Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या उपक्रमांसह यापुढे सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार !

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात समान कृती कार्यक्रमाची निश्‍चिती !
डावीकडून श्री. चेतन राजहंस, श्री. अनिल धीर, बोलतांना श्री. रमेश शिंदे,
 डॉ. शिव नारायण सेन, श्री. कुरु ताई आणि अधिवक्ता चेतन मणेरीकर
     पणजी - पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींच्या अधिवेशनाचा २२ जून या दिवशी समारोप झाला असून दुसर्‍या टप्प्यात २३ जूनपासून हिंदु राष्ट्र संघटकांचे अधिवेशन चालू होणार आहे. या निमित्ताने एकत्र आलेल्या १६१ हून अधिक संघटनांच्या प्रतिनिधींनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार केला. विशेष म्हणजे राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या उपक्रमांसह यापुढे सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार अधिवेशनातील हिंदुत्वनिष्ठांनी केला. समान कृती कार्यक्रमांद्वारे निश्‍चित केलेल्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अश्‍लीलता, शाळांमधील डोनेशन, रुग्णालयांतील लुटमार, भ्रष्टाचार अशा सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांच्या विरोधातही कृती करण्यात येणार आहे, तसेच काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कोलकाता येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे सचिव डॉ. शिव नारायण सेन; अरुणाचल प्रदेशमधील श्री. कुरु ताई; भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर; बेळगाव, कर्नाटक येथील हिंदु विधीज्ञ परिषदेचे समन्वयक अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर आणि सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस उपस्थित होेते.

लाचखोरी प्रकरणी खडसेंना लोकायुक्तांकडून क्लीन चीट !

     मुंबई - एकनाथ खडसेंचे स्वीय साहाय्यक गजानन पाटील कथित लाचखोरी प्रकरणी लोकायुक्तांनी एकनाथ खडसे यांना क्लीन चीट दिली आहे. या प्रकरणात खडसेंचा हात नसल्याचा निर्णय लोकायुक्त तहलिया यांनी दिला आहे.

सनातनच्या आश्रमावर धाड टाकल्याचे वृत्त धादांत खोटे ! - सनातन संस्था

पुणे मिररच्या पत्रकाराकडून आणखी एक खोटी बातमी
     मुंबई - काही पत्रकारांनी सनातन संस्थेच्या विरोधात खोटी वृत्ते देणे आरंभले आहे, त्या अंतर्गतच पुणे मिरर या इंग्रजी दैनिकाच्या २२ जून २०१६ च्या अंकात सीबीआय आणि एस्आयटी यांनी संयुक्तिकरित्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाची झडती घेतली, असे धादांत खोटारडे वृत्त दिले आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि विशेष तपास पथक (एसआयटी) यांच्यापैकी कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने सनातनच्या रामनाथी आश्रमात कोणत्याही प्रकारे धाड मारणे सोडा, साधी चौकशीही केलेली नाही. कोणतेही पुरावे नसतांना गेली काही वर्षे सनातनची मिडिया ट्रायल अजूनही चालूच आहे. पुरोगामी म्हणवणारे घटनाबाह्य मार्गांचा वापर करत असले, तरी सनातन संस्था वैध मार्गानेच याचा निषेध आणि त्या विरोधात कृती करील. सनातन संस्थेवर तथाकथित पुरोगाम्यांनी कितीही चिखलफेक केली, तरी समाजाच्या मिररमध्ये सनातन स्वच्छच आहे, हे सनातनच्या वाढत्या कार्याच्या व्याप्तीतून लक्षात येते ! नामवंत टाइम्स ग्रुपचा घटक असलेल्या पुणे मिररमध्ये गेले काही दिवस सनातन संस्थेच्या विरोधात वृत्ते छापून येत आहेत. यामुळे टाइम्स ग्रुप अशा प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करते, असा संदेश समाजात जाऊन टाइम्स ग्रुपचीच प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे टाइम्स ग्रुपच्या संचालक-संपादकांनीही अशा पत्रकारांवर कारवाई करावी, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

श्रीलंकेतील हिंदूंचा वंशविच्छेद रोखण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी श्रीलंकेत यावे ! - श्री. सच्चिदानंदन्

श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन्
देश-विदेशातील हिंदूंच्या साहाय्याला जाण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार
पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा चौथा दिवस
     विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - लक्षावधी वर्षांपासून श्रीलंकेत हिंदूंचे वास्तव्य आहे. ब्रिटीश जेव्हा सोडून गेले, तेव्हा ती हिंदू भूमी म्हणून आम्हाला मिळाली; पण आज श्रीलंकेत मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध यांची लोकसंख्या वाढली असून पोलिसांकडून तेथील हिंदूंचे दमन केले जात आहे. निरपराध हिंदूंना गोळ्या घालून ठार केले जात आहे. श्रीलंकेत हिंदूंचा पद्धतशीरपणे वंशविच्छेद चालू असून तेथील हिंदूंच्या साहाय्यासाठी, तसेच त्यांना आधार देण्यासाठी भारत, बांगलादेश आणि नेपाळ येथील हिंदुत्वनिष्ठांनी श्रीलंकेत यावे, असे कळकळीचे आवाहन श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांनी येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात केले.
     ते पुढे म्हणाले, संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान यांचा अमूल्य ठेवा आपल्याला मिळाला आहे. तो आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचा आहे. या संस्कृतीचा प्रसार, प्रचार करण्यासाठी, तसेच आचरण करता येण्यासाठी घटनात्मक कार्यप्रणाली निर्माण व्हायला हवी. केवळ भारत, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या ठिकाणी नाही, तर जेथे जेथे हिंदू आहेत, त्या सर्वच ठिकाणी हिंदु राष्ट्र निर्माण व्हायला हवे.

(म्हणे) सनातनला आतंकवादी संघटना घोषित करा !

  • महंमद अफझल या जिहादी आतंकवाद्याचे उदात्तीकरण करणार्‍या विद्यार्थ्यांना जाहीरपणे पाठिंबा देणारे, तसेच अशा विद्यार्थ्यांवर कारवाई होऊ न देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने करणार्‍या देशद्रोही पुरोगाम्यांना देशभक्त सनातन संस्था ही आतंकवादी संघटना वाटते, यात आश्‍चर्य ते काय ?
  • तथाकथित पुरो(अधो)गाम्यांची कांगावखोर मागणी
      पुणे - सनातन संस्था ही आतंकवादी संघटना आहे. अन्य आतंकवादी संघटना आणि सनातनमध्ये कोणताही भेद नाही, असा आरोप करत सनातनला आतंकवादी संघटना घोषित करावे, अशी मागणी राष्ट्रसेवा दल या संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (कोणतीही अन्वेषण यंत्रणा अथवा न्यायव्यवस्था यांनी सनातन संस्थेला दोषी ठरवले नसतांना राष्ट्रसेवा दलाची हिंदुद्वेषी मागणी ! राष्ट्रसेवा दलाने जिहादी आतंकवादी संघटनांवर कधी बंदी घालण्याची मागणी केली आहे का ? - संपादक) येथील ससून रुग्णालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सनातनवर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रसेवा दलाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. (पुण्यातील जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्ता येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या घटनांनंतर पुरोगाम्यांनी कधी संबंधित आतंकवाद्यांच्या विरोधात असे आंदोलन केले होते का ? यावरून पुरोगाम्यांचे हिंदुद्वेष दिसून येतो ! - संपादक)

देशी गायींची संख्या आणि दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रसरकार अमेरिकेहून तंत्रज्ञान आयात करणार !

  •  देशात गोहत्या होत असतांना त्या रोखण्याऐवजी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी अमेरिकेतून तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करणारे राज्यकर्ते राष्ट्रहित कसे साधणार ?
  •  मेक इन इंडियाचा जयघोष करणार्‍यांचे हेच का भारत निर्माण ?
     नवी देहली - देशी गायींची संख्या आणि गायींच्या दुधाचे उत्पादन वाढून गोपालन अधिक लाभदायक व्हावे, यासाठी केंद्रसरकार अमेरिकेतील ए.बी.एस्. जीनस आणि सेक्सिंग टेक्नॉलॉजीज् या आस्थापानांशी बोलणी करत आहे. जगातील एकमेव असलेल्या या आस्थापनांनी दिलेल्या सल्ल्यानुसार लिंगाधारित विर्याचा वापर करून कृत्रिम रेतन केल्यास जन्मणारे वासरू हे गायच असेल, याची निश्‍चिती असते. या दोन्ही आस्थापनांकडे असलेले तंत्रज्ञान आणि उपकरणे विकत घेऊन भारतातील शासनाचे उपक्रम त्यांचे अशाच प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करू शकतील. या तंत्रज्ञानामुळे देशात प्रत्येक वर्षी ६० लक्ष जनुक विकसित (जेनेटिकली मोडीफाइड) गायींची उत्पत्ती करून त्यांच्यापासून दुग्ध व्यावसायिकांच्या लाभात वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शासकीय आकडेवारीनुसार सध्या देशात ८ कोटी ९० लाख गायी आणि म्हशी आहेत. याविषयी केंद्रीय मंत्रीमंडळ ऑगस्ट मासात प्रस्ताव पारित करणार आहे आणि या तंत्रज्ञानाची पहिली (पहिली गाय) एप्रिल २०१७ मध्ये जन्म घेईल, अशी अपेक्षा करण्यात येते. (केंद्रशासनाचे उद्दिष्ट वाखाणण्यासारखे असले, तरी गायींची संख्या न्यून होण्यामागील गोहत्या हे मुख्य कारण सर्व जनतेला आणि सरकारलाही ठाऊक आहे. त्यामुळे दुग्धव्यवसाय वाढवण्यासाठी खर्चिक उपाययोजना टाळून संपूर्ण देशात गोहत्येवर बंदी घालण्याचा पर्याय सोपा नाही का ? अन्यथा प्रत्येक वर्षी ६० लक्ष गायींचे उत्पादन करायचे आणि कोट्यवधी गायी कसायांकडे पाठवायच्या असा विपरीत प्रकार चालू होईल. - संपादक)

पंचम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनातील मान्यवरांचे उद्बोधक विचार

धर्मकार्य करतांना केवळ संख्या नाही, तर संकल्पाचा विचार 
करणे आवश्यक ! - टी.एन्. मुरारी, तेलंगण राज्यप्रमुख, शिवसेना 
      विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - तेलंगणा राज्याच्या निर्मितीमध्ये उस्मानिया विद्यापिठातील साम्यवादी विचारधारा असलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. या विद्यार्थ्यांनी भाग्यनगरच्या उस्मानिया विद्यापिठामध्ये बीफ पार्टी (गोमांस मेजवानी) चे आयोजन केले होते. या मेजवानीला ओवैसी यांच्या एम्आयएम् या पक्षाचाही पाठिंबा होता. या कार्यक्रमाच्या विरोधात केवळ हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना समोर आली. कोणत्याही परिस्थितीत ही मेजवानी होऊ देणार नाही, याचा आम्ही निर्धार केला. या कार्यक्रमाच्या विरोधात इतर संघटनांनाही जागृत केले. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी या कार्यक्रमाला अनुमती नाकारली. त्यानंतर ते उच्च न्यायालयात गेल्यावर तेथेही त्यांना अपयश आले. असे असतांनाही या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम घेण्याचे ठरवले. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनीही या विद्यापिठामध्ये श्री सरस्वतीपूजन आणि श्री गोपूजन करण्याचे ठरवले. त्यानंतर इतरही हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग वाढला. त्यासंदर्भात शहरात भित्तीपत्रके लावली. त्यानंतर शासनाने १६ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अटक केली. या विरोधानंतरही आम्ही १० डिसेंबर या दिवशी विद्यापिठात घुसलो आणि श्री सरस्वतीदेवीचे आणि गोमातेचे पूजन केले. त्यामुळे धर्मकार्य करतांना केवळ संख्या नाही, तर संकल्पाचा विचार करणे आवश्यक आहे. बीफ पार्टीचे आयोजन करून धर्मनिरपेक्ष शक्तींना शहरात दंगल घडवून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लाभ घ्यायचा होता.

गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी रा.स्व. संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाकडून पाकसहित १४० देशांच्या राजदूतांसाठी इफ्तार पार्टी !

     नवी देहली - २ जुलैला सायंकाळी संसद भवन परिसरात होणार्‍या आंतरराष्ट्रीय इफ्तार पार्टीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असणार्‍या मुस्लिम राष्ट्रीय मंचने पाकसहित १४० देशांच्या राजदूतांना आमंत्रित केले आहे. या पार्टीला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, तसेच केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री उपस्थित रहाणार आहेत. मंचचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार म्हणाले की, या आयोजनाला राजकीय दृष्टीने पाहू नये, तर जगाला हे दाखवायची आवश्यकता आहे की, भारतात सर्व धर्मांच्या लोकांना समान महत्त्व दिले जाते. (भारतातील अनेक राज्यांत हिंदूंवर जिहाद्यांकडून आक्रमणे केली जातात, लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु तरुणींना फसवले जाते, ईशान्य भारतासह अनेक राज्यांत ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंचे धर्मांतर केले जाते, हे समान महत्त्व समजायचे का ? - संपादक)

काश्मीरमधील हिंदूंच्या पुनर्वसनासाठी कृतीशील होण्याचा भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

  • साडेचार लक्ष हिंदूंच्या स्वाक्षर्‍यांचा निर्धार
  • ८० सभा, लक्षावधी हस्तपत्रके यांद्वारे जागृती
  • ३६५ ग्रामपंचायतींचे आणि ५० बार कौन्सिल ठराव करणार
      विद्याधिराज सभागृह, रामनाथी (वार्ता.) - काश्मीरमधून १९९० मध्ये विस्थापित झालेल्या हिंदूंच्या पुनर्वसनासाठी देशभरात जागृती करून २७ डिसेंबर २०१६ या दिवशी संपूर्ण देशात आंदोलन करण्याचा निर्धार अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात २१ जून या दिवशीच्या गटचर्चांमध्ये करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत विस्थापित काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन करायचेच, या निर्धाराने विविध संघटनांनी त्यांच्या परीने अधिकाधिक प्रयत्न करण्याची मनीषा हिंदु राष्ट्राच्या जयघोषात या वेळी बोलून दाखवली. या गटचर्चेचा आढावा मांडतांना पनून काश्मीर या संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक राहुल कौल यांनी वर्षभरातील कृतींची सूची मांडली, तसेच या संदर्भातील विविध ठराव हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी मांडले आणि जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।च्या गजरात त्याला अनुमोदन देण्यात आले.

पावसाळ्यामध्ये निरोगी रहाण्यासाठी काय करावे ?

वैद्य मेघराज पराडकर
आरोग्य संजीवनी
१. जेवणासंबंधी पाळावयाचे नियम
     पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंद असते. खाल्लेले पचले नाही की, रोग होतात. तसे होऊ नये म्हणून भूक लागल्यावरच जेवावे, म्हणजे जेवलेल्या अन्नाचे नीट पचन होते. भूक लागली नसेल, तर शक्य असल्यास उपवास करावा किंवा अत्यंत अल्प प्रमाणात खावे. पावसाळ्यामध्ये आठवड्यातून एखादा दिवस एकभुक्त राहणे, म्हणजे दुपारी व्यवस्थित जेवण घेऊन रात्री न जेवणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरते.
२. पावसाळ्यात घ्यावयाची विशेष काळजी
अ. पावसाळ्यात स्नानासाठी कोमट किंवा गरम पाणी वापरावे. थंड पाण्याने स्नानाची सवय असलेल्यांनी थंड पाण्याने स्नान करण्यास आडकाठी नाही.
आ. ओलसर किंवा दमट जागेत राहू नये.
इ. ओलसर किंवा दमट कपडे घालू नयेत.
ई. सतत पाण्यात काम करू नये.
उ. पावसात भिजू नये. त्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. भिजल्यास त्वरित कोरडे कपडे घालावेत.
ऊ. पावसाळ्यातील गारठ्यापासूनही संरक्षण करावे.
ए. जागरणामुळे शरिरातील रूक्षता वाढून वात वाढत असल्याने रात्रीचे जागरण टाळावे.
ऐ. दिवसा झोपू नये.
- वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

एकाच वेळी २० उपग्रह सोडण्याचा यशस्वी प्रयत्न !

इस्रोचे अभिनंदनीय यश !
        श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रोने) पीएस्एल्व्ही- सी ३४ या प्रक्षेपकाच्या साह्याने एकाच वेळी २० उपग्रह अवकाशात सोडण्यात २२ जून या दिवशी सकाळी ९.२६ वाजता यश प्राप्त केले. अवकाशात सोडण्यात आलेल्या या २० उपग्रहांचे एकूण वजन १ सहस्र २२८ किलो होते. भारतासमवेत कॅनडा, अमेरिका, जर्मनी आणि इंडोनेशिया या देशांचेही उपग्रह या वेळी सोडण्यात आले. भारताकडून पृथ्वीच्या निरीक्षणासाठी कार्टोसॅट हा उपग्रह सोडण्यात आला आहे. तसेच भारतीय विद्यापिठांनी केलेल्या २ उपग्रहांचाही यात समावेश आहे. याआधी पीएस्एल्व्ही-सी ९ च्या साहाय्याने इस्रोने २००८ मध्ये एकाच वेळी १० उपग्रह अवकाशात सोडले होते. ते सर्व एकाच कक्षेत सोडले होते. २०१४ मध्ये रशियाने एकाच वेळी ३३ उपग्रह सोडले होते. त्यानंतर अद्याप कोणीही इतके उपग्रह एकाच वेळी सोडलेले नाहीत.
        महासागरात भरकटलेले जहाज किंवा जंगलात हरवलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी उपयुक्त ठरणारा स्वयम् उपग्रह पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) बनवला आहे. हा संपूर्णतः भारतीय बनावटीचा आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात बनवलेला उपग्रह आहे.

फलटण येथे कचर्‍याच्या गाडीवर लावण्यात येणारे श्रीरामाचे गीत हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनानंतर बंद !

निवेदन देतांना हिंदु धर्माभिमानी
     फलटण (जिल्हा सातारा) २२ जून (वार्ता.) - फलटण नगरपालिकेच्या वतीने शहरात कचरा गोळा करण्यासाठी प्रतिदिन सकाळी घंटागाडी फिरत असते. शहरातील भागात कचरा गाडी आली आहे, हे फलटणमधील नागरिकांना कळण्यासाठी गाडीवरून गीत रामायणातील श्रीरामाचे गीत प्रतिदिन लावले जात होते. सदरचे गीत कचरा गोळा करणार्‍या गाडीवरून लावले जात असल्याने हिंदूंच्या भावना दुखावत असल्याने ते त्वरित बंद करावे, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फलटणचे मुख्याधिकारी श्री. फरांदे यांना २० जून या दिवशी दिले. त्यानंतर श्री. फरांदे यांनी तातडीने कचरा गाडीवर लावण्यात येणारे रामायणातील श्रीरामाचे गीत बंद करण्याचे आदेश आरोग्य विभागाचे श्री. तुलसे यांना दिले. सदर निवेदन देतांना भाजपचे डॉ. त्रिपुटे, गोरक्षक श्री. जितेंद्र पलंगे, तर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

(म्हणे) सनातन संस्थेवर कारवाई करा !

सनातन संस्थेच्या विरोधात पुरावेच मिळालेले नसतांना अशी मागणी करण्यात काय तथ्य ?
डॉ. हमीद दाभोलकर यांची हिंदुद्वेषी मागणी
     सातारा - सारंग अकोलकरसह ४ संशयितांना पकडले जावे, अशी आमची मागणी आहे. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या मारेकर्‍यांची रेखाचित्रे पोलीस ठाणी, बसस्थानक, रेल्वे स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी लावावीत, अशी मागणी आम्ही जिल्हा पोलिसांना करणार आहोत. डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी आणि सूत्रधार लवकरात लवकर पकडले जावते आणि हिंसेचा प्रसार-प्रचार करणार्‍या संघटनांना सनदशीर मार्गाने चाप लागावा, यासाठी संविधानिक मार्गाने अंनिस लढाई चालू ठेवणार आहे. त्याचप्रमाणे सनातन संस्थेवर कारवाई करावी, अशी मागणी अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत केली. तशी मागणीही अंनिसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
डॉ. हमीद दाभोलकर पुढे म्हणाले, १. सनातनच्या साधकांकडूनच हत्येची कृती झाल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) तपासात उघड झाले आहे. त्यातील संशयित फरार आहे. वर्ष २००९ मध्ये झालेल्या मडगाव बॉम्बस्फोटाचा तपास करतांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने टोकाचा गलथानपणा दाखवला.

मडगाव स्फोटाची चौकशी नव्याने करण्याची दाभोलकर कुटुंबियांची मागणी !

स्वत:ला न्यायालयाच्याही 
वर समजणारे दाभोलकर कुटुंबीय !
       मुंंबई - मडगाव स्फोटाची चौकशी नव्याने करण्यात यावी, या मागणीसाठी दाभोलकर कुटुंबीय पुढील आठवड्यात गोवा उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. वर्ष २००९च्या या स्फोटात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा सहभाग असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासात पुढे आली आहे. या पार्श्‍वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. याविषयी बोलतांना डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की, या प्रकरणाचा केवळ पुनर्तपास नव्हे, तर उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली जलदगतीने याचा तपास व्हावा, यासाठी आम्ही पुढील आठवड्यात एक याचिका प्रविष्ट करणार आहोत. हत्येत सहभागी असलेल्या सारंग अकोलकर आणि अन्य आरोपी यांच्या छायाचित्रांसह एक राज्यव्यापी अभियान चालू केले आहे. ज्या माध्यमातून या आरोपींविषयी माहिती असलेले नागरिक समोर येतील.

आतंकवाद्यांशी लढण्याचे धडे आता शाळेतच मिळणार !

       मुंबई - दहशतवाद आणि हिंसाचार यांचा खात्मा करण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली असून आतंकवादविरोधी धडे आता विद्यार्थीदशेतच देण्यात येणार आहेत. यासाठी नागपूरच्या सुराबुलदी गावात दहशतवादविरोधी शाळा चालू करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला संमती देण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या आतंकवादविरोधी शाळेसाठी निधी देण्यात येणार आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना पोलिसांच्या साहाय्याने जंगल ट्रेनिंग, अचानक झालेल्या आक्रमणापासून बचाव करणे, वेगवेगळी शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (उशिरा का होईना आता शासनाच्या वतीने असे प्रशिक्षण देण्यात येत आहे, हे चांगलेच आहे; मात्र सनातन संस्थेने स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले, तर संस्था आतंकवादी संघटना आहे, तिच्यावर बंदी घाला अशी ओरड पुरो(अधो)गामी करतात ! - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

आम आदमी पक्षाचा गौरव असणारे भ्रष्ट आमदार !
     आम आदमी पक्षाचे देहलीतील आमदार आसिम अहमद खान यांच्यावर सरफराज नावाच्या एका बांधकाम व्यवसायिकाने १५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Aap ke MLA Asim Khan par Sarfaraj nam ke Builderne 15 lakh ki rishwat manganeka arop lagaya hai !
     Bhrasthachar ka virodh karnewalonka Bhrasthachar !
जागो !
: आम आदमी पार्टी के विधायक आसिम अहमद खान पर सरफराज नाम के बिल्डरने १५ लाख रुपयोंकी रिश्‍वत मांगने का आरोप लगाया है । 
      भ्रष्टाचार का विरोध करनेवालोंका भ्रष्टाचार !

धर्मवीर संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या पवित्र कार्यात सहभागी व्हा ! - योगेश शिर्के, हिंदु जनजागृती समिती

भांडुप येथे श्री श्रीमंतयोगी प्रतिष्ठानची धर्मवीर 
संभाजी महाराज जयंतीनिमित्त शंभूज्योतीला मानवंदना !
       भांडुप, २२ जून (वार्ता.) - धर्मवीर संभाजी महाराज यांच्या वेळी जसा धर्म संकटात होता, त्याप्रमाणे आज चारही बाजूंनी हिंदु धर्मावर संकटे आली आहेत. धर्मवीर संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या पवित्र कार्यात सहभागी होऊया. आजचा काळ आणि शंभूरायांचा काळ हा समान आहे. त्यामुळे आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या पवित्र कार्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, हीच काळाची आवश्यकता आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश शिर्के यांनी केले. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १७ जून या दिवशी येथील श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वतीने शंभूराजांच्या चरित्रावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

तत्त्वावर आधारित हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांची स्थापना !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ...
    २२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात अध्यात्मातील तत्त्वांचे महत्त्व आणि कर्मफलन्याय याविषयी माहिती पाहिली. आज त्या पुटील भाग पाहुया. 
३. कलियुगाचा प्रभाव आणि साधनेचे महत्त्व 
३ अ. कलियुगाच्या प्रभावाने विश्‍वात निर्माण 
झालेली अशांती आणि अभद्रता 
       कालचक्र फिरत आहे. आता आपण कलियुगाचा प्रभाव पहात आहोत. आज सर्व राष्ट्रांत अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार आपले अधिपत्य स्थापन करत आहेत. धर्माच्या नावाखाली कट्टरपंथीय धर्मांधांचा अन्याय, जिहादच्या नावाखाली चालू असलेला आतंकवाद, लव्ह जिहाद हे सर्व आता विश्‍वव्यापी झाले आहे. यांच्यामुळे विश्‍वात अशांती आणि अभद्रता निर्माण झाली आहे. दुसरीकडे ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचे षड्यंत्र रचले जाते. क्षणिक सुखाच्या आशेमुळे आपण गरिबीच्या पाशातून मुक्त होऊ शकतो, अशा मानसिकतेमुळे अनेक जण धर्मांतर करत असल्याचे आपण पहातो. संपूर्ण विश्‍वात हे दोन पंथ मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. धर्मांतर केल्याने ख्रिस्ती जग सुखी होईल का ? आतंकवादी जिहादी मानसिकतेमुळे मुसलमान जग सुखी होईल का ? दोन्ही धर्मीय बहुसंख्यांक असलेली राष्ट्रे आज अभद्रतेच्या काळ्या छायेत आहेत. उद्या काय होईल, हे कुणालाच ठाऊक नाही.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

     १९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. 
श्री. उमेश नायक, बेळगाव, कर्नाटक यांना प्रसारसाहित्याविषयी 
माहिती देतांना सनातनच्या कु. युवराज्ञी शिंदे
श्री. संभाजी भोकरे, शिवसेना, उपजिल्हाप्रमुख, कोल्हापूर आणि 
श्री. अनिल (राजू) यादव, शिवसेना, करवीर तालुकाप्रमुख, कोल्हापूर 
यांना प्रसारसाहित्याविषयी माहिती देतांना सनातनच्या सौ. मंगला मराठे

देशातील बहुतांश प्रसारमाध्यमे विदेशींची धार्मिक हस्तक ! - सुरेश चव्हाणके, संचालक संपादक, सुदर्शन न्यूज

हिंदु धर्माच्या संदर्भातील अमूल्य कामगिरीविषयी सुरेश चव्हाणके यांचा सत्कार ! 
* हिंदुत्ववादी संघटनांच्या उपक्रमांच्या प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्‍वासन 
* स्थानिक वृत्तवाहिन्या आणि आकाशवाणी यांद्वारे हिंदु राष्ट्राचे कार्य करण्याची अभिनव कल्पना
श्री. सुरेश चव्हाणके (डावीकडून दुसरे) यांचा सत्कार करतांना
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे सोबत श्री. सुभाष चक्रवर्ती
        विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - भारतात ७३२ दूरचित्रवाहिन्या असून त्यात ४२० वृत्तवाहिन्या आहेत. यातील बहुतांश वाहिन्यांमध्ये विदेशातील पैसा गुंतवण्यात आला आहे. भारतातील देवळांना त्यांच्याकडे आलेले अर्पण अधिकोषात ठेवता येते; मात्र कुठेही गुंतवण्याची मुभा नाही. विदेशातील चर्चला मात्र त्यांचा पैसा भागभांडवल म्हणून व्यावसायिक हेतूने गुंतवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे विविध चर्च त्यांचा पैसा व्यावसायिक आणि धार्मिक कारणासाठी भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये गुंतवत आहेत. परिणामी भारतातील माध्यमे जाणीवपूर्वक हिंदु धर्माच्या विरोधात कार्यरत आहेत, हे वास्तव सुदर्शन न्यूजचे संचालक संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी उघड केले. ते २१ जून या दिवशी सायंकाळच्या सत्रात हिंदु राष्ट्र-स्थापनेतील प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयावर बोलत होते.

हिंदु महिलांनो, राष्ट्र-धर्म रक्षणासाठी पुढाकार घ्या ! - कु. प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र संघटक, रणरागिणी

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात आवाहन
कु. प्रतिक्षा कोरगावकर
१. गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर हिंदु जनजागृती समितीच्या 
रणरागिणी शाखेकडून धर्मपरंपरा रक्षण चळवळीस प्रारंभ !
      हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेचे कार्य गेली ७ वर्षेे चालू आहे. आतापर्यंत रणरागिणी शाखेने लव्ह जिहाद, अश्‍लीलता, महिलांवरील अन्याय, युवतींची छेडछाड आदी अनेक अपप्रकारांच्या विरोधात कार्य केले आहे, तसेच महिलांची शारीरिक अन् मानसिक प्रतिकारक्षमता वाढावी, यासाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण दिलेले आहे. सध्या महिला अधिकारांच्या (हक्कांच्या) नावाखाली हिंदु धर्मातील प्राचीन परंपरा, धर्मशास्त्र आदींवर आघात करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शबरीमला, श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर आणि कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान येथील शेकडो वर्षांच्या परंपरा मोडून समानतेच्या नावाखाली महिलांना चौथर्‍यावर अथवा गर्भगृहात प्रवेश देण्यात यावा, यासाठी आंदोलने केली जात आहेत.
     धर्महीनतेमुळे जगात किंमत शून्य असलेले हिंदू कुठे आणि धर्मपालनाने जगाला भारी ठरलेले मुसलमान कुठे !
      हिंदूंनो, पाकिस्तानधार्जिण्यांवर पूर्णपणे सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घाला अन् त्यांच्याकडून काहीही खरेदी करू नका किंवा त्यांना काही विकूही नका !
- आचार्य स्वामी धर्मेंद्र महाराज (मासिक सावरकर टाइम्स, जून २०१०)

ओडिशातील श्री. प्रेम प्रकाश कुमार यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

ही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले 
यांची कृपा ! - श्री. प्रेम प्रकाश कुमार 
श्री. प्रेम प्रकाश कुमार (उजवीकडे)
यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव
       विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - माझी आध्यात्मिक पातळी घोषित केली जाणे, यात माझे कोणतेही कर्तृत्व नाही. मी काहीही केलेले नाही. अध्यात्मात करणारे कुणीतरी (गुरु) असते आणि त्याचा लाभ कुणालातरी (शिष्याला) होत असतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी मी अपात्र आहे. ही सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच कृपा आहे, असे भावोद्गार ओडिशातील हिंदु धर्माभिमानी श्री. प्रेम प्रकाश कुमार यांनी व्यक्त केले. पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात २२ जूनला सायंकाळच्या सत्रात श्री. प्रेम प्रकाश कुमार यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. सनातन संस्थेचे धर्मप्रसारसेवक पू. नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते श्रीकृष्णाची सनातन-निर्मित प्रतिमा आणि पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

हिंदूंनो, सनातनच्या हिंदु राष्ट्रविषयक ग्रंथांचा अभ्यास करा ! - निखिल कनोजिया, हिंदू सेवा परिषद, मध्यप्रदेश

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील उद्बोधन सत्र देश-विदेशातील हिंदूंची दुःस्थिती
श्री. मनीष सहारिया यांनी व्यक्त केली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता ! 
     श्री. मनीष सहारिया म्हणाले की, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे युगपुरुष आहेत. युगपुरुष परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आपण सर्वजण शरण जाऊन प्रयत्न करूया ! त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयासाठी कार्यरत होत आहोत, याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया !
श्री. निखिल कनोजिया
      विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी आमचा संपर्क आहे. समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांच्याकडून प्रत्येक कार्याविषयी आम्ही सल्ला घेतो. त्यामुळेच आम्ही योग्य पद्धतीने हिंदु धर्माचे कार्य करत आहोत. माझे सर्व हिंदुत्ववाद्यांना आवाहन आहे की, त्यांनी सर्वांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या हिंदु राष्ट्रविषयक ग्रंथांचा अभ्यास करावा ! त्यानुसार जर आपण कार्य केले, तर आपल्याला यश निश्‍चित मिळते, असा आमचा अनुभव आहे, असे ठाम प्रतिपादन जबलपूर (मध्यप्रदेश) येथील हिंदू सेवा परिषदेचे सचिव श्री. निखिल कनोजिया यांनी केले. ते अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील २१ जूनच्या सायंकाळच्या सत्रात बोलत होते.

हिंदु राष्ट्र आणि धर्मरक्षण या सत्राचा उर्वरित वृत्तांत

बांगलादेशी घुसखोरीला आळा घालण्यासाठी सक्षम कायदा 
करा ! - श्री. सूर्यकांत केळकर, संयोजक, भारत रक्षा मंच, मध्यप्रदेश. 
      बांगलादेशातील घुसखोरीच्या विरोधात कार्य करतांना आलेल्या अनुभवांविषयी सांगतांना श्री. सूर्यकांत केळकर म्हणाले, बांगलादेशातून कोट्यवधींच्या संख्येने बांगलादेशी मुसलमान घुसखोर भारतात घुसले आहेत. त्यांनी हिंदूंची भूमी हडप केली असून त्यांच्यामुळे गुन्हेगारी वृत्तीही वाढली आहे. कथित धर्मनिरपेक्ष लोक राजकारणासाठी अशा घुसखोरांना मतदार बनवतात. बांगलादेशातून हिंदू आणि मुसलमान दोन्हीही भारतात आले असले, तरी बांगलादेशी हिंदू तेथील जाचाला कंटाळून जीव वाचवण्यासाठी भारतात आले आहेत; तर बांगलादेशी मुसलमान नोकरीच्या नावाखाली अवैधरित्या भारतात घुसले आहेत. वर्ष २००१ च्या जनगणनेनुसार बांगलादेशातील १ कोटी नागरिक मिसिंग (हरवले) आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रशासनाने बांगलादेशी सरकारशी नुकताच करार केला. त्या करारानुसार सीमानिश्‍चिती करण्यात आली, तसेच काही गावांची अदलाबदल करण्यात आली; मात्र या करारात बांगलादेशातील पीडित हिंदूंच्या सुरक्षिततेविषयी, तसेच बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येविषयी काहीच ठरवण्यात आले नाही. या करारानुसार १० सहस्र एकर भूमी भारताने बांगलादेशला अतिरिक्त दिली. सीमा निश्‍चितीमुळे भविष्यात होणार्‍या घुसखोरीला चांगला आळा बसत असला, तरी आतापर्यंत भारतात झालेल्या मुसलमानांच्या अवैध घुसखोरीसंदर्भात ठोस उपाययोजना काढण्याची, तसेच त्या संदर्भात कठोर कायदा बनवण्याची आवश्यकता आहे.

गोमातेचे महत्त्व दर्शवणारा एका हिंदुत्वनिष्ठ उद्योगपतींना आलेला अनुभव

गोमातेमुळे वडिलांचा कर्करोग बरा झाला ! - 
श्री. अनंंत कामत, उद्योगपती, दक्षिण कन्नड, कर्नाटक 
       माझेही जीवन सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे होते. सनातन संस्थेशी संपर्क आल्यावर प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला जीवनाचा अर्थ समजला. साधनेला प्रारंभ केला. त्याचबरोबर व्यवसायासह मी एक गोशाळाही चालू केली.
       माझ्या वडिलांना कर्करोग असल्याचे समजले. आधुनिक वैद्यांनी ते अधिकतर ६ मास जगतील, असे सांगितले होते. त्यांना रुग्णालयातून घरी आणले. वडील संपूर्ण शाकाहारी होते, तसेच त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. एवढेच नव्हे, तर ते प्रतिदिन १ घंटा व्यायामही करत होते. असे असतांना त्यांना कर्करोग कसा झाला ? याचा मी विविध माध्यमांतून शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर व्यवसायानिमित्त माझी एका व्यक्तीशी ओळख झाली. त्यांच्याकडून समजले की, विदेशी (जर्सी) गायींमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यांसह अनेक रोग होतात. त्यानंतर त्यांनी माझ्या गोशाळेत ४० गायींपैकी ९ गायी संकरित असल्याचे सांगितल्याप्रमाणे मी त्या ९ गायी दुसर्‍या गोशाळेत पाठवून दिल्या. व्यावसायिक मित्राने दिलेल्या सल्ल्यानुसार देशी गायीचे प्रतिदिन दूध आणि सकाळी गोमूत्र वडिलांना देण्यास चालू केले. त्यानंतर १४ मासानंतर वडिलांची आरोग्य तपासणी केल्यावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे लक्षात आले. त्यांचा पी.एस्.आय. २८२ वरून ०.९ वर आला होता. हे प्रारंभी आधुनिक वैद्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी वडिलांचा अहवाल पुन्हा १ मासानंतर दाखवण्यास सांगितले. त्यानंतरही त्यांचा अहवाल सकारात्मक असल्याचे आढळून आले. याचे आधुनिक वैद्यांनाही आश्‍चर्य वाटले. केवळ गोमाता आणि प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) यांच्या आशीर्वादानेच हे घडू शकले.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

धर्मकार्यासाठी पुन: पुन्हा जन्म मिळावा, अशी इच्छा बाळगणारे वैशिष्ट्यपूर्ण हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता हरि शंकर जैन !

    
अधिवक्ता हरि शंकर जैन
लखनौ येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी धर्मकार्य करण्यासाठी पुनः पुन्हा जन्म मिळावा, अशी इच्छा बोलता बोलता व्यक्त केली. यावरून त्यांची राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्याची तळमळ आणि दृढ भाव व्यक्त होतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातन संस्थेला आतंकवादी ठरवू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांचा वैचारिक आतंकवाद !

  • एखाद्या सराईत रहस्यकथाकारालाही लाजवेल, अशा कपोलकल्पित कथा रचणार्‍या प्रसारमाध्यमांची पीतपत्रकारिता !
  • पीतपत्रकारिता म्हणजे कोणतीही शहानिशा न करता सनसनाटी निर्माण करण्यासाठी, वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी प्रसारित केलेली खोटी आणि निराधार वृत्ते होय !
      १० जून या दिवशी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून त्यांच्याविषयी आणि सनातनविषयी धादांत खोटी माहिती देणारी अनेक वृत्तांची मालिकाच चालू झाली. ही वृत्ते त्यांना कोण पुरवत होते, हा प्रश्‍न आहेच आणि ती वृत्ते जर केंद्रीय अन्वेषण विभाग पुरवत होता, तर या विषयाचे गांभीर्य पाहून त्याने पत्रकार परिषद का घेतली नाही ?, असा प्रश्‍न निर्माण होतो. या कथित वृत्तांतील असत्यकथन काळाच्या ओघात उघडे पडेलच; मात्र या कालावधीत सनातन संस्था, संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांची मोठ्या प्रमाणात अपकीर्ती झाली. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची सत्य बाजू लोकांच्या समोर येण्यासाठी अशा वृत्तांचे खंडण करणारे हे सदर क्रमशः चालू करत आहोत.

श्रीकृष्णाच्या गोकुळी रमले वेदांत अन् वैभवी ।

धर्मकार्याची तळमळ असलेला साधक वेदांत ।
व्यवस्थापनाच्या सेवेचे नियोजन करतो निवांत ॥ १ ॥

६३ टक्के आध्यात्मिक पातळीची बालसाधिका आहे भूवर ।
वेदांतची लहान बहीण कु. वैभवी झरकर ॥ २ ॥

अशी ही भावंडे पाहिली श्रीकृष्णाच्या गोकुळी (टीप १) ।
त्यांची तळमळ पाहूनी गुरुकृपेने सुचल्या चार ओळी ॥ ३ ॥
टीप १ : रामनाथी आश्रम
- एक धर्मसेवक

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. तुम्हाला असे वाटते का की, हिंदूंच्या काही समस्या आहेत किंवा स्वतःला हिंदु म्हणणेच एक समस्या आहे
२. गोध्रा प्रतिक्रिया अतिरंजित करण्यात आली; मात्र काश्मीरमधून चार लाख हिंदूंना हाकलून दिल्याविषयी कोणी काहीच का बोलत नाही ?
३. वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तान निर्माण केले, तेव्हा पाकिस्तानमध्ये हिंदू २४ टक्के होते. आज १ टक्कासुद्धा नाही. पूर्व पाकिस्तानात वर्ष १९४७ मध्ये हिंदू ३० टक्के होते. आज बांगलादेशात ७ टक्के हिंदू उरले आहेत. नाहीशा झालेल्या हिंदूंचे काय झाले? त्यांना आणि एकंदरीत हिंदूंना मानवाधिकार आहेत का ?
४. हिंदुस्थानात मुसलमान समाज वर्ष १९५१ मध्ये १०.४ टक्के होता, तो आज १४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर हिंदु समाज १९५१ मध्ये ८७.२ टक्के होता, तो २००१ मध्ये ८१.५ टक्के इतका अल्प झाला आहे. एकातरी राजकारण्याची मुसलमानांना कुटुंब नियोजन करण्यास सांगण्याची हिंमत आहे का?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस


गुरुपौर्णिमेला २६ दिवस शिल्लक

    
     चंदनवृक्ष जसा जवळच्या सामान्य वृक्षांनाही सुवासिक बनवतो, त्याप्रमाणे आपल्या केवळ सान्निध्याने शिष्याला तारून नेणारे, ज्यांच्या केवळ सान्निध्यानेच जीवनात सुगंध निर्माण होतो, ते चंदन गुरु. चंदन स्वतःला घासून घेऊन दुसर्‍यांना सुगंध देते; त्याप्रमाणे असे गुरु प्रभुकार्यासाठी स्वतःला झिजवून जगात सुगंध पसरवितात. असे गुरु वाणीने नाही, तर स्वतःच्या वर्तनाने उपदेश देतात.

पू. चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी साधिकांना जाणवलेली सूत्रे

गुरुपौर्णिमा मास २०१६
    १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

प्रत्येक जीव त्याच्यातील त्रिगुणांच्या प्रमाणानुसार त्या त्रिगुणांना पोषक असलेल्या वातावरणात जन्माला येत असणे

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
     एखादा खाण्याचा पदार्थ कुजला की, त्यामध्ये अळ्या होतात. आपल्याला प्रश्‍न पडतो, तो पदार्थ डब्यात बंद असतांना त्यामध्ये अळ्या होतात कशा ? त्यावर प.पू. पांडे महाराजांनी त्यांच्या लेखामध्ये स्पष्टीकरण दिले की, वस्तूतः तो पदार्थ चांगला असतांनाही त्यामध्ये अनेक सूक्ष्म जीव असतातच; पण तेव्हा त्या पदार्थातील सत्त्वगुणामुळे त्या जिवांची वाढ होत नाही. ते अकार्यरत असतात. या संदर्भात देवाने पुढील तत्त्व सांगितले.
     प्रत्येक जिवामध्ये सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे ठराविक प्रमाण असते. ती त्याची प्रवृत्ती असते. त्या ठराविक त्रिगुणांच्या प्रमाणाला पोषक वातावरण असल्याशिवाय त्या जिवाची वाढ होत नाही, उदा. आंबा कुजला की, त्यातील सत्त्वगुणाचे प्रमाण अल्प होऊन तमोगुणाचे प्रमाण वाढते. ती परिस्थिती पोषक असलेले जे जीव असतात, ते त्या परिस्थितीत वाढीस लागतात. याचे आणखी एक चांगले उदाहरण म्हणजे जगभरातील सर्व देशांपेक्षा भारत भूमी ही सत्त्वगुणी आहे; म्हणूनच या भूमीत अवतार आणि संतमहात्मे जन्माला आले. अन्य ठिकाणी नाही. तसेच अवतार आणि संतमहात्मे ज्या मातेच्या उदरी जन्माला येतात, ती माता इतरांपेक्षा अधिक सत्त्वगुणी असते. हा त्या संदर्भातील एक निकष आहे.
     सध्या भारत भूचा सत्त्वगुण अल्प झाल्याने भारतातील सत्त्वगुणी लोकांचे प्रमाण अल्प झाले आहे. ते वाढण्याकरता सनातन संस्था गेली २५ वर्षे अध्यात्मप्रसार आणि धर्मजागृती ही समष्टी साधना करत आहे.
- (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.६.२०१६)

असे हे ईश्‍वरी नियोजन अनुभवा मिळे आम्हा ।

मुहूर्तमेढ केली त्यांनी । हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची ।
त्या भगव्या सूर्याची । येईल लवकरच रामराज्य ।
पाऊल पडता रामनाथीद्वारी (टीप १) ॥ १ ॥

पहाट झाली सनातनची ।
अन् हिंदु जनजागृतीची (टीप २) ।
अनुभवू पहाट रामराज्याची । 
नांदेल तेथे सुखसमृद्धी अन् शांती ।
प्रत्येक तरुण-तरुणी होईल धर्माचरणी ॥ २ ॥

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांची आवड असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मुलुंड, मुंबई येथील चि. ईश्‍वरी योगेश महाडीक (वय ११ मास) !

चि. ईश्‍वरी महाडीक
     मुलुंड, मुंबई येथील चि. ईश्‍वरी योगेश महाडिक हिचा ज्येष्ठ कृष्ण पक्ष तृतीया (२३.६.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. चि. ईश्‍वरी हिच्याविषयी सौ. मीना महाडीक (ईश्‍वरीची आजी) आणि चि. ईश्‍वरीचे वडील श्री. योगेश यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
चि. ईश्‍वरी हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून आशीर्वाद
१. सौ. मीना महाडीक (आजी)
१ अ. बाळाच्या जन्मापूर्वी 
१ अ १. दैवी बालकाच्या जन्माविषयी मिळालेला स्वप्नदृष्टांत ! : माझ्या मुलाचा विवाह झाल्यावर साधक-बाळ जन्माला यावे, अशी मी श्रीकृष्णाच्या चरणी मनोमन प्रार्थना करत होते. बाळ जन्माला येण्यापूर्वी माझ्या बहिणीच्या मुलाच्या स्वप्नात एक देवी बालरूपात येऊन काका, काका असे म्हणत होती. त्याने याविषयी त्याच्या गुरूंना विचारल्यावर त्यांनी सांगितले, तुमच्या जवळच्या नात्यामध्ये एक दैवी बालक जन्माला येणार आहे.

रामनाथी आश्रमात जायचे आहे, असे समजल्यावर आणि रामनाथी आश्रमात आल्यानंतर झालेली साधिकेच्या मनाची स्थिती !

सौ. आसावरी म्हसकर
१. रामनाथी आश्रमात जाण्याआधी
१ अ. रामनाथी आश्रम पहाण्याची इच्छा असणे आणि आश्रमात जायला मिळणार, हे समजल्यावर मनात नकारात्मक विचार येऊनही जाण्याचा निश्‍चय होणे : मी मिरज येथील सनातनचा आश्रम सोडून अन्य कुठलाच सनातनचा आश्रम पाहिला नव्हता. घरी अथवा आश्रमात जाण्यासाठी साधक मिरज आश्रमात आले की, त्यांना पाहून माझ्या मनात मला रामनाथी आश्रमात जायला कधी मिळणार ?, असा विचार यायचा. ७.२.२०१६ या दिवशी मिरज आश्रमातून १० साधकांना रामनाथी आश्रम पहाण्यासाठी पाठवण्याचे नियोजन झाल्याचे मला समजले. या साधकांमध्ये माझेही नाव असल्याचे समजल्यावर मला हा दिवस कधी उजाडतो, असे झाले. त्याच वेळी माझ्या मनात नकारात्मक विचारही येऊ लागले. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी स्वतःकडून काहीच प्रयत्न होत नाहीत, या विचाराने आश्रमात जाणे नको वाटू लागले. देव जवळ करील कि नाही, हे ठाऊक नाही. निदान आश्रम तरी पाहूया, या विचाराने रामनाथीला जाण्यासाठी माझ्या मनाचा निश्‍चय झाला.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडून त्याची अपेक्षित अशी फलनिष्पत्ती मिळावी, याकडे महर्षींचे असलेले लक्ष आणि त्यासाठी त्यांनी करायला सांगितलेले उपाय

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. १९.६.२०१६
अधिवेशनाचा पहिला दिवस
१ अ. अधिवेशनासाठी तिरुवण्णामलई येथील अग्नितत्त्वाची ऊर्जा आणि आशीर्वाद मिळवून देणे : १९.६.२०१६ या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महर्षींनी आम्हाला तमिळनाडू राज्यातील तिरुवण्णामलई येथे अग्निक्षेत्रात (अग्नितत्त्व असलेल्या ठिकाणी) रहायला सांगितले. तेथे राहून त्यांनी आम्हाला शिव आणि श्रीविष्णु या दोघांना प्रार्थना करायला सांगितले. तसेच आम्हीही अधिवेशनासाठी प्रार्थना करू, असे महर्षी म्हणाले.
१ आ. तिरुवण्णामलई येथील श्री मूकांबिकादेवी आणि बालाजी यांना अभिषेक घालायला अन् गाय-वासरू यांचे पूजन करायला सांगणे आणि गोपूजनाच्या वेळी गायीने गोमय अन् गोमूत्र देऊन अधिवेशनाला असलेल्या देवाच्या कृपेची साक्ष देणे : तिरुवण्णामलई येथे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घराच्या बाजूला श्री मूकांबिकादेवी आणि बालाजी यांच्या मूर्तींची स्थापन केली आहे, तसेच तेथे गेली काही वर्षे उपासनाही केली आहे. महर्षींनी आम्हाला त्या देवांना सायंकाळी ६ वाजता अभिषेक करायला सांगितले. तसेच तेथे गाय-वासरू यांचे पूजनही करायला सांगितले. त्या वेळी मिळालेली देवाच्या कृपेची साक्ष म्हणजे, गायीचे घरासमोर पूजन होत असतांना तिने गोमय आणि गोमूत्र दोन्ही दिले. हे अत्यंत शुभचिन्ह असते.

गोपीभाव विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
गोपीभाव वाढवण्यासाठी 
उपयुक्त मजकूर या अंकात वाचा !
प्रसिद्धी दिनांक : २६ जून २०१६
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ जून 
या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात २३ जून या दिवशी चर्चिले जाणारे विषय !

सकाळी ९.४५ ते १२.३०
उद्बोधन सत्र : वैचारिक मार्गदर्शन आणि राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणासंदर्भातील आंदोलन
१. अखिल भारतीय हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशन : उद्देश आणि प्रस्तावनात्मक विवेचन
२. आपल्या इतिहासाकडे कशा प्रकारे पहावे ?
३. हिंदुत्वाचा अपप्रचार करणार्‍यांचे धर्मशास्त्राच्या दृष्टीकोनातून खंडण कसे करावे ?
४. राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी करण्यात येणार्‍या आंदोलनांचे विषय निवडणे, आंदोलनाच्या रूपरेषेचे स्वरूप आणि अन्य हिन्दुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न
५. सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात आंदोलन अथवा प्रत्यक्ष कृतीशील होण्याची आवश्यकता !

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणावर प्रेम करीत नाही. प्रेम मला खेचते.
 मी प्रेमात फसेन म्हणून मी प्रेमात अडकलो.
भावार्थ : मी प्रेम कोणावर करीत नाही, यातील प्रेम शब्द हा व्यावहारिक, मायेतील प्रेमासंबंधी आहे. प्रेम मला खेचते, यातील प्रेम म्हणजे प्रीती, पारमार्थिक प्रेम. नामधारकाचे प्रेम मला खेचते, म्हणजे मला त्याच्याविषयी ओढ वाटते.
     मी प्रेमात फसेन, यातील प्रेम हा शब्द व्यावहारिक प्रेमासंबंधी आहे. म्हणून मी प्रेमात अडकलो, यातील प्रेमात हा शब्द प्रीती म्हणजे पारमार्थिक प्रेम या अर्थाने वापरला आहे. थोडक्यात व्यावहारिक प्रेमात फसू नये, म्हणून मी पारमार्थिक प्रेमात अडकलो आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
स्वार्थासाठी राजकीय पक्ष बदलणारे सहस्रो असतात; पण स्वार्थत्यागी सांप्रदायिकांच्या मनाला संप्रदाय पालटण्याचा विचार एकदाही मनाला शिवत नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणेबोधचित्र

अहंला व्यापकतेत नेले की, तो शून्य होता !

प.पू. पांडे महाराज
      समष्टी साधनेचा आकार वाढला की, अहं घटत जातो; म्हणून समष्टी साधना करावी. धुराड्यातून निघणारा धूर अत्यंत दाट असतो. तो आकाशात पसरतो, तेव्हा नाहीसा होतो. साधनेत व्यापकता असली पाहिजे. अहंला व्यापकतेत नेले की, तो शून्य होतो. - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१४) 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

इच्छांवर मर्यादा हवी ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
मनात निर्माण होणार्‍या इच्छा कशा पूर्ण होतील, याचा सतत विचार करून त्या पूर्ण करण्यापेक्षा इच्छा मर्यादित केल्या, तरच मानसिक शांतीचा लाभ होईल ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

खरे शत्रू शेजारीच !

संपादकीय
      अणूपुरवठादार देशांच्या गटात (एन्एस्जी) भारताचा समावेश होणार कि नाही, हे २३ आणि २४ जून या दिवशी अणूपुरवठादार देशांच्या दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथ होणार्‍या बैठकीत स्पष्ट होईल. या गटात आपला समावेश व्हावा, यासाठी एकीकडे भारत प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे भारताला रोखण्यासाठी चीनची कमालीची खटपट चालू आहे.
     भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढती जवळीक, हे चीनचे भारतविरोधामागील कारण सांगितले जाते; पण ती वस्तूस्थिती नाही. मुळात दोन्ही देशांचा एकमेकांकडे बघण्याच्या दृष्टीकोनामागील मानसिकता जाणून घेतली पाहिजे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn