Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी रा.स्व. संघाचा महाराष्ट्र सरकारवर दबाव !

संघाच्या सूत्रांच्या हवाल्याने डीएन्ए वृत्तपत्राने प्रसिद्ध केले वृत्त !

रा.स्व. संघाचा हवाला देऊन डीएन्ए सारखे इंग्रजी दैनिक अशा प्रकारचे वृत्त प्रकाशित
 करत असेल, तर संघ आणि भाजप सरकार यांनी याचा खुलासा करणे अपेक्षित आहे !
     मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सनातन संस्थेचे अस्तित्व नकोसे झाल्याने संघाने महाराष्ट्र सरकारला पुरेशी आवश्यक कारणे देऊन सनातन संस्थेवर बंदी घालण्याची प्रक्रिया चालू करण्यास सांगितले आहे. त्यामुळेच गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सी.बी.आय.कडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, अशी बातमी डी.एन.ए. या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
     या वृत्तात म्हटले आहे की,
१. उच्च न्यायालयाने गोविंद पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण सी.बी.आय.कडे सोपवण्यास विरोध केला आहे आणि पोलिसांनाच अन्वेषण पुढे नेण्यास सांगितले आहे, तरीही राज्य सरकारने सनातन संस्थेवर बंदी आणण्याची पाऊले उचलण्यास प्रारंभ केला आहे.
२. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंद पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण सी.बी.आय.कडे सोपवण्याचा निर्णय घेण्यामागे या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला गोवल्यास संस्थेवर बंदी आणणे सोपे जाणार आहे, असे कारण आहे.

अल्पवयीन मुलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारांविरुद्ध होऊ घातलेल्या कायद्याला विरोध करण्यासाठी चर्चने १ सहस्र ३०० कोटी रुपये खर्च केले !

हिंदूंच्या संतांवरील कथित लैंगिक शोषणाच्या
आरोपांवरून त्यांची अपकीर्ती करणारे ख्रिस्त्यांच्या
चर्चमधून होणार्‍या लैंगिक शोषणावर मात्र मौन बाळगतात !
     यू यॉर्क - अल्पवयीन मुलांवरवरील लैंगिक अत्याचारांच्या विरोधात न्यायालयात चालू असलेल्या खटल्यांत आरोपींवर दिवाणी दावे लावून हानीभरपाई मागणे सोयीस्कर व्हावे; म्हणून न्यू यॉर्क राज्याच्या कायदेमंडळात नवीन कायदा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा कायदा होऊ नये; म्हणून अमेरिकेतील कॅथॉलिक चर्चने कायदेमंडळातील सदस्यांवर दबाव आणून त्यांचे मन वळवण्यासाठी दबावगटांचे साहाय्य घेतलेे. या दबावगटावर सुमारे १ सहस्र ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमुळे चर्चची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. तसेच आजपर्यंत चर्चने पीडित मुलांच्या हानीभरपाईपोटी कोट्यवधी रुपये दिले आहेत. आज अनेक पीडित मुले वयाच्या मुदतीत हानीभरपाईचे खटले दाखल करू शकत नाहीत, तसेच त्यांचे कुटुंबीय समाजात होणार्‍या अपकीर्तीलाही घाबरतात. नवीन कायद्याने या मुलांना आणि त्यांच्या पालकांना चर्चवर खटले भरणे सोयीचे होईल; म्हणूनच कॅथॉलिक चर्चने या कायद्याला तीव्र विरोध केला आहे.

अमेरिकेच्या पश्‍चिम व्हर्जिनियामध्ये वादळी पावसामुळे २३ जणांचा मृत्यू !

महर्षींची दिव्य भविष्यवाणी खरी ठरली !
     महर्षींनी याआधी वादळी पाऊस आणि त्यामुळे होणारी भीषण हानी यांविषयी भविष्यवाणी केली होती. अमेरिकेतील वादळी पाऊस पहाता महर्षींची दिव्य वाणी किती सत्य आहे, याची प्रचीती येते.
    वॉशिंग्टन - अमेरिकेच्या पश्‍चिम व्हर्जिनिया प्रांतात वादळी पावसामुळे २३ जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी लोकांना पाणी साचल्यामुळे अडकून पडावे लागले आहे. ६६ सहस्र लोकांना विजेविना रहावे लागत आहे. पूरस्थितीमुळे हानी झालेल्या घरांतील लोकांसाठी १७ आश्रयस्थाने स्थापन करण्यात आली आहेत.

राजकारणात शिरण्यापेक्षा निर्भयतेने धर्मकार्य करा ! - आमदार राजासिंह ठाकूर, तेलंगण

प्रचंड घोषणांच्या गजरात हिंदूसिंह श्री. राजासिंह ठाकूर 
यांना उपस्थित हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !
पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सांगता सोहळ्यात आवाहन !
    रामनाथी (गोवा) - राजकारण हे महामार्गावरील कचराकुंडीप्रमाणे आहे. राजकारणात शिरल्यानंतर धर्मकार्य करण्यासाठी अनेक बंधने येतात. राजकारणात गेल्यावर गुलाम बनावे लागते. पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणात पुष्कळ भेद आहे. पूर्वी तत्त्वांच्या आधारे राजकारण केले जात होतेे; आज मात्र ही परिस्थिती पालटली आहे. त्यामुळे राजकारणात जाण्याचा विचार न करता निर्भयपणे धर्मकार्य करत रहा. जो धर्मकार्य करतो, त्याचे साक्षात् ईश्‍वर रक्षण करतो, असे आवाहन तेलंगणमधील भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी केले. ते रामनाथी (गोवा) येथे २५ जून या दिवशी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सिरोही संस्थान, राजस्थानचे महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर, भोपाळ (मध्यप्रदेश) येथील धर्मपाल शोध पिठाचे संचालक प्रा. रामेश्‍वर मिश्र आदी मान्यवर उपस्थित होते.
     ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगम असलेले श्री. राजासिंहजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी सभागृह घोषणांनी दणाणून गेले. त्यांच्या व्यासपिठावरील उपस्थितीनेही सभागृहात हिंदुत्वाचे चैतन्य सळसळत होते. हिंदुत्वनिष्ठ विचारांना कृतीची जोड असल्यामुळे हिंदूंचे सिंहच असणारे श्री. राजासिंह यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांमध्ये हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवले. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री. राजासिंहजी ठाकूर यांचे मार्गदर्शन संस्मरणीय ठरले.

मंदिरांच्या भूमीवर शेती करण्यास अन्य धर्मियांना बंदी !

आंध्रप्रदेश शासनाचा अभिनंदनीय निर्णय !
      भाग्यनगर - आंध्रप्रदेश शासनाने सरकारीकरण केलेल्या मंदिरांच्या तसेच अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाच्या शेतभूमीवर त्या धर्माच्या बाहेरील मजुराला शेती करण्यास बंदी घालणारा आदेश दिला आहे. तसेच आता शेती करत असलेल्या अशा मजुरांना शेती करण्याचे थांबवण्याचाही आदेश दिला आहे. हा आदेश नोव्हेंबर २०१५ मध्ये देण्यात आला होता; मात्र आता प्रत्यक्ष शेतीची कामे चालू झाल्याने त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता मंदिरांच्या भूमीवर मुसलमान किंवा ख्रिस्ती मजूर काम करू शकत नाहीत. 
१. शासनाने मंदिरांची भूमी भाडेपट्टीवर घेतलेल्यांना नोटिसा जारी करून भूमी तात्काळ सोडण्यास सांगितले आहे. तसेच जे दलित आहेत, त्यांना ते ख्रिस्ती धर्म मानत नसल्याचे चर्चकडून शपथपत्र घेऊन यावे, असेही सांगण्यात आले आहे.

बारामुल्लामध्ये २ आतंकवादी ठार

     श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून घुसखोरी करत असलेल्या २ जिहादी आतंकवाद्यांना सैनिकांनी ठार केले. सैनिकांनी या आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केली.

एन्एस्जीचे सदस्यत्व मिळाले तर हानीच ! - यशवंत सिन्हा

     नवी देहली - अणूपुरवठादार देशांच्या गटाचे (एन्एस्जीचे) सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताला याचना करण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या परिस्थितीत एन्एस्जीचे सदस्यत्व मिळाले, तर हानीच आहे, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. मोदी सरकारचे पाकविषयीचे धोरण पूर्णत: फसले आहे. जितक्या लवकर हे धोरण पालटले जाईल, तितके ते हिताचे आहे, असेही ते म्हणाले.

पाक क्रिकेटपटू इमरान खान यांच्या पक्षाच्या सरकारकडून आतंकवाद्यांच्या मदरशांना आर्थिक साहाय्य !

     इस्लामाबाद - खैैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारमधील मंत्री हबीब रहमान यांनी म्हटले आहे की, इमरान खान यांचा पक्ष तहरीके इंसाफच्या सरकारकडून हक्कानी नेटवर्कशी संबंधित असणार्‍या मदरशांना प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जात आहे. हक्कानी नेटवर्क एक आतंकवादी संघटना आहे. या मदरशांना सौदी अरबकडूनही मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात.

जिहादी आतंकवाद्यांकडून पॅराशूट, फुगे किंवा पॅराग्लायडिंग यांच्या माध्यमातून अमरनाथ यात्रेवर आक्रमणाची शक्यता !

अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यास एकालाही हज यात्रेला जाऊ देणार नाही, 
अशी चेतावणी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती ! 
     जम्मू - २ जुलैपासून आरंभ होणार्‍या अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवादी आक्रमण करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये आतंकवादी आणि सैनिक यांच्यातील चकमकी पहाता सैन्यदल चिंतीत आहे. आतंकवादी यात्रेवरील आक्रमणासाठी पॅराशूट, फुगे किंवा पॅराग्लायडिंग यांचा वापर करू शकतात, अशी गोपनीय माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. यामुळे या वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

मोगल बादशहा अकबरही गंगाजल ग्रहण करायचा ! - केंद्रशासन

     नवी देहली - मोगल बादशहा अकबर शुद्ध गंगाजल ग्रहण करायचा, असे वक्तव्य केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये केले आहे. उत्तराखंड येथे अलकनंदा आणि भागीरथी नदीवर होणार्‍या २४ जलवीज प्रकल्पावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. वर्ष २०१३ मध्ये आलेल्या पुरानंतर न्यायालयाने अलकनंदा आणि भागीरथी या नद्यांच्या प्रकल्पावर बंदी घातली आहे. आस्थापनांनी ही बंदी हटवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी होऊन गेलेल्या मोगल बादशहांनीही गंगाजलाचे वैशिष्ट्य मान्य केले होते. जल विकास मंत्रालयाने न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करून गंगा नदीचे संरक्षण करणे, तसेच तिला प्रदूषणमुक्त करणे सरकारचे दायित्व असल्याचे सांगत गंगा नदीच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाविषयीही वक्तव्य केले आहे. गंगा नदी भारताची ओळख आहे. अन्य नद्यांमध्ये नाही, असे विशेष तत्त्व गंगाजलामध्ये आहे. ५० कोटी लोकांच्या उत्पन्नाचे साधन हे आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

म्यानमार येथे पुन्हा बौद्ध आणि मुसलमान यांच्यात तणाव !

अवैधरित्या बनवण्यात येणारा मदरसा पाडला !
* अहिंसावादी बौद्धांनाही धर्मांधांची गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागतो ! 
* हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे म्यानमारच्या बौद्धांविषयी कधीच तोंड उघडत नाहीत ! यंगून - म्यानमारच्या बागो शहरामध्ये बौद्ध आणि रोहिंग्या मुसलमान यांच्यात अनधिकृतरित्या बनवण्यात येणार्‍या एका मदरशावरून झालेल्या संघर्षात एक मुसलमान घायाळ झाला, तर मदरशाची भिंत पाडण्यात आली. 
      बागो येथील थूई था मेईन या गावात ५०० घरे आहेत. त्यात मुसलमानांची केवळ ४० घरे आहेत. येथील अब्दुल शरीफ याने विनाअनुमती घराच्या परिसरातच मदरशाचे निर्माण चालू केले. त्याला एका बौद्ध महिलेने विरोध केला. (भारतात बहुसंख्य हिंदू असतांना एकही हिंदु महिला किंवा पुरुष असा विरोध करण्याचे धाडस करू शकत नाही ! - संपादक) तेव्हा दोघांत वाद झाला. याची माहिती मिळताच २०० बौद्ध लगेच येथे पोचले आणि त्यांनी तोडफोड चालू केली. (बौद्धांचा संघटितपणा ! - संपादक) यात शरीफ घायाळ झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर त्याच्या परिवाराला पोलिसांनी अन्यत्र हालवले. या घटनेनंतर घाबरलेल्या ७० मुसलमानांनी पोलीस ठाण्यातच आश्रय घेतला आहे. सध्या येथे शांतता आहे.

आतंकवाद्यांच्या आक्रमणात ८ भारतीय पोलीस ठार झाल्यावर पाक उच्चायुक्त म्हणतात, इफ्तार पार्टीचा आनंद घ्या !

पाक उच्चायुक्ताच्या इफ्तार पार्टीत फुटीरतावाद्यांचा सहभाग !
पाकशी मैत्री करण्याचा प्रयत्न करणार्‍या केंद्र सरकारला चपराक ! 
आतातरी सरकार शहाणे होणार कि स्वतःचे शहाणपण दाखवत रहाणार ?
     नवी देहली - भारतातील पाकचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत काश्मीरमधील फुटीरतावादी नेते उपस्थित होते. (देशद्रोही फुटीरतावाद्यांना शत्रू राष्ट्राशी जवळीक करू देणारे राज्यकर्ते कधीतरी देशद्रोह्यांवर नियंत्रण मिळवू शकतील का ? - संपादक) याच वेळी काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ८ पोलीस ठार झाल्याची घटना घडली. यावर प्रतिक्रिया देतांना बसीत म्हणाले की, हा रमझानचा महिना आहे. आता इफ्तारची पार्टी आहे. त्यावर बोला आणि पार्टीचा आनंद घ्या. बसीत यांनी या आक्रमणाचा निषेधही केला नाही. अब्दुल बसीत आणि फुटीरतावादी नेते यांच्यात स्वतंत्र काश्मीरच्या सूत्रावर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र बसीत यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. आम्ही राजकीय चर्चेसाठी नव्हे, तर इफ्तार पार्टीचा आनंद लुटण्यासाठी एकत्र जमलो आहोत, असे बसीत म्हणाले.

मुंबई येथील एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी काँग्रेसचे शिवानंद हुल्याळकर यांना अटक

नैतिकता नसलेल्या काँग्रेसवर या प्रकरणी बंदीची मागणी केल्यास चुकीचे काय ?
     मुंबई - येथील काँग्रेसचे शिवानंद हुल्याळकर यांना एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली २४ जून या दिवशी रात्री वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. (या प्रकरणी काँग्रेस पक्ष हुल्याळकर यांच्यावर कारवाई करणार कि पक्ष आपले दायित्व झटकणार ? - संपादक)
१. पीडित तरुणीला हुल्याळकर याने कामानिमित्त मॉरिशसला नेले होते. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे या तरुणीने म्हटले आहे.
२. त्या तरुणीने स्वत:ची सुटका करून मुंबईला आल्यावर पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि सहआयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली आणि तक्रार मांडली. त्यावर पडसलगीकर यांनी तातडीने तक्रार प्रविष्ट करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर हुल्याळकर यांना अटक केली आहे.
३. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी सांगितले की, पीडीत तरुणीची आणि हुल्याळकर याची १ वर्षापूर्वी ओळख झाली होती. त्या तरुणीला हुल्याळकर याने त्याच्या आस्थापनाची मालक बनवतो आणि घर देतो, असे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले, तसेच वारंवार मारहाण केल्याचीही तक्रार दिली आहे. (अशा नराधमांना कठोरात कठोर शासन व्हायला हवे. - संपादक) ४. शिवानंद हुल्याळकर याने त्यांच्या फेसबूक या संकेतस्थळावर इंडियन नॅशनल काँग्रेस, असे लिहिले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पगडी देतांनाचे छायाचित्रही त्याने फेसबूकच्या डीपीवर ठेवले आहे.

सिल्लोड (संभाजीनगर) येथून गोवंशियांना गोशाळेत घेऊन जाणार्‍या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण, २ धर्मांध अटकेत

गोवंश रक्षण आणि धर्मांधांच्या मुसक्या आवळण्यासाठी शासन कधी कृतीशील होणार ?
     संभाजीनगर - जळगाव येथून एक मालवाहू ट्रक गोवंशियांना घेऊन सिल्लोडकडे जात असतांना त्याचा अपघात झाला. त्या वेळी जमावाने सदर ट्रक थांबवून पोलिसांना कळवले. पोलिसांनी आटोक्यात आणत त्या ट्रकचा पंचनामा केला. त्यानंतर पोलीस तो ट्रक शासनाधीन करून गोशाळेकडे घेऊन जात असतांना दुचाकीवरून आलेल्या १० हून अधिक धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण केले. (यावरून धर्मांधांचा वाढता उद्दामपणा लक्षात येतो. - संपादक) सदर आक्रमणात काही पोलिसांना धक्काबुक्की झाली असून १ पोलीस कर्मचारी घायाळ झाला आहे. (धर्मांधांच्या आक्रमण प्रसंगी पोलीस मात्र शेपूट घालून गप्प बसतात आणि मार खातात, हेच यावरून सिद्ध होते. - संपादक) या प्रकरणी पोलिसांनी शेख अजीम शेख बशीर आणि शेख फैयाज शेख कादीर यांना अटक केली आहे.
१. पोलीस गोशाळेत ट्रक घेऊन जात असतांना धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण करत तो ट्रक घेऊन ते पसार झाले. ही माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना कळताच त्यांनीही ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी धर्मांधांनी पोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. 
२. या वेळी धर्मांधांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाणही केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य पहाता पोलिसांनी जादाची कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी सिल्लोड ग्रामीण, शहर आणि वडोदा बाजार पोलीस ठाण्यात एकूण ४० जणांवर गुन्हा प्रविष्ट केला आहे.

राज्य महिला आयोगाकडे पोलिसांच्या विरोधातीलच अधिक गार्‍हाणी (तक्रारी) !

जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षक बनलेले पोलीस !
     संभाजीनगर, २६ जून - येथील सुभेदारी सभागृहामध्ये २५ जून या दिवशी राज्य महिला आयोगाच्या विजया रहाटकर यांनी २ घंटे ३० मिनिटे नागरिकांसाठी वेळ दिला. यामध्ये घेण्यात आलेली २० हून अधिक गार्‍हाणी पोलिसांच्या विरोधातील होती. यात महिला पोलीस, २ माजी पोलीस उपअधीक्षक, माजी आयुक्त यांच्या विरोधातील गार्‍हाणे होते. (अशा पोलिसांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होते. या पोलिसांना खड्यासारखे बाजूला करून कठोर शासन करणे आवश्यक आहे. - संपादक) या वेळी नावाचा तसेच पदाचा अपवापर करून मालमत्ता हडपणे, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण करणे, असे प्रकार होत असल्याची इतर गार्‍हाणीही मांडण्यात आली. (राज्यातील महिलांना सुरक्षित करण्यासाठी राज्य महिला आयोग कोणती उपाययोजना करणार ? - संपादक) या वेळी भाजप महिला मोर्च्याच्या पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

पंजाबमधील मलेरकोटला येथे कुराणच्या कथित अवमानावरून धर्मांधांकडून हिंसाचार !

अकाली दल-भाजप सरकार धर्मांधांना रोखू शकत नाही. 
खलिस्तानवाद्यांचे कायमचे मागे लागलेले संकट ते कसे रोखणार ?
     चंडीगड - पंजाबचे मुसलमानबहुल शहर मलेरकोटला येथे कुराणाची फाटलेली पाने मिळाल्यावरून धर्मांधांकडून हिंसाचार करण्यात आला. यात अनेक गाड्या जाळण्यात आल्या, तसेच अन्य संपत्तीचीही हानी करण्यात आली. (हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यावर हिंदू शासकीय यंत्रणांना निवेदने देतात, तरीही हिंदूंना असहिष्णु आणि आतंकवादी ठरवण्यात येते; तर मुसलमानांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान झाल्यावरही ते कायदा हातात घेतात; तरीही त्यांच्याविषयी कुणालाही काही बोलायचे नसते ! - संपादक) या वेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवले.
     पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंह यांनी आरोप केला की, अकाली दलाच्या स्थानिक आमदार फरजाना खातून यांचे पती आणि माजी पोलीस महासंचालक इजहार आलम यांच्या सुरक्षारक्षकांनी नागरिकांवर गोळीबार केला ज्यात अनेक जण घायाळ झाले.
     पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी लोकांना शांत रहाण्याचे आवाहन केले; मात्र अमरिंदरसिंह यांनी आरोप केला की, आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच राज्यातील शांतता भंग करून अस्थिरता निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.

३० सप्टेंबरपर्यंत अघोषित संपत्ती घोषित करा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन !
करबुडवे कधीही अशा आवाहनांना प्रतिसाद देणार 
नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाईच केली पाहिजे !
     नवी देहली - शासनाने अवैधरित्या संपत्ती बाळगणार्‍या नागरिकांना अघोषित संपत्ती घोषित करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देऊ केली आहे. त्यानंतर मात्र करबुडव्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. स्वेच्छेने देशांतर्गत अघोषित संपत्ती घोषित करणारे लोक स्वत:वर होणारी दंडात्मक कारवाई होण्यापासून स्वत:ला वाचवू शकणार आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जून या दिवशी केले. ते आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करत होते. या वेळी मोदी यांनी देशात चांगला पाऊस पडावा, तसेच नागरिकांनी पावसाचा आनंद घ्यावा, पण थेंबन् थेंब साठवून ठेवावा, असेही ते म्हटले.

(म्हणे) बांगलादेशातील भारतीय नागरिक सुरक्षित !

बांगलादेशमध्ये प्रतिदिन अनेक हिंदूंच्या हत्या होत असतांना 
बांगलादेशचे उपउच्चायुक्त सलाउद्दीन नोमन चौधरी यांची धादांत खोटी माहिती
     नागपूर - बांगलादेशात हिंदू-मुसलमान अशी तेढ असल्याचा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे; मात्र वास्तवात बांगलादेशमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कुठलीही दुय्यम वागणूक दिली जात नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत, असा दावा बांगलादेशचे उपउच्चायुक्त सलाउद्दीन नोमन चौधरी यांनी केला आहे. सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित विश्‍व बांगला परिषदेसाठी ते आले असतांना त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
    हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशमध्ये हिंदूंच्या होणार्‍या हत्यांविषयीचे आरोप फेटाळून लावतांना सलाउद्दीन नोमन यांनी सांगितले की, आतंकवाद्यांकडूनच खरा धोका आहे. विरोधक त्याचा शासनाशी संबंध जोडत आहेत. बांगलादेशी नागरिकांना जी वागणूक दिली जाते, तीच भारतीय नागरिकांनाही दिली जाते. बांगलादेशी असो अथवा भारतीय असो दोघांच्याही सुरक्षेच्या संदर्भात देशाचे पंतप्रधान अब्दुल हमीद पूर्णपणे समान काळजी घेत आहेत.

गोमंतकियांचे पोर्तुगीज पारपत्र घेण्याचे प्रमाण घटणार !

ब्रिटन युरोपियन समूहातून बाहेर पडल्याचा परिणाम
     पणजी - ब्रिटन युरोपियन समूहातून बाहेर पडला आहे. त्यामुळे पोर्तुगालचे पारपत्र घेऊन ब्रिटनमध्ये गेलेल्या गोव्यातील लोकांचे अधिकार अल्प होणार आहेत. ब्रिटनने या लोकांसाठी विशेष कायदा न बनवल्यास या लोकांना ब्रिटनमधून बाहेर पडावे लागणार आहे. यामुळे गोव्यातून पोर्तुगीज नागरिकत्व घेण्याचे प्रमाणात घटण्याची शक्यता आहे, अशी माहिती अनिवासी भारतीय कार्यालय संचालक उल्हास कामत यांनी दिली.

पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवक घेणार भजनाचे धडे

     पुणे - गेल्या २ वर्षांपासून पंढरपूरला जाणार्‍या वारीमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवक-युवती यांची दिंडी सहभागी होते. ज्याप्रमाणे वारकरी वारीमध्ये हरिनाम आणि भजन करतात, तसे त्या दिंडीतील युवकांना करता यावे, यासाठी येथील सिंहगड रस्त्यावरील श्री विठ्ठल मंदिरात २६ जून या दिवशी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी १०० हून अधिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांनी हे दिंडीत सहभागी असणार्‍या टाळकरी आणि विणेकरी मंडळी यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

चिखली (जिल्हा पुणे) येथे उभारण्यात येणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ कागदोपत्रीच !

हज हाऊस उभारायचे असते, तर आतापर्यंत त्याच्या उभारणीस आरंभ झाला असता. 
 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संतपीठ घोषणा पोकळ आश्‍वासन ठरू नये !
     चिखली, २६ जून - येथील नगरसेवक दत्ता साने यांनी केलेल्या मागणीनुसार येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाने संतपीठ उभारण्याची घोषणा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने वर्षभरापूर्वी केली होती. त्यासाठी चिखली गायरानातील सुमारे ८ एकर जागाही या प्रकल्पासाठी निश्‍चित केली होती; परंतु अद्यापपर्यंत या संतपिठाच्या उभारणीसाठी कोणतीही हालचाल दिसून येत नाही. 
     सध्या चालू होणार्‍या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील वारकरी संप्रदायाचे लक्ष वेधून घेतलेल्या या संतपिठाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारकरी संप्रदायातील सर्व कलागुणांचे जतन, प्रसार आणि शिक्षण ही संतपिठाची संकल्पना आहे. संतपिठामध्ये संत साहित्याचा अभ्यास आणि मराठी संस्कृतीचे संशोधन करण्याचे नियोजन आहे. पदविका, पदवी आणि संशोधनावर आधारित असा या पिठाचा अभ्यासक्रम असणार आहे; परंतु प्रकल्पासाठीची जागाच उपलब्ध न झाल्याने हे सारे नियोजन बारगळेल कि काय, अशी चर्चा वारकर्‍यांमध्ये चालू आहे.

हलकर्णी (जिल्हा कोल्हापूर) येथे मंदिरात चोरी !

हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
     गडहिंग्लज, २६ जून (वार्ता.) - हलकर्णी (तालुका गडहिंग्लज) येथील बिरोबा मंदिरातील तिजोरी फोडून सोन्याचे सुमारे ६० सहस्र रुपयांचे दागिने चोरल्याच्या प्रकरणी गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. २५ जून या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली. २५ जून या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटे ५ वाजता पुजारी मंदिर उघडण्यासाठी गेले असता त्यांना समोरील ग्रीलच्या दाराचे कुलूप नसल्याचे, तसेच गाभार्‍यातील लोखंडी तिजोरीचे दार उचकटलेले दिसले. चोरट्याने चांदीचा मुखवटा, चांदीचे दागिने तिथेच विस्कटून टाकले होते. (हिंदूंनो, निद्रिस्त आणि अकार्यक्षम पोलीस मंदिरांचे संरक्षण करतील, या भ्रमात न रहाता मंदिरांचे रक्षण करण्यासाठी मंदिर समितीमधील भाविकांचे नियोजन करा. मंदिरांतील चोरीच्या वाढत्या घटना कायदा-सुव्यवस्थेची दु:स्थिती दर्शवतात ! - संपादक) 
अकोला येथील श्री गणपति मंदिरात चोरी
     अकोला - येथील खेडकर नगरातील श्री गणपति मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली. चोरट्याने मंदिरातील चांदीची छत्री आणि दानपेटी चोरून नेली. या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

(म्हणे) केंद्र आणि राज्य शासनाने कुठे नेऊन ठेवला आहे भारत माझा ?

स्वतःच्या हातात सत्ता असतांना देश आणि राज्य यांना आर्थिक 
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ठेवणारे शरद पवार यांचे बोल ! 
     पिंपरी (पुणे), २६ जून - केंद्र आणि राज्य शासनाकडून केवळ योजनांच्या घोषणाच होत आहेत. प्रत्यक्षात सकारात्मक चित्र दिसत नाही. शेतकरी दुष्काळाने होरपळला असून आत्महत्या करत आहेत. उद्योग संकटात आहेत. कामगारांना भविष्याची चिंता आहे, अशी भयावह परिस्थिती असून आता त्यांच्याच भाषेत बोलायचे, तर कुठे नेऊन ठेवला आहे भारत माझा ? हेच का ते अच्छे दिन ?, अशी टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेरगाव येथे झालेल्या राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केली. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, महापौर शकुंतला धराडे आदी उपस्थित होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावरील आक्रमणाला हिंदूंनी संघटितपणे विरोध करावा ! - अधिवक्ता रणजित घाटगे

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा ! 
कोल्हापूर येथे हिंदुत्ववाद्यांची बैठक
हिंदुत्ववाद्यांच्या बैठकीत बोलतांना
अधिवक्ता श्री. रणजित घाटगे 
     कोल्हापूर, २६ जून (वार्ता.) - सध्याचा काळ हिंदुत्ववादी संघटनांच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे. यापूर्वी देशात काँग्रेस शासन होते आणि त्यांनी हिंदुविरोधी असल्याने हिंदु संघटनांना लक्ष्य करून कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चीकरण करून त्यांना जीवनातून उठवले. सध्या हिंदुत्ववादी शासन असूनही काँग्रेस राजवटीपेक्षा वाईट अनुभव येत आहे. सर्व हिंदु संघटनांनी संघटित होऊन आक्रमणास विरोध केला पाहिजे. सनातन संस्था सध्या जात्यात असून अन्य संघटनांवर केव्हाही वरवंटा फिरू शकतो. आम्ही सर्व हिंदु संघटना निरपराधी असणारी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहरप्रमुख आणि अधिवक्ता श्री. रणजित घाटगे यांनी येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या हिंदुत्ववादी संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत केले. येथील महादेव मंदिरात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

आषाढी पालखी सोहळा प्रस्थान काळात आळंदीत (पुणे) प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

आषाढी पालखी सोहळ्यापुरती प्लास्टिक पिशव्यांवर 
बंदी न घालता ती कायमस्वरूपी घालणे आवश्यक !
     आळंदी - आषाढी पायीवारी पालखी सोहळा प्रस्थान काळात आळंदी नगरपरिषदेने शहरात प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोलच्या पत्रावळ्या यांवर बंदी घातली आहे. या प्रकारचे व्यवसाय करणारे विक्रेते शहरात कोठेही आढळून आल्यास वा त्या निर्देशाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगळे यांनी दिले आहेत. यासंबंधित शहरातील नागरिक आणि व्यापारी यांना तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

जुलै मासात १२ दिवस अधिकोष (बँका) बंद रहाणार

     सिंधुदुर्ग - जुलै मासात जवळपास १२ दिवस अधिकोष (बँका) बंद रहाणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काही बँकांचे विलीनीकरण होणार आहे. याविरोधात स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूरच्या कर्मचार्‍यांचा १२ आणि २८ जुलैला देशव्यापी संप आहे. तसेच ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचाही संप आहे.
     प्रत्येक मासातील दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार नियमित सुट्टी, तसेच ६ जुलैला ईदची सुट्टी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनच्या आवाहनानुसार इतर बँकांचा १३ जुलैला देशव्यापी संप आहे, तर २९ जुलैला युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियनने आवाहन केल्यानुसार सर्व बँका बंद रहाणार आहेत.

२९ जून या दिवशी पुणे येथे वारकरी-धारकरी संगमासाठी उपस्थित रहा !

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आवाहन 
     सांगली, २६ जून (वार्ता.) - महाराष्ट्रातील सर्व वारकरी आळंदी, देहू येथून निघून श्री ज्ञानोबा आणि श्री तुकोबाराय यांच्या पालख्या घेऊन प्रतिवर्षी पुणे येथे मुक्कामी येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य यशस्वी होण्यासाठी संतांच्या दर्शनाला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. हीच त्यांची पद्धत अनुसरून वारकरी-धारकरी संगम अर्थात भक्तीगंगा शक्तीगंगा संगम याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमासाठी बुधवार, २९ जून या दिवशी पुणे येथे श्री जंगली महाराज मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात दुपारी २ वाजेपर्यंत यावे, असे आवाहन सातारा येथील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीशिवप्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात येत आहे.

इंग्रजीचे स्तोम थांबवून मातृभाषेतूनच मुलांना शिक्षण द्या ! - अभिनेता शरद पोंक्षे

     पिंपरी (पुणे), २६ जून - सध्याच्या भारतीय शिक्षणपद्धतीचा ज्ञानी होण्याशी काहीच संबंध राहिलेला नाही. सध्या मुलांना ८ वीपर्यंत अनुत्तीर्ण करायचे नाही, अशी टूम काढली गेली आहे. उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण असे खाचखळगे नसतील, तर मुले शिकणार कशी ? लोकमान्य टिळक, सावरकर घडणार कसे ? ९० प्रतिशत शाळा या डॉन बॉस्को, सेंट फ्रान्सिस अशा आहेत. त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमात संत, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांचा त्रोटक उल्लेख असतो; मात्र फ्रेंच राज्यक्रांती, दुसर्‍या महायुद्धाचा इतिहास रंगवून सांगितला जातो. यासाठी इंग्रजीचे स्तोम थांबवून मातृभाषेतूनच मुलांना शिक्षण दिले पाहिजे, असे आवाहनात्मक प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले. येथील संदीपभाऊ वाघेरे युवा मंचाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या वेळी खासदार अमर साबळे आणि आमदार अधिवक्ता गौतम चाबुकस्वार हेही उपस्थित होते. 
     श्री. पोंक्षे पुढे म्हणाले की, संतांनी हा महाराष्ट्र घडवला; मात्र त्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव यांच्या नावाने शाळा नाहीत. पैशांपलीकडे एक जगणे असते, हे शिकवले जात नाही. भारतात प्रत्येकी ३ मिनिटाला एक बलात्कार होतो. अशा परिस्थितीत मुलींनी स्वरक्षणार्थ पुढे यावे.

सव्वाशे कोटी जनतेची शक्ती चांगल्या कामासाठी वापरली गेल्यास शासनाची आवश्यकता नाही - पंतप्रधान

शासनविहीन व्यवस्थेकडे वाटचाल होण्यासाठी राजा
 आणि प्रजा धर्माचरणी असणे आवश्यक आहे !
     पुणे - देशातील नागरिकच खरा स्मार्ट असल्याने देशातील १२५ कोटी जनतेची शक्ती चांगल्या कामासाठी वापरली गेल्यास शासनाची आवश्यकता नाही. (नागरिकांना खरेच स्मार्ट करायचे असेल आणि सुशासन हवे असेल, तर धर्मशिक्षणाला पर्याय नाही, हेही तितकेच सत्य आहे, हे मोदींनी जाणावे. - संपादक) शासनाशिवायही जग अधिक गतीने पुढे जाऊ शकते. पूर्वी अधिक गरीब होण्याची स्पर्धा होती. आता ती पालटून पुढे जाण्याची स्पर्धा या स्मार्ट सिटीप्रकल्पाच्या माध्यमातून चालू झाली आहे. शहरीकरण हे संकट नसून गरिबी पचवण्याची संधी आहे. तंत्रज्ञान हे सामूहिक सेवेचे उत्तम माध्यम आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केले. येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी सभागृहात २५ जून या दिवशी पार पडलेल्या अमृत, स्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत एकात्मिक नागरी विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, महापौर प्रशांत जगताप आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
     या वेळी पंतप्रधानांचे स्वागत महापौर जगताप यांच्या हस्ते पुणेरी पगडी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन करण्यात आले. पुणे स्मार्ट सिटीच्या १४ प्रकल्पांचे, केंद्र शासनाच्या स्मार्ट नेट या संकेतस्थळाचे आणि मेक युवर सिटी स्मार्ट या स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातील सुधारित नकाशे बालभारतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

बालभारतीचा अभ्यासशून्य कारभार !
      पुणे, २६ जून - इयत्ता ६ वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील नव्या अभ्यासक्रमातील मौर्यकालीन नकाशे पालटण्यात आले आहेत. बालभारतीकडून सुधारित नकाशे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. इयत्ता ६ वीच्या इतिहासाच्या पुस्तकात नकाशे चुकीचे असल्याचा आरोप मुंबई भुगोल शिक्षक संघटनेने एक मासापूर्वी केला होता. त्यानंतर हा पालट करण्यात आला आहे. (बालभारतीच्या चुका दाखवून ते पालटण्यासाठी प्रयत्न केलेल्या मुंबई भुगोल शिक्षक संघटनेचे अभिनंदन ! - संपादक)

अभिनेता (?) सलमान खानला राज्य महिला आयोगाची नोटीस

महिला आयोगाने सलमान खानवर कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !
महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण
     संभाजीनगर, २६ जून - अभिनेता (?) सलमान खान याने सुल्तान या चित्रपटातील भूमिकेच्या अनुषंगाने एका पत्रकार परिषदेत महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने त्याला नोटीस बजावली आहे. त्याच्या सुनावणीसाठी २९ जून या दिवशी आयोगाच्या मुंबई कार्यालयात उपस्थित रहाण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
     रहाटकर म्हणाल्या, सलमानचे ते वाक्य अत्यंत हीन असून त्याच्या या बोलण्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो. या विधानाची राज्य महिला आयोगाने गंभीर नोंद म्हणूनच त्याला नोटीस बजावली आहे.

भेंड (जिल्हा बीड) येथे पहिल्याच पावसात जलशिवार योजनेतील बंधारा फुटला

जलशिवार योजनेतही असेच होत राहिले, तर काँग्रेस शासन आणि आताचे शासन यांत काय भेद ?
     बीड, २६ जून - दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना वरदान ठरलेली राज्य शासनाची जलशिवार योजना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍यांच्या मुळावर उठली आहे. येथील गेवराई तालुक्यातील भेंड येथे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे जलशिवार योजनेतील बंधारा पहिल्याच पावसात फुटून २५० एकर शेतीची हानी झाली आहे. (असे निकृष्ट बंधारे बांधणार्‍या भ्रष्ट ठेकेदारांना काय शिक्षा करणार ? - संपादक) बंधारा सिद्ध करत असतांना खोदकाम केलेली माती ठेकेदाराने काढली नसल्याने ही घटना घडली आहे. (याची त्वरेने चौकशी करायला हवी ! - संपादक) जिल्हा प्रशासनाने बंधार्‍याच्या बाजूची माती तत्काळ काढण्याचे आदेश दिले होते; परंतु ठेकेदाराने माती काढलीच नाही. बंधार्‍यातील पाण्याचा विसर्ग एवढा प्रचंड होता की, काही क्षणातच संपूर्ण शेतातील माती आणि नव्याने पेरलेली बी-बियाणे वाहून गेली आहेत.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे वाळू तस्करांकडून महसूलच्या अधिकार्‍यांवर दगडफेक

कायद्याचा धाक न राहिलेले वाळू तस्कर !
    सोलापूर, २६ जून - येथील पंढरपूर तालुक्यातील उंबरे येथे भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका मंडल अधिकार्‍यासह ५ जणांच्या पथकावर वाळू तस्करांनी दगडफेक केली. या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा प्रविष्ट केला आहे. 
१. महसूल अधिकार्‍यांनी वाळू तस्करांकडे स्वामित्व हक्काच्या (रॉयल्टी) पावत्यांची विचारणा केली असता त्यांनी त्या पथकावर दगडफेक केली. 
२. पंढरपूरचे तहसीलदार नागेश पाटील यांनी या घटनेविषयी माहिती देतांना सांगितले की, उंबरे येथे कारवाई करण्यास जाण्याआधी पोलीस संरक्षण मागितले होते; परंतु ते मिळाले नाही. (पोलीस संरक्षण का मिळाले नाही, याची चौकशी व्हायला हवी ! - संपादक) भविष्यात वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठीची मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल. (अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना आवश्यक आहे ! - संपादक)

भूपाल माळी आत्महत्या प्रकरणात अधिवक्ता झाकीर झुसेन आणि अधिवक्ता नासिर जमादार यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

       मिरज, २६ जून (वार्ता.) - मिरज कृष्णाघाट रस्त्यावर घरभूमीच्या वादातून आत्महत्या केलेल्या भूपाल रामू उपाख्य रामचंद्र माळी यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी पोलिसांनी अधिवक्ता झाकीर हुसेन मोईद्दीन जमादार आणि त्यांचे भाऊ अधिवक्ता नासीर जमादार या दोघांच्या विरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे. या संदर्भात भूपाल माळी यांचे चिरंजीव विशाल माळी यांनी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दोघा जमादार बंधूंना अजून अटक झालेली नाही.

आर्द्रता नियंत्रित करण्याचे दायित्व देवस्थान समितीचे अधिक आहे ! - श्रीपूजक मंडळ

श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर पांढरे डाग पडल्याचे प्रकरण
      मूर्तीच्या संदर्भातील या अडचणी चालू रहाणार आणि त्यामुळे त्या संदर्भात होणारे धर्माचरणही अल्प होत जाणार. त्यामुळे धर्मशास्त्रानुसार मूर्ती पालटणे आणि सर्व धर्माचार चालू करणे हाच या सर्वांवरील मूलभूत उपाय आहे. - संपादक
     कोल्हापूर, २६ जून (वार्ता.) - श्री महालक्ष्मी मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर गाभार्‍यातील आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी नियुक्त केलेल्या अभ्यास समितीने सुचवलेल्या उपायांमध्ये श्रीपूजकांचे दायित्व अल्प आणि देवस्थान समितीचे अधिक आहे. असे असतांना समितीने कोणकोणत्या उपाययोजनांवर कार्यवाही केली आणि आर्द्रता नियंत्रणाचे दायित्व केवळ श्रीपूजकांचेच आहे का, असा प्रश्‍न श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी हक्कदार श्रीपूजक मंडळाने केला आहे.

गोव्याचे मंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांच्याकडून पोर्तुगीज दूतावास बंद करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार !

असा दूरदर्शीपणा अन्य नेते दाखवतील तो राज्यासाठी सुदिन ठरेल !
श्री. सुदिन ढवळीकर
     पणजी, २७ जून (वार्ता.) - ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय मतदानाद्वारे घेतला आहे. यामुळे पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारून पोर्तुगीजमार्गे ब्रिटनला गेलेले सहस्रो गोमंतकीय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पोर्तुगीज नागरिकत्व देण्याचे प्रकार बंद व्हावेत, यासाठी गोव्यातील पोर्तुगीज दूतावास कार्यालय बंद करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार मगो पक्षाचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी केला. 
     ब्रिटनमधील जे सहस्रो गोमंतकीय आता अडचणीत सापडले आहेत, त्यांना गोवा राज्याने साहाय्य करावे, अशी मागणीही श्री. ढवळीकर यांनी केली आहे. श्री. ढवळीकर म्हणाले, पोर्तुगीज दूतावास कार्यालयाची गोव्यात आवश्यकता नाही. त्यामुळे हे कार्यालय बंद केले जावे किंवा हे कार्यालय गोव्यातून अन्यत्र स्थलांतर केले जावे. सहस्रो गोमंतकीय भारतीय नागरिकत्व सोडून पोर्तुगालमार्गे युरोपात जातात आणि पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारतात हे चिंताजनक होते आणि आहे.

फलक प्रसिद्धीकरता

लोकहोे, अमेरिकेतील कॅथलिक चर्चचे खरे स्वरूप जाणा !
     अल्पवयीन मुलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारांच्या विरोधात आरोपींवर खटला चालवून हानीभरपाई मागण्यासाठी न्यूयॉर्क राज्याने नवीन कायदा करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला विरोध करण्यासाठी कॅथलिक चर्चने दबावगटांवर १ सहस्र ३०० कोटी रुपये खर्च केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Nabalikonpar ho rahe yon attyacharonpar New York me ban rahe kanun ka Catholic church ne kiya virodh !
     Catholic church ka vastvik rup !
जागो !
: नाबालिकोंपर हो रहे यौन अत्याचारोंपर न्यूयॉर्क में बन रहे कानून का कैथलिक चर्च ने किया विरोध !
     कैथलिक चर्च का वास्तविक रूप !

महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीवर प्रशासक नेमा - दीपकबाबा शिंदे

वालचंद महाविद्यालयाच्या वादाचे प्रकरण
      सांगली, २६ जून (वार्ता.) - आजही एम्.टी.ई.चे अध्यक्ष हे श्री. विजय पुसाळकर हेच आहेत. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी (एम्.टी.ई.)वर पृथ्वीराज देशमुख आणि श्रीराम कानिटकर यांनी बळजोरीने घुसखोरी केली आहे. त्यांच्या विरोधात धर्मादाय आयुक्त, तसेच पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या आहेत. शासनाने त्यांच्या अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी एम्.टी.ई.वर प्रशासक नेमावा, अशी मागणी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे सदस्य आणि वालचंद वाचवा कृती समितीचे निमंत्रक श्री. दीपकबाबा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी श्री. विजय पुसाळकर उपस्थित होते.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात समारोप !

  • अधिवेशनस्थळ जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्च्या जयघोषाने दुमदुमले ! 
  • भावपूर्ण वातावरणात हिंदुत्वनिष्ठांचा एकमेकांना निरोप
आगामी काळात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य व्यापक स्तरावर अन् 
गतीने करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प
     विद्याधिराज सभागृह, रामनाथ देवस्थान, रामनाथी (गोवा) - हिंदु राष्ट्र स्थापनेचे सोनेरी ध्येय उराशी बाळगून देशभरात, तसेच विदेशातही अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते निःस्वार्थीपणे धर्म अन् राष्ट्र रक्षणाचे कार्य करत आहेत. हिंदुत्वासाठी लढणार्‍या या शिलेदारांना एखाद्या माळेतील धाग्याप्रमाणे एकत्रित गुंफण्याचे कार्य अखिल भारतीय हिंदू अधिवेशन करत आहे. आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून धर्मकार्य करणारे हे हिंदुत्वनिष्ठच भविष्यातील हिंदु राष्ट्राचे शिल्पकार आहेत. हिंदुत्वनिष्ठांना धर्मकार्यासाठी आध्यात्मिक आणि मानसिक उर्जा पुरवणारे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन गत ४ वर्षांप्रमाणे याही वर्षी हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात यशस्वीरित्या पार पडले.

हिंदु राष्ट्र येण्यासाठी अर्जुनाप्रमाणे प्रयत्न करणे आवश्यक ! - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

सुदर्शन वाहिनीवर हिंदु राष्ट्र निर्मितीची शक्यता आणि त्यातील अडचणी या विषयावर चर्चा 
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातून जनसंवाद कार्यक्रमाचे प्रसारण
डावीकडून सूत्रसंचालक श्री. सुरेश चव्हाणके, श्री. रमेश शिंदे, श्री. अनिल धीर,
श्री. अर्जुन संपथ, आणि श्री. विष्णुशंकर जैन
      रामनाथी (गोवा) - जेव्हा धर्मावर संकटे येतात, तेव्हा त्याच्या पुनरुत्थानासाठी मी स्वतः अवतार घेतो, असे भगवान श्रीकृष्णानेे गीतेमध्ये सांगितले आहे. त्यानुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण येणारच आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची अर्जुन बनण्याची सिद्धता झाल्यास निश्‍चितपणे हिंदु राष्ट्र येईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या प्रथम दिवसाच्या अंतिम सत्रात सुदर्शन वाहिनीच्या वतीने आयोजित जनसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी हिंदु राष्ट्र निर्मितीची शक्यता आणि त्यातील अडचणी या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव खोरधा (ओडिशा) येथील श्री. अनिल धीर, तमिळनाडू येथील हिंदू मक्कल कच्छीचे (हिंदू जनता पक्षाचे) संस्थापक अध्यक्ष अर्जुन संपथ आणि गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील हिंदू फ्रंट फॉर जस्टिसचे (हिंदू न्याय मंचचे) प्रवक्ता श्री. विष्णुशंकर जैन सहभागी झाले होते. अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनीही या चर्चेमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले.

२ वर्षांच्या आत नेपाळला पुनश्‍च हिंदु राष्ट्र बनवू ! - डॉ. माधव भट्टराय

डॉ. माधव भट्टराय
      काठमांडू (नेपाळ) येथील सनातन हिंदु मोर्च्याचे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराय म्हणाले, युरोपीय लोकांच्या प्रभावाखाली येऊन नेपाळी हिंदूंची संस्कृती नष्ट करण्यासाठी नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. धर्मनिरपेक्ष नेपाळ असे घोषित करून हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍या नेपाळी हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी संविधानात आम्ही सनातन हिंदु धर्माचे रक्षण करू असे वाक्य घालण्यात आले आहे. हा विरोधाभास ही शुद्ध फसवणूक आहे; कारण जेव्हा नेपाळमध्ये संविधानाविषयी जनमत घेण्यात आले, त्या वेळी ८५ प्रतिशत हून अधिक नेपाळी जनतेने नेपाळ हिंदु राष्ट्रच असावे, असा कौल दिला; पण हा कौल डावलत नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. नेपाळच्या संसदेतील दोन तृतीयांश प्रतिनिधी साम्यवादी आहेत. या साम्यवादी संसदेच्या प्रभावाखाली हिंदु असुरक्षित आहेत. त्यामुळे नेपाळला हिंदु राष्ट्र बनवण्याचे आंदोलन आम्ही चालूच ठेवणार असून येत्या दोन वर्षांच्या आतच नेपाळला पुनश्‍च हिंदु राष्ट्र बनवू. हे हिंदु राष्ट्र केवळ शाब्दिकदृष्ट्या नको, तर हिंदु राष्ट्रामध्ये शासनप्रणालीच सनातन धर्मानुसार चालणारे शासन अपेक्षित आहे.

केवळ साधनेमुळे अधिवेशनाला उपस्थित राहू शकलो ! - अधिवक्ता बिभूती भूषण पलेई, जिल्हा सचिव, प्रज्ञान क्रियायोग मिशन, सुंदरगढ, ओडिशा

अधिवक्ता बिभूती भूषण पलेई
     नामस्मरण केल्यावर आपल्या व्यावहारिक अडचणी सुटतात आणि आपण करत असलेली कामे निर्विघ्नपणे पार पडतात. मध्यंतरी माझा अपघात झाला होता. या संकटातून देवानेच मला वाचवले. या अपघातामुळे मला विश्रांती घेण्यास सांगितली होती; मात्र देवाच्या कृपेनेच मी या हिंदू अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकलो.

क्षत्रिय लढवय्यांमुळेच भारतात हिंदू शिल्लक ! - महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर, सिरोही संस्थान, राजस्थान

महाराजाधिराज महाराव
रघुवीरसिंहजी बहादूर
     रामनाथी (गोवा) - पृथ्वीराज चौहान यांचे वंशज आणि राजस्थान येथील सिरोही संस्थानचे महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर म्हणाले, जगभरात ४६ इस्लामी राष्ट्रे आहेत. क्षत्रियांच्या योगदानामुळे भारतात आज हिंदू शिल्लक राहिले आहेत अन्यथा भारत केव्हाच इस्लामी राष्ट्र झाले असते. क्षत्रिय लढवय्ये कधीच माघार न घेता शेवटच्या क्षणापर्यंत लढत रहातात.
भारताच्या गौरवशाली इतिहासासंदर्भात 
त्यांनी सांगितलेली अन्य सूत्रे 
१. पृथ्वीराज चौहान यांनी १४ वर्षे राज्य केले. ते १४ लढायांपैकी एकही लढाई हरले नाहीत; कारण त्यांना देवीचा आशीर्वाद होता.

सनातन संस्थेला आतंकवादी ठरवू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांचा वैचारिक आतंकवाद !

एखाद्या सराईत रहस्यकथाकारालाही लाजवेल, अशा कपोलकल्पित 
कथा रचणार्‍या प्रसारमाध्यमांची पीतपत्रकारिता ! 
      पीतपत्रकारिता म्हणजे कोणतीही शहानिशा न करता सनसनाटी निर्माण करण्यासाठी, वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी प्रसारित केलेली खोटी आणि निराधार वृत्ते होय !
      १० जून या दिवशी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून त्यांच्याविषयी आणि सनातनविषयी धादांत खोटी माहिती देणारी अनेक वृत्तांची मालिकाच चालू झाली. यामुळे सनातन संस्था, संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांची मोठ्या प्रमाणात अपकीर्ती झाली. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची सत्य बाजू लोकांच्या समोर येण्यासाठी अशा वृत्तांचे खंडण करणारे हे सदर क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

मनात येणार्‍या प्रतिक्रिया आणि नकारात्मक विचार दूर होण्यासाठी पू. राजेंद्र शिंदे आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार उपाय केल्याने आलेल्या अनुभती !

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
         १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.
श्री. शिवाजी वटकर
        मागील ३ मासापासून पू. राजेंद्र शिंदे माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यात चांगले पालट जाणवत आहेत. प.पू. डॉक्टर आणि पू. राजेंद्र शिंदे यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनात येणार्‍या जटील प्रतिक्रिया कशा न्यून झाल्या ?, त्याविषयी लिहून देत आहे.
१. काही वर्षे प्रक्रिया राबवून
आणि सतत मार्गदर्शन मिळूनही
नकारात्मक विचारांवर मात करू न शकणे
         माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे माझ्या मनात पुष्कळ विचार आणि प्रतिक्रिया येत असत. त्यांवर नियंत्रण ठेवणे मला जमत नव्हते. मी काही वर्षे प्रक्रिया राबवून आणि मला सतत मार्गदर्शन मिळूनही नकारात्मक विचारांवर मात करायला मी असमर्थ होऊन हतबल झालो होतो. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मला पू. राजेंद्र शिंदे यांच्याकडे व्यष्टी साधनेचा आढावा देण्याचे भाग्य लाभले.

गुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक

गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे,
 अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच 
ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करत असतात.

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील प्रा. रामेश्‍वर मिश्र, मंगळुरू (कर्नाटक) येथील धर्माभिमानी श्री. दिनेश एम्.पी. आणि कल्याण (मुंबई) येथील धर्माभिमानी अधिवक्ता श्री. विवेक भावे जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील धर्माभिमानी शिलेदार साधनापथावर अग्रेसर
प्रा. रामेश्‍वर मिश्र (डावीकडे) यांचा सत्कार
करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
श्री. दिनेश एम्.पी.(उजवीकडे) यांचा सत्कार 
करतांना पू. नंदकुमार जाधव

अवीट आनंदाचा ठेवा असलेली प.पू. गुरुदेवांची यवतमाळ येथील भेट आणि अनुभवलेली त्यांची लीला !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ...
        वर्ष २००४ मध्ये प.पू. गुरुदेव यवतमाळला आले होते. ते येण्यापूर्वी माझ्याकडून आपोआप प्रार्थना होत होत्या, हे गुरुदेवा, आपण रामाच्या रूपात या. त्या वेळी प्रार्थनेत एवढी शक्ती असते, हे ठाऊक नव्हते. आजही त्या सर्व घटना जशाच्या तशा चित्रपटासारख्या डोळ्यांसमोर येतात आणि पुष्कळ आनंद देतात. रामनाथी आश्रमात कु. राजश्रीताई सखदेव यांच्याशी बोलता बोलता मागील आठवणी निघाल्या आणि त्यांना सर्व सांगितले. त्या वेळी गुरुदेवांनी पुन्हा तेवढाच आनंद दिला. त्यातील अवीट गोडी तसूभरही अल्प होत नाही.
१. प.पू. गुरुदेव आणि प.पू. कालीदास 
देशपांडेकाका यांची सापडलो एकामेका 
अशा स्वरूपाची अविस्मरणीय भेट ! 
श्रीमती वसुधा देशपांडे
         संध्याकाळी ७ च्या सुमारास प.पू. गुरुदेव घरासमोर (कै. प.पू. कालीदास देशपांडेकाका यांच्या यवतमाळ येथील घरासमोर) आले. मी त्यांच्या गाडीजवळ गेले. त्या वेळी प.पू. देशपांडेकाका घराच्या पहिल्या खोलीच्या दारापाशी होते. (तेव्हा ते कुणात विशेष मिसळत नव्हते.) प.पू. गुरुदेवांची दृष्टी क्षणमात्र दाराच्या कोपर्‍यात उभ्या असलेल्या प.पू. देशपांडेकाकांवर गेली आणि ते दोघे ५ मिनिटे एकमेकांकडे बघतच राहिले. मी गोंधळून गेले. मला काय करावे ? ते समजत नव्हते. अकस्मात् प.पू. डॉक्टरांचा तोंडवळा पालटला. त्यांची दृष्टी एकाग्रतेने अंतरात्म्यात खोलवर पहात होती.
        प.पू. गुरुदेव पुष्कळ आनंदी आणि प्रफुल्लित झाले. त्यांच्या मुखावरून आणि देहावरून आनंद थुई-थुई नाचत होता. ते तोंडाने म्हणत होते, आता कसे सापडले ! शोधता शोधता इथे सापडले. प.पू. देशपांडेकाका गालातल्या गालात हसत होते. हे सर्व दृश्य म्हणजे अवीट आनंदाचा झरा होता. प.पू. गुरुदेवांनी प्रथमदर्शनीच यांना संत म्हणून ओळखले होते !

गुरुदेव, विष्णुके तुम अवतार हो ।

पू. नंदकुमार जाधव
      प.पू. गुरुदेवांनी आपल्याला पुष्कळ अगदी भरभरून दिले आहे. मग आपणही त्यांना काही देऊया, असे मला वाटायचे; पण त्यांना आपण काय देणार ?, असा विचार माझ्या मनात यायचा.
      इतर अनेक साधक कविता लिहितात, तशी आपणही कविता करावी, असा विचार मनात यायचा; म्हणून माहिती असलेल्या एका प्रार्थनागीताच्या चालीवर मी एक ओळ गुणगुणत होतो; पण नाडीवाचन ऐकल्यावर एक दिवस काव्य सुचवावे; म्हणून प.पू. गुरुदेवांना तळमळीने प्रार्थना केली. तेव्हा त्यांचे गुणगान आणि महती गाणारी पुढील प्रार्थना त्यांनीच सुचवली.
तुम ही राम हो, तुम ही कृष्ण हो ।
श्रीजयंत में तुम ही समाए हो ।
गुरुदेव तुम ही, ईश्‍वर तुम हो ।
विष्णु के तुम अवतार हो ॥ धृ.॥
गुरुकृपायोग सिखाकर शीघ्र प्रगति का मार्ग दिखा दिया ।
मोक्षप्राप्ति और रामराज्य ध्येय व्यष्टि समष्टि का ।
शरणागति से प्रार्थना है, मोक्ष तक हमें ले चलो ॥ १ ॥

श्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांची आध्यात्मिक पातळी एका वर्षात ६१ टक्क्यांवरून ६४ टक्के झाल्याविषयी सत्कार !

श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् (डावीकडे)
यांचा सत्कार करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
      श्रीलंकेतील हिंदूंच्या रक्षणासाठी तळमळीने कार्य करणारे श्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केला असल्याचे गत चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये घोषित करण्यात आले होते. धर्मबंधुत्वाची भावना असणारे आणि हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी उतारवयातही कार्यरत असणारे श्री. सच्चिदानंदन् यांनी ६४ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याचे अधिवेशनात घोषित करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांचा सत्कार करण्यात आला.

हिंदू अधिवेशनाला साहाय्य करणार्‍या सनातनच्या हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार !

श्री रामनाथ देवस्थानचे सचिव श्री. गुरुप्रसाद कुंकळ्येकर 
(उजवीकडे) यांचा सत्कार करतांना राजस्थानचे 
महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर
गोवा डेअरीच्या वितरण व्यवस्थापक सौ. रेश्मा 
तळावलीकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना 
सनातनच्या संत पू. (कु.) अनुराधा वाडेकर
श्री नागेश-महारुद्र देवस्थानचे सचिव श्री. सतीश नमशीकर (उजवीकडे)
यांचा सत्कार करतांना राजस्थानचे महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर
अधिवेशनासाठी सभागृह, तसेच हिंदुत्वनिष्ठांच्या निवासासाठी खोल्या उपलब्ध करून देणार्‍या मान्यवरांचा या वेळी सिरोही संस्थान, राजस्थानचे महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
१. श्री रामनाथ देवस्थान समितीचे सचिव श्री. गुरुप्रसाद कुंकळ्येकर यांनी अधिवेशनासाठी सभागृह, तसेच निवासी खोल्या उपलब्ध करून दिल्या. हे अधिवेशन त्यांनी सभागृह उपलब्ध करून दिल्यामुळेच होऊ शकले, अशी कृतज्ञता श्री. कुंकळ्येकर यांच्याप्रती व्यक्त करण्यात आली.
पुढील वर्षीचे अधिवेशन अधिक चांगले होण्यासाठी प्रयत्न करू ! - श्री. कुंकळ्येकर 
   श्री. कुंकळ्येकर यांनी उत्स्फूर्तपणे मीही एक हिंदूच असून मला या माध्यमातून धर्मकार्याची एक संधी मिळाली. यात मी काही केले नाही. पुढील वर्षीचे अधिवेशन अजून चांगले होण्यासाठी सुधारणा सांगाव्यात. त्यानुसार आम्ही पालट करू, असे नम्र आवाहन केले.

रामनाथी आश्रमाची वारी । साधकांचे जीवन उद्धारी ॥

कु. कविता कुलकर्णी
       अक्षय्य तृतीयेला रामनाथी आश्रमात कलशारोहण समारंभ झाला. त्या वेळी मला पुढील काव्यपंक्ती सुचल्या.
रामनाथीची साधनेची वारी ।
वर्षातून करावी एकदा तरी ॥ १ ॥
साधकांचे हे पंढरपूर ।
भक्तगणांचे असे माहेर ॥ २ ॥
होई दुरून कळसाचे दर्शन ।
पतित जीव होई पावन ॥ ३ ॥
मुखाने करावे हरि उच्चारण ।
सुटेल मग जन्म आणि मरण ॥ ४ ॥
येथे साधक करतात वारी साधनेची ।
दोष आणि अहं घालवून वाट चालती प्रगतीची ॥ ५ ॥

देवाची आणि धर्माचरणाची आवड अन् प.पू. डॉक्टरांविषयी भाव असणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेली पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथील चि. गायत्री विनय गर्गे (वय अडीच वर्षे) !

चि. गायत्री गर्गे
        चि. गायत्री हिची २०१५ मध्ये आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. आता ५३ टक्के आहे.
जन्म ते १ वर्ष
आध्यात्मिक स्तरावर 
केलेला वाढदिवस सर्वांना आवडणे
१. आम्ही चि. गायत्रीचा पहिला वाढदिवस सभागृहात साजरा केला. त्या दिवशी यजमान आणि मी सातत्याने सभागृहाची सूक्ष्मातून शुद्धी करत होतो. सभागृहात क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन लावले होते, तसेच सनातनची सात्त्विक उत्पादनेही ठेेवली होती. प्रत्यक्षातही मी जेव्हा सभागृहात पोहोचले, तेव्हा तेथे अतिशय प्रसन्न वाटून देवतांचे अस्तित्व जाणवत होते. येणार्‍या प्रत्येकाला तेथेच थांबावे, जाऊच नये, असे वाटत होते.
२. चि. गायत्रीचे ७ सुवासिनींनी औक्षण करून नंतर श्रीरामरक्षेतील संरक्षककवचाचे १० श्‍लोक म्हणून तिच्या शरिराच्या संबंधित अवयवांवर अक्षता वाहिल्या. हे सर्व आलेल्या पाहुण्यांना पुष्कळ आवडले.
१ ते २ वर्षे
१. देवाची आवड असणे
१ अ. खोलीतील बाळकृष्णाच्या चित्राकडे प्रसाद मागणे : गायत्री सवा वर्षांची असल्यापासून खोलीत लावलेल्या लोणी खाणार्‍या बाळकृष्णाच्या चित्राकडे पाहून हात पुढे करते आणि त्याच्याकडे प्रसाद म्हणून लोणी मागते. तिला बोलता यायला लागल्यापासून ती दे दे, असे म्हणते.

व्यष्टी साधनेसंदर्भात प्रयत्न होत नाहीत; म्हणून निराशा आल्यावर श्रीकृष्णाला केलेली प्रार्थना !

         १३.११.२०१४ या दिवशी सकाळी व्यष्टी साधनेसंदर्भात काहीच प्रयत्न होत नाहीत; म्हणून थोडी निराशा येऊ लागली होती. मनाच्या नकारात्मक स्थितीची जाणीव होताच श्रीकृष्णाने पू. बिंदाताईंनी वर्तमानात रहायला सांगितले आहे, याची आठवण करून दिली. वर्तमानात रहाण्यासाठी काय काय करता येईल ? याचे चिंतन चालू असतांना श्रीकृष्णाने खालील ओळी सुचवल्या.
हे श्रीकृष्ण, कृष्ण नाम में पागल बना दे मुझे ।
मन के बहकावों से, तन के विचारों से बचाना मुझे ।
चूकों के पापों से दोष-अहं के आवरण से छुडाना मुझे ॥ १ ॥
बाबा के (टीप) भजनों में दंग करा दे मुझे, सेवा के रंग में रंग दे मुझे ।
लेन-देन की इस दुनिया में, व्यष्टि साधना का गांभीर्य आने दे मुझमेंे ॥ २ ॥
जहां जहां मेरा मन लेकर जाएगा, गुरुकृपा की याद दिलाना मुझे,
माया की इस दुनिया में श्री गुरु के चरणों में झुकाना मुझे ॥ ३ ॥
         हे श्रीकृष्णा, तू सुचवलेल्या ओळी तुझ्याच चरणी अर्पण करतो.
टीप : प.पू. भक्तराज महाराज
- श्री. वैभव आफळे, देवद, पनवेल. (१३.११.२०१४) 

सनातनच्या शुद्धीयज्ञांचे (स्वभावदोष निर्मूलन सत्संगांचे) महाभारतकालीन युद्धाशी कसे साधर्म्य आहे, याविषयी सुचलेली सूत्रे

श्री. वैभव आफळे
       १५.११.२०१४ या दिवशी दुपारपासून शारीरिक त्रासाचे प्रमाण वाढले. १६.११.२०१४ या दिवशी सकाळी पायातील वेदनांमुळे प.पू. पांडे महाराज यांच्या उपायांना बसणेही अशक्य झाले. त्या वेळी प.पू. डॉक्टरांना आणि श्रीकृष्णाला कळकळीची प्रार्थना झाली अन् त्यांनी सूक्ष्मातून एक दृश्य दाखवले. मला आकलन झालेला त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.
१. युद्धातील प्रतिस्पर्धी
       सध्या सनातनचे संत आणि साधक यांना जे तीव्र आध्यात्मिक त्रास होत आहेत, तेसुद्धा महाभारतकालीन युद्धाप्रमाणेच सूक्ष्मातून युद्ध चालू असल्याने होत आहेत. त्या युद्धात पांडव कौरवांशी लढत होते. आताच्या शुद्धी यज्ञात (सत्संगात) साधक त्यांचे जन्मोजन्मीचे प्रबळ दोष आणि अहं यांच्याशी लढत आहेत.
२. लढण्याचे मार्गदर्शन कोण करते ?
       युद्धात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी होते. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच अर्जुनास मार्गदर्शनही करत होते. आताचे शुद्धी यज्ञ (सत्संग) ही युद्धभूमी असून सर्व साधक अर्जुनाच्या रूपात आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या तत्त्वरूपातून संत मार्गदर्शन करत आहेत. कौरवांसह त्यांचे बलाढ्य सैन्य होते, तर सत्संगात स्वभावदोष आणि अहं यांच्याशी कसे लढावे, हे संत साधकांना शिकवत आहेत.

चला चला साधकांनो, शुद्धीकरण यज्ञाला जाऊया ।

        सनातनचे संत आणि प्रसारसेवक जिल्ह्याजिल्ह्यांतूून शुद्धीकरण सत्संग घेत आहेत. गोरेगाव, मुंबई येथील साधक आणि माझे चुलतबंधू श्री. विवेक आफळे या सत्संगाविषयीची माहिती सांगतांना त्यांच्यातील कृतज्ञताभाव जागृत झाल्याचे जाणवले. दुसर्‍या दिवशी शुद्धीयज्ञाच्या (शुद्धीकरण सत्संगाच्या) होणार्‍या लाभाविषयी श्रीकृष्णकृपेने मला सुचलेल्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत.
चला चला हो शुद्धीयज्ञाला जाऊया ।
अहं-दोषरूपी गाठोडे संगे घेऊन जाऊया ॥ १ ॥
यज्ञाचे पौरोहित्य करत आहेत हो आपुले संत ।
साधकांना शुद्ध करून सवे नेण्या हिंदु राष्ट्र येईपर्यंत ॥ २ ॥
हिंदु राष्ट्र आणायचे तुम्हा-आम्हा सर्वांमध्येे आधी ।
प.पू. डॉक्टरांचा झाला संकल्प,
साधकांच्या दूर व्हाव्यात भव-तापादी व्याधी ॥ ३ ॥

मिरज येथील सनातनच्या आश्रमात क्षणोक्षणी गुरुकृपेची आणि गुरूंच्या अस्तित्वाची येणारी अनुभूती

       मिरज आश्रमात वयस्कर साधकांची संख्या अधिक आहे आणि स्वच्छता, वाहनसेवा यांसाठी साधक अल्प आहेत. आश्रम मोठा असल्याने आणि सेवा अधिक असल्याने साधकसंख्या पुरेशी नसते, तरीही प्रत्येक प्रसंगात अडचण समोर आली की, भगवंत लगेचच त्यातून मार्ग काढतो. त्यातील काही प्रसंग देत आहे.
१. वाहनचालक सेवेसाठी साधक 
उपलब्ध नसतांना इतर ठिकाणाहून 
मिरज आश्रमात काही दिवसांसाठी साधक येणे 
कु. वैदेही पिंगळे
       आश्रमात बर्‍याचदा वाहनचालकाची अडचण येते. अशी अडचण आली की, त्या वेळी लगेचच त्या सेवेसाठी साधक उपलब्ध होतो. एकदा आश्रमात वाहनसेवा करणारे दादा घरी गेले होते. आश्रमात चारचाकी वाहन चालवण्यासाठी कोणी चालक साधक उपलब्ध नव्हता. आता काय करायचे असा प्रश्‍न पडला; देव काहीतरी सोय करणार हे ठाऊक होते. त्यामुळे मी निश्‍चिंत होते. दुसर्‍या दिवशी रामनाथी आश्रमातून पू. (सौ.) गाडगीळकाकूंसमवेत श्री. परशुराम पाटीलदादा आले. त्यांची सेवा झाल्यावर त्यांना वेळ असायचा. त्यामुळे पुढील १५ दिवस चालक साधकाची अडचण आली नाही. यानंतरही एकदा वाहनसेवा करणारे दादा घरी गेल्याने आश्रमात चालक साधकाची अडचण येत होती. त्या मासातील धान्य खरेदीही राहिली होती. त्या वेळी श्री. घनश्याम गावडे रुग्णालयात उपचारांसाठी आले होते. तेव्हा दादांनी चालक म्हणून साहाय्य केले आणि त्या वेळी धान्य खरेदीही देवाच्या कृपेने कोणतीही अडचण न येता पूर्ण झाली. प्रत्येक वेळी अशी अडचण आली की, देव कोणत्या तरी साधकाच्या माध्यमातून येतो आणि ती सेवा पूर्ण होते. अशा कितीतरी अनुभूती आल्या आहेत.

कु. सायली गाडगीळ (आताच्या सौ. सायली करंदीकर) हिच्या विवाहानिमित्त धार्मिक विधी चालू असतांना पू. मुकुल गाडगीळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याभोवती तेज जाणवणे

      २४.४.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात कु. सायली (पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू आणि पू. गाडगीळकाका यांची मुलगी) हिच्या विवाहानिमित्त धार्मिक विधी चालू होते. त्या वेळी पू. काका-काकूंच्या भोवती मला पुष्कळ तेज दिसले. भावविभोर अवस्थेत आपोआपच मी आसंदीवर कधी बसलो, ते मला समजलेच नाही. पू. काकूंच्या ठिकाणी मला जगन्माता दिसली. माते असा भावोद्गार माझ्या मनी उमटून गेल्याचे जाणवले. नंतर पू. गाडगीळकाकूंची भेट झाल्यावर मी माझी अनुभूती त्यांना कथन केली. त्या वेळी मलाही तेज जाणवले, असे त्या म्हणाल्या.
- श्री. दीपक रा. छत्रे, रायंगिणी, बांदोडा, गोवा. (२५.४.२०१६)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

हरि ॐ तत्सत

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही. 
ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ ः सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
आता एकेका रुग्णासाठीचे नव्हे, तर मरणोन्मुख स्थितीतील राष्ट्र आणि धर्म यांसाठी हजारो डॉक्टर (आधुनिक वैद्य) हवेत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ? 
कालक्रमणा करतांना मनुष्याकडून चुका घडतातच; पण प्रत्येक चुकीपासून 
आपण काहीतरी शिकलो, तरच पुढील आयुष्य यशस्वी होते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पत्रकारितेचा धंदा !

संपादकीय 
     सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्यानंतर पुढील १ आठवडा प्रसारमाध्यमांनी ज्या प्रकारची धादांत असत्य वृत्ते दिली आणि सनातन संस्था अन् तिचे साधक यांची जी अपकीर्ती केली, ती पहाता त्याला दुर्दैवाने पत्रकारितेचा धंदा असा शब्द वापरावा लागतो. आज भारतातील अपवाद वगळता सर्वच प्रसारमाध्यमे आणि त्यांचे पत्रकार हे तथाकथित निधर्मी, पुरोगामी, साम्यवादी विचारसरणींचा पुरस्कार करतात, हे आपण पहातो; मात्र हे करतांना एक पत्रकार म्हणून त्यांनी त्यांच्या व्यवसायाशी किमान नैतिक बांधिलकी राखणे तरी अपेक्षित आहे. हे सर्व परत एकदा सांगण्याची वेळ आली आहे, याचे कारण म्हणजे राणा अयुब नावाच्या अशाच स्वतःला मानवतावादी म्हणवणार्‍या महिला पत्रकाराने गुजरात फाईल्स नावाचे पुस्तक लिहून गुजरात दंगलीप्रकरणी स्वतःजवळ काही विशेष पुरावे असल्याचा आव आणत ढोंगीपणा आणि हिंदुद्वेष चालूच ठेवला असल्याचे समोर येत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn