Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भेटी लागी जीवा लागलीसे आस,
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥

कोटी कोटी प्रणाम !

स्वामी विवेकानंद पुण्यस्मरण (दिनांकानुसार)
पू. उमेश शेणै यांचा आज वाढदिवस

शरीयत कायद्यात कोणतीही लुडबुड सहन करणार नाही ! - ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

समान नागरी कायद्याला मुसलमानांचा विरोध
देशावर समान अधिकार सांगणारे मुसलमान समान नागरी कायद्याला मात्र विरोध करतात !
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - समान नागरी कायद्याला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पूर्णत: विरोध केला असून उत्तरप्रदेशमध्ये होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीत मतांच्या राजकारणासाठी भाजपकडून हे सूत्र उचलून धरण्यात येत आहे, असा आरोप केला आहे. (निवडणुका आल्या की, भाजपकडून अयोध्येचे श्रीराम मंदिर, समान नागरी कायदा यांविषयी घोषणा केली जाते आणि निवडून आल्यानंतर साळसूदपणे ही सूत्रे विसरली जातात. त्यामुळे हा भाजपचा संधीसाधूपणा आहे, असे मुसलमानांनी म्हटल्यास त्यात आश्‍चर्य ते काय ? - संपादक)

जम्मू-काश्मीरमध्ये हिंदु आणि शीख यांना अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळणार नाही !

भाजप-पीडीपी सरकारचा निर्णय !
      श्रीनगर - विधानसभेत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना जम्मू-काश्मीर सरकारने स्पष्ट केले की, राज्यात हिंदू आणि शीख यांना अल्पसंख्यांकांचा दर्जा देता येणार नाही. आमदार चरणजीत सिंह यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर हे स्पष्ट करण्यात आले. सिंह यांनी याविषयी सांगितले, सरकारने ही मागणी फेटाळतांना सांगितले की, असे करणे शक्य नाही; कारण राज्यातील तीन प्रांतांत वेगवेगळ्या धर्माचे लोक बहुसंख्यांक आहेत.
      जम्मूमध्ये हिंदू आणि शीख बहुसंख्य आहेत. काश्मीर खोर्‍यात मुसलमान बहुसंख्य आहेत, तर लडाखमध्ये बौद्ध आणि हिंदूंची लोकसंख्या अधिक आहे. यामुळे कोणत्याही एका धर्माला अल्पसंख्यांक म्हणता येणार नाही. (प्रत्यक्षात असे असले, तरी एकूण राज्याच्या लोकसंख्येची तुलना केली, तर जम्मू-काश्मीरमध्ये मुसलमान बहुसंख्यांक आहेत. तरीही अशी विभागणी करून सरकार बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहे. - संपादक)

आक्रमणकर्ते इसिसचे नाहीत, तर पाककडून साहाय्य मिळणार्‍या जमातुल मुजाहिदीनचे !

ढाका येथील आतंकवादी आक्रमण
      ढाका (बांगलादेश) - ढाका येथील स्पॅनिश हॉटेलवर आक्रमण करून २० विदेशी नारिकांचा जीव घेणारे आतंकवादी इसिसचे नव्हे, तर बांगलादेशातील जमातुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेचे सदस्य होते, अशी माहिती बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जामन खान यांनी दिली आहे.
      या आक्रमणाचे दायित्व इसिस या आतंकवादी संघटनेने त्यांच्या अमाक वृत्तसंस्थेमार्फत स्वीकारले होते; मात्र खान यांनी दिलेल्या माहितीने हा दावा खोटा ठरला आहे. तसेच पाकच्या पंतप्रधानांचे सल्लागार तौफीक इमाम यांनी या संघटनेला पाकची गुप्तचर संस्था आयएस्आय साहाय्य करते, असे म्हटले आहे. 

आमदार राजासिंह ठाकूर यांची हत्या करणार होते इसिसचे आतंकवादी !

राजासिंह ठाकूर
हिंदूंनो, जिहादी आतंकवादी तुमच्या नेत्यांना वेचून वेचून
ठार करण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करा !
      भाग्यनगर - तीन दिवसांपूर्वी भाग्यनगर येथून अटक करण्यात आलेले इसिसचे ५ आतंकवादी शहरातील गोशामहल येथील भाजपचे आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ राजासिंह ठाकूर यांची हत्या करणार होते, असे चौकशीतून समोर आले आहे. यापूर्वी शहरात दंगल घडवण्यासाठी येथील भाग्यलक्ष्मी मंदिरात त्यांना गोमांस फेकायचे होते, अशी माहिती समोर आली होती. टी. राजासिंह यांच्या हत्येसाठी मे महिन्यांत त्यांच्या घराचे तीन वेळा अवलोकन करण्यात आले होते. राजासिंह प्रतिवर्षी येथे रामनवमीच्या वेळी लक्षावधी हिंदूंची मिरवणूक काढतात, तसेच गोरक्षण करतात म्हणून त्यांची हत्या करण्यात येणार होती, असे माहितीतून उघड झाले.

ट्विटरवर राममंदिराच्या उभारणीचा ट्रेंड सर्वांत पुढे !

     नवी देहली - ३ जुलैला ट्विटरवर रामजन्मभूमीवर राममंदिराच्या उभारणीवरून चालू करण्यात आलेला NationWantsRamMandir हा ट्रेंड सर्वात वर होता. यावर राममंदिराच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेक ट्विट करण्यात आले होते. अनेकांनी यावरून केंद्रसरकारवर टीकाही केली.

बेळगाव येथे कायदामंत्र्यांच्या विरोधात अधिवक्त्यांचे कामबंद आंदोलन !

      बेळगाव, ३ जुलै (वार्ता.) - कर्नाटकचे कायदामंत्री टी.बी. जयचंद्र यांनी अधिवक्त्यांचे बार असोसिएशन म्हणजे जुगारी अड्डा असल्याचे म्हटले होते. कायदामंत्री टी.बी. जयचंद्र यांच्या या वक्तव्याविषयी येथील बेळगाव बार असोसिएशनने कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या वेळी कायदामंत्र्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. कित्तूर चन्नम्मा चौक येथे मानवी साखळी करून त्यांचा निषेध नोंदवण्यात आला. त्यानंतर संपूर्ण राज्यात त्यांच्या विरोधात अधिवक्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले. एका उत्तरदायी व्यक्तीने अधिवक्त्यांच्या विषयी अशा प्रकारे वक्तव्य करणे हा समस्त अधिवक्त्यांचा अवमान आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अधिवक्त्यांनी केली आहे.

म्यानमारमध्ये बौद्धांच्या जमावाने मशीद जाळली !

अहिंसक बौद्धांनाही धर्मांधांच्या विरोधात कृती करावीशी वाटते,
याचा विचार तथाकथित पुरोगामी आणि निधर्मी विचार करतील का ?
     यांगून - बौद्ध धर्मियांच्या एका जमावाने उत्तर म्यानमारमधील काचीन राज्यात असलेल्या हपाकांत गावात एका मशिदीला आग लावून ती भस्मसात केली. पोलिसांनी जमावाला रोखण्याचा असफल प्रयत्न केल्यानंतर आता त्या गावातील बंदोबस्तात वाढ केली आहे. एका आठवड्यातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी अवैधरित्या बांधण्यात येणारा मदरसा पाडण्यात आला होता.
     हपाकांत गावात एका बुद्ध पागोडाजवळ या वादग्रस्त मशिदीची उभारणी केल्याने बौद्ध धर्मियांत राग होता. तसेच येथे उभारण्यात येणार्‍या पुलासाठी ही मशीद अडसर ठरत असल्याने तिला ३० जूनपर्यंत पाडण्यास प्रशासनाने सांगितले होते; मात्र ती सूचना पाळण्यात आल्याने त्याचा भडका उसळून त्याचे पर्यवसान मशीद जाळण्यात झाले.

इसिसने बगदादमध्ये केलेल्या बॉम्बस्फोटांत ८३ जणांचा मृत्यू

संतप्त लोकांकडून इराकच्या पंतप्रधानांच्या वाहनताफ्यावर दगडफेक !
     बगदाद (इराक) - इराकची राजधानी बगदादमधील कर्रादा आणि कललाल या सर्वात गर्दीच्या ठिकाणी ३ जुलैच्या पहाटे २ चारचाकी वाहनांत झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटांत ८३ लोकांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक गंभीर घायाळ झाले. इसिसने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. २ वेगवेगळ्या ठिकाणी हे स्फोट घडवण्यात आले. या वेळी येथे रमझाननिमित्त खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होती. आतंकवाद्यांनी त्यांना लक्ष्य करूनच हे स्फोट घडवले. या आक्रमणामुळे नागरिक संतप्त झाले. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक करून त्यांचा रोष व्यक्त केला. (भविष्यात भारतात असे घडले, तर आश्‍चर्य वाटू नये ! - संपादक)

बजरंग दलाकडून चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन

राजकीय पक्ष या आवाहनातून बोध घेऊन कृतीशील होणार का ?
     उल्हासनगर (जिल्हा ठाणे) - भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळाचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी चीनने विरोध केला होता. यामुळे उल्हासनगर येथे बजरंग दलाने चीनचा निषेध करत चीनची उत्पादने खरेदी आणि विक्री करण्याचे थांबवा, असे नागरिकांना आवाहन केले आहे. बजरंग दलाचे उल्हासनगरचे संयोजक श्री. आशिष यादव यांनी सांगितले की, शहरात चिनी साहित्य येणे बंद न केल्यास आंदोलन चालूच रहाणार आहे.

पंजाबमधील आपचे आमदार नरेश यादव यांच्यावर कुराणाची पाने फाडल्याचे षड्यंत्र रचल्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट !

सनातन संस्था म्हणजे हिंदु धर्माला कलंक, असे म्हणणारे आपचे नेते आशिष
 खेतान यांना नरेश यादव म्हणजे आपचे गौरव वाटतात का ? 
      मलेरकोटला - येथे कुराणाची पाने फाडून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी आम आदमी पार्टीचे आमदार नरेश यादव यांच्याविरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील विजय नावाच्या गुन्हेगाराने चौकशीत सांगितले की, त्याला नरेश यादव यांनी कुराणाची पाने फाडण्यास सांगितले. यासाठी त्याला १ कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. नरेश यादव देहलीतील महारौली येथील आमदार आहेत. या प्रकरणी नरेश यादव म्हणाले, माझ्या विरोधात षड्यंत्र रचण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांचा सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांना खंबीर पाठिंबा ! - श्री. राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना, कोल्हापूर.

आमदार श्री. राजेश क्षीरसागर
     कोल्हापूर - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती समाजात हिंदु धर्म टिकवण्यासाठी आणि त्यानुसार आचरण करण्यासाठी कित्येक वर्षांपासून कार्य करत आहेत. या दोन्ही संस्थांनी आतापर्यंत समाजाचे हित पाहिले आहे. असे असतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी करण्यात येते, हे चुकीचे असून त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. शिवसेना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावरील संभाव्य बंदीच्या विरोधात आहे. शिवसेना या दोन्ही संघटनांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनीही पुढील काळात सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे सांगितले आहे. त्याप्रमाणे शिवसेना सनातन संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी आश्‍वासक प्रतिक्रिया येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.कोल्हापूर पोलिसांकडून सनातनच्या साधकांची गोपनीय चौकशी !

कॉ. पानसरे हत्या प्रकरण
सनातनच्या साधकांची अशी चौकशी करणार्‍या पोलिसांनी आतंकवाद्यांची कधी गोपनीय चौकशी केली आहे का ?
      कोल्हापूर, ३ जुलै - कोल्हापूर पोलिसांची २ विशेष पथके गेल्या १५ दिवसांपासून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी अटकेत असलेले डॉ. वीरेंद्र तावडे यांच्या संपर्कात असलेल्या कोल्हापूर, वारणानगर, इचलकरंजी, सांगली आणि सातारा येथील काही साधकांची गोपनीय चौकशी करत आहेत. अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांची आणि कोल्हापूर पोलिसांची या प्रकरणी संयुक्त बैठक होईल, असे वृत्त २ जुलै २०१६ या दिवशीच्या दैनिक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

जिहादी आतंकवाद्यांकडून बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना फेसबूकवरून जिवे मारण्याची धमकी !

हिंदु धर्मातील रुढी परंपरांवर टीका करणार्‍या पुरोगाम्यांनी कधीही तस्लिमा नसरीन यांना समर्थन 
दिलेले नाही आणि आताही तिच्या सुरक्षेसाठी ते काहीही बोलत नाहीत !
     कोट्टायम (केरळ) - फेसबूकवर खाते असलेल्या धर्मांधांच्या एका गटाने बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना ठार मारण्याची धमकी दिल्याने रुरकी आणि भाग्यनगर पाठोपाठ केरळमध्येही इस्लामिक स्टेटचा उदय झाला असावा, अशी भीती गुप्तहेर यंत्रणेने व्यक्त केली आहे. या दोन्ही ठिकाणांवरून इसिसच्या आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती. 
     आता ही धमकी फेसबूकवरून काढून टाकण्यात आली आहे. या धमकीमागे अन्सारूल खलिफा या आतंकवादी संघटनेचा हात असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. 
       ख्रिस्ताब्द २०१३ मध्ये इंडियन मुजाहिदिन या आतंकवादी संघटनेच्या माजी सदस्यांनी अन्सारूल तौहाद नावाची आतंकवादी संघटना स्थापन केली होती. या संघटनेचा भारतात झालेल्या अनेक आतंकवादी कारवायांत हात असल्याचे सिद्ध झाले आहे.

राष्ट्रहितासाठी समान नागरी कायदा झालाच पाहिजे ! - चंद्रकांत बराले, हिंदु एकता आंदोलन

     कोल्हापूर, ३ जुलै (वार्ता.) - राष्ट्रहितासाठी सर्व धर्मियांसाठी समान नागरी कायदा झालाच पाहिजे, ही मागणी हिंदु एकता आंदोलनाच्या झालेल्या बैठकीत एकमताने करण्यात आली आहे, अशी माहिती या संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बराले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी शासनाने समान नागरी कायद्याचे उचललेले पाऊल भारतियांसाठी समाधानाची गोष्ट आहे, असे या बैठकीत सांगण्यात आले. येथील हिंदु एकता आंदोलन संघटनेच्या जिल्हा कार्यालयात नुकतीच ही बैठक पार पडली. या बैठकीला हिंदु एकता आंदोलनाचे सर्वश्री लाला गायकवाड, हिंदुराव शेळके, सुभाष पोतदार, शिवाजीराव ससे, दिलीप भिवटे, संभाजी शिंदे, गजानन तोडकर, नंदु सुतार, अजित चव्हाण, राजू पाटील, पांडुरंग कदम आदी आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्स अ‍ॅपवरून पंतप्रधानांची अपकीर्ती करणार्‍याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

     इगतपुरी - व्हॉट्स अ‍ॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपकीर्ती करणारी पोस्ट टाकल्याप्रकरणी सुनील खातळे यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून भारतातील महापुरुषांवर टीका करणे, पंतप्रधानांच्या विरोधात अपकीर्ती करणारा मजकूर टाकणे असे प्रकार व्हॉट्स अ‍ॅपच्या गटात चालू होते. यावर भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश चिटणीस महेश श्रीश्रीमाळ यांनी असे न करण्याच्या संदर्भात वारंवार सूचना केली होती; मात्र संबंधित गटाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे खातळे यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्याची तक्रार महेश श्रीश्रीमाळ आणि भाजपाचे तालुका पदाधिकारी यांनी केली होती. इगतपुरी पोलीस ठाण्यात सायबर कायद्यान्वये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.

विद्यार्थ्यांकडून अवैध देणगी घेणार्‍या रोझरी हायस्कूलच्या विरोधात तक्रार

ख्रिस्ती शाळांकडून पालक आणि विद्यार्थी यांच्या होणार्‍या शोषणासंदर्भात आवाज 
उठवणारे अधिवक्ता आयरिश रॉड्रीग्स यांचे अभिनंदन !
शासनाकडून अनुदान मिळत असूनही पालकांकडून भरमसाट शुल्क 
उकळणार्‍या अशा मिशनरी शाळा हा शिक्षणाचा उघड व्यापारच !
     पणजी - शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांकडून अवैधपणे मोठ्या प्रमाणात देणग्या घेणार्‍या मिरामार येथील रोझरी हायस्कूलच्या प्रशासनाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ता अधिवक्ता आयरिश रॉड्रीग्स यांनी तक्रार केली आहे. या तक्रारीवरून शिक्षण खात्याने रोझरी हायस्कूलच्या व्यवस्थापनाला नोटीस पाठवली असून यासंदर्भात ७ दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. (ख्रिस्त्यांच्या शाळांमध्ये पालकांकडून सहस्रो रुपये डोनेशन घेण्यासह इतरही शालेय साहित्य भेटस्वरूपात मागितले जाते ! विद्यार्थ्यांना हिंदु धर्मानुसार आचरण करू न देणे, धर्माचरण केल्यास अमानुष शिक्षा करणे आदी अवैध कृत्ये होत असतात ! त्या विरोधातही आंदोलन उभारण्याची आज आवश्यकता आहे ! - संपादक)

संतप्त नागरिकांकडून काँग्रेसचे विजय दर्डा यांच्या शहरातील सर्व फलकांची तोडफोड !

दर्डा शिक्षण संस्था अत्याचारी शिक्षकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ! 
जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या यवतमाळ पब्लिक स्कूलमधील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण !
    यवतमाळ - जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस्) या शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी यवतमाळमध्ये ३ जुलै या दिवशीही तणावाची स्थिती होती. दर्डानगरमध्ये पुन्हा संतप्त पालकांचा जमाव जमला. इयत्ता पहिलीतील मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी २ शिक्षकांना अटक झाल्यानंतर संतप्त पालकांनी संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांच्या अटकेची मागणी करत मोर्चा काढला. किशोर दर्डा यांनी २ जुलै या दिवशी वरील घटनेविषयी पालकांशी बोलतांना आंदोलन करणे बंद करा, मोर्चे काढून काय होणार आहे ?

(म्हणे) भारताची अण्वस्त्रशक्ती वाढल्यास जशास तसे उत्तर देऊ ! - पाकची धमकी

     नवी देहली - जर भारताने त्याच्या अण्वस्त्रांमध्ये वाढ केली, तर पाकही त्याला जशास तसे उत्तर देईल, अशी धमकी पाकचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीज यांनी दिली आहे. अझीज अमेरिकेला चेतावणी देतांना पुढे म्हणाले की, अमेरिकेने हे लक्षात ठेवले पाहिजे की, भारत आणि अमेरिका यांच्या मैत्रीमुळे भारताच्या अण्वस्त्रांमध्ये वाढ होणे पाक सहन करणार नाही.

नांदेड-वाघाळा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचा पशूवधगृहाला तीव्र विरोध

  • शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या पटलावरच मांसाचे तुकडे टाकून केला निषेध 
  • पशूवधगृहाच्या विरोधात विविध हिंदुत्ववादी संघटनांचीही निदर्शने 
    पशूवधगृहाला केवळ धर्मप्रेमी शिवसेनाच विरोध करते; मात्र इतर राजकीय पक्ष गप्प रहातात, म्हणजे त्यांच्यामध्ये धर्मप्रेम नाही, असे समजायचे का कि त्यांना केवळ अल्पसंख्यांकांचेच लांगूलचालन करायचे आहे ? 
     नांदेड, ३ जुलै - शहरात काँग्रेसने पशूवधगृह (कत्तलखाना) चालू करण्याचे प्रयत्न चालू केले असून २ जुलैला बोलावलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने याला तीव्र विरोध केला आहे. शहरात पशूवधगृह चालू करण्याअगोदर महापालिकेच्या सभागृहातच पशूवधगृह चालू करा, अशी मागणी करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहातील टेबलवर मांस टाकले. या घटनेमुळे सभागृहात गोंधळ उडाला. तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी घोषणाबाजीही केली. याच वेळी पशूवधगृहाला विरोध करण्यासाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. नांदेड शहरात पशूवधगृह होऊ देणार नाही, असे शिवसेनेने सांगितले. (पशूवधगृह होऊ न देण्यासाठी ठाम भूमिका घेणार्‍या शिवसेनेचा हिंदूंना आधार ! - संपादक) या वेळी सभागृहाच्या बाहेर पशूवधगृहाच्या प्रश्‍नावर विविध हिंदुत्ववादी संघटनांनीही निदर्शने केली.

पुनेगाव (जिल्हा जालना) येथे अतिक्रमित गायरान भूमी मुक्तीसाठी उपोषणाला बसलेल्यांवर दगडफेक

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) हवे ! 
     जालना, ३ जुलै - येथील गोरक्षक ह.भ.प. कारभारी महाराज अंभोरे हे अतिक्रमित गायरान भूमी मुक्ती आणि संबंधितांवर कठोर कारवाई करणे, या मागण्यांसाठी २७ जून या दिवशीपासून पुनेगाव येथील श्री मारुति मंदिरात आमरण उपोषणाला बसले आहेत. २९ जूनच्या रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास मंदिरामध्ये हरिपाठ चालू असतांना गायरान जमीन अतिक्रमण करणार्‍या सुभाष गुलाबराव पाईकराव याने मंदिरावर दगडफेक केली. (धर्मशिक्षणाच्या अभावी मंदिरावर दगडफेक करणारे जन्महिंदू ! अशांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. - संपादक) या प्रकरणी पाईकराव याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

चेन्नई आणि बेंगळुरू येथील सैन्याच्या कॅन्टीनमध्ये ६० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा उघड !

भ्रष्टाचारात आता सैन्यही मागे राहिलेले नाही. ही स्थिती कायद्याने पालटणे कठीण असून त्यासाठी 
समाजात नैतिक मूल्येच रुजवणे आवश्यक आहे. यासाठी साधना हाच एकमेव पर्याय आहे !
     चेन्नई - चेन्नई आणि बेंगळुरू या शहरांतील भारतीय सैन्याच्या कॅन्टीनमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या कॅन्टीनमध्ये स्मार्ट कार्डचा वापर करून सैन्याला ६० कोटींपेक्षा अधिक रुपयांना लुबाडण्यात आल्याचे लक्षात आले आहे. कॅन्टीनचे काही कर्मचारी आणि काही दलाल संगनमताने या कॅन्टीनमध्ये मिळणार्‍या वस्तू अनुदानित मूल्यात विकत घेऊन बाजारात विकत होते. हा प्रकार तब्बल ९ वर्षांपासून चालू होता आणि याविषयी कोणालाही ठाऊक नव्हते. (सर्वच भ्रष्टाचारी असल्यामुळे कोण कुणाची तक्रार करणार ? सैन्याच्या कॅन्टीनमध्ये दिवसाढवळ्या होणारे गैरप्रकार ९ वर्षे लक्षात न येणारे सैन्यातील अधिकारी भारतावर आक्रमण करू पहाणार्‍यांवर लक्ष ठेवण्यास सक्षम आहेत का ? असा विचार जर कोणाच्या मनात आला, तर त्यात चूक ते काय ? असे भ्रष्टाचारी कर्मचारी पाकिस्तानसारख्या भारताच्या शत्रूलाही भारतीय सैन्याविषयीची उपयुक्त माहिती पैशांसाठी पुरवत नसतील कशावरून ? या प्रकरणातील सर्वांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. - संपादक)

माहिती सेवा समिती आणि विशाल सातव युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली-बकोरी (पुणे) रस्त्यावर वृक्षारोपण

वृक्षारोपण करतांना मध्यभागी श्री. चंद्रकांत वारघडे आणि मान्यवर
    पुणे, ३ जुलै - वन विभागाने १ जुलै या दिवशी वृक्षारोपण दिवस जाहीर केला होता. त्या निमित्ताने येथील वाघोली-बकोरी (पुणे) रस्त्यावर माहिती सेवा समिती आणि विशाल सातव युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै या दिवशी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप (आबा) सातव, युवा सेनेचे हवेली तालुका विशाल सातव, समितीचे हवेली तालुका अध्यक्ष किशोर सातव आणि विशाल सातव युवा मंचचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

भ्रष्टाचारात महसूल आणि पोलीस प्रशासन आघाडीवर; ६ मासांत ५३३ कर्मचार्‍यांवर कारवाई

भ्रष्टाचार्‍यांना छी-थू होईल अशी अथवा अन्य कठोरात कठोर शिक्षा दिल्यासच त्याला आळा बसेल !
      मुंबई, ३ जुलै - भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी यांविरुद्ध गेल्या ६ मासांतील कारवाईची आकडेवारी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यात महसूल आणि पोलीस विभागच हे आघाडीवर आहेत. जानेवारी ते जून २०१६ या कालावधीत भ्रष्ट कर्मचार्‍यांवर कारवाई केलेल्यांची संख्या ५३३ आहे. वर्ष २०१४ मध्ये १ सहस्र २४५, तर २०१५ मध्ये १ सहस्र २३४ भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करण्यात आली. (एवढ्या मोठ्या प्रमाणात लाचखोर कर्मचारी सापडतात, याचा अर्थ तळागाळातील भ्रष्टाचार अजून अल्प झालेला नाही, हे जाणून भाजप शासनाने पारदर्शी कारभार होण्यासाठी प्रयत्न करावेत ! - संपादक)

संभाजीनगर येथे एका जर्मन युवतीची छेड काढल्याप्रकरणी युवक कह्यात

     संभाजीनगर, ३ जुलै - येथील नागेश बोराडे या युवकाला एका जर्मन युवतीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे. (अशा युवकांमुळे देशाचे नाव कलंकित होत आहे. छेड काढण्याच्या प्रकरणी कठोर शासन केल्यासच अशा प्रवृत्तींना आळा बसेल ! - संपादक) मागील १० मासांपासून येथे शिकण्यासाठी आलेल्या त्या युवतीची २ जुलै या दिवशी नागेश याने दुपारी मॉलमधून बाहेर पडतांना छेड काढली. त्या वेळी युवतीने आरडाओरडा केल्यावर परिसरातील नागरिक तिच्या साहाय्यास धावून आले आणि नागेश याला पोलिसांच्या कह्यात दिले.

चोरट्यांनी काळेवाडी पोलीस चौकीवरच आक्रमण करून लाकडी बाक चोरले !

पोलीस चौकीत चोरी होऊ देणारे पोलीस जनतेचे रक्षण करणार ?
     पुणे, ३ जुलै - तक्रार प्रविष्ट करण्यास येणार्‍या नागरिकांसाठी काळेवाडी पोलीस चौकीच्या बाहेर ठेवण्यात आलेले लाकडी बाक १ जुलै या दिवशी रात्री चोरीला गेले आहेत. २ जुलै या दिवशी सकाळी पोलिसांनी या संदर्भात आसपास चौकशी करूनही काहीच माहिती हाती न लागल्याने त्यांनी जवळची भंगार दुकाने तपासण्यास आरंभ केला. (जिथे पोलीस ठाणेच असुरक्षित असतील, तिथे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची काय कथा ? यांसारख्या घटना नागरिकांना संरक्षण प्रशिक्षण घेण्यास उद्युक्त करतात ! - संपादक)

अभिनेत्रीला पहायला जाण्यासाठी अल्पवयीनाने घरफोडी करून मिळवले पैसे

      अकलूज - सैराट या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला पहाण्यासाठी अल्पवयीने मुलाने घरफोडी करून ३५ सहस्र रुपये आणि २ दुचाकी यांची चोरी केली. त्यानंतर तो रिंकूच्या चाहत्यासमवेत तिला पहाण्यासाठी गेला. रिंकूला शाळेजवळ पाहून त्याला आनंद झाला. चोरलेल्या पैशांपैकी १५ सहस्र रुपये तो आनंद साजरा करण्यात घालवले. (चित्रपटांच्या मायाजाळात वाहून गुन्हे करण्यापर्यंत मजल गेलेल्या तरुण पिढीला अधोगतीपासून रोखण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण द्यायला हवे ! - संपादक) या प्रकरणी पोलिसांनी एक सराईत गुन्हेगार आणि अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. त्यांनी चोरी करण्यामागील कारण सांगितल्यावर पोलीसही चक्रावून गेले.

महंत यती नरसिंहानंद यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट !

     गाझियाबाद (उत्तरप्रदेश) - कैराना पलायन प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना हिंदुविरोधी अहवाल सादर करणार्‍या कथित संतांना चेतावणी देणारे डासनादेवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद आणि त्यांचे सहकारी अनिल यादव यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. काही दिवसांपूर्वी कल्कि पीठाधीश्‍वर आचार्य प्रमोद कृष्णन् यांच्या तक्रारीवरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
    २४ जून या दिवशी शहर पोलीस ठाण्यात आचार्य प्रमोद कृष्णन् यांनी यती नरसिंहानंद यांच्या विरोधात तक्रार दाखल करतांना आरोप लावला होता की, कैराना प्रकरणाचा विस्तृत अहवाल मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना सोपवून स्वामी कल्याण देव यांच्यासह लखनौ येथून गाझियाबादकडे परत येत असतांना माझ्या आणि स्वामी कल्याण देव यांच्या भ्रमणभाषवर महंत नरसिंहानंद यांनी जिवानिशी मारण्याची धमकी दिली होती.

आमच्या देशाचे नाव आहे बांगलादेश ! - बंगालमधील शासकीय विद्यालयातील विद्यार्थ्यांचे धक्कादायक उत्तर

उद्या बंगालच्या शासकीय शाळांमधून राष्ट्रद्रोही निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
     कोलकाता - बांगलादेशी घुसखोरीने बंगालला कुठपर्यंत पोखरले आहे, याचा अनुभव नुकताच बंगालमधील एका शिक्षण मंडळाच्या अधिकार्‍यांनी घेतला. बर्दवान जिल्ह्यातील एका शासकीय विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या देशाचे नाव बांगलादेश आणि राजधानी ढाका असल्याचे सांगितल्यामुळे शाळा तपासण्यासाठी गेलेले अधिकारीही अचंबित झाले. (सरकारी अनुदानाने बांगलादेशाशी निष्ठा ठेवणारे नागरिक निर्माण करणार्‍या बंगालच्या शाळा भारताच्या कि बांगलादेशाच्या ? याला राज्यशासनही उत्तरदायी आहे ! - संपादक)

अखिल भारतीय साधकत्ववृद्धी आणि धर्मप्रसार नियोजन शिबिरात धर्मप्रसार करतांना येणार्‍या अडचणींविषयी मार्गदर्शन

     सनातन आश्रम, रामनाथी, ३ जुलै (वार्ता.) - येथे सनातनच्या साधकांसाठी अखिल भारतीय साधकत्ववृद्धी आणि धर्मप्रसार नियोजन शिबिराला १ जुलैपासून प्रारंभ झाला. शिबिराच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे २ जुलैला साधकांना धर्मप्रसार करतांना येणार्‍या अडचणी मुळाशी जाऊन कशा सोडवायच्या ? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
     शिबिरात साधकांमधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे समष्टी साधनेची होणारी हानी अन् ती टाळण्यासाठी करायच्या उपाययोजना याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच धर्मप्रसाराविषयीचा प्रायोगिक भाग दाखवण्यात आला.

आणीबाणी हीच सर्वांत मोठी असहिष्णुता ! - माधव भंडारी

देशात असहिष्णुता वाढली आहे, असे म्हणून कांगावा करणारे
काँग्रेसवाले आणि तथाकथित पुरोगामी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
      पुणे, ३ जुलै - आणीबाणी लादून व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संकोच करणारे आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करणारेच सध्या असहिष्णुतेच्या नावाने गळा काढत आहेत. वास्तविक पहाता आणीबाणीच्या १९ मासांचे अंधारयुग हीच सर्वांत मोठी असहिष्णुता म्हणावी लागेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असतांना २६ जून १९७५ या दिवशी देशात आणीबाणी लागू केली होती. या घटनेला ४० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले मिसा बंदी, सत्याग्रही आणि भूमीगत कार्यकर्ते यांनी आयोजित केलेल्या कारागृह ते सिंहासन या कार्यक्रमात ते बोलत होते.
     या वेळी भंडारी यांनी आणीबाणीच्या काळात घडलेल्या सत्तासमीकरणे आणि जनसंघ ते पूर्ण बहुमतातील भाजपचे सरकार ही वाटचाल याविषयीचा आढावा आपल्या भाषणातून घेतला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने वारकर्‍यांना भेट देण्यासाठी खरेदी केलेल्या मूर्ती पळवणार्‍यांची नावे घोषित करावीत !

शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांची मागणी
     पिंपरी (पुणे), ३ जुलै - पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकर्‍यांना भेट देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने खरेदी केलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती पळवलेल्या नगरसेवकांची नावे महापौर शकुंतला धराडे यांनी घोषित करावीत, अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? जनहितासाठी महापौरांनीच ही नावे उघड करून त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत ? - संपादक)
     सुलभा उबाळे म्हणाल्या, मूर्तीचोरीचा प्रकार वेदनादायक आहे. महापौरांच्या बेछूट आरोपामुळे आमची प्रतिमा डागाळली आहे. सवंग लोकप्रियतेसाठी त्यांनी असे बोलणे उचित नाही. मूर्ती पळवलेल्यांची नावे महापौरांनी जाहीरपणे सांगावीत, अन्यथा क्षमा मागावी. गेल्या वर्षीही नगरसेवकांना देण्यासाठी अधिक मूर्ती खरेदी केल्या होत्या; पण त्या नगरसेवकांच्या हातात पडल्याच नाहीत. या वर्षीही तसेच झाले. गेल्या २ वर्षांत किती मूर्ती खरेदी केल्या, त्याचा लेखाजोखा महापौरांनी जनतेसमोर मांडावा. नाहीतर आगामी महासभेत आम्ही यासंदर्भात सूत्र उपस्थित करू.रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्या !

सर्वसामान्यांच्या समस्यांची नोंद संवेदनशीलपणे घेणारी शिवसेना !
तमिळनाडूतील शिवसेनेचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
     चेन्नई - २४ जून २०१६ या दिवशी स्वाती नामक २४ वर्षीय युवतीची नुगंमंबिका रेल्वेस्थानकावर निर्घृण हत्या करण्यात आली. सुमारे दीडशेहून अधिक लोक या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. सुरक्षा व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे तरुण युवतीची ओळख पटू शकली नाही. या वेळी रेल्वेस्थानकामध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि पोलीस यांच्यापैकी कोणीच नव्हते. प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने पहायला हवे आणि त्याविषयी सतर्क रहायला हवे. मध्यवर्ती असलेल्या रेल्वेस्थानकामध्ये काही वर्षांपूर्वी बॉम्बस्फोट झाला होता. त्यामुळे तात्काळ रेल्वे आणि बस स्थानकांमध्ये प्रवेश करणार्‍या गुन्हेगारांना थांबवायला हवे, अशी मागणी करणारे पत्र तमिळनाडूतील शिवसेनेचे राज्यप्रमुख जी. राधाकृष्णन् यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना पत्र लिहून केली आहे. 
     पत्रात पुढे म्हटले आहे की, रेल्वेप्रशासनाने अजनूही तेथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला नाही. प्रवाशांच्या सुरक्षेविषयी आपण आम्हाला आश्‍वस्त करावे, तसेच हानी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची हानीभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अरब राष्ट्रातील पैशांचा वापर करून पूर्वेकडील देशांमध्ये तमिळी लोकांचे धर्मांतर ! - श्री. आर्येंद्रन्

     चेन्नई - युद्धानंतर पूर्वेकडील देशांमध्ये पद्धतशीरपणे धर्मांतर करण्यात येत आहे, असे तमिळ राष्ट्रीय समितीचे माजी खासदार श्री. आर्येंद्रन् यांनी म्हटले आहे. थुलीयाम संकेतस्थळाने घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. मुसलमान राज्यकर्ते आणि धर्मगुरु यांच्याकडून अरब राष्ट्रांतून धर्मांतर करण्यासाठी पुष्कळ पैसा घेतला जातो. येथील भूमी कह्यात घेण्याचे काम मुसलमान राज्यकर्त्यांच्या मूकसंमतीने होत आहे. तमिळी लोकांचे होणारे धर्मांतर थांबवण्यासाठी उपाययोजना काढण्याविषयी तमिळी नेते उदासीन आहेत, असेही ते म्हणाले.

घुसखोरी रोखण्यासाठी भारताच्या सीमेवर इस्रायलप्रमाणेच अंडर वॉटर आणि अंडर अर्थ सेन्सर !

एखाद्या समस्येचे मूळ नष्ट केले की, ती समस्या नष्ट होते; मात्र ते सोडून वरवरची 
बचावात्मक उपाययोजना तत्कालिकच ठरते, हेच पुनःपुन्हा करणारा भारत ! 
     नवी देहली - पाककडून सातत्याने होणार्‍या आतंकवादी आक्रमणांना रोखण्यासाठी भारताकडून इस्रायलप्रमाणे भारताच्या सीमारेषेवर ऑपरेशन चक्रव्यूह राबवण्यात येणार आहे. सीमारेषेवर आता अंडर वॉटर आणि अंडर अर्थ सेन्सर लावण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे आतंकवाद्यांना भूमी किंवा जल यांमार्गे भारतात घुसखोरी करणे कठीण होणार आहे. चालू महिन्यात जम्मू-काश्मीर आणि गुजरातच्या सीमेवर हे सेन्सर लावण्यात येणार आहेत. सीमारेषेवर प्रत्येक ५ किमी अंतरावर हे सेन्सर बसवण्यात येतील. सीमा सुरक्षा दल यासाठी १८ ते २० कोटी रुपये खर्च करणार आहे. सीमारेषेवर लागणारे हे सेन्सर ३६० अंश परिसरावर नियंत्रण करतील. हे सेन्सर नियंत्रण कक्षाला माहिती देतील. ही माहिती मिळाल्यानंतर सीमेवर लागलेले कॅमेरे घुसखोरांच्या दिशेने फिरतील. तसेच घुसखोर दिसल्यावरच अत्याधुनिक बंदुका गोळीबार करून घुसखोरांना ठार करतील. हे सेन्सर खोल्यांमध्येही असणार आहेत. कोणीही संशयित आल्यावर त्यालाही हा सेन्सर स्कॅन करेल. पाण्यामधला सेन्सरही भूमीवरच्या सेन्सरप्रमाणेच काम करेल.

कन्हैय्या कुमारने हार घातलेल्या कवी दिनकर यांच्या पुतळ्याची अभाविप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांकडून गंगाजलाने शुद्धी !

     पाटलीपुत्र - जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार यानेे ३० जून या दिवशी प्रसिद्ध कवी दिनकर यांच्या बेगुसराईतील पुतळ्याला हार घालून पुष्पांजली वाहिल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी गंगाजलाने पुतळा धुवून त्याचे शुद्धीकरण केले. या वेळी कम्युनिस्ट पक्षाने आयोजित केलेल्या सभेत कन्हैयाने भाषण केले होते. कन्हैय्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला असल्याने त्याच्या उपस्थितीमुळे मैदान अपवित्र झाल्याचा दावा करत मैदानावर हवन आणि पूजा करून तेथेही कार्यकर्त्यांनी गंगाजल शिंपडले. बेगुसराईतील बिहाट हे कन्हैयाचे मूळ गाव आहे.-

गॉड फादर बीअरमुळे धार्मिक भावना दुखावल्यावरून देहली उच्च न्यायालयात याचिका !

     नवी देहली - देहली उच्च न्यायालयात एका संघटनेने जनहित याचिका दाखल करून उत्तर भारतात प्रसिद्ध असणार्‍या गॉड फादर बीअरच्या उत्पादकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. 
    या याचिकेत असे म्हटले आहे की, गॉड फादर या शब्दामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. गॉड या शब्दामुळे प्रत्येक धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या जातील. प्रत्येक धर्मात गॉड (देव) हा सर्वशक्तीमान असतो. त्यामुळेच या बीअरचे उत्पादन, विक्री आणि पुरवठा यांवर तात्काळ बंदी आणावी. देहलीमधील प्रत्येक अधिकृत दुकानामध्ये गॉड फादर बीअरची विक्री होत आहे. त्यांना त्याची अनुमती देऊ नये आणि त्यावर तात्काळ बंदी आणावी.

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची पालखी जेजुरीकडे, तर संत तुकाराम महाराज यांची पालखी वरवंडकडे मार्गस्थ

      पुणे, ३ जुलै - संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी ३ जुलै या दिवशी जेजुरीकडे, तर संत तुकाराम महाराज यांची पालखी वरवंडकडे मार्गस्थ झाली. माऊलींची पालखी दोन दिवस सासवडमध्ये मुक्कामास होती. ३ जुलै या दिवशी पहाटेची पूजा झाल्यावर संततधार पावसातच माऊलींच्या पालखीने जेजुरीकडे प्रस्थान केले. ही पालखी जेजुरी येथे रात्री मुक्कामास असणार आहे. संत तुकाराम महाराज यांची पालखी २ जुलै या दिवशी यवत येथे मुक्कामी होती. पहाटेची पूजा झाल्यावर ही पालखी वरवंडच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि रात्री ती वरवंड येथे मुक्कामी असणार आहे.

श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याविषयी हरकती प्रविष्ट !

श्री अंबाबाई भक्त समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 
     कोल्हापूर, ३ जुलै (वार्ता.) - श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील २५५ कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यातील ७२ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. या निधीतून करण्यात येणार्‍या कामासाठी विविध संघटनांकडून सूचना आणि हरकती घेण्यात येत आहेत. 
     श्री अंबाबाई भक्त समितीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे हरकती प्रविष्ट केल्या आहेत. सूचना आणि हरकती यांकडे दुर्लक्ष केले, तर या विकास आराखड्याच्या विरोधात जनआंदोलन उभे करण्याची चेतावणी या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. या वेळी बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सर्वश्री संभाजी साळुंखे, शहरप्रमुख महेश उरसाल, प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.

मेक्सिकोतील प्राचीन मंदिराची समाजकंटकांकडून विटंबना !

     मेक्सिको सिटी - मेक्सिको देशातील हिदाल्गो राज्यात असलेल्या प्राचीन ओतोमी मंदिरातील दगडी खांब अज्ञातांनी पाडून तेथील पूजा साहित्य फेकून मंदिराची विटंबना केली, तसेच दगडावरील कोरीव कामे, चित्रे इत्यादींना हानी पोहोचवण्यात आली. पर्वतराशींच्या दुर्गम भागात असलेल्या या मंदिराला मायोनिहाका असे नाव असून त्याची जगातील अतिप्राचीन वास्तूत गणना होते. या मंदिरात मेक्सिको देशातील हिंदू हे विवाह आणि धार्मिक उत्सव साजरे करत होते. अमेरिकेतील हिंदु धार्मिक नेते श्री. राजन झेद मेक्सिकोचे अध्यक्ष एनरिक पेना आणि हिदाल्गो राज्याचे गव्हर्नर जोस फ्रान्सिस्को ओलीव्हरा रुझ यांना पत्र लिहून या विटंबनेला उत्तरदायी असणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची आणि मंदिराला सुरक्षा देण्याची विनंती केली आहे.

शाळेच्या प्राचार्यांना देवतेच्या स्वरूपात दाखवल्याने कुलपतींनी क्षमा मागावी ! - अमेरिकेतील हिंदूंची मागणी

अमेरिकेतील हिंदू अल्पसंख्य असूनही देवतांच्या विडंबनाच्या विरोधात त्वरित आवाज उठवतात, तर 
भारतात हिंदू बहुसंख्य असूनही नाटक, चित्रपट, चित्रकला, यांतून देवतांचे विडंबन झाल्यास हाताच्या 
बोटावर मोजण्याएवढेच हिंदू आवाज उठवतात. हे भारतातील हिंदूंसाठी लज्जास्पद !
     न्यूयॉर्क - अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील क्विन्स येथील शाळेच्या प्राचार्यांचा पुतळा हिंदु देवतेच्या रूपात उभारण्यात आला आहे. यामुळे हिंदूंच्या देवतेचे विडंबन झाले, तसेच कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. या प्रकरणी अमेरिकेतील हिंदु धार्मिक नेते श्री. राजन झेद यांनी न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर आणि तेथील शिक्षण मंडळाचे कुलपती कारमेन फरीना यांना पत्र लिहून या घटनेविषयी निषेध व्यक्त केला असून त्यांनी हिंदूंची क्षमा मागावी, अशी मागणी केली आहे. न्यूयॉर्क राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यकक्षेत १ सहस्र ८०० शाळा असून त्यात सुमारे ११ लक्ष विद्यार्थी शिक्षण घेतात. अमेरिकेतील हिंदूंची लोकसंख्या सुमारे ३० लक्ष आहे.-

व्हिएन्ना येथील सुपरमार्केटमध्ये गोळीबार करणारी व्यक्ती पोलिसी कारवाईत ठार !

     व्हिएन्ना (आस्ट्रिया) - व्हिएन्ना या शहरातील बिल्ला सुपरमार्केटमध्ये १ जुलै या दिवशी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका बंदूकधारी व्यक्तीने प्रवेश करत अंदाधुंद गोळीबार करण्यास आरंभ केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या कमांडो पथकाने तात्काळ कारवाई करत या बंदूकधारी व्यक्तीला ठार मारले. या वेळी २ पोलीस घायाळ झाले. सुपरमार्केटमध्ये झालेले हे आक्रमण आतंकवाद्यांनी केले का ?, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. -

देहली येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी कारागृहातून फरार !

अत्यंत निष्काळजीपणे काम करणार्‍या पोलिसांना निलंबित करा !
देहली पोलिसांची कार्यक्षमता ! 
    नवी देहली - येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी कारागृहातून फरार झाला आहे. २९ जून या दिवशी त्याला अटक करण्यात आली होती. आरोपी लाल सिंह याला कारागृहात बंद करून पोलीस गस्त घालण्यास गेले होते. त्या वेळी संधी साधून सिंह कारागृहाचे लोखंडी गज तोडून पळून गेला. पोलिसांनी आपल्या अधिकार्‍यांना ही माहिती दिली. त्यानंतर यासंबंधी एफ्आयआर् दाखल करून पोलीस लाल सिंहचा शोध घेत आहेत.

भारतात गेल्या ६ मासांत ७४ वाघांचा मृत्यू !

वाघाची शिकार थांबवू न शकलेले निष्क्रीय (कि भ्रष्ट ?) वन खाते आणि विकासाच्या 
नावाखाली होणारी जंगलतोड याच गोष्टी या मृत्यूंना कारणीभूत आहेत !
     नवी देहली - भारतात १ जानेवारी ते २६ जून २०१६ या ६ महिन्यांच्या कालावधीत भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या वाघाच्या हत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या कालावधीत ७४ वाघांचा मृत्यू झाला आहे.
१. यातील ३० वाघांची शिकार करण्यात आली असून २६ वाघ मृतावस्थेत आढळले. वनरक्षक, पोलीस आणि ग्रामस्थ यांनी मारलेल्या वाघांची संख्या २ असून ३ वाघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. उत्तराखंड राज्यात वाघांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. 
२. वर्ष २०१४ च्या सर्वेक्षणानुसार देशात वाघांची संख्या २ सहस्र २२६ आहे.

ब्राह्मणद्वेष थांबवा; राष्ट्र वाचवा !

     जात ही संकल्पना कालबाह्य ठरत असतांनाच फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेत ब्राह्मण समाजाला सतत टीकेचे लक्ष्य करण्यात येत आहे. ब्राह्मणांना झोडपणे, त्यांच्यावर आक्रमणे करणे, त्यांना त्रास देणे म्हणजेच पुरोगामित्वाचे प्रतिक असा ग्रह काही समाजकंटकांनी करून घेतलेला दिसतो आहे. जातीने ब्राह्मण असणे, हा गुन्हा आहे कि काय ? असेच आता अनेकांना वाटू लागले आहे. जातीजातींत तेढ आणि द्वेषाचे राजकारण करून सामाजिक वातावरण दूषित करणार्‍यांना आवरणे, हे आता राज्यकर्त्यांसमोरील मोठे आव्हान आहे. प्रत्येक जातीत काही गुणदोष असतात हे मान्य; मात्र त्यामुळे एखाद्या जातीचा टोकाचा द्वेष करणे आणि त्यांच्या हत्या करा. त्यांच्या बायका पळवून आणा, अशा घाणेरड्या वल्गना करून समाजस्वास्थ्य बिघडवणे, हे समाजातील वाढत्या अराजकतेचे लक्षण आहे. आजपर्यंतच्या अनेक ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींत ब्राह्मणांनी दिलेले योगदान दुर्लक्षून चालणार नाही. समाज भटमुक्त करण्याचा विडा उचलणार्‍या फुरफुरत्या घोड्यांना आवरले नाही, तर आपल्या राष्ट्र्राला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

पंतप्रधान मोदीजी, अमेरिकेपासून सावध रहा !

१. नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या दौर्‍यात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेवर स्तुतीसुमने उधळणे ! 
     पंतप्रधान मोदींचे त्यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या दौर्‍यात अमेरिकेकडून जंगी स्वागत करण्यात आले, तसेच अमेरिकेच्या संसदेचे सर्वोच्च सभागृह सिनेटमध्ये त्यांना भाषण करण्यास देण्यात आले. या भाषणामध्ये मोदींनी त्यांच्या झालेल्या सन्मानाविषयी अमेरिकेवर स्तुतीसुमने उधळली. तेव्हा ते म्हणाले, अमेरिका लोकशाहीचे मंदिर असून भारताचा नैसर्गिक मित्र आहे, इत्यादी...
२. अमेरिका भारताला साहाय्य करत असल्याचा देखावा करण्यामागील कूटनीती ! 
     सध्या अमेरिका भारताला साहाय्य करत असल्याचा देखावा करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करत आहे. भारताला पूर्वी संयुक्त राष्ट्र संघ, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा न देणारी अमेरिका आता मात्र काही प्रमाणात पाठिंबा दर्शवत आहे. यातही अमेरिकेचा काही हेतू दिसतो.

वाहनांची तोडफोड थांबवा !

    संस्कृतीचे केंद्र असलेले पुणे हे सध्या कायदा सुव्यवस्थेच्या बट्ट्याबोळासाठी गाजत आहे. सध्या पुण्यातील सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, वारजे, येरवडा, थेरगाव अशा विविध उपनगरांमध्ये गेल्या काही मासांपासून वाहन तोडफोडीच्या घटना या सातत्याने घडत आहेत. यामध्ये किरकोळ भांडणे होवो किंवा क्षुल्लक कारणावरून मारामारी होवो की, लगेचच १६ ते २५ या वयोगटातील मुले दादागिरी करण्यासाठी आणि त्यांची दहशत निर्माण करण्यासाठी हातात लाठ्या-काठ्या, हत्यारे घेऊन रस्त्यावरील, इमारतीच्या वाहनतळातील वाहनांची तोडफोड करतात. यामध्ये वाहनांची तोडफोड करण्यापासून ते वाहने पेटवून देण्यापर्यंत त्या टोळक्यांची मजल जाते. सध्या तरी अशा घटना वारंवार घडत असून त्या थांबणार कधी, असा प्रश्‍न पुणेकरांना नक्कीच पडत आहे. या मुलांना पोलिसांची भीतीच राहिलेली नाही, याचा प्रत्ययच त्या घटनांवरून येत आहे.

भावशक्तीच्या जोरावर विदेशात धर्मजागृतीचे महान कार्य प्रभावीपणे आणि यशस्वीरित्या पार पाडू शकणारे स्वामी विवेकानंद !

स्वामी विवेकानंद 
स्वामी विवेकानंद  यांच्या दिनांकानुसार 
पुण्यतिथीच्या निमित्ताने...
     स्वामी विवेकानंद यांच्याविषयी घडलेला एक प्रसंग येथे देत आहे. स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी, म्हणजेच सनातन हिंदु धर्माचे तेज विदेशात पसरवण्यासाठी सवर्र् धर्म परिषदेच्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो (अमेरिका) येथे गेले होते. तेव्हा त्यांनी त्या धर्मपरिषदेत श्रोत्यांची मने जिंकून तेथे न भूतो न भविष्यति ! असा विलक्षण प्रभाव निर्माण केला. त्यामुळेे सनातन हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व पाश्‍चात्त्यांसमोर प्रभावीपणे आणि समर्थपणे ठसलेे. त्या वेळी स्वामी विवेकानंदांना तेथील अनेक संस्थांच्या वतीने व्याख्यानांसाठी निमंत्रणे मिळू लागली. त्यात त्यांनी ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग, राजयोग हे विषय प्रभावीपणे मांडले. सर्व श्रोतृवृंद अगदी मंत्रमुग्ध होऊन आणि देहभान हरपून त्यांच्या निरूपणाचा आस्वाद घेत असायचा. या प्रासादिक निरूपणाच्या वलयातून श्रोते जेव्हा भानावर यायचे, तेव्हा त्यांच्यामध्ये पुढील विषय ऐकून घेण्यासंबंधी तीव्र उत्कंठा जागृत होत असे.

सनातनच्या विरोधात ऊर बडवणार्‍या पुरोगाम्यांचा धर्मनिरपेक्षतावाद !

     आठवतं, काही दिवसांपूर्वी मी केरळमधल्या एका तरुणीच्या बलात्कार आणि खुनाविषयी लिहिले होते आणि प्रश्‍न विचारला होता की, मुख्य प्रवाहातली माध्यमे का गप्प आहेत ? आज त्या प्रश्‍नाचे काही अंशी उत्तर मिळालाय की काय, असे वाटत आहे ! जिशा नाव होत त्या तरुणीचे. त्या घटनेमध्ये पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहेे. त्याचं नाव मोठे सुंदर आहे बरं का ! त्याचं नाव आहे, अमियुर-उल-इस्लाम !! आहे की नाही गंमत ? आता माझी देशातल्या यच्चयावत पुरोगाम्यांना, विवेकवाद्यांना आणि धर्मनिरपेक्षतावाद्यांना सूचना आहे एक. तुम्ही सर्वांनी सनातनच्या वीरेंद्र तावडेला असेच कह्यात घेतल्यावर आभाळ डोक्यावर पडल्यागत आरडाओरडा आणि वाट्टेल त्या मागण्या केल्या होत्या ना ? गुड ! आता तसाच कांगावा आणि त्याच सगळ्या मागण्या सदरच्या आरोपीचे नाव घेऊन तुमच्या लाडक्यांविषयीही करा ! कराल ना ? काय म्हणताय, नाही जमणार ? काय ? अच्छा ! फक्त संशयित म्हणून अटक केली आहे, होय? मग लेकाच्याहो, हाच नियम जगातल्या समस्त घटनांना लावायचे संस्कार दाखवत जा की! एकतर याही प्रकाराविषयी तेवढाच गदारोळ करा, नाहीतर येथूनपुढे कोणतीही घटना असो, तिचा निकाल आपणच लावल्याच्या थाटात बरळणे बंद करा. सनातनवर बंदी घालायची किंवा काय ते न्यायालय आणि सरकार विचारपूर्वक ठरवतील, दुटप्पी टाळक्यांनी त्यात फक्त सोयीस्कर तेवढेच नाक खुपसायचे काम नाही !! - श्री. विक्रम एडके (व्हॉट्स अ‍ॅपवरील मजकूर)

गुरूंच्या आज्ञेचे पालन करून त्यांचे मन जिंकणारा उपमन्यू !

बोधकथा
     धौम्यऋषींचा शिष्य उपमन्यू हा गुरुगृही राहून आश्रमातील गायी सांभाळण्याची सेवा करत असे. तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करी. त्याची परीक्षा पहाण्यासाठी एकदा धौम्यऋषींनी मिळालेल्या भिक्षेतील अर्धी भिक्षा गुरूंना द्यावी आणि उरलेल्या भिक्षेवर निर्वाह करावा, असे त्याला सांगितले. उपमन्यू आनंदाने अर्धी भिक्षा धौम्यऋषींना अर्पण करू लागला. उरलेल्या अर्ध्या भिक्षेतही उपमन्यू संतुष्ट राहू लागला. काही काळाने धौम्यऋषींनी त्याला मिळालेली संपूर्ण भिक्षा गुरूंना अर्पण करण्यास सांगितली. उपमन्यूने तसे केले. अन्नग्रहण न करताही उपमन्यूची प्रकृती उत्तमच आहे, हे पाहून धौम्यऋषींनी त्याला विचारले, तू काय सेवन करतोस ? त्याने सांगितले, गुरुदेव, मी रानात गायीचे दूध पितो. तेव्हा धौम्यऋषी म्हणाले, अरे, त्यामुळे दूध उष्टे होते. ते पिऊ नकोस. धौम्यऋषींची ही आज्ञाही उपमन्यूने आनंदाने मान्य केली.

अ‍ॅन्टीबायोटिक्स घेत आहात ? पुन्हा एकदा विचार करा !

     सेंटर फॉर डिसिज् डायनॅमिक्स इकोनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिसीच्या अहवालानुसार वर्ष २०५० पर्यंत भारतात प्रतिजैविक प्रतिरोध अर्थात् अ‍ॅन्टीबायोटिक्स रेझिस्टन्स (Antibiotics resistance) मुळे ३० कोटी लोक मृत्यूमुखी पडलेले असतील ! भारतात प्रतिवर्षी सुमारे ६० सहस्र लहान मुले अ‍ॅन्टीबायोटिक्स रेझिस्टन्समुळे मृत्यूमुखी पडतात.
१. अ‍ॅन्टीबायोटिक्स रेझिस्टन्स म्हणजे काय ?
     अ‍ॅन्टीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके म्हणजे बॅक्टेरियावर दिली जाणारी औषधे. आपला जीव वाचवणे, ही प्रत्येक सजिवाची धडपड असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून बॅक्टेरिया हे स्वतःला या अ‍ॅन्टीबायोटिक्स पासून सुरक्षित बनवणारे पालट स्वतःच्या रचनेत घडवून आणतात आणि काही काळातच ही औषधे निष्प्रभ ठरू लागतात.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - ज्येष्ठ कृष्ण पक्ष चतुर्दशी (३.७.२०१६) सायं ६.५३ वाजता
समाप्ती - ज्येष्ठ अमावास्या (४.७.२०१६) दुपारी ४.३१ वाजता
आज अमावास्या आहे.

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. तुम्हाला असे वाटते का की, हिंदूंच्या काही समस्या आहेत किंवा स्वतःला हिंदू म्हणणेच एक समस्या आहे.
३. वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तान निर्माण केले, तेव्हा पाकिस्तानमध्ये हिंदू २४ टक्के होते. आज १ टक्कासुद्धा नाही. पूर्व पाकिस्तानात वर्ष १९४७ मध्ये हिंदू ३० टक्के होते. आज बांगलादेशात ७ टक्के हिंदू उरले आहेत. नाहीशा झालेल्या हिंदूंचे काय झाले ? त्यांना आणि एकंदरीत हिंदूंना मानवाधिकार आहेत का ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

साधना, धर्म आणि नीतीमत्ता न शिकवणार्‍या आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांमुळे असे गुन्हे होतात; म्हणून त्यांनाच आजन्म कारागृहात टाका !

      पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये संगणक शास्त्र शाखेच्या (बीसीएस्) पडताळणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिपायानेच पळवल्या. यामध्ये त्या शाखेचे शिक्षण घेणार्‍या विदेशी विद्यार्थ्यांसह काही जणांनी शिपायाच्या साहाय्याने उत्तरपत्रिका घरी नेल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट करून शिपाई शिगवण यांना कह्यात घेतले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांच्या प्रयत्नांना सहिष्णुता म्हणायचे का ?
     भाग्यनगर (हैद्राबाद) हून अटक करण्यात आलेले इसिसचे ५ आतंकवादी येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांची हत्या करणार होते. राजासिंह प्रतिवर्षी रामनवमीला लक्षावधी हिंदूंची मिरवणूक काढतात, तसेच गोरक्षण करतात म्हणून त्यांची हत्या करण्यात येणार होती.


हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Hyderabadke BJP vidhayak aur Hindutvanishth T. Rajasinghji ko ISISke ५ jihadi marnewale the.
Hinduopar honewale aise aghatopar Secularwadi chup kyon ?
जागो !
हैद्राबाद के भाजपा विधायक और हिन्दुत्वनिष्ठ टी. राजासिंहजी को इसिस के ५ जिहादी मारनेवाले थे.
हिन्दुआें पर होनेवाले ऐसे आघातों पर सेक्युलरवादी चुप क्यों ?

चल साधका, करूया प्रयत्न अष्टांगसाधनेचा !

पू. जाधवकाका (टीप १) सेवाकेंद्रा येती ।
भावजागृती होते आमची ।
दुग्धशर्करायोग होई पू. स्वातीताई (टीप २) येता ।
आपल्या साधनेची काळजी प.पू. डॉक्टरांना ।
स्वातीताईचा सत्संग मिळाला आम्हाला ॥ १ ॥
देवा, तूच सद्बुद्धी दे आम्हा सर्वांना ।
प्रयत्न करावे कसे आवडेल तुला ।
या घोर कलियुगात तू सांगूनी साधना ।
तरी त्याची जाणीव नसे मना ॥ २ ॥

पू. सदाशिव (भाऊ) परबकाका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि साधकांना आलेल्या अनुभूती !

गुरुपौर्णिमा मास २०१६
    १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.
गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सनातन संस्थेची वैशिष्ट्ये
१. सनातन संस्थेत अनेक संत असूनही सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते.
२. विविध संत आणि संप्रदाय यांत एक प्रमुख असतात; म्हणून त्यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते आणि त्यांच्या विषयीची माहिती स्मरणिकेत किंवा पत्रकात असते. सनातनमध्ये अनेक साधक संत झाले असल्यामुळे त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सनातन प्रभात नियतकालिकांत प्रकाशित करण्यात येतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले  
पू. सदाशिव (भाऊ) परब
     पू. सदाशिव (भाऊ) परबकाका यांच्या समवेत सेवा करतांना साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत. 
१. श्री. विलास महादेव महाडीक, मुंबई
१ अ. नवीन जप करतांना आरंभी जप विसरायला होऊन सेवेत चुका होणे : दैनिक सनातन प्रभातमध्ये सांगितल्याप्रमाणे नवीन जप करायला मी त्याच दिवशी आरंभ केला. मला प्रथम जप करायला नीट जमत नव्हते. मला कधी जपाची पहिली ओळ, तर कधी मधली ओळ आठवायची नाही. माझ्या सेवेत चुका होऊ लागल्या. तेव्हा पू. भाऊकाका माझे दोष सांगून मला प्रक्रियेकडे लक्ष द्यायला सांगायचे.

बाह्य अवडंबरात धन्यता मानणारे अन्य संत आणि बाह्य अवडंबरात न अडकता साधकांच्या उद्धारासाठी झटणारे परात्पर गुरु श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
श्री. आनंद जाखोटिया
    संत चोखा मेळा यांनी एका अभंगात म्हटले आहे, ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥ उज्जैन येथील सिंहस्थ पर्वात नावाजलेल्या साधू-संतांकडे असणारी लोकांची ओढ पाहून या अभंगाची आठवण आली.
    या सिंहस्थ पर्वात काही साधू-संतांचे जे काही स्थूल निरीक्षण झाले, त्यातून परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले यांच्या संदर्भात लक्षात आलेल्या वेगळेपणाची ठळक सूत्रे येथे मांडत आहे. या स्थुलातील सूत्रांतूनही प.पू. गुरुदेव असाधारण आहेत, हे स्पष्ट होते.
 

- श्री. आनंद जाखोटिया, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.५.२०१६)

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
    सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. उमेश शेणै यांनी सांगितलेली सूत्रे

पू. उमेश शेणै
     पू. उमेश शेणै यांचा ज्येष्ठ अमावास्या (४.७.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी साधनेविषयी सांगितलेली सूत्रे येथे देत आहोत.
पू. उमेश शेणै यांच्या चरणी
सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
सतत इतरांना आनंद देणे
    आपण नेहमी आनंदीच राहायला हवे. आपण नेहमी इतरांना आनंद द्यायचा आणि इतरांचे दुःख घ्यायचे. इतरांना आनंद दिल्याने त्यांच्याकडून आपल्याला आनंद मिळतो आणि आपला आनंद आणखी वाढतो.
प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारणे
    आपण आपल्या नियोजित सेवा करत असतो; परंतु अचानक दुसरी कुठली सेवा आली की, ती करण्यात कशा अडचणी आहेत वा येतील, याचा आपण विचार करत रहातो आणि त्या सेवेला बहुतेक वेळा नकार देतो. त्यामुळे आपल्यात नकारात्मकता निर्माण होते. सेवेला नकार दिल्याने देवाचे साहाय्यही मिळत नाही. त्यामुळे येणारी परिस्थिती आनंदाने स्वीकारण्यातच आपली प्रगती होते.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

प.पू. पांडे महाराज
१. आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा त्यांच्याकडे
केवळ बाह्यांगाने न पहाता अंतरात्म्याकडे लक्ष देणे आवश्यक असणे
    आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा आपण आपल्यावरील आवरणाकडे लक्ष देत असतो; पण त्याच्यातील कार्य करणार्‍या भगवंताकडे आपले लक्ष नसते. आपण त्यांच्या दोषांशी एकरूप न होता त्यांच्या स्थितीत जाऊन त्यांना दोष घालवायला कसे साहाय्य करता येईल ?, याचा विचार करायला हवा. आपण त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता त्यांच्यातील अंतरात्म्याकडे लक्ष द्यायला हवे.
२. कार्य सत्य नसून कार्याचा कर्ता करविता ईश्‍वरच खरा सत्य होय !
    कार्याचे व्यक्त स्वरूप आपल्यात दृष्यमान होत असते. त्यालाच आपण सत्य समजण्याची चूक करतो. प्रत्यक्षात कार्याचा कर्ता करविता (मन आणि ईश्‍वर) अव्यक्त असून तोच खरा सत्य असतो. अशा प्रकारे असत्याला सत्य मानल्याने सूक्ष्मातील ईश्‍वराशी आपले अनुसंधान रहात नाही. वास्तविक अव्यक्तच श्रेष्ठ असते.

हसतमुख, गुणी, संत अन् उन्नत यांच्याकडे आकर्षित होणारी आणि सात्त्विकतेची अन् देवाची आवड असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देहली येथील चि. कश्यपी मकरंद तांबे (वय १ वर्ष) !

चि. कश्यपी मकरंद तांबे
      चि. कश्यपी मकरंद तांबे हिचा (३.७.२०१६) या दिवशी म्हणजे ज्येष्ठ कृष्ण पक्ष चतुर्दशीला पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि नातेवाईक यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. सौ. मुक्ती मकरंद तांबे (चि. कश्यपीची आई), देहली
१ अ. वयाच्या मानाने अधिक चपळ असणे : चि. कश्यपी तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा फार चपळ आहे. बसणे, धरून उभे रहाणे, घोडा-घोडा करून चालणे, अशा हालचाली ती साडेसहा मासांची असतांनाच करू लागली.
१ आ. आवड-निवड अल्प असणे : तिला जेवण भरवतांना ती विशेष त्रास देत नाही. जेवणातील सर्व पदार्थ ती आवडीने खाते. तिच्या आवडी-निवडी अल्प आहेत. दही आणि लोणी मात्र तिला पुष्कळ आवडते. ती १० मासांची असतांना पालेभाजी आणि कारले आवडीने खात असे.

तळमळीने सेवा करणार्‍या आणि अंतर्मुख असणार्‍या देवद आश्रमातील कु. अदिती पवार !

कु. अदिती पवार
    ज्येष्ठ कृष्ण पक्ष चतुर्दशी (३.७.२०१६) या दिवशी देवद येथील मागणी पुरवठा विभागातील ग्रंथ विभागात सेवा करणार्‍या कु. अदिती पवार यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त देवद आश्रमातील साधिकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. कु. राजश्री हेम्बाडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ अ. सेवेची तीव्र तळमळ
१ अ १. कोणतीही आश्रमसेवा आनंदाने करणे :
अदितीला कधीही आश्रमसेवा सांगितली, तरी ती मी आता दमले आहे, असे कधीही म्हणत नाही. तिला बरेे वाटत नसेल, तरीही ती विश्रांती घेऊन आश्रमसेवा पूर्ण करते. तसेच विभागातील एखादा साधक आजारी असेल आणि त्याची आश्रमसेवा करण्यास कुणी साधक उपलब्ध होत नसेल, तर ती स्वत: एकाच दिवशी दोन आश्रमसेवा करते. यातून तिची आश्रमाविषयीची आपुलकी, आपलेपणा, आश्रम माझा वाटणे या गुणांचे दर्शन होते.

व्यष्टी आणि समष्टी साधनेसंदर्भात काही कृतीच्या स्तरांवरील सूत्रे

     २७ ते ३० जून २०१६ या काळात रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे अखिल भारतीय साधनावृद्धी शिबीर झाले. या निमित्ताने व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात येणार्‍या अडचणींना सामोरे कसे जावे याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातील काही सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. शिकण्यातील आनंद केवळ अध्यात्मात मिळतो !
      शिकण्यातील आनंद केवळ अध्यात्मात मिळतो आणि तो आयुष्यभर मिळवता येतो; कारण अध्यात्मातील ज्ञान अनंत आहे. याउलट मायेतील वैद्यकीय, अभियांत्रिकी, वाणिज्य इत्यादी सर्वच विषयांतील ज्ञान अत्यंत थिटे असल्यामुळे ते काही वर्षांतच शिकून पूर्ण होते. त्यामुळे पुढे शिकण्यातील आनंद मिळत नाही.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन
१. तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने पहाता, त्याच भावनेने मी तुमच्याकडे पहातो.
२. आपल्याकरिता कुणी नाही, आपण सर्वांकरिता आहोत.
३. दरिद्रका मुंह नहीं देखता । गरीबका साथ नहीं देता । लखपतीके घर नहीं जाता । धनवानके घर रहता हूं ।
भावार्थ : दरिद्र, गरीब हे शब्द नाम न घेणार्‍याच्या संदर्भातील आहेत. लखपती हा मायेसंबंधातील, तर धनवान हा नाम घेणार्‍या साधकाला उद्देशून आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
देशाचे खरे शत्रू आहेत बुद्धीप्रामाण्यवादी !
      देशाचे खरे शत्रू बुद्धीप्रामाण्यवादी आहेत. त्यांनी हिंदूंची धर्मावरील श्रद्धा डळमळीत केली. त्यामुळे हिंदूंची एकजूट संपली. याउलट ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यात धर्मासंदर्भात बुद्धीप्रामाण्यवादी नसल्याने त्यांच्यात एकजूट आहे. त्यामुळे त्यांनी बहुसंख्य हिंदूंची आणि भारताची स्थिती अत्यंत केविलवाणी केली आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेला १५ दिवस शिल्लक

आपल्या गुरूंकडून आणि इतर संतांकडून जे ज्ञान मिळाले, ते शिष्याला उदार हस्ते देण्याची गुरूंना तळमळ असते.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सन्मार्गावरून चालण्याचे महत्त्व ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      सत्प्रवृत्ती अंगी बाणवणे आणि तशी इच्छा होणे हे चांगलेच; पण चित्तवृत्ती संपूर्णपणे 
सन्मार्गाला लागणे, हा मनुष्य जीवनातील सुवर्णक्षण होय ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

इसिसचे मसिहा !

संपादकीय 
     भाग्यनगरमध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने इसिसचा तळ उद्ध्वस्त केला असून पाच जणांना अटक केली आहे. भारतात आतंकवादी आक्रमण आणि आतंकवाद्यांना अटक ही आता नित्याची गोष्ट झाली आहे; मात्र भाग्यनगर येथील घटनेला एक वलय प्राप्त झाले आहे. कारणही तसेच आहे. या पाच जणांच्या सुटकेसाठी एम्आयएम्चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी मसिहा बनून धावून आले आहेत. ओवैसी यांनी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या धर्मांधांना त्यांचा पक्ष कायदेशीर साहाय्य देणार, असे घोषित केले आहे. त्यांनी हे युवक निरपराध सुटल्यास त्यांना अटक करणार्‍या अधिकार्‍यांना यंत्रणा शिक्षा करणार का ?, असे थेट आव्हानही दिले आहे.

इसिसचे संकट !

संपादकीय 
     बांगलादेशाची राजधानी असलेल्या ढाका शहरात इसिसच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर काही गंभीर बाबी पुढे येत आहेत. आक्रमण करण्यासाठी आलेल्या जिहादी आतंकवाद्यांनी उपाहारगृहातील लोकांना त्यांचा धर्म विचारला आणि नंतर गैरमुसलमानांना ठार मारले. यामध्ये एका हिंदु युवतीचाही समावेश होता. बांगलादेशात बांगलादेशी हिंदू तर वास्तव्य करत आहेतच; पण त्याचबरोबर तेथील वस्त्रोद्योग निर्मितीच्या क्षेत्रात जवळ जवळ ५ लाख भारतीय बांगलादेशात वास्तव्य करत आहेत. आता यांतील बहुतांश हिंदूच आहेत, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेबरोबरच तेथे कामानिमित्त गेलेल्या या भारतियांच्या सुरक्षेचे दायित्वही भाजप शासनावर आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn