Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज अंगिरसऋषी जयंती 
--------------
पू. (सौ.) सूरजकांता मेनराय
सनातनच्या ४५ व्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांचा आज वाढदिवस !
भेटी लागी जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥

बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदु पुजार्‍याची गळा चिरून हत्या !

     हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) अन्य धर्मियांचे काय होणार यासाठी गळा काढणारे, मुसलमानबहुल देशात हिंदूंचे गळे चिरले जातात, तेव्हा तोंड उघडत नाहीत !
     ढाका - बांगलादेशमध्ये हिंदूंचा वंशसंहार चालू असून आता आणखी एका हिंदु पुजार्‍याची हत्या करण्यात आली आहे. जैनैदाह जिल्ह्यातील एका मंदिरातच श्यामनोंद दास नावाच्या ४५ वर्षीय पुजार्‍याची गळा चिरून हत्या करण्यात आली. दास सकाळी पूजेची सिद्धता करत असतांना दुचाकीवरून आलेल्या ३ तरुणांनी मंदिरात घुसून त्यांची गळा चिरून हत्या केली. स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रमुख हसन हफीजुर रहमान म्हणाले की, दास अनेक मंदिरांत पूजा करत होते. गुरुवारी ते या मंदिरात आले होते.
१. यापूर्वी झालेल्या हिंदु पुजार्‍यांच्या हत्येत आणि या हत्येत साम्य असल्याचे जिल्हा प्रशासन प्रमुख महबूर रहमान यांनी सांगितले. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
२. पोलीस म्हणतात, हिंदु पुजार्‍यांवर का आक्रमणे होत आहेत, हे आम्हाला माहीत नाही, तसेच कुणीही याचे दायित्व घेतलेले नाही. तरीही या मागे इसीस असण्याची शक्यता आहे; मात्र बांगलादेश सरकार देशात इसीसचे अस्तित्व नसल्याचे सांगते. यामागे स्थानिक आतंकवादी संघटना कार्यरत आहेत.

केंद्रसरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी विधी आयोगाकडून मत मागवल्याची चर्चा !

     नवी देहली - केंद्रसरकार समान नागरी कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे वृत्त झी न्यूज वाहिनीने दिले आहे. केंद्रीय विधी आयोगाकडे या संदर्भात अभ्यास करून सल्ला मागण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे; मात्र सरकारकडून याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा सल्ला मागण्यात आला आहे. सध्या देशात हिंदु आणि मुसलमान यांच्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत. यामुळे अनेक विषयांत निर्णय घेतांना समस्या निर्माण होते. सर्वोच्च न्यायालयानेही सरकारला समान नागरी कायदा लागू करण्याचे निर्देश दिले होते.

पॅरिस आणि ब्रुसेल्स प्रमाणे भारतात आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते इसीसचे आतंकवादी !

     नवी देहली - भाग्यनगर येथून अटक करण्यात आलेल्या इसीसच्या ५ आतंकवाद्यांच्या चौकशीतून विविध माहिती समोर येत आहे. हे आतंकवादी पॅरिस आणि ब्रुसेल्स येथे झालेल्या आक्रमणाप्रमाणे भारतात आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते, असे उघड झाले आहे. ते पोलीस ठाणे, मंदिर, अतिमहनीय व्यक्ती यांना लक्ष्य करणार होते. त्यांच्याजवळून जप्त करण्यात आलेले ट्रायसेटोन ट्रायपरऑक्साइड हे अत्यंत धोकादायक स्फोटक आहे. याचा वापर पॅरिस आणि ब्रुसेल्स येथे झालेल्या स्फोटांमध्ये वापरण्यात आले होते. याच्या वापरामुळे धातूच्या डिटोनेटरचा वापर आवश्यक नसतो. 

आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील मंदिरे विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचा डाव !

विकासाच्या आड केवळ हिंदूंचीच मंदिरे कशी येतात ?
अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या विषयी सर्वच राज्यकर्ते शेपूट घालतात !
     विजयवाडा - येथील प्रकाशम बांधाजवळ असलेले प्राचीन विजयेश्‍वर स्वामी मंदिर पाडण्याचे प्रयत्न सत्ताधारी तेलगू देसम पक्षाच्या सरकारने चालू केले असल्याने हिंदूंमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक संत आणि हिंदू भाविकांनी मोर्चे काढून निषेध व्यक्त केला आहे. या आधीही सेन्ट्रल रोडवरील विनायक मंदिर पाडून टाकण्यात येईल, असेही म्हटले जात होते.

उत्तराखंडमध्ये ढगफुटी ८ ठार, ३० बेपत्ता

अलकनंदा, शरयू आणि गोमती नद्यांना पूर
     डेहराडून - उत्तराखंडच्या वरच्या भागात मुसळधार पाऊस आणि ढगफुटी यांमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चमोली येथे ढगफुटीमुळे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर पिथौरागड येथे अनेक नागरिक ढिगार्‍याखाली दबले गेले आहेत. ३० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचेही सांगण्यात येत आहे. नद्यांवर बांधण्यात आलेले तात्पुरते पूल वाहून गेले आहेत. बचावकार्य चालू आहे. अधिकृत माहितीनुसार मुसळधार पावसामुळे अलकनंदा नदी, बागेश्‍वरमध्ये शरयू आणि गोमती या नद्यांनी धोक्याची मर्यादा ओलांडली असून त्यांना पूर आले आहेत. ग्रामीण भागाशी संपर्क तुटला आहे. भूस्खलन झाल्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संभाजी ब्रिगेडवर बंदी घालण्याची अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाची मागणी !

  • संभाजी ब्रिगेडने सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केल्याचे प्रकरण !
  • सनातन संस्थेच्या पाठीशी रहाणार्‍या अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे आभार !
     ठाणे - संभाजी ब्रिगेडने सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केल्याचे वृत्त दैनिक लोकमतच्या ३० जून या दिवशीच्या अंकात वाचनात आले. सरकारने जर ही मागणी अमलात आणली नाही, तर राज्यभर आंदोलन केले जाईल, अशी धमकीही संभाजी ब्रिगेडने दिली आहे. आमच्या महासंघाच्या वतीने आम्ही अशा मागणीविषयी संभाजी ब्रिगेडचा निषेध करतो. त्यांनी ही मागणी करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असे परखड मत अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ता श्री. दिलीप अलोणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले. या पत्रकात पुढे म्हटले आहे की, सनातन संस्था करत असलेल्या हिंदु धर्मरक्षणाच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे अल्पच आहे, तसेच तिची राष्ट्रभक्ती आणि संसदीय मार्गांवरील विश्‍वास या गोष्टी वादातीत आहेत. हिंदु धर्म रक्षणाचे कार्य करणार्‍या अशा संघटना शिल्लक राहू नयेत; म्हणून संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असतात. याविषयी आम्ही मुख्यमंत्र्यांना संभाजी ब्रिगेड आणि तत्सम राष्ट्रद्रोही संघटना यांवर बंदी घालावी म्हणून निवेदन दिले असून त्याचा पाठपुरावाही करणार आहोत.

भारतभरातील विविध ठिकाणचे सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांचे बारीक लक्ष !

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे
कार्यकर्ते यांच्या मागे पोलिसांच्या चौकशीचा वाढता ससेमिरा ! 
पोलिसांनी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याऐवजी तोच
वेळ आतंकवाद्यांच्या शोधासाठी वापरला असता, तर देश आतंकवादमुक्त झाला असता !
१. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी रेल्वेतून गोव्याकडे येणारे
समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक यांच्यावर लक्ष ठेवणारे पोलीस !
     गोवा येथे नुकतेच पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात देशभरातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या अधिवेशनासाठी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक मुंबई येथून रेल्वेने गोवा येथे जात असता एक पोलीस अन् त्याच्यासोबत असलेले अन्य २-३ जण त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून होते. प्रत्येक स्थानक आल्यावर हा पोलीस कार्यकर्ते आणि साधक यांच्या बाजूला येऊन उभा रहायचा अन् भ्रमणभाषवरून, तसेच लघुसंदेश यांद्वारे कुणाच्यातरी संपर्कात होता.

अमरनाथ यात्रेला आरंभ !

     जम्मू - १ जुलैला अमरनाथ यात्रेकरूंच्या पहिल्या पथकाला जम्मू-कश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर यात्रेला प्रारंभ झाला. यात १ सहस्र २८३ यात्रेकरू आहेत. या वेळी सिंह म्हणाले की, यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी शासनाने सर्वप्रकारची व्यवस्था केली आहे.

(म्हणे) सनातन संस्थेवर बंदी घालणे आणि कर्नाटकात (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा करणे, यांसाठी प्रयत्न करणार !

अंनिसचे अविनाश पाटील यांचा हिंदुद्वेष !
तिन्ही हत्यांचे अन्वेषण जलदगतीने करण्याच्या मागणीसाठी २० जुलैपासून देहलीत आंदोलन करणार
     बेळगाव, १ जुलै (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम्.एम्. कलबुर्गी यांच्या खुनाचे अन्वेषण राजकीय इच्छाशक्तीअभावी रेंगाळले आहे. या अन्वेषणाला गती मिळावी, यासाठी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन छेडून शासनावर दबाव घालण्यात येणार आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी. याचसमवेत कर्नाटकमध्येही (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा संमत करण्यात यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रामलिंग खिंड गल्ली येथील अंनिसच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

विधानसभा निवडणुकीपूर्वीच गोव्यात हज हाऊसची पायाभरणी - शेख जीना, भाजप

धर्मांधांसाठी हज हाऊस उभारणार्‍या भाजपने हिंदूंसाठी कधी काही केले आहे का ?
     मडगाव - आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच गोवा हज हाऊसची पायाभरणी करण्यात येणार आहे. यासंबंधी कागदोपत्री व्यवहार पूर्ण झालेले आहेत. हे हज हाऊस दाबोळी विमानतळाजवळ बांधण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय हज समितीचे उपाध्यक्ष तथा भाजपचे नेते शेख जीना यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
     शेख जीना पुढे म्हणाले, गोव्यातील भाजप शासन अल्पसंख्यांक आयोग स्थापण्यासंदर्भातील सर्व अडचणी दूर करणार आहे. गोव्यातील भाजप शासन हज समितीतील सदस्यांची निवड योग्यरित्या करत आहे, तर पूर्वी केंद्रातील काँग्रेस शासन हज समितीतील सदस्यांची निवड निवडणूक घेऊन करण्याऐवजी स्वत:च्या मर्जीने करत असे.

चेकमेट आस्थापनावर दरोडा टाकणार्‍या ६ जणांना अटक

     ठाणे - येथील पोलिसांनी चेकमेट आस्थापनावर दरोडा टाकून ९ कोटी रुपये पळवणारे आस्थापनाच्या आजी-माजी कर्मचार्‍यांसह सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ कोटी १९ लाख रुपये कह्यात घेण्यात आले आहेत. अजून ५ कोटी रक्कम मिळवणे बाकी आहे. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि ठाणे पोलीस आयुक्त परवींदर सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. (पोलिसांनी अशीच तत्परता अन्य गुन्ह्यांच्या संदर्भातही दाखवावी ! - संपादक) अटक केलेले बहुतेक जण नाशिक परिसरातील आहेत. खबर्‍यांची माहिती आणि तंत्रज्ञानाचे साहाय्य घेऊन आरोपींपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितलं. आरोपींनी दरोडा टाकल्यानंतर शहराबाहेर रक्कम वाटून घेतली आणि वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले होते.

रामनाथी (गोवा) येथे अखिल भारतीय साधकत्ववृद्धी तथा धर्मप्रसार नियोजन शिबिराला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !

      रामनाथी, १ जुलै (वार्ता.) - सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात १ जुलैपासून अखिल भारतीय साधकत्ववृद्धी आणि धर्मप्रसार नियोजन शिबिराचा भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सनातन संस्थेच्या साधकांसाठी असलेले हे शिबीर ४ दिवस चालणार आहे. या शिबिरात साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असून वर्षभरातील धर्मप्रसाराच्या कार्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
साधनेत मनाचा अडथळा दूर होण्यासाठी मनातील विचार मोकळेपणाने
मांडले पाहिजे ! - पू. (कु.) अनुराधा वाडेकर, प्रसारसेविका, सनातन संस्था
     या वेळी उपस्थित साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करताना सनातनच्या प्रसारसेविका पू. (कु.) अनुराधा वाडेकर म्हणाल्या, स्थुलातून ज्याप्रमाणे आपण घर स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे शरिराने सेवा केल्याने शरिराची, तर स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रिया केल्याने मन अन् बुद्धी यांची शुद्धी होते. स्वभावदोष आणि अहं यांमुळे भावजागृतीत अडथळे निर्माण होऊन देवाचे अस्तित्व अनुभवता येत नाही. आपण भूतकाळात न रहाता सतत वर्तमानकाळात राहून शिकण्याच्या स्थितीत रहायला हवे. आपले मन ईश्‍वराच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करायला हवा. साधनेत मनाचा अडथळा दूर होण्यासाठी मनामध्ये येणारे विचार मोकळेपणाने मांडले पाहिजे.

पांडवांप्रमाणे धर्मकार्यात सहभागी होऊन गुरुकृपेस पात्र होऊया ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समिती आयोजित अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिराचा समारोप
     सनातन आश्रम, रामनाथी, १ जुलै (वार्ता.) - साधनावृद्धी करून ब्राह्मतेजासह धर्मकार्य करण्याच्या निर्धारात आणि संतांच्या आशीर्वचनात हिंदु जनजागृती समिती आयोजित अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिराची ३० जून या दिवशी सांगता झाली. या वेळी शिबिरार्थींना मार्गदर्शन करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ज्याप्रमाणे महाभारतामध्ये धर्माच्या बाजूने लढणारे पांडव भगवान श्रीकृष्णाच्या कृपेस पात्र ठरले, रामायणातही वानर आणि खार यांची धर्माप्रतीची समर्पित वृत्ती पाहून प्रभु श्रीरामचंद्रांनी त्यांचा उद्धार केला, त्याप्रमाणे आपण सर्वांनी धर्मकार्यात सहभागी होऊन गुरुकृपेस पात्र होऊया. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, तेव्हा गोपगोपींनी आपली साधना म्हणून काठी लावून योगदान दिले, त्याप्रमाणे आज आपल्यालाही धर्मकार्यात साधनारूपी काठी लावून योगदान द्यायचे आहे. पुढे येणारा आपत्काळ तीव्र असल्याने सर्वांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांकडून भाव आणि आज्ञापालन हे गुण सर्वांनी शिकायला हवेत.

डॉ. तावडे यांच्या विरोधात खोटे पुरावे देणारे साडविलकर हे सीबीआयने विकत घेतलेले साक्षीदार ! - समस्त हिंदुत्ववादी संघटना, कोल्हापूर

निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे (बसलेले) यांना निवेदन देतांना धर्माभिमानी हिंदू
राष्ट्र्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याचीही मागणी !
     कोल्हापूर, १ जुलै (वार्ता.) - डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्र्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याविषयी ठोस भूमिका घ्यावी, अशा मागण्यांचे निवेदन समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेने श्री महालक्ष्मी मंदिर आणि अन्य ३ सहस्र ६६ मंदिरे यांतील भूमींचे खाणकामाचे, मौल्यवान दागिन्यांचे असे कित्येक घोटाळे बाहेर काढले. त्यात चांदीच्या रथाच्या कंत्राटात चांदी खाल्ल्याचा आरोप संजय साडविलकर यांच्यावर आहे. हा घोटाळा बाहेर काढल्यावर त्याविषयी सीआयडीचौकशी करण्यात यावी, यासाठी मोठे आंदोलन उभे करण्यात आले. या प्रकरणात सनातन संस्थेमुळे आपल्या पोटावर पाय येईल आणि आपण कारागृहात जाऊ, अशी भीती अनेकांना वाटत असून या भीतीतूनच साडवलकर यांनी सनातनवर खोटे आरोप करण्याचे काम चालू केले आहे. डॉ. तावडे यांच्या विरोधात खोटे पुरावे देणारे साडविलकर हे सीबीआयने विकत घेतलेले साक्षीदार आहेत, अशी दाट शंका आम्हाला येते, असेही या संघटनांनी निवेदनात म्हटले आहे.

पठाणकोटवर संभावित पॅरा मोटर्स, ग्लायडर्स आणि ड्रोन विमाने यांद्वारे आतंकवादी आक्रमणाची शक्यता !

प्रत्येक वेळी आतंकवादाच्या भक्ष्यस्थानी पडण्यापेक्षा एकदाच शत्रूला धडा का शिकवत नाही ? 
वायूदलाच्या अधिकार्‍यांकडून जनजागृती
     पठाणकोट - शहरावर काही आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय वायूदलाच्या अधिकार्‍यांनी एअरबेसच्या परिसरातील भागामध्ये घरोघरी जाऊन जागृती अभियान राबवून संभावित आतंकवादी आक्रमणाविषयी लोकांना जागृत केले. या वेळी अधिकार्‍यांनी आकाशात उडणारे पॅरा मोटर्स, ग्लायडर्स आणि ड्रोन विमाने यांची छायाचित्रे दाखवून लोकांना दक्ष रहाण्यास सांगितले. सूत्रांनुसार पॅराग्लायडर्स रडारद्वारेही पकडू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आकाशात दिसल्यास त्वरित त्याविषयी सूचना देण्यास सांगण्यात आले. पठाणकोट एअरबसवर आक्रमण होण्याची गुप्तचर विभागाला माहिती मिळाल्यावर ही खबरदारी घेण्यात आली.

आराखड्यामुळे मंदिराचे सौंदर्य, भव्यता आणि हवेशीरपणा नाहीसा होणार ! - भाविकांचे मत

अभ्यास न करताच २५५ कोटी रुपयांच्या श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्याची सिद्धता ?
     कोल्हापूर, १ जुलै (वार्ता.) - श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सिद्ध करतांना फोट्रेस आस्थापनाने सामान्य नागरिक, व्यापारी, अधिकारी, भाविक यांच्या मानसिकतेचा आणि शहर, शहरातील मोकळ्या भूमी, शहरातील ३६५ दिवसांतील परिस्थिती यांचा अभ्यास न करताच २५५ कोटी रुपयांचा आराखडा केला आहे. विकास म्हणजे इमारतनिर्मिती नव्हे. फोट्रेस आस्थापनाने बनवलेल्या आराखड्यामुळे सौंदर्य, मोकळेपणाने परिसराला येणारी भव्यता आणि हवेशीरपणा नाहीसा होणार आहे. आराखड्याच्या नावे होणारी इमारतींची गर्दी रस्त्याची आणि माणसांच्या भावनांची कुचंबणा करणारी ठरू शकते. याचा गांभिर्याने विचार केला पाहिजे, असे अभ्यासपूर्ण आणि परखड मत श्री. रमेश श्रीधर कुलकर्णी या भक्ताने नोंदवलेले असून ते वास्तवास धरून आहे.

प्रभावी प्रसारमाध्यमांची योजना सिद्ध करून कन्यागत महापर्वकाळ सोहळा सर्वदूर पोहोचवा ! - पालक सचिव राजगोपाल देवरा

     कोल्हापूर, १ जुलै (वार्ता.) - शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्वकाळ सोहळा सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रभावी प्रसारमाध्यमांची योजना सिद्ध करून कार्यवाही करावी, अशी सूचना पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी केली. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे १२ ऑगस्टपासून चालू होणार्‍या कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यानिमित्त चालू असलेल्या कामांचा देवरा यांनी ३० जून या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. या वेळी आमदार उल्हास पाटील, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
     कन्यागत महापर्वकाळ २०१६ साठी करण्यात आलेल्या आराखड्यानुसार सर्व विभागांनी कार्यवाही करावी. या कामास संबंधित यंत्रणांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यानिमित्त करावयाच्या कामांचे बारकाईने नियोजन करून सर्व विभागांनी कार्यवाही करावी, अशी सूचनाही पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी केली.


ग्यानबा-तुकाराम आणि श्री विठ्ठलनामाच्या गजरात दोन्ही पालख्यांचे पुणे येथून प्रस्थान

     पुणे, १ जुलै - ग्यानबा-तुकाराम आणि श्री विठ्ठलाचे नाम यांच्या गजरात पुणे मुक्कामी असलेली संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाल्या. 
     संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी लोणी काळभोर मार्गे पंढरपूरकडे, तर संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांची पालखी सासवडमार्गे पंढरपूरला निघाली आहे. या दोन्ही पालख्या ३० जून या दिवशी पुणे मुक्कामी होत्या. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी पहाटे पूजा करून १ जुलै या दिवशी सकाळी ६ वाजता अनुक्रमे पालखी विठोबा मंदिर आणि श्री निवडुंग विठोबा मंदिर येथून प्रस्थान ठेवले. माऊलींच्या पालखीचा सकाळचा विसावा महादजी शिंदे छत्री येथे झाला, तर दुपारचा विसावा उरुळी देवाची, वडकीनाला, झेंडेवाडी येथे झाला. रात्रीचा मुक्काम सासवड येथे असणार आहे. सासवड येथे दोन दिवस पालखीचा मुक्काम असेल. ३ जुलै या दिवशी पालखी जेजुरीकडे मार्गस्थ होईल.(म्हणे) भारताने २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचे अतिरिक्त पुरावे न दिल्याने खटला प्रलंबित !

डावपेचात भारतापेक्षा हुशार असलेल्या पाकचा कांगावा !
     इस्लामाबाद - भारताने पुरावे न दिल्यामुळे २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा खटला प्रलंबित आहे, असा कांगावा पाकिस्तानचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीस झकारीया यांनी इस्लामाबाद येथील एका पत्रकार परिषदेत केला. 
१. मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा कट रचल्याच्या प्रकरणी लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचा प्रमुख झकी उर् लख्वी याच्यासह अन्य ६ जणांवर असलेला हा खटला पाकिस्तानात चालू आहे. हा खटला ६ वर्षांपेक्षा अधिक काळ रेंगाळला असून लवकर पूर्ण केला जावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
२. झकारीया यांनी पुढे म्हटले आहे की, त्यांनी हा खटला लवकर पूर्ण करण्यासाठी भारताच्या परराष्ट्र सचिवांकडे अतिरिक्त पुरावे देण्याची मागणी केली होती; मात्र भारताने त्यावर अजून कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही. झकारीया यांनी हे पत्र कधी पाठवले हे सांगितलेले नाही. (आजपर्यंत भारताने दिलेल्या पुराव्यांचे पुढे काय झाले, हे पाक सांगेल का ? पठाणकोटच्या आतंकवादी आक्रमणाविषयीही भारताने पुरावे दिले होते; मात्र पाकने ते फेटाळून लावले. पुरावे मिळूनही त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करणार्‍या पाकच्या या कांगाव्याला भारत चोख प्रत्युत्तर देईल का ? - संपादक)

जम्मू येथे २ वर्षांपूर्वी मंदिराची विटंबना करणारा धर्मांध घरात मृतावस्थेत आढळला !

     जम्मू - गेल्या ३-४ दिवसांत जम्मूतील रूपनगर आणि नानकनगर येथील मंदिरांच्या विटंबनाच्या घटना ताज्या असतांनाच २ वर्षांपूर्वी त्रिकुटनगर येथील शिव मंदिरात मूर्तीवर गोळीबार करणारा २१ वर्षीय धर्मांध तरुण सैद शाह बुखारी त्याच्याच घरात गुरुवारी मृतावस्थेत आढळला.
     सैद शाह बुखारी हा डॉ. मुमताज बुखारी यांचा मुलगा असून नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे माजी आमदार मुश्ताक बुखारी यांचा पुतण्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सैद शाह बुखारी हा सकाळी त्याच्या पलंगावर मृतावस्थेत आढळला. त्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव झाला होता. 
     मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस करत असून या प्रकरणी सैद याचा घरगडी यासिर शहंशाह याला पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले आहे.गोव्यातील कॅसिनोच्या विरोधात २ जुलैला महारॅली

     पणजी - गोव्यात वाढीस लागलेल्या कॅसिनो संस्कृतीच्या विरोधात २ जुलै या दिवशी आझाद मैदान, पणजी येथे महारॅली काढण्यात येणार असल्याची माहिती आम औरत आदमी अगेन्स्ट गॅम्बलींग (एएएएजी) या अशासकीय संस्थेच्या निमंत्रक सबिना मार्टीन्स यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.
    सबिना मार्टीन्स पुढे म्हणाल्या, गोव्यातील शासन लोकांसाठी कार्य करण्यास अपयशी ठरले आहे आणि आता लोकांनी याविरोधात आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. गोव्यात वाढत असलेल्या कॅसिनो विकृतीच्या विरोधात आयोजित केलेल्या महारॅलीमध्ये समस्त गोमंतकियांनी सहभागी होणे आवश्यक आहे. मांडवी येथे येऊ घातलेल्या नवीन कॅसिनोला आमचा विरोध आहे. लोकांचा कॅसिनोला विरोध असतांना, तसेच मांडवीतून कॅसिनो बाहेर काढण्याचे आश्‍वासन देऊनही भाजप शासन नवीन कॅसिनोंना अनुज्ञप्ती देत आहे. राज्यात भूमीवरील किंवा तरंगत्या अशा कोणत्याही प्रकारच्या कॅसिनोंना अनुज्ञप्ती देऊ नये. कॅसिनोला राज्यात प्रवेश देण्यासाठी गोवा गॅम्बलींग कायद्यात जो पालट करण्यात आला आहे तो रहित करावा.

स्विस बँकेतील भारतियांच्या काळ्या पैशांत २५ टक्क्यांची घट !

बँकेतून हा काळा पैसा काढला गेेला, तर तो कुणी काढला ? या बँकेतील सर्व काळा पैसा, हा लाचखोरीतला 
आणि कर न भरलेला असल्याने तो जप्त करायला हवा. अशा प्रकारे स्विस बँकेतून काळा पैसा काढून 
घेऊन भ्रष्टाचारी नामानिराळे होण्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी !
     नवी देहली - स्विस नॅशनल बँकेने दिलेल्या आकड्यांनुसार स्विस बँकेत असलेल्या भारतियांच्या काळ्या पैशांत २५ टक्क्यांची घट झाली आहे. या बँकेत सध्या ८ सहस्र ३९२ कोटी रुपये शिल्लक आहेत. वर्ष १९९७ पासून स्विस बँकेत पैसे ठेवण्यास भारतियांना अनुमती मिळाली होती. तेव्हापासून आतापर्यंतची ही सर्वांत मोठी घट आहे. वर्ष २००६ मध्ये ठेवीचा आकडा २३ सहस्र कोटी होता. स्वित्झर्लंड भारताला काळा पैसा स्विस बँकेत ठेवणार्‍यांची माहिती देणार आहे. त्या दृष्टीने २०१८ मध्ये दोन्ही देशांमध्ये ऑटोमॅटिक एक्स्चेंज प्रणाली स्थापन होणार आहे. लवकरच एक पथक स्विस बँकेचा दौरा करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश धस यांची जामखेडच्या (जिल्हा नगर) तहसीलदारांना शिवीगाळ

जामखेड महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन
नैतिकताशून्य आणि गावगुंडांचा भरणा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष !
     जामखेड, १ जुलै - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी ३० जून या दिवशी येथील तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना दूरभाषवरून शिवराळ भाषेत शिवीगाळ करत दमबाजी केली. (या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस धस यांच्यावर कोणती कारवाई करणार आहे ? - संपादक) ही घटना तहसील कार्यालय, तलाठी आणि महसूल विभागासह अन्य सर्वच विभागांच्या कर्मचार्‍यांनी काम बंदचे आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे. (कर्मचार्‍यांनी असे आंदोलन करून राष्ट्राची हानी करण्यापेक्षा अन्य सनदशीर मार्गांचा अवलंब करावा ! - संपादक)
     सुरेश धस यांनी दूरभाष केल्यावर तहसीलदार बेल्हेकर यांना थेट शिवीगाळ करण्यास प्रारंभ केला. धस यांनी त्यांच्याशी अरे, तुरेची भाषा करत शिवराळ भाषेत दमबाजी केली. त्या वेळी तहसीलदारांनी दूरभाष केला नव्हता, असे सांगितले, तरीही धस हे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.

संत गजानन महाराज, संत मुक्ताई आणि संत एकनाथ महाराज यांच्या पालख्या बीडमध्ये दाखल

     बीड, १ जुलै - श्री विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराज, संत मुक्ताई आणि संत एकनाथ महाराज यांच्या मानाच्या पालख्या बीड जिल्ह्यात ३० जून या दिवशी दाखल झाल्या. शेगाव येथून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी परभणी जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे, तर संत मुक्ताई आणि पैठण येथून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी बीड जिल्ह्यात आली आहे. संत मुक्ताईच्या पालखीचा जिल्ह्यात ३ दिवस मुक्काम असणार आहे.

विरोधी पक्षनेते धनंजय मुडे यांची मध्यरात्री विशेष तपास पथकाकडून चौकशी

बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरण
     बीड, १ जुलै - बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळाप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विशेष तपास पथकाने ३० जूनच्या मध्यरात्री १२ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी केली. (मुंडे यांची चौकशी होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आणि त्यांना पक्षातून निलंबित करायला हवे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका जाहीर करेल का ? - संपादक) ही चौकशी दीड घंटा चालू होती. त्यांच्यासमवेत अमरसिंह पंडित यांचीही चौकशी करण्यात आली आहे. बीड जिल्हा बँकेच्या अवैधरित्या करण्यात आलेल्या कर्जवाटप प्रकरणी संभाजीनगर खंडपीठात विशेष पथकाने गोपनीय अहवाल सादर केला होता. त्यानंतर न्यायालयाने २३ जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित रहाण्याचे समन्स बजावले आहे.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे कालवश

     पुणे, १ जुलै - संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. रा. चिं. ढेरे (वय ८७ वर्षे) यांचे १ जुलै या दिवशी येथील त्यांच्या रहात्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी धार्मिक आणि संत साहित्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यावर १ जुलै या दिवशी दुपारी येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर या कन्या आहेत.
     डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय यांचा इतिहास जगासमोर मांडला. त्यांनी लिहिलेले श्री तुळजाभवानी आणि करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी हे दोन्ही ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ढेरे यांचा दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयाचा विशेष अभ्यास होता. त्यांनी विविध विषयांवरील १०५ पुस्तके लिहून महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेत मोलाची भर घातली. वर्ष १९८७ मध्ये त्यांना श्री विठ्ठल - एक महासमन्वय या ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवले होते. या व्यतिरिक्त त्यांना पुण्यभूषण पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा महर्षी वाल्मिकी पुरस्कार आणि अन्य काही पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते.

आजपासून दत्तावतारी महासाधू ब्रह्मचैतन्य श्रीअण्णाबुवा यांच्या १४४ व्या पुण्यतिथीचा उत्सवास प्रारंभ !

     मिरज, १ जुलै - प्रतिवर्षाप्रमाणे येथील शनिवार पेठ मिरज येथील दत्तावतारी महासाधू ब्रह्मचैतन्य श्रीअण्णाबुवा यांच्या १४४ व्या पुण्यतिथीचा उत्सव २ जुलै ते ८ जुलै या कालावधीत होत आहे. या निमित्ताने प्रतिदिन दुपारी ३.३० ते ४.३० महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, तसेच सायंकाळी ६.३० ते ८.३० कीर्तन होईल. ८ जुलै या दिवशी सकाळी ९ ते ११ काल्याचे कीर्तन, सकाळी ११ ते १२ पालखी सेवा, महाप्रसाद आणि सत्यनारायण पूजा होईल. तरी या उत्सवात भाविकांनी सहभागी होऊन श्रींच्या सेवेची संधी घ्यावी, असे आवाहन श्री अण्णाबुवा देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

माणुसकी शिकवण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक ! - प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज

     पुणे, १ जुलै (वार्ता.) - सध्याची मेकॉलेने दिलेली शिक्षणपद्धती ही स्वाभिमान गमवायला लावणारी आहे. आताची शिक्षणपद्धत जीविकेचे ज्ञान देणारी आहे. जीवनाचे ज्ञान अत्यावश्यक असून ते आपल्याला केवळ धर्मातून मिळते. सध्या जेवढे शिक्षण जास्त होते, तेवढा माणूस माणुसकीपासून दूर जातो. त्यामुळे माणुसकी शिकवण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. जन्माचे कल्याण करायचे असेल, तर संतांच्या साहित्याविना पर्याय नाही, असे मार्गदर्शक प्रतिपादन प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी केले.

प्रत्येकाच्या अंतरंगात छत्रपती शिवराय संचारावेत ! - प.पू. स्वामी गोविंददेवगिरी

     पुणे, १ जुलै (वार्ता.) - ज्या झाडाला आतून वाळवी लागली, त्या झाडाचे कुंपण रक्षण करू शकत नाही. आजचा समाज आतून पोखरला गेला आहे. हे पोखरण्याचे काम इंग्रजांनी बुद्धीभ्रंश करून केले आणि नंतर चंगळवादाने केले. त्यामुळे भारतियांची परंपरांवरची निष्ठा ढळली. आज सर्वत्र दिसणारी मीची भावना पूर्वी नव्हती. राष्ट्रउभारणीसाठी चारित्र्यवान लोकांचे संघटन निर्माण होण्याची आवश्यकता व्हावी. त्यासाठी प्रत्येकाच्या अंतरंगात छत्रपती शिवराय संचारावेत, असे धर्म आणि राष्ट्र रक्षणार्थ उद्युक्त करणारे आवाहन प.पू. स्वामी गोविंददेवगिरी (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी केले. छत्रपती शिवरायांचा पालखी सोहळा पुणे मुक्कामी असतांना येथील भावे शाळेच्या पटांगणावर शस्त्ररिंगण पार पडले. त्या वेळी उपस्थित धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज बोलत होते.

समलैंगिक तृतीयपंथीय नाहीत ! - सर्वोच्च न्यायालय

      नवी देहली - समलैंगिक आणि उभयलिंगी आकर्षण असणार्‍यांना कधीही तृतीयपंथीय म्हटलेले नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असून तृतीय पंथियांच्या संदर्भात वर्ष २०१४ मध्ये दिलेल्या त्याविषयीच्या आदेशात सुधारणा करण्यास नकार दिला. 
     न्यायालयाच्या आदेशात अस्पष्टता असल्याने या आदेशाची नेमकी कार्यवाही कशा प्रकारे करावी, असा संभ्रम निर्माण झाल्यामुळे न्यायालयाने त्यांच्या पूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा करावी, अशी विनंती केंद्रशासनाने केली होती. या वेळी न्यायालयाने सांगितले, समलैंगिक आणि उभयलिंगी आकर्षण असणारे तृतीय पंथियांमध्ये मोडत नाहीत, असे या आदेशात स्पष्टपणे लिहिण्यात आलेले आहे. त्या आधारेच तृतीयपंथीय कॅटॅगरी बनवली जावी. तृतीय पंथियांना इतर मासासवर्गीय समजून त्या आधारावर शिक्षण आणि नोकरी यांमध्ये आरक्षण दिले जावे, अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्त केली.तब्बल ३३ वर्षांनंतर भारतीय बनावटीचे पहिले लढाऊ विमान तेजस वायूसेनेत दाखल !

एवढ्या कूर्मगतीने स्वदेशी बनावटीच्या विमानांची निर्मिती करून देशाचे रक्षण होईल का ? 
     नवी देहली - भारतीय बनावटीचे पहिले सर्वांत हलके लढाऊ विमान तेजस १ जुलैपासून भारतीय वायूसेनेत दाखल झाले. हिंदुस्तान अ‍ॅरोनॉटीकल्स लिमिटेडने याची निर्मिती केली आहे. या विमानाच्या स्कॉड्रनची पहिली २ विमाने सेवेत सहभागी झाली. एका स्कॉड्रनमध्ये साधारणतः २० विमाने असतात. मिग २१ या रशियन बनावटीच्या विमानांची जागा घेण्यासाठी तेजस तयार करण्यात आले आहे. मिग- २१ ची जागा भविष्यात भारतीय बनावटीच्या विमानांनी घेतली जावी, यासाठी १९८० च्या दशकांत अशी लढाऊ विमाने बनवण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. वर्ष १९८३ पासून तेजसवर काम चालू असले, तरी अजूनही विमानाची केवळ ६० टक्के उपकरणे ही स्वदेशी बनावटीची आहेत.


७ व्या वेतन आयोगावर अप्रसन्न कर्मचार्‍यांची संप पुकारण्याची चेतावणी !

वेतनात २३.५ टक्क्यांनी वाढ करूनही संप पुकारणारे रेल्वे आणि टपाल खात्यातील कर्मचारी जनतेला 
अशी कोणती तत्पर सेवा देतात ? देशासाठी प्रत्येकाने त्याग करण्याची आवश्यकता असतांना वेतनवाढ 
मागणे, हा स्वार्थच होय ! 
     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संमती दिलेल्या ७ व्या वेतन आयोगातील शिफारसींवर ३२ लक्ष सरकारी कर्मचारी अप्रसन्न झाले असून ११ जुलैला त्यांनी संप पुकारण्याचे घोषित केले आहे. यात रेल्वे, टपाल आणि दारूगोळा कारखान्यातील कर्मचारी आहेत.
१. २९ जूनला या शिफारसींना संमती मिळाली असून जुलैपासून त्याची कार्यवाही होणार आहे.
२. कर्मचार्‍यांच्या वेतनात २३.५ टक्क्यांनी वाढ होणार असून यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन किमान १८ सहस्र रुपये, तर कमाल अडीच लक्ष रुपये असे होईल. 
३. जानेवारी २०१६ पासून वाढीव वेतनाचा फरक ४७ लक्ष केंद्रीय कर्मचारी आणि ५३ लक्ष निवृत्तीवेतनधारक यांना मिळेल. एकूण १ कोटी जणांना यामुळे लाभ होईल.
४. कर्मचारी १८ सहस्र रुपयांपेक्षा अधिक मूळ वेतनाची मागणी करत असून त्यांनी निवृत्तीवेतन प्रणाली फेटाळली आहे.

विजयनगर (कर्नाटक) येथे रणरागिणी शाखेच्या वतीने मंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोशाख परिधान करण्यासंदर्भात एका मंदिरातील पुजार्‍यांना निवेदन सादर !

      विजयनगर - रणरागिणी शाखेच्या वतीने मंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोशाख परिधान करण्याविषयी येथील संकष्टहरा गणपति मंदिरामध्ये मुख्य पुजारी ब्रह्मर्षी डॉ. उमेश शर्मा गुरुजी यांना निवेदन देण्यात आले. मंदिराचे विश्‍वस्त श्री. प्रभाकर यांनी महिला कार्यकर्त्यांना धर्माचरणाचे महत्त्व सांगितले, तसेच चांगले कार्य करत आहात, असे सांगत आशीर्वाद दिला. मी सतत आपल्या पाठीशी आहे, असेही सांगितले. 
     या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय पोशाख परिधान केल्याने दैवी शक्ती ग्रहण करता येते, तसेच आध्यात्मिक अनुभूतीही येते. महिलांनी साडी नेसल्याने त्यांच्यामधील सात्त्विकतेमध्ये वाढ होऊन त्या दैवी शक्ती ग्रहण करू शकतात. पाश्‍चिमात्य संस्कृतीनुसार वेशभूषा केल्याने, तसेच केस मोकळे सोडल्याने वाईट शक्ती आकृष्ट होतात आणि रज-तमात्मक पोशाखामुळे मंदिरांमधील सात्त्विकतेवरही त्याचा परिणाम होतो. 
      श्री. प्रभाकर यांनी मंदिरात याविषयी सूचना लावण्याची व्यवस्था करतो, असे सांगितले.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात एका ख्रिस्ती मिशनरी संस्थेचा धर्मप्रसार

ख्रिस्ती मिशनर्‍यांचा प्रसार म्हणजे धर्मांतरणाची संधी शोधण्याचा डाव !
     देहू रस्ता (पुणे), १ जुलै - यंदाच्या वर्षी चालू झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात एका ख्रिस्ती संस्थेकडून अनाहूतपणे घुसखोरी करून धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न केला. (वारकर्‍यांनी सतर्क राहून अशा मिशनर्‍यांना हुसकावून लावायला हवे ! - संपादक)
     एका मिशनरी संस्थेच्या गटाने नया नियम नावाची पुस्तके वारीतील भाविकांना २९ जून या दिवशी पालखी पुण्याकडे येत असतांना विनामूल्य वाटली. (ख्रिस्ती संस्था म्हणजे प्रेमाचा सागर असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? - संपादक) खरेतर ही पुस्तके धर्मांतरासाठी किंवा धर्मप्रसारासाठी वाटली जातात. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात ही पुस्तके कशी वाटली गेली, याविषयीची चर्चा वारकर्‍यांमध्ये चालू होती.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, बांगलादेशमधील हिंदूंचा वंशसंहार रोखण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करा !
     बांगलादेशमध्ये हिंदूंचा वंशसंहार चालू असून आता आणखी एका हिंदु पुजार्‍याची हत्या करण्यात आली आहे. जैनैदाह जिल्ह्यातील एका मंदिरातच श्यामनोंद दास नावाच्या ४५ वर्षीय पुजार्‍याची गळा चिरून हत्या करण्यात आली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Bangladesh mein Jihadiyone Mandir me ghuskar
Shyamnond Das namak aur ek pujari ki hatya !
Bharat Sarkar Hinduon ki raksha ke liye kab prayas karegi ?
जागो  !
बांग्लादेश में जिहादियोंने द्वारा मंदिर में घुसकर
श्यामनोंद दास नामक और एक पुजारी की हत्या !
भारत सरकार हिन्दुआें की रक्षा के लिए कब प्रयास करेगी ?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून दिंडी प्रमुखांना भेट देण्यात येणार्‍या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अनेक मूर्ती गायब

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा हलगर्जी कारभार !
      पिंपरी (जिल्हा पुणे), १ जुलै - नुकतेच श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झाले. श्री संत तुकाराम महाराजांची पालखी ही पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतून मार्गस्थ होते, त्या वेळी महानगरपालिका या पालखी सोहळ्याचे स्वागत करतांना दिंडी प्रमुखांना चादर आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देते. यंदाच्या वर्षी हा सन्मान चालू असतांना अनेक मूर्ती गायब होण्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. (या प्रकरणाची पालिका आयुक्त संबंधितांची चौकशी करून कारवाई करतील का ? - संपादक)

मुसळधार पावसामुळे मुंबईत रस्ते वाहतूक आणि मध्य रेल्वे यांचा खोळंबा

     मुंबई - दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने दादर परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. रस्ते वाहतुकीसमवेत रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. कळव्याजवळ रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएस्टीकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा घंटा विलंबाने चालू आहे. जेव्हीएल्आर् मार्गावर ट्रक बंद पडल्यामुळे कांजूर मार्गावरून पवईकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. पश्‍चिम द्रुतगती मार्गावर दिंडोशीजवळ वाहतूक धीम्या गतीने चालू आहे.

नाशिक कारागृहातील ६ बंदीवानांकडून २ पोलिसांना मारहाण

बंदीवानांकडून मार खाणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? राज्यात 
कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न पडतो !
     नाशिक - येथील मध्यवर्ती कारागृहातील सहा बंदीवानांनीच दोन पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. कारागृहातील ६ बंदीवानांना न्यायालयात नेण्यात येणार होते; पण गाडीत बसायला जागा नसल्याने खासगी गाडीतून न्यायालयात नेण्याची व्यवस्था करा, अशी मागणी बंदीवानांनी पोलिसांकडे केली. (बंदीवानांचा उद्दामपणा ! - संपादक) पोलिसांनी मागणी मान्य न केल्यामुळे बंदीवानांनी पोलिसांना मारहाण करत त्यांचे कपडेही फाडले.

अतीगरम पेयांच्या सेवनाने कर्करोग होण्याचा धोका !

      पॅरिस - जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आय.ए.आर्.सी) या संस्थेने कॉफी आणि अन्य गरम पेये पुष्कळ गरम असतांना प्यायल्यास अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका आहे, असा निष्कर्ष काढला आहे. एक सहस्र जणांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. ६५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक गरम असलेल्या कॉफीचे सेवन केल्यास हानी होऊ शकते; ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर इंग्रजीही हद्दपार होणार ?

      ब्रसेल्स (बेल्जियम) - ब्रिटन युरोपीय महासंघामधून बाहेर पडल्यानंतर आता युरोपीय महासंघाची अधिकृत भाषा इंग्रजी हद्दपार होण्याची शक्यता आहे. इंग्रजी ही युरोपीय महासंघातील प्रमुख अधिकृत भाषा आहे. युरोपीय महासंघातील प्रत्येक सदस्य देशाला एका भाषेला नामांकन देण्याचा अधिकार आहे. इंग्रजी ही युरोपात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असली, तरी केवळ ब्रिटनने इंग्रजीची निवड केली आहे. आयर्लंडने गेलिक, तर माल्टाने माल्टिस भाषेची निवड केली आहे. युरोपीय महासंघामधील संस्थांमध्ये वर्ष १९९० पर्यंत फ्रेंच ही प्रभावी भाषा होती. 
     ब्रिटनने नामांकन केल्यामुळे इंग्रजी ही आमची अधिकृत भाषा आहे; मात्र आमच्यात ब्रिटन नसल्यावर इंग्रजीही रहाणार नाही, असे युरोपियन संसदेच्या घटनात्मक व्यवहार समितीचे अध्यक्ष दानुता हबनर यांनी सांगितले. इंग्रजी ही युरोपीय महासंघाची अधिकृत भाषा राहिली नाही, तरी कामकाजाची भाषा म्हणून रहाण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेच्या आक्रमणात इसिसचे २५० आतंकवादी ठार

भारत असे आक्रमण कधी करणार ?
     वॉशिंग्टन - अमेरिकेने ३० जूनला फल्लुजा शहरावर केलेल्या आक्रमणात २५० आतंकवादी मारले गेल्याचा दावा केला आहे, तसेच ४० वाहनांची नासधूस झाली आहे. इसिसचे आतंकवादी दक्षिण फल्लुजाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्याच वेळी आक्रमण करण्यात आले. (अमेरिकेला इसिसच्या आतंकवाद्यांपासून धोका आहे, हे लक्षात आल्यावर अमेरिका सिरियात घुसून इसिसच्या आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करते. या उलट भारताला पाकपुरस्कृत आतंकवाद्यांपासून धोका असतांनाही भारत पाकच्या विरोधात कारवाई करत नाही, हे दुदैवी म्हणावे लागेल ! - संपादक)हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेकडून राजमाता जिजाबाई स्मृतीदिन साजरा !

     हुबळी (कर्नाटक) - येथील विजयनगर कनिष्ठ महाविद्यालयात २९ जून या दिवशी आणि श्री विश्‍वेश्‍वर नगर महिला मंडळ येथे ३० जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेकडून राजमाता जिजाबाई स्मृतीदिनाचे कार्यक्रम साजरे करण्यात आले. दोन्ही कार्यक्रमांचा आरंभ राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून करण्यात आला. 
     दोन्ही कार्यक्रमांमध्ये रणरागिणी शाखेच्या कु. स्फूर्ती बेनकनवारी यांनी त्यांचे विचार मांडले. उपस्थितांना संबोधित करतांना त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी स्वत:चे सर्वस्व पणाला लावणार्‍या भारतीय इतिहासातील पराक्रमी महिला योद्ध्यांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, हिंदूंना धर्मांध मुसलमानी आक्रमकांपासून वाचवण्यासाठीच माता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली. त्यांनी महाराजांमध्ये निर्भयता, धर्माभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत केले. 
     इतिहासातील राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, बेलवडी मल्लम्मा यांसारख्या आदर्श स्त्रियांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्यातील गुण आपण अंगीकारले तरच या कार्यक्रमांचे आयोजन यशस्वी झाले, असे म्हणता येईल.

मोदी सरकारच्या विरोधात रान उठवणार्‍या तमाम माध्यमांची विश्‍वासार्हता किती ?

श्री. भाऊ तोरसेकर
     मध्यंतरी टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीचे अर्णब गोस्वामी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदीर्घ मुलाखत दिली. सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर २५ महिन्यांनी (मासांनी) कुणा पत्रकार वा माध्यमाला मोदींनी जाहीर मुलाखत दिली आहे. त्यामुळे अनेक नामवंत संपादक पत्रकार विचलीत झाले, तर नवल नाही; पण त्याहीपेक्षा नवलाची गोष्ट म्हणजे या मुलाखतीने आधुनिक प्रसिद्धीमाध्यमात नवाच विक्रम प्रस्थापित केला. टाईम्स नाऊ या वाहिनीने गेल्या काही महिन्यांत उर्वरित इंग्रजी वृत्तवाहिन्यांना नगण्य करून टाकलेले होतेच. मोदींच्या ताज्या मुलाखतीने त्यांना पुरते नामोहरम करून टाकले. या निमित्ताने आपलेच कौतुक करतांना टाईम्स नाऊने म्हटले आहे की, ती वाहिनी आता माध्यमे आणि बातम्या यांचा अजेंडा निश्‍चित करत आहे; पण अशाच वाहिनीने गेल्या काही महिन्यांत विविध विषयांवर उठवलेले रान बघितले, तर तिच्या यशाची कारणे नजरेत भरतात. नेमक्या अशाच वाहिनी वा पत्रकाराला प्रदीर्घ मुलखत देऊन मोदींनी उर्वरित वाहिन्या आणि माध्यमे यांची हवाच काढून घेतली आहे. 

जीम, पार्लर, फॅशन आणि मॉडेलिंग यांच्या कुसंस्कारांत हरवत चाललेले निरागस बाल्य !

सौ. रूपाली वर्तक
     सध्या खाजगीकरण आणि आंतरराष्ट्रीयीकरण यांमुळे आलेल्या पाश्‍चात्त्यीकरणाच्या सुनामी लाटेत या देशातील केवळ युवा पिढी आणि वाढत्या वयाचे नागरिकच नव्हे, तर लहान मुलेही भरडली जात आहेत. पाश्‍चात्त्य देशांप्रमाणे आता भारतातही पौंगडावस्थेचे वय लहान होत असून विशेषतः शहारातील मुले आणि दुर्दैवाने त्यांचे पालकही चंगळवादी सवयींचे बळी ठरत आहेत. चित्रपट, तसेच मॉडेलिंग आदींच्या प्रभावामुळे (तथाकथित) सुंदर दिसणे हे शहरी जीवनमानाचेे एक व्यवच्छेदक लक्षण झाले असून त्यासाठी सातत्याने नवनवीन केशरचना, वेशभूषा, रंगभूषा करत रहाणे हा शहरी जीवनाचा एक अपरिहार्य भाग झाला आहे ! या टूममध्ये (फॅशनमध्ये) आता ६ ते १४ या वयोगटातील कोवळी बालकेही कशी भरडली जात आहेत, हे लक्षात येण्यासाठी २००७ च्या इंडिया टुडे या आंग्लभाषिक मासिकात आलेल्या काही लेखांतील काही सूत्रे येथे उद्धृत करत आहोत. आज २०१६ मध्ये ही स्थिती अधिक गंभीर झाली आहे, हे अध्याहृत आहेच !

पालकांनी विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची आवश्यकता !

      नुकत्याच शाळा चालू झाल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष, नवा शालेय अभ्यासक्रम, नवे मित्र असे सर्व चालू आहे. जशी मैत्री होते, तशी काही त्यांच्यात थोडीफार भांडणेही होतात. लहान वयातील शाळकरी मुलांची भांडणे पूर्वी काही वेळापुरती किंवा क्षणिक असत. झाले गेले विसरून पुन्हा ही मुले एकत्र खेळू लागतात; परंतु सध्या १४ ते १७ या वयातील मुलांची भांडणे ही धोकादायक होऊ लागली आहेत. पुण्यातील चाकण परिसरात या वयातील मुलांच्या मारामार्‍या विकोपाला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. शाळांच्या आवारात होणार्‍या अशा मारामार्‍या रक्तरंजित होऊ लागल्या आहेत. उपरोक्त वयातील मुलांचे हे अपप्रकार एवढ्यावरच न थांबता अगदी स्वतःच्या टोळ्या बनवणे, गुंडगिरी करणे इतपत वाढले आहेत. मे २०१५ या मासांत पुण्यातील चाकण पोलिसांनी १५ ते १७ वयोगटातील शालेय आणि शाळाबाह्य मुलांचे एक ५ हून अधिक जणांचे टोळके दरोड्याच्या गुन्ह्यांत गजाआड केले.

बालकांसाठी परिपाठ !

बोधकथा
                               रामसे बडा रामका नाम !
       रामनाम लिहिलेले दगड तरले. तेव्हा वानर श्रीरामाचा जयजयकार करू लागले. श्रीराम म्हणाला, हा तुमच्या भक्तीचा प्रताप आहे. माझ्यामुळे नाही. वानरांनी विचारले, कशावरून. श्रीराम म्हणाला, बघा, हा छोटा दगड मी पाण्यात टाकतो, तो तरला तर माझ्यामुळे दगड तरले, असे मी मानीन. श्रीरामाने दगड पाण्यात टाकला, तो बुडला. हनुमान म्हणाला, तू ज्यांना नामाच्या माध्यमातून स्वीकारलेस, ते दगड तरले अन् तू ज्याला टाकलेस तो तरेल कसा ? श्रीरामाचे नाव लिहिलेले दगड तरले. श्रीरामाने टाकलेल्या दगडावर नाव लिहिलेले नव्हते.
केवळ स्वतःला सुधारणे आवश्यक ! 
     एकदा एका राजाच्या मुलीच्या पायाला काटा टोचला. राजे काहीसे लहरी असतात. राजाने प्रधानांना सांगितले की, सगळी जमीन चामड्याने झाकून टाक, म्हणजे युवराज्ञीला काटा टोचणार नाही. प्रधान विचारात पडला की, एवढे चामडे आणायचे कोठून ? त्याने एक चामड्याचा सुंदर जोेडा युवराज्ञीला दिला.
तात्पर्य : जगात काटे आहेत; परंतु ज्याच्या पायात जोडे (पादत्राणे) असतात, त्याला काटे बोचत नाहीत. त्याचप्रमाणे स्वतःला सुधारावे; कारण सर्व जगाला आपण सुधारू शकत नाही.

शेती व्यवसायाचा विकास न होण्यामागील कारणे आणि उपाय !

१ जुलै या दिवशी झालेल्या महाराष्ट्र कृषीदिनाच्या निमित्ताने...
      शेती व्यवसाय, हा देशाचा आर्थिक कणा आहे. शेती व्यवसायाच्या विकासाविना राष्ट्राचा आर्थिक विकास ही असंभव गोष्ट आहे. एवढेच नाही, आज जर शेतीचा विकास झाला नाही, तर उद्या भारतियांची अन्नान्न दशा होईल. आजचे लोकसंख्यावाढीचे मूळ (दर) विचारात घेतले, तर आजच्या तुलनेत आपल्या अडीच पटीने अधिक धान्योत्पादन करावे लागगणार आहे. म्हणून देशहित डोळ्यांसमोर ठेवून या व्यवसायातील त्रुटी आणि उपाय यांविषयी चर्चा झाली पाहिजे. खेळाडूंनी १०० धावा काढल्या, तर देशभर चर्चा होते; पण भारतीय शेतकरी आपल्या नांगरामागे, आवमागे अखंड धाव (रन) काढून देशाला उत्पन्न आणि अन्नधान्य सिद्ध करून देतोे; पण त्यांच्या या धावांचे मूल्य कधीच होत नाही. १ जुलै या दिवशी झालेल्या महाराष्ट्र कृषीदिनाच्या निमित्ताने याविषयीचा ऊहापोह करत आहोत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) असा आदेश हिंदूंच्या एकातरी सणासाठी सरकारने काढला आहे का ?

     बंगाल येथील दक्षिण २४ परगण्यातील मंदिर बाजारात असलेल्या ६०० वर्षे प्राचीन केशवेश्‍वर मंदिरातील भोंग्यांवरून सकाळी आणि संध्याकाळी ऐकवल्या जाणार्‍या आरतीला धर्मांधांनी रमझान असल्याचे सांगत विरोध केला. त्यांनी मंदिरात घुसून भोंगे काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला हिंदूंनी संघटितपणे विरोध केला. या घटनेच्या संदर्भात येथील पोलिसांनी सांगितले, आम्हाला देहलीतून रमझान मासात मुसलमानांना त्रास होता कामा नये, असा सरकारचा आदेश आहेे. या आदेशाची प्रत दाखवण्यास मात्र पोलिसांनी असमर्थता दर्शवली.

वर्ष २०२३ मध्ये स्थापित होणार्‍या हिंदु राष्ट्रात सर्व कारभार राज्यांच्या भाषेत होणार आहे; मुलांना इंग्रजी भाषेत शिक्षण दिल्यास त्यांना नोकरी मिळणार नाही, हे लक्षात घेऊन मुलांना राज्यांच्या भाषेत शिक्षण द्या !

     गेल्या शैक्षणिक वर्षात २ जून २०१५ या दिवशी महाराष्ट्र शासनाने सुमारे १ सहस्र १९ इंग्रजी आणि सुमारे ५३ मराठी नवीन शाळांना अनुमती दिली होती. या वर्षी पुन्हा १७ जून २०१६ या दिवशी नवीन शाळा उघडण्यास आणि शाळांचा दर्जावाढ करण्यास अनुमती दिलेल्या शाळांची संख्या ३ सहस्र ७४३ आहे. त्यापैकी नवीन इंग्रजी शाळांची संख्या सुमारे १ सहस्र ७७९, उर्दू ५३, हिंदी १६, कन्नड १, मराठी सुमारे ८८८ शाळा आणि अन्य शाळांना दर्जावाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. - महादेव सुळे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य काँग्रेस सेल
     पाकिस्तानी मुसलमानांचा उद्देश भारतावर जय मिळवणे, हाच आहे. युद्ध करून त्यांना ते साध्य न झाल्याने हसके लिया पाकिस्तान, घुसके लेंगे हिंदुस्तान असे म्हणत हा जिहादी प्रकार त्यांनी चालवला आहे. - श्री. प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना. पू. (कु.) अनुराधा वाडेकर देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात रहायला असतांना आलेल्या अनुभूती

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
        १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

बालपणापासून गोपीभावात रममाण असणार्‍या आणि सर्वांवर प्रीतीचा वर्षाव करणार्‍या पू. (सौ.) सूरजकांता मेनराय !

        आषाढ कृष्ण पक्ष त्रयोदशी (पौर्णिमांत पंचांग पद्धतीप्रमाणे) (२.७.२०१६) या दिवशी पू. आईचा (पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांचा) तिथीनुसार ७४ वा वाढदिवस आहे. श्री गुरुचरणी आणि पू. आईच्या श्री चरणी कृतज्ञता व्यक्त करून तिची गुणवैशिष्ट्ये लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझ्याकडून हे लिखाण करवून घ्यावे आणि हे लिहिण्यासाठी तुम्हीच माझ्यामध्ये आवश्यक तो भाव निर्माण करावा, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे संत माता-पिता दिल्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.
पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! 
पू. (सौ.) सूरजकांता मेनराय
१. लहानपणापासूनच गोपीभावात असणे
         पू. आई सांगते, मी लहान असल्यापासूनच आपण गोपींप्रमाणे शृंगार केला आहे आणि गोपींसमवेत खेळत आहोत, असे मला वाटत असे. स्नान करतांना आपण श्रीकृष्ण आणि गोपी यांच्यासमवेत नदीत स्नान करत आहोत, असे मला वाटायचे. तिच्यामध्ये आपण नेहमीच गोपींशी बोलत आहोत, हा भाव असायचा.
२. मुलांवर लहानपणीच 
देशप्रेम आणि भक्ती यांचे संस्कार करणे
         पू. आई लहानपणी आम्हाला ग्रंथालयातून देशभक्त, क्रांतीवीर आणि भक्त यांची माहिती असणारी पुस्तके वाचण्यासाठी आणून द्यायची. प्रत्येक सुटीत आई-बाबा आम्हाला कोणत्या ना कोणत्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवून आणायचे.

कु. शुभम् वाघ (वय १६ वर्षे) याला प.पू. डॉक्टरांचे दर्शन होण्यासंदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ...
१. प.पू. डॉक्टरांना पुष्कळ दिवसांनी पाहिल्यावर डोळ्यांसमोर अंधार येणे आणि देवाला प्रार्थना केल्यावर त्यांच्यात भगवान श्रीकृष्ण दिसणे : ४.७.२०१४ या दिवशी सौ. पार्वतीताई (सौ. पार्वती जनार्दन) पू. स्वातीताईंसह (पू. स्वाती खाडये यांच्यासह) प्रसारात जाण्यासाठी निघाल्या. त्या वेळी त्यांना निरोप देण्यासाठी प.पू. डॉक्टर त्यांच्या खोलीच्या दारात आले होते. तेव्हा प.पू. डॉक्टरांना बघितल्यावर माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला. ते दिसतच नव्हते. पुष्कळ दिवसांनी प.पू. डॉक्टर दिसले; म्हणून मी देवाला म्हटले, मला त्यांचे रूप दिसू दे ना ! तेवढ्यात प.पू. डॉक्टरांच्या बाजूला लख्ख प्रकाश आला.
प.पू. डॉक्टरांच्या रूपात भगवान श्रीकृष्ण दिसले. पुष्कळ तेज होते. कृतज्ञताभाव जागृत होऊन आपल्याला एवढे महान गुरु लाभले, अशी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

प.पू. डॉक्टरांचे विश्‍वरूपात दर्शन होत असतांना देवदेवता त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत, असे दिसणे

कु. नंदा नाईक
१. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्यासमवेत प.पू. डॉक्टर चालत असतांना त्यांचे देहधारी रूप न दिसता विश्‍वरूपात दर्शन होणे : २८.५.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचे आगमन झाले. त्या दिवशी प.पू. डॉक्टर त्यांना त्यांच्या खोलीपर्यंत सोडायला आले होते. त्या वेळी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्यासमवेत प.पू. डॉक्टर चालत असतांना मला त्यांचे देहधारी रूप न दिसता जसे द्वापरयुगात श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवले होते, तसे विश्‍वरूपात दर्शन झाले.
२. प.पू. डॉक्टरांच्या दोन्ही हातांवर संत, नंतर ६० टक्के पातळीचे साधक आणि उच्च स्वर्गलोकातून आलेले बालसाधक अन् शेष साधक त्यांच्या चरणांजवळ बसले आहेत, असे दिसणे : प.पू. डॉक्टरांच्या दोन्ही हातांवर संत दिसले. नंतर ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक दिसले. नंतर उच्चस्वर्गलोकातून आलेले बालसाधक आणि बालसाधिका दिसल्या. त्यानंतर शेष साधक त्यांच्या चरणांजवळ बसलेले दिसले. तेव्हा सर्व साधक त्यांना बघून नमस्कार करत होते. त्या वेळी देवदेवता प.पू. डॉक्टरांवर पृष्पवृष्टी करत आहेत, असे दिसले. 
- कु. नंदा नाईक, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (३.६.२०१६)

गुरूंच्या चरणांचे व्हावे दास !

श्रीमती उषा बडगुजर
गुरूंचे रूप असावे ध्यानी ।
गुरूंचे रूप असावे नयनी ।
गुरूंचे रूप असावे मनी ।
गुरूंचे रूप ठेवावे हृदयी ॥ १ ॥
गुरूंच्या नामातून मिळते चैतन्य ।
गुरूंच्या नामातून जडते प्रेम ।
गुरूंच्या नामातून जळतो अहंकार ।
गुरूंच्या नामातून सरतो अंधार ॥ २ ॥
गुरूंच्या नामातून मिळते सुख शांती ।
गुरूंच्या नामातून येतो आनंद जीवनी ।
गुरूंच्या चरणी अर्पावे जीवन ।
गुरूंच्या चरणाचे व्हावे दास ॥ ३ ॥
गुरुचरणी असावे अखंड नतमस्तक ।
गुरूंच्या चरणी असावे अखंड शरण ।
गुरूंच्या चरणी असावे कोटी कोटी कृतज्ञ ॥ ४ ॥
- श्रीमती उषा बडगुजर, जळगाव (वैशाख कृष्ण पक्ष षष्ठी (१४.६.२०१३))

साधकांचा जीव कि प्राण तुम्ही !

श्री. बाळासाहेब विभूते
       भगवान श्रीकृष्णाने जसे सुदाम्याला प्रेम दिले, तसा भाव ठेवून प्रयत्न करतांना मला तुमची पुष्कळ आठवण येते. माझ्यासारख्या दीनाला जवळ करून तुम्ही माझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. आश्रमातील चैतन्य ग्रहण कसे करायचे ? तुम्हाला आश्रमात कुठे शोधायचे ?, याचे चिंतन केले असता पुढील कविता स्फुरली.
आत तुम्ही, बाहेर तुम्ही (टीप १), वर तुम्ही, खाली तुम्ही ।
चोहोबाजूला वावरत असता तुम्ही ।
पण मयुरांगीचे (मोरपिसावरील डोळे) व्यर्थ नेत्र माझे ।
धृतराष्ट्र-गांधारी वृत्तीमुळे शोधूनही सापडेना तुम्ही ॥ १ ॥
रखरखत्या उन्हातील थंडगार वार्‍याची झुळूूक तुम्ही ।
कर्णकर्कश आवाजाच्या रणधुमाळीतील नीरव शांततेचा अनुभव तुम्ही ।
तृष्णेने व्याकुळ झालेल्या जिवासाठी शुद्ध पाण्याचा घोट तुम्ही ।
क्षुधेने तडफडणार्‍या जिवाच्या मुखातील अन्नाचा घास तुम्ही ॥ २ ॥

पू. अनुराधाताई आहेत महान !

काय अन् किती सांगू ।
पू. अनुराधाताई आहेत किती महान ॥ १ ॥
त्यांच्या स्पर्शात आहे,
आईच्या मायेची अन् आपुलकीची ऊब ।
देत असे मायेने पाठीवर थाप,
कधी फिरवत असे गालावरून प्रीतीचा हात ॥ २ ॥
पू. अनुताई आहेत प्रेमळ फार ।
आवाजात त्यांच्या मधुरता अपार ॥ ३ ॥
खळखळणार्‍या झर्‍यासारखे आहे हसणे त्यांचे ।
साधकांची साधना व्हावी, हेच ध्येय त्यांचे ॥ ४ ॥
प.पू. डॉक्टरांच्या सगुण रूपाने वावरती सदा ॥
आम्ही थोर भाग्यवान,
अशा सद्गुरु लाभल्या आम्हाला ॥ ५ ॥
- सौ. ऋतुजा नाटे, ठाणे (२९.१२.२०१५)

कृष्णप्रेम में डूबी थी, बनकर इक प्यारी गोपी ।

आषाढ कृष्ण त्रयोदशी को ।
जन्म लिया इक कोमल कली ने ॥
भाई और बहनो की थी लाडली ।
मां थी थोडी सख्तीवाली ॥
कृष्णप्रेम में डूबी थी ।
बनकर इक प्यारी गोपी ॥ १ ॥
विवाह हुआ फुलेरा होली को ।
पती थे साक्षात शिवरूपी ॥
छत्तीस के छत्तीस गुण मिले ।
थी यह सबसे अनोखी जोडी ॥ २ ॥

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - ज्येष्ठ कृष्ण पक्ष चतुर्दशी (३.७.२०१६) सायं ६.५३ वाजता
समाप्ती - ज्येष्ठ अमावास्या (४.७.२०१६) दुपारी ४.३१ वाजता
दोन दिवसांनी अमावास्या आहे.

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या 
वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
        सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यष्टी आणि समष्टी साधनेसंदर्भात काही कृतीच्या स्तरांवरील सूत्रे

        २७ ते ३० जून २०१६ या काळात रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे अखिल भारतीय साधनावृद्धी शिबीर झाले. या निमित्ताने व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात येणार्‍या अडचणींना सामोरे कसे जावे, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातील काही सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. साधनेचा पाया 
पक्का होण्याचे महत्त्व
        साधनेचा पाया पक्का झाला, म्हणजे स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन व्हायला लागले की, स्वतःच्या प्रकृतीनुसार व्यष्टी किंवा समष्टी साधना करावी.
२. साधकांच्या मनावर 
साधनेचे महत्त्व बिंबवावे
        रुग्णांना औषधांचे महत्त्व ज्ञात असते; म्हणून ते नियमितपणे औषधे घेतात, तसेच साधकांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवले की, ते नियमितपणे साधना करतात.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
व्यावहारिक प्रश्‍न आणि संत
     संत उत्स्फूर्तपणे बोलतात ते खरे. एखाद्याच्या प्रश्‍नाला लगेच उत्तर दिले तर ते खरे समजायचे, थोड्या वेळाने दिले तर ते खोटे असू शकते. एखाद्याने प्रश्‍न विचारल्यावर संत उत्तर देतात, ते बहुधा त्याला बरे वाटावे असे असते. (हे उत्तर बिंब- प्रतिबिंब या न्यायाने असते; म्हणजे त्याला जे उत्तर हवे असते (बिंब), त्याचे प्रतिबिंब संतांच्या मनात पडून ते त्याप्रमाणे सांगतात.) संतांना व्यवहारातील प्रश्‍नांविषयी, म्हणजे मायेविषयी, काहीही सांगायला आवडत नाही. संत अध्यात्मविषयक प्रश्‍नांची उत्तरे आवडीने सांगतात आणि ती कधीच चुकीची असत नाहीत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना आता कोणाचा आधार नाही. तो देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक

     संन्याशांना ज्ञानयोगाने वैराग्य येते. काही जण वैराग्य पराकोटीला गेले की, संन्यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्याचा फायदा होतो. गुरूंशिवाय संन्यास घेऊन गेल्यास काही जण हिमालयात थंडीने किंवा इतरत्र उपासमारीने मरतातसुद्धा.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ज्ञानाचा वापर सुयोग्य करायला हवा !
     नुसते ज्ञान संपादन केले, तर त्याचा उपयोग होईलच, असे नाही. त्याचा सुयोग्य वापर करण्याचा चाणाक्षपणा आणि हुशारी नसेल, तर ते ज्ञान म्हणजे इंजिनविना असलेली गाडी ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पाकची गिधाडे !

संपादकीय
     भारतीय सैनिकांना गिधाडे संबोधून पाकिस्तानी आतंकवादी हाफीज सईद याचा मेहुणा अब्दुल रेहमान मक्की याने दाखवून दिले आहे की, त्याच्याशिवाय दुसरी कोणतीच व्यक्ती भारतीय सैनिकांची अशी निर्भत्सना करणार नाही. काश्मीरमधील पम्पोर येथे नुकतेच पाकच्या दोन आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर आक्रमण केले आणि त्यात आठ भारतीय पोलीस ठार झाले. हा घातपात पाकच्या आतंकवाद्यांनी का केला ? अथवा पाकचे हे आतंकवादी भारतीय सुरक्षा दलातील सैनिकांना ठार मारण्यासाठी का सज्ज असतात ? त्यांना त्यांचे रक्तच हवे असते ना ? मग गिधाडे कोण ? भारतीय सैनिकांच्या रक्तासाठी तहानलेले पाकचे आतंकवादी गिधाडे या संज्ञेला पात्र आहेत आणि अब्दुल रेहमान मक्की याचा नातेवाईक हाफीज सईद हा या गिधाडांचा नेता आहे, एवढे मक्कीने लक्षात ठेवायला पाहिजे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn