार्ता.) - सांगली शहर आणि विधानसभा मतदारसंघातील विजेचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी धामणी येथे एक आणि सांगली शहरात एक अशी दोन विद्युत उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत याला त्यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती सांगलीचे आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली.

(म्हणे) आम्ही गैरमुसलमानांची हत्या करणे थांबवणार नाही !

  • आतंकवाद्यांना धर्म असतो, हे आतातरी मान्य करणार का ?
  • इसिसची बांगलादेशात पुन्हा आक्रमण करण्याची धमकी !
       नवी देहली - ढाक्यावरील आतंकवादी आक्रमणाला आठवडा होत नाही तोच इसिसने बांगलादेशात पुन्हा आक्रमण करण्याची धमकी दिली आहे. इसिसने एक ध्वनिचित्रफीत सार्वजनिक केली आहे. यात जोपर्यंत आम्ही जिंकणार नाही किंवा आमच्या धर्मासाठी प्राण देणार नाही, तोपर्यंत आम्ही गैरमुसलमानांची हत्या करणे थांबवणार नाही, असे म्हटले आहे.
१. ही ध्वनिचित्रफीत इसिसशी संबंधित एका संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे. यात ज्या ३ लोकांना दाखवण्यात आले आहे, ते मूळचे बांगलादेशी आहेत; मात्र त्यांची ओळख समजू शकलेली नाही.
२. यात एका आतंकवाद्याने म्हटले आहे, शासनाने अल्लाचा कायदा पालटून मनुष्याने बनवलेला कायदा लागू केला आहे. त्यामुळे आमच्यासाठी ते सर्व काफीर झाले आहेत. आमच्या धर्माप्रमाणे त्यांच्या विरोधात लढणे, हे आमचे कर्तव्य आहे. मुसलमान धर्म न मानणारे निरपराध मुसलमानांची विमाने आणि बॉम्बस्फोट यांच्या माध्यमांतून हत्या करत आहेत.
३. १ जुलै या दिवशी ढाका येथे जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात २० हून अधिक मुसलमानेतर विदेशी नागरिकांना ठार करण्यात आले होते. याचे दायित्व इसिसने घेतले होते; परंतु शासनाने हे आक्रमण इसिसने केले नसून स्थानिक जमातुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेने केल्याचे म्हटले होते.

रामपूर (उत्तरप्रदेश) येथे गोवंश पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तस्करांचा गोळीबार !

पोलिसांवर गोळीबार करण्याचे तस्करांना धाडसच कसे होते ? 
अशा तस्करांना अटक करून त्यांना शिक्षा करा !
     रामपूर (उत्तरप्रदेश) - अवैधरित्या पशूवधगृहात नेण्यात येणार्‍या गोवंशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार्‍या पोलिसांवर तस्करांनी गोळीबार करून ते फरार झाल्याची घटना येथे घडली. पोलिसांनी घटनास्थळावरून ४१ प्राण्यांना कह्यात घेतले. त्यात गोवंशही होते. पोलिसांनी २० जणांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. 
    या घटनेनंतर येथील कुरैशी समाजाची बैठक झाली. त्यांनी पोलिसांवर आरोप केला की, काही व्यावसायिक २०० जनावरांना बाजारातून विकत घेऊन ते पशूवधगृहात नेत होते; मात्र पोलिसांनी त्यांच्यावर अकारण कारवाई केली. (पोलिसांनी अकारण कारवाई केली, तर व्यावसायिकांना त्यांच्यावर गोळीबार करण्यास अनुमती देण्यात आली आहे का ? - संपादक) तसेच यात एकही गोवंश नव्हता. पकडलेल्या पशूंना पोलिसांनी लोकांमध्ये वाटून टाकले, हेही चुकीचे आहे. 
     या बैठकीविषयी पोलीस म्हणाले की, बैठक घेणार्‍यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात येणार आहे.

सीमीचा आतंकवादी ठरवून दैनिक भास्करच्या पत्रकारांना मारहाण !

मध्यप्रदेश पोलिसांची मोगलाई !
     भोपाळ (मध्यप्रदेश) - येथील अवधपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रघुवीरसिंह दांगी, तसेच सुभाष त्यागी अन् संजय यादव या २ हवालदारांनी दैनिक भास्करचे कृष्णमोहन तिवारी आणि विजय प्रभात शुल्ला या २ पत्रकारांना सीमीचे आतंकवादी ठरवत मारहाण केली, तसेच रात्रभर त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. मारहाण करतांना दांगी म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री माझ्या खिशात रहातात. या वेळी दांगी मद्याच्या नशेत होते. (हे पोलीस सीमीचे खरे आतंकवादी आले असते, तर त्यांना पकडू शकले असते का ? पोलिसांच्या या अशा वागण्यामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे खरे आतंकवादी त्यांना हवे तिथे बॉम्बस्फोट घडवू शकत आहेत. - संपादक) या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधिकारी दांगी आणि २ हवालदार यांना निलंबित केले आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. हे दोन्ही पत्रकार रात्री दैनिकाचे काम संपवून घरी निघाले असतांना दांगी यांनी त्यांना पकडले होते.भारत-पाक सीमेवरील ४ गावांतील ग्रामस्थांनी लावली गाव विकण्याची भित्तीपत्रके !

     फाजिल्का (पंजाब) - भारत-पाक सीमेलगत असणार्‍या ४ गावांतील शेतकर्‍यांनी गावे विकायला काढली आहेत. त्यांनी ठिकठिकाणी गावे विकण्याची भित्तीपत्रके लावली आहेत. यावर लिहिले आहे की, कोणीही श्रीमंत व्यक्ती, टाटा, अंबानी अथवा सरकार बोली लावून गाव विकत घेऊ शकतात. येथील ९९ टक्के शेतकरी कर्जदार आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची भित्तीपत्रके लावली आहेत. या घटनेवर पंजाबचे मंत्री आणि स्थानिक आमदार सुरजीत जियाणी यांनी हा विरोधी पक्षांच्या राजकारणाचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. 
     ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, गेल्या अडीच महिन्यांपासून येथे पाणी नाही. त्यामुळे पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे बँकांचे कर्ज फेडता येणार नाही. येथे कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. सरकारे येतात आणि जातात; परंतु शेतकर्‍यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळेच गावे विकण्याचा निर्णय आम्ही घेतला.

फलक प्रसिद्धीकरता

झाकीर नाईकच नाही, तर चिथावणीखोर भाषणे करणार्‍या सर्वच धर्मांधांवर बंदी घाला !
     माझी पीस टीव्ही वाहिनी, फेसबुक आदी मिळून माझे कोट्यवधी अनुयायी आहेत. त्यामुळे ढाका आक्रमणातील आतंकवादी मला ओळखतात यात आश्‍चर्य काय ?, असे उद्दाम विधान कथित विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांनी केले आहे.

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी निलंगा (जिल्हा लातूर) येथून १ धर्मांध कह्यात

        निलंगा (जिल्हा लातूर), ६ जुलै - पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी नांदेड आतंकवादी पथकाने निलंगा तालुक्यातील हलगरा येथील बशीर जैन्नुसाब मुल्ला याला ४ जुलै या दिवशी कह्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा प्रविष्ट केला. ईदच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई झाल्याने जिल्ह्यात सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
        जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मोहंमद लोकमन मुद्दीलोक फरार आहे. त्याच्या पासपोर्टसाठी देण्यात आलेला जन्मदाखला हलगरा येथील आहे. हलगरा ग्रामपंचायतीत सेवक असलेल्या बशीर जैन्नुसाब मुल्ला याने हा जन्मदाखला बनवून देण्यात साहाय्य केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी हलगरा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांचीही चौकशी करण्यात आली.

ख्रिस्ती न्यायालयांकडून संमत करण्यात आलेले घटस्फोट कायदाबाह्य ! - सर्वोच्च न्यायालय

समान नागरी कायदा झाल्यावर अशा प्रकारच्या सर्वच अडचणी सुटतील, हे येथे लक्षात घ्यायला हवे !
     नवी देहली - देशात असणार्‍या ख्रिस्ती न्यायालयांकडून (एक्लेसियास्टिकल ट्रिब्युनल्स यांच्याकडून) संमत करण्यात आलेले ख्रिस्ती पती-पत्नींमधील घटस्फोट कायदाबाह्य असून अशा घटस्फोटानंतर दुसरा विवाह करणे, हा गुन्हा ठरतो, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी.एस्. ठाकूर आणि न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपिठाने एका याचिकेवर सुनावणी करतांना हे मत व्यक्त केले आहे.
    बेंगळुरू येथील अधिवक्ता क्लॅरेन्स पायस यांनी या संदर्भातील याचिकेत म्हटले होते, देशातील कॅथलिक ख्रिस्तींचे विवाह आणि घटस्फोट चर्चकडून संमत करण्यात येतात; परंतु भारतीय दंडविधानाला सदर निर्णय मान्य नसल्याने अशा प्रकारे घटस्फोटित ख्रिस्त्यांनी दुसरा विवाह केल्यास तो गुन्हा ठरून त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे अशा घटस्फोटांना कायद्याद्वारे संमती देण्यात यावी.३ पेक्षा अधिक आतंकवादी पंजाबमार्गे देहलीमध्ये घुसण्याची शक्यता !

हे आणखी किती दिवस चालणार ?
      नवी देहली - पंजाब पोलीस अधिकार्‍यांनी देहली पोलिसांना जम्मू-काश्मीरमधून ३ पेक्षा अधिक आतंकवादी विविध चारचाकी गाड्यांमधून हत्यारे घेऊन निघाले आहेत. ते पंजाबमार्गे देहलीमध्ये घुसण्याची शक्यता आहे, अशी गोपनीय माहिती दिली. यानंतर पोलिसांनी देहली येथे सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे. येणार्‍या-जाणार्‍या सर्व गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह धार्मिक स्थळे, बाजार आणि रेल्वेस्थानकांवर बारिक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. सतर्कतेच्या आदेशानंतर येथेही सुरक्षाव्यस्थेत वाढ केली असल्याचे पठाणकोट येथील पोलीस अधिकार्‍याने सांगितले.आतंकवादाच्या विरोधात सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता ! - इराणचे परराष्ट्रमंत्री

जिहादी आतंकवादाचा भस्मासुर आता इस्लामी राष्ट्रांनाच गिळंकृत करायला 
निघाल्यावर इस्लामी देशांना तो चुकीचा वाटू लागला आहे !
     दुबई - सौदी अरेबियामधील मदिना शहरातील महंमद पैगंबरांच्या मशिदीवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा इराणने निषेध करत सर्व देशांनी मतभेद विसरून इस्लामी आतंकवाद्यांच्या विरोधात एकत्र येण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिकाही या वेळी स्पष्ट केली आहे. आतंकवाद्यांना आता कोणतीही मर्यादा राहिलेली नाही. आता आपण एकत्र आलो नाही; तर शिया आणि सुन्नी पंथियांनाही सातत्याने लक्ष्य करण्यात येईल, असे इराणचे परराष्ट्रमंत्री महंमद जवाद झरीफ यांनी म्हटले आहे. इराणच्या या प्रतिक्रियेवर सौदी अरबकडून अजूनही औपचारिक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

आंध्रप्रदेशच्या मी सेवा सेंटरच्या माध्यमातून आतंकवाद्यांनी सिरियामध्ये पाठवले होते इमेल !

भारतात इसिसची पाळेमुळे खोलवर रूजल्याचे समोर आल्यावर त्याच्या 
समूळ उच्चाटनासाठी शासन काय पावले उचलणार ? 
      नवी देहली - २९ जून या दिवशी भाग्यनगर येथून इसिसच्या ५ आतंकवाद्यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केली होती. या आतंकवाद्यांनी इसिसचा प्रमुख बगदादी याच्याकडे शपथपत्र पाठवतांना आंध्रप्रदेशच्या शासकीय योजनेतील संगणकाचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आंध्रप्रदेश सरकारच्या मी सेवा सेंटर या उपक्रमाच्या अंतर्गत वापरण्यात येणार्‍या संगणकाचा यासाठी उपयोग करण्यात आला. (धर्मांध शासकीय सुविधांचा वापरही देशविघातक कारवायांसाठी करत असल्याचे समोर आल्यावर त्यांना सुविधा पुरवायच्या कि नाही, हे राज्यकर्त्यांनी ठरवणे आवश्यक ! - संपादक) या सेवेअंतर्गत नागरिक सरकारी देयके भरू शकतात. बगदादीला पाठवण्यात आलेले मेल हे आतंकवादी इब्राहिम चालवत असणार्‍या मी सेवा सेंटरमधून पाठवण्यात आले होते. सिरियामधील आमीर नावाच्या इसिसच्या आतंकवाद्यालाही या संगणकातून इमेल पाठवण्यात आले होते.

इसिसकडूनच रमझानच्या मासात ८०० जणांची हत्या !

इस्लामला शांतीचा धर्म म्हणू नका, असे बांगलादेशी लेखिका तसलीम 
नसरीन म्हणतात, ते दर्शवणारे वृत्त !
     नवी देहली - इस्लामिक स्टेट अर्थात इसिसने अमेरिका, तुर्कस्थान, लेबनॉन, जॉर्डन, इराक, येमेन, सौदी अरब, बांगलादेश आणि फिलीपिन्स या देशांत आक्रमण करून ८०० नागरिकांची हत्या केली आहे. रमझान महिन्यात नागरिकांची हत्या करण्याची अनुमती आम्हाला देवाने दिली आहे. नागरिकांची हत्या केल्यामुळे आम्हाला जगभरातून पाठिंबा मिळत असून आमच्या समर्थकांची संख्या वाढत आहे, असे इसिसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. (इसिसचे आतंकवादी इस्लामी राष्ट्रातही आतंकवादी आक्रमणे करून स्वतःच्या धर्मबांधवांचा जीव घेतात. त्यांच्या धर्माची शिकवणच हिंसाचारावर आधारित असल्यामुळे त्यांच्याकडून असे कृत्य होते ! - संपादक)
     अरबमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराकमधील मोसूल शहरामध्ये रमझानच्या पहिल्याच दिवशी इसिसने ६५ जणांची हत्या केली. बगदादमध्ये ३ जुलै या दिवशी केलेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये २०० जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Mere karodo anuyayi hain. Bangladeshke atankwadi bhi muze pahachante honge. - Dr. Zakir Naik
Kya sarkar aise logonko bandi banayegi ?
जागो ! : मेरे करोडों अनुयायी हैं । बांग्लादेशके आतंकवादी भी मुझे पहचानते होंगे । - डॉ. जाकिर नाईक
क्या सरकार ऐसे लोगों को बंदी बनाएगी ?

यवतमाळ पब्लिक स्कूलमधील नराधमांना ठार मारले पाहिजे ! - राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

       मुंबई - यवतमाळ पब्लिक स्कूलमधील नराधमांना ठार मारले पाहिजे. या शाळेतील प्रकरणाच्या विरोधात पालक करत असलेल्या आंदोलनाच्या पाठीशी मी आहे. शाळेचे व्यवस्थापन पालटण्यासाठी संबंधितांशी बोलणार आहे. या प्रकरणी विजय दर्डा यांनी क्षमा मागावी. मुख्यमंत्र्यांनीही शाळेला भेट द्यायला हवी, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी यवतमाळ येथील पब्लिक स्कूलमधील प्रकरणाविषयी व्यक्त केली आहे.

समांतर न्यायालय बनू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांना आवरणार कोण ?

श्री. योगेंद्र जोशी
     नंदुरबार येथील दै. पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार श्री. योगेंद्र जोशी यांनी दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी प्रसारमाध्यमांनी चालवलेला हिंदुद्वेष, तसेच प्रसामाध्यमांची बदमाषी चव्हाट्यावर आणणारा लेख त्यांच्या फेसबूक पानावर लिहिला आहे. हा लेख आम्ही आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
१. प्रसारमाध्यमांकडून केली जाणारी बदमाषी !
     मित्रहो, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास कसा चालू आहे, हे सांगण्याचे निमित्त करून प्रसारमाध्यमांनी प्रतिदिन सनातन संस्थेची यथेच्छ अपकीर्ती करणारी माहिती प्रसारित करण्याचा सपाटा लावला आहे. पत्रकारितेतील अपकीर्तीचा उत्तम नमुना ठरावा इतका हा हीन प्रकार आहे. मी स्वतः दोन तपांहून अधिक काळ सलगपणे पत्रकारितेत कार्यरत आहे आणि दीर्घकाळापासून पत्रकारिता अनुभवत आहे. या संपूर्ण काळात मान्यवरांची अनुभवलेली पत्रकारिता, मी घेतलेले अनुभव आणि या कार्यकाळातील निरीक्षण यांच्या बळावर मी हे वरील विधान पूर्ण शुद्धीत करत आहे. हा बदमाष पत्रकारितेचा उत्तम नमुना म्हणावासा वाटतो; कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी सनातन संस्थेच्या साधकांचा संबंध आहे कि नाही, याचे अन्वेषण सीबीआय करत आहे; पण संबंध असल्याची निश्‍चिती होणे बाकी आहे.

सनातनवर बंदी घालणे; म्हणजे विश्‍वकल्याणाच्या कार्यास खिळ घालणे !

श्री. महेश पारकर
     डॉ. वीरेंद्र तावडे यांच्या अटकेवरून पुन्हा एकदा सनातन संस्थेवरती बंदीचे वारे घोंगावू लागले आहे, असे अनेकदा घडले आहे. हवा गेल्यावर टायरमधील ट्यूबची जी अवस्था होते, तशीच स्थिती काही कालावधीनंतर सनातनच्या विरोधकांची झालेली नेहमी दिसते.
१. हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्याने त्यांच्यावर 
सातत्याने आक्रमण होत असणे
     गेल्याच आठवड्यात उत्तरप्रदेशातील कैराना येथील ३६० हिंदु कुटुंबांना सर्व साहित्य घेऊन पलायन करावे लागले. गोव्यातील एका अग्रगण्य म्हणवणार्‍या वृत्तपत्राने त्या बातमीसह हिंदूंच्या मागे लाठ्या-काठ्या घेऊन मागे लागलेल्या मुसलमानांचे एक छायाचित्रही छापले आहे. स्वातंत्र्याला सत्तर वर्षे होऊनही देशांतील काही मुजोर मुसलमान अशा प्रकारे हिंदूंना देशोधडीस लावू शकतात. ही स्थिती काय दर्शवते ? एकदा देशाच्या कुठल्याही भागात मुसलमान बहुसंख्य झाले की, ते हिंदूंच्या उरावर बसतात. हिंदूंना हाकलून लावल्यावरच ते शांत बसतात. गत सहस्र वर्षांचा इतिहास उर बडवून बडवून आम्हाला हेच सांगत आहे; परंतु हिंदू यातून कुठलाच धडा घेत नाहीत; कारण आपल्यामध्ये हिंदु धर्म, तसेच हिंदू बांधव यांविषयी अभिमान नाही. तो अभिमान सनातन संस्था हिंदूंमध्ये रूजवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याआधारे अन्य धर्मीय हिंदूंवर जो अन्याय-अत्याचार करतात, त्याला आळा बसू शकेल.

हिंदुत्वाचा विकास कधी ?

    नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठींनी भाजप कार्यकर्त्यांना भारताला स्मार्ट बनवण्याची, तसेच त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या कामाचा प्रचार जनमानसात करावा, अशी सूचना केली. सध्याच्या शासनाने जनतेचे १० पैकी ७ प्रश्‍न सोडवले असल्याने उरलेल्या ३० टक्के कामांचा पाठपुरावा घेण्यापेक्षा झालेली कामे जनतेला सांगावीत, असेही या वेळी ज्येष्ठ धुरिणांकडून सांगण्यात आले. या बैठकीमध्ये विकासाच्या सूत्रांवरही ऊहापोह झाला; मात्र एवढे सगळे होऊनही हिंदुत्वाच्या सूत्राची उपेक्षाच झाल्याचे दिसून आले.

समर्थ रामदासस्वामींना त्यांच्या आजारावरील उपाय म्हणून वाघिणीचे दूध आणून देणारे छत्रपती शिवाजी महाराज !

बालकांसाठी परिपाठ !
     शिवाजीराजे प्रत्येक गुरुवारी समर्थांचे दर्शन घेतल्याविना भोजन करत नसत. एके दिवशी राजे समर्थांच्या दर्शनार्थ निघाले असता महाबळेश्‍वरच्या रानात समर्थ असल्याचे त्यांना समजले. समर्थ दर्शनार्थ कितीही कष्ट पडले, तरी त्याची खंत ते मानत नसत. 
     त्यांनी समर्थांचा पुष्कळ शोध केला. दिवस मावळला तरी त्यांना त्यांच्या ठिकाणाचा शोध लागला नाही. शेवटी काही सेवकांसह ते मशाली घेऊन निघाले. घोर जंगल असल्यामुळे सोबतच्या माणसांची आणि त्यांची चुकामूक होऊन ते एकटेच फिरू लागले. इतक्यात एका गुहेतून जोरजोरात विव्हळण्याचा स्वर ऐकू आला. तो स्वर समर्थांचाच वाटल्याने ते त्या गुहेत शिरले.

स्वीट डिश खाताय ?

घरोघरी आयुर्वेद
      आपण भारतीय लोक पाश्‍चात्त्य ते ते चांगले, या अपसमजात इतके दंग आहोत की, आपण आपले कपडेच नव्हेत, तर राहणीमान आणि आहारसुद्धा त्यांच्याचप्रमाणे नक्कल करून घेण्यास सुरुवात केली आहे. स्वीट डिश हा त्यातलाच एक प्रकार. स्वीट डिश हा परदेशात जेवणाच्या शेवटी खाण्याचा प्रकार समजला जातो. आयुर्वेद मात्र मधुर रसाचे पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावे, असे सांगतो. असे केल्याने वाताचे शमन होते आणि अन्न पचनास अडथळा देखील येत नाही, हे आयुर्वेदाचे मत.
     आयुर्वेदाचे मत आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने विचार करता सुद्धा अधिक शास्त्रीय आहे. गोड पदार्थ पचायला जड असतात. जेवणाच्या सुरुवातीलाच त्यांचे सेवन केल्याने त्यांचे पचन तर उत्तम होतेच शिवाय पुढे आपण जे जेवण घेतो त्याचे प्रमाणही मर्यादेत रहाते. याउलट जेवणाच्या शेवटी आणि त्यातही थंड करून गोड पदार्थ खाल्ल्यास जठराचे तापमान न्यून होऊन पचनाचा बोजवारा उडतो. याकरताच गोड पदार्थ खायचे असल्यास ते जेवणाच्या सुरुवातीला किंवा किमान जेवतांना मध्ये-मध्ये तरी खावेत. जेवणाच्या शेवट स्वीट डिश खाण्याची पाश्‍चात्त्य प्रथा मात्र आपल्या देशात निश्‍चितपणे घातक आहे.
- वैद्य परिक्षित शेवडे, (एम्डी, आयुर्वेद), डोंबिवली
(वैद्य परीक्षित शेवडे यांच्या व्हॉटस्-अ‍ॅपवरील/लेखातील निवडक सूत्रे.)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) हिंदु धर्मासाठी भारताबाहेरून आर्थिक वा इतर कोणतीही मदत येणे शक्य नाही. हिंदु धर्माच्या दृष्टीने विचार केला, तर हिंदूंना स्वबळावर उभे रहाण्याशिवाय पर्याय नाही ! (लोकजागर)

प्रांजळपणा, स्वतःला पालटण्याची तळमळ आणि भावपूर्ण गुरुसेवा करणे, या गुणांचा समुच्चय असलेले श्री. रूपेश गोकर्ण यांची सहसाधकांनी टिपलेली गुणवैशिष्ट्ये

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
        १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने हे लिखाण प्रकाशित करत आहोत.
        कर्नाटकातील साधक श्री. रूपेश गोकर्ण रामनाथी आश्रमात सेवा करत होते. आता ते प्रसारसेवेसाठी कर्नाटक राज्यात जात आहेत. त्यांच्याविषयी आश्रमातील सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

साधकांच्या हृदय सिंहासनी आरूढ झालेल्या प.पू. डॉक्टरांनी अमृत महोत्सवानिमित्त सिंहासनावर विराजमान होऊन २१ वर्षांपूर्वीची इच्छा पूर्ण करून साधकाला दिलेला आनंद !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
       ३०.५.२०१६ च्या दैनिक सनातन प्रभातच्या अंकामध्ये महर्षींच्या आज्ञेने सिंहासनावर विराजमान झालेले परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्र पाहून माझा डोळ्यांवर विश्‍वास बसेना. हर्ष उल्हसित होऊन माझी भावजागृती झाली. मला आनंद मिळून श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली; कारण माझ्यासारख्या क्षुद्र जिवाची इच्छा तब्बल २१ वर्षांनी परमेश्‍वराने पूर्ण केली होती. या इच्छापूर्तीचा आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही.
श्री. शिवाजी वटकर
१. प.पू. डॉक्टरांचे चांगले छायाचित्र स्वतःकडे असावे, असे वाटणे, ते काढण्याचा बराच प्रयत्न करणे; पण तो असफल होणे : पूर्वी आमच्याकडे प.पू. डॉक्टरांचे चांगले छायाचित्र नव्हते. माझ्याकडे ते सतत असावे, ते सर्व ठिकाणी प्रकाशित व्हावे, अशी माझी तीव्र इच्छा होती. त्यांचे छायाचित्र काढण्याचा मी बराच प्रयत्न केला होता; पण अपेक्षित असे छायाचित्र मिळत नव्हते. वर्ष १९९४ मध्ये धुळे येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात दिवसभर मी छायाचित्रक (कॅमेरा) घेऊन त्यांचे छायाचित्र काढण्यासाठी त्यांच्यामागे फिरत होतो. सायंकाळच्या वेळी सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ सिंहासनासारखी (व्यासपिठावर ठेवण्यात येणारी) एक आसंदी ठेवली होती. त्यावर ते येऊन बसले. चांगली संधी मिळाली, असे वाटून मी छायाचित्र घेऊ लागलो. तेवढ्यात ते म्हणाले, आसंदी कशी आहे, हे पहाण्यासाठी मी बसलो होतो. आसपास सर्व चपलांचा ढीग आहे. येथे छायाचित्र कशाला काढता ? असे म्हणून ते निघून गेले. अशा रितीने दिवसभर प्रयत्न करूनही आणि प.पू. सिंहासनासारख्या आसंदीवर बसलेले असतांनाही छायाचित्र काढता आले नाही. तेव्हा ईश्‍वरेच्छेविना आपण काही करू शकत नाही, याचा अनुभव आला.

कोल्हापूर सेवाकेंद्रात ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तृप्ती गावडे यांनी दीपावलीच्या दिवशी घेतलेला भावसत्संग !

कु. तृप्ती गावडे
       ८.११.२०१५ या दिवशी भावसत्संगाच्या आरंभी प.पू. गुरुदेवांच्या हृदयात त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांच्या चरणांकडे जाण्याचा भावसत्संग ९० मिनिटे चालू होता. त्यामध्ये सौ. सानिकाताईंनी एक लहानसा भावाचा प्रयत्नही सांगितला. तेव्हा ताईंनी साधकांना काय जाणवते ?, असे विचारले. त्या वेळी सर्वांना हलकेपणा आणि थंडावा जाणवला. त्यावरून ताई म्हणाली, भावाच्या छोट्याशा प्रयत्नाने एवढे सारे पालटते, तर आपण सर्वांनी भावाचे प्रयत्न किती वाढवले पाहिजेत, हे लक्षात घेऊ या. भाव हा असा आहे की, तो देवाकडे आणि त्याच्या गुणांकडे क्षणात घेऊन जातो. भावाचे प्रयत्न हे आपल्याकडून देवच करवून घेतो आणि तसा भाव देवच प्रत्येकात निर्माण करतो. दैनिकात पू. (सौ.) बिंदाताई यांची चौकट येते. त्यानुसार कृतज्ञतेचा दीप आपल्या हृदयात तेवत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. त्यानंतर सानिकाताईंनी भावाच्या प्रयत्नांमध्ये पुढील प्रश्‍न विचारले आणि त्याची साधकांनी सांगितलेली उत्तरे पुढे देत आहे.
शरिरात आपण भावाचे 
दीप कुठे कुठे लावू शकतो ?
१. डोळे
अ. सतत गुरुचरणांकडे लक्ष जाण्यासाठी डोळ्यांत दीप लावूया.
आ. आपल्या डोळ्यांना दिसलेली कृती ही दिसेल ते कर्तव्य या भावाने करून कर्तव्याचा दीप लावूया.

देहावर गुरूंची सत्ता असल्याने गुरु या देहाचे मालक असून आपण भाडेकरू असणे आणि साधना करून ईश्‍वरप्राप्ती करून घेणे, हेच मालकाला (गुरूंना) द्यावयाचे भाडे असणे

        १.५.२०१६ या दिवशी मी नामजप करायला बसले होते. तेव्हा मी प.पू. भक्तराज महाराजांचे धाव रे धाव गुरुनाथा&! हे भजन ऐकत होते. तेव्हा त्या भजनातील या देहावरची सत्ता, तव चरणी अकळी दत्ता या ओळींचा मला देवाने पुढील अर्थ सांगितला, या देहावर गुरूंची सत्ता आहे; म्हणजे गुरु या देहाचे मालक आहेत आणि आपण भाडेकरू आहोत. साधना करून ईश्‍वरप्राप्ती करून घेणे, हेच मालकाला (गुरूंना) द्यावयाचे भाडे आहे.
        गुरुमाऊली, आपणच मला हे सुचवलेत, यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. गुरुमाऊली, माझ्याकडून आपल्याला अपेक्षित अशीच साधना करवून घ्या, हीच आपल्या चरणी प्रार्थना !
तुमची,
- सुप्रिया (कु. सुप्रिया जठार), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.५.२०१६)

सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असणारा ५६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मिरज (जिल्हा सांगली) येथील चि. अवधूत संजय जगताप (वय ३ वर्षे) !

चि. अवधूत जगताप
१. व्यवस्थितपणा
अ. त्याला माझ्याकडून किंवा त्याच्या बाबांकडून घरातील काही साहित्य किंवा कपडे अव्यवस्थित ठेवल्याचे दिसले की, तो असे ठेवायचे नाही, नीट ठेवा, असे सांगतो आणि साहित्य व्यवस्थित करीपर्यंत तेथेच थांबतो.
आ. त्याच्या कपड्यांवर काही सांडले, तर तो लगेच कपडे पालटून मागतो.
इ. भूमीवर पाणी सांडले, तर तो स्वतः कापड आणून पुसतो. त्याच्यात नीटनेटकेपणा आणि शिस्त हे गुण आहेत.
- सौ. वेदिका संजय जगताप (चि. अवधूतची आई), मिरज (२.६.२०१६)
२. इतरांना साहाय्य करणे
        आमच्याकडे मिरज केंद्राच्या उत्पादन साहित्याचा साठा आणि त्यांचे वितरण करणे, या सेवा आहेत. जिल्ह्याकडून साहित्य आल्यानंतर संपूर्ण साहित्य व्यवस्थित लावण्यासाठी तो मला साहाय्य करतो. त्याची क्षमता नसतांनाही तो खोके ओढत नेऊन योग्य ठिकाणी ठेवतो. काही वेळा तो घराची स्वच्छता करतांनाही साहाय्य करतो.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनोद गादीकर यांना आलेल्या अनुभूती

श्री. विनोद गादीकर
१. सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांनी 
दुचाकीवर मागे बसून दुकानात येणे 
आणि तेथील त्यांच्याच प्रतिमेत जाऊन बसणे
        एके दिवशी सकाळी मी दुकानात जाण्यासाठी घरातून बाहेर पडलो. घराचे दार मी ओढून बंद केले. त्या वेळी सूक्ष्मातून प.पू. डॉक्टर मला म्हणाले, अरे, मी तुझ्यासमवेत येत आहे.
        मी मागे वळून घराचे दार उघडले. प.पू. डॉक्टर हळूहळू चालत होते. त्यामुळे मी दार उघडून प.पू. डॉक्टरांना येतांना पाहू लागलो. घरात माझी पत्नी होती. तिने मला विचारले, दार परत का उघडलेत ? मी सांगितले, उगाचच.
        प.पू. डॉक्टर गाडीजवळ आले. तेव्हा आमच्यात पुढील संभाषण झाले.
मी : तुम्हाला फारच हळू चालावे लागते ना !
प.पू. डॉक्टर : अरे, मी तुझ्यासाठी हळूहळू चालतोय.
मी : तुम्हाला माझ्या गाडीवर बसायला जमेल का ?
प.पू. डॉक्टर : हो.

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे तेजस्वी विचार या लेखमालेचा मथळा वाचून साधिकेची झालेली विचारप्रक्रिया

        प.पू. गुरुदेवांचे स्मरण करण्यामध्ये मी खूप न्यून पडते. मला गुरुदेवांची आठवण येत नाही, याची मला काळजी वाटते. एकदा मनात विचार आला, दैनिक सनातन प्रभात मधील परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे तेजस्वी विचार या लेखाच्या मथळ्यातील विचार हा शब्द काढल्यास परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे तेजस्वी, असे वाक्य होईल. माझे नावही तेजस्वी आहे. हे लक्षात आल्यावर मला वाटले, मला गुरुदेवांची आठवण राहिली अथवा नाही, तरीही दयाळू प.पू. गुरुदेव मला त्यांच्याजवळच ठेवत आहेत. या विचारांमुळे मला आलेली निराशा न्यून होऊ लागली.
- कु. तेजस्वी, इंदूर, तेलंगण. (आताच्या सौ. तेजस्वी वेंकटापूर, भाग्यनगर) (२१.०१.२०१६)

प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रत्यक्ष कृपाशीर्वादाने स्थापन झालेली सनातन भारतीय संस्कृती संस्था !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान
प.पू. भक्तराज महाराज
प.पू. भक्तराज महाराज 
यांच्या जन्मोत्सवानिमित्त...
         सनातन संस्था कशी स्थापन झाली ? हे तुम्हाला आठवतं का ? वर्ष १९९१ मध्ये एकदा डॉ. सौ. कुंदाताईंचा मला फोन आला, बाबा (प.पू. भक्तराज महाराज) नाशिकला आले आहेत. आपण उद्या त्यांना भेटायला जाऊ. दुसर्‍या दिवशी मी, डॉ. आठवले आणि सौ. कुंदाताई नाशिकला गेलो. तो दिवस आम्ही प.पू. बाबांच्या सान्निध्यात घालवला. तेव्हा प.पू. बाबांचा निवास उंटवाडीत रहाणारे श्री. गिरीश दीक्षित यांच्या घरी होता. आम्हीही रात्री तिथेच थांबलो. दुसर्‍या दिवशी सकाळी बाबा पलंगावर झोपले होते. त्यांच्या समोर डॉ. आठवले बसले होते. दादासुद्धा (प.पू. रामानंद महाराज) होते आणि आम्ही सगळे जण बाजूला बसलो होतो. त्या वेळी डॉक्टर म्हणाले, आपण सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी एक संस्था स्थापन केली पाहिजे ! यावर प.पू. बाबा म्हणाले, फार चांगला विचार आहे. तुम्ही चालू करा. यासाठी पुढाकार घ्या. हे करा. ही सगळी चर्चा झाल्यानंतर असा प्रश्‍न पडला की, संस्थेला नाव काय द्यायचे ? तेवढ्यात पलंगावर झोपलेल्या अवस्थेत प.पू. बाबा मोठ्याने ओरडून म्हणाले, सनातन भारतीय संस्कृती संस्था ! तेव्हापासून सनातन भारतीय संस्कृती संस्था जन्माला आली !
- श्री. जयंत बोरकर, विक्रोळी, मुंबई. (२३.२.२०१५)

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

चुका झाल्याने मनावर 
होणारा परिणाम आणि त्याची लाभ-हानी ! 
प.पू. परशराम पांडे
१. निरुत्साह वाटणे : आपले मन झालेल्या चुकांमुळे ओशाळते आणि त्यामुळे आपला उत्साह मावळतो. आपल्याला निरुत्साही वाटत असल्याने त्याचा परिणाम आपल्या तोंडवळ्यावर दिसतो. दुसराही निरुत्साही होतो. सेवा करतांना आपले मन एकाग्र होत नाही. त्यामुळे पुनःपुन्हा चुका होतात आणि मन आणखीनच निरुत्साही होऊन मनात नकारात्मक विचार येतात. त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. साधना न होता मायेशी बद्धता वाढते. रज-तमाचे आवरण वाढत जाते आणि मनुष्य हताश होतो.
२. निरुत्साही मनाने केलेल्या स्वयंपाकात तशाच संवेदना अन्नात उतरल्याने खाणार्‍यालाही समाधान न वाटणे : समजा एखाद्या व्यक्तीने मनात नकारात्मक विचार येत असतांना स्वयंपाक केला, तर तिच्या मनातील निरुत्साही संवेदनाच त्या अन्नात उतरतील. असे अन्न जो ग्रहण करतो त्याच्यावरही त्याचा परिणाम (निरुत्साहाचा) झाल्यामुळे ते अन्न ग्रहण केल्यावर खाणार्‍यालाही समाधान वाटत नाही. ते अन्न रुचकर वाटत नाही. त्याचे पाप स्वयंपाक करणार्‍याला लागते. त्यामुळे त्याच्या पापात भर पडते आणि त्याचे आवरण अधिकच वाढते. यासाठी ईश्‍वराच्या अनुसंधानात राहून स्वयंपाक बनवल्यास लाभ होतो.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.५.२०१५)

सनातनचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज ।

        प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रकटदिनी (वसंतपंचमी, ४.२.२०१४ या दिवशी) मला पुढील कविता सुचली.
सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज ।
शिष्य जयंत हे गुरुभक्तीचे रत्न लाभले त्यांस ॥ धृ. ॥
दिनू भक्तीत दंगला । नामाचे बीज पेरले ।
देहभान हा विसरला । गुरुभक्तीत रंगला ॥ १ ॥
सनातनचा हा मुकुटमणी । हृदयी वसली हिरकणी ।
साधकांच्या ठसला रे मनी । गुरुदेवांचा हा चिंतामणि ॥ २ ॥
गुरुभक्तीचे रूप हे भक्तराज । नामकरण केले रे आज ।
अनंतानंद साईशांच्या गळ्यातील साज । शोभला भक्तमंडळात ॥ ३ ॥
सनातनच्या ५८ व्या संत पू. विजयालक्ष्मी काळेआजी यांचा वाढदिवस

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
     सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
एखादे औषध लागू पडले नाही, तर आपण ते पालटतो. त्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात लोकशाही पूर्णपणे अयशस्वी ठरल्याने आज हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेला पर्याय नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक

   गंगेमुळे पाप, शशी (चंद्रा) मुळे ताप (मानसिक तणाव) आणि कल्पतरूमुळे दैन्य (दारिद्य्र) नाहीसे होते. याउलट श्री गुरुदर्शनाने पाप, ताप अन् दैन्य या तिन्ही गोष्टींचे हरण होते, म्हणजेच हे तिन्ही त्रास दूर होतात. - श्री गुरुचरित्र १३:१३०

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

असत्याचा विजय तात्पुरताच !
सत्य हे स्वयंप्रकाशी असते. कलियुगात असत्याचा विजय होतो, असे वाटले, 
तरी नित्य हे लक्षात ठेवावे की, हा विजय तात्पुरता असतो ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

झाकिरी फुत्काराचे परिणाम !

संपादकीय 
     ढाका येथे झालेले जिहादी आक्रमण भीषण होते. जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण करणे नवीन नसले, तरी या आक्रमणात पकडल्या गेलेल्या एका जिहादी आतंकवाद्याने आणि भाग्यनगर येथे पकडलेल्या एका इसिसच्या आतंकवाद्याने केलेला खुलासा यांत कमालीचे साधर्म्य असून तो भारताला निश्‍चितपणे अंतर्मुख करायला लावणारा आहे. बांगलादेशमधील आतंकवाद्याने डॉ. झाकिर नाईक यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली, अशी धक्कादायक स्वीकृती दिली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn