Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सीमेपलीकडून गोळीबार चालूच राहिला, तर भारत गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही !

पाकचे नाव न घेता केंद्रीय गृहमंत्र्यांची पोपटपंची !
  •  भारतीय नेत्यांच्या दमबाजीला पाकने कधीही भीक घातलेली नाही उलट प्रतिदिन भारताच्या विरोधात कारवाया करून सैनिक आणि नागरिक यांना पाक ठार करत आहे !
  •  गेल्या २ वर्षांत पाकने अनेक वेळा आक्रमण करून सैनिकांना ठार केले असतांना निष्क्रिय रहाणारे गृहमंत्री !
     रांची (झारखंड) - सीमेपलीकडून असाच गोळीबार चालू राहिला, तर त्याला प्रत्युत्तर देतांना भारत गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही, अशी चेतावणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकचे नाव न घेता पाकला दिली. २५ जूनला जम्मू काश्मीरच्या पंपोरमधल्या आतंकवादी आक्रमणात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ८ पोलीस हुतात्मा झाले. त्यावर राजनाथ सिंह यांनी रांची येथील सभेत वरील विधान केले.
     या वेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, आतंकवादी भारतीय सैन्यापुढे हतबल ठरू लागले आहेत. त्या निराशेतूनच हे आक्रमण केले. (आतंकवादी जरी निराशेत गेले असे म्हटले, तरी ते भारतीय सैनिकांना ठार करतात, ही देशाची मोठी हानी मंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवी. - संपादक) भारताला शांतता हवी आहे. याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असा नाही. सामर्थ्यातून शांतता प्रस्थापित करण्याचा आपला नेहमीच प्रयत्न आहे. (गेल्या ६८ वर्षांत असे सामर्थ्य कधीही प्रस्थापित झाले नाही त्यामुळे सुज्ञ जनतेसमोर अशी विधाने अर्थहीन ठरतात. - संपादक)

सनातनवर बंदी घालण्याविषयी संघाचा शासनावर दबाव या वृत्ताविषयी संघ आणि भाजप यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट करावी ! - सनातन संस्था

     मुंबई - डीएनए या इंग्रजी दैनिकाच्या २६ जून २०१६ च्या अंकात Pressure grown on government to ban Sanstha (सनातनवर बंदी घालण्याविषयी संघाचा शासनावर दबाव) या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. या वृत्तात संघाच्या उच्चपदस्थ व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे सध्याचे राज्यशासन संघाच्या दबावामुळे सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा विचार करत आहे, असे म्हटले आहे. आतापर्यंत सीबीआयच्या अधिकार्‍यांच्या हवाल्याने वृत्ते दिली जात होती; मात्र प्रथमच रा.स्व. संघासारख्या एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या हवाल्याने वृत्त दिले गेले आहे. या वृत्तामुळे एक मोठी हिंदुत्ववादी संघटना दुसर्‍या लहान संघटनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा चुकीचा संदेश समाजात जात आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर होणार्‍या आरोपांच्या संदर्भात रा.स्व. संघाची नेमकी अधिकृत भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे. या दृष्टीने हिंदु समाजामध्ये योग्य संदेश जावा आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये फूट पाडणार्‍या शक्तींना रोखता यावे, यासाठी रा.स्व. संघ आणि भाजप शासन यांनी या वृत्ताविषयी खुलासा करावा, अशी मागणी सनातन संस्थचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

गुजरातच्या साबरमती कारागृहात ६५० मुसलमान कैद्यांच्या रोजासाठी १२ बरॅकची निर्मिती !

हिंदूंच्या सणाचे महत्त्व लक्षात घेऊन कारागृहात 
त्यांच्यासाठी विशेष सुविधा पुरवल्याचे कधी ऐकिवात नाही !
     कर्णावती - साबरमती येथील मध्यवर्ती कारागृहात प्रशासनाने ६५० कैद्यांसाठी १२ रोजा बरॅकची निर्मिती केली आहे. कारागृह अधीक्षक सुनील जोशी म्हणाले की, हे कैदी सामूहिकरित्या नमाजपठण करू शकतील म्हणून या बरॅकची निर्मिती करण्यात आली आहे. (सर्व कैदी एकत्र येऊन एखादा कट रचू लागल्यास त्याला उत्तरदायी कोण ? या कैद्यांमध्ये कुणी आतंकवादी असतील, तर उर्वरितांना त्यांनी आतंकवादी बनवल्यास याचे दायित्व कोण घेणार ? - संपादक) रमझान संपल्यानंतर त्यांना मूळ बरॅकमध्ये पाठवण्यात येईल. या कैद्यांसाठी चहा आणि अल्पाहारात काही पालट करण्यात आले आहेत. त्यांच्या सुविधांसाठी २० सदस्यीय समिती बनवण्यात आली आहे.

राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचाच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीचा संघाशी संबंध नाही !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. प्रसारप्रमुख मनमोहन वैद्य यांचे स्पष्टीकरण !
     नागपूर - राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचाने देहली येथे २ जुलै या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीवरून अपुर्‍या माहितीच्या आधारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर करण्यात येणारी टीका अयोग्यच आहे; कारण मुळात राष्ट्रीय मुस्लिम विचार मंच ही संघ परिवारातील संघटना नाही, असे स्पष्टीकरण संघाचे अखिल भारतीय प्रसारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी दिले आहे. वैद्य म्हणाले की, राष्ट्रीय मुस्लिम विचार मंच राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित मुसलमानांकडून चालवण्यात येणारी संघटना आहे. इंद्रेश कुमार हे संपर्क अधिकारी आहेत; मात्र ते पार्टीला गेले म्हणून इफ्तार पार्टी संघाची होत नाही. अनेक जण संघाला बोलावतात. ख्रिस्ती समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातही संघ निमंत्रणावरून सहभागी झाला होता. आताही राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचाने आमंत्रित केले आहे.

समलैंगिकांशी अयोग्य वर्तन केल्यासंदर्भात चर्च आणि ख्रिस्ती यांनी क्षमा मागावी ! - पोप यांची मागणी

     नवी देहली - रोमन कॅथलिक चर्च आणि ख्रिस्ती समाज यांनी समलैंगिकांशी अयोग्य वर्तन केल्याच्या प्रकरणी क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी केली आहे. पोप फ्रान्सिस पुढे म्हणाले की, समलैंगिकांशी भेदभाव करणे चर्चच्या संस्कारच्या विरुद्ध आहे. (समलैंगिकता हा एक मानसिक आणि शारीरिक आजार आहे. त्याला खतपाणी घालण्यापेक्षा तो दूर करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि त्यासाठी पोप यांनी आवाहन करायला हवे ! - संपादक)

बंगालच्या मालदा जिल्ह्यात मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण

हिंदुबहुल भारतात हिंदू असुरक्षित ! केंद्रातील सरकार 
बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलणार आहे कि नाही ?
     कोलकाता - बंगालच्या मालदा जिल्ह्यातील सामसी येथे मुसलमानांकडून हिंदूंच्या दुकानांवर आक्रमण करून चेतन दास या हिंदु व्यक्तीच्या घराची तोडफोड करून ते लुटण्यात आले. त्यांनी सर्व बाजूंनी हिंदूंवर आक्रमण केले. हिंदूंनी धैर्याने त्यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. मुसलमानांनी हिंदूंवर गोळीबारही केला. दंगल घडवणार्‍या जमावाला पांगवण्यासाठी पोलीस अपयशी ठरले आहेत. दंगलखोरांना अटक करण्यासही ते अपयशी ठरले आहेत. पोलिसांनी उलट हिंदूंनाच अटक केली आहे. मुसलमान जमावाने ३ जानेवारी २०१६ या दिवशी कालियाचाक पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. त्याची पुनरावृत्ती होईल, या भीतीने पोलीस बघ्याची भूमिका घेण्यापलीकडे काही करत नाही.

भारत-बांगलादेश सीमेवर भूकंपाचा धक्का

      ढाका - २७ जूनला सकाळी भारत-बांगलादेश सीमेवर भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपामुळे अद्याप कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाचे धक्के भारताच्या ईशान्येकडील आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यांनाही बसले आहेत. यावर्षी जानेवारीमध्ये याच भागाला ६.८ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. यामध्ये सुमारे २०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (२७ जूनला भारत-बांगलादेश सीमेवर भूकंपाचा धक्का बसला घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

धर्मांधांनी सामूहिक बलात्कार करून मरणासन्न अवस्थेत सोडून दिलेली तरुणी अत्यवस्थच !

बिहारमध्ये अराजक ! महिलांना मंदिरात पूजा करण्याची अनुमती मिळावी; म्हणून गळे 
काढणार्‍या पुरोगामी महिला संघटना आता कुठे लपून बसल्या आहेत ? 
     मोतीहारी (बिहार) - एका धर्मांधाविरुद्ध विनयभंगाची तक्रार केल्याचा सूड उगवण्यासाठी एका तरुणीवर ६ धर्मांधांनी सामूहिक बलात्कार करून तिला मरणासन्न रस्त्यावर अवस्थेत सोडून दिले. ती तरुणी येथील रुग्णालयात शेवटच्या घटका मोजत आहे. 
    पीडित तरुणी पहाटे प्रातर्विधीसाठी घराबाहेर गेली असता सामिउल्ला याने तिचा विनयभंग करून त्याचे चित्रीकरण केले. या घटनेविषयी मुलीच्या कुटुंबियांनी सामिउल्लाच्या कुटुंबियांकडे तक्रार केली. याचा राग मनात धरून सामिउल्ला आणि त्याचे सहकारी अलीउल्ला, जाविउल्ला, समारुल्ला आणि नुरुल्ला यांनी त्या मुलीच्या घरात बलपूर्वक घुसून तिला फरफटत बाहेर काढले आणि तिच्यावर अमानुष बलात्कार केला, तसेच तिच्या गुप्तांगात बंदूक आणि काठीने इजा केली. त्यानंतर बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेली ती तरुणी मृत झाली असे समजून सोडून दिले. तेव्हा गस्त घालणार्‍या पोलीस वाहनाने त्या मुलीला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर मोतीहारी येथील सदर रुग्णालयात दाखल केले.
     सध्या त्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (अपराध्यांना शासनाचा वचक वाटत नसल्याचा परिणाम ! हिंदु राष्ट्रात अपराध्यांना कठोर शासन करण्याची तरतुद असेल, यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे ! - संपादक)

हुतात्मा सैनिकाच्या अंत्यसंस्काराला भूमी देण्यास गावकर्‍यांचा विरोध !

भारतियांसाठी लज्जास्पद घटना !
     फिरोजाबाद - पम्पोर येथील आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले सैनिक वीर सिंह यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावातील सार्वजनिक ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास गावातील गावकर्‍यांनी विरोध केल्याची घटना समोर आली आहे.
     हुतात्मा वीर सिंह फिरोजाबाद जिल्ह्यातील नागला केवल या गावातून सैन्यात दाखल झाले होते. त्यांना वीरमरण आल्यावर गावातील सार्वजनिक जागेवर त्यांचा अंत्यसंस्कार करून त्या ठिकाणी स्मृतीस्थळ उभारण्याची अनुमती त्यांच्या कुटुंबियांनी मागितली होती. या अनुमतीला सवर्ण गावकर्‍यांनी विरोध केला. शेवटी उपविभागीय दंडाधिकार्‍यांच्या मध्यस्थीनंतर अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यात आली.

देहलीत रमझानमुळे महाशिवशक्ती मंदिरातील पूजा आणि हनुमान चालिसा पठण बंद पाडण्याच्या धर्मांधांच्या कृतीस विश्‍व हिंदु सेनेकडून चोख उत्तर !

१० सहस्र हिंदूंना संघटित करून पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण !
हिंदूंच्या लहान लहान संघटना धर्मांधांच्या आघातांना विरोध करतात, अशा वेळी
 मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना कुठे असतात ? दिवसांतून ५ वेळा देशभरात
 वैध आणि अवैध मशिदींतून होणार्‍या अजानचा हिंदू कधी विरोध करतात का ?
     नवी देहली - देहलीच्या सुंदरनगरी येथील महाशिवशक्ती मंदिरात चालू असलेले हनुमान चालिसाचे पठण मुसलमानांच्या दबावामुळे २३ जूनपासून बंद करण्यात आले होते. रमझानचा महिना चालू असेपर्यंत पूजा आणि पठण बंद करण्याची पूजार्‍याला धमकी देऊन तेे बंद करण्यात आले होते. पूजा किंवा पठण चालू ठेवल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, अशी धमकी देण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर २५ जूनला विश्‍व हिंदु सेनेने १० सहस्र हिंदूंना संघटित करून मंदिराच्या बाहेर रस्त्यावर हनुमान चालिसाचे पठण केले. तसेच पूजा आणि हनुमान चालिसाच्या पठणानंतर ध्वनीक्षेपकावरून धर्माधांना चेतावणी देण्यात आली की, पुन्हा अशा प्रकारची धमकी देऊन पूजा आणि पठण बंद केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जाईल. या वेळी देहली प्रशासन आणि पोलीस यांनी हिंदूंना साहाय्य केले. विश्‍व हिंदु सेनेचे श्री. विनोद शर्मा यांनी त्यांचे आभार मानले. (देहलीतील या पोलिसांचे आणि प्रशासनाचे अनुकरण देशातील पोलीस आणि प्रशासन यांनी करावे ! - संपादक)

खडकवासला धरणसाखळीमध्ये केवळ दीड अब्ज घनफूट (टीएम्सी) पाणी

पाणी कपातीत वाढ होण्याची शक्यता
पुण्यामध्ये वाढणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य ! लोकहो, भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधना करा !
     पुणे - राज्यात कोकणासह सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असतांना पानशेत, वरसगांव, टेमघर आणि खडकवासला या धरण क्षेत्रात मात्र तुरळक स्वरूपात रिमझिम पाऊस पडत आहे. या धरणसाखळीत फक्त १.५६ अब्ज घनफूट (टीएम्सी) म्हणजेच, ५.३८ टक्के इतकेच पाणी शेष राहिले आहे. उपरोक्त ठिकाणी जोरदार आणि अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे या ४ धरणांची पाण्याची स्थिती अजूनही चिंताजनक आहे; म्हणून पुणेकरांच्या पाणी कपातीत वाढ होण्याची शक्यता आहे. (पुण्यासारख्या ठिकाणी पाऊस पडत नसतांना पाण्यासाठी राज्य सरकार कोणती उपाययोजना करणार आहे ? - संपादक) गेल्या वर्षी याच वेळी खडकवासला धरण साखळीत ६.७९ अब्ज घनफूट (टीएम्सी) म्हणजे, २३.३० टक्के इतका पाणीसाठा झाला होता. पुणे शहर आणि परिसरासाठी सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे धरण साखळीतील पाणी साठ्यात घट होत आहे.

खडकी (जिल्हा पुणे) आणि पुणे लष्कर छावणी परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑगस्ट मासात गणवेश देण्यात येणार

लष्कर छावणी परिषदेचा उदासीन आणि नियोजनशून्य कारभार !
     पुणे - येथील खडकी आणि पुणे लष्कर छावणी परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही लष्कर छावणी परिषदेमधील विद्यार्थ्यांना ऑगस्ट मासात गणवेश देण्यात येणार आहे.
     छावणी परिषदेचे प्रशासन गणवेशाच्या प्रश्‍नाकडे फारसे गांभीर्याने पहात नसल्याची सद्यःस्थिती आहे. मुळात छावणी परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची प्रक्रिया एप्रिल-मे मासांत पूर्ण होणे आवश्यक असतांना परिषदेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांना गणवेशाच्या विषयाकडे पहाण्यासाठी वेळ नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळेच विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यास विलंब होतो. खडकी लष्कर छावणी परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी सांगितले की, १५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. आगामी वर्षापासून गणवेश देण्यास होणारा विलंब अल्प करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. (लष्कर छावणी परिषदेकडून गणवेश वेळेत देण्यासाठी नेमकी कोणती उपाययोजना केली जाणार आणि या प्रक्रियेतील संबंधितांवर कोणती कारवाई करणार, ते परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी स्पष्ट करायला हवे. - संपादक)

भारतियांचे परदेशात १३ सहस्र कोटी रुपयांचे काळे धन ! - प्राप्तीकर खात्याची माहिती

नुसती माहिती मिळवण्यासाठी काही वर्षे घालवणारे प्राप्तीकर खाते ते परत आणण्यासाठी
 किती वर्षे घालवणार ? आणि ते काळे धन परत आणले जाईल यावर विश्‍वासतरी कसा ठेवायचा ?
     नवी देहली - प्राप्तीकर विभागाला २०११ मध्ये ४००, तर २०१३ मध्ये ७०० परदेशातील बँक खात्यांची माहिती मिळाली होती. या खात्यांत भारतीय नागरिकांनी ठेवलेल्या सुमारे १३ सहस्र कोटी रुपयांच्या काळ्या धनाची माहिती समोर आली आहे.
     फ्रान्स शासनाने जिनिव्हा येथील एच्एस्बीसी बँकेतील भारतीय नागरिकांच्या ४०० बँक खात्यांची माहिती भारत शासनाला दिली होती. प्राप्तीकर विभागाकडून चौकशी केल्यानंतर या खात्यांमध्ये ८ सहस्र १८६ कोटी रुपयांचे काळे धन असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर इंटरनॅशनल कन्सोर्शियम् ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नलिस्ट्स् या संकेतस्थळावर २०१३ मध्ये भारतीय नागरिकांद्वारे उघडण्यात आलेल्या ७०० बँक खात्यांचा तपशील उघड करण्यात आला होता. त्यातही ५००० कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली होती. या दोन्ही मिळून ११०० खात्यांमधून भारतियांच्या १३ सहस्र कोटी रुपयांच्या काळ्या धनाची माहिती मिळाली आहे.
     सप्टेंबर २०१५ पर्यंत १ सहस्र १०० खात्यांपैकी फक्त ६३८ खातेधारकांनी ३ सहस्र ७७० कोटी रुपयांच्या काळ्या धनाचा खुलासा केला आहे. प्राप्तीकर विभागाने आतापर्यंत ५५ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. या खातेधारकांवर कर चुकवेगिरी आणि चुकीची माहिती दिल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

नगर येथे उपासनेवरून चर्चमध्येच हाणामारी; तिघे घायाळ

शांतीचा संदेश देणार्‍या चर्चमध्ये होणार्‍या या हाणामारीविषयी हिंदूंच्या
 तथाकथित असहिष्णुतेविषयी कांगावा करणार्‍या पुरोगाम्यांना काय म्हणायचे आहे ?
     नगर - अहमदनगर पहिली मंडळी (कॉग्रिगेशनल) या संस्थेवरील वर्चस्वाच्या वादातून २६ जून या दिवशी सकाळी ऐतिहासिक ह्युम मेमोरिअल चर्चमध्ये उपासनेच्या वेळीच दोन गटांत धुमश्‍चक्री उडाली. परस्परांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. कोतवाली पोलीस ठाण्यात पोलिसांच्या स्वतंत्र तक्रारीसह एकूण चार गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. तिघा घायाळांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील ऐतिहासिक ह्युम मेमोरिअल चर्चसह अहमदनगर पहिली मंडळी संस्थेची बरीच मोठी मालमत्ता आहे. या संस्थेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी ख्रिस्ती समाजाच्या दोन गटांत वाद आहे. न्यायालयातही दावे, प्रतिदावे दाखल करण्यात आले आहेत. याच वादातून दोन महिन्यांपूर्वी ह्युम मेमोरिअल चर्चमध्ये झालेल्या गोंधळामुळे कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. त्या वेळी पोलिसांनी दोन्ही गटांना समजही दिली होती.

बारामती (जिल्हा पुणे) येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक

राज्यातील वाढत्या दगडफेकीच्या घटना म्हणजे कायदा-सुव्यवस्था संपल्याचे लक्षण !
     बारामती - मुंबईतील दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुद्रणालय (प्रिंटिंग प्रेस) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्यानंतर त्याविषयी व्हॉट्स अ‍ॅप या सामाजिक संकेतस्थळावरून भावना भडकावणारे संदेश पसरले गेले. त्यावरून येथील काही युवकांनी २६ जून या दिवशी शहरातील तीन हत्ती चौक आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकासमोर टायर पेटवले. त्यानंतर बसस्थानकात जाऊन ७ हून अधिक युवकांनी महामंडळाच्या एका बसवर दगडफेक करत काचा फोडल्या. शहर पोलिसांना उपरोक्त घटना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती पूर्वपदावर आणली. याविषयी बारामती आगाराकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

हिंदूंवरील निर्बंधांमुळेच नाती संपुष्टात ! - अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

    कराड - न्यायालयात न्याय मिळण्याचे दिवस संपले. आता तेथे पोटगी मिळते, घर मिळत नाही. वडील गेल्यानंतर ८ व्या दिवशी बहीण भावाला न्यायलयात खेचते. सरकारने केवळ हिंदूंनाच लोकसंख्या अल्प करण्याचे सांगितल्याने सर्व नातीच संपून गेली आहेत, असे प्रतिपादन अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु स्त्रियांसमोरील सांस्कृतिक आव्हान या विषयावर त्या बोलत होत्या. या वेळी पुष्कळ महिला उपस्थित होत्या.
त्या पुढे म्हणाल्या...
१. मुलींनो, मी दिसते कशी, याची काळजी न करता मी आहे कशी, याची काळजी करा.
२. आपल्या घरात असलेल्या प्रत्येक नात्याला न्याय द्यायला शिका.
३. पुढील १० वर्षेच घराचे घरपण टिकणार आहे. आई आणि शिक्षक बिघडले, तर संपूर्ण संस्कारांचा नाश झाला, असे समजा.
४. आईच्या हृदयातील प्रेम आणि संस्कार यांच्या अस्तित्वाला पुष्कळ महत्त्व असते.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू (जिल्हा पुणे) येथून प्रस्थान

  • * देहू-आळंदी येथे लक्षावधी वैष्णवांचा भक्तीमेळा 
  • * माऊलींची पालखी २८ जून या दिवशी प्रस्थान करणार 
आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग सार्थ ठरवणारी वैष्णवांची वारी !
संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील
चांदीच्या पादुका (वर्तुळात)
      पुणे, २७ जून - भेटी लागी जीवा लागलीचिये आस या अभंगानुसार आषाढी एकादशीला लक्षावधी वैष्णवांच्या संगतीने पंढरपूर येथील सावळ्या परब्रह्माच्या भेटीला जाणार्‍या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ३३१ व्या पालखीचे २७ जून या दिवशी देहू येथून प्रस्थान झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींची पालखी आळंदीतून २८ जून या दिवशी प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी आणि पालख्यांसमवेत पंढरीनाथाच्या भेटीला जाण्यासाठी देहू आणि आळंदी या ठिकाणी लक्षावधी संख्येने वारकरी आले आहेत.

आम आदमी पक्षाचे नाटकी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची अटक आणि सुटका !

आपच्या गुन्हेगार आमदाराच्या अटकेचा निषेध करून आमदाराचे समर्थन करणार्‍या स्वपक्षाच्या 
नेत्यांच्या विरोधात आशिष खेतान तोंड का उघडत नाहीत ? कि केवळ सनातनच्या विरोधात 
बोलण्याचा त्यांनी विडा उचलला आहे ?
आपच्या आमदारांच्या अटकेच्या निषेधार्थ पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी जात 
असतांना पोलिसांनी घेतले कह्यात ! 
     नवी देहली - वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याच्या प्रकरणी आपचे आमदार दिनेश मोहनिया यांना अटक करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी जाणारे देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आमदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना पोलिसांनी कह्यात घेतले. (आपवाल्यांचा कायद्यावर विश्‍वास नाही का ? जर मोहनिया खरोखरंच निर्दोष असेल, तर सत्य समोर येईलच. त्यांना अटक झाल्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्चा काढणे, ही आपवाल्यांची स्टंटबाजीच होय ! - संपादक) हे सर्व जण पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन अटक करवून घेणार होते. येथे जमावबंदी लागू करण्यात आली होती.

(म्हणे) योग ही वाईट शक्ती !- फादर गॅब्रीयल अमॉर्थ, माजी मुख्य मांत्रिक, कॅथॉलिक चर्च

चांगली शक्ती आणि वाईट शक्ती हे न समजणारे फादर !
     व्हॅटीकन (रोम) - योग करणे आणि हॅरी पॉटरची पुस्तके वाचणे, हे सैतानी कृत्य आहे. योग केल्याने हिंदु धर्माची पूजा होते, तसेच पुनर्जन्मावर विश्‍वास असणारे सर्व पौवार्त्य धर्म हे खोटे असून ते ख्रिस्ती धर्माच्या विरुद्ध आहेत, असे प्रतिपादन एके काळी कॅथॉलिक चर्चचे मुख्य मांत्रिक असलेले फादर गॅब्रीयल अमॉर्थ यानी केले आहे. अशाच प्रकारचे मत वर्ष १९९९ मध्ये पोप बेनेडिक्ट यांनी केले होते. 
      फादर गॅब्रीयल अमॉर्थ यांनी म्हटले की, योग हा शारीरिक क्रियेचाच एक भाग आहे. त्याचा ख्रिस्ती धर्माच्या प्रार्थनेशी काही संबंध नाही. चर्चच्या धर्मगुरूंनी महिला आणि अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केले, त्यामागे ख्रिस्तविरोधी वाईट शक्तीचाच सहभाग आहे. अमॉर्थ यांनी अनेक व्यक्तींमधील वाईट शक्तींवर उपाय केले आहेत. इटलीतील योग शिकवणार्‍या आस्थापनांच्या मते अमॉर्थ यांचे प्रतिपादन म्हणजे सत्याचा विपर्यास आहे. योगाचा सैतानाशी काही एक संबंध नाही. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी योगाभ्यास अत्यंत आवश्यक आहे.

(म्हणे) संस्कृत लादल्यास द्रमुक आंदोलन करणार ! - करुणानिधी यांची धमकी

सर्व भाषांची जननी असणार्‍या देवभाषा संस्कृतला विरोध करणारे असुरच होत !
     चेन्नई - तमिळनाडूत वैदिक शिक्षणाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने एक मंडळ स्थापन करण्याचा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा विचार आहे, असे वृत्त प्रसारित झाले आहे. त्यावर द्रमुकचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम्. करुणानिधी यांनी धमकी दिली आहे की, तमिळनाडूतील लोकांवर संस्कृत भाषा लादण्यात आली, तर हिंदीविरोधी आंदोलनासारखे मोठे आंदोलन करण्यात येईल. (इंग्रजीच्या गुलामगिरीचे जोखड मिरवणारे करुणानिधीसारखे नेते संस्कृतीद्रोहीच होत ! - संपादक)
   पत्रकारांशी बोलतांना करुणानिधी यांनी केंद्रातील भाजप शासनावर टीका केली. ते म्हणाले की, तमिळनाडूमध्ये संस्कृतचे समर्थन करणारे मूर्ख आहेत. (करुणानिधीच एकटेच शहाणे आहेत, असे जनतेने समजायचे का ? - संपादक) सत्तारूढ अण्णाद्रमुक भाजपचे तळवे चाटत आहे आणि तमिळनाडूला उद्ध्वस्त करू पहात आहे.

छत्रपती संभाजीराजे यांची खासदारपदी नियुक्ती राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी केली ! - मुख्यमंत्री

     कोल्हापूर - मी छत्रपतींचा केवळ सेवक आहे, छत्रपती संभाजी राजे यांची राज्यसभेवरील नियुक्ती ही राष्ट्रपतींनीच केली आहे. संभाजीराजे यांची खासदारकी हा विचारांचा सन्मान आहे, असे उत्तर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलेल्या टीकेला दिले आहे. २५ जून या दिवशी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेले खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या निवडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकेची झोड उठवली. त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले.
     खासदार शरद पवार यांनी यापूर्वी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करत होते आणि पेशव्यांकडून फडणवीस यांची नियुक्ती केली जात होती; मात्र आता संभाजीराजे यांच्याविषयी फडणवीस यांनीच छत्रपतींची नियुक्ती केल्याचा प्रकार घडला आहे, अशी टीका केली होती.

युवा मानव संसाधनाचा उचित वापर केल्यावर भारत जगाची फॅक्टरी बनेल ! - मुख्यमंत्री

     कोल्हापूर - कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज यांनी खर्‍या अर्थाने उद्योगाची मुहुर्तमेढ रोवली. राजर्षी शाहू यांच्या दूरदृष्टीमुळे शेती, उद्योग, व्यापार अशा सर्वच क्षेत्रांमध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रणी आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असतांना केवळ भारताचा विकासदर ७.६ टक्के आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. चीनच्या तुलनेत भारतात असलेल्या युवा मानव संसाधनाचा उचित वापर केला, तर भारत जगाची फॅक्टरी बनेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ जून या दिवशी येथे व्यक्त केला.

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून होणारा सनातन संस्थेचा छळ थांबवण्यासाठी ठोस भूमिका घ्या !

हिंदुत्ववादी संघटनांची कराड येथील निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
निवासी नायब तहसीलदारांना (वर्तुळात) निवेदन देतांना धर्माभिमानी
     कराड - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याविषयी ठोस भूमिका घ्यावी, याविषयीचे निवेदन येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार श्री. अजित कुर्‍हाडे यांना देण्यात आले. या निवेदनातून केंद्रीय गृहमंत्री श्री. राजनाथ सिंह यांना कळवण्यात आले आहे की, दाभोलकर हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना संशयित म्हणून अटक केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसतांना प्रसारमाध्यमांतून खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने सनातनला अजून दोषी ठरवलेले नसतांना काही राजकीय पक्ष, पुरोगामी संघटना, तथाकथित नास्तिकवादी संघटना यांच्याकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची अन्याय्य मागणी केली जात आहे. त्यामुळे हे थांबवावे.

ठेकेदाराचा गैरव्यवहार उघड करणार्‍या अहवालावर शासनाने काय कारवाई केली ? - उच्च न्यायालय

श्री तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीच्या अपव्यवहाराचे प्रकरण
     धाराशिव - तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीच्या अपव्यवहार प्रकरणी धर्मादाय आयुक्तांच्या अहवालावर शासनाने काय कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने नुकतीच राज्य शासनाकडे केली. तसेच या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) केलेल्या चौकशीची माहिती सादर करण्याचे आदेश दिले. 
याविषयी पुजारी मंडळाचे अधिवक्ता आनंदसिंह बायस यांनी सांगितले की, 
१. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात ठेवलेल्या दानपेटीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची, तसेच दानपेटीत भाविकांनी भक्तीभावाने अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात लंपास होत असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती.

कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या ६३ गोवंशियांची मुक्तता

     चंद्रपूर - येथील नांदगाव येथून तेलंगणाच्या पशूवधगृहात नेण्यात येणार्‍या ६३ गोवंशियांची मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली असून २ आरोपी फरार आहेत. ही कारवाई बजरंग दल आणि पोलीस यांनी केली. 
     येथून गोवंशियांची अवैध तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुुसार बल्लारशाह येथील बजरंग दल आखाडाप्रमुख सचिन मेहरोलीया हे कार्यकर्त्यांना घेऊन मध्यरात्री २.३० वाजता तेथे पोहोचले. (गोवंशियांच्या रक्षणासाठी मध्यरात्रीही तत्पर असणार्‍या गोप्रेमींचे अभिनंदन ! - संपादक) ४ ट्रक थांबवून चौकशी केल्यावर वरील प्रकार उघड झाला.माळीणवासियांना (जिल्हा पुणे) दिवाळीपर्यंत घरे मिळणार

माळीण गावाचे दोन वर्षे रखडलेले पुनर्वसन हे राजकीय इच्छाशक्तीचा 
अभाव म्हणायचे कि वेळकाढू लालफितीचा कारभार ?
      पुणे, २७ जून - येथील आंबेगाव तालुक्यातील माळीणगाव डोंगरउतारावरील दगड कोसळून पूर्ण गाव ३० जुलै २०१४ या दिवशी गाडले गेलेे. त्यानंतर माळीण गावाचे पुनर्वसन १ वर्षांच्या आत पूर्ण करू, असे आश्‍वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी दिले होते. सद्यस्थितीत माळीणवासियांसाठी नव्याने बांधण्यात आलेली घरे येत्या दिवाळीपर्यंत या गावातील बाधितांना मिळतील, असा विश्‍वास राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त केला.
     भूस्खलनात दुर्घटनाग्रस्त झालेल्या माळीण गावच्या नवीन पुनर्वसन कामाची पाहणी मुख्य सचिव क्षत्रिय यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई आणि अन्य संबंधित विभागांचे शासकीय अधिकारी यांच्यासमवेत केले. क्षत्रिय यांनी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तेव्हा ते बोलत होते.पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील चंद्रभागा नदीच्या पात्रात अवैध दुकानांची वाढ

आता कुठे आहेत पर्यावरणवादी आणि जिल्हा प्रशासन ?
      पंढरपूर, २७ जून - येथील चंद्रभागा नदीच्या पात्रात दुचाकी धुऊ नयेत, दशक्रिया विधी करू नयेत, कोणतीही दुकाने लावू नयेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. असे असतांनाही काही जणांनी नदीपात्रात अवैधरित्या दुकाने लावली असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तसेच चंद्रभागेच्या पात्रातील वाळूउपसाही गाढवांच्या साहाय्याने प्रति दिवशी केला जातो. तसेच वाळवंटात कचर्‍याचे ढीगही साठले आहेत. या सर्व गोष्टींकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने वारकर्‍यांमधून तीव्र अप्रसन्नता व्यक्त होत आहे. (सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यशासन या प्रकरणी संबंधितांवर कोणती कठोर कारवाई करणार आहे ? - संपादक)

सैराटने तरुण पिढीचे वाटोळे केले ! - विजय शिवतारे

किमान एकतरी लोकप्रतिनिधी याविषयी बोलले हेही नसे थोडके !
     नगर - सैराट चित्रपटाने तरुण पिढीचे वाटोळे केले, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभे राहा, मग सैराट व्हा, असा सल्ला शिवतारे यांनी दिला. एवढेच नाही तर अल्पावधित अधिक पैसे कमावण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक सैराटसारखे चित्रपट काढतात, असेही श्री. शिवतारे म्हणाले. ते हिवरेबाजार येथे बोलत होते.

धर्मांतरित दलित ख्रिस्ती झाल्याचे लपवत असल्याचे सर्वेक्षणात उघड !

जनगणनेच्या आकडेवारीत ख्रिस्त्यांची लोकसंख्या अल्प दिसण्याचे कारण उघड !
     चेन्नई - प्रत्येक १० वर्षांनी होणार्‍या भारतीय जनगणनेच्या आकडेवारीत ख्रिस्त्यांची लोकसंख्या अल्प दिसण्यामागील गौडबंगाल अधिकच गूढ होत चालले आहे. जनगणनेत दिसणारी ख्रिस्ती धर्मियांची लोकसंख्या चर्चने घोषित केलेल्या भारतीय ख्रिस्ती धर्मियांच्या संख्येने तुलनेत अत्यंत अल्प दिसते. ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यात दलित अग्रेसर आहेत. मात्र जनगणनेच्या वेळी ते त्यांचे धर्मांतर झालेले दाखवत नाहीत. कारण त्यामुळे त्यांना हिंदु धर्मातील काही जाती-जमातींना मिळणार्‍या लाभांपासून वंचित राहावे लागते. केंद्रशासनाने दलितांसाठी घोषित केलेले लाभ नियमानुसार ख्रिस्त्यांना मिळू शकत नाहीत.

आतंकवाद्यांच्या आक्रमणामुळे काश्मीरची अपकीर्ती होत आहे ! - मेहबूबा मुफ्ती

काश्मीरमधून साडेसात लाख हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, यातून 
काश्मीरची अपकीर्ती झाली, हेही मेहबूबा यांनी सांगावे ! 
      श्रीनगर - २५ जूनला पंपोर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या ८ पोलिसांना राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी २६ जूनला आदरांजली वाहिली. त्या वेळी मेहबूबा म्हणाल्या की, अशा आक्रमणांमुळे काश्मीरची अपकीर्ती होत आहे. त्याचा परिणाम गुंतवणूकदार आणि पर्यटक यांच्यावर होऊन त्यांचे प्रमाण न्यून होत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या आक्रमणाचा निषेध केला.हिंदु आतंकवादावरून सोनिया गांधी देशात आणीबाणी लावणार होत्या !

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा दावा !
      थिरुवनंतपुरम् - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वर्ष २०११-१२ या कालावधीत भारतात हिंदु आतंकवादाचे संकट दाखवून देशात आणीबाणी लागू करणार होत्या, असा दावा भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केला आहे. लवकरच या संदर्भातील विस्तृत माहिती लोकांसमोर सादर करू, असेही डॉ. स्वामी म्हणाले. लिव्ह इन रिलेशनशिप, व्यक्तीस्वातंत्र्य इत्यादींविषयी बोलणार्‍यांना शास्त्रज्ञांची चपराक !

      विवाहित लोकांना हृदयरोगाचा धोका तुलनेने अल्प असतो; परंतु घटस्फोटित, विधवा, विधुर लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण लक्षणीय असते, असा निष्कर्ष न्यूयॉर्कमधील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी लॅनगोग मेडिकल सेंटरमध्ये तज्ञांच्या एका गटाने काढला आहे. त्यांनी या संशोधनासाठी अमेरिकेतील सर्व राज्यांमधून आलेल्या ३५ लाख लोकांची आरोग्यतपासणी केली.


शिवरायांच्या हाती धनुष्यबाण दाखवल्याने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडची निदर्शने

     मुंबई - जहाँगीर कलादालनामध्ये शिवरायांच्या आयुष्यावर आधारित तैलचित्रांचे प्रदर्शन चालू आहे. यातील अनेक चित्रांमध्ये शिवरायांच्या हातात तलवारीऐवजी धनुष्यबाण देण्यात आल्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २६ जून या दिवशी जहाँगीर कला दालनासमोर निदर्शने केली. छत्रपती शिवाजी महाराजांना भविष्यात परशुरामाचा अवतार म्हणून दाखवण्यात येईल, अशी भीती स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
१. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात बाण दाखवण्यात आल्याने या वेळी हे प्रदर्शन बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनाविषयी कुलाबा पोलिसांनी पाच जणांना कह्यात घेऊन संध्याकाळच्या सुमारास सोडून दिले.
२. वास्तुरचनाकार आणि चित्रकार जहांगीर वझिफदार ग्रुपचे संचालक दीपक गोरे यांच्या ध्यासातून आणि संकल्पनेतून ही चित्रे साकारली आहेत.
३. या आंदोलनाच्या संदर्भात प्रतिक्रिया देतांना गोरे यांनी इतिहासकार आणि श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चित्रे साकारण्यात आली आहेत. श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चित्रे काढण्यात आल्याने महाराजांना परशुरामाचा अवतार म्हणून दाखवण्याचा या माध्यमातून कोणताही प्रयत्न केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात मुंबईच्या भाविक महिलेचा मृत्यू

     पंढरपूर (जिल्हा सोलापूर) - येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी उल्हासनगरहून आलेल्या राजूबाई भगवानदास राजानी (वय ६० वर्षे) या भाविक महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मंदिरात मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांच्या साहाय्यासाठी भाविक किंवा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी कुणीही आले नाही. रुग्णवाहिकेची अर्धा घंटा वाट पाहून त्यांच्या यजमानांनी त्यांना खाजगी वाहनातून रुग्णालयात नेले; पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. (श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अक्षम्य निष्काळजीपणा ! - संपादक)
     या प्रकरणी येत्या १५ दिवसांत समितीच्या वतीने रुग्णवाहिका खरेदी केली जाईल, तसेच २४ घंटे प्राथमिक उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिली.

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी श्रीशिवप्रतिष्ठानचे आवाहन !

      सांगली, २७ जून (वार्ता.) - सांगली शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाचा सहयोग लाभावा म्हणून एक प्रभावी आणि परिणामकारक योजना ठरवण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक दिवशी केवळ एक रुपया घरातील देवासमोर अर्पण करावयाचा आहे. हा एक रुपया नित्य अर्पण करण्याचा आचार म्हणजे प्रत्येक कुटुंबाने संपूर्ण एक वर्षभर म्हणजेच ३६० दिवस पाळावयाचा आहे. अशा अनेक कुटुंबातील जमणार्‍या अर्पण निधीतून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तरी या राष्ट्र आणि धर्मकार्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे सांगली शहराध्यक्ष श्री. अविनाशबापू सावंत यांनी केले आहे.

श्री क्षेत्र धामणगांव येथे श्री गुरु प्रभाकर दादा बोधले महाराज धामणगांवकर यांचे कीर्तन !

धामणगांव (जिल्हा सोलापूर) येथील श्री संत माणकोजी महाराज समाधी सोहळा
१. श्री गुरु प्रभाकर दादा बोधले महाराज
धामणगांवकर (वर्तुळात)
२. कीर्तनाला उपस्थित भाविक
 
     बार्शी (जिल्हा सोलापूर), २७ जून (वार्ता.) - श्री संत माणकोजी महाराज समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र धामणगांव येथे २३ जून या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत श्री गुरु प्रभाकर दादा बोधले महाराज धामणगांवकर यांचे कीर्तन झाले. या वेळी माणकोजी महाराजांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि श्री माणकोजी महाराजांचे चरित्र सांगण्यात आले. या वेळी भाव बळे विष्णुदास ! नाही नाश पावत !! संत तुकाराम महाराजांच्या या अभंगावर ३ घंटे कीर्तन झाले. परंपरेने हे कीर्तन सांगण्यात आले. हा श्री संत माणकोजी महाराजांचा ३२२ वा समाधी सोहळा होता. श्री संत माणकोजी महाराजांनी त्या काळात केलेले समतेचे कार्य तसेच सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य यांचे वर्णन या कीर्तनातून करण्यात आले. या वेळी ३२२ टाळकरी आणि गावातील, तसेच परिसरातील सहस्रो भाविक कीर्तनाला उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांसह सर्व बोधले परिवार उपस्थित होता.

उत्तरप्रदेशमध्ये ७ सहस्र मुसलमान मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाळांमधून शिक्षण घेतात !

     प्रयाग - उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १ सहस्र २०० शाळांमधून सुमारे ७ सहस्र मुसलमान मुले शिक्षण घेत आहेत. केंद्रात भाजपचे शासन सत्तास्थानी आल्यापासून गेल्या २ वर्षांमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांच्या संख्येत ३० टक्के वाढ झाली आहे. मुसलमान विद्यार्थी श्‍लोक पाठांतर आणि भोजन मंत्र यांसारखे शाळांचे सर्व नियम तंतोतंत पाळतात. तसेच हे विद्यार्थी अभ्यास आणि क्रीडा यांमध्येही चांगली चमक दाखवतात. संघाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुसलमान मुलांपैकी बहुतेक मुले ही ग्रामीण भागांतील आहेत, अशी माहिती संघाने दिली आहे.
     संघाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणार्‍या मुसलमान मुला-मुलींनी शिक्षण, क्रीडा आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे, असे विद्या भारतीचे राज्य निरीक्षक चिंतामणी सिंह यांनी सांगितले. संघाच्या शाळांमध्ये दिवसाचा प्रारंभ सूर्यनमस्कार आणि वन्दे मातरम् यांनी होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रप्रेमी संघटना आहे. 
      संघ मुसलमानविरोधी नाही अथवा कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, असे श्री. सिंह यांनी सांगितले.

पाकमध्ये हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर

भारतातील मानवाधिकारवाले आणि निधर्मी यांना हे दिसत नाही का ?
पाकमध्ये हिंदूंना जीवन जगणे कठीण
     इस्लामाबाद पाकमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंना बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे येथे हिंदूंना जीवन जगणे कठीण झाले आहे, असे पाकमधील उमरकोट जिल्ह्यातील खासदार लालचंद मल्ही यांनी सांगितले.
      ते म्हणाले की, हिंदु मुलींना त्यांच्या कुटुंबांपासून वेगळे करून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. पाकमध्ये प्रतिवर्ष सुमारे १ सहस्र हिंदु मुलींचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केले जाते. पाकमधील हिंदूंना देश सोडून जाण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे पाकमधील बरीच हिंदु कुटुंबे भारतात स्थलांतरित झाली आहेत. याविषयी गप्प रहाणे म्हणजे हिंदु मुलींना जीवनभर अत्याचाराला सामोरे जाण्यास सोडून देण्यासारखे आहे. पाकमध्ये बलपूर्वक धर्मांतराच्या सूत्राने गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे. पाकमध्ये मानवाधिकाराचे उघड उल्लंघन केले जात आहे. पाकमध्ये बलपूर्वक धर्मांतराच्या घटना सर्रास घडत आहेत. उमरकोट या एकाच जिल्ह्यात हिंदूंची संख्या सुमारे ५० टक्के आहे. पाकमधील इस्लामधार्जिणे शासन हिंदूंच्या यातनांकडे दुर्लक्ष करत आहे.

इसिसच्या हिटलिस्टवर २८५ भारतीय !

या संकटापासून स्वतःचे रक्षण करण्यास भारतीय समर्थ आहेत का ?
     नवी देहली - गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार इसिस समर्थित युनायटेड खलिफतने जगभरातल्या ४ सहस्र लोकांना ठार करण्याचा कट रचला आहे. यांत भारतातल्या २८५ जणांचा समावेश आहे. यातील सगळ्यात अधिक व्यक्ती सॉफ्टवेअर तज्ञ आहेत. इसिसच्या सूचीमध्ये या सगळ्या व्यक्तींची नावे, वैयक्तिक माहिती आणि भ्रमणभाष क्रमांकसुद्धा प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जगभरातल्या नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यासाठीच इसिसने हा कट रचला आहे.

गोरक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा !

विश्‍व हिंदु परिषदेच्या गोरक्षण शाखेची केंद्रशासनाकडे मागणी !
विहिंपला आताही अशी मागणी का करावी लागते ?
     नवी देहली - विश्‍व हिंदू परिषदेच्या भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषद शाखेकडून केंद्रशासनाकडे गोरक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या शोखेने शासनाला निवडणुकीच्या कालावधीत दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती करण्याची आठवण करून दिली आहे. तसेच यासाठी कालावधी निश्‍चित करण्यात यावा, असेही म्हटले आहे. 
     या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, भारतीय वंशाच्या गायींना वाचवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची आवश्यकता आहे. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी जसे स्वतंत्र मंत्रालय बनवण्यात आले, तसेच या संदर्भात व्हावे. हा विषय संसदेच्या आताच्या पावसाळी अधिवेशनात उठवण्यात आला पाहिजे.

फलक प्रसिद्धीकरता

देहलीतील विश्‍व हिंदु सेनेने केलेले धर्मरक्षण जाणा !
     देहलीतील सुंदरनगरीच्या महाशिवशक्ती मंदिरातील हनुमान चालिसाचे पठण रमझानमुळे धर्मांधांनी बंद पाडल्यावर विश्‍व हिंदु सेनेने १० सहस्र हिंदूंना संघटित करून येथे हनुमान चालिसाचे पठण केले. पुन्हा पठण बंद केल्यास तीव्र विरोध करण्याची चेतावणीही दिली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Vishwa Hindu Sena ki Dharmraksha !
     Dehli ke Mahashivshakti Mandir me kattarpanthiyone ramzan ke nampar band ki puja punah shuru ki !
जागो ! : विश्‍व हिन्दू सेना की धर्मरक्षा !
     देहली के महाशिवशक्ति मंदिर में कट्टरपंथियोंने रमजान के नाम पर बंद की पूजा पुनः शुरू की !

धर्मांधांकडून महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकातील कर्मचार्‍याला मारहाण

धर्मांधांचा उद्दामपणा जाणा ! 
      जळगाव - येथील सुभाष चौक परिसरात महानगरपालिकेने अतिक्रमण हटवून स्थलांतर केले; मात्र सैय्यद अब्दुल, जाफर अब्दुल, शेख मुस्ताक या अतिक्रमणधारक धर्मांधांसह एकाने अतिक्रमण कर्मचार्‍याशी वाद घालून त्याला मारहाण केली. या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. धर्मांधांनी या जागेवर अतिक्रमण केले होते; मात्र आता तेथे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तैनात केले आहेत. त्यांना धर्मांधांनी मारहाण केली.

गोव्याचा उडता पंजाब होऊ देऊ नका ! - मुक्तेश चंदर, पोलीस महासंचालक

अमली पदार्थ व्यवसाय रोखण्याकडे गांभीर्याने न पाहिल्यानेच 
असे आवाहन करण्याची वेळ आली आहे.
     पणजी - गोव्याचा उडता पंजाब होऊ देऊ नका. उडता पंजाब हा एक चांगला चित्रपट आहे आणि यामध्ये अमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम दाखवण्यात आले आहेत. प्रत्येकाने हा चित्रपट पाहून अमली पदार्थाला आपल्यापासून दूर ठेवले पाहिजे, असे आवाहन गोव्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका सभेच्या वेळी पोलीस महासंचालक चंदर यांनी हे आवाहन केले. पोलीस महासंचालक चंदर यांनी मात्र या वेळी गोव्यातील अमली पदार्थ व्यवहारासंबंधी अधिक माहिती देण्याचे टाळले.

महंमद पैगंबर यांचा व्हॉटस अ‍ॅपवरून अवमान केल्याच्या प्रकरणी विहिंपच्या जिल्हा उपाध्यक्षाला अटक !

     बरवानी (मध्यप्रदेश) - विश्‍व हिंदु परिषदेचे बरवानी जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय भावसार यांना महंमद पैगंबर यांचा व्हॉटस अ‍ॅपवर कथित आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून अवमान केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुसलमानांनी केलेल्या विरोधानंतर अवघ्या २ घंट्यांत पोलिसांनी कारवाई करत यांना अटक केली. (हिंदूंच्या देवतांचा अवमान झाल्यानंतर हिंदूंनी कितीही आंदोलन केले, तरी त्याची दखल न घेणारे पोलीस मुसलमानांच्या संतापाची तत्परतेने दखल घेतात, हे लक्षात घ्या ! - संपादक) भावसार यांच्या अटकेनंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील गाव बंद करण्याची घोषणा केली.

जनतेच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात आंदोलने करा !

रामनाथी, गोवा येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पार पडलेल्या पंचम 
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील मान्यवरांचे विचार
श्री. चेतन जनार्दन, समन्वयक,
हिंदु जनजागृती समिती,
भाग्यनगर, तेलंगण.
      हिंदु जनजागृती समितीच्या कार्यातून आपण आजपर्यंत हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या संदर्भातील समस्या मांडल्या आहेत. तसेच या विषयांवर काही यशस्वी आंदोलनेही केली आहेत. आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक जागृतीसाठी अगदी थोडा कालावधी शेष राहिला आहे. यासाठी हिंदु राष्ट्राचे महत्त्व आपल्याला जनतेच्या मनावर बिंबवावे लागेल. सध्याची लोकशाही ही नावापुरतीच लोकांनी लोकांसाठी चालवलेली राज्यव्यवस्था राहिलेली आहे. आज आपल्याला आपल्या लहान लहान गोष्टीसुद्धा आंदोलन केल्याविना मिळत नाहीत. तसेच काश्मीर-आसाम आणि बंगाल या राज्यांत ही राज्यव्यवस्था तेथील हिंदूंचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचे आपण पहात आहोत. हीच स्थिती नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रांतही आहे. तेथे कायदा गुंडाळून ठेवून शस्त्रे आणि वर्चस्व यांच्या बळावर राज्य केले जात आहे. त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने निवडून दिलेले प्रतिनिधीही मूकसंमती देण्याचे कार्य करत आहेत. अशा स्थितीत लोकशाही तर अपयशी ठरत आहेच; पण त्याचबरोबर सामाजिक दुष्प्रवृत्तींमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेतून जनतेचे कसे शोषण होत आहे, याविषयी आपल्याला जनतेमध्ये जागृती करायची आहे. या जागृतीमुळे या यंत्रणेतील भ्रष्ट आणि राष्ट्रद्रोही कृत्यांत सहभागी असणार्‍यांविरुद्ध समाजमनात चीड निर्माण होईल आणि त्यांच्याविरुद्ध कृती करण्याची प्रेरणाही समाजाला मिळेल.

तरुणांनो, आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग राष्ट्रासाठी करा !

     भारताची लोकसंख्या आज १२५ कोटींच्या घरात पोहोचली असून एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या ही १८ ते ३५ वयोगटातील आहे. त्यामुळे भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. कुठल्याही देशाचा आधारस्तंभ हा त्या देशातील युवकवर्ग असतो. भारताला मिळालेला आध्यात्मिक वारसा, अलौकिक बुद्धीमत्तेची देणगी, विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती यांच्या जोरावर देशाने एव्हाना महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करायला हवे होते; परंतु असे न होता स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली, तरी अजूनही आपला देश विकसनशील म्हणूनच ओळखला जातो. यामागे स्वातंत्र्योत्तर राज्यकर्ते आणि तरुणांमधील विदेशाचे वाढते आकर्षण हेही तितकेच कारणीभूत आहे. वर्ष २०१० मधील निष्कर्षानुसार एकूण लोकसंख्येच्या ०.३८ प्रतिशत भारतीय विविध देशांमधे विविध कारणास्तव स्थलांतरित झाले आणि होत आहेत. ही संख्या चिंताजनक आहे.

दाभोलकरांचे खरे आरोपी मोकाटच !

     पनवेल येथील दैनिक कर्नाळाच्या १२.६.२०१६ या दिवशीच्या अंकात श्री. उन्मेश गुजराती यांनी फ्रॉम द डेस्क ऑफ उन्मेश गुजराथी या स्तंभात दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासातील फोलपणा समोर आणला आहे. हा लेख आमच्या वाचकांसाठी आहे तसा प्रसिद्ध करत आहोत.
  • * सरकार करते जनतेची दिशाभूल ! 
  • * तीन वर्षांनंतरही खरे आरोपी लपवण्यात सरकारला यश !
     काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारला जेव्हा जेव्हा एखाद्या राजकीय विषयावरून समाजाचे लक्ष वळवायचे असेल, तेव्हा तेव्हा त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे राजकारण केले. त्याकरता मग सनातनचे आश्रम, साधकांची घरे यांच्यावर छापे टाकले. साधकांच्या तासन्तास चौकशा केल्या. दुर्दैवाने फडणवीस सरकारनेही आघाडी सरकारचीच री ओढणे चालू केले आहे. तीन वर्षे झाली तरी सरकार आजही जाणीवपूर्वक दाभोलकर हत्या प्रकरणातील खर्‍या आरोपींना लपवत आहे, तसेच सनातनचे आश्रम आणि साधकांच्या घरोघर छापे टाकून त्यांना अटक करत जनतेची दिशाभूल करत आहे. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असल्याने फडणवीस सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपावरील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अटकेचा फार्स निर्माण करत आहे का ?

सैराट चित्रपटातील नैतिकता आणि संस्कार यांतील सैराट अपयश !

कु. प्राजक्ता धोतमल
१. चित्रपटाचे समाजमनावर झालेले विघातक परिणाम ! 
      काही मासांपासून लोकांना सैराट नावाच्या मराठी चित्रपटाने अक्षरश: वेड लावले आहे. अशा नैतिकताशून्य आणि बोधहीन चित्रपटांची निर्मिती हा मनुष्याचे संस्कारिक मूल्य घसरल्याचा परिपाकच म्हणावा लागेल. चित्रपटातील कलाकारांना अकारण डोक्यावर चढवून ठेवण्यात जनता धन्यता मानत आहे; पण असा कोणता अमूल्य संदेश या चित्रपटाने दिला याचा मात्र विचार जनतेकडून होत नाही. या चित्रपटामुळे झालेले लाभ ऐकिवात नाहीत. तोटे मात्र पुष्कळ झाले. चित्रपट पाहून कित्येक मुला-मुलींनी पळून जाऊन स्वत:च स्वत:च्या भविष्याची आणि पर्यायाने उज्ज्वल राष्ट्राची राखरांगोळी करून घेतली. आंधळ्या प्रेमाच्या उदात्तीकरणामुळे कोवळ्या वयातील मुलांना भलत्याच वाटेला लावण्याचे पाप या चित्रपटाने ओढवून घेतले. चित्रपट पाहून पळून गेल्याच्या १३ घटना घडल्याचे समजले.

दुधातील भेसळ रोखण्यासाठी संतांना याचिका दाखल करावी लागणे लज्जास्पद !

     देशाच्या सर्वच भागांमध्ये भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री करण्यात येत आहे. यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून, ही अतिशय गंभीर बाब आहे, अशा शब्दात चिंता व्यक्त करतांना, भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी राज्यांनी तातडीने पावले उचलायलाच हवीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. उत्तराखंडमधील स्वामी अच्युतानंदतीर्थ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या एका गटाने ही याचिका दाखल केली आहे. युरीया, साबण, रिफाइंड तेल, कॉस्टीक सोडा आणि पांढर्‍या रंगाचा वापर करून दुधाची निर्मिती करण्यात येत आहे. या दुधाचा पुरवठा देशातील सर्वच राज्यांमध्ये करण्यात येत आहे. हे दूध आरोग्यास अतिशय अपायकारक असून, कर्करोगासारख्या विविध रोगांना त्यामुळे आमंत्रण मिळत आहे, याकडे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. (साप्ताहिक वीरवाणी, वर्ष ३७, अंक ८, ५ जुलै २०१३)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार नव्हे, तर सध्या दाते पंचागानुसार पाऊस पडत आहे !

     दाते पंचांगानुसार पाऊस पडल्याचे सध्या दिसत आहे. पंचांगावर यापुढे लक्ष ठेवले पाहिजे. गेल्या काही वर्षातील पाऊस पडलेले दिवस आणि दाते पंचांग किंवा इतर पारंपारिक पाऊसवेधी लोकांची मांडणी नेहमी खरी ठरली आहे का, हेही पडताळले पाहिजे.
     प्रचंड निधी, अफाट मनुष्यबळ आणि इंग्रजी या तथाकथित सामर्थ्यवान, ज्ञानभाषेतून (?) रात्रंदिवस परिषदा, संशोधन करणारे हवामान खात्याचे अंदाज मात्र वर्षानवर्षे चुकतात.
     हवामान खात्यात रजेचा अर्जही इंग्रजीतच लिहावा लागतो. रजेच्या अर्जात आपले इंग्रजी चुकत नाही ना, या मानसिक दडपणात गुंतलेले हवामान खाते ढगाचा अंदाज घेण्यापेक्षा इंग्रजी कसे सुधारावे, यावर भर देत असल्याने असे होत असेल का ? यावर इंग्रजीचे जाणकार, समर्थक आणि इंग्रजी प्रेमी यांनी संशोधन करायला हवे. - श्री. अनिल गोरे, मराठीकाका, सदस्य आणि समन्वयक, शिक्षणविषयक उपसमिती, भाषा सल्लागार समिती महाराष्ट्र शासन

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)      हिंदूंनो, पाकिस्तानधार्जिण्यांवर पूर्णपणे सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घाला अन् त्यांच्याकडून काहीही खरेदी करू नका किंवा त्यांना काही विकूही नका ! - आचार्य स्वामी धर्मेंद्र महाराज (मासिक सावरकर टाइम्स, जून २०१०)

गुरुपौर्णिमेला २१ दिवस शिल्लक

गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरःसर 
भक्ताकडे लावतात. ही कृपा शिष्याला गुरूंच्या प्रयत्नाने दिलेली असते.

मायेपासून अलिप्त असलेल्या आणि शांत अन् स्थिर राहून साधकांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या पू. (कु.) रेखा काणकोणकर !

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
         १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.
पू. (कु.) रेखा काणकोणकर
१. शांत आणि स्थिर असणे
         मागील काही दिवसांपासून स्वयंपाक विभागात सेवा करणारी पू. रेखाताई काणकोणकर पुष्कळ शांत आणि स्थिर जाणवत होती. कितीही अडचणी आल्या किंवा काहीही झाले, तरीही ती शांत आणि स्थिर राहून अजून काय उपाययोजना काढू शकतो ? असा विचार करायची. विभागात साधकांची संख्या अल्प असली किंवा इतर काही अडचणी असल्या, तरीही ती स्थिर असायची. कोणत्याही बाह्य गोष्टींचा किंवा अडचणींचा तिच्या मनावर परिणाम होत नव्हता. ती अखंड देवाला अनुभवत असते.
२. सेवेविषयी
२ अ. दमलेल्या साधकांना सरबत बनवून देणे : रेखाताई निरपेक्षपणे सेवा करते. आम्ही विभागात सेवा करतो, तेव्हा काही वेळा पुष्कळ उकडत असते किंवा काही वेळा दमायलाही होते, तेव्हा ताई लगेच कुणालातरी सरबत बनवायला सांगते किंवा स्वतः बनवते. (ताई संत झाल्यावरही आमच्यासाठी सरबत बनवते.)

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात हिंदु जनजागृती समितीच्या अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिरास प्रारंभ !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
       सनातन आश्रम, रामनाथी, २७ जून (वार्ता.) - हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या हिंदु जनजागृती समिती, तसेच पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या मुंबई येथील हिंदु गोवंश रक्षा समिती, कर्नाटक येथील ॐ साई मित्रमंडळ, आसाम येथील हिंदु सेवा मंच, ओडिशा येथील क्रियायोग मिशन या संघटनांच्या कार्यकर्त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिराचे आयोजन केले आहे. रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात २७ जून या दिवशी मंगलमय शंखनादात आणि भावपूर्ण वातावरणात या शिबिरास प्रारंभ झाला. ३० जूनपर्यंत चालणार्‍या या शिबिरात साधनेविषयी, तसेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून खर्‍या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास कसा करावा? या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात एकूण १९० शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. शिबिराच्या उद्घाटनाच्या प्रारंभी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. अमर जोशी यांनी शंखनाद केला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी साधिका कु. वैदेही पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर कु. मनीषा माहुर यांनी शिबिरार्थींकडून भावपूर्णरित्या प्रार्थना करवून घेतल्या.
साधनेने स्वयंप्रकाशित होऊन संपूर्ण विश्‍वाला प्रकाशित करायचे आहे ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
     प्रत्येक साधकाचे प्रथम ध्येय साधनावृद्धी आहे. आपण साधनेच्या प्रकाशाने स्वत: प्रकाशित होऊन संपूर्ण विश्‍वाला प्रकाशित करायचे आहे. ईश्‍वराकडून प्रक्षेपित होणारे हे चैतन्य आपल्याला विश्‍वभर पोचवायचे आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.प.पू. गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या साधकाने त्यांच्या चरणी अर्पिलेले शब्दरूपी आत्मनिवेदन !

॥ प.पू. भक्तराज महाराजांचा विजय असो ॥
॥ भगवान श्रीकृष्णांचा विजय असो ॥
॥ परात्पर गुरुदेवांचा विजय असो ॥
प.पू. परात्पर गुरुदेवा, भगवंता,
आपल्या चरणकमलांशी सेवकाचा शिरसाष्टांग नमस्कार !
          प.पू. परात्पर गुरुदेवा, भगवंता, आपणांस पत्र लिहिण्यास माझी स्मृती न्यून आहे, अत्यल्प आहे, मुळात नाहीच. आपणांस हे लिहिणे दुःसाहस वाटत आहे; कारण आपल्या अवतारस्वरूप स्थूलदेहाच्या अभिष्ट चिंतनासाठी माझ्या मंदबुद्धीने कोणत्या शब्दसुमनांनी शुभेच्छा देऊ ? कारण आपण प्रकट केलेल्या (लिहिलेल्या) प्रत्येक धर्मग्रंथामध्ये मुखपृष्ठाच्या मागील पानावरील आपले अमृतमय शब्द आठवतात.

प.पू. डॉक्टर, संत तुम्ही... भगवंत तुम्हीच !!!

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ...
         संतांच्या प्रकृतीला न पाहता त्यांच्या तत्त्वसदृश शिकवणीकडे पाहिल्यावर आपल्याला विविध संतांच्या ठायी असणारे गुरुतत्त्व हे समानच असते, याची अनुभूती येते. भावविभोर अवस्थेतून आत्माज्ञानापर्यंत जात असतांना ते तत्त्व अंतर्यामी जीवनाचे मूलभूत रहस्य हळूहळू उलगडते आणि जिवाला मुक्तीच्या द्वारापर्यंत नेऊन सोडते. श्री. आनंद जाखोटिया यांनी लिहिलेल्या प.पू. डॉक्टर, संत तुम्ही... भगवंत तुम्हीच !!! या काव्यपंक्तींमध्ये सर्व संतांच्या आणि भगवंताच्या कार्याची अन् शिकवणीची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याशी गुंफण घातली आहे. त्यावरून प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याची व्याप्ती कळते. श्री. आनंद जाखोटिया यांनी हे गुरुगीत अत्यंत भावपूर्ण शब्दांत मांडले आहे. असे हे सर्वव्यापी समष्टी कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे गुरु आपल्याला लाभले आहेत, हे आपले थोर भाग्य आहे. अशा या आपल्या गुरुदेवांना त्रिवार वंदन !!!
         कोणत्याही संतांचे साहित्य किंवा अवतारांचे कार्य कधीही वाचले, तर लक्षात यायचे की, त्यात जे काही लिहिले आहे, ते गुरुदेव आपल्याकडून करवून घेत आहेत किंवा त्याचा अनुभव आपल्याला देत आहेत. त्यातूनच गुरुदेवांविषयी पुढील ओळी सुचल्या. अशा प्रकारे सर्व संतांचे आणि भगवंताचे दर्शन देणार्‍या गुरुमाऊलीच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

१. स्वतःत जाणवलेले पालट
अ. मला अखिल भारतीय हिंदू अधिवेशन काळापासून डोळ्यांसमोर रंग दिसत आहेत. मला प्रार्थना करत असतांना चांगले वाटते. भूमी हलल्यासारखी वाटते. मी कुठेही असतांना (अनिश्‍चित ठिकाण आणि वेळ) मला हलल्यासारखे वाटते. मला स्वप्नांच्या किंवा विचारांच्या माध्यमातून पूर्वसूचना मिळण्याचे प्रमाण अल्पाधिक असते.
आ. मला बांगड्यांचा आणि पैंजणाचा नाद अनोखा वाटतो. त्या नादामुळे मला फार आनंद मिळतो.
इ. देव मला साधनेत साहाय्य करत आहे, याची जाणीव होते. कधी सलग १५ दिवस असे जाणवते, तर कधी नेहमी जाणवते. एवढाच भेद असतो की, सलग जाणवते, तेव्हा त्याचे प्रमाण अधिक असते. (दिवसातून ५-६ वेळा) आणि नेहमी जाणवते, तेव्हा प्रमाण अल्प असते. (दिवसातून ३-४ वेळा) याविषयी संतांना विचारून घेतले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या वेळी ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर असलेली कु. मृण्मयी कोथमिरे (वय १४ वर्षे) हिला आलेली अनुभूती

कु. मृण्मयी कोथमिरे
१. गुरुदेवांच्या अमृतमहोत्सवी भावसोहळ्याच्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या चरणांशी बसले असून त्यांनी मस्तकावर हात ठेवल्याचे जाणवणे : ३०.५.२०१६ या दिवशी गुरुदेवांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सप्तर्षि जीवनाडीचे वाचन होते. ते ऐकण्यासाठी मी आणि आई एका ठिकाणी गेलो होतो. त्या वेळी मी प.पू. डॉक्टरांच्या चरणांशी बसले आहे, असा मी भाव ठेवला होता. मी प.पू. डॉक्टरांच्या चरणांशी बसल्यावर थोड्याच वेळात त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आहे, असे क्षणभर मला जाणवले.
२. वेदमूर्तींचे मंत्रपठण ऐकतांना भावजागृती होऊन मन एकाग्र, निर्विचार आणि स्थिर होणे अन् गुरुदेव मला चैतन्य देत आहेत, असे जाणवणे : महर्षींचे नाडीवाचन चालू होते. त्यांनी वेदमूर्तींना ९ वेळा मंत्रपठण करायला सांगितले होते. ते मंत्र म्हणत असतांना मला हात जोडून आणि डोळे मिटून शांत बसावेसे वाटले; म्हणून मी तशी बसले आणि माझे मन एकाग्र झाले. थोड्याच वेळात माझी भावजागृती होऊन मन स्थिर आणि निर्विचार झाले. तेव्हा गुरुदेव मला चैतन्य देत आहेत, असे मला जाणवले. मंत्रपठणानंतरही माझे मन काही वेळ स्थिर होते.
         श्रीकृष्णा, माझ्याकडून ही अनुभूती लिहून घेतल्याबद्दल मी पुष्कळ कृतज्ञ आहे.
- कु. मृण्मयी शैलेश कोथमिरे, डोंबिवली, ठाणे. (१४.६.२०१६)

जिज्ञासू, प्रेमभाव असणारा आणि सहनशील वृत्तीचा ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मंगळुरू, दक्षिण कन्नड येथील कु. गुरुदास गौडा (वय ७ वर्षे) !

कु. गुरुदास गौडा
       कु. गुरुदास गौडा याची वर्ष २०१२ मध्ये आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. आता ५३ टक्के झाली आहे.
       गुरुदास लहान असूनही त्याच्याशी बोलतांना तो लहान आहे, असे वाटत नाही. तो समवयस्क वाटतो. त्याच्याशी बोलतांना आनंद होतो. सहनशीलता, प्रेमभाव, सेवाभाव, उत्साह, नेतृत्वगुण इत्यादी समष्टीला आवश्यक असे पुष्कळ गुण त्याच्यात आहेत. त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१. सहनशीलता
१ अ. अडीच वर्षांचा असतांना गुरुदासचे अंग भाजल्याने त्याच्या शरिराची आग होत असूनही तो शांत असणे, रात्री झोप न येऊनही चिडचिड न करणे आणि सांगितल्यावर जप करत किंवा प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकत शांतपणे पडून रहाणे : तो अडीच वर्षांचा असतांना त्याच्या अंगावर ऊन पाणी पडून त्याचे शरीर भाजले होते. ते बघणार्‍यालाही भीती वाटायची. त्या वेळी त्याच्या शरिराची पुष्कळ आग होत असूनही तो शांत असायचा. त्या कठीण प्रसंगामुळे तो १ मास झोपलेल्या स्थितीतच होता. त्याला रात्री झोप यायची नाही, तरीही तो चिडचिड न करता सांगितल्यावर जप करत असे, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकत शांतपणे पडून रहात असे.

एका श्रीरामभक्ताने भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी धर्मसेवा निर्विघ्नपणे पार पाडता यावी, यासाठी पत्रातून केलेल्या विविध प्रार्थना !

हे श्रीकृष्णा,
         तूच माझ्या माध्यमातून हे पत्र लिखाण करून घे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्‍वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ।
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ।
तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥
श्री गुरवे नमः, श्री गुरवे नमः,
श्री गुरवे नमः ।
         प.पू. गुरुदेवा, माझी पात्रता नसतांना तुम्ही मला जवळ केले. मी तुमच्या चरणी मनापासून कोटी कोटी कृतज्ञ आहे.

प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवी वर्षारंभाच्या रात्री स्वतःचा आकार मोठा होत असल्याचे जाणवणे आणि वातावरणातील चैतन्यमय तत्त्वांमुळे संरक्षण निर्माण झाल्याचे वाटणे

कु. निधी देशमुख
        २९.५.२०१६ या दिवशी, म्हणजेच परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षारंभाच्या रात्री ११ वाजता अंथरुणावर नामजप करत होते. त्या वेळी वाटले, मी आणि आजूबाजूला असलेल्या वस्तू यांतील अंतर न्यून होत आहे. मी मोठी होत चालले आहे. त्यामुळे भिंती अन् छत यांपासून असलेले माझे अंतर अल्प होत आहे. त्या दिवशी वातावरणात संचरित झालेल्या चैतन्यमय तत्त्वांमुळे संरक्षण निर्माण झाल्याने असे वाटले असावे. या अनुभूतीसाठी मी देवाच्या चरणी कृतज्ञ आहे. ३०.५.२०१६ या दिवशी नाडीवाचनाच्या कार्यक्रमानंतर सेवा करत असतांना असेच जाणवले.
- कु. निधी देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.५.२०१६)

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील देवाने दिलेली सेवा करण्यासाठी बळ मिळावे, यासाठी अनन्य शरणागत भावाने संतांचे आशीर्वाद घेणारे अधिवक्ता सुरेश कुलकर्णीकाका !

पू. सौरभदादांचा आशीर्वाद घेतांना अधिवक्ता सुरेश कुलकर्णीकाका
         २५.६.२०१६ या दिवशी सायंकाळी संभाजीनगर येथील अधिवक्ता सुरेश कुलकर्णीकाका पू. सौरभदादांना भेटण्यासाठी आले होते. खोलीत आल्यावर त्यांनी पू. सौरभदादांना अनन्य शरणागत भावाने नमस्कार केला अन् प्रार्थना केली, पू. दादा, देवाने सेवा दिली आहे. ती त्याला अपेक्षित होण्यासाठी तुमचे आशीर्वाद पाहिजेत. पू. दादा बराच वेळ काहीच बोलत नव्हते. शांत राहून सर्व पहात होते; म्हणून कुलकर्णीकाका हात जोडून पू. दादांना म्हणाले, पू. दादा, माझ्यावर रागावलात का ? काही चुकलं का माझं ? क्षमा करा ! तरीही पू. दादा शांत होते; म्हणून मी पू. दादांना विचारले, काकांना ओळखले का ? संभाजीनगर येथून आले आहेत. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून सेवा करतात.
         हे ऐकून काका मला म्हणाले, दादा, प्रत्येक वेळी संत बोलले पाहिजेत, असे काही नाही. त्यांना राहू द्या शांत. मी त्यांच्या चरणांकडे बसून रहातो. त्यांचे चैतन्य मिळेल. ते पुष्कळ झाले. (पू. दादा अधूनमधून कुलकर्णीकाकांकडे वळून बघत होते; परंतु काहीच बोलत नव्हते.) थोड्या वेळाने काका आणि पू. दादा यांच्यात पुढील संभाषण झाले.

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ध्यानाला बसल्यावर श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या संदर्भात आलेली अनुभूती !

सौ. स्वर्णलता सीतारामैय्या
        रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात पंच धातूची श्री दुर्गादेवीची मूर्ती ठेवली आहे. मी ध्यानमंदिरात बसले असतांना मला पुढील दृश्य दिसले. श्री दुर्गादेवीचे वाहन असलेला सिंह श्रीनृसिंहासारखा दिसून श्रीनृसिंहस्वामीच्या सोबत श्री लक्ष्मीदेवीही दिसली. श्रीनृसिंहाने मोठ्ठा जबडा उघडला असून तो मोठ्या गुहेप्रमाणे होता. ही गुहा पुष्कळ लांबीची होती. गुहेत दोन्ही बाजूने पुष्कळ दूर अंतरापर्यंत सर्व साधक थांबल्याचे दिसून डोळ्यांना पेलवणार नाही, एवढा तेजोमय प्रकाश दिसला. त्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्‍वरूप दाखवल्याचे दृश्य दिसले. काही क्षणांत मी स्वतःला पूर्णपणे विसरून गेले. नंतर मला सनातन धर्म राज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना त्वरित होणार असल्याचे ते संकेत वाटले.
- सौ. स्वर्णलता सीतारामैय्या, भाग्यनगर, तेलंगण. (२६.६.२०१६)

सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन ऐकण्याचे भाग्य मिळणारा सनातनचा प्रत्येक साधक लाखांत एक भाग्यवान असण्यासंबंधी महर्षींच्या वाक्याचा झालेला उलगडा !

श्री. श्रीराम काणे
१. सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचनात महर्षींनी पुनःपुन्हा हा सोहळा पहाणारे साधक अत्यंत भाग्यशाली आहेत, असे सांगणे : प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सव वर्षारंभाच्या दुसर्‍या दिवशी, म्हणजे ३०.५.२०१६ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात पू. ॐ उलगनाथन् यांनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन केले. तेव्हा नाडीवाचनात महर्षींनी पुनःपुन्हा सांगितले, आज जे साधक हा सोहळा पहात आहेत, ते अत्यंत भाग्यशाली आहेत. त्यांनी मागील ३ जन्मच नव्हे, तर अनेक जन्म पुण्य केले आहे. पुढे येणार्‍या आपत्काळात साधकांच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व महर्षींनी स्वतः घेतले आहे. साधकांनी केवळ प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी व्यष्टी आणि समष्टी साधना झोकून देऊन करायची आहे. साक्षात् विष्णुस्वरूप श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले हे साधक आणि त्यांचे कुटुंब यांच्या व्यावहारिक अन् आध्यात्मिक उन्नतीची काळजी घेत आहेत आणि पुढेही घेेणार आहेत.
२. हा सोहळा पृथ्वीवरील ७५० कोटी लोकसंख्येपैकी ७ सहस्र साधकांनी पाहिल्याचे समजल्यावर महर्षींच्या वरील वाक्याचा उलगडा होणे : त्याच रात्री झालेल्या सत्संगात देश-विदेशातील अनुमाने ७ सहस्र साधकांनी हा भावसोहळा पाहिला, असे समजले. तेव्हा देवाने सुचवले, जगात अनुमाने ७५० कोटी माणसे रहातात. ७ सहस्र साधकांशी त्याचे गुणोत्तर काढले, तर ७० लाखात एक साधक असे होते. यावरून मला सनातनचा प्रत्येक साधक लाखात एक कसा ?, याचा उलगडा झाला.
        हे गुरुमाऊली, आपण करत असलेली कृपा ग्रहण करण्याचे सामर्थ्य आमच्यात निर्माण करा, हीच आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना !
- श्री. श्रीराम काणे, राऊरकेला, ओडिशा. (३०.५.२०१६)

पू. रेखाताई म्हणजे व्यापक प्रेमभावाचे प्रतीक ।

पू. रेखाताई म्हणजे व्यापक प्रेमभावाचे प्रतीक ।
त्यांच्या प्रेमभावाचेच वाटते गुरूंना कौतुक ॥ १ ॥
पू. रेखाताई म्हणजे निर्मळतेची ओळख ।
निर्मळतेमुळेच पहातात त्या सर्वांमध्ये देवाचे मुख ॥ २ ॥
पू. रेखाताई म्हणजे बाळासारखा भोळा भाव ।
त्यांच्या हृदयी वसला बालकभावातील देव ॥ ३ ॥
पू. रेखाताई म्हणजे निखळ मोहून टाकणारे हास्य ।
मनात असे हनुमंतासारखी भक्ती दास्य ॥ ४ ॥
पू. रेखाताई म्हणजे मनाची शरणागती ।
शरण असतात सदा त्या भगवंत चरणांवरती ॥ ५ ॥
पू. रेखाताई म्हणजे निरपेक्ष प्रीती ।
तशीच देवावरही आहे त्यांची अफाट भक्ती ॥ ६ ॥

सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची अद्ययावत सूची प्रसारासाठी उपलब्ध !

साधक आणि सनातनच्या उत्पादनांचे वितरक यांच्यासाठी सूचना
     सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची नावे आणि मूल्य असलेली सूची अद्ययावत करण्यात आली आहे. ही सूची नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध आहे. साधक आणि उत्पादनांचे वितरक यांनी आवश्यकतेनुसार या सूचीचा उपयोग गुरुपौर्णिमा महोत्सव तसेच अन्य उपक्रमांच्या वेळी प्रसारासाठी करावा.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
दुसरा आणि स्वतः दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला
 न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास
 तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
आता काँग्रेस सरकारप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांगण्यानुसार भाजप सरकारने सनातन संस्थेवर बंदी घातली, तरी सनातन संस्थेच्या कार्यात काही फरक पडणार नाही; कारण आता शेकडो हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते सनातन संस्थेशी जोडले गेले आहेत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा हितचिंतक !
अहो रूपम् अहो ध्वनिः । म्हणजे (गाढवाने उंटाला म्हणावे) वा ! काय रूप आहे आणि (उंटाने गाढवाला 
म्हणावे) वा ! काय आवाज आहे, असे म्हणणारा कधीही मित्र नसतो. तुम्हाला तुमच्यातील दोष 
सांगणाराच तुमचा खरा मित्र आणि खरा हितचिंतक असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हे कुठवर चालणार ?

संपादकीय
     आतंकवादी एकामागोमाग एक आक्रमण करून सैन्याला लक्ष्य करत असल्याच्या घटना प्रत्येक राष्ट्रभक्ताला अस्वस्थ करणार्‍या आहेत. २५ जून या दिवशी जम्मू-काश्मीरमधील पंपोर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआर्पीएफ्च्या) बसवर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. या आक्रमणात ८ सैनिक हुतात्मा झाले, तर २० सैनिक घायाळ झाले. या आक्रमणानंतर आपल्या राज्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे शाब्दिक बुडबुडे उडवण्यापलीकडे काहीही केले नाही. या घटनेविषयी रांची येथील सभेत भाष्य करतांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, सीमेपलीकडून असाच गोळीबार चालू राहिला, तर त्याला प्रत्युत्तर देतांना भारत गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही ! यानंतर लागोलग संरक्षणमंत्र्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, आतंकवादी भारतीय सैन्यापुढे हतबल ठरू लागले आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn