Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मृतांचे नातेवाईक ज्यांच्याकडे बोट दाखवतील, त्यांचेच तुम्ही अन्वेषण करणार का ? - उच्च न्यायालय

  • न्यायालयाच्या या ताशेर्‍यांवरून अन्वेषण यंत्रणांचे अन्वेषण आणि कार्यपद्धत कशा प्रकारची आहे, हे लक्षात येते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातही अशा प्रकारची कार्यपद्धत वापरून निरपराध हिंदूंना आतंकवादी ठरवण्यात आले ! 
  • न्यायालयाने संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशीच न्यायप्रेमी जनतेची अपेक्षा आहे !  
  • मुंबई उच्च न्यायालयाचे अन्वेषण यंत्रणांवर कडक शब्दांत ताशेरे
  • डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरण
       मुंबई, २३ जून (वार्ता.) - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू असून त्याची सुनावणी २२ जून या दिवशी उच्च न्यायालयाचे न्या. एस्.सी. धर्माधिकारी आणि न्या. शलिनी फणसळकर-जोशी यांच्या खंडपिठापुढे झाली. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने मृतांचे नातेवाईक ज्यांच्याकडे बोट दाखवतील, त्यांचेच तुम्ही अन्वेषण करणार का ? अशा तीव्र शब्दांत अन्वेषण यंत्रणांवर ताशेरे मारून नाराजीही व्यक्त केली. तसेच वारंवार प्रसारमाध्यमांकडे जाऊन माहिती देऊ नका, असे खडेबोलही दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांना सुनावले. तसेच सरकारी अधिवक्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलू नये असेही बजावले. न्यायालयाकडून निर्णय मिळेपर्यंत पानसरे प्रकरणाचे अन्वेषण राज्यातील अन्वेषण यंत्रणांनाच करण्यास सांगितले. अन्वेषणाचा अहवाल सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाने अन्वेषण यंत्रणांना ६ आठवड्यांची मुदत दिली.

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी तन-मन-धन अर्पण करण्याची सिद्धता ठेवा ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या 
दुसर्‍या टप्प्यातील हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनाला 
सर्वांगीण हिंदूसंघटनासाठी निश्‍चयात्मक प्रारंभ 
        विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा पहिला टप्पा १९ ते २२ जून या कालावधीत पार पडला. या ४ दिवसांत धर्मजागृतीचे उपक्रम, त्यातील अडचणी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा यांविषयी अभ्यासपूर्ण विचारमंथन झाले. २३ जूनला हिंदु राष्ट्र-संघटकांसाठीच्या अधिवेशनाला प्रारंभ झाला. हिंदु राष्ट्रासाठी समाजप्रेमी, धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, संत, अधिवक्ता, पत्रकार, आधुनिक वैद्य, उद्योजक आदींचे महासंघटन उभारण्याची कृतीशील दिशा आपल्याला ठरवायची आहे. त्यासाठी पद, पक्ष, मान-सन्मान यांचा अहं विसरला पाहिजे; कारण या गोष्टी हिंदूसंघटनाला मारक आहेत. अहं-निर्मूलनासाठी साधना आवश्यक आहे. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यावर सर्व गोपगोपींनी आपल्या काठ्या लावून महत्त्वाचा वाटा उचलला, त्याप्रमाणे आपणही हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन अर्पण करण्याची सिद्धता ठेवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनातील मान्यवरांचे उद्बोधक विचार !

धर्मांतर रोखण्यासाठी कायद्याचे ज्ञान आवश्यक ! - श्री. अतुल 
जेसवानी, संस्थापक अध्यक्ष, हिंदु सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश 
       मुसलमान लव्ह जिहाद आणि ख्रिस्ती सेवेच्या माध्यमातून हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. हिंदु मुलगी मुसलमान युवकासह पळून जाते आणि त्याच्याशी विवाह करून मुसलमान होते, हेही धर्मांतरच आहे. त्यानंतर त्यांची पिळवणूक झाल्यावर खरे वास्तव त्यांच्या लक्षात येते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. यात हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. हे कटू सत्य हिंदु मुलींना समजावून सांगणे अजूनही कठीण होत आहे; कारण धर्मशिक्षणाचा अभाव ! हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आजही मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांच्यावर वरचढ ठरत आहेत. आज हिंदू त्यांच्या मुलांना सर्व सुखसुविधा पुरवतात; मात्र त्यांच्यावर योग्य संस्कार करणे टाळतात. त्यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायातून थोडा वेळ काढून मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत. लव्ह जिहादपासून हिंदु मुलींचे रक्षण करतांना आपल्याला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कायद्याच्या माध्यमातून आपण या धर्मांतराला आळा घालू शकतो.
       संघटनांच्या कार्यकर्त्यांनी झोपडपट्यांमध्ये हिंदूंचे संघटन केले पाहिजे. ज्या भागात साधे दुचाकी वाहन जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी फार पूर्वीपासून ख्रिस्ती मिशनरी पोचलेले असतात. हे मिशनरी हिंदूंचे नाव धारण करून सेवेच्या नावाखाली धर्मांतर करत असतात.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले मनोगत

नि:स्वार्थीपणे हिंदुत्वरक्षणाचे कार्य करणारी सनातन 
संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना आमचा 
पूर्णपणे पाठिंबा आहे ! - अधिवक्ता निरंजन चौधरी, जळगाव 
        सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या राजकीय लाभासाठी कार्य करत नसून नि:स्वार्थीपणे हिंदुत्वरक्षणाचे कार्य करत आहेत. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असून यापुढेही असणार आहे. आपण जेव्हा धर्मासाठी कार्य करतो, तेव्हा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र कार्यरत रहात असून तेच कार्यासाठी बळ देते. जळगावमध्ये सध्या २५ अधिवक्ता हिंदुत्वासाठी विनामूल्य कार्य करतात. अधिवेशन झाल्यानंतर नाशिक, तसेच मालेगाव येथे जाऊन ही संख्या ७५ पर्यंत नेणार आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळे हिंदु राष्ट्र येणारच असल्याची निश्‍चिती वाटते !
        परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळे कोणत्याही संकटांचे भय वाटत नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अन्य संत यांच्या कृपेने सध्या चालू असलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामुळे हिंदु राष्ट्र येणारच असल्याची खात्री वाटते. हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून जे कार्य करत आहे, त्या कार्याची गेल्या ३-४ वर्षांपासूनच ओळख झाली असती, तर आज आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या घटली असती.

कैराना, कांधला, आग्रा नंतर गाझियाबाद येथील कैला भट्टा परिसरातून ३०० हिंदु परिवारांचे पलायन !

दुसरा काश्मीर 
बनत चाललेला उत्तरप्रदेश !
      गाझियाबाद (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशातील कैराना, कांधला आणि आग्रा येथून हिंदूंचे होणारे पलायन समोर येत असतांनाच आता गाझियाबादमधून ३०० हिंदु परिवारांनी पलायन केल्याचे वृत्त आहे. येथील कैला भट्टा क्षेत्रातील वाल्मीकि समाजातील हे परिवार असल्याचे म्हटले जात आहे. या हिंदूंचा आरोप आहे की, मुसलमानबहुल क्षेत्र असल्याने त्यांना प्रलोभन दाखवून, तसेच धमकी देऊन पलायन करण्यास भाग पाडण्यात आले होते. वाल्मीकि समाजाचे नेते प्रदीप चौहान यांनी सांगितले की, मुसलमानबहुल क्षेत्र बनल्याने येथे प्रतिदिन हिंदु मुलींची छेडछाड केली जात होती. त्यांना धमकावण्यात येत होते. त्यामुळे येथे रहाणे अशक्य झाले होते. येथील भंगारचा व्यापारी असणार्‍या एका मुसलमानाने हिंदूंना धमकावून पलायन करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. या व्यापार्‍याने येथील ५० हिंदूंची घरे विकत घेतली आहेत. त्याने धमकी देतांना म्हटले की, आमची संख्या वाढत आहे, त्यापूर्वीच तुम्ही येथून चालते व्हा अन्यथा तुम्हाला भोगावे लागेल. तुम्हाला हवे तेवढे पैसे घ्या आणि घरे विका.

लव्ह जिहाद हा धर्मांधांचा हिंदु महिलांच्या विरोधातील आतंकवादच ! - अधिवक्त्या (सौ.) चेतना शर्मा

हिंदु जनजागृती समितीच्या लव्ह जिहाद 
या ग्रंथाचे जनजागृतीसाठी मोठे साहाय्य ! 
       विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - लव्ह जिहाद हा धर्मांध मुसलमानांनी हिंदु महिलांच्या विरोधात पुकारलेला आतंकवादच आहे. या आतंकवादाच्या विरोधात हिंदूंनी सर्व दृष्टीने प्रशिक्षित होणे आणि साधनाबळाद्वारे सक्षम होणे अत्यावश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन उत्तरप्रदेश येथील हिंदु स्वाभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा अधिवक्त्या (सौ.) चेतना शर्मा यांनी केले. एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे मार्गदर्शन करतांना शर्मा यांनी लव्ह जिहादच्या विरोधात केलेल्या कार्याविषयी काही छायाचित्रे आणि ध्वनीचित्रचकती यांच्या माध्यमातून विषय प्रभावीपणे मांडला. त्यांनी लव्ह जिहादच्या विरोधात धर्मांधांकडून उपयोगात आणल्या जाणार्‍या आधुनिक पद्धती यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी सांगतले की, लव्ह जिहादच्या विरोधात गावोगावी जनजागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या लव्ह जिहाद या ग्रंथाचे मोठ्या प्रमाणात साहाय्य झाले.

सनातन धर्माला हानी पोचवणार्‍या संप्रदायांचे समूळ उच्चाटन आवश्यक ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

       बद्रीनाथ (उत्तराखंड) - सर्व धर्म समान आहेत, अशा घोषणा देऊन आज सनातन धर्मावर आघात केला जात आहे. त्याला हानी पोचवली जात आहे. ही राजकीय घोषणा आहे. सनातनसारखा दुसरा कोणताही धर्म नाही. सनातन धर्माला हानी पोचवणार्‍या नव्या संप्रदायांचे समूळ उच्चाटन करण्याची आवश्यकता आहे, असे उद्गार ज्योतिष आणि द्वारका पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे काढले. ज्योतिष पीठ बद्रिकाश्रमाच्या स्थापनेला २ सहस्र ५०० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने येथे ज्योतिषी पीठ महिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शंकराचार्यांनी मार्गदर्शन केले.
शंकराचार्य पुढे म्हणाले,
१. जोपर्यंत भ्रष्टाचार दूर होत नाही, तोपर्यंत अतीवृष्टी, अनावृष्टी इत्यादी संकटे दूर होणार नाहीत. ही संकटे भ्रष्टाचाराचेच दुष्परिणाम आहेत. ईश्‍वरी दंडाच्या भयानेच भ्रष्टाचार दूर होऊ शकतो.
२. हिंदूंचे अस्तित्व वर्णांमुळेच टिकून आहे अन्यथा सर्व हिंदू मुसलमान झाले असते. एकाच्या धर्मपरिवर्तनानंतर सर्वांचे धर्मांतर झाले असते.

रा.स्व. संघ आणि भाजप हिंदुत्वापासून भरकटले ! - शिवसेना

संघाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन
       मुंबई - रा.स्व. संघाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्याचे काहीच कारण नाही. कारण राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजप हे दोघेही हिंदुत्वाच्या सूत्रापासून भरकटले असून त्यांनी हिंदुत्वाचे सूत्र सोडून दिले आहे, अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केली आहे. संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने २ जुलै या दिवशी देहलीत १४० देशांच्या राजदूतांना निमंत्रण देऊन इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. यावर शिवसेनेने ही टीका केली आहे. कायंदे पुढे म्हणाल्या की, संघाने इफ्तार पार्टीचे आयोजन करणे हा संघ आणि भाजप यांचा ढोंगीपणा आहे. राममंदिराचे सूत्र उपस्थित करून भाजपने २ खासदारांवरून १८१ खासदारांपर्यंत मजल मारली; परंतु सत्तेत आल्यानंतर राममंदिराचे सूत्र भाजप सोयीस्करपणे विसरला आहे. जेव्हा काँग्रेसकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत होते, तेव्हा भाजप आणि संघ यांच्याकडून काँग्रेसवर टीका केली जायची; परंतु आता भाजप स्वतः इफ्तार पार्टीचे आयोजन करत आहेे.

हिंदु धर्मशास्त्रावरील आघात परतवून लावा ! - डॉ. शिव नारायण सेन, सचिव, शास्त्र धर्म प्रचार सभा, कोलकाता, बंगाल.

      सध्या भारतात आपल्या धर्मशास्त्रावर प्रतिदिन टीका करण्यात येत आहे. हिंदूंना भ्रमिष्ट करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत. या आघातांचे बौद्धीक स्तरावर खंडण करून ते परतवून लावणे आवश्यक आहे. आपले वेद आणि शास्त्र स्वयं ईश्‍वराची वाणी आहेत. आपल्या शास्त्रात प्रत्येक गोष्ट पूर्णत: सत्य आहे. शास्त्रात जे लिहून ठेवले आहे, ती काळ्या दगडावरची रेष आहे. यात कोट्यवधी वर्षांच्या काळात कोणताही पालट झालेला नाही. आमचे शास्त्र काळाच्या कसोटीवर अचल राहिले आहे. असे असतांना आम्हाला आमच्याच ज्ञानाचा, शास्त्राचा विसर पडला आहे. त्यामुळे आमचे धन, ज्ञान आणि कीर्ती विदेशी लूटून नेत आहेत. याच ज्ञानाच्या आधारे विदेशी पेटंटवर (स्वामित्वावर) दावा करत आहेत. ईश्‍वराने दिलेला हा अमूल्य ठेवा जतन करणे, हे आपले कर्तव्य आहे. जगातील कोणत्याही समस्यांचे उत्तर आपल्या धर्मशास्त्रात आहे. शास्त्र, गुरु आणि आत्मा स्वत: भगवान श्रीकृष्ण आहे. तो तुमच्या हृदयात विराजमान आहे; पण मायेच्या आवरणामुळे त्याला आपण आपल्या हृदयात पाहू शकत नाही. त्यासाठी आपल्यातील अहंकार नष्ट करणे आणि भगवंताला शरण जाणे आवश्यक आहेे.

हिंदू अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्र चालवू शकणार्‍या भावी पिढीची ओळख !

डावीकडून कु. कन्हैया श्रीवास्तव, कु. जयेश कापशीकर,
कु. राधा शेळके, कु, वैभवी झरकर, कु. अंबिका हंबर्डे, कु. अमृता मुद्गल
       विद्याधिराज सभागृह, रामनाथी, २३ जून (वार्ता.) - पुढील सहस्रो वर्षे अखिल मानवजातीला मार्गदर्शक असलेले हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी ईश्‍वरी नियोजनानुसार उच्चलोकातून बालकांनी जन्म घेतला आहे. अशा बालकांमध्ये उपजतच राष्ट्र आणि धर्म यांप्रती प्रेम, ईश्‍वराप्रती अनन्यभाव, तसेच साधना करण्याची तीव्र तळमळ असे गुण आहेत. सनातनला आजपर्यंत अशा ५०० बालकांची ओळख झाली असून यांपैकी ६ दैवी (सात्त्विक) बालकांची ओळख येथे चालू असलेल्या पंचम अखिल भारतीय अधिवेशनात उपस्थित धर्माभिमान्यांना करून देण्यात आली.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करणे, हीच धर्मवीर संभाजी महाराज यांना खरी मानवंदना ! - सुमित सागवेकर

विक्रोळी येथे श्री शिवकार्य प्रतिष्ठानची 
छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना !
      विक्रोळी, २३ जून (वार्ता.) - आज आपले राष्ट्र आणि धर्म संकटात आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करणे, हीच धर्मवीर संभाजी महाराज यांना खरी मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले. १७ जून या दिवशी येथील श्री शिवकार्य प्रतिष्ठानच्या वतीन धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात धर्मवीर शंभूराजांचे चरित्र या विषयावर व्याख्यान देतांना श्री. सागवेकर बोलत होते. या वेळी श्री. सुमित सागवेकर यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांचे बालपण, त्यांचा पराक्रम-शौर्य, त्यांच्यातील दैवी गुण, त्यावेळचा काल आणि सध्यस्थिती यांविषयी माहिती दिली. या व्याख्यानाला ८० हून अधिक शंभूप्रेमी उपस्थित होते.

मथुरा येथे ४० मृत गायी सापडल्याने ट्रक जाळला !

       मथुरा - ट्रकमध्ये ४० मृत आणि ५ जिवंत गायी सापडल्यावर संतप्त झालेल्या लोकांनी ट्रक जाळल्याची घटना २२ जूनला येथील चौमुहान चौकात घडली. या ट्रकचा चालक आणि त्याचा सहकारी दोघेही फरार आहे.

हिंदु युवतीची धर्मांध प्रियकराकडून हत्या, कुटुंबियांच्या तक्रारीवरून धर्मांधाला अटक

हिंदू बांधवांनो, लव्ह जिहादचे प्रकार घडू नयेत यासाठी स्वत: धर्मशिक्षण घेऊन आपल्या पाल्यांनाही धर्मशिक्षण द्या ! 
हिंदूंनो, तुमच्या घरातील मुलींची धर्मांधांशी सलगी वाढत नाही ना, याकडे लक्ष द्या ! 
     मुंबई, २३ जून (वार्ता.) - वाशीनाका, चेंबूर येथे राहणार्‍या इरफान तथा समीर मोहम्मद उमर वारसी (वय २५ वर्षे) या धर्मांधाने एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. त्यानंतर कुटुंबियांनी तिचा विवाह हिंदु युवकाशी निश्‍चित केल्यानंतर झालेल्या वादातून इरफान याने तिला कात्रीने भोसकले. यामध्ये तिचा मृत्यू झाला. याविषयी तिच्या कुटुंबियांनी इरफान याच्या विरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीवरून पोलिसांनी इरफान याला अटक करून त्याच्या विरोधात भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

     १९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. या वेळी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.
१. आश्रमात येताच आश्रमातील चैतन्य आणि सात्त्विकता यांची अनुभूती आली. कोणतेही तीर्थक्षेत्र आणि शक्तिपीठ येथे गेल्यास जसा अनुभव होतो, तसा मला आश्रमात अनुभव आला.

सनातनच्या पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते अधिवक्त्या (सौ.) चेतना शर्मा यांचा सत्कार !

अधिवक्त्या (सौ.) चेतना शर्मा (डावीकडे) यांचा 
सत्कार करतांना पू. (कु.) अनुराधा वाडेकर
    अधिवक्त्या (सौ.) चेतना शर्मा यांनी उत्तरप्रदेशात लव्ह जिहादच्या विरोधात हिंदु तरुणींना सक्षम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे, तसेच बालवयातच स्वसंरक्षण देण्याची सिद्धता सौ. शर्मा यांनी केली आहे. त्यांच्या या धर्मकार्यासाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रसारसेविका पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा आणि पुष्प देऊन सत्कार केला. शर्मा यांच्या तेजस्वी वाणीमुळे सभागृहात उत्साहवर्धक वातावरण होते. सौ. शर्मा यांनी संस्कृत श्‍लोकांच्या आधारे हिंदूंच्या धर्मकर्तव्याचे महत्त्व विशद केले.


पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा चतुर्थ दिवशीचा वृत्तांत

तळमळीने धर्मकार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचा परिचय ! 
समोरील रांगेत डावीकडून श्री. अमित बर्मन, कु. किलुंग नरियामें, 
कु. आलिया नरियामें, पाठीमागच्या रांगेत डावीकडून श्री. नीरज साहा, 
श्री. बरुण साहा, श्री. राजू पी.टी., त्रिलोकज्योती श्रेष्ठ
      हिंदुत्वासाठी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून कार्यरत असलेल्या पुढील हिंदुत्वनिष्ठांचा परिचय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात उपस्थितांना करून देण्यात आला.
१. श्री. अमित बर्मन, आसाम : श्री. अमित बर्मन (वय १७ वर्षे) हे आसाम येथील असून त्यांना हिंदु धर्माप्रती पुष्कळ आस्था आणि धर्मरक्षणाची तळमळ आहे. ते गेल्या ६ मासांपासून (महिन्यांपासून) नामजपादी साधना करत आहेत. ते ज्या मंदिरांत जातात, त्या ठिकाणी असणारी मुले नेहमी अनावश्यक बोलण्यात वेळ वाया घालवत होती; मात्र श्री. अमित यांना नामजपाविषयी कळल्यापासून ते मंदिरातील मुलांकडूनही नामजप करवून घेतात.

आम आदमी पक्षाच्या आमदारावर महिलेची छेडछाड केल्याचा आरोप

      नवी देहली - आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांच्याकडे एक महिला पाण्याविषयीची तक्रार घेऊन गेली होती. त्या वेळी छेडछाड करण्यात आली, अशी तक्रार तिने पोलिसांकडे केली आहे. मी तक्रार घेऊन गेले होते; मात्र आमदाराने मला धक्काबुक्की करून ते वाईट पद्धतीने बोलले., असे आमदारांनी म्हटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (सनातन संस्था हिंदु धर्मावरील कलंक म्हणणारे आपचे नेते आशिष खेतान यांच्या पक्षाचा हा गौरव आहे का ? - संपादक)

पंचम अखिल भारतीय अधिवेशनात २४ जून या दिवशी चर्चिले जाणारे विषय !

सकाळी ९.४५ ते ११.००
 * उद्बोधन सत्र : हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मशिक्षण आणि धर्मजागृती 
१. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मप्रेमी घडवण्याचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग 
२. हिंदु धर्मजागृती सभांचे आगामी काळातील धोरण आणि धर्मजागृती सभा घेतांना येणार्‍या समस्या अन् त्यांचे निवारण 
३. धर्मजागृती सभेसंदर्भात अनुभवकथन 
दुपारी ११.०० ते १२.३०
* उद्बोधन सत्र : संघटितपणे कार्य करतांना पाळायवाची आचारसंहिता आणि धर्मरक्षण 
१. सार्वजनिक उत्सव आदर्शरित्या साजरे करण्यासाठी करावयाचे प्रयत्न 
२. सामाजिक दुष्प्रवृत्तीच्या विरोधात केली जाणारी आंदोलने 
३. हिंदुत्वनिष्ठांची आचारसंहिता कशी असावी ? 

हिंदु राष्ट्राची स्थापना उद्बोधन सत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन

संत आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी मैदानात उतरा ! 
- साध्वी तरुणा बहेन, धर्मप्रचारक, पूज्यपाद संतश्री आसारामजी आश्रम
साध्वी तरुणा बहेन
     संतांची मांदियाळी हे भारताचे वैशिष्ट्य आणि गौरवाचे स्थान आहे; मात्र आज जीवनाच्या उन्नतीचा मार्ग दाखवणार्‍या संतांवर हिंदूंकडूनच खोटे आरोप केले जात आहेत. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर खोटे आरोप होऊन ३ वर्षे झाली. आतापर्यंत त्यांच्यावरील एकही आरोप सिद्ध झाला नाही, तरीही त्यांना कोणतीही सवलत दिली गेली नाही. निरपराध माणसांची हत्या करणार्‍या सलमान खानच्या खटल्याची जलद सुनावणी होते; मात्र संतांना खोट्या आरोपांखाली कारागृहात डांबून ठेवले जाते, हे दुर्दैवी आहे. चित्रपटांमधनूही हिंदु संतांना दोषी ठरवले जाते. संत आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी आपण सिद्ध झाले पाहिजे. महाभारतकाळात एकच धृतराष्ट्र होता; मात्र आजच्या समाजात अनेक धृतराष्ट्र असून समाज आंधळा होत चालला आहे. न्याययंत्रणेत अनेक त्रुटी असल्यामुळे आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा नाही; म्हणूनच संत आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी मैदानात उतरण्याची वेळ आली आहे.

हिंदूंनी प्रत्येक युगात अधर्म वाढल्यानंतर त्याच्या नाशासाठी पुनर्जन्माची सिद्धता ठेवावी ! - अधिवक्ता (सौ.) चेतना शर्मा, उत्तरप्रदेश

अधिवक्ता (सौ.) चेतना शर्मा
       विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - हिंदु धर्मावरील धर्मांध जिहाद्यांचे संकट पहाता, त्यांचा सामना करण्यासाठी आपण बचावात्मक पवित्रा सोडून दिला पाहिजे. हिंदु राष्ट्राची स्थापना सहजासहजी होणार नाही. त्यासाठी हिंदूंनी तन, मन आणि धन अशा सर्व प्रकारच्या त्यागाची सिद्धता ठेवली पाहिजे. आज देशातील सर्वांत मोठी संघटना धर्मांधांसाठी मेजवानी देऊ पहात असतांना हिंदूंनी कोणत्याही राज्यकर्त्यावर विसंबून राहून चालणार नाही, हे शिकले पाहिजे. हिंदु धर्माच्या विश्‍वासघातक्यांना ओळखून त्यांना या कार्यापासून दूर ठेवले पाहिजे. हिंदूंनी प्रत्येक युगात अधर्म वाढल्यानंतर त्याच्या नाशासाठी पुनर्जन्माची सिद्धता ठेवावी, असे खणखणीत आवाहन मेरठ (उत्तरप्रदेश) येथील हिंदू स्वाभिमान संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा अधिवक्त्या (सौ.) चेतना शर्मा यांनी केले.

आंदोलनांच्या प्रसारासाठी प्रसारसाहित्य आणि सामाजिक प्रसारमाध्यमे यांचा परिणामकारक वापर करा !

हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनात सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री यांनी केलेले मार्गदर्शन
कु. कृतिका खत्री
१. प्रसारसाहित्य आणि सामाजिक प्रसारमाध्यमे यांचा 
प्रभावी वापर करण्याची आवश्यकता
१ अ. जगभरात सामाजिक प्रसारमाध्यमांचा वाढता वापर : जगभरात सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांचा (सोशल मिडीयाचा) वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरात १६५ कोटी जण फेसबूक, ३२ कोटी लोक ट्वीटर आणि १०० कोटी नागरिक व्हॉटस्अप या माध्यमांचा वापर करतात. भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या आसपास असून यापैकी १४ कोटी लोक फेसबूक, अडीच कोटी लोक ट्विटर आणि १० कोटी लोक व्हॉटस्अप वापरतात. भारतात इंटरनेटचा वापर वाढत असून सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापरही वाढण्याची टक्केवारी जगभरातून भारतात सर्वाधिक आहे, असे अनेक जागतिक सर्व्हेक्षणे सांगतात. या ठिकाणी जमलेले आपण सर्वजण धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत आहोत. इतक्या मोठ्या प्रमाणात जर जनता या माध्यमांत कार्यरत आहे, तर आपल्यालाही या माध्यमांचा वापर धर्मप्रसारासाठी प्रभावीपणे करण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात आले असेल.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी योगदान देऊन इतिहासात हिंदु राष्ट्र-संघटक म्हणून अजरामर व्हा !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
१. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची फलनिष्पत्ती 
   हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी आयोजित अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पहिल्या भागाचा २३.६.२०१६ या दिवशी समारोप झाला. आपल्यापैकी अनेकांनी हे चार दिवसीय अधिवेशन अनुभवले आहे. या चार दिवसांत आपल्याला भारतभरातील हिंदूंची दुःस्थिती, धर्मरक्षणाचे उपक्रम, हिंदुत्वाच्या क्षेत्रात कार्य करण्यातील अडचणी, तसेच हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य यांविषयी मौलिक मार्गदर्शन झाले. या मार्गदर्शनाचा आपल्या सर्वांना हिंदुत्वाचे आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करतांना निश्‍चितच लाभ होईल.

वानवडी (जिल्हा पुणे) येथे अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड, २ धर्मांधांवर गुन्हा प्रविष्ट

पुण्यातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था ! 
      पुणे, २३ जून - येथील वानवडी परिसरातील साळुंके विहार रस्त्यावरील जश्‍न हॉटेल यामध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरोडा प्रतिबंधक पथक कोंढवा आणि वानवडी पोलीस यांनी तेथे २० जून या दिवशी पहाटे ४ वाजता धाड टाकली. त्यानुसार हुक्का पार्लरचा मालक मोहम्मद सालेह अब्दुल कादीर शुक्री आणि व्यवस्थापक अशरफ उमर अहमद नाकवा यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे. (धर्मांध गुन्हेगारीत अग्रेसर ! - संपादक) पोलिसांनी तंबाखू असलेला साहित्य ४० सहस्र रुपयांचा माल शासनाधीन केला, तसेच १७ युवक आणि ३ युवती यांना कह्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले.

महाराष्ट्रातील सर्वच तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस यांवर बंदी करावी !

पिंपरी (पुणे) येथील वैष्णवांच्या मेळाव्यात समस्त वारकर्‍यांची एकमुखी मागणी !
     पिंपरी, २३ जून - 'पंढरपूर, आळंदी, देहू या ठिकाणीच केवळ मद्य आणि मांस यांच्यावर बंदी न घालता पैठणसह महाराष्ट्रातील सर्वच तीर्थक्षेत्रांवर त्या दोहोंवर बंदी करावी', अशी मागणी समस्त वारकर्‍यांनी एका ठरावाद्वारे केली आहे. (तीर्थक्षेत्रांच्या पावित्र्य रक्षणासाठी मद्य आणि मांस यांच्यावर बंदीची मागणी करणार्‍या वारकरी संप्रदायाचे अभिनंदन ! - संपादक) येथील आचार्य अत्रे सभागृहात २० जून या दिवशी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आयोजित वैष्णवांच्या मेळाव्यात ही मागणी करण्यात आली. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासन यांनी पाठपुरावा करावा, अशीही मागणी खासदार अमर साबळे यांच्याकडे केली आहे. 
      या कार्यक्रमाला ह.भ.प चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, ह.भ.प रामेश्‍वर शास्त्री महाराज, ह.भ.प चंद्रकांत महाराज वांजळे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, संत साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्च्या गजरात हिंदु राष्ट्राच्या निर्मितीचा ठराव एकमुखाने संमत !

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्च्या घोषात ठराव
संमत करतांना हिंदुत्वनिष्ठ
     सर्वकल्याणकारी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या ध्येयाने भारतभर हिंदुत्वरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांचे कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांनी पाचव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करावे या प्रमुख ठरावासह राष्ट्र आणि धर्म हितकारी ठराव जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्च्या गजरात एकमुखाने संमत केले. या वेळी दोन हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे मांडलेले ठराव :
१. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू खोट्या आरोपांखाली गेली ३ वर्षे कारागृहात आहेत. त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी !, असा ठराव पूज्यपाद संतश्री आसारामजी आश्रमाच्या साध्वी तरुणा बहेन यांनी मांडला. एका मुलीने बापूंजीवर केलेले सर्व कलंक धुऊन काढून आम्ही त्यांना निर्दोष सिद्ध करू असेही त्या म्हणाल्या. 
     वरील ठरावानंतर उपस्थित हिंदुत्ववाद्यांनी राष्ट्रसंतों का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान, अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या. 
२. लष्कर-ए-हिंद संघटनेचे अधिवक्ता ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी डॉ. तावडे यांना झालेल्या अन्यायपूर्ण अटकेच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अन्वेषण विभागाने दाभोलकर हत्या प्रकरणात प्रारंभी अटक केलेल्या नागोरी आणि खंडेलवाल यांना आरोपी बनवून त्यांचीही पुन्हा चौकशी करावी. सनातनला बळीचा बकरा बनवू नये, असा ठराव मांडला. त्यालाही उपस्थितांनी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्च्या गजरात एकमुखाने मान्यता देण्यात आली.

मंदिरांतील जत्रोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी केलेल्या कार्याचे अनुभवकथन

श्री कमलेश बांदेकर
पोलीस आणि राजकारण्यांचा सहभाग असलेला गोव्यातील 
जुगार लवकरच बंद होईल ! - कमलेश बांदेकर, राज्यप्रमुख, 
भारत स्वाभिमान, गोवा
     गोव्यातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात धामिर्र्क उत्सव साजरे केले जातात; मात्र दुर्दैवाने या उत्सवांमध्ये रात्रीच्या वेळी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जुगार चालतो. यात येथील सहस्रो लोक सहभागी होतात. मंदिर समितीतील सदस्यच त्यांच्या उत्सवांमध्ये जुगार लावतात. यात कोट्यवधी रुपयांच्या काळ्या पैशांची उलाढाल होते. मंदिर समितीच्या लोकांसह स्थानिक राजकारणी, पोलीस यांचे संगनमत आहे. त्यामुळे हा प्रकार अनेक दिवसांपासून चालू आहे. जुगाराचे जेवढे टेबल लागतात, त्याप्रमाणे पोलिसांचे हप्ते ठरलेले असतात. एवढेच नाही, तर गुन्हे अन्वेषण विभागालाही (सीआयडीला) यातील वाटा मिळतो. त्यामुळे तेही वरच्या स्तरावर त्याचा वास्तविक अहवाल पाठवत नाहीत.

गोपीभाव विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत गोपीभाव वाढवण्यासाठी उपयुक्त मजकूर या अंकात वाचा !
प्रसिद्धी दिनांक : २६ जून २०१६ 
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
 विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ जून या दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

ज्या क्रांतीकारकांनी स्वतःच्या प्राणांचे मोल देऊन ही भूमी स्वतंत्र केली, त्या भूमीवर मद्यधुंद होऊन नाचतांना या दारूड्यांना त्यांची आठवणसुद्धा होऊ नये, हे या हिंदु राष्ट्राचे दुर्दैव ! (साप्ताहिक राष्ट्र्रपर्व, १७.१.२०११)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी अधिवेशन आणि सनातनचा आश्रम येथील सुनियोजन अनुभवल्यावर व्यक्त केलेले मनोगत अन् त्यांना आलेल्या अनुभूती

       १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत रामनाथी, फोंडा, गोवा येथे चालू असलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात भारतातील २२ राज्यांसह नेपाळ आणि श्रीलंका येथील १६१ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. हिंदूंचे अभेद्य संघटन निर्माण करण्याच्या दृष्टीने आयोजित केलेले हे अधिवेशन गोवंश हत्या, धर्मांतर आणि लव्ह जिहाद आदी आघातांच्या संदर्भात उपस्थितांना कृतीशील होण्यास उद्युक्त करत आहे.
       या अधिवेशनात सहभागी झालेल्या मान्यवरांनी येथील नियोजन, व्यवस्थापन आणि उत्साही अन् चैतन्यमय वातावरण यांचा त्यांच्यावर कोणता परिणाम होत आहे, याविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहूया.
१. अधिवेशनाला येण्यापूर्वी
१ अ. प्रकृती स्वस्थ होणे : गेल्या २० - २५ दिवसांपासून मी अतिशय रुग्णाईत होतो. प्रकृती सुधारल्यावर मी अधिवेशनाला जाण्याचे ठरवले आणि अधिवेशनात जाण्याच्या इच्छेमुळे मी लवकर ठीकही झालो. अधिवेशनात मी शिकण्यासाठी येत आहे.
- श्री. गोविंदराज नायडू, संयोजक, हिंदू युवा मंच, दुर्ग, छत्तीसगड.

५४ शाळा शासनाची मान्यता नसतांना अवैधरित्या चालू

     नागपूर - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत शिक्षण हक्क कायद्याची कार्यवाही झाली आहे. असे असतांना कायद्यातील कलम १८ नुसार ५४ शाळा शासनाची मान्यता नसतांना अवैधरित्या चालू असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपक लोखंडे यांच्या निदर्शनास आले आहे. येथील शहर भागात २०, तर ग्रामीण भागात ३४ अवैध शाळा चालू असून त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शहरी भागांत नक्षलवाद्यांच्या ५५ फ्रंटल संघटना कार्यरत

सरकार नक्षलवाद्यांच्या या संघटनांचा सामना कशा प्रकारे करणार आहे ? तसेच सनातनच्या विरोधात आकांडतांडव करणारे पुरोगामी या संघटनांच्या विरोधात का आवाज उठवत नाहीत ? 
     नागपूर - 'शहरी भागात नक्षलवाद्यांच्या जवळपास ५५ फ्रंटल संघटना कार्यरत असल्याचे उघड झाले असून मुंबई, पुणे यांसह विविध महानगरांत त्यांचा छुपा प्रसार चालू आहे. नक्षलवाद केवळ गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांच्या दुर्गम आणि घनदाट जंगल भागांपुरता मर्यादित राहिला नाही. नक्षलवाद्यांंनी महानगरातही आपले जाळे विस्तारले आहे', अशी धक्कादायक माहिती नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. शिवाजी बोडखे यांनी दिली. नक्षलविरोधी अभियान आणि अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने सुराबर्डी येथे आयोजित केलेल्या नक्षलविरोधी प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 
श्री. बोडखे पुढे म्हणाले की, 
१. आतापर्यंत जेथे दळणवळणाची कमतरता आहे, प्रशिक्षित तरुण वर्ग नाही, विकास आणि शिक्षणाच्या सुविधा नाहीत, अशा भागांत नक्षलवादी स्थानिकांची दिशाभूल करायचे; मात्र त्यांनी आता मोठ्या शहरांकडे मोर्चा वळवला आहे. 

सनातन संस्थेला आतंकवादी ठरवू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांचा वैचारिक आतंकवाद !

  • पीतपत्रकारिता म्हणजे कोणतीही शहानिशा न करता सनसनाटी निर्माण करण्यासाठी, वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी प्रसारित केलेली खोटी आणि निराधार वृत्ते होय ! 
  • एखाद्या सराईत रहस्यकथाकारालाही लाजवेल, अशा कपोलकल्पित कथा रचणार्‍या प्रसारमाध्यमांची पीतपत्रकारिता !
       १० जून या दिवशी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून त्यांच्याविषयी आणि सनातनविषयी धादांत खोटी माहिती देणारी अनेक वृत्तांची मालिकाच चालू झाली. यामुळे सनातन संस्था, संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांची मोठ्या प्रमाणात अपकीर्ती झाली. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची सत्य बाजू लोकांच्या समोर येण्यासाठी अशा वृत्तांचे खंडण करणारे हे सदर क्रमशः चालू करत आहोत.
डॉ. वीरेंद्र तावडे यांना दंगलखोर ठरवण्याचा 
प्रयत्न करणारे सनातनद्वेष्टे दैनिक सकाळ !
१६ जून या दिवशी पृष्ठ १ वर मडगाव स्फोट : मिरज दंगलीत वीरेंद्रसिंग तावडेचा हात या मथळ्याखालील वृत्त दैनिक सकाळच्या सातारा आवृत्तीत प्रसिद्ध करण्यात आले. यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याचा मडगाव येथे २००९ मध्ये झालेला बॉम्बस्फोट आणि मिरज येथील दंगलीमागेही हात होता, असे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) तपासात समजले आहे, असे प्रसिद्ध करण्यात आले होते.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल ! 
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे २१० वा दिवस ! 
२२.६.२०१६ 
रात्री ९ वाजता आश्रमासमोरील रस्त्यावरून ३ मुले सनातन बॉम्बअसे ओरडत गेली.

फलक प्रसिद्धीकरता

दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचे अन्वेषण यंत्रणांवर कडक शब्दांत ताशेरे ! 
     न्यायालयाने सुनावणीच्या वेळी अन्वेषण यंत्रणांना फटकारतांना, मृतांचे नातेवाईक ज्यांच्याकडे बोट दाखवतील, त्यांचेच तुम्ही अन्वेषण करणार का ? असे सुनावले. तसेच प्रसारमाध्यमांकडे जाऊन माहिती देऊ नका, असे दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनाही सुनावले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Kattarpanthiyonke dhamakane ke karan Gaziyabad (Uttar Pradesh) ke Kaila Bhatta se 300 Hindu parivaronka palayan ! 
Dusara Kashmir banata Uttar Pradesh ! 
जागो ! : कट्टरपंथियोंके धमकाने के कारण गाझियाबाद के कैला भट्टासे ३०० हिंदु परिवारोंका पलायन ! 
 दुसरा काश्मीर बनता उत्तरप्रदेश !

प.पू. डॉ. आठवले यांचे बुद्धीगम्य श्रेष्ठत्व !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
       प.पू. डॉ. आठवले प्रसिद्धीपराङ्मुख असल्याने मागील वर्षापर्यंत त्यांनी कुठल्याही अंगाने त्यांचे श्रेष्ठत्व जगजाहीर करण्यास साधकांना अनुमती दिली नाही. साधकांना प.पू. डॉक्टर यांच्यासंदर्भात शेकडो अनुभूती येऊनही प.पू. डॉक्टर त्याचे सर्व कर्तेपण श्रीकृष्णाला देऊन त्यापासून अलिप्त रहात. देवच साधकांना अनुभूती देतो, अशा प्रकारचे काहीतरी साधकांना सांगत. मागील वर्षी मात्र महर्षींची आज्ञा म्हणून त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यास साधकांना अनुमती दिली आणि साधकांनी महर्षींनी सांगितलेले प.पू. डॉक्टरांचे श्रेष्ठत्व जगाला सनातन प्रभातच्या माध्यमातून सांगितले. यात कुठेही प.पू. डॉक्टरांचा स्वतःचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. महर्षि सांगतील त्याप्रमाणे त्यांचे आज्ञापालन करावे, इतकेच होते, तरीही काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांना आणि अपेक्षेप्रमाणे पुरो(अधो)गाम्यांना पोटशूळ उठलाच ! काहींनी तर दूरचित्रवाहिन्यांवरून त्यांना भेटण्याची आणि त्यांचे चमत्कार पहाण्याची (जे प.पू. डॉक्टर कधीही करत नाहीत) आग्रही इच्छा व्यक्त केली.

साधकाने साधना करून स्वतः सूर्याप्रमाणे, म्हणजेच स्वयंप्रकाशी व्हायला हवे !

      साधकांमधे साधनेमुळे कधी कधी चांगला पालट होतांना दिसतो, उदा. तोंडवळा तेजस्वी दिसणे, उत्साही आणि आनंदी दिसणे, तर कधी तोंडवळ्यावरील तेज न्यून होणे, निरूत्साह दिसणे इत्यादी. सूर्यप्रकाशामधे ढग आल्यास त्याचा परिणाम पृथ्वीवर पडणार्‍या प्रकाशात होतो; परंतु त्याचा सूर्यावर परिणाम होत नाही. साधकाच्या आत्मसूर्यावर स्वभावदोष, अहं अथवा आवरणाचे ढग जमा झाल्यास किंवा बाजूला झाल्यास त्याचा परिणाम आपोआपच साधकावर होतो. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे साधना करून स्वतः सूर्याप्रमाणे, म्हणजेच स्वयंप्रकाशी व्हायला हवे. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (अंघोळ करतांना मिळालेले ज्ञान) (२७.८.२०१५)

ज्ञान मिळवल्याने नव्हे, तर सत्सेवा केल्याने प्रगती होण्याची कारणे

श्री. राम होनप
      एकदा प.पू. डॉक्टरांनी मला सांगितले, ज्ञान मिळवल्याने प्रगती होत नाही, तर सत्सेवेतून प्रगती होते. हे ऐकून माझ्या मनात प्रश्‍न निर्माण झाले, ज्ञान मिळवणे, ही सेवा का नाही ? त्याने प्रगती का होत नाही ? पुढील सूत्रांवरून मला माझ्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली.
१. पूर्वी प.पू. डॉक्टरांनी केलेल्या प्रवचनात जिज्ञासूंना सांगितले, तुम्ही येथे काहीतरी मिळवायला आला आहात. साधनेत तन, मन आणि धन यांच्या त्यागाने प्रगती होते. ज्यांनी या प्रवचनासाठी कापडी फलक बांधणे, सभागृह स्वच्छ करणे आदी सेवा केल्या आहेत, त्यांची साधना होत आहे. हे वाक्य आठवल्यावर लक्षात आले, ज्ञान मिळवणे म्हणजे ईश्‍वराकडून काहीतरी मिळवण्याची क्रिया झाली. यातून माझे तन, मन आणि धन यांचा त्याग होत नाही. त्यामुळे ज्ञान मिळवण्यातून माझी प्रगती होणार नाही.

तत्त्वनिष्ठ, प्रेमभाव असलेली आणि लाघवी स्वभावाची ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिवमोग्गा, कर्नाटक येथील कु. ऐश्‍वर्या प्रकाश रायकर (वय १६ वर्षे) !

कु. ऐश्‍वर्या रायकर
१. गुणवैशिष्ट्ये 
१ अ. सर्वांकडे जाणे आणि शेजार्‍यांची लाडकी असणे : कु. ऐश्‍वर्या लहानपणापासून लाघवी स्वभावाची आहे. ती लहान असतांना सर्वांकडे जात असे. ती शेजार्‍यांची अतिशय लाडकी होती आणि शेजारच्या कुणाच्याही घरी जेवायला, झोपायला आणि खेळायला जात असे.
१ आ. ताप असतांना रात्रभर नामजप करणे : तीन वर्षांची असतांना तिला पुष्कळ ताप आला होता. तेव्हा ती रात्रभर दत्ताचा नामजप करत होती.
१ इ. वस्तूंशी बोलणे : सात वर्षांची असतांना ऐश्‍वर्या भातुकलीचा खेळ खेळत होती. तेव्हा ती स्वयंपाकघरात येऊन भांड्यांशी बोलू लागली - तुम्ही पुष्कळ पुण्यवंत आहात. सतत उष्ण झाल्यामुळे तुम्ही थोडे जुने दिसत असलात, तरी तुम्ही प्रतिदिन थंड पाण्याने स्नान करत असल्यामुळे छान दिसता.

हसतमुख, सर्वांना आपलेसे करणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील चि. आराध्य अनिकेत जोशी (वय २ वर्षे ८ मास) !

चि. आराध्य जोशी
१. कुलदेवी भुवनेश्‍वरीदेवीचे उपवास केल्यावर थोडे; 
पण स्पष्ट बोलायला शिकणे 
     चि. आराध्यने पुढे सरकणे, पालथे पडणे, हुंकार देणे, चालणे आणि धावणे या सर्व कृती टप्प्याटप्प्याने नवव्या मासापर्यंत पूर्ण केल्या; पण तो उशिरा बोलायला लागला. पूर्वी तो केवळ हातवारे करून त्याला काय हवे-नको, ते सांगत असे. तो लवकर बोलावा, यासाठी आमची कुलदेवी भुवनेश्‍वरीदेवीचे उपवास केले. त्यानंतर तो थोडे; पण स्पष्ट बोलायला शिकला.
२. सर्वांशी मिळूनमिसळून रहाणे 
     तो सर्वांमध्ये मिसळतो आणि जेथे जाईल तेथे सर्वांना आपलेसे करून घेतो.

स्वतःहून इतरांना तत्परतेने साहाय्य करणारा रामनाथी आश्रमातील बालसाधक चि. विश्‍व कृष्णा आय्या (वय ९ वर्षे) !

चि. विश्‍व आय्या
      रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील बालसाधक चि. विश्‍व कृष्णा आय्या हा उन्हाळ्याच्या सुटीत त्याच्या वडिलांसमवेत रहाण्यासाठी देवद येथील सनातन आश्रमात आला होता. एके दिवशी प्रसाद (अल्पाहार) ग्रहण केल्यानंतर मी भोजनगृहातील बैठका उचलत होतो. दोन बैठका उचलल्या, तेवढ्यात चि. विश्‍वने तत्परतेने येऊन तिसरी बैठक उचलायला आरंभ केला. माझ्या मनात विचार आला, मी विश्‍वच्या ठिकाणी असतो, तर मी कुणीतरी उचलतोय ना ? चला जाऊया, असा विचार करून तेथून गेलो असतो. 
     कुणीही न सांगता स्वतःहून इतरांना तत्परतेने साहाय्य करणे, ही वृत्ती झाल्याचे पाहून मला विश्‍वचे कौतुक वाटले आणि तो गुण शिकता आला. 
- श्री. नंदू मुळ्ये, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.५.२०१६)

जमा, व्यय (खर्च) आणि काटकसर यांविषयी प.पू. पांडे महाराज यांनी केलेले मार्गदर्शन !

प.पू. पांडे महाराज
१. प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेली सूत्रे 
१ अ. जमा : प्रत्येक कर्म अनुसंधानित राहून करून चैतन्य वर्धमान करणे. (चैतन्य वाढवणे)
१ आ. व्यय (खर्च) : होणार्‍या प्रत्येक क्रियेसाठी व्यय होणारे चैतन्य. त्यामुळे आपल्याला थकवा येतो. आपल्याला नैराश्य येऊन आपल्यातील काळी शक्ती वाढते. त्यासाठी आपण असा व्यय (खर्च) करायचा की, त्यामुळे जमाच होईल.
१ इ. काटकसर : व्यय (खर्च) अल्प करून जमा अधिक करणे.
२. प.पू. पांडे महाराजांनी सांगितलेल्या वरील 
सूत्रांविषयी साधकाकडून झालेले चिंतन 
२ अ. जमा : कर्म + अनुसंधान 
     जमा म्हणजे प्रत्येक कर्म अनुसंधानित राहून चैतन्य वर्धमान करणे. चैतन्य जमा करणे, म्हणजे धनवान होणे. ही खरी श्रीमंती ! श्रीमंताला जसे कुणी फसवत नाही. तो ऐटीत रहातो, तसे चैतन्याने श्रीमंत असलेल्या साधकाला अनिष्ट शक्ती त्रास देऊ शकत नाही. त्याला थकवा, निराशा आणि नकारात्मकता येत नाही. 
    याउलट गरीबाला जसे कुणी फसवते, लुबाडते किंवा त्रास देते, तसे चैतन्याने गरीब असलेल्या व्यक्तीला वाईट शक्ती त्रास देतात. त्याला थकवा, नैराश्य आणि नकारात्मकता यांसारखे त्रास होतात. 
      भक्त प्रल्हाद हा भगवंताशी सतत अनुसंधानित राहून चैतन्य वर्धमान करत राहिल्याने त्याला कुणीही त्रास देऊ शकला नाही किंवा वडिलांचा साधनेला विरोध होऊनही तो नैराश्यात गेला नाही.

ओढ निर्माण व्हावी श्रीगुरुचरणांची !

सौ. सावित्री इचलकरंजीकर
देवाचे रूप आठवावे ।
मनी त्यास वसवावे ॥ १ ॥

नित्य रहावे त्याच्या अनुसंधानात ।
ऐसी लागावी मज गोडी हरिनामाची । 
ओढ निर्माण व्हावी श्रीगुरुचरणांची ॥ २ ॥
- सौ. सावित्री इचलकरंजीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.४.२०१६)

असह्य त्रास होत असतांनाही पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सकारात्मक असणार्‍या अन् देवाप्रती कृतज्ञ रहाणार्‍या कु. गायत्री बुट्टे !

गुरुपौर्णिमा मास २०१६
       १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

तंजावूर, तमिळनाडू येथील संत प.पू. रामभाऊस्वामी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात केलेल्या उच्छिष्ट गणपति यागाची उपस्थितांना अनुभूती !

     सनातनच्या रामनाथी आश्रमात १४ ते १७ जानेवारी २०१५ या कालावधीत पार पडलेल्या उच्छिष्ट गणपति यागाची ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी झालेल्या या यागात तंजावर, तमिळनाडू येथील संत प.पू. रामभाऊस्वामी यांनी यज्ञीय ज्वालांमध्ये अग्नीप्रवेश केल्यानंतरही साधनेमुळे अग्नी स्पर्श करत नाही, याची प्रत्यक्ष अनुभूती ध्वनीचित्र-चकतीच्या माध्यमातून उपस्थित धर्माभिमान्यांनी घेतली.रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाचे अज्ञातांकडून चित्रीकरण करण्याचा प्रयत्न

साधकांनो, ठिकठिकाणचे आश्रम, सेवाकेंद्रे आणि निवासस्थाने 
यांच्या परिसरात वावरणार्‍या अनोळखी व्यक्तींपासून सतर्क रहा आणि त्याची 
माहिती त्वरित उत्तरदायी साधकांना कळवून पुढील कायदेशीर प्रक्रिया करा !
        २३.६.२०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाचे आणि आश्रमाच्या परिसरात असलेल्या वाहनांचे तीन अज्ञातांकडून अवैधरित्या चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या तिघांमध्ये एक महिला आणि दोन पुरुष होते. या वेळी आश्रमाच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी या तिघांना चित्रीकरण करण्यास मज्जाव केला. या वेळी पोलिसांनी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्वतःची कोणतीही ओळख सांगितली नाही आणि ते निघून गेले.
सनातनच्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य जाणून 
न घेता दूरचित्रवाहिन्यांवरील सनातनविषयीच्या धादांत 
खोट्या बातम्यांवरून साधकाला टोमणे मारणारे सनातनद्वेष्टे !
        एका जिल्ह्यात सनातन संस्थेचा आश्रम आहे. २२ जून या दिवशी या आश्रमातील एक साधक परिसरातून जात असता तेथील काही सनातनद्वेषी युवकांनी एकमेकांकडे पाहून आजची ब्रेकिंग न्यूज कळली का ?, असे मोठ्या आवाजात वक्तव्य केले.

गुरुपौर्णिमेला २५ दिवस शिल्लक

       मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हिंदुत्वनिष्ठांना संदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य 
करतांना ठेवायचा साधनेचा दृष्टीकोन !
     मी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मयोगाप्रमाणे करतो. कर्मफलाकडे ज्ञानयोगानुसार साक्षीभावाने पहातो, तर भक्तीयोगाप्रमाणे सर्व ईश्‍वरेच्छेने होते, हे ज्ञात असल्यामुळे कर्मफलाचा विचार करत नाही; म्हणून मी नेहमी आनंदी असतो. हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करणार्‍या प्रत्येकाने साधनेचा हा दृष्टीकोन ठेवल्यास त्यांना या कार्यातून आनंदप्राप्ती करता येईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

१. सनातन संस्थेत अनेक संत असूनही सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. 
२. विविध संत आणि संप्रदाय यांत एक प्रमुख असतात; म्हणून त्यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते आणि त्यांच्या विषयीची माहिती स्मरणिकेत किंवा पत्रकात असते. सनातनमध्ये अनेक साधक संत झाले असल्यामुळे त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सनातन प्रभात नियतकालिकांत प्रकाशित करण्यात येतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले ॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
   आपले आध्यात्मिक ज्ञान जन्मोजन्मी आपल्या समवेत असते, उदा. महर्लोकातील जिवांची जन्मापासूनच साधना चालू असते; मात्र भौतिक ज्ञान प्रत्येक जन्मात मिळवावे लागते. - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.११.२०१४)

वाईट शक्तींमुळे त्रास होत असतांना कोणत्याही उपायांनी लाभ न झाल्यास करावयाचे उपाय

साधकांना सूचना !
      वाईट शक्तींमुळे त्रास होत असल्यास प्राणशक्तीवहन-संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय या ग्रंथात दिल्याप्रमाणे जप, मुद्रा आणि न्यास शोधून त्यानुसार उपाय करावेत. ते न जमल्यास सर्वांसाठीचे उपाय यामध्ये दिल्याप्रमाणे उपाय करावेत.
        त्रास होत असतांना विविध नामजप, मुद्रा आणि न्यास ३ - ४ वेळा शोधून तसे उपाय केले, तरी त्यांचा लाभ न झाल्यास शेवटचा उपाय म्हणून पुढीलप्रमाणे करावे.
१. शून्य, महाशून्य, ॐ किंवा निर्गुण यांपैकी एखाद्या शब्दाचा जप करावा. या वेळी हाताच्या तळव्याने त्रास होत असणारे कुंडलिनीचक्र वा अवयव याच्या ठिकाणी शरिरापासून १ - २ सें.मी. अंतरावरून न्यास करावा किंवा न्यास न करता ध्यान लावतांना करतात त्याप्रमाणे दोन्ही हातांची केवळ अंगठा आणि तर्जनी (अंगठ्याशेजारचे बोट) यांची टोके एकमेकांना चिकटवून मुद्रा करावी.
२. वरील उपायानेही लाभ न झाल्यास नमस्काराची मुद्रा करून आणि ती छातीशी टेकवून देवाला संपूर्ण शरण जाऊन भावावस्थेत रहावे किंवा आकाशाचा निळा रंग डोळ्यांसमोर आणावा. हे निर्गुण स्तरावरील उपाय आहेत. समष्टीसाठी कार्य करणारे संत आणि साधक यांना अधिकतर वाईट शक्तींच्या निर्गुण स्तरावरील आक्रमणांना तोंड द्यावे लागते. अशांना कोणत्याही उपायाने लाभ न झाल्यास या उपायांनी लाभ होईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संयमाची आवश्यकता !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
संस्कृती हा केवळ विद्वत्तापूर्ण चर्चा करण्याचा विषय नसून नित्य आपल्या मनावर नियंत्रण 
ठेवणे आणि इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवणे, हीच खरी संस्कृती ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सलमानच्या चित्रपटावर बहिष्कार घाला !

संपादकीय
     बलात्कार पीडितांची खिल्ली उडवणार्‍या सलमान खान याच्या सुलतान चित्रपटावर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकावा, असेच आवाहन करावेसे वाटते. कुस्तीचे चित्रीकरण असणार्‍या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर आपल्याला बलात्कार पीडित महिलेसारखे वाटायचे असे विधान त्याने केले. व्यावसायिक दृष्टीकोन असलेले आणि पोक्त (मॅच्युअर) विचारांचे सलमान यांचे वडील लेखक सलीम खान नेहमीच सलमानच्या चुकांविषयी क्षमा मागून त्याला सावरून घेतात आणि वाद वाढू देत नाहीत. आतापर्यंत अनेकदा हिंदूंची बाजू घेऊन त्यांनी जलात राहून माशाशी वैर धरू शकत नाही ही भूमिकाही सांभाळली आहे.

निर्वासित मुसलमानांच्या विरोधात ब्रिटन !

संपादकीय
     ब्रिटनने युरोपियन संघातून (युनियन) बाहेर पडावे कि नाही, याचा अंतिम निर्णय २४ जूनला सकाळी ११ वाजता होणार आहे. युरोपियन संघ हा युरोपातील ३७ देशांचा समुदाय आहे. युरोपियन संघातून ब्रिटनने बाहेर पडण्यासाठी ब्रिटनमधील एका मोठ्या गटाने चळवळ उभारली आहे. त्याला बे्रग्झिट (ब्रिटन आणि एक्झिट यांचे एकत्रीकरण) म्हटले गेले आहे. बहुसंख्य ब्रिटिशांना युरोपियन संघातून बाहेर पडायचे आहे; कारण त्यांना वाटत आहे की, त्या गटातून बाहेर पडल्यावर ब्रिटनमध्ये येणारे निर्वासितांचे लोंढे थांबतील. ब्रिटिशांना प्रामुख्याने सिरिया, लिबिया आदी देशांतून येत असलेलेे हे मुसलमानांचे लोंढे त्यांच्या देशात नको आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn