Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

आज राजमाता जिजाऊ भोसले यांची पुण्यतिथी

(म्हणे) सनातन संस्थेने दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या पुरोगामी विचारवंतांना संपवले !

कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने वा न्यायव्यवस्थेने सनातनवर कोणत्याही प्रकारचे आरोप
 केलेले नसतांना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा धादांत खोटा आरोप
     पिंपरी (जिल्हा पुणे) - बुरसटलेले विचार आणि त्या माध्यमातून कालचक्र उलटवून पूर्वीची चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा आणण्याचे सनातनचे प्रयत्न आहेत. या संस्थेला पुरोगामी विचार नष्ट करता आले नाहीत; म्हणून त्यांनी दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या पुरोगामी विचारवंतांना संपवले. (यावरून चव्हाण हे पुन्हा एकदा अन्वेषण यंत्रणांची दिशाभूल करत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे काय ? - संपादक)      डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणी सनातनचे दोघे जण हाती लागले आहेत. (त्या दोघांना केवळ संशयित म्हणून अटक केली आहे. त्यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. - संपादक) तरीही या संस्थेवर बंदी घालण्यासाठी वेळकाढूपणा करणार्‍या सरकारला सनातनला काय महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचा आहे का, असे सनातनद्वेषी आणि उपरोधिक प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे २७ जून या दिवशी आयोजित केलेल्या कार्यकर्ता शिबिरानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रवक्ता रत्नाकर महाजन आदी उपस्थित होते.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा जामीन अर्ज एन्आयएच्या विशेष न्यायालयाने फेटाळला

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
     मुंबई - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) विशेष न्यायालयात केलेला जामीन अर्ज २८ जून या दिवशी फेटाळण्यात आला. या निकालामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. वर्ष २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे एन्आयएने पुरवणी आरोपपत्राद्वारे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्याआधारे त्या जामिनास पात्र असल्याचा दावा त्यांच्या जामीन अर्जात करण्यात आला होता.
     बॉम्बस्फोटासाठी ज्या मोटारसायकलचा वापर करण्यात आला होता, ती साध्वींच्या नावे नोंद असली, तरी ती फरारी आरोपी रामचंद्र कालसंग्रा याच्या कह्यात होती. त्यामुळे या प्रकरणाचे खापर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर फोडले जाऊ शकत नाही, असा दावाही त्यांच्या अर्जात करण्यात आला होता; मात्र निसार अहमद सय्यद बिलाल या व्यावसायिकाने साध्वी प्रज्ञा सिंह हिच्या जामिनाला विरोध करणारा अर्ज न्यायालयात केला होता. जमात-ए-उलेमा महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली होती. दोन्ही बाजूंनी केलेल्या दाव्या-प्रतिदाव्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीमुळे बाबरी मशीद पाडण्यात आली ! - उपराष्ट्रपती हमीद अन्सारी

उपराष्ट्रपतींकडून स्वधर्मनिष्ठा शिका !
     नवी देहली - तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीमुळे बाबरी मशीद पाडली गेली, असा दावा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केला आहे. विनय सीतापती यांनी लिहिलेल्या हॉफ लॉयनच्या प्रकाशनाच्या वेळी अन्सारी बोलत होते. अन्सारी पुढे म्हणाले की, जर हा देश राव यांच्या चांगल्या कामांचा लाभ घेत आहे, तर चुकीच्या कामांचे भोगही भोगत आहे. पुस्तकाचे लेखक सीतापती यांच्या म्हणण्यानुसार बाबरी पाडण्यात राव यांचा स्पष्ट हात नव्हता; मात्र त्यांनी ती वाचवण्यासाठी काहीही केले नाही.

अमरनाथ यात्रेवर २१३ जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता !

अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाल्यास भारतातून एकालाही हज यात्रेला जाऊ दिले
 जाणार नाही, अशी चेतावणी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती !
     नवी देहली - २ जुलैपासून आरंभ होणार्‍या अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाचे संकट भिरभिरत आहे. काश्मीरमध्ये घुसलेल्या २१३ जिहादी आतंकवाद्यांकडून या यात्रेवर आक्रमण होण्याची शक्यता गुप्तचर विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. २१३ आतंकवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिदीन यांच्या आतंकवाद्यांचा समावेश आहे. सध्या हे आतंकवादी काश्मीर खोर्‍यात लपून बसलेले आहेत. यातील अनेक आतंकवादी पूर्वीपासून, तर काही आतंकवादी आता घुसले आहेत. त्यांचा बीमोड करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि सैनिक यांनी समन्वयाची रणनीती आखली आहे. १८ ऑगस्टपर्यंत चालणार्‍या यात्रेच्या सुरक्षेसाठी सैन्याने हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांचा वापर करण्याचे ठरवले आहे. यात्रेमध्ये असणार्‍या भोजनालयांवरही आक्रमणाची शक्यता आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारच्या आक्रमणाचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे.

भाजप नेत्याच्या घरातून एके ५६ बंदूक पळवली !

आतंकवादग्रस्त काश्मीर ! अशी स्थिती असेल, तर सामन्य जनतेचे रक्षण कसे होणार ?
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे भाजपचे नेते गुलाम महंमद चोपन यांच्या घरात ४ संशयित आतंकवाद्यांनी घुसून त्यांच्या सुरक्षा कर्मचार्‍याकडून एके ५६ बंदूक हिसकावून घेऊन पळ काढल्याची घटना बडगाम जिल्ह्यातील चांदोरा येथे २८ जून या दिवशी घडली. या घटनेनंतर त्या भागात दक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. गावात जाणार्‍या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली असून आतंकवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पाक उच्चायुक्तांना दिलेले इफ्तार पार्टीचे निमंत्रण मुस्लिम राष्ट्रीय मंचने मागे घेतले !

     नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचने २ जुलैला देहलीत इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. यात ११४ देशांच्या राजदूतांना आणि उच्चायुक्तांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांचाही समावे होता; मात्र पंपोर येथील आक्रमणानंतर बासीत यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना देण्यात आलेले आमंत्रण मागे घेण्यात आले आहे. बासीत यांना दूरभाष करून पार्टीला येऊ नका, असे सांगण्यात आले आहे. बासीत यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून टीका करण्यात आली होती. तसेच त्यांना निमंत्रण देणार्‍या मुस्लिम राष्ट्रीय मंचालाही लक्ष्य करण्यात आले होते. 

आतंकवादी आक्रमणावरून काश्मीर विधानसभेत गदारोळ

विधानसभेत गदारोळ करण्यापेक्षा केंद्रशासनाकडे पाकवर कारवाई करण्याची मागणी का करत नाही ?
     कुपवाडा (काश्मीर) - भारतीय सैनिक हुतात्मा झाल्यावरून काश्मीरच्या विधानसभेत राज्यातील सुरक्षेच्या स्थितीवरून गदारोळ झाला. राज्यशासनाने सध्याच्या सुरक्षेच्या स्थितीविषयी निवेदन द्यावे, अशी नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी मागणी केली. २५ जून या दिवशी आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर केलेल्या आक्रमणात ८ पोलीस हुतात्मा झाले होते आणि जवळपास २४ हून अधिक पोलीस घायाळ झाले होते.

भारत हिंदु मुन्नानीचे नेते आर्.डी. प्रभू यांना ठार मारण्याच्या धमकीप्रकरणी शिवसेना तमिळनाडूची समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

हिंदुत्ववादी नेत्यांच्या रक्षणासाठी समस्त हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !
     चेन्नई - भारत हिंदु मुन्नानी या संघटनेचे नेते श्री. आर्.डी. प्रभू यांना दूरभाषवरून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी शिवसेना तमिळनाडूने चेन्नई पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले. या वेळी त्यांनी श्री. प्रभू यांना मारणार्‍यास २५ लाख रुपये देण्याची उघड घोषणा देणार्‍या ३ जिहाद्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली. श्री. प्रभू यांना २१ जून या दिवशी ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.

मंगळुरू (कर्नाटक) येथे गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांकडून सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याविषयी चौकशी

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांची नाहक चौकशी करण्यात वेळ वाया घालवणार्‍या पोलिसांनी
 अशी चौकशी आतंकवाद्यांची केली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !
     २८.६.२०१६ या दिवशी गुप्तचर विभागाच्या २ अधिकार्‍यांनी मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनच्या सेवाकेंद्रात जाऊन सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याविषयी चौकशी केली.
१. या अधिकार्‍यांनी सेवाकेंद्रातील साधकांना उपरोक्त कार्यकर्त्यांविषयी आमच्याकडे असलेल्या माहितीची केवळ निश्‍चिती करायची आहे, असे सांगितले. त्या पोलीस अधिकार्‍यांकडे या कार्यकर्त्यांचे पत्ते आणि दूरभाष क्रमांक होते.
२. साधकांनी अधिकार्‍यांना तुम्हाला जी काही माहिती हवी आहे, ती संबंधित कार्यकर्त्यांना विचारा, असे सांगितले.
३. यावर पोलीस अधिकार्‍यांनी आम्हाला वेगळी अशी काही माहिती नको आहे, असे सांगितले. यानंतर पोलीस अधिकार्‍यांनी तेथील जागेविषयी विचारले असता, साधकांनी माहिती दिली.
४. यानंतर पोलीस अधिकमार्‍यांनी आम्ही आमच्या कार्यालयात जाऊन संबंधित कार्यकर्त्याला दूरभाष करू, असे सांगितले.

गायीपासून केवळ दूधच नाही, तर सोनेही मिळते !

जुनागड (गुजरात) कृषी विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. गोलकिया यांचा दावा
केंद्रशासन राष्ट्रीय स्तरावर गोहत्या बंदी कायदा करून देशी गोधन वाचवणार आहे का ?
    
जुनागड (गुजरात) - देशी गायीच्या गोमूत्रात सोने मिळाल्याचा दावा गुजरातच्या जुनागड कृषी विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. बी.ए. गोलकिया यांनी केला आहे. त्यामुळे गायीपासून केवळ दूधच नाही, तर सोनेही मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे. (गाय ही गोपालकाचेही पालन करणारी असून देशाच्या समृद्धीची जननी आहे, असे वारंवार सिद्ध झाले असतांनाही आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी देशात गोहत्या बंदी कायदा न करता कोट्यवधी गायींची हत्या होऊ दिली, हे या देशाचे दुर्दैव आहे ! - संपादक)      डॉ. गोलकिया यांनी त्यांच्या ४ वर्षांच्या संशोधनामध्ये गीर जातीच्या ४०० हून अधिक गायींच्या गोमूत्राची सतत चाचणी केली. यानंतर त्यांनी १ लिटर गोमूत्रामधून ३ मिलीग्रॅम ते १० मिलीग्रॅम पर्यंत सोने काढल्याचा दावा केला आहे.

काश्मीर प्रश्‍नावर पाक मागे हटणार नाही !

पाकचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांचे फुत्कार
काश्मीरच्या संदर्भात पाक जसा कणखर भूमिकेतून विधाने करतो, तसे 
भारतीय शासनकर्त्यांनीही करून आपण पाकहून वरचढ असल्याचे दाखवून दिले पाहिजे !
     इस्लामाबाद - पाकिस्तानला त्यांचे शेजारी राष्ट्र भारताशी मैत्रीचे संबंध हवे आहेत; मात्र पाक काश्मीर धोरणापासून मागे हटणार नाही. जेव्हाही भारताशी चर्चा होईल, तेव्हा काश्मीर प्रश्‍न प्राध्यान्याने असेल, असे पाकचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटले आहे. (केंद्रात राष्ट्रवादी विचारांचे शासन येऊन २ वर्षे होऊनही पाकच्या विचारसरणीत काहीही फरक पडला नाही. यावरून शासनाची परराष्ट्र नीती फसली, तर नाही ना ? असे जनतेला वाटल्यास नवल नाही ! - संपादक)
     अजीज म्हणाले, भारत काश्मीरच्या संदर्भात पाकिस्तानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे, जे आम्हाला अमान्य आहे. पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील कोणत्याही तणावाच्या विरोधात आहे. पठाणकोट एअरबसवर जानेवारीमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय चर्चा सध्या थांबलेली आहे.

शिबिरार्थींकडून हिंदु धर्मजागृती सभा आणि साधना यांविषयी अनुभवकथन

हिंदु जनजागृती समितीच्या अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिराचा दुसरा दिवस !
     सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) - हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांसाठी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिराचा प्रारंभ २७ जूनला येथे झाला. शिबिरात दुसर्‍या दिवशी म्हणजे २८ जूनला शिबिरार्थींनी त्यांच्या भागांत धर्मजागृतीच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणार्‍या हिंदु धर्मजागृती सभांविषयीच्या अनुभवांचे कथन केले. यातून प्रत्यक्ष कार्य करतांना येणार्‍या अडचणींवरील उपाययोजना, तसेच साधनेचे महत्त्व यांविषयी शिकायला मिळाल्याचे शिबिरार्थींनी सांगितले.
साधकत्व आणि भाव यांमुळे कर्नाटक राज्याची 
धर्मप्रसाराची फलनिष्पत्ती अधिक ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
     शिबिरार्थींना मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, कर्नाटक राज्यात साधकसंख्या अल्प असूनही साधकत्व आणि भाव यांमुळे कर्नाटक राज्यात धर्मप्रसाराची फलनिष्पत्ती अधिक आहे. येथील साधक फळाची अपेक्षा न ठेवता प्रत्येक सेवा गुरुसेवा आहे, या भावाने सेवा करतात. सकारात्मक आणि आध्यात्मिक स्तरावर राहून ईश्‍वराला अपेक्षित अशी सेवा करण्याचा आदर्श या साधकांनी सर्वांसमोर ठेवला आहे.

माऊलींचा गजर आणि टाळ-मृदूंगाच्या निनादात संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे आळंदी (जिल्हा पुणे) येथून प्रस्थान

पाऊले चालती पंढरीची वाट !
      आळंदी - माऊली, माऊली, जय जय रामकृष्ण हरि असा जयघोष आणि टाळ-मृदूंगाच्या निनादात संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे २८ जून या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा म्हणजे याची देही याची डोळा असा होता. परब्रह्माची भेट घेण्यासाठी निघालेल्या या पालखीमध्ये लक्षावधी संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत. 
     २८ जून या दिवशी पहाटे ४ वाजता घंटानाद, पहाटे ४.१५ वाजता काकड आरती आणि त्यानंतर माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक करण्यात आला. पहाटे ४.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत भक्तांच्या महापूजा आणि समाधी दर्शन हे एकाच वेळी चालू होते. दुपारी १२.३० वाजता माऊलींना नैवेद्य दाखवण्यात आला.

राष्ट्रद्रोही सुधींद्र कुलकर्णी यांची पत्रकार परिषद शिवसैनिकांनी उधळली !

भारतात असे कार्यक्रम आयोजित करणे हा पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी 
बळी घेतलेल्या सहस्रो नागरिक आणि सैनिक यांचा घोर अवमान आहे ! 
  • केवळ शिवसैनिकच राष्ट्रप्रेमी आहेत का ?
  • पाक छायाचित्रकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन
  • पाकप्रेमात आकंठ बुडालेल्या सुधींद्र कुलकर्णी यांना पाकमध्ये हाकला !
     मुंबई - मुंबई-कराची फ्रेंडशिप फोरमच्या नावाखाली सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकिस्तानी छायाचित्रकारांना बोलावले आहे. तस्बीर ए मुंबई-तस्बी या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी २८ जून या दिवशी दुपारी प्रेस क्लब ऑफ मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. सीमेवर रोज सैनिकांचे बळी जात असतांना हे पाकिस्तान प्रेम कशासाठी ?, असा प्रश्‍न करत आणि घोषणा देत संतप्त शिवसैनिकांनी ही पत्रकार परिषद उधळून लावली. सुधींद्र कुलकर्णी यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ५ शिवसैनिकांना कह्यात घेतले आहे.

आई-वडील अथवा नातेवाईक यांचे संरक्षण करण्यासाठी कुणावर प्रतिआक्रमण केले, तर तो गुन्हा क्षमापात्र ! - सर्वोच्च न्यायालय

      नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक मिश्र आणि न्या. शिव कीर्ती सिंह यांच्या खंडपिठाने दिलेल्या महत्त्वाच्या निकालानुसार स्वत:चे आई-वडील अथवा नातेवाईक यांचे संरक्षण करण्यासाठी कुणावर प्रतिआक्रमण केले, तर तो गुन्हा क्षमापात्र ठरेल. याआधी प्रचलीत कायद्यानुसार हे प्रावधान केवळ स्वत:च्या संरक्षणापुरतेच मर्यादित होते.
     राजस्थानातील दोघांना त्यांच्या शेजार्‍यावर प्राणघातक आक्रमण केल्याच्या आरोपाखाली कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवून २ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठवली होती. ही शिक्षा नंतर राजस्थान उच्च न्यायालयानेही कायम ठेवली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने, या दोघांनी शेजार्‍यांवर का आक्रमण केले, त्याची कारणे कनिष्ठ न्यायालयाने विचारात घेतली नव्हती, तसेच या आरोपींनाही अनेक जखमा झाल्या होत्या ही गोष्टही नजरेआड केली, असे म्हटले आहे. या सर्वांचा विचार करून त्यांना निर्दोष मुक्त केले. (कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय वरिष्ठ न्यायालय पालटते. कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश सक्षम नाहीत म्हणून त्यांना न्यायदानासाठी अपात्र का ठरवत नाहीत ? - संपादक)


गोमांस वाहतूक करणार्‍या रिझवान आणि मुख्तयार यांना गोरक्षकांनी शेण खाऊ घातले !

हिंदूंसाठी श्रद्धास्थानी असणार्‍या गोमातांची हत्या करून त्यांच्या मासांची वाहतूक 
करणार्‍यांच्या विरोधात हिंदूंचा हा उद्रेक राज्यकर्ते केव्हा लक्षात घेणार ?
     मानेसर (हरियाणा) - येथे गोरक्षकांनी गोमांसाची वाहतूक करणार्‍या रिझवान आणि मुख्तयार यांना चोपले आणि त्यांना शेण खायला लावल्याची घटना घडली. हरियाणा सरकाराने गोमांस विक्रीस बंदी घातली आहे.
    गोरक्षक दलाचे गुडगाव येथील प्रमुख धमेंद्र यादव यांनी सांगितले की, कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर टेम्पोमधून गोमांस नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी रिझवान आणि मुख्तयार या दोघांना टेम्पोचा ७ किलोमीटर पाठलाग करून बदरपूर सीमेजवळ रोखले. त्यांच्याजवळ ७०० किलो गोमांस सापडले.

पंपोर येथील आक्रमणाचा सूत्रधार हा हाफिज सईदचा जावई !

पाक हाफीज सईदवर कोणतीही कारवाई करत नाही, तेथे त्याच्या जावयावर कारवाई काय करणार ? 
पाकला जशास तसे उत्तर देणारे राज्यकर्ते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र अर्थात सनातन धर्म राज्यच हवे !
     श्रीनगर - काश्मीरच्या पंपोरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ८ पोलीस ठार झाले होते. या आक्रमणामागे जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याचा जावई खालिद वलीद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
    या आक्रमणाच्या वेळी २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. या आतंकवाद्यांना आम्ही ठार मारले, असे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस आणि सैनिक यांच्यात श्रेय घेण्यावरून वाद निर्माण झाला आहे. (८ पोलिसांना ठार केल्याच्या दुःख करण्याऐवजी २ आतंकवाद्यांना ठार केल्याचे श्रेय घेण्यासाठी वाद घालणारे सुरक्षा रक्षक देशाचे कसे रक्षण करणार ? - संपादक)

मिरी (बॉर्नियो) येथे उभारण्यात आलेले हिंदु मंदिर १० जुलैला उघडणार !

     मिरी - मलेशियाजवळील बॉर्नियो बेटावरील मिरी येथे उभारण्यात आलेले श्री कामिनी दुर्गा ईश्‍वरी अम्मा अलायम मंदिर १० जुलै या दिवशी हिंदु भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या मंदिरामुळे मिरी हिंदु सोसायटीच्या १ सहस्रपेक्षा अधिक सदस्यांना पूजाविधीसाठी जागा उपलब्ध होणार आहे. मिरीच्या तमन तुंकु येथे उभारलेले श्री कामिनी दुर्गा ईश्‍वरी अम्मा अलायम मंदिर हे येथील पहिलेच हिंदु मंदिर आहे. या मंदिराचे आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर जून महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे, असे मिरी हिंदु सोसायटीचे अध्यक्ष सेलवाराज ग्रप्रगसे यांनी सांगितले.
     मंदिराच्या उभारणीसाठी साहाय्य केलेले राज्यशासन, विविध संघटना आणि अर्पणदाते यांचे श्री. ग्रप्रगसे यांनी आभार मानले आहेत. १० जुलै या दिवशी मंदिराचे विधिवत् उद्घाटन होणार आहे. त्या दिवशी मंदिरात महाकुंभाभिषेक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे मिरी हिंदु सोसायटीच्या अध्यक्षांनी सांगितले.

कार्वे (जिल्हा सातारा) येथे पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागेची अनुमती

हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावाचा परिणाम !
     कार्वे - येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावानंतर पोलीस आणि प्रशासन यांनी शासकीय भूमीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची अनुमती दिली.
१. कार्वे, तालुका कराड येथील कार्वे-शेणोली राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे कार्य चालू आहे. कार्वे गावानजीक असलेल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शासकीय हद्दीमध्ये आहे.
२. तो पुतळा शासकीय भूमीवरील अतिक्रमण असून रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा निर्माण करत आहे, असे सांगून पाटबंधारे खाते तो मागे हलवण्याच्या विचारात आहे. २८ जून या दिवशी सरकारकडून पुतळा हलवण्यात येणार असल्याची नोटीस ग्रामपंचायतीला देण्यात आली. नोटिसीची एक प्रत कराड ग्रामीण पोलीस ठाण्याला माहितीसाठी देऊन त्यांच्याकडून आवश्यक ते पोलीस संरक्षण मागण्यात आले आहे. (अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असा प्रसंग घडवला असता, तर त्यांना विरोध करण्याचे अथवा ते हटवण्याचे धाडस झाले असते का ? - संपादक)

महाराणा प्रताप बटालियन आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आझाद मैदानात निदर्शने !

निदर्शने करतांना महाराणा प्रताप बटालियनचे
आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते
     मुंबई - आझाद मैदानात २८ जून या दिवशी साध्वी प्रज्ञा ठाकूर, धनंजय देसाई आणि समीर गायकवाड यांच्या सुटकेकरिता महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आतंकवादाना बेल आणि हिदूंना जेल अशा घोषणा या वेळी देण्यात येत होत्या. कारागृहात असणारे निर्दोष साधू-संत आणि धर्मरक्षक यांची त्वरित सुटका करावी, त्यांच्यावरील खटले रहित करण्याची मागणी केली. हिंदू महासभा, स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, हिंदुराष्ट्र सेना, हिंदू राष्ट्र जनजागृती संघटन, हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग होता साधू, संत आणि हिंदुत्ववादी संघटना उपस्थित होत्या. या वेळी बटालियनचे अध्यक्ष श्री. ठाकूर अजयसिंह सेंगर, श्री. एकनाथ मुंबईकर, श्री. निखिल वर्मा यांनी मार्गदर्शन केले.

दादरमध्ये रिपब्लिकन सेनेकडून मोर्च्याच्या वेळी दुकानांवर दगडफेक आणि मोडतोड !

डॉ. आंबेडकर यांचे जुने मुद्रणालय आणि भवन पाडल्याचे प्रकरण
     मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील जुने ऐतिहासिक मुद्रणालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याचा विरोध म्हणून रिपब्लिकन सेनेने दादरमध्ये मोर्चा काढला होता. या मोर्च्याच्या वेळी आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक केली आणि साहित्याची मोडतोड करून दुकाने बंद करण्यास सांगितले. अनेक दुकानदारांनी दुकाने बंद केली आहेत. या घटनेमुळे या भागात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. 
     आनंदराज आंबेडकर या मोर्च्याचे नेतृत्व करत होते. आंबेडकर भवन ते भोईवाडा पोलीस ठाण्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. पोलिसांच्या देखत दुकाने आणि वाहने यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली, तसेच काही दुकानांतील पैसेही चोरण्यात आले. डॉ. आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स इम्प्रूव्हमेंट या न्यासाकडे या दोन वास्तूंची मालकी होती. २७ जून या दिवशी या पाडकामाच्या निषेधार्थ वरळीमध्ये बंद पुकारण्यात आला होता. न्यासाने पुनर्विकासासाठी पाडकाम केल्याचे सांगितले आहे; मात्र त्याला आंबेडकर कुटुंबीय आणि अन्य नागरिक यांनी विरोध दर्शवला आहे.

राज्यावरील जलसंकट दूर होण्यासाठी स्वयंभू श्री बाणेश्‍वर महादेव जलाधिवासात

     पंचवटी (जिल्हा नाशिक) - जून मास संपत असूनही पाऊस न झाल्याने राज्यावरील जलसंकट टाळण्यासाठी पुरोहितांनी रामकुंड येथील स्वयंभू श्री बाणेश्‍वर महादेवाला जलाधिवासात ठेवले आहे.
१. गंगाघाट येथील पुरोहितांनी २७ जूनला संध्याकाळी रामकुंड येथील स्वयंभू श्री बाणेश्‍वर महादेवाला दुग्धाभिषेक, राजपोचार पूजा करून जलाधिवासात ठेवले आहे.
२. ज्या वेळी पाऊस पडत नाही, त्या वेळी येथे पूजा केल्यास पर्जन्यमान चांगले रहाते. जलाधिवास म्हणजे येथील स्वयंभू महादेवाच्या पिंडीला संपूर्णपणे पाण्याने बुडवण्यात येते. त्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला काटेरी झाडाझुडपांच्या फांद्या लावून नव्या कोर्‍या पांढर्‍या वस्त्राने चारही बाजूंनी बंदही करण्यात येते. 
३. याआधी वर्ष २००८ मध्ये पाऊस न पडल्याने पुरोहित संघाने येथील स्वयंभू श्री बाणेश्‍वर महादेवाला जलाधिवासात ठेवले होते. त्यानंतर पुष्कळ पाऊस पडला. नाशिक शहरात महापूर येऊन अर्धे नाशिक पाण्याखाली गेले होते.

शारीरिक स्वास्थ्याकरता मुसलमान विद्यार्थी करत आहेत प्रतिदिन योगा !

योगासनांना विरोध करणारे मुसलमान हे लक्षात घेतील का ? 
     कर्णावती (अहमदाबाद) - येथील अंजुमन-ए-इस्लाम या शाळेतील विद्यार्थी प्रतिदिन योगाचा ३० मि. अभ्यास करत आहेत. विशेषत: रमजानच्या महिन्यात काही खायचे नसल्याने तसेच पाणीही प्यायचे नसल्याने योगामुळे पुष्कळ साहाय्य होते, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
     नमीरा नावाच्या एका विद्यार्थिनीने म्हटले आहे की, योगामुळे पुष्कळ लाभ होत असून हा कोणत्या विशिष्ट धर्माशी जोडलेला नाही. योगामुळे आरोग्य चांगले रहाण्यासाठी साहाय्य होत असल्याने कोणीही योगा करू शकतो. शाळेतील शिक्षकांनीही योगामुळे विद्यार्थ्यांना पुष्कळ लाभ होत असून योगामध्ये ॐ चे उच्चारण करायचे कि नाही याचे आम्ही विद्यार्थ्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले आहे, असे म्हटले आहे.रघुराम राजन देशभक्त ! - पंतप्रधान मोदी

      नवी देहली - भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि अर्थ मंत्रालयातील अधिकारी यांच्या विरुद्ध केलेल्या टिपण्ण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देतांना म्हटले की, कुणी जर स्वत:ला व्यवस्थेपेक्षा वरचढ समजत असेल, तर ते चुकीचे आहे. रघुराम राजन हे कमी देशभक्त नाहीत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 
      एन्एस्जी सदस्यत्वाविषयी मोदी म्हणाले की, मागील सरकारांनीही एन्एसजी सदस्यत्वासाठी प्रयत्न केलेले आहेत; मात्र आमच्या सरकारने याविषयी अधिक यश मिळवले. यामुळेच सरकारवर टीका केली जात आहे.कला शाखेत सर्वाधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थिनीसह अन्य ३ जणांना अटक !

बिहारच्या शिक्षण क्षेत्रातील जंगलराज !
      पाटलीपुत्र (बिहार) - इयत्ता १२वीच्या कला शाखेच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या निकालासंर्भातील घोटाळा उघडकीस आल्यानंतर बिहार शालेय परीक्षामंडळाने पुन्हा परीक्षेसाठी बोलवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून प्रथम आलेल्या रूबी रॉय या विद्यार्थिनीचा समावेश होता. परीक्षा मंडळाच्या अधिकार्‍यांनी विचारलेल्या एकाही प्रश्‍नाचे उत्तर रूबी देऊ शकली नाही. ३ मासांपूर्वी झालेल्या परीक्षेसाठी तिने २ वर्ष अभ्यास केला होता. प्रश्‍नांची देऊ न शकण्याचे कारण विचारल्यावर रूबी हिने मी सर्व विसरले आहे, असे सांगितले. 
     यानंतर रूबी आणि अन्य ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

हवाई सुंदरीवर सेल्फीसाठी बळजोरी करणार्‍या धर्मांधाला अटक

     मुंबई - दमन-मुंबई विमान प्रवासात हवाई सुंदरीवर सेल्फीसाठी बळजोरी करणारा धर्मांध मोहमद अबुबाकर (वय २९ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. जेट एअरवेजच्या विमानाने गुजरातमधील दमन येथून मुंबईला येत असताना त्याने हवाईसुंदरीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी अंगलट करून सेल्फी घेतला, तसेच प्रसाधनगृहात जाऊन धूम्रपान करून नियमांचेही उल्लंघन केले. (धर्मांधांची वासनांधता जाणा ! - संपादक)

पुण्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची समाधी दुर्लक्षितच !

  • हिंदूंनो, थोर राष्ट्रपुरुषांच्या समाधीस्थळांकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्‍या पुणे महानगरपालिकेला लक्षात ठेवा !
  • हिंदु राष्ट्रातच (सनातन धर्म राज्यात) थोर राष्ट्रपुरुषांच्या समाधीस्थळांची योग्य ती काळजी घेतली जाईल.
     पुणे - पुण्याची उभारणी करण्यामध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा सिंहाचा वाटा होता. त्या श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे समाधीस्थान पुणे महानगरपालिकेने येथील मुठा नदीच्या पात्रात बांधले आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या २६ जून या स्मृतिदिनी त्यांच्या समाधीस्थळाची दुरवस्था झालेली आढळून आली आहे. या समाधीस्थळी त्यांच्या कार्याची माहिती देणारे शिलालेख पुसले गेले असून समाधीच्या मागील बाजूस प्रचंड घाण आणि गटाराचे पाणी साचले आहे. त्याकडे महानगरपालिका प्रशासन गांभीर्याने पहात नाही. (हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी पालिका प्रशासन कोणती ठोस उपाययोजना करणार आहे, याविषयी पालिका आयुक्त उत्तर देतील का ? - संपादक)
     श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री देवदेवेश्‍वर संस्थान आयोजित अभिवादनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे या समाधीस्थळासह इतर अनेक ऐतिहासिक व्यक्तींच्या स्मारकांची जोपासना करण्याची मागणी केली आहे. या कार्यक्रमाला पेशव्यांचे वंशज डॉ. उदयसिंह पेशवा, संस्थानचे विश्‍वस्त रमेश भागवत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात तत्कालीन अधिकारी आणि दलाल यांचा संगनमताने २ कोटी रुपयांचा घोटाळा

भ्रष्टाचाराचे कुरण बनत चाललेली प्रादेशिक परिवहन कार्यालये !
      संभाजीनगर, २८ जून - येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात अवजड (ट्रान्सपोर्ट) वाहतूक संवर्गातील वाहने हलक्या वाहन (नॉन ट्रान्सपोर्ट) संवर्गात रूपांतरित करतांना तत्कालीन अधिकारी आणि दलाल यांनी संगनमताने २ कोटी रुपयांचा महसूल बुडल्याचे उघडकीस आले आहे. (या प्रकरणात सहभागी असलेल्या संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासमवेत आर्थिक दंडही सव्याज वसूल करावा. - संपादक) ही रक्कम वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईहून आलेल्या तपास पथकाने २ दिवस केलेल्या कार्यालयाच्या झडतीत ६०० हून अधिक वाहनांचा कर अशा प्रकारे बुडवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

पुणे येथील बारामती तालुक्यातील दुष्काळी भागात पशूधनासाठी विनामूल्य चारावाटप

जनकल्याण समिती, पुणे आणि माहिती सेवा समिती यांचा संयुक्त उपक्रम !
मध्यभागी बोलतांना श्री. चंद्रकांत वारघडे
     पुणे, २८ जून - जून मास संपत आला, तरीसुद्धा पुणे जिल्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यांत अद्यापपर्यंत पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना पशुधन जगवण्यासाठी पुष्कळ कसरत करावी लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती, पुणे शाखा आणि माहिती सेवा समिती, बकोरी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळी भागातील पशुधनासाठी विनामूल्य चारावाटप करण्यात येत आहे. या दोन्ही संघटनांच्या वतीने २६ जून या दिवशी दौंड तालुक्यातील वाळकी येथे ६३ टन चारा विनामूल्य देण्यात आला. माहिती सेवा समितीच्या माध्यमातून दुष्काळी भागातील पशुधनासाठी गेल्या ३ मासांपासून ५०० टनांपेक्षा अधिक चारा विनामूल्य देण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये अश्‍लीलतेकडे झुकत असल्याचे सांगत एका शाळेत विद्यार्थिनींना स्कर्ट परिधान करण्यास बंदी घालणे, ही पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणार्‍या भारतियांना चपराक !

     ब्रिटनमधील डिस हायस्कूलच्या व्यवस्थापनाने शाळेतील विद्यार्थिनींना स्कर्ट परिधान करण्यास बंदी घातली आहे. मुलींना पँट घालूनच शाळेत येण्याचा आदेश दिला आहे. त्याशिवाय ७ ते ११ वर्षे वयाच्या मुलींना यापुढे मेकअप करून शाळेत येण्यास मनाई करण्यात आली आहे. मुलींचे स्कर्ट दिवसेंदिवस तोकडे होत चालले आहेत. ही बाब अव्यवहार्य आणि अश्‍लीलतेकडे झुकणारी असल्यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे. फलक प्रसिद्धीकरता

दूधच नाही, तर सोने देणार्‍या गायींना सरकार कधी वाचवणार ?
     गीर जातीच्या देशी गायीच्या १ लिटर गोमूत्रामधून ३ ते १० मिलीग्रॅमपर्यंत सोने काढल्याचा दावा गुजरातच्या जुनागड कृषी विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. बी.ए. गोलकिया यांनी केला आहे. तसेच त्यात ३८८ औषधीय गुण मिळाले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Dhoodh hi nahi Sona bhi denevali Gomata ki sarkar kab raksha karegi ? - Deshi gay ke 1 ltr. Gomutra se 10 mg sona nikalne ka dava Dr. Golkiya ne kiya hai !
जागो !
     दूध ही नहीं, सोना भी देनेवाली गोमाता की सरकार कब रक्षा करेगी ? - देसी गाय के १ लीटर गोमूत्र से १० मि.ग्रा. सोना निकालने का दावा जूनागढ कृषि विश्‍वविद्यालय के डॉ. गोलकिया ने किया है !

तोंडी तलाकवर बंदीच हवी ! - मुसलमान महिलांची महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे मागणी

     संभाजीनगर, २८ जून - मुसलमान समाजात ३ वेळा तलाक हा शब्द उच्चारून दिल्या जाणार्‍या घटस्फोटाच्या प्रक्रियेवर बंदी घालावी, अशी मागणी मुस्लिम महिला आंदोलन संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे करण्यात आली आहे. (हिंदु धर्मप्रथांविरुद्ध गरळओक करणार्‍या पुरो(अधो)गामी संघटना आणि कथित स्त्री-पुरुष समानतेची भाषा करणार्‍या तृप्ती देसाई याविषयी काय करणार आहेत ? - संपादक) या संघटनेच्या नूरजहाँ शेख यांनी धर्मसंमत आणि न्यायसंगत ही मागणी योग्य असल्याचे सांगितले. या निवेदनाची संवेदनशीलपणे दखल घेण्यात आली असून मुस्लिम पर्सनल लॉ आणि घटनेतील अधिकार सर्व महिलांना मिळावेत, यासाठी प्रयत्न केले जावेत, असे रहाटकर यांनी म्हटले आहे. (अशीच संवेदनशील दखल महिला आयोगाने हिंदु महिलांच्या सबलीकरणासाठीही दाखवावी ! - संपादक) या निवेदनाची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयासही पाठवण्यात आली आहे.

बेळगाव येथे एका शाळेतील मराठी विभाग बंद करण्याचे षड्यंत्र

मराठीप्रेमींनो, मराठीला वाचवण्यासाठी आतातरी संघटित व्हा !
    बेळगाव - येथील सरस्वती गर्ल्स हायस्कूलमधील मराठी विभाग बंद करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. शाळेतील मराठी विभाग बंद करण्यासाठी दोन शिक्षकांच्या पदोन्नतीवर बदलीची शिफारस करण्यात आली आहे. 
१. शहापूर संस्थान काळात पटवर्धन राजांनी या शाळेचा प्रारंभ केला. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत ही शाळा केवळ मराठी माध्यमाचीच होती; परंतु अलीकडच्या काही वर्षांत शिक्षण खात्याने तेथे कन्नड विभाग चालू केला. 
२. उपप्राचार्य भोवी हे सातत्याने मराठी माध्यम विभाग बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कन्नडधार्जिण्या भूमिकेमुळे गेल्या वर्षीपासूनच येथील काही विभाग बंद करण्यात आले. 
३. या वर्षीही येथे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ करण्यात आली.


मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १ लक्ष झाडांऐवजी मोजक्या संख्येनेच केली झाडांची लागवड

दुभाजकांत झाडे न लावल्याने महामार्गावर अपघातांची मालिका !
     पुणे, २८ जून - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे काम देण्यात आलेल्या आयडीयल रोड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड (आयआर्बी) हे आस्थापन आणि राज्य सरकार यांच्यात त्या वेळी झालेल्या करारानुसार रस्त्याची बांधणी करतांना दुभाजकांमध्ये १ लक्ष झाडे लावण्याचा करार करण्यात आला होता; मात्र त्यांपैकी काही मोजकीच झाडे प्रत्यक्षात लावण्यात आली. (हा भाग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या लक्षात का आला नाही ? - संपादक) १४ वर्षांपूर्वी महामार्गाचे काम चालू असतांनाच जर ही झाडे लावली गेली असती, तर आतापर्यंत अनेक अपघात रोखण्यास साहाय्य झाले असते, असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. (आस्थापनाची ही कुचराई नागरिकांच्या जिवावर बेतत आहे, हे जाणून सरकारने आयआर्बी आस्थापनावर कारवाई करावी - संपादक)

फेअरनेस क्रिम आरोग्यासाठी हानीकारक !

देहली इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्चचा निष्कर्ष 
     नवी देहली - प्रत्येक व्यक्तीला आपण गोरे दिसावे, असे वाटत असते. त्यासाठी ती कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यास सिद्ध असते. त्यामुळे बाजारात फेअरनेस क्रिमला मोठ्या प्रमाणात मागणी असते; मात्र त्वचेला गोरे बनवणार्‍या या क्रीम व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते आणि त्यामुळे व्यक्तीला अनेक प्रकारचे आजार जडण्याची शक्यता असतेे, असा निष्कर्ष देहली इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेने केलेल्या चाचणीतून पुढे आला आहे. 
१. या संशोधन संस्थेने बाजारात मिळणार्‍या ११ प्रसिद्ध आस्थापनांच्या फेअरनेस क्रिम्सची चाचणी केली.
२. या संस्थेनुसार भारतात कॉस्मेटिकच्या उत्पादनांमध्ये पार्‍याच्या वापराला अनुमती नसतांनाही या आस्थापनांच्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात पारा आढळून आला आहे.

ब्रिटनमध्ये वर्णद्वेषातून पोलिश नागरिकांना लक्ष्य !

     लंडन - युरोपियन समुदायातून बाहेर पडल्यानंतर आता इंग्लंडमधील वर्णद्वेष उफाळून आला आहे. मूळ पोलंडचे नागरिक असलेल्या नागरिकांना प्रामुख्याने लक्ष्य केले जात असून आतापर्यंत वांशिक शोषण आणि द्वेषाचे १००हून अधिक गुन्हे समोर आले आहेत. त्यामुळे पोलिश समुदायामध्ये तणावाचे वातावरण आहे.
    पोलिश सोशल अ‍ॅण्ड कल्चरल असोसिएशनच्या लंडनमधील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर वर्णद्वेषी मजकूर असलेले फलक लावण्यात आले होते, तसेच हंगटिनडॉनमध्ये रहाणार्‍या पोलिश नागरिकांच्या घराच्या दारांवर ब्रिटन सोडून जाण्याची चेतावणी देणारे भित्तीपत्रके चिकटवण्यात आली होती. याबरोबरच येथील सेन्ट पीटर स्कूलच्या बाहेर इंग्रजी आणि पोलिश भाषेत युरोपियन समुदाय सोडा, आणखी पोलिश समाजकंटक नकोत, असे लिहिलेली पत्रके आढळून आली होती. नागरिकांना भररस्त्यात थांबवून ब्रिटन सोडून जाण्याची चेतावणी दिली जात असल्याचेही काहींनी म्हटले आहे. याचवेळी स्थलांतरितांना कोणी धमकावत असल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असे मावळते पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी स्पष्ट केले आहे.

जोधपूर, राजस्थान येथे जोधपूर सेवा सन्मान समारोहात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सन्मान

नंदकिशोर राठी मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिटीझन सोसायटी 
फॉर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन
डावीकडून श्री. आनंद राठी आणि श्री. सुरेश राठी
यांच्याकडून सन्मान स्वीकारतांना सौ. सुशिला
मोदी, त्यांच्या बाजूला सौ. राखी मोदी
     जोधपूर (राजस्थान) - जोधपूरमध्ये कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा समाजाला परिचय व्हावा, याकरता नंदकिशोर राठी मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिटीझन सोसायटी फॉर एज्युकेशन यांच्या संयुक्त वतीने नुकतेच जोधपूर सेवा सन्मान समारोहाचे आयोजन करण्यात आले. या समारोहामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांसह स्थानिक १५१ स्वयंसेवी संस्थांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपिठावर प.पू. स्वामी देवगिरीजी महाराज, पू. स्वामी अचलानंदजी यांच्या वंदनीय उपस्थितीसह महापौर श्री. घनश्याम ओझा, विभागीय आयुक्त श्री. रतन लाहोटी, जोधपूर स्वयंसेवी संस्था संघाचे अध्यक्ष श्री. गोपालचंद भंडारी उपस्थित होते. या वेळी ट्रस्टचे विश्‍वस्त श्री. आनंद राठी आणि श्री. सुरेश राठी यांच्या हस्ते सहभागी संस्थांना स्मृतीचिन्ह आणि आर्थिक साहाय्य देण्यात आले. हा सन्मान सनातन संस्थेच्या वतीने साधिका सौ. सुशिला मोदी आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साधिका सौ. राखी मोदी यांनी स्वीकारला.

राष्ट्रद्रोही आणि संस्कृतीद्रोही राज्यकर्त्यांमुळे बौद्धिक लंपटतेत वाढ ! - प्रा. कुसुमलता केडिया, संचालक, गांधी विद्या संस्थान, वाराणसी, उत्तरप्रदेश

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांतर्गत हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनाचा अंतिम दिवशीचा वृत्तांत
प्रा. कुसुमलता केडिया
    युरोपीय विचारांचे अंधानुकरण करून स्वधर्माला, तसेच स्वसंस्कृतीला न्यून लेखण्याची कुप्रथा भारतात गेल्या शतकांमध्ये बळावली आहे; मात्र ज्याप्रमाणे चित्रविचित्र आरशांमध्ये वेगवेगळ्या प्रतिमा उमटतात, त्याप्रमाणे युरोपीय संस्कृतीच्या आरशामध्ये विकृत प्रतिमाच दिसते. युरोपीय विचारांचा आरसा हा ज्ञानाचा नसून अज्ञानाचा आहे. वास्तविक शिल्प, कला, ज्ञान आदी क्षेत्रांमध्ये जे विश्‍वगुरु आहेत, त्यांचे आपण वंशज आहोत. दुर्दैवाने राष्ट्रद्रोही आणि परंपराद्रोही राज्यकर्त्यांमुळे बौद्धिक लंपटता आज पुष्कळ प्रमाणात वाढत आहे. या बौद्धिक लंपटतेमध्ये इस्लाम, ख्रिस्ती, साम्यवाद आणि धर्मनिरपेक्षता यांचे वर्चस्व आहे. हिंदु धर्माभिमान्यांनी त्याला प्रत्युत्तर देण्याचे कार्य करत रहाण्याची आवश्यकता आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तपस्येचे फळ अर्पण करणारे मुंबई (महाराष्ट्र) येथील ज्योतिषतज्ञ संतश्री राजेंद्र शर्मा !

      ज्योतिषतज्ञ संतश्री राजेंद्र शर्मा मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यामध्ये मी सहभागी झालो होतो. हा कुंभमेळा प्रत्येक १२ वर्षांनी भरतो; गोवा येथे मात्र या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षीच कुंभमेळा भरत आहे. तीर्थक्षेत्री भरणार्‍या कुंभमेळ्यापेक्षाही मला या ठिकाणी अधिक ऊर्जा जाणवते. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन साधक, कार्यकर्ते निष्ठेने तपस्या करत आहेत. कदाचित अशी तपस्या यापूर्वी कुणी केली नसेल.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मान्यवरांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान !

संतश्री राजेंद्र शर्मा (डावीकडे) यांचा सत्कार
करतांना पू. नंदकुमार जाधव
प्रा. कुसुमलता केडिया (डावीकडे) यांचा सत्कार
करतांना पू. (कु.) अनुराधा वाडेकर

गुन्हेतपास कि थिल्लरपणा ?

दाभोळकर हत्या प्रकरणाच्या अन्वेषणावर आपलं महानगरचा अग्रलेख !
     मुंबईतील दैनिक आपलं महानगरने त्यांच्या १७.६.२०१६ या दिवशीच्या अंकातील संपादकीय लेखात दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासातील फोलपणा समोर आणला आहे. हा लेख आमच्या वाचकांसाठी आहे तसा प्रसिद्ध करत आहोत.
       डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आणखी दोन मासांनी तीन वर्षे पूर्ण होतील. अजून त्यांच्या हत्येचे रहस्य उलगडलेले नाही. दरम्यान आणखी दोन समाज सुधारकांच्या तशाच पद्धतीने हत्या होऊन गेल्या आहेत. अशा स्थितीत नव्या कुणा आरोपीला पकडल्यानंतर जी सनसनाटी तपासयंत्रणाच माध्यमातून निर्माण करत आहेत, ती शंकास्पद आहे; कारण अशीच सनसनाटी तीन वर्षापूर्वी झाली आणि वारंवार होत राहिली.

आपत्काळाचा सामना करण्यासाठी स्वतःतील ब्रह्मशक्ती जागृत करणे आवश्यक ! - कर्नल (निवृत्त) अशोक किणी

कर्नल (निवृत्त) अशोक किणी
    नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकते. महर्षींनी नाडीपट्टीमध्येही आगामी काळात जलप्रलय होणार असल्याचे सांगितले आहे. या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी स्वतःतील ब्रह्मशक्ती जागृत करणे आणि त्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नवी देहली येथील फेथ फाऊंडेशनचे अध्यक्ष कर्नल अशोक किणी यांनी केले.
    ते पुढे म्हणाले, मानवनिर्मित आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी या आपत्ती कशा प्रकारे उद्भवू शकतात, याचे विश्‍लेषण करून त्यावरील उपाययोजनांचा विचार करून ठेवायला हवा. आपत्काळामध्ये तीन दिवसांच्या खाण्यापिण्याची, तसेच कपड्यांची अन् औषधोपचारांची व्यवस्था करून ठेवायला हवी. त्यासाठी प्रशिक्षण घेण्याचीही आवश्यकता आहे.

साधनाविरहित राष्ट्रवाद पोकळ आणि विनाशाकडे नेणारा आहे ! - प्रा. रामेश्‍वर मिश्र, मार्गदर्शक, धर्मपाल शोध पीठ, भोपाळ, मध्यप्रदेश

प्रा. रामेश्‍वर मिश्र
      राष्ट्रवादासाठी धर्म आणि साधना हेच मूळ आहे. केवळ राष्ट्रवादासाठी नाही, तर जीवनाच्या सार्थकतेच्या दृष्टीनेही हे आवश्यक आहे. यामुळे चित्त निर्मळ होते. राजनीती हा मूळ संस्कृत शब्द आहे. ज्या समाजव्यवस्थेला पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते, उल्हासित होते, ती नीती ही राजनीती आहे. राजधर्मच सर्वांचा आदर्श आहे. आता जे चालू आहे, ती राजनीती नाही, तर पॉलिटिक्स आहे. आपल्याला राजनीतीकडे जायला हवे. फाळणीच्या वेळी भारतमातेचे विभाजन झाले, असे म्हटले जाते. हे चुकीचे आहे. जी भारतमाता स्वतः जगदंबा आहे, तिचे विभाजन कसे होऊ शकते ? भारताचे विभाजन झाले, याचा अनुवाद चुकीचा केला गेला. याऐवजी भारताचा काही भाग इस्लामच्या बाजूने दिला, हे त्याचे योग्य भाषांतर होईल. देशद्रोही अशा प्रकारे चुकीचे समज पसरवतात. अशी वक्तव्ये साधनेच्या अभावामुळे केली जातात.

देशात सर्वांसाठी एक कायदा असावा ! - पवन केसवानी, संयोजक, प्रबुद्ध नागरिक मंच, दुर्ग, छत्तीसगड

श्री पवन केसवानी
      अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करून देशाशी खेळ चालू आहे. लव्ह जिहाद, गोहत्याबंदी कायदा आदी अनेक विषयांवर लांगूलचालनाचे राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण देश आतून पोकळ बनला आहे. त्यामुळे लांगूलचालन हे एक ध्येय ठेवून त्याच्या विरोधात जनतेमध्ये जागृती करून संघटितपणे विरोध केला पाहिजे आणि देशात एक कायदा, एक राज्यघटना बनवण्यासाठी शासनाला भाग पाडले पाहिजे. आज गोहत्याबंदीचे कायदे होतात; पण प्रत्यक्षात त्याचे पालन होतांना दिसत नाही. सर्व संप्रदाय गोहत्या, तसेच हिंदूंवर होणार्‍या आघातांच्या विरोधात एका व्यासपिठावर एकत्र आले, तर गोहत्येसारख्या समस्या नष्ट होऊ शकतात. लव्ह जिहादमुळे हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे हा विषय बेधडकपणे समाजासमोर ठेवला पाहिजे. त्याला उघडपणे विरोध झाला पाहिजे.

केवळ साधनेमुळे अधिवेशनाला उपस्थित राहू शकलो ! - अधिवक्ता बिभूती भूषण पलेई, जिल्हा सचिव, प्रज्ञान क्रियायोग मिशन, सुंदरगढ, ओडिशा

अधिवक्ता बिभूती भूषण पलेई
     नामस्मरण केल्यावर आपल्या व्यावहारिक अडचणी सुटतात आणि आपण करत असलेली कामे निर्विघ्नपणे पार पडतात. मध्यंतरी माझा अपघात झाला होता. या संकटातून देवानेच मला वाचवले. या अपघातामुळे मला विश्रांती घेण्यास सांगितली होती; मात्र देवाच्या कृपेनेच मी या हिंदू अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकलो.

राष्ट्र आणि धर्म यांसाठी तळमळीने कार्य करणार्‍या हिंदुत्ववाद्यांचा परिचय !

     राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य तळमळीने करणार्‍या वेगवेगळ्या भागातील काही हिंदुत्वनिष्ठ अधिवेशनाला उपस्थित होते. या वेळी ते करत असलेल्या कार्याची ओळख इतरांना करून देण्यात आली.
अधिवेशनात सहभागी हिंदुत्वनिष्ठांविषयीचा श्री. कैलास कुर्‍हाडे यांचा भाव 
   अधिवेशनात सहभागी झालेले ज्येष्ठ हिंदुत्ववादी मला बाजीप्रभु देशपांडे यांच्याप्रमाणे, तर महिला हिंदुत्ववादी झाशीच्या राणीच्या रूपात भासत आहेत, असे श्री. कैलास कुर्‍हाडे यांनी सांगितले. 
१. शनिशिंगणापूर येथून नेवासा येथील बजरंग दलाचे श्री. संतोष पंडुरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नगर येथील श्री. संदीप खामकर, शनिशिंगणापूर युवा विचार मंच, शनिशिंगणापूर येथील श्री. दत्तात्रय जमदाडे, धर्माभिमानी श्री. अमोल दुसे हे उपस्थित होते.
     श्री. संतोष पंडुरे यांची अनुभूती सांगतांना हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, त्यांना एकदा ११ सहस्र व्होलटेज असलेल्या इलेक्ट्रिक लाईनचा स्पर्श झाला. अशा स्थितीत माणसाचा मृत्यू होतो. श्री. पंडुरे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आधुनिक वैद्यांनी त्यांच्या वाचण्याची काही शाश्‍वती नाही, असे सांगितले; मात्र तपासल्यानंतर काही विशेष झाले नसल्याने घरी जाऊ शकता, असे सांगितले. इलेक्ट्रिक लाईनचा स्पर्श झाला, तेव्हा श्री. पंडुरे यांनी एकदा देवाचे नाम घेतले होते. त्या नामजपाच्या शक्तीमुळे देव आपले कसे रक्षण करतो, याची ही सर्वांत मोठी अनुभूती त्यांना आली.

इंग्रजी शाळांचे वाढते प्रस्थ !

     या वर्षी मुंबईत एकाही मराठी शाळेसाठी अर्ज आला नाही, तर इंग्रजी माध्यमाच्या ३० नव्या शाळांना मान्यता देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमांच्या शाळांतच प्रवेश घेण्याचे मराठीजनांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे आणि ते वाढतच आहे. यातच या मान्यतेचे मूळ आहे. २०-२५ वर्षांपूर्वी मराठी शाळांचा बोलबाला होता आणि आज इंग्रजी शाळांचा आहे. ब्रिटीश अधिकारी मेकॉलेचे विचार खरे करून दाखवण्याचा विडाच जणू उचलला गेला आहे.

हिंदूंच्या एकतेची अपरिहार्यता सांगणारा प्रसंग

     आम्ही रामनाथी आश्रमातून यवतमाळला जायला राज्यपरिवहन मंडळाच्या गाडीने निघालो. गाडी प्रवाशांनी पूर्ण भरलेली असून बसायला एकही आसंदी रिकामी नव्हती. निमआराम वाहन असेल तर अधिक प्रवासी घेत नाहीत. अशा गाडीत उभ्याने प्रवास करणारे प्रवासी सहसा नसतात. 
       गाडी अहमदपूरला आल्यावर काही प्रवासी गाडीत चढले. वाहकाने (कंडक्टरने) त्यांना बसायला जागा नाही. उभे राहून प्रवास करावा लागेल, असे आधीच बजावले होते. या प्रवाशांमध्ये ३ धर्मांध होते. गाडी चालू झाल्यावर बसायला जागा नाही; म्हणून ते वाहकाशी भांडू लागले. वाहकाने त्यांना सांगितले, मी आधीच कल्पना दिली होती. तुम्हाला पटत नसेल, तर गाडीतून उतरा. त्यावर ते वाहकाशी वाद घालू लागले आणि गाडी पोलीस ठाण्यात घेऊन चला, असे वारंवार म्हणायला लागले. असे काही मिनिटे चालले. ते वाहकाचे ऐकत नव्हते. 
       तेव्हा गाडीतील अन्य सर्व प्रवाशांनी वाहकाला पाठिंबा देऊन ते त्याची बाजू घेऊन बोलू लागले. तेव्हा धर्मांध वरमले आणि गाडी थांबवायला सांगून गाडीतून उतरले. सर्व हिंदु संघटितपणे वाहकाच्या पाठीशी उभे राहिले; म्हणून पुढील प्रसंग टळला.
       यावरून हिंदु संघटित झाल्यावर त्यांना कुणीही त्रास देऊ शकत नाही, हे लक्षात आले. 
- सौ. धनश्री देशपांडे, यवतमाळ (३.२.२०१६)

सनातन संस्थेला आतंकवादी ठरवू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांचा वैचारिक आतंकवाद !

एखाद्या सराईत रहस्यकथाकारालाही लाजवेल, अशा कपोलकल्पित कथा 
रचणार्‍या प्रसारमाध्यमांची पीतपत्रकारिता ! 
      पीतपत्रकारिता म्हणजे कोणतीही शहानिशा न करता सनसनाटी निर्माण करण्यासाठी, वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी प्रसारित केलेली खोटी आणि निराधार वृत्ते होय !
      १० जून या दिवशी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून त्यांच्याविषयी आणि सनातनविषयी धादांत खोटी माहिती देणारी अनेक वृत्तांची मालिकाच चालू झाली. यामुळे सनातन संस्था, संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांची मोठ्या प्रमाणात अपकीर्ती झाली. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची सत्य बाजू लोकांच्या समोर येण्यासाठी अशा वृत्तांचे खंडण करणारे हे सदर क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरक शक्ती : राजमाता जिजाऊ !

राजमाता जिजाऊंना छायाचित्रात्मक अभिवादन
राजमाता जिजाऊ भोसले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...
    वर्ष १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला. त्यांना रामायण-महाभारत आणि पुराणे यांतील कथा अतिशय आवडत होत्या. महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात मोगलां अन् विजापूरचे सुलतान यांनी धुमाकूळ घातला होता. राष्ट्ररक्षणासाठी सुपुत्र दे, अशी प्रार्थना जिजाऊंनी भवानीदेवीला केली. बाल शिवाजीच्या जन्मानंतर त्यांच्यावर लहानपणापासूनच राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे संस्कार होण्यासाठी जिजाऊंनी त्यांना प्रभु श्रीराम, मारुती, श्रीकृष्ण इत्यादी देवतांच्या, तसेच महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगून राष्ट्र अन् धर्म भक्तीचे बाळकडूच पाजले. पुण्यात रहाण्यासाठी आल्यानंतर त्यांनी कसब्यात गणपतीची स्थापना केली आणि जोगेश्‍वरी अन् केदारेश्‍वर यांचा जीर्णोद्धार केला. तत्कालीन राजकारणात आणि समाजकारणात जिजाबाई सतत लक्ष घालत होत्या. राजमाता जिजाबाईंचे पाच पुत्र मृत्यूमुखी पडले होते. एकटे शिवाजी महाराज जगले आणि त्यांच्यावरही अनेक संकटे ओढावत होती; पण तशाही स्थितीत मन कठोर करून त्या शिवरायांना यशस्वी होण्याचे आशीर्वाद देत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथे जातांना सर्व राज्यकारभार जिजाऊंच्या स्वाधीन केला होता. जिजाबाई या केवळ माताच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरक शक्तीही होत्या. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच वर्ष १६७४ मध्ये त्यांनी पाचाड येथे देह ठेवला. अशा जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करूया.
(भारतीय संस्कृतीकोष)

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

* हिंदी : www.hindujagruti.org/hindi/
* मराठी : www.hindujagruti.org/marathi/

करोडपती नेत्यांनी राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी लोकांकडून साहाय्य मागणे आणि स्वतः मात्र साहाय्य न करणे

     भारतात निवडणुकीला उभ्या रहाणार्‍या एकूण उमेदवारांपैकी जवळपास ३० टक्क्यांहून अधिक उमेदवार करोडपती आहेत. असे असतांना उत्तराखंड प्रलय, ओडिशा आणि आंध्रप्रदेश येथील वादळ, आसाममधील पूर अशा राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी लोकांकडून साहाय्याची मागणी करणारे हे करोडपती स्वतः किती साहाय्य करतात, हा चिंतनाचा विषय आहे. - एक साधक (१०.१२.२०१३) 
     (निवडणुकीच्या वेळी लोकांकडे मतांची भीक मागणारे हे नेते निवडणुकीनंतर मात्र जनतेकडे ढुंकूनही पहात नाहीत. जनतेचा पैसा लुटून श्रीमंत झालेल्या या नेत्यांना राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी मात्र आपद्ग्रस्तांना साहाय्य करावेसे वाटत नाही. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे. - संकलक)

गुरुपौर्णिमेला २० दिवस शिल्लक

गुरु अध्यात्मविवेचन करतात, तेव्हा ऋषीमुनी आणि देवता 
तेथे येतात. त्यांच्या अस्तित्वाचाही शिष्यांना लाभ होतो.

फिर क्यों नहीं होगी गुरुकृपा अपार !

गुरुके चरणों मे करके अपना सबकुछ अर्पण ।
लेकर साधना का दृढ प्रण ॥

गुरु सेवा को बनाया अपना संसार ।
नहीं किया मार्ग के कांटों का विचार ।
गुरु का आशीर्वाद जो है सर पर ॥ १ ॥

तडप, लगन और भाव की लेकर कुंजी ।
कमाई है उसने गुरुकृपा की पूंजी ॥
दिया सभी साधकों को प्रेमका आधार ।
नहीं किया उसने अपने कष्टों का विचार ।
फिर क्यों नहीं होगी गुरुकृपा अपार ॥ २ ॥
- कु. संगीता मेनराय, फरिदाबाद (जून २०१६)

प.पू. डॉक्टरांच्या खोलीत नामजप लिहून त्यांच्या चैतन्याने भारित झालेले नाम आपल्या खोलीत आणूया, असा विचार येणे आणि तसे केल्यावर त्या नामानुसंधानात शांत झोप लागणे अन् दुसर्‍याच दिवशी दैनिक सनातन प्रभातमधे साधकांनी आपल्या सभोवती नामजपाची पेटी करून झोपावे, असे पू. राजेंद्रदादांनी सांगितले असल्याचे छापून येणे

कु. स्वाती गायकवाड
पू. राजेंद्रदादांनी साधकांनी आपल्या सभोवती नामजपाची पेटी करून झोपावे, असे सांगितल्याचे दैनिक सनातन प्रभातमधे छापून आले होते. हे दैनिक सनातन प्रभातमधे येण्याच्या आदल्या रात्री माझ्या मनात खोलीत सर्वत्र नामजप लिहून काढूया, असा विचार आला होता. तेव्हा थोडा वेळ नामजप लिहिल्यावर मला वाटले, आधी प.पू. डॉक्टरांच्या खोलीत लिहूया. मग त्यांच्या चैतन्याने भारित झालेले नाम आपल्या खोलीत आणूया; म्हणजे अधिक चैतन्य मिळेल. या विचाराने मी प.पू. डॉक्टरांच्या खोलीत सर्वत्र जप लिहिला आणि थोड्या वेळाने ते चैतन्यमय नाम मी झोपत असलेल्या खोलीत आणून सर्वत्र पसरवले. त्यामुळे मला चांगले वाटून त्या नामानुसंधानात मला शांत झोप लागली.
    पू. राजेंद्रदादांनी लिहिलेली दैनिक सनातन प्रभातमधील चौकट वाचल्यावर देवाने ते अनुभवण्याची संधी दिल्यामुळे कृतज्ञता वाटली. आता नामजपाची पेटी सिद्ध करत असतांना झोपेतही अखंड नामानुसंधानाची संधी देवाने दिली. त्यानेच ती गोडी लावली, यासाठी भगवंताच्या आणि पू. दादांच्या चरणी कृतज्ञता !
- कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.४.२०१६)

अनेक दायित्व लीलया सांभाळणार्‍या आणि साधकांचा आधारस्तंभ असणार्‍या फरिदाबाद येथील कु. पूनम किंगर !

कु. पूनम किंगर
    आषाढ कृष्ण पक्ष नवमी (उत्तर भारतातील तिथीप्रमाणे) (२९.६.२०१६) या दिवशी फरिदाबाद येथील साधिका कु. पूनम किंगर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पूनमसमवेत सेवा करतांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
कु. पूनम किंगर यांना वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. हसतमुख
     कु. पूनम सेवेत कितीही व्यस्त असली किंवा तिला कितीही आध्यात्मिक त्रास होत असला, तरीही ती सतत हसतमुख असते.
२. साधकांना आधार वाटणे
    साधकांना कोणतीही अडचण आली, तरी ती त्यावर उपाय शोधण्यास त्यांना पूर्ण साहाय्य करते. ती इतरांच्या चुकाही प्रेमाने सांगते. त्यामुळे ऐकणार्‍यांना त्याचे वाईट वाटत नाही, उलट सर्व साधकांना तिचा आधार वाटतो.
३. गुरुधनाचा विचार करणे
    एकदा प्रसाराहून परत जातांना संध्याकाळ झाल्यामुळे सर्व बसगाड्यांना गर्दी होती. तेव्हा मी पूनमला थोडे अधिक भाडे असलेल्या बसमधून जाण्याचा पर्याय सांगितला; पण तिने गुरुधन वाचवणे महत्त्वाचे आहे, असे सांगून त्या बसने जाण्यास नकार दिला.

शांत, काटकसरी, साधी राहणी आणि देवावर दृढ श्रद्धा असलेली कु. सोनाली बधाले !

कु. सोनाली बधाले
     कु. सोनाली बधाले ही सनातनच्या रामनाथी आश्रमातील ग्रंथ विभागात सेवा करतेे. तिचा ज्येेष्ठ कृष्ण पक्ष नवमी (२९.६.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. सोनाली बधाले हिला सनातन परिवाराकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
१. साधनेला आरंभ
शाळेत असतांना सोनालीला साधनेची आवड नव्हती. आमच्या घरी साधक आले की, ती बाहेर निघून जायची. १० वीच्या परीक्षेत तिचा एक विषय राहिला होता. नंतर दुसर्‍या वेळी तिला त्या विषयात १ गुण अधिक मिळून ती पास झाली. त्या वेळी मी तिला म्हणाले, देवाने हा १ गुण तुला दिला आहे. तेव्हापासून तिचा देवावर विश्‍वास बसू लागला. त्यानंतर १२ वीत गेल्यानंतर ती साधना करू लागली.
२. पूर्णवेळ साधिका होऊन आश्रमात राहून साधना करणे
     तिने १३ वीसाठी प्रवेश घेतला, तेव्हा ती थोड्याच दिवसांसाठी रामनाथी आश्रमात आली होती; पण आश्रमातील वातावरणाने प्रभावित होऊन ती पूर्णवेळ साधिका म्हणून आश्रमात राहून साधना करू लागली. ती आजपर्यंत कोणत्याही नातेवाइकांकडे कधी राहिली नाही; पण रामनाथी आश्रमात पूर्णवेळ रहाण्याचा निर्णय तिने घेतला.
३. वर्षभर अभ्यास न करता केवळ परीक्षेच्या वेळी अभ्यास करूनही उत्तीर्ण होणे
तिची १३ वीची परीक्षा जवळ आल्यावर मीच तिला घरी बोलावून घेतले. परीक्षेला बसायचे, तर तिच्याकडे पुस्तके नव्हती आणि तिने अभ्यासही काहीच केला नव्हता. तिने आमच्या शेजारी रहाणार्‍या तिच्या वर्गातील मुलाच्या पुस्तकांवरून अभ्यास केला आणि परीक्षा दिली. तरीही ती सर्व विषयांत उत्तीर्ण झाली.

आध्यात्मिक प्रगतीविषयी सकारात्मकता वाढून मनाची स्थिती चांगली होण्यासाठी देवाने सुचवलेली सूत्रे आणि त्याविषयी आलेली अनुभूती

     एक तपापेक्षा (१२ वर्षांहून) अधिक काळ पूर्णवेळ साधना करणारा एक साधक स्वतःची आध्यात्मिक प्रगती होत नसल्याच्या कारणांमुळे थोडा निराश झाला होता. त्याने मला विचारले, तुला तुझ्या आध्यात्मिक प्रगतीविषयी विचार येत नाहीत का ? त्यावर मी सांगितले, कधी तरी येतात; मात्र आता विचार करतो की, देवाने सर्वांना जीवनमुक्त केलेलेच आहे. केवळ आपण जीवनमुक्त झालेलो आहोत कि नाही, याविषयी स्वतःला ज्ञात नाही; म्हणून आपले मन स्वतःला खात असते. आपल्याला ही गोष्ट ज्ञात झाल्यास आपला अहं वाढून प्रगतीमध्ये अडथळा होऊ शकतो; म्हणून देव आपल्याला या गोष्टीपासून दूर ठेवून सातत्याने त्याच तळमळीने साधना करून घेत आहे. देवाने ही साधना करण्यास संधी दिली; म्हणून देवाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ राहूया. त्यामुळे देवाच्या प्रती सतत कृतज्ञताच वाढायला साहाय्य होते.

व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांमधील भेद

श्री. राम होनप
     व्यष्टी साधना करणार्‍या साधकाची दृष्टी मर्यादित असल्याने तो ठराविक विषयांद्वारे देवाला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि तो एका विशिष्ट टप्प्यापर्यंत देवाशी एकरूप होतो. समष्टी साधना करणारा साधक व्यापक होऊन प्रत्येक गोष्टीत लपलेल्या ईश्‍वराचा शोध घेतो. त्यामुळे त्या साधकाची ज्ञानकक्षा अनंत बनते आणि त्यामुळे त्याला अनंताशी पूर्णपणे एकरूप होणे साध्य होते. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.८.२०१५)

मानवा, विचार करण्यात किती वेळ वाया घालवतोस ।

मानवा, काय येणार तुझ्यासह ।
विचार करण्यात किती वेळ घालवतो ॥ धृ. ॥

पृथ्वीवर येतांना काय आणले ।
अन् जातांना काय नेणार ॥

शरिराचा किती विचार करतो ।
त्याच्यासाठी किती पैसे व्यय करतो ॥ १ ॥

बालपणापासूनच साधनेची आवड असणारी आणि पू. राजेंद्रदादांसारखे प्रयत्न करणार असल्याचे सांगणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली वाशीम येथील कु. मधुरा गजानन चिद्रावार (वय ६ वर्षे) !

कु. मधुरा चिद्रावार
     कु. मधुरा गजानन चिद्रावार हिचा २९.६.२०१६ या दिवशी ६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची वैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. मधुरा हिला सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा !
१. प्रेमभाव
१ अ. आईला त्रास होऊ नये, यासाठी नामजप करणे : एकदा मी माझ्या पायात टोचलेला काटा काढत होते. तेव्हा मला होत असलेला त्रास पाहून कु. मधुराला दुःख वाटत होते. ती मला म्हणाली, आई, तू काटा नको काढूस. तुला त्रास होईल. तरीही मी ऐकत नाही, असे पाहून तिने माझ्यासाठी ॐ नमो भगवते वासुदेवाय हा नामजप करण्यास आरंभ केला.

आता तरी धरा गुरूंचे चरण !

आता तरी धरा गुरूंचे चरण, नाहीतर पुढे आहे मरण ।
हरीचा दास (साधक), गुरुचरणांचा ध्यास ।
कृपेची छाया, गुरूंची माया ।
चरणांचा वास, मुखावर हास्य ॥
- श्री. शंकर नरूटे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.८.२०१४)

पू. स्वातीताई म्हणजे प्रीतीचा अथांग सागर !

गुरुपौर्णिमा मास २०१६
     नाशिक सिंहस्थपर्वाच्या वेळी प्रथमच पू. स्वातीताई खाडये यांना जवळून अनुभवायला मिळाले. घरी परत येतांना पू. ताईंविषयी पुढील पंक्ती देवाने सुचवल्या आणि कृतज्ञतेने डोळे भरून आले.
पू. स्वातीताई म्हणजे प्रीतीचा अथांग सागर ।
पू. ताई म्हणजे हास्याचा खळाळता झरा ।
पू. ताई म्हणजे आनंदीआनंद ॥ १ ॥
पू. ताई म्हणजे सगुणरूपी संत ।
पू. ताई म्हणजे दुर्गादेवी ।
घेई शुद्धीसत्संग तत्त्वनिष्ठेने ॥ २ ॥
तारिती साधकांसी मोहमायेतूनी ।
पू. ताई म्हणजे निर्मळ, निरागस मन ।
देई सर्वांना गोड गोड आनंदरूपी खाऊ ॥ ३ ॥

रामनाथी आश्रमातील महर्षि नाडीवाचनाच्या दिवशी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ...
१. सकाळपासून मनात अनावश्यक विचार येणे, तेव्हा कशाला
विचार करतेस ?, असा प.पू. डॉक्टरांचा स्वर ऐकू येणे
    ३०.५.२०१६ या दिवशी सकाळी मला बरे वाटत नसल्यामुळे मी उशिरा उठले. नंतर नाडीवाचन ऐकण्यासाठी अन्य ठिकाणी जायचे होते. सकाळपासून ३ - ४ वेळा माझ्या मनात अनावश्यक विचार आले. तेव्हा मला आतून प.पू. डॉक्टरांचा आवाज ऐकू यायचा, कनक, हे आपल्याला आवश्यक आहे का ? मग कशाला विचार करतेस ? तेव्हा मला त्याची जाणीव व्हायची.
कु. कनकमहालक्ष्मी
२. प्रत्येक क्षणी केवळ प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असेच करणार,
असे निश्‍चित करणे आणि नाडीवाचनामध्ये महर्षींनी काही
साधक प.पू. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे करण्याचा निश्‍चय
करून आले आहेत का ?, असे विचारल्यावर कृतज्ञता व्यक्त होणे
    मी अंघोळीसाठी जाण्यापूर्वी आणि अंघोळ करतांनाही मनात काही अनावश्यक विचार येत होते. तेव्हा आतून प.पू. डॉक्टर म्हणाले, काहीही होऊदे. आपण आज निश्‍चय करूया. आजपासून प्रत्येक क्षण आपण साधनेसाठी देऊया. तेव्हा मी त्यांना सांगितले, आज मला नाडीवाचन ऐकायची संधी मिळाली आहे. मी आजपासून प्रत्येक क्षणी केवळ तुम्हाला अपेक्षित असेच करणार, असे निश्‍चित केले आहे.
नाडीवाचनामध्ये महर्षींनी विचारले होते, काही साधक प.पू. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कृती करण्याचा निश्‍चय करून आले आहेत. आहेत का कुणी ? ते ऐकल्यावर माझ्या मनात कृतज्ञतेचा भाव जागृत झाला आणि सर्वकाही प.पू. डॉक्टर करतात, असा विचार आला.

गुरूंविषयी प्रसिद्ध असलेल्या एका गीतात सुचलेले काही शब्द घालून केलेले गीत

गुरु मेरी पूजा ।
गुरु मेरे गोविंद ।
गुरु मेरे परब्रह्म ।
गुरु मेरे भगवंत ॥ १ ॥
गुरु मेरी पूजा ।
गुरु मेरे पिता ।
गुरु मेरी माता ।
गुरु मेरे सर्वस्व ॥ २ ॥
गुरु मेरी पूजा ।
गुरु मेरे ज्ञान ।
गुरु मेरे ध्यान ।
गुरु मेरे विष्णु ।
और गुरुही मेरे कृष्ण ॥ ३ ॥
- (पू.) कु. स्वाती खाडये

झोपेत असतांना पुणे येथून शिबिरातील साधकांना गुरुपौर्णिमेतील सेवांविषयी मार्गदर्शन करणे, झोपेत असल्याने काय मार्गदर्शन केले ?, याची जाणीव नसणे; परंतु शेजारी असलेल्या साधिकेने सूत्रबद्ध मार्गदर्शन केल्याचे सांगितल्यावर ते प.पू. गुरुदेवांनीच केल्याची जाणीव होणे

     मी सध्या कुंभमेळ्यासाठी उज्जैनला आले आहे. १९.४.२०१६ या दिवशी आगामी गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे येथे एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या समारोपाच्या वेळी साधकांना गुरुपौर्णिमेतील सेवांविषयी उज्जैनहून मार्गदर्शन करायचे होते. मार्गदर्शनाला आरंभ करायला थोडा अवधी होता. मला किंचित् थकवा जाणवत होता. तेव्हा मार्गदर्शनाच्या वेळेपर्यंत विश्रांती घेऊ, असा विचार करून मी झोपले. मला गाढ झोप लागली होती. दिलेल्या वेळेनुसार कु. वैभवी भोवरचा मला भ्रमणभाष आला. मी झोपेत असतांनाच तो घेतला आणि झोपेतच पुणे येथील साधकांना ठरल्याप्रमाणे मार्गदर्शन केले. अर्धा घंटा मार्गदर्शन केल्यानंतर मला जाग आली. तेव्हा माझ्या बाजूला एक साधिका (कु. तृप्ती) होती. तिला विचारले, मी आता भ्रमणभाषवर काय बोलले ? तेव्हा ती म्हणाली, ताई, तू विषयानुरूप योग्य तेच बोललीस. त्यानंतर मला जाणीव झाली की, आता मी जे बोलले, ते साक्षात् गुरुदेवच माझ्या मुखातून बोलले.
- (पू.) कु. स्वाती खाडये, उज्जैन

हे माऊली, उद्धारावे तूच या पामरांना !

कृतज्ञता पू. स्वातीताई तव कोमलचरणी ।
सदैव राहो आमुचे नाव तव नित्य स्मरणी ॥ १ ॥
दिले आम्हास तू प्रेम सदैव निर्मळ ।
आम्हात नकारात्मकता येता,
दावलें साधनेचे बळ ॥ २ ॥

साधकावस्थेतही सतत इतरांचा विचार करणे आणि थोडाही वेळ वाया न दवडता सेवारत रहाणे हे गुण असणार्‍या पू. (कु.) स्वाती खाडये !

     १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.
गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सनातन संस्थेची वैशिष्ट्ये
१. सनातन संस्थेत अनेक संत असूनही सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते.
२. विविध संत आणि संप्रदाय यांत एक प्रमुख असतात; म्हणून त्यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते आणि त्यांच्या विषयीची माहिती स्मरणिकेत किंवा पत्रकात असते. सनातनमध्ये अनेक साधक संत झाले असल्यामुळे त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सनातन प्रभात नियतकालिकांत प्रकाशित करण्यात येतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
घरघर नसणे एकदा घर सुटले की तो दारोदार होतो, दारोदार झाला की घरोघर
होतो आणि घरोघर झाला म्हणजे तो सर्वत्र असतो; म्हणून त्याला घरघर नाही.
भावार्थ : एकदा घर सुटले येथे घर हा शब्द माया या अर्थाने वापरला आहे. दारोदार होतो ... सर्वत्र असतो येथे सर्वव्यापी ब्रह्म किंवा ईश्‍वर या अर्थाचे वर्णन आहे. म्हणून त्याला घरघर नाही म्हणजे त्याला मृत्यूची घरघर नाही. तो अमर झालेला असतो.
(संदर्भ ः सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
आता एकेका अशिलाची बाजू मांडणारे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडणारे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्ता हवेत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ?
इतरांच्या चुका दाखवणे सोपे असते; पण इतरजन सुधारावेत, असे खरोखरच वाटत असेल, 
तर नुसत्या चुका न दाखवता त्या कशा सुधारायच्या, तेही सांगावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बिहारच्या शिक्षणव्यवस्थेचे तीन-तेरा !

संपादकीय 
     बिहार पोलिसांनी १२ वीच्या कला विभागाची टॉपर रुबी रॉय हिला अटक केल्यानंतर बिहार राज्यात शिक्षण क्षेत्राची प्रत किती खाली घसरली आहे, हे पहायला मिळाली. प्रथमत: बिहार शैक्षणिक बोर्डाने रूबी रॉय हिच्यासह काही जणांना टॉपर घोषित केले. याची शहानिशा करण्यासाठी काही दूरचित्रवाहिन्या तिच्या घरी पोहोचल्या तेव्हा विषयांची नावेही न सांगता येणे, पॉलीटिकल सायन्सला प्रोडीकल सायन्स संबोधणे, ५०० गुणांची परीक्षा असतांना ६०० गुणांची परीक्षा सांगणे, अशी धक्कादायक उत्तरे तिने दिली. रुबी रॉयची मुलाखत दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित झाल्यावर बिहारमध्ये पळापळ झाली आणि रुबी रॉय हिला परत परीक्षा देण्यासाठी बोलावण्यात आले. दोन वेळा परीक्षा देण्यासाठी न आल्यामुळे तिसर्‍या वेळी अटक करण्याचीच चेतावणी दिल्यावर रुबीने येऊन परीक्षा दिली. ज्यात ती नापास झाल्यावर तात्काळ तिला अटक करण्यात आली. परीक्षा देतांना रुबीला तुलसीदास यांच्यावर निबंध लिहिण्यास सांगितले.

भ्रष्टाचाराला वेसण कधी ?

संपादकीय
     बल फ्रॉड रिपोर्टच्या नव्या अहवालानुसार भारत देशात ८० प्रतिशत आस्थापनांनी कोणते ना कोणते काम करण्यासाठी लाच दिली आहे, असे मान्य केले आहे. भ्रष्टाचार आणि लाच देणे किंवा घेणे यांसाठी जागतिक पातळीवर एक सूची बनवण्यात आली असून त्यात भारताच्या क्रमांक तिसरा लागतो. यामुळे सत्तेत आल्यापासून दोन वर्षांत आमच्या शासनावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असे कितीही पंतप्रधान सांगत असले, तरी प्रत्यक्षात खालच्या पातळीपर्यंत या देशात वस्तूस्थिती काय आहे, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. देशातील मोठ्या आस्थापनांना लाच देणे-घेणे मान्य आहे, असे नाही; मात्र भारतातील विविध शासकीय खात्यांची व्यवस्थाच अशा प्रकारे निर्माण झाली आहे की, लाच दिल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच रहात नाही. भारतात भ्रष्टाचाराला वेसण न बसण्यास एक प्रमुख कारण म्हणजे इथल्या न्यायव्यवस्थेत अत्यंत विलंबाने मिळणारा न्याय होय. त्याचप्रकारे भारतात भ्रष्टाचाराच्या संदर्भातील खटला दाखल झाल्यावर प्रत्यक्षात आरोप सिद्ध होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने इथे कोणाला कशाचीच भीती राहिलेली नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn