Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

माझी बहीण चंद्रभागा । करीतसे पापभंगा ॥

कोटी कोटी प्रणाम !

प.प. टेंब्येस्वामी पुण्यतिथी
------------
विनम्र अभिवादन !
महाकवी कालीदास दिन

जादूटोणाविरोधी कायदा संमत करण्याच्या दबावातून डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली असू शकते !

  • इंदापूर (जिल्हा पुणे) येथील श्रीपाद खरात यांचे न्यायालयात आवेदन प्रविष्ट 
  • इंदापूर येथील एका हत्येच्या प्रकरणातील तिघांना सहआरोपी करण्याची मागणी
     पुणे, ४ जुलै - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. ४ जुलै या दिवशी इंदापूर (जिल्हा पुणे) येथील श्रीपाद धर्माजी खरात यांनी न्यायालयात जादूटोणा विरोधी कायदा संमत करण्याच्या दबावातून डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली असू शकते, अशी शक्यता व्यक्त करणारे आवेदन प्रविष्ट केले आहे.
खरात यांनी केलेल्या आवेदनात म्हटले आहे की,
१. जादूटोणा विरोधी कायद्याला जसा वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा विरोध होता, तसा हा कायदा संमत करण्यासाठी काही मंडळींचा दबावही होता.
२. डॉ. दाभोलकर यांचा बळी घेऊनच हा कायदा संमत होऊ शकतो, या भूमिकेतून कायदा पारित करण्याच्या संदर्भातील दबावातूनही डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली असू शकते. (डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागे वेगवेगळी कारणे असू शकतात; पण केवळ सनातनद्वेष या एकाच सूत्रावर हत्या झाल्याच्या दिवसापासून अन्वेषण होत आहे. डॉ. दाभोलकर यांचे कुटुंबीय खरात यांनी उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या सूत्राच्या संदर्भात काही बोलतील का ? - संपादक)

(म्हणे) त्या घटनेशी आमचा संबंध नाही !

शाळेतील अत्याचाराशी संबंधित नसल्याचे सांगून
हात झटकणारे शाळेचे संस्थापक अध्यक्ष विजय दर्डा !
     यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये जे घडले, त्याचा माझ्याशी आणि माझ्या कुटुंबाशी दुरान्वयानेही संबंध नाही. ज्या मुलींवर प्रसंग ओढवला, त्या मला माझ्या मुलीसारख्याच आहेत. त्यामुळे अशा गोष्टींवर पांघरूण घालण्याचा विचार एका पित्याच्या मनात कसा येईल, असे मत शाळेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले. (असे आहे, तर मग किशोर दर्डा स्वतःची अटक टाळण्यासाठी फरार झाले, असा आरोप केला जात आहे, याविषयी विजय दर्डा यांना काय म्हणायचे आहे ? - संपादक)

शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सचिव किशोर दर्डा यांना अटक आणि पोलीस कोठडी

यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा एज्युकेशन
सोसायटीच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरण
     यवतमाळ - जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव किशोर दर्डा यांना ४ जुलैैला पहाटे साडेतीन वाजता नागपूरमधून अटक करण्यात आली. त्यांना येथील न्यायालयात उपस्थित केले असता, १ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी संतप्त पालक आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते. अटक टाळण्यासाठी दर्डा फरार झाले होते; मात्र पोलिसांनी त्यांना पकडले. (फरार होण्याच्या कृतीतूनच या घटनेत काहीतरी काळेबेरे आहे, हे लक्षातयेते ! - संपादक) त्यांच्या विरोधात गुन्हाही प्रविष्ट करण्यात आला होता. अत्याचाराची माहिती मिळाल्यानंतर सक्षम यंत्रणेला न कळवल्याविषयी गुन्हा प्रविष्ट झाल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी सांगितले.

सौदी अरेबियामधील अमेरिकेच्या दूतावासाबाहेर आक्रमण !

    दुबई - जेद्दा शहरातील अमेरिकेच्या दूतावासाबाहेर आत्मघाती आक्रमण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये आक्रमणकर्त्या आतंकवाद्याचा मृत्यू झाला आहे. अमेरिकी दुतावासाबाहेर असलेल्या मशिदीबाहेर आतंकवादी चारचाकीमधून आला होता.

(म्हणे) भारताने चीनची मानहानी करू नये !

चीनचा कांगावा !
     बीजिंग - भारताने चीनच्या भूमिकेचा चुकीचा अन्वयार्थ काढून चीनची मानहानी करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्‍वासार्हता मिळवण्याचा अधिक प्रयत्न करावयास हवा होता, अशी टीका चीनमधील ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भारताला आण्विक इंधन पुरवठादार गटाचे (एन्एस्जीचे) सदस्यत्व मिळू नये, याकरता चीनने खलनायकी भूमिका बजावली होती; परंतु त्यानंतर क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण करार व्यवस्थेचे (एम्टीसीआर) सदस्यत्व भारताला मिळाल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. चीनला मोठ्या राजनैतिक प्रयत्नांनंतरही एम्टीसीआरचे सदस्यत्व मिळू शकले नाही. या पार्श्‍वभूमीवर एन्एस्जीच्या बैठकीतील अपयशामुळे बहुसंख्य भारतीय माध्यमांनी चीन भारतविरोधी असल्याची भूमिका घेत सर्व दोष एकट्या चीनलाच दिला होता, असे ग्लोबल टाईम्स मध्ये म्हटले आहे.

जर ते मुसलमान असतील, तर मी नाही !

किती मुसलमान सलीम खान यांच्यासारखी भूमिका जाहीरपणे मांडतात आणि 
किती पुरोगामी मुसलमानांकडून अशी भूमिका मांडण्याची अपेक्षा करतात ?
सलीम खान यांच्याकडून बांगलादेशातील आक्रमणाचा निषेध 
     नवी देहली - अभिनेता सलमान खान यांचे वडील आणि प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांनी बांगलादेशातील आक्रमणाचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करतांना म्हटले आहे की, थोड्या थोड्या वेळाने जगभरात होणार्‍या अशा आक्रमणांतील लोक स्वतःला मुसलमान म्हणवून घेतात. एक मुसलमान म्हणून पैगंबर आणि कुराण यांचे पालन केले जाते. मला माहिती नाही की, ते याचे पालन करतात कि नाही; परंतु ते इस्लामचे पालन करत नाहीत. जर ते कोणत्याही कारणाने मुसलमान असतील, तर मी मुसलमान नाही. पैगंबर म्हणतात की, निर्दोष नागरिकाला मारणे मानवतेला मारण्यासारखे आहे. या ईदच्या वेळेला आपली प्रार्थना तोपर्यंत पूर्ण होणार नाही, जोपर्यंत आपण या आक्रमणाचा निषेध करत नाही.

युरोपच्या धर्तीवर एकट्याने आक्रमण करण्यासाठी पुढे या !

जिहादी आतंकवाद्यांकडून पुन: पुन्हा आक्रमण करण्याचे धाडस होणार नाही, 
असा धडा भारताने आतंकवाद्यांना शिकवणे आवश्यक आहे !
अल्-कयदाचे भारतीय मुसलमानांना आवाहन 
      नवी देहली - भारतीय मुसलमानांनी देशात युरोपच्या धर्तीवर एकट्याने आक्रमण करण्यासाठी पुढे आले पाहिजे आणि प्रशासन अन् पोलीस अधिकारी यांच्या हत्या केल्या पाहिजेत, असे आवाहन अल्-कयदाचा भारतीय उपखंडाचा प्रमुख असीम उमर याने केले आहे, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. 
      बांगलादेशची राजधानी ढाक्यातील होली आर्टिसन बेकरी या रेस्टॉरंटमध्ये १ जुलैच्या रात्री आतंकवाद्यांनी २० लोकांना ठार केले होते. अल्-कयदा आणि इसिस भारतियांना त्यांच्या संघटनेत दाखल करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तज्ञांच्या मते, भारत उपखंडामध्ये इसिसचा उदय झाल्यामुळे अल्-कयदा अशा आक्रमणाचा विचार करत आहे. (आतंकवाद्यांशी संबंधित युवकांचे केवळ समुपदेशन न करता त्यांना कारागृहात टाकून कठोर शासन केले पाहिजे ! - संपादक)

(म्हणे) भाजपचा देशाला हिंदु राष्ट्र करण्याचा प्रयत्न !

एम्आयएम्चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा जळफळाट !
     नवी देहली - निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे शासन समान नागरी कायदा करण्याच्या नावावर देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप एम्आयएम्चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. (समान नागरी कायद्यामुळे मुसलमानांवर एका विवाहाचे, तसेच मुले जन्माला घालण्याची बंधणे येणार आहे, त्यामुळे त्यांचे मुसलमानांची लोकसंख्या वाढीचे स्वप्न अपूर्ण रहाणार आहे; म्हणून ओवैसी यांचा जळफळाट होत आहे ! - संपादक)

समान नागरी कायद्यातच हिंदुस्थानचे हित आहे !

दैनिक सामनाच्या संपादकियातून शिवसेनेने मांडली देशहिताची भूमिका
देशाचे हित कशात आहे, हे शिवसेनेप्रमाणे अन्य पक्ष जाणतील तो सुदिन !
     मुंबई - राममंदिरप्रश्‍नी न्यायालयाचा निर्णय मानायला हवा, अशी समन्वयाची आणि समान नागरी कायद्याविषयी कायदा आयोगाचे मत मागवून वेळ मारून नेण्याची भूमिका केंद्रातील भाजप सरकारने घेतली आहे. समान नागरी कायद्याविषयी कायदा आयोगाचे मत मागवण्याचे जाहीर होताच अनेक मुस्लिम संघटनांनी आदळआपट आणि आगलावेपणाची भाषा चालू केली. या सगळ्यांचा परिणाम उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीवर होईल आणि ती निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच समान नागरी कायद्याचा शंखनाद केला गेला असेल, तर ते देशहिताचे नाही. समान नागरी कायद्यातच हिंदुस्थानचे हित आहे, असे परखड मत दैनिक सामनाच्या समान नागरी कायदा होईल काय ? या संपादकियातून केले आहे.

पुढच्या दोन दिवसांत भारतात आक्रमणाची शक्यता !

     नवी देहली - गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कर-ए-तोयबा या जिहादी संघटनेचे आतंकवादी ईदपूर्वी म्हणजे ६ जुलैपूर्वी भारतावर आक्रमण करू शकतात. बांगलादेशात झालेल्या आक्रमणासारखे आक्रमण भारतात होऊ शकते. जमात-उद-दावा या आतंकवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबई आक्रमणातील सूत्रधार हाफिज सईद यांचे संभाषण गुप्तचर यंत्रणेने मुद्रित केले आहे. या संभाषणात आतंकवादी गर्दीच्या ठिकाणी आक्रमण करणार असल्याचे म्हटले आहे. त्यातही बंगाल, त्रिपुरा, मेघालय, आसाम आणि मिझोरम येथे आक्रमण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे भारताने बांगलादेश सीमेवर दक्षतेची चेतावणी दिली आहे. तसेच सीमेवरील गावांमध्ये शोध मोहीम चालवण्यात येत आहे.

ढाका येथे आतंकवादी आक्रमण करणार्‍यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या मुलाचा सहभाग !

     ढाका (बांगलादेश) - येथे आतंकवादी आक्रमण करणार्‍यांमध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते आणि बांगलादेश ऑलिम्पिक असोसिएशनचे उपसचिव एस्. एम. इम्तियाज खान बाबूल यांचा मुलगा रोहन इम्तियाज याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
      त्यांनी ४ जानेवारी या दिवशी रोहन बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. रोहनसह छायाचित्रामध्ये दिसणार्‍या अन्य दोघांचीही ओळख पटली आहे. शमीम मुबाशीर आणि निबारस खान अशी यांची नावे आहेत. हे दोघेही ढाकामधील नावाजलेल्या शाळेत शिक्षण घेत होते.
      अवामी लिग पक्षातील नेत्याचा मुलगा आतंकवादी झाल्यास जमायतुल मुजाहिदीन बांगलादेश संघटनेशी संबंधित कोणतीही गोष्ट परिस्थिती बिघडवू शकते, असा दावा गुप्तचर संघटनेने केला आहे.

माझ्यावर आक्रमण करून दाखवा ! - राजासिंह ठाकूर यांचे इसिसच्या आतंकवाद्यांना आव्हान

आमदार राजासिंह ठाकूर
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जिहादी
आतंकवाद्यांच्या धमक्या येत, तेव्हा त्यांनी म्हटले
होते की, मला
मारणारी गोळी ज्या रंगाची असेल, त्या रंगाची जमात शिल्लक रहाणार नाही !
     भाग्यनगर - येथील भाजपचे आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. राजासिंह ठाकूर यांनी इसिसच्या आतंकवाद्यांना आव्हान दिले आहे. श्री. ठाकूर यांनी म्हटले आहे, माझ्यावर आक्रमण करून दाखवा. तसेच आतंकवाद्यांची पाठराखण करणारे एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या आतंकवाद्यांना वाचवून दाखवावे, असे आव्हानही दिले आहे. नुकत्याच येथून पकडण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्यांच्या चौकशीतून त्यांनी श्री. ठाकूर यांना ठार करण्याचा कट रचला होता, असे उघड झाले आहे. श्री. राजासिंह ठाकूर यांनी जिहादी आतंकवाद्यांच्या अटकेवर मौन बाळगणार्‍या तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांच्या सरकारांवरही टीका केली. ओवैसीसारखे लोक उघडपणे जिहादी आतंकवाद्यांची पाठराखण करत असतांना सरकार गप्प का आहेे ?, असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.
     श्री. ठाकूर यांनी मागणी केली आहे की, सध्या देशात हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणाच्या अनेक घटना घडत आहेत आणि इस्लामी आतंकवादात वाढ झालेली आहे, अशा वेळी सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.


काळा पैसा जाहीर करा, अन्यथा कारवाई ! - अरुण जेटली

      सांगली, ४ जुलै (वार्ता.) - काळा पैसा ३० सप्टेंबरपर्यंत घोषित करा आणि निवांत झोपा, कसलीही चौकशी होणार नाही; मात्र या मुदतीत काळा पैसा घोषित न केल्यास १ ऑक्टोबरपासून कारवाईची मोहीम चालू करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देहली येथील एका कार्यक्रमात सांगितले. त्याच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था येथील चेंबर ऑफ कॉमर्समध्ये २ जुलै या दिवशी करण्यात आली होती. चार्टर्ड असोसिएशनच्या वतीने देहली येथे ही बैठक झाली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यात मार्गदर्शन केले. या बैठकीचे थेट प्रक्षेपण पहाण्याची सोय आयकर विभाग आणि चार्टर्ड असोसिएशनने केली होती. त्यानंतर ४५ टक्के रक्कम कर स्वरूपात भरून काळा पैसा पांढरा होणार आहे. केंद्र शासनाने ही मोहीम गांभीर्याने घेतली आहे.

देहलीच्या मुख्य सचिवांस भ्रष्टाचारप्रकरणी अटक

आम आदमी पक्षाच्या राज्यातील भ्रष्टाचारी अधिकारी हा त्यांचा गौरव समजायचा का ? 
     नवी देहली - देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांना ४ जुलै या दिवशी भ्रष्टाचाराच्या प्रकरणासंदर्भात अटक करण्यात आली. राजेंद्र कुमार यांच्यासहित इतर ४ जणांनाही अटक करण्यात आली आहे. 

निष्पापांच्या हत्यांविषयी मुसलमान गप्प का ? - अभिनेते इरफान खान यांचा प्रश्‍न


ढाका येथील आतंकवादी आक्रमण
      मुंबई - रमझानच्या मासात बकर्‍यांची कुर्बानी (प्राण्यांचा बळी देणे) देण्याच्या प्रथेला विरोध केल्यानंतर चित्रपट अभिनेते इरफान खान यांनी ढाका येथील आतंकवादी आक्रमणाविषयी मुसलमान गप्प का ? असा प्रश्‍न विचारला आहे.
      ढाका येथील हॉटेलमध्ये १ जुलैला झालेल्या आतंकवादी आक्रमणात २० नागरिक ठार झाले होते. याविषयी सामाजिक संकेतस्थळावर दु:ख व्यक्त करण्याबरोबरच अभिनेते इरफान खान यांनी, इस्लामच्या नावाखाली अशी दुष्कृत्ये करणार्‍यांविषयी मुसलमान गप्प का आहेत ? असा प्रश्‍न केला. खान म्हणाले, दया, क्षमा आणि शांती हा इस्लामचा पाया असतांना मुसलमान गप्प बसून त्यांच्या धर्माची मानहानी होऊ देणार का ? अत्याचार आणि निष्पापांची हत्या करणे, म्हणजे इस्लाम नाही.

मुलांसह पोहण्यास नकार दिल्यावरून स्वित्झर्लंडने दोन मुलींना नागरिकत्व नाकारले !

धर्मपालन म्हणून अनैतिक गोष्ट करण्यास नकार देणार्‍या मुसलमान मुलींकडून हिंदु मुलींनी शिकावे !
     जिनेव्हा (स्वित्झर्लंड) - शाळेत मुलांसह पोहण्यास नकार दिल्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये दोन मुसलमान मुलींना नागरिकत्व नाकारण्यात आले आहे. द डॉनच्या वृत्तानुसार या बाझल शहरात रहाणार्‍या अनुक्रमे १२ आणि १४ वर्षांच्या या मुलींनी त्यांच्या शाळेत अनिवार्य असलेल्या पोहण्याच्या वर्गाला जाण्यास नकार दिला. या वेळी त्यांनी सांगितले की, त्यांना मुलांसोबत पोहावे लागणार होते आणि त्यांचा धर्म मुलींना मुलांसह पोहण्याची अनुमती देत नाही. (१२ आणि १४ वर्षांच्या मुलींनी मुलांसोबत किंवा त्यांच्यासमोर पोहणे कधीही अयोग्यच ! मुसलमान मुली धर्मपालन म्हणून तरी अनैतिक गोष्टी टाळतात. भारतात तथाकथित पुढारलेले हिंदू धर्मपालन करत नसल्यामुळे अशा अनैतिकतेकडे दुर्लक्ष करतात. - संपादक) त्यानंतर स्विस अधिकार्‍यांनी या मुलींचे नॅचरलायझेशन अ‍ॅप्लिकेशन फेटाळले. स्थानिक अधिकार्‍यांनी सांगितले की, या दोघींनी काही दिवसांपूर्वी स्विस नागरिकत्वासाठी आवेदन दिले होते; परंतु त्यांनी शाळेतील अभ्यासक्रमाचे पालन न केल्यामुळे त्यांचे आवेदन फेटाळण्यात आले. नॅचरलायझेशन समितीचे अध्यक्ष स्टीफन म्हणाले, जे कायद्याचे उल्लंघन करतील, त्यांना नागरिकत्व देता येणार नाही.

अमेरिकेत आतंकवादी समजून एका शीख संगीतकाराची पोलिसांकडून तपासणी !

      फ्लोरिडा (अमेरिका) - येथील नीलमजीत ढिल्लों नामक शीख संगीतकाराला आतंकवादी समजून त्याची पोलिसांनी तपासणी केली. डिझ्नी चॅनलच्या अ‍ॅनिमल किंगडम शो जंगल बुक अलाईव्हमध्ये काम करणारा हा भारतीय वंशाचा संगीतकार त्याच्या एका मित्रासोबत उपाहारगृहात गेला असता ही घटना घडली. नीलमजीत ऑरलँडो उपाहारगृहात गेल्यानंतर त्याला आतंकवादी समजून कोणीतरी पोलिसांना संपर्क केल्यानंतर पोलिसांनी येऊन त्याची आणि त्याच्याजवळ असलेल्या साहित्याची तपासणी केली. (आतंकवादाविषयी सतर्क असणार्‍या अमेरिकी नागरिकांकडून भारतीय काही शिकतील का ? - संपादक) तपासणीमध्ये नीलमजीतच्या साहित्यामध्ये कोणतीही संशयित वस्तू न आढळल्यामुळे संबंधित पोलीस अधिकार्‍यांनी ढिल्लों यांची क्षमा मागितली. या अनुभवानंतर शीख समुदायाच्या व्यक्तीला आतंकवादी समजण्याची ही घटना काही नवीन नाही, असे मत ढिल्लों यांनी इन्स्टाग्राम संकेतस्थळावर मांडले आहे.

भाजपची ओवैसी यांच्यावर टीका !

     नवी देहली - एन्आयएने (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने) अटक केलेल्या इसिसशी संबंधित ५ मुसलमान युवकांना एम्आयएम्चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी न्यायालयीन साहाय्य देऊ केल्यावरून भाजपने टीका केली आहे. (केवळ टीका नको, तर कारवाई करा ! - संपादक)

आतंकवाद्यांचा बिमोड करण्यासाठी साहाय्यभूत ठरणारे पॅनिक बटन असलेले घड्याळ सिद्ध

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून घड्याळाचे कौतुक
     नाशिक - येथील आनंद सुंदरराज याने एक घड्याळ सिद्ध केले असून त्यातील पॅनिक बटन आतंकवाद्यांचा बिमोड करण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या घड्याळाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या घड्याळ्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. आनंदराजने पुणे येथे मेक इन इंडियाच्या कार्यशाळेत सादरीकरण केल्यानंतर आयोजकांनी त्याच्या या आविष्काराची वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या ७० देशांच्या इनोव्हेशन अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट समीट - २०१६ साठी निवड केली.

भ्रष्टाचाराचा बॅरॉमीटर समजून घ्या !

     विकास म्हणजे भरभराट ! विकास म्हणजे मोठे रस्ते, इमारती, पूल, कारखाने सर्वकाही मोठे मोठे. त्यामुळे जगात आमच्याकडे हे आहे, ते आहे, असा मोठेपणा तुम्हाला मिरवता येतो. विकास म्हणजे समृद्धी; पण त्या समृद्धीचे मोल तुम्हाला मोजायलाच लागते; कारण समृद्धी सुखासुखी येत नाही. त्यासह भ्रष्टाचार येतोच. भ्रष्टाचारामुळे महागाई वाढते. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब आणखी गरीब होतात. हा भ्रष्टाचार कसा मापायचा ? अगदी सोपे आहे. अमेरिकेची करन्सी डॉलर. एका डॉलरला किती रुपये मोजायला लागतात, ते पहा म्हणजे कळेल. पुढील आकडे बोलके आहेत. 
(संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१५)

सुक्या मेव्यामुळे कर्करोगापासून होते रक्षण !

     नवी देहली/लंडन - बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते आदी सुक्या मेव्यातील घटक व्यक्तीचे कर्करोगापासून रक्षण करत असल्याचे २६ वर्षांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. 
     आठवड्यातून ५ किंवा त्यापेक्षा अधिक वेळा अक्रोड खाणार्‍या व्यक्तीला कर्करोग होण्याचा धोका ३४ टक्क्यांनी न्यून होत असल्याचे दिसून आले. प्रतिदिन १.५ औंस अक्रोड खाणार्‍याच्या आरोग्यात सकारात्मक पालट झाल्याचे इंटरनॅशनल ट्री नट कौन्सिल न्यूट्रिशन रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक मौरेन तेरनस यांनी नमूद केले आहे.
    मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका अल्प करण्यात अक्रोड महत्त्वाची भूमिका पार पाडते, तसेच अक्रोडमध्ये लाभदायी चरबी, उच्चदर्जाची प्रथिने आणि रसायने असतात. यामुळे व्यक्तीचे कर्करोगापासून रक्षण होत असल्याचे ब्रिटीश जर्नल ऑफ कॅन्सर या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात नमूद करण्यात आले आहे. 
तब्बल २६ वर्षे चाललेल्या या संशोधनामध्ये ४७ सहस्र २९९ लोकांचा अभ्यास करण्यात आला होता.

श्रीलंकेकडून तमिळनाडूच्या ५ मच्छिमारांना अटक

भारतीय मच्छिमारांना शेजारी राष्ट्रांच्या सागरी सीमा कळण्यासाठी 
केंद्रशासन काही उपाय का करत नाही ? 
     चेन्नई - उत्तर श्रीलंकेच्या भागात येत असलेल्या पाल्कच्या सामुद्रधुनीतील नेडुनथेवू बेटाजवळ मच्छिमारी करत असतांना तमिळनाडूतील ५ मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली, तसेच त्यांची बोटही कह्यात घेतली आहे. हे बेट तमिळनाडूतील रामेश्‍वरम्पासून ४८ कि.मी. अंतरावर आहे. सागरी सीमेचे उल्लंंघन केल्याप्रकरणी श्रीलंकेकडून आतापर्यंत अनेक वेळा भारतीय मच्छिमारांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

लक्षावधी रुपये उकळून आजार बरे करण्याचा दावा करणार्‍या धर्मांध भोंदूस अटक

      धर्माबाद (जिल्हा नांदेड) - कथित मंत्रोच्चाराने आजार दूर करण्याचा दावा धर्माबादेत एक धर्मांध भोंदू करत होता. यासाठी तो गरजूंकडून लक्षावधी रुपये घेत असे. या भोंदूचे स्वरूप उघड झाल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.
१. धर्माबाद शहरात गांधीनगर भागातील रहिवासी आणि डाक विभागात पोस्टमास्तर असलेले तौफिख पठाण हे २५ वर्षांपासून ग्रामीण भागासह सीमांध्रातील लोकांना दुर्धर आजार बरे करण्यासाठी वेगवेगळी औषधी वेळप्रसंगी कथित मंत्रोच्चार करून त्यांच्याकडून हवे तेवढे शुल्क वसूल करत असत.

पाकमध्ये १० वर्षांच्या मुलांनाही शाळांमधून जिहादी आतंकवादी विचारसरणीचे शिक्षण !

     इस्लामाबाद - पाकमध्ये आता मुलांना शाळेपासूनच जिहादी आतंकवादाचे प्रशिक्षण दिले जात आहे. तेथील मदरशांमध्ये मुलांना जी पाठ्यपुस्तिका दिली जात आहे, त्यात बी फॉर बंदूक, के फॉर नाइफ, आर् फॉर रॉकेट, टी फॉर टेरर आणि एस् फॉर स्वोर्ड या पद्धतीने आतंकवाद शिकवला जात आहे. अवघ्या १० वर्षांच्या मुलांच्या मनात पुढील भारतद्वेषाची भावना भिनवली जात आहे. 
१. या पुस्तकातील पहिला धडा महंमद अली जिना यांच्यावर आधारित आहे. हिंदु नॅशनल काँग्रेसने मुसलमानांना गुलाम बनवले होते; मात्र जिना यांनी मुसलमानांना हिंदूंपासून वाचवले, असे यामध्ये म्हटले आहे.

(म्हणे) दोन धर्मांत तेढ निर्माण करणार्‍या ख्रिस्ताचे हिंदुत्व या पुस्तकावर जप्तीची कारवाई करावी !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकरलिखित पुस्तकाच्या विरोधाचे प्रकरण
* प्रेमाचे नाटक करणार्‍या ख्रिस्त्यांची ही असहिष्णुता नव्हे का ? 
* हिंदुत्ववाद्यांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही का ?
* ख्रिस्ती लक्षावधी हिंदूंचे फसवून धर्मांतर करत आहेत. त्यामुळे दोन धर्मांत खरी तेढ निर्माण होत आहे; सावरकरांच्या पुस्तकाने नव्हे.
      मुंबई - येशू ख्रिस्त हे तमिळ हिंदू होते आणि त्यांचे खरे नाव केशव कृष्ण होते. मुळात ख्रिस्ती धर्म हा अस्तित्वातच नव्हता. तो हिंदु धर्मातील एक पंथ होता. येशू भारतात आल्यानंतर त्यांनी योगाचे प्रशिक्षण घेतले.., असे सांगणारे ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व हे पुस्तक दोन धर्मांत आणि समाजात तेढ निर्माण करणारे आहे. ख्रिस्ती धर्मातील लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणारे आहे. तसेच देशातील सौहार्दाचे वातावरण बिघडवणारे आहे. त्यामुळे त्याची प्रत्येक प्रत जप्त करण्याच्या कारवाईचे आदेश राज्य सरकारला द्यावेत. तसेच पुस्तकाच्या प्रकाशन-वितरणाला मज्जाव करावा, अशी विनंती ऑल इंडिया टू ख्रिश्‍चन कौन्सिल ट्रस्ट या संस्थच्या वतीने अधिवक्ता पंकज पूर्वे यांनी फौजदारी जनहित याचिकेत केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

माध्यमिक शिक्षक मंडळाच्या सभेत गदारोळ

शिक्षण संस्थांचा अनागोंदी कारभार ! 
     नगर - नुकत्याच झालेल्या माध्यमिक शिक्षक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर आरोप केल्याने सत्ताधारी आणि विरोधी गटाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद झाला. खरेदी, नोकरभरती, घटलेला लाभांश इत्यादी प्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी संचालक मंडळाला धारेवर धरले आणि सत्ताधार्‍यांना साडीचोळीचा अहेर करत आक्रमक पवित्रा घेतला. प्रत्युत्तरादाखल ध्वनीक्षेपकावरून बोलण्याच्या संदर्भात दोन्ही गटांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत ध्वनीक्षेपकच तोडण्यात आला़. (असे हिंसक वृत्तीचे शिक्षक मुलांवर काय संस्कार करणार ? - संपादक)

सनातन संस्थेचा चौकशीच्या नावाखाली होणारा छळ थांबवावा !

हिंदुत्ववादी संघटनांची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी 
जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड (उजवीकडे) यांना निवेदन देताना हिंदुत्ववादी
     सांगली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सीबीआयने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी आणि सनातन संस्थेचा चौकशीच्या नावाखाली होणारा छळ थांबवावा, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ४ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पतंजली योग समितीचे श्री. शामराव वैद्य, माळी समाजाचे विश्‍वस्त श्री. श्रीकृष्ण माळी, श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री सचिन पवार, हरिदास कालिदास, अनुप हरिदास, प्रदीप तांदळे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या इफ्तार पार्टीमध्ये इंद्रेश कुमार यांच्याकडून समान नागरी कायद्याची पाठराखण !

      नवी देहली - संसदेच्या आवारात मुस्लिम राष्ट्रीय मंचने २ जुलैला इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या वेळी केंद्रीय मंत्री, विविध देशांचे राजदूत अन् उच्चायुक्त आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते. या वेळी मुस्लिम राष्ट्रीय मंचचे मार्गदर्शक आणि संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याविषयी विचार मांडले. तसेच त्यांनी पाकिस्तानवरही टीका केली.
     इंद्रेश कुमार म्हणाले की, आतापर्यंत जितक्या धर्मगुरूंशी मी तलाकविषयी चर्चा केली त्या सर्वांनी म्हटले की, अल्लाला तलाक पसंत नाही. याविषयावर निकोप चर्चा झाली पाहिजे. माझ्या सूचनावर अधिकाधिक धर्मगुरूंनी सहमती दर्शवली. 
      ते पुढे म्हणाले की, मुसलमानांना हे निश्‍चित करावे लागेल की, त्यांच्यासाठी वेगळा कायदा चांगला आहे कि नाही ? सर्वांसाठी (एकच) समान कायदा असला, तर त्यातून मुसलमानांचा विकास होऊ शकतो.

इस्लामला शांतीचा धर्म म्हणणे बंद करा ! - तस्लिमा नसरीन

     नवी देहली - ढाका येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर बांगलादेशविषयी प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी अनेक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, बांगलादेश वैश्‍विक आतंकवादाला समर्थन देणारा देश आहे. येथील लोक ३६ आतंकवादी संघटनांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे इस्लाम शांतीचा धर्म आहे, असे म्हणणे बंद करा. 
     तस्लिमा यांनी पुढे म्हटले आहे की, ढाका येथील आक्रमणातील आतंकवादी निब्रस इस्लाम हा तुर्की होप्स स्कूल आणि मोनाश विश्‍वविद्यालयाचा विद्यार्थी होता. यानंतर त्याचा इस्लामच्या नावाखाली ब्रेनवॉश केला गेला आणि तो आतंकवादी बनला. ढाका आक्रमणातील सर्व आतंकवादी श्रीमंत कुटुंबातील होते आणि चांगल्या शाळांमध्ये त्यांचे शिक्षण झाले होते. त्यामुळे गरीब आणि निरक्षर लोकांना आतंकवादी बनवले जाते, असे कृपया म्हणू नका. तुम्हाला जिहादी आतंकवादी बनवण्यासाठी गरिबी, अशिक्षितपणा अमेरिकेच्या विदेशी धोरणाची किंवा इस्रायलच्या कटाची आवश्यकता नाही, तर इस्लामची आवश्यकता आहे. (आतंकवाद्यांना धर्म नसतो किंवा मुसलमान गरीब आणि अशिक्षित असतात म्हणून ते आतंकवादाकडे वळतात, असे म्हणून मुसलमानांची पाठराखण करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? - संपादक )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवू नका ! - राम जेठमलानी, ज्येष्ठ विधीज्ञ

विदेशातील काळा पैसा परत आणू न शकल्याने टीका
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्‍वासन पूर्ण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरल्याचा आरोप ज्येष्ठ विधीज्ञ आणि राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार राम जेठमलानी यांनी केला आहे. 
     समाजवादी सिंधी सभेच्या एका कार्यक्रमात मोदींवर टीका करतांना जेठमलानी म्हणाले की, मोदींना साहाय्य करून मला स्वतःला दोषी असल्यासारखे वाटत आहे. भाजपने काळा पैसा परत आणण्याचे आश्‍वासन दिल्यामुळेच मोदींना पंतप्रधान होण्यासाठी साहाय्य केलेे. पंतप्रधान मोदी आता हे काम करू शकतील, असे वाटत नाही. त्यामुळे मोदींना साहाय्य केल्याचा आता मला पश्‍चाताप होत आहे. म्हणून मोदींवर विश्‍वास ठेवू नका, असे मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे.

रत्नागिरी-मडगाव पॅसेंजरमध्ये प्रवाशाची बॅग चोरणारा पोलिसांच्या कह्यात !

     कणकवली - कोकणरेल्वे मार्गावरून धावणार्‍या रत्नागिरी-मडगाव पॅसेंजरमधून प्रवास करणारे हरकुळ खुर्द, कणकवली येथील अवधूत प्रभाकर लोके यांची बॅग चोरण्याचा प्रयत्न ३ जुलैला पहाटे चोराने केला. लोके यांच्या सतर्कतेमुळे चोराचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. ३ जुलैला पहाटे ही पॅसेंजर वैभववाडी रेल्वे स्थानकानजिक आली असता ही घटना घडली. लोके यांची सोन्याची साखळी आणि रोख रक्कम असलेली बॅग चोरट्याने सर्व प्रवासी झोपेत असल्याचे पाहून पळवण्याचा प्रयत्न केला; मात्र लोके यांना जाग आल्याने त्यांनी धाडसाने त्याला पकडले. महेश महाली, असे चोराचे नाव असून तो मडगाव येथील असल्याचे समजते. महाली याला कणकवली रेल्वेस्थानकात गाडी आल्यावर पोलिसांच्या कह्यात देण्यात आले.

इचलकरंजीत फलक फाडण्यावरून हिंदुत्ववादी संतप्त

छत्रपतींच्या महाराष्ट्रात त्यांचा फलक फाडण्याचे धैर्य होते, हा हिंदूंच्या सहिष्णुतेचा परिपाक !
शहरात तणावाचे वातावरण !
     इचलकरंजी, ४ जुलै (वार्ता.) - येथील स्वामी मळ्यात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा डिजिटल फलक अज्ञाताने फाडल्यामुळे ३ जुलैला सकाळी ११ वाजता काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटित झाले होते. शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने धाव घेऊन कार्यकर्त्यांना शांत केले. (पोलिसांनी या संदर्भात काय कारवाई केली, ते समजले पाहिजे ! - संपादक) त्यामुळे तणाव निवळला; मात्र उशिरापर्यंत राज्य राखीव पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी परिसरातील डिजिटल फलक आणि येणार्‍या सणानिमित्त लावण्यात आलेले ध्वज पोलिसांनी उतरून ठेवण्याच्या सूचना केल्या. (हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करून धर्मद्रोह्यांकडून फलक फाडले जात आहेत. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने धर्माभिमान्यांनी संघटित होऊन न्याय मिळेपर्यंत लढा दिला पाहिजे. - संपादक)

भाविकांकडून शाडू मातीच्याच गणेशमूर्तींना अधिक मागणी !

श्री गणेशमूर्तींच्या किंमतीत २० ते २५ टक्के वाढ ! 
      कोल्हापूर, ४ जुलै (वार्ता.) - गणेशोत्सव यंदा ५ सप्टेंबरला चालू होत आहे; त्यामुळे घरगुती गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला वेग आला आहे. शहरातील शाहूपुरी, गंगावेश, पापाची तिकटी आणि बापट कॅम्प येथील कुंभारवाड्यांमध्ये मूर्ती सिद्ध करण्याकामी रात्रीचा दिवस होऊ लागला आहे. यात कच्च्या मालाचे दर वाढल्याने यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ होणार आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाण्यामध्ये तात्काळ विरघळणार्‍या शाडू मातीच्याच गणेशमूर्तींना यंदा भाविकांकडून अधिक मागणी आहे. त्यामुळे शाडू मातीच्याच मूर्ती मोठ्या प्रमाणात सिद्ध केल्या जात आहेत.
     यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, विविध आस्थापनांचे रंग, कारागिरांची मजुरी यांत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वच घटकांच्या किमती वाढल्याने परिणामी मूर्तींच्या किमतीतही वाढ होणार आहे. सर्वसाधारणपणे शहरात ६ इंच ते ५ फुटांपर्यंतच्या ६० ते ७५ सहस्र मूर्ती बनवल्या जातात.

छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ जुलैपर्यंत वाढ

     मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १४ मार्चला ११ घंट्यांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती.

शासकीय रुग्णालयांना साई संस्थानकडून ४३ कोटी रुपये देण्यास न्यायालयाची स्थगिती !

धर्मस्थळांच्या ठिकाणच्या निधीच्या रक्षणासाठी प्रयत्नरत ग्रामस्थांचे अभिनंदन !
साई संस्थांनाचा निधी देण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध !
      शिर्डी, ४ जुलै (वार्ता.) - राज्यातील शासकीय रुग्णालयांना सी.टी. स्कॅन आणि क्ष-किरण यंत्र घेण्यासाठी श्री साईबाबा संस्थानचे ४३ कोटी ६४ लक्ष रुपये देण्याच्या निर्णयास संभाजीनगर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, अशी माहिती ग्रामस्थांच्या वतीने याचिकाकर्ते श्री. विजय कोते यांनी दिली. शासनाने संस्थानकडे ४३ कोटी ६४ लक्ष रुपयांचा निधी मागितला होता. श्री साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने निर्णयाला मान्यता देऊन तो उच्च न्यायालयाच्या संमतीसाठी पाठवला होता; मात्र ग्रामस्थांनी या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती. (जे ग्रामस्थांच्या लक्षात येते, ते समितीतील सदस्यांना का समजत नाही ? - संपादक)

सनातन संस्थेच्या विरोधात रचलेल्या कारस्थानाची न्यायालयीन चौकशी व्हावी !

निवेदनाची प्रत दाखवतांना हिंदुत्ववादी
वसई (जिल्हा पालघर) येथील हिंदुत्ववाद्यांचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन
      वसई, ४ जुलै (वार्ता.) - सध्या देशभरात सर्वत्र हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववादी संघटना यांना अपकीर्त करण्याचे कारस्थान जोरदार चालू आहे. न्यायपालिका निर्णय देण्याआधीच अंनिस, संभाजी ब्रिगेड यांसारख्या स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्‍या संघटना, वृत्तपत्र आणि दूरचित्रवाहिन्या स्वतःच निर्णय घेऊन सनातन संस्था अन् संस्थेचे साधक यांना डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या खूनाविषयी दोषी ठरवून अपकीर्त करीत आहेत. सनातन संस्था ही अध्यात्मप्रसार करणारी संघटना असून तिचे साधक धर्मप्रसार करणारे प्रसारक आहेत. आम्ही स्वतः साधना कशी करावी, नाम कसे घ्यावे ? नमस्कार कसा करावा? हिंदु धर्मातील सण कसे साजरे करावेत ? हे सनातन संस्थेकडून शिकलो आहोत. अशा आध्यात्मिक संस्थेला अपकीर्त करण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. याविषयी न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली. याविषयी २ जुलै या दिवशी वसई येथील उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या वेळी बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, शिवसेना, बजरंग सेवा दल, योग वेदांत समिती, हिंदू गोवंश रक्षा समिती, युवा सेवा या संघटनांचे हिंदुत्ववादी उपस्थित होते.

हिंदू जागृती संस्थेचा शासनाच्या २ कोटी वृक्षारोपण उपक्रमात सहभाग

वृक्षारोपण करतांना कार्यकर्ते
    फलटण (जिल्हा सातारा) - येथे १ जुलै या दिवशी महाराष्ट्र शासन आणि वन खाते यांच्या वतीने २ कोटी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला, त्यात हिंदू जागृती संस्थेने सक्रीय सहभाग घेतला. संस्थेच्या १७ कार्यकर्त्यांनी उपळवे गावाच्या हद्दीत २५० झाडे लावली. फलटण शहराच्या २२ किमी दक्षिणेस असलेल्या सीतामाई डोंगराच्या पायथ्याशी दंडकारण्याच्या ठिकाणी वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. तसेच लव-कुश यांच्या जन्माच्या काळात तेथे सीतामाईंचे वास्तव्य होते. सध्या तेथे सीतामाईचे मंदिर आहे. अशा पवित्र ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

कृषी बाजार समित्यांच्या संपामुळे पुरवठ्यावर परिणाम

    मुंबई - ग्राहक आणि शेतकरी यांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाटा बाजार समितीच्या जोखडातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र हा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप करत ४ जून या दिवशी नवी मुंबईसह राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. यामुळे फळे आणि भाजीपाला यांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
    शेतकर्‍यांनी त्यांचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीत आणल्यानंतर त्याला त्या मालाच्या उत्पादनाइतकाही बाजारभाव मिळत नाही. शेतकर्‍यांना अनेक ठिकाणी पैसे मोजावे लागत असल्याने याला आळा घालण्यासाठी कांदा-बटाटा, भाजीपाला एपीएम्सी अ‍ॅक्टमधून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांचा माल थेट ग्राहकांना विकण्याची संधी मिळणार आहे.

मिरजकरांनीच माणुसकीचा खरा धर्म जपला ! - जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा

    मिरज, ४ जुलै (वार्ता.) - मिरजकरांनीच माणुसकीचा खरा धर्म जपला आहे, अशी प्रतिक्रिया जलतज्ञ श्री. राजेंद्रसिंह राणा यांनी ३ जुलै या दिवशी मिरज रेल्वे यार्डास भेट देतांना दिली. लातूर येथे पाठवण्यात येणार्‍या जलदूत एक्स्प्रेसची माहिती त्यांनी घेतली. पाण्यासाठी सर्वत्र कलह चालू असतांना मिरजेतील लोक दुष्काळग्रस्त लातूरला पाणी देत असल्याविषयी श्री. राणा यांनी प्रशंसा केली. खर्‍या अर्थाने मिरजकरांनी भारतीय संस्कृतीचे आणि माणुसकीच्या धर्माचे पालन केल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, ठेकेदार शशांक जाधव यांनी त्यांना माहिती दिली. सर्वत्र पाण्यासाठी ओरड चालू असल्याने नद्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, असे मत श्री. राणा यांनी व्यक्त केले.

मुंबईत मुसळधार पाऊस

    मुंबई - मुंबई परिसरात आठ दिवसांपासून पुष्कळ पाऊस झाल्याने शहर आणि उपनगर चिंब झाले आहे. शहरातील पवई तलाव भरून वाहत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतील सातही धरण क्षेत्रात सध्या चांगला पाऊस कोसळत आहे. गेल्या २४ घंट्यांत धरणांतील पाणीसाठ्यात दहा सहस्र दशलक्षांनी वाढ झाल्याने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

शुल्काच्या नावाखाली पैसे लुबाडणार्‍या कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलवर कारवाई करा !

धुळे येथील युवासेनेची मागणी
आर्थिक लुबाडणूक करणार्‍या इंग्रजी माध्यमांच्या
शाळांवर पालकांनी बहिष्कारच टाकायला हवा !
     धुळे - शुल्काच्या नावाखाली भरमसाठ पैसे घेऊन विद्यार्थी आणि पालक यांची आर्थिक लूट करणार्‍या कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलवर कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. या प्रकरणी अशा मागणीचे पत्र माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण अधिकार्‍यांना दिले आहे. (लुबाडणार्‍या इंग्रजी शाळांच्या विरोधात कृतीशील होणार्‍या युवासेनेचे अभिनंदन ! - संपादक)
     कनोसा शाळेने सक्ती केलेले जाचक शुल्क रहित करावे आणि आर्थिक लूट थांबवावी, तसेच शुल्काच्या नावाखाली कोणता अधिकारी ही लूट करत आहे, याचीही चौकशी करावी. लूट न थांबल्यास युवासेना तीव्र आंदोलन छेडेल, अशी चेतावणी युवासेनेच्या वतीने देण्यात आली.

(म्हणे) युवकांनो, आंतरजातीय विवाह करा !

माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे वक्तव्य
राजकारण्यांनी उद्या आंतरधर्मीय विवाह करा, असे म्हटल्यास आश्‍चर्य वाटायला नको !
     सोलापूर, ४ जुलै - महात्मा बसवेश्‍वरांनी समतेचा संदेश दिला. जातीभेद दूर करून समाजात क्रांती घडवून आणली. महात्मा बसवेश्‍वर हे आंतरजातीय विवाहाचे प्रणेते आहेत. १२ व्या शतकात त्यांनी वीरशैव कक्कय्याचा विवाह एका ब्राह्मण युवतीशी करून दिला होता. त्यातून त्यांनी आंतरजातीय विवाहांनाही प्रोत्साहन दिले. (संतांनी केलेल्या कृतींमागील कोणतीही कारणमीमांसा माहिती नसतांना शिंदे यांचे हे विधान अज्ञानदर्शकच आहे. - संपादक) त्यामुळे युवकांनो, आंतरजातीय विवाह करा, मुलींचा शोध घ्या; पण ती जीवनभर साथ देणारी असावी, असे समुपदेशन माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले. सोलापूर विद्यापिठाचे प्रथम कुलगुरु डॉ. इरेश स्वामी यांच्या बसवबोध या पुस्तकाचे प्रकाशन १ जुलै या दिवशी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

गणेशचतुर्थीनिमित्त कोकण रेल्वेच्या दोन अतिरिक्त गाड्या

कोकणातील बहुतांश स्थानकांवर थांबणार
    रत्नागिरी - गणेशचतुर्थी कालावधीत कोकणात मोठ्या संख्येने दाखल होणार्‍या गणेशभक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने ३१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत वांद्रे टर्मिनस ते करमळी आणि ३ ते ११ सप्टेंबर या कालावधीत अहमदाबाद ते करमळी अशा दोन अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गाड्यांना कोकण मार्गावरील बहुतांश रेल्वेस्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
    वांद्रे-करमळी (०९००७) ही वातानुकूलीत गाडी ३१ ऑगस्ट तसेच ५, ७, १२, १४ सप्टेंबरला वांद्रे टर्मिनस येथून सकाळी १०.१० वा. सुटेल, तर (०९००८) करमळी स्थानकावरून १, ६, ८, १३, १५ सप्टेंबरला पहाटे ५.४० वा. सुटेल. गाडीला १८ डबे असून बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्‍वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे आदी रेल्वेस्थानकावर थांबा आहे.

हरियाणा पोलिसांकडून गोरक्षणासाठी हेल्पलाईन !

गोरक्षणासाठी हरियाणा शासनाने केलेली कृती देशातील इतर राज्यांनीही अंगीकारावी !
     चंदीगड (हरियाणा) - गोहत्याबंदी कायदा करण्यात आल्यानंतर आता हरियाणा पोलिसांकडून गोवंशांच्या रक्षणासाठी हेल्पलाईन चालू करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाय, वासरू आणि बैल यांची तस्करी किंवा पशूवधगृहाशी संबंधित कोणत्याही घटनेशी संबंधित तक्रार ८२८४०३०४५५ या क्रमांकावर देण्याची सोय करण्यात आली आहे. गोतस्करींच्या तक्रारी समोर आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. 
     हरियाणाचे पोलीस महासंचालक के. पी. सिंह यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी विशेष पथक पाठवून आवश्यक कारवाई करतील, तसेच राज्यात गोतस्करी थांबवण्यासाठी तपासणी नाकेही लावण्यात येईल.

असदुद्दीन ओवैसी यांनी इसिसच्या आतंकवाद्यांना कायद्याचे साहाय्य देणे, हे आतंकवादाचे समर्थन ! - साध्वी प्राची, विश्‍व हिंदु परिषद

     लक्ष्मणपुरी (लखनौ) - एम्आयएम्चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी इसिसच्या आतंकवाद्यांना कायद्याचे साहाय्य देण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे त्यांनी संसदेत काही आतंकवादी खासदार असल्याचे सिद्ध केले आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी प्राची यांनी व्यक्त केले. 
       साध्वी यांनी पुढे म्हटले आहे की, याकूब मेमन याच्या संदर्भात संसदेत काही आतंकवादी लोकप्रतिनीधी असल्याचे म्हटल्यावर मला न्यायालयाकडून नोटीस आली होती. आज ओवैसी इसिसच्या आतंकवाद्यांना साहाय्य करण्याची भाषा करत असतांना निधर्मीवाले कुठे गेले ? ते काही बोलत नाहीत यावरून ते आतंकवादाचे समर्थन करतात, हे सिद्ध होते.

गोव्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गुन्हा नोंद झालेले अधिकारी एल्विस गोम्स यांचा स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज !

      पणजी, ४ जुलै (वार्ता.) - भ्रष्टाचार विरोधीपथकाने एका प्रकरणी गुन्हा नोंद केलेले कारागृह महानिरीक्षक एल्विस गोम्स यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज सादर केला आहे. स्वेच्छा निवृत्तीसाठीचे कारण एल्विस गोम्स यांनी अर्जात स्पष्ट केले नसले, तरी पोलीस अधिकार्‍यांकडून छळवणूक होत असल्याने त्यागपत्र देत असल्याचे गोम्स यांनी म्हटले आहे. 
     एल्विस गोम्स हे गृहनिर्माण मंडळात संचालकपदी कार्यरत असतांना झालेल्या एका भूमीघोटाळ्याच्या आरोपावरून गोम्स आणि मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष तथा माजी पर्यटन मंत्री निळकंठ हळर्णकर यांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
      वर्ष २०११-२०१२ मध्ये गृहनिर्माण मंडळासाठी अधिग्रहित करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली ३० सहस्र चौरस मीटर भूमी शेवटच्या क्षणी अधिग्रण रहित करून एका व्यक्तीला देण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

चेंबूर येथील सुधारगृहातून १६ महिलांचे पलायन !

सुधारगृहाच्या दायित्वशून्य अधिकार्‍यांवरच कारवाई व्हायला हवी ! 
     मुंबई - न्यायालयाच्या आदेशानुसार चेंबूर येथील सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या १६ महिला सुधारगृहातून पळून गेल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून पोलिसांचा तपास चालू आहे. एका महिलेला पकडण्यात आले आहे. रात्री ८ वाजता जेवण झाल्यावर महिला भांडी धुण्याच्या निमित्ताने स्नानगृहाच्या दिशेने गेल्या. बर्‍याच वेळ बाहेर न आल्याने त्या पळून गेल्याचे लक्षात आले.

एकनाथ खडसे यांच्याकडे अंतर्गत माहिती असू शकते ! - गिरीश महाजन

    जळगाव, ४ जुलै (वार्ता.) - भाजपमध्ये काही लोक गद्दार असून कार्यकर्त्यांनी विरोधकांऐवजी या गद्दारांचे थोबाड रंगवावे, असे विधान २ दिवसांपूर्वी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले होते; मात्र पक्षात कोणीही गद्दार नाहीत, एकनाथ खडसे यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल, तर त्याविषयी आपल्याला माहिती नाही. खडसे यांच्याकडे अंतर्गत माहिती असू शकते. त्यांच्यावर होत असलेले आरोप आणि त्यागपत्र यांच्या संदर्भात खुद्द त्यांनीच स्पष्टीकरण दिले आहे, मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली आहे. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता खडसे यांच्यावर बोलण्याइतका मोठा नाही. ते आरोपातून तावून-सलाखून बाहेर येतील, अशी आशा जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन यांनी ३ जुलै या दिवशी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. खडसे यांचे त्यागपत्र, भाजपमधील वाढती गटबाजी या पार्श्‍वभूमीवर अनेक दिवसांपासून मौन बाळगून असलेले महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकार्‍यांना धमकावल्याप्रकरणी ८ दलालांना कार्यालय प्रवेशबंदी

     संभाजीनगर, ४ जुलै - येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना चुकीचे कामकाज करण्यासाठी सक्ती करत धमकावल्याप्रकरणी ८ दलालांना कार्यालयाच्या आवारात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यांची नावे फिरोज खान, मुस्ताक खान सरवर खान, अथर खान सरदार खान, गुलाम फैय्याज गुलाम मोहंमद, अल्ताफ खान, मोहंमद मुस्ताहसन उपाख्य असिफ भाई, शेख खलिल आणि नीलेश नरवडे अशी आहेत. (या गुन्ह्यांंतही धर्मांध आघाडीवर ! - संपादक) त्यांना परिवहन कार्यालय परिसरात कार्यालयीन वेळेत पुढील २ मास येण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी दिली. (अशा शिक्षेमुळे ते अन्य ठिकाणी जाऊन तशी दलाली करतील. यासाठी त्यांना कठोर शासनच करायला हवे ! - संपादक)

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोरील घरासह ३ दुकानांत चोरी !

     कोल्हापूर, ४ जुलै (वार्ता.) - लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोरील एका घरासह दुकानांना लक्ष्य करून चोरट्यांनी २ जुलै या दिवशी पहाटे अनुमाने ७० सहस्र रुपये किमतीचा ऐवज पळवला. याच परिसरातील एक दुकानही फोडण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे २ संशयितांना चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. प.पू. शिवरामपंत वाडकर महाराजांचे वास्तव्य असलेल्या फ्लॅटमधील खोलीचा दरवाजा तोडून सुमारे १५ सहस्र रुपयांचे साहित्य चोरले आहे. (अकार्यक्षम पोलीस यंत्रणा ! - संपादक)

बार्देश (गोवा) तालुक्यात एच्आयव्हीग्रस्तांचे प्रमाण वाढले !

    म्हापसा, ४ जुलै (वार्ता.) - गेल्या काही वर्षांत बार्देश तालुक्यात एच्आयव्हीग्रस्तांचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील एकूण एच्आयव्हीग्रस्तांपैकी १८.४ टक्के हे बार्देश तालुक्यात आहेत. ही माहिती गोवा एड्स नियंत्रण संस्थेच्या आकडेवारीतून उघड झाली आहे. या संदर्भात नवहिंद टाईम्स या दैनिकात ३ जुलै या दिवशी वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच ! - आमदार वैभव नाईक

    कणकवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केलेल्या भोगले यांच्यासह जयसिंग नाईक, नारायण कुबल यांचे कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी ४ जुलैला स्वागत केले. या वेळी बोलतांना आमदार वैभव नाईक म्हणाले, भाजपाने साथ सोडली, तरी शिवसेनेवर फरक पडत नाही. अनेकांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात सेनेला अधिक बळकटी आली आहे. २०१९ या वर्षी विधानसभेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता असेल.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंमध्ये असा निर्भिडपणा कधी निर्माण होणार ?
    भाग्यनगर (हैद्राबाद) येथील भाजपचे आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. राजासिंह ठाकूर यांनी इसिसच्या आतंकवाद्यांना आव्हान देत म्हटले आहे, माझ्यावर आक्रमण करून दाखवा ! इसिसने त्यांना ठार करण्याचा कट रचला होता.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Hyderabadke BJP vidhayak Raja Singh Thakurne ISISke
atankiyoko chunauti di mujhpar akraman karke dikhao.
Anya Hindu netaome aisa sahas kyon nahi ?
जागो !
हैद्राबाद के भाजपा विधायक राजासिंह ठाकुर ने इसिस के
आतंकियों को चुनौती दी मुझपर आक्रमण करके दिखाओ.
अन्य हिन्दू नेताआें में ऐसा साहस क्यों नहीं ?

वेतनवाढ केली नाही, तर सर्व ठप्प होईल ! - न्या. अशोक माथूर, अध्यक्ष, ७ वा वेतन आयोग

     नवी देहली - सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मान्यता मिळाल्यानंतर देशभरातील केंद्रीय शासकीय कर्मचार्‍यांच्या वेतनात मोठी वाढ होणार असल्याची चर्चा आहे. याविषयी आयोगाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. अशोक माथूर यांची एका दैनिकात मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. शासकीय कर्मचारी काम करत नाही, तर त्यांना वेतनवाढ का देता ?, या प्रश्‍नावर न्या. माथूर म्हणाले, मला वाटून उपयोग नाही. आयआयएम्, अहमदाबादच्या सर्वेक्षणातूनही समोर आले आहे की, शासकीय कर्मचारी दुप्पट वेतन घेतात; पण फलनिष्पत्ती अर्धीही मिळत नाही. तरीही त्यांचे वेतन वाढवावे लागते; कारण कर्मचारी संपावर गेले, तर सर्व ठप्प होईल.

स्विस बँकेत काळा पैसा ठेवण्यामध्ये भारत ७५ व्या क्रमांकावर !

     नवी देहली - स्विस बँकेमध्ये काळा पैसा ठेवण्यामध्ये भारत आता ७५ व्या क्रमांकावर गेला आहे. इतर देशांच्या तुलनेत या बँकेमध्ये पैसा ठेवण्यात पूर्वी भारतीय नागरिक पुढे होते. वर्ष २००४ मध्ये काळा पैसा ठेवण्यामध्ये जगात भारताचा ३७ वा क्रमांक होता. वर्ष २००७ मध्ये जगातील ५० देशांच्या सूचीमध्ये भारताचेही नाव होते, अशी माहिती स्विस नॅशनल बँकेने आपल्या ताज्या वार्षिक अहवालात दिली आहे. स्विस बँकेत काळे धन ठेवण्यात इंग्लंड प्रथम, तर अमेरिका दुसर्‍या स्थानी आहे.

सोन्याची आयात निम्म्याने घटली !

     नवी देहली - सोन्याच्या वाढत्या किमतीचा परिणाम मागणीवर झाला असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन मासांत आयातीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. एप्रिल आणि मे या दोन मासांत सोन्याची आयात निम्म्याने घटली आहे. वाणिज्य खात्याने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार या दोन मासांत १८ सहस्र १५२ कोटी रुपयांचे (२.७ अब्ज डॉलरचे) सोने आयात करण्यात आले. वर्ष २०१५ च्या या दोन मासात तब्बल ३७ सहस्र ३१८ कोटी रुपयांचे (५.५५ अब्ज डॉलर्सचे) सोने आयात करण्यात आले होते.

जम्मू येथे राष्ट्रीय सेविका समितीकडून युवतींना स्वसंरक्षण प्रशिक्षण

     जम्मू - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित राष्ट्रीय सेविका समिती या महिला संघटनेकडून येथील दिवाण बद्रीनाथ शाळा मुबारकमंडी येथे युवतींना स्वसंरक्षण, योगासने आदींचे प्रशिक्षण, तसेच आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. १९ जून ते ३ जुलै पर्यंत चाललेल्या या शिबिरामध्ये उत्तर भारतातील विविध राज्यांतील ७७ युवती सहभागी झाल्या होत्या. (सध्या महिलांवर अत्याचार होत असतांना त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणार्‍या राष्ट्रीय सेविका समितीचे अभिनंदन ! - संपादक)

गोवा राज्यातील हातकातरो खांबाकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

पोर्तुगिजांच्या गुलामगिरीचे स्मरण करून देणार्‍या चर्चच्या जतनासाठी शासन कोट्यवधी 
रुपये व्यय करते; मात्र त्यांनी हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांचे प्रतीक 
असलेल्या हातकातरो खांबाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, असेच दिसते !
प्राचीन स्मारक म्हणून घोषित न झाल्याचा परिणाम
हातकातरो खांब
     पणजी - जुने गोवा येथील ऐतिहासिक हातकातरो खांब अजूनही प्राचीन स्मारक म्हणून घोषित न झाल्याने त्याकडे पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केले आहे. हातकातरो खांबाची ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करण्यासाठी त्याला प्राचीन स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांनी शासनाकडे अनेक वेळी केली होती; मात्र शासनाने या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.
      प्राप्त माहितीनुसार जुने गोवा येथील हातकातरो खांब प्राचीन स्मारक म्हणून घोषित न झाल्याने त्यावर भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण किंवा पुराभिलेख आणि पुरातन वास्तू संचालनालय किंवा गोवा शासन अधिकृत हक्क सांगू शकत नाही. गोवा राज्यात शेकडो ऐतिहासिक वास्तू असल्या तरी यामधील अत्यल्प वास्तूंचा भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण आणि पुराभिलेख आणि पुरातन वास्तू संचालनालय यांच्या प्राचीन स्मारकांच्या सूचीत समावेश झालेला आहे.

प्रश्‍नावली : संत वाङ्मयातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार !

श्रीमत् परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती 
टेंबेस्वामीमहाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...
        संत त्यांच्या लिखाणातून साधना, अध्यात्म आदी विषयांच्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात. संतांनी लिहिलेले विविध प्रकारचे गद्य आणि पद्य वाङ्मय सर्वपरिचित आहे. येथे प्रश्‍नावलीच्या माध्यमातून संतांनी साधना सांगण्याचे एक अनोखे उदाहरण दिले आहे.
श्री वासुदेवानंदसरस्वती यांनी रचलेली प्रश्‍नावली आणि ती पहाण्याची पद्धत
   महाराष्ट्रातील एक थोर संत श्रीमत् परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज यांची प्रश्‍नावली या नावाने प्रसिद्ध असलेली एक प्रश्‍नावली आहे. यात एकूण २४ ओळी आहेत. त्या प्रत्येक ओळीत २४ चौकोन, असे एकूण ५७६ चौकोन आहेत. प्रत्येक चौकोनात मराठी वर्णमालेतील एक अक्षर आहे.

४० सहस्र भारतीय स्त्री-पुरुषांच्या सहभागाने स्थापन झालेली आझाद हिंद सेना!

आझाद हिंद सेनेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने...
        आज आझाद हिंद सेनेचा स्थापनादिन आहे. ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ४० सहस्र भारतीय स्त्री-पुरुषांच्या सहभागाने आझाद हिंद सेना स्थापन केली आणि तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा असे आवाहन केले. 

हिंदु जनजागृती समितीचा देहली, फरिदाबाद आणि आग्रा या शहरांतील मे २०१६ मधील धर्मप्रसार कार्याचा आढावा

१. राष्ट्र आणि धर्म द्रोहींवर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, 
यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन !
१ अ. दिनांक १५.५.२०१६ - देहलीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन : देहलीतील जंतरमंतर मैदानावर १५.५.२०१६ या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुढील मागण्या करण्यात आल्या. 
१. देहली विश्‍वविद्यालयाच्या पाठ्यपुस्तकांत देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या भगतसिंह, चंद्रशेखर आजाद, सूर्यसेन आदी क्रांतिकारकांचा आतंकवादी असा उल्लेख केल्यामुळे त्यांच्या विरोधात आरोपपत्र (याचिका) प्रविष्ट करण्यात यावे.

दुर्ग : पर्यटनस्थळ नको, प्रेरणास्थान व्हावे !

     सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव ! याच गडकोटांच्या साक्षीने छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण केले. किल्ल्यांच्या भिंतीआड शत्रूला नेस्तनाबूत करण्याची खलबते आखून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे निष्ठावंत मावळे यांनी मोगल आक्रमकांची दाणादाण उडवली. धर्म आणि राष्ट्र यांच्याशी झुंजणार्‍यांच्या पदस्पर्शाने हे गडकिल्ले पावन झाले. मुघलांकडे असणारे हे किल्ले स्वराज्यामध्ये आणण्यासाठी अनेक मावळ्यांनी त्यांच्या प्राणांचे बलीदान दिले. या किल्ल्यांवर फडकणारा भगवा पाहून मावळ्यांना पुढील लढायांसाठी स्फुरण चढत असे.

समर्थ रामदासस्वामी आणि मारुति यांच्या कथेतून प्रतीत होणारा सद्गुरु महिमा

बोधकथा
बालकांसाठी परिपाठ !
पू. (सौ.) लक्ष्मी
(माई) नाईक
१. श्रीरामाने कृष्णातिरी जाण्याची केलेली आज्ञा म्हणजेच 
पुरश्‍चरण असल्याचे मारुतीने समर्थांना सांगणे
    नाशिकमधील पंचवटीच्या जवळ टाकळी येथील मठाच्या ठिकाणी समर्थ रामदासस्वामी पुरश्‍चरणाला (तपश्‍चर्येला) बसले असतांना एकदा त्यांचा मारुतीशी वाद झाला. समर्थांचे पुरश्‍चरण संपत आले, तेव्हा प्रभु श्रीरामाने त्यांना आज्ञा केली, कृष्णातिरी जा. हे सांगताच समर्थ म्हणाले, पुरश्‍चरण पूर्ण करून जाण्याची आज्ञा द्या. तेव्हा मारुति म्हणाला, श्रीरामाची आज्ञा म्हणजेच पुरश्‍चरण आहे. मग तुमचे पुरश्‍चरण पूर्ण करण्याची तुम्हाला काय आवश्यकता आहे ? त्या वेळी समर्थ म्हणाले, लोकसंग्रहाच्या दृष्टीने पुनश्‍चरण पूर्ण करण्याची आज्ञा द्यावी. रामनवमीचा उत्सव पूर्ण करून मी कृष्णातिरी जाईन.

धर्मनिरपेक्षता कि हिंदुद्रोह : एक दृष्टीक्षेप

श्री. विक्रम डोंगरे
     उत्तरप्रदेशची निवडणूक समीप आली आहे. अनेक राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार असून निवडणुकीचे निकाल उमेदवारांची राजकीय कारकीर्दच नव्हे, तर त्यांच्या ध्येय-धोरणांवर दूरगामी परिणाम करतील. याचे कारणही सुस्पष्ट आहे. भारतभरात सर्वाधिक विधानसभा क्षेत्रे उत्तरप्रदेशात आहेत. लोकसभेत तेथून निवडून जाणार्‍या खासदारांची संख्याही अन्य कोणत्याही राज्यापेक्षा अधिक आहे. असो.
हिंदुत्ववादी नको, सेक्युलर हे विशेषण हवे ?
      या पार्श्‍वभूमीवर केंद्रात सत्ताधारी असलेले पक्ष किंवा विरोधी पक्ष त्यांची रणनीती सिद्ध करण्यास सरसावले आहेत. स्वत:पुढे लावण्यात येणारे हिंदुत्वनिष्ठ हे विशेषण आता काही राजकीय पक्षांना नकोसे झाले आहे. अर्थात हा शब्द कथित धर्मनिरपेक्ष आणि प्रसारमाध्यमे एखाद्याला हिणवण्यासाठी वापरतात. ही देशाची शोकांतिका नव्हे का ?

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

      जसे मुसलमान आणि ख्रिस्ती महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार वगैरे ठिकाणी अल्पसंख्य आहेत तसे जम्मू-काश्मीर, मिझोराम, नागालॅण्ड, अरुणाचल प्रदेश, मेघालय येथे हिंदु अल्पसंख्य नाहीत का? तिथे हिंदूंना अल्पसंख्य अधिकार का नाकारण्यात आले आहेत ? - पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस

कार्यक्रमापेक्षा संतांच्या आज्ञापालनास महत्त्व देणारा, सेवेच्या तळमळीमुळे शिक्षणापेक्षा सेवेला प्राधान्य देणारा, इतरांच्या साहाय्यास सदैव तत्पर असणारा, आनंदी आणि हसतमुख श्री. अतुल तबाजी बधाले (वय १९ वर्षे) !

श्री. अतुल बधाले
१. सतत हसतमुख असणे
      अतुल नेहमी हसतमुख आणि आनंदी असतो. कोणताही प्रसंग आला, तरी तो कधीच निराश झालेला दिसत नाही.
२. ताण न घेणे
      शाळा-महाविद्यालयात शिकत असतांना अतुलने परीक्षेचा कधीच ताण घेतला नाही. परीक्षेच्या वेळी अधिक अभ्यास न करतासुद्धा त्याला नेहमी चांगले गुण मिळाले.
३. प्रांजळपणा
      अतुल कोणतीच गोष्ट मनात ठेवत नाही. सर्वकाही प्रांजळपणे सांगतो. त्याला पैसे दिल्यावर किती व्यय केले, काय घेतले, हे सर्व तो सांगतो. त्याला काही हवे असेल, तर तितक्याच सहजतेने तो मागतो. त्याच्या या प्रांजळपणामुळे त्याचा सहवास हवाहवासा वाटतो.

साधकांनो, मनोनिग्रह करून साधनेत अडथळा ठरणार्‍या आवडी-नावडी न्यून करण्याचा प्रयत्न करा !

गुरुपौर्णिमा मास २०१६
    १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.
------------------------
गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सनातन संस्थेची वैशिष्ट्ये
१. सनातन संस्थेत अनेक संत असूनही सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते.
२. विविध संत आणि संप्रदाय यांत एक प्रमुख असतात; म्हणून त्यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते आणि त्यांच्या विषयीची माहिती स्मरणिकेत किंवा पत्रकात असते. सनातनमध्ये अनेक साधक संत झाले असल्यामुळे त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सनातन प्रभात नियतकालिकांत प्रकाशित करण्यात येतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
------------------------
  
पू. के. उमेश शेणै
  परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना साधनेतील प्रत्येक अंग सविस्तर सांगून ते कृतीत आणण्यासाठी साधकांचा अव्याहतपणे पाठपुरावा करत आहेत. साधनेच्या दृष्टीकोनात त्यांनी सांगायचा राहिला आहे, असा एकही विषय नाही; परंतु त्याचा साधनेसाठी गुरुदेवांच्या अपेक्षेप्रमाणे उपयोग करण्यास कृतीच्या स्तरावर साधक न्यून पडले.
१. पंचज्ञानेंद्रिये, त्याच्याशी संबंधित आवडी-नावडीच्या
संवेदना आणि त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करावयाचे प्रयत्न
    पंचज्ञानेंद्रियांत डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांचा समावेश आहे. यांचा नकळत आपल्या साधनेवर प्रचंड प्रभाव असतो. मन नावाच्या रंगमंचावर नाटक करणारी हीच पात्रे आहेत. आपल्या संस्कार निर्मितीत ही प्रमुख भूमिका बजावतात. साधनेच्या दृष्टीने यांना कह्यात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. द्रष्टा दृश्यवशात्
बद्धः । म्हणजे जीव दृश्यामुळे त्याच्यात बद्ध होतो. दृश्याने पंचेंद्रिये त्यांचे काम चालू करतात. वरचेवर होणार्‍या संस्कारांमुळे इच्छा निर्माण होऊन आपण त्याविषयी रुची दाखवतो. आधीपासून झालेले संस्कार आणि आपण नव्याने करवून घेत असलेले संस्कार यांमुळे या शृंखलेतून बाहेर पडणे कठीण होते. हे जाळे आपणच पसरवतो आणि आपणच त्यात अडकून पडतो.

खानापूर (असूगा) येथील कु. शोभा मिसाळ (वय १९ वर्षे) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

कु. शोभा मिसाळ
      कु. शोभा मिसाळ ही साधिका एक मासासाठी कोल्हापूर सेवाकेंद्रात सेवेसाठी आली होती. तिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
१. आपल्याला गुरूंच्या आश्रमात जायची संधी मिळते, हाच
सकारात्मक विचार करून रामनाथीऐवजी कोल्हापूर सेवाकेंद्रात सेवेला येणे
      ती एक मासासाठी रामनाथी आश्रमात जाणार होती; पण कोल्हापूर सेवाकेंद्रात साधकांची आवश्यकता असल्याने तिला कोल्हापूर सेवाकेंद्रात बोलावण्यात आले. ज्या दिवशी ती येत होती, तेव्हा ती आणि तिचे बाबा रामनाथीला जाण्यासाठी गाडीत बसले होते. त्याच वेळी त्यांना दूरभाष आला की, तुम्ही कोल्हापूर सेवाकेंद्रात जा. लगेच गोव्याच्या गाडीतून उतरून ते कोल्हापूरच्या गाडीत बसले. त्या वेळी तिचे बाबा आणि तिची सकारात्मकता अशी होती की, कुठे का जायचे असेना, आपल्याला गुरूंच्या आश्रमात जायची संधी मिळते, हेच पुष्कळ आहे. आम्हाला रामनाथीला जायचे होते; पण निर्णय पालटला असे त्यांच्या मनात नव्हते.

ईश्‍वर साधकाला रिकाम्या वेळेत ज्ञान देऊन आणि प.पू. डॉक्टर साधकाला रिकाम्या वेळेत ज्ञान मिळवायला सांगून त्याच्या वेळेचा सदुपयोग करत असणे

     ईश्‍वर मला विविध विषयांवर ज्ञान देतो. यांपैकी बहुतेक ज्ञान ज्या वेळी मी काही वैयक्तिक गोष्टी करत असतो, त्या वेळी मिळत असते, उदा. अंघोळ करणे, कपडे धुणे, झोपेतून उठल्यावर इत्यादी. ज्या वेळी मला ध्वनीचित्रीकरण विभागाची सेवा असते, त्या वेळी मला कधीही ज्ञान मिळत नाही. यावरून देव रिकाम्या वेळेत ज्ञान देऊन त्याही वेळेत साधना करवून घेत आहे, असे जाणवले. या वेळी मला पुढील प्रसंग आठवला.

गुरुदेवा, किती लिहू अन् कशी लिहू तुमची ही लीला !

सौ. अर्चना मराठे
प.पू. डॉक्टर,
तुमचे शब्द म्हणजे दिव्यवाणी ।
साधकांसाठी असे ती वेदवाणी ॥ १ ॥
प.पू. डॉक्टर,
तुमचे शब्द म्हणजे ज्ञानगंगा ।
करी साधकांना अंतर्बाह्य पवित्र,
नको अन्य तीर्थगंगा ॥ २ ॥
प.पू. डॉक्टर,
तुमची भाषा म्हणजे निर्गुणाची शक्ती ।
साधकांना मिळेल यातून गुरुकृपेची भक्ती ॥ ३ ॥

प.पू. डॉक्टर, तुमचे शब्द म्हणजे निर्गुण-निराकार ।
साधकांना अनुभवेल यातून साक्षात्कार ॥ ४ ॥
 

भगवंताच्या स्थूलदेहाला ७५ वे वर्ष लागेल हा क्षण म्हणजे सगुण भक्तीसाठी दिलेली पूजारूपी संधी !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. श्रीकृष्णाप्रमाणे अनंत गुण असलेलेे अवतार प.पू. डॉक्टर
गुणांचे वर्णन करतांना शब्दांना मर्यादा येणे

सौ. आनंदी पांगुळ
असितगिरिसमं स्यात्कज्जलं सिन्धुपात्रे
सुरतरुवरशाखा लेखिनी पत्रमुर्वी ।
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं
तदपि तव गुणानामीश (प.पू.डॉक्टर) पारं न याति ॥
अर्थ : समुद्राच्या पात्रात काळ्या पर्वताएवढे काजळ घालून त्याची शाई केली, कल्पवृक्षाच्या शाखेची लेखणी केली, संपूर्ण पृथ्वीचा वापर कागद म्हणून केला, तसेच प्रत्यक्ष सरस्वती सर्वकाळ लिहित राहिली, तरी हे ईश्‍वरा (प.पू. डॉक्टर), तुमचे गुणवर्णन संपणार नाही.
काव्य पंक्तींनी असो किंवा लेखाने असो, शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करतांना प.पू. डॉक्टरांचे गुण आणि आम्हा साधकांवर त्यांनी केलेले अनंत उपकार यांना वरील श्‍लोकात दिल्याप्रमाणे अंतच नाही; कारण शब्दांना मर्यादा आहेत.
२. सगुणातील पूजेसाठी सर्व इंद्रियांसहित आपण सर्व अत्यंत शरणागतीने सिद्ध होऊया !
    भगवंताच्या स्थूलदेहाला ७५ वे वर्ष लागेल. हा क्षण म्हणजे सगुण भक्तीसाठी दिलेली पूजारूपी संधी, असे म्हणता येईल. या सगुणातील पूजेसाठी सर्व इंद्रियांसहित शुद्ध आणि पवित्र अंतःकरणाने आपण सर्व अत्यंत शरणागतीने सिद्ध होऊया. त्यानेच आपल्याला दिलेल्या विविध माध्यमांतून त्याची पूजा करूया (कृतज्ञता व्यक्त करूया).

घरी आणि आश्रमात जमीन पुसतांना भूमातेला स्नान घालत आहे, असा भाव हवा ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


सौ. क्षिप्रा जुवेकर यांना श्रीकृष्णाने दिलेले ज्ञान !

एस्.एस्.आर.एफ्.च्या संकेतस्थळावरील ड्रगानाआजींचा लेख वाचून मला श्रीकृष्णाने पुढील सूत्रे सांगितली.
१. मुले श्रीगुरूंचीच असून या जन्मी पालकांना केवळ त्यांच्या पालनपोषणाची सेवा दिलेली असणे
     पालकांनी पाल्यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी संमती दिल्यावर कालांतराने ती मुले ६० टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करतात अथवा संत बनतात. श्रीगुरु अशा पालकांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्याकडून साधना करवून घेतात. वास्तविक पाहता मुले(भक्त) श्रीगुरुंचीच असतात; परंतु या जन्मी त्यांच्या पालकांना त्या मुलांच्या पालनपोषणाची सेवा दिलेली असते.

चंडीकवच म्हणत असतांना सौ. क्षिप्रा जुवेकर यांना आलेल्या अनुभूती !

सौ. क्षिप्रा जुवेकर
१. चंडीकवच म्हणण्यापूर्वी प्रार्थना करत असतांना
सिंहावर आरूढ असणार्‍या श्री दुर्गादेवीच्या सुंदर रूपाचे दर्शन होणे
      अनुमाने पाच दिवसांपूर्वी मी देहली सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात चंडीकवचाचे पठण करत होते. मी हे कवच म्हणण्यापूर्वी प्रार्थना करतांना डोळे मिटून नमस्कार केल्यावर मला सिंहावर आरूढ झालेल्या श्री दुर्गादेवीचे दर्शन झाले. देवीचे ते रूप इतके सुंदर आणि तेजस्वी होते की, ते डोळ्यांत सामावले जात नव्हते. तिचे ते दर्शन अत्यंत शीतल आणि आनंददायक होते. दुर्गामाता अत्यंत प्रेमाने माझ्याकडे पहात होती. मी एक लहानशी बालिका होते आणि देवीचे रूप विशाल होते. सिंहाने माझा तोंडवळा चाटून माझ्या तोंडवळ्याभोवती असणारे काळ्या शक्तीचे आवरण नष्ट केले आणि मला भरभरून प्रेम दिले.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल अमावास्या झाली.

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     गीता केवळ शिकू नका, तर तिच्यातील शिकवण कृतीत आणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

      शिष्यांच्या भावानुसार गुरूंचे शिष्यांवर कमी-जास्त प्रेम असणे साहजिक आहे, जसे आई-वडिलांचे आपल्या मुलांवर कमी-जास्त प्रेम असते; पण चांगले आई-वडील जसे ते दर्शवीत नाहीत, तसे गुरुही दर्शवीत नाहीत.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
वेळ न मिळणे
     जे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता व जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका.
भावार्थ : जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता म्हणजे पैसा गोळा करता आणि जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. याउलट कसे करायचे ते शिका म्हणजे वेळेचा जास्तीतजास्त वापर साधना करण्यासाठी करा.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनुष्याची बलवान शस्त्रे ! 
जीवनसंग्राम यशस्वी करण्याकरता अनेक शस्त्रांची आवश्यकता असते; पण सर्वांत 
बलवान शस्त्रे म्हणजे धैर्य आणि योग्य वेळ हीच होत !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

समान नागरी कायदा आणि विरोध

संपादकीय 
     आपल्या देशात काही प्रश्‍न वर्षांनुवर्षे कुजत ठेवले गेले आहेत. त्यावर तात्काळ तोडगा काढून समस्या सोडवणे, ही खरे तर मुळीच अशक्य गोष्ट नाही. तरीही त्या सूत्राचे भांडवल करून पुन:पुन्हा निवडणुका लढवता आणि जिंकता याव्यात, याकरता अनेक समस्यांचे घोंगडे जाणीवपूर्वक भिजत ठेवले गेले आहे. त्यातीलच एक प्रश्‍न म्हणजे समान नागरी कायदा ! आता उत्तरप्रदेशची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून समान नागरी कायद्याचा विषय जाणीवपूर्वक चर्चेत आणला गेला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn