Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


विनम्र अभिवादन !

श्रीमंत नानासाहेब पेशवे स्मृतीदिन

कोटी कोटी प्रणाम !

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी (तिथीनुसार)

नेपाळला पुन:श्‍च हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घ्यावा !

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची यशस्वी सांगता 
डावीकडून श्री. रमेश शिंदे, श्री. टी. राजासिंह, श्री. माधव भट्टराई,
प्रा. रामेश्‍वर मिश्र, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
      पणजी, २५ जून (वार्ता.) - भारतात निधर्मीपणाच्या नावाखाली चालू असलेले अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवरील अन्याय पहाता मोदी सरकारने नेपाळमधील निधर्मी राज्यघटना रहित करण्यास लावावी आणि नेपाळला पुनःश्‍च हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाद्वारे करण्यात आली. नेपाळमधील विद्यमान सरकारचे भारताशी असलेले बंधुत्वाचे नाते संपुष्टात येत असून, चीन याचा लाभ उठवू पहात आहे. नेपाळमधील चीनचा वाढता प्रभाव भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हितावह नाही, त्यामुळे त्यात वेळीच हस्तक्षेप करून नेपाळला हिंदु राष्ट्र बनवावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी २५ जून या दिवशी केले. १९ ते २५ जून या कालावधीत रामनाथी, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानाच्या सभागृहात पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पार पडले. या अधिवेशनच्या समारोपीय पत्रकार परिषदेत श्री. शिंदे बोलत होते. या वेळी तेलंगण येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह; राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे अध्यक्ष श्री. माधव भट्टराई; वाराणसी येथील हिंदु विद्या केंद्राचे संचालक प्रा. रामेश्‍वर मिश्र आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.

धर्मांधांकडून जळगाव येथे दंगल !

  • अल्पसंख्यांकांकडून बहुसंख्यांकांना मार खावा लागणारा जगातील एकमेव देश भारत ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) अपरिहार्यता स्पष्ट करते ! 
  • हिंदूंनो, स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वत:सह आपल्या धर्मबांधवांचेही रक्षण करा !
महंमद पैगंबर यांच्याविषयी व्हॉटस् अ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप
  • धर्मांधांनी हिंदु देवतांच्या प्रतिमा फेकून पायदळी तुडवल्या !
  • अनेकांना मारहाण, एका हिंदूचा डोळा निकामी ! 
  • दगडफेक करून व्यापार्‍यांच्या दुकानांची नासधूस !
       जळगाव - महंमद पैगंबर यांच्याविषयी व्हॉटस् अ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत २४ जून या दिवशी धर्मांधांनी येथील गोलाणी मार्केटवर अल्ला हो अकबरच्या घोषणा देत दगडफेक करून दुकानांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली, तर अनेक व्यापार्‍यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यांनी तोंडावर रूमाल बांधले होते. जमावाने केलेल्या मारहाणीत धरणगाव येथील उज्ज्वल शुक्ल यांचा डोळा निकामी झाला. त्यानंतर संतप्त व्यापार्‍यांनी शहर पोलीस ठाणे गाठून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. सुमारे तासभर हा गोंधळ चालू होता.

सनातन संस्थेला आतंकवादी ठरवू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांचा वैचारिक आतंकवाद !

एखाद्या सराईत रहस्यकथाकारालाही लाजवेल, अशा कपोलकल्पित 
कथा रचणार्‍या प्रसारमाध्यमांची पीतपत्रकारिता ! 
      पीतपत्रकारिता म्हणजे कोणतीही शहानिशा न करता सनसनाटी निर्माण करण्यासाठी, वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी प्रसारित केलेली खोटी आणि निराधार वृत्ते होय !
      १० जून या दिवशी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून त्यांच्याविषयी आणि सनातनविषयी धादांत खोटी माहिती देणारी अनेक वृत्तांची मालिकाच चालू झाली. यामुळे सनातन संस्था, संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांची मोठ्या प्रमाणात अपकीर्ती झाली. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची सत्य बाजू लोकांच्या समोर येण्यासाठी अशा वृत्तांचे खंडण करणारे हे सदर क्रमशः चालू करत आहोत.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संकेतस्थळांवर सायबर आक्रमण !

सनातनद्वेष्ट्यांनी कितीही विरोध केला, तरी सनातनच्या राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या 
कार्याला ईश्‍वर आणि संत यांचे आशीर्वाद असल्याने ते कदापि बंद पडणार नाही !
ईश्‍वराच्या कृपेने काही वेळातच दोन्ही संकेतस्थळे पूर्ववत दिसू लागली !
     मुंबई - २४ जून या दिवशी सनातन संस्थेचे संकेतस्थळ Sanatan.org आणि हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org या दोन्ही संकेस्थळांवर सायबर हल्लेखोरांकडून (हॅकर्सकडून) आक्रमण करण्यात आले. या आक्रमणाद्वारे दोन्ही संकेतस्थळे बंद पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हे आक्रमण होऊनही केवळ ईश्‍वराच्या कृपेने त्याचा फारसा परिणाम न होता काही वेळातच दोन्ही संकेतस्थळे पूर्ववत् दिसू लागली.

अटक या शब्दाचा चुकून उल्लेख झाला ! - जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी

खोटे वृत्त प्रसारित करणार्‍या वृत्तवाहिनीच्या विरोधात कायदेशीर 
मार्गाने लढा देणार्‍या साधिकेचे अभिनंदन !
सनातनच्या साधिका सौ. श्रद्धा पवार यांना अटक केल्याचे खोटे वृत्त प्रसारित 
करून तिची अपकीर्ती करणार्‍या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा जाहीर खुलासा
      मुंबई - पानसरे हत्याप्रकरणी सनातनची साधिका श्रद्धा पवार अटकेत, असे एकांगी, खोटे आणि खोडसाळ वृत्त सातत्याने प्रसारित करून वैयक्तिक अपकीर्ती केल्याविषयी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वृत्तवाहिनीचे संपादक आणि वृत्तवाहिनीचे संचालक यांच्या विरोधात सनातनच्या साधिका सौ. श्रद्धा पवार यांनी अधिवक्त्या सौ. अस्मिता सोवनी यांच्यामार्फत राजापूर येथील दिवाणी न्यायालयात ५ लक्ष रुपयांच्या हानीभरपाईचा दावा दाखल केला होता. या दाव्यानंतर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने २४ जून २०१६ या दिवशी बातमीपत्रात जाहीर खुलासा करतांना सांगितले की, अटक या शब्दाचा चुकून उल्लेख केला. यामागे कुणाची प्रतिमा मलिन करण्याचा जय महाराष्ट्र वाहिनीचा हेतू नव्हता.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

१९ ते २५ जून २०१६ या कालावधीत रामनाथी, फोंडा, गोवा येथे चालू असलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात भारतातील २२ राज्यांसह नेपाळ आणि श्रीलंका येथील १६१ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. मान्यवरांनी आश्रमातील व्यवस्थापन, नियोजन आणि उत्साही तसेच चैतन्यमय वातावरण यांचा त्यांना लाभ झाल्याचे सांगितले.
डावीकडून श्री. उमाकांत सुबेदी, सक्रीय सदस्य, राष्ट्रीय हिंदु युवा मंच, नेपाळ; श्री. सुयश राज खांड, सक्रीय सदस्य, राष्ट्रीय हिंदु युवा मंच, नेपाळ; श्री. रॉबसन श्रेष्ठ, सदस्य, जागृत नेपाळ, नेपाळ; श्री. राजेंद्र श्रेष्ठ, समन्वयक, सूचना-तकनीकी समिती, जागृत नेपाळ, नेपाळ; श्री. कबीन्द्र श्रेष्ठ, मुख्य सदस्य, राष्ट्रीय हिंदु युवा मंच, नेपाळ; श्री. सागर कटवाल, संयोजक, राष्ट्रीय हिंदु युवा आंदोलन, नेपाळ यांना माहिती सांगतांना सनातनचे श्री. अमोल हंबर्डे.

सनातन संस्था आणि गोव्यातील सनातन आश्रम यांविषयी खोटी अन् बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी पुणे मिरर या इंग्रजी दैनिकाला कायदेशीर नोटीस !

      रामनाथी, फोंडा, २५ जून (वार्ता.) - पुणे मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने त्यांच्या २१ जून २०१६ या दिवशीच्या अंकात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि विशेष अन्वेषण यंत्रणा (एस्आयटी), कोल्हापूर यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाची झडती घेतल्याची खोटी बातमी प्रसिद्ध केली होती. या खोट्या आणि बदनामीकारक बातमीच्या विरोधात सनातन संस्थेचे व्यस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी त्यांचे अधिवक्ता श्री. गजानन नाईक यांच्यामार्फत १० कोटी रुपये हानीभरपाई देण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावली. या नोटीशीत म्हटले आहे की,
१. सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या कार्याच्या विरोधात पुणे मिरर या दैनिकाने बदनामीकारक बातम्या छापण्याचा सपाटा लावला होता. 
२. या दैनिकाने बातमीची कोणतीही खात्री न करता केवळ हिंदुत्ववादी संघटना आणि धार्मिक संस्था यांना अपकीर्त करण्याच्या उद्देशाने बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.

सनातनच्या विरोधात सीबीआय आणि प्रसिद्धीमाध्यमांतील काही लोक नियोजनबद्धरितीने षड्यंत्र रचत आहेत ! - श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था

वाहिनीवर बोलतांना श्री. चेतन राजहंस
प्रूडंट वृत्त वाहिनीवरील मुलाखतीत सनातन संस्थेचे प्रवक्ता चेतन राजहंस यांनी घेतला विरोधकांचा समाचार !

पणजी, २५ जून (वार्ता.) - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) अधिकृतपणे माहिती दिली नसतांना कपोलकल्पित कहाण्या प्रसिद्ध करून सनातन संस्थेची काही सुपारीबाज पत्रकारांकडून अपकीर्ती केली जात आहे. सनातनच्या विरोधात सीबीआय आणि प्रसिद्धीमाध्यमांतील काही लोक नियोजनबद्धरितीने षड्यंत्र रचत आहेत, असे परखड सत्य सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी प्रूडंट वाहिनीचे संपादक प्रमोद आचार्य यांनी घेतलेल्या मुलाखतीत मांडले. सनातनवर धादांत खोटे आरोप होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रूडंट वाहिनीवरील 'हेड ऑन' या कार्यक्रमात श्री. राजहंस यांची ही मुलाखत घेण्यात आली होती. मुलाखतीत आचार्य यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना श्री. राजहंस यांनी दिलेली समर्पक उत्तरे पुढील प्रमाणे आहेत.

मडगाव स्फोट प्रकरणी सनातनला गोवणे हे तत्कालीन काँग्रेस शासनाचे राजकीय षड्यंत्र !
प्रश्‍न : सनातन संस्थेवर पूर्वी आरोप झाले आहेत. मडगाव स्फोट, तसेच कॉ. गोविंद पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्या हत्या या शृंखलेचा संबंध सनातनशी जोडला जात आहे. याविषयी तुम्हाला काय वाटते ?
उत्तर : मडगाव स्फोटाच्या प्रकरणी सनातनला राजकीय षड्यंत्राखाली गोवण्यात आले होते. सनातन संस्थेला गोवण्याच्या हेतूनेच प्रथमदर्शनी अहवाल बनवण्यात आला होता, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. त्या वेळी राज्याचे गृहमंत्री कोण होते, कुठल्या पक्षाचे होते, हेही सर्वश्रृत आहे. प्रत्यक्षात खटल्यास जिल्हाधिकार्‍यांची अनुमती आवश्यकता असतांना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम् यांच्या आदेशावरून सनातनविरोधात कारवाईचा आदेश देण्यात आला होता. केंद्रीय गृहखाते भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी सनातनचा बळी देण्याचा प्रयत्न करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ठोका आणि सत्तेत या ही काँग्रेसची मनोवृत्ती होती. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोठा झाला आहे. त्यामुळे सनातन संस्थेला लक्ष्य केले जात आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Jalgoan me whatsup par kathith appattijanak post ke karan kattarpanthiyone 
hinduonpar akramn kar devtaonka anadar kiya !
Kya ye pakisthan hai ? 
जागो ! : 
महाराष्ट्र के जलगाव में व्हॉटस् अ‍ॅपवर कथित आपत्तीजनक पोस्ट के कारण कट्टरपंथियोंने 
हिंदूओंपर आक्रमण कर देवताआें का अनादर किया !
क्या यह पाकिस्तान है ?

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, धर्मांधांच्या आक्रमणापासून रक्षण होण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! 
      व्हॉटस् अ‍ॅपवर कथित आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून २४ जूनला धर्मांधांनी जळगावच्या गोलाणी मार्केटवर आक्रमण केले. यात काही हिंदु घायाळ झाले. धर्मांधांनी देवतांच्या चित्रांच्या प्रतिमा ओढून त्या पायदळी तुडवल्या. -

देवाची दृष्टी सी.सी.टी.व्ही कॅमेर्‍यांप्रमाणे चोवीस घंटे आपल्यावर आहे, असे संस्कार मनावर सातत्याने बिंबवल्यास वाईट कृती करण्याचा विचार मनातच न आल्याने सी.सी.टी.व्ही. कॅमेरे वापरण्याची आवश्यकताच भासणार नसणे

    कार्यालयांत नोकरांवर लक्ष ठेवण्यासाठी, किराणा मालाचे दुकान ते सराफी दुकान यांतील चोरी टाळण्यासाठी आणि पोलीस गुन्हेगार शोधण्यासाठी सी.सी.टी.व्ही कॅमेर्‍यांचा वापर करतात. सी.सी.टी.व्हीचा वापर पुष्कळ वाढत असला, तरीही अपराधांचे प्रमाण वाढतच आहे. यावर उपाय म्हणजे देव अस्तित्वात आहे. त्याची दृष्टी (सी.सी.टी.व्ही. कॅमेरा) आपल्यावर चोवीस घंटे आहे. पापकर्म केल्यास त्याचे फळ भोगावे लागते, असे संस्कार मनावर सातत्याने बिंबवल्यास वाईट कृती करण्याचा विचार मनातच येणार नाही. परिणामी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे वापरण्याची आवश्यकताच भासणार नाही. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, गोवा. (९.२.२०१६)

पावसाळ्यामध्ये निरोगी रहाण्यासाठी काय करावे ?

वैद्य मेघराज पराडकर
१. पावसाळ्यात रोगनिर्मितीस कारणीभूत घटक
    पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतो, शरिराची शक्ती न्यून झालेली असते. कडक उन्हानंतर वातावरणात अचानक पालट होऊन पावसामुळे गारठा निर्माण होतो. हवेतील आर्द्रताही वाढते. त्यामुळे शरिरातील वातदोष वाढतो. वातावरणात, विशेषतः वनस्पती, धान्ये, पाणी इत्यादी सर्वच ठिकाणी आम्लता वाढत असल्याने पित्त साचण्याकडे शरिराचा कल असतो. या दिवसांत पचनशक्तीही घटते. भूक मंदावल्यामुळे अपचनाचे विकार होतात. पावसाच्या पाण्यासह धूळ, कचरा वाहून आल्याने पाणी दूषित होते आणि तेही रोगनिर्मितीस कारण ठरते. या सर्व घडामोडींमुळे वाताचे विकार, उदा. संधीवात, आमवात यांसह जुलाब, अजीर्ण इत्यादी अपचनजन्य विकार बळावतात.
२. पावसाळ्यातील विकारांना असा अटकाव करा !
    पावसाळ्यातील प्रमुख लक्षण म्हणजे भूक मंदावणे. भूक मंदावलेली असतांनाही पूर्वीसारखाच आहार घेतला, तर ते अनेक रोगांना आमंत्रणच ठरते; कारण मंदावलेली भूक किंवा पचनशक्ती हे बहुतेक विकारांचे मूळ कारण आहे. पोट जड वाटणे, करपट ढेकर येणे, गॅसेस (पोटात वायू) होणे, ही भूक मंदावल्याची लक्षणे आहेत. अशा वेळी हलके अन्न, उदा. पेज, कढणे, भाजून केलेले पदार्थ घ्यावेत. अल्प प्रमाणात खावे. पोट जड असतांनाही आहार चालू ठेवल्यास अजीर्ण, जुलाब, आव पडणे हे विकार चालू होतात.

प्रसारमाध्यमांना बाईट देण्याची पद्धत !

श्री. अभय वर्तक
आजकाल वृत्तवाहिन्यांवर २४ घंटे दाखवली जाणारी वृत्ते समाजाची मानसिकता आणि विचारांची दिशा यांवर परिणाम करत असतात. त्यामुळे हिंदु राष्ट्राचा, म्हणजे सनातन धर्म राज्याचा विचार आपल्याला जनतेत पोेचवायचा असेल, तर हिंदुत्वनिष्ठांनीही या माध्यमाचा गांभीर्याने विचार करायला हवा. वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रे, मुलाखती यांसारख्या मोठ्या कार्यक्रमांत जसे सहभागी व्हावे लागते, तसेच एखाद्या मोठ्या घटनेच्या संदर्भात किंवा विरोधकांच्या आंदोलनांविषयी आपल्या संघटनेची १ - २ मिनिटांची भूमिकाही त्वरित विचारली जाते. अशा प्रकारे संक्षिप्तपणे व्यक्त करावयाच्या भूमिकेला वृत्तवाहिन्यांच्या प्रचलित भाषेत बाईट असे म्हटले जाते. हीच प्रतिक्रिया दूरभाषद्वारे द्यावयाची असेल, तर त्याला फोनो म्हणतात. थोडक्यात फोनो हा बाईटचाच प्रकार आहे. आपली ही बाईट वृत्तवाहिनीवरून मुख्य बातमीसह सतत दाखवली जात असल्याने ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोेचते. अशा प्रकारे वृत्तवाहिन्यांना बाइट देण्यातूनही आपण प्रभावी जागृती करू शकतो. सनातन संस्थेने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवक्त्यांची एक फळी उभारण्यासाठी हिंदु जनजागृती समितीसोबत गेल्या सहा मासांपासून प्रयत्न आरंभले आहेत. मला सांगण्यास आनंद होत आहे की, आज आमच्याकडे हिंदु धर्माची बाजू प्रखरपणे मांडणारे ४० प्रवक्ते सिद्ध असून ते विविध वाहिन्यांवर नियमितपणे धर्माची भूमिका मांडत आहेत. बाइट देणे हा प्रवक्ता होण्यातील पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असल्याने हा विषय आता आपण येथे समजून घेणार आहोत.
१. बाईट देतांना लक्षात
घ्यावयाच्या सर्वसाधारण गोष्टी
१ अ. पार्श्‍वभूमी : ज्या ठिकाणी आपण बाईट देणार आहोत, तेथील पार्श्‍वभूमी कशी आहे, हे पहावे, उदाहरणार्थ आपल्या आंदोलनाच्या ठिकाणी बाईट देत असल्यास आपल्या मागे असलेले आंदोलनकर्ते शिस्तबद्ध पद्धतीने उभे असल्याचे दिसतील, असे पहावे. आंदोलनकर्त्यांच्या हातात असलेले फलक, हस्तफलक आदी व्यवस्थित आहेत ना, हे पहावे.
१ आ. आवाज : आपल्या आवाजासह शेजारचा गोंधळ ऐकू जाणार नाही, अशा ठिकाणी बाईट द्यावी. आंदोलनात घोषणा किंवा भाषण चालू असल्यास बाईट पूर्ण होईपर्यंत ते थांबवावे.

प्रसारमाध्यमांमध्ये हिंदुत्वाची भूमिका मांडण्यासाठी हिंदु धर्माचे प्रवक्ते बना !

श्री. चेतन राजहंस
     आपण सर्व जण हिंदु धर्मरक्षक आहोत. आपल्यापैकी अनेक जण शारीरिक स्तरावर धर्मरक्षणाचे कार्य करणारे आहेत. धर्मरक्षणाचे कार्य केवळ शारीरिक स्तरापुरते मर्यादित नाही, तर ते वैचारिक आणि आध्यात्मिक स्तरावरही केले जाते. हिंदु धर्माचा प्रवक्ता म्हणून कार्य करणे, हे वैचारिक स्तरावरील हिंदु धर्मरक्षणाचे कार्य आहे. याविषयी काही मार्गदर्शक सूत्रे येथे देत आहे.
१. वक्ता आणि प्रवक्ता
     वक्ता आणि प्रवक्ता या दोन्ही शब्दांमध्ये भेद आहे. वक्त्याचे कार्य भाषणाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचेे असते, तर प्रवक्त्याचे कार्य संघटनेची योग्य वैचारिक भूमिका मांडण्याचे आणि आक्षेपांचे खंडण करण्याचे असते. आपण रामायणात वाचले आहे की, रावणाला युद्धापासून परावृत्त करण्यासाठी प्रभु श्रीरामाने अंगद नावाच्या वानराला स्वतःचा प्रवक्ता म्हणून पाठवले होते. महाभारतात स्वतः भगवान श्रीकृष्ण पांडवांचे प्रवक्ता म्हणून कौरवांच्या सभेत गेले होते आणि त्यांनी युद्ध न होण्यासाठी कौरवांनी पांडवांना केवळ ५ गावे द्यावीत, अशी मागणी केली होती. तात्पर्य, एखाद्या पक्षाची शास्त्र आणि तर्क यांच्या दृष्टीतून योग्य बाजू मांडणे, हे प्रवक्त्याचे कार्य असते. हे कार्य वैचारिक स्वरूपाचे आणि मुत्सद्धीपणाचे असते.
आपण पाहिले असेल, प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रवक्ते असतात. अनेक संघटनांचेही स्वतःचे प्रवक्ते असतात. ते त्यांच्या पक्षाची किंवा संघटनेची भूमिका दूरचित्रवाहिन्यांवरून मांडत असतात.

श्रीकृष्णाचे भक्तांना वचन

माझ्या चरित्राचा अभ्यास करून तर बघ, 
नाही तुझ्यासाठी ज्ञानाचे मोती उधळले तर सांग !

एखाद्या गोपीत श्रीकृष्णभाव किंवा गोपीभाव असल्याचे कसे ओळखावे ?

१. श्रीकृष्णभाव असलेलाच इतरांना मिळालेला श्रीकृष्णाचा आनंद अनुभवू शकणे आणि एखाद्या साधकात श्रीकृष्णभाव, म्हणजेच गोपीभाव असल्यासच तो गोपी वाटणे : एका साधकाने विचारले, "तुम्हाला तुमच्यातील कृष्णभावामुळे सगळ्यांच्यात गोपी दिसतात कि त्यांच्यातील गोपीभावामुळे ?" मी सांगितले, आम्हाला साधकांच्या मनात असणार्‍या श्रीकृष्णाच्या ओढीमुळे ते गोपी वाटतात. त्यानंतर मनात विचार आला, श्रीकृष्णाची भक्ती करायला लागल्यावर काही जणांच्या अंतर्मनात श्रीकृष्णभाव निर्माण होतो. त्यामुळे त्यांना स्वतःला आनंद मिळतो आणि हा आनंद काही व्यक्तींना सांगितला जातो. त्यांपैकी काही गोपी तो आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण ऐकतात आणि सोडून देतात. इथे असे लक्षात आले की, ज्याच्यात श्रीकृष्णभाव आहे, तोच इतरांना मिळालेला श्रीकृष्णाचा आनंद अनुभवू शकतो. काही जणांमध्ये श्रीकृष्णभाव नसतो. त्यामुळे त्यांना श्रीकृष्णाचा आनंद अनुभवता येत नाही; म्हणून आम्हाला काही साधकांमध्येच गोपीभाव जाणवतो.

श्रीकृष्णाने सुचवलेली साधनेच्या संदर्भातील सूत्रे

१. देवाने आपल्याला पुष्कळ शिकवले आहे. आपण नेहमी म्हणतो, 'देव माझ्यासाठी अमुक अमुक करतो; पण मी देवासाठी काय करतो ?', याकडेही आपण लक्ष ठेवायला हवे.

२. आपण म्हणतो, 'मला काही जमत नाही.' (स्वतःला काहीच जमत नसते.) 'आपल्याला जमायला पाहिजे', असे वाटत असेल, तर देवाची साथ घ्यायला पाहिजे.

३. एखाद्या प्रसंगात स्थिर रहाता आले नाही, तर आपण देवाला प्रार्थना करतो का ?

४. एखादा प्रयत्न देवाने सुचवला, तर देवाचरणी कृतज्ञ राहून तो प्रयत्न तळमळीने करतो का ?

५. देवाची क्षमा मागून लगेच चूक सुधारणे म्हणजे खर्‍या अर्थाने देवाची क्षमा मागणे असणे : आपल्याकडून चूक झाली, तर आपण देवाची क्षमा मागतो; पण चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाही. आपल्याकडून चूक होते, तेव्हा देवाची क्षमा मागून चूक लगेच सुधारायला पाहिजे, तरच ते खर्‍या अर्थाने देवाची क्षमा मागणे होते.

भावावस्थेत रहाण्याचे टप्पे

१. ओढ : देव पाहिजे असेल, तर आपल्यात देवाविषयीची ओढ निर्माण करावी लागते. त्या ओढीचा आनंद वेगळाच असतो.

२. तळमळ : ओढ निर्माण झाली की, मला देव पाहिजे, ही तळमळ वाढते आणि मग आपण हळूहळू देवाशी बोलायला लागतो.

३. देवाशी बोलणे :
नंतर देवाशी बोलण्यातून आनंद मिळू लागतो. तो आनंद मिळावा; म्हणून आपले त्याच्याशी सतत बोलणेही चालू होते.

४. देवाला हाका मारणे : नंतर आपल्याला वाटू लागते, हा आनंद आता सदैव मिळायला हवा आणि त्यासाठी आपण देवाला हाका मारू लागतो.

५. सतत भावावस्थेत राहून सेवा करणे : नंतर आपल्याला जाणीव होते, देवाविना आपल्याला कोणीच नाही. तेव्हा आपण क्षणाक्षणाला त्याला हाक मारून तो समवेत असल्याचा आनंद घेऊ लागतो आणि सतत भावावस्थेत राहून सेवा करू लागतो.

६. देवाच्या सान्निध्यात असल्याचा भाव ठेवून दोषांविरुद्धची प्रक्रिया राबवणे : आपल्याला दोषांविरुद्ध प्रक्रिया राबवायची असेल, तर 'देवाच्या सान्निध्यात आहे', असा भाव ठेवून प्रयत्न करायला हवेत. त्या प्रसंगात देव आपल्याला साहाय्य करत असतो. देव माझ्यासमवेत आहे, हा मनात भाव असेल, तर तोच माझ्याकडून प्रयत्न करवून घेणार, याची मनाला जाणीव असते.

- कु. तृप्ती गावडे (२८.३.२०१२)

गोपीभावातील कु. तृप्ती गावडे यांनी कृष्णभक्ती वाढवण्याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन

ध्येयप्राप्तीसाठी चिकाटीने, प्रामाणिकपणे आणि देवावर श्रद्धा ठेवून सातत्याने प्रयत्न करा !
१. प्रत्येकाचा साधनामार्ग आणि कौशल्य निराळे असूनही सर्वांचे ध्येय 'ईश्‍वरप्राप्ती' हेच असणे : प्रत्येकाचा साधनामार्ग निरनिराळा असल्याने त्या त्या मार्गाने त्याची प्रगती होत असते. अनेक साधक म्हणतात, 'आम्हाला गोपीभावाने साधना करायची आहे'. प्रत्येकाचे कौशल्य निराळे असते. त्या गुणांनुसार त्यांची उन्नती होत असते. एखाद्या साधकाला एखाद्या मार्गाने साधना करायला सांगितल्यावर लगेच निराशा येते. 'मला त्या मार्गानुसार साधना नको. मला गोपीभावानुसार साधना करायची आहे', असे तो सर्वांना सांगतो. आपली उन्नती कुठल्या मार्गाने होणार आहे, हे आपल्यापेक्षा गुरु आणि श्रीकृष्ण यांनाच अधिक ठाऊक असते. आपल्या मनाने विशिष्ट मार्गानुसार जाण्यासाठी हट्ट केला, तर आपण देवाजवळ जलद गतीने जाऊ शकत नाही. मार्ग निरनिराळे असले, तरी आपल्याला कृष्णाशी एकरूप व्हायचे असून ईश्‍वरप्राप्तीच करायची आहे, हे लक्षात ठेवावे.

आदर्श आणि प्रभावी वक्ता कसा असावा ?

श्री. रमेश शिंदे
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या वेळापत्रकात २०१५ ते २०१८ हा काळ मानसिक आणि वैचारिक स्तरावर कार्य करण्याचा आहे. या काळात मानसिक आणि वैचारिक (बौद्धिक) स्तरावरील संघर्ष तीव्र होणार आहे. अशा काळात हिंदु धर्माचे वैचारिक संरक्षण करण्यासह हिंदु समाजात धर्माविषयीचा अभिमान निर्माण करू शकणारे प्रभावी वक्ते मोठ्या प्रमाणात लागणार आहेत. सद्यस्थितीत हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांकडे संख्याबळ अल्प आहे. अशा स्थितीत आदर्श आणि प्रभावी वक्ता एका वेळी अनेकांना हिंदुत्वाच्या कार्यासाठी उद्युक्त करू शकतो. या दृष्टीने हिंदूंना जागृत करण्याचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी आदर्श आणि प्रभावशाली वक्ता सिद्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता आणि सध्याच्या आधुनिक काळानुसार तांत्रिक कौशल्य यांचा विकास करून प्रभावी वक्तृत्व कसे सिद्ध करावे आणि त्याचा धर्मकार्यासाठी कसा वापर करावा, हे आज आपण समजून घेऊया. 

१. व्यक्तीगत क्षमतांचा विकास करण्याचे महत्त्व !
अ. आपल्या कार्याच्या दृष्टीने वक्ता म्हणजे केवळ जाऊन भाषण करणे, ही एकच भूमिका अपेक्षित नाही, तर त्याला वक्तृत्वासह संपर्क आणि संघटन या क्षमतांचा विकास करण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील, तरच आपल्याला वक्तृत्वाच्या प्रभावाने जागृत झालेल्या हिंदूंना संघटित करून, दिशादर्शन करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सक्रीय करता येईल.
२. शारीरिक क्षमतेचा विकास
२ अ. व्यायाम आणि प्राणायाम : शरीर चांगले असेल, तर मनही उत्साही असते. वक्त्याने उत्साही राहून विषय मांडल्यास तो कंटाळवाणा न होता परिणामकारक होतो. यासाठी नियमित व्यायाम आणि प्राणायाम यांद्वारे आपण शारीरिक क्षमता वाढवू शकतो.
२ आ. चेहरा हसतमुख ठेवणे : हा वक्त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. आपला चेहरा हसतमुख असेल, तर समाजातील व्यक्ती आपल्याकडे आकर्षिल्या जातात. आपला चेहरा तणावग्रस्त किंवा निराश असल्यास इतरांना आपल्याशी संवाद साधण्यात मर्यादा येतात. त्यामुळे वक्त्याने आपला चेहरा सतत हसतमुख राहील, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

द्वापरयुगातील गोपी

प.पू. काणे महाराज
आदर्श भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोपी
    गोपी म्हणजे सूक्ष्म-देहाने कृष्णतत्त्वाशी पूर्णतः एकरूप झाल्याचे एकमेव उदाहरण होय.
     तदर्पिताखिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलतेति ।
- नारदभक्तिसूत्र, अध्याय १, सूत्र १९
अर्थ : दिवसभरातील सर्व क्रियाकलाप, आचारादी सर्व ईश्‍वरार्पित बुद्धीने, म्हणजे त्याच्यासाठीच, त्याच्या प्राप्तीसाठीच करतो, अशी बुद्धी, भावना असणे आणि त्याचे विस्मरण झाले असता अत्यंत व्याकुळ किंवा दुःखी होणे, हे भक्तीचे एक द्योतक आहे. ज्ञानोत्तर भक्ती करणार्‍या भक्ताच्या अंतःकरणाची अवस्था अशीच असते. भक्ती ही परम प्रेमस्वरूप असावी, असे भक्तीचे स्वरूप सांगून नारद सांगतात - भक्ती यथा व्रजगोपिकानाम् । (नारदभक्तिसूत्र, अध्याय २, सूत्र २१), म्हणजे गोकुळातील गोपींच्या भक्तीप्रमाणे असावी.

गोपीभाव आणि कृष्णभाव

१. गोपीभाव
    गोपीभाव म्हणजे श्रीकृष्णभेटीची तळमळ अथवा श्रीकृष्णभेटीतील आर्तता.
२. कृष्णभाव
     कृष्णभाव म्हणजे केवळ निखळ आनंद. कलियुगात या दोन्ही गोष्टी अत्यंत दुर्मिळ झाल्या आहेत. 
३. द्वापरयुगाचा महिमा 
(भक्तीरसाने ओथंबलेले युग)
     द्वापरयुगात मात्र सर्व वातावरणच गोपीभावाने भारून गेलेले असायचे. येथील प्रत्येक झाड-वेल, नभांगण, भूतलअंगण, गोप-गोपींची हृदये, गायी-वासरे, नद्या-जल सर्वकाही श्रीकृष्णभेटीतील भक्तीने ओथंबलेले असायचे. तेव्हा वातावरण श्रद्धा, भाव आणि भक्ती यांच्या त्रिवेणी संगमाने व्याप्त होते.

मन निर्मळ ठेवून कृष्णाला अर्पण करा आणि त्याच्या विचारांचे माध्यम बना !

आपले मन कृष्णमय करण्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि होणारे लाभ

आपले मन केवळ कृष्णासाठी असते. आपण सतत कृष्णाविषयी विचार करत रहायचे. आपण स्वयंपाक बनवतो, तो कृष्णासाठी आणि त्याच्या गोपगोपींसाठी. आपले मन नामजप करू शकते, कृष्णाला आळवू शकते. कृष्णाने सेवा दिली; म्हणून सारखी कृतज्ञता व्यक्त करावी. 'जी काही सेवा करतो, ती कृष्णाजवळ जाण्यासाठी आहे', असा विचार करावा. काही चुकले, 'तर कृष्णाने सुधारण्यासाठी संधी दिली आहे', असा विचार करावा.

कृष्णाला शरण जाऊन सेवा करायचा विचार करावा. नामजप करत राहिल्याने मन स्थिर रहाते, तसेच अंतर्मुखता वाढते. आपण शरिराने सेवा करतो, तशी मनालाही सेवा द्यायला पाहिजे. आपण सतत देवाविषयी बोलायचे आणि कार्य करायचे. त्यामुळे आपले मन प्रसन्न आणि आनंदी रहाते. मन नामाविना ठेवले, तर त्यात अयोग्य विचार येतात. मनात नकारात्मक विचार आले की, अनावश्यक बोलणे चालू होते. त्यामुळे आपल्या मनावर आवरण येते आणि आपण देवाच्या विचारांपासून दुरावतो. आपल्यातील नकारात्मक विचार आणि स्वभावदोष यांमुळे वाईट शक्तींना आपल्यावर आक्रमण करणे सोपे जाते. त्यांनी आक्रमण करून त्रासदायक शक्ती प्रक्षेपित केल्यामुळे व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांच्याभोवती त्रासदायक स्पंदनांचे सूक्ष्म-आच्छादन निर्माण होते, त्याला 'त्रासदायक शक्तीचे आवरण' असे म्हणतात. व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांवर नियंत्रण मिळवणे, हा या आक्रमणामागील वाईट शक्तींचा उद्देश असतो. मनुष्याला त्रास देणारे भुवलोक आणि सप्तपाताळ येथील अदृश्य जीव (लिंगदेह) म्हणजे आसुरी शक्ती. यांना वाईट शक्ती असेही म्हटले जाते. वाईट शक्तींचे भूत, पिशाच, हडळ, मांत्रिक यांसारखे वेगवेगळे प्रकार आहेत. आसुरी शक्ती मनुष्याच्या शरिराबाहेर राहून किंवा त्याच्या शरिरात राहून (शरिरात स्थाने निर्माण करून) त्याला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक असे विविध स्वरूपाचे त्रास देतात.

प्रत्येक सेवेला कृष्णाशी जोडण्याचे महत्त्व

१. सेवेला कृष्णाशी जोडणे : आपल्याला आपली प्रत्येक सेवा कृष्णाशी जोडता आली पाहिजे. आपण जे काही करतो, ते ईश्‍वराच्या नियोजनानुसार आणि त्याच्या इच्छेनुसार घडत असते; म्हणून आपण करत असलेली प्रत्येक सेवा कृष्णाशी जोडली पाहिजे.
२. धारिका पडताळणे : धारिका पडताळत असतांना 'देवाने मला ही धारिका पडताळण्याची संधी दिली', असा विचार हवा. सेवा भावपूर्ण, परिपूर्ण, तसेच प्रार्थना आणि नामजप करत करणे, म्हणजे ती कृष्णाशी जोडणे होय.
३. आवडीचा पदार्थ खाणे : आपल्याला अतिशय आवडणारा पदार्थ आपण अधिक खातो. त्यापेक्षा 'मला तो पदार्थ जितका आवडतो, तितकाच इतरांनाही आवडतो आणि त्यांनाही तो मिळायला पाहिजे', असा विचार करणे, म्हणजे खाण्याची कृती कृष्णाशी जोडणे.
४. कपडे धुणे : कपडे धुतांना पाणी भरपूर उपलब्ध असल्यास 'देेेवाने मला पुष्कळ पाणी दिले आहे, तरी ते मला काटकसरीने वापरायचे आहे', असा विचार करायचा आणि 'देवा, तुझ्यामुळे हे झाले, तुझ्यामुळे घडले', असे म्हणून प्रत्येक कृती श्रीकृष्णाशी जोडायची.
अशा प्रकारे प्रत्येक कृती श्रीकृष्णाशी जोडल्यामुळे कुठेही मनाचा सहभाग होत नाही, तसेच बुद्धीचा अडथळाही येत नाही; कारण तिथे ती कृती आपण देवाला अर्पण करत असतो.
- कु. तृप्ती गावडे

गोपींमध्ये असलेले गुण

कु. मधुरा भोसले
१. सेवावृत्ती
    गोपींमध्ये श्रीकृष्णाप्रती पुष्कळ सेवाभाव होता. त्यामुळे त्या श्रीकृष्णाची केवळ शरिरानेच नव्हे, तर मन आणि बुद्धी यांद्वारेही सेवा करत होत्या. त्यांनी श्रीकृष्णाच्या सेवेत स्वतःचा अहं पूर्णपणे अर्पण केला होता. त्यामुळे त्या २४ घंटे श्रीकृष्णाच्या सेवेत होत्या. त्या स्वप्नातही श्रीकृष्णाची सेवा करत होत्या. ७५ टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत त्यांनी श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची सेवा केली, तर ७५ टक्के पातळीनंतर त्यांनी श्रीकृष्णाच्या निर्गुण तत्त्वाची सेवा केली.
    गोपींकडून एखादी चूक झाल्यास होणारी प्रत्येक चूक म्हणजे आपण श्रीकृष्णाची सेवा करण्यास न्यून पडलो, अशी त्यांना खंत वाटत असे. त्यामुळे ती चूक पुन्हा होऊ नये, असे त्यांना वाटत असे. आपली चूकही श्रीकृष्णच सूक्ष्मातून दाखवतो, असा त्यांचा भाव होता. त्यामुळे स्वतःच्या लहान लहान चुकाही त्यांच्या लक्षात येत होत्या. त्यांची तळमळ आणि भाव पाहून त्यांच्यावर श्रीकृष्णाची कृपा आणि साहाय्य यांचा ओघ वाढत गेला. त्यांची आध्यात्मिक पातळी वाढल्यावर सर्वकाही श्रीकृष्णच करत आहे, अशा भावामुळे साक्षात श्रीकृष्णच त्यांच्या माध्यमातून कार्य करत होता. त्यामुळे त्यांच्याकडून प्रत्येक कृती अचूक होत होती आणि त्यातून सात्त्विकता, चैतन्य आणि आनंद यांचे प्रक्षेपण होत होते.

श्रीकृष्णरूपी अमृतसमुद्रातील लहरी म्हणजे गोपी आणि त्या अमृतसमुद्रातील गोडपणा म्हणजे राधा !

      रासक्रीडा, हिलाच राधाच कृष्ण आणि कृष्णच राधा असे म्हणतात. श्रीकृष्णरूपी अमृतसमुद्रातील लहरी याच गोपी होत; परंतु त्या अमृतसमुद्रातील गोडपणा म्हणजे राधा होय. म्हणून अखंडसंयोगोप्य वियोग पालनं नाम भक्तिः, अशी शांडील्य ऋषींनी भक्तीची व्याख्या केली आहे. उत्कंठा म्हणजे विरह आणि प्राप्ती म्हणजे मीलन, म्हणजेच तृप्ती. प्रेमात या दोन्ही भावांचे एकसमयाविच्छेदेकरून अस्तित्व असते. म्हणजे तृप्ती उत्कंठेला वाढवते आणि उत्कंठा तृप्तीचा आनंद वाढवत असते. हेच राधा-कृष्णाचे स्वरूप होय. ही लीला अनादीकाळापासून अनवरत अखंड चालू आहे; परंतु कोणी कोणाला ओळखले नाही. अद्वैत असल्यामुळे हा साक्षात् अपरोक्ष रस आहे. अनुभूती परोक्षात येते. मग तिची स्मृती होते. त्याला प्राप्ती म्हणत नाहीत. परमभाग्यवंतांनाच रासलीला पहाण्याचे आणि खेळण्याचे सौभाग्य लाभले. गोपींचे माझ्यावरील प्रेम आणि माझे गोपींवरील प्रेम हेे आम्हा दोघांनाच माहिती आहे, इतरांना ते अतर्क्य आहे, असे भगवंताने उद्धवाला सांगितले. तेव्हा आपण गोपीसम झाल्यावरच आपल्याला रासलीला कळेल. 
- प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.

-

प.पू. डॉक्टरांनी त्यांच्यासाठी थोडासा स्वयंपाक बनवणार्‍या गोपी दीपालीला 'भातुकलीचा खेळ खेळल्यासारखे वाटत असेल ना ?', असे म्हटल्यावर तिला लहानपणी भातुकलीच्या खेळात देवासाठी अन्न बनवून तो खायची वाट पहात असल्याचे आठवणे आणि आता गुरूंची तीच सेवा मिळाल्याने अपार कृतज्ञता वाटणे

१. भातुकलीचा खेळ खेळतांना 'देवाला केलेला नैवेद्य त्याने खरोखर खावा', असे वाटणे आणि आजीने 'तो अन्नाचा सुगंध घेतो', असे सांगितल्यावर 'त्याने अन्न प्रत्यक्ष ग्रहण करायला हवे', असे न वाटणे : ७.७.२०१२ या दिवशी मी प.पू. डॉक्टरांसाठी अर्धी वाटी शिरा बनवून नेला. प.पू. डॉक्टर म्हणाले, "तुला हे बनवतांना भातुकलीचा खेळ खेळल्यासारखे वाटत असेल ना ?" मी म्हणाले, "होय, प.पू. डॉक्टर !" मी (मनात) म्हटले, लहान असतांना मी खोटी खोटी भांडी घ्यायचे. खोटा खोटा स्वयंपाक करायचे. दगडाचा देव करून त्याची पूजा करायचे आणि त्या देवालाच भरवायचे. तेव्हा कधी कधी मातीची चूल करायचे. ती दिवसभर सुकवायचे. दुसर्‍या दिवशी ती पेटवून तिच्यावर मातीचा गडू ठेवून डाळ-तांदूळ घालून शिजवायचे. नंतर त्यात मीठ घालायचे आणि ते दगडाच्या देवाला भरवायचे. तेव्हा वाटायचे, 'देवाला केलेला तो नैवेद्य त्याने खरोखर खावा'. भक्ताच्या हाकेला देव धावून येतो. भक्ताने केलेला नैवेद्य तो ग्रहण करतो, असे ऐकले होते; पण देव तो खायचा नाही. तेव्हा वाटायचे, आपण लपून बसल्यावर देव येऊन खाईल; पण लगेच भक्त प्रल्हादाची गोष्ट लक्षात यायची, देव चराचरात आहे. आपण कुठेच लपू शकत नाही. तो आपल्याला बघतोय. एकदा आजीकडून बोलता बोलता ऐकले, 'देव वासाचा धनी असतो'. मी विचारले, "म्हणजे काय गं आजी ?" तेव्हा ती म्हणाली, "तो केवळ अन्नाचा सुगंध घेतो." हे कळल्यावर 'देवाने अन्न ग्रहण करायला हवे', असे वाटेनासे झाले.

समष्टी साधना

अ. एखादी चूक किंवा अपप्रकार घडला, तर क्षमा मागून लगेच सुधारणा करणे
आ. मिळालेल्या सेवेसाठी कृतज्ञ राहून देवाला शरण जाणे
इ. सतत शिकण्याच्या स्थितीत राहून स्वतः शिकलेले इतरांना शिकवणे 
ई. सतत समष्टी कार्याची ओढ असणे

व्यष्टी साधना

अ. मला श्रीकृष्ण पाहिजे आणि मला तो मिळवायचा आहे, असा भाव सतत मनात ठेवणे
आ. श्रीकृष्णाचा विचार सतत मनात येऊन आणि त्याची जाणीव होऊन प्रयत्न करणे
इ. स्वतःचे देहभान विसरून या देहात श्रीकृष्णच आहे, असा भाव ठेवणे 
ई. सांगितलेले प्रयत्न कोणतेही स्पष्टीकरण न देता तत्परतेने करणे

सतत भावावस्था

      गोपींचे श्रीकृष्णावर एवढे प्रेम होते की, त्या प्रत्येक क्षणी त्याचेच स्मरण करत होत्या. त्यांच्या मनात सर्वत्र श्रीकृष्ण व्यापलेला होता. त्या सूक्ष्मातून, म्हणजेच मनाने सदैव त्याच्याच सेवेत होत्या. त्यामुळे त्यांना स्वतःची शुद्ध हरपायला होत असे. त्यांना श्रीकृष्णाविषयीचा भाव वाढवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागले नाहीत. त्यांना केवळ जागेपणी, म्हणजे जागृतावस्थेतच नव्हे, तर झोपेत, म्हणजे सुुषुप्तीत (गाढ झोपेत) आणि तुर्यावस्थेतही (कुंडलिनी जागृत होऊन मूलाधारापासून निघून सहस्रारात पोहोचून तेथे स्थिर होते, त्या अवस्थेत) सतत श्रीकृष्णाचे स्मरण होत असे. हे स्मरण म्हणजे केवळ स्मरण नसून प्रत्येक क्षणी श्रीकृष्णाला मारलेली हाक असायची. गोपींच्या प्रेमात त्यांच्या सर्व देहांचा सहभाग होता. त्यांच्या मनात श्रीकृष्णाविषयीचा भाव काही क्षण, काही घंटे किंवा काही दिवस न रहाता तो सततच असायचा. जशी श्‍वास घेण्याची क्रिया आपोआप होते, तसे त्यांच्याकडून श्रीकृष्णाचे स्मरण आपोआप होत होते. त्या भावाच्या टप्प्याला असल्यामुळे फार अल्प काळ जीवदशेत वावरायच्या. भावावस्थेमुळे त्यांना चैतन्य आणि आनंद सतत अनुभवता येत होता.

'मी कृष्ण नाही', असे सांगणारे प.पू. डॉक्टर आणि 'तुम्हीच भगवंत आहात', हे त्यांना सांगणारी गोपी दीपाली !

पाने, झाडे, मनुष्य, तसेच छोटे-छोटे सर्व जीव यांना स्वतः सांभाळत असूनही 'मला कृष्णाप्रमाणे करता येत नाही', असे म्हणून श्रेष्ठत्व भक्ताला देणारे भगवंतरूपी प.पू. डॉक्टर ! : 'प.पू. डॉक्टर, तुम्ही म्हणता, 'बघ, पटल (टेबल) सरकवायचे नाही, हे मी विसरलो. कृष्ण माझ्यासारखा विसरत नाही. कृष्ण पाने, झाडे, मनुष्य, तसेच छोटे-छोटे सर्व जीव यांचे सगळेच बघतो. मला कुठे येते असे ? तरीही तुम्ही मला 'कृष्ण' म्हणता. त्यानंतर तुम्ही पुन्हा मधुर मधुर हसू लागता. प.पू. डॉक्टर, पाने, झाडे, मनुष्य, तसेच छोटे-छोटे सर्व जीव यांच्याकडे पहाणारा भगवंत तुम्हीच आहात; पण भगवंत स्वतःचे नाव कधीच पुढे येऊ देत नाही. सर्वकाही स्वतः करून श्रेष्ठत्व मात्र भक्तालाच देत असतो. तुम्ही म्हणता, 'छान सुचतं हो तुम्हाला. हे कृष्णच सुचवतो ना ?' त्यानंतर तुमचे मधुरात्मक मधुर आणि आनंदमय गोड गोड हास्य बघितले की, समोरचा सर्वकाही विसरून जातो.

श्रीकृष्णासाठी प्राणत्याग करण्यास सिद्ध असणार्‍या गोपी !

एकदा श्रीकृष्णाने छातीत पुष्कळ दुखत असल्याचा बहाणा केला. कोणत्याच औषधाने गुण येईना. तेव्हा श्रीकृष्णानेच नारदमुनींना उपाय सुचवला, कोणी भक्ताने स्वतःच्या पायाखालची माती छातीला लेप म्हणून लावायला दिली, तर माझे दुखणे थांबेल; पण माती देणारा मात्र मृत्यू पावेल. नारदमुनींनी द्वारकेतील कोणी आपल्या पायाखालची माती देण्यास तयार आहे का, याचा शोध घेतला; पण कोणीही तशी माती द्यायला कोणी सिद्ध होईना. नारदमुनींच्या प्रयत्नाला यश येत नसल्याचे पाहून श्रीकृष्णाने त्यांना 'गोकुळात जाऊन बघा जमले तर', असा पर्याय सुचवला. गोकुळात शिरतांना नारदमुनींनी यमुनेवर पाणी भरायला आलेल्या पहिल्या गोपीला श्रीकृष्णाच्या रोगाविषयी सांगताच तिने लगेच आपल्या पायाखालची माती नारदमुनींना दिली. 'मी मेले तरी चालेल; पण आमच्या भगवंतावर प्राणसंकट ओढवण्याच्या आत ही माती लवकर घेऊन जा', असे सांगून तिने नारदमुनींना बोलूसुद्धा न देता त्वरित श्रीकृष्णाकडे जाण्यास विनवले. नंतर गोपीच्या पायांखालची माती श्रीकृष्णाच्या छातीला लावल्यानंतर त्याच्या छातीत दुखायचे थांबले. अर्थातच श्रीकृष्णाला माती देणारी गोपी काही मरण पावली नाही. नंतर श्रीकृष्णाने तुम्ही माती दिली असती, तरी चालले असते, असे नारदमुनींना सांगितले.

गुरूंचा वाढदिवस !

श्रीमती रजनी नगरकर
     वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा वाढदिवस झाला. त्या वेळी साधिकेला सुचलेले काव्य येथे देत आहोत. 
आला गं सण आज । 
माझ्या गुरूंचा वाढदिवस ।
करा गं सयांनो । 
अंगणात सडासंमार्जन ॥ १ ॥

आला गं सण आज । माझ्या गुरूंचा वाढदिवस । 
घालू गं रांगोळी । त्या चैतन्याच्या आवली (टीप १) ॥ २ ॥

धर्मप्रेमींनो, प.पू. डॉ. आठवले यांच्या कृपाछत्राखाली एकत्र येऊन संघटितपणे धर्मकार्य केल्यास सर्वांचेच कल्याण होणार असून सनातन धर्म राज्याची निश्‍चितच स्थापना होईल !

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात उपस्थित असलेल्या 
धर्मप्रेमींना प.पू. पांडे महाराज यांनी दिलेला संदेश !
प.पू. परशराम पांडे
१. पृथ्वीवरील सध्याची अराजक स्थिती 
अ. पृथ्वीवर मुसलमान आणि ख्रिस्ती पंथ उदयाला आले. तेव्हापासून जिकडेतिकडे उत्पात, निसर्गाचा कोप होऊन चक्रीवादळे, भूकंप, त्सुनामी यांसारखे प्रकार घडू लागले. त्यांच्यामुळे पृथ्वीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. दुुष्ट शक्तींना चैतन्य शक्तीमुळे त्रास होत असल्यामुळे ते मूर्तीभंजनादी प्रकार करत आहेत. 
आ. सध्या रज-तमाचा प्रभाव वाढल्याने मनोविकृती, स्वभावदोष आणि अहं वाढला असून मनुष्याला दुःख, निराशा अन् चिंता यांनी ग्रासले आहे.
इ. इसिस या संघटनेने सहस्रो लोकांची हत्या केल्यामुळे सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

श्रीकृष्णभक्तीचा व्यष्टी साधनेतील टप्पा गाठल्यानंतर समष्टी भाव, तळमळ आदी गुणांमुळे समष्टी सेवेचे दायित्व सहजतेने पेलणार्‍या गोपीभावातील साधिका !

कु. दीपाली मतकर
कु. तृप्ती गावडे 
गोपींसारखी भक्ती करणे सातत्याने जमणे, हा साधनेतील शेवटचा टप्पा नसून तो व्यष्टी साधनेतील एक टप्पा गाठल्याप्रमाणेे आहे. सध्याच्या काळात व्यष्टी साधनेला ३० टक्के, तर समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे. त्यामुळे 'धर्मप्रसार करणे, समाजाला धर्मशिक्षण देऊन धर्मपालन करायला सांगणे, त्याचप्रमाणे त्यांना साधना सांगून साधनेकडे वळवणे' इत्यादी समष्टी साधना करणे आवश्यक आहे.

सनातन संस्थेतील गोपीभाव असणार्‍या साधिकाही आता समष्टी साधना करू लागल्या आहेत. वयाने लहान असलेल्या, विशेष शिक्षण झालेले नसतांना आणि समष्टीचा काहीच अनुभव नसतांनाही श्रीकृष्णकृपेने त्यांना ही साधना चांगल्या रितीने जमू लागली आहे. अशा साधिकांची नावे आणि त्या दायित्व घेऊन करत असलेल्या सेवा पुढे दिल्या आहेत. अशा गोपीभावातील आणखीही काही साधिका धर्मकार्यासाठी सिद्ध होत आहेत.

(साधकांनो, आपणही आपल्यात गोपीभाव
वाढवून राष्ट्र-धर्म कार्यासाठी सिद्ध होऊया !) 

श्रीकृष्ण प्रत्येकाला एकेक गुण देत असून त्याचे सर्व गुण आपल्यात आल्यावर त्याच्याशी एकरूप होता येणे

    श्रीकृष्ण हा परिपूर्ण आणि तिन्ही लोकांचा भगवंत आहे. सर्व सृष्टी त्यानेच निर्माण केली आहे. तो प्रत्येकाला त्याचा एकेक गुण देतो; कारण एकच गुण कितीतरी जणांना शिकवू शकतो. प्रत्येक व्यक्तीमधील गुण इतरांना शिकवू शकतो. सर्व जण एकमेकांमधील गुण जाणून घेऊन प्रयत्न करतात. श्रीकृष्णाचे अस्तित्व चराचरात असते. त्याचे वेगवेगळे गुण आपल्यात आल्यावर आपल्याला श्रीकृष्णाशी एकरूप होता येते. आपल्यातील सर्व गुण वाढत जाऊन आपण श्रीकृष्णाशी एकरूप होतो.
 - कु. तृप्ती गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे यश !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
स्वतःच्या यशाच्या धुंदीत रहाणार्‍यांपेक्षा जो दीन-दुबळे, दरिद्री आणि गरजू अशा व्यक्तींच्या 
साहाय्याला धावून जातो अन् यालाच कर्तव्य मानतो, तोच खरा यशस्वी माणूस ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

मी रस्त्यावर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही; 
कारण आमची माघार नाही; म्हणून मी हरलो.
संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
      भावार्थ : मी रस्त्यावर प्रेम करतो म्हणजे साधनेवर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही म्हणजे साधनेत येणार्‍या अडचणी, सिद्धी आदींकडेे दुर्लक्ष करतो. कारण आमची माघार नाही म्हणजे मोक्षाला जाऊन, नामाशी एकरूप झाल्यावर आम्हाला तेथून परत यावयाचे नाही. म्हणून मी हरलो यातील मी म्हणजे मीपणा, अहंभाव हरलो. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

गुरुपौर्णिमेला २३ दिवस शिल्लक

     वेद, शास्त्र, स्मृती वगैरेंच्या बहुवाक्यतेचे एकवाक्यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः त्यांचे शब्दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा, हे गुरुकृपेने कळते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

कुठे पाश्‍चात्त्यांची वेळकाढू संशोधनपद्धत, तर कुठे क्षणात 
कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देणारी भारतीय साधना ! 
परात्पर गुरु डॉ. आठवले
       पाश्‍चात्त्यांची संशोधनपद्धत आहे, माहिती गोळा करा, तिचे सांख्यिकी विश्‍लेषण (Statistical analysis) करा आणि मग निष्कर्ष काढा. याला अनेक वर्षे लागतात. याउलट साधनेत प्रगती झाली की, क्षणात जगातील कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर मिळते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

पंचम हिंदू अधिवेशनाची सांगता !

संपादकीय 
      रामनाथी, गोवा येथे भरलेले पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन २५ जून २०१६ या दिवशी समाप्त झाले. देशविदेशातील हिंदुत्वनिष्ठ एक आठवडाभर एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या विचारांचे आदानप्रदान केले. जगभरातील हिंदूंच्या स्थितीवर त्यामुळे प्रकाश पडला. हिंदूंवर होणारे आघात आणि त्यांची तीव्रता, त्यावर योजलेले उपाय इत्यादीसंबंधी उहापोह झाला. हिंदूंच्या संघटनाचे उत्तम प्रात्यक्षिक या अधिवेशनाच्या निमित्ताने झाले. मागील चार वर्षांपासून हे अधिवेशन चालू असून हिंदूंच्या भक्कम संघटनाची ते ग्वाही देते. देशात हिंदूंना चिंतामुक्त करण्यासाठी अगणित गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी कृतीच्या स्तरावर उतरण्याची निकड आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn